Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

कोटी कोटी प्रणाम !


सनातनचे २८ वे संत 
पू. सुदामराव शेंडे यांचा आज वाढदिवस

हिंदुत्व ही सामर्थ्यशाली संस्कृती आहे ! - अमेरिकी वैदिक शिक्षक डेव्हिड फ्रॉले उपाख्य पंडित वामदेवशास्त्री

  • जे विदेशींना समजते, ते भारतियांना कधी कळणार ?
  • डेव्हिड फ्रॉले यांचा परिचय
         पद्मभूषण पुरस्कारप्राप्त डेव्हिड फ्रॉले यांनी योग आणि वैदिक विज्ञान यांत डी-लिट मिळवली आहे. त्यांनी वेद, हिंदुत्व, योग, आयुर्वेद आणि वैदिक भविष्य यांवर अनेक पुस्तके लिहिली आहेत.
         नवी देहली - हिंदुत्व ही एक अतिशय सामर्थ्यशाली संस्कृती आहे. त्यामुळे तिच्या विरोधात सांस्कृतिक युद्ध चालू आहे. भारतात अनेक हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्ते आणि नेते यांच्यावर मिडियाकडून टीका करण्यात येत आहे. एवढेच नव्हे, तर न्यायालयेही हिंदु परंपरा आणि आचरण यांच्या विरोधात निर्णय देत आहेत. ही न्यायालये ख्रिस्ती आणि मुसलमान यांच्या विरोधात मात्र असे वागत नाहीत, असे प्रतिपादन अमेरिकी वैदिक शिक्षक डेविड फ्रॉले उपाख्य पंडित वामदेवशास्त्री यांनी एका पत्रकाराशी बोलतांना केले.
फ्रॉले पुढे म्हणाले,
१. आपल्याला हिंदुत्वाविषयी मार्क्सवादी, ख्रिस्ती आणि अमेरिका अशा अहिंदूंकडून माहिती मिळते. अमेरिकेत अनेक धर्मांचे विभाग आहेत. या विभागांमध्ये त्या त्या धर्माचे लोक शिकवत आहेत; परंतु हिंदु धर्माच्या विभागात क्वचितच हिंदू आहेत.

कणकवली येथे प्रथमच जनकल्याण महायाग अर्थात श्री लक्ष्मीनारायण महायाग !

     सिंधुदुर्ग - येथील कणकवलीजवळील श्री मुंडेश्‍वर मैदान येथे जनकल्याण महायाग अर्थात श्री लक्ष्मीनारायण महायाग पार पडणार आहे. या कार्यक्रमाचे स्वरूप पुढीलप्रमाणे असणार आहे.
१. १६ नोव्हेंबर या दिवशी दुपारी ३ वाजता श्री. मौनी महाराज नागपूर, श्री रामप्रियदासजी महाराज - राजस्थान, श्री. अवधेशजी महाराज - मथुुरा, श्री. रामायणी महाराज कुलू-मनाली यांच्या प्रमुख उपस्थितीत ध्वजारोहण कार्यक्रम केला जाणार आहे.
२. १६ नोव्हेंबर ते १९ डिसेंबर या कालावधीत अखंड रामसंकीर्तन आणि धार्मिक पूजाविधी होणार आहे.
३. १९ डिसेंबर या दिवशी महाकुंभयात्रेची मिरवणूक निघेल. यामध्ये संत, महंत, मंडलेश्‍वर आणि सहस्रो भाविक सहभागी होणार आहेत.
४. १९ डिसेंबर ते २५ डिसेंबर या कालावधीमध्ये श्री लक्ष्मीनारायण वाहयाग-यज्ञ होणार आहे. भारतातील जवळजवळ ३०० हून अधिक साधू-संत, महंत आणि मंडलेश्‍वर उपस्थित रहाणार असून आध्यात्मिक संस्थांमधील सद्गुरु आणि भाविक मोठ्या प्रमाणात तेथे येणार आहेत. संपूर्ण कोकणातील जनतेला ही अभूतपर्व पर्वणी ठरणार आहे.
५. यज्ञाच्या जोडीला अखंड महाप्रसाद, संगीतमय रामकथा, विविध सांस्कृतिक कार्यक्रम, विचार प्रबोधने असा मोठ्या प्रमाणात कार्यक्रम होणार आहे. भारतीय संस्कृतीचे दर्शन या वेळी होणार आहे. तपस्वी, संत-महंत यांचा एकत्रित दर्शनाचा योग कुंभमेळ्याप्रमाणे येथेही जुळून येणार आहे. असा दुर्मिळ दुर्लभ महायाग केवळ जनल्याणासाठी होत असून हे महाराष्ट्राचे भाग्य आहे.

(म्हणे) सनातनचे आरोप खोटे आणि अंनिसचे सर्व व्यवहार पारदर्शी !

धर्मादाय आयुक्त कार्यालयाने ताशेरे 
ओढल्याने सैरभैर झालेले अंनिसचे हमीद दाभोलकर 
आणि प्रशांत पोतदार यांचा पत्रक काढून कांगावा !
       कोल्हापूर, २२ ऑक्टोबर (वार्ता.) - डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाच्या अन्वेषणावरून समाजाचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी सनातन संस्था अंाणि हिंदुत्ववादी संघटना यांच्याकडून अंधश्रद्धा निर्मूलन समितीवर खोटे अन् दिशाभूल करणारे आरोप केले आहेत, असा कांगावा अंनिसचे कार्याध्यक्ष हमीद दाभोलकर आणि प्रशांत पोतदार यांनी अंनिसच्या वतीने पत्रक काढून केला आहे. (अंनिसचे घोटाळे गंभीर असल्याचे सातारा येथील धर्मादाय आयुक्त कार्यालयाचा चौकशी अहवाल सांगत आहे. एकप्रकारे हा अंनिसने केलेल्या घोटाळ्याचा पुरावाच आहे. असे असतांना असे पत्रक काढून अंनिसचे कार्याध्यक्ष हमीद दाभोलकर आणि प्रशांत पोतदार हे दोघे जनतेची दिशाभूलच करत आहेत ! - संपादक) अंनिसचे सर्व व्यवहार खुले आणि पारदर्शी आहेत. लोक आणि शासन यांनी त्याची कधीही पडताळणी करावी, असे या पत्रकात नमूद करण्यात आले आहे, असे वृत्त दैनिक सकाळने प्रसिद्ध केले आहे. (असे आहे, तर सनातन संस्थेचे प्रवक्ता श्री. अभय वर्तक यांनी दोन दिवसांपूर्वी पत्रकार परिषदेत अंनिसच्या घोटाळ्यासंदर्भात अंनिसला खुली चर्चा करण्याचे दिलेले आव्हान डॉ. हमीद दाभोलकर आणि प्रशांत पोतदार का स्वीकारत नाहीत ? - संपादक)

पाक गुप्तहेराला अटक !

पाक आतंकवादी आणि गुप्तहेर 
यांना तात्काळ कठोर शिक्षा द्यायला हवी !
       श्रीनगर - जम्मू-काश्मीरमधील सांबा सेक्टरमधून पाकिस्तानी गुप्तहेराला अटक करण्यात आली आहे. बोधराज असे गुप्तहेराचे नाव असून त्याच्याकडून २ पाकिस्तानी सीमकार्ड आणि सुरक्षादलाच्या बंदोबस्ताच्या संदर्भातील नकाशे जप्त करण्यात आले आहेत. या गुप्तहेराने काय माहिती मिळवली होती आणि त्याचा कट काय होता, याचा पोलीस तपास करत आहेत. दुसरीकडे २१ ऑक्टोबरच्या रात्रीपासून पाक सैन्याकडून वारंवार शस्त्रसंधी कराराचे उल्लंघन करून गोळीबार केला जात आहे. राजौरी सेक्टरमधील मांजाकोट येथे पाक सैन्याने भारतीय चौक्यांवर गोळीबार केला. जैश-ए-महंमदच्या २ आतंकवाद्यांना बारामुला सेक्टरमधून अटक करण्यात आली. त्यांच्याकडून एके-४७, एक पिस्तुल आणि काडतुसे जप्त करण्यात आली.

ऐ दिल है मुश्किल चित्रपटाचा पैसा सैन्याला नको ! - निवृत्त सैन्याधिकारी

      नवी देहली - ऐ दिल है मुश्किल या हिंदी चित्रपटात पाक कलाकारांना घेतल्यावरून महाराष्ट्र्र नवनिर्माण सेनेने त्याला विरोध केला होता; मात्र महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या मध्यस्थीनंतर काही अटी लादून हा विरोध मागे घेतला. यात चित्रपटाच्या निर्मात्यांनी सैन्यनिधीमध्ये ५ कोटी रुपये जमा करण्याचा म्हटले आहे. याला माजी लेफ्टनंट जनरल बी.एस्. जैस्वाल यांनी विरोध केला आहे. 
     जैस्वाल म्हणाले की, भारतीय सैन्य राजकारण विरहित आणि धर्मनिरपेक्ष आहे. याला लाभासाठी राजकारणात ओढू नये. सैन्य भीक दिलेला पैसा घेत नाही. जर चित्रपट निर्मात्यांना काही दान देण्याची इच्छा असेल, तर त्यांनी इतर भारतियांप्रमाणे स्वेच्छेने दिले पाहिजे. बळजोरी करून उपयोग नाही. जर प्रकरण एवढे संवेदनशील असेल, तर सरकारने त्यात हस्तक्षेप करून कायमचा तोडगा काढला पाहिजे.
उद्धव ठाकरे यांचाही विरोध 
      या प्रकरणावर श्री. उद्धव ठाकरे म्हणाले, खंडणी मागून मिळवलेला पैसा सैन्याला नको. सैन्याला स्वतःचा स्वाभिमान आहे.

पाकची वळवळ बंद करण्यासाठी पंतप्रधानांनी पाकमध्ये सैन्य घुसवावे ! - श्री. उद्धव ठाकरे

       पर्वरी (गोवा), २२ ऑक्टोबर (वार्ता.) - भारतीय सैन्याने सर्जिकल स्टाईक करूनसुद्धा पाकने ३० वेळा सीमेवर आक्रमणे केली आहेत. भारताने अजून सर्जिकल स्टाईक करणे अपेक्षित आहे. एका सर्जिकल स्टाईकचे श्रेय लाटण्याचे राजकारण करत बसण्यापेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बेधडक पाकमध्ये सैन्य घुसवावे आणि पाकचे अस्तित्व मिटवावे, असे प्रतिपादन शिवसेना पक्षपमुख श्री. उद्धव ठाकरे यांनी केले. श्री. उद्धव ठाकरे पर्वरी येथे गाडगे महाराज सभागृहात शिवसेनेच्या गोव्यातील कार्यकर्त्यांना संबोधित करून गोव्यात निवडणुकीचे रणशिंग फुंकले. या कार्यकत्या मेळाव्याला प्रचंड प्रतिसाद लाभला होता. शिवसैनिकांनी संपूर्ण सभागृह भरून गेले होते. या वेळी शिवसेनेचे खासदार संजय राऊत, शिवसेनेचे गृहराज्य मंत्री दीपक केसरकर, गोवा राज्यप्रमुख सुदीप ताम्हणकर आदी उपस्थित होते.

पाक कलाकारांवरची बंदी योग्यच ! - मुख्यमंत्री

       मुंबई - बॉलिवूडच्या चित्रपट निर्मात्यांनी पाकिस्तानी कलाकारांवर घातलेल्या बंदीचे मी स्वागत करतो. पाकिस्तानी कलाकारांवर घातलेली बंदी ही योग्यच आहे. पाक कलाकारांनी भारतात काम करू नये, अशी जनभावना आहे, असे मत मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी येथे एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात व्यक्त केले.

जनतेने क्रांतीसाठी बंदूक हातात घ्यावी ! - काटजू

        कानपूर - देशात निवडणुका आणि मतदान यांचा काळ संपत आला आहे. प्रत्येक ठिकाणी भ्रष्टाचार आणि अन्यायच पहायला मिळत आहे. आता देशाला क्रांतीची आवश्यकता आहे. लढाई केल्याशिवाय काही होणार नाही. आता जनतेने बंदूक हातात घेण्याची आवश्यकता आहे, असे उद्गार सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती आणि प्रेस काउन्सिल ऑफ इंडियाचे माजी अध्यक्ष मार्कंडेय काटजू यांनी येथे एका कार्यक्रमात काढले.
काटजू पुढे म्हणाले की,
१. चीनच्या क्रांतीच्या वेळी जितक्या जणांचा मृत्यू झाला, त्यापेक्षा अधिक मृत्यू या क्रांतीत होईल. हे सोपे नाही; परंतु करावे लागणार आहे.
२. देशातील ५० टक्के खासदार गुन्हेगार आणि बहुतेक सर्वच खासदार भ्रष्ट आहेत. तसचे देशातील न्याय आणि प्रशासन व्यवस्थाही भ्रष्ट आहे.
३. गांधी हे इंग्रजांचे हस्तक, तर सय्यद अहमद खान हे समर्थक होते.

महाराष्ट्र १ वाहिनीकडून सनातन संस्थेचे प्रवक्ता श्री. अभय वर्तक यांना अपमानास्पद वागणूक !

श्री. अभय वर्तक
     मुंबई, २२ ऑक्टोबर (वार्ता.) - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जगद्गुरु नरेंद्र महाराज यांच्या कार्यक्रमाला उपस्थिती लावून धर्मसत्ता ही राजसत्तेपेक्षा श्रेष्ठ आहे, अशा प्रकारचे वक्तव्य केले होते. या संदर्भात १७ ऑक्टोबर या दिवशी महाराष्ट्र १ या वाहिनीने चर्चासत्राचे आयोजन केले होते. यामध्ये सहभागी होण्यासाठी सनातन संस्थेचे प्रवक्ता श्री. अभय वर्तक यांनाही निमंत्रित करण्यात आले होते; मात्र आझाद मैदान दंगलप्रकरणी केलेल्या एका वक्तव्यावरून चर्चासत्राचे सूत्रसंचालक निखिल वागळे यांनी अपमानास्पद वागणूक देऊन श्री. अभय वर्तक यांना कार्यक्रमातून निघून जाण्यास सांगितले. (सभाशास्त्राचे साधे नियमही न पाळणारी महाराष्ट्र १ वाहिनी चर्चांमधून समाजाला काय विधायक संदेश देत असेल, याचा विचारच न केलेला बरा. सूत्रसंचालकाने चर्चेत सहभागी झालेल्या वक्त्यांचे म्हणणे पूर्ण आणि तटस्थ राहून ऐकून घेणे अपेक्षित असते. असे न करता स्वतःच्या मताच्या विरोधात मते मांडणार्‍यांच्या अंगावर ओरडून त्याचे म्हणणे बंद पाडून त्यांना वाहिनीवरून जाण्यास सांगणे, ही सभ्यता नव्हे ! एरवी विचारांचा लढा विचारांनी द्यावा असे दृष्टीकोन देणारे स्वतःच इतरांच्या अभिव्यक्तीस्वातंत्र्याची गळचेपी करत आहेत, असेच नव्हे का ? - संपादक)

दिवाळीतील विविध सणांचे महत्त्व, इतिहास आणि अध्यात्मशास्त्र

श्री लक्ष्मीपूजन 
        सामान्यतः अमावास्या हा अशुभ दिवस म्हणून सांगितला आहे. या अमावास्येचा त्याला अपवाद आहे. हा दिवस शुभ मानला आहे; पण तो सर्व कामांना नाही; म्हणून या दिवसाला शुभ म्हणण्यापेक्षा आनंदी दिवस म्हणणे योग्य ठरते.
तिथी : आश्‍विन अमावास्या
इतिहास
        या दिवशी श्रीविष्णूने लक्ष्मीसह सर्व देवांना बळीच्या कारागृहातून मुक्त केले आणि त्यानंतर ते सर्व देव क्षीरसागरात जाऊन झोपले, अशी कथा आहे.
सण साजरा करण्याची पद्धत
        प्रातःकाळी मंगलस्नान करून देवपूजा, दुपारी पार्वणश्राद्ध आणि ब्राह्मणभोजन अन् प्रदोषकाळी लतापल्लवांनी सुशोभित केलेल्या मंडपात लक्ष्मी, श्रीविष्णु इत्यादी देवता आणि कुबेर यांची पूजा, असा या दिवसाचा विधी आहे.

दिवाळीमध्ये लहान मुले किल्ला का बांधतात ?

पू. डॉ. चारुदत्त पिंगळे
१. किल्ला बांधण्याचा इतिहास
१ अ. काही शतकांपूर्वी दिवाळीच्या वेळी किल्ला बांधण्याची प्रथा नव्हती.
१ आ. हिंदवी स्वराज्याची कल्पना बाल पिढीमध्ये रुजवण्याचे कार्य करणे : काही शतकांपूर्वी हिंदूंमधील लढाऊ वृत्ती न्यून होऊ लागली. येणार्‍या पिढ्यांमधील कणखरपणा जागृत व्हावा आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या हिंदवी राज्याचे स्मरण बालवयापासूनच व्हावे यांसाठी दिवाळीच्या वेळी लहान मुलांना किल्ले बांधण्यास शिकवण्याची प्रथा चालू झाली. किल्ल्यांवर सिंहासनावर आरूढ छत्रपती शिवाजी महाराज, त्यांचे अष्टप्रधान मंडळ आणि मावळे यांना विराजमान करून हिंदवी स्वराज्याची कल्पना रुजवण्याचे कार्य चालू झाले.

भूतदया, पर्यावरण रक्षण यांसह आरोग्यपूर्ण जीवनाचा संदेश देणारे हिंदु धर्मातील सण !

धनत्रयोदशी
तिथी : आश्‍विन कृष्ण पक्ष त्रयोदशी
     यालाच बोलीभाषेत धनतेरस असे म्हटले जाते. या दिवशी व्यापारी तिजोरीचे पूजन करतात. व्यापारी वर्ष दिवाळी ते दिवाळी असे असते. नव्या वर्षाच्या हिशोबाच्या वह्या या दिवशीच आणतात.
भावार्थ : साधनेसाठी अनुकूलता आणि ऐश्‍वर्य प्राप्त होण्यासाठी या दिवशी ज्यामुळे आपल्या जीवनाचे पोषण सुरळीत चालू आहे, त्या धनलक्ष्मीची पूजा करतात. येथे धन म्हणजे शुद्ध लक्ष्मी. श्रीसूक्तात वसू, जल, वायू, अग्नी आणि सूर्य यांना धनच म्हटले आहे. ज्या धनाला खरा अर्थ आहे, तीच खरी लक्ष्मी ! अन्यथा अलक्ष्मीमुळे अनर्थ घडतो.
      धनत्रयोदशीच्या दिवशी नवीन सुवर्ण विकत घेण्याचा प्रघात आहे. त्यामुळे वर्षभर घरात धनलक्ष्मी वास करते. वास्तविक लक्ष्मीपूजनाच्या वेळी वर्षभराचा जमाखर्च द्यायचा असतो. त्या वेळी धनत्रयोदशीपर्यंत शेष राहिलेली संपत्ती प्रभुकार्यासाठी व्यय केल्यास सत्कार्यात धन खर्च झाल्यामुळे धनलक्ष्मी शेवटपर्यंत लक्ष्मीरूपाने रहाते. धन म्हणजे पैसा. हा पैसा घामाचा, कष्टाचा, धवलांकित असलेला आणि वर्षभरात पै पै करून जमा केलेला असावा. या पैशाचा कमीतकमी १/६ भाग प्रभुकार्यासाठी खर्च करावा, असे शास्त्र सांगते. - प.पू. परशराम माधव पांडे महाराज, सनातन आश्रम, देवद, पनवेल.

श्री लक्ष्मीदेवीचे तत्त्व आकृष्ट करणारे यंत्र, देवीचे चित्र आणि रांगोळी यांचा वायूमंडलावर होणारा परिणाम अभ्यासण्यासाठी पिप तंत्रज्ञानाच्या साहाय्याने महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाने केलेली वैज्ञानिक चाचणी !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली 
साधक-कलाकारांनी काढलेली सात्त्विक रांगोळी आणि 
श्री लक्ष्मीदेवीचे सात्त्विक चित्र यांत श्री महालक्ष्मी यंत्राप्रमाणे 
सकारात्मक स्पंदने पुष्कळ प्रमाणात आहेत, हे दर्शवणारी पिप छायाचित्रे 

श्री महालक्ष्मी यंत्र

श्री लक्ष्मीदेवीचे चित्र

सनातन-निर्मित रांगोळी

         रांगोळी ही ६४ कलांपैकी एक कला आहे. ही कला घरोघरी पोचली आहे. सणा-समारंभांत, देवळांत आणि घरोघरी रांगोळी काढली जाते. सौंदर्याचा साक्षात्कार आणि मांगल्याची सिद्धी हे रांगोळीचे दोन उद्देश आहेत. ज्या ठिकाणी सात्त्विक रांगोळी काढली जाते, त्या ठिकाणी आपोआपच मंगलदायी वातावरणाची निर्मिती होते. हिंदु धर्मातील सर्व सण आणि विधी विविध देवतांशी संबंधित असतात. त्या त्या सणाच्या दिवशी आणि विधीच्या वेळी त्या त्या देवतेचे तत्त्व वातावरणात नेहमीपेक्षा जास्त प्रमाणात असते अन् विधीमुळे रांगोळीमध्ये आकृष्ट होते. प्रत्येक सणानुसार त्या-त्या देवतेचे तत्त्व रांगोळीतून अधिक प्रमाणात आकृष्ट होऊन त्याचा सर्वांना लाभ व्हावा, अशा उद्देशाने सनातनच्या साधकांनी संतांच्या मार्गदर्शनाखाली विविध देवतांची तत्त्वे आकृष्ट करणार्‍या अनेक सात्त्विक रांगोळ्या सिद्ध केल्या आहेत. या रांगोळ्यांमुळे देवतेचे तत्त्व आकृष्ट आणि प्रक्षेपित झाल्यामुळे तेथील वातावरण त्या तत्त्वाने भारित होऊन त्याचा सर्वांना लाभ होतो. या गोष्टीचा वैज्ञानिकदृष्ट्या तुलनात्मक अभ्यास करण्याच्या उद्देशाने पिप (पॉलीकॉन्ट्रास्ट इंटरफेरन्स फोटोग्राफी) या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने चाचणी घेण्यात आली. या चाचणीची निरीक्षणे आणि त्यांचे विवरण पुढे दिले आहे.

दीपावलीत लक्ष्मीप्राप्तीसाठी करावयाची साधना

१. सुख-संपत्तीत वाढ होण्यासाठी दीपावलीच्या दिवशी घराच्या 
मुख्य द्वाराच्या दोन्ही बाजूंना गव्हाचे लहान ढीग करून त्यांवर दिवे तेवत ठेवावेत ! 
     दीपावलीच्या दिवशी घराच्या मुख्य द्वाराच्या उजव्या आणि डाव्या बाजूंना गव्हाचे लहान ढीग करून त्यांवर दिवे तेवत ठेवावेत. हे दिवे शक्य असल्यास रात्रभर तेवत ठेवावेत. यामुळे तुमच्या घरातील सुख-संपत्तीत वाढ होईल. 
      मातीच्या नव्या दिव्यात कधीही तेल-तूप घालू नये. हे दिवे वापरण्याआधी ६ घंटे पाण्यात भिजत ठेवावेत. 
२. लक्ष्मीप्राप्तीसाठी दीपावलीच्या दिवसापासून 
भाऊबिजेपर्यंत दिवा लावून पुढील मंत्राचा जप करावा ! 
      दीपावलीच्या दिवसापासून ३ दिवसांपर्यंत, म्हणजेच भाऊबिजेपर्यंत एका स्वच्छ खोलीत उदबत्ती किंवा धूप (रसायनापासून बनलेला नव्हे, तर शेणाने बनवलेला) आणि दिवा लावून पिवळे वस्त्र धारण करून, कपाळावर केशराचा टिळा लावून स्फटिकाच्या जपमाळेने प्रतिदिन सकाळी पुढील मंत्राचा जप करावा.
     भाग्यलक्ष्म्यै च विद्महे । अष्टलक्ष्म्यै च धीमहि । तन्नो लक्ष्मीः प्रचोदयात् ॥ 
अर्थ : भाग्य उजळवून टाकणार्‍या लक्ष्मीदेवीला आम्ही जाणतो. आम्ही अष्टलक्ष्मींची आराधना करतो. ती लक्ष्मीदेवी आमच्या बुद्धीला सत्प्रेरणा देवो.

एक भारत अभियान - चलो कश्मीर की ओर अंतर्गत पुणे येथे होणार्‍या हिंदु धर्मजागृती सभेसाठी केलेला प्रसार आणि त्याला मिळालेला प्रतिसाद

      एक भारत अभियान - चलो कश्मीर की ओर अंतर्गत २३.१०.२०१६ या दिवशी पुणे येथे हिंदु धर्मजागृती सभेचे आयोजन केले आहे. त्यानिमित्त पुणे जिल्ह्यातील ४० गावांमध्ये प्रसार करण्यात आला. विविध माध्यमांतून केलेली धर्मप्रसारसेवा आणि त्याला समाजातून मिळालेला प्रतिसाद पुढे देत आहोत. 
१. सभेच्या पूर्वनियोजन आढावा बैठकीत धर्माभिमान्यांची सभेतील विविध सेवांमध्ये सहभागी होण्याची सिद्धता : हिंदु धर्मजागृती सभेच्या पूर्वनियोजन आढावा बैठकीस जवळपास ४५ हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे १३० हून अधिक धर्माभिमानी उपस्थित होते. या बैठकीत हिंदुत्वनिष्ठांनी धर्मजागृती सभेच्या विविध सेवांमध्ये सहभागी होण्याचे नियोजन केले. सभेच्या निमित्ताने विविध गावांमध्ये झालेल्या प्रसारात हिंदुत्वनिष्ठांचा उत्स्फूर्त सहभाग होता.

पुष्पांजलीचे मन आतातरी जाणा ।

आम्ही घालणार आहोत सडासंमार्जन शिवजटेतील गंगेचा ।
तारकांच्या ठिपक्यांनी काढणार रांगोळी आकाशगंगेची ।
त्यात प्रभातीचे लाल-केशरी-पिवळे रंग भरायचे आहेत ॥ १ ॥

चंद्राच्या आकाशदीपासमवेत सूर्याची पणती लावू ।
पृथ्वीचे कमलपुष्प चरणी वाहून तुझी पूजा करू ॥ २ ॥

म्हणूनच विनंती चरणा ।
हृदयगुंफेचे उघडावे द्वार दीपावलीच्या सणा ।

घेऊनी आरती करी उभी देवराणा ।
पुष्पांजलीचे मन आतातरी जाणा ॥ ३ ॥
- पुष्पांजली, बेळगाव (२५.११.२०१५)


फटाक्यांमुळे होणारे अपघात !

१. वर्ष १९९७ मध्ये देहलीत केलेल्या पाहणीत फटाक्यांमुळे ३८३ जणांचे मृत्यू, तसेच ४४२ जण दुखापतग्रस्त झाल्याचे लक्षात आले.
२. वर्ष १९९९ मध्ये हरियाणातील सोनपथ येथे फटाक्यांमुळे लागलेल्या आगीत ४४ जणांचे बळी गेले. 
३. वर्ष १९९९ मध्ये जळगाव शहरात फटाक्यांमुळे आग लागून बाजारपेठच भस्मसात् झाली आणि लक्षावधी रुपयांची हानी झाली.
४. ५ सप्टेंबर २०१२ या दिवशी फटाक्यांच्या निर्मितीसाठी प्रसिद्ध असलेल्या तमिळनाडूतील शिवकाशी येथे फटाके बनवण्याच्या कारखान्याला लागलेल्या भीषण आगीत ५२ जणांचा मृत्यू, तसेच ७० हून अधिक कामगार दुखापतग्रस्त झाले.


सण-उत्सव-व्रते यांविषयी आध्यात्मिक मार्गदर्शन करणारे सनातनचे ग्रंथ !

शास्त्र जाणूनी घेता सण-उत्सव-व्रतांचे । लाभेल चैतन्य, करता नित्य आचरण तयांचे ॥
सण साजरे करण्याच्या योग्य पद्धती आणि शास्त्र
  • सण धर्मशास्त्रानुसारच का साजरे करावेत ?
  • गुढीपाडवा हाच वर्षारंभ का आहे ?
  • अक्षय्य तृतीया कशी साजरी करावी ?
  • दसरा, दीपावली, मकरसंक्रांत आदी सणांचे महत्त्व काय ?
धार्मिक उत्सव आणि व्रते यांमागील शास्त्र
  • उत्सव आणि व्रते यांचे महत्त्व काय आहे ?
  • उत्सवातील गैरप्रकार कसे रोखावेत ? 
  • व्रत आचरणार्‍याने कोणते नियम पाळावेत ?
  • चातुर्मासात सर्वांत जास्त प्रमाणात व्रते असण्याचे कारण काय ?
...यांसारख्या विविध प्रश्‍नांची शास्त्रीय उत्तरे या ग्रंथांतून जाणून घ्या !

समाज, राष्ट्र आणि धर्म यांना सर्वांगीण अभ्युदयाकडे नेण्याचा संदेश देणारी दीपावली !

       दीपावली हा शब्द दीप+आवली (ओळ), असा बनला आहे. दीप या शब्दाचा खरा अर्थ तेल आणि वात यांची ज्योत. तमसो मा ज्योतिर्गमय, म्हणजे अंधाराकडून ज्योतीकडे म्हणजे प्रकाशाकडे जा, अशी वेदांची आज्ञा आहे. सुखसमृद्धीचे प्रतीक असलेली व्यष्टीतील दिवाळी आतापर्यंत आपण उत्साहाने साजरी करत आलो. आज व्यष्टीतून बाहेर म्हणजे समष्टीत डोकावून पाहिले तर अन्याय, भ्रष्टाचार, गुन्हेगारी, सामाजिक विषमता आदी दुष्प्रवृत्तींरूपी रज-तमाचा अंधार दिसून येतो. आपला समाज, राष्ट्र आणि धर्म हे या अंधारात खितपत पडले आहेत, म्हणूनच समाजाला अंधारातून प्रकाशाकडे, म्हणजे सर्वांगीण अभ्युदयाकडे नेण्याची आवश्यकता आहे. आपत्काळ असल्याने दिवाळी साधेपणाने; पण आध्यात्मिकदृष्ट्या योग्य प्रकारे साजरी करा !

       सध्या आपत्काळ चालू आहे, तसेच गेल्या काही दिवसांत हिंदूंवर मोठ्या प्रमाणात अत्याचार झाले. या हिंदूंप्रती आपली सहवेदना व्यक्त करण्यासाठी दिवाळी साधेपणाने साजरी करणे योग्य ठरते. दिवाळी साधेपणाने साजरी करतांना पुढील गोष्टी लक्षात घ्याव्यात. दिवाळीत पणत्या आणि आकाशकंदिल लावण्यामागे आध्यात्मिक कारण आहे. पणत्या आणि आकाशकंदिल लावल्याने देवतांचे तत्त्व आकृष्ट होण्यास साहाय्य होते. त्यामुळे साधकांनी दिवाळी साधेपणाने साजरी करतांना पणत्या आणि आकाशकंदिल लावून त्यापासून होणारा आध्यात्मिक लाभ मिळवावा. दिवाळीत गोडधोड खाऊ शकतो; मात्र त्यावर मर्यादा असाव्यात. फराळाचे पुष्कळ पदार्थ बनवण्यापेक्षा आवश्यक तेवढाच फराळ बनवावा. दिवाळीत फटाके लावणे, तसेच किमती कपडे, तसेच वस्तू खरेदी करणे, यांसाठी अनावश्यक खर्च न करता, हे पैसे राष्ट्र अन् धर्म कार्यासाठी अर्पण करावेत.

लोकहो, फटाक्यांचे दुष्परिणाम जाणा !

      दिवाळीच्या काळात मुंबईतील मालाड येथील सनी श्रीवास्तव (वय ७ वर्षे) याच्या डोळ्यांसमोर सुतळी बाँब फुटल्याने त्याच्या डोळ्यांना गंभीर दुखापत झाली. रुग्णालयात शस्त्रकर्म केल्यावर संपूर्ण डोळाच खराब झाल्याचे लक्षात आले. जोगेश्‍वरी येथील साहिल राठोड (वय ५ वर्षे) याच्याही डोळ्याला फटाक्यांमुळे दुखापत होऊन त्याची दृष्टी गेल्याचे समजते. जवळजवळ ७० जणांना इजा झाल्याचे वृत्त आहे.

अभ्यंगस्नान

१. अर्थ
अ. अभ्यंगस्नान म्हणजे पहाटे उठून डोक्याला आणि शरिराला तेल लावून नंतर कोमट पाण्याने स्नान करणे
आ. पिंडाच्या अभ्युदयासाठी केलेले स्नान म्हणजेच अभ्यंगस्नान

सर्वत्र विलसत असलेल्या भगवंताच्या आनंदमय स्वरूपाने आत्मज्योत प्रज्वलित करण्यातील आनंद घेऊन खरी दिवाळी साजरी करूया !

प.पू. पांडे महाराज
       दीपावली ही आसुरी वृत्तीवर मिळवलेल्या विजयाची निदर्शक आहे. 
१. दीपावलीतील प्रत्येक दिवसाचे महत्त्व 
१ अ. नरकचतुर्दशी : हा दीपावलीचा पहिला दिवस. या दिवशी श्रीकृष्णाने नरकासुराचा वध करून राक्षसी वृत्तींचा नाश केला आणि दैवी विचारांचा प्रसार केला.
१ आ. लक्ष्मीपूजन : या दिवशी शुद्धस्वरूपी लक्ष्मीचे पूजन आणि सरस्वतीपूजन असते. सरस्वतीकृपेनेच आमच्यातील विवेकजागृतीमुळे शुद्ध लक्ष्मी, जी अनपगामिनी (आमच्यापासून कधीही दूर न जाणारी) आहे, तिचे स्वागत अन् पूजन करावे. केरसुणी ही बाह्य भौतिक स्वच्छतेचे प्रतीक आहे; म्हणून तिची पूजा करतात. दैवी विचारांचे प्रकाशमय उन्नत करणारे विचार ज्ञानदीपाद्वारे मिळाल्याने दिव्याचे पूजन केले जाते.

दिवाळीत अंगाला उटणे लावण्याची पद्धत

      उटणे हे रजोगुणी तेजोमय असल्याने ते अंगाला लावतांना घड्याळाच्या काट्याच्या दिशेने बोटांच्या अग्रभागाचा अंगाला स्पर्श करून थोडेसे दाबून लावावे. प्रत्येक ठिकाणी दिलेली उटणे लावण्याची पद्धत ही त्या त्या पोकळीत असणार्‍या त्रासदायक वायूंच्या गतीला अनुसरून दिली आहे.
१. स्वतःला उटणे लावणे
अ. कपाळ : कपाळावर लावतांना मधल्या तीन बोटांचा उपयोग करून स्वतः लावतांना डावीकडून उजवीकडे या पद्धतीने लावावे. परत उलट्या दिशेने त्यावरून हात फिरवू नये. उलट्या दिशेने हात फिरवल्याने त्रासदायक स्पंदनांची निर्मिती होेते. लावतांना थांबून परत डावीकडून उजवीकडे यावे. कपाळाच्या पोकळीत साठलेल्या त्रासदायक स्पंदनांची गती ही डावीकडून उजवीकडे असल्याने त्याच पद्धतीने या स्पंदनांना कार्यरत करून उटण्यातील तेजोमय स्पर्शाने त्यांचे विघटन केले जाते.

आनंद, सौख्य, सुखसमृद्धी, भरभराट, प्रचंड उत्साह आणि चैतन्य असलेला दीपोत्सव म्हणजे दीपावली !

१. दीप शब्दाची व्याख्या
     दीप्यते दीपयति वा स्वयं परं चेति । म्हणजे स्वतः प्रकाशतो आणि दुसर्‍यांना प्रकाशित करतो तो दीप, अशी दीप या शब्दाची व्याख्या आहे.
२. बुद्धी आणि ज्ञान यांचे प्रतीक
    दीप किंवा दीपज्योत हे बुद्धी आणि ज्ञान यांचे प्रतीक आहे. तमसो मा ज्योतिर्गमय म्हणजे अज्ञानरूपी तिमिराकडून ज्ञानरूपी प्रकाशज्योतीकडे ने, असा त्याचा अर्थ आहे. 
३. प्राणज्योत
     शरिरातील जीवनतत्त्वाला, चैतन्याला प्राणज्योत, म्हटले आहे. ही प्राणज्योत तेवेपर्यंतच जीवन आहे. 
(संदर्भ : आदिमाता)

प.पू. डॉक्टरांना दीपावलीनिमित्त नमस्कार करून कृतज्ञता व्यक्त करणारी कु. गौरी मुद्गल (वय १५ वर्षे) !

कु. गौरी मुद्गल
      प.पू. डॉक्टर तुम्हाला गोपींकडून, संतांकडून दीपावलीचा नमस्कार ! प.पू. डॉक्टर, तुम्ही मला तुमचे छायाचित्र दिल्यावर माझा भाव जागृत होऊन मी तुम्हाला अनुभवण्याचा प्रयत्न करीन.
       प.पू. डॉक्टर, या अपराधी जिवाला क्षमा करा. तुमचे चित्र काढण्याचा मी प्रयत्न केला; पण मला व्यवस्थित काढता आले नाही. मला क्षमा करा. मी चित्र काढतांना व्यवस्थित काढण्याचा प्रयत्न करीन. प.पू. डॉक्टर, जर तुम्ही मला विचारले, तुला काय हवे आहे ? तर मी म्हणेन, मला माझे दोष आणि अहं घालवून हिंदु राष्ट्र्राच्या स्थापनेच्या कार्यात सहभागी व्हायचे आहे.

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी होणार्‍या अयोग्य कृती आणि त्यामुळे सूक्ष्मातून होणारे परिणाम

१. दिवाळीच्या दिवशी कृत्रिम, 
लुकलुकणारी आणि विचित्र आकाराच्या रोषणाईमुळे 
प्रकाशाच्या स्वरूपात तम ऊर्जात्मक शक्तीचे प्रक्षेपण होणे
१ अ. कृत्रिम रोषणाई केल्यामुळे होणारे परिणाम : दिवाळीच्या दिवशी केल्या जाणार्‍या कृत्रिम रोषणाईमुळे वातावरणात प्रवाहित होणार्‍या ईश्‍वराच्या तारक लहरी कृत्रिम रोषणाईतून प्रक्षेपित होणार्‍या तेजोमय तमात्मक ऊर्जेमुळे गतीच्या अभावी संचारणात्मक अवस्थेतून स्थिर स्वरूपात बद्ध होतात. वातावरणात असणार्‍या कनिष्ठ त्रासदायक शक्ती वायूमंडलात गतीमान होऊन पूर्ण वातावरणाच्या नैसर्गिक क्षमतेला शोषली जाते. वातावरण रज-तमाने भारीत आणि स्मशानाप्रमाणे त्रासदायक बनते.

तुझेच रूप दिसावे या नयनी ।

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले 
यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त... 
सौ. सायली करंदीकर
गुरुचरणांचा ध्यास देऊनी अंतरी सजव या क्षुद्र मना ।
अनेक गुणांची वृद्धी करूनी घडवे रे या अंतःकरणा ॥ १ ॥
तुझ्या चरणांची ओढ लावोनी व्याकूळ कर रे या हृदया ।
सर्व प्रयत्नांची पराकाष्ठा करूनी गाठता येऊदे तव चरणा ॥ २ ॥
शेवटी तुला मी शरण येऊनी तळमळीने करते प्रार्थना ।
प्रार्थनेकरिता डोळे मिटूनी तुझेच रूप दिसावे या नयनी ॥ ३ ॥
- सौ. सायली करंदीकर (पूर्वाश्रमीच्या कु. सायली गाडगीळ), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१४.९.२०१४)

देवतातत्त्वे आणि आनंद आदी स्पंदने आकृष्ट अन् प्रक्षेपित करणार्‍या सात्त्विक रांगोळ्या (भाग १) (रांगोळ्यांच्या सात्त्विकतेमागील शास्त्रासह)

सनातनचा नूतन ग्रंथ प्रकाशित !
       रांगोळ्यांची अनेक पुस्तके पेठेत उपलब्ध असतांना या विषयावर एक ग्रंथ प्रकाशित करण्याचा सनातनचा उद्देश हा की, रांगोळी केवळ नेत्रसुखद नव्हे, तर सात्त्विक आणि आध्यात्मिक लाभ करून देणारी असते, हे सर्वांना समजावे !
१. रांगोळ्यांचे आध्यात्मिक 
महत्त्व लक्षात घेऊन निर्मिलेला ग्रंथ
अ. हिंदु धर्मातील सर्व सण, तसेच विधी कोणत्यातरी देवतेशी संबंधित असतात. त्या त्या सणाच्या दिवशी किंवा विधीच्या वेळी त्या त्या देवतेचे तत्त्व वातावरणात नेहमीपेक्षा जास्त प्रमाणात असते किंवा विधीमुळे तेथे आकृष्ट होते. ते तत्त्व आणखी जास्त प्रमाणात यावे व त्याचा सर्वांना लाभ व्हावा; म्हणून ते तत्त्व आकृष्ट तसेच प्रक्षेपित करणार्‍या रांगोळ्या या ग्रंथात दिल्या आहेत. या रांगोळ्यांमुळे देवतेचे तत्त्व आकृष्ट आणि प्रक्षेपित झाल्यामुळे तेथील वातावरण त्या तत्त्वाने भारित होऊन त्याचा सर्वांना लाभ होऊ शकेल.
आ. या ग्रंथाचा अभ्यास केल्यास इतरांनाही विविध प्रकारच्या सात्त्विक रांगोळ्या काढता येतील. सर्व जण सात्त्विक रांगोळ्या काढू लागले, तर वातावरणातील रज-तमाचे प्रदूषण थोड्या प्रमाणात तात्पुरते तरी अल्प होण्यास साहाय्य होईल.

योग्य साधना असल्यास कलियुगातही देवतांचे तत्त्व पुष्कळ प्रमाणात आकृष्ट करणारी कलाकृती निर्माण करता येते, हे परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी दाखवून देणे

        शेकडो वर्षांपूर्वी होऊन गेलेले आद्य शंकराचार्य हे अवतारी पुरुष होते. त्यांच्यात सूक्ष्मातीसूक्ष्म स्पंदने जाणण्याची क्षमता असल्याने त्यांनी उपासकांना आध्यात्मिकदृष्ट्या लाभदायक असणारी देवतांची विविध यंत्रे निर्माण केली. अध्यात्म हे सूक्ष्मातील शास्त्र आहे आणि योग्य साधना केल्यास सध्याच्या काळातही व्यक्तीमध्ये सूक्ष्मातील जाणण्याची क्षमता निर्माण होऊ शकते, असा आत्मविश्‍वास परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधकांना दिला. त्यामुळे सनातनचे साधक-कलाकार परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली विविध देवतांची तत्त्वे पुष्कळ प्रमाणात आकर्षित करणार्‍या रांगोळ्यांची निर्मिती करू शकले.

फटाक्यांचा वापर टाळा !

१. अक्कल जाळून सहस्रो 
कोटी रुपयांचा धूर काढणे टाळावे !
       भारतामध्ये केवळ दीपावलीच्या कालावधीत पाचशे कोटी रुपयांचे फटाके जळतात, तसेच लग्न आणि निवडणुका इत्यादींमुळे वर्षभरात एकूण काही सहस्र कोटी रुपयांची राखरांगोळी होते. धूमधडाका करण्याच्या आनंदात पैशाची अशी राख करणे, म्हणजे आपली अक्कल जाळून धूर करण्यासारखेच आहे !
२. मानवतेच्या दृष्टीने मोठे 
आवाज होणारे फटाके कटाक्षाने टाळावे !
       आवाजाची पातळी ८० डेसिबलपेक्षा अधिक झाली, तर त्याचा माणसाला त्रास होतो. अ‍ॅटमबाँब आणि डांबरी माळा पेटवल्यावर यांच्या आवाजाची पातळी नेहमीच १०० डेसिबलपेक्षा अधिक असते. फटाक्याची वात पेटवण्यापूर्वी धार्मिकता आणि परंपरा यांचा बडेजाव करणार्‍यांनी आपण मानवताच विसरत नाही ना ?, असा विचार करावा.
(संदर्भ : मासिक अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र, सप्टेंबर २००९)

फटाक्यांमुळे प्रतिवर्षी ६ सहस्र व्यक्ती दृष्टीहीन !

        दिवाळीत फटाक्यांमुळे प्रतिवर्षी ६ सहस्र व्यक्ती दृष्टीहीन होत असल्याचे सर्वेक्षणातून समोर आले आहे. बाधित व्यक्तींपैकी ६० टक्के व्यक्ती २० वर्षांखालील असतात. फटाके फोडणार्‍यांपेक्षा बघणार्‍यांना अधिक बाधा होते; कारण स्फोटामुळे दगड-माती वेगाने डोळ्यांना इजा करतात.
१. फटाके फुटल्यानंतर निघणारा धूर डोळे, फुप्फुस आणि त्वचा यांना अपायकारक असतो. त्यामुळे दमा आणि अ‍ॅलर्जी यांचे प्रमाण वाढते.
२. फटाक्यांमुळे ध्वनी, जल, वायू आणि सामाजिक प्रदूषण होते. फटाके फोडलेल्या ठिकाणचे तापमान ४०० ते ५०० अंशापर्यंत वाढते.
३. जगात प्रतीवर्षी फटाके आणि शोभेच्या दारूमुळे ५ लाख लोक अंध होतात. फटाक्यांतील चारकोल, गंधक, नायट्रेट, क्लोरेट, परफ्लोरेट हे रासायनिक घटक डोळ्यांसाठी घातक असतात.
           तुळस ही पावित्र्य आणि सात्त्विकता यांचे प्रतीक आहे. तुळशीसमवेत श्रीकृष्णाचा विवाह होणे, याचा अर्थ ईश्‍वराला जिवाचा पावित्र्य हा गुण अतिशय प्रिय असणे. म्हणूनच श्रीकृष्णाच्या गळ्यात वैजयंती माळ असते.

तुळशी विवाहाच्या माध्यमातून मिळणारे श्रीविष्णु आणि लक्ष्मी तत्त्व !

       तुळशी विवाहाच्या दिवशी सायंकाळी ब्रह्मांड पोकळीतील विष्णु आणि लक्ष्मी या तत्त्वांच्या सूक्ष्मतर लहरींचे ब्रह्मांडात आगमन होते. वातावरणातील विष्णु आणि लक्ष्मी या तत्त्वांच्या कार्याचे प्रमाण वाढून या लहरींचा संयोग घडून येतो. या लहरींच्या संयोग सोहळ्यालाच तुळशी-विवाह असे म्हणतात.
       तुळशीच्या रूपात लक्ष्मीची आणि श्रीकृष्णाच्या रूपात श्रीविष्णूची पूजा केली जाते. या तत्त्वांचा अधिकाधिक लाभ मिळवण्यासाठी सायंकाळी तुळशी-विवाह साजरा केला जातो. मुहूर्त कालातच श्रीविष्णु-लक्ष्मी या दोन तत्त्वांच्या लहरींचे आगमन आणि संयोग घडून येत असतो. वातावरणातील या सात्त्विकतेचा फायदा मिळवा, यासाठी तुळशी-विवाह हा मुहूर्त कालातच करावा.
- एक विद्वान (२०.११.२००४) (पू. (सौ.) अंजली गाडगीळ एक विद्वान या टोपण नावाने लिखाण करतात.)

विविध आकाशकंदिलातून प्रक्षेपित होणार्‍या विविध तत्त्वांच्या लहरी

१. चांदणीच्या आकाराचा कंदिल 
      या प्रकारच्या कंदिलातून चंचल स्वरूपाच्या लहरी प्रक्षेपित होतात. या प्रकारचा आकाशकंदिल बघणार्‍याच्या माध्यमातून लगेच मध्य भागातून, पाताळातून ऊर्ध्व दिशेस प्रक्षेपित होणारा तमोगुण खेचला जाऊन स्वतःच्या विशिष्ट आकाराच्या बलावर वातावरणात प्रक्षेपित होेतो.
२. षट्कोनी आकाराचा कंदिल 
      या कंदिलातून समप्रमाणात तीन या घटकाशी संबंधित लहरी प्रक्षेपित होतात. या प्रकारच्या आकाशकंदिलाच्या सर्व ६ निगडित घटकांच्या सर्व ठिकाणी, बाजूस सतत तमोगुणी शक्तीचे प्रक्षेपण करणार्‍या यंत्राद्वारे ऊर्ध्व दिशेतून अधर दिशेपर्यंत मोठ्या प्रमाणावर तमोगुणाचे प्रक्षेपण केले जाते.
३. चौकोनी आकाराचा कंदिल 
      या कंदिलातून सतत वलयांकित स्वरूपाच्या लहरी प्रक्षेपित होतात. या प्रकारच्या आकाशकंदिलातून तमोगुणी शक्ती तमोगुणाचे प्रक्षेपण करणारे चौकोनी स्वरूपाचे कोष्टक स्वरूपाचे यंत्र बसवतात आणि त्या माध्यमातून वास्तूच्या चारही बाजू दूषित करतात.
४. लंबगोल आकाराचा कंदिल 
      या प्रकारच्या आकाशकंदिलात आकारत्व विहिनता प्राप्त झालेली असल्यामुळे तमोगुणी शक्तींना या प्रकारच्या कंदिलातून तमोगुणाचे प्रक्षेपण करता येत नाही. अधिक तमोगुणी शक्तींनाच या प्रकारच्या कंदिलात स्थान निर्माण करणे शक्य होते.
- श्री. निषाद देशमुख (१५.१०.२००६)

आकाशदीप

       त्रेतायुगात रामराज्याभिषेकाच्या वेळी श्रीरामाच्या चैतन्याने पुनित वायूमंडलाचे स्वागत आकाशदीप टांगून करण्यात आले. आकाशदीपामुळे वायूमंडलाची शुद्धी आणि वास्तूभोवती संरक्षककवच निर्माण होते.
- एक विद्वान (सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ एक विद्वान, या टोपणनावानेही लिखाण करतात.)

फलक प्रसिद्धीकरता

राष्ट्र कर्जबाजारी असतांना 
फटाके वाजवणे, हा राष्ट्रद्रोहच !
       राष्ट्राला अब्जावधी रुपयांचे कर्ज असतांना आणि ४० टक्के जनता दारिद्य्रात होरपळून निघत असतांना फटाके वाजवणे, हा राष्ट्रद्रोहच होय.

हिंदू तेजा जाग रे !

Jago ! : Bharatiyo, Dipawalike avsarpar sangathit rupse Chini vastuoka bahishkar kare.
Sansarko apni Rashtranistha dikhakar aiye apna Rashtra kartavya nibhaye !
जागो ! : भारतीयो, दीपावली के अवसर पर संगठित रूप से चीनी वस्तुआें का बहिष्कार करें !
संसार को अपनी राष्ट्रनिष्ठा दिखाकर आइए अपना राष्ट्रकर्तव्य निभाएं !

दीपावलीच्या निमित्ताने विज्ञापनदाते, 
वाचक आणि हिंतचिंतक यांना शुभेच्छा !
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥

या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो. - प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

सनातनच्या संतांना त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी भ्रमणभाष करू नका !

       वाढदिवसाच्या दिवशी सर्वत्रच्या साधकांचे त्या संतांना भ्रमणभाष येतात. स्थुलापेक्षा सूक्ष्म श्रेष्ठ असल्याने साधकांनी संतांना भ्रमणभाष न करता त्यांना मानस नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद मिळवावेत.
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले
सहस्रो पानांचे आरोपपत्र 
वाचण्यासाठी न्याययंत्रणेचा बहुमूल्य 
वेळ वाया घालवणारी अन्वेषण यंत्रणांची 
निरर्थक कार्यपद्धत हिंदु राष्ट्रात नसेल ! 
       न्यायालयात छोट्याशा प्रकरणाचे दाखल केलेले आरोपपत्रही शेकडो पानांचे असते, तर काही बॉम्बस्फोट, हत्या प्रकरणांतील आरोपपत्र सहस्रो पानांचे असते. या आरोपपत्रांचा अभ्यास केला असता बरीच कागदपत्रे आवश्यकता नसतांना जोडली जातात. न्यायाधिशांना न्याय देण्यासाठी सर्व कागदपत्रांचा अभ्यास करणे आवश्यक असते. अशी अनावश्यक कागदपत्रे जोडल्यामुळे न्यायाधिशांना या ढीगभर कागदपत्रांचा अभ्यास करणे क्रमप्राप्त ठरते. कोट्यवधी प्रलंबित खटले, कामकाजाचा कालावधी, न्यायाधिशांची अपुरी संख्या या सर्व गोष्टींचा विचार करता अशा सहस्रो पानांच्या आरोपपत्रांची आवश्यकता वाटत नाही. आरोपपत्र सार स्वरूपात दाखल करून न्याययंत्रणेच्या वेळेचा अपव्यय टाळणे आवश्यक आहे. हिंदु राष्ट्रात अशी सहस्रो पानांची आरोपपत्रे सादर करणार्‍या तपास अधिकार्‍याला कर्तव्यपराङ्मुख आणि अकार्यक्षम समजले जाईल.
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले

॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज
सनातनचे श्रद्धास्थान
सासूके घरसे जवाई, बहनके घरसे भाई और 
गुरुके घरसे शिष्य कभी खाली हाथ वापस नहीं जाते ।
भावार्थ : गुरुके घरसे शिष्य कभी खाली हाथ वापस नहीं जाते म्हणजे शिष्यावर गुरुकृपा झाल्याविना रहात नाही. एकदा एखाद्याला शिष्य केले की, त्याला पूर्णत्वाला न्यायचे दायित्व गुरु पार पाडतात.
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.)
      जे आंधळे, बहिरे कि भ्रष्ट पोलीस रात्री २ - ३ पर्यंत उघडपणे फोडल्या जाणार्‍या फटाक्यांना थांबवू शकत नाहीत, ते अतिरेकी लपून-छपून करत असलेले बॉम्बस्फोट कधी थांबवू शकतील का ? फटाक्यांचे प्रदूषण रोखण्यासाठी आता हिंदु राष्ट्रच हवे !
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

साधना 
समुद्रातील वादळे अल्पकाळात नाहीशी होतात; पण मनातील वादळे एकदा निर्माण झाली की, 
ती आवरणे अतिशय कठीण; म्हणून ती निर्माण होऊ न देण्यासाठी साधना करणेच श्रेयस्कर ! 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

अंधाराकडून प्रकाशाकडे !

संपादकीय
       दिवाळी एक आठवड्यावर आली. वर्षातून एकदा येणारा हिंदूंचा सण हा दिव्यांचा सण आहे. तमसो मा ज्योतिर्गमय । अंधाराकडून प्रकाशाकडे नेणारा हा सण ! हिंदूंची घरे दिव्यांनी उजळून जातात. प्रकाशाची सोबत असलेली सर्वत्र सजावट, त्यामुळे वातावरण सात्त्विक बनलेले असते. अमेरिका आणि इंग्लंड या देशांनाही या सणाचा रुबाब भावला आणि त्यांनी त्यांच्या संसदेतही तो साजरा करण्याचा निर्णय घेतला. हिंदूंच्या सणांच्या दिवशी होणारी सात्त्विक वातावरण निर्मिती हेच त्यांचे वैशिष्ट्य असते. दिवाळी हा राष्ट्रीय सण असल्याने संपूर्ण देश प्रकाशात न्हाऊन जात असतो.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn