Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

नवरात्रोत्सव (आज चौथा दिवस)

सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके ।
शरण्ये त्र्यम्बके गौरि नारायणि नमोऽस्तुते ॥
       एका मतानुसार नवरात्रीतील पहिले तीन दिवस तमोगुण कमी करण्यासाठी तमोगुणी महाकालीची, पुढील तीन दिवस रजोगुण वाढवण्यासाठी रजोगुणी महालक्ष्मीची आणि शेवटचे तीन दिवस साधना तीव्र होण्यासाठी सत्त्वगुणी महासरस्वतीची पूजा करतात.
(संदर्भ : सनातनचा ग्रंथ शक्ती)
नवरात्र विषयक माहितीसाठी संकेतस्थळावरील मार्गिका
https://www.sanatan.org/mr/navratri

गणेशोत्सव मंडळांवरील अन्यायकारक कलमे न हटवल्यास आंदोलन छेडण्यात येईल ! - आमदार राजेश क्षीरसागर यांची चेतावणी

        कोल्हापूर - गणेशोत्सवात होणार्‍या डॉल्बीला फाटा देत डॉल्बीमुक्त गणेशोत्सवासाठी कोल्हापूरनेच पुढाकार घेतला आहे. गणेशमूर्ती विसर्जन मिरवणुकीत कोल्हापूरच्या मंडळांनी शिस्तबद्ध मिरवणूक काढली; मात्र काही मंडळांनी ध्वनीक्षेपकाचा वापर केल्याविषयी त्यांच्यावर पर्यावरण कायद्यांतर्गत अजामीनपात्र गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. पोलिसांनी कारवाई करावी; मात्र अन्यायकारक कलमे हटवावीत. अन्यायकारक कलमे हटवली नाहीत, तर आंदोलन करण्यात येईल, अशी चेतावणी शिवसेनेचे आमदार श्री. राजेश क्षीरसागर यांनी दिली. शासकीय विश्रामगृहात पार पडलेल्या बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला नगरसेवक सर्वश्री रवीकिरण इंगवले, हिंदु जनजागृती समितीचे मधुकर नाझरे, शिवानंद स्वामी, गणेशोत्सव मंडळांचे अध्यक्ष, कार्यकर्ते, शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. 
        आमदार श्री. क्षीरसागर म्हणाले की, पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या अटींनुसार मंडळांनी ध्वनीक्षेपक यंत्रणा लावली होती; पण मिरवणुकीच्या मध्यरात्री अचानक साहित्य कह्यात घेतल्याने मिरवणूक थांबली. मिरवणूक पुन्हा चालू होण्यासाठी कार्यकर्त्यांची समजूत घालणे महत्त्वाचे होते. त्यामुळे ध्वनीक्षेपक पुन्हा चालू करण्याची अनुमती मिळाली. पोलिसांनी मंडळांच्या पदाधिकार्‍यांवर पर्यावरण कायद्यांतर्गत गुन्हे प्रविष्ट केले आहेत. गुन्हे अजामीनपात्र असल्याने कार्यकर्त्यांना ३ मास कारागृहात रहावे लागू शकते. अनेक कार्यकर्त्यांचे शिक्षण आणि नोकरी यांना धोका निर्माण झाला आहे. पोलिसांनी अन्यायकारक कलमे त्वरित मागे घ्यावीत, यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेऊन मंडळांची बाजू मांडणार आहे. मंडळांकडून झालेल्या चुकीविषयी आम्ही डॉल्बीचा त्रास झालेल्या नागरिकांची क्षमा मागतो. 

काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांचे फुत्कार (म्हणे) नरेंद्र मोदी आणि अजित डोवाल युद्धपिपासू !

  • सर्जिकल स्ट्राईकनंतर पाकचा जळफळाट झाला आहे, तसाच जळफळाट काँग्रेसमधील पाकप्रेमी आणि जिहादी आतंकवादप्रेमी नेते यांचाही झाला आहे, त्यातूनच अशी विधाने केली जात आहेत. राष्ट्रप्रेमी जनताच अशा नेत्यांना निवडणुकीत त्यांची जागा दाखवून देईल !
  • सध्याचे सरकार युद्धपिपासू असते, तर पाकिस्तान आणि आतंकवाद केव्हाच नष्ट झाला असता !
        नवी देहली - पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना युद्धाची खुमखुमी असून हे दोघेही युद्धपिपासू आहेत, अशी टीका काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी सर्जिकल स्ट्राईकवरून केली आहे. एका इंग्रजी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हा आरोप केला. (लादेनला ओसामाजी म्हणणार्‍या दिग्विजय सिंह यांच्याकडून आणखी काय अपेक्षा असणार ? - संपादक)
        दिग्विजय सिंह म्हणाले की, काँग्रेसच्या कार्यकाळातही अशाप्रकारचे सर्जिकल स्ट्राईक झाले होते; मात्र तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी प्रत्येक वेळी विरोधी पक्षाच्या नेत्यांना विश्‍वासात घेऊन कारवाईचा बभ्रा (जगजाहीर) होणार नाही, याची काळजी घेतली होती. तेव्हाच्या आणि आताच्या कारवाईमध्ये स्वत:ची पाठ थोपटून घेणे आणि प्रसारमाध्यमांमध्ये स्वत:चा प्रचार करणे, हाच काय तो भेद आहे. असा प्रकार यापूर्वी कधीही घडला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी भारत-पाक युद्ध आणि शांतता यांपैकी काय महत्त्वाचे आहे ? भारताच्या अर्थव्यवस्थेला धक्का लागू नये, यासाठी दोन्ही देशांमध्ये शांतता असणे आवश्यक आहे. भाजपकडून सर्जिकल स्ट्राईकविषयी कार्यकर्त्यांना उरबडवेगिरी न करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत; मात्र पक्षाचे अध्यक्ष अमित शहा आणि कनिष्ठ नेते स्वत:ची पाठ थोपटून घेत आहेत.

काश्मीरमध्ये आतंकवाद्यांचे पुन्हा आक्रमण

  • एका सर्जिकल स्ट्राईकमुळे आतंकवादी संपणारे नाहीत, तर त्यासाठी पाकलाच संपवावे लागणार आहे, हे सरकार आणि जनता यांनी समजून घेतले पाहिजे !
  • २ आतंकवादी ठार, तर १ सैनिक हुतात्मा !
  • आतंकवादी आक्रमणे हे युद्ध आहे, हे सरकारला कधी समजणार ?
  • इस्रायल त्याच्या एका नागरिकावर जरी आक्रमण झाले, तरी शत्रूवर आक्रमण करून त्याला जशास तसे प्रत्युत्तर देतो. भारतानेही अशा प्रकारेच प्रत्युत्तर द्यायला हवे !
  • २ ठिकाणी पाकचा गोळीबार
        श्रीनगर - भारतीय सैनिकांनी पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून केलेल्या सर्जिकल स्ट्राईकचा सूड घेण्याचा प्रयत्न पाकपुरस्कृत आतंकवाद्यांकडून केला जात आहे. २ ऑक्टोबरच्या रात्री आतंकवाद्यांनी काश्मीरच्या बारामुल्ला येथील राष्ट्र्रीय रायफल्सच्या छावणीवर आत्मघातकी आक्रमण केले. आतंकवाद्यांनी येथे बॉम्बचा माराही केला. या वेळी झालेल्या चकमकीत २ आतंकवाद्यांना ठार करण्यात आले, तर एक सैनिक हुतात्मा झाला. आक्रमण करणारे ६-७ आतंकवादी होते. यांतील एक आतंकवादी घायाळ झाल्यानंतर त्याने झेलम नदीत उडी मारून पलायन केले, तर अन्य आतंकवाद्यांचा शोध घेण्यात येत आहे. जवळच असलेल्या पार्कच्या मार्गाने आतंकवाद्यांनी सैन्यतळात शिरण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यात त्यांना यश आले नाही. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी या आक्रमणाची संपूर्ण माहिती घेतली. राष्ट्रीय रायफल्सच्या या छावणी शेजारी सीमा सुरक्षा दलाची छावणी आहे.

नवरात्रोत्सवासाठी येणार्‍या भाविकांना सुविधा मिळण्यासाठी महापालिकेने व्यवसाय आणि रोजगार चालवणार्‍या घटकांना आवाहन करावे !

बजरंग दलाची महानगरपालिका 
आयुक्तांकडे निवेदनाद्वारे मागणी
        कोल्हापूर - नवरात्रोत्सवासाठी येणार्‍या भाविकांना सोयी सुविधा देण्यासाठी सेवा, व्यवसाय आणि रोजगार चालवणार्‍या सर्व घटकांनी आपले दायित्व पार पाडण्याविषयी महापालिकेने तसे आवाहन करावे, या मागणीचे निवेदन बजरंग दलाच्या वतीने महापालिकेचे आयुक्त पी. शिवशंकर यांना २९ सप्टेंबर या दिवशी देण्यात आले. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री सुधाकर सुतार, बजरंग दलाचे जिल्हाप्रमुख संभाजी साळुंखे, शहरप्रमुख महेश उरसाल, प्रशांत कागले, निखिल माळकर, सागर कलघटगी, कृष्णा मेरवाडे आदी धर्माभिमानी उपस्थित होते.
निवेदनात म्हटले आहे की...
१. नवरात्रोत्सवात देशातील अनेक भाविक श्री महालक्ष्मीदेवीच्या दर्शनासाठी येत असतात. त्यामुळे प्रशासनाने जरी स्वच्छतागृहे, वाहनतळ आदींची सोय केली, तरी ती बर्‍याच वेळा अपुरी पडते. त्यामुळे सदर दायित्व हे प्रशासनाचे नसून नवरात्रोत्सवात सेवा, व्यवसाय आणि रोजगार चालवणार्‍या सर्वच घटकांनी ते पार पाडणे आवश्यक आहे.

सनातन संस्थेचे ग्रंथ प्रत्येकाने वाचावयास हवेत ! - नितीन काळे, शिवसेना

ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन करतांना श्री. नितीन काळे

        सांगली, ३ ऑक्टोबर (वार्ता.) - सनातन संस्थेच्या ग्रंथांमध्ये अत्यंत सोप्या भाषेत भाविकांना उपयुक्त अशी माहिती दिलेली आहे. त्यामुळे प्रत्येकाने सनातन संस्थेचे ग्रंथ वाचावयास हवेत, असे मत शिवसेनेचे उपशहरप्रमुख श्री. नितीन काळे यांनी व्यक्त केले. येथील माधवनगर रस्त्यावरील श्री दुर्गामाता मंदिरासमोर नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने लावण्यात आलेल्या ग्रंथ प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

बाळकुम (कोलशेत) येथील सनातनचे साधक श्री. दयानंद हजारे यांना ठाणे गुणीजन गौरव पुरस्कार प्रदान !

ठाणे महानगरपालिकेचा ३४ वा वर्धापनदिन सोहळा 

आमदार श्री. रवींद्र पाठक यांच्या हस्ते
पुरस्कार स्वीकारतांना श्री. दयानंद हजारे (डावीकडे)

        ठाणे, ३ ऑक्टोबर (वार्ता.) - ठाणे महानगरपालिकेचा ३४ वा वर्धापनदिन सोहळा १ ऑक्टोबर या दिवशी राम गणेश गडकरी रंगायतन येथे साजरा करण्यात आला. या वेळी ठाणे महानगरपालिकेच्या वतीने आजवर केलेल्या कामाचा आढावा घेऊन शिवसेनेचे आमदार श्री. रवींद्र पाठक यांच्या हस्ते सनातन संस्थेचे साधक श्री. दयानंद हजारे यांना ठाणे गुणीजन गौरव प्रदान करण्यात आला. श्री. हजारे हे बाळकुम गावातील लोकांना सनातनने प्रकाशित केलेल्या ग्रंथांमधील धार्मिक कृतीमागील शास्त्र आणि त्याचे महत्त्व यांविषयी माहिती सांगून समाजात जागृती करतात. गावातील लोक कोणतीही धार्मिक कृती करण्यासाठी श्री. हजारे यांनाच बोलावतात.

समुद्रमार्गे २ पाकिस्तानी नौका भारतात घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात !

पाक भारताला प्रत्युत्तर देण्याचा 
प्रयत्न करण्यापूर्वीच भारताने त्याला संपवावे !
        नवी देहली - सर्जिकल स्ट्राईकनंतर पाक भारतावर सूड उगवण्यासाठी आसुसलेला आहे. यासाठी तो विविध माध्यमांतून प्रयत्न करत आहे. यातूनच पाकमधून २ संशयित नौका गुजरात आणि महाराष्ट्राच्या दिशेने निघाल्या असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांनी दिली आहे. यामुळे भारताच्या तटरक्षक दलाला सतर्क करण्यात आले आहे. मल्टी एजन्सी सेंटरने या नौकांविषयी माहिती देतांना सांगितले आहे की, एका नौकेला तांत्रिक अडचण आली आहे, तर दुसरी चांगली आहे आणि ती भारताच्या दिशेने येत आहे. तटरक्षक दलाने २ ऑक्टोबरला पोरबंदर येथून पाकची एक संशियत नौका कह्यात घेतली आहे. त्यातील ९ पाकिस्तान्यांना कह्यात घेतले आहे.

(म्हणे) काँग्रेस आघाडी सरकारच्या काळातही झाले होते सर्जिकल स्ट्राईक !

  • काँग्रेसच्या काळात जर सर्जिकल स्ट्राईक झाले होते, तर त्याचा पाकवर काहीच परिणाम कसा झाला नाही ? म्हणजे ही कारवाई निष्क्रीयच ठरली आणि काँग्रेसनेही नंतर याहून परिणामकारक कारवाई का केली नाही ?
  • माजी केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम् यांचा दावा
         नवी देहली - काँग्रेसच्या नेतृत्वाखालील दुसर्‍या आघाडी सरकरच्या काळात म्हणजे जानेवारी २०१३ मध्ये भारतीय सैन्याने नियंत्रणरेषा पार करून सर्जिकल स्ट्राईक केले होते; परंतु त्या वेळच्या सरकारने यात गोपनीयता राखत ही गोष्ट सार्वजनिक न करण्याचा निर्णय घेतला होता, असा दावा माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिंदबरम् यांनी केला.
         चिदंबरम् पुढे म्हणाले की, केंद्र सरकार पाकसमवेतच्या नीतीमध्ये पालट झाल्याचा दावा करत असले, तरी येणारा काळच सर्व काही सांगेल. तथापि काँग्रेस पक्ष या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमवेत आहे, अशी ग्वाही त्यांनी दिली. देशाच्या सुरक्षिततेविषयी कायम सहकार्याची भावना आहे, असेही त्यांनी सांगितले.

विजयवाडा (आंध्रप्रदेश) येथील श्री कनकदुर्गा मंदिराच्या नवरात्रोत्सवातील प्रसादात किडे, झुरळे आणि बुरशी !

        विजयवाडा (आंध्रप्रदेश) - येथील प्रसिद्ध श्री कनकदुर्गा मंदिरात आलेल्या भाविकांना लाडवाच्या प्रसादात किडे, किटक आणि झुरळे आढळल्याची घटना समोर आली आहे. अन्न सुरक्षा विभागाच्या अधिकार्‍यांनी तातडीने कारवाई करून ज्या ठिकाणी प्रसादाचे लाडू ठेवण्यात आले होते ती खोली सीलबंद केली आहे. किडेयुक्त लाडवाच्या प्रसादाचे नमुने तपासणीसाठी अन्न प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. किड्यांसह बुरशी आणि कचरा असलेले सुमारे ५० सहस्र लाडू नष्ट करण्याचे आदेश मंदिर प्रशासनाच्या कार्यकारी अधिकारी सूर्या कुमारी यांनी दिले आहेत. मुसळधार पावसामुळे किडे, किटक आणि झुरळे आत आल्याची माहिती स्वयंपाकघर प्रमुखाने दिली आहे. महोत्सव काळात या मंदिराला प्रतिदिन लाखभर भाविक भेट देत असतात. भाविकांनी मंदिर कर्मचार्‍यांकडे लाडवांचा प्रसाद खराब झाल्याची तक्रार केली होती; मात्र कर्मचार्‍यांनी दुर्लक्ष केले. उलट या तक्रारींची दखल घेण्याऐवजी भाविक अशा तक्रारी करून मंदिराची प्रतिमा मलीन करत आहेत, असा आरोप मंदिर प्रशासन अधिकार्‍यांनी केला होता. भाविकांनी मंदिराबाहेर निदर्शने करत या निष्काळजीपणाचा निषेध केला आहे. उत्तरदायी कर्मचार्‍यांवर कारवाई करा, अशी मागणीही भाविकांनी केली आहे.

आदर्श नवरात्रोत्सव साजरा करण्यासाठी पनवेल येथे वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना निवेदन

कार्यकर्त्यांकडून निवेदन स्वीकारतांना वरिष्ठ पोलीस निरीक्षक

         पनवेल - येथे नवरात्रोत्सव आदर्शरित्या साजरा व्हावा, यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील बाजारे यांना हिंदु जनजागृती समितीच्या वतीने निवेदन देण्यात आले. या वेळी समितीचे विलास पुंडले, श्री. राजेंद्र पावसकर, विलास सुर्वे उपस्थित होते.

मुंबईत आतंकवादी आक्रमणाच्या शक्यतेने सतर्कतेची चेतावणी !

आतंकवादी आक्रमणाच्या सावटाखाली रहाणारा एकमेव देश भारत !
     मुंबई, ३ ऑक्टोबर - मुंबईमध्ये पुन्हा एकदा आतंकवादी आक्रमण होण्याची शक्यता लक्षात घेऊन राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार समितीने आतंकवादविरोधी पथक आणि महाराष्ट्र्र पोलीस यांना सतर्कतेची चेतावणी दिली आहे. या चेतावणीनंतर वेस्टर्न कोस्ट लाइनवर सर्वांत जास्त सतर्कता राखली जात आहे.
    नवरात्रोत्सवाच्या कालावधीत गर्दीच्या ठिकाणी आणि मंदिरांना विशेष करून लक्ष्य केले जाऊ शकते. १९ नोव्हेंबरपर्यंत आतंकवादी मुंबईमध्ये आक्रमण करण्याच्या सिद्धतेत असल्याची माहितीही समितीने महाराष्ट्र सरकारला दिली आहे.

अमेरिकेच्या नागरिकांमध्ये धर्मांधांविषयी सर्वाधिक तिरस्कार

    वॉशिंग्टन - अमेरिकेच्या नागरिकांना धर्मांध सर्वाधिक तिरस्करणीय वाटतात, असे मिनिसोटा विश्‍वविद्यालयातील सामाजिक विभागाने केलेल्या पाहणीत आढळून आले आहे. (भारतात कधी अशी पाहणी करण्याचे धाडस कोणी करत नाही ! - संपादक) अमेरिकेच्या नागरिकांना देशातील अल्पसंख्य समाजातील नागरिकांच्या श्रद्धा आणि धार्मिक गट यांविषयी काय वाटते, याचे परीक्षण केले असता अमेरिकेतील अर्ध्या नागरिकांना धर्मांधांंविषयी तिरस्कार वाटतो, असे लक्षात आले आहे. (अमेरिकेचे नागरिक जगातील अत्यंत उदारमतवादी म्हणून ओळखले जातात. जर तिथेच अशी स्थिती असेल, तर जगभरात काय भावना असेल ? - संपादक)

वारकरी संप्रदायाचे लांजा तालुका अध्यक्ष ह.भ.प. मनोहर सदाशिव रणदिवे यांची देवद (पनवेल) येथील सनातन आश्रमाला सदिच्छा भेट

ह.भ.प. मनोहर सदाशिव रणदिवे यांना दैनिक सनातन
प्रभातविषयी माहिती सांगतांना श्री. आेंकार कापशीकर

        देवद (पनवेल) - वारकरी संप्रदायाचे लांजा तालुका अध्यक्ष ह.भ.प. मनोहर सदाशिव रणदिवे यांनी येथील सनातन आश्रमाला नुकतीच सदिच्छा भेट दिली. श्री. आेंकार कापशीकर यांनी त्यांना आश्रमातील सेवांविषयी अवगत केले.
        आश्रमातील स्वभावदोष आणि अहं निर्मूलनाच्या अंतर्गत असणारे चुकांचे फलक पाहून या प्रक्रियेचे साधनेत पुष्कळ महत्त्व आहे, असे त्यांनी सांगितले. आश्रमातील टापटीपपणा, शांतता, शिस्तबद्ध नियोजन, पाण्याची केली जाणारी काटकसर हे पाहून त्यांनी साधकांचे कौतुक केले. दैनिक सनातन प्रभातमध्ये बातम्यांना दिल्या जाणार्‍या संपादकीय टीपा पुष्कळ चांगल्या असतात, असेही ते म्हणाले. तसेच समाजात हिंदूसंघटन नसल्याने आपण यशस्वी होऊ शकत नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.

दारिद्य्ररेषेखालील लोकसंख्या घटली ! - जागतिक बँक

आशियातील लोकांच्या उत्पन्नात सर्वाधिक वाढ !
     न्यूयॉर्क - जागतिक अर्थव्यवस्थेची परिस्थिती चिंताजनक असूनही जगभरातील दारिद्य्ररेषेखालील लोकसंख्येत १० कोटींची घट झाली आहे, अशी माहिती जागतिक बँकेचे अध्यक्ष जिम याँग किम यांनी दिली. बँकेच्या नव्या आकडेवारीनुसार वर्ष २०१२ च्या तुलनेत वर्ष २०१३ मधील उत्पन्नात वाढ झाली अहो. विशेषतः आशियातील लोकांच्या उत्पन्नात सर्वाधिक वाढ झाल्याचे बँकेने स्पष्ट केले. यावर जागतिक बँकेचे अध्यक्ष जिम याँग किम यांनी दारिद्य्र नष्ट करत सर्व देशांची समृद्धीकडे चालू असलेली वाटचाल उल्लेखनीय आहे, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. वर्ष २०३० पर्यंत दारिद्य्र नष्ट करण्याचे संयुक्त राष्ट्रसंघाचे उद्दिष्ट समीप आल्याचे सिद्ध होत आहे, असे जागतिक बँकेने म्हटले आहे.

या देशात हिंदूच अल्पसंख्यांक ! - पू. डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती

मार्गदर्शन करतांना डावीकडून पू. डॉ. चारुदत्त
पिंगळे आणि त्यांच्या बाजूला श्री. चित्तरंजन सुराल
     जमशेदपूर (झारखंड) - एकीकडे इसिसचे जिहादी आतंकवादी देशात प्रवेश करण्याच्या मार्गावर आहेत, तर दुसरीकडे देशातील एकूण हिंदूंपैकी २५ ते ३० टक्के स्वत:ला धर्मनिरपेक्षतावादी, साम्यवादी म्हणून घेणे अधिक पसंत करत आहेत. इतर २५ ते ३० टक्के हिंदू जातीच्या आधारावर आरक्षण मिळण्यासाठी स्वत:ला वेगळे ठेवून आहेत. त्यामुळे या देशात हिंदूच अल्पसंख्यांक आहेत, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक पू. डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी केले. ते हिंदु जनजागृती समिती आणि धर्माभिमानी युवक यांनी संयुक्तपणे कदमा येथील प्रकृती ऐनक्लेवमध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमात राष्ट्र आणि धर्म यांची सध्याची स्थिती आणि त्यावर उपाय - साधना या विषयावर बोलत होते. या कार्यक्रमात मार्गदर्शन करतांना पू. डॉ. पिंगळे पुढे म्हणाले, साधना नसल्यामुळे लोकांमध्ये ईश्‍वराचे बळ अल्प आहे. ऋषी-मुनी साधना करून सदा ईश्‍वराच्या अनुसंधानात रहात होते. त्यामुळे त्यांना योग्य-अयोग्य कळत होते. आमचा प्रयत्नही त्यादृष्टीने असला पाहिजे. साधना कशी करावी ? याविषयीची माहिती हिंदु जनजागृती समितीचे पूर्व आणि पूर्वोत्तर भारताचे समन्वयक श्री. चित्तरंजन सुराल यांनी सांगितली.

(म्हणे) मी समलिंगी आहे; मात्र ब्रह्मचर्य व्रताचे पालन करतो !

ब्रह्मचर्य व्रत म्हणजे काय हेच न समजलेले चर्च ऑफ इंग्लंडचे बिशप चेंबरलीन !
            असे नीतीमत्ताहीन बिशप निर्माण करणारे व्हॅटिकन मदर तेरेसाला संतपद बहाल करत आहे !
      लंडन - इंग्लंडमधील चर्च ऑफ इंग्लंडने ग्रँथमचे बिशप म्हणून निकोलस चेंबरलीन यांची नियुक्ती केली आहे. बिशप चेंबरलीन यांनी ते समलिंगी आहेत; मात्र चर्चच्या नियमानुसार ब्रह्मचर्य व्रताचे पालन करत आहेत, असे एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत मान्य केले आहे. (चर्चला आणि बिशपना ब्रह्मचर्य म्हणजे काय, हे तरी समजले आहे का ? समलिंगी आहे आणि ब्रह्मचर्याचे पालन करतो, या म्हणण्याला काही अर्थ आहे का ? - संपादक)
१. बिशप चेंबरलीन यांची नियुक्ती करणारे आर्चबिशप ऑफ कँटरबरी जस्टीन वेल्बी यांनीही निकोलस चेंबरलीन यांच्या लैंगिक संबंधांविषयी पूर्वकल्पना असल्याचे मान्य केले आहे; मात्र चेंबरलीन यांचे कौशल्य आणि चर्चप्रती नितांत श्रद्धा या गुणानुसारच त्यांची नियुक्ती करण्यात आल्याचे सांगितले. (हिंदूंच्या संतांवर आरोप करणारे ख्रिस्त्यांच्या या वस्तूस्थितीविषयी कधीच बोलत नाहीत ! - संपादक)

माझ्या प्रश्‍नांची गीता आणि उपनिषदे यांमध्ये उत्तरे मिळाली ! - हॉलिवूड अभिनेते ह्यू जॅकमॅन

भविष्यात विदेशी लोकांनी भारतियांना हिंदु 
धर्म समजावून सांगितल्यास आश्‍चर्य वाटणार नाही !
      नवी देहली - प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेते ह्यू जॅकमॅन या दिवसांत हिंदु धर्माचे पूर्णपणे आचरण करत आहेत. ते ख्रिस्ती असतांनाही चर्च किंवा बायबल ऐवजी हिंदु धर्मग्रंथ, भगवद्गीता आणि उपनिषदे यांमध्ये शांती शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. ते हिंदु धर्मामुळे इतके प्रभावित झाले की, त्यांनी माझ्या प्रश्‍नांची उत्तरे चर्चमध्ये नाही, तर गीता आणि उपनिषदे यांमध्ये मिळाली, असे उद्गार काढले आहेत. (पाश्‍चात्त्य संस्कृतीच्या मागे लागून सुख शोधू पहाणारे भारतीय यातून बोध घेतील का ? - संपादक) एका इंग्रजी वृत्तपत्राशी संवाद साधतांना जॅकमॅन म्हणाले, माझ्या डोक्यात निर्माण झालेले प्रश्‍न मला त्रास देत होते. त्यामुळे मी चर्चमध्ये जाऊन आलो. त्या वेळी मला काही उत्तरेही मिळाली; परंतु जसे मी वैदिक विचार, ग्रंथ आणि तथ्य यांचा शोध घेतला. तेव्हा मला सर्व प्रश्‍नांची उत्तरे मिळाली आणि मला संपूर्णपणे संतुष्टता लाभली. जॅकमॅन हिंदु धर्मासोबतच आदि शंकराचार्य आणि महेश योगी यांच्यामुळे अत्यंत प्रभावित आहेत. जेव्हापासून त्यांनी या दोघांची ग्रंथसंपदा वाचण्यास प्रारंभ केला, तेव्हापासून सनातन धर्मग्रंथांविषयी त्यांची जिज्ञासा वाढत गेली. त्यानंतर त्यांनी गीता आणि उपनिषदे वाचणे चालू केले. (हिंदु धर्मग्रंथांत विदेशींना त्यांच्या सर्व प्रश्‍नांची उत्तरे मिळतात; कारण ते त्याचा जिज्ञासेने अभ्यास करून ती तत्त्वे कृतीत आणतात. याउलट भारतातील बहुसंख्य हिंदू हिंदु धर्मग्रंथांचे वाचनही करत नाहीत, त्याप्रमाणे आचरण करणे तर दूरच उलट अर्धवट आणि ऐकीव माहितीवरून धर्मावर टीका मात्र करतात. - संपादक)

सॅमसंग गॅलेक्सी नोट भ्रमणभाष संचाने विमानात पेट घेतल्याच्या प्रकरणी नागरी उड्डाण महासंचालकांकडून चौकशी

     नवी देहली - सॅमसंग गॅलेक्सी नोट या भ्रमणभाष संचाने इंडिगो एअरक्राफ्टच्या विमानात पेट घेतल्याच्या प्रकरणी नागरी उड्डाण महासंचालकांकडून चौकशी चालू करण्यात आली. भ्रमणभाषमधील बॅटरी खूप गरम होऊन तिचा स्फोट होत असल्याविषयी या वेळी शंका व्यक्त करण्यात आली, अशी माहिती अधिकृत सूत्रांनी दिली. 
   २३ सप्टेंबर २०१६ या दिवशी इंडिगो एअरक्राफ्टचे सिंगापूरहून आलेले विमान चेन्नई विमानतळावर उतरतांना सॅमसंग गॅलक्सी नोट २ या भ्रमणभाष संचने पेट घेतला होता. भ्रमणभाषने विमानात पेट घेण्याची भारतातील ही पहिलीच घटना होती. त्यामुळे भारताच्या विमान उड्डाण महासंचालकांनी सॅमसंगच्या वरिष्ठ अधिकार्‍यांना बोलावून घेऊन त्याविषयी चौकशी केली.उत्तरप्रदेशातील देवली येथे धर्मांधांचे हिंदूंवर आक्रमण

देशात ठिकठिकाणी हिंदूंच्या उत्सवांमध्ये कुरापत काढून धर्मांधांकडून हिंदूंना त्रास
देण्यात येतो. त्यामुळे खरे सण आणि उत्सव साजरे करण्यासाठी आता हिंदु राष्ट्राशिवाय पर्याय नाही ! 
धर्मांधांच्या दगडफेकीत ६ जण घायाळ
      बुलंदशहर (उत्तरप्रदेश) - देवली येथे नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने मंदिराच्या बाहेर स्वच्छता चालू असतांना धर्मांधांनी घाण पाणी टाकले. त्यामुळे हिंदूंचा धर्मांधांशी वाद झाला. त्यानंतर धर्मांधांनी हिंदूंवर आक्रमण करून जोरदार दगडफेक केली. यात ६ जण घायाळ झाले. याविषयी माहिती मिळताच जिल्हा दंडाधिकारी वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांसह घटनास्थळी पोचले. त्यानंतर त्यांनी मंदिरात पूजा करून वातावरण शांत करण्याचा प्रयत्न केला; मात्र तणाव कायम आहे. घायाळांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात प्रविष्ट करण्यात आले. येथे कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. यापूर्वीही येथे मंदिरात घंटा आणि ध्वनीक्षेपक वाजवण्यावरून वाद झाला होता.युरोपमध्ये इस्लामिक स्टेट सेल स्थापण्याच्या संशयावरून ५ जणांना अटक

जगाला डोकेदुखी झालेला इस्लामी आतंकवाद !
      बार्सिलोना - युरोपातील स्पेन, जर्मनी आणि बेल्जियम या देशांमध्ये इस्लामिक स्टेट सेल स्थापन करून इस्लामी आतंकवाद पसरवत असल्याच्या संशयावरून स्पेन, जर्मनी आणि बेल्जियम या देशांच्या अधिकार्‍यांनी ५ जणांना अटक केली आहे, अशी माहिती स्पेनच्या गृहमंत्रालयाने दिली आहे. यांपैकी तिघांना स्पेनमध्ये, तर बेल्जियम आणि जर्मनीमध्ये प्रत्येकी एकाला अटक करण्यात आली आहे.
    युरोपमधील आतंकवादी गट फेसबूकच्या माध्यमातून इस्लामिक स्टेटचा प्रसार करत होते. या गटात अनुमाने ३२ सहस्र समर्थक आहेत. स्पेन शासनाने इस्लामी आतंकवादाच्या विरोधात कडक पावले उचलली असून आतापर्यंत १४३ आतंकवाद्यांना अटक केली आहे.

चेन्नई येथील अन्नदान कार्यक्रमात हिंदु जनजागृती समितीकडून विशेष सत्संग !

      चेन्नई - कोळतुर, चेन्नई येथे २७ सप्टेंबरला विवेकानंद निवासी संस्थेच्या वतीने तिरुपती कोडैच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या अन्नदान कार्यक्रमात हिंदु जनजागृती समितीकडून सत्संग घेण्यात आला. प्रतिवर्ष भक्तमंडळी श्री तिरुपती बालाजीला कोडै म्हणजे सुशोभित छत्र अर्पण करतात. हे छत्र घेऊन जात असतांना मार्गात येणार्‍या मंदिरांत किंवा सार्वजनिक ठिकाणी त्याची पूजा केली जाते आणि त्या ठिकाणी अन्नदानासारखे कार्यक्रम आयोजित केले जातात. असाच एक कार्यक्रम कोळतुर येथे आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात हिंदु जनजागृती समितीच्या सौ. सुगंधी जयकुमार आणि सौ. उमा रविचंद्रन् यांनी सत्संग घेतला. त्यांनी आचारधर्म, साधना, पितृपक्षाचे महत्त्व आणि नवरात्री आदी ग्रंथांचे प्रदर्शन लावण्यात आले होते. 
     या कार्यक्रमाच्या आयोजकांपैकी एक असलेल्या एका उद्योजकाने सनातनचे ५०० तामिळ पंचांग पुरस्कृत करण्याची सिद्धता दर्शवली.

हिंदु धर्मामुळेच विविध देशांच्या लोकांना भारतात आश्रय मिळाला ! - कु. प्रणीता सुखटणकर

केरळच्या आलापुझा जिल्ह्यात आंतरधर्मीय 
सलोखा बैठकीत हिंदु जनजागृती समितीचा सहभाग
      आलापुझा (केरळ) - केरळ राज्याच्या तीन जिल्ह्यांतील किनारपट्टीच्या भागात काम करणार्‍या व्हिन सेंटर या सामाजिक संघटनेच्या २५ व्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात हिंदु जनजागृती समितीला निमंत्रित करण्यात आले होते. हिंदु धर्माच्या प्रतिनिधी म्हणून कु. प्रणीता सुखटणकर यांनी लोक: समस्थ सुखिनो भवन्तु या विषयावर विचार मांडले. हिंदु धर्मानुसार साधना करण्याचे विविध मार्ग त्यांनी या वेळी विषद केले. या कार्यक्रमाला अनुमाने ८०० लोक उपस्थित होते. या वेळी ख्रिस्ती आणि इस्लाम या धर्मांच्या प्रतिनिधींना निमंत्रित करण्यात आले होते.
     कु. प्रणीता सुखटणकर यांनी भारताच्या वैभवशाली इतिहासाविषयी सांगतांना म्हटले की, त्या काळी वेगवेगळ्या देशांतील लोकांचा भारतियांनी कुठलीच शंका न घेता स्वीकार केला. भारतात अस्तित्वात असलेल्या हिंदु धर्मामुळे ते शक्य झाले. बर्‍याच इतिहासकारांनी भारत आणि हिंदु धर्म यांच्या बाजूने विचार मांडले. सध्या समाजामध्ये जी अस्थिरता दिसून येते, त्याला धर्माचरण आणि साधना यांचा अभाव हेच कारण आहे.

कम्युनिस्ट चीनमध्ये भगवान श्रीकृष्णाच्या भक्तीचा प्रसार !

      बीजिंग - अधिकृत निरीश्‍वरवाद जोपासणार्‍या चीनमध्ये भगवान श्रीकृष्णाची भक्ती वाढत आहे. भगवान श्रीकृष्णाच्या भक्तांचा नेमका आकडा सांगणे कठीण आहे; मात्र श्रीकृष्णाने सांगितलेल्या भक्तीमार्गाकडे बरेच चिनी नागरिक आकर्षित होत असल्याचे दिसून येत आहे. गेल्या आठवड्यात चीनमध्ये मोठ्या प्रमाणात श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी करण्यात आली. या उत्सवाच्या वेळी हरे कृष्ण जप करण्यात आला. भक्तीगीते सादर करण्यात आली, भगवद्गीतेचे वाचन करण्यात आले आणि खाऊचे वाटप करण्यात आले. दक्षिण चीनमधील गाँवडाँग प्रांतामध्ये आंतरराष्ट्रीय बौद्ध हस्तकला मेळ्याच्या ठिकाणी हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात आला. चीनच्या बीजिंग, शांघाय, चेंगडू, शेंजेन आणि हर्बिन या शहरांमध्ये जन्माष्टमी उत्सव साजरा करण्यात आला, असे भक्तीयोगाचे गोडिया दास यांनी सांगितले.सर्जिकल स्ट्राइकच्या वेळी इराणकडून भारताला साहाय्य झाल्याची चर्चा !

       नवी देहली - भारताने २८ सप्टेंबरच्या रात्री जेव्हा पाकव्याप्त काश्मीरमध्ये सर्जिकल स्ट्राईक केले, त्याच वेळेस इराणकडून पाकच्या बलुचिस्तान भागात उखळी तोफांद्वारे ६ गोळे डागण्यात आले. त्यावरून भारताला साहाय्य करण्यासाठीच इराणने हे आक्रमण केल्याची चर्चा चालू झाली आहे. इराण आणि भारत यांच्यातील संबंध चांगले आहेत. या आक्रमणामुळे पाक सैन्याला भारतासह इराणकडेही लक्ष द्यावे लागेल आणि त्यातून पाकच्या सैन्य शक्तीचे विभाजन होईल, अशी रणनीती होती. पाकला लागून इराणची ९०० कि.मी. लांबीची सीमा आहे. या आक्रमणानंतर पाकने इराण सीमेवर सैनिकांची संख्या वाढवली आहे.

पाकला आतंकवादी राष्ट्र घोषित करण्याच्या अमेरिकेतील ऑनलाइन याचिकेवर ५ लाखांहून अधिक लोकांच्या स्वाक्षर्‍या !

      वॉशिंग्टन - पाकिस्तानला आतंकवादाला पुरस्कृत करणारा देश म्हणून घोषित करावे, अशी मागणी करणार्‍या अमेरिकेतील ऑनलाइन याचिकेवर आतापर्यंत ५ लाखांहून अधिक लोकांनी स्वाक्षर्‍या केल्या आहेत. व्हाईट हाऊसकडून प्रतिसाद मिळण्यासाठी या याचिकेवर ३० दिवसांमध्ये एक लाख स्वाक्षर्‍या होणे आवश्यक होते. हे उद्दिष्ट एका आठवड्याहून अल्प काळातच गाठले गेले आहे.

पाकच्या सुरक्षा सल्लागारांचा अजित डोवाल यांना दूरभाष !

        नवी देहली - पाकचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार नासिर जंजुआ यांनी भारताचे सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्याशी दूरभाषवरून चर्चा केली. डोवाल आणि जंजुआ यांच्यात दोन्ही देशांमध्ये तणाव न्यून करण्यावर चर्चा झाली. जंजुआ यांनी हा दूरभाष केला होता. (पाकसमवेत चर्चा करून काहीही उपयोग होणार नाही ! पाकला केवळ युद्धाचीच भाष समजत असल्याने त्याला त्याच भाषेत भारताने उत्तर दिले पाहिजे ! - संपादक)

कलाकारांपेक्षा देश महत्त्वाचा ! - अभिनेता नाना पाटेकर

पाकिस्तानची बाजू घेणार्‍या बॉलिवूडमधील कलाकारांना याविषयी काय म्हणायचे आहे ?
      पुणे, ३ ऑक्टोबर - जेव्हा दोन देशांत संघर्ष निर्माण होतो, तेव्हा सर्वांत आधी देशाकडे पहायचे असते. देशाचा विचार करायचा असतो. सीमेवर लढणारे सैनिक हे देशाचे खरे हिरो आहेत. स्वत:ला हिरो म्हणवून घेणारे आम्ही सगळे कलाकार नकली आहोत. सैनिकांपेक्षा मोठे कोणी नाही; पण आम्ही मोठे आहोत, असे म्हणवणार्‍या कलाकारांना अजिबात महत्त्व देऊ नका. सलमान काय म्हणतो किंवा बॉलिवूड काय म्हणते, हे महत्त्वाचे नाही. कलाकारांपेक्षा देश महत्त्वाचा आहे, असे स्पष्ट मत अभिनेते नाना पाटेकर यांनी व्यक्त केले. तसेच आताच्या स्थितीत पाकिस्तानी कलाकारांना भारतात काम देऊ नये, असेही ते म्हणाले. भारत-पाकिस्तान यांच्यामध्ये तणावाची स्थिती असतांना पाकिस्तानातील कलाकार म्हणजे आतंकवादी नाहीत, असे वक्तव्य अभिनेता सलमान खान याने नुकतेच केले होते. या पार्श्‍वभूमीवर नाना पाटेकर हे पत्रकारांशी बोलत होते.

श्रीशैल दाभाडे यांना कराटे स्पर्धेत गोल्ड मेडल !

        मिरज, ३ ऑक्टोबर - कोल्हापूर जिल्ह्यात नागाव येथे झालेल्या ११ व्या मार्शल आर्ट स्पर्धेत मिरज येथील ओकीनावा शोतोकॉन कराटे क्लबमधील १० विद्यार्थ्यांनी यश मिळवले. या क्लबमधील श्री. श्रीशैल दाभाडे यांनी कराटे स्पर्धेत गोल्ड मेडल, तसेच सांघिक दुसर्‍या क्रमांकाचे पारितोषिक मिळवले. श्री. श्रीशैल दाभाडे हे हिंदु धर्माभिमानी असून सनातन संस्थेचे हितचिंतक श्री. संतोष दाभाडे यांचे पुत्र आहेत. मुलींमध्ये मनस्वी जाधव हिला सुवर्णपदक मिळाले. या सर्व विद्यार्थ्यांना श्री. संतोष दाभाडे यांचे मार्गदर्शन मिळाले.

मराठवाड्यात १६ लाख हेक्टर शेती पाण्याखाली !

शेतकर्‍यांची पुष्कळ हानी 
      अतिवृष्टि: अनावृष्टि: शलभा मूषका: शुका: ।
      स्वचक्रं परचक्रं च सप्तैता ईतय: स्मृता: ॥ - कौशिकपद्धति
अर्थ : धर्माचे पालन न केल्यामुळे अतीवृष्टी, अनावृष्टी (दुष्काळ), टोळधाड, उंदरांचा त्रास, पोपटांचा उपद्रव, आपापसांत लढाया आणि शत्रूचे आक्रमण, अशी सात प्रकारची संकटे (राष्ट्रावर) येतात. तात्पर्य, प्रजा आणि राजा, दोन्हीही धर्मपालक आणि साधना करणारे हवेत. तरच आपत्काळाची तीव्रता अल्प होईल किंवा आपत्काळ सुसह्य होईल.
    बीड - मराठवाड्यात गेल्या अनेक दिवसांपासून पडलेल्या मुसळधार पावसामुळे १६ लाख हेक्टर शेती पाण्याखाली गेली आहे. त्यामुळे शेतकर्‍यांची पुष्कळ हानी झाली आहे. पावसाचा सर्वाधिक फटका सोयाबीनला बसला आहे. अनेक ठिकाणी सोयाबीनला कोंब फुटल्याने शेतकर्‍यांच्या हाताशी आलेले पीक वाया गेले आहे. 
     बिंदुसरा नदीच्या पाण्याने संपूर्ण बीड जिल्हा जलमय झाला आहे. लातूर जिल्ह्यातीला १६ गावातील १ सहस्र २६५ लोकांना स्थलांतरित करण्यात आले. एकूण ३८ जनावरे वाहून गेली.
महर्षींनी प्रलयकालाविषयी सतर्क करणे
      १९.३.२०१६ या दिवशी झालेल्या नाडीवाचन क्रमांक ६७ मध्ये महर्षि म्हणतात, हे पूर्ण वर्ष प्रलयकालाचे आणि आपत्तीजनक असणारे आहे. (२ आणि ३ ऑक्टोबर या दोन्ही दिवशी मराठवाड्यात मुसळधार पाऊस पडला. या घटनेवरून प्रलयकालाविषयी महर्षींनी केलेले भाष्य किती तंतोतंत आहे, हे लक्षात येते ! - संपादक)

वायूदलाचे जग्वार अपघातग्रस्त !

आपत्काळ उंबरठ्यावर आला असतांना त्यापूर्वीच 
जर वायूदलाची विमाने अपघातग्रस्त होत असतील, 
तर प्रत्यक्ष युद्धाच्या वेळी काय स्थिती असेल ?
       नवी देहली - वायूदलाचे जग्वार हे लढाऊ विमान राजस्थानच्या पोखरणजवळ अपघातग्रस्त झाले. यात दोन्ही वैमानिक वाचले आहेत. या घटनेची चौकशी करण्याचा आदेश वायूदलाने दिला आहे.

१८ वर्षांखालील व्यक्तीने दुचाकी चालवल्यास वाहन मालकावर दंडात्मक कारवाई

        मुंबई, ३ ऑक्टोबर - १८ वर्षांखालील व्यक्तीने दुचाकी वाहन चालवल्यास दुचाकी वाहन मालकावर कारवाई करण्यात येणार असून राज्यातील सर्व प्रादेशिक परिवहन अधिकारी आणि उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांना तशा सूचना देण्यात आल्या आहेत. मोटार वाहन कायद्याच्या कलम १८० नुसार १८ वर्षांखालील व्यक्तीने वाहन चालवल्यास वाहन मालकास कारावास किंवा १ सहस्र रुपयांपर्यंत दंड किंवा दोन्ही अशी शिक्षा आहे.

नगर येथे अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणार्‍या २ अल्पवयीन मुलांना अटक

महिलांसाठी असुरक्षित बनलेला आणि कायद्याचे धिंडवडे निघालेला नगर जिल्हा !
     नगर, ३ ऑक्टोबर - अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणार्‍या दोघा अल्पवयीनांना पोलिसांनी अटक केली आहे. तालुक्यातील वाकोडी येथे शेळ्या आणि मेंढ्या चरण्यासाठी घेऊन गेलेल्या एका अल्पवयीन मुलीला १ ऑक्टोबरला तेथील २ अल्पवयीन मुलांनी अडवले आणि जवळच्या शेतामध्ये नेऊन तिच्यावर बलात्कार केला.

नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने सनातनच्या ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन !

सनातनच्या ग्रंथ प्रदर्शनाचे
उद्घाटन करतांना श्री. शरद शेटे
    कोल्हापूर, ३ ऑक्टोबर (वार्ता.) - नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने येथील शिवाजी पेठेतील श्री महाकाली मंदिरासमोर सनातन-निर्मित उत्पादन आणि ग्रंथ प्रदर्शन लावण्यात आले आहे. १ ऑक्टोबर या दिवशी प्रदर्शनाचे उद्घाटन कसबा बावडा शुगर मिलचे व्यवस्थापक श्री. शरद शेटे यांच्या हस्ते निरांजनाने दीपप्रज्वलन आणि नारळ वाढवून करण्यात आले. या वेळी सनातन संस्थेचे साधक आणि बांधकाम व्यावसायिक श्री. आनंद पाटील, डॉ. मानसिंग शिंदे उपस्थित होते. डॉ. मानसिंग शिंदे यांनी श्री. शरद शेटे अन् श्री महाकाली तालीम मंडळाचे अध्यक्ष श्री. अतुल साळोखे यांना श्री महालक्ष्मीदेवीची प्रतिमा भेट दिली. या वेळी डॉ. शिंदे यांनी वरील मान्यवरांना प्रदर्शनाचा उद्देश आणि सनातनच्या कार्याविषयी माहिती दिली. नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने शहरात ७ ठिकाणी असे ग्रंथप्रदर्शन लावण्यात आले आहे. याचा लाभ सर्वांनी घ्यावा, असे आवाहन सनातन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.

भुजबळांना सोडा, अन्यथा त्याचे परिणाम सरकारला भोगावे लागतील !

अशा प्रकारे मोर्चे काढून शासनावर दबाव आणणे कितपत योग्य ?
भुजबळ समर्थकांची मोर्चाद्वारे चेतावणी 
      नाशिक, ३ ऑक्टोबर - छगन भुजबळ यांना लवकरात लवकर सोडा, अन्यथा त्याचे परिणाम सरकारला भोगावे लागतील, अशी चेतावणी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या समर्थनार्थ येथे काढलेल्या मोर्च्यामध्ये त्यांच्या समर्थकांनी दिली. ३ ऑक्टोबर या दिवशी काढलेल्या या मोर्च्याला संपूर्ण उत्तर महाराष्ट्रातून कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. भ्रष्टाचाराच्या विविध आरोपांखाली छगन भुजबळ हे सध्या कारागृहात आहेत. भुजबळ यांना सोडण्यात यावे, ओबीसी आरक्षणला धक्का लावू नका, ओबीसी नेत्यांच्ये खच्चीकरण थांबवा, अशा विविध मागण्या मोर्च्यात करण्यात आल्या.श्री महालक्ष्मी मंदिरात पहिल्या दिवशी सव्वा लक्ष भाविक !

कोल्हापूर येथे घटस्थापनेने उत्सवाला प्रारंभ ! 
      कोल्हापूर, ३ ऑक्टोबर (वार्ता.) - साडेतीन शक्तीपिठांपैकी एक प्रमुख पीठ असलेल्या येथील श्री महालक्ष्मी मंदिरात ३ ऑक्टोबरपासून शारदीय नवरात्रोत्सवाला प्रारंभ झाला. सकाळी ८.३० वाजता तोफेची सलामी दिल्यानंतर घटस्थापना झाली. त्यानंतर जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी आणि अंशू भार्गवा यांच्या हस्ते पूजा झाली. उत्सवाच्या पहिल्या दिवशी सव्वा लक्ष भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली. किमान दीड घंट्यात सुरक्षित दर्शन होईल, अशी व्यवस्था पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने केली आहे.

नवरात्रोत्सव आदर्शरित्या साजरा होण्यासाठी पुणे आणि पिंपरी-चिंचवड येथे पोलिसांना निवेदने !

बिबवेवाडी पोलीस ठाण्याचे अनिल पाटील
यांना निवेदन देतांना समितीचे कार्यकर्ते
     पुणे, ३ ऑक्टोबर (वार्ता.) - नवरात्रोत्सव आदर्शरित्या साजरा व्हावा, उत्सवात शिरलेल्या अपप्रकारांना आळा बसावा, तसेच दांडिया आणि नवरात्रोत्सवाच्या कार्यक्रमांमध्ये सुरक्षिततेच्या दृष्टीनेही योग्य ती काळजी घेण्यात यावी. उत्सव शांततेत आणि धार्मिक वातावरणात साजरा व्हावा, यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने पुणे शहरात विविध पोलीस ठाण्यांमध्ये पोलीस निरीक्षकांना निवेदने देण्यात आली. या वेळी बहुतांश ठिकाणी पोलिसांनी सकारात्मक प्रतिसाद देत समितीच्या कार्याचे कौतुक केले. पुणे शहरातील फरासखाना, विश्रामबाग आणि खडकमाळ पोलीस ठाणे, सहकारनगर, दत्तवाडी, स्वारगेट, बिबवेवाडी, मार्केटयार्ड, भारती विद्यापीठ या पोलीस ठाण्यांमध्ये, तसेच पिंपरी-चिंचवड परिसरात भोसरी, पिंपरी, निगडी, हिंजवडी, वाकड, चिंचवड या पोलीस ठाण्यांमध्ये निवेदने देण्यात आली. याचसमवेत पुणे पोलीस आयुक्त कार्यालयातील विशेष गुन्हे शाखेलाही समितीच्या वतीने निवेदन देण्यात आले.

चिपळूण येथील सनी लिओनविरुद्धचा गुन्हा निकाली !

      रत्नागिरी - संकेतस्थळावर अश्‍लील आणि आक्षेपार्ह छायाचित्रे अन् ध्वनीचित्रफीती ठेवल्याच्या प्रकरणी अश्‍लील चित्रपटांतील अभिनेत्री सनी लिओन हिच्याविरोधात चिपळूण पोलीस ठाण्यात प्रविष्ट करण्यात आलेला गुन्हा निकाली काढण्यात आला आहे. चिपळूणमधील शिवसेनेच्या रेश्मा लक्ष्मण पवार यांनी २३ मे २०१५ या दिवशी तक्रार दिली होती. हे आक्षेपार्ह छायाचित्र आणि ध्वनीचित्रफीती विदेशातून अपलोड झाले असल्यामुळे हा गुन्हा निकाली काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. (विदेशातून अपलोड झाल्यामुळे गुन्हा निकाली काढतांना त्या संकेतस्थळावर भारतात बंदी घालण्याची प्रक्रिया करता येऊ शकते, हे पोलिसांच्या का लक्षात येत नाही ? पोलिसांनी बंदी घालण्याच्या संदर्भातील अहवाल सरकारकडे पाठवून त्यांना कारवाई करण्याची सूचना करायला हवी ! - संपादक)

नवरात्रोत्सवातील अपप्रकार रोखण्यासाठी प्रत्येकाने स्वतःच्या घरापासून प्रारंभ करावा ! - नगराध्यक्ष बाबासाहेब पाटील

हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांचा आदर्श नवरात्रोत्सव उपक्रम !
तहसीलदार श्री. सानप यांना
निवेदन देतांना रणरागिणी
       मलकापूर (जिल्हा कोल्हापूर), ३ ऑक्टोबर (वार्ता.) - नवरात्रोत्सवातील अपप्रकार थांबवून नवरात्रोत्सव आदर्श पद्धतीने साजरा करण्यात यावा, या मागणीचे निवेदन हिंदु जनजागृती समितीप्रणीत रणरागिणी शाखेच्या वतीने नगराध्यक्ष श्री. बाबासाहेब पाटील यांना ३० सप्टेंबर या दिवशी देण्यात आले. या वेळी श्री. पाटील म्हणाले, नवरात्रोत्सवातील अपप्रकार थांबवण्यासाठी प्रत्येकानेच स्वतःच्या घरापासून प्रारंभ करायला हवा. सध्या देवतांची उपासना
नगराध्यक्ष श्री. बाबासाहेब पाटील यांना
निवेदन देतांना रणरागिणी शाखेच्या महिला
करणारे अल्प झाले असून मौजमजा करण्यासाठीच आताची पिढी उत्सव साजरे करत आहे. तुम्ही करत असलेले जागृतीचे काम चांगले आहे. मी गावातील सर्व मंडळांना पत्रे पाठवतो. तुम्हीही तुमचे प्रबोधनाचे धार्मिक फ्लेक्स लावावेत. 
     या वेळी ब्राह्मण समाजाच्या सौ. पमाकाकू, सौ. मंजिरी जोशी, सौ. जाई हर्डीकर, कु. रसिका जोशी, सौ. गाडे, तसेच सौ. देशमाने, सौ. माया पाटील, सौ. शशिकला पाटील, सौ. पवार आणि हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्या उपस्थित होत्या.

नवरात्रोत्सवानिमित्त कळवा (ठाणे) येथे रणरागिणीच्या वतीने स्वसंरक्षणाची प्रात्यक्षिके आणि पथनाट्य सादर !

प्रात्यक्षिके दाखवतांना कार्यकर्ते
      कळवा (ठाणे) - प्रत्येक स्त्रीने स्वतःत दुर्गादेवीचे रूप प्रकट करणे आवश्यक आहे. दैनंदिन जीवनात प्रत्येक स्त्रियांना अनेक प्रतिकूल प्रसंगांना सामोरे जावे लागते. यासाठी स्त्रियांनी स्वसंरक्षण प्रशिक्षण घेऊन स्वतः सिद्ध व्हायला हवे. हिंदु जनजागृती समितीत प्रणीत रणरागिणी शाखेच्या माध्यमातून स्त्रियांंना विनामूल्य स्वसंरक्षण प्रशिक्षण दिले जाते. या प्रशिक्षण वर्गात सहभागी व्हावे, असे आव्हान रणरागिणीच्या सौ. सुनिता पाटील यांनी उपस्थित महिलांना केले. येथे शिवप्रतिष्ठानचे श्री. समीर विचारे यांच्या साहाय्याने जानकी नगर रहिवाशी संघाचे श्री. प्रमोद येरणकर यांच्या अनुमतीने स्वसंरक्षण प्रशिक्षणाची प्रात्यक्षिके दाखवण्यात आली, तसेच पथनाट्यही सादर करण्यात आले. याचा लाभ ८० महिलांनी घेतला.
क्षणचित्रे 
१. महिलांनी नवरात्रोत्सव संपल्यानंतर स्वसंरक्षण प्रशिक्षण वर्ग चालू करण्यास सांगितले.
२. या वेळी सौ. सुनीता पाटील यांचा शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

पोलिसांच्या संदर्भातील कटू अनुभव !

        सध्या सनातनचे साधक आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते यांना पोलिसांच्या शारीरिक आणि मानसिक छळाला सामोरे जावे लागत आहे. या अनुषंगाने विविध ठिकाणच्या पोलिसांविषयी सनातनचे साधक, हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते किंवा हिंदुत्वनिष्ठ यांना यापूर्वी पोलिसांच्या सतावणुकीविषयी आलेले अनुभव येथे प्रसिद्ध करत आहोत.
हिंदूंवर लाठीमार करणारे पोलीस !
        कणकवली (महाराष्ट्र) महाविद्यालयात शिक्षण घेणार्‍या युवतींचा पाठलाग करून मैत्रीसाठी त्यांचा छळ करणार्‍या चार युवकांवर येथील पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. संशयितांपैकी एक जण पोलीस कर्मचार्‍याचा मुलगा असल्याचे समजले. या प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक करा, या मागणीसाठी ऑगस्ट २०१३ मध्ये शिवसेनेच्या वतीने पोलीस ठाण्यावर मोर्चा काढण्यात आला होता. या वेळी पोलिसांनी या मोर्च्यावर लाठीमार केला होता.
पोलिसांविषयी चांगले आणि वाईट अनुभव असल्यास 
वाचकांनी नजीकच्या दैनिक कार्यालयात कळवावेत !

विमानातील सहप्रवाशासमवेत झालेल्या चर्चेतून सनातन संस्थेविषयीच्या त्यांच्या शंकांचे साधिकेने केलेले निरसन आणि त्यांचे झालेले मतपरिवर्तन !

कु. सुप्रिया टोणपे
१. गोव्याहून पुण्याला जातांना विमानात 
सहप्रवाशाने संवाद साधण्याचा प्रयत्न करणे आणि 
त्याला सनातन संस्थेची साधिका असल्याचे सांगणे 
      १२.४.२०१६ या दिवशी मी काही घरगुती कारणास्तव गोव्याहून विमानाने पुण्याला निघाले होते. विमानात बसल्यावर मी माझा छोटा संगणक (टॅब्लेट) काढला आणि हिंदूंविषयीची एक इंग्रजी धारिका वाचू लागले. माझ्या शेजारच्या आसनावर बसलेल्या व्यक्तीने संगणक पाहून संगणकाच्या आस्थापनाविषयी आणि तो वापरण्याच्या माझ्या अनुभवाविषयी विचारले. त्यानंतर साधारणतः एक घंटा आमच्यात पुढील चर्चा झाली.

पालकांनो, तुमच्या मुलींमधील रणरागिणी जागृत होण्यासाठी प्रयत्नरत रहा !

श्री. संदीप जगताप
          सध्या भारतात अनेक ठिकाणी महिलांवर बलात्कार होण्याचे प्रमाण वाढले आहे. आपल्या देशाची राजधानी बलात्कार करणार्‍यांचीही राजधानी झाली आहे. हे तेथील राज्यसरकारच्या अपयशासमवेतच तेथील जनतेच्या असंवेदनशीलतेची परिसीमा असल्याचे दर्शवते. सध्या जनतेतून आवाज येतो, बलात्कार करणार्‍यांना कठोर शिक्षा झालीच पाहिजे. यासंदर्भात मुलींच्या पालकांनी एका गोष्टीचा अंतर्मुख होऊन विचार करावा की, बलात्कारी वृत्तीचे हात-पाय पोसणारे आणि प्रोत्साहन देणारे तुम्हीच आहात ! हे पुढील काही सूत्रांवरून सुस्पष्ट होते.

गोहत्या रोखण्यासाठी मी जन्मले, असे सांगणारी वेतोरे (जिल्हा सिंधुदुर्ग) येथील कु. कविता ओगले (वय ११ वर्षे) !

कु. कविता ओगले
     वेतोरे, वेंगुर्ले (जिल्हा सिंधुदुर्ग) येथील दैनिक सनातन प्रभातचे वाचक तथा पुरोहित श्री. माधव ओगले यांची मुलगी कु. कविता ओगले (वय ११ वर्षे, इयत्ता ६वी) हिला देशात चालू असलेल्या गोहत्या थांबाव्यात, असे वाटते. या संदर्भात तिने काव्याच्या माध्यमातून व्यक्त केलेले विचार येथे देत आहोत.
    कु. कविता प्रतिदिन दैनिक सनातन प्रभातचे वाचन करते. गोहत्येमुळे कु. कविता हिचे बालमनही जर हळहळते, तर गोहत्या होऊ देणारे, पोलीस आणि प्रत्यक्ष गोहत्या करणारे यांना त्याचे गांभीर्य लक्षात का येत नाही ? महाराष्ट्र शासनाने गोहत्येवर बंदी आणली आहे, मात्र त्याची काटेकोरपणे प्रत्यक्ष कार्यवाही कधी होणार ?, असा विचार मनात आल्याशिवाय रहात नाही.

असून अडचण नसून खोळंबा !

     पुणे शहरात बीआर्टीमध्ये १४ सायकल मार्ग सिद्ध करण्यात आले आहेत. त्यांपैकी केवळ एकच मार्ग वापरात असून उर्वरित १३ मार्ग विनावापर पडून असल्याचे लेखी उत्तर महानगरपालिकेने दिले आहे. पडीक असलेल्या सायकलमार्गांचा उपयोग खाद्यपदार्थ विक्रेत्यांनाच अधिक प्रमाणात होत असल्याचे पहायला मिळत आहे.

भक्ती करणार्‍यांना आनंद आणि शक्ती प्रदान करणारी शक्तीस्वरूपिणी देवी विजयादुर्गा !

१. मखरोत्सवाच्या निमित्ताने कुलदेवीच्या देवळात जाऊन तिचे 
दर्शन घेतांना देवीच्या मुखावरील हास्य वाढत असल्याचे जाणवून मन प्रसन्न होणे 
      २६.११.२०१४ या दिवशी मखरोत्सवाच्या निमित्ताने कुलदेवीच्या देवळात गेल्यावर मखरातील देवीच्या मूर्तीकडे पाहिले असता ती माझ्याकडे पाहून हसत आहे, असे वाटले. त्यानंतर मखर डोलवतांना (मागे-पुढे करतांना) जसजसे ते माझ्याजवळ येत होते, तसतसे तिच्या मुखावरील हास्य वाढत गेले. त्या हास्याने मला स्वतःचा विसर पडला आणि क्षणभर ती मूर्ती आहे, हेही मी विसरले, इतकी ती जिवंत वाटत होती ! त्यानंतर माझा दिवसभरातील शीण निघून गेला आणि मन प्रसन्न झाले. देवी आपल्या भक्ताला काही दिल्याविना परत पाठवत नाही, या विचाराने मला भरून आले.
२. देवीसमोर बसून अपराधक्षमापनस्तोत्र म्हणतांना एक निराळाच आनंद अनुभवणे 
      मी प्रतिदिन अंघोळीनंतर आद्यशंकराचार्य यांनी रचलेले अपराधक्षमापनस्तोत्र म्हणते. त्या वेळी मला पुष्कळ शांत वाटते. काही कारणाने ते म्हणायचे राहून गेले किंवा मध्येच कुणी व्यत्यय आणला, तर मनाला चुटपुट लागते. एकांतात देवीसमोर बसून हे स्तोत्र म्हटल्यावर एक निराळाच आनंद मिळतो. जीवनातील अनेक कठीण प्रसंगीही तिच्या स्मरणमात्रेनेच तारून नेले आहे. तिची अशीच कृपादृष्टी आमच्यावर राहो, हीच प्रार्थना !
- एक देवीभक्त

सर्वांची माऊली दुर्गादेवी !

कु. समृद्धी जोशी
दुर्गादेवी, तूच माझी माऊली ।
देतेस कृपेची सावली ।
तूच मला पावलोपावली ॥ १ ॥

एवढीच आहे आस ।
मला लागो तुझा ध्यास ।
जेव्हा मला लागेल तुझा ध्यास ।
तेव्हा तू माझ्यासाठी हास ॥ २ ॥

जेवढी विहीर असते खोल ।
तेवढी तू माझ्याशी बोल ।
तुझ्याएवढे नाही कोणाचे मोल ।
तू आहेस सर्वांत अनमोल ॥ ३ ॥
- कु. समृद्धी जोशी (सध्याचे वय १६ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (जुलै २०१४)
      आधुनिकांच्या जगास पाप-पुण्य, शुभ-अशुभ यांची रतीमात्र कदर नाही. त्यांना अधिकार हवेत; पण कर्तव्ये नकोत ! - गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी

तत्त्वनिष्ठता आणि प्रीती या गुणांचा अनोखा संगम असलेले अन् साधकांचे आधारस्तंभ बनलेले सनातनचे ६२ वे संतरत्न : पू. (सौ.) सुमनमावशी नाईक !

पू. (सौ.) सुमन नाईक
     पू. (सौ.) सुमन नाईक म्हणजेच फोंडा, गोवा येथील साधकांच्या लाडक्या पू. (सौ.) सुमनमावशी ! फोंड्यातील साधकांना पू. सुमनमावशींचा सहवास लाभला आहे. त्यांच्या सहवासात साधकांना नियोजनबद्धता, अभ्यासूवृत्ती, शिस्तपालन, स्थिरता, तळमळ, प्रेमभाव, भाव आदी गुण शिकायला मिळाले. त्यांच्यामध्ये असे अनेक गुण असल्याने त्या अनेक गुणांची खाणच आहेत, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. पू. मावशींनी स्वतःमध्ये हे गुण बाणवले आहेतच आणि त्याचबरोबर हे गुण सहसाधकांमध्येही वाढावेत, यासाठी त्या तळमळीने प्रयत्न करतात. त्या साधकांसह किंवा कुटुंबासमवेत असल्या, तरी सतत साधना आणि सेवा होण्यासाठी प्रयत्न करत असतात. अशा पू. (सौ.) सुमनमावशींकडून फोंडा, गोवा येथील साधकांना शिकायला मिळालेली सूत्रे पुढे देत आहोत.
१. पू. सुमनमावशींनी घराचा परिसर आणि स्वयंपाकघर स्वच्छ अन् नीटनेटके ठेवणे
     पू. (सौ.) सुमनमावशी घरी स्वतः पुष्कळ कामे करतात. त्या घराचा परिसर आणि स्वयंपाकघर स्वच्छ ठेवतात. त्या म्हणतात, स्वयंपाक बनवून झाल्यावर स्वयंपाकघर इतके स्वच्छ दिसायला हवे की, तिथे काही केले नाही, असे वाटले पाहिजे. पू. सुमनमावशी बाहेर प्रसाराला जातांना नीटनेटक्या असतात. त्यांना कधीही बघितले, तरी त्यांचा तोंडवळा प्रसन्न दिसतो. - सौ. दीपा मामलेदार, दुर्गाभाट
२. कौटुंबिक कर्तव्ये साधना म्हणून पार पाडणे
२ अ. सगळ्यांमधे असूनही सगळ्यांतून अलिप्त असणे : पू. मावशींनी साधनेचे दृष्टीकोन स्वतः कृतीत आणून कुटुंंबियांनाही साधनेला प्रवृत्त केले. त्यांच्या दोन्ही सुनांवर त्यांनी साधना आणि धर्मानुसार वागण्याचे संस्कार केले. त्यांचे कुटुंब मोठे असून त्या सगळ्यांमध्ये असूनही सगळ्यांतून अलिप्त आहेत, कुणातही अडकलेल्या नाहीत, असे जाणवते. - सौ. श्रुती हजारे, फोंडा
२ आ. स्थिर राहून कौटुंबिक अडचणींना तोंड देणे : कुटुुंंबातील अनेक प्रकारची दायित्वे पार पाडतांना त्या सर्व गोष्टी सेवाभावाने करतात. त्या प.पू. डॉक्टरांना सतत आत्मनिवेदन करतात. कौटुंबिक अथवा सेवेच्या संदर्भात कितीही अडचणी आल्या, तरी त्या स्थिर असतात.

पू. (सौ.) सुमन नाईक संतपदी विराजमान होण्याविषयी फोंडा, गोवा येथील साधकांना मिळालेल्या पूर्वसूचना !

१. सौ. सुमनमावशींनी दिलेले दृष्टीकोन ऐकून त्या लवकर
संत होणार असल्याची बातमी मिळणार, असे जाणवणे
     महाशिवरात्रीनिमित्त मी आणि एक साधक श्री कपिलेश्‍वर मंदिरात ग्रंथप्रदर्शनाची सेवा करत होतो. नंतर आम्ही सुमनमावशींकडे महाप्रसादाला गेलो. महाप्रसाद झाल्यानंतर मावशींनी जे दृष्टीकोन दिले, ते ऐकून मावशी गुडीपाढव्याला संत झाल्याची गोड बातमी मिळेल, असे मला जाणवले होते. तो योग गुरुपौर्णिमेला आला. - श्री. रमेश दत्ता फडते
२. मुलाने सुमनमावशींकडे पाहून पोटदुखी थांबल्याचे
आणि मावशी पुष्कळ पुढे गेल्या आहेत, असे सांगणे
     रामनाथीला हिंदू अधिवेशन होते. त्या वेळी माझा मुलगा प्रथमेश (वय ९ वर्षे) मला म्हणाला, आई मला सुमनमावशींकडे पहात रहावेसे वाटते. माझ्या पोटात दुखत होते. तेव्हा मला सुमनमावशी वरच्या माळ्यावर दिसल्या. मी खाली होतो, तरीही माझा त्रास न्यून झाला. दैनिक सनातन प्रभातमध्ये गोव्यातील साधकांची आध्यात्मिक पातळी आलेली सूची मी वाचत होते. त्या वेळी प्रथमेशला सुमनमावशींची पातळी वाचून दाखवल्यावर तो म्हणाला, मावशी पुष्कळ पुढे गेली आहे. गुरुपौर्णिमेला सुमनमावशी संत झाल्याचे ऐकल्यावर त्याला पुष्कळ आनंद झाला आणि त्याच्या डोळ्यांतून पाणी येऊ लागले. तो म्हणाला, आई, पू. (सौ.) सुमनमावशींना बघितल्यावर मनाला आतून पुष्कळ चांगले वाटत होते

मागील २ वर्षांपासून उपचारांनी आटोक्यात न येणारा मधुमेह पूर्णकालीन सेवा करण्यासाठी आश्रमात राहू लागल्यावर अल्पावधीतच नियंत्रणात येणे

श्री. रवींद्र हेम्बाडे
१. इन्सुलीनचे इंजेक्शन आणि गोळ्या नियमित घेऊनही रक्तातील 
साखरेचे प्रमाण अत्यधिक असणे; परंतु त्याचा त्रास न होणे
     मागील २ वर्षांपासून मी इन्सुलीनचे इंजेक्शन आणि गोळ्या नियमित घेत असूनही माझ्या रक्तातील साखरेचे प्रमाण ४०० ते ६०० एकक एवढे असायचे. अहवालात ते नेहमी +++ असेच असायचे; मात्र मी मधुमेहाची लक्षणे, उदा. थकवा, अशक्तपणा, अंधारी येणे, ही कधी अनुभवली नाहीत. नोकरीच्या निमित्ताने मी दिवसभर जरी उपाशी राहिलो, तरी मला कधीच थकवा जाणवत नसे; पण अहवालात मात्र साखरेचे प्रमाण अधिकच असायचे. याचे कारण मला समजले नाही.
२. पूर्णकालीन सेवा करण्याचा निर्णय घेतल्यानंतर आणि सेवा चालू केल्यावर 
रक्तातील साखरेचे प्रमाण न्यून होऊन मधुमेह पूर्णपणे नियंत्रणात येणे
     आम्ही गोवा येथील रामनाथी आश्रमात ६.५.२०१६ या दिवशी गेलो होतो. तेव्हा पूर्णकालीन सेवा करावी, असा विचार माझ्या मनात आला. २९ मे या दिवशी आता गुरुचरणी लीन व्हावे, असे वाटू लागले. पूर्णकालीन सेवा करण्याचा निर्णय घेतल्यानंतर माझ्या रक्तातील साखरेचे प्रमाण ४८१ वरून ३०६ वर आले. १०.७.२०१६ पासून मी देवद आश्रमात पूर्णकालीन सेवेसाठी गेलो आणि त्यानंतर १५ दिवसांतच माझा मधुमेह पूर्णपणे नियंत्रणात आला. त्या वेळच्या अहवालात रक्तातील साखरेचे प्रमाण केवळ १०२ एकक एवढेच होते.

सर्वांत महान आश्‍चर्य आणि मूर्खत्वाचा बाजार

प.पू. पांडे महाराज
प.पू. पांडे महाराज यांचे अनमोल विचारधन
     भगवंताचे चैतन्य सर्वत्र कार्यरत आहे, असे असूनही त्याची जाणीव आपल्याला नसते, हे जगातील केवढे महान आश्‍चर्य आहे ! याला भ्रम म्हणतात. याविषयीचे सत्य समजले की, मूर्खता जाते; परंतु आजकाल मूर्खत्वाचाच बाजार झाला आहे. मूर्खत्वच सत्य म्हणून विकले जात आहे. त्यामुळे सर्वत्र गोंधळ चालू आहे. आपण सध्या आवरणालाच, उदा. ताजमहाल, इजिप्तचे पिरॅमिड, चीनची भिंत इत्यादींना जगातील सर्वांत महान आश्‍चर्य म्हणून पहात आहोत. - प.पू. परशराम पांडे, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२६.७.२०१६)


रामनाथी आश्रमात बगलामुखी यज्ञ झाल्यानंतर सद्गुरु (सौ.) बिंदाताई सुवासिनींची ओटी भरत असतांना आलेल्या अनुभूती आणि जाणवलेली सूत्रे !

सध्या चालू असलेल्या नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने...
     सनातन संस्थेवर येणार्‍या नित्य नवीन संकटांच्या निवारणासाठी महर्षींनी प.पू. डॉक्टरांच्या जन्मदिनांकांच्या, म्हणजेच ६.५.२०१५ ते ६.५.२०१६ या कालावधीत ज्यांचे विवाह झाले, त्या सुवासिनींची १७.८.२०१६ या दिवशी ओटी भरून त्यांना सुवर्णदान करण्यास सांगितले. सद्गुरु (सौ.) बिंदाताईंनी ५ सुवासिनींची ओटी भरली. त्या वेळी त्या सुवासिनींना आणि अन्य एका साधिकेला जाणवलेली सूत्रे अन् आलेल्या अनुभूती यांपैकी काही भाग आपण काल पाहिला. आज पुढील भाग येथे देत आहोत.
३. सौ. राधिका कोकाटे
३ अ. ओटी भरणार असल्याचे समजल्यावर : १७.८.२०१६ या दिवशी सद्गुरु (सौ.) बिंदाताई आमची ओटी भरणार असल्याचे समजले. त्या वेळी आम्ही सर्व भारावून गेलो. आम्हाला काही सुचेनासे झाले. 
३ आ. सद्गुरु (सौ.) बिंदाताई ध्यानमंदिरात आल्यावर : ताईंकडे पहातांना माझा भाव जागृत झाला. त्यांच्या भोवती चैतन्य जाणवत होते.

भगवान कधी सांगत नाही, हे मी केले, तर भक्तांच्या माध्यमातून करून भक्ताने केले, असे दर्शवतो, तसेच भक्तांनीही केले पाहिजे, म्हणजे स्वतः काहीही केले तरी ते भगवंताने केेले, असेच जाणवले पाहिजे आणि इतरांना सांगितले पाहिजे. - (परात्पर गुरु) डॉ. आठवले
स्वतःच्या कृतीतूनच साधकाने कसे वागावे ?, याचा आदर्श सर्वांसमोर ठेवणारे प.पू. डॉक्टर !

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त...
३. प्रीती, नम्रता आणि सेवाभाव यांच्या माध्यमातून
 संतांना सनातनशी जोडणारे प.पू. डॉक्टर !
३ अ. संतांच्या भेटीला जातांना भेटवस्तू नेऊन त्यांच्याशी जवळीक साधणे : सनातनचे कार्य वटवृक्षाप्रमाणे वाढू लागल्यावर प्रसारकार्याच्या कालावधीत प.पू. डॉक्टर अनेक संतांना भेटायचे आणि सनातनच्या कार्याला त्यांचे आशीर्वाद घ्यायचे. त्यामुळे त्यांचे अनेक संतांशी जिव्हाळ्याचे संबंध होते. ते जेव्हा संतांना भेटायला जायचे, त्या वेळी त्यांच्यासाठी आवर्जून भेटवस्तू घेऊन जायचे. त्याचसोबत सनातनचा एखादा नवीन ग्रंथ छापून झाला असल्यास त्या संतांच्या हस्ते त्याचे प्रकाशनही करायचे.
३ आ. संतांच्या समोर भूमीवर बसूनच त्यांच्याशी चर्चा करणे : प.पू. डॉक्टरांना गुडघ्यांचा त्रास असूनही ते सद्य:स्थितीसंदर्भात संतांशी बोलतांना त्यांच्याशी चर्चा करतांना २ - ३ घंटे भूमीवर बसून बोलत असत आणि त्यांचे मार्गदर्शनही घेत असत. ते कधीही त्यांच्यासमोर आसंदीत बसत नसत.
३ इ. वयस्कर संतांची नम्रपणे आणि सेवाभावाने सेवा करणे : एखादे संत वयस्कर असल्यास प.पू. डॉक्टर त्यांच्या सेवेची संधी कधीही सोडत नसत. त्यांना पाणी हवे असल्यास पाणी दे, मधेच त्यांचे पाय चेप, असेही त्यांचे चालू असायचे. त्यांचा तो नम्रभाव आणि सेवाभाव पाहून संतही प्रसन्न होऊन सनातनशी कायमचे जोडले जात असत. त्या संतांचे आपण चित्रीकरण केले असल्यास किंवा छायाचित्र काढले असल्यास ते नंतर त्यांना आवर्जून पाठवत असत.

स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रियेसाठी रामनाथी आश्रमात आल्यानंतर साधिकेला आलेल्या अनुभूती

१. आश्रमात आल्यानंतर ३ आठवड्यांत माझे ६ किलो वजन 
उणावले. माझे वजन अधिक असल्याने याचा मला लाभ झाला.
२. पाठदुखीचा त्रास असूनही अधिक वेळ बसता येणे
     मला अनेक शारीरिक व्याधी आहेत. त्यातच पाठदुखीचा त्रासही आहे. आधुनिक वैद्यांनी मला १५ मिनिटांपेक्षा अधिक वेळ बसू नये, अशी सूचना दिली होती; पण आश्रमात मी ७ घंटे बसू शकले.
३. साधक आणि काळे गोळे यांच्यात युद्ध चालू असल्याचे जाणवणे अन् काळे गोळे
पांढर्‍या-पिवळ्या प्रकाशात विरून जाऊन शरीर प्रकाशमय झाल्याचे दिसणे
     २५.११.२०१५ या दिवशी माझ्या हृदयात भगवे झेंडे घेतलेले अनेक साधक एकीकडे आणि अनेक काळे गोळे दुसरीकडे दिसले अन् दोघांमध्ये युद्ध चालू झाले. पांढर्‍या-पिवळ्या प्रकाशात ते काळे गोळे विरून गेले. माझे पूर्ण शरीर प्रकाशमय झाले. त्या दिवशी दिवसभर माझ्या तोंडात गोड चव येत होती.
४. मनाचा संघर्ष होत असतांना खोलीच्या छतावर इंद्रधनुष्याचे
पट्टे दिसणे आणि सहस्र्रारचक्रातून चारही देहांभोवती प्रकाश फिरत
असल्याचे जाणवून मन शांत आणि स्थिर होणे
     २८.११.२०१५ या दिवशी माझ्या मनाचा संघर्ष होत होता. माझी प्रकृती चांगली नव्हती. पहाटे ४ वाजता मला अकस्मात् जाग आली आणि खोलीच्या छतावर इंद्रधनुष्याचे सात पट्टे दिसले.

प्रेमळ, समजूतदार, काटकसरी आणि भाव असणारा ५३ टक्के आध्यात्मिक पातळीचा उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला कोलशेत, ठाणे येथील कु. सार्थक किरण कामतीकर (वय ९ वर्षे)

कु. सार्थक कामतीकर
१. प्रेमभाव 
अ. सार्थक पुष्कळ प्रेमळ आहे. तो घरातील सर्वांशी पुष्कळ प्रेमाने वागतो. 
आ. त्याला कुणाला दुखावलेले आवडत नाही. 
इ. तो लहान मुलांसमवेत प्रेमाने वागतो आणि खेळतो.
२. इतरांची काळजी घेणे 
अ. सार्थक त्याच्या आजीची काळजी घेतो. 
आ. आजी एकटी असेल, तेव्हा तो आवर्जून तिच्याशी खेळतो. 
३. इतरांना साहाय्य करणे 
अ. सार्थक प्रतिदिन न सांगता आम्हा दोघांना आनंदाने चहा करून देतो. 
आ. तो पुष्कळ वेळा मला स्वयंपाक करतांना साहाय्य करतो.

पुष्कळ प्रयत्न करूनही कुलदेवता न समजणे, सनातनच्या साधकाने सांगितल्यानुसार श्री कुलदेवतायै नमः । हा नामजप केल्यावर पाचव्या दिवशी कुलदेवतेचे नाव आणि स्थान समजणे अन् गुरूंनी गुरुपौर्णिमेला मंत्र देईन, असे सांगणे

     मागील काही वर्षे मी श्रीविद्या उपासना करत आहे. मला माझ्या कुलदेवतेचे नाव जाणण्याची फार उत्कंठा होती. मी उपासना करत होतो; पण मला कुलदेवतेचे नाव कळत नव्हते. त्यामुळे माझ्या साधनेत फार अडथळे यायचे. मी अनेक ज्योतिष्यांकडे जाऊनही मला कुलदेवतेच्या नावाचा उलगडा होत नव्हता.
     या वर्षी माझ्या सहकार्‍यांनी मला एका शेतकर्‍याचे नाव सुचवले. तो एक सामान्य माणूस आहे. अनेक लोकांना त्याच्या साहाय्याने त्यांच्या कुलदेवतेविषयी माहिती मिळाली आहे. मी मोठ्या आशेने तिथे गेलो. त्याने पुष्कळ प्रयत्न करूनही त्याला काही कळेना. त्यामुळे मी दुःखी झालो. मग कुणीतरी सुचवल्यावरून मी सनातनच्या केरळ येथील सेवाकेंद्रात गेलो. माझी सगळी गोष्ट ऐकून तेथील साधक श्री. बालकृष्ण यांनी मला श्री कुलदेवतायै नमः । असा नामजप करायला सांगितला. ईश्‍वराच्या अन् माझ्या गुरूंच्या कृपेने त्या शेतकर्‍याने ५ दिवसांतच मला भ्रमणभाष करून मला माझ्या कुलदेवतेचे नाव आणि स्थान सांगितले. मला पुष्कळ आश्‍चर्य वाटले. मी माझ्या गुरूंना हे सांगितले आणि त्यांनीही त्याला रूकार दिला. मग आम्ही घरातील सर्वजण कुलदेवतेच्या दर्शनाला (काडन्नागंडू शिवाच्या मंदिरात) दर्शनाला गेलो.
      माझ्या गुरूंनी मला गुरुपौर्णिमेला मंत्र देईन, असे सांगितले. आता मी आनंदी आहे.
- श्री. श्रीराज कैमल, केरळ (२३.७.२०१६)


सनातन संस्थेच्या माध्यमातून साधनेला आरंभ झाल्यावर अनेक असाध्य आजारांतून मुक्त झाल्याची आश्‍चर्यकारक अनुभूती घेऊन गुरुकृपा अनुभवणार्‍या संभाजीनगर येथील सौ. सविता सत्यनारायण तिवारी !

सौ. सविता तिवारी
    मी पूर्वी रामनामाचा जप करत होते. नंतर वर्ष १९९८ मध्ये मी सनातन संस्थेच्या संपर्कात आले आणि माझ्या साधनेला आरंभ झाला. वर्ष २००९ पासून मी हिंदी भाषांतराची सेवा करू लागले. साधनेमुळे आणि सेवेमुळे आश्‍चर्यकारक वाटणार्‍या अनेक अनुभूती मला आल्या. माझे असाध्य रोग बरे होऊन मी प.पू. गुरुदेवांची अखंड कृपा अनुभवली. याविषयीच्या अनुभूती पुढे देत आहे.
१. साधनेला आरंभ केल्यावर १५ ते २० वर्षांपासून
असलेला दम्याचा त्रास ३ - ४ वर्षांत पूर्ण बरा होणे
     गेल्या १५ ते २० वर्षांपासून मला दम्याचा (अस्थमाचा) आजार आहे. मी माझ्या मैत्रिणीच्या आईचा अस्थमाचा त्रास अगदी जवळून पाहिला होता. त्यामुळे मला अस्थमा झाला आहे, हे ऐकल्यावर मला पुष्कळ काळजी वाटत होती; परंतु गुरुकृपेमुळेे साधनेला आरंभ केल्यावर ३ - ४ वर्षांतच मी या आजारातून पूर्णतः मुक्त झाले.
२. साधनेमुळे अर्धबेशुद्धावस्थेतून (कोमातून) सुखरूप बाहेर पडणे आणि ५ वर्षांनंतर
कायमस्वरूपी गोळ्या घेण्याची आवश्यकता नसल्याचे आधुनिक वैद्यांनी सांगणे
२ अ. पुष्कळ ताण आल्याने अर्धबेशुद्धावस्थेत (कोमात) जाणे आणि आधुनिक वैद्यांनी शुद्धीवर येण्याची शक्यता नसल्याचे सांगणे; पण प्रत्यक्षात ६८ घंट्यांनी शुद्धीवर येणे : वर्ष १९९५ मध्ये मला नोकरीचा आणि घरचाही पुष्कळ ताण आल्यामुळे मी अर्धबेशुद्धावस्थेत (कोमामध्ये) गेेले होते. तेव्हा आधुनिक वैद्यांनी सांगितले, या कोमातून शुद्धीवर येण्याची शक्यता नाही आणि ७२ घंट्यांत शुद्धीवर आल्या, तरी त्यांची स्मरणशक्ती कायमची जाईल. प्रत्यक्षात श्रीकृष्णाच्या कृपेने मी ६८ घंंट्यांंनंतर शुद्धीवर आले आणि तेही स्मरणशक्ती न जाता ! तेव्हा आधुनिक वैद्यांनाही आश्‍चर्य वाटले.
२ आ. मेंदूची क्षीण झालेली शक्ती भरून निघाल्याने कायमस्वरूपी गोळ्या घेण्याची आवश्यकता नसल्याचे आधुनिक वैद्यांनी सांगणे : नंतर पुन्हा ताण येऊन मी कोमात जाऊ नये; म्हणून आधुनिक वैद्यांनी मला कायमस्वरूपी गोळया घेण्यास सांगितल्या होत्या. वर्ष २००० मध्ये एम्.आर्.आय्. तपासणी केल्यावर ते म्हणाले, कोमात गेल्यामुळे तुमच्या मेंदूची क्षीण झालेली शक्ती आता भरून निघाली आहे.

वाढवी रे देवा तळमळ या जिवा ।

कु. कनकमहालक्ष्मी
शब्दांच्या पलीकडे कधी रे नेणार ।
स्वला कधी रे नष्ट करणार ।
मी काय आहे, हे मला कधी कळणार ।
नष्ट कर ना रे देवा, देवा कर रे ॥ १ ॥

का रे देवा रडवी या वेडीला ।
याच जन्मी अर्पण कर तन, मन, काया ।
वाढवी रे देवा तळमळ या जिवा ।
काय बोलू यापेक्षा राया ॥ २ ॥

मनाची स्थिती कशी व्यक्त करू रे ।
देवाच्या देवा गुरुदेवा ।
मला या स्थितीतून कधी रे काढणार ।
करी रे आनंद या मनी राया ॥ ३ ॥

भगवंता तुझ्या स्मरणाने जो आनंद ।
भगवंता तुझ्या सेवेतला तो परमानंद

साधिकेने श्रीकृष्णाला व्याकुळ होऊन केलेल्या प्रार्थना

सौ. नेहा प्रभु
     मला देवाला माझ्या मनाची स्थिती कशी सांगू ? आणि मन सतत देवाला काहीतरी सांगत आहे, असे वाटत होते. मग कृष्णाने मला हे सर्व चित्राच्या स्वरूपात मांडूया, असा विचार सुचवला आणि त्यासमवेत प्रार्थनाही सुचवल्या. त्यामुळे मी साश्रु नयनांनी प्रार्थना करत आहे, असे माझे मुख काढले आणि त्यासोबत प्रार्थना लिहिली. असे प्रत्येक प्रार्थनेसाठी केले. त्यामुळे माझ्या मनाची व्याकुळता चित्राच्या स्वरूपात प्रकट झाली. ती कृष्णचरणी अर्पण करत आहे
.१. कृष्णा, मला क्षमा कर ना !
२. कृष्णा, मी तुला शरण आले रे !
३. कृष्णा, तुझे मन जिंकण्यासाठी मी काय करू ? मला मार्ग दाखव.
४. कृष्णा, या मनाला तुझ्या चरणी स्थिर कर, अंतर्मुख कर.
५. कृष्णा, सतत त्रागा होतो रे !
६. कृष्णा, काय करू ? कळत नाही. ये रे...!

उच्च न्यायालयाने कोट्यवधी प्रलंबित दाव्यांसंदर्भात माहिती मागवून कृती करणे अपेक्षित आहे !

       सप्टेंबर २००६ मध्ये मालेगाव येथे घडवण्यात आलेल्या बॉम्बस्फोटाशी संबंधित खटला अद्याप चालू का झालेला नाही ?, असा प्रश्‍न मुंबई उच्च न्यायालयाने केला. त्याचबरोबर या खटल्याला होणार्‍या विलंबाच्या कारणांचा अहवाल विशेष न्यायालयाकडून मागण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाचे न्या. नरेश पाटील आणि न्या. प्रकाश नाईक यांच्या खंडपिठाने न्यायालयीन निबंधकांना दिला आहे.

राज्यघटना धर्मग्रंथाच्या स्थानी मानली, तरी शासनाकडून धर्मपालन होते का ?

       आमचे पंतप्रधान म्हणतात, राज्यघटना त्यांचा धर्मग्रंथ आहे. राज्यघटनेतील समान नागरी कायदा, गोहत्या बंदी कायदा हे सर्व देशात असावेत, अशी तरतूद सांगण्यात आली आहे. मग यावर कोणतीही कृती करण्यात येत नाही, तर खर्‍या अर्थाने धर्माचे पालन होत आहे का ?
- पू. डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती

जागृत मुसलमान आणि निद्रिस्त हिंदू !

हिंदूंच्या देवतांचा प्रतिदिन अवमान होत 
असतांना, विरोध न करणारे खरंच हिंदू आहेत का ?
        जॉर्डनचे प्रसिद्ध ख्रिस्ती लेखक नाहेद हत्तार (वय ५६ वर्ष) यांची २५ सप्टेंबर २०१६ या दिवशी धर्मांधांकडून न्यायालयाबाहेर ३ गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. इस्लामचा अपमान करणारे व्यंगचित्र फेसबूकवर शेअर केल्याचा त्यांच्यावर आरोप होता.

अंनिसची सामाजिक भोंदूगिरी उघड करणार्‍या पत्रकार परिषदेचे वृत्त प्रसिद्ध करण्यासंदर्भातील आढावा

वस्तूस्थितीदर्शक वृत्ताला प्रसिद्धी न देणे किंवा अल्प 
प्रसिद्धी देणे, म्हणजे गुन्हेगारी वृत्तीला पाठिंबा देण्यासारखेच 
होय. अशी प्रसारमाध्यमे जनतेला दिशा काय देणार ?
      घोटाळेबाज अंनिसच्या न्यासाची सामाजिक भोंदूगिरी उघड करणार्‍या सार्वजनिक न्यास नोंद कार्यालयाच्या अहवालाची माहिती सनातन संस्थेच्या वतीने पुणे येथे १ ऑक्टोबर २०१६ या दिवशी झालेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आली होती. या पत्रकार परिषदेचे वृत्त २ ऑक्टोबर या दिवशी कोणकोणत्या वृत्तपत्रांत कशा प्रकारे प्रसिद्ध करण्यात आले आहे, तसेच प्रसिद्ध करण्यात आलेले नाही, याविषयीचा आढावा पुढे देेण्यात आला आहे. 
        कोणताही ख्रिस्ती असा नाही की, ज्याने बायबल वाचले नसेल. कोणताही मुसलमान असा नाही की, ज्याने कुराण वाचले नसेल आणि एकही हिंदु असा नाही की, ज्याने गीता वाचली असेल !
- चिन्मय मिशनच्या स्वामिनी विमलानंदजी, म्हापसा, गोवा.

फलक प्रसिद्धीकरता

केवळ एका सर्जिकल 
स्ट्राईकने काही होणार नाही !
       आतंकवाद्यांनी २ ऑक्टोबरला काश्मीरच्या बारामुल्ला येथील राष्ट्र्रीय रायफल्सच्या छावणीवर आत्मघातकी आक्रमण केले. या वेळी २ आतंकवाद्यांना ठार करण्यात आले, तर एक सैनिक हुतात्मा झाला. ३ ऑक्टोबरला काश्मीर आणि पंजाबमध्ये पाकने गोळीबार केला.

हिंदू तेजा जाग रे !

Jago !
      Atankiyoka Baramula me Rashtriya Rifles ke chavanipar bumdwara akraman, Gurudaspur me bhi golibari.
Ek Surgical Strike se jihadi atank samapt nahi hoga
जागो !
       आतंकियों का बारामूला में राष्ट्रीय रायफल्स की छावनी पर बमद्वारा आक्रमण, गुरदासपुर में भी गोलीबारी ।
एक सर्जिकल स्ट्राईक से जिहादी आतंक समाप्त नहीं होगा !
     जोपर्यंत माझे घर जळत नाही, तोपर्यंत मी उठणार नाही, ही मानसिकता हिंदूंनी त्यागायला हवी !
- ह.भ.प. शिवणीकर महाराज, पंढरपूर

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले
       ३ कोटींहून अधिक खटले न्यायालयांत प्रलंबित असल्याची लाज न वाटणारी, म्हणजेच न्याय देण्याऐवजी अन्याय करणारी शासनयंत्रणा आता नको ! हिंदु राष्ट्रात सर्वांना त्वरित न्याय मिळेल !
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले

बोधचित्र

ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥

या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो.
- प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज
सनातनचे श्रद्धास्थान
प्रेम
          कोणतीही गोष्ट जगात दिसली पाहिजे, उदा. प्रेम हे जगात दिसले पाहिजे, दाखविले पाहिजे, मग त्यात वास्तविकता असो वा नसो.
भावार्थ : जग आणि प्रेम हे प्रकृतीतील आहे. प्रेम कृतीतून दाखविता आले पाहिजे, नाहीतर दुसर्‍याला ते कळणार नाही. एकदा एका शिष्याकडे गेले असता, बाबांनी तेथे हातात माळ घेऊन जप केला. मग त्याच्या घरातील त्रासदायक स्पंदने नाहीशी झाली. वास्तविक बाबांच्या केवळ अस्तित्वानेच तसे झाले असते; पण अस्तित्वाचा परिणाम लोकांना दिसत नाही, तर हातात माळ धरून केलेला जप दिसतो, म्हणून बाबांनी तसे केले. या प्रसंगाच्या आधी जवळजवळ वीस वर्षे बाबांनी हातात माळ घेऊन जप केल्याचे कुणी पाहिले नव्हते.
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.)
        राष्ट्र आणि धर्म यांसाठी त्याग करण्याची प्रेरणा प्रत्येकात निर्माण झाली, तर हिंदु राष्ट्राची पहाट दूर नाही ! - सद्गुरु (कु.) स्वाती खाडये

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

ईश्‍वर सर्वत्र आहे !
जी गोष्ट उघडपणे करणे अयोग्य वाटते, ती लपून करण्याचा प्रयत्न करणेही अयोग्यच; 
कारण एखादी अहितकारक गोष्टच उघडपणे करायची टाळली जाते. 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

पोलीसदलात स्वच्छता अभियान राबवा !

संपादकीय
      पोलिसांनी तस्करीचा माल पकडला, पोलिसांकडून बँक लुटणारी टोळी गजाआड, पोलिसांनी भ्रष्ट अधिकार्‍याच्या घरावर टाकलेल्या धाडीत कोट्यवधी रुपये जप्त यांसारख्या बातम्या आपण वाचतो. या बातम्यांमध्ये आपल्याला काही नाविन्य वाटत नाही; कारण पोलिसांचे ते कर्तव्यच असते आणि त्याप्रमाणे ते कृती करत असतात; मात्र आता उलट्या बातम्या आपल्या वाचनात येऊ लागल्या आहेत. अलीकडेच तमिळनाडूमध्ये पोलिसांनीच हवाल्याचे ३ कोटी ५० लाख रुपये लुटल्याचे समोर आले. या प्रकरणी ३ पोलिसांना अटक करण्यात आली. येथे काळा पैसा शासनदरबारी जमा करून काळा पैसा धारकांना गजाआड करणे आवश्यक होते; मात्र पोलिसांनी लुटारूंची भूमिका बजावून स्वतःच्या तुंबड्या भरल्या. कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे दायित्व ज्यांच्यावर सोपवले आहे, तेच त्याच्या मुळावर उठले आहेत. समाजासाठी हे धोकादायक आहे.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn