Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

आज नवरात्रोत्सवारंभ (घटस्थापना)

सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके ।
शरण्ये त्र्यम्बके गौरि नारायणि नमोऽस्तुते ॥
        एका मतानुसार नवरात्रीतील पहिले तीन दिवस तमोगुण कमी करण्यासाठी तमोगुणी महाकालीची, पुढील तीन दिवस रजोगुण वाढवण्यासाठी रजोगुणी महालक्ष्मीची आणि शेवटचे तीन दिवस साधना तीव्र होण्यासाठी सत्त्वगुणी महासरस्वतीची पूजा करतात.
(संदर्भ : सनातनचा ग्रंथ शक्ती)
नवरात्र विषयक माहितीसाठी संकेतस्थळावरील मार्गिका
https://www.sanatan.org/mr/navratri

कोटी कोटी प्रणाम !

संत मुक्ताबाई जयंती
 ------------------------------------
 संत बहिणाबाई पुण्यतिथी 
 ------------------------------------
 
हिंदु जनजागृती समितीचा वर्धापनदिन

वृत्तपत्रांना वृत्त देण्याची चूक घडली, तर तुम्हाला नोकरी गमवावी लागेल !

सुहेल शर्मा
कॉ. पानसरे हत्येप्रकरणी अतिरिक्त पोलीस 
अधीक्षक सुहेल शर्मा यांना उच्च न्यायालयाची तंबी !
        मुंबई - यापुढे तुमच्याकडून अन्य वृत्तपत्रांना वृत्ते देण्याची चूक झाली, तर तुम्हाला नोकरी सोडून घरी बसावे लागेल, अशी तंबी मुंबई उच्च न्यायालयाने विशेष तपास पथका (एस्आयटी)चे अतिरिक्त पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा यांना २९ सप्टेंबर या दिवशी सुनावणीच्या वेळी दिली.
        या वेळी न्यायाधीश धर्माधिकारी म्हणाले, ज्यांची तपासणी केली जाते त्या साक्षीदारांची नावे आणि आरोपींची माहिती वृत्तपत्रात कशी छापून येते ? मी वृत्तपत्रांत ही वृत्ते वाचली आहेत. ती पोलीस अधिकार्‍याच्या नावानिशी दिली आहेत. साक्षीदार कोण तपासले आणि आरोपी कोणती माहिती देतो, असे तुमचा हवाला देऊन छापले जाते, हे कसे काय ? साक्षीदारांची नावे तुम्हालाच माहीत असल्याने तुम्ही दिल्याशिवाय ती बाहेर कशी येतील ? त्यावर सरकारी अधिवक्त्यांनी (पब्लिक प्रॉसिक्युटर) उत्तर दिले, मॅजिस्ट्रेट (दंडाधिकारी, कनिष्ठ न्यायालयाचा न्यायाधीश) सुनावणीच्या वेळी प्रश्‍न विचारतो, त्या वेळी पत्रकार उपलब्ध असतात. त्यावर न्यायाधीश धर्माधिकारी म्हणाले, तुम्ही जो मॅजिस्ट्रेट येथे उपस्थित नाही, त्यावर खापर फोडत आहात. पण वेगवेगळ्या वृत्तपत्रांत तुमच्या अधिकार्‍यांच्या नावाची जी वेगवेगळी वृत्ते येतात, ते न्यायालयात बोललेले नसते. तुमचे अधिकारी थेट बोललेले असतात. या वेळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा यांच्याजवळ याचे उत्तर नसल्याने ते यावर निरुतर झाले. सरकारी अधिवक्ते या वेळी म्हणाले, मी त्यांना सांगीन की, हे न्यायालयाला आवडत नाही. न्यायालय तुमच्यावर अ‍ॅक्शन घेईल. त्यावर न्या. धर्माधिकारी म्हणाले, अ‍ॅक्शन वगैरे काही नाही, यापुढे तुम्हाला नोकरी सोडून घरी बसावे लागेल, अशी तंबी देऊन यापुढे असे होता कामा नये, असे त्यांनी बजावून सांगितले.

भारताने फार पूर्वीच सैनिकी कारवाई करायला हवी होती ! - बलुची नेते

       नवी देहली - बलुचिस्तानमधील आणि जगातील बलुची नेत्यांनी भारताने पाकव्याप्त काश्मीरमध्ये केलेल्या सैनिकी कारवाईचे स्वागत केले आहे. अशा प्रकारची कारवाई चालूच ठेवावी, अशी विनंतीही त्यांनी केली आहे.
१. स्वित्झर्लंडमध्ये असणारे बलुच रिपब्लिकन पार्टीचे प्रवक्ता शेर महंमद यांनी म्हटले की, अशी कारवाई फार पूर्वी केली पाहिजे होती. पाकिस्तान आतंकवाद्यांसाठी स्वर्ग आहे; मात्र जगासाठी तो कर्करोग आहे. जर त्याला रोखले नाही, तर जगाला तो त्रासदायक ठरेल.
२. लंडन येथील फ्री बलुचिस्तान मुव्हमेंटचे फैज महंमद बलुच यांनी म्हटले की, हे एक योग्य पाऊल आहे. संपूर्ण जगाला माहीत आहे की, उरी येथील आक्रमणामागे पाक आहे. शांती भंग करणार्‍यांवर ही कारवाई योग्य आहे.

वेळकाढूपणा खपवून घेतला जाणार नाही !

  • सनातन सत्याधारीत तेच करते, पुरो(अधो)गाम्यांप्रमाणे खोटे आरोप करत नाही, हेच यावरून सिद्ध होते !
  • मुंबई उच्च न्यायालयाने केंद्रीय अन्वेषण यंत्रणेला स्पष्ट बजावले !
  • कॉ. पानसरे आणि डॉ. दाभोलकर हत्या प्रकरण !
  • स्कॉटलंड यार्डहून अहवाल मिळवण्याची सीबीआयला सहा आठवड्यांची अखेरची संधी !
        मुंबई, ३० सप्टेंबर - कॉ. गोविंद पानसरे आणि डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचे अन्वेषण (तपास) जमत नसेल, तर तसे सांगा; पण बॅलेस्टिक अहवालाचे कारण पुढे करून वेळकाढूपणा करू नका. तुमचा हा वेळकाढूपणा खपवून घेतला जाणार नाही, अशा अत्यंत खरमरीत शब्दांत केंद्रीय अन्वेषण यंत्रणेला उच्च न्यायालयाने २९ सप्टेंबर या दिवशी बजावले. तसेच डॉ. दाभोलकर आणि कॉ. पानसरे हत्याकांडाच्या अन्वेषणाला गती द्या. या दोन्ही प्रकरणांतील सूत्रधाराला वेळीच गजाआड करा अन्यथा जनतेत तुमच्या अन्वेषणाविषयी चुकीचा समज जाईल, अशी तीव्र अप्रसन्नता न्यायालयाने तपास यंत्रणांच्या अन्वेषणावर व्यक्त केली. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एस्.सी. धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती बी.पी. कुलाबावाला यांच्या खंडपिठाने केंद्रीय अन्वेषण यंत्रणेने (सीबीआयने) सादर केलेला मोहोरबंद अहवाल पाहिल्यानंतर वरील ताशेरे अन्वेषण यंत्रणेच्या अन्वेषणावर ओढले.

अभिनेता सलमान खान पाकिस्तानी कलाकारांना प्रमाणपत्र देण्याच्या आविर्भावात म्हणतात, पाकिस्तानी कलाकार आतंकवादी नाहीत !

  • पाकचे कलाकार आतंकवादी नाहीत, तसेच ते पाकपुरस्कृत जिहादी आतंकवादाचे विरोधकही नाहीत, हे सलमान खान का सांगत नाहीत ?
  • पाकचे कलाकार ज्या चित्रपटांत काम करतात, ते चित्रपट भारतीय नागरिक पहातात आणि त्याच भारतीय नागरिकांना पाकचे आतंकवादी ठार करतात, हे सलमान खान यांना माहिती नाही का ?
       नवी देहली - भारताने केलेली सैनिकी कारवाई योग्य आहे; मात्र पाकमधून आलेले कलाकार हे काही आतंकवादी नाहीत. ते सर्व प्रक्रिया पूर्ण करूनच भारतात प्रवेश करतात. त्यांना भारतात काम करण्यास बंदी घालणे अयोग्य आहे, अशा शब्दांत अभिनेता सलमान खान यांनी पाकच्या कलाकारांचे भारतात येऊन काम करण्याचे समर्थन केले आहे. उरी येथील आक्रमणानंतर पाकच्या कलाकारांच्या विरोधात भारतात संताप व्यक्त होत आहे. मनसेने या कलाकारांना देश सोडण्याची चेतावणी दिली होती. या संदर्भात सलमान यांनी राज ठाकरे यांना दूरभाष करून पाक कलाकारांचा समावेश असणारे ए दिल है मुश्किल आणि रईस हे दोन्ही चित्रपट विरोधाविना प्रदर्शित होऊ द्यावे, अशी विनंती केली होती.

पाकिस्तानी कलाकार आणि तंत्रज्ञ यांना भारतीय चित्रपटात काम करण्यास बंदी !

इंडियन मोशन पिक्चर्स प्रोड्युसर्स 
असोसिएशनचा (इम्पाचा) अभिनंदनीय निर्णय !
        पुणे, ३० सप्टेंबर - यापुढे कोणताही पाकिस्तानी कलाकार आणि तंत्रज्ञ यांना भारतीय चित्रपटांमध्ये काम द्यायचे नाही, तसेच सध्या करण्यात आलेले सर्व करार रहित करावेत, असा ठाम निर्णय इंडियन मोशन पिक्चर्स प्रोड्युसर्स असोसिएशनने अर्थात इम्पाने घेतला आहे. हिंदी आणि प्रादेशिक चित्रपट क्षेत्रांतील ८ सहस्र निर्माते सदस्य असलेल्या इम्पा या संघटनेची नुकतीच मुंबईत ७७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा झाली.
        या सभेमध्ये पाकिस्तानने उरी येथे केलेल्या आक्रमणाचा निषेध करत एकमताने हा निर्णय घेतला.
        या संदर्भात इम्पाचे संचालक विकास पाटील म्हणाले की, सैनिक सीमेवर हुतात्मा होत असतांना पाकिस्तानी कलाकारांचे स्वागत करणे योग्य नाही. कोणतीही कला देशापेक्षा मोठी नाही. पाकिस्तानी कलाकार, तंत्रज्ञ यांना यापुढे चित्रपट आणि मालिका यांमध्ये काम न देऊन आम्ही आमच्या पद्धतीने पाकिस्तानचा निषेध करत आहोत. असाच निषेध प्रत्येकाने केला पाहिजे.

केरळमधील हिंदुत्वनिष्ठ नेत्यांच्या हत्यांमागे जिहादी आतंकवादीच ! - किशोरकुमार, हिंदू मुन्नानी

     कोझीकोडे (केरळ) - हिंदु मुन्नानीचे (हिंदु आघाडीचे) प्रवक्ता सी. शशिकुमार यांची २२ सप्टेंबरला झालेली हत्या, तसेच हिंदु मुन्नानीचे वेल्लयापन, भाजपचे अरविंद रेड्डी आणि लेखक व्ही. रमेश यांच्या हत्येसाठी वापरण्यात आलेली प्राणघातक शस्त्रे अन् त्यांच्या हत्यांचे भीषण स्वरूप पहाता या हत्यांमागे जिहादी आतंकवाद्यांचाच हात आहे, असे प्रतिपादन हिंदू मुन्नानीचे राज्य सचिव श्री. जे.एस्. किशोरकुमार यांनी केले आहे. 
    राज्यातील इसिसच्या एका समर्थकाला नुकतीच अटक करण्यात आली, त्यावरून राज्यात जिहादी आतंकवाद्यांचा प्रभाव वाढत आहे, हे लक्षात येते. अनंतचतुर्दशी साजरी करतांना हिंदूंच्या एकतेचे प्रदर्शन झाले, त्यामुळे धर्मांधांच्या उरात धडकी भरली. त्यामुळेच हिंदु नेत्यांच्या हत्यांचे सत्र चालू झाले आहे, असे प्रतिपादन श्री. जे.एस्. किशोरकुमार यांनी व्यक्त केले आहे.

पवित्र गंगाजलापासून क्षयरोग आणि विषमज्वर यांवरील औषध निर्माण होऊ शकते ! - शास्त्रज्ञ

हिंदु धर्माने पवित्र गंगा नदीचे महत्त्व सहस्रो 
वर्षांपूर्वीच ओळखले होते. ते आज शास्त्रज्ञांच्या लक्षात येत आहे !
     चंदीगड - अलीकडे करण्यात आलेल्या एका संशोधनात गंगा नदीचे पाणी पवित्र असल्याचे शास्त्रज्ञांनी मान्य केले आहे. येथील सीएस्आयआर-इन्स्टिट्यूट ऑफ मायक्रोबियल टेक्नॉलॉजी (आयएम्टेक) च्या शास्त्रज्ञांना त्यांच्या संशोधनात गंगेच्या पाण्यात बॅक्टिरियोफेजेज विषाणू असल्याचे आढळून आले आहे.

धर्मांधांकडून हत्या झालेल्या हिंदु नेत्याच्या पत्नीचा आत्महत्येचा प्रयत्न !

हिंदु नेत्यांच्या वाढत्या हत्या रोखण्यासाठी हिंदुऐक्याची वज्रमूठ सिद्ध करा !
     कोइम्बतूर (तमिळनाडू) - हिंदु मुन्नानी (हिंदु आघाडी) संघटनेचे प्रवक्ता सी. शशिकुमार यांची निर्घृण हत्या झाल्यावर त्यांची पत्नी एस्. जमुना यांनी पतीवियोगामुळे २९ सप्टेंबर या दिवशी विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यांचे बंधू सी. धनपाल त्यांनी श्रीमती जमुना यांना उपचारार्थ एका खाजगी रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर अतीदक्षता विभागात उपचार चालू असून त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे कळते. पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा प्रविष्ट केला असून पुढील अन्वेषण चालू आहे.

तमिळनाडूच्या दिंडीगुल जिल्ह्यात भाजपच्या कार्यालयावर पेट्रोल बॉम्बने आक्रमण !

केंद्र सरकारने तमिळनाडूतील कायदा आणि सुव्यवस्था 
सुधारण्यासाठी राज्य सरकारला कृती करण्यास भाग पाडावे, अशी हिंदूंची अपेक्षा आहे ! 
     मदुराई - तमिळनाडूच्या दिंडीगुल जिल्ह्यातील दिंडीगुल-करूर रस्त्यावर असणार्‍या वझिविडुम विनायक मंदिराच्या जवळील भाजपच्या कार्यालयावर अज्ञातांनी २६ सप्टेंबरला पहाटे ४ वाजता पेट्रोल बॉम्ब फेकला; मात्र या आक्रमणात कार्यालयाची अधिक हानी झालेली नाही. तसेच दुसर्‍या एका घटनेत प्रदेश कार्यकारणीच्या सदस्याची चारचाकी गाडी अज्ञातांनी पेटवली. कार्यालयावरील आक्रमणाचे वृत्त कळताच भाजपच्या कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी तणावाची स्थिती निर्माण झाल्याने मोठ्या प्रमाणात पोलीस तैनात करण्यात आल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.

कॉर्पोरेट मंत्रालयातील लाचखोरीचे संशयित आरोपी असणारे अधिकारी बी.के. बन्सल आणि त्यांचा मुलगा यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी उघड !

सीबीआयच्या छळामुळे आत्महत्या करत असल्याचा दावा ! 
     नवी देहली - ९ लाख रुपयांंची लाच घेतल्याच्या प्रकरणी केंद्र सरकारच्या कॉर्पोरेट मंत्रालयाचे बडतर्फ अधिकारी बी.के. बन्सल आणि त्यांचा मुलगा योगेश यांनी आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेली चिठ्ठी उघड झाली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी बन्सल यांनी प्रसारमाध्यमांना ती पाठवली होती. २७ सप्टेंबरला बन्सल आणि त्यांच्या मुलाचा मृतदेह त्यांच्या सदनिकेमध्येच सापडला होता. यात त्यांनी आत्महत्येसाठी केंद्रीय अन्वेषण विभागाला उत्तरदायी ठरवले आहे. काही दिवसांपूर्वी याच कारणांवरून बी.के. बन्सल यांच्या पत्नी आणि मुलीनेही आत्महत्या केली होती. त्यामुळे त्यांचे संपूर्ण कुटुंबच संपले आहे.

जागतिक कबड्डी स्पर्धेत भाग घेण्यासाठी पंजाब कबड्डी असोसिएशनचे पाकला निमंत्रण !

स्वातंत्र्यानंतर गेली कित्येक वर्षे पाक निरपराध 
भारतीय नागरिक आणि सैनिक यांना ठार मारत असतांना 
पंजाब कबड्डी असोसिएशनला असे निमंत्रण देण्याची दुर्बुद्धी का 
सुचली ? भारतियांना राष्ट्रीय अस्मिता न शिकवल्याचा हा परिणाम आहे !
उरी येथील आक्रमणाच्या आधीच निमंत्रण दिल्याचा दावा ! 
    चंडीगड - पंजाब राज्यात ३ ते १७ नोव्हेंबर या कालावधीत होणार्‍या ६ व्या जागतिक कबड्डी स्पर्धेत भाग घेण्यासाठी पंजाब कबड्डी असोसिएशनने पाकला निमंत्रण दिले आहे; मात्र त्यासाठी भारत शासनाकडून पाकच्या कबड्डी खेळाडूंना व्हिसा मिळेल, असे वाटत नाही, असे पंजाब कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष आणि पंजाब राज्याचे मंत्री सिकंदरसिंग मालुका यांनी सांगितले. 
     उरी येथील आक्रमणाच्या पार्श्‍वभूमीवर पाकला असे निमंत्रण का दिले याविषयी स्पष्टीकरण देतांना मालुका म्हणाले की, आम्ही हे निमंत्रण अडीच मास आधी दिले होते. (पाक खेळाडू, कलाकार यांच्याविषयी भारतीय संघटनांना अतिशय कळवला असतो. त्यातून त्यांच्याकडून अशी अस्मिताशून्य कृती होते आणि त्यांना यात काही चुकीचे आहे, असे वाटत नाही ! - संपादक) आम्ही पुरुष आणि महिला गटातील स्पर्धा भरवण्यावर ठाम आहोत. पाक व्यतिरिक्त या स्पर्धेत कॅनडा, अमेरिका, अर्जेन्टिना, इंग्लंड, स्पेन, इराण, टांझानिया, सिएरा लिओन, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड हे देश सहभागी होणार आहेत.

महंमद शहाबुद्दीन याचा जामीन सर्वोच्च न्यायालयाकडून रहित !

संक्षिप्त वृत्ते 
      नवी देहली - राष्ट्रीय जनता दलाचा नेता महंमद शहाबुद्दीन याचा जामीन सर्वोच्च न्यायालयाने ३० सप्टेंबर या दिवशी रहित केला आणि त्याला कह्यात घेण्याचा आदेश दिला. हत्याकांडप्रकरणी ११ वर्षे अटकेत असलेल्या शहाबुद्दीन याला १० सप्टेंबरला पाटणा उच्च न्यायालयाकडून जामीन देण्यात आला होता. (उच्च न्यायालयाचा निर्णय सर्वोच्च न्यायालय रहित करते, मग जनतेने योग्य काय समजावे ? एखाद्या व्यक्तीला कनिष्ठ न्यायालयात मिळालेला न्याय योग्य वाटत नसेल; मात्र त्याची वरिष्ठ न्यायालयात जाण्याची ऐपत नसेल, तर त्याला योग्य न्याय कसा मिळेल ? - संपादक)सर्जिकल स्ट्राईकसाठी इस्रोच्या उपग्रहाचे सैन्याला मोठे साहाय्य !

      बेंगळुरू - भारताने पाकव्याप्त काश्मीरमध्ये केलेल्या सैनिकी कारवाईसाठी (सर्जिकल स्ट्राईकसाठी) भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रोने) अत्यंत महत्त्वपूर्ण सहकार्य केले होते. या आतंकवादी स्थळांची अत्यंत उच्च क्षमतेची छायाचित्रे इस्रोने उपलब्ध करून दिली होती. भारताच्या कार्टोसॅट या मालिकेतील उपग्रहाने ही छायाचित्रे घेतली होती. कार्टोसॅट-२ सी हा उपग्रह सैनिकी देखरेखेसाठी अत्यंत प्रभावशाली मानला जातो. ०.६५ मीटर इतक्या कमी उंचावरून छायाचित्रे घेण्याची या उपग्रहाची क्षमता आहे. गेल्या जून महिन्यातच हा उपग्रह अवकाशात पाठवण्यात आला होता.

हिंदू महासभेचे नेते कमलेश तिवारी यांच्यावरील रासुका हटवला !

      लक्ष्मणपुरी - अखिल भारत हिंदू महासभेचे नेते श्री. कमलेश तिवारी यांच्यावरील राष्ट्रीय सुरक्षा कायदा (रासुका) हटवण्याचा आदेश अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपिठाने ३० सप्टेंबरला दिला. गेल्या वर्षी श्री. तिवारी यांनी महंमद पैगंबर यांच्याविषयी कथित आक्षेपार्ह विधान केल्याच्या आरोपावरून त्यांना रासुका अंतर्गत अटक करण्यात आली होती. श्री. तिवारी यांच्या विरोधात मुसलमानांनी देशभरात अनेक ठिकाणी निदर्शनेही केली होती.

सर्जिकल स्ट्राईक म्हणजे पाकिस्तानसाठी एक धडा आहे ! - लेफ्टनंट जनरल (निवृत्त) दत्तात्रय शेकटकर

      पुणे, ३० सप्टेंबर - भारतीय लष्कराने पाकिस्तानमध्ये जाऊन सर्जिकल स्ट्राईक केले आहे. वर्ष १९७१ च्या युद्धानंतर प्रथमच भारताने पाकिस्तानात सर्जिकल स्ट्राईक केले आहे. आपल्या लष्कराकडे हिंमत आणि क्षमता प्रचंड असून आदेश दिला की, आपले सैनिक काहीही करू शकतात. त्यामुळे सर्जिकल स्ट्राईक म्हणजे पाकिस्तानसाठी एक धडा आहे, असे प्रतिपादन लेफ्टनंट जनरल (निवृत्त) दत्तात्रय शेकटकर यांनी केले. उरी येथे आतंकवाद्यांनी केलेल्या आक्रमणानंतर भारतीय लष्कराने केलेल्या सर्जिकल स्ट्राईक करण्याच्या घेतलेल्या निर्णयाचे शेकटकर यांनी अभिनंदन केले.

नोएडा येथे सनातन संस्थेच्या वतीने ११ ठिकाणी श्राद्धपक्षाविषयी प्रबोधन

श्राद्धपक्षाविषयी माहिती
सांगतांना सौ. राजरानी माहुर
      नोएडा - अलीकडे लोकांना श्राद्ध म्हणजे अशास्त्रीय आणि अवास्तव कर्मकांड असल्याचे वाटते. काही जणांना पितरांसाठी श्राद्ध न करता गरिबांना अन्नदान द्यावे किंवा शाळेला देणगी द्यावी, असे वाटते. त्यामुळे श्राद्धाविषयी समाजातील चुकीच्या समजुती दूर करून हिंदूंना धर्मशिक्षण मिळावे, यासाठी सनातन संस्थेच्या वतीने शहरातील, गौतम बुद्धनगर येथे ११ ठिकाणी प्रवचने घेण्यात आली. या प्रवचनांना उत्तम प्रतिसाद मिळाला. यात शाळांमधील शिक्षक, भाविक आदींचा सहभाग होता. ही प्रवचने सनातनचे श्री. अरविंद गुप्ता, सौ. राजरानी माहुर आणि कु. किरण महतो यांनी घेतली.
क्लोथिंग मॉन्स्टर डॉट कॉम या संकेतस्थळाकडून श्री गणेशाचे विडंबन

हिंदु जनजागृती समितीकडून विडंबन हटवण्याची मागणी
श्री गणेशाच्या मुखाचे
चित्र असलेले टी-शर्ट
      मुंबई - क्लोथिंग मॉन्स्टर डॉट कॉम या संकेतस्थळावरून श्री गणेशाचे चित्र असलेले टी-शर्ट आणि लेडीज मिनी डे्रस यांची विक्री केली जात आहे. श्री गणेशाच्या या विडंबनाविषयी अनेक धर्माभिमान्यांनी हिंदु जनजागृती समितीशी संपर्क साधून नापसंती व्यक्त केली होती. हिंदु जनजागृती समितीने क्लोथिंग मॉन्स्टर डॉट कॉम संकेतस्थळाशी संपर्क साधून श्री गणेशाचे चित्र असलेले टी-शर्ट आणि लेडीज मिनी डे्रस यांची विक्री थांबवण्याची विनंती केली आहे, तसेच हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याविषयी क्षमायाचना करण्याची मागणी केली आहे. याविषयी संकेतस्थळाने कोणताच प्रतिसाद दिलेला नाही. हिंदु धर्माभिमानी या विडंबनाच्या विरोधात पुढील संपर्कावर वैध मार्गाने निषेध नोंदवत आहेत. 
इमेल : sales@clothingmonster.com
हे चित्र छापण्यामागे कोणाच्या धार्मिक भावना 
दुखावण्याचा उद्देश नसून हिंदूंना विडंबन कळावे, हा उद्देश आहे !मालीमधील स्मारकावरील आक्रमणाच्या प्रकरणी जिहादी आतंकवाद्याला ९ वर्षांचा कारावास !

       हेग (नेदरलॅण्ड) - मालीमधील जागतिक वारसा म्हणून घोषित करण्यात आलेले ऐतिहासिक स्मारक उद्ध्वस्त केल्याच्या प्रकरणी जिहादी आतंकवादी अहमद अल्-फकी अल्-महदी याला हेगमधील आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायालयाने ९ वर्षांचा कारावास ठोठावला. अहमद अल्-फकी अल्-महदी याच्या नेतृत्वाखालील आतंकवादी गटाने वर्ष २०१२ मध्ये तिंबुक्टु स्मारकावर आक्रमण केले होते. सांस्कृतिक वारसा उद्ध्वस्त करणे हा युद्ध गुन्हा असून त्या आधारे महदी याला शिक्षा ठोठावण्यात आल्याचे हेगच्या आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायालयाने म्हटले आहे.

अमेरिकेतील १८ ते ३४ वयोगटातील नागरिकांमध्ये पालकांबरोबर रहाण्याच्या प्रमाणात वाढ

भारतीय कुटुंबपद्धतीचा अव्हेर करून 
पाश्‍चात्त्यांची जीवनशैली स्वीकारणार्‍या भारतियांना चपराक !
अमेरिकेतील तरुण पिढीमध्ये कौटुंबिक जीवनाची वाढती ओढ !
     वॉशिंग्टन - आधुनिक इतिहासामध्ये प्रथमच १८ ते ३४ वयोगटातील बहुसंख्य अमेरिकी आपल्या साक्षीदारांसोबत रहाण्याऐवजी पालकांबरोबर रहाण्यास प्राधान्य देत आहेत, असे प्यू रिसर्च सेंटरने केलेल्या नवीन जनगणनेत आढळून आले आहे. मागच्या पिढीपेक्षा विद्यमान पिढीमध्ये विवाहाचे प्रमाण मंदावले आहे. वर्ष २०१४ मधील आकडेवारीनुसार या वयोगटातील ३२.१ टक्के नागरिक पालकांबरोबर रहातात, तर ३१.६ टक्के नागरिक पती-पत्नी किंवा प्रेमीसह रहात आहेत.
     अमेरिकेत विवाह करण्याचे प्रमाण किंवा स्वत:च्या साथीदारासह वेगळे रहाण्याचे प्रमाण बरेच न्यून झाले आहे, असे प्यू अर्थतज्ञ रिचर्ड फ्राय यांनी सांगितले. वर्ष १९६० मध्ये येथील तरुण मंडळी अगदी अल्प वयात विवाह करायचे आणि घरदार सोडून वेगळी चूल थाटायचे; मात्र आताच्या दशकात विवाहाचे प्रमाण अल्प झाले आहे किंवा विवाह करणारे थोडे उशिराच विवाह करतात. वर्ष १९६० मध्ये महिलांचे विवाहाचे सरासरी वय २० होते आणि पुरुषांचे २२ होते, तर आताच्या दशकात महिलांचे विवाहाचे सरासरी वय २७, तर पुरुषांचे वय २९ वर्षे आहे, असे या अहवालात म्हटले आहे.

इसिसचे ११० जिहादी आतंकवादी ऑस्ट्रेलियात परतण्याच्या सिद्धतेत !

ऑस्ट्रेलिया इसिसच्या छायेखाली !
      सिडनी - इस्लामिक स्टेट या आतंकवादी संघटनेमध्ये सहभागी झालेले अल्पअधिक ११० ऑस्ट्रेलियाचे नागरिक असलेले मुसलमान मायदेशी परतण्याच्या सिद्धतेत आहेत. सैन्याच्या दबावामुळे इसिसचे प्रमुख इराक आणि सिरीया या देशांमध्ये अपयशी ठरत आहेत. त्यामुळे इसिससाठी लढणारे ११० मुसलमान ऑस्ट्रेलियामध्ये परत येण्याच्या सिद्धतेत आहेत; मात्र या जिहादी आतंकवाद्यांना कारागृहात पाठवण्यासाठी पोलिसांना प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार आहे, असे ऑस्ट्रेलियाचे फेडरल पोलीस अधिकारी माईक फेलन यांनी सांगितले. या आतंकवाद्यांच्या विरोधात विदेशातून पुरावे गोळा करणे अडचणीचे आहे. त्याचा लाभ उठवून बरेच जिहादी आतंकवादी शिक्षा चुकवू शकतात, असे फेलन यांनी सांगितले. अमेरिकेच्या सीआयए आणि ब्रिटीश सिक्रेट सर्व्हीस यांकडून मिळालेले पुरावे ऑस्ट्रेलियाच्या न्यायालयात ग्राह्य धरले जात नाहीत. त्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या गुप्तचर संस्थांकडून मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे न्यायालयात खटले भरण्यात येणार आहेत, असे फेलन यांनी सांगितले. (भारतातून इसिसमध्ये भरती होण्यासाठी गेलेले धर्मांध युवकही असेच परत आले, तर भारतातही अशी स्थिती उद्भवू शकते, हे अन्वेषण यंत्रणांनी आताच लक्षात घेऊन सतर्क झाले पाहिजे ! - संपादक)

पाक सैन्याचा पुन्हा गोळीबार !

पाकची खुमखुमी त्याला पूर्णपणे संपवल्याशिवाय 
थांबणार नाही, हे सरकारने लक्षात घ्यायला हवे !
       भारताने केलेल्या सैनिकी कारवाईनंतरही पाकची खोड जिरलेली नाही. त्याने २९ सप्टेंबरच्या रात्री काश्मीरच्या अखनूर येथील नियंत्रणरेषेजवळ गोळीबार केला. येथील पल्लनवाला, चाप्रियाल आणि समनम येथे हा गोळीबार करण्यात आला. जवळपास घंटाभर हा गोळीबार चालू होता; मात्र यात जीवितहानी झाली नाही. या महिन्यात आतापर्यंत पाकने ५ वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन करून भारतीय सीमेवर गोळीबार केला आहे.

आजपासून श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने श्री दुर्गामाता दौडीला प्रारंभ

    सातारा, ३० सप्टेंबर (वार्ता.) - आपल्या कुटुंबाच्या, मुलाबाळांच्या रक्षणासाठी, सुखासाठी आपण देवाला तेलवात करतो. देवाकडे आशीर्वाद मागतो; परंतु वैयक्तिक सुखाच्या पलीकडे जाऊन देव, देश आणि धर्मासाठी, भारतमातेचे स्वातंत्र्याचे कुंकू टिकवण्यासाठी सामाजिक पातळीवरही आपण नवरात्र पाळलेच पाहिजे. यासाठीच आपण सर्व सुजाण, देशभक्त नागरिकांनी श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने आयोजित करण्यात येत असलेल्या श्री दुर्गामाता दौडीमध्ये सहभागी होऊन आपले राष्ट्र आणि धर्मकर्तव्य बजावावे, असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.  

सातारा येथील नटराज मंदिरामध्ये शारदीय नवरात्रोत्सवाचे आयोजन

   सातारा, ३० सप्टेंबर (वार्ता.) - कृष्णानगर येथील श्री उत्तर चिदंबरम नटराज मंदिरामध्ये श्री शारदीय नवरात्रोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती व्यवस्थापकीय विश्‍वस्तांनी दिली आहे.
    १ ऑक्टोबर ते ११ ऑक्टोबर या कालावधीत होणार्‍या श्री शारदीय नवरात्रोत्सवामध्ये श्री दुर्गा सप्तशती पारायण, श्री उमादेवी यांना ललिता सहस्रनाम अर्चन, श्री शिवकामसुंदरी यांना ललिता सहस्रनाम अर्चन, सौंदर्यलहरी पारायण, चंण्डिहोम आणि दीपपूजन असे कार्यक्रम होणार आहेत. समस्त सातारानगरवासियांनी सहकुटुंब कार्यक्रमास उपस्थित राहून श्री शारदीय नवरात्रोत्सवाची शोभा वाढवावी, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

दंगलीची याचिका ४ मासांत निकाली काढा ! - मुंबई उच्च न्यायालयाचे नागपूर खंडपीठ

  • दंगलीत हिंदूंची हानी होऊनही हानीभरपाई न मिळाल्याचे प्रकरण 
  • याचिका दाखल करण्यात हिंदू विधीज्ञ परिषदेचा पुढाकार
      मलकापूर (जिल्हा बुलढाणा), ३० सप्टेंबर (वार्ता.) - येथे २४ डिसेंबर २०१५ या दिवशी पैगंबर जयंतीच्या निमित्ताने मुसलमान समाजाकडून काढण्यात आलेल्या मिरवणुकीत धर्मांधांनी दंगल घडवून आणून हिंदूंची घरे, वाहने, मंदिरे यांच्यावर दगडफेक करून मोठ्या प्रमाणात हानी केली होती. या प्रकरणात पोलिसांत तक्रार प्रविष्ट होऊनही हिंदूंना कोणताच न्याय मिळाला नाही. हिंदू विधीज्ञ परिषदेच्या सदस्या अधिवक्त्या (सौ.) श्रुती श्रीकांत भट यांनी या प्रकरणात पुढाकार घेऊन मुख्य याचिकाकर्ते डॉ. अशोक काबरा यांची याचिका मुंबई उच्च न्यायालयाचे नागपूर खंडपिठात प्रविष्ट केली. यावर २१ सप्टेंबर २०१६ या दिवशी नागपूर खंडपिठाचे न्यायाधीश श्री. बी.पी. धर्माधिकारी आणि श्री. ए.एस्. चांदूरकर यांनी दंगलपिडीतांना हानीभरपाई देण्याच्या संदर्भात जिल्हा न्यायदंडाधिकार्‍यांनी महाराष्ट्र पोलीस अ‍ॅक्टच्या कलम ५१ च्या तरतुदींनुसार याचिकाकर्त्यांच्या तक्रारीवर कारवाई करण्याच्या सूचना करत दंगलीची याचिका ४ मासांत निकाली काढण्याचे निर्देशही दिले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे मधुकर पिचड यांचे जात प्रमाणपत्र संभाजीनगर खंडपिठाने रद्दबातल ठरवले

अशी खोटी जात प्रमाणपत्र सादर करणारे नेते आणि पक्ष कायद्याचे राज्य देतील का ?
    संभाजीनगर, ३० सप्टेंबर - राष्ट्र्रवादी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड यांचे महादेव कोळी जातीचे जातवैधता प्रमाणपत्र मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपिठाने २८ सप्टेंबर या दिवशी रद्दबातल ठरवले. या वेळी खंडपिठाने पिचड यांना कोळी महादेव जातीचे प्रमाणपत्र देण्याच्या सूचना दिल्या आहेत. नागपूर येथील महाराष्ट्र आदिवासी मन्ना जमात मंडळाने पिचड यांच्या विरोधात याचिका प्रविष्ट केली होती. त्यामुळे पिचड यांनी महादेव कोळी जात दाखवून अनुसूचित जमाती अंतर्गत घेत असलेले त्यांचे आरक्षण रहित झाले आहे. (आरक्षणासाठी हपापलेल्या अशा नेत्यांवर कठोर कारवाई करायला हवी. याचसमवेत देशहितासाठी जातीनिहाय आरक्षण पूर्णपणे रहित करणे आवश्यक आहे. - संपादक)

महिला तिकीट तपासनीसाच्या मारहाणीत युवती बेशुद्ध !

    मुंबई - येथील शीव स्थानकावर महिला तिकीट तपासनीस कविता तांबे यांनी झालेल्या वादातून युवतीला मारहाण केली. त्यात युवती काही काळ बेशुद्ध झाली. त्यामुळे संतप्त प्रवाशांनी तांबे यांना मारहाण केली. याप्रकरणी रेल्वे पोलिसांनी तांबे यांना कह्यात घेतले. तांबे आणि युवती यांनी एकमेकींच्या विरोधात तक्रार प्रविष्ट केली आहे.

नागपूर येथे अश्‍लील संदेश पाठवल्याप्रकरणी अधिवक्त्याच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा प्रविष्ट

     नागपूर, ३० सप्टेंबर - एका महिलेला अश्‍लील संदेश पाठवल्याप्रकरणी येथील उच्च न्यायालयाचे अधिवक्ता नितीन खांबोरकर यांच्या विरोधात पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा प्रविष्ट केला आहे. या प्रकरणी महिलेच्या पतीने खांबोरकर यांना चोप दिला.
    आपल्या परिचयातील एका कंत्राटदाराचा एका मुलीशी नितीन खांबोरकर यांनी विवाह करून दिला होता. त्या वेळी त्यांनी तिचे कन्यादानही केले. काही दिवसांनी तिला त्यांनी अश्‍लील लघुसंदेश पाठवले. तसेच पती घरी नसतांना भेटण्याची विचारणाही केली. (असे वासनांध अधिवक्ता खटले कसे लढवत असतील, याचा विचारच न केलेला बरा ! - संपादक) तिने याविषयी यजमानांना सांगितले असता ते उच्च न्यायालयात खांबोरकर यांच्याशी चर्चा करण्यासाठी गेले. तेथे त्यांच्यात वाद होऊन त्या मुलीच्या पतीने खांबोरकर यांना चोप दिला. या वेळी त्यांनी तुमच्या पत्नीनेच मला अश्‍लील संदेश पाठवले, असे खोटे सांगितले. त्यानंतर मुलीच्या पतीने आपल्याला मारहाण करून धमकी दिल्याची तक्रार अधिवक्ता खांबोरकर यांनी पोलिसांत दिली. (चोराच्या उलट्या बोंबा ! - संपादक)

भारतीय सैन्यात असलेल्या नातवाला पाकने कह्यात घेतल्याचे वृत्त समजताच आजीचा मृत्यू

      धुळे - पाकिस्तानने भारतीय सैनिक चंदू चव्हाण (वय २३ वर्षे) यांना पकडल्याचा धक्का सहन न झाल्याने त्यांच्या आजीचा मृत्यू झाला. चंदू चव्हाण हे लष्कराच्या आमर्ड रेजिमेंटमध्ये सैनिक म्हणून कार्यरत आहेत. टट्टापानी येथे ते कार्यरत असून सीमेवर तैनात असतांना ते चुकून पाकिस्तानच्या सीमेत गेले होते. पाकिस्तानी लष्कराने त्यांना कह्यात घेतले आहे. चंदू चव्हाण यांचा भाऊसुद्धा लष्करात आहे. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी चव्हाण यांच्या सुटकेसाठी पाकशी चर्चा चालू असल्याची माहिती दिली आहे.फलक प्रसिद्धीकरता

जिहादी याकूब मेमनचे समर्थन करणार्‍यांकडून आणखी काय अपेक्षा करायची ?
   भारताने केलेली सैनिकी कारवाई योग्य आहे; मात्र पाकमधून आलेले कलाकार हे काही आतंकवादी नाहीत. ते सर्व प्रक्रिया पूर्ण करूनच भारतात येतात. त्यांना भारतात काम करण्यास बंदी घालणे अयोग्य आहे, असे वक्तव्य अभिनेता सलमान खान यांनी केले.

डॉ. तावडे यांना अधिवक्त्यांना भेटू न देण्याच्या संदर्भातील सुनावणी १४ ऑक्टोबरला !

कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरण
      कोल्हापूर, ३० सप्टेंबर (वार्ता.) - न्यायालयाच्या आदेशानंतरही सनातनचे साधक डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांना त्यांच्या अधिवक्त्यांना भेटू दिले नव्हते. या संदर्भात ५ सप्टेंबर या दिवशी अधिवक्ता श्री. वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकार्‍यांच्या निदर्शनास आणून दिले होते. या प्रकरणात ३० सप्टेंबर या दिवशी सुनावणी झाली. या प्रकरणाची पुढील सुनावणी १४ ऑक्टोबर या दिवशी होणार आहे. येथील सातवे सहदिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर) श्रीमती व्ही.व्ही. पाटील यांच्यासमोर ही सुनावणी झाली. या वेळी अधिवक्ता श्री. समीर पटवर्धन, तर शासकीय पक्षाच्या वतीने अधिवक्ता चंद्रकांत बुधले उपस्थित होते. १३ ऑक्टोबर या दिवशी डॉ. तावडे यांच्या न्यायालयीन कोठडीची मुदत संपणार आहे. याची सुनावणी १३ ऑक्टोबर या दिवशी होईल.

महाराष्ट्र आतंकवादविरोधी पथकाकडून जिहादी चित्रफीत असलेली ३५६ संकेतस्थळे बंद

उशिरा सुचलेले शहाणपण ! 
अशा संकेतस्थळांची निर्मिती करणार्‍यांवरच कठोर कारवाई व्हायला हवी !
      मुंबई, ३० सप्टेंबर - महाराष्ट्र आतंकवादविरोधी पथकाने गेल्या ८ मासांत जिहादी चित्रफीत असलेली ३५६ संकेतस्थळे बंद, तर यूआरएल्ही ब्लॉक केली आहेत. आखाती देशांत काही ऑपरेटर फेसबूक आणि ट्विटर या सामाजिक संकेतस्थळांवर जिहादी चित्रफीत ठेवण्यात (अपलोड) येत आहेत. त्या माध्यमातून आतंकवादी संघटनांकडून तरुणांची माथी भडकावून त्यांना जिहादी बनवण्याचा प्रयत्न केला जात होता. गेल्या वर्षी मालाडमधील मालवणी येथून एकाच वेळी ५ तरुण बेपत्ता झाले होते. आखाती देशात गेलेल्या त्या तरुणांना जिहादविषयीच्या चित्रफीती दाखवण्यात आल्या होत्या. तसेच पुण्यातील एका तरुणीला अशाच प्रकारे जिहादी बनवण्याचा डाव होता; पण पथकाने वेळीच तिचे समुपदेशन केले.

बीड जिल्ह्यातील १२ मदरशांच्या आधुनिकीकरणासाठी शासनाकडून ५० लक्ष रुपयांचा निधी जाहीर

मदरशांमधून आतंकवादी आणि धर्मांध सिद्ध होत असतात, हे शासनाला ठाऊक नाही का ?
      बीड, ३० सप्टेंबर - डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजनेच्या अंतर्गत जिल्ह्यातील १२ मदरशांना ५० लक्ष १५ सहस्र रुपयांचा निधी जाहीर करण्यात आला. येथील उस्मानिया मदरशात मुलेच आढळून न आल्याने त्यास अनुदानातून वगळण्यात आले. जिल्ह्यातील मदरशांकडून डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण अनुदान योजनेच्या अंतर्गत प्रस्ताव मागवले होते. त्या प्रस्तावांची जिल्हाधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखाली निवड समितीने छाननी केल्यानंतर ते प्रस्ताव मंजुरीसह आवश्यक निधीच्या मागणीने शासनाकडे पाठवण्यात आलेे. त्यानुसार राज्य शासनाने हा निधी मंजूर केला आहे. 
     हे अनुदान पायाभूत सुविधा, ग्रंथालय आणि शिक्षक मानधन आदींसाठी वापरण्यात येणार असून ३ मासांच्या आत प्रस्तावातील नमूद कामे करणे बंधनकारक आहे. तसेच अनुदान वितरित करण्यापूर्वी संबंधित मदरसा सद्यस्थितीत चालू आहेत का, याची निश्‍चिती जिल्हाधिकारी कार्यालयाकडून करण्याविषयीही शासन आदेशात नमूद केले आहे.गडहिंग्लज येथे शिवसेनेच्या वतीने पाकिस्तानचा ध्वज जाळला !

      गडहिंग्लज (जिल्हा कोल्हापूर), ३० सप्टेंबर (वार्ता.) - उरी येथे झालेल्या भ्याड आक्रमणात १७ भारतीय सैनिक हुतात्मा झाले होते. या घटनेच्या निषेधार्थ २७ सप्टेंबर या दिवशी गडहिंग्लज (जिल्हा कोल्हापूर) येथे शिवसेनेच्या वतीने पाकिस्तानचा ध्वज जाळण्यात आला. या वेळी शिवसेना जिल्हाप्रमुख सर्वश्री विजय देवणे, उपजिल्हाप्रमुख प्रभाकर खांडेकर, सहसंपर्क प्रमुख सुनील शिंत्रे, चंदगड विधानसभा संघटक संग्राम कुपेकर, तालुकाप्रमुख दिलीप माने, शहरप्रमुख सागर कुर्‍हाडे, मनोज पवार, उपतालुकाप्रमुख वसंतराव नाईक, संजय पाटील, दयानंद पाटील, उपशहरप्रमुख प्रकाश कोलते, काशीनाथ गडकरी, योगेश खोत, शिवसेनेचे पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते.

गणेशोत्सवाच्या कालावधीत वीरश्री निर्माण होईल असे देखावे सादर करणार्‍या सनातनच्या साधिका सौ. स्मिता भोज !

सौ. स्मिता भोज यांनी सिद्ध केलेला अफझलखान वधाचा देखावा
   सातारा, ३० सप्टेंबर (वार्ता.) - वाई येथील सनातनच्या साधिका सौ. स्मिता भोज यांनी यंदा गणेशोत्सवाचे औचित्य साधून स्वत:च्या घरी अफझलखान वधाचा देखावा सिद्ध केला होता. त्यासाठी सौ. भोज यांचे पती
श्री. सुनील भोज आणि त्यांची मुले कु. सायली, कु. श्रृतिका आणि कु. जयदीप यांनीही साहाय्य केले.

रायगडच्या पश्‍चिम किनारपट्टीवर संशयास्पद बोट आढळली

सातत्याने आतंकवादाच्या सावटाखाली असणारा एकमेव देश भारत !
    रायगड, ३० सप्टेंबर - येथील पश्‍चिम किनारपट्टीवर संशयास्पद बोट आढळली आहे. स्थानिक मच्छिमारांच्या दृष्टीस बोट पडली. त्यांना ती संशयास्पद वाटल्यामुळे त्यांनी कोस्टगार्डला त्याविषयी माहिती दिली. त्यानंतर कोस्टगार्डकडून किनारपट्टीवर गस्त वाढवण्यात आली असून बोटीचा कसून तपास केला जात आहे. या घटनेने सुरक्षायंत्रणा सतर्क झाल्या असून परिसरात शोधमोहीम चालू केली आहे.

कल्याण येथेही भाजप युवा मोर्चाच्या वतीने मिठाई वाटून आनंदोत्सव साजरा

     कल्याण - भारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्मीरमध्ये केलेल्या सर्जिकल स्ट्राईकमध्ये आतंकवाद्यांना कंठस्नान घातले. या यशस्वी कारवाईचा आनंदोत्सव येथे फटाके फोडून आणि मिठाई वाटून साजरा करण्यात आला. येथील शिवाजी चौकात भाजप युवा मोर्चाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यानंतर फटाके फोडून घोषणा दिल्या. भारतीय सैनिकांच्या कामगिरीचे कौतुक म्हणून जल्लोष करण्यात आला, तसेच नागरिकांना बुंदी वाटून आनंद व्यक्त करण्यात आला. 

कोल्हापूर येथे गोदामात शक्तीशाली स्फोट

     कोल्हापूर - कागल पिंपळगाव खुर्द येथे जिलेटिनच्या गोदामात २९ सप्टेंबरच्या रात्री अडीच वाजता शक्तीशाली स्फोट झाला. मुस्तफा महम्मद यांचे हे गोदाम आहे. स्फोटात जीवितहानी झाली नाही; मात्र स्फोटाचे कारण समजू शकलेले नाही. 
     स्फोटाची तीव्रता एवढी होती की, १२ किलोमीटर अंतरापर्यंत त्याचा आवाज ऐकू आला. प्रारंभी नागरिकांना भूकंप असल्याचे जाणवले; परंतु नंतर स्फोटाविषयी समजले. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

सांगली जिल्ह्यातील एका गावातील भिन्नधर्मीय तरुण-तरुणीची आग्रा येथे आत्महत्या !

     सांगली, ३० सप्टेंबर (वार्ता.) - येथील एका गावातील १५ वर्षीय हिंदु तरुणी आणि १७ वर्षीय मुसलमान तरुण या दोघांनी आग्रा (उत्तरप्रदेश) शहराजवळ शाहदरा येथे रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केली आहे. सदरची तरुणी दहावीत शिकायची, तर मुस्लीम तरुण हा बारावीत होता. सदरची मुलगी गेल्या सहा दिवसांपासून हरवली असल्याची तक्रार घरातील लोकांनी पोलीस ठाण्यात दिली होती. 
     घरातील लोकांनी तरुणीचा शोध घेतल्यावर ती १७ वर्षीय तरुणासमवेत पळून गेल्याची माहिती समजली आणि आत्महत्येची घटना उघडकीस आली. आग्रा येथील ताजमहालाला या दोघांनी आत्महत्या करण्यापूर्वी भेट दिली. ताजमहालासमोर छायाचित्र काढतांना सदरच्या तरुणीने बुरखा परिधान केला होता. ताजमहालासमोर दोघांनी छायाचित्रे काढले त्यानंतर दोघांनी आत्महत्या केली. दोघांच्या पिशवीत ही छायाचित्रे मिळाली.

युवकांमध्ये राष्ट्रप्रेम-धर्मप्रेम निर्माण करणार्‍या श्री दुर्गामाता दौडीचा आजपासून जागर !

     सांगली, ३० सप्टेंबर (वार्ता.) - श्रीशिवप्रतिष्ठानच्या वतीने नवरात्रात नऊ दिवस श्री शिवाजी महाराज आणि श्री संभाजी महाराज यांच्या अवघ्या रक्तगटाचा तरुण निर्माण होण्यासाठी, तसेच युवकांमध्ये राष्ट्रप्रेम-धर्मप्रेम निर्माण होण्यासाठी श्री दुर्गामाता दौड काढण्यात येते. ही दौड १ ऑक्टोबरपासून चालू होत आहे. केवळ महाराष्ट्र नव्हे, तर कर्नाटक आणि अन्य राज्यांतही ही दौड आता झेपावत-विस्तारत आहे. या दौडीच्या माध्यमातून प्रखर राष्ट्रभक्त निर्माण करण्यासाठी पू. संभाजीराव भिडे (गुरुजी) प्रयत्नरत आहेत.
     प्रारंभी पहाटे ५.३० वाजता मारुती चौक येथील शिवतीर्थावर सर्व धारकरी एकत्र जमतात. तेथून सर्वजण श्री दुर्गामाता मंदिराजवळ जातात. येथे पू. भिडे (गुरुजी) यांचे मार्गदर्शन होते. यानंतर प्रतिदिन वेगवेगळ्या भागातून ही दौड काढण्यात येते. या दौडीत राष्ट्रभक्तीपर गीते म्हणून घोषणा देण्यात येतात. ठिकठिकाणी नागरिक, महिला मोठ्या उत्साहाने औक्षण करून दौडीचे स्वागत करतात.

हिंदू तेजा जाग रे !

Jago ! : Pak se aye kalakar atanki nahi. Unpar pratibandh lagana anuchit! - Salman Khan
Jihadi atanki Yakub Memonka samarthan karnewalo se aur kya apeksha kare ?
जागो ! : पाक से आए कलाकार आतंकी नहीं. उनपर प्रतिबंध लगाना अनुचित ! - सलमान खान
जिहादी आतंकी याकूब मेमन का समर्थन करनेवालों से और क्या अपेक्षा करें ?

पोलिसांच्या संदर्भातील कटू अनुभव !

साधकांनो, पोलीस चौकशीसाठी गेल्यावर 
अध्यात्माचा अभ्यास नसणार्‍या पोलिसांनी विचारलेल्या 
अनावश्यक प्रश्‍नांची उत्तरे देण्यात वेळ घालवू नका !
        कॉ. पानसरे हत्येप्रकरणी काही साधकांची चौकशी चालू होती. त्या वेळी साधकांना सनातन आश्रमात लावण्यात आलेल्या प्रदर्शनाच्या संदर्भातही विचारण्यात आले. साधकांनी त्या प्रश्‍नांची उत्तरे दिली. प्रश्‍न विचारणार्‍या अधिकार्‍यांना ती उत्तरे मान्य नसल्याचे लक्षात आले. साधकांच्या कपड्यांवर रक्ताचे डाग पडणे, वस्तूंमध्ये दैवी पालट होणे, या गोष्टींमध्ये त्यांना तथ्य वाटत नव्हते. चौकशी करणारे एक पोलीस अधिकारी म्हणाले, खरेच जर असे असेल, तर तुम्ही आमच्यासमोर चमत्कार करून दाखवा. मग आम्ही मानतो. आम्हीही देवाचे करतोच. बाप दाखव, नाहीतर श्राद्ध घाल.

नवरात्रीचे व्रत आणि पूजन

१ ऑक्टोबर ते १० ऑक्टोबर २०१६ या कालावधीत नवरात्रोत्सव आहे. त्यानिमित्ताने...
श्री. अनिल बोकील
१. नवरात्रीचे व्रत आणि पूजन 
       नवरात्रारंभाच्या तिथीविषयी देवीपुराणात पुढील संदर्भ दिला आहे, 
अमायुक्ता न कर्तव्या प्रतिपत्पूजने मम ।
मुहूर्तमात्रा कर्तव्या द्वितीयादिगुणान्विता ॥ 
     अर्थ : नवरात्रीचे व्रत आणि पूजन अमावास्यायुक्त प्रतिपदेस करू नये. अशा वेळी प्रतिपदायुक्त द्वितीयेस व्रताचा प्रारंभ आणि पूजन करणे श्रेयस्कर असते.
२. कलश स्थापना 
     हस्त नक्षत्रयुक्त प्रतिपदेस कलश स्थापना करणे उत्तम असते.

शारदीय नवरात्रीमागील शास्त्र आणि त्या काळात केले जाणारे धार्मिक आचार !

१ ऑक्टोबर ते १० ऑक्टोबर २०१६ या कालावधीत नवरात्रोत्सव आहे. त्यानिमित्ताने...
     एका मतानुसार नवरात्रीतील पहिले तीन दिवस तमोगुण अल्प करण्यासाठी तमोगुणी महाकालीची, दुसरे तीन दिवस रजोगुण वाढवण्यासाठी रजोगुणी महालक्ष्मीची आणि शेवटचे तीन दिवस साधना तीव्र होण्यासाठी सत्त्वगुणी महासरस्वतीची पूजा करतात. रात्री म्हणजे होत असलेला पालट. देवीचे एक नाव कालरात्री असे आहे. कालरात्री म्हणजे कालपुरुषात पालट घडवणारी. फिरणे हा पृथ्वीचा गुणधर्म आहे. पृथ्वीच्या फिरण्यामुळे पालट होत असतात, म्हणजे रात्र आणि दिवस होतात. अशा पालटांना सहन करण्याची क्षमता शरिरात असावी म्हणून व्रते करतात. आश्‍विन शुक्ल पक्ष प्रतिपदा ते आश्‍विन शुक्ल पक्ष नवमीपर्यंत शारदीय नवरात्रात भगवतीदेवीची विशेष आराधना केली जाते.

सामाजिक संस्थांवर लक्ष हवे !

     देशामध्ये साधारणपणे ३० लाख सामाजिक संस्था (एन्जीओ) आहेत आणि त्यांच्या कार्यासाठी त्या जगभरातून पैसे घेत असतात. सर्वोच्च न्यायालयाने त्या संस्थांच्या वाढत्या संख्येवर चिंता व्यक्त करतांना त्यांच्या व्यवहारांत पारदर्शकता आणण्यासाठी विधी आयोगाने कोणत्या कायद्याची शिफारस केली आहे का, असे विचारले आहे. या संस्थांना मान्यता देतांना सध्याच्या नियमांत पालट करणे आवश्यक झाले आहे. सदर संस्थांच्या कार्यपद्धतीवर अंकुश ठेवण्यासाठी कार्यरत असलेला सरकारी विभाग काय करत आहे ? जगभरातून पैसे घेऊन या संस्था नेमके काय कार्य करतात, याविषयी पारदर्शकता असायलाच हवी. या माध्यमातून पैशांचा मोठा अपहार तर चालू नाही ना ? कारण नंतर काहीतरी गंभीर प्रकरण उघडकीस येण्यापूर्वी नेहमीच सावध रहाणे केव्हाही चांगलेच. एन्जीओंच्या आर्थिक व्यवहारांची सातत्यपूर्णपणे पडताळणी होत रहाणे आवश्यक आहे. त्या संस्था कोण, कोणत्या उद्देशासाठी चालवतो, तसेच त्यांच्याकडे आलेल्या पैशांच्या तुलनेत त्यांनी दाखवलेले काम तथ्यपूर्ण आहे का ?, त्यांच्या कामाने लाभार्थी समाधानी आहेत का ? तपासासाठी खोटे लाभार्थी उभे करून सरकारच्या डोळ्यांत धूळफेक चालू आहे का ? आदी अनेक गोष्टींचा सरकारने तपास करायला हवा.

वजन वाढवण्यासाठी आयुर्वेदीय उपचार

वैद्य मेघराज पराडकर
    वजन वाढवण्यासाठी प्रतिदिन तेलाने मर्दन करावे, व्यायाम करावा आणि पौष्टिक आहारही घ्यावा. ज्यांना भूक लागत नाही, त्यांनी भूक वाढण्यासाठी औषधे घ्यावीत. या सर्व स्तरांवर प्रयत्न केल्यास शरीर पुष्ट आणि बळकट होते. यांसंबंधीचे विवेचन पुढे दिले आहे.
१. मर्दन (तैलाभ्यंग)
    व्यायामापूर्वी १५ मिनिटे सर्वांगाला तेल लावून मर्दन (मालिश) करावे. मर्दनासाठी पुढीलपैकी कोणतेही एक तेल वापरावे.
अ. खोबरेल तेल
आ. तिळांचे तेल 
इ. शेंगदाण्याचे तेल
ई. माष (उडीद) तेल : वाटीभर उडीद रात्रभर थोड्याशा पाण्यात भिजत घालावेत. सकाळी यात २ पेले पाणी घालून एक पेला पाणी शिल्लक राहीपर्यंत उकळावे. हा काढा गाळून त्यात एक तांब्या (१ लिटर) तिळाचे तेल घालून केवळ तेल शिल्लक राहीपर्यंत उकळावे. तेल गरम असतांनाच लोखंडी किंवा स्टीलच्या गाळण्याने गाळावे आणि थंड झाल्यावर बाटलीत भरून ठेवावे. हे माष तेल अभ्यंगासाठी वापरावे, तसेच सकाळी रिकाम्या पोटी गरम पाण्यातून १-२ चमचे ते पोटातही घ्यावे. यामुळे स्नायू पुष्ट आणि बळकट होतात.
सर्वांना सुख देणारे हिंदु राष्ट्र हे एक दैवी राष्ट्र आहे. - आद्यसरसंघचालक डॉ. केशव बळीराम हेडगेवार

नवरात्र या शब्दाचा साधिकेला समजलेला अर्थ

- नवविधा भक्ती गुरुचरणांची होऊ दे. 
- वासना मोहविरहित सेवा होऊ दे.
रा - रामराज्य आधी या मनात निर्माण होऊ दे.
त्र - त्रैलोक्याचे योगीराज अशा गुरूंची कृपा होऊ दे.
- कु. भावना कदम, नंदुरबार (सप्टेंबर २०१६) राष्ट्रद्रोही आणि हिंदुद्रोही घटनांचा निषेध संयत मार्गाने करा !

      हिंदुद्रोह्यांचा निषेध करण्यामागचा मुख्य उद्देश त्यांचे वैचारिक परिवर्तन करणे, हा आहे. त्यामुळे कोणाचाही निषेध करतांना तात्त्विक सूत्रांच्या आधारे वैचारिक स्तरावर करा ! चुकणार्‍या व्यक्तीला तिच्या चुका सांगून योग्य मार्गावर आणणे, हा व्यापक दृष्टीकोन निषेध व्यक्त करण्यामागे हवा !

वृत्तीत सात्त्विकता असल्याशिवाय कारागृहातून सोडू नये, हेही न कळणारी न्यायव्यवस्था आणि सरकार !

   बलात्काराच्या गुन्ह्यात केवळ ४ वर्षांच्या कारावासाची शिक्षा भोगून बाहेर आलेल्या २२ वर्षीय सलीम नावाच्या वासनांधाने दुसरीत शिकणार्‍या मुलीवर बलात्कार करून तिची हत्या केल्याची घटना उत्तरप्रदेशच्या बरेलीतील कामेरी तालुक्यात घडली.

सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी सांगितलेली साधनेतील अनमोल मार्गदर्शक सूत्रे

१. मनातील विकल्प घालवणे
     आपल्यासमवेत सेवा करणार्‍याविषयी कुठलाही विकल्प आला, तर लगेच त्या साधकाशी किंवा संबंधित व्यक्तीशी बोलून तो विकल्प घालवला पाहिजे; कारण तो मनातून काढून टाकण्यासाठी आपली पुष्कळ साधना व्यय होते. केवळ सेवेतील अडचणी सोडवण्यापेक्षा मनाच्या स्तरावरील अडचणी आणि विकल्प वेळीच सोडवले पाहिजेत.
२. अपेक्षा न ठेवता वस्तूस्थिती समजून घेणे
     समोरच्या साधकाकडे साहाय्य मागितल्यावर त्याने कसे वागावे किंवा कसा प्रतिसाद द्यावा ? हे आपण अगोदरच मनात ठरवत असतो. त्या साधकाकडून तसे न झाल्यास त्याच्याविषयी आपले मन दूषित होते. त्यापेक्षा आपण आपल्या मनातील विचार त्या व्यक्तीला सांगून त्याला तसे वागणे शक्य आहे का ? किंवा तसे असणे अपेक्षित आहे का ? हे पहायला हवे. असे केल्याने आपल्याला अपेक्षित साहाय्य मिळते किंवा वस्तूस्थिती समजून घेतल्यामुळे आनंद मिळतो.
३. पालट स्वीकारणे
     वर्तमानात आयत्या वेळी होत असलेले पालट स्वीकारून आपण १०० टक्के प्रयत्नरत झालो, तर आपली साधना होते. तसे प्रयत्न सगळ्यांनी वाढवले पाहिजेत.
४. क्रियमाण १०० टक्के वापरावे !
     आपण काही वेळा अमुक एक केले नाही, तरी देवाच्या कृपेने काही अडचण आली नाही, असे अनुभव सांगतो किंवा ऐकतो.

नवरात्रोत्सवाच्या काळात नवरात्रीचे ९ दिवस प्रतिदिन प.पू. डॉक्टर, कार्तिकपुत्री आणि उत्तरापुत्री यांनी डाव्या पायाने लिंबू फोडावे, असे महर्षींनी सांगणे आणि यामागील कार्यकारणभावही सांगणे

     आता १ ऑक्टोबरपासून नवरात्रोत्सवाला आरंभ होत आहे. या मुहूर्ताला धरून महर्षींनी या काळात नवरात्रीचे ९ दिवस प्रतिदिन प.पू. डॉक्टर, कार्तिकपुत्री (सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ) आणि उत्तरापुत्री (सद्गुरु (सौ.) बिंदाताई) यांनी डाव्या पायाने लिंबू फोडावे, असे सांगितले. लिंबू व्ही या इंग्रजी अक्षराप्रमाणे फुटते, असे महर्षींनी सांगितले. कधी कधी पूर्ण लिंबू फुटून त्यातील रसही बाहेर पडतो. त्या दिवशी असणार्‍या दुष्ट शक्तींच्या आक्रमणाप्रमाणे लिंबू अल्प-अधिक प्रमाणात फुटते, असा आमचा अनुभव आहे.
     नवरात्रात देवीची शक्ती अधिक प्रमाणात असते. याच काळात महिषासुरमर्दिनीनेही आपल्या डाव्या पायाखाली अनेक असुरांना चिरडून मारले होते. दुष्प्रवृत्तींचे निर्मूलन करण्याच्या त्या कृतीची आठवण म्हणून तुम्हाला ही कृती करायची आहे, असे महर्षींनी सांगितले.
- (सद्गुरु) सौ. अंजली गाडगीळ, म्हैसुरू, कर्नाटक. (२८.९.२०१६, दुपारी १२.०६)

पू. (सौ.) अंजली गाडगीळ आणि पू. (सौ.) बिंदा सिंगबाळ सद्गुरुपदी विराजमान होत असतांनाचा भावसोहळा होत आहे, हे ठाऊक नसूनही त्या वेळी रामनाथी आश्रमाच्या चरणी पांढरी फुले अर्पण होत आहेत, असे सूक्ष्मातून दिसून स्थुलातून सुगंध येणे

सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ
 
सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ
    २४.७.२०१६ या दिवशी आम्ही सेवा करत असतांना आम्हाला सायंकाळी ५.४५ वाजता जुईच्या फुलांचा सुगंध येऊ लागला. संध्याने मला विचारले, तू अत्तर लावले आहेस का ? गजरा घातला आहेस का ? त्यावर मी नाही म्हटले. त्यानंतर आम्हाला रामनाथी आश्रमदेवतेच्या चरणी पांढरी फुले अर्पण होत आहेत, असे दिसले आणि तीव्र सुगंध येऊ लागला. त्या वेळी रामनाथी आश्रमातील चैतन्य वाढले असल्याने प्रसन्न होऊन देवता पुष्पवृष्टी करत आहेत, असे वाटले. त्यानंतर सुगंध येण्याचे प्रमाण वाढतच होते. तेव्हा रामनाथी आश्रमातील चैतन्यामुळे गंधलहरी आश्रमाकडे आकर्षित होत आहेत, असे जाणवले. याविषयी आम्ही एकमेकींशी बोलत असतांना पुष्कळ आनंद मिळत होता. ईश्‍वर आपल्याला त्याच्या चैतन्याच्या स्तोत्रात ठेवतो. रामनाथी आश्रमात चैतन्य आणि देवतांचे अस्तित्व अधिक प्रमाणात असल्याने ईश्‍वरी तत्त्व तिथे आकर्षिले जाते. त्यामुळे भाव व्यक्त करण्यासाठी सहज उपलब्ध होणार्‍या फुलांच्या रूपाने ईश्‍वराने ही अनुभूती दिली, यासाठी कृतज्ञता वाटून भावजागृती होऊ लागली.
     काही वेळाने रामनाथी आश्रमात पांढर्‍या रंगाचा भावाचा प्रवाह ओसंडून वहात आहे, असे दिसले.

साधकांची पोटच्या मुलांप्रमाणे मायेने काळजी घेणार्‍या आणि सतत कृतज्ञताभावात असणार्‍या जोधपूर (राजस्थान) येथील सनातनच्या पू. (सौ.) सुशीला मोदी !

पू. (सौ.) सुशीला मोदी
   
सौ. रेखा जाखोटिया
  जोधपूर (राजस्थान) येथील सनातनच्या पू. (सौ.) सुशीला मोदी (पू. मोदीभाभी) यांचा आणि माझा परिचय प्रथम देवद (पनवेल) येथील सनातन आश्रमात झाला. त्यापूर्वी मी त्यांच्याविषयी बरेच ऐकले होते. त्यांना प्रत्यक्ष पाहिल्यावर त्या मला प्रेमभावाचे मूर्तीमंत रूप आहेत, असे जाणवले. त्यांच्यात अनेक दैवी गुणांचा समुच्चय आहे. त्यांच्यातील पुढील गुणवैशिष्ट्ये माझ्या लक्षात आली.
१. सेवेची तळमळ
१ अ. सनातनला काही देऊ इच्छित नसलेल्यांकडून क्षमतेनुसार साधक-रुग्णांना आथिर्र्क साहाय्य मिळवून देणे : पनवेल येथे पू. मोदीभाभींचे माहेर आहे. तेेथील एक नगरसेवक त्यांच्या परिचयाचे आहेत. मला झालेल्या व्याधीविषयी त्यांनी जाणून घेतले आणि त्या नगरसेवकाच्या ओळखीच्या एका न्यासाकडून मला आथिर्र्क साहाय्य मिळवून दिले. जे लोक सनातनला काही देऊ इच्छित नाहीत, त्यांना रुग्णांना काही साहाय्य करू शकता का ?, असे विचारून त्यांनी २ - ३ वेळा औषधांसाठी साहाय्य मिळवून दिले.
१ आ. माहेरी आल्यानंतरही अखंड सेवारत रहाणे : राजस्थानमध्ये उन्हाळा अतिशय कडक असतो. त्या वेळी पू. मोदीभाभी काही दिवस पनवेल येथे त्यांच्या माहेरी रहायला येतात.

इतरांच्या चुका दिसल्यावर काय करायचे ?

प.पू. पांडे महाराज
प.पू. पांडे महाराज यांचे अनमोल विचारधन
      आपल्याला साधकांच्या चुका दिसल्या, तर त्यांच्यावर दया करावी. या साधकात, म्हणजे या जीवतत्त्वात प्रारब्धाचे किती दोष आहेत ! भगवंता, तूच याला याच्यातून बाहेर काढ. हे साधक बिचारे एवढा त्याग करून साधनेद्वारे होणार्‍या तुझ्या प्राप्तीसाठी इथे आले आहेत. त्यांची प्रगती होऊ दे. त्यांचे हे दोष नाहीसे होऊ देत, अशी प्रार्थना करावी. यासाठी आपल्या मनात त्यांच्याविषयी आत्मीयता निर्माण होणे आवश्यक आहे, तरच हे शक्य होते. - प.पू. परशराम पांडे, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (मार्च २०१५)


विविध विषयांवर लिखाण करण्यास सुचवणारा परमेश्‍वर !

श्री. राम होनप
     एकदा एका साधकाने माझे कौतुक करताना म्हटले, तुला विविध विषयांवर लिखाण करायला बरे सुचते ! हे ऐकल्यावर काही वेळाने माझ्या मनात विचार आला, कुणीतरी सुचवणारा आहेे; म्हणून सुचते. सुचवणारा आहे परमेश्‍वर !
- श्री. राम होनप, सनातन आश्रम रामनाथी, गोवा. (२०.९.२०१६)
प.पू. गुरुदेवांनी साधिकेला सूक्ष्मातून मार्गदर्शन करणे आणि गुरु शिष्यांमध्ये भेद न करता त्यांच्या स्तरावर येऊन मार्गदर्शन करत असल्याचे लक्षात येणे

      कन्नड सनातन प्रभात वाचतांना त्यामधे अर्जुन श्रीकृष्णाला शरण जातो, असा प्रसंग वाचत होते. त्यामधे श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतो, आता तू मला मित्राप्रमाणे नाही, तर गुरुस्थानी पहात आहेस; म्हणून गुरूंच्या अधिकाराने मी तुला माझे सर्व ज्ञान दिले पाहिजे. यासाठी मी तुझ्या सर्व प्रश्‍नांची उत्तरे देत आहे. हे वाचत असतांना खोलीत मी एकटीच होते. तेव्हा मी प.पू. डॉक्टरांच्या छायाचित्राकडे पाहून म्हणाले, पहा, श्रीकृष्णाला अर्जुन पूर्ण शरण गेल्यावरच श्रीकृष्ण त्याच्या सर्व प्रश्‍नांची देण्यासाठी आला; पण तुम्ही.. असे छायाचित्राशी बोलत असतांनाच दारातून प.पू. डॉक्टरांचा आवाज आला, काय विचारत होतीस ? विचार ! प.पू. डॉक्टर हसतमुखाने पुढे आले. तेव्हा माझ्या कपाटाकडे पाहून म्हणाले, पहा ! तुझा खण कसा ठेवला आहेस ? ज्यांचा खण व्यवस्थित असतो, त्यांची साधना कशी चालू आहे, ते कळते. मग मी खण व्यवस्थित केला आणि विचारले, आता कसा दिसतो खण ? व्यवस्थित दिसतो का ?
प.पू. डॉक्टर : हं ! बोल, काय प्रश्‍न विचारत होतीस ?
मी : माझे अर्जुनासारखे आध्यात्मिक प्रश्‍न नाहीत. वैयक्तिक आहेत आणि थोडे व्यष्टी साधनेविषयी आहेत. ते विचारणे योग्य होईल का ?
प.पू. डॉक्टर : ठीक आहे. विचार. तू यातून मुक्त झालीस, तरच पुढे जाऊ शकशील. नंतर तुला आध्यात्मिक प्रश्‍न निर्माण होतील. यासाठी ते तू आधी आताचे विचार.
     त्यानंतर मी काही प्रश्‍न विचारल्यावर त्यांनी त्यांची उत्तरे दिली. यातून प.पू. डॉक्टरांंनी मला शिकवले की, एकदा आपण गुरूंना शरण गेलो की, ते वैयक्तिक, आध्यात्मिक असा भेद पहात नाहीत.

हनुमानाच्या दास्यभक्तीवरून हरि आणि हर एकच असल्याचे लक्षात येऊन आनंद अनुभवता येणे

कु. सर्वमंगला मेदी
१. हनुमानासारखी दास्यभक्ती सर्व साधकांना करता यावी, अशी प्रार्थना करणे
     हनुमान चालीसाचे वाचन केल्यानंतर मला असे वाटले, दास्यभक्तांमधे हनुमान अग्रस्थानी आहे. कृष्णावतारात तसा भक्त झाला नव्हता. श्रीराम श्रेष्ठ आहे; कारण त्याला हनुमानासारखा भक्त मिळाला. तेव्हा मी मारुतीला प्रार्थना केली, हे मारुतिराया, तुमची कृपा सनातनच्या आम्हा सर्व साधकांवर असू दे. तुमच्यासारखी भक्ती करायला आम्हाला शिकवा. प.पू. डॉक्टरांच्या अवतारकार्यात त्यांना हनुमानासारखा भक्त मिळाला नाही, असे व्हायला नको.
२. जसे हर में हरि है । हरि में हर है । तसे सभी साधकों में प.पू. गुरुदेव है और 
प.पू. गुरुदेवमें सभी साधक है । हे वाक्य सुचल्यावर पुष्कळ आनंद मिळणे
      तेव्हा माझ्या मनात विचार आला, हनुमान तर, शिवाचा अंश आहे; विष्णूने धर्मसंस्थापनेसाठी श्रीरामाचा अवतार घेतला, तेव्हा शिवाने महारुद्र हनुमानरूपात पृथ्वीवर जन्म घेतला; म्हणून तो अशी भक्ती करू शकला. कैलासात राहून शिव(हर) हरिचेच स्मरण करतो आणि हरि शिवाचेच स्मरण करतो. ते दोघे एकमेकांना श्रेष्ठ समजतात; परंतु त्यांची भक्ती करणारे संप्रदाय मात्र एकमेकांशी भांडतात.

धर्माचरणाची आवड असणारी ५७ टक्के आध्यात्मिक पातळीची अन् उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली संभाजीनगर येथील कु. देवकी ऋषिकेश देवडीकर (वय ८ वर्षे) !

कु. देवकी देवडीकर
      (वर्ष २०१५ मधील गुरुपौर्णिमेला कु. देवकी उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आल्याचे घोषित झाले होते. - संकलक)
१. गरोदरपण
१ अ. गरोदरपणात झालेले शारीरिक त्रास 
१. गरोदर झाल्यापासून बाळाच्या जन्मापर्यंत मला उलट्या होणे, खाल्लेले न पचणे, असे पुष्कळ शारीरिक त्रास व्हायचे.
२. त्या काळात मला उपवासाचे पदार्थ खाल्ले की, काहीच त्रास होत नसे; पण इतर कोणतेही पदार्थ खाल्ले की, त्रास होत असे.
१ आ. गरोदरपणात केलेले आध्यात्मिक स्तरावरील प्रयत्न
१. बाळ पोटात असतांना मी श्रीकृष्ण, छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वामी विवेकानंद यांच्यावरील ग्रंथांचे वाचन केले.
२. मी प्रतिदिन पोटावर हात ठेवून श्री गुरुदेव दत्त । हा नामजप करत असे.

निर्मळ मनाची आणि भावपूर्ण सेवा करणारी कु. रोहिणी गुरव !

१. जवळीक साधणे
     रोहिणी आश्रमात आल्यानंतर अल्प कालावधीत तिची सर्वांशी जवळीक झाली. ती नवीन आलेल्या साधकांशी लगेच ओळख करून घेते. रोहिणी लहान-मोठ्यांशी त्यांच्या वयानुसार आदराने आणि प्रेमाने बोलते.
२. निर्मळ
     रोहिणी मनाने निर्मळ आहे. तिच्या मनात कुणाविषयी पूर्वग्रह नाही. त्यामुळे तिचे वागणे सर्वांशी समान आणि प्रेमाचे असते.
३. सेवाभाव
३ अ. दायित्व घेऊन सेवा करणे : पूर्वी स्वयंपाकघरातील सेवा दायित्व घेऊन कशी करायची ?, हे तिला समजत नसे; पण पू. रेखाताईंनी याविषयी तिला सांगितल्यापासून ती त्याकडे लक्ष देऊन सेवा पूर्ण करते. ती खोलीतील सेवाही दायित्व घेऊन पूर्ण करते.
३ आ. सेवा भावपूर्ण करणे : रोहिणी संतांची सेवा ताण न घेता भावपूर्ण आणि परिपूर्ण करते. संत तिला जे काही सांगतात, ते कृतीत आणण्यासाठी ती लगेच प्रयत्न करते. ती क्षमतेचा पूर्ण वापर करून सेवा करते.
४. तत्त्वनिष्ठ
     साधकांकडून चुका झाल्यास ती त्यांच्या वयाकडे लक्ष न देता त्यांना साहाय्य करण्याच्या हेतूनेे चुका सांगते. 
५. साधनेचे गांभीर्य
अ. तिला व्यष्टी साधना करतांना काही अडचणी आल्यास ती पू. रेखाताईंशी बोलून ताईंनी सांगितल्यानुसार प्रयत्न करते.
आ. आश्रमात ती आणि तिचा भाऊ (कुशल) रहातात.

मनमोकळेपणा, तत्त्वनिष्ठता आणि इतरांचा विचार करणे यांसह अनेक गुणांचा समुच्चय असणारी कु. रोहिणी गुरव !

१. निर्मळ मन आणि मनमोकळा स्वभाव
     रोहिणीचे मन निर्मळ आहे. तिला सर्वांविषयीच प्रेम वाटते. प्रत्येक साधिकेशी तिची लगेचच जवळीक होते. तिच्या मनमोकळ्या स्वभावामुळे ती सर्वांनाच हवीहवीशी वाटते. तिच्या मनात कधी कोणाविषयी प्रतिक्रिया आल्यास ती लगेच बोलून त्यातून बाहेर पडते.
२. आज्ञाधारक आणि शिकण्याची वृत्ती असणे
      रोहिणी व्यष्टी आढाव्यात सांगितलेले भावजागृतीचे प्रयत्न मनापासून करते. तिने योग्य पद्धतीने म्हणजे पोशाखाला समांतर येईल अशा प्रकारे ओढणी कशी लावायची, हे शिकून घेतले. तिला ग्रंथ वाचनातून जे शिकायला मिळते, ते ती कृतीत आणण्याचा प्रयत्न करते. तसेच दैनिक सनातन प्रभात मधून जे मार्गदर्शन मिळते, ते ती स्वतःमध्ये रुजवण्याचा ती प्रयत्न करते.
३. तत्त्वनिष्ठतेने चुका सांगणे 
     खोलीसंदर्भात काही प्रसंग झाल्यास किंवा माझ्या काही चुका झाल्यास ती मला तुझ्यात हा दोष कधीपासून आहे ? मग आतापर्यंत प्रयत्न व्हायला हवे होते ना ? असे विचारून माझे दोषांविषयीचे गांभीर्य वाढवण्यास साहाय्य करते.
४. समंजसपणा आणि इतरांचा विचार करण्याची वृत्ती
      नवीन पोशाख परिधान करण्यास तिला आग्रह केला तर ती म्हणते, आता माझ्यामुळे घरच्यांना आर्थिक अडचण यायला नको. मी पूर्णवेळ साधिका झाले आहे.

शांत, समजूतदार आणि शिक्षण घेण्याच्या आवडीला मुरड घालून साधना करायला प्राधान्य देणारी कु. रोहिणी उत्तम गुरव !

कु. रोहिणी गुरव
     रामनाथी आश्रमात सेवा करणारी कु. रोहिणी उत्तम गुरव हिचा आश्‍विन शुक्ल पक्ष प्रतिपदा, घटस्थापना (१.१०.२०१६) या दिवशी वाढदिवस आहे. त्यानिमित्त तिच्या आई-वडिलांना तिची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये देत आहोत.
कु. रोहिणी उत्तम गुरव हिला वाढदिवसानिमित्त
सनातन परिवाराच्या वतीने शुभेच्छा !
१. शांत
     रोहिणीचा स्वभाव जन्मापासूनच शांंत आहे. ती एक वर्षाची असतांना तिच्या शरिरावर घाव (जखमा) झाले होते, तरीही ती शांत असायची. ती कधी हट्ट करायची नाही.
२. समजूतदार
     रोहिणी मैत्रिणींशी प्रेमाने खेळायची. ती कधीही भांडत नसे. तिला खाण्या-पिण्याची आवड नाही. तिला जे देऊ, ते खाऊन ती शांत असायची. आमच्या नवीन घराच्या बांधकामाच्या वेळी जरा आर्थिक चणचण होती. त्या वेळी तिने कधीच मला नवीन कपडे, चप्पल किंवा पैंजण पाहिजेत, असे सांगितले नाही.
३. चांगली आकलनक्षमता
       ती लहानपणापासूनच हुशार आहे. तिला चित्रकलेची फार आवड आहे. तिला कुठलीही गोष्ट सांगितली की, परत सांगावी लागत नाही. तिच्या पटकन लक्षात येते. 
४. तिला कुणाविषयीही कधीच प्रतिक्रिया किंवा नकारात्मक विचार येत नाहीत.
५. ती रविवारी नियमितपणे प.पू. कलावती आईंच्या बालोपासना वर्गाला जात असेे.
६. शिक्षण घ्यायची आवड असतांना भावाने सेवा कर, असे सांगितलेले ऐकणे
     तिला बारावी झाल्यानंतर पुढचे शिक्षण घेण्याची आवड होती; पण तिच्या मोठ्या भावाने (कुशलने) महाविद्यालयात जाऊ नकोस. रामनाथी आश्रमात सेवेसाठी जा, असे सांगितले. मोठ्या भावाने सांगितलेले ऐकून महाविद्यालयात जायचा विचार सोडून ती रामनाथी आश्रमात सेवेसाठी गेली. तिथे एक मास (महिनाभर) राहिल्यानंतर तिला परत घरी यावेसे वाटत होते.

भांडी पुसण्याच्या संदर्भात एका संतांनी सांगितलेले सूत्र अंमलात आणतांना लक्ष नसल्याचे सांगितल्यावर आपले लक्ष लक्ष्याकडे (ध्येयाकडे) असले पाहिजे, असे साधकाने सांगणे

      २३.२.२०१६ या दिवशी मी स्वयंपाकघरामध्ये भांडी पुसत असतांना दिनेशदादा (श्री. दिनेश शिंदे) आले. त्या वेळी आमच्यात पुढील संभाषण झाले.
श्री. दिनेश शिंदे : तू कशी पुसतेस ?
मी म्हणाले : कसे पुसायचे असते ?
(त्या वेळी दिनेशदादांनी माझ्या हातातील कापड घेऊन त्यांनी कापडाची चौकोनी घडी केली.)
श्री. दिनेश शिंदे : एकदा या बाजूने पुसायचे आणि (पुसणीची घडी पालटून) एकदा या बाजूने पुसायचे.
मी : हो, प्रयत्न करते.
श्री. दिनेश शिंदे : तुला संतांनी असे करायचे, ते शिकवले असेल ना !
मी : हो; पण आता माझे लक्ष नव्हते.
श्री. दिनेश शिंदे : लक्ष लक्ष्याकडे (ध्येयाकडे) नाही; म्हणून असे होते. लक्ष लक्ष्याकडे असले पाहिजे.
- कु. रोहिणी गुरव, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (८.६.२०१६)


रामनाथी आश्रमातून जिल्ह्यात परत आल्यानंतर विरहातील आणि निर्गुणातील आनंद अनुभवता येणे

सौ. विनुता शेट्टी
१. एक वर्ष रामनाथी आश्रमात रहाण्याची संधी मिळणे, नंतर 
आंध्रप्रदेशला परत जायचे आहे, हे स्वीकारता न येणे आणि देवाची 
इच्छा, तीच स्वतःचीअसायला हवी, असा विचार करून तसे करणे
     वर्ष २०१५ मध्ये मी एका सेवेनिमित्त रामनाथी आश्रमात गेले होते. ती सेवा संपल्यावर एक अन्य सेवा करण्यासाठी मला १ वर्ष तिथेच रहाण्याची संधी मिळाली. त्या काळात रामनाथी आश्रम आणि साधक अगदी जवळचे झाले होते. एक दिवस मला आंध्रप्रदेशला परत जायचे आहे, असे कळले. ते मी स्वीकारू शकले नाही. तेव्हा देवाची इच्छा मी आंध्रमध्ये रहावे, अशी आहे ना, मग माझी इच्छाही तीच असायला हवी, असा विचार करून मी आंध्रला परत आले.
२. आश्रमात केलेली प्रार्थना आठवणे, ती केल्यानंतर 
आश्रम आणि प.पू. डॉक्टर यांना इथेही अनुभवू शकणे
     इकडे आल्यानंतर रामनाथी आश्रमाची पुष्कळच आठवण येऊन रडूही यायचे. या स्थितीत देवाच्या कृपेने विचार आला की, मी इकडे राहून रामनाथीची आठवण काढून रडणे, प.पू. डॉक्टरांना आवडणार नाही. मला इकडे राहून रामनाथी आश्रम आणि प.पू. डॉक्टर यांना अनुभवायचे आहे. तेव्हा आश्रमात करत असलेली प्रार्थना आठवली. हे गुरुदेव, तू ज्या वास्तूमध्ये रहातोस, तिथेच तू मला ठेवले आहेस. तुझा श्‍वासोच्छ्वास जेथे चालतो, तेथे प्रत्येक श्‍वासातून तुझे चैतन्य आणि प्रीती मला ग्रहण करता येऊ दे.

श्री गणेशाच्या मूर्तीला चिकटलेले फूल पाहून साधिकेला ती स्वतःही देवाच्या चरणी अर्पण झाल्याचे आणि देवाने घट्ट मिठीत घेऊन त्याचे चैतन्य अन् सहवास दिल्याचे जाणवणे

     १८.१२.२०१५ या दिवशी एका संतांच्या खोलीतील देवाघरातील आसंदीत ठेवलेल्या श्री गणेशमूर्तीला जास्वंदीचे फूल वाहिले होते. ते फूल १९.१२.२०१५ या दिवशी सकाळी गणेशाच्या चरणांना घट्ट चिकटलेले होते. त्यावरून वाटले, फुलाप्रमाणेे आपल्याला ही गुरुचरणी घट्ट मिठी मारून त्यांच्याशी एकरूप व्हायचे आहे. मी ते फूल बनून देवाच्या चरणी अर्पण झाले आणि देवाने मला घट्ट मिठीत घेऊन त्याचे चैतन्य अन् त्याचा सहवास दिला. मला ते दृश्य पाहून पुष्कळ आनंद झाला.
- कु. रोहिणी गुरव, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२४.२.२०१६)

आमचे गुरु आहेत महान ।

श्री. शंकर नरुटे
परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या
 अमृत महोत्सवी वर्षानिमित्त... 
 आम्ही आहोत लहान ।
पण आमचे गुरु आहेत महान ॥
ते देतात नेहमीच सर्वांना मान ।
म्हणूनच तर आमचे गुरुच आहेत महान ॥ १ ॥

त्यांचे कार्य त्याहून महान ।
आमचे गुरु आहेत विश्‍वाची शान ।
म्हणून सर्व जण अनुभवती ।
सनातन आहे विश्‍वात महान ॥ २ ॥

साधक म्हणजेे गुरूंची लेकरे ।
जणू त्यांची चिमणी-पाखरे ॥
गुरूंची लेकरे आश्रमात घडतात ।
पाखरे उडून धर्मप्रसारास जातात (टीप)

साधकांना सूचना

पौर्णिमा आणि अमावास्या या तिथींना प्रार्थना, नामजप, तसेच साधना अधिकाधिक करा.
प्रारंभ - भाद्रपद कृष्ण पक्ष चतुर्दशी (२९.९.२०१६)
उ.रात्री ३.५६ वाजता
समाप्ती - भाद्रपद अमावास्या (१.१०.२०१६) पहाटे ५.४१ वाजता
काल अमावास्या झाली.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले
        डॉक्टर फारतर व्याधी कमी करतात; पण मृत्यू टाळू शकत नाहीत. याउलट संत जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतूनच मुक्त करतात !
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले

बोधचित्र

॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज
सनातनचे श्रद्धास्थान
दुसर्‍याला उमजू न देणे, स्वतःचे स्वतःला न उमजणे,
स्वतःचे दुसर्‍याला उमजू न देणे, ही अवस्था
आल्यास तो जीव ईश्‍वराच्या अगदी निकट आला आहे, असे समजावे.
भावार्थ : दुसर्‍याला उमजू न देणे म्हणजे आपल्यातील शक्ती दुसर्‍याला समजणार नाही, असे वागणे. स्वतःचे स्वतःला न उमजणे म्हणजे अद्वैतात गेल्यावर स्वतःचे स्वतःला उमजण्यासारखे काही उरत नाही; कारण तो स्वतःला विसरूनच गेलेला असतो. स्वतःचे दुसर्‍याला उमजू न देणे म्हणजे आपण स्वतः ब्रह्मस्थितीत आहोत, हे प्रकृतीतील दुसर्‍याला उमजून येत नाही. ही ईश्‍वराची, ब्रह्माची लक्षणे असल्याने तशा स्थितीत जो असेल, तो साहजिकच ईश्‍वराच्या निकट आलेला असतो.
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.)
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥

या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो.
- प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

सकारात्मक रहा !
जगात यशाचीच पूजा केली जाते. मी यशस्वी होणारच, 
असे म्हणणारी आणि सकारात्मक वागणारी व्यक्तीच सर्वांना हवीहवीशी वाटते. 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)


पाकला आव्हान !

संपादकीय 
      भारतीय सैन्याच्या एम्आय १७ चॉपर या हेलिकॉप्टरने २५ कमांडोंना पॅराशूटद्वारे प्रत्यक्ष नियंत्रणरेषेजवळ उतरवले आणि भारतीय कमांडो काम फत्ते करून परत आले. जेव्हा जेव्हा पाकपुरस्कृत आतंकवादी भारतीय सीमेत घुसून भारताची मनुष्यहानी, सैनिकीहानी आणि शासकीय अन् खाजगी संपत्तीची हानी करायचे, तेव्हा भारतीय जनता म्हणायची, पाकच्या सीमेत घुसून भारतीय शासनाने पाकला धडा शिकवायला पाहिजे. भारतीय जनतेची इच्छा पूर्ण झाली, असे आज आपण म्हणू शकतो. भारतीय कमांडोंनी पाकच्या सीमेत जाऊन पाकची ८ आतंकवादी प्रशिक्षणकेंद्रे नष्ट केली आणि ४० आतंकवाद्यांचा नायनाट केला. भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जगभर कौतुक झाले.

बंगालमधील हिंदू !

संपादकीय 
      आज घटस्थापना आणि नवरात्रोत्सवारंभ ! हिंदूंचा वर्षाकाठचा हा उत्सव. उत्सवाचे नऊ दिवस संपल्यानंतर दहाव्या दिवशी दसरा हा सण येईल. हिंदूंच्या आनंदाला पारावार नसलेला हा कालावधी. महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वती या तीन देवतांचे आशीर्वाद ग्रहण करण्याचा हा कालावधी. हिंदु भाविक तसा लाभ घेत असतातच. तरीही असे काही अभागी हिंदू आहेत ज्यांना धर्मांधांच्या विरोधाला सामोरे जावे लागते. हा केवळ एका गावातील प्रश्‍न नाही, तर देशभर ज्या ज्या ठिकाणी धर्मांधांचे वास्तव्य आहे, त्या त्या ठिकाणचे हिंदू स्वतःचे सण आणि उत्सव साजरे करतांना जीवघेण्या प्रसंगांना सामोरे जात असतात. आपल्या देशातील बंगाल आणि ईशान्य भारतातील काही राज्यांतील हिंदू या आपत्तीला सामोरे जात असल्याची वृत्ते वाचकांच्या वाचनांत येत असतातच. बंगालमधील हिंदू एरव्ही जीव मुठीत घेऊन जगत असतात. शेजारच्या बांगलादेशमधून मुक्तपणे घुसखोरी करणारे धर्मांध स्थानिक हिंदूंना डोईजड झाले आहेत, हे वास्तव आज कुणी राजकीय पक्ष नाकारू शकत नाही.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn