Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

कोटी कोटी प्रणाम !

संत बहिणाबाई यांची आज जयंती

पाकमध्ये मानवी बॉम्ब बनून घुसण्याची शिवसैनिकांची सिद्धता !

देशप्रेमापोटी जीवाची पर्वा न करणारे शिवसैनिक ! 
     मुंबई - शिवसेनेच्या गुजतरातच्या सूरत येथील कार्यकर्त्यांनी पाकमध्ये आत्मघातकी अर्थात मानवी बॉम्ब बनून घुसण्याची सिद्धता दर्शवली आहे. तसेच सीमेवर लढत असलेल्या घायाळ सैनिकांसाठी रक्तदानाची आणि अवयवदानाची इच्छाही त्यांनी व्यक्त केली आहे, असे वृत्त एका इंग्रजी दैनिकाने प्रसिद्ध केले आहे. याविषयी सूरतच्या जिल्हाधिकार्‍यांना २८ शिवसैनिकांनी निवेदन दिले आहे, अशी माहिती शिवसेना शहराध्यक्ष अरूण कलाल यांनी दिली. आम्ही मानवी बॉम्ब बनून पाकला नष्ट करून हुतात्मा झालेल्या सैनिकांचा सूड उगवू, असा विश्‍वास अरूण कलाल यांनी व्यक्त केला. 

'पाकिस्तान झिंदाबाद'च्या घोषणा देणार्‍या २०० काँग्रेसींवर देशद्रोहाचा गुन्हा प्रविष्ट !

पाकची निर्मिती करणार्‍या काँग्रेसकडून याहून वेगळी 
घोषणा काय असणार ? अशांना शिक्षा म्हणून पाकमध्येच 
पाठवले पाहिजे, अशी प्रतिक्रिया जनतेने व्यक्त केली, तर त्यात चूक ते काय ! 
     मुरादाबाद (उत्तरप्रदेश) - येथील ठाकुरद्वारा पोलीस ठाण्यात पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा देणार्‍या काँग्रेसच्या २०० कार्यकर्त्यांच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा प्रविष्ट करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक अमित शर्मा यांनी हा गुन्हा प्रविष्ट केला आहे.

जळगाव येथे १२ दिवसांनंतरही कृत्रिम हौदातील मूर्तींचे विसर्जन न झाल्याने हिंदुत्वनिष्ठ संतप्त !


  • हिंदुत्वनिष्ठांची पोलीस अधीक्षकांकडे धर्मद्रोही आयोजकांवर गुन्हा नोंदवण्याची मागणी ! 
  • दोन दिवसांत श्री गणेशमूर्तींचे विधीवत् विसर्जन करून कृत्रिम हौद हटवण्याची मागणी ! 

पोलीस अधिक्षकांना निवेदन देतांना १. श्री. सुनिल घनवट आणि अन्य धर्माभिमानी हिंदू
     जळगाव - धर्मशास्त्रानुसार श्री गणेशमूर्तींचे वाहत्या पाण्यात अथवा नैसर्गिक जलस्रोतात विसर्जन करणे योग्य आहे; पण जलप्रदूषण होत असल्याचा कांगावा करत जळगाव महानगरपालिका आणि आर्य चाणक्य संस्था यांनी संयुक्त विद्यमाने सागर पार्क येथे कृत्रिम हौदाची बांधणी केली होती. विशेष म्हणजे प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींचे विघटन होण्यासाठी अमोनियम बायकार्बोनेट हे रसायन कृत्रिम हौदातील पाण्यात मिसळण्यात आले होते. अनंत चतुर्दशी होऊन १२ दिवस उलटूनही हौदातील श्री गणेशमूर्तींचे विघटन न होता श्री गणेशमूर्ती मोठ्या संख्येने पाण्यात तशाच पडून आहेत. या प्रकारामुळे गणेशभक्त आणि हिंदुत्ववनिष्ठ यांच्या धार्मिक भावना दुखावल्या जात असून श्री गणेशाची विटंबना चालूच आहे. याविरोधात येथील हिंदुत्वनिष्ठांनी २७ सप्टेंबरला सागर पार्क येथील कृत्रिम हौदाजवळ जमून स्थानिक प्रसिद्धीमाध्यमांसमोर या धर्मद्रोही घटनेविषयी निषेध व्यक्त केला, तसेच 'कृत्रिम हौदातील मूर्तींचे त्वरित विधीवत् विसर्जन करावे, तसेच श्री गणेशाच्या विटंबनेस उत्तरदायी असणारे महापालिकेचे आयुक्त जीवन सोनावणे आणि आर्य चाणक्य संस्थेचे अध्यक्ष अतुलसिंह हाडा यांच्याविरोधात पोलीस प्रशासनाने गुन्हा नोंदवावा अन्यथा हिंदुत्वनिष्ठ संघटना तीव्र आंदोलन छेडतील', अशी चेतावणीही या वेळी त्यांनी दिली. या वेळी धर्माभिमानी श्री. हर्षित (बबलू) पिपरीया, माहिती अधिकाराचे कार्यकर्ते श्री. दीपककुमार गुप्ता, स्वराज्य निर्माण सेनेचे अध्यक्ष श्री. महेश सपकाळे, शिवसेनेचे श्री. मोहन तिवारी, हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र राज्य संघटक श्री. सुनील घनवट आणि अन्य धर्माभिमानी उपस्थित होते. 

दैनिक 'सामना'च्या वाशी येथील मुद्रणालयावर दगडफेक, तर ठाणे येथील कार्यालयावर शाईफेक

विचारांचा प्रतिवाद हा विचारांनी केला पाहिजे. एखाद्याला व्यंगचित्र 
पटले नसेल, तर लोकशाही मार्गाने त्याचा विरोध करणे आवश्यक होते. हिंसक 
उत्तर हा विरोधाचा लोकशाही मार्ग नव्हे. अशा आक्रमणांशी आम्ही सहमत नाही ! - संपादक 
     मुंबई - शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक 'सामना'च्या वाशी (नवी मुंबई) येथील मुद्रणालयावर ३ जणांनी दगडफेक केली, तर ठाणे येथील कार्यालयावरही शाईफेक करण्यात आली. पोलिसांकडून या घटनेचे अधिक अन्वेषण चालू आहे. दैनिक 'सामना'च्या २५ सप्टेंबरच्या अंकात मराठा मूक मोर्च्यासंदर्भात प्रसिद्ध झालेल्या व्यंगचित्रामुळे ही घटना घडल्याची चर्चा होत आहे. 'यात आमचे कार्यकर्ते सहभागी असतील, तर आम्ही या आक्रमणाचे दायित्व घेऊ', असे संभाजी ब्रिगेडचे विकास पासलकर यांनी सांगितले. 'या व्यंगचित्रातून मराठा समाजाचा अपमान करण्यात आला आहे', असे काँग्रेसचे प्रवक्ता सचिन सावंत यांनी म्हटले; मात्र 'सामना'ने हा आरोप फेटाळून लावला असून 'मराठा समाजाच्या भावनांचा अपमान करण्याचा प्रश्‍नच येत नाही', असे स्पष्ट करण्यात आले होते.

केरळमध्ये मनेका गांधी यांच्या प्राणीप्रेमी भूमिकेच्या निषेधासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांकडून भटक्या कुत्र्यांची हत्या !

      कोट्टयाम (केरळ) - येथे भटक्या कुत्र्यांमुळे होणार्‍या त्रासामुळे काँग्रेस यूथ फ्रंटच्या कार्यकर्त्यांनी भटक्या कुत्र्यांची हत्या करून त्यांना एका बांबूला बांधून शहरात मोर्चा काढला. शहरामध्ये भटक्या कुत्र्यांची वाढलेली आक्रमणे आणि केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांच्या प्राणीप्रेमी भूमिकेचा निषेध दर्शवण्यासाठी हे कृत्य करण्यात आले.
      कार्यकर्त्यांनी मृत कुत्र्यांना टपाल कार्यालयापर्यंत नेले. तेथे पोचल्यावर हे मृतदेह पार्सल करून मेनका गांधी यांना पाठवण्याची मागणी करण्यात आली. कार्यकर्त्यांनी टोकन म्हणून मृतदेह टपाल कार्यालयाबाहेर ठेवले आणि त्या ठिकाणी मनेका गांधी यांचा पत्ता लिहून ठेवला.

भारताने पाकला दिलेल्या सर्वाधिक पसंतीचे राष्ट्र या दर्जावर पुनर्विचार !

पाकला अशा प्रकारचा दर्जा देणेच मुळात 
मूर्खपणाचे होते आणि आता ते त्वरित रहित करायला हवे !
      नवी देहली - उरी येथील आतंकवादी आक्रमणानंतर भारताकडून शक्य त्या मार्गांनी पाकची कोंडी करण्याचे प्रयत्न चालू झाले आहेत. याचाच एक भाग म्हणून पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सिंधू पाणीवाटप करारासंदर्भातील बैठकीत काही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. आता पाकला देण्यात आलेला मोस्ट फेवर्ड नेशन (सर्वाधिक पसंतीचे राष्ट्र) हा दर्जा कायम ठेवायचा किंवा रहित करायचा, यावर भारत पुनर्विचार करणार आहे. यासंबंधीचा अंतिम निर्णय घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २९ सप्टेंबर या दिवशी उच्चपदस्थ अधिकार्‍यांची बैठक बोलावली आहे. भारताने हा दर्जा रहित केल्यास पाकसाठी ही मोठी मानहानी ठरेल.

सुरक्षेच्या दृष्टीने सैन्याकडून होणार्‍या गोळीबाराने काश्मीरमधील प्रश्‍न सुटणार नाही ! - नईमा मेहजूर

मग किती दिवस शांततेची कबुतरे 
उडवणार याचेही उत्तर नईमा मेहजूर यांनी द्यावे !
       पुणे, २७ सप्टेंबर - काश्मीरमध्ये आतंकवादी आक्रमण किंवा हिंसाचाराच्या घटना घडतात. अशा परिस्थितीत तेथील जनता ज्या अडचणींमधून जाते, त्याकडे आपण दुर्लक्ष करतो. सुरक्षेच्या दृष्टीने सैन्याकडून होणार्‍या गोळीबाराने काश्मीरमधील प्रश्‍न सुटणार नाही. (सुरक्षेसाठी सैन्याने गोळीबार करायचा नाही, तर मग काय स्वतःच्या प्राणांची आहुतीच द्यायची का ? - संपादक) काश्मीरमधील शांततेसाठी सर्वांनी एकत्र येऊन उपाय शोधले पाहिजेत, असे मत जम्मू-काश्मीरच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा नईमा मेहजूर यांनी व्यक्त केले. काश्मिरी महिलांची सद्यस्थिती आणि उपाय या विषयावर सरहद संस्थेच्या वतीने आयोजित व्याख्यानात त्या बोलत होत्या. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ, सरहदचे संस्थापक अध्यक्ष संजय नहार आदींसह अन्य मान्यवर या वेळी उपस्थित होते.

आर्थिक अपव्यवहार प्रकरणी दाभोलकर कुटुंबियांची चौकशी करा ! - श्री. गंगाधर कुलकर्णी, श्रीराम सेना

पत्रकार परिषदेला संबोधित करतांना डावीकडून
श्री. गुरुप्रसाद, श्री. गंगाधर कुलकर्णी आणि
श्री. व्यंकटरमण नायक
      हुबळ्ळी (कर्नाटक) - दाभोलकर कुटुंबियांनी अंधश्रद्धा निर्मूलन समिती या ट्रस्टचे आर्थिक ताळेबंदही योग्य कालावधीत धर्मादाय आयुक्तांना सादर केलेले नाहीत. त्यामुळे आर्थिक अपव्यवहाराच्या प्रकरणी दाभोलकर कुटुंबियांची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी श्रीराम सेनेचे कर्नाटक राज्य संघटक श्री. गंगाधर कुलकर्णी यांनी केली. हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी २४ सप्टेंबर या दिवशी येथे पत्रकार परिषद घेतली. या परिषदेला श्रीराम सेनेचे कर्नाटक राज्य संघटक श्री. गंगाधर कुलकर्णी, हिंदु जनजागृती समितीचे राज्य समन्वयक श्री. गुरुप्रसाद आणि श्री. व्यंकटरमण नायक यांनी संबोधित केले.

पूरस्थितीमुळे तेलंगण आणि आंध्रप्रदेश या राज्यांत राष्ट्रीय आपत्ती निवारण दल तैनात !

      नवी देहली - तेलंगण, आंध्रप्रदेश आणि कर्नाटक राज्यांत गेल्या काही दिवसांपासून चालू असलेल्या मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सरकारने राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या १७ पथकांना तैनात केले आहे. यामध्ये अनुमाने ५५० सैनिकांचा समावेश आहे. आंध्रप्रदेशातील गोदावरी आणि कृष्णा नदीकाठच्या नागरिकांना, तेलंगणातील निझामाबाद, अदिलाबाद, करीमनगर या जिल्ह्यांतील तसेच कर्नाटकातील रायचूर येथील नागरिकांना सावधानतेची चेतावणी देण्यात आली आहे. 
महर्षींनी प्रलयकालाविषयी सतर्क करणे
      १९.३.२०१६ या दिवशी झालेल्या नाडीवाचन क्रमांक ६७मध्ये महर्षि म्हणतात, हे पूर्ण वर्ष प्रलयकालाचे आणि आपत्तीजनक असणारे आहे. (तेलंगण, आंध्रप्रदेश आणि कर्नाटक राज्यांत गेल्या काही दिवसांपासून चालू असलेल्या मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. या घटनेवरून प्रलयकालाविषयी महर्षींनी केलेले भाष्य किती तंतोतंत आहे, हे लक्षात येते ! - संपादक)जमात-उल-मुजाहिदीनच्या ६ आतंकवाद्यांना अटक !

३ आतंकवादी बांगलादेशी !
     कोलकाता - बांगलादेशच्या जमात-उल-मुजाहिदीनच्या ६ आतंकवाद्यांना कोलकात्याच्या विशेष पोलीस पथकाने अटक केली आहे. त्यातील ४ जण २०१४ च्या खागरगड स्फोट प्रकरणात फरार होते. ६ पैकी ३ आतंकवादी मूळचे बांगलादेशीय आहेत. (बांगलादेशी देशाच्या मुळावर येणार त्याचेच हे दर्शक आहे ! - संपादक) 
     दक्षिण भारतात काही विध्वंसक कृत्ये करण्याच्या कामात हे आतंकवादी गुंतले होते. या आतंकवाद्यांनी परस्परांशी संपर्क साधण्यासाठी भ्रमणभाषऐवजी संकेतस्थळावरील नेटवर्किंग प्रणालीचा वापर केला. ८ नोव्हेंबर पासून अयोध्येत राममंदिराच्या उभारणीला प्रारंभ करणार ! - अखिल भारतीय हिंदू महासभेची घोषणा

अयोध्येचे श्रीराम मंदिर हा कोट्यवधी हिंदूंच्या अस्मितेचा 
प्रश्‍न असल्यामुळे सरकार मंदिराच्या उभारणीसाठी साहाय्य करेल, अशी आशा आहे !
      नवी देहली - अखिल भारतीय हिंदू महासभा ८ नोव्हेंबर पासून अयोध्येत राममंदिराच्या उभारणीला प्रारंभ करणार असल्याची घोषणा महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष चन्द्र प्रकाश कौशिक आणि राष्ट्रीय महासचिव मुन्ना कुमार शर्मा यांनी केली आहे. 
     मुन्ना कुमार शर्मा यांनी सांगितले की, तत्कालीन गृहमंत्री वल्लभभाई पटेल यांनी विशेष कायदा करून सोमनाथ मंदिर उभारले होते. त्याचप्रमाणे राममंदिराच्या उभारणीसाठीही संसदेत विशेष कायदा करण्यात यावा, अशी महासभेने अनेकवेळा मागणी केली; मात्र त्यावर कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही. प्रत्येकवेळी प्रकरण न्यायालयाच्या विचाराधीन असल्याचे सांगण्यात येते. हे लक्षात घेऊन अखिल भारतीय हिंदू महासभेच्या नेत्यांनी आगामी ८ नोव्हेंबर या दिवशी अयोध्येत राममंदिराच्या उभारणीला प्रारंभ करण्याचा निर्णय घेतला आहे.(म्हणे) उरी येथील आक्रमणात पाकचा हात नाही !

अशा देशद्रोह्यांना सरकार कारागृहात का डांबत नाही ? 
आतंकवादी बुरहान वानीच्या पाकप्रेमी वडिलांचे संतापजनक विधान !
      नवी देहली - हिजबुल मुजाहिदीनचा सुरक्षादलांकडून ठार करण्यात आलेला आतंकवादी बुरहान वानी याचे वडील मुझफ्फर वानी यांनी, उरी येथील सैन्य मुख्यालयावर झालेल्या आक्रमणात पाकचा हात नाही, असे विधान केले आहे. ते म्हणाले की, जो कोणी आतंकवादी बनल्यानंतर काश्मीरमध्ये येतो तो काश्मिरी आहे. भारतातील कोणत्याही भागातून मुसलमान येथे येऊ शकतात. हे काश्मिरी आतंकवाद्यांनी केलेले आक्रमण आहे. (अशा प्रकारे आतंकवाद्यांचे समर्थन करणारे वानी यांच्यावर कारवाई होणे आवश्यक आहे ! संपादक)

दरिद्री पाकिस्तानपेक्षा एकट्या इंडियन ऑइलचे उत्पन्न अधिक !

भारत पाकपेक्षा बर्‍याच बाबतीत वरचढ आहे ! 
तरीही त्याच्यावर कारवाई करण्यासाठी राज्यकर्ते दिरंगाई करतात, हे दुर्दैवी !
     नवी देहली - इंडियन ऑइल कॉर्पोरेशनचे उत्पन्न पाकिस्तानपेक्षा अधिक आहे. वर्ष २०१५ मध्ये इंडियन ऑइल कॉर्पोरेशनचा महसूल पाकच्या महसूलापेक्षा ४० टक्के अधिक होता. वर्ष २०१५ मध्ये इंडियन ऑइलचे महसुली उत्पन्न ५४.७ अब्ज डॉलर इतके होते, तर पाकचे महसुली उत्पन्न ३८.७ अब्ज डॉलर इतकेच होते. ब्रिटनची संस्था ग्लोबल जस्टिस नाऊने नुकत्याच केलेल्या एका सर्वेक्षणामध्ये ही माहिती दिली आहे. 
    जगातील १० मोठ्या कॉर्पोरेशनचे उत्पन्न अनेक देशांच्या संयुक्त उत्पन्नापेक्षाही अधिक आहे. वॉलमार्ट, अ‍ॅपल, शेल या तिन्ही आस्थापनांचा एकूण महसूल हा १८० गरीब देशांच्या एकूण उत्पन्नापेक्षा अधिक आहे. या गरीब देशांमध्ये दक्षिण अफ्रीका, इराक, आयर्लंड, इंडोनेशिया, इस्रायल, कोलंबिया, ग्रीस आणि व्हीएतनाम आदी देशांचा समावेश आहे.

आर्थिकदृष्ट्या मागासवर्गियांना दिल्या जाणार्‍या १० टक्के आरक्षणाला हरियाणा उच्च न्यायालयाची स्थगिती !

      चंदीगड - हरियाणामध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना दिल्या जाणार्‍या १० टक्के आरक्षणाला पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने स्थागिती दिली आहे. वर्ष २०१३ मध्ये काँग्रेसचे तत्कालीन मुख्यमंत्री भूपेंद्रसिंह हुड्डा यांच्या शासन काळात २ लक्ष ४० सहस्र रुपयांहून अल्प वाषिर्र्क उत्पन्न असणार्‍या व्यक्तींना १० टक्के आरक्षण देण्यात आले होते. या निर्णयाच्या विरोधात कालिंदी वशिष्ठ यांनी पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयात एक याचिका प्रविष्ट केली होती. याचिकाकर्त्याचे अधिवक्ता नीरज गुप्ता यांनी सांगितले, आर्थिकदृष्ट्या मागासलेपणाच्या आधारावर आरक्षण देता येत नाही. त्यासाठी संबंधितांचे सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपण असणे आवश्यक असते. अशाच प्रकारे वर्ष २०१० मध्ये गुजरात सरकारनेही आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना १० टक्के आरक्षण दिले होते; परंतु वर्ष २०१६ मध्ये गुजरात उच्च न्यायालयाने ते रहित केले होते.भारतावर टीका करणार्‍या पाकिस्तानी अभिनेत्याची ब्रिटीश वाहिनीने केली हकालपट्टी !

जगात पाकिस्तानी कुठेही वावरत असले, 
तरी ते भारतद्वेषाने पछाडलेले असतात, याचा पुरावा !
      नवी देहली - उरी आक्रमणानंतर पाकिस्तानी कलाकारांनी भारत सोडावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे. या पार्श्‍वभूमीवर ट्विट करतांना ब्रिटनमधील पाकिस्तानी वंशाचा अभिनेता मार्क अन्वर याने भारतियांविषयी अत्यंत अश्‍लाघ्य आणि हीन भाषा वापरली. त्यामुले आय टीव्ही या ब्रिटीश वाहिनीने त्याची हकालपट्टी केली आहे. (हीन भाषा वापरून द्वेष पसरवणार्‍या पाक कलाकाराला ब्रिटनमधील वाहिनी डच्चू देते, या उलट भारतात हिंदूंना धर्मांध उघड धमक्या देत असतांनाही त्यांच्यावर कारवाई होत नाही, हे दुर्दैवी ! - संपादक)

तोंडी तलाकला तेलंगण आणि आंध्रप्रदेश राज्य अल्पसंख्यांक आयोगाचा विरोध

सरकारने समान नागरी कायदा लागू केल्यास तोंडी 
तलाक मुळे मुसलमान महिलांवर होणारा अन्याय दूर होईल !
      भाग्यनगर (हैद्राबाद) - तीनदा तोंडी तलाक उच्चारून घटस्फोट देण्याचे सूत्र वादग्रस्त असून त्यामुळे मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाची मान्यता रहित होऊन समान नागरी कायदा लागू होण्याची भीती नाकारता येत नाही. त्यामुळे पर्सनल लॉ बोर्डाने त्यांची भूमिका पालटावी, असे आवाहन तेलंगण आणि आंध्रप्रदेश राज्य अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष अबीद रसूल खान यांनी केले आहे. (याचा अर्थ समान नागरी कायदा येऊ नये, यासाठी मुसलमानांनी तलाक पध्दतीला विरोध करावा, असे खान यांना वाटते का ? - संपादक)

सिंधु करार तोडल्यास पाक आंतरराष्ट्रीय न्यायालयात जाणार !

     नवी देहली - सिंधु पाणीवाटप करार तोडण्याचा भारताने निर्णय घेतल्यास त्या विरोधात पाक आंतरराष्ट्रीय न्यायालयात जाईल, अशी चेतावणी पाकने दिली आहे. पाकचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांचे सल्लागार सरताज अजीज यांनी पाकच्या संसदेत ही भूमिका मांडली. ते म्हणाले की, आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार भारत सिंधु करार एकतर्फी मोडू शकत नाही. भारताने तसे केल्यास पाकिस्तान आंतरराष्ट्रीय न्यायालयात दाद मागेल. कारगील आणि सियाचीन युद्धाच्या काळातही सिंधु करार स्थगित करण्यात आला नव्हता. पाकिस्तानात येणारे सिंधु नदीचे पाणी तोडणे हा आर्थिक आतंकवाद ठरेल.

पंजाबमध्ये १०० वर्षीय वृद्धेची बलात्कारानंतर हत्या !

धर्मशिक्षणाच्या अभावी देशभरातील राज्यांची होत असलेली अधोगती ! 
     पटियाला (पंजाब) - पटियाला जिल्ह्यातील दौब कलान गावात २६ सप्टेंबरला १०० वर्षीय वृद्धेचा मृतदेह आढळून आला. तिचा मृतदेह अर्धनग्न अवस्थेत सापडला. या वृद्धेच्या डोक्यावर वार करण्यात आल्याने दिसून आले आहे. वृद्धेच्या कुटुंबियांनी त्यांच्यावर हत्येपूर्वी बलात्कार झाल्याचा आरोप केला आहे. पोलीस अधिकारी हरविंदर विर्क यांनी दिलेल्या माहितीनुसार खुनाचा गुन्हा प्रविष्ट केला असून शवविच्छेदनानंतर बलात्काराचाही गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. प्राथमिक तपासणीनुसार ही हत्या संपत्तीच्या वादातून किंवा अमली पदार्थाच्या नशेतून केल्याचे दिसत आहे.

भारतातून बांगलादेशमध्ये होणार्‍या गोमातांच्या तस्करीवर केंद्रीय गृहमंत्र्यांकडून बैठक

    नवी देहली - भारतातून बांगलादेमध्ये होणार्‍या गोमातांच्या तस्करीच्या संदर्भात केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी सीमा सुरक्षा दलाच्या अधिकार्‍यांची नुकतीच बैठक घेऊन त्यांना यावर नियंत्रण मिळवण्याचा आदेश दिला. (नुसते आदेश देऊन उपयोग नाही, तर त्याची कठोरपणे अंमलबजावणी होण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे, तरच ही गोतस्करी रोखली जाईल ! - संपादक)

सती प्रथेप्रमाणे तीन वेळा तोंडी तलाकवरही बंदी घालावी ! - आखिल भारतीय शिया पर्सनल लॉ बोर्ड

सरकार तोंडी तलाकवर बंदी घालणार का ?
      नवी देहली - हिंदु धर्मामध्ये ज्याप्रमाणे सती प्रथेवर बंदी घालण्यात आली. त्याचप्रमाणे मुसलमान समाजातील तीन वेळा तोंडी तलाक देण्याच्या पद्धतीवर बंदी घालण्यात यावी, अशी विनंती आखिल भारतीय शिया पर्सनल लॉ बोर्डने केली आहे. याविषयी सुन्नी समुदायाला समजावून सांगण्यात येईल, असेही बोर्डाने म्हटले आहे. मुसलमान समाजातील तीन वेळा तोंडी तलाक घेण्याच्या प्रथेवर सर्वोच्च न्यायालयात खटला चालू आहे. या पार्श्‍वभूमीवर शिया पसर्नल लॉ बोर्डाने त्यांची भूमिका स्पष्ट केली.केंद्रीय गृहमंत्रालयाकडून गुन्हा दाखल

इशरत जहाँ प्रकरणातील गहाळ धारिकांचे प्रकरण
      नवी देहली - इशरत जहाँ प्रकरणातील गहाळ झालेल्या धारिकांच्या प्रकरणी महिनाभर चौकशी करण्यात आल्यानंतर केंद्रीय गृहमंत्रालयाने गुन्हा दाखल केला आहे. या तक्रारीनंतर पोलिसांनी तपास चालू केला असून गहाळ धारिकांचा शोध घेण्यात येत आहे.
      इशरत जहाँ प्रकरणी सप्टेंबर २००९ मध्ये गुजरात उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र प्रविष्ट करण्यात आले होते. या प्रतिज्ञापत्रातील महत्त्वाची कागदपत्रे गहाळ झाली होती. याप्रकरणी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी अतिरिक्त गृह सचिवांना चौकशीचे आदेश दिले होते. यासंदर्भात काही माहिती न मिळाल्याने पोलिसांत तक्रार करण्यात आली.
     १९ वर्षीय इशरत लष्कर-ए-तोएबाची आतंकवादी होती. पोलीस चौकशीच्या वेळी काँग्रेस सरकारच्या काळात गृहखात्यात असलेल्या अधिकार्‍यांची आता चौकशी होण्याची शक्यता आहे.केंद्र सरकार तीन वेळा तलाक देण्याच्या प्रथेच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार !

      नवी देहली - तीन वेळा तलाक म्हणून दिल्या जाणार्‍या घटस्फोट प्रथेला अवैध घोषित करण्यासाठी मुसलमान महिलांनी प्रविष्ट केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी चालू आहे. या याचिकेत ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने शपथपत्र प्रविष्ट केले आहे. यात तीनदा तलाक ही प्रथा शरीया कायद्यानुसार असून तो मुसलमानांचा मुलभूत अधिकार आहे, असे प्रतिपादन केले होते. सर्वोच्च न्यायालयाने या संदर्भात केंद्र सरकारने त्याचे म्हणणे मांडण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार केंद्र सरकारने तीनदा तलाक प्रथेला विरोध करण्याचा निर्णय घेतला आहे.

अझरबैजान या मुसलमानबहुल देशात ३०० वर्षांहूनही अधिक प्राचीन दुर्गा मातेचे मंदिर !

असेे मंदिर भारतात असते, तर शहर विकासाच्या नावावर 
निधर्मी प्रशासनाने कदाचित् ते भुईसपाट केले असते !
  • अझरबैजान सरकारकडून मंदिराचे स्मारक 
  • युनेस्कोच्या वतीने ऐतिहासिक वास्तू म्हणून घोषित
      बाकू - अझरबैजान या ९५ टक्के मुसलमानबहुल देशात ३०० वर्षांहूनही अधिक प्राचीन असे दुर्गामातेचे मंदिर आहे. या मंदिरात अखंड ज्योती तेवत असल्यामुळे या मंदिराला टेंपल ऑफ फायर असेही संबोधले जाते. ही ज्योती साक्षात भगवती असल्याची भावना भक्तगणांमध्ये आहे. या ठिकाणी प्रतिवर्षी १५ सहस्रांहून अधिक भाविक दर्शनाला येतात.

(म्हणे) भगवेकरणामुळे भारतीय अर्थव्यवस्थेतील पालटांचा वेग मंदावला !

हिंदुद्वेषाने पछाडलेल्या अमेरिकेतील विचार गटाचा (थिंक टॅन्कचा) निष्कर्ष
      वॉशिंग्टन - भारतीय अर्थव्यवस्थेत आमूलाग्र पालट होण्याऐवजी सांस्कृतिक वाद आणि भगवेकरण यांमुळे पालटांचा वेग मंदावला, असा निष्कर्ष अमेरिकेतील एका विचार गटाने (थिंक टॅन्कने) काढला आहे. (भारतातील हिंदू जागृत झाले, तर अमेरिकेला, ते भारी पडेल, हे ती जाणून आहे ! तसे होऊ नये, यासाठी हिंदूंचे मानसिक खच्चीकरण करण्यासाठी अमेरिकेकडून असे अजब निष्कर्ष काढले जातात ! - संपादक) महागाई आटोक्यात आणण्यात भारताने यश मिळवले आहे, असेही या गटाने म्हटले आहे.

अमेरिकी संस्कृतीमध्ये हिंदूंचे अमूल्य योगदान ! - डोनाल्ड

ट्रम्प यांच्याकडून हिंदूंची भलावण
      वॉशिंग्टन - अमेरिकी संस्कृती आणि जागतिक नागरीकरणाच्या प्रक्रियेमध्ये हिंदु समाजाने सुंदर योगदान दिले आहे. दोन्ही देशांमधील मुक्त व्यवसाय धोरण, कामाची चिकाटी आणि प्रेम, कौटुंबिक मूल्यांवरील निष्ठा या समान धाग्यांचा गौरव केला गेला पाहिजे, असे आपल्याला वाटते, असे प्रतिपादन अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाचे रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी केले आहे. १५ ऑक्टोबर या दिवशी न्यूयॉर्कमध्ये रिपब्लिकन हिंदू युती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. दिवसभर चालणार्‍या या मेळाव्यात चित्रपट अभिनेते, गायक, आदी सहभागी होतील. तसेच हिंदु धर्मगुरु आणि नेतेही यात सहभागी होण्याची शक्यता आहे. या कार्यक्रमात सुमारे १० सहस्र जण उपस्थित रहातील असा आयोजकांचा अंदाज आहे. त्यासंदर्भात ट्रम्प यांनी हिंदूंना आवाहन केले आहे.
     ट्रम्प यांनी २४ सेकंदाचा एक व्हिडिओ देखील अपलोड केला आहे. या व्हिडिओत ट्रम्प म्हणतात, रिपब्लिक हिंदू युती मेळाव्यात तुम्हाला निमंत्रित करतांना मला आनंद होतो. या मेळाव्यात सहस्रो भारतियांना अमेरिकी मंडळींशी बोलता येईल आणि याचा लाभ शेवटी अमेरिकेला होईल. हिंदूंची मते मिळण्यासाठी ट्रम्प यांनी हा कार्यक्रम आयोजित केला आहे.

हिंदु जनजागृती समितीच्या फेसबूक पानाने ओलांडला ११ लाख सदस्यसंख्येचा टप्पा !

     मुंबई - हिंदु जनजागृती समितीच्या 'हिंदू अधिवेशन' या फेसबूक पानाच्या सदस्यसंख्येने २० सप्टेंबर २०१६ या दिवशी ११ लाख सदस्यसंख्येचा महत्त्वाचा टप्पा ओलांडला. हिंदु जनजागृती समितीच्या कार्याची ओळख आणि प्रसाराचाच एक भाग म्हणून समितीने इंग्रजी भाषेतील 'हिंदुजागृती' हे फेसबूक पान चालू केले होते. ऑगस्ट २०१२ मध्ये आसाम दंगलीसंदर्भात सत्यनिष्ठ वृत्ते दिल्यामुळे तत्कालीन काँग्रेस सरकारने समितीचे 'हिंदूजागृती' हे फेसबूक पान बंद केले होते. त्यामुळे समितीने अखिल भारतीय हिंदु अधिवेशनाच्या प्रसारासाठी चालू केलेले 'हिंदु अधिवेशन' हे फेसबूक पान समितीचे अधिकृत फेसबूक पान म्हणून वापरण्यास प्रारंभ केला. हे पान गेल्या ४ वर्षांहून अधिक काळ राष्ट्र आणि धर्म यांच्या जागृतीचे कार्य करत आहे. या पानावर करण्यात येणार्‍या पोस्ट्समध्ये राष्ट्र, धर्म यांविषयीच्या बातम्या, धर्मशास्त्र, सण, क्रांतीकारक आणि राष्ट्रपुरुष यांचा इतिहास या विषयांचा समावेश असतो. 

पोलिसांच्या संदर्भातील कटू अनुभव !

     सध्या सनातनचे साधक आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते यांना पोलिसांच्या शारीरिक आणि मानसिक छळाला सामोरे जावे लागत आहे. या अनुषंगाने विविध ठिकाणच्या पोलिसांविषयी सनातनचे साधक, हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते किंवा हिंदुत्वनिष्ठ यांना यापूर्वी पोलिसांच्या सतावणुकीविषयी आलेले अनुभव येथे प्रसिद्ध करत आहोत. 

आज लोकशाहीची व्याख्या स्वार्थी नेत्यांचे, 'स्वार्थी नेत्यांसाठी, स्वार्थी नेत्यांकडून शासन', अशी बनली आहे ! - पू. डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती

आसनसोल (बंगाल) येथे राज्यस्तरीय हिंदू अधिवेशनाचे आयोजन 
डावीकडून श्री. उपानंद ब्रह्मचारी, श्री. सुभाष चक्रवर्ती आणि बोलतांना पू. डॉ. चारुदत्त पिंगळे
     आसनसोल (बंगाल) - वर्ष २०१२ मध्ये गोवा येथील अखिल भारतीय हिंदू अधिवेशनात हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचा सर्व संमतीने विषय मांडण्यात आला होता. त्या हिंदु राष्ट्राच्या ठिणगीने आज मशालीचे रूप धारण केले आहे. लोकशाहीची व्याख्या आहे, 'जनतेचे, जनतेकडून, जनतेसाठी शासन !'; परंतु सध्या यात पालट होऊन 'स्वार्थी नेत्यांचे, स्वार्थी नेत्यांसाठी, स्वार्थी नेत्यांकडून शासन !' असे झाल्याचे दिसून येत आहे. आमचे पंतप्रधान म्हणतात, 'राज्यघटना त्यांचा धर्मग्रंथ आहे.' राज्यघटनेतील समान नागरी कायदा, गोहत्या बंदी कायदा हे सर्व देशात असावेत, अशी तरतूद सांगण्यात आली आहे. मग यावर कोणीही कृती करण्यात येत नाही, तर खर्‍या अर्थाने धर्माचे पालन होत आहे का ? असा प्रश्‍न मनात निर्माण होतो, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक पू. डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी केले. ते हिंदु जनजागृती समितीच्या वतीने २२ सप्टेंबरला येथील गोराई स्मृती भवनमध्ये आयोजित राज्यस्तरीय हिंदू अधिवेशनाच्या व्यासपिठावरून बोलत होते.

मुंबईमध्ये पोलिसांना धक्काबुक्की करणारा मद्यपीचालक पोलिसांच्या कह्यात

राज्यातील असुरक्षित पोलीस !
       मुंबई, २७ सप्टेंबर - मद्य पिऊन भरधाव वेगाने गाडी चालवणार्‍याला आणि पोलिसांना धक्काबुक्की करणार्‍याला पोलिसांनी कह्यात घेतले आहे. येथील कफपरेड मधील गणेशमूर्ती नगर परिसरात कोम्बिंग ऑपरेशन अंतर्गत २६ सप्टेंबर या दिवशी कफपरेड पोलिसांची पहाटे नाकाबंदी चालू होती. त्या वेळी मद्यधुंद अवस्थेत भरधाव चारचाकी चालवणार्‍या दीपककुमार बनवारीलाल याला पोलिसांनी अडवले. त्याने पोलिसांना शिवीगाळ करत वाद घातला.
       या वेळी चारचाकीची पडताळणी करणार्‍या पोलिसाच्या गणवेशावरील नामफलकही त्याने काढला आणि पोलिसाला धक्काबुक्की केली.

नाशिक येथे शेतात सापडलेल्या पेटीमध्ये आढळली जुनी पितळी घंटा

संरक्षण मंत्रालयाची पेटी बाहेर येणे, हे ढिसाळ 
सुरक्षाव्यवस्थेचेच लक्षण आहे. सरकारने 
याप्रकरणी लक्ष घालून मंत्रालयाची यंत्रणा 
काटेकोर करावी, अशी जनतेची अपेक्षा आहे.
       नाशिक, २७ सप्टेंबर - येथे २५ सप्टेंबरला सापडलेल्या पेटीमध्ये केवळ एक जुनी पितळी घंटा सापडली असून पेटीवरील संरक्षण क्षेत्रातील संस्थांची काही चिन्हे आणि धोक्याचे चिन्ह मात्र योग्य आहेत, अशी माहिती पोलिसांनी एका पत्रकार परिषदेत दिली. येथील बागलाण तालुक्यातील किकवारी भागातील एका मक्याच्या शेतात २५ सप्टेंबर या दिवशी लष्कराचे चिन्ह आणि अशोक चक्र असलेली एक मोठी पेटी सापडली होती. या पेटीच्या पडताळणीसाठी संरक्षण मंत्रालयाचे ३ अधिकारी आणि भाभा अणुसंशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ दाखल झाले होते.

पाकिस्तानला आतंकवादी राष्ट्र म्हणून घोषित करा आणि काश्मीरमधील ३७० कलम हटवा !

राष्ट्रप्रेमींच्या मागणीची दखल केंद्रशासन कधी घेणार ?
ऑल इंडिया अँटीटेरेरिझम फ्रंटचे अध्यक्ष मणिंदरजीतसिंग बिट्टा यांची पत्रकार परिषदेत मागणी 
      पुणे, २७ सप्टेंबर - संसद, मुंबईवरील २६/११ चे आक्रमण, पठाणकोट आणि नुकतेच उरी येथे झालेले आतंकवादी आक्रमण, अशी आक्रमणे आपण किती दिवस सहन करणार आहोत ? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानात जाऊन आतंकवाद संपवा, असे हात जोडून सांगितले, तरी लाभ झाला नाही. त्यामुळे आता पाकिस्तानला उत्तर देण्याची वेळ आली आहे. हे उत्तर आता गोळी किंवा बॉम्बने देऊन उपयोग नाही, तर आम्ही आतंकवादाच्या विरोधात आहोत, असे म्हणणार्‍या सर्व राष्ट्रांनी एकत्र येऊन संयुक्त राष्ट्रसंघाच्या बैठकीत पाकिस्तानला आतंकवादी राष्ट्र म्हणून घोषित करावे आणि शासनाने काश्मीरमधील कलम ३७० हटवावे, अशी मागणी ऑल इंडिया अ‍ॅन्टीटेरेरिझम फ्रंटचे अध्यक्ष श्री. मणिंदरजीतसिंह बिट्टा यांनी केली. काश्मीरमध्ये आतंकवाद आणि उरी येथील आतंकवादी आक्रमणात हुतात्मा झालेल्या भारतीय सैनिकांना २६ सप्टेंबर या दिवशी श्रद्धांजली अर्पण केल्यानंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

(म्हणे) गोवंश हत्या बंदी कायदा रहित करा !

शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथ पाटील यांचे गोद्रोही विधान !
       नगर, २७ सप्टेंबर - राज्य सरकारने शेतकरी विरोधी कायदे रहित करावेत, तसेच राज्य सरकारने गोवंश हत्या बंदी कायदा केल्याने शेतकर्‍यांच्या पशुधनावर गदा आली आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना भाकड आणि निरुपयोगी जनावरे संभाळावी लागत आहेत. कायदा झाल्याने कुरेशी समाजावर उपासमारीची वेळ आली आहे. यामुळे गोवंश हत्या बंदी कायदा रहित करा, अन्यथा नागपूरला मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर आंदोलन करण्यात येईल, असे विधान शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथ पाटील यांनी केले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली येथील ईदगाह मैदानापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत शेतकरी संघटना आणि कुरेशी समाज यांच्यासमवेत शेतकर्‍यांच्या विविध मागण्यांसाठी २६ सप्टेंबर या दिवशी मोर्चा काढण्यात आला. या वेळी कुरेशी समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता.१ ऑक्टोबरपासून पनवेल महानगरपालिका अस्तित्वात येणार

     मुंबई - पनवेल महानगरपालिका १ ऑक्टोबरपासून अस्तित्वात येणार आहे. सरकारने यासंदर्भात अधिसूचना काढली आहे. त्यामुळे पनवेल नगरपरिषदेचे संपूर्ण क्षेत्र महानगरपालिका क्षेत्रात येणार आहे. पनवेल महापालिका क्षेत्रात २९ महसुली गावांचा समावेश करण्यात आला आहे. 
     उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पनवेल आणि परिसरातील ३२ गावांचा समावेश करून नवी पनवेल महापालिका स्थापन करण्यात आली आहे. यामध्ये पनवेल नगरपालिकेसह सिडकोच्या हद्दीतील २१ आणि मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या क्षेत्रातील ११ गावांचा समावेश आहे.

काळा पैसा बाळगणार्‍यांमध्ये पुण्याचा देशात ६ वा क्रमांक

राज्याची सांस्कृतिक राजधानी आणि विद्येचे माहेरघर असणार्‍या पुण्याला हे न शोभणारे !
     पुणे, २७ सप्टेंबर - राज्याची सांस्कृतिक राजधानी ओळख असलेल्या पुण्याचे नाव काळा पैसा बाळगणार्‍यांमध्ये देशात ६ व्या क्रमांकावर आहे, अशी माहिती आयकर विभागाच्या उत्पन्न घोषणापत्र योजनेमध्ये (इन्कम टॅक्स डिक्लेरेशन स्किम) समोर आली आहे. (यावरून समाजाला धर्मशिक्षणाची किती आवश्यकता आहे, हेच स्पष्ट होते. भविष्यात काळा पैसा निर्माण न होण्यासाठी कठोर उपाययोजना आणि शिक्षा यांची अंमलबजावणी केल्यास त्याला काही प्रमाणात आळा बसेल. - संपादक)

पाकिस्तानी अभिनेता फवाद खान याने भारत देश सोडला !

मनसेच्या धमकीचा परिणाम
     मुंबई - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पाकिस्तानी कलाकारांना ४८ घंट्यांत भारत सोडून जाण्याची दिलेल्या धमकीनंतर पाकिस्तानी अभिनेता फवाद खान याने भारत देश सोडला असल्याचे वृत्त समोर आले आहे. त्याने भारतातून गुपचूप पळ काढला असल्याची चर्चा आहे. 
    दिग्दर्शक करण जोहरचा प्रसिद्ध टॉक शो कॉफी विथ करणचं पाचवे सत्र लवकरच चालू होणार आहे. कॉफी विथ करणच्या पहिल्या शोमध्ये फवाद खान पाहुणा म्हणून येणार होता; मात्र मनसेच्या धमकीनंतर फवादच्या जागी शाहरूख खान आणि आलिया भट्ट हे येणार आहेत. करण जोहरचा आगामी चित्रपट ऐ दिल है मुश्कील चित्रपटातही फवाद खान याने काम केले आहे.

मराठी क्रांती मोर्च्यासाठी सांगलीत लक्षावधींचा जनसागर !

मूकमोर्च्यात सहभागी झालेले नागरिक
     सांगली, २७ सप्टेंबर (वार्ता.) - होणार, होणार याकडे लक्ष लागून राहिलेल्या मराठी क्रांती मोर्चासाठी २७ सप्टेंबर या दिवशी सांगलीत लक्षावधींचा जनसागर लोटला होता. पंधरा लक्षहून अधिक नागरिक या मोर्च्यासाठी उपस्थित होता, असा कयास बांधण्यात येत आहे. विश्रामबाग येथील क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्यास वंदन करून या मोर्च्याचा प्रारंभ झाला. राममंदिर चौकात मोर्च्याचा समारोप झाला. यानंतर जिल्हाधिकार्‍यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. श्रीशिवप्रतिष्ठानचे संस्थापक पू. संभाजीराव भिडे (गुरुजी) आणि त्यांचे कार्यकर्ते मोर्च्यासाठी उपस्थित होते.

(म्हणे) गुरुकुल शिक्षणपद्धती चालू करण्याचा राज्य शासनाचा डाव !

आमदार कपिल पाटील यांचा हिंदुद्वेष्टेपणा !
      पुणे, २७ सप्टेंबर - राज्यातील शिक्षण व्यवस्था मोडून काढण्याचा राज्य शासनाचा डाव आहे. गांधी, फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारांवर चालू असलेल्या शिक्षण संस्था मोडीत काढून गुरुकुल शिक्षणपद्धत चालू करण्याचा शासनाचा डाव आहे. (यात डाव कसला ? - संपादक) विनाअनुदानित शिक्षकांना वेतन द्यायचे नाही आणि अनुदानित शाळांमध्ये शिक्षक वाढवून त्या शाळाच बंद पाडायच्या, असे धोरण सध्या राबवण्यात येत आहे, असा आरोप शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी २६ सप्टेंबर या दिवशी पत्रकार परिषदेत केला. (आताच्या मेकॉलेप्रणीत शिक्षणप्रणालीमुळे चारित्र्यहीन, देशद्रोही, नीतीमत्ताहीन आणि संस्कारहीन पिढी सिद्ध होण्यापेक्षा गुरुकुल पद्धतीमुळे आदर्श युवक घडल्यास कपिल पाटील यांना पोटशूळ का ?- संपादक) या वेळी त्यांनी सरकारच्या शिक्षण विरोधी धोरणाच्या विरोधात ऑक्टोबरपासून आंदोलन करण्यात येणार असल्याचे सांगितले.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या काशीद रुग्णालयातील कर्मचारी संगीत खुर्ची खेळतात !

सरकारी रुग्णालयांचा ढिसाळ आणि हलगर्जी कारभार !
  पिंपरी (पुणे), २७ सप्टेंबर - पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या पिंपळे गुरव परिसरातील काशीद रुग्णालयातील आरोग्य अधिकारी आणि अन्य कर्मचारी गणेशोत्सवाच्या काळात संगीत खुर्ची खेळत असल्याचा प्रकार उघड झाला आहे. एका व्यक्तीने याचे भ्रमणभाषमध्ये चित्रीत केल्याने हा अपप्रकार उघड झाला. 
     रुग्णालयाच्या प्रशासनाने अपप्रकार घडल्याचे मान्य केले; मात्र रुग्णालयाची वेळ संपल्यावर संगीत खुर्ची खेळत असल्याचेही सांगितले. (असे प्रशासन रुग्णांकडे किती लक्ष देत असतील, याचा विचारच न केलेला बरा ! - संपादक)

पुण्यात प्रतिदिन सरासरी ५, तर ८ मासांमध्ये १ सहस्त्र १०३ तक्रारी सायबर गुन्हे शाखेकडे प्रविष्ट

सायबर गुन्ह्यांतील वाढती गुन्हेगारी म्हणजे कायद्याचा धाक राहिला नसल्याचे द्योतक !
महाराष्ट्र सायबर गुन्ह्यांमध्ये पहिल्या क्रमांकावर
     पुणे, २७ सप्टेंबर - सध्या संगणकीय जालाच्या संदर्भातील तक्रारी वाढत चालल्या असून येथे प्रतिदिन सरासरी ५ तक्रारी सायबर गुन्हे शाखेकडे प्रविष्ट होत आहेत. जानेवारी २०१६ ते ऑगस्ट २०१६ या ८ मासांच्या कालावधीत १ सहस्त्र १०३ तक्रारी प्रविष्ट झाल्या आहेत. नॅशनल क्राइम रेकॉर्ड्स ब्युरोच्या आकडेवारीनुसार वर्ष २०११ ते २०१५ या काळात सायबर गुन्ह्यांमध्ये महाराष्ट्र देशात १ ल्या क्रमांकावर आहे. गेल्या पाच वर्षांत महाराष्ट्रात ५ सहस्र ९०० गुन्हे, उत्तर प्रदेशात ५ सहस्र, तर कर्नाटकात ३ सहस्र ५०० गुन्हे नोंद झाले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रही सायबर गुन्ह्यांमध्ये प्रथम क्रमांकावर आहे. (अशा गुन्ह्यांना प्रतिबंध करण्यासाठी पोलीस आणि शासन गतीमान उपाययोजना कधी करणार ? - संपादक)मराठा मोर्चे हिंदु राष्ट्र स्थापनेच्या दृष्टीने कृतीशील होवोत !

श्री. यज्ञेश सावंत
      कोपर्डीच्या पाशवी बलात्काराच्या घटनेनंतर एक मराठा लाख मराठा या घोषवाक्याने कोणत्याही नेतृत्वाशिवाय शिस्तबद्धरित्या लाखोंच्या संख्येने एकत्र येणार्‍या मराठा समाजाचे संघटन राजकारण्यांसह अनेकांच्या भुवया उंचावणारे ठरले आहे. गुन्हेगारांवर त्वरित कारवाई होत नाही म्हणून संताप, तसेच मराठा समाज खुल्या वर्गात येत असल्याने आरक्षणामुळे झालेल्या परवडीमुळे प्रत्येक ठिकाणी झालेली घुसमट या मोर्च्यांच्या निमित्ताने दिसून येते.
१. कोपर्डी येथील घटना आणि पक्षपाती पत्रकारिता !
     नगर जिल्ह्यातील कोपर्डी येथे १३ जुलै या दिवशी एका १५ वर्षांच्या शाळकरी मुलीवर तीन नराधमांनी बलात्कार करून तिच्या देहाची अक्षरश: चाळण करत
मराठा मोर्चाचे संकेतस्थळावरील छायाचित्र
तिची हत्या केली. तिच्या शरिरावर जखमा नाहीत, अशी एकही जागा शिल्लक नव्हती. तिच्यावर केलेले अत्याचार येथे लिहूही शकत नाही, इतके भयंकर होते; मात्र घटना घडल्यावर सामाजिक संकेतस्थळांच्या माध्यमातून ते तात्काळ सर्वदूर पसरले आणि सर्वांच्या पायाखालची जमीन सरकल्याप्रमाणे सर्वांना धक्का बसला. एरव्ही अनेक अनावश्यक विषयांवरील बातम्या देण्यास पुढे पुढे करणार्‍या माध्यमांनी या भयंकर घटनेला २ दिवस उलटूनही एकही बातमी देण्याचे सौजन्य दाखवले नाही. तिसर्‍या दिवसापासून प्रचंड जनक्षोभ उसळायला लागल्यावर पत्रकार जागे झाले आणि १६ जुलैपासून पुढचा घटनाक्रम देण्यात आला. पक्षपाती पत्रकारिता म्हणजे काय, याचा आणखी काही पुरावा हवा का ? या थंड पत्रकारितेमुळे देहलीतील निर्भया प्रकरणापेक्षाही भयंकर प्रकरण घडूनही सर्वसामान्य जनतेला घटनेची भीषणताच अनेक दिवस लक्षात आली नाही.

श्राद्धाचा महिमा

१. श्राद्ध कुणी करावे ?
      शास्त्रामध्ये श्राद्धाविषयी वर्णन येते की, आपल्या कुलोचित धर्माचे पालन करणार्‍या ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य यांनी आपापल्या वर्णानुसार वेदोक्त विधीने मंत्रोच्चारणासहित श्राद्धाचे अनुष्ठान करावे. जो पुत्रहीन असेल, त्याचे श्राद्ध त्याची नातवंडे (मुलीची मुले) करू शकतात. कुणीही नसेल, तर पत्नी आपल्या पतीचे श्राद्ध मंत्रोच्चाराविना करू शकते. 
२. श्राद्धासाठी योग्य काळ
      प्रत्येक मासाच्या (महिन्याच्या) अमावास्या आणि पौर्णिमा या तिथींना श्राद्धासाठी योग्य काळ सांगण्यात आला आहे. जेव्हा सूर्य कन्या राशीत असतो, तेव्हा कृष्ण पक्षात पौर्णिमेपासून अमावास्येपर्यंत श्राद्ध केले पाहिजे.

पितृपक्षातील श्राद्ध !

        ४ ऋणांपैकी पितृऋण फेडण्यासाठी श्राद्ध आवश्यक असते. माता-पिता, तसेच निकटवर्तीय यांचा मृत्यूनंतरचा प्रवास हा सुखमय आणि क्लेशरहित व्हावा, त्यांना सद्गती मिळावी यांसाठीचा संस्कार म्हणजेच श्राद्ध. श्राद्धातील मंत्रोच्चारांमध्ये पितरांना गती देण्याची सूक्ष्म शक्ती सामावलेली असते. श्राद्धात पितरांना हविर्भाग दिला गेल्याने ते संतुष्ट होतात. श्राद्धाचे इतके महत्त्व असतांनाही आज हिंदूंमधील धर्मशिक्षणाच्या अभावामुळे श्राद्धविधी दुर्लक्षिला जाऊ लागला आहे; म्हणूनच अन्य संस्कारांइतकाच श्राद्ध हा संस्कारही अत्यावश्यक कसा आहे, हे सांगणे क्रमप्राप्त ठरते. १७ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर २०१६ या कालावधीत पितृपक्ष आहे. त्यानिमित्ताने श्राद्धाविषयीचे लिखाण येथे देत आहोत.

कुपोषण थांबणार का ?

     काही दिवसांपूर्वी राज्यात वर्षभरात १७ सहस्र बालकांचा कुपोषणामुळे मृत्यू झाला, अशी याचिका मुंबई उच्च न्यायालयात प्रविष्ट झाली. या वेळी न्यायालयाने कुपोषणामुळे होणारे मृत्यू गंभीर आहेत, असे निरीक्षण नोंदवत सरकारला खडसवले. त्या आधी काही दिवस पालघर जिल्ह्यातील जव्हार, मोखाडा परिसरात कुपोषणामुळे दोन आदिवासी बालके अकाली मरण पावली.

लोकमान्यांच्या पादुका आणि राहुलवरील बूटफेक !

     २७.९.२०१६ च्या (कालच्या) दैनिक सनातन प्रभातमध्ये राहुल गांधी यांच्यावर बूट फेकला ! ही बातमी वाचून लोकमान्य टिळकांच्या जीवनातील त्यांच्या पादत्राणांविषयीचे दोन प्रसंग आठवले. 
      इंग्लंडहून चर्चेसाठी आलेल्या मॉटेंग्यू नावाच्या मोठ्या ब्रिटिश अधिकार्‍याला भेटून लो. टिळक परत येत होते. वाटेत मथुरेला ते उतरणार नव्हते; पण रेल्वेस्थानकावर लोकांनी अतोनात गर्दी केली. येथे उतरून आमचा सत्कार स्वीकारलाच पाहिजे, असा लोकांनी आग्रहच धरला. लोकमान्य राजी झाले. स्वयंसेवकांनी लोकमान्यांना खांद्यावर घेऊन बाहेर गाडीत बसवले नि मोठी मिरवणूक चालू झाली. त्या मिरवणूकीत लोकमान्यांच्या पायांतील जोडा (चामड्याच्या चप्पला) गळून पडला. लोकमान्य मथुरेतील मुक्कामी पोचले. दुसर्‍या दिवशी भल्या पहाटेच एक ब्राह्मण तेथे आला. त्याने विचारले, भगवान तिलक कुठे आहेत ? उत्तर मिळाले, मीच टिळक. त्याने हातातील वस्तू भक्तीभावाने टिळकांपुढे ठेवून त्यांना साष्टांग नमस्कार घातला. तो म्हणाला, माझ्या पुण्याईने आज आपल्या दर्शनाचा योग आला. सडकेवर मला हा जोडा दिसला. असा दक्षिणी पद्धतीचा जोडा इकडचे लोक वापरत नाहीत. कालच्या गर्दीत तो आपल्या पायांतून पडला असावा, असे वाटून मी तो घेऊन आलो. लोकांचे टिळकांवरील प्रेमच यातून दिसून येते !
शेरास सव्वाशेर भेटला की, त्याचा पावशेर होतो. - स्वातंत्र्यवीर सावरकर

त्रिगुणात्मक गुणांतून होणारे कार्य आणि हिंदु राष्ट्रासाठी भगवंताचे नियोजन


प.पू. पांडे महाराज
    देवद आश्रमात सायंकाळी प.पू. पांडे महाराज यांच्यासमवेत फिरतांना त्यांनी केलेल्या मार्गदर्शन खजिन्यातील वेचलेले काही मौल्यवान मोती येथे देत आहे.
१. सदाचार आणि मानवता, हे सत्य आहे आणि तेच यापुढे काळाच्या 
परीक्षेसाठी टिकेल; कारण प्रत्येकाला आनंद पाहिजे. आनंद हा माणसाचा
स्थायीभाव आहे. तो गुण कायम रहाणार आहे.
२. विनाशकाळ जवळ आल्याने मानवाची बुद्धी भ्रष्ट होणे
     सध्या विकृतीला उधाण आलेले आहे. माणसे विकृतीतून सुख घेण्याचा प्रयत्न करत आहेत. मारणे, खोड्या करणे, विडंबन करणे, धर्मद्रोही आणि राष्ट्रद्रोही कृत्ये करणे, यामध्ये सुख पाहिले जाते. त्यांनी उच्चांक गाठला असून त्यालाच लोक भूषण मानत आहेत. रज-तमाचा प्रभाव इतका वाढलेला आहे की, पापाचरण आणि भ्रष्टाचार हाच शिष्टाचार झालेला आहे. या विकृतीमुळे सदाचारी वृत्ती आणि मानवता नष्ट होत आहे. यापुढे लोकांना अशा विकृतीचाही वीट येईल. अति सर्वत्र वर्जयेत । म्हणजे सर्व ठिकाणी अतिरेक टाळावा.
     विकृतीचा अतिरेक होण्याचे कारण म्हणजे विनाशकाले विपरीतबुद्धिः । म्हणजे विनाशकाळ जवळ आल्यावर बुद्धी भ्रष्ट होते. सर्वत्र याच वेळी असे का घडत आहे ? विनाशाकडे वाटचाल चालू असल्याने दुराचारी वृत्तीने परिसीमा गाठली आहे. दिवा विझतांना मोठा होतो, तसेच हे आहे.
३. हिंदु राष्ट्राची स्थापना हे भगवंताचे नियोजन असणे
     कोणतीही गोष्ट अती झाली की, माणसाला त्याचा वीट येतो. असा काळ परिवर्तनास अनुकूल होतो. यामुळे हिंदु राष्ट्राची स्थापना अटळ आहे. हे सर्व भगवंताचे नियोजन आहे

आयुष्यभर कठीण प्रसंगांत देवाचे साहाय्य घेऊन श्रद्धेच्या बळावर परिस्थितीला सामोरे गेलेल्या कै. पू. देवकी परबआजी !

कै. पू. देवकी परबआजी
    पू. श्रीमती देवकी परबआजी ८५ वर्षांच्या असतांना २२.३.२०१६ या दिवशी त्यांनी देहत्याग केला. २.४.२०१६ या दिवशी परबआजी संत झाल्याचे प.पू. डॉक्टरांनी सांगितले. पू. आजींनी त्यांच्या जीवनात प्रत्येक कठीण प्रसंगात देवाचे साहाय्य घेतले आणि त्या आलेल्या परिस्थितीला श्रद्धेच्या बळावर सामोरे गेल्या. पू. आजींच्या जीवनप्रवासाविषयी त्यांची मुले श्री. बाजी आणि श्री. अंकुश यांनी लिहून दिलेली सूत्रे पुढे दिली आहेत. मुलांनी त्यांचा उल्लेख आई असा केला आहे.
१. वडिलांनी वनखात्यातील नोकरीचे त्यागपत्र देऊन गोवा स्वातंत्र्यलढ्यात 
सहभागी होणे आणि पोर्तुगीज सैनिक मागे लागल्याने त्यांनी मूळ गाव सोडून 
सावर्डे गावातील नारळाची बाग असलेल्या निर्जन स्थळी रहाण्याचे ठरवणे
     वडिलांनी वनखात्यातील नोकरीचे त्यागपत्र देऊन गोवा स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतला. त्या वेळी त्यांना अटक झाली; पण ते पुराव्याअभावी सुटले, तरीही त्यांची गोव्याच्या स्वातंत्र्यासाठी धडपड चालूच होती. पोर्तुगीज सैनिक त्यांच्या मागे लागले; म्हणून ते आमचे मूळ गाव विर्नोडा, पेडणे सोडून इतरत्र राहू लागले. शेवटी त्यांनी सावर्डे गावातील खमडे हे नारळाची बाग असलेले निर्जन स्थळ रहाण्यासाठी निवडले. हे स्थळ बाजारापासून ६ किलोमीटर अंतरावर घनदाट अरण्यात आहे. त्या ठिकाणी हिंस्र प्राणी आहेत.
२. वडिलांनी मजुरी करणे, आईने त्यांना साहाय्य म्हणून लाकडाच्या मोळ्या, तण गोळा करून 
बाजारात नेऊन विकणे; पण वडिलांना दारूचे व्यसन लागल्याने स्थिती आणखी बिकट होणे
     मोठा भाऊ आणि बहिण यांच्या नंतर आमचा सर्वांचा जन्म आणि बालपण त्या रानातच गेले. घरात खाणारे दहा होते. वडील मजुरी करत होते. त्यांना साहाय्य म्हणून आई लाकडाच्या मोळ्या आणि गवत गोळा करून चालत जाऊन बाजारात विकायची. त्याच्यावर उदरनिर्वाह चालायचा. याच कालावधीत वडिलांचा नारळाच्या झाडावरून पडून अपघात झाला. त्यांना पुष्कळ दुखापत झाली.

गुरुदेवांच्या (गुुुरुदेव डॉ. काटेस्वामीजी यांच्या) शब्दाशब्दांतून जाणवणारी ज्वलंत धर्मनिष्ठा, सनातन धर्म पुनर्प्रतिष्ठापनेसाठी कमालीची अधीरता, ही साक्षात् देवांनाही दिपवून टाकील. - (घनगर्जित, जानेवारी २०१२)


उच्च आध्यात्मिक कार्यास्तव देवतादींनी पृथ्वीवर स्वेेच्छेने घेतलेले अवतार आणि प्रारब्धाच्या बंधनात अडकल्यामुळे ते फेडण्यासाठी मनुष्याला मिळणारा पुनर्जन्म !

पू. डॉ. चारुदत्त पिंगळे
- (पू.) डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती. (१४.९.२०१६)

साधकांच्या शिबिरामध्ये आणि संतांच्या मागर्र्दर्शनातून शिकायला मिळालेली सूत्रे

कु. रश्मी परमेश्‍वरन
१. अंतर्मुख करणे
     रामनाथी आश्रमात प्रसारातील साधकांसाठी शिबीर झाले. या शिबिरातील सर्व सत्रांतून प्रत्येकाने अंतर्मुख झाले पाहिजे आणि साधनेच्या दृष्टीने प्रत्येक उपक्रमातून स्वतःमध्ये कोणते पालट करायचे ? कोणते दोष-अहं न्यून करायचे ? किंवा कोणता गुण वृद्धींगत करायचा ?, यांवर सर्व संतांनी चिंतन करण्यास सांगून साधकांना साधनेसाठी प्रेरित केले. शिबिरात मधे मधे प्रार्थना किंवा भावजागृतीचे प्रयोग करून घेत होते. त्यामुळे शिकण्याच्या स्थितीत रहाता आले आणि कृतज्ञता भावही जागृत रहाण्यासाठी साहाय्य मिळाले.
२. श्री. रमानंद गौडा यांनी अभ्यास करण्यासंदर्भात सांगितलेली महत्त्वाची सूत्रे
अ. स्वतःचा अभ्यास म्हणजे व्यष्टी साधना होय.
आ. प्रत्येक कृती करणे म्हणजे सेवेचा अभ्यास, नियोजन, चुका कळणे आणि शिकायला मिळालेली सूत्रे.
इ. सनातनचे ग्रंथ आणि सनातन प्रभातचा अभ्यास करावा.
ई. साधक आणि धर्माभिमानी यांच्या प्रकृतीचा अभ्यास करून त्यांना गुरुकार्याशी जोडावे.
३. पू. पिंगळेकाकांच्या मार्गदर्शनामुळे निधीसंकलनाची सेवा करण्यास स्फूर्ती मिळणे
     पू. पिंगळेकाकांनी शिबिरात धर्मकार्यासाठी निधीसंकलन हा विषय घेतला आणि ही सेवा आध्यात्मिक स्तरावर झाली पाहिजे, असे सांगितले.

कृतज्ञ ! कृतज्ञ !! कृतज्ञ !!!

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त...

कृतज्ञ आहे गुरुमाऊली । मानव देह देऊनी ।
साधना शिकवण्यासाठी ॥ १ ॥

कृतज्ञ आहे गुरुमाऊली । लहानपणापासून सांभाळ करून ।
रक्षण केल्याविषयी ॥ २ ॥

कृतज्ञ आहे गुरुमाऊली । असा भाऊ दिल्याबद्दल ।
ज्याने साधनेत आणून तुमचे (टीप १) महत्त्व सांगितले ॥ ३ ॥

कृतज्ञ आहे गुरुमाऊली । अशी बहीण दिल्याबद्दल ।
जिने सदैव आईप्रमाणे । समजून घेतल्याबद्दल ॥ ४ ॥

कृतज्ञ आहे गुरुमाऊली । असे सर्व साधक दिल्याबद्दल ।
ज्यांनी भरभरून प्रेम, माया दिली ।
आणि वेळप्रसंगी पाठीशी उभे राहिले ॥ ५

सभाधीट, उत्तम स्मरणशक्ती असलेला आणि इतरांचा विचार करणारा ५५ टक्के आध्यात्मिक पातळीचा उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेेला कु. जयेश आेंकार कापशीकर (वय १० वर्षे) !

कु. जयेश कापशीकर
     (वर्ष २०११ मध्ये कु. जयेश याची आध्यात्मिक पातळी ५१ टक्के असल्याचे घोषित करण्यात आले. - संकलक)
    भाद्रपद कृष्ण पक्ष त्रयोदशी (२८.९.२०१६) या दिवशी कु. जयेश कापशीकर याचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्याच्या वडिलांना त्याची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत. 
कु. जयेश आेंकार कापशीकर याला वाढदिवसानिमित्त 
सनातन परिवाराच्या वतीने शुभाशीर्वाद !
१. चांगली स्मरणशक्ती 
१ अ. गीतेतील अध्याय १ - २ दिवसांत पाठ होणे : जयेश एखादी गोष्ट किंवा ठिकाण अचूक लक्षात ठेवतो. त्याचे पाठांतरही चांगले आहे. सुटीत आजीकडे गेल्यावर गीतेचा एक अध्याय पाठ करणे, हा त्याचा सुटीतील कार्यक्रम असतो. त्याचे पाठांतर चांगले असल्याने १-२ दिवसांत अध्याय पाठ होतो.

बाहेर ठेवलेले अन्न बहुतांश पशू-पक्ष्यांनी अमावास्येला न खाणे; पण इतर दिवशी खाणे

     आमच्या परसात (घराच्या आवारात) खारी, चिमण्या, बुलबुल पक्षी आणि भारद्वाज येतो. प्रतिदिन ते बसून आनंदाने मिळून-मिसळून अन्न खातात; पण अमावास्येला बाहेर ठेवलेले अन्न कुणीही खात नाही, क्वचित रात्री उंदीर संपवतात. अमावास्येला बाहेर ठेवलेले अन्न गाईसुद्धा खात नाहीत. - पुष्पांजली

देवद आश्रमातील संत आणि साधक यांच्याविषयी जाणवलेली सूत्रे

कु. नंदा सदानंद नाईक
१. संत
अ. देवद आश्रमातील सर्व संत सर्वांना नमस्कार करतात. ते स्वतःहून प्रत्येक साधकाची ओळख करून घेतात. त्यांच्याशी बोलतांना संतांशी बोलत आहे, असे वाटत नाही. ते सर्व साधकांशी मिळून मिसळून वागतात.
आ. काही संत बांधणीची सेवा करतात. त्यांना ही सेवा कशी करायची ?, असे वाटत नाही. संतांना न्यूनपणा घेण्याची सवय आहे. त्यातूनच त्यांचा मोठेपणा दिसून येतो.
२. साधक
अ. देवद आश्रमात वयस्कर साधकांची संख्या अधिक आहे. तिथे वयस्कर साधकही सतत सेवा करत असतात. ते सतत शिकण्याच्या भूमिकेत असतात.
आ. देवद आश्रमात तरुण साधकांची संख्या अल्प असल्याने काही वयस्कर साधक अनेक सेवा उत्साहाने करतात.
इ. येथील साधक सतत हसतमुख असतात. त्यांचे विचार एकमेकांशी लगेच जुळतात. ते एकमेकांना साहाय्य करतात. ते कुठेही वेळ वाया घालवत नाहीत.
ई. प्रत्येक दिवशी ३ - ४ साधक भोजनकक्षात सर्वांसमोर चुका सांगतात आणि कान पकडून क्षमा मागतात.
उ. प्रसारातील साधकांना आश्रमात जेव्हा बोलावले जाते.

व्यष्टी साधनेसाठी जपयज्ञ, तर समष्टी साधनेसाठी यज्ञ-याग आवश्यक आहेत; म्हणून सनातन संस्था हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी महर्षींच्या आज्ञेनुसार, तसेच काही संत अनेक यज्ञ-याग करत आहेत. - (परात्पर गुरु) डॉ. आठवले


योग्य दक्षिणा घेऊन किंवा दक्षिणा न घेता शास्त्रोक्त पद्धतीने धार्मिक विधी करण्यास इच्छुक पुरोहितांनी पौरोहित्याच्या सेवेत सहभागी व्हावे !

ब्राह्मतेज प्रदान करणार्‍या सेवेत सहभागी होण्याची सर्वत्रच्या पुरोहितांना सुवर्णसंधी !
१. यज्ञ हे एक वरदानच !
     श्रीमद् भगवद्गीतेत श्रीकृष्णाने यज्ञाला कामधेनू म्हटले आहे. पुरोहितांनी एकाग्रतेने केलेल्या शास्त्रोक्त मंत्रपठणामुळे वायूमंडलाची शुद्धी तर होतेच; पण व्यक्ती, समाज आणि राष्ट्र या सर्वांनाही त्या मंत्रशक्तीचा लाभ होतो. अवर्षणादी नैसर्गिक प्रकोपांना रोखून पर्जन्यवृष्टी करण्याचे सामर्थ्य यज्ञयागात आहे. यज्ञ हे भारतीय संस्कृतीला लाभलेेले फार मोठे वरदानच आहे.
२. सनातन साधक-पुरोहित पाठशाळेच्या स्थापनेचा व्यापक उद्देश !
    यज्ञसाधनेचे अनन्यसाधारण महत्त्व लक्षात घेऊन सनातन संस्थेने वर्ष २००९ मध्ये सनातन साधक-पुरोहित पाठशाळेची स्थापना केली. विविध विधींच्या माध्यमातून समाजाला साधनेकडे वळवणे आणि आदर्श अन् सात्त्विक पुरोहितांना घडवून त्यांची संतपदाकडे वाटचाल करून घेणे, हा या स्थापनेमागील उद्देश होता.
३. महर्षि आणि संत यांच्या मार्गदर्शनानुसार जप, अनुष्ठाने अन् धार्मिक
विधी सेवाभावाने आणि विनामूल्य करणारे साधक-पुरोहित !
     सनातनच्या वेदपाठशाळेत साधक-पुरोहितांना शुद्ध आणि स्पष्ट मंत्रोच्चारण करण्यास शिकवले जाते. त्यामुळे त्यांच्या वाणीत चैतन्य आणि मंत्रांत सामर्थ्य निर्माण झाले आहे.
     हिंदु राष्ट्र स्थापनेतील अडथळे दूर व्हावेत, यासाठी संतांच्या मार्गदर्शनानुसार सर्व साधक-पुरोहित प्रतिदिन जप-अनुष्ठाने करत आहेत.

शास्त्रशुद्ध पद्धतीने पौरोहित्य करण्यासह आध्यात्मिक प्रगतीसाठी मार्गदर्शन करणार्‍या सनातन साधक-पुरोहित पाठशाळेत पूर्णवेळ प्रवेश घेण्यासाठी संपर्क करावा !

पौरोहित्याचे शिक्षण घेण्यास इच्छुक साधकांना सूचना आणि वाचक,
हितचिंतक अन् धर्मप्रेमी यांना नम्र विनंती !
१. साधना म्हणून वेदाध्ययन करण्यास शिकवणारी सनातनची वेदपाठशाळा !
     धर्माचरणी समाज घडवण्यासाठी सनातन संस्थेने आरंभलेला शुद्धीयज्ञ म्हणजे सनातन साधक-पुरोहित पाठशाळा ! बहुमूल्य सांस्कृतिक ठेवा असणारे वेदशिक्षण घेता घेता पुरोहितांची सर्वांगीण आध्यात्मिक उन्नतीही व्हावी, यासाठी या पाठशाळेत प्रामुख्याने प्रयत्न केले जातात. अर्थार्जनासाठी नव्हे, तर साधना म्हणून शास्त्रशुद्ध पद्धतीने पौरोहित्य करण्यास शिकवणारी ही एकमेव पाठशाळा आहे.
२. साधक-पुरोहितांमधील मंत्रसामर्थ्य आणि साधनेचे
बळ यांमुळे विधीनंतर यजमानांची उद्देशपूर्ती होणे
      प.पू. डॉक्टरांचा वेदपाठशाळेच्या स्थापनेमागील संकल्प फलद्रूप होण्यासाठी सर्व साधक-पुरोहित निष्काम भावाने आणि सेवाभावी वृत्तीने विधी अन् अनुष्ठाने करत आहेत. साधना बळामुळे त्यांनी केलेल्या धार्मिक विधींनंतर त्यामागील उद्देश सफल होत असल्याची अनुभूतीही आतापर्यंत अनेकांनी घेतलेली आहे. विधीनंतर उद्देशपूर्ती होणे, ही साधक-पुरोहितांनी भावपूर्णरित्या केलेल्या पौरोहित्य कर्माची पोचपावतीच आहे !
३. सनातन साधक-पुरोहित पाठशाळेत प्रवेश घेण्यास
इच्छुक असलेल्यांनी पुढील निकष लक्षात घ्यावेत !
      अशा विविध वैशिष्ट्यांनी युक्त असलेली आणि वेदाध्ययन करता करता साधक-पुरोहित ते संत-पुरोहित असा आध्यात्मिक प्रवास करून घेणारी ही पाठशाळा एकमेवाद्वितीय आहे.

और्ध्वदेहिक संस्कारांचे (अंत्यसंस्कारांचे) महत्त्व !

गृहस्थाच्या मृत्यूपत्राप्रमाणे मृत्यूत्तर संस्कार न केल्याने 
त्याचे हाल होत असल्याचे त्याने एका ख्रिस्ती मुलाच्या माध्यमातून सांगणे आणि त्यांच्या 
मुलाने ते ऐकल्याने त्यांनी स्वतःच्या सुनेच्या माध्यमातून सांगितल्यावर मुलाचे डोळे उघडणे
       पुण्याला लक्ष्मी रस्त्यावर एक श्रीमंत गृहस्थ रहात होते; परंतु त्यांना धर्माविषयी आदर नव्हता. त्यांनी अनेक संस्थांना देणग्या दिल्या होत्या. त्यांनी स्वतःच्या मृत्यूपत्रात लिहून ठेवले, माझ्या मृत्यूनंतर कोणतेही संस्कार हिंदु पद्धतीने करू नयेत. पुढे ते गृहस्थ वारले. मृत्यूपत्राप्रमाणे त्यांच्या मुलाने त्यांचे और्ध्वदेहिक संस्कार (अंत्यसंस्कार) केले नाहीत. मृत झालेल्या त्या गृहस्थाने ज्या ख्रिस्ती मुलाला स्वतःच्या घरात जागा दिली होती, त्याच्या पत्नीच्या माध्यमातून त्यांनी मी या घराचा मालक आहे. माझ्या मुलाला बोलवा, असे सांगितले. त्यांचा मुलगा मुंबईला होता. तो आल्यावर ते म्हणाले, मी मरून ४ ते ६ मास (महिने) झाले; पण अंत्यसंस्कार न केल्यामुळे माझे अत्यंत हाल होत आहेत. मला अन्नाचे ढीग दिसतात; पण एक कणही पोटात जात नाही. पाण्याचे प्रचंड साठे आहेत; पण थेंबही पाणी पोटात जात नाही. मी एवढ्या संस्थांना देणग्या दिल्या; पण त्याचा काहीही उपयोग होत नाही. त्यांच्या मुलाला हे पटले नाही आणि काही न करताच तो परत गेला. पुढे त्या गृहस्थांनी सुनेच्या माध्यमातून हेच सांगितले, तेव्हा मुलाचे डोळे उघडले. त्यानंतर तो मुलगा प.पू. काणे महाराज यांच्याकडे येताच महाराजांंनी त्याला सांगितले, अंत्यसंस्कार हे करायलाच हवेत, नाहीतर हाल होतात. 
(संदर्भ : सदाचार आणि संस्कृती, जुलै २०१५)

नामस्मरण न केल्यास काशीमध्ये मरण येऊनही मुक्ती मिळत नाही, याचे एक उदाहरण !

     काश्यां हि मरणान्मुक्तिः स्मरणादरुणाचलम् ।
     श्रीशैलशिखरं दृष्ट्वा पुनर्जन्म न विद्यते ॥
      वरील श्‍लोकाचा बाह्यार्थ पाहिला, तर काशीक्षेत्रात मृत्यू आल्यास मुक्ती मिळते, अरुणाचलाच्या स्मरणाने मुक्ती मिळते आणि श्रीशैल्यशिखराचे दर्शन घेतल्यास पुनर्जन्म होत नाही, असा आहे; परंतु प्रचीती मात्र उलट येते, असा अनुभव प.पू. काणे महाराज यांनी काशीयात्रेच्या वेळी घेतला. 
     तेथील एक वैदिक ब्राह्मण पंडित पटकीच्या (कॉलर्‍याच्या) साथीत कालवश झाले. त्यांचे और्ध्वदेहिक संस्कारही (अंत्यसंस्कार) होऊ शकले नाहीत. पुढे ते एकाच योनीत अनुमाने १० वर्षे राहिले. प.पू. काणे महाराज जेव्हा काशीयात्रेसाठी गेले, तेव्हा अडकलेल्या पंडितांनी त्यांना विनंती केली, आम्हाला या योनीतून मुक्त करा. त्याप्रमाणे प.पू. काणे महाराजांनी शिष्याकरवी संस्कार करवून त्यांना त्या योनीतून मुक्त केले.

सर्वत्रचे साधक आणि आश्रमसेवक यांना सूचना

घरी अथवा आश्रमात शुभसंकेत दर्शक प्राणी-पक्षी दिसणे, विशिष्ट प्राणी-पक्षी मरून 
पडणे, अकस्मात् झाडे सुकणे आदी घटना घडल्यास त्याची सविस्तर माहिती कळवा !
     सध्या रामनाथी आश्रमात साधकांना गरुड, भारद्वाज आदी पक्ष्यांचे, वानर, मुंगूस यांसारख्या प्राण्यांचे दर्शन होत आहे. त्याचप्रमाणे बहरलेले झाड अकस्मात् सुकणे, पुष्कळ पानगळती होणे, विशिष्ट प्राणी-पक्षी आपोआप मरून पडणे आदी त्रासदायक घटनाही घडत आहेत. बाह्यतः शुभ भासणार्‍या काही घटना त्रासदायक, तर अशुभ वाटणार्‍या घटना प्रत्यक्षात शुभ असल्याचे काही वेळा लक्षात येते. या घटनांमागील वैज्ञानिक आणि आध्यात्मिक कारणांचे संशोधन करणे आवश्यक ठरते.
     रामनाथी आश्रमाप्रमाणे अन्य आश्रमांत, सेवाकेंद्रांत तसेच साधकांच्या निवासस्थानी काही वैशिष्ट्यपूर्ण घटना घडल्यास त्याविषयीची माहिती पुढील सारणीनुसार श्री. अमोल बधाले यांच्या नावे sankalak.goa@gmail.com या संगणकीय पत्त्यावर अथवा टपाल पत्त्यावर पाठवावीत. (टपालासाठी पत्ता : श्री. अमोल बधाले, सनातन आश्रम, २४/बी, रामनाथी, बांदिवडे, फोंडा, गोवा.)
     घटनेची छायाचित्रे अथवा व्हिडिओ उपलब्ध असल्यास तेही माहितीसमवेत पाठवावेत. (२५.९.२०१६)

सनातन प्रभातसाठी संपादकीय साहाय्य करू इच्छिणारे साधक, वाचक, हितचिंतक आणि धर्मप्रेमी यांच्यासाठी सुवर्णसंधी !

राष्ट्र-धर्म रक्षणार्थ कार्यरत असलेल्या 
सनातन प्रभातच्या संपादनाच्या सेवेत सहभागी व्हा !
        वाचकांत राष्ट्रप्रेम जागवणारे, अल्पावधीत त्यांच्यात साधनाबीज रोवणारे एकमात्र दैनिक म्हणून सनातन प्रभातची ख्याती आहे. गेल्या ३ वर्षांपासून या दैनिकाने पृष्ठसंख्या वृद्धी केली असून त्यामुळे राष्ट्र, धर्म आणि अध्यात्म यांविषयीची वाचनीय सदरे वाचकांना उपलब्ध होत आहेत. यापुढेही दैनिकाची पृष्ठसंख्या प्रतिदिन १० पानी करण्याचा प्रयत्न आहे; मात्र अपुरे मनुष्यबळ, वाढती पृष्ठसंख्या यांमुळे संपादनाच्या सेवेसाठी उपलब्ध साधकसंख्या अपुरी पडत आहे.
        या दृष्टीकोनातून मराठी किंवा संस्कृत भाषेचे ज्ञान असणे, तसेच या विषयांचे शिक्षक अथवा प्राध्यापक, तसेच संपादकीय सेवेचा पूर्वानुभव असलेल्यांना सनातन प्रभातसाठी पूर्णवेळ अथवा अर्धवेळ संपादकीय संस्करणाची सेवा करण्याची संधी गोवा, पनवेल, पुणे, जळगाव, सांगली, मुंबई या ठिकाणी राहून उपलब्ध आहे.

सनातन प्रभातसाठी वार्तांकन करू इच्छिणारे साधक, वाचक आणि धर्मप्रेमी यांच्यासाठी सुवर्णसंधी !

८ आणि ९ ऑक्टोबर २०१६ या दिवशी 
रामनाथी आश्रमात आयोजित करण्यात आलेल्या 
वार्ताहर प्रशिक्षण शिबिरात सहभागी व्हा !
        सनातन प्रभात म्हणजे ज्वलंत हिंदुत्व आणि हिंदु राष्ट्राची स्थापना यांचा वसा घेतलेले एकमेव नियतकालिक ! सनातन प्रभातमध्ये प्रतिदिन राष्ट्र आणि धर्म यांवरील संकटांविषयी जागृती करणारी वृत्ते, लेख, तसेच अन्य लिखाण प्रसिद्ध केले जाते.
१. वार्तांकन करण्यास शिकून अर्धवेळ 
किंवा पूर्णवेळ वार्ताहराची सेवा करण्यास इच्छुक 
असलेल्यांसाठी रामनाथी आश्रमात शिबिराचे आयोजन !
        प्रतिदिन घडणार्‍या राष्ट्र-धर्म विरोधी घटनांचे वार्तांकन करण्यासाठी मुंबई, पुणे, कोल्हापूर, सोलापूर, संभाजीनगर, नागपूर, जळगाव आदी प्रमुख शहरांमध्ये वृत्तसंकलनाच्या सेवेसाठी पूर्णवेळ वार्ताहर, तर अन्य जिल्ह्यांमध्ये अर्धवेळ वार्ताहर आवश्यक आहेत. सनातन प्रभातसाठी वार्तांकन करण्याची इच्छा अनेक साधक, वाचक, धर्मशिक्षणवर्गातील युवक, धर्मप्रेमी आदींनी व्यक्त केली आहे. आपल्या जिल्ह्यात किंवा प्रमुख शहरांमध्ये अर्धवेळ अथवा पूर्णवेळ वृत्तसंकलनाची सेवा करण्याची ज्यांची इच्छा आहे, त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी ८ आणि ९ ऑक्टोबर २०१६ या दिवशी रामनाथी, गोवा येथील सनातन आश्रमात वार्ताहर प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

साधकांना सूचना

       पौर्णिमा आणि अमावास्या या तिथींना प्रार्थना, नामजप, तसेच साधना अधिकाधिक करा.
प्रारंभ - भाद्रपद कृष्ण पक्ष चतुर्दशी (२९.९.२०१६)
उ.रात्री ३.५६ वाजता
समाप्ती - भाद्रपद अमावास्या (१.१०.२०१६) पहाटे ५.४१ वाजता
दोन दिवसांनी अमावास्या आहे.
हिंदु ऐक्यासाठी संकेतस्थळाला भेट द्या !
English : www.hindujagruti.org

फलक प्रसिद्धीकरता

पाक समर्थक काँग्रेसचे 
आणखी एक देशद्रोही कारस्थान !
        उत्तरप्रदेशच्या मुरादाबाद येथील ठाकुरद्वारा पोलीस ठाण्यात पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा देणार्‍या काँग्रेसच्या २०० कार्यकर्त्यांच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा प्रविष्ट करण्यात आला आहे. २४ सप्टेंबरला कार्यकर्त्यांनी या घोषणा दिल्या होत्या.

हिंदू तेजा जाग रे !

Jago ! : UPke Muradabadme Pakistan Zindabadki ghoshnaye denewale 200 Congressiyopar Deshdrohka aparadh pravisht.
Aise deshdrohiyoko Pakme bhejne ki mang kare!
जागो ! : उत्तरप्रदेश के मुरादाबाद में पाकिस्तान जिंदाबाद की घोषणाएं देनेवाले २०० कांग्रेसियों पर देशद्रोह का अपराध प्रविष्ट ! 
ऐसे देशद्रोहियों को पाक में भेजने की मांग करें !

बोधचित्र

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले
     'पाच ज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडे ज्ञान देणारे सूक्ष्मातील काहीतरी आहे, हे ज्ञात नसल्याने विज्ञानवाद्यांचे संशोधन पोरखेळासारखे असते !'  - (परात्पर गुरु) डॉ. आठवले 

॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥
या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो. - प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे


॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज
सनातनचे श्रद्धास्थान
दिशा
माझ्याकडे उत्तर आहे; कारण मी दक्षिणेकडे पाठ फिरविली आहे.
भावार्थ अ :
दक्षिण दिशा यमलोकाची आहे. तिच्याकडे पाठ फिरविली आहे म्हणजे मी उत्तरेकडे, यमलोकापासून दूर जात आहे. माझ्याकडे यमलोक कसा चुकवायचा, या प्रश्‍नाचे उत्तर आहे, या अर्थी माझ्याकडे उत्तर आहे, हे वाक्य आहे.
भावार्थ आ : पूर्व दिशा ज्ञानयोगाची, पश्‍चिम कर्मयोगाची, दक्षिण शक्तीयोगाची आणि उत्तर भक्तीयोगाची आहे. या संदर्भात मी शक्ती-उपासक नसून भक्तीमार्गी आहे, हे सुचविले आहे.
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.)

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

समर्पित व्हा ! 
इतरांना प्रकाश देण्यासाठी ज्योत सतत तेवत रहाते. तोच आदर्श समोर ठेवावा 
आणि गरजू लोकांसाठी आपले जीवन समर्पित करावे ! 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

वारे निवडणुकीचे !

संपादकीय 
      येत्या काही महिन्यांत गोवा, उत्तरप्रदेश, पश्‍चिम बंगाल आदी राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. विविध पक्षांची आपापल्या परिने सिद्धता चालू आहे. अत्यंत नियोजनबद्ध रितीने आखलेल्या विकासकामांचे आता निवडणुकीच्या तोंडावर उद्घाटन करण्याचे सत्रच चालू झाले आहे. पक्षातील मोठमोठ्या नेत्यांच्या सभा, मुलाखती सर्वत्र चालू आहेत. एकूणच निवडणूक जवळ आल्याचे वातावरण आहे. उत्तरप्रदेशमध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपची धावपळ चालू आहे, तर गोव्यात सत्ता टिकवण्यासाठी ! उत्तरप्रदेशातील जनता महागाई, मागासलेपणा, रोगराई, हिंसाचार यांनी पिचली आहे. भ्रष्ट कुटुंबियांनी चालवलेला राज्यशकट आता जनतेच्या मानेवरील जू झाला आहे. त्यामुळे तेथे सत्तापालट संभव आहे. सत्तांतर झाल्याने परिवर्तन होईल, असे थेट म्हणता येत नाही. कोणताही राजकीय पक्ष सत्तास्थानी असला, तरी विशेष फरक पडत नाही, हे आतापर्यंत आलेल्या बर्‍या-वाईट अनुभवांतून उघडच झाले आहे; मात्र राष्ट्रहिताच्या दृष्टीकोनातून या सर्वाकडे पाहून योग्यायोग्याची समाजाला जाणीव या निमित्ताने होत असते. तसा निवडणुकांचा उपयोग तेवढाच होतो.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn