Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

नवरात्रोत्सव (आज पाचवा दिवस)

सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके ।
शरण्ये त्र्यम्बके गौरि नारायणि नमोऽस्तुते ॥
        एका मतानुसार नवरात्रीतील पहिले तीन दिवस तमोगुण कमी करण्यासाठी तमोगुणी महाकालीची, पुढील तीन दिवस रजोगुण वाढवण्यासाठी रजोगुणी महालक्ष्मीची आणि शेवटचे तीन दिवस साधना तीव्र होण्यासाठी सत्त्वगुणी महासरस्वतीची पूजा करतात.
(संदर्भ : सनातनचा ग्रंथ शक्ती)
नवरात्र विषयक माहितीसाठी संकेतस्थळावरील मार्गिका
https://www.sanatan.org/mr/navratri

जिहादी आतंकवाद्यांना संपवण्यासाठी ६ महिने द्या ! - सैन्याची सरकारकडे मागणी

  • भारतीय सरकारनेच स्वतःहून सैन्याला असे सांगायला हवे होते की, तुम्ही ६ महिन्यांत जिहादी आतंकवाद संपवा; मात्र आता सैन्य मागणी करत आहे, तर सरकारने जनतेच्या सुरक्षेसाठी आणि भारताच्या सर्वांगीण विकासासाठी ही अनुमती द्यायला हवी, अशीच जनतेची इच्छा आहे !
  • शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी काही दशकांपूर्वीच म्हटले होते की, माझ्या हातात काश्मीर दिल्यास तेथील समस्या ६ महिन्यांत संपवतो ! आज सैन्यही काही प्रमाणात तसेच म्हणू लागले आहे !
  • सैन्याला अशी मागणी करावी लागणे, हे सरकारला लज्जास्पद !
  • अधून-मधून आक्रमणे करून आतंकवाद्यांना संपवता येणार नाही ! - सैन्याचे सुतोवाच
        नवी देहली - उरी येथील सैन्याच्या मुख्यालयावर झालेल्या आक्रमणानंतर भारतीय सैन्याने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून केलेल्या सर्जिकल स्ट्राईकमधून पाक अद्याप सावरलेला नाही. आता सैन्याने पाकव्याप्त काश्मीरमधील जिहादी आतंकवाद पूर्णपणे नष्ट करण्यासाठी योजना आखली आहे. सैन्याने सरकारकडे येथील आतंकवाद्यांची ठिकाणे आणि आतंकवादी यांना संपवण्यासाठी ६ महिने देण्याची मागणी केली आहे.
१. सैन्याच्या एका वरिष्ठ अधिकार्‍याने दिलेल्या माहितीनुसार प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या दुसर्‍या बाजूस सर्जिकल स्ट्राईकनंतर अधिकार्‍यांनी म्हटले की, अधून-मधून आक्रमणे करून आतंकवाद्यांना संपवता येणार नाही. एकाच वेळी मोठी कारवाई करण्याची आवश्यकता आहे.

पाकमध्ये लपलेल्या आतंकवाद्यांवर कारवाई करण्यासाठी सैन्याची योजना !

       नवी देहली - सर्जिकल स्ट्राईकनंतर पाकव्याप्त काश्मीरमधील जिहादी आतंकवाद्यांनी प्रशिक्षणकेंद्रातून पळ काढला असून ते पाकच्या आतील भागात लपले आहेत. त्यांना शोधून त्याचा नाश करण्यासाठी भारतीय सैन्याने एक योजना आखली आहे. आम्ही त्यांच्यापर्यंत पोचण्यासाठी नेटवर्क बनवले आहे, असे एका सैन्याधिकार्‍याने सांगितले. यासाठी सरकारकडून अनुमतीची आवश्यकता आहे. ती मिळाल्यास ही योजना प्रत्यक्षात आणू शकतो, असेही ते म्हणाले.
       एका अधिकार्‍याने दिलेल्या माहितीनुसार भारतीय सुरक्षादल वर्ष १९७० पासून अशी कारवाई करण्यास सिद्ध आहे; मात्र पूर्वीच्या शासनांनी तशी इच्छाशक्ती न दाखवल्याने ती कधीही प्रत्यक्षात उतरवता आली नाही. (भारतात आतंकवाद पसरण्यासाठी यापूर्वीचे राजकारणी अधिक उत्तरदायी नव्हेत का ? सरकारने अशांवर खटले चालवून त्यांना शिक्षा करायला हवी ! - संपादक) ३ वर्षांपूर्वी आतंकवादी दाऊद इब्राहीम यालाही ठार मारण्यासाठी योजना आखली होती; मात्र ऐनवेळी ती रहित करावी लागली होते. (यासाठी कोणत्या राजकीय नेत्याने दबाव आणला, याचा शोध घेऊन त्याचे नाव उघड करायला हवे ! - संपादक) इस्रायल त्याच्या शत्रूंना ठार मारण्यासाठी अशा योजना राबवत असतो.

सर्जिकल स्ट्राईकचे पुरावे मागणारे अरविंद केजरीवाल ठरले पाकमध्ये हिरो !

  • अमेरिकेने ओसामा बीन लादेन याला ठार केले, तेव्हा एकाही आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमाने किंवा कोणत्याही राजकीय नेत्याने त्याचे पुरावे मागितले नव्हते आणि अमेरिकेनेही ते अद्याप दिलेले नाहीत; मग भारताने तरी ते का द्यावेत ?
  • आम आदमी पार्टी नव्हे, तर पाकिस्तानी आदमी पार्टीचे अरविंद केजरीवाल !
        नवी देहली - भारताने केलेल्या सर्जिकल स्ट्राईकचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पुरावा मागणारे आम आदमी पक्षाचे देहली सरकारचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे पाकमध्ये कौतुक केले जात आहे. पाकच्या प्रसारमाध्यमांकडून केजरीवाल यांच्या या संदर्भातील ध्वनीचित्रफितीचा त्यासाठी वापर करण्यात येत आहे.
        केजरीवाल यांनी त्यांच्या २ मिनिटे ५२ सेकंदांच्या या ध्वनीचित्रफीतीत प्रथम मोदी यांचे कौतुक केले आहे. नंतर सर्जिकल स्ट्राइकचे पुरावे पाकला द्यावे, असे म्हटले आहे. पाक अनेक आंतरराष्ट्रीय स्तरावरील पत्रकारांना प्रत्यक्ष घटनास्थळी नेत असून, तेथे काही घडलेच नाही, असे सांगत आहे. त्यानंतर या पत्रकारांनीही तशाच बातम्या दिल्या आहेत. त्यामुळे भारताने पुरावे देणे आवश्यक असल्याचे केजरीवाल यांनी यात म्हटले आहे. या मागणीमुळेच पाकचे फावले आहे. पाककडून आधीच असा स्ट्राईक झालाच नसल्याचा दावा केला जात असतांना केजरीवाल यांच्या या विधानामुळे त्याला आणखी आधार मिळाला आहे. भाजपने केजरीवाल यांच्यावर टीका केली आहे. केजरीवाल यांचे विधान पाकच्या बाजूचे असल्याचे भाजपने म्हटले आहे.

(म्हणे) बलीदान देणार्‍या सैनिकांना आम्ही सैन्यात जायला सांगितले होते का ? - ओम पुरी

देशाचे रक्षण करणार्‍या सैनिकांमुळेच 
आपण जिवंत आहोत, हे ओम पुरी 
यांच्यासारख्या कृतघ्न कलाकारांनी जाणावे !
        मुंबई - बलीदान देणार्‍या सैनिकांना आम्ही सैन्यात जायला सांगितले होते का ? त्यांना कुणी बळजोरी केली होती का ?, असे अपमानजनक विधान अभिनेता ओम पुरी यांनी केले आहे. त्यामुळे त्यांच्यावर सामाजिक संकेतस्थळांवरून टीका केली जात आहे. एका वृत्तवाहिनीवरील चर्चेत ते बोलत होते. या विधानावरून ओम पुरी यांच्या विरोधात मुंबईतील अंधेरी येथील पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट करण्यात आली आहे.
ओम पुरी पुढे म्हणाले,
१. भारतात २२ कोटी मुसलमान रहातात. त्यांचे नातलग पाकिस्तानात आहेत आणि पाकिस्तानी नागरिकांचे नातलग भारतात आहेत. तुम्ही त्यांना कशासाठी भडकवता ? (कोण भडकवत आहे, हे भारतातील सूज्ञ जनतेला चांगले ठाऊक आहे. त्याविषयी ओम पुरी यांना सांगायला नको ! - संपादक) भारत आणि पाक यांना इस्रायल अन् पॅलेस्टाइन बनवू नका.

राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाचे संकेतस्थळ पाकिस्तान्यांकडून हॅक

पाकिस्तानच्या सायबर चाचेगिरीला केंद्र सरकार जशास तसे उत्तर केव्हा देणार ?
संकेतस्थळ उघडल्यावर पाकिस्तानी राष्ट्रगीत चालू
       पुणे, ४ ऑक्टोबर - राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाच्या (एन्जीटी) संकेतस्थळावर ३ ऑक्टोबर या दिवशी हॅकर्सने आक्रमण केले. (यावरून केंद्र शासनाची संकेतस्थळे अद्ययावत प्रणालीने सुरक्षित नाहीत. त्यावर तात्काळ उपाययोजना करणार का ? - संपादक) संकेतस्थळ उघडल्यानंतर त्यावर पाकिस्तानचे राष्ट्रगीत वाजत होते. या हॅकर्सच्या गटाने स्वत:चे नाव डी४आरके ४एनजी३१ असे लिहिले असून निष्पाप काश्मिरी लोकांच्या हत्यांच्या विरोधातील हे सायबर युद्ध आहे, अशा आशयाचा मजकूरही होता. या हॅकर्सनी संकेतस्थळावर आम्ही अजिंक्य आहोत. तुम्ही काश्मिरातील निष्पाप लोकांना मारता आणि देशाचे रक्षक म्हणवता. तुम्ही सीमेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन करून त्याला सर्जिकल स्ट्राईक म्हणता. (चोरांच्या उलट्या बोंबा ! - संपादक) आता सायबर युद्धाचे चटके सोसा, असेही लिहिले होते.मुंबईवर आतंकवाद्यांकडून हवाई आक्रमणाची शक्यता !

मुंबईवर असणारी आतंकवादाची टांगती 
तलवार दूर करण्यासाठी शासनाने कठोर पावले उचलावीत !
      मुंबई - पाकिस्तानी आतंकवादी दिवाळीच्या आधी मुंबईवर हवाई आक्रमण करू शकतात, अशी शक्यता मुंबई पोलिसांनी वर्तवली आहे. भारतीय लष्कराने केलेल्या सर्जिकल स्ट्राईकनंतर देशभरात अतिदक्षतेची चेतावणी देण्यात आली आहे. या पार्श्‍वभूमीवर मुंबई पोलिसांनी शहरातील सुरक्षेत मोठी वाढ केली आहे. देशात पाकिस्तानी आतंकवादी घुसले असल्याचाही संशय आहे. परिणामी ते पॅराग्लायडर, रिमोट कंट्रोल्ड मायक्रोलाईट एअर क्राफ्ट, ड्रोन किंवा हवाई क्षेपणास्त्रांच्या माध्यमातून मुंबईवर हवाई आक्रमणे करू शकतात. मुंबईसह परिसरात २ ऑक्टोबर ते ३१ ऑक्टोबर या काळात पॅराग्लायडर, रिमोट कंट्रोल्ड मायक्रोलाईट एअर क्राफ्ट, ड्रोन यांवर बंदी घालण्यात आली आहे.

(म्हणे) डरपोक भारतियांना ठार करा !

भारतासमवेतच्या क्रिकेट सामन्याच्या वेळी माकडचाळे 
करणार्‍या मियाँदादची ही सवय अद्याप गेलेली नाही, हे या विधानातून लक्षात येते !
माजी क्रिकेटपटू आणि दाऊद इब्राहिमचा नातेवाईक जावेद मियाँदाद याची काव काव !
     कराची - पाकचा माजी क्रिकेटपटू तथा आतंकवादी दाऊद इब्राहिमचा नातेवाईक जावेद मियाँदाद याने भारतियांना घाबरट संबोधत त्यांना ठारच मारायला हवे, असे म्हटले आहे. त्यांना जशास तसे उत्तर दिले, तर ते घाबरतात, असे त्याने म्हटले आहे. (पाकशी क्रिकेट खेळून मैत्री करण्याचा प्रयत्न करणार्‍या पाकप्रेमी भारतियांना चपराक ! - संपादक) भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष आणि भाजपचे खासदार अनुराग ठाकूर यांनी मियाँदाद यांच्या विधानावर प्रतिक्रिया देतांना म्हटले की, पाक आतापर्यंच्या युद्धातील पराभवाने सावरलेला नाही. तसेच विश्‍वचषक क्रिकेट स्पर्धेत पाक भारताला एकदाही हरवू शकलेला नसतांना मियाँदाद युद्धात भारताला हरवण्याच्या गोष्टी करत आहेत.

दसरा आणि दिवाळी या सणांना चीन-निर्मित वस्तूंची विक्री न करण्याचा हिसार (हरियाणा) येथील दुकानदारांचा निर्धार !

      हिसार (हरियाणा) - दसरा आणि दिवाळी या सणांच्या दिवशी चीन-निर्मित वस्तूंची विक्री न करण्याचा निर्धार हिसार (हरियाणा) येथील ५० हून अधिक दुकानदारांनी केला आहे. (चिनी वस्तू न विकण्याचा राष्ट्राभिमानी निर्णय घेणार्‍या हिसार येथील दुकानदारांचे अभिनंदन ! सर्वत्रच्या दुकानदारांनीही यातून बोध घ्यावा ! - संपादक) याविषयीचा निर्णय या दुकानदारांच्या संघटनेने एकमताने घेतला. या बैठकीचे अध्यक्ष तथा एक दुकानदार श्री. राजू शर्मा म्हणाले, भारताने पाकवर केलेल्या सर्जिकल स्ट्राईकनंतर चीनने ब्रह्मपुत्रा नदीशी संबंधित अन्य नद्यांतून भारतात येणारे पाणी रोखले. याशिवाय चीनने जैश-ए-महंमद या जिहादी आतंकवादी संघटनेचा नेता मसूद अझहर यास राष्ट्रीय आतंकवादी घोषित करण्याच्या भारताच्या मागणीला विरोध केला. चीनच्या या कृत्यांच्या निषेधार्थ हिसारमधील दुकानदारांनी वरील निर्णय घेतला.

लक्ष्मणपुरी (लखनौ) येथे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर शाई फेकण्याचा प्रयत्न !

      लक्ष्मणपुरी - शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांच्यावर शाई फेकण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे वृत्त एएन्आय या वृत्तसंस्थेने दिले आहे. या वेळी उपस्थित शिवसैनिकांनी शाई फेकणार्‍याला पकडून चोपले आणि पोलिसांच्या कह्यात दिले. शाई फेकणारा उत्तरप्रदेशातील सूर्यभान नावाचा शिवसैनिक असल्याचे प्रसारमाध्यमांकडून म्हटले जात आहे.
      उत्तरप्रदेशातील विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने श्री. राऊत येथे पदाधिकार्‍यांशी चर्चा करण्यासाठी आले होते. तेव्हा ही घटना घडली. श्री. राऊत यांनी सांगितले की, येथील पदाधिकार्‍यांमध्ये मारामारी झाली. माझ्या अनुपस्थितीत हा प्रकार घडला. मी तिथे पोहोचलो, तेव्हा सर्व प्रकरण मिटले होते. माझ्या अंगावर कोणीही शाई फेकलेली नाही. तिथे नेमके काय घडले, याची मी माहिती घेत आहे.

चुकून भारताच्या सीमेत आलेला पाकचा १२ वर्षीय मुलगा पाक सैन्याकडे सुपूर्द !

भारतीय सीमेवर हेरगिरी करण्यासाठी प्राणी आणि पक्षी यांचाही वापर 
करणारा धूर्त पाक यासाठी लहान मुलांचा वापर करणार नाही, यावर कोण विश्‍वास ठेवणार ?
      नवी देहली - पाण्याच्या शोधात चुकून नियंत्रणरेषा ओलांडून भारताच्या सीमेत आलेल्या एका १२ वर्षीय पाकिस्तानी मुलाला सीमा सुरक्षा दलाच्या सैनिकांनी पाकच्या सैन्याकडे सोपवले. एम्.डी. तन्वीर असे या मुलाचे नाव असून तो पाकिस्तानातील कासूर जिल्ह्यातील धारी या गावातील रहिवासी आहे. भारतीय सैनिकांनी त्यास पंजाब सीमेवरील दोना तेलू माल येथून कह्यात घेतले होते. रात्रभर त्यास सैनिकी छावणीत ठेवून सकाळी सर्व प्रक्रिया पार पाडून पाककडे सुपूर्द केले. मागच्या आठवडयात भारताचाही एक सैनिक चंदू बाबूलाल चव्हाण चुकून सीमा ओलांडून पाकमध्ये गेला होता; पण पाकने चंदू चव्हाण त्यांच्याकडे नसल्याचे सांगितलेे. चंदू बाबूलाल चव्हाण हा महाराष्ट्र्रातील धुळे जिल्ह्यातील रहिवासी आहे.

पुरुलिया (बंगाल) येथे हिंदु जनजागृती समितीच्या धर्मशिक्षणवर्गास आरंभ !

     पुरुलिया, ४ ऑक्टोबर (वार्ता.) - सिधी या गावातील धर्मप्रेमी युवकांच्या प्रयत्नांमुळे हिंदु जनजागृती समितीकडून धर्मशिक्षणवर्गास नुकताच आरंभ करण्यात आला. या धर्मशिक्षणवर्गात साधना का आणि कशी करावी ? कुलदेवता आणि दत्त यांचा नामजप करण्याची योग्य पद्धत कोणती ? शास्त्रानुसार नवरात्रोत्सव कसा साजरा करावा ? आदी विषयांवर समितीचे पूर्वोत्तर भारताचे समन्वयक श्री. चित्तरंजन सुराल यांनी उपस्थित जिज्ञासूंना मार्गदर्शन केले. याशिवाय त्यांनी सद्य:स्थितीत नवरात्रोत्सवात होणार्‍या अपप्रकारांविषयीही उपस्थितांमध्ये जागृती केली.
     या वेळी रणरागिणीच्या धनबाद, झारखंंड येथील कु. निशाली यांनी आचारधर्माच्या पालनाविषयी माहिती दिली. यामध्ये कपाळाला टिळा का लावावा ? नमस्कार करण्याची योग्य पद्धत कोणती ? भ्रमणभाषवर बोलतांना हॅलोऐवजी नमस्कार, जय श्रीकृष्ण अथवा कोणत्याही देवाचे नाव उच्चारणे आदींविषयी माहिती दिली. याशिवाय त्यांनी लव्ह जिहादविषयी माहिती देऊन उपस्थितांमध्ये जागृती केली.

पंजाबमध्ये रावी नदीत पाकिस्तानी नौका सापडली !

       लुधियाना - गुरुदासपूर सीमेजवळ टोटा गुरूनानक चौकीजवळ रावी नदीत ४ ऑक्टोबरला पहाटे एक पाकिस्तानी नौका संशयास्पदरित्या आढळून आली. या नौकेतून आतंकवाद्यांनी भारतीय भूप्रदेशात घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला असावा.

तमिळनाडूमधून इसिसच्या आतंकवाद्याला अटक !

अशांवर शीघ्रगती न्यायालयात खटला चालवून 
त्यांना कठोर शिक्षा होण्यासाठी सरकारने प्रयत्न 
करायला हवेत, तरच इतरांना काही प्रमाणात वचक बसेल !
       तिरुनेलवेली (तमिळनाडू) - इसिसशी संबंधित असल्याच्या कारणावरून राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (एन्आयएने) येथून सुहानी नावाच्या ३१ वर्षीय आतंकवाद्याला अटक केली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. सुहानी गेल्या २० वर्षांपासून केरळमधील थोडापुझ्झा येथे स्थायिक झाला आहे. इसिसशी संबंध असलेल्या काही जणांशी त्याचा संपर्क झाला. एन्आयएने काही जणांना अटक केल्यानंतर सुहानी थोडापुझ्झातून पसार झाला आणि तो तिरुनेलवेली येथे आला होता, असे पोलिसांनी सांगितले. इसिसशी संबंध असणार्‍या ६ जणांना यापूर्वी थोडापुझ्झातून अटक करण्यात आली होती. त्यांच्या चौकशीतून सुहानी हा त्यांचा साथीदार असल्याचे उघड झाले होते.

पिंपरी (पुणे) येथील महानगरपालिकेच्या रुग्णालयात महिलेला मारहाण केलेले आधुनिक वैद्य निलंबित !

     पिंपरी, ४ ऑक्टोबर - पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात (वायसीएम) गायनिक सर्जन डॉ. आशिष बुरांडे यांनी प्रसूती झालेल्या महिलेला मारहाण केल्याची घटना २६ सप्टेंबर या दिवशी पहाटे घडली होती. त्याविषयी रुग्णाच्या नातेवाइकांनी रुग्णालयाच्या प्रशासनाकडे तक्रारही केली होती. या घटनेची नोंद घेत प्रशासनाने डॉ. बुरांडे यांना कामावरून काढले आहे. (अशा घटना घडू नयेत, यासाठी दोषी आधुनिक वैद्यांवर फौजदारी कारवाईही होणे आवश्यक आहे. - संपादक)

विद्यापिठांकडून दिल्या जाणार्‍या तत्त्वज्ञान आणि विद्यावाचस्पती पदवी यांचे तपशील संकेतस्थळावर उपलब्ध होणार

     पुणे, ४ ऑक्टोबर - राज्यातील विद्यापिठांकडून दिल्या जाणार्‍या तत्त्वज्ञान पदवी (एम्.फिल.) आणि विद्यावाचस्पती (पीएच्. डी.) यांच्या पदव्या यापुढे विद्यापिठाच्या संकेतस्थळांवर तातडीने उपलब्ध करून देण्याच्या सूचना विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) दिल्या आहेत. 

राष्ट्रभावना दुखावणारी आक्षेपार्ह माहिती व्हॉटस् अ‍ॅपवर टाकणार्‍या धर्मांध मोहसीन कोल्हापुरे याला अटक : चार दिवस पोलीस कोठडी

नृसिंहवाडी येथील घटना !
  • संतप्त जमावाकडून धर्मांधाच्या दुकानांची तोडफोड !
  • देशद्रोहाचा गुन्हा प्रविष्ट करून कठोर कारवाई करण्याची हिंदुत्वनिष्ठांची मागणी !
नृसिंहवाडी येथील यात्री निवासासमोरील
मोहसीन कोल्हापुरे याचे मिठाईचे दुकान
फोडून जमावाने साहित्याची
नासधूस केली.
     नृसिंहवाडी (जिल्हा कोल्हापूर), ४ ऑक्टोबर (वार्ता.) - येथील गौरवाड गावात रहाणारा मोहसीन मोजम कोल्हापुरे (वय २५ वर्षे) या धर्मांधाने व्हॉट्स अ‍ॅप या सामाजिक संकेतस्थळावर राष्ट्रीय भावना दुखावणारी आक्षेपार्ह माहिती टाकल्याने त्याच्या नृसिंहवाडी आणि कुरुंदवाड (जिल्हा कोल्हापूर) येथील २ दुकानांची संतप्त जमावाने तोडफोड केली. ही घटना ३ ऑक्टोबरच्या रात्री ९ वाजता घडली. त्यामुळे तेथे तणावाचे वातावरण असून पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पोलिसांनी मोहसीनवर गुन्हा प्रविष्ट करून त्याला अटक केली आहे. मोहसीन याला ४ ऑक्टोबरला न्यायालयात उपस्थित करण्यात आले असता त्याला चार दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
१. मोहसीन कोल्हापुरे याने व्हॉट्स अ‍ॅपवर कार्टूनद्वारे राष्ट्रीय भावना दुखावणारा संदेश पाठवला होता. यामध्ये त्याने भारताला तुच्छ लेखून पाकचा उदोउदो केला.
२. यात त्याने शिकारी गरुड दुसर्‍या एका पक्षाची शिकार करत आहे, असे चित्र दाखवले होते. यात गरुडाच्या पंखावर पाकिस्तानचा झेंडा दाखवण्यात आला होता, तर ज्याची शिकार होत आहे, त्या पक्षाच्या पंखावर भारतीय झेंडा दाखवण्यात आला होता. या प्रकरणी त्या गटातील एक हिंदु धर्माभिमानी श्री. शुभम दिलीपकुमार कुंभोजे यांनी तक्रार दिली आहे.

इसिसचा म्होरक्या अबू अल् बगदादीवर विषप्रयोग !

        नवी देहली - इस्लामिक स्टेट अर्थात् इसिस या जिहादी आतंकवादी संघटनेचा म्होरक्या अबू बकर अल् बगदादी याच्या जेवणातून त्याच्यावर विषप्रयोग करण्यात आला आहे. यानंतर बगदादीची प्रकृती चिंताजनक आहे. त्याच्यासह इसिसच्या आणखी ३ आतंकवाद्यांवरही जेवणातून विषप्रयोग करण्यात आला. उपचारासाठी त्यांना अज्ञातस्थळी हालवण्यात आले आहे. अल् कायदा या जिहादी आतंकवादी संघटनेत फूट पाडून इसिस ही नवी आतंकवादी संघटना बनवण्यास बगदादीला उत्तरदायी ठरवले जाते.

सार्वजनिक नवरात्रोत्सवातील अपप्रकार टाळून उत्सवाचे पावित्र्य राखूया ! - प्रा. विठ्ठल जाधव

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने शिरवळ (जिल्हा सातारा) येथे व्याख्यानाचे आयोजन 
     शिरवळ, ४ ऑक्टोबर (वार्ता.) - पूर्वीपासून धर्माचरण, संस्कृतीचे जतन, समाज संघटन आणि साधना म्हणून सार्वजनिक उत्सव साजरे केले जात होते; परंतु सध्या सार्वजनिक उत्सवांना विकृत स्वरूप प्राप्त झाले आहे. उत्सवात चित्रपटातील गीतांवर अंगविक्षेप करून गरबा खेळणे, मद्यपान, व्यभिचार, बळजोरीने वर्गणी गोळा करणे, रोषणाईसाठी पैशांचा व्यय, जुगार खेळणे अशा प्रकारच्या अनेक अपप्रकारांमुळे उत्सवाचे पावित्र्य नष्ट होत आहे. असे अपप्रकार थांबवून धार्मिकतेने आणि भावाच्या स्तरावर उत्सव साजरे केले, तरच उत्सवातील पावित्र्य टिकून राहील. तसेच उत्सवातील आनंद अनुभवता येईल, असे प्रतिपादन प्रा. विठ्ठल जाधव यांनी १ ऑक्टोबर या दिवशी येथील मंडई वसाहतीतील मंडईमाता नवरात्रोत्सव मंडळात आयोजित केलेल्या व्याख्यानात केले. या वेळी समितीचे श्री. सोमनाथ राऊत, सौ. छाया पवार आणि ३५ धर्मप्रेमी उपस्थित होते. 

हिंदु राष्ट्र स्थापनेच्या ठिणगीची मशाल झाली !

     'वर्ष २०१२ मध्ये गोवा येथील अखिल भारतीय हिंदू अधिवेशनात हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचा सर्व संमतीने विषय मांडण्यात आला होता. त्या हिंदु राष्ट्राच्या ठिणगीने आज मशालीचे रूप धारण केले आहे.' 
- पू. डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती

विचारातही सनातनची कॉपी (नक्कल) करणारे अंनिसचे डॉ. हमीद दाभोळकर !

     सनातन म्हणते, 'आजन्म साधनेची शिक्षा करण्यात येईल' सनातनच्या या विचाराची नक्कल करून अंनिसचे डॉ. हमीद दाभोलकर म्हणतात, "जर पोलिसांना डॉ. दाभोलकरांचे मारेकरी सापडले, तर त्यांना आजन्म अंधश्रद्धा निर्मूलना'चे कार्य करण्याची शिक्षा ठोठवण्यात यावी."

पुण्यात सीमा शुल्क विभागाने १ कोटी रुपयांचे ड्रोन पकडले

कायदा-सुव्यवस्थेचा धाक संपल्याचे दर्शवणारी घटना ! 
     पुणे, २ ऑक्टोबर - काश्मीरमधील उरी येथे झालेल्या आक्रमणानंतर देशात सर्वत्र सतर्कतेचा आदेश दिलेला असतांना येथील सीमा शुल्क विभागाने १ ऑक्टोबर या दिवशी १ कोटी रुपयांचे ७ ड्रोन लोहगाव विमानतळावर पकडले. या प्रकरणी अमित तटके याला कह्यात घेतले असून त्याच्या विरुद्ध सीमाशुल्क कायदा १९६२ आणि दूरसंचार अधिनियमन कायद्यांतर्गत गुन्हा प्रविष्ट केला आहे. (एवढ्या प्रमाणात ड्रोन आणण्याची आवश्यकता काय ? याची सखोल चौकशी होऊन कारवाई होणे आवश्यक आहे. - संपादक) 

ठाणे येथे अडीच लाखांचा गांजा हस्तगत !

महाराष्ट्राची व्यसनाधीनतेकडे होणारी वाटचाल रोखण्यासाठी शासनाने प्रयत्न करावेत ! 
     ठाणे - अडीच लाखांच्या गांजासह ३ जणांना अटक करण्यात आली आहे. यात एका महिलेचाही समावेश असून सर्वजण तामिळनाडू येथील रहिवाशी आहेत. या त्रिकुटाकडून दोन प्रवाशी बॅगाभरून गांजा हस्तगत करण्यात आला. पंदीयाम्मल थेवर, अजय कोसकुमार थेवर आणि निथीराजन थेवर अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

पाक सैन्याच्या भारतीय चौक्यांवर गोळीबार चालूच !

भारताने आता बचावाची भूमिका सोडून आक्रमणाच्या 
स्थितीत जायला हवे, तरच या कुरापती रोखता येतील !
       श्रीनगर - ४ ऑक्टोबरला पहाटे पाक सैनिकांनी काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यातील नौशेरा सेक्टरमध्ये भारतीय चौक्यांवर गोळीबार केला. जवळपास घंटाभर हा गोळीबार चालू होता. येथील कालसियानमध्ये तोफांचा मारा करण्यात आला. भारतीय सैनिकांच्या चोख प्रत्युत्तरानंतर पाक सैन्याने गोळीबार थांबवला.

पाककडून भारतीय सैनिकांचा शिरच्छेद करण्यासाठी आतंकवाद्यांचे विशेष पथक !

आतंकवाद्यांकडून भारतीय सैनिकांचा शिरच्छेद करण्याचे 
धाडस करण्यापूर्वीच भारत शासनाने त्याच्या अटकेत 
असणार्‍या आतंकवाद्यांना फासावर लटकवून आतंकवाद्यांमध्ये 
दहशत निर्माण करावी, अशीच जनतेची अपेक्षा आहे !
       नवी देहली - भारतीय सैनिकांचा शिरच्छेद करण्यासाठी पाकने आतंकवाद्यांचे बॉर्डर अ‍ॅक्शन टीम या नावाचे एक विशेष पथक बनवले आहे. त्यांना यासाठी प्रशिक्षण देण्यात आले आहे. ते जेथे भारतीय सैनिक तैनात आहेत, तसेच पुंछ येथील केजी सेक्टरमध्येही सक्रीय आहेत.

संभाजीनगर येथील शिक्षकांच्या मोर्च्यावर पोलिसांकडून लाठी आक्रमण

     संभाजीनगर - विनाअनुदानित शाळांना अनुदान मिळण्यासाठी येथील शिक्षकांनी मोर्चा काढला होता. या वेळी पोलिसांनी शिक्षकांवर लाठीने आक्रमण करून त्यांना बेदम मारहाण केली. त्यानंतर संतप्त शिक्षकांनीही पोलिसांवर दगडफेक केली. या वेळी झालेल्या गोंधळात ९ पोलिसांसह आंदोलकही घायाळ झाले. त्याच धावपळीत एका पोलीस कर्मचार्‍याचा मृत्यू झाला. घायाळ शिक्षकांना रुग्णालयात प्रविष्ट करण्यात आले आहे.

डेंग्यू चाचणीसाठी ६०० रुपयांपेक्षा अधिक शुल्क न आकारण्याचा शासनाचा आदेश !

असा आदेश देण्याची वेळच का येते ? 
     पुणे, ४ ऑक्टोबर - डेंग्यूच्या बहुतेक रुग्णांच्या चाचण्या या खासगी प्रयोगशाळांमध्ये होत आहेत. खाजगी रुग्णालये, प्रयोगशाळा या एन्एस्-१ एलायझा आणि मॅक एलायझा या चाचण्यांसाठी अंदाजे ८०० ते १ सहस्र ५०० रुपये शुल्क आकारत आहेत, असे निदर्शनास आले. (वैद्यकीय क्षेत्राचे बाजारीकरण ! - संपादक) त्यामुळे या उपरोक्त चाचण्यांसाठी प्रत्येकी ६०० रुपयांपेक्षा अधिक शुल्क आकारू नये, असा आदेश राज्य शासनाने काढला आहे. (अवास्तव दर आकारणी करणार्‍या प्रयोगशाळांवर राज्य शासनाने कारवाई करणे आवश्यक आहे. असे केल्यास मनमानी कारभाराला आळा बसेल. - संपादक) 

योग विषयाच्या पात्रता परीक्षेसाठी महाभारत आणि रामायण या धर्मग्रंथांचाही अभ्यास

धर्मग्रंथांचा अभ्यास करण्यासमवेत त्यांचे आचरण 
करणे महत्त्वाचे असून तसे झाल्यास खर्‍या अर्थी 'योग' होईल ! 
     पुणे, ४ ऑक्टोबर - विद्यापीठ अनुदान आयोगाने 'योग' या विषयाचीही राष्ट्रीय स्तरावर घेण्यात येणारी पात्रता परीक्षा (नेट) चालू केली आहे. या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना महाभारत, रामायण, उपनिषदे, भगवद्गीता या धर्मग्रंथांचाही अभ्यास करावा लागणार आहे. पात्रता परीक्षेसाठी निश्‍चित करण्यात आलेल्या अभ्यासक्रमांत त्यांचा समावेश केला आहे. 

शहापूर येथे माहुली गडावर 'चेकपोस्ट' उभारणार !

शिवप्रेमींना अशा गोष्टींसाठी आंदोलन का करावे लागते ? प्रशासनाच्या ते लक्षात येत नाही का ? 
 व्यसनमुक्त शिवकिल्ले अभियानांतर्गत शिवप्रेमींना आश्‍वासन 
     ठाणे - येथील शहापूर तालुक्यात असणार्‍या माहुली गडावर व्यसनमुक्त शिवकिल्ले अभियानांतर्गत शिवप्रेमी २ ऑक्टोबरपासून उपोषणाला बसले होते. स्थानिक तहसीलदारांनी लेखी आश्‍वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. 
     तेथे लवकरच पोलीस 'चेकपोस्ट' उभारण्यात येणार आहे. 

आतंकवादाच्या समूळ उच्चाटनासाठी हिंदु राष्ट्राविना पर्याय नाही ! - सौ. रूपा महाडिक, सनातन संस्था

सातारा येथे हिंदु धर्मजागृती सभा
 सौ. रूपा महाडिक
      सातारा, ४ ऑक्टोबर (वार्ता.) - गेली अनेक वर्षे हिंदू दयनीय स्थितीत जीवन व्यतीत करत आहेत. गांधी आणि नेहरू यांच्या निर्णयांची फळे आजही आपण आणि आपले सैन्य सीमेवर भोगत आहोत. इस्रायलप्रमाणे राष्ट्राभिमान बाळगण्यास आपण आजही अल्प पडत आहोत. हिंदू शौर्याची इतिहासगाथा विसरले आहेत. मूठभर मावळ्यांना हाताशी घेऊन श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, त्याप्रमाणे आतंकवादाच्या समूळ उच्चाटनासाठी आता आपल्यापुढे हिंदु राष्ट्राविना पर्याय नाही, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीच्या सौ. रूपा महाडिक यांनी केले. 
     मेढा येथील श्री भैरवनाथ मंदिरामध्ये हिंदु जनजागृती समितीच्या वतीने जाहीर हिंदु धर्मजागृती सभा आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये त्या बोलत होत्या. या वेळी मेढा आणि पंचक्रोशीतील ६० हिंदू धर्माभिमानी उपस्थित होते.

वाहतुकीचे नियम मोडणार्‍यांना कठोर दंड आकारण्याची मुंबई उच्च न्यायालयाची सूचना

हे न्यायालयाला का सांगावे लागते ? पोलीस प्रशासन आणि अधिकारी आहेत कशाला ? 
     मुंबई, ४ ऑक्टोबर - वाहतूक नियमांचे उल्लंघन करणार्‍यांची आणि प्रतिदिन नव्या वाहनांची वाढणारी संख्या लक्षात घेता परिस्थिती अत्यंत गंभीर बनली आहे. त्यामुळे पाश्‍चिमात्य देशांप्रमाणे वाहतुकीचे नियम मोडणार्‍यांना कठोर दंड आकारण्यासह वाहनासाठीच्या विम्याच्या रकमेत भरमसाट वाढ करण्याचे धोरण करावे. अशा धोरणाचा अवलंब केला, तरच या प्रकारांना चाप बसेल आणि सरकारच्या तिजोरीतही महसूल जमा होण्यास साहाय्य होईल, अशी सूचना मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती विद्यासागर कानडे यांच्या खंडपिठाने राज्य सरकारला केली. वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पुण्यातील मुख्य चौकांमध्ये 'सीसीटीव्ही कॅमेरे' बसवण्याची मागणी करणार्‍या याचिकेवर ३ ऑक्टोबर या दिवशी सुनावणी झाली. त्या वेळी खंडपिठाने ही सूचना केली. 
     'कोणतीही चळवळ लोकांच्या अनुकूलतेखेरीज सिद्धीस जात नाही. लोक अनुकूल नसल्यास एकटा पुढारी फशी पडतो !'  - श्री. ग. माजगावकर

फलक प्रसिद्धीकरता

जिहादी आतंकवाद्यांना संपवण्यासाठी सैन्याला ६ महिने द्याच ! 
     उरी येथील सैन्याच्या मुख्यालयावर झालेल्या आक्रमणानंतर भारतीय सैन्याने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून ४० आतंकवाद्यांना ठार मारले. आता सैन्याने सरकारकडे पाकव्याप्त काश्मीरमधील आतंकवाद्यांची ठिकाणे आणि आतंकवादी यांना संपवण्यासाठी ६ महिने देण्याची मागणी केली आहे.

हिंदू तेजा जाग रे !


Jago ! : 
Pakvyapta Kashmir se atankwad purnatah nashta 
karne ke liye sena ne sarkar se 6 mahine mange. 
sarkar sena ki yaha mang poori karegi ? 

जागो ! :
 पाकव्याप्त कश्मीर से आतंकवाद पूर्णतः नष्ट करने 
के लिए सेना ने सरकार से ६ महीने मांगे । 
 सरकार सेना की यह मांग पूरी करेगी ?

पोलिसांवरील आक्रमणांच्या विरोधात जनजागृती करण्यासाठी पोलीस ठाण्यात फलक लावण्यात येणार

जनजागृती करण्यासमवेत आक्रमणकर्त्यांवर कठोर कारवाईही होणे आवश्यक !
   पुणे, ४ ऑक्टोबर - गेल्या ५ वर्षांत पोलिसांवरील आक्रमणांच्या घटना वाढत आहे. त्याविषयी सर्वसामान्यांमध्ये जनजागृती करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. पोलिसांवर आक्रमण केल्यावर कायद्याद्वारे कोणती शिक्षा होते, याची माहिती व्हावी, यासाठी आता प्रत्येक पोलीस ठाण्यात जनजागृती फलक लावण्यात येणार आहे. या फलकाद्वारे पोलिसांवरील आक्रमण अजामीनपात्र गुन्हा असून १० वर्षांची शिक्षा होऊ शकते, ही माहिती दिली जाणार आहे, असे पुण्याचे पोलीस उपायुक्त डॉ. बसवराज तेली यांनी सांगितले. 
      पोलिसांवरील आक्रमणे गंभीर असल्याचे निरीक्षण नोंदवत न्यायालयाने राज्य शासनाला त्यावर उपाययोजना करण्याचे आदेश दिले होते. या पार्श्‍वभूमीवर राज्य सरकारने नागरिकांमध्ये फलकाद्वारे जनजागृती करण्याचे परिपत्रक जारी केले आहे. त्यामुळे आता प्रत्येक पोलीस ठाण्यात उपरोक्त आशयाचे फलक लावले जाणार आहेत.
     वर्ष २०१२ पासून चालू वर्षाच्या जुलै अखेरपर्यंत ४ सहस्र ३५३ पोलिसांना मारहाण केल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यापैकी ४ सहस्र १५३ गुन्ह्यांचा तपास करण्यात पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणी एकूण ६ सहस्र ८८१ जणांना अटक केली आहे. यावर्षी जुलै अखेरपर्यंत ६९५ घटना घडल्या आहेत. त्यापैकी ६६० गुन्ह्यांचा तपास झाला असून त्यात १ सहस्र १५६ जणांना अटक केली आहे.मोर्चाद्वारे न्यायालयावर दबाव आणणार्‍या भुजबळ समर्थकांवर कारवाई करा ! - छावा संघटना

     पुणे, ४ ऑक्टोबर (वार्ता.) - घोटाळेबाज छगन भुजबळ यांच्या समर्थनार्थ नाशिकमध्ये नुकताच एक मोर्चा काढण्यात आला होता. त्याला राज्यभरातून भुजबळ यांचे समर्थक उपस्थित होते. वास्तविक भुजबळ यांच्या संदर्भात न्यायालयीन प्रक्रिया चालू आहे. त्यामुळे मोर्चा काढून न्यायालयावर दबाव आणणार्‍या भुजबळ समर्थकांवर कारवाई करा, अशा मागणीचे निवेदन छावा संघटनेच्या वतीने येथील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात देण्यात आले. या प्रसंगी छावा संघटनेचे श्री. धनंजय जाधव, गणेश सोनवणे आदी उपस्थित होते. 
     निवेदनात म्हटले आहे की, छगन भुजबळ हे कायद्याने आरोपी असून त्यांच्या संदर्भात न्यायालयीन प्रक्रिया चालू असल्याने त्यासंदर्भात आंदोलन करण्याचा अथवा मोर्चा काढण्याचा कुणालाही अधिकार नाही. केवळ राजकीय लाभ मिळवण्यासाठी, तसेच प्रसिद्धीसाठी भुजबळ समर्थकांकडून मोर्चा काढला जात असून एकप्रकारे न्यायालयावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे घोटाळेबाज आणि गुन्हेगारांचे समर्थन करणार्‍यांवर भारतीय दंडविधान कलम १५५ प्रमाणे, तसेच न्यायालय अवमान अधिनियम १९७१ प्रमाणे योग्य ती कारवाई करावी.

पोलिसांच्या संदर्भातील कटू अनुभव !

        सध्या सनातनचे साधक आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते यांना पोलिसांच्या शारीरिक आणि मानसिक छळाला सामोरे जावे लागत आहे. या अनुषंगाने विविध ठिकाणच्या पोलिसांविषयी सनातनचे साधक, हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते किंवा हिंदुत्वनिष्ठ यांना यापूर्वी पोलिसांच्या सतावणुकीविषयी आलेले अनुभव येथे प्रसिद्ध करत आहोत.
गणेशोत्सवात फलक लावणार्‍या हिंदूंना मारहाण 
करणारे धर्मांध आणि समानतेच्या नावाखाली 
धर्मांधांसह हिंदूंनाही अटक करणारे हिंदूद्रोही पोलीस !
        कर्नाटक राज्यातील बेळगावमधील अनगोळ भागातील राजहंस गल्लीत रहीम आणि करीम हे मुल्लाबंधू रहातात. गणेशोत्सवात हिंदूंना फलक आणि विजेच्या माळा लावू द्यायच्या नाहीत, यासाठी मुल्ला आणि त्यांचे सहकारी वारंवार प्रयत्न करत होते. पोलिसांकडे हे प्रकरण गेल्यानंतर पोलिसांनी धर्मांधांना शांत रहाण्याचा सल्ला दिला होता. ८.९.२०१३ च्या सकाळी दोन हिंदु तरुण फलक लावण्यासाठी मुल्ला यांच्या घराजवळ गेले, तेव्हा रहीम आणि करीम यांनी त्यांना विरोध केला. हिंदु तरुणांनी त्या दोघांच्या विरोधाला न जुमानता फलक लावणारच, असे सांगितले. लगेचच तेथे ५० हून अधिक धर्मांध जमले. त्यांनी या दोघांना मारहाण केली. धर्मांध या हिंदूंपैकी एका तरुणाच्या घरात घुसले आणि त्यांनी तेथील महिलांनाही मारहाण केली. तोपर्यंत हिंदूही मोठ्या संख्येने जमा झाले. त्यांनी धर्मांधांना तीव्र प्रतिकार केला. या वेळी पोलिसांनी १० हिंदू आणि १० धर्मांध यांना अटक केली.
पोलिसांविषयी चांगले आणि वाईट अनुभव असल्यास 
वाचकांनी नजीकच्या दैनिक कार्यालयात कळवावेत !

काश्मीर खोर्‍यात काश्मिरी हिंदूंचे पुनर्वसन ही १०० कोटी हिंदूंची मागणी ! - श्री. चेतन राजहंस, प्रवक्ता, सनातन संस्था

श्री. चेतन राजहंस
       देशात राष्ट्रवादी शासन आलेले असल्याने काश्मिरी हिंदूंचे काश्मीर खोर्‍यात सन्मानाने पुनर्वसन व्हावे, या मागणीला अनुसरून भारत रक्षा मंच, हिंदु जनजागृती समिती आणि इतर हिंदुत्वनिष्ठ संघटना यांनी एक भारत अभियान-कश्मीरकी ओर हे राष्ट्रव्यापी अभियान आरंभले आहे. या अभियानांतर्गत गोव्यातील म्हापसा येथील श्री देव बोडगेश्‍वर मंदिर सभागृहात २.१०.२०१६ या दिवशी जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी सनातन संस्थेचे प्रवक्ता, श्री. चेतन राजहंस यांनी मांडलेले विचार आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. मनोज खाडये यांनी मांडलेले विचार येथे देत आहोत. 
१. सैन्यकारवाईद्वारे संपूर्ण काश्मीर 
मुक्त करण्याचे धाडस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दाखवावे !
     गांधीजींचे सर्वच विचार आपल्याला पटतील, असे नाही; तरीही त्यांच्या राष्ट्रभक्तीविषयी कोणाच्याही मनात संशयही नाही ! जेव्हा १९४८ मध्ये पापीस्थानचे सैन्य टोळीवाल्यांच्या रूपात काश्मीरमध्ये घुसले, तेव्हा नेहरूंनी गांधीजींना विचारले होते की, महात्माजी, भारताने या परिस्थितीत काय केले पाहिजे, तेव्हा गांधी म्हणाले, सैन्य कारवाईद्वारे पापीस्थानचा पराभव केला पाहिजे; कारण काश्मीर हे भारताचे अभिन्न अंग आहे ! दुर्दैवाने सैन्यकारवाईद्वारे संपूर्ण काश्मीर मुक्त करण्याचे धाडस नेहरूंनीच काय, देशातील एकाही राज्यकर्त्यांने आजपर्यंत दाखवले नाही. मोदीजींनी ते धाडस दाखवून गांधींचे आपण सच्चे अनुयायी आहोत, हे सिद्ध करावे.

देवीचे माहात्म्य !

सध्या चालू असलेल्या नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने...
कु. मधुरा भोसले
       देवीच्या उपासनेची परंपरा पुष्कळ पूर्वीपासून भारतात चालत आलेली आहे. देवीचे मूळ रूप निर्गुण असले, तरी तिच्या सगुण रूपाची उपासना करण्याची परंपरा भारतात प्रचलित आहे. कुलदेवी, ग्रामदेवी, शक्तीपीठ आदी रूपांमध्ये देवीच्या विविध सगुण रूपांची उपासना केली जाते. हिंदु संस्कृतीमध्ये जितके महत्त्व देवाला आहे, तितकेच देवीलाही आहे, हे विशेषत्वाने सांगावेसे वाटते. भारतात अन्य संप्रदायांप्रमाणेच शाक्त संप्रदायही कार्यरत आहे. पंचायतन पूजेमध्ये शिव, विष्णु, गणपति आणि सूर्य यांसमवेत देवीच्या पूजनाचेही विशेष महत्त्व आहे. उपासकांच्या हृदयात देवीला विशेष स्थान असल्यामुळेच प्रतीवर्षी नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहाने भारतभर साजरा केला जातो.

हिंदूंमधील धर्मशिक्षण आणि संघटनशक्ती यांचा अभाव, हेच आज सर्वत्र अराजकसदृश परिस्थिती निर्माण होण्यामागील मुख्य कारण !

प.पू. पांडे महाराज
१. भारतातील राजकीय क्षेत्रातील हिंदूंची स्थिती
      भारतातील राजकीय क्षेत्रातील बहुतेक हिंदू विविध पक्षांमधे विभागले गेले आहेत. ते हिंदुहितासाठी काही न करता उलट हिंदूंविरुद्ध प्रचार करतांना दिसतात. काही जण केवळ आश्‍वासने देतात; परंतु निवडून आल्यावर ती पूर्ण करत नाहीत.
२. हिंदुत्वनिष्ठ पक्षांनी हिंदूंना 
धर्मशिक्षण देण्याचा प्रयत्न केला पाहिजे 
     सध्या हिंदुहिताच्या गोष्टी करणारे पक्ष म्हणजे शिवसेना आणि हिंदु महासभा हे आहेत. ते काही ठिकाणी हिंदुहितासाठी झटतांना दिसतात. त्यांनीसुद्धा हिंदूंना सबल करण्याच्या दृष्टीने हिंदु संस्कृतीच्या ठेव्याचा प्रसार किंवा हिंदूंना धर्मशिक्षण देण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

पैशांसाठी न्यायाची सौदेबाजी !

     वादग्रस्त मालमत्ता खटल्याच्या प्रकरणी तक्रारदाराच्या बाजूने निर्णय देण्यासाठी ५ लाख रुपयांची लाच स्वीकारल्याच्या प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने तीस हजारी जिल्हा न्यायालयाच्या वरिष्ठ सत्र न्यायाधीश रचना तिवारी लखनपाल यांना अटक केली आहे. वादग्रस्त मालमत्ता प्रकरणावर निर्णय देण्यासाठी २० लाख रुपयांची लाच या न्यायाधिशांनी मागितली होती.

काश्मीरमध्ये हिंदूंचे पुनर्वसन केल्याविना हिंदुत्वनिष्ठ स्वस्थ बसणार नाहीत ! - श्री. मनोज खाडये, हिंदु जनजागृती समिती

श्री. मनोज खाडये
१. काश्मिरी हिंदूंसाठी उभारलेल्या जम्मू, 
देहली येथील छावण्यांची स्थिती विदारक !
      गेली १० वर्षे पनून कश्मीर आणि हिंदु जनजागृती समिती हातात हात घालून काश्मिरी बंधूंच्या पुनर्वसनासाठी कृतीशील आहेत. पनून कश्मीरचा प्रत्येक कार्यक्रम हा काश्मिरी हिंदूंच्या हिताचा असतो आणि या कार्यक्रमातील समितीचा सहभाग म्हणजे जणू स्वतःच्या संघटनेचा कार्यक्रम आहे, असा असतो. १० वर्षांत पनून कश्मीरसोबत कार्य करतांना विस्थापित काश्मिरी हिंदूंच्या नरकयातनांचा अभ्यास आम्हाला अत्यंत जवळून करता आला. आम्ही विस्थापित काश्मिरी हिंदूंच्या जम्मू, देहली येथील छावण्यांना भेटी दिल्या होत्या. तेथील चित्र अत्यंत विदारक होते. या सभागृहात जे छायाचित्र प्रदर्शन लावले आहे, ते तुम्हालाही त्या नरकयातनांची गंभीरता सांगेल, याचा मला विश्‍वास वाटतो. असो.
     आज केवळ हिंदु जनजागृती समितीच नाही, तर संपूर्ण भारतातील हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी, तुम्ही-आम्ही या एक भारत अभियानाद्वारे संकल्प करायचा आहे, काश्मिरी हिंदूंचे पनून कश्मीर (नियोजित काश्मिरी होमलँड) भागात पुनर्वसन झाल्याविना आम्ही स्वस्थ बसणार नाही ! करणार ना हा संकल्प ?

भक्तांच्या हाकेला धावून येणारी श्री दुर्गादेवी !

सनातन-निर्मित श्री दुर्गादेवीचे चित्र
        सर्वस्वरूपी, विश्‍वस्वामीनी, सर्वसामर्थ्यशाली, अशा आई जगदंबेने कार्यानुमेय श्री महासरस्वती, श्री महालक्ष्मी, श्री महाकाली अशी विभिन्न रूपे धारण केली. शरणागतांना तात्काळ पावणारी, जे जे मंगल आहे, ते ते प्रदान करणारी, जीवनाला परिपूर्ण करणार्‍या प्रत्येक गोष्टीचे मूर्तीमंत प्रतीक असलेली, भक्तांच्या हाकेला लवकर धावून येणारी, अशी आई जगदंबेची ख्याती आहे. तिच्या असंख्य भक्तांना तिची अशी प्रचीती आहे. 
(अधिक माहितीसाठी वाचा सनातनचा लघुग्रंथ देवीपूजनाचे शास्त्र)
भारतात प्रजासत्ताक नव्हे, लुटारू राज आहे ! 
- श्री. श्री. भट (धनुर्धारी, मार्च २०११)

समाजकंटकांचे सनातन आश्रमावरील आक्रमणांचे घृणास्पद कृत्य चालूच !

शिवीगाळ करणे, धमक्या देणे, अश्‍लील बोलणे आणि 
दगडफेक करणे या गोष्टी दखलपात्र ठरवणारे दंडविधान हिंदु राष्ट्रात असेल ! 
     सनातनच्या रामनाथी आश्रमातील साधकांना धमक्या देण्याचा, अश्‍लील बोलण्याचा आणि आश्रमावर दगड फेकण्यास आरंभ केल्याचा कालचा ६ वर्षे ३१३ वा दिवस ! 
३.१०.२०१६
     ४ साधक आश्रमातून रामनाथ मंदिराच्या दिशेने जातांना आश्रमापासून २०० मीटर अंतरावर पोहोचले असता समोरून येणार्‍या दुचाकीस्वाराने ए सनातन, असे मोठ्याने ओरडून तो निघून गेला. बांबोळी, गोवा येथील शासकीय रुग्णालयात शस्त्रक्रियेसाठी भरती झाल्यावर आलेले अनुभव आणि अनुभूती

कु. हर्षदा दातेकर
गोव्यातील बांबोळी येथील शासकीय रुग्णालय म्हणजे अस्वच्छता, बेशिस्त रुग्ण, कर्मचार्‍यांची वाईट वागणूक, मोठ्या रांगा, कामकाजाची क्लिष्ट प्रक्रिया, एकूण मानसिक त्रासच !, अशी तेथे गेेलेल्या बहुतेकांची अनुभवांतून आलेली प्रतिक्रिया होती. मलाही तेथे काही दिवस शस्त्रक्रियेसाठी भरती व्हावे लागले. त्या वेळी मला प.पू. डॉक्टर, सहसाधिका, बाजूचे रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक, आधुनिक वैद्य (डॉक्टर), परिचारीका अन् कर्मचारी यांच्या माध्यमातून क्षणोक्षणी देव शिकवत असतो, सांभाळून घेतो आणि कठीण परिस्थितीतून सुखरूप बाहेर काढतो, अशा अनुभूती आल्या. यासाठी मी त्याच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हे लिहून देत आहे.
१. प्रेमाने बोलल्याने सहरुग्ण आणि स्वच्छता कर्मचारी यांनी चांगला प्रतिसाद देणे
१ अ. प्रसाधनगृहात गेलेल्यांना पाणी व्यवस्थित ओतण्यास प्रेमाने 
सांगितल्यावर त्यांनी ऐकणे आणि पुढे ते स्वच्छ ठेवणे
     प्रसाधनगृहे पाश्‍चात्त्य पद्धतीची होती. त्यांची दिवसातून एकदा स्वच्छता होत असे. बहुतेक लोकांना ते कसे वापरावे ?, हे कळत नाही, असे लक्षात आले. प्रसाधनगृह वापरल्यावर पाणी व्यवस्थित ओतल्यास आपल्यानंतर जाणार्‍यांना चांगले वाटेल, असे प्रेमाने समजावल्यावर लोक पाणी व्यवस्थित ओतू लागले. तसेच मी माझ्याआधी प्रसाधनगृह वापरणार्‍यांकडून ते प्रेमाने सांगून स्वच्छ करवून घेत असे. प्रेमाने सांगितल्यावर लोक ऐकतात, असे लक्षात आले.
१ आ. स्वच्छता कर्मचार्‍यांशी हसून जवळीक साधल्यावर त्यांनी स्वच्छता चांगली करणे
     स्वच्छता कर्मचार्‍यांशी प्रेमाने बोलल्यावर ते स्वच्छता चांगली करतात आणि त्यांच्याकडे बघून प्रेमाने हसल्यावर पुढे पुढे ते तेवढ्याच प्रेमाने प्रतिसाद देतात, हे लक्षात आले. त्यानंतर तेसुद्धा माझी विचारपूस करू लागले.

१ इ. आयांनी (सेविकांनी) प्रेमाने चहा विचारणे
     तेथील आयांशी (साहाय्याला असणार्‍या सेविकांशी) थोड्या प्रेमाने बोलल्यावर त्या मलाही प्रेमानेच चहा विचारत असत. चहा घे, गरम आहे. तुला घशाला बरे वाटेल, असे त्या सांगायच्या. (त्या वेळी मला खोकला झाला होता.)
१ ई. सहरुग्णांनी काळजी घेतल्याने कुटुंबातच रहात असल्याप्रमाणे वाटणे
     देवाच्या कृपेने समवेतचे रुग्ण पुष्कळ चांगले होते. अल्पावधीत सर्वांशी चांगली ओळख झाली. त्यांतील काहींना मला साधना सांगता आली. माझ्या बाजूच्या पलंगावरील स्त्री-रुग्ण समर्थ संप्रदायाच्या बैठकीला जाणारी होती. आम्ही एकमेकींना नामजपाची आठवण करत होतो.

कुठे वर्षानुवर्षे हिंदुत्वाचे कार्य करूनही अशांत आणि असमाधानी असलेले कार्यकर्ते, तर कुठे सनातन संस्थेच्या माध्यमातून साधना करून गुरुकृपेने अल्प कालावधीमध्ये समाधानी आणि आनंदी होणारे साधक !

आधुनिक वैद्या
(कु.) माया पाटील
        प्रसारामध्ये सेवा करतांना एका हिंदुत्वनिष्ठ संस्थेच्या माध्यमातून कार्य करणारे एक अधिवक्ता माझ्या संपर्कात आले. ते एका हिंदुत्वनिष्ठ संस्थेत अनेक वर्षे कार्य करत होते. त्यानंतर ते सनातन संस्थेच्या संपर्कात आले. त्यांना संस्थेची शिकवण आवडली. त्यामुळे ते सनातन संस्थेचा गोव्यातील रामनाथी येथील आश्रम पहाण्यासाठी आले. त्या वेळी त्यांच्याशी बोलल्यानंतर त्यांची मनःस्थिती असमाधानी आणि अशांत असल्याचे लक्षात आले.
१. अधिवक्त्यांची अशांत मनःस्थिती
१ अ. हिंदुत्वनिष्ठ संस्थेशी संबंधित असूनही हिंदुत्व आणि हिंदु धर्म यांविषयी अनभिज्ञ असणे : हिंदुत्वनिष्ठ संस्थेशी संबंधित असूनही हिंदुत्व म्हणजे नेमके काय, हे त्या अधिवक्त्यांना ठाऊक नव्हते. त्यांना हिंदु धर्म, त्यातील शास्त्र, उपासना पद्धती इत्यादींच्या संदर्भातील कोणतेही ज्ञान नव्हते. त्यांना जे काही ठाऊक होते, ते अतिशय अल्प होते आणि शास्त्र म्हणून तर काहीच ज्ञात नव्हते. ते आस्तिक होते; परंतु अध्यात्मातील काही सूत्रांविषयी त्यांच्या मनामध्ये प्रश्‍न होते. त्यांनी अध्यात्मावर अनेकांची मते आणि चर्चा ऐकली होती; पण त्यामुळे योग्य आणि अयोग्य काय, हे समजत नसल्यामुळे त्यांच्या मनामध्ये अध्यात्मातील सूत्रांविषयी अनेक प्रकारचा गोंधळ होता. या सर्व गोंधळामुळे त्यांच्या मनातील प्रश्‍नांना उत्तर कुठेच मिळत नव्हते.

प.पू. डॉक्टरांनी आध्यात्मिक संशोधनाद्वारे ईश्‍वरी कार्य विशद केल्याने साधकांत ईश्‍वरप्राप्तीची ओढ निर्माण होणे

श्री. राम होनप
     वेद, पुराणे, श्रीराम आणि श्रीकृष्ण या अवतारांचे कार्य, संतचरित्रे आदी आध्यात्मिक लिखाणातून ईश्‍वरी कार्याच्या भिन्न पैलूंचे आपल्याला ज्ञान होते. त्याप्रमाणे प.पू. डॉक्टरांनी दैवी कण प्राप्त होणे, अंगावर अथवा लादीवर शुभचिन्ह उमटणे, दैवी नाद ऐकू येणे, साधकांना येणार्‍या अनुभूतींमागील शास्त्र सांगणे, वैज्ञानिक उपकरणांद्वारे आध्यात्मिक संशोधन करणे यांद्वारे ईश्‍वरी कार्य विशद केले आहे. त्यामुळे साधकांना साधनेची गोडी लागली आणि त्यांची ईश्‍वरापर्यंत जाण्याची ओढ वाढली.
- श्री. राम होनप, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१०.५.२०१६)
निर्भयपणे आणि तळमळीने साधना करणारे एक अन्य धर्मीय साधक

पू. (सौ.) भावना शिंदे-हर्ली
        एप्रिल २०१६ मध्ये महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या वतीने रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. मला त्या कार्यशाळेत उपस्थित रहाण्याची संधी मिळाली. कार्यशाळेसाठी विदेशातून आलेले एक अन्य धर्मीय शिबिरार्थी यांच्याकडून शिकण्यासारखे पुष्कळ होते. त्यांतील काही सूत्रेे मी लिहून देत आहे.
१. स्वभावदोष-निर्मूलनाचे सत्र लक्षपूर्वक शिकून घेेण्याविषयी कुणीतरी मार्गदर्शन करत असल्याचे जाणवणे आणि स्वतःच्या देशातील निम्न स्तराला पोचलेल्या लोकांसाठी या प्रक्रियेची आवश्यकता असल्याचे सांगितल्यावर उपस्थितांचा भाव जागृत होणे : अन्य धर्मीय साधकांचा प.पू. भक्तराज महाराज यांच्याप्रती (प.पू. बाबांच्या प्रती) एखाद्या निरागस बालकाप्रमाणे भाव आहे. त्यांना काही वेळा कुणीतरी सूक्ष्मातून मार्गदर्शन करत असल्याचे ऐकू येते. स्वभावदोष-निर्मूलनाचे सत्र चालू असतांना त्यांना सूक्ष्मातून पुढीलप्रमाणे ऐकू आले, हे सत्र लक्षपूर्वक शिकून घेे. मायदेशी परत गेल्यानंतर तुला तेथील लोकांना स्वभावदोष-निर्मूलन प्रक्रिया शिकवता येईल. स्वभावदोष-निर्मूलन प्रक्रिया ही कोणत्याही धर्माशी निगडित नसल्यामुळे त्याविषयी तू इतरांना निर्भयपणे शिकवू शकशील. त्या वेळी त्या साधकांच्या डोळ्यांत भावाश्रू आले आणि ते म्हणाले, माझ्या देशातील लोकांची वर्तणूक एवढ्या निम्न स्तरावर पोचली आहे की, त्यांना स्वभावदोष-निर्मूलनाची अत्यंत आवश्यकता आहे. हे ऐकून कार्यशाळेत उपस्थित असणार्‍या आम्हा सर्वांच्या डोळ्यांत अश्रू आले.

सप्टेंबर २०१६ मध्ये केरळ येथे हिंदु जनजागृती समितीने आयोजित केलेल्या प्रवचनांना उत्स्फूर्त प्रतिसाद !

कु. अदिती सुखटणकर
१. एर्नाकुलम् जिल्ह्यातील कुझिक्काट भगवती 
मंदिरात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने प्रवचन 
    १८.९.२०१६ या दिवशी एर्नाकुलम् जिल्ह्यातील कुझिक्काट भगवती मंदिराच्या विश्‍वस्तांनी हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांना तेथे प्रवचन घेण्यास बोलावले होते. तेथे या आधी २ वेळा विविध विषयांवर समितीच्या वतीने प्रवचने घेण्यात आली होती. या प्रवचनात समितीच्या कु. अदिती सुखटणकर यांनी कुंकू लावण्याचे महत्त्व आणि शास्त्र, प्रार्थनेचे महत्त्व आणि पितृपक्ष या विषयांवर प्रवचन केले.
१ अ. वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे
१ अ १. प्रवचन ऐकून नामजपाला आरंभ करणे : मागील २ प्रवचनांत घेतलेले विषय जिज्ञासूंना आवडले आणि त्यांतील दोघांनी नामजप करण्यास आरंभ केला. एका महिलेने सांगितले, नामजप करायला लागल्यापासून माझ्यासमवेत देव आहे, असा मला आधार वाटतो.

शांत, सेवाभाव, वेळेचा सुयोग्य वापर करणे, गांभीर्याने साधना करणे आदी गुणवैशिष्ट्ये असणारी देवद (पनवेल) येथील सनातन आश्रमातील साधिका कु. शीतल चिंचकर !

कु. शीतल चिंचकर
          मी गेल्या ६ वर्षांपासून पायांच्या व्याधीमुळे अंथरुणावरच आहे. त्यामुळे मी मिरज येथील आश्रमात असतांना कु. सुषमा लांडे, कु. पूनम देसाई, कु. मेधा सहस्रबुद्धे आणि भाग्यश्री देशमाने, तसेच देवद येथील आश्रमात कु. शीतल चिंचकर, कु. राजश्री हेम्बाडे, कु. गौरी मेणकर, सौ. भक्ती महाजन (पूर्वाश्रमीची कु. भक्ती पारकर), भाग्यश्री जाधव आदी साधिकांनी मला वैयक्तिक आवरण्यास साहाय्य केले. त्यांपैकी कु. शीतलशी माझा बर्‍याचदा संपर्क आला. माझे पती श्री. जाखोटिया हे देवद येथील आश्रमात पूर्णवेळ साधक म्हणून सेवेसाठी येण्यापूर्वी मला काही तपासण्या करून घेण्यासाठी १ मास (महिना) पनवेलमधील एम्.जी.एम्. रुग्णालयात दाखल केले होते. त्या वेळी त्या रुग्णालयात शीतल साधारणतः प्रतिदिन सायंकाळी येत होती. त्या प्रसंगी तिची प्रकर्षाने लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये पुढे देत आहे.
१. अतिशय शांत स्वभाव
          कु. शीतल चिंचकर ही गेल्या ५ वर्षांपासून देवद (पनवेल) येथील सनातन आश्रमात पूर्णवेळ सेवा करते. तिचा स्वभाव अतिशय शांत आहे. कुणाशीही बोलतांना तिच्या आवाजाची पट्टी कधी उंचावली आहे, असे कधीही होत नाही. ती नेहमी एका लयीत आणि शांतपणे बोलते.

प.पू. गुरुदेवांना अपेक्षित अशी सेवा होण्यासाठी धडपडणार्‍या आणि साधकांना साधनेत साहाय्य करणार्‍या ६२ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कु. सिद्धि क्षत्रीय !

कु. सिध्दि क्षत्रीय
         आश्‍विन शुक्ल पक्ष चतुर्थी (५.१०.२०१६) या दिवशी रामनाथी आश्रमात सेवा करणार्‍या कु. सिद्धि क्षत्रीय यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त सहसाधिकेला त्यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत.
कु. सिध्दि क्षत्रीय यांना वाढदिवसानिमित्त 
सनातन परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा !
१. आनंदी
         सिद्धिताई स्वतः आनंदी असते आणि इतरांनाही आनंद देण्याचा प्रयत्न करते.
२. निर्मळ
         ताईला कधी राग आणि प्रतिक्रिया येत नाहीत. ताई कुणाचेही मन दुखावत नाही.
३. स्थिरता
         ती प्रत्येक अडचणीत स्थिर राहून उपाय काढते.

रामनाथी आश्रमात भृगुसंहिता आणि शिवसंहिता यांचे आगमन झाल्यानंतर आलेल्या अनुभूती

कु. तृप्ती गावडे
१. आश्रमात येण्यापूर्वी -
         संहिता येणार; म्हणून आनंद होणे : आश्रमात भृगुसंहिता आणि शिवसंहिता येणार, हे ऐकल्यापासून मला पुष्कळ आनंद होत होता; कारण मला या संहितांमुळे येणारी अनुभूती घेता येणार होती.
२. संहितांचे आगमन झाल्यानंतर
२ अ. दोन्ही संहिता सजीव रूपात आल्या आहेत, असे वाटणे : या दोन्ही संहितांचे वाचक होशियारपूर, पंजाब येथील डॉ. विशाल शर्मा आणि नाथद्वार, राजस्थान येथील डॉ. सुनील चोपडा यांनी आश्रमात प्रवेश करण्यापूर्वी त्यांची पाद्यपूजा करण्यात आली. त्या वेळी या दोन्ही संहिता सजीव रूपात आल्या आहेत आणि आश्रमातील प्रत्येक साधकाला, तसेच प्रत्येक सजीव-निर्जीव वस्तूला त्या भेटत आहेत, असे जाणवले.
२ आ. सद्गुरु (सौ.) बिंदाताईंसह अनेक देवता असल्याचे जाणवणे : संहिता आणि संहितांचे वाचक यांच्या समवेत सद्गुरु (सौ.) बिंदाताई होत्या; पण सद्गुरु (सौ.) बिंदाताई एकट्या नसून त्यांच्यासमवेत अनेक देवता आहेत, असे जाणवत होते.
२ इ. संहितांसमवेत अनेक ऋषीमुनीही आले आहेत, असा भाव मनात निर्माण होऊन कृतज्ञताही वाटत होती.

प्रेमळ, आनंदी आणि देवाप्रती भाव असलेली ५५ टक्के आध्यात्मिक पातळीची अन् उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली पुण्यातील कु. गार्गी मंदार म्हात्रे (वय ३ वर्षे) !

कु. गार्गी म्हात्रे
१. जन्म ते २ वर्ष ४ मास (महिने)
१ अ. चार मासांची असूनही सभेच्या वेळी शांत राहून चैतन्य ग्रहण करणे : गार्गी चार मासांची असतांना शनिवारवाडा येथे सभा होती. मला वाटले होते की, तिला भूक लागेल. ती एवढा वेळ शांत राहू शकेल का; परंतु ती सभा संपेपर्यंत रडली नाही. ती भाषणे ऐकत होती आणि चैतन्य ग्रहण करत होती. तेव्हा श्रीकृष्णानेच तिचा सांभाळ केला, असे मला जाणवले. 
१ आ. कु. गार्गीच्या पोटावर जन्मताच ॐचा आकार आहे. 
१ इ. तिच्या अंगावर दैवी कण दिसायचे.
२. ती झोपेतून उठतांना हसत उठते, कधीच रडत नाही. ती सतत उत्साही आणि आनंदी असते.

साधिकेला सकाळपासून सतत त्रास होत असतांना सायंकाळी अकस्मात् ते न्यून होणे आणि रामनाथी आश्रमात भृगु अन् शिव संहितांचे आगमन झाल्याने हे त्रास न्यून झाल्याचे, तसेच अन्य मोठी संकटे टळल्याचेही ध्यानी येणे

कु. मयुरी डगवार
         ३१.७.२०१६ या दिवशी सकाळपासून मला सतत चक्कर, तसेच देहातील प्राण कुणीतरी खेचून घेत आहे, असेे त्रास जाणवत होते. त्यामुळे पुष्कळ थकवा येऊन माझ्यात नामजप करण्याचेही त्राण नव्हते; पण मी नामजपाच्या खोलीत दिवसभर बसून जप करण्याचा प्रयत्न करत होते. दिवसभर होत असलेलेे त्रास सायंकाळी ५.३० नंतर अकस्मात् न्यून होऊ लागले. त्यानंतर शरिरात शक्ती जाणवून पुष्कळ हलके वाटले. नंतर रात्री मला कळले की, याच कालावधीत भृगुसंहिता आणि शिवसंहिता यांचे रामनाथी आगमन झाले. माझे त्रास न्यून होण्याचे हेेच कारण आहे, असे माझ्या लक्षात आले. या संहितांच्या आगमनाने माझेच नव्हे, तर आश्रमातील अनेक साधकांचे त्रास न्यून होऊन काही मोठी संकटेही टळली, तसेच त्या वेळी वातावरणातील श्रीकृष्णतत्त्व आणि शिवतत्त्व वाढले आहे, असेही जाणवत होते.
- कु. मयुरी डगवार, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१२.८.२०१६)

हे दीनदयाळा गुरुदेवा, कृपा कर सत्वरी ।

आधुनिक वैद्या (कु.) आरती तिवारी
परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले 
यांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त...
तुझ्या उच्छ्वासावर आमचा श्‍वास अनंता ।
तुझ्या दृष्टीवरच आमची सृष्टी भगवंता ॥ १ ॥
तुझ्या शब्दांनीच आम्हा होतो आनंद लक्ष्मीकांता ।
तुझ्या कृपेनेच घडते जीवन सदैव नाथा ॥ २ ॥
हे दीनदयाळा गुरुदेवा, कृपा कर सत्वरी ।
या अनंत अपराध्यावरी ॥ ३ ॥
होईल कृपा तुझी आम्हावरी ।
या आशेवर कृपावंता ॥ ४ ॥
पार कर या भवसागरा ।
हेची मागणे तव चरणांवरी ॥ ५ ॥
- आधुनिक वैद्या (कु.) आरती तिवारी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१३.४.२०१४)

रामनाथी आश्रमाच्या परिसरात नारळाच्या झाडावर २ गरुड बसलेले दिसणे

       १३.९.२०१६ या दिवशी आश्रमाच्या समोरील भागात असलेल्या नारळाच्या झाडावर २ गरुड पक्षी दिसले. साधारणपणे १ आणि २.९.२०१६ या दिवशीही आकाशात याच परिसरात गरुड दिसले होते. या दोन दिवसांतील एका दिवशी २ गरुड उजव्या बाजूला असलेल्या नारळाच्या झाडावर बसले होते. ऑगस्ट मासातही मला ते दिसले होते.
- श्री. यज्ञेश सावंत, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१३.९.२०१६)
       (महर्षींनी गरुड दिसतील, असे सांगितले होते. त्याप्रमाणे ते काही साधकांना दिसले. - संकलक)
       धार्मिक कार्यक्रमाच्या वेळी माणसाच्या वृत्ती सात्त्विक झालेल्या असतात. अशा वेळी राष्ट्र आणि धर्म यांविषयीचे जाज्ज्वल्य विचार समाजमनात रुजवणे सोपे असते.
- सौ. राजश्री खोल्लम (२१.८.२०१०)
ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥

या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो. - प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले
     एका अब्जाधिशाच्या मुलाने त्याची सर्व संपत्ती उधळून टाकावी, तशी हिंदूंच्या मागच्या पिढ्यांनी सर्व धर्मसंपत्ती मातीमोल केली आहे !
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले

बोधचित्र

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

स्नेही निर्धन असला तरी चालेल पण सदाचारी असावा !
धनवान स्नेही दुराचारी असेल, तर तो कधीही तुमचा विश्‍वासघात करू शकतो; पण तुमचा स्नेही सदाचारी असेल, तर तो कितीही निर्धन असला, तरी नित्य तुम्हाला साथच देतो. 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

निधी परत जाण्याची नामुष्की !

संपादकीय 
     केंद्र सरकारने महाराष्ट्र राज्याच्या शिक्षण विभागाला माध्यमिक शिक्षणाच्या विकासासाठी दिलेल्या निधीतील जवळपास १०१ कोटी रुपयांचा निधी वेळेत व्यय होऊ न शकल्याने केंद्राकडे परत जाण्याची नामुष्की ओढवली आहे. राज्यातील माध्यमिक शाळांचे सबलीकरण, मुलींच्या वसतीगृहांची उभारणी, तसेच अन्य कामांसाठी केंद्रशासनाने वेळोवेळी हा निधी राज्यशासनाला संमत करून दिला होता. या योजनेच्या अंतर्गत दुर्गम भागातील विद्यार्थिनींसाठी उभारण्यात येणार्‍या ४३ वसतीगृहांचा निधी परत पाठवावा लागला आहे. आता केंद्राने राज्याच्या खात्यातून हा निधी व्यय करण्यास सांगितले आहे. वास्तविक शिक्षणासारख्या अतीमहत्त्वाच्या सूत्राच्या संदर्भात निधी परत जाणे, हा राज्यासाठी लांछनास्पद आहे. त्यामुळे केंद्रशासनाने दिलेला निधी ज्या अधिकार्‍यांच्या नाकर्तेपणामुळे परत गेला त्यांच्यावर कठोर केली पाहिजे, तर यापुढील काळात असे न होण्यासाठी वचक बसेल !

काळा पैसा संपवा !

 संपादकीय 
      वर्ष २००० नंतर जवळपास प्रत्येक निवडणुकीमध्ये अल्प-अधिक प्रमाणात काळा पैसा हा विषय प्रत्येक राजकीय पक्षाने राजकीय सभांमधून लोकांसमोर मांडला; मात्र काँग्रेस शासनाच्या कार्यकाळात त्यावर कधीच कारवाई झाली नाही. भाजप शासनाने मात्र सत्तेवर आल्यापासून हे सूत्र लावून धरले आहे. याअंतर्गच केंद्रशासनाने देशातील काळा पैसा घोषित करण्यासाठी १ जून ते ३० सप्टेंबरपर्यंत लोकांना समयमर्यादा दिली होती. विशेष म्हणजे या योजनेच्या अंतर्गत पैसा घोषित करण्यासाठी पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी स्वत: आवाहन केले होते. ३० सप्टेंबरपर्यंत असलेल्या समयमर्यादेत केवळ ६५ सहस्र २५० कोटी रुपयांची रक्कम घोषित करण्यात आली आहे. या योजनेत अगदी शेवटच्या दिवशी काही जणांनी रात्रीही काळा पैसा घोषित केला. त्यानुसार ही रक्कम पाच सहस्र कोटी रुपयांनी अधिक वाढू शकते, असा कयास वर्तवण्यात येत आहे. यातील सुमारे ३० सहस्र कोटी रुपये संबंधितांना कर भरावा लागेल, याशिवाय शासनाने देशभरात टाकलेल्या धाडीत ५६ सहस्र कोटी रुपयांची अवैध रक्कम उघड झाली आहे. यातील बहुतांश लोक हे करबुडवे आहेत.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn