Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

काश्मिरी हिंदूंचे पुनर्वसन होईपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही ! - प्रमोद मुतालिक, राष्ट्रीय अध्यक्ष, श्रीराम सेना

व्यासपिठावर उपस्थित असलेले
विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे प्रतिनिधी

  • फेसबूक, यूस्ट्रीम प्रणाली यांच्या माध्यमातून सहस्रोंनी घेतला हिंदु धर्मजागृती सभेचा लाभ !  
  • पुणे येथील हिंदु धर्मजागृती सभेला ४ सहस्रांहून अधिक धर्माभिमानी हिंदूंची उपस्थिती
        पुणे, २४ ऑक्टोबर (वार्ता.) - जम्मू-काश्मीरमधील समस्या ही केवळ त्या राज्याची नाही, तर ती राष्ट्रीय समस्या आहे. जिहाद्यांकडून साडेचार लक्ष काश्मिरी हिंदूंवर ते केवळ हिंदु असल्याच्या कारणावरून अत्याचार झाले. दुर्दैवाने स्वातंत्र्यानंतरसुद्धा हे अत्याचार चालूच आहेत. संपूर्ण देश इस्लाममय करण्याचे धर्मांधांचे ध्येय आहे; पण राज्यकर्त्यांना धर्मांधांची ही मानसिकता समजलेली नाही. किंबहुना सत्तेच्या लालसेपोटी राज्यकर्ते देशहित पहाण्यास विसरून गेले आहेत. जोपर्यंत काश्मिरी हिंदूंचे काश्मीरमध्ये सन्मानपूर्वक पुनर्वसन होणार नाही, तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही, असे प्रतिपादन श्रीराम सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. प्रमोद मुतालिक यांनी केले. 
        काश्मिरी हिंदूंच्या समर्थनासाठी २३ ऑक्टोबर या दिवशी येथील रमणबाग शाळेच्या पटांगणावर काश्मिरी हिंदूंच्या पुनर्वसनासाठी हिंदूंना जागृत आणि कृतीशील करण्यासाठी आयोजित केलेल्या हिंदु धर्मजागृती सभेत ते बोलत होते. 

सामाजिक संकेतस्थळाद्वारे कोट्यवधी लोकांना काश्मिरी हिंदूंना समर्थन करण्याचे आवाहन !

       प्रारंभीपासूनच धर्मजागृती सभेचा सामाजिक संकेतस्थळांच्या माध्यमातून प्रसार करण्यात येत होता. २२ ऑक्टोबर या दिवशी चलो कश्मीर या नावाचा ट्विटर ट्रेंड काही कालावधीसाठी पहिल्या क्रमांकावरही होता. आतापर्यंत झालेल्या प्रसारादरम्यान ४५ सहस्र लोकांपर्यंत व्हॉट्स अ‍ॅपच्या माध्यमातून, १ सहस्र २०० जणांपर्यंत संगणकीय पत्राच्या माध्यमातून, ३५ लक्ष लोकांपर्यंत ट्विटरच्या माध्यमातून, ४ कोटी २० सहस्र लोकांपर्यंत फेसबूकच्या माध्यमातून पनून कश्मीरचा विषय पोचवण्यात आला. सभेच्या निमित्ताने ९ सहस्र ४०० व्हॉइस कॉलही करण्यात आले. 
मनसेचे श्री. कैलास दांगट यांच्याकडून ७५ सहस्र जणांना लघुसंदेश 
     मनसेचे वारजेचे जनसेवक श्री. कैलास दांगट यांनी ७५ सहस्र जणांना धर्मजागृती सभेचे लघुसंदेशाद्वारे निमंत्रण दिले. (धर्मकार्यात योगदान देणारे श्री. कैलास दांगट यांचे अभिनंदन ! - संपादक)हिंदु धर्मजागृती सभेला उपस्थित संत आणि मान्यवर !

संत आणि सांप्रदायिक
     प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पू. (श्रीमती) निर्मला दाते, पू. (श्रीमती) विजयालक्ष्मी काळे, पू. शेडगे महाराज, पू. रामनाथजी येवले महाराज, मोतीराम महाराज संस्थानचे अध्यक्ष श्री. मंचिकराव पोळ, ह.भ.प. भाजंग महाराज जाधव, ह.भ.प. मंचक महाराज कराळे, ह.भ.प. पांडुरंग महाराज परभणीकर, राष्ट्रीय वारकरी सेनेचे ह.भ.प. भानुदास कोकरे महाराज 
उपस्थित अन्य हिंदुत्वनिष्ठ
पक्ष - शिवसेना पुणे शहर संघटक श्री. श्याम देशपांडे, शिवसेनेचे विद्युत महावितरण सदस्य श्री. भरत (आबा) कुंभारकर, कसबा येथील भाजप युवा मोर्च्याचे उपाध्यक्ष श्री. संतोष फडताळे, भाजप युवा मोर्च्याचे पुणे शहराध्यक्ष श्री. संतोष परदेशी, पुणे महानगरपालिकेचे सभासद श्री. जयदीप पडवळ

हिंदु धर्मजागृती सभेत श्री. प्रमोद मुतालिक यांचे समस्त हिंदूंना आवाहन !

हिंदूंनो, आगामी काळात रस्त्यारस्त्यांवर लढाया (स्ट्रीट फाईट) 
चालू होतील. त्या वेळी केवळ काही लक्ष संख्येने असलेले पोलीस 
कोट्यवधी हिंदूंना वाचवू शकणार नाहीत. त्यामुळे हिंदूंनी स्वसंरक्षण प्रशिक्षण घ्या !
      ज्या वेळी काश्मीरमधील लक्षावधी हिंदू जिहादी आतंकवादाचे बळी ठरले, त्या वेळी देशभरातील अन्य मुसलमानांनी काश्मिरी हिंदूंच्या बाजूने आवाज उठवला नाही. त्यामुळे जोपर्यंत काश्मिरी हिंदूंचे काश्मीरमध्ये सन्मानपूर्वक पुनर्वसन होत नाही, तोपर्यंत भारतातील धर्मांध इस्लामी शक्तींना सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या बहिष्कृत करा.

हिंदु धर्मजागृती सभेचे थेट प्रक्षेपण !

     या सभेचे फेसबूक आणि युस्ट्रीमवर होमलँड वाहिनीवरून थेट प्रक्षेपण करण्यात आले. फेसबूकच्या माध्यमातून ५०० हून अधिक, तर युस्ट्रीमच्या माध्यमातून २ सहस्रांहून अधिक जोडण्यांच्या माध्यमातून सहस्रोंनी ही सभा प्रत्यक्ष अनुभवली !

हिंदुत्वनिष्ठांचे अभिप्राय !

१. हिंदु जनजागृती समिती केवळ देवळांसाठी नव्हे, तर देशासाठीही सभेच्या माध्यमातून व्यापक स्तरावर कार्य करत आहे. 
- श्री. विद्याधर नागोलकर, सावरकर प्रतिष्ठान, पुणे
२. काश्मिरी हिंदूंसाठी १४६ संघटना एकत्रित आल्या. या माध्यमातून आता सर्वत्रच्या हिंदूंचे संघटन होईल आणि लवकरच हिंदु राष्ट्राची निर्मिती होईल !
- श्री. विनयकुमार पंधे, हिंदुत्वनिष्ठ
३. काश्मिरी हिंदूंच्या पुनर्वसनासाठी महाराष्ट्राची भूमिका नेहमी आधाराची आणि महत्त्वाची राहिली आहे. या सभेच्या माध्यमातून इतकाच सांगायचे आहे की, तुम्ही जर जागृत झाला नाहीत, तर काश्मिरी हिंदूंवर जी वेळ आली, ती उद्या तुमच्यावर येईल; म्हणून जागृत व्हा ! 
- श्री. अरूण भट, पनून काश्मीर वैशिष्ट्यपूर्ण !
१. हुतात्मा सैनिक आणि जिहादी आतंकवादाचे बळी ठरलेले काश्मिरी हिंदू यांना श्रद्धांजली ! 
     सभेच्या प्रारंभी उरी येथील आतंकवादी आक्रमणात हुतात्मा झालेले भारतीय सैनिक, तसेच जिहादी आतंकवादाला बळी पडून प्राण गमवावे लागलेले काश्मिरी हिंदू यांना श्रद्धांजली वहाण्यात आली. या वेळी सर्वांनी हात जोडून श्री गुरुदेव दत्त असा नामजप केला. 
२. प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी यांनी सभेसाठी प्रार्थनारूपी मंत्र म्हटला !
     सभेला उपस्थित प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी यांनी सभेच्या प्रारंभी सभा निर्विघ्नपणे पार पडण्यासाठी प्रार्थनारूपी मंत्र म्हटला. हिंदु राष्ट्र आहेच. पुढे त्याची अजून प्रगती होईल, असा आशीर्वाद देत प.पू. श्रीकृष्ण कर्वे गुरुजी यांनी उपस्थितांकडून प्रार्थना, तसेच विश्‍वदर्शनदेवतेचा मंत्रजप ११ वेळा करवून घेतला. (धर्मकार्य आणि राष्ट्रकार्य करण्यासाठी आध्यात्मिक शक्ती पुरवणार्‍या प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी यांच्या चरणी सर्व हिंदुत्वनिष्ठ आणि राष्ट्रप्रेमी कृतज्ञ आहेत. - संपादक) 
       प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी प्रार्थनारूपी मंत्र म्हणेपर्यंत एक पक्षी व्यासपिठाच्या मागे असलेल्या झाडावर बसून होता. प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी यांची प्रार्थना संपल्यानंतर हा पक्षी उडून गेला.
क्षणचित्रे
१. माँ अंबे, वीर जवानों को ऐसा वरदान हो । काश्मीर के साथ साथ मे पुरा पाकिस्तान दो । जय जय अंबे माँ, जय जगदंबे माँ । या क्षात्रवृत्तीपूर्ण गीताने सभेच्या पूर्वी केली वातावरणनिर्मिती ! 
२. काश्मिरी हिंदूसाठी प्रारंभीपासून नेटाने लढा देणारे पनून कश्मीरचे डॉ. अजय च्रोंगू आणि जम्मू फॉर इंडियाचे डॉ. हरि ओम् यांचा सत्कार केला श्रीराम सेनेचे अध्यक्ष श्री. प्रमोद मुतालिक यांनी ! 
३. अनेक हिंदुत्वनिष्ठांनी घोषणा देत सभास्थळी प्रवेश केल्याने सभास्थळी निर्माण झाले क्षात्रवृद्धी करणारे उत्साहाचे वातावरण ! 
४. सभेसाठी येणार्‍या धर्माभिमान्यांसाठी शिवसेनेने केले पाणीवाटप ! 
५. सभास्थळी लावलेल्या फॅक्ट चित्रप्रदर्शनाने विदीत केली काश्मिरी हिंदूंवरील अत्याचारांची भीषणता ! 
६. वक्त्यांनी महाराष्ट्राचे युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराष्ट्राचे भूषण शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा त्यांच्या भाषणात आवर्जून उल्लेख करून राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणातील त्यांच्या योगदानाचा केला गौरव !

हिंदुत्वनिष्ठांच्या सभेला पोलिसांचीही उपस्थिती !

१. सभास्थळी पोलिसांचा बंदोबस्त होता. (हाच वेळ पोलिसांनी आतंकवाद्यांच्या शोधार्थ दिला असता, तर एव्हाना देश आतंकवादमुक्त झाला असता ! - संपादक) 
२. सभेपूर्वी युथ फॉर पनून काश्मीरचे राष्ट्रीय संयोजक श्री. राहुल कौल यांना पोलिसांनी कलम १४९ अन्वये नोटीस बजावली. तसेच पोलिसांनी संपूर्ण सभेचे ध्वनीचित्रीकरण केले. (पोलिसांनी हीच तत्परता देशद्रोही वक्तव्ये करणार्‍यांच्या विरोधात दाखवावी ! - संपादक)
३. सभेच्या प्रवेशद्वाराशी संरक्षणाचा भाग एक म्हणून पोलिसांनी दोन्ही प्रवेशद्वारांच्या ठिकाणी मेटल डिटेक्टर उभारले होते.

सभेनंतर झालेल्या गटचर्चेला उत्स्फूर्त प्रतिसाद !

     राष्ट्रकार्यात सहभागी होऊ इच्छिणार्‍या, तसेच काश्मीरमध्ये जाऊ इच्छिणार्‍या हिंदुत्वनिष्ठांशी चर्चा करण्यासाठी आणि त्यांचे शंकानिरसन करण्यासाठी सभेनंतर झालेल्या गटचर्चेत १०० हून अधिक धर्माभिमानी सहभागी झाले होते. चलो काश्मीर अभियानाला समर्थन देऊन त्यात सर्व प्रकारे सहभागी होण्याचे या वेळी ठरवण्यात आले. या वेळी श्री. रमेश शिंदे, श्री. अभय वर्तक, श्री. सुनील घनवट, श्री. देवदास शिंदे, श्री. अनिल धीर, श्री. अभिजीत देशमुख, तसेच सद्गुरु स्वाती खाडये यांनी उपस्थित जिज्ञासूंना कृतीशील होण्याच्या दृष्टीने मार्गर्शदन केले. सन्माननीय वक्त्यांंच्या हस्ते सनातनच्या ग्रंथांचे प्रकाशन !

सनातनच्या हिंदी भाषिक ग्रंथाचे प्रकाशन झाले तो क्षण !
      या वेळी सनातन संस्थेच्या मराठी भाषेतील सात्त्विक रांगोळ्या (भाग १) या ग्रंथाचे शिवसेनेचे तमिळनाडू राज्याचे अध्यक्ष श्री. राधाकृष्णन यांच्या हस्ते; तर हिंदी भाषेतील टीवी, मोबाईल एवं इंटरनेट की हानिसे बचें और लाभ उठाएं ! या हिंदी ग्रंथाचे श्रीराम सेनेचे राष्ट्र्रीय अध्यक्ष श्री. प्रमोद मुतालिक यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.

...अन् पुण्यात घुमला राष्ट्रीयत्वाचा बुलंद आवाज !

      जिस कश्मीर को खून से सिचाँ, वो कश्मीर हमारा है, कश्मीर मे भारत की तसबीर पनून कश्मीर पनून कश्मीर वुई वॉन्ट होमलॅण्ड, कश्मीर तो होगा लेकीन पाकिस्तान नही होगा, पनून कश्मीर का नारा क्या ? ॐ भुः भुवस्वः अशा नानाविध घोषणांनी २३ ऑक्टोबर या दिवशी सायंकाळी रमणबाग शाळेचे मैदान दुमदुमून गेले ! रमणबाग शाळेच्या पटांगणावर काश्मिरी हिंदूंचे काश्मीरमध्ये सन्मानाने पुनर्वसन व्हावे आणि काश्मीर हा कलम ३७० लागू नसलेला एक स्वतंत्र केंद्रशासित प्रदेश निर्माण व्हावा या उद्देशाने एक भारत अभियानांतर्गत हिंदु धर्मजागृती सभेचे आयोजन करण्यात आले होते. काश्मिरी हिंदूंचा आवाज बुलंद करण्यासाठी एक भारत अभियान या राष्ट्रव्यापी उपक्रमांतर्गत देशवासियांमध्ये राष्ट्रभक्तीची ज्योत पेटवून हिंदुत्वप्रेमी मावळ्यांचे संघटन निर्माण केले जात आहे. पुण्यात झालेल्या हिंदु धर्मजागृती सभेच्या निमित्तानेही पुन्हा एकदा धर्मबंधुत्वाच्या भावापोटी देशभरातील हिंदुत्वनिष्ठ धर्म अन् राष्ट्र यांच्या रक्षणासाठी संघटित झाले... आणि हीच सर्वांचे ध्येय असलेल्या हिंदु राष्ट्र स्थापनेची नांदी ठरली !

...असा झाला हिंदु धर्मजागृती सभेचा आरंभ !

  • जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम्च्या गजरात मान्यवर वक्त्यांचे सभास्थळी आगमन झाले. 
  • हिंदु जनजागृती समितीचे श्री. इंद्रजित वाडकर यांनी केलेल्या शंखनादाने सभेला प्रारंभ झाला !
  • सद्गुरु (कु.) स्वाती खाडये, डॉ. अजय च्रोंगू, डॉ. हरि ओम्, श्री. मुरली मनोहर शर्मा आणि अन्य मान्यवर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. 
  • श्री. टी.एन्. मुरारी यांच्या हस्ते हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला.
  • श्री. अंबरीश वझेगुरुजी आणि श्री. विपुल माणकेगुरुजी यांनी म्हटलेल्या वेदमंत्रपठणाने वातावरण चैतन्यमय झाले !
  • उपस्थित संत आणि मान्यवर वक्ते यांचा धर्माभिमान्यांच्या हस्ते अनुक्रमे सन्मान आणि सत्कार करण्यात आला. 
  • काश्मिरी हिंदूंवर झालेल्या अत्याचाराचे वास्तव दर्शवणारी & आणि जग शांत राहिले ही ध्वनीचित्र-चकती पडद्यावर दाखवण्यात आली. 
  • सौ. नेहा मेहता आणि कु. गौरी फणसळकर यांनी म्हटलेल्या संपूर्ण वन्दे मातरम्ने धर्मसभेची सांगता झाली. 

काश्मीर समस्या ही काँग्रेसच्या निष्क्रीयतेचे फळ !

      मागील २४ वर्षांत राज्यकर्त्यांची निष्क्रीयता, मतांचे राजकारण आणि नालायकता या तीन गोष्टींमुळे देशाच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला आहे. आज जे काश्मीरमध्ये झाले, ते केवळ देशावरील संकटांचा आरसा आहे. अशी परिस्थिती उद्या संपूर्ण भारतात निर्माण होईल. आम्ही मागील २४ वर्षांपासून विस्थापित जीवन जगत आहोत. आमचे दुर्दैव हेच की, काश्मीर भारताचा अविभाज्य भाग आहे, असे सांगणारा एकही पंतप्रधान भारताला लाभला नाही. काश्मीर समस्या ही काँग्रेसच्या निष्क्रीयतेचे फळ आहे. 
- डॉ. अग्निशेखर, विस्थापित काश्मिरी हिंदू

निर्वासित हिंदु कुटुंबांची नोंद न करण्यासाठी हास्यास्पद कारणे देणारे शासन !

१. पाकव्याप्त काश्मीरमधून आश्रयार्थ आल्यानंतर जी कुटुंबे शिबिरांत रहाण्याऐवजी नातेवाइकांच्या घरी राहिली, त्यांची नोंद करण्यात आली नाही. 
२. ज्या कुटुंबास प्रमुख नाही, म्हणजे तो मारला गेेला आहे किंवा हरवला आहे, अशा कुटुंबाची नोंद करण्यात आली नाही. 
३. पाकव्याप्त काश्मीरमध्ये रहात असतांना ज्या कुटुंबांचे मासिक उत्पन्न ३०० रुपयांपेक्षा अधिक होेते, अशा कुटुंबांना शासनाचे साहाय्य मिळू शकत नाही.
४. सप्टेंबर १९४७ ते डिसेंबर १९५० या काळात जी कुटुंबे स्थलांतरित झाली नाहीत, मात्र नंतर स्थलांतरित झाली, त्यांचीही नोंद केली गेली नाही.

पुणे येथील हिंदु धर्मजागृती सभेतील वक्त्यांच्या ओजपूर्ण वाणीने झाली काश्मीरविषयी राष्ट्रजागृती !

एक भारत अभियान - कश्मीर की ओर या अभियानातील १२ वी सभा !
श्री रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ता, 
हिंदु जनजागृती समिती

पनून कश्मीरला मूर्त स्वरूप प्राप्त होईपर्यंत एक भारत 
अभियान चालूच रहाणार ! - रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ता, 
हिंदु जनजागृती समिती
     जगभरातील जिहादी आतंकवादाचे पहिले बळी काश्मिरी हिंदू ठरले. वर्ष १९९० मधील विस्थापनानंतर गेली २६ वर्षे विविध सरकारे येऊनही मुसलमानांच्या तुष्टीकरणाच्या राजकारणामुळे काश्मीरच्या स्थितीत पालट झाला नाही आणि काश्मीरमधील हिंदू त्यांच्या घरी परतू शकले नाहीत. ही स्थिती पालटण्यासाठी आणि काश्मीरमध्ये हिंदूंच्या सुरक्षित पुनर्वसनासाठी देशभरातील राष्ट्रप्रेमी संघटनांनी एक होऊन एक भारत अभियान चालवले आहे. पनून कश्मीरला जोपर्यंत मूर्त स्वरूप प्राप्त होत नाही, तोपर्यंत एक भारत अभियान थांबणार नाही. जम्मू-काश्मीरसमवेतच आसाम, बंगाल, केरळ, तमिळनाडू, तसेच देशाच्या अन्य अनेक ठिकाणी हिंदूंचा होत असलेला वंशविच्छेद अथवा पलायन पूर्णपणे थांबवण्यासाठी एक भारत अभियान अथकपणे प्रयत्न करील. आज काश्मीरला वाचवले नाही, तर काश्मीरसारखी स्थिती सर्वत्र ओढवेल. पनून कश्मीरची मागणी हा हिंदूंचा अधिकार आहे.

अवामी लीग पार्टी आणि ऑल इंडिया युथ फेडरेशन यांनी सनातनचे प्रवक्ता अभय वर्तक यांच्या वक्तव्यावरून राजकारण करू नये ! - समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटना

श्री. अभय वर्तक यांना पाठिंबा देणार्‍या 
कोल्हापूर येथील सर्व हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे आभार !
         कोल्हापूर, २४ ऑक्टोबर (वार्ता.) - महाराष्ट्र १ वृत्तवाहिनीवर १८ ऑक्टोबर या दिवशी आजचा सवाल कार्यक्रमातील चर्चासत्रात जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज आणि मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या संदर्भात बोलत असतांना श्री. निखिल वागळे यांनी सनातन संस्थेचे प्रवक्ता श्री. अभय वर्तक यांना अपमानास्पद वर्तणूक देत त्यांच्याविरुद्ध पोलिसांकडे तक्रार करण्याची धमकी दिली होती. कार्यक्रमात श्री. अभय वर्तक यांनी मुंबई येथे आझाद मैदानावर झालेल्या दंगलीच्या वेळी मुसलमानांनी मराठा महिला पोलिसांवर अत्याचार केल्याचे वक्तव्य केले होते. या कारणावरून सांगली येथे अवामी लीग पार्टीचे अश्रफअली सलीम वांकर आणि त्यांचे सहकारी यांनी श्री. अभय वर्तक यांच्यावर गुन्हा प्रविष्ट करण्यासाठी सांगली ग्रामीण पोलिसांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. ऑल इंडिया युथ फेडरेशनने पोलीस आयुक्तांकडे श्री. अभय वर्तक यांच्या विरोधात केलेली तक्रार निषेधार्ह आहे. अवामी लीग पार्टी आणि ऑल इंडिया युथ फेडरेशन यांनी सनातन संस्थेचे प्रवक्ता अभय वर्तक यांच्या वक्तव्यावरून राजकारण करू नये, असे प्रसिद्धीपत्रक समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनेच्या वतीने २३ ऑक्टोबर या दिवशी काढण्यात आले आहे. (हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि हिंदू प्रत्येकच वेळी सत्याच्या बाजूने उभे राहिल्यास हिंदु राष्ट्राची स्थापना होण्यास वेळ लागणार नाही ! - संपादक) 
         प्रसिद्धीपत्रकावर हिंदु एकता आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष सर्वश्री चंद्रकांत बराले, कार्यकर्ते शिवाजीराव ससे, बजरंग दलाचे जिल्हाप्रमुख संभाजी साळुंखे, शहरप्रमुख महेश उरसाल, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख संभाजीराव भोकरे, करवीर तालुकाप्रमुख राजू यादव, युवा सेनेचे जिल्हा समन्वयक रणजित आयरेकर, शिवसेना उद्योग समूहाचे अध्यक्ष सतीश शिंदे, शिवसैनिक उदय भोसले, उपतालुकाप्रमुख विक्रम चौगले, वन्दे मातरम् युथ ऑर्गनायझेशनचे अध्यक्ष अवधूत गुप्ते, योग वेदांत समितीचे राजमोहन स्वामी, श्री. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे शरद माळी, श्री संप्रदायाचे शहरप्रमुख एम्.के. यादव, धर्माभिमानी सतीश अतिग्रे, हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते यांच्या स्वाक्षर्‍या आहेत. 

पतीची लैंगिक इच्छापूर्ती करण्यासाठी इस्लाममध्ये एकापेक्षा अधिक विवाहाला मान्यता ! - कर्नाटकातील काँग्रेस नेते इब्राहिम

महिलांना लैंगिक वासनेची वस्तू समजणारे 
कधीतरी महिलांना आदराचे स्थान देतील का ?
        बेंगळुरू (कर्नाटक) - काँग्रेसचे दक्षिण कन्नड क्षेत्राचे प्रमुख इब्राहिम यांनी सांगितले की, पतीची लैंगिक इच्छापूर्ती व्हावी, यासाठी इस्लाममध्ये अनेक महिलांशी विवाह करण्यास अनुमती देण्यात आली आहे. जेव्हा पत्नी आजारी पडते, तेव्हा ती पतीला लैंगिक सुख देऊ शकत नाही. अशा वेळी पतीला वेश्येकडे जावे लागेल. यासंदर्भात इस्लाम सांगतो की, आपण वेश्येकडे जाऊ शकत नाही. जर आपली इच्छा असेल, तर आपण दुसरा विवाह करावा. समान नागरी कायद्याविषयी पत्रकारांकडून विचारण्यात आलेल्या एका प्रश्‍नावर ते उत्त देत होते.
        याला आपण योग्य समजता का ?, असा प्रश्‍न विचारला असता इब्राहिम म्हणाले की, इस्लाममध्ये अशी अनुमती केवळ आर्थिक आणि शारीरिक दृष्ट्या अनेक विवाह करण्यास जे सक्षम आहेत, त्यांनाच देण्यात आली आहे. (म्हणजेच या नियमाच्या विरोधात जाऊन मुसलमान अनेक विवाह करत आहेत, हे इब्राहिम यांना मान्य आहे का ? आणि आहे, तर ते त्याचा विरोध का करत नाहीत ? - संपादक)

तलाकचे समर्थन करून राजकीय पक्ष मतपेढीसाठी मुसलमान महिलांना त्यांच्या अधिकारापासून वंचित ठेवू इच्छितात ! - पंतप्रधान नरेंद्र मोदी

       महोबा (बुंदेलखंड) - मला आश्‍चर्य वाटते की, मतपेढीसाठी काही राजकीय पक्ष तीन वेळा तलाक म्हणण्याचे समर्थन करून मुसलमान महिलांना त्यांच्या नैसर्गिक अधिकारापासून वंचित ठेवू इच्छितात. कन्या भ्रूणहत्या करणारा हिंदु असला की त्याला कारागृहात जावे लागते, तर मग केवळ दूरभाषवरून तीन वेळ तलाक म्हटल्याने घटस्फोट होऊ शकतो का?, असा प्रश्‍न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे विचारला. मोदी पुढे म्हणाले की, तीन वेळा तलाक म्हणून घटस्फोट घेणे, हे सत्ताधारी आणि विरोधी पक्ष यांनी चर्चेचेे सूत्र बनवू नये. भारतातील मुसलमान महिलांना त्यांचा अधिकार देणे हे सरकारचे कर्तव्य आहे. याला हिंदु-मुसलमान असा विषय बनवू नये, हे विकासाचे सूत्र आहे.

ओडिशा-आंध्रप्रदेश सीमेवर झालेल्या चकमकीत २३ माओवादी ठार !

        विशाखापट्टणम् / भुवनेश्‍वर - ओडिशा आणि आंध्रप्रदेश यांच्या सीमेवरील मलकानगिरीच्या जंगलात २४ ऑक्टोबरच्या पहाटे सुरक्षादल आणि माओवादी यांच्यात १ ंघंटा झालेल्या चकमकीत २३ माओवादी ठार झाले आहेत, तर २ पोलीस गंभीर घायाळ झाले आहेत. पोलिसांनी माओवाद्यांकडून ४ एके-४७ रायफली जप्त केल्या आहेत.

रामभक्तच नसतील, तर राममंदिर कसे बनणार ? - केंद्रीयमंत्री गिरीराज सिंह

        सहारणपूर (उत्तरप्रदेश) - देशातील जनतेला राममंदिर हवे आहे; मात्र देशात रामभक्तच राहिले नाहीत, तर राममंदिर कसे बनणार ? हिंदूंनी प्रथम त्यांची लोकसंख्या वाढवली पाहिजे. देशातील ८ राज्यांत हिंदूंची संख्या न्यून होत आहे, असे प्रतिपादन केंद्रीय राज्यमंत्री गिरीराज सिंह यांनी येथे केले. सिंह म्हणाले की, फाळणीच्या वेळी पाकिस्तानमध्ये २२ टक्के हिंदु होते आणि आता केवळ १ टक्का राहिले आहेत. दुसरीकडे भारतात ९० टक्के हिंदु आणि १० टक्के मुसलमान होते, तर आता ७६ टक्के हिंदू आणि मुसलमान २४ टक्के झाले आहेत.

पाकच्या गोळीबारात एक सैनिक आणि एक मुलगा ठार !

एका सर्जिकल स्ट्राईकचा अपेक्षित परिणाम झालेला 
नसल्याने पाकला युद्ध करून संपवणेच अधिक योग्य !
        नवी देहली - जम्मू येथील आंतरराष्ट्रीय सीमेवर २३ ऑक्टोबरच्या रात्री पाकच्या सैन्याने केलेल्या गोळीबारात सीमा सुरक्षा दलाचा सुशील कुमार नावाचा एक सैनिक हुतात्मा झाला, तसेच एक मुलगा ठार झाला. भारतीय सैन्याने या गोळीबाराला प्रत्युत्तर दिले. आर्एस् पुरा, पर्गवाल, कानाचक भागातील सीमा सुरक्षा दलाच्या सुमारे १३ चौक्यांवर आणि नागरी भागात रात्रभर गोळीबार केला. यात ८ वर्षांचा एक मुलगा आणि ४ नागरिक घायाळ झाले आहेत.

मणीपूरच्या मुख्यमंत्र्यांवर गोळीबार, तर साखळी बॉम्बस्फोटांत एक सैनिक घायाळ !

        नवी देहली - मणीपूरच्या उखरूल जिल्ह्यात २३ ऑक्टोबरला रात्री साखळी बॉम्बस्फोट झाले. यात एक सैनिक घायाळ झाला. २४ ऑक्टोबरला सकाळी राज्याचे मुख्यमंत्री इबोबी सिंह हेलिकॉप्टरमधून उतरत असतांना त्यांच्यावर गोळीबार झाल्याचे वृत्त आहे. यात एक पोलीस घायाळ झाला. येथील जिल्हाधिकार्‍यांच्या निवासस्थानाजवळ एक हातबॉम्बही सापडला.या आक्रमणामागे नॅशनल सोशालिस्ट काऊंसिल ऑफ नागालॅण्ड या आतंकवादी संघटनेचा हात असल्याचे सांगितले जात आहे. (जेथे मुख्यमंत्रीच असुरक्षित आहेत, तेथे सामन्य जनतेची काय स्थिती असेल, याचा विचारच न केलेला बरा ! - संपादक)

हिंदुत्वाच्या कार्याला यश लाभो आणि काश्मिरी हिंदूंना न्याय मिळो ! - प.पू. आबा उपाध्ये

प.पू. आबा उपाध्ये आणि पू. (सौ.) मंगला उपाध्ये
     पुणे येथे पार पडलेल्या हिंदु धर्मजागृती सभेला उपस्थित रहाण्यासाठी प.पू. आबा उपाध्ये आणि पू. (सौ.) मंगला उपाध्ये हे मुंबईतील वैयक्तिक काम आटोपून पुण्याला निघाले; पण प्रवासाचा थकवा असल्याने ते धर्मसभेला उपस्थित राहू शकले नाहीत; परंतु त्यांनी सभेच्या दुसर्‍या दिवशीच हिंदुत्वाच्या कार्याच्या यशस्वीतेसाठी आशीर्वादपर संदेश देऊन काश्मिरी बांधवांना न्याय मिळावा, अशी प्रार्थना केली. त्यांनी धर्मजागृती सभेच्या निमित्ताने दिलेला मजकूर देत आहोत.

वीरश्री निर्माण करणार्‍या पुणे येथील सभेची छायाचित्रे !


सभास्थळी प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, सनातनच्या
पू. (श्रीमती) निर्मला दाते आणि पू. (श्रीमती) विजयालक्ष्मी काळे
या संतांच्या वंदनीय उपस्थितीने सभेला आध्यात्मिक अधिष्ठान लाभले !

कटक (ओडिशा) येथे हिंदूंच्या देवतेच्या १८ लक्ष रुपये किमतीच्या दागिन्यांची चोरी !

       कटक (ओडिशा) - येथील अलिशा बाजार पूजा समितीच्या कार्यालयातून हिंदूंच्या देवतेचे १८ लक्ष रुपये किमतीचे ४० किलो वजनाचे चांदीचे दागिने चोरीला गेल्याची घटना नुकतीच घडली आहे. कार्यालयातून दागिने चोरीला गेल्याचे लक्षात येताच समितीच्या सदस्यांनी पोलिसांत तक्रार प्रविष्ट केली. या प्रकरणी पोलिसांनी चौकशी चालू केली असून एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे, अशी माहिती पोलीस उपायुक्त संजीव अरोरा यांनी दिली.

पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू यांची जामिनासाठीची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली !

        नवी देहली - सर्वोच्च न्यायालयाने पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू यांची जामिनासाठीची याचिका पुन्हा एकदा फेटाळून लावली आहे. पू. बापू यांनी आजारामुळे अंतरिम जामीन देण्याची मागणी केली होती. न्यायालयाने नियमित जामिनाच्या याचिकेवर गुजरात सरकारकडून उत्तर मागितले आहे.

पाकिस्तानी कलाकार असलेले चित्रपट प्रदर्शित करणार नाही ! - बेळगाव चित्रपटगृह मालक संघटनेचा निर्णय

अभिनव हिंदु राष्ट्र संघटनेद्वारे ग्लोब चित्रपटगृहाच्या संचालकांना आभारपत्र ! 
ग्लोब चित्रपटगृहाचे संचालक श्री. महेश कुगजी
(मध्यभागी) यांना आभारपत्र देतांना धर्माभिमानी
     बेळगाव, २४ ऑक्टोबर (वार्ता.) - 'पाकिस्तानी कलाकार असलेले चित्रपट प्रदर्शित करणार नाही', असा निर्णय बेळगाव चित्रपटगृह मालक संघटनेने घेतला आहे. (देशप्रेमापोटी असा निर्णय घेणार्‍या बेळगाव येथील चित्रपटगृह मालक संघटनेचे अभिनंदन ! यातून इतर चित्रपटगृह मालकांनी बोध घेऊन पाकिस्तानी कलाकार असलेले चित्रपट प्रदर्शित करू नये ! - संपादक) हा निर्णय देशहिताचा असून त्याविषयी संघटनेचे आभारी आहोत, अशी भावना २२ ऑक्टोबर या दिवशी अभिनव हिंदु राष्ट्र संघटनेने मांडली. यानिमित्ताने प्रातिनिधीक स्वरूपात येथील ग्लोब चित्रपटगृहात येऊन अभिनव हिंदु राष्ट्र संघटनेने आभाराचे पत्र चित्रपटगृह संचालक श्री. महेश कुगजी यांना दिले. 

सनातनचे वाचक आणि हितचिंतक श्री. रमेश फडके रायगड भूषण पुरस्कार २०१६ने सन्मानित

श्री. रमेश फडके आणि त्यांच्या पत्नी (उजवीकडे) 
सुनील तटकरे यांच्याकडून पुरस्कार स्वीकारतांना
      पनवेल - वर्ष २०१६ चा रायगड भूषण पुरस्कार येथील सनातनचे वाचक आणि हितचिंतक श्री. रमेश फडक यांना १५ ऑक्टोबर या दिवशी अलिबाग येथे माजी आमदार सुनील तटकरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या वेळी त्यांच्या समवेत त्यांच्या धर्मपत्नीसुद्धा उपस्थित होत्या. श्री. रमेश फडके हे सामजिक कार्यात मोठ्या प्रमाणात सक्रिय असून नामवंत कलावंतही आहेत. 
      श्री. फडके हे ग्रामपंचायत नेरे येथे सन १९८३ ते १९९२ पर्यंत सरपंच होते. रायगड जिल्हा परिषदेकडून आदर्श सरपंच पुरस्कार सन १९९१-९२ साली त्यांना मिळाला आहे. या माध्यमातून त्यांनी नेरे गावात अनेक विकासकामे करून नेरेवासियांची मने जिंकली.

जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांना न्यायालयाची कारणे दाखवा नोटीस !

नवरात्रोत्सवात श्री महालक्ष्मी मंदिरात 'व्हीआयपी' दर्शन दिल्याचे प्रकरण 
     कोल्हापूर, २४ ऑक्टोबर (वार्ता.) - नवरात्रोत्सवात श्री महालक्ष्मी मंदिरात 'व्हीआयपीं'ना विशेष दर्शन देऊन न्यायालयाच्या हुकूमाचा अवमान केल्याच्या प्रकरणी जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी आणि पोलीस अधीक्षक प्रदीप देशपांडे यांना दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर श्री. यादव यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे, अशी माहिती श्रीपूजक श्री. गजानन मुनीश्‍वर यांनी २३ ऑक्टोबर या दिवशी पत्रकार परिषदेत दिली. 

भारत अमेरिकेकडून १४५ तोफा खरेदी करून चीन सीमेवर तैनात करणार !

     नवी देहली - संरक्षण प्रणाली सशक्त करण्यासाठी भारत लवकरच अमेरिकेबरोबर संरक्षण व्यवहार करणार आहे. या अंतर्गत अमेरिकेकडून १४५ अल्ट्रा लाइट होवित्झजर तोफांची खरेदी करण्याची शक्यता आहे. या तोफांसाठी भारताला सुमारे ५ सहस्र कोटी रुपये खर्च करावे लागतील. १९८० च्या दशकात बोफोर्स घोटाळा समोर आल्यानंतर तोफांच्या खरेदीसाठी केलेला हा पहिला व्यवहार होईल. दुसरीकडे संरक्षण मंत्रालयाने एम् ७७७ तोफांच्या खरेदीस संमती दिली आहे. या तोफांना चीनच्या सीमेलगत असलेल्या अरुणाचल प्रदेश आणि लडाख क्षेत्रांत तैनात करण्यात येणार आहे.

केरळमध्ये कम्युनिस्टांकडून सुडापोटी हत्यासत्र ! - रा.स्व. संघ

केरळमधील खुनी कम्युनिस्टांवर केंद्र सरकारने कारवाई करावी ! 
     भाग्यनगर - केरळमध्ये कम्युनिस्टांकडून राजकीय सुडापोटी हत्यासत्र चालू आहे, असा आरोप राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संयुक्त सरचिटणीस भागय्या यांनी केला. संघाच्या अखिल भारतीय कार्यकारी मंडळाची ३ दिवसांची वार्षिक परिषद २३ ऑक्टोबरपासून येथे चालू झाली. देशभरात ठिकठिकाणी हिंदूंवर होत असलेल्या आक्रमणांविषयी या परिषदेत ठराव मांडण्यात येणार आहेत. 

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने धनबाद (झारखंड) येथे 'एकाग्रता कशी वाढवावी ?'

या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन 
     धनबाद (झारखंड) - हिंदु जनजागृती समितीच्या वतीने हीरापूर येथील 'किड्स केयर कोचिंग सेंटर'मध्ये एकाग्रता कशी वाढवावी ? या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. या मार्गदर्शनाला सर्व विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. 

पाटलीपुत्र (पाटणा) रेल्वे स्थानकात विनामूल्य वाय-फाय सेवेचा वापर अश्‍लील चित्रपट पहाण्यासाठी !

सरकारने याचसाठी ही सुविधा चालू केली आहे का ?
     पाटलीपुत्र (पाटणा) - देशभरातील रेल्वे स्थानकांवर प्रवाशांच्या सोयीसाठी चालू करण्यात आलेल्या विनामूल्य वाय-फाय सुविधेचा गैरवापरच होतांना दिसत आहे. पाटणा रेल्वेस्थानकातील प्रवासी या सुविधेचा सर्वाधिक वापर अश्‍लील संकेतस्थळे पहाण्यासाठी करत असल्याची माहिती एका रेल्वे अधिकार्‍याने दिली आहे. 
     अश्‍लील संकेतस्थळे पहाण्याबरोबरच अनेक प्रवासी अ‍ॅप्स, बॉलिवूड आणि हॉलिवूडचे चित्रपटही डाऊनलोड करतात. सद्यस्थितीत रेलटेलतर्फे १ जीबी इंटरनेट डेटा विनामूल्य दिला जातो. पुढे या योजनेत पालट करून १० जीबीपर्यंत विनामूल्य इंटरनेट डेटा दिला जाणार आहे, असेही या अधिकार्‍याने सांगितले.

आसामला भूकंपाचा धक्का !

 महर्षींनी प्रलयकालाविषयी सतर्क करणे 
     १९.३.२०१६ या दिवशी झालेल्या 'नाडीवाचन क्रमांक ६७' मध्ये महर्षि म्हणतात, "हे पूर्ण वर्ष प्रलयकालाचे आणि आपत्तीजनक असणारे आहे." (आसाम आणि चीन येथे झालेल्या या घटनांवरून प्रलयकालाविषयी महर्षींनी केलेले भाष्य किती तंतोतंत आहे, हे लक्षात येते ! - संपादक)

     नवी देहली - आसाममध्ये २३ ऑक्टोबरच्या रात्री ४.८ तीव्रतेच्या भूकंपाचा धक्का बसला. येथील धुबरी येथे हा धक्का जाणवला. यात जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. 

हिंदु ऐक्यासाठी संकेतस्थळाला भेट द्या !

English : www.hindujagruti.org 

 हिंदी : www.hindujagruti.org/hindi/

चीनच्या गुआंग्दोंग प्रांतात हाइमा वादळामुळे मोठी हानी !

     गुआंग्झू (चीन) - दक्षिण चीनच्या गुआंग्दोंग प्रांतात हाइमा नावाच्या वादळामुळे १७ लाख लोक प्रभावित झाली. यातील ६ लाख ६८ सहस्र लोकांना सुरक्षित स्थानी ठेवण्यात आले आहे. वादळामुळे २ सहस्र ७४९ घरे आणि १ लाख ७८ सहस्र हेक्टर शेती यांची हानी झाली आहे.

शिक्षणक्षेत्राची अवनती !

      भावी राष्ट्राची पिढी असणारे विद्यार्थी नैतिकतेपासून दूर जात आहेत, याचे एक कारण म्हणजे त्यांचे संस्कारक्षम मन घडवण्यात अपयश येत आहे. नुकताच एका शाळेने काढलेल्या प्रश्‍नप्रत्रिकेतील प्रश्‍नावरून याची प्रचीती येते. मुंबई येथे भिवंडीतील चाचा नेहरू या हिंदी शाळेने क्रिकेट खेळाडू विराट कोहलीची गर्लफ्रेंड कोण ?, असा प्रश्‍न प्रश्‍नपत्रिकेत देऊन त्याला पर्यायही दिले. 
      विद्यार्थी चुकल्यास त्यांना उपदेशाने, तर प्रसंगी दंड करून सन्मार्गाला नेणे, हे शिक्षकांचे कर्तव्य आहे. येथे प्रश्‍नपत्रिका काढणारे शिक्षक स्वतःच कुमार्गाला गेले आहेत कि काय, अशी शंका येते. त्यांना शिक्षक तरी कसे म्हणावे, असा प्रश्‍न या घटनेमुळे निर्माण झाला आहे. विद्यार्जनाचे आणि सृजनशील नागरिक घडवण्याचे पवित्र क्षेत्र, अशी ओळख असणार्‍या शाळांचा दर्जा येथपर्यंत घसरावा, हे सूत्र चिंतातुर करणारे आहे. मुलांनी शालेय अभ्यासासमवेत गुणांकनासाठी याचाही अभ्यास करावा, अशी शाळेची अपेक्षा आहे की काय ?

चिनी वस्तूंना विरोध करणार्‍या गावोगावच्या स्वदेशीच्या शिलेदारांसाठी उद्बोधक असलेला सावरकरांच्या अंदमानोत्तर चरित्रातील एक प्रसंग !

      बंगालच्या फाळणीच्या विरोधात ७.१०.१९०५ या दिवशी पुणे येथे गाडाभर विदेशी कपड्यांची पहिली होळी करण्यात आली. लोकमान्य टिळक आणि शि.म. परांजपे यांच्या साक्षीने पुण्यात सार्वजनिक रितीने परदेशी कपड्यांची प्रचंड होळी करणारे सावरकर हेच पहिले भारतीय विद्यार्थी आणि पुढारी होते. या तथाकथित अपराधासाठी त्यांना महाविद्यालयाच्या वसतीगृहातून काढून टाकण्यात आले आणि १० रु. दंडही करण्यात आला. अनेकांना सावरकर चरित्रातील हा प्रसंग ठाऊक असतो. सावरकरांचे हे स्वदेशीविषयीचे प्रेम अंदमान भोगून आल्यावरही कृतीतून व्यक्त होत असे. डॉ. अरविंद गोडबोले यांच्या मला उमजलेले स्वातंत्र्यवीर सावरकर या पुस्तकात ते मार्मिकरित्या शब्दबद्ध झाले आहे. चिनी वस्तूंना विरोध करणार्‍या गावोगावच्या स्वदेशीप्रेमी असलेल्या लहान-मोठ्या शिलेदारांना ही माहिती निश्‍चितच बळ देईल !

ठाणे आणि रायगड जिल्ह्यांचा ऑक्टोबर २०१६ मधील पहिल्या आठवड्याचा हिंदु जनजागृती समितीच्या प्रसारकार्याचा आढावा !

१. ठाणे आणि रायगड जिल्ह्यांत नवरात्रोत्सव मंडळांमध्ये 
हिंदु जनजागृती समितीप्रणीत रणरागिणी शाखेतर्फे 
सादर करण्यात आलेल्या पथनाट्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद !
      कळवा, ठाणे, कल्याण, उरण, पनवेल, कळंबोली आणि शहापूर येथील नवरात्रोत्सव मंडळांमध्ये हिंदु जनजागृती समितीप्रणित रणरागिणी शाखेतर्फे महिलांवरील अत्याचारांसंदर्भात, तसेच एक भारत अभियानाविषयी प्रात्यक्षिके दाखवण्यात आली. या वेळी प्रबोधनपर विषयही मांडण्यात आले. याचा २ सहस्र ५०० हून अधिक लोकांनी लाभ घेतला.

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने महाराष्ट्रात ठिकठिकाणी निवेदने आणि समाजप्रबोधन !

देवता आणि राष्ट्रपुरुष यांची चित्रे असलेल्या फटाक्यांना तसेच चिनी फटाक्यांना विरोध
पनवेल तहसीलदारांना निवेदन देतांना कार्यकर्ते
वर्धा येथे प्रवचनाद्वारे जागृती
     दिवाळी अगदी काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. दिवाळीनिमित्त सर्वत्र मोठ्या प्रमाणात फटाक्यांची विक्री केली जात आहे. याच फटाक्यांवर सध्या हिंदूंच्या देवता, तसेच राष्ट्रपुरुष यांची चित्रे असतात. फटाके फोडल्यावर त्यांच्या चिंधड्या होऊन देवतांची विटंबना आणि राष्ट्रपुरुषांचा अवमान होतो. त्यामुळे अशा फटाक्यांवर बंदी घालायला हवी. फटाक्यांद्वारे होणारे प्रदूषणही रोखण्याची सध्या आवश्यकता आहे. पेठेत फटाक्यांच्या जोडीला चिनी बनावटीच्या फटाक्यांनीही शिरकाव केला आहे. फटाक्यांद्वारे मिळणार्‍या पैशांतून शत्रूराष्ट्र पाकला आतंकवादासाठी निधी पुरवणार्‍या चिनी फटाक्यांवरही आपण बहिष्कार टाकायला हवा. अशा विविध मागण्यांच्या अनुषंगाने हिंदु जनजागृती समितीच्या वतीने महाराष्ट्रात पोलीस आणि प्रशासन यांना निवेदने देण्यात आली. तसेच समाजात प्रबोधन व्हावे, यासाठी समितीच्या वतीने विविध उपक्रम राबवण्यात आले. निवेदने आणि उपक्रम यांविषयीचा वृत्तांत येथे देत आहोत. 
पनवेल


पनवेलचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक (उजवीकडून दुसरे) यांना निवेदन
      येथे तहसीलदार श्री. दीपक धावडे यांना निवेदन देण्यात आले. या वेळी ते म्हणाले, "फटाक्यांवर देवता आणि राष्ट्रपुरुष यांचे चित्र असणे अयोग्य आहे. याविषयी समाजात जागृती करून हे अपप्रकार रोखायला हवेत." पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. सुनील बाजारे यांना निवेदन दिल्यावर ते म्हणाले, "अशा प्रकारचे फटाके बाजारात कोणी विकत असेल, तर आम्ही त्या विक्रेत्यावर कारवाई करू. असे फटाके निर्मिती करणार्‍या आस्थापनांना नोटीस पाठवून या विटंबनेचा मागावा घेऊ". 

पू. भगवंतकुमार मेनराय आणि पू. (सौ.) सुरजकांता मेनराय यांच्या समवेत नामजप करतांना साधिकांना आलेल्या अनुभूती

पू. भगवंतकुमार मेनराय आणि पू. (सौ.) सुरजकांता मेनराय
१. पू. मेनरायकाका नामजपाला बसल्यावर त्यांच्यासह नामजप करतांना एकाच 
वेळी देवाशी अनुसंधान आणि दुसरीकडे नामजप चालू असल्याचे जाणवणे अन् त्यांच्या चरणांकडे 
पाहिल्यावर एकदा बासरी वाजवणार्‍या कृष्णाचे आणि दुसर्‍या वेळी प.पू. डॉक्टरांच्या चरणांचे दर्शन होणे 
      दोन दिवस मी रुग्णाईत असल्याने एक दिवस माझ्याकडून एक घंटा नामजप अल्प झाला; म्हणून २४.९.२०१६ या दिवशी मी कितीही त्रास झाला, तरी आज नामजप पूर्ण करायचाच, असे ठरवले होते. त्याप्रमाणे मी पू. मेनरायकाका यांच्यासह नामजपाला बसले आणि प्रार्थना केली, हे भगवंता, काल माझा नामजप अल्प झाला, तर आज तुम्हीच माझ्याकडून नामजप पूर्ण करवून घ्या आणि मी नामजप करू लागले. त्यानंतर माझे एकाच वेळी देवाशी अनुसंधान आणि नामजपही चालू असल्याचे जाणवले. मी मिटलेले डोळे उघडले आणि पू. मेनरायकाकांच्या चरणांकडे पाहिल्यावर एकदा बासरी वाजवणार्‍या कृष्णाचे दर्शन व्हायचे, तर दुसर्‍या वेळी प.पू. डॉक्टरांच्या चरणांचे दर्शन होत होते. असे जवळ जवळ १ घंटा चालू होते. अशी अनुभूती मी आयुष्यात प्रथमच घेतली आणि ती प.पू. डॉक्टरांच्या कृपेमुळे मिळाली. या वेळी १ घंटा नामजप मला १५ मिनिटांत झाला, असे वाटत होते. त्या स्थितीतून बाहेर येऊच नये, असे वाटत होते.

कल्याण येथे तहसीलदार आणि पोलीस यांना निवेदन

कल्याणचे तहसीलदार श्री. किरण सुरवसे यांना निवेदन देतांना 
डावीकडून धर्माभिमानी श्री. रमेश वाव्हळ आणि डॉ. उपेंद्र डहाके
     कल्याण येथे महात्मा फुले पोलीस ठाण्याचेे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. अनिल पोवार आणि तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.

फलक प्रसिद्धीकरता

काश्मिरी हिंदूंच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहा !
     जनहो, जोपर्यंत काश्मिरी हिंदूंचे काश्मीरमध्ये सन्मानपूर्वक पुनर्वसन होत नाही, तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही, या उद्देशाने चालवण्यात येणार्‍या 'एक भारत अभियान - कश्मीर की ओर' या देशव्यापी चळवळीत सहभागी होऊन आपले राष्ट्रकर्तव्य बजावा !

हिंदू तेजा जाग रे !

Jago ! : Kashmiri Hinduoke punarvas hetu prayasrat Ek Bharat Abhiyan-Kashmir Ki Or is andolanme bhag le. Rashtrahit me sakriya hona kaalki avashyakta hai ! 

जागो ! : कश्मीरी हिन्दुआें के पुनर्वास हेतु प्रयासरत एक भारत अभियान - कश्मीर की ओर इस आंदोलन में भाग लें ! राष्ट्रहित में सक्रिय होना काल की आवश्यकता है !

सनातन संस्थेवर श्रद्धा असणारे आणि आपल्या वागण्यातून मुलांवर संस्कार करणार्‍या वशेणी (जि. रायगड) येथील श्री. भास्कर सावळाराम ठाकूर (वय ७५ वर्षे) यांनी गाठली ६१ टक्के आध्यात्मिक पातळी !

श्री. भास्कर ठाकूर यांचा सत्कार करतांना सौ. संगीता लोटलीकर

        उरण (रायगड) - वशेणी येथील सनातनचे साधक श्री. भास्कर ठाकूर यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठल्याचे ६३ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. संगीता लोटलीकर यांनी घोषित केले. या वेळी उपस्थित प्रत्येक साधकाने भावावस्था अनुभवली.
        सौ. लोटलीकर यांनी श्रीकृष्णाची प्रतिमा देऊन श्री. ठाकूर यांचा सत्कार केला. अनेक साधकांना श्री. ठाकूर यांच्या आध्यात्मिक प्रगतीविषयी पूर्वसूचना मिळाली होती. मनोगत व्यक्त करतांना श्री. ठाकूर म्हणाले, मला रात्री झोप येत नाही. त्या वेळी मी नामजपच करत रहातो.

पू. (सौ.) सुरजकांता मेनराय यांना भावावस्थेत राहिल्याने आलेल्या अनुभूती

१. नामजपाच्या वेळी जप करतांना मनगटावर लहान लहान किड्यांप्रमाणे साप 
सरपटत चालले असल्याचे दिसणे आणि त्या वेळी भीती न वाटता शिवाचे अस्तित्व जाणवणे
      १८.९.२०१६ या दिवशी दुपारी मी खोलीत नामजप करत बसले होते. त्या वेळी माझ्या मनगटावर लहान लहान किड्यांप्रमाणे साप सरपटत चालले आहेत आणि मी दुसर्‍या हाताने त्यांना झटकून टाकत आहे, असे जाणवले. त्या वेळी मला मुळीच भीती वाटली नाही. त्या वेळी माझ्या तोंडातून सहजच शब्द बाहेर पडले, तुम्ही या ! मी तुम्हाला घाबरत नाही. मला तिथे भगवान शिवाचे अस्तित्व जाणवत होते आणि आनंद वाटत होता. 
२. श्रीकृष्ण समवेत असल्याचे जाणवून धर्मद्रोह्यांना दिलेले आव्हान !
      तुम्हाला संस्थेवर जे काही आरोप करायचे आहेत, ते करा. श्रीकृष्ण आमच्यासमवेत आहे. आम्ही चुकीचे काही करू शकत नाही. त्यामुळे आम्हाला कशाची भीती वाटत नाही. आम्ही तुम्हाला (निधर्म्यांना) सांगू इच्छितो की, आमच्याकडे भगवान श्रीविष्णूची सर्व अस्त्रे (चक्र, गदा, पद्म आणि शंख) आहेत.

सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांच्यावर असलेली महर्षींची कृपा आणि महर्षींचे त्यांच्याशी असलेले आध्यात्मिक नाते !

सद्गुरु (सौ). अंजली
गाडगीळ
      महर्षि सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांना म्हणतात, हे कार्तिकपुत्री, आमचा तुझ्यावर पूर्ण हक्क आहे; कारण तू आमची मुलगी आहेस. तुझ्या मुलीचा विवाह करण्याचे आम्हीच ठरवून दिले. तिच्यासाठी योग्य असा पुरोहित वरही मिळाला आणि त्यांच्या घरातूनही होकार आला. विवाहही झाला. तू काही आम्हाला तिच्या विवाहाविषयी विचारले नव्हतेस. तुला न विचारता जसे देण्याचा अधिकार आम्हाला आहे, तसाच तुझ्याकडे मागण्याचाही अधिकार आम्हाला आहे. 
(संदर्भ : नाडीवाचन क्रमांक १०२, कांचीपूरम्, तमिळनाडू, १७.१०.२०१६) 
- (सद्गुरु) सौ. अंजली गाडगीळ, कुंभकोणम्, तमिळनाडू.(१८.१०.२०१६, रात्री ९.१०)सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या जन्माविषयी महर्षींनी काढलेले उद्गार !

महर्षींची शिकवण आणि कार्य !
       नाडीवाचन क्रमांक १०२मध्ये महर्षि म्हणतात, हे कार्तिकपुत्री, तू या शास्त्राकडे येण्याची आम्ही वाटच पहात होतो. तुझ्या जन्माच्या वेळी तुझ्याबरोबर आलेली तुझी जुळी बहीण तुझी सावली होती. सावली फार काळ टिकत नाही. तशी ती गेली. तुला पुढे मोठे दैवी कार्य करायचे असल्याने तू स्थिर राहिलीस आणि आमच्या समक्ष आलीस. हे सर्व आमचेच नियोजन होते. (संदर्भ : नाडीवाचन क्रमांक १०२, १७.१०.२०१६, कांचीपूरम्, तमिळनाडू.)
- (सद्गुरु) सौ. अंजली गाडगीळ, कुंभकोणम्, तमिळनाडू.(१९.१०.२०१६, सायं. ६.५२) अखिल भारतीय साधनावृद्धी शिबिरात मुंबई येथील साधिकेला आलेल्या अनुभूती

१. त्रासदायक अनुभूती
१ अ. प.पू. गुरुदेवांच्या बालपणीच्या छायाचित्रांचे दर्शन घेतांना विविध शारीरिक त्रास होऊ लागणे, त्यांच्या छायाचित्रांकडे पाहू नये, असे वाटणे, पुष्कळ थकवा आल्याने लवकर झोपी जाणे : प.पू. गुरुदेवांच्या बालपणीच्या छायाचित्रांचे दर्शन घेतांना आणि त्यांच्या वस्तूंचे प्रदर्शन पहातांना मला मळमळणेे, डोके जड होणे, डोळ्यांची जळजळ होऊन त्यांतून पाणी येणे, चक्कर आल्यासारखे वाटणे, असे त्रास झाले.
       प.पू. गुरुदेवांच्या छायाचित्रांकडे पाहू नये, असे मला वाटत होते. नंतर मला पुष्कळ थकवा वाटू लागला. माझ्या पायांत गोळे आले. मी खोलीत झोपायला लवकर गेले आणि नामजप करून रात्री लवकरच झोपले. तेव्हा माझे शरीर पुष्कळ दुखत होते.
२. चांगल्या अनुभूती
२ अ. वीज गेल्यावर प्रत्येक वेळी व्यासपिठावर बसलेल्या संतांच्या मागे पिवळ्या प्रकाशात चक्रासारखा गोल फिरतांना दिसणे आणि आनंद होणे : शिबीर चालू असतांना जेव्हा जेव्हा वीज जात होती, तेव्हा तेव्हा मला व्यासपिठावर बसलेल्या संतांच्या मागे पिवळ्या प्रकाशात चक्रासारखा गोल फिरतांना दिसत होता आणि आनंद होत होता.

आश्रमाविषयी कृतज्ञताभाव वाढवा आणि सतत सत्मध्ये रहायचा प्रयत्न करा !

पू. संदीप आळशी
     मी श्री गणेशचतुर्थीच्या काळात काही दिवसांसाठी घरी गेलो होतो. तेथे माझ्या शारीरिक त्रासांचे प्रमाण थोडे उणावले; पण मन आणि बुद्धी यांवरील आवरण वाढल्याचे मला जाणवले. यामुळे प्रार्थनाही न सुचणे, भावजागृतीचे प्रयत्न न होणे, बुद्धीवर जडत्व येणे इत्यादी त्रास जाणवले. तेव्हा सनातनच्या आश्रमात रहातांना साधना करणे किती सोपे आहे, हे प्रकर्षाने जाणवले. आश्रमात रहातांना आपल्याला आश्रमाचे मूल्य तेवढे कळत नाही, पण बाहेर रहात असतांना कळते; यासाठी सर्वांनीच आश्रमाविषयी कृतज्ञताभाव वाढवायला हवा.
     बाहेर वातावरणात रज-तमाचा प्रादुर्भाव असतो. त्या रज-तमाशी लढून स्वतःची सात्त्विकता वाढवण्यासाठी एकच मार्ग म्हणजे, सतत सत्मध्ये रहायचा प्रयत्न करणे. बर्‍याचदा आश्रमातून घरी गेल्यावर किंवा बाहेर असतांना आपण नकळत दूरचित्रवाणीवरील कार्यक्रम पहाणे, पुष्कळ वेळ इतरांसमवेत गप्पा मारणे, अनावश्यक मासिके वाचणे आदींमध्ये रंगून जातो. सध्या बर्‍याच जणांकडे इंटरनेटची सुविधा असलेला भ्रमणभाष (मोबाईल) असतो. हातात असा भ्रमणभाष असल्यावर स्वाभाविकपणे इंटरनेट हाताळण्याची इच्छा होते. काही जण आम्ही बातम्या पहातो, असे सांगतात; पण बातम्या पहाण्याचीही खरंच आवश्यकता आहे का, असा प्रश्‍न त्यांनी स्वतःला विचारायला हवा; कारण जेवढ्या आवश्यक बातम्या असतात, तेवढ्या सनातन प्रभातमधून वाचायला मिळतच असतात.

रामनाथी आश्रमभेटीच्या वेळी आलेल्या अनुभूती

१. बसने रात्रीचा प्रवास करूनही 
आश्रमात आल्यावर उत्साह जाणवणे 
आणि दिवसभर भावजागृती होणे
     मी १६.७.२०१५ या रात्री खारघर, नवी मुंबई येथून रामनाथी आश्रम, गोवा येथे येण्यासाठी निघाले. मुंबई येथे पुष्कळ पाऊस पडल्यामुळे गोव्याला आमची बस पोेचायला नेहमीपेक्षा अधिक वेळ लागला. आश्रमामध्ये पोहोचताच पुष्कळ थकल्यासारखे वाटत होते; पण थोड्या वेळाने पुष्कळ उत्साह जाणवू लागला. आश्रमदर्शन करतांना प.पू. डॉक्टरांविषयी फार कृतज्ञता वाटत होती. आश्रमातील नियोजन, शिस्त आणि स्वच्छता बघून पुष्कळ कौतुक वाटले आणि हे सर्व केवळ प.पू. डॉक्टरांमुळेच आहे, असे जाणवले. दिवसभर भावजागृती होत होती आणि सतत कृतज्ञता व्यक्त होत होती.

पुणे जिल्ह्यातील बारामती येथील ६१ टक्के पातळीच्या श्रीमती पार्वती भवानजी घाटगेआजी यांच्या मृत्यूपूर्वी आणि मृत्यूनंतर जाणवलेली सूत्रे अन् आलेल्या अनुभूती

कै. श्रीमती पार्वती
भवानजी घाटगेआजी
        पुणे जिल्ह्यातील बारामती येथील श्रीमती पार्वती भवानजी घाटगेआजी यांचे ५.८.२०१६ या दिवशी निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय ९४ वर्षे होते. त्यांच्या मृत्यूपूर्वी आणि मृत्यूनंतर त्यांची सून सौ. सुधा घाटगे अन् अन्य साधिका यांना जाणवलेली सूत्रे, तसेच आलेल्या अनुभूती पुढे देत आहोत.
१. मृत्यूपूर्वी
१ अ. प्रकृती ठीक नसतांनाही सुनेला सेवेला जाण्यास सांगणे आणि श्रीकृष्ण, श्रीकृष्ण असा नामजप चालू असणे : ३.८.२०१६ या दिवशी आम्ही ढवळेवाडी येथे सभेनिमित्त पहिली बैठक घेण्यास जात असतांनाच अकस्मात् सासूबाईंची प्रकृती बिघडली. तेव्हा त्यांनी तुम्ही सेवेला जा; पण लवकर या, असे सांगून मला सेवेला पाठवले. आम्ही रात्री उशिरा बैठकीहून आल्यानंतर त्यांना त्रास होऊ लागला. तेव्हा त्या श्रीकृष्ण, श्रीकृष्ण असे म्हणत होत्या.
१ आ. दैनिक सनातन प्रभातमधील प.पू. गुरुदेवांच्या छायाचित्राला नमस्कार करून त्यांची क्षमा मागणे, श्रीकृष्णाकडे जायचे आहे, असे म्हणून त्याला नमस्कार करणे आणि थोड्या वेळाने निधन होणे : ४.८.२०१६ या दिवशी त्यांना रुग्णालयात भरती केले. तेव्हाही त्यांचे नाम चालूच होते. वैद्यांनी त्यांना संध्याकाळी ६.३० वाजता घरी सोडले. (दोन रात्री त्यांच्याजवळ बसल्यावर माझा ५ - ६ घंटे जप होत होता.) रुग्णालयातून घरी आल्यावर त्या सतत मला कृष्णाकडे जायचे आहे. मला कृष्णाचे चित्र द्या, असे म्हणत होत्या. त्या दैनिक सनातन प्रभात हातात घेऊन छातीशी धरत होत्या. माझ्या कृष्णाचे पान मला द्या, असे म्हणत होत्या. त्या रात्रभर दैनिक सनातन प्रभातमधील प.पू. गुरुदेवांच्या छायाचित्राला नमस्कार करून माझे चुकले असल्यास क्षमा करा, असे वारंवार म्हणत होत्या. मलाही सुधा, माझे चुकले असल्यास मला क्षमा कर, असे म्हणून नमस्कार करत होत्या. श्रीकृष्णाकडे पाहून मला कृष्णाकडे जायचे आहे, असे म्हणून नमस्कार करत होत्या. त्यानंतर थोड्याच वेळाने त्यांचे निधन झाले.

बालवयातच देवतांप्रती भक्तीभाव असणारी ५४ टक्के पातळीची उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली पुणे येथील कु. स्वराली ऋषीकेश ब्रह्मे (वय ५ वर्षे) !

कु. स्वराली ब्रह्मे
उच्चलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी
बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र चालवणारी पिढी ! 
या पिढीतील कु. स्वराली ऋषीकेश ब्रह्मे ही एक दैवी बालक आहे !
     आश्‍विन कृष्ण पक्ष दशमी (२५.१०.२०१६) या दिवशी कु. स्वराली ऋषीकेश ब्रह्मे हिचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त तिच्या आजीला जाणवलेली तिची गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत.
      (वर्ष २०११ मध्ये कु. स्वराली उच्च स्वर्गलोकातून आल्याचे घोेषित झाले होते. - संकलक)

कृपा करा हो गुरुमाऊली ।

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले 
यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त... 
रागावलात का गुरुमाऊली । भेट होईना अंतरी आपली ।
दोष-अहं आले उफाळूनी ।
तरी दूर लोटू नका हो या पामरा गुरुमाऊली ॥ १ ॥
बाळ हे अज्ञानी असे, करा हो त्याला सज्ञानी ।
कळे ना त्याला वाट अध्यात्माची ।
अध्यात्माची वाटही असे खडतर जरी ।
तरी न्याल या पामरास तुम्हीच पुढे गुरुमाऊली ॥ २ ॥
चुका झाल्या बाळाकडून जरी ।
तरी आई घेई त्यास कडेवरी ।
मी तर मातीचा गोळा संपूर्णच अपराधाने भरलेला ।
तरी, करा कृपा हो गुरुमाऊली ॥ ३ ॥
आयुष्य हे आपलेच झाले ।
प्रत्येक क्षण आपलाच आहे अन् असावा ।
दूर लोटू नका अशी अंतःकरणातून एकच हाक देते ।
अन् या पामराला जवळी घ्या हो गुरुमाऊली ॥ ५ ॥
- कु. रजनी कुर्‍हे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (११.४.२०१४)

विद्यार्थी-साधकांनो, दीपावलीच्या सुटीच्या काळात चैतन्यदायी आश्रमजीवन अनुभवून सर्वांगीण विकास साधणार्‍या विविध सेवांमध्ये सहभागी व्हा !

१. राष्ट्र आणि धर्म कार्यासाठी 
वेळ देणे, ही काळाची आवश्यकता !
     भावी आपत्कालीन स्थिती निर्माण होण्यापूर्वी धर्मप्रसार आणि सनातनच्या संशोधनाचे कार्य समाजापर्यंतच नाही, तर जगात सर्वत्र अधिकाधिक पोचवणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रत्येकाने स्वतःचे शिक्षण, तसेच अन्य व्यावहारिक कामे सांभाळून अधिकाधिक वेळ राष्ट्र आणि धर्म यांच्या कार्यासाठी देणे काळाची आवश्यकता आहे.
२. पालकांनो, १३ वर्षांपेक्षा अधिक वयाच्या 
साधक-पाल्यांना सुटीत आश्रमात पाठवा !
     थोड्याच दिवसांत शाळा आणि महाविद्यालये यांमधील विद्यार्थ्यांना दीपावलीची सुटी लागेल. या कालावधीत १३ वर्षांपेक्षा अधिक वयाच्या साधक-पाल्यांना सेवेत सहभागी होण्यासाठी सनातनच्या रामनाथी (गोवा), देवद (पनवेल) येथील आश्रमात अथवा मंगळुरू (कर्नाटक) सेवाकेंद्रात पाठवता येईल. आश्रमांमध्ये विविध सेवा उपलब्ध आहेत.
३. आश्रमातील सेवा
३ अ. सनातन-निर्मित ग्रंथांच्या संदर्भातील
१. मराठी भाषेत टंकलेखन करणे
२. लिखाणाचे भाषांतर, तसेच भाषाशुद्धी करणे
       काश्मीरमधून साडेचार लक्ष हिंदूंना विस्थापित केले गेले. तथापि काँग्रेसने याविषयी संसदेत चर्चा तर सोडाच; पण आजपर्यंत एकदाही साधा निषेधही केलेला नाही.
- योगी आदित्यनाथ, खासदार, भाजप, गोरखपूर
        स्वातंत्र्य मिळून ४३ वर्षे झाल्यानंतर काश्मीरमधून हिंदूंचे झालेले विस्थापन हा भारताचा पराभव आहे. हिटलरने केलेल्या अन्यायाची धग तेवत ठेवत ज्यू स्वाभिमानाने नेक्स्ट इयर जेरुसलेम म्हणत. त्याप्रमाणे आपणही पुढच्या वर्षी श्रीनगरला भेटू, असे म्हणूया.
- श्री. अविनाश धर्माधिकारी, निवृत्त सनदी अधिकारी आणि ज्येष्ठ राजकीय विश्‍लेषक
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥

या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो. - प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले
       पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका इत्यादी देशांतीलच नव्हे, तर भारतातील काश्मीरसह सर्वच ठिकाणच्या हिंदूंना आधार देण्यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना करणे अपरिहार्य आहे.
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले

॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज 
सनातनचे श्रद्धास्थान
गुरूंकडे काय मागावे ? 
 माझ्याकडे सुख मागू नका, दुःख सहन करण्याचे बळ मागा.
भावार्थ : सुख हे प्रकृतीतील असल्याने अशाश्‍वत असते, म्हणून गुरूंकडे मागू नये. तसेच हेही लक्षात ठेवले पाहिजे की, शाश्‍वत आनंद मिळवून देणे, हेच गुरूंचे खरे कार्य असते. प्रारब्धामुळे दुःख भोगावे लागणार असल्यास, त्या दुःखदायक प्रसंगांमुळे होणारे दुःख सहन करण्याची शक्ती मात्र गुरु निश्‍चित (नक्कीच) देतात; म्हणून ती मागायला आडकाठी (हरकत) नाही (संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.) 

हिंदूंची केविलवाणी सद्यस्थिती !

     आधुनिकतेच्या मोहक, रंगीबेरंगी आणि विषारी अजगराने सनातन हिंदु धर्म आणि संस्कृती यांना विळख्यात घेतले आहे. आमची ‘हिंदु ही ओळखच नष्ट होऊ पहात आहे. हिंदु हा किड्या-मुंगीसारखे पुरुषार्थहीन जीवन जगतो व मरतो ! 
- गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी
     उत्तर प्रदेशसारख्या राज्यात इस्लामी राजवट यादवांनी चालू केली आहे, ती उलथवून तेथे हिंदुत्वनिष्ठ राज्य यायला पाहिजे; पण असे प्रखर हिंदुत्वनिष्ठ आज उरले आहेत का ? 
- श्री. उद्धव ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख आणि संपादक, सामना

असे गांधीवादी पोलीस असल्यामुळेच देशातील गुन्ह्यांचे प्रमाण वाढले आहे !

      शैक्षणिक संस्थांमध्ये अमली पदार्थांना आळा घालण्यासाठी गांधीतत्त्वावरील आंदोलनाची आवश्यकता आहे. एखाद्या शैक्षणिक संस्थेमध्ये कोणीही अमली पदार्थाचे सेवन करत असल्याचे लक्षात आल्यास त्याच्यावर इतर विद्यार्थ्यांनी बहिष्कार घातला पाहिजे. 
- मुक्तेश चंदर, पोलीस महासंचालक, गोवा

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

खरा आनंद 
आनंद हा कोणताही प्रसंग, वस्तू अथवा व्यक्ती यांच्याशी निगडित नसावा. ज्या गोष्टीमुळे दुःख होते 
वा होईल, असा कोणताही आनंद नसावा. आपला आनंद आपल्यात मिळावा, हा विचार प्रत्येकाने 
सांभाळून ठेवावा, म्हणजे कोणत्याही अवस्थेत शांती ढळणार नाही. तुझे आहे तुजपाशी या 
संतवाणीप्रमाणे ज्याचा त्याने शोध घेत जावा. मनाची स्थिती केवळ स्वतःशीच निगडित 
असावी. अन्य कुठेही संपर्क नसावा. हे प्रगत होऊ पहाणार्‍या साधकांना परत परत सांगू इच्छितो. 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

राजकारण !

संपादकीय
     उरी येथील आक्रमणानंतर देशभरात पाकच्या विरोधात संतापाची लाट उसळली आहे. त्या संतापाचे राजकारण करण्यापेक्षा यातून काहीतरी विधायक झाले, तर त्या संतापाची योग्य दखल घेतली गेल्यासारखे होईल. अन्यथा नेहमीप्रमाणे वातावरण शमले की, एक पाऊल मागे यायचे, हे काही खरे नाही. पाकिस्तानी कलाकारांची भूमिका असलेल्या ऐ दिल है मुश्किल या चित्रपटाच्या प्रदर्शनाला मोठा विरोध झाल्यानंतर काही अटी घालून राज ठाकरे यांनी हिरवा कंदिल दाखवला होता. त्यानंतर पाकिस्तानी कलाकारांना घेऊन चित्रपट करायचा असल्यास सैनिक कल्याण निधीला ५ कोटी रुपयांचे साहाय्य द्यावे, अशी अट मनसेअध्यक्ष राज ठाकरे यांनी चित्रपट निर्मात्यांसमोर ठेवली आहे. सैनिक कल्याण निधीचा उल्लेख आल्यामुळे ही मागणी राष्ट्रप्रेमाशी केलेली तडजोड म्हणावी लागेल. राष्ट्रप्रेमाच्या भावनेपोटी जमवलेला निधी किंवा पैसे नाही, तर राष्ट्रहित महत्त्वाचे आहे, हे लक्षात घेतले पाहिजे.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn