Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

कोटी कोटी प्रणाम !
महर्षि वाल्मीकि जयंती

चांगेफळ पैसाळी (अकोला) येथे हिंदूंच्या घरांवर १५० हून अधिक बौद्धांचे सशस्त्र आक्रमण !

 • प्राणघातक आक्रमणामुळे अनेक हिंदू घायाळ 
 •  घरे आणि वाहने यांची नासधूस 
 •  दागिने आणि पैसे चोरले
      अकोला - चांगेफळ पैसाळी या गावातील हिंदूंच्या घरांवर १४ ऑक्टोबरला पहाटे ६ वाजता गावातील सर्व जण झोपेत बेसावध असतांना १५० हून अधिक बौद्ध पुरुष आणि महिला यांनी हातात शस्त्रे घेऊन आक्रमण केले. या वेळी आक्रमणकर्त्या बौद्धांचा मोठा जमाव पुष्कळ प्रक्षुब्ध झाला होता. यात अनेक हिंदू घायाळ झाले असून हिंदूंची सर्व स्तरांवरची प्रचंड हानी झाली आहे. लहान मुले आणि महिला यांना घेऊन अक्षरशः घरातून पळून गेले म्हणून संभाव्य अनर्थ टळला. या संदर्भात ध्वनीक्षेपकावर सूचना देऊन त्यांना भडकवण्यात आले होते, असे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. दंगलखोरांची संख्या आणि मोठ्या प्रमाणात झालेली दगडफेक यावरून ही दंगल पूर्वनियोजित असल्याचे सिद्ध होत आहे. सध्या या भागात तणावपूर्ण शांतता आहे.

वाराणसीमध्ये सत्संग सोहळ्याच्या वेळी झालेल्या चेंगराचेंगरीत २४ जणांचा मृत्यू !

    वाराणसी - येथील राजघाट पुलावर झालेल्या चेंगराचेंगरीमुळे २४ लोकांचा मृत्यू झाल्याची घटना १५ ऑक्टोबरला घडली. यात १०० जण घायाळ झाले आहेत. येथे जय गुरुदेव संप्रदायाच्या सत्संग सोहळ्यासाठी भाविक आले असतांना ही घटना घडली.

शासकीय अधिवक्ता चंद्रकांत बुधले यांनी डॉ. तावडे यांचे छायाचित्र प्रसिद्ध झाल्याचे खापर प्रसारमाध्यमांवर फोडले !

कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरण !
डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांना भेटू न देण्याच्या आणि त्यांना 
प्रसिद्धीमाध्यमांसमोर उभे करण्याच्या प्रश्‍नांवर शासकीय अधिवक्ता निरुत्तर !
दोन्ही प्रकरणांची पुढील सुनावणी २६ ऑक्टोबरला
      कोल्हापूर, १५ ऑक्टोबर (वार्ता.) - न्यायालयाच्या आदेशानंतरही सनातनचे साधक डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांना ४ सप्टेंबर या दिवशी पोलिसांनी त्यांच्या अधिवक्त्यांना का भेटू दिले नव्हते ? तसेच अटक केलेल्या आरोपींना प्रसारमाध्यमांसमोर उभे करू नये, असे शासनाचे परिपत्रक असतांनाही डॉ. तावडे यांना पोलिसांनीच प्रसारमाध्यमांसमोर का उभे केले ? असा जाब डॉ. तावडे यांचे अधिवक्ता श्री. समीर पटवर्धन यांनी न्यायालयात युक्तीवाद करतांना विचारला; मात्र शासकीय अधिवक्ता चंद्रकांत बुधले यांना या दोन्ही प्रश्‍नांची उत्तरे देता आली नाहीत. पोलिसांनी प्रसारमाध्यमांना डॉ. तावडे यांचे छायाचित्र प्रसिद्ध करण्यास सांगितले नव्हते, तर प्रसारमाध्यमांनीच डॉ. तावडे यांचे छायाचित्र प्रसिद्ध केले आहे, असे सांगून अधिवक्ता बुधले यांनी छायाचित्रांच्या प्रसिद्धीचे खापर प्रसारमाध्यमांवर फोडले आणि पोलिसांच्या बाजूने बचावात्मक भूमिका घेतली. न्यायालयाने या दोन्ही प्रकरणांची सुनावणी २६ ऑक्टोबरपर्यंत पुढे ढकलली आहे. या दोन्ही सुनावण्या सातवे सहदिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर) श्रीमती व्ही.व्ही. पाटील यांच्यासमोर झाल्या.

(म्हणे) भारताला पाक आणि चीन यांपासून नव्हे, तर देशांतर्गतच धोका ! - शिवशंकर मेनन, माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार

युद्धखोर पाक आणि बलाढ्य चीन यांचा धोका ओळखू न 
शकणारे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार भारताला लाभले, यांसारखे दुर्दैव ते कोणते ?
      वॉशिंग्टन - भारताला पाक किंवा चीन यांच्यासारख्या बाहेरील शक्तींपासून नाही, तर देशांतर्गत धार्मिक आणि सामाजिक हिंसाचार यांपासून धोका आहे, असे विधान माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार शिवशंकर मेनन यांनी येथे केले. मेनन माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांच्या कार्यकाळात जानेवारी २०१० ते २०१४ पर्यंत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार होते. (मेनन यांच्या विधानावरून ते डॉ. मनमोहन सिंह यांना कशा प्रकारचे सल्ले देत होते, हे लक्षात येते. काँग्रेसच्या काळात पाक आणि चीन यांच्या कुरापती, तसेच आतंकवाद आणि हिंसाचार का वाढत गेला, याचे उत्तरही आपल्याला या विधानावरून मिळेल ! - संपादक)

पाक सरकार आणि सैन्य आतंकवादी मसूद अझर आणि हाफीज सईद यांच्यावर कारवाई का करत नाही ? - पाकच्या दैनिकाचा प्रश्‍न

     इस्लामाबाद - राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोका असलेला जमात-उद-दवाचा प्रमुख हाफिज सईद आणि जैश-ए-महंमदचा प्रमुख मसूद अझर यांच्या विरोधात कारवाई का करत नाही, असा प्रश्‍न पाकमधील द नेशन वृत्तपत्राने सरकार आणि पाक सैन्य यांना केला आहे. या वृत्तपत्राच्या संपादकीय भागात याविषयी अनेक प्रश्‍न उपस्थित करण्यात आले आहेत.
      द नेशनने प्रश्‍न उपस्थित केला की, सरकार आणि सैन्य मसूद अझर आणि हाफिज सईद यांच्यावर कारवाई करत नाही, उलट प्रसारमाध्यमांना शिकवण्याचा प्रयत्न करतात. मसूद अझर पठानकोट, तर हाफिज सईद वर्ष २००८ च्या मुंबईवरील आक्रमणाचा सूत्रधार आहे. आतंकवादी संघटनांचे हे दोन्ही प्रमुख पाकमध्ये उघडपणे फिरतात. दोघांनाही पाक सैन्याकडून संरक्षण मिळाले आहे, असे या वृत्तपत्रात म्हटले आहे.

भारत आणि रशिया यांच्यात महत्त्वपूर्ण संरक्षण अन् आर्थिक करार !

आतंकवादाचे उच्चाटन करण्यासंदर्भात भारत आणि 
रशियाची भूमिका सुसंगत ! - पंतप्रधान नरेंद्र मोदी
गोवा राज्यात ब्रिक्स परिषद
      पणजी, १५ ऑक्टोबर (वार्ता.) - दोन नव्या मित्रांपेक्षा एक जुना मित्र अधिक महत्त्वपूर्ण आहे. भारताचे जुने मित्र असलेले पुतिन यांचे भारतामध्ये स्वागत करतांना मला अत्यंत आनंद होत आहे. आतंकवादाचे उच्चाटन करण्यासाठी रशियाची भूमिका भारताशी सुसंगत आहे. आतंकवादास ठाम विरोध करण्याच्या संदर्भातील रशियाच्या भूमिकेचे आम्ही स्वागत करतो. आतंकवाद आणि आतंकवादाचे समर्थक यांच्याविरुद्ध सहनशीलता न बाळगण्यासंदर्भात रशिया आणि भारत यांच्यामध्ये एकमत आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
      भारत, रशिया, चीन, ब्राझील आणि दक्षिण आफ्रिका या सदस्य देशांचा समावेश असलेल्या आठव्या दोन दिवसीय ब्रिक्स शिखर परिषदेस केळशी-मोबोर (गोवा) येथील ताज एक्झॉटिक या तारांकित हॉटेलमध्ये १५ ऑक्टोबरपासून प्रारंभ झाला. १६ ऑक्टोबरला ही परिषद संपणार आहे. देशांतर्गत विविध क्षेत्रांत व्यापार, दळणवळण वाढावे, यासाठी या परिषदेत भर देण्यात आला. उच्च तंत्रज्ञान भागीदारीसाठी करार झाले आणि व्यापारासाठी संयुक्त अधिकोष निर्माण करण्याचे ठरले. आतंकवाद रोखण्यासाठी सहकार्य करण्याविषयी महत्त्वाची चर्चा झाली.

काश्मीरमध्ये पाक आणि आतंकवादी संघटना यांच्यानंतर आता चीनचा झेंडा फडकला !

पाकचे झेंडे फडवले जात असतांना त्यांच्यावर कारवाई न झाल्याचाच 
हा परिणाम आहे, आतातरी सरकार त्यांच्यावर कठोर कारवाई करणार का ? 
      श्रीनगर - काश्मीरमध्ये शुक्रवार, १४ ऑक्टोबरला दंगलखोर धर्मांधांनी नमाजानंतर नेहमीप्रमाणे केलेल्या निदर्शनांच्या वेळी चीनचे झेंडे फडकवले. आतापर्यंत या धर्मांधांकडून पाकिस्तान, इसिस, लष्कर-ए-तोयबा, जैश-ए-महंमद आदी आतंकवादी संघटनांचे झेंडे फडकवले जात होते. आता पहिल्यांदाच चीनचे झेंडे फडकवण्यात आले. चीनने आम्हाला साहाय्यता करावी, असे या झेंड्यांवर लिहिण्यात आले होते. ही घटना बारामुल्ला येथे घडली. या धर्मांधांनी या वेळी पाकचेही झेंडे फडकवले. या वेळी धर्मांधांनी पोलिसांवर दगडफेक केली. पोलिसांनी या वेळी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडत त्यांना पांगवले. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग हे ब्रिक्स परिषदेसाठी भारत दौर्‍यावर आले असतांनाच काश्मीरमध्ये चीनचे झेंडे फडकावण्यात आले आहेत.

पाकमध्ये ३२४ निर्दोष लोकांना फाशीची शिक्षा दिली गेली ! - मानवाधिकार आयोग

बलुचिस्तानमधील मानवाधिकारांची स्थिती अत्यंत वाईट !
      इस्लामाबाद - पाकमध्ये ३२४ निरपराध लोकांना फासावर लटकवण्यात आले. यांचा आतंकवादाशी कोणताही संबंध नव्हता. याव्यतिरिक्त ८ सहस्र लोकांना फाशी देण्यात येणार आहे, अशी माहिती पाकिस्तान मानवाधिकार आयोगाने दिली आहे. आयोगाच्या अहवालात बलुचिस्तानमधील अत्याचारांवर चिंता व्यक्त करण्यात आली आहे. आयोगाने २०१५ चा अहवाल पंतप्रधान नवाज शरीफ यांना सादर केला आहे. 
आयोगाने यात म्हटले आहे की, 
१. अपहरणाची १ सहस्र ३९० प्रकरणे प्रलंबित आहेत, त्यातील १५१ प्रकरणे बलुचिस्तानमधील आहेत. 
२. पाकच्या पोलिसांना आणि सुरक्षा दलांना आतंकवादविरोधी कायदा आणि पाक कायद्यांचे संरक्षण या कायद्यांनुसार कारवाई करण्याचा अधिकार दिला गेला आहे. याद्वारे सुरक्षा दलांच्या लोकांवरील अत्याचारांत वाढ झाली आहे. यात सुरक्षा दलांनी लोकांचे अपहरण करणे, तसेच कह्यात घेऊन नंतर त्यांना बेपत्ता करण्यासारख्या घटनांत वाढ झाली आहे. पोलीस एखाद्याला घेऊन गेल्यावर त्याची कोणतीही कल्पना त्याच्या नातेवाईकांना देत नसल्याचे आढळून आले आहे.

सार्क परिषदेतील भारताचे महत्त्व अल्प करण्यासाठी पाककडून दुसरी संघटना बनवण्याचा प्रयत्न !

डावपेचात हुशार असलेला पाक !
      इस्लामाबाद - उरी येथील आक्रमणानंतर पाकमध्ये होणार्‍या सार्क परिषदेवर भारतानंतर बांगलादेश, श्रीलंका, भूतान आदी देशांनी सहभागी होण्यास नकार दिल्यावर आणि हे देश भारताच्या बाजूने उभे राहिल्याने पाकिस्तान आता बृहत दक्षिण आशियायी आघाडी सिद्ध करण्याच्या प्रयत्नात आहे. त्यात चीन, इराण आणि अन्य शेजारी देश तसेच मध्य आशियायी देशांचा समावेश केला जाणार आहे. पाकच्या अमेरिकेतील असलेल्या संसदीय शिष्टमंडळाने वॉशिंग्टनमधील बैठकीत हे मत व्यक्त केले. भारतानेही या आघाडीत सामील व्हावे, अशी आमची अपेक्षा आहे, असे पाकने म्हटले आहे. जर इस्लामी देशांत तीन वेळा तलाक म्हणण्याच्या प्रथेवर बंदी आहे, तर भारतात का नाही ? - केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद

     पाटलीपुत्र - जर इजिप्त, इराण, ट्यूनिशिया, मोरक्को, पाकिस्तान आदी इस्लामी देशांत तीन वेळा तलाक म्हणत घटस्फोट देण्याच्या प्रथेवर बंदी घालण्यात आली आहे, तर भारतात ती का घालू नये ? या देशांत जर या बंदीला शरीयतच्या विरोधात असल्याचे म्हटले जात नसेल, तर धर्मनिरपेक्ष भारतात ते इस्लामविरोधी कसे ठरते, असे प्रश्‍न केंद्रीय कायदामंत्री रविशंकर प्रसाद यांनी उपस्थित केले आहेत. केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात तीन वेळा तलाक देण्याच्या प्रथेला सरकारचा विरोध असल्याचे म्हटले आहे. त्यावर ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डने आक्षेप घेतला आहे. या आक्षेपावर प्रसाद यांनी वरील प्रश्‍न विचारला आहे. प्रसाद यांनी समान नागरी कायद्यावर मात्र ते म्हणाले की, यावर विचार चालू असल्याने मी कोणतेही विधान करू शकत नाही.

गोव्यातील श्री मल्लिकार्जुन देवस्थानात मोडतोड करणार्‍या दोन्ही संशयितांची जामिनावर सुटका !

 • बेतकी-खांडोळावासियांचे फोंडा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन
 • पोलिसांनी प्रकरण गांभीर्याने न घेतल्याचा आरोप
     फोंडा, १५ ऑक्टोबर (वार्ता.) - खांडोळा, माशेल येथील श्री मल्लिकार्जुन देवस्थानातील गर्भगृहातील देवाची मूर्ती उखडून देवतांचे तरंग आणि निशाणे यांची मोडतोड केल्याच्या प्रकरणातील संशयित आरोपी गुरुदास आणि गोकुळदास यांची न्यायालयाने १२ ऑक्टोबरला जामिनावर सुटका केली. यामुळे फोंडा पोलीस ठाण्यात सायंकाळी तणावाचे वातावरण निर्माण झाले. 
     खांडोळा, माशेल येथील श्री मल्लिकार्जुन देवस्थानात ११ ऑक्टोबरला दसर्‍याच्या दिवशी ही घटना घडल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणातील दोन्ही संशयितांना कह्यात घेऊन त्यांची चौकशी चालवली होती. या संशयितांची जामिनावर सुटका झाल्याने संतप्त झालेल्या नागरिकांनी फोंडा पोलीस ठाण्यात येऊन पोलिसांनी हे प्रकरण गंभीरतेने न हाताळल्याचा आरोप करत पोलीस उपअधीक्षकांनी ग्रामस्थांना संबोधित करावे असा आग्रह धरून ठिय्या आंदोलन केले, तसेच दोघांवरही खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंद करावा, अशी मागणी केली. ब्रिक्स परिषदेच्या पार्श्‍वभूमीवर फोंडा पोलीस ठाण्यात पोलिसांची कमतरता असल्याने पोलिसांनी अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलीस ठाण्याचे दार बंद करून ठेवले. अखेर पोलीस उपअधीक्षक सुनीता सावंत यांनी चर्चा करण्याचा संदेश आंदोलनकर्त्यांना दिल्यानंतर आंदोलन स्थगित ठेवण्यात आले आहे.

आतंकवाद पीडित हिंदूंच्या साहाय्यासाठी आयोजित कार्यक्रमात डोनाल्ड ट्रम्प हिंदूंना मार्गदर्शन करणार !

      वॉशिंग्टन - अमेरिकेतील राष्ट्र्रपती निवडणुकीतील रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प न्यू जर्सी येथील भारतीय वंशाच्या अमेरिकी नागरिकांना मार्गदर्शन करणार आहेत. आतंकवाद पीडित हिंदूंना साहाय्य करण्यासाठी रिपब्लिकन हिंदू कोअ‍ॅलिशन (आर्एच्सी)कडून १६ ऑक्टोबरला आयोजित कार्यक्रमात ट्रम्प मार्गदर्शन करणार आहेत. 
    आर्एच्सीचे संस्थापक अध्यक्ष शलभ कुमार यांनी सांगितले की, अमेरिकेच्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीतील उमेदवार इतिहासात कधीही हिंदूंच्या कार्यक्रमात सहभागी झालेला नाही. हा कार्यक्रम विस्थापित काश्मिरी हिंदू आणि बांगलादेशातील विस्थापित हिंदू यांना साहाय्य करण्यासाठी आयोजित करण्यात आला असून यात भारतीय चित्रपटसृष्टीतील अभिनेते सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमात सहभागी होत असल्याचे सांगणारे ट्रम्प यांच्या एका व्हीडिओमध्ये ते म्हणाले की, हिंदु धर्मियांनी जगातील संस्कृती आणि अमेरिकेतील संस्कृती यांना मोठे योगदान दिले आहे.

समान नागरी कायद्यामुळे गोव्यातील मुसलमान महिलांना कोणतीही अडचण नाही !

समान नागरी कायदा असतांनाही गोव्यात कोणाच्याही धार्मिक 
अधिकारांवर गदा येत नाही, तर देशभरात हा कायदा करण्यास काय अडचण आहे ? 
केवळ राजकारणापोटी काही धर्मांध पक्ष समान नागरी कायद्यास विरोध करतात, हेच यातून उघड होते !
राज्यपालांनी मुुसलमान महिलांची बैठक घेऊन 
समान नागरी कायद्याविषयी भूमिका जाणून घेतली !
       पणजी, १५ ऑक्टोबर (वार्ता.) - महिलांच्या कल्याणासाठी गोव्यात प्रचलित असलेल्या समान नागरी कायद्याविषयी भूमिका जाणून घेण्यासाठी राज्यपाल डॉ. (सौ.) मृदुला सिन्हा यांनी राजभवनात मुसलमान समाजातील महिलांची बैठक घेतली. समान नागरी कायद्याने गोव्यातील मुसलमान महिलांचे जीवनमान सुधारले आहे, अशी माहिती मुसलमान महिलांनी राज्यपालांना या बैठकीत दिली. राज्य निबंधक तथा नोटरी सेवेचे प्रमुख या बैठकीस उपस्थित होते.

गोवा पोलिसांकडून नागरिकांना सुरक्षिततेचा सल्ला

      पणजी - गोवा पोलीस यंत्रणेने राज्यात संपन्न होणार्‍या ब्रिक्स परिषदेच्या निमित्ताने नागरिकांना सुरक्षिततेचा सल्ला दिला आहे. सर्व नागरिकांनी कायद्याची कार्यवाही करणार्‍या संस्थांना सहकार्य करावे आणि कोणतीही संशयास्पद कृती किंवा बॅग, वस्तू सापडल्यास १०९३ किंवा १०० या टोल फ्री क्रमांकावर नियंत्रण कक्षाला कळवावे. माहिती देणार्‍याची ओळख गुप्त ठेवण्यात येईल, असे आवाहन करण्यात आले आहे. (यावरून केवळ राज्यातच नव्हे, तर देशात कुठलाही महत्त्वाचा राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय कार्यक्रम असल्यास त्यावर आतंकवादाचे किंवा समाजघातक घटकांचे सावट असते, हे यावरून सिद्ध होते. असे असतांना जनतेला सर्तक रहाणे क्रमप्राप्त आहेच; पण त्याऐवजी या आतंकवादाचा स्रोत असलेले पाकमधील आतंकवाद्यांचे तळ नष्ट केल्यास ही समस्याच कायमची संपुष्टात येईल. शासन याविषयी काही कृतील करील का ? - संपादक) पोलीस यंत्रणेने नागरिकांना अफवांवर विश्‍वास न ठेवण्याचे आणि त्यांचा प्रसार न करण्याचे आवाहन केले आहे. नागरिकांना सुरक्षा पुरवणे यासाठी गोवा पोलीस बांधील आहेत आणि त्याकामी नागरिकांकडून त्यांनी सहकार्य मागितले आहे.

सामाजिक संकेतस्थळांच्या माध्यमातून धर्मसभेच्या प्रसाराला वेग !

काश्मिरी हिंदूंच्या समर्थनार्थ पुण्यात विराट हिंदु धर्मजागृती सभा
     पुणे, १५ ऑक्टोबर (वार्ता.) - आता आवश्यकता आहे, ती शिवरायांच्या काळात पेटलेल्या हिंदु मावळ्यांची ! शत्रूच्या घरात घुसून आपले शौर्य दाखवणार्‍यांची !! चलो कश्मीर !!! यांसारख्या घोषवाक्यांच्या माध्यमातून काश्मिरी हिंदूंच्या समर्थनार्थ उभे रहाण्याचे आवाहन करणार्‍या पोस्ट्स व्हॉट्स अ‍ॅप, फेसबूक, ट्विटर यांसारख्या सामाजिक संकेतस्थळांमध्ये सध्या पाठवण्यात येत असून त्या माध्यमातून धर्मसभेच्या प्रसाराने वेग घेतला आहे. येथील न्यू इंग्लिश स्कूल, रमणबाग शाळेच्या पटांगणावर २३ ऑक्टोबरला काश्मिरी हिंदूंचा आवाज बुलंद करण्यासाठी सायंकाळी ५.३० वाजता विराट हिंदु धर्मजागृती सभेचे आयोजन करण्यात आले आहे. सामाजिक संकेतस्थळाच्या माध्यमातून सभेचा मोठ्या प्रमाणावर प्रसार चालू असून आतापर्यंत जवळपास १ कोटी ३४ लक्ष ५४ सहस्रांहून अधिक लोकापर्यंत फेसबूकच्या माध्यमातून सभेचा विषय पोचवण्यात आला आहे. समाजातील राष्ट्रप्रेमी बांधवांकडूनही उत्स्फूर्तपणे परिचितांना पोस्ट्स पाठवून सभेचा प्रचार केला जात आहे.

दुर्गोत्सव मंडळांच्या वाद्यांवर पोलिसांनी बंदी घातल्याने कार्यकर्ते संतप्त !

अडावद (जिल्हा जळगाव) येथील श्री दुर्गामूर्ती विसर्जन मिरवणुकीतील प्रकार
अन्य धर्मियांच्या उत्सवांच्या वेळी पोलीस अशी अडवणूक कधी करतात का ?
     अडावद (जिल्हा जळगाव) - येथे १३ ऑक्टोबरला श्री दुर्गादेवीची मूर्तीविसर्जन मिरवणूक विलंबाने निघाल्याने पोलिसांनी नेहरू चौकातच रात्री ११.३० वाजता १५ मंडळांची वाद्ये बंद केली. (प्रत्येक वेळी हिंदूंच्याच उत्सवावर निर्बंध का ? - संपादक) त्यामुळे मंडळांच्या संतप्त कार्यकर्त्यांनी पोलिसांशी दीड घंटा वाद घातला. शेवटी १ वाजता मिरवणूक संपली.
१. मिरवणूक दुपारी २ वाजता निघणे अपेक्षित असतांना ती सायंकाळी ५ वाजता निघाली. मंडळांची संख्या अधिक असल्याने नियोजन करतांना पोलिसांची धावपळ झाली. त्यामुळे त्यांनी वाद्ये बंद करण्याचा निर्णय घेतला. (मंडळांची संख्या अधिक होती, तर   पोलिसांनी आधीच सुनियोजन का केले नाही ? - संपादक)

राष्ट्राभिमान जागा ठेवून चीनमध्ये निर्माण झालेली कोणतीही वस्तू वापरणार नाही, असा निर्धार करा ! - डॉ. नरेंद्र पाटील, हिंदु जनजागृती समिती

चिनी उत्पादनांची होळी करतांना कार्यकर्ते
 • नंदुरबार येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन
 •  चिनी उत्पादनांचा होळीद्वारे निषेध
     नंदुरबार - भारतीय सैन्यावर आतंकवादी आक्रमणे करणार्‍या पाकिस्तानची पाठराखण करणार्‍या चीनचे उत्पादन खरेदी करून वापरणे म्हणजे अप्रत्यक्षपणे शत्रूराष्ट्राला शक्ती पुरवण्यासारखेच आहे; म्हणून आपल्यातील राष्ट्राभिमान जागा ठेवून प्रत्येकाने चीनमध्ये तयार झालेली कोणतीही वस्तू वापरणार नाही, असा निर्धार करा, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे डॉ. नरेंद्र पाटील यांनी केले. येथे घेण्यात आलेल्या राष्ट्रीय हिंदू आंदोलनाच्या अंतर्गत ते बोलत होते. या वेळी ज्येष्ठ कार्यकर्ते भिका गिरनान यांच्या हस्ते चिनी उत्पादनांची होळी करण्यात आली.

कोल्हापूर येथे मराठा समाजाच्या वतीने भव्य मराठा क्रांती मोर्चा !

मोर्च्यात सहभागी झालेले लक्षावधी लोक
मराठा समाजाला आरक्षण मिळावे आणि कोपर्डी प्रकरणातील
आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, या मोर्चेकर्‍यांच्या मागण्या !
    कोल्हापूर, १५ ऑक्टोबर (वार्ता.) - भगवे झेंडे, भगव्या टोप्या, भगवे स्कार्फ आणि निःशब्द वातावरणात चालेन तर वाघासारखेच असे सांगत मराठा समाजाने मराठा समाजाला आरक्षण मिळावे, कोपर्डी प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा करावी आणि अ‍ॅट्रॉसिटी कायद्यात सुधारणा करावी, या प्रमुख मागण्यांसाठी १५ ऑक्टोबर या दिवशी येथे भव्य मराठा क्रांती मोर्चा काढला. या मोर्च्यात लक्षावधी संख्येने लोक सहभागी झाले होते.
    कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि बेळगाव येथून मोठ्या संख्येने लोक मोर्च्यात सहभागी झाले होते. सीमा भागातून आलेले २१ नगरसेवक आणि नागरिक यांच्या समवेत बेळगाव येथील महापौर श्रीमती सरिता पाटील या मोर्च्यात सहभागी झाल्या होत्या.

पेट्रोलबॉम्ब अंगावर फुटल्याने ७ पोलीस होरपळले; दोघांची प्रकृती चिंताजनक

भिवंडीत दंगल
    भिवंडी - १२ ऑक्टोबरला मोहरमच्या मिरवणुकीत नवरात्रीची कमान तोडून हैदोस घालणार्‍या धर्मांधांनी फेकलेले पेट्रोलबॉम्ब अंगावर फुटून एकूण ७ पोलीस घायाळ झाले असून त्यांपैकी २ जण गंभीर घायाळ झाल्याने अतीदक्षता विभागात त्यांची मृत्यूशी झुंज चालू आहे. मोहरमच्या निमित्ताने दंगल घडवून पोलिसांवर थेट आक्रमण करण्याचा त्यांचा पूर्वनियोजित डाव होता, हे तपासाअंती स्पष्ट होत आहे.
       पोलीस उपनिरीक्षक संजय राठोड आणि पोलीस नाईक पंढरीनाथ माळी यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे. या आक्रमणात राठोड हे ३० टक्के, तर माळी ४१ टक्के भाजले आहेत. त्यांचे चेहरे, छाती आणि हात अक्षरश: होरपळून गेले आहेत. ऐरोली येथील नॅशनल बर्न सेंटरमध्ये दोघांवरही शर्थीचे उपचार चालू आहेत.

धर्मसत्तेच्या माध्यमातून होत असलेले उत्तुंग सामाजिक कार्य जवळून अनुभवता आले ! - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

अंनिसचा आक्षेप धुडकावून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नाणीज, रत्नागिरी येथे जगद्गुरु रामानंदाचार्य स्वामी
नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या वाढदिवसाच्या सोहळ्याला उपस्थित !
    रत्नागिरी, १५ ऑक्टोबर (वार्ता.) - हिंदु धर्म हा जागतिक धर्म आहे. यात कर्माचा सिद्धान्त मांडलेला आहे. हिंदु धर्मात संपूर्ण विश्‍वाचे भले चिंतीले असून विश्‍वकल्याणाचा विचार केलेला आहे. राजसत्तेमध्ये कोणी राजा, तर कोणी प्रजा असा भाव असतो. हिंदु धर्मामध्ये मात्र हाच एकमेव श्रेष्ठ भाव आहे. हिंदु धर्माचे जगद्गुरु म्हणून स्वामी नरेंद्राजार्यजी महाराज यांनी त्यागाचा भाव समाजामध्ये निर्माण केला आहे. थोडक्यात राजसत्तेपेक्षा नेहमी धर्मसत्ता वरचढ असते. आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून नाणीजधामी धर्मसत्तेच्या माध्यमातून होत असलेले उत्तुंग सामाजिक कार्य जवळून अनुभवता आले, असे प्रतिपादन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी जगद्गुरु रामानंदाचार्य दक्षिण पीठ, नाणीजधाम येथे केले.

शिवसैनिकांनी हिंदु धर्मजागृती सभेस बहुसंख्येने उपस्थित रहावे ! - श्री. विनायक निम्हण, शिवसेना

विनायक निम्हण यांना धर्मजागृती
सभेचे निमंत्रण देतांना समितीचे कार्यकर्ते
     काश्मिरी हिंदूंच्या समर्थनार्थ राष्ट्रीय स्तरावर राबवण्यात येणार्‍या एक भारत अभियानाला जाहीर पाठिंबा व्यक्त करत शिवसेनेचे पुणे शहरप्रमुख श्री. विनायक निम्हण यांनी २३ ऑक्टोबरला होणार्‍या हिंदु धर्मजागृती सभेस शिवसैनिकांनी बहुसंख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन केले आहे. शिवसेना काश्मिरी हिंदूंच्या सदैवी पाठीशी असल्याचेही त्यांनी सांगितले. न्यू इंग्लिश स्कूल, रमणबाग शाळेच्या पटांगणावर होणार्‍या हिंदु धर्मजागृती सभेचे निमंत्रण देण्यासाठी हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र समन्वयक सर्वश्री सुनील घनवट, अमोल मेहता, कृष्णाजी पाटील आणि शशांक सोनवणे यांनी त्यांची भेट घेतली. त्या वेळी ते बोलत होते. याप्रसंगी शिवसेनेचे जिल्हासंघटक श्री. शाम देशपांडे हेही उपस्थित होते. श्री. देशपांडे यांचेही धर्मजागृती सभेस सहकार्य लाभत आहे.

सावंतवाडी येथे श्री दुर्गादेवीच्या मूर्तीविसर्जन मिरवणुकीच्या वेळी पोलिसांकडून हिंदूंवर दबाव

पोलिसांच्या कार्यपद्धतीच्या विरोधात भाविकांनी अडीच घंटे रस्त्यावरच ठाण मांडले !
     सावंतवाडी - शहरातील श्री दुर्गादेवीच्या मूर्तीचे विसर्जन ११ ऑक्टोबरच्या रात्री करण्यात आले. मूर्तीचे विर्सजन लवकर करावे, तसेच डॉल्बी, ढोल-ताशे वाजवणे थांबवण्यासाठी पोलिसांनी दबाव टाकल्याने भाविक आणि पोलीस यांच्यात जोरदार शाब्दिक वाद झाला. नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्याशीसुद्धा पोलिसांनी वाद घातला. यामुळे तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली. या प्रकाराचा निषेध करण्यासाठी येथील भटवाडी-दुर्गामाता मंडळाने भजन आंदोलन करत तब्बल अडीच घंटे रस्त्यावर ठाण मांडले. आम्ही शांततेत विसर्जन करत आहोत. त्यामुळे नाहक कायद्याचा बाऊ करू नका, असे भाविकांनी पोलिसांना ठणकावले. (गेली अनेक वर्षे मशिदीवरील भोंगे पहाटे पहाटेच हिंदूंची झोपमोड करून ध्वनीप्रदूषण कायद्याचा भंग करतात ! पोलिसांनी कधी त्यांच्यावर कारवाई करण्याचे धारिष्ट्य दाखवले आहे का ? - संपादक)

आता पोलिसांनी कायद्यानुसार प्रतिदिन पहाटे ५.३० वाजता आवाज करणार्‍या मशिदींच्या भोंग्यांवरही कारवाई करण्याचे धाडस दाखवावे !

रत्नागिरीत देवी विसर्जन मिरवणुकीत आवाजाच्या मर्यादेचे उल्लंघन : 
डीजेसह जनरेटर आणि स्पीकर पोलिसांकडून जप्त
     रत्नागिरी - तालुक्यातील भुतेनाका - मांडवी येथे देवी विसर्जनाच्या मिरवणुकीत आवाजाच्या मर्यादेचे उल्लंघन केल्याने शहर पोलिसांनी डीजेसह जनरेटर आणि स्पीकर जप्त करण्याची कारवाई केली आहे. या प्रकरणी राम मंदिर नवरात्र उत्सव मंडळाचे सचिव अभिजित मनोहर मटकर (पेठकिल्ला, रत्नागिरी) आणि डीजे ऑपरेटर सलमान नजीर गुहागरकर (किल्ला-पठाणवाडी, रत्नागिरी) या दोघांवर ध्वनीप्रदूषण कायद्यांतर्गत गुन्हा प्रविष्ट करण्यात आला आहे. पोलीस कर्मचारी अमित सुरेश शिंदे यांनी याविषयीची तक्रार दिली.

वेर्ले (सावंतवाडी) ग्रामपंचायतीमधील ३५ लक्ष रुपयांच्या अपहाराच्या प्रकरणी सरपंच प्रमिला मेस्त्री यांना अटक : ग्रामसेवक फरार

 • भ्रष्टाचारातही महिलांना समानहक्क आहे, हे सिद्ध करणार्‍या महिला सरपंच !
 • ग्रामपंचायत पातळीवर एवढा भ्रष्टाचार होत असेल, तर देशभरात किती मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असेल, याची कल्पनाच न केलेली बरी !
     सावंतवाडी - तालुक्यातील वेर्ले ग्रामपंचायतीमधील ३५ लक्ष रुपयांच्या अपहार प्रकरणी पोलिसांनी संशयित आरोपी सरपंच प्रमिला श्यामसुंदर मेस्त्री यांना अटक करून न्यायालयात उपस्थित केले असता, न्यायालयाने मेस्त्री यांना १७ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी बजावली. या प्रकरणातील अन्य संशयित आरोपी ग्रामसेवक केतन जाधव फरार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
   वेर्ले ग्रामपंचायत शौचालय बांधकाम घोटाळा प्रकरणी चार दिवसांपूर्वी सावंतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा प्रविष्ट झाला होता. त्यानंतर पोलिसांनी पुढील कारवाई केली. या अपहार प्रकरणात अन्य काही मोठ्या राजकीय व्यक्ती असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पोलीस निरीक्षक शंकर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जे.एच्. कळेकर, पोलीस नाईक एफ्.बी. काळसेकर अन्वेषण करत आहेत.हिंदू तेजा जाग रे !

Jago ! : Akola jile ke Changefal paisali gao me Hinduo ke gharopar 150 Baudho ne sashastra akraman kiya. - Hinduo, swaraksha ke liye sangathit ho jao !
जागो ! : अकोला जिले के चांगेफल पैसाली गांव में हिन्दुआें के घरों पर १५० से अधिक बौद्धों ने सशस्त्र आक्रमण किया. - हिन्दुओ, स्वरक्षाके लिए संगठित हो जाओ !

फलक प्रसिद्धीकरता

स्वरक्षणासाठी हिंदूंना आता संघटनाशिवाय पर्याय नाही !
    अकोला जिल्ह्यातील चांगेफळ पैसाळी येथे शुल्लक कारणावरून १४ ऑक्टोबरला सकाळी हिंदूंच्या घरांवर १५० हून अधिक बौद्ध महिला-पुरुषांनी सशस्त्र आक्रमण केले. त्यांनी हिंदूंना मारहाण केली, त्यांची वाहने, धान्य यांची हानी केली, तसेच जनावरांना मारहाण केली.

ज्योतिर्लिंग नवरात्र मंडळात सनातन संस्था कोल्हापूर न्यासाच्या वतीने प्रबोधन !

   
मार्गदर्शन करतांना डॉ. (श्रीमती) मृणालिनी भोसले
   मिरज, १५ ऑक्टोबर (वार्ता.) - येथील नदीवेस भागातील ज्योतिर्लिंग नवरात्र मंडळात १० ऑक्टोबर या दिवशी सनातन संस्था कोल्हापूर न्यासाच्या वतीने नवरात्रीची माहिती सांगण्यात आली. यात आदर्श गरबा कसा खेळावा, कुंकुमार्चनाचे महत्त्व, नवरात्र उत्सवातील गैरप्रकार यांविषयी प्रबोधन करण्यात आले. सनातन संस्था कोल्हापूर न्यासाच्या डॉ. (श्रीमती) मृणालिनी भोसले यांनी ही माहिती सांगितली, तर सौ. कांता वांडरे यांनी एक घंटा श्री दुर्गादेव्यै नमः। हा नामजप सामूहिकरित्या, तसेच कुंकुमार्चन प्रत्यक्ष करवून घेतले.

रुग्णांच्या जिवाशी खेळ करणार्‍या सातारा जिल्हा रुग्णालयात आलेले कटू अनुभव

श्री. राहुल कोल्हापुरे
       सध्या सरकारी रुग्णालये ही नागरिकांसाठी मन:स्तापाची केंद्रे बनली आहेत. या रुग्णालयांत रुग्णांची सेवा करणे दूरच; पण तेथील आधुनिक वैद्य आणि कर्मचारी यांच्यात रुग्णांप्रती कमालीची अनास्था आणि असंवेदनशीलता असल्याचे जाणवते. याविषयी सातारा जिल्हा रुग्णालयात आलेले काही कटू अनुभव येथे देत आहोत.
१. केसपेपर विभागाची दुःस्थिती
१ अ. गेली ६ वर्षे २ कर्मचार्‍यांचे काम एकटाच करणारा केसपेपर विभागातील कर्मचारी : जिल्हा रुग्णालयात प्रवेश केल्यावर प्रथम केसपेपर विभागाशी संपर्क येतो. रुग्णांच्या सेवेसाठी नवीन केसपेपर काढणे आणि जुना शोधून देणे यांसाठी स्वतंत्र विभाग कार्यरत आहेत. तेथे केसपेपरसाठी मोठी रांग लावावी लागते; कारण तेथे गेल्या ६ वर्षांपासून जुने केसपेपर देण्यासाठी केवळ एकच कर्मचारी तेथे कार्यरत आहे. वारंवार रुग्णालय प्रशासनाकडे तोंडी, तसेच लेखी मागणी करूनही प्रशासनाकडून या विभागात कर्मचारी दिला जात नाही, तसेच सर्वच कामकाज हस्तलिखितावर अवलंबून असल्याने अनेक समस्या उद्भवतात. केसपेपर हरवण्यासारखी गंभीर समस्याही अनेकदा घडते.

देहलीतील जेएन्यू विद्यापिठात आयोजित केलेल्या संस्कृत परिसंवादामध्ये महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाचा शोधनिबंध सादर

 • जेएन्यूच्या विशेष संस्कृत अध्ययन केंद्राने केले आयोजन !
 • अनेक विचारवंतांनी संस्कृत, वेद आणि हिंदु धर्माचे अद्वितियत्व प्रतिपादिले !
 • महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाकडून संस्कृत भाषेतील लिखाण आणि संहिता यांचा इतर भाषांच्या तुलनेत होणारा सूक्ष्म परिणाम या विषयावर शोधनिबंध सादर !
 • महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या संशोधनाचे सर्वांकडून उत्स्फूर्तपणे कौतुक !
शोधनिबंध सादर करतांना महर्षि अध्यात्म
विश्‍वविद्यालयाच्या (१) सौ. क्षिप्रा जुवेकर आणि
(२) सौ. संदीप कौर मुंजाल 
    नवी देहली - येथील जवाहरलाल नेहरू विद्यापिठाच्या (जेएन्यूच्या) विशेष संस्कृत अध्ययन केंद्राच्या वतीने एक दिवसीय संस्कृत परिसंवादाचे (सेमिनारचे) ८ ऑक्टोबर या दिवशी आयोजन करण्यात आले होते. या परिसंवादाचा विषय आधुनिक काळाच्या संदर्भात संस्कृतची शोध परंपरा, असा होता. या वेळी महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या सौ. संदीप कौर मुंजाल आणि सौ. क्षिप्रा जुवेकर यांनी संस्कृत भाषेतील लिखाण आणि संहिता यांचा इतर भाषांच्या तुलनेत होणारा सूक्ष्म परिणाम, या विषयावर शोधनिबंध सादर केला. परिसंवादात काश्मीर, देहली, अलीगढ, मणिपूर, भाग्यनगर (हैद्राबाद) इत्यादी ठिकाणांहून आलेल्या संशोधकांनी शोधनिबंध सादर केले.
     परिसंवादाचे उद्घाटन मंगलाचरण आणि दीपप्रज्वलन करून करण्यात आले. परिसंवादाच्या पहिल्या सत्रात प्रमुख पाहुण्यांचे भाषण झाले.

साम्यवाद या जगाची जितकी हानी करतो, तितकी दुसरा कोणताही वाद करत नसणे

श्री. व्यंकटेश अय्यंगार
१. सनातन हिंदु धर्मात मान्य असलेल्या 
काही शब्दांचा साम्यवाद्यांना तिटकारा असणे 
     साम्यवाद या जगाची जितकी हानी करतो, तितकी दुसरा कोणताही वाद करत नाही. हा साम्यवाद लोकांना केवळ काम करणेच शिकवतो. लोकांना जिवंत, चालते-फिरते मुडदे बनवतो. संगीत नाही, साहित्य नाही, कला नाही केवळ काम, काम, काम...! धर्म, ज्ञान, संगीत, साहित्य, कला, कल्याण, चित्त (अंतर्मन) इत्यादी जे जे सनातन हिंदु धर्मात मान्य आहे, अशा काही शब्दांचा साम्यवाद्यांना नेहमीच तिटकारा (अ‍ॅलर्जी) असतो. 
२. साम्यवाद्यांच्या हास्यास्पद वक्तव्याचे उदाहरण 
     मी एका साम्यवाद्याला बोलतांना ऐकले आहे. तो म्हणाला, एखाद्या व्यक्तीचे डोके, हात आणि पाय कापून टाकले, तर त्याचे चित्त कुठे आहे, हे मला दाखवू शकाल का ? इतके हास्यास्पद वक्तव्य साम्यवादीच करू शकतात.

अंनिसची भोंदूगिरी उघड करणार्‍या मुंबई येथील पत्रकार परिषदेच्या वृत्तप्रसिद्धीचा आढावा

वस्तूस्थितीदर्शक वृत्ताला उचित प्रसिद्धी न देणे हे निष्पक्ष पत्रकारितेचे लक्षण नाही !

     घोटाळेबाज अंनिसच्या न्यासाची सामाजिक भोंदूगिरी सनातन संस्थेने उघड केल्याच्या संदर्भात १२ ऑक्टोबर या दिवशी मुंबई येथे पत्रकार परिषद घेण्यात आली. त्या माध्यमातून अंनिसचा भ्रष्ट तोंडवळा पुराव्यांनिशी उघडा पाडत अंनिसवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली होती. १३ ऑक्टोबर या दिवशी या पत्रकार परिषदेला प्रसिद्धी देण्याच्या संदर्भातील आढावा देत आहोत.

भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांचे खरे मुसलमान स्वरूप उघड !

     देशाच्या राज्यघटनेने सर्वांना समान हक्क दिले असले, तरी त्यामध्ये काहीतरी उणीव असल्याचे जाणवते. कधीकधी आम्हाला या देशाचे दुय्यम नागरिक असल्यासारखे वाटते. अनेकदा मूळ प्रश्‍नांना मूठमाती दिली जाते.- केंद्रीयमंत्री मुख्तार अब्बास नक्वी 
 • बंगाल, आसाम, केरळ येथे हिंदूंवर धर्मांधांकडून आक्रमणे केली जातात, त्याविषयी मुसलमानांना काय वाटते, हेही नक्वी यांनी सांगावे ! 
 • मुंबईतील आझाद मैदानात सहस्रावधी धर्मांधांनी म्यानमारच्या मुसलमानांसाठी दंगल घडवून कोट्यवधी रुपयांची हानी केली, 
 • हुतात्म्यांचा स्मृतीस्तंभ तोडला, याविषयी त्यांना काय वाटते, हेही नक्वी यांनी सांगावे !

पोलिसांच्या संदर्भातील कटू अनुभव !

      राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणासाठी निःस्वार्थी वृत्तीने कार्य करणार्‍या सनातनच्या साधकांवर लक्ष ठेवणार्‍या पोलिसांनी त्यांचा हाच वेळ आतंकवाद्यांना शोधण्यासाठी वापरला असता, तर देश आतंकवाद्यांनी पोखरला गेला नसता !
एका शहरात दैनिक सनातन प्रभातचे वितरण 
करणार्‍या एका साधकावर पोलिसांचे लक्ष ! 
   नुकतेच एका शहरातील एक साधक पहाटे ५ वाजता दैनिक सनातन प्रभातचे गठ्ठे घेण्यासाठी बसस्थानकावर आले होते. त्याच वेळी तेथील परिसरात पोलिसांची चारचाकी थांबली. ही गाडी जवळजवळ २० मिनिटे तेथे होती. गाडीतील पोलीस दैनिकाचे वितरण करणार्‍या साधकाचे निरीक्षण करत होते. साधक काय करत आहे, कोणत्या बसमधून गठ्ठे घेत आहे, आदींचे पोलीस निरीक्षण करत होते.

सनातनच्या निरपराध साधकांवरील हा अन्याय लक्षात ठेवा !

     कोणताही गुन्हा केला नसतांना श्री. समीर गायकवाड यांना मागील १ वर्ष २७ दिवसांपासून, तर डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांना ४ महिने ६ दिवसांंपासून कारागृहात डांबण्यात आले आहे.
       केवळ हिंदुत्वाची मानहानी करण्यासाठी सनातनच्या निरपराध साधकांना कारागृहात डांबणार्‍यांना हिंदु राष्ट्रात दामदुप्पटीने शिक्षा देण्यात येईल !

हिंदु धर्माची यथार्थ बाजू लोकांना सांगण्याची आवश्यकता !

      आज आम्हाला सर्व बाजूंनी जमेल तसा, जमेल त्या प्रकारच्या साधनांचा अवलंब करावा लागेल. प्रसार-माध्यमांचा अवलंब करावा लागेल. तन, मन आणि धन वेचून सनातन हिंदु धर्माची यथार्थ बाजू आणि यथार्थ धर्म लोकांना सांगावा लागेल. - गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी (मासिक घनगर्जित)

अशांनी पुढे रावणाची पूजा केली, तर आश्‍चर्य वाटायला नको !

      बंगालच्या नदिया जिल्ह्यातील चाकदा येथील नवरात्रोत्सवाच्या मंडपात राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची श्री दुर्गादेवीच्या रूपातील मूर्ती ठेवण्यात आली. या मूर्तीच्या दहा हातांमध्ये राज्य सरकारच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली आहे. भवानीपूर येथील मंडपात ठेवण्यात आलेली मूर्ती याचकाच्या स्वरूपात असून श्री दुर्गादेवीचा एक हात ममता बॅनर्जी यांच्या डोक्यावर आहे. सारासार विवेकबुद्धी गमावलेले भूतपूर्व पंतप्रधान आणि पं. नेहरू !

१. पराजय समोर दिसू लागल्यावर प्रसारमाध्यमांवर धमकी देणारे भूतपूर्व पंतप्रधान मनमोहनसिंह ! : वर्ष २०१४ च्या निवडणुका जाहीर झाल्या आणि नरेंद्र मोदी यांचे नाव पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून घोषित झाले. सत्ता हातातून निसटली की, राजकारणी सैरभैर होतात. त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे भूतपूर्व पंतप्रधान मनमोहनसिंह. सुसंस्कृतपणाचे सर्व संकेत झुगारून दूरचित्रवाहिनीवरील चर्चेत ते म्हणाले, मोदी पंतप्रधान झाले, तर देशात आम कत्तली होतील. काय गंमत आहे, या एकमेव शीख पंतप्रधानांना वर्ष १९८४ मधील देहलीतील शिखांच्या कत्तलींचे विस्मरण झाले.
२. पंतप्रधानपदाच्या हव्यासापायी सुभाषबाबूंच्या अपघाती मरणाची खोटी बातमी पसरवणारे नेहरू ! : नेहरूंनी पंतप्रधानपद आणि सर्व भारताची सत्ता यांच्या हव्यासापायी सुभाषबाबूंच्या अपघाती मरणाची खोटीच बातमी पसरवून आपला एक स्पर्धक वगळला. त्यामुळे भारतातील लोकांची निर्भेळ राजनिष्ठा एकट्या नेहरूंवर केंद्रित राहिली.
- दादूमिया (संदर्भ : धर्मभास्कर, एप्रिल २०१६)

असे सर्वोच्च न्यायालयाला सांगावे लागणे, हे लज्जास्पद ! लहानपणापासून धर्मसंस्कार न केल्याचे, म्हणजे मातृदेवो भव पितृदेवो भव हे न शिकवल्याचा हा परिणाम आहे. असे वरवरचे उपाय नकोत, तर शालेय शिक्षणातच हे संस्कार करा !

     विवाह झाल्यानंतर पतीच्या वयोवृद्ध आईवडिलांना सोडून वेगळे रहाण्यासाठी प्रयत्न करणे वा त्यासाठी दबाव आणणे, हे क्रूर कृत्य आहे, यासाठी पत्नीला घटस्फोट दिला जाणे शक्य आहे. - न्या. अनिल दवे आणि न्या. एल्. नागेश्‍वर राव, सर्वोच्च न्यायालयअशांना फाशी का देत नाही ? पहिल्याच गुन्ह्यात फाशी दिली, तर पुढचे गुन्हे होणार नाहीत, हेही सरकारला कळत नाही का ?

      ऑक्टोबर २००९ मधील मालतीया यादव या युवतीच्या हत्येप्रकरणी म्हापसा, गोवा येथील केंद्रीय अन्वेषण विभाग न्यायालयाच्या न्यायाधीश विजया पोळ यांनी आरोपी सायरन रॉड्रिग्स आणि चंद्रकांत तलवार यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. या दोघा आरोपींनी अशा पद्धतीने मुंबई, सुकूर, वेर्णा, मेरशी आणि खोर्जुवे येथे एकूण ५ हत्या केल्या होत्या.

भारताने किती अण्वस्त्रविरोधी बंकर बनवले आहेत ?

     तिसर्‍या महायुद्धाचा धोका लक्षात घेऊन रशियाने तेथील जनतेला सूचना दिल्या आहेत. या पार्श्‍वभूमीवर रशियाने राजधानी मास्कोत १२ लाख लोकांना सुरक्षित ठेवण्यासाठी अण्वस्त्रविरोधी बंकर बनवले आहेत, अशी घोषणा ऑक्टोबरच्या प्रारंभी पुतिन यांच्या सरकारमधील एका उत्तरदायी मंत्र्याने केली होती.

प.पू. डॉक्टरांना झालेले त्रास आणि सनातन आश्रमाच्या परिसरातील वनस्पती, प्राणी अन् पक्षी यांच्या संदर्भात लक्षात आलेली सूत्रे

     ज्याप्रमाणे घरात घडणार्‍या सुख-दुःखाच्या घटनांचा परिणाम घरातील प्रत्येकावर अल्प-अधिक प्रमाणात होतो, त्याप्रमाणेच आपण रहात असलेल्या वास्तूच्या परिसरात असणारी तुळशीची रोपे किंवा देवतांना जी फुले वाहाण्यात येतात त्यांची सात्त्विक झाडे आणि घरातील पाळीव प्राणी यांच्यावरही होतो, असे म्हटले जाते. सनातनच्या रामनाथी येथील आश्रमात घडलेल्या अशाच काही घटनांच्या संदर्भात आपण या लेखात जाणून घेणार आहोत.
१. प.पू. डॉक्टरांना २९.७.२०१६ ते १.८.२०१६ या कालावधीत झालेले विविध त्रास
    २९.७.२०१६ या दिवशी सायंकाळी प.पू. डॉक्टर आजारी पडले. सायंकाळी खोलीत जात असतांना त्यांना चक्कर येऊन त्यांचा तोल जात होता. त्या वेळी आधुनिक वैद्यांनी तपासल्यावर त्यांना १००.५ फॅरनहाईट ताप होता, असे लक्षात आले. त्यानंतर पुढे २ दिवस त्यांना ताप होता. त्यांची प्राणशक्ती पुष्कळ न्यून झाली होती. खोकला होता. अंगाला सूज आली होती आणि त्यांचे बोलणे अस्पष्ट झाले होते. ३० आणि ३१.७.२०१६ या दिवशी त्यांना उलट्या होत होत्या. थोडेसे खाल्लेलेही उलटून पडत होते. या कालावधीत त्यांच्यात उठून बसायचेही त्राण नव्हते. उलट्या सोडल्यास बाकी सर्व त्रास त्यांना १ ऑगस्टपर्यंत होत होते. १.८.२०१६ या दिवशी ताप नव्हता.
२. याच कालावधीत आश्रम परिसरातील झाडांवर झालेले परिणाम 
 प.पू. डॉक्टरांच्या खोलीच्या सज्जामध्ये ठेवलेली आणि
ते प्रतिदिन पाणी घालत असलेली तुळस सुकणे (२९.७.२०१६)
     २ अ. प.पू. डॉक्टरांच्या खोलीच्या सज्जामध्ये ठेवलेली तुळस सुकणे : २९.७.२०१६ या दिवशी दुपारी प.पू. डॉक्टरांच्या खोलीच्या सज्जामध्ये ठेवलेली आणि ते प्रतिदिन पाणी घालत असलेली तुळस सुकल्याचे लक्षात आले.
२ आ. अश्‍वत्थाच्या लहान रोपाची पाने गळून पडणे : दुपारी प.पू. डॉक्टरांच्या खोलीच्या सज्जामध्ये ठेवलेले आणि महर्षींच्या आज्ञेवरून ते प्रतिदिन पाणी घालत असलेल्या कुंडीतील अश्‍वत्थाच्या (पिंपळाचा एक प्रकार) लहान रोपाची ४ पाने एकेक करून गळून पडली.

स्वतः आदर्श न वागणारे आणि भक्तांना शिस्त न लावणारे एक संत !

     माझे एक आप्त एका संतांचे भक्त आहेत. काही कारणास्तव आम्ही तीर्थक्षेत्री गेलो असतांना त्या संतांना भेटण्याचा योग आला. तेव्हा जाणवलेली सूत्रे येथे देत आहे. 
१. संत मार्गदर्शन करत असलेला कक्ष अव्यवस्थित असणे : संत भक्तांना ज्या कक्षात मार्गदर्शन करत होते, तो कक्ष अव्यवस्थित होता. कक्षाच्या प्रवेशद्वारात भुईमुगाच्या शेंगांची टरफले अस्ताव्यस्त पडली होती. ते बसलेल्या आसंदीच्या जवळच जमिनीवर एका प्लास्टिकच्या पिशवीत केळी ठेवली होती. आसंदीपासून काही अंतरावर केळीचे देठ पडले होते. काही वेळाने एक भक्त आल्यावर संतांनी वाटेत असणारे केळीचे देठ आणि शेंगांची टरफले पायाने बाजूला सरकवली. 

रामनाथी आश्रमात आल्यावर सौ. दुर्गा आणि श्री. मिलिंद कुलकर्णी यांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

     २२ ते २६ १.२०१५ या कालावधीत आम्ही कवळे (फोंडा) येथील श्री शांतादुर्गा मंदिराच्या भक्तनिवासात रहात होतो आणि प्रतिदिन सकाळी ११ ते रात्री ८ या वेळेत नामजप अन् सत्सेवा करण्यासाठी सनातनच्या रामनाथी आश्रमात येत होतो. या कालावधीत जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती येथे देत आहे. 
 १. जाणवलेली सूत्रे 
१ अ. संतांचा प्रेमभाव : २२.१.२०१५ या दिवशी आश्रमदर्शन करतांना आम्ही दैनिकात आलो. तेव्हा तेथे सनातनचे संत पू. हजारेकाका सेवा करत होते. आम्हाला पाहून ते संत असूनही उठून आमच्याजवळ आले आणि त्यांनी आमची विचारपूस केली. या त्यांच्या कृतीतून आम्हाला त्यांच्यातील प्रेमभाव अनुभवता आला. 
१ आ. सनातन आश्रम म्हणजे चैतन्य प्रकट करण्याचे स्थान ! : सनातन आश्रम म्हणजे एक गाव आहे. या आश्रमातील संत म्हणजे गावातील मंदिरे आहेत. प्रत्येक साधक म्हणजे गावातील घर आहे. आत्मा म्हणजे शक्ती. या आश्रमरूपी गावात राहून अष्टांग साधनेच्या माध्यमातून संस्कार, स्वभावदोष अन् अहं घालवून आत्मा म्हणजे चैतन्य प्रकट करण्याचे हे स्थान आहे, असे विचार माझ्या मनात आले. 

एस्.एस्.आर.एफ्.च्या संकेतस्थळाची सेवा करतांना आलेल्या अडचणी दत्ताचा नामजप लावून ठेवल्यामुळे दूर होणे

      काही दिवसांपूर्वी मी सनातन प्रभातमध्ये संगणक आणि माहितीजाल (इंटरनेट) यांच्या संदर्भात येणार्‍या त्रासांविषयीचा एक लेख वाचला होता. माझ्याही संगणकासंदर्भात मला पुढील अनुभव आले.
१. एस्.एस्.आर्.एफ्.च्या संकेतस्थळाशी संबंधित सेवेला आरंभ केल्यावर
मॉनिटरच्या चहूबाजूंनी अनेक विचित्र विज्ञापने दिसणे, सेवेशी संबंधित अन्य
संकेतस्थळांवरही हा त्रास जाणवणे, नंतर ई मेल आणि संगणक यांचे काम बंद पडणे
     २५.१२.२०१४ या दिवसापासून मी संगणकावर स्पिरिच्युअल सायन्स रिसर्च फाउंडेशन (एस्.एस्.आर्.एफ्.)च्या संकेतस्थळाशी संबंधित सेवा करत असतांना एस्.एस्.आर्.एफ्.च्या संकेतस्थळावर वाईट शक्तींची आक्रमणे होतात, असे मला वाटले. याचा दृश्य परिणाम म्हणजे अकस्मात् मॉनिटरच्या चहूबाजूंनी अनेक विचित्र विज्ञापने दिसू लागतात. यामुळे संकेतस्थळाचे पेज जॅम होते. या आक्रमणानंतर संगणकीय पत्र (ई मेल) आणि संगणक दोहोंचे काम बंद पडते. फेब्रुवारी २०१५ पासून या आक्रमणांची तीव्रता आणि वारंवारता वाढली आहे.
२. संकेतस्थळावरील लिखाणातील काही शब्द व्हायरसमध्ये रूपांतरित
झाल्याने संकेतस्थळाच्या एका पानावरून दुसर्‍या पानावर जाता न येणे
     माझा संगणक आणि भ्रमणसंगणक (लॅपटॉप) यांच्यावर होणार्‍या वाईट शक्तींच्या आक्रमणांमध्ये पुष्कळ वाढ झाली आहे, असे जाणवते. जवळजवळ प्रतिदिन होणार्‍या या आक्रमणांमुळेे मला संगणकावर वाचन किंवा सेवा करणे अशक्य होत चालले आहे. चालू असलेल्या संगणकाच्या पडद्यावर अकस्मात वरून, खालून आणि डाव्या अन् उजव्या बाजूंनी लालभडक, तसेच काळ्या रंगांची विज्ञापने येऊ लागतात. एस्.एस्.आर्.एफ्.च्या संकेतस्थळावरील लिखाणातील काही शब्द व्हायरसमध्ये रूपांतरित झाल्याने त्यांचा रंग पालटून ते निळ्या रंगाचे आणि आकाराने मोठेे बनतात, तसेच संगणकीय पानाच्या कोपर्‍यात एक हिरवा बाणही असतो. त्यावर क्लिक केल्यास निराळेच काहीतरी चालू होते.

व्यक्तीच्या जीवनातील गुरूंचे महत्त्व !

व्यक्तीच्या जीवनातील गुरूंचे महत्त्व ! : राजा नृग हा सरडा बनला. राजा अज हा बुद्धिमान होता; पण तो मृत्यूनंतर साप झाला. तसेच अमेरिकेचे माजी राष्ट्रपती अब्राहम लिंकन हे मानवतावादी होते, मला त्यांच्याविषयी प्रेमही आहे. त्यांची प्रसिद्धी करणार्‍या संस्था मला तेथे घेऊन गेल्या आणि मी तेथे गेलोसुद्धा; पण ते बिचारे अजूनही व्हाइट हाऊसमध्ये लिंगदेह बनून फिरत आहेत; कारण त्यांचे जीवन हे गुरुविना होते. 
- पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू (ऋषिप्रसाद, फेब्रुवारी २०१५)

आपल्या वाढदिवसाच्या दिवशी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी आयुष्यभर प्रयत्न करण्याचा संकल्प करणारी ७ वर्षांची आणि ६६ टक्के आध्यात्मिक पातळीची कु. पूर्ती लोटलीकर !

 कु. पूर्ती लोटलीकर
     १३.६.२०१६ या दिवशी माझी ६६ टक्के आध्यात्मिक पातळीची भाची कु. पूर्ती लोटलीकर हिचा वाढदिवस होता. त्या दिवशी मी तिला विचारले, "पूर्ती, आज वाढदिवसाच्या दिवशी काय संकल्प केलास ?" त्यावर पूर्तीने उत्तर दिले, "हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी आयुष्यभर प्रयत्नरत राहीन !" अवघ्या ७ वर्षांच्या एवढ्या लहान वयात हिंदु राष्ट्राच्या स्थापनेची तिची तळमळ पाहून आणि तिचे ते उत्तर ऐकून माझ्या अंगावर रोमांच उभे राहिले. तिचे ते उत्तर तिची आध्यात्मिक पातळी आणि प्रगल्भता सिद्ध करणारे आहे. 
- कु. प्रियांका लोटलीकर, सनातन आश्रम, गोवा. (१३.६.२०१६) 

सनातनला नावे ठेवणार्‍या शिक्षकांच्या प्रश्‍नांना सडेतोड उत्तरे देणारा एक विद्यार्थी साधक (वय १३ वर्षे) !

      आमच्या शाळेतील एक शिक्षक मला सनातनवाल्या या नावाने हाक मारायचे. एके दिवशी त्यांचे माझ्याशी पुढील संभाषण झाले. 
सर : सनातनवाल्या, इकडे ये. 
मी : काय सर ?
सर : सध्या काय चालू आहे तुमचे ? 
मी : गुरुपौर्णिमेची सिद्धता चालू आहे. 
सर : कशाला तसली गुरुपौर्णिमा करता ? मूर्ख कुणीकडचे ! 
मी : गुरुपौर्णिमेला गुरूंचा आशीर्वाद मिळण्यासाठी साजरी करतो. 
सर : तुमच्या गुरूंचे नाव काय ? 
मी : प.पू. डॉ. जयंत आठवले. 

संत मीराबाईंशी संबंधित विविध स्थानांची आध्यात्मिक स्तरावरील वैशिष्ट्ये अभ्यासण्यासाठी यू.टी.एस्. (युनीव्हर्सल थर्मो स्कॅनर) या उपकरणाद्वारे महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाने केलेली वैज्ञानिक चाचणी

     भाविकांना संतांमधील सात्त्विक स्पंदनांचा लाभ व्हावा, यासाठी संतांशी संबंधित वस्तू जतन करून ठेवण्याची हिंदूंची प्राचीन परंपरा आहे. सोळाव्या शतकात राजस्थानमध्ये संत मीराबाई या थोर श्रीकृष्णभक्त होऊन गेल्या. राजस्थानातील मेडता येथे त्यांचा कक्ष, त्यांचे हस्तलिखित असलेला गवाक्ष (खिडकी) आणि त्या ज्या मूर्तीसमोर बसून भजने म्हणत, ती श्री चतुर्भुजनाथाची मूर्ती आहे. या तीनही वास्तू ४०० वर्षांहूनही अधिक पुरातन आहेत. त्यांमधील स्पंदनांचा वैज्ञानिकदृष्ट्या अभ्यास करण्यासाठी यू.टी.एस्. (युनीव्हर्सल थर्मो स्कॅनर) या उपकरणाच्या साहाय्याने चाचणी घेण्यात आली. या चाचणीची निरीक्षणे आणि त्यांचे विवरण पुढे दिले आहे.
१. वैज्ञानिक चाचणी करण्याचा उद्देश
     एखाद्या घटकात (वस्तू, वास्तू, प्राणी आणि व्यक्ती यांत) किती टक्के सकारात्मक स्पंदने आहेत, तो घटक सात्त्विक आहे कि नाही किंवा तो घटक आध्यात्मिकदृष्ट्या लाभदायक आहे कि नाही, हे सांगण्यासाठी सूक्ष्मातील कळणे आवश्यक असते. संत सूक्ष्मातील जाणू शकत असल्याने ते प्रत्येक घटकातील स्पंदनांचे अचूक निदान करू शकतात. भाविक आणि साधक संतांनी सांगितलेले शब्द प्रमाण मानून त्यावर श्रद्धा ठेवतात; परंतु बुद्धीप्रामाण्यवाद्यांना मात्र शब्दप्रमाण नाही, तर प्रत्यक्ष प्रमाण हवे असते. त्यांना प्रत्येक गोष्ट वैज्ञानिक चाचणीद्वारे, म्हणजेच यंत्राने सिद्ध करून दाखवली असेल, तरच ती खरी वाटते.
२. चाचणीचे स्वरूप
     या चाचणीत थोर संत मीराबाई यांचा कक्ष, त्यांचे हस्तलिखित असलेला गवाक्ष (खिडकी) आणि संत मीराबाई ज्या मूर्तीसमोर बसून भजने म्हणत, ती श्री चतुर्भुजनाथाची मूर्ती यांचे यू.टी.एस्. उपकरणाद्वारे परीक्षण करण्यात आले.

भगवान शिवाचे वैराग्य !

श्री. राम होनप
      १९.७.२०१६ या दिवशीच्या दैनिक सनातन प्रभातमधे प.पू. डॉक्टरांनी गुरुकृपायोगाचा उगम याविषयी लिहिले आहे. त्यात 'अपेक्षाविरहित कर्म म्हणजे वैराग्य !', अशी वैराग्याची व्याख्या दिली आहे. शिवाला वैरागी म्हणतात. वरील सूत्रानुसार भगवान शिवाचे आचरण कसे असेल ?, असा विचार मनात आला. त्या वेळी पुढील सूत्रे सूचली. 
१. पूर्वी असुर कठोर साधना करून शिवाला प्रसन्न करून त्यांना हवा तो वर शिवाकडून मिळवत असत. त्या वेळी शिव असुरांना हा वर तुमच्यासाठी हितावह नसल्याचे सांगत, तरी असुर स्वतःच्या मतावर ठाम राहून त्याचा अपलाभ घेत. त्या वेळी शिवाला असुरांनी माझे ऐकावे, अशी अपेक्षा नसायची. 

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त...

घ्या मज सामावूनी 
तव चरणामध्ये नाथा । 
गुरुमाऊली आमची थोर । 
वाहे सार्‍या विश्‍वाचा भार । 
धन्य धन्य झालो सारी लेकरे आम्ही । 
या घोर कलियुगात भेटलात तुम्ही ॥ १ ॥ 

सर्वत्रच्या साधकांना सूचना

सनातन साधक-पुरोहित पाठशाळेतील पुरोहितांना धार्मिक विधींविषयी काही शंका विचारायच्या असल्यास त्या लिखित स्वरूपात पाठवा ! 
     काही साधकांना ज्योतिषी नारायण-नागबळी, त्रिपिंडी श्राद्ध आदी विविध धार्मिक विधी करण्यास सांगतात. तेव्हा त्यांच्या मनात ज्योतिष्यांनी सांगितलेल्या विधीचे स्वरूप काय असते ? भावपूर्ण आणि परिणामकारक विधी होण्यासाठी काय करायला हवे, आदी प्रश्‍न आल्याने ते सनातन साधक-पुरोहित पाठशाळेतील पुरोहितांना संपर्क करण्याचा प्रयत्न करतात. विधी, यज्ञयाग आदींच्या सेवेत पुरोहित व्यस्त असल्यास त्यांच्याशी भ्रमणभाषवर संपर्क होत नाही. यामुळे साधकांची असुविधा होऊ नये, यासाठी विधींविषयी काही शंका असल्यास साधकांनी त्या जिल्हासेवकांच्या माध्यमातून श्री. केतन शहाणे यांच्या नावे sankalak.goa@gmail.com या संगणकीय पत्त्यावर अथवा टपाल पत्त्यावर पाठवाव्यात. शंका पाठवतांना साधकाचे नाव, जिल्हा, तसेच संपर्क क्रमांक अंतर्भूत करावा. सांगितलेल्या विधी अथवा उपायाचे नाव काय आहे आणि तो कोणी करायला सांगितला आहे, हाही उल्लेख करावा. 
(टपालासाठी पत्ता : श्री. केतन शहाणे, सनातन आश्रम, २४/बी, रामनाथी, बांदिवडे, फोंडा, गोवा.)

रंगपंचमीच्या दिवशी एका मंदिरात अश्‍लील गाणी लावून नाचत रंग खेळणार्‍या मुलांचे प्रबोधन केल्यावर मुलांनी क्षमा मागून मंदिर धुवून स्वच्छ करणे आणि तेव्हापासून रंगपंचमीला मंदिरात गाणी लावणे पूर्णपणे बंद होणे !

       रंगपंचमीच्या दिवशी एका मंदिरात २० ते २२ मुले ध्वनीमुद्रकावर (टेपरेकॉर्डरवर) अश्‍लील गाणी लावून नाचत रंग खेळत होती. त्यात एक धर्मांध मुलगाही होता. अशा कृतींनी मंदिराचे पावित्र्य न्यून होते, हे ठाऊक असल्याने हे सर्व पाहून माझी घुसमट होत होती. त्या वेळी मी श्रीकृष्णाला प्रार्थना केली, हे श्रीकृष्णा, हे सर्व थांबवण्यासाठी तूच मला शक्ती दे. त्या धर्मांध मुलाला म्हटले, आता हा ध्वनीमुद्रक, ही गाणी आणि या सर्व मुलांना घेऊन तू तुमच्या प्रार्थनास्थळात जा ! तेव्हा तो गप्प बसला. मग मी हिंदु मुलांना म्हटले, आपल्या मंदिरांचे पावित्र्य आपणच राखायला हवे. त्यांच्या प्रार्थनास्थळात ते तुम्हाला उभेही राहू देत नाहीत. मग तुम्हाला तुमच्या देवाचे महत्त्व का वाटत नाही ? तेव्हा मुलांनी क्षमा मागितली आणि मंदिरही धुवून स्वच्छ केले. तेव्हापासून रंगपंचमीला त्या मंदिरात गाणी लावणे पूर्ण बंद झाले आहे. 
- एक साधिका

सुशिक्षित बेरोजगारांची सेना निर्माण करणारी सध्याची शिक्षणपद्धती !

     शिक्षण सम्राटांनी त्यांच्या धंदेवाईक शिक्षण संस्थांमधून कुचकामी शिक्षण देऊन समाजाच्या हाती ज्ञानाऐवजी निरर्थक पदव्यांची भंडारे दिली आहेत. अशिक्षित बेरोजगारांच्या जागी आता सुशिक्षित बेरोजगारांची सेना आम्ही सिद्ध केली. - श्री. अभय भंडारी, सांगली (साप्ताहिक वज्रधारी)


सर्वधर्मसमभावचा खरा अर्थ काय ?

     सर्वधर्मसमभाव याचा अर्थ आपल्या धर्माविषयी उदासीनता बाळगणे, असा होत नाही. मध्यप्रदेशमधील भोजशाळेत, म्हणजे सरस्वती मंदिरात मुसलमान समाजाला प्रत्येक शुक्रवारी नमाज पढण्यासाठी अनुमती दिली गेली; मात्र हिंदूंच्या गणपतीच्या मिरवणुकीला मशिदीसमोरून जाण्यास अनुमती दिली जात नाही.
- श्री. दुर्गेश परुळकर (संदर्भ : मासिक धर्मभास्कर, सप्टेंबर २०१३)


पाणी पिण्याच्या पारदर्शक बाटलीचा रंग पालटून ती गुलाबी होणे

     माझी पाणी पिण्याची बाटली पारदर्शक होती. २८.९.२०१६ या दिवसापासून मला तिच्यातील पाणी गुलाबी रंगाचे दिसायला लागले. त्या वेळी मी घातलेल्या कपड्यांच्या प्रतिबिंबामुळे ते गुलाबी दिसत असेल, असे मला वाटले. त्यामुळे मी त्याकडे दुर्लक्ष केले. दुसर्‍या दिवशी पाणी गुलाबी दिसत होते. इतर साधिकांना ते दाखवल्यावर त्यांनाही तसेच जाणवले. बाटलीतील पाणी पालटून बघितल्यावरही ते गुलाबीच दिसले. नंतर आमच्या लक्षात आले की, बाटलीचा रंगच गुलाबी झाला आहे. - कु. प्रणिता नलावडे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१.१०.२०१६)
साधकांना सूचना
     अशा प्रकारे साधकांना त्यांच्या घरी खोल्यांतील भिंती, छायाचित्रे, वस्तू, उदा. कपडे, कागद यांच्या रंगात पालट होतांना दिसल्यास त्यांनी त्याची छायाचित्रे काढावीत. ती छायाचित्रे आणि त्याविषयीची माहिती पुढील सारणीनुसार sankalak.goa@gmail.com या संगणकीय पत्त्यावर पाठवावी.

वैज्ञानिक दृष्टीने संशोधन करणार्‍यांना विनंती !
     आश्रमात, संतांचे वास्तव्य असलेले ठिकाण आणि साधकांच्या घरी खोल्यांतील भिंती, छायाचित्रे, त्यांच्या वस्तू, उदा. कपडे, कागद यांच्या रंगात पालट होतांना दिसतो. त्याचेच हे एक उदाहरण आहे.

धर्मशिक्षणवर्गात विचारलेले प्रश्‍न आणि त्यांची उत्तरे

 वेदमूर्ती केतन शहाणे
१. प्रश्‍न : श्राद्धविधी चालू असतांना त्या ठिकाणी 'ॐ'चा उच्चार करू नये, असे शास्त्रात सांगितले आहे. यावर्षी (वर्ष २०१६ मध्ये) पितृपक्षाच्या कालावधीत सर्व साधकांना 'ॐॐ श्री गुरुदेव दत्त ॐॐ ।' असा नामजप करण्यास सांगितले होते. श्राद्धविधी चालू असतांना 'ॐ' लावून नामजप केल्यास ते शास्त्रसंमत होणार नाही, तर कसे असावे ? 
उत्तर : श्राद्धविधी चालू असतांना त्या ठिकाणी 'ॐ'चा उच्चार करू नये, हे योग्य आहे. नामजप मनातल्या मनात (सूक्ष्मातून) करत असल्याने त्याला हा नियम लागू होत नाही. श्राद्धविधी चालू असतांना सध्या सांगितलेला 'ॐॐ श्री गुरुदेव दत्त ॐॐ ।' असा नामजप मनातल्या मनात करण्यास आडकाठी नाही; परंतु वैखरीतून (मोठ्याने) नामजप करायचा असल्यास तो 'श्री गुरुदेव दत्त ।' असा करावा. त्या वेळी मात्र 'ॐ' लावून नामजप करू नये; मात्र श्राद्धकर्त्याने मनातल्या मनात अथवा वैखरीतून (मोठ्याने) 'श्री गुरुदेव दत्त ।' असाच नामजप करावा. 

एका विवाहप्रसंगी विधींचे पावित्र्य राखण्यासंदर्भात व्यक्तींचे प्रबोधन केल्यावर मिळालेला सकारात्मक प्रतिसाद !

श्री. रविकांत कुलकर्णी
      मी पौरोहित्य करतो. मी धार्मिक विधी केवळ दक्षिणा मिळावी यासाठी करत नाही, तर विधी शास्त्रानुसार व्हावेत, यासाठी प्रयत्न करतो. त्यासाठी मी यजमानांना पुढील सूचना देतो.
१. विवाहासारख्या मंगल विधीचे 
पावित्र्य राखण्यासाठी देत असलेल्या सूचना
अ. वधू-वर एकमेकांना हार घालत असतांना त्यांना उचलू नये.
आ. उपस्थितांवर स्प्रे न मारता अत्तर शिंपडावे, म्हणजे वातावरणात सात्त्विकता निर्माण होते.
इ. वधू-वरांवर अक्षता उभे राहूनच वहाव्यात. अपंग आणि वृद्ध व्यक्तींनी बसून अक्षता वहाव्यात.
ई. व्यासपिठावर देवतांची मांडणी केलेली असल्याने आणि वधू-वर हे लक्ष्मी-नारायणांप्रमाणे असल्याने तेथे पादत्राणे घालून जाऊ नये. 
     वरील प्रमाणे सूचना देऊनही कुणी ऐकले नाही, तर वातावरण रज-तमात्मक होते, असे सांगून मी सर्वांचे प्रबोधन करतो.

भावी आपत्काळात अन् नेहमीसाठीही उपयुक्त ठरणारी सनातनची ग्रंथमालिका : भावी आपत्काळातील संजीवनी !

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचे स्वसंमोहन उपचारांवरील अभ्यासपूर्ण ग्रंथ
     संत-महात्मे, ज्योतिषी आदींच्या सांगण्यानुसार आगामी काळ हा भीषण आपत्काळ असून या काळात समाजाला अनेक आपत्तींना तोंड द्यावे लागणार आहे. आपत्काळात दळणवळण तुटल्यामुळे रुग्णाला रुग्णालयात नेणे, डॉक्टर वा वैद्य यांच्याशी संपर्क साधणे आणि पेठेत (बाजारात) औषधे मिळणेही कठीण होते. आपत्काळात ओढवणार्‍या विकारांना (आजारांना) तोंड देेण्याच्या पूर्वसिद्धतेचा एक भाग म्हणून सनातन भावी आपत्काळातील संजीवनी ही ग्रंथमालिका सिद्ध (तयार) करत आहे. या मालिकेतील १२ ग्रंथ आतापर्यंत प्रकाशित झाले आहेत. या ग्रंथांचा अभ्यास आतापासूनच केला, तर प्रत्यक्ष आपत्काळात विकारांना सामोरे जाण्यासाठी लागणारा आत्मविश्‍वास निर्माण होण्यास साहाय्य होईल. यासाठी हे सर्व ग्रंथ वाचकांनी अवश्य संग्रही ठेवावेत !
मनोविकारांवर स्वसंमोहन उपचार (भाग १)
     प्रस्तुत ग्रंथात मनोविकारांवरील उपचार पद्धती, संमोहन उपचार पद्धतीची वैशिष्ट्ये आदींचा उहापोह केला आहे.

प.पू. डॉक्टरांनी संकलित केलेल्या ग्रंथांच्या संख्येने उच्चांक गाठण्याची कारणे

     गेल्या २० वर्षांत, म्हणजे ऑगस्ट २०१६ पर्यंत मी संकलित केलेल्या आणि सनातन संस्थेने प्रकाशित केलेल्या अध्यात्मविषयक ग्रंथांची स्थिती अशी आहे - १५ भाषांतील २७३ ग्रंथांच्या सुमारे ६४ लक्षांहून अधिक प्रती ! अध्यात्मविषयक ग्रंथांचे लिखाण करणार्‍या काही जणांनी प्रश्‍न केला, 'आपण एवढे ग्रंथ एवढ्या कमी काळात कसे संकलित करू शकलात ?' या प्रश्‍नाचे उत्तर पुढीलप्रमाणे आहे. 
१. इतरांच्या ग्रंथांत धर्मात काय सांगितले आहे, याचा उल्लेख असतो; 'पण तसे का सांगितले आहे', याचे स्पष्टीकरण नसते, उदा. एखाद्या देवाला विशिष्ट फूलच का वाहतात ? बायकांनी कुंकू लावण्याचे कारण काय ? इत्यादी. मी संकलित केलेल्या ग्रंथांत अशा प्रश्‍नांची उत्तरे असतात, म्हणजेच अध्यात्मातील 'का ?', या प्रश्‍नांची उत्तरे असतात. त्यामुळे वाचकांच्या बुद्धीचे समाधान होते. शंकांचे निरसन झालेले वाचक अधिकाधिक ग्रंथांचे वाचन करतात आणि पुढे साधनेला लागतात. 

साधकांना सूचना

पौर्णिमा आणि अमावास्या या तिथींना प्रार्थना, नामजप, तसेच साधना अधिकाधिक करा.
प्रारंभ - आश्‍विन शुक्ल पक्ष चतुर्दशी (१५.१०.२०१६) दुपारी १.२६ वाजता
समाप्ती - आश्‍विन पौर्णिमा/कृष्ण पक्ष प्रतिपदा (१६.१०.२०१६) सकाळी ९.५३ वाजता
आज पौर्णिमा आहे.

विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने पुणे येथे एक भारत अभियान-कश्मीर की ओर या अंतर्गत हिंदु धर्मजागृती सभा !

    वर्ष १९९० मध्ये काश्मीरमधून विस्थापित होऊन भारताच्या इतर भागात रहाणार्‍या काश्मिरी हिंदु बांधवांना पुन्हा एकदा त्यांच्या जन्मभूमीत स्थान मिळावे आणि ते तेथे सुरक्षित रहावेत, या मागणीसाठी पनून काश्मीर, हिंदु जनजागृती समिती, लष्कर-ए-हिंद, हिंदू एकता आंदोलन, शिववंदना प्रतिष्ठान आणि अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्या वतीने पुणे येथे काश्मीर-एक भारत अभियान या अंतर्गत हिंदु धर्मजागृती सभा आयोजित केली आहे.
स्थळ : न्यू इंग्लिश स्कूल, रमणबाग शाळेचे मैदान, शनिवार पेठ, पुणे-३०
वार आणि दिनांक : रविवार, २३ ऑक्टोबर २०१६
वेळ : सायंकाळी ५.३०
भ्रमणभाष : ८९८३३३५५१७

सर्वत्रचे वाचक, हितचिंतक आणि धर्मप्रेमी यांना नम्र विनंती !

सनातनच्या विविध आश्रमांमध्ये खालील उपकरणांची आवश्यकता !
    सनातनच्या विविध आश्रमांमध्ये शेकडो साधक पूर्णवेळ साधना करत आहेत. राष्ट्र-धर्म यांच्या कार्यासाठी अधिकाधिक वेळ देता यावा, यासाठी पूर्णवेळ साधनेस आरंभ करणारे साधक, तसेच राष्ट्र आणि धर्म प्रेमी यांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. त्यामुळे सध्या आश्रमांमध्ये खालील उपकरणांची तातडीने आवश्यकता आहे.
 
जे वाचक, हितचिंतक अथवा धर्माभिमानी वरील उपकरणे विकत घेण्यासाठी धनरूपात साहाय्य करू इच्छितात, त्यांनी श्री. विनायक आगवेकर यांना vaastunirmiti@gmail.com या संगणकीय पत्त्यावर अथवा ०८४५१००६०३६ या क्रमांकावर संपर्क साधावा.
धनाच्या त्यागाद्वारे राष्ट्र आणि धर्म यांच्या कार्यात सहभागी होण्याची संधी दवडू नका !

विद्यार्थी-साधकांनो, दीपावलीच्या सुटीच्या काळात चैतन्यदायी आश्रमजीवन अनुभवून सर्वांगीण विकास साधणार्‍या विविध सेवांमध्ये सहभागी व्हा !

१. राष्ट्र आणि धर्म कार्यासाठी वेळ देणे, ही काळाची आवश्यकता ! 
 भावी आपत्कालीन स्थिती निर्माण होण्यापूर्वी धर्मप्रसार आणि सनातनच्या संशोधनाचे कार्य समाजापर्यंतच नाही, तर जगात सर्वत्र अधिकाधिक पोचवणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रत्येकाने स्वतःचे शिक्षण, तसेच अन्य व्यावहारिक कामे सांभाळून अधिकाधिक वेळ राष्ट्र आणि धर्म यांच्या कार्यासाठी देणे काळाची आवश्यकता आहे. 
२. पालकांनो, १३ वर्षांपेक्षा अधिक वयाच्या साधक-पाल्यांना सुटीत आश्रमात पाठवा ! 
 थोड्याच दिवसांत शाळा आणि महाविद्यालये यांमधील विद्यार्थ्यांना दीपावलीची सुटी लागेल. या कालावधीत १३ वर्षांपेक्षा अधिक वयाच्या साधक-पाल्यांना सेवेत सहभागी होण्यासाठी सनातनच्या रामनाथी (गोवा), देवद (पनवेल) येथील आश्रमात अथवा मंगळुरू (कर्नाटक) सेवाकेंद्रात पाठवता येईल. आश्रमांमध्ये विविध सेवा उपलब्ध आहेत. 
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥
या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो. - प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज
सनातनचे श्रद्धास्थान
शिष्याचा विश्‍वास
गुरु विश्‍वासावर आहे. आपल्या विश्‍वासावर गुरूंची महती अवलंबून आहे. गुरु तुमच्यापण विश्‍वासावर
आहे. तुमच्या विश्‍वासातच गुरु आहे.
भावार्थ : गुरु विश्‍वासावर आहे. आपल्या विश्‍वासावर गुरूंची महती अवलंबून आहे, यातील गुरु हा शब्द बाह्य गुरूविषयी वापरलेला आहे. गुरूवर विश्‍वास असेल, तरच गुरु गुरु म्हणून कार्य करू शकतो. गुरु तुमच्यापण विश्‍वासावर आहे. तुमच्या विश्‍वासातच गुरु आहे, यातील गुरु हा अंतर्यामी असलेला गुरु होय.
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.)

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले
    आद्य शंकराचार्यांनी विरोधी पंडितांशी वाद-विवाद करून त्यांचा पराभव केला; मात्र हल्लीच्या बुद्धीप्रामाण्यवाद्यांना, धर्मद्रोह्यांना वाद-विवाद करून हरवता येत नाही; कारण त्यांचा धर्माचा काडीइतकाही अभ्यास नसल्याने ते वाद-विवाद करण्यास पुढे येत नाहीत ! - (परात्पर गुरु) डॉ. आठवले 

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

बाह्यरूपापेक्षा आत्म्याचे रूप महत्त्वाचे ! 
नुसते बाह्यरूपच देखणे असून काय उपयोग ? आत्माही तेवढाच देखणा 
हवा ! दिव्याची काच घासून पुसून ठेवली; पण त्यात ज्योतच नसेल, तर त्याचा काय उपयोग ?
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

सत्तांध पक्ष !

संपादकीय
      गोवा राज्यात चालू असलेल्या ब्रिक्स परिषदेचे चिन्ह आहे कमळ. भाजपचेही हेच चिन्ह असल्याने काँग्रेसचे गोव्यातील खासदार नाईक यांनी ब्रिक्सचे चिन्ह कमळ असणे, या गोष्टीला आक्षेप घेतला. या आक्षेपाचे समर्थन करतांना त्यांनी म्हटले, गोव्यासह ५ राज्यांत येत्या ६ मासांत विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यामुळे निवडणूक चिन्हाचा हा गैरवापर आहे. झाले ! काँग्रेसचे सत्तापिपासू धोरण परत एकदा उघड झाले. काहीही झाले, तरी सत्तेच्या राजकारणाकडे वळायचे, हा एकच ध्यास या पक्षाने घेतलेला दिसतो. विरोधकांवर मात करणे आणि स्वतःचे नेतृत्व दामटण्याचे प्रयत्न करणे, एवढाच या पक्षाच्या अस्तित्वाचा हेतू दिसतो. कमळ हे राष्ट्रीय फूल आहे.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn