Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

अंनिसच्या घोटाळ्यांविषयी जाहीर व्यासपिठावर खुली चर्चा होणे आवश्यक ! - सनातन संस्थेचे अभय वर्तक यांचे जाहीर आव्हान

डावीकडून श्री. सुधाकर सुतार, श्री. मधुकर नाझरे,
श्री. अभय वर्तक, डॉ. मानसिंग शिंदे आणि श्री. शिवाजीराव ससे.

  • घोटाळ्यांविषयी तथाकथित विवेकवादी दाभोलकर कंपूने धारण केले मौनव्रत !
  • पत्रकार परिषदेला पोलिसांनी सुरक्षा पुरवली !
       कोल्हापूर, २० ऑक्टोबर (वार्ता.) - सातारा येथील सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयाच्या अधीक्षकांनी डॉ. दाभोलकर यांच्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या संदर्भातील चौकशी अहवालात गंभीर ताशेरे ओढले आहेत. न्यासामधील घोटाळे पहाता विशेष लेखा परीक्षण करावे, न्यासावरील गंभीर आरोपांची मोघम चौकशी केल्यामुळे फेरचौकशी करावी, तसेच त्यावर प्रशासक नेमावा, असाही उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे अंनिसवर प्रशासक नियुक्त करावा. जाहीर व्यासपिठावर अंनिसच्या घोटाळ्यांविषयी उघड चर्चा करायला आम्ही सिद्ध आहोत, असे जाहीर आव्हान सनातन संस्थेचे प्रवक्ता श्री. अभय वर्तक यांनी येथील पत्रकार परिषदेत केले. सनातन संस्थेच्या वतीने २० ऑक्टोबर या दिवशी येथील शाहू स्मारक भवनात दुपारी ४ वाजता पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. चौकशी अहवालातील गंभीर सूत्रांविषयीची सविस्तर माहिती श्री. वर्तक यांनी पुराव्यासह पत्रकार परिषदेत दिली.

काश्मिरी हिंदूंच्या पुनर्वसनासाठी उभारलेल्या चळवळीला पुणे बार असोसिएशनचा पाठिंबा

डावीकडून अधिवक्ता श्री. देवदास शिंदे, श्री. सुनील घनवट, श्री. राहुल कौल
हे अधिवक्ता श्री. सत्यजीत तुपे यांना सभेचे निमंत्रण देतांना आणि अन्य अधिवक्ता

        पुणे, २० ऑक्टोबर (वार्ता.) - काश्मीर हे भारताचे अविभाज्य अंग आहे. तेथील देशभक्त नागरिकांना हुसकावून लावण्याचे कारस्थान शत्रूराष्ट्र करत आहे. याविषयी आणि देशभरात वाढत असलेल्या आतंकवादाच्या विरोधात करण्यात येत असलेले जनजागृती अभियान म्हणून एक भारत अभियान चालू झाले आहे. त्यामध्ये काश्मिरातील मूळ निवासी असलेल्या काश्मिरी हिंदूंच्या पुनर्वसनाच्या हक्कासाठी पनून काश्मीर, तसेच अन्य राष्ट्रप्रेमी आणि देशभक्त संस्था यांनी एकत्र येऊन ही चळवळ उभारलेली आहे. अशा एकात्मवादाला पुणे बार असोसिएशन पाठिंबा देत आहे, असा ठराव २० ऑक्टोबर या दिवशी करण्यात आला. तसेच बार असोसिएशनच्या अधिवक्त्यांनी न्यू इंग्लिश स्कूल, रमणबाग शाळेचे मैदान येथे आयोजित केलेल्या विराट हिंदु धर्मजागृती सभेस जाहीर पाठिंबा दर्शवला आणि सभेस उपस्थित रहाणार असल्याचे त्यांनी सांगितले. बार असोसिएशनचे सचिव अधिवक्ता श्री. सत्यजीत तुपे, अधिवक्ता श्री. प्रशांत यादव, अधिवक्ता श्री. अभिजीत डोईफोडे यांनी हा ठराव करण्यासाठी सक्रिय सहभाग घेतला. 

जेएन्यूमधील एक विद्यार्थी बेपत्ता झाल्याने अन्य विद्यार्थ्यांनी कुलगुरूंना खोलीत डांबले !

शिक्षण सोडून इतर गोष्टींसाठीच अधिक प्रसिद्ध असलेले 
जवाहरलाल नेहरू विद्यापीठ ! भारतीय विद्यापिठांमधील 
अशा स्थितीमुळेच जगभरात नावाजलेले एकही विद्यापीठ 
देशात नाही ! ही स्थिती पालटण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे ! 
        नवी दिल्ली - बहुचर्चित जवाहरलाल नेहरू विद्यापिठातून (जेएन्यूमधून) एक विद्यार्थी बेपत्ता झाला आहे. यासंदर्भात या विद्यापिठातील विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. नेहमीच वादग्रस्त ठरलेल्या या विद्यापिठात १९ आक्टोबरच्या रात्री तणावाचे वातावरण निर्माण झाले. त्यानंतर आंदोलनातील विद्यार्थी अचानकपणे आक्रमक होऊन त्यांनी कुलगुरु एम्. जगदीश कुमार यांना एका खोलीत डांबून ठेवले. घटनास्थळी पोलीस आल्यानंतर तणाव न्यून झाला. विद्यापिठातून एक विद्यार्थी बेपत्ता झाल्याच्या प्रकरणी कारवाई करण्यात यावी, अशी मागणी या आंदोलक विद्यार्थ्यांनी केली आहे. कुलगुरु जगदीश कुमार यांनी सांगितले, विद्यार्थ्यांनी माझ्यासह एका महिला कर्मचार्‍यालाही कोंडले आहे. या महिलेला मधूमेह असल्याने तिची प्रकृती खालावली आहे.

(म्हणे) न्यासामधील गोष्टींपेक्षा सनातनच्या पसार झालेल्या आरोपींवरील कारवाईविषयी बोला !

स्वतःच्या न्यासातील आर्थिक घोटाळ्याविषयी 
उत्तर नसल्याने मुक्ता दाभोलकर यांचा कांगावा !
        पुणे, २० ऑक्टोबर - सनातन संस्था सांगत असलेली सूत्रे तांत्रिक असून धर्मादाय आयुक्त यांनी सांगितलेली प्रक्रिया आम्ही पूर्ण करत आहोत. आम्ही वेळोवेळी त्यांनी मागवलेल्या सर्व गोष्टींची पूर्तता करत आहोत. त्यामुळे त्या करणे, ही मोठी गोष्ट नाही. आम्ही कोणताही गुन्हा केलेला नाही. त्यामुळे त्यावर चर्चा करण्याची आवश्यकता नाही, असे वक्तव्य मुक्ता दाभोलकर यांनी केले. (आर्थिक घोटाळे समोर येत असूनही त्यावर चर्चा करण्याची आवश्यकता विवेकवादी मुक्ता दाभोलकरांना वाटत नसली, तरी ज्या समाजाची त्यांनी दिशाभूल आणि फसवणूक केली आहे, त्या समाजाला त्याची आवश्यकता वाटत आहे. अहवालातील सूत्रे केवळ तांत्रिक म्हणून सोडून देण्याजोगी आहेत, तर त्यांतील एकेका सूत्रांची उत्तरे त्यांनी उघडपणे समाजाला द्यावीत. यावरूनच अंनिसमध्ये झालेला आर्थिक घोटाळा दडपण्याची मुक्ता दाभोलकरांची इच्छा आहे, असे कुणाला वाटल्यास चुकीचे काय ? - संपादक) त्यापेक्षा सनातनच्या पसार झालेल्या आरोपींवरील कारवाईविषयी बोला, असे त्या पुढे म्हणाल्या. (स्वतःचे ठेवावे झाकून आणि इतरांचे पहावे वाकून या वृत्तीच्या मुक्ता दाभोलकर ! सनातनच्या फरार साधकांविषयी बोलण्यास सांगणार्‍या मुक्ता दाभोलकर नक्षलवाद्यांशी संबंध असणार्‍या त्यांच्या संघटनेतील कार्यकर्त्यांविषयी बोलत नाहीत ! त्यांच्यावर काय कारवाई झाली, हे त्यांनी जनतेला सांगावे ! - संपादक) येथील शिंदे पुलावर २० ऑक्टोबरला डॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या निषेधार्थ केलेल्या आंदोलनात त्या बोलत होत्या.

अवैध बांधकाम प्रशासनाने न पाडल्यास हिंदू पाडतील ! - विशाल आंदोलनाद्वारे हिंदूंची चेतावणी

पवित्र ज्योर्तिलिंग महाकाल 
मंदिरासमोर मुसलमानांकडून अवैध बांधकाम ! 

आंदोलनात सहभागी झालेल्या हिंदूंना संबोधित
करतांना विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे प्रतिनिधी

      उज्जैन (मध्यप्रदेश), २० ऑक्टोबर (वार्ता.) - कोट्यवधी हिंदूंचे श्रद्धास्थान असलेल्या आणि १२ ज्योर्तिलिंगांपैकी एक असलेल्या उज्जैनच्या श्री महाकाल मंदिराच्या समोरील मार्गावर मुसलमानांकडून नगरपालिकेच्या जागेवर अतिक्रमण करून अवैध बांधकाम करण्यात आले आहे. या विरोधात १९ ऑक्टोबरला येथील गुदरी चौकात हिंदूंच्या विविध संघटनांच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. याला २ सहस्रांहून अधिक हिंदू उपस्थित होते. या वेळी प्रशासनाने सदर अवैध बांधकाम करणारे, त्याच्याकडे कानाडोळा करणारे पोलीस अधिकारी आणि नगरपालिकेचे अधिकारी यांच्यावर कारवाई करून हे अतिक्रमण तात्काळ पाडावे; अन्यथा हिंदू ते पाडून टाकतील, अशी चेतावणी प्रशासनाला देण्यात आली. या आंदोलनाच्या शेवटी उपरोक्त मागण्यांचे निवेदन प्रशासनाला देण्यात आले. समस्त हिंदू समाजाच्या वतीने श्री. कुलदीपक जोशी यांनी या आंदोलनाचे संचालन केले. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. आनंद जाखोटिया यांनीही मार्गदर्शन केले.

निखिल वागळे यांच्यासारखे पत्रकार पुरोगामीपणाच्या आड लबाड्या करून जनतेपासून सत्य लपवून ठेवतात !

निखिल वागळे यांच्या महाराष्ट्र १ या वाहिनीवरील 
चर्चासत्र आणि त्यात मांडलेल्या सूत्रांविषयी 
सनातनचे प्रवक्ता श्री. अभय वर्तक यांचा खुलासा 
श्री. अभय वर्तक
        मुंबई, २० ऑक्टोबर (वार्ता.) - महाराष्ट्र १ वाहिनीवर सोमवार, १८.१०.२०१६ या दिवशी आजचा सवाल कार्यक्रमातील जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संदर्भातील चर्चेच्या वेळी श्री. निखिल वागळे यांनी चर्चेतून माझा सहभाग वगळला आणि मला अपमानास्पद वर्तणूक देत माझ्याविरुद्ध पोलिसांकडे तक्रार करण्याची धमकी दिली. निखिल वागळे यांच्या आक्रस्ताळेपणाविषयी संपूर्ण महाराष्ट्र त्यांना ओळखतो, त्यामुळे त्यांच्याकडून सौजन्याची अपेक्षा करणेही चुकीचे आहे. या कारणाने त्यांनी आक्रस्ताळेपणा करून मांडलेल्या सूत्रांविषयी खुलाशाची खरे तर आवश्यकताच नाही; मात्र मी मांडलेल्या सूत्रांची सत्यता महाराष्ट्रातील सुजाण नागरिकांना कळावी आणि वागळे यांच्यासारखे पत्रकार पुरोगामीपणाच्या आड लबाड्या करून जनतेपासून सत्य कसे लपवून ठेवतात, हे कळावे, यासाठी स्पष्ट आणि रोखठोक मत येथे मांडत आहे, असा खुलासा सनातन संस्थेचे प्रवक्ता श्री. अभय वर्तक यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे केला आहे.
श्री. वर्तक यांनी या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की,
१. १२.८.२०१२ या दिवशी आझाद मैदानात जी भीषण दंगल धर्मांधांनी केली, त्याची प्रेरणा बांगलादेश आणि ब्रह्मदेशातील धर्मांध बांधवांच्या कळवळ्याची अन् राष्ट्रद्रोहाची होती.

साप पाळणार्‍या लोकांना त्याचा दंशही होऊ शकतो ! - गृहमंत्री राजनाथ सिंह

अशा अनेक चेतावण्या पाकला आतापर्यंत देण्यात आल्या आहेत; मात्र त्याचा पाकवर 
परिणाम होत नाही. त्यामुळे त्याला जी भाषा समजते, त्याच भाषेत त्याला समजावणे आवश्यक !
भारताच्या गृहमंत्र्यांची पाकला चेतावणी !
      चंडीगड - जे लोक साप पाळतात, त्यांना त्यांचा दंशही होऊ शकतो, अशी चेतावणी गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी पाकला दिली. पाकचे संपूर्ण राजकीय आणि सैनिकी सत्ताकेंद्र भारतात आतंकवाद पसरवण्यसाठी कटीबद्ध झालेले आहे. भारत पाकपुरस्कृत आतंकवादाच्या विरुद्ध आहे; परंतु तेथील जनतेच्या प्रति आमच्या मनात द्वेषभावना नाही आणि आम्ही त्यांच्यापासून अंतर ठेवूनही राहू इच्छित नाही. (सामाजिक संकेतस्थळांवरील पाक नागरिकांच्या खात्यांवर दृष्टीक्षेप टाकला, तर बहुतांश नागरिक हे भारतद्वेषाने पछाडल्याचे दिसून येते. भारतद्वेष हा केवळ पाक राज्यकर्ते आणि पाक सैन्य यांच्यापुरता मर्यादित नसून तो तेथील जनतेतही अस्तित्वात असतांना गृहमंत्र्यांनी असे वक्तव्य करणे दुर्दैवी ! - संपादक) जर पाकिस्तानचा हेतू शुद्ध असेल, तर पाकव्याप्त काश्मीरमध्ये आतंकवादविरोधी अभियान चालवण्यासाठी आम्ही साहाय्य करू, असेही राजनाथ सिंह यांनी म्हटले. (पाक अशा विनंत्यांना केराची टोपली दाखवणार, हे सिंह जाणतील का ? - संपादक) ते एका कार्यक्रमात बोलत होते.

पाक आणि जपान यांना भूकंपाचे धक्के !

      क्वेट्टा - बलुचिस्तानमधील क्वेट्टा शहराला २० ऑक्टोबरला भूकंपाचा धक्का बसला. रिश्टर स्केलवर याची तीव्रता ५.० इतकी होती. यात जीवित किंवा वित्त हानीचे वृत्त नाही. या भूकंपापूर्वी पहाटे साडेपाच वाजता जपानच्या चिबा येथेही ५.३ तीव्रतेचा भूकंपाचा धक्का बसला. यात कोणत्याही प्रकारची हानी झाल्याचे वृत्त नाही. 
महर्षींनी प्रलयकालाविषयी सतर्क करणे
      १९.३.२०१६ या दिवशी झालेल्या नाडीवाचन क्रमांक ६७मध्ये महर्षि म्हणतात, हे पूर्ण वर्ष प्रलयकालाचे आणि आपत्तीजनक असणारे आहे. (पाक आणि जपान यांना भूकंपाचे धक्के बसले. या घटनांवरून प्रलयकालाविषयी महर्षींनी केलेले भाष्य किती तंतोतंत आहे, हे लक्षात येते ! - संपादक)

शावेज नावाच्या बलात्कार्‍याकडून पीडित महिलेशी विवाह केल्यानंतर झालेल्या मुलीची केली विक्री !

अशा बलात्कार्‍यांना शरिया कायद्यानुसार शिक्षा 
करण्याची कोणी मागणी केल्यास त्यात चुकीचे ते काय ?
      बरेली - येथे एका महिलेवर बलात्कार केल्यानंतर बलात्कारी शावेज याने तिच्याशी विवाह केला. या विवाहानंतर या महिलेला झालेल्या मुलीला शावेज या बलात्कारी पित्याने २५ सहस्र रुपयांत विकल्याची घटना उघडकीस आली आहे. मुलीला विकल्यानंतर त्याने महिलेला तलाकही दिला. महिलेने पोलिसांत तक्रार करून मुलीला परत मिळवण्याचा प्रयत्न चालू केला आहे.

(म्हणे) मुलांना शाळेत पाठवू नका, तेथे इस्लामविरोधी शिक्षण दिले जाते ! - मौलवीचा फतवा

एकीकडे केंद्र आणि राज्य सरकारे मुले शाळेत कशी जातील, 
यासाठी विविध उपाययोजना राबवत असतांना मौलवी मात्र मुलांना शाळेत न पाठवण्यासाठी 
फतवा काढत आहेत, अशांना सरकारने देशद्रोहाखाली कारवाई करून कारागृहात डांबले पाहिजे !
      कोझिकोड (केरळ) - येथील सलाफी (कट्टर इस्लामचा संदेश देणारा) धर्मोपदेशक अब्दुल मोहसीन अदीद या मौलवीने संगितले की, मुलांना शाळांमध्ये पाठवू नये; कारण तेथे इस्लामविरोधी शिक्षण दिले जाते. 
१. मौलवीच्या म्हणण्यानुसार मुख्य प्रवाहातील शाळांमध्ये शिकल्यामुळे मुसलमान मुले इस्लाम आणि अल्ला यांपासून दूर जातात आणि काफिर बनतात. या मौलवीने पालकांना मुलांना इस्लामी पद्धतीने घरीच शिक्षण देण्याचा सल्ला दिला. 
२. एक घंट्याच्या ध्वनीफितीमध्ये हा मौलवी मुसलमानांना आवाहन करतो की, त्यांच्या मुलांना अल्लाने दाखवलेल्या मार्गाने चालण्यास बाध्य करावे.

तोकडे कपडे परिधान करून मंदिरात प्रवेश करण्यावर प्रतिबंध घाला !

रणरागिणीची गोव्यातील म्हापसा येथील श्री महारुद्र संस्थानच्या अध्यक्षांकडे मागणी
रणरागिणीच्या वतीने श्री. अमर कवळेकर यांना 
निवेदन  देतांना १. सौ. राजश्री गडेकर आणि डावीकडून 
२. सौ. शर्वाणी आगरवाडेकर, ३. सौ. शुभा सावंत 
आणि ४. सौ. अंजली नायक
      म्हापसा, २० ऑक्टोबर (वार्ता.) - मंदिराचे पावित्र्य अबाधित ठेवण्यासाठी तोकडे कपडे परिधान करून मंदिरात प्रवेश करण्यावर प्रतिबंध घालण्याची मागणी रणरागिणी शाखेच्या वतीने येथील श्री महारुद्र संस्थानचे (श्री मारुती मंदिर) अध्यक्ष श्री. अमर कवळेकर यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली. या वेळी रणरागिणीच्या शिष्टमंडळामध्ये रणरागिणीच्या सौ. राजश्री गडेकर, हिंदु जनजागृती समितीच्या सौ. शुभा सावंत, सनातन संस्थेच्या सौ. अंजली नायक आणि सौ. शर्वाणी आगरवाडेकर यांचा समावेश होता. मंदिराचे अध्यक्ष श्री. अमर कवळेकर यांनी या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दर्शवतांना मंदिराचे पावित्र्य टिकून रहाण्यासाठी सर्वांकडून योग्य कृती होऊ दे, यासाठी देवाला सामूहिक गार्‍हाणे घातले.

हिंदु समाजाने धर्मशिक्षण घेऊन धर्माचे रक्षण करणे आवश्यक ! - सौ. गायत्री राव

बेंगळुरू येथे हिंदु जनजागृती समितीची हिंदु धर्मजागृती सभा !
      बेंगळुरू - हिंदु राष्ट्राची स्थापना आणि हिंंदुत्वाचे रक्षण हे उद्देश समोर ठेवून हिंदु जनजागृती समितीच्या वतीने बेंगळुरू शहरातील श्री लक्ष्मीनारायण सभा भवनामध्ये १६ ऑक्टोबरला हिंदु धर्मजागृती सभा आयोजित करण्यात आली होती. हिंदु समाजाने धर्मशिक्षण घेऊन धर्माचे रक्षण करणे आवश्यक आहे, असे उद्गार सनातन संस्थेच्या सौ. गायत्री राव यांनी या वेळी बोलतांना काढले. समाज सेवक श्री. व्यंकटस्वामी रेड्डी, रणरागिणीच्या कु. भव्या गौडा आणि हिंंदु जनजागृती समितीचे श्री. विजय रेवणकर यांनीही या वेळी मार्गदर्शन केले.
समाज, राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणासाठी 
स्वसंरक्षण प्रशिक्षण घेणे आवश्यक ! - भव्या गौडा
      आज जिहादी आतंकवाद, नक्षलवाद आणि गुंडगिरी यांनी समाज पोखरला आहे. महिलांच्या सुरक्षेचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. समाज आणि राष्ट्र यांची सुरक्षा धोक्यात आली आहे. त्यामुळे स्वसंरक्षणाबरोबरच समाज, राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणासाठी स्वसंरक्षण प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे. मुलींमध्ये आत्मबळ वृद्धींगत करण्यासाठी आणि समाजातील अश्‍लीलतेच्या विरोधात लढा देण्यासाठी रणरागिणीच्या वतीने कन्या शौर्य अभियान राबवण्यात येत आहेे.

देहलीत अधिवक्त्याकडे सापडली १२५ कोटी रुपयांची संपत्ती !

प्रत्येक क्षेत्रच भ्रष्टाचाराने बरबटलेले आहे. ही स्थिती पालटण्यासाठी आता हिंदु राष्ट्रच हवे !
     नवी देहली - देहली उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय येथे वकिली करणार्‍या एका अधिवक्त्याच्या दक्षिण देहलीतील निवासस्थानी आयकर खात्याच्या अधिकार्‍यांनी घातलेल्या धाडीमध्ये १२५ कोटी रुपयांची संपत्ती सापडली आहे. या अधिवक्त्याने देहलीत १०० कोटी रुपयांचा बंगला खरेदी केल्यानंतर आयकर विभागाचे लक्ष या अधिवक्त्याकडे गेले. काळा पैसा घोषित करण्यास सांगितलेली ४ महिन्यांची वेळ संपल्याने आयकर विभागाने अघोषित संपत्ती असलेल्यांच्या विरोधात कडक कारवाई करण्यास प्रारंभ केला आहे.

पाकमध्ये भारतीय दूरचित्रवाहिन्या आणि रेडिओ यांवर संपूर्ण बंदी !

      इस्लामाबाद - पाकमध्ये भारतीय दूरचित्रवाहिन्या आणि रेडिओ यांवरील कार्यक्रमांवर २१ ऑक्टोबरपासून संपूर्ण बंदी घातली जाणार आहे. बंदीचे उल्लंघन करतांना केबलवाहिनीधारक अथवा अन्य कोणी आढळल्यास त्यांचा परवाना रहित करण्यात येणार आहे. पाकच्या पाकिस्तान इलेक्ट्रॉनिक मीडिया रेग्युलेटरी अ‍ॅथॉरिटीने हा निर्णय येईल. (पाकमधून भारताच्या बाजूने कोणीही बोलत नाही; मात्र भारतात पाकच्या बाजूने बोलणारे असंख्य पाकप्रेमी आहेत ! -संपादक)

जिहादी आतंकवादी संघटना बोको हरामने अपहरण केलेल्या विद्यार्थिनींचे केले धर्मांतर !

आतंकवाद्यांना धर्म असतो आणि ते एकाच धर्माचे असतात ! 
      अबुजा (नायजेरिया) - येथे बोको हराम या जिहादी आतंकवादी संघटनेने २ वर्षांपूर्वी एका शाळेतून २०० हून अधिक विद्यार्थिनींचे अपहरण केले होते. यांतील काही जणी पळ काढण्यात यशस्वी ठरल्या आहेत. अपहरण करण्यात आलेल्या या ख्रिस्ती विद्यार्थिनींचे बोको हरामकडून धर्मांतर करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.सौदी अरेबियामध्ये शाही परिवारातील राजपुत्राला मृत्यूदंड !

भारताच्या लोकराज्यात असे कधीतरी घडू शकेल का ?
       रियाद - सौदी अरेबियामध्ये एका हत्येप्रकरणी शाही परिवारातील एका राजपुत्राला मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात आली आहे. हाऊस ऑफ सऊद च्या सहस्रो सदस्यांमध्ये एखाद्याला अशी शिक्षा होणे, ही एक दुर्लभ घटना समजली जाते. सौदीच्या गृहमंत्रालयाने केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, प्रिन्स तुर्की बिन सऊद अल-कबीरला राजधानी रियादमध्ये मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात आली आहे. अल् कबीरवर सौदी नागरिक अल्-महंमदची गोळ्या मारून हत्या केल्याचा आरोप होता. अरब न्यूज ने नोव्हेंबर २०१४ मध्ये दिलेल्या वृत्तात, मित्राची हत्या केल्याच्या प्रकरणी रियादच्या एका न्यायालयाने राजपुत्राला मृत्यूदंड दिल्याचे प्रसिद्ध झाले होते.बलुचिस्तानमध्ये पाक-चीन सैन्याकडून मोठ्या प्रमाणावर जनसंहार !

बलुची नेते मजदक यांची माहिती
      नवी देहली - पाकव्याप्त काश्मीरमध्ये चीनकडून करण्यात येणारा आर्थिक विकास वास्तविक पाक-चीन आतंकवादी विकास आहे. पाक चीनच्या साहाय्याने बलुचिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणावर जनसंहार करत आहे. पाकचे सैन्य बलुच लोकांची गावे जाळत आहेत आणि त्यांच्या साहित्याची लूट करत आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात बलुची लोक तेथून स्थलांतर करत आहेत, अशी व्यथा बलुचीस्तानच्या स्वातंत्र्यासाठी लढत असलेले बलुची नेते मजदक बलुच यांनी दिली.

(म्हणे) चिनी आस्थापनांनी भारतात गुंतवणूक करणे म्हणजे आत्महत्या करण्यासारखे ! - चिनी प्रसारमाध्यमांची गरळओक

चीनची मग्रुरी उतरवण्यासाठी भाजप शासनाने चिनी वस्तूंची 
आयात थांबवावी ! आर्थिक नाड्या आवळल्यावर चीन वठणीवर येईल !
      बीजिंग - चीनने पाकची तळी उचलल्यापासून भारतात चीनच्या विरोधात असंतोष निर्माण झाला आहे. विविध माध्यमांतून चीनच्या वस्तूंवर बहिष्कार करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. त्यामुळे चिडलेल्या चिनी प्रसारमाध्यमांनी भारताच्या विरोधात थयथयाट करणे चालू केले आहे. भारतात बनलेले साहित्य चिनी साहित्याला टक्कर देऊ शकत नाही, अशी टीका चीनच्या प्रसारमाध्यमांनी केली आहे. (भ्रमात वावरणारी चिनी प्रसारमाध्यमे ! चिनी वस्तू या निकृष्ट आणि आरोग्यासही अहितकारक असतात ! असे असतांना चिनी वस्तूंविषयी अभिमान बाळगणे, हास्यास्पद होय ! - संपादक) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मेक इन इंडिया यावर टीका करतांना त्यांनी म्हटले आहे की, चिनी आस्थापनांनी भारतात गुंतवणूक करणे म्हणजे आत्महत्या करण्यासारखे आहे. भारतात भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात आहे. (भारतात भ्रष्टाचार आहे, तसेच चीनमध्येही भ्रष्टाचार फोफावला आहे ! चिनी प्रसारमाध्यमे हे का विसरतात ? - संपादक) त्यामुळे चिनी आस्थापनांनी भारतात गुंतवणूक करू नये, असा सल्ला दिला आहे. भारतात ही योजना यशस्वी होणार नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

नेपाळला पुन्हा हिंदु राष्ट्र बनवण्यासाठी काठमांडू येथे विराट आंतरराष्ट्रीय हिंदु महासंमेलनाला प्रारंभ !

       काठमांडू (नेपाळ) - येथे २० ऑक्टोबरला विराट आंतरराष्ट्रीय हिंदु महासंमेलनाला आरंभ झाला. हे महासंमेलन २२ ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे. नेपाळला पुन्हा हिंदु राष्ट्र बनवण्यासाठी या महासंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या महासंमेलनात नेपाळचे माजी राजे ज्ञानेंद्र बिरबिक्रम शहा देव, राणी कोमल राज्यलक्ष्मीदेवी शहा, उत्तरप्रदेशमधील भाजपचे खासदार योगी आदित्यनाथ, सिरोही महाराज आणि अन्य मान्यवर सहभागी झाले आहेत.

देवतांची चित्रे असलेल्या फटाक्यांची विक्री न करण्याविषयी फटाके विक्रेत्यांना नोटिसा पाठवू ! - निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे

निवासी उपजिल्हाधिकारी यांना निवेदन 
निवासी उपजिल्हाधिकारी श्री. संजय शिंदे यांना निवेदन देतांना धर्माभिमानी
     कोल्हापूर, २० ऑक्टोबर (वार्ता.)- फटाक्यांच्या चित्रांद्वारे होणारी हिंदु देवता आणि राष्ट्रपुरुष यांची विटंबना रोखण्यात यावी आणि चिनी मालाची अवैध विक्री रोखण्यासाठी निवासी उपजिल्हाधिकारी श्री. संजय शिंदे यांना हिंदु जनजागृती समितीच्या वतीने १८ ऑक्टोबर या दिवशी विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. या वेळी श्री. संजय शिंदे यांनी आश्‍वासन दिले की, देवतांची चित्रे असलेल्या फटाक्यांची विक्री करू नये, यासाठी फटाके विक्रेत्यांना नोटिसा पाठवण्यात येतील, तसेच धर्माभिमान्यांनी फटाके विक्रेत्यांकडे देवतांची चित्रे असलेले फटाके विक्रीसाठी ठेवण्यात आल्याचे निदर्शनास आल्यास त्यांनी त्वरित मला कळवावे. मी संबंधितांवर कारवाई करतो. 

मानपाडा (डोंबिवली) येथे वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना निवेदन !

निवेदन स्वीकारतांना वरिष्ठ पोलीस निरीक्षक
    डोंबिवली - मानपाडा येथील पोलीस स्थानकामध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. गजानन काब्दुले यांना हिंदुत्वनिष्ठ संघटनांकडून निवेदन देण्यात आले. या वेळी हिंदी भाषा जनता परिषदेचे श्री. हरिशंकर पाण्डेय, धर्माभिमानी श्री. शुभम् मिश्रा, श्री. विमलेश पाण्डेय, श्री. प्रमोद सिंह आणि अन्य हिंदुत्वनिष्ठ उपस्थित होते. या वेळी एक पोलीस अधिकारी म्हणाले, "हिंदु जनजागृती समितीचे कार्य स्तुत्य आहे." 

कोल्हापूर येथे श्री रेणुका मंदिराच्या दानपेटीतील रक्कम मिळण्यासाठी गुंडांकडून पुजार्‍याला मारहाण !

हिंदूंची असुरक्षित मंदिरे ! 
        कोल्हापूर, २० ऑक्टोबर (वार्ता.) - येथील जवाहरनगर परिसरातील श्री रेणुका मंदिरात भक्तांनी दान केलेले पैसे बलपूर्वक घेतांना अडवल्याने मंदिराचे पुजारी श्री. विलास मेढे यांना ८ गुंडांनी मोठ्या प्रमाणात मारहाण केली. (यापूर्वी भक्तांचे पैसे आणि दागिने लुटण्याचे प्रकार गुन्हेगारांकडून घडत होते. आता दानपेटीतील रकमेसाठी पुजार्‍यांना मारहाण करण्यापर्यंत गुंडांची मजल गेली आहे. हिंदूंनी मंदिरांचे संरक्षण शासन आणि पोलीस करतील, या भ्रमात न रहाता मंदिर आणि दानपेटी यांचे संरक्षण करण्यासाठी संघटित झाले पाहिजे. हिंदु राष्ट्रात हिंदूंची मंदिरे सुरक्षित असतील ! - संपादक)

कोल्हापूर येथे बसवरील नियंत्रण सुटल्याने बस शेतात घुसली !

     कोल्हापूर, २० ऑक्टोबर (वार्ता.) - येथील कसबा-बावडा रस्त्यावर केएम्टीच्या बसचालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने बस चक्क रस्त्यालगत असलेल्या शेतात घुसली. बस दुसर्‍या वाहनावर न धडकता शेतात घुसल्याने सुदैवाने जीवितहानी टळली. या अपघातात ९ प्रवासी किरकोळ घायाळ झाले आहेत.

दीपोत्सव विशेषांक

दैनिक सनातन प्रभातचा रंगीत
दीपोत्सव विशेषांक
 प्रसिद्धी दिनांक : २३ ऑक्टोबर २०१६ पृष्ठ संख्या : १०, मूल्य : ५ रुपये 

विशेषांकाची वाढीव मागणी वितरकांनी 
२२ ऑक्टोबर  या दिवशी दुपारी ३ पर्यंत 'इआरपी प्रणाली'त भरावी !

श्रीराम मंदिरासाठी आता विश्‍व हिंदु परिषदेने मोदींवर दडपण आणणे आवश्यक आहे. नुसती मागणी करून ते काही करणार नाहीत, हे इतक्या वर्षांच्या अनुभवावरून लक्षात आले नाही का ?

     'दसर्‍याच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्ष्मणपुरी (लखनौ) येथील ऐशबागमधील ऐतिहासिक रामलीला महोत्सवात केलेल्या मार्गदर्शनाच्या आरंभी आणि शेवटी 'जय श्रीराम'च्या घोषणा दिल्या. यावरून विश्‍व हिंदु परिषदेचे नेते डॉ. प्रवीण तोगाडिया 'ट्वीट' करतांना म्हणाले, आता 'जय श्रीराम'ची घोषणा केलीच आहे, तर संसदेत कायदा संमत करून अयोध्येतील रामजन्मभूमीवर त्वरित भव्य राममंदिर बांधूनच द्यावे !'

हिंदूंच्या देवतांची चित्रे असलेले, तसेच चिनी फटाके यांची विक्री न करण्याचा विक्रेत्यांचा निर्णय !

नंदुरबार येथे हिंदु जनजागृती समितीने केलेल्या प्रबोधनाला मिळालेले यश !
      नंदुरबार - शहरातील फटाके विक्रेत्यांच्या बैठकीत हिंदु जनजागृती समितीने प्रबोधन केल्यानंतर हिंदूंच्या देवता आणि राष्ट्रपुरुष यांची चित्रे असलेल्या फटाक्यांची, तसेच चीन उत्पादित फटाक्यांची विक्री करणार नाही, असा निर्धार फटाके विक्रेत्यांनी या बैठकीत व्यक्त केला. (राष्ट्रप्रेमी भूमिका घेणार्‍या विक्रेत्यांचे अभिनंदन ! येथील विक्रेत्यांचा आदर्श सर्वांनी घेतला, तर परिवर्तन होण्यास वेळ लागणार नाही ! - संपादक) 
१. हिंदूंच्या देवता आणि राष्ट्रपुरुष यांची चित्रे असलेले फटाके फोडल्याने त्यांच्या चित्रांच्या चिंधड्या उडून विटंबना होते आणि धर्मभावनाही दुखावल्या जातात; म्हणून या फटाक्यांवर बंदी घालावी, अशी मागणी करणारे निवेदन हिंदु जनजागृती समितीने अप्पर जिल्हाधिकारी अनिल पाटील आणि जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र डहाळे यांना नुकतेच दिले होते.

लेफ्टनंट कर्नल पुरोहित यांचा मुंबई उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज !

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण
       मुंबई, २० ऑक्टोबर - वर्ष २००८ मध्ये मालेगाव येथे झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणातील संशयित लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांनी मुंबई उच्च न्यायालयात १९ ऑक्टोबर या दिवशी जामीन मिळण्यासाठी अर्ज सादर केला. सत्र न्यायालयाच्या विशेष न्यायालयाने कर्नल पुरोहित जामीन अर्ज फेटाळला होता. त्यानंतर पुरोहित यांनी न्यायमूर्ती नरेश पाटील आणि न्यायमूर्ती प्रकाश नाईक यांच्या खंडपिठापुढे उपरोक्त अर्ज सादर केला. खंडपिठाने अर्जाची गंभीर नोंद घेतली असून यासंदर्भात राष्ट्रीय तपास यंत्रणेला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले आहेत. पुढील सुनावणी १६ नोव्हेंबर या दिवशी आहे. लेफ्टनंट कर्नल पुरोहित यांना यापूर्वी उच्च न्यायालयाने विशेष न्यायालयात नव्याने दाद मागा, असे निर्देश दिले होते; मात्र विशेष न्यायालयाने अर्ज फेटाळल्यानंतर त्यांनी उच्च न्यायालयात जामीन मिळण्यासाठी पुन्हा अर्ज सादर केला आहे.पुणे येथे होर्डिंग्ज, फ्लेक्स अन् भित्तीपत्रके यांच्या माध्यमातून हिंदु धर्मजागृती सभेचा प्रसार !

सातारा रस्ता येथे उभारण्यात आलेली कमान
सारसबाग येथील कमानीवर लावलेले फलक

बारा वर्षे गैरव्यवहारांकडे दुर्लक्ष करणार्‍या उत्तरदायी अधिकार्‍यांना कारागृहात पाठवा !

     'डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या (अंनिसच्या) न्यासाचा कारभार पहाता त्यावर प्रशासक नेमावा, न्यासामधील घोटाळे पहाता विशेष लेखा परीक्षण (स्पेशल ऑडिट) करावे, तसेच गंभीर आरोपांची मोघम चौकशी केल्यामुळे न्यासाची फेरचौकशी करावी, असे अनेक गंभीर ताशेरे सातारा येथील सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयाच्या अधीक्षकांनी चौकशी अहवालात ओढले आहेत. त्या अहवालामुळे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा विवेकवाद, पुरोगामित्व आणि बुद्धीप्रामाण्यवाद यांचा बुरखा फाटला असून त्यांचा घोटाळेबाज चेहरा समाजासमोर आला आहे.'

भारताने किती अण्वस्त्रविरोधी बंकर बनवले आहेत ?

     तिसर्‍या महायुद्धाचा धोका लक्षात घेऊन रशियाने त्यांच्या जनतेला सूचना दिल्या आहेत. या पार्श्‍वभूमीवर 'रशियाने राजधानी मास्कोत १२ लाख लोकांना सुरक्षित ठेवण्यासाठी अण्वस्त्रविरोधी बंकर बनवले आहेत, अशी घोषणा ऑक्टोबरच्या प्रारंभी पुतिन यांच्या सरकारमधील एका उत्तरदायी मंत्र्याने केली होती.'

चाचणी केल्याशिवाय हे गोळे वापरात का आणले ? उत्तरदायींना कारागृहात पाठवा !

     'काश्मीरमधील दंगलखोरांवर नियंत्रण मिळवण्यासाठी सुरक्षादलांकडून प्रायोगिक तत्त्वावर तिखट मसाल्याच्या गोळ्यांचा ('पावा शेल्स'चा) वापर करण्यात येत आहे. याविषयी केंद्रीय राखीव पोलीस दलाकडून सांगण्यात आले की, पावा शेल्स दंगलखोरांवर झाडल्यानंतर ते लगेच वितळून त्यातील तिखटपणाचा त्यांच्यावर परिणाम झाला पाहिजे; मात्र या गोळ्यांना वितळण्यास वेळ लागत असल्याने दंगलखोर हेच गोळे उचलून सुरक्षादलांवर फेकत आहेत.'

दोषींवर कडक कारवाई करण्याचे पोलीस आयुक्तांचे आश्‍वासन !

ठाणे पोलिसांनी देवतांची चित्रे असलेल्या आणि अधिक 
आवाज असणार्‍या फटाक्यांच्या विक्रीवर बंदी घातल्याचे प्रकरण
हिंदु जनजागृती समितीच्या चळवळीला यश !
ठाणे पोलीस आयुक्तांना निवेदन
देतांना धर्माभिमानी महिला
     ठाणे, २० ऑक्टोबर (वार्ता.) - ठाणे पोलिसांनी देवतांची चित्रे असलेल्या आणि अधिक आवाज असणार्‍या फटाक्यांच्या विक्रीवर बंदी घातली असून दोषींवर कडक कारवाई करणार असल्याचे आश्‍वासन ठाणे पोलीस आयुक्त श्री. परमबीर सिंह यांनी हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्या शिष्टमंडळाला दिले. 
     पोलीस आयुक्त श्री. परमबीर सिंह म्हणाले, असे फटाके विक्री करतांना आढळल्यास आम्ही कारवाई करणार आहोत, तसेच तुम्हाला आढळल्यास जवळच्या पोलीस ठाण्यात किंवा १०० नंबरच्या हेल्पलाईनवर कळवावे. या वेळी निवेदन देतांना शिष्टमंडळात हिंदु जनजागृती समितीच्या सौ. वेदिका पालन, रणरागिणी शाखेच्या सौ. सुनीता पाटील, सनातन संस्थेच्या सौ. चांगण, धर्माभिमानी महिला सौ. श्रद्धा कपाडी आणि सौ. सीमा कपाडी उपस्थित होत्या.

महिलेवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करणार्‍या धर्मांधास ग्रामस्थांकडून चोप !

सवलती मिळवतांना अल्पसंख्य म्हणून ओरड करणारे गुन्हेगारीत मात्र बहुसंख्य कसे ?
      मिरज, २० ऑक्टोबर (वार्ता.) - मिरज तालुक्यातील शिंदेवाडी येथे शेतात कामाला जाणार्‍या महिलेवर चाकूचा धाक दाखवून अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करणारा धर्मांध शानूर शेख (रा. उगार, जि. बेळगाव) याला ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीसमोरील खांबास बांधून चोप दिला. शानूर याला मिरज ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. 
      १९ ऑक्टोबर या दिवशी गावातील ओढ्याजवळ काही महिला कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या. यातील एक महिला मागे राहिली होती. ती एकटी असल्याचे पाहून शानूर याने स्वत:जवळील चाकू तिच्या गळ्याला लावून तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. सदरच्या महिलेने आरडाओरडा केल्याने ग्रामस्थ तेथे धावत आले. या वेळी शानूर दुचाकी घेऊन पळून गेला. काही कालावधीनंतर शानूर हा दुचाकीवरून शिंदेवाडी गावाकडे परत आला. त्या वेळी ग्रामस्थांनी त्याला पकडून त्याला चोप दिला.

ऐ दिल है मुश्किल या चित्रपटाच्या प्रदर्शनाला विरोध करणार्‍या मनसेच्या १२ कार्यकर्त्यांना अटक

४ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी
      मुंबई, २० ऑक्टोबर - पाकिस्तानी कलाकार असलेला चित्रपट ऐ दिल है मुश्किल या चित्रपटाच्या प्रदर्शनाला विरोध म्हणून छत्रपती शिवाजी टर्मिनसजवळील मेट्रो चित्रपटगृहाबाहेर मल्टिप्लेक्स मालकांच्या विरोधात मनसे कार्यकर्त्यांनी १९ ऑक्टोबर या दिवशी आंदोलन केले. या वेळी आझाद मैदान पोलिसांनी आंदोलनकर्त्या मनसेच्या १२ कार्यकर्त्यांना अटक केली. किल्ला न्यायालयात उपस्थित केले असता न्यायालयाने त्यांना ४ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. 
       कोणत्याही मल्टिप्लेक्स चित्रपटगृहात ए दिल है मुश्किल चित्रपट लावू नये, अन्यथा मनसेच्या पद्धतीने निदर्शनाला सामोरे जावे लागेल, अशी चेतावणी मनसेने दिली होती. या पार्श्‍वभूमीवर चित्रपटगृह मालकांनी ए दिल है मुश्किल चित्रपट प्रदर्शित न करण्याचा निर्णय घेतला आहे. मल्टिप्लेेक्स चित्रपटगृहांनीही हा चित्रपट दाखवू नये, असे आवाहनही मनसेने केले आहे.

ऐ दिल है मुश्किल हा चित्रपट प्रदर्शित करू नये ! - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे चित्रपटगृह व्यवस्थापकांना निवेदन

       सांगली, २० ऑक्टोबर (वार्ता.) - उरी येथे झालेल्या आक्रमणात भारताचे १९ सैनिकांनी बलीदान दिले. देशाच्या सीमेवर असलेले सैनिक त्यांच्या प्राणांची पर्वा न करता त्यांचे कर्तव्य बजावतात. त्यामुळे ज्या पाकपुरस्कृत आतंकवाद्यांमुळे भारतीय सैनिकांना बलीदान द्यावे लागले, अशा देशातील अभिनेत्यांचा चित्रपट प्रदर्शित करणे हा राष्ट्रद्रोहच ठरेल. तरी या सैनिकांना श्रद्धांजली म्हणून आपण ऐ दिल है मुश्किल हा चित्रपट प्रदर्शित करू नये, असे निवेदन येथील माधवनगर रस्त्यावरील न्यू प्राईड चित्रपटगृहाच्या व्यवस्थापकांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने देण्यात आले. या वेळी जिल्हा उपाध्यक्ष श्री. संदीप टेंगले, जिल्हाध्यक्ष श्री. तानाजी सावंत, सर्वश्री दयानंद मलपे, विनय पाटील, अमित पाटील, राहुल माने, प्रल्हाद ढगे उपस्थित होते. (पाक अभिनेते असलेला चित्रपट प्रदर्शित न होण्यासाठी चित्रपटगृह व्यवस्थापकांना निवेदन देणार्‍या मनसेच्या कार्यकर्त्यांचे अभिनंदन ! प्रत्येक नागरिकाने राष्ट्रप्रेमाची भावना लक्षात घेता या चित्रपटावर बहिष्कार टाकला पाहिजे ! - संपादक)

कोपरी रेल्वे पुलाच्या रुंदीकरणाला २९५ कोटी रुपये संमत

आघाडी सरकारच्या अनास्थेमुळे व्यय वाढला 
      ठाणे - पूर्वद्रुतगती महामार्गावरील कोपरी येथील ब्रिटीशकालीन रेल्वे पुलाच्या रुंदीकरणाचा मार्ग मोकळा झाल्याने येथील वाहतूक कोंडी कायमची सुटणार आहे. वर्ष २००३ मध्ये पुलाची डागडुजी आणि रुंदीकरण यांना मान्यता मिळूनही आघाडी शासनाच्या काळात पुलाचे काम रखडले होते; मात्र भाजपचे आमदार संजय केळकर यांच्या पाठपुराव्यामुळे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी २९५ कोटी रुपयांचा निधी संमत केला. हा व्यय आता कित्येक पटींनी वाढला असून सार्वजनिक बांधकाम खात्याकडे तितका निधी नाही. त्यामुळे निधी नसल्याने हे काम एम्एम्आरडीएकडे सोपवण्याची सूचना ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.

हिंदू तेजा जाग रे !

Jago ! : 
Dehli ke 'JNU' me 1 vidyarthi lapata hone per
 anya vidyarthione kulguru ko kamre me band kiya.
- kya duniya ko gyan denewala desh yahi hai ?

 जागो ! : 
देहली के 'जेएनयू' में एक विद्यार्थी लापता होने पर 
अन्य विद्यार्थियों ने कुलगुरु को कमरे में बंद किया. 
 - क्या दुनिया को ज्ञान देनेवाला देश यही है ?
'या देशाला स्वातंत्र्य मिळावे; म्हणून सशस्त्र क्रांतीचा 
ध्वज फडकवत, शत्रूला नामोहरम करत करत मी आमरण झुंजेन !'  - स्वा. सावरकर

फलक प्रसिद्धीकरता

भारतातील विद्यापीठे आदर्श बनवण्यासाठी हिंदु राष्ट्राशिवाय पर्याय नाही ! 
     बहुचर्चित जवाहरलाल नेहरू विद्यापिठातून (जेएन्यूमधून) एक विद्यार्थी बेपत्ता झाला आहे. याप्रकरणी कारवाई करण्यात यावी, यासाठी आंदोलन करणार्‍या विद्यार्थ्यांनी विद्यापिठाचे कुलगुरु एम्. जगदीश कुमार यांना एका खोलीत डांबले.

ब्राह्मण महिला आणि समर्थ रामदासस्वामी यांच्या संदर्भात आक्षेपार्ह विधाने करणार्‍याच्या विरोधात निवेदन

       यवतमाळ - नागपूर येथील शंकर चव्हाण यांनी ब्राह्मण महिलांच्या संदर्भात फेसबूकवर, तसेच समर्थ रामदासस्वामी यांच्या संदर्भात आक्षेपार्ह विधाने केल्याप्रकरणी अखिल भारतीय ब्राह्मण युवा आणि महिला आघाडी यवतमाळ यांनी जिल्हाधिकारी यवतमाळ यांना निवेदन दिले. जातीय द्वेष पसरवणार्‍यांंवर कायद्यानुसार गुन्हा प्रविष्ट करून कठोर कारवाईसह अटक करावी, अशी मागणी महिला आघाडी अध्यक्षा सौ. माधवी देशपांडे यांनी केली आहे.

पुरोगामी होणे श्‍वास घेण्यापेक्षाही सोपे ?

      प्रस्तुत उपरोधिक लेखातून पुरोगाम्यांची दुटप्पी आणि हिंदुद्वेषी भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे. पाक्षिक सांस्कृतिक वार्तापत्रामध्ये प्रकाशित झालेला सदर लेख आमच्या वाचकांसाठी साभार प्रकाशित करत आहोत.
१. हिंदूंना अपमानास्पद वाटेल, असे ढोंगीपणाने वागणे म्हणजे पुरोगामित्व !
      हल्लीच्या जगात श्‍वास घेण्यापेक्षाही सोपी गोष्ट कोणती झाली आहे माहिती आहे ? पुरोगामी होणे!! त्यासाठी काय करायचे ? काहीच नाही. जाणून बुजून सातत्याने हिंदूंना अपमानास्पद वाटेल असे वागायचे ! मग यात सरळसरळ तुमचा ढोंगीपणा दिसला तरी चालेल; कारण तुम्हाला काहीच करावे लागत नाही. हे मूर्ख हिंदूच तुमचा ढोंगीपणा हा कसा ढोंगीपणा नसून प्रामाणिकपणा आहे, हे जीवाच्या आकांताने सांगायला पुढे येतात. अहो उलट तुम्ही जितका जास्त ढोंगीपणा कराल, तितकी वरची पुरोगामी श्रेणी मिळेल तुम्हाला. म्हणजे थोडासा ढोंगीपणा केला की, विवेकवादी, त्याहून अधिक केला की, पुरोगामी आणि ढोंगीपणाची कमाल मर्यादा गाठली की, भारतीय सेक्युलर !!

काँग्रेसचा अंत:काल निकट ?

१. बंगाल काँग्रेसवर आमदारांकडून एकनिष्ठतेच्या 
शाश्‍वतीचे अनुबंधपत्र लिहून घेण्याची नामुष्की ओढवणे !
       विदेशात आजकाल लग्नापूर्वी एकनिष्ठतेच्या शाश्‍वतीचे अनुबंधपत्र द्यावे लागते. म्हणजे पती किंवा पत्नी जर विश्‍वासघातकी निघाले, तर त्यांना त्याची भरपाई म्हणून मोठी धनराशी द्यावी लागावी; पण सध्या राजकारणातही पहिल्यांदाच एकनिष्ठतेची शाश्‍वती घेतली जाऊ लागली आहे. काँग्रेसच्या बंगाल विभागाने आपल्या ४४ आमदारांना वाईट दृष्टीपासून वाचवण्यासाठी १०० रूपयांच्या मुद्रांकावर अनुबंधित केले आहे. यामध्ये हे आमदार अशी शपथ घेतात की, ते सदैव आपल्या पक्षाशी एकनिष्ठ रहातील. एकनिष्ठतेचे हे वचन केवळ पक्षासाठी नव्हे, तर राहुल आणि सोनिया गांधी यांच्यासाठीही आहे आणि ते अशा वेळी येत आहे की, जेव्हा काँग्रेसच्या नेतृत्वावर प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले जात आहे. लोकप्रतिनिधींचा हा एकनिष्ठपणा जनतेच्या वरचा नसावा. काँग्रेसला बंडाची एवढी भीती आहे आणि यासाठी मुद्रांकावर स्वाक्षर्‍या घेऊन ही एकनिष्ठता ठरवली जाऊ शकते का ? या अनुबंधामध्ये असे लिहिले आहे की, मी कोणत्याही अटीविना काँग्रेसशी एकनिष्ठ राहीन, जिचे नेतृत्व सोनिया आणि राहुल गांधी करत आहेत. आमदार म्हणून काम करतांना मी पक्षविरोधी अशा कोणत्याही कारवायांमध्ये भाग घेणार नाही. पक्षाच्या एखाद्या निर्णयाशी जरी मी असहमत असलो, तरीही मी पक्षाच्या विरोधात काहीही वक्तव्य करणार नाही. असे कोणतेही काम करण्यापूर्वी मी आधी माझ्या आमदारपदाचे त्यागपत्र देईन.

पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू यांच्या विरोधातील खटल्यातील साक्षीदारांवर होणारी आक्रमणे, हे विरोधकांचेच षड्यंत्र !

१. पोलिसांद्वारे साक्षीदाराच्या नावे 
बनवलेल्या खोट्या प्रकरणाचे पितळ उघडे पडणे
      २०.६.२०१५ ला जोधपूर सत्र न्यायालयाने पूज्यपाद संतश्री आसारामजी बापूंच्या भूमीविषयी केलेल्या अर्जाच्या सुनावणीत म्हटले होते, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार ६ मुख्य साक्षीदारांची साक्ष पूर्ण झाल्यानंतर जामिनासाठी अर्ज करता येऊ शकतो. त्यानुसार सहावी साक्षीदार सुधा पटेल यांची साक्ष ८.७.२०१५ या दिवशी झाली आणि पोलिसांद्वारे तिच्या नावे बनवलेल्या खोट्या प्रकरणाचे पितळ उघडे पडले.

हिंदू सक्षम केव्हा होणार ?

       भिवंडी येथे मोहरमच्या मिरवणुकीत धर्मांधांनी नवरात्रीची कमान तोडली, म्हणून पोलीस त्यांना अडवत असतांना काही क्षणांतच शस्त्रे उपसण्यात आली. त्या वेळी धर्मांधांनी पोलिसांवर पेट्रोल बॉम्ब फेकले आणि जमावावर दगडफेक केली. या आक्रमणात काही पोलीस गंभीर घायाळ झाले आहेत. धार्मिक कार्यक्रमाच्या मिरवणुकीमध्ये मुळात शस्त्रे कशी बाळगण्यात आली ? त्यामुळे धर्मांधांनी अशा प्रकारे आक्रमण करण्याचे नियोजित षड्यंत्र होते, हेच पुन्हा एकदा सिद्ध झाले. भिवंडीमध्ये अशा प्रकारची शस्त्रसज्ज आक्रमणे करणे, ही काही पहिली वेळ नाही. या आधीही धर्मांधांनी भिवंडी येथे पोलीस ठाणे उभारण्याच्या वेळी २ पोलिसांना जिवंत जाळले होते.

अभ्यास कसा करावा ?

परीक्षेच्या पार्श्‍वभूमीवर मुलांना मार्गदर्शक अशी लेखमालिका
      आजकाल बहुतेक मुले आईच्या आग्रहामुळे, बाबांच्या भीतीपोटी अन् एकमेकांमध्ये असलेल्या चढाओढीमुळे काहीशा तणावाखालीच अभ्यास करतांना दिसतात. अशा वेळी अभ्यास मनापासून होतोच, असे नाही. त्यामुळे परीक्षेत अपेक्षित यश मिळाले नाही की, दुःख होते. त्यामुळे मुलांनो, अभ्यास करण्यामागील योग्य दृष्टीकोन समजून घेतला, तर अभ्यास कंटाळवाणा न वाटता आनंददायी वाटेल. अभ्यास करण्याच्या विशिष्ट पद्धती आहेत. त्याप्रमाणे अभ्यास केल्यास अभ्यास चांगला होतो. परीक्षेची भीती कशी घालवावी, उत्तरपत्रिका आत्मविश्‍वासाने कशी लिहावी, अभ्यासात एकाग्रता कशी साधावी आदींची माहिती सांगणारा हा लेखप्रपंच...

निवृत्त होतांना पुढच्या पिढीच्या डोळ्यांत आदराचे अश्रू पहाण्यासाठी काय करावे ?

१. काळ आणि ज्ञान यांचा झालेला परिणाम मागच्या पिढीने स्वीकारणे आवश्यक !
      अनेक संस्थापक हे गात्रे गलीत झाली, तरी अध्यक्षाची खुर्ची (पद) सोडत नाहीत. आपल्यापेक्षा कोणी चांगले काम करूच शकत नाही, हा त्यांचा अपसमज असतो. अशा संस्थांत नवनवीन विचार येत नाहीत. जग सारखे पालटत असते. काळ झपाट्याने पुढे जातो. दोन पिढ्यांत विचार, कामाची पद्धत आणि काम करण्याची साधने यांची बरीच मोठी दरी असते. आता कोणी पत्र पाठवत नाहीत. पटकन् एखादा दूरभाष, संगणकीय पत्र (इ-मेल) किंवा लघुसंदेश (एस्.एम्.एस्.) करतात. हा काळ आणि ज्ञान यांचा झालेला परिणाम आहे. या गोष्टींचा मागच्या पिढीने स्वीकार करायला हवा.

चिनी फटाके, तसेच हिंदु देवता अन् राष्ट्रपुरुष यांची चित्रे असणारे फटाके विकण्यास मज्जाव करणार ! - जीवन सोनवणे, जळगाव महापालिका आयुक्त

दीपावलीचे निवेदन स्वीकारतांना
आयुक्त श्री. जीवन सोनवणे
       जळगाव - यंदा फटाकेविक्रेत्यांना देण्यात येणार्‍या नियमावलीतच चिनी फटाके, तसेच हिंदु देवता आणि राष्ट्रपुरुष यांची चित्रे असणारे फटाके विकण्यास मज्जाव करण्याचे सूत्रे आम्ही घालू. या गोष्टी निश्‍चितपणे बंद व्हायला हव्यात, असे जळगाव महापालिकेचे आयुक्त श्री. जीवन सोनवणे यांनी हिंदु जनजागृती समितीला सांगितले. समितीच्या वतीने आयुक्तांना निवेदन देण्यात आले. या वेळी श्री. मोहन तिवारी, श्री. ओमप्रकाश जोशी, श्री. प्रमोद बारी, श्री. प्रशांत जुवेकर आणि अन्य हिंदुत्वनिष्ठ उपस्थित होते.

सप्टेंबर २०१६ मध्ये केरळ राज्यात हिंदु जनजागृती समितीचा प्रवचने आणि ग्रंथप्रदर्शने यांच्याद्वारे प्रसार !

१. प्रवचन
     केरळच्या एर्नाकुलम् जिल्ह्यातील भगवती मंदिरात हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांना मागील २ मासांमध्ये (महिन्यांमध्ये) ३ वेळा प्रवचनाला बोलावले होते.
अ. प्रवचनाला आलेल्या भाविकांनी प्रवचनात सांगितल्याप्रमाणे कृती करण्यास आरंभ केला. त्यामुळे त्यांना पालटही जाणवू लागले आहेत, उदा. नामजपास आरंभ केल्यापासून घरातील भांडणे अल्प होणे. 
आ. तेथील विश्‍वस्तांनी आठवड्यातून एकदा धर्मशिक्षणवर्ग घेण्यास सांगितले आहे. त्यानुसार २.९.२०१६ पासून तेथे धर्मशिक्षणवर्ग चालू झाला आहे. 
इ. धर्मशिक्षणाच्या फलकांची मागणी : तिरुवनंथपुरम् जिल्ह्यातील एका धर्माभिमान्याने संपर्क करून समितीच्या कार्यकर्त्यांना सांगितले, मी एक शिशुवर्ग (Nursery) चालू करत आहे. त्यासाठी मला धर्मशिक्षणाचे फलक हवे आहेत. मी शाळेच्या भिंतींवर ते फलक लावीन किंवा त्यातील सूत्रे भिंतीवर लिहून काढीन. 
२. ग्रंथप्रदर्शन : एर्नाकुलम् जिल्ह्यातील पेरंडूर येथील मंदिरात नारायणीय सत्रम्च्या निमित्ताने ३ दिवस सनातन निर्मित ग्रंथांचे आणि सात्त्विक उत्पादनांचे प्रदर्शन लावण्यात आले.
- कु. अदिती सुखटणकर, केरळ

काश्मिरी हिंदू बांधवांना सन्मानपूर्वक आपला काश्मीर पुन्हा मिळवून देण्यासाठी पुणे येथे विराट जाहीर हिंदु धर्मजागृती सभा

स्थळ : न्यू इंग्लिश स्कूल, रमणबाग शाळेचे मैदान, शनिवार पेठ, पुणे-३०
वार आणि दिनांक : रविवार, २३ ऑक्टोबर २०१६ 
वेळ : सायंकाळी ५.३० 
संपर्क क्रमांक : ८९८३३३५५१७

महर्षींच्या कृपेने गुरुपरंपरेची आलेली अनुभूती !

महर्षींची शिकवण आणि कार्य !
सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ
     महर्षींनी सांगितल्याप्रमाणे आम्ही केरळच्या प्रवासात असतांना मुन्नारपासून कुमरकुमकडे जात होतो. मुन्नार या हिल स्टेशनवर आम्ही महर्षींच्या आज्ञेप्रमाणे दोन दिवस राहिलो होतो. कुमरकुम हे स्थान बॅक वॉटर बोटिंगसाठी प्रसिद्ध आहे. या ठिकाणी पाण्यावर तुम्हाला बोटीतच दोन दिवस रहायचे आहे, असे महर्षींनी सांगितले होते; म्हणून आम्ही मुन्नार ते कुमरकुम अशा प्रवासाला चारचाकी गाडीतून निघालो होतो. आमच्यासमवेत गाडीतच पू. डॉ. ॐ उलगनाथन् हेही होते. त्यांच्या तोंडून साक्षात् महर्षिच बोलत असतात, याची आम्हाला पदोपदी प्रचीती येत असते आणि अगदी तसेच घडले.
१. महर्षींनी वारंवार शेषहरि आणि शेषहर या शब्दांचा उच्चार करणे
     ते बोलत असतांना म्हणाले, शेषहरि आणि शेषहर असे दोन शब्द महर्षि मला वारंवार सांगत आहेत. का, ते कळत नाही. तेव्हा मी त्यांना म्हटले, प.पू. भक्तराज महाराज नेहमी म्हणत की, मी हरिहर संप्रदायाचा आहे.
२. हरि म्हणजे हरिद्वार आणि हर म्हणजे आेंकारेश्‍वर, या नावांचे प्रतिनिधित्व
करणार्‍या अन् या नावांशीच संबंधित असणार्‍या पुरोहितांचा अकस्मात् भ्रमणभाष येणे
     असे आमचे बोलणे चालू असतांनाच आेंकारेश्‍वरहून एका पुरोहितांचा मला भ्रमणभाष आला. हे पुरोहित प.पू. रामभाऊस्वामींसमवेत रामनाथी आश्रमात झालेल्या उच्छिष्ट गणपति होमाच्या वेळी आले होते. त्यांनी मला या घटनेचे स्मरण करून दिले. मी त्यांना विचारले, आपण कुठून बोलत आहात ? तर ते म्हणाले, मी हरिद्वार येथून बोलत आहे.

प.पू. डॉक्टरांच्या अमृतमहोत्सवी वर्षारंभाला रुद्रयाग आणि बगलामुखी ब्रह्मास्त्रयाग करतांना आलेल्या अनुभूती

१. रुद्रयाग
१ अ. रुद्रयाग करत असतांना प्रज्वलित यज्ञकुंडाजवळ असूनही शरिराला थंड संवेदना जाणवणे आणि मन कैलास पर्वतावरील शिवाजवळ असल्याची जाणीव होणे : २८.५.२०१६ या दिवशी रुद्रयागाचे विधी करत असतांना यज्ञकुंड पूर्ण प्रज्वलित झाले होते. त्या वेळी मला शरिरामध्ये थंड संवेेेेदना जाणवत होत्या. मी स्थूल देहाने यज्ञकुंडाजवळ होतो; परंतु माझे मन कैलास पर्वतावरील शिवाजवळ असल्याची मला जाणीव होत होती. ही स्थिती मी २ - ३ मिनिटे अनुभवत होतो.
१ आ. रुद्रयागाच्या स्वाहाकाराच्या वेळी आहुती देतांना यज्ञकुंडात शिवतत्त्व खेचले जात असल्याचे जाणवणे : रुद्र स्वाहाकाराच्या वेळी यज्ञकुंडात आहुती देतांना प.पू. डॉक्टरांच्या संरक्षणासाठी जागृत झालेले शिवतत्त्व ब्रह्मांडातील शिवतत्त्वाला साद घालत आहे आणि ते रामनाथी आश्रमाच्या पवित्र भूमीवरील यज्ञकुंडात खेचले जात आहे, असे मला संपूर्ण रुद्रयाग होईपर्यंत जाणवत होते.
२. बगलामुखी ब्रह्मास्त्रयाग
२ अ. बगलामुखी ब्रह्मास्त्रयागाच्या वेळी पू. (सौ.) गाडगीळकाकू आणि पू. (सौ.) बिंदाताई देवी असल्याचे जाणवणे : ३१.५.२०१६ या दिवशी रामनाथी आश्रमात बगलामुखी ब्रह्मास्त्रयाग करण्यात आला. त्या वेळी माझ्या समोरच्या दिशेला महर्षींच्या लाडक्या कार्तिकपुत्री पू. (सौ.) अंजली गाडगीळकाकू आणि उत्तरापुत्री पू. (सौ.) बिंदाताई बसलेल्या होत्या.

काळ आणि भगवंताचे अनुसंधान !

प.पू. परशराम पांडे
१. काळाचे आयुष्य
     काळाचे आयुष्य केवळ एक क्षण आहे. क्षण क्षण मिळून काळ होतो. प्रत्येक क्षणाला काळात पालट होतो.
२. आयुष्यात मिळालेल्या प्रत्येक क्षणी भगवंताशी अनुसंधान
साधूनच जीवनाची वाटचाल करणे आवश्यक !
     सध्याचे आयुष्य हे भगवंताच्या प्राप्तीसाठी मिळालेले आहे. तेव्हा गुरुकृपायोगाद्वारे साधना करून आपले भगवंतप्राप्तीचे ध्येय गाठणे आवश्यक आहे. यासाठी भूत किंवा भविष्य काळाचा विचार न करता आयुष्यात मिळालेला प्रत्येक क्षण म्हणजेच वर्तमानकाळ होय. हा प्रत्येक क्षण भगवंताशी अनुसंधान साधूनच जीवनाची वाटचाल केल्यास मायेची बाधा होत नाही. मायेशी बद्ध झाल्याने मन आणि बुद्धी यांची भगवंताकडे असणारी ओढ नाहीशी होते. सतत भगवंताच्या स्मरणात राहिल्याने आपले जीवन आनंदात जाते.
३. मृत्यूसमयी भगवंताचे स्मरण का करावे ?
     जो जीव मृत्यूसमयी भगवंताच्या स्मरणात रहातो, तो जन्म-मरणाच्या फेर्‍यांतून मुक्त होतो.

आरक्षकांनो, सनातन साधकांना काय शिकवत आहे, हे समजून घ्या !

सौ. तारा शेट्टी
     आज कोणत्याही हिंदु विरोधी व्यक्तीची हत्या झाली, तर सनातनच्या साधकांना लक्ष्य करण्यात येते. अशा वेळी माझ्या मनात आरक्षक (पोलिस) सनातनची शिकवण का पहात नाहीत ?, असा विचार येतो. सनातन साधकांना काय शिकवते ? सनातनचे साधक कुठेही, कोणालाही दुखवण्याचा विचारही करत नाहीत, तर चुकीची कृती करणे अशक्य आहे ?, असे वाटते. साधकांवर दोषारोप करणार्‍या आरक्षकांना आणि समाजालाही सनातन काय शिकवते, ते समजावे; म्हणून प.पू. गुरुदेवांच्या कृपेने ईश्‍वराने दिलेले विचार येथे मांडत आहे.
१. धर्माचरण शिकवणे
    आम्ही सर्वजण सनातनमध्ये येण्याआधी सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंतच्या सर्व कृती, म्हणजे आचार अयोग्य पद्धतीने करत होतो. यांमध्ये असात्त्विक वस्त्र धारण करणे, आहार-विहाराची पद्धत, बोलणे, स्नान करणे, घरातील केर काढणे, झोपणे अशा सर्व कृती अयोग्य पद्धतीने करत होतो. अशा अयोग्य कृतींमुळे कुठल्याना कुठल्या प्रकारे त्रास होत असे; परंतु सनातनने आम्हाला यात योग्य आणि आध्यात्मिक स्तरावर कृती करण्यास शिकवले. यामुळे आम्हाला आनंद मिळू लागला. सात्त्विक आचरणामुळे केवळ साधक नव्हे, तर समाजही आनंदी होतो. सनातनने आम्हाला धर्माचरण करायला शिकवले.
२. सर्वांमध्ये भगवंताला पहाण्यास आणि सतत देवाच्या अनुसंधानात रहाण्यास शिकवणे
     सनातन साधकांना सर्व परिस्थितींत, प्रसंगांत आणि साधकांमध्ये भगवंताला (श्रीकृष्णाला) पहायला शिकवते. त्यामुळे साधकांमध्ये व्यक्तींवर राग किंवा द्वेष करण्याचा विचार नसतो. साधनेमुळे साधकांमध्ये असलेला तमोगुण न्यून होऊन सत्त्वगुण वाढू लागतो; म्हणून त्यांनी कोणाविषयी वाईट विचार करणे, शक्य नाही. त्यामुळे इतरांना हानी पोचवण्याचा प्रश्‍नच उद्भवत नाही.

प्रती स्वर्ग भासणार्‍या रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात जाण्यापूर्वी केलेले भावजागृतीचे प्रयत्न आणि आश्रमात गेल्यानंतर देवतांच्या दर्शनाच्या आलेल्या अनुभूती !

सौ. सुशीला पाटील
१. आश्रमात जाण्यापूर्वी
१ अ. श्रीविष्णूच्या मंदिरात नेण्यासाठी प्रसाद
सिद्ध करत आहे, असा भाव ठेवून लाडू करणे
     सनातनच्या रामनाथी, गोवा येथील आश्रमात नेण्यासाठी लाडू करतांना माझ्या मनात मला श्रीविष्णूच्या मंदिरात जायचे आहे आणि त्यासाठी मी प्रसाद सिद्ध करत आहे, असा भाव होता. प्रसाद अधिकाधिक चांगला होण्यासाठी मी देवाला आळवत, भावपूर्ण प्रार्थना करत होते.
१ आ. १५ वर्षांचा वनवास संपून माहेरी (रामनाथी आश्रमात)
जायला मिळाल्याने देवाप्रती कृतज्ञता वाटणे
     आश्रमात जाण्याच्या आदल्या रात्री मला झोप लागली नाही. देवाविषयी कृतज्ञता वाटत होती. मी १५ वर्षे वनवासात होते. आता माहेरी जात आहे, असा माझा भाव होता. माझा वनवास प.पू. डॉक्टरांनी संपवला, असे वाटत होते. माझ्या मनात घरातील विचार येत नव्हते. प्रवासात स्वतःसाठी काही खाऊ घ्यायचा आहे, हेही माझ्या लक्षात आले नाही. इतरांनी सांगितल्यावर रात्री पुष्कळ उशिरा स्वतःसाठी खाऊ घेतला.
१ इ. आगगाडी (रेल्वे) म्हणजे श्रीकृष्णाने पाठवलेला रथ आहे, असा भाव ठेवून प्रवासात व्यष्टी
साधनेचे सर्व प्रयत्न भावपूर्णरित्या करणे
     मी आगगाडी (रेल्वे) म्हणजे श्रीकृष्णाने पाठवलेला रथ आहे, असा भाव ठेवला होता. आगगाडीत माझा अखंड नामजप होत होता. मी मानसपूजा केली. प.पू. डॉक्टरांची सूक्ष्मातून आरती केली. त्यांना श्रीकृष्णासारखा पिवळा शेला आणि निळे वस्त्र (सोवळे) नेसवले.

साधिकेला सकाळी स्वप्नावस्थेत सद्गुरु (सौ.) गाडगीळकाकू पूजा करत असलेल्या एका मंदिरावर गरुड घिरट्या घालत आहे, असे दिसणे

कु. अमृता मुद्गल
     १४.९.२०१६ या दिवशी सकाळी ७ वाजता मला एक स्वप्न पडले. त्यात मला सद्गुरु गाडगीळकाकू (सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ) एका मंदिरात देवाची पूजा करत आहेत आणि अनुमाने ५ फूट लांबीचा एक चॉकलेटी रंगाचा गरुड त्या मंदिरावर प्रदक्षिणा घातल्याप्रमाणे घिरट्या मारत आहे, असे दिसले. त्या गरुडाच्या मानेचा रंग पांढरा आणि चोचीचा रंग पिवळा होता. मला स्वप्नातून जाग आल्यावर पुष्कळ आनंद झाला आणि माझे मनही पुष्कळ उत्साही झाले. खरेतर मी कधीही गरुड पाहिला नव्हता; पण देवाने मला स्वप्नात गरुडाचे दर्शन घडवले, यासाठी मी देवाच्या चरणी अनंत कोटी कोटी कृतज्ञ आहे.
     (गरुड हे श्रीविष्णूचे वाहन आहे. तसेच सकाळी स्वप्नावस्थेत मंदिर, संत आणि गरुड यांचे दर्शन होणे, ही अनुभूती आगामी काळात घडणारी शुभघटना सूचित करते. - संकलक)
- कु. अमृता मुद्गल (वय १४ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१४.९.२०१६)प.पू. गुरुदेवांना अपेक्षित अशी सेवा होण्यासाठी धडपडणारे ६१ टक्के पातळीचे श्री. प्रकाश सुतार !


श्री. प्रकाश सुतार
१. प्रगतीची पूर्वसूचना
     एक मासापासून (महिन्यापासून) दादांची सेवेची तळमळ आणि गुरूंचे मन जिंकण्याची ओढ त्यांच्या कृतीतून दिसत होती. तेव्हा दादांची लवकर प्रगती होईल, असा विचार माझ्या मनात आला. त्यानंतर त्यांची ६१ टक्के आध्यात्मिक पातळी झाल्याचे एका भावसत्संगात घोषित करण्यात आले.
२. गुणवैशिष्ट्ये
२ अ. परिपूर्ण सेवा करण्याची तळमळ : श्री. प्रकाशदादांशी माझा बर्‍याच वेळा सेवेनिमित्त संपर्क येतो. त्यांना सेवेची पुष्कळ तळमळ आहे. ते मला भेटले की, सेवा आणि साधना यांचे दृष्टीकोन सांगतात. ते सेवा प.पू. गुरुदेवांना अपेक्षित अशी होण्यासाठी काय करावे ?, तसेच ती बिनचूक, अल्प वेळेत आणि साधकांचा वेळ वाचवून कशी करता येईल ?, यांसाठी ते सतत प्रयत्नरत असतात.
२ आ. नेतृत्वगुण : सेवा करतांना गुरुधनाचा अपव्यय होणार नाही, याची ते काळजी घेतात. स्वतःची सेवा चालू असतांना सहसाधकांच्या सेवेकडे त्यांचे लक्ष असते. त्यात काही सुधारणा करायची असल्यास ते लगेच त्यासंबंधी योग्य दृष्टीकोन देतात. तसेच सेवेत चूक आढळल्यास ते कोणताही दुरावा न ठेवता सांगतात.
- श्री. सुनील निनावे, भू, तालुका राजापूर, जिल्हा रत्नागिरी. (१९.२.२०१६)

प्रेमभाव आणि इतरांना साहाय्य करणे हे गुण असणारे ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. दादा (रामचंद्र) कुंभार !


श्री. रामचंद्र कुंभार
१. प्रगतीची पूर्वसूचना
     मी देवद येथील सनातन आश्रमातून रामनाथी आश्रमात आल्यावर त्यांना भेटलोेे. तेव्हा मला त्यांचा तोंडवळा पुष्कळ प्रमाणात उजळलेला दिसला आणि त्यांची प्रगती झाली आहे, असाही विचार मनात आला. त्यानंतर त्यांची ६१ टक्के आध्यात्मिक पातळी झाल्याचे एका भावसत्संगात घोषित करण्यात आले.
२. गुणवैशिष्ट्ये
२ अ. परिस्थिती स्वीकारणे : श्री. दादा (रामचंद्र) कुंभार हे लागवडमध्ये सेवा करतांना बर्‍याच वेळा एकटेच असतात. त्यांच्या साहाय्याला कुणी नसेल, तरी ते त्यांना जमेल तेवढी सेवा करतात. साहाय्याची आवश्यकता असतांना जर कुणाचे साहाय्य मिळू शकले नाही, तरी त्यांच्या मनात प्रतिक्रिया नसतात. ते भेटले की, सेवेविषयी बोलतात. त्यांच्या मनात सतत साधनेचेच विचार असतात.
२ आ. इतरांना साहाय्य करणे : दादांमध्ये प्रेमभाव आणि दुसर्‍याला साहाय्य करणे हे गुण आहेत. मी जेव्हा रामनाथी आश्रमात पहिल्यांदा आलो, तेव्हा मी त्यांना मला सनातनचे विकलांग अवस्थेतील संत पू. सौरभ जोशी (सौरभदादा) यांना भेटायचे आहे, असे सांगितले. त्यांनी लगेच साधकांशी संपर्क केला आणि दुसर्‍या दिवशी माझी पू. सौरभदादांशी भेट करून दिली.

सेवेला प्राधान्य देणारे आणि कृतज्ञताभाव असणारे अधिवक्ता समीर पटवर्धन !

अधिवक्ता समीर पटवर्धन
१. जवळीक साधणे
     अधिवक्ता समीर पटवर्धन साधकांची स्वतःहून ओळख करून घेतात. ते सर्वांशी सहजतेने बोलतात. त्यांना साधकांविषयी आदरभाव आहे. त्यांनी अल्प कालावधीत सर्वांशी जवळीक साधली.
२. प्रांजळ
     ते स्वतःतील दोष सहजतेने सांगतात, उदा. ते म्हणतात, मी घरी गेल्यावर भ्रमणभाषमधील लघुसंदेश पहात नाही.
३. सेवेला प्राधान्य देणे
अ. ते खटला लढण्यापूर्वी काहीच खात-पीत नाहीत. ते म्हणतात, आधी ते पूर्ण करायचे. मग मी निवांत बसून चहा-पाणी घेईन.
आ. कोठडीतील साधकाला नेहमी भेटावे लागते, त्यामुळे ते अनेकदा सकाळी सांगलीहून कोल्हापूरला येतात.
इ. एकदा ते कुटुंबियांसमवेत गावाला जाण्यासाठी चारचाकीत बसले असतांना त्यांना भ्रमणभाष आला की, त्यांना कोल्हापूरला जावे लागणार आहे. त्यांनी पत्नीला तसा निरोप देऊन सर्वांना गावी जाण्यास सांगितले आणि ते स्वतः कोल्हापूरला आले.
४. अल्प अहं
     एकदा अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी न्यायालयात सनातन संस्थेची बाजू प्रभावीपणे मांडली. तेव्हा समीर सरांनी भ्रमणभाष करून दादांचे कौतुक केले आणि मलाही त्यातून शिकायला मिळाले, असे सांगितले.
५. कृतज्ञताभाव
     ते आश्रमातील महाप्रसाद कृतज्ञताभावाने ग्रहण करतात.

प.पू. डॉक्टर, तुम्हीच मला देवाचे वेड लावले ।

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त...
कु. कविता कुलकर्णी

प.पू. डॉक्टर, तुम्हीच मला जगवले ।
तुम्हीच माझ्यातील अहंला मारले ॥ १ ॥

तुम्हीच मला घडवले ।
तुम्हीच मला देवाचे वेड लावलेे ॥ २ ॥

तुम्हीच मला रडवले ।
तुम्हीच मला हसवले ॥ ३ ॥

तुम्हीच मला हरवले ।
तुम्हीच मला जिंकवले ॥ ४ ॥

तुम्हीच मला नमवले ।
तुम्हीच मला बोलवले ॥ ५ ॥

तुम्हीच मला गुणांनी सजवले ।
तुम्हीच मला समर्पिले ॥ ६ ॥

तुम्हीच मला बोलते केले ।
तुम्हीच मला निःशब्द केले ॥ ७ ॥

तुम्हीच मला सूक्ष्म शिकवले ।
तुम्हीच मला व्यापक व्हायला शिकवले ॥ ८

इतरांशी आपुलकीने वागणारा आणि बालपणापासून आध्यात्मिक उपायांची आवड असणारा ५३ टक्के आध्यात्मिक पातळीचा अन् उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला डोंबिवली (जिल्हा ठाणे) येथील चि. श्‍लोक घाडीगांवकर (वय ३ वर्षे) !

चि. श्‍लोक घाडीगांवकर
      आश्‍विन कृष्ण पक्ष षष्ठी (२१.१०.२०१६) या दिवशी डोंबिवली (जिल्हा ठाणे) येथील चि. श्‍लोक नीलेश घाडीगांवकर याचा तिसरा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्याच्या आई-वडिलांना लक्षात आलेली त्याची गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत. 
चि. श्‍लोक घाडीगांवकर याला वाढदिवसानिमित्त 
सनातन परिवाराच्या वतीने शुभाशीर्वाद !
१. गर्भारपण
अ. एरव्ही मला गर्भाची हालचाल जाणवायची नाही; पण प.पू. भक्तराज महाराज यांचे चरित्र हा ग्रंथ किंवा मारुतिस्तोत्र हा लघुग्रंथ पोटावर ठेवल्यावर गर्भाची हालचाल होत असे.

दुचाकी वाहनावर महत्त्वाचे साहित्य ठेवून इतरत्र गेल्याने साहित्य चोरीला जाण्याच्या संदर्भात झालेल्या गंभीर चुका

१. महत्त्वाची कागदपत्रे असणारी पिशवी बसस्थानकावर उभी
केलेल्या दुचाकीवर ठेवणे आणि ती पिशवी चोरीला जाणे
     पुण्यातील श्री. योगेश डिंबळे एका सेवेसाठी बसस्थानकावर गेले असता त्यांनी तेथे दुचाकी उभी करून त्यावर पिशवी ठेवली आणि ते एका सेवेसाठी अन्यत्र गेले. काही वेळानेे वाहनाजवळ आल्यावर त्यांना पिशवी चोरीला गेल्याचे लक्षात आले. या पिशवीत वाहन परवाना (लायसन्स्), पॅनकार्ड, क्रेडीट आणि डेबिट कार्ड, गुरुपौर्णिमेच्या निमंत्रणपत्रिका, धर्मशिक्षणवर्गाचे साहित्य, तसेच समितीची कागदपत्रे अन् काही रक्कम आदी साहित्य होते. महत्त्वाची ओळखपत्रे चोरीला गेल्याने ती बनवण्यासाठी श्री. डिंबळे यांना पुन्हा वेळ द्यावा लागला.
२. वाहनावर पिशवी ठेवून साधिकेच्या घरी गेल्याने पिशवीतील
सनातन-निर्मित उदबत्तीची ५० पाकीटे चोरीला जाणे
     पुणे जिल्ह्यातील सौ. प्रीती कुलकर्णी एका साधिकेच्या घराबाहेर वाहन उभे करून आणि त्यावर उदबत्त्या असलेली पिशवी ठेवून काही वेळासाठी साधिकेच्या घरी गेल्या. ५ मिनिटांनंतर तेथून परत आल्यानंतर वाहनावर ठेवलेल्या पिशवीतून सनातन-निर्मित उदबत्तीची ५० पाकीटे चोरीला गेल्याचे लक्षात आले. सौ. कुलकर्णी यांच्याकडून अशीच चूक यापूर्वीही झाली आहे.
३. वाहनाच्या डिकीतून साहित्य काढल्यावर चावी डिकीलाच रहाणे
     संभाजीनगर येथील कु. चैताली डुबे आणि दादर (मुंबई) सेवाकेंद्रातील श्री. सतीश बांगर यांच्याकडून वाहनाच्या डिकीतून साहित्य काढल्यानंतर चावी डिकीलाच रहाण्याची चूक वारंवार होते.

आध्यात्मिक उपाय चालू असतांना उपाय करत असलेल्या साधकाशी आणि साधकांनी एकमेकांशी शक्यतो बोलू नये !

पू. डॉ. मुकुल गाडगीळ
साधकांना सूचना
     काही साधक आध्यात्मिक उपाय करत असलेल्या साधकाला मधेच येऊन काही विचारतात किंवा काही निरोप देतात. असे करणे अयोग्य आहे; कारण यामुळे उपायांमध्ये साधलेली एकाग्रता भंग होते. त्यामुळे त्या साधकाचे चित्त विचलीत होते आणि आध्यात्मिक त्रासामुळे पुन्हा मनाची एकाग्रता साधायला पुष्कळ वेळ लागू शकतो. तसेच नामजपामध्ये खंड पडल्याने त्या साधकाच्या त्रासाची तीव्रता वाढू शकते. वाईट शक्तींना त्रास वाढवण्यासाठी तेवढे निमित्त पुरते; म्हणून उपाय करत असलेल्या साधकाशी शक्यतो बोलू नये. तसेच एकत्रित उपाय करत असलेल्या साधकांनीही एकमेकांशी आवश्यक असल्यासच बोलावे. आपल्या बोलण्यामुळे इतरांचे लक्ष विचलीत होणार नाही, याची काळजी घ्यावी. काही तातडीचे असल्यास थोडक्यात बोलण्यास हरकत नाही.
- (पू.) डॉ. मुकुल गाडगीळ, महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय, गोवा. (१८.१०.२०१६)

साधकत्वाच्या वृद्धीसाठी मनावर नियंत्रण ठेवणे आवश्यक ! - रमानंद गौडा

उडुपी जिल्ह्यात साधनावृद्धी शिबीर
मार्गदर्शन करतांना श्री. रमानंद गौडा, मध्यभागी 
श्रीमती अश्‍विनी प्रभु आणि डावीकडे सौ. शोभा कामत
     करकळा (कर्नाटक) - कर्नाटकच्या उडुपी जिल्ह्यातील साधकांसाठी साधनावृद्धी शिबीर करकळा येथे नुकतेच पार पडले. या शिबिरामध्ये उडुपी, करकळा, मूदबिद्री, कुंदापूर येथील एकूण ३५ साधक सहभागी झाले होते. या वेळी शिबिरार्थींना व्यष्टी आणि समष्टी साधनेविषयी मार्गदर्शन करण्यात आले. या वेळी सनातन संस्थेचे कर्नाटक राज्य प्रसारसेवक आणि ६७ टक्के आध्यात्मिक स्तर असलेले श्री. रमानंद गौडा यांनी शिबिरार्थींना संबोधित केले. 
    श्री. गौडा म्हणाले, साधकत्वाच्या वृद्धीसाठी मनावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. आम्हाला सगुणाकडून निर्गुणाकडे नेणारे ५ बीज म्हणजे स्वभावदोष निर्मूलन, अहं निर्मूलन, नामजप, सेवाभाव आणि भावजागृती. साधकत्वाच्या वृद्धीसाठी या ५ बिजांचे रोपण आमच्यामध्ये झाले पाहिजे. मन हेच सर्व बंधनांचे कारण आहे. सेवेतून आपण साधकत्वाची वृद्धी करू शकतो. परात्पर गुरूंनी आम्हाला व्यष्टी साधनेविषयीची सूत्रे दिली आहेत. प्रत्येकाने ती आचरणात आणली पाहिजे. व्यष्टी साधनेतून आम्ही अध्यात्मामध्ये उन्नती करू शकतो.
       ज्यांना ध्येयाविषयी दृढ आस्था आहे, असे मूङ्गभर संकल्पनिष्ठ लोक इतिहासाचा प्रवाह पालटू शकतात. 
- दीपक सिंह (अभय भारत, १५ मे ते १६ जून २०१०)
       साधकांनो, तुम्ही राष्ट्र आणि धर्म यांसाठी सर्वस्वाचा त्याग करत आहात. त्यामुळे भगवंत तुम्हाला आपत्काळात तारून तर नेईलच; पण तो तुम्हाला आपले करून घेईल, याची खात्री बाळगा !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले
हास्यास्पद साम्यवाद !
       आई-वडिलांचेही आपल्या सर्व मुलांवर सारखे प्रेम नसते. असे असतांना साम्यवाद शब्दाला काही अर्थ आहे का ?
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले

बोधचित्र

॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज
 सनातनचे श्रद्धास्थान
आश्रमाविषयीचा दृष्टीकोन 
आश्रम माझा नाही; पण मी आश्रमाचा आहे. 
भावार्थ : ‘आश्रम माझा नाही’ म्हणजे आश्रमावर माझे स्वामित्व (मालकी) किंवा अधिकार (हक्क) नाही; कारण तो गुरूंचा आहे. ‘मी आश्रमाचा आहे’ म्हणजे मी गुरूंच्या आश्रमाचा असल्याने आश्रमाची, आश्रमात आलेल्यांची काळजी घेणार व सेवा करणार. या दृष्टीकोनामुळेच आश्रमातील कामे करूनही आश्रमाविषयी प्रेम निर्माण होत नाही, तर प्रीती निर्माण होते. 
 (संदर्भ : सनातनचे प्रकाशन ‘संत भक्तराज महाराज यांची शिकवण.’) 


॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥ 
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥ 

या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा
 आशीर्वाद प्राप्त होतो. - प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

जीवनाकडे पहाण्याचा दृष्टीकोन 
आध्यात्मिक प्रगती होऊ लागल्यावर माणसाचा जीवनाकडे पहाण्याचा 
दृष्टीकोन आपोआप बदलत जातो आणि शाश्‍वत सुखाच्या दिशेने त्याची वाटचाल सुरू होते. 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

करण जोहरचे नक्राश्रू !

संपादकीय
      पाकच्या विरोधात जनमत तीव्र झाले असतांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने हिंदी चित्रपटसृष्टीत पाक कलाकारांच्या प्रवेशाला विरोध केल्यानंतर आणि पाकच्या कलाकारांना पाकमध्ये परत जाण्याचे सांगितल्यावर या कलाकारांनी येथून पलायन केले; मात्र काही पाकप्रेमी निर्माते, दिग्दर्शक अद्यापही त्यांचे समर्थन करत आहेत. मनसेने पाक कलाकारांचा समावेश असलेल्या चित्रपटांना चित्रपटगृहात लावू देणार नाही, अशी चेतावणी दिल्याने पाक कलाकार असणारा करण जोहर याच्या ऐ दिल हैं मुश्किल चित्रपट प्रदर्शित करण्यावर प्रश्‍नचिन्ह लागले आहे.

तृणमूल काँग्रेसची गुंडगिरी !

संपादकीय
      बंगालमधील सत्ताधारी तृणमूल काँग्रेसची गुंडगिरी पुन्हा एकदा समोर आली आहे. तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी आसानसोल येथे एका भाजपच्या कार्यकर्त्याला मारहाण केल्यानंतर त्याला पहाण्यासाठी गेलेले भाजपचे खासदार आणि केंद्रीयमंत्री बाबुल सुप्रियो यांच्यावरही तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी आक्रमण केले. त्यांनी फेकलेला एक दगड सुप्रियो यांच्या छातीवर मर्मस्थानी बसल्याने ते घायाळ झाले. ही घटना सामान्य नाही. याकडे गांभीर्याने पहायला हवे. केंद्रातील एका मंत्र्यावर असे आक्रमण होणे, हे सुरक्षिततेच्या दृष्टीने घातक आहे. सामान्य कार्यकर्ते जर असे आक्रमण करू धजावू शकतात, तर आतंकवादी सहजपणे मंत्र्यांवर आक्रमण करून त्यांना ठार करू शकतात, हे लक्षात येते.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn