Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

नवरात्रोत्सव (आज आठवा दिवस)

सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके ।
शरण्ये त्र्यम्बके गौरि नारायणि नमोऽस्तुते ॥
       एका मतानुसार नवरात्रीतील पहिले तीन दिवस तमोगुण अल्प करण्यासाठी तमोगुणी महाकालीची, दुसरे तीन दिवस रजोगुण वाढवण्यासाठी रजोगुणी महालक्ष्मीची आणि शेवटचे तीन दिवस साधना तीव्र होण्यासाठी सत्त्वगुणी महासरस्वतीची पूजा करतात.
       वर उल्लेखिलेला रजोगुण हा गतीमानतेचे प्रतिक आहे. साधना, धर्मकार्य, राष्ट्रकार्य आदी करण्यासाठी गतीमानता आवश्यक असते. नवरात्रीत महालक्ष्मीदेवीच्या पूजेने ती गतीमानता आपल्याला लाभते.
(संदर्भ : सनातनचा ग्रंथ शक्ती (भाग २) - शक्तीची उपासना)
नवरात्र विषयक माहितीसाठी संकेतस्थळावरील मार्गिका
https://www.sanatan.org/mr/navratri

शत्रूवर जरब बसवण्यासाठी शिवरायांची नीतीच अवलंबावी - श्रीनिवास सोहोनी

        पुणे, ७ ऑक्टोबर (वार्ता.) - भारताने शत्रूवर जरब बसवण्यासाठी छत्रपती शिवरायांच्या नीतीचा अवलंब करायला हवा. सध्या भारतासमोर असलेल्या संकटांना हिंदवी स्वराज्याची संकल्पना हेच उत्तर आहे, असे मत प्रशासन आणि धोरणविषयक तज्ञ श्री. श्रीनिवास सोहोनी यांनी व्यक्त केले. साप्ताहिक सकाळच्या ३० व्या वर्धापनदिनानिमित्त ४ ऑक्टोबर या दिवशी येथील बालगंधर्व कलामंदिर येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात भारताची सुरक्षितता : काही पैलू या विषयावर ते बोलत होते. या वेळी सकाळचे अध्यक्ष प्रताप पवार, समूह संपादक श्रीराम पवार आणि पुणे आवृत्तीचे संपादक मल्हार अरणकल्ले उपस्थित होते.
        श्री. सोहोनी पुढे म्हणाले, उरी येथील आक्रमणाला भारताने सर्जिकल स्ट्राईकद्वारे प्रत्युत्तर दिल्यानंतर भारताच्या पाकिस्तानविषयक धोरणात पालट झाला आहे. पाकिस्तानविरुद्ध नमते न घेता आपल्या बाजूने संयम राखत चोख प्रत्युत्तर द्यायचे, असे धोरण भारताने स्वीकारले आहे. यानंतर पाकिस्तानकडून खोटे चलन, नार्कोटिक्स, हवाला, संघटित गुन्हेगारी, तसेच अतिरेकीकरण आदी माध्यमातून काढल्या जाणार्‍या भारताच्या कुरापती अजून वाढतील. भारतापुढील संकटांना छत्रपती शिवरायांप्रमाणे युद्धकौशल्यामध्ये शक्ती आणि युक्ती यांचा वापर करून प्रत्युत्तर द्यायला हवे.

पंतप्रधानांनी लखनऊमध्ये जाऊन राममंदिराची घोषणा करावी ! - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे

        मुंबई - मोदी यांनी जरूर लखनऊला यावे आणि लखनऊमधून अयोध्येतील राममंदिर उभारणीची घोषणा करून जोरदार सीमोल्लंघन करावे. पंतप्रधान होताच मोदी यांनी वाराणसीत जाऊन गंगा-आरती केली, तसे आता अयोध्येत जाऊन रामाचे दर्शन घ्यावे आणि राममंदिर होणारच, अशी घोषणा करून शहीद रामसेवकांना श्रद्धांजली अर्पण करावी, असे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख आणि सामनाचे संपादक श्री. उद्धव ठाकरे यांनी ७ ऑक्टोबरच्या सामनाच्या संपादकियातून पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांना केले आहे. पंतप्रधान यंदाच्या दसर्‍याला त्यांचा मतदारसंघ असणार्‍या उत्तरप्रदेशमधील लखनऊमध्ये असणार आहेत, त्यावरून त्यांच्यावर टीका होत आहे. या संदर्भात पंतप्रधानांचे समर्थन करतांना श्री. ठाकरे यांनी राममंदिराच्या सूत्राला पुनरुज्जीवित करण्याचे सुतोवाच केले आहे.
        श्री. ठाकरे यांनी यात पुढे म्हटले आहे की, केवळ राजकीय लाभासाठी लखनऊला आलो नसून राममंदिर घोषणेसाठी आलो आहोत, असे पंतप्रधानांनी घोषित करावे. या कृतीने विरोधकांची थोबाडे आपोआप बंद होतील. पंतप्रधानांनी सर्जिकल हल्ला करून पाकिस्तानला बेहोश केले. त्यामुळे पाकिस्तान युद्धाची भाषा विसरून शांतीची पोपटपंची करत आहे. पंतप्रधानांचे पुढचे लक्ष्य म्हणजे पाकव्याप्त काश्मीर आणि बलुचिस्तानचे स्वातंत्र्य आहे. पुढची दिवाळी आमच्या पंतप्रधानांनी प्रत्यक्ष बलुचिस्तानमध्ये जाऊन साजरी केली, तरी आम्हाला आश्‍चर्य वाटणार नाही. अर्थात् बलुचिस्तानात काही मोदींना निवडणुका लढवायच्या नाहीत, हे विरोधकांनी नीटपणे समजून घेतले पाहिजे. मोदी यांचे दसर्‍याचे सीमोल्लंघन त्या दृष्टीने महत्त्वाचे !

हाफिज सईद अशी कोणती अंडी देतो म्हणून आपण त्याला पाळले ! - नवाज शरीफ यांच्या पक्षातील खासदाराचा प्रश्‍न

        इस्लामाबाद - हाफिज सईद आणि इतर लोकांवर कारवाई का होत नाही ? कोणी तरी सांगावे, अखेर हाफिज सईद अशी कोणती अंडी देतो, ज्यामुळे आपण त्याला पाळले आहे ?, असा प्रश्‍न नवाज शरीफ यांच्या पाकिस्तान मुस्लिम लीग पक्षाचे खासदार राणा महंमद अफझल यांनी स्वपक्षियांसमोर प्रश्‍न उपस्थित केला. पाकमध्ये परराष्ट्र्र व्यवहार खात्याच्या समितीची बैठक झाली. त्यात जगात पाकिस्तान एकटे पडत असल्यावर चर्चा झाली. या वेळी अफझल यांनी अनेक प्रश्‍न उपस्थित केले.
राणा महंमद अफजल 
यांनी उपस्थित केलेली अन्य सूत्रे
१. आमच्या परराष्ट्र धोरणाची ही अवस्था आहे की, आम्ही आजपर्यंत हाफिजसारख्या लोकांना संपवू शकलेलो नाही.
२. फ्रान्स दौर्‍याचा उल्लेेख करत अफझल म्हणाले की, तेथील लोकांनीही काश्मीर परिस्थितीवर चर्चा केली. ते विचारत होते की, प्रत्येक वेळी हाफिजचेच नाव का समोर येते ?

(म्हणे) पाकिस्तान आतंकवादी राष्ट्र नाही !

  • अमेरिकेनेच विषारी पाकला आतापर्यंत दूध पाजले आहे आणि आताही ती पाजत आहे ! भारताने पाकच्या विरोधात कठोर कारवाई करू नये म्हणून अमेरिकेकडून भारतावर दबाव येत असणार यातही शंका नाही !
  • धूर्त अमेरिकेकडून भारताचा पुन्हा एकदा विश्‍वासघात !
       वॉशिंग्टन - पाकला आतंकवादी राष्ट्र म्हणून घोषित करण्यास अमेरिकेने नकार दिला आहे. भारताला धोका असलेली पाकमधील आतंकवाद्यांची केंद्रे उद्ध्वस्त करण्यासाठी पाकसमवेत चर्चा चालूच ठेवण्यात येईल, असे अमेरिकेने स्पष्ट केले आहे.
       अमेरिकी सरकारचे प्रवक्ता जॉन किर्बी यांनी म्हटले की, पाकला आतंकवादी राष्ट्र घोषित करण्याविषयीचे विधेयक आल्याचे मला तरी ठाऊक नाही. काश्मीर प्रश्‍नावर भारत-पाक यांनी चर्चा करावी आणि तणाव न्यून करावा. पाकने अण्वस्त्रे आतंकवाद्यांपासून सुरक्षित ठेवलेली असावीत.

बंगालमध्ये नवरात्रोत्सवातील मंडपात ममता बॅनर्जी यांची श्री दुर्गादेवीच्या रूपातील मूर्ती ठेवली !

धर्मशिक्षणाच्या अभावामुळे 
हिंदूंकडून होणारे अधर्माचरण !
       कोलकाता - बंगालच्या नदिया जिल्ह्यातील चाकदा येथील नवरात्रोत्सवाच्या मंडपात राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची श्री दुर्गादेवीच्या रूपातील मूर्ती ठेवण्यात आली आहे. या मूर्तीच्या दहा हातांमध्ये राज्य सरकारच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली आहे. भवानीपूर येथील मंडपात ठेवण्यात आलेली मूर्ती याचकाच्या स्वरूपात असून श्री दुर्गादेवीचा एक हात ममता बॅनर्जी यांच्या डोक्यावर आहे.
       भवानीपूर येथील आयोजक आणि तृणमूल काँग्रेसचे स्थानिक नगरसेवक असीम बसू म्हणाले की, आम्ही या मूर्तीद्वारे महिला सशक्तीकरण दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. आम्ही देवीच्या मूर्तीचे विसर्जन करणार नाही; कारण त्यामुळे ममता बॅनर्जी यांच्या मूर्तीचेही विसर्जन करावे लागेल.
       या मूर्तींवर तृणमूल काँग्रेसमधून कोणीही बोलण्याचे टाळत आहेत; मात्र कृष्णेंदु नावाच्या कार्यकर्ता म्हणाला की, ममता बॅनर्जी यांना देवीचा दर्जा देणे योग्य नाही. हा लोकांच्या धार्मिक भावनांचा अवमान आहे. यामुळे पुढच्या वर्षी अनेक आयोजक असा प्रयत्न करू शकतात. यास आताच पायबंद घातला पाहिजे. बंगालमध्ये यापूर्वी १९७१ मध्ये बांगलादेश युद्धानंतर इंदिरा गांधी यांच्या रूपातील मूर्ती बनवण्यात आली होती.

(म्हणे) सनातनचे संस्थापक जयंत आठवले यांना कह्यात घेऊन चौकशी झाली पाहिजे !

अंनिसचे राज्य कार्याध्यक्ष 
अविनाश पाटील यांचा सनातनद्वेष उघड !
        सातारा - सनातनच्या महाराष्ट्रातील आश्रमांवर धाडी टाकल्याविना फरार साधक सापडणार नाहीत. सनातनच्या हिंसक विचारधारेतून हे कृत्य झाले असल्याने सनातनचे संस्थापक जयंत आठवले यांना कह्यात घेऊन चौकशी झाली पाहिजे, असे सनातनद्वेषी विधान अंनिसचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे. (मऊ दिसते तेथे खणण्याची वृत्ती असलेले अंनिसचे पदाधिकारी - संपादक)
त्यांनी प्रसिद्धीपत्रकात पुढे म्हटले आहे की,
१. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येच्या गुन्ह्यात केंद्रीय अन्वेषण विभागाने सनातन आणि हिंदु जनजागरण समितीचा सारंग अकोलकर अन् विनय पवार यांच्यावर पुणे न्यायालयात आरोपपत्र प्रविष्ट केले आहे. गोवा बॉम्बस्फोटानंतर गेली सात वर्षे दोघेही फरार आहेत. अकोलकरवर इंटरपोलची रेड कॉर्नर नोटीस आहे. केंद्रीय अन्वेषण विभागाने दोघांनाही पकडण्यासाठी नवीन रेड कॉर्नर नोटीस काढावी, तसेच त्यांच्याविषयी माहिती देणार्‍यास २५ लाखांचे पारितोषिक जाहीर करावे.

मोदी सैनिकांच्या रक्ताची दलाली करत आहेत, या विधानावर राहुल गांधी यांचा स्पष्टीकरणाचा प्रयत्न !

     नवी देहली - आमच्या ज्या सैनिकांनी जम्मू-काश्मीरमध्ये आपले प्राण दिले, सर्जिकल स्ट्राईक केले त्यांच्या रक्ताची तुम्ही दलाली करत आहात. ही गोष्ट अतिशय चूक आहे, अशी टीका काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर ६ ऑक्टोबरच्या रात्री एका सभेत केली. सैन्याने त्याचे काम केले आहे, तुम्ही तुमचे काम करा, असा फुकाचा सल्लाही त्यांनी दिला. त्यावर देशातील सर्व स्तरावरून राहुल गांधी यांच्यावर टीका होत आहे. या वक्तव्यावरून आता राहुल गांधी यांनी स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला आहे. सर्जिकल स्ट्राईकला मी पाठिंबा दिला आहे. मी कोणतेही चुकीचे वक्तव्य केलेले नाही. राजकीय भित्तीपत्रकावर सैन्याचा वापर करण्याला मात्र मी कधीच पाठिंबा देणार नाही, असे ट्वीट राहुल गांधी यांनी केले आहे.

अमेरिकेजवळील हैती देशात चक्रीवादळामुळे ३३९ जणांचा मृत्यू !

      फ्लोरिडा (अमेरिका) - अमेरिकेजवळील बेटांचा देश असलेल्या हैतीमध्ये आलेल्या मॅथ्यू चक्रीवादळामुळे ३३९ जणांचा मृत्यू झाला आहे. ३ दिवसांपासून चालू असलेल्या या वादळामुळे संपूर्ण हैती शहर उद्ध्वस्त झाले आहे. हैतीच्या दक्षिण आणि पश्‍चिम भागाचा संपर्क तुटला आहे. या वादळात २३० प्रती घंटे गतीने वारा वाहात आहे. अमेरिकेच्या फ्लोरिडा राज्यात मॅथ्यू वादळ येण्याची शक्यता असल्यामुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी फ्लोरिडासाठी आणीबाणीची घोषणा केली आहे. येथील किनार्‍याजवळील ३० लाख लोकांना सुरक्षित स्थळी हालवण्यात आले आहे. हैती आणि क्यूबानंतर या वादळाने बहामास द्वीपसमुहाकडे आगेकूच केली आहे.
महर्षींनी प्रलयकालाविषयी सतर्क करणे
      १९.३.२०१६ या दिवशी झालेल्या नाडीवाचन क्रमांक ६७मध्ये महर्षि म्हणतात, हे पूर्ण वर्ष प्रलयकालाचे आणि आपत्तीजनक असणारे आहे. (अमेरिकेजवळील बेटांचा देश असलेल्या हैतीमध्ये आलेल्या मॅथ्यू चक्रीवादळामुळे ३३९ जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेवरून प्रलयकालाविषयी महर्षींनी केलेले भाष्य किती तंतोतंत आहे, हे लक्षात येते ! - संपादक)

सर्जिकल स्ट्राईक करून हाफिज सईद आणि दाऊद याला ठार करा ! - योगऋषी रामदेवबाबा

हिंदूंच्या संतांना आतंकवाद्यांविषयी जे वाटते ते मौलवी आणि पाद्री यांना का वाटत नाही ? 
सर्वधर्मसमभावामुळे अशी मागणी करता येत नाही, असे त्यांना वाटते का ?
     नवी देहली - भारतीय सैन्याने सर्जिकल स्ट्राईक करून लष्कर-ए-तोयबाचा प्रमुख हाफिज सईद आणि आतंकवादी दाऊद इब्राहिम यांना ठार करावे, अशी मागणी योगऋषी रामदेवबाबा यांनी केली आहे. नवाझ शरीफ विश्‍वासघातकी असून त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीत सुरा खुपसला आहे. त्यामुळे पाकबरोबर चर्चा करण्यात काहीच अर्थ नाही. नवाझ शरीफ हे नपुंसक असून ते पाक सैन्याच्या हातातील बाहुले बनले आहे, अशी प्रखर टीकाही त्यांनी केली. 
     पाकच्या कलाकारांना भारतात बंदी घालण्याच्या मागणीचे रामेदवबाबा यांनी समर्थन केले आहे. चीनने कायम भारताला धोका आणि पाकला नेहमी साथ दिलेली आहे. त्यामुळे चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकणे आवश्यक आहे. पंतप्रधानांनी देशभर गोमांस बंदीसाठी एक विधेयक सादर केले पाहिजे.

स्प्राईट, कोका कोला, ड्यू, पेप्सी आणि 7-अप या शीतपेयांमध्ये ५ विषारी घटक !

शीतपेयांच्या माध्यमातून लोकांना विष पाजणार्‍या बहुराष्ट्रीय आस्थापनांवर 
कारवाई होणार का ? अशा शीतपेयांवर आता लोकांनीच बहिष्कार टाकायला हवा !
सरकारी औषधी तांत्रिक सल्लागार मंडळाच्या परीक्षणातून उघड 
     नवी देहली - स्प्राईट, कोका कोला, ड्यू, पेप्सी आणि 7-अप या शीतपेयांमध्ये ५ विषारी घटक असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या औषधी तांत्रिक सल्लागार मंडळाने (ड्रग्ज टेक्निकल अ‍ॅडवायझरी बोर्डाने) केलेल्या परीक्षणात उघड झाले आहे. या परीक्षणामध्ये कोका कोला सारख्या आस्थापनांच्या शीतपेयांमध्ये अ‍ॅन्टीमोनी, शिसे, क्रोमियम्, कॅडमियम् आणि कम्पाऊंड डीईएच्पी यांसारखे विषारी घटक मिळाले आहेत.
     7-अप आणि माऊन्टेन ड्यू पेप्सिको आस्थापनाची उत्पादने आहेत, तर स्प्राईट हे कोका कोला आस्थापनाचे उत्पादन आहे. मंडळाने या वर्षीच्या फेब्रुवारी-मार्चमध्ये या शीतपेयांचे नमुने गोळा केले होते. या नमुन्यांचे परीक्षण आरोग्य मंत्रालयाच्या अखत्यारित येणार्‍या कोलकाता येथील ऑल इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ हाइजीन अ‍ॅण्ड पब्लिक हेल्थमध्ये करण्यात आले होते.

वर्ष २०१८ पर्यंत भारत-पाक सीमा बंद करणार ! - राजनाथ सिंह

घुसखोरीची मूळ समस्या पाक आहे. त्याला धडा शिकवण्याऐवजी 
केवळ बचावाचेच विचार करत रहाणारे सरकार कधीतरी जनतेचे रक्षण करू शकेल का ?
     जैसलमेर - पाककडून वारंवार होणारी घुसखोरी रोखण्यासाठी डिसेंबर २०१८ पर्यंत भारत-पाक सीमा पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी दिली. काहीही झाले तरी कालमर्यादा चुकवू देणार नाही, अशी ग्वाही सिंह यांनी या वेळी दिली.

७ सहस्र भारतीय संकेतस्थळे हॅक केल्याचा पाकिस्तानी हॅकर्सचा दावा !

प्रत्येक क्षेत्रात भारतावर कुरघोडी करणारे पाकिस्तानी !
      इस्लामाबाद - पाकिस्तानी हॅकर्सच्या एका गटाने ७ सहस्र भारतीय संकेतस्थळे हॅक केल्याचा दावा केला आहे. यामध्ये खाजगी संकेतस्थळांचा समावेश अधिक आहे. हे हॅकर्स या क्षेत्रातील तज्ञ नाहीत; मात्र त्यांनी वापरात असलेल्या लिपीचा अचूक वापर करून ही संकेतस्थळे हॅक केली आहेत, असे सायबर सुरक्षा तज्ञांनी सांगितले. पाकिस्तान हॅकर्स क्रु असे या गटाचे नाव असून त्यांनी यापूर्वी टाटा मोटर्स, अण्णाद्रमुक आणि ताजमहल यांची संकेतस्थळे हॅक केली होती.

केजरीवाल, चिदंबरम् आणि निरूपम यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा प्रविष्ट करण्यासाठी याचिका !

       मुझफ्फरपूर (बिहार) - देहलीचे मुख्यमंत्री तथा आपचे नेते अरविंद केजरीवाल, काँग्रेस नेते पी. चिदंबरम् आणि संजय निरुपम यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी करणारी याचिका येथील न्यायालयात प्रविष्ट करण्यात आली आहे. या तिन्ही नेत्यांनी सर्जिकल स्ट्राईकचे पुरावे मागितले होते. जगन्नाथ साह नामक व्यक्तीने मुख्य न्यायाधीश रामचंद्र प्रसाद यांच्या न्यायालयात ही याचिका दाखल केली आहे. १९ ऑक्टोबरला या याचिकेवर सुनावणी होणार आहे. जगन्नाथ साह हे एका नव्या राजकीय पक्षाचे अध्यक्ष असल्याचे बोलले जात आहे.

पाकिस्तानी कलाकारांना काम देऊ नका ! - गजेंद्र चौहान, अध्यक्ष, एफटीआय

      पुणे - पाकिस्तानी कलाकारांना काम देणे हा भारतीय अर्थव्यवस्था आणि सुरक्षेला फार मोठा धोका आहे. भारतात चांगल्या कलागुणांची कमतरता नाही. त्यामुळे देशाला सीमेपलीकडून अभिनेते किंवा गायक आणण्याची आणि त्यांना काम देण्याची काही आवश्यकता नाही. बाहेरच्या कलाकारांना काम दिल्यामुळे आपल्या देशातील योग्य कलाकारांना काम मिळत नाही. जे निर्माते पाकिस्तानी कलाकारांना घेऊन चित्रपट बनवतात त्याच्या मागे फार मोठे अर्थकारण आहे. या कलाकारांना चित्रपटात घेतल्यामुळे पाकिस्तानातही त्यांचे चित्रपट प्रदर्शित होतात, ज्याचा चित्रपटाला लाभच होतो, असे प्रतिपादन फिल्म अ‍ॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे (एफटीआयचे) अध्यक्ष गजेंद्र चौहान यांनी केले.
     चौहान पुढे म्हणाले की, निर्मात्यांना पाकिस्तानी कलाकार त्यांच्या चित्रपटात हवे असतील, तर त्यांनी पाकमध्ये जाऊन चित्रीकरण करावे. तेव्हा त्यांना कळेल की, यासाठी अनुमती मिळवायला किती खटाटोप करावा लागतो. तसेच तिकडचे लोक तुम्हाला कशी वागणूक देतात तेही कळेलच.

(म्हणे) सर्जिकल स्ट्राईकचा पुरावा देण्यासाठी सैन्याकडून बनावट चित्रीकरण !

लोकशाहीच्या नावाखाली देशाच्या सैन्यावर प्रश्‍न निर्माण करणार्‍या 
प्रत्येकाच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा प्रविष्ट करून त्यांना कारागृहात डांबले पाहिजे ! 
काश्मीरमधील अपक्ष आमदार शेख अब्दुल राशिद यांचे देशद्रोही विधान !
      श्रीनगर - सर्जिकल स्ट्राईक झाल्याचा पुरावा देण्यासाठी भारतीय सैन्य प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळील लीपा खोर्‍यामध्ये बनावट चित्रीकरण करत आहे, असा दावा काश्मीरमधील अपक्ष आमदार शेख अब्दुल राशिद यांनी केला आहे. त्यांनी पाकव्याप्त काश्मीरमध्ये कोणतीही कारवाई झाली नाही, असा दावाही केला. सर्जिकल स्ट्राईक एक नाटक होते जे गेल्या ३ महिन्यांपासून काश्मीरमध्ये होत असलेल्या हिंसाचारापासून लोकांचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी करण्यात आले आहे.

कोलकाता उच्च न्यायालयाकडून बंगालच्या कांगलापहारी गावात घरामध्ये दुर्गा पूजा करण्याला अनुमती !

     कोलकाता - बंगालमधील बीरभूम जिल्ह्यात असलेल्या कांगलापहारी गावात प्रशासनाने कायदा आणि सुव्यवस्था बिघडेल या कारणास्तव हिंदूंना दुर्गा पूजा उत्सव साजरा करण्यास अनुमती नाकारली होती. त्या विरुद्ध कोलकाता उच्च न्यायालयात एक याचिका प्रविष्ट करण्यात आली होती. कोलकाता उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशाच्या खंडपिठाने नुकताच निर्णय देऊन कांगलापहारी गावातील हिंदूंना घरात दुर्गा पूजा करण्याची अनुमती दिली आहे. हा आदेश तात्पुरत्या स्वरूपाचा असून अंतिम निर्णय याचिकेची सुनावणी केल्यावर देण्यात येईल, असे सांगण्यात आले.

पाकमधील जफर एक्स्प्रेसमधील बॉम्बस्फोटात ४ जणांचा मृत्यू

      इस्लामाबाद - पाकमधील रावळपिंडीला जाणार्‍या जफर एक्स्प्रेसमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात ४ जणांचा मृत्यू झाला आहे, तर १३ जण घायाळ झाले आहेत. बलुचिस्तान प्रांतातील माच गावाजवळ हा बॉम्बस्फोट झाल्याचे पाकिस्तान रेल्वे प्रशासनाचे अधिकारी तौफील अहमद यांनी सांगितले आहे.

नातेवाईकांचा अंत्यसंस्कार करण्यास नकार : सरकारच्या विरोधात आंदोलन

बहुसंख्य हिंदूंच्या देशात हिंदूंना न्याय कोण देणार आहे ? 
दादरी हत्याकांडातील आरोपीच्या मृत्यूचे प्रकरण
उत्तरप्रदेश सरकारला राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची नोटीस
      दादरी (उत्तरप्रदेश) - दादरी प्रकरणातील एक आरोपी रवी सिसोदियाच्या हत्येनंतर बिसहाडामध्ये निर्माण झालेला तणाव अद्याप कायम आहे. मृतकांच्या नातेवाईकांनी अंत्यसंस्कार करण्यास नकार दिला असून आंदोलन चालू केले आहे. त्यांनी अखलाकचा मुलगा चांद महंमद याला अटक करण्याची मागणी करण्याबरोबरच १ कोटी रुपयांची हानीभरपाई मागितली आहे. या आंदोलनामध्ये विश्‍व हिंदु परिषदेच्या नेत्या साध्वी प्राचीही सहभागी झाल्या आहेत. (कारागृहातील हलगर्जीपणामुळे एखाद्या धर्मांधाचा मृत्यू झाला असता, तर सरकारने त्याच्या नातेवाईकांच्या पायाशी लोटांगण घातले असते; परंतु रवी हिंदु असल्यामुळे त्याच्या नातेवाईकांना आंदोलन करावे लागते, हे लक्षात घ्या ! - संपादक)

वर्धा येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन

आंदोलन करतांना कार्यकर्ते
       वर्धा - येथे ७ ऑक्टोबरला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राष्ट्रीय हिंदू आंदोलन घेण्यात आले. आंदोलनात १८ धर्माभिमानी सहभागी झाले होते. बंगाल राज्यात ४ वर्षे श्री दुर्गादेवी पूजेला अनुमती नाकारून देवीभक्तांना पूजेपासून वंचित ठेवणार्‍यांच्या विरोधात ठोस अन् कठोर कारवाई करावी, असे प्रतिपादन रणरागिणी शाखेच्या सौ. भार्गवी क्षीरसागर यांनी केले. या आंदोलनात गुरुदेव सेवा समिती, हिंदु जनजागृती समिती, सनातन संस्था यांचेही कार्यकर्ते सहभागी झाले. या वेळी सनातन संस्थेच्या सौ. रत्ना हस्ती आणि हिंदु जनजागृती समितीच्या सौ. मंदा डगवार यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले.
क्षणचित्र - गुरुदेव सेवा समितीचे डॉ. ऐरकेवार आंदोलनातील घोषणा ऐकून आंदोलनात सहभागी झाले.

जळगाव महानगरपालिकेच्या उपायुक्तांना ५० सहस्र रुपयांची लाच घेतांना अटक !

     जळगाव - येथील महानगरपालिकेच्या उपायुक्तांना ५० सहस्र रुपयांची लाच मागतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. उपआयुक्त श्री. राजेंद्र फातले यांनी एका अधिकार्‍याला कामावर उपस्थित करण्यासाठी १ लाख रुपयांची लाच मागितली होती.

तमिळनाडूत राष्ट्रपती राजवट लागू करा ! - डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी

     चेन्नई - तमिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललीता अनेक दिवसांपासून रुग्णालयात आहेत. त्यांच्याशी कसलाही संपर्क होऊ शकत नाही. मुख्यमंत्रीच नसल्यामुळे राज्याची प्रशासकीय घडी विसकटली आहे. राज्यात इसिससारख्या आतंकवादी संघटनांचे स्लीपर सेल सक्रीय झाले आहेत. एल्टीटीई आणि अन्य नक्षलवादी संघटनांनी राज्यात गोंधळ घालायला आरंभ केला असून कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. त्यामुळे तमिळनाडूत राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणी खासदार डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांनी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांना पत्र लिहून केली आहे.

सामाजिक संकेतस्थळावर इस्लामविरोधी मजकूर लिहिल्याच्या कथित आरोपाखाली अटक झालेले तारक बिश्‍वास जामिनावर मुक्त !

      कोलकाता - तारक बिश्‍वास याला हावडा पोलिसांनी सामाजिक संकेतस्थळावर इस्लामविरोधी मजकूर लिहिल्याच्या कथित आरोपावरून अटक केली होती. तृणमूल काँग्रेसच्या सनाउल्ला खान याने दिलेल्या तक्रारीची दखल घेऊन पोलिसांनी तारक बिश्‍वास याच्यावर भारतीय दंड विधान २९५ अ, २९८ आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या ६६, ६७ आणि ६७ अ या कलमाखाली गुन्हे दाखल केले होते. (काँग्रेसचे किती हिंदु नेते किंवा कार्यकर्ते देवतांचा अवमान झाल्यावर तक्रार करतात ! काँग्रेसचे मुसलमान नेते त्यांचा धर्म सोडत नाही; मात्र हिंदू ढोंगी धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली धर्माला तिलंाजली देतात ! - संपादक) हावडा येथील न्यायालयाने बिश्‍वास यांना जामीन देण्यास नकार दिला होता; मात्र कोलकाता उच्च न्यायालयाचे न्या. जयमाला बागची यांनी तारक बिश्‍वास यांना जामिनावर सोडण्यास अनुमती दिली. बिश्‍वास याच्यावर याच प्रकरणी तामलूक येथील न्यायालयात खटला दाखल करण्यात आला असल्याने त्याची अद्याप मुक्तता झालेली नाही.

गुजरातमध्ये यावर्षीही लव्ह जिहाद रोखण्यासाठी बजरंग दलाकडून गरब्याच्या ठिकाणी गोमूत्र शिंपडून प्रवेश !

      गांधीनगर (गुजरात) - येथे बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी गरब्याचे आयोजन होत असलेल्या ठिकाणी सहभागी झालेल्यांवर गोमूत्र शिंपडण्याची चळवळ चालू केली आहे. यामुळे हिंदू युवतींना प्रेमाच्या जाळ्यात ओढण्यासाठी हिंदू बनून आलेल्यांना यातून बाहेर काढण्यास साहाय्य होईल, असे त्यांचे म्हणणे आहे. मात्र काही हिंदू याला विरोध करत आहेत. 
     गांधीनगरच्या सेक्टर ११ मध्ये बजरंग दलाचे कार्यकर्ते गोमूत्र शिंपडून टिळा लावत असतांना एका हिंदूने याला विरोध करत पोलिसांना बोलावले. हे हास्यास्पद आहे. लोकांना ते आवडत नाही, केवळ भीतीमुळे ते विरोध करत नाहीत, असे तो म्हणाला. बजरंग दलाचे गांधीनगर जिल्हाध्यक्ष अमित उपाध्याय म्हणाले की, गेल्या ४ वर्षांपासून ही चळवळ राबवण्यात येत आहे. याचा उद्देश लव्ह जिहादला रोखणे हा आहे. याच्यासाठी पोलिसांच्या अनुमतीची आवश्यकता नाही. आम्ही हिंदु धर्माचे आचरण करत आहोत. शहर अध्यक्ष शक्तिसिंह जाला म्हणाले की, या चळवळीला विरोध करणार्‍यांना आम्ही गरब्याच्या स्थानावरून बाहेर काढू. पोलिसांचे म्हणणे आहे की, आमच्याकडे तक्रार आली, तर आम्ही कारवाई करू. एका ठिकाणी राज्याच्या मंत्र्यांसमवेत आलेले भाजपचे अल्पसंख्यांक विभागाचे नेते महबूब अली चिश्ती यांच्यावर गोमूत्र न शिंपडताच त्यांना आयोजन स्थळी जाऊ देण्यात आले. मुस्लिम पर्सनल लॉमध्ये पालट करण्याचा सरकारचा विचार नाही ! - गृहमंत्री राजनाथ सिंह

देशात समान नागरी कायदा आणण्यासाठी 
हिंदु राष्ट्राचीच आवश्यकता आहे, हे हिंदूंनी आता लक्षात घ्यावे !
      भाग्यनगर - तेलंगणचे उपमुख्यमंत्री महंमद महमूद यांनी त्यांच्या देहली भेटीत गृहमंत्री राजनाथसिंह यांची भेट घेऊन केंद्र सरकारच्या समान नागरी कायदा लागू करण्याच्या प्रयत्नांमुळे मुसलमानांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे, असे सांगितले. त्यावर राजनाथसिंह यांनी सरकारचा असा कोणताही विचार नसून मुसलमानांना घाबरून जाण्याचे काहीच कारण नाही, असे आश्‍वासन दिले.
     महमूद यांनी या वेळी मुस्लिम पर्सनल लॉमध्ये पालट करण्याच्या प्रयत्नांना विरोध केला. हे कायदे मानवनिर्मित नसून ते महंमद पैगंबर यांनी बनवले आहेत. त्यात हस्तक्षेप करण्याचे अधिकार कोणत्याही व्यक्तीला अथवा न्यायालयाला नाहीत, असे उपमुख्यमंत्री म्हणाले. भाग्यनगरमध्ये या विषयावर मुसलमानांच्या अनेक बैठका झाल्या. समान नागरी कायदा लागू करू नये, असे ठामपणे सांगण्यात आले. या समान नागरी कायद्याला केवळ मुसलमानांचाच नव्हे, तर इतर धर्मियांचाही विरोध आहे, असे महमूद यांनी गृहमंत्र्यांना सांगितले. (मुसलमान कितीही मोठ्या पदावर गेला, तरी तो आपल्या धर्माविषयी सतर्क असतो आणि त्याच्या रक्षणासाठी सातत्याने प्रयत्न करतो. दुसरीकडे हिंदु गरीब आणि कनिष्ठ स्तरावर असला काय किंवा मोठ्या पदावर पोचला काय तो धर्मासाठी काही करतांना दिसत नाही ! - संपादक)

अमेरिका आता जागतिक महासत्ता नाही ! - पाकिस्तानची कृतघ्नता

आता तरी पाकला पोसणार्‍या अमेरिकेला पाकची औकात (लायकी) समजेल का ? 
     वॉशिंग्टन - अमेरिका ही आता जागतिक महासत्ता राहिलेली नाही. तिचा प्रभाव ओसरत चालला आहे. पाकच्या काश्मीर आणि भारताच्या संदर्भातील धोरणाचा विचार न केला गेल्यास आम्ही अमेरिकेऐवजी चीन अन् रशियास झुकते माप देऊ, अशी धमकी पाककडून देण्यात आली आहे. पाकचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांचे विशेष दूत मुशाहिद हुसेन सईद यांनी अमेरिकेमधील एका महत्त्वपूर्ण बैठकीनंतर ही धमकी दिली.

जर्मनीमध्ये जर्मन इस्लामची स्थापना करण्याची अर्थमंत्र्यांची मागणी !

      बर्लीन - जर्मनीमध्ये उदारमतवाद आणि सहिष्णुता यांवर आधारित जर्मन इस्लामची स्थापना करण्यात यावी, अशी मागणी जर्मनीचे अर्थमंत्री वुल्फगँग शौबल यांनी केली आहे. जर्मनीमध्ये मुसलमान शरणार्थी मोठ्या प्रमाणात प्रवेश करत असल्याने जर्मनीतील मुख्य समाजापुढे ते एक आव्हान ठरले आहे. जर्मनीमध्ये येणार्‍या सहस्रावधी मुसलमान शरणार्थींनी जर्मनीतील लोकांचे जीवनमान समजून घ्यावे आणि त्यानुसार जगण्याचा प्रयत्न करावा, असे शौबल यांनी सांगितले.
     गेल्या वर्षी मध्य पूर्व देश आणि आफ्रिका येथून सुमारे १० लक्ष शरणार्थी जर्मनीमध्ये आले. त्यामुळे जर्मनीमध्ये तणावाची स्थिती निर्माण झाली. शरणार्थींच्या या स्थलांतराला विरोध करणार्‍या उजव्या विचारसरणीच्या एएफ्डी पक्षाला जर्मन नागरिकांचा पाठिंबा मिळत आहे. उजव्या विचारसरणीच्या नागरिकांनी काही ठिकाणी शरणार्थींच्या विरोधात आंदोलनही केले आहे. 
      शौबल हे पंतप्रधान अँजेला मर्केल यांचे सहयोगी असून ते जर्मनीचे पंतप्रधानपदाचे उमेदवार आहेत.

केंद्रीय अन्वेषण यंत्रणेला अधिक तपास करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश

  • केंद्रीय अन्वेषण यंत्रणेचा पाट्याटाकूपणा !
  • आदर्श सोसायटीच्या केलेल्या तपासाविषयी उच्च न्यायालय असमाधानी
        मुंबई, ७ ऑक्टोबर - कुलाबा येथील आदर्श सोसायटीमधील २ बेनामी सदनिकांविषयी तपास पूर्ण झाला आहे, अशी माहिती ५ ऑक्टोबर या दिवशी बुधवारी केंद्रीय अन्वेषण यंत्रणेच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयात देण्यात आली; परंतु हा तपास समाधानकारक नाही, असे सुनावत अधिक तपास करण्याचे आदेश न्यायमूर्ती अभय ओक आणि न्यायमूर्ती ए.ए. सय्यद यांच्या खंडपिठाने दिले. (या प्रकरणातील संबंधितांना वाचवण्यासाठी यंत्रणा करत असलेला बचाव हा संशयास्पद आहे, असे म्हटल्यास चुकीचे काय ? - संपादक) न्यायालयाच्या निर्देशानुसार अन्वेषण यंत्रणेचे सहसंचालक अमृत प्रसाद हे या सुनावणीला उपस्थित होते.
        अन्वेषण यंत्रणेचे अतिरिक्त महाअधिवक्ता अनिल सिंग यांनी सांगितले की, यंत्रणेकडून तपास पूर्ण झाला आहे आणि २ वर्षांपूर्वी न्यायालयात आरोपपत्रही प्रविष्ट केले आहे. त्यावर न्यायालयाने आधीच्या दोन अहवालांप्रमाणेच या अहवालाविषयीही असंतोष व्यक्त करत बेनामी मालमत्तेविषयी तपास अधिकार्‍यांनी काहीही छडा लावल्याचे दिसत नाही. त्यामुळे अधिकार्‍यांनी आदर्श आयोगाच्या अहवालातील संबंधित शिफारशींविषयी प्रामुख्याने तपास करून १६ डिसेंबरपर्यंत अहवाल प्रविष्ट करावा.

काश्मीरमधून येणार्‍या सफरचंदांवर भारतविरोधी घोषणा !

      नवी देहली - काश्मीरमधून देहलीतील बाजारात आलेल्या सफरचंदांच्या पेटीपैकी एका पेटीतील सफरचंदांवर भारतविरोधी घोषणा लिहिण्यात आल्याचे आढळून आले आहे. व्यापार्‍याने ती सफरचंदे विकण्याऐवजी ती गटारात फेकून दिली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर गुप्तचर खाते सतर्क झाले असून याची माहिती घेत आहे. ही सफरचंदे कोणत्या शेतातून आली आहेत, त्यांचे वितरण कोणी केले आदी माहिती गोळा केली जात आहे. (भारतियांनी काश्मीरमधून येणार्‍या सफरचंदांवर बहिष्कार घालावा ! व्यापार्‍यांनीही या सफरचंदांचा व्यापार करू नये ! - संपादक)

महिला कर्मचार्‍यांशी केल्या जाणार्‍या गैरवर्तनाविषयी कठोर कारवाई करा !

  • न्यायालयाला असे आदेश का द्यावे लागतात ? पोलिसांच्या हे लक्षात का येत नाही ?
  • मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश
        मुंबई, ७ ऑक्टोबर - महिला कर्मचार्‍यांशी केल्या जाणार्‍या कुठल्याही प्रकारच्या गैरवर्तनाविषयी कठोर कारवाई करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने ४ ऑक्टोबर या दिवशी दिले. याचसमवेत पुरुष कर्मचार्‍यांनी महिला कर्मचार्‍यांशी कसे वागावे आणि कसे वागू नये, याविषयी प्रत्येक कार्यालयाने मार्गदर्शिका सिद्ध करावी आणि ती लागू करावी, असेही न्यायालयाने बजावले आहे. केंद्र सरकारच्या एका महिला कर्मचार्‍याने तिच्यावर झालेल्या लैंगिक अत्याचाराविषयी वरिष्ठांच्या विरोधात याचिका प्रविष्ट केली होती. त्यावर निर्णय देतांना न्यायमूर्ती विद्यासागर कानडे यांच्या खंडपिठाने वरील आदेश दिले.
अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाच्या या संदर्भातील 
निकालाचा दाखला देत न्यायालयाने सांगितले की...
१. लैंगिक गैरवर्तन हे एकांगी पहाता येणार नाही. त्याला दुसरी बाजूही आहे आणि मालक वा आस्थापन व्यवस्थापनाने अशा गैरवर्तनातील धोका लक्षात घेणे आवश्यक आहे.
२. आस्थापनाच्या व्यवस्थापनाने लैंगिक अत्याचाराच्या तक्रारी गांभीर्याने घेण्याची आवश्यकता असून त्याकडे नि:पक्षपातीपणे पहायला हवे.
३. व्यवस्थापन वा कार्यालयीन व्यवस्था काळानुसार पालटलेली असल्याने महिला कर्मचार्‍यांशी केल्या जाणार्‍या कुठल्याही प्रकारच्या गैरवर्तनाविषयी कठोर कारवाई करणे आवश्यक आहे.

भारतीय सैन्याकडून सर्जिकल स्ट्राईक झाले ! - पाकच्या सुरक्षातज्ञ आयशा सिद्धीकी यांचा दुजोरा

       नवी देहली - भारतीय सैनिकांनी पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून केलेल्या सर्जिकल स्ट्राईकवर पाकिस्तान आणि भारतातील पाकप्रेमी पुरावे मागत असतांना आता स्वतः पाकच्या सुरक्षातज्ञ आयशा सिद्धीकी यांनी सर्जिकल स्ट्राईकला दुजोरा दिला आहे. भारतीय सैनिकांनी केलेल्या या कारवाईत अनेक आतंकवादी ठार झाले, तसेच काही पाकिस्तानी सैनिकही ठार झाले, हे आयशा यांनी मान्य केले आहे. त्यांनी या कारवाईविषयीचे काही पुरावे गोळा केले आहेत. ज्या आधारे त्यांनी सर्जिकल स्ट्राईक मान्य केला आहे. (पाक आणि भारतातील पाकप्रेमी पुन्हा एकदा तोंडघशी ! - संपादक)

(म्हणे) देवीच्या मूर्तीचे विसर्जन मोहरमच्या आदल्या दिवशी किंवा दुसर्‍या दिवशी करा !

अन्य धर्मियांच्या सण-उत्सवांच्या संदर्भात 
अशी अरेरावी करण्याचे पोलिसांनी धाडस केले असते का ?
कुर्ला पोलिसांकडून नवरात्रोत्सव मंडळांवर दबाव !
      मुंबई - मोहरमच्या दिवशी म्हणजे १२ ऑक्टोबरला आम्हाला पोलीस बंदोबस्त ठेवायचा असल्याने देवीच्या मूर्तीचे विसर्जन दसर्‍याच्या दिवशी म्हणजे ११ ऑक्टोबरला अन्यथा मोहरमच्या दुसर्‍या दिवशी म्हणजे १३ ऑक्टोबरला करा. आमच्याकडे पोलीस संख्येचा अभाव आहे, असे आदेश कुर्ला पोलिसांनी येथील नवरात्रोत्सव मंडळांना दिले आहेत. सर्व मंडळे दसर्‍याच्या दुसर्‍या दिवशी देवीच्या मूर्तीचे विसर्जन करतात. त्यामुळे सर्वांनी दसर्‍याच्या दुसर्‍या दिवशीच देवीचे विसर्जन करण्याचा निर्धार केला आहे.

वितरकांशीही चर्चा करून राष्ट्रभावनेशी सुसंगत निर्णय होण्यासाठी प्रयत्न करणार ! - संदीप खर्डेकर

पाकिस्तानी कलाकारांचे चित्रपट 
दाखवण्यास पुणे येथील चित्रपटगृह मालकांचा विरोध
पाकिस्तानी कलाकारांचा समावेश असलेले
चित्रपट प्रदर्शित न करण्यासंदर्भात आयोजित
केलेल्या बैठकीत चर्चा करताना मान्यवर
      पुणे, ७ ऑक्टोबर (वार्ता.) - पाकिस्तानसमवेतचे ताणलेले संबंध, अतिरेक्यांची आक्रमणे, तसेच सीमेवर चालू असलेली पाकिस्तानची आगळीक बघता सद्यस्थितीत पाकिस्तानी कलाकारांची भूमिका असलेले चित्रपट येथे प्रदर्शित केले जाऊ नयेत, अशी भूमिका भाजपचे शहर उपाध्यक्ष श्री. संदीप खर्डेकर यांनी घेतली होती. यानंतर या विषयावर चर्चा करण्यासाठी पुणे एक्झिबिटर्स असोसिएशनच्या पदाधिकार्‍यांसमवेत एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी पाकिस्तानी कलाकारांचे चित्रपट दाखवण्यास पुण्यातील चित्रपटगृह मालकांचा विरोध आहे; मात्र यासंदर्भात वितरकांनीही सहकार्याची भूमिका घ्यावी, असे मत चित्रपटगृह मालकांनी व्यक्त केले.

गडचिरोली येथे नक्षलवाद्यांकडून पोलिसांवर बेछूट गोळीबार

नक्षलवादाच्या वाढत्या समस्येला तोंड 
देण्यासाठी शासनाने ठोस भूमिका घेणे आवश्यक ! 
      गडचिरोली - नक्षलविरोधी अभियान राबवतांना ६ ऑक्टोबरला एटापल्ली तालुक्यातील गट्टा हद्दीतील कुंजीमर्का-गुंडगुजर आणि भामरागड तालुक्यातील नारगुंडा पोलीस मदत केंद्रांतर्गत मत्तेमकुयी जंगलात पोलीस आणि नक्षलवादी यांच्यात चकमक झाली. नक्षलवाद्यांनी पोलिसांच्या दिशेने बेछूट गोळीबार केला. पोलिसांनीही त्यांच्या दिशेने गोळीबार करत प्रत्युत्तर दिले. पोलिसांचा वाढता दबाव पाहून नक्षल्यांनी पळ काढला. सकाळी ११.३० वाजता नक्षलवाद्यांनी बांधलेले फलक काढतांना भूसुरूंगाचा स्फोट झाला; परंतु जीवितहानी झाली नाही.

आकुर्डी (चिंचवड) येथील सनातनच्या ग्रंथप्रदर्शनास भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

ग्रंथप्रदर्शनाला भेट देतांना जिज्ञासू
      आकुर्डी, ७ ऑक्टोबर (वार्ता.) - येथील भवानीमाता मंदिरात नवरात्रीच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने आध्यात्मिक आणि धार्मिक ग्रंथ, तसेच सात्त्विक उत्पादने यांचे प्रदर्शन लावण्यात आले आहे. त्याला भाविकांचा उत्तम प्रतिसाद लाभत असून या निमित्ताने सनातनच्या अनमोल ग्रंथ संपदेचे ज्ञानभांडार भाविकांना खुले झाले आहे. ग्रंथप्रदर्शन कक्षामध्ये धर्मशिक्षणविषयक काही फलकही लावण्यात आले आहेत. ११ ऑक्टोबरपर्यंत सकाळी १० ते रात्री १० या वेळेत हे प्रदर्शन चालू रहाणार असून देवीभक्तांनी त्याचा अधिकाधिक लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.बारलिंगा (जिल्हा अकोला) येथे हिंदु धर्मजागृती सभा !

      अकोला - येथील बारलिंगा गावामध्ये ३ ऑक्टोबर या दिवशी हिंदु धर्मजागृती सभा सायंकाळी ७ ते रात्री ९ या वेळेत पार पडली. या सभेला हिंदु जनजागृती समितीचे श्री. धीरज राऊत, तसेच रणरागिणी शाखेच्या सौ. माधुरी मोरे यांनी संबोधित केले. सभेच्या प्रारंभी दीपप्रज्वलन झाले. त्यानंतर समस्त गावाच्या वतीने समितीचे श्री. धीरज राऊत यांचा सत्कार श्री. शुभम भोगे यांनी केला. तसेच रणरागिणी शाखेच्या सौ. माधुरी मोरे यांचा सत्कार श्रीमती अवातीरक यांनी केला.

पुणे येथे नवरात्रोत्सवाच्या काळात होणारे अपप्रकार रोखण्यासंदर्भात निवेदने

पोलीस निरीक्षक बबन खोडदे यांना निवेदन देतांना कार्यकर्ते
      पुणे, ७ ऑक्टोबर (वार्ता.) - नवरात्रोत्सवाच्या कालावधीत होणारे अपप्रकार रोखले जावे, तसेच हा उत्सव धार्मिक वातावरणात आणि धर्मशास्त्रानुसार साजरा व्हावा, या संदर्भात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बबन खोडदे, हवेली पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक मनोज पवार, तसेच श्रीमंतयोगी प्रतिष्ठानचे पदाधिकारी यांना निवेदने देण्यात आली. या वेळी बबन खोडदे यांनी याच आशयाची नोटीस परिसरातील मंडळांना दिली असल्याचे सांगितले. 


कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतील नगरसेवकाला लाच घेतल्याप्रकरणी न्यायालयीन कोठडी !

असे लाचखोर नगरसेवक पालिकेचा कारभार 
कसा पहात असतील, याचा विचारच न केलेला बरा !
      कल्याण, ७ ऑक्टोबर - कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील अवैध बांधकामे वाचवण्यासाठी लाच मागणारे भाजप नगरसेवक गणेश तुकाराम भाने आणि त्याचा साथीदार श्रीकांत दौलत नगारे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. ५ ऑक्टोबरला त्यांना न्यायालयात उपस्थित केल्यावर न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. येथील प्रभाग क्र. ४४ या नेतीवली टेकडी येथे चालू असलेल्या बांधकामाच्या विरोधात पालिकेकडे अनेक तक्रारी आल्या होत्या. प्रभागाचे नगरसेवक म्हणून भाने यांनी अवैध बांधकामाच्या विरोधात कारवाई न करण्यासाठी कथित बांधकाम व्यावसायिकाकडे १ लक्ष २५ सहस्र रुपयांची मागणी केली. तसेच पैसे दिले नाहीत, तर बांधकाम तोडले जाईल, अशी भीतीही त्याने बांधकाम व्यावसायिकाला घातली होती.पोलीस उपनिरीक्षकाला १० सहस्र रुपयांची लाच देण्याच्या प्रयत्नात असलेल्या अधिवक्त्याला अटक

भ्रष्टाचारग्रस्त महाराष्ट्र !
      कोल्हापूर - संशयित आरोपीच्या अटकपूर्व जामिनाला विरोध करू नये, यासाठी पोलीस उपनिरीक्षकाला १० सहस्र रुपयांची लाच देण्याचा प्रयत्न करणार्‍या अधिवक्ता माणिक डवंग (वय ३० वर्षे) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. त्यांनी उपनिरीक्षक दिलीप तिबिले यांना ५० सहस्र रुपयांच्या लाचेचे आमिष दाखवले होते. यातील १० सहस्र रुपये देतांना डवंग याला अटक झाली. अधिवक्त्याला लाच घेतांना झालेली अटक ही कोल्हापूर जिल्ह्यातील प्रथमच घटना असावी, असे पोलिसांनी सांगितले.

कोपर्डी अत्याचारप्रकरणी तीन आरोपींविरुद्ध आरोपपत्र

     नगर, ७ ऑक्टोबर - कोपर्डी (ता. कर्जत) येथील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार आणि तिची हत्या यांप्रकरणी तीन आरोपींविरुद्ध आरोपपत्र प्रविष्ट करण्यात आले. मुख्य आरोपी जितेंद्र उपाख्य पप्पू शिंदे, संतोष भवाळ, नितीन भैलूमे या तिघांविरुद्ध बलात्कार, हत्या, बालकांचे लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा यांनुसार आरोपपत्र प्रविष्ट करण्यात आले आहे. या खटल्यात सरकारी पक्षाच्या वतीने विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम हे काम पहाणार आहेत.

पोलिसांच्या संदर्भातील कटू अनुभव !

         सध्या सनातनचे साधक आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते यांना पोलिसांच्या शारीरिक आणि मानसिक छळाला सामोरे जावे लागत आहे. या अनुषंगाने विविध ठिकाणच्या पोलिसांविषयी सनातनचे साधक, हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते किंवा हिंदुत्वनिष्ठ यांना यापूर्वी पोलिसांच्या सतावणुकीविषयी आलेले अनुभव येथे प्रसिद्ध करत आहोत.
हिंदूंच्या न्याय्य हक्कांसाठी लढणारे 
नवलकिशोर शर्मा यांना अवैधरित्या अटक 
करून त्यांच्यावर अत्याचार करणारे पोलीस !
         रा.स्व. संघाचे माजी प्रचारक आणि मध्यप्रदेशातील धार येथील भोजशाळा मुक्तीयज्ञ आंदोलनाचे संयोजक धर्माभिमानी श्री. नवलकिशोर शर्मा यांना फेब्रुवारी २०१३ मध्ये मध्यप्रदेश पोलिसांनी अवैधरित्या अटक करून अमानुष मारहाण केली होती. या प्रकरणी श्री. शर्मा यांनी इंदूर उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यावर २६.९.२०१३ या दिवशी झालेल्या सुनावणीच्या वेळी उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एन्.के. मोदी यांनी शासकीय अधिवक्ता आणि पोलीस यांना पोलिसांनी अटक केल्यावर श्री. शर्मा यांना २४ घंट्यांत न्यायालयात उपस्थित का केले नाही ?, तुम्ही दूरभाषवरून दंडाधिकार्‍यांकडून पोलीस कोठडी घेतली का ?, असे प्रश्‍न विचारून त्यांची खरडपट्टी काढली. पुढील सुनावणीच्या वेळी तत्कालीन पोलीस अधीक्षक आणि अन्य पोलीस अधिकारी यांना उपस्थित रहाण्याचा आदेश दिला.
पोलिसांविषयी चांगले आणि वाईट अनुभव असल्यास
वाचकांनी नजीकच्या दैनिक कार्यालयात कळवावेत !

मुंबई जिल्ह्यातील हिंदु जनजागृती समितीचा सप्टेंबर २०१६ च्या तिसर्‍या सप्ताहातील प्रसारकार्याचा आढावा

१. सार्वजानिक गणेशोत्सव मंडळांतून केलेले प्रबोधन 
१ अ. मुंबईमधील चुनाभट्टी येथील गणेश मित्र मंडळातील कार्यकर्त्यांसाठी प्रवचनाचे आयोजन : आझाद गल्ली, चुनाभट्टी (मुंबई) येथील गणेश मित्र मंडळातील कार्यकर्त्यांसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आदर्श गणेशोत्सव कसा साजरा करावा ? या विषयावर प्रवचन करण्यात आले. समितीच्या धर्मशिक्षणवर्गातील सर्वश्री श्रीराम यादव आणि मनोज यादव यांनी प्रवचन आयोजित करण्याची सेवा केली होती. त्या प्रवचनाला मंडळाच्या मुलांचा प्रतिसाद चांगला होता, तसेच त्यांनी धर्मशिक्षणवर्गात येण्याचीही सिद्धता दर्शविली आहे.

देवीचा नामजप आणि श्‍लोक (भावार्थासह) !

     नवरात्रीत देवीतत्त्व नेहमीपेक्षा १००० पटीने कार्यरत असल्याने त्याचा अधिकाधिक लाभ मिळण्यासाठी या काळात श्री दुर्गादेव्यै नमः । हा नामजप अधिकाधिक करावा.
      सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके ।
      शरण्ये त्र्यम्बके गौरि नारायणि नमोऽस्तुते ॥
भावार्थ : सर्व मंगलकारकांची मंगलस्वरूप असणारी; स्वतः कल्याणकारी शिवरूप असणारी; धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे चारही पुरुषार्थ साध्य करून देणारी; शरण जाण्यास योग्य असणारी; त्रिनेत्रयुक्त असणारी; अशा हे नारायणीदेवी, तुला माझा नमस्कार असो. 
(अधिक माहितीसाठी वाचा सनातनचा लघुग्रंथ देवीपूजनाचे शास्त्र)

शक्तीपिठांची निर्मिती

सध्या चालू असलेल्या नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने...
      सतीची स्मृती शंकराला बेचैन करीत असते. शिव आणि शक्ती एकच असतात. शिवाचा अपमान हा सतीचा अपमान असतो. दक्ष शिवाचा अपमान करतो. दक्ष यज्ञात योगयुक्तीने देहत्याग करणार्‍या दाक्षायणी सतीचे शव तसेच असते. शंकर ते सतीचे शव पाहून बेभान होतो. सतीचे शव खांद्यावर घेऊन शोक दुःखाने व्याकूळ झालेला शंकर भारतभर फिरतो. सती ही महाशक्ती आहे, महामाया आहे. त्या सती शवालाही महाशक्तीचा अंश होताच व्याकुळलेला, मोहित झालेेला शंकर त्या महाशक्तीला सोडू शकत नाही. 
     वास्तविक शंकर सदासर्वदा स्वरूपातच अधिष्ठित असतो. त्याच वेळी सृष्टीचे पालन, रक्षण, संहार या कार्यांत, विश्‍वकल्याण कर्मात अव्यग्र शंकर व्यग्र असतो.

सर्जिकल स्ट्राईकवरून वाचाळांनी कोल्हेकुई बंद करावी !

     सर्जिकल स्ट्राईकची कारवाईच बनावट होती, कारवाईचे पुरावे जगासमोर मांडा म्हणजे पाकिस्तानचा अपप्रचार बंद होईल, अशी सर्जिकल स्ट्राईकविषयी मतांतरे व्यक्त झाली. या विधानांचा रोख हा सर्जिकल स्ट्राईकच्या पुराव्यांकडे अंगुलीनिर्देश करणारा होता. भारतामध्ये काही मंडळी तोंडाचा पट्टा कधीही, कुठेही चालवण्यात आघाडीवर असतात. कारण गलिच्छ राजकारणापुढेे त्यांना सर्व गौणच वाटत असते. पाकव्याप्त काश्मिरींनीच सर्जिकल स्ट्राईकच्या काही घडामोडींविषयीची माहिती एका इंग्रजी दैनिकाच्या प्रतिनिधीस सांगितली. याशिवाय भारतातील एका वृत्त वाहिनीच्या संपादकाने पाकव्याप्त काश्मीरच्या मिरपूरच्या पोलीस अधीक्षकांशी बोलून त्या ऑपरेशनविषयी भ्रमणध्वनीवरून माहिती घेतल्याचे ध्वनीमुद्रीत संभाषण समोर आले. त्यामुळे या प्रकरणावर शंका उपस्थित करणार्‍यांना चपराक बसली आहे. सर्जिकल स्ट्राईकची ध्वनीचित्रफीत भारतीय सैन्याने सरकारला सादर केली आहे. कोणी कितीही आदळआपट केली, तरी सैन्याचे हित पहाता ती सर्वांसाठी उघड न करण्याचे दायित्व सरकारने पार पाडले, ते एक चांगले झाले.

हिंदुु जनजागृती समिती

हिंदूंनो, करा धर्माचरण ।
जा ईश्‍वराला शरण ॥ १ ॥
असे का सांगते समिती(टीप) ? ।
कारण व्हावी आध्यात्मिक उन्नती ॥ २ ॥
समितीशी जुळून करा स्वतःचा उद्धार ।
तेव्हाच होईल या देशाचा सुधार ॥
चालू आहे धर्मक्रांतीचा काळ ।
हाती घ्या नामजपाची माळ ॥
समजावून घ्या हिंदु धर्म ।
टाळा अनावश्यक कर्म ॥
हिंदूंनो, धर्मकार्य करायला का भिता ? ।
आधी समजावून घ्या भगवद्गीता ॥
टीप - हिंदुु जनजागृती समिती
- श्री. श्याम सांगूनवेढे, अमरावती
वर वाचा आणि अध्यात्म अनुभवा !

हिंदु ऐक्यासाठी संकेतस्थळाला भेट द्या !

सेवाभावी वृत्ती आणि देवावरील दृढ श्रद्धा या अंगभूत गुणांमुळे महर्षि अन् सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळकाकू यांच्या कृपाशीर्वादास पात्र ठरलेले श्री. दिवाकर आगावणे !

श्री. दिवाकर आगावणे
श्री. विनायक शानभाग
   श्री. दिवाकर आगावणे यांचा आश्‍विन शुक्ल पक्ष सप्तमी (८.१०.२०१६) या दिवशी तिथीप्रमाणे वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांचे सहसाधक श्री. विनायक शानभाग यांना त्यांच्याविषयी जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत.
श्री. दिवाकर आगावणे यांना वाढदिवसानिमित्त
सनातन परिवाराकडून हार्दिक शुभेच्छा !
१. सेवाभावी वृत्ती
१ अ. अल्प वेळेत सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळकाकू
आणि प.पू. गुरुदेव यांचे मन जिंकणे
     दिवाकरदादा गेल्या अडीच वर्षांपासून सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांच्यासह सेवा करत आहे. या पूर्वी त्या दोघांच्या विशेष भेटीगाठी झाल्या नव्हत्या. दादाने थोड्या वेळेत त्याच्यातील सेवाभावी वृत्तीने सद्गुरु गाडगीळकाकू आणि प.पू. गुरुदेव यांचे मन जिंकले.
१ आ. मुलाप्रमाणे सद्गुरु गाडगीळकाकूंची सेवा जातीने करणे
     सद्गुरु गाडगीळकाकूंना असह्य शारीरिक वेदना होत असतांनाही त्या सतत प्रवास करतात. अशा वेळी दिवाकरदादा त्यांना हवे-नको ते सर्व जातीने पहातो. तो प्रत्येक रात्री १ ते १.३० वाजेपर्यंत त्यांची सेवा करूनही सकाळी सेवेसाठी सिद्ध असतो. दादा करत असलेली सेवा पाहून सद्गुरु काकू नेहमी म्हणतात, दिवाकर माझा मुलगाच आहे. कदाचित् मागच्या जन्मात तो माझा मुलगा असेल; म्हणून आता माझ्या सहवासात आला आहे.
२. स्वतःत पालट करण्याची तळमळ असल्याने स्वतःच्या चुकांविषयी विचारणे
आणि त्या पुन्हा होऊ नयेत, यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करणे
     दिवाकरदादाने हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेतले असल्याने साधनेत येण्यापूर्वी तो त्या क्षेत्रात नोकरी करायचा. त्याने विदेशातही नोकरी केली आहे. मायेतील संस्कार दूर करणे आणि अध्यात्मातील सुसंस्कार करून घेणे, यांसाठी तो नेहमी प्रयत्नरत असतो.

साधकांनो, ब्राह्मतेज आणि क्षात्रतेज यांनी युक्त असलेल्या दैनिक सनातन प्रभातची सेवा व्रत म्हणून अंगीकारून भगवंताची कृपा संपादन करा ! - प.पू. पांडे महाराज

रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात ८ ऑक्टोबरपासून चालू 
होत असलेल्या वार्ताहर आणि संपादक प्रशिक्षण शिबिराच्या निमित्ताने...
प.पू. पांडे महाराज
       आज मला इतक्या वर्षांनंतर दैनिक सनातन प्रभातची सेवा करणार्‍या साधकांशी २ - ४ शब्द बोलण्याचा योग आला आहे. ही भगवंताची कृपा आहे. मी काही मोठा विद्वान नाही, मार्गदर्शक नाही. आपण सर्वांनी मिळून दैनिक सनातन प्रभातला उत्थान देऊन आणि त्यातील दैवी शक्ती कायम ठेवून त्याच्याकडून चांगले कार्य होण्यासाठी त्याला प्रभावित करावे, असे मला वाटते. मी दैनिक सनातन प्रभातचा वाचक आहे आणि त्या दृष्टीने मी माझे मनोगत व्यक्त करत आहे. 
१. दैनिक सनातन प्रभातची वैशिष्ट्ये 
१ अ. ब्राह्मतेज आणि क्षात्रतेज यांनी युक्त : प.पू. डॉक्टरांच्या कृपेमुळे दैनिक सनातन प्रभातला एक वेगळे स्थान प्राप्त झाले आहे. हे ब्राह्मतेज आणि क्षात्रतेज यांनी युक्त आहे.

महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या वतीने आयोजित आध्यात्मिक कार्यशाळेसाठी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात आल्यावर आलेल्या अनुभूती

श्री. मौलिक पटेल
मेलबर्न, ऑस्टे्रेलिया येथील श्री. मौलिक पटेल यांना आलेल्या अनुभूती
१. एस्.एस्.आर्.एफ्.शी संपर्क आणि साधनेला प्रारंभ
     लहानपणापासूनच मला ईश्‍वर आणि साधना यांविषयी विशेष ओढ होती. लहानपणी मी बालसंस्कारवर्गांना जात असे. माझ्या आई-वडिलांचा ओढा मायेतील गोष्टींमध्येच अधिक असल्याने त्यांना मी एक दिवस सर्व गोष्टींचा त्याग करून संन्यासी होईन, अशी भीती वाटत असे. मी मेलबर्न येथील एस्.एस्.आर्.एफ्.चे साधक श्री. वाम्सीकृष्णा गोल्लामुडी यांच्या घरी राहिलो. त्यांनी मला साधनेची ओळख करून दिली. त्यानंतर मी नामजप आणि ग्रंथांचा अभ्यास करायला आरंभ केला; मात्र मी साधनेत पूर्णतः सहभागी झालो नव्हतो. मागील वर्षापासून (वर्ष २०१५ पासून) श्रीकृष्णाने मला जीवनात काहीतरी अपूर्ण आहे आणि त्यासाठी साधना वाढवायला हवी, असे विचार देण्यास आरंभ केला. त्यामुळे मी एस्.एस्.आर्.एफ्.च्या ऑनलाईन सत्संगात सहभागी झालो. त्यानंतर मी तळमळीने साधनेचे प्रयत्न वाढवले.
२. प.पू. डॉक्टरांची कृपा संपादन करण्यासाठीची तळमळ लागणे
     प.पू. डॉॅक्टरांची कृपा कधी होईल ? ते मला ओळखतील का ? मी एक सामान्य साधक असून माझे साधनेचे प्रयत्नही अल्प असल्यामुळे प.पू. डॉक्टरांची कृपा संपादन करण्यासाठी कसे प्रयत्न करायचे ?, असे विचार माझ्या मनात येतात.
३. रामनाथी आश्रमात आल्यावर आलेल्या अनुभूती
     महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या कार्यशाळेला यावे, असे मला तीव्रतेने वाटत होते. सनातनच्या रामनाथी येथील आश्रमात आल्यापासून मी भावावस्था अनुभवत आहे.

विविध पीडांच्या निवारणासाठी अमावास्येला गोमातेला केळी आणि गूळ अर्पण करतांना साधिकेने अनुभवलेले गोमातेचे दिव्यत्व !

कु. मधुरा भोसले
डॉ. मोहन फडके
     पुणे येथील डॉ. मोहन फडके यांनी सनातनच्या रामनाथी आश्रमातील काही साधकांची चिकित्सा करून मंत्रोपाय सांगितले. काही साधकांना जन्मनक्षत्रामुळे लागलेला दोष, तसेच वाईट शक्तींच्या त्रासामुळे होणार्‍या विविध पीडा यांचे निवारण होण्यासाठी प्रत्येक अमावास्येला गोमातेला केळी आणि गूळ भरवण्यास सांगितले. त्याप्रमाणे ३१.८.२०१६ या दिवशी अमावास्या असल्याने ढवळी येथील एका गायीला केळे (सालीसहित) आणि गूळ भरवल्यानंतर जाणवलेली सूत्रे आणि आलेली अनुभूती येथे देत आहे.
१. एक आठवड्यापूर्वी गोमातेला ग्रास भरवावा, ही इच्छा निर्माण होणेे
     एक आठवड्यापूर्वी गोमातेला ग्रास भरवावा, ही इच्छा माझ्या मनात जागृत झाली. माझ्या मनात अशी इच्छा का निर्माण झाली ? याचे मला कोडे पडले. ३१.८.२०१६ या दिवशी मला गायीला केळी आणि गूळ भरवण्यासाठी जायचे आहे, हे समजल्यावर माझ्या मनात जागृत झालेल्या इच्छेमागील कार्यकारणभाव मला उमजला.
२. गोमातेच्या दर्शनानंतर तिला ग्रास भरवतांना झालेल्या कृती आणि त्यामागील विश्‍लेषण
२ अ. कृती - गायीला पहाताच माझा भाव जागृत होऊन तिला हात जोडून नमन केले गेले.
२ अ १. विश्‍लेषण : दिव्यत्वाची जेथे प्रचीती, तेथे कर माझे जुळती या उक्तीप्रमाणे गोमातेत वास करणार्‍या देवतांच्या तत्त्वामुळे साधिकेला दिव्यत्वाची अनुभूती आली आणि तिचे हात आपोआप जोडले गेले. गोमातेमध्ये असणार्‍या दिव्यत्वाचा सूक्ष्म-स्पर्श तिच्या सूक्ष्म देहांना झाल्यामुळे तिच्या मनोदेहातील भावाचे केंद्र जागृत झाले.
२ आ. कृती - गायीने प्रसाद भक्षण करणे : माझ्या उजव्या तळव्यावर ठेवलेली केळी आणि गूळ गायीच्या मुखापुढे नेल्यावर तिने ते त्वरित खाण्यास चालू केले.

एस्.एस्.आर्.एफ्.च्या जिज्ञासू सौ. हिमानी मोघे यांना आलेल्या अनुभूती

१. कांदळी येथील प.पू. भक्तराज महाराज यांंच्या समाधीचे
दर्शन घेतांना ते बोलत असल्याचे जाणवणे
     जुलै २०१५ मध्ये अमेरिकेतील सीएटल येथे गुरुपौर्णिमा साजरी करण्याची आनंददायी संधी मिळाली. तेव्हापासून प.पू. भक्तराज महाराज यांना (प.पू. बाबांना) मी माझ्या घरी बोलावत असल्याचे जाणवत आहे. ते मला मार्गदर्शन करतात, नामजपाची आठवण करून देतात आणि एखाद्या पित्याप्रमाणे माझी काळजी घेतात. अलीकडेच मी कांदळीला भेट दिली असता तू मला तुझ्या घरी बोलावलेस ना ? आता मी माझ्या घरी तुझे स्वागत करतो, असे प.पू. बाबा म्हणत असल्याचे मला जाणवले. या आनंददायी अनुभूतीविषयी प.पू. बाबांच्या चरणी अनंत कोटी कृतज्ञता !
२. सनातनच्या रामनाथी आश्रमात असतांना आलेल्या अनुभूती
२ अ. कोणती प्रार्थना करायची, हे प.पू. भक्तराज महाराज सुचवत असल्याचे जाणवणे : डिसेंबर २०१५ मध्ये महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या वतीने घेण्यात आलेल्या कार्यशाळेसाठी मी सनातनच्या रामनाथी येथील आश्रमात वास्तव्यास होते. त्या वेळी तेथील ध्यानमंदिरात गेल्यावर माझी आतून अखंड प्रार्थना होत असल्याचे जाणवले.

बालपणापासूनच शांत, समजूतदार आणि बुद्धीमान असलेला ५३ टक्के आध्यात्मिक पातळीचा अन् उच्च स्वर्गलोकातून जन्माला आलेला अकोला येथील चि. देवेश नटकुट (वय ५ वर्षे) !

चि. देवेश नटकुट
      आश्‍विन शुक्ल पक्ष सप्तमी (८.१०.२०१६) या दिवशी चि. देवेश नटकुट याचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त आईला त्याची जाणवलेली गुणवैशिष्टये पुढे देत आहोत.
चि. देवेश नटकुट याला सनातन 
परिवाराकडून वाढदिवसाचे अनेक शुभाशीर्वाद !
१. जन्मापूर्वी 
१ अ. बाळ होणार असल्याचा संकेत मिळणे : मला एक स्वप्न पडले. स्वप्नात मी देवाजवळ बसून नामजप करत होते. त्या वेळी आमच्या देव्हार्‍यातील पितळेचा बाळकृष्ण बाळ होऊन रडत-रडत अन् रांगत आला आणि माझ्या मांडीवर बसला. त्याच मासात मला बाळ होणार आहे, असे संकेत मिळाले.

रुग्णांच्या आजारपणाचे कारण सूक्ष्मातून अचूक ओळखून निदान करणारे पुणे येथील डॉ. फडके यांनी सांगितलेले उपाय करतांना झालेले त्रास आणि आलेल्या अनुभूती !

सौ. सारिका अय्या
     रामनाथी आश्रमात रुग्ण-साधकांची तपासणी करण्यासाठी डॉ. फडके आले होते. एखाद्या रुग्णाला पडताळून त्यावरील मंत्र सांगत असतांना त्याला तो रोग कशामुळे झाला आहे ? याविषयी ते अचूकपणे सांगत होते. त्यांनी आजारपणावरील उपचार म्हणून सांगितलेले मंत्रोपचार आणि त्यांनी सांगितलेले उपाय केल्यावर झालेले त्रास आणि आलेल्या अनुभूती देत आहोत.
१. आजारपणाची पार्श्‍वभूमी सूक्ष्मातून अचूक ओळखणे
१ अ. घराबाहेरील जिन्यातील पाईपलाईन लागल्याने मुलाला हर्निया झाल्याचे सांगणे : माझा मुलगा कु. विश्‍व अय्या याला हर्निया झाला होता आणि नुकतेच त्याचे शस्त्रकर्मही झाले आहे, असे मी त्यांना सांगितले. त्या वेळी त्यांनी तुमच्या घराला बाहेरून जिना असून तेथे पाण्याची पाईपलाईन होती आणि ती पाईपलाईन लागल्यामुळे त्याला हा आजार झाला, असे सांगितले.
१ आ. पूर्वी बटाट्याचे पदार्थ पुष्कळ खाल्ल्याने आतापित्ताचा त्रास होत आहे, असे त्यांनी मला सांगितले.      वरील दोन्ही घटना अगदी खर्‍या आहेत. यावरून त्यांच्यात रुग्णाच्या आजारपणाची पार्श्‍वभूमी सूक्ष्मातून जाणण्याची क्षमता असल्याचे लक्षात आले.
२. आजारपणावर मंत्रोपचारादी उपाय केल्यावर झालेले त्रास आणि आलेल्या अनुभूती
२ अ. झालेले त्रास
२ अ १. मंत्र सांगितल्यानंतर आध्यात्मिक त्रासांत वाढ होणे :
डॉ. फडके यांनी माझ्या व्याधीसाठी सांगितलेले मंत्रोपाय माझ्याकडून स्वीकारले जात नव्हते. त्यासाठी माझा पुष्कळ संघर्ष होत होता. मधे-मधेे माझ्या आध्यात्मिक त्रासांत वाढ होत होती. 
२ अ २. गोग्रास न दिल्याने मुलाचा त्रास वाढणे : त्यांनी विश्‍वला गोग्रास देण्याकरता सांगितले. त्यानुसार विश्‍वकडून गोमातेला गोग्रास दिला गेला नाही.

हिंदूंंना अती पवित्र असलेल्या गोमातेच्या दर्शनाने आणि तिच्या वात्सल्यमयी स्पर्शाने साधिकेने अनुभवलेली आनंदावस्था !

कु. मधुरा चतुभुर्र्ज
१. गायीच्या दर्शनाला जातांना श्रीकृष्णाचे अस्तित्व जाणवेल, असे मनात येणे
     ३१.८.२०१६ या दिवशी ढवळी येथे आम्हा काही साधकांना गायीचे दर्शन घेण्यासाठी नेले होते. तेथे जाण्यापूर्वी आम्हाला एक प्रार्थना करण्यास सांगितली. तेव्हा गायीचेे दर्शन घेतांना श्रीकृष्णाचे अस्तित्व जाणवेल, तसेच तेथे श्रीकृष्णही भेटणार आहे, असे मला तीव्रतेने वाटत होते. तेथे गेल्यावर एका साधकाने आम्हाला केळे आणि गूळ हा प्रसाद गोमातेला भरवायला सांगितला.
२. आनंदावस्थेत नेणारा गोमातेचा स्पर्श
२ अ. गायीनेे स्पर्श केल्यावर हलकेपणा जाणवणे : मी प्रार्थना करून गायीला प्रसाद भरवला. तेव्हा तिने माझ्या तळहाताला चाटले. मला तिचा स्पर्श आईच्या स्पर्शाप्रमाणे वाटला आणि कामधेनूची आठवण तीव्रतेने झाली. मला तो परिसर गोकुळासम वाटून तेथे अनेक देवता उपस्थित आहेत, असेे दिसले. गायीनेे मला स्पर्श केल्यावर हलकेपणा जाणवला. मला त्रास देणार्‍या आसुरी शक्तीची शक्ती न्यून झाल्यासारखे वाटले. गायीच्या डोक्यावरून हात फिरवतांना माझा वात्सल्यभाव जागृत झाला.
२ आ. गोदर्शनामुळे मन शांत होणे : मी आश्रमात येईपर्यंत माझी भावावस्था टिकून होती. नंतर पुष्कळ वेळ माझे मन शांत होते. एका साधिकेने गायीशी काय बोलणे झाले ?, असे विचारल्यावर गाय जे काही बोलली, ते स्पर्शातच बोलली. ते शब्दांत व्यक्त करता येत नाही, असे वाटले. मी आनंदावस्थेत होते.

डॉ. मोहन फडके यांनी केलेल्या उपायांमुळे शरिरातील जडत्व आणि दुखणे न्यून होणे

सौ. विजयलक्ष्मी आमाती
     विकारांवर मंत्रांद्वारे उपचार करणारे पुणे येथील डॉ. मोहन फडके हे रामनाथी (गोवा) येथील सनातन आश्रमात आले होते. २३.८.२०१६ या दिवशी सायंकाळी मी त्यांच्याकडे आध्यात्मिक त्रासांवर उपाय विचारण्यासाठी गेले. तेव्हा त्यांनी माझ्यावर २ मिनिटे उपचार केले आणि मला २ मंत्रजप करायला सांगितले. त्यांनी उपाय केल्यानंतर लगेचच माझ्या पायांचे दुखणे उणावून मला हलकेपणा जाणवला. मला सांगितलेले मंत्रजप अंघोळ करून करावयाचे असल्याने मी ते न करताच रात्री झोपले, तरीही मला पुष्कळ हलके वाटत होते. आदल्या दिवशी माझे सर्वांग पुष्कळ दुखत असल्याने मी झोपूनच होते. त्या वेळी मला जडत्व जाणवत होते; मात्र उपायांनंतर मी झोपल्यावर माझ्या शरिराचे वजन (जडत्व) जवळजवळ अर्धे झाल्याचे मला जाणवत होते.
     दुसर्‍या दिवशी माझी थोडी धावपळ झाली. त्या वेळी माझे पाय दुखत होते; परंतु शरीर आणि पाय यांच्याभोवती असलेले ओझे जाणवत नव्हते.
- सौ. विजयलक्ष्मी आमाती, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२५.८.२०१६)


न भूतो न भविष्यति गुरुमाऊलीसम कोणी होणार ।

सौ. वर्षा ठकार
परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त...

थोर हो गुरुमाऊली माझी । थोर हो माऊली माझी ।
किती वर्णावे तिचे गुण । कधी सगुण, तर कधी निर्गुण ॥ १ ॥

ना केला कधी चमत्कार । ना हारतुर्‍यांची बडदास्त ।
हातात घेऊनी रणशिंग । झाली माऊली नरसिंह ॥ २ ॥

सजविला सनातन धर्म । सनातन धर्म राज्याची स्थापना कराया ।
आळविले सप्तदेवतांना । दाखविला महिमा प्रार्थनेचा ॥ ३ ॥

आला हो आला श्रीकृष्ण । भक्तांचा उद्धार कराया ।
कराया धर्मसंस्थापना । आला कालियामर्दन ॥ ४

सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ आणि पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांनी मुकांबिकादेवीचे दर्शन घेणे, या घटनेचे कु. मधुरा भोसले यांनी केलेले सूक्ष्म-परीक्षण

      महर्षींच्या आदेशानुसार १७.३.२०१६ या दिवशी सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ आणि पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांनी सायंकाळी ६.३० नंतर उडुपी, कर्नाटक येथील कोलुर गावातील मुकांबिकादेवीचे दर्शन घेतले. या घटनेचे कु. मधुरा भोसले यांनी सनातनच्या रामनाथी आश्रमातून केलेले सूक्ष्म-परीक्षण येथे देत आहोत. 
१. सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांनी मुकांबिकादेवीचे दर्शन 
घेतल्यावर झालेली सूक्ष्मातील प्रक्रिया आणि दर्शनाचा प.पू. डॉक्टर, 
सनातन संस्था अन् हिंदु जनजागृती समिती यांवर झालेला सूक्ष्म परिणाम 
      मुकांबिकादेवीचे प्रत्यक्ष दर्शन घेणार्‍या सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांना मुकांबिकादेवीच्या मंदिरात कार्यरत असणार्‍या पार्वतीदेवीची सृजन अन् स्थितीजन्य शक्तीची स्पंदने, तसेच कृपाशीर्वाद मिळाल्याचे जाणवले. सदगुरु अंजलीताईंना मिळालेली दैवी शक्ती प.पू. डॉक्टरांकडे संक्रमित झाली. प.पू. डॉक्टरांकडून त्यांचे प्रतिरूप असणार्‍या सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्याकडे या दैवी शक्तीचा प्रवाह द्विगुणित होऊन प्रवाहित झाला अन् जगभरातील सर्व सात्त्विक जिवांपर्यंत चैतन्य शक्तीची धारा पोचल्याचे जाणवले.

अपेन्डिक्सच्या शस्त्रक्रियेच्या वेळी साधिकेला आलेल्या अनुभूती

१. श्रीकृष्ण आणि प.पू. डॉक्टर यांचा धावा केल्यावर 
अंगावर सूज असूनही सलाईन लावायला शीर सापडणे
     २०१४ या वर्षी माझी अपेन्डिक्सची शस्त्रक्रिया झाली. शस्त्रक्रियेपूर्वी मला पुष्कळ भीती वाटत होती. मला इंजेक्शनची पुष्कळ भीती वाटते. त्या वेळी माझ्या अंगावर पुष्कळ सूज आल्यामुळे परिचारिकांना सलाईन लावायला शीर सापडत नव्हती. मी सतत श्रीकृष्ण आणि प.पू. डॉक्टर यांचा धावा करत होते. तेव्हा माझी शीर सापडली. 
२. सतत देवाचा धावा केल्यामुळे शस्त्रक्रियेची भीती उणावणे
      मला शस्त्रक्रिया करण्यासाठी रुग्णालयात नेल्यापासूनच मी सतत देवाचा धावा करत होते. त्यामुळे माझी भीती उणावली. मला भूल देतांना प.पू. डॉक्टरांकडून प्रक्षेपित होत असलेले चैतन्य माझ्या शरिरात जात आहे, असा मी भाव ठेवला. त्यामुळे मला भूल देत असल्याचे जाणवले नाही, तसेच शस्त्रक्रिया झाल्यावर माझी गुंगी उतरल्यावरही मला काहीच त्रास झाला नाही.

पुण्याचे डॉ. फडके यांनी केलेल्या उपायांमुळे माझ्या शरिरातून काहीतरी बाहेर पडत आहे, असे जाणवणे, १० मिनिटे काहीच न सुचणे आणि नंतर शरीर हलके वाटून माझ्या व्याधी अल्प झाल्या आहेत, असे जाणवणे

श्रीमती संध्या बधाले
     पुणे येथील तज्ञ डॉ. फडके यांच्या उपायांना जाण्याची संधी मला मिळाली. मी उपायांच्या खोलीत गेले, तेव्हा इतर साधकही उपायांना बसले होते. त्या वेळी मला जांभया आणि ढेकरा येऊन माझ्यावर उपाय होत आहेत, हे जाणवत होते. मी डॉ. फडके यांच्या समोरच्या पलंगावर बसून त्यांना माझी व्याधी सांगितली. तेव्हा ते माझ्यावर उपाय करू लागले. त्या वेळी मला काही सुचत नव्हते आणि गोल फिरल्यासारखे वाटून माझ्या शरिरातून काहीतरी बाहेर पडत आहे, असे वाटले. मी उपायांच्या खोलीतून बाहेर आल्यावरही मला १० मिनिटे काहीच सुचत नव्हते. त्यामुळे मी काही वेळ भोजनकक्षात शांत बसले. नंतर मी चौथ्या माळ्यावर माझ्या सेवेच्या ठिकाणी गेले. जातांना मी माझे गुडघे-पाय दुखतात का ?, हे बघत होते. तेव्हा मला माझे शरीर हलके वाटून माझ्या व्याधी अल्प झाल्या आहेत, असे जाणवले.
पू. पात्रीकरकाकांनी दिलेल्या नामजपाने डोके आणि मान दुखण्याचा
त्रास अल्प होणे अन् जपाने व्याधी बर्‍या होतात, हेही अनुभवणे
     आदल्या दिवशी माझ्या डोक्याचा अर्धा भाग आणि मान दुखत होती. हे मी पू. पात्रीकरकाकांना सांगितल्यावर त्यांनी मला सनातनच्या ग्रंथात बघून श्री दुर्गादेव्यै नमः । हा नामजप दिला. (संदर्भ : विकार निर्मूलनासाठी नामजप हा भावी महायुद्धकाळात डॉक्टर, वैद्य, औषधे आदी उपलब्ध नसतांना, तसेच नेहमीसाठी उपयुक्त सनातनचा ग्रंथ) तो नामजप मी रात्री ध्यानमंदिरात बसून केला. तेव्हा मला बरे वाटू लागले आणि शरीरही हलके वाटले.

अंनिसचा भांडाफोड करणार्‍या पत्रकार परिषदेचे वृत्त प्रसिद्ध करण्याच्या संदर्भातील आढावा

वस्तूस्थितीदर्शक वृत्ताला प्रसिद्धी न देणे 
किंवा अल्प प्रसिद्धी देणे, म्हणजे गुन्हेगारी 
वृत्तीला पाठिंबा देण्यासारखेच होय. 
अशी प्रसारमाध्यमे जनतेला दिशा काय देणार ?
       घोटाळेबाज अंनिसच्या न्यासाची सामाजिक भोंदूगिरी उघड करणार्‍या सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयाच्या अहवालाची माहिती सनातन संस्थेच्या वतीने पुणे येथे १ ऑक्टोबर २०१६ या दिवशी झालेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आली होती. या पत्रकार परिषदेचे वृत्त कोणकोणत्या वृत्तपत्रांत कशा प्रकारे प्रसिद्ध करण्यात आले आहे, याविषयीचा आढावा पुढे देेण्यात आला आहे.
वृत्तपत्रांचे प्रकार 

सनातनच्या सात्त्विक शुभेच्छापत्रांच्या माध्यमातून धर्मप्रसाराच्या सुवर्णसंधीचा लाभ घ्या !

       सनातनच्या सात्त्विक शुभेच्छापत्रांमध्ये देवतांची सात्त्विक चित्रे आणि धर्मशिक्षणाविषयी लिखाण असते. यामुळे ही शुभेच्छापत्रे धर्मप्रसाराचे प्रभावी माध्यम बनली आहेत. दीपावलीनिमित्त व्यापारी वर्ग, लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, मोठी आस्थापने, कार्यालये यांच्याकडून शुभेच्छापत्रांची मोठ्या प्रमाणात आदान-प्रदान होत असते. यामुळे साधकांना धर्मप्रसाराची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे.
       वर्ष २०१७ मध्ये महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, विविध नगरपालिका यांच्यासह गोवा, उत्तरप्रदेश आदी राज्यांमधील विधानसभा निवडणुका होणार आहेत. या पार्श्‍वभूमीवर जनसंपर्काचे प्रयत्न आणखी वाढवता येतील. मतदारांना दिवाळीनिमित्त शुभेच्छा देण्यासाठी काही लोकप्रतिनिधींनी मोठ्या संख्येने सनातनच्या सात्त्विक शुभेच्छापत्रांची मागणी केली आहे.
       या संधीचा लाभ घेऊन जिल्हासेवकांनी शुभेच्छापत्रांचे व्यापक स्तरावर वितरण करण्याचे नियोजन करावे. सनातन संस्थेचे साधक आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते लोकप्रतिनिधींना भेटून सनातनच्या शुभेच्छापत्रांचे नमुने दाखवून शुभेच्छापत्रांची मागणी घेऊ शकतात. साधकांनी हे संपर्क ११ ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करावेत.
        शिवाजी महाराजांच्या वेळी हिंदवी स्वराज्य मिळण्याअगोदर समाजाची जशी स्थिती होती, तशी स्थिती आजही आहे. निधर्मीवादी, बुद्धीप्रामाण्यवादी आणि पुरोगामी विचारांचे लोक आपल्या देशात सर्वधर्मसमभावाचे विचार पसरवून समाजाची फारच हानी करत आहेत. याच लोकांनी या देशाचे तीन तुकडे केले, ते धर्माच्या नावावर !
- पू. संभाजीराव भिडेगुरुजी, संस्थापक, श्री शिवप्रतिष्ठान

फलक प्रसिद्धीकरता

अधर्माचरण रोखण्यासाठी 
हिंदूंना धर्मशिक्षण आवश्यक !
        बंगालच्या नदिया जिल्ह्यातील चाकदा येथील नवरात्रोत्सवाच्या मंडपात राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची श्री दुर्गादेवीच्या रूपातील मूर्ती ठेवण्यात आली आहे. या मूर्तीच्या दहा हातांमध्ये राज्य सरकारच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली आहे.

हिंदू तेजा जाग रे !

Jago !
       Bangal me Navaratrotsav ke mandap me Mamata Banargee ki Shree Durga devi ke rup me pratima sthapit ki.
kya Aise adharmacharan se Devi ki krupa hogi ?
जागो !
       बंगाल में नवरात्रोत्सव के मंडप में ममता बैनर्जी की श्री दुर्गादेवी के रूप में प्रतिमा स्थापित की ।
क्या ऐसे अधर्माचरण से देवी की कृपा होगी ?

सनातन प्रभातचे वार्ताहर बनू इच्छिणार्‍यांचा प्रवास चांगला वार्ताहर ते संत-वार्ताहर, असा व्हावा !

गोवा येथे ८ ते ११ ऑक्टोबर या 
कालावधीत होणार्‍या वार्ताहर आणि 
संपादक प्रशिक्षण शिबिराच्या निमित्ताने...
        सनातन प्रभात हे प्रभावीपणे धर्मप्रसार करणारे आणि राष्ट्र आणि धर्म विषयक जागृती करणारे एकमेव दैनिक आहे. प्रतिदिन राष्ट्र आणि धर्म यांवरील संकटांविषयी वृत्ते, लेख आदींद्वारे हिंदु समाजात जागृती करून प्रबोधन करणे, हा सनातन प्रभात प्रकाशित करण्याचा उद्देश आहे. हा उद्देश सफल होण्यासाठी ठिकठिकाणी राष्ट्र अन् धर्म विषयक विविध घटनांचे वार्तांकन करणे आणि आलेल्या बातम्यांचे संपादन करणे, हे शिकण्यासाठी वार्ताहर प्रशिक्षण शिबीर आणि संपादक प्रशिक्षण शिबीर महत्त्वाचे ठरते.
परात्पर गुरु डॉ. आठवले
 १. शिबिराचा 
साधनेच्या दृष्टीने लाभ करून घ्या !
        या शिबिरात वार्तांकन, वृत्तसंपादन, मराठी मुद्रितशोधन, वृत्तांना समाज, राष्ट्र आणि धर्म हिताचा दृष्टीकोन देणे आदी विषय शिकवले जाणार आहेत. या सर्वांचे साधनेच्या दृष्टीने काय महत्त्व आहे, हे लक्षात घ्या.
अ. वार्तांकन : वार्ता हरण करतो, तो वार्ताहर. नारदमुनी जसे आद्यकीर्तनकार आहेत, तसेच आद्यवार्ताहरही आहेत. त्यांना वार्ताहरविद्येचे जनक म्हटले गेले आहे. नारायणभक्ती करणार्‍या नारदमुनींनी असुरांच्या वार्ता देवलोकात पोहोचवल्या, तसेच उपदेशाद्वारे योग्य दृष्टीकोनही दिले, तसेच वार्ताहर साधकांनी श्रीकृष्णाची भक्ती करतांना समाजातील दुष्प्रवृत्तींच्या बातम्या सनातन प्रभातमध्ये पोहोचवल्या पाहिजेत. नारदमुनींचा आदर्श ठेवला, तर भक्तीयोगाची साधनाही होईल.

बोधचित्र


॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥

 या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो.
- प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज
सनातनचे श्रद्धास्थान
व्यावहारिक प्रश्‍न आणि संत
         संत उत्स्फूर्तपणे बोलतात ते खरे. एखाद्याच्या प्रश्‍नाला लगेच उत्तर दिले तर ते खरे समजायचे, थोड्या वेळाने दिले तर ते खोटे असू शकते. एखाद्याने प्रश्‍न विचारल्यावर संत उत्तर देतात, ते बहुधा त्याला बरे वाटावे असे असते. (हे उत्तर बिंब- प्रतिबिंब या न्यायाने असते; म्हणजे त्याला जे उत्तर हवे असते (बिंब), त्याचे प्रतिबिंब संतांच्या मनात पडून ते त्याप्रमाणे सांगतात.) संतांना व्यवहारातील प्रश्‍नांविषयी, म्हणजे मायेविषयी, काहीही सांगायला आवडत नाही. संत अध्यात्मविषयक प्रश्‍नांची उत्तरे आवडीने सांगतात आणि ती कधीच चुकीची असत नाहीत.
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण)

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

मानवी जीवन 
मानवी जन्म पूर्वपुण्याईनेच प्राप्त होतो; म्हणून जीवनात सुविचाराची साथ ठेवून जन्माचे सार्थक करावे
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

घरभेद्यांना आवरा !

संपादकीय 
     सर्जिकल स्ट्राईकच्या धक्क्यातून सावरल्यावर विविध हिंदुविरोधी घरभेद्यांनी त्यांची पोपटपंची चालू केली. त्यात कलाकारांपासून सर्व पक्षांच्या राजकारण्यांनी त्यांचा भाजपद्वेषी कंड शमवून घेतला. माजी केंद्रीयमंत्री पी. चिदंबरम् यांच्यापासून मुंबई काँग्रेस प्रदेशाध्यक्ष संजय निरूपम आणि देहलीचे मुख्यमंत्री अन् आपचे केजरीवाल यांच्यापर्यंत सार्‍यांनी भारताचे सैन्य आणि पंतप्रधान यांनी केलेल्या राष्ट्रगौरवाच्या कृत्याविषयी शंका उपस्थित केल्या. त्याविषयी पुरावे मागून स्वतःच्या कोत्या घरभेदी मनोवृत्तीचे उघड प्रदर्शन केले आहे.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn