Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

कोटी कोटी प्रणाम !

प.पू. रामानंद महाराज जयंती, इंदूर

डॉ. दाभोलकरांच्या अंनिसवर मुख्यमंत्री कारवाई करणार का ? - अभय वर्तक, प्रवक्ता, सनातन संस्था

धर्मादाय आयुक्त 
कार्यालयाचा चौकशी अहवाल ! 

डावीकडून वैद्य उदय धुरी, अधिवक्ता श्री. संजीव पुनाळेकर,
श्री. अभय वर्तक, ह.भ.प. बापू महाराज रावकर, अधिवक्ता श्री. वीरेंद्र इचलकरंजीकर

        मुंबई, १२ ऑक्टोबर - डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या अंधश्रद्धा निर्मूलन समिती (अंनिस)च्या न्यासाचा कारभार पहाता त्यावर प्रशासक नेमावा, न्यासामधील घोटाळे पहाता विशेष लेखा परिक्षण (स्पेशल ऑडिट) करावे, तसेच गंभीर आरोपांची मोघम चौकशी केल्यामुळे न्यासाची पुन्हा फेरचौकशी करावी, असे अनेक गंभीर ताशेरे सातारा येथील सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयाच्या अधीक्षकांनी चौकशी अहवालात ओढले आहेत. त्या अहवालामुळे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा विवेकवाद, पुरोगामित्व आणि बुद्धीप्रामाण्यवाद यांचा बुरखा फाटला असून त्यांचा घोटाळेबाज चेहरा समाजासमोर आला आहे. दाभोलकर कुटुंबीय आणि पुरोगामी यांच्या दबावामुळे सनातन संस्थेची चौकशी करणारे मुख्यमंत्री आतातरी दाभोलकरांच्या न्यासावर कारवाई करणार आहेत का, असा प्रश्‍न सनातन संस्थेचे प्रवक्ता श्री. अभय वर्तक यांनी १२ ऑक्टोबर या दिवशी मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित पत्रकार परिषदेत उपस्थित केला. या वेळी पत्रकार परिषदेत हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष अधिवक्ता श्री. वीरेंद्र इचलकरंजीकर, राष्ट्रीय सचिव अधिवक्ता श्री. संजीव पुनाळेकर, राष्ट्रीय वारकरी सेनेचे कोकण प्रांताध्यक्ष ह.भ.प. बापू महाराज रावकर आणि हिंदु जनजागृती समितीचे प्रवक्ता डॉ. उदय धुरी हे उपस्थित होते.

अश्‍वमेधयाजी प.पू. नारायण (नाना) काळेगुरुजी यांच्या पार्थिवावर वेदमंत्रांच्या जयघोषात अग्निसंस्कार

अश्‍वमेधयाजी प.पू. नारायण
(नाना) काळेगुरुजी यांचे पार्थिव

    बार्शी (जिल्हा सोलापूर), १२ ऑक्टोबर (वार्ता.) - अश्‍वमेधयाजी प.पू. नारायण (नाना) गोविंद काळेगुरुजी (वय ८४ वर्षे) यांनी दसर्‍याच्या शुभदिनी म्हणजे ११ ऑक्टोबरला देहत्याग केला. त्यानंतर अश्‍विन शुक्ल पक्ष एकादशीला म्हणजे १२ ऑक्टोबरला सकाळी चार वेदांच्या मंत्रघोषात त्यांच्या पार्थिवाला मंत्राग्नी देण्यात आला.
देहत्यागापूर्वी प.पू. नाना 
काळेगुरुजी यांनी ३ वेळा आेंकार म्हणणे
    ११ ऑक्टोबरला प.पू. काळेगुरुजी यांच्या छातीमध्ये दुखत असल्याने त्यांना रुग्णालयात नेण्यात आले होते. तेथे त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यापूर्वी रुग्णालयात वैद्यकीय तपासण्या करतांना प.पू. नाना यांचा ३ वेळा आेंकार चालू झाला. त्यानंतर थोड्या वेळातच म्हणजे सायंकाळी ५.३० वाजता त्यांनी देहत्याग केला.

सर्जिकल स्ट्राईकचं श्रेय १२७ कोटी जनतेचे ! - पर्रीकर

     नवी मुंबई - पाकव्याप्त काश्मीरमध्ये भारतीय सैन्याने केलेल्या सर्जिकल स्ट्राईकचं श्रेय १२७ कोटी जनतेचे आहे. कुठल्याही एका पक्षाचे नाही, असे संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी तेथील एका कार्यक्रमात म्हटले. नवी मुंबईतील एका परिषदेच्या उद्घाटनाच्या कालावधीत भाषणात संरक्षणमंत्री श्री. मनोहर पर्रीकर बोलत होते.
    श्री. पर्रीकर पुढे म्हणाले की, आमच्या मैत्रीला कमकुवतपणा समजले गेले. आता पाकिस्तान गोंधळात आहे; कारण भारताविषयी अंदाजही लावू शकत नाहीत. तसेच भविष्यात परत ते धैर्य करू शकत नाहीत. (प्रतिदिन पाक भारतावर अद्यापही आक्रमणे करत असतांना या भ्रमात पर्रीकर कसे काय राहू शकतात ? - संपादक)

गोवा येथे सनातन आश्रमावर ड्रोन फिरतांना आढळला !

आश्रम व्यवस्थापनाच्या 
वतीने पोलिसांत तक्रार दाखल
       रामनाथी, १२ ऑक्टोबर (वार्ता.) - ११ ऑक्टोबर २०१६ या दिवशी सनातनच्या रामनाथी आश्रमावर सायंकाळी ६.३० च्या कालावधीत आश्रमावर ड्रोन (मानवरहित उडता कॅमेरा) फिरतांना दिसला. जमिनीपासून साधारण ७०-८० फुटांवर तो फिरत होता. श्री रामनाथ देवस्थानाच्या दिशेने सनातन आश्रमाकडे येत असलेला हा ड्रोन साधारण २० मिनिटे फिरत होता. याविषयी सनातन आश्रमाच्या वतीने त्वरित १०० क्रमांकावर संपर्क करून पोलिसांना माहिती देण्यात आली, तसेच फोंडा पोलीस ठाण्यातही कळवण्यात आले. त्यानंतर सुमारे अर्ध्या घंट्याने पोलीस आश्रमात पोचले आणि त्यांनी याविषयी जाणून घेतले. याविषयी १२ ऑक्टोबर या दिवशी आश्रम व्यवस्थापनाच्या वतीने फोंडा पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल करण्यात आली आहे. या तक्रारीच्या प्रती मुख्यमंत्री श्री. लक्ष्मीकांत पार्सेकर, स्थानिक आमदार तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री. सुदिन ढवळीकर आणि पोलीस महानिरीक्षक यांना देण्यात आल्या आहेत.
       या तक्रारीत म्हटले आहे की, नुकतेच पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून भारतीय सैन्याने आतंकवाद्यांची जवळपास ८ स्थळे नष्ट केली. यावर पाकिस्तानची मोठ्याप्रमाणावर हानी झाली असली किंवा मानसिक खच्चीकरण झाले असले, तरीही आतंकवादाला प्रोत्साहन देणारा पाकिस्तान निश्‍चितच शांत बसणार नाही. याच अनुषंगाने सध्या मोठमोठ्या शहरांमध्ये सुरक्षेच्या दृष्टीने अतीदक्षतेची चेतावणीही देण्यात आली आहे. गेल्या काही वर्षांमध्ये गोव्यामध्ये आतंकवादी कारवाया होत असल्याचे उघडकीस आले आहे. गोव्याची शांतता आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी संशयास्पद घटनांकडे गांभीर्याने आणि सतर्कतेने पहाणे क्रमप्राप्त आहे. याच दृष्टीने सनातन आश्रमावर फिरतांना आढळलेल्या ड्रोनकडेही तितक्याच गांभीर्याने पहाणे आवश्यक आहे.

काश्मिरी हिंदूंना न्याय मिळवून देण्यासाठी संघटित व्हा ! - प्रा. श्रीकांत बोराटे, हिंदु जनजागृती समिती

भोर येथील दुर्गामाता दौडीमध्ये हिंदु जनजागृती समितीचा सहभाग
प्रा. बोराटे यांचे मार्गदर्शन ऐकतांना धर्मप्रेमी
      भोर (जिल्हा पुणे), १२ ऑक्टोबर (वार्ता.) - विजयादशमीनिमित्त सीमोल्लंघन करायला हवा, असा संदेश हिंदूंना दिला आहे. सद्यस्थितीत हिंदु धर्मावर होणारे आघात परतवून लावण्यासाठी आणि हिंदुत्वाच्या शत्रूंना प्रत्युत्तर देण्यासाठी हिंदूंनी संघटित होणे आवश्यक आहे. काश्मीरमधील हिंदू आपल्याच देशात निर्वासितांचे जिणे जगत आहेत. अशा परिस्थितीत काश्मिरी हिंदूंना न्याय मिळवून देण्यासाठी देशभरातील हिंदूंनी संघटित होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे प्रा. श्रीकांत बोराटे यांनी केले. ते दसर्‍यानिमित्त शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानने आयोजित केलेल्या दुर्गामाता दौडीमध्ये बोलत होते. दौडीचा प्रारंभ भगव्या ध्वजाचे पूजन करून करण्यात आला. या वेळी शिवप्रतिष्ठानचे सर्वश्री प्रा. अमर बुग्दुडे, गणेश कुंभार, राहुल शिंदे, पंकज आवाळे, धनंजय पवार, सोमनाथ ढवळे, तसेच समितीचे विश्‍वजीत चव्हाण यांसह १२५ हून अधिक धारकरी उपस्थित होते.

जेएन्यूमध्ये काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनेने रावणाच्या ठिकाणी पंतप्रधान मोदी, योगऋषी रामदेवबाबा, पू. संतश्री आसारामजी बापू यांचा पुतळा जाळला !

रावण ज्यांचा आदर्श आहे, अशा काँग्रेसकडून याहून दुसरी कृती काय होणार ?
      नवी देहली - देशात एकीकडे दसर्‍याच्या दिवशी रावण म्हणून पाकिस्ताचे सैन्य दल प्रमुख राहिल शरीफ, आतंकवादी हाफीज सईद यांचे पुतळे जाळले जात असतांना देहलीतील जेएन्यू विद्यापिठात रावणाच्या दहा मुखांना पंतप्रधान नरेंद्र मोदी, योगऋषी रामदेव बाबा, अमित शाह, नथुराम गोडसे, साध्वी प्रज्ञा सिंह, पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू आदींचे मुखवटे लावून या पुतळ्यांचे दहन करण्यात आले. काँग्रेसची विद्यार्थी संघटना एन्एस्यूआयच्या (नॅशनल स्टुडंट्स यूनियन ऑफ इंडियाच्या) कार्यकर्त्यांनी विद्यापिठातील सरस्वती ढाबा येथे हा पुतळा जाळला. केंद्र सरकारच्या विरोधातील रोष व्यक्त करण्यासाठी पुतळा जाळण्यात आल्याचे एन्एस्यूआयच्या नेत्याने सांगितले. (प्रत्यक्ष देशाच्या पंतप्रधानांचा घृणास्पद अपमान करणारे विद्यापिठातील विद्यार्थी समाजकंटक म्हणूनच विद्यापिठातून बाहेर पडणार हे यातून स्पष्ट होते - संपादक)

लक्षद्वीप बेटाला भूकंपाचा धक्का !

     नवी देहली - भारताच्या लक्षद्वीप बेटाला १२ ऑक्टोबरला पहाटे भूकंपाचा धक्का बसला. या भूकंपामुळे कोठेही जीवित किंवा वित्त हानी झाल्याचे वृत्त नाही. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ५.३ इतकी मोजण्यात आली आहे. भूकंपाचा केंद्रबिंदू भूगर्भात १० कि.मी. अंतरावर होता.
महर्षींनी प्रलयकालाविषयी सतर्क करणे
     १९.३.२०१६ या दिवशी झालेल्या नाडीवाचन क्रमांक ६७मध्ये महर्षि म्हणतात, हे पूर्ण वर्ष प्रलयकालाचे आणि आपत्तीजनक असणारे आहे. (भारताच्या लक्षद्विप बेटाला १२ ऑक्टोबरला पहाटे भूकंपाचा धक्का बसला. या घटनेवरून प्रलयकालाविषयी महर्षींनी केलेले भाष्य किती तंतोतंत आहे, हे लक्षात येते ! - संपादक)

नवाझुद्दीनला रामलीलेतून काढण्यास शिवसेनेचे समर्थन नाही !

आदित्य ठाकरे यांचे स्पष्टीकरण
     मुंबई - उत्तर प्रदेशमध्ये नवाझुद्दीन सिद्दीकी याला गावी रामलीलेमधून काढून टाकण्यात आले होते. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी नवाझुद्दीनला संपर्क करून रामलीलेमधून काढण्यात आलेल्या गोष्टीचे समर्थन करत नाही, असे स्पष्ट केले आहे.
     सलमान खानने पाक कलाकारांचे समर्थन केल्यावर नवाझुद्दीनेही याचे समर्थन केले होते. त्याच्यावर एक गुन्हाही नोंद आहे. बुढाना शहरात नवाझुद्दीन रामलीलेमध्ये काम करण्यावरून वाद निर्माण झाला होता. तेथील कार्यकर्त्यांनी त्यांचा असंतोष कार्यक्रमाच्या आयोजकांकडे बोलून दाखवली, त्यानंतर काही हिंदू कार्यकर्त्यांनी केलेल्या विरोधामुळे हा कार्यक्रमच रहित करण्यात आला. बेळगावमध्ये धर्मांध तस्कराला अटक

अल्पसंख्यांक गुन्हेगारीत बहुसंख्य !
     बेळगाव - येथून कोट्यवधी किमतीची सांबराची शिंगे, हत्तीचे सुळे आणि वाघनखे जप्त करण्यात आली आहेत. येथील शेट्टी गल्लीतील एका घरावर धाड टाकून पोलिसांनी हा माल जप्त केला आहे. या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. सलीम चमडेवाले असे अटक केलेल्या धर्मांध तस्कराचे नाव आहे. 
     ज्या घरातून हे सर्व साहित्य जप्त करण्यात आले, त्या घरात भूत असल्याची अफवा पसरवण्यात आली होती. त्यामुळे घरात कोणीही जात नव्हते. तसेच घरात दिवे नसल्याने रात्रीच्या वेळी नेमके काय चालते हे कोणालाही समजत नव्हते. सलीम त्याच्या गाडीतून प्राण्यांची शिंगे आणि इतर वस्तू आणायचा आणि घरात ठेवायचा. यानंतर कारमधून हा सर्व माल मुंबईला जायचा तिथून चीनमध्ये पाठवला जात असे, अशी माहिती आहे.
     या सर्व वस्तूंचे मूल्यमापन करण्यासाठी पोलिसांनी वनखात्याशी संपर्क साधला आला असून यामागे आंतरराष्ट्रीय रॅकेट असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

केरळमध्ये माकपच्या कार्यकर्त्याच्या हत्येचा सूड उगवण्यासाठी भाजपच्या कार्यकर्त्याची हत्या !

केंद्र सरकारने केरळमधील भाजप आणि रा.स्व. संघ 
यांच्या कार्यकर्त्यांच्या रक्षणासाठी पाऊल उचलावे, अशी हिंदूंची अपेक्षा आहे !
     कन्नूर (केरळ) - केरळच्या कन्नूर जिल्ह्यात १२ ऑक्टोबरला सकाळी भाजपच्या रेमित नावाच्या कार्यकर्त्याला फासावर लटकवून त्याची हत्या करण्यात आली. ११ ऑक्टोबरला सत्ताधारी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे (माकपच्या) कार्यकर्ते के. मोहनन यांची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी माकपने भाजपवर आरोप केला होता. याच घटनेचा सूड म्हणून ही हत्या झाल्याचे सांगितले जात आहे. भाजपनेही रेमित यांच्या हत्येसाठी माकपला दोषी ठरवले आहे. 
      भाजप कार्यकर्त्याची हत्या करण्यात आल्याने येथील परिस्थिती तणावग्रस्त बनली आहे. केरळमध्ये माकपचे सरकार सत्तेत आल्यापासून कन्नूर जिल्ह्यात ३०० हून अधिक हिंसाचाराच्या घटना घडल्या आहेत. (कम्युनिस्ट सत्तेत आल्यावर शांतता नव्हे, तर हिंसाचार होतो आणि हेच त्यांचे पुरोगामित्व ! - संपादक)गोव्यातील श्री मल्लिकार्जुन देवस्थानातील गर्भगृहातील देवाची मूर्ती उखडून देवतांचे तरंग आणि निशाणे यांची मोडतोड !

हिंदूंना धर्मशिक्षण नसल्याचा परिणाम !
  • देवळाच्या मालकी अधिकारावरील वादाचे धर्मद्रोहात पर्यावसान ! 
  • कृत्य करणारे दोन बंधू पोलिसांच्या कह्यात 
  • गावात तणावग्रस्त वातावरण 
  • पोलिसांना पूर्वकल्पना देऊनही प्रकरण गंभीरतेने न हाताळल्याचा आरोप
      फोंडा, १२ ऑक्टोबर (वार्ता.) - माशेल, खांडोळा येथील श्री मल्लिकार्जुन देवस्थानातील गर्भगृहातील देवाची मूर्ती उखडून देवतांचे तरंग आणि निशाणे दोन व्यक्तींनी मोडून टाकल्याची घटना ११ ऑक्टोबर या दिवशी सकाळी दसरोत्सवाच्या दिवशी घडली. देवळाच्या मालकी अधिकारावरील वादाचे पर्यावसान या मूर्ती उखडण्याच्या कृत्यात झाले आहे. या प्रकारामुळे गावात प्रचंड तणाव निर्माण झाला. फोंडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन उपरोल्लेखित गैरकृत्य करणार्‍या गावडे बंधूंना कह्यात घेऊन त्यांना पोलीस ठाण्यात आणून त्यांची कसून चौकशी केली. श्री मल्लिकार्जुन देवस्थानचे पदाधिकारी आणि गावकरी यांनी संशयितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

आम्हाला कोणी डिवचले, तर आम्ही त्यांना सोडणार नाही ! - केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह

पाकवर सर्जिकल स्ट्राईक करूनही त्याच्यात सुधारणा नाही ! 
तो वारंवार आतंकवादी कारवाया करत आहे ! त्यामुळे पाकच्या नांग्या ठेचणे अत्यावश्यक आहे. 
हे जाणून गृहमंत्र्यांनी पाकच्या विरोधात निर्णायक लढा द्यावा, अशी भारतियांची अपेक्षा आहे ! 
    नवी देहली - आम्हाला कोणी डिवचण्याचा प्रयत्न केला, तर आम्ही त्याला सोडणार नाही, असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी केले आहे. सिंह पुढे म्हणाले की, आम्ही गेल्या काही दिवसांत आमची शक्ती दाखवून दिली आहे. त्याद्वारे जगाला दाखवून दिले आहे की, भारत एक शक्तीशाली देश आहे. (भारत एक शक्तीशाली देश आहे, हे सत्य आहे; मात्र त्याची जगाला प्रचीती येण्यासाठी भारताने आणखी कठोर पावले उचलणे आवश्यक ! - संपादक) यापूर्वी राजनाथ सिंह यांनी म्हटले होते की, जर कोणी कुरापत काढली, तर आम्हीही गोळ्या मोजत बसणार नाही.

आतंकवादाला थारा देणार्‍यांचीही गय केली जाणार नाही ! - पंतप्रधान मोदी

      लक्ष्मणपुरी - आतंकवाद्यांना थारा देणार्‍यांचीही गय केली जाणार नाही, अशी चेतावणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकचे नाव न घेता दिली. येथील ऐशबागमधील ऐतिहासिक रामलीला सोहळ्यात मोदी सहभागी झाले होते. या वेळी त्यांनी ही चेतावणी दिली. सर्जिकल स्ट्राईकविषयी मात्र त्यांनी कोणतेही विधान केले नाही. जय श्री रामचा जयघोष करत त्यांनी त्यांच्या भाषणाला प्रारंभ केला. समाजातील अनिष्ट गोष्टीरूपी रावणाला नष्ट करण्याचे आवाहनही त्यांनी केले. 
      मोदी पुढे म्हणाले की, आतंकवाद हा मानवतेचा सर्वांत मोठा शत्रू आहे. आतंकवादाचा विषाणू संपूर्ण जगाला त्रासदायक ठरत आहे. त्यावर मात करण्यासाठी जगभरातील सर्वांनी एकत्र येण्याची आवश्यकता आहे. कधी कधी परिस्थितीमुळे युद्ध अनिवार्य ठरते; मात्र आम्ही युद्धाकडून बुद्धाकडे जाणारे आहोत.

काश्मीरमधील दंगलखोरांना नियंत्रित करण्यासाठी वापरण्यात येणारे तिखट मसाल्याचे गोळे निष्प्रभ !

विरोधकांसमोर न झुकता भाजप शासनाने काश्मीरमधील 
दगडफेक आतंकवाद्यांच्या विरोधात कठोर भूमिका घ्यावी, अशी भारतियांची अपेक्षा आहे !
     श्रीनगर - काश्मीरमधील दंगलखोरांवर नियंत्रण मिळवण्यासाठी सुरक्षादलांकडून पॅलेट गनचा वापर करण्यात येत आहे; मात्र त्याला दंगलखोरांचे पाठीराखे विरोध करत असल्याने आणि मुसलमानांचे लांगूलचालन करण्यासाठी सरकारही त्यांचा वापर थांबवून प्रायोगिक तत्त्वावर तिखट मसाल्यांच्या गोळ्यांचा (पावा शेल्सचा) वापर करण्यात येत आहे; मात्र या गोळ्यांचा दंगलखोरांवर विशेष परिणाम होत नसल्याचे लक्षात येत आहे.
     केंद्रीय राखीव पोलीस दलाकडून सांगण्यात आले की, पावा शेल्स दंगलखोरांवर झाडल्यानंतर ते लगेच वितळून त्यातील तिखटपणाचा त्यांच्यावर परिणाम झाला पाहिजे. मात्र या गोळ्यांना वितळण्यास वेळ लागत असल्याने दंगलखोर हेच गोळे उचलून सुरक्षादलांवर फेकत आहेत. तसेच गोळे वितळल्यानंतर त्यातून निघणार्‍या धुराची परिणामकारकता वाढवणे आवश्यक आहे. ग्वाल्हेर येथील सीमा सुरक्षा दलाच्या उत्पादन विभागाला या संदर्भात कळवण्यात आले आहे.


उत्तरप्रदेशात दुर्गादेवीच्या मूर्तीच्या विसर्जन मिरवणुकांवर धर्मांधांकडून आक्रमण !

दुसरा काश्मीर होऊ घातलेला उत्तरप्रदेश !
     लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) - उत्तरप्रदेशच्या आग्रा, गोंडा आणि कौशांबी येथे दुर्गादेवीच्या मूर्तीच्या विसर्जन मिरवणुकीवरून धर्मांधांबरोबर झालेल्या वादातून त्यांनी आक्रमण केल्याच्या घटना घडल्या आहेत. काही ठिकाणी पोलिसांना लाठीमार आणि गोळीबार करावा लागला. या आक्रमणामुळे पोलीसही घायाळ झाले.

मुंबईतील झोपडपट्ट्यांच्या पुनर्वसनाची चर्चा

     नवी देहली - मुंबईतील झोपडपट्ट्यांच्या पुनर्वसनाच्या संदर्भात देहलीत चर्चा चालू असल्याचे वृत्त आहे. भाजपच्या खासदारांची केंद्रीय जहाज आणि रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी, रेल्वेमंत्री सुरेश प्रभु आणि पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांच्यासमवेत बैठक झाली.
    या वेळी बीपीटीच्या जागेवरच्या ४७ सहस्र झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन व्हावे यासाठी पाठपुरावा करण्यात आला. तसेच रेल्वेच्या जागेवर झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन करण्यासाठी रेल्वेने स्वतंत्र योजना राबवावी, अशी मागणीही या वेळी करण्यात आली.
     संजय गांधी नॅशनल पार्कच्या परिसरातील इको सेन्सिटीव्ह बफर झोन न्यून करून १०० मीटरवर आणावा, अशी मागणी भाजप खासदारांनी जावडेकरांकडे केली आहे.काबूलमध्ये दर्ग्यावरील आक्रमणात १४ जण ठार !

     काबूल - अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये मोहरमच्या आदल्या रात्रीच शियापंथियांच्या दर्ग्यावर आक्रमण करण्यात आले. अज्ञाताने केलेल्या गोळीबारात १४ जण ठार, तर ३६ जण घायाळ झाले आहेत. या दर्ग्यात अशुरा उत्सवासाठी मोठ्या प्रमाणात लोकांनी गर्दी केली होती. या लोकांवर आक्रमण करण्यात आले.

पंपोर येथील चकमकीत २ आतंकवादी ठार !

पाकिस्तानला संपवल्याविना आतंकवाद संपणार नाही, हे सरकार जाणेल का ?
     श्रीनगर - काश्मीरमधील पंपोर येथील उद्योजकता विकास संस्थेच्या सरकारी इमारतीमध्ये लपलेले आतंकवादी आणि सुरक्षा दल यांमध्ये गेल्या २ दिवसांपासून चालू असलेली चकमक १२ ऑक्टोबरला तिसर्‍या दिवशी दुपारी संपली. सुरक्षा दलांनी २ आतंकवाद्यांना ठार केले, तर एक सैनिक घायाळ झाला.

केक कापण्याची प्रथा बंद व्हावी ! - अभिनेता अमिताभ बच्चन यांचे आवाहन

  • पाश्‍चात्त्यांच्या विकृतीच्या विरोधात आवाहन करणारे अमिताभ बच्चन यांचे अभिनंदन !
  • चित्रपट अभिनेत्यांचे अनुकरण करणारे नागरिक अमिताभ बच्चन यांच्या आवाहनानुसार कृती करतील का ?
      मुंबई - ११ ऑक्टोबरला प्रसिद्ध चित्रपट अभिनेते अमिताभ बच्चन यांचा ७४ वा वाढदिवस साजरा करण्यात आला. या वेळी त्यांनी त्यांच्या निवासस्थानी पत्रकारांशी वार्तालाप केला. विविध विषयांवर त्यांनी त्यांचे मत मांडले. यात त्यांनी वाढदिवसाच्या दिवशी केक कापण्याच्या प्रथेवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले आणि ती बंद होण्याचे आवाहन केले. त्यांच्यासाठी आणण्यात आलेला केक त्यांनी कापण्याचेही या वेळी टाळले. 
     अमिताभ बच्चन म्हणाले की, मी पूर्वी केक कापत होतो; मात्र आता मी तो कापण्याच्या विरोधात आहे. मी ही प्रथा बंद करण्याचे आवाहन केले आहे; कारण आम्हाला माहिती नाही की वाढदिवसाला केक का आणला जातो ? आणि केकच का आणला जातो ? त्यावर मेणबत्ती का लावली जाते ? मग तिला पेटवले का जाते ? पेटवल्यावर ती विझवली का जाते ? मग त्याच्यावर चाकू चालवून त्याचे तुकडे केले जातात आणि ते इतरांना खायला दिले जातात. आता आणखी एक प्रथा चालू झाली आहे ती म्हणजे केक त्या व्यक्तीच्या तोंडवळ्यावर फासला जातो. हे कशासाठी केले जाते ते आम्हाला समजलेले नाही.

पाश्‍चात्त्यांप्रमाणे आधुनिक (मॉर्डन) होण्याचा प्रयत्न करणार्‍या मुलीला शिक्षा म्हणून मुसलमान पित्याकडून बलात्कार !

स्वत:च्या मुलीवर बलात्कार करणारे इतरांच्या मुलींकडे 
कशा दृष्टीने पहात असतील, याचा विचारही न केलेला बरा !
      फ्रेड्रीस्टेड (नार्वे) - पाश्‍चात्त्यांप्रमाणे आधुनिक (मॉर्डन) होण्याचा प्रयत्न करणार्‍या स्वत:च्या २० वर्षीय मुलीला शिक्षा म्हणून येथील मुसलमान पित्याने तिच्यावर बलात्कार केला. याविषयीची माहिती स्वत: पीडितेने पोलिसांना दिली. याप्रकरणी पोलीस अधिकार्‍यांनी सांगितले, पीडित मुलगी इस्लामी पद्धती मानत नव्हती. त्यामुळे वडील तिच्यावर अप्रसन्न होते. बलात्कार केल्यावर मुलीने घरातून पलायन केले. वाटेत तिला एक पोस्टमास्तर भेटला. याविषयी तिने पोस्टमास्तरला सर्व माहिती सांगितली. त्यानंतर तो पीडितेला पोलिसांकडे घेऊन गेला. सध्या आरोपीला शिक्षा करण्यात आली नाही. त्याला मनोविकारतज्ञाकडे पाठवण्यात आले आहे.

(म्हणे) भारताचे तुकडे होतील !

कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही ! हाफिज सईदने 
म्हटले म्हणून भारताचे तुकडे होण्यासाठी तो काही पाकिस्तान नाही !
आतंकवादी हाफिज सईद याचे फुत्कार 
     इस्लामाबाद - काश्मीरच्या स्वातंत्र्यासाठी आम्ही पुढेही सैनिकांची (आतंकवाद्यांची) निर्मिती करत रहाणार. ज्या दिवशी काश्मीर आपल्या हातात येईल, तेव्हा संपूर्ण जग तुमच्या मागे मागे येईल. काश्मीरला स्वातंत्र्य मिळाल्यावर भारताचेही तुकडे होतील, असे फुत्कार लष्कर-ए-तोयबाचा म्होरक्या हाफिज सईद याने काढले. (भारताने पाकच्या भूमीत घुसून अशा आतंकवाद्यांची तोंडे कायमची बंद करावीत, अशी जनतेची अपेक्षा आहे ! - संपादक)

कारगिलच्या वेळी तत्कालीन पंतप्रधान वाजपेयी यांनी सैन्याला पाकमध्ये घुसून कारवाई करण्यास रोखले होते ! - माजी सैन्यदल प्रमुख व्ही.पी. मलिक

      कर्णावती - १९९९च्या कारगिल युद्धाच्या वेळी भारतीय सैन्य पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून आक्रमण करण्याच्या सिद्धतेत होते; मात्र आंतरराष्ट्रीय दबावामुळे तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी सैन्याला रोखले होते, असा गौप्यस्फोट माजी सैन्यदल प्रमुख व्ही.पी. मलिक यांनी केला आहे. मात्र वाजपेयी यांनी घेतलेला निर्णय त्या वेळी किती योग्य होता, ते त्या वेळी लक्षात आले, असेदेखील मलिक यांनी मान्य केले. येथील एका कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी त्यांनी सर्जिकल स्ट्राईकचे कौतुक केले. यामुळे पाकवर दबाव निर्माण करण्यासाठी देशाला आता आंतरराष्ट्रीय पातळीवर विनंती करावी लागणार नाही, असेही त्यांनी म्हटले आहे. 
      मलिक पुढे म्हणाले की, पाक असाच वागत राहिला तर, आम्हाला युद्ध करावे लागेल, अशी पाकला चेतावणी देण्याची आवश्यकता आहे. एक सर्जिकल स्ट्राईक केल्यानंतर पाकिस्तान सुधारेल, असे वाटत नाही, आपण त्यांच्या कृतीला प्रत्युत्तर देण्यासाठी अधिक सिद्ध राहिले पाहिजेे. देशाच्या सुरक्षेप्रश्‍नी आपण सर्वांनी एकत्र काम केले पाहिजे. राजकारण्यांना देशाच्या सुरक्षेविषयी ज्ञान नसल्याने त्यांनी बोलणे टाळावे, असेही ते म्हणाले.पाकमध्ये सैन्य आणि शासन यांच्यातील दुरावा चव्हाट्यावर आणणार्‍या पाक पत्रकाराला देश न सोडण्याची सूचना !

पाकमध्ये सैन्याचीच हुकूमशाही चालू असल्याने 
तेथे वृत्तपत्रस्वातंत्र्याची गळचेपी होते, याचे उदाहरण !
     इस्लामाबाद - पाकमधील सुरक्षेविषयी लेख लिहिणार्‍या पाकस्थित सिरील अल्मेडा या पत्रकाराला देश न सोडण्याची सूचना देण्यात आली आहे. पत्रकार अल्मेडा यांनी पाकमधील द डॉन या वृत्तपत्रात भारताने पाकमध्ये घुसून केलेल्या सर्जिकल स्टाईकविषयी लेख लिहतांना पाकच्या राष्ट्रीय सुरक्षेविषयी भाष्य केले होते. या लेखात त्यांनी सर्जिकल स्ट्राईकनंतर पाकचे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या सरकारने पाकच्या सैन्याला पाकमधील आतंकवादी तळ उद्ध्वस्त करण्याच्या सूचना दिल्याचे म्हटले होते. यावरून पाक शासन आणि सैन्य यांच्यातील दुरावा स्पष्ट झाला होता. या लेखामुळे पाकिस्तानसह जगभरात खळबळ माजली होती. याविषयी अल्मेडा ट्वीट करतांना म्हणाले, मला फार वाईट वाटत आहे. हे माझे आयुष्य आहे, माझा देश आहे. माझी काय चूक झाली ?

भारत-पाक सीमा बंद करण्याच्या निर्णयावरून चीनचा थयथयाट !

भारताने काय करावे आणि काय करू नये, हे सांगणारा 
चीन कोण लागतो ? भारताने चीनला त्याच्याच भाषेत उत्तर द्यायला हवे !
      बीजिंग - पाकलगतची सीमा पूर्णपणे बंद करण्याच्या भारताच्या निर्णयावर चीनचे सरकारी दैनिक ग्लोबल टाइम्सने टीका केली आहे. उरी येथील आतंकवादी आक्रमणाचे सखोल अन्वेषण न करताच भारताने हा अत्यंत अतार्किक निर्णय घेतला आहे. या आक्रमणामध्ये पाकचा सहभाग असल्याचा कोणताही पुरावा नाही, तसेच चीन आणि पाक यांच्यातील सार्वकालिक मैत्री लक्षात घेता भारताच्या या निर्णयामुळे भारत-चीन संबंध अधिक जटिल होण्याची चेतावणीही यात देण्यात आली आहे. भारताच्या या निर्णयामुळे दोन देशांमधील आधीच रखडत चालू असलेला व्यापार आणखी बाधित होईल, तसेच द्विपक्षीय चर्चाही थांबेल. किंबहुना भारताच्या या निर्णयामधून या देशाची शीतयुद्धकालीन मानसिकता दिसून येत असल्याची टीकाही यात करण्यात आली आहे.

जय श्रीराम म्हटले, तर आता राम मंदिरही बांधून द्यावे ! - डॉ. प्रवीण तोगडिया यांचे पंतप्रधानांना आवाहन

       लक्ष्मणपुरी - दसर्‍याच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्ष्मणपुरी (लखनौ) येथील ऐशबागमधील ऐतिहासिक रामलीला महोत्सवात सहभाग घेतला. या वेळी त्यांनी केलेल्या मार्गदर्शनाच्या आरंभी आणि शेवटी जय श्रीरामच्या घोषणा दिल्या. यावरून विश्‍व हिंदु परिषदेचे नेते डॉ. प्रवीण तोगडिया यांनी ट्विट केले आहे. ते यात म्हणतात आता जय श्रीरामची घोषणा केलीच आहे, तर संसदेत कायदा संमत करून अयोध्येतील रामजन्मभूमीवर त्वरित भव्य राममंदिर बांधूनच द्यावे !

साधकांनो, दीपावली आणि कार्तिकी एकादशी यांच्या निमित्ताने लावण्यात येणार्‍या ग्रंथप्रदर्शनातून सनातन-निर्मित ग्रंथसंपदा सर्वदूर पोचवा !

     'दीपावली आणि कार्तिकी एकादशी यांच्या निमित्ताने पुढील ग्रंथ, लघुग्रंथ आणि प्रसारसाहित्य यांच्या वितरणासाठी विशेष प्रयत्न करावेत.'
१. ग्रंथ 
अ. पूजासाहित्याचे महत्त्व 
आ. पूजेपूर्वीची वैयक्तिक सिद्धता 
इ. देवपूजेपूर्वीची सिद्धता 
ई. पंचोपचार आणि षोडशोपचार पूजनामागील शास्त्र 
उ. देवळात दर्शन कसे घ्यावे ? (भाग १ आणि २) 
ऊ. सण साजरे करण्याच्या योग्य पद्धती आणि शास्त्र
ए. धार्मिक उत्सव आणि व्रते यांमागील शास्त्र 
ऐ. शक्ति (भाग १ आणि २) 
ओ. अलंकारशास्त्र 
अं. स्त्रियांच्या अलंकारांमागील शास्त्र (बिंदीपासून कर्णभूषणांपर्यंतचे अलंकार) 
क. कंठभूषणांपासून मेखलेपर्यंतचे अलंकार 
ख. हाता-पायांत घालायचे अलंकार 
ग. सात्त्विक रांगोळ्या - भाग १ 
घ. विष्णु आणि विष्णूची रूपे

(म्हणे) दाभोलकर, पानसरे आणि कलबुर्गी यांच्या हत्या ही सांस्कृतिक आतंकवादाची परिणती !

पुरोगाम्यांच्या वैचारिक आतंकवादाने केवळ राज्यात नव्हे, 
तर देशात थैमान घातले असतांना कवयित्री प्रज्ञा पवार यांची मुक्ताफळे !
      सातारा, १२ ऑक्टोबर (वार्ता.) - भविष्यकाळात सांस्कृतिक आतंकवादाच्या विरोधात लढा उभारून त्याचे दिशादिग्दर्शन करण्याचे दायित्व साहित्यिकांनी स्वीकारावे. दाभोलकर, पानसरे आणि कलबुर्गी यांच्या हत्या ही सांस्कृतिक आतंकवादाचीच परिणती आहे, अशी मुक्ताफळे कवयित्री प्रज्ञा पवार यांनी उधळली. 
      पाटण (जिल्ह सातारा) येथील बाळासाहेब देसाई महाविद्यालयाच्या प्रांगणात महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे आणि बाळासाहेब देसाई महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विभागीय संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. या वेळी माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर, माजी आमदार उल्हास पवार उपस्थित होते.

नृत्य नव्हे, निवळ अंगविक्षेप ! - मंगेश तेंडुलकर

     पुणे, १२ ऑक्टोबर - नृत्यकलेची जोपासना करणारा कलाकार हा शरिराच्या एखाद-दुसर्‍या भागातून नव्हे, तर आपल्या संपूर्ण अस्तित्वातून प्रकट होत असतो. यामध्ये एक साधना आणि शास्त्रीय बैठक अपेक्षित असते. आज नृत्याच्या नावाखाली अनेकदा निवळ अंगविक्षेप पहायला मिळतात. नर्तकाला शरिरावर वेगवेगळ्या ठिकाणी विजेचा झटका दिल्यानंतर तो जसा काही वागेल, दचकेल आणि अंगविक्षेप करेल, तसे आजचे नृत्य आहे, अशा शब्दांत ज्येष्ठ व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर यांनी आधुनिक नृत्यप्रकारावर टीका केली. पुणे महापालिकेच्या वतीने देण्यात येणारा 'स्व. पंडिता रोहिणी भाटे पुरस्कार' कथ्थक नृत्यगुरु रोशन दात्ये यांना प्रदान करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते. (याला गुरुकुल पद्धतीच्या अभावामुळे भारतीय कलांचा समाजाला पडलेला विसर आणि पाश्‍चात्त्यांचे अंधानुकरण कारणीभूत आहे. त्यामुळे नृत्यातील हिडिसपणा आणि अश्‍लीलता दूर होऊन नृत्य ही कला ईश्‍वरप्राप्तीचे एक माध्यम बनावी, यासाठी कलाक्षेत्रात बोकाळलेल्या दुष्प्रवृत्ती दूर करायला हव्यात ! - संपादक)

देहलीला लाच खायला पाठवले का ?

     'एका फसवणूक प्रकरणात प्रथमदर्शी अहवाल नोंद करून घेण्यासाठी पोलीस महानिरीक्षक गर्ग यांनी साडेपाच लक्ष रुपयांचे लाच स्वीकारल्याप्रकरणी गोव्याचे पोलीस महानिरीक्षक सुनील गर्ग यांचे अखेर देहली येथे स्थानांतर करण्यात आले.'

सुरक्षारक्षकाच्या बंदुकीतून गोळी सुटल्याने ३ भाविक घायाळ

सप्तश्रृंगी गडावरील प्रकार 
मानवंदनेच्या वेळी निष्काळजीपणा करणार्‍या सुरक्षारक्षकांवर कारवाईच हवी ! 
     नाशिक - सप्तश्रृंगी गडावर सुरक्षारक्षकाच्या बंदुकीतून गोळी सुटल्याने ३ भाविक घायाळ झाले आहेत. विजयादशमीनिमित्त गडावर बोकडबळी दिला जात होता. या वेळी सुरक्षारक्षक एक गोळी हवेत फायर करून मानवंदना देतो. या वेळीच हा अपघात झाला. सुरक्षारक्षकाने झाडलेली गोळी भिंतीला धडकून परत आली आणि तीन जणांना घासून गेली.

हे न्यायालयाला का सांगावे लागते ? सरकार स्वत:हून का करत नाही ? उत्तरदायींना कडक शिक्षा करा !

     'सार्वजनिक भूमीवरील सर्व धर्मांची अवैध प्रार्थनास्थळे शोधून निश्‍चित करण्याचे काम येत्या ३१ मार्चपर्यंत पूर्ण करा, तसेच यापूर्वीच निश्‍चित झालेल्या २९ सप्टेंबर २००९ नंतरच्या अवैध प्रार्थनास्थळांवर तोडकामाची कारवाई ३१ डिसेंबर २०१६च्या आत पूर्ण करा', असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने राज्य शासनाला दिला.
     राष्ट्रधर्म सर्वश्रेष्ठ 'राष्ट्रापेक्षा श्रेष्ठ काहीही नाही. जर भारताची एकता, अखंडता, धर्म आणि संस्कृती धोक्यात असेल, तर आपल्या सर्वस्वाचे बलीदान करून देश वाचवणे, हे प्रत्येक भारतियाचे आद्य कर्तव्य आहे. हाच सनातन धर्म आहे.'
- समर्थ रामदास स्वामी (अभय भारत, १५ मे ते १४ जून २०१०)

राष्ट्र आणि धर्म यांच्या संदर्भात कृतीशील होण्यासाठी देवीची उपासना आवश्यक ! - सौ. गौरी खिलारे

धारकर्‍यांना मार्गदर्शन करतांना सौ. गौरी खिलारे
     मिरज, १२ ऑक्टोबर (वार्ता.) - छत्रपती शिवाजी महाराज यांनी श्री भवानीदेवीची उपासना केली. त्यामुळे त्यांना देवीचे आशीर्वाद मिळून ते हिंदवी स्वराज्य स्थापन करू शकले. आजही आपल्याला राष्ट्र आणि धर्म यांच्या संदर्भात कृतीशील होण्यासाठी देवीची उपासना आवश्यक आहे. या अगोदरच्या शासनाने पाकिस्तानच्या विरोधात कधीच प्रत्युत्तर दिले नाही; मात्र भाजप शासनाने योग्य निर्णय घेत पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले, ही अत्यंत चांगली गोष्ट आहे, असे मार्गदर्शन रणरागिणी शाखेच्या सौ. गौरी खिलारे यांनी केले. येथील मल्लिकार्जुन देवालयासमोर श्रीदुर्गामाता दौडीच्या समारोपप्रसंगी त्या बोलत होत्या. 

हिंदु जनजागृती समिती प्रणित रणरागिणी शाखेच्या वतीने महादौडीचे स्वागत !

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, मुंबई विभागाच्या वतीने दादर येथे श्री दुर्गामाता महादौड !
ध्वजपूजन करतांना सौ. श्‍वेता सावंत
     मुंबई - श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान मुंबई विभागाच्या वतीने यंदाही श्री दुर्गामाता दौड पार पडली. दौडीच्या माध्यमातून देव, देश आणि धर्म यांसाठी छत्रपती शिवाजी महाराज अन् धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या हिंदवी स्वराज्याच्या स्वप्नपूर्तीसाठी, तसेच दुर्गामातेच्या चरणी साकडे घालण्यासाठी शेकडोंच्या संख्येने तरुण दौडीत सहभागी झाले होते. दसर्‍याच्या दिवशी दादर (प.) येथे शेकडो धारकर्‍यांच्या उपस्थितीत कबुतरखाना ते शिवाजी पार्क या मार्गाने काढण्यात महादौड काढण्यात आली. 
क्षणचित्रे 
१. भाजपचे मुंबई प्रदेश अध्यक्ष श्री. आशिष शेलार यांच्या हस्ते ध्वजपूजन करण्यात आले. 
२. रणरागिणी शाखेच्या वतीने महादौडीचे स्वागत करण्यात आले. या वेळी रणरागिणी शाखेच्या वतीने सौ. श्‍वेता सावंत यांनी ध्वजपूजन केले. तसेच हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्तेही उपस्थित होते.

पाक कलाकारांचा समावेश असलेल्या चित्रपटांच्या प्रदर्शनावर बहिष्कार टाकावा !

पनवेल येथील ३ चित्रपटगृह व्यवस्थापकांकडे हिंदु जनजागृती समितीची मागणी
चित्रपटगृह व्यवस्थापकांना निवेदन देतांना कार्यकर्ते
     पनवेल - हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथील फन सिनेमा, पीव्हीआर् सिनेमा, मिराज सिनेमा येथील चित्रपटगृह व्यवस्थापकांना पाक कलाकारांचा समावेश असलेले रईस आणि ए दिल है मुश्किल हे चित्रपट प्रदर्शित करू नयेत. त्यांच्यावर बहिष्कार टाकावा, असे निवेदन देण्यात आले. या वेळी निवेदन देतांना समितीचे कार्यकर्ते, तसेच धर्माभिमानी कु. अथर्व उपाध्ये, कु. कुणाल सावंत आणि कु. रूपेश किंद्रे उपस्थित होते. उरी येथील आक्रमणाच्या विरोधात ही निवेदने देण्यात आली. समितीच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनाला चित्रपटगृहांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. पीव्हीआर् सिनेमा या चित्रपटगृहाने आगामी चित्रपटांच्या सूचीत वरील दोन्ही चित्रपटांची नावे आणि फलक लावले नाही. (अशा कृतीशील चित्रपटगृह व्यवस्थापकांचे अभिनंदन ! - संपादक)

हिंदु ऐक्यासाठी संकेतस्थळाला भेट द्या !

English : www.hindujagruti.org 

 हिंदी : www.hindujagruti.org/hindi/

फलक प्रसिद्धीकरता

बहुसंख्य हिंदूंच्या देशात हिंदुत्वनिष्ठांंच्या हत्या होणे, हे हिंदु संघटित नसल्याचे द्योतक ! 
     केरळच्या कन्नूर जिल्ह्यात माकपच्या कार्यकर्त्याची हत्या झाल्यानंतर १२ ऑक्टोबरला सकाळी भाजपच्या रेमित नावाच्या कार्यकर्त्याला फासावर लटकवून त्याची हत्या करण्यात आली. भाजपने रेमित यांच्या हत्येसाठी माकपला दोषी ठरवले आहे.

हिंदू तेजा जाग रे !

Jago ! : 
Keral me CPM ke karyakarta ki hatya ke uparant hui BJP karyakrta ki hatya.
 desh me Hindutwanishthon ka hatya satra kab rukega ? 

जागो ! : 
केरल में माकपा के कार्यकर्ता की हत्या के उपरांत हुई भाजप कार्यकर्ता की हत्या. 
 देश में हिन्दुत्वनिष्ठों का हत्यासत्र कब रुकेगा ?

नागपूर येथे विजयादशमीनिमित्त मंदिरांतून समाजाला शुभेच्छा आणि सोने वितरण !

मंदिरात विशेषांकाचे वितरण करतांना कार्यकर्ते
     नागपूर - येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ४ विविध भागांतील मंदिरांमधून समाजातील लोकांना विजयादशमीनिमित्त शुभेच्छा देण्यात आल्या. या वेळी सोने (आपट्याची पाने) देऊन दैनिक सनातन प्रभातच्या ४२५ विशेषांकांचे वितरण करण्यात आले. या उपक्रमात २६ कार्यकर्ते सहभागी झाले होते. स्थानिक मानेवाडा येथील श्री साईमंदिर, महाल येथील श्री गजानन महाराज मंदिर, प्रतापनगर येथील श्री दुर्गादेवी मंदिर आणि अजनी चौक येथील श्री हनुमान मंदिर येथे हा उपक्रम राबवण्यात आला. या दिवशी सनातन संस्थेचे हितचिंतक, अर्पणदाते आणि विज्ञापनदाते श्री. राजेश मराठे, श्री. वामनराव जोशी, अधिवक्ता संदीप शास्त्री, अधिवक्ता भानुदास कुळकर्णी यांना तसेच मेडिकल प्रयोजनमचे डायरेक्टर श्री. शर्मा, पडगीलवार अ‍ॅग्रो इंडस्ट्रीजचे तुषार पडगीलवार, थ्री फेज इंजीनिअरींगचे श्री. नितीन नामजोशी आणि काकडे ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचे श्री. सुधाकर काकडे यांना व्यक्तीशः भेटून विजयादशमीनिमित्त शुभेच्छा, सोने आणि अंक देण्यात आले. भाजपचे नगरसेवक आणि मंदिरांचे विश्‍वस्त यांनाही शुभेच्छा अन् अंक देण्यात आले.
क्षणचित्र - या कार्यक्रमात साप्ताहिक सनातन प्रभातचे ३ वार्षिक वर्गणीदार सहभागी झाले.

न्यायालयांतील वृत्तसंकलन करतांना घ्यावयाची दक्षता

वार्ताहर प्रशिक्षण
श्री. चेतन राजहंस
     वार्ताहराला विविध क्षेत्रांतील वार्ता गोळा कराव्या लागतात. या विविध क्षेत्रांसाठी वर्तमानपत्रांकडून वेगवेगळे वार्ताहर नियुक्त केले जातात. राजकीय, महानगरपालिका, विद्यापीठ, गुन्हे आदींप्रमाणे न्यायालयातील वृत्तसंकलनासाठी वार्ताहर असतात. आज न्यायालयातील वृत्तसंकलन कसे करावे, याविषयीची प्राथमिक माहिती पाहूया.
श्री. चेतन राजहंस, उपसंपादक, सनातन प्रभात
     पोलिसांनी एखाद्या प्रकरणात आरोपीला अटक केल्यावर त्याला न्यायालयात हजर केले जाते. येथे न्यायालय त्याला पोलीस कोठडी किंवा न्यायालयीन कोठडी ठोठावते. याची माहिती घेण्यासाठी वार्ताहराला न्यायालयात जावे लागते.
   शहरात महानगर दंडाधिकारी यांची न्यायालये आहेत. स्थानिक पोलीस ठाण्यांनी अटक केलेल्यांना स्थानिक न्यायालयात उपस्थित केले जाते. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींना शहरातील एकाच न्यायालयात उपस्थित केले जाते. मोठ्या गुन्ह्यांचा खटला उदा. बॉम्बस्फोट, हत्या आदींचे खटले सत्र न्यायालयात चालवले जातात. काही वेळेस विशेष न्यायालयही स्थापन केले जाते. मोक्का कायद्याचे विशेष न्यायालय आहे. एन्आयए (राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणा) आणि सीबीआय (केंद्रीय अन्वेषण विभाग) यांचे विशेष न्यायालयही असते. न्यायालयाच्या बातम्यांसाठी प्रत्येक खटल्याच्या पुढील सुनावणीची नोंद जाणीवपूर्वक ठेवावी लागते.

आव्हाड आणि मुसलमानांचा मोर्चा !

     काही दिवसांपूर्वी मुसलमानांच्या आरक्षणासाठी ठाणे आणि नाशिक येथे मोर्चा काढण्यात आला. या देशातील संपत्तीवर पहिला हक्क मुसलमानांचा असे उद्गार काढणार्‍या काँग्रेसची सत्ता या देशात गेली ७ दशके असूनही मुसलमानांनी आरक्षण मागणे, हे कसे काय हा प्रश्‍न आहेच. मुसलमानांना एवढ्या भरमसाठ सवलती देऊनही त्यांनी अधिकाधिक सवलती मागणे म्हणजे भटाला दिली ओसरी आणि & अशी त्यांची गत आहे. या मोर्च्यात अन्यही काही मागण्या होत्या. त्याची पूर्तता तसेच मुसलमानांना खरेच आरक्षण हवे का, याविषयी ऊहापोह करणे आवश्यक आहे. या मोर्च्याचे आयोजन राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केले होते.

वायफायच्या अधिक वापरामुळे आरोग्यावर विपरीत परिणाम !

     वायफायचे तंत्रज्ञान आज आपल्या दैनंदिन जीवनाचे एक अंग झाले आहे; मात्र वायफायच्या अधिक वापरामुळे आरोग्यावर विपरीत परिणाम होत असल्याचे आढळून आले आहे. वायफायच्या प्रदीर्घ वापरामुळे आरोग्याविषयी काही समस्या निर्माण होऊ शकतात, असा दावा एका संकेतस्थळाने केला आहे.
१. अस्वस्थता आणि निद्रानाश ! : रात्री उशिरापर्यंत वायफायचा वापर केल्यामुळे झोप न लागणे आणि अस्वस्थता यांसारखे त्रास होऊ शकतात. त्यामुळे पुढे निराशा किंवा ताण-तणाव यांसारख्या समस्या निर्माण होण्याची शक्यता असते. 
२. गर्भ वाढीवर परिणाम ! : गर्भाशयातील गर्भाच्या वाढीवर परिणाम होऊ शकतो. लहान मुलांच्या एकाग्रतेवर त्याचा परिणाम होतो.
३. गर्भपात किंवा दोषयुक्त गरोदरपणा ! : गर्भावर विपरीत परिणाम होतो. त्यामुळे गर्भपात किंवा दोषयुक्त गरोदरपणा यांसारखे त्रास उद्भवतात.
४. रक्तदाबासारख्या समस्या ! : उच्च रक्तदाबासारख्या समस्या निर्माण होतात. (संदर्भ : संकेतस्थळ)
वर वाचा आणि अध्यात्म अनुभवा !

साधकांतील दोष-अहं रूपी रावणाचा नाश करून त्यांच्या अंतरंगात ईश्‍वरी राज्याची स्थापना करणार्‍या प.पू. डॉक्टरांच्या चरणी व्यक्त केलेली कृतज्ञता !


     त्रेतायुगात श्रीरामाने असुर रावणाचा वध करून पृथ्वीवर रामराज्य आणले होते. आता श्रीविष्णूचा अवतार असलेले प.पू. डॉक्टर आमच्या अंतरंगात लपलेल्या दोष-अहं रूपी रावणाचा गुरुकृपायोगानुसार साधनारूपी बाणाने वध करून ईश्‍वरी राज्याची स्थापना करत आहेत.

अश्‍वमेधयाजी प.पू. नाना काळे यांनी देहत्याग केल्याचे कळले आणि वाटले, ....पृथ्वीवरचा यज्ञच संपला !

सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ
१. साक्षात् वेदनारायण असलेल्या 
प.पू. नानांना हिंदु राष्ट्र स्थापनेचाच ध्यास होता !
     काल विजयादशमीच्या दिवशी प.पू. नानांनी देहत्याग केल्याचे कळले आणि एकदम धक्काच बसला. काहीच ध्यानीमनी नसतांना अकस्मात् असे घडले. वाटले, प.पू. नाना गेले, म्हणजे जणू एक प्रकारे पृथ्वीवरचा यज्ञच संपला. प.पू. नाना म्हणजे आम्हाला साक्षात् वेदनारायणच होते. प.पू. नानांना सतत हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचा ध्यास होता. 
२. प.पू. नानांमुळे सनातनवर आलेली अनेक संकटे दूर झाली !
     आजपर्यंत सनातनवर आलेली अनेक संकटे त्यांच्या आशीर्वादाने दूर झाली आणि होतही आहेत. ते गेल्याने आमचा एकदम आधारच गेला, असे वाटले. प.पू. नाना केवळ यज्ञाचेच जाणकार होते, असे नाही, तर त्यांना जगातील अनेक गोष्टींचे ज्ञान होते. आम्हाला कोणतीही अडचण आली आणि नानांना ती विचारली की, आम्हाला त्याचे योग्य उत्तर मिळत असे.

सतत हसतमुख, आनंदी राहून साधकांना आधार देणारी आणि सद्गुरूंच्या पावलावर पाऊल टाकून देहभान हरपून सेवा करणारी ६५ टक्के आध्यात्मिक पातळी असलेली कु. प्रियांका अजय जोशी !

कु. प्रियांका जोशी
     रामनाथी आश्रमात राहून पूर्णवेळ सेवा करणारी आणि ६५ टक्के आध्यात्मिक पातळी असलेली कु. प्रियांका अजय जोशी हिचा आश्‍विन शुक्ल पक्ष द्वादशी (१३.१०.२०१६) या दिवशी वाढदिवस आहे. त्यानिमित्त आश्रमातील सहसाधिकांना जाणवलेली तिची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
कु. प्रियांका अजय जोशी हिला वाढदिवसानिमित्त
सनातन परिवाराच्या वतीने अनेक शुभेच्छा !
१. व्यवस्थितपणा
१ अ. साहित्यांची मांडणी नेटकेपणाने करणे : प्रियांकाताई तिचे वैयक्तिक साहित्य व्यवस्थित लावून ठेवते. तिच्या खणातील कपड्यांच्या घड्या आणि वस्तू व्यवस्थित ठेवलेल्या असतात. एकदा तिने तिच्या खणात कृष्णाच्या चित्रापुढे केसात माळण्यासाठी घेतलेली फुले आणि त्यापुढे चॉकलेट यांची अशी रचना केली होती की, ती पाहून आमची भावजागृती झाली. - कु. मयुरी डगवार
१ आ. सद्गुरु (सौ.) बिंदाताईंचा खण भावपूर्णतेने आवरणे : प्रियांका सद्गुरु (सौ.) बिंदाताईंचा खण व्यवस्थित ठेवण्यापासून त्यांचे सेवेसाठीचे आणि वैयक्तिक साहित्य नीट ठेवण्यापर्यंत सर्व कृती भावपूर्ण करते. - कु. मेघा चव्हाण
२. पूर्णवेळ साधना करण्यासाठी चांगल्या वेतनाची नोकरी सोडणे : ताई पूर्णवेळ होऊन आश्रमात येेण्यापूर्वी नामांकित आस्थापनात (सॉफ्टवेअर कंपनीत) नोकरी करत होती. तेथे तिला पुष्कळ वेतन मिळत होते. तिने पूर्णवेळ साधना करायची, यासाठी नोकरी सोडली. नंतरही ते आस्थापन तिला वेतन वाढवून देण्यास सिद्ध होते; पण तिने निर्णय पालटला नाही.
३. अहं अल्प : ती आस्थापनात नोकरी करत होती, याचा तिला जराही अहं नाही. तिचे शिक्षण इंग्रजी माध्यमातून झाले असल्याने कधी कधी तिच्याकडून मराठी शब्द वापरतांना काहीतरी गंमती होतात. तिला तसे सांगितल्यावर राग येत नाही. ती विचारून शिकून घेते.
४. चुकांमधून शिकणे : सेवेमध्ये चुका झाल्यावर ती निराश न होता आपण कुठे न्यून पडलो, याचे चिंतन करून प्रयत्न करते आणि परत तशी चूक न होण्यासाठी प्रयत्न करते.

पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांच्या माध्यमातून महर्षींनी मार्गदर्शन करणे आणि ते त्यांच्या सहजबोलीतूनही व्यक्त होत असणे

महर्षींची शिकवण आणि कार्य !
     ७.१०.२०१६ या दिवशी आम्ही महर्षींच्या सांगण्याप्रमाणे केरळमध्ये प्रवास करत होतो. त्या वेळी गाडीमध्ये सनातनचे साधक श्री. विनायक शानभाग यांच्याशी बोलतांना पू. डॉ. ॐ उलगनाथन् म्हणाले, कुठे कुठे जायचे, ते तू ठरव. मी केवळ आकाशातील ग्रह, तारे, नक्षत्र यांच्याविषयीच सांगू शकतो. यावरून लक्षात आले, खरंतर माणसाचे भवितव्य या ग्रह, नक्षत्र, तारे यांच्या स्थितीवरच अवलंबून असते. ग्रह अनिष्ट असतील, तर मनुष्य कितीही श्रीमंत असला, तरी त्याला परिस्थिती साथ देत नाही; परंतु साधकांवर मात्र महर्षींची कृपा असल्यामुळे आपल्याला सतत देवग्रहांचेच सान्निध्य लाभत आहे आणि सनातनचे कार्य कितीही संकटे आली, तरी उत्तरोत्तर वृद्धिंगतच होत आहे. खरंच, जीवनात आणखी आपल्याला काय हवे ? देवकृपाच महत्त्वाची !
- (सद्गुरु) सौ. अंजली गाडगीळ, कुमरकुम, कोची, केरळ. (९.१०.२०१६)

अपार कष्ट घेऊन वेदविद्येचे रक्षण करणारे आणि आधुनिक विज्ञानाच्या आधारे वैदिक शास्त्रातील तत्त्वे जगासमोर मांडणारे एक संंशोधक संत - अश्‍वमेधयाजी प.पू. नाना काळे गुरुजी !

     पर्जन्यवृष्टीसाठी करण्यात येणार्‍या सोमयागाचा अभ्यास करण्यासाठी आम्ही गोव्याहून महाराष्ट्रातील परळी वैजनाथ येथे जातांना प्रवासात इंडियन एक्सप्रेस या इंग्रजी दैनिकातील पुढील लिखाण वाचले, दुष्काळग्रस्त मराठवाड्यात कृत्रिम पावसाचे प्रयोग अयशस्वी होऊनही हे खर्चिक प्रयोग आणखी ९० दिवस चालू ठेवण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे. त्यासाठी शासनाने २७ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध केला आहे. त्या व्यतिरिक्त विमानाचे भाडे आणि पायलटचे वेतन यांवर प्रतिदिन ३ लाख रुपयांचा व्यय होणार आहे... हे वाचल्यावर आम्हा साधकांमध्ये चर्चा चालू झाली. यज्ञात पुष्कळ व्यय होतो, दूध-तूपासारखे महागडे पदार्थ आगीत टाकून ते वाया घालवतात... आदी यज्ञसंस्थेवर होणार्‍या टीकाही आमच्या वाचनात आल्या होत्या.

कृपाळू गुरुरूपे श्रीजयंत लाभले साक्षात् श्रीहरि ।

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त...
     श्रीरामाची आरती ऐकतांना मनात विचार आला, जशी श्रीराम, श्रीकृष्ण, श्री विठ्ठल यांची आरती आहे, तशीच गुरुदेवांचीही आरती असायला हवी. त्या वेळी पुढील ओळी सुचल्या,

कृपाळू गुरुरूपे श्रीजयंत लाभले साक्षात् श्रीहरि ।
दीन जिवाला उद्धरण्या केली कृपा मजवरी ॥ १ ॥

हरिदास (टीप १) झाले व्याकूळ हरिलोकी, दिसेना श्रीहरि ।
त्वरित येती भुवरी गुरुरूपी पहाती श्रीहरि ॥ २ ॥

बाबा (टीप २) असती वसिष्ठ गुरु, मार्गदर्शन करी ।
रामराज्य स्थापण्या कलियुगी श्रीजयंत येती भुवरी ॥ ३ ॥

सुंदर गुरुकृपायोग निर्मूनी करी कृपा साधकांवरी ।
गुरुकृपायोगे घडती संतरत्ने कृपा दावी श्रीहरि ॥ ४ ॥

दाखवूनी साधका मोक्षमार्ग जन्मांतरीचे बंध सोडवती ।
कीर्ती वदती संत-महंत अन् कीर्ती सांगती महर्षीही ॥ ५

प्रेमळ, आनंदी आणि गुरूंवर पुष्कळ श्रद्धा असणारे श्री. अशोक रेणके !

श्री. अशोक रेणके
सौ. सुजाता रेणके
      श्री. रेणके (पती) यांच्यासमवेत घरी रहात असतांना त्यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये आणि साधनेमुळे त्यांच्यात झालेले पालट अन् त्यानंतर आश्रमात रहायला आल्यानंतर मला त्यांच्याविषयी जाणवलेली सूत्रे पुढे देत आहे.
१. आश्रमात येण्यापूर्वी जाणवलेली गुणवैशिष्ट्ये
१ अ. व्यवस्थितपणा : पूर्वीपासूनच श्री. रेणकेकाकांना नीटनेटकेपणाची आवड होती. प्रत्येक गोष्ट व्यवस्थित आणि नीटनेटकी करण्याचा प्रयत्न करतात. त्यांचे लिखाणही सुवाच्य आणि सुंदर आहे. घरी असतांना ते दैनिक सनातन प्रभातमध्ये प्रसिद्ध झालेल्या महत्त्वाच्या विषयांची कात्रणे काढून त्याची सुंदर धारिका बनवत आणि प्रसारातील साधकांना आवश्यकतेनुसार देत असत. हे त्यांचे कौशल्य वाखाणण्यासारखे आहे.
१ आ. जिज्ञासूवृत्ती : श्री. रेणकेकाकांमध्ये नवीन सेवा शिकण्याची आवड दिसून येते. घरी कोणी साधक किंवा पाहुणे आल्यावर त्यांच्याकडे सेवेला उपयुक्त अशी कोणतीही कला किंवा ज्ञान असेल, तर ते लगेच शिकून घेत असत आणि त्याचा योग्य ठिकाणी उपयोग करत.
१ इ. सेवाभाव
१ इ १. सेवेतील बारकावे समजून घेणे :
त्यांच्याकडे मराठी भाषेतील लिखाणाचे कन्नड भाषेत भाषांतर करण्याची सेवा आहे. आरंभी सेवेविषयी काही ठाऊक नसतांना त्यांनी त्यातील बारकावे समजून घेऊन सेवा केली.
१ इ २. सेवा परिपूर्ण करण्याचा प्रयत्न करणे : भाषांतराच्या सेवेत एखादे सूत्र चुकीेचे वाटत असेल किंवा समजत नसेल, तर ती सेवा पुढे चालू न ठेवता आधी त्याविषयी योग्य काय आहे, हे ते विचारून घ्यायचे आणि त्यानंतर ती सेवा पूर्ण करून पाठवायचे. सेवा परिपूर्ण करण्यासाठी त्यांची धडपड असते.
१ इ ३. कृतज्ञताभावाने सेवा करणे : सेवा तातडीची असल्यास कुठल्याही परीस्थितीत ते ती पूर्ण करायचे. सेवा पुष्कळ असली, तरी ते कधीही कंटाळा न करता कृतज्ञताभावाने रात्री उशिरापर्यंत बसून सेवा पूर्ण करत असत

पू. सखदेवआजींच्या अंतिम क्षणापर्यंत त्यांची मनोभावे सेवा करणार्‍या कु. राजश्री सखदेव यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये !

     १७.८.२०१६ या दिवशी सायंकाळी सनातनच्या संत पू. (सौ.) आशालता सखदेवआजी यांनी देहत्याग केला. आजींची मुलगी कु. राजश्री सखदेव यांनी आजींच्या अंतिम क्षणापर्यंत त्यांची सेवा केली. राजश्रीताईंच्या संदर्भात जाणवलेली सूत्रे पुढे देत आहे.
१. मनोभावे संतसेवा करणे
     राजश्रीताई आजींची सेवा अतिशय भावपूर्ण करत असत. आई या भावाने नव्हे, तर एक संत या भावाने त्या प्रेमाने आजींची काळजी घेत.
२. स्थिरता
     पू. आजींनी देहत्याग केल्यानंतर ताई शांत आणि स्थिर वाटत होत्या. या कठीण प्रसंगातही त्यांचे वागणे-बोलणे भावाच्या स्तरावरच होते.
३. इतरांचा विचार
     देहत्यागानंतर पुढील सिद्धतेच्या वेळी काही साधक साहाय्य करत होते. ते साधक जेवले का ?, याकडे ताईंचे लक्ष होते.
४. सेवाभाव
     स्वतःचा कुठेच विचार न करता आजींच्या संदर्भातील सेवा पूर्ण करण्यासाठी त्यांची धडपड होती. विधीच्या वेळीही साहित्याची आवराआवर करतांनाही त्यांचा सेवाभाव जाणवत होता.
५. संतांविषयी कृतज्ञताभाव
     आजींच्या देहत्यागानंतर ताई सद्गुरु (सौ.) बिंदाताई यांच्याविषयी बोलत होत्या.

आनंदी आणि सात्त्विक गीतांची आवड असलेला ५१ टक्के आध्यात्मिक पातळी असलेला आणि उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला पनवेल येथील चि. श्रीकृष्ण विजय तुपे (वय १ वर्ष) !

चि. श्रीकृष्ण तुपे
     आश्‍विन शुक्ल पक्ष दशमी (११.१०.२०१६) या दिवशी पनवेल येथील चि. श्रीकृष्ण विजय तुपे याचा प्रथम वाढदिवस झाला. त्यानिमित्त त्याच्या आईला जन्मापूर्वी आणि नंतर जाणवलेली त्याची गुणवैशिष्ट्ये पुढे देत आहोत.
१. जन्मापूर्वी
१ अ. गर्भारपणात सेवा केल्यावर आनंद मिळणे : गर्भधारणा झाल्याचे समजल्यावर दैनिक सनातन प्रभातमध्ये येणार्‍या दैवी बालकांविषयीचे लेख वाचून मला नेहमी सत्मध्ये रहावे, असे वाटून तशी प्रार्थना व्हायची. मी २ मासांनंतर साप्ताहिक आणि मासिक सनातन प्रभात संबंधीच्या सेवेला जाऊ लागले. ही सेवा करतांना मला आनंद होऊन तिथेच थांबावे, असे वाटायचे.

सनातनने धर्मप्रसारासाठी बनवलेल्या आकाशकंदिलात थर्माकोलचा वापर करण्यामागील उद्देश लक्षात घ्या !

     श्री गणेशोत्सवात श्री गणेशाची सात्त्विकता अधिकाधिक मिळावी, यासाठी त्याच्या मूर्तीभोवती थर्माकोलने आरास न करता नैसर्गिक वस्तूंनी, उदा. पाने, फुले इत्यादींनी आरास करावी, अशी सूचना देण्यात आली होती. यावरून सनातनने दिवाळीसाठी आकाशकंदील थर्माकोलचा कसा काय बनवला, अशी शंका काहींच्या मनात आली. त्याचे उत्तर पुढीलप्रमाणे देता येईल.
     कृतीपेक्षा त्या कृतीमागील उद्देश महत्त्वाचा असतो, या तत्त्वानुसार सनातनने आकाशकंदील शोभेसाठी बनवला नसून धर्मप्रसारासाठी बनवला आहे. त्यामुळेच त्यावरील लिखाण धर्मजागृतीपर आहे. धर्मजागृतीचा उद्देश सहजसाध्य व्हावा, यासाठी त्याच्यामध्ये थर्माकोलचा सांगाडा म्हणून वापर केला आहे आणि त्यावर धर्मप्रसाराचा उद्बोधक लिखाण चिकटवले आहे. म्हणजेच थर्माकोलचा वापर आकाशकंदील आकर्षक दिसण्यासाठी केलेला नसून धर्मप्रसारासाठीचे एक माध्यम म्हणून केला आहे. आकाशकंदिलातील थर्माकोलचा सांगाडा सात्त्विक लिखाणानेे पूर्णपणे झाकला जात असल्यामुळे त्यातून सात्त्विकता प्रक्षेपित होते.

साधकांनो, मायारूपी अंधःकार नष्ट करून चैतन्यदायी प्रकाशाची उधळण करणारा सनातन आकाशकंदिल घरोघरी पोचवण्याची सेवा भावपूर्ण करा !

सनातन आकाशकंदिल
असे चैतन्यदायी ज्ञानदीप ।
जणू गुरुदेवांनी दिला
हिंदु राष्ट्राचा हा प्रकाशदीप ॥
१. सनातन आकाशकंदिलाचे महत्त्व
     २६.१०.२०१६ पासून दीपावलीला आरंभ होत आहे. या काळात आकाशकंदिलाला अनन्यसाधारण महत्त्व असते. सनातनचा आकाशकंदिल केवळ आकाशदिवा नव्हे, तर श्री गुरूंचा ज्ञानदीप आहे. तो चैतन्यदायी प्रकाश घरोघरी पोचवतो. हिंदु राष्ट्राची स्थापना होण्यासाठी देवता, ऋषिमुनी आणि संत यांचा संकल्प कार्यरत झाला आहे. हा संकल्प फळास येेण्यासाठी हा दीप प्रयत्नरत आहे. वास्तूत सनातन आकाशकंदिल लावल्याने अनेकांना चांगल्या अनुभूती आल्या आहेत.
२. सनातनचा आकाशकंदिल बनवतांना कसा भाव ठेवावा ?
     चैतन्याची उधळण करणारा हा आकाशकंदिल बनवण्याची संधी साधकांना लाभत आहे. प्रत्यक्ष भगवंतच ही सेवा माझ्याकडून करून घेणार आहे, असा कृतज्ञतेचा भाव ठेवून नामजपासहित सेवा करावी. मनोभावे, अचूकपणे आणि परिपूर्णतेने सेवा होईल, याकडे लक्ष द्यावे.
३. श्री गुरूंचा ज्ञानदीप सर्वत्र पोचवा !
     आकाशकंदिलाच्या वितरणाची सेवा म्हणजे गुरूंनी दिलेले चैतन्य सर्वदूर पोचवण्याची अमूल्य संधी ! हा आकाशकंदिल मायारूपी अंधःकार नष्ट करून देवतांचा दैदीप्यमान प्रकाश सर्वत्र प्रक्षेपित करतो.

नामजप करण्यापूर्वी प्रार्थना आणि स्वयंसूचना सत्र करतांना वर्धा येथील सौ. भक्ती चौधरी यांना आलेल्या अनुभूती !

१. नामजप करण्यापूर्वी प्रार्थना करत असतांना आपत्कालीन
स्थिती दर्शवणारे दृश्य डोळ्यांसमोर दिसणे
     २८.६.२०१६ या दिवशी नागेशी (गोवा) येथील निवासस्थानी सकाळी ६.१५ वाजता नामजप करण्यापूर्वी मी प.पू. डॉक्टरांना प्रार्थना करत होते. त्या वेळी प.पू. भक्तराज महाराज यांचे धावत ये केशवा.... हे भजन ऐकू आल्यावर मला प.पू. डॉक्टरांची पुष्कळ आठवण येऊन रडू आले. मी प.पू. डॉक्टरांच्या खोलीत त्यांच्या चरणांजवळ बसून धावा करत आहे, असे मला दिसले. माझी साधना होत नाही. माझ्यातील दोष आणि अहं यांमुळे मी प.पू. डॉक्टरांची कृपा अन् आश्रमातील चैतन्य अनुभवू शकत नाही. प.पू. डॉक्टरांना अपेक्षित असे प्रयत्न माझ्याकडून होत नाहीत. मी काय करू ?, असे विचार येऊन मी प.पू. डॉक्टरांच्या चरणांवर डोके ठेवले आहे, असे मला दिसले.
     नंतर मला मी एक लहान मुलगी आहे. एक मोठी जत्रा भरली असून मी त्या जत्रेत हरवले आहे आणि माझ्या आईला (प.पू. डॉक्टरांना) पुष्कळ आर्ततेने हाक मारत आहे. जत्रारूपी संसारात मला माझी आई कोठे दिसत नाही. मी भयभीत होऊन तिला शोधत आहे. माझ्या डोळ्यांतून पाणी येत आहे. सायंकाळ झाली आहे. ती सायंकाळ, म्हणजे आपत्कालातील संधीकाल आहे. थोड्या वेळात रात्रीचा प्रहर चालू होईल; म्हणजे घोर आपत्काल, या विचाराने मी प.पू. डॉक्टरांना पुष्कळ आर्ततेने हाक मारत आहे, असे दिसले.
२. प्रार्थना करतांना डोंगर आणि आश्रमातील इमारतीच्या
भिंती पारदर्शक झाल्या असल्याचे जाणवणे
    मी प्रार्थना करतांना नागेशी येथील इमारतीच्या समोर असलेला डोंगर पारदर्शक झाला असून तो प.पू. डॉक्टरांना खोलीत बसून दिसत आहेे.

गुरुमाऊलीने केलेल्या कृपावर्षावासाठी तिच्या चरणी व्यक्त केलेली भावपूर्ण कृतज्ञता !

माझी प्राणप्रिय गुरुमाऊली,
     माझी रेणुका माऊली । कल्पवृक्षाची सावली ॥
     जैसी वत्सा लागी गाय । तैसी अनाथांची माय ॥
     या भक्तीगीताप्रमाणेच तुम्ही आमची माऊली, कल्पवृक्षाची सावली आहात. मला आजवर जे काही मिळाले, मिळत आहे, ते केवळ आणि केवळ आपल्या कृपेमुळेच मिळत आहे.
     देवा, कळत नव्हते काय लिहू ? कुठून आरंभ करू ? तेव्हा वरील भक्तीगीताचे बोल मुखात आले. देवा, तुम्ही मला माझे गुरु म्हणून लाभलात. दयाघना, तुझ्या कृपेने मला सर्व मिळाले; म्हणून तुझ्या चरणी कोटी-कोटी कृतज्ञ आहे.
१. गुरुमाऊलीच्या कृपेने पुष्कळ प्रेम करणारे आई-वडील आणि बहीण मिळणे
     देवा, तू मला आई-वडील दिलेस. ते माझ्यावर पुष्कळ प्रेम करतात. माझ्या बाबांचा स्वभाव तुझ्या कृपेेमुळे पूर्णतः पालटला आहे. माझी लहान बहीण आपल्याच कृपेने मला मिळाली आहे, असे जीव लावणारे कुटुंबीय मला दिलेत; म्हणून तुमच्या चरणी कोटी कोटी कृतज्ञ आहे.
२. गुरुमाऊलीनेच भूतकाळातून सावरून त्यांच्या छत्रछायेखाली
आणणे आणि साधकांकडूनही प्रेम देणे
     माझ्या भूतकाळातून आपल्या कृपेमुळेच मला सावरता आले. मला तुमच्या छत्रछायेखाली रहाता आले. मला जिल्हा आणि आश्रम येथील साधकांचे प्रेम दिलेत. साधकांचे प्रेम आणि तुमची कृपा अखंड माझ्यावर रहाण्यासाठी मला तसे घडवा. मला दुसरे काही नको. गुरुदेवा, तुमच्यामुळे सद्गुरु बिंदाईंसारखी आध्यात्मिक आई मला मिळाली, त्याचा लाभ मला करून घेता येऊ दे, अशी तुमच्या चरणी कृतज्ञतेने प्रार्थना आहे.
३. गुरूंच्या कृपेने रामनाथी आश्रमात आल्यापासून सतत संतसेवा मिळणे
     पूर्वीपासूनच तुमची कृपा माझ्यावर असल्याची मला जाणीव आहे; म्हणून मी आपल्या कृपाछत्राखाली आहे. तीर्थक्षेत्रासमान रामनाथी आश्रमात मला रहायला मिळाले आहे.
       ज्या क्रांतीकारकांनी स्वतःच्या प्राणांचे मोल देऊन ही भूमी स्वतंत्र केली, त्या भूमीवर मद्यधुंद होऊन नाचतांना या दारूड्यांना त्यांची आठवणसुद्धा होऊ नये, हे या हिंदु राष्ट्राचे दुर्दैव ! 
(साप्ताहिक राष्ट्र्रपर्व, १७.१.२०११)

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले
       बुद्धीप्रामाण्यवादी म्हणजे प्राण्यांप्रमाणे स्वेच्छेने वागणारे, तर साधक म्हणजे परेच्छेने आणि ईश्‍वरेच्छेने वागणारे !
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले

बोधचित्र

प.पू. पांडे महाराज यांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांना दसर्‍याच्या निमित्त आपट्याच्या पानावर लिहून पाठवलेली कृतज्ञता !


प.पू. पांडे महाराज 
पानाची पुढील बाजू

पानाची मागील बाजू

॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज
सनातनचे श्रद्धास्थान
जिसने पायो उसने छिपायो । 
वो नर सच्चा, वोही गुरुका बच्चा । 
भावार्थ : 'पायो' म्हणजे आत्मानुभूती झाली. 'छिपायो' म्हणजे आत्मानुभूती झाल्याचे कोणाला सांगितले नाही. (अर्थात ती शब्दांत सांगताही येत नाही.) 
'गुरुका बच्चा' म्हणजे गुरूचा खरा शिष्य. एखाद्याकडे अनमोल हिरा असला, तर तो काही सर्वांना त्याविषयी सांगत नाही. तसेच अनमोल आत्मानुभूती आलेला त्याविषयी कोणाला काही सांगत नाही. अहंभाव नसल्यामुळेच त्याला ती अनुभूती आलेली असते व म्हणूनच तो तिच्याविषयी बोलत नाही. 
(संदर्भ : 'सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.') 
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥ 
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥

या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो.
 - प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

यशप्राप्ती
सातत्याने प्रयत्न केल्याशिवाय कशाचीही प्राप्ती होत नाही. यश हे नेहमी प्रयत्नांनाच चिकटून रहाते. 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

पाकप्रेमी राष्ट्रांनाही समज द्या !

संपादकीय
      भारतीय सैन्याने केलेली सर्जिकल स्ट्राईकची धडक कारवाई पाकच्या म्हणजेच जिहादी आतंकवाद्यांच्या चांगलीच जिव्हारी लागली आहे. आपण सर्जिकल स्ट्राईक केले त्या दिवसानंतर आजपर्यंत आतंकवाद्यांनी सीमेवर सलग कुठे ना कुठे आक्रमण केले आहे. नुकतीच एका सरकारी इमारतीचा ताबा घेतलेल्या आतंकवाद्यांशी सैन्याची चकमक झाली. ही चकमक ३ दिवस चालली. पाककडून भारताच्या कुरापती काढण्याचे प्रकार यापूर्वी पासूनच चालू आहेत.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn