Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

कोटी कोटी प्रणाम !

प.पू. ढेकणे महाराज पुण्यतिथी

आतंकवादाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी काश्मीरला कुरुक्षेत्र बनवा ! - डॉ. अजय च्रोंगू, अध्यक्ष, पनून कश्मीर

मुंबई येथे पत्रकार परिषद 

डावीकडून शिवसेनेचे तामिळनाडू राज्य प्रमुख श्री. राधाकृष्णन, भारत रक्षा मंचचे
(ओडीशा) श्री. अनिल धीर, युथ फॉर पनून कश्मीरचे राष्ट्रीय समन्वयक श्री. राहुल कौल,
जम्मू फॉर इंडियाचे प्रा. हरिओम, पनून कश्मीर चे अध्यक्ष श्री. अजय च्रोंगू, हिंदु जनजागृती
समितीचे राष्ट्रीय प्रवक्ता श्री. रमेश शिंदे, आणि हिंदु विधीज्ञ परिषदेचे अधिवक्ता श्री. अमृतेश

       मुंबई, २१ ऑक्टोबर (वार्ता.) - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच वक्तव्य केले की, पाकिस्तान हा जगातील आतंकवादाचा अड्डा आहे. त्यासमवेत त्यांनी हे लक्षात घेतले पाहिजे की, भारतातील आतंकवादाचा अड्डा काश्मीर बनलेला आहे. त्यामुळे ज्याप्रमाणे पाकिस्तानमध्ये सर्जिकल स्ट्राईक करून तेथील आतंकवादी तळ उद्ध्वस्त केले, त्याप्रमाणे काश्मीरमधील आतंकवादी कारवाया रोखण्यासाठी सर्जिकल हस्तक्षेप करण्याची आवश्यकता आहे. आतंकवादाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी काश्मीरला कुरुक्षेत्र बनवले पाहिजे, असे प्रतिपादन पनून कश्मीरचे अध्यक्ष डॉ. अजय च्रोंगू यांनी केले. काश्मिरी हिंदूंवरील अन्याय आणि आतंकवाद यांच्या विरोधात पनून कश्मीर आणि विविध हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्या वतीने उभारण्यात आलेल्या एक भारत अभियान या राष्ट्रीय चळवळीची माहिती देण्यासाठी २१ ऑक्टोबर या दिवशी मुंबई मराठी पत्रकार संघाच्या कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
       या वेळी व्यासपिठावर जम्मू फॉर इंडियाचे प्रा. हरि ओम, युथ फॉर पनून कश्मीरचे राष्ट्रीय समन्वयक श्री. राहुल कौल, भारत रक्षा मंचचे श्री. अनिल धीर, तमिळनाडू शिवसेनेचे श्री. राधाकृष्णन् आणि हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ता श्री. रमेश शिंदे हे उपस्थित होते. वर्ष १९९० मध्ये झालेल्या अनन्वित अत्याचारांमुळे काश्मिरी हिंदूंना स्वत:च्याच भूमीत विस्थापित व्हावे लागले. मागील २६ वर्षे काश्मिरी हिंदू विस्थापितांचे जीवन जगत आहेत. या विस्थापित हिंदूंचे काश्मीर खोर्‍यात पुनर्वसन व्हावे, यासाठी उभारण्यात आलेल्या एक भारत अभियानाची माहिती या पत्रकार परिषदेत देण्यात आली.

(म्हणे) सनातनचे दोन्ही आश्रम उद्ध्वस्त करणार !

  • धमकीची भाषा वापरून समाजातील शांतता बिघडवू पहाणारे लक्ष्मण माने यांच्यावर पोलीस कठोर कारवाई करतील का ?
  • आतंकवाद्यांप्रमाणे धमक्या देऊन कायदा हातात घेण्याची भाषा करणारे विद्रोही लेखक लक्ष्मण माने !
  • सनातनच्या विरोधात बोलले की प्रसिद्धी मिळते, हे लक्षात आल्याने आजकाल कोणीही येतो आणि सनातनच्या विरोधात बोलतो. माने यांचा हा स्टंट यापेक्षा वेगळा नव्हे.
       सातारा, २१ ऑक्टोबर (वार्ता.) - सनातन अतिरेकी संघटना असून ते बंदुका आणि रायफल चालवण्याचे प्रशिक्षण देतात. धर्मचिकित्सा आणि विवेकावर बोलणार्‍यांची हत्या करणार्‍या सनातनचे आगामी काळात दोन्ही आश्रम उद्ध्वस्त करणार आहे. मी आता मोकळा झालो असून मरण्यासाठी सिद्ध आहे. (सनातन धर्म आणि राष्ट्र विचारांचा प्रसार करणारी संस्था आहे. सनातनने बंदुका आणि रायफल चालवण्याचे प्रशिक्षण दिल्याचे, तसेच कोणाची हत्या केल्याचे कोणते पुरावे माने यांच्याकडे आहेत ? सनातनचे आश्रम उद्ध्वस्त करण्याची धमकी देणार्‍या आणि सनातनची अपकीर्ती करणार्‍यांच्या विरोधात सनातन कायदेशीर सल्ला घेत आहे ! - संपादक) विचारांना मारण्यासाठी तुमच्या बंदुकीत किती गोळ्या आहेत हे दाखवा, असे आव्हान सनातनद्वेषाची कावीळ झालेले धर्मद्रोही लक्ष्मण माने यांनी २१ ऑक्टोबर या दिवशी पत्रकार परिषदेत केले. लक्ष्मण माने नुकतेच सहा महिलांवरील लैंगिक अत्याचाराच्या आरोपातून मुक्त झाले आहेत. जिल्हा आणि सत्र न्यायाधीश वर्षा मोहिते यांनी पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केल्यानंतर माने यांनी स्वतःच्या निवासस्थानी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

खटला का लांबवत आहात ? - न्यायालयाकडून विचारणा

  • केंद्रीय अन्वेषण यंत्रणेला न्यायालयाने पुन्हा फटकारले !
  • डॉ. दाभोलकर हत्या प्रकरण
       पुणे, २१ ऑक्टोबर - केंद्रीय अन्वेषण यंत्रणेने आरोपपत्र प्रविष्ट केलेले असतांना तपास यंत्रणा हा खटला बंदुकीच्या गोळ्यांच्या अहवालासाठी थांबवून का ठेवत आहे ? तुम्हाला उच्च न्यायालयाने आतापर्यंत अनेक वेळा मुदत दिलेली आहे. हा खटला कायद्यानुसार चालवावा. आतापर्यंत यंत्रणेने अशा प्रकारचे खटले लांबवलेले नाहीत. असे असतांना तुम्हाला स्वतःची अपकीर्ती करून घ्यायची आहे का ? त्यामुळे हा खटला चालू करण्यासाठी पुढील सुनावणी ४ नोव्हेंबरला ठेवण्यात येत आहे, अशा शब्दांत जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश पी.वाय. लाडेकर यांनी अन्वेषण यंत्रणेचे अतिरिक्त सरकारी अधिवक्ता मनोज चालाडे यांना फटकारले. डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणाची सुनावणी २१ ऑक्टोबर या दिवशी झाली. त्या वेळी ते बोलत होते.
       या वेळी डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणात संशयित म्हणून अटक केलेले सनातनचे डॉ. तावडे यांचे अधिवक्ता श्री. वीरेंद्र इचलकरंजीकर, अधिवक्ता नीता धावडे, अन्वेषण अधिकारी एस्.आर्. सिंग हे उपस्थित होते. या वेळी डॉ. तावडे यांना न्यायालयात उपस्थित करण्यात आले होते.

अभय वर्तक यांच्यावर गुन्हा प्रविष्ट करण्यासाठी अवामी लीग पार्टीचे अश्रफअली वांकर आणि त्यांचे सहकारी यांचा सांगली पोलिसांवर दबाव !

सनातन संस्थेचे प्रवक्ता श्री. अभय वर्तक यांनी महाराष्ट्र 
१ या वाहिनीवरील चर्चासत्रात केलेल्या वक्तव्याचे प्रकरण
         सांगली, २१ ऑक्टोबर (वार्ता.) - सनातन संस्थेचे प्रवक्ता श्री. अभय वर्तक यांनी महाराष्ट्र १ या दूरचित्रवाहिनीवरील चर्चासत्रात केलेल्या वक्तव्याचे भांडवल करून त्यांच्यावर गुन्हा प्रविष्ट करण्यासाठी अवामी लीग पार्टीचे अश्रफअली सलीम वांकर आणि अन्य लोक यांनी सांगली ग्रामीण पोलिसांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. श्री. वर्तक यांच्यावर गुन्हा प्रविष्ट झाला पाहिजे, यांसाठी वांकर आणि त्यांचे सहकारी २० ऑक्टोबर या दिवशी दिवसभर सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यासमोर ठिय्या मारून बसले होते. अशा प्रकारे एखाद्या वक्तव्यावर गुन्हा प्रविष्ट होत नाही, असे सांगूनही ते ऐकण्यास सिद्ध नव्हते. शेवटी पोलिसांनी सदर प्रकरणी योग्य तो कायदेशीर सल्ला आणि वरिष्ठ अधिकारी यांचे मार्गदर्शन घेऊन लवकर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याची तजवीज ठेवली आहे, असा उल्लेख करून त्यांना तक्रारीच्या अर्जावर पोच दिली.
         वांकर यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, मी बुधगाव येथे रहाणारा असून १९ ऑक्टोबर या दिवशी महाराष्ट्र १ न्यूज वाहिनी पहात असतांना सदर चर्चासत्रात उपस्थित असलेले अभय वर्तक यांनी ज्या वेळी आझाद मैदानावर दंगे झाले, त्या वेळी मराठा पोलीस महिलांवर मुसलमानांनी बलात्कार केले, अशा प्रकारचे वक्तव्य जाणीवपूर्वक आणि पूर्वग्रहदूषितपणे केले. यामुळे माझ्यासह मुसलमान बांधवांच्या भावना दुखावल्या आहेत. या वक्तव्यामुळे मुसलमान आणि मराठा समाज यांच्यात तेढ अन् द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे त्यांच्यावर भारतीय दंड संहिता २९५ अ आणि १५३, तसेच इतर अन्य कलमांनुसार गुन्हा प्रविष्ट करून कायदेशीर कारवाई करावी.

ड्रोन उडवणार्‍या तिघांना मुंबई विमानतळाजवळ अटक

हवाई सुरक्षेचे तीनतेरा !
       मुंबई - मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने मुंबई विमानतळाजवळ ड्रोन छायाचित्रकाचे (कॅमेर्‍याचे) विमान उडवल्याच्या प्रकरणी तिघा जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून दोन ड्रोन छायाचित्रक आणि एक आयपॅड कह्यात घेतला आहे. १८ ऑक्टोबर या दिवशी इंडिगो विमानाच्या वैमानिकाला विमानाचे लँण्डीग करतांना मुंबई विमानतळाजवळ एक संशयास्पद ड्रोन दिसले होते.
       चारकोप पोलिसांनी या प्रकरणी राहुल राजकुमार जैस्वाल, राणा सुभाष सिंह आणि विधिचंद जैसवाल अशा तिघांना अटक केली आहे. चित्रपटाच्या शूटींगसाठी राहुल जैस्वाल आणि सुभाष सिंह यांनी छायाचित्रक असलेले ड्रोन विमान उडवल्याचे चौकशीतून समोर आले. चित्रीकरणाच्या नियोजित दिनांकापूर्वी ते शूटसाठी ड्रोनची चाचणी घेत होते. विधिचंद जैस्वाल यांचा चित्रपटाच्या शूटींगसाठी ड्रोन कॅमेरे भाडयावर देण्याचा व्यवसाय आहे.

महाराष्ट्र १ वाहिनीचे वादग्रस्त संपादक निखिल वागळे यांचा पत्रकाराकडून निषेध !

अभय वर्तक यांना 
अपमानास्पद वागणूक दिल्याचे प्रकरण !
        पंढरपूर - सनातन संस्थेचे प्रवक्ता श्री. अभय वर्तक यांचा अवमान केल्याविषयी येथील पत्रकार श्री. द्वैपायन वरखेडकर यांनी महाराष्ट्र १ वाहिनीचे संपादक निखिल वागळे यांना पत्र पाठवून निषेध केला आहे. या निषेधपत्रात श्री. वरखेडकर यांनी लिहिले आहे, अन्य वाहिन्यांप्रमाणे मी महाराष्ट्र १ या वृत्तवाहिनीचाही नियमित प्रेक्षक आहे.
        १८ ऑक्टोबर या दिवशी रात्री आजचा सवाल या कार्यक्रमात सनातन संस्थेचे प्रवक्ता श्री. अभय वर्तक यांना त्यांचे मत मांडण्यासाठी आपण बोलावले होते. त्या वेळी श्री. अभय वर्तक हे स्वत:चे मत-विचार मांडत असतांना अचानक आपण आक्रस्ताळेपणा करीत त्यांना येथून निघून जा, येथून पुढे सनातनच्या लोकांना मी बोलावणार नाही इत्यादी प्रकारची अनेक चुकीची वाक्ये बोलून अत्यंत अपमानास्पद वागणूक दिली. त्यांना विचार पूर्णपणे मांडण्याची संधी न देताच त्यांना हाकलून दिले. ही गोष्ट शिष्टाचाराला आणि सुसंस्कारितेला धरून नाही. एका पत्रकारासाठी तर हे कृत्य फारच अशोभनीय आणि चुकीचे आहे. पत्रकाराकडून अशी वागणूक अपेक्षित नाही. मी स्वत: एक पत्रकार असून पत्रकाराने लोकांशी असे वागण्यास माझा आक्षेप आहे.
        श्री. वरखेडकर यांनी निषेध करतांना पुढे लिहिले आहे, तुमच्यासारखे पत्रकार संपूर्ण पत्रकारितेला कलंक आहेत. आपण श्री. अभय वर्तक यांची त्वरित क्षमा मागावी आणि येथून पुढे असे वागू नये. अन्यथा पत्रकार म्हणून काम करण्याचा आपणाला अधिकारच नाही, असे मी समजतो. (पत्रकारिता क्षेत्रात श्री. वरखेडकर यांच्यासारखे पत्रकार कार्यरत असल्यामुळेच या क्षेत्राला अजूनतरी थोडी प्रतिष्ठा शिल्लक आहे ! अन्यथा वागळे यांच्यासारख्या पत्रकारांमुळे हे क्षेत्र कलंकित झाले आहे ! - संपादक)

मतांसाठी आवाहन करणार्‍या धर्मगुरूंवर कारवाई करता येईल का ?

अल्पसंख्यांकांची एकगठ्ठा मते मिळवण्यासाठी त्यांच्या 
धर्मगुरूंच्या पायाशी लोटांगण घालणार्‍या राजकारण्यांवर बंधने येण्याची शक्यता !
सर्वोच्च न्यायालयाचा प्रश्‍न
       नवी देहली - दोन दशकांपूर्वी हिंदुत्वाविषयी करण्यात आलेल्या व्याख्येविषयी सर्वोच्च न्यायालयाकडून नव्याने विचार करण्यात येत आहे. प्रत्येक धर्मगुरूंचा त्यांच्या धर्मियांवर चांगला प्रभाव असतो. या प्रभावाचा राजकारण्यांकडून राजकारणासाठी सोयीस्करपणे उपयोग करण्यात येतो. अशा स्थितीत निवडणुकीत धर्मगुरूंनी एखाद्या उमेदवारासाठी मतदान करण्याचे आवाहन केले, तर त्यासाठी धर्मगुरूंना उत्तरदायी ठरवण्यात येऊ शकते का ? धर्मगुरु निवडणुका लढवत नसले, तरी त्यांच्यावर निवडणूक कायद्यानुसार कारवाई शक्य आहे का ? यावर आता सर्वोच्च न्यायालयात सुनावणी चालू आहे. एखाद्या पक्षाला निवडणुकीत मतदान करण्याचे आवाहन धर्मगुरूंनी केल्यावर त्यांना उत्तरदायी ठरवले जाऊ शकते का ? उमेदवाराला लाभ मिळवून देण्यासाठी धर्मगुरूंनी आवाहन केले, हे कसे सिद्ध करणार ?, असे अनेक प्रश्‍न मुख्य न्यायाधीश टी.एस्. ठाकूर यांच्या अध्यक्षतेखालील ७ न्यायाधिशांच्या खंडपिठाने या वेळी उपस्थित केले.

कर्नाटकच्या हवेरी जिल्ह्यात विश्‍वधर्म संस्थेकडून बालसंस्कार शिबीर

बालसंस्कार शिबीरात मार्गदर्शन करतांना 
सनातनचे साधक आणि उपस्थित विद्यार्थी
      सावनुर (कर्नाटक) - कर्नाटक राज्यातील हवेरी जिल्ह्याच्या सावनुर तालुक्यातील हट्टीमळ्ळुर गावात सरकारी माध्यमिक शाळेमध्ये विश्‍वधर्म संस्थेकडून ८ ते १६ ऑक्टोबरपर्यंत बालसंस्कार शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरामध्ये ५ वी ते ८ वी या वर्गांतील १०६ विद्यार्थी सहभागी झाले होते. या शिबिरामध्ये विद्यार्थ्यांना चांगल्या सवयी (संस्कार) या विषयी मार्गदर्शन करण्यात आले. टीव्ही, इंटरनेट आणि मोबाईल यांच्या विपरीत परिणामाविषयी मुलांमध्ये जागृती करण्यात आली. राष्ट्र आणि धर्म यांविषयी आपले कर्तव्य, राष्ट्रप्रेम वृद्धिंगत करणे, प्रार्थना आणि श्‍लोक यांचे महत्त्व, अभ्यास कसा करावा इत्यादी विषयांवर या शिबिरामध्ये मार्गदर्शन करण्यात आले. कुलदेवतेचा जप आणि दत्ताचा जप यांचे महत्त्व या वेळी विशद करण्यात आले. हिंदु संस्कृतीनुसार वाढदिवस कसा साजरा करावा, याचे प्रात्यक्षिकही या वेळी दाखवण्यात आले.

पाकने आतंकवाद्यांच्या विरोधात कारवाई करून देश त्यांच्याविरोधात असल्याचे दाखवून द्यावे ! - पाकच्या माजी परराष्ट्रमंत्री हिना रब्बानी खार

पाकचे सत्ताच्युत झालेले नेते आतंकवादाच्या विरोधात 
भूमिका घेतात आणि सत्तेत आल्यावर आतंकवादाला प्रोत्साहन देतात ! 
त्यामुळे खार यांचा पक्ष सत्तेत आल्यास तेथील आतंकवाद निपटेल, अशी आशाच नको !
      नवी देहली - आता केवळ शब्दांनी नाही, तर प्रत्यक्ष कारवाई करून पाकला सिद्ध करावे लागेल की, आपण आतंकवादाच्या विरोधात आहोत, असे परखड विधान पाकच्या पाकिस्तान पीपल्स् पार्टीच्या सदस्या आणि माजी परराष्ट्रमंत्री हिना रब्बानी खार यांनी केले आहे. (रब्बानी यांचा पक्ष सत्तेत असतांना त्यांच्या पक्षाने तेथील आतंकवाद निपटण्यासाठी काय केले, हे प्रथम सांगावे ! - संपादक)

केंद्र सरकारकडून भारताचे हिंदु राष्ट्र करण्याचा प्रयत्न ! - असदुद्दीन ओवैसी यांचा जळफळाट

केंद्र सरकारकडून भारताचे हिंदु राष्ट्र करण्याचा प्रयत्न झाला 
असता, तर देशातील हिंदूंसाठी ते सर्वाधिक आनंददायी ठरले असते !
       भाग्यनगर - केंद्रातील सरकार भारताचे हिंदु राष्ट्र्र करण्याचा प्रयत्न करत आहे, असे एम्आयएम्चे प्रमुख खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी म्हटले आहे. एका कार्यक्रमात ओवैसी म्हणाले की, केंद्र सरकार मुसलमान नागरिकांना दुय्यम स्थान देण्याचा प्रयत्न करत आहे. विविधतेमुळे भारताची शक्ती आणि सौंदर्य टिकून आहे; परंतु निधर्मीपणा नष्ट करण्यासाठी प्रयत्न चालू आहेत. पंतप्रधान दसर्‍याच्या वेळी भाषण करतांना धर्माविषयी बोलले होते. देशातील नागरिकांना समान नागरी हक्क हवा आहे. सरकारला समान नागरी अधिकार आणि गोहत्या यांविषयी काही देणे-घेणे नाही.

राष्ट्रविरोधी कारवाया केल्याच्या प्रकरणी १२ अधिकार्‍यांची हकालपट्टी !

अधिकार्‍यांना केवळ नोकरीवरून न काढता शासनाने त्यांच्यावर 
राष्ट्रद्रोहाच्या आरोपाखाली खटला भरून आजन्म कारागृहात पाठवले पाहिजे !
जम्मू-काश्मीर सरकारची कारवाई 
      श्रीनगर - राष्ट्रविरोधी कारवाया केल्याच्या प्रकरणी जम्मू-काश्मीर सरकारने १२ अधिकार्‍यांची नुकतीच हकालपट्टी केली आहे. राज्यात अशांतता पसरवल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. या अधिकार्‍यांमध्ये काश्मीर विद्यापिठाच्या रजिस्टरसह शिक्षण, महसूल, सार्वजनिक आरोग्य, अभियांत्रिक आणि अन्न पुरवठा या विभागांतील अधिकार्‍यांचा समावेश आहे. या कारवाईनंतर इतर अधिकार्‍यांवरही बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.
      या संदर्भात एका अधिकार्‍याने सांगितले, या अधिकार्‍यांच्या राष्ट्रविरोधी कारवायांचा तपशील पोलिसांनी मुख्य सचिवांना पाठवला होता. त्यानंतर मुख्य सचिवांनी संबंधित विभागांच्या प्रमुखांना या अधिकार्‍यांकडील सेवा काढून घेण्याचे आदेश दिले. राज्याच्या घटनेतील अनुच्छेद २६ अंतर्गत हा निर्णय घेण्यात आला आहे. काही अधिकार्‍यांवर यापूर्वीच सार्वजनिक सुरक्षा कलमाच्या अंतर्गत गुन्हा प्रविष्ट झाला आहे, तर काही कर्मचारी अटकेच्या भीतीने फरार झाले आहेत.

सर्जिकल स्ट्राईकमुळे घायाळ झालेल्या पाकिस्तानला जन्माची अद्दल घडवा !

जम्मू-काश्मीरच्या सीमावर्ती भागात पाककडून शस्त्रसंधीचे उल्लंघन !
      जम्मू - सर्जिकल स्ट्राईकच्या नंतर पाकच्या सैन्याकडून सतत शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात येत आहे. भारत-पाक आंतरराष्ट्रीय सीमेवरील हिरानगर सेक्टरमधील बोबिया नाक्याजवळ २० ऑक्टोबरच्या रात्रीपासून पाक सैन्याकडून गोळीबर चालू आहे. तब्बल १५ घंट्यापासून चालू असलेल्या या गोळीबाराला भारतीय सैनिकांनी चोख प्रत्युत्तर दिले. या कारवाईत पाकचे ७ सैनिक ठार, तर ५ सैनिक घायाळ झाले. तसेच सीमा सुरक्षा दलाचा एक सैनिक घायाळ झाला आहे.


केरळमधील कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे दायित्व माकपचे ! - भारतीय कम्युनिस्ट पक्ष

       भाग्यनगर - केरळच्या कन्नूर जिल्ह्यातील राजकीय हत्यांवर भारतीय कम्युनिस्ट पक्षाने (भाकपने) चिंता व्यक्त केली आहे. भाकपने दुसरा डावा पक्ष असलेल्या सत्ताधारी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला (माकपला) सल्ला दिला आहे की, त्याने संयम बाळगावा आणि रा.स्व. संघाच्या जाळ्यात अडकू नये; कारण राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे दायित्व माकपचे आहे. 
      भाकपचे सरचिटणीस एस्. सुधाकर रेड्डी यांनी म्हटले की, विशेषतः संघाने संयम राखण्याची आवश्यकता आहे; कारण प्रत्येक वेळेस संघच अशा घटना घडवून आणतो; मात्र याचा अर्थ असा नव्हे की, आम्ही माकपने केलेल्या हत्यांचे समर्थन करतो. (हिंदूंचा सदैव द्वेष करणार्‍या भाकपकडून संघावर असे आरोप होणे, यात काय आश्‍चर्य ? - संपादक)

भारत आणि चीन यांचा संयुक्तपणे युद्धसराव !

हिंदी-चिनी भाई भाई अशी घोषणा देऊन भारताची 
भूमी हडपणार्‍या धूर्त चीनपासून भारताने सावध रहावे !
      नवी देहली - गेल्या काही दिवसांपासून भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये तणावाचे वातावरण आहे. या पार्श्‍वभूमीवर भारतीय सैन्य आणि चीनची पिपल्स लिबरेशन आर्मी यांनी पूर्व लडाख येथील चुशूल येथे संयुक्तपणे युद्धाचा सराव केला. विशेष म्हणजे सध्या भारत आणि चीन यांच्यात पाकिस्तानच्या सूत्रावरून मतभेद चालू आहेत. त्यामुळे या युद्ध सरावाकडे राजकीय आणि संरक्षणात्मक दृष्टीने महत्त्वाचे समजले जात आहे.

दक्षिण काश्मीरमधील हिंदूंच्या वस्तीवर जिहादी आतंकवाद्यांचे आक्रमण !

भाजप-पीडीपीच्या राज्यातील असुरक्षित हिंदू ! 
      श्रीनगर - दक्षिण काश्मीरच्या सिरनू-पुलवामामध्ये हिंदूंच्या वस्तीवर जिहादी आतंकवाद्यांनी अचानक आक्रमण केले. गेल्या १० दिवसांत काश्मिरी हिंदूंवर होणारे हे तिसरे आक्रमण आहे. या घटनेनंतर येथील सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. (१९९० च्या दशकातील परिस्थिती पुन्हा काश्मीरमध्ये उद्भवत असतांना प्रसारमाध्यमे याविषयी ब्रही काढत नाहीत, हे लक्षात घ्या ! - संपादक) ७ ऑक्टोबरला शोपियांच्या जामनगरीमध्ये पहिल्यांदा आक्रमण करण्यात आले. या वेळी एक पोलीस हुतात्मा झाला, तर अन्य काही जणांसह एक हिंदूही घायाळ झाला होता.(म्हणे) मी अलाहाबादचा गुंड !

सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्तीला असे विधान करणे शोभते का ?
सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती मार्कंडेय काटजू यांचे विधान
      मुंबई - मनसेचे कार्यकर्ते गुंड असतील, तर मी सुद्धा अलाहाबादचा गुंड आहे. असाहाय्य कलाकारांना कशाला लक्ष्य करतात, तुमच्यात एवढेच धैर्य असेल, तर माझ्याकडे या. तुमच्यासाठी माझा दंडुका तयार आहे. माझ्यासोबत दंगल करा. मग जगाला बघू दे की, कोण किती मोठा गुंड आहे, असे ट्विट सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती मार्कंडेय काटजू यांनी केले आहे. तुम्ही तरी अरबी समुद्राचे खारे पाणी प्यायला आहात; पण मी तर संगम नदीचे पाणी प्यायलो आहे, असे म्हणत त्यांनी मनसेला आव्हान दिले आहे.

खिडुकपाडा (पनवेल) येथे नवरात्रोत्सवानिमित्त घेतलेल्या स्त्रीशक्ती उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद !

        पनवेल (वार्ता.) - खिडुकपाडा (ता. पनवेल) येथील गावदेवी मित्रमंडळ आणि साई मित्रमंडळ अ‍ॅन्ड स्पोर्टस अ‍ॅकॅडमी या नवरात्रोत्सव मंडळांमध्येे रणरागिणी शाखेच्या वतीने स्त्रीशक्ती उपक्रम राबवण्यात आला. बजरंग दलाचे श्री संजय उलवेकर यांच्या पुढाकाराने दोन्ही मंडळात कार्यक्रम झाले. स्वसंरक्षण प्रात्यक्षिके दाखवल्यावर ग्रामस्थांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्यांचे कौतुक केले. ग्रामस्थांनी गावात हिंदु धर्मजागृती सभा घेण्याची मागणी केली आहे.

सनातनचे प्रवक्ता श्री. अभय वर्तक यांच्या पत्रकार परिषदेला कोल्हापूर येथील पोलिसांनी मोठी सुरक्षाव्यवस्था पुरवणे !

हिंदुत्वनिष्ठांना सुरक्षा पुरवणारे असेही चांगले पोलीस 
समाजामध्ये आहेत ! हिंदु राष्ट्रात सर्वच पोलीस चांगले असतील !
       कोल्हापूर येथे २० ऑक्टोबर २०१६ या दिवशी शाहू स्मारक भवन येथे दुपारी ४ वाजता सनातन संस्थेच्या वतीने अंनिसने केलेल्या घोटाळ्यासंदर्भात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. या पत्रकार परिषदेला काही संघटनांकडून विरोध होण्याची शक्यता लक्षात घेऊन कोल्हापूर येथील लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. तानाजीराव सावंत यांनी पत्रकार परिषद चालू होण्यापूर्वीपासून ते पत्रकार परिषद संपेपर्यंत पत्रकार परिषदेला उत्तम पद्धतीने सुरक्षाव्यवस्था पुरवून संरक्षण दिले. पत्रकार परिषदेच्या ठिकाणी येऊन श्री. सावंत यांनी साधकांना साहाय्य करण्याविषयी चर्चा केली. शाहू स्मारक भवन येथे बाहेर आणि आतील बाजूस पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यात काही साध्या वेशातीलही पोलीस होते. संपूर्ण पत्रकार परिषद संपेपर्यंत पोलीस थांबले होते. (पत्रकार परिषदेला पोलीस बंदोबस्त ठेवून उत्तम पद्धतीने सुरक्षाव्यवस्था पुरवल्याविषयी सनातन संस्थेने लक्ष्मीपुरी पोलिसांचे आभार मानले आहेत ! - संपादक)

पुण्यात अपंग बांधवांच्या वतीने सैनिकांना पाठिंबा देण्यासाठी मानवी साखळी !

       पुणे, २१ ऑक्टोबर (वार्ता.) - गोळीचे उत्तर गोळीने देऊन भारत एक बलवान राष्ट्र आहे, हे जगाला पुन्हा सिद्ध करून दाखवणार्‍या भारतीय सैनिकांना पाठिंबा देण्यासाठी अपंग बांधवांच्या वतीने येथे मानवी साखळी करण्यात आली. नामदार गोपाळ कृष्ण गोखले चौक (गुडलक चौक) येथे १८ ऑक्टोबर या दिवशी मानवी साखळी करून उरी आक्रमणात हुतात्मा झालेल्या सैनिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली. या वेळी सीमेवरील लढाईत अपंगत्व आलेले गोरखा रायफल्स रेजिमेंटचे श्री. सुरेशकुमार कार्की आणि श्री. प्रेमकुमार आले यांचा श्री. आकाश कुंभार यांनी सन्मान केला.

हिंदु धर्मजागृती सभेसाठी बैठका, समूहसंपर्क यांना वेग

सह्याद्रीच्या मावळ्यांनो, हिमालयाच्या रक्षणासाठी धावून या ! चलो कश्मीर !! 
शिवा फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांसमवेतची बैठक
    पुणे, २१ ऑक्टोबर (वार्ता.) - जिहादी आतंकवादामुळे विस्थापित झालेल्या काश्मिरी हिंदूंचे काश्मीरमध्ये सन्मानाने पुनर्वसन व्हावे या उद्देशाने आयोजित केलेल्या हिंदु धर्मजागृती सभेचा प्रसार शिगेला पोचला असून सर्वच ठिकाणी नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद लाभत आहे. काश्मिरी हिंदूंना धर्मसभेच्या माध्यमातून समस्त
(नि.) ब्रिगेडियर हेमंत महाजन (उजवीकडे) यांना 
धर्मसभेचे निमंत्रण देतांना समितीचे श्री. चैतन्य तागडे
हिंदु समाजाचा पाठिंबा मिळावा, यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांच्या जोडीला अनेक हिंदुत्ववादीही बैठका, समूहसंपर्क आदी माध्यमांतून काश्मीरचे वास्तव लोकांपुढे मांडत आहेत. घरोघरी प्रसार करून सभेचे निमंत्रण देण्याच्या जोडीलाच सामाजिक संकेतस्थळे, समूहसंपर्क, भित्तीपत्रके, फलक (होर्डिंग्ज) या माध्यमांतूनही नागरिकांना धर्मजागृती सभेला येण्यासाठी उद्युक्त केले जात आहे. या धर्मजागृती सभेला राष्ट्रीय स्तरावरील हिंदुत्ववादी नेते संबोधित करणार आहेत. या माध्यमातून राष्ट्रीय भावना चेतवून जात-पात, संप्रदाय, पक्ष, तसेच संघटना यांमध्ये विखुरले गेलेल्या मावळ्यांचे भक्कम संघटन निर्माण होत आहे. एक भारत अभियानाच्या निमित्ताने हिंदु राष्ट्र निर्मितीच्या कार्याला देशभरात गती मिळाल्याचे चित्र आहे.

अमरावती येथील सौ. दुर्गा कडुकर, सौ. चित्रा चाळीसगावकर आणि श्री. विकास चौधरी यांनी गाठली ६१ टक्के आध्यात्मिक पातळी !

सौ. दुर्गा कडुकर यांचा सत्कार करतांना पू. नंदकुमार जाधव

सौ. चित्रा चाळीसगावकर यांचा सत्कार करतांना पू. नंदकुमार जाधव

श्री. विकास चौधरी यांचा सत्कार करतांना पू. नंदकुमार जाधव (डावीकडे)

        अमरावती - साधकांसाठी आयोजित भावसत्संगामध्ये येथील सौ. दुर्गा कडुकर (वय ४७ वर्षे), सौ. चित्रा चाळीसगावकर (वय ५३ वर्षे) आणि श्री. विकास चौधरी (वय ६१ वर्षे) यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठल्याची आनंदवार्ता सनातनचे पू. नंदकुमार जाधव यांनी दिली. या वेळी उपस्थित साधकांची भावजागृती झाली. पू. जाधवकाका यांनी श्रीकृष्णाचे चित्र भेट देऊन तिघांचा सत्कार केला.
६१ टक्के आध्यात्मिक पातळी 
गाठलेल्या साधकांचे मनोगत
सौ. चित्रा चाळीसगावकर - माझे प्रयत्न अल्प असूनही गुरूंनी माझ्यावर कृपा केली. मी केवळ दैनिक वाचून स्वतःत पालट करण्याचा प्रयत्न करते. तेही माझ्याकडून प.पू. डॉक्टरच करवून घेतात.
श्री. विकास चौधरी - मी काहीच केले नाही. सर्व काही गुरूंनीच करवून घेतले.
सौ. दुर्गा कडुकर- यांना भावाश्रू न आवरल्याने त्या मनोगत व्यक्त करू शकल्या नाहीत.

राजे शिवराय प्रतिष्ठानच्या वतीने पनवेल येथे सामूहिक शस्त्रपूजन

       नवीन पनवेल - येथील समाज मंदिर सभागृहात राजे शिवराय प्रतिष्ठानच्या वतीने सामूहिक शस्त्रपूजनाचे आयोजन करण्यात आले होते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन राजे शिवराय प्रतिष्ठानचे पनवेल येथील संघटक श्री. संजय पाटील यांनी केले. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. बळवंत पाठक यांनी मार्गदर्शन केले. या वेळी धर्माभिमानी श्री. विलास पुंडले यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

अभय वर्तक यांच्या विरोधात ऑल इंडिया युथ फेडरेशनची पोलीस आयुक्तांकडे तक्रार

        मुंबई - सनातनचे प्रवक्ता श्री. अभय वर्तक यांनी महाराष्ट्र १ या वृत्तवाहिनीवर आजचा सवाल या कार्यक्रमात बोलतांना मराठा पोलीस महिलांवर मुसलमानांनी बलात्कार केले, असे विधान केल्यावरून त्यांच्या विरोधात ऑल इंडिया युथ फेडरेशन च्या शंबुक संकल्पना उदय, राहुल गाजरे आणि भगवान शेळटे यांनी मुंबई पोलीस आयुक्तांकडे तक्रार केली आहे आणि श्री. वर्तक यांना तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे.

विस्थापित काश्मिरी हिंदूंच्या पुनर्वसनाच्या संदर्भात सरकारने त्वरित निर्णय घ्यावा !

पिरंगुटच्या (जिल्हा पुणे) ग्रामसभेतील ठराव 
पिरंगुट : ग्रामसभेत काश्मिरी हिंदूंविषयीचे वास्तव
अवगत करतांना श्री. दीपक आगवणे (उभे असलेले)
      पिरंगुट (जिल्हा पुणे), २१ ऑक्टोबर (वार्ता.) - काश्मिरी हिंदूंचे काश्मीरमध्ये सन्मानाने पुनर्वसन करणे ही काळाची आवश्यकता आहे. त्यामुळे विस्थापितांचे जीवन जगत असलेल्या काश्मिरी हिंदूंच्या पुनर्वसनाच्या संदर्भात सरकारने त्वरित निर्णय घ्यावा, असा ठराव पिरंगुटच्या ग्रामसभेचे एकमताने संमत केला. हिंदु जनजागृती समितीचे श्री. दीपक आगवणे यांनी पिरंगुटच्या ग्रामसभेत काश्मिरी हिंदूंच्या समर्थनासाठी आयोजित करण्यात आलेल्या हिंदु धर्मजागृती सभेविषयी ग्रामस्थांना अवगत केले होते. त्यानंतर सरपंच सौ. ललिता पवळे यांच्या अध्यक्षतेखाली १० ऑक्टोबर या दिवशी झालेल्या ग्रामसभेत हा महत्त्वपूर्ण ठराव संमत करण्यात आला. (अशाच प्रकारे अन्यत्रच्या ग्रामपंचायत, नगरपरिषद, महानगरपालिका यांनी काश्मिरी बांधवांविषयी ठराव संमत करून काश्मिरी हिंदूंच्या पुनर्वसनासाठी जनमताचा रेटा निर्माण करावा. - संपादक)

स्थिर राहून साधना करणार्‍या नेर (जिल्हा यवतमाळ) येथील सौ. लता राऊत (वय ६० वर्षे) यांनी गाठली ६१ प्रतिशत आध्यात्मिक पातळी

पू. नंदकुमार जाधव (डावीकडे)
सौ. लता राऊत यांचा सत्कार करतांना
     यवतमाळ, २१ ऑक्टोबर (वार्ता.) - येथील साधिका सौ. लता चंपतराव राऊत (वय ६० वर्षे) यांनी ६१ % आध्यात्मिक पातळी गाठल्याचे घोषित करण्यात आले. या वेळी सनातनचे संत पू. नंदकुमार जाधव यांनी सौ. लता राऊत यांचे श्रीकृष्णाच्या चित्राची प्रतिमा देऊन सत्कार केला. या वेळी नेर येथील सर्व साधकांची भावजागृती झाली. आध्यात्मिक पातळी घोषित झाल्यावर सौ. राऊत भावावस्थेत होत्या. त्या वेळी काकू म्हणाल्या, मी काहीच करत नाही, हे सर्व गुरुदेवांनी केले; ही गुरुमाऊलींचीच कृपा. मी कोणत्या शब्दांत बोलू मला शब्दच आठवत नाही, असे म्हणून त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. सौ. राऊत यांचे वैशिष्ट्य म्हणजे त्या आहे त्या परिस्थितीत साधना करतात. परिस्थितीशी जुळवून घेतात.

हिंदूंनो, पुणे येथील हिंदु धर्मजागृती सभेला उपस्थित रहा !

हिंदुत्वनिष्ठांचे सामाजिक संकेतस्थळांच्या माध्यमातून आवाहन 
       पुणे, २१ ऑक्टोबर (वार्ता.) - २६ वर्षांपूर्वी आपल्याच देशात विस्थापित झालेल्या काश्मिरी हिंदूंचे काश्मीरमध्ये सन्मानाने पुनर्वसन व्हावे, या उद्देशाने शनिवारपेठेतील रमणबाग शाळेच्या पटांगणात २३ ऑक्टोबर या दिवशी सायंकाळी ५.३० वाजता विराट हिंदु धर्मजागृती सभेचे आयोजन करण्यात आले आहे. काश्मिरी हिंदूंना पाठिंबा देण्यासाठी या हिंदु धर्मजागृती सभेस उपस्थित रहा, असे आवाहन करणारी मान्यवर व्यक्तींची चलचित्रे (व्हिडिओ), तसेच पोस्टर्स सध्या सामाजिक संकेतस्थळांवरून (सोशल मिडियावरून) फिरत आहेत. मान्यवर हिंदुत्वनिष्ठांच्या या चलचित्रांना उत्तम प्रतिसाद मिळत असून नागरिकांमध्ये सभेची उत्सुकता निर्माण झाली आहे.

महाराष्ट्रातील ग्राहक आयोग आणि ग्राहक मंच यांमध्ये ५९ सहस्र प्रकरणे प्रलंबित

कूर्मगतीची न्यायप्रणाली हेही लोकशाहीचे अपयश नव्हे का ? 
ही प्रणाली गतीमान करण्यासाठी राज्यशासन प्रयत्न करेल का ?
प्रलंबित प्रकरणांमध्ये महाराष्ट्र्र देशात दुसर्‍या क्रमांकावर
     मुंबई - राज्य ग्राहक कायद्याअंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या ग्राहक आयोग आणि ग्राहक मंच यांमध्ये प्रलंबित प्रकरणांची संख्या ५९ सहस्र ८९७ आहे. प्रलंबित प्रकरणांमध्ये महाराष्ट्र देशात दुसर्‍या क्रमांकावर आहे. राज्य आयोग आणि जिल्हा ग्राहक मंचचा दर्जा अर्धन्यायिक स्वरूपाचा असून त्यांचे कामकाज अंशत: दिवाणी न्यायालयाप्रमाणे चालते. पक्षकार आणि अधिवक्ता यांची अनुपस्थिती, अपुरे कर्मचारी अशा अनेक कारणांमुळे बरेच खटले प्रलंबित असल्याचे सांगितले जाते. उपलब्ध आकडेवारीनुसार वर्ष २०१६ मध्ये जुन्या प्रलंबित प्रकरणांची संख्या ४९ सहस्र ४०३, तर नवीन १२ सहस्रांहून ७ प्रकरणांची त्यात भर पडली. एकूण १ सहस्र ५१३ प्रकरणे निकाली काढली आहेत. प्रतीवर्षी साधारणपणे ७ सहस्रांहून अधिक प्रकरणे निकाली काढण्यात येतात; पण नव्याने प्रविष्ट होणार्‍या दाव्यांचे प्रमाण वाढले आहे.महाराष्ट्रात १० वर्षांत दहा माहिती अधिकार कार्यकर्त्यांच्या हत्या

राज्यातील असुरक्षित जनता !
      मुंबई - मुंबईत दोनच दिवसांपूर्वी भूपेंद्र वीरा या माहिती अधिकार कार्यकर्त्याची हत्या झाली. २००५ मध्ये माहिती अधिकाराचा कायदा अस्तित्वात आल्यापासून गेल्या दहा वर्षांत महाराष्ट्रात दहा माहिती अधिकार कार्यकर्त्यांच्या हत्या झाल्या, तर धमक्या आणि व्यवस्थेच्या दबावामुळे निराश होऊन दोघांनी आत्महत्या केली आहे. (एवढ्या मोठ्या प्रमाणात माहिती अधिकार कार्यकर्त्यांच्या होत असलेल्या हत्या रोखण्यासाठी सरकारने पावले उचलणे आवश्यक ! - संपादक) महत्त्वाचे म्हणजे यापैकी एकाही प्रकरणात आरोपींना शिक्षा झालेली नाही. या दहा हत्यांपैकी बहुतांश हत्या या भूमाफियांनी घडवून आणल्याचा पोलिसांना कयास आहे.

औषधांची अवैधरित्या ऑनलाइन विक्री करणार्‍या संकेतस्थळांवर कारवाई कशी करणार ? - मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश

ही गोष्ट न्यायालयाला का विचारावी लागते ? 
केंद्र सरकारला हे स्वतःचे दायित्व वाटत नाही का ?
      मुंबई - गंभीर आजारांवरील औषधांची अवैधरित्या ऑनलाइन विक्री करणार्‍या संकेतस्थळांवर केंद्रसरकार कोणत्या विभागाच्या माध्यमातून कारवाई करणार, ती कशी होईल, याविषयी स्पष्टीकरण देण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती विद्यासागर कानडे यांच्या खंडपिठाने १८ ऑक्टोबर या दिवशी केंद्र सरकारला दिले. 
     ऑनलाइन वस्तू खरेदीप्रमाणेच आता ऑनलाइन विक्रीही चालू झाली असून गर्भधारणा टाळणारी औषधे किंवा दुर्धर आजारांवरील कथित औषधे यांचाही यात समावेश आहे. अशा प्रकारे वैद्यकीय समुपदेशन आणि पुरेशा प्रीस्क्रिप्शन यांविना मिळणार्‍या औषधांमुळे गैरप्रकार घडण्याचा धोका आहे, असा दावा करणारी जनहित याचिका नवी मुंबईतील मयुरी पाटील यांनी उच्च न्यायालयात प्रविष्ट केली आहे. त्यावरील झालेल्या सुनावणीच्या वेळी हे निर्देश दिले आहेत. या याचिकेवरील पुढील सुनावणी दिवाळीनंतर होईल.

काँग्रेसच्या माजी नगरसेवकाच्या मुलाकडूनच माहिती अधिकार कार्यकर्त्याची हत्या

हे आहेत काँग्रेसींचे त्यांच्या मुलांवरील (कु)संस्कार !
      मुंबई - माहिती अधिकार कार्यकर्ते भूपेंद्र वीरा यांची हत्या मीच केली आहे, असे काँग्रेसचे माजी नगरसेवक रज्जाक खान यांचा मुलगा अहमद याने मान्य केले आहे. (धर्मांधांचे खरे स्वरूप जाणा ! - संपादक) १५ ऑक्टोबरला भूपेंद्र यांच्यावर त्यांच्या घरातच गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. भूपेंद्र वीरा राहत असलेल्या घराचे मालक आणि काँग्रेसचे माजी नगरसेवक रज्जाक खान यांच्याशी त्यांचा जमिनीच्या हक्कावरून वाद चालू होता. त्यामुळे भूपेंद्र यांच्या हत्येनंतर रज्जाक खान आणि त्यांचा मुलगा अहमदला पोलिसांनी कह्यात घेतले. त्यानंतर अहमदने हत्या केल्याचे मान्य केले.कोल्हापूर येथे नव्या १ सहस्र १५४ पोलीस निवासस्थानांसाठी २९ कोटी ४७ लक्ष रुपये संमत !

आमदार राजेश क्षीरसागर यांच्या पाठपुराव्यास यश !
      कोल्हापूर - मुंबई येथे १८ ऑक्टोबर या दिवशी गृहराज्यमंत्री श्री. दीपक केसरकर यांनी त्यांच्या दालनामध्ये विस्तारित मंत्रालय इमारतीमध्ये संबंधित सर्व विभागांच्या व्यापक बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीत जिल्ह्यामध्ये नवीन १ सहस्र १५४ पोलीस निवासस्थानांसाठी २९ कोटी ४७ लक्ष रुपये संमत केले आहेत, अशी माहिती आमदार श्री. राजेश क्षीरसागर यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली. 
       पोलिसांना कामाच्या ठिकाणी राहून कर्तव्य बजावता यावे, यासाठी ब्रिटीश कालपासूनच पोलीस वसाहतींची संकल्पना राबवण्यात आली. यानंतर शासनानेही यात विशेष लक्ष घालून पोलिसांना त्यांच्या कुटुंबियांसह रहाण्यासाठी पोलीस वसाहती वाढवल्या. १०० वर्षांपूर्वीच्या आवश्यकतेनुसार तत्कालीन प्रशासनाने छोटेखानी घरे बांधली; मात्र सध्या घरांची अत्यंत दुरवस्था झाली आहे. याविषयी शिवसेनेचे आमदार श्री. राजेश क्षीरसागर यांनी विविध आयुधांसह निवेदनाद्वारे विधान सभेमध्ये आवाज उठवून शासनाचे लक्ष वेधले होते. या प्रश्‍नी सर्वच संबंधित विभागांची तातडीची बैठक घेण्याची मागणी गृहराज्यमंत्री श्री. दीपक केसरकर यांच्याकडे केली होती. त्यानुसार बैठक घेण्यात आली होती.

(म्हणे) आमच्या महानगरपालिकांमध्ये भ्रष्टाचार नाही !

राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यातील पालिकांवर भ्रष्टाचाराचे 
आरोप होत असतांना अजित पवार यांचे दिशाभूल करणारे वक्तव्य
      मुंबई - आमच्या कह्यातील सर्व महानगरपालिका आम्ही व्यवस्थित चालवत असून आमच्या पालिकांमध्ये एकही भ्रष्टाचाराचा आरोप झालेला नाही आणि कोणी करूही शकत नाही, असे प्रतिपादन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. मालाड येथे मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेसच्या परिवर्तन मेळाव्यात ते बोलत होते. 
     ते पुढे म्हणाले की, रा.रा. पाटील हे गृहमंत्री असतांना पोलिसांवर आक्रमणे होत नव्हती; मात्र सध्या भाजप गुंडांनाच पक्षात घेऊन आश्रय देत असेल, तर दुसरे काय होणार ? (धादांत खोटे विधान करणारे अजित पवार ! आझाद मैदानात धर्मांधांनी पोलिसांना केलेली मारहाण आणि भिवंडी येथे धर्मांधांनी २ पोलिसांना जाळणे, यांसह अन्य घटना या पोलिसांवरील आक्रमणे नव्हेत का ? स्वतःच्या पक्षातील गुंडगिरी आणि गुन्हेगार कार्यकर्ते यांविषयी अजित पवार बोलतील का ? - संपादक)

अंनिसची भगवी पोटदुखी !

भाऊ तोरसेकर
१. बुद्धीचे अजीर्ण झालेल्यांकडूनच रामानंदाचार्य नरेंद्र महाराज 
यांना पाया पडल्यावरून मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर टीका !
      शहाण्यांची एकदाच चूक होते, नंतर ते कधीही चूक करू शकत नाहीत. आपण शहाणे झालो आणि जगातल्या तमाम अनाकलनीय गोष्टींचे आकलन केवळ आपल्यालाच होऊ शकते, अशी समजूत करून घेतली की, मग माणूस शहाणा होतो. त्यानंतर त्याला चुका करण्याचे स्वातंत्र्य उरत नाही. साहजिकच चुकाच करत नसल्यामुळे त्याला चुका सुधारताही येत नाहीत. परिणामी झालेल्या चुकांचे समर्थन आणि युक्तीवाद करणे त्यांच्या हाती शिल्लक उरते. दुसरी बाजू अशी की, या मूठभर शहाण्यांपलीकडे प्रचंड सामान्य लोकसंख्या असते आणि ही सामान्य माणसे चुका करण्याचा त्यांचा अधिकार जीवापाड जपत असतात. त्यामुळे त्यांना हव्या तितक्या चुका करता येतात आणि चुका मान्य करून सुधारणा करण्याचीही संधी उपलब्ध होत असते.

शिवरायांचे हिंदवी राज्य आणि आजची हिंदूंची दैनावस्था !

१. हिंदूंच्या स्वातंत्र्याच्या नंदादीपातील 
शेवटची ज्योत विझली होती !
       ७.१.१५६५ शुक्रवार या दिवशी कर्नाटकातील राक्षसतागडीच्या युद्धात वैभवशाली विजयनगरचा सम्राट रामराया यांच्या १० लक्ष सैन्याचा लांडगेतोड करत आदिलशहा, निजामशहा, कुतुबशहा आदी पांच सुलतानांनी एकजूट करून विजयनगरचे साम्राज्य उद्ध्वस्त केले. सम्राट रामरायाचा स्वतः निजामशहाने शिरच्छेद केला. भाल्याच्या टोकावर रामरायाचे शिर लावून ते दिंडीतील अब्दागिरीप्रमाणे नाचवले. विजापूरच्या अली आदिलशहाने ते पोखरून काढले, पूर्ण रिकामे केले आणि विजापूरातील एका मोरीच्या तोटीवर अशाप्रकारे बसवले की, त्या मोरीतून येणारे घाण पाणी त्या हिंदु सम्राटाच्या तोंडातून बाहेर पडावे. या युद्धातही रामरायाचा विश्‍वासघात करून फंदफितुरी करण्यात आली. या पराभवाने हिंदूंच्या स्वातंत्र्याच्या नंदादीपातील शेवटची ज्योतही विझली आणि अवघ्या महाराष्ट्रासह सर्वत्र पारतंत्र्याची प्रदीर्घ जीवघेणी काजळरात्र चालू झाली.

आध्यात्मिक आणि मानसिक परिपक्वता यांतूनच देशाचा विकास !

        स्वित्झर्लंड शासनाने ५ जूनला प्रत्येक नागरिकासाठी युनिव्हर्सल बेसिक इन्कम या घरबसल्या वेतन घेण्याच्या योजनेसाठी जनमत घेतले. मतमोजणीच्या आकडेवारीनुसार सदर योजनेला ७८ प्रतिशत नागरिकांनी विरोध केला. सदर योजनेमध्ये सरकारकडून नागरिकांना घरबसल्या विनासायास ठराविक रक्कम देण्यात येणार होती. आम्हाला घरी बसून फुकटचा पैसा नको. आम्ही आधी काम करू, मगच वेतन घेऊ, असे नागरिकांचे मत आहे. या घटनेवरून तेथील सरकार आणि जनता यांची मानसिकता अगदी अविश्‍वसनीय वाटावी, अशी उद्धृत होते. देशाने आपल्यासाठी काय केले, हे न पहाता आपण देशासाठी काय करू शकतो, ही भावना सतत मनात तेवत असल्याचे हे द्योतक आहे. साहजिकच अशा मानसिकतेमुळे स्वित्झर्लंड हा देश भ्रष्टाचारमुक्त देशांमध्ये गणला जातो.

अभ्यास कसा करावा ?

परीक्षेच्या पार्श्‍वभूमीवर मुलांना मार्गदर्शक अशी लेखमालिका
      आजकाल बहुतेक मुले आईच्या आग्रहामुळे, बाबांच्या भीतीपोटी अन् एकमेकांमध्ये असलेल्या चढाओढीमुळे काहीशा तणावाखालीच अभ्यास करतांना दिसतात. अशा वेळी अभ्यास मनापासून होतोच, असे नाही. त्यामुळे परीक्षेत अपेक्षित यश मिळाले नाही की, दुःख होते. त्यामुळे मुलांनो, अभ्यास करण्यामागील योग्य दृष्टीकोन समजून घेतला, तर अभ्यास कंटाळवाणा न वाटता आनंददायी वाटेल. अभ्यास करण्याच्या विशिष्ट पद्धती आहेत. त्याप्रमाणे अभ्यास केल्यास अभ्यास चांगला होतो. परीक्षेची भीती कशी घालवावी, उत्तरपत्रिका आत्मविश्‍वासाने कशी लिहावी, अभ्यासात एकाग्रता कशी साधावी आदींची माहिती सांगणारा हा लेखप्रपंच...

काश्मिरी हिंदूंवरील अन्यायाविरुद्ध विराट जाहीर हिंदु धर्मजागृती सभा

काश्मिरी हिंदूंचे स्वतंत्र पनून काश्मीर होण्यासाठी आणि जिहादी 
आतंकवादाला उत्तर देण्यासाठी हिंदूंचे ऐक्य दाखवा आणि बहुसंख्येने उपस्थित रहा !
स्थळ - न्यू इंग्लिश स्कूल, रमणबाग शाळेचे मैदान, शनिवार पेठ, पुणे-३०
वार आणि दिनांक - रविवार, २३ ऑक्टोबर २०१६ वेळ - सायंकाळी ५.३० वाजता
संपर्क क्र. - ८९८३३३५५१७
आपला सहभाग नोंदवण्यासाठी मिस्ड कॉल द्या - ०२०-४९१३१३१२

विविध मागण्यांसाठी राष्ट्रीय हिंदू आंदोलने

१. देशाची सहस्रो कोटी रुपयांची आर्थिक हानी टाळण्यासाठी फटाक्यांवर तात्काळ बंदी घालण्यात यावी.
२. शिवछत्रपती यांचा वारसा असलेले; मात्र राज्यातील खाजगी लोकांकडे असलेले किल्ले राज्य शासनाने कह्यात घेऊन त्यांना त्वरित संरक्षित स्मारक घोषित करण्यात यावेत.
३. भारताच्या विरूद्ध अघोषित युद्ध आरंभणार्‍या पाकिस्तानी कलाकारांच्या चित्रपटांना प्रतिबंध करण्यात यावा.
४. वर्ल्डेक्स इंडिया एक्झिबिशन अ‍ॅन्ड प्रमोशन लि. या आस्थापनाच्या वतीने १५ ते १७ नोव्हेंबर २०१६ या कालावधीत मुंबई येथे आयोजित केलेले चिनी उत्पादनांचे प्रदर्शन तात्काळ रहित करण्यात यावे.
दैनिक सनातन प्रभातचा रंगीत 
दीपोत्सव विशेषांक
प्रसिद्धी दिनांक : २३ ऑक्टोबर २०१६ पृष्ठ संख्या : १०, मूल्य : ५ रुपये
विशेषांकाची वाढीव मागणी वितरकांनी २२ ऑक्टोबर 
या दिवशी दुपारी ३ पर्यंत इआरपी प्रणालीत भरावी !
भारतात प्रजासत्ताक नव्हे, लुटारू राज आहे ! - श्री. श्री. भट (धनुर्धारी, मार्च २०११)
      पाकिस्तानशी सर्व प्रकारचे राजनैतिक, आर्थिक, सामाजिक, तसेच व्यावहारिक संबंध त्वरित तोडून टाका. पाकिस्तान, बांगलादेश यांना शेजारी राष्ट्र्र असे म्हणणे बंद करा ! त्यांना शत्रूराष्ट्रच म्हणा ! 
- आचार्य स्वामी धर्मेंद्रजी महाराज (मासिक सावरकर टाइम्स, जून २०१०)

अखंड हिंदुस्थानापासून अखंड 'पाकिस्थान'कडे

१. मुसलमांनाचा प्रश्‍न कायमचा सोडवण्यासाठी पाकिस्तानची मागणी मान्य होणे !
     आम्ही मुसलमांनाचा प्रश्‍न कायमचा सोडवण्यासाठी म्हणून त्यांची पाकिस्तानची मागणी मान्य करीत आहोत, असे पंडित जवाहरलाल नेहरू आणि सरदार वल्लभभाई पटेल यांचे तेव्हाचे प्रकट उद्गार होते. तो प्रश्‍न कायमचा सुटला तर नाहीच, पण तो कायमचाच झाला आहे, हे सांगणे नकोच.
२. राष्ट्रीय धोरणे हिंदु हितघातक नि मुसलमान-ख्रिस्ती हितसाधक !
   स्वराज्याच्या गेल्या ६० वर्षांच्या कालावधीतही आपली राज्यघटना, त्या नुसारची विधी-विधाने, नियमावल्या, धोरणे नि आदेश हे सारे बहुतांशी हिंदु हितघातक नि मुसलमान-ख्रिस्ती हितसाधक झाले आहेत. त्यातून आपली हिंदूंची वाटचाल अखंड हिंदुस्थानच्या ऐवजी अखंड पाकिस्तानकडे चालू आहे, हे सांगायला, कळायला फारशा विद्वत्तेची गरज आहे का ?
- संदर्भ : मासिक स्वातंत्र्यवीर (दीपावली विशेषांक २००६)

स्थिरता आणि गुरुदेवांवर श्रद्धा असणारे अमरावती येथील श्री. विकास चौधरी (वय ६१ वर्षे) यांनी गाठली ६१ टक्के आध्यात्मिक पातळी !

१. दैनिक सनातन प्रभात म्हणजे गुरूंचे आज्ञापत्र आहे, असा भाव ठेवून त्याचे प्रतिदिन वाचन करणे आणि त्यातील सूचनांचे तंतोतंत पालन करणे : दैनिक सनातन प्रभातमधून कोणतीही सूचना आली, तर ते त्या सूचनांचे तंतोतंत पालन करतात किंवा काही पालट आल्यास काहीच शंका न विचारता त्वरीत कृती करतात. दैनिक सनातन प्रभात म्हणजे गुरूंचे आज्ञापत्र आहे, असा भाव ठेवून त्याचे प्रतिदिन पूर्ण वाचन करतात.
२. चुकांची खंत वाटून त्यांविषयी गुरूंची मानस क्षमा मागून प्रायश्‍चित्त घेणे : काका जिल्ह्यातील दैनिक सनातन प्रभातचे वितरक म्हणून सेवा पहातात. मार्च २०१६ मध्ये दैनिकाची वसुली करण्याची सेवा राहिली होती. तेव्हा वसुली राहिल्यास संस्था स्तरावर त्याचा काय परिणाम होतो, हे समजल्यावर त्यांना पुष्कळ खंत वाटली आणि त्यांनी गुरूंची मानस क्षमा मागितली अन् प्रायश्‍चित्त घेतले.
३. इतरांना साहाय्य करणे : जिल्ह्यामधील इतर वितरकांनी काही साहित्य मागितल्यास त्यांना कुठलीही प्रतिक्रिया न देता त्यांना हवे ते साहित्य स्वतः त्यांच्याकडे पोेचवतात. साधकांना इ.आर.पी. संगणकीय सेवेमध्ये काही अडचण असल्यास त्यांना त्वरित साहाय्य करतात.

पुढील जन्मी वयाच्या पहिल्या वर्षापासून अध्यात्म विश्‍वविद्यालयात जाऊन शरणागत भावाने धर्मकार्य करण्याची इच्छा असलेली कु. प्राजक्ता धोतमल !

कु. प्राजक्ता धोतमल
प.पू. डॉक्टर,
माझी एक इच्छा आहे. या जन्मात मी शालेय शिक्षण पूर्ण करून मग साधनेत आले. स्वभावदोष, अहं आणि प्रारब्ध यांच्या प्रभावामुळे मला झोकून देऊन धर्मकार्य करता येत नाही. हे गुरुदेवा, या जन्मी चांगली साधना होऊन राष्ट्र आणि धर्म कार्यार्थ मला पुढील जन्म मिळेल का ? पुढील जन्मी वयाच्या पहिल्या वर्षापासून अध्यात्म विश्‍वविद्यालयात जाऊन शरणागत भावाने धर्मकार्य व्हावे, याच जन्मी भाव-भक्ती, ज्ञान आणि वैराग्य अंतर्मनी रुजवून पुढील जन्मी त्याचा लाभ व्हावा, असे वाटते.
- कु. प्राजक्ता धोतमल (वय २१ वर्षे), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१९.१०.२०१६)


रामनाथी आश्रमात स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रिया राबवण्यापूर्वी मनाची झालेली विचारप्रक्रिया अन् नंतर शिकायला मिळालेली सूत्रे

१. मनाची झालेली विचारप्रक्रिया
       रामनाथी (गोवा) येथील सनातन आश्रमात स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रिया शिकण्यासाठी आले. त्यापूर्वी माझ्या मनात घरी पुष्कळ अडचणी असतात. मग आश्रमातून घरी गेल्यावर मला ही प्रक्रिया करण्यास जमेल का ?, असे नकारात्मक विचार येत होते.
२. शिकायला मिळालेली सूत्रे
अ. रामनाथी आश्रमात आल्यावर माझे एक ध्येय निश्‍चित होण्यास साहाय्य झाले. देवाने मनाचा संघर्ष करून मला शिकायचे आहे, असा आत्मविश्‍वास माझ्या मनात निर्माण केला.
आ. चूक झाली, तर चुकीचे कारण वर-वर न शोधता त्या चुकीच्या मुळाशी कसे जायचे ? चिंतन कसे करायचे ? हे शिकायला मिळाले. देवाने अहंरूपी एका दगडाला फोडण्याची संधी दिली, याविषयी मी कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती अल्पच आहे.
इ. प्रत्येक एक घंट्याने मनाचा अभ्यास केल्यावर चुका आणि अहंचे पैलू भराभर मिळतात. एखाद्या प्रसंगाविषयी चिंतन करून चुकीच्या मुळाशी गेल्यावर जो आनंद आपण अनुभवतो, तो अवर्णनीय आहे. त्यामुळे शरीर हलके होऊन चैतन्य ग्रहण व्हायला साहाय्य झाले.

बगलामुखी यज्ञासाठी यज्ञवेदीजवळ रांगोळी काढण्याची सेवा करत असतांना कु. गौरी मुद्गल यांना आलेल्या अनुभूती !

कु. गौरी मुदगल
१. प.पू. डॉक्टरांचे स्मरण केल्यावर चक्कर येणे न्यून होऊन कृतज्ञता वाटणे
    ८.१०.२०१६ या दिवशी मी यज्ञवेदीजवळ रांगोळी काढत असतांना मला चक्कर येत होती. तेव्हा मी प.पू. डॉक्टरांचे स्मरण करून त्यांचे चरण आठवले आणि मी त्यांच्या चरणांपाशी बसले आहेे, असा भाव ठेवला. मी देवाने मला आतापर्यंत केलेले साहाय्य आणि माझ्यासाठी सहन केलेला त्रास आठवला. हे सर्व केल्यावर मला चक्कर आली नाही. त्या वेळी माझ्यावर देवाची किती कृपा आहे !, असे वाटून कृतज्ञता वाटली.
२. यज्ञवेदी जवळ असणार्‍या दुर्गादेवीच्या मूर्तीकडे पाहून माझी भावजागृती झाली. मी अन्य देवतांकडे पाहिल्यावर ते देवही तिथे आले आहेत. तेच सर्व करत आहेत, असे जाणवले.

साधकांना सूचना

सनातनची उत्पादने नियमित घेणारे हितचिंतक वा सनातन प्रभात नियतकालिकांचे
वाचक स्थलांतरित झाल्यास त्याची माहिती तेथील जिल्हासेवकांना कळवा !
   आपल्या भागात वास्तव्यास असलेले सनातनचे हितचिंतक वा सनातन प्रभात नियतकालिकांचे वाचक यांना काही कारणास्तव अन्य जिल्ह्यांत वास्तव्यासाठी जावे लागते. हे वाचक वा हितचिंतक सनातनचे ग्रंथ आणि अन्य सात्त्विक उत्पादने, तसेच सनातन प्रभात नियतकालिके नियमित घेत असतात; परंतु स्थलांतर होऊन नवीन ठिकाणी वास्तव्यास गेल्यावर तेथे त्यांना उत्पादने वा नियतकालिके मिळण्यात अनेक अडचणी येतात किंवा अनेक दिवस वाट पहावी लागते. त्यामुळे आपल्या भागातून अन्य भागांमध्ये स्थलांतरित होणारे वाचक आणि हितचिंतक यांची माहिती वेळीच तेथील जिल्हासेवकांना कळवावी.

इतरांशी जवळीक साधणे आणि स्वतःला पालटण्याची तळमळ असणे हे गुण असलेल्या ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठलेल्या अमरावती येथील सौ. चित्रा चाळीसगावकर (वय ५३ वर्षे) !

१. आनंदी आणि स्थिर
      सौ. चित्रा चाळीसगावकर (काकू) नेहमी आनंदी आणि स्थिर असतात, तसेच त्यांची अधूनमधून भावजागृती होत असते.
२. स्वीकारण्याची वृत्ती
      काकू सेवा करतांना एखादी सेवा जमत नाही किंवा करता येत नाही, याचा विचार करण्यापेक्षा जी सेवा येेते, ती परिपूर्ण करावी, असा विचार करतात. पूर्वी काकू सहसाधिकेसह सेवेला जायच्या; पण आता त्यांची एकट्याने सेवेला जाण्याची सिद्धता असते. त्या सतत सकारात्मक विचार करून परिस्थिती स्वीकारतात.
३. स्वतःला पालटण्याची तळमळ
      काही दिवसांपूर्वी पू. नंदकुमार जाधवकाकांनी अमरावती येथील साधकांना व्यष्टी साधनेविषयी मार्गदर्शन केले. तेव्हापासून काकूंची स्वतःत पालट करण्याची तळमळ वाढली आहे. त्या प्रतिदिन व्यष्टी साधना पूर्ण करतात आणि स्वतःहून आढावा देतात. पूर्वी काकूंना साधकांविषयी प्रतिक्रिया यायच्या; परंतु पू. काकांच्या मार्गदर्शनानंतर त्यांना साधकांविषयी प्रतिक्रिया येत नाहीत.

त्यागी वृत्तीच्या आणि गुरुदेवांवर श्रद्धा असणार्‍या अमरावती येथील सौ. दुर्गा कडुकर (वय ४७ वर्षे) यांनी गाठली ६१ टक्के आध्यात्मिक पातळी !

१. अगत्यशील
        काकूंना साधक घरी आल्यावर आनंद होतो. त्या साधकांचे प्रेमाने आदरातिथ्य करतात.
- सौ. स्मिता ठाकरे
२. वेळेचे पालन करणे
        सेवाकेंद्रात संतांचे मार्गदर्शन असल्यास काकू बाहेरील स्वयंपाक बनवण्याची कामे आटोपून वेळेत सेवाकेंद्रात येतात. काकूंचे घर आणि सेवाकेंद्र यांमध्ये १४ - १५ किमीचे अंतर आहे, तरीही मी इतके काम करून आले आहे, असा विचार कधीच त्यांच्या तोंडवळ्यावर जाणवत नाही.
- सौ. रेखा उंबरकर
३. स्वीकारण्याची वृत्ती
        ३ वर्षांपूर्वी काकूंच्या यजमानांना अर्धांगवायूचा झटका आल्याने काका काहीच करू शकत नाहीत. काकूंवर संसाराचे दायित्व आहे. त्या घरकाम करून काकांची सेवाही आनंदाने करतात.

कै. (सौ.) आशा पांडेआजींच्या समवेत देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमात असतांना अनुभवलेले अविस्मरणिय क्षण !

कै. (सौ.) आशा पांडे
   सौ. पांडेआजींच्या निधनाचे वृत्त दैनिक सनातन प्रभातमध्ये वाचल्यावर क्षणभर माझे मन सुन्न झाले. मला खरेच वाटत नव्हते. त्यांच्या सहवासात मी घालवलेले क्षण भराभर माझ्या डोळ्यांसमोरून गेले.
    मी विमानतळावरून देवदला आश्रमात जात होते. आम्हाला न्यायला आश्रमातून गाडी आली होती. जातांना आजींनाही देवद आश्रमात घेऊन जायचे असल्याने आम्ही गाडीने ऐरोलीला सौ. आजींच्या घरी गेलो. तेव्हा प्रथमच माझी आणि सौ. पांडेआजींची भेट त्यांच्या घरी झाली. त्यांना समवेत घेऊन आम्ही देवद येथील आश्रमात जायला निघालो. मार्गात एकमेकींची ओळख झाली. आम्ही देवद आश्रमात पोेचलो. आश्रमात असतांना प्रत्येक सेवेत आम्ही दोघी एकत्रच रहात होतो.

देवा, तूच व्यापले आहेस अंतराळ ॥

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त...
कु. शर्वरी बाकरे

मनात वसशी तू, चित्ती वसशी तू ।
सर्व ठायी-ठायी असशी तू ॥ १ ॥

देही वसशी तू, विदेही वसशी तू ।
सर्वत्र भरला आहेस तू ॥ २ ॥

अनुभवण्यास आणि वर्णन करण्या तुझे रूप ।
शब्दही नसती मजजवळ फार ॥ ३ ॥

भय जोपासल्यामुळे आपण व्यक्तीनिष्ठ बनतो, तर भाव जोपासल्याने आपण ईश्‍वरनिष्ठ होतो, हे लक्षात घ्या आणि गुरूंचे मन जिंकण्यासाठी साधनेचे प्रयत्न करा !

पू. भगवंतकुमार मेनराय
पू. भगवंतकुमार मेनरायकाका यांनी
साधकांना केलेल्या अनमोल मार्गदर्शनातील ज्ञान-मोती !
    प.पू. डॉक्टरांनी साधकांना भाववृद्धीसाठी प्रयत्न करण्यास सांगितले होते. माझ्या मनात प्रश्‍न यायचा, सनातन संस्थेतील अनेक साधकांमध्ये पुष्कळ भाव असतांना त्यांना प.पू. डॉक्टर भाववृद्धी करण्यास का बरे सांगत आहेत ? तेव्हा हे लक्षात आले की, अनेक साधकांचे प्रयत्न हे भावापोटी होत नसून भयापोटी होत आहेत. दायित्व असणार्‍या साधकांना काय वाटेल ? ते माझ्याविषयी काय विचार करत असतील ?, अशा प्रकारे उत्तरदायी साधकांविषयी भीती वाटत असल्याने साधकांचे साधनेतील प्रयत्न म्हणावे तितके मनापासून होत नाहीत. भय जोपासल्यामुळे आपण व्यक्तीनिष्ठ बनतो, तर भाव जोपासल्याने आपण ईश्‍वरनिष्ठ होतो. त्यामुळे साधकांनी उत्तरदायी साधकाचे मन सांभाळण्यापेक्षा किंवा आपत्काळाची भीती बाळगण्यापेक्षा मला गुरूंचे मन जिंकायचे आहे, हे एकच ध्येय समोर ठेवून प्रयत्न केले, तर खर्‍या अर्थाने साधना होईल आणि साधनेतील निखळ आनंद अनुभवता येईल.

श्रीकृष्णाची गोपी होण्याची इच्छा असलेली ६३ टक्के आध्यात्मिक पातळीची महर्लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली नागपूर येथील चि. कार्तिकी अश्‍विन ढाले (वय ५ वर्षे) !

चि. कार्तिकी ढाले
      (चि. कार्तिकीची जुलै २०१५ मध्ये ६१ टक्के आध्यात्मिक पातळी असल्याचे घोषित करण्यात आले. - संकलक)
     आश्‍विन कृष्ण पक्ष सप्तमी (२२.१०.२०१६) या दिवशी चि. कार्तिकी ढाले हिचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त तिची आई, आजी आणि मावशी यांना तिची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत.
चि. कार्तिकी ढाले हिला वाढदिवसानिमित्त 
सनातन परिवाराच्या वतीने शुभाशीर्वाद !
१. प्रगल्भता
    कार्तिकी मला नेहमी सांगते, आई, तू आनंदी रहा आणि हसत रहा. तिचे हे बोलणे ऐकून ती प्रौढ आहे, असे वाटते. त्या वेळी मला प.पू. डॉक्टरांची आठवण येते.

साधकाने झोपेत केलेला सूक्ष्म लोकांचा प्रवास आणि त्याला आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती !

श्री. राम होनप
१. सरस्वती लोकात गेल्यावर 
सरस्वतीदेवीने आशीर्वाद देणे
       ९.२.२०१६ च्या रात्री दीड वाजता मी अकस्मात् सरस्वती लोकात गेल्याचे दृश्य मला दिसले. तेथे सरस्वतीदेवी वीणेजवळ बसली होती. मी तेथे गेल्यावर ती उठून उभी राहिली. मी तिला नमस्कार केला. तिने माझ्या डोक्यावर हात ठेवून तुझी अस्थिर बुद्धी हळूहळू स्थिर होऊ लागेल. बुद्धी स्थिर झाली की, तुझी प्रज्ञा पूर्णतः जागृत होईल, असा आशीर्वाद दिला. त्यानंतर हे दृश्य दिसेनासे झाले.
२. भगवान शिवांनी वैराग्य देण्याचा 
अधिकार गुरूंचा असल्याचे सांगणे
       काही वेळाने मला शिवाचे दर्शन झाले. मी भगवान शिवांना विचारले, मला तुम्ही ग्रंथ भेट देऊन ज्ञान दिलेत. (मागील आठवड्यात भगवान शिवांनी मला एक ग्रंथ भेट दिला होता.) भक्ती हळूहळू निर्माण करत आहात. मग वैराग्य कधी मिळणार ? त्या वेळी ते म्हणाले, हा अधिकार तुझ्या गुरूंचा आहे. त्यानंतर हे दृश्य दिसेनासे झाले.

संतांनी दिलेला प्रसाद ग्रहण करणे, विभूती लावणे इत्यादी आध्यात्मिक उपाय करतांना चैतन्य ग्रहण होण्याबरोबरच माझ्याभोवती संरक्षककवच निर्माण होऊ दे, अशीही प्रार्थना करा, तसेच ही प्रार्थना दिवसभरात मधून मधूनही करा !

पू. डॉ. मुकुल गाडगीळ
अध्यात्मिक त्रास असलेले साधक आपला त्रास न्यून होण्यासाठी संतांनी दिलेला प्रसाद ग्रहण करणे, विभूती लावणे इत्यादी आध्यात्मिक उपाय करतात. तेव्हा तीव्र त्रास असलेल्या काही साधकांना असा अनुभव येतो की, ते उपाय केल्यावर त्यांचा त्रास २ - ३ मिनिटे न्यून होतो आणि त्यानंतर पुन्हा आधीपेक्षा तीव्र होतो. उपाय केल्याने त्यांना त्रास देणार्‍या अनिष्ट शक्तींनी त्यांच्यावर आणखी तीव्रतेने आक्रमण केल्याने त्यांचा त्रास वाढलेला असतो.
असे होण्यामागचे कारण असे लक्षात आले की, हे उपाय करतांना साधक या प्रसादातून किंवा विभूतीतून मला चैतन्य मिळू दे, अशीच केवळ प्रार्थना करतात; पण हे उपाय केल्याने माझ्याभोवती चैतन्याचे संरक्षककवच निर्माण होऊ दे आणि माझ्यावर अनिष्ट शक्तींना कोणत्याही प्रकारे आक्रमण करता येऊ नये, अशी प्रार्थना करत नाहीत.

साधकांना सूचना

दीपावलीनिमित्त सात्त्विक भेटवस्तू म्हणून 
सनातनचा सात्त्विक रांगोळ्या (भाग १) हा 
ग्रंथ देण्यासाठी व्यापार्‍यांना प्रवृत्त करूया !
      दीपावलीच्या निमित्ताने समाजात मोठ्या प्रमाणात विविध उत्पादने खरेदी केली जातात. त्यानिमित्ताने साधनेची सुवर्णसंधी साधूया.
१. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनेक कपडे व्यावसायिक, इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची विक्रीकेंद्रे आणि अन्य व्यापारी दीपावलीच्या निमित्ताने भेटवस्तू देत असतात. या व्यापार्‍यांनी त्यांच्या ग्राहकांना सनातन-निर्मित सात्त्विक रांगोळ्या (भाग १) हा ग्रंथ भेट म्हणून द्यावा, यासाठी प्रबोधन करू शकतो.
२. अनेक उद्योग (कारखाने), निरनिराळी आस्थापने त्यांच्या कामगारांना दिवाळीनिमित्त अतिरिक्त वेतन (बोनस) देतांना काही भेटवस्तू देत असतात. त्यांनाही हा ग्रंथ भेट देण्याची संकल्पना सुचवू शकतो.

हिंदूंनी आतापर्यंत मुसलमान, खिस्ती यांच्याकडून मार खाल्ला आता बौद्धांकडून ! हिंदू शहाणे आणि सक्षम कधी होणार ? हिंदु राष्ट्रातच हे शक्य आहे !

       चांगेफळ पैसाळी (जिल्हा अकोला) गावात एका युवकाच्या मांस विक्रीच्या दुकानातून मद्यविक्री होत होती. तिथे महिलांच्या छेडछाडीचे प्रकार वाढल्याने या गावातील महिलांनी नवरात्रोत्सवात ते दुकान बंद करण्यास भाग पाडले होते. त्यानंतर १४ ऑक्टोबरला सकाळी ६ वाजता गावातील १५० हून अधिक बौद्ध पुरुष आणि महिला यांनी हातात शस्त्रे घेऊन येथील हिंदूंच्या घरांवर आक्रमण केले. या वेळी आक्रमणकर्त्या बौद्धांचा मोठा जमाव पुष्कळ प्रक्षुब्ध झाला होता. यात अनेक हिंदू घायाळ झाले असून हिंदूंची सर्व स्तरांवर प्रचंड हानी झाली आहे. हिंदु महिला लहान मुलांना घेऊन अक्षरशः घरातून पळून गेल्या होत्या.

समाजकंटकांवर वर्षानुवर्षे कृती न करणारे पोलीस आतंकवाद्यांवर कृती करतील का ? अशा पोलिसांना कर्तव्यच्युती म्हणून आजन्म कारागृहात टाका !

      रामनाथी, गोवा येथील सनातन आश्रमासमोरील रस्त्यावरून अश्‍लील भाषेत ओरडत जाणार्‍या समाजकंटकांवर कारवाई करण्याची मागणी सनातन संस्थेने एका निवेदनाद्वारे गृहमंत्री या नात्याने गोव्याचे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर आणि पोलीस महानिरीक्षक यांच्याकडे केली आहे. हे समाजकंटक गेली ७ वर्षे आश्रमासमोरून ओरडत जात आहेत.

विद्यार्थी-साधकांनो, दीपावलीच्या सुटीच्या काळात चैतन्यदायी आश्रमजीवन अनुभवून सर्वांगीण विकास साधणार्‍या विविध सेवांमध्ये सहभागी व्हा !

१. राष्ट्र आणि धर्म कार्यासाठी वेळ देणे, ही काळाची आवश्यकता !
    भावी आपत्कालीन स्थिती निर्माण होण्यापूर्वी धर्मप्रसार आणि सनातनच्या संशोधनाचे कार्य समाजापर्यंतच नाही, तर जगात सर्वत्र अधिकाधिक पोचवणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रत्येकाने स्वतःचे शिक्षण, तसेच अन्य व्यावहारिक कामे सांभाळून अधिकाधिक वेळ राष्ट्र आणि धर्म यांच्या कार्यासाठी देणे काळाची आवश्यकता आहे.
२. पालकांनो, १३ वर्षांपेक्षा अधिक वयाच्या साधक-पाल्यांना सुटीत आश्रमात पाठवा !
    थोड्याच दिवसांत शाळा आणि महाविद्यालये यांमधील विद्यार्थ्यांना दीपावलीची सुटी लागेल. या कालावधीत १३ वर्षांपेक्षा अधिक वयाच्या साधक-पाल्यांना सेवेत सहभागी होण्यासाठी सनातनच्या रामनाथी (गोवा), देवद (पनवेल) येथील आश्रमात अथवा मंगळुरू (कर्नाटक) सेवाकेंद्रात पाठवता येईल. आश्रमांमध्ये विविध सेवा उपलब्ध आहेत. 

फलक प्रसिद्धीकरता

हिंदूंनो, तुमच्या श्रद्धास्थानांचे 
रक्षण करण्यासाठी संघटित व्हा !
       कोट्यवधी हिंदूंचे श्रद्धास्थान असलेल्या आणि १२ ज्योर्तिलिंगांपैकी एक असलेल्या उज्जैनच्या श्री महाकाल मंदिराच्या समोरील मार्गावर धर्मांधांंकडून नगरपालिकेच्या जागेवर अतिक्रमण करून अवैध बांधकाम करण्यात आले आहे.

साधकांनो, मायारूपी अंधःकार नष्ट करून चैतन्यदायी प्रकाशाची उधळण करणारा सनातन आकाशकंदिल घरोघरी पोचवण्याची सेवा भावपूर्ण करा !

सनातन आकाशकंदिल असे चैतन्यदायी ज्ञानदीप ।
जणू गुरुदेवांनी दिला हिंदु राष्ट्राचा हा प्रकाशदीप ॥

१. सनातन आकाशकंदिलाचे महत्त्व
    २६.१०.२०१६ पासून दीपावलीला आरंभ होत आहे. या काळात आकाशकंदिलाला अनन्यसाधारण महत्त्व असते. सनातनचा आकाशकंदिल केवळ आकाशदिवा नव्हे, तर श्री गुरूंचा ज्ञानदीप आहे. तो चैतन्यदायी प्रकाश घरोघरी पोचवतो. हिंदु राष्ट्राची स्थापना होण्यासाठी देवता, ऋषिमुनी आणि संत यांचा संकल्प कार्यरत झाला आहे. हा संकल्प फळास येेण्यासाठी हा दीप प्रयत्नरत आहे. वास्तूत सनातन आकाशकंदिल लावल्याने अनेकांना चांगल्या अनुभूती आल्या आहेत.

हिंदू तेजा जाग रे !

Jago !
      Ujjain ke Shri Mahakal mandir ke samne sarvajanik jagah per dharmandhone avaidh nirman-karya kiya.
Hinduo, mandir ki suraksha dharmaraksha hi hai !
जागो
      उज्जैन के श्री महाकाल मंदिर के सामने सार्वजनिक जगह पर धर्मांध ने अवैध निर्माण-कार्य किया ।
हिन्दुओ, मंदिर की सुरक्षा धर्मरक्षा ही है !
       हिंदु जनजागृती समिती व सनातन संस्था यांना धर्म, अध्यात्म आणि उपासना यांचे अधिष्ठान आहे !
- पू. मोहनबुवा रामदासी, सज्जनगड

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले
हास्यास्पद साम्यवाद !
      साम्यवाद्यांची सर्वांत हास्यास्पद गोष्ट म्हणजे त्यांच्यातही राज्यकर्ते, प्रशासन आणि जनता असा भेद असतो.
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले

बोधचित्र

॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥
या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो. - प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज
सनातनचे श्रद्धास्थान
गुरूंकडे काय मागावे ?
       माझ्याकडे सुख मागू नका, दुःख सहन करण्याचे बळ मागा.
भावार्थ :
सुख हे प्रकृतीतील असल्याने अशाश्‍वत असते, म्हणून गुरूंकडे मागू नये. तसेच हेही लक्षात ठेवले पाहिजे की, शाश्‍वत आनंद मिळवून देणे, हेच गुरूंचे खरे कार्य असते. प्रारब्धामुळे दुःख भोगावे लागणार असल्यास, त्या दुःखदायक प्रसंगांमुळे होणारे दुःख सहन करण्याची शक्ती मात्र गुरु निश्‍चित (नक्कीच) देतात; म्हणून ती मागायला आडकाठी (हरकत) नाही.
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.)

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

परमेश्‍वरावरील श्रद्धा !
परमेश्‍वरावरील श्रद्धा म्हणते, हे कार्य देवच करू शकतो. त्यापेक्षा अधिक प्रमाणातील 
श्रद्धा म्हणते, देव हे करीलच !; पण परमेश्‍वरावरील परमश्रद्धा म्हणते, हे काम झालेच आहे ! 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

चीनचे व्यापारी आव्हान !

संपादकीय
      चीनने शेवटी जी अपेक्षित होती, ती धमकी दिलीच. चीनच्या वस्तूंवर बहिष्कार घालण्याची चळवळ भारतात जोर धरत असतांना आणि त्याचा काही प्रमाणात प्रभावही पडत असतांना चीनच्या सरकारी वर्तमानपत्राने त्याची दखल घेत भारताला धमकी दिली. भारत ओरडण्याच्या पलीकडे काही करू शकत नाही. त्यापेक्षा भारताने चीनच्या वस्तूंशी स्पर्धा करण्याचा प्रयत्न करावा; मात्र त्याला ते शक्य होणार नाही. अशा प्रकारे चीनने भारताला ललकारले आहे. एका अर्थी चीनने केलेल्या श्रमाचा तो अहंकार असला, तरी सध्याची भारताची स्थिती पहाता तो मान्यच करावा लागणार आहे.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn