Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

नवरात्रोत्सव (आज सहावा दिवस)

सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके ।
शरण्ये त्र्यम्बके गौरि नारायणि नमोऽस्तुते ॥
        एका मतानुसार नवरात्रीतील पहिले तीन दिवस तमोगुण कमी करण्यासाठी तमोगुणी महाकालीची, पुढील तीन दिवस रजोगुण वाढवण्यासाठी रजोगुणी महालक्ष्मीची आणि शेवटचे तीन दिवस साधना तीव्र होण्यासाठी सत्त्वगुणी महासरस्वतीची पूजा करतात.
(संदर्भ : सनातनचा ग्रंथ शक्ती)
नवरात्र विषयक माहितीसाठी संकेतस्थळावरील मार्गिका
https://www.sanatan.org/mr/navratri

पाकव्याप्त काश्मिरींनीच दिले सर्जिकल स्ट्राईकचे पुरावे !

पाकव्याप्त काश्मिरींनी दिलेल्या पुराव्यानंतर 
तरी भारतातील पाकप्रेमी गप्प बसतील का ?
      नवी देहली - सर्जिकल स्ट्राइकचे पुरावे मागणार्‍या भारतातील पाकप्रेमी राजकारण्यांना आणि पाकिस्तानला पाकव्याप्त काश्मीरमधील घटनास्थळावरील प्रत्यक्षदर्शींनी चपराक लगावली आहे. त्यांनी भारताकडून आतंकवाद्यांची केंद्रे उद्ध्वस्त करण्यात आल्याचे मान्य केले आहे. ठार झालेल्या आतंकवाद्यांचे मृतदेह लष्कर-ए-तोयबाने ट्रकमध्ये भरून नेले आणि अज्ञातस्थळी पुरले, अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे. एका इंग्रजी दैनिकात प्रसिद्ध झालेल्या बातमीत ही माहिती देण्यात आली आहे.
१. या दैनिकाच्या प्रतिनिधीने पाकव्याप्त काश्मीरमध्ये रहाणार्‍या ५ कुटुंबांशी त्यांच्या भारतातील नातलगांच्या माध्यमातून संपर्क साधला. त्या सर्व लोकांनी २८ सप्टेंबरच्या मध्यरात्री आणि २९ सप्टेंबरच्या पहाटे अनुभवलेला घटनाक्रम सांगितला.
२. आक्रमण झाल्यानंतर नियंत्रणरेषेपासून अवघ्या ४ किलोमीटर अंतरावर असलेल्या दधनियल या लहानशा खेड्यात काही प्रत्यक्षदर्शी गेले होते. त्या वेळी त्यांना येथील मुख्य बाजारातून अल्-हवाई पुलाच्या परिसरात असणार्‍या इमारती भस्मसात झालेल्या दिसल्या. अल्-हवाई हे आतंकवाद्यांना आवश्यक गोष्टींचा पुरवठा करण्याचे शेवटचे ठिकाण आहे. त्यानंतर आतंकवादी भारतात घुसखोरी करण्यासाठी कुपवाड्याच्या दिशेने कूच करतात.

मुंबई येथे रणरागिणी शाखेच्या वतीने नवरात्रोत्सव मंडळांमध्ये पथनाट्याद्वारे जनजागृती !

एक भारत अभियान - काश्मिर की ओर चळवळ

नायगाव येथील सार्वजनिक नवरात्रोत्सवात पथनाट्य सादर
करतांना हिंदु जनजागृती समिती आणि रणरागिणी शाखेचे कार्यकर्ते

        मुंबई, ५ ऑक्टोबर (वार्ता.) - काश्मीरमधील विस्थापित हिंदूंचे पुनर्वसन करून त्यांचा आवाज बळकट करण्यासाठी हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने एक भारत अभियान-काश्मिर की ओर ही राष्ट्रव्यापी चळवळ राबवण्यात येत आहे. हिंदु जनजागृती समितीच्या रणरागिणी शाखेच्या वतीने ठिकठिकाणी पथनाट्य आणि स्वसंरक्षण प्रात्यक्षिके सादर करून या चळवळीविषयी जनजागृती करण्यात येत आहे. या पथनाट्यामध्ये सौ. नयना भगत, कु. शिवानी कीर, सर्वश्री संदीप गवंडी, संकेत काणेकर, श्री. सदानंद पांचाळ, भूषण देवरूखकर, संदीप धामणे, हेमंत पुजारी, नीलेश पवार, गणेश दुखंडे हे सहभागी झाले होते.

सनातन संस्था सातारा न्यासाच्या वतीने स्वच्छता अभियानाच्या अंतर्गत प्रबोधन !

सौ. संगीता लिमकर यांचे मार्गदर्शन ऐकतांना विद्यार्थी

      सांगली, ५ ऑक्टोबर (वार्ता.) - सनातन संस्था सातारा न्यासाच्या वतीने स्वच्छता अभियान जनजागृतीच्या अंतर्गत १ ऑक्टोबर या दिवशी सौ. क.भ. दामाणी हायस्कूल येथे सकाळी ९.३० ते १० या वेळेत प्रबोधनपर मार्गदर्शन करण्यात आले. सनातन संस्था साताराच्या कार्यकर्त्या सौ. संगीता लिमकर यांनी मार्गदर्शन केले.
      सौ. लिमकर यांनी विद्यार्थी-विद्यार्थिनींना स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले. विद्यार्थ्यांनी नंतर स्वच्छतेची कृती केली. ५५० हून अधिक विद्यार्थी-विद्यार्थिनी यांनी याचा लाभ घेतला. या मोहिमेत हायस्कूलमधील सर्व शिक्षक-शिक्षिका यांनी उत्स्फूर्त सहभाग दर्शवला. हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री. एस्.बी. पाटील यांचे या कार्यक्रमास मोलाचे सहकार्य लाभले.

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांच्या आशीर्वादामुळे काम करण्याची उमेद वाढली ! - मुख्यमंत्री फडणवीस

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांच्या ट्रस्टकडून 
मुख्यमंत्र्यांना ४ लाख रुपयांचा धनादेश सुपुर्द ! 

डावीकडे भाजपचे आमदार श्री. संजय केळकर, योगतज्ञ दादाजी
वैशंपायन यांचा सत्कार करतांना मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस

        ठाणे - कल्याण येथील थोर संत योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांच्या सत्कर्म सेवा सो. ट्रस्टच्या वतीने मुख्यमंत्री साहाय्यता निधी आणि जलशिवार योजना यांसाठी ४ लाख रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे देण्यात केला. मुख्यमंत्री येथे आले असतांना योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी त्यांची भेट घेऊन हा धनादेश त्यांच्याकडे सुपुर्द केला. येथील आमदार संजय केळकर यांनी ही भेट घडवून आणली. मुख्यमंत्री साहाय्यता निधी आणि जलयुक्त शिवार योजनेला साहाय्य केल्याविषयी मुख्यमंत्र्यांनी त्यांना धन्यवाद देऊन त्यांचे आभार मानले. या वेळी भाजपचे आमदार श्री. संजय केळकर उपस्थित होते.

पाक-चीन यांना एकाच वेळेला तोंड देण्यास वायूदल समर्थ ! - वायूदल प्रमुख अरूप राहा

        नवी देहली - भारतीय वायूदल पाकला तोंड देण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहे. पाकला चीनने पाठिंबा दिला, तर दोन्ही देशांचा सामना करण्याचीही क्षमता वायूदलात आहे, असे वायूदल प्रमुख अरूप राहा यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.
        राहा म्हणाले की, वर्ष १९६२ च्या युद्धाच्या तुलनेत वायूदलाचे बळ आता किती तरी पटीने वाढले आहे. शत्रूला केवळ रोखणेच नाही, तर आक्रमण झाल्यास त्यांचा सामना करणेही वायूदलाचे काम आहे.
        वायूदलाकडे गेल्या काही वर्षांत अनेक अत्याधुनिक विमाने दाखल झाली आहेत. स्वदेशी आणि विदेशी बनावटीच्या अ‍ॅवॉक्स रडारमध्ये शत्रूंना शेकडो किलोमीटरवरून ओळखण्याची क्षमता आहे. तसेच राफेल विमानेही वायूदलाच्या ताफ्यात दाखल होत आहेत. त्यामुळे वायूदलाचा आत्मविश्‍वास वाढला आहे.

शहापूर येथे माहुली गडावर चेकपोस्ट उभारण्यात येणार !

  • शिवप्रेमींना अशा गोष्टींसाठी आंदोलन का करावे लागते ? प्रशासनाच्या हे लक्षात येत नाही का ?
  • व्यसनमुक्त शिवकिल्ले अभियानांतर्गत शिवप्रेमींना तहसीलदारांकडून आश्‍वासन
        ठाणे - येथील शहापूर तालुक्यात असणार्‍या माहुली गडावर व्यसनमुक्त शिवकिल्ले अभियानांतर्गत शिवप्रेमी २ ऑक्टोबरपासून उपोषणाला बसले होते. स्थानिक तहसीलदारांनी लेखी आश्‍वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. तेथे लवकरच पोलीस चेकपोस्ट उभारण्यात येणार आहे.
१. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची साक्ष देणार्‍या गड-किल्ल्यांवर मद्याची मेजवानी केली जाते. त्याविरोधात शिवव्याख्याते आणि लेखक प्रभाकर ताम्हणकर आणि दिपक गोवर्धने हे माहुली गडावर उपोषणाला बसले होते.
२. व्यसनमुक्त किल्लेे कायदा करावा, किल्ल्यांना हेरिटेज दर्जा मिळावा, गड-किल्ल्यांच्या जवळपास मद्यविक्रीची दुकाने, रिसॉर्ट यांना अनुमती देऊ नये आदी मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले. त्याला शेकडो शिवप्रेमींनी उत्स्फूर्त पाठिंबा दिला.
३. पोलीस आणि तहसील प्रशासनाने चालढकल केल्यास उग्र आंदोलनाची चेतावणीही शिवप्रेमींनी दिली आहे.

केरळमध्ये रा.स्व. संघाचे नेते आणि उच्च न्यायालयाचे न्यायाधीश इसिसच्या हिटलिस्टवर !

       नवी देहली - केरळमध्ये २ दिवसांपूर्वी अटक करण्यात आलेल्या इसिसच्या आतंकवाद्यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ नेते आणि उच्च न्यायालयाचे न्यायाधीश इसिसच्या हिटलिस्टवर होते. या माहितीनंतर पोलिसांनी संघाचे नेते आणि न्यायाधीश यांच्या सुरक्षेत वाढ केली आहे. यात संघाच्या ८ नेत्यांचे नाव होते.
       राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (एन्आयएने) इसिसच्या ६ आतंकवाद्यांना केरळ आणि तमिळनाडू येथून नुकतीच अटक केली. एन्आयएने स्पष्ट केले की, केरळमधून बेपत्ता होऊन अफगाणिस्तानमध्ये जाऊन इसिसमध्ये सहभागी झालेल्या २१ मुसलमानांचा अटक करण्यात आलेल्या आतंकवाद्यांशी संबंध नाही. या आतंकवाद्यांच्या चौकशीतून केरळमध्ये नव्याने स्थापन झालेल्या अंसार-उल्-खिलाफची माहिती मिळाली आहे.

भारतीय सैनिक पाकप्रेमी कलाकारांप्रमाणे वागले, तर चालेल का ? - निवृत्त मेजर गौरव आर्य यांचा प्रश्‍न

     मुंबई - निवृत्त मेजर गौरव आर्य यांनी पाकच्या कलाकारांची तळी उचलणार्‍या पाकप्रेमी भारतीय कलाकार आणि निर्माते-दिग्दर्शक यांना फेसबूकवर लेख प्रसारित करून फटकारले आहे. मेजर आर्य यांनी लिहिले आहे की, 
१. दिग्दर्शक करण जोहर, महेश भट्ट म्हणतात, पाकबरोबर चर्चा थांबवू नये, तर आतंकवाद थांबवा. भारतीय क्रिकेट मंडळ पाकबरोबर सामने खेळवणार आणि उद्योगपती पाकशी व्यापार करणार. हे सर्व होत असतांना आपले सैनिक मात्र सीमेवर हुतात्मा होत रहाणार.
२. पाकिस्तानी कलाकारांना परत पाठवून, क्रिकेट बंद करून आणि व्यापार थांबवून आतंकवाद थांबेल का ? नक्कीच थांबणार नाही; परंतु ऐक्याचे भावनात्मक दर्शन, तर घडेल. अन्यथा सैनिक विचारात पडतील की, भारत-पाक संबंधांमध्ये केवळ आम्हीच का भरडले जावे ?

भारतापासून पाकला कधीच धोका नव्हता ! - निवृत्त एअर मार्शल असगर खान, पाकिस्तान

जगात शांतीचा पुरस्कर्ता म्हणून भारताची ओळख आहे. 
भारताने कधीच स्वत:हून पाकशी युद्ध केले नाही; म्हणून तो पुन:पुन्हा 
भारताची कुरापत काढतो. त्यामुळे पाकला कायमचा धडा शिकवणे आवश्यक आहे !
     इस्लामाबाद - पाकचे संरक्षण प्रमुख भ्रष्ट असून ते त्यांच्या स्वार्थासाठी भारताच्या विरोधात युद्धाची भावना भडकवत असतात. भारत-पाक यांच्यात जेवढेही युद्धे झाली, ती सर्व पाकमुळे झाली आहेत. भारतापासून पाकला कधीच धोका नव्हता, असे प्रतिपादन पाकचे माजी एअर मार्शल असगर खान यांनी खैबर न्यूजशी बोलतांना केले. 
     असगर खान वर्ष १९५७ ते वर्ष १९६५ पर्यंत पाकिस्तानचे वायूसेना प्रमुख राहिले आहेत. ते वर्ष १९६५ मध्ये भारत-पाक युद्धाच्या पूर्वी निवृत्त झाले होते. ते म्हणाले, वर्ष १९७१ चे युद्ध पाकनेच चालू केले होते. पाकने बांगलादेशात (तेव्हाचे पूर्व पाकिस्तान) लोकांना ठार मारणे चालू केले होते. त्यामुळे बांगलादेशातील लोकांनी भारताकडे साहाय्य मागितले. त्यानंतर भारताला पाकशी युद्ध करावे लागले. ते म्हणाले, मी पाकचे पंतप्रधान नवाज शरीफ यांना सांगितले होते की, पाकला अणूबॉम्बची काहीही आवश्यकता नाही. तरीही त्यांनी अणूबॉम्बची चाचणी केली. जेव्हा ते वायूसेनेचे प्रमुख होते, तेव्हा त्यांना हेही माहीत नव्हते की, पाक भारताच्या विरोधात युद्धाची सिद्धता करत आहे, असेही खान यांनी सांगितले.

नालासोपारा आणि जोगेश्‍वरी येथील बैठकांमध्ये धर्माभिमान्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद !

एक भारत अभियान- काश्मिर की ओर 

जोगेश्‍वरी येथील इच्छापूर्ती गणेश
मंदिरातील बैठकीत सहभागी झालेले धर्माभिमानी

       मुंबई, ५ ऑक्टोबर (वार्ता.) - विस्थापित काश्मिरी हिंदूंचे पुनर्वसन व्हावे, यासाठी हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने एक भारत अभियान-काश्मिर की ओर ही राष्ट्रव्यापी चळवळ राबवण्यात येत आहे. या चळवळीला देशवासियांचा पाठिंबा मिळावा आणि काश्मिरी हिंदूंचा आवाज बळकट व्हावा, यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ठिकठिकाणी बैठका घेऊन देशप्रेमी नागरिकांपर्यंत हा विषय पोहोचवण्यात येत आहे. यासाठी २ ऑक्टोबर या दिवशी जोगेश्‍वरी आणि नालासोपारा येथे बैठका घेण्यात झाल्या. या बैठकींना धर्माभिमान्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

वर्ष २०१५-१६ मध्ये जेएन्यूमध्ये लैंगिक शोषणाच्या ३९ तक्रारी !

जेएन्यू विश्‍वविद्यालयाची अधोगती ! डाव्या विचारसरणीच्या विद्यार्थी संघटनांचा प्रभाव
असणार्‍या अशा विश्‍वविद्यालयात विद्यार्थी काय शिकत असतील, याची कल्पना करता येत नाही ! 
       नवी देहली - वर्ष २०१५-१६ मध्ये येथील जवाहरलाल नेहरू विश्‍वविद्यालयात (जेएन्यूत) लैंगिक शोषणाच्या ३९ तक्रारी प्रविष्ट करण्यात आल्या आहेत. देशातील कोणत्याही विश्‍वविद्यालयांतील तक्रारींच्या संख्येपेक्षा ही अधिक आहे. वर्ष २०१४-१५ मध्ये ही संख्या २६, तर वर्ष २०१३-१४ मध्ये ती २५ होती. या प्रकारच्या तक्रारीवर काम करणार्‍या समितीच्या वार्षिक अहवालानुसार जानेवारी २०१५ ते मार्च २०१६ या कालावधीत एकूण ४२ तक्रारी आल्या. त्यातील तिघांची चौकशी पूर्ण झाली. या तक्रारी मागे घेण्यात आल्या. २९ प्रकरणांची चौकशी चालू आहे. दोन्ही बाजूकडील व्यक्ती उपस्थित नसल्याने अन्य तक्रारींची अद्याप चौकशी चालू झालेली नाही.

उत्तरप्रदेशातील २९ मुसलमानबहुल शहरांमध्ये अद्यापही पाकिस्तानी दूरचित्रवाहिन्या पाहिल्या जातात !

  • मुसलमानांची लोकसंख्या वाढल्यावर आणि ते बहुसंख्य झाल्यावर काय होते, हे यातून ढोंगी निधर्मीवाद्यांना समजेल का ?
  • एवढ्या शहरांमध्ये पाकच्या वाहिन्या पाहिल्या जात असतांना त्यांच्यावर कारवाई न करणार्‍या प्रशासनावरही कारवाई झाली पाहिजे !
     लक्ष्मणपुरी - पाकिस्तानी दूरचित्रवाहिन्या आणि पाक आस्थापनांनी चालवलेले रेडिओ यांच्या प्रसारणावर उत्तरप्रदेशमध्ये कारवाई करण्यात येत आहे. केंद्रीय गुप्तचर विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील मुसलमानबहुल शहरांमध्ये जाणीवपूर्वक पाकिस्तानी वाहिन्यांचे प्रसारण केले जात आहे. अनेकदा या संदर्भात तक्रारी करण्यात येऊनही त्यावर गंभीरपणे कारवाई करण्यात आलेली नाही; मात्र सद्यस्थितीत या वाहिन्यांवर कारवाई करण्याचा आदेश देण्यात आला आहे.

धारवाड (कर्नाटक) येथील कृषी मेळ्यात ख्रिस्ती धर्मग्रंथांची विक्री करणार्‍यांना श्रीराम सेनेच्या कार्यकर्त्यांनी चोपले !

     धारवाड (कर्नाटक) - येथील कृषीविज्ञान विद्यापिठाच्या इमारतीमध्ये भरलेल्या कृषी मेळ्याच्या ठिकाणी ख्रिस्ती धर्मग्रथांची विक्री करणार्‍यांना श्रीराम सेनेच्या कार्यकर्त्यांनी चोपले. या प्रकरणी पोलिसांनी श्रीराम सेनेच्या ५ कार्यकर्त्यांना अटक केली आहे. (श्रीराम सेनेच्या कार्यकर्त्यांना अटक करणारे पोलीस ख्रिस्ती धर्मप्रसारकांवर कारवाई करत नाहीत, हे लक्षात घ्या ! - संपादक)
     कृषी मेळ्याच्या समारोप कार्यक्रमात ख्रिस्ती धर्मग्रंथांची विक्री करण्यास श्रीराम सेनेच्या कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतला. या विक्री केंद्रावरील कार्यकर्ते बायबलची विक्री करतांना धर्मांतराचा प्रयत्न करत होते, असा आरोप श्रीराम सेनेच्या कार्यकर्त्यांनी केला. कृषी मेळ्यातील हे धार्मिक केंद्र बंद करावे आणि त्यातील धर्मप्रसारकांनी विद्यापिठाच्या परिसरातून बाहेर जावे, अशी मागणी श्रीराम सेनेच्या कार्यकर्त्यांनी केली होती. पाकने भारतीय सैन्याचे आभार मानायला हवेत ! - गायक अदनान सामी

     मुंबई - भारत आणि पाकिस्तान यांचा आतंकवाद हा समान शत्रू आहे. आतंकवादाच्या समस्येमुळे दोन्ही देशांची आणि संपूर्ण जगाची हानी होत आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून पाकिस्तान स्वत: आतंकवादाचा बळी ठरत असल्याचा दावा करत आहे. त्यामुळे भारताने केलेल्या सर्जिकल स्ट्राईकसाठी पाकने आभार मानायला पाहिजेत. शेजारी तुम्हाला साहाय्य करत आहे आणि तुम्हाला त्याची जाणीवही नाही, अशा शब्दांत मूळचा पाकिस्तानी गायक आणि आता भारताचे नागरिकत्व घेतलेल्या अदनान सामी यांनी पाकला फटकारले आहे. यापूर्वीही सर्जिकल स्ट्राईकनंतर अदनान सामीने ट्विट करून पंतप्रधान मोदी आणि भारतीय सैन्याचे अभिनंदन केले होते.


केजरीवाल यांच्यावर बीकानेरमध्ये शाई फेकली !

     बीकानेर - देहलीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर ४ ऑक्टोबरला रात्री शाई फेकण्यात आली. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. शाई फेकण्याचा उद्देश समजू शकलेला नाही. केजरीवाल यांनी भारतीय सैनिकांनी केलेल्या सर्जिकल स्ट्राईकचा पुरावा मागितला आहे. त्या पार्श्‍वभूमीवर या घटनेला पाहिले जात आहे.

मंदिरातील फरशीवर झोपून राहिल्याने महिलांना होते अपत्यप्राप्ती ! - देवीभक्तांची श्रद्धा

अंनिसला चपराक ! अंनिस हिंदु धर्मांतील 
देवी-देवतांच्या सामर्थ्याचे महत्त्व लक्षात घेईल तो सुदिन !
विज्ञानासाठी आव्हान ठरलेले हिमाचल प्रदेशातील जागृत सिमसा माता मंदिर
     मंडी (हिमाचल प्रदेश) - देशात सर्वत्र नवरात्रोत्सव साजरा करण्यात येत आहे. देवींची मंदिरे भाविकांनी फुलून गेली आहेत. असेच एक मंडी जिल्ह्यातील सिमस गावात सिमसा माता देवीचे मंदिर आहे. ही देवी अपत्यहीन महिलांची मनोकामना पूर्ण करणारी म्हणून संतान दात्री या नावाने ओळखली जाते. या ठिकाणी नवरात्रोत्सवात संतान प्राप्तीसाठी पंजाब, हरियाणा, चंदीगड, तसेच देशातील अनेक भागांतून जोडपी येत असतात. या मंदिरातील फरशीवर महिला झोपून रहातात आणि त्यांना अपत्यप्राप्ती होते, असे सांगितले जाते. या मंदिराचे कोडे अद्याप विज्ञानालाही उलगडता आलेले नाही.

मुंबई येथे श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानकडून दुचाकी फेरीद्वारे आनंद व्यक्त !

भारताने पाकच्या 
आक्रमणाला दिलेल्या प्रत्युत्तराचे प्रकरण 

दुचाकी फेरीत सहभागी झालेले धारकरी

        मुंबई, ५ ऑक्टोबर (वार्ता.) - भारतीय सैन्यदलाने पाकव्याप्त काश्मीमध्ये जाऊन आतंकवाद्यांची तळी उद्ध्वस्त करून आतंकवाद्यांना कंठस्नान घातले. भारताने पाकच्या आक्रमणाला दिलेल्या या प्रत्युत्तराचा येथे २ ऑक्टोबर या दिवशी श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने दुचाकी फेरी काढून आनंद व्यक्त करण्यात आला. शिवतीर्थ ते गेट-वे-ऑफ इंडियापर्यंत ही फेरी काढण्यात आली. या फेरीत सर्वश्री मंगेश केणी, अविनाश पवार, सुमीत तळवणकर, गिरिधर बाबर, सुशिलकुमार वर्मा, सुजित डिसले, आदित्य गायकवाड, सौरभ कुबडे, विठ्ठल भिसे, अभिजीत रणदिवे, आेंकार खातू, राजेश सावंत, उदय पिंपळे, दिनेश आव्हाड, स्वप्नील म्हात्रे, प्रणित परब, दीपक यादव, अक्षय म्हस्के, मनोहर खंदारे, रोहित कोळी यांसह बहुसंख्य धारकरी सहभागी झाले होते.

(म्हणे) पाकच्या सीमेवर पठाण तैनात आहेत !

पाकचा आणखी एक क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदी याची पोपटपंची ! 
      नवी देहली - भारतियांना पाक सैन्याच्या सर्वात पुढे असलेल्या सैनिकांची माहिती नाही. यात पठाण तैनात आहेत. सर्व सीमांचे रक्षण पठाण करत आहेत, असे विधान पाकचा क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदी याने केले आहे. (छत्रपती शिवाजी महाराजांनी धिप्पाड अफझलखानाचा कोथळा बाहेर काढला. या ज्वलंत इतिहासाचा आदर्श घेतलेल्या भारतीय सैनिकांना आफ्रिदी यांनी अशा धमक्या देऊ नयेत ! - संपादक) काही दिवसांपूर्वी आफ्रिदी यांनी ट्वीट करून भारताशी युद्धाऐवजी शांतीसाठी प्रयत्न केले पाहिजेत, असे म्हटले होते. सर्जिकल स्ट्राईक्सचे रशियाकडून समर्थन !

     नवी देहली - आतंकवादी भारतामधील शांतताप्रिय नागरिकांवर, तसेच सैन्यावर आक्रमण करतात; तेव्हा मानवाधिकारांचे सर्वाधिक उल्लंघन होते. अशा वेळी या सर्जिकल स्ट्राईक्सचे आम्ही स्वागत करतो. प्रत्येक देशास स्वसंरक्षणाचा अधिकार आहे, असे रशियाचे भारतामधील राजदूत अ‍ॅलेक्झांडर एम्. कदाकिन यांनी म्हटले आहे. 
     रशिया आणि पाकिस्तान यांच्यामधील संयुक्त सैनिकी सराव हा पाकव्याप्त काश्मीरमध्ये होत नसल्याने यासंदर्भात भारताने काळजी करण्याची आवश्यकता नाही, अशी पुस्तीही त्यांनी या वेळी जोडली. गेल्या आठवड्यामध्ये, सर्व प्रकारच्या आतंकवादाविरोधातील निर्णायक संघर्षास रशियाचा पाठिंबा असल्याची भूमिका रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून घोषित करण्यात आली होती.विश्‍व हिंदु परिषद अत्याचारग्रस्त हिंदूंसाठी पलायन नाही, पराक्रम चळवळ राबवणार !

     नवी देहली - विश्‍व हिंदु परिषद लवकरच देशात पलायन नाही, पराक्रम चळवळ आरंभ करणार आहे. याद्वारे धर्मांधांच्या अत्याचारांमुळे पलायन करणार्‍या हिंदूंना त्यापासून रोखण्यात येणार आहे.
     उत्तरप्रदेशातील कैराना येथून हिंदूंच्या पलायनानंतर ही चळवळ राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विहिंपचे नेते सुरेंद्र जैन म्हणाले की, या चळवळीद्वारे हिंदूंमध्ये विश्‍वासाचे वातावरण निर्माण करण्यात येणार आहे. ज्यामुळे धर्मांधांच्या भीतीपोटी त्यांनी पलायन करू नये. विहिंप पीडित हिंदूंच्या क्षेत्रात बजरंग दल आणि दुर्गा वाहिनी यांच्या शाखा निर्माण करील. या शाखेतील कार्यकर्ते येथील हिंदूंची प्रतिदिन भेट घेतील. येथे सभेचेही आयोजन करण्यात येईल. तसेच राष्ट्रीय मानवाधिकार आयोगालाही विहिंपकडून एक निवेदन देण्यात येणार आहे. 
     विहिंपचे म्हणणे आहे की, देशातील १७ राज्यांतील विविध ठिकाणाहून हिंदूंनी पलायन केले आहे. यात प्रामुख्याने जम्मू-काश्मीर, हरियाणा, उत्तरप्रदेश, बिहार, बंगाल, आसाम, त्रिपुरा, ओडिशा या राज्यांचा समावेश आहे. गेल्या ३० वर्षांत उत्तरप्रदेशातील काही भागात हिंदू अल्पसंख्य झाले आहेत. यात मेरठ, मुजफ्फरनगर, सहारनपूर, संभल, शामली, अमरोहा, बिजनौर आणि रामपूर या जिल्ह्यांचा समावेश आहे.

अमेरिकेत मुसलमान धर्मोपदेशकाला मारहाण !

एक-दोन जिहादी आतंकवादी आक्रमणे झाल्यावर 
अमेरिकेतील नागरिकांमध्ये इस्लामविषयी द्वेष निर्माण झाला आहे, 
गेली ३ दशके जिहादी आतंकवाद सहन करणारे भारतीय अद्यापही सहिष्णु आहेत !
     वॉशिंग्टन - अमेरिकेत इमामच्या पारंपरिक वेशात मशिदीमध्ये धर्मोपदेश करायला निघालेल्या रशीद दार नावाच्या मुसलमान व्यक्तीला एका अज्ञाताने मारहाण केली. शुक्रवारच्या प्रार्थनेला जातांना मी नेहमीच पारंपरिक वेश परिधान करतो. मी एक स्वाभिमानी मुसलमान आहे आणि त्याविषयी क्षमायाचना करण्याची आवश्यकता आहे, असे मला वाटत नाही, असे दार यांनी वृत्तसंस्थेला सांगितले. वॉशिंग्टनमध्ये माझ्यावर प्रथमच असा प्रसंग ओढवला आहे. मी मशिदीमध्ये जात असतांना ड्युपाँट सर्कलजवळ एका अज्ञात व्यक्तीने माझ्यावर ठोसा मारला, असे दार यांनी पोलिसांत केलेल्या तक्रारीत म्हटले आहे.अमेरिकेत शालेय पाठ्यपुस्तकांतून इस्लामवरील धडे हटवण्याची मागणी !

मुघलांचा उदोउदो करणारी भारतातील शिक्षण मंडळे यातून बोध घेतील का ?
     वॉशिंग्टन - इस्लामच्या शिकवणीचा आपल्या पाल्यांवर विपरीत परिणाम होण्याची भीती अमेरिकेतील पालकांना भेडसावते आहे. त्यामुळे अमेरिकेतील काही राज्यांमध्ये शालेय पाठ्यपुस्तकातून इस्लामवरील धडे हटवण्याची मागणी होत आहे. 
     जॉर्जियामधील काही पालकांनी इस्लामविषयीच्या अभ्यासक्रमावरून जॉर्जिया शाळा शिक्षण मंडळाला फैलावर घेतले होते. त्यामुळे इस्लामविषयीचे धडे वगळण्याचा प्रस्ताव शिक्षण मंडळाने बनवला आहे. अरबी भाषेवरील एका धड्याच्या वादावरून व्हर्जिनियातील शाळा एक दिवस बंद ठेवण्यात आल्या होत्या. टेनेसी राज्य शिक्षण मंडळाने समाज शास्त्राविषयी नवीन अभ्यासक्रम बनवला असून त्यामध्ये सातवीच्या वर्गात शिकवण्यात येणारा इस्लामवरील धडा वगळण्यात आला आहे. आपल्या पाल्यांना शाळांमध्ये इस्लामचे शिक्षण देण्यास पालकांचा विरोध आहे. त्यामुळे यापुढे शाळांमधून इस्लामविषयी विस्तृत माहिती दिली जाणार नाही, असे टेनेसी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष माईकल ह्युजिस यांनी सांगितले.

तरुणींनी ऐतिहासिक वीरांगनांचा आदर्श समोर ठेवून राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणासाठी संघटितपणे लढा दिला पाहिजे ! - कु. भव्या गौडा, समन्वयक, रणरागिणी शाखा, बेंगळुरू

उपस्थितांना मार्गदर्शन करतांना डावीकडून
श्री. मोहन गौडा आणि कु. भव्या गौडा
     बेंगळुरू (कर्नाटक) - तरुणींनी एतिहासिक वीरांगनांचा आदर्श समोर ठेवून राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणासाठी संघटितपणे लढा दिला पाहिजे. कित्तुरूची राणी चन्नम्मा, झांसीची राणी लक्ष्मीबाई, केलादी चन्नम्मा, राणी अब्बाक्का आणि बेलवाडी मल्लम्मा यांचा आदर्श आपण समोर ठेवला पाहिजे, असे प्रतिपादन रणरागिणी शाखेच्या बेंगळुरू समन्वयक कु. भव्या गौडा यांनी केले. युवतींमध्ये क्षात्रतेज वृद्धींगत करण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या रणरागिणी या महिला शाखेच्या वतीने २ ऑक्टोबर या दिवशी चंदपूर येथील छाया अन्नपुर्णेश्‍वरी कल्याण मंडपामध्ये कन्या युवा शौर्य अभियानचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे बेंगळुरू समन्वयक श्री. मोहन गौडा उपस्थित होते.

पाककडून गोळीबाराच्या घटना चालूच !

पाकपेक्षा शक्तीशाली असतांनाही पाकचा हा गोळीबार 
आणखी किती दिवस भारतीय सैन्याने सहन करायचा ?
       श्रीनगर - भारतीय सैन्याने केलेल्या सर्जिकल स्ट्राईकनंतर पाक सैन्याकडून भारतीय सीमेवर गोळीबार करण्याच्या घटना चालूच आहेत. पाककडून ५ ऑक्टोबरला नौशेरा सेक्टर येथे गोळीबार करण्यात आला. पाकने गेल्या २ दिवसांत १० वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन करून गोळीबार केला. वायूदल प्रमुख अरूप राहा म्हणाले की, सर्जिकल स्ट्राईकनंतर सीमेवर तणाव आहे.
काश्मीरमध्ये दंगलखोरांकडून 
सैनिकांना घेरण्याचा प्रयत्न
       काश्मीरच्या बांडीपोर येथे दंगलखोरांनी सैनिकांच्या वाहनांना घेरून दगडफेक केल्यावर सैनिकांनी हवेत गोळीबार केला. या वेळी पोलीस आणि केंद्रीय राखीव पोलीस दल येथे पोचल्यावर त्यांनी दंगलखोरांवर अश्रूधुराचे गोळे फोडले आणि पॅलेट गनचा वापर केला. त्यानंतर दंगलखोर पळून गेले. (आणखी किती दिवस सैनिकांना अशा घटनांना सामोरे जावे लागणार आणि त्यात घायाळ व्हावे लागणार ? - संपादक)

पाकला आतंकवादी देश घोषित करण्याच्या मागणीवरील याचिकेला अमेरिकेत विक्रमी प्रतिसाद !

पाकला आतंकवादी देश घोषित करण्यासाठी भारत नव्हे, 
तर अमेरिकेतील खासदार प्रयत्न करतात आणि त्याला तेथील 
लक्षावधी लोक समर्थन देतात, हे भारतीय लोकप्रतिनिधींना लज्जास्पद !
       वॉशिंग्टन - पाकिस्तानला आतंकवादी देश म्हणून अधिकृतपणे घोषित करावे, या मागणीसाठी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे निवासस्थान असणार्‍या व्हाईट हाऊसला पाठवण्यात आलेल्या अमेरिकेतील खासदारांच्या याचिकेवर शेवटच्या दिवशी ५० सहस्र स्वाक्षर्‍या झाल्या. आतापर्यंत त्यावर एकूण ६ लाख ६५ सहस्र ७६९ जणांनी स्वाक्षरी केली असून अमेरिकेतील ही विक्रमी आणि सर्वाधिक लोकप्रिय याचिका ठरली आहे. व्हाईट हाऊसला प्राप्त झालेल्या यापूर्वीच्या याचिकेवर केवळ साडेतीन लाख जणांनी स्वाक्षरी केली होती. याविषयी व्हाईट हाऊसकडून काहीही प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आलेली नाही. एखाद्या याचिकेवर चर्चा घडवण्यासाठी त्यावर किमान एक लाख जणांच्या स्वाक्षर्‍या असणे आवश्यक असते. त्यामुळे साधारण ७ लाखांच्या जवळपास स्वाक्षर्‍या झालेल्या या याचिकेवर अमेरिकन सरकार चर्चा करण्याची शक्यता नाकारता येत नाही.

(म्हणे) 'आरोपांची राळ उडवून संभ्रमाचे वातावरण करण्याचे सनातन संस्थेचे प्रयत्न !'

अंनिसच्या कृष्णात कोरे यांचा थयथयाट ! 
     पुणे, ५ ऑक्टोबर - आरोपांची राळ उडवून संभ्रमाचे वातावरण तयार करून मूळ विषयापासून लक्ष विचलित करण्याचे सनातन संस्थेचे प्रयत्न चालू आहेत. (चोराच्या उलट्या बोंबा ! असे जर आहे, तर सनातन संस्थेने केलेल्या आरोपांविषयी अंनिसच्या एकाही पदाधिकार्‍याने खुलासा का केला नाही ? यावरूनच अंनिसवालेच दिशाभूल करत आहेत, असे म्हटल्यास चुकीचे होणार नाही. याचसमवेत अंनिसवाल्यांनीच डॉ. दाभोलकर हत्येप्रकरणी अन्वेषण यंत्रणांचे लक्ष विचलित केले आहे, हेही तितकेच सत्य ! - संपादक) यापूर्वीही सनातनने आरोपांची राळ उडवून देऊन संभ्रमाचे वातावरण निर्माण केले आहे. मूळ विषयावरून लक्ष भरकटवण्याचा प्रयत्न करणे, ही या संस्थेची कार्यपद्धती आहे, असे सनातनद्वेषी प्रतिपादन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कृष्णात कोरे यांनी केले. (सनातनने केलेले आरोप सत्य असून त्याविषयी खुलासा करण्याऐवजी सनातनवर टीका करण्यात धन्यता मांडणारे कृष्णात कोरे ! तसेच आतापर्यंत अंनिसवाल्यांनी मूळ विषयावरून कायम लक्ष भरकटवत दिशाभूल केली असून तीच अंनिसची कार्यपद्धती आहे. - संपादक) पुणे येथे सनातन संस्थेने नुकत्याच घेतलेल्या पत्रकार परिषदेत अंनिसचा आर्थिक घोटाळ्याचा कारभार चव्हाट्यावर आणून प्रशासक नेमण्याची मागणी केली होती. त्या पार्श्‍वभूमीवर कोरे यांनी सनातन संस्थेने केलेले आरोप चुकीचे आहे, असे सांगत सनातनवर टीका केली. 

पोलिसांच्या मारहाणीमुळे दादरी हत्याकांड प्रकरणातील संशयित आरोपी रविन सिसोदिया याचा कारागृहात मृत्यू !

कारागृहात आरोपींना मारहाण केली जाते, हे देशातील 
जनतेला नवे नाही आणि याचा अनुभव सनातनच्या साधकांनीही 
घेतला आहे; मात्र अजूनही लोकशाही अशा घटना रोखू शकलेली नाही ! 
     नवी देहली - दादरी येथील अखलाक याच्या हत्येच्या प्रकरणातील संशयित आरोपी रविन सिसोदिया (वय २१ वर्षे) याचा ४ ऑक्टोबरला कारागृहात मृत्यू झाला. रविन आणि त्याच्या ३ सहकार्‍यांना पोलिसांनी कारागृहात मारहाण केल्याचा आरोप गावकर्‍यांनी केला आहे. (या प्रकरणी उत्तरदायी असणार्‍यांवर कारवाई करून त्यांना कठोर शिक्षा होण्यासाठी सरकारने प्रयत्न करायला हवेत ! - संपादक) मारहाण केल्यानंतर रविन याला रुग्णालयात दाखल केले होते. उपचार चालू असतांना त्याचा मृत्यू झाला. यामुळे रविन रहात असलेल्या बिसारा गावात तणावाचे वातावरण असून तिथे पोलिसांचा मोठा फौजपाटा तैनात करण्यात आला आहे. मागील वर्षी सप्टेंबर मासात दादरीमध्ये अखलाक यांचा गोमांस खाल्ल्याच्या कारणावरून जमावाने केलेल्या मारहाणीत मृत्यू झाला होता. 

राज्य शासनाने पत्रकार आक्रमणविरोधी कायदा लवकरात लवकर करावा !

पुणे श्रमिक पत्रकार संघाची 
जिल्हाधिकार्‍यांकडे निवेदनाद्वारे मागणी
       पुणे, ५ ऑक्टोबर - राज्यात पत्रकारांवर होणारे वाढती आक्रमणे लक्षात घेता तातडीने पत्रकार आक्रमणविरोधी कायदा करण्याची मागणी पुणे श्रमिक पत्रकार संघाने केली आहे. याविषयी संघाचे अध्यक्ष गजेंद्र बडे यांनी ३ ऑक्टोबर या दिवशी जिल्हाधिकारी सौरभ राव यांना निवेदन दिले. या वेळी सरचिटणीस अजय कांबळे, अन्य कार्यकारिणी सदस्य आणि पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
       उपस्थित सदस्य आणि पत्रकारांनी असंतोष करतांना म्हटले की, गेल्या काही दिवसांत पत्रकारांवर आक्रमणे होण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे पत्रकारांना संरक्षण देण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी राज्य शासनाने प्रभावी पत्रकार आक्रमणविरोधी कायदा करण्याची मागणी पत्रकारांकडून केली जात आहे; परंतु आधीच्या शासनाप्रमाणे आताच्या सरकारकडूनही असा कायदा केला जात नाही. या वेळी सौरभ राव यांनी पत्रकार संघाचे निवेदन राज्य सरकारला पाठवण्यात येणार आहे, असे सांगितले.

१०० आतंकवादी भारतात घुसण्याच्या सिद्धतेत !

आतंकवादी भारतात घुसण्यापूर्वीच 
आता भारतीय सैन्याला पाकव्याप्त 
काश्मीरमध्ये घुसण्याचा आदेश देण्यात यावा !
        नवी देहली - गुप्तचरांनी दिलेल्या माहितीनुसार सुमारे १०० आतंकवादी भारतात घुसण्याच्या सिद्धतेत आहेत. पाक सैन्य त्यांना भारतात घुसवण्यासाठी योग्य संधीची वाट पहात आहे.

आज ब्राह्मणद्वेष म्हणजेच 'पुरोगामित्व' हे चुकीचे समीकरण खोडून काढायला हवे ! - अविनाश धर्माधिकारी

     पुणे, ५ ऑक्टोबर (वार्ता.) - ज्ञान आणि साधना करून ईश्‍वरापर्यंत पोचू शकतो म्हणजेच ज्याचा प्रवास सोहमकडे चालू असतो, तो ब्राह्मण ! आज ब्राह्मणद्वेष म्हणजेच पुरोगामित्व, असे चुकीचे समीकरण झाले असून ते खोडून काढायला हवे, असे प्रतिपादन माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांनी केले. येथील टिळक स्मारक सभागृहात ४ ऑक्टोबर या दिवशी ब्राह्मण जागृती सेवा संघाच्या द्वितीय वर्धापनदिन सोहळ्याच्या कार्यक्रमात ते बोलत होते. 

प्रतापगडाच्या पायथ्याशी ३५८ वा शिवप्रतापदिन साजरा करण्याचा शिवप्रतापभूमी मुक्ती आंदोलनाचा निर्णय

     सांगली, ५ ऑक्टोबर (वार्ता.) - हिंदवी स्वराज्यावर चाल करून आलेल्या अफझलखानाचा प्रतापगडाच्या पायथ्याशी छत्रपती शिवाजी महाराज यांनी कोथळा बाहेर काढला, तो दिवस म्हणजे मार्गशीर्ष शुद्ध सप्तमी होय. यंदा ६ डिसेंबर २०१६ या दिवशी या दिवसाला ३५८ वर्षे पूर्ण होत आहेत. त्यामुळे यंदाच्या वर्षी ६ डिसेंबर या दिवशी प्रतापगडाच्या पायथ्याशी ३५८ वा शिवप्रतापदिन साजरा करण्याचा निर्णय शिवप्रतापभूमी मुक्ती आंदोलनाच्या वतीने घेण्यात आलेला आहे, अशी माहिती शिवप्रतापभूमी मुक्ती आंदोलनाचे निमंत्रक माजी आमदार श्री. नितीन शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

मीरा रोड येथे २०० पोलिसांची ७ खोट्या कॉल सेंटर्सवर कारवाई

७०० हून अधिक जणांना कह्यात
        ठाणे - मीरा रोड येथील ७ खोट्या कॉल सेंटर्सवर रात्री पोलिसांनी केलेल्या कारवाईत ७०० हून अधिक जणांना कह्यात घेतले आहे. ठाणे गुन्हे शाखेच्या २०० पोलिसांच्या पथकाने ही कारवाई केली. रॉयल कॉलेज शेजारील डेल्टा बिल्डिंगमधून या सर्वांना कह्यात घेण्यात आले. पोलिसांनी एकूण तीन कॉल सेंटर्सवर कारवाई केली. देशात कॉल सेंटरवर प्रथमच एवढी मोठी कारवाई झाली आहे.
        या कॉल सेंटर्सद्वारे परदेशातील लोकांना दूरभाष करून टॅक्स रिव्हिजनच्या नावाने गंडवले जायचे. पॉलिसीच्या नावाने लोकांच्या खात्याची गोपनीय माहिती गोळा करून त्यातून रक्कम चोरण्याचे काम या कॉल सेंटर्समधून चालत होते.

लष्करी कारवाईचे पुरावे मागणार्‍यांनो, पाकिस्तानचे नागरिकत्व घ्या ! - केंद्रीय मंत्री उमा भारती

अशी सडेतोड भूमिका केंद्र सरकार घेईल का ? 
     पुणे, ५ ऑक्टोबर - उरी आक्रमणानंतर भारतीय लष्कराने सीमारेषा ओलांडून पाकव्याप्त काश्मीरमध्ये 'सर्जिकल स्ट्राईक'द्वारे आतंकवाद्यांचा खात्मा केला. या कारवाईविषयी कोणाला पुरावे हवे असतील, तर त्यांनी पाकिस्तानचे नागरिकत्व स्वीकारावे, असा सडेतोड प्रतिपादन केंद्रीय जलसंपदा आणि गंगानदी विकास खात्याच्या मंत्री उमा भारती यांनी केले. 'ग्रीन थंब' संस्थेच्या वतीने येथील खडकवासला धरणातील गाळ काढून धरणाच्या काठी वनीकरण करण्यात आले आहे. या उपक्रमाची पाहणी करण्यासाठी उमा भारती आल्या होत्या. आप आणि काँग्रेस यांनी भाजप सरकारने खरेच 'सर्जिकल स्ट्राईक' केले का, अशी शंका उपस्थित करत त्याविषयी पुरावे मागितले होते. त्या पार्श्‍वभूमीवर त्या पत्रकारांशी बोलत होत्या.

(म्हणे) 'माझ्याकडून खूप मोठी चूक झाली असून मला माफी नको, शिक्षा हवी !'

अभिनेता ओम पुरी यांना झाली उपरती ! 
     मुंबई, ५ ऑक्टोबर - माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आणि त्यासाठी मला माफी नको, शिक्षा हवी आहे. लष्कराने माझे 'कोर्ट मार्शल' करावे, असे विधान अभिनेता ओम पुरी यांनी केले आहे. 'बलीदान देणार्‍या सैनिकांना आम्ही सैन्यात जायला सांगितले होते का ? त्यांना कुणी बळजोरी केली होती का ?', असे अपमानजनक वक्तव्य त्यांनी यापूर्वी केले होते. प्रकरण अंगलट आल्यावर त्यांनी पुन्हा स्वतःचे विधान मागे घेतले आहे. (असे असले, तरी सरकारने ओम पुरी यांच्यावर कठोर कारवाई करावी, म्हणजे देशद्रोही विधाने करण्याचे धाडस होणार नाही ! - संपादक) 

देशप्रेमींना फाशी आणि ३० लाख हिंदूंची हत्या या सर्वांना गांधीच उत्तरदायी ! - ठाकूर अजयसिंह सेंगर, अध्यक्ष, महाराणा प्रताप बटालियन

महाराणा प्रताप बटालियनकडून गांधी जयंती 'काळा दिवस' म्हणून साजरी ! 
कार्यक्रमात सहभागी कार्यकर्ते आणि १. ठाकूर अजयसिंह सेंगर
     नवी मुंबई - वर्ष २००८ पासून 'महाराणा प्रताप बटालियन'च्या वतीने गांधी जयंती हा दिवस निषेध म्हणून 'काळा दिवस' मानला जातो. भगतसिंह, राजगुरु, सुखदेव या देशप्रेमींना फासावर चढवण्याची मागणी इंग्रजांनी केली. त्याला गांधींनी अनुमती दिली होती. त्यामुळे या क्रांतीकारकांना फासावर जावे लागले. गांधींमुळे देशाची फाळणी झाली. त्या वेळी पाकमध्ये ३० लाख हिंदूंची हत्या करण्यात आली. या सगळ्याला गांधीच उत्तरदायी आहेत, असे प्रतिपादन महाराणा प्रताप बटालियनचे अध्यक्ष ठाकूर अजयसिंह सेंगर यांनी केले. येथील पृथ्वी हॉलमध्ये महाराणा प्रताप बटालियनद्वारे गांधी जयंती हा काळा दिवस म्हणून पाळण्यात आला. या वेळी झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमात गांधी यांच्या विरोधात घोषणाही देण्यात आल्या. या वेळी हिंदु राष्ट्र सेना, शिवसेना, बजरंग दल, विहिंप, लष्कर-ए-हिंद यांचेही कार्यकर्ते उपस्थित होते. 

(म्हणे) 'नरेंद्र-देवेंद्र' यांनी देश आणि राज्य यांचा बट्ट्याबोळ केला !

राष्ट्रवादी काँग्रेसने इतकी वर्षे काय केले, याविषयी सूज्ञ 
जनतेला सर्वकाही ठाऊक आहे, हे सुळे यांनी लक्षात घ्यावे ! 
     नगर, ५ ऑक्टोबर - मुख्यमंत्रीपद झेपत नसल्याने देवेंद्र फडणवीस यांची चिडचीड वाढली आहे. त्यांना आपण सुसंस्कृत समजत होतो; परंतु त्यांचे अंगावर धावून जाणे, सतत चढलेला पारा पाहून त्यांना एवढा राग का येतो, हे समजत नाही. पद झेपत नसेल, तर त्यांनी राजीनामा द्यावा आणि विरोधी पक्षनेता म्हणून काम करावे. देहलीत नरेंद्र आणि महाराष्ट्रात देवेंद्र या दोघांनी देश आणि महाराष्ट्र यांचा बट्ट्याबोळ केला, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सौ. सुप्रिया सुळे यांनी केला. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर आयोजित केलेल्या पक्ष मेळाव्यात त्या बोलत होत्या.

२५ सहस्रांहून अधिक शिवप्रेमींचा दौडीमध्ये सहभाग !

बेळगाव येथे दुर्गामाता दौड 
श्री दुर्गादौडीमध्ये सहभागी झालेले शिवप्रेमी
     बेळगाव, ५ ऑक्टोबर (वार्ता.) - श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आयोजित श्री दुर्गामाता दौडीला दोन दिवसांत वडगाव, भारतनगर, जुने बेळगाव परिसरात प्रचंड प्रतिसाद मिळाला. देशप्रेमाने प्रेरित झालेल्या २० ते २५ सहस्रांहून अधिक शिवप्रेमींनी दौडीमध्ये सहभागी होऊन 'जय भवानी, जय शिवाजी' असा जयजयकार केला. आकर्षक रांगोळ्या, विविध प्रकारची सजावट आणि महिलांचा लक्षणीय सहभाग यामुळे ही दौड लक्षवेधी आणि प्रेरणादायी ठरली. बसवेश्‍वर सर्कल येथील श्री दुर्गामाता मंदिर येथे सांगली येथील नाना बापट आणि नगरसेवक मासेकर यांच्या हस्ते आरती करून ध्वज चढवण्यात आला. प्रेरणा मंत्राने दौडीचा प्रारंभ झाला. 

सातारा येथे रणरागिणी शाखेच्या वतीने 'श्री दुर्गामाता दौडी'मध्ये धर्मध्वजाचे पूजन !

     
धर्मध्वजाचे पूजन करतांना रणरागिणी शाखेच्या कार्यकर्त्या
     सातारा, ५ ऑक्टोबर (वार्ता.) - नवरात्रोत्सवानिमित्त श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने शहरातील विविध ठिकाणी श्री दुर्गामाता दौडीचे आयोजन करण्यात आले आहे. २ ऑक्टोबर या दिवशी शाहूपुरी येथे आयोजित करण्यात आलेल्या श्री दुर्गामाता दौडीमधील धर्मध्वजाचे पूजन रणरागिणी शाखेच्या वतीने करण्यात आले. या वेळी रणरागिणी शाखेच्या १२ महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या. 

फुटीरतावादी नेत्या आसिया अंद्राबी यांना अटक !

     श्रीनगर - जम्मू-काश्मीर पोलिसांनी फुटीरतावादी संघटना 'दुख्तरान-ए-मिल्लत'च्या प्रमुख आसिया अंद्राबी (वय २२ वर्षे) यांना अटक केली आहे. पोलिसांनी सांगितले की, आसिया भूमिगत झाल्या होत्या आणि काश्मीरमधील सध्याच्या अशांततेत हिंसाचार घडवण्यासाठी कट रचत होत्या.

हिंदु विधीज्ञ परिषदेच्या कार्याचा जून, जुलै आणि ऑगस्ट २०१६ या तीन मासांतील (महिन्यांतील) आढावा

अधिवक्ता वीरेंद्र
इचलकरंजीकर
१. जून २०१६
१ अ. पत्रकार परिषदा
१. गोवा येथे आयोजित केलेल्या पंचम अखिल भारतीय हिंदू अधिवेशन आणि हिंदु संघटना यांविषयी माहिती देण्यासाठी मुंबई येथे ११ जूनला घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेला अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांनी संबोधित केले. 
२. मुंबई येथील प्रेस क्लबमध्ये सनातन संस्थेच्या वतीने १७ जूनला पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेत पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थानच्या व्यवस्थापन समितीमधील भ्रष्टाचार उघडकीस आणल्यामुळेच सनातनच्या साधकांचा छळ होत असल्याची भूमिका परखडपणे मांडण्यात आली. या वेळी मी आणि अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांनी पत्रकारांना संबोधित केले.

पोलिसांच्या संदर्भातील कटू अनुभव !

       सध्या सनातनचे साधक आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते यांना पोलिसांच्या शारीरिक आणि मानसिक छळाला सामोरे जावे लागत आहे. या अनुषंगाने विविध ठिकाणच्या पोलिसांविषयी सनातनचे साधक, हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते किंवा हिंदुत्वनिष्ठ यांना यापूर्वी पोलिसांच्या सतावणुकीविषयी आलेले अनुभव येथे प्रसिद्ध करत आहोत.
धर्मसंसदेला जाणार्‍या हिंदूंना 
अमानुष मारहाण करणारे पोलीस !
       उत्तरप्रदेशमधील सहारनपूर येथील देवबंद भागात असणार्‍या देवीकुंड येथे ७.९.२०१३ या दिवशी हिंदु धर्मसंसदेचे आयोजन करण्यात आले होते. पोलिसांनी या धर्मसंसदेला कायदा आणि सुव्यवस्थेचे कारण देत अनुमती नाकारली होती. एक दिवस आधीच पोलिसांनी काही संत आणि हिंदु नेते यांना अटक केली होती. ७.९.२०१३ या दिवशी देवीकुंड येथे कोणीही येऊ नये; म्हणून पोलिसांनी नाकाबंदी करत येथे मोठ्या प्रमाणात बंदोबस्त ठेवला होता. तरीही या दिवशी दुपारी काही सहस्र हिंदू धर्मसंसदेसाठी येथे मार्गावरून येत होते. त्या वेळी पोलिसांनी त्यांच्यावर अमानुष लाठीमार केला. यात अनेक जण घायाळ झाले, तर भाजप आणि विहिंप यांच्या पदाधिकार्‍यांना पोलिसांनी अटक केली.
पोलिसांविषयी चांगले आणि वाईट अनुभव असल्यास 
वाचकांनी नजीकच्या दैनिक कार्यालयात कळवावेत !

सत्तातुराणां न भयं न लज्जा !

     उत्तरप्रदेशमधील किसान यात्रेच्या कालावधीत काँग्रेसचे राष्ट्रीय उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर बूट फेकण्याचा प्रकार घडला. ते सीतापूरच्या रॅलीच्या कालावधीत उघड्या जीपमधून गर्दीला अभिवादन करत असतांना एकाने त्यांच्या दिशेने बूट भिरकवला; पण तो बूट गांधी यांना लागला नाही. राहुल यांच्यावर बूट फेकणार्‍या त्या व्यक्तीला पोलिसांनी कह्यात घेतले. यापूर्वीही राहुल गांधी यांनी बेंगळुरू येथील एका कार्यक्रमात युवकांना स्वच्छ भारत अभियानाविषयी विचारले असता, उपस्थित युवकांनी त्यांना उत्तर देऊन तोंडघशी पाडले होते.

मूलतत्त्व म्हणजे परमेश्‍वर आणि देवी-देवता ही त्याच्यापासून निर्माण झालेली विविध तत्त्वे असणे

श्री. राम होनप
     तत्त्व म्हणजे परमेश्‍वर. ते मूलतत्त्व आहे. कृष्णतत्त्व, देवीतत्त्व, गुरुतत्त्व, पंचतत्त्वे इत्यादी तत्त्वे परमेश्‍वराचीच निर्मिती आहेत, उदा. दुधाचे स्वरूप पालटले की, त्यापासून दही, ताक, लोणी, तूप, मिठाई इत्यादी बनते; परंतु या सगळ्यांचा मूळ स्त्रोत एकच आहे. नावे वेगवेगळी ठेवल्याने स्वरूप आणि त्याचे कार्य लक्षात येण्यास सुलभ होते. हाच नियम परमेश्‍वर आणि त्याने निर्मिलेली तत्त्वे यांविषयी लागू आहे. 
- श्री. राम होनप, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२७.७.२०१६)

शारदीय नवरात्र

      महिषासुराच्या नाशासाठी अवतार घेणार्‍या श्री दुर्गादेवीचा उत्सव म्हणजे नवरात्र ! जगात जेव्हा तामसी, आसुरी आणि क्रूर लोक प्रबळ होऊन सात्त्विक अन् धर्मनिष्ठ सज्जनांना छळतात, तेव्हा देवी धर्मसंस्थापनेकरता पुनःपुन्हा अवतार घेते. त्या देवतेचे हे व्रत आहे. घटस्थापना, मालाबंधन, अखंड दीपप्रज्वलन, देवीचे माहात्म्यपठण (चंडीपाठ), सप्तशतीपाठ, देवीभागवत, ब्रह्मांडपुराणातील ललितोपाख्यानाचे श्रवण, ललिता-पूजन, सरस्वतीपूजन, उपवास, जागरण इत्यादी कार्यक्रम करून क्षमता आणि सामर्थ्य यांनुसार नवरात्रमहोत्सव साजरा करावा. 
(अधिक माहितीसाठी वाचा सनातनचा ग्रंथ सण, धार्मिक उत्सव आणि व्रते)

देवीची पूजा कशी करावी ?

      देवीच्या कोणत्याही रूपाची पूजा करतांना तिला अनामिकेने, म्हणजेच करंगळीजवळच्या बोटाने गंध लावावे. देवीला हळद-कुंकू वहातांना आधी हळद अन् नंतर कुंकू, उजव्या हाताचा अंगठा आणि अनामिका यांच्या चिमटीत घेऊन देवीच्या चरणांवर वहावे. देवीच्या सर्व रूपांना फुले वहातांना ती नऊ किंवा नऊच्या पटीत आणि वर्तुळाकारात वहावीत. श्री दुर्गादेवीला मोगरा हे फूल वहावे. चंदन, मोगरा, केवडा, चंपा, चमेली, जाई, वाळा, रातराणी आणि अंबर या गंधांकडे देवीतत्त्व लवकर आकृष्ट होते. यामुळे या गंधांच्या उदबत्त्या देवीच्या उपासनेत वापरल्यास देवीतत्त्वाचा लाभ अधिक प्रमाणात होतो. 
(अधिक माहितीसाठी वाचा सनातनचा लघुग्रंथ देवीपूजनाचे शास्त्र)

देवीचे माहात्म्य !

सध्या चालू असलेल्या नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने...
कु. मधुरा भोसले
      देवीच्या उपासनेची परंपरा पुष्कळ पूर्वीपासून भारतात चालत आलेली आहे. देवीचे मूळ रूप निर्गुण असले, तरी तिच्या सगुण रूपाची उपासना करण्याची परंपरा भारतात प्रचलित आहे. कुलदेवी, ग्रामदेवी, शक्तीपीठ आदी रूपांमध्ये देवीच्या विविध सगुण रूपांची उपासना केली जाते. हिंदु संस्कृतीमध्ये जितके महत्त्व देवाला आहे, तितकेच देवीलाही आहे, हे विशेषत्वाने सांगावेसे वाटते. भारतात अन्य संप्रदायांप्रमाणेच शाक्त संप्रदायही कार्यरत आहे. पंचायतन पूजेमध्ये शिव, विष्णु, गणपति आणि सूर्य यांसमवेत देवीच्या पूजनाचेही विशेष महत्त्व आहे. उपासकांच्या हृदयात देवीला विशेष स्थान असल्यामुळेच प्रतीवर्षी नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहाने भारतभर साजरा केला जातो. 
काल या लेखाचा आपण पूर्वाध पाहिला. आज उतरार्ध पाहूया. 

राजे, एकदा पुन्हा येऊन भगवा फडकवा ।

कृतघ्न हिंदूंनो, नावापुरताच चालतो तुमचा गाजावाजा ।
विसरलात हिंदू छत्रपती तुमचा जाणता राजा ॥ १ ॥

भगवा आज शत्रूंना खुपतो ।
तरीही हिंदु दिवसरात्र झोपतो ॥ २ ॥

या भगव्यासाठीच झुकवल्यात धर्मद्रोह्यांच्या माना ।
आज तुमच्या स्वराज्यातच पाहिजे भगवा फडकवण्या परवाना ॥ ३ ॥
     हिंदु राष्ट्राची स्थापना स्वार्थी नेत्यांनी भरलेले राजकीय पक्ष नाही, तर सर्वस्वाचा त्याग करणारे साधकवृत्तीचे राष्ट्र आणि धर्म प्रेमीच करू शकतात. 
- श्री. रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ता, हिंदु जनजागृती समिती

घराला आग लागण्याच्या कठीण प्रसंगात भगवंताने पदोपदी साहाय्य केल्याची पुणे येथील कर्वे कुटुंबियांनी घेतलेली अनुभूती !

सौ. कल्याणी कर्वे
श्री. प्रवीण कर्वे
     हे श्रीकृष्णा, तुझी पदोपदी आठवण रहाण्यासाठी, प्रत्येक प्रसंगात आणि प्रत्येक क्षणी स्थिर रहाण्यासाठी तूच आमच्याकडून प्रयत्न करवून घेतलेस. ते तूच शब्दबद्ध करवून घे, अशी तुझ्या चरणी प्रार्थना आहे.
१. पुण्यात घेतलेल्या नवीन घराच्या मालकांना धनादेश देऊन श्री महालक्ष्मीदेवीचे दर्शन घेऊन कोल्हापूरहून पुण्याला परत येणे
     आम्ही पुण्यात घर विकत घेतलेे. या जागेच्या मालक एक वयोवृद्ध आजी आहेत. त्या कोल्हापूरला रहातात. त्यांना प्रवास करणे शक्य नाही. त्यांचे घर विकत घेतलेल्या व्यक्तीला भेटण्याची त्यांना उत्सुकता होती; म्हणून आम्हीच त्यांना भेटून धनादेश देण्यासाठी १४.२.२०१६ या दिवशी पहाटे पुण्याहून निघून कोल्हापूरला गेलो होतो. आजींना भेटून धनादेश दिल्यानंतर श्री महालक्ष्मीदेवीचे दर्शन घेऊन आम्ही परत निघालो आणि रात्री ८ वाजता पुण्याला घरी परत आलो.
२. घरी पोचताच वडिलांना समवेत घेऊन आहे त्या कपड्यांवर बारशाला जाणे
     प्रकृती अस्वास्थ्यामुळे माझे वडील २ दिवस आमच्याकडेच होते, तर प.पू. कर्वेगुरुजी ४ दिवस वास्तव्यास होते. रात्री पूजा झाल्यावर ते दुसरीकडे जाण्यासाठी निघाले. त्याच दिवशी एके ठिकाणी आम्हाला बारशाचे बोलावणे होते. प.पू. कर्वेगुरुजी निघाल्यानंतर तुम्ही कधी येणार ? आम्ही वाट पहात आहोत, असा बारशाच्या ठिकाणाहून निरोप आला. त्या वेळी माझे वडील मी घरीच थांबतो. तुम्ही जाऊन या, असे सांगत असूनही आम्ही त्यांंना समवेत घेऊन आहेत त्या कपड्यांवर जायला निघालो.
३. बारशाच्या ठिकाणी पोचल्यावर १० मिनिटांतच घराला आग लागल्याचा
निरोप येणे आणि जेवणाचे ताट तसेच ठेवून परत निघणे
     बारशाच्या ठिकाणी पोचल्यावर १० मिनिटांतच आमच्या शेजार्‍यांचा मला दूरभाषवरून निरोप आला, आहात तिथून तात्काळ घरी या. तुमच्या घराला आग लागली आहे. हा इतका अनपेक्षित धक्का होता की, मी काय ऐकत आहे ?, हे क्षणभर खरेच वाटले नाही.

प्रवासाला निघतांना लिंबाचे उपाय करूनच पुढचा प्रवास करा !

महर्षि देत असलेल्या आपत्कालीन सूचना 
महर्षींची शिकवण आणि कार्य ! 
(सद्गुरु) सौ. अंजली गाडगीळ

     सध्या आपत्काल चालू झाल्याने महर्षि आम्हाला नेहमी प्रवासाला आरंभ करण्यापूर्वी चार लिंबे गाडीच्या चाकांखाली ठेवायला सांगून नंतर नारळाने गाडीची दृष्ट काढायला सांगतात आणि त्यानंतर मला एक लिंबू डाव्या पायाने चिरडायला सांगून मगच प्रवासाला आरंभ करा, असे सांगतात. प्रत्येक वेळी आम्ही असेच उपाय करून प्रवासाला आरंभ करतो. डाव्या पावलाने लिंबू चिरडतांना जर का ते पायाखालून सटकले, तर महर्षींनी आम्हाला सांगितले आहे की, त्या दिवशी त्याच ठिकाणी रहायचे. पुढे प्रवासाला निघायचे नाही. आज असेच घडले. आज नवरात्रीच्या दुसर्‍या दिवशी, म्हणजे २.१०.२०१६ या दिवशी आम्ही होसूरहून कांचीपूरम्कडे जायला निघालो होतो. या वेळी गाडीसमोर पायाखाली लिंबू चिरडतांना माझ्या पायाखालून लिंबू सटकले. यावर आम्ही महर्षींना परत एकदा प्रार्थना करून लिंबाचे उपाय करू का ?, असे विचारले असता त्यांनी त्याला होकार दिला. पुन्हा एकदा तेच लिंबू प्रार्थना करून पायाखाली चिरडले असता ते व्यवस्थित फुटले. यानंतर महर्षींनी सांगितले, आता तुम्ही निघा; परंतु तुमच्या चालकाला सांगा की, आज त्याने एकदाही पुढे चाललेल्या कोणत्याही गाडीला वळसा घालून तिच्या पुढे जायचे नाही (ओव्हरटेक करायचे नाही). महर्षींची आज्ञा मानून आम्ही पुढच्या प्रवासाला आरंभ केला.
     यावरून लक्षात आले की, काळ कठीण असला, तरी महर्षि आपले कार्य थांबू देत नाहीत. त्यातही उपाय सांगून योग्य त्या वेळी योग्य ती काळजी घ्यायला सांगतात.

कधीही ना संपावी तुमच्या चरणांची आस ।

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त...
कु. शांभवी केळकर

कृष्णाच्या मनात कृष्णाच्या हृदयात ।
आहेत प.पू. डॉक्टर कणाकणांत ॥ १ ॥

ते साधक अनेक घडवती ।
कृष्णासम लळा लाविती ॥ २ ॥

कसेच करूनी कर्तेपण ना घेती ।
आम्हाला जिंकवूनी मात्र स्वतः हरती ॥ ३ ॥

संकटसमयी धावूनीया येती ।
वाटत नाही आता वाईट शक्तींची भीती ॥ ४ ॥

नाही त्यांची आमच्याकडून कुठलीच अपेक्षा ।
आम्हास लवकर ईश्‍वरप्राप्ती व्हावी ।
हीच आहे त्यांची इच्छा ॥ ५ ॥

करवूनी घेती साधना सुलभ अन् सोपी ।
मनुष्यजन्माचे सार्थक करविती ॥ ६ ॥

कितीही जरी आले कोणाला नकारात्मक विचार ।
सांगावा त्यांना माझ्या गुरूंचा महिमा अपार ॥ ७

लोकहो, प्रवचन घेण्यासाठी सनातन संस्था कोणतेही मूल्य आकारत नाही, हे लक्षात घ्या आणि अपप्रचारांपासून सावध रहा !

सद्गुरु (कु.) स्वाती खाडये
    नुकतेच एका गावात एका गणेशोत्सव मंडळाच्या वतीने एका सामाजिक कार्यकर्त्यांचे प्रवचन आयोजित करण्यात आले होते. त्या ठिकाणी सनातन संस्थेलाही प्रवचन घेण्यासाठी निमंत्रित करण्यात आले होते. या वेळी प्रवचन घेण्यासाठी येण्याजाण्याचा व्ययही साधकांनीच केला होता. या प्रवचनाला उपस्थित असणारी एक महिला सनातन संस्थेच्या वतीने अन्य एका शहरात घेण्यात आलेल्या एका प्रवचनासाठीही उपस्थित होत्या. त्या वेळी प्रवचन झाल्यावर या महिलेने स्वतःच्या एका नातेवाइकास सनातन संस्थेच्या लोकांनी आमच्या गावात झालेल्या कार्यक्रमासाठी २० सहस्र रुपये घेतले, असे सांगितले. प्रत्यक्षात सनातन संस्थेच्या साधकांनी तेथील प्रवचनासाठी असे कोणतेही मूल्य घेतले नव्हते आणि येण्याजाण्याचा व्ययही साधकांनीच केला होता.
     या संदर्भात सनातन संस्थेच्या साधकांनी गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांची भेट घेतली असता, त्या मंडळातील कार्यकर्त्यांनी आमच्याकडे प्रवचन घेण्यासाठी जे सामाजिक कार्यकर्ते आले होते, त्यांचा येण्याजाण्याचा व्यय, सभागृह भाडे, तसेच अन्य कारणांसाठी १५ ते २० सहस्र रुपये व्यय झाले. याविषयी आम्ही आमच्या कार्यकर्त्यांमध्ये अंतर्गत चर्चा केली होती. यात तुमचा (सनातनचा) काही संबंध नाही, असे स्पष्ट केले.
     लोकहो, सनातनच्या वतीने सर्व प्रकारची प्रवचने ही विनामूल्यच घेण्यात येतात.

साधकांनो, पुरुषी अहंकार जोपासून पुरुष आणि स्त्रिया यांचा सण, असा भेदभाव न करता सर्व सण उत्साहाने साजरे करून देवतांची कृपा संपादन करण्यासाठी प्रयत्न करा !

श्री. अमोल बधाले
      घटस्थापनेच्या दिवशी सर्व साधिकांनी सात्त्विक पोशाख परिधान केला होता; पण हाताच्या बोटावर मोजता येईल, एवढ्याच साधकांनी सात्त्विक पोशाख घातला होता. याविषयी काही साधकांना विचारले असता त्यांनी सांगितले, नवरात्र हा सण स्त्रियांचा असतो; म्हणून त्यांनी सात्त्विक पोशाख घातला आहे. यावर माझ्या मनात पुढील विचार आले.
१. नवरात्र हा सण देवीचा आहे; पण देवीची कृपा स्त्री-पुरुष दोघांवरही होते. देवी त्यात भेद करत नाही. मग आपण (पुरुषांनी) त्यात भेद का करावा ?
२. रामनवमी, श्रीकृष्णजयंती आदी सण देवांचे असतात; पण साधिका त्या दिवशी सात्त्विक पोशाख घालून येतात. त्यात त्या कसलाही भेदभाव करत नाहीत. मग पुरुषांनी असा भेदभाव का करावा ?
३. पुरुषांच्या विचाराचे कारण पुरुषांमधील पुरुषी अहं असावा, असे वाटले. 
- श्री. अमोल बधाले, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१.१०.२०१६) 

सेवेची तळमळ आणि क्षात्रवृत्ती असणारा ५५ टक्के आध्यात्मिक पातळीचा उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला पिंपरी (पुणे) येथील कु. स्वरूप श्रीनिवास दुधगांवकर (वय ८ वर्षे) !

कु. स्वरूप दुधगांवकर
      (कु. स्वरूप हा वर्ष २०१५ मध्ये उच्च स्वर्गलोकातून जन्माला आल्याचे घोषित केले होते. - संकलक) 
१. हसतमुख
     स्वरूपचा जन्म झाल्यापासून तो नेहमी हसतमुख आणि प्रसन्न असतो. 
२. समजूतदारपणा
    त्याने कधी अनावश्यक वस्तू मागितली, तर त्याला समजावल्यावर तो लगेच ऐकतो.
३. सेवेची तळमळ असणे
अ. स्वरूपला बालसंस्कारवर्गाला जायला पुष्कळ आवडते. वर्गापूर्वी मुलांना एकत्रित करणे, बसण्यासाठी आसने घालणे, अशा सेवा तो नियमितपणे करतो. 
आ. त्याला धर्मरथावर किंवा प्रदर्शनकक्षावर मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेत साधनेचा प्रसार करायला आणि सनातन पंचांग इतरांना देण्यास आवडते.

प.पू. भक्तराज महाराज यांच्या गाडीजवळ उपायांना बसल्यावर गाडीमध्ये प.पू. भक्तराज बाबांचा तोंडावळा दिसणे, त्यामुळे आध्यात्मिक उपायांची तीव्रता अधिक जाणवणे

     २२.६.२०१६ या दिवशी सकाळी प.पू. भक्तराज महाराज यांच्या (प.पू. बाबांच्या) गाडीजवळ उपायांना बसल्यावर नामजप भावपूर्ण होत होता. मी गाडीच्या आत पाहून नामजप करत होते. त्या वेळी गाडीच्या छताला आतून लावलेल्या आच्छादनात मला प.पू. बाबांचा तोंडवळा दिसत होता. ते माझ्याकडे पाहून हसत असल्याचेही मला दिसले. गाडीच्या भोवतीही त्यांचे अस्तित्व जाणवत होते. त्या वेळी प.पू. बाबांच्या अंगावर भगव्या रंगाची वस्त्रे आणि डोक्यावर भगव्या रंगाची टोपी होती. माझ्यावर होणार्‍या उपायांची तीव्रता अधिक होती आणि प्रार्थना-नामजप अधिकाधिक होत होता. मला सतत जांभया येऊन माझ्यावरील काळे आवरण नष्ट होत होते. या अनुभूतीचे चैतन्य दिवसभर टिकून होते.
- कु. शुभांगी आचार्य, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२८.६.२०१६)


साधनेने स्वतःत आमूलाग्र पालट घडवून आणणारा जळगाव येथील श्री. प्रणव नागणे (वय १८ वर्षे) !

श्री. प्रणव नागणे
     आश्‍विन शुक्ल पक्ष पंचमी (६.१०.२०१६) या दिवशी जळगाव येथील श्री. प्रणव नागणे याचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्याच्या कुटुंबियांना त्याची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये आणि त्याने साधनेला आरंभ केल्यानंतर त्याच्यात जाणवलेले पालट पुढे देत आहोत.
श्री. प्रणव नागणे याला वाढदिवसानिमित्त 
सनातन परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा !
१. जाणवलेली गुणवैशिष्ट्ये
१ अ. आसक्ती नसणे : मला हा पदार्थ खावासा वाटतो. मला तो पदार्थ खावासा वाटतो, असे प्रणव कधीही म्हणत नाही. मला आता नवीन कपडे पाहिजे, असेही तो कधीच म्हणत नाही. यावरून त्याला कसलीही आसक्ती नाही, हे लक्षात आले.
१ आ. नातेवाइकांपेक्षा सेवेला प्राधान्य देणे : प्रणव घरामध्येे आवश्यक तेवढाच वेळ असतो. त्याला नातेवाइकांकडे जाण्यास सांगितले, तर तिकडे सेवा असेल, तरच तो जातो. अन्य कोणत्याही कारणासाठी जात नाही. त्याला भ्रमणभाषवर नातेवाइकांशी अधिक वेळ बोलायला आवडत नाही. मी त्याला भ्रमणभाष केला आणि तो सेवेमध्ये व्यस्त असेल, तर ताई, मी तुला नंतर भ्रमणभाष करू का ?, असे तो प्रेमाने विचारतो.
१ इ. कर्तेपण देवाला अर्पण करणे : त्याच्या बोलण्यामध्ये पुष्कळ सहजता आहे. त्याने कोणतीही कृती चांगली केली की, आई त्याचे कौतुक करते; पण तो त्यावर काहीच बोलत नाही. तो कर्तेपण देवाला अर्पण करतो, हे लक्षात येेते.
१ ई. संतसेवेचा साधनेसाठी लाभ करून घेणे : प्रत्येक कृतीमध्ये देवाचे मन कसे जिंकू शकतो ?, हाच विचार तो करतो. पू. जाधवकाकांना गुडघ्यांचा त्रास आहे. त्यामुळे तो काही दिवस त्यांच्या पायांना मर्दन (मालीश) करण्याची सेवा करत होता. तेव्हा तो आपले मन त्यांच्याजवळ मोकळे करायचा.

लोकशाहीची व्याख्याच पालटली !

      लोकशाहीची व्याख्या आहे, जनतेचे, जनतेकडून, जनतेसाठी शासन !; परंतु सध्या यात पालट होऊन स्वार्थी नेत्यांचे, स्वार्थी नेत्यांसाठी, स्वार्थी नेत्यांकडून शासन ! असे झाल्याचे दिसून येत आहे
- पू. डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती

हिंदूंना अशी मागणी का करावी लागते ? अशा कार्यक्रमांवर प्रशासन स्वत: बंदी का घालत नाही ?

       पाकचा प्रसिद्ध गायक आतिफ असलम याचा गुरुग्राम (हरियाणा) येथे १५ ऑक्टोबर २०१६ ला होणारा गायनाचा कार्यक्रम रहित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम रहित करण्यासाठी हिंदु क्रांती दल या संघटनेने पोलिसांना निवेदन दिले होते.

फलक प्रसिद्धीकरता

हिंदूंनो, इसिसचे लक्ष्य 
हिंदूच आहेत, हे लक्षात घ्या !
      राज्यातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ नेते आणि उच्च न्यायालयाचे न्यायाधीश इसिसच्या हिटलिस्टवर होते, अशी माहिती केरळमध्ये अटक करण्यात आलेल्या इसिसच्या आतंकवाद्यांनी दिली.

हिंदू तेजा जाग रे !

Jago ! : Keral me RSS ke neta aur High Court ke Judge ISIS ke hitlist par.
kya ISIS se apani raksha karne me Hindu saksham hai ?
जागो ! : केरल में आरएस्एस् के नेता और उच्च न्यायालय के न्यायमूर्ति इसिस के हिटलिस्टपर.
क्या इसिस से अपनी रक्षा करने में हिन्दू सक्षम हैं ?
       अधर्माच्या विरोधात सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती देत असलेला लढा स्पृहणीय आहे ! 
- प.पू. मोहनबुवा रामदासी, सज्जनगड
       प्रवाहाच्या बरोबर वहाणारे मुडदे असतात. त्या प्रवाहात स्वतःची दिशा ठरवणारे जिवंत असतात !
- डॉ. सच्चिदानंद शेवडे, राष्ट्रीय प्रवचनकार आणि साहित्यिक, डोंबिवली, ठाणे.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले
हिंदु राष्ट्राची स्थापना हे शब्द आता 
सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती 
समिती यांचे धृवपद झाले आहे !
       कवितेत धृवपद असते. प्रत्येक कडव्यानंतर ते म्हणायचे असते. त्याप्रमाणे आता हिंदु राष्ट्राची स्थापना (सनातन धर्म राज्याची स्थापना) हे शब्द आता सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांचे धृवपद झाले आहेत. राष्ट्र आणि धर्म यांच्याशी संबंधित काही प्रश्‍न असला, तर सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती त्याचे उत्तर म्हणून सांगतात, हिंदु राष्ट्राची स्थापना हेच त्या प्रश्‍नाचे उत्तर आहे !
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले

बोधचित्र

॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥
या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो.
- प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज
सनातनचे श्रद्धास्थान
इतरांकडे बघण्याचा दृष्टीकोन
१. तुम्ही माझ्याकडे ज्या भावनेने पहाता, त्याच भावनेने मी तुमच्याकडे पहातो.
२. आपल्याकरिता कुणी नाही, आपण सर्वांकरिता आहोत.
३. दरिद्रका मुंह नहीं देखता । गरीबका साथ नहीं देता । लखपतीके घर नहीं जाता । धनवानके घर रहता हूं ।
भावार्थ :
दरिद्र, गरीब हे शब्द नाम न घेणार्‍याच्या संदर्भातील आहेत. लखपती हा मायेसंबंधातील, तर धनवान हा नाम घेणार्‍या साधकाला उद्देशून आहे.
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.)

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

परमेश्‍वरावर श्रद्धा ठेवा !
एखादी सुसंधी हातातून निसटली, तर परमेश्‍वरावर श्रद्धा ठेवून 
याची निश्‍चिती बाळगा की, याहीपेक्षा चांगली संधी मला मिळणार आहे. 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

पाकप्रेमींना हाकला !

संपादकीय 
      काही मासांपूर्वी जेएन्यूच्या निमित्ताने देशभर वहालेले देशविरोधी वारे नुकत्याच झालेल्या सर्जिकल स्ट्राईक नंतरच्या घटनांतून पुन्हा एकदा वहायला लागले आहेत. पाकच्या सततच्या कुरापतींना प्रत्युत्तर म्हणून भारतीय सैन्याने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून सर्जिकल स्ट्राईक केले. त्याचे जगभरातून कौतुक झाले. तथापि आपल्याकडील काही मंडळींकडून त्याविषयी पुरावे मागण्याचे उद्योग सध्या चालू आहेत, तर काही जण पाक कलाकारांची पाठराखण करत आहेत. स्पष्ट सांगायचे, तर काही जण प्रत्यक्ष, तर काही जण अप्रत्यक्षपणे पाकची भाषा बोलत आहेत. भारताच्या बर्बादीच्या घोषणा देणारा उमर खलीद, देशद्रोहाचे आरोप असणारा कन्हैयाकुमार, जिहादी आतंकवादी याकूब मेमनला फाशी दिली; म्हणून निदर्शने करणारा रोहित वेमुल्ला आदींचे समर्थन करणे आणि सर्जिकल स्ट्राईकचे पुरावे मागणे, यांमागील वृत्ती एकच ! ज्यांनी ज्यांनी वरील घटनांचे समर्थन करत त्यांची निलाजरी पाठराखण केली, तीच वृत्ती आज सर्जिकल स्ट्राईकचे पुरावे मागत आहे, याला योगायोग कसे म्हणणार ?
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn