Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

कोटी कोटी प्रणाम !

सनातनचे २३ वे संत पू. विनायक 
रघुनाथ कर्वे यांचा आज वाढदिवस 
-------------------------------------------
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी

(म्हणे) राम आणि कृष्ण मांसाहारी होते !

  • काँग्रेसच्या मंत्र्यांकडून याहून वेगळे काय म्हटले जाणार ? अशा मंत्र्यांच्या विरोधात गुन्हा प्रविष्ट करून त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे ! काँग्रेसचे मंत्री अन्य धर्मियांच्या श्रद्धास्थानांच्या संदर्भात असे विधान करण्याचे धाडस कधीही करत नाहीत !
  • कर्नाटकच्या काँग्रेस मंत्र्यांचे धर्मद्रोही विधान !
       बेंगळुरू - श्रीराम, श्रीकृष्ण आणि वाल्मीकि या पौराणिक आणि धार्मिक व्यक्ती मांसाहारी होत्या, असे विधान कर्नाटकचे मंत्री प्रमोद माधवराज यांनी येथे केले. देशातील अन्न सवयीविषयी चालू असलेल्या चर्चासत्रांना अनुसरून मंत्र्यांनी जाणीवपूर्वक हे विधान केले आहे. उडुपी येथे महर्षि वाल्मीकि जयंती महोत्सवाचे उद्घाटन केल्यानंतर मंत्रीमहोदय बोलत होते. पुराणकाळामध्ये सर्वोत्कृष्ट ध्येय साध्य करण्याच्या मार्गात आजच्याप्रमाणे जात आड येत नव्हती. रामायण लिहिणारे वाल्मीकि हे कनिष्ठ जातीतील होते, तर महाभारताचे लेखक व्यास हे एका कोळी स्त्रीचे पुत्र होते, असे वक्तव्य माधवराज यांनी केले. (काँग्रेसमुळेच देशात जातीपातीचे राजकारण चालू झाले, काँग्रेसमुळे देशात आरक्षण नावाची विकृती चालू झाली आहे, हे माधवराज का सांगत नाहीत ? - संपादक)

धर्मादाय आयुक्त कार्यालयाने अंनिसवर गंभीर ताशेरे ओढलेले असतांना डॉ. हमीद दाभोलकर आणि अविनाश पाटील गप्प का ? - अभय वर्तक, सनातन संस्था

शासनाने अंनिसवर तात्काळ प्रशासक नेमावा ! 

श्री. हेमंत सोनावणे, श्री. अभय वर्तक आणि श्री. आेंकार डोंगरे

       सातारा - येथील सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयाच्या अधीक्षकांनी डॉ. दाभोलकरांच्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या संदर्भातील चौकशी अहवालात गंभीर ताशेरे ओढले आहेत. न्यासामधील घोटाळे पहाता विशेष लेखा परीक्षण (स्पेशल ऑडिट) करावे, ट्रस्टवरील गंभीर आरोपांची मोघम चौकशी केल्यामुळे पुन्हा फेरचौकशी करावी, असे सांगून त्यावर प्रशासक नेमावा, असेही नमूद केले आहे. हिंदु धर्मातील प्रत्येक रुढी-परंपरा यांच्या विरोधात सतत प्रसिद्धीच्या झोतात असणारे, स्वत:ला नेहमीच विवेकवादी म्हणवून घेणारे डॉ. हमीद दाभोलकर आणि अविनाश पाटील हे धर्मादाय आयुक्तांच्या गंभीर ताशेर्‍यांनंतर कोणत्या बिळात लपून बसले आहेत ? ते पत्रकार आणि समाज यांच्यासमोर येऊन उत्तरे देण्याचे धाडस का दाखवत नाहीत ? डॉ. हमीद दाभोलकर आणि अविनाश पाटील यांच्या या पलायनवादामुळेच अंनिसचा पुरोगामित्वाचा आणि बुद्धीप्रामाण्यवादाचा बुरखा फाटला आहे अन् त्यांचा घोटाळेबाज चेहरा समाजासमोर आला आहे. अंनिसचे घोटाळे इतके गंभीर आहे की, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीवर मुख्यमंत्र्यांनी तात्काळ प्रशासक नेमावा आणि सनातन संस्थेने वारंवार सांगितल्यानुसार दाभोलकरांच्या हत्येस त्यांच्या न्यासामधील आर्थिक गैरव्यवहार कारणीभूत आहेत का ?, याची कसून चौकशी करावी, अशी मागणी सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ता श्री. अभय वर्तक यांनी सातारा येथील पत्रकार परिषदेत केली. सातारा येथील सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयाच्या निरीक्षकांचा चौकशी अहवाल माहितीच्या अधिकारात उपलब्ध झाला असून त्यातून गंभीर सूत्रे समोर आली आहेत, असेही श्री. वर्तक यांनी या वेळी सांगितले. या पत्रकार परिषदेस श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्री. आेंकार डोंगरे आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. हेमंत सोनावणे उपस्थित होते.

काश्मिरी हिंदूंचे पुनर्वसन म्हणजे राष्ट्रीयत्वाला स्थान ! - राहुल कौल, अध्यक्ष, युथ फॉर पनून कश्मीर

डावीकडून सर्वश्री विजय पाटील, जगमोहन कौल, राहुल कौल,
सुनील घनवट, अधिवक्ता देवदास शिंदे आणि चैतन्य तागडे

  • २३ ऑक्टोबरला होणार्‍या सभेला उपस्थित रहाण्याचे आवाहन
  • पुणे येथे पत्रकार परिषद
       पुणे, १९ ऑक्टोबर (वार्ता.) - जिहादी आतंकवादामुळे वर्ष १९९० मध्ये लक्षावधी काश्मिरी हिंदूंना काश्मीरमधून विस्थापित व्हावे लागले. गेली २६ वर्षे ते आपल्याच देशात निर्वासितांसारखे दयनीय जीवन जगत आहेत. काश्मिरी हिंदूंनी त्यांचा सन्मान आणि राष्ट्रीयत्वाची भावना वाचवण्यासाठी धर्मांतराचा पर्याय स्वीकारला नाही. आतापर्यंतच्या राज्यकर्त्यांनी मात्र काश्मिरी हिंदूंच्या पुनर्वसनासाठी काही केले नाही. काश्मिरी हिंदूंचा हा नरसंहार केवळ धार्मिक कारणामुळे केला गेला. राजकीय पक्ष मात्र ते स्वीकारत नाहीत आणि काश्मिरी हिंदूंच्या विस्थापनाकडे राजकीय दृष्टीकोनातून पहातात. काश्मिरी हिंदूंचे पुनर्वसन म्हणजे काश्मीरमध्ये पुन्हा राष्ट्रीयत्वाला स्थान देण्यासारखे आहे, असे प्रतिपादन युथ फॉर पनून कश्मीरचे अध्यक्ष श्री. राहुल कौल यांनी केले. २३ ऑक्टोबर या दिवशी काश्मिरी हिंदूंच्या समर्थनासाठी विराट हिंदु धर्मजागृती सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या धर्मजागृती सभेची माहिती देण्यासाठी १९ ऑक्टोबर या दिवशी येथील श्रमिक पत्रकार संघात एका पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते. या प्रसंगी काश्मिरी हिंदु सभा, पुणेचे अध्यक्ष श्री. जगमोहन कौल; हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र राज्य संघटक श्री. सुनील घनवट, तसेच सदस्य श्री. चैतन्य तागडे; लष्कर-ए-हिंदचे प्रदेशाध्यक्ष अधिवक्ता श्री. देवदास शिंदे आणि हिंदु एकता आंदोलन पक्षाचे श्री. विजय पाटील उपस्थित होते.

हिंदू आणि हिंदु सैनिक पाकिस्तानला उद्ध्वस्त करतील !

आप्पाचीवाडी (जिल्हा बेळगाव) येथील 
श्री हालसिद्धनाथांच्या भाकणुकीतील भविष्यवाणी 

पालखी प्रदक्षिणेनंतर
प्रतिष्ठापना केलेली श्रींची मूर्
ती

      आप्पाचीवाडी (जिल्हा बेळगाव) - महाराष्ट्राचे सैनिक मृत्यूला घाबरणार नाहीत. हिंदू आणि हिंदु सैनिक पाकिस्तानला उद्ध्वस्त करतील. सीमा प्रश्‍न राज्यकर्त्यांच्या आणि लोकांच्या चर्चेत राहील. सीमा भागात मोठा गोंधळ माजेल. स्त्रीवर्ग राजकारणात बाजी मारेल. उसासाठी राज्यात मोठी आंदोलने छेडतील. भगवा झेंडा राज्य करेल. काँग्रेस पक्षात दोन पक्ष पडून झंझावात लागेल. पंच लोक दोन्हींकडून लाच घेऊन भांडणे लावतील, अशी भविष्यवाणी आप्पाचीवाडी (जिल्हा बेळगाव) येथील श्री हालसिद्धनाथांच्या यात्रेच्या वेळी करण्यात आली.
      श्री क्षेत्र आप्पाचीवाडी कुर्ली (तालुका चिक्कोडी, जिल्हा बेळगाव) येथील श्री हालसिद्धनाथ देवाच्या यात्रेचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे भाकणूक (भविष्यवाणी) ! आप्पाचीवाडी येथील श्री हालसिद्धनाथ मंदिरात १९ ऑक्टोबर या दिवशी पहाटे ५ वाजता श्री. भगवान डोणे महाराज (वाघापुरे) यांच्या माध्यमातून ही भाकणूक सांगण्यात आली. या वेळी आप्पाचीवाडी, कुर्ली, रायबाग, चिक्कोडी, निपाणी, संकेश्‍वर, कारवार, कोल्हापूर यांसह आदी गावांतील भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते.

भाजप राम मंदिरापासून पळ कसा काढू शकतो ? - डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी

        नवी देहली - अयोध्येत राम मंदिर उभारणे हे २०१४ च्या भाजपच्या घोषणापत्रातील प्रमुख सूत्र होते. आपण त्यापासून पळ कसा काय काढू शकतो ? आपल्याला हे आश्‍वासन पूर्ण केलेच पाहिजे, असे प्रतिपादन भाजपचे खासदार डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांनी केले.
        डॉ. स्वामी पुढे म्हणाले की, राम मंदिर बळजबरीने बांधावे, असे माझे म्हणणे नाही; मात्र त्यासाठी सर्वोच्च न्यायालयात जाऊन प्रयत्न केले पाहिजेत. न्यायालयाने यासंदर्भातील म्हणणे ऐकून घेतले पाहिजे आणि हे सूत्र निकाली काढले पाहिजे.

मुंबई पोलीस करण जोहरनिर्मित पाकिस्तानी कलाकार असलेल्या चित्रपटाला संरक्षण देणार !

मुंबई पोलिसांची ही भूमिका शत्रूराष्ट्राचा पुळका असणारी 
आणि देशद्रोह्यांना पाठीशी घालणारी आहे, असे वाटल्यास चुकीचे काय ?
     मुंबई - चित्रपट निर्माते मुकेश भट आणि फॉक्स स्टार इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी विजय सिंह यांनी मुंबई पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांची भेट घेतली. या वेळी करण जोहरनिर्मित ऐ दिल है मुश्किल या चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी त्यांनी सुरक्षा पुरवण्याची मागणी केली. त्यावर पोलीस आयुक्तांनी काही वेळ चर्चा केल्यावर चित्रपटाला सुरक्षा पुरवू, अशी ग्वाही भट यांना दिली. या वेळी सहपोलीस आयुक्त (कायदा-सुव्यवस्था) देवेन भारती उपस्थित होते. मुंबई पोलिसांच्या या निर्णयावर महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी असंतोष व्यक्त केला आहे.

चिनी बनावटीच्या बस्तूंवर बहिष्कार घालण्याचे वी फॉर सांगे या संघटनेचे आवाहन

राष्ट्रप्रेमी आवाहन करणार्‍या वी फॉर सांगे संघटनेचे अभिनंदन ! गावागावांतील संघटना असे आवाहन 
करतात; मात्र शासनाला शत्रूराष्ट्राच्या उत्पादनांच्या आयातीवर निर्बंध घालावेसे वाटत नाही, हे दुर्दैव !
चिनी आकाशकंदिल
      सांगे, १९ ऑक्टोबर (वार्ता.) - देशभक्त गोमंतकीय बांधवांनी धार्मिक उत्सवासाठी बाजारपेठेतून चिनी बनावटीच्या वस्तूंवर पूर्णपणे बहिष्कार घालून आतंकवादाविरुद्ध लढण्यास भारत शासनाला आपले सहकार्य देण्याचे आवाहन येथील वी फॉर सांगे (we for sange) या संघटनेने केले आहे. संघटनेने पुढे म्हटले आहे की, परदेशी बनावटीच्या वस्तू खरेदी करून आपण एकप्रकारे देशाविरुद्ध युद्ध पुकारणार्‍या राष्ट्रांना आर्थिक साहाय्य करत असतो. याचा विचार आपण बाजारपेठेत गेल्यावर करत नाही. दिवाळीचा सण साजरा करतांना आपण आकाशदिवे, पणत्या, विद्युत रोषणाई चिनी बनावटीच्या अशा वस्तू विकत घेऊन शत्रूराष्ट्रांना आपणच आर्थिकदृष्ट्या सक्षम करत असतो. चीनसारखा देश भारतातील बाजारपेठ बळकावत आर्थिक जाळे पसरवत आहे आणि यामधून मिळणार्‍या नफ्यातून भारताविरुद्ध कारवाया करण्यासाठी आतंकवाद्यांना पैसा पुरवत आहे.

चीनच्या निकृष्ट वस्तूंवर बहिष्कार घाला ! - तिबेटमधील सामाजिक कार्यकर्त्यांचे आवाहन

गोव्यात चिनी वस्तूंवर बहिष्कार घालण्याच्या प्रक्रियेला वेग !
तिबेटचे नागरिक शत्रूराष्ट्र चीनच्या विरोधात भारतात येऊन 
जागृती करतात; भारतीय मात्र स्वदेशातही अशी राष्ट्रप्रेमी कृती करत नाहीत ! 
       पणजी, १९ ऑक्टोबर (वार्ता.) - विस्तारवादी चीनने तिबेटचा भूप्रदेश गिळंकृत केला आहे. चीनचे परराष्ट्र धोरण शेजारील देशांना घातक आहे. अन्य देशांच्या साधनसंपत्तीची लूट करून निकृष्ट उत्पादनांची निर्मिती करणार्‍या आणि जगभरातील बाजारपेठ गिळंकृत करण्यासाठी टपलेल्या चीनच्या वस्तूंवर बहिष्कार घाला, असे आवाहन तिबेटच्या स्वातंत्र्यासाठी लढा देणार्‍या कार्यकर्त्यांनी १८ ऑक्टोबर या दिवशी पत्रकार परिषदेत केले.
     हे कार्यकर्ते म्हणाले, चीनमध्ये साम्यवाद्यांनी प्रचंड नरसंहार करून राजवट स्थापन केली. साम्यवादाचा पुरस्कार करणारा हा देश शेजारील देशांनादेखील सन्मानाने वागवत नाही. चीनचे परराष्ट्र्र धोरण आजूबाजूच्या देशांसाठी अत्यंत घातक आहे. स्वत:कडे अवाढव्य भूमी असतांनाही अन्य देशांच्या भूमी चीन बळकावत आहेत. तिबेटच्या भूमीवरदेखील चीनने उच्छाद मांडला आहे. तिबेटचे खनिज ओरबडून घेऊन त्याच्यापासून निकृष्ट दर्जाची उत्पादने बनवण्याचे चीनचे धोरण आहे. अशा चीनला गोव्यात अजिबात थारा देऊ नये. त्यांच्या वस्तूंवरदेखील बहिष्कार टाका.चीन ईस्ट इंडिया कंपनी होईल ! - पाकच्या खासदारांना भीती

      इस्लामाबाद - ईस्ट इंडिया कंपनी ही ब्रिटिशांची व्यापारी मोहीम होती. ते भारतात व्यापारी बनून आले होते. त्यानंतर त्यांनी राज्यकर्ते होण्याइतकी मजल मारली. त्यांनी भारतात साम्राज्य निर्माण होते. फाळणीपूर्वीची परिस्थिती पाकिस्तानवर चीनच्या माध्यमातून येऊ नये, अशी चेतावणी पाकिस्तानच्या खासदारांनी दिली आहे. या खासदारांनी इकॉनॉमिक कॉरिडॉर आडून चीनच्या वसाहतवादाची शक्यता व्यक्त केली आहे. 
    नियोजन आयोगाच्या स्थायी समितीचे अध्यक्ष खासदार ताहिर माशहादी म्हणाले की, सरकारने चीनसोबतचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प करत असतांना राष्ट्रहिताचे संरक्षण करण्यात कोठेही कमी पडता कामा नये. पाकिस्तान-चीन यांच्यातील मैत्रीचा आम्हाला अभिमान वाटतो; परंतु त्याआधी राष्ट्रहित सर्वोच्च आहे, याचा विसर पडता कामा नये. चीनवर सरकारने डोळे झाकून विश्‍वास ठेवू नये. चीनच्या साहाय्याने बनवण्यात येणार्‍या सीपीईसी प्रकल्पातील वीजनिर्मिती सामान्यांना परवडणारी असेल का, यावरून काही खासदारांनी सरकारला विचारणा केली. चीनकडून निधी घेण्याऐवजी सामान्य नागरिकांकडून प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणात पैसा घेण्यात आला आहे. ही गोष्ट आपल्यासाठी घातक ठरू शकते. हा राष्ट्रीय विकास आहे कि राष्ट्रीय आपत्ती, असा प्रश्‍न खासदार मशादी यांनी केला.

इसिसच्या कह्यातील मोसूल शहराला मुक्त करण्यासाठी अमेरिकेची मोठी सैनिकी मोहीम !

      वॉशिंग्टन - इसिसच्या कह्यातून इराकमधील मोसूल शहराला मुक्त करण्यासाठी अमेरिकेच्या नेतृत्वाखाली इराकी सैन्याने मोठ्या सैनिकी कारवाईला १८ ऑक्टोबरपासून प्रारंभ झाला आहे. मोसूलला मुक्त केल्यास तो इसिसचा मोठा पाडाव ठरेल, असे मत अमेरिकेच्या तज्ञांनी व्यक्त केले आहे. या शहराच्या मुक्ततेसाठी ४० सहस्राहून अधिक सैनिक शहरात घुसल्याने भीषण युद्धाला प्रारंभ झाला आहे. शहरातील लोकसंख्या १५ लाखांवर आहे. त्यांची तात्पुरती व्यवस्था करण्यात आली आहे. इराकमधील दुसरे मोठे शहर असलेल्या मोसूलमध्ये सुमारे ७ सहस्रांहून अधिक आतंकवादी दडून बसल्याची माहिती आहे. त्यांना ठार करण्यासाठी ही कारवाई असल्याचे व्हाइट हाऊसचे प्रसारमाध्यम विभागप्रमुख जॉश अर्नेस्ट यांनी सांगितले. मोसूलवरील कारवाई पूर्ण होण्यासाठी काही आठवडे देखील लागू शकतात, असा तर्क आहे. इसिसने मोसूलमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी मोसूल शहर रणनीतीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. इसिसच्या कह्यात रमादी आणि तिकरीत ही शहरे देखील आहेत. मोसूलमध्ये यश आल्यास रमादी आणि तिकरीत शहरांवर आक्रमण करण्यात येईल, असे अमेरिकेच्या अधिकार्‍यांनी सांगितले.

भूकग्रस्त देशांच्या सूचीत अग्रेसर रहाण्याची भारतावर ओढवलेली नामुष्की !

     जगभरातील भूकग्रस्त देशांच्या सूचीमध्ये एकूण ११८ देश अंतर्भूत असून त्यामध्ये भारताचा भूक निर्देशांक ९७ वर आहे. सर्वांत जलदगतीने वाढणारी एक अर्थव्यवस्था असल्याचा दावा करणारा भारत लहान मुलांचे पोषण करू शकत नाही, ही वस्तूस्थिती ग्लोबल हंगर इन्डेक्स (जीएच्आय) ने प्रसिद्ध केलेल्या अहवालातून परत एकदा जगासमोर आली आहे. या सर्वेक्षणात ० ते १०० अशा चढत्या क्रमांकाने देशांना क्रमांक दिले जातात. म्हणजे ज्या देशात उपाशी असणार्‍या लोकांची संख्या अल्प आहे, त्यांना वरचा (सुरुवातीचा) क्रमांक दिला जातो, तर ज्या देशांमध्ये उपाशी असणार्‍या नागरिकांची संख्या अधिक आहे, त्यांना खालचा (शेवटचा) क्रमांक देण्यात येतो. यावरून भारत ९७ व्या क्रमांकावर असणे, याचा अर्थ भारतात भूकग्रस्त असणार्‍या नागरिकांची संख्या अधिक आहे, असे म्हणावे लागेल. ग्लोबल हंगर इन्डेक्स ही संघटना विविध देशांतील भूक स्थितीचा आढावा घेऊन त्याविषयी आकडेवारीसह अहवाल प्रसिद्ध करते.

डिचोली, गोवा गृहनिर्माण वसाहतीसमोर शासकीय आदेशाला न जुमानता गेल्या दोन वर्षांपासून अनधिकृत मद्यालय चालूच

शासकीय आदेशाला न जुमानता मद्यालय चालूच रहाणे, हे प्रशासनाचे अपयश !
  • अनैतिक प्रकारांत वाढ 
  • वसाहतीतील रहिवासी त्रस्त
     डिचोली (वार्ता.) - डिचोली गृहनिर्माण वसाहतीसमोर शासकीय आदेशाला न जुमानता अनधिकृत मद्यालय गेल्या दोन वर्षांपासून चालू आहे. या मद्यालयामुळे तेथे अनैतिक प्रकारांत वाढ झाली असून वसाहतीतील रहिवासी यामुळे त्रस्त झाले आहेत. (दोन वर्षे अनधिकृत मद्यालय चालू असतांना प्रशासन काय करत आहे ? - संपादक)
सविस्तर वृत्त असे की,
१. सुमारे दोन वर्षांपूर्वी डिचोली गृहनिर्माण वसाहतीसमोरील एका घरात रॉक बार अ‍ॅन्ड रेस्टॉरंट हे मद्यालय चालू करण्यात आले. (घरात मद्यालय चालू करणारे नीतीमत्ताहीन मद्यालयचालक समाजाला कलंकच ! - संपादक)

शिग्ली (कर्नाटक) येथील धर्मसभेत पोलिसांकडून हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांचा छळ !

देशात आतंकवाद्यांनी उच्छाद मांडला असतांना राष्ट्र आणि धर्म 
यांचे कार्य करणार्‍या संघटनेच्या कार्यात अडथळा निर्माण करणारे पोलीस !
      शिग्ली (कर्नाटक) - येथे २ ऑक्टोबर या दिवशी हिंदु धर्मजागृती सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत पोलिसांकडून हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांना नाहक त्रास देण्यात आला, तसेच त्यांच्याकडून अयोग्य वर्तन करण्यात आले. (पोलिसांनी हिच शक्ती आतंकवाद्यांना पकडण्यासाठी वापरली असती, तर देश आतंकवादमुक्त होण्यास साहाय्य झाले असते - संपादक)
१. पोलिसांनी सभेच्या आदल्या दिवशी समितीच्या कार्यकर्त्यांना अनेक वेळा दूरभाष करून सभेच्या वक्त्यांच्या नावांची विचारणा केली. 
२. सभेच्या प्रारंभी सूत्रसंचालक व्यासपिठावरून बोलत असतांना हरित क्रांतीविषयी का बोलत आहात ? उगीच विनाकारण अन्य धर्मिंयांविषयी बोलून वातावरण बिघडवत आहात, असे एक पोलीस एका कार्यकर्त्याला सांगत होते. (धर्मांधांच्या सभांमध्ये जाऊन त्यांनी काय बोलावे अथवा बोलू नये, असा फुकाचा सल्ला पोलीस त्यांना देतात का ? हिंदु धर्मजागृती सभांमध्ये सत्य स्थिती सांगून हिंदूंचे प्रबोधन केले जाते. हे सत्य सांगण्यास पोलीस आडकाठी करतात, हे लक्षात घ्या ! - संपादक)

सोन्याचे दागिने आणि पैसे लुबाडल्याप्रकरणी कर्नाटक पोलीस हवालदाराच्या विरोधात गुन्हा प्रविष्ट !

जनतेचे रक्षक नव्हे, तर भक्षक पोलीस !
      कोलार (कर्नाटक) - गोव्यात एका घरामधून सोन्याचे दागिने आणि पैसे लुबाडल्याच्या प्रकरणी कर्नाटकातील एक पोलीस हवालदार आणि इतर एक व्यक्ती यांच्या विरोधात गुन्हा प्रविष्ट करण्यात आला आहे. हवालदार गोपाल सिंह आणि पोलीस शिपाई गजेंद्र त्यांच्या सादिक आणि जंबो या मित्रांसह एका फसवणुकीच्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी सुमो गाडीने १४ सप्टेंबर २०१६ या दिवशी गोव्यात गेले. तेथे ९ ऑक्टोबरपर्यंत थांबून फसवणुकीच्या प्रकरणातील आरोपी अजय कुमार यांना त्यांनी गाठले. गोपाल सिंह आणि सादिक यांनी अजय कुमार आणि त्यांच्या पत्नी यांना धमकावले आणि त्यांच्या घरातून रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने लुबाडले, असे सुमो गाडीचे चालक स्टॅलीन यांनी तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी कोलारच्या पोलीस अधीक्षक दिव्या व्ही. गोपीनाथ यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.भाजपचे नेते तथा केंद्रीयमंत्री बाबूल सुप्रियो दगडफेकीत घायाळ !

बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची गुंडगिरी ! 
केंद्रीयमंत्र्याला मारहाण करणार्‍या पक्षावर बंदी घालून येथील सरकार विसर्जितच करायला हवे ! 
     बंगाल - बंगालमधील आसनसोल येथील भाजप नेते आणि केंद्रीयमंत्री बाबूल सुप्रियो यांच्यावर तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आक्रमण केले. कार्यकर्त्यांनी केलेल्या दगडफेकीत छातीला दगड लागल्याने सुप्रियो घायाळ झाले. येथे तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांसमोरच एका भाजप नेत्याला बेदम मारहाण केली. या घटनेची माहिती मिळताच बाबूल सुप्रियो घटनास्थळी पोहोचले. त्या वेळी तेथील कार्यकर्त्यांनी त्यांना घेरले आणि त्यांच्या वाहनांच्या ताफ्यावर दगडफेक केली.

उत्तरप्रदेशमध्ये २६ घंट्यांत एका कैद्याचा मृत्यू होतो !

उत्तरप्रदेशमधील कारागृहांची दुःस्थिती ! 
      आग्रा - उत्तरप्रदेशमधील कारागृहामध्ये प्रत्येक २६ घंट्यांत एका कैद्याचा मृत्यू होतो, अशी माहिती माहिती अधिकाराच्या अंतर्गत उघडकीस आली आहे. मानवाधिकार कार्यकर्ते नरेश पारस यांनी विचारलेल्या प्रश्‍नात मिळालेल्या माहितीनुसार जानेवारी २०१० ते फेब्रुवारी २०१६ या ६ वर्षे १ महिन्यात २ सहस्र ६२ कैद्यांचा मृत्यू झाला. वर्ष २०१० ते २०१५ मध्ये ४४ कैद्यांनी कारागृहातच आत्महत्या केली, तर २४ कैद्यांचा पोलीस कोठडीत मृत्यू झाला आहे. कारागृहातील कैद्यांना पुरवण्यात येणारी पायाभूत वैद्यकीय सुविधा आणि त्यांच्यावर करण्यात येणार्‍या उपचारांकडे दुर्लक्ष करण्यात येते. कारागृहातील वातावरणामुळे कैदी आत्महत्येकडे वळतात. नरेश पारस यांनी राष्ट्रीय मानवाधिकार आयोग, उत्तरप्रदेशचे राज्यपाल आणि पंतप्रधान कार्यालय यांना पत्र लिहिले आहे.

रशिया पाकिस्तानला लढावू विमाने देणार नाही !

शस्त्रास्त्रांमध्ये भारताशी स्पर्धा करण्याची पाकिस्तानची मनोकांक्षा धुळीस मिळाली !
पाकिस्तानला आतंकवादविरोधी प्रशिक्षण देण्यासाठी संयुक्त सैन्य अभ्यास ! - रशिया
     पणजी - शस्त्रास्त्रांचा निर्माता असलेल्या रशियाने पाकिस्तानला नजीकच्या काळात कोणत्याही प्रकारची लढाऊ विमाने किंवा अन्य सैनिकी एअरक्राफ्ट देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे पाकिस्तानी वायूदलाच्या क्षमतेत वाढ होण्याची शक्यता अल्प झाली आहे. मागच्या काही दिवसांत पाकिस्तानसह झालेला एकत्रित सैन्य अभ्यास हा भारताच्या हिताच्या विरूद्ध नव्हता, तर पाकिस्तानमधील वाढत असलेला आतंकवाद निपटून काढण्यासाठी द्यावयाच्या प्रशिक्षणाचा भाग होता, असे रशियाच्या डिफेन्स कंपनी रोस्टेक कॉर्पोरेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी सर्गेई चेमेझोव यांनी स्पष्ट केले आहे. रशियाच्या मतानुसार, असे करून त्यांनी आतंकवादाच्या विरोधात कसे लढायचे ? याविषयी पाकिस्तानी सेनेला प्रशिक्षित केले आहे.

ओडिशामध्ये मेंदूज्वराच्या आजाराने ५४ मृत्यूमुखी !

     मलकानगिरी (ओडिशा) - जिल्ह्यातील मेंदूज्वरामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या ५४ वर पोचली आहे. जिल्ह्यातील मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. यू एस्. मिश्रा यानी सांगितले, जिल्हा मुख्यालयातील रुग्णालयामध्ये अतीदक्षता विभागामध्ये उपचार चालू असलेल्या एका मुलीचा मृत्यू झालेला आहे. ही मुलगी पहाडी प्रदेशात रहाणारी होती. तिच्या मृत्यूमुळे मृतांची संख्या ५४ झाली आहे. आतापर्यंत जिल्हा मुख्यालयातील रुग्णालयात प्रविष्ट झालेल्या १८४ पैकी १०५ मुलांना औषधोपचार करून घरी पाठवण्यात आले आहे. डासांमुळे माणसे, विशेषत: मुलांमध्ये अनुमाने ३८ दिवसांपूर्वी हा धोकादायक आजार पसरलेला असून आदिवासीबहुल मलकानगिरी जिल्ह्यातील जवळपास ४५ गावे या आजाराने बाधित आहेत.

गुड मॉर्निंग ऐवजी हरि ओम म्हणा !

या विद्यालयाचा आदर्श देशातील इतर विद्यालयांनी 
घेतल्यास मुलांवर चांगले संस्कार होण्यास साहाय्य होईल !
केरळमधील चिन्मया विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी नवीन नियम 
     तिरुवनंतपुरम् (केरळ) - मुलांनी सकाळी शाळेत आल्यावर शिक्षक आणि वरिष्ठ कर्मचारी यांना अभिवादन करतांना गुड मॉर्निंग ऐवजी हरि ओम म्हटले पाहिजे, असा नियम येथील चिन्मया विद्यालयात करण्यात आला आहे. इंडिया टूडेनुसार शाळेच्या मुख्याध्यापिका प्रतिभा शर्मा यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. त्या म्हणाल्या, ही चिंन्मया संस्कृतीचा एक भाग आहे. या नियमांचे विद्यार्थी पालन करतील, अशी आशा आहे. याविषयी संकेतस्थळावर म्हटल्याप्रमाणे हा नियम पालन करण्यासाठी कोणत्याही विद्यार्थ्याला आग्रह करण्यात आलेला नाही.

पंतप्रधान मोदी यांच्यामुळे पाकिस्तान जागतिक पातळीवर वेगळा पडण्याच्या उंबरठ्यावर ! - पाकिस्तानचे प्रमुख वृत्तपत्र द नेशनची पाकिस्तान सरकारला चेतावणी

पाकिस्तानी वृत्तपत्रांच्या सूचना शरीफ सरकार मनावर 
घेईल कि भारतावर कुरघोडी करण्याचे कार्य चालूच ठेवेल ?
पाकिस्तान सरकारचे त्यांच्याच वृत्तपत्राने कान टोचले !
     इस्लामाबाद - भारताचे पंतप्रधान नरेंद मोदी अतिशय जिद्दी असून त्यांच्या व्युहरचनेमुळे पाकिस्तान जागतिक पातळीवर वेगळा पडण्याच्या उंबरठ्यावर आहे. त्यांनी पाकिस्तानात होणारी सार्क परिषद रहित केली. आपल्या कलाकरांना भारतात बंदी केली गेली. ते कोणत्याही आंतरराष्ट्रीय पातळीवर आपल्याला उभे राहू देत नाहीत. अजूनही वेळ गेलेली नाही. शरीफ सरकार आणि पाक सैन्य यांच्याकडून चांगले अन् वाईट आतंकवादी यांत करण्यात येत असलेला भेद थांबवायला हवा, अशी चेतावणी पाकिस्तानातील प्रमुख वृत्तपत्र द नेशनने पुन्हा एकदा पाक सरकारला दिली आहे.

तीन वेळा तलाक म्हणण्याच्या सूत्रावरून काँग्रेसमध्ये मतभेद !

एका सूत्रावर एकमत होऊ न शकणारी काँग्रेस देश एकसंध काय ठेवणार ?
      नवी देहली - समान नागरी कायदा आणि तीनदा तलाक म्हणणे, या सूत्रावर काँग्रेसने सर्वोच्च न्यायालयाचा निकाल स्वीकारला जाईल, असे म्हटले आहे; मात्र काँग्रेसमध्ये नुकतेच प्रवेश केलेले माजी खासदार ओबेदुल्ला आझमी यांनी केंद्र सरकारच्या या विषयाच्या संदर्भातील भूमिकेचा विरोध करण्याचे घोषित केले. (मुसलमान कुठल्याही पक्षाचे नेते असतोत, ते प्रथम मुसलमान असतात आणि ते भारतीय कायद्यांपेक्षा धर्माने घालून दिलेल्या कायद्यालाच प्राधान्य देतात, हे यातून दिसून येते ! - संपादक) येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत आझमी बोलत होते. या वेळी काँग्रेसचे अन्य नेतेही उपस्थित होते. त्यापैकी गुलाम नबी आझाद यांनी पुन्हा या विषयावर न्यायालयाच्या निकालाची आम्ही वाटत पहात आहोत, असे म्हटले. (पक्षाच्या धोरणांच्या विरुद्ध भूमिका घेणार्‍या नेत्याला काँग्रेसमधील एकही नेता विरोध करत नाही, हे लक्षात घ्या ! - संपादक) त्यामुळे काँग्रेसमधील मतभेद दिसून आला.

उडुपी येथील श्री पेजावर अधोक्षजा मठाचे संकेतस्थळ पाककडून हॅक !

भारतीय आस्थापनांची संकेतस्थळे पाकचे चाचे हॅक 
करत असतांना त्यांना रोखण्यासाठी शासन उपाययोजना काढणार का ?
      उडुपी (कर्नाटक) - येथील परयाया श्री पेजावर अधोक्षजा मठाचे संकेतस्थळ पाकिस्तान सायबर प्रोफेशनल्स्नी हॅक केल्याचा दावा मठाच्या व्यवस्थापकांनी केला आहे. याविषयी मठाचे व्यवस्थापक रघुराम आचार्य यांनी पोलिसांत तक्रार केली आहे. संकेतस्थळ हॅक झाल्याचे कळताच संकेतस्थळ बनवून देणार्‍या संबंधित आस्थापनाला सूचित करण्यात आले. या आस्थापनाने समस्या सोडवली असून संकेतस्थळाला मूळ रूप प्राप्त करून दिले आहे. मठाच्या व्यवस्थापनाने केलेल्या तक्रारीनुसार अन्वेषण चालू आहे. या प्रकरणी गुन्हा आढळून आल्यास प्रथमदर्शी अहवाल (एफ्आयआर्) नोंदवण्यात येणार आहे, असे उडुपीचे उपअधीक्षक कुमारस्वामी यांनी सांगितले.

पाककडून भारतीय सैन्यातील शिखांना भडकवण्याचे षड्यंत्र !

डावपेचात भारतापेक्षा हुशार असणारा पाक !
        कोलकाता - पाककडून आता भारतीय सैन्यातील शिखांना भडकवण्याचा प्रयत्न होत असल्याचे समोर आले आहे. पाकने एका अफवेद्वारे हा प्रयत्न केला आहे. पाकच्या सैन्याकडून सामाजिक संकेतस्थळावरून भारतातील बलबीर सिंह नावाच्या सैनिकाने आत्महत्या केल्याचे म्हटले आहे. पाकविषयीचे प्रेम, पाकविरोधात युद्ध न करण्याची भूमिका आणि हिंदूंकडून होणारा अत्याचार यांमुळे या सैनिकाने आत्महत्या केल्याची अफवा याद्वारे पसरवण्यात येत आहे. यामुळे भारतीय सैन्य सतर्क झाले असून त्यांनी सर्व प्रमुखांना याविषयी सतर्क केले आहे. तसेच त्यांना याविषयीची सत्य माहितीही दिली आहे. सैन्यातील बलबीर सिंह नावाच्या कोणत्याही सैनिकाने आत्महत्या केली नसल्याचे भारतीय सैन्याने म्हटले आहे. तसेच आतापर्यंत कोणत्याही सैनिकाने पाकविरोधात कारवाई करण्याला विरोध केलेला नाही.

पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू यांच्या जामिनावरील याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने राजस्थान सरकारकडून उत्तर मागितले !

       नवी देहली - कथित लैंगिक शोषणाच्या आरोपाखाली ३ वर्षे अटकेत असणारे पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू यांनी सर्वोच्च न्यायालयात जामिनासाठी याचिका दाखल केली आहे. यावर न्यायालयाने राजस्थान सरकारकडून उत्तर मागितले आहे. पू. आसारामजी बापू यांचे अधिवक्ता सोली सोराबजी यांनी म्हटले की, पू. बापू ३ वर्षांपासून कारागृहात असल्याने त्यांना जामीन मिळायला हवा. अंतरिम जामिनासाठीच्या याचिकेवर २४ ऑक्टोबरला, तर नियमित जामिनासाठी नंतर सुनावणी करण्यात येईल, असे न्यायालयाने म्हटले आहे.

खाजगी जागेतील किल्ल्यांना शासनाने राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित करावे - प्रशांत जुवेकर, हिंदु जनजागृती समिती

जळगाव येथील राष्ट्रीय हिंदू आंदोलनात हिंदुत्वनिष्ठ संघटनांची शासनाकडे मागणी ! 
आंदोलनात सहभागी हिंदुत्वनिष्ठ
     जळगाव - छत्रपती शिवाजी महाराजांच्या २३ किल्ल्यांवर त्वरित कारवाई करत जरी गडकोटांची मालकी खाजगी असली, तरी कायद्यानुसार राज्यसंरक्षित स्मारक घोषित करावे. राज्य संरक्षित स्मारक झाल्यावर त्यात कोणतेही पालट मालकाला करता येत नाहीत. संबंधित गड राज्य संरक्षित स्मारक करण्याविषयीचा निर्णय पूर्णतः मंत्रालयाच्या अधीन आहे. त्यामुळे या मागणीकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे श्री. प्रशांत जुवेकर यांनी केले. येथे झालेल्या राष्ट्रीय हिंदू आंदोलनात ते बोलत होते. 

शिक्षणाधिकार्‍यांनी दप्तराचे ओझे उचलावे म्हणजे विद्यार्थ्यांच्या व्यथा कळतील !

मुंबई उच्च न्यायालयाने शिक्षण विभागाला सुनावले खडे बोल ! 
जे न्यायालयाला कळते, ते शिक्षण विभागाला का कळत नाही ? 
     मुंबई - विद्यार्थ्यांच्या दप्तराच्या ओझ्याविषयी मुंबई उच्च न्यायालयाने चिंता व्यक्त करत शिक्षण विभागाच्या अधिकार्‍यांनी प्रतिदिन असे ओझे उचलावे म्हणजे त्यांना विद्यार्थ्यांच्या ओझ्याची जाणीव होईल, अशा शब्दांत न्यायमूर्ती विद्यासागर कानडे यांच्या अध्यक्षतेखालील खंडपिठाने शिक्षण विभागाला खडे बोल सुनावले. त्याचप्रमाणे 'दप्तराचे ओझे' अल्प करण्यासाठी काय केले, याचा अहवाल २६ ऑक्टोबर या दिवशीच्या सुनावणी वेळी सादर करण्याचे आदेशही सरकारला दिले. स्वाती पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या दप्तराच्या ओझ्याविषयी उच्च न्यायालयात जनहित याचिका केली असून त्याची सुनावणी १७ ऑक्टोबर या दिवशी झाली. त्या वेळी न्यायालयाने हे आदेश दिले. 

तलवारी घेऊन फिरणार्‍या अकरा धर्मांधांवर सोलापुरात गुन्हा प्रविष्ट !

'हा भारत आहे कि पाक, असे वाटावे', असे वातावरण ठिकठिकाणी निर्माण करणारे धर्मांध !
सोलापूर - येथील मोहमदीया मशिदीसमोर बेगमपेठ येथे तलवारी आणि लोखंडी सळ्या घेऊन त्या भागात दहशत निर्माण केल्याप्रकरणी अकरा जणांवर गुन्हा प्रविष्ट करण्यात आला आहे. शहरात जमावबंदीचा आदेश असतांनाही संशयित आरोपी सर्फराज हत्तुरे, मोहनीस मैंदर्गी, गुलाब मैंदर्गी, आसिफ हत्तुरे, अमिन कामले, अप्पा झिरपे, साहिल आरीफ मंगलगिरी, तोलन, जवाद एलाल बागवान, उमेर कामील मीरजकर, अजहर हत्तुरे यांनी हातात तलवारी आणि सळ्या घेऊन बेगमपेठ भागात दहशत निर्माण केली असल्याची तक्रार पोलीस शिपाई अभिजीत कोष्टी यांनी दिल्याने जेलरोड पोलीस ठाण्यात गुन्हा प्रविष्ट करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक श्री. बनकर करत आहेत.

राष्ट्राच्या परमवैभवासाठी टिळकांच्या विचारांचा संस्कार आवश्यक ! - डॉ. सच्चिदानंद शेवडेे

     सोलापूर - स्वराज्यासाठी ज्या क्रांतीकारकांनी रक्त सांडले, त्या रक्ताशी कृतघ्न होत असल्याचे सांगत सामाजिक संकेतस्थळाच्या माध्यमातून चुकीचा इतिहास पसरवला जात आहे. सुशिक्षित तरुण त्याची निश्‍चिती न करताच असे संदेश पुढे पाठवतात. राष्ट्राला परमवैभव आणण्यासाठी लोकमान्य टिळकांच्या विचारांचा संस्कार तरुण पिढीवर रुजवणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन डॉ. सच्चिदानंद शेवडे यांनी केले. येथे आयोजित एका कार्यक्रमातील 'स्वराज्य हा माझा.....' या घोषणेचे शताब्दी वर्ष या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, "हिंदूंमध्ये राष्ट्रीय ऐक्य निर्माण व्हावे, यासाठी टिळकांनी गणेशोत्सवाचा प्रारंभ केला; मात्र गणेशोत्सवात 'डीजे'च्या तालावर नाचत पत्यांचा डाव मांडला जातो. टिळकांना हे अभिप्रेत होते का ? याविषयी आत्मचिंतन करायला हवे."

स्त्रियांना स्वशक्तीची जाणीव होणे आवश्यक ! - आमदार (सौ.) मेधा कुलकर्णी

     पुणे, १९ ऑक्टोबर (वार्ता.) - स्त्री ही शक्ती असून प्रत्येक महिलेला त्याची जाणीव होणे आवश्यक आहे. राजकारणातील स्त्रियांनी आपल्या समाजातील वावराच्या संदर्भात सजग असले पाहिजे. समाजकारण आणि राजकारण करतांना कुटुंबाकडे दुर्लक्ष होता कामा नये. नेत्यांनी सार्वजनिक जीवनात वावरतांना त्यांच्याकडून चुका होणार नाहीत, याची काळजी घेतली पाहिजे, असे प्रतिपादन आमदार सौ. मेधा कुलकर्णी यांनी केले. शिक्षण मंडळाच्या सदस्या सौ. मंजुश्री खर्डेकर यांनी गणेशनगर आणि अलंकार पोलीस ठाणेे या ठिकाणी आयोजित केलेल्या भाजप महिला आघाडीच्या शाखांच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या.

भाजप युवा मोर्चाकडूनही पाकिस्तानी कलाकारांना विरोध

पाकिस्तानी कलाकारांचे चित्रपट प्रदर्शित केल्यास मल्टिप्लेक्स फोडण्याची धमकी 
     ठाणे, १९ ऑक्टोबर - पाकिस्तानी कलाकारांना भाजपच्या युवा मोर्चानेही विरोध दर्शवला आहे. 'ए दिल है मुश्किल' आणि 'रईस' या चित्रपटातील प्रक्षेपण थांबवण्यात यावे, असे निवेदनही ठाण्यातील विवियाना मॉलमधील मल्टिप्लेक्स चित्रपटगृहात देण्यात आले. भाजयुमोचे ठाणे शहर अध्यक्ष हृषिकेश आंग्रे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या या आंदोलनात भाजयुमो कार्यकर्त्यांनी पाकिस्तान मुर्दाबाद अशी घोषणाबाजी करण्यात आली. या वेळी त्यांनी चित्रपटाचे फलकही फाडले. तसेच 'पाकिस्तानी कलाकारांचे चित्रपट प्रदर्शित केल्यास मल्टिप्लेक्स फोडू', अशी धमकीही आंदोलकांनी दिली.

शिवाजीनगर (पुणे) येथील जिल्हा न्यायालयातून हत्या प्रकरणातील आरोपी पसार

पोलिसांची बेभरवशी आणि गलथान सुरक्षाव्यवस्था ! असे पोलीस आतंकवाद्यांना काय पकडणार ? 
उच्च न्यायालयाप्रमाणे सुरक्षा उपाययोजनेची अधिवक्ता आणि पक्षाकार यांची मागणी 
पुणे, १९ ऑक्टोबर - पूर्ववैमनस्यातून एका युवकाची हत्या केल्याप्रकरणी आरोपी सागर लबडे याला येथील शिवाजीनगर जिल्हा न्यायालयात १७ ऑक्टोबर या दिवशी उपस्थित करण्यात आले होते. लबडे याला न्यायालयात उपस्थित करण्यापूर्वी पोलिसांनी त्याच्या हातातील बेड्या काढल्या आणि त्यानंतर लबडे हा पोलिसांची दृष्टी चुकवून पसार झाला. (यावरून न्यायालयात पोलिसांचे अस्तित्व फक्त नावालाच असते, असे म्हटल्यास चुकीचे काय ? - संपादक) यामुळे न्यायालयातील सुरक्षाव्यवस्थेचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. यापूर्वीही न्यायालय कचेरीतून धारिका चोरीला जाणे, दुचाकी चोरीस जाणे असे अपप्रकार घडले आहेत. या पार्श्‍वभूमीवर पुणे बार असोसिएशन आणि अनेक अधिवक्ता यांनी न्यायालयाला उच्च न्यायालयाप्रमाणे सुरक्षा उपाययोजना आणि क्लोज सर्किट टीव्ही बसवण्याची मागणी केली आहे.

राहुल गांधी यांना गाढव म्हणणारे काँग्रेसचे आमदार पक्षातून निलंबित !

       रायपूर (छत्तीसगड) - छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री अजीत जोगी यांचे सहकारी आणि काँग्रेसचे आमदार आर.के. राय यांनी म्हटले की, राहुल गांधी गाढव आहेत, तर मी त्यांना घोडा कसे म्हणू ? या विधानानंतर राय यांना पक्षातून निलंबित करण्यात आले आहे. मी स्वतंत्र विचारांचा एक आदिवासी असून पक्षातून निलंबित करण्यात आल्याचे मला कोणतेच दु:ख नाही, अशी प्रतिक्रिया राय यांनी निलंबनानंतर दिली.

देशातील परिवर्तन एका नेतृत्वामुळे नाही ! - संघाचे सरकार्यवाह भैयाजी जोशी

       पुणे - देशात परिवर्तन एका नेतृत्वामुळे घडून आलेले नाही. सामान्य माणसाचे दायित्व ठरवण्यात आल्याने हे परिवर्तन झाले आहे, असे वक्तव्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भैयाजी जोशी यांनी केले. चेहरा नसलेली माणसे ही संघाच्या कामाची मोठी शक्ती असून हे कारखाने चालूच रहायला हवेत, असेही ते म्हणाले.

पूर्वीही पाकच्या विरोधात सैनिकी कारवाया झाल्या होत्या ! - परराष्ट्र सचिव एस्. जयशंकर यांची स्वीकृती

     पूर्वीही पाकच्या विरोधात सैनिकी कारवाई झाली आणि आताही सर्जिकल स्ट्राईक झाले; मात्र पाकपुरस्कृत आतंकवाद संपला नाही आणि अल्पही झाला नाही. त्यामुळे आता पाकला संपूर्ण नष्ट करणे हाच एकमेव पर्याय असून तो सरकारने अमलात आणावा ! 
     नवी देहली - परराष्ट्र सचिव एस्. जयशंकर यांनी 'भारतीय सैन्याने यापूर्वीही मर्यादित क्षमतेच्या आणि विशिष्ट लक्ष्यकेंद्री कारवाया केल्या होत्या; मात्र या वेळी पहिल्यांदाच सरकारने रणनीतीचा भाग म्हणून या कारवाईची माहिती सार्वजनिक केली; मात्र त्या वेळी आतंकवाद्यांचे तळ नष्ट करण्यात आले नव्हते', अशी स्वीकृती दिली. जयशंकर यांनी त्या कारवायांचा उल्लेख करतांना 'सर्जिकल स्ट्राईक' असे म्हटले नाही. १८ ऑक्टोबरला परराष्ट्रविषयक संसदीय समितीच्या झालेल्या बैठकीत जयशंकर यांनी ही स्वीकृती दिली. यामुळे काँग्रेसने यापूर्वी केलेला दावा खरा असल्याचे स्पष्ट झाले आहे. जयशंकर यांनी या बैठकीत २९ सप्टेंबरला झालेल्या सर्जिकल स्ट्राईकविषयी माहिती दिली. या वेळी परराष्ट्र समितीच्या सदस्यांनी सर्जिकल स्ट्राईकच्या पुराव्यांचीही मागणी केली; मात्र 'भारतीय सैन्य नियंत्रणरेषेपलीकडे पुरावे गोळा करायला गेले नव्हते', असे सरकारच्या प्रतिनिधींकडून सांगण्यात आले. या बैठकीला काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधीही उपस्थित होते; मात्र त्यांनी सरकारला एकही प्रश्‍न विचारला नाही. सूत्रांच्या माहितीनुसार काँग्रेसचे नेते सत्यव्रत चतुर्वेदी यांनी बैठकीच्या वेळी भारतीय सैन्याने पाकिस्तानविरुद्ध केलेला हा पहिलाच सर्जिकल स्ट्राईक आहे का, असा प्रश्‍न विचारला होता.

जळगाव जिल्हा कुपोषणाच्या विळख्यात !

जनतेला कुपोषित नव्हे, तर सशक्त, निरोगी आणि 
चारित्र्यसंपन्न बनवणारे राज्यकर्ते मिळण्यासाठी हिंदु राष्ट्राविना पर्याय नाही !
      जळगाव, १९ ऑक्टोबर (वार्ता.) - मागील सहा मासांतील कुपोषणाचा टक्का न्यून झाला असल्याचा दावा जिल्हा परिषदेने केला आहे; मात्र जिल्ह्यातील १ सहस्र ८४४ बालके अजूनही कुपोषणाच्या विळख्यात आहेत. कोट्यवधींचा व्यय केला जात असूनही विशेषत: पूरकपोषक आहारातून अंडी, केळी, फळे यांवर मोठा व्यय होऊनही प्रशासनाला कुपोषण दूर करण्यात यश आले नाही. (खरोखर निधीचा योग्य विनियोग झाला असता, तर प्रशासनाला आढावा देण्याची वेळ आली असती का ? - संपादक)
मंत्र्यांच्या मतदारसंघात कुपोषणाचे प्रमाण अधिक !
     जळगाव जिल्हयात कुपोषणाचे सर्वाधिक प्रमाण जामनेर तालुक्यात म्हणजेच एका मंत्र्यांच्या मतदारसंघात जास्त असल्याचे आढळून आले आहे.


भुसावळ रेल्वे प्रशासनाकडून अंध कर्मचार्‍याला रोखपाल पदावर पदोन्नती !

असे केवळ भारतातच घडू शकते !
      भुसावळ - भारतीय रेल्वेतील महत्त्वाचे म्हणून ओळखले जाणार्‍या भुसावळ रेल्वे प्रशासनाने अंध असलेल्या अख्तर हुसेन या कर्मचार्‍याला रोखपाल पदावर पदोन्नती दिलेली आहे. (अंध कर्मचार्‍याला रोखपाल पदावर नियुक्त करणारे रेल्वे प्रशासन खरोखर डोळस आहे का ? - संपादक)
       रेल्वे प्रशासनाच्या कार्मिक अधिकारी श्री. व्ही.एस्. वडनेरे यांच्या स्वाक्षरीने बदलीच्या निघालेल्या आदेशात स्पष्टपणे अंध असा उल्लेख करण्यात आला आहे. या आदेशात २५ व्या क्रमांकावर अख्तर हुसेन याचे नाव असून त्याची बदली जळगाव रेल्वे स्थानकावर रोखपाल म्हणून करण्यात आली आहे. हे अंध रोखपाल रोकड हाताळणी कशी करतील, असा साधा विचारही रेल्वे प्रशासनाने केलेला नाही. या हास्यास्पद आदेशाने भुसावळ रेल्वे प्रशासनाच्या कारभाराविषयी जनतेत संशय व्यक्त होत आहे.

विद्यार्थी-साधकांनो, दीपावलीच्या सुटीच्या काळात चैतन्यदायी आश्रमजीवन अनुभवून सर्वांगीण विकास साधणार्‍या विविध सेवांमध्ये सहभागी व्हा !

१. राष्ट्र आणि धर्म कार्यासाठी वेळ देणे, ही काळाची आवश्यकता !
      भावी आपत्कालीन स्थिती निर्माण होण्यापूर्वी धर्मप्रसार आणि सनातनच्या संशोधनाचे कार्य समाजापर्यंतच नाही, तर जगात सर्वत्र अधिकाधिक पोचवणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रत्येकाने स्वतःचे शिक्षण, तसेच अन्य व्यावहारिक कामे सांभाळून अधिकाधिक वेळ राष्ट्र आणि धर्म यांच्या कार्यासाठी देणे काळाची आवश्यकता आहे.
२. पालकांनो, १३ वर्षांपेक्षा अधिक वयाच्या साधक-पाल्यांना सुटीत आश्रमात पाठवा !
     थोड्याच दिवसांत शाळा आणि महाविद्यालये यांमधील विद्यार्थ्यांना दीपावलीची सुटी लागेल. या कालावधीत १३ वर्षांपेक्षा अधिक वयाच्या साधक-पाल्यांना सेवेत सहभागी होण्यासाठी सनातनच्या रामनाथी (गोवा), देवद (पनवेल) येथील आश्रमात अथवा मंगळुरू (कर्नाटक) सेवाकेंद्रात पाठवता येईल. आश्रमांमध्ये विविध सेवा उपलब्ध आहेत.
३. आश्रमातील सेवा
३ अ. सनातन-निर्मित ग्रंथांच्या संदर्भातील १. मराठी भाषेत टंकलेखन करणे
२. लिखाणाचे भाषांतर, तसेच भाषाशुद्धी करणे
३. ग्रंथसंरचना करणे
४. ग्रंथासाठीची मुखपृष्ठे बनवण्यासाठी संगणकीय छायाचित्रांवर काम करणे
५. रेखाचित्रे (आऊटलाईन्स्) सिद्ध करणे
६. सात्त्विक कलाकृती सिद्ध करणे
७. छायाचित्रांचे वर्गीकरण करणे
३ आ. नियतकालिक विषयक
१. वृत्तांचे संकलन करणे
२. विज्ञापनांची (जाहिरातींची) संरचना करणे
३ इ. ध्वनीचित्रीकरणाच्या संदर्भातील
१. चित्रीकरण करणे
२. छायाचित्रे काढणे
३. ध्वनीमुद्रण (रेकॉर्डिंग) करणे
४. चित्रीकरणाचे संकलन करणे
५. ध्वनीचित्र-चकत्या संगणकात घेतल्यावर त्यांची तपासणी

फटाक्यांद्वारे देवता आणि राष्ट्रपुरुष यांची होणारी विटंबना थांबवण्यासाठी पेण येथे निवेदन !

     
पोलीस निरीक्षकांना निवेदन देतांना कार्यकर्ते
     पेण -
देवता आणि राष्ट्रपुरुष यांची चित्रे असलेले फटाके फोडल्याने विटंबना होते. ती रोखण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने पेण येथील तहसीलदार श्रीमती वंदना मकु आणि पोलीस निरीक्षक जगदाळेसाहेब यांना निवेदन देण्यात आले.

काश्मीरमध्ये आतंकवाद्यांच्या तळांवरून चिनी झेंडा जप्त !

     जम्मू - काश्मीरच्या बारामुल्लामध्ये सैन्याने एका मोठ्या शोधमोहिमेनंतर ४४ जणांना अटक केली आहे. हे सर्व जण आतंकवादी कारवायांमध्ये सहभागी असण्याची शक्यता आहे. या कारवाईत आतंकवाद्यांच्या अनेक ठिकाणांचाही पत्ता लागला. त्यांच्याकडून चीन आणि पाकिस्तान यांचे झेंडे जप्त करण्यात आले आहेत. काश्मीरमधील आतंकवाद्यांकडे चीनचा झेंडा सापडण्याची ही पहिलीच वेळ आहेे. अटक करण्यात आलेल्यांकडून पेट्रोल बॉम्ब, जैश-ए-महंमदचे लेटरपॅड आणि भ्रमणभाष संच सापडले. सुरक्षादलांनी १७ ऑक्टोबरला १२ घंट्यांत ७०० घरांमध्ये शोधमोहीम राबवली.

कल्याण-डोंबिवलीतही ए दिल है मुश्किल प्रदर्शित होऊ देणार नाही ! - मनसे

      डोंबिवली - पाकिस्तानी कलाकार असलेला हिंदी चित्रपट ए दिल है मुश्किल हा कल्याण-डोंबिवलीतही प्रदर्शित होऊ देणार नसल्याची चेतावणी येथेही मनसेच्या वतीने देण्यात आली आहे. चित्रपट प्रदर्शित झाल्यास होणार्‍या सर्व परिणामांचे दायित्व चित्रपटगृह व्यवस्थानाचे राहील, असे डोंबिवली शहर मनसेने स्पष्ट केले आहे. यासंदर्भात डोंबिवलीतील पीव्हीआर मल्टिप्लेेक्सला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने निवेदन देण्यात आले.

फलक प्रसिद्धीकरता

काँग्रेसच्या अशा हिंदुद्वेषी नीतीपासून सावध रहा ! 
     'श्रीराम, श्रीकृष्ण आणि वाल्मीकि या पौराणिक आणि धार्मिक व्यक्ती मांसाहारी होत्या. रामायण लिहिणारे वाल्मीकि हे कनिष्ठ जातीतील होते, तर महाभारताचे लेखक व्यास हे एका कोळी स्त्रीचे पुत्र होते', असे वक्तव्य कर्नाटकचे मंत्री प्रमोद माधवराज यांनी येथे केले.

(म्हणे) आताचे सरकार भोंदूंच्या आश्रयाखाली काम करत आहे !- अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेस

५० वर्षे सत्तेवर असतांना अजित पवार यांनी 
शेतकरीहिताचे निर्णय घेतले कि त्यांना आत्महत्येस प्रवृत्त केले ?
      करमाळा (जिल्हा सोलापूर) - आमच्या सरकारने भोंदूबाबांच्या विरोधात कायदा केला; पण हे सरकार भोंदूंच्या आश्रयाखाली काम करत आहे. तसेच या सरकारने आतापर्यंत एकही निर्णय शेतकरी हिताचा घेतला नाही. हे सरकार शेतकरीविरोधी असून सध्याच्या काळात मंत्रालयात शेतकर्‍यांपेक्षा भोंदूबाबांचेच जास्त चालते. त्यामुळे सध्याचे सरकार भोंदूबाबाधार्जिणे आहे, असे विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केले. (हिंदु संतांना भोंदू संबोधणारे अजित पवार मदर तेरेसा यांना भोंदू म्हणत नाहीत. यावरून त्यांचा हिंदुद्वेषच दिसून येतो. - संपादक) करमाळा येथे राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता मेळावा मंगळवारी दुपारी पार पडला. त्या मेळाव्यात ते बोलत होते. या वेळी अनेक मान्यवर उपस्थित होते.

छत्रपती शिवरायांचा वारसा असलेले गडकोट सुरक्षित ठेवू न शकणार्‍या पुरातत्व खात्यालाच बंद करण्याची वेळ आली आहे ! - श्री. नितीन व्यास, हिंदु महासभा, अमरावती

हिंदु जनजागृती समिती आणि समविचारी 
हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने राष्ट्रीय हिंदू आंदोलन 
आंदोलनात सहभागी हिंदुत्वनिष्ठ
      अमरावती - सध्या आपण नवीन किल्ले बांधू शकत नाही; परंतु असलेल्या किल्ल्यांचे तरी जतन करायला हवे. किल्ल्यांवरील शिवरायांच्या आठवणी पुसल्या जात आहेत. असे असतांनाही पुरातत्व खाते स्वतः लक्ष घालून त्यांचे संरक्षण करत नाही. त्यामुळे आम्हाला आंदोलन करावे लागते, मग त्या पुरातत्व खात्याचे कामच काय ? ते खातेच बंद करण्याची वेळ आली आहे, असे प्रतिपादन येथील हिंदु महासभेचे श्री. नितीन व्यास यांनी केले. छत्रपती शिवाजी महाराजांचे २३ गडकोट अजूनही खाजगी मालमत्तेचा भाग आहेत. त्यांना पुरातत्व खात्याने स्वतःच्या कह्यात घेऊन संरक्षण द्यावे, तसेच चिनी बनावटीचे फटाके वापरू नयेत, या मागण्यांसाठी १८ ऑक्टोबरला दुपारी ४ ते सायंकाळी ६ या वेळेत राजकमल चौकात राष्ट्रीय हिंदू आंदोलन घेण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी हिंदु जनजागृती समिती, सनातन संस्था, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, श्री योग वेदांत सेवा समिती, भगवे वादळ या संघटनांसह एकूण ४२ कार्यकर्ते उपस्थित होते.

हिंदू तेजा जाग रे !

Jago ! : 
Ram, Krishna aur Valmiki manasahari the !
 - Congress ke mantri, Pramod Madhavraj, Karnatak 
 Yah hai Congress ki Hindudweshi neeti ! 

जागो ! :
 राम, कृष्ण और वाल्मीकि मांसाहारी थे ! 
- कांग्रेस के मंत्री प्रमोद माधवराज, कर्नाटक 
 यह है कांग्रेस की हिन्दूद्वेषी नीति !

भारताने ब्रिक्सपेक्षा बिमस्टेकवर लक्ष केंद्रित करावे !

ब्रिगेडियर (निवृत्त)
हेमंत महाजन
      गोव्यामध्ये पार पडलेल्या ब्रिक्स देशांच्या (ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका) आठव्या परिषदेचे वैशिष्ट्य म्हणजे या गटाचा सदस्य नसलेल्या पाकिस्तानवर दबाव वाढवण्यात भारताला काही प्रमाणात यश आले. त्या दृष्टीने परिषदेचा काळ भारताला अगदी अनुकूल ठरला. परिषदेपूर्वी भारतीय लष्कराच्या उरी येथील छावणीवर पाकिस्तानी आतंकवाद्यांनी जे आक्रमण केले आणि त्यात १९ सैनिकांची आहुती पडली, त्यापायी भारताने आतंकवादाचे सूत्र संपूर्ण ब्रिक्स परिषदेत सातत्याने लावून धरले.
१. चीनची प्रचंड निर्यात सर्वच व्यापार क्षेत्र व्यापून टाकेल अशी भिती !
      ब्रिक्स गटाचा मुख्य उद्देश परस्पर व्यापारी सहकार्याचा आहे; पण अलीकडच्या काळातील दोन घटनांमुळे या उद्देशाला थोडी खीळ बसली. एक म्हणजे चीनने व्यापारात वेगाने केलेली प्रगती ! वर्ष १९९१ मध्ये जागतिक निर्यातीत चीनचा वाटा अवघा दोन टक्के होता; पण वर्ष २०१३ मध्ये चीनने औद्योगिक निर्यात व्यापाराचा पाचवा भाग व्यापून टाकला होता. चालू सहस्रकाच्या पहिल्या दशकात जेव्हा ब्रिक्स गट उत्तमरित्या कार्यरत होता, तेव्हा अपेक्षा अशी होती की, चीनमुळे व्यापार क्षेत्रातली कोंडी फुटेल; पण या अपेक्षेचे रूपांतर आता एका भीतीत झाले आहे. चीनची प्रचंड निर्यात सर्वच व्यापार क्षेत्र व्यापून टाकेल कि काय, अशीच भीती सर्वांना वाटू लागलीे आहे.

हिंदु जीवन हिंदूंसाठीच दुर्मिळ !

१. हिंदुस्थानातच राहिलेला हिंदु 
अंतःकरणाने मात्र गोरा साहेब झालेला असणे
     आज भारतियांच्या घराघरातील तेजस्वी शिक्षणाचे, संस्काराचे निर्मळ निर्झर आटून कोरडे ठणठणीत झाले आहेत. हिंदुस्थानात, हिंदु घराण्यात, हिंदु म्हणून जन्मला, हिंदु म्हणून वाढला, हिंदुस्थानातच राहिला असला, तरी आज अंतःकरणाने तो हिंदु, गोरा साहेब झाला आहे.
२. मक्सम्यूलरने हिंदु धर्माचे मूळ 
असलेल्या वेदांनाच उखडून टाकणे
    ऋग्वेदाच्या अनुवादाविषयी मॅक्सम्यूलर हा पाश्‍चिमात्त्य विचारवंत आपल्या पत्नीला लिहिलेल्या पत्रात म्हणतो, वेद हेच हिंदूंच्या धर्माचे मूळ आहे. ... आणि तेच कसे हीन आहेत ?, हे मी दाखवतो आहे. माझी खात्री आहे की, तीन सहस्त्र वर्षांपासून जे जे या वेदापासून मोहरले आहे, त्या सर्वांचे मूळच मी उखडून टाकले आहे.

अभ्यास कसा करावा ?

परीक्षेच्या पार्श्‍वभूमीवर मुलांना मार्गदर्शक अशी लेखमालिका
       आजकाल बहुतेक मुले आईच्या आग्रहामुळे, बाबांच्या भीतीपोटी अन् एकमेकांमध्ये असलेल्या चढाओढीमुळे काहीशा तणावाखालीच अभ्यास करतांना दिसतात. अशा वेळी अभ्यास मनापासून होतोच, असे नाही. त्यामुळे परीक्षेत अपेक्षित यश मिळाले नाही की, दुःख होते. त्यामुळे मुलांनो, अभ्यास करण्यामागील योग्य दृष्टीकोन समजून घेतला, तर अभ्यास कंटाळवाणा न वाटता आनंददायी वाटेल. परीक्षेची भीती कशी घालवावी, उत्तरपत्रिका आत्मविश्‍वासाने कशी लिहावी, अभ्यासात एकाग्रता कशी साधावी आदींची माहिती सांगणारा हा लेखप्रपंच...

राष्ट्राची उन्नती आणि रक्षण यांसाठी अव्याहतपणे समाजप्रबोधन करणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज !

आज असलेल्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने...
१. भारतभर अध्यात्मिक, सामाजिक आणि 
राष्ट्रीय एकात्मतेचे प्रबोधन करणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज !
     राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे आधुनिक काळातील महान संत होऊन गेले. अडकोजी महाराज हे त्यांचे गुरू. विदर्भात त्यांचा विशेष संचार असला तरी महाराष्ट्रभरच नव्हे तर देशभर हिंडून त्यांनी अध्यात्मिक, सामाजिक आणि राष्ट्रीय एकात्मतेचे प्रबोधन केले. एवढेच नव्हे तर जपानसारख्या देशात जाऊन त्यांनी सर्वांना विश्‍वबंधुत्वाचा संदेशही दिला.
२. ग्रामोन्नती आणि ग्रामकल्याण होण्यासाठी ग्रामगीतेचे लेखन करणे
      भारत हा खेड्यांचा देश आहे, हे लक्षात घेऊन ग्रामविकास झाला की राष्ट्राचा विकास होईल, अशी त्यांची श्रद्धा आणि विचारसरणी होती. ग्रामोन्नती आणि ग्रामकल्याण हा त्यांच्या विचारसरणीचा जणू केंद्रबिंदूच होता. ं ग्रामगीतेचं लेखन हा त्यांच्या जीवनकार्यातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा ! खेडेगाव स्वयंपूर्ण कसं होईल, याविषयी त्यांनी जी उपाययोजना सुचविली, ती अतिशय परिणामकारक ठरली. ग्राम हे सुशिक्षित व्हावं, सुसंस्कृत व्हावं, ग्रामोद्योग संपन्न व्हावं, गावानेच देशाच्या गरजा भागवाव्यात अशीही त्यांची निष्ठा होती. तिचे प्रतिबिंब ग्रामगीतेत उमटले आहे.

आकाशवाणी दिशादर्शक व्हावी !

   आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून पर्सनॅलिटी टिप्स (व्यक्तीमत्त्वासंदर्भातील सूत्रे) हा प्रायोजित कार्यक्रम सादर केला जातो. यामध्ये व्यक्तिमत्त्व आकर्षक दिसण्यासाठी कुठल्या प्रसंगात कुठले कपडे वापरावेत, याविषयी मार्गदर्शन (?) करण्यात येते. अमुक मेजवानीत कुठल्या रंगाचा आणि कसा पेहराव करावा, कार्यालयात जातांना पोशाख कसा असावा, अशा प्रकारच्या श्रोत्यांनी विचारलेल्या प्रश्‍नांना या कार्यक्रमात उत्तरे दिली जातात. हा कार्यक्रम प्रायोजित असल्याने, तसेच प्रत्येक प्रसारमाध्यमाची स्वतंत्र ध्येयधोरणे असल्याने कुठला कार्यक्रम सादर केला जावा आणि कुठला नाही याविषयी सर्वसामान्य श्रोत्यांना अधिकार नसतात. असे असले, तरी लोकशाही व्यवस्थेत सरकारी यंत्रणा आणि सेवा यांचे दायित्व अधिक असल्याने आकाशवाणीच्या दर्जाविषयी अवलोकन होणे आवश्यक ठरते.
     हिंदुस्थानात सांस्कृतिक आधारावर राष्ट्राची कल्पना अतीप्राचीन आहे; परंतु राजनैतिक चेतनेची उणीव होती आणि आजही आहे. त्याचे दुष्परिणाम हिंदूंना वेळोवेळी भोगावे लागले आहेत. 
(अभय भारत, १५ मे ते १४ जून २०१०)

साधकांनो, मत्सरयुक्त विचारांमुळे होणारी स्वतःच्या साधनेची हानी टाळण्यासाठी योग्य दृष्टीकोन घेऊन कठोर प्रयत्न करा !

सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ
     काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर हे षड्रिपू प्रत्येकात अल्प-अधिक प्रमाणात असतात. ईश्‍वरप्राप्तीच्या प्रयत्नांत ते प्रमुख अडथळा ठरत असल्याने त्यांचे निर्मूलन करणे आवश्यक असते. मत्सर हा त्यातील सर्वांत घातक रिपू !
१. मत्सर निर्माण होण्याची कारणे आणि त्याची लक्षणे
     व्यक्तीचा स्वभाव एकलकोंडा असल्यास, तसेच मनमोकळेपणाने बोलण्याची सवय नसल्यास मत्सराचे विचार अधिक असतात, असे आढळते. इतरांशी तुलना झाल्यानंतर विचारांना योग्य दिशा न दिल्यास मत्सराच्या विचारांचा उगम होतो. इतरांचे चांगले झाल्यावर हेवा वाटणे, त्यांना मानसन्मान मिळाल्यावर अहं दुखावणे, ज्याच्या संदर्भात मत्सर वाटतो, त्यांचे वाईट चिंतणे ही मत्सराची लक्षणे आहेत.
२. साधकांच्या मनातील मत्सरदर्शक काही विचार
२ अ. अनेक दोष असूनही अमुक साधक जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त कसा झाला ?
२ अ १. अयोग्य विचार :
बर्‍याच साधकांच्या मनात अमुक साधकात अनेक स्वभावदोष आणि अहंचे पैलू आहेत, तरीही त्याची प्रगती कशी काय झाली ?, असे विचार येतात.
२ अ २. योग्य दृष्टीकोन : स्वतःला पालटण्याची तळमळ, ऐकण्याची अन् स्वीकारण्याची वृत्ती असेल, तर साधकांना अन्य स्वभावदोष आणि अहंचे पैलू यांवर सहजतेने मात करता येते. अशा साधकांमधील विविध गुणांच्या आधारे भगवंत त्यांची प्रगती करून घेतोे. त्यामुळे वरील बहिर्मुख विचारांऐवजी दोष असतांनाही त्यावर मात करून साधकाने कशी प्रगती केली ? ते जिज्ञासेपोटी जाणून घ्यावे आणि तसे प्रयत्न करावेत.
     एवढ्या चुका होऊनही काही साधकांना सेवेचे दायित्व पुन्हा का दिले जाते ?, असे विचार येत असतील, तरीही वरील दृष्टीकोन लक्षात घ्यावा.
२ आ. काहीही सेवा न करणार्‍या साधकांची आध्यात्मिक उन्नती कशी झाली ?
२ आ १. अयोग्य विचार :
बर्‍याच साधकांच्या मनात अमुक साधक काहीच सेवा करत नाहीत, तरी त्यांची आध्यात्मिक उन्नती कशी झाली ?, असा विचार येतो.
२ आ २. योग्य दृष्टीकोन : बर्‍याच साधकांना तीव्र शारीरिक आणि आध्यात्मिक त्रास असल्याने ते सेवा करू शकत नाहीत.

श्री बगलामुखी (ब्रह्मास्त्र) यज्ञाच्या प्रसंगी आलेल्या अनुभूती

सौ. वृंदा मराठे
१. श्री बगलामुखी (ब्रह्मास्त्र) यज्ञाच्या प्रसंगी आपोआप
श्री कुलदेवीचा नामजप चालू होणे आणि देवीचे तत्त्व प्रत्येक
साधकाला त्याच्या भावाप्रमाणे मिळते, असा विचार मनात येणे
     ७.१०.२०१६ या दिवशी रामनाथी (गोवा) येथील सनातन आश्रमात श्री बगलामुखी यज्ञ चालू होता. यज्ञस्थळी मी आध्यात्मिक उपायांना बसल्यावर माझ्याकडून आपोआप कुलदेवी श्री योगेश्‍वरीदेवीचा नामजप चालू लागला. तेव्हा मी नेहमीचा नामजप करण्याचा प्रयत्न करत होते; परंतु मला पुन्हा कधी कुलदेवीचा नामजप चालू व्हायचा ?, ते कळायचे नाही. दोन्ही दिवशी माझ्याकडून कुलदेवीचा नामजप झाला. कुलदेवतेचा नामजप सोडून कित्येक वर्षे झाली. आता मी प.पू. गुरुदेवांनी सांगितलेला काळानुसार नामजप करते; तरीही यज्ञाचे दोन दिवस माझ्याकडून कुलदेवीचा नामजप आपोआप चालू होण्याचे कारण देवीचे तत्त्व प्रत्येक साधकाला त्याच्या भावाप्रमाणे मिळते, हे असल्याचा विचार मनात आला.  
२. पूर्वी अन्य यज्ञांच्या ठिकाणी आध्यात्मिक उपायांसाठी बसल्यावर
डोके प्रचंड दुखणे; पण श्री बगलामुखी यज्ञस्थळी कोणताच त्रास न होणे
आणि यज्ञातून सकारात्मक ऊर्जा मिळत आहे, असे जाणवणे
     आतापर्यंत झालेल्या अन्य यज्ञांच्या प्रसंगी आध्यात्मिक उपायांसाठी बसल्यावर माझे डोके प्रचंड दुखत असे; परंतु श्री बगलामुखी यज्ञाच्या ठिकाणी मला कोणताच त्रास जाणवला नाही,

९.१०.२०१६ या दिवशी रामनाथी आश्रमात श्री बगलामुखी यज्ञाच्या वेळी आलेल्या अनुभूती

कु. युवराज्ञी शिंदे
१. अन्य वेळी नामजप करतांना मनात अनेक विचार येणे; पण
श्री बगलामुखी यज्ञाच्या ठिकाणी नामजप करतांना मन लगेचच एकाग्र
होणे आणि काही वेळाने संपूर्ण देह हलका झाला आहे, असे वाटणे
      ९.१०.२०१६ या दिवशी रामनाथी (गोवा) येथील सनातन आश्रमात श्री बगलामुखी यज्ञ चालू असतांना मी यज्ञस्थळी आध्यात्मिक उपायांना बसले होते. पूर्वी अन्य ठिकाणी नामजप करतांना माझ्या मनात अनेक विचार येत असत; पण आज यज्ञस्थळी नामजप करतांना प्रथम मनात अत्यंत अल्प विचार येत असल्याची पुसटशी जाणीव झाली आणि लगेचच माझे मन एकाग्र झाले. तेव्हा माझे लक्ष पुरोहित म्हणत असलेल्या मंत्रांकडेच जात होते आणि काही वेळाने माझा संपूर्ण देह हलका झाला आहे, असे वाटले.
२. मंत्रपठणाचे एक सत्र झाल्यावर मध्यंतराच्या वेळी मला डोळे
न उघडता शांतपणे त्याच स्थितीत बसून रहावे, असे वाटत होते.
३. मिरवणुकीत मोठमोठ्याने बॅण्ड वाजत असूनही मन आत स्थिर
होणे आणि त्या वेळी देवीने यज्ञात विघ्न आणण्यासाठीच हे इतक्या
जोराने बॅण्ड वाजवत आहेत, तरी तू डोळे उघडू नकोस, असे सांगणे
     आश्रमाच्या समोरच्या रस्त्यावरून जात असलेल्या एका देवीच्या मिरवणुकीत काही जण मोठमोठ्याने बॅण्ड वाजवत होते. एरव्ही मला मिरवणूक पहावी, असे वाटते; पण आज माझे मन आतच स्थिर होते आणि डोळे उघडतच नव्हते. त्या वेळी देवी मला म्हणाली, यज्ञात विघ्न आणण्यासाठीच हे इतक्या जोराने बॅण्ड वाजवत आहेत. काहीही झाले, तरी तू डोळे उघडू नकोस. तुझे लक्ष विचलित होता कामा नये.

भावसत्संगात भावजागृतीचा प्रयोग घेतल्यावर दोन्ही हातांवर दैवी कण दिसणे

     १७.१०.२०१५ या दिवशी मी दुपारी ३ ते ५ या वेळेत भावसत्संगात बसले होते. कु. स्वाती गायकवाड भावसत्संग घेत होती. भावजागृतीचा प्रयोग झाल्यावर माझे हाताकडे लक्ष गेले, तर माझ्या दोन्ही हातांवर दैवी कण दिसत होते. अन्य साधकांनीही ते दैवी कण पाहिले. माझी पात्रता नसतांना देव भरभरून देत आहे. माझीच झोळी अहं आणि दोषांनी भरली असल्याने ती फाटकी आहे. देव आपल्यासाठी किती करत आहे, देवाचे किती लक्ष आहे, हे अनुभवता आले.
रामनाथी आश्रमात आल्यानंतर पुष्कळ शारिरीक त्रास होणे,
तेव्हा सद्गुरु (सौ.) बिंदाताईंनी उपाय सांगून काळजी घेणे
     मी रामनाथी आश्रमात आल्यानंतर मला शरीर जड होणे, थकवा येणे, जेवण न जाणे असे पुष्कळ त्रास होत होते. त्या वेळी पू. बिंदाताई माझी लहान बाळासारखी काळजी घेत असत आणि मला वेगवेगळे उपाय सांगत. मला जेवणही जात नव्हते; म्हणून त्यांनी एक मंत्र सांगितला होता. मी जेवण वाढून घेऊन तो मंत्र म्हटल्यावर मला पिवळे सुदर्शनचक्र ताटाभोवती गोल फिरतांना दिसले.

आधुनिक वैद्या (सौ.) कस्तुरी भोसले यांना रामनाथी आश्रमात होत असलेल्या श्री बगलामुखी आणि दत्तमाला मंत्रपठणाविषयी आलेल्या अनुभूती !

आधुनिक वैद्या
(सौ.) कस्तुरी भोसले
१. बगलामुखी मंत्रपठण चालू नसतांनाही सलग २ - ३ दिवस
पहाटे श्री बगलामुखी मंत्राचे आवाज ऐकू येणे आणि मंत्राचे आवाज
आश्रमातील वातावरणात घुमत आहेत, हे लक्षात येणे
     सप्टेंबर २०१६ मध्ये रामनाथी आश्रमात गणेशयाग आणि बगलामुखी यज्ञ झाला. त्यानंतर आश्रमात प्रतिदिन पुरोहित साधक आणि अन्य साधक श्री बगलामुखी मंत्रपठण सामूहिकरित्या मोठ्याने करतात. तो मंत्र आश्रमात सर्वत्र घुमतो.
     एकदा मला पहाटे जाग आल्यावर मी उठून खोलीच्या बाहेर आल्यावर मला श्री बगलामुखी मंत्रपठण चालू असल्याचा आवाज आला. मी ध्यानमंदिराकडे पाहिले असता तेथे कुणीच नव्हते, तरीही मला श्री बगलामुखी मंत्राचे आवाज ऐकू येत होते. मला भास झाला असेल, असे वाटले. नंतर सलग २ - ३ दिवस पहाटे मला श्री बगलामुखी मंत्राचे आवाज ऐकू आले. त्या वेळी ती अनुभूती असून मंत्राचे आवाज आश्रमातील वातावरणात घुमत असून पहाटे मला ते देवाच्या कृपेने ऐकू आले, हे लक्षात आले आणि माझी भावजागृती होऊन मी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त केली.
२. श्री बगलामुखी मंत्रपठण झाल्यानंतर ध्यानमंदिरात मंत्रपठणाची स्पंदने
फिरत असल्याचे जाणवून उष्णता जाणवणे आणि आरती भावपूर्ण होणे
     २९.९.२०१६ या दिवशी मी श्री बगलामुखी मंत्रपठण झाल्यानंतर ध्यानमंदिरात सायंकाळच्या आरतीसाठी गेले होते. तेव्हा मला तेथे पुष्कळ उष्णता जाणवली आणि बगलामुखी मंत्रपठणाची स्पंदने तेथे फिरत असल्याचे जाणवले.

श्रीकृष्ण आणि प.पू. डॉक्टर यांची ओढ असणारी, सतत आनंदी तसेच ६१ टक्के आध्यात्मिक पातळी असलेली आणि महर्लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली देवगड (जिल्हा सिंधुदुर्ग) येथील चि. अनुश्री स्वप्नील पवार (वय १ वर्ष) !

चि. अनुश्री पवार
      आज देवगड, जिल्हा सिंधुदुर्ग येथील चि. अनुश्री स्वप्नील पवार हिचा प्रथम वाढदिवस आहे. त्या निमित्ताने कुटुंबियांना जाणवलेली सूत्रे येथे देत आहोत.
चि. अनुश्री पवार हिला वाढदिवसानिमित्त 
सनातन परिवाराच्या वतीने शुभाशीर्वाद !
१. सौ. स्वानंदी स्वप्नील पवार (चि. अनुश्रीची आई) 
१ अ. गर्भारपण 
१ अ १. दिवस गेल्याचे संतांना सूक्ष्मातून आधीच कळणे : देवगडला आमच्या घरी माझ्या वाढदिवसाच्या दिवशी पू. पात्रीकरकाका (सनातनचे संत पू. अशोक पात्रीकर) घरी आले होते. त्यांच्यासाठी स्वयंपाक करण्याच्या सेवेची संधी मला मिळाली होती. त्यांच्या समवेत काढलेले छायाचित्र आम्ही पू. सौरभदादांना (सनातनचे संत पू. सौरभ जोशी) रामनाथी आश्रमात दाखवले. ते पाहून पू. दादा हसले. त्या वेळी त्यांची आई सौ. प्राजक्ता जोशी (सनातनच्या ज्योतिष फलित विशारद साधिका) मला म्हणाल्या, तुझ्याकडे गोड बातमी आहे, असे वाटते. त्यानंतर १५ दिवसांनी मला दिवस गेल्याचे समजले. यावरून संतांना सूक्ष्मातून आधीच कळते, हे लक्षात आले.

परात्पर गुरु (डॉ.) आठवले यांच्या अमृत महोत्सवी वर्ष सोहळ्याच्या दिवशी अमेरिकेतील पू. (सौ.) भावना शिंदे-हर्ली यांना आलेल्या अनुभूती

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त...
पू. (सौ.) भावना शिंदे-हर्ली
१. प.पू. डॉक्टरांच्या अमृत महोत्सवाच्या कार्यक्रमाला आरंभ झाल्यानंतर त्रास
 नाहीसा होऊन आनंद जाणवणे
     प.पू. डॉक्टरांच्या अमृत महोत्सवाच्या दोन दिवस अगोदरपासून माझ्या मनात पुष्कळ विचार येत असल्याने मला त्याचा तीव्र त्रास होत होता; मात्र (अमेरिकेतील कालगणनेनुसार २८.५.२०१६ या दिवशी) प.पू. डॉक्टरांच्या अमृत महोत्सवाच्या कार्यक्रमाला आरंभ झाल्यानंतर तो त्रास नाहीसा झाला आणि अधूनमधून मला आनंद जाणवत होता.
२. दुसर्‍या दिवशी श्रीश्री जयंत बाळाजी आठवले...जय गुरुदेव । हा जप आपोआप चालू 
होणे, सकाळपासून श्रीरामाचा पाळणा पुनःपुन्हा आठवणे आणि प.पू. डॉक्टर सिंहासनावर
बसले, तेव्हा ते श्रीरामाप्रमाणे दिसत होते, असे पू. सिरियाकदादांनी सांगणे
     दुसर्‍या दिवशी, म्हणजे २९.५.२०१६ या दिवशी सकाळी मला जाग आल्यानंतर माझा श्रीश्री जयंत बाळाजी आठवले...जय गुरुदेव । हा जप आपोआप होत असल्याचे माझ्या लक्षात आले. त्या दिवशी सकाळपासून मला श्रीरामाचा पाळणा पुनःपुन्हा आठवत होता.

पंचम् अखिल भारतीय हिंदू अधिवेशनासाठी ध्यानमंदिरात बसून नामजप आणि प्रार्थना करतांना अष्टदेवता आशीर्वाद देत आहेत, असे दिसणे आणि प.पू. भक्तराज महाराज यांचे ओठ हलत असून ते जप करत आहेत, असे जाणवणे !

पू. (श्रीमती) राधा प्रभु
     रामनाथी, गोवा येथे १९ ते २५.६.२०१६ या कालावधीत पंचम् अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले होते. अधिवेशन चालू असतांना मला आणि पू. विनायक कर्वे यांना अधिवेशनात अडथळे येऊ नयेत आणि अधिवेशन यशस्वी व्हावे, यासाठी दिवसभर निरंतर नामजप करण्याची सेवा दिली होती. नामजपासमवेत आम्हाला रामनाथी येथे होत असलेले अधिवेशन निर्विघ्नपणे पार पडू दे ! त्यात सहभागी झालेल्या धर्माभिमान्यांच्या भोवती, साधकांभोवती आणि आश्रमाभोवती संरक्षककवच निर्माण होऊ दे !, अशी प्रार्थना करण्यास सांगितले होते.
     १९.६.२०१६ या दिवशी मी सनातनच्या मंगळुरू येथील सेवाकेंद्राच्या ध्यानमंदिरात बसून अष्टदेवतांच्या चित्रांकडे पाहून प्रार्थना करत होते. त्या वेळी मला अष्टदेवता जागृत होऊन त्या प्रार्थना स्वीकारून हात वर करून आशीर्वाद देत आहेत, असे दिसले. मला ३ दिवस प.पू. भक्तराज महाराज आणि प.पू. गुरुदेव यांच्या छायाचित्राकडे पाहून जप करत असतांना त्यांचे डोळे, ओठ आणि मस्तक यांची हालचाल होत आहे, असे जाणवले. मला प.पू. डॉक्टर आणि प.पू. भक्तराज महाराज माझ्याकडे पाहून हसत आहेत आणि त्यांचे ओठ हलत असून ते माझ्यासमवेत बसून जप करत आहेत, असे जाणवले.
     मला अशी अनुभूती निरंतर यावी, असे वाटून मन आनंदित झाले होते

बालपणापासूनच श्रीकृष्ण आणि श्रीराम यांची आवड असणारा ५३ टक्के आध्यात्मिक पातळीचा आणि उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला नेब्रास्का, अमेरिका येथील चि. ईशान सोमनाथ परमशेट्टी (वय २ वर्षे) !

चि. ईशान परमशेट्टी
     (चि. ईशान याची वर्ष २०१५ मध्ये ५१ टक्के आध्यात्मिक पातळी होती. - संकलक) 
१. चि. ईशानची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये
१ अ. सात्त्विक आवडीनिवडी : सायंकाळी घरातील ध्यानमंदिरात तुपाचा दिवा लावल्यावर त्याला घंटा वाजवायला आवडते. तसेच त्याचा मोठा भाऊ शुभं करोति म्हणत असतांना त्याला फार आनंद होतो.
१ आ. श्रीराम आणि हनुमान यांचे अ‍ॅनिमेटेड चित्रपट पहायला आवडणे : चि. ईशानला दूरचित्रवाणीवरील रामायण आणि बाल हनुमान यांचे अ‍ॅनिमेटेड चित्रपट पहायला आवडते. या व्यतिरिक्त इतर कोणताही कार्यक्रम लावला, तर तो रडू लागतो. तो श्रीरामाचा जयघोष त्याच्या शब्दात जय सिया (जय श्रीराम), असा करतो. हनुमानाचे अ‍ॅनिमेटेड चित्रपट चालू असतांना ईशान बाल हनुमानासमवेत लपाछपीचा खेळ खेळत असल्याप्रमाणे सोफ्याच्या मागे लपतो. त्याला बाल हनुमानाच्या चित्रपटामधील हनुमान चालीसा ऐकायला फार आवडतेे.

योग्य दक्षिणा घेऊन किंवा दक्षिणा न घेता शास्त्रोक्त पद्धतीने धार्मिक विधी करण्यास इच्छुक पुरोहितांनी पौरोहित्याच्या सेवेत सहभागी व्हावे !

ब्राह्मतेज प्रदान करणार्‍या सेवेत सहभागी होण्याची सर्वत्रच्या पुरोहितांना सुवर्णसंधी !
१. यज्ञ हे एक वरदानच !
     श्रीमद् भगवद्गीतेत श्रीकृष्णाने यज्ञाला कामधेनू म्हटले आहे. पुरोहितांनी एकाग्रतेने केलेल्या शास्त्रोक्त मंत्रपठणामुळे वायूमंडलाची शुद्धी तर होतेच; पण व्यक्ती, समाज आणि राष्ट्र या सर्वांनाही त्या मंत्रशक्तीचा लाभ होतो. अवर्षणादी नैसर्गिक प्रकोपांना रोखून पर्जन्यवृष्टी करण्याचे सामर्थ्य यज्ञयागात आहे. यज्ञ हे भारतीय संस्कृतीला लाभलेेले फार मोठे वरदानच आहे.
२. सनातन साधक-पुरोहित पाठशाळेच्या स्थापनेचा व्यापक उद्देश !
     यज्ञसाधनेचे अनन्यसाधारण महत्त्व लक्षात घेऊन सनातन संस्थेने वर्ष २००९ मध्ये सनातन साधक-पुरोहित पाठशाळेची स्थापना केली. विविध विधींच्या माध्यमातून समाजाला साधनेकडे वळवणे आणि आदर्श अन् सात्त्विक पुरोहितांना घडवून त्यांची संतपदाकडे वाटचाल करून घेणे, हा या स्थापनेमागील उद्देश होता.
३. महर्षि आणि संत यांच्या मार्गदर्शनानुसार जप, अनुष्ठाने अन् धार्मिक
विधी सेवाभावाने आणि विनामूल्य करणारे साधक-पुरोहित !
     सनातनच्या वेदपाठशाळेत साधक-पुरोहितांना शुद्ध आणि स्पष्ट मंत्रोच्चारण करण्यास शिकवले जाते. त्यामुळे त्यांच्या वाणीत चैतन्य आणि मंत्रांत सामर्थ्य निर्माण झाले आहे.
     हिंदु राष्ट्र स्थापनेतील अडथळे दूर व्हावेत, यासाठी संतांच्या मार्गदर्शनानुसार सर्व साधक-पुरोहित प्रतिदिन जप-अनुष्ठाने करत आहेत. विविध नाडीपट्ट्यांच्या माध्यमातून महर्षि करत असलेल्या आदेशानुसार त्यांनी ब्रह्मास्त्रयाग, रुद्रयाग, सुदर्शनयाग इत्यादी धार्मिक विधी केले आहेत आणि अजूनही करत आहेत.

शास्त्रशुद्ध पद्धतीने पौरोहित्य करण्यासह आध्यात्मिक प्रगतीसाठी मार्गदर्शन करणार्‍या सनातन साधक-पुरोहित पाठशाळेत पूर्णवेळ प्रवेश घेण्यासाठी संपर्क करावा !

पौरोहित्याचे शिक्षण घेण्यास इच्छुक साधकांना सूचना आणि
वाचक, हितचिंतक अन् धर्मप्रेमी यांना नम्र विनंती !
१. साधना म्हणून वेदाध्ययन करण्यास शिकवणारी सनातनची वेदपाठशाळा !
     धर्माचरणी समाज घडवण्यासाठी सनातन संस्थेने आरंभलेला शुद्धीयज्ञ म्हणजे सनातन साधक-पुरोहित पाठशाळा ! बहुमूल्य सांस्कृतिक ठेवा असणारे वेदशिक्षण घेता घेता पुरोहितांची सर्वांगीण आध्यात्मिक उन्नतीही व्हावी, यासाठी या पाठशाळेत प्रामुख्याने प्रयत्न केले जातात. अर्थार्जनासाठी नव्हे, तर साधना म्हणून शास्त्रशुद्ध पद्धतीने पौरोहित्य करण्यास शिकवणारी ही एकमेव पाठशाळा आहे.
२. साधक-पुरोहितांमधील मंत्रसामर्थ्य आणि साधनेचे
बळ यांमुळे विधीनंतर यजमानांची उद्देशपूर्ती होणे
     प.पू. डॉक्टरांचा वेदपाठशाळेच्या स्थापनेमागील संकल्प फलद्रूप होण्यासाठी सर्व साधक-पुरोहित निष्काम भावाने आणि सेवाभावी वृत्तीने विधी अन् अनुष्ठाने करत आहेत. साधना बळामुळे त्यांनी केलेल्या धार्मिक विधींनंतर त्यामागील उद्देश सफल होत असल्याची अनुभूतीही आतापर्यंत अनेकांनी घेतलेली आहे. विधीनंतर उद्देशपूर्ती होणे, ही साधक-पुरोहितांनी भावपूर्णरित्या केलेल्या पौरोहित्य कर्माची पोचपावतीच आहे !
३. सनातन साधक-पुरोहित पाठशाळेत प्रवेश घेण्यास
इच्छुक असलेल्यांनी पुढील निकष लक्षात घ्यावेत !
     अशा विविध वैशिष्ट्यांनी युक्त असलेली आणि वेदाध्ययन करता करता साधक-पुरोहित ते संत-पुरोहित असा आध्यात्मिक प्रवास करून घेणारी ही पाठशाळा एकमेवाद्वितीय आहे. या पाठशाळेच्या मार्गदर्शनानुसार पौरोहित्याचे शिक्षण घेण्याची आणि त्याद्वारे सेवारत राहून आध्यात्मिक उन्नती करून घेण्याची इच्छा अनेक जण व्यक्त करतात.

देवतांच्या विडंबनाविरुद्ध सनातन चळवळी (मोहिमा) राबवत असतांना सनातनची प्रकाशने आणि उत्पादने यांवर देवतांची चित्रे का ?

     सनातन संस्था व्यावसायिक उत्पादनांच्या, तसेच त्यांच्या विज्ञापनांच्या माध्यमातून देवतांचे विडंबन होऊ नये, यासाठी विविध चळवळी राबवते. विविध उत्पादनांवर देवतांची चित्रे छापल्यावर कालांतराने ती पायदळी तुडवली जाण्याची आणि इतस्ततः पडण्याची शक्यता असल्याने तसे न करण्याविषयी समाजप्रबोधनही करते. या पार्श्‍वभूमीवर सनातनची नियतकालिके, उत्पादने, ग्रंथ अन् प्रसारसाहित्य यांवर देवतांची चित्रे किंवा गुरुकृपायोगाचे (गुरु-शिष्याचे) बोधचिन्ह का ?, असा प्रश्‍न एखाद्याला पडू शकतो. याचे उत्तर पुढीलप्रमाणे आहे. १. अध्यात्मात कृतीपेक्षा तिच्यामागील उद्देशाला अधिक महत्त्व आहे. कुठलीही प्रकाशने आणि उत्पादने काढण्यामागे सनातनचा व्यावसायिक हेतू नसून अध्यात्मप्रसार करून समाजाची सात्त्विकता वाढवणे, हा आहे. सनातन-निर्मित देवतांची चित्रे बाजारात मिळणार्‍या देवतांच्या चित्रांपेक्षा अधिक सात्त्विक असल्याने हा हेतू साध्य होत आहे. अध्यात्मातील जाणकार आणि साधक यांना त्यासंबंधी अनुभूतीही आल्या आहेत.
२. सनातनची प्रकाशने आणि उत्पादने यांवर देवतांची चित्रे छापतांनाच त्यांची हाताळणी कशी करावी, उत्पादनांचा उपयोग झाल्यानंतर त्यांचा विनियोग कसा करावा आदी गोष्टींसंबधी सूचना त्या-त्या उत्पादनांवर शक्यतो प्रसिद्ध केली जाते.

अकस्मात् एखादा निराळा नामजप चालू झाल्यास काय करावे ?

     कालमाहात्म्यानुसार समष्टीसाठी आवश्यक असलेले जप आणि मुद्रा यांविषयीची माहिती दैनिक सनातन प्रभातमध्ये प्रसिद्ध करण्यात येते. त्यानुसार साधक तो जप करतात; परंतु काही वेळा साधकांचा या जपाव्यतिरिक्त अन्य जप अकस्मात् चालू होतो. अशा वेळी कोणता जप करावा ?, असा संभ्रम साधकांच्या मनात निर्माण होतो. अशा वेळी जो जप सहजतेने होतो आणि त्याने आनंद मिळतो. तोच जप करावा. मायेचे किंवा अन्य विचार मनात न येण्यासाठी आपण जप करतो. त्यामुळे जप कोणता करतो ?, यात न अडकता त्यातून मिळणार्‍या आनंदाकडे साधकांनी लक्ष द्यावे. ज्या वेळी ज्या देवतेच्या तत्त्वाची आवश्यकता असते, तो जप आपोआप चालू होत असतो, हे सूत्र लक्षात घ्यावे. कधी वाईट शक्तीही आपण योग्य तो जप करू नये; म्हणून निराळा जप चालू करतात. वाईट शक्तीचा त्रास असलेल्यांनी हे लक्षात घेऊन त्या वेळी कोणता जप करावा, हे प्रगत साधकांना विचारावे.
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले


साधकांना सूचना

सनातनच्या संतांना त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी भ्रमणभाष करू नका ! 
     'सनातनच्या संतांचा वाढदिवस असलेल्या दिवशी त्यांच्या संदर्भात साधकांनी दैनिक सनातन प्रभातमध्ये गुणवैशिष्ट्ये लिहून दिलेली असतात. त्यामुळे सर्वत्रच्या साधकांचे त्या संतांना भ्रमणभाष येतात. संतांना दिवसभर अनेक साधकांशी भ्रमणभाषवर बोलावे लागत असल्याने त्यांच्या सेवेतील अमूल्य वेळ वाया जातो. सध्या आपत्काळाला आरंभ झाल्यामुळे एकेक क्षण महत्त्वाचा आहे. स्थुलापेक्षा सूक्ष्म श्रेष्ठ असल्याने साधकांनी संतांना भ्रमणभाष न करता त्यांना मानस नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद मिळवावेत.'  
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले
       शिवाजी महाराजांच्या वेळी हिंदवी स्वराज्य मिळण्याअगोदर समाजाची जशी स्थिती होती, तशी स्थिती आजही आहे. निधर्मीवादी, बुद्धीप्रामाण्यवादी आणि पुरोगामी विचारांचे लोक आपल्या देशात सर्वधर्मसमभावाचे विचार पसरवून समाजाची फारच हानी करत आहेत. याच लोकांनी या देशाचे तीन तुकडे केले, ते धर्माच्या नावावर !
- पू. संभाजीराव भिडेगुरुजी, संस्थापक, श्री शिवप्रतिष्ठान
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून 
घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या !
www.hindujagruti.org

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले
       जिथे पृथ्वीवरची सर्व माणसेच नव्हे, तर झाडे, डोंगर, नद्या इत्यादी सर्व एकसारखे दिसत नाहीत, तेथे साम्यवाद हा शब्दच हास्यास्पद नाही का ?
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले

बोधचित्र

॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥

या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो.
- प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज
सनातनचे श्रद्धास्थान
जिवात्मा आणि शिवात्मा म्हणजे काय ? 
बाबा : 'मी कशासाठी जन्माला आलो आहे आणि मला काय करायचे आहे', याचे ज्ञान जिवाला झाले, तर त्या आत्म्याला 'जिवात्मा' म्हणतात. 'कोणीतरी माझ्याकडून कार्य करवून घेत आहे', याचे ज्ञान झाले की, त्या आत्म्याला शिवात्मा म्हणतात. शिवात्मा शोधणे, म्हणजे खरे ज्ञान. 'शिवात्मा' कार्यकारणभावापुरता जन्माला येतो, तर जीव प्रारब्धभोगामुळे जन्माला येतो. 
 (संदर्भ : सनातनचे प्रकाशन 'संत भक्तराज महाराज यांची शिकवण.') 

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

योग्य आचार-विचार
मनात निर्माण होणार्‍या इच्छा कशा पूर्ण होतील ?, याचा सतत विचार करून 
त्या पूर्ण करण्यापेक्षा इच्छा मर्यादित केल्या, तर मानसिक शांतीचा लाभ होईल. 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

धर्मसत्तेचा बागुलबुवा !

संपादकीय
     मुख्यमंत्र्यांनी धर्मसत्ता या शब्दाचा उल्लेख संतांच्या स्थानी जाऊन केल्याबरोबर तथाकथित बुद्धीवादी, पुरोगामी, साम्यवादी, निधर्मीवादी, घटनाप्रेमी म्हणजेच हिंदु धर्म विकल्पवादी प्रसारमाध्यमे आणि राजकारणी यांचे पित्त खवळले आणि विजेचा धक्का बसल्याप्रमाणे माध्यमांतील प्रतिनिधी प्रश्‍नांची सरबत्ती करू लागले. वास्तविक सध्या भारतात स्थुलातून धर्मसत्तेचे राजसत्तेवर वर्चस्व आहे, असे कुठल्याच कोनातून आढळत नाही. तसे असते, तर राष्ट्रातील जटील समस्या तत्परतेने सुटत गेल्या असत्या.

कलाकारांचा अभिनय (?)

संपादकीय
     ओम पुरी यांनी सैनिकाला सैन्यात जायला आम्ही सांगितले होते का ?, असे उद्दाम आणि कृतघ्न वक्तव्य करून सैनिक आणि राष्ट्र यांचा घोर अवमान केला होता. त्यानंतर मला क्षमा नको, शिक्षा करा ही त्यांनी मागितलेली क्षमा हे नाटक वाटले; कारण त्यानंतर पाकमध्ये जाऊन शिवसेनेवर टीका करून त्यांनी पाक कलाकारांची बाजू घेतली होती. आता परत उत्तरप्रदेशात हुतात्मा सैनिक नितीन यादव यांच्या घरी जाऊन होमहवन केले, इतकेच नव्हे तर मी प्रायश्‍चित्त घेण्यासाठी आलो आहे, असे सांगितले.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn