Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

नवरात्रोत्सव (आज दहावा दिवस)

सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके ।
शरण्ये त्र्यम्बके गौरि नारायणि नमोऽस्तुते ॥
         एका मतानुसार नवरात्रीतील पहिले तीन दिवस तमोगुण अल्प करण्यासाठी तमोगुणी महाकालीची, दुसरे तीन दिवस रजोगुण वाढवण्यासाठी रजोगुणी महालक्ष्मीची आणि शेवटचे तीन दिवस साधना तीव्र होण्यासाठी सत्त्वगुणी महासरस्वतीची पूजा करतात.
         वर उल्लेखिलेला रजोगुण हा गतीमानतेचे प्रतिक आहे. साधना, धर्मकार्य, राष्ट्रकार्य आदी करण्यासाठी गतीमानता आवश्यक असते. नवरात्रीत महालक्ष्मीदेवीच्या पूजेने ती गतीमानता आपल्याला लाभते.
(संदर्भ : सनातनचा ग्रंथ शक्ती (भाग २) - शक्तीची उपासना)
नवरात्र विषयक माहितीसाठी संकेतस्थळावरील मार्गिका
https://www.sanatan.org/mr/navratri
         प्रतिपदा तिथीची वृद्धी असल्याने या वर्षी नवरात्र १० दिवस आहे. तिथी साधारणत: क्षय होते. वृद्धी क्वचितच होते. - वेदमूर्ती श्री. केतन शहाणे

तळेगाव (जिल्हा नाशिक) येथील बालिकेच्या लैंगिक शोषणाच्या निषेधार्थ संतप्त नागरिक रस्त्यावर !

 • पोलिसांकडून आरोपींवर वेळीच कठोर कारवाई झाली असती, तर जनतेला असे पाऊल उचलावे लागले नसते !
 • पोलिसांच्या वाहनांसह इतर वाहने जाळली
 • आरोपीच्या घराची तोडफोड
 • महामार्ग रोखून धरला
 • पोलिसांकडून हवेत गोळीबार
 • बाजारपेठा बंद
        नाशिक - त्र्यंबकेश्‍वरमधील तळेगाव (अंजनेरी) येथील ५ वर्षांच्या बालिकेचे लैंगिक शोषण केल्याच्या निषेधार्थ संतप्त जनतेने रस्त्यावर उतरून आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.
        एका १५ वर्षीय मुलाने या पीडित बालिकेवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप झाला होता; परंतु वैद्यकीय अहवालानुसार बलात्कार झाला नसून अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न झाला आहे, अशी माहिती नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दिली. वैद्यकीय अहवालानुसार मुलीची स्थिती गंभीर आहे. या घटनेनंतर संतप्त स्थानिक नागरिक रस्त्यावर उतरले आणि त्यांनी वाहने जाळली, तोडफोड केली, तसेच महामार्ग रोखून धरला.
        जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी हवेत गोळीबार केला. येथे राज्य राखीव पोलीस दलाची एक तुकडी नियुक्त करण्यात आली आहे.

९०० हून अधिक जणांचा बळी घेणार्‍या मॅथ्यू चक्रीवादळाच्या उपग्रहाने काढलेल्या चित्रात मानवी कवटीचा आकार आढळला !

अमेरिकेत अंनिससारख्या संघटना असत्या तर 
त्यांनी उपग्रहाने काढलेल्या चित्रालाही अंधश्रद्धा 
म्हणत त्यावर अंधश्रद्धाविरोधी कायद्यांतर्गत 
गुन्हा प्रविष्ट करण्याची मागणी केली असती ! 

मॅथ्यू नावाच्या चक्रीवादळाच्या केंद्रबिंदूचे उपग्रहातून
काढलेले मानवी कवटीच्या आकारासारखे दिसणारे चित्र

         वॉशिंग्टन - कॅरेबियन बेटे आणि अमेरिकेचा पूर्व भाग येथे थैमान घालून ९०० हून अधिक लोकांचा बळी घेणार्‍या मॅथ्यू नावाच्या चक्रीवादळाच्या केंद्रबिंदूचे उपग्रहातून चित्र काढले असता त्याच्या मध्यभागी मानवी कवटीचा आकार आढळून आला, असे अमेरिकेच्या हवामान खात्याचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ स्तू ओस्रो यांनी सांगितले आहे. (शास्त्रज्ञांपेक्षा स्वतःला अधिक विज्ञानवादी समजणार्‍यांना चपराक ! - संपादक)
         मॅथ्यू चक्रीवादळाचे चित्र इन्फ्रा रेड छायाचित्रक लेन्स वापरून काढण्यात आले. या वादळामुळे जणूकाही जगाचा अंतच समीप आला आहे, असा भास होतो, असे शास्त्रज्ञांचे मत आहे. चक्रीवादळाच्या मध्यभागी दिसणार्‍या या कवटीचे डोळे लाल असून तिचे दातही आवळल्यासारखे दिसत आहेत. ते बहुतेक ढगांमुळे निर्माण झाले असावेत, असा अंदाज शास्त्रज्ञ पॉल मेयर यांनी व्यक्त केला.

अल्पसंख्यांकांचे लांगूलचालन करण्याचा प्रयत्न ही सरकारची मनमानी !

 • न्यायालयाने फटकारल्यानंतर ममता बॅनर्जी सरकार लांगूलचालन करणे थांबवील, याची शक्यता नाही, हे हिंदूंनी लक्षात ठेवावे !
 • या मनमानीसाठी न्यायालयाने ममता बॅनर्जी सरकारला शिक्षा केली पाहिजे !
 • दुर्गामूर्ती विसर्जनावर निर्बंध घालण्याच्या प्रकरणी कोलकाता उच्च न्यायालयाने ममता बॅनर्जी सरकारला फटकारले !
        कोलकाता - बंगालच्या ममता बॅनर्जी सरकारने मोहरमच्या मिरवणुकांसाठी नवरात्रीच्या काळात दुर्गादेवी मूर्तीच्या विसर्जनाची वेळ निश्‍चित करणारा आदेश घोषित केला. या आदेशाच्या प्रकरणी कोलकाता न्यायालयाने बंगाल सरकारला फटकारले आहे. सरकारचा हा आदेश म्हणजे अल्पसंख्यकांना खुश करण्याचा प्रयत्न असून ही सरकारची मनमानी आहे, अशा शब्दांत न्यायालयाने फटकारले आहे. न्यायाधीश दीपांकर दत्ता यांनी पोलीस आणि प्रशासन यांना दोन्ही समुदायांसाठी वेगवेगळे मार्ग शोधण्याचा आणि दोन्ही गट कोठेही एकत्र येणार नाहीत, याची काळजी घेण्याचा आदेश दिला आहे. ११ ऑक्टोबरला दसरा असून दुसर्‍या दिवशी मोहरम आहे. राज्य सरकारच्या आदेशाच्या विरोधात ३ याचिका प्रविष्ट करण्यात आल्या होत्या.
न्यायालयाने सरकारला फटकारतांना केलेली विधाने,
१. धर्माच्या जोडीला राजकारण करणे हे अत्यंत धोकादायक आहे.

२०११ मध्ये भारताने सर्जिकल स्ट्राईक करून पाकच्या ३ सैनिकांचे शिर कापून आणल्याचा द हिंदू दैनिकाचा दावा !

शत्रूदेशाच्या तीन सैनिकांचे शिर कापून 
आणल्याचे वृत्त पाच वर्षांनंतर प्रसिद्ध 
करणारे काँग्रेसला साहाय्यभूत दैनिक द हिंदू
       नवी देहली - द हिंदू या इंग्रजी दैनिकाने प्रसिद्ध केलेल्या वृत्तात भारताने २०११ मध्ये काँग्रेसची सत्ता असतांना सर्जिकल स्ट्राईक करून पाकच्या ३ सैनिकांचे शिर कापून आणले होते, असे म्हटले आहे. या वृत्ताला सैन्याचे निवृत्त मेजर जनरल ए.के. चक्रवर्ती यांनी दुजोरा दिला आहे; मात्र केंद्र सरकार आणि संरक्षण मंत्रालय यांनी अद्याप दुजोरा दिलेला नाही. काँग्रेसच्या कार्यकाळातही सर्जिकल स्ट्राईक केले गेले होते; मात्र ते उघड करण्यात आले नव्हते, असा दावा काँग्रेसने यापूर्वीच केला आहे. (भारतीय सैनिकाचे शिर कापून पाकचे सैनिक घेऊन गेल्याचे वृत्त जगभर प्रसिद्ध झाले. मग शत्रूदेशाच्या सैनिकाचे शिर भारतीय सैनिक घेऊन आल्याचे वृत्त उघड करण्यात काँग्रेसच्या राजवटीला लाज वाटत होती का ? कि तेथेही अल्पसंख्यांकांना न दुखवण्याचे मतांचे राजकारण केले ? - संपादक) मात्र निवृत्त महासंचालकांनी हा दावा फेटाळून लावला होता.
       या वृत्तात पुढे म्हटले आहे की, ऑपरेशन जिंजर नावाने ही मोहीम राबवण्यात आली होती. यात २५ सैनिक सहभागी झाले होते. पाकिस्तानी सैन्याने ३० जुलै २०११ या दिवशी कुपवाडा येथे भारतीय सैन्याच्या राजपूत आणि कुमाऊ रेजिमेंटच्या तुकडीतील ६ सैनिकांवर आक्रमण करून दोघा सैनिकांचे शिर कापून नेले होते. काही दिवसांनी सैनिकांनी एका आतंकवाद्याला ठार केले होते. त्याच्याकडे सापडलेल्या ध्ननीचित्रफितीमध्ये पाकचे सैनिक भारताच्या सैनिकाचे शिर मधोमध ठेवून त्याभोवती फिरतांना दिसत होते. यावरून पाकचा सूड उगवण्याचा निर्णय घेतला गेला. त्यानंतर पाकच्या ३ चौक्यांवर सर्जिकल स्ट्राईक करून पाकच्या ८ सैनिकांना ठार करण्यात आले.

(म्हणे) सार्कसाठी पाकिस्तानात न जाण्याचा मोदींचा निर्णय चुकीचा ! - स्वामी अग्निवेश

सरकारच्या देशहितैशी निर्णयांवर स्वामी अग्निवेश यांची टीका
      पुणे, ९ ऑक्टोबर - दक्षिण आशियाई प्रादेशिक संघटनेच्या (सार्क) पाकिस्तानात होणार्‍या परिषदेसाठी न जाण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा निर्णय चुकला. कोणत्याही संकटांवर चर्चा होणे, हा एकच मार्ग असतो. त्यामुळे पाकिस्तानसमवेत चर्चा कायम ठेवणे आवश्यक आहे, असे मत वादग्रस्त वक्तव्यांसाठी प्रसिद्ध असलेले सामाजिक कार्यकर्ते स्वामी अग्निवेश यांनी व्यक्त केले. पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने ८ ऑक्टोबर या दिवशी पत्रकार संघात त्यांच्याशी वार्तालापाचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते. (चर्चेतून प्रश्‍न सुटू शकतात, अशा लेच्यापेच्या भूमिकेमुळेच काश्मीर प्रश्‍न इतकी वर्षे चिघळत राहिला आहे. छत्रपती शिवरायांनीही मुघलांशी चर्चा करून हिंदवी स्वराज्याची निर्मिती केली नव्हती. शत्रूराष्ट्र पाकिस्तानच्या विरोधात कठोर भूमिका घेण्याची आवश्यकता असतांना चर्चेचे गुर्‍हाळ चालू ठेवण्याची भूमिका राष्ट्रहिताला मारक आहे. - संपादक)

मुंबई येथे १५ ऑक्टोबर या दिवशी भरणार्‍या चिनी उत्पादनांच्या प्रदर्शनाला हिंदु जनजागृती समितीचा विरोध !

        मुंबई - वर्ल्डेक्स इंडिया एक्झिबिशन अँड प्रमोशन लि. या आस्थापनाच्या वतीने मुंबई येथे १५ ऑक्टोबर या दिवशी चिनी उत्पादनांच्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे प्रचार साहित्य वाचून तसेच या प्रदर्शनाविरुद्ध आलेल्या तक्रारी लक्षात घेऊन हिंदु जनजागृती समितीने या प्रदर्शनास विरोध करण्याचा निर्णय घेतला. समितीने म्हटले आहे की, चीन हा देश भारताचा चांगला शेजारी कधीच नव्हता. चीनला आशियात पाळेमुळे रोवायची आहेत. दक्षिण चीन सागरात चीनने चालवलेली दादागिरी याची साक्ष आहे.
        चीनने भारताच्या अणूपुरवठादार देशांच्या गटातील प्रवेशाला कडाडून विरोध केला. तसेच जैश-ए- महंमदचा प्रमुख मसूद अझर याला राष्ट्रसंघाने आतंकवादी घोषित करण्याच्या भारताच्या प्रस्तावाला सुरक्षा परिषदेतील १५ पैकी १४ राष्ट्रांचा पाठिंबा असूनही एकट्या चीनने हा प्रस्ताव राखून ठेवला. तसेच भारतावर नेहमी आक्रमण करणार्‍या पाकला चीन समर्थन देत आला आहे. या पार्श्‍वभूमीवर चीनच्या उत्पादनाचे प्रदर्शन आयोजित करणे, भारतियांच्या देशप्रेमाला आणि राष्ट्रीय एकात्मतेला बाधा आणणारे आहे. तरी समिती वर्ल्डेक्स इंडिया एक्झिबिशन अ‍ॅण्ड प्रमोशन लि. या आस्थापनाला वरील प्रदर्शन रहित करण्याचे आवाहन करत आहे.
देशप्रेमी नागरिक पुढील 
संपर्कावर निषेध नोंदवत आहेत.
इमेल : operations.mumbai5@worldexindia.com
operations.delhi@worldexindia.com
दू.क्र. (मुंबई) : (०२२) ४०३७६७००-३०, २४९४४६७२/७३
देहली : (०११) ४१८०२०३३ / २६२८५१४२

पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत बेदरे यांच्यावर कडक कारवाई करण्याचा अप्पर जिल्हादंडाधिकार्‍यांचा आदेश !

गणेशमूर्ती विसर्जनाच्या वेळी दैनिक 
सनातन प्रभातचे वार्ताहर श्री. राहुल कोल्हापुरे 
यांना पोलिसांनी कह्यात घेतल्याचे प्रकरण
        सातारा - गणेशमूर्ती विसर्जनाच्या वेळी येथील दैनिक सनातन प्रभातचे वार्ताहर श्री. राहुल कोल्हापुरे यांच्यावर आकसाने कारवाई करण्याचा प्रयत्न करणारे पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत बेदरे यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी, असा आदेश येथील उपजिल्हाधिकारी श्री. संजीव देशमुख यांनी पोलीस अधीक्षकांना दिला आहे.
        पाच दिवसांच्या श्री गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यासाठी येथील खाजगी मंगळवार तळ्यावर भाविकांनी गर्दी केली होती. या वेळी स्थानिक पोलीस प्रशासनाने श्री गणेशमूर्ती पारंपरिक पद्धतीने विसर्जन करण्यासाठी बंदी असल्याचे कारण पुढे करत भाविकांना श्री गणेशमूर्ती विसर्जनास मज्जाव केला होता. या संदर्भात तेथे कुटुंबियांसह मूर्ती विसर्जनासाठी आलेले दैनिक सनातन प्रभातचे वार्ताहर श्री. राहुल कोल्हापुरे यांनी पोलिसांना समजावले आणि विविध प्रकारची कायदेशीर कागदपत्रे दाखवली; मात्र शाहूपुरी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक चंद्रकांत बेदरे यांनी वार्ताहर श्री. कोल्हापुरे यांनाच दमदाटी करून कह्यात घेतले होते. याविषयी माहिती मिळताच शहरातील हिंदुत्वनिष्ठ शाहूपुरी पोलीस ठाण्यात जमा झाले होते. या वेळी पोलिसांनी मंगळवार तळ्यामध्ये मूर्तीविसर्जन करू देणार नाही, अशी ठाम भूमिका घेत हिंदुत्वनिष्ठांवरच अरेरावी केली, तसेच त्यांनी गणेशभक्त आणि श्री. कोल्हापुरे यांच्यावर गुन्हा प्रविष्ट करण्याची धमकीही दिली होती. त्यानंतर या प्रकाराविरुद्ध समस्त हिंदुत्ववादी संघटनांनी स्थानिक जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांना निवेदन दिले होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी लक्ष्मणपुरी येथील रामलीला कार्यक्रमासाठी उपस्थित रहाणार !

पंतप्रधान मोदी यांनी अयोध्येतील राम मंदिराच्या 
उभारणीसाठीही प्रयत्न करावेत, असे हिंदूंना वाटते !
गोस्वामी तुलसीदास यांच्या काळापासून या रामलीलेला प्रारंभ !
      लक्ष्मणपुरी (लखनौ) - दसर्‍यानिमित्त होणार्‍या येथील सर्वात जुन्या ऐशबाग रामलीलेच्या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित रहाणार आहेत. येथील ऐशबाग रामलीला समिती मागील ७० वर्षांपासून भारताच्या पंतप्रधानांना या कार्यक्रमांचे निमंत्रण देत आली आहे; परंतु प्रथमच पंतप्रधानांकडून या निमंत्रणाचा स्वीकार करण्यात आला आहे. ११ ऑक्टोबरला पंतप्रधान मोदी १ घंट्यासाठी या रामलीलेसाठी येणार आहेत. त्यानंतर रावणवधाचा कार्यक्रम पाहून ते थेट देहलीला परत जाणार आहेत.
     ही रामलीला अनुमाने ५०० वर्षांपूर्वी चालू झाली असून स्वत: गोस्वामी तुलसीदास यांनी त्यांच्या जीवनकाळात या रामलीलेला प्रारंभ केला होता, असे म्हटले जाते. प्रारंभी या ठिकाणी रामलीलाऐवजी रामकथा होत होती, ज्यात अयोध्येहून आलेले साधूसंत रामायणातील पात्र सादर करत असत. कालांतराने अवधचा नवाब असफउद्दौलाच्या काळापासून त्याला मैदानी स्वरूप प्राप्त झाले.

कपिल सिब्बल यांच्या दबावापोटी तिस्ता सेटलवाड यांच्या संघटनेला ३ कोटी रुपयांचा निधी संमत केल्याचा त्रिसदस्यीय चौकशी समितीचा आरोप !

     नवी देहली - तिस्ता सेटलवाड यांच्या स्वयंसेवी संघटनेला ३ कोटी रुपयांचा निधी संमत करण्यासाठी तत्कालीन मनुष्यबळ विकास मंत्री कपिल सिब्बल यांनी शासकीय अधिकार्‍यांवर दबाव आणल्याचा आरोप त्रिसदस्यीय चौकशी समितीने केला आहे. तिस्ता सेटलवाड यांच्या सबरंग ट्रस्ट या स्वयंसेवी संघटनेला मुंबई शाळांमध्ये सप्लेमेंटरी रीडर्स पुरवण्यासाठी मनुष्यबळ विकास मंत्र्यांनी संमत केलेल्या निधीची चौकशी करण्यासाठी तत्कालिन मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती ईराणी यांनी त्रिसदस्यीय समिती स्थापन केली होती. महाराष्ट्र शासन आणि नॅशनल काउन्सील ऑफ एज्युकेशनल रीसर्च अ‍ॅन्ड ट्रेनिंग (एन्सीइआर्टी) यांनी तिस्ता सेटलवाड यांच्या प्रस्तावाला विरोध केला होता. तिस्ता सेटलवाड यांचा सप्लेमेंटरी रीडर्स विषयीचा प्रस्ताव एनसीइआरटीकडे पाठवण्यात आला होता; मात्र त्यामध्ये तांत्रिक अडचणी असल्याने तो संमत करण्यात आला नव्हता. तसेच त्यावेळच्या महाराष्ट्र शासनानेही त्या प्रस्तावाला आक्षेप घेतला होता. तरीही केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयातील अधिकार्‍यांनी या प्रकल्पासाठी निधी संमत केला होता.अमेरिकेत शीख व्यक्तीला तरुणांच्या टोळक्याकडून मारहाण

      कॅलिफोर्निया (अमेरिका) - अमेरिकेमध्ये भारतीय वंशाच्या मानसिंग खालसा या ४१ वर्षीय आयटी तज्ज्ञाला तरुणांच्या टोळक्याने बेदम मारहाण केली. या मारहाणीमध्ये त्यांच्या हात, डोळे आणि चेहर्‍याला गंभीर दुखापत झाली आहे. याप्रकरणी अमेरिकेतील द शीख कोएलिशन या शीख समाजाच्या संघटनेने पोलिसांकडे तक्रार नोंदवली आहे. खालसा यांना मारहाण करणार्‍या आक्रमणकर्त्यांना तात्काळ अटक करून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी संघटनेने केली आहे. शीख समाजाचे खालसा २५ सप्टेंबर या दिवशी रात्री कामावरून घरी परत येत होते. तेव्हा ५ ते ६ तरुणांच्या टोळक्याने त्यांच्या गाडीवर दारूची बाटली फेकली, तसेच त्यांचा पाठलाग करून त्यांच्यावर चाकूने आक्रमण केले. या वेळी तरुणांनी खालसा यांची पगडी पाडली, त्यांचे केस कापले आणि त्यांना शिवीगाळ करत मारहाण केली, असे खालसा यांनी सांगितले.

पालिका अधिकार्‍यांची अपकीर्ती करणार्‍यांच्या विरोधात पाच कोटी रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा प्रविष्ट

बेकायदा इमारतीवरील कारवाई प्रकरण
       मुंबई - येथील मशीद बंदर परिसरातील ११ मजली अनधिकृत इमारत पाडण्याची कारवाई करणार्‍या पालिका अधिकार्‍यांनी त्यांची अपकीर्ती करणार्‍यांच्या विरोधात पाच कोटी रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा पालिकेने दाखल करावा, असा विनंती प्रस्ताव प्रशासनाला पाठवला आहे. अनधिकृत बांधकामाविरुद्ध कारवाई करणार्‍या अधिकार्‍यांची बदनामी करणार्‍याविरुद्ध पालिकेने अब्रुनुकसानीचा दावा प्रविष्ट केल्यास तो ऐतिहासिक निर्णय ठरेल.
१. पालिकेची अनुमती न घेता मशीद बंदर येथील ११ केशवजी नाईक रोडवर ११ मजली इमारत बांधण्यात आली. कायदेशीर प्रक्रियेच्या पूर्ततेनंतर पालिकेच्या साहाय्यक आयुक्तांनी काम पाडण्यास प्रारंभ केला. यासाठी अधिकार्‍यांवर दबाव टाकण्यात आला.
२. पाडकाम करणार्‍या कामगारांना दमदाटी करून पळवून लावणे, पाडकामासाठी लागणारे आवश्यक साहित्य जवळपास मिळू न देणे, असे प्रकार होत आहेत.
३. पोलिसांकडून सहकार्य मिळत नसल्याने अधिकार्‍यांचे मानसिक खच्चीकरण होत आहे.
४. दबावतंत्राचा वापर केल्यानंतरही पाडकाम चालू असल्याने काहींनी अधिकार्‍यांच्या भ्रष्टतेविषयी प्रचार चालू केला आहे.

प्रजेला धर्माधिष्ठित आणि राष्ट्रप्रेमी बनवणे, हा दैनिक सनातन प्रभात चा उद्देश - शशिकांत राणे, समूह समूह संपादक, दैनिक सनातन प्रभात

रामनाथी, गोवा येथील वार्ताहर 
आणि संपादक प्रशिक्षण शिबीर : दुसरा दिवस
       रामनाथी (गोवा) ९ ऑक्टोबर (वार्ता.) - केवळ बातम्या छापून हिंदु राष्ट्र येणार नाही. बातम्यांकडे कोणत्या दृष्टीकोनातून पहायचे, हे समाजाला शिकवावे लागेल. प्रजेला धर्माधिष्ठित आणि राष्ट्रप्रेमी बनवणे, हा दैनिक सनातन प्रभातचा उद्देश आहे, असे प्रतिपादन दैनिक सनातन प्रभातचे समूह संपादक श्री. शशिकांत राणे यांनी केले. रामनाथी आश्रम येथे ८ ते ११ ऑक्टोबर या कालावधीत होत असलेल्या वार्ताहर आणि संपादक प्रशिक्षण शिबिराच्या दुसर्‍या दिवशी म्हणजे ९ ऑक्टोबर या दिवशी उपस्थित वार्ताहर साधकांना ते मार्गदर्शन करत होते.
       यानंतर दैनिकासाठी छायाचित्र कसे असावे ?, बातम्या पाठवतांना कोणती काळजी घ्यावी ?, संपादकीय विभागातील कार्यपद्धत यांविषयी मार्गदर्शन करण्यात आले आणि नंतर गटचर्चा पार पडली. दुपारच्या सत्रानंतर शिबिरार्थींना भावजागृतीपर ध्वनीचित्र तबकडी दाखवण्यात आली.

महाराष्ट्रात नवरात्रोत्सवानिमित्त विविध मंडळांत हिंदु जनजागृती समिती आणि रणरागिणी शाखा यांच्या वतीने करण्यात आलेला राष्ट्र आणि धर्म यांचा प्रसार !

         देवीचे रूप समजले जाणार्‍या महिलांची देशातील स्थिती विदारक झाली आहे. महिलांवरील अत्याचारांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. धर्माचरणाचा विसर पडल्याने अनेक महिलांचा मार्ग भरकटला आहे. यांवर महिलांनी शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिकदृष्ट्या सक्षम होणे हाच पर्याय आहे. तोच पर्याय समोर ठेवून हिंदु जनजागृती समितीच्या वतीने नवरात्रोत्सवाच्या कालावधीत पथनाट्याच्या माध्यमातून महिला सबलीकरणाचा जागर केला जात आहे. ऊठ भगिनी, जागी हो या पथनाट्याच्या माध्यमातून स्वसंरक्षण प्रशिक्षण - काळाची आवश्यकता यावर प्रभावीपणे भाष्य करण्यात येत आहे. सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळांमध्ये या पथनाट्याचे सादरीकरण करून महिलांना रणरागिणी बनण्याचे आवाहन करण्यात येत आहे. महाराष्ट्रातील विविध मंडळांत या सर्वच उपक्रमांना कृतीशील प्रतिसाद लाभत आहे. त्याविषयी छायाचित्रांसहित वृत्तांत येथे देत आहोत.

सर्जिकल स्ट्राईकचे पुरावे मागणार्‍यांविरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा प्रविष्ट करा !

नरेंद्र मोदी विचारमंचाची आंदोलनाद्वारे मागणी 
सैनिकांचा अपमान करणार्‍यांविरुद्ध
देशद्रोहाचा गुन्हा प्रविष्ट करावा, या
मागणीसाठी आंदोलन करतांना आंदोलनकर्ते
       पुणे, ९ ऑक्टोबर (वार्ता.) - भारताने सर्जिकल स्ट्राईकद्वारे पाकिस्तानातील आतंकवादी तळ उद्ध्वस्त करण्याची धाडसी कारवाई करून आतंकवाद्यांना संपवले; मात्र त्यानंतर काही देशविरोधी विचारसरणीच्या लोकांकडून प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या या सर्जिकल स्ट्राईकचे पुरावे मागून सैनिकांच्या शौर्याविषयी प्रश्‍नचिन्ह उपस्थित करण्यात आले. त्यामुळे सैनिकांना अपमानित करणारे देहलीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, मुंबई काँग्रेसचे संजय निरूपम, अभिनेता ओम पुरी, सलमान खान यांच्याविरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा नोंदवून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नरेंद्र मोदी विचार मंचच्या वतीने करण्यात आली. या संदर्भात ९ ऑक्टोबर या दिवशी बालगंधर्व चौकात आंदोलनही करण्यात आले. या प्रसंगी मंचाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष श्री. प्रमोद परदेशी, संपर्क प्रमुख शिवाजी पवार आणि अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

उरण (जिल्हा रायगड) येथे नवरात्रोत्सव मंडळांत सादर केलेल्या कार्यक्रमांना महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

सार्वजनिक नवरात्र मंडळात 
प्रात्याक्षिके करताना महिला कार्यकर्त्या 
     उरण (जिल्हा रायगड) - येथे ५ ऑक्टोबर रोजी नवदुर्गा नवरात्रोत्सव मंडळात रणरागिणी शाखेच्या वतीने स्वसंरक्षण प्रात्याक्षिके आणि पथनाट्ये सादर करण्यात आली. सौ. पुष्पलता ठाकूर यांनी नवरात्रीचे शास्त्र आणि सौ. मोहिनी मांढरे यांनी लव्ह जिहादचे भीषण सत्य यांविषयी माहिती दिली. स्वसंरक्षण प्रशिक्षणासाठी रणरागिणीच्या कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहनही या वेळी करण्यात आले. या कार्यक्रमाचा लाभ ८० महिलांनी
घेतला. मंडळात क्रांतीकारकांचे फ्लेक्स प्रदर्शन लावण्यात आले. ३०० हून अधिक जणांनी लाभ घेतला. तसेच सनातनने प्रकाशित केलेल्या १०० लघुग्रंथांचे वाटप करण्यात आले.
     धर्मशिक्षण वर्गातील श्री. आणि सौ. गुंजाळ, तसेच मंडळाचे अध्यक्ष श्री. पानसरे यांच्या पुढाकाराने कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले. त्यांनी रणरागिणीचा एक फ्लेक्स फलकही प्रायोजित केला. 
क्षणचित्र 
१. शिवसेना शहरप्रमुख श्रीमती पवार यांनी शिवसेना महिला मेळाव्यात रणरागिणीला आमंत्रित केले.

पुणे येथे हिंदूसंघटन, तसेच महिला सबलीकरण यांचा पथनाट्याद्वारे जागर

 • पथनाट्याच्या माध्यमातून स्वसंरक्षण प्रशिक्षण घेऊन सक्षम बनण्याचा संदेश
 • काश्मिरी हिंदूंच्या समर्थनार्थ कृतीशील योगदान देण्यासाठी साद
चिंचवड येथील अखिल चिंचवड नवरात्री
महोत्सवामध्ये पथनाट्याचे सादरीकरण
करतांना हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते
     पुणे - येथील सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळांत रणरागिणी शाखेच्या वतीने सादर केलेल्या पथनाट्यानंतर आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण - काळाची आवश्यकता या विषयावरील मार्गदर्शन पार पडल्यावर एक भारत अभियानांतर्गत येथील रमणबाग शाळेच्या मैदानावर होणार्‍या हिंदु धर्मजागृती सभेचाही प्रसार करण्यात येत आहे. काश्मिरी हिंदूंना वर्ष १९९० मध्ये जिहादी आतंकवादामुळे सर्व संपत्ती तेथेच सोडून काश्मिरमधून पलायन करावे लागले. २६ वर्षे त्यांच्यावर आपल्याच देशात निर्वासितासारखे जीवन वाट्याला आले आहे. सर्वपक्षीय राज्यकर्त्यांच्या अनास्थेमुळे हा प्रश्‍न अजूनही तसाच आहे. काश्मिरी हिंदूंच्या पाठीशी उभे रहाणे हे देशभरातील धर्मबांधवांचे कर्तव्यच आहे, असे आवाहन करत छोट्या व्याख्यानाच्या माध्यमातून हिंदु धर्मजागृती सभेचाही प्रसार करण्यात येत आहे. नवरात्रोत्सव मंडळांच्या पदाधिकार्‍यांसह उपस्थित भाविकांचा दोन्ही विषयांना उत्तम प्रतिसाद लाभत आहे.

मुंबई येथे प्रबोधनपर पथनाट्ये आणि स्वसंरक्षण प्रात्याक्षिके या माध्यमांतून केलेल्या जनजागृती समाजाचा कृतीशील पाठिंबा !

वसई येथील कार्यक्रमात
प्रात्यक्षिके दाखवतांना कार्यकर्ते
    मुंबई - येथे हिंदु जनजागृती समिती आणि रणरागिणी शाखा यांच्या वतीने नवरात्रोत्सव मोहिमेअंतर्गत चेंबुर, घोडपदेव, शिवडी, तुर्भे आणि वसई येथे ४ ते ७ ऑक्टोबर या कालावधीत विविध नवरात्रोत्सव मंडळांत प्रबोधनपर पथनाट्ये आणि स्वरक्षा प्रात्याक्षिके या माध्यमांतून जनजागृती करण्यात आली. या वेळी रणरागिणी शाखेच्या वतीने सौ. नयना भगत यांनी उपस्थितांना नवरात्रोत्सवांमागील शास्त्र, स्त्रियांवर होणारे अत्याचार, नवरात्रोत्सवांतील अपप्रकार रोखणे 
वसई येथील कार्यक्रमात घोषणा देतांना कार्यकर्ते
यांविषयी प्रबोधन केले. तसेच एक भारत अभियान काश्मीर की ओर या अभियानाचीही जागृती करण्यात आली. 
      चेंबूर येथील ओम साई गणेश मित्र मंडळ आणि जय अंबे मित्र मंडळ, तसेच घोडपदेव येथील सार्वजनिक नवरात्रोत्सव संलग्न बाल गोपाळ मंडळ, शिवडी येथील बाळ मित्र सेवा मंडळ, तुर्भे येथील मराठा मित्र मंडळ सेक्टर २१, तसेच वसई येथील धर्मजागृती सेवा मंडळ, पाचुबंदर येथे काश्मीरमध्ये वाढत चाललेला देशद्रोह अन् महिलांवर वाढत चाललेले अत्याचार या विषयांवर पथनाट्ये आणि स्संरक्षणाची प्रात्याक्षिके सादर केली. याचा एकूण ७५० हून अधिक भाविकांनी लाभ घेतला. सर्व ठिकाणी मंडळांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांचे उत्तम सहकार्य लाभले. अनेकांनी या वेळी धर्मकार्यात सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली. मुंबई आणि मुंबई उपनगर परिसरात अनेक मंडळांत त्यांच्या मागणीनुसार पथनाट्ये आणि प्रात्याक्षिके सादर केली जाणार आहेत.

दारूमुळे वाढलेल्या आत्महत्या नव्हे, तर हत्याच ! - मेधा पाटकर

       नागपूर - दारूमुळे हिंसेत वाढ होत असून महाराष्ट्रात आत्महत्यांचे सत्र म्हटले जात असले, तरी मुळात त्या हत्याच आहेत, असे विधान नर्मदा बचाव आंदोलनाच्या राष्ट्रीय संयोजक मेधा पाटकर यांनी केले आहे. देशभरात नशामुक्त भारत आंदोलनाचा आरंभ १ जुलैला देहली येथून करण्यात आला आहे. विविध राज्यांतील २० सामाजिक संघटना या आंदोलनात उतरल्या आहेत. नागपुरात आलेल्या या आंदोलनाच्या कार्यकर्त्यांची परिषद झाली. त्या वेळी त्या बोलत होत्या.

राज्यातील १०० शाळा आंतरराष्ट्रीय दर्जाच्या करणार ! - मुख्यमंत्री

राज्यातील शिक्षणक्षेत्राची सर्व स्तरांवरील स्थिती 
सुधारण्यासही मुख्यमंत्र्यांनी प्राधान्य द्यावे, ही अपेक्षा 
     मुंबई - दोन वर्षांत राज्यातील १०० शाळा आंतरराष्ट्रीय दर्जाच्या करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. एन्सीपीए येथे झालेल्या राज्य शिक्षक पुरस्कार सोहळ्यात ते बोलत होते. जनतेसोबत संवाद साधता यावा यासाठी केंद्रातील भारत नेटच्या धर्तीवर महाराष्ट्र नेटचा प्रयोग येत्या काळात चालू करण्यात येणार आहे. त्याद्वारे राज्यातील प्रत्येक खड्यातील लोकांपर्यंत आरोग्य आणि शिक्षण यांच्या सेवा पोचवता येतील, असेही मुख्यमंत्र्यांनी या वेळी सांगितले.
       ते पुढे म्हणाले की, राज्यातील सर्व ग्रामपंचायती २०१८ पर्यंत डिजिटल आणि अत्याधुनिक करण्यात येणार असून राज्यातील सर्व शाळा ऑनलाईन डिजिटल करण्यात येणार आहेत. अपंग विद्यार्थ्यांसाठी लवकरच अभ्यास मंडळ स्थापन करण्यात येईल. तसेच या वर्षी राज्यभरात ३३ सहस्र प्रगत शाळा चालू करण्यात येणार आहेत. 
     सिंगापूर, फिनलॅण्ड या देशांत कशा पद्धतीचे शिक्षण दिले जाते, याची चित्रफीत ग्रामीण भागातील शिक्षकांना दाखवण्यात येणार आहे, असे शिक्षणमंत्री तावडे यांनी या वेळी सांगितले.

शक्तीशिवाय काहीही अशक्य ! - सरसंघचालक मोहन भागवत

भारताने त्याची सर्व शक्ती दाखवून पाकला 
कायमचा धडा शिकवावा, अशी जनतेची अपेक्षा आहे !
     नागपूर - शक्तीच्या वापराशिवाय जगात कुठलीही गोष्ट शक्य नाही, अशा शब्दांत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक श्री. मोहन भागवत यांनी भारताने केलेल्या सर्जिकल स्ट्राईकचे समर्थन केले आहे. इतके दिवस आपण शक्तीच्या भाषेचा वापर करत होतो तेव्हा अमेरिका आपल्याला शांत बसवत होती; मात्र आता त्यांना न विचारता आपण शक्तीचा वापर केला, तर अमेरिकाही आपल्या पाठीशी आहे. एखादी गोष्ट चांगली असो वा वाईट, शक्तीच्या वापराशिवाय ती साध्य होऊ शकत नाही, असे श्री. भागवत यांनी नागपूरमध्ये आयोजित केलेल्या एका खाजगी कार्यक्रमात म्हटले.

मुंबईतील मोनो रेल्वे मार्गिकेचा भाग निखळला

      मुंबई - मोनो रेल्वेच्या दुसर्‍या टप्प्याचे बांधकाम वेग घेत असतांनाच या बांधकामाचा साईबाबा पथ ते करी रोड या मार्गाच्या दरम्यान असलेल्या मार्गिकेचा काही भाग ८ ऑक्टोबर या दिवशी दुपारी अचानक निखळला. हा निखळलेला भाग रस्त्यावर कोसळला असता, तर अनर्थ ओढवला असता. (रेल्वेचा पूल बांधून झाल्यावर अशा दुर्घटना घडल्यास त्याला उत्तरदायी कोण ? - संपादक)
     लोअर परळ ते मिंट कॉलनी या दरम्यान मोनो मार्गावरील १ सी ते एक डी १ या खांबांमधील कन्डक्टर रेलचा काही भाग अचानक निखळला. येथे सध्या मोनोच्या चाचण्या घेण्यात येत आहेत. या वेळी मोनोची कोणतीही चाचणी नसल्याने मोठी दुर्घटना ठळली. या घटनेमुळे मोनो रेल्वेच्या कामाच्या दर्जाबाबतही शंका उपस्थित होत आहे. विधी विद्यालयातील प्राध्यापकाने विनयभंग केल्याची तक्रार

      नागपूर - न्यायालयात नेण्याच्या बहाण्याने एका प्राध्यापकाने विद्यार्थिनीला दुसर्‍याच ठिकाणी नेऊन तिचा विनयभंग केल्याची तक्रार प्राचार्यांकडे करण्यात आली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयातील अंतिम वर्षांत शिकणार्‍या विद्यार्थिनीने प्राध्यापकाने गैरवर्तन केल्याची तक्रार प्राचार्य डॉ. श्रीकांत कोमावार यांच्याकडे केली असून तिचे पालकही प्राचार्यांना भेटून गेले. प्राध्यापकाविरुद्ध तक्रार केल्याने मुलीच्या गुणांवर त्याचा परिणाम होईल, अशी भीतीही व्यक्त करण्यात येत आहे.

महसूल उभारणीसाठी सरकार लीजच्या भूमी विकणार

       मुंबई - लीजवर दिलेले भूखंड, भूमी विकून महसूल उभारणीचा राज्य सरकारचा विचार आहे. या भूमीचे हस्तांतरण सुलभ होण्यासाठी समिती स्थापण्यात आली आहे. असे झाले तर सरकारला सुमारे ५० सहस्र कोटी रुपयांचा महसूल उभा करता येईल. ज्यांचा लीजचा करार संपला आहे, त्यांनी नूतनीकरण करावे, अन्यथा त्यांच्या भूमी सरकार परत घेईल, अशी सूचना देण्यात आली आहे. लीजवरील भूमी विकण्यात अनेक अडचणी आहेत. अनेक रुग्णालयांना अशा भूमी दिल्या आहेत. समजा त्या मुक्त झाल्या, तर त्यांतील २० टक्के खाटांचा कोटा रहित होईल.

खारघर येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने मार्गदर्शन

गरबाप्रेमींना मार्गदर्शन करतांना श्री. सुमित सागवेकर
      खारघर - येथील शिवतेज सार्वजनिक उत्सव मंडळात श्री. रमेशदादा खडकर आणि दांडिया नृत्य कार्यक्रमाचे संयोजक श्री. संदेश कदम, श्री. सचिन केदार आणि हिंदु जनजागृती समितीचे स्थानिक कार्यकर्ते श्री. दिनेश चासकर यांच्या सहकार्याने उपस्थित गरबाप्रेमी आणि भाविकांना समितीचे श्री. सुमित सागवेकर यांनी मार्गदर्शन केले. राष्ट्र-धर्माच्या अनुषंगाने केलेले मार्गदर्शन आवडल्याने मंडळाकडून येत्या दसर्‍याला होणार्‍या भंडारा कार्यक्रमाच्या वेळीही समितीला हा विषय सविस्तरपणे मांडण्याची संधी मिळाली आहे. 
क्षणचित्र - मार्गदर्शनासाठी वेळेआधी १० मिनिटे गरबा थांबवल्यावर उपस्थित गरबाप्रेमी नाराज झाले; पण हर हर महादेव असा गजर करून मार्गदर्शन चालू झाल्यावर सर्वांनीच शांतपणे विषय ऐकला आणि त्याला प्रतिसादही दिला.

मराठी माणसांनी ज्वारी खाणे बंद केल्यानेच आजार बळावले ! - आयुर्वेदाचार्य वैद्य खडीवाले

     कल्याण - मराठी माणसांनी ज्वारी खाणे बंद केल्यानेच बहुतांश आजार बळावले आहेत, असे स्पष्ट मत सुप्रसिद्ध आयुर्वेदाचार्य वैद्य खडीवाले यांनी व्यक्त केले. येथे आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. 
      ते पुढे म्हणाले, दैनंदिन आहारात ज्वारीचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. शरिराला आवश्यक असणारी ऊर्जा आणि पाचक रस ज्वारीत ठासून भरलेला आहे. त्यामुळे दिवसाची सुरुवात ज्वारीच्या पदार्थाने करण्यासह जेवणातही तिचा वापर केल्यास लठ्ठपणा, मधुमेह, हृदयरोग यांसारख्या अनेक व्याधींना आपण दूर ठेवू शकतो.नवरात्रीच्या निमित्ताने लैंगिक विज्ञापन प्रसिद्ध करणार्‍या टाइम्स ऑफ इंडियाच्या विरोधात निदर्शने

निदर्शने करतांना कार्यकर्ते 
     पुणे, ९ ऑक्टोबर (वार्ता.) - नवरात्रीच्या निमित्ताने दांडियाचा संदर्भ देत टाइम्स ऑफ इंडियाने १ ऑक्टोबर या दिवशीच्या अंकात लैंगिक उत्तेजना वाढवणार्‍या स्टे ऑन या उत्पादनाचे रंगीत विज्ञापन प्रसिद्ध केले होते. या विज्ञापनामध्ये जेव्हा तुम्ही दांडियाचा विचार करता, तेव्हा तुम्ही स्टे ऑनचा विचार करा. या गोळ्या खाऊन तुमच्या पार्टनरला जोशपूर्ण नृत्याने आश्‍चर्यचकित करा, अशा पद्धतीचा मजकूर लिहिण्यात आला होता. नवरात्रीतील दांडियाचा लैंगिकतेशी संबंध जोडणार्‍या या विज्ञापनाच्या विरोधात भारतीय संस्कृती संवर्धक समितीच्या वतीने ९ ऑक्टोबर या दिवशी येथील गुडलक चौकात निदर्शने करण्यात आली. या वेळी नैतिकतेची चाड न ठेवता अश्‍लील विज्ञापन प्रसिद्ध करणार्‍या टाइम्स ऑफ इंडियाने माफी मागावी, अशी मागणी करण्यात आली.

महापारेषणच्या साहाय्यक अभियंत्याला काँग्रेसच्या आमदाराकडून मारहाण अन् ठार मारण्याची धमकी

असे गुंड लोकप्रतिनिधी देणारी लोकशाही काय कामाची ?
     नागपूर - कोराडी ते तिडंगी या गावांच्या दरम्यान अतिउच्च दाबाच्या वाहिनीचे काम करणार्‍या महापारेषणच्या साहाय्यक अभियंत्यासह अन्य एकास सावनेरचे काँग्रेसचे आमदार सुनील केदार आणि त्यांचे सहकारी यांनी ६ ऑक्टोबरला जिवे मारण्याची धमकी देऊन, शिवीगाळ करून पुष्कळ प्रमाणात मारहाण केली. अभियंत्यांच्या संघटनेने या वाहिनीवरील काम गेल्या तीन दिवसांपासून बंद करून आंदोलन चालू केले आहे, तर साहाय्यक अभियंत्याच्या तक्रारीवरून केळवद पोलिसांनी आमदार केदारांसह इतरांवर गुन्हे प्रविष्ट केले आहेत. 
     या घटनेमुळे संतप्त अधिकार्‍यांनी तेथील काम बंद करून आवश्यक सुरक्षेशिवाय काम न करण्याची चेतावणी दिली असून महापारेषणच्या जिल्ह्यातील अधिकार्‍यांनी काळ्या फिती लावून काम चालू केले आहे.

लक्ष्मणपुरी येथे मायावती यांच्या सभेच्या वेळी झालेल्या चेंगराचेंगरीत तिघांचा मृत्यू !

       लक्ष्मणपुरी - बहुजन समाज पार्टीचे संस्थापक कांशीराम यांच्या १० व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या पक्षाध्यक्षा मायावती यांच्या सभेच्या वेळी झालेल्या चेंगराचेंगरीत ३ जणांचा मृत्यू झाला, तर ३० हून अधिक जण घायाळ झाले आहेत. मृतांमध्ये २ महिलांचा समावेश आहे. पक्षाचे लक्ष्मणपुरीचे शहराध्यक्ष रामअचल यांनी सभेत कोणतीही चेंगराचेंगरी झाला नसून उष्माघाताने महिलांचा मृत्यू झाल्याचे म्हटले आहे. (जनतेला सभेला बोलावून लोकांच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्यानंतरही खोटे बोलणारे राजकारणी लोकशाही निरर्थक ठरवत आहेत ! - संपादक)

पाकमधील व्यापार्‍यांची भारतीय साहित्यांना आग लावून भारताबरोबरील व्यापार बंद करण्याची मागणी !

पाकबरोबरचा व्यापार बंद झाल्यास भारताची काहीच 
हानी होणार नाही, हे माहीत नसलेले पाकचे व्यापारी !
        लाहोर - येथील हॉल रोड मार्गावर व्यापार्‍यांनी एकत्र येऊन भारताबरोबर व्यापार बंद करण्याची मागणी केली. तसेच भारताने केलेल्या सर्जिकल स्ट्राईकचा निषेध केला. त्यांनी काश्मीरमध्ये होत असलेल्या हिंसाचाराचा विरोध म्हणून भारतीय सामानांना आग लावली.

हिंदु जनजागृती समितीच्या प्रसारकार्याचा पुणे आणि पश्‍चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांचा सप्टेंबर २०१६ मधील आढावा !

सद्गुरु (कु.) स्वाती खाडये

१. जिल्हा - पुणे 
१ अ. बारामती 
१ अ १. विरोध होत असतांनाही साधिकांनी निर्भयपणे गणेशमूर्ती दानाच्या विरोधात प्रबोधन करणे : येथे गणेश मूर्तीदान मोहीम मोठ्या प्रमाणात राबवली जाते. या वेळी दहा साधिकांनी अनेक ठिकाणी जाऊन प्रबोधन केले. काही ठिकाणी सौ. सुनेत्रा पवार (श्री. अजित पवार यांची पत्नी) यांच्या संघटनेतील सदस्य भाविकांवर मूर्तीदानासाठी सक्ती करत होते. समितीच्या साधिकांनी भाविकांचे प्रबोधन केल्यावर काही जण गणेशमूर्तीचे विसर्जन करण्यास आले; पण या संघटनेतील महिला साधिकांच्या अंगावर धावून गेल्या. तेव्हा साधिकांनी घाबरून न जाता निर्भीडपणे प्रबोधन केले आणि संयम ठेवून परिस्थिती हाताबाहेर जाऊ दिली नाही.
     प्रबोधन करण्यास काही पोलीस साधिकांना प्रतिबंध करत होते. त्यांना धर्मशास्त्र सांगितल्यावर त्यांना ते पटले. आमच्यावर दबाव आहे, असे ते सांगत होते.

दुर्गा हे शक्तिरूप आहे !

नवरात्रीनिमित्त...
     दुर्गा ही महालक्ष्मी, अंबाबाई, जगदंबा इत्यादी अनेक नावांनी ओळखली जाते.
१. प्रसिद्ध आरतीत दुर्गे दुर्घटभारी तुजवीण संसारी । अनाथ नाथे अंबे करुणा विस्तारी, असे म्हटले जाते.
२. भारतीय संस्कृतीकोशकार पं. महादेवशास्त्री जोशी म्हणतात, सर्व देवांच्या ठिकाणी असलेल्या शक्तीचे दैवतीकरण झाले. त्या समस्त शक्तिरूप देवतेला दुर्गा म्हणतात.
३. शाक्त सांप्रदायिक दुर्गेला सर्वश्रेष्ठ देवता, आदिमाया आणि जगदंबा मानतात. (पंचदेव उपासना, ५.२)
४. दुर्गेचे नऊ प्रकार आहेत. त्यापैकी महालक्ष्मी ही एक आहे. (नी.पु. जोशी, भारतीय मूर्तीशास्त्र, पृ.२४२)
- गो.बं. देगलूरकर, पुणे (साप्ताहिक चित्रलेखा, २३.५.२०११)

शिक्षणाच्या गुणवत्तेसाठी गुरुकुल शिक्षणपद्धती हवी !

     पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाच्या एका पथकाने काही महाविद्यालयांच्या वर्गांना प्रत्यक्ष भेट दिली असता अनेक वर्ग ओस पडले असल्याचे लक्षात आले. बहुतेक विद्यार्थी वर्गाबाहेरच फिरतात अथवा महाविद्यालयाच्या वेळेमध्ये खाजगी शिकवण्यांना प्राधान्य देतात. बरेच विद्यार्थी केवळ प्रायोगिक तासांना उपस्थित असतात, असे आढळून आले. एकीकडे नामांकित महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी रांगा लागतात, त्यासाठी लक्षावधी रुपयांची देणगी दिली जाते आणि दुसरीकडे ही विदारक स्थिती आहे. हा दोष शिक्षक, विद्यार्थी कि पालक यांपैकी कोणाचा ? कसेही असले, तरी सर्वेक्षणाचा निकाल महाविद्यालयातील शिक्षणाची गुणवत्ता कमालीची घसरल्याचे निदर्शक आहे.
दैनिक सनातन प्रभातचा रंगीत 
दसरा विशेषांक 
प्रसिद्धी दिनांक : ११ ऑक्टोबर २०१६ 
पृष्ठ संख्या : ८, मूल्य : ४ रुपये
विशेषांकाची वाढीव मागणी वितरकांनी 
१० ऑक्टोबरला दुपारी ३ पर्यंत इआर्पी प्रणालीत भरावी.महर्षींच्या आदेशानुसार सर्व संकटांच्या निवारणासाठी रामनाथी आश्रमात करण्यात आलेल्या श्री गणेश यागाचे सूक्ष्म-परीक्षण !

कु. मधुरा भोसले
     महर्षींच्या आदेशानुसार सनातन संस्थेवरील सर्व संकटांचे निवारण करण्यासाठी १२ ते १४.९.२०१६ या कालावधीत सनातनच्या रामनाथी आश्रमात गण होमाचे (गणेश यागाचे) आयोजन करण्यात आले. १२ आणि १३ सप्टेंबर २०१६ या दोन दिवसांमध्ये यज्ञातील घडलेल्या प्रमुख घडामोडींचे सूक्ष्म स्तरावर अवलोकन केल्यानंतर जाणवलेली सूत्रे प्रस्तुत करत आहे.
१. सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या मार्गदर्शनानुसार गणेश
यागाला प्रारंभ करण्याआधी पुरोहितांनी श्री बगलामुखीदेवीचा मंत्रजप
विशिष्ट संख्येने पूर्ण करून देवीला प्रार्थना करणे
     सनातन संस्थेवरील अरिष्ट दूर होऊन साधकांचे संरक्षण करण्याचे प्रमुख दायित्व श्री बगलामुखीदेवीकडे असून तिला तिच्या कार्यात साहाय्य करण्यासाठी गणेश यागाचे प्रयोजन महर्षींनी सांगितले होते. श्री बगलामुखीदेवीची शक्ती ब्रह्मास्त्राप्रमाणे शत्रूच्या मर्मस्थानांना भेदत असतांना तिला कार्य करण्यासाठी दशदिशा मोकळ्या व्हाव्यात, तसेच तिचे ब्रह्मास्त्र लक्ष्यवेधी ठरावे, यासाठी ज्ञानरूपी श्री गणेशाने तिला मार्गदर्शन करावे, यासाठी गणेश यागाचे आयोजन करण्यात आले. गणेश यागाची शक्ती निवळ व्यष्टी पातळीवरील अरिष्ट निवारणासाठी नसून तिच्याकडून व्यापक स्तरावर समष्टी कार्य पूर्ण व्हावे, यासाठी श्री गणेश यागाच्या आरंभी श्री बलामुखीदेवीचा मंत्रजप सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या मार्गदर्शनानुसार पुरोहितांनी विशिष्ट संख्येने पूर्ण केला.
२. गणेश यागाचे उद्देश, प्रयोजन आणि कार्यकारणभाव
     ही एक प्रकारची संग्रामेष्टी (टीप १) असल्यामुळे धर्म-अधर्माच्या युद्धात धर्माचा विजय व्हावा, धर्मयुद्ध लढणारे साधक आणि संत यांचे संरक्षण व्हावे, तसेच धर्मयुद्धात धर्मावर अधर्माने केले जाणारी आक्रमणे परतवून लावण्याचे सामर्थ्य प्राप्त व्हावे, म्हणजे धर्म बलवान व्हावा, यासाठी श्री बगलामुखीदेवीप्रमाणे श्री गणेशाचीही कृपा प्राप्त व्हावी, यासाठी गणेश याग करण्याच्या संदर्भात महर्षींनी आदेश दिला होता. या यज्ञामुळे साधकांभोवती संरक्षककवच निर्माण होऊन पुढे होणार्‍या स्थूल, तसेच सूक्ष्म स्तरावरील संघर्षाला तोंड देण्याचे आध्यात्मिक बळ साधकांना प्राप्त व्हावे, यासाठी श्री गणेशाकडून यज्ञाद्वारे शक्ती अर्जित करण्यात आली.

प.पू. डॉक्टरांवरील श्रद्धेच्या बळावर जीवनातील कठीण प्रसंगांना सामोरे जाणारे आणि मुलांपुढे साधनेतील उच्च ध्येय ठेवणारे डोंबिवली, ठाणे येथील ६२ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. भरत अन् ६३ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. चारुलता नखाते !

श्री. भरत नखाते
       आई-बाबांच्या विवाहानंतर ते एकाच वेळी साधनेत आले. त्यांची आध्यात्मिक प्रगती एकाच वेळी झाली. आई पायाने अधू (अपंग) असल्याने तिचा पाय पुष्कळ दुखायचा. आधुनिक वैद्यांनी तिचा पाय कधीही बरा होणार नाही. त्यावर कोणतेही उपचार नाहीत, असे सांगितले. ते आई-बाबांनी स्वीकारले. आई-बाबांनी श्रद्धेच्या बळावर आजवर अनेक कठीण प्रसंगाना तोंड दिले आहे. आई-बाबा दोघेही तत्त्वनिष्ठ आहेत. त्यांनी आम्हाला कधी मानसिक स्तरावर सांभाळले नाही. त्यांनी आमच्या मनावर लहानपणीच साधनेच महत्त्व बिंबवले आणि साधना करण्यास प्रोत्साहन दिले.
१. श्री. भरत नखाते (वडील) 
यांच्याविषयी जाणवलेली सूत्रे
१ अ. व्यवस्थितपणा : बाबांना पूर्वीपासून प्रत्येक कृती नीटनेटकी आणि व्यवस्थित करण्याची सवय आहे. ते कितीही घाई असली, तरी घेतलेली वस्तू जागेवरच ठेवून जातात. क्वचितच बाबांची एखादी वस्तू जागेवर ठेवायची राहिली, तर ते आम्हाला ठेवण्यास सांगतात आणि त्याचा पाठपुरावाही करतात. एखादी वस्तू शोधण्यात वेळ जायला नको आणि त्यामुळे ताण यायला नको, असे त्यांनी आमच्यावर अनेकदा बिंबवले आहे.

महर्षींच्या कृपेने सनातनच्या साधकांना लाभला साक्षात् श्री अन्नपूर्णादेवीचा आशीर्वाद !

आशीर्वादस्वरूप मिळालेल्या परा पात्रात तांदूळ 
घालून सनातनच्या आश्रमात झाला वैशिष्ट्यपूर्ण विधी !
परा पात्रात तांदूळ घालतांना
परात्पर गुरु डॉ. आठवले
      रामनाथी, गोवा - २३ सप्टेंबर या दिवशी मकर रास होती. साक्षात् श्रीराम, तसेच परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचीही मकर रास आहे. त्यामुळे २३ सप्टेंबर या दिवशी रामनाथी, गोवा येथील सनातन आश्रमात वैशिष्ट्यपूर्ण विधी झाला. महर्षींनी नाडीपट्टीद्वारे केलेल्या मार्गदर्शनानुसार हा विधी करण्यात आला. केरळमधील कोची शहराजवळ असणार्‍या छोटानिखारा या गावातील श्री भगवतीदेवीच्या मंदिरातून आशीर्वादस्वरूप मिळालेल्या परा या पात्रात परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या हस्ते एक मूठ तांदूळ घालून मंत्रपठणाद्वारे हा विधी करण्यात आला.

हिंदु राष्ट्राची स्थापना आणि सनातनवर आलेल्या सर्व संकटांचे निवारण करणे, यांसाठी सप्तर्षि जीवनाडीत सांगितल्याप्रमाणे सप्तयाग संपन्न

सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत
आठवले यांच्या वतीनेे संकल्प करतांना
सनातनच्या सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ
       पालक्काड (केरळ) - हिंदु राष्ट्राची स्थापना करणे आणि सनातन संस्थेवर आलेल्या सर्व संकटांचे निवारण करणे, यांसाठी सप्तर्षि जीवनाडीत महर्षींनी सांगितल्याप्रमाणे सप्तयाग करण्यात आले. महर्षींच्या आज्ञेनुसार पालक्काड, केरळ येथील वेदश्री नंदन नम्बुदिरी यांनी त्यांच्या निवासस्थानी हे याग केले. सुदर्शन याग, अघोरास्त्र याग, बगलामुखी याग (शत्रूसंहार याग), चंडिका याग, नरसिंह याग, गरुडपंचाक्षरी याग आणि गायत्री याग, असे सप्तयाग या वेळी करण्यात आले. यागशाळेत मुख्य यागकुंडाजवळ गुरु ग्रह आणि गणेश यांची स्थापना करून आवाहन करण्यात आले. महागणपति होमाने सप्तयागाला आरंभ झाला. सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या वतीनेे सनातनच्या सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांनी संकल्प केला. याग पूर्ण होईपर्यंत सप्तर्षि जीवनाडीपट्टीचे वाचन करणारे पू. डॉ. ॐ उलगनाथन् नामजप करत होते.

अध्ययन, अध्यापन आणि संशोधन हा जीवनाधार असलेले अन् ज्ञानदानाचा आनंद अनुभवणारे पू. (प्रा.) अशोक नेवासकर - एक ऋषितुल्य व्यक्तीमत्त्व !

पू. (प्रा.) अशोक नेवासकर
     पू. (प्रा.) अशोक नेवासकर यांंचे सनातन संस्थेशी जिव्हाळ्याचेे संबंध आहेत. १०.१०.२०१६ या शुभ दिवशी ते अमृत महोत्सवी वर्षामध्ये पदार्पण करत आहेत. माननीय पांडुरंग दिगंबर ॠषी, अहमदनगर यांचे पू. (प्रा.) अशोक नेवासकर यांच्याशी मित्रत्वाचे नाते आहे. त्यांनी पू. (प्रा.) नेवासकर यांनी केलेले विपुल लेखन, संशोधनकार्य आणि नाथ संपद्रायाचा गाढा अभ्यास यांविषयी अतिशय भावस्पर्शी शब्दांत लिहिले आहे. त्यांच्याच शब्दांतील लेख पुढे देत आहोत.
पू. (प्रा.) अशोक नेवासकर यांच्या चरणी अमृत महोत्सवी
वर्षानिमित्त सनातन परिवाराचे कोटी कोटी प्रणाम !
१. नाथ संप्रदायाचा अभ्यास आणि संशोधन भान हरपून करणे
     १०.१०.२०१६ या शुभ दिवशी पू. (प्रा.) अशोकराव नेवासकर हे ७५ व्या वर्षात पदार्पण करत आहेत. पू. (प्रा.) नेवासकर यांचा अध्ययन, अध्यापन आणि संशोधन हा जीवनाधार आहे. पाण्याच्या छोट्या छोट्या झर्‍यांचे नंतर मोठ्या नदीमध्ये रूपांतर होते आणि ही नदी पुढे सागराला जाऊन मिळते. तेव्हा नदीचे स्वतःचे अस्तित्व संपते. त्याप्रमाणे नाथ संप्रदायाचा अभ्यास आणि संशोधन करतांना जीव-ब्रह्म सेवेची एकरूपता त्यांना अनुभवास येत आहे.
२. ज्ञानदान करतांना अनेक विद्यार्थ्यांना घडवणे आणि
विद्यार्थ्यांनीही पू. (प्रा.) नेवासकर यांचा वारसा चालवणे
     त्यांनी नगर येथील महाविद्यालयात अध्यापन करत असतांना आपल्या व्यासंगपूर्ण व्याख्यानांद्वारे विद्यार्थ्यांना मोहून टाकले होते. आनंदाचे डोही आनंद तरंग अशा भावपूर्ण ज्ञानदानाच्या आनंदात त्यांनी अनेक विद्यार्थी घडवले. त्यांचे विद्यार्थीही ज्ञानव्रताचा वारसा अत्यंत यशस्वीपणे पुढे चालवत असून त्यांनीही यशाची अनेक उत्तुंग शिखरे गाठली आहेत.
३. इतिहासाचा अभ्यास - विपुल लेखन आणि संशोधनकार्य !
३ अ. पुणे येथे डेक्कन महाविद्यालयातील पुरातत्व विभागात अनेक थोर
व्यासंगी ज्ञानगुरूंचे मार्गदर्शन लाभल्याने इतिहास संशोधनाला चालना मिळणे
      पुणे येथे डेक्कन महाविद्यालयातील पुरातत्व विभागात पू. (प्रा.) नेवासकर यांना अभ्यास आणि संशोधन करण्याची संधी मिळाली. त्यांनी या संधीचे सोने केले. विविध ऐतिहासिक विषयांचे संशोधन करत असतांना त्यांना डॉ. एच.डी. सांकलिया, डॉ. ढवळीकर, प्रा. माटे, डॉ. शोभना गोखले, तसेच नगर महाविद्यालयाचेे इतिहास विभागप्रमुख डॉ. गद्रे या अतिशय थोर व्यासंगी ज्ञानगुरूंचे मार्गदर्शन लाभले. जीवनाच्या वाटचालीत अनेक गुरु भेटतात; पण सद्गुरु लाभणे, हे भाग्याचे लक्षण आहे. पू. (प्रा.) नेवासकर यांना सद्गुरूंचा लाभ आणि सहवास मिळाला. त्यातून त्यांच्या पुढील इतिहास संशोधनाला चालना मिळाली.
३ आ. अनेक ठिकाणी संशोधन, उत्खनन, शिलालेखांचा अभ्यास, भूर्जपत्राचे वाचन,
तसेच प्राचीन नगरजीवन, संस्कृती, परंपरा आदींचा सखोल अभ्यास करणे
     या विद्वत्जनांसह त्यांना अनेक ठिकाणी संशोधन, उत्खनन, शिलालेखांचा अभ्यास, भूर्जपत्राचे वाचन करण्याची संधी मिळाली. नगर जिल्ह्यातील इनामगाम, नेवासे, तसेच पैठण येथील उत्खननात ते सहभागी झाले होते. इतिहास अभ्यासाची ती जिवंत अनुभूती होती. प्राचीन नगरजीवन, त्यांची संस्कृती, परंपरा आणि अन्य वैशिष्ट्ये यांचा त्यांनी सखोल अभ्यास केला.

गुरुराया तूच माझा हरि ।

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त...

हसरे मोहक रूप तुझे ठसले या मनी ।
गुरुराया तूच माझा हरि ॥ १ ॥

तूच विठ्ठल, तूच कृष्ण, तूच मायबाप या संसारी ।
देवा, तूच माझा सांगाती ॥ २ ॥

जेथे जाती नयन माझे, तुझेच रूप पहाती ।
जादूगार तू या मायेचा, ब्रह्मांड निर्मिले तरी ॥ ३ ॥

करुणाकर तू असशी देवा ।
भक्ती तुझी हा आमुचा ठेवा ॥ ४ ॥

माती होऊनी तुझ्या अंगणी पडले देवा ।
तरी मन का चिंता (टीप १) करी ॥ ५

स्थिर राहून कठीण प्रसंग हाताळणारा ४८ टक्के आध्यात्मिक पातळीचा उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला संभाजीनगर येथील श्री. मंदार उदय कुलकर्णी (वय १९ वर्षे) !

श्री. मंदार कुलकर्णी
       (वर्ष २०११ मध्ये मंदार उच्च स्वर्गलोकातून आल्याचे (५१ टक्के) घोषित झाले होते. - संकलक)
१. मंदार १५ वर्षांचा असतांना त्यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये 
१ अ. मंदार लहान-मोठ्यांसमवेत त्यांच्या वयानुसार मिळून-मिसळून वागतो. तो सतत आनंदी असतो.
१ आ. महाविद्यालयात गेल्यावर मनाविरुद्ध घडलेले प्रसंग आध्यात्मिक स्तरावर स्वीकारणे आणि नामजप अन् प्रार्थना करून त्यावर मात करणे : त्याला १० वी मध्ये ८४ टक्के गुण मिळाले होते. त्याला संगणक शास्त्रात पुष्कळ आवड असल्याने त्याच शाखेत प्रवेश घ्यायचा होता; पण कुटुंबीय आणि इतरांच्या आग्रहास्तव त्याने विद्युत् अभियांत्रिकी शाखेत प्रवेश घेतला. या तीन वर्षांच्या अभ्यासक्रमात त्याला पुष्कळ मानसिक त्रास झाले. यात मित्रांकडून फसवले जाणे, शिक्षकांकडून सतत मानसिक खच्चीकरण होणे, अपमान होणे, अशा प्रकारचे त्रास झाले. त्या वेळी त्याला नामजप आणि प्रार्थना यांचे महत्त्व सांगितल्याने तो मनापासून ते करत होता. त्यामुळे त्याची मनःस्थिती शांत राहिली. त्याला ज्या गोष्टी पटत नव्हत्या, त्या तो देवाला सांगू लागला. अशा प्रकारे प्रतिकूल परिस्थितीत त्याने अभ्यास पूर्ण केला.

सौ. श्रुति सहकारी यांना देवीविषयी आलेल्या विविध अनुभूती !

सौ. श्रुति सहकारी
१. बगलामुखी यज्ञाच्या वेळी पुरोहित साधक मंत्र म्हणून यज्ञात आहुती देत असतांना यज्ञवेदीजवळ श्री बगलामुखीदेवीचे वेगळ्या रूपात दर्शन होणे : १३.९.२०१६ या दिवशी रामनाथी आश्रमात झालेल्या यज्ञवेदीजवळ बसून पुरोहित साधक बगलामुखी मंत्र म्हणत असतांना मला यज्ञवेदीजवळ श्री बगलामुखीदेवीचे दर्शन झाले. तेव्हा मला देवी वेगळ्या वेशात दिसत होती. तिच्या अंगावर कोणतीच आभूषणे नव्हती. मी माहितीसाठी संकेतस्थळावर पाहिल्यावर देवीचे ते रूप बंगालमधे रेखाटलेल्या पटचित्र शैलीतील होते.
२. ध्यानमंदिरात नामजप करत असतांना सहस्रारचक्राच्या ठिकाणी संवेदना जाणवणे, देवीच्या मूर्तीसमोर ५ कुमारिकांचे आणि त्यानंतर शाकंभरीदेवीचे दर्शन होणे अन् देवीचे एक रूप साधकांच्या रक्षणासाठी आश्रमात फिरत आहे, असे जाणवणे : ३.१०.२०१६ या दिवशी मी ध्यानमंदिरात नामजप करत असतांना मला सहस्रारचक्राच्या ठिकाणी संवेदना जाणवत होत्या. मी प्रार्थना केल्यावर मला त्या ठिकाणी पांढरी शुभ्र जलधारा पडत असल्याचे जाणवले. या वेळी माझ्यावर उपाय होऊन मला ढेकरा आणि जांभया येत होत्या. थोड्या वेळानेे मला ती शिवाच्या जटेतील गंगेची धार असल्याचे जाणवले. त्यानंतर मला देवीच्या मूर्तीसमोर ५ कुमारिकांचे आणि त्यानंतर शाकंभरीदेवीचे दर्शन झाले. मला देवीचे एक रूप साधकांच्या रक्षणासाठी आश्रमात फिरत आहे, असे जाणवले.

श्री. अनंत आठवले (ती. भाऊकाका) यांच्याविषयी जाणवलेली सूत्रे

श्री. अनंत आठवले
     २७.९.२०१६ या दिवशी माझी ती. भाऊकाकांशी भेट झाली. भेटीच्या कालावधीत मला आनंद मिळाला.
१. ते अतिशय प्रेमळ आहेत.
२. त्यांचे हास्य प.पू. डॉक्टरांसारखेच आहे.
३. प.पू. डॉक्टरांविषयीच्या काही जुन्या आठवणी मी भाऊकाकांना सांगितल्या. त्या वेळी त्यांची भावजागृती होत होती.
- श्री. राम होनप, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२८.७.२०१६)


अर्जुनाने रणांगणावर शत्रूंना पराजित करण्याकरता श्री दुर्गादेवीची स्तुती करणे आणि तिने विजयी होण्याचा वर देणे

      भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाचा रथ दोन्ही सैन्यात उभा करून त्याला कौरवसेना दाखवली आणि म्हणाला, अर्जुना, तू युद्धाला सन्मुख उभा आहेस. शुचिर्भूत होऊन शत्रूंना पराजित करण्याकरता श्री दुर्गादेवीची स्तुती कर. (महाभारत, भीष्मपर्व, अध्याय २३.२) श्रीकृष्णाच्या सूचनेनुसार अर्जुनाने श्री दुर्गादेवीचे भावपूर्ण स्तवन केले. तेव्हा विजयी होण्याचा वर देऊन श्री दुर्गादेवी अंतर्धान पावली. वरदान प्राप्त झाल्यामुळे अर्जुनाला आपल्या विजयाचा परम विश्‍वास वाटला. मग अर्जुन आपल्या परम सुंदर रथावर आरूढ झाला आणि श्रीकृष्ण अन् अर्जुन यांनी आपले दिव्य रणशंख फुंकले.
- गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी (साप्ताहिक सनातन चिंतन, २० मार्च २००८)

स्वप्नात एका मुलीची पूजा केल्यावर ती मुलगी म्हणजे कुमारिकेच्या रूपातील देवीच असावी, असे वाटणे आणि नवचंडीनिमित्त देवीची प्रत्यक्ष पूजा करण्याची संधीही मिळणे

     एकदा मला पडलेल्या स्वप्नात आमच्या घराजवळून सौभाग्यालंकार ल्यायलेल्या पुष्कळ स्त्रिया आणि काही मुली जातांना दिसल्या. त्यातील एका मुलीला मी घरी घेऊन आले. तिची पूजा केली, तिला खाऊ दिला आणि अलंकारही दिले. जाग आल्यावर ती मुलगी म्हणजे कुमारिकेच्या रूपात आलेली देवीच असावी, असे मला वाटले. २ दिवसांनी मला एका नातेवाईकाच्या घरी नवचंडीसाठी बोलावणे आले आणि सर्व कृती प्रत्यक्ष करण्याची संधी मिळाली, तसेच कुंकुमार्चनही करता आले. अशा प्रकारे तिनेच माझ्याकडून सेवा करून घेतली.
देवीला हार घेतांना निशिगंधाचा हार घेण्याचा विचार प्रबळ 
होणे आणि देवीला तो अर्पण केल्यावर पुजार्‍यांनी नेमका तोच हार देवीला वाहणे
     गेल्या आठवड्यात मी विजयादुर्गादेवीच्या देवळात गेले होते. देवीला नमस्कार करतांना तिला वहाण्यासाठी हार घेण्याचा विचार मनात आला; म्हणून मी बाहेर आले. तिथल्या फुलवालीने मला शेवंतीचा हार घेण्यासाठी आग्रह केला; परंतु मला निशिगंधाचा हार घ्यावासा वाटल्याने मी तो घेतला आणि देवीला अर्पण केला. माझ्यामागून आलेल्या व्यक्तीने शेवंतीचा हार घेतला. तेथील परडीत अन्य फुलेही होती; परंतु पुजार्‍यांनी नेमका निशिगंधाचाच हार देवीला वाहिला. हे पाहिल्यावर सर्वकाही तिच्या इच्छेनुसार घडत असते, याची मला जाणीव झाली.
- एक भाविक स्त्री

स्वतःवरील त्रासदायक शक्तीचे आवरण दूर करण्यासाठी करावयाचे उपाय

कु. गायत्री बुट्टे
१. नामजपाला बसल्यावर झोप येणे, काही न सुचणे, मनात नकारात्मक
विचार येणे, असे त्रास होत असल्यास स्वतःभोवती त्रासदायक शक्तीचे
आवरण आल्याने असे होत आहे, हे लक्षात घ्यावे !
     नामजपाला बसल्यावर झोप येणे, थकवा येणे, नामजप आणि प्रार्थना न होणे, काही न सुचणे, मनात नकारात्मक विचार येणे, भीती वाटणे, मनात अचानक अहंयुक्त विचार येणे, असे त्रास होत असल्यास आध्यात्मिक त्रासामुळे स्वतःभोवती त्रासदायक शक्तीचे आवरण आल्याने असे होत आहे, हे लक्षात घ्यावे. स्वतःभोवतीचे हे आवरण गेल्यावरच नामजप होऊन त्यातील चैतन्य ग्रहण करता येते. केवळ नामजप करतांनाच नव्हे, तर इतर वेळीही असे त्रास होत असल्यास स्वतःवर आवरण आल्याचे समजावे. तेव्हा कापूर, उदबत्ती, मोरपीस, देवतेचे चित्र, सनातन प्रभात नियतकालिक अशा कोणत्याही सात्त्विक गोष्टीने आवरण काढावे. आवरण काढण्याची पद्धत येथे देत आहे.
१ अ. कापराने आवरण काढणे
१ अ १. देहाभोवतीचे आवरणे काढणे : भीमसेनी कापराची मध्यम आकाराची १ वडी घ्यावी. ती हाताच्या बोटांनी पकडून संपूर्ण देहाभोवती किंवा जिथे आवरण जाणवत असेल, त्या अवयवाभोवती (उदा. डोके, छाती इत्यादीभोवती) तीन वेळा फिरवावी अन् तेथील आवरण काढावे. आवरण काढल्यावर तो कापूर जाळावा.
१ अ १ अ. आवरण काढतांना करावयाच्या प्रार्थना
१. आवरण दूर होण्यासाठी :
हे श्रीकृष्णा, माझा देह, मन आणि बुद्धी यांच्यावरील त्रासदायक शक्तीचे आवरण या कापरामध्ये खेचले जाऊन ते नष्ट होऊ दे.
२. त्रास दूर होण्यासाठी
अ. शारीरिक त्रास : हे श्रीकृष्णा, माझ्यावरील आवरण दूर होऊन मला आलेला थकवा दूर होऊ दे आणि माझी प्राणशक्ती वाढू दे किंवा हे श्रीकृष्णा, माझ्या डोक्यातील काळी शक्ती दूर होऊन माझी डोकेदुखी थांबू दे.

फलक प्रसिद्धीकरता

हिंदूंच्या आदर्श सण-उत्सवांसाठी 
हिंदु राष्ट्राशिवाय पर्याय नाही !
        दसर्‍याच्या दुसर्‍या दिवशी मोहरम असल्यामुळे बंगालच्या ममता बॅनर्जी सरकारने दसर्‍याच्या पूर्वी किंवा मोहरमच्या नंतर दुर्गादेवी मूर्तीचे विसर्जन करण्याचा आदेश दिला. या प्रकरणी कोलकाता न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले.

हिंदू तेजा जाग रे !

Jago !
Durga pratima visarjan pratibandhit karnewali Bangal sarkar ko Kolkata hai court ne lagai phatkar.
Hinduopar aisi manmani kab tak chalegi ?
जागो !
दुर्गा प्रतिमा विसर्जन प्रतिबंधित करनेवाली बंगाल सरकार को कोलकाता हाय कोर्ट ने लगाई फटकार !
हिन्दुआें पर ऐसी मनमानी कब तक चलेगी !
        इतकी वर्षे देशात बॉम्बस्फोट होत आहेत. आतापर्यंत त्याचा कोणीही इस्लामी दहशतवाद असा उल्लेख करत नव्हते. आता हिंदूंना बॉम्बस्फोटांत अटक करण्यात आल्यावर मात्र सर्व जण हिंदु दहशतवादी असा उल्लेख करू लागले आहेत.
- अभिनव भारत संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षा श्रीमती हिमानी सावरकर
       गल्लीगल्लीत ५-७ वर्षांची मुसलमान मुले पाकिस्तान झिंदाबाद, अशी घोषणा देतात; पण तेथून जाणारे शेकडो मृतवत् हिंदू त्याबद्दल काहीच करत नाहीत !
- प.पू. डॉ. आठवले (२०.९.२००८)

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले
       हिंदु राष्ट्र म्हणजे सनातन धर्म राज्य, म्हणजे सत्त्वप्रधान, म्हणजेच सज्जन आणि साधक यांचे राज्य ! : येथे हिंदु, ख्रिस्ती, मुसलमान, बौद्ध इत्यादी धर्मांचा संबंध नसतो.
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले

बोधचित्र

॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥
या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो.
- प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज
सनातनचे श्रद्धास्थान
अढळपद
       अशा ठिकाणी बसा की, तुम्हाला जिथून कोणी ऊठ म्हणून सांगणार नाही. असे बोला की, हे खोटे आहे असे कोणी बोलणार नाही.
भावार्थ :
ब्रह्मस्थितीला पोहोचल्यावर ऊठ असे म्हणायला दुसरा कोणी उरतच नाही आणि ती सर्वव्यापी अवस्था असल्याने तिथून उठायचा प्रश्‍नच निर्माण होत नाही. हे खोटे आहे असे कोणी बोलणार नाही, असा बोलण्याचा विषय म्हणजे ब्रह्माची किंवा परमेश्‍वराची अनुभूती. मायाच खोटी असल्याने मायेतील सत्य बोलणेही खोटेच असते.
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.)

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

मानवी जीवन 
परमेश्‍वराने देणगी दिलेल्या देहाचा उपयोग नेहमी सत्कर्मासाठी करावा. 
इतरांच्या त्रासाला आपला देह कारणीभूत होणार नाही, याची नेहमी काळजी घ्यावी. 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)


चक्रीवादळामागील सत्य !

संपादकीय 
     निसर्गाने त्याच्या प्रकोपातून काय होऊ शकतेे, याची झलक पुन्हा एकदा दाखवून दिली आहे. अमेरिकेजवळील कॅरेबियन बेटांमध्ये असलेल्या हैती देशात मॅथ्यू नावाच्या चक्रीवादाळाने हाहा:कार माजवला आहे. आतापर्यंत ९०० हून अधिक जणांचा मृत्यू झाला असून यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. या चक्रीवादळाचा तडाखा बसण्याच्या शक्यतेने हैतीच्या शेजारील क्युबा, जमैका, डोमिनिकन रिपब्लिक, बहामास आणि अमेरिकेतील फ्लोरिडा येथेही आणीबाणी लागू करण्यात आली आहे. अमेरिकेत गेल्या काही वर्षांत अनेक चक्रीवादळे आली आणि त्यांच्यामुळे मोठी हानीही झाली.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn