Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

शेजारील देशच आतंकवाद्यांची जन्मभूमी ! - पंतप्रधान नरेंद्र मोदी

बंदुका, दारूगोळा, विमाने इत्यादी सर्व 
वस्तू आयात करता येतील; पण राष्ट्रप्रेमी 
आणि धर्मप्रेमी नेते कुठून आयात करता येतील ? 

गोवा राज्यात ब्रिक्स परिषद

        मडगाव - एखादा देश आतंकवादी मानसिकता पुढे घेऊन जात असेल, तर त्याला विरोध करणे आवश्यक आहे. आतंकवादविरोधी लढाई आपल्याला लढली पाहिजे. दक्षिण, पश्‍चिम आशिया आणि युरोप आतंकवादाचा सामना करत आहे. ब्रिक्समधील देशांनी यासाठी पुढे आले पाहिजे. भारताच्या प्रगतीसाठी आतंकवादच सर्वात मोठा धोका आहे; पण भारताचा शेजारचा देश आतंकवादाची जन्मभूमी आहे. आतंकवाद्यांना प्रोत्साहन देण्यासमवेतच तो आतंकवादी मानसिकता वाढवण्याचाही प्रयत्न करत आहे. जगभरातील आतंकवादी कारवायांचा भारताच्या शेजारील राष्ट्राशी संबंध आहे, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकचे नाव न घेता केली. येथे ब्रिक्स परिषदेच्या दुसर्‍या दिवशी झालेल्या ब्राझील, रशिया, दक्षिण आफ्रिका आणि चीन या देशांच्या राष्ट्रप्रमुखांच्या बैठकीत मोदी बोलत होतेे.

मी हिंदू आणि भारत यांचा मोठा प्रशंसक ! - डोनाल्ड ट्रम्प

         न्यू जर्सी - भारत आणि अमेरिका हे राजकीय मित्र आहेत. मी अमेरिकेचा अध्यक्ष झाल्यास भारत आणि अमेरिका यांच्यातील मैत्री आणखी वृद्धिंगत होईल. मी हिंदू आणि भारत यांचा मोठा प्रशंसक आहे, असे अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीतील रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले. मी नरेंद्र मोदी यांचा चाहता असून त्यांच्यासोबत काम करण्यासाठी मी इच्छुक आहे, असेही ते म्हणाले. न्यू जर्सीमध्ये रिपब्लिकन-हिंदू कोअ‍ॅलिशनने एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यामध्ये डोनाल्ड ट्रम्प सहभागी झाले होते. या कार्यक्रमातून जमा होणारा ५० टक्के निधी काश्मिरी हिंदूंसाठी आणि आतंकवादाने पीडित असणार्‍या इतर देशांतील नागरिकांना दिला जाणार आहे.
         ट्रम्प पुढे, म्हणाले, जर मी निवडून आलो, तर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारखी धोरणे अमेरिकेत लागू करू. मोदी हे महान व्यक्ती आहेत. भारताप्रमाणेच अमेरिकेतही अर्थव्यवस्था आणि प्रशासनात सुधारणा करणे आवश्यक आहे. मोदी यांच्यामध्ये प्रचंड ऊर्जा असून ते भारतीय अर्थव्यवस्थेला गती देण्याचे काम करत आहेत. ते आर्थिक सुधारणा आणि प्रशासकीय पालट घडवून देशाला विकासाच्या वाटेवर नेत आहेत. त्यांच्यासारखेच काम अमेरिकेतही करण्याची आवश्यकता आहेे.

बेंगळुरूमध्ये रा.स्व. संघाच्या स्वयंसेवकाची निर्घृण हत्या !

  • संघाचे ५० लाख स्वयंसेवक असतांना एका स्वयंसेवकाचे रक्षण होण्यात अडचण का येते ?
  • कर्नाटकात काँग्रेसच्या राज्यात असुरक्षित संघ स्वयंसेवक !
        बेंगळुरू - येथील शिवाजीनगरमध्ये रा.स्व. संघाच्या कार्यक्रमातून घरी परतत असणार्‍या रूद्रेेश या ३५ वर्षीय संघ स्वयंसेवकाची १६ ऑक्टोबरला अज्ञातांनी निर्घृण हत्या केली. पोलीस या हत्येचे अन्वेषण करत आहेत.

नगर येथे दुर्गादौडीत मशिदीसमोर भगवा ध्वज हातात धरून छायाचित्र काढल्यावरून धर्मांधांकडून २ हिंदूंना गंभीर मारहाण !

हिंदूंनो, आणखी किती काळ धर्मांधांकडून 
मार खात रहाणार ? ही स्थिती पालटण्यासाठी 
आता हिंदु राष्ट्राशिवाय पर्याय नाही, हे जाणा ! 

उपजिल्हाधिकार्‍यांशी चर्चा करतांना हिंदुत्वनिष्ठ

        नगर, १६ ऑक्टोबर - दसर्‍याच्या दिवशी म्हणजेच ११ ऑक्टोबरला येथेे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानने आयोजित केलेल्या दुर्गामाता दौडीमध्ये आशा चित्रपटगृहाजवळील मशिदीसमोर हिंदूंनी भगवा ध्वज हातात घेतलेले छायाचित्र काढले. त्यामुळे धर्मांधांनी धर्मभावना दुखावल्याचा कांगावा करत श्री. आकाश निस्ताने आणि श्री. अजय बोडखे या हिंदूंना गंभीर मारहाण केली. या प्रकरणी धर्मांधांवर गुन्हा प्रविष्ट झाला असला, तरी पोलिसांनी हिंदुत्वनिष्ठांवरही गुन्हा प्रविष्ट केला, तसेच हिंदु राष्ट्र सेनेचे सहजिल्हाप्रमुख श्री. सागर ठोंबरे यांना स्थानांतर (हद्दपार) करून त्यांचे हात-पाय तोडण्याची धमकी दिली. (धर्मांधांची तळी उचलत हिंदूंना धमकावणारे पोलीस हिंदूंना कधीतरी न्याय देतील का ? - संपादक)
१. दुर्गामाता दौड मशिदीसमोर आल्यावर श्री. आकाश निस्ताने यांनी लहान मुलाचे हातात भगवा ध्वज घेतलेले छायाचित्र काढले आणि मित्रांना दाखवले.

उज्जैन येथील महाकाल मंदिरातील अर्पण पेटीतून लक्षावधी रुपयांचा अपहार !

हिंदूंनो, मंदिरांच्या 
सरकारीकरणाचे परिणाम जाणा !
        उज्जैन (मध्यप्रदेश) - येथील महाकाल मंदिराच्या अर्पण पेटीतील रक्कमेची चोरी होत असल्याचे उघड झाले आहे. ही चोरी अर्पण पेटी उघडण्याचे दायित्व असणारे चंद्रप्रकाश शर्मा यांच्याकडून होत असल्याचे सीसीटीव्ही कॅमेर्‍यातून उघड झाले आहे. शर्मा यांचेकडून लक्षावधी रुपये हडप करण्यात आले असावेत, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. या प्रकरणी जिल्हाधिकार्‍यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. (मंदिरांचे सरकारीकरण झाल्यामुळे त्या ठिकाणी भक्तांऐवजी प्रशासनाला वाटेल त्या व्यक्तीची नेमणूक करण्यात येते. अशा व्यक्तींकडून मंदिरातील धनाची चोरी होणे नाकारता येत नाही. त्यासाठी ही मंदिरे भक्तांच्या कह्यात देणे आवश्यक आहे. - संपादक)
        व्यवस्थापनाकडून मंदिराची अर्पण पेटी आठवड्यातून तीन वेळा उघडण्यात येते. याकरिता प्रभारी शर्मासह काही कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. त्यांच्याकडून सीसीटीव्ही कॅमेर्‍याच्या निरीक्षणात दानपेटीतील रक्कम मोजण्यात येत असे. या वेळी शर्मा केवळ ५०० आणि १ सहस्र रुपयांच्या नोटा मोजायचे. त्याच वेळी शिताफीने या नोटांचे बंडल खिशात टाकत असतांनाचे छायाचित्रण सीसीटीव्ही कॅमेर्‍यात टिपले गेले आहे.

नोएडा (उत्तरप्रदेश)मधून ९ सशस्त्र नक्षलवाद्यांना अटक !

        नोएडा - येथील हिंडन विहार भागातील हिंडन अपार्टमेंटमधून १५ ऑक्टोबरच्या रात्री पोलिसांनी छापा टाकून ९ नक्षलवाद्यांना अटक केली. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे जप्त करण्यात आली आहेत. देहली आणि जवळपासच्या भागांमध्ये आक्रमण करण्याचा त्यांचा हेतू होता. हे नक्षलवादी कमांडोंच्या वेशामध्ये होते. यांच्याकडून ६ बंदुका आणि स्फोटके जप्त करण्यात आली आहेत. उत्तरप्रदेश आतंकवादविरोधी पथक, राष्ट्रीय सुरक्षा दल आणि देहली पोलीस यांच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली. गेल्या २-३ महिन्यांपासून हे सर्व जण येथे रहात होते. हे सर्व नक्षलवादी ५ प्रमुख नक्षलवाद्यांच्या संपर्कात असल्याचेही सांगण्यात येत आहे.

१८ आणि १९ ऑक्टोबर या दोन्ही दिवशी भाकणुकीचा कार्यक्रम होणार !

श्रीक्षेत्र हालसिद्धनाथ यात्रेला उत्साहात प्रारंभ !
श्री हालसिद्धनाथ
      कुर्ली (जिल्हा बेळगाव), १६ ऑक्टोबर (वार्ता.) - कर्नाटक-महाराष्ट्रातील लक्षावधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीक्षेत्र हालसिद्धनाथ देवाच्या आश्‍विन यात्रेला (भोंब यात्रा) १६ ऑक्टोबरपासून उत्साहात प्रारंभ झाला. ही यात्रा २० ऑक्टोबरअखेर साजरी होणार असून ती शांततेत साजरी करण्यात यावी, असे आवाहन यात्रा संयोजन समितीचे अध्यक्ष श्री. सुरेश पाटील यांनी केले आहे, तसेच यात्राकाळात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले असून त्याचा परिसरातील नागरिकांनी लाभ घ्यावा, असेही त्यांनी सांगितले. १६ ऑक्टोबर या दिवशी खडक मंदिरात नाथांच्या उत्सवमूर्तीची प्रतिष्ठापना झाली.
१. यात्रेचा प्रारंभ कुर्ली येथील श्री हालसिद्धनाथ मंदिरातून होतो, र आप्पाचीवाडी येथे यात्रा भरते. पाच दिवस होणार्‍या यात्रेत रात्रभर ढोलवादन आणि जागर होणार आहे. 
२. १८ ऑक्टोबर या दिवशी पहिली भाकणूक, तर १९ ऑक्टोबर या दिवशी नाथांना महानैवेद्य, रात्री जागर, पहाटे दुसरी भाकणूक होणार आहे. २० ऑक्टोबर या दिवशी सकाळी घुमटातील भाकणूक होणार असून हाच दिवस यात्रेचा शेवटचा दिवस आहे.

चीनमध्ये धार्मिक कार्यात सहभागी होण्यासाठी मुलांवर दडपण आणणार्‍या पालकांना कारागृहात जावे लागणार !

मुसलमानबहुल झिंजियांग शहरापासून अंमलबजावणीस प्रारंभ !
       बीजिंग - चीनमध्ये धार्मिक कार्यात सहभागी होण्यासाठी मुलांवर दडपण आणणार्‍या पालकांना कारागृहात जावे लागणार आहे. तसा नियमच चीन सरकार पुढील मासापासून लागू करणार असून मुसलमानबहुल झिंजियांग शहरापासून त्याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
      या नियमानुसार पालक त्यांच्या पाल्यांना धार्मिक पद्धतीनुसार कपडे घालण्याची सक्ती करू शकणार नाहीत. पालक हा नियम मोडत असल्याचे एखाद्या संघटनेला आढळल्यास, याविषयी ती संघटना बिनदिक्कतपणे पोलिसांकडे तक्रार करू शकणार आहे. चीन सरकारने हा नियम शाळांमध्येही लागू केला असून तेथेही धार्मिक उपक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे. जे पालक त्यांच्या मुलांना कट्टरवादी विचारसरणीपासून परावृत्त करू शकत नसतील, अशांच्या पाल्यांना शाळेत प्रवेश नसेल. अशा पाल्यांना विशेष शाळांमध्ये पाठवण्यासाठी आवेदन करावे लागणार आहे. हा नियम विशेषत: या क्षेत्रात रहाणार्‍या अल्पसंख्यांक मुसलमानांसाठी आहे.केरळच्या कदवंथरा देवीच्या मंदिरात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने प्रवचन

      कोची (केरळ) - येथील कदवंथरा देवीच्या मंदिरात नवरात्रीच्या काळात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने नवरात्र आणि त्याचे आध्यात्मिक महत्त्व या विषयावर प्रवचन घेण्यात आले. हिंदु जनजागृती समितीच्या कु. रश्मी परमेश्‍वरन् यांनी या वेळी मार्गदर्शन केले. कु. रश्मी परमेश्‍वरन् म्हणाल्या, महिलांमध्ये देवीतत्त्व असते आणि त्यांनी ते नेहमी लक्षात ठेवले पाहिजे. या वेळी कु. परमेश्‍वरन् यांनी भारताच्या गौरवशाली परंपरेचे महत्त्वही विशद केले. या परंपरेचे रक्षण करणे, हे आपले कर्तव्य असल्याचे ही त्यांनी सांगितले. या वेळी ६० देवी भक्त उपस्थित होते. प्रवचनाला उपस्थितांकडून चांगला प्रतिसाद लाभला. मंदिरातील उत्सवाच्या वेळी असा कार्यक्रम पुन्हा आयोजित करणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.

पाकिस्तानी कलाकार असलेल्या चित्रपटांना महाराष्ट्रासह ४ राज्यांत बंदी !

सिनेमा ओनर्स अ‍ॅण्ड एझिबिटर्स असोसिएशनचा अभिनंदनीय निर्णय !
      मुंबई - जोपर्यंत भारत आणि पाकिस्तान यांच्यामधील संबंध सामान्य होत नाहीत, तोपर्यंत कोणत्याही पाकिस्तानी कलाकारांचा कोणताही चित्रपट गुजरात, कर्नाटक, गोवा आणि महाराष्ट्र या ४ राज्यांत प्रदर्शित केला जाणार नसल्याचा निर्णय सिनेमा ओनर्स अ‍ॅण्ड एझिबिटर्स असोसिएशनने घेतला आहे. (पाकिस्तानी कलाकारांना संपूर्ण भारतातच बंदी करण्याचा निर्णय केंद्र सरकार घेईल का ? - संपादक) हा निर्णय असोसिएशनच्या १४ ऑक्टोबर या दिवशी मुंबईमध्ये झालेल्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती असोसिएशनचे प्रमुख नितीन दातार यांनी पत्रकार परिषदेत दिली.

चीनकडून बांगलादेशला २४ अब्ज डॉलरचे ऋण !

       नवी देहली - चीनने बांगलादेशला तब्बल २४ अब्ज डॉलरचे (१ लाख ६० सहस्र कोटी भारतीय रुपयांचे) ऋण देण्याची घोषणा केली आहे. तसेच ३० वर्षांनी चीनचे राष्ट्राध्यक्ष बांगलादेशचा दौरा करणार आहेत. नरेंद्र मोदी यांनी शेजारी राष्ट्रांशी संबंध सुधारण्यावर भर दिला. गेल्या वर्षी मोदी यांनी बांगलादेशला २ अब्ज डॉलरचे (१३ सहस्र कोटी भारतीय रुपयांहून अधिक) कर्ज देण्याची घोषणा केली होती. त्यामुळे चीनने भारतावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला आहे. या ऋणाद्वारे चीन बांगलादेशमधील २५ प्रकल्पांचा विकास करणार आहे. या साहाय्यामुळेे दोन्ही देशांमधील आर्थिक संबंधांत नव्या पर्वाला प्रारंभ होईल, अशी आशा बांगलादेशचे परराष्ट्र मंत्री महमूद अली यांनी व्यक्त केली आहे. चीनपाठोपाठ जपानही बांगलादेशला आर्थिक साहाय्य करणार आहे.

सैन्यासह देशातील कोणतेही खाते हिंदुत्वाच्या प्रभावापासून मुक्त नाही ! - प्रकाश करात, नेते, माकप

हिंदुत्वाचा प्रभाव असे काही नसून हा देश अनादि 
काळापासून हिंदूंचा आणि हिंदु संस्कृतीचा आहे, हे करात का स्वीकारत नाहीत ?
      नवी देहली - देशातील सैन्य आणि अन्य सर्व खाती हिंदुत्वाच्या प्रभावापासून मुक्त नाहीत, असा दावा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे (माकपचे) नेते तथा माजी सरचिटणीस प्रकाश करात यांनी केला आहे. हा सर्व नागरिकांसाठी चिंतेचा विषय असला पाहिजे, असेही ते म्हणाले.
     करात म्हणाले की, राज्यघटनेच्या धर्मनिरपेक्ष आणि संवैधानिक स्वरूपाचे रक्षण करू इच्छिणार्‍यांनी भाजप आणि संघ यांना सांगितले पाहिजे की, त्यांनी सैन्यापासून दूर रहावे. भाजप सर्जिकल स्ट्राईकचा राजकीय लाभ घेण्याचा प्रयत्न करत आहे. पंतप्रधान मोदी यांनी रामलीलेत सहभागी होऊन संदेश दिला आहे की, राज्यातील निवडणुकीत ते धर्म आणि राजकारण यांना एकत्र घेऊन लढणार आहेत.

मुसलमान असल्यामुळे पाक वंशाच्या ७ वर्षांच्या मुलाला सहकारी विद्यार्थ्यांकडून मारहाण !

अमेरिकेत एखाद-दुसरे आतंकवादी आक्रमण झाले, तरी 
अमेरिकेतील नागरिकांचा संताप अनावर होतो. भारतात सतत ३ दशके जिहादी 
आक्रमणे होऊनही भारतीय ती सहन करत आहेत. यातून ते किती सहिष्णु आहेत, हे लक्षात येते !
मारहाणीनंतर अमेरिका सोडून पाकमध्ये जाण्याचा मुलाच्या वडिलांचा निर्णय !
      नवी देहली - अमेरिकेच्या नॉर्थ कॅरोलिना येथील वीदरस्टान एलिमेंटरी स्कूल या शाळेतील ७ वर्षांच्या पाक वंशाच्या मुसलमान विद्यार्थ्याला त्याच्या ५ सहकारी विद्यार्थ्यांनी मारहाण केली. शाळेच्या बसमध्ये ही मारहाण करण्यात आली.
     या घटनेची माहिती मुलाचे पिता जीशान उल् हसन उस्मानी यांनी फेसबूकद्वारे दिली. त्यांनी त्यांचा मुलगा अब्दुल याचे छायाचित्र पोस्ट करून लिहिले की, डोनाल्ड ट्रम्पच्या अमेरिकेमध्ये स्वागत ! मुसलमान असल्यामुळे शाळेच्या बसमध्ये माझ्या मुलाला त्याच्या सहकार्‍यांनी मारहाण केली. या घटनेनंतर मी, माझी पत्नी आणि ३ मुले अमेरिका सोडून पाकमध्ये जात आहोत.तहबाद (कर्नाटक) येथे श्रीरामाच्या प्रतिमेला शेण फासले !

हिंदूंच्या देशात हिंदूंच्या श्रद्धास्थानांचा असा अवमान 
रोखण्यासाठी हिंदु राष्ट्राला (सनातन धर्म राज्याला) पर्याय नाही !
      कलबुर्गी (कर्नाटक) - येथील चितापूर तालुक्यातील तहबाद येथे विजयादशमीच्या रात्री समाजकंटकांकडून श्रीरामाच्या प्रतिमेला शेण फासण्यात आले. त्यामुळे हिंदुत्वनिष्ठांनी तीव्र आंदोलन करून आरोपीला अटक करण्याची मागणी केली. याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट करण्यात आली आहे. आरोपींचा तपास करण्यात येत आहे.मोहरमच्या मिरवणुकीच्या वेळी मुसलमान व्यक्तीच्या दुकानाला शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीला भाजप आणि संघ कार्यकर्त्यांना उत्तरदायी ठरवले !

भाजप शासित मध्यप्रदेशातील पेटलावद 
येथे पोलिसांकडून भाजप आणि संघ कार्यकर्त्यांना मारहाण !
      धार (मध्यप्रदेश) - धार जिल्ह्यातील पेटलावद येथे १२ ऑक्टोबरला मोहरमच्या मिरवणुकीच्या वेळी एका मुसलमानाच्या दुकानाला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. मात्र या प्रकरणी पोलिसांनी भाजप आणि रा.स्व. संघ यांच्या कार्यकर्त्यांना उत्तरदायी ठरवून त्यांना घरातून नेऊन मारहाण करण्याची आणि त्यांच्या सुटकेसाठी पोलीस ठाण्यात गेलेल्या अन्य पदाधिकार्‍यांना पोलिसांकडून मारहाण झाल्याची घटना घडली आहे. मोहरमच्या दिवशी धार जिल्ह्यातील झाबुआ, गंधवानी, देदला, पीपल्या, देवास आणि धामनोद या भागांत तणाव निर्माण झाला होता. येथे हिंसाचाराच्या घटना घडल्या. १४ ऑक्टोबरला हिंदु जागरण मंचने येथील झाबुआ भागात बंद पुकारला होता. धार जिल्ह्यात एकूण ७० लोकांना कह्यात घेण्यात आले आहे. पीपल्या येथे मोहरमच्या वेळी दोन्ही गटांत झालेल्या हिंसाचाराच्या वेळी ४ घरे, १२ हून अधिक दुचाकी वाहने, एक ट्रक आणि अन्य एक वाहन जाळण्यात आले. यात २० जण घायाळ झाले.आरोप मागे घेतल्यानंतरही साध्वी प्रज्ञासिंह कारागृहात का ?

मुंबई उच्च न्यायालयाची राष्ट्रीय तपास यंत्रणेला विचारणा
      मुंबई, १६ ऑक्टोबर - मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील मुख्य आरोपी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यावरील सगळे आरोप राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयएने) मागे घेतलेले असतांनाही त्यांना कारागृहात कसे काय ठेवले आहे, अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती नरेश पाटील आणि न्यायमूर्ती प्रकाश नाईक यांच्या खंडपिठाने केली. तसेच या प्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणा आणि राज्याच्या आतंकवादविरोधी पथकाने प्रविष्ट केलेले आरोपपत्र आणि जामीन नाकारण्याच्या विशेष न्यायालयाची प्रत सादर करण्याचे आदेशही खंडपिठाने १४ ऑक्टोबर या दिवशी दिले आहेत.

(म्हणे) निवडणुकांसाठी भाजपकडून सर्जिकल स्ट्राईकचा प्रचार !

माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा जळफळाट !
      पुणे, १६ ऑक्टोबर - मी गृहमंत्री असतांनाही एकदा सर्जिकल स्ट्राईक झाले होते; परंतु आम्ही त्याची कधी प्रसिद्धी केली नाही. सर्जिकल स्ट्राईकचे खरे श्रेय सैनिकांचे आहे. आगामी निवडणुका लक्षात घेऊन भाजप सर्जिकल स्ट्राईकचा प्रचार करत असावा, असे मत माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी पत्रकारांशी बोलतांना व्यक्त केले. 
    शिंदे म्हणाले की, सर्जिकल स्ट्राईकच्या जाहीर वाच्यतेमुळे बूमरँग होण्याची शक्यता असते. याकूब मेमनला फाशी दिल्यानंतर त्याचे शव मुंबईत आणल्यावर त्याच्या अंत्ययात्रेला ७० सहस्र लोक उपस्थित होते, हे चांगले चित्र नाही. बुरहान वाणीविषयीही तेच झाले. (धर्मांधांची देशविघातक वृत्ती वाढण्यामागे काँग्रेसच कारणीभूत आहे, हे सूज्ञ जनतेलाही ठाऊक आहे ! - संपादक)

ब्रिटनच्या पंतप्रधान भारत दौर्‍यावर येणार !

       नवी देहली - ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे या ६ नोव्हेंबरपासून भारत दौर्‍यावर येणार आहेत. नरेंद्र मोदी यांच्यासमवेत मे भारत-ब्रिटन सामरिक संबंधांचा आढावा घेणार आहेत.

पाककडून नौशेरा सेक्टरमध्ये गोळीबार !

कुरापतखोर पाक !
        श्रीनगर - पाकच्या सैन्याकडून पुन्हा एकदा शस्त्रसंधी कराराचे उल्लंघन करत प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील नौशेरा सेक्टरमधील भारतीय सैन्याच्या ४ चौक्यांवर गोळीबार करण्यात आला. तसेच तोफगोळ्यांचाही वापर करण्यात आला. भारतीय सैनिकांनीही गोळीबाराला चोख प्रत्युत्तर दिले.

केंद्र सरकार अयोध्येत भगवान श्रीरामाचे संग्रहालय उभारणार !

श्रीरामाचे संग्रहालय उभारण्यापेक्षा राममंदिर 
बांधण्याला प्राधान्य द्यावे, अशी हिंदूंची अपेक्षा आहे !
        नवी देहली/अयोध्या - केंद्र सरकारचे संस्कृती मंत्रालय अयोध्येत भगवान श्रीरामाचे संग्रहालय उभारणार आहे. उत्तरप्रदेश सरकारने येथे राम आणि रामायण संग्रहालय उभारण्यासाठी २५ एकर भूमीही अधिग्रहित केली आहे. ही भूमी रामजन्मभूमीपासून १० ते १५ कि.मी. अंतरावर आहे.

एक भारत अभियानाला मनसेचा जाहीर पाठिंबा ! - अजय शिंदे, मनसे

धर्मसभेचे निमंत्रण स्वीकारतांना उजवीकडून 
सर्वश्री अजय शिंदे आणि आशिष देवधर
     पुणे, १६ ऑक्टोबर (वार्ता.) - एक भारत अभियानांतर्गत काश्मिरी हिदूंच्या समर्थनासाठी येथील रमणबाग शाळेच्या पटांगणावर २३ ऑक्टोबर या दिवशी सायंकाळी ५.३० वाजता विराट हिंदु धर्मजागृती सभेेचे आयोजन करण्यात आले आहे. हिंदु जनजागृती समितीचे श्री. सुनील घनवट आणि श्री. चैतन्य तागडे यांनी सभेचे निमंत्रण देण्यासाठी मनसेचे पुणे शहराध्यक्ष श्री. अजय शिंदे यांची भेट घेतली असता त्यांनी एक भारत अभियानाला जाहीर पाठिंबा दर्शवला. मनसेच्या कार्यकर्त्यांनी धर्मसभेला उपस्थित रहावे, असे आवाहनही केले. या प्रसंगी एम्पायर ग्रुपचे अध्यक्ष श्री. आशिष देवधर हेही उपस्थित होते.

चलो काश्मीरच्या नार्‍याने सिंहगड दुमदुमला... !

सिंहगडावर प्रसार करतांना कार्यकर्ते
       पुणे, १६ ऑक्टोबर (वार्ता.) - जिहादी आतंकवादामुळे विस्थापित झालेल्या काश्मिरी हिंदूंचे पुन्हा सन्मानाने काश्मीरमध्ये पुनर्वसन व्हावे, या उद्देशाने येथील रमणबाग शाळेच्या पटांगणावर २३ ऑक्टोबरला सायंकाळी ५.३० वाजता विराट हिंदु धर्मजागृती सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेच्या प्रसारासाठी समितीच्या कार्यकर्त्यांनी १६ ऑक्टोबर या दिवशी सकाळी ७.३० ते ११.३० या वेळेत किल्ले सिंहगड येथे प्रसारमोहीम राबवली. कार्यकर्त्यांनी गडावरील पर्यटकांना काश्मिरी हिंदूंवर ओढवलेली दुर्दैवी स्थिती अवगत करून त्यांच्या समर्थनासाठी संघटित होण्याचे आवाहन करत धर्मसभेचे निमंत्रण दिले.

पाक आतंकवाद्यांना पोसत राहिला, तर पुन्हा सर्जिकल स्ट्राईक करू ! - भारतीय सैन्याची चेतावणी

      नवी देहली - पाक यापुढेही आतंकवाद्यांना पोसत राहिला, त्यांना त्यांच्या देशात आश्रय देत राहिला, तर सर्जिकल स्ट्राईकसारखी धडक कारवाई यापुढेही केली जाऊ शकते, अशी चेतावणी भारतीय सैन्याने दिली आहे. संसदेच्या संरक्षणविषयक स्थायी समितीला सर्जिकल स्ट्राईकविषयी औपचारिक माहिती देतांना सैन्याचे उपप्रमुख लेफ्टनंट जनरल बिपीन रावत यांनी ही चेतावणी दिली. (पाक आतंकवाद्यांना पोसत आला आहे आणि रहाणार आहे, तसेच सैन्याच्या एका सर्जिकल स्ट्राईकमुळे आतंकवाद्यांवर मोठा परिणाम झालेला नाही. या कारवाईनंतर पाक सैन्याने २८ हून अधिक वेळा शस्त्रसंधी कराराचे उल्लंघन करून गोळीबार केला आहे, तर आतंकवाद्यांनी सैन्यावर काही आक्रमणे केली आहेत आणि करत आहेत, हे लक्षात घेऊन पाकची नांगी ठेचण्याचेच सैन्याचे ध्येय असले पाहिजे ! - संपादक)

मराठा क्रांती मूकमोर्चाची विराटत्वाची परंपरा ठाण्यातही टिकून !

      ठाणे, १६ ऑक्टोबर (वार्ता.) - विराटत्वाची परंपरा मराठा क्रांती मूक मोर्चाने ठाण्यातही तशीच ठेवली. ठाणे, मुंबई, नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, भिवंडी, तसेच ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागांतून भगवी वस्त्रे, झेंडे, टोप्या घालून आलेल्या नागरिकांनी विविध मागण्यांसाठी जणूकाही मराठा एकतेचा हुंकारच ठाण्यात दिला. विविध भागातून येणार्‍या नागरिकांसाठी मध्य रेल्वेच्या ४० विशेष गाड्या सोडण्यात आल्या होत्या. शहरात वाहतुकीत पालट करण्यात आले होते, तर शहरात कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

कोजागरीच्या निमित्ताने राष्ट्रजागरण !

       पुणे, १६ ऑक्टोबर (वार्ता.) - काश्मिरी हिंदूंच्या समर्थनासाठी आयोजित केलेल्या हिंदु धर्मजागृती सभेचा कोजागरी पौर्णिमेच्या कार्यक्रमांच्या माध्यमातून प्रसार करत समितीच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रजागरण केले. कोजागरी पौर्णिमेच्या निमित्त सायंकाळी विविध ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्या माध्यमातून धर्मसभेची माहिती लोकांपर्यंत पोचवून धर्मसभेला उपस्थित रहाण्याचे आवाहन करण्यात आले. 
१. नवयुग मित्रमंडळाच्या वतीने कोजागरीच्या कार्यक्रमातही विषय मांडण्यात आला. या प्रसंगी ३०० जण उपस्थित होते. या प्रसंगी सभेची हस्तपत्रकेही वितरित करण्यात आली.
२. गावठाण येथे शिवसेनेचे श्री. अजय भोसले यांच्या, तसेच श्रीरामनगर येथे, मेहुणपुरा नवरात्रोत्सव मंडळ येथे कोजागरीच्या निमित्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमांत उपस्थितांना धर्मसभेचे निमंत्रण देण्यात आले. नारदमंदिर येथील कार्यक्रमातही विषय मांडण्यात आला. नारदमंदिराचे श्री. येनपुरे यांनी समितीच्या कार्यात सहभागी होण्याची इच्छा प्रदर्शित केली.

गेल्या ३० वर्षांत परिस्थिती पालटलेली दिसत नाही ! - उच्च न्यायालयाचे गंभीर निरीक्षण

स्वातंत्र्यप्राप्तीनंतर कुपोषणाची समस्या संपण्याऐवजी ती वाढत जाणे, 
हे आतापर्यंतची सर्वपक्षीय सरकारे आणि लोकशाही यांचे अपयश नव्हे का ?
स्वातंत्र्य मिळाले, तरीही आदिवासी भागाविषयी नोकरशहांमध्ये हीच बेदखलपणाची वृत्ती कायम !
मुंबई उच्च न्यायालयाने कुपोषणाच्या मुद्यावरून सरकारला पुन्हा खडसावले !
      मुंबई, १६ ऑक्टोबर - समाजसेवक बाबा आमटे आणि डॉ. अभय बंग यांच्यासारख्या व्यक्ती कुठल्याही साहाय्याविना गंभीर अशा सामाजिक प्रश्‍नांवर कार्य करतात आणि ते काही प्रमाणात यशस्वीही होतात; परंतु सरकारकडे सर्व यंत्रणा आणि पैसा हाती असूनही गेल्या ३० वर्षांत परिस्थिती पालटलेली दिसत नाही. त्याउलट सरकारकडून कारणांचा पाढा वाचला जातो, अशा शब्दांत मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती विद्यासागर कानडे यांच्या अध्यक्षतेखालील खंडपिठाने सरकारला कुपोषणाच्या सूत्रावरून फटकारले. याचसमवेत पालघरमध्ये मंत्र्यांनी भेटी देऊनही गेल्या २ मासांपासून तेथील परिस्थितीत फरक पडलेला नाही. अशा वेळी मेळघाटात परिस्थिती पालटेल, अशी अपेक्षा करणे म्हणजे, थट्टा ठरेल. आदिवासी भागाची दखल स्वातंत्र्यपूर्वीच्या ब्रिटिश सरकारकडून घेतली जात नव्हती. आता स्वातंत्र्य मिळाले, तरीही त्या भागाविषयी नोकरशहांमध्ये हीच बेदखलपणाची वृत्ती कायम आहे, हे दुर्दैवी आहे, असेही खडे बोल न्यायालयाने १४ ऑक्टोबर या दिवशी मेळघाट आणि अन्य भागांमधील कुपोषणासंबंधित विविध जनहित याचिकांवरील सुनावणीच्या वेळी सुनावले.

नाशिक - तळेगांव येथे प्रशासनाकडून उर्वरित ७ गावांमधील संचारबंदी मागे

      नाशिक, १६ ऑक्टोबर (वार्ता.) - तळेगांव येथील अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर जिल्ह्यात लागू झालेली संचारबंदी टप्याटप्याने उठवण्यात आली असून प्रशासनाने १६ ऑक्टोबर या दिवशी सकाळी उर्वरित ७ गावांमधील संचारबंदी मागे घेतली आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी येथील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती. तीही पूर्ववत चालू करण्यात आली असून जुन्या वादग्रस्त संदेशांवर विश्‍वास ठेवू नका, असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे. नाशिकमध्ये सायबर सेलचे गुन्हे प्रविष्ट झाले आहेत, तसेच दंगलखोरांचा तपासही चालू आहे, अशी माहिती पोलिसांनी या वेळी दिली.निगडी प्राधिकरण (पुणे) येथे रुग्ण तरुणीवर बलात्कार करणार्‍या आधुनिक वैद्याला अटक

      निगडी, १६ ऑक्टोबर - २० वर्षीय रुग्ण तरुणीवर बलात्कार करणार्‍या येथील एका मेडिटेशन सेंटरमधील आधुनिक वैद्य रमेश चव्हाण यांना पोलिसांनी अटक केली आहे. (असे आधुनिक वैद्य म्हणजे वैद्यकीय क्षेत्रासाठी कलंकच आहेत ! - संपादक) पीडित तरुणीवर उपचार चालू असतांना चॉकलेटमधून गुंगीचे औषध देऊन त्याने बलात्कार केला. याप्रकरणी पीडितेने तक्रार दिली होती. देवनार पशूवधगृहासाठी देण्यात येणार्‍या १ सहस्र ६६ कोटी रुपये अनुदानाच्या निषेधार्थ अखंड हिंद पार्टीचे आंदोलन !

वारंवार अशी आंदोलने करावी लागू नयेत, यासाठी हिंदु राष्ट्र स्थापा !
      मुंबई, १६ ऑक्टोबर (वार्ता.) - देवनार पशूवधगृहासाठी १ सहस्र ६६ कोटी रुपये अनुदान देणार्‍या मुंबई महानगरपालिकेच्या निर्णयाचा निषेध म्हणून येथील आझाद मैदानात अखंड हिंद पार्टीच्या वतीने आंदोलन करण्यात आले. अनुदान रहित न झाल्यास आम्ही तीव्र आंदोलन करू. त्यातून होणार्‍या परिणामांना शासन आणि मुंबई महानगरपालिका कारणीभूत असेल, अशी चेतावणी यावेळी देण्यात आली.

(म्हणे) राज्यात पूर्णवेळ गृहमंत्री हवा !

सत्ताकाळात कायदा-सुव्यवस्थेची लक्तरे वेशीवर 
टांगलेली असतांना त्याविषयी स्वतः काय केले, ते चव्हाण यांनी सांगावे ! 
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचा अनाहूत सल्ला
     पुणे, १६ ऑक्टोबर - सरकार फक्त घोषणा करत असून त्याची अंमलबजावणी होत नाही. राज्यात मोर्चे, आंदोलने आणि नाशिकमध्ये अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराची घटना बघता कायदा-सुव्यवस्था बिघडलेली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे व्यस्त कामांमुळे गृहखात्याला पुरेसा वेळ देऊ शकत नाहीत; म्हणून राज्याला पूर्ण वेळ गृहमंत्री हवा, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली. जिल्हा काँग्रेसच्या वतीने आयोजित केलेल्या शिबिरासाठी ते येथे आले होते. त्या वेळी ते पत्रकारांशी बोलत होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि हिंदुत्वनिष्ठ नेते यांचे संबंध जिव्हाळ्याचे ! - वा.ना. उत्पात

     पुणे, १६ ऑक्टोबर (वार्ता.) - स्वातंत्र्योत्तर काळात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची हिंदुत्वविरोधी अशी प्रतिमा रंगवली गेली. प्रत्यक्षात डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि तत्कालीन हिंदुत्वनिष्ठ नेते यांचे अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध होते. डॉ. आंबेडकर यांनी नेहमीच सामाजिक एकोपा कायम रहाण्यासाठी प्रयत्न केले, असे प्रतिपादन भागवताचार्य वा.ना. उत्पात यांनी केले. समस्त हिंदु आघाडीच्या वतीने १३ ऑक्टोबर या दिवशी येथील मॉडर्न महाविद्यालयात राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक डॉ. बाबासाहेब आंबेडकर या विषयावर वा.ना. उत्पात यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते. या प्रसंगी समस्त हिंदु आघाडीचे कार्याध्यक्ष श्री. मिलिंद एकबोटे, मॉडर्न महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय खरात उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. प्रीतम गिते यांनी केले. (दलित चळवळीतील हिंदुत्वविरोधी नेते डॉ. आंबेडकर यांना खर्‍या अर्थाने समजून घेतील का ? - संपादक)

आपच्या आणखी एका आमदाराला अटक !

गुन्हेगार लोकप्रतिनिधींचा भरणा असलेला आप !
       सूरत (गुजरात) - खंडणीच्या प्रकरणी आम आदमी पक्षाचे आमदार गुलाब सिंह यांना देहली पोलिसांनी येथून अटक केली. त्यांच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट काढण्यात आले होते. गुलाब सिंह आपचे गुजरात राज्याचे प्रभारी आहेत.

(म्हणे) हिंदु राष्ट्रामुळे देश रसातळाला जाईल ! - डॉ. भालचंद्र मुुणगेकर, माजी खासदार

हिंदु राष्ट्राची व्यापक संकल्पना समजून 
घेण्याआधीच त्यावर टीका करणे, हा अविवेकीपणा नव्हे का ?
      पुणे, १६ ऑक्टोबर (वार्ता.) - हिंदु राष्ट्रवादापेक्षा भारतीय राष्ट्रवाद महत्त्वाचा आहे. हिंदु राष्ट्र आले, तर भारतदेश रसातळाला जाईल, असे वक्तव्य माजी खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी केले. साहित्यिक रावसाहेब कसबे यांना मारवाडी फाऊंडेशनच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते. (भारतीय राष्ट्रवाद आणि हिंदु राष्ट्रवाद यांना वेगळे कसे करणार ? सनातन धर्माची परंपरा हीच भारतीय राष्ट्रवादाची परंपरा आहे. हिंदु राष्ट्राविषयी जाणून न घेता त्याविषयी अज्ञानमूलक भीती निर्माण करणे, हा हिंदुद्वेष आहे ! - संपादक)

बेळगाव महाराष्ट्रात आणण्यासाठीही मराठा क्रांती मोर्च्यासारखा भव्य मोर्चा काढा ! - सीमा भागातील मराठी माणसांची भावना

सीमा भागातील मराठी बांधवांकडे महाराष्ट्रातील राज्यकर्ते लक्ष देतील का ?
      कोल्हापूर, १६ ऑक्टोबर (वार्ता.) - सीमा भागातील नागरिकांचे आजही पुष्कळ हाल होत आहेत. रुग्णालये, शाळा, महाविद्यालये यांसह शासकीय कार्यालयांतील व्यवहार कन्नड भाषेतून होत असल्याने आम्हाला ते अडचणीचे ठरत आहे. बेळगाव महाराष्ट्रात आणण्यासाठी महाराष्ट्रातील जनतेने बेळगाव येथे असा मराठा क्रांती मोर्चासारखा विराट मोर्चा काढून कर्नाटक शासनाला शक्ती दाखवून द्यावी, अशी भावना येळ्ळूर येथे कर्नाटक पोलिसांनी मारहाण केलेल्या पीडित कुटुंबातील महिलांनी व्यक्त केली. १५ ऑक्टोबर या दिवशी येथे काढण्यात आलेल्या मराठा क्रांती मोर्चामध्ये कर्नाटक राज्यातील बेळगाव, निपाणी, येळ्ळूर, बिदर, भालकी परिसरातील सहस्रो सीमाबांधव उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. त्या वेळी त्यांनी ही भावना व्यक्त केली. सकाळपासूनच शेंडा पार्क येथे सीमावासीय बांधव येत होते. यात महिलांचा सहभाग लक्षणीय होता. सीमा भागातील महिलांनी कर्नाटक शासनाकडून होणार्‍या अन्यायाची माहिती फलकांच्या माध्यमातून देऊन इतरांचे लक्ष वेधून घेतले. बेळगाव महाराष्ट्रात आणण्यासाठी सीमा भागातील नागरिकांना आरक्षण मिळावे, अशी मागणी येळ्ळूर येथील महिला सुनीता वसूलकर, राजश्री पवार, शैलजा गारेल, नीता शिंदे यांनी केली.

वर्धा येथे शेती उत्पादक आंदोलन समितीकडून पाणी आटवून कोजागरी पौर्णिमा साजरी !

      वर्धा, १६ ऑक्टोबर - कोजागरी पौर्णिमेला सायंकाळी दूध आटवून ते ग्रहण करण्याची धर्मपरंपरा आहे. येथील शेडनेट पॉलीहाऊस संदर्भात शासनाच्या वतीने राबवण्यात आलेल्या चुकीच्या धोरणामुळे शेतकरी कर्जबाजारी झाल्याचा आरोप करत शेडनेट पॉलीहाऊस शेती उत्पादक आंदोलन समितीने दुधाऐवजी पाणी आटवून कोजागरी पौर्णिमा साजरी केली. (समाजाला धर्मशिक्षण देण्याची आवश्यकता दर्शवणारी घटना ! - संपादक) या वेळी किसान अधिकार अभियान, शेडनेट पॉलीहाऊस आंदोलन समिती यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठात कुलगुरूंचे परिचय पत्र (बायोडेटा) उपलब्ध नाही !

पुणे विद्यापिठाचा भोंगळ कारभार !
     पुणे, १६ ऑक्टोबर - संशोधन क्षेत्रात चांगले कार्य करणार्‍या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाच्या कुलगुरूंचे शोधनिबंध, तसेच त्यांच्या स्वामित्व हक्काच्या (पेटंट) संदर्भातील माहितीच उपलब्ध नाही. याचसमवेत माहितीच्या अधिकारातून मिळालेल्या माहितीनुसार विद्यापिठात कुलगुरूंचे परिचय पत्रही (बायोडेटा) उपलब्ध नसल्याची माहिती विद्यापीठ प्रशासनाने दिली आहे.
    कोणत्याही शिक्षणसंस्थेत अथवा आस्थापनात काम करणार्‍या व्यक्तींचे परिचय पत्र असणे अपेक्षित असते. त्या आधारेच संबंधित व्यक्तीची पदावर नेमणूक केली जाते. विद्यापीठ अधिसभेचे माजी सभासद डॉ. अतुल बागुल यांनी कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे यांच्या परिचय पत्राची मागणी करणारा अर्ज माहिती अधिकारांतर्गत विद्यापिठाकडे १ वर्षापूर्वीही केला होता; परंतु अजूनपर्यंत परिचय पत्र सिद्ध करण्यात आलेले नाही.

पोलिसांच्या संदर्भातील कटू अनुभव !

पोलिसांची कार्यक्षमता !
        ११ ऑक्टोबर २०१६ या दिवशी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमावर सायंकाळी ६.३० च्या सुमारास ड्रोन (मानवरहित उडता कॅमेरा) फिरतांना दिसला. श्री रामनाथ देवस्थानच्या दिशेकडून सनातन आश्रमाकडे येत असलेला हा ड्रोन साधारण २० मिनिटे फिरत होता. याविषयी सनातन आश्रमाच्या वतीने त्वरित १०० क्रमांकावर संपर्क करून पोलिसांना माहिती देण्यात आली, तसेच फोंडा पोलीस ठाण्यातही कळवण्यात आले. त्यानंतर सुमारे अर्ध्या घंट्याने पोलीस आश्रमात पोचले आणि त्यांनी याविषयी जाणून घेतले.
पोलिसांविषयी चांगले आणि वाईट अनुभव असल्यास 
वाचकांनी नजीकच्या दैनिक कार्यालयात कळवावेत !

आपण आपल्याच देशात रहात आहोत का ?

     देहली येथील जवाहरलाल नेहरू विद्यापिठात मध्यंतरी जे काही झाले, तेच सर्व भाग्यनगर (हैद्राबाद) विद्यापिठातही झाले होते. भाग्यनगर (हैद्राबाद) विद्यापिठातील देशद्रोहाच्या घटनेला दलित शोषणाचे रूप दिले गेले. देहली प्रकरणात खरे रूप पुढे आले. भाग्यनगर विश्‍वविद्यालयाच्या घटनेची वास्तविकता वाचा...
१. याकूबच्या फाशीने भारतियांना आनंद; मात्र पाकसमर्थकांचा विरोध
     पाकिस्तानच्या साहाय्याने आतंकवाद्यांनी मुंबईमध्ये केलेल्या बॉम्बस्फोटांमध्ये ३०० निरपराध्यांचा मृत्यू झाला. याकूब मेमन या षड्यंत्रांचा सूत्रधार होता, ज्याला दोन दशकांनंतर वर्ष २०१५ मध्ये फाशी दिले गेले. उशिरा का होईना; परंतु न्याय मिळाला; म्हणून भारतीय नागरिकांना आनंद झाला; परंतु भारतातच राहून पाकिस्तानचे समर्थक असणार्‍या तथाकथित बुद्धीवादी आणि कुटील राजकारण्यांनी याकूबला फाशीची शिक्षा देण्यावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली.

मुलांना केवळ शालेय शिक्षण न शिकवता त्यांच्यावर आदर्श संस्कार करणारे आणि त्यांच्यासमोर सर्व आदर्श कृती घडाव्यात, याविषयी आग्रही असणारे आदर्श शिक्षक !

१. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण 
प्रगतीचे दायित्व घेणे 
     शिक्षक शेठाणीला म्हणाले, तुम्ही तुमच्या मुलांना शिकवण्याची कामगिरी माझ्यावर सोपवली आहे, हे मला पुष्कळ कठीण वाटते. त्या वेळी शेठाणी म्हणाली, का ? मुले तर व्यवस्थित अभ्यास करतात. वेळेवर शिकायला येतात आणि तुम्ही शिकवल्याप्रमाणे त्याचे अनुकरणही करतात ? त्यावर शिक्षक म्हणाले, मुलांना शिकवतांना मला केवळ मुलांकडे पहावे लागत नाही, तर मुलांना अयोग्य वाटणार्‍या गोष्टीतून कोणतेही प्रसंग घडायला नको, याकडेही लक्ष द्यावे लागते.

अभ्यास कसा करावा ?

परीक्षेच्या पार्श्‍वभूमीवर मुलांना मार्गदर्शक अशी लेखमालिका
     आजकाल बहुतेक मुले आईच्या आग्रहामुळे, बाबांच्या भीतीपोटी अन् एकमेकांमध्ये असलेल्या चढाओढीमुळे काहीशा तणावाखालीच अभ्यास करतांना दिसतात. अशा वेळी अभ्यास मनापासून होतोच, असे नाही. त्यामुळे परीक्षेत अपेक्षित यश मिळाले नाही की, दुःख होते. त्यामुळे मुलांनो, अभ्यास करण्यामागील योग्य दृष्टीकोन समजून घेतला, तर अभ्यास कंटाळवाणा न वाटता आनंददायी वाटेल. अभ्यास करण्याच्या विशिष्ट पद्धती आहेत. त्याप्रमाणे अभ्यास केल्यास अभ्यास चांगला होतो. परीक्षेची भीती कशी घालवावी, उत्तरपत्रिका आत्मविश्‍वासाने कशी लिहावी, अभ्यासात एकाग्रता कशी साधावी आदींची माहिती सांगणारा हा लेखप्रपंच...

प्रेक्षकांचा दर्जा का खालावला ?

     पुण्यात पूर्वी नाटकांना चोखंदळ प्रेक्षक होता. नाटक पहाण्यासाठी अमुक एक बुद्धिमत्ता असलेला प्रेक्षक यायचा. आता प्रेक्षकांची अभिरुची खालावली आहे. अनेक जण अभिनेत्रींचे चेहरे पाहून आणि हॉटेलिंगला जावे, तसे नाटकाला येतात. तमाशाचा असावा, तसा नाटकाचा प्रेक्षक बनला आहे, असे विधान नाटककार रत्नाकर मतकरी यांनी केले आहे. मतकरी यांच्या टीकेतून आजचे चित्रपट, नाटके आणि प्रेक्षक यांची विदारक स्थितीचे चित्रण झाले आहे. तसेच हे विधान विद्येचे माहेरघर आणि सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळख असणार्‍या पुण्याला निश्‍चितच भूषणावह नाही.

'हिंदू एकता आंदोलन' आणि 'श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थान' यांच्या शाखाफलकांचे मालगाव (जिल्हा सातारा) येथे अनावरण !

मध्यवर्ती चौकाचे छत्रपती शिवाजी महाराज चौक असे नामकरण ! 
शाखाफलकांचे अनावरण करतांना 
श्री. विक्रम पावसकर आणि हिंदु धर्माभिमानी
     मालगाव (जिल्हा सातारा), १६ ऑक्टोबर (वार्ता.) - येथे भाजपचे जिल्हाध्यक्ष श्री. विक्रम पावसकर यांच्या हस्ते भगव्या ध्वजाचे पूजन करून हिंदू एकता आंदोलन आणि श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या फलकांचे अनावरण करण्यात आले. या वेळी मध्यवर्ती चौकात छत्रपती शिवाजी महाराज चौक या नामफलकाचे नारळ वाढवून उद्घाटन करण्यात आले. हिंदु मातृभूमी रक्षक संघटनेच्या वतीने आयोजित कार्यक्रमास पंचक्रोशीतील युवक उत्साहाने सहभागी झालेे. (पाश्‍चात्त्यांप्रमाणे फीत न कापता हिंदु धर्मशास्त्राप्रमाणे नारळ वाढवून नामफलकाचे उद्घाटन करणार्‍या आयोजकांचे अभिनंदन ! - संपादक) 
हिंदूंनी जातीपाती विसरून धर्मरक्षणासाठी संघटित झाले पाहिजे ! - विक्रम पावसकर, जिल्हाअध्यक्ष, भाजप 
     हिंदु धर्मातील जाती-जातींमध्ये फूट पाडण्याचे षड्यंत्र काही हिंदुद्वेष्ट्या राजकारण्यांकडून रचले जात आहे. सध्या निघत असलेल्या मोर्च्यांमध्ये धर्माधांकडून खाऊ आणि पाणी वाटप केले जात आहे. हिंदूंनी या गोष्टींना न भुलता या पाठीमागील षड्यंत्र ओळखले पाहिजे. हिंदूंच्या सणांमध्येदेखील धर्मांध शिरकाव करत आहेत. यातून हिंदूंच्या सणांचे पावित्र्य नष्ट करण्याचा घाट घातला जात आहे.

सुसंस्कृतपणा शिकवावा कुणी कुणाला ?

         राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर यांनी विजयादशमीच्या दिवशी भगवानगडाच्या पायथ्याशी झालेल्या सभेत भाषणाच्या ओघात राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार, तसेच पवार कुटुंबीय यांच्याविषयी अपशब्द वापरले. त्यानंतर मोठ्या प्रमाणावर राजकारण चालू झाले. जानकर यांच्या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्यांचा रोष प्रकट करण्यासाठी राष्ट्रीय समाज पक्षाच्या पुण्यातील कार्यालयाची मोडतोड केली. याला प्रत्युत्तर म्हणून बारामती हॉस्टेलमधील शरद पवार यांच्या छायाचित्रावर शाई फेकण्यात आली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जानकर यांच्या रहाटणी येथे होणार्‍या कार्यक्रमादरम्यान निदर्शने करून जानकर यांचा प्रतिक्रियात्मक पुतळ्याला मारहाण केली, तर या प्रकरणी क्षमायाचना न केल्यास कुठल्याच मंत्र्याला राज्यात फिरू देणार नाही, अशी भाषाही राष्ट्रवादी काँग्रेसचे नवाब मलिक यांनी वापरली. त्यानंतर जानकर यांनी खुलासा करत त्यांच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढल्याचे सांगत जर लोकांची मने कलुषित झाली असतील, तर खेद प्रकट करतो, असे म्हणून वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.

ठाणे येथे नवरात्रोत्सवानिमित्त पथनाट्य आणि स्वसंरक्षणाची प्रात्यक्षिके यांद्वारे प्रसार !

कल्याण
पथनाट्य सादर करतांना रणरागिणीच्या 
महिल्या कार्यकर्त्या आणि उपस्थित महिला
     येथील श्री छत्रपती प्रतिष्ठान नवरात्र मंडळात रणरागिणी शाखेच्या वतीने पथनाट्य आणि स्वसंरक्षण प्रशिक्षणाची प्रात्यक्षिके दाखवण्यात आली. कार्यक्रमासाठी मंडळाचे अध्यक्ष श्री. शरद गवळी यांचे सहकार्य लाभले. या वेळी सौ. वेदिका पालन यांनी महिलांना लव्ह जिहादविषयी मार्गदर्शन केले. येथेही महिलांनी प्रशिक्षणवर्ग चालू करण्यास सांगितले. 
     येथील गांधी चौकात गरबा संपल्यावर १५० जणांसमोर पथनाट्य आणि प्रात्यक्षिके सादर करण्यात आले. श्री. धोकीया यांनी कार्यक्रमासाठी अनुमती देऊन सहकार्य केले. या वेळी सनातनच्या साधकांचा नारळ आणि हार देऊन सत्कार करण्यात आला. येथील लोकांनी ३ प्रशिक्षणवर्गांची मागणी केली. 

श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थान यांच्या वतीने वडूज (जिल्हा सातारा) येथे श्री दुर्गादौड !

 दौडीमध्ये सहभागी झालेले कार्यकर्ते
     सातारा, १६ ऑक्टोबर (वार्ता.) - श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थान यांच्या वतीने आयोजित केलेल्या श्री दुर्गामाता दौडीची सांगता दसर्‍याला करण्यात आली. या वेळी वडूज शहरातील समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. अनेक युवकांनी दौडीत उत्स्फूर्त सहभाग घेतला. दौडीमध्ये सनातन संस्थेच्या वतीने सौ. राधा पटेल आणि हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ज्योती कुंभार यांनी धर्मध्वजाचे पूजन केले. 

भारतात असे करायला सर्वधर्मसमभाववाल्यांनी विरोध केला असता !

     अमेरिकेत प्रथमच दिवाळीच्या टपाल तिकिटाचे प्रकाशन करण्यात आले. न्यूयॉर्क शहरातील भारतीय वकिलातीमध्ये नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात नवीन टपाल तिकिटाचे अनावरण करण्यात आले. 'युनायटेड स्टेट्स पोस्टल सर्व्हिस' आणि 'दिवाळी स्टँप प्रोजेक्ट कमिटी' यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या तिकिटावर पारंपरिक दीप आणि त्याच्या समोर गुलाबाच्या पाकळ्यांची जोडी दाखवण्यात आली आहे.

सर्व पक्षीय सरकारांनी मुलांवर संस्कार न केल्याने ही स्थिती झाली आहे !

     त्र्यंबकेश्‍वरमधील तळेगाव (अंजनेरी) येथील ५ वर्षांच्या बालिकेचे लैंगिक शोषण केल्याच्या निषेधार्थ संतप्त नागरिकांनी रस्त्यावर उतरून आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. एका १५ वर्षीय मुलाने या पीडित बालिकेवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप झाला होता; परंतु वैद्यकीय अहवालानुसार बलात्कार झाला नसून अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न झाला आहे, अशी माहिती नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दिली.

जीवनात कधीच नैराश्य येऊ नये; म्हणून मुलांना हिंदु राष्ट्रात साधना शिकवली जाईल !

     आजच्या जगात पालक आणि विद्यार्थी यांच्यामध्ये अजिबातच सुसंवाद नाही. फक्त भौतिक सुविधा आपल्या मुलांना उपलब्ध करून दिल्या की, आपले उत्तरदायित्व संपले, असे करू नका. मुलांवर अपेक्षांचे ओझे न लादता, तसेच त्यांची क्षमता बघूनच त्यांना योग्य मार्गदर्शन करा अन्यथा मुलांमध्ये नैराश्य येईल. 
- गंगाधर म्हमाणे, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षा मंडळ

चुनाभट्टी येथील धर्माभिमान्यांचा विजयादशमीनिमित्त हिंदु राष्ट्र स्थापनेचा निर्धार !

डावीकडून धर्माभिमानी सर्वश्री श्रीराम यादव, आदेश कोरी, 
राजेश पाल, मनोज यादव, राकेश पाल, संतोष धारकर, नितीन दुबे
     चुनाभट्टी (मुंबई), १६ ऑक्टोबर (वार्ता.) - विजयादशमीनिमित्त येथे ११ ऑक्टोबर या दिवशी आझाद गल्ली येथील धर्माभिमान्यांनी कारेश्‍वर मंदिरात शस्त्रपूजन करून देव, देश आणि धर्म यांच्या रक्षणासाठी दुर्गादेवी आणि महादेव यांच्या चरणी प्रार्थना केली. तसेच शस्त्रपूजन झाल्यानंतर उपस्थित धर्माभिमान्यांनी श्रीकृष्ण, श्रीराम, शिव आणि दुर्गामाता यांना साक्षी ठेवून हिंदु राष्ट्राच्या स्थापनेची शपथ घेतली. याप्रसंगी धर्माभिमानी सर्वश्री श्रीराम यादव, आदेश कोरी, राजेश पाल, मनोज यादव, राकेश पाल, संतोष धारकर, नितीन दुबे उपस्थित होते. 

पोलिसांच्या सूचना न पाळणार्‍या ममुराबाद येथील सहा मंडळातील १२ जणांवर गुन्हे प्रविष्ट

कायदा-सुव्यवस्थेचा धाक नसल्याचेच हे द्योतक !
 श्री दुर्गादेवी मूर्तीविसर्जन मिरवणुकीतील प्रकार
     जळगाव - श्री दुर्गादेवी मूर्तीविसर्जन मिरवणुकीत पोलिसांच्या सूचना न पाळणार्‍या ममुराबाद येथील सहा मंडळातील १२ जणांवर तालुका पोलीस ठाण्यामध्ये गुन्हे प्रविष्ट करण्यात आले आहेत. 
१. तालुक्यातील ममुराबाद येथे १२ ऑक्टोबरला श्री दुर्गादेवी मूर्तीविसर्जन होते. मिरवणूक शांततेत आणि वेळेत पार पडण्यासाठी मंडळांना पोलिसांनी लेखी आणि तोंडी सूचना दिल्या; मात्र मंडळांनी सूचनांचे पालन न केल्याने गुन्हा प्रविष्ट करण्यात आला. 

पू. (सौ.) सखदेवआजी यांच्या संदर्भात पू. (सौ.) सूरजकांता मेनराय आणि पू. भगवंतकुमार मेनराय यांना आलेल्या अनुभूती

पू. (सौ.) आशालता सखदेवआजी
१. पू. आजींच्या चरणांवर डोके ठेवताच शरिरातील पेशीपेशीत त्यांचे
चैतन्य जाऊन संपूर्ण शरीर चैतन्यमय होणे आणि भावविभोर होऊन
त्यांच्या चरणांवरून कधी डोके उचलले, हे लक्षात न येणे
     ८.८.२०१६ या दिवशी श्रावणी सोमवार असल्याने पू. मेनरायकाका रामनाथी मंदिरात गेले होते. त्यांनी मंदिरातून आणलेला प्रसाद घेऊन मी पू. सखदेवआजींना देण्यासाठी गेले होते. त्या वेळी पू. आजी पलंगावर तक्क्याला टेकून पहुडल्या होत्या. मी खोलीत जाताच त्या व्यवस्थित उठून बसल्या. मी त्यांना मिठी मारली. थोडा वेळ बोलून मी त्यांचे चरण पकडले आणि माझे डोके त्यांच्या चरणांवर ठेवले. पू. आजींनी माझ्या पाठीवर हात ठेवून मला आशीर्वाद दिला. त्या वेळी माझ्या शरिरातील पेशीपेशीत त्यांचे चैतन्य जाऊन माझे संपूर्ण शरीर चैतन्यमय झाले. मी भावविभोर झाले. मी त्यांच्या चरणांवरून कधी माझे डोके उचलले, ते माझ्या लक्षातही आले नाही. त्यानंतर मी तेथे असलेल्या आसंदीत बसले. त्यांनी मला प्रसाद दिला. (प्रत्यक्षात त्या दिवशी दुपारपर्यंत पू. आजींनी काहीच खाल्ले नव्हते. पू. मेनरायआजींनी आणलेल्या प्रसादातील दोन मोठ्या वड्या त्यांनी खाल्ल्या. - कु. राजश्री सखदेव)
पू. भगवंतकुमार मेनराज आणि पू. (सौ.) सूरजकांता मेनराय
२. स्वतःला पुष्कळ त्रास होत असतांना
पू. आजींनी मी प्रतिदिन करत
असलेल्या नामजपाविषयी कौतुक करणे
     एकदा मी पू. सखदेवआजींना भेटण्यासाठी त्यांच्या खोलीत गेले होते. त्या दिवशी त्यांना थोडे बरे वाटत होते. मी त्यांना त्यांच्या घरातील व्यक्तींविषयी विचारले. त्या वेळी तेथे असलेल्या त्यांच्या मुलीने मला घरातील सर्वांविषयी सांगितले. मी पू. आजींना त्या करत असलेल्या नामजपाविषयी विचारले. मी त्यांना म्हटले, तुम्ही जसा जप करता, तसा जप मला केव्हा करता येईल ? त्या वेळी त्या म्हणाल्या, मला बरे वाटत नसल्याने काही वेळा मी अंथरुणावर पहुडून जप करते.

उष:काल होता होता, काळरात्र झाली अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली !


साधकांना सूचना

पौर्णिमा आणि अमावास्या या तिथींना प्रार्थना, नामजप, तसेच साधना अधिकाधिक करा. 
काल पौर्णिमा झाली.

फलक प्रसिद्धीकरता

हिंदूंचे कार्यक्रम विनाविघ्न कधी साजरे होणार ?
     दसर्‍याच्या दिवशी नगर येथे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानने आयोजित केलेल्या श्री दुर्गामाता दौडीमध्ये आशा चित्रपटगृहाजवळील मशिदीसमोर भगवा ध्वज हातात घेतलेले छायाचित्र काढल्यावरून धर्मांधांनी संघटनेच्या २ कार्यकर्त्यांना शस्त्रे आणि दांडगे यांनी गंभीर मारहाण केली.

हिंदू तेजा जाग रे !

Jago ! 
Maharashtrake Nagarme Durgadaud me Mashjid ke samane bhagva dwaj ka photo nikalnepar dharmandhone 2 hinduonko pita. 
Hinduopar ka ye sankat kab dur hoga ? 
जागो !
 महाराष्ट्र के नगर में दुर्गादौड में मस्जिद के सामने भगवा ध्वज का फोटो निकालने पर, धर्मांधों ने २ हिन्दुआें को पीटा ।
 हिंदूओपर का ये संकट कब दूर होगा ?

आध्यात्मिक उपायांच्या संदर्भात रायगड जिल्ह्यात घेतलेल्या कार्यशाळेपूर्वी आणि नंतर साधकांना सद्गुरु अनुताई यांच्या चैतन्यमय सत्संगामुळे आलेल्या अनुभूती, तसेच शिकायला मिळालेली सूत्रे

सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर
     रायगड जिल्ह्यात ठिकठिकाणी आध्यात्मिक उपायांच्या संदर्भात कार्यशाळा घेण्यात आली. या वेळी सर्व साधकांना सद्गुरु (कु.) अनुताई यांच्या संतसंगाचा आणि मार्गदर्शनाचा लाभ झाला. कार्यशाळेच्या वेळी साधकांच्या, तसेच त्यांच्या मुलांच्या अडचणी याविषयीची माहिती घेऊन सद्गुरु (कु.) अनुताई यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी काही साधकांना आध्यात्मिक उपाय, पूर्वजांचे त्रास यांविषयी सांगून, तर काहींना स्वभावदोषांची जाणीव करून देऊन प्रक्रियेचे महत्त्व लक्षात आणून दिले. काहींना सेवेचा कालावधी वाढवायला सांगून त्यासाठी कार्यपद्धत घालून दिली आणि तसे न झाल्यास प्रायश्‍चित्तही घ्यायला सांगितले. रायगड जिल्ह्यातील अनेक साधकांना त्यांच्या या मार्गदर्शनाचा सर्व स्तरांवर लाभ झाला.
     सद्गुरु (कु.) अनुताई केंद्रात येण्यापूर्वी, तसेच त्यांच्या मार्गदर्शनाच्या वेळी आलेल्या अनुभूती आणि शिकायला मिळालेली सूत्रे येथे देत आहोत.
१. सद्गुरु (कु.) अनुताई केंद्रात येण्यापूर्वी आलेल्या अनुभूती
१ अ. सद्गुरु (कु.) अनुताई यांचा तोंडवळा सतत डोळ्यांसमोर दिसणे
     केंद्रात कार्यशाळा आहे, हे समजल्यापासूनच या कार्यशाळेचा आध्यात्मिक स्तरावर लाभ व्हावा, यासाठी प्रार्थना वाढल्या. सद्गुरु (कु.) अनुताई यांचा तोंडवळा सतत डोळ्यांसमोर दिसून त्यांनी सांगितलेले शब्द अंतर्मनापर्यंत जात असून स्थिरता जाणवत आहे, असे वाटत होते.
१ आ. सद्गुरु ताई येणार असल्याचे समजल्यावर शारीरिक त्रासावर औषध घेण्याची बुद्धी होणे
     सदगुरु अनुताई येण्याआधी मला तीव्र त्रास होत होता. मी त्वचाविकाराने त्रस्त झाले होते. त्यामुळे अस्वस्थता वाढून नकारात्मक विचारांचे प्रमाणही वाढले होते; परंतु डॉक्टरांकडे जाण्याची बुद्धी होत नव्हती. ३ मास असेच गेले. सद्गुरु ताई कार्यशाळेच्या निमित्ताने जिल्ह्यात येणार, असे समजताच त्या येण्यापूर्वी ४ - ५ दिवस डॉक्टरांकडे जाऊन औषध घ्यावेसे वाटले. - सौ. विमल गरुड
१ इ. सदगुरु अनुताईंच्या येण्याने हलकेपणा जाणवून
मन आनंदी होणे आणि घरी अधिक प्रकाश जाणवणे
     सदगुरु अनुताई घरी येण्याआधी माझ्या मनावर पुष्कळ दडपण आले होते. माझ्याकडून संत सेवा नीट होईल का ? मला जमेल का ? असे वाटत होते.

नामजपाच्या संदर्भात कु. मधुरा भोसले यांना आलेल्या अनुभूती

कु. मधुरा भोसले
१. अधूनमधून भिंतीवर आणि खोलीतील वस्तूंवरही नामजप
दिसणे आणि खोलीतील रिकाम्या पोकळीतही नामजपातील
अक्षरे स्वतःभोवती गोल फिरत असल्याचे दृश्य दिसणे
     १.७.२०१६ पासून जागृत असतांना आणि झोपेतून उठल्याबरोबर अधूनमधून माझ्या डोळ्यांपुढे पिवळ्या अक्षरात नामजप लिहिलेला दिसत होता. भिंतीवर आणि खोलीतील वस्तूंकडे पाहिल्यावर वस्तूंवरही श्रीकृष्ण, प.पू. डॉक्टर आणि निसर्गदेवता यांचा नामजप लिहिलेला दिसत होता. खोलीतील रिकाम्या पोकळीतही नामजपातील अक्षरे स्वत:भोवती प्रदक्षिणा घालाव्यात, तशी स्वतःभोवती गोल फिरत असल्याचे दृश्य दिसले. नामजप दिसणे म्हणजे नामजप पहाणे होय. पश्य म्हणजे पहाणे. पश्यंती वाणीतील नामजप चालू असेल, तर नामजप दिसतो, असे प.पू. डॉक्टरांनी लिहिलेल्या नामसंकीर्तनयोग आणि मंत्रयोग या ग्रंथात अनेक वर्षांपूर्वी वाचल्याचे मला आठवले. तेव्हा माझ्या मनात विचार आला, पश्यंती वाणीतील नामजप मी करत नसून देवच करत आहे. त्यामुळे मला पश्यंती वाणीतील नामजप कसा असतो ?, हे अनुभवता आले. यासाठी देवाच्या चरणी कृतज्ञता व्यक्त झाली.
२. पू. मेनरायकाकांनी नामजप होण्यासाठी सांगितलेले विविध उपाय
     त्यानंतर ७.७.२०१६ या दिवशी पू. भगवंतकुमार मेनरायकाका यांनी नामजप होण्यासाठी पुढील विविध उपाय करण्यास सांगितले.
अ. डोळे बंद न ठेवता डोळे उघडे ठेवून नामजप करणे
आ. प्रयत्नपूर्वक मनातल्या मनात नामजप न करता पुटपुटत नामजप करणे
इ. दूरचित्रवाणीवर कार्यक्रम चालू असतांना तळपट्टी धावत असेल, तर आपले लक्ष दृश्यापेक्षा तळपट्टीकडे जाते.

प्रामाणिक, कोणतेही काम सुंदर आणि परिपूर्ण रितीने करणारे अन् ईश्‍वराच्या अनुसंधानात असलेले राजापूर, जि. रत्नागिरी येथील ६५ टक्के आध्यात्मिक पातळीचे कै. महादेव गोपाळ शिंदे !

कै. महादेव शिंदे
  
सौ. मुक्ता सावंत
   कै. महादेव गोपाळ शिंदे, राजापूर, जि. रत्नागिरी हे माझे (सनातनची साधिका सौ. मुक्ता मिलिंद सावंत, पुणे यांचे) वडील आहेत. त्यांचे शिक्षण (जुनी) सातवीपर्यंत झाले होते. ते वारकरी संप्रदायानुसार साधना करत होते. त्यांनी अनेक ग्रंथांच्या साहाय्याने समाजाला साधना सांगितली. नीटनेटकेपणा, वक्तशीरपणा, समजूतदारपणा, स्वावलंबन, इतरांना न दुखवणे, प्रामाणिकपणा आदी गुण त्यांच्यात होते. त्यांना १६.१०.२००७ (नवरात्री पंचमी) या दिवशी मृत्यू आला. त्यांची गुणवैशिष्ट्ये आणि त्यांचे अध्यात्ममय झालेले जीवन यांविषयीची माहिती पुढे देत आहे.
१. गुणवैशिष्ट्ये
१ अ. अंगी विविध कला आणि कोणतेही काम सुंदर अन् परिपूर्ण रितीने करणे
     कै. महादेव गोपाळ शिंदे आणि मंदाकिनी महादेव शिंदे यांच्या संसारवेलीवरील मी (हेमलता महादेव शिंदे आताच्या सौ. सावंत) पहिले पुष्प होय ! कागदी फुले बनवणे, बंगला-इमारतीची कागदी प्रतिकृती बनवणे, लोकरीचे विणकाम, सुतारकाम, गवंडीकाम, झाडांची देखभाल आणि मशागत करणे इत्यादी अनेक कला त्यांना येत होत्या. त्या कलांचा ते वेळोवेळी उपयोग करत. राजापूर येथील आमच्या घराचे सुतारकाम त्यांनीच केले आहे. कोणतेही काम असो, ते एकदम परिपूर्ण करत. त्यांनी कपडे वाळत घातले, तरी कपड्यांची टोके परस्परांना जुळलेली असत. अशा प्रकारे लहानसे कामही तेे सुंदर, परिपूर्ण करत, म्हणजे ते निर्दोष, परिपूर्ण काम (Perfectionist) करणारे होते.
१ आ. अभ्यासू वृत्ती
१ आ १. सांडपाणी झाडांना मिळावे, यासाठी एक हौद बांधणे : त्यांची प्रत्येक कृती अभ्यासपूर्ण होती. सांडपाणी वाया जाऊ नये; म्हणून त्यांनी सुंदर उपाय योजले होते.

आरती ऐकण्याची आवड असलेला आणि गायींचा सहवास आवडणारा ५१ टक्के आध्यात्मिक पातळीचा अन् उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला घार्ली, रामनगर, जि. बेळगाव येथील चि. सर्वेश्‍वर यशवंत राणे ! (वय २ वर्षे)

चि. सर्वेश्‍वर राणे
१. जन्मापूर्वी
१ अ. येणार्‍या बाळाचा हिंदु राष्ट्रात सहभाग असू दे, अशी प्रार्थना होणे : मी गरोदर असल्याचे समजल्यावर श्रीकृष्णाला देवा, येणारे बाळ तुला अपेक्षित असेच असू दे आणि हिंदु राष्ट्र स्थापनेच्या तुझ्या कार्यात त्याचा सहभाग असू दे, अशी प्रार्थना झाली. नंतरही माझ्याकडून नामजप करतांना याच प्रार्थना व्हायच्या.
१ आ. स्तोत्रे म्हणतांना पोटात हालचाल जाणवून बाळ ऐकत असल्याचे जाणवणे : मी गरोदरपणात प्रतिदिन सायंकाळी रामरक्षा आणि मारुतिस्तोत्र म्हणायचे. त्या वेळी पोटातील बाळाची हालचाल जाणवायची. तेव्हा बाळ स्तोत्र ऐकत आहे, असे मला जाणवायचे.

प.पू. गुरुदेव सणांच्या निमित्ताने देत असलेल्या संदेशांविषयी सुचलेले विचार

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त...
     दसरा (विजयादशमी), दिवाळी, गुढीपाडवा इत्यादी सणांच्या निमित्ताने प.पू. गुरुदेव आपल्याला संदेश देत असतात. त्यासंबंधी मला पुढील विचार सुचले.
१. प.पू. गुरुदेवांनी दिलेल्या संदेशाचे पालन होण्यासाठी साधकांनी प्रयत्न केले पाहिजेत, हेच खरे !
२. त्यांच्या संदेशाचे पालन करणे, हे साधकांचे परमकर्तव्य आहे.
३. खरेतर अशा प्रकारचे संदेश द्यावेच लागणार नाहीत, असे प्रयत्न साधकांनी केले पाहिजे.
४. प.पू. गुरुदेवांचा साधकांसाठी असलेला संदेश म्हणजे त्यांचा संकल्पच असतो. हा संकल्प फलद्रूप होण्यासाठी साधकांनी सर्वस्व अर्पण करून प्रार्थनापूर्वक प्रत्येक कर्म साधना म्हणून करूया !
- श्री. शंकर नरुटे, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (४.१०.२०१६)

सोलापूर येथील साधक श्री. केदार तिवारी यांना रामनाथी आश्रमात आल्यावर आलेल्या अनुभूती !

१. श्रीकृष्णाच्या चित्राकडे पहातांना आलेली अनुभूती
     आश्रम दर्शनाच्या दिवशी श्रीकृष्णाच्या चित्रासमोर उभा राहिल्यावर श्रीकृष्ण माझ्याकडे बघून हसत आहे आणि त्याचे सुदर्शनचक्र फिरत आहे, असे मला २ मिनिटे जाणवले.
२. पू. जाधवकाकांच्या भजनांच्या ध्वनीचित्र-चकती पहातांना अंगावर रोमांच येणे आणि
त्यांच्या माध्यमातून प.पू. भक्तराज महाराज भजन म्हणत आहेत, असे जाणवणे
     पू. जाधवकाकांच्या भजनांची ध्वनीचित्र-चकती पहातांना अंगावर रोमांच येत होते. डोळे बंद करून भजने ऐकत असतांना पू. जाधवकाकांच्या माध्यमातून मागे झोक्यावर बसून प.पू. भक्तराज महाराज झोका घेत घेत स्वतः भजन म्हणत आहेत, असे जाणवले.
३. रामनवमीच्या दिवशी आश्रमात रामाचा पाळणा लावल्यावर आपण वैकुंठात आहोत, असे
वाटून पाळण्यात श्रीराम बालरूपात झोपला असून देवता पाळणा हलवत आहेत, असे दिसणे
     रामनवमीच्या दिवशी दुपारी १२ वाजता रामनाथी आश्रमात रामाचा पाळणा लावण्यात आला. त्या वेळी आपण वैकुंठात आहोत, असे दिसत होते

तीव्र आध्यात्मिक त्रास असणार्‍या साधकांनो, त्रासामुळे साधनेत प्रगती न झाल्याच्या विचाराने निराशा येत असल्यास पुढील स्वयंसूचना प्रतिदिन द्या !

     आध्यात्मिक त्रास असलेल्या काही साधकांना मी अनेक वर्षे साधना करत आहे; पण माझ्यातील तीव्र स्वभावदोष आणि अहंचे पैलू यांमुळे माझी प्रगती झाली नाही, या विचाराने निराशा येते. सतत नकारात्मक स्थितीत राहिल्याने त्यांना साधनेतील आनंद मिळत नाही. या विचारांची तीव्रता अधिक असल्यास साधकांनी पुढील स्वयंसूचना प्रतिदिन अधिकाधिक वेळा द्यावी, ज्या वेळी मला माझ्यातील तीव्र स्वभावदोष आणि अहं यांमुळेच माझी प्रगती झाली नाही, असे वाटून निराशा येईल, त्या वेळी आध्यात्मिक त्रासामुळे माझी प्रगती झाली नाही, हे माझ्या लक्षात येईल आणि त्रास अल्प झाल्यावर माझी जलद प्रगती होणारच आहे, हे मी समजून घेईन. वरील सूचनेसह प्रगतीच्या संदर्भातील सूचनाही द्यावी.
- (सद्गुरु) सौ. बिंदा सिंगबाळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (११.१०.२०१६)

गरुडाचे दर्शन झाल्यावर भावपूर्ण प्रार्थना करा !

साधकांना सूचना
     सध्या रामनाथी आश्रमातील बर्‍याच साधकांना गरुडाचे दर्शन होत आहे. भगवान विष्णूचे वाहन असणार्‍या गरुडाचे दर्शन होणे हा शुभसंकेत मानला जातो. संकटकाळात विजय आपलाच आहे, याची दैवी निश्‍चिती या माध्यमातून ईश्‍वर देत आहे. गरुडाचे दर्शन झाल्यानंतर साधकांनी महर्षींच्या आदेशानुसार पुढील प्रार्थना भावपूर्ण करावी, हे भगवान विष्णुदेवा, आम्हा सर्व साधकांचे रक्षण कर !
- (सद्गुरु) सौ. बिंदा सिंगबाळ (१४.१०.२०१६)

आपल्या भागात महत्त्वाच्या पदावर नव्याने नियुक्त झालेले शासकीय अधिकारी वा लोकप्रतिनिधी यांना भेटून शुभेच्छा द्या !

हिंदु जनजागृती समितीच्या समन्वयकांना सूचना
     आपल्या जिल्ह्यामध्ये शासकीय अधिकारी (उदा. जिल्हाधिकारी, तहसीलदार, पोलीस अधीक्षक, पोलीस उपअधीक्षक, पोलीस निरीक्षक) नव्याने नियुक्त झाले असल्यास, तसेच एखाद्या लोकप्रतिनिधीची महत्त्वाच्या पदावर (उदा. आमदार, खासदार, मंत्री, महामंडळाचे अध्यक्ष) नियुक्ती झाली असल्यास त्यांना समितीच्या वतीने भेटून शुभेच्छा द्याव्यात. शुभेच्छा देतांना आवश्यकतेप्रमाणे सनातनचे ग्रंथ वा ध्वनीचित्र-चकती (सीडी) भेट द्यावी. कोणत्याही कारणामुळे प्रत्यक्ष भेट घेणे शक्य न झाल्यास पत्र पाठवून शुभेच्छा द्याव्यात.


       हिंदूंनी हिंदुत्व हा आपला प्राण कुडीतून बाहेर काढून ठेवला आणि ते जिवंतपणाच्या हालचाली करू लागले; परिणामी हिंदूंचा सांगाडा झाला आहे.
- श्री. अरविंद विठ्ठल कुळकर्णी, ज्येष्ठ पत्रकार, मुंबई.
       काही ब्राह्मणांच्या तात्कालिक चुकांचा बाऊ करून काहींनी सर्वच ब्राह्मणांविरुद्ध विषसदृश लिखाण करून ब्राह्मणद्वेष निर्माण केला. त्यामुळे ब्राह्मण समाजापासून दूर गेले.
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले
       जिथे पृथ्वीवरची सर्व माणसेच नव्हे, तर झाडे, डोंगर, नद्या इत्यादी एकसारखे दिसत नाहीत, तेथे साम्यवाद हा शब्दच हास्यास्पद नाही का ?
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले

बोधचित्र

॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥

या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो.
- प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे


॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज 
सनातनचे श्रद्धास्थान
वाटाड्या
 देव वाटाड्या आहे. मार्गात ठेच लागते; कारण मार्गात खाचखळगे असतात. आपण वाटाड्यावर संतापतो, तरी तो सांगतो, "पुढे मार्ग चांगला आहे". 
भावार्थ : येथे 'वाटाड्या' म्हणजे मोक्षाचा मार्ग दाखविणारे गुरु. 'ठेच लागते' म्हणजे त्रास होतो, आध्यात्मिक प्रगती खुंटते. मार्गात खाचखळगे असतात म्हणजे साधनेत अडचणी असतात. 'पुढे मार्ग चांगला आहे' म्हणजे आध्यात्मिक प्रगती चांगली होणार आहे. 
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.) 

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

साधक
साधक जेव्हा एखाद्या गोष्टीचा निर्धार करतो आणि 
निर्धाराला दृढतापूर्वक चिकटून रहातो, तेव्हा उद्दिष्टपूर्ती होणे लांब रहात नाही. 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)


धर्मसत्ता आणि राजसत्ता

संपादकीय
      महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जगद्गुरु रामानंदाचार्य स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या ५० व्या वाढदिवसानिमित्त झालेल्या कार्यक्रमाला उपस्थित राहून राजकीय क्षेत्रात एक आदर्श प्रस्थापित केला आहे. त्यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहू नये; म्हणून नास्तिकतावाद्यांनी बरीच काव काव केली, निवेदने दिली; मात्र अंनिसवाल्यांचा आक्षेप झुगारून मुख्यमंत्री हिंदूंचे सर्वोच्च धर्मगुरु जगद्गुरु स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांच्यासमोर नतमस्तक झाले.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn