Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

केंद्र सरकारकडून मुसलमानांसाठी प्रगतीशील पंचायत योजना !

  • केंद्र सरकारने देशातील ६ राज्यांत अल्पसंख्यांक असणार्‍या हिंदूंच्या प्रगतीसाठीही एखादी योजना आणावी, अशी हिंदूंची अपेक्षा आहे !
  • देशातील इतर समुदायांची प्रगती झालीच, असे आहे का ?
       नवी देहली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुसलमानांच्या प्रगतीसाठी आणि त्यांना विकासाच्या मुख्यप्रवाहात आणण्यासाठी प्रगतीशील पंचायतच्या नावाने देशभर पंचायतीचे आयोजन करण्याचा निर्णय घेतला आहे. या पंचायतीद्वारे मुसलमानांच्या समस्या शोधून त्या सोडवण्यासाठी त्वरित प्रयत्न केले जाणार आहेत.
       प्रगतीशील पंचायतचा प्रारंभ हरियाणातील मुसलमानबहुल मेवात येथून केला जाणार आहे. यात अल्पसंख्यांक कल्याणमंत्री मुख्तार अब्बास नकवी आणि अन्य केंद्रीयमंत्री सहभागी होणार आहेत. केंद्र सरकारचे म्हणणे आहे की, मुसलमानांच्या सर्व समस्या सोडवण्यासाठी सरकार सिद्ध आहे. त्यासाठी या पंचायतीद्वारे देशातील मुसमानांना भेटण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. काँग्रेसने या योजनेवर टीका करतांना, उत्तरप्रदेशातील निवडणूक जिंकण्यासाठी भाजपने केलेला प्रयत्न, असे म्हटले आहे. उलट काँग्रेसने नेहमीच मुसलमानांच्या भल्याचा विचार केला आहे आणि त्यासाठी कामही केले आहे. (काँग्रेसने केवळ मुसलमानांच्या भल्याचा विचार करून त्यासाठीच काम केले आहे, तर हिंदूंना वार्‍यावर सोडले ! - संपादक)

पाकचे समर्थन करणार्‍या आणि इस्लामिक स्टेटचे झेंडे फडकवणार्‍या मुसलमानांना आपले म्हणायचे का ?

दैनिक सामनाच्या संपादकियातून 
पंतप्रधानांना उपस्थित केलेला प्रश्‍न
       मुंबई - काश्मीरातील जे मुसलमान पाक झिंदाबादच्या घोषणा देत आहेत, इस्लामिक स्टेटचे झेंडे फडकवत आहेत, बुरहान वानीसाठी शोक करत आहेत, अशा मुसलमानांनाही छातीशी कवटाळून आपले म्हणायचे का ? यावरही चिंतन किंवा मंथन झाले, तर बरे होईल, असे मत शिवसेना पक्षप्रमुख आणि सामनाचे संपादक श्री. उद्धव ठाकरे यांनी दैनिक सामनाच्या २८ सप्टेंबरच्या संपादकियातून व्यक्त केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोझीकोड (केरळ) येथे केलेल्या भाषणात मुसलमानांना आपलेसे करा, असे म्हटले होते. त्या पार्श्‍वभूमीवर श्री. ठाकरे यांनी वरील विधान केले.
त्यांनी पुढे म्हटले आहे...
१. मुसलमानांना गाठीशी बांधून राजकारण करणार्‍यांची एक नवी पेढी निर्माण झाली. त्यात राममंदिराचा कळस उतरला हेच आता दिसते. मुसलमान हा देशाचा सदासर्वदा दुश्मन नाही; पण हिंदूंना त्यांच्यामुळे त्यांच्याच भारतात मान-अधिकार मिळत नाही. शासन पालटले, तरी मुसलमानी लांगूलचालनाचे नवे प्रयोग घडतच आहेत. मुसलमानांना मिठ्या मारा असे पंतप्रधान मोदी यांनी सांगताच त्यांचे शब्द जिभेवर विरघळण्याआधीच मुसलमानी मोर्चाचा बॉम्ब फुटावा, हे कसले लक्षण समजायचे ?

सैन्याकडे मूलभूत शस्त्रांची कमतरता !

  • युद्धासाठी सिद्ध होऊ इच्छिणार्‍या भारताच्या सैन्याची दयनीय सद्यस्थिती !
  • भारतीय सैन्याला या स्थितीत ठेवणारे राष्ट्रघातकीच होत !
        नवी देहली - पाकबरोबर युद्ध करण्याचा विचार होत असतांना काही निवृत्त सैन्याधिकार्‍यांनी सैन्यातील शस्त्रांच्या कमतरतेवर बोट ठेवले आहे. विशेषतः असॉल्ट रायफल, कार्बाइन आणि आर्टिलरी गन यांसारख्या मूलभूत शस्त्रांची कमतरता असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच विमानविरोधी बंदूका आणि विमानविरोधी क्षेपणास्त्र प्रणालीसारख्या आधुनिक शस्त्रांची आवश्यकताही प्रतिपादित केली आहे. ही शस्त्रे विकत घेण्याच्या प्रक्रियेमध्ये विलंब होत असल्याचेही त्यांनी निदर्शनास आणून दिले. संरक्षण मंत्रालय सैन्याच्या आधुनिकीकरणासाठीच्या आर्थिक तरतुदीची रक्कम व्यय करण्यात अपयशी ठरल्याचा आरोप त्यांनी केला.
        सैन्यातील सूत्रांच्या म्हणण्यानुसार सध्या भारताकडे काही दिवस पुरेल इतकाच दारूगोळा आहे. नवीन दारूगोळ्याची मागणी देण्यात आली असली, तरी भारताला या संदर्भात सुस्थितीत असणे आवश्यक आहे.

भाजपशासित मध्यप्रदेशात पोलीस अधिकारी झिया-ऊल-हक यांच्याकडून रा.स्व. संघाच्या प्रचारकाला मारहाण !

अशा गुंड पोलिसांवर राज्य 
सरकारने कठोर कारवाई करायला हवी !
        बालाघाट/बैहर (मध्यप्रदेश) - येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयात बैठक चालू असतांना स्थानिक पोलीस ठाण्याचे प्रभारी झिया-ऊल-हक आणि अन्य पोलीस कर्मचारी यांनी बैठक कक्षात प्रवेश करून संघाचे प्रचारक सुरेश यादव यांना मारहाण करण्याची घटना नुकतीच घडली. यादव यांना कार्यालयात मारहाण केल्यानंतर त्यांना पोलीस ठाण्यात नेऊनही मारहाण करण्यात आली. तेव्हा यादव यांनी पोलिसांच्या तावडीतून सुटका करून घेतली आणि औषधाच्या दुकानात गेले अन् तेथे बेशुद्ध झाले. त्यांना उपचारार्थ रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. तेथून त्यांना जबलपूर येथील रुग्णालयात पाठवण्यात आले. ही घटना २५ सप्टेंबरच्या रात्री घडली. यानंतर हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी येथे आंदोलन केले आणि २६ सप्टेंबरला बैहर शहर बंद ठेवण्यात आले. यादव यांच्या तक्रारीनंतर साहाय्यक पोलीस अधीक्षक राजेश शर्मा, ठाणे प्रभारी झिया-ऊल-हक आणि अन्य काही अधिकार्‍यांच्या विरोधात गुन्हा प्रविष्ट करण्यात आला.
        या घटनेच्या दोन दिवसआधी मुसलमान नेते ओवैसी यांच्या विरोधात सामाजिक संकेतस्थळावर टीका करण्यात आली होती. याची काही मुसलमान युवकांनी तक्रार केली होती. त्यावरून झिया-ऊल-हक यांनी यादव यांना मारहाण केली. यात तक्रार करणारे नवाब खान, सन्नू खान, दानिश खान आणि शाहीद खान हेही सहभागी होते.

जिंदगी या भारतीय हिंदी वाहिनीद्वारे भारतात प्रसिद्धी मिळालेल्या पाकच्या कलाकारांचा उरी आक्रमणाचा निषेध करण्यास नकार !

  • कलाकारांना धर्म आणि राष्ट्र यांच्या चौकटीत बांधू नका अशी पोपटपंची करणार्‍या पाकप्रेमी भारतियांना चपराक ! पाकचे कलाकार खरे राष्ट्रभक्त आहेत. त्यांच्याकडून भारतातील पाकप्रेमी कलाकारांनी राष्ट्रभक्ती शिकून घ्यावी !
  • वाहिनीने बंद केल्या पाक कलाकारांच्या मालिका !
        नवी देहली - काश्मीरच्या उरी येथील आक्रमणानंतर झी आस्थापनाचे संचालक श्री. सुभाष चंद्रा यांनी त्यांच्या जिंदगी या हिंदी वाहिनीवरील पाक कलाकारांचा समावेश असणार्‍या मालिका बंद केल्या आहेत. या संदर्भात त्यांनी ट्विट करून म्हटले की, प्रेम एकतर्फी असू शकत नाही. आम्ही पाकच्या कलाकारांना डोक्यावर बसवावे, त्यांनी आमच्या देशात रहावे, काम करावे, पैसे कमवावेत आणि जेव्हा आमच्या देशावर आतंकवादी आक्रमण होईल, तेव्हा त्यांनी मौन बाळगावे, असे होऊ शकत नाही. (अशी राष्ट्रप्रेमी भूमिका घेणारे श्री. सुभाष चंद्रा यांचे अभिनंदन ! - संपादक)
श्री. सुभाष चंद्रा यांनी मांडलेली सूत्रे
१. आमचा हा निर्णय कोणत्याही व्यक्ती अथवा पाकच्या कलाकारांच्या विरोधात नाही. आम्ही भारतीयता आणि मानवता यांच्या दृष्टीने आमच्या दर्शकांच्या भावना लक्षात घेऊन हा निर्णय घेतला आहे. असा निर्णय घेणे आवश्यक होते.

भारतासह, अफगाणिस्तान, भूतान आणि बांगलादेश यांच्या बहिष्कारानंतर सार्क परिषद स्थगित !

        नवी देहली - पाकची राजधानी इस्लामाबादमध्ये येत्या नोव्हेंबरमध्ये होणार्‍या सार्क परिषदेवर भारत, भूतान, बांगलादेश यांच्या पाठोपाठ अफगाणिस्ताननेही बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतल्यावर ही परिषदच स्थगित करण्यात आली आहे. नेपाळकडे यंदाच्या या परिषदेचे अध्यक्षपद होते. नेपाळनेच परिषद स्थगित केल्याचे कळवले आहे.
        सार्कच्या एका सदस्य देशाकडून भारतात आतंकवादी कारवाया केल्या जात आहेत. तसेच भारताच्या अंतर्गत गोष्टींमध्ये हा देश ढवळाढवळ करत आहे. या प्रकारांमुळे ही परिषद यशस्वी होणार नाही, असे वातावरण या देशाने निर्माण केले आहे. त्यामुळे आम्ही या परिषदेत सहभागी होणार नाही, असे भारताने नेपाळला कळवले होते. काही अन्य देशही याच कारणामुळे या परिषदेत सहभागी होणार नसल्याची माहिती आम्हाला मिळाली आहे. दक्षिण आशियाई देशांच्या विकासासाठी दहशतमुक्त वातावरण असणे आवश्यक आहे, असे भारताने नेपाळला कळवले होते.

देहलीत तस्करांनी आणलेले २ सहस्र कोटी रुपयांचे ७ सहस्र किलो सोने जप्त !

केवळ अडीच वर्षांत ७ सहस्त्र किलो सोन्याची तस्करी झाली, 
तर आतापर्यंत किती किलो सोन्याची तस्करी झाली असेल, याचा विचारही न केलेला बरा !
भारतातील आतापर्यंतची सर्वांत मोठी सोन्याची तस्करी उघड ! 
     नवी देहली - महसूल गुप्तचर विभागाने केलेल्या कारवाईत तस्करांनी आणलेले ७ सहस्र किलो सोने जप्त केले. या सोन्याची किंमत २ सहस्र कोटी रुपयांहून अधिक आहे. या सोन्याची तस्करी करणारी टोळी मागील अडीच वर्षे कार्यरत होती. (ही सुरक्षायंत्रणांची निष्क्रीयताच होय ! - संपादक) भारतात एवढ्या मोठ्या प्रमाणात सोन्याची तस्करी उघड होण्याचे हे पहिलेच प्रकरण आहे, असे सांगण्यात येत आहे. हे सोने म्यानमार ते मणीपूर मार्गे भारतात आणले जात होते. या टोळीकडून लक्षावधी अमेरिकी डॉलरही जप्त करण्यात आले आहेत. (एवढ्या मोठ्या प्रमाणात सोन्याची तस्करी होणे, हे भ्रष्ट अधिकार्‍यांचे तस्करांशी संगनमत असल्याशिवाय अशक्य आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून या तस्करीसाठी उत्तरदायींना कारागृहात टाका ! - संपादक)

नागपूर येथे अवैधरित्या वास्तव्य करणार्‍या नायजेरियन तरुणाला अटक

नायजेरियन लोकांचा वाढता विळखा दूर 
करण्यासाठी शासनाने वेळीच कठोर पावले उचलावीत !
       नागपूर - येथे १ वर्षापासून अवैधरित्या वास्तव्य करणारा इरिक जॉन क्वेम या नायजेरियन तरुणाला स्थानिक सीआयएसएफ तसेच इमिग्रेशन विभागातील अधिकारी यांनी अटक केली आहे.
१. येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर तो आल्यावर त्याचे वर्तन संशयास्पद वाटल्यामुळे अधिकार्‍याने त्याचे पारपत्र आणि व्हिसा पडताळली. पारपत्रातील क्रमांकाचा शोध घेतला असता तो दुसर्‍याच व्यक्तीच्या नावावर असल्याचे आढळले. त्यामुळे इरिकजवळचे पारपत्र खोटे असल्याचे उघड झाले.
२. तो वर्ष २०१५ मध्ये ३ मासांचा वैद्यकीय व्हिसा घेऊन भारतात आला. ३ मास उलटूनही तो विदेशात परत गेला नाही.
३. देशातील विमानतळांना आतंकवादी आक्रमणाचा धोका असतांनाही इरिक नागपूर, मुंबई येथील विमानळांवर फिरत असल्याचे सुरक्षेविषयी प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे.

करूर (तमिळनाडू) पोलीस ठाण्याच्या पोलिसांच्या टोळीने ६० गाड्या चोरल्याचे उघड !

कायद्याचे रक्षक नव्हे, तर भक्षक पोलीस ! राज्यकर्तेच भ्रष्ट असल्याने पोलीसही 
तसेच वागू लागले आहेत, ही स्थिती धर्माचरणी राज्यकर्त्यांच्या हिंदु राष्ट्रातच पालटली जाईल ! 
पोलिसांनी हवाल्याचे पैसे लुटल्याचे प्रकरण !
      कोईम्बतूर (तमिळनाडू) - मडुकराई येथील महामार्गावरील दरोडा प्रकरणी अटक करण्यात आलेले करूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मुथुकुमार यांची पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली. अशा प्रकारच्या ६० प्रकरणांमध्ये मुथुकुमार यांचा हात असल्याचे उघड झाले आहे. बेहिशेबी पैसे घेऊन जाणार्‍या ६० गाड्या त्यांनी चोरल्याचा आरोप आहे. या गाड्यांच्या मालकांनी गाड्या चोरल्याच्या तक्रारी केल्या; मात्र गाडीतील हवाल्याचे पैसे गेल्याच्या तक्रारी पोलिसात केल्या नाहीत. याच संधीचा अपलाभ पोलीसांच्या टोळीने उठवला, असे जिल्हा पोलीस सूत्रांनी सांगितले. या प्रकरणी पोलिसांना माहिती पुरवणारे केरळमधील कोडाली श्रीधरन् आणि त्यांचा मुलगा अरुण यांचा पोलीस शोध घेत आहेत.
     २५ ऑगस्ट २०१६ या दिवशी कोईम्बतूरपासून जवळच असलेल्या मडुकराई येथील महामार्गावर मुथुकुमार यांच्या नेतृत्वाखालील पोलीस टोळीने केरळ येथील एका व्यापार्‍याची गाडी पळवून त्यातील ३ कोटी ९० लाख रुपये लुटले होते. मुथुकुमार यांनी गुन्हा स्वीकारल्याचे सूत्रांनी सांगितले.

काशी येथे किन्नरांनी केले सामूहिक पिंडदान !

      काशी (वाराणसी) - किन्नरांनी त्यांच्या पितरांच्या अतृप्त आत्म्यांच्या मुक्तीसाठी येथील पिशाच मोचन विमल तीर्थावर सामूहिक त्रिपिंडी श्राद्ध केले. पुरोहित अनुप शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली २१ ब्राह्मणांनी या श्राद्धविधीमध्ये सहभाग घेतला. या वेळी किन्नर आखाड्याचे आचार्य महामंडलेश्‍वर लक्ष्मीनारायण त्रिपाठी यांच्यासह देशातील किन्नर आखाड्याचे पिठाधिश्‍वर आणि महंत उपस्थित होते. 
    उज्जैन येथे प्रथमच किन्नरांच्या आखाड्याची स्थापना करण्यात आली होती. आखाड्याचे आचार्य महामंडलेश्‍वर त्रिपाठी यांनी सांगितले, महाभारताच्या काळात शिखंडीने त्यांच्या पितरांचे पिंडदान केले होते. त्यानंतर प्रथमच किन्नरांकडून सामूहिक स्तरावर धार्मिक पद्धतीने पिंडदान करण्यात आले. यापुढे सनातन धर्मियांप्रमाणे किन्नर समाज त्यांच्या पितरांसाठी प्रत्येक वर्षी श्राद्ध-तर्पण विधी करतील. त्याचबरोबर या ठिकाणी प्रत्येक ५ वर्षांनंतर सामूहिकपणे पिंडदान करण्यात येईल.संतकृपा प्रतिष्ठानच्या वतीने फरिदाबाद येथील टागोर अ‍ॅकॅडमी शाळेत तणावमुक्तीसाठी प्रवचन

टागोर अ‍ॅकॅडमी शाळेत प्रवचन
करतांना सौ. संदीपकौर मुंजाल
      फरिदाबाद - संतकृपा प्रतिष्ठानच्या वतीने येथील टागोर अ‍ॅकॅडमी शाळेत नुकतेच तणाव मुक्तीसाठी काय करावे ? या विषयावर प्रवचन घेण्यात आले. या प्रवचनाचा ७० शिक्षकांनी लाभ घेतला. या वेळी प्रतिष्ठानच्या सौ. संदीपकौर मुंजाल यांनी तणावामागील कारणे आणि त्यांवरील उपाय, आपल्यातील गुणांचा विकास करून व्यक्तिमत्त्व विकास कसा साधायचा ? आदी विषयांवर मार्गदर्शन केले. या प्रवचनानंतर शिक्षकांनी अशा प्रकारचे कार्यक्रम पुन्हा घेण्याची मागणी केली.
सोशल मीडियाच्या माध्यमातून राष्ट्र आणि धर्म यांचा प्रसार करण्याचा शिबिरार्थींचा निर्धार

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने कुमठा (कर्नाटक) येथे सोशल मीडिया शिबीर
डावीकडून शिबिरार्थ्यांना मार्गदर्शन करतांना
श्री. शशिधर पै आणि उपस्थित शिबिरार्थी
        कुमठा, उत्तर कन्नडा, २८ सप्टेंबर (वार्ता.) - हिंदु जनजागृती समितीच्या वतीने २५ सप्टेंबर या दिवशी येथील श्री महासती मंदिराच्या सभागृहामध्ये एक दिवसीय सोशल मीडिया (सामाजिक प्रसारमाध्यमाद्वारे प्रसार) शिबीर घेण्यात आले. या शिबिरात राष्ट्र आणि धर्म यांचा प्रसार करण्यासाठी सोशल मीडियाचा अधिक चांगला वापर कसा करू शकतो ?, याविषयी श्री. शशिधर पै यांनी मार्गदर्शन केले. या शिबिराच्या शेवटी साधना कशी करायची याविषयी उपस्थितांना माहिती देण्यात आली. कृतज्ञता व्यक्त करून शिबिराची सांगता करण्यात आली. या वेळी शिबिरार्थींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून राष्ट्र आणि धर्म यांचा प्रसार करण्याचा निर्धार व्यक्त केला.

उरी येथील आक्रमण आणि तमिळनाडूमध्ये हिंदु नेत्यांच्या हत्या यांच्या निषेधार्थ शिवसेनेकडून चेन्नई येथे मोर्चा !

मोर्च्यानंतर उपस्थितांना मार्गदर्शन करतांना
सौ. उमा रविचंद्रन्, श्री. राधाकृष्णन् आणि धर्माभिमानी
      चेन्नई - उरी येथील सैन्यदलाच्या तळावरील आतंकवादी आक्रमण आणि तमिळनाडूमध्ये हिंदु नेत्यांच्या हत्या यांच्या निषेधार्थ शिवसेनेने चेन्नई शहरातील चेपॉक येथे निषेधमोर्चा काढला. यामध्ये शिवसेनेसह भारत हिंदु मुन्नानी (भारतीय हिंदूंची आघाडी), ऑल इंडिया हिंदु पीपल्स् पार्टी, सत्यसेना, हिंदु जनजागृती समिती इत्यादी हिंदुत्वनिष्ठ संघटना सहभागी झाल्या होत्या. या वेळी श्री. आर्.डी. प्रभु, श्री. जयम पंडियन, श्री. वसंत कुमार, श्री. सिवकुमार, श्री. गणेश बाबु, श्री. कर्णन इत्यादी नेत्यांची भाषणे झाली. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने श्री. श्रीराम लुकतुके आणि सौ. उमा रविचंद्रन् यांनी या निषेधमोर्च्यात सहभाग घेतला. या वेळी शिवसेनेचे श्री. राधाकृष्णन् यांनी उरी येथील आतंकवादी आक्रमणाच्या प्रकरणी केंद्रशासनाने पाकच्या विरोधात तात्काळ पावले उचलण्याची मागणी केली. तसेच राज्यात होणार्‍या हिंदु नेत्यांच्या हत्या प्रकरणी तमिळनाडू शासनाने आतंकवाद्यांच्या विरोधात तात्काळ कारवाई करावी आणि तसे न केल्यास राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ शकतो, अशी चेतावणी त्यांनी दिली. हुतात्मा झालेल्या हिंदुत्वनिष्ठांना न्याय मिळवून दिला जाईल, असे श्री. राधाकृष्णन् यांनी या वेळी सांगितले. कार्यक्रमाच्या शेवटी पाकिस्तानचा ध्वज जाळण्यात आला.

युद्धात पाकला साहाय्य करणार नाही आणि काश्मीर प्रश्‍नी हस्तक्षेप नाही ! - चीनची दुसर्‍यांदा ग्वाही

हिंदी-चिनी भाई भाई म्हणून भारताच्या पाठीत सुरा 
खुपसणार्‍या चीनच्या या भूलथापांना भारताने बळी पडू नये ! 
      बीजिंग - पाकच्या प्रसारमाध्यमांत चीन भारत-पाक युद्धात पाकला साहाय्य करणार आणि काश्मीरप्रश्‍नी चीनचा पाकला पाठिंबा अशा आशयाच्या बातम्या गेल्याच आठवड्यात प्रसारित झाल्या होत्या; मात्र चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते गेंग शुंग यांनी प्रसारमाध्यमांना संबोधित करतांना या बातम्या खोडून काढल्या. पाकमधील चीनचे राजदूत यु बोरेन यांनी पाकच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट घेतल्यानंतर पाकने चीन भारत-पाक युद्धात पाकला साहाय्य करणार आणि काश्मीरप्रश्‍नी चीनचा पाकला पाठिंबा देणार, अशा बातम्या पत्रकारांना दिल्या होत्या. 
      या बातम्यांना पाकच्या प्रसारमाध्यमांत ठळक प्रसिद्धी मिळाल्याने पाक नागरिक आनंदी झाले होते; मात्र गेंग शुंग यांनी केलेल्या खुलाशाने पाकचा खोटारडेपणा पुन्हा एकदा उघडकीस आला. भारत आणि पाकिस्तान हे दोघेही चीनचे मित्रराष्ट्र आहेत, त्यांच्यातील प्रश्‍न त्यांनी बोलण्याद्वारे सोडवावेत, असे निवेदन गेंग शुंग यांनी या आठवड्यात दुसर्‍यांदा घोषित केले आहे. पाकमधील चीनचे राजदूत यु बोरेन हे काय म्हणाले हे मला माहित नाही, असेही गेंग शुंग म्हणाले.

धर्मांधांना परत पाठवण्यासाठी सरकारने पावले उचलावीत ! - ऑस्ट्रेलियाच्या खासदार हॅनसन

अमेरिका, युरोप आणि ऑस्ट्रेलिया या तीनही खंडांतून जिहादी 
आतंकवादाच्या भयामुळे धर्मांधांविषयी संतप्त भावना प्रकट होत आहेत. गेली तीन दशके 
जिहादी आतंकवाद सहन करत असलेल्या भारतातून कधीही अशा भावना व्यक्त झाल्या नाहीत, 
हा अहिंसावाद आहे कि गांधीगिरी कि सहिष्णुता कि आत्मघात याचे चिंतन भारतीय करतील का ?
      सिडनी - ऑस्ट्रेलियाची संस्कृती आणि विचारसरणी यांच्याशी मेळ न खाणार्‍या धर्मांधांनी देशात निर्माण केलेल्या दलदलीत फसण्याचा धोका ओळखून शासनाने त्यांना ते ज्या देशातून येथे आले तेथेच परत पाठवण्यासाठी पावले उचालावीत. ज्यांच्या निष्ठा या देशाशी आहेत, त्यांनाच या देशात रहाण्याचा अधिकार आहे, अशा स्पष्ट शब्दांत खासदार पौलिन हॅनसन यांनी ऑस्ट्रेलियाच्या संसदेत भाषण करतांना चेतावणी दिली. पौलिन हॅनसन या वन नेशन या पक्षाच्या नेत्या असून त्यांच्या पक्षाचे संसदेत ४ खासदार आहेत. त्या आधीपासूनच विदेशी नागरिकांच्या ऑस्ट्रेलियातील स्थलांतराच्या विरुद्ध आहेत.

पाकिस्तानात अल्पसंख्यांकांवर नियमित अत्याचार केले जातात ! - मानवाधिकार संस्थेच्या पाहणीचा निष्कर्ष

       इस्लामाबाद - पाकिस्तानातील असंतुष्ट आणि भ्रष्टाचारी पोलीस अल्पसंख्यांकांना अनावश्यक अटक, शारीरिक छळ, हत्या करणे आणि लैंगिक हिंसा असे अत्याचार नियमितपणे करत आहेत, असे जागतिक मानवाधिकार संस्थेने केलेल्या पाहणीत आढळून आले आहे. केवळ वर्ष २०१५ मध्ये अशा प्रकारची सहस्रो प्रकरणे उजेडात आली आहेत, असे या संस्थेने सिद्ध केलेल्या १०२ पानी अहवालात नमूद केले आहे. (काश्मीरच्या जनतेवर होणार्‍या तथाकथित अत्याचाराविषयी जगभर अपप्रचार करणार्‍या पाकिस्तानला ही सणसणीत चपराक होय ! - संपादक)

अमेरिकेत वाहन अनुज्ञप्तीसाठी ख्रिस्ती महिलेला डोक्यावर उपवस्त्र घेऊ देण्यास नाकारण्यावरून तक्रार !

       अलबामा (अमेरिका) - वाहन अनुज्ञप्तीसाठीच्या (परवान्यासाठीच्या) छायाचित्रासाठी योन अ‍ॅलन नावाच्या एका ख्रिस्ती महिलेला डोक्यावर उपवस्त्र घेऊ देण्याचे नाकारणार्‍या येथील अधिकार्‍याला द अमेरिकन सिव्हील लिबर्टीज युनियनने न्यायालयात खेचले आहे. केवळ मुसलमान महिलांनाच डोक्यावर उपवस्त्र घेण्याची अनुमती दिली जाते, असे या ख्रिस्ती महिलेला त्या अधिकार्‍याकडून सांगण्यात आले होते.
       ख्रिस्ती धर्मातील शिकवणीनुसार डोक्यावरून उपवस्त्र घेणे, हा अविभाज्य घटक आहे, असे योन अ‍ॅलन या महिलेने सांगितले. (कुठे स्वतःच्या धर्मातील आचरणासाठी कटिबद्ध असणार्‍या ख्रिस्ती महिला, तर कुठे हिंदु धर्मानुसार धर्माचरण न करणार्‍या जन्महिंदू महिला ! - संपादक)

(म्हणे) 'देवाधर्माच्या उपासनेला अंनिसचा विरोध नाही !'

     अंनिसने आतापर्यंत 'देव नावाची संकल्पना जगात नाही', 'अध्यात्म थोतांड आहे', असाच अपप्रचार करून नास्तिकतावादाचे उघड समर्थन केले आहे. असे असतांना 'देवाधर्माच्या उपासनेला अंनिसचा विरोध नाही !', असे सांगून विद्यार्थ्यांची दिशाभूल करणार्‍या मुक्ता दाभोलकर ! हिंदूंनो, नास्तिकतावाद्यांचे खरे स्वरूप जाणा आणि त्यांच्या भूलथापांना बळी पडू नका !
नास्तिकतावादी अंनिसच्या मुक्ता दाभोलकर यांचे धादांत खोटे विधान ! 
     चिंचवड (पुणे), २८ सप्टेंबर - देवाधर्माच्या उपासनेला अंनिसचा विरोध नाही. देवाधर्माच्या नावाखाली सामान्य नागरिकांची होणारी पिळवणूक आणि फसवणूक करण्यास विरोध आहे, असे प्रतिपादन मुक्ता दाभोलकर यांनी केले. (असे असते, तर सद्य परिस्थितील सक्षम कायद्यांनीच अंनिसने हे प्रकार उघडकीस आणले असते. श्रद्धेचीच गळचेपी करणार्‍या जादूटोणाविरोधी कायद्याचा आग्रहच धरला नसता ! - संपादक) येथील प्रतिभा महाविद्यालयात अंनिसच्या वतीने आयोजित 'प्रश्‍न विद्यार्थ्यांचे - उत्तर मुक्ता दाभोलकरांचे' या कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

कोलकातामध्ये या वर्षी साम्यवादी चीनचे अधिकारीही दुर्गापूजेत सहभागी होणार !

     विश्‍वासघातकी चीनचे कोणते मनसुबे चालू आहेत, हे कोणी ठरवायचे ? चीनच्या कोणत्याही कृतीकडे सहजतेने पहाता येणार नाही; कारण चीन भारताच्या संदर्भात प्रत्येक गोष्ट हेतू ठेवूनच करत असतो. त्यामुळे चीनच्या या कृतीने हिंदूंनी हरपून जाऊ नये ! 
     कोलकाता - येथील या वर्षीच्या नवरात्रीतील दुर्गापूजेमध्ये पहिल्यांदाच साम्यवादी चीनच्या उच्चायुक्त कार्यालयातील अधिकारी सहभागी होणार आहेत. 

बीड येथे पावसामुळे सहस्रो हेक्टर शेतीची हानी !

अतिवृष्टि: अनावृष्टि: शलभा मूषका: शुका: ।
स्वचक्रं परचक्रं च सप्तैता ईतय: स्मृता: ॥ - कौशिकपद्धति
अर्थ :
धर्माचे पालन न केल्यामुळे अतीवृष्टी, अनावृष्टी (दुष्काळ), टोळधाड, उंदरांचा त्रास, पोपटांचा उपद्रव, आपापसांत लढाया आणि शत्रूचे आक्रमण, अशी सात प्रकारची संकटे (राष्ट्रावर) येतात. तात्पर्य, प्रजा आणि राजा, दोन्हीही धर्मपालक आणि साधना करणारे हवेत. तरच आपत्काळाची तीव्रता अल्प होईल किंवा आपत्काळ सुसह्य होईल.
      बीड - जिल्ह्यात सतत पाच दिवस पडलेल्या मुसळधार पावसामुळे सहस्रो हेक्टर शेतीची हानी झाली. कापूस, सोयाबीन, बाजरी आदी पिके उद्ध्वस्त झाली आहेत. जिल्ह्यात एक सहस्रांपेक्षा अधिक घरांची पडझड झाली आहे.

अज्ञातांनी तलावाबाहेर काढून ठेवलेल्या गणेशमूर्तींचे धर्माभिमान्यांकडून पुन्हा तलावात विसर्जन !

केर्ले येथील धर्माभिमान्यांची अभिनंदनीय कृती ! 
तलावाबाहेर काढून ठेवलेल्या मूर्ती आणि त्यांचे विसर्जन करतांना कार्यकर्ते
     केर्ले (जिल्हा कोल्हापूर), २८ सप्टेंबर (वार्ता.) - अनंत चतुर्दशीच्या दिवशी कोल्हापूर-पन्हाळा रस्त्यावरील पाझर तलावामध्ये श्री गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले होते. काही अज्ञातांनी या मूर्ती तलावाबाहेर काढून ठेवल्या होत्या. ही गोष्ट केर्ले गावातील धर्मशिक्षणवर्गातील धर्माभिमानी श्री. पंडितराव शिंदे यांच्या निदर्शनास आली. त्यांनी याची माहिती इतर धर्माभिमान्यांना कळवली. केर्ले गावातील धर्माभिमानी श्री. रामभाऊ मेथे यांच्या नेतृत्वाखाली गावातील हिंदुत्वनिष्ठ सर्वश्री चंद्रकांत पाटील, येथील कला, क्रीडा, सांस्कृतिक युवा मंचचे कार्यकर्ते सर्वश्री नाना नलवडे, विक्रम माने, सचिन किल्लेदार, अमोल पाटील, सौरभ पाटील, प्रवीण सूर्यवंशी, अमित अतिग्रे, विक्रम माने यांनी सर्व गणेशमूर्तींचे पुन्हा तलावामध्ये विसर्जन केले. (शास्त्रानुसार वाहत्या पाण्यात श्री गणेश मूर्तींचे पुन्हा विसर्जन करणार्‍या सर्व धर्माभिमान्यांचे अभिनंदन ! अशी कृती हिंदूंनी करणे हे त्यांचे कर्तव्य आहे. - संपादक) या वेळी सनातन संस्थेचे डॉ. मानसिंग शिंदे यांनी उपस्थित सर्व धर्माभिमान्यांना श्री गणेशमूर्तींचे वाहत्या पाण्यात विसर्जन करण्याचे महत्त्व विशद केले. तसेच अशी कृती पुन्हा होऊ नये, यासाठी सर्वांचे प्रबोधन केले. 

एम्आयएम् पक्षाच्या सभेत प्रक्षोभक वक्तव्य केले जाऊ नये !

कराड येथील हिंदुत्वनिष्ठांची पोलिसांकडे निवेदनाद्वारे मागणी 
तहसीलदारांना निवेदन देतांना हिंदुत्वनिष्ठ
     कराड, २८ सप्टेंबर (वार्ता.) - येथे २९ सप्टेंबर या दिवशी सायंकाळी ५ वाजता छत्रपती शिवाजी महाराज भाजी मंडई परिसरात एम्आयएम् पक्षाची सभा होणार आहे. त्यात कोणतेही प्रक्षोभक वक्तव्य केले जाऊ नये, यासाठी येथील हिंदुत्वनिष्ठांनी कराडचे तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी श्री. राजेंद्र शेळके, तसेच कराड शहर पोलीस यांना दिले. 

जमात-उल-मुजाहिदीन बांगलादेशचे आतंकवादी दुर्गापूजेच्या वेळी आक्रमण करणार होते !

     कोलकाता - बांगलादेशच्या जमात-उल-मुजाहिदीन या आतंकवादी संघटनेच्या ६ आतंकवाद्यांना अटक केल्यानंतर त्यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीत ते येथे दुर्जापूजेच्या वेळी घातपात करणार होते. यातील ५ आतंकवादी दोन वर्षांपूर्वी खाग्राघर येथे दुर्गापूजेच्या कालावधीत झालेल्या बॉम्बस्फोटात सहभागी होते. आता ते दक्षिण भारतात काही विध्वंसक कृत्ये करण्याच्या कामातही गुंतले होते.

(म्हणे) सिंधूचे पाणी रोखले, तर चीनला सांगून ब्रह्मपुत्रेचे पाणी थांबवू ! - पाकची धमकी

भारताने कोठेही सिंधु नदीचे पाणी रोखू, असे 
म्हटलेले नसतांना डावपेचात हुशार असणार्‍या पाकने 
आधीच अशी धमकी देऊन भारताला शह दिला आहे !
       इस्लामाबाद - भारताने जर सिंधु नदीचे पाणी रोखले, तर चीनला सांगून आम्ही ब्रह्मपुत्रा नदीचे पाणी थांबवू, अशी धमकी पाकचे मंत्री सरताज अजीज यांनी दिली आहे.

सिंधु पाणीवाटप कराराच्या विरोधातील कोणत्याही निर्णयाला पीडीपी विरोध करणार !

पीडीपीचे पाकप्रेम !
       जम्मू - काश्मीरमध्ये भाजपसमवेत सत्तेत असणार्‍या पीपल्स डेमोक्रेटिक पार्टीने सिंधु पाणीवाटप कराराच्या विरोधात कोणताही पालट करण्यास विरोध केला आहे. पीडीपीचे वरिष्ठ नेते मुझफ्फर हुसैन बेग यांनी म्हटले की, पाकच्या विरोधात या करारातील नद्याचे पाणी रोखण्यासाठी त्यावर धरणे बांधण्याची केंद्रसरकारची योजना काश्मीरला डुबवू शकते आणि काश्मीरला एका तळ्यात परिवर्तित करू शकते. या कराराच्या उल्लंघनामुळे पाकची जितकी हानी होईल, तितकीच भारताचीही होईल. हा करार जागतिक बँकेच्या मध्यस्थीने झालेला आहे. त्याला कायम ठेवणे भारताचे दायित्व आहे. जर भारताने हा करार रहित केला, तर जगाच्या दृष्टीने भारताची प्रतिमा मलिन होईल.

नाशिक येथील माहिती अधिकार कार्यकर्ते विशाल गंगापुत्र यांच्यावर प्राणघातक आक्रमण

माहिती अधिकार कार्यकर्त्यांवर वारंवार केली जाणारी 
आक्रमणे रोखण्यासाठी शासन ठोस उपाययोजना काढेल का ? 
     नाशिक - अवैध बांधकामांना अभय देणार्‍या शासकीय अधिकार्‍यांच्या विरुद्ध आवाज उठवणारे येथील माहिती अधिकार कार्यकर्ते श्री. विशाल गंगापुत्र यांच्यावर प्राणघातक आक्रमण करून त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार चालू आहेत. 

मुंबईत करण जोहर यांच्या कार्यालयाबाहेर आंदोलन केल्याने मनसेच्या कार्यकर्त्यांना अटक

राष्ट्रप्रेमींना अटक, तर धर्मांधांना मोकळीक हा कुठला न्याय ? 
भारतियांच्या भावनांचा आदर का केला जात नाही ? - मनसे कार्याध्यक्षा शालिनी ठाकरे 
     मुंबई, २८ सप्टेंबर - पाकिस्तानी कलाकारांना हिंदी चित्रपटात कामे देऊ नयेत, यासाठी महाराष्ट्र्र नवनिर्माण सेनेने २७ सप्टेंबर या दिवशी अंधेरी (प.) येथील दिग्दर्शक करण जोहर यांच्या धर्मा प्रोडक्शन कार्यालयाच्या बाहेर निषेध आंदोलन केले. या वेळी आंबोली पोलिसांनी मनसेचे विभाग अध्यक्ष संदेश देसाई आणि अन्य कार्यकर्त्यांना अटक केली. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. 

(म्हणे) 'पाकिस्तानी कलाकारांसाठीही भारतीय चित्रपटसृष्टी खुली !'

सैफ अली खान यांना पाक कलाकारांविषयी 
एवढेच प्रेम असेल, तर त्यांनी खुशाल पाकिस्तानात जावे ! 
सैफ अली खान यांचे पाकप्रेम (?) 
     मुंबई - जगभरातील विशेष करून सीमेपलीकडील प्रतिभावंत कलाकारांसाठी भारतीय चित्रपटसृष्टी खुली आहे. ते भारतीय चित्रपटांमध्ये काम करू शकतात. आम्ही कलाकार असून प्रेम आणि शांती यांविषयी बोलतो; पण इथे कोणी काम करावे आणि कोणी करू नये, याचा निर्णय सरकारने घेतला पाहिजे, असे मत अभिनेता सैफ अली खान यांनी जीक्यू मेन ऑफ द इयर पुरस्कार सोहळयात व्यक्त केले. (पाकिस्तानी कलाकारांचे समर्थन करून हुतात्मा सैनिकांशी प्रतारणा करणार्‍या अशा कलाकारांच्या चित्रपटांवर बहिष्कारच घालायला हवा ! - संपादक) उरीमध्ये लष्करी तळावर झालेल्या आतंकवादी आक्रमणात १८ सैनिक हुतात्मा झाल्यानंतर देशात संतापाचे वातावरण आहे. मनसेने पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घालण्याची मागणी केली. त्या पार्श्‍वभूमीवर सैफ अली खान यांनी हे वक्तव्य केले आहे.

हिंदु ऐक्यासाठी संकेतस्थळाला भेट द्या !

 English : www.hindujagruti.org 
 हिंदी : www.hindujagruti.org/hindi/ 
मराठी : www.hindujagruti.org/marathi/

दैनिक सनातन प्रभातचे वाचक श्री. शरद ताम्हनकर यांना पुणे विद्यापिठाची विद्यावाचस्पती पदवी जाहीर !

     चिंचवड (पुणे) - येथील श्री. शरद श्रीपाद ताम्हनकर यांना नुकतीच पुणे विद्यापिठाची 'विद्यावाचस्पती ' (पीएच्.डी.) पदवी जाहीर झाली आहे. श्री. ताम्हनकर यांनी कला आणि ललित कला विद्या शाखेअंतर्गत मराठीमध्ये 'संत तुकाराम आणि संत रामदास यांच्या साहित्य संपदेतील मूल्य विचारांचा अभ्यास' या विषयावर शोधप्रबंध सादर केला होता. त्या प्रबंधामध्ये नाशिक येथील के.टी.एच्.एम्. महाविद्यालयातील प्रा. बाळासाहेब गुंजाळ यांनी त्यांना मार्गदर्शन केले होते. श्री. शरद ताम्हनकर हे गेली काही वर्षे दैनिक सनातन प्रभातचे नियमित वाचक आहेत.

मराठा समाजाचे प्रश्‍न वेळीच सोडवा, अन्यथा यापुढे मोर्च्यात उद्रेक होऊ शकतो !

मराठा क्रांती मोर्चा समन्वयक समितीची चेतावणी 
     संभाजीनगर, २८ सप्टेंबर - राज्यभर मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून समाज शिस्तीत आणि संयमाने आपल्या मागण्या मांडत आहे; पण पुढील काळातही हे मोर्चे शांततेतच पार पडतील, असे सांगता येणार नाही. सरकारने लवकरात लवकर मराठा समाजाच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेतला पाहिजे. तसे न झाल्यास मराठा समाजाचा उद्रेक होऊ शकतो. आम्ही सरकारला चेतावणीच देत आहोत, असे स्पष्ट प्रतिपादन मराठा क्रांती मोर्च्याचे समन्वयक समितीचे रवींद्र काळे यांनी केले. येथील सिंचन भवनमध्ये २६ सप्टेंबर या दिवशी पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 

डॉ. बालाजी तांबे यांच्याविरुद्ध राज्य शासन सर्वोच्च न्यायालयात जाणार

गर्भलिंगनिदान प्रकरणात उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान
     मुंबई, २८ सप्टेंबर - आयुर्वेदीय गर्भसंस्कार या पुस्तकाच्या माध्यमातून पुत्रप्राप्तीचा उपाय सुचवून त्याचा प्रचार करून गर्भधारणापूर्व आणि प्रसवपूर्व गर्भलिंगनिदान प्रतिबंधक कायद्याचा (पीसीपीएनडीटी) भंग केल्याच्या आरोप लेखक डॉ. बालाजी तांबे, प्रकाशक आणि वितरक यांच्या विरोधात केला होता. त्यावर संगमनेर येथील न्यायालयात प्रविष्ट केलेला गुन्हा रहित करण्याचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपिठाने दिला होता. त्या निर्णयाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात जाण्याची राज्य शासनाने सिद्धता केली आहे. त्यासाठी राज्य सरकारच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट करण्यात येणार असल्याची माहिती राज्य कुटुंब कल्याण विभागाच्या अतिरिक्त संचालक डॉ. अर्चना पाटील यांनी दिली. त्याविषयीची कायदेशीर प्रक्रियाही चालू असल्याचे त्यांनी सांगितले.

फलक प्रसिद्धीकरता

पाकला जगाच्या नकाशावरून नष्ट करणे, हाच युद्धाचा शेवट हवा !
   भारतीय सैनिकांनी पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून सर्जिकल स्ट्राईकद्वारे प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ असलेली ६ ते ८ आतंकवादी प्रशिक्षण केंद्रे नष्ट केली. ही कारवाई २८ सप्टेंबरच्या उत्तर रात्री करण्यात आली. यात ४० आतंकवादी ठार झाले.

शैक्षणिक क्षेत्रातील परीक्षा उत्तम गुणांनी उत्तीर्ण झालेले गुणवंत आणि अध्यात्मशास्त्रात प्रगती झालेले उन्नत यांच्यातील भेद

श्री. अरूण डोंगरे
      सध्याचे युग हे स्पर्धेचे युग आहे. प्रत्येक क्षेत्रातच स्पर्धा अनिवार्य झालेली आहे. शिक्षणक्षेत्र तर त्याची जन्मभूमीच म्हणावी लागेल. अशा या शिक्षणक्षेत्रात विविध परीक्षांमध्ये गुणवत्ता सूचीत येणे, हे फार मानाचे मानले जाते. त्याचा लाभ त्या व्यक्तीच्या उत्तरार्धातील जीवनावर होत असतो. अशा प्रकारच्या मोठ्या परीक्षांमध्ये, उदा. बोर्डाच्या गुणवत्ता सूचीत आलेले, वैद्यकीय क्षेत्रातील परीक्षांतील गुणवंत अथवा स्पर्धापरीक्षांमध्ये चांगले गुण मिळवून गुणवत्तासूचीत नाव झळकलेले आणि अध्यात्मशास्त्रात प्रगती केलेले उन्नत आणि संतपदास पोचलेले यांचा तौलनिक अभ्यास केल्यास पुढील सूत्रे लक्षात येतात. (साधनेतील उन्नत म्हणजे ६० टक्के आणि त्याहून अधिक आध्यात्मिक स्तर गाठलेले साधक.)
वरील सूत्रे लिहून घेतल्याविषयी भगवान श्रीकृष्ण आणि प.पू. डॉक्टर यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करतो. 
- श्री. अरूण डोंगरे, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१३.१२.२०१५)

पर्यावरणवाद्यांचा पर्यावरणद्वेष आणि विवेकवाद्यांचा अविवेक !

श्री. विक्रम डोंगरे
    समस्त हिंदूंचे आराध्यदैवत असलेल्या गणरायाचा उत्सव आपण नुकताच आनंदाने साजरा केला. आपण जेवढ्या भक्तीभावाने गणरायाला आपल्या घरी स्थानापन्न केले तेवढ्याच भक्तीभावाने त्या श्री गणेशमूर्तीचे धर्मशास्त्रानुसार विसर्जनही केले. तथापि १४ सप्टेंबर २०१६ या दिवशी जय महाराष्ट्र या वृत्तवाहिनीवर नाशिकमधील श्री गणेशमूर्तीच्या विसर्जनाविषयीचे वृत्त पाहिले आणि धक्काच बसला. गणेशोत्सवात येथील महानगरपालिका आणि तथाकथित पर्यावरणवादी यांनी जलप्रदूषणाचा बागुलबुवा उभा करून श्री गणेशमूर्तीदानाचा धर्मद्रोही उपक्रम राबवला होता. या उपक्रमात दान घेण्यात आलेल्या श्री गणेशमूर्ती महानगरपालिकेचे कर्मचारी एका नदीत अक्षरश: फेकून देत होते, असे या वृत्तवाहिनीने त्याच्याविषयीची एक चित्रफीत दाखवून उघड केले. हे दृश्य बघून मनात पुढील विचार आले.

पोलिसांच्या संदर्भातील कटू अनुभव !

व्यवहारात नोकरीसाठी पती-पत्नी वेगळे 
राहिले, तर योग्य आणि साधनेसाठी वेगवेगळे 
राहिल्यास अयोग्य, असा अपसमज असणारे पोलीस !
      एका साधिकेला पोलीस ठाण्यात चौकशीला बोलावले होते. तिच्या घरातील व्यक्तींची माहिती घेत असतांना तिच्या यजमानांविषयी पोलिसांनी चौकशी केली. त्या साधिकेचे यजमान सेवेसाठी एका ठिकाणी आणि ती साधिका सेवेसाठी वेगळ्या ठिकाणी होती. त्याविषयी पोलीस अधिकार्‍याने अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न केला. त्यांनी साधिकेला विचारले, तुम्ही असे वेगवेगळे का रहाता ? तुम्हाला कुणी सांगितले आहे का ? याविषयी साधिकेने आम्ही साधनेसाठी स्वेच्छेने वेगवेगळे रहात असल्याचे स्पष्ट केले, तरीही त्या अधिकार्‍यांना ते पटत नव्हते. ते अधिकारी त्या साधिकेला तुमच्या मुलाला वडिलांचेही प्रेम मिळायला हवे, असे भावनिक स्तरावर समजावून सांगत होते. तेथे आम्हा साधिकांसमवेत एक महिला पोलीस होती. तिच्याशी बोलतांना लक्षात आले, तिचे एक वर्षाचे बाळ पाळणाघरात ठेवून ती नोकरीसाठी येते आणि तिचे यजमान दुसर्‍या शहरात पोलिसात नोकरीसाठी आहेत.
- एक साधिका
पोलिसांविषयी चांगले आणि वाईट अनुभव असल्यास 
वाचकांनी नजीकच्या दैनिक कार्यालयात कळवावेत !

साधकांना सूचना

पौर्णिमा आणि अमावास्या या तिथींना प्रार्थना, नामजप, तसेच साधना अधिकाधिक करा. 
प्रारंभ - भाद्रपद कृष्ण पक्ष चतुर्दशी (२९.९.२०१६) उ.रात्री ३.५६ वाजता 
समाप्ती - भाद्रपद अमावास्या (१.१०.२०१६) पहाटे ५.४१ वाजता 
उद्या अमावास्या आहे.

पितृपक्षात महालय श्राद्ध केले नसल्यास कार्तिक कृष्ण पक्ष प्रतिपदा (१५.११.२०१६) पर्यंत श्राद्ध करू शकतो !

       काही साधकांना वाटते की, आपण समष्टी साधना करतो, तर आपल्याला श्राद्धपक्ष विधी करणे आवश्यक नाही; परंतु दैनिकात आलेल्या सूचनेनुसार प्रत्येक साधक आणि व्यक्ती यांनी मृत व्यक्तीचे श्राद्ध करणे आवश्यक असते. 
१. श्राद्ध न केल्याने होणारा त्रास प्रत्येक भावाला सहन करावा लागत असल्याने न्यूनतम एका भावाने श्राद्ध केल्यास पूर्वजांचा त्रास अल्प होईल सर्व बंधू एकत्र रहात असल्यास वडील बंधूने श्राद्ध करावे. काही कारणाने (उदा. शारीरिक असमर्थता) वडील बंधू श्राद्ध करत नसल्यास कोणताही भाऊ श्राद्ध करू शकतो; कारण श्राद्ध न केल्याने होणारा त्रास प्रत्येक भावाला सहन करावा लागत असल्याने न्यूनतम एकाने श्राद्ध केल्यास ते पूर्वजांना तृप्ती देण्यास उपयुक्त ठरून पूर्वजांचा त्रास अल्प होईल. सर्व बंधू विभक्त रहात असल्यास प्रत्येकालाच श्राद्धविधी करता येतो. 

पाकला आतंकवादी देश घोषित करण्याची मागणी !

पाकच्या विरोधात ऑनलाइन चळवळ 
     वॉशिंग्टन - अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे निवासस्थान असणार्‍या व्हॉइट हाऊसच्या अधिकृत संकेतस्थळावर पाकिस्तानला आतंकवादी देश घोषित करण्यासाठी एक ऑनललाईन याचिका ठेवण्यात आली आहे. त्या मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत एक लाखाहून अधिक लोकांनी या मागणीला समर्थन दिले आहे. अमेरिकेच्या रिपब्लिकन पक्षाचे खासदार टेड पो आणि डेमोक्रेट पक्षाच्या डाना रोहराबैच यांनी ही याचिका ठेवली आहे. या ऑनलाइन याचिकेवर समर्थन देण्याचा अंतिम दिनांक २१ ऑक्टोबरला आहे.

हिंदु जनजागृती समितीचे कार्य हे अतुलनीय व एकध्येयी आहे ! - पू. ग्यानेंद्रजी महाराज, उपाध्यक्ष, ऑल इंडिया संत असोसिएशन


शिवसमर्थ कोकण ट्रस्टच्या वतीने धर्मकार्याविषयी हिंदु जनजागृती समितीचा गौरव

 हिंदु जनजागृती समितीचे श्री. कृष्णाजी पाटील (उजवीकडे) 
यांचा सत्कार करतांना श्री. सुनील पवार (डावीकडे)
     पुणे, २८ सप्टेंबर (वार्ता.) - येथे २३ ऑक्टोबरला होणार्‍या हिंदु धर्मजागृती सभेच्या निमित्ताने हिंदु जनजागृती समितीचे श्री. कृष्णाजी पाटील आणि श्री. विनायक बागवडे शिवसमर्थ कोकण ट्रस्टचे अध्यक्ष श्री. सुनील पवार यांना भेटण्यासाठी गेले असता त्यांचा श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. या वेळी श्री. पवार यांनी शिवसेनेच्या संपर्क कार्यालयात हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांना एकत्रित केले होते. शिवसेनेचे नगरसेवक श्री. सचिन दांगट हेही या वेळी उपस्थित होते. 

मुलुंड येथे हिंदु जनजागृती समिती आयोजित सोशल मिडिया शिबिराला धर्माभिमान्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

मार्गदर्शन करतांना श्री. सागर चोपदार, 
सोबत सौ. नेहाली शिंपी
      मुलुंड, २८ सप्टेंबर (वार्ता.) - राष्ट्ररक्षण आणि धर्मरक्षण यांचे कार्य 'सोशल मिडिया'द्वारे प्रभावीपणे कसे करावे ? यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने २५ सप्टेंबर या दिवशी येथील श्री. प्रकाश गंगाधरे सभागृहात एका शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्यांतील शंभरहून अधिक धर्माभिमानी सहभागी झाले होते. या शिबिरात हिंदु जनजागृती समितीचे मुंबई जिल्हा समन्वयक श्री. सागर चोपदार यांनी शिबिराचा उद्देश स्पष्ट केला. रायगड जिल्हा सोशल मिडिया समन्वयक श्री. सागर म्हात्रे आणि मुंबई जिल्हा सोशल मिडिया समन्वयक श्री. विजय सरगर यांनी 'व्हॉटस् अ‍ॅप', श्री. भालचंद्र गायकवाड यांनी 'फेसबूक', सौ. नेहाली शिंपी अन् श्री. नरेंद्र सुर्वे यांनी 'ट्विटर' या माध्यमांचा राष्ट्र अन् धर्म यांच्या कार्यासाठी कसा प्रभावी वापर करू शकतो ? याविषयी उपस्थितांना मार्गदर्शन केले. शिबिराचे सूत्रसंचालन श्री. स्मितेश देवरूखकर यांनी केले. 

हिंदुत्वनिष्ठाचा उद्वेग !

      डॉ. कलाम यांच्यासारख्या देशभक्ताची अंत्ययात्रा दाखवायला वाहिन्यांकडे वेळ नाही; पण देशद्रोही याकूबची प्रेतयात्रा क्षणाक्षणाला दाखवत होते. ती बातमी एकदा दाखवून थांबवायला हवी होती. या अशा विकल्या गेलेल्या वाहिन्या ? यांच्याकडून काय अपेक्षा करणार ? 
- अभिनेता शरद पोंक्षे

बिहारमधील गुन्हेगारीचे जंगलराज !

       देशातील जनतेला बिहारच्या गुन्हेगारीच्या जंगलराजची माहिती सर्वश्रुत आहे. तेथे गुन्हेगार निपजले जातात आणि पैशासाठी ते गुन्हेगार शत्रू देशाचे हस्तकही होऊ शकतात. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचे नाव जंगलराजला संपवण्यासाठी प्रसिद्ध झाले; पण त्याच बिहारमध्ये पुन्हा एकदा गुन्हेगारीला शरण जाण्याची नामुष्की आली आहे. लालूप्रसाद यादव यांचा निकटवर्तीय आणि सिवान जिल्ह्यातील अनेक हत्याकांडांचा दोषी महंमद शहाबुद्दीन या राजकारण्याला जामीन मिळाला आहे. शहाबुद्दीनला २ हत्याकांडांमध्ये शिक्षा झालेली आहे. अशा गुन्हेगाराला दुसर्‍या अन्य खटल्यात जामीन मिळाला. त्याला जामीन मिळणे, ही निव्वळ कायदेशीर चलाखी असून तो कारागृहातून मुक्त होऊ शकला. असे असले तरी शहाबुद्दीनची आजही भीती आहे. ज्यांच्या हत्येसाठी शहाबुद्दीनला शिक्षा झाली, त्यांच्या कुटंबियांना जीव मुठीत धरून जगण्याची वेळ आली आहे; पण त्यासाठी त्याला दोषपात्र ठरवून जन्मठेपेची शिक्षा देणार्‍या न्यायाधिशांनी सिवान जिल्हा सोडला आहे. यावरूनच बिहारच्या जंगलराज आणि कायदा सुववस्थेचा बट्याबोळ कळून येईल.

महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी स्वच्छता कामगाराला अटक

     मुंबई - वसई स्थानकातील स्वच्छता कामगार प्रकाश डिसूझा (वय ४५ वर्षे) याला महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे. ही महिला स्थानकातील शौचालयाचा वापर करण्यासाठी गेल्यावर डिसूझा याने तिच्या मागे जाऊन तिचा विनयभंग केला. पीडित महिलेने पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली होती.
 

गांजा न पिण्यास सांगणार्‍या विद्यार्थ्यावर चाकूने आक्रमण

हिंसकतेकडे वाटचाल करणारी देशाची भावी पिढी !  
३ विद्यार्थी घायाळ 
     कल्याण - बिर्ला महाविद्यालयाबाहेरील तरुणाला गांजा पिऊ नको असे सांगणार्‍या विद्यार्थ्यावर करण्यात आलेल्या चाकूच्या आक्रमणात ३ विद्यार्थी गंभीररित्या घायाळ झाले आहेत. त्यापैकी एकाची प्रकृती चिंताजनक आहे. या प्रकरणी पोलिसांनी आठ जणांविरोधात गुन्हा प्रविष्ट केला आहे; मात्र ते सर्वजण फरार आहेत.

फलक प्रसिद्धीकरता

सरकारने हिंदुहितासाठीही योजना आखावी, ही अपेक्षा !
      पंतप्रधान मोदी यांनी मुसलमानांच्या प्रगतीसाठी आणि त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी 'प्रगतीशील पंचायत'च्या नावाने देशभर पंचायतीचे आयोजन करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे मुसलमानांच्या समस्या शोधून त्या सोडवण्यासाठी त्वरित प्रयत्न होतील.

हिंदू तेजा जाग रे !

Jago ! : Musalmanoki unnati le liye sarkar Deshbhar me Pragatisheel Panchayatoka ayojan karegi. 
Kya Bahusankhyak Hinduoki unnati hetu bhi sarkar kuch karegi ? 
जागो ! : मुसलमानों की उन्नति के लिए सरकार देशभर में प्रगतीशील पंचायतों का आयोजन करेगी. 
 क्या बहुसंख्यक हिन्दुआें की उन्नति हेतु भी सरकार कुछ करेगी ?

प.पू. डॉक्टरांचा अमृत महोत्सव कसा साजरा होणार याचे त्यांनी वर्णन लिहायला सांगणे

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त...
परात्पर गुरु
डॉ. जयंत आठवले
       मी माझ्या कामानिमित्त इगमोरला पंडियान हॉटेलमध्ये राहिलो होतो. रात्री १.३० वाजता प.पू. गुरुमाऊली सूक्ष्मातून आली. तिने उठवले आणि सांगितले, मी सांगतो, ते लिही. त्यानंतर ते म्हणाले, हा सर्व आपला ७५ व्या अमृत महोत्सव वर्षारंभाचा सोहळा आहे. ईश्‍वराने सांगितल्याप्रमाणे आरंभ केला. भगवान शंकराला पार्वती विचारते, आज ब्रह्मांड का नटले आहे ? भगवान शंकर म्हणतात, पृथ्वीवर श्रीविष्णूच्या अवताराचा ७५ व्या अमृत महोत्सव वर्षारंभाचा सोहळा आहे. चला रामनाथीला, ब्रह्मांडात जिकडे तिकडे आनंदी आनंद पसरला आहे. पशू-पक्षी आनंदाने नाचत आणि बागडत आहेत. एरव्ही वैशाखात सूर्यकिरण अग्नी वर्षाव करत असतात; पण आज सूर्यकिरण सोनेरी शितलहरी सोडून प्रकाश देत आहेत. जणूकाही सूर्यनारायण भरपूर प्रकाशात असतांना आनंदाने आपले देहभान विसरून भावपूर्ण नजरेने सोहळा पहात आहे आणि आपला उष्ण स्वभाव विसरून शीतल झाला आहे. सोहळ्याला येणार्‍या देवतांना आणि भक्तांना त्रास होणार नाही, याची तो काळजी घेत आहे. गडबडीने भगवान भोलेनाथ पार्वतीसह कैलासावरून नंदीवर बसून, तर श्री गणपति रिद्धी-सिद्धीला घेऊन मूषकावर बसून येत आहेत. श्री कार्तिकेय मोरावर बसून, तसेच देवी सरस्वती हंसावर बसून वीणावादन करत, श्री ब्र्रह्मदेव देवी सावित्रीसहित, देवांचा राजा इंद्र ऐरावतावर बसून सहकुटुंब सहपरिवार यक्ष, किन्नर, अप्सरांसहित रामनाथीला जायला निघाले आहेत.
- श्री. श्रीरामप्रसाद कुष्टे, ढवळी, गोवा. (२१.३.२०१६)

भावजागृतीसाठी प्रयत्न करतांना श्री. यशवंत कणगलेकर यांना दिसलेले दृश्य

श्री. यशवंत कणगलेकर
१. बालकाने अंतर्मनात प्रवेश केला आणि श्रीकृष्णाचा शोध घेण्यास आरंभ केला.
२. बराच वेळ अंतर्मनात अंधार दिसत होता.
३. बराच वेळ शोध घेतल्यावर एका काळ्या ढिगार्‍याखाली बालकाला श्रीकृष्णाचा मुरली धरलेला हात दिसू लागला.
४. बालकाच्या लक्षात आले की, त्याचे दोष आणि अहं यांच्या ढिगाखाली श्रीकृष्ण सापडल्यामुळे त्याला कृष्णाचे दर्शन होत नाही; मात्र कृष्ण त्याला ढिगारा दूर करण्यासाठी विनवणी करत आहे.
५. बालकाला त्याचे दोष आणि अहं दूर करून कृष्णाला ढिगार्‍याच्या बाहेर काढणे कठीण जात आहे.

प.पू. डॉक्टरांच्या कृपेने महर्षि साधकांना देत असलेल्या दैवी साक्षीचे महत्त्व

महर्षींची शिकवण आणि कार्य !
१० सहस्र वर्षांत कुणालाही दैवी साक्ष मिळाल्या 
नाहीत, त्या तुम्हाला आम्ही देत आहोत, असे महर्षींनी सांगणे
      महर्षि नाडीवाचन क्रमांक ९०मध्ये म्हणतात, हे कार्तिकपुत्री (सद्गुरु सौ. अंजली गाडगीळ), अष्टगणपति असलेल्या प्रदेशातून तू आली आहेस. (जेथे अष्टविनायकांचे स्थान आहे, तो प्रदेश म्हणजे महाराष्ट्र. माझा जन्मही महाराष्ट्रात झाला असल्याने महर्षि असे म्हणत आहेत. - सौ. गाडगीळ) दहा सहस्र वर्षांत कोणाला साक्ष दिल्या नाहीत, त्या तुला आम्ही देत आहोत. निसर्गरूपाने आम्ही खेळ करणार आहोत. (संदर्भ : सप्तर्षि जीवनाडीवाचन क्रमांक ९०, चेन्नई, तमिळनाडू )

आश्रमात येतांना गुरुकृपेने मोठा अपघात टळल्याची साधिकेला आलेली अनुभूती

श्रीमती रत्नप्रभा सुतार
१. घरून रामनाथी आश्रमात जाण्याच्या दिवशी नातवाने आज जाऊ 
नकोस, असे म्हटल्याने दुसर्‍या दिवशी निघणे, निघतांना मनाला 
अस्वस्थ वाटत असणे, रस्ता पार करतांना कोणीतरी ढकलल्यासारखे 
होऊन पुढे पडणे आणि त्यामुळे मागून वेगाने आलेल्या गाडीमुळे 
होणार असलेला मोठा अपघात टळणे
     १७.३.२०१६ या रात्री माझा नातू मला आज रामनाथी आश्रमात जाऊ नकोस, असे म्हणाला; म्हणून मी दुसर्‍या दिवशी निघण्याची सिद्धता केली आणि १८ ला सकाळी ६ वाजता निघाले. त्या वेळी मला अस्वस्थ वाटत होते.  त्यामुळे मी आश्रमात व्यवस्थित पोेचू शकेन, याची शाश्‍वती वाटत नव्हती; तरीही मी घरून निघाले. सकाळी पावणेआठ वाजता वैभववाडी स्थानकावर गोव्यासाठीची आगगाडी होती. मुलाच्या मित्राने मला स्थानकावर आणून सोडले.

परात्पर गुरु देशपांडेकाका यांनी वापरलेल्या पलंगाखालील लादी गुळगुळीत आणि आरशासारखी होणे आणि त्यामुळे संतांच्या वस्तूंमधून अधिक चैतन्य मिळत असल्याचे लक्षात येणे

परात्पर गुरु देशपांडेकाका
      आमच्या घरी परात्पर गुरु कालीदास देशपांडेकाका यांनी वापरलेला पलंग ठेवला होता. साधक तो आध्यात्मिक उपायांसाठी वापरत होते. अनिष्ट शक्तींचा त्रास असणारे केंद्रातील साधक आणि माझी मोठी बहीण त्या पलंगावर बसून नामजप करत असत. ३ वर्षांपूर्वी तो पलंग देवद आश्रमात घेऊन गेले. तो पलंग ज्या ठिकाणी ठेवला होता. त्या खालील लादी गुळगुळीत आणि आरशासारखी झाल्याचे लक्षात आले. त्या जागेवर आता घरातील दुसरा पलंग ठेवला असूनही तिथे तितकेच चैतन्य जाणवते. यावरून संतांच्या वस्तूंमधूनही वातावरणात किती चैतन्य पसरते, हे लक्षात आले. 
- कु. ऋतुजा शिंदे, पुणे (२२.८.२०१६) 
प.पू. पांडे महाराज यांचे अनमोल विचारधन

प. पू. पांडे महाराज
१. आत्मा इंटरनेट आहे
      जेव्हा मी भावपूर्णतेने आश्रमातील साधकावरील वाईट शक्तीचे आवरण काढतो, तेव्हा मी प्रसारातील सर्व साधकांवरील त्रासदायक आवरण निघू दे, अशी प्रार्थना करतो. त्यामुळे प्रसारातील साधकांवरील त्रासदायक आवरण निघण्यास साहाय्य होते. हे कसे होते ? तर आत्मा इंटरनेट आहे. सर्व जिवांतील आत्मा परमेश्‍वराचा अंश असून ते एकमेकांशी जोडलेले असतात. त्यामुळे एका आत्म्यावर केलेल्या आध्यात्मिक उपायांचा परिणाम आपोआपच दुसर्‍या आत्म्यावर होऊन त्याच्यावरील आवरण निघते. आपण धारण केलेले शरीर म्हणजे मुखवटा आहे; परंतु प्रत्यक्षात कार्य करणारा आत्माच असतो. त्यामुळेच हे कार्य होते.

अतीवृष्टीमुळे रस्त्याला मोठी भगदाडे पडून सर्व वाहने त्यामध्ये अडकल्याचेे; मात्र स्वतःचे वाहन सर्व अडथळे पार करून सहजतेने गेल्याचे स्वप्नामध्ये दिसणे आणि केवळ प.पू. डॉक्टरांच्या कृपेने आपत्तीतून वाचल्याचे जाणवणे

श्री. गौरव सेठी
      २९.७.२०१६ या रात्री मला एक भयानक स्वप्न पडले. अतीवृष्टीमुळे रस्त्याला मोठी भगदाडे आणि भेगा पडल्या होत्या. रस्त्यावरील सर्व वाहने त्यामध्ये पडत होती किंवा अडकली जात होती. माझी गाडी मात्र त्यावरून सहजतेने सर्व अडथळे पार करून गेली. या प्रसंगाचे मला आश्‍चर्य वाटले. केवळ प.पू. डॉक्टरांच्या कृपेने मी या आपत्तीतून वाचलो, असे मला वाटले. संपूर्ण स्वप्नामध्ये लोकांचा गोंधळ चालू होता आणि भीतीचे वातावरण होते. केवळ प.पू. डॉक्टरांच्या कृपाशीर्वादामुळे अशा आपत्तीतून आपले संरक्षण होऊ शकते, असे मला जाणवले. 
- श्री. गौरव सेठी, चंदीगड (३०.७.२०१६)

संत किंवा उत्तरदायी साधक यांनी कठोरपणे चुका सांगितल्यावर साधकांनी लक्षात घ्यायचे दृष्टीकोन !

पू. संदीप आळशी
      साधकांकडून समष्टी सेवा किंवा व्यष्टी साधना यांच्या संदर्भात त्याच त्याच चुका होत असल्यास काही वेळा संत किंवा उत्तरदायी साधक संबंधित साधकांना कठोरपणे चुका सांगतात. त्यावर काही साधकांना मी माझ्या परीने एवढे तर करतोच, तरी मला समजून घेतले जात नाही, यासारख्या प्रतिक्रिया येतात, काही साधकांना वाईट वाटून निराशा येते, तर काहींना चुका सांगणार्‍यांचा राग येतो. यासंदर्भात साधकांनी पुढीलप्रमाणे दृष्टीकोन ठेवावेत.
१. संत किंवा उत्तरदायी साधक यांना आपले साधक साधनेत मागे राहू नयेत, असेच तीव्रतेने वाटत असते. ते साधकांना दुखावण्यासाठी चुका सांगत नसून त्यांना साधकांच्या कल्याणाचीच काळजी असते.

महर्षींच्या माध्यमातून देवच साधनेतील अमूल्य मार्गदर्शन करत असल्याची साधिकेला आलेली प्रचीती !

श्री. धनंजय कर्वे
१. मुलाची साधनेत घसरण झाल्याचे 
ऐकून त्याचे कारण कळल्यावर अध्यात्मातील 
सिद्धांत तंतोतंत सत्यच सांगतो, याची प्रचीती येणे
     ६.६.२०१६ या दिवशी माझा मुलगा कु. राज याची आध्यात्मिक पातळी गेल्या ५ वर्षांत ६१ टक्क्यांवरून ५१ टक्क्यांवर आल्याचे मला एका संतांकडून समजली. राजला अनेक विषयांची आवड असल्याने तो अनेकातून एकात या मूलभूत सिद्धांताच्या उलट दिशेने साधनेतील वाटचाल करत आहे, असे याचे कारणही संतांनी सांगितले. हे ऐकल्यावर अध्यात्मातील सिद्धांत तंतोतंत सत्यच सांगतो,
सौ. मधुरा कर्वे
याची मला प्रचीती आली.
२. मुलाचे लौकिक शिक्षण होणार नसून धार्मिक (आध्यात्मिक) 
शिक्षण चांगले होेणार असल्याचे अगस्ती महर्षींनी नाडीपट्टीत सांगणे
     पुणे येथे अगस्ती नाडीकेंद्र आहे. वर्ष २०१३ मध्ये या नाडीकेंद्रात जाऊन राजची नाडीपट्टी वाचून घेतली होती. त्यात राजचे लौकिक शिक्षण होणार नाही; परंतु धार्मिक (महर्षींना आध्यात्मिक शिक्षण असे म्हणायचे आहे.) शिक्षण तो चांगले घेईल, असा स्पष्ट उल्लेख अगस्ती महर्षींनी केला होता. राजच्या शिक्षणातील अडथळे दूर होण्यासाठी आणि त्याचे शिवमय (चांगले) होण्यासाठी अगस्ती नाडीवाचकांनी विद्यापंचाक्षरीमंत्र हे यंत्र सिद्ध करून दिले होते आणि राजची वृत्ती वयाच्या २० व्या वर्षापर्यंत चंचल राहील. नंतर तो स्थिर होऊन काही वर्षांनी अध्यात्मात उच्च कोटीला जाईल, असे सांगितले होते. (राजला १९ वर्षे पूर्ण होत आहेत. तो पुष्कळ चंचल आहे. त्याला गाणे, विविध वाद्ये वाजवणे, अवांतर वाचन करणे, देवळात जाणे, या गोष्टींमध्ये रस आहे; म्हणून तो सतत निरनिराळ्या गोष्टी करण्यात वेळ घालवतो.)

उपजतच कृष्णलीला दाखवणारा, अनेक दैवी गुणांचा समुच्चय असलेला ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचा आणि महर्लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला चि. कृष्णांश योगेश भट (वय २ वर्षे) !

चि. कृष्णांश भट
         ठाणे जिल्ह्यातील चि. कृष्णांश योगेश भट याचा भाद्रपद कृष्ण पक्ष दशमी (२५.९.२०१६) या दिवशी दुसरा वाढदिवस झाला. त्यानिमित्त त्याच्या आईला जाणवलेली त्याची गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत.
१. जन्म ते ६ मास
१ अ. मुद्रा करणे : कृष्णांश जन्माला आल्यानंतर दहा ते पंधरा दिवसांतच तो दैवी बालक असल्याचे जाणवले. त्याला धुरी देतांना झोपेत त्याची बोटे नेहमी शिवमुद्रेत (अंगठा आणि तर्जनी जुळवून केलेली मुद्रा) असायची.
१ आ. पाचव्या मासापासून (महिन्यापासून) तो स्वतःच नमस्कार करू लागला.
१ इ. प.पू. डॉक्टरांचे छायाचित्र अचूक ओळखणे :
आम्ही त्याला दैनिक सनातन प्रभातमधील प.पू. डॉक्टरांच्या छायाचित्राची ओळख प.पू. डॉक्टरआजोबा अशी करून दिली होती. त्यानंतर त्याला आजोबा कुठे आहेत ?, असे विचारल्यावर तो दैनिक सनातन प्रभातकडे बोट दाखवत असे.

साधकांबद्दल प्रेम आणि तत्त्वनिष्ठ असलेला ५१ टक्के आध्यात्मिक पातळीचा अन् उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला पुण्यातील कु. मोहनीश साळुंखे (वय २० वर्षे) !

कु. मोहनीश साळुंखे
       पुण्यातील कु. मोहनीश साळुंखे याचा आज भाद्रपद कृष्ण पक्ष चतुर्दशीला (२९.९.२०१६ या दिवशी) तिथीनुसार वाढदिवस आहे. त्या निमित्त त्याच्या आईला जाणवलेली त्याची गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत.
कु. मोहनीश साळुंखे याला सनातन 
परिवाराकडून वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा !
१. गुणवैशिष्ट्ये
१ अ. मोहनीशला साधकांबद्दल पुष्कळ प्रेम वाटते.
१ आ. देव, देश आणि धर्म यांबद्दल त्याला प्रेम आणि आदर आहे. सैनिक हे त्याचे आदर्श आहेत.
१ ई. तो प्रतिदिन दैनिक सनातन प्रभातच्या १७ अंकांचे वितरण करण्याची सेवा करतो.
१ उ. भाव : दैनिक सनातन प्रभातचा अंक घरात कसाही पडलेला दिसला, तर ते त्याला आवडत नाही.

श्री. दिनेश एम्.पी. यांनी ६१ टक्के आध्यात्मिक स्तर गाठल्यानिमित्त केलेल्या सत्काराच्या वेळी घातलेल्या हारातील फुले १२ दिवसांनंतरही ताजी रहाणे

श्री. दिनेश एम्.पी.
       १९ ते २५ जून २०१६ या कालावधीत हिंदु जनजागृती समितीने पंचम अखिल भारतीय हिंदू अधिवेशन आयोजित केले होते. हे अधिवेशन गोव्यातील रामनाथी येथील रामनाथ देवस्थानाच्या सभागृहात पार पडले. या अधिवेशनाला मंगळुरू येथील धर्माभिमानी श्री. दिनेश एम्.पी. उपस्थित होते. त्यांनी ६१ टक्के आध्यात्मिक स्तर प्राप्त केल्यानिमित्त या अधिवेशनात त्यांचा सत्कार करण्यात आला. या सत्काराच्या वेळी त्यांना घातलेल्या हारातील झेंडूची पिवळी फुले पुढे १२ दिवसांनंतरही ताजी होती.
- सौ. गीता, मुल्की सेवाकेंद्र, कर्नाटक. (१५.७.२०१६)

स्वतःची आध्यात्मिक पातळी घसरल्याचे समजल्यावर खचून न जाता सकारात्मक राहून प्रयत्न करण्याचा निश्‍चय करणारा श्री. राज कर्वे (वय १९ वर्षे) !

१. स्वतःच्या आध्यात्मिक पातळीविषयी अनभिज्ञ असणे आणि पातळी 
घसरल्याचे समजल्यावर स्वतःची पातळी कधीतरी ६१ टक्के होती, या विचाराने मन सुखावणे
     गेली ५ वर्षे ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठण्यासाठी मी जिवाचे रान करत होतो; परंतु माझी आध्यात्मिक पातळी ६१ टक्के होती, याची मला मुळीच कल्पना नव्हती. ७.६.२०१६ या दिवशी आईने मला माझी आध्यात्मिक पातळी घसरल्याचे सांगितले. तेव्हा मला माझ्या आध्यात्मिक पातळीविषयी कळले आणि पूर्वी कधीतरी माझी आध्यात्मिक पातळी ६१ टक्के होती, हे ऐकून माझे मन काही क्षण सुखावले.

देवघरात मृत व्यक्तीचे छायाचित्र लावून त्याचे पूजन केल्याने होणारी हानी

     (येथे दिलेली माहिती सर्वसाधारण व्यक्तीच्या संदर्भात आहे. आध्यात्मिकदृष्ट्या उन्नत असलेल्यांच्या संदर्भात नाही. - संकलक)
१. देवघरात मृत व्यक्तीचे छायाचित्र लावल्याने आर्थिक दौर्बल्य येते किंवा 
विवाह उशिरा होण्यास ते कारणीभूत ठरू शकते, हा अनुभवांवर आधारित सिद्धांत असणे
      कोणत्याही व्यक्तीने स्वतःचे मृत झालेले वडील, आई, पत्नी, मुलगा, मुलगी, भाऊ किंवा निकटचे नातेवाईक यांचे छायाचित्र कधीही देवघरात लावू नये; कारण त्यामुळे आर्थिक दौर्बल्य येते किंवा घरात होणारे विवाह उशिरा होण्यास ते कारणीभूत ठरू शकते, हा माझा अनुभवांवर आधारित सिद्धांत आहे. हा सिद्धांत आजपर्यंत कोणत्याही वास्तुशास्त्राच्या पुस्तकात एकाही वास्तुशास्त्रज्ञाने मांडलेला नाही किंवा त्या दृष्टीकोनातून कधी कुणी पाहिलेले नाही, असे प्रमाणपत्र (सर्टिफिकेट) जगप्रसिद्ध वास्तुशास्त्रज्ञ श्रीमान् गणपति स्थपती यांनी मला बेंगळुरू मुक्कामी माझी पाठ थोपटून दिले.

पितृपक्षातील श्राद्ध !

     ४ ऋणांपैकी पितृऋण फेडण्यासाठी श्राद्ध आवश्यक असते. माता-पिता, तसेच निकटवर्तीय यांचा मृत्यूनंतरचा प्रवास हा सुखमय आणि क्लेशरहित व्हावा, त्यांना सद्गती मिळावी यांसाठीचा संस्कार म्हणजेच श्राद्ध. श्राद्धातील मंत्रोच्चारांमध्ये पितरांना गती देण्याची सूक्ष्म शक्ती सामावलेली असते. श्राद्धात पितरांना हविर्भाग दिला गेल्याने ते संतुष्ट होतात. श्राद्धाचे इतके महत्त्व असतांनाही आज हिंदूंमधील धर्मशिक्षणाच्या अभावामुळे श्राद्धविधी दुर्लक्षिला जाऊ लागला आहे; म्हणूनच अन्य संस्कारांइतकाच श्राद्ध हा संस्कारही अत्यावश्यक कसा आहे, हे सांगणे क्रमप्राप्त ठरते. १७ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर २०१६ या कालावधीत पितृपक्ष आहे. त्यानिमित्ताने श्राद्धाविषयीचे लिखाण येथे देत आहोत.

खाजगी कार्यालये, आस्थापने, दुकाने येथील कर्मचारी, तसेच मंदिरात येणारे भाविक यांच्यासाठी धर्मशिक्षणवर्ग चालू होण्याकरता प्रयत्न करा !

सर्वत्रचे साधक आणि कार्यकर्ते यांच्यासाठी सूचना
       धर्मशिक्षणवर्ग म्हणजे धर्मप्रेमींना राष्ट्र-धर्म यांसाठी कृतीशील बनवणारे एक सुलभ माध्यम ! आस्थापने, खाजगी कार्यालये, महिला बचत गट, स्वयंसेवी संघटना, दुकाने आदी ठिकाणी हे वर्ग आयोजित करण्यात येतात. विविध जिल्ह्यातील हितचिंतक, धर्मप्रेमी आणि साधक यांनी त्यांच्या कार्यालयात धर्मशिक्षणवर्ग चालू करण्यासाठी स्तुत्य प्रयत्न केले आहेत. 
१. अंतस्फूर्तीने स्वतःच्या कार्यालयात वर्ग चालू करणारे काही व्यावसायिक !
१ अ. श्री. अनंत कामत यांच्या कार्यालयातील धर्मशिक्षणवर्गात येणार्‍या कर्मचार्‍यांनी केलेली धर्मरक्षणाची अनोखी कृती ! : मंगळुरू (कर्नाटक) येथील व्यावसायिक श्री. अनंत कामत यांच्या कार्यालयात चालू झालेल्या धर्मशिक्षणवर्गामुळे कर्मचार्‍यांना राष्ट्र आणि धर्म कार्याची प्रेरणा मिळाली. ते कर्मचारी निवेदन देणे, आंदोलनाला उपस्थित रहाणे या सेवा नियमितपणे करत आहेत. 
       या कर्मचार्‍यांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी धर्मरक्षण निधी नावाचा फंड स्थापन केला असून मिळकतीतील प्रतिमास काही रक्कम ते त्या फंडला देतात. एकत्रित झालेल्या या एकूण निधीतून त्यांनी २२ जणांना कन्नड साप्ताहिक सनातन प्रभातचे वाचक बनवले आहे.
     समुद्रकिनारी असलेल्या वाळूचे कण एकमेकांना अजिबात चिकटत नाहीत. त्याप्रमाणे हिंदु समाजाची स्थिती आहे.

'सनातन प्रभात'साठी संपादकीय साहाय्य करू इच्छिणारे साधक, वाचक, हितचिंतक आणि धर्मप्रेमी यांच्यासाठी सुवर्णसंधी !

राष्ट्र-धर्म रक्षणार्थ कार्यरत असलेल्या सनातन प्रभातच्या संपादनाच्या सेवेत सहभागी व्हा !
     वाचकांत राष्ट्रप्रेम जागवणारे, अल्पावधीत त्यांच्यात साधनाबीज रोवणारे एकमात्र दैनिक म्हणून सनातन प्रभातची ख्याती आहे. गेल्या ३ वर्षांपासून या दैनिकाने पृष्ठसंख्या वृद्धी केली असून त्यामुळे राष्ट्र, धर्म आणि अध्यात्म यांविषयीची वाचनीय सदरे वाचकांना उपलब्ध होत आहेत. यापुढेही दैनिकाची पृष्ठसंख्या प्रतिदिन १० पानी करण्याचा प्रयत्न आहे; मात्र अपुरे मनुष्यबळ, वाढती पृष्ठसंख्या यांमुळे संपादनाच्या सेवेसाठी उपलब्ध साधकसंख्या अपुरी पडत आहे. 
     या दृष्टीकोनातून मराठी किंवा संस्कृत भाषेचे ज्ञान असणे, तसेच या विषयांचे शिक्षक अथवा प्राध्यापक, तसेच संपादकीय सेवेचा पूर्वानुभव असलेल्यांना सनातन प्रभातसाठी पूर्णवेळ अथवा अर्धवेळ संपादकीय संस्करणाची सेवा करण्याची संधी गोवा, पनवेल, पुणे, जळगाव, सांगली, मुंबई या ठिकाणी राहून उपलब्ध आहे. 

'सनातन प्रभात'साठी वार्तांकन करू इच्छिणारे साधक, वाचक आणि धर्मप्रेमी यांच्यासाठी सुवर्णसंधी !

८ आणि ९ ऑक्टोबर २०१६ या दिवशी रामनाथी आश्रमात आयोजित करण्यात आलेल्या वार्ताहर प्रशिक्षण शिबिरात सहभागी व्हा !
      सनातन प्रभात म्हणजे ज्वलंत हिंदुत्व आणि हिंदु राष्ट्राची स्थापना यांचा वसा घेतलेले एकमेव नियतकालिक ! सनातन प्रभातमध्ये प्रतिदिन राष्ट्र आणि धर्म यांवरील संकटांविषयी जागृती करणारी वृत्ते, लेख, तसेच अन्य लिखाण प्रसिद्ध केले जाते. 
१. वार्तांकन करण्यास शिकून अर्धवेळ किंवा पूर्णवेळ वार्ताहराची सेवा करण्यास इच्छुक असलेल्यांसाठी रामनाथी आश्रमात शिबिराचे आयोजन ! 
     प्रतिदिन घडणार्‍या राष्ट्र-धर्म विरोधी घटनांचे वार्तांकन करण्यासाठी मुंबई, पुणे, कोल्हापूर, सोलापूर, संभाजीनगर, नागपूर, जळगाव आदी प्रमुख शहरांमध्ये वृत्तसंकलनाच्या सेवेसाठी पूर्णवेळ वार्ताहर, तर अन्य जिल्ह्यांमध्ये अर्धवेळ वार्ताहर आवश्यक आहेत. सनातन प्रभातसाठी वार्तांकन करण्याची इच्छा अनेक साधक, वाचक, धर्मशिक्षणवर्गातील युवक, धर्मप्रेमी आदींनी व्यक्त केली आहे. आपल्या जिल्ह्यात किंवा प्रमुख शहरांमध्ये अर्धवेळ अथवा पूर्णवेळ वृत्तसंकलनाची सेवा करण्याची ज्यांची इच्छा आहे, त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी ८ आणि ९ ऑक्टोबर २०१६ या दिवशी रामनाथी, गोवा येथील सनातन आश्रमात वार्ताहर प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. 
      जेथे हिंदूंना नाही स्थान, ते हिंदुस्थान ! - प्रा. श्रीधर वक्ते, अध्यक्ष, मंदिर संरक्षण राष्ट्रीय धर्मसंसद (हिंदुस्थान)

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

सन्मार्गावरून चालण्याचे महत्त्व ! 
       सत्प्रवृत्ती अंगी बाणवणे आणि तशी इच्छा होणे हे चांगलेच; पण चित्तवृत्ती संपूर्णपणे सन्मार्गाला लागणे, हा मनुष्य जीवनातील सुवर्णक्षण होय !
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले
       हिंदु धर्माचा जितका अभ्यास करत गेलो, तितकी भगवंताने परिपूर्ण अशा हिंदु धर्मात जन्म दिल्याबद्दल कृतज्ञता वाढत गेली.
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले

॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज 
सनातनचे श्रद्धास्थान
खरे समजून घेणे 
 सुनो सोचो समझो । 
सुनो समझो सोचो । 
भावार्थ : 'सुनो' म्हणजे ऐका, 'सोचो' म्हणजे विचार करा आणि 'समझो' म्हणजे समजून घ्या. पहिल्या ओळीत 'सुनो सोचो समझो' आहे. त्याचा अर्थ असा की, ऐकल्यावर मन आणि बुद्धी यांद्वारेे विचार करून काय ते समजून घ्या. यातील समजून घेणे मन आणि बुद्धी यांच्या माध्यमातून असल्याने ते मायेच्या संदर्भात आहे. अभिमन्यूला केवळ हीच ओळ ठाऊक होती, म्हणून तो चक्रव्यूहात अडकला. याउलट दुसर्‍या ओळीत 'सुनो समझो सोचो' आहे. त्याचा अर्थ असा की, ऐकल्यावर जिवाने ती गोष्ट समजून जाणे, त्याची अनुभूती घेणे आणि नंतर त्याविषयी विचार करणे. हे ब्रह्माच्या संदर्भात आहे. 
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.) 
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥
या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो.
- प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

नवरात्रोत्सवावरील सुलतानी संकट !

      एरव्ही आतंकवाद्यांना अटक, अशा बातम्या भारतियांना नवीन राहिलेल्या नाहीत. अशीच आसाम आणि बंगाल येथे ६ आतंकवाद्यांच्या अटकेची बातमीही सर्वांच्या वाचनात आलीच असेल. तथापि ही घटना सामान्य नाही. अटकेतील आतंकवाद्यांचा बंगाल आणि आसाम या राज्यांतील नवरात्रोत्सवात, तसेच दक्षिण भारतात मोठ्या प्रमाणात घातपात घडवून आणण्याचा कट होता, अशी खळबळजनक माहिती अन्वेषण यंत्रणांनी दिली आहे. बंगालमध्ये अत्यंत लोकप्रिय असलेला हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. या नवरात्रोत्सवात घातपात घडवून आणला गेला असता, तर मोठा अनर्थ घडला असता. तथापि श्री दुर्गामातेच्या कृपाशीर्वादाने तो टळला.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn