Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

रक्त आणि पाणी एकत्र वाहू शकत नाहीत !

  • पंतप्रधान मोदी यांनी पाकला मिळणारे पाणी रोखावे आणि पाकमध्ये आतंकवाद्यांच्या रक्ताचे पाट वहावेत, अशीच जनतेची इच्छा आहे !
  • पंतप्रधान मोदी यांचे सिंधु पाणीवाटप करारावर विधान
        नवी देहली - २६ सप्टेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिंधु पाणी वाटप कराराच्या संदर्भात एका बैठकीचे आयोजन केले होते. यात शासनाचे वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले होते. या वेळी पंतप्रधान मोदी म्हणाले की, रक्त आणि पाणी एकत्र वाहू शकत नाही. आम्ही या कराराच्या पुनर्विचारावर गंभीर आहोत. मोदी पुढे म्हणाले की, आतापर्यंत पाकसमवेत ११२ बैठका घेण्यात आल्या; मात्र आता आतंकवादाच्या छायेखाली चर्चा होऊ शकत नाही. (भारतीय शासनाला उशिरा सुचलेले शहाणपण ! - संपादक)
        या बैठकीत अधिकार्‍यांनी करार रहित न करता भारत त्याचा पाण्याचा हिस्सा या नद्यांमधून घेऊ शकतो. तेवढे पाणी रोखता येऊ शकते. आतापर्यंत हे पाणी भारत पाकला कराराच्या व्यतिरिक्तच देत आहे. हे पाणी रोखले, तर ६ लाख हेक्टर क्षेत्रात सिंचन केले जाऊ शकते. तसेच यातून १८ सहस्र मेगावॅट वीजनिर्मितीही होऊ शकते. सध्या येथून केवळ ३ सहस्र मेगावॉट विजेची निर्मिती केली जाते. या दोन्ही गोष्टींची कार्यवाही केली, तर जम्मू-कश्मीर राज्याची पाणी आणि सिंचन यांची समस्या कायमची दूर होईल. (आतापर्यंतच्या सरकारांनी भारताच्या वाटणीचे पाणी रोखून त्याचा वापर का केला नाही आणि आता उरी येथील आक्रमणानंतर सरकार याचा विचार करत आहे, हे भारताला लज्जास्पदच होय ! - संपादक) सिंधु पाणीवाटप करार वर्ष १९६० मध्ये जागतिक बँकेच्या मध्यस्थीमुळे भारत आणि पाक यांच्यात झाला होता. यात रावी, चिनाब आणि सतलज या नद्यांचे पाणी भारताकडून पाकला मिळेल आणि सिंधु, झेलम या नद्यांचे पाणी भारताला मिळेल. हा करार तोडला, तर पाकमध्ये पाण्याचे दुर्भिक्ष्य निर्माण होईल; मात्र हे पाणी अडवण्यासाठी भारताला काही वर्षे प्रयत्न करावे लागतील.

(म्हणे) युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्था उद्ध्वस्त होईल ! - भुकेकंगाल पाकचा दावा

        नवी देहली - भारत आणि पाक यांच्यात युद्ध होणार नाही. पाकची युद्ध करण्याची कोणतीही इच्छा नाही; मात्र या वेळी युद्ध झाल्यास भारतीय अर्थव्यवस्था उद्ध्वस्त होईल, याची जाणीव भारतालाही आहेच, असे मत पाकच्या एका उच्चस्तरीय राजनैतिक अधिकार्‍याने व्यक्त केले आहे. (युद्ध झालेच, तर भारतीय अर्थव्यवस्था उद्ध्वस्त होण्याऐवजी पाक संपूर्णपणे उद्ध्वस्त होईल, हे वास्तव पाकच्या अधिकार्‍यांना माहीत असून ते लपवण्यासाठी भारताच्या हानीविषयी ते बोलत आहेत, हा त्यांचा केवळ धूर्तपणा आहे ! - संपादक) पाकला एकटे पाडण्याची कल्पना ही प्रत्यक्षात उतरणे शक्य नसल्याचेही या अधिकार्‍याने म्हटले. उलटपक्षी या प्रयत्नामधून भारतच एकाकी पडण्याचा धोका असल्याची चेतावणीही त्याने दिली. (भारताच्या विरोधात अपप्रचार करण्याची पाकच्या अधिकार्‍यांची खोड जगप्रसिद्ध आहे, याचेच हे उदाहरण ! - संपादक)

भारतीय आक्रमणाच्या भीतीने पाकने आतंकवादी प्रशिक्षणकेंद्रांचे स्थलांतर केले !

डावपेचात भारतापेक्षा हुशार असलेला पाकिस्तान ! 
भारताने जरी आता पाकवर आक्रमण केले, तरी 
आतंकवाद्यांच्या प्रशिक्षणकेंद्रांना काहीही हानी होणार नाही !
        नवी देहली - उरी येथील आतंकवादी आक्रमणानंतर भारताकडून पाकमधील आतंकवादी प्रशिक्षणकेंद्रावर आक्रमण होण्याच्या भीतीने पाकने १६-१७ प्रशिक्षण केंद्रे स्थलांतरित केली आहेत, अशी माहिती गुप्तचर विभागाने दिली आहे. ही प्रशिक्षणकेंद्रे लष्कर-ए-तोयबा, जैश-ए-महंमद आणि हिजबुल मुजाहिदीन यांची असल्याचे सांगण्यात येत आहे. ही केंद्रे प्रत्यक्ष नियंत्रणरेषेजवळून आणि पाकव्याप्त काश्मीरमधून पाकच्या आतील भागात नेण्यात आली आहेत. पाकचे सैन्य आणि आयएस्आय ही गुप्तचर संस्था यांच्या साहाय्याने ती स्थलांतरित करण्यात आली आहेत. मनसेहरा आणि मुझफ्फराबाद येथील ४ केंद्रे स्थलांतरित करण्यात आली आहेत. काही केंद्रांना सैन्याच्या तळांमध्ये स्थलांतरित करण्यात आले आहे.

ऑस्ट्रेलियातील खलिस्तानवाद्याकडून फेसबूकद्वारे हिंदु देवतांचा अवमान

पंजाबमध्ये २० 
हिंदुत्वनिष्ठ संघटनांकडून आंदोलन !
       फिरोजपूर (पंजाब) - खलिस्तानवादी विचारसरणीचे ऑस्ट्रेलियात रहाणारे गुरजंट सिंह यांनी त्यांच्या फेसबूक खात्यावरून भगवान परशुराम, भगवान शिव, भगवान श्रीराम, ब्रह्मदेव यांच्याविषयी अश्‍लाघ्य भाषेत मजकूर लिहून अवमान केल्याने येथे २० हिंदुत्वनिष्ठ संघटनांकडून २४ सप्टेंबरला निषेध करण्यात आला. या संघटनांनी येथे गुरजंट सिंह यांच्या विरोधात निदर्शने केली आणि गुजरंट सिंह यांच्यावर गुन्हा प्रविष्ट करून त्यांना भारतात आणले पाहिज, अशी मागणी केली.
       अशा प्रकारे पंजाबमध्ये हिंदु आणि शीख यांच्यात दुरावा निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यातून येथे अशांती निर्माण होईल; मात्र आम्ही हे सहन करणार नाही, असे या संघटनांनी राष्ट्रपती, पंतप्रधान, विदेश मंत्रालय आदींना इमेलद्वारे या अवमानाविषयी कळवले आहे.

प्रयाग, वाराणसी आणि गया येथे पुरोहितांकडून आता ऑनलाईन पिंडदान आणि अस्थीविसर्जन यांची सुविधा !

  • शास्त्रानुसार कृती करण्याचे सोडून आर्थिक लाभासाठी अशा पद्धतीच्या सवलती निर्माण करणारे आणि लोकांची फसवणूक करणारे पुरोहित हिंदु धर्माचे खरे वैरी होत !
  • श्राद्ध करणे अशक्य असणार्‍यांना धर्मशास्त्राने सहज साध्य होणारे अनेक पर्याय दिले असतांना अशा प्रकारचा धर्मशास्त्र विरोधी पर्याय सांगणारे आणि तसे हिंदूंकडून करून घेणारे पुरोहित धर्मद्रोहीच होत ! 
     मुंबई - पितृपक्षात सर्वांना श्राद्ध करणे शक्य होत नाही. या सर्वावर तोडगा म्हणून प्रयाग, गया, वाराणसी या भागांतील काही पुरोहितांना एकत्र येऊन पिंडदान, श्राद्ध, अस्थीविसर्जन, नारायण नागबळी यांसारख्या सुविधा ऑनलाइन उपलब्ध करून दिल्या आहेत. (पूर्वजांना गती मिळावी, यासाठी करण्यात येणार्‍या पिंडदानासारख्या धार्मिक कृतीसाठीही वेळ काढू न शकणारे जन्महिंदू ! वरील विधी ऑनलाईन करून त्याचा लाभ कसा होईल ? - संपादक) यंदाच्या पितृपक्षात या सुविधेमुळे आभासी पिंडदानाचा नवा पायंडा पडल्याचे काही पुरोहितांना सांगितले आहे. ही ऑनलाइन सेवा मागच्या वर्षीपासून चालू झाली असली, तरी यंदा त्याला चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. सर्वाधिक प्रतिसाद गुजरात, महाराष्ट्र आणि दक्षिण भारतातून मिळत आहे. प्रत्येक प्रांतानुसार हे धार्मिक विधि करण्यासाठी वेगवेगळे पुरोहित नेमण्यात आले आहेत.

हिंदूंवरील आघात परतवून लावण्यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना करणे आवश्यक ! - श्री. जगजीतन पाण्डेय, महामंत्री, अखिल भारतीय धर्म संघ

वाराणसी येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने हिंदु धर्मजागृती सभा
डावीकडून श्री. गुरुराज प्रभु, सौ. प्राची जुवेकर, 
श्री. जगजीतन पाण्डेय, अधिवक्ता श्री. कमलेशचंद्र 
त्रिपाठी आणि श्री. नीलेश सिंगबाळ 
    काशी (वाराणसी) - निधर्मीवाद्यांकडून लोकांना भाषा, संप्रदाय आणि जातपात यांच्यात गुंतवून जाणीवपूर्वक हिंदु धर्म, रूढी आणि परंपरा यांना नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. चित्रपट, विज्ञापने यांच्या माध्यमातून मानवाला हिंदूंच्या देवतांच्या रूपात दाखवून त्यांचा अवमान करण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. त्याचसमवेत प्रलोभने देऊन हिंदूंचे धर्मांतर करण्यात येत आहे. हे थांबवण्यासाठी हिंदूंनी संघटित होऊन हिंदु राष्ट्राची स्थापना करणे आवश्यक आहे.

जॉर्डनमध्ये अवमानकारक व्यंगचित्रावरून ख्रिस्ती लेखकाची हत्या !

      अम्मान (जॉर्डन) - जॉर्डनचे प्रसिद्ध ख्रिस्ती लेखक नाहेद हत्तार (वय ५६ वर्षे) यांची २५ सप्टेंबर या दिवशी धर्मांधांकडून न्यायालयाबाहेर ३ गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. इस्लामचा अपमान करणारे व्यंगचित्र फेसबूकवर शेअर केल्याचा त्यांच्यावर आरोप होता. त्या खटल्यासाठीच ते न्यायालयात आले होते, असे जॉर्डनची अधिकृत वृत्तसंस्था पेट्रोने म्हटले आहे. त्यांच्या मारेकर्‍याला अटक करण्यात आली आहे. 
     जॉर्डनच्या अनेक मुसलमानांना ते व्यंगचित्र अपमानकारक आणि त्यांच्या धर्माविरुद्ध असल्याचे वाटले. ते व्यंगचित्र मोठ्या प्रमाणावर शेअर करून हत्तार यांनी कायद्याचे उल्लंघन केले, असे अधिकार्‍यांनी म्हटले.

श्री क्षेत्र मंत्रालय (आंध्रप्रदेश) येथील स्वामी श्री श्री सुबुधेन्द्र तीर्थ यांच्या हस्ते कन्नड सनातन पंचांग २०१७ चे प्रकाशन !

कन्नड सनातन पंचांग २०१७ चे प्रकाशन करतांना
स्वामी श्री श्री सुबुधेन्द्र तीर्थ आणि साधक श्री. शेषगिरी
राव, श्री. यशवंत कणगलेकर अन् श्री. राघवेंद्र
    रायचूर (कर्नाटक) - २५ सप्टेंबर या दिवशी कर्नाटकातील रायचूर येथील सनातनच्या साधकांनी श्री क्षेत्र मंत्रालय, आंध्रप्रदेश येथील स्वामी श्री श्री सुबुधेन्द्र तीर्थ यांची भेट घेऊन त्यांना सनातनच्या कार्याची माहिती दिली. या वेळी श्री स्वामी यांनी कन्नड सनातन पंचांग २०१७ चे प्रकाशन केले. या प्रसंगी श्री स्वामींनी सनातन कार्याची प्रशंसा केली. आशीर्वाद देतांना ते म्हणाले, सनातनवर येणारी सर्व संकटे दूर होऊन सनातनचे कार्य यशस्वी होईल. 
      सनातनचा मराठी ग्रंथ तीर्थक्षेत्र लवकरच प्रसिद्ध होत आहे, असे श्री स्वामींना सांगितल्यावर त्यांनी या ग्रंथाच्या मागील पानासाठी १५ सहस्र रुपयांचे विज्ञापन देण्याची सिद्धता दशर्र्वली.
मुंबईतील विशेष न्यायालयाने कर्नल पुरोहित यांचा जामीन अर्ज फेटाळला

२००८ मधील मालेगाव बॉम्बस्फोटाचे प्रकरण
      मुंबई, २६ सप्टेंबर - वर्ष २००८ च्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील कर्नल श्रीकांत पुरोहित यांचा जामीन अर्ज राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या मुंबईतील विशेष न्यायालयाने २६ सप्टेंबर या दिवशी फेटाळला. यापूर्वी यंत्रणेने विशेष न्यायालयात साध्वी प्रज्ञासिंह आणि अन्य ५ आरोपींना आरोपमुक्त ठरवणारे पुरवणी आरोपपत्र सादर केले होते. त्या वेळी कर्नल पुरोहित यांच्यासह १० जणांना यंत्रणेने दोषमुक्त केले नसले, तरी त्यांच्यावरील कठोर असा मोक्का हटवत केवळ भा.दं.वि. आणि अवैध कृत्य प्रतिबंधक कायद्यांतर्गत आरोप ठेवले होते. त्यामुळे अटकेपासून तुरुंगात असलेल्या कर्नल पुरोहित यांचा जामिनावर सुटण्याचा मार्गही मोकळा झाल्याचे म्हटले जात होते.

काश्मीरचे स्वप्न पहाणे सोडून द्या ! - सुषमा स्वराज यांचे संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत पाकला सडेतोड उत्तर

      न्यूयॉर्क - जम्मू-काश्मीर भारताचा अविभाज्य भाग आहे आणि राहील. पाकने काश्मीरचे स्वप्न पहाणे सोडून द्यावे, असे सडेतोड उत्तर भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी संयुक्त राष्ट्र संघाच्या महासभेला संबोधित करतांना दिले. काही दिवसांपूर्वी नवाज शरीफ यांनी येथे केलेल्या भाषणात काश्मीरवरून भारतावर टीका केली होती.
सुषमा स्वराज यांनी मांडलेली सूत्रे 
१. आपण आतंकवादाला रोखण्यात अपयशी ठरलो आहोत. आतंकवाद मानवाधिकारांचे सर्वांत मोठे उल्लंघन आहे. 
२. आतंकवाद्यांना कोण आश्रय देतो, त्यांना कोण साहाय्य करतो हे जगजाहीर आहे. ज्याने आतंकवादाचे बीज रोवले, यानेच त्याचे कटू फळ खाल्ले आहे. 
३. ज्यांचे घर काचेचे असते, त्यांनी दुसर्‍यांच्या घरावर दगड फेकू नये. 
४. आम्ही मैत्रीद्वारे वाद मिटवण्याचा प्रयत्न केला; मात्र त्या बदल्यात आम्हाला काय मिळाले ? पठाणकोट, उरी ? अटक करण्यात आलेला बहादुर अली हा पाकमधून आला होता, हा त्याचा पुरावा आहे. 
५. जे आमच्यावर मानवाधिकारांच्या उल्लंघनाचा आरोप करतात, त्यांनी स्वतःच्या घराकडे पहावे. बलुचिस्तानमध्ये मानवाधिकारांचे उल्लंघन होत आहे. तेथील लोकांवर अमानुष अत्याचार केले जात आहेत.

राहुल गांधी यांच्यावर बूट फेकला !

       लक्ष्मणपुरी - उत्तरप्रदेशातील सीतापूर येथे राहुल गांधी यांच्यावर रोड शोच्या वेळी एका व्यक्तीने बूट फेकल्याची घटना घडली; मात्र गांधी यांना बुट लागला नाही. बुट फेकणार्‍याला अटक करण्यात आली आहे. हे आक्रमण भाजप आणि संघ यांच्याकडून करण्यात आले आहे, असा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. (राहुल गांधी यांना संघ आणि भाजप यांची कावीळ झाल्याचेच हे लक्षण आहे ! - संपादक)

चिनी सैनिकांची अरुणाचल प्रदेशमध्ये घुसखोरी !

कुरापतखोर चीन !
      नवी देहली - ९ सप्टेंबरला चिनी सैनिकांनी अरुणाचल प्रदेशातील भारतीय सीमेत ४५ कि.मी. आत घुसखोरी केल्याची घटना समोर आली आहे. चार दिवसांनी म्हणजे १३ सप्टेंबरला भारतीय सैन्याने त्यांना हाकलून लावले. चीनच्या सैन्याने सीमेवरील हदीग्रह येथे ही घुसखोरी केली होती. तेथून ते ४५ कि.मी. आत असलेल्या प्लम क्षेत्रापर्यंत पोचले होते. तेथे त्यांनी तळ निर्माण केला होता.

गणेशोत्सवात देखाव्यांच्या माध्यमातून भाविकांचे प्रबोधन केलेले पुणे शहरातील काही देखावे

गणेशोत्सवात असे देखावे उभारून राष्ट्र आणि धर्म यांच्या कार्यात खारीचा वाटा घेऊया ! 
     पुणे - १२३ वर्षांपूर्वी लोकमान्य टिळक यांनी घरगुती गणेशोत्सवाला सार्वजनिक स्वरूप देऊन त्या माध्यमातून देशवासियांमध्ये जागृती आणि संघटन निर्माण करण्याचा प्रयत्न केला. सध्या गणेशोत्सवामध्ये अवाजवी रोषणाई, चित्रपट गाण्यांचा थरथराट अशा चुकीच्या गोष्टी शिरल्या असल्या, तरी अनेक गणेशोत्सव मंडळांनी समाजप्रबोधनाची परंपरा जपत यंदाच्या वर्षीही ऐतिहासिक, पौराणिक, सामाजिक, राष्ट्रीय विषय हाताळून जनप्रबोधन करण्याचा प्रयत्न केला. पुणे आणि पिंपरी-चिंचवड येथील काही गणेशोत्सव मंडळांच्या देखाव्यांचा येथे सारांश देत आहोत. 

रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा बौद्ध पद्धतीने राज्याभिषेक !

हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना 
सर्वधर्मसमभावाचा पुरस्कर्ता दाखवून हिंदु धर्मात फूट पाडण्याचा धर्मद्रोह्यांचा कुटील डाव जाणा !
  • छत्रपती शिवाजी महाराजांना बौद्ध राजे ठरवण्याचा संतापजनक प्रकार 
  • निवेदन देऊनही अपप्रकार न रोखता पोलिसांनी धारकर्‍यांनाच स्थानबद्ध केले !
      मुंबई, २६ सप्टेंबर (वार्ता.) - महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीस्थळी रायगडावरील त्यांच्या पुतळ्याला २४ सप्टेंबर या दिवशी बौद्ध पद्धतीने राज्याभिषेक करून काही समाजकंटकांनी महाराजांना बौद्ध राजा ठरवण्याचा संतापजनक प्रकार केला. या अपप्रकाराची चाहूल लागताच तो रोखण्यासाठी श्रीशिवप्रतिष्ठानच्या अनुमाने ४०० धारकर्‍यांनी एकत्रित येऊन रायगड पोलिसांना निवेदन दिले. त्यानंतरही पोलिसांनी हा अपप्रकार न रोखता शिवाजी महाराज यांच्याविषयी सर्वधर्मसमभावाचा दाखला देत धारकर्‍यांनाच स्थानबद्ध केले. (छत्रपती शिवाजी महाराज यांनी जरी सर्व धर्मांचा आदर केला असला, तरी त्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. धर्मांध मुसलमान, कावेबाज ख्रिस्ती यांचा शिवरायांनी बीमोड केला,

भांडुप येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने 'श्राद्धाचे महत्त्व' या विषयावर मार्गदर्शन !

     भांडुप, २६ सप्टेंबर ( वार्ता.) - येथील लालासेठ कंपाऊंड मधील 'ज्येष्ठ नागरिक मंच' आणि उत्कर्षनगर येथील दैनिक 'सनातन प्रभात'चे वाचक श्री. प्रदीप (दादा) नेरुरकर यांच्या निवासस्थानी २४ सप्टेंबर या दिवशी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने 'श्राद्धाचे महत्त्व' या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. समितीच्या वतीने श्री. लक्ष्मण जठार यांनी 'पितृपक्षात श्राद्धविधी का करावा ?', 'श्राद्धविधी करण्यामागील शास्त्र आणि त्यामागील आध्यात्मिक लाभ' यांविषयी माहिती दिली. या मार्गदर्शनानंतर श्री. नेरूरकर यांनी त्यांच्या भागात धर्मशिक्षणवर्ग चालू करण्यास सांगितले. 'नवरात्रोत्सवातही धर्मशिक्षण देण्यासाठी मार्गदर्शनाचे आयोजन करू', असे श्री. नेरुरकर यांनी या वेळी सांगितले.

समीर गायकवाड यांच्यावरील आरोप निश्‍चितीची सुनावणी १० ऑक्टोबरला !

कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरण
     कोल्हापूर, २६ सप्टेंबर (वार्ता.) - सनातन संस्थेचे साधक श्री. समीर गायकवाड यांच्यावर कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरणात आरोप निश्‍चित करण्याच्या विषयाची पुढील सुनावणी १० ऑक्टोबरला होईल. आरोप निश्‍चित प्रकरणात अजून उच्च न्यायालयात स्थगिती असून तेथील सुनावणी ७ ऑक्टोबर या दिवशी होणार आहे. येथील जिल्हा न्यायाधीश एल्.डी. बिले यांच्यासमोर कॉ. गोविंद पानसरे खून प्रकरणाची सुनावणी चालू आहे. 
डॉ. तावडे यांना अधिवक्त्यांना भेटू न देण्याच्या संदर्भातील सुनावणी ३० सप्टेंबरला ! 
    न्यायालयाच्या आदेशानंतरही सनातनचे साधक डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांना त्यांच्या अधिवक्त्यांना भेटू दिले नव्हते. या संदर्भात ५ सप्टेंबर या दिवशी अधिवक्ता श्री. वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकार्‍यांच्या निदर्शनास आणून दिले होते. या प्रकरणात २६ सप्टेंबर या दिवशी सुनावणी झाली. या प्रकरणाची पुढील सुनावणी ३० सप्टेंबर या दिवशी होणार आहे.

कराड येथे हुतात्म्यांना मानवंदना देत दुचाकी फेरी

हिंदुत्वनिष्ठ विक्रम पावसकर यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम 

     कराड, २६ सप्टेंबर (वार्ता.) - भाजपचे सातारा जिल्हाध्यक्ष, हिंदु एकता आंदोलनचे कराड अध्यक्ष आणि कराड नगरपालिकेचे नगरसेवक श्री. विक्रम पावसकर यांच्या वाढदिवसानिमित्त २२ सप्टेंबर या दिवशी येथेे हुतात्म्यांना मानवंदना देत दुचाकीची फेरी काढण्यात आली. या वेळी विविध घोषणा देण्यात आल्या. दत्त चौकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करत पुष्पहार अर्पण करून फेरी पुन्हा मार्गस्थ झाली. 

राज्यात वाहनांवरील क्रमांक आता मराठीत करण्यास केंद्र शासनाची अनुमती

केंद्र शासनाचा स्तुत्य निर्णय ! आता मराठी भाषेला अभिजात 
दर्जा मिळण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मराठीजनांची अपेक्षा ! 
     मुंबई, २६ सप्टेंबर - राज्यात वाहनांवरील क्रमांक मराठी भाषेत लावण्याच्या मागणीला केंद्र सरकारने अनुमती दिली आहे. त्यामुळे यापुढे आता राज्यातील वाहनांचे क्रमांक मराठीत म्हणजेच देवनागरीत लिहिण्याला कोणतेही बंधन असणार नाही; मात्र राज्याबाहेर जाणार्‍या वाहनांचे क्रमांक हे इंग्रजीतच ठेवावे लागणार आहेत. 

पाकिस्तानच्या राष्ट्रध्वजाचे दहन करत उरी आक्रमणाचा निषेध !

उरी येथील आतंकवादी आक्रमणाच्या निषेधार्थ
आंदोलन करतांना विद्यार्थी
     पुणे, २६ सप्टेंबर - उरी येथील आतंकवादी आक्रमणाच्या निषेधार्थ कर्वे रस्त्यावरील गरवारे महाविद्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर राष्ट्रप्रेमी युवकांनी आंदोलन केले. २४ सप्टेंबर या दिवशी झालेल्या आंदोलनाचा सामाजिक संकेतस्थळांच्या माध्यमातून प्रसार करण्यात आला. त्याला प्रतिसाद देत अनेक विद्यार्थी आंदोलनाला उपस्थित होते. या वेळी पाकिस्तानच्या विरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या आणि पाकिस्तानच्या राष्ट्रध्वजाचे दहन केले. या प्रसंगी आतंकवादी आक्रमणात हुतात्मा झालेल्या सैनिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. राष्ट्रगीत म्हणून आंदोलनाचा समारोप करण्यात आला. गरवारे महाविद्यालयातील युवकांचा आंदोलनाच्या नियोजनात सहभाग होता.अरविंद केजरीवाल यांच्या डोक्यात 'सत्ता' घुसली आहे ! - ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची टीका

     मुंबई, २६ सप्टेंबर - केजरीवाल माझे बरीच वर्षे सहकारी होते, हे माझे दुर्दैवच आहे. अरविंद केजरीवाल यांच्या डोक्यात आता 'सत्ता' घुसली आहे, असे संतप्त उद्गार ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी काढले आहेत. केजरीवाल यांना आपल्या मंत्रीमंडळातील ३ मंत्र्यांची अलीकडेच हकालपट्टी करावी लागली, त्या पार्श्‍वभूमीवर ते बोलत होते.

जात या शब्दाकडे व्यावहारिकदृष्ट्या नव्हे, तर आध्यात्मिकदृष्ट्या पहायला हवे ! - डॉ. संजय उपाध्ये

      चिंचवड (पुणे), २६ सप्टेंबर (वार्ता.) - सध्या आपण जात या शब्दाकडे व्यावहारिकदृष्ट्या नव्हे, तर आध्यात्मिकदृष्ट्या पहायला हवे. तसे पाहिल्यासच लक्षात येईल की, निसर्गानेही फुले आणि फळे यांनाही जातींत विभागले (आवश्यकतेनुसार वर्गीकरण) आहे. तीच गोष्ट आपण येथेही पाहिली, तर ज्ञानाची उपासना करणारा तो ब्राह्मण, एखादी गोष्ट येत नाही म्हणून कमीपणा घेणारा तो शूद्र. याचाच अर्थ माणसाची गुणवत्ता हीच त्याची जात आहे, असे प्रतिपादन डॉ. संजय उपाध्ये यांनी केले. येथील काशिधाम मंगल कार्यालयात धावे जातीपाशी जाती या विषयावर ते बोलत होते. या कार्यक्रमाला २५० हून अधिक जणांची उपस्थिती होती.

जुईनगर (नवी मुंबई) येथे 'गुरुकृपा प्रतिष्ठान' न्यासाच्या वतीने साथीच्या रोगांच्या प्रतिबंधाविषयी जागृतीपर व्याख्यान

उपस्थितांना आरोग्याविषयी मार्गदर्शन करतांना डॉ. उदय धुरी
     नवी मुंबई, २६ सप्टेंबर (वार्ता.) - जुईनगर सेक्टर २५ येथील श्री स्वामी समर्थ सेवा ट्रस्ट येथे २२ सप्टेंबर या दिवशी 'गुरुकृपा प्रतिष्ठान' न्यासाच्या वतीने साथीच्या रोगांच्या प्रतिबंधाविषयी जागृतीपर व्याख्यान घेण्यात आले. गुरुकृपा प्रतिष्ठानच्या वतीने डॉ. उदय धुरी यांनी डेंग्यू, मलेरिया यांसह पावसाळ्यातील साथीचे आजारांच्या प्रतिबंधाविषयी उपस्थितांना मार्गदर्शन केले. या मार्गदर्शनाचा लाभ २०० जणांनी घेतला. 

मशिदींवरील भोंग्यांतून होणारे प्रदूषण त्रासदायक ! - डॉ. उपेंद्र डहाके, कल्याण, उपाध्यक्ष, भाजप

आंदोलनात सहभागी हिंदुत्वनिष्ठ
      कल्याण (ठाणे), २६ सप्टेंबर (वार्ता.) - मशिदीवरील भोंग्यांतून होणार्‍या प्रदूषणाच्या संदर्भात न्यायालयीन आदेशाची अंमलबजावणी कोठेही होतांना दिसून येत नाही. मशिदीत लावण्यात येणारे भोंगे कायद्यांचे उल्लंघन करून लावलेले असतात. पहाटे दिली जाणारी अजान शाळेकरी मुले, ज्येष्ठ नागरिक आणि रुग्ण यांना त्रासदायक ठरते. असे असतांनाही पोलीस प्रशासन केवळ बघ्याची भूमिका घेते. हाच का सर्वधर्मसमभाव, हीच धर्मनिरपेक्षता का, असे प्रतिपादन येथील भाजपचे उपाध्यक्ष डॉ. उपेंद्र डहाके यांनी केले. येथे झालेल्या राष्ट्रीय हिंदू आंदोलनात ते बोलत होते. या आंदोलनात शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, हिंदु राष्ट्र सेना, शिवछत्रपती प्रतिष्ठान, स्वराज्य हिंदु सेना, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, योग वेदांत सेवा समिती, हिंदु जनजागृती समिती, सनातन संस्था, रणरागिणी शाखा आणि भाजप इत्यादी हिंदुत्ववादी संघटना आणि राजकीय पक्ष यांसह असे एकूण ८० धर्माभिमानी उपस्थिती होते. 
      या वेळी सनातन संस्थेच्या सौ. दीक्षा पेंडभाजे आणि रणरागिणी शाखेच्या सौ. सुनीता पाटील यांनीही त्यांचे मनोगत व्यक्त केले.

समाजकंटकांचे सनातन आश्रमावरील आक्रमणांचे घृणास्पद कृत्य चालूच !

शिवीगाळ करणे, धमक्या देणे, अश्‍लील बोलणे आणि 
दगडफेक करणे या गोष्टी दखलपात्र ठरवणारे दंडविधान हिंदु राष्ट्रात असेल ! 
     सनातनच्या रामनाथी आश्रमातील साधकांना धमक्या देण्याचा, अश्‍लील बोलण्याचा आणि आश्रमावर दगड फेकण्यास आरंभ केल्याचा कालचा ६ वर्षे ३०४ वा दिवस ! 
 २४.९.२०१६ 
      रात्री १२.१० वाजता एका दुचाकीवरून आश्रमासमोरील रस्त्यावरून दोघे जण 'सनातन बॉम्ब', असे ओरडत गेले.

मुंबईत ६६ ब्रिटिशकालीन पाण्याच्या टाक्या सापडल्या !

       मुंबई, २६ सप्टेंबर - येथील विविध जुन्या वास्तूंमध्ये ६६ ब्रिटिशकालीन पाणी साठवण टाक्यांचे अस्तित्व आहे. एका टाकीची पाणी साठवण क्षमता २ लक्ष ५० सहस्र असून सर्व टाक्यांची एकूण पाणी साठवण क्षमता १ कोटी ७५ लक्ष लिटर इतकी आहे. ब्रिटिशांनी त्या वेळी एखाद्या ठिकाणी आगीची गंभीर घटना घडल्यास ती विझवण्यासाठी हायड्रण्ट अशा टाक्या बांधल्या. त्या टाक्यांकडे पालिकेचे दुर्लक्ष झाले असून त्यांचे जतन करणे आवश्यक आहे, असे शिवसेनेचे नामनिर्देशित नगरसेवक अवकाश जाधव यांनी सांगितले. 
     ते पुढे म्हणाले की, सध्या ए वॉर्डातील ६ टाक्यांचे सर्वेक्षण केले असून इतर ६० टाक्यांचे टप्प्याटप्प्याने सर्वेक्षण करण्यात येणार आहे. त्या टाक्या कशा प्रकारे जिवंत ठेवता येतील, त्यांचा वापर आणखी कसा करता येईल, त्यांना कुठे गळती आहे का, हेही पाहिले जाईल.

नाशिक येथे शेतात लष्करातील शस्त्रे असलेली पेटी सापडली !

असे फक्त भारतातच घडू शकते !
      नाशिक, २६ सप्टेंबर - येथील बागलाण तालुक्यातील किकवारी भागातील एका मक्याच्या शेतात भारतीय लष्कर, अशोक चक्र आणि गोपनीय असे शिक्का असलेली लष्करातील शस्त्रे असलेली मोठी पेटी २५ सप्टेंबर या दिवशी सापडली, अशी माहिती सटाणा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपअधीक्षक अशोक नखाते यांनी दिली. या प्रकरणी पोलिसांनी ६ जणांना कह्यात घेतले आहे. या पेटार्‍याच्या पडताळणीसाठी संरक्षण मंत्रालयाचे ३ अधिकारी सटाणामध्ये आले असून भाभा अणुसंशोधन केंद्राचे शास्त्रज्ञही येणार आहेत. त्यानंतरच पेटार्‍यातील शस्त्रांचा उलगडा होईल. पेटार्‍यावरील शिक्के पहाता प्रथमदर्शनी पेटारा चुकीचा (बनावट) असल्याचा दावा सैन्य दलाच्या अधिकार्‍यांनी केला आहे.

इस्रोच्या अंतराळ केंद्रावरून ८ उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण !

     श्रीहरिकोटा - भारतीय अवकाश संशोधन संस्थेने ('इस्रो'ने) २६ सप्टेंबर या दिवशी सकाळी येथील सतीश धवन अंतराळ केंद्रावरून हवामान उपग्रह 'स्कॅटसॅट-१', आयआयटी मुंबईच्या विद्यार्थ्यांनी ८ वर्षं श्रम घेऊन बनवलेला 'प्रथम' हा उपग्रह, अन्य एक उपग्रह आणि अन्य देशांचे ५ उपग्रह यांचे पीएस्एल्व्ही-सी३५ च्या माध्यमातून प्रक्षेपण केले. अमेरिका आणि कॅनडा यांच्या उपग्रहांचा यात समावेश आहे.

फलक प्रसिद्धीकरता

आक्रमण करण्यात भारताने केलेल्या दिरंगाईचा जिहादी पाकला लाभ !
     उरी आक्रमणानंतर भारताकडून पाकमधील आतंकवादी प्रशिक्षण केंद्रांवर आक्रमण होण्याच्या भीतीने पाकने लष्कर-ए-तोयबा, जैश-ए-महंमद आणि हिजबुल मुजाहिदीन यांची १६-१७ प्रशिक्षण केंद्रे स्थानांतरीत केल्याची माहिती गुप्तचर विभागाने दिली आहे.

हिंदू तेजा जाग रे !

Jago ! : 
Bharatdwara akramanke bhay se Jihadi Pak ne 
atankiyoke 16-17 prashikshan kendroka sthanantaran kiya hai.
 Kya Bharat ki videsh neetiki yah haar nahi ? 

जागो ! : 
भारतद्वारा आक्रमण के भय से जिहादी पाक ने 
आतंकियों के १६-१७ प्रशिक्षण केंद्रों का स्थानांतरण किया है. 
 क्या भारत की विदेश नीति की यह हार नहीं ?

आम्ही सारे सनातन.. सनातन..सनातनच्या घोषणेने दोन दिवसीय अधिवेशनाचा समारोप

घोषणा देतांना डावीकडून अधिवक्ता गोविंद तिवारी, 
अधिवक्ता सुरेश कुलकर्णी, पू. नंदकुमार जाधव, 
ह.भ.प. विक्रम महाराज आणि श्री. सुनील घनवट
      सनातन संस्थेचे श्री. समीर गायकवाड आणि डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांना पुरोगाम्यांच्या दबावाखाली फसवले गेले असून या दोघांचीही १०१ टक्के निर्दोष मुक्तता होणार, असे प्रतिपादन पाळधी (जळगाव) येथील ह.भ.प. विक्रम महाराज यांनी केले. ते हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवसीय प्रांतीय हिंदू अधिवेशनाच्या समारोपीय कार्यक्रमात बोलत होते. अधिवेशनाला उपस्थित जळगाव, धुळे आणि नंदूरबार येथील हिंदुत्वनिष्ठांनी सनातन संस्थेला भक्कम पाठिंबा दर्शवला तसेच या प्रसंगी सर्व हिंदुत्वनिष्ठांनी उत्स्फूर्तपणे दिलेल्या आम्ही सारे सनातन.. सनातन..सनातनच्या घोषणेने सभागृह दणाणून गेले. समारोपीय कार्यक्रमाला हिंदू महासभेचे राज्य संघटक अधिवक्ता श्री. गोविंद तिवारी, हिंदु विधीज्ञ परिषदेचे संस्थापक सदस्य अधिवक्ता श्री. सुरेश कुलकर्णी, हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र राज्य संघटक श्री. सुनील घनवट आणि सनातन संस्थेचे पू. नंदकुमार जाधव यांनी उद्बोधन केले.

जळगाव येथे प्रांतीय हिंदु अधिवेशनात हिंदुत्वनिष्ठांचा सनातनला भक्कम पाठिंबा !

अधिवेशनाच्या दुसर्‍या सत्रातील मान्यवरांचे विचार
हिंदु धर्माचे कार्य करतांना हिंदुत्वनिष्ठ अधिवक्त्यांचेे सहकार्य 
आवश्यक ! - अधिवक्ता गोविंद तिवारी, हिंदु महासभा, राज्य संघटक
     जळगाव - हिंदूंचे संघटन असणे काळाची आवश्यकता आहे. हे संघटन आपण कायद्याच्या चौकटीत राहूनच केले पाहिजे. हिंदूंच्या सणांच्या वेळी आपल्याला पोलिसांचा विरोध होतो. दुर्गामाता दौडीला मला माझ्या कार्यकर्त्यांना १४९ नोटीस आणि चौकशीला बोलावले होते. त्या वेळी हिंदुत्वनिष्ठ अधिवक्त्यांच्या माध्यमांतून आम्ही त्यांना तोंड दिले. वर्ष १९७० मध्ये जळगाव येथील तांबापुरा भागात झालेल्या दंगलीतही धर्मांधावर अनेक प्रकारचे गुन्हे प्रविष्ट झाले होते. त्या तुलनेत हिंदूवर अल्प प्रमाणात गुन्हे प्रविष्ट होते. त्यामुळे हिंदु धर्माचे कार्य करतांना हिंदुत्वनिष्ठ अधिवक्त्यांचेे सहकार्य घ्यायला हवे.

गुन्हेगारांना शासनाने वेळीच कठोर शिक्षा दिली, तरच गुन्हे अल्प होतील !

प.पू. आबा उपाध्ये यांचे पंतप्रधानांना अनावृत्त पत्र !
प.पू. आबा उपाध्ये आणि पू. (सौ.) मंगला उपाध्ये
    भारताचे पंतप्रधान सन्मानीय श्री. नरेंद्र मोदी यांचा गेल्या मासात मन की बात हा कार्यक्रम झाला. त्याअगोदर त्यांनी जनतेला आवाहन करून त्यांना त्यांच्याशी लेखी किंवा प्रत्यक्ष संवाद साधण्याची संधी दिली. त्यात त्यांनी इंग्रजी, मराठी आणि हिंदी या भाषांचीही सवलत दिली. याविषयी आम्हा कुटुंबियांकडून धन्यवाद ! यासंदर्भात आम्हास काय वाटते, ते येथे देत आहोत.
      सध्या भारतात दरोडेखोर, आतंकवादी आणि बलात्कारी हे प्रथमदर्शनी समोर येतात. त्यावर उपाय म्हणजे शासनाने गुन्हेगारांना कठोर शिक्षा दिली, तरच गुन्हेगारांना सरकारचा धाक वाटेल.

सभ्यतेचे धडे न्यायालयाला का द्यावे लागतात ?

      उच्च न्यायालयाने महिलांविषयी बोलतांना सभ्यतेची भाषा वापरा, असे आदेश राजकीय नेत्यांना दिले आहेत. बोलण्याचा विपर्यास केला गेला, अशा शब्दांत स्पष्टीकरण देऊन रंग पालटणार्‍यांना न्यायालयाने खडसवले आहे. मुळात न्यायालयाला असे आदेश का द्यावे लागतात, ही गोष्ट विचार करण्यासारखी आहे. सभ्यतेचे धडे देणे, हा संस्कार शालेय जीवनात विद्यार्थ्यांमध्ये रुजवण्याचा आहे; मात्र वयाची चाळीशी ओलांडलेल्यांना हे सांगावे लागणे खेदजनक आहे.

सैराट, मन भैराट ।

श्री. कोंडिबा जाधव
सैराट (टीप १) पाहून पोरं झाली भैराट ।
मनोराज्यात मारताहेत प्रेमाची गाठ ॥ १ ॥

आर्ची-परशाची करताहेत नक्कल ।
जोडीदाराला पटवायला नवी-नवी शक्कल ॥ २ ॥

कोवळं वय, हळवं मन, एकमेकांच्या चिंतनात दंग ।
दायित्व आणि अभ्यास याचा होतोय भंग ॥ ३ ॥

पोलिसांच्या संदर्भातील कटू अनुभव !

       सध्या सनातनचे साधक आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते यांना पोलिसांच्या शारीरिक आणि मानसिक छळाला सामोरे जावे लागत आहे. या अनुषंगाने विविध ठिकाणच्या पोलिसांविषयी सनातनचे साधक, हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते किंवा हिंदुत्वनिष्ठ यांना यापूर्वी पोलिसांच्या सतावणुकीविषयी आलेले अनुभव येथे प्रसिद्ध करत आहोत.
मशिदींवरील कर्ण्यांविषयी मूग गिळून गप्प 
बसणारे; मात्र मंदिरावर ध्वनीक्षेपक लावल्याच्या 
कारणावरून हिंदूला मारहाण करणारे रझाकारी पोलीस !
       कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी येथील थोरात चौकातील श्री विठ्ठल मंदिरात शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या पूर्वानुमतीने प्रतिदिन पहाटे ५.३० वाजता ध्वनीक्षेपकावर भक्तीगीते आणि भजने लावली जातात. २७.३.२०१३ या दिवशी सकाळी ६ वाजता पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत कनव्ही आणि पोलीस कर्मचारी इंगवले श्री विठ्ठल मंदिरात आले. त्यांनी श्री. प्रशांत माळी (वय २३ वर्षे) यांना ध्वनीक्षेपक बंद करण्यास सांगितले. श्री. माळी यांनी ध्वनीक्षेपक बंद केला. त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक कनव्ही यांनी श्री. माळी यांना पोलीस ठाण्यात यायला सांगितले. श्री. माळी यांनी तिकडे येण्यास नकार दशर्वला. त्यानंतर कनव्ही यांनी माळी यांची गळपट्टी धरून त्यांना मारहाण केली. (असे वर्तन एखाद्या धर्मांधाशी त्यांच्या मशिदीत किंवा मदरशात जाऊन करण्याचे धाडस पोलिसांत आहे का ? - संपादक) या घटनेनंतर २०० संतप्त हिंदूंचा जमाव शिवाजीनगर पोलीस ठाण्यावर मोर्चा घेऊन गेला. त्या वेळी पोलीस निरीक्षक दुर्योधन पवार यांनी, पोलिसांकडून हिंदुत्वनिष्ठांना पुन्हा असा त्रास होणार नाही, याची काळजी घेण्यात येईल. असभ्य वर्तन करणार्‍या पोलिसांना समज देण्यात आली आहे, असे सांगितले. (हिंदूंनो, प्रत्येक वेळी असे संघटित झाल्यास पोलिसांचे हिंदूद्वेषी वर्तन बंद होईल ! - संपादक) काही मासांपूर्वी पोलीस उपनिरीक्षक कनव्ही यांनी या मंदिरातील ध्वनीक्षेपकावर आक्षेप घेतला होता. श्री. माळी यांच्याशी बोलतांना ते म्हणाले होते, उद्यापासून ध्वनीक्षेपक लावला, तर हा ध्वनीक्षेपक फोडून टाकतो.
पोलिसांविषयी चांगले आणि वाईट अनुभव असल्यास 
वाचकांनी नजीकच्या दैनिक कार्यालयात पाठवावेत !
      मुळातच राजकारणात धर्मनिरपेक्ष किंवा धर्मांधता हे वाद नसतातच, असतो तो सत्तावाद ! (साप्ताहिक वज्रधारी, वर्ष ७ वे, अंक २०, २० जून ते २६ जून २०१३ )

फेसबूक पेजसाठी वृत्तानुसार सात्त्विक चित्र बनवण्याची सेवा करतांना ६२ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. गणेश तांबे यांना आलेल्या अनुभूती !

 श्री. गणेश तांबे
१. फेसबूक पेजसाठी वृत्तानुसार केलेले चित्र रज-तमात्मक होत असणे
     फेसबूक पेजसाठी वृत्तानुसार चित्र सिद्ध करण्याची सेवा करत असतांना जे चित्र बनते, ते राजसिक आणि तामसिक असते. चित्रातील रंगसंगतीही राजसिक आणि तामसिक असते. त्यातून त्रासदायक स्पंदने प्रक्षेपित होत नाही ना ? आणि त्यामुळे पहाणार्‍या व्यक्तींवर त्याचा परिणाम होत असावा, असे मला वाटायचे; पण विषयानुरूप तसेच चित्र करावे लागायचे.
२. प्रार्थनेत सुचल्याप्रमाणे गुरुदेवांचे छायाचित्र प्रत्येक छायाचित्राच्या
मागे पार्श्‍वभूमीवर ठेवल्यावर झालेला परिणाम
२ अ. चित्रात सकारात्मक पालट होणे : गुरुदेवांना प्रार्थना केल्यावर त्यांचेच चित्र फेसबूकवर पाठवण्यात येणार्‍या प्रत्येक छायाचित्राच्या मागे पार्श्‍वभूमीवर ठेवून पुढे बातमीचे चित्र ठेवावे, असे सुचले. त्याप्रमाणे छायाचित्रात पालट केल्यावर चित्रात सकारात्मक पालट जाणवू लागला. त्यामुळे सेवा करतांना आनंदही मिळू लागला.
२ आ. निर्गुण स्वरूपातील प.पू. गुरुदेवांचे चैतन्य प्रक्षेपित होत आहे, असे जाणवणे : रज-तमात्मक विषयांवरील फेसबूक पोस्टच्या छायाचित्राच्या मागे प.पू. गुरुदेवांचे चित्र ठेवले. त्यामुळे चित्रातील त्रासदायक स्पंदने न्यून होऊन त्यातून निर्गुण स्वरूपातील प.पू. गुरुदेवांचे चैतन्य प्रक्षेपित होत आहे, असे जाणवायचे.
२ इ. चित्रांना चांगला प्रतिसाद मिळणे : श्रीकृष्णाने फेसबूक पेजवरील चित्र पहाणार्‍या व्यक्तींच्या मन आणि बुद्धी यांच्यावरील आवरण दूर होऊन गुरुदेवांच्या कृपेने ते संस्थेच्या कार्याशी जोडले जाऊ दे, अशी प्रार्थना करवून घेतली.

साधनेमुळे पूर्वीच्या काळचे ऋषिमुनी आणि शेतकरी यांचे समाधानी जीवन अन् लालसा वाढल्याने आताच्या शेतकर्‍यांचे असमाधानी जीवन !

प.पू. पांडे महाराज
१. पूर्वीच्या काळी ऋषिमुनी आणि शेतकरी यांचे साधनामय जीवन
१ अ. ऋषिमुनींच्या जीवनशैलीची आठवण म्हणून ऋषिपंचमी हा सण साजरा केला जाणे : पूर्वीच्या काळी ऋषिपत्नी शेतकर्‍यांच्या शेतात सांडलेले धान्य गोळा करून आणत असत. हे धान्य रानात पसरून ठेवत. शेतात अशा प्रकारे उगवलेले हे धान्य बैलांच्या किंवा अन्य जनावरांच्या साहाय्याविना आणि नांगरणीविना उगवलेले असे.
     कुणाच्याही मेहनतीविना कुणाच्या मिळकतीतील नसलेल्या अशा धान्यावर ऋषिमुनींची उपजीविका होत असे. त्यांच्या अशा पद्धतीच्या जीवनशैलीची आठवण म्हणून ऋषिपंचमी हा सण साजरा केला जातो. अशा प्रकारे मूलतः नैसर्गिकरित्या भूमीतून उगवलेल्या धान्यात सात्त्विकता होती. कोणत्याही जिवाची सेवा न घेता नैसर्गिकरित्या उगवलेल्या धान्याचे ग्रहण होत असे. ते पौष्टिक आणि सात्त्विक होते.

गोव्यामध्ये झालेल्या पंचम अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाच्या काळात रामनाथी आश्रमातील स्वयंपाक-विभागात सेवा करतांना साधकाला शिकायला मिळालेली सूत्रे

श्री. अपूर्व प्रसन्न ढगे
१. गोवा येथील पंचम अखिल भारतीय हिंदू 
अधिवेशनकाळात रामनाथी आश्रमातील 
स्वयंपाकघरात सेवेला जाण्याची संधी मिळाल्याने आनंद होणे
     मागील वर्षीप्रमाणे २०१६ या वर्षी गोव्यामध्ये पार पडलेल्या पंचम अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाच्या काळात रामनाथी आश्रमातील स्वयंपाकघरातील सेवेसाठी जाण्याची संधी मला मिळाली. गोव्याला जाण्यापूर्वी मला पुष्कळ उत्साह जाणवत होता आणि मी आनंदी होतो. कधी एकदा रामनाथी आश्रमात जाऊन सेवा आरंभ करतो, असे मला वाटत होतेे.
२. आश्रमात जाण्यापूर्वी पू. रेखाताई काणकोणकर आणि सौ. सुप्रियाताई माथुर
यांच्या सत्संगाने स्वभावदोष आणि अहं निर्मूलन होईल, हा विचार मनात असणे
     आश्रमात जाण्यापूर्वी माझ्या मनात विचार होते, आता रामनाथीला गेल्यावर स्वयंपाकगृहात सेवा करणार्‍या पू. रेखाताई काणकोणकर आणि सौ. सुप्रियाताई माथुर यांचा मला सत्संग लाभणार आहे. त्यामुळे माझे स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन होणार आहे.
३. प्रत्यक्षात आश्रमात गेल्यानंतर मनात सेवा कशी करायची ? आपल्याला 
सेवा जमेल ना ?, असे भीतीचे अनेक विचार येणे आणि तोंडवळ्यावरही
त्रासदायक शक्तीचे पुष्कळ आवरण आलेले असणे
     प्रत्यक्षात आश्रमात गेल्यानंतर मात्र माझ्या मनाची स्थिती अकस्मात पालटली. मला पुष्कळ थकवा जाणवू लागला. सेवेतही उत्साह वाटत नव्हता

रामनाथी आश्रमात बगलामुखी यागाच्या पूर्वसिद्धतेची सेवा करतांना साधिकेला आलेल्या अनुभूती

सौ. सारिका आय्या
१. देवाला प्रार्थना पोचून यागाच्या सेवेची संधी मिळणे : ११.८.२०१६ या दिवशी रामनाथी आश्रमात बगलामुखी याग होणार होता. आदल्या रात्री यागाची पूर्वसिद्धता करण्यात आली. मला दिवसभर सेवा करता न आल्याने मी देवाला प्रार्थना केली, माझ्याकडून रात्री सेवा करून घे. नंतर रात्री यज्ञकुंडाचा परिसर सारवायचा आहे, असा निरोप मिळाल्यावर कृतज्ञता व्यक्त होऊन देवाला माझ्या साधनेची किती काळजी आहे, याची जाणीव झाली.
२. चैतन्यामुळे यज्ञकुंडाचा परिसर सारवण्याची सेवा करतांना उत्साह जाणवणे : यज्ञकुंडाचा परिसर सारवत असतांना कोणताही त्रास झाला नाही आणि अल्प वेळेत सारवून झाले. सारवतांना नामजप एका लयीत चालू होता, तसेच पुष्कळ चैतन्य आणि उत्साहही जाणवत होता. तेथील चैतन्यामुळे सेवा कधी संपली, हेही कळले नाही.
३. सारवणे आणि पूजेची भांडी घासणे या सेवा करतांना हाताला एरव्ही होणारा त्रास न होणे अन् सद्गुरु बिंदाताई यांनी केलेल्या प्रार्थनेमुळे अनुभूती आल्याची जाणीव होणे : सारवून झाल्यावर इतर वेळी माझे हात खरखरीत होतात; परंतु या वेळी ते मऊ झाले होते. पूजेची भांडी घासल्यावर तळहात काळे होतात आणि हाताला भेगा पडून ते राठ होतात; परंतु या वेळी हातांना काही झाले नाही. सेवा पूर्ण झाल्यावर आम्ही सेवेतील सर्व साधिका सद्गुरु बिंदाताईंना भेटायला गेलोे. तेव्हा कळले की, साधिकांच्या हाताला काही होऊ नये; म्हणून सद्गुरु ताईंनी प्रार्थना केली होती.

प्राणशक्तीवहन उपायपद्धत या अंतर्गत सगुण-निर्गुण स्तराचे उपाय !

      त्रासाच्या निर्मूलनासाठी प्राणशक्तीवहन उपायपद्धत अवलंबतांना सगुण स्तराच्या उपायांचा लाभ होत नसल्यास एकदम निर्गुण स्तराच्या उपायांकडे न जाता प्रथम या दोन्हींच्या मधील सगुण-निर्गुण स्तराचे उपाय करा !      प्राणशक्तीवहन उपायपद्धत अवलंबतांना आपण न्यासस्थान, मुद्रा आणि नामजप शोधून त्याप्रमाणे उपाय करतो. नामजपामध्ये आपण एकतर पंचमहाभूतांचे किंवा उच्च देवतांचे जप करतो. हे जप सगुण स्तराचे आहेत. निर्गुण स्तराच्या जपांमध्ये शून्य, महाशून्य, ॐ आणि निर्गुण हे अधिकाधिक निर्गुण स्तराचे जप आहेत.
     त्रास होत असतांना सगुण स्तराचे विविध नामजप, मुद्रा आणि न्यास ३ - ४ वेळा शोधून तसे उपाय केले, तरी त्यांचा लाभ न झाल्यास प्रथम सगुण-निर्गुण स्तराचा जप करून बघावा. सगुण-निर्गुण स्तराचा जप म्हणजे सगुण स्तराचा जप आणि निर्गुण स्तराचा जप एकत्रित करणे किंवा ते दोन्ही थोडा थोडा वेळ करणे. यामध्ये शेवटी उपायांमध्ये जो सगुण स्तराचा जप आला असेल तो जप आणि कोणताही एक निर्गुण स्तराचा जप करावा. हा सगुण-निर्गुण स्तराचा जप करूनही त्रास न्यून झाला नाही, तर मग निर्गुण स्तराचा जप करावा.
     सगुण-निर्गुण स्तराचा जप करण्याची पद्धत, त्या वेळी करायची मुद्रा आणि न्यास यांची माहिती पुढे दिली आहे.
१. सगुण-निर्गुण स्तराचा जप करण्याची पद्धत
१ अ. ४ - ५ मिनिटे सगुण स्तराचा जप आणि नंतर ४ - ५ मिनिटे निर्गुण स्तराचा जप, असे पुनःपुन्हा करावे.
१ आ. सगुण स्तराच्या नामजपाबरोबर ॐ व्यतिरिक्त अन्य निर्गुण स्तराचा जप करायचा असल्यास तो जप करण्याची पद्धत :
सगुण स्तराचा आणि निर्गुण स्तराचा जप एक-आड-एक या पद्धतीने करावा,

नृसिंहवाडीला गेल्यावर आधुनिक वैद्य प्रकाश घाळी यांना आलेल्या अनुभूती

पितृपक्षातील श्राद्ध !
      ४ ऋणांपैकी पितृऋण फेडण्यासाठी श्राद्ध आवश्यक असते. माता-पिता, तसेच निकटवर्तीय यांचा मृत्यूनंतरचा प्रवास हा सुखमय आणि क्लेशरहित व्हावा, त्यांना सद्गती मिळावी यांसाठीचा संस्कार म्हणजेच श्राद्ध. श्राद्धातील मंत्रोच्चारांमध्ये पितरांना गती देण्याची सूक्ष्म शक्ती सामावलेली असते. श्राद्धात पितरांना हविर्भाग दिला गेल्याने ते संतुष्ट होतात. श्राद्धाचे इतके महत्त्व असतांनाही आज हिंदूंमधील धर्मशिक्षणाच्या अभावामुळे श्राद्धविधी दुर्लक्षिला जाऊ लागला आहे; म्हणूनच अन्य संस्कारांइतकाच श्राद्ध हा संस्कारही अत्यावश्यक कसा आहे, हे सांगणे क्रमप्राप्त ठरते. १७ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर २०१६ या कालावधीत पितृपक्ष आहे. त्यानिमित्ताने श्राद्धविषयक लिखाण देत आहोत.

प्रेमळ, अभ्यासू वृत्तीच्या आणि इतरांना प्रोत्साहन देणार्‍या सौ. विजया घिसे !

सौ. विजया घिसे
     भाद्रपद कृष्ण पक्ष द्वादशी (२७.९.२०१६) या दिवशी सौ. विजया घिसे यांचा तिथीनुसार वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांच्या बहिणीला त्यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये देत आहोत.
सौ. विजया घिसे यांना वाढदिवसानिमित्त
 सनातन परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा !
१. शांत
     ताई लहानपणापासून शांत आणि मितभाषी आहे. ती घरी कधीच कुणाला उलट उत्तर देत नसे. आजी आणि वडील कधी तिच्यावर (कधी कधी तिची चूक नसतांनाही) रागावले, तरी ती शांतपणे ऐकून घ्यायची.
२. वाचनाची आवड
     ताईला लहानपणापासून वाचनाची पुष्कळ आवड आहे. वडील उन्हाळ्याच्या सुटीत आम्हाला कादंबर्‍या आणून द्यायचे. महाभारत, रामायण, छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज आणि कर्ण यांच्यावरील मोठ्या कादंबर्‍या ती अल्प वेळातच वाचून पूर्ण करायची. त्यातील आवडलेला भाग ती आम्हाला शिकण्याच्या दृष्टीने गोष्टी म्हणून सांगायची.
३. काटकसरी
     ताई कुठेही आवश्यकता नसतांना पैसे व्यय करत नाही. ती वस्तू, पैसे काटकसरीने आणि जपून वापरते.
४. बालपणी केलेली साधना
     ताईची लहानपणापासून देवावर पुष्कळ श्रद्धा आहे. ताई लहानपणी घराजवळील गणपतीच्या देवळात प्रत्येक रविवारी (सुटीच्या दिवशीही) सकाळी ६.३० वाजता होणार्‍या कलावती आईंच्या बालोपासना वर्गाला पहाटे लवकर उठून अंघोळ करून जात असे.
५. अभ्यासू वृत्ती आणि चिकाटी
५ अ. शालेय जीवनात मनापासून आणि चिकाटीने अभ्यास करणे : ताई प्रत्येक विषयाचा मनापासून आणि सखोल अभ्यास करायची

शांत आणि सहनशील असणारा उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला ५३ टक्के आध्यात्मिक पातळीचा चंद्रपूर येथील चि. श्रीवेद राहुल वनकर (वय १ वर्ष) !

चि. श्रीवेद वनकर
     चंद्रपूर येथील चि. श्रीवेद राहुल वनकर याचा जन्म भाद्रपद कृष्ण पक्ष दशमी (७.१०.२०१५) या दिवशी झाला. २५.९.२०१६ या दिवशी त्याचा तिथीनुसार पहिला वाढदिवस झाला. त्यानिमित्त त्याच्यातील लक्षात आलेले काही दैवी गुण आपल्यासमोर मांडत आहे. 
१. गर्भारपणापूर्वी
     माझ्या पत्नीला पूर्वीपासूनच नामस्मरणाची सवय होती. गर्भ राहिल्यापासून ती श्रीकृष्णाचा नामजप अधिकाधिक करत असे. आम्ही दोघे मिळून श्रीकृष्णाला हे भगवंता, आम्हाला तुझ्यासारखा धर्माचे रक्षण करणारा आणि धर्माचा प्रसार करणारा पुत्र होऊ दे, अशी प्रार्थना करायचो. त्या काळात माझी पत्नी भागवत ऐकणे आणि भगवद्गीता अन् कृष्णचरित्र यांचे वाचन करत असे.

प्रेमळ आणि प.पू. डॉक्टरांप्रती भाव असलेली अन् उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली ५५ टक्के आध्यात्मिक पातळीची सातारा येथील चि. आराध्या विनोद चव्हाण (वय ३ वर्षे) !

चि. आराध्या चव्हाण
     (कु. आराध्या हीची वर्ष २०१४ मधे ५१ टक्के आध्यात्मिक पातळी होती. - संकलक)
    भाद्रपद कृष्ण पक्ष द्वादशी (२७.९.२०१६) या दिवशी सातारा येथील चि. आराध्या चव्हाण हिचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त तिच्या आईला तिची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये पुढे देत आहोत. 
चि. आराध्या चव्हाण हिला वाढदिवसाप्रीत्यर्थ 
सनातन परिवाराकडून अनेक शुभाशीर्वाद !
१. प्रेमभाव
      आराध्याने मी कधी अस्वस्थ आहे, हे पाहिले की, ती मला तू अशी का बसली आहेस ? परमपूज्यबाबा आपलेच आहेत ना !, कृष्णबाप्पा आपला आहे, असे सांगते. एखाद्या दिवशी माझे जेवण झाले नसल्याचे लक्षात आल्यावर ती मला त्याविषयी विचारते. मी जेवल्याविना तीही जेवत नाही.

साधनेतील अडचणींवर आध्यात्मिक दृष्टीकोन देणार्‍या आणि देवाप्रती भाव असणार्‍या सौ. मीरा संभाजी माने !

सौ. मीरा माने
      भाद्रपद कृष्ण पक्ष द्वादशी (२७.९.२०१६) या दिवशी रामनाथी आश्रमात पूर्णवेळ सेवा करणार्‍या सौ. मीरा संभाजी माने यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त साधिकेला तिची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये देत आहोत.
सौ. मीरा संभाजी माने यांना वाढदिवसानिमित्त 
सनातन परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा !
१. हसतमुख : मीराताई कोणत्याही परिस्थितीत हसतमुख असते. ती आश्रमसेवा करूनही थकलेली दिसत नाही.
२. प्रेमभाव : ताई माझी आस्थेने विचारपूस करायची. मला काही अडचणी नाहीत ना ?, हे ती जाणून घ्यायची.
३. प्रत्येक प्रसंगात मी कुठे चुकले ?, हे ताई तत्त्वनिष्ठपणे सांगायची.
४. ताई स्वतःकडून झालेल्या चुकाही पारदर्शकपणे सांगून त्यातून काय शिकले ?, हेही सांगायची.
५. साधनेतील अडचणींवर आध्यात्मिक दृष्टीकोन देणे :
मला असलेल्या वैयक्तिक अडचणींसाठी मीच कारणीभूत आहे, असे समजून काही वेळा मला निराशा यायची. तेव्हा ताई सांगायची, अशा प्रकारे विचार करणे, हे अहंचे लक्षण आहे. परिस्थिती कशीही असली, तरी स्थिर रहाता यायला हवे. आपल्या प्रारब्धानुसार आपल्या जीवनात प्रसंग घडतात.

असे आहेत माझे गुरुदेव !

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त...

ज्यांची कांती सोन्याहूनही पिवळी ।
ज्याने होत असे सारे वातावरण चैतन्यमय ॥ १ ॥

ज्यांचे मन आकाशाहूनही विशाल ।
ज्याने व्यापले सारे ब्रह्मांड ॥ २ ॥

ज्यांचे बोलणे असे अमृताहूनी गोड ।
ज्याने जिंकले सर्व देवतांचे ।
संतांचे अन् साधकांचे मन ॥ ३ ॥

त्यांचे कार्य इतके व्यापक ।
ज्यांनी मिळवले देवतांचे आशीर्वाद ।
म्हणून देवतांनी महर्षींच्या रूपात पाठवले दूत ।
रक्षण करण्या अन् संकल्प सिद्धीस नेण्या ॥ ४ ॥

ज्यांचे मुख असे ।
सूर्याहूनही तेजस्वी ।
ज्यांच्याकडे पहाताच ।
जाती डोळे दिपून

माझ्या आश्रमाची काय सांगू महती ।

कधी वाटे द्वारका । जिथे साक्षात् कृष्ण वास करी ।
अन् करी चैतन्याची उधळण ॥ १ ॥

कधी वाटे वृंदावन । जिथे गोपी वास करती ।
अन् करी रासलीलेतून भक्तीची उधळण ॥ २ ॥

कधी वाटे गोकुळ । जिथे बाळगोपाळ वास करती ।
अन् करिती आपुल्या बाललीलेतून आनंदाची उधळण ॥ ३ ॥

कधी वाटे अयोध्या । जिथे रामराज्यासारखे साधक वास करती ।
अन् करती जे सतत इतरांचा विचार ॥ ४ ॥

कधी वाटे स्वर्ग । जिथे साक्षात् सर्व देवता सूक्ष्मातून वास करती ।
अन् करती साधकांसाठी तारक-मारक शक्तींची उधळण

नामजप करत सेवा केल्याने ती अल्प वेळेत पूर्ण होणे

कु. रोहिणी गुरव
      मी प्रतिदिन एका संतांच्या खोलीतील सेवा करते. ही सेवा करायला मला ४ घंटे लागतात. एके दिवशी ३ घंट्यांतच सर्व सेवा पूर्ण झाल्या. सेवा लवकर पूर्ण होण्याचे कारण शोधल्यानंतर लक्षात आले की, सेवा करतांना माझा एकाग्रतेने आणि भावपूर्णपणे नामजप होत होता. श्री गुरुदेवांना अपेक्षित अशी सेवा करायची आहे, हा ध्यासही मनात होता. यामुळे त्या दिवशी सेवेसाठी मला १ घंटा न्यून लागला.
      नामजप करत कोणतीही कृती केल्यास अधिक फलनिष्पत्ती मिळतेे, हे वरील उदाहरणावरून लक्षात आले.
- कु. रोहिणी गुरव, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२०.८.२०१६)


अपघातांच्या प्रसंगी भावाचे रक्षण होणे

१. भावाच्या दुचाकीचे चाक निखळूनही त्या अपघातात भावाचे रक्षण होणे
     एकदा माझा धाकटा भाऊ हरि संध्याकाळी ६ वाजता मोटर सायकलने सावंतवाडी (जिल्हा सिंधुदुर्ग) येथे जायला निघाला. तेव्हा मी त्याच्या दुचाकीवर मानस श्री गुरुदेव दत्त या नामजपाच्या पट्टया लावल्या. वाटेत त्याच्या दुचाकीचे चाक निखळून पडले, तरी तो वाचला. लोकांनी रात्री ९ वाजता त्याच्या दुचाकीचे चाक बसवून दिले. नंतर तो रात्री ११ वाजता सुखरूप घरी पोचला.
२. चारगाडीचे चाक रस्त्यात निखळून ते अंधारात नाहीसे होणे आणि गाडी 
कशीबशी थांबवून स्टेपनीचा वापर करून तो रात्री १२ वाजता सुखरूप घरी पोचणे
     काही दिवसांपूर्वी रात्री माझा भाऊ चारचाकी गाडीने परगावी निघाला. मी त्याच्या गाडीवर मानस श्री गुरुदेव दत्त या नामजपाच्या पट्टया लावल्या. त्याने रात्री रस्त्याच्या कडेला गाडी उभी केली होती. कुणी टवाळ मुलाने त्या गाडीच्या एका चाकाचे नट-बोल्ड सैल केले. त्यामुळे गाडीचे चाक रस्त्यात निखळून पडले आणि रात्रीच्या अंधारात गाडी उतारावर असतांना ते कुठेतरी नाहीसे झाले.

दुचाकी किंवा चारचाकी गाडीने प्रवासाला निघण्यापूर्वी गाडीमध्ये देवतांच्या सात्त्विक नामपट्ट्या लावल्याची निश्‍चिती करा आणि वाहनशुद्धी करा !

साधकांना सूचना !
     दुचाकी किंवा चारचाकी गाडीने प्रवासाला निघण्यापूर्वी वाहनाची गोमूत्र किंवा सात्त्विक विभूती घातलेल्या पाण्याने शुद्धी करावी. तसे करणे शक्य नसल्यास कोर्‍या कागदावर चिमूटभर सात्त्विक विभूती घ्यावी आणि ती आपल्या वाहनामध्ये आणि वाहनाच्या सभोवती फुंकरावी. नंतर सनातनच्या वाहनशुद्धीसंबंधी पत्रकात दिल्याप्रमाणे देवतांच्या नामजपाच्या पट्ट्या वाहनात त्या त्या ठिकाणी लावल्या आहेत का ?, याची पडताळणी करावी. वाहनात नामपट्ट्या लावल्या नसल्यास वाहनशुद्धी पत्रकात दिल्याप्रमाणे प्रथम त्या लावाव्यात. नंतर त्या भक्तीभावाने पुसाव्यात. त्यामुळे आपल्या वाहनाभोवती देवतांच्या चैतन्याचे संरक्षककवच निर्माण होईल आणि आपले अनिष्ट शक्तींच्या आक्रमणांपासून रक्षण होईल.
     वरीलप्रमाणे वाहनशुद्धी केल्यानंतरच गाडीने प्रवास करावा.

धर्म-अधर्म लढ्यामागील कार्यकारणभाव !

      जय मल्हार मालिकेत देवतांमध्ये पुढील संवाद होतो.
     गणेश सांगतो, मल्लासुरांना मारण्यास मी एकटा समर्थ आहे. आज्ञा द्यावी.
      मल्हारी सांगतात, सर्वांमध्ये एकजूट हवी. एकजुटीचे कार्य कळायला हवे, तसेच प्रत्येकाचा लेखा-जोखा पूर्ण व्हायचा असतो. तेव्हा प्रत्येकाने आपले सैन्य घेऊन यावे. सर्व दिशांच्या देवांनी यावे.
     पार्वती सांगते, आपल्या अगणित सैन्याने शेतपिकाची वा झाडाझुडपांची हानी होऊ नये; म्हणून प्रत्येकाने विमानातून प्रयाण करावे. जे सत्य आणि पवित्र आहे, त्याचे रक्षण करावे.
     देवराणाचे विचार हेच सांगतात, एकत्र यावे. संधीकाळ येईपर्यंत थांबावे. लेखा-जोखा होणारच. देव (भगवान श्रीकृष्ण) जरी कार्य करू शकत असला, तरी त्याने हाती शस्त्र न घेता अर्जुन आणि प्रजा यांच्याकडून कार्य करवून घेतले. धर्म-अधर्माचा हा लढा असतो ना !
- पुष्पांजली

सनातन प्रभातसाठी वार्तांकन करू इच्छिणारे साधक, वाचक आणि धर्मप्रेमी यांच्यासाठी सुवर्णसंधी !

८ आणि ९ ऑक्टोबर २०१६ या दिवशी 
रामनाथी आश्रमात आयोजित करण्यात आलेल्या 
वार्ताहर प्रशिक्षण शिबिरात सहभागी व्हा !
        सनातन प्रभात म्हणजे ज्वलंत हिंदुत्व आणि हिंदु राष्ट्राची स्थापना यांचा वसा घेतलेले एकमेव नियतकालिक ! सनातन प्रभातमध्ये प्रतिदिन राष्ट्र आणि धर्म यांवरील संकटांविषयी जागृती करणारी वृत्ते, लेख, तसेच अन्य लिखाण प्रसिद्ध केले जाते.
१. वार्तांकन करण्यास शिकून अर्धवेळ किंवा 
पूर्णवेळ वार्ताहराची सेवा करण्यास इच्छुक 
असलेल्यांसाठी रामनाथी आश्रमात शिबिराचे आयोजन !
        प्रतिदिन घडणार्‍या राष्ट्र-धर्म विरोधी घटनांचे वार्तांकन करण्यासाठी मुंबई, पुणे, कोल्हापूर, सोलापूर, संभाजीनगर, नागपूर, जळगाव आदी प्रमुख शहरांमध्ये वृत्तसंकलनाच्या सेवेसाठी पूर्णवेळ वार्ताहर, तर अन्य जिल्ह्यांमध्ये अर्धवेळ वार्ताहर आवश्यक आहेत.

साधकांनो, साधनेत सातत्य रहात नाही, याची चिंता करू नका !

     काही साधकांना स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रियेत सातत्य ठेवता येत नसल्याने निराशा येते. साधना वाढवण्याचे महत्त्व कळूनही प्रयत्न होेत नसल्याने त्यांची स्थिती कळते; पण वळत नाही, अशी होते. त्यामुळे त्यांना स्वतःच्या साधनेची चिंता वाटते.
    साधनेत जसजशी प्रगती होते, तसतशी स्थिरता येऊ लागतेे. साधक साधनेत स्थिर झाला की, त्याच्या प्रयत्नांत आपोआप सातत्य येते. ६० टक्के पातळी गाठेपर्यंत मायेची ओढ अधिक असल्याने हे प्रयत्न परिश्रमपूर्वक करावे लागतात. त्यामुळे साधकांनी निराश न होता सध्या करत असलेले साधनेचे प्रयत्न खंड पडू न देता चालू ठेवणे आणि त्यात दिवसागणिक वृद्धी करणे अपेक्षित आहे !
- (सद्गुरु) सौ. बिंदा सिंगबाळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२५.९.२०१६)


सनातन प्रभातसाठी संपादकीय साहाय्य करू इच्छिणारे साधक, वाचक, हितचिंतक आणि धर्मप्रेमी यांच्यासाठी सुवर्णसंधी !

राष्ट्र-धर्म रक्षणार्थ कार्यरत असलेल्या 
सनातन प्रभातच्या संपादनाच्या सेवेत सहभागी व्हा !
        वाचकांत राष्ट्रप्रेम जागवणारे, अल्पावधीत त्यांच्यात साधनाबीज रोवणारे एकमात्र दैनिक म्हणून सनातन प्रभातची ख्याती आहे. गेल्या ३ वर्षांपासून या दैनिकाने पृष्ठसंख्या वृद्धी केली असून त्यामुळे राष्ट्र, धर्म आणि अध्यात्म यांविषयीची वाचनीय सदरे वाचकांना उपलब्ध होत आहेत. यापुढेही दैनिकाची पृष्ठसंख्या प्रतिदिन १० पानी करण्याचा प्रयत्न आहे; मात्र अपुरे मनुष्यबळ, वाढती पृष्ठसंख्या यांमुळे संपादनाच्या सेवेसाठी उपलब्ध साधकसंख्या अपुरी पडत आहे.
        या दृष्टीकोनातून मराठी किंवा संस्कृत भाषेचे ज्ञान असणे, तसेच या विषयांचे शिक्षक अथवा प्राध्यापक, तसेच संपादकीय सेवेचा पूर्वानुभव असलेल्यांना सनातन प्रभातसाठी पूर्णवेळ अथवा अर्धवेळ संपादकीय संस्करणाची सेवा करण्याची संधी गोवा, पनवेल, पुणे, जळगाव, सांगली, मुंबई या ठिकाणी राहून उपलब्ध आहे.

हिंदु जनजागृती समितीची मराठा आंदोलनाविषयीची भूमिका

        कोपर्डी येथील बलात्काराच्या घटनेतील आरोपींना फाशी देणे, तसेच अ‍ॅट्रॉसिटी कायदा रहित करणे, या मागण्यांसाठी होत असलेल्या मराठा समाजाच्या आंदोलनाला हिंदु जनजागृती समितीचे समर्थन आहे. हिंदु समाजाचे संघटन हे विविध समाजांच्या संघटनातून होते, या तत्त्वावर हिंदु जनजागृती समितीचा विश्‍वास आहे. यासाठीच हिंदु जनजागृती समितीचे मराठा समाजातील कार्यकर्ते आवर्जून या आंंदोलनात सहभागी होत आहेत. या आंदोलनात मराठा आरक्षणाच्या होणार्‍या मागणीचे मात्र हिंदु जनजागृती समिती समर्थन करत नाही; कारण जातीजातींत फूट पाडणारे आरक्षणाचे धोरण हिंदूंचे संघटन नाही, तर विघटन करते, असे समितीला वाटते. आंदोलनातील सगळ्याच सूत्रांविषयी सर्वच संघटनांचे एकमत होणे शक्य नसते, यासाठी समितीचे ज्या सूत्रांना समर्थन आहे, त्या सूत्रांना समिती पाठिंबा देते.
- श्री. अरविंद पानसरे, प्रवक्ता, हिंदु जनजागृती समिती
       क्रांती ही सीतेसारखी असते. राम वनवासात जातो, तेव्हा ती त्याच्यासोबत असते आणि तो जेव्हा राजवैभव भोगू लागतो, तेव्हा ती भूमिगत होते. 
- ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे
      साधकांनो, तुम्ही राष्ट्र आणि धर्म यांसाठी सर्वस्वाचा त्याग करत आहात. त्यामुळे भगवंत तुम्हाला आपत्काळात तारून तर नेईलच; पण तो तुम्हाला आपले करून घेईल, याची खात्री बाळगा !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले
       साधक साधना करत असल्यामुळे एखाद्याशी बोलतांना किंवा दूरचित्रवाणीवर सनातन संस्थेचे प्रवक्ता म्हणून बोलतांना त्यांना ईश्‍वराच्या कृपेने अकस्मात् योग्य बोलणे सुचते.
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले

बोधचित्र

॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥
या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो.
- प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज
 सनातनचे श्रद्धास्थान
हे असे आहे का ? 
ते तसे आहे का ? हे असेही नाही, तसेही नाही.
ते कशात नाही ? मग ते असेही आहे आणि तसेही आहे. 
भावार्थ : 'हे असे आहे का ?' मधील 'हे' मायेविषयी आहे. 'ते तसे आहे का ?' मधील 'ते' ब्रह्मासंबंधी आहे. हे असेही नाही, तसेही नाही, म्हणजे म्हटले तर 'ही' म्हणजे माया, 'असेही नाही' म्हणजे दिसते तशी नसून ब्रह्म आहे आणि 'तशीही नाही' म्हणजे ब्रह्म म्हटले तर ब्रह्मस्वरूपातही नाही. 'ते कशात नाही ?' म्हणजे ब्रह्म सर्वत्र आहे, मायेतही आहे. 'मग ते असेही आहे आणि तसेही आहे' म्हणजे माया व ब्रह्म दोन्ही एकच आहेत. 
 (संदर्भ : सनातनचे प्रकाशन 'संत भक्तराज महाराज यांची शिकवण'.) 

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

सदाचाराचे महत्त्व ! 
मानवाचे रूप अल्प काळाचे असते. रूपाला महत्त्व नसते, तर व्यक्तीचे 
आचार-विचार आणि वर्तन यांनाच खरे महत्त्व असते. 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

भारत पाकला पाणी पाजणार ?

संपादकीय 
       भारत आणि पाक यांच्यात असलेला सिंधु पाणीवाटप करार रहित करावा कि नाही, याविषयी भारत शासन खल करत आहे. उरी येथे पाकपुरस्कृत आतंकवाद्यांनी केलेल्या आक्रमणानंतर भारताने पाकवर कारवाई करावी, यासाठी शासनावर दबाव आला आहे; मात्र शासन थेट सैन्य कारवाई करण्यास सिद्ध नाही. त्याऐवजी भारतातून जाणार्‍या सिंधु, झेलम आणि चिनाब या नद्यांचे पाणी अडवून पाकच्या अर्थव्यवस्थेवर घाला घालून त्याला कोंडित पकडण्याचे धोरण अवलंबवावे का ?, याविषयी भारत शासन विचाराधीन आहे. या नद्यांच्या पाण्यावर पाकची ९० टक्के अर्थव्यवस्था अवलंबून आहे.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn