Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

काश्मिरी हिंदूंचे पुनर्वसन काश्मीरमध्येच करण्याचा हिंदूंचा दृढ निश्‍चय !

एक भारत अभियान - चलो कश्मीर की ओर अंतर्गत
 ऐतिहासिक पुण्यामध्ये विराट हिंदु धर्मजागृती सभा ! 

दीपप्रज्वलन करताना डावीकडून सद्गुरु (कु.) स्वाती खाडये, सर्वश्री रमेश
शिंदे, अजय च्रोंगू, डॉ. हरि ओम, मुरली मनोहर शर्मा आणि प्रमोद मुतालिक

        पुणे, २३ ऑक्टोबर (वार्ता.) - ज्या मैदानावरून लोकमान्य टिळक यांनी स्वराज्याचा उद्घोष केला, त्या न्यू इंग्लिश स्कूल, रमणबाग शाळेच्या मैदानावर एक भारत अभियान - चलो कश्मीर की ओर अंतर्गत ऐतिहासिक १२ वी सभा पार पडली. या वेळी जमलेले हिंदुत्वनिष्ठ आणि सह्याद्रीचे मावळे यांनी जय भवानी जय शिवाजी या घोषात काश्मिरी हिंदूंचे पुनर्वसन काश्मीरमध्ये झाल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही !, असा दृढ निश्‍चय केला ! पनून कश्मीर, हिंदु जनजागृती समिती, काश्मिरी हिंदू सभा पुणे, लष्कर-ए-हिंद, हिंदु एकता आंदोलन पक्ष यांनी आयोजित केलेली ही सभा अन्य हिंदुत्ववादी संघटनांच्या भरीव सहभागाने साकारली !

शिवसेना गोव्यात धर्मांतराला विरोध करणार ! - उद्धव ठाकरे

  • अन्य राजकीय पक्ष कधी असे बोलतात का ?
  • यांमुळे हिंदूंना शिवसेना अधिक जवळची वाटते !
        पणजी, २३ ऑक्टोबर (वार्ता.) -
गोव्यात बळजोरीने आणि आमिषे दाखवून हिंदूंचे धर्मांतर करण्याचे प्रकार चालू आहेत. याविषयी आम्हाला माहिती आहे. बळजोरीने होणार्‍या धर्मांतराला शिवसेना विरोध केल्याशिवाय रहाणार नाही, असे शिवसेना पक्षप्रमुख श्री. उद्धव ठाकरे यांनी पणजी येथे एका पत्रकार परिषदेत एका प्रश्‍नाला उत्तर देतांना स्पष्ट केले.
        श्री. उद्धव ठाकरे विविध प्रश्‍नांना उत्तर देतांना म्हणाले,
१. शिवसेना हिंदुत्वनिष्ठच आहे. सर्वांना बरोबर घेऊन जाणारे आमचे हिंदुत्व आहे. त्यामुळे येथील राष्ट्रवादी ख्रिस्त्यांना शिवसेनेपासून घाबरण्याचे कारण नाही. म्हापसा येथील माजी नगराध्यक्ष मायकल कारास्को यांनी अनेक ख्रिस्ती कार्यकर्त्यांसह शिवसेनेत कालच प्रवेश केला आहे. त्यामुळे शिवसेना ही ख्रिस्त्यांच्या विरोधात आहे, असा ग्रह कोणी करू नये.

आतंकवादी संघटनांवर कारवाई करा अन्यथा पाकमध्ये घुसून आक्रमण करू ! - अमेरिकेची पाकला चेतावणी

अमेरिकेने नुसत्या चेतावण्या देण्याऐवजी
 पाकमध्ये घुसून कारवाई करावीच !
        वॉशिंग्टन - आवश्यकता वाटल्यास पाकमध्ये घुसून आतंकवादी संघटनांवर थेट आक्रमण करण्यास आम्ही मागेपुढे पहाणार नाही, अशी चेतावणी अमेरिकेने पाकला दिली आहे.
        आतंकवादास मिळणारे आर्थिक साहाय्य रोखण्याकरता अमेरिकेने स्थापन केलेल्या विभागाचे अतिरिक्त मंत्री अदम स्झुबिन यांनी म्हटले की, पाकिस्तानी सरकारमध्ये विशेषत: आयएस्आयमध्ये येथील आतंकवादी संघटनांच्या विरोधात कारवाई करण्यास सिद्ध नसलेले घटक आहेत, ही खरी समस्या आहे. पाकमधील आतंकवादी संघटनांपैकी काही संघटनांना मोकळे रान मिळत आहे, तसेच परिस्थिती त्यापेक्षाही गंभीर असू शकते. पाकमधील आमच्या भागीदारांना तेथील सर्व आतंकवादी संघटनांच्या विरोधात कारवाई करावी, असे आमचे आवाहन आहे, तसेच आमची त्यांना साहाय्य करण्याचीही सिद्धता आहे; मात्र आतंकवादास मिळणारे आर्थिक साहाय्य रोखण्याकरता पाकबरोबर काम करण्यास आम्ही कटीबद्ध असलो, तरी आवश्यकता पडल्यास एकट्याने कारवाई करून आतंकवादी संघटना उद्ध्वस्त करण्यास अमेरिका मागेपुढे पाहणार नाही.

हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या विरोधामुळे फटाक्यांच्या वेष्टनांवरील हिंदूंच्या देवतांची चित्रे छापणे बंद झाले !

हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या संघटितपणाचाच 
हा परिणाम होय ! असे हिंदुत्वनिष्ठ सर्वत्र हवेत ! 
        मुंबई - दिवाळीच्या दिवसांत फोडण्यात येणार्‍या फटाक्यांच्या वेष्टनांवर हिंदूंच्या देवतांची चित्रे (उदा. लक्ष्मीदेवी) छापण्याची १०० वर्षे जुनी असलेली अयोग्य प्रथा हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी केलेल्या जनजागृतीमुळे संपुष्टात आली आहे. या वर्षी आता फटाक्यांच्या वेष्टनांवर मोर, तसेच अन्य पशू-पक्षी, चित्रपट अभिनेते-अभिनेत्री अथवा फटाके निर्माते यांची नावे किंवा छायाचित्रे छापलेली आढळून आली. बाजारात देवतांची चित्रे असलेले कोणतेही फटाके आढळून येत नाहीत.
        देशातील बहुतेक फटाके तमिळनाडूतील शिवकाशी येथे बनवले जातात. तेथील जिल्हाधिकार्‍यांनी वर्ष २०१५ मध्ये एका पत्राद्वारे फटाके निर्मात्यांच्या संघटनेला फटाक्यांच्या वेष्टनांवर हिंदूंच्या देवतांची चित्रे न छापण्याचा आदेश दिला होता. तसेच हिंदु जनजागृती समिती आणि इतर हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी याविषयी मोठ्या प्रमाणावर जनजागृती केली होती. फटाक्यांच्या वेष्टनांवर हिंदूंच्या देवतांची चित्रे छापल्याने देवतांची चित्रे पायदळी तुडवली जाऊन हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या जातात, असा प्रचार केला होता.

पाकच्या विरोधात युद्ध पुकारा !

  • सैनिक हुतात्मा होत असल्यामुळे त्यांच्या नातेवाइकांच्या पाकच्या विरोधातील भावना तीव्र असणे स्वाभाविक आहे ! असे असतांना पाकला धडा शिकवणे, हीच भारतासाठी प्राणार्पण करणार्‍या सैनिकांना श्रद्धांजली होय !
  • हुतात्मा सैनिक गुरनाम सिंह यांच्या वडिलांचे पंतप्रधानांना आवाहन !
        जम्मू - पाक सैन्याने २१ ऑक्टोबरला नियंत्रणरेषेजवळ केलेल्या गोळीबारात घायाळ झालेले सीमा सुरक्षा दलाचे सैनिक गुरनाम सिंह यांचे २२ ऑक्टोबरला रात्री उपचाराच्या वेळी निधन झाले. त्यानंतर गुरनाम यांचे वडील कुलबीर सिंह यांनी म्हटले की, माझा मुलगा देशासाठी हुतात्मा झाला, याचा मला अभिमान आहे. आता पंतप्रधान मोदी यांनी पाकिस्तानविरुद्ध युद्ध पुकारावे.
        गुरनाम सिंह यांच्यावर जम्मूतील शासकीय रुग्णालयात उपचार चालू होते. तेथील सुविधांविषयी कुलबीर सिंह यांनी अप्रसन्नता व्यक्त केली. सैनिकांच्या उपचारांसाठी जम्मूत स्वतंत्र रुग्णालय असायला हवे, अशी मागणीही त्यांनी केली.

(म्हणे) देशात पुन्हा असहिष्णुता दिसू लागली आहे ! - रतन टाटा

      ग्वाल्हेर - असहिष्णुता हा एक शाप आहे आणि गेल्या काही दिवसांपासून आपल्या देशात पुन्हा असहिष्णुता दिसू लागली आहे, असे विधान प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांनी केले आहे. ग्वाल्हेर येथे शिंदे स्कूलचा ११९ वा स्थापनादिन सोहळा पार पडला. त्या वेळी ते बोलत होते. टाटा यांच्या मार्गदर्शनापूर्वी काँग्रेसचे खासदार ज्योतिरादित्य शिंदे यांनी असहिष्णुतेवर विधान केले. (फाळणीच्या वेळी १० लाख हिंदूंची हत्या होत असतांना काँग्रेसला असहिष्णुता का दिसली नाही ? देहलीत साडेतीन सहस्र शिखांची हत्या करतांना काँग्रेसवाल्यांना असहिष्णुता कशी दिसली नाही ? त्या वेळी टाटा याविषयी का बोलले नाहीत ? - संपादक)
       टाटा म्हणाले की, एखाद्याला ओलीस ठेवावे, मारझोड करावी, ही आपली संस्कृती नाही. येथे सगळ्यांनी बंधूभावाने रहायला हवे. सगळे लोक एकमेकांवर प्रेम करतात, एकमेकांचा आदर करतात, अशाप्रकारचे वातावरण असायला हवे. आजकाल जी असहिष्णुता दिसत आहे, त्याचा उगम कुठून होत आहे, याची सर्वांना कल्पना आहे. कुणालाच असे वातावरण नको आहे. देशातील लाखो लोकांना असहिष्णुतामुक्त देश हवा आहे.

पाक कलाकारांवरील बंदी योग्यच ! - डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी, खासदार, भाजप

       न्यूयॉर्क - भारत-पाकिस्तान यांच्या दरम्यान तणावाचे संबंध असतांना पाकिस्तानी कलाकारांना भारतात काम करण्यास बंदी घालणेच योग्य आहे, असे मत खासदार डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांनी व्यक्त केले. इंडिया अ‍ॅण्ड पाकिस्तान अ सबकॉण्टिनेन्टल अफेअर या विषयावरील परिषदेत ते बोलत होते. 
      डॉ. स्वामी पुढे म्हणाले, आगामी काळात युद्धाची शक्यता असल्यामुळे लोकांच्या मनाची सिद्धता करून घ्यावी, अशी स्थिती आहे. पाकशी आतापर्यंत ४ युद्धे झाली आहेत. युद्ध ही काही साधारण गोष्ट नाही. त्यामुळे पाकिस्तानी चित्रपट कलाकार आणि क्रिकेटपटू यांना भारतात येऊ देणे योग्य ठरणार नाही. पाकशी संबंध सुरळीत होतील, तेव्हा क्रिकेट अन् चित्रपट क्षेत्रांतील संबंधही आपोआप सुरळीत होतील. युद्ध हे उत्तर नसले, तरी केंद्र सरकार आतंकवाद सहन करणार नाही. आतंकवादी कारवाया केल्या, तर आम्हाला उपलब्ध साधनांच्या साहाय्याने आम्ही त्याला प्रत्युत्तर देऊ.

चेन्नईच्या दूरचित्रवाहिनीवरील चर्चासत्रात श्रीरामाविषयी अश्‍लाघ्य वक्तव्य केले म्हणून ख्रिस्त्याविरुद्ध पोलिसांत तक्रार !

       चेन्नई - येथील थांती दूरचित्रवाहिनीवर १८ ऑक्टोबर या दिवशी रात्री ८ वाजता आयुध एझुथू या कार्यक्रमात एका चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. दसर्‍याच्या दिवशी रामलिलेच्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जय श्रीराम असा नारा दिल्याचा विषय घेऊन सदर चर्चासत्र घेण्यात आले. या चर्चासत्रात ख्रिस्तोदास गांधी नावाच्या ख्रिस्त्याने कोट्यवधी हिंदूंचे आराध्य दैवत प्रभू श्रीराम यांच्याविषयी अत्यंत अशलाघ्य वक्तव्य करून त्यांचे विडंबन केले. ख्रिस्तोदास गांधी म्हणाले, मी श्रीरामाच्या प्रतिमेला चपलांचा हार घालून त्या चित्राला चापटा मारल्या असत्या. या वक्तव्याविरुद्ध कार्यक्रमाचे सूत्रधार अथवा दूरचित्रवाहिनीने कुठलीच प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. (हिंदु देवतेच्या विरोधात करण्यात आलेल्या अश्‍लाघ्य वक्तव्यासंदर्भात धर्मनिरपेक्ष भारतातील दूरचित्रवाहिनीने कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त न करणे, हे संतापजनकच ! एखाद्या हिंदूने अशाप्रकारे अन्य धर्मीयांच्या विरोधात एखादे वक्तव्य केले असते, तर एव्हाना संपूर्ण सेक्युलर ब्रिगेडने टाहो फोडायला आरंभ केला असता, हे लक्षात घ्या ! - संपादक) त्यामुळे हिंदुत्वनिष्ठ श्रीमती उमा आनंदन् यांनी ख्रिस्तोदास गांधी आणि थांती दूरचित्रवाहिनी यांच्या विरोधात तक्रार नोंदवली आहे. (हिंदुत्वनिष्ठ श्रीमती उमा आनंदन् यांनी श्रीरामाच्या अनादराच्या विरोधात तत्परतेने केलेल्या कृतीसाठी त्यांचे अभिनंदन ! अन्य हिंदूंनीही धर्मरक्षणासाठी अशाप्रकारे कार्यरत व्हायला हवे ! - संपादक)

पतंजली योग समितीने आरंभलेल्या चळवळीने चीन आणि पाकिस्तान ही शत्रूराष्ट्रे खाक होतील ! - आमदार मंगलप्रभात लोढा

मुंबई येथे जनजागृती फेरीद्वारे चिनी उत्पादनांवर 
बहिष्कार टाकण्याचे पतंजली योग समितीचे आवाहन !
चिनी वस्तूंवर बहिष्कार घालण्यासाठी 
पतंजली योग समितीच्या वतीने जनजागृती फेरी
        मुंबई, २३ ऑक्टोबर (वार्ता.) - आज स्वदेशी वस्तू घेण्यासह जो सकारात्मक पालट दिसनू येत आहे, त्यामध्ये रामदेवबाबा यांचे मोठे योगदान आहे. पतंजली योग समितीने आरंभ केलेल्या या चळवळीने चीन आणि पाकिस्तान ही शत्रूराष्ट्रे खाक होतील, असे प्रतिपादन भाजपचे आमदार श्री. मंगलप्रभात लोढा यांनी केले. आतंकवादी कारवाया करणार्‍या पाकिस्तानला साहाय्य करणार्‍या चीनच्या उत्पादनांवर बहिष्कार घालण्याविषयी जनजागृती करण्यासाठी पतंजली योग समितीच्या वतीने २२ ऑक्टोबर या दिवशी मुंबई येथे जनजागृती फेरी काढण्यात आली. आझाद मैदान- वासुदेव बळवंत चौक-लोकमान्य टिळक मार्ग-क्रॉफर्ड मार्केट ते छत्रपती शिवाजी रेल्वे स्थानक असा या फेरीचा मार्ग होता. फेरीत भारत स्वाभिमान ट्रस्ट, युवा भारत, किसान सेवा समिती, हिंदु जनजागृती समिती आदी संघटनांचे कार्यकर्त्यांसह २०० हून अधिक राष्ट्रप्रेमी नागरिक सहभागी झाले होते.

नेदरलॅण्ड सरकार सैनिकांना योगशिक्षण देणार !

नेदरलॅण्डमध्ये भारतातील धर्मनिरपेक्षतावादी, 
पुरोगामी आणि बुद्धीप्रामाण्यवादी नाहीत ! नाहीतर एव्हाना तेथील ख्रिस्ती 
शासनाचे भगवेकरण झाल्याची ओरड करण्यातही या हिंदुद्वेष्ट्यांनी मागे पुढे पाहिले नसते !
नेदरलॅण्ड सरकारचा अभिनंदनीय निर्णय !
      नेवाडा (अमेरिका) - तणावपूर्ण स्थिती हाताळणे आणि अत्यंत क्लेशकारक प्रसंगांना सामोरे जाणे शक्य व्हावे, यासाठी सैनिकांना योगशिक्षण देण्याचा अभिनंदनीय निर्णय नेदरलॅण्ड सरकारने घेतल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. नेदरलॅण्ड सरकारच्या या निर्णयाचे जगभरातील हिंदूंनी स्वागत केले आहे. जगभरातील सर्व सैन्यदलांनी योग शिक्षणाचा कार्यक्रम राबवावा, अशी मागणी हिंदूंनी केली आहे.
     काही योगशिक्षक नेदरलॅण्डच्या सशस्त्र दलातील अधिकार्‍यांना प्रथम योगशिक्षण देतील आणि नंतर हे अधिकारी त्यांच्या विभागातील इतर सैनिकांना प्रशिक्षित करतील. 
      अमेरिकेच्या राष्ट्रीय आरोग्य संस्थेने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार योगामुळे व्यक्ती तणावरहीत होते. तसेच ती निरोगी होते आणि सकारात्मक बनते. योग हा मानवी आत्मा आणि मन यांच्याशी संबंधित आहे, असे या संस्थेने म्हटले आहे.

गोमूत्र शिंपडून वाईट शक्तींना पळवून लावा ! - गुजरात गोसेवा मंडळाचा सल्ला

      कर्णावती (अहमदाबाद) - गुजरात गोसेवा आणि गोचर विकास मंडळाच्या वतीने प्रकाशित करण्यात आलेल्या आरोग्य गीता या पत्रकात सल्ला देण्यात आला आहे की, गोमूत्राचा वापर करून वाईट शक्तींना पळवून लावता येते. या समवेतच वाईट शक्तींमुळे होणार्‍या रोगांवरही उपचार केला जाऊ शकतो. मंडळाने वाईट शक्तींसाठी ड्रॅक्युला असा शब्दप्रयोग केला आहे.
      गोमूत्राच्या उपायांची पार्श्‍वभूमी देतांना या पत्रकात म्हटले आहे की, भगवान शिव हे सर्व भूतांचे स्वामी आहेत आणि गंगा नदी त्यांच्या जटात वास करते. नंदी हे शिवाचे वाहन आहे. गोमूत्रात गंगा आहे. गोमूत्रापासून भूतंखेतं दूर पळतात; कारण नंदी हा गोमातेचा पुत्र आहे. जरी आधुनिक विज्ञानाचा आणि अनेक लोकांचा भूताखेतांवर विश्‍वास नसला, तरी सर्व धर्मांच्या ग्रंथांत त्यांचा उल्लेेख आढळतो. हिंदु धर्मशास्त्रांत वाईट शक्तींच्या त्रासामुळे भूतमिष्टांग रोग होतो, असा उल्लेेख आहे. पाश्‍चिमात्त्य लोक ड्रॅक्युला, व्हॅम्पायर, हडळ इत्यादी वाईट शक्तींच्या अस्तित्वावर विश्‍वास ठेवतात. इस्लाममध्ये यांनाच सैतान म्हटले आहे.
      गुजरात गोसेवा आणि गोचर विकास मंडळाचे अध्यक्ष डॉ. वल्लभ काठीरीया म्हणाले की, जरी काही लोकांचा भुताखेतांवर विश्‍वास नसला, तरी या क्षेत्रात संशोधनाला वाव आहे.ब्रिक्स परिषदेतील गोवा डिक्लेरेशनमध्ये पाकनिर्मित आतंकवाद समाविष्ट करण्यास अपयशी ठरलेल्या सरकारवर काँग्रेसची टीका !

        नवी देहली - गोव्यात पार पडलेल्या ब्रिक्स परिषदेत संयुक्त गोवा डिक्लेरेशन मध्ये पाकनिर्मित आतंकवाद समाविष्ट करण्यात मोदी सरकार अपयशी ठरले, अशी टीका काँग्रेसचे प्रवक्ते मनीष तिवारी यांनी केली. तसेच पाकव्याप्त काश्मीरमधील सर्जिकल स्ट्राईक्सचे श्रेय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला देणार्‍या संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांच्यावरही त्यांनी टीका केली. पाकिस्तान आतंकवादी देश असल्याचे ब्रिक्स देशांना पटवून देण्यास मोदी शासन अपयशी ठरल्याचा आरोपही तिवारी यांनी केला आहे.

श्रीलंकेतील शिव सेनाई संघटनेच्या शिष्टमंडळाने स्थानिक राज्यपालांची भेट घेतली !

मंदिरात नवरात्रोत्सव साजरा करणार्‍या हिंदूंवर मुसलमान, 
ख्रिस्ती आणि बौद्ध गुंडांनी केलेल्या आक्रमणाचे प्रकरण 
      कोलंबो - श्रीलंकेतील अनुराधापुरम् या मुसलमानबहुल जिल्ह्यातील निरावी या गावात असलेल्या शक्ती मंदिरात ख्रिस्ती, मुसलमान आणि बौद्ध गुंडांनी दसर्‍याच्या दिवशी हिंदूंवर आक्रमण केले होते. यात चाकूंच्या वारांमुळे २२ वर्षीय कंडासामी प्रभु गंभीररित्या घायाळ झाले होते. यावेळी मंदिराची हानीही करण्यात आली. तेव्हा हिंदू नवरात्रोत्सव साजरा करत होते. या संबंधी श्रीलंकेतील शिव सेनाई संघटनेच्या शिष्टमंडळाने अनुराधापुरम्ला भेट देऊन तेथील राज्यपाल, वरिष्ठ पोलीस अधिकारी, अरुलामिगु काठीरेसन मंदिराचे पुजारी श्री. जयान्तिपुरम् बुद्ध महानायक आणि शांतता समितीचे श्री. जयसिंघ यांची भेट घेतली. या शिष्टमंडळात नाल्लूर येथील स्वामी सागीराथर चैतन्य चिन्मयानंद, वात्तुकोताई येथील मानवाधिकार आयोगाचे माजी अधिकारी श्री. कलानिधी मोहन, वादामागना सभेचे सदस्य श्री. शिवसेषन, वौनिया येथील विधी शाखेचे विद्यार्थी श्री. यशोधरन् आणि श्री. मरवनपुलावू सच्चिदानंदन् यांचा समावेश होता. त्यानंतर शिष्टमंडळ निरावी या गावी गेले. शिष्टमंडळाने याझीपानाम वैद्यकीय सामितीने अर्पण केलेले ४० सहस्र रुपये कंडासामी प्रभु यांच्यासह अन्य पीडितांना दिले. तसेच मंदिरातील हानी झालेल्या मूर्ती नव्याने स्थापन करून देण्याचे आश्‍वासन दिले. या घटनेला उत्तरदायी असलेल्या ७ गुंडांना आतापर्यंत अटक करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे.

तोंडी तलाक पद्धत आणि बहुपत्नीत्व रहित करून समान नागरी कायदा लागू करा ! - सत्यशोधक मुसलमान मंडळाची मागणी

     पुणे, २३ ऑक्टोबर (वार्ता.) - समान नागरी कायद्याला विरोध करून जातीयवादी मंडळी मुसलमान स्त्रियांचे अधिकार दडपत आहे. तोंडी त्रिवार तलाक, बहुपत्नीत्व यांमुळे अनेक महिलांचे जीवन नरकासमान झाले आहे. त्यामुळे तोंडी तलाक पद्धत आणि बहुपत्नीत्व रहित करून समान नागरी कायदा लागू करावा अशी मागणी मुस्लिम सत्यशोधक मंडळाने केली आहे. २१ ऑक्टोबर या दिवशी येथे या संदर्भात एका पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. या प्रसंगी मंडळाचे अध्यक्ष शमसुद्दीन तांबोळी यांनी आताच्या सरकारला खरंच समान नागरी कायदा आणायचा आहे का, असा प्रश्‍न उपस्थित केला. शरियतच्या चुकीच्या प्रथांना विरोध करत तलाक प्रक्रिया न्यायालयातच व्हायला हवी, असेही त्यांनी सांगितले. 
      या प्रसंगी तलाक पद्धतीमुळे पीडित एका युवतीनेही अनुभवकथन केले. १६ व्या वर्षी लग्न झालेल्या पीडित महिलेचा कुटुंबियांकडून छळ होऊन तिच्यावर ओढवलेल्या दुर्दैवी स्थितीविषयीही त्यांनी अवगत केले. अशा आणखी काही घटना जवळपास घडल्याचेही त्यांनी सांगितले.

मुसलमान राष्ट्र इराणने एस्.एस्.आर्.एफ्. संकेतस्थळावर १० दिवसांसाठी घातलेली बंदी उठवली !

        मुंबई - स्पिरिच्युल सायन्स रिसर्च फाउंडेशन अर्थात् एस्.एस्.आर्.एफ्. या आध्यात्मिक संघटनेच्या एस्एस्आर्एफ् डॉट ऑर्ग (ssrf.org) या संकेतस्थळावर इराणने १० दिवसांसाठी बंदी घातली होती. १० ते २० ऑक्टोबर असा या बंदीचा काळ होता. ही बंदी आता उठवण्यात आली आहे. या बंदीमुळे इराणमधील जिज्ञासू संकेतस्थळावरील आध्यात्मिक ज्ञानापासून वंचित राहिले. इराण सरकारकडून या बंदीचे नेमके कारण समजू शकलेले नसले, तरी इस्लामेतर अध्यात्म शिकवणारे संकेतस्थळ म्हणून त्यावर बंदी घालण्यात आल्याची चर्चा आहे.

एका घटनेवरून राष्ट्रीय प्रसिद्धीमाध्यमांकडून राष्ट्रगीताच्या वेळी उभे रहाणे आवश्यक नाही, असा अपप्रचार !

अशी प्रसिद्धीमाध्यमे देशद्रोहीच ठरतात !
      पणजी, २३ ऑक्टोबर (वार्ता.) - गोव्यातील आयनॉक्स चित्रपटगृहात सलील चतुर्वेदी नावाच्या दिव्यांग (अपंग) टेनिसपटूच्या संदर्भात घडलेल्या कथित घटनेचा सोयिस्कर वापर करून देशभक्ती व्यक्त करण्यासाठी राष्ट्रगीताच्या वेळी उभे रहाणे आवश्यक नाही, असा अपप्रचार काही मोठ्या प्रसिद्धीमाध्यमांकडून केला जात आहे. 
      इंडियन एक्स्प्रेस आणि टाइम्स ऑफ इंडिया यांसारख्या प्रसिद्धीमाध्यमांनी ही बातमी लावून धरली आहे आणि या वृत्ताचा बाऊ केला आहे. मुंबई येथे रहाणारे ४९ वर्षीय सलील चतुर्वेदी गोव्यात आले असता आयनॉक्स या चित्रपटगृहात चित्रपट पहाण्यासाठी गेले होते. चतुर्वेदी हे दिव्यांग टेनिसपटू असून त्यांनी जपान आणि ऑस्टे्रलिया येथील स्पर्धांमध्ये भाग घेतला आहे. जेव्हा चित्रपटगृहात राष्ट्रगीत चालू होते, तेव्हा चतुर्वेदी उभे राहिले नसल्याने त्यांच्या मागे असलेल्या एका जोडप्याने त्यांना राष्ट्रगीतासाठी उभे रहाण्यासाठी मागून हात लावला. त्यानंतर राष्ट्रगीत संपल्यानंतर राष्ट्रगीतासाठी उभे न राहिल्याविषयी खडसावले. या वेळी चतुर्वेदी यांना उभे रहाता येत नसल्याचे लक्षात आल्यानंतर या जोडप्याने त्यांची क्षमाही मागितली. या संदर्भात चतुर्वेदी यांनी कोणतीही पोलीस तक्रार केलेली नाही. असे असतांना या घटनेचा बाऊ करून काही प्रसिद्धीमाध्यमे देशभक्ती व्यक्त करण्यासाठी राष्ट्रगीताला उभे रहाणे आवश्यक आहे का ? असा प्रश्‍न उपस्थित करून राष्ट्रगीताच्या वेळी उभे रहाण्याविषयी अपप्रचार करत आहेत.

चायना प्रॉडक्ट एक्झिबिशन २०१६ रहित करा; चिनी उत्पादनांवर बहिष्कार घाला !

वाशी येथील राष्ट्रीय हिंदू आंदोलनात राष्ट्रप्रेमी नागरिकांची मागणी !
आंदोलनाला उपस्थित राष्ट्र आणि धर्म प्रेमी नागरिक 
     नवी मुंबई, २३ ऑक्टोबर (वार्ता.) - नुकतेच चीनच्या शासकीय वृत्तपत्रातून चिनी उत्पादने घेऊ नका, असे भारतीय हे केवळ भुंकू शकतात, बाकी काही करू शकत नाहीत, अशा आशयाचा करणारा लेख प्रसिद्ध केला आहे. चीनमध्ये बनवण्यात आलेल्या विविध वस्तूंची विक्री वाढवण्यासाठी १५ ते १७ नोव्हेंबर या कालावधीत मुंबई येथे चायना प्रॉडक्ट एक्झिबिशन २०१६चे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रदर्शन भरवणे म्हणजे आपल्या देशाचे अहित करणार्‍या देशाला अर्थसाहाय्य करण्यासारखे आहे. भारतात वारंवार आतंकवादी कारवाया करणार्‍या पाकिस्तानला चीन नेहमीच उघडपणे साहाय्य करत आहे. चीनच्या हेकेखोरपणाला उत्तर देण्यासाठी आणि जनभावनांचा आदर राखण्यासाठी या प्रदर्शनाची अनुमती रहित करावी, अशी मागणी २२ ऑक्टोबर या दिवशी वाशी येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलनात करण्यात आली.

अमेरिकेत रहाणार्‍या भूतानच्या हिंदूंना हिंदु अमेरिकन फाऊन्डेशनकडून आर्थिक सहाय्य !

हिंदु अमेरिकन फाऊन्डेशनचे अभिनंदन !
      न्यूयॉर्क - अमेरिकेत भूतान येथून स्थलांतरित झालेल्या काही हिंदूंचे पुनर्वसन झाले आहे. त्यांची परिस्थिती दयनीय आहे. स्वत:ची भाषा, संस्कृती आणि धर्म यांचे रक्षण करण्यासाठी त्यांना साहाय्याची आवश्यकता आहे. त्यासाठी अमेरिकेतील हिंदु अमेरिकन फाऊन्डेशन या हिंदुत्वनिष्ठ संघटनेने १२ सहस्र डॉलर (८ लाख भारतीय रुपये) गोळा करण्याचा संकल्प केला होता. हा संकल्प नुकताच पूर्ण झाला असून फाऊन्डेशनने सर्व अर्पणदात्यांचे आभार मानले आहेत. या निधीतील ५० टक्के निधी गुम्माकोंडा रेड्डी फाऊन्डेशनने दिला आहे.


भाग्यनगर येथे हिंदु जनजागृती समितीकडून विद्यार्थ्यांसाठी फटाक्यांचे दुष्परिणाम या विषयावर मार्गदर्शन !

       भाग्यनगर (हैद्राबाद) - येथील अंबरपेट क्षेत्रामध्ये रोज बड्स किड्स वर्ल्ड या प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांना हिंदु जनजागृती समितीकडून फटाक्यांचे दुष्परिणाम याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. फटाक्यांच्या दुष्परिणामांविषयी जागृती करण्यासाठी ध्वनिचित्रफीतही (व्हीसीडीही) या वेळी दाखवण्यात आली. हिंदु जनजागृती समितीच्या सौ. तेजस्वी व्यंकटपूर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. शाळेतील २५५ मुले आणि ८ शिक्षक यांनी या व्याख्यानाचा लाभ घेतला. शाळेच्या प्रमुख सौ. रमादेवी वडवळकर यांचे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मोलाचे योगदान लाभले. 
क्षणचित्र 
शाळेच्या शिक्षकांसाठी तणावमुक्त जीवनासाठी अध्यात्म या विषयावर व्याख्यान आयोजित करण्याची सौ. वडवळकर यांनी या वेळी विनंती केली. चिनी फटाक्यांवर बंदी घालण्यासाठी हिंदु जनजागृती समितीकडून भाग्यनगरच्या जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देतांना 
समितीचे श्री. चेतन जनार्दन (डावीकडून दुसरे)
    भाग्यनगर (हैद्राबाद) - दिवाळीच्या काळात होणारे फटाक्यांचे दुष्परिणाम रोखणे, देवतांची चित्रे असणार्‍या फटाक्यांवर आणि चिनी फटाक्यांवर बंदी घालणे, या मागण्यांचे निवेदन हिंदु जनजागृती समितीकडून भाग्यनगरच्या जिल्हाधिकार्‍यांना नुकतेच देण्यात आले. या वेळी संतश्री पूज्यपाद आसाराम बापू यांच्या संप्रदायातील साधक, हिंदु वाहिनीचे कार्यकर्तेही सहभागी झाले होते. देहली सरकारने चिनी फटाक्यांवर बंदी घातली आहे, तसा निर्णय येथे घ्यावा, अशी मागणीही या वेळी करण्यात आली.

झारखंडच्या धनसार येथे हिंदु जनजागृती समितीप्रणीत रणरागिणी शाखेचे अध्यात्मावर मार्गदर्शन !

      धनबाद (झारखंड), २३ ऑक्टोबर (वार्ता.) - धनबाद जिल्ह्याच्या धनसार येथील सिद्धिविनायक सभागृहात मारवाडी महिला समितीच्या वतीने दोन दिवसीय आनंद मेळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळ्यामध्ये आनंदी जीवनासाठी अध्यात्म या विषयावर हिंदु जनजागृती समितीप्रणीत रणरागिणी शाखेच्या स्थानिक समन्वयक कु. निशाली सिंह यांनी जिज्ञासूंना संबोधित केले. आपण भौतिक वस्तूपासून सुख इच्छितो; परंतु या वस्तू क्षणभंगूर असल्यामुळे कालांतराने त्यापासून आपण दु:खी होतो. ईश्‍वर चिरस्थायी त्याचप्रमाणे आनंदायक आहे. त्याच्या साधनेने आपण चिरंतन आनंद प्राप्त करू शकतो, असे प्रतिपादन कु. सिंह यांनी केले. ११० जिज्ञासूंनी या प्रवचनाचा लाभ घेतला. सनातन संस्थेच्या सात्त्विक उत्पादन तसेच ग्रंथ यांचे विक्रीकेंद्र लावण्यात आले होते. 
क्षणचित्रे
१. मार्गदर्शन चालू झाल्यानंतर मेळ्यामध्ये फिरत असलेले काही जिज्ञासू स्वत:हून प्रवचनस्थळी आले आणि त्यांनी संपूर्ण मार्गदर्शनाचा लाभ घेतला.
२. विविध प्रांतांमधून आलेल्या विक्री केंद्रांवरील लोकांनीही मार्गदर्शन लक्षपूर्वक ऐकले.

बिलियडर्सचे जगप्रसिद्ध खेळाडू मायकल फरेरा यांना ४०० कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी अटक !

      भाग्यनगर (हैद्राबाद) - देशातील माजी बिलियडर्स खेळाडू आणि एकाकाळी जागतिक विजेता असलेल्या मायकल फरेरा यांना ४०० कोटी रुपयांच्या घोटाळ्या प्रकरणी नुकतीच भाग्यनगर पोलिसांनी अटक केली. पद्मभूषण पुरस्कार प्राप्त फरेरा यांच्यावर अनधिकृत विपणन (मार्केटिंग) योजनेत सहभागी असल्याचा आरोप आहे. विहान डायरेक्ट सैलिंग या आस्थापनाच्या संचालकांपैकी फरेरा हे एक असून सदर अनधिकृत आर्थिक योजना याच आस्थापनाकडून चालवण्यात आली होती.

भाग्यनगर येथे बनावट नोटांची तस्करी करणार्‍या टोळीला अटक !

      भाग्यनगर (हैद्राबाद) - बनावट भारतीय चलनी नोटांची तस्करी करणारी एक टोळी भाग्यनगर पोलिसांनी पकडली आहे. दुबईहून आणलेल्या ९ लक्ष रुपये किमतीच्या बनावट नोटांसह ३ जणांना पोलिसांनी कह्यात घेतले आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये महंमद अकील मर्फानी, घियास मोहिउद्दीन आणि महंमद तौफीक यांचा समावेश आहे. या बनावट नोटा भारतात पाठवणारा महंमद यासीन हा कराची येथील रहिवाशी असून सध्या तो बेपत्ता आहे. (अल्पसंख्यांकांचे गुन्हेगारी आणि राष्ट्रद्रोह यांच्या संदर्भात मात्र अधिक प्रमाण असल्याचे हे आणखी एक उदाहरण ! - संपादक) या प्रकरणी पुढील चौकशी चालू आहे, असे एका वरिष्ठ पोलीस अधिकार्‍याने सांगितले.


केंद्र सरकारने पाकिस्तानी कलाकारांच्या बंदीविषयीचे ठोस धोरण सिद्ध करावे ! - अभिनेत्री रेणुका शहाणे

जे एका अभिनेत्रीला वाटते, ते केंद्र सरकारला का वाटत नाही ?
      मुंबई - पाकिस्तानी कलाकारांचा मला कोणताही पुळका नाही; पण केवळ ए दिल है मुश्किल चित्रपटावर बंदी घालून हा प्रश्‍न सुटणार नाही. कला क्षेत्रातच नव्हे, तर क्रीडा, व्यवसाय आणि अन्य सर्वच क्षेत्रांत पाकिस्तानशी आपण कोणतेही संबंध ठेवू नये. पाकिस्तानी कलाकार रितसर व्हिसा घेऊन भारतात येतात. त्यामुळे त्यांना कोणत्याही प्रकारचा व्हिसा दिला जाऊ नये; पण त्यासाठी मुळातच पाकिस्तानी कलाकार भारतात येऊन काम करू शकणार नाहीत, असे ठोस धोरण केंद्र सरकारनेे राष्ट्रीय स्तरावरच तात्काळ सिद्ध करावे, असे प्रतिपादन अभिनेत्री रेणुका शहाणे यांनी केले. असे धोरण ठरवण्यासाठी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुढाकार घेऊन त्याचा पाठपुरावा करावा, असे आवाहनही त्यांनी केले.

जापानमध्ये २ स्फोटांत एकाचा मृत्यू !

        टोकीयो - उतसुनोमिया येथील पार्कमध्ये एकाच वेळी २ स्फोट झाले. यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला, तर दोघे जण घायाळ झाले. या स्फोटांचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. एक स्फोट सायकल स्ॅटण्डजवळ, तर दुसरा चारचाकी वाहनतळाच्या येथे झाला. यात एका चारचाकी संपूर्ण जळाली.

अखिलेश यादव यांच्याकडून ४ मंत्र्यांची हकालपट्टी !

उत्तरप्रदेशमध्ये 
सत्ताधारी कुटुंबात यादवी !
        लक्ष्मणपुरी - उत्तरप्रदेशमध्ये मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी मंत्रीमंडळातून ४ मंत्र्यांची हकालपट्टी केली आहे. यांत त्यांचे काका शिवपाल यादव यांचादेखील समावेश आहे. अखिलेश यादव यांनी पक्षाच्या आमदारांची बैठक बोलावली होती. या बैठकीत ते म्हणाले की, पक्षातील नेते अमरसिंह यांनी कट केला असून अमरसिंह यांच्या निकटवर्तियांना माझ्या मंत्रीमंडळात स्थान मिळणार नाही. गेल्या काही महिन्यांपासून समाजवादी पक्षाच्या यादव कुटुंबियांमध्ये कलह चालू आहे. पक्षाचे आमदार उदयवीर सिंह यांनाही ६ वर्षांसाठी पक्षातून निलंबित करण्यात आले आहे.

गाजीपूर (बंगाल) येथे धर्मांधांनी महाकाली मंदिरात तोडफोड करून मूर्ती पळवल्याने तणाव !

ममता(बानो) यांच्या बंगालचे इस्लामिस्तान झाल्यामुळेच 
तेथील धर्मांधांपासून हिंदू आणि हिंदूंची मंदिरे असुरक्षित !
         गाजीपूर (बंगाल) - युसुफपूर येथील महाकाली मंदिरावर धर्मांधांनी रात्रीच्या वेळी आक्रमण करून तेथील कालीमातेची मूर्ती, पिंडी आणि मंदिराच्या द्वारावरील दुर्गामातेची मूर्ती पळवून नेली. तसेच मंदिरातील साहित्यांची तोडफोड केली. मंदिराची घंटा शेजारच्या शेतात फेकून दिली.
         मंदिराचे पुजारी नेहमीप्रमाणे संध्याकाळी पूजा, आरती करून रात्री आठ वाजता मंदिराचे द्वार बंद करून गेले होते. त्यानंतर रात्री उशिरा हे आक्रमण करण्यात आले.
         पहाटे ४ वाजता पुजारी सत्यप्रकाश उपाख्य मुकेश मंदिराच्या स्वच्छतेसाठी आले असता ही घटना उघड झाली. पुजार्‍याने स्थानिक लोकांना आणि पोलिसांना याची माहिती दिली. त्यानंतर मंदिराजवळ मोठ्या संख्येने हिंदु उपस्थित झाले. या वेळी लोकांनी पोलिसांच्या विरोधात घोषणाबाजी केली. येथे तणाव निर्माण झाल्याने पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकारी घटनास्थळी आले. त्यांनी लोकांना समजावण्याचा प्रयत्न केला. (हिंदूंना शांत करण्याऐवजी हे कुकृत्य करणार्‍या धर्मांधांवर पोलीस आणि प्रशासन कारवाई का करत नाही ? नेहमी असे प्रकार घडल्यावर हिंदूंना शांत करून प्रकरण कसे दाबता येईल, असाच पोलीस आणि प्रशासन यांचा डाव असतो ! - संपादक) येथे भाजपचे माजी आमदार पशुपतीनाथ राय आणि त्यांचे कार्यकर्तेही पोचले. पशुपतीनाथ यांनी प्रशासनाला चेतावणी दिली की, ३ दिवसांत कारवाई झाली नाही, तर आम्ही रस्ताबंद आंदोलन करू. यानंतर प्रशासकीय अधिकार्‍यांनी दोषींना शोधून काढण्याचे आश्‍वासन दिल्यावर लोक शांत झाले.

फराळाचे पदार्थ ठेवण्यासाठी वर्तमानपत्रे वापरणे आरोग्यासाठी धोकादायक

      मुंबई - दिवाळीला करण्यात येणार्‍या फराळाचे पदार्थ ठेवण्यासाठी, त्यातील तेल टिपण्यासाठी वर्तमानपत्रे वापरतात; मात्र त्यामुळे गंभीर आजाराचा धोका अधिक आहे. फराळाचे अनेक पदार्थ तळलेले असतात, त्यामुळे ते ठेवण्यासाठी आणि तेल टिपण्यासाठी वर्तमानपत्रांवर पसरले जातात. वर्तमानपत्रांसाठी जी शाई वापरली जाते, ती आरोग्याला अत्यंत धोकादायक असते. यामुळे कर्करोगाचाही धोका वाढतो.
१. मासिके किंवा वर्तमानपत्रामधील शाई तेलकट पदार्थांमध्ये सहज शोषली जाते. शाईमधील ग्राफाईट हा घटक घातक असल्याने यामुळे कर्करोग होण्याचा धोकाही असतो. 
२. शरीरातील विषारी घटक मूत्रविसर्जनातून किंवा शौचातून बाहेर पडतात; परंतु ग्राफाईट शरीरात साचून राहतो. त्याचा परिणाम मूत्रपिंड आणि फुफ्फुस यांवर होतो.

पुणे येथील सभेचे निमंत्रण स्वीकारून भाजपचे नगरसेवक श्री. श्रीनाथ भिमाले यांचाही एक भारत अभियानाला पाठिंबा !

पुणे येथील सभेचे निमंत्रण स्वीकारून 
भाजपचे नगरसेवक श्री. श्रीनाथ भिमाले 
यांचाही एक भारत अभियानाला पाठिंबा !

बेकायदेशीररीत्या गायी घेऊन जाणारे ४ ट्रक पकडले

गायींनी भरलेला ट्रक
गोवंश हत्याबंदी कायद्याच्या प्रभावी कार्यवाहीची आवश्यकता !
     ठाणे - बेकायदेशीररीत्या गायी घेऊन जाणारे ४ ट्रक स्थानिक रहिवाशांनी ठाण्यातील पातलीपाडा येथे पकडून पोलिसांच्या स्वाधीन केल्याची घटना २१ ऑक्टोबर या दिवशी सायंकाळी घडली. या प्रकरणी रात्री उशिरा कासारवडवली पोलिसांत गुन्हा प्रविष्ट करण्यात आला. ठाण्यातील पातलीपाडा भागात २१ ऑक्टोबरला गायी भरून घेऊन जाणारे ४ ट्रक स्थानिक रहिवाशांना दिसले. हे ट्रक अडवून ट्रक चालकांची चौकशी केली असता त्यांनी घटनास्थळावरून पळ काढण्याचा प्रयत्न केला. हे सर्व ट्रक रहिवाशांनी अडवून धरत पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिसांनी हे सर्व ट्रक कह्यात घेतले आहेत.

पू. आसारामबापूंची निर्दोष सुटका होईल ! - पू. संभाजीराव भिडे गुरुजी

बैठकीला उपस्थित पू. बापूजींचे साधक आणि अन्य कार्यकर्ते 
पू. गुरूजींकडून सनातनच्या कार्याचे कौतुक
     अमरावती - ढग सूर्याला खाऊ शकत नाही, केवळ काही काळापुरते झाकाळु शकतात आणि तेही दुरूनच. सूर्याच्या जवळ ते जाऊ शकत नाहीत; कारण सूर्य शेवटीसूर्यच आहे. पू. आसारामबापूंवर लावलेले आरोप खोटे असून लवकरच बापूंची निर्दोष सुटका होईल, असे मत श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या संघटनेचे संस्थापक पू. संभाजीराव भिडे गुरुजी यांनी संत पू. आसारामजी बापू यांच्या अमरावती येथील आश्रमात बोलतांना व्यक्त केले.
     श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या स्थानिक शाखेद्वारे बापूंच्या अमरावती आश्रमात पू. भिडे गुरूजींच्या उपस्थितीत आणि मार्गदर्शनाखाली विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत श्री योग वेदांत सेवा समितीचे सचिव श्री. मानव बुद्धदेव, श्री. दयाराम राठोड, श्री. नंदलाल तरडेजा आणि श्री. रामेश्‍वर इंगोले यांनी गुरूजींचा श्रीफळ अन् पू. बापूजींची पुस्तके भेट देऊन सन्मान केला. पू. बापूजींच्या साधकांशी चर्चा करतांना त्यांनी वरील विधान केले.

कुख्यात गुंड अरुण गवळीची पॅरोलवर नागपूर कारागृहातून सुटका

कुख्यात गुंडांना पॅरोल मिळतो; मात्र मालेगाव 
प्रकरणातील हिंदु बंदीवानांना मिळत नाही हे आश्‍चर्य !
      मुंबई, २३ ऑक्टोबर - कुख्यात गुंड अरुण गवळीची पॅरोलवर कारागृहातून सुटका झाली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अरुण गवळीला २१ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबरपर्यंत अभिवचन रजा (पॅरोल) संमत केली आहे. गवळीच्या आजारी पत्नीवर २५ ऑक्टोबर या दिवशी शस्त्रक्रिया होणार आहे. त्यासाठी त्याला रजा देण्यात आली आहे. विभागीय आयुक्तांनी रजेचा अर्ज नाकारल्यामुळे गवळीने उच्च न्यायालयात रिट याचिका प्रविष्ट केली होती. ही याचिका अंशत: संमत करण्यात आली आहे. गवळीला शिवसेनेचे नगरसेवक कमलाकर जामसांडेकर यांच्या हत्येच्या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा झाली आहे.

सनातन संस्थेचे कार्य चांगले आहे ! - डी.रा. कदम, उथळसर प्रभाग ठाणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ब्लॉक अध्यक्ष

श्रीफळ स्वीकारतांना सौ. चित्ररेखा कुलकर्णी 
(डावीकडून तिसर्‍या), समवेत मंडळाचे अध्यक्ष श्री. डी.रा. कदम (भाऊजी)
     जागमाता (ठाणे) - खोपट येथील सिद्धेश्‍वर तलाव मित्र मंडळात नवरात्रोत्सवानिमित्त सनातनच्या साधिकांनी ३५ महिलांना मार्गदर्शन केले. सिद्धेश्‍वर तलाव मित्र मंडळाचे अध्यक्ष आणि उथळसर प्रभाग ठाणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ब्लॉक अध्यक्ष श्री. डी.रा. कदम (भाऊजी) प्रभावित झाले. ते म्हणाले, स्त्रिया असूनही तुम्ही धर्मकार्य करता. सनातचे कार्य चांगले आहे. त्यांनी साधकांचा श्रीफळ देऊन सत्कार केला.
भाजयुमोचा एक भारत अभियानास जाहीर पाठिंबा !

एक भारत अभियानाला पाठिंबा दर्शवतांना श्री. दीपक पोटे (उजवीकडून तिसरे),
श्री. विशाल पवार (उजवीकडून पाचवे), श्री. गणेश घोष (उजवीकडून दुसरे)
     पुणे - काश्मिरी हिंदूंच्या हक्कांसाठी, तसेच त्यांचे काश्मीरमध्ये सन्मानाने पुनर्वसन केले जावे, या मागणीसाठी येथे एक भारत अभियानाच्या अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या हिंदु धर्मजागृती सभेस भारतीय जनता युवा मोर्चाने जाहीर पाठिंबा दिला आहे. भाजयुमोच्या सर्व कार्यकर्त्यांसह सभेला उपस्थित रहाणार असल्याचे भाजयुमोचे श्री. दीपक पोटे यांनी सांगितले. धर्मजागृती सभेचे निमंत्रण देण्यासाठी हिंदु जनजागृती समितीचे श्री. सुनील घनवट यांनी त्यांची भेट घेतली. त्या वेळी ते बोलत होते. या प्रसंगी श्री. विशाल पवार, भाजपचे सरचिटणीस श्री. गणेश घोष यांच्यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

नागपूर येथे विविध मागण्यांसाठी राष्ट्रीय हिंदू आंदोलन

आंदोलनस्थळी बोलतांना ह.भ.प. श्री वणवे महाराज
     नागपूर - येथे सक्करदरा चौकात राष्ट्रीय हिंदू आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. आंदोलनात शिवसेना, वारकरी संप्रदाय अशा विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचा पाठिंबा लाभला. या वेळी आरोग्यास आणि पर्यावरणास घातक अशा चिनी बनावटीच्या फटाक्यांवर, तसेच चिनी वस्तूंवर बंदी घालावी, शत्रुराष्ट्र पाकिस्तानातील कलाकारांना भारतात काम करून पैसे कमावण्यावर बंदी घालावी आणि छत्रपती शिवरायांचे २३ किल्ले खाजगी व्यक्तींच्या कह्यात आहेत, ते त्वरित शासनाने अधिग्रहीत करून त्यांना राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करावे आणि त्यांचे संवर्धन करावे, अशा मागण्या आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात आल्या.

यापुढे पाक कलाकार हिंदी चित्रपटात नसतील ! - मुख्यमंत्र्यांनी मध्यस्ती केलेल्या बैठकीत निर्णय

     मुंबई - निर्मात्यांनी पाक कलाकारांना चित्रपटात घेतले, त्यांनी प्रायश्‍चित्त म्हणून आर्मी वेलफेअर फंडाला ५ कोटी रुपये द्यावे, चित्रपट चालू होण्याआधी उरीच्या शहिदांना श्रद्धांजली वहाण्याच्या संदर्भातील पाटी लावावी, यापुढे पाक कलाकार किंवा गायक हिंदी चित्रपटात नसतील, असे दिल है मुश्किल हा चित्रपट प्रदर्शित होण्याविषयी घेण्यात आलेल्या आणि मुख्यमंत्र्यांनी मध्यस्ती केलेल्या बैठकीत ठरले. या चित्रपटाला मनसेने मोठ्या प्रमाणात विरोध केला होता. मुख्यमंत्री, दिग्दर्शक करण जोहर, निर्माता मुकेश भट आणि राज ठाकरे यांची या संदर्भात बैठक झाली.
     राज ठाकरे म्हणाले की, पाक कलाकारांच्या विरोधातही मनसेने यापूर्वी आवाज उठवला आहे. पाक कलाकारांना रेड कार्पेट कशासाठी ? पाक कलाकार असे कोणते कलाकार आहेत की, त्यांना घेऊन तुम्ही चित्रपट केलाच पाहिजे, असे प्रश्‍न राज ठाकरे यांनी विचारले आहेत. या संदर्भात शिवसेनेकडून आणि सामाजिक संकेतस्थळावरून टीका होत आहे.

भुसावळ येथे मुसलमानांकडून ५ टक्के आरक्षणाची मागणी, तर समान नागरी कायद्याला मूक मोर्चाद्वारे विरोध

     भुसावळ - येथे मुस्लीम पर्सनल लॉ बोर्ड आणि सर्व मुसलमान संघटनांच्या वतीने जाम-मोहल्ला भागातील खडका रस्त्यावरील रजा टॉवर येथून प्रांताधिकारी कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात आला. या वेळी प्रांताधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनात ५ टक्के आरक्षण मिळावे, नियोजित समान नागरी कायदा रहित करण्यात यावा, अशा मागण्या मूक मोर्च्याद्वारे करण्यात आल्या. (एका बाजूला आरक्षण हवे आणि दुसर्‍या बाजूला समान नागरी कायदा नको अशी दुटप्पी भूमिका असणारे कधीतरी राष्ट्रहिताचा विचार करतील का ? - संपादक)

राष्ट्रप्रेमींच्या चेतावणीनंतर वसई येथील कार्निवल चित्रपटगृहाच्या प्रतिनिधींनी ऐ दिल है मुश्किल या चित्रपटाचा फलक उतरवला !

असे कृतीशील नागरिकच देशाची शक्ती आहे ! 
कार्निवल चित्रपटगृहाच्या प्रतिनिधींना
निवेदन देतांना राष्ट्रप्रेमी नागरिक
      मुंबई, २३ ऑक्टोबर (वार्ता.) - देशात पाकपुरस्कृत आतंकवाद थैमान घालत असतांना आणि देशाच्या सीमांचे रक्षण करणार्‍या सैनिकांवर जिहादी आक्रमणे होत असतांना भारतातील पाक कलाकारांनी त्याचा साधा निषेध नोंदवलेला नाही. त्यामुळे पाक कलाकारांचा कोणताही चित्रपट प्रदर्शित करू नये, अशी चेतावणी दिल्यावर वसई येथील कार्निवल सिनेमागृहाच्या प्रतिनिधींनी ऐ दिल है मुश्किल या चित्रपटाचा फलक उतरवला. याविषयी राष्ट्रप्रेमी नागरिकांच्या वतीने पाक कलाकारांचे चित्रपट प्रदर्शित करू नयेत, अशी विनंती करणारे निवेदन येथील कार्निवल सिनेमागृह आणि नालासोपारा येथील मिराज सिनेमागृह येथील मल्टिप्लेक्स मालकांना देण्यात आले.

जळगाव येथे लाच मागितल्याच्या प्रकरणी पोलिसांना अटक

कायद्याचे रक्षक बनले भक्षक !
      जळगाव - येथील अडावद पोलीस ठाण्याचे साहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश देशमुख आणि साहाय्यक फौजदार नीलकंठ पाटील यांच्यावर लाच स्वीकारल्याच्या प्रकरणी गुन्हा प्रविष्ट झाला आहे. नीलकंठ पाटील यांना अटक करण्यात आली, तर साहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश देशमुख पसार झाले आहेत. धानोरा, ता. चोपडा येथील एका नागरिकावर गुन्हा प्रविष्ट झाला असून या गुन्ह्यात त्यांना न्यायालयाकडून जामीन संमत झाला आहे. याविषयी योगेश देशमुख यांनी संबंधित नागरिकाला दंगलीच्या प्रकरणी गुन्हा प्रविष्ट झाल्यामुळे तुम्ही ५ सहस्र रुपये आणि मद्याच्या बाटल्या दिल्यास तुमच्यावर अडवदा पोलीस ठाण्यातच चॅप्टर केस प्रविष्ट करू अन्यथा स्थानिक गुन्हे शाखेमध्ये चॅप्टर केस प्रविष्ट करू असे सांगितले. याविषयी नागरिकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला कळवल्यावर त्यांनी साहाय्यक फौजदार नीलकंठ पाटील यांना लाच स्वीकारतांना कह्यात घेतले.

विसंगत उत्तरे देऊन महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून दोषी अधिकार्‍यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न

भिवंडी, ठाणे येथे अवैधपणे चालवल्या जाणार्‍या 
पशूवधगृहाच्या संदर्भात हिंदु जनजागृती समितीने तक्रार केल्याचे प्रकरण
       ठाणे, २३ ऑक्टोबर - भिवंडी, ठाणे येथे महानगरपालिकेकडून इदगाह हे पशूवधगृह अवैधपणे चालवले जाते. या पशूवधगृहावर आणि त्याचे संरक्षण करणार्‍यांवर कायदेशीर कारवाई करण्याविषयी हिंदु जनजागृती समितीने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला पत्र लिहिले होते. प्रदूषण नियंत्रण मंडळाने त्याविषयी खुलासा करणारे पत्र हिंदु जनजागृती समितीला दिले; मात्र त्यात केलेल्या मागणीच्या विसंगत उत्तरे देण्यात आली. (गणेशोत्सवाच्या वेळी तथाकथित प्रदूषणाचे कारण पुढे करून हिंदूंच्या धार्मिक भावनांवर आघात करणारे आणि पर्यावरणप्रेमाचा उमाळा येणारे पुरो(अधो)गामी याविषयी चकार शब्दही काढत नाहीत ! - संपादक)

मांगूर (जिल्हा बेळगाव) येथे २४ ऑक्टोबरला श्रीराम सेना शाखेचे उद्घाटन आणि हिंदु धर्मजागृती सभेचे आयोजन !

       मांगूर, २३ ऑक्टोबर (वार्ता.) - चिक्कोडी तालुक्यातील मांगूर येथे २४ ऑक्टोबर या दिवशी श्रीराम सेनेचे संस्थापक अध्यक्ष श्री. प्रमोद मुतालिक यांच्या उपस्थितीत श्रीराम सेना शाखेचे उद्घाटन आणि हिंदु धर्मजागृती सभेचे आयोजन करण्यात आले आहे. येथील ग्रामदैवत श्री भैरवनाथ मंदिर समोरील पटांगणात हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाला श्रीराम सेनेचे बेळगाव जिल्हाध्यक्ष सर्वश्री रमाकांत कोंडुसकर आणि निपाणी (जिल्हा बेळगाव) येथील कार्यकर्ते सागर श्रीखंडे उपस्थित रहाणार आहेत. सभेपूर्वी गावातून मिरवणूक काढून वक्त्यांचे भव्य स्वागत करण्यात येईल.

घोषणांची कार्यवाही लवकरच होणार ! - वस्त्रोद्योगमंत्री सुभाष देशमुख

      इचलकरंजी (जिल्हा कोल्हापूर), २३ ऑक्टोबर (वार्ता.) - महाराष्ट्राचे मँचेस्टर म्हणून ओळखल्या जाणार्‍या येथील यंत्रमागाशी संबंधित विविध संघटनांच्या पदाधिकार्‍यांनी वस्त्रोद्योगमंत्री श्री. सुभाष देशमुख यांची २१ ऑक्टोबर या दिवशी भेट घेतली आणि यंत्रमाग उद्योगातील अडचणी आणि सद्यपरिस्थितीची माहिती दिली. येथे २७ ऑगस्ट या दिवशी दिलेल्या आश्‍वासनांची पूर्तता लवकरात लवकर करावी, अशी मागणी केली. दिवाळीपर्यंत यंत्रमाग उद्योग सुरळीत न झाल्यास हा उद्योग पूर्णपणे बंद पडेल, असेही पदाधिकार्‍यांनी सांगितले. त्यावर इचलकरंजी दौर्‍यात २७ ऑगस्ट या दिवशी केलेल्या घोषणांची कार्यवाही लवकरात लवकर होईल, असे आश्‍वासन श्री. देशमुख यांनी दिले.पंढरपूर येथे अवैध वाळू उपसा विरुद्ध मोहीम

अवैध कृत्ये बंद व्हावीत, यासाठी प्रशासन ठोस उपाययोजना काढणार का ? 
४५ होड्या, १ जेसीबी, दोन टिपर यांच्यावर प्रशासनाकडून कारवाई !
      पंढरपूर - पंढरपूर रेल्वे पूल ते गुरसाळे यामधील भीमा नदीपात्रात अवैध वाळू उपसा करणार्‍या ४५ लाकडी होड्या, तर अवैध मुरूम उचलणारा जेसीबी, तसेच दोन टिपर (मोठे ट्रक) यांवर महसूल विभागाच्या पथकाने कारवाई केली. काही गावांच्या परिसरातील अवैध वाळूसाठा कह्यात घेतला. लाकडी होड्या जेसीबीच्या साहाय्याने मोडून टाकण्यात आल्या, अशी माहिती प्रांताधिकारी श्री. देशमुख यांनी दिली.

अकलूज (जिल्हा सोलापूर) येथे वीज जोडणीच नाही; पण देयक मात्र सहस्रांत !

विद्युत कार्यालयाचा भोंगळ कारभार उघड !
     अकलूज (जिल्हा सोलापूर) येथील माळीनगर येथे विजेची जोडणी न देताच २९ सहस्र ५०० रुपयांचे देयक शेतकर्‍याच्या नावे देण्याचा अजब कारभार अकलुज विद्युत कार्यालयाकडून घडला आहे. अनिल शिवराम एकतपुरे असे सदर शेतकर्‍याचे नाव असून त्यांनी २०१४ ला वीज जोडणीची मागणी केली होती; पण अद्याप वीज जोडणी मिळालेली नसली, तरी जून २०१६ ला एकतपुरे यांना २९ सहस्र ५०० रुपयांचे देयक अकलूज कार्यालयाने पाठवले आहे. त्यामुळे दोन वर्षांत वीज जोडणी न देता एवढे देयक आल्याने विद्युत कार्यालयाचा भोंगळ कारभार उघडकीस आला आहे. विजेची जोडणी न देता देयक मात्र त्यांना वेळेवर मिळत आहे. आता मात्र वीज जोडणी न दिल्यास आणि देयक रहित न केल्यास अकलूज कार्यालयासमोरच आपण आत्मदहन करणार असल्याचे, एकतपुरे यांनी सांगितले आहे.

श्री महालक्ष्मी देवीच्या शालूची ५ लक्ष ५ सहस्र रुपयांना विक्री !

        कोल्हापूर, २३ ऑक्टोबर (वार्ता.) - करवीर निवासिनी श्री महालक्ष्मीच्या २ शालूंचा २१ ऑक्टोबर या दिवशी दुपारी लिलाव करण्यात आला. पुणे येथील बांधकाम व्यावसायिक श्री. सुभाष येमूल यांनी ५ लक्ष ५ सहस्र रुपयांना हा शालू विकत घेतला. प्रतीवर्षी दसर्‍याच्या वेळी तिरुपती बालाजी येथून श्री महालक्ष्मी देवीला मानाचा शालू पाठवला जातो. प्रतीवर्षी या शालूचा पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या वतीने लिलाव केला जातो.


पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयात वाहन नोंदणी प्रमाणपत्रासाठी कागद नाही

प्रादेशिक परिवहन विभागाचा अनागोंदी कारभार ! 
१ सहस्र ३०० कोटींचा महसूल; पण नागरिकांची प्रमाणपत्रासाठी वर्षभर फरफट
      पुणे - प्रादेशिक परिवहन कार्यालयात नव्या वाहनाची नोंदणी झाल्यानंतर नोंदणीचे प्रमाणपत्र ३ मासांत टपालाने पाठवले जाईल, असे सांगितले जात असले, तरी प्रत्यक्षात हे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी नागरिकांना वर्षभराची वाट पहावी लागत आहे. (स्वातंत्र्यप्राप्तीनंतर जनतेला अशा समस्येला सामोरे जावे लागणे, हे लोकशाहीतील प्रशासनाचे अपयश नव्हे का ? - संपादक) तसेच वाहन नोंदणी प्रमाणपत्रासाठी लागणारा कागद कार्यालयाला पुरेशा प्रमाणात उपलब्ध होत नाही. त्यामुळे सध्या टपाल खात्याद्वारे प्रमाणपत्रे घरी पाठवण्याची व्यवस्था फोल ठरत आहे. त्यातच गंभीर गोष्ट म्हणजे, वर्षाला अनुमानेे १ सहस्र ३०० कोटी रुपयांचा महसूल देणार्‍या प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे प्रमाणपत्रासाठी पुरेसा कागद उपलब्ध नाही. (या प्रकरणी शासनाने लक्ष घालून नागरिकांची समस्या सोडवावी आणि या प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, ही सर्वसामान्य जनतेची अपेक्षा ! - संपादक)

पोलिसांना ध्वनीमापक उपकरणे नोव्हेंबर अखेरपर्यंत उपलब्ध करून न दिल्यास अवमान कारवाई अटळ !

निर्ढावलेली प्रशासकीय यंत्रणा !
मुंबई उच्च न्यायालयाची चेतावणी 
      मुंबई - उत्सवाच्या कालावधीत आवाजावर नियंत्रण ठेवण्यासाठी आवश्यक असलेली ध्वनीमापक उपकरणे पोलिसांना दिवाळीपूर्वी उपलब्ध होऊ न शकण्यामागे सरकारची उदासीनता नव्हे, तर विदेशी आस्थापनाची दिरंगाई कारणीभूत असल्याचा दावा अतिरिक्त गृह सचिव के.पी. बक्षी यांनी मुंबई उच्च न्यायालयात केला. हा खुलासा उच्च न्यायालयाने अमान्य करत सरकारने आतापर्यंत न्यायालयाचे सगळे आदेश धाब्यावर बसवलेले आहेत. त्यामुळे त्यांचा हा खुलासा मान्य केला जाऊ शकत नाही. पोलिसांना ध्वनीमापक उपकरणे नोव्हेंबर अखेरपर्यंत उपलब्ध करून न दिल्यास बक्षी यांच्यावरील अवमान कारवाई अटळ आहे, अशी चेतावणी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक आणि न्यायमूर्ती अमजद सय्यद यांच्या खंडपिठाने दिली.

तपोवन फलकाचे अनावरण !

      सांगली, २३ ऑक्टोबर (वार्ता.) - गावभाग येथील विष्णुघाट येथील तपोवन परिसर या फलकाचे अनावरण नगरसेवक श्री. युवराज बावडेकर यांच्या हस्ते करण्यात आले. तपोवन परिसर म्हणजे विष्णुघाट, विष्णुमंदिर, मारुति मंदिर, महादेव मंदिर, कृष्णामाई मंदिर, तसेच अन्य परिसराचा समावेश होतो. या परिसरात महापालिकेच्या वतीने विविध उपक्रम राबवण्यात येतील, असे श्री. युवराज बावडेकर यांनी सांगितले. या वेळी सर्वश्री शरदराव फडके, नाना बावडेकर, बाळासो पोतदार, विनायक कुन्नुर, सुनील कुंभार यांसह १५० हून अधिक नागरिक उपस्थित होते. या परिसराचा उल्लेख १६ व्या शतकात एका हिंदी भाषेत असलेल्या पोथीत करण्यात आला आहे.

फलक प्रसिद्धीकरता

पाकला संपवण्यासाठी पंतप्रधान पावले उचलतील, अशी अपेक्षा !
      पाक सैन्याने नियंत्रणरेषेजवळ केलेल्या गोळीबारात घायाळ झालेले सीमा सुरक्षा दलाचे सैनिक गुरनाम सिंह यांचे २२ ऑक्टोबरला निधन झाले. यावर त्यांच्या वडिलांनी म्हटले, माझ्या मुलाचा मला अभिमान आहे. आता पंतप्रधान मोदी यांनी पाकविरुद्ध युद्ध पुकारावे.

हिंदू तेजा जाग रे !

Jago !
Pak ki golibarime virgati prapt sainik Gurnam Singhke pitane
kaha, Ab Modiji Pak ke virudh yudha ghoshit kare!
Kya Sarkar Pakko mitaneka sahas dikhayegi
जागो !
पाक की गोलीबारी में वीरगति प्राप्त सैनिक गुरनाम सिंह के पिता ने कहा,
अब मोदीजी पाक के विरुद्ध युद्ध घोषित करें !
क्या सरकार पाक को मिटाने का साहस दिखाएगी ?

क्रांतीकारक मदनलाल धिंग्रा यांनी ब्रिटीश अधिकार्‍याला गोळ्या घालून ठार मारले, हाच आधुनिक भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील पहिला सर्जिकल स्टाईक ! - देशभक्त चंद्रकांतजी शहासने

पुस्तक प्रकाशनाच्या वेळी उपस्थित मान्यवर
    पंढरपूर - स्वातंत्र्यवीर सावरकर बंधूंच्या सैनिकीकरणाच्या धोरणामुळेच वर्ष १९४७ मध्ये ब्रिटीश सैन्यात हिंदू बहुसंख्य होते. सैन्यात मुसलमान बहुसंख्य असते, तर संपूर्ण भारतच गमावण्याची वेळ आली असती. केवळ देशभक्तीवर कविता लिहिली म्हणून क्रांतीवीर बाबाराव सावकारांना ब्रिटीश शासनाने सश्रम कारावास आणि जन्मठेपेची शिक्षा दिले अन् अंदमानच्या कारावासात धाडले. ब्रिटीश शासनाचा सूड उगवण्यासाठी क्रांतीकारक मदनलाल धिंग्रा यांनी ऐन ब्रिटनच्या राजधानीत कर्झन वायली या अधिकार्‍याला गोळ्या घालून ठार मारले आणि भारतीय स्वातंत्र्याचा प्रश्‍न जगाच्या समोर आणला. हाच खरा आधुनिक भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील पहिला सर्जिकल स्टाईक होता, असे उद्गार देशभक्त कोषाकार श्री. चंद्रकांतजी शहासने यांनी काढले. येथील क्रांतीकारक आणि गोवामुक्तीकार दिवंगत वसंतदादा बडवे यांच्या ३१ व्या पुण्यतिथीनिमित्त नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.

देवद, पनवेल येथे लिंबू आणि कोंबडीचे डोके यांच्या माध्यमातून वाईट शक्तींचे आक्रमण झाल्याचे जाणवणे

सनातन संस्थेचे ग्रंथ आणि उत्पादने असणार्‍या परिसरातील घटना
कोंबडीचे कापलेल्या
स्थितीतील डोके
रस्त्यावर पडलेले लिंबू (वर्तुळात)

सातारा नगरपालिकेने भाजीमंडईजवळील कचराकुंडी हलवली

सनातन प्रभातच्या वृत्ताचा परिणाम !
हलवलेल्या कचराकुंडीची जागा (वर्तुळात)
      सातारा, २३ ऑक्टोबर (वार्ता.) - येथील राजवाडा परीसरातील भाजीमंडईजवळच सातारा नगरपालिकेच्या वतीने कचराकुंडी ठेवण्यात येत होती; मात्र या कचराकुंडीमुळे नागरिकांची सोय अल्प आणि गैरसोय अधिक होत होती. याविषयी सनातन प्रभातने छायाचित्रासह वृत्त प्रसिद्ध केले होते. तसेच नगरपालिकेच्या कर्मचार्‍यांनाही या वृत्ताविषयी कल्पना होती. यामुळे नगरपालिकेच्या कर्मचार्‍यांनी तातडीने ही कचराकुंडी तेथून हलवून परिसर स्वच्छ केला.

आपण राज्यकर्त्यांना विचारले, तर ते काम करतील; अन्यथा ते दुर्लक्षच करतील ! - अभिनेता नाना पाटेकर

सरकार आणि लोकप्रतिनिधी यांविषयी विदारक परिस्थिती दर्शवणारे बोल !
      रोहा (जिल्हा रायगड), २३ ऑक्टोबर - आपल्या आजच्या परिस्थितीला आपणच उत्तरदायी आहोत. आपल्या योग्यतेप्रमाणेच आपल्याला राजकारणी मिळणार. जशी प्रजा तसा राजा मिळतो. आपण राज्यकर्त्यांना खडसवायला हवेे. तसे न केल्यानेच त्यांचे फावते. कोणी विचारणारे नसल्याने ते दुर्लक्ष करतात. रस्त्यासारखी सुविधाही मिळत नाही. रस्ते का चांगले मिळत नाहीत ? ते ५ वर्षे का टिकत नाहीत ? त्यात काय अडचणी आहेत ? असे प्रश्‍न राज्यकर्त्यांना विचारल्यासच ते काम करतील; अन्यथा ते दुर्लक्षच करतील, असे खडे बोल अभिनेते नाना पाटेकर यांनी सामान्य नागरिक, सरकार आणि लोकप्रतिनिधी यांना सुनावले. रायगड जिल्ह्यातील रोहा येथे राष्ट्रवादी काँग्रेसने आयोजित केलेल्या रोहा मित्र पुरस्काराचे वितरण नाना पाटेकर यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. 
     ते पुढे म्हणाले की, सध्या वेगवेगळे मोर्चे निघत आहेत; पण असे वेगळे मोर्चे काढण्यापेक्षा आपण सर्व जातीच्या लोकांनी एकत्र येऊन मोर्चे काढले पाहिजेत. कुठल्याही व्यक्तीला मी अमुक जातीचा म्हणून मोर्चा काढण्याची वेळ येता कामा नये. सामान्य माणसाला प्राथमिक सुविधांसाठी मोर्चे काढावे लागत असतील, तर हे आपले अपयश आहे.

धमकी प्रकरणातील आरोपी संदीप सुर्वेची कारागृहात आत्महत्या !

      सांगली, २३ ऑक्टोबर (वार्ता.) - तरुणीच्या छेडछाडप्रकरणी सांगली जिल्हा कारागृहात असलेल्या संदीप सुर्वे या आरोपीने २० ऑक्टोबर या दिवशी सांगली येथील मध्यवर्ती कारागृहात चादरीने गळफास लावून आत्महत्या केली. संदीप याने एका हिंदी वृत्तवाहिनीसाठी काम करत असल्याचा दावा केला होता. त्याच्या विरोधात विविध पोलीस ठाण्यात १३ गुन्हे प्रविष्ट आहेत. सांगली शहर पोलीस ठाण्यात सदर घटनेची नोंद झाली असून पोलीस अधिक तपास करत आहेत. गेल्या काही महिन्यांत आरोपीने केलेली दुसरी आत्महत्या होय.

कोल्हापूर विमानतळास छत्रपती राजाराम महाराज यांचे नाव देण्याचे मुख्यमंत्र्यांचे आश्‍वासन !

       मुंबई, २३ ऑक्टोबर (वार्ता.) - येथील कोल्हापूर विमानतळास छत्रपती राजाराम महाराजांचे नाव देण्याचे आश्‍वासन मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी खासदार युवराज छत्रपती संभाजीराजे यांना २० ऑक्टोबर या दिवशी दिले. राज्य सरकार विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी हिस्सा उचलणार असल्याचे अधिकृत पत्र श्री. फडणवीस यांनी छत्रपती संभाजीराजे यांच्याकडे सुपूर्द केले. छत्रपती शाहू राजा नगरीच्या विकासासाठी निधी कदापी अल्प पडू दिला जाणार नाही, अशी ग्वाहीसुद्धा त्यांनी दिली.

साधकांनो अशा संशयास्पदरित्या येणार्‍या अज्ञात व्यक्तींपासून सावधान !

सनातनच्या एका राज्यातील सेवाकेंद्रात येऊन 
माहिती काढण्याचा संशयास्पद व्यक्तीचा प्रयत्न !
        सनातनच्या एका राज्यातील सेवाकेंद्रात नुकतीच एक संशयास्पद व्यक्ती सकाळी ११.१० वाजता अचानक आली. या व्यक्तीच्या हालचाली संशयास्पद होत्या. या वेळी तेथे उपस्थित असलेले सनातनचे साधक आणि या व्यक्तीमध्ये पुढील संभाषण झाले.
व्यक्ती : सनातनचे कार्यालय हेच का?
साधक : हो.
व्यक्ती (भिंतीवरील फलक वाचत) : तुमच्या एवढ्या संस्था आहेत का?
साधक : तुमचे नाव काय? तुम्ही कुठे रहाता?
(व्यक्तीने स्वत:चे नाव सांगितले.)
व्यक्ती : मला डॉ. तावडे यांच्या घरचा पत्ता हवा होता.
साधक : पत्ता माहीत नाही.
व्यक्ती : मी कुठेही भ्रमण करू शकतो. मला माझ्या वाईट सवयी घालवायच्या आहेत. तुमचे कार्य चांगले आहे.

अधिकोषांनी सायबर सुरक्षेत वाढ करावी !

     मालवेअरच्या (एखादी यंत्रणा तंत्रज्ञानदृष्ट्या खराब करण्यासाठी वापरले जाणारे सॉफ्टवेअरच्या) माध्यमातून स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएम् काडर्सची क्लोनिंग (नक्कल) होत असल्याचे उघड झाल्याने अर्थजगतात हाहाकार माजला आहे. या अधिकोषाने (बँकेने) आपल्या ६ लक्ष खातेधारकांची डेबिट काडर्स ब्लॉक केली आहेत. देशातील विविध अधिकोषांमधील ३२ लक्ष ग्राहकांच्या एटीएम् काडर्सची महत्त्वाची माहिती चोरली गेल्याची शक्यता आहे. सदर प्रकरण हे देशातील आजपर्यंतचा सर्वांत मोठा सायबर गुन्हा आहे कारण यामध्ये लक्षावधी ग्राहक भरडले गेले आहेत.

अभ्यास कसा करावा ?

परीक्षेच्या पार्श्‍वभूमीवर मुलांना मार्गदर्शक अशी लेखमालिका
     आजकाल बहुतेक मुले आईच्या आग्रहामुळे, बाबांच्या भीतीपोटी अन् एकमेकांमध्ये असलेल्या चढाओढीमुळे काहीशा तणावाखालीच अभ्यास करतांना दिसतात. अशा वेळी अभ्यास मनापासून होतोच, असे नाही. त्यामुळे परीक्षेत अपेक्षित यश मिळाले नाही की, दुःख होते. त्यामुळे मुलांनो, अभ्यास करण्यामागील योग्य दृष्टीकोन समजून घेतला, तर अभ्यास कंटाळवाणा न वाटता आनंददायी वाटेल. अभ्यास करण्याच्या विशिष्ट पद्धती आहेत. त्याप्रमाणे अभ्यास केल्यास अभ्यास चांगला होतो. परीक्षेची भीती कशी घालवावी, उत्तरपत्रिका आत्मविश्‍वासाने कशी लिहावी, अभ्यासात एकाग्रता कशी साधावी आदींची माहिती सांगणारा हा लेखप्रपंच...

हिंदूंनो, अशा काँग्रेसवाल्यांना कायमचे घरी बसवा !

    गोव्याच्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने चार मुसलमान उमेदवारांना तिकिटे द्यावीत, अशी मुसलमानांनी केलेली मागणी आपण पक्षाच्या समन्वय समितीकडे मांडणार आहोत, तसेच काँग्रेस पक्ष सत्तेवर आल्यास तो मुसलमान समाजाचे हित साधेल. - दिग्विजय सिंह, महासचिव तथा गोवा प्रभारी, काँग्रेस

अशा उत्सवात देवीचे तत्त्व असेल का ?

     रत्नागिरी तालुक्यातील भुतेनाका-मांडवी येथे देवी विसर्जनाच्या मिरवणुकीत आवाजाच्या मर्यादेचे उल्लंघन केल्याने शहर पोलिसांनी डीजेसह जनरेटर आणि स्पीकर जप्त करण्याची कारवाई केली आहे.

असे अधिवक्ते भारतात आहेत का ?

     पॅरिस आक्रमणातील मुख्य संशयित आरोपी सलेह अब्देसलामचा त्याचे अधिवक्ता फ्रॅन्क बेर्टन आणि त्यांची सहकारी अधिवक्ता स्वेन मेरी यांनी न्यायालयीन बचाव करण्यास नकार दिला आहे. याविषयी ते एका दूरचित्रवाहिनीशी बोलतांना म्हणाले, आम्ही पूर्वीच सांगितले होते की, आमचा अशील गप्प राहिल्यास आम्ही त्याचा बचाव सोडून देऊ.

कु. कनकमहालक्ष्मी देवकर यांना स्वप्नाच्या माध्यमातून प.पू. डॉक्टरांनी दाखवून दिलेले २४ घंटे अनुसंधानाचे महत्त्व !

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले 
यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त...
        ३.६.२०१६ या दिवशी पहाटे ५ ते ६ या वेळेत मला स्वप्न पडले होते. त्यामधेेे प.पू. डॉक्टर सिंहासनावर बसले होते आणि काही साधक खाली बसले होते. मी त्यांना विचारले, प.पू. डॉक्टर, इतके दिवस झाले, तरी माझ्याकडून साधनेचे प्रयत्न होत नाहीत. मी चराचरात देवाला बघायचे, असे ध्येय ठेवले आहे; पण माझ्याकडून काहीच प्रयत्न होत नाहीत. मला कसे प्रयत्न करायचे, ते कळत नाहीत. प.पू. डॉक्टर ऐकत होते. नंतर मला अल्पाहार (प्रसाद) बनवायची सेवा असल्याने एका साधिकेने उठवले.
१. सेवेसाठी गेल्यावर प.पू. डॉक्टरांशी मनातून संवाद साधतांना त्यांनी व्यष्टी अनुसंधान वाढवल्यासच समष्टी अनुसंधान होणे शक्य असल्याचे सांगणे : त्यानंतर मी अल्पाहार बनवण्याच्या सेवेला गेले. मला अल्पाहार बनवण्यास एवढे जमत नाही. त्या वेळी मनातून प.पू. डॉक्टरांचा आवाज ऐकू आला, मी आहे ना तुला साहाय्य करण्यास ! नंतर आमचे सूक्ष्मातून बोलणे चालू झाले. मी त्यांना विचारले, स्वप्नात विचारलेल्या प्रश्‍नाचे तुम्ही उत्तर दिले नाहीत. मग ते म्हणाले, व्यष्टी अनुसंधान म्हणजे स्वत:तील आतल्या देवाशी बोलणेेे आणि समष्टी अनुसंधान म्हणजे चराचरात देवाला बघणे. तुझ्या व्यष्टी अनुसंधानात सातत्य नाही. त्यात सातत्य आणलेस, तर समष्टी अनुसंधान चालू करणे सोपे जाईल. यासाठी तू महर्षींनी सांगितल्याप्रमाणे व्यष्टी अनुसंधान २४ घंटे करण्याचा प्रयत्न कर. मग समष्टी अनुसंधान आपोआप मीच करवून घेईन.

प.पू. नाना काळेगुरुजी यांचा देहत्याग म्हणजे जणू त्यांनी घेतलेली जलसमाधीच ! - महर्षि

अश्‍वमेधयाजी प.पू. नारायण (नाना) काळेगुरुजी 
यांच्या देहत्यागाला आज १३ दिवस झाले त्यानिमित्ताने... 

महर्षींची शिकवण आणि कार्य !

         ११.१०.२०१६, म्हणजे विजयादशमीच्या दिवशी तुम्ही केरळच्या कोची येथील सागरावर असायला हवे, तसेच सायंकाळी ५ ते ७ या कालावधीत तुम्हाला सागराला प्रार्थना करून त्यात नारळ अर्पण करायचा आहे, असे महर्षींनी आम्हाला सांगितले होते. तसे आम्ही केले. नारळ अर्पण करतांना कोणती प्रार्थना करायची ? तो आपल्याला का अर्पण करायचा आहे ?, याविषयी महर्षींनी आम्हाला काहीच सांगितले नव्हते. विशेष म्हणजे सागराचे स्मरण करून मी समुद्रात नारळ अर्पण केला आणि त्यानंतरच मला प.पू. नाना काळे यांनी देहत्याग केल्याचे समजले. यावर महर्षि म्हणाले, प.पू. नाना काळे जाणार होते, हे आम्हाला आधीच ठाऊक असल्याने आणि ही वार्ता कानावर पडल्यानंतर तुम्ही भूमीवर नाही, तर पाण्यावर असायला हवे, असे आमचे नियोजन असल्याने आम्ही आधीच तुम्हाला येथे पाठवले होते. जलसमाधी घेणारे जीव उन्नत असतात. (प्रभु श्रीरामानेही शरयू नदीत देहावतार संपवला होता, तसेच संत एकनाथांनीही गोदावरीत देह समर्पण केला होता, याची मला या वेळी आठवण झाली.) तुम्ही सागरात अर्पण केलेला नारळ आम्हीच प.पू. नानांच्या नावे अर्पण करून प.पू. नानांनी केलेला देहत्याग हा जणू त्यांनी जलसमाधी घेतल्यासारखाच आहे, असे जगाला दाखवून दिले आहे.

वैदिक संस्कृतीच्या पुनरुत्थानासाठी आयुष्य वेचणारी थोर विभूती : अश्‍वमेधयाजी प.पू. नारायण (नाना) काळेगुरुजी !

       सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथील थोर संत अश्‍वमेधयाजी प.पू. नारायण (नाना) काळे यांनी ११.१०.२०१६ या दसर्‍याच्या दिवशी देहत्याग केला. त्यांनी समष्टीच्या कल्याणार्थ अनेक यज्ञयाग केले. पू. (सौ.) लक्ष्मी (माई) नाईक यांनी उलगडलेले प.पू. नारायण (नाना) काळेगुरुजी यांच्या समष्टी कार्याचे विविध पैलू पुढे देत आहेत.
पू. (सौ.) लक्ष्मी (माई) नाईक
१. नाडीपट्टीतून उलगडा व्हायच्या आधीच 
परात्पर गुरु डॉ. आठवले हे श्रीमत् नारायणाचा 
अवतार आहेत, हे वैदिक उपासनेच्या 
जोरावर जाणणारे प.पू. नाना काळेगुरुजी !
         प.पू. नारायण (नाना) काळेगुरुजी यांच्या देहत्यागाचे वृत्त वाचून सनातनवरील एक कृपाछत्र हरपले आहे, असे वाटले. यापुढे त्यांचे सगुणातून दर्शन होणे शक्य नाही, तरी त्यांची आम्हा साधकांवर निर्गुणातून सदैव कृपादृष्टी राहील, यात शंका नाही. वैदिक उपासना मार्गाने साधना करून प.पू. काळेगुरुजी यांनी अध्यात्मातील उच्च शिखर गाठले. याच उपासनेच्या जोरावर नाडीपट्टीतून उलगडा व्हायच्या आधीच परात्पर गुरु डॉ. आठवले हे श्रीमत् नारायणाचा अवतार आहेत, हे त्यांनी जाणले. यातून त्यांची दृष्टी किती सूक्ष्म स्तरावर कार्यरत होती, हे स्पष्ट होते.

त्रास न्यून होण्यासाठी वेगवेगळा नामजप, मुद्रा आणि न्यास करूनही लाभ होत नसल्यास करायचे उपाय

पू. डॉ. मुकुल गाडगीळ
१. पंचतत्त्वांच्या नामजपांनी त्रास न्यून होत
 नसल्यास करायचा नामजप, मुद्रा आणि न्यास
         त्रास होत असतांना काही वेळा पंचतत्त्वांचे नामजप, न्यासस्थान आणि मुद्रा पालटूनही अन् सर्वोच्च असा निर्गुण स्तराचा असलेला आकाशतत्त्वाचा नामजप करूनही त्रास न्यून होत नाही. अशा वेळी सध्या काळानुसार आवश्यक असलेला श्रीकृष्णाचा नामजप (ॐ ॐ नमो भगवते वासुदेवाय ॐ ॐ ।) करावा. त्या वेळी हाताची पाचही बोटे जुळवून त्या मुद्रेने जिथे वेदना होत असतील, तिथे न्यास करावा. दोन्ही हातांनी ती मुद्रा करून सर्वांत जास्त वेदना असलेल्या २ ठिकाणी न्यास करू शकतो. एकाच ठिकाणी वेदना होत असतील, तर एका हाताने मुद्रा करून तेथे न्यास करावा आणि दुसर्‍या हाताने नुसती मुद्रा करावी. पाचही बोटांची टोके एकत्र करून न्यास केल्याने पाचही बोटांमुळे पंचतत्त्वांपैकी हवे ते तत्त्व आपल्याला मिळते.
२. कोणत्याही उपायांनी 
लाभ न झाल्यास करावयाचा उपाय
         वरील उपायांनी लाभ न झाल्यास शेवटचा उपाय म्हणून कोणताही नामजप, मुद्रा आणि न्यास न करता केवळ आपल्या श्‍वासावर लक्ष ठेवावे. हा निर्गुण स्तरावरील उपाय आहे.
- (पू.) डॉ. मुकुल गाडगीळ, महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय, गोवा. (२०.१०.२०१६)

दैनिक सनातन प्रभातमधील प.पू. नाना काळेगुरुजी यांच्या पार्थिवाचे छायाचित्र पाहिल्यावर आलेल्या अनुभूती

      १३.१०.२०१६ या दिवशीच्या दैनिक सनातन प्रभातमधील प.पू. नाना काळेगुरुजी यांच्या पार्थिवाचे छायाचित्र पाहिले.
१. त्यांचे डोळे अर्धोन्मीलित आहेत, असे जाणवले.
२. त्यांच्या डोळ्यांतील बुबुळे इकडून तिकडे फिरल्यासारखी वाटत होती.
३. डोळ्यांच्या कडांना ओलावा जाणवत होता.
४. त्यांना पाहिल्यावर पुष्कळ शक्ती आणि चैतन्य जाणवत होते.
५. श्रीकृष्णाच्या कृपेने एकदा मला त्यांचे रामनाथी आश्रमात दर्शन झाले होते. त्यामुळे त्यांना पुष्कळ भावपूर्ण प्रार्थना झाली.
६. प.पू. डॉक्टरांच्या कृपेमुळे आम्हा पामरांना वेगवेगळ्या संतांचे दर्शन होते आणि त्यांंचे कृपाशीर्वाद लाभतात, असे वाटून कृतज्ञता व्यक्त झाली.
- सौ. सुशांती मडगावकर, वास्को, गोवा. (२३.१०.२०१६)

चौकटी

       ६१ आध्यात्मिक पातळीची महर्लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली नाशिक येथील चि. हिंदवी ज्ञानेश्‍वर भगुरे (वय १ वर्ष) हिचा आज वाढदिवस आहे.
चि. हिंदवी ज्ञानेश्‍वर भगुरे हिला प्रथम
वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने शुभाशीर्वाद ! 
------------- 
      ५९ टक्के आध्यात्मिक पातळीचा उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला पुणे येथील कु. हृषिकेश संजय चव्हाण (वय ११ वर्षे) याचा आज वाढदिवस आहे.
कु. हृषिकेश संजय चव्हाण याला
वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने शुभाशीर्वाद !
दोन्ही बालसाधकांची गुणवैशिष्ट्ये लवकरच प्रसिद्ध करत आहोत.

सतत साधनेचा ध्यास असलेली आणि साधकांना घडवण्यासाठी प्रयत्नशील असणारी ६५ टक्के आध्यात्मिक पातळीची कु. वैदेही चारुदत्त पिंगळे (वय २० वर्षे) !

कु. वैदेही पिंगळे
        आश्‍विन कृष्ण पक्ष नवमी (२४.१०.२०१६) या दिवशी कु. वैदेही चारुदत्त पिंगळे (वय २० वर्षे) हिचा तिथीनुसार वाढदिवस आहे. त्यानिमित्त सहसाधिकेला तिची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत.
कु. वैदेही पिंगळे हिला वाढदिवसानिमित्त 
सनातन परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा !
१. उत्तम निरीक्षणक्षमता
        वैदेही कुठेही गेली, तरी ती शरिराने सर्वांसमवेत असते; पण मनातून तिची विचारप्रक्रिया चालू असते. कधी एखादा साधक एखादे सूत्र सांगत असल्यास वैदेही तो कसा सांगतो ? त्याचे हावभाव कसे असतात ? इत्यादी निरीक्षण करत असते. नंतर ती त्या प्रसंगाचा अभ्यास करते.
२. अल्प देहबुद्धी
        वैदेहीला कधीच नटावेसे वाटत नाही. तिला हे कानातले, गळ्यातले घाल, असे सांगावे लागते. वैदेहीला असे सांगितल्यावर ती लगेच घालते. एकदा आम्ही बाहेर गेलो असतांना तिच्या शाळेतील मैत्रीण भेटली. ती वैदेहीकडे वेगळ्या दृष्टीने पहात होती. ती विशेष वेशभूषेत (हायफाय) होती; मात्र आम्ही साधेसुधे होतो. तेव्हा मला वाईट वाटले; पण वैदेही स्थिर होती. तिने सांगितले, जाऊ दे गं ताई ! आपल्याला देव हवा आहे ना !

वर्ष २०१४ मध्ये वयाच्या ८२ व्या वर्षीही न थकताहिंदु राष्ट्र यावे, यासाठी यज्ञकर्मात देवतांना प्रतिदिन आवाहनात्मक आहुती देणारे प.पू. नाना काळे !

       हिंदु राष्ट्र यावे, यासाठी बार्शी, जिल्हा सोलापूर येथील प.पू. नाना काळे वयाच्या ८२ व्या वर्षीही न थकता प्रतिदिन संपन्न होणार्‍या इष्टीमध्ये देवतांना आवाहनात्मक आहुती देऊन त्यांना प्रार्थना करत होते की, लवकरच पृथ्वीवर कल्याणकारी रामराज्य येऊदे.
- (सद्गुरु) सौ. अंजली गाडगीळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

कु. अमृता मुद्गल (वय १२ वर्षे) हिचे साधनेविषयी झालेले चिंतन !

कु. अमृता मुद्गल
१. साधकांनी सांगितलेल्या 
चुकांकडे अंतर्मुखतेने पहायला हवे !
        साधकांनी चुका सांगितल्यावर आपण प्रत्येक चूक स्वीकारून त्यातून आनंद घ्यायला पाहिजे आणि अंतर्मुखतेने चुकीतून शिकायला पाहिजे. चूक स्वीकारल्यावरच देव आपल्याला निर्गुणाकडे नेणार आहे. त्या दृष्टीने देवा, तूच मला चुका स्वीकारायला शिकव, असे देवाला सतत सांगायला हवे.
२. स्वकौतुक आणि कर्तेपणा 
देवाच्या चरणी अर्पण करायला हवा !
        मी सेवा करत नसून देवच माझ्याकडून सेवा करून घेत आहे. मग मी सेवा करते, असे का म्हणायचे ? एखादी कृती छान झाली, तर ती देवाच्या चरणी अर्पण करायला हवी; कारण ती देवानेच करून घेतलेली असते. आपल्याला स्वकौतुक आणि कर्तेपणा नको. तो देवाच्या चरणी अर्पण करून देवाला सांगावे, मला हे काहीच नको. मला केवळ तुझे चरण हवेत. सतत मला तुझ्या चरणांपाशी रहाता येऊ दे.
        हे श्रीकृष्णा, मला सतत प्रत्येकाकडून शिकता येऊ दे, अशी तुझ्या चरणी कळकळीची प्रार्थना ! प.पू. डॉक्टर, हे लिखाण मी उशिरा लिहून दिल्याविषयी मला क्षमा करा !
- कु. अमृता मुद्गल (वय १२ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२६.३.२०१६)

कृतज्ञतेची भावमय पुष्पे काव्याच्या माध्यमातून गुरुचरणी अर्पित करणारी कु. वैदेही पिंगळे !

         मिरज आश्रमात सेवा करणारी कु. वैदेही पिंगळे हिने पू. (सौ.) बिंदा सिंगबाळ यांना पाठवलेेले काव्य पुढे देत आहे.
परम आदरणीय पूजनीय बिंदाताई,
         पू. ताई...माझी आई...माझे गुरु...तूच सर्वकाही...!
         केवळ केवळ आणि केवळ कृतज्ञताच !!!
हे गुरुराया,
         या जिवास तू सनातनरूपी मोक्षदायी संस्थेत घेतलेस ।
         पू. बिंदाताईंसमवेत रहाण्याची अमूल्य संधी दिलीस ॥ १ ॥
ना उरे शब्द कृतज्ञतेस ।
केवळ अर्पिते चरणांवर सुमने ॥ २ ॥
साधनेची तळमळ लागो ।
लवकरात लवकर गुरुचरण लाभो ॥ ३ ॥
हीच आशा एकच आता ।
अखंड झटावे गुरुचरणा ।
हीच प्रार्थना पुनःपुन्हा ॥ ४ ॥
- कु. वैदेही पिंगळे, सनातन आश्रम, मिरज. (९.४.२०१६)

देवा, तूच माझा सर्वस्व असशी !

काय म्हणू देवा तुला ।
काय म्हणू तुझ्या प्रेमाला ॥
कृतज्ञताच केवळ वाटे ।
तुझ्या चरणांपाशी यावे ।
तुझ्या भाव-भक्तीत डुंबून जावे ॥
जीवनाचे ध्येय होते ।
तुझ्याशी एकरूप व्हावे ।
समष्टी संत बनून ।
तुझ्या चरणी एक फूल व्हावे ॥
माया आड आली ।
दोष-अहं आड आले ।
या ध्येयापासून दूर घेऊनी गेले ।
क्षमा कर देवा, या अपराधी जिवाला ॥
अपराधांना तू घे पोटात ।
कोणाला सांगू सांग ना रे देवा ।
        हिंदूंना आधी हिंदु बनवणे, हे प्रथम कर्तव्य आहे.
- श्री. विनय पानवळकर, धर्मशक्ती सेना
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥

या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो. - प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले
        सर्व रोगांना एकच औषध किंवा सर्व दाव्यांना एकच कायदा नसतो; पण राष्ट्र आणि धर्म यांच्या सर्व समस्यांना एकच उत्तर आहे आणि ते म्हणजे हिंदु राष्ट्राची स्थापना !
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले

बोधचित्र

॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज
सनातनचे श्रद्धास्थान
मी कोणाचा नाही. माझा कुणी नाही.
ज्याचा त्याचा तोच मी; म्हणून मी सर्वांचा आहे.
भावार्थ : मी सर्वस्व गुरुचरणांवर वाहिल्यानंतर मी दुसर्‍या कुणाचा होऊच शकत नाही. गुरूंना अर्पण झाल्यानंतर माझा कुणी असायला मी शिल्लक राहिलोच कुठे ? परंतु सर्वांचा खरा मी एकच आणि सर्वव्यापी असल्यामुळे आता मी सर्वांचा आहे.
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण)

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

आवश्यक तेवढेच बोलणे योग्य !
परमेश्‍वराने आपल्याला दोन कान आणि एक जीभ दिली आहे. 
ती यासाठी की, जेवढे ऐकाल, त्याच्या निम्मेच बोला. 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

काटजू यांची शाब्दिक गुंडगिरी !

संपादकीय
     मार्कंडेय काटजू हे नाव भारतियांना (कु)परिचित असेलच. वाचाळ बडबड करून सतत प्रसिद्धीच्या झोतात रहाण्याचा त्यांचा उद्योग सर्वश्रुत आहे. आताही पाकिस्तानी कलाकार काम करत असल्याने ए दिल है मुश्कील या चित्रपटाला विरोध करणार्‍या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला त्यांनी लक्ष्य केले आहे. मनसेच्या कार्यकर्त्यांना गुंड संबोधतांना त्यांनी स्वतःला अलाहाबादचा मोठा गुंड म्हटले आहे. त्यांच्या मते पाकिस्तानी कलाकार हे गरीब आणि बिच्चारे आहेत. हे गरीब बिच्चारे पाक कलाकार आतंकवादी कारवायांचा साधा निषेधह नोंदवत नाहीत, हे काटजू विसरतात ! काटजू हे भारताचे माजी सरन्यायाधीश आणि प्रेस कौन्सिलचे माजी अध्यक्ष आहेत. असे असतांनाही त्यांची भाषा एवढी असभ्य कशी ? अशा उथळ विचारांच्या व्यक्तीने इतकी वर्षे सरन्यायाधीशपद भूषवणे, हे भारतियांसाठी दुर्दैवी होय !

यादव विरुद्ध यादव !

संपादकीय
       उत्तरप्रदेशात सत्तेवर असलेल्या समाजवादी पक्षातील धुसफूस आता चव्हाट्यावर आली आहे. मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी चार मंत्र्यांची हकालपट्टी केली. त्यात अखिलेश यांचे काका शिवपाल यादव यांचाही समावेश आहे. हे चार जण अमर सिंह यांच्या गोटातले असल्याचे बोलले जाते. असे असले, तरी अखिलेश यादव यांची ही चाल म्हणजे थेट त्यांचे पिता आणि समाजवादी पक्षाचे सर्वेसर्वा मुलायमसिंह यांना आव्हान देण्याचा प्रकार आहे. साडेचार वर्षांपूर्वी समाजवादी पक्ष बहुमताने सत्तेवर आला. त्यात अखिलेश यादव यांचा मोठा हात होता. ते मुख्यमंत्री झाल्यावर त्यांच्याकडे कच्चा बच्चा म्हणून पाहिले गेले. अशातच त्यांचे काका आणि मंत्री असलेले शिवपाल यादव यांची कारभारात वाढती लुडबूड अखिलेश यादव यांना रूचेनासी झाली. त्यांना डच्चू देण्याची ही कारवाई, हा त्याचाच भाग आहे.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn