Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

उत्पादन वाढवण्यासाठी युद्ध शस्त्र पुरवठादारांनी सिद्ध रहावे ! - केंद्र सरकारची सूचना

 • चीन आणि पाक सारखे कुरापतखोर शत्रू शेजारी असतांना भारताने प्रत्येक क्षणी युद्धसज्ज रहाणे आवश्यक आहे; मात्र तशी सिद्धता भारताची नाही, हेच यातून उघड होते !
 • भारताने बचावासाठीच नव्हे, तर पाकसारख्या शत्रू राष्ट्राला संपवण्यासाठी शस्त्रसिद्ध रहायलाच हवे !
       नवी देहली - भारत आणि पाक यांच्यातील वाढत्या तणावाच्या पार्श्‍वभूमीवर केंद्र सरकारने सैन्याला शस्त्र पुरवठा करणार्‍या आस्थापनांना शस्त्रांचे उत्पादन वाढवण्यासाठी सिद्ध रहाण्याची सूचना केली आहे. कुठल्याही आक्रमणाला तोंड देण्यासाठी सैन्याकडे असलेला शस्त्रसाठा आणि आवश्यक असलेली सामुग्री यांचा आढावा घेण्याचा आदेश केंद्र सरकारने गेल्या काही दिवसांत दिला आहे, अशी माहिती एका इंग्रजी दैनिकाने सरकारमधील वरिष्ठ अधिकार्‍याच्या हवाल्याने दिली आहे.
१. देशातील काही उद्योग आणि शस्त्र पुरवठादार यांच्याशी सरकारने संपर्क साधला आहे. शस्त्र पुरवठ्याशी संबंधित आस्थापने आणि उद्योग यांच्याशी लगेचच करार करण्यात येईल, असे संकेतही केंद्र सरकारने संबंधितांना दिले आहेत.

इराणमध्ये एस्.एस्.आर्.एफ्.च्या संकेतस्थळावर दुसर्‍यांदा बंदी !

मुसलमान देशांत अध्यात्माची गळचेपी !
       तेहरान - इराण या मुसलमानबहुल देशात एस्.एस्.आर्.एफ्.च्या (स्पीरिच्युअल सायन्स रिचर्स फाऊंडेशनच्या) फारसी भाषेतील संकेतस्थळावर दुसर्‍यांदा बंदी घालण्यात आली आहे. सध्याची बंदी ९ ऑक्टोबरपासून अमलात आणली असून त्या आधी २०१५ च्या सप्टेंबर मासात एस्.एस्.आर्.एफ्.च्या फारसी भाषेतील संकेतस्थळावर बंदी घालण्यात आली होती. मात्र तेथील एका साधकाने प.पू. डॉक्टरांचे ज्ञान सर्वांना मिळूदे, अशी कळकळीने प्रार्थना केल्यावर वरील संकेतस्थळ ५ दिवसानंतर परत चालू झाले होते. इराणच्या सरकारने असे संकेतस्थळ एकदा बंद करून परत चालू करण्याची कृती अद्भूतच म्हणावी लागेल.
       एस्.एस्.आर्.एफ्.च्या फारसी भाषेतील संकेतस्थळाला इराण देशात चांगला प्रतिसाद लाभत होता. सप्टेंबर २०१५ मध्ये या संकेतस्थळाला १५ सहस्र लोकांनी भेटी दिल्या होत्या. हीच संख्या सप्टेंबर २०१६ मध्ये वाढून ४४ सहस्र झाली होती. ऑक्टोबर मासाच्या प्रारंभी संकेतस्थळाला भेट देणार्‍यांची संख्या प्रत्येक दिवशी १ सहस्र ७०० पर्यंत पोचली होती. एस्.एस्.आर्.एफ्.च्या संकेतस्थळावरून स्तर क्रमांक २ आणि ३ असे २ सत्संग स्वभावदोष निर्मूलनासाठी आयोजित केले जातात. त्यातील तिसर्‍या स्तरावरील सत्संगात १० साधक प्रत्येक आठवड्याला नियमित सहभागी होत असत. तर दुसर्‍या स्तरावरील सत्संगात २५ साधक प्रत्येक आठवड्याला नियमित सहभागी होत असत. अशा रीतीने ३५ साधक त्यांच्या धर्माच्या शिकवणुकीपासून दूर जात इराणसारख्या कठीण देशातील परिस्थितीवर मात करून श्री गुरुदेव दत्त आणि नमो भगवते वासुदेवाय हे नामजप करत आहेत. त्यातील ५ साधक भारतात आयोजित आध्यात्मिक विश्‍वविद्यालयाच्या ५ दिवसीय शिबिरात सहभागी होण्यासाठी आले होते. त्यांच्यात आध्यात्मिक प्रगतीची चांगली लक्षणे दिसत असून प.पू. डॉक्टर आणि प.पू. भक्तराज महाराज यांच्याविषयी चांगला भाव आहे.

काश्मीरमध्ये २५० हून अधिक आतंकवाद्यांची घुसखोरी !

 • घुसखोरीची माहिती सांगणारे नको, तर घुसखोरी थांबवण्यासाठी कृती करणारे शासन हवे. आतंकवाद्यांना संपवण्यासाठी एका सर्जिकल स्ट्राईकचा उपयोग होणार नाही त्यासाठी त्यांना धडाच शिकवायला हवा !
 • इतक्या मोठ्या प्रमाणात आतंकवाद्यांची घुसखोरी होत असतांना सुरक्षा दले काय करत असतात ?
        नवी देहली - गृह मंत्रालयाच्या सूत्रांच्या माहितीनुसार हिजबूल मुजाहिदीन आणि लष्कर-ए-तोयबा यांच्या २५० हून अधिक आतंकवाद्यांनी भारतात घुसखोरी केली आहे. हे सर्व सर्जिकल स्ट्राईक पूर्वीच काश्मीरमध्ये घुसले आहेत. ते सणांच्या वेळी देशात आक्रमण करून देशात अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न करणार आहेत. गृहमंत्रालयाने सर्व राज्यांना यासंदर्भात सतर्क रहाण्याची आणि सुरक्षा वाढवण्याची सूचना दिली आहे. विशेषतः देहली, मुंबई, भाग्यनगर, बेंगळुरू आदी शहरांना सतर्क रहाण्यास सांगितले आहे.

पोलिसांच्या संदर्भातील कटू अनुभव !

        सध्या सनातनचे साधक आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते यांना पोलिसांच्या शारीरिक आणि मानसिक छळाला सामोरे जावे लागत आहे. या अनुषंगाने विविध ठिकाणच्या पोलिसांविषयी सनातनचे साधक, हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते किंवा हिंदुत्वनिष्ठ यांना यापूर्वी पोलिसांच्या सतावणुकीविषयी आलेले अनुभव येथे प्रसिद्ध करत आहोत.
कार्यालयाच्या स्वच्छतेविषयी उदासीन 
असलेले पोलीस आणि कार्यालयीन कर्मचारी !
        आम्हाला चौकशीसाठी पोलीस मुख्यालयात बोलावण्यात आले होते. दिवसभर आम्ही त्या कार्यालयात होतो.
१. पोलीस मुख्यालयातील कमालीची अस्वच्छता होती :
अ. आम्ही ज्या ठिकाणी बसलो होतो, त्या ठिकाणी असलेल्या पंख्यावर जळमटे लागली होती.
आ. कित्येक दिवस त्या कार्यालयातील केर काढला नसल्याने प्रत्येक कोपर्‍यात केर साचला होता.
इ. पटलावर अतिशय धूळ होती.
ई. नियमित वापरात असलेला संगणक आणि संगणकाचा कळफलक (की-बोर्ड) यांवर धूळ साचलेली होती. त्यावर काम करणारे धूळ न पुसता तसेच काम करत होते.

इस्लाम स्वीकारण्यास नकार देणार्‍या ख्रिस्ती युवकाच्या अल्पवयीन बहिणीवर धर्मांधांकडून सामूहिक बलात्कार !

 • पाकमधील अल्पसंख्यांकांची दयनीय स्थिती कोणत्याही मानवाधिकार आयोगाला कधीच का दिसत नाही आणि त्यांच्या साहाय्यासाठी प्रयत्न का केले जात नाहीत ?
 • भारतातील अल्पसंख्यांकावर चुकून जरी अन्याय झाला, तर बहुसंख्य हिंदूंना तालिबानी ठरवले जाते; मात्र पाकमधील बहुसंख्य मुसलमानांवर कोणीही टीका करत नाही !
        कसूर (पाकिस्तान) - कसूर जिल्ह्यात एका ख्रिस्ती युवकाने इस्लाम स्वीकारण्यास नकार दिल्यावर धर्मांधांनी त्याच्या अल्पवयीन बहिणीचे अपहरण करून तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली आहे. ब्रिटीश पाकिस्तानी ख्रिश्‍चियन असोसिएशनने ही माहिती दिली. क्रूर धर्मांधांनी बहिणीवर बलात्कार होत असतांना तिच्याकडून केली जाणारी आरडाओरड या युवकाला ऐकवली. युवकाने त्यांच्या कह्यातून पलायन केले असले, तरी बहिणीचा शोध अद्याप लागलेला नाही. पोलिसांनी या घटनेची तक्रार दाखल करून घेण्यास नकार दिला आहे.

ब्रिटनमध्ये इसिसचे समर्थन करणार्‍या धर्मांतरित मुसलमान मॉडेलला अटक

कुठे इसिसशी संपर्क ठेवण्यावरून तात्काळ कारवाई करणारे ब्रिटन 
शासन, तर कुठे इसिसच्या संपर्कातील युवकांचे समुपदेशन करण्यासारख्या 
हास्यास्पद उपाययोजना राबवणारा भारत ! भारत शासन ब्रिटनकडून बोध घेईल का ?
      लंडन - आतंकवादी संघटना इसिसला संपर्क केल्याच्या आरोपाखाली ब्रिटीश मॉडेल किंबर्ले मिनर्सला ७ ऑक्टोबरला रात्री पोलिसांनी अटक केली. मिनर्सवर अनेक दिवसांपासून पोलीस आणि गुप्तचर यंत्रणा एम्आय-५ लक्ष ठेवून होती. ब्रिटीश माध्यमांनुसार मिनर्सला ब्रिटीश गुप्तचर यंत्रणांनी संशयितांच्या सूचीमध्ये ठेवले होते. ब्रिटीश वृत्तपत्र द सन आणि संडे टाइम्स यांनी दिलेल्या वृत्तानुसार मिनर्सने काही मासांपूर्वी इस्लामचा स्वीकार केला होता. यानंतर ती इसिस या आतंकवादी संघटनेच्या संपर्कात आली होती. (इस्लामचा स्वीकार केल्यावर इसिसच्या संपर्कात येणे, ही गोष्ट संशय निर्माण करणारी आहे ! - संपादक) मिनर्स सामाजिक संकेतस्थळांवरूनही आतंकवादी संघटनेशी संबंधित लोकांशी संभाषण करत होती, तसेच ती ब्रिटनचे आतंकवादविरोधी पोलीस पथक आणि गुप्तचर यंत्रणा यांच्यावर लक्ष ठेवत होती.

सॅन्टोस यांना शांततेचे नोबेल पारितोषिक मिळण्यामागे श्री श्री रविशंकर यांची प्रेरणा !

जगात संतांनी जेवढे कार्य केले, तेवढे एकातरी राजकारण्यांनी केले आहे का ? 
      बेंगळुरू - कोलंबियाचे राष्ट्राध्यक्ष जूआन मॅन्युअल सॅन्टोस यांना शांततेचे नोबेल पारितोषिक घोषित झाले आहे. ते मिळण्यासाठी आर्ट ऑफ लिव्हिंग या आध्यात्मिक संस्थेचे संस्थापक आणि प्रख्यात आध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर यांचा मोलाचा वाटा आहे, असे समोर येत आहे. कोलंबियातील एका बंडखोर गटाशी शांतता प्रक्रिया आरंभण्यात श्री श्री रविशंकर यांचा मोलाचा वाटा होता, हे पुढे आले आहे.

बालकांवरील अत्याचाराची तक्रार करण्यासाठी पोस्को ई बॉक्स सुविधा कार्यरत !

केवळ तक्रारीची सुविधा निर्माण करून नव्हे, तर अत्याचार रोखण्याची 
मानसिकता असलेले सक्षम अधिकारी असल्यासच बालकांवरील अत्याचार थांबतील !
     मुंबई, ११ ऑक्टोबर (वार्ता.) - बालकांवर दिवसेंदिवस होणार्‍या अत्याचारांचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन याविषयी तक्रार करणे सुलभ व्हावे, यासाठी राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगाने त्यांच्या संकेतस्थळावर पोस्को ई बॉक्स ही सुविधा चालू केली आहे. यासाठी आयोगाच्या www.ncpcr.gov.in या संकेतस्थळाच्या होमपेज वर पोस्को ई-बॉक्स सिद्ध करण्यात आला आहे. या सुविधेद्वारे अत्याचारित बालकांना संकेतस्थळावर अत्याचाराची तक्रार करता येणार आहे.

बांगलादेशच्या सैनिकी कारवाईत ११ आतंकवादी ठार !

आतंकवाद्यांना पोसत न बसता त्यांचा त्वरित नायनाट करणारा बांगलादेश !
      ढाका - बांगलादेशच्या सुरक्षा सैनिकांनी ८ ऑक्टोबरला ११ आतंकवाद्यांना ठार केले. हे सर्व आतंकवादी जमात उल् मुजाहिदीन या बांगलादेशी संघटनेचे सदस्य असल्याचे समजते. जुलैमध्ये झालेल्या येथील आतंकवादी आक्रमणात त्यांचा सहभाग असल्याचे सांगितले जाते. या आक्रमणात एका भारतीय तरुणीसह २२ विदेशी नागरिक ठार झाले होते. आतंकवादी आक्रमणाचे दायित्व प्रथम इसिसने स्वीकारले होते; परंतु बांगलादेश सरकारने या आक्रमणासाठी देशातीलच आतंकवाद्यांना उत्तरदायी धरले होते. या आक्रमणाशी संबंधित आतापर्यंत २४ हून अधिक आतंकवाद्यांना ठार करण्यात आले आहे.

अमेरिकेच्या श्रीमंतांमध्ये ५ भारतीय वंशाच्या अमेरिकी नागरिकांचा समावेश !

     न्यूयॉर्क - फोर्ब्स नियतकालिकाने अमेरिकेतील श्रीमंतांच्या घोषित केलेल्या सूचीमध्ये भारतीय वंशाच्या ५ अमेरिकी नागरिकांचा समावेश आहे. यात एकूण ४०० जणांची नावे आहेत. मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स सतत २३ व्या वर्षी या सूचीत पहिल्या क्रमांकावर आहेत. ५ भारतीय वंशांच्या नागरिकांमध्ये सिंफनी टेक्नोलोजीचे संस्थापक रमेश वाधवानी, सिनटेलचे सहसंस्थापक भरत नीरज देसाई, उद्योगपती राकेश गंगवाल, उद्योगपती जॉन कपूर आणि सिलिकॉन व्हॅली निवेशक कवितर्क राम श्रीराम यांचा समावेश आहे.पाक-चीन आर्थिक कॉरिडॉरला बलुचिस्तान नागरिकांचा तीव्र विरोध !

     क्वेट्टा (बलुचिस्तान) - चीनने पाकमध्ये चालू केलेल्या आर्थिक कॉरिडॉरला बलुचिस्तानातील नागरिकांकडून तीव्र विरोध करण्यात येत आहे. या कॉरिडॉरच्या विरोधात त्यांनी नुकतेच तीव्र आंदोलन केले. या वेळी त्यांनी पाकिस्तान आणि चीन यांच्या विरोधात घोषणा दिल्या, तसेच पाकचे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन केले. तेथील मानवी हक्कांची होणारी पायमल्ली जगासमोर आली आहे.
      पाकिस्तान-चीन आर्थिक कॉरिडॉर हा चीनचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. या प्रकल्पात बलुचिस्तानातील सर्वाधिक भाग येत आहे. बलोच नागरिकांचा प्रकल्पातील चीनच्या सहभागाला विरोध आहे. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी देहली येथे स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून भाषण करतांना बलुचिस्तान, गिलगिट आणि पाकव्याप्त काश्मीर येथील लोकांवर पाककडून होणार्‍या अत्याचारांचा उल्लेख केला होता. तेव्हापासून बलुचिस्तानचे सूत्र जागतिक स्तरावर पोचले आहे.मुसलमान महिलांना भारताच्या तुलनेत इस्लामी राष्ट्रांत अधिक बरोबरीचा दर्जा मिळतो ! - मनेका गांधी, केंद्रीय महिला आणि बालकल्याण मंत्री

जगातील इस्लामी देशांमध्ये शरीया कायद्यापेक्षा त्यांच्या 
राष्ट्रीय कायद्यांना अधिक प्राधान्य दिले जाते. केवळ भारतातच धर्माच्या नावाखाली 
त्याचे अवडंबर माजवले जाते. त्यामुळे आता देशाला समान नागरी कायद्याविना पर्याय नाही ! 
      नवी देहली - तिहेरी तलाकची प्रथा इस्लामी देशांमध्ये नाही. तेथे मुसलमान महिलांना भारताच्या तुलनेत अधिक बरोबरीचा दर्जा देण्यात येतोे. त्यामुळे केंद्र सरकारने तिहेरी तलाकच्या संदर्भात उचललले पाऊल योग्यच आहे, असे प्रतिपादन केंद्रीय महिला आणि बालकल्याणमंत्री मनेका गांधी केले आहे. केंद्र सरकारने नुकतेच सर्वोच्च न्यायालयात एक प्रतिज्ञापत्र सादर केले. या प्रतिज्ञापत्रात तलाक आणि बहुपत्नीत्व आदी प्रथांना विरोध केला आहे. यांमध्ये लैंगिक समानता, धर्मनिरपेक्षता, धार्मिक व्यवहार आणि विविध इस्लामी देशांमधील वैवाहिक कायद्यांचा उल्लेखही करण्यात आला आहे.अधिकार असता, तर पाक कलाकारांचे समर्थन करणार्‍या देशद्रोह्यांना शिक्षा केली असती ! - विक्रम गोखले

किती कलाकार विक्रम गोखले यांच्याप्रमाणे 
कलेपेक्षा राष्ट्रहिताला प्राधान्य देतात ?
      मुंबई - उरी येथे काही दिवसांपूर्वी झालेल्या आतंकवादी आक्रमणानंतर आपला देश पाकिस्तानी आतंकवाद्यांशी लढा देत आहे. सद्यस्थितीत मी पाकिस्तान आणि पाकिस्तानी व्यक्ती यांचा विरोधच करू इच्छितो. माझ्यावर प्रेम करणार्‍या पाकिस्तानी दर्शकांना यामुळे माझा राग आला, तरी पर्वा नाही. पाकिस्तान किंवा पाकिस्तानी कलाकार यांचे समर्थन करणार्‍या प्रत्येक भारतीय व्यक्तीचा मला तिटकारा वाटतो, भले तो एखादा नेता असो किंवा कलाकार असो ! माझ्या हातात असते, तर अशांना भर चौकात उभे करून देशद्रोहासाठी सर्वांत कठोर शिक्षा केली असती, असे परखड मत मराठी नाट्य आणि चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ कलाकार श्री. विक्रम गोखले यांनी फेसबूकवर नोंदवले आहे. (आता निधर्मीवादी विक्रम गोखले यांनाही धर्मांध बुरसटलेले, असे म्हणण्यास मागेपुढे पहाणार नाहीत ! चित्रपटसृष्टी पाक कलाकारांची तळी उचलत असतांना गोखले यांनी परखडपणे त्याचा विरोध करणे अभिनंदनीय होय ! - संपादक)

(म्हणे) इराकमधील हिंसाचार आणि दु:ख असह्य झाल्याने भारतात परतलो ! - इसिसमध्ये सहभागी झालेल्या आतंकवाद्याला आलेली कथित उपरती

जिहादी आतंकवादी खरे बोलत आहे कि 
दिशाभूल करत आहे, हे न समजायला हिंदू मूर्ख नाहीत ! 
      नवी देहली - इसिस या आतंकवादी संघटनेमध्ये सहभागी होऊन आतंकवादी कारवायामध्ये गुंतलेला सुबहानी महंमद (वय ३१ वर्षे) हा आतंकवादी मोसूल, इराक येथील हिंसाचार आणि दु:ख असह्य झाल्याने भारतात परतला. राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेच्या अधिकार्‍यांनी त्याला नुकतीच अटक केली आहे. इसिसमध्ये सहभागी होऊन आतंकवादी कारवायांमध्ये भाग घेतल्याचा त्याच्यावर आरोप आहे. सुबहानी महंमद हा तिरुनेलवेली, तामिळनाडू येथील रहिवासी आहे. 
      सामाजिक संकेतस्थळाच्या माध्यमातून मी इसिसमध्ये भरती झालो. ८ एप्रिल २०१४ या दिवशी मी इराकमध्ये गेलो आणि इसिसच्या कारवायामध्ये सहभागी झालो. माझ्या डोळ्यांसमोर माझे २ साथीदार एका बॉम्बस्फोटात ठार झाल्याचे मी पाहिले. तेथील हिंसाचार आणि दु:ख सहन न झाल्याने मी भारतात परतण्याचा निर्णय घेतला, असे महंमद याने सांगितले. भारतात परतल्यानंतर काही महिन्यांनी मी परत इसिसच्या संपर्कात आलो होतो, असे महंमदने सांगितले.

बेळगाव येथे नवरात्रोत्सवानिमित्त सनातन संस्थेच्या वतीने मार्गदर्शन !

     बेळगाव - नवरात्रोत्सवानिमित्त मुतागा आणि निलजी या गावांमध्ये सनातन संस्थेच्या वतीने मार्गदर्शन करण्यात आले. मुतागा येथे ३००, तर नीलजी येथे १०० इतकी उपस्थिती होती.
मुतागा 
     येथे आधुनिक वैद्या (सौ.) शिल्पा कोठावळे यांनी नवरात्रोत्सवाचे महत्त्व, नवरात्रोत्सवाच्या संदर्भातील शास्त्र यांविषयी मार्गदर्शन केले. 
राजमाता जिजाऊ यांच्यासारखी मातृशक्ती घरोघरी निर्माण होणे आवश्यक ! 
- रमाकांत कोंडुसकर, बेळगाव जिल्हा अध्यक्ष, श्रीराम सेना 
     मातृभक्ती जागृत करणारा भारत हा एकमात्र देश आहे. फक्त याच देशात भारतमाता असा उल्लेख करून गौरव केला जातो. राजमाता जिजाऊ यांच्यासारखी मातृशक्ती घरोघरी निर्माण होणे आवश्यक आहे. युवा पिढी सध्या विविध नटांचे आदर्श घेत आहेे; पण ते मोडीत काढून घरोघरी मुलांमध्ये राष्ट्रभक्तीचे संस्कार रुजवले गेले पाहिजेत. तसे झाल्यासच पुन्हा एकदा हिंदूंच्या रक्षणासाठी छत्रपती शिवाजी महाराज जन्माला येऊ शकतील.

पाकिस्तानी कलाकार असलेले चित्रपट न पहाण्याचा निर्धार करा ! - किरण दुसे, कोल्हापूर जिल्हा समन्वयक, हिंदु जनजागृती समिती

बेळगाव येथील राजहंस गडावर श्री दुर्गामाता दौडीचा सांगता समारंभ
मार्गदर्शन करतांना श्री. किरण दुसे,
त्यांच्या मागे श्री. पंकज गांधी
आणि श्री. कल्लाप्पा पाटील
      बेळगाव - उरी आक्रमणानंतर भारतीय सैनिकांचा झालेला अवमान सहन केला जाणार नाही. सैनिकांना पाठिंबा दर्शवून त्यांचे मनोबल वाढवणे आवश्यक आहे. आपण सर्वांनीच पाकिस्तानी कलाकार असलेले चित्रपट पहायचे नाही, असा निर्धार करणे महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे कोल्हापूर जिल्हा समन्वयक श्री. किरण दुसे यांनी केले. येथील राजहंस गडावर झालेल्या श्री दुर्गामाता दौडीच्या सांगता समारंभात ते बोलत होते. 
     शिवप्रतिष्ठानचे श्री. कल्लाप्पा पाटील यांनी सांगितले, संघटन चांगले होण्यासाठी शिस्त महत्त्वाची आहे. दौडीच्या माध्यमातून ती आपण वाढवू शकतो. दौडीच्या माध्यमातून आपण राष्ट्र सुखी व्हावे, यासाठी एकप्रकारे कुलाचेच पालन करत आहे.

इंदूर (मध्यप्रदेश) येथे हिंदु संघटनांचा धर्मजागृती सभा आणि धर्मशिक्षण वर्ग यांद्वारे जागृती करण्याचा निर्धार !

बैठकीसाठी उपस्थित हिंदुत्वनिष्ठ
     इंदूर - हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ९ ऑक्टोबर या दिवशी येथील आर्य समाज मंदिर येथे हिंदुत्वनिष्ठांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत येत्या दोन मासांत दोन धर्मजागृती सभा, धर्माभिमान्यांशी संवाद सभा आणि धर्मशिक्षण वर्ग यांचे आयोजन करून त्याद्वारे जागृती करण्याचा निर्धार करण्यात आला. या बैठकीला ८ संघटनांचे १५ प्रतिनिधी उपस्थित होते. या बैठकीत सर्वांनी या सभांच्या प्रसारासाठी सहकार्य करण्याची सिद्धता दर्शवली आहे.

सैन्याच्या चकमकीत ठार झालेल्या आतंकवाद्यांकडे पाक बनावटीची शस्त्रास्त्रे !

पाकमध्ये भारताशी समोरासमोर लढण्याचे धैर्य नाही. 
त्यामुळे आतंकवाद्यांच्या माध्यमातून तो भारताला नामोहरम करू 
पहातो आहे. अशा पाकला धडा शिकवणे, हाच यावर प्रभावी उपाय आहे !
                                         आतंकवाद्यांमागे पाक असल्याचे पुन्हा एकदा उघड !
      नवी देहली - ५ आणि ६ ऑक्टोबरला भारतीय सैन्याने ४ आतंकवाद्यांना चकमकीत ठार मारून घुसखोरीचा कट उधळून लावला होता. यातील नौगम येथे ठार झालेल्या आतंकवाद्यांकडे पाक बनावटीची शस्त्रास्त्रे आढळून आली. या शस्त्रास्त्रांमुळे आतंकवाद्यांना पाकचा पाठिंबा असल्याचे पुन्हा एकदा उघड झाले आहे.
     या ठार झालेल्या आतंकवाद्यांकडे बॉम्ब सापडले होते. या बॉम्बची निर्मिती पाकच्या सैनिकी दारूगोळ्याच्या कारखान्यात करण्यात आली होती. ही शस्त्रास्त्रे उरी येथील आतंकवादी आक्रमणातील शस्त्रास्त्रांएवढीच संहारक आहेत. या शस्त्रांस्त्रासह या आतंकवाद्यांकडे मिळालेली औषधे, खाद्यपदार्थ आणि इतर वस्तूही पाकमध्येच निर्माण झाल्याचे त्यावर असलेल्या उल्लेखावरून स्पष्ट झाले आहे.फटाक्यांवर बंदी घालावी आणि महिलांवर बलात्कार करणार्‍यांच्या विरोधात कायदा करावा ! - हिंदुत्वनिष्ठ संघटना

देहली येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन
आंदोलनात सहभागी हिंदुत्वनिष्ठ
     देहली - कोट्यवधी रुपयांचा चुराडा करणार्‍या फटाक्यांवर बंदी आणावी, चिनी उत्पादने विशेषत: चिनी फटाके यांच्यावर बंदी घालावी आणि महिलांवर अत्याचार करणार्‍या बलात्कार्‍यांच्या विरोधात कठोर कायदा करावा, यांसाठी ९ ऑक्टोबर या दिवशी हिंदुत्वनिष्ठांकडून राष्ट्रीय आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला शिवसेना नेपाली प्रकोष्ठ, भारत नेपाल हिंदू एकता परिषद्, भारतीय युवा शक्ती, वैदिक उपासना पीठ, सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती आदी संघटना आणि इंडियन पब्लिक स्कूल, सुलतानपुर (जिल्हा हिस्सार) चे विद्यार्थी उपस्थित होते.

आतंकवादाच्या व्यतिरिक्त इतर विषयावर बोलणी नाही ! - भारताची पाकला चेतावणी

      नवी देहली - भारत-पाक तणाव न्यून करण्यासाठी बोलणी करण्याचा प्रस्ताव पाकिस्तानकडून भारताला अप्रत्यक्षरित्या पाठवण्यात आला आहे; मात्र भारताने त्यात रस दाखवला नाही. मुंबई, पठाणकोट आणि उरी येथील आतंकवादी आक्रमणांच्या पार्श्‍वभूमीवर पाकिस्तान आतंकवादाच्या विरुद्ध कोणती ठोस आणि दृश्य कारवाई करण्याचे नियोजन करणार आहे, हे भारताला जाणून घ्यायचे आहे. हा विषय वगळता इतर कोणत्याही विषयावर बोलणी करण्यास भारताला स्वारस्य नाही, यावर मोदी सरकार ठाम आहे, असे संकेत पाकिस्तानला पाठवण्यात आल्याचे समजते.

भारत-पाक यांच्यातील तणावाच्या काळात पाकमधील हिंदूंवर अत्याचार वाढतात !

शासनाने पाकमधून पळून आलेल्या हिंदूंना कायमचे नागरिकत्व देऊन त्यांचे पुनर्वसन करावे, 
तसेच पाकमधील हिंदूंवर होणारे अत्याचार थांबवण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी हिंदूंची अपेक्षा !
      जयपूर - भारत-पाक यांच्यात सीमेवर तणाव असतांना तेथे रहाणार्‍या हिदूंवर मोठ्या प्रमाणात अत्याचार करण्यात येतात. एवढेच नव्हे तर त्यांच्या महिला आणि मुली यांचे अपहरण करण्यात येते, तसेच त्यांचे धर्मांतरही करण्यात येते, अशी व्यथा पाकमधून पळून आलेल्या हिंदूंनी व्यक्त केली. दोन्ही देशांमधील तणावाच्या पार्श्‍वभूमीवर सध्या ५ हिंदु विस्थापित कुटुंबांनी राजस्थानच्या सीमावर्ती भागात आश्रम घेतला आहे. पाकमधून आलेली ही कुटुंबे सध्या जैसलमेरच्या किशनाकाठमध्ये झोपड्यांमध्ये रहात आहेत. त्याचे अर्धे सदस्य पाकमध्येच आहेत. पाकिस्तानी हिंदु किशनरामने सांगितले की, दोन देशांच्या तणावाच्या काळात तेथील प्रशासनाकडून हिंदूंकडे संशयाच्या दृष्टीने पाहिले जाते. वर्ष १९६५ आणि १९७१ या भारत-पाक युद्धांच्या वेळी लक्षावधी पाकिस्तानी हिंदु विस्थापित भारतात पळून आले होते.

केरळमध्ये सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्याची हत्या !

      नवी देहली - केरळमधील सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाच्या कुझीकल मोहनन या ५२ वर्षांच्या कार्यकर्त्याची कन्नूर येथे १० ऑक्टोबरला हत्या करण्यात आली. येथील बाजारात असणार्‍या त्यांच्या दुकानात ४-५ आक्रमणकर्त्यांनी येऊन ही हत्या केली. राजकीय उद्देशाने ती करण्यात आल्याचा पोलिसांचा संशय आहे. गेल्या महिन्यात भाजपच्या कार्यकर्त्यावर कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आक्रमण केले होते. मे २०१६ पासून कम्युनिस्ट पक्ष सत्तेवर आल्यापासून ५० हून अधिक राजकीय आक्रमणे आणि त्यात ४ जणांची हत्या झाली आहे.

हिमाचल प्रदेशातील भलेई माता मंदिरातील मूर्तीला घाम आल्यास मनोकामना पूर्ण होत असल्याची भक्तांची श्रद्धा !

अंनिसला चपराक ! संशोधकांनी याचे संशोधन 
करून त्यामागील कार्यकारण भाव उघड करावा ! 
      शिमला - हिमाचल प्रदेशातील भलेई माता मंदिरच्या संदर्भात येथील भक्तांची श्रद्धा आहे की, येथील देवीच्या मूर्तीला घाम आल्यास भाविकांची मनोकामना पूर्ण होते. घाम येणे हे त्यामागील संकेत आहे. हिमाचल प्रदेशातील चंबा जिल्ह्यापासून ४० किमी अंतरावर असलेले हे मंदिर शेकडो वर्षे प्राचीन आहे. येथील भ्राण नामक ठिकाणावरील विहिरीत देवी प्रकट झाली होती. तत्कालिन राजा प्रतापसिंह यांना देवीने स्वप्नांत दृष्टांत देऊन चंबा येथे तिची स्थापना करण्यास सांगितले. राजा जेव्हा तेथून देवीची मूर्ती घेऊन येत होते, तेव्हा तिला भलेई स्थान आवडले आणि तिने पुन्हा दृष्टांत देऊन तेथेच तिची स्थापना करण्यास सांगितले, अशी मूर्तीच्या स्थापनेमागील आख्यायिका सांगितले जाते.

उत्तराखंड येथील कसारदेवी मंदिराच्या क्षेत्रातील भू-गर्भीय लहरींचे नासाकडून संशोधन !

हिंदूंची मंदिरे चैतन्यस्रोत आहेत, याचे संशोधन विज्ञानवादी नासाला 
करावेसे वाटते; मात्र तेच अंनिससारख्या तथाकथित विज्ञानवाद्यांना करावेसे वाटत नाही ! 
     अल्मोडा (उत्तराखंड) - जिल्ह्यातील कसारदेवी मंदिराच्या शक्तीमुळे विज्ञानवादी चकीत झाले आहेत. पर्यावरणतज्ञ डॉ. अजय रावत यांनी या मंदिराच्या स्थानाचे अनेक वर्षे संशोधन केले आहे. येथील क्षेत्राच्या भूमीखाली विशाल भू-चुंबकीय दगडी स्तर आहे. यावर विद्युत कणांचे आवरण आहे. ते संपूर्णपणे भारित आहे. त्याद्वारे चुंबकीय लहरी प्रक्षेपित होत आहेत. 
      गेल्या २ वर्षांपासून अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नासाचे शास्त्रज्ञ या क्षेत्राचे संशोधन करत आहेत. या चुंबकीय दगडी स्तराच्या चुंबकीय लहरींचा मनुष्याच्या मेंदूवर काय परिणाम होतो, याचा हे शास्त्रज्ञ अभ्यास करत आहेत. 
     आतापर्यंत करण्यात आलेल्या संशोधनातून कसारदेवी मंदिर आणि दक्षिण अमेरिकेतील पेरू देशातील माचू-पिच्चू, तसेच इंग्लंडच्या स्टोन हेंग येथील स्थानांमध्ये समानता आहे. या तीनही ठिकाणी चुंबकीय शक्ती आहे. डॉ. रावत यांच्या संशोधनात ही चारही ठिकाणे चुंबकीयदृष्ट्या भारित असल्याचे लक्षात आले आहे.

भाजपशासित हरियाणामध्ये गोहत्या कायद्याची कठोरपणे अंमलबजावणी करण्याची हिंदु रक्षा मंचची सरकारकडे मागणी !

अशी मागणी का करावी लागते, 
सरकार हे स्वत:हून का करत का नाही ? 
        गुरुग्राम (हरियाणा) - येथे हिंदु रक्षा मंचच्या वतीने सेक्टर-५ स्थित हुडा मैदानावर एका महापंचायतीचे आयोजन करण्यात आले होते. यात गोहत्या आणि लव्ह जिहाद यांवर चर्चा करण्यात आली. पंचायतने प्रस्ताव संमत करून हरियाणा सरकारने बनवलेल्या गोहत्येविषयीच्या कायद्याचे कौतुक केले; मात्र त्याच वेळेत या कायद्याची अंमलबजावणी करण्यात पोलीस अपयशी ठरत असल्याची, टीकाही करण्यात आली. (सर्वच राज्यात गोहत्या बंदी कायद्याची हीच स्थिती आहे ! खर्‍या अर्थाने गोहत्या रोखण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे ! - संपादक)
        प्रस्तावामध्ये सरकारकडे मागणी करण्यात आली की, गोहत्या कायद्याची कठोरपण अंमलबजावणी करण्यात यावी, तसेच राज्यातील गावांमधील गायरान भूमीच्या रक्षणासाठीही सरकारने पावले उचलावीत, असा प्रस्तावही संमत करण्यात आला. गायरान भूमीवरील अतीक्रमणे हटवण्याची मागणी करण्यात आली, तसेच लव्ह जिहादच्या विरोधातही ठरावत संमत करण्यात आला.

अमित शहा यांना रावण, तर राहुल गांधी यांना दाखवले राम !

 • काँग्रेसच्या नेत्यांचा हिंदुद्वेष्टेपणा ! काँग्रेसचे नेते इतर धर्मियांच्या श्रद्धास्थानांचे असे विडंबन करण्याचे धाडस कधी दाखवतील का ?
 • काँग्रेसच्या नेत्यांकडून सामाजिक संकेतस्थळावर आक्षेपार्ह पोस्टर प्रसिद्ध
       प्रयाग (अलाहाबाद) - उत्तरप्रदेशमध्ये पुढील वर्षी होणार्‍या विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर काँग्रेसचे हसीब अहमद आणि श्रीशचंद्र दुबे यांनी सामाजिक संकेतस्थळावर एक पोस्टर प्रसिद्ध केले आहे. यात त्यांनी भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांना रावणाच्या, तर काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांना श्रीरामाच्या रूपात दाखवले आहे. एवढेच नव्हे, तर श्रीरामाच्या वेशात असलेले राहुल गांधी रावणाच्या वेशात असलेल्या अमित शहा यांचा वध करत आहेत, असेही दाखवले आहे. यापूर्वीही एका पोस्टरमध्ये प्रियांका गांधी या दुर्गादेवीचा अवतार असल्याचे दाखवण्यात आले होते.

(म्हणे) भारताबाहेर बुद्धच चालतात, गोळवलकर नव्हे !

बुद्ध आणि गांधी हे हिंदु संस्कृतीचीच देण आहेत, एवढे साधेही न कळणारे सबनीस बरळले !
      नागपूर - पंतप्रधान नरेंद्र मोदी भारताबाहेर जातात, तेव्हा त्यांच्या तोंडी बुद्ध आणि गांधी असतात. संघाच्या संस्कारात वाढलेल्या मोदींना त्याविना पर्याय नाही; कारण जगात बुद्ध आणि गांधी यांचेच नाव ठाऊक आहे. तेथे गोळवलकर आणि हेडगेवारांचे नाव ठाऊक नाही, असे मत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी नागपुरात व्यक्त केले. (सबनीस यांनी अशी बालबुद्धीची धर्मद्वेषी वक्तव्ये करण्यापूर्वी सनातन हिंदु धर्माचा जगावरील प्रभावाचा थोडा जरी अभ्यास केला असता, तरी बरे झाले असते. अर्थात जिथे जाऊ तिथे त्या त्या समूहाला खूष करणारी वक्तव्ये करणारे सबनीस यांंच्याकडून ही अपेक्षा काय करणार ? - संपादक) डॉ. बाबासाहेब आंबेडकर नॅशनल असोसिएशन ऑफ इंजिनिअर्सच्या वतीने बुद्ध आणि त्याचा धम्म या ग्रंथाचे वितरण लोकार्पण सोहळ्यात सबनीस प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.

सनातनचे कार्य चांगले आहे ! - श्री. राज ठाकरे, अध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना

सनातनच्या ग्रंथप्रदर्शनात ग्रंथांविषयीची
माहिती जाणून घेतांना श्री. राज ठाकरे
      मुंबई - सनातनचे कार्य चांगले आहे, असे गौरवोद्गार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष श्री. राज ठाकरे यांनी काढले. त्यांनी सनातन संस्थेच्या महालक्ष्मी मंदिरात लावलेल्या ग्रंथप्रदर्शनास सदिच्छा भेट दिली. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी सनातन संस्थेच्या वतीने श्री. उदय खानविलकर यांनी संस्थेच्या कार्याची आणि ग्रंथांची माहिती श्री. राज ठाकरे यांना दिली. त्याचप्रमाणे अध्यात्म विश्‍वविद्यालयाची माहितीही या वेळी त्यांना सांगण्यात आली. या प्रसंगी हिंदु राष्ट्र का हवे ? हा ग्रंथ श्री. ठाकरे यांना भेट देण्यात आला. श्री. राज ठाकरे यांच्या पत्नी सौ. शर्मिला ठाकरे याही त्यांच्यासमवेत होत्या. सनातन संस्थेच्या सौ. सुहासिनी परब या वेळी उपस्थित होत्या.

जेएन्यूने योग आणि भारतीय संस्कृती यांच्या अभ्यासक्रमांचा प्रस्ताव दुसर्‍यांदा फेटाळला !

नास्तिकतावादी आणि हिंदुद्वेषी 
डाव्यांच्या कह्यात असणार्‍या जेएन्यूच्या 
व्यवस्थापनाकडून याहून दुसरे काय घडणार ?
       नवी देहली - येथील जेएनयू विद्यापिठात भारतीय संस्कृती आणि योग या विषयांवर अल्पकालिक अभ्यासक्रम चालू करण्याच्या योजनेचा प्रस्ताव दुसर्‍यांदा फेटाळण्यात आला आहे. गेल्या वर्षीही हा प्रस्ताव फेटाळण्यात आला होता. विद्यापिठांमधून भारतीय संस्कृती आणि भारतीय पुरातन ठेवा पुढच्या पिढीपर्यंत पोचवण्यासाठी ते शिकवण्याच्या मागणीवरून हा प्रस्ताव आला होता. विद्यापिठाच्या वैधानिक निर्णय घेणार्‍या अकादमिक परिषदेने नोव्हेंबर मासात (महिन्यात) तो फेटाळला होता. त्यावर पुनर्विचार करण्याची मागणी केल्यावर तो पुन्हा आणण्यात आला; मात्र त्यानंतरही तो फेटाळण्यात आला. या प्रस्तावात हिंदूंच्या धार्मिक ग्रंथांचे प्रकाशन करणार्‍या गोरखपूरच्या गीता प्रेसचे रामायण, श्रीमद् भगवतगीता, तसेच अन्य ग्रंथ शिकवण्याची सूचना करण्यात आली होती.

इंद्रेश्‍वर आणि सिद्धेश्‍वर मंदिरांलगतच्या सार्वजनिक स्वच्छतागृहांमुळे मंदिरांचे पावित्र्य धोक्यात !

 • इंदापूर नगरपरिषद आणि सिद्धेश्‍वर मंदिर ट्रस्ट यांच्याकडून हिंदूंच्या भावना पायदळी 
 • सार्वजनिक स्वच्छतागृहे तातडीने अन्यत्र हलवण्याची धर्माभिमानी हिंदूंची मागणी !
       इंदापूर (जिल्हा पुणे), ११ ऑक्टोबर - इंदापूर शहराचे ग्रामदैवत असणारे इंद्रेश्‍वर देवतेचे मंदिर, तसेच सिद्धेश्‍वर मंदिर यांच्या भितींना लागूनच सार्वजनिक स्वच्छतागृहे उभी केली आहेत. विशेष म्हणजे सिद्धेश्‍वर मंदिर ट्रस्ट आणि नगरपरिषद यांनीच ही सार्वजनिक स्वच्छतागृहे उभारली आहेत. (मंदिरालागूनच स्वच्छतागृहांची उभारणी होणे, हा हिंदूंच्या धर्मशिक्षणाविषयी असलेल्या अज्ञानाचा परिणाम ! मंदिर हे केवळ दगडी बांधकाम नसून मंदिरे ही चैतन्याचे स्रोत आहेत. अशा मंदिरांचे पावित्र्य जपणे, हे सर्व हिंदूंचे कर्तव्य आहे. अशा वेळी पावित्र्य जपणे तर सोडाच, उलट देवळाचा पावित्र्यभंग करणार्‍या जन्महिंदूंवर देवतेची कधीतरी कृपा होईल का ? - संपादक)

येमेनमध्ये अमेरिकेच्या नौदलाच्या युद्धनौकेवर आक्रमण !

       वॉशिंग्टन - हैतीच्या बंडखोरांनी येमेन येथील समुद्रकिनार्‍याजवळ २ क्षेपणास्त्रांद्वारे अमेरिकेच्या नौदलाच्या युद्धनौकेवर आक्रमण केले; मात्र ती क्षेपणास्त्रे युद्धनौकेवर पडण्याऐवजी समुद्रात पडली. वर्ष २०१४ पासून येमेनमध्ये चालू असलेल्या युद्धामुळे तेथे अराजक निर्माण झाले आहे. ८ ऑक्टोबरला बंडखोरांनी एका अंत्ययात्रेवर आक्रमण करून १४० जणांना ठार केले होते.

हाफिज सईद आणि सलाउद्दीन यांना पाक सैन्याचे संरक्षण !

       नवी देहली - लष्कर-ए-तोयबाचा प्रमुख हाफिज सईद आणि आतंकवादी सलाउद्दीन यांना पाकच्या सैन्याने लहोर येथे त्याच्या संरक्षणात ठेवले आहे.

राज्यात एकूण ४ सहस्र ४१३ डेंग्यूच्या रुग्णांची नोंद

धर्माचरणाच्या अभावी वाढत असलेले रोगराईचे प्राबल्य !
पुण्यात सर्वाधिक रुग्ण चिकनगुनियाचे
     पुणे, ११ ऑक्टोबर - राज्यात एकूण ४ सहस्र ४१३ डेंग्यूच्या रुग्णांची नोंद झाली असून ग्रामीण भागात १ सहस्र ३७५ रुग्ण आढळून आले. राज्यात चिकनगुनियाचे सर्वाधिक ९७५ रुग्ण पुणे जिल्ह्यात आढळले असून पुणे शहरात सप्टेंबरपर्यंत चिकनगुनियाचे ७०९ रुग्ण आढळले आहेत, अशी माहिती राज्याच्या सहसंचालक डॉ. कांचन जगताप यांनी दिलेल्या आकडेवारीनुसार स्पष्ट झाले आहे. (केंद्र आणि राज्य सरकार स्वच्छ भारत अभियान राबवत असून असे का होत आहे ? - संपादक) मुंबईत डेंग्यूचे ६९२, नाशिकमध्ये ६४०, तर पुण्यात ४०८, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये २५३ रुग्ण आढळले आहेत. या आजारांच्या नियंत्रणासाठी रक्त नमुन्यांच्या विनामूल्य तपासण्या, उद्रेकाच्या ठिकाणी शीघ्र प्रतिसाद पथके, धूरफवारणी अशा उपाययोजना केल्या जात आहेत.

नागपूर येथे नवरात्रोत्सवानिमित्त निवेदन !

कार्यकर्त्याकडून निवेदन स्वीकारतांना उपजिल्हाधिकारी
      नागपूर - येथे आदर्श नवरात्रोत्सव साजरा व्हावा, यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने उपजिल्हाधिकारी श्री. राव यांना निवेदन देण्यात आले. या वेळी समितीचे श्री. अभिजीत पोलके आणि श्री. अतुल आर्वेन्ला उपस्थित होते.

सनातनचे साधक डॉ. प्रवीण कोळी यांना वैद्यकीय रत्न पुरस्कार प्रदान !

डॉ. प्रवीण कोळी (डावीकडे) यांना पुरस्कार 
प्रदान करतांना श्री. दादा इदाते (उजवीकडे), 
तसेच अन्य मान्यवर...
     बावची-वाळवा (जिल्हा सांगली), ११ ऑक्टोबर (वार्ता.) - येथील सनातन संस्थेचे साधक डॉ. प्रवीण कोळी यांना महाराष्ट्र पत्रकार संघाचा राज्यस्तरीय वैद्यकीय रत्न हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार गणपतीपुळे (रत्नागिरी) येथील श्री महालक्ष्मी कार्यालयात राष्ट्रीय विमुक्त भटक्या जाती आणि जमाती आयोगाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. दादा इदाते यांच्या हस्ते देण्यात आला. सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. 
    या वेळी अकलूज येथील आमदार श्री. रामहरी रूपनवर, कोकण विभागीय बोर्डाच्या अध्यक्षा डॉ. शकुंतला काळे, शिक्षण मित्र श्री. केदार जोशी, मुंबई उच्च न्यायालयाचे अधिवक्ता प्रकाश साळशिंगीकर, पुणे येथील डॉ. अरुण धावत, श्री. संजय सोनवणे, महाराष्ट्र पत्रकार संघाचे राज्यध्यक्ष श्री. विलासराव कोळेकर, उपाध्यक्ष श्री. सागर पाटील यांसह अन्य उपस्थित होते.हिंदु जनजागृती समितीच्या प्रसारकार्याचा पश्‍चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांचा सप्टेंबर २०१६ मधील आढावा !

सद्गुरु (कु.) स्वाती खाडये

     १० ऑक्टोबरच्या दैनिक सनातन प्रभातमध्ये पुणे जिल्हा आणि पश्‍चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्याचा आढावा प्रसिद्ध करण्यात आला. आता उर्वरित जिल्ह्यांचा आढावा देत आहोत. 
३. जिल्हा - सातारा 
३ अ. गणेशोत्सवातील अपप्रकार 
रोखण्यासाठी व्यापक प्रसार !
     शहरात एकूण १६८ गणेश मंडळांना संपर्क करण्यात आले. ४० मंडळांनी सनातन-निर्मित सात्त्विक उत्पादने घेतली. एकूण ४० ठिकाणी प्रवचने करण्यात आली. ३६ ठिकाणी फलक लेखन केले. २२ कुंभारांना सात्त्विक वस्तू घेण्यासाठी संपर्क केले. गणेशोत्सवाच्या अनुषंगाने १८ निवेदने देण्यात आली.

पापस्थानचा कौमी तराना !

      कौमी तराना म्हणजे राष्ट्रगीत. पापस्थानच्या (पाकिस्तानच्या) राष्ट्रगीताचे बोल आहेत पाक सरजमीं शाद बाद. हाफीज जलंदरी नामक शायराने लिहिलेले हे गीत १ मार्च १९५० पासून पापस्थानचे राष्ट्रगीत आहे. मग वर्ष १९४७ ते १९५० या ३ वर्षांत या देशाकडे राष्ट्रगीत नव्हतं का ? उत्तर आहे होतं. त्यांचे बोल होते ए सरजमीन-ए-पाक. मग हे गीत का बरं बदलण्यात आलं ? कारण जरी स्वतः बॅ. महंमद अली जिनांच्या विनंतीनुसार या गीताची रचना करण्यात आली असली, तरी या गीताचा रचयिता हा एक हिंदु होता ! प्रा. जगन्नाथ आझाद हे त्यांचं नाव. एका मुस्लिम देशाचा कौमी तराना काफराने लिहिलेला कसा काय असू शकतो; याहून मोठी शरमेची बाब नाही, असे वाटल्याने हा बदल करण्यात आला. त्याहून मजेची गोष्ट म्हणजे या देशात राष्ट्रगीत लिहावे म्हणून दक्षिण आफ्रिकेत स्थायिक झालेल्या एका मुसलमान व्यापार्‍याने पैसे देऊन बक्षीस जाहीर केलं होतं. म्हणजे राष्ट्रगीताच्या निर्मितीसाठीसुद्धा या भिकारड्या देशाला बाहेरून पैसे घ्यावे लागले !!

आतंकवाद आणि लैंगिक शोषण : पाकिस्तानी मुलांची समस्या !

भारत आणि पाकिस्तान एकाच वेळी स्वतंत्र झाले; मात्र भारत जगाचे उद्याचे 
आशास्थान म्हणून समोर येत आहे, तर पाकिस्तान जगाच्या दृष्टीने डोकेदुखी बनला आहे !
     आपण जेव्हा पाकिस्तानचा विचार करतो, तेव्हा आपल्यासमोर केवळ आतंकवाद समोर येतो. तेथे आतंकवाद एक मोठी समस्या बनली आहेच; परंतु तेेथील लहान मुलांसमोर एक भीषण समस्या आहे ती म्हणजे त्यांचे होणारे लैंगिक शोषण ! त्यामुळे भारताच्या कुरापती काढण्यापेक्षा पाकने स्वत:च्या घरात डोकावून पाहिले पाहिजे.
      एका संशोधनानुसार पाकिस्तानमध्ये वर्ष २००१ पासून आतापर्यंत ५० सहस्रांहून अधिक लोक आतंकवादाचे बळी ठरले आहेत. यात अधिकांश मुलांचा समावेश आहे.

अमृतत्वाची प्राप्ती होण्यासाठी संपत्ती नाकारून ज्ञान मागणारी याज्ञवल्क्यऋषींची आदर्श पत्नी मैत्रेयी !

     बृहदारण्यक उपनिषदात अशी कथा आहे की, याज्ञवल्क्यऋषींनी संन्यास घेण्याचा निश्‍चय केला. त्यांना दोन पत्नी होत्या. त्यांची नावे मैत्रेयी आणि कात्यायनी. त्या वेळी याज्ञवल्क्यऋषी आणि मैत्रेयी यांच्यामध्ये पुढील संवाद झाला.
याज्ञवल्क्यऋषी : माझी संपत्ती मी तुम्हा दोघींना विभागून देणार आहे.
मैत्रेयी : तुम्ही जी संपत्ती देणार आहात, त्या संपत्तीमुळे मला अमृतत्वाची प्राप्ती होईल का ?
याज्ञवल्क्यऋषी : संपत्तीमुळे अमृतत्वाची प्राप्ती होत नाही. माणूस ऐष-आरामात राहू शकतो, एवढेच !
मैत्रेयी : ज्या संपत्तीमुळे अमृतत्वाची प्राप्ती होत नाही, ती संपत्ती घेऊन मी काय करू ? मला संपत्ती नको, मला ज्ञान द्या !
     हे तिचे बोलणे ऐकून याज्ञवक्ल्यांना फार संतोष झाला.
(संदर्भ : शांतिकुटीर संदेश, सप्टेंबर १९९९)

शिष्याने नेहमी मांडी घालून ताठ बसून अभ्यास करावा ! - समर्थ रामदासस्वामी

       एकदा एक महंत पलंगावर पालथे पडून दासबोध हा ग्रंथ वाचत होते. ग्रंथाचा अभ्यास पडल्या-पडल्या केलेला समर्थांना चालत नसे. त्यांचा शिष्याने मांडी घालून ताठ बसावे आणि अभ्यास करावा, असा दंडक होता. पालथे पडून दासबोध वाचणार्‍या त्या महंतांना संत वेणाबाईंनी साष्टांग नमस्कार घातला. त्या वेळी ते महंत थोडे ओशाळले. संत वेणाबाई म्हणाल्या, मी तुम्हाला नमस्कार केला नाही. आपल्याला गुरुस्थानी असलेल्या दासबोध या ग्रंथाला नमस्कार केला. तेवढ्यात समर्थ आले आणि त्या महंतांना म्हणाले, आपण मंचकावरी लोळावे आणि सरस्वतीने आपणावरी वोळावे (आपल्याशी बोलावे) । एवढी सरस्वती स्वस्त नाही. नीट अभ्यास करायचा नसेल, तर मठात थांबू नये. 
       अलीकडे दूरचित्रवाणी (टी.व्ही.) पहात अभ्यास करणार्‍या मुलांनी या घटनेपासून धडा शिकावा आणि अभ्यास नीट करावा. 
(साप्ताहिक जय हनुमान, ८.३.२०१४)

धर्मांध युवकाकडून हिंदु मुलीचा विनयभंग आणि भावाला गंभीर मारहाण !

हिंदूंनो, किती दिवस तुमच्या कन्या आणि भगिनी यांना अशा प्रकारे लज्जित होण्याची वेळ आणणार आणि किती दिवस धर्मांधाच्या हातचा मार खात रहाणार, ते एकदाचे ठरवून टाका !
'लव्ह जिहाद' कुठे आहे म्हणणार्‍यांना अजून किती पुरावे हवेत ? 
अडवाद (जिल्हा जळगाव) येथे 'लव्ह जिहाद' चालूच ! 
     अडावद (जिल्हा जळगाव) - येथे एका हिंदु मुलीचा विनयभंग करून एका धर्मांध युवकाने तिच्या भावाला गंभीर मारहाण केल्याची घटना ९ ऑक्टोबरला रात्री घडली. पोक्सा कलमाखाली आरोपीला अटक करण्यात आली आहे. 
     वडती येथील एका हिंदु युवतीचा (वय १७) जुबेद पिंजारी (वय १९) हा धर्मांध युवक २ महिन्यांपासून पाठलाग करून तिला त्रास देत होता आणि तिचा भ्रमणध्वनी मागत होता. ९ ऑक्टोबरला रात्री १० वाजता ही युवती तिच्या चुलत बहिणीसोबत घरी पायी जातांना वडती येथील मारुतीच्या मंदिराच्या समोरील चौकात धर्मांध जुबेद याने तिचा हात धरला आणि "माझे तुझ्यावर प्रेम आहे. मी तुला किती वेळा भ्रमणध्वनी क्रमांक मागितला. तू मला भ्रमणध्वनी क्रमांक का देत नाहीस ? तू आता माझ्यासोबत चल", असे म्हणून तिचा विनयभंग केला. 

मुंबईतील शासकीय विधी विद्यालयाचे संकेतस्थळ पाक सायबरकडून हॅक !

पाकला कायमचा धडा शिकवण्यासाठी केंद्र शासनाने पाऊल न उचलल्यास अशा घटना वाढत जातील ! 
मुंबई - आशियातील सर्वात जुन्या मुंबईतील चर्चगेट येथील प्रसिद्ध शासकीय विधी महाविद्यालयाचे संकेतस्थळ पाकिस्तानी सायबर पायरट्सनी 'हॅक' केले आहे. भारताने पाकव्याप्त काश्मीरमध्ये केलेल्या 'सर्जिकल स्ट्राईक'चे हे प्रत्युत्तर असल्याचे हॅकर्सनी या लिखाणात म्हटले आहे. विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सामाजिक संकेतस्थळावर तातडीने या संदर्भातील माहिती दिली आहे. कृपया महाविद्यालयाच्या संकेतस्थळाला भेट देऊ नका, अन्यथा तुमचा आयपी पत्ता आणि वैयक्तिक माहिती यांना धोका असू शकतो, असे आवाहनही या विद्यार्थ्यांनी केले आहे.

काँग्रेसचे दोन नेते एकमेकांविरुद्ध कसे बोलतात ?

अ. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना युद्धाची खुमखुमी असून हे दोघेही युद्धपिपासू आहेत. 
- दिग्विजय सिंह, काँग्रेस नेते 
आ. काँग्रेसच्या नेतृत्वाखालील दुसर्‍या आघाडी सरकारच्या काळात म्हणजे जानेवारी २०१३ मध्ये भारतीय सैन्याने नियंत्रणरेषा पार करून सर्जिकल स्ट्राईक केले होते; परंतु त्या वेळच्या सरकारने यात गोपनीयता राखत ही गोष्ट सार्वजनिक न करण्याचा निर्णय घेतला होता. 
- माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिंदबरम्

अंनिसवाल्यांचा बुद्धीप्रामाण्यवादावर विश्‍वास असल्याने त्यांनी बुद्धीचा वापर करून आर्थिक घोटाळे केले. त्याचे फळ काय मिळते, हे त्यांना कळेल आणि भोगावे लागेल !

     सातारा येथील सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयाच्या अधीक्षकांनी चौकशी अहवाल सादर करून अंनिसच्या न्यासामधील आर्थिक घोटाळ्यांच्या आरोपांमध्ये तथ्य असल्याचे नमूद केले आहे. एवढेच नाही, तर 'महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या न्यासावर प्रशासक नेमावा, त्याचे विशेष लेखापरीक्षण (स्पेशल ऑडिट) करावे, तसेच न्यासावरील गंभीर आरोपांची मोघम चौकशी केल्याने पुन्हा फेरचौकशी करावी,' असे गंभीर ताशेरेही ओढले आहेत. यातून अंनिस आणि डॉ. दाभोलकर यांचा भोंदूपणा उघडा पडला. अंनिसच्या वतीने वैज्ञानिक जाणिवा उपक्रमाच्या नावाखाली विद्यार्थ्यांकडून प्रत्येकी १०-१० रुपये गोळा करून लक्षावधी रुपये जमवले. विशेष म्हणजे असा उपक्रम शाळांमध्ये राबवणे हे धार्मिक भावना दुखावणारे आहे, असा शिक्षण विभागाचा आदेश असूनही विद्यार्थ्यांची आर्थिक फसवणूक करण्यात आली.

अंनिससारख्या पुरोगामी संघटना गांधी विचारांचीच री कशी ओढत आहेत, हे दर्शवणारा प्रसंग !

       हिंदु संस्कृतीत तुपाच्या दिव्याचे महत्त्व अनन्यसाधारण असेच आहे; परंतु गांधींनी या दिव्याला पाप म्हणून हिंदु संस्कृतीचा अवमानच केला आहे. त्यासंदर्भातील घटना पुढे देत आहे. 
     गांधी एका वाढदिवसाला सेवाग्राम (जिल्हा वर्धा) येथे उपस्थित होते. त्या दिवशी कस्तुरबा यांनी वाढदिवसानिमित्त तुपाचा दिवा लावला होता. गांधी त्या दिव्याकडे पाहून म्हणाले, तुपाचा दिवा लावला नसता, तरी काहीच फरक पडला नसता. आसपासच्या लोकांकडे खाण्यासाठी शिळा तुकडाही नाही. त्यामुळे दिव्यासाठी तूप जाळणे हे (दिवा लावणे हे पाप आहे.) पाप आहे. 
       अशाच अज्ञानापोटी भारतियांच्या हिंदूंच्या धार्मिक भावना (श्रद्धा) दुखावण्याचे काम नेहरू, गांधी यांनी केल्याने नागरिकांत त्यांच्याविषयीचा आदर दिवसेंदिवस अल्प होतांना दिसत आहे. 
- श्री. श्रीकांत भट, अकोला

(म्हणे) 'मी आतंकवादाची निंदाच करते' !

उरी आक्रमणाचा निषेध न करणार्‍या महिराने हे पाकला सांगावे ! 
     मुंबई - मी आतंकवादाची निंदाच करते. मग तो कोणत्याही भूमीवर झालेला असून देत. मी रक्तपात आणि युद्ध या गोष्टींनी आनंदित होत नाही. मी अशा एका जगाचे स्वप्न पहात आहे, जिथे माझी मुले आतंकवादाशिवाय राहू शकतील. या वेळीही माझा विश्‍वास चांगूलपणावर कायम आहे, अशी प्रतिक्रिया देण्याची उपरती आज उरी आक्रमणानंतर एवढ्या दिवसानंतर पाक कलाकार महिरा हिला झाली आहे. 
      माहिराची शाहरुख खान याच्यासोबत रईस या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका आहे. या चित्रपटातून माहिराची व्यक्तिरेखा काढून टाका, मगच या चित्रपटाला प्रदर्शनाची मान्यता देऊ अशी मनसेची भूमिका आहे. या पार्श्‍वभूमीवर महिराने ही प्रतिक्रिया दिली आहे.

पाक कलाकारांना काम देऊ नका, अन्यथा मार खाण्यास तयार रहा ! - मनसेचे अमित खोपकर यांची चेतावणी

शत्रूराष्ट्रासमवेत युद्ध चालू असतांना त्यांच्या कलाकारांना घेऊ नका, हे मनसेला का सांगावे लागते ? चित्रपटक्षेत्रात कार्यरत असणार्‍या अशा राष्ट्रभेदी व्यक्तीही देशाच्या तेवढ्याच शत्रू नव्हेत का ? 
     मुंबई - पाकच्या कोणत्याही कलाकारांना काम देऊ नका, अन्यथा मार खाण्यास तयार रहा, अशी चेतावणी अमेय खोपकर यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमेय खोपकर यांनी पाक कलाकारांची बाजू घेणारे महेश भट्ट आणि करण जोहर यांना दिली आहे. खोपकर यांनी म्हटले आहे की, पाकिस्तानी कलाकारांना विरोध करणार्‍या आमच्या भूमिकेवर मी ठाम आहे. पाक कलाकारांना कायम विरोध करत राहीन. 'ऐ दिल है मुश्किल' आणि 'रईस' हे चित्रपट महाराष्ट्रात प्रदर्शित झाल्यास त्याला विरोध करून हे चित्रपट प्रदर्शित करू देणार नाही. चित्रपट प्रदर्शित करण्याचा प्रयत्न केल्यास आम्ही आमच्या भाषेत त्याला उत्तर देऊ. कार्यकर्ते कारागृहात गेले तरी चालतील. मात्र साम, दाम, दंड, भेद या आयुधांचा वापर करून हे दोन्ही चित्रपट प्रदर्शित करण्यापासून थांबवू. (असे राष्ट्रप्रेम किती पक्षांत आहे ? - संपादक) 

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने दुर्गामाता दौडीचे स्वागत !

 धर्मध्वजाचे पूजन करतांना सौ. मंगल नरके
पुणे, ११ ऑक्टोबर (वार्ता.) - हिंदु जनजागृती समितीच्या वतीने भोसरी येथील येथे दुर्गामाता दौडीचे स्वागत करण्यात आले. या वेळी समितीच्या सौ. मंगल नरके यांनी धर्मध्वजाचे पूजन केले. त्यानंतर धर्मध्वजाला पुष्पहार अर्पण करण्यात आला. 

सप्तश्रृंगी नवरात्र तरुण मंडळाकडून सायकल स्पर्धेतील विजेत्यांना सनातन संस्थेने प्रकाशित केलेल्या भवानीदेवीचे चित्र भेट देण्याचे आवाहन !

     मंगळवेढा (जिल्हा सोलापूर) - येथील सप्तश्रृंंगी नवरात्र तरुण मंडळाच्या वतीने प्रा. कलुबर्गी यांनी सनातनने प्रकाशित केलेल्या भवानीदेवीच्या ५० चित्रांची मागणी केली होती. साधक त्यांना चित्रे देण्यासाठी मंडळात गेल्यावर तेथे सायकल स्पर्धा चालू होत्या. त्या वेळी प्रा. कलुबर्गे यांनी सायकल स्पर्धेत विजेता ठरणार्‍यांना देवीचे चित्र देण्यात येईल, असे ध्वनीक्षेपकावरून घोषित केले.
     हिंदूंनी हिंदुत्व हा आपला प्राण कुडीतून बाहेर काढून ठेवला आणि ते जिवंतपणाच्या हालचाली करू लागले; परिणामी हिंदूंचा सांगाडा झाला आहे. 
- श्री. अरविंद विठ्ठल कुळकर्णी, ज्येष्ठ पत्रकार, मुंबई.       हिंदूंमध्ये केवळ अस्तित्व आणि जाणीव उरली आहे; पण जागृती नसल्याने हिंदु धर्मावर निरंतर आक्रमणे होत आहेत. 
- श्री श्री गुरुनागभूषण शिवाचार्य महास्वामी, कर्नाटक
     आपण हिंदु एकत्र येतो; पण एक होत नाही. आतातरी एक होेऊया !
- श्री. आनंद मयेकर, अध्यक्ष, ब्रह्मानंद तरुणाई
     हिंदु धर्मातील संस्कृती जपण्याचे कार्य सनातन संस्था करत आहे. तिच्या पाठीशी सर्वांनी उभे रहावे. गोवर्धन पर्वत हिंदूंचा आहे आणि त्या पर्वताला प्रत्येकाने काठी लावण्याची आवश्यकता आहे ! 
- पू. मोहनबुवा रामदासी, सज्जनगड
     उत्तर प्रदेशसारख्या राज्यात इस्लामी राजवट यादवांनी चालू केली आहे, ती उलथवून तेथे प्रखर हिंदुत्ववादी राज्य यायला पाहिजे; पण असे प्रखर हिंदुत्ववादी आज उरले आहेत का ? 
- श्री. उद्धव ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख आणि संपादक, सामना

महर्षींनी सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांना कथन केलेली त्यांच्याविषयीची वैशिष्ट्यपूर्ण माहिती

महर्षींची शिकवण आणि कार्य !
सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ
१. महर्षींचा आशीर्वाद
      पुढेही तुमच्या माध्यमातून देवच प्रवास करणार आहे ! : महर्षि सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांना म्हणतात, मी हे लिहिले आहे; कारण तुमच्याकडे ती शक्ती आहे. आतापर्यंत देवानेच तुम्हाला शक्ती दिली. पुढेही तुमच्या माध्यमातून देवच हा प्रवास करणार आहे. दैवी शक्ती असलेल्या तुम्हाला देवाने साहाय्य करणे, म्हणजे देवानेच देवाला साहाय्य करण्यासारखे आहे.
२. जन्मस्थानाची सांगितलेली वैशिष्ट्ये !
     परम गुरुजींचा आणि तुमचा जन्म सूर्यदशेत झाला आहे. (हो. सद्गुरु (सौ.) काकूंच्या जन्माच्या वेळी रवि महादशा असून त्यात राहूची अंतर्दशाही होती. - सौ. प्राजक्ता जोशी) त्यानंतर जन्माच्या एका ठराविक वाटचालीत काही कालावधीसाठी गुरुदशाही होती. ( हो. रवि महादशेतील गुरु अंतर्दशा २७.९.१९७१ या दिवसापासून १५.७.१९७२ या कालावधीत होती. - सौ. प्राजक्ता जोशी) सांगली येथे श्री दत्तात्रेयाच्या स्थानाजवळ तुमचा जन्म झाला. तुमच्या जन्माच्या वेळी उजाडताच दत्तजयंती होती. (हो. सांगलीच्या जवळ श्री आैंदुबर, श्री क्षेत्र नरसोबाची वाडी, शिरोळ ही पवित्र दत्तक्षेत्रे आहेत. येथे श्री दत्तात्रेयाचे दुसरे अवतार श्री नृसिंह सरस्वती यांनी १२ वर्षे राहून तपःश्‍चर्या केली होती. - (सद्गुरु) सौ. अंजली गाडगीळ) तुमचा जन्म झाला, त्या ठिकाणाजवळ श्‍वेत गणपतीचे एक मंदीर आहे.

याची आतापर्यंत सत्तेत असणार्‍या एकाही राजकीय पक्षाला लाज वाटणार नाही, हे लक्षात घ्या !

      केंद्र सरकारने काळा पैसा बाहेर काढण्यासाठी घोषित केलेल्या उत्पन्न प्रकटीकरण योजनेची मुदत संपत असतांना ३० सप्टेंबरच्या रात्री ८ वाजेपर्यंत सुमारे ६५ सहस्र कोटी रुपयांचा काळा पैसा करदात्यांनी घोषित केल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. काळा पैसा बाहेर काढण्यास सरकारने ही योजना घोषित केली होती. बेनामी उत्पन्नावर ४५ टक्के कर भरून उत्पन्न नियमित करून घेण्याची सोय यात होती.

३० वर्षे जुन्या हत्यारांनी सैनिकांनी केले सर्जिकल स्ट्राईक !

सुरक्षेच्या संदर्भात अशी हेळसांड करणारे सरकार आणि प्रशासन लोकशाही निरर्थक ठरवतात !
     नवी देहली - भारतीय सैनिकांनी पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून केलेल्या सर्जिकल स्ट्राईकसाठी ३० वर्षे जुन्या शस्त्रांचा वापर करण्यात आल्याचे समोर आले आहे. २०१५ मध्ये ही शस्त्रे पालटण्याचा आदेश संरक्षणमंत्र्यांनी दिला होता; मात्र त्यात झालेल्या दिरंगाईमुळे ती अद्याप पालटलेली नाहीत. यासाठी १८० कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. सध्या सैन्याला १२ सहस्र पॅराशूटची आवश्यकता असतांना केवळ ४०० पॅराशूट आहेत.

समाजकंटकांचे सनातन आश्रमावरील आक्रमणांचे घृणास्पद कृत्य चालूच !

शिवीगाळ करणे, धमक्या देणे, अश्‍लील बोलणे आणि दगडफेक करणे या गोष्टी दखलपात्र ठरवणारे दंडविधान हिंदु राष्ट्रात असेल !
     सनातनच्या रामनाथी आश्रमातील साधकांना धमक्या देण्याचा, अश्‍लील बोलण्याचा आणि आश्रमावर दगड फेकण्यास आरंभ केल्याचा कालचा ६ वर्षे ३२० वा दिवस ! 
१०.१०.२०१६
 •  रात्री ८.४० वाजता आश्रमासमोरून दुचाकीवरून जाणारे दोघेजण बॉम्ब, असे ओरडत गेले. 
 • रात्री १०.३० वाजता आश्रमासमोरून चारचाकीतून जातांना एकजण ठो-ठो-ठो, असे ओरडला.

फलक प्रसिद्धीकरता

चीन आणि पाक सारख्या कुरापतखोर शत्रूंसमोर भारताने प्रत्येक क्षणी युद्धसज्ज असावे !
     भारत-पाकमधील वाढत्या तणावाच्या पार्श्‍वभूमीवर केंद्र सरकारने सैन्याला शस्त्र पुरवठा करणार्‍या आस्थापनांना शस्त्रांचे उत्पादन वाढवण्यासाठी सिद्ध रहाण्याची सूचना केली आहे, अशी माहिती एका इंग्रजी दैनिकाने सरकारमधील वरिष्ठ अधिकार्‍याच्या हवाल्याने दिली आहे.

हिंदू तेजा जाग रे !

Jago ! 
 sarkar ne yudhhakshastra nirmataonko utpadan badhane ke nirdesh diye. 
To ham Pak ko kada sabak kab sikhayenge ? 
जागो ! 
 सरकार ने युद्धकशस्त्र निर्माताआें को उत्पादन बढाने के निर्देश दिए । 
तो हम पाक को कडा सबक कब सिखाएंगे ?

बालसाधिका कु. आनास्तासिया वाले (वय ११ वर्षे) हिला आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती

कु. आनास्तासिया वाले
१. डोळे बंद करून नामजप करतांना प.पू. डॉक्टर दिसणे, त्यांनी श्रीकृष्णाच्या
भेटीसाठी द्वारकेला घेऊन जाणे, प.पू. डॉक्टरांना पाहून श्रीकृष्णाने
सिंहासनावरून उठून त्यावर त्यांना बसवणे आणि त्यांचे चरण धुणे
अन् ते भावपूर्ण दृश्य पाहून डोळ्यांत भावाश्रू येणे
     ११.११.२०१५ या दिवशी दुपारी मी नामजपाच्या खोलीत बसून डोळे बंद करून नामजप करत होते. त्या वेळी मला प.पू. डॉक्टर दिसले. ते माझी वाट पहात होते. ते मला म्हणाले, आपण श्रीकृष्णाला भेटण्यासाठी द्वारकेला जाऊया. ते ऐकून मला पुष्कळ आनंद झाला. आम्हाला एक मोठे सुवर्णद्वार दिसले. मी आणि प.पू. डॉक्टर आत गेलो. वाटेत आम्हाला अनेक साधिका उभ्या असलेल्या दिसल्या. त्या प.पू. डॉक्टरांवर पुष्पवृष्टी करत होत्या. आम्ही थोडे अंतर पुढे चालत गेल्यानंतर मला सिंहासनावर बसलेला श्रीकृष्ण दिसला. प.पू. डॉक्टरांना पाहिल्यानंतर श्रीकृष्णाने उठून त्यांना आपल्या सिंहासनावर बसवले. त्यानंतर श्रीकृष्णाने प.पू. डॉक्टरांचे चरण धुतले. हे भावपूर्ण दृश्य पाहून माझ्या डोळ्यांतून भावाश्रू ओघळू लागले. काय झाले ?, असे प.पू. डॉक्टरांनी मला विचारले, तेव्हा मला आनंद झाला आहे, असे मी त्यांना सांगितले. त्यावर प.पू. डॉक्टर म्हणाले, चांगले आहे. तुला श्रीकृष्णाचे प्रेम अनुभवता येत आहे.
२. नामजपाच्या वेळी बंद डोळ्यांसमोर ध्यानस्थ शिवाचे दर्शन होणे, काही वेळाने
शिवाने डोळे उघडून महाभारतातील गीता सांगणे, त्या वेळी शिव आणि साधिका 
यांच्यामध्ये एक मोठा दगड येऊन पडणेे अन् डोळे उघडल्यानंतर तो दगड
आध्यात्मिक त्रास असलेल्या साधकांनी फेकला असल्याचे लक्षात येणे
     ११.११.२०१५ या दिवशी रामनाथी आश्रमात सुदर्शनयाग झाला. याग झाल्यानंतर नामजपासाठी आम्ही काही साधक यज्ञाच्या ठिकाणी बसलो होतो. मी डोळे बंद केले असता मला ध्यानस्थ शिवाचे दर्शन झाले. मी शिवाने डोळे उघडण्याची वाट पहात होेते. मी पुन्हा माझे डोळे बंद केले. काही वेळाने (मिनिटांनी) मी डोळे उघडले. तेव्हा मला भगवान शिव माझ्याकडे पहात असल्याचे दिसले.

सनातनचे संत पू. भगवंतकुमार मेनराय यांना त्यांच्या ७.८.२०१६ या दिवशी झालेल्या वाढदिवसाच्या निमित्ताने दिलेल्या शुभेच्छापत्रातील कविता !

पू. भगवंतकुमार मेनराय
     संत ईश्‍वर का सगुण रूप होते हैं, उनकी गुण-विशेषताआें का वर्णन करना अज्ञानी जीवों के लिए कठिन है, इसकी अपेक्षा वे जो करते हैं और जो करने के लिए कहते हैं (नामजप), उसके विषयमें यह कविता भगवंत की कृपा हो, अज्ञानी जीवोंपर यह करबद्ध प्रार्थना है ।

है नामजप नहीं ये केवल, ये तो एक संग्राम है ।
दुःख, चिंता और निराशा के विचारों को देना अब विराम है ॥ १ ॥

है नामजप नहीं ये केवल, ये तो एक तपस्या है ।
कृपा होगी प्रभु की इस क्षण बस इतनीसी ही प्रतीक्षा है ॥ २ ॥

है नामजप नहीं ये केवल, ये तो एक कृतज्ञता है ।
मिला है कृपा का भंडार अर्जित करनी उसकी योग्यता है ॥ ३ ॥

है नामजप नहीं ये केवल, ये तो एक बलिदान है ।
राष्ट्र-धर्म सेवा में चिरस्मरणीय योगदान है ॥ ४ ॥

है नामजप नहीं ये केवल, समष्टि की पूंजी है ।
हिन्दू राष्ट्र-स्थापना की यह तो गुरुकुंजी है ॥ ५

जन्मभर प्राथमिक टप्प्याची साधना करूनही प्रगती न होण्याची कारणे

     बरेच जण सांगतात, मी अनेक वर्षे प्रतिदिन १ - २ घंटे पोथीवाचन करतो किंवा प्रतिदिन मंदिरात जाऊन प्रदक्षिणा घालतो. असे करणार्‍या बहुतेकांची साधनेत प्रगती झालेली आढळून येत नाही. याची कारणे पुढीलप्रमाणे आहेत.
१. वरील कृती करणे, हे साधनेतील बालवाडीतील शिक्षणाप्रमाणे आहे. आपण आयुष्यभर बालवाडीत जात नाही, तर पुढे पुढे शिकत जातो.
२. पोथीवाचन करण्यापेक्षा पोथीत काय सांगितले आहे, हे कृतीत आणणे साधनेत अपेक्षित असते; कारण साधना हे कृतीचे शास्त्र आहे. पोथीत सांगितलेले कृतीत आणले नाही, तर पोथीवाचन आध्यात्मिक स्तरावरचे न होता केवळ मानसिक स्तरावरचे होऊन मनात मी साधना करतो, असा भ्रम निर्माण होतो.
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले

रामनाथी आश्रमात झालेल्या नवार्ण मंत्र आणि सप्तशती हवनांचे कु. मधुरा भोसले यांनी हवनापूर्वी केलेले सूक्ष्म-परीक्षण

कु. मधुरा भोसले
      १ ते ६ ऑक्टोबर २०१६ या कालावधीत सनातनच्या रामनाथी आश्रमात नवार्ण मंत्राने हवन करण्यात आले. ११ ऑक्टोबर २०१६ या दिवशी सप्तशतीचे हवन करण्यात आले. या दोन्ही हवनांचे कु. मधुरा भोसले यांनी केलेले सूक्ष्म-परीक्षण येथे देत आहोत. 
 
१. १ ते ६ ऑक्टोबर या कालावधीत नवार्ण मंत्राने केलेल्या हवनाचे
आणि ११.१०.२०१६ या दिवशी केलेल्या सप्तशती हवनाचे सूक्ष्म-परीक्षण
 
२. आलेल्या अनुभूती
२ अ. नवार्ण हवनामध्ये काळ्या तिळांऐवजी फुलांची आहुती दिल्याचे जाणवणे : यामध्ये नवार्ण मंत्र म्हणत काळ्या तिळांची आहुती देण्यात आली. त्यानंतर नवग्रह आणि योगिनी यांच्यासाठी आहुती देण्यात आल्या. तेव्हा मला सूक्ष्मातून यज्ञकुंडामध्ये कमळ आदी गडद रंगाच्या फुलांची आहुती दिल्याचे जाणवत होते. नवार्ण मंत्रातून तारक-मारक स्वरूपाच्या शक्तीचे प्रक्षेपण होतांना जाणवले, तर नवग्रहाच्या संदर्भातील मंत्र म्हणत असतांना मारक शक्ती जाणवली.

देवों के देव महादेव या शिवाविषयीच्या मालिकेतील भगवान शिव आणि असुर लोहितांग यांच्यातील संगीतयुद्ध अन् संगीतातून उत्पन्न होणार्‍या नादलहरींविषयी मिळालेले ज्ञान !

श्री. राम होनप
१. धार्मिक मालिकांचा आध्यात्मिक दृष्टीकोनातून अभ्यास केल्यास
त्यातून स्थूल आणि सूक्ष्म जगताच्या विविध पैलूंचे ज्ञान होणे
     एका खाजगी वाहिनीवरील देवों के देव महादेव या भगवान शिवाविषयीच्या मालिकेतील भाग क्रमांक ७९४ आणि ७९५ मध्ये भगवान शिव आणि असुर लोहितांग यांच्यातील संगीतयुद्ध दाखवण्यात आले आहे. दूरचित्रवाणीवर अनेक धार्मिक मालिका असतात. त्याकडे केवळ कथा म्हणून न पहाता त्याचा आध्यात्मिक दृष्टीकोनातून अभ्यास केल्यास त्यातून स्थूल आणि सूक्ष्म जगताच्या विविध पैलूंचे ज्ञान होऊन अध्यात्म आणि देव यांच्या वरील श्रद्धा दृढ होण्यास साहाय्य होते. या दृष्टीने मालिकेतील या दोन भागांचा केलेला अभ्यास येथे देत आहे.
२. मालिकेतील संगीतयुद्धविषयक भागांची पार्श्‍वभूमी
     एकदा भगवान शिव आणि पार्वती तांडवनृत्य करतांना शिवाच्या घामाचे थेंब पृथ्वीवर पडतात. या थेंबातून एका जिवाची निर्मिती होते. तो जीव म्हणजे असुर लोहितांग होय. काही कारणास्तव त्याच्या मनात शिवाविषयी पुष्कळ क्रोध निर्माण होतो. त्यामुळे शिवाला संमोहनाद्वारे ठार मारून त्याचे स्थान लोहितांगला प्राप्त करायचे असते. त्यासाठी तो संगीतयुद्धाचा मार्ग निवडतो.
३. मालिकेतील संगीतयुद्धविषयक भागांची काही आध्यात्मिक वैशिष्ट्ये
३ अ. असुरांनी वाद्ये वाजवून संगीत युद्धास प्रारंभ केल्यावर देवांनी स्वतःकडील वाद्ये वाजवून असुरांना प्रत्युत्तर देणे : युद्धाच्या प्रारंभी लोहितांग आणि त्याची आसुरी सेना शिवाशी संगीतयुद्ध करण्यासाठी विविध वाद्ये वाजवू लागतात. या युद्धाला प्रत्युत्तर देण्याकरिता भगवान शिवासमवेत असलेले नारद, सरस्वति, गणपति आणि अन्य देव त्यांच्याकडील वाद्ये वाजवतात.
३ आ. देव आणि असुर यांच्याकडील वाद्यांतून उत्पन्न होणार्‍या नादलहरींचे आकाशमंडलात युद्ध चालू होणे : लोहितांग आणि त्याची आसुरी सेना वाद्ये वाजवतांना त्यातून विशिष्ट प्रकारच्या नादलहरी बाहेर पडतात. त्याचप्रमाणे देवांकडील वाद्यांतूनही विविध प्रकारच्या नादलहरी बाहेर पडतात. देव आणि असुर यांच्याकडील वाद्यांतून उत्पन्न होणार्‍या नादलहरींचे आकाशमंडलात युद्ध चालू होते.
३ इ. देव आणि असुर यांच्यातील संगीतयुद्धातून उत्पन्न होणार्‍या नादलहरींचा परिणाम पृथ्वीवर होणे : देव आणि असुर यांच्या वाद्यांतून उत्पन्न होणार्‍या नादलहरींचे युद्ध अधिकाधिक तीव्र होत जाते. कैलास पर्वतावर चालू असलेल्या देव आणि असुर यांच्यातील संगीतयुद्धातून उत्पन्न होणार्‍या नादलहरींचा परिणाम पृथ्वीवर होतो. त्यामुळे पृथ्वीवर अग्नीवर्षाव होणे, भूकंप येणे इत्यादी नैसर्गिक आपत्ती निर्माण होतात.
३ ई. असुरांचे संगीत ऐकून भगवान शिव तांडवनृत्य करण्यास उद्युक्त होणे : असुरांचे संगीत ऐकून भगवान शिवही तांडवनृत्य करण्यास उद्युक्त होतो आणि भगवान शिवाच्या तांडवनृत्यास आरंभ होतो. या प्रसंगात संगीत ऐकून भगवान शिव तांडवनृत्यास उद्युक्त होणे, ही घटना संगीताचे महत्त्व विशद करते. नृत्याच्या वेळी भगवान शिवाभोवती निर्माण झालेली दैवी प्रभावळ मालिकेत दाखवण्यात आली आहे.
३ उ. भगवान शिवाने डमरूच्या नादाने संगीतयुद्धात पृथ्वीची झालेली हानी भरून काढणे आणि डमरूच्या नादाने लोहितांग शिवाच्या आधीन होऊन त्याच्यातील असुरत्व नष्ट होणे : युद्धाच्या शेवटी भगवान शिव संगीतयुद्धात पृथ्वीची झालेली हानी डमरूच्या नादाने भरून काढतो. त्यामुळे पृथ्वी पूर्ववत होते. डमरूच्या नादाने लोहितांग शिवाच्या अधीन होऊन नृत्य करू लागतो. नृत्य करतांना लोहितांगमधील असुरत्व नष्ट होते. या प्रसंगात भगवान शिवाच्या सामर्थ्यासह डमरूच्या नादाचेही महत्त्व विशद होते.
३ ऊ. देव आणि असुर यांच्या वाद्यांतून उत्पन्न होणार्‍या नादलहरींचे युद्ध मालिकेद्वारे पहाता येत असल्याने कठीण विषय कळण्यास सुलभ होणे : देव आणि असुर यांच्या वाद्यांतून उत्पन्न होणार्‍या नादलहरींचे युद्ध यांविषयी एखाद्या ईश्‍वरी ज्ञानप्राप्तकर्त्या साधकाला ज्ञान मिळाले असते, तर ज्ञानातील तात्त्विक माहितीमुळे हा विषय कळायला कठीण गेला असता; परंतु या मालिकेद्वारे नादलहरींचे युद्ध दूरचित्रवाहिनीवर दाखवल्यामुळे हा विषय सर्वांना कळण्यासाठी सुलभ झाला आहे.
३ ए. वाद्यांतून निर्माण होणार्‍या सूक्ष्म नादलहरी आणि त्यांचे कार्य मालिकेतून दाखवण्याचा प्रयत्न कौतुकास्पद असणे : मालिकेतील या भागात देव आणि असुर यांच्या वाद्यातून उत्पन्न होणार्‍या नादलहरींचे गोल, उदबत्तीच्या धुराप्रमाणे असे विविध आकार दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. प्रत्यक्षातही सूक्ष्म नादलहरींना साधारणतः अशाच प्रकारचे विविध आकार आहेत. वाद्यांतून निर्माण होणार्‍या सूक्ष्म नादलहरी आणि त्यांचे कार्य मालिकेतून दाखवण्याचा प्रयत्न कौतुकास्पद आहे.
४. संगीतातून उत्पन्न होणार्‍या नादलहरींविषयी मिळालेले ज्ञान !
४ अ. शत्रूशी लढण्याचा प्रकार : शरीर, बुद्धी (डावपेचांद्वारे शत्रूला पराभूत करणे), शस्त्र आणि नाद म्हणजेच संगीत
४ आ. अणूपेक्षाही सूक्ष्म असलेल्या संगीतातून उत्पन्न होणार्‍या नादलहरींचा वातावरण आणि मनुष्य यांवर परिणाम होणे : ज्याप्रमाणे अणूबॉम्ब आकाराने लहान असला, तरी तो सहस्रो पटींनी सजीव आणि निर्जीव अशी दोंन्हींची हानी करतो; कारण अणू अधिकाधिक सूक्ष्म आहे. तो जेव्हा प्रगट होतो, तेव्हा तो अनेक पटींनी सृष्टीवर परिणाम करतो. अणूपेक्षाही संगीतातून उत्पन्न होणार्‍या नादलहरी अधिक सूक्ष्म असतात. त्यांचा वातावरण आणि मनुष्य यांवर सकारात्मक अथवा नकारात्मक परिणाम होतो.
४ आ १. सात्त्विक संगीताने उत्पन्न नादलहरींनी होणारा लाभ : सात्त्विक संगीताने मनःशांती लाभते, ताण न्यून होतो, तसेच मनाची एकाग्रता वाढते.
४ आ २. आसुरी संगीताचा प्रतिकूल परिणाम मनुष्य आणि निसर्ग यांवर होत असणे : हल्लीचे संगीत रज-तमप्रधान आणि पाश्‍चात्त्य संगीताच्या धर्तीवर आधारित आहे आणि सात्त्विक संगीत लोप पावत आहे. त्याचा पृथ्वीवर भयंकर परिणाम होत आहे. ज्याप्रमाणे असुर लोहितांगच्या संगीतातून प्रक्षेपित होणार्‍या नादलहरींचा परिणाम पृथ्वीवर झाला, त्याप्रमाणे आताही या आसुरी संगीताचा प्रतिकूल परिणाम मनुष्य आणि निसर्ग यांवर होत आहे
४ आ २ अ. मनुष्य : रज-तम प्रधान संगीताने मन चंचल होऊन मनोबल घटते. त्यामुळे शरिरात अशांतता निर्माण होऊन त्याचा मनुष्याच्या आरोग्यावर परिणाम होतो.
४ आ २ आ. निसर्ग : पिकांच्या उत्पन्नात घट होणे, निसर्गचक्रात पालट होऊन अतीवृष्टी किंवा अनावृष्टी होणे इत्यादी.
५. संगीतातील सूक्ष्मत्व परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी
जाणून सनातनमध्ये सात्त्विक संगिताची बीजे रोवणे
     संगीताचे हे सूक्ष्मत्व आणि त्याचे महत्त्व परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी जाणले असल्याने त्यांनी सनातनमध्ये संगिताच्या माध्यमातून साधना करणार्‍या साधकांना दिशा देऊन सात्त्विक संगीताची बीजे रोवली. त्यायोगे सात्त्विक संगीताची निर्मिती होऊन रज-तमप्रधान संगीताला प्रतिबंध होईल आणि संगीत-साधना करणार्‍या साधकाला त्यातून ईश्‍वरप्राप्तीचा मार्ग मिळेल.
     आता आपत्काळ असल्याने सनातनच्या संगीतकार्याला सध्या मर्यादा असल्या, तरीही (परात्पर गुरु) डॉ. आठवले यांनी आरंभलेल्या संगीतकार्याचे महत्त्व हिंदु राष्ट्रात सर्वांच्या लक्षात येईल.
- श्री. राम होनप, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (११.९.२०१६)

एस्.एस्.आर्.एफ्.च्या कार्यशाळेसाठी आलेल्या एका साधिकेला आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती

१. ध्यानमंदिरात असलेल्या छायाचित्रातील प.पू. भक्तराज महाराज
साधिकेकडे पाहून स्मित करत असल्याचे जाणवणे
     २६.७.२०१६ या दिवशी मी ध्यानमंदिरात नामजपासाठी गेले होते. तेथील प.पू. बाबांच्या (प.पू. भक्तराज महाराज यांच्या) छायाचित्राकडे पाहिल्यावर ते माझ्याकडे पाहून स्मित करत आहेत, असे मला जाणवले. त्यांचे छायाचित्र जिवंत झाले असून ते माझ्याशी बोलत आहेत, असे मला जाणवले. हे सर्व अद्भुत होते.
२. नामजप करतांना मी तुझ्याजवळच आहे, असे ईश्‍वर सांगत असल्याचे जाणवून
भाव जागृत होणे आणि प्रत्येकामध्ये ईश्‍वर दिसत असल्याचे अनुभवणे
     २८.७.२०१६ या दिवशी कार्यशाळेच्या सकाळच्या सत्रात सामूहिक प्रार्थना करत असतांना माझा भाव जागृत झाला. मी ईश्‍वराला प्रार्थना केली, माझ्यासमवेत रहा आणि मला तुझे अस्तित्व दाखव. मला प्रत्येकामध्ये तुला अनुभवता येऊ दे. त्यानंतर मी नामजप करत असतांना ईश्‍वर मला त्याच्या कवेत घेऊन कुरवाळत आहे, असे मला अनुभवायला आलेेे. मी तुझ्याजवळच आहे. तू केवळ पहा, मी तुला दिसेन, असे तो सांगत असल्याचे मला जाणवले. त्यामुळे माझा भाव जागृत होऊन माझ्या डोळ्यांतून अश्रू येऊ लागले. मला या स्थितीतून बाहेर येऊच नये, असे वाटत होते.
     माझी ही स्थिती पाहून श्‍वेताताईंनी (सौ. श्‍वेता क्लार्क यांनी) मला त्याविषयी कार्यशाळेत सांगण्यास सांगितले; पण मला ते जमले नाही. त्यानंतर कार्यशाळेत एखादा साधक बोलत असतांना ईश्‍वर माझ्या कानात हळू आवाजात पहा, मी तुझ्याजवळच आहे, असे सांगत असल्याचे मला जाणवत होते.

झाडांविषयी अतीव प्रेम असल्याने त्यांची मनापासून काळजी घेणारे श्री. सुरेश कदम !

श्री. सुरेश कदम
     श्री. सुरेश कदमकाकांना झाडांविषयी पुष्कळ प्रेम आहे. ते सतत कुंडीतील आणि अन्य झाडांची निगा राखत असतात. कुंडीतील झाड मोठे झाले की, ते लागवडीत लावायला घेऊन जातात आणि त्या कुंडीत अन्य रोपे आणून लावतात. प.पू. डॉक्टरांसाठी प्रतिदिन आश्रमासमोरील औषधी झाडाची पाने आणायची असतात. एकदा मी पाने आणण्यासाठी गेले असता तेथून कदमकाका जात होते. मला पाने तोडतांना पाहून ते म्हणाले, पाने एका बाजूने तोडत जाऊ नकोस. सगळ्या बाजूंनी तोड, म्हणजे झाडाला तोल राखणे सोपे जाईल ! तेव्हा काका स्वतःप्रमाणेच झाडांचीही काळजी घेतात आणि झाडांवर निरपेक्ष प्रेम करतात, हे माझ्या लक्षात आले. आम्हा सर्व साधकांना त्यांचे गुण आचरणात आणता येऊ देत, ही श्रीचरणी प्रार्थना !
- कु. रोहिणी गुरव, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१५.११.२०१५)


पतितपावन नाम ऐकूनी आले तुझिया द्वारा ।

सौ. अंजली जोशी
परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या
अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त...

पतितपावन नाम ऐकूनी आले तुझिया द्वारा ।
पतितपावन आहेस म्हणोनी ना जाणार माघारा ॥ १ ॥

रामरूपाने त्रेतायुगी आलास अहिल्या उद्धारण्या ।
महर्षी केलेस वाल्यासी वळवूनी जीवनधारा ॥ २ ॥

शिवरूपाने तूच धरिले महानंदेच्या करा ।
पतितपावन रूप तुझे रे दाविले चराचरा ॥ ३ ॥

मोहमायेत अडकोनी पडले अन् नासविले शरिरा ।
संस्कारहीन झाले रचण्या पापाच्या डोंगरा ॥ ४ ॥

षड्रिपूंवरी धरबंध नसे या जिवाचा हो जरा ।
सनातन रूपे प्रगटलास या जिवाच्या उद्धारा ॥ ५ ॥

पावन करण्या या जिवासी हिरा बांधिला पदरा ।
अन् हिरकण्या घातल्या तूच रे मम उदरा ॥ ६

राष्ट्र-धर्म यांप्रती प्रेम आणि प.पू. डॉक्टरांप्रती भोळा भाव असलेला ५७ टक्के आध्यात्मिक पातळीचा अन् उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला पनवेल, रायगड येथील कु. सनातन बुगडे (वय ११ वषेर्र्) !

कु. सनातन बुगडे
      (वर्ष २०११ मध्ये कु. सनातनची आध्यात्मिक पातळी ५१ टक्के होती. - संकलक) 
१. धर्माचरण - डोक्यावर शेंडी ठेवणे 
     सनातनला शेंडी ठेवण्याचे महत्त्व समजल्यावर त्याने ते कृतीत आणले. शाळेतील मुले त्याला शेंडीवरून चिडवतात; पण त्याने शेंडी काढण्याचा विचार केला नाही. एकदा गावातील घरी उदकशांतीसाठी ब्राह्मण आलेे होते. त्यांनी त्याची शेंडी पाहिली आणि त्याला जवळ घेऊन म्हणाले, मी ब्राह्मण असूनही शेंडी ठेवत नाही आणि या मुलाने पहा कशी शेंडी ठेवली आहे !
२. धर्मद्रोही कृती पहाण्याचे टाळणे
     आम्ही रहात असलेल्या संकुलात नवरात्रीत चित्रपटांच्या गाण्यांवर दांडिया खेळला जातो; म्हणून सनातन ते पहायलाही जात नाही.

अखिल भारतीय हिंदू अधिवेशनासाठी आलेल्या मान्यवरांना आलेल्या अनुभूती

१. चतुर्थ अखिल भारतीय हिंदू अधिवेशनासाठी गोव्याला येण्याची सिद्धता करतांना दाढदुखीचा त्रास होऊ लागल्याने दंतवैद्यांनी शस्त्रकर्म करायला सांगणे, नामजप करत अधिवेशनाला गेल्याने त्रास उणावणे आणि त्यानंतर वर्षभरात कधीही दाढदुखीचा त्रास न होणे : मी मागील वर्षी चौथ्या अखिल भारतीय हिंदू अधिवेशनासाठी येण्याची सिद्धता करत होतो. त्यापूर्वी चार दिवस माझी डाव्या बाजूची दाढ पुष्कळ दुखत होती. माझ्या डोक्यापासून पायापर्यंत असह्य वेदना होत होत्या. मी मुखेड येथील दंतवैद्यांकडे उपचारासाठी गेलो. ते म्हणाले, तातडीने शस्त्रकर्म करावे लागेल. मी म्हटले, मला हिंदू अधिवेशनासाठी गोवा येथे जायचे आहे. शस्त्रकर्म झाल्यावर विश्रांती घ्यावी लागेल. मला काही औषधे द्या. आल्यावर शस्त्रकर्म करू. दंतवैद्य म्हणाले, तेथे त्रास होईल. जाऊ नका. मी ॐ नमो भगवते वासुदेवाय असा नामजप चालू केला आणि बॅग घेऊन गाडीत बसलो. गाडीत बसल्यावर मी ॐ नमो भगवते वासुदेवाय हा जप दुखणार्‍या दाढेभोवती सूक्ष्मातून फिरवत केला.
     मिरज येथील आश्रमात येईपर्यंत त्रास होत होता. पुढे त्रास एकदम बंद झाला. मी अधिवेशनात पूर्णवेळ होतो. मला कोणतेही औषध लागले नाही. मी ५ व्या अधिवेशनाला परत एक वर्षाने रामनाथी, गोवा येथे आलो. वर्षभरात कुठलेही शस्त्रकर्म अथवा औषध दाढदुखीसाठी घ्यावे लागले नाही. हे श्रीकृष्ण आणि परात्पर गुरु डॉ. आठवलेजी यांच्या कृपाशीर्वादामुळे झाले.
२. आधुनिक वैद्यांनी शस्त्रकर्म किंवा अ‍ॅन्जिओप्लास्टी करावी लागणार असल्याचे सांगणे, तपासणीच्या वेळी नामजप केल्याने वैद्यकीय अहवाल सर्वसाधारण येणे आणि ४ वर्षे केलेली साधना अन् प.पू. डॉक्टरांचे आशीर्वाद यांमुळे हे शक्य झाल्याचे लक्षात येणे : वर्ष १९९७ मध्ये वयाच्या ३७ व्या वर्षी मुंबई येथे माझ्या हृदयाची बायपास सर्जरी आधुनिक वैद्य नीतू मांडके यांनी केली होती. आता जवळपास १९ वर्षे झालेली आहेत. जानेवारी २०१६ मध्ये पुणे येथील प्रसिद्ध हृदयरोगतज्ञ डॉ. जगदीश हिरेमठ यांच्याकडे मी तपासणीसाठी गेलो होतो. त्यांनी सी.टी., अ‍ॅन्जीओ आणि इतर तपासण्या करण्यास सांगितल्या. तपासणीपूर्वी ते म्हणाले, बायपास होऊन अधिक दिवस झाले

साधनेची तळमळ आणि प्रेमभाव असलेले रामनाथी आश्रमातील साधक श्री. नाना (सीताराम) आग्रे (वय ६१ वर्षे) !

श्री. नाना (सीताराम) आग्रे
१. वेळेचे पालन करणे
     पाचव्या मजल्यावर दिवसभर साधकांची ये-जा चालू असते, तरी ते झोपण्यासह सर्व गोष्टी नियोजित वेळेत आणि नियमित करतात. ते पहाटे ४.३० वाजता उठतात. नंतर ते नामजप, व्यायाम, प्राणायाम, स्वसंरक्षण प्रशिक्षणातील काही प्रकार आदी गोष्टी सकाळी ८ वाजेपर्यंत पूर्ण करतात.
२. भाव
     जणू एखाद्या शिष्याने आपल्या गुरूंच्या स्थूलदेहाची सेवा करावी, तशा भावाने श्री. नाना (सीताराम) आग्रे हे पाचव्या मजल्यावरील खोलीत पूजा करतात. ज्याप्रमाणे आई मुलाला मांडीवर घेऊन अंघोळ घालते, त्याप्रमाणे ते हळुवारपणे विठ्ठलाचे चित्र भावपूर्ण पुसतात.
३. साधनेची तळमळ
     ते दिलेली सेवा दायित्व घेऊन वेळेत पूर्ण करतात. ते दिवसातून दोन वेळा सारणीत चुका लिहिण्यासह व्यष्टी साधना भावपूर्ण करतात. त्यांच्यामध्ये पूर्वी राग येणे हा स्वभावदोष होता; परंतु आता कोणत्याही प्रसंगात त्यांना राग येत नाही.
४. प्रेमभाव
अ. नाना मला प्रतिदिन सकाळी ४.३० वाजता उठवतात. त्यांना मी पहाटे बंबात विस्तव पेटवण्याच्या सेवेला जातो, असे कळल्यावर त्यांनी मला तेथे तुम्हाला बसायला आसंदी (खुर्ची) आहे का ? असे प्रेमाने विचारले.
आ. रुग्णाईत साधकाला ते त्यांना ठाऊक असणारे घरगुती औषध सांगतात आणि त्याने ते घेतले कि नाही, याची चौकशी करतात.
        धर्मशिक्षणाच्या अभावी धर्माचरण आणि धार्मिकता म्हणजे काय, हेही हिंदू विसरले. त्यामुळे बहुतेक सर्व केवळ जन्महिंदू झाले. कर्महिंदू फारच थोडे उरले. परिणामी हिंदु धर्माच्या अस्तित्वाचा प्रश्‍न निर्माण झाला.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले
       आपल्या मुलाचे पुढे कसे होणार ?, ही काळजी त्याच्या आई-वडिलांना असते. याउलट राष्ट्रातील सर्वजण आपलीच मुले आहेत, या व्यापक भावामुळे संत नेहमी आनंदी असतात.
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले

बोधचित्र

॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥

या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो.
- प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

॥ हरि ॐ तत्सत् ॥

खरा शिष्य
 रंगाच्या जशा अनेक छटा असतात, तशाच शिष्यत्वाच्याही अनेक पायर्‍या असतात. 
१. मला कोणी शिव्या दिल्या, मारले, माझी कुणी हत्या (खून) केली, तरी त्याच्यावर तुम्ही दया केलीत, तर मी समजेन की, माझ्या गुरूने तुम्हाला सिद्ध (तयार) केले. 
भावार्थ : शिव्या देणे, मारणे, हत्या करणे इत्यादी सर्व प्रकृतीतील आहे. हे समजून ते करणार्‍याविषयी राग न येणे, एवढेच नव्हे, तर करुणाकर भगवंताप्रमाणे त्याच्यावर दया करणे, हे शिष्याच्या खर्‍या प्रगतीचे लक्षण होय. (संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.)
संत भक्तराज 
सनातनचे श्रद्धास्थान

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

साधना 
दैवी कृपेने प्राप्त झालेला आयुष्यातील काळ ऐषारामात न घालवता सतत साधनारत 
रहाणे, परमेश्‍वरी चिंतनात रहाणे आणि प्राप्त कर्तव्य करणे, हीच जिवंतपणाची लक्षणे होत. 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

वाढता जनक्षोभ !

संपादकीय 
      तळेगाव-नाशिक येथील पाच वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याच्या प्रकरणात समाजातून मोठ्या प्रमाणात उद्रेक पहावयास मिळाला. या उद्रेकातून मोठ्या प्रमाणात तोडफोड, गाड्या उलथवून टाकणे, पोलिसांच्या गाड्यांवर दगडफेक, आग लावणे अशा टोकाच्या घटनाही झाल्या. चौदा वर्षांच्या मुलाकडून पाच वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार होणे, हे समाजाची नीतीमत्ता झपाट्याने रसाताळाला जात असल्याचे द्योतक आहे.

लोकहो, स्वदेशी उत्पादनांचा आग्रह धरा !

संपादकीय
      काश्मीर येथील उरी येथे सैन्यतळावर झालेल्या आक्रमणानंतर भारतातील समाजमन प्रक्षुब्ध झाले आहे. केवळ पाकिस्तानच नव्हे, तर त्याला वारंवार समर्थन देणार्‍या आणि भारताचे पाणी अडवण्याची भाषा करणार्‍या चीनच्या विरोधातही राष्ट्रप्रेमी नागरिकांच्या भावना संतप्त आहेत. हरियाणातील मेवात येथील व्यापारी असोशिएशननेे चीनच्या सर्व वस्तूंवर बहिष्कार, असा निर्णय घेऊन या असंतोषाला वाट मोकळी करून दिली आहे. असाच निर्णय अनेक व्यापारी संघटना देशात विविध ठिकाणी घेतांना दिसून येत आहेत. चीनच्या वस्तूंनी भारतीय बाजारपेठात प्रचंड मोठ्या प्रमाणात घुसखोरी केली आहे. अगदी टाचणीपासून, लेखणी, कागद यांपासून कोणतीही इलेक्ट्रॉनिक वस्तू, भ्रमणसंच, तसेच दैनंदिन जीवनात लागणार्‍या प्रत्येक वस्तू भारतियांच्या घराघरांत पहावयास मिळत आहेत.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn