Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

दसरा विशेषांक

हे रामराया, हिंदु राष्ट्र (रामराज्य) स्थापन
करण्यासाठी आम्हाला भक्ती अन् संघटनशक्ती दे !

आजचे दिनविशेष


साईबाबा पुण्यतिथी

रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात १ लक्ष २५ सहस्र बगलामुखी ब्रह्मास्त्र मंत्र जपयज्ञाची हवनाने सांगता

बगलामुखी यागाच्या वेळी श्री दुर्गादेवीचे पूजन
करतांना सद्गुरु (सौ.) बिंदाताई सिंगबाळ आणि
सनातन साधक पुरोहित पाठशाळेेचे पुरोहित

        रामनाथी, १० ऑक्टोबर (वार्ता.) - हिंदु राष्ट्राच्या स्थापनेतील सर्व अडथळे दूर व्हावेत आणि साधकांवरील संकटांचे निवारण व्हावे यांसाठी भृगू महर्षींच्या आज्ञेने रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात बगलामुखी याग (ब्रह्मास्त्र याग) करण्यात आला. या निमित्ताने १ मासभर १ लक्ष २५ सहस्र एवढा बगलामुखी मंत्राचा जप करण्यात आला. त्यानंतर त्याच्या दशांश म्हणजे १२ सहस्र ५०० या संख्येने चाफ्याच्या फुलांचे हवन करण्यात आले. यागाच्या वेळी बगलामुखी देवी, नवग्रह आणि योगिनी देवता यांचे पूजन करण्यात आले.

जैश-ए-महंमदकडून संसदेवर आक्रमणाची शक्यता !

  • भारताने बचावाचे धोरण राबवण्याऐवजी सीमोल्लंघन करून पाकमधील आतंकवाद्यांची सर्व केंद्रे नष्ट करावीत !
  • देहलीतील अक्षरधाम मंदिर आणि लोटस टेम्पलही लक्ष्य !
  • एका सर्जिकल स्ट्राईकमुळे आतंकवाद नष्ट होणार नाही, हे लक्षात घ्या !
  • सर्जिकल स्ट्राईकचे पुरावे मागणारे याविषयी काही बोलतील का ?
       नवी देहली - आतंकवाद्यांनी काश्मीरच्या उरी येथील मुख्यालयावर केलेल्या आक्रमणाचा सूड उगवण्यासाठी भारतीय सैन्याने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून सर्जिकल स्ट्राईक केले. यात जिहादी आतंकवाद्यांचे ८ तळ उद्ध्वस्त झाले. याला प्रत्युत्तर देण्यासाठी आता जैश-ए-महंमद या आतंकवादी संघटनेने थेट भारताच्या संसदेवर आक्रमण करण्याचा कट रचला आहे. गुप्तचर यंत्रणांनी ही माहिती दिली आहे. यामुळे देशातील सर्व सुरक्षा यंत्रणांना सतर्क रहाण्याचा आदेश देण्यात आला आहे.
       संसदेसह देशातील अन्य काही ठिकाणांवरही त्यांचा आक्रमण करण्याचा डाव आहे. यात मंत्रालय, अक्षरधाम मंदिर आणि लोटस टेम्पल यांचा समावेश आहे. गर्दीच्या ठिकाणांना लक्ष्य करावे, असा आदेश जैशच्या आतंकवाद्यांना देण्यात आला आहे. जैशचा प्रमुख मौलाना मसूद अझर हा कट रचत आहे. उरी येथील आक्रमणातही मसूद अझरचा हात असल्याचे स्पष्ट झाले होते. १३ डिसेंबर २००१ या दिवशी भारतीय संसदेवर झालेल्या आक्रमणात मसूद अझर याचा हात होता. यापूर्वी गुप्तचर यंत्रणांना जैशचे आतंकवादी ट्रक किंवा तत्सम मालवाहू वाहनांमधून देहलीत येणार असल्याची माहिती मिळाली होती. काश्मीरच्या कुलगाम येथून हे आतंकवादी देहलीच्या दिशेने मार्गस्थ झाले असून त्यांच्याकडे एके-४७ रायफल्स आणि इतर शस्त्रे असल्याची माहिती होती.

काश्मीरला स्वयंनिर्णयाचा अधिकार देण्याची मागणी !

  • माओवाद संपवण्यासाठी गेल्या ५० वर्षांत सर्वपक्षीय सरकारांनी ठोस प्रयत्न न केल्याचा हा परिणाम आहे ! आतापर्यंत केवळ शोषितांच्या नावाखाली हिंसाचार करणारे माओवादी देशद्रोही कृती करू लागले असल्याने त्यांना संपवणे क्रमप्राप्त झाले आहे !
  • माओवाद्यांकडून जिहादी आतंकवाद्यांना साहाय्यकारक प्रयत्न !
         नागपूर - पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आयएस्आयने सर्जिकल स्ट्राइकचा सूड उगवण्यासाठी आणि भारतात आतंकवाद पसरवण्यासाठी नवी व्यूहरचना केली आहे, अशी माहिती गुप्तचर यंत्रणांनी दिली आहे. या व्यूहरचनेतून पाकने माओवाद्यांना आणि अन्य फुटीरतावाद्यांना बळ पुरवण्याचा प्रयत्न चालू केला आहे. त्याचा परिणाम विदर्भातील भामरागड येथे दिसून येत आहे. येथे माओवाद्यांनी लावलेल्या फलकांवर काश्मीरला स्वयंनिर्णयाचा अधिकार द्यावा, अशी मागणी केली आहे. तसेच काश्मीरसह देशातील आतंकवादी संघटनांच्या समर्थनार्थ देशव्यापी बंदचे आवाहनही केले आहे.

समान नागरी कायद्यासाठी नागरिकांकडून सूचना मागवल्या !

      मुंबई - समान नागरी कायद्यात सुधारणा करण्यासाठी कायदा आयोगाने नागरिकांकडून थेट सूचना मागवल्या आहेत. देशातील वेगवेगळ्या कौटुंबिक कायद्यांमध्ये बरीच विसंगती आहे. त्या पार्श्‍वभूमीवर आयोगाने सर्वेक्षण करण्यासाठी एक प्रश्‍नपत्रिका बनवली आहे. तोंडी तलाक पद्धतीला मान्यता हवी कि नको ? लग्नाच्या नोंदणीकरणाची प्रक्रिया कशी सुलभ करता येईल, आंतरजातीय विवाह करणार्‍यांना कशा प्रकारे संरक्षण देता येईल ? अशा अनेक प्रश्‍नांचा त्यात समावेश करण्यात आलेला आहे. लोकांचा अभिप्राय जाणून घेतल्यानंतर कायद्यात सुधारणा करण्यासाठी कायदा आयोग केंद्र सरकारकडे शिफारस करणार आहे.नवीन बांधामुळे ब्रह्मपुत्रेच्या भारतातील प्रवाहावर परिणाम होणार नाही ! - चीनचे स्पष्टीकरण

चीनकडून भारतियांच्या शंकांचे निरसन करण्याचा खटाटोप
      नवी देहली - बांध बांधण्यासाठी ब्रह्मपुत्रा नदीच्या साहाय्यक नदीचे पाणी अडवल्यामुळे भारतातील ब्रह्मपुत्रेच्या प्रवाहावर कोणताही परिणाम होणार नाही, असा दावा चीनने केला आहे. ब्रह्मपुत्राची सहाय्यक शियाबुकु नदी ही तिबेटमध्ये आहे. तिबेटमधील अन्न आणि पूर संरक्षणासाठी या नदीवर लालहो बांध योजना राबवणे आवश्यक आहे, असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. ब्रह्मपुत्रा नदी तिबेट पासून भारतातील अरुणाचल प्रदेश आणि आसाम, तसेच बंागलादेशमधून वहाते. अलीकडे चीनकडून या सर्वांत खर्चिक बांध योजनेसाठी शियाबुकू नदीचा प्रवाह अडवण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर भारतात याविषयी चिंता व्यक्त करण्यात येत होती.अमेरिकेत दिवाळीच्या पार्श्‍वभूमीवर टपाल तिकिटाचे प्रकाशन !

सातासमुद्रापलीकडे पोचलेले हिंदु संस्कृतीचे महत्त्व !
अमेरिकेत दिवाळीच्या
पार्श्‍वभूमीवर प्रकाशित
करण्यात आलेले
टपाल तिकीट
     न्यूयॉर्क - अमेरिकेत प्रथमच दिवाळीच्या टपाल तिकिटाचे प्रकाशन करण्यात आले. न्यूयॉर्क शहरातील भारतीय वकिलातीमध्ये नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात नवीन टपाल तिकिटाचे अनावरण करण्यात आले. युनायटेड स्टेट्स पोस्टल सर्व्हिस आणि दिवाळी स्टँप प्रोजेक्ट कमिटी यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या तिकिटावर पारंपरिक दीप आणि त्याच्या समोर गुलाबाच्या पाकळ्यांची जोडी दाखवण्यात आली आहे. न्यूयॉर्क शहराचे लेखा अधिकारी स्कॉट स्ट्रिन्जर यांनी दिवाळी टपाल तिकिटाची घोषणा केली. अमेरिकेतील भारतीय राजदूत रिवा गांगुली दास यांनी भारतीय समाजाची मागणी मान्य केल्याविषयी युनायटेड स्टेट्स पोस्टल सर्व्हिसचे आभार मानले. दिवाळी पोस्टल स्टँप प्रोजेक्टच्या अध्यक्ष रंजु बत्रा यांनी सदर प्रकल्प तडीस नेण्यासाठी प्रयत्न केले.

अ‍ॅट्रॉसिटी कायद्यात सुधारणा होऊ शकतात ! - रामदास आठवले

     अमरावती - अ‍ॅट्रॉसिटी कायदा हा दलितांवरील अन्याय अत्याचार रोखण्यासाठी आहे. या कायद्याचा दुरुपयोग टाळण्याकरिता सामाजिक न्याय मंत्रालयाअंतर्गत सुधारणा सुचवल्या जाऊ शकतात, असे मत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले. दोन दिवसांच्या अमरावती दौर्‍यावर आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी आठवले म्हणाले, "दलित समाज हा मराठा समाजाच्या आरक्षणाच्या विरोधात नाही. एवढ्या मोठ्या प्रमाणात मराठा समाज हा आपल्या मागण्यांसाठी अहिंसक मार्गाने रस्त्यावर उतरत आहे. हा क्रांती मोर्चा नव्हे, तर शांती मोर्चा आहे. एकेकाळी २००-३०० एकर भूमी असलेल्या या समाजाकडे आता केवळ २० ते २५ एकर शेती राहिलेली आहे. अनुसूचित जाती, जमाती आणि इतर मागासवर्गीयांच्या आरक्षणाला धक्का न लावता उर्वरित ५० टक्क्यांमधून १६ टक्के आरक्षण मराठा समाजाला देण्यात यावे. मोदी हेच विकासाचे जादूगार आहेत."

संभाजीनगरमध्ये मराठा क्रांती मोर्चा समितीची स्थापना !

  • १४ डिसेंबरला मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर मोर्चा 
  •  १० मागण्यांचा ठराव 

     संभाजीनगर - संभाजीनगरमध्ये ८ ऑक्टोबर या दिवशी मराठा क्रांती मोर्चा समिती राज्यव्यापी स्थापना करण्यात आली. संपूर्ण राज्यातून समन्वय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या समितीने केलेल्या ठरावात काही मागण्या केल्या आहेत. १४ डिसेंबरला नागपूरचा मोर्चा अधिवेशनावर काढण्यात येईल. त्यानंतरही या मागण्या मान्य न झाल्यास मुंबईच्या मोच्यार्र्ची तारीख ठरवली जाईल. मुंबईचा मोर्चा शेवटचे अस्त्र राहील, असे या वेळी घोषित करण्यात आले. 

१५ दिवसांत आरोपपत्र प्रविष्ट करू ! - गृहराज्यमंत्री दीपक केसरकर

तळेगाव येथील अल्पवयीन मुलीवरील अतीप्रसंगाचे प्रकरण
  • भ्रमणध्वनी सेवा बंद 
  • दोन ठिकाणी रस्ता बंद आंदोलन  

     नाशिक - अल्पवयीन मुलीवरील अतीप्रसंग करण्याच्या प्रयत्नाच्या प्रकरणी १५ दिवसांत आरोपपत्र प्रविष्ट करू, असे आश्‍वासन गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी १० ऑक्टोबरला दिले. त्यांनी घटनास्थळी जाऊन मुलीच्या पालकांची भेट घेतली. 

दादर येथे कबुतरखाना ते शिवाजी पार्क अशी श्री दुर्गामाता महादौड !

     मुंबई - श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान मुंबई विभागाच्या वतीने प्रतीवर्षीप्रमाणे या ही वर्षी श्री दुर्गामाता दौड संपूर्ण मुंबईत होणार आहे. दसर्‍याच्या दिवशी दादर येथील कबुतरखाना ते शिवाजी पार्क अशी श्री दुर्गामाता महादौड शेकडो धारकर्‍यांच्या उपस्थितीत सकाळी ७.३० वाजता काढली जाणार आहे. हिंदूंनी मोठ्या प्रमाणात या दौडीत सहभागी होण्याचे आवाहन श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने करण्यात आले आहे. 

भगवानगडावर मागणी केलेल्या जागेवर जिल्हा प्रशासनाने मेळाव्याला अनुमती नाकारली !

     पाथर्डी (नगर) - दसरा मेळाव्यानिमित्त येथील भगवानगडावर मागणी केलेल्या जागेवर जिल्हा प्रशासनाने मेळाव्याला अनुमती नाकारली आहे. भगवानगडावर पंकजा मुंडे यांनी सभा घेणारच असे घोषित केल्याने नामदेवशास्त्री महाराज यांचा विरोध लक्षात घेता पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर १ सहस्र पोलिसांचा बंदोबस्त केला आहे. नामदेवशास्त्री महाराज यांना नोटीस पाठवण्यात आली आहे, तसेच या परिसरातील अनेक जणांनाही नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत. 

फलक प्रसिद्धीकरता

दभारताने पाकमधील आतंकवाद्यांची सर्व केंद्रे नष्ट करावीत ! 
     सर्‍याच्या शुभ मूहुर्तावर हिंदूंचे तेजस्वी राजे सिमोल्लंघन करून शत्रूवर स्वारी करत होते. त्याप्रमाणे भारताने पाकमधील आतंकवाद्यांची सर्व केंद्रे नष्ट करण्यासाठी सिमोल्लंघनाचाच पर्याय वापरावा.

हिंदू तेजा जाग रे !

Jago ! : 
Jaish-A-Mohemad ke atankione Bharat ke 
sansad par akraman karne ka shadayantra racha hai. - Guptachar sanstha 
Sargical strike ke sabudh magnewale ab chup kyo ?

जागो ! :
 जैश-ए-महंमद के आतंककीआें ने भारत के 
संसदपर आक्रमण करने का षड्यंत्र रचा है. - गुप्तचर संस्था 
सर्जिकल स्ट्राइक के सबूद मागनेवाले अब चूप क्यो ?

विजयादशमीच्या दिवशी करावयाची कृत्ये आणि त्यामागील शास्त्र !

      आश्‍विन शुक्ल पक्ष दशमी या दिवशी येणार्‍या दसरा या सणाच्या शब्दाची एक व्युत्पत्ती दशहरा अशीही आहे. दश म्हणजे दहा आणि हरा म्हणजे हरल्या आहेत. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या दसर्‍याच्या आधीच्या नऊ दिवसांच्या नवरात्रात दाही दिशा देवीच्या शक्तीने भारलेल्या असतात. नियंत्रणात आलेल्या असतात, म्हणजेच दाही दिशांतील दिक्भव, गण इत्यादींवर नियंत्रण आलेले असते, दाही दिशांवर विजय मिळालेला असतो. 
१. विजयादशमीचे ऐतिहासिक माहात्म्य ! 
१ अ. कौत्साच्या संदर्भातील उदाहरण या अंकात पृष्ठ ३ वर आलेलेच आहे. 
१ आ. प्रभु श्रीराम याने रावणावर विजय मिळवून त्याचा वध केला, तोही याच दिवशी. या अभूतपूर्व विजयामुळे या दिवसाला विजयादशमी असे नाव मिळाले आहे.
१ इ. पांडवांनी अज्ञातवास संपताच शक्तीपूजन करून शमीच्या वृक्षावरची आपली शस्त्रे परत घेतली आणि विराटाच्या गायी पळवणार्‍या कौरवसैन्यावर स्वारी करून विजय मिळवला, तोही याच दिवशी.

विजयादशमी साजरी करण्याचे महत्त्व !

     साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असणार्‍या दसरा या सणाचे अनेक गुणधर्म आहेत. विजयाची प्रेरणा देणारा हा सण परस्परांतील प्रेम वृद्धींगत करायलाही शिकवतो. या लेखाच्या माध्यमातून दसरा सण साजरा करण्यामागील काही महत्त्वाची कारणे समजून घेऊया.
१. स्वतःसमवेत इतरांचाही विचार करण्यास शिकवणारा सण दसरा
       दसरा हा देवीचा सण आहे. देवी ही शक्तीची देवता आहे. यासाठी आश्‍विन शुक्ल पक्ष प्रतिपदेला देवीचे आवाहन करून रामनवमीप्रमाणे नऊ दिवस तिचे भजन, पूजन, कीर्तन करायचे असते. अष्टमीच्या दिवशी सरस्वतीस्वरूपी भगवतीचे पूजन, नवमीच्या दिवशी शस्त्रगर्भा देवीचे पूजन आणि दशमीच्या दिवशी शमीचे अन् शांततेचे पूजन करायचे असते. हे शांततेचे पूजन आपल्या गावाच्या शिवेबाहेर जाऊन करायचे असते. गावाप्रमाणेच गावाबाहेरही शांतता राखून जिकडे तिकडे सुखसमृद्धी आणू, असा यामागचा अर्थ आहे. बाहेर सर्वत्र शांतता राखण्यासाठी शस्त्रे, अस्त्रे, सैन्य इत्यादींचे प्रदर्शन करायचे असते आणि शत्रू असेल, तर त्याचे पारिपत्य करण्यासाठी या दिवशी निघायचे असते. शत्रूचे पारिपत्य करून शांतता प्रस्थापित केल्यानंतर सर्वांना सोने वाटावयाचे असते.

हिंदूंनो, धर्मशिक्षणाचा अभाव किंवा धर्मद्रोह यांमुळे होणार्‍या अपप्रचाराला बळी पडू नका !

     अंनिसवाले आणि धर्मद्रोही यांना हिंदूंचे सण आणि उत्सव आले की, पर्यावरण रक्षणाचा उमाळा येतो. गणेशमूर्ती वहात्या पाण्यात विसर्जित करायची नाही, कारण प्रदूषण होते म्हणणारे मूर्ती मातीचीच करून नैसर्गिक रंग द्या, असा कधी प्रचार करत नाहीत. तसेच आता दसरा आल्यावर सोनं लुटण्याच्या प्रथेमुळे आपट्याचे झाड ओरबाडले जाते असे सांगून निसर्गाच्या रक्षणाचे ठेकेदार असल्याप्रमाणे हे धर्मद्रोही सरसावले आहेत. असाच एक संदेश गेल्या वर्षी दसर्‍याच्या आदल्या दिवशीपासून व्हॉट्स अ‍ॅपवर फिरत होता.
व्हॉट्स अ‍ॅपवरून फिरत असलेला धर्मद्रोही संदेश !
    येत्या विजयादशमीपासून सोनं लुटणे म्हणजेच आपट्याच्या पानांची देवाणघेवाण करायची नाही असं मी ठरवलंय. निसर्ग अक्षरशः ओरबाडला जातोय. पूर्वी माणसं कमी आणि झाडं मुबलक होती, तेव्हा ही प्रथा ठीक होती. आता मात्र परिस्थिती नेमकी उलटी झाली आहे; म्हणून निसर्गाचे रक्षण व्हायला हवे आणि त्याचा प्रारंभ आपल्यापासूनच करायला हवा. मला भेटायला येणार्‍यांनाही मी हे समजावून सांगणार आहे. हळूहळू निश्‍चितच जागृती होऊन झाडं ओरबाडणे थांबेल.

लेखणी, पुस्तके आणि वह्या रूपी शस्त्रांचे पूजन करणे अन् आपल्या वर्तनातून त्यांचा अवमान होऊ न देणेे, हाच खरा दसरा !

      विद्यार्थीमित्रांनो, आपण अनेक सण साजरे करतो आणि प्रत्येक सणातून आपल्याला जीवनाची अनेक नैतिक मूल्ये शिकायला मिळतात. आपण दसरा या सणाचे महत्त्व जाणून घेऊया. 
विद्यार्थ्यांमधील दहादुर्गुणांना हरवण्याचा निश्‍चय करण्याचा दिवस म्हणजे दसरा ! 
       दसर्‍याच्या आधीचे नऊ दिवस देवीने असुरांशी युद्ध करून दहाही दिशांवर नियंत्रण मिळवले. मित्रांनो, तोच हा दिवस ! जसे देवीने असुरांचा नाश केला, म्हणजे वाईट गोष्टींचे निर्मूलन केले, तसे आपणसुद्धा या दिवशी आपल्यातील कोणत्याही दहा दोषांचे निर्मूलन करण्याचा निश्‍चय करायला पाहिजे. आपणसुद्धा आपल्यातील दहा दोषांचे निर्दालन करायचे आणि दहा दुर्गुणांना हरवायचे. तोच आपल्यासाठी खरा दसरा होय. मग मित्रांनो, आपण असे करूया ना ?

१० हा अंक आणि विजयादशमी

प.पू. पांडे महाराज
१. १० या अंकाच्या स्पष्टीकरणातून 
संत एकनाथ महाराजांनी निजात्म पूजेचे केलेले विवेचन
      नवरात्रीच्या सणात प्रथम ९ दिवस महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वती यांची पूजा करण्यात येते. त्या वेळी आपल्यातील तमोगुणाचे प्राबल्य, म्हणजे विकार नाहीसे होण्यासाठी महाकालीची पूजा केली जाते. रजोगुण, म्हणजेच शक्ती वाढवण्यासाठी महालक्ष्मीची अन् सत्त्वगुण वाढवण्यासाठी महासरस्वतीची पूजा करतात. ज्ञानाद्वारे सत्य-असत्य जाणून सत्याशी संलग्न होण्यासाठी या देवींची पूजा करायची असते. अशा प्रकारे आत्मबलपूर्वक समर्थ होऊन विजयादशमी, म्हणजे दसरा साजरा केला जातो आणि मायेची सीमा पार करून (गुणातीत होऊन) समष्टीसाठी सर्वत्र चैतन्यरूप वातावरण निर्माण करण्यासाठी विजय प्राप्त करण्यासाठी) सीमोल्लंघन केले जाते. अशा प्रकारे साधकाची ती समष्टी साधनाच होते. वेदांमध्येसुद्धा कृण्वन्तो विश्‍वमार्यम् । (ऋग्वेद, मण्डल ९, सूक्त ६३, ऋचा ५) म्हणजे संपूर्ण जगाला आर्य (सुसंस्कृत) करू, असे म्हटले आहे.

काश्मीर प्रश्‍नी राज्य आणि केंद्र यांत एकवाक्यता हवी ! - मोहन भागवत, सरसंघचालक

दसर्‍या मेळाव्यातील मार्गदर्शन 
     नागपूर - भारतीय अध्यात्मात प्रचंड ताकद आहे. काश्मीरचे काश्मीरपण अभिनव गुप्ताशिवाय अधुरे आहे. पाकव्याप्त काश्मीरसह संपूर्ण काश्मीर भारताचे अभिन्न अंग आहे. उपद्रवी लोकांना बाहेर काढण्यासाठी आणि काश्मीरसाठी केंद्र आणि राज्य यांच्यात एकवाक्यता हवी. उपद्रवींना दृढतापूर्वक काढायला पाहिजे. भारताच्या सागरी आणि भूमीवरील सीमांच्या रक्षणासाठी सरकार, प्रशासन आणि समाज यांनी तत्पर रहाणे आवश्यक आहे. भारतीय सीमारेषेवर कोणतीही ढिलाई आणि कसूर राहू नये. सर्जिकल स्ट्राईकमुळे जगभरात भारतीय सैन्याची प्रतिष्ठा उंचावली. फूस लावणार्‍या काश्मीरमधील उपद्रवी शक्तींचे समूळ उच्चाटन करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दसर्‍या मेळाव्यात सरसंघचालक श्री. मोहन भागवत यांनी केले. 
श्री. भागवत यांच्या भाषणातील अन्य सूत्रे 
१. आम्ही युगांपासून एकसंघ देश आहोत. राज्यातील शासनांच्या स्वार्थीपणामुळे सनातन एकतेला खंड पडायला नको. त्यांनी मर्यादांचे पालन केले पाहिजे. 

दसरा

१. दशहरा
     दसरा या शब्दाची फोड दस + हरा. दसर्‍याला उत्तर हिंदुस्थानात दशहरा असे म्हणतात. हरणे म्हणजे घेऊन जाणे. दशहरा म्हणजे माझे दहा अवगुण घेऊन जा. 
२. दुर्गापूजा (नवरात्री) उत्सव साजरा करण्यासंबंधी कालिका पुराणात सांगितलेले पर्याय 
अ. भाद्रपद कृष्ण पक्ष नवमीपासून आश्‍विन शुद्ध पक्ष नवमीपर्यंत करावा. 
आ. आश्‍विन मासातील (महिन्यातील) शुद्ध पक्ष प्रतिपदेपासून नऊ दिवस करावा. 
इ. आश्‍विन मासातील शुद्ध पक्ष सप्तमीपासून तीन दिवस करावा. 
ई. आश्‍विन मासातील शुद्ध पक्ष अष्टमीपासून दोन दिवस करावा. 
उ. न्यूनतम आश्‍विन शुद्ध पक्ष नवमी या दिवशी एक दिवस तरी करावा.
३. दुर्गापूजा उत्सवाचा प्रचार आणि लोकप्रियता
    बंगाल, बिहार, ओरिसा, आसाम, उत्तरप्रदेश आणि मध्यप्रदेश या प्रदेशांमध्ये दुर्गापूजेचा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होतो. त्यातल्या त्यात बंगालमध्ये त्याचा प्रचार आणि लोकप्रियता विशेष आहे. बंगाली लोकांचा तो वर्षातील प्रमुख सणच आहे. 
(मासिक मनशक्ती, ऑक्टोबर २००७)

रोगापेक्षा उपचार भयंकर !

    वाहतुकीच्या संदर्भातील नियम वा शिस्त मोडण्यामध्ये अनेक जण सराईत आहेत. शिस्त पाळणे म्हणजे जणू स्वतःचा पराभव आहे, अशी मानसिकता भारतियांमध्ये बर्‍याच अंशी आढळते. त्यामुळेच शिस्त मोडल्यावर त्याविषयी ते क्षमायाचना करत नाहीत. याउलट होणार्‍या गैरसोयीमुळे आम्हाला नाईलाजास्तव शिस्त मोडावी लागत आहे अन्यथा नियम मोडायची आम्हाला हौस का आहे ? वर असा निलाजरा प्रश्‍न विचारून स्वतःच्या अयोग्य वर्तणुकीचे समर्थनही करतात. वाहतुकीच्या नियमांच्या संदर्भात तर ही गोष्ट पदोपदी अनुभवायला येते. अशा निर्ढावलेल्यांना शिस्त लावण्यासाठी खरे तर कठोर उपाय अवलंबण्याची आवश्यकता आहे; मात्र पुण्याच्या वाहतूक पोलिसांनी यावर अजब उपाय शोधून काढला आहे.

दसर्‍याच्या दिवशी आपट्याचे पान देण्यामागील कारणे

मुळाशी आकृष्ट झालेल्या निर्गुण 
तेजोलहरी पानांमध्ये कार्यरत होत असणे 
     ब्रह्मांडातील निर्गुण तेजोलहरी आकृष्ट होऊन आपट्याच्या झाडाच्या मुळाशी सामावून रहातात. तेजतत्त्वाचे अधिष्ठान लाभल्यामुळे कालांतराने त्या लहरी झाडाच्या पानांमध्ये कार्यरत होतात. या तेजोलहरी इच्छा-क्रिया शक्तीशी संबंधित असतात.
आपट्याच्या पानांमध्ये हरितद्रव्याचे प्रमाण 
अधिक असणे आणि सूर्यकिरणांचा प्रभाव पडल्यावर त्यांतील तेजतत्त्व कार्यान्वित होणे
      अन्य वृक्षांच्या तुलनेमध्ये आपट्याच्या पानांमध्ये हरितद्रव्याचे प्रमाण अधिक असते. ज्या वेळी या पानांवर सूर्यकिरण पडतात, त्या वेळी त्यांतील तेजतत्त्व कार्यान्वित होण्यास आरंभ होतो. ही पाने वाळली, तरी त्यांचा जो मूळ रंग असतो, त्यामध्ये अन्य वृक्षांच्या पानांच्या तुलनेत अधिक पालट होत नाही. पानांतून प्रक्षेपित होणार्‍या तेजोलहरींचे वातावरणामध्ये दीर्घकाळ वास्तव्य असते.

हिंदूंनो, हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी सीमोल्लंघन करा !

सीमोल्लंघन करा आपल्या संकुचित वृत्तीचे 
आणि व्यापक व्हा कृण्वंतो विश्‍वं आर्यम् या ध्येयाने !

सीमोल्लंघन करा आपल्या स्वार्थी वृत्तीचे 
आणि त्याग करा तन-मनाचा राष्ट्रासाठी समर्पण भावाने ! 

सीमोल्लंघन करा मी आणि माझे कुटुंब या भावनेचे 
आणि संघटित व्हा हिंदू सारा एक या भावनेने !

कलका, हरियाणा येथील भृगु नाडीवाचनातून मिळालेल्या फलादेशानुसार रामनाथी आश्रमात झालेल्या ध्वजपूजनाचे सूक्ष्म-परीक्षण !

कु. मधुरा भोसले
     १६.९.२०१६ या दिवशी कलका, हरियाणा येथील भृगु नाडीवाचनातून मिळालेल्या फलादेशानुसार सनातनच्या रामनाथी येथील आश्रमात लोह-निर्मित चार ध्वजप्रतिमांचे पूजन करण्यात आले. त्यानंतर हे ध्वज आश्रमात विविध ठिकाणी लावण्यात आले. ध्वजांच्या पूजनाचे सूक्ष्म-परीक्षण पुढीलप्रमाणे आहे.

१. विविध कृती, सूक्ष्म-परीक्षण आणि त्यांचे विश्‍लेषण
शार्दूल (सिंह) ध्वज

गज (ऐरावत) ध्वज
ऋषभ (नंदी) ध्वज
कपि (मारुति) ध्वज

नवरात्रीच्या कालावधीत यज्ञकुंडाभोवती रांगोळी काढतांना आलेली अनुभूती

कु. सिद्धि क्षत्रीय
सौ. समृद्धी राऊत
      सनातनच्या रामनाथी, गोवा येथील आश्रमात ७ ऑक्टोबर ते १० ऑक्टोबर या कालावधीत बगलामुखी ब्रह्मास्त्र याग झाला. या यागाच्यावेळी ज्या यज्ञकुंडात हवन करण्यात आले. त्या यज्ञकुंडाभोवती आणि देवीच्या मूर्तीची स्थापना केलेल्या ठिकाणी साधिकांनी शस्त्रांच्या रांगोळ्या काढल्या होत्या. या रांगोळ्या आणि त्या संदर्भातील अनुभूती येथे देत आहोत.

हिंदूंनो, रामराज्य स्थापनेसाठी प्रभु श्रीरामाची वैशिष्ट्ये अंगी बाणवा !

    नित्य धर्माचरण आणि धर्माधिष्ठित राज्यकारभार यांद्वारे आदर्श राज्यकारभार करणारा मर्यादा पुरुषोत्तम म्हणजे प्रभु श्रीराम ! प्रजेचे जीवन संपन्न करणारे; गुन्हेगारी, भ्रष्टाचार आदींना स्थान नसलेले अशी रामराज्याची ख्याती होती. असे आदर्श राज्य (हिंदु राष्ट्र) स्थापण्याचा निर्धार करूया !
सर्वार्थाने आदर्श
१. आदर्श पुत्र : रामाने आईवडिलांच्या आज्ञांचे पालन केले; पण प्रसंगी वडीलधार्‍यांनाही उपदेश केला आहे, उदा. वनवासप्रसंगी आईवडिलांनाही त्याने दुःख करू नका असे सांगितले. ज्या कैकेयीमुळे रामाला चौदा वर्षे वनवास घडला, त्या कैकेयीमातेला वनवासाहून परतल्यावर राम नमस्कार करतो आणि पहिल्याप्रमाणेच तिच्याशी प्रेमाने बोलतो.
२. आदर्श बंधू : अजूनही आदर्श अशा बंधूप्रेमाला राम-लक्ष्मणाचीच उपमा देतात.
३. आदर्श पती : श्रीराम एकपत्नीव्रती होता. सीतेचा त्याग केल्यावर श्रीराम विरक्तपणे राहिला. पुढे यज्ञासाठी पत्नीची आवश्यकता असतांना त्याने दुसरी पत्नी न करता सीतेची प्रतिकृती आपल्या शेजारी बसविली. यावरून श्रीरामाचा एकपत्नी बाणा दिसून येतो. त्या काळी राजाने अनेक राण्या करण्याची प्रथा होती. या पार्श्‍वभूमीवर श्रीरामाचे एकपत्नीव्रत प्रकर्षाने जाणवते.
४. आदर्श मित्र : रामाने सुग्रीव, बिभीषण इत्यादींना त्यांच्या संकटकाळात साहाय्य केले.
५. आदर्श राजा : प्रजेने सीतेविषयी संशय व्यक्त केल्यावर आपल्या वैयक्तिक सुखाचा विचार न करता, राजधर्म म्हणून श्रीरामाने आपल्या धर्मपत्नीचा त्याग केला. याविषयी कालिदासाने कौलीनभीतेन गृहान्निरस्ता न तेन वैदेहसुता मनस्तः । (अर्थ : लोकापवादाच्या भयाने श्रीरामाने सीतेला घरातून बाहेर घालवले, मनातून नाही.), असा मार्मिक श्‍लोक लिहिला आहे.
६. आदर्श शत्रू : रावणाच्या मृत्यूनंतर अग्नीसंस्कार करायला त्याचा भाऊ बिभीषण नकार देतो, तेव्हा राम त्याला सांगतो, मरणासह वैर संपते.

श्री दुर्गादेवीच्या मूर्तीच्या अवतीभोवती काढलेल्या रांगोळ्या जिवंत भासणे आणि त्यांतून मारक स्पंदने बाहेर पडत असल्याचे जाणवणे

      सनातनच्या रामनाथी येथील आश्रमात नवरात्रीनिमित्त प्रतिदिन विविध याग करण्यात येत आहेत. त्यासाठी तेथे श्री दुर्गादेवीची मूर्ती ठेवून बाजूलाच नवग्रहांची स्थापना केली आहे. काही साधिकांनी होमकुंड आणि श्री दुर्गादेवीची मूर्ती ठेवलेले पटल यांभोवती देवीच्या विविध अस्त्रांच्या रांगोळ्या काढल्या. यांत धनुष्य-बाण, गदा, चक्र इत्यादींचा समावेश होता. मी ३ - ४ दिवसांपूर्वी दर्शनासाठी गेलो असता माझे लक्ष सहज त्या रांगोळ्यांकडे गेले. तेव्हा त्या जिवंत भासत होत्या. नंतर प्रतिदिनच दर्शनासाठी गेल्यावर मला त्या रांगोळ्यांमधून मारक स्पंदने बाहेर पडत असल्याचे जाणवत आहे, तसेच देवीकडून ती अस्त्रे बाहेर पडत असल्याचे जाणवत आहे. ६.१०.२०१६ या दिवशी तर मला देवीच्या मागे उष्मा जाणवत होता. प्रत्यक्षात होमकुंड तेथून जरा लांब आहे आणि होमकुंडाजवळ मात्र गारवा जाणवत होता. 
- अधिवक्ता योगेश जलतारे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (७.१०.२०१६)

अवतरला श्रीहरि, आनंदी आनंद झाला भूवरी ।

 परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त...

देवाला भक्ताच्या भक्तीची भुरळ पडते ।
म्हणून तर तो वैकुंठ सोडून येतो ।
येतो नव्हे आला अन् रमला । (साधकांचे भक्त होवोत ।)
भक्तांना सनातन राष्ट्राचे भव्य-दिव्य स्वप्न दाखवलेस ।
स्वप्न सत्यांत उतरण्यासाठी
साधना शिकवलीस अन् करून घेतलीस ।
हात दिलास अन् वैतरणा पार झाली ।
आणि आता भारतभूमी स्वर्गभूमी करणार, नव्हे झालीच ।
६० टक्के पातळीच्या वर स्वर्गात जागा ना ?
स्वर्ग - ग-र्व (अहं) गेला स्व कळला ।
स्व-र्ग झाला ना देवा ?
आणि नित्य तुझं सान्निध्य ।
अवतरला हा स्वर्ग भूमीवरी ।
सांग त्याची येईल कशास सरी ?
श्रीजयंत नाम साधका हृदयी धरी ।
मिळण्या देवप्रीती जरी खरी ।
भाग्य भक्ताचे वर्णावे कोठवरी ?
देव सांगतो मी सदैव भक्ता घरी ।

महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या वतीने आयोजित केलेल्या आध्यात्मिक कार्यशाळेत सहभागी झालेल्यांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

श्री. अयाद अल्हिलो
१. श्री. अयाद अल्हिलो, इराक
१ अ. एस्.एस्.आर्.एफ्.ने केलेल्या मार्गदर्शनानुसार दत्ताचा नामजप केल्यावर शारीरिक त्रासांच्या संदर्भात लाभ झाल्याचे लक्षात येणे : मला संधिवात आणि सोरायसिस (एक त्वचारोग) आहे. एक्झिमा (एक प्रकारचा त्वचारोग) विषयी गूगलवर माहिती शोधतांना मी एस्.एस्.आर्.एफ्.च्या संपर्कात आलो. एस्.एस्.आर्.एफ्.ने केलेल्या मार्गदर्शनानुसार मी श्री गुरुदेव दत्त । हा नामजप चालू केला. या नामजपाने मला लाभ झाल्याचे लक्षात आले आणि आध्यात्मिक कार्यशाळेसाठी मी नोंदणी करून सनातनच्या रामनाथी येथील आश्रमात आलो.
१ आ. आश्रमात आल्यावर सांधेदुखीमुळे होणार्‍या वेदना अत्यल्प झाल्याचे जाणवणे : आश्रमात आल्यावर मला स्वतःमध्ये पुष्कळ सकारात्मक पालट जाणवले. सांधेदुखीमुळे मला नियमित औषधे घ्यावी लागतात. ती घेतली नाही, तर पुष्कळ वेदना होऊन मला चालता येत नाही. आश्रमात आल्यापासून आश्रमातील चैतन्य माझ्या शरिरात, विशेषत: तीव्र वेदना होत असलेल्या भागात झिरपत आहे, असे मला जाणवले. आश्रमात केवळ एका दिवसाच्या कालावधीतच माझ्या वेदना अत्यल्प झाल्याचे जाणवले.
१ इ. भिंतीला स्पर्श केल्यावर शरिरात चांगली शक्ती प्रवेश करत असल्याचे जाणवणे : आश्रमाच्या भिंतीला स्पर्श केल्यावर काय जाणवते ?, याविषयी सूक्ष्मातील प्रयोग घेण्यात आले.

श्रीरामतत्त्व आकृष्ट करणार्‍या सात्त्विक रांगोळ्या

             
       ११ ठिपके ११ ओळी
१२ ठिपके १२ ओळी
देवघर, पाट आदींभोवती काढावयाच्या श्री दुर्गादेवीतत्त्व आकृष्ट करणार्‍या रांगोळ्या
१७ ठिपके ३ ओळी
१९ ते १६ ठिपके
(संदर्भ : सनातनचा लघुग्रंथ देवतांची तत्त्वे आकृष्ट आणि प्रक्षेपित करणार्‍या सात्त्विक रांगोळ्या)

महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या आध्यात्मिक कार्यशाळेत सहभागी झालेले श्री. मणिकवसागम् यांना देव पदोपदी साहाय्य करत असल्याविषयी आलेल्या अनुभूतीश्री. मणिकवसागम्
१. क्षयरोग होऊन फुफ्फुसाच्या अर्ध्या भागात पाणी झाल्याने
शस्त्रकर्म करण्याची आवश्यकता असतांना देवाने केलेला चमत्कार !
१ अ. लष्करात सेवा करत असल्याने अनेक ठिकाणच्या दूषित पाण्यामुळे क्षयरोग होणे आणि तपासणी केल्यावर फुफ्फुसाच्या अर्ध्या भागात पाणी झाल्याने शस्त्रकर्म करण्याची आवश्यकता असल्याचे आधुनिक वैद्यांकडून समजणे : मी सिंगापूर लष्करात सेवारत होतो. त्यामुळे मला विविध देशांमध्ये जावे लागत असे. त्या त्या ठिकाणची प्रतिकूल परिस्थिती आणि दूषित पाणी यांमुळे वर्ष २००५ मध्ये मला क्षयरोग झाला. सिंगापूरला आल्यानंतर आधुनिक वैद्यांकडून तपासणी केल्यावर माझ्या फुफ्फुसाच्या अर्ध्या भागात पाणी झाल्याने ते अकार्यक्षम झाल्याचे मला कळले. माझ्यावर शस्त्रकर्म करण्याची आवश्यकता असून ते गुंतागुंतीचे असल्याचे आधुनिक वैद्यांनी मला सांगितले. त्या काळात श्‍वासोच्छ्वास करतांना त्रास होणे आणि जलद गतीने चालता न येणे, यांसारखे त्रास मला होत होते. माझ्या आरोग्याच्या तक्रारीही पुष्कळ वाढल्या होत्या.
१ आ. ऋषिकेशला गंगातिरी ध्यानाला बसल्यावर छातीच्या ठिकाणी काहीतरी जोरात घासत असल्याचे जाणवणे; पण ध्यान पूर्ण करावे, असे वाटून डोळे न उघडणे : माझी भगवान शंकरावर दृढ श्रद्धा असून मी त्याच्या चरणी प्रार्थना करत असे. उत्तर भारतातील ऋषिकेश या ठिकाणी जावे, असे मला आतून वाटत होते. मी ऋषिकेशला गेलो आणि गंगातिरी राहिलो. एके दिवशी मी गंगेत ३ डुबक्या मारल्या आणि तेथेच ध्यानाला बसलो. ती अगदी पहाटेची वेळ होती आणि मला ध्यान लागले. त्या वेळी माझ्या सभोवती अनेक लोक आहेत, असे मला जाणवत होते.

दसर्‍याच्या शुभदिनी प.पू. डॉक्टरांचा आशीर्वाद प्राप्त करूया !

श्रीमती शैला देव
दसर्‍याच्या शुभदिनी ।
सर्व साधक येती घरी (आश्रम) । 
श्रीकृष्णाच्या चरणांवरी । 
वाहती शमीची पत्री ॥ १ ॥ 

शस्त्रांचे (टीप १) पूजन करोनी । 
साधक हातात विजयध्वज घेऊनी । 

राष्ट्ररक्षणासाठी सज्ज होऊनी । 
क्षात्रगीते गोड गाऊनी ॥ २ ॥

दिन आज विजयादशमी ।

      आज (२२.१०.२०१५) सकाळी ५ व्या माळ्यावर गेलो होतो. तेव्हा सकाळी १० वाजण्याच्या सुमारास पांढर्‍या रंगाची मान आणि उर्वरित शरिराचा भाग तांबूस असणारा गरुडासम पक्षी प.पू. डॉक्टर ज्या खोलीत रहातात, तेथे घिरट्या (प्रदक्षिणा) घालत आहे, असे श्री. चेतन एन्.एम्. यांना दिसले. त्यांनी ते दृश्य मला लगेच दाखवले. या दृश्यासंबंधी पुढील ओळी सुचल्या. 
दिन आज विजयादशमी ।
परम पूज्यांच्या धामी ॥ १ ॥

सेवेत असे कृष्णपद्मी ।
वेळ सकाळी दशमीची ॥ २ ॥

जिल्हासेवक आणि साधक यांच्यासाठी महत्त्वाची सूचना

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती निर्मित धर्मसत्संगांचे 
केबल अथवा दूरचित्रवाणी यांवरून प्रसारण करण्याचे नियोजन करावे ! 
     '२६.१०.२०१६ या दिवसापासून 'दिवाळी' चालू होत आहे. त्या निमित्ताने या संदर्भातील महत्त्व विशद करणारा हिंदी विशेष धर्मसत्संग सिद्ध करण्यात आला आहे. या धर्मसत्संगांतर्गत 'धार्मिक कृतियोंका शास्त्र' या विषयाचे ६ धर्मसत्संग आहेत आणि 'अध्यात्मशास्त्र' या विषयाचे ३ धर्मसत्संग आहेत. या सत्संगांचा कालावधी २८ मिनिटे आहे. 
     या धर्मसत्संगांच्या माध्यमातून अधिकाधिक धर्मप्रसार होण्यासाठी साधकांनी पुढील प्रयत्न करावेत. 
१. स्थानिक केबल अथवा दूरचित्रवाणी यांवरून या धर्मसत्संगांचे प्रसारण करण्याचे नियोजन करावे. 
२. गावोगावी चालू असणार्‍या धर्मशिक्षणवर्गात आवश्यकतेनुसार हे धर्मसत्संग दाखवावेत. 
३. सध्या सर्वत्र चालू असलेल्या सभा, अधिवेशने यांमधून जोडल्या जाणार्‍या धर्माभिमान्यांना हे धर्मसत्संग आसपासच्या गावांत दाखवण्याची सेेवा द्यावी. 
४. समाजातील कार्यक्रमांमध्येही हे धर्मसत्संग दाखवण्याचे नियोजन करू शकतो. 
     धर्मसत्संग एम्.पी.४ (MP4) फॉरमॅटमध्ये उपलब्ध असून त्याची लिंक जिल्ह्यांना पाठवण्यात आली आहे. वाचक, हिंदुत्ववादी किंवा हितचिंतक यांना हे धर्मसत्संग आपल्या गावात, संघटनेत, स्थानिक मंदिरात, तसेच इतरत्र दाखवायचे असल्यास त्यांनी केंद्रातील दायित्व साधकाकडून ती लिंक घ्यावी.'
रामो राजमणिः सदा विजयते रामं रमेशंभजे ।
रामेणाभिहता निशाचरचमू रामाय तस्मैनमः ॥
अर्थ : राजांमध्ये सर्वश्रेष्ठ असणारे श्रीराम सदैव विजयी होतात. अशा रमापती (सीतापती) रामचंद्रांचे मी भजन करतो. ज्या रामचंद्रांनी राक्षसांचा विनाश केला, त्यांना मी प्रणाम करतो.

हिंदूंची खरी विजयादशमी !

       भ्रष्टाचार, गोहत्या, धर्मांतर, आतंकवाद यांसारख्या समस्यांरूपी रावणावर हिंदूंच्या संघटनरूपी बाणांनी विजय मिळवणेे ही खरी विजयादशमी !


वाचक, विज्ञापनदाते आणि हितचिंतक 
यांना दसर्‍यानिमित्त हार्दिक शुभेच्छा !

दसर्‍यानिमित्त परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचा संदेश

हिंदूंनो, विजयोपासनेला आरंभ करा ! 
परात्पर गुरु डॉ. आठवले
      शुंभ, निशुंभ, महिषासुरादी प्रबल दैत्यांवर महादुर्गेने आणि अहंकारी रावणावर श्रीरामाने विजय मिळवला, तो दिवस म्हणजे विजयादशमी ! दसरा म्हणजे केवळ हिंदु देवतांच्या विजयाचे स्मरण करण्याचा सण नव्हे, तर विजिगीषू वृत्तीचे संवर्धन करण्याचा दिवस आहे; म्हणूनच या दिवशी राक्षसी प्रवृत्तींवर विजय मिळवण्यासाठी हिंदु धर्मात विजयोपासना सांगितली आहे. शत्रूंपासून अजिंक्य रहाण्यासाठी अपराजिता देवीचे पूजन, शस्त्रे शत्रूंचा संहार करतात म्हणून शस्त्रपूजन आणि नंतर प्रत्यक्ष शत्रूच्या पराभवासाठी सीमोल्लंघन करणे, या कृती दसर्‍याला केल्या जातात.
      आज या विजयोपासनेचे विस्मरण झाल्याने सर्वत्र हिंदू पराभूत होत आहेत. युद्धाचा एकच उद्देश असतो आणि तो म्हणजे विजय ! विश्‍वात पराभवासाठी एकही युद्ध होत नाही. हिंदूंनो, विजयाचे हे माहात्म्य आणि विजयादशमीच्या विजयोपासनेचे महत्त्व लक्षात घ्या ! केवळ कर्मकांड म्हणून विजयादशमीला विजयोपासना करू नका, तर या वर्षीपासून सामाजिक, राजकीय आदी क्षेत्रांतील भ्रष्टाचारादी दुष्प्रवृत्तींच्या निवारणार्थ खर्‍या विजयोपासनेला आरंभ करा !
- (परात्पर गुरु) डॉ. जयंत आठवले, संस्थापक, सनातन संस्था (१०.९.२०१६)

॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज
सनातनचे श्रद्धास्थान
आनेवालेको कहना नहीं, जानेवालेको 
रोकना नहीं और पूछे बिगर रहना नहीं । 
भावार्थ : 'आनेवालेको कहना नहीं' मधे 'कहना' हे 'विचारणे' या अर्थी आहे. येणार्‍याला, म्हणजे जन्माला आलेल्याला 'तू जन्माला का आलास ?' असे आपण विचारू शकत नाही. सृष्टीचे निर्माण बंद होऊ शकत नाही. 'जानेवालेको', म्हणजे मृत्यू पावणार्‍याला 'रोकना नहीं', म्हणजे आपण थांबवू शकत नाही. 'पूछे बिगर रहना नहीं', म्हणजे 'तू खरोखर कोण आहेस ?' हे स्वतःला विचारल्याविना राहू नये. या प्रश्‍नाने तरी तो स्वतःच्या खर्‍या रूपाची ओळख करून घ्यायचा प्रयत्न करील. 
 (संदर्भ : 'सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.') 
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥ 
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥ 
          या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो. 
- प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

यशप्राप्ती
आयुष्यात यश, सुख आणि ईश यांची प्राप्ती होणे, या अतिशय कठीण गोष्टी आहेत, 
असे न मानता प्रयत्न करीत राहिले की, या गोष्टी प्राप्त होतात. 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

सरकारची मनमानी !

संपादकीय 
      आज हिंदूंचा दसरा हा सण असून उद्या म्हणजे १२ ऑक्टोबर या दिवशी मोहरम हा मुसलमानांचा सण आहे. या पार्श्‍वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्था बिघडण्याची भीती बंगालच्या तृणमूल काँग्रेसला वाटली आणि राज्यातील हिंदूंनी दुर्गामातेच्या मूर्तीचे विसर्जन करण्याविषयी बंधने घातली. एकूणच हिंदूंची गळचेपी झाली. राज्यात अगोदरच अनेक ठिकाणी नवरात्रोत्सव सार्वजनिक स्तरावर साजरा करण्यास प्रशासनाने अनुमती नाकारली आणि हिंदूंना घटनेने दिलेला धर्मपालनाचा अधिकारच हिरावून घेतला. न्यायालयात शासनाच्या विरोधात तीन याचिका गेल्यावर न्यायालयाने म्हटले, सरकारचा आदेश म्हणजे अल्पसंख्यांकांना संतुष्ट करण्याचा प्रयत्न असून सरकारची ही मनमानी आहे.

सीमोल्लंघन वारंवार हवे !

आज विजयादशमी ! विजयोपासना करण्याचा हा दिवस ! अलीकडेच उरी येथे आतंकवाद्यांनी केलेल्या आक्रमणात आपले सैनिक हुतात्मा झाले. त्यानंतर भारतीय सैन्यानेही पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून तेथील आतंकवाद्यांना कंठस्नान घातले. यामुळे भारतियांमध्ये चैतन्य संचारले. गेली कित्येक दशके पाकचा उद्दामपणा आपण सहन केला. त्यानंतर या छोट्याशा विजयाने देश उल्हासित झाला नसता, तर नवल ! मात्र हे पुरेसे आहे का ? विजयाची ही तृष्णा संपलेली नाही. हिंदूंना समाजातील दुष्प्रवृत्तींवर विजय हवा आहे ! हा विजय मिळवण्यासाठी प्रथम अंतरातील दुष्प्रवृत्ती नष्ट होणे आवश्यक आहे. हिंदूंना यासाठी आध्यात्मिक स्तरावर सिद्ध व्हावे लागेल.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn