Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

खांदा वसाहत (पनवेल) येथेही महिलांना मार्गदर्शन !

      पनवेल - येथील खांदा वसाहतीतील सप्तशृंगी सांस्कृतिक महिला मंडळ आणि अमरदीप सोसायटी येथे रणरागिणी शाखेच्या वतीने स्वसंरक्षण प्रशिक्षण प्रात्याक्षिके आणि पथनाट्याचे सादरीकरण करण्यात आले. सौ. वैशाली सांबर यांनी नवरात्रीचे शास्त्र, तर कु. आरती म्हात्रे यांनी रणरागिणी या विषयांवर मार्गदर्शन केले. 
     ५५ महिलांनी याचा लाभ घेतला. सोसायटीमधील कार्यक्रमात सौ. नंदिनी सुर्वे यांनी लव्ह जिहादचे भीषण सत्य आणि त्यावरील उपाय, तसेच हिंदु समाजातील शौर्य जागरणाचे महत्त्व सांगितले. ४० महिलांनी याचा लाभ घेतला. अनेकांनी रणरागिणीच्या उपक्रमात सहभागी होण्याची सिद्धता दर्शवून शंकानिरसन करून घेतले.अनुक्रमे सार्वजनिक नवरात्रोत्सव आणि नवदुर्गा मंडळात प्रात्यक्षिके करतांना महिला कार्यकर्त्या

नवरात्रोत्सव (आज नववा दिवस)

सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके ।
शरण्ये त्र्यम्बके गौरि नारायणि नमोऽस्तुते ॥
         एका मतानुसार नवरात्रीतील पहिले तीन दिवस तमोगुण अल्प करण्यासाठी तमोगुणी महाकालीची, दुसरे तीन दिवस रजोगुण वाढवण्यासाठी रजोगुणी महालक्ष्मीची आणि शेवटचे तीन दिवस साधना तीव्र होण्यासाठी सत्त्वगुणी महासरस्वतीची पूजा करतात.
         वर उल्लेखिलेला रजोगुण हा गतीमानतेचे प्रतिक आहे. साधना, धर्मकार्य, राष्ट्रकार्य आदी करण्यासाठी गतीमानता आवश्यक असते. नवरात्रीत महालक्ष्मीदेवीच्या पूजेने ती गतीमानता आपल्याला लाभते.
(संदर्भ : सनातनचा ग्रंथ शक्ती (भाग २) - शक्तीची उपासना)
नवरात्र विषयक माहितीसाठी संकेतस्थळावरील मार्गिका
https://www.sanatan.org/mr/navratri

(म्हणे) बलुचिस्तानात हस्तक्षेप केल्यास खलिस्तान, नक्षलवाद आणि ईशान्य भारतातील आतंकवादाचा विषय घेऊ !

 • पाकची ही खुमखुमी भारत कधी जिरवणार ? 
 • पाकची भारताला धमकी ! 
        वॉशिंग्टन - भारताने बलुचिस्तानविषयी बोलणे थांबवले नाही, तर आम्ही खलिस्तान, ईशान्येतील हिंसाचार आणि माओवाद्यांचे बंड आदी विषय आंतरराष्ट्रीय स्तरावर नेऊ. आम्हाला तसे करायचे नाही. तो भारताचा अंतर्गत प्रश्‍न आहे; पण खेळाचे नियम पालटल्यास आम्हालाही जशास तसे उत्तर द्यावे लागेल, अशी धमकी पाकचे विशेष दूत मुशाहिद हुसेन सय्यद आणि शेजरा मनसब यांनी दिली आहे. काश्मीर प्रश्‍नात अमेरिकेने हस्तक्षेप करावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
        अमेरिकेने काश्मीरमध्ये लक्ष घालावे यासाठी सय्यद यांनी अफगाणिस्तानचा वापर करण्याची धमकीही दिली. भारत आणि अमेरिका हे दोन्ही देश सध्या अफगाणिस्तानच्या उभारणीसाठी प्रयत्नशील आहेत. त्याविषयी सय्यद म्हणाले की, काश्मीर प्रश्‍न सुटला, तरच काबूलमध्ये शांतता राहू शकते. काश्मीर जळू द्यायचे आणि काबूलमध्ये शांततेसाठी प्रयत्न करायचे हे होऊ शकत नाही.

काश्मीरमध्ये आतंकवाद्यांच्या पोलीस चौकीवरील आक्रमणात एक सैनिक हुतात्मा !

एका सर्जिकल स्ट्राईकमुळे पाकमधील जिहादी 
आतंकवाद नष्ट होणार नाही, तर संपूर्ण 
पाकला नष्ट करण्याची आवश्यकता आहे !
        श्रीनगर - जम्मू-काश्मीरच्या शोपियान जिल्ह्यातील हरपोरा परिसरातील पोलीस चौकीवर आतंकवाद्यांनी केलेल्या आक्रमणात नजीर अहमद हा सैनिक हुतात्मा झाला. ७ ऑक्टोबरच्या मध्यरात्री हे आक्रमण झाले. यात पूर्ण कृष्ण कौल हे रहिवासीही घायाळ झाले. या वेळी सैनिकांनी दिलेल्या प्रत्युत्तरानंतर आतंकवादी पळून गेले. पळून गेलेल्या आतंकवाद्यांच्या शोधासाठी सैनिकांनी मोहीम हाती घेतली आहे. (आतंकवादी घुसतात, आक्रमण करतात आणि पळूनही जातात ! - संपादक)
        काश्मीरमधील हिंदु आणि शीख धर्मियांची सुरक्षा वाढवण्यात आली असून त्या ठिकाणी केंद्रीय राखीव पोलीस दलाची अतिरिक्त तुकडी तैनात करण्यात आली आहे. पोलीस चौकीमध्ये असलेली शस्त्रे लुटण्यासाठी आतंकवाद्यांनी आक्रमण केले होते.

(म्हणे) अपत्यप्राप्तीसाठी वादग्रस्त सनातनचा अजब सल्ला.. !

झी २४ तास वृत्तवाहिनीच्या संकेतस्थळाने 
सनातनद्वेषापोटी प्रसिद्ध केली हास्यास्पद बातमी !
        मुंबई - सनातनच्या द्वेषापोटी ओढूनताणून एखादी बातमी प्रसिद्ध करण्याची हौस झी २४ तास या वृत्तवाहिनीच्या संकेतस्थळाने भागवून घेतली आहे. हिमाचल प्रदेश येथील सिमसा माता मंदिराचे एक वृत्त दैनिक सनातन प्रभातच्या ६ ऑक्टोबरच्या अंकातील पृष्ठ ३ वर प्रसिद्ध करण्यात आले होते. या मंदिरातील फरशीवर झोपून राहिल्याने महिलांना अपत्यप्राप्ती होते, अशी देवीभक्तांची श्रद्धा आहे, असे या वृत्तात म्हटले आहे; मात्र या वृत्तवाहिनीने सनातनद्वेषापोटी महिला मंदिरातील फरशीवर झोपल्याने त्याना मुले होतात असा दावा सनातन प्रभात या सनातनच्या मुखपत्रात करण्यात आलाय, असे म्हटले आहे. या वृत्तामुळे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक नरेंद्र दाभोलकर आणि गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी चर्चेत आलेली सनातन संस्था पुन्हा एकदा चर्चेत आल्याचे तारेही या बातमीत तोडण्यात आले आहेत. (स्वतःच याची निरर्थक चर्चा करायची, त्यातून संस्थेची अपकीर्ती करायची आणि वर संस्था पुन्हा चर्चेत आली म्हणायचे, यालाच आताच्या काळात पीतपत्रकारिता म्हणतात ! - संपादक) यात पुढे म्हटले आहे की, इतकेच नाही, तर ही गोष्ट म्हणजे, अंनिसला चपराक असल्याचंही त्यांनी आपल्या या लेखात म्हटलंय. (मुळात दैनिक सनातन प्रभात हे म्हणत नसून तेथील देवीभक्त म्हणत आहेत आणि त्यांची अनेक वर्षांपासूनची श्रद्धा आहे. बातमीतही तसाच उल्लेख आहे. या बातम्या अनेक संकेतस्थळांनी प्रसिद्ध केल्या आहेत; मात्र ते समजून न घेतात उचलली लेखणी आणि केली बातमी असा हास्यास्पद प्रकार या वाहिनीने केला आहे. सनातन प्रभात या संदर्भात कायदेशीर कारवाई करण्यासाठी अधिवक्त्यांचा सल्ला घेत आहे ! - संपादक)

मुंबईतील रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यासाठी कंत्राटदारच दिले नाहीत !

महापालिका 
अभियंता कृती समितीची माहिती
       मुंबई (प्रतिनिधी) - मुंबईतील रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यासाठी यंदा आयुक्त अजोय मेहता यांनी कंत्राटदारच नियुक्त केले नाहीत, अशी धक्कादायक माहिती बृहन्मुंबई महानगरपालिका अभियंता संयुक्त कृती समितीचे नेते साईनाथ राजाध्यक्ष, सुखदेव काशिद आणि यशवंत धुरी यांनी ७ ऑक्टोबरला पालिका पत्रकार संघात पत्रकार परिषद घेऊन वरील माहिती दिली. त्यामुळे अभियंत्यांपेक्षा आयुक्तच या खड्डयांना उत्तरदायी असल्याचे उघड झाले आहे. सध्या मुंबईतील खड्डयांंवरून प्रकरण तापले असल्याच्या पार्श्‍वभूमीवर ही पत्रकार परिषद घेण्यात आली.
या पत्रकार परिषदेत मांडण्यात आलेली सूत्रे
१. प्रतीवर्षी २४ प्रभागांना खड्डे बुजवण्यासाठी २४ कंत्राटदार दिले जातात. यंदा मात्र पावसाळापूर्व कामांसाठी काही कंत्राटदार नेमले होते त्यांच्याकडूनच बलपूर्वक खड्डे बुजवून घेतले जात आहेत.
२. पाण्याची गळती शोधण्यासाठी एम्डब्ल्यूडब्ल्यूडीपी या आस्थापनाला हे काम दिले होते. त्यांनी २०० ठिकाणी खड्डे खोदले. त्यांपैकी केवळ ८० ठिकाणी गळती होत असल्याचे लक्षात आले. हे खोदलेले खड्डे भरण्यासाठी महापालिकेला २० लाख रुपये खर्च आला. गळती शोधण्यासाठी १५ कोटी रुपये महापालिकेने दिले होते. अशा तर्‍हेने महापालिकेने १५ कोटी २० लाख रुपये खड्डयात घातले.

भारतीय सैन्य कोणतेही आव्हान स्वीकारण्यास सिद्ध ! - वायूदल प्रमुख अरूप राहा यांचा पुनरुच्चार

 • भारतीय सैन्य कोणतेही आव्हान स्वीकारण्यास सिद्ध आहे; मात्र सरकार तसे नाही, हेच भारतियांचे दुर्दैव आहे !  
 • भारतियांना इस्रायलच्या सरकारप्रमाणे सरकार मिळणे आवश्यक आहे !
         हिंडोन (हरियाणा) - सर्जिकल स्ट्राईकवर देशभरात भरपूर चर्चा झाली आहे. प्रत्येक जण या विषयावर त्याचे मत व्यक्त करत आहे. भारतीय सैन्याने देशवासियांना असलेल्या अपेक्षेप्रमाणे निकाल दिला पाहिजे. आम्ही यावर चर्चा करणार नाही, कृती करू, असे प्रतिपादन वायूदलाचे प्रमुख अरूप राहा यांनी केले.

धादांत खोटे वृत्त प्रसिद्ध करून सनातन संस्थेची अपकीर्ती केल्याप्रकरणी दैनिक बंगलोर मिररला सनातनची कायदेशीर नोटीस !

        रामनाथी (गोवा) - सनातन संस्थेची अपकीर्ती करण्याच्या हेतूने बेंगळुरू येथून प्रसिद्ध होणार्‍या दैनिक बंगलोर मिरर या इंग्रजी वृत्तपत्राने ३१ ऑगस्ट २०१६ या दिवशीच्या अंकात कॉल देम सनातनीक वर्सेस या मथळ्याखाली मानहानीकारक लेख प्रसिद्ध करून संस्थेची अपकीर्ती केली. या प्रकरणी संस्थेचे व्यवस्थापकीय विश्‍वस्त श्री. वीरेंद्र मराठे यांनी अधिवक्ता श्री. रामदास केसरकर यांच्या मार्फत दैनिक बंगलोर मिररचे संपादक, मालक, प्रकाशक आणि मुद्रक यांना कायदेशीर नोटीस बजावून मानहानी भरपाईपोटी १० कोटी रुपयांची मागणी केली आहे.
        या कायदेशीर नोटिसीत म्हटले आहे की, सनातन संस्थेचा समाजात असलेला नावलौकिक माहिती असतांना मानहानी करण्याच्या हेतूने दैनिक बंगलोर मिररच्या संपादकांनी, कॉल देम सनातनीक वर्सेस या मथळ्याखाली सनातन संस्थेच्या विरोधात खोडसाळ आणि मानहानीकारक लेख दैनिक बंगलोर मिरर च्या ३१ ऑगस्ट २०१६ या दिवशीच्या अंकात प्रसिद्ध केला. त्यामुळे संस्थेची अपरिमित हानी झाली; म्हणून सनातन संस्थेचे व्यवस्थापकीय विश्‍वस्त श्री. वीरेंद्र मराठे यांनी मानद कायदेविषयक सल्लागार अधिवक्ता श्री. रामदास केसरकर यांच्या मार्फत बंगलोर येथून प्रसिद्ध होणार्‍या दैनिक बंगलोर मिरर चे संपादक बी. महेश, मालक बेनेट कोलोमन अ‍ॅण्ड कंपनी, मुद्रक आणि प्रकाशक आर्.जे. प्रकाशन् यांना कायदेशीर नोटीस बजावून मानहानी भरपाईपोटी १० कोटी रुपयांची मागणी केली आहे. हानीभरपाईची रक्कम नोटीस मिळाल्यापासून १० दिवसांच्या मुदतीत न दिल्यास हानीभरपाई वसूल करण्यासाठी संस्थेला न्यायालयात दिवाणी दावा दाखल करणे भाग पडेल आणि तसे करावे लागल्यास दाव्याचा खर्च आणि होणार्‍या सर्व परिणामांना आपणास उत्तरदायी धरण्यात येईल, अशी समज या नोटीसीतून देण्यात आली आहे, तसेच कायदेशीर नोटिसीचा खर्च ५ सहस्र रुपये देण्याचे दायित्वही आपलेच असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

पत्रकारिता साधना म्हणून करा ! - श्री. चेतन राजहंस, प्रवक्ता, सनातन संस्था

दैनिक सनातन प्रभातच्या वार्ताहर आणि संपादक 
प्रशिक्षण शिबिरास भावपूर्ण वातावरणात प्रारंभ ! 

डावीकडून श्री. शशिकांत राणे,
पू. (श्री.) पृथ्वीराज हजारे आणि श्री. चेतन राजहंस

         रामनाथी (गोवा), ८ ऑक्टोबर (वार्ता.) - दैनिक सनातन प्रभात हे हिंदूंवरील अन्यायाला वाचा फोडणारे एकमेव दैनिक असल्याने वार्ताहर सेवेतून आपल्याला धर्माकार्याचीच संधी मिळत आहे. वार्ताहर सेवेतून स्वभावदोष निर्मूलन, अहं निर्मूलन आणि भावजागृतीसाठी प्रयत्न करत चांगला वार्ताहर ते संत वार्ताहर असा प्रवास करण्याची ही संधी आहे. म्हणूनच पत्रकारिता ही साधना म्हणून करा आणि त्या दृष्टीने या सेवेचा अधिकाधिक लाभ करून घ्या, असे प्रतिपादन सनातन संस्थेचे प्रवक्ता श्री. चेतन राजहंस यांनी केले. येथील सनातन आश्रमात चालू झालेल्या वार्ताहर आणि संपादक प्रशिक्षण शिबिरात ते बोलत होते.

एम्आयएम्च्या धर्मांधांकडून शिवसैनिकाला मारहाण

 • ही स्थिती पालटण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे !
 • पोलिसांकडून गुन्हा प्रविष्ट करण्यास नकार !
         संभाजीनगर - दुचाकीचा धक्का लागल्याचे निमित्त करून येथील चिश्तिया चौकात एम्आयएम्च्या धर्मांध कार्यकर्त्यांनी शिवसैनिक देशमुख यांना पुष्कळ मारहाण केली. त्यानंतर धर्मांधांनी पोलीस चौकीतही गोंधळ घातला. (उद्दाम आणि कायद्याचा धाक नसलेले धर्मांध ! - संपादक) रस्त्यावर हा प्रसंग घडत असतांना तेथे उपस्थित महानगरपालिकेचे सभागृह नेते राजेंद्र जंजाळ यांनी या प्रकरणी धर्मांधांना खडसवल्यावर तेथे आणखी धर्मांध जमले. (हिंदूंनो, धर्मांधांकडून संघटितपणा शिका ! - संपादक)
१. जंजाळ यांनी शिवसैनिक देशमुख यांना जवळच्या पोलीस चौकीत नेले आणि धर्मांधांच्या विरोधात तक्रार देत असतांनाच अचानक धर्मांधांनी तेथे घुसून गोंधळ घातला. एम्आयएम् पक्षाचे नगरसेवक अज्जू नाईकवाडी या वेळी उपस्थित होते.
२. शिवसेनेचे नगरसेवक मकरंद कुलकर्णी, माजी नगरसेवक वीरेंद्र गादगे, रमेश इधाटे, विलास राऊत हेही घटनास्थळी पोचले.
३. पोलिसांनी मात्र गुन्हा प्रविष्ट करण्यास नकार दिला.
४. यापूर्वीही याच चौकात एका हिंदु तरुणाला मारहाण करण्यात आली होती.

बिहारमधील पूर्णिया येथे दुर्गोत्सवाच्या माध्यमातून दारूबंदीचा प्रसार

 • सध्याच्या काळात हिंदूंना आध्यात्मिक बळाची नितांत आवश्यकता असतांना दुर्गोत्सवाचाही सामाजिक कार्यासाठी वापर करणारे हिंदू !
 • दुर्गापूजा मंडपाच्या प्रवेशद्वाराला दिले दारूच्या बाटल्यांचे स्वरूप !
         पाटलीपुत्र (पाटणा) - सध्या बिहारमधील दारूबंदीचा परिणाम नवरात्रोत्सवामध्येही पहायला मिळत आहे. राज्यातील पूर्णियामध्ये श्रीधाम सेवा समिती या नवरात्रोत्सव मंडळाकडून दुर्गापूजा मंडपाच्या प्रवेशद्वाराला दारूच्या बाटलीचे स्वरूप देण्यात आले असून या बाटल्यांवर लाल रंगाने फुल्या मारण्यात आल्या आहेत. या माध्यमातून दारूबंदीचा संदेश देण्यात आला आहे. दारूच्या बाटल्या बनवण्यासाठी प्लायवूडचा वापर करण्यात आला आहे. (नवरात्रोत्सव हे देवीचे व्रत आहे. या माध्यमातून हिंदूंनी आसुरी प्रभावाच्या विरोधात लढण्यासाठी देवीकडून आध्यात्मिक बळ प्राप्त करणे आवश्यक आहे. त्याऐवजी त्यांच्याकडून इतर गोष्टींना प्राधान्य दिले जाणे, हे हिंदूंचे दुर्दैव आहे. त्यामुळेच आज हिंदू शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक स्तरावर दुर्बल झाले आहेत ! - संपादक)
         पूर्णियाचे पोलीस अधीक्षक निशांत कुमार म्हणालेे, श्रीधाम सेवा समितीकडून वर्ष १९६२ पासून दुर्गापूजेचे आयोजन करण्यात येत आहे. प्रतिवर्षी त्यांच्याकडून महत्त्वपूर्ण घटनांवर आधारित मंडप निर्माण करण्यात येतो. यावेळी राज्यातील दारूबंदी हे सर्वांत महत्त्वाचे सूत्र असल्यामुळे या मंडळाने दारूबंदीची संकल्पना साकार केली आहे. मागील वर्षी हा मंडप माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांना समर्पित करण्यात आला होता आणि त्याचे नाव मिसाईल मंडप ठेवण्यात आले होते. यापूर्वीही सिलेंडरची सबसिडी, कारगील युद्ध, संसद भवनावरील आतंकवादी आक्रमण, अमेरिकेतील वर्ल्ड ट्रेड सेंटरवरील आतंकवादी आक्रमण यांसारख्या संकल्पना या मंडळाने त्यांच्या मंडपाच्या माध्यमातून साकारल्या आहेत.

हैतीमधील चक्रीवादळात ८७७ जण ठार, तर ७ देशांत आणीबाणी घोषित !

        पोर्ट-ओ-प्रिंस - अमेरिकेजवळील बेटांचा देश असलेल्या हैतीमध्ये आलेले मॅथ्यू चक्रीवादळ अद्याप थांबलेले नाही. या वादळात आतापर्यंत ८७७ जणांचा मृत्यू झाला असून लक्षावधी लोक बेघर झाले आहेत. गेल्या ५३ वर्षांतील अटलांटिक खंडातील हे सर्वार्ंत शक्तीशाली चक्रीवादळ आहे.
        हैती, क्यूबा, जमैका, डोमिनिकन रिपब्लिक, बहामास आणि अमेरिकेतील फ्लोरिडा येथे या वादळामुळे आणीबाणी घोषित करण्यात आली आहे. विमानांची ४ सहस्र ३०० उड्डाणे रहित करण्यात आली आहेत. या चक्रीवादळाचा फटका लाखो नागरिकांना बसला आहे. जवळपास १ कोटी ७० लाख रुपयांची हानी झाल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.
        पेनिन्सुला (प्रायद्वीप) मधील सर्वांत महत्त्वाचे शहर जेरेमी पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहे. जवळपास ८० टक्के घरे पडली असून सहस्रो लोक बेघर झाले आहेत. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

(म्हणे) देशात असुरक्षित वाटत आहे !

 • सैनिकांच्या शौर्यकृतीला अफवा संबोधणार्‍यांसाठी हे करावे तसे भरावेच नव्हे का ?
 • संजय निरूपम यांच्या पत्नीचा स्टंट
        मुंबई - देशद्रोही विधाने करणारे मुंबई काँग्रेस अध्यक्ष तथा खासदार संजय निरूपम यांच्या पत्नी गीता निरूपम यांनी मला देशात असुरक्षित वाटत आहे. मला आणि माझ्या परिवाराला सुरक्षा पुरवली जावी, अशी मागणी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून केली आहे. सर्जिकल स्ट्राइकवरून केलेल्या वक्तव्याविषयी क्षमा मागा, अशी धमकी गुंड रवी पुजारीने दिल्याचा आरोप संजय निरूपम यांनी वृत्तवाहिन्यांशी बोलतांना केला. या पार्श्‍वभूमीवर त्यांच्या पत्नीने हे पत्र लिहिले आहे. काही दिवसांपूर्वी निरूपम यांनी भारतीय सैनिकांनी सर्जिकल स्ट्राइक केल्याविषयी संशय व्यक्त करून त्याला अफवा असे म्हटल्याने त्यांच्यावर सामाजिक संकेतस्थळावरून चौफेर टीका होत आहे.
        गीता निरूपम यांनी पत्रात म्हटले आहे की, केवळ सामाजिक संकेतस्थळावरूनच नव्हे, तर उघडपणे आम्हाला शिव्या दिल्या जात आहेत. आमची अपकीर्ती केली जात आहे. आमच्यावर होणारी टीका रोखण्यात यावी. माझ्या पतीसमवेत चर्चा केली जाऊ शकते. असे असतांना आमच्यावर अभद्र टिपणी का केली जात आहे ? संस्कृतीप्रधान देशात देवीची पूजा केली जात असतांना आपल्या ८० वर्षीय आईला राजकारणात का ओढले जात आहे, असे प्रश्‍न गीता यांनी पंतप्रधानांना विचारले आहेत. (संजय निरूपम देशद्रोही विधाने करत असतांना त्यांना त्यांच्या पत्नीने किंवा आईने थांबवण्याचा प्रयत्न केला होता का ? मूकसाक्षीदार हेही तितकेच गुन्हेगार नव्हेत का ? - संपादक)

रेवाडी (हरियाणा) येथील व्यापारी आणि सामाजिक संघटनांकडून चिनी साहित्यावर बहिष्कार

रेवाडी आणि रतलाम येथील राष्ट्रप्रेमी नागरिकांचा 
आदर्श घेऊन देशवासियांनीही चिनी साहित्यावर बहिष्कार घालावा !
चीनच्या कुरापतखोरीवर रेवाडीवासियांचे चोख उत्तर
      रेवाडी (हरियाणा) - चीनच्या कुरापतींना उत्तर देण्यासाठी येथील व्यापारी आणि सामाजिक संघटनांनी चिनी साहित्यावर पूर्णपणे बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या सण आणि उत्सवांचा काळ आहे. या काळात शहरातील बाजारपेठांमध्ये ग्राहकांकडून मोठ्या प्रमाणात साहित्य खरेदी केले जाते. याच काळात रेवाडीवासियांनी हा निर्णय घेतल्याने चिनी साहित्याच्या व्यापार्‍यांना अनुमाने ३०० कोटी रुपयांचा फटका बसण्याची चिन्हे आहेत.
      या अंतर्गत शिक्षण संघटनांनीही पुढाकार घेतला असून त्यांनी शाळेतील विद्यार्थ्यांना चिनी साहित्य खरेदी न करण्याविषयी आवाहन करण्याचा निर्णय घेतला आहे. देशापेक्षा कुणीही मोठे नाही. त्यामुळे या मोहिमेच्या अंतर्गत जे व्यावसायिक एकत्र येणार नाहीत, त्यांच्यावर बहिष्कार टाकण्यात येईल, असेही या राष्ट्रप्रेमी संघटनांनी म्हटले आहे.

भारत-पाक सीमेवर भिंत उभारण्याचा सरकारचा निर्णय

गेल्या ७० वर्षांत पाकच्या गोळीबारात शेकडो सैनिक ठार 
झाल्यानंतर भारत-पाक सीमा बंद करण्याचा निर्णय घेणारे भारत सरकार !
      नवी देहली - पाकशी वाढता तणाव पाहून भारताने पाक सीमेवर ताराच्या कुंपणासह उंच भिंत बांधण्याचा निर्णय घेतला आहे. सूत्रांच्या नुसार लवकरच यावर अंमलबजावणी करण्यात येणार आहे. इस्राईल-पॅलेस्टाईन सीमेच्या धर्तीवर भारत-पाक सीमा बंद करण्याचा सरकार विचार करत आहे.
पाक सैन्याकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन 
      पाक सैन्याकडून सीमेवर सतत ७ दिवसांपासून गोळीबार करण्यात येत आहे. पाक सैन्याने जम्मू, राजौरी आणि पुंछ या जिल्ह्यांमधील सीमावर्ती भागात गोळीबार केला, तसेच मोठ्या प्रमाणात मोर्टार दागले. याला भारतीय सैन्याकडून चोख प्रत्युत्तर देण्यात आले. यात ६ भारतीय सैनिक घायाळ झाले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
पाक सैन्याच्या आगळीकीमुळे १ लाख लोक प्रभावित 
      पाक सैन्याच्या गोळीबारामुळे सीमावर्ती भागात दहशतीचे वातावरण आहे. याचा अनुमाने १ लाख लोकांवर परिणाम झाला आहे. केवळ अखनूर भागात ६० सहस्र ग्रामस्थ बेघर झाले आहेत.

पुण्यातील लोहगाव विमानतळ परिसराचे भ्रमणभाषवरून चित्रीकरण करणार्‍या युवकाला अटक !

कायदा-सुव्यवस्थेचे धिंडवडे !
        पुणे, ८ ऑक्टोबर - येथील लोहगाव विमानतळ परिसरात असलेल्या हवाई दलातील अधिकार्‍यांच्या निवासस्थानांचे भ्रमणभाषमधून चित्रीकरण केल्याच्या संशयावरून एका युवकाला पोलिसांनी ५ ऑक्टोबर या दिवशी अटक केली. स्थानिक पोलीस, गुप्तचर यंत्रणा आणि आतंकवादविरोधी पथक यांच्याकडून त्यांची चौकशी केली जात आहे. भारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून सर्जिकल स्ट्राईक केल्यानंतर देशात सतर्कतेचा आदेश देण्यात आला आहे.
        लोहगाव विमानतळ हा हवाई दलाचा अत्यंत संवेदनशील तळ आहे. पोलिसांनी अटक केलेला युवक हा डिलिव्हरी बॉय म्हणून काम करतो. नेहमीप्रमाणे तो वस्तू देण्यासाठी जात असतांना लष्कर पोलिसांच्या हा प्रकार लक्षात आला. त्यामुळे पोलिसांनी त्याला लगेचच कह्यात घेतले. त्याच्या भ्रमणभाषची पडताळणी केल्यावर त्यात उपरोक्त चित्रीकरण आढळून आले.

फ्रान्सच्या नींसमध्ये झालेल्या आक्रमणाप्रमाणे केरळमध्ये आक्रमण करण्याचे इसिसचे षड्यंत्र !

अटक करण्यात आलेल्या आतंकवाद्याच्या 
गटातील सदस्य डॉ. झाकीर नाईकमुळे प्रभावित !
      नवी देहली - यावर्षी जुलै महिन्यात फ्रान्सच्या नींस शहरात एका कार्यक्रमात ट्रक घुसवून इसिसकडून आक्रमण करण्यात आले होते. यात ८४ लोकांचा मृत्यू झाला होता. अशाच प्रकारचे आक्रमण केरळच्या कोच्ची शहरातील सर्वधर्म कार्यक्रमात करण्याचे षड्यंत्र रचले होते, अशी माहिती नुकतेच अटक करण्यात आलेल्या इसिसच्या मनसीद उपाख्य उमर-अल-हिंदी या आतंकवाद्याच्या चौकशीतून मिळाली आहे. या आक्रमणासाठी त्याने वाहन खरेदी करण्यासाठी विदेशातून पैसेही मागवले होते. 
      अल-हिंदी याने केरळमधील पॉप्युलर फ्रंट इंडियाच्या गुप्तचर शाखेत १२ वर्षे काम केले होते. तो केरळमधील संघाची आणि त्यांच्या शाखेची माहिती गोळा करत होता. 
     अल-हिंदी आणि त्याच्या गटातील ६ सदस्य डॉ. झाकीर नाईक यांच्याशी प्रभावित होते. संकेतस्थळाच्या माध्यमातून अल हिंदी अबु आयशा नावाच्या जिहादी गटाच्या संपर्कात आला. हा गट अफगाणिस्तानमधून चालवण्यात येत होता. अबु आयशा त्याला संघाच्या विरोधात कारवाया करण्यासाठी चेतवत होता.

पाककडून सिमेंटची आयात बंद करा ! - डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांची पंतप्रधान मोदी यांच्याकडे मागणी

ही मागणी त्वरित मान्य करून शासनाने त्यास अनुमती द्यावी !
      नवी देहली - खासदार डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांनी पाकमधून करण्यात येणारी सिमेंटची आयात बंद करावी, अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. त्यांनी मोदी यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, आर्थिक वृद्धी आणि देशातील सिमेंट उद्योगाच्या हितासाठी, तसेच राष्ट्राच्या हिताच्या दृष्टीने सिमेंटची आयात बंद करायला हवी.

पत्नीने पतीच्या वयोवृद्ध आईवडिलांना सोडून वेगळे रहाण्याचा प्रयत्न करणे, हे क्रूर कृत्य ! - सर्वोच्च न्यायालय

      नवी देहली - विवाह झाल्यानंतर पतीच्या वयोवृद्ध आईवडिलांना सोडून वेगळे रहाण्यासाठी प्रयत्न करणे वा त्यासाठी दबाव आणणे, हे क्रूर कृत्य आहे, यासाठी पत्नीस घटस्फोट दिला जाणे शक्य आहे, असे मत सर्वोच्च न्यायालयाचे न्या. अनिल दवे आणि न्या. एल्. नागेश्‍वर राव यांच्या खंडपिठाने व्यक्त केले आहे. 
     न्यायालयाने म्हटले की, विवाहानंतर पत्नी ही पतीच्या एकंदर कुटुंबाचा भाग बनत असते. तेव्हा पतीचे आर्थिक उत्पन्न केवळ आपल्यालाच मिळावे, या उद्देशार्थ पतीला कुटुंबापासून वेगळे केले जाऊ शकत नाही. भारतामध्ये पत्नीच्या आग्रहाखातर हिंदु पतीने आईवडिलांपासून वेगळे रहाण्याची प्रथा नाही किंवा आवश्यक संस्कृतीही नाही. विवाह झालेला मुलगा हा घरातील एकमेव पैसा कमावणारा सदस्य असेल; तेव्हा ही गोष्ट ध्यानी घेणे आवश्यक आहे. आईवडिलांनी वर्षानुवर्षे काळजी घेऊन मुलाला कर्ता केले असते. मुलाने आता वृद्ध झालेल्या वा आर्थिकदृष्ट्या कमकुवत झालेल्या आईवडिलांची काळजी घेणे नैतिकदृष्ट्या आणि कायदेशीररित्याही बंधनकारक आहे.शिवसेनेच्या विरोधामुळे अभिनेता नवाजुद्दीन सिद्धकी यांची मारीच ही भूमिका असलेली रामलिला रहित !

      मेरठ - हिंदी चित्रपटातील अभिनेता नवाजुद्दीन सिद्धकी याला मुझफ्फरनगर येथील रामलिलेमध्ये मारीच याची भूमिका करण्यास शिवसेनेने विरोध केल्यामुळे रामलिला रहित करण्यात आली. स्थानिक प्रशासनाने सिद्धकी यांना मारीचची भूमिका करण्यास अनुमती दिली नाही. येथे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होण्याच्या शक्यतेने ही अनुमती देण्यात आली नाही. येथील शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख मुकेश शर्मा यांनी नवाजुद्दीन याला विरोध केला होता. सिद्धकी याच्यावर नुकताच त्याच्या गर्भवती वहिनीला मारहाण केल्याचा गुन्हा प्रविष्ट करण्यात आला आहे.

जेएन्यूमध्ये गुजरात सरकार आणि गोरक्षक यांचा पुतळा जाळला !

विद्यापिठात शिक्षणाऐवजी हिंदुद्वेषी आणि देशद्रोही 
कारवाया करणार्‍या विद्यार्थ्यांवर सरकारने कठोर कारवाई करायला हवी !
      नवी देहली - देहलीतील जवाहरलाल नेहरू विद्यापिठातील (जेएनयूमधील) काही विद्यार्थ्यांनी विद्यापिठाच्या आवारात गुजरात सरकार आणि गोरक्षक यांचा पुतळा जाळल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी विद्यापीठ प्रशासनाने ४ विद्यार्थ्यांना नोटीस बजावली आहे.
    देशविरोधी घोषणा दिल्याच्या प्रकरणी देशद्रोहाचा गुन्हा असलेला रामा नागा याच्यासह अब्दुल मतीन, परवीन आणि मनिकांत या विद्यार्थ्यांना १४ ऑक्टोबर या दिवशी विद्यापीठ निरीक्षकांच्या समोर हजर रहाण्यास सांगण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना पाठवण्यात आलेल्या नोटिशीत १९ सप्टेंबरच्या घटनेचा उल्लेख करण्यात आला आहे. १९ सप्टेंबरच्या रात्री साडेनऊ वाजता विद्यापिठाच्या आवारातील साबरमती ढाब्यावर गुजरात सरकार आणि गोरक्षक यांचा पुतळा जाळण्यात आला होता, असे त्यात म्हटले आहे.झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाचे तीन-तेरा !

        पिंपरी, ८ ऑक्टोबर - अल्प उत्पन्न गटातील नागरिकांना त्यांच्या हक्काचे घर मिळावे, यासाठी केंद्र सरकार, राज्य सरकार आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका यांनी स्वस्त किंमतीमध्ये तीन खोल्यांच्या सदनिका बांधून दिल्या. पिंपरीतील मिलिंदनगर पुनर्वसन प्रकल्पातील ५९ सदनिका मात्र लाभार्थींनी भाड्याने दिल्याचे उघड झाले आहे. १० टक्के लाभार्थींनी सदनिका विकल्याचे, तर ३० टक्के झोपडपट्टीवासियांनी या प्रकल्पातील सदनिका भाड्याने देऊन शहरात पुन्हा झोपडी उभारल्याचे एका पाहणीत आढळून आले. महानगरपालिकेने लाभार्थ्यांशी केलेल्या करारानुसार त्यांना १० वर्षे सदनिकांची विक्री करता येत नाही, तसेच त्या भाड्यानेही देता येत नाहीत. या प्रकरणी दोषींना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असून समाधानकारक खुलासा न मिळाल्यास सदनिका जप्तीची कारवाई केली जाणार असल्याचे झोपडपट्टीनिर्मूलन आणि पुनर्वसन प्रकल्पाचे साहाय्यक आयुक्तांनी सांगितले.

अमेरिकेचे महत्त्व अल्प होत असल्याने पाक चीन आणि रशिया यांच्याकडे जाईल !

सर्जिकल स्ट्राईक नंतर पाकची ससेहोलपट !
पाकचे पंतप्रधान नवाज शरीफ यांचे दूत मुशाहिद हुसैन सैयद यांचे वक्तव्य
       वाशिंग्टन - अमेरिका आता जागतिक शक्ती नाही आहे, तिचे महत्त्व अल्प होत आहे, तिला विसरून जा. जर काश्मीर आणि भारत यांच्या संदर्भात अमेरिका पाकला महत्त्व देत नसेल, तर तो चीन आणि रशिया यांच्याकडे जाईल, असे वक्तव्य पाकचे पंतप्रधान नवाज शरीफ यांचे दूत मुशाहिद हुसैन सैयद यांनी केले. यातून पाक भविष्यात अमेरिका सोडून चीन आणि रशियाकडे झुकणार, याचे सुतोवाच करण्यात आले आहे.
     अमेरिकेतील विचारवंतांच्या अटलांटा काऊन्सिलमध्ये एका चर्चेचे आयोजन करण्यात आले होते. या चर्चेच्या समारोपानंतर एका प्रेक्षकाच्या प्रश्‍नाला उत्तर देतांना सैयद यांनी वरील वक्तव्य केले.

गांधींचा पुतळा भारतात परत पाठवण्याची मागणी

घानामध्ये म. गांधींच्या पुतळ्यावरून वाद !
     अक्रा (घाना) - येथील एका विद्यापिठात गांधींचा उभारण्यात आलेला पुतळा हटवण्यात येत आहे. हा निर्णय पुतळ्याच्या सुरक्षेसाठी घेण्यात येत असल्याचे घाना सरकारने स्पष्ट केले आहे. गांधी यांच्या एका जातीवाचक टिपणीवरून त्यांचा पुतळा हटवण्याची मागणी करण्यात येत आहे. भारताचे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी जूनमध्ये घाना विद्यापिठात या पुतळ्याचे अनावरण केले होते. या पुतळ्याच्या विरोधात याच विद्यापिठातील एका प्राध्यापकाने एक याचिका चालू केली आहे. गांधी अधिवक्ता म्हणून वर्ष १८९३ मध्ये दक्षिण आफ्रिकेत गेले होते. ते तेथे २० वर्षे राहिले होते. या काळात भारतियांच्या अधिकारासाठी लढतांना त्यांनी कथितरित्या दक्षिण आफ्रिकेतील अश्‍वेतांना असभ्य म्हटल्याचे या याचिकेत म्हटले आहे. (गांधीगिरी करणारे भारतातील समस्त गांधीवादी याविषयी काही करणार कि केवळ भारतियांनाच गांधीगिरी शिकवत रहाणार ? - संपादक)भारताचे संयुक्त राष्ट्रातील राजदूत सईद अकबरुद्दीन यांनी पाकला सुनावले

पाकला बोलून उपयोग नाही, तर त्याला कायमचा धडा शिकवला पाहिजे !
पाकने काश्मीरचा नाद सोडावा !
      संयुक्त राष्ट्र - काश्मीरप्रश्‍नी पाकने कितीही कंठशोष केला, तरी जगाला त्यांचा खोटेपणा कळून चुकला आहे. पाकने केलेल्या कोणत्याही आरोपाला आंतरराष्ट्रीय समुदायाकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे त्यांनी काश्मीरचा नाद सोडून द्यावा. जम्मू-काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे आणि राहील; अशा शब्दांत भारताचे संयुक्त राष्ट्रातील राजदूत सईद अकबरुद्दीन यांनी पाकला सुनावले आहे. खरे तर पाक हा जागतिक आतंकवादाचे केंद्र बनला आहे, असेही अकबरुद्दीन म्हणाले.

मुंगेली (छत्तीसगड) येथेे फेसबूकवर देवतांच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट केल्यावरून निर्माण झालेल्या तणावानंतर जमावबंदी

      मुंगेली (छत्तीसगड) - येथे फेसबूक आणि व्हॉटस् अ‍ॅप यांवरून देवतांविषयी आक्षेपार्ह पोस्ट केल्यावरून सर्वपक्षियांनी येथे आंदोलन चालू केल्यामुळे निर्माण झालेल्या तणावानंतर जिल्हा प्रशासनाने १४४ कलम लागू केले आहे. पोलिसांनी या प्रकरणी विकास खांडेकर या युवकाच्या विरोधात कलम २९५ अंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.


तमिळनाडूमध्ये ५ सप्टेंबर २०१६ च्या श्री गणेशचतुर्थीनंतर धर्मांधांनी घडवून आणलेली हिंदुत्वनिष्ठांवरील आक्रमणे आणि त्यांच्या हत्या !

 • तमिळनाडूमध्ये हिंदुत्वनिष्ठांवर आक्रमणे होत असतांना देशातील एकही हिंदुत्वनिष्ठ संघटना यासंदर्भात आवाज उठवत नाही, हे हिंदूंना आणि यांच्या संघटनांना लज्जास्पद होय ! 
 • साम्यवादी, पुरोगामी, ख्रिस्ती, मुसलमान त्यांच्या नेत्यांच्या हत्या झाल्यावर आकाशपाताळ एक करतात, तर हिंदु आणि त्यांच्या संघटना निष्क्रीय रहातात !
१. १०.०९.२०१६ - हिंदु मन्नानीचे (हिंदु आघाडीचे) जिल्हा अध्यक्ष श्री. महेश यांच्या वेळ्ळूर येथील निवासस्थानावर पेट्रोल बाँब फेकण्यात आला. 
२. १०.०९.२०१६ - हिंदु मन्नानीचे (हिंदु आघाडीचे) कार्यकर्ता श्री. श्रीनिवासन यांच्या वेळ्ळूर येथील वाहतूक कार्यालयावर पेट्रोल बॉम्ब फेकण्यात आला. यामध्ये एक बस जळून खाक झाली.
३. ११.०९.२०१६ - हिंदु मन्नानीचे (हिंदु आघाडीचे) कोषाध्यक्ष श्री. षण्मुगम् यांच्या तिरुपूर येथील पायमोजे आणि त्यासारख्या इतर वस्तूंच्या आस्थापनावर पेट्रोल बॉम्ब फेकण्यात आला. त्यामध्ये १५ लक्ष रुपयांची हानी झाली.

लैंगिक छळाच्या प्रकरणी पुणे महापालिका सहाय्यक आयुक्त निलंबित

        पुणे - महानगरपालिकेच्या घोले रोड क्षेत्रीय कार्यालयाचे तत्कालीन सहायक आयुक्त आणि अतिक्रमण निर्मूलन विभागाचे प्रमुख माधव जगताप यांनी पदावर कार्यरत असतांना एका महिला कर्मचार्‍याचा लैंगिक छळ केल्याच्या प्रकरणी त्यांना निलंबित करण्याचा आदेश पालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी ५ ऑक्टोबर या दिवशी दिला. (एवढ्यावरच न थांबता अशांवर फौजदारी कारवाई करून कठोर शिक्षा देण्यास भाग पाडले पाहिजे. - संपादक) माधव जगताप यांच्या विरोधात त्यांच्या कार्यालयातील एका आरोग्य निरीक्षक महिला कर्मचार्‍याने आयुक्त कुणाल कुमार यांच्याकडे तक्रार केली होती. त्या वेळी आयुक्तांनी या प्रकरणाची चौकशी महिला तक्रार निवारण समितीकडे (विशाखा समिती) सोपवली होती आणि जगताप यांचे स्थानांतर मालमत्ता व्यवस्थापन विभागाच्या सहायक आयुक्तपदी केले होते. जगताप यांच्या विरुद्ध एकूण ३ महिला कर्मचार्‍यांच्या तक्रारी आल्याने कठोर कारवाई करण्याची शिफारस समितीने केली होती.

गुजरातच्या व्यापार्‍यांचा पाकला भाजीपाल्याचा पुरवठा न करण्याचा निर्णय !

गुजरातच्या व्यापार्‍यांचा अभिनंदनीय निर्णय !
खरेतर सरकारनेच पाकसमवेतचे सर्व प्रकारचे 
संबंध तोडायला हवेत, असे जनतेला वाटते !
        कर्णावती (गुजरात) - गुजरातमधील भाजीपाला विक्रेत्यांनी पाकला भाजीपाला पुरवठा न करण्याचा निर्णय घेतला आहे. विशेषतः मिरची आणि टोमॅटोच्या पुरवठ्यावर व्यापार्‍यांनी बंदी आणली आहे. गेल्या २ दिवसांपासून पाकला भाजीपाल्याचा पुरवठा थांबवण्यात आला आहे. यामुळे भाजीपाला विक्रेत्यांना प्रतीदिन ३ कोटी रुपयांचा फटका बसणार आहे, अशी माहिती अहमदाबाद जनरल कमिशन एजंट असोसिएशनचे सचिव अहमद पटेल यांनी दिली आहे.

ओशो यांच्या बनावट मृत्यूपत्राच्या संदर्भात पोलीस गंभीर नाहीत ! - मुंबई उच्च न्यायालय

गांभीर्याचा अभाव असलेल्या अशा 
पोलिसांवर सरकारने कारवाई करणे अपेक्षित !
        मुंबई - गुरु रजनीश अर्थात् ओशो यांची खोटी स्वाक्षरी करून न्यासाने बनावट मृत्यूपत्र सिद्ध केले. या आरोपांविषयी तपास करण्यात पोलीस गंभीर दिसत नाहीत, अशा शब्दांत मुंबई उच्च न्यायालयाने ७ ऑक्टोबरला पुणे पोलिसांना फटकारले. ओशो यांचे भक्त योगेश ठक्कर यांनी ओशो फाऊंडेशनच्या विरोधात याचिका प्रविष्ट करून सीबीआय चौकशीची मागणी केली आहे.
        वरिष्ठ अधिकार्‍यांना सुनावणीच्या वेळी उपस्थित रहाण्यास सांगूनही त्यांच्याऐवजी कनिष्ठ अधिकारी आल्याने आणि तोही समाधानकारक माहिती देत नसल्याच्या कारणावरून न्या. नरेश पाटील आणि न्या. प्रकाश नाईक यांच्या खंडपिठाने तीव्र अप्रसन्नता व्यक्त केली. प्रथम दर्शनी अहवाल प्रविष्ट होऊन ३ वर्षे झाली, तरी अद्याप तपास पुढे गेलेला नाही. तत्पूर्वी मृत्यूपत्रातील ओशो यांच्या हस्ताक्षराची पडताळणी करण्यासाठी हस्ताक्षर तज्ञाचा अभिप्राय मागितला होता; मात्र झेरॉक्स प्रत आल्याने कोणताही अभिप्राय देण्यास असमर्थ असल्याचे त्याने कळवले, असे सरकारी अधिवक्त्यांनी न्यायालयाला सांगितले. तसेच त्यांच्या मृत्यूपत्राची प्रत स्पेनमध्ये असल्याचे कळल्याने ती मिळवण्यासाठी केंद्र सरकारमार्फत त्या देशाच्या विधी विभागाला पत्र पाठवले असल्याचेही त्यांनी सांगितले.

हिंदूंच्या होणार्‍या गळचेपीविरुद्ध आवाज उठवण्यासाठी हिंदु एकता मंचची स्थापना ! - प्रदीप जैस्वाल, महानगरप्रमुख, शिवसेना

       संभाजीनगर - हिंदूंचे सण आणि उत्सव यांच्यावर शासन आणि न्यायव्यवस्था यांच्याकडून जाचक नियमांचा फास आवळून निर्बंध घातले जातात. हिंदूंच्या सणांवरच निर्बंध का ? हिंदूंच्या या गळचेपीविरुद्ध आवाज उठवण्यासाठी हिंदु एकता मंचची स्थापना करण्यात आली आहे, असे प्रतिपादन शिवसेनेचे महानगरप्रमुख श्री. प्रदीप जैस्वाल यांनी केले आहे. येथे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले...
१. प्रशासन आणि राज्यकर्ते यांच्याशी संवाद साधण्याचा मार्ग अवलंबण्यासमवेत या गळचेपीचा निषेध करण्यासाठी मंचच्या माध्यमातून हिंदुत्वाचा आवाज बुलंद केला जाईल.
२. हिंदूंनी सण-उत्सव भारतात नाही साजरे करायचे, तर काय पाकिस्तानात साजरे करायचे का ?
३. हिंदु एकता मंचच्या व्यासपिठावर सर्व हिंदु समाजाच्या प्रतिनिधींनी एकत्र यावे. लवकरच यासंदर्भात बैठक घेण्यात येईल.

लोकशाहीदिनाला उपस्थित न रहाणार्‍या प्रशासकीय अधिकार्‍यांना नोटिसा !

असे कर्तव्यचुकार अधिकारी 
ही लोकशाहीचीच देण नव्हे का ?
        पुणे - महिन्याच्या पहिल्या सोमवारी नागरिकांच्या प्रश्‍नांसाठी आयोजित करण्यात येणार्‍या लोकशाहीदिनाला न येणार्‍या प्रशासनातील १४ वरिष्ठ अधिकार्‍यांना पुणे जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी नोटिसा बजावल्या आहेत. सार्वजनिक बांधकाम आणि कृषी विभागाचे अधिकारी दांड्या मारत असल्यामुळे येथील लोकशाहीदिनाच्या वेळी जिल्हाधिकार्‍यांना आणि नागरिकांना मन:स्ताप सहन करावा लागत आहे.
        त्यासाठी संबंधित खात्याच्या खातेप्रमुखांनी जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित रहाणे बंधनकारक आहे; परंतु अधिकार्‍यांना त्याचे गांभीर्य नाही. सरकारी पोर्टलवर तक्रार आणि संबंधित खात्याची नावे यांची माहिती दिली जाते. जिल्ह्याचे प्रमुख म्हणून जिल्हाधिकार्‍यांकडे त्याचे नियंत्रण आहे. कोणतीही पूर्वअनुमती न घेता हे अधिकारी लोकशाहीदिनाला दांडी मारत आहेत. त्यामुळे तक्रारदार नागरिकांच्या प्रश्‍नांचे निराकरण करता येत नाही, असे जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी काढलेल्या नोटिशीत म्हटले आहे.

सर्जिकल स्ट्राईकमुळे आयएस्आयच्या प्रमुखाची हकालपट्टी होणार !

        इस्लामाबाद - भारताच्या सर्जिकल स्ट्राईकमुळे जिहादी आतंकवाद्यांची नेमकी किती हानी झाली हे अद्याप स्पष्ट झाले नसले, तरी याप्रकरणी पाकच्या गुप्तचर संस्था आयएस्आयचे (इंटर सर्व्हिस इंटेलिजन्सचे) प्रमुख जनरल रिझवान अख्तर यांची हकालपट्टी होणार आहे. सप्टेंबर २०१४ मध्ये अख्तर यांची नियुक्ती झाली होती. त्यांचा कार्यकाळ नोव्हेंबर २०१७ मध्ये संपुष्टात येणार होता. पाक सैन्याच्या प्रवक्त्यांनी ही शक्यता फेटाळली असली, तरी काही अधिकार्‍यांनी यास दुजोरा दिला आहे. लेफ्टनंट जनरल नावेद मुख्तार यांची आयएस्आयचे नवे प्रमुख म्हणून वर्णी लागण्याची शक्यता आहे. पाक गुप्तचर यंत्रणांना या कारवाईचा थोडासाही अंदाज आला नव्हता. त्यामुळे पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणांसाठी ही अपयशाची गोष्ट असल्याचे मानले जात आहे.

बीडचा धर्मांध आतंकवादी फैय्याज कागजीने जेद्दामध्ये स्फोट केल्याचा संशय !

        मुंबई - सौदी अरबियातील जेद्दामध्ये झालेला आत्मघातकी स्फोट हा मूळचा बीडचा रहिवासी असलेला फैय्याज कागजी याने घडवून आणल्याचा संशय तपास पथकांना आहे.
        या प्रकरणी महाराष्ट्र पोलिसांनी केंद्रसरकारला पत्र लिहून मृत आतंकवादी अब्दुल्ला कलझर खान आणि फैय्याज कागजी यांचा काही संबंध आहे का, याची निश्‍चिती सौदी अरबिच्या दूतावासाकडून करून घेण्याची मागणी केली आहे.
        ४ जुलै या दिवशी सौदी अरेबियामध्ये झालेल्या साखळी आत्मघातकी स्फोटांमध्ये ४ जणांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी १९ जणांना अटक करण्यात आली होती. यामध्ये १२ पाकिस्तानी आणि ७ सौदी अरेबियातील आरोपींचा समावेश होता. हे आत्मघातकी आक्रमण अब्दुल्ला कलझर खान या पाकिस्तानी वंशाच्या नागरिकाने घडवून आणल्याचा यंत्रणाचा दावा होता; परंतु हा अब्दुल्ला हाच बीडचा फय्याज कागजी असल्याचाही संशय आहे. वर्ष २००६ मध्ये तो बांगलादेशमार्गे पाकमध्ये गेला. तिथून त्याने अबू जुंदालसह मुंबईच्या आतंकवादी आक्रमणात भाग घेतल्याचाही आरोप आहे. कागजीचे डीएन्ए पुरावे (सॅम्पल्स) मिळवून त्याच्या आई-वडिलांच्या डीएन्एशी तपासून पाहिले जाणार आहेत.

उरण तालुक्यातील शासकीय कार्यालयांच्या दूरवस्थेमुळे कागपत्रांवर दुष्परिणाम !

        उरण - तालुक्यातील अनेक महत्त्वपूर्ण शासकीय कार्यालये येथील करंजा रेवस खाडी पुलावर बांधण्यात आलेल्या इमारतीत असून यामध्ये कृषी, मत्स्य विभाग, वन विभाग, रोजगार नोंदणी त्याचप्रमाणे महसूल विभागाची तलाठी कार्यालये आहेत. या कार्यालयांचे भाडे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून आकारले जाते. ३६ वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या या इमारती जीर्ण झाल्या असून त्या पावसाळ्यात गळू लागल्या आहेत. याचा परिणाम या महत्त्वाच्या शासकीय कागदपत्रांवर होत आहे. तर भाडे आकारत असल्याने बांधकाम विभागाकडे दुरुस्तीची मागणी करूही दुर्लक्ष केले जात असल्याचे येथील विभागांच्या अधिकार्‍यांचे म्हणणे आहे. शासकीय कार्यालयातील कागदपत्रांच्या सुरक्षेसाठी कार्यालयाची दुरुस्ती करण्याची मागणी येथील अधिकार्‍यांनी केली आहे. तलाठी कार्यालयात मोठ्या प्रमाणात ब्रिटीश काळापासूनची जुनी कागदपत्रे आहेत.
        या दोन्ही इमारतीची लाकडी दारे, खिडक्या कुजल्या आहेत. तर वीजपुरवठा करणार्‍या तारा लोंबकळत आहेत. लाद्या फुटल्याने चालताही येत नाही. अशी स्थिती झाली आहे. शासकीय कार्यालये कि कोंडवाडे अशी या इमारतींची दुरवस्था झाली आहे.

मराठा मोर्च्याचे श्रेय संभाजी ब्रिगेडने लाटू नये !

नगर जिल्ह्यातील मराठा 
समाजाचे प्रसिद्धीपत्रकाद्वारे निवेदन !
        नगर, ८ ऑक्टोबर - २३ सप्टेंबर या दिवशी नगर जिल्ह्यात समस्त मराठा समाजाच्या वतीने मराठा मूकमोर्च्याचे आयोजन करण्यात आले होते. त्याला राज्यभरातून लक्षावधी मराठा बांधव उपस्थित होते. प्रत्येक मराठा व्यक्तीने यात सहभाग घेतल्याने याचे श्रेय संपूर्ण मराठा समाजाला जाते. संभाजी ब्रिगेड आणि अन्य संघटनांनी या मोर्च्यांचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन नगर जिल्ह्यातील मराठा समाज कोअर समितीच्या सदस्यांनी केले आहे. काही घटनांमधून संभाजी ब्रिगेडकडून या मोर्च्याचे आयोजक असल्याच्या थाटात प्रसिद्धीमाध्यमांमध्ये भूमिका मांडून श्रेय लाटण्याचा प्रयत्न होत होता. या पार्श्‍वभूमीवर हे पत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. (यावरून श्रेय लाटणार्‍या संघटनांची प्रसिद्धीलोलुपता आणि अहंभावी वृत्ती दिसून येते. अशा संघटनांपासून मराठा समाजाने चार हात दूर राहिलेलेच चांगले ! - संपादक)
        या संदर्भात कोअर समितीच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकात म्हटले आहे की, शिवप्रहार संघटनेचे संस्थापक संजीव भोर, तसेच मराठा समाजाच्या नावावर काम करणार्‍या संभाजी ब्रिगेड, मराठा महासंघ, अखिल भारतीय छावा संघटना, स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड आदी संघटनांचा मोर्च्याच्या आयोजनामध्ये कोणताही सक्रीय सहभाग नव्हता आणि नाही.

सर्जिकल स्ट्राईक सर्वांना दाखवायला ते स्टिंग ऑपरेशन नाही ! - लेखक चेतन भगत

एका लेखकाला जे कळते, ते आप 
आणि काँग्रेसवाले यांना कळत कसे नाही ? 
यावरूनच त्यांची परिपक्वता (?) लक्षात येते !
         मुंबई, ८ ऑक्टोबर - सर्जिकल स्ट्राईकची चित्रफीत सर्वांना दाखवायला ते स्टिंग ऑपरेशन किंवा अश्‍लील चित्रफीत (सेक्स टेप) नाही. जर तुमचा देशाच्या लष्करावर विश्‍वास नसेल, तर तुमच्यात काहीतरी खोटं आहे. काही राजकीय पक्ष भारतीय लष्कराच्या संदर्भात शंका उपस्थित करत आहेत, हे धक्कादायक आहे. यामुळे देश दुखावला गेला आहे, असे भाष्य लेखक चेतन भगत यांनी केले आहे. सर्जिकल स्ट्राईकचा पुरावा मागणार्‍यांना भगत यांनी ट्विटर या सामाजिक संकेतस्थळावर केलेल्या ट्विटमध्ये हे भाष्य केले आहे. देहलीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजीव निरुपम यांनी केंद्र सरकारकडे सर्जिकल स्ट्राईक केल्याचा पुरावा सादर करण्याची मागणी केली होती. त्यावर चेतन भगत यांनी हे भाष्य केले आहे.

शहरी भागातील नक्षलवाद थोपवण्याचे पोलिसांसमोर आव्हान ! - रवींद्रसिंह परदेशी, पोलीस उपायुक्त, नागपूर

       मुंबई - नक्षलवाद केवळ जंगलापुरताच मर्यादित राहिलेला नाही. नक्षलवादाने शहरातही पाय पसरले असून नागपूर, तसेच पुणे शहरात अशा अनेक घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे शहरी भागात नक्षलवादाचा प्रसार थोपवण्याचे आणि तरुणाईला त्यापासून दूर ठेवण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे, असे मत नागपूरच्या विशेष शाखेचे पोलीस उपायुक्त रवींद्रसिंह परदेशी यांनी दैनिक लोकसत्ता या वृत्तपत्राशी बोलतांना व्यक्त केले.
       ते पुढे म्हणाले की, पोलीस हा नागरिकांशी विनम्र आणि गुन्हेगारांशी करारी असणे आवश्यक आहे. पोलिसांचा आदरयुक्त दरारा असायला हवा.

झोपडपट्टीत मलःनिस्सारण वाहिन्या टाकण्याचे काम चालू

नवी मुंबईत स्वच्छता अभियान !
        नवी मुंबई - येत्या नोव्हेंबरपर्यंत नवी मुंबई हागणदारीमुक्त करण्याचा निर्धार पालिका प्रशासनाने केला आहे. त्यानुसार प्रथमच झोपडपट्टी भागातही नव्या मलनि:सारण वाहिन्या टाकण्यात येणार आहेत. महापालिकेच्या स्वच्छता अभियानाकडे वैयक्तिक स्वच्छतागृहे उभारण्यासाठी आलेल्या २ सहस्र ५३७ पेक्षा अधिक अर्जांपैकी १ सहस्र ५९१ अर्जांना मान्यता देण्यात आली असून अपुर्‍या कागदपत्रांमुळे ४०२ अर्ज रहित करण्यात आले. आतापर्यंत ६५१ वैयक्तिक स्वच्छतागृहे बांधून पूर्ण झाली आहेत. वैयक्तिक स्वच्छतागृह उभारण्यासाठी २०१० पर्यंतच्या झोपडपट्टीधारकांना फोटो पास आणि आधारकार्ड यांची आवश्यकता असते. शीव-पनवेल महामार्गावर तीन आणि पामबीच रस्त्यावर चार अशी सात ई-टॉयलेट उभारण्यात येणार आहेत. त्यामुळे महामार्गावरून जाणार्‍या प्रवाशांची सोय होणार आहे.

अल्पवयीन आरोपीचे भिवंडी सुधारगृहातून पलायन !

       ठाणे - कल्याण येथील एका तरुणीच्या हत्या प्रकरणातील अल्पवयीन आरोपी भिवंडी सुधारगृहातून पळून गेला. त्याच्यावर दोन हत्या, दोन हत्यांचे प्रयत्न आणि अनेक दरोडयांंचे गुन्हे दाखल आहेत. त्याच्यासह अन्य दोन बंदीवानही पळून गेले.

हाजी अली दर्ग्यामध्ये महिलांना प्रवेश स्थगितच !

       नवी देहली - मुंबईच्या प्रसिद्ध हाजी अली दर्ग्याच्या गर्भगृहाजवळ महिलांच्या प्रवेशास मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या स्थगिती आदेशाचा अवधी सर्वोच्च न्यायालयाने १७ ऑक्टोबरपर्यंत वाढवला आहे. सरन्यायाधीश टी.एस्. ठाकूर आणि न्या. ए.एम्. खानविलकर यांच्या न्यायपिठाने दर्गा ट्रस्ट प्रगत भूमिका घेईल, अशी आशा व्यक्त केली. ट्रस्टने मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालास आव्हान दिले आहे.

रत्नागिरीतील बीजघर सज्जाच्या तलाठी सौ. जाधव यांना लाच घेतांना अटक

       खेड - झाडे तोडल्याच्या प्रकरणी तहसीलदारांकडे तक्रार करण्याची धमकी देऊन तक्रार मिटवण्यासाठी ३ सहस्र रुपयांची लाच स्वीकारतांना तालुक्यातील बीजघर सज्जाच्या तलाठी सौ. अंजली राजू जाधव यांना अटक करण्यात आली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली. अनावश्यक झाडे शेतीयोग्य जमीन बनवण्यासाठी तक्रारदाराने तोडली होती. यासाठी जमीन मालकाची अनुमती त्याने घेतली होती. तरीही बिजघर सज्जाच्या तलाठी सौ. जाधव यांनी तक्रारदाराकडे ५ सहस्र रुपयांची मागणी केली. पैसे दिले नाही, तर तहसीलदार कार्यालयाला माहिती कळवतो, अशी धमकी दिली होती. वारंवार येणार्‍या दूरभाषमुळे कंटाळलेल्या तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पडताळणी करून सौ. जाधव यांना पकडण्यासाठी सापळा रचला होता. लाच घेतल्याप्रकरणी उत्पादन शुल्क अधीक्षकास पाच वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

लाच खाण्याच्या क्षेत्रातही पुरुषांशी बरोबरी करणार्‍या महिला
      रत्नागिरी - मद्य विक्री व्यवसाय परवाना नूतनीकरणासाठी ५ लाख रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी राज्य उत्पादन शुल्कचे तत्कालीन अधीक्षक विजयकुमार चिंचाळकर यांना न्यायालयाने ५ वर्षे सक्तमजुरी आणि दंडाची शिक्षा ठोठावली. जिल्ह्यात वर्ग १च्या अधिकार्‍यावर लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यांतर्गत कारवाई झाल्याची ही पहिलीच घटना आहे. गुहागर तालुक्यातील राजाराम गडदे यांचा मद्य विक्रीचा व्यवसाय होता. तोटा झाल्याने त्यांनी तो बंद केला. तो पुन्हा चालू करण्यासाठी त्यांनी वर्ष २०१३ मध्ये परवाना नूतनीकरणाचा प्रस्ताव उत्पादन शुल्कच्या रत्नागिरी कार्यालयाकडे दिला. त्यावर कार्यालयाने निर्णय दिला नाही. त्यामुळे गडदे यांनी तत्कालीन उत्पादन शुल्क मंत्री गणेश नाईक यांच्याकडे अपील दाखल केले. नूतनीकरणाचा परवाना देण्याचा आदेश नाईक यांनी दिला होता. गडदे यांनी सुनावणीचे आदेश उत्पादन शुल्क अधीक्षक विजयकुमार चिंचाळकर यांच्याकडे दिले. त्या वेळी चिंचाळकर यांनी परवाना नूतनीकरणासाठी १० लाखांची मागणी केली. मंत्र्याकडील पत्र दाखवूनही चिंचाळकर परवाना देण्यास राजी नव्हते. (संदर्भ : संकेतस्थळ कोकण टुडे)

विधी महाविद्यालयांत १३ सहस्र जागा रिक्त

        मुंबई - दूरच्या महाविद्यालयामध्ये मिळालेला प्रवेश, रखडलेली प्रवेशप्रक्रिया आणि बार काऊन्सिलने महाविद्यालयांना क्षमतेपेक्षा अल्प विद्यार्थ्यांची सूची पाठवल्यामुळे तिसर्‍या फेरीनंतर विधी महाविद्यालयांमधील १३ सहस्र जागा रिक्त आहेत. परिणामी महाविद्यालयेच अडचणीत आली आहेत. त्यामुळे ऑफलाइन प्रवेशप्रक्रिया चालू करावी, अशी मागणी महाविद्यालय प्रशासन करीत आहेत.

पैशांपेक्षा देश महत्त्वाचा आहे ! - अजय देवगण

      मुंबई - पाककडून सीमेवर गोळीबार चालू असतांना तेथील कलाकारांसमवेत काम करण्याचा प्रश्‍नच उद्भवत नाही. त्या देशातील लोकांशी बोलणेही उचित ठरणार नाही. पैशांपेक्षा देश हा कधीही महत्त्वाचा आहे. कुणी आम्हाला कानशिलात लगावली, तर आम्हीही त्यांना त्यांच्यात भाषेत उत्तर देऊ, असे परखड मत अभिनेता अजय देवगण यांनी एका मुलाखतीत मांडले.

कुर्ला स्थानकाजवळ रुळाला तडे गेल्याने गाड्या रखडल्या

        मुंबई - मध्य रेल्वे मार्गावरील कुर्ला स्थानकाजवळ रुळाला तडे गेल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होती. छत्रपती शिवाजी टर्मिनसच्या दिशेने येणार्‍या जलद लोकलगाड्या रखडल्या होत्या. कार्यालयाला जाण्याच्या वेळेतच हा प्रकार घडल्याने प्रवाशांची मोठ्या प्रमाणात असुविधा झाली. जलद लोकलगाड्या अचानक रहित झाल्याने कुर्ला, तसेच अन्य स्थानकांवरही प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली होती. प्रशासनाने दुरुस्तीचे काम तात्काळ पूर्ण केले असले, तरी एक्सप्रेस गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले.

भारतातील तरुण बुद्धीमान आणि मेहनती ! - अमेरिकेच्या वकिलातीतील संचालक

        संभाजीनगर - जगातील सर्वाधिक तरुणांचा देश म्हणून भारताची ओळख निर्माण झाली असून येथील तरुण बुद्धीमान, मेहनती आणि नवनिर्मितीची क्षमता असणारे आहेत, असे प्रतिपादन अमेरिकन वकिलातीतील संचालक थॉमस वायडा यांनी केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापिठाच्या पत्रकारिता विभागास त्यांनी ६ ऑक्टोबरला सदिच्छा भेट दिली. या वेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

पोलिसांच्या संदर्भातील कटू अनुभव !

         सध्या सनातनचे साधक आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते यांना पोलिसांच्या शारीरिक आणि मानसिक छळाला सामोरे जावे लागत आहे. या अनुषंगाने विविध ठिकाणच्या पोलिसांविषयी सनातनचे साधक, हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते किंवा हिंदुत्वनिष्ठ यांना यापूर्वी पोलिसांच्या सतावणुकीविषयी आलेले अनुभव येथे प्रसिद्ध करत आहोत.
पोलीस अधिकार्‍यांच्या अशा वागण्याला सज्जनता 
म्हणता येईल का ?, याचा त्यांनी विचार करावा !
         पोलीस अधिकारी चौकशी करतांना मध्ये मध्ये आम्ही दुर्जन आहोत का ? आम्हाला तुम्ही दुर्जन म्हटले आहे, अशा आशयाचे आमच्याशी परत परत बोलत होते. दैनिक सनातन प्रभातमधून येणारे लिखाण हे साधकांना प्रत्यक्ष आलेल्या अनुभवांच्या आधारे आणि सत्यच असते. त्यात एकही शब्द असत्य नसतो. दुर्जन ही एक व्यक्ती नसून ती प्रवृत्ती आहे आणि त्याला सनातन संस्था सनदशीर मार्गाने विरोध करते. इतकी सुस्पष्टता असतांनाही पोलीस अधिकारी परत परत याविषयी बोलत होते.
         एका साधिकेच्या घरी पोलीस न सांगता आले. किल्ली बनवणार्‍या एका व्यक्तीकडून किल्ली बनवून त्यांनी साधिकेच्या घराचे कुलूप उघडले.

दंगलीचे वार्तांकन कसे कराल ?

श्री. चेतन राजहंस
     वार्ताहर कितीही चांगला असला, तरी दंगलींच्या काळात वार्तांकन करणे, ही कसोटी असते. वार्ताहर, वाचक, हितचिंतक, साधक आणि धर्मप्रेमी यांना आपल्या भागात दंगल होत असतांना सनातन प्रभातसाठी वार्तांकन कसे करायचे, हे सांगणारा हा लेखप्रपंच...
दंगलीचे वार्तांकन आणि वार्ताहराचे संरक्षण !
      दंगलीच्या बातम्या गोळा करतांना स्वतःच्या सुरक्षिततेचा विचार प्रथम करायला हवा. दंगलीच्या वेळी दगडफेक, पेट्रोल बॉम्ब फेकणे आदींचा वापर करण्यात येत असतो. हिंदु-मुसलमान दंगलीच्या वेळी घटनास्थळी जाऊन वार्तांकन करणे अशक्यच असते. दंगल झाल्यानंतर पोलिसांच्या संरक्षणात आपण जाऊ शकतो.

दाभोलकरांचा खुनी साधनात आहे !

कै. अरुण रामतीर्थकर
       २० ऑगस्टला सकाळी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या झाली आणि लागेचच या हत्येसाठी सनातन संस्थेला उत्तरदायी ठरवत समाजवाद्यांनी आणि तथाकथित पुरोगाम्यांनी आरोप चालू केले. त्यानंतर सनातनच्या अनेक साधकांच्या चौकशा पोलिसांनी केल्या. त्यांना पुण्यात बोलावून चौकशी करण्यात आली; मात्र आज हत्येला अडीच महिने गेल्या नंतरही उलटून दाभोलकर यांचे मारेकरी पोलिसांना सापडलेले नाही. त्यामुळे आता पोलिसांचा तपास चुकीचा होता, असे म्हटले जात आहे, तर आता योग्य तपास कोणता असला पाहिजे, हे या लेखातून मांडण्यात आले आहे. 
कै. अरुण रामतीर्थकर, ज्येष्ठ पत्रकार, सोलापूर

बलुची नेत्यांना जे कळते, ते स्वातंत्र्याला ६९ वर्षे झाली, तरी भारतीय नेत्यांना कळत नाही !

अ. भारताने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून आतंकवाद्यांना ठार केले. अशी कारवाई फार पूर्वी करायला पाहिजे होती. पाकिस्तान आतंकवाद्यांसाठी स्वर्ग आहे; मात्र जगासाठी तो कर्करोग आहे. जर त्याला रोखले नाही, तर जगाला तो त्रासदायक ठरेल. 
- शेर महंमद, प्रवक्ता, बलुच रिपब्लिकन पार्टी 
आ. भारताने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून आतंकवाद्यांना ठार केले. या कारवाईने आम्ही फार आनंदी आहोत. आमची इच्छा आहे की, अशा प्रकारची कारवाई रावळपिंडीमध्येही केली जावी, जेथे खर्‍या अर्थाने आतंकवादी आहेत. 
- मजदक दिलशाद बलुच, भारतातील बलुचिस्तानचे नेत

कायद्याचे पालन करणे आणि माणुसकी न शिकवणारे पोलीस प्रशिक्षण आता नको. हिंदु राष्ट्रात हे प्राधान्याने शिकवले जाईल. यासंदर्भात गंभीर चुका करणार्‍यांना निलंबित करून आजन्म कारागृहात ठेवा, तरच इतर अधिकारी अशी चूक करणार नाहीत !

      कॉ. गोविंद पानसरे आणि डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचे अन्वेषण (तपास) जमत नसेल, तर तसे सांगा; पण बॅलेस्टिक अहवालाचे कारण पुढे करून वेळकाढूपणा करू नका. तुमचा हा वेळकाढूपणा खपवून घेतला जाणार नाही, अशा अत्यंत खरमरीत शब्दांत केंद्रीय अन्वेषण यंत्रणेला (सीबीआयला) उच्च न्यायालयाने २९ सप्टेंबर २०१६ या दिवशी बजावले. 
      या वेळी न्या. धर्माधिकारी विशेष तपास पथका (एस्आयटी)चे अतिरिक्त पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा यांना म्हणाले, ज्यांची तपासणी केली जाते त्या साक्षीदारांची नावे आणि आरोपींची माहिती वृत्तपत्रात कशी छापून येते ? मी वृत्तपत्रांत ही वृत्ते वाचली आहेत. ती पोलीस अधिकार्‍याच्या नावानिशी दिली आहेत. साक्षीदार कोण तपासले आणि आरोपी कोणती माहिती देतो, असे तुमचा हवाला देऊन छापले जाते, हे कसे काय ? वैज्ञानिक दृष्टीने संशोधन करणार्‍यांना विनंती !

      आश्रमात, संताचे वास्तव्य असलेले ठिकाण तसेच साधकांच्या घरी अशाप्रकारे विविध नाद ऐकू येतात. काही नाद एखादे माध्यम असते उदा. (पंख्यातून नाद येतो, वातानुकूलित यंत्रातून नाद येतो) अशा प्रकारे येणारा नाद नेहमीच्या नादापेक्षा वेगळा असतो. काही वेळा तो कोणतेही माध्यम नसतांना येतो. काही वेळा हा नाद इतरांनाही ऐकू येतो तर काही वेळा हा नाद केवळ स्वत:लाच ऐकू येतो. या नादांच्या मागील वैज्ञानिकदृष्ट्या यामागचे कारण कोणतेे ? कोणत्या वैज्ञानिक उपकरणांद्वारे याचे संशोधन करता येईल ? या संदर्भात वैज्ञानिक दृष्टीने संशोधन करणार्‍यांचे साहाय्य लाभल्यास आम्ही कृतज्ञ असू.
- व्यवस्थापक, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (संपर्क : श्री. रूपेश लक्ष्मण रेडकर, इ-मेल : savv.research@gmail.com)

अंनिसची सामाजिक भोंदूगिरी उघड करणार्‍या वृत्ताला प्रसिद्धी देणारी आणि न देणारी वृत्तपत्रे

वस्तूस्थितीदर्शक वृत्ताला प्रसिद्धी न देणे किंवा अल्प प्रसिद्धी देणे, म्हणजे 
गुन्हेगारी वृत्तीला पाठिंबा देण्यासारखेच होय. अशी प्रसारमाध्यमे जनतेला दिशा काय देणार ?
      घोटाळेबाज अंनिसच्या न्यासाची सामाजिक भोंदूगिरी उघड करणार्‍या सार्वजनिक न्यास नोंद कार्यालयाच्या अहवालाची माहिती सनातन संस्थेच्या वतीने पुणे येथे १ ऑक्टोबर २०१६ या दिवशी झालेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आली होती. या पत्रकार परिषदेचे वृत्त कोणकोणत्या वृत्तपत्रांत कशा प्रकारे प्रसिद्ध करण्यात आले आहे, तसेच प्रसिद्ध करण्यात आलेले नाही, याविषयीचा आढावा पुढे देेण्यात आला आहे.
वृत्तपत्रांचे प्रकार पाकचे गोडवे गाणार्‍यांनाही आपले म्हणायचे का ?

      कोझीकोड (केरळ) येथील भाषणात पंतप्रधान मोदी म्हणाले होते,मुसलमानांना आपलेसे करा. त्यावर प्रतिक्रिया देतांना शिवसेना पक्षप्रमुख आणि दैनिक सामनाचे संपादक श्री. उद्धव ठाकरे म्हणाले, काश्मिरातील जे मुसलमान पाक झिंदाबादच्या घोषणा देत आहेत, इस्लामिक स्टेटचे झेंडे फडकवत आहेत, बुरहान वानीसाठी शोक करत आहेत, अशा मुसलमानांनाही छातीशी कवटाळून आपले म्हणायचे का ? हिंदु राष्ट्रात लगेच निकाल लागतील; कारण न्यायमूर्ती साधना करणारे असल्याने सूक्ष्मातून जाणणारे असतील !

      देशभरातील न्यायालयांमध्ये एकूण २ कोटी २९ लाख प्रकरणे प्रलंबित आहेत. त्यांपैकी २३ लक्ष प्रकरणे १० वर्षांपेक्षा अधिक काळ प्रलंबित आहेत, तर ४० लक्ष प्रकरणे ५ वर्षांपेक्षा अधिक काळ प्रलंबित आहेत. २३ लाखांपैकी ९० टक्के प्रकरणे केवळ ६ राज्यांमध्ये प्रलंबित असल्याचे नॅशनल ज्युडिशियल डेटा ग्रीडने दिलेल्या आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे. हे इतकी वर्षे का केले नाही ? याचे आधी उत्तर द्या !

      यापुढे कोणताही पाकिस्तानी कलाकार आणि तंत्रज्ञ यांना भारतीय चित्रपटांमध्ये काम द्यायचे नाही, तसेच सध्या करण्यात आलेले सर्व करार रहित करावेत, असा निर्णय इंडियन मोशन पिक्चर्स प्रोड्युसर्स असोसिएशनने अर्थात् इम्पाने घेतला आहे.

श्री गणेशयाग आणि बगलामुखी मंत्रपठण चालू असतांना सद्गुरु (सौ.) बिंदाताई यांच्या रूपात साक्षात् देवीच याग करत आहे, असे वाटून यज्ञकुंडातून सर्व दिशांनी शस्त्रास्त्रेे बाहेर येत असल्याचे जाणवणे

सौ. उमा रविचंद्रन्
सध्या चालू असलेल्या नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने...
     महर्षींच्या आज्ञेनुसार रामनाथी आश्रमात १२, १३ आणि १४ सप्टेंबर २०१६ या दिवशी श्री गणेशयाग आणि बगलामुखी मंत्रपठणाचे आयोजन करण्यात आले होते. या यागाला साधक-पुरोहितांसमवेत सद्गुरु (सौ.) बिंदाताई बसल्या होत्या. त्या वेळी त्यांच्या रूपात साक्षात् देवीच याग करत आहे, असे मला जाणवत होते. यागाच्या वेळी त्यांच्या तोंडवळ्यावर मातृवात्सल्य भाव होता. यज्ञकुंडातून सर्व दिशांनी शस्त्रास्त्रे बाहेर येत आहेत, असे मला जाणवत होतेे. देवीचे वाहन सिंह आश्रमाच्या प्रवेशद्वाराचे रक्षण करत होता. तो अवाढव्य आणि भयंकर दिसत होता.

शारदीय ऋतूचर्या - शरद ऋतूत निरोगी रहाण्यासाठी आयुर्वेदीय उपाय !

वैद्य मेघराज पराडकर
१. विकारांची संख्या अधिक असलेला शरद ऋतू
     पावसाळा संपल्या संपल्या सूर्याचे प्रखर किरण धरणीवर पडू लागतात, तेव्हा शरद ऋतूला आरंभ होतो. पावसाळ्यामध्ये शरिराने सततच्या थंड वातावरणाशी जुळवून घेतलेले असते. शरद ऋतूचा आरंभ झाल्यावर एकाएकी उष्णता वाढल्याने नैसर्गिकपणे पित्तदोष वाढतो आणि डोळे येणे, गळू होणे, मूळव्याधीचा त्रास बळावणे, ताप येणे यांसारख्या विकारांची शृंखलाच निर्माण होते. शरद ऋतूमध्ये सर्वाधिक विकार होण्यास वाव असतो; म्हणूनच वैद्यानां शारदी माता । म्हणजे (रुग्णांची संख्या वाढवणारा) शरद ऋतू वैद्यांची आईच आहे, असे गमतीत म्हटले जाते.
२. ऋतूनुसार आहार
२ अ. शरद ऋतूत काय खावे आणि काय खाऊ नये ? 
२ आ. आहारासंबंधी काही महत्त्वाची सूत्रे
२ आ १. भूक लागल्यावरच जेवा ! :
पावसाळ्यामध्ये पचनशक्ती मंद असते. शरद ऋतूमध्ये ती हळूहळू वाढू लागते. यासाठी भूक लागल्यावरच जेवावे.

अ‍ॅन्ड्रॉईड सनातन पंचांग २०१६ ला आतापर्यंत मिळालेला भरघोस प्रतिसाद !


- श्री. महेश ननावरे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (७.१०.२०१६)

१२ वर्षांतून एकदा येणार्‍या कन्यागत महापर्वाच्या वेळी गंगेचे प्रत्यक्ष किंवा सूक्ष्म पाणी कृष्णा नदीत प्रवेश करत असल्याने त्या काळात कृष्णा नदीच्या पाण्याची वैशिष्ट्ये अभ्यासण्यासाठी यू.टी.एस्. (युनीव्हर्सल थर्मो स्कॅनर) या उपकरणाद्वारे महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाने केलेली वैज्ञानिक चाचणी !

       कृष्णा नदीचा उगम महाराष्ट्रातील महाबळेश्‍वर येथे आहे. गंगा नदी हिमालयात उगम पावते आणि बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. भौगोलिकदृष्ट्या या दोन्ही नद्यांमध्ये शेकडो किलोमीटरचे अंतर आहे; पण ज्या वेळी गुरु ग्रह कन्या राशीत प्रवेश करतो, त्या मुहूर्तावर गंगेचे पाणी कृष्णा नदीत प्रवेश करते, याला सर्वमान्यता आहे. त्या शुभमुहूर्तावर कृष्णा नदीच्या काठी कन्यागत महापर्वकाल आरंभ होतो. हे ११.८.२०१६ या दिवशी रात्री ९ वाजून २९ मिनिटांनी घडले. प्रत्येक १२ वर्षांनी एकदाच हा चमत्कार घडतो. या गोष्टीचा वैज्ञानिकदृष्ट्या तुलनात्मक अभ्यास करण्याच्या उद्देशाने ११.८.२०१६ या दिवशी तीन विविध वेळी कृष्णा नदीच्या पाण्याचे घेतलेले नमुने आणि उत्तर प्रदेशातील वाराणसी (काशी) येथील गंगेच्या पाण्याचा नमुना यांची वैशिष्ट्ये वैज्ञानिकदृष्ट्या अभ्यासण्यासाठी यू.टी.एस्. (युनीव्हर्सल थर्मो स्कॅनर) या उपकरणाच्या साहाय्याने चाचणी घेण्यात आली. या चाचण्यांची निरीक्षणे आणि त्यांचे विवरण पुढे दिले आहे.

नवरात्रोत्सवातील अपप्रकार रोखून उत्सवाचे पावित्र्य राखा !

     गरब्याच्या वेळी गोलाकार फेर धरून केलेले मंडल हे घटाचे प्रतीक असते. पूर्वी गरबा या नृत्याच्या वेळी देवीची, कृष्णलीलेची आणि संतरचित गीतेच म्हटली जात असत. आज भगवंताच्या या सामूहिक नृत्योपासनेला विकृत स्वरूप आले आहे. चित्रपटांतील गीतांच्या तालावर अश्‍लील अंगविक्षेप करून गरबा खेळला जातो. गरब्याच्या निमित्ताने व्यभिचारही होतो. पूजास्थळी तंबाखूसेवन, मद्यपान, ध्वनीप्रदूषण इत्यादी प्रकारही घडतात. हे अपप्रकार म्हणजे धर्म आणि संस्कृती यांची हानी होय. हे अपप्रकार रोखणे, हे काळानुसार आवश्यक धर्मपालनच आहे. सनातन काही वर्षांपासून या अपप्रकारांविरुद्ध जनजागृती चळवळ राबवते. यात तुम्हीही सहभागी व्हा !

मैत्री मिळवण्याची आयती संधी मिळते; म्हणून नवरात्रोत्सव साजरा करणारा सध्याचा युवावर्ग आणि स्वतःतील शक्तीचे पूजन करण्यापेक्षा प्रतिदिन निराळ्या रंगाची साडी परिधान करण्यासाठी धडपडणारा महिला वर्ग !

     रास-गरबा लोकप्रिय झाल्याने नवरात्रीला अचानक भरभराट (बरकत) आली आहे. मैत्री मिळवण्याची आयती संधी मिळते; म्हणून युवावर्ग नवरात्र हा सण भक्तीभावाने साजरा करू लागला आहे. त्यामुळे गर्भपात केंद्रावर काही मासांनंतर गर्दी वाढू लागली आहे. आपल्या मुला-मुलींवर लक्ष ठेवण्यासाठी धनिक मंडळी गुप्तहेरसुद्धा वापरू लागली आहेत. यावरून या नवरात्रीत सण राहिला एकीकडे आणि भलतेच प्रकार वाढीस लागलेले पहायला मिळतात. पूर्वी घटस्थापना घरोघरी होत असे. आता तो प्रकार बंद झाला आहे. नवरात्रीत खरे तर महिलांचे राज्य असते. त्यांच्यातील शक्तीची ही पूजा असते; पण या महिला आज कुठल्या रंगाची साडी नेसायची आणि नसेल तर ती विकत घ्यायची, यांतच आपली शक्ती वाया घालवतांना दिसतात. सध्या गणेशोत्सव, दिवाळी आणि नवरात्र या सणांच्या वेळी प्रतिदिन वेगवेगळ्या रंगांच्या साड्या नेसायची, ही एक नवी पद्धतच आली आहे. कहर म्हणजे या वेडात आता पुरुषांनाही ओढले जात आहे; म्हणूनच स्त्री शक्तीला मानावे लागेल.
- श्री. संजीव नरेंद्र पाध्ये (श्री गजानन आशिष, मार्च २०११)

गरबा आणि दांडिया या शब्दांचा अर्थ समजून भावपूर्ण नृत्य केल्यास त्याचा आध्यात्मिक लाभ होतो !

१. गरबा या शब्दाचे आध्यात्मिक महत्त्व
     गुजरातमध्ये नवरात्रोत्सवात मातृशक्तीचे प्रतीक म्हणून अनेक छिद्रांच्या मातीच्या मडक्यात ठेवलेला दीप पूजला जातो. स्त्रीच्या सृजनात्मकतेचे प्रतीक म्हणून नऊ दिवस पुजल्या जाणार्‍या दीपगर्भमधील दीप या शब्दाचा लोप होऊन त्यापासून पुढे गर्भ, गरबो अन् नंतर गरबा, असा शब्द प्रचलित झाला.
२. सांस्कृतिक अधिष्ठान असलेला पूर्वीचा गरबोत्सव
     पूर्वीच्या काळी नवरात्रात पहिल्या रात्री देवीजवळ लहान-मोठे सच्छिद्र घट एकमेकांवर ठेवण्यात येत असत. वरच्या घटात चार ज्योती असलेली पणती ठेवून हा दिवा अखंड तेवत ठेवला जाई. या दिव्याभोवती नृत्याचे फेर धरले जात.
गरब्याच्या वेळी दोन प्रकारची लोकनृत्ये होत.
अ. गरबी : पुरुषांनी वर्तुळाकार उभे राहून समूहगीत म्हणत टाळ्या वाजवत साध्या पदन्यासांनी केलेल्या नृत्याला गरबी म्हणतात.
आ. गरबा : स्त्रियांनी नाजूक अंगविक्षेपांनी केलेले नृत्य म्हणजे गरबा. गरब्याचा वेळी अंबा, कालिका, रांदलमाँ आदी देवींची स्तुतीगीते गायली जात असत. या वेळी वीररस निर्माण करणारी चौघडा, सनई यांसारखीच वाद्ये वापरली जात.
३. नृत्यात झालेले पालट
     कालांतराने कृष्णलीला, संतरचित पदे, ऋतुवर्णने किंवा सामाजिक विषय यांवर आधारलेल्या गीतरचनांवर नृत्ये होऊ लागली.

रामनाथी आश्रमात आलेल्या दैवी नादासारखे ध्वनी ऐकू येऊन त्यामुळे उपाय होत असल्याच्या संदर्भात साधिकेला येत असलेली अनुभूती !

      गेल्या बर्‍याच वर्षांपासून मला माझ्या कानांत अधूनमधून ध्वनी ऐकू यायचा आणि काही सेकंदातच तो बंद व्हायचा. दोन वर्षांपासून ध्वनी येण्याचे हे प्रमाण वाढले आहे. यासाठी मी कान, नाक आणि घसा तज्ञांकडून जाऊन पडताळणी केली; पण ध्वनी अगदीच अल्प, तसेच तो कधीतरीच येत असल्याने त्यांनी विशेष काही त्रास नाही, असे सांगितले. 
१. एक मासापासून डाव्या कानात सतत आणि हळू आवाजात नाद ऐकू येणे
      एक मासापासून मला माझ्या डाव्या कानात सतत आणि हळू आवाजात नाद ऐकू येतो. हा नाद 1d(टीप १) आणि 1e(टीप २) प्रमाणे सतत येत असतो. काही मिनिटे 1b(टीप ३) प्रमाणे नाद आला. त्या ध्वनीचा मला त्रास होत नाही. रात्री झोप लागेपर्यंत तो येत असतो. सकाळी उठल्यावर १० - १५ मिनिटांनी हा नाद येण्यास आरंभ होतो. यामुळे माझ्यावर उपाय होतात, असे वाटते. हा नाद का येतो ? असा मला प्रश्‍न पडला आहे. 
(उत्तर : टीप पहा.)

ध्यानमंदिरात असलेल्या भवानीमातेच्या मूर्तीने ती पाषाणाची का आहे ? याविषयी दिलेले ज्ञान !

कु. युवराज्ञी शिंदे
     २९.८.२०१६ या दिवशी सायंकाळी ध्यानमंदिरात भवानीमातेच्या मूर्तीसमोर बसून मी नामजप करत होते. थोडा वेळ जप झाल्यावर जाणवले की, मूर्ती म्हणत आहे, तुला माहिती आहे का की, मी पाषाणाची का आहे ? अंतर्बाह्य दोषांचे (रिपूंचे) निर्मूलन करायचे असल्यास पाषाणासारखेच कणखर असावे लागते. पाषाण हे वैराग्याचेही प्रतीक आहे.
- कु. युवराज्ञी शिंदे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२९.८.२०१६)


रामनाथी आश्रमात बनवत असलेल्या श्रीदुर्गादेवीच्या मूर्तीकडे पाहून भावजागृती होणे आणि देवी आशीर्वाद देत आहे, असे जाणवणे

     मी गोवा येथे पंचम अखिल भारतीय हिंदू अधिवेशनात सहभागी झालो होतो. रामनाथी आश्रमात बनवत असलेल्या श्रीदुर्गादेवीच्या मूर्तीकडे पाहून माझी भावजागृती झाली आणि माझ्या अंगावर रोमांच आले. ती आशीर्वाद देऊन तू चांगले आणि योग्य दिशेने धर्मरक्षणाचे कार्य करत आहेस, असे मला सांगत असल्याचे जाणवले.
- अधिवक्ता चेतना शर्मा, मेरुत, उत्तर प्रदेश (२८.६.२०१६)

सहजावस्थेत राहून स्वर्गाकडे वाटचाल करत असलेला सनातनचा रामनाथी आश्रम !


श्री. श्रीकांत भट
८.६.२०१६ या दिवशी रामनाथी, गोवा येथील आश्रम पालट दर्शनाचा योग प.पू. गुरुदेवांच्या कृपाशीर्वादाने लाभला. त्या वेळी आलेल्या अनुभूती आणि जाणवलेली सूत्रे पुढीलप्रमाणे आहेत.
१. स्वागतकक्षातील वातावरण चैतन्याने भारित
असल्याचे जाणवून तेथे असलेल्या छायाचित्रातील
प.पू. भक्तराज महाराजांच्या तोंडवळ्यावर आनंद दिसणे
स्वागतकक्षातील वातावरण उत्साह, आनंद आणि चैतन्याने भारित झाल्याचे जाणवले. छायाचित्रातील प.पू. भक्तराज महाराज यांच्या तोंडवळ्यावर आनंद दिसत होता. छायाचित्रातील महाराजांच्या नेत्रांतील कृपादृष्टीचा ओघ पूर्वीपेक्षा अधिक जाणवला. छायाचित्राला नमन करताच गुरुकृपेचे पूर्ण समाधान आतून मिळाले.

श्रावण मासानिमित्त उपाहारगृहाने खास शाकाहारी भोजनाची थाळी हे दिलेले विज्ञापन म्हणजे हिंदूंना धर्मशिक्षणाची किती आवश्यकता आहे, हेच सिद्ध करते !

श्रीमती रजनी नगरकर
      २०.८.२०१६ या दिवशी दैनिक सनातन प्रभातमध्ये गोवा येथील एका उपाहारगृहाचे श्रावण मासानिमित्त खास शाकाहारी भोजनाची थाळी, हे विज्ञापन वाचले. त्यात उपलब्ध पदार्थांची सूचीही दिली होती. ते विज्ञापन वाचून माझ्या मनात घरातील पूर्वीच्या काळातील चित्र आणि आता झालेल्या पालटाचे चित्र अशी दोन्ही चित्रे उभी राहिली.
१. श्रावणातील उपवासाच्या दिवशीचे पूर्वीचे सात्त्विक वातावरण आठवणे
     मला लहानपणी श्रावणात घरात असलेले वातावरण आठवले. तेव्हा त्या सणाला अनुसरून वाचली जाणारी कहाणी, त्यामुळे घरात निर्माण होणारे सात्त्विक वातावरण, संध्याकाळी उपवास सोडण्यासाठी केलेले सात्त्विक पदार्थ, साध्या वरण-भाताचा सुटलेला दरवळ, जेवणासाठी केळीच्या पानांची मांडणी, काढलेल्या सात्त्विक रांगोळ्या, जेवायला येणारे ब्राह्मण आणि सवाष्ण यांच्यासाठी खास केलेली पंगत रचना, पंगतीत वाढण्यासाठी घरातील सज्ज गृहिणी, जेवणासाठी पंगतीत आवडीने बसलेली लहान मुले, असे सगळे असायचे. खरेच किती विलोभनीय दृश्य होते ते. अन्नदानही होत असे आणि दक्षिणा दिल्याने द्रव्यदानही होत असे. त्या गरम गरम वरण-भाताची चव अजूनही विसरली जात नाही.
२. विकतचे आणि घरचे वातावरण यांत भूमी आणि आकाश एवढे अंतर असल्याचे लक्षात येणे
     आता वरील विज्ञापन देऊन लोकांना गतकाळात नेण्याचा प्रयत्न तरी केला जातो; पण विकतचे आणि घरचे वातावरण यांत भूमी आणि आकाश एवढे अंतर असल्याचे लक्षात येते. तसेच त्या विज्ञापनाला मुद्दाम शाकाहारी असे विशेषण द्यावे लागते.

स्पिरिच्युअल सायन्स रिसर्च फाउंडेशन (एस्.एस्.आर्.एफ्.)च्या प्रसारकार्याचा ऑगस्ट २०१६ मधील आढावा


पू. मिलुटीन पांक्रात्स
 १. संकेतस्थळाच्या संदर्भातील संख्यात्मक आढावा
१ अ. विविध माध्यमांतून संकेतस्थळाला भेट देणार्‍यांची संख्या
 १ आ. संकेतस्थळाला मिळालेले मानांकन
१ आ १. गूगलने दिलेले मानांकन (टीप १) (ऑगस्ट २०१६ नुसार) : ३
टीप १ :
प्रत्येक संकेतस्थळाला गूगल १ ते १० यांपैकी क्रमांक देते. जेवढा क्रमांक जास्त, तेवढे मानांकन (पेज रँक) चांगले.
१ आ २. अलेक्सा क्रमांक (टीप २) (३१.८.२०१६ नुसार) : ५५,५४५
टीप २ :
एखाद्या संकेतस्थळाचे अलेक्सा मानांकन जितके अल्प, तेवढे ते संकेतस्थळ अधिक लोकप्रिय समजले जाते. अलेक्सा मानांकन १ लक्षहून अल्प असणे, हे संकेतस्थळ अधिक प्रमाणात लोकप्रिय असल्याचे दर्शक असते.
२. संकेतस्थळावरील लेख
२ अ. नवीन लेख : ऑगस्ट २०१६ मध्ये संकेतस्थळावर जर्मन भाषेत पुढील २ विशेष पाने (लँडिंग पेजेस) ठेवण्यात आली आहेत.
१. हाऊ टू रिड्यूस् इगो (भाषा - जर्मन) (स्वतःचा अहं न्यून कसा करावा ? (भाषा - जर्मन))
२. कुंडलिनी अँड चक्राज (कुंडलिनी आणि चक्रे)
२ आ. संकेतस्थळावरील लेखांचे अन्य भाषांमध्ये भाषांतर : ऑगस्ट २०१६ मध्ये विविध भाषांमधील एकूण ६० लेख संकेतस्थळावर ठेवण्यात आले आहेत. दोन नवीन जिज्ञासूंनी संकेतस्थळावरील लेखांचे चिनी आणि फ्रेंच भाषांत भाषांतर करण्याच्या सेवेला आरंभ केला आहे.

भारतीय ऋषींना सहस्रो वर्षांपूर्वी समजलेले पाण्याचे महत्त्व जपानी शास्त्रज्ञांना आता उकलणे, हा विज्ञानाचा थिटेपणा !

     सहस्रो वर्षांपूर्वी हिंदूंच्या धर्मग्रंथांत सांगितलेल्या जलविषयक सूत्राला पूरक असे संशोधन जपानच्या शास्त्रज्ञांनी आता केले आहे. त्यानुसार समाजाच्या एखाद्या क्रियेला जल प्रतिसाद देऊ शकते आणि स्वतःची पसंती दर्शवू शकते, हे त्यांनी सप्रमाण सिद्ध केले आहे. या संशोधनामुळे, जल हे सजिवांची निर्मिती करणारे मूळ रसायन आहे, हा भारतीय ऋषींनी अनंत कालापूर्वी मांडलेला सिद्धांत आणि जल अशुद्ध अथवा अपवित्र करू नये, असे सांगून वेद, उपनिषदे, स्मृती, पुराणे आदी ग्रंथांतून झालेले प्रबोधन, यांना आता वैज्ञानिकदृष्ट्या प्रमाण मिळाले आहे.
- डॉ. रा.श्री. मोरवंचीकर, निवृत्त प्राध्यापक (इतिहास), आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, संभाजीनगर (औरंगाबाद). (मासिक धर्मभास्कर, सप्टेंबर २००७)


भावी आपत्काळात अन् नेहमीसाठीही उपयुक्त ठरणारी सनातनची ग्रंथमालिका : भावी आपत्काळातील संजीवनी !

भावी महायुद्धकाळात डॉक्टर, औषधे आदी उपलब्ध नसतांना
अन् नेहमीसाठीही उपयुक्त सनातनचा ग्रंथ !
     संत-महात्मे, ज्योतिषी आदींच्या सांगण्यानुसार आगामी काळ हा भीषण आपत्काळ असून या काळात समाजाला अनेक आपत्तींना तोंड द्यावे लागणार आहे. आपत्काळात दळणवळण तुटल्यामुळे रुग्णाला रुग्णालयात नेणे, डॉक्टर वा वैद्य यांच्याशी संपर्क साधणे आणि पेठेत (बाजारात) औषधे मिळणेही कठीण होते. आपत्काळात ओढवणार्‍या विकारांना (आजारांना) तोंड देेण्याच्या पूर्वसिद्धतेचा एक भाग म्हणून सनातन भावी आपत्काळातील संजीवनी ही ग्रंथमालिका सिद्ध (तयार) करत आहे. या मालिकेतील १३ ग्रंथ आतापर्यंत प्रकाशित झाले आहेत. या ग्रंथांचा अभ्यास आतापासूनच केला, तर प्रत्यक्ष आपत्काळात विकारांना सामोरे जाण्यासाठी लागणारा आत्मविश्‍वास निर्माण होण्यास साहाय्य होईल. यासाठी हे सर्व ग्रंथ वाचकांनी अवश्य संग्रही ठेवावेत !
प्राणशक्ती (चेतना) वहन संस्थेतील अडथळ्यांमुळे होणार्‍या विकारांवरील उपाय
     शरिरातील प्राणशक्ती (चेतना) वहन संस्थेत अडथळे निर्माण झाल्यास विकार निर्माण होतात. ते अडथळे स्वतः शोधून दूर करण्याचे नाविन्यपूर्ण उपाय या ग्रंथात सांगितले आहेत.

एस्.एस्.आर्.एफ्.च्या साधिकांनी सिंगापूर येथील एका कार्यक्रमात भाजपचे खासदार श्री. तरुण विजयजी आणि हिंदुत्वनिष्ठ संघटनेचे प्रमुख यांची घेतलेली भेट !

     संपूर्ण दक्षिण पूर्व आशिया भागात सभांचे (भाषणांचे) नियोजन करणार असून एस्.एस्.आर्.एफ्.लाही त्यामध्ये सहभागी होेण्याची संधी देऊ, असे भाजपचे खासदार श्री. तरुण विजयजी यांनी सांगणे : सिंगापूर येथील धर्माभिमानी श्री. राजदादा यांनी आम्हाला (सौ. श्‍वेता आणि आरती यांना) एका कार्यक्रमासाठी निमंत्रित केले होते. त्या कार्यक्रमात त्यांनी आमची भेट खासदार श्री. तरुण विजयजी यांच्याशी करून देऊन आम्हाला त्यांच्याशी वार्तालाप करण्याची संधी दिली. खासदार श्री. तरुण विजयजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कृतीशील कार्यकर्ते असून हिंदुहितासाठी ते कार्यरत आहेत. श्री. राजदादा यांनी श्री. तरुण विजयजी यांना आमची ओळख एस्.एस्.आर्.एफ्.चे प्रतिनिधी म्हणून करून दिली. एस्.एस्.आर्.एफ्.च्या देश-विदेशात होत असलेल्या प्रसारकार्याविषयी आम्ही त्यांना अवगत केले. आम्ही त्यांना एस्.एस्.आर्.एफ्.ची माहितीपत्रके आणि हस्तपत्रके दिली. तेव्हा ते म्हणाले, तुम्ही समाजाला साधनेच्या संदर्भात योग्य मार्गदर्शन देऊन त्यांना साधनेचे महत्त्व सांगता. तुमचे समाजहिताचे हे कार्य फार चांगले आहे.
     श्री. तरुण विजयजी संपूर्ण दक्षिण पूर्व आशिया भागात सभांचे (भाषणांचे) नियोजन करणार असून त्या वेळी एस्.एस्.आर्.एफ्.लाही त्यामध्ये सहभागी होेण्याची संधी देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

एवढीच भीक गुरुमाऊली घाल गं मला ।

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त...

किती करशील गुरुमाऊली आमच्यासाठी ।
तुझा आशीर्वाद आहे सदैव आमच्यापाठी ॥ १ ॥

रात्रंदिवस प्रतिकार करिशी तू वाईट शक्तींशी ।
आमच्यातील दोष घालवण्यासाठी देवालाही तू आळवीशी ॥ २ ॥

लेकरांच्या प्रगतीसाठी संतांचे नियोजन सदैव करिसी ।
आम्हाला स्वभावदोषांसी लढायला तूच शिकविसी ॥ ३ ॥

महर्षींनी परात्पर गुरु श्रीश्रीजयंत आठवले यांच्या अवतारी कार्यात सहभागी असलेल्या सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांचे उलगडलेले जन्मरहस्य

महर्षींची शिकवण आणि कार्य !
१. पृथ्वीवर जन्माला येणारा प्रत्येक जीव ईश्‍वरी नियोजनानुसार जन्म घेत असणे आणि जेव्हा देव स्वतः अवतारकार्यासाठी पृथ्वीवर जन्माला येतो, तेव्हा त्याच्या अस्तित्वमात्रे सर्व प्राणीमात्रांचे कल्याण होणे, तसेच भक्तांचे जीवन आध्यात्मिकदृष्ट्या बहरून येणे
पृथ्वीवर जन्माला येणारा प्रत्येक जीव हा ईश्‍वरी नियोजनानुसार जन्म घेत असतो. यानुसारच मनुष्य, पशू, पक्षी, वृक्ष, दगड, डोंगर, पर्वत, नदी अशा अनेक गोष्टींची निर्मिती झालेली आपल्याला पहायला मिळते. या सर्वांमध्ये जेव्हा देव स्वतः अवतारकार्यासाठी पृथ्वीवर जन्माला येतो, तेव्हा खर्‍या अर्थाने या भूमातेचे आणि त्या वेळी पृथ्वीवर असलेेल्या सर्व प्राणीमात्रांचे कल्याण होते. त्यांच्या जीवनाचे सार्थक होते. केवळ अशा अवतारी जिवांच्या अस्तित्वमात्रे भक्तांचे जीवन आध्यात्मिकदृष्ट्या बहरून येते.
२. श्रीविष्णूच्या अवतारासमवेत जन्म घेणार्‍या देव-देवींप्रमाणेच
परात्पर गुरु श्रीश्रीजयंत आठवले (प.पू. डॉक्टर) यांच्यासमवेत
मनुष्यरूपात देव-देवी, संत आणि साधक यांनी जन्म घेतला असणे
   महर्षींच्या कृपेने आपल्याला परात्पर गुरु श्रीश्रीजयंत आठवले (प.पू. डॉक्टर) यांच्या अवतारी कार्याची प्रचीती येत आहे. सध्या या धरेवर श्रीमत् नारायणाने परात्पर गुरु श्रीश्रीजयंत आठवले यांच्या रूपात अवतार घेतला आहे. स्वयं श्रीविष्णुच पृथ्वीवर आल्यावर इतर देवतांना तरी पृथ्वीवर येण्याचा मोह कसा टळेल ! त्यांचे येणेही सामान्य नसून, तेही ईश्‍वरी कार्यासाठीचे ईश्‍वरी नियोजनच आहे. अगदी तसेच परात्पर गुरु श्रीश्रीजयंत आठवले यांच्यासारख्या महान गुरूंच्या कार्यासाठी मनुष्य रूपात काही देव-देवी, संत आणि साधक या कलियुगात जन्माला आले आहेत.

हिंदु जनजागृती समितीच्या प्रथमोपचार प्रशिक्षणवर्ग या नवीन उपक्रमाविषयी सूचना

      प्रथमोपचार म्हणजे रुग्णाला वैद्यकीय उपचार मिळेपर्यंत त्याच्यावर केले जाणारे प्राथमिक उपचार ! भावी आपत्काळाचा, अर्थात् भविष्यात होऊ शकणारे महायुद्ध, नैसर्गिक आपत्ती, दंगली आदींचाही विचार करता समाज आणि राष्ट्र यांच्याप्रतीचे कर्तव्य म्हणून प्रथमोपचार प्रशिक्षण प्रत्येक नागरिकाने घेणे आवश्यक झाले आहे. यासाठी सनातनने प्रथमोपचार प्रशिक्षण ही तीन भागांची ग्रंथमालिका प्रकाशित केली आहे. भावी आपत्काळात नागरिकांचे रक्षण व्हावे, यासाठी हिंदु जनजागृती समिती लवकरच सर्वत्र निःशुल्क प्रथमोपचार प्रशिक्षणवर्ग हा उपक्रम चालू करणार आहे. सनातन-निर्मित प्रथमोपचार प्रशिक्षण ग्रंथमालिका हाच या प्रशिक्षणवर्गांचा अभ्यासक्रम असणार आहे.

साधकांना सूचना

      अशाप्रकारे साधकांना नाद ऐकू येत असल्यास आणि त्याचे ध्वनिमुद्रण करणे शक्य असल्यास साधकांनी त्यांच्या कडील भ्रमणध्वनी अथवा संभाव्य उपकरणांमध्ये त्याचे ध्वनिमुद्रण करावे तसेच त्याविषयीची माहिती पुढील सारणीनुसार sankalak.goa@gmail.com या संगणकीय पत्त्यावर कळवावी.

फलक प्रसिद्धीकरता

केंद्र सरकारच पाकशी 
व्यापारी संबंध का तोडत नाही ?
        गुजरातमधील भाजीपाला विक्रेत्यांनी पाकला भाजीपाला पुरवठा न करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे त्यांना प्रतीदिन ३ कोटी रुपयांचा फटका बसणार आहे; मात्र हानीपेक्षा देश महत्त्वाचा असल्याचे अहमदाबाद जनरल कमिशन एजंट असोसिएशनने म्हटले आहे.

हिंदू तेजा जाग रे !

Jago !
       Gujrat ke sabji vaparione Pak ko sabji n bhejne ka nirnay liya hai.
hamari sarkar Pak se vapari sambandh kab todegi ?
जागो !
       गुजरात के सब्जी व्यापारियों ने पाक को सब्जी न भेजने का निर्णय लिया !
हमारी सरकार पाक से व्यापारी संबंध कब तोडेगी ?
       पापापासून बुद्धी आणि विवेक फार फार दूर आहेत. दोघांचे आग-पाण्यासारखे नाते आहे. पापाला सहानुभूती हा कर्करोग आधुनिक समाजाला झाला आहे !
- गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी

दसरा विशेषांक

दैनिक सनातन प्रभातचा रंगीत
प्रसिद्धी दिनांक :
११ ऑक्टोबर २०१६
पृष्ठ संख्या :
८, मूल्य : ४ रुपये
विशेषांकाची वाढीव मागणी वितरकांनी १० 
ऑक्टोबरला दुपारी ३ पर्यंत इआर्पी प्रणालीत भरावी.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले
        कुठल्याही प्रसंगात सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती आणि सनातन प्रभात यांचा काही मिळवण्याचा उद्देश नसल्याने, म्हणजे त्यांचा स्वार्थ नसल्याने ते सत्य तेच सांगतात.
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले

बोधचित्र

॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥
या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो.
- प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज
सनातनचे श्रद्धास्थान
अमृत आणि विष
       अमृतको जहरका डर होता है ।
भावार्थ :
अमृत प्यायलेल्यालासुद्धा जहर म्हणजे विष घेतले, तर आपण मरू कि काय, अशी भीती वाटू शकते; मात्र ज्याने विषच पचविलेले आहे, त्याला कशाचीच भीती नसते. सुखात राहिलेल्या साधकाला दुःखाची भीती वाटू शकते; मात्र सर्व संकटांतून गेलेल्याला कशाचीच भीती वाटत नाही.
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.)

प्रत्येक गोष्टीला अंधश्रद्धा म्हणून सोडून देणे सोपे असणे; परंतु ही गोष्ट सिद्ध करण्यासाठी अपार कष्ट घ्यावे लागत असणे आणि हे कष्ट महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाकडून घेतले जाणे

      भारतात असे अनेक चमत्कार घडत आहेत; परंतु याला अंधश्रद्धा म्हणून सोडून देणे सोपे आहे; तसे केले की, काही करावेच लागत नाही; परंतु सिद्ध करायचे झाल्यास मात्र अपार कष्ट घ्यावे लागतात. हे कष्ट महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाचे साधक घेत आहेत आणि देवाच्या कृपेला पात्रही होत आहेत. 
- (सद्गुरु) सौ. अंजली गाडगीळ, चेन्नई, तमिळनाडू. (२१.८.२०१६, सकाळी १०.०१)       हिंदु धर्मातील संस्कृती जपण्याचे कार्य सनातन संस्था करत आहे. तिच्या पाठीशी सर्वांनी उभे रहावे. गोवर्धन पर्वत हिंदूंचा आहे आणि त्या पर्वताला प्रत्येकाने काठी लावण्याची आवश्यकता आहे ! - पू. मोहनबुवा रामदासी, सज्जनगड

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

कुठलेही कर्म मनःपूर्वक करणे हितकारक !
कर्म करतांना ते छोटे आहे का मोठे, हे पहाणे 
महत्त्वाचे नसून प्राप्त कर्म मनःपूर्वक करणे हितकारक आहे. 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

पंतप्रधानांचा निश्‍चय !

संपादकीय 
      भारतीय सैनिकांनी पाकच्या प्रदेशात जाऊन सर्जिकल स्ट्राईक केल्याच्या घटनेला दहा दिवस लोटले, तरी विरोधकांची टोमणेबाजी थांबलेली नाही. हे सर्जिकल स्ट्राईक जगातील देशांना कौतुकास्पद वाटले. ते मोठे धैर्याचे आणि धडाडीचे होते. कोणतीही मनुष्यहानी न सोसता भारतीय सैनिकांनी ही योजना यशस्वी केली. भारतीय पंतप्रधान आणि लष्कराचे तीनही विभाग यांचे जगभरातून कौतुक झाले; मात्र देशातील काँग्र्रेस पक्षाला विद्यमान भाजप शासनाची ही कृती घृणास्पद वाटते.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn