Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

धर्मांधांच्या भीतीने प्रशासनाने बंगालमधील एका गावात दुर्गापूजेला अनुमती नाकारली !

 • धर्मांधांच्या दहशतीमुळे दुर्गापूजेला अनुमती नाकारण्यासाठी बंगाल पाकिस्तानात आहे का ?
 • केंद्र सरकारने यात हस्तक्षेप करून हिंदूंना न्याय द्यावा, अशीच बंगालमधील हिंदूंची अपेक्षा !
      कोलकाता - बंगालमधील बीरभूम जिल्ह्यात असलेल्या कांगलापहार गावात हिंदूंची ३०० आणि मुसलमानांची २५ घरे असूनही प्रशासनाने कायदा अन् सुव्यवस्था बिघडेल या कारणास्तव हिंदूंना दुर्गापूजा उत्सव साजरा करण्यास अनुमती नाकारली आहे. अशाच प्रकारे अनुमती नाकारण्याचे हे चौथे वर्ष आहे. (गेली ४ वर्षे हिंदूंना दुर्गापूजेसाठी अनुमती नाकारणे ही त्यांना राज्यघटनेने दिलेल्या धर्मस्वातंत्र्याची होणारी गळचेपीच होय ! एरव्ही राज्यघटनेच्या अवमानावरून आक्रोश करणारे पुरो(अधो)गामी आता तोंड का उघडत नाहीत ? देशातील हिंदुत्वनिष्ठ संघटनांनाही हे लज्जास्पद आहे. - संपादक)
१. दुर्गापूजा उत्सव समितीच्या आयोजकांनी जिल्हा प्रशासन, पोलीस अधीक्षक, उपविभागीय अधिकारी इत्यादी अधिकार्‍यांना पत्रे देऊन, भेटी घेऊन दाद मागितली; मात्र कुणीही त्यांना प्रतिसाद दिला नाही.

सैन्याला पराक्रम करण्यासाठी अनुमती न देताही पंतप्रधान म्हणतात, भारतीय सैन्य पराक्रम करील !

       नवी देहली - माझा सैन्यावर पूर्ण विश्‍वास आहे. राजकीय नेते बोलतात; मात्र सैन्य बोलत नाही, तर पराक्रम करते. माझी खात्री आहे की, आपले सैनिक उरीसारख्या आक्रमणांना चोख प्रत्युत्तर देतील, असे विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २५ सप्टेंबरला मन की बात या आकाशवाणीवरील कार्यक्रमात केले. काश्मीरमधील लोकांना आता शांती हवी आहे. काश्मीरचे नागरिक देशविरोधी शक्तींना आता ओळखू लागले आहेत, असेही त्यांनी सांगितले. मोदी पुढे म्हणाले की, या घटनेमुळे देश शोकमग्न आहे आणि आक्रोशही आहे. ही केवळ त्या परिवाराचीच हानी नाही, ज्यांनी त्यांचा मुलगा, भाऊ आणि पती गमावला आहे, तर ही संपूर्ण देशाची हानी आहे. त्यामुळे मी देशवासियांना पुन्हा एकदा इतकेच सांगू इच्छितो की, या घटनेला उत्तरदायी असणार्‍यांना शिक्षा करणारच.
मुसलमानांच्या मतांना 
बाजारातील वस्तू समजू नका !
       मुसलमानांंच्या मतांना बाजारातील वस्तू समजू नका, अशी चेतावणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे. केरळमधील कोझीकोडमध्ये पंडित दीनदयाळ यांच्या १०० व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. जनसंघाने दीनदयाल उपाध्याय यांना अध्यक्ष बनवले होते. त्यांनी मुसलमानांना नेहमीच आपले मानले. त्यांचा आदर करण्याची शिकवण दिली, असेही मोदी म्हणाले.

शिक्षणातून कुशल मनुष्यबळाची निर्मिती व्हायला हवी ! - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

       पुणे, २५ सप्टेंबर - केवळ दुकाने उघडून बसण्यापेक्षा गुणवत्तापूर्ण शिक्षणावर भर द्यायला हवा. नुसत्या पदव्या देऊन चालणार नाही, तर शिक्षणातून कुशल मनुष्यबळाची निर्मिती व्हायला हवी. तेव्हाच आपण २१ व्या शतकातील आव्हानांचा सामना करू शकू. यामध्ये शिक्षकांची भूमिका महत्त्वाची आहे. त्यासाठी तशी शिक्षणपद्धती आणि शिक्षक सिद्ध करायला हवेत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी केले. (यासाठी मेकॉलेप्रणीत शिक्षणप्रणालीपेक्षा गुरुकुल पद्धतीची आवश्यकता आहे. ती चालू होण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी प्रयत्न करावेत ! - संपादक) माईर्स एम्आयटी येथे आयोजित पहिल्या अखिल भारतीय शिक्षक संघाच्या (नॅशनल टीचर्स काँग्रेसच्या) उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या वेळी सिम्बायोसिसचे संस्थापक डॉ. शां.ब. मुजुमदार आणि माईर्स एमआयटीचे संस्थापक डॉ. विश्‍वनाथ कराड या दोघांचा शिक्षण क्षेत्रात केलेल्या कार्याविषयी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते जीवनगौरव पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला.

हिंदु राष्ट्र आमचा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो आम्ही मिळवणारच !

वाराणसी येथे हिंदु जनजागृती समितीद्वारे 
आयोजित हिंदु धर्मजागृती सभेत हिंदूंची प्रतिज्ञा ! 

डावीकडून श्री. गुरुराज प्रभु, सौ. प्राची जुवेकर, श्री. जगजीतन
पाण्डेय, अधिवक्ता श्री. कमलेशचंद्र त्रिपाठी आणि श्री. निलेश सिंगबाळ

      वाराणसी - येथील रामलीला मैदानमध्ये २५ सप्टेंबर या दिवशी हिंदु जनजागृती समितीद्वारे आयोजित करण्यात आलेल्या हिंदु धर्म जागृती सभेत हिंदु राष्ट्र आमचा जन्मसिद्ध अधिकार आहे तो आम्ही मिळवणारच, अशी सामूहिक प्रार्थना करण्यात आली. या वेळी अखिल भारतीय धर्म संघाचे महामंत्री श्री. जगजीतन पाण्डेय, हिंदुत्वनिष्ठ अधिवक्ता श्री. कमलेशचंद्र त्रिपाठी, सनातन संस्थेचे श्री. गुरुराज प्रभु, रणरागिणी शाखेच्या सौ. प्राची जुवेकर आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. निलेश सिंगबाळ यांनी मार्गदर्शन केले. या सभेला ४५० धर्माभिमानी उपस्थित होते.
सविस्तर वृत्त उद्या प्रसिद्ध करत आहोत.

काही पाक कलाकारांनी भारत सोडला !

 • मनसेसारखी राष्ट्रप्रेमी भूमिका केंद्र सरकार का घेत नाही ?
 • हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीतूनही पाकिस्तानच्या कलाकारांना विरोध !
       मुंबई - मनसेने दिलेल्या चेतावणीनंतर काही पाकिस्तानी कलाकारांनी भारत सोडल्याची माहिती पुढे येत आहे. मनसेचे अमेय खोपकर यांनी सांगितले की, मुंबईतून अनेक पाकिस्तानी कलाकार निघून गेले, तर काही देहलीमध्ये गेले आहेत; पण ते आता मुंबईत येणार नाहीत.
१. पाकिस्तानी कलाकारांना त्वरित देश सोडण्याची चेतावणी मनसेने दिल्यानंतर आता चित्रपटसृृष्टीतूनही पाकिस्तानी कलाकारांना विरोध चालू झाला आहे. (उशिरा सुचलेले शहाणपण ! - संपादक) मनसेच्या मताशी हिंदी आणि मराठी चित्रपटक्षेत्रातील अनेक कलाकार सहमत आहेत. गायक कुमार सानू आणि विनोदी कलाकार राजू श्रीवास्तव यांनी त्यांचा पाकिस्तानचा दौरा रहित केला आहे.

धर्मसेवा प्रतिष्ठान न्यासाच्या वतीने वणी (जिल्हा यवतमाळ) येथे विविध उपक्रम

महिलांनी तणावमुक्त जीवन 
कसे जगावे याविषयी मार्गदर्शन 

महिलांना मार्गदर्शन करतांना सौ. कल्पना खामणकर

       वणी (जिल्हा यवतमाळ) - येथे धर्मसेवा प्रतिष्ठान न्यासाच्या वतीने तणावमुक्त जीवन कसे जगावे, याविषयी सौ. काळे यांच्या सभागृहात सौ. कल्पना खामणकर यांनी मार्गदर्शन केले. काही महिलांनी त्याचा लाभ घेतला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सौ. काळे, सौ. रोडे, सौ. ठाकरे यांनी प्रयत्न केले.

(म्हणे) भारतच पाकमध्ये आतंकवाद पसरवतो ! - पाकचा कांगावा

पाकचा हा आरोप म्हणजे 
चोराच्या उलट्या बोंबा होय !
      नवी देहली - २४ सप्टेंबरला पंतप्रधान मोदी यांनी केरळच्या कोझीकोडे येथे केलेल्या भाषणात पाक आतंकवाद निर्यात करणारा देश असल्याची टीका केली होती. त्यावर पाकने प्रत्युत्तर देतांना भारतच पाकमध्ये आतंकवाद पसरवतो आहे, असा कांगावा केला आहे. पाकच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता महंमद नफीस जकारिया यांनी म्हटले की, भारतीय हेर कुलभूषण यादव याने दिलेल्या स्वीकृतीवरूनच हे स्पष्ट झाले होते की, भारत पाकमध्ये आतंकवाद्यांना साहाय्य करतो. भारत पाकची प्रतिमा मलीन करण्याची मोहीम राबवत आहे. भारताने केलेले सर्व आरोप निराधार आहेत. भारताचे सुरक्षा दल काश्मीरमधील लोकांवर अत्याचार करत आहे आणि त्याकडे लोकांचे दुर्लक्ष व्हावे, यासाठी असे आरोप करत आहे.

कोइम्बतूर (तमिळनाडू) येथे पोलिसांकडून हवालाच्या ३ कोटी ५० लाख रुपयांची लूट !

गुन्हेगारी कृत्ये करणार्‍या पोलिसांना गुन्हेगारांपेक्षा 
अधिक कठोर शिक्षा न्यायालयाने करावी, ही अपेक्षा ! 
      कोईम्बतूर (तमिळनाडू) - तमिळनाडूमध्ये ३ पोलिसांनी हवालाचे ३ कोटी ५० लाख रुपये लुटल्याच्या प्रकरणी पोलिसांनी त्यांना अटक केली. यांपैकी एक जण करूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मुथुकुमार असल्याचे उघड झाले आहे. यापूर्वीही अशाच एका चोरीच्या प्रकरणात मुथुकुमार यांचा हात असल्याचे उघड झाले होते. 
पोलिसांनी सोन्याच्या व्यापाराची गाडी पळवली !
      पोलिसांच्या या टोळीमध्ये पोलीस निरीक्षक मुथुकुमार, उपनिरीक्षक सरवानन आणि पोलीस शिपाई धर्मेंद्रन यांचा समावेश आहे. या टोळीने २५ ऑगस्टला कोईम्बतूरच्या इचनारी येथे वाहनांची तपासणी करत असल्याचे भासवून एक गाडी अडवली. या गाडीमध्ये केरळच्या मलप्पूरम् येथील सोन्याचे व्यापारी अन्वरसाद यांचे सहकारी होते. पोलिसांनी त्यांना गाडीची झडती घ्यायचे असल्याचे सांगितले. एका पोलिसाने त्या आलिशान गाडीचा ताबा घेतला आणि गाडी महामार्गावर घेऊन गेले. बरेच पुढे गेल्यानंतर पोलिसाने अन्वरसाद यांच्या सहकार्‍यांना महामार्गावर उतरण्यास सांगितले आणि गाडीसह पळ काढला.

पाकिस्तानमध्ये विधानसभा अध्यक्षांकडून हिंदु नेत्याला सदस्यत्वाची शपथ देण्यास नकार !

भारतात अल्पसंख्यांक लोकप्रतिनिधींविषयी असे कधी घडू शकते का ?
      नवी देहली - पाकच्या खैबर-पख्तूनख्वा प्रांताचे विधानसभा अध्यक्ष असद कैसर यांनी हिंदु नेते बलदेव कुमार यांना सदस्यत्वाची शपथ देण्यास नकार दिला. तहरीक-ए-इन्साफचे नेते कुमार विधानसभा अध्यक्षांच्या या व्यवहाराच्या विरोधात न्यायालयात जाण्याचा विचार करत आहेत.
   पाकच्या खैबर-पख्तूनख्वा प्रांताचे अल्पसंख्यांक मंत्री सरदार सूरन सिंह यांची हत्या झाल्यानंतर अल्पसंख्यांकांसाठी आरक्षित असलेल्या या मतदारसंघात दुसर्‍या स्थानावर असलेले बलदेव कुमार यांना निर्वाचित घोषित करण्यात आले होते. त्यानंतर त्यांना विधानसभा सदस्यत्वाची शपथ देण्यात येणार होती.
     सरदार सूरन सिंह यांची अज्ञात बंदूकधार्‍यांनी गोळी मारून हत्या केली होती. या हत्येचे तहरीक-ए-तालिबान या संघटनेने दायित्व स्वीकारले होते; परंतु या हत्येत बलदेव कुमार यांचा सहभाग असल्याचे सांगून पोलिसांनी त्यांना अटक केली होती. सध्या कुमार कारागृहात आहेत. त्यामुळे विधानसभा अध्यक्ष कैसर यांनी कुमार यांना शपथ देण्यास नकार दिला. (आतंकवादी संघटनेने सिंह यांना ठार मारल्याचे दायित्व स्वीकारले असतांनाही पाक बलदेव कुमार यांना कारागृहात डांबून ठेवते, यावरून पाकचा हिंदुद्वेष दिसून येतो ! - संपादक )

कोल्हापूर येथील लोकशाही संघर्ष यात्रेत सनातन संस्था मुर्दाबाद, आर्एस्एस् मुर्दाबाद अशी घोषणाबाजी !

यावरून ही लोकशाही संघर्ष यात्रा केवळ हिंदुत्वनिष्ठ संघटनांची 
अपकीर्ती करून हिंदुद्वेष पसरवण्यासाठीच काढली जात आहे, हे लक्षात येते !
      कोल्हापूर - येथे पुरो(अधो)गाम्यांच्या वतीने काढण्यात आलेल्या लोकशाही संघर्ष यात्रेत शेवटी सनातन संस्था मुर्दाबाद, आर्एस्एस् मुर्दाबाद अशी घोषणाबाजी करण्यात आली. ही यात्रा मुस्लीम बोर्डिंगच्या सभागृहात झाली. डॉ. दाभोलकर, कॉ. पानसरे आणि प्रा. कलबुर्गी यांच्या हत्यांच्या निषेधार्थ या यात्रा ठिकठिकाणी काढल्या जात आहेत. यात्रेत कॉ. अजित अभ्यंकर म्हणाले, हे सरकार हिंदुत्वनिष्ठांचे आहे. हिंदुत्वनिष्ठांमधीलच काही पूर्वी पकडले होते आणि त्यांना सोडून देण्यात आले. आताही त्यांचे दोन लोक पकडले असून त्यांनाही सोडून देतील; कारण सरकार त्यांचेच आहे. कुठल्याही राष्ट्राची निर्मिती ही धर्माच्या आधारावर होऊ शकत नाही. पाकिस्तानची अवस्था आज काय झाली, ते आपण पहातोच.

जर काश्मिरींना भारतासमवेत रहाण्यात आनंद आहे, तर आमचा आक्षेप नाही ! - पाक

काश्मिरी भारतासमवेत रहाण्यात आनंदी नाहीत, असे दर्शवण्यासाठी पाक तेथे 
हिंसाचार घडवून आणत आहे, हे संपूर्ण जगाला ठाऊक आहे, हे पाकने लक्षात ठेवावे ! 
      नवी देहली - कोणत्याही क्षेत्रावर दावा करण्याची आमची इच्छा नाही आणि आमचे धोरणही नाही; मात्र काश्मीर असे क्षेत्र नाही. तेथे एक कोटी २० लाख लोक रहातात. तेथील नागरिकांना त्यांचे भविष्य निवडण्याचा अधिकार आहे. जम्मू-काश्मीरच्या लोकांना त्यांच्या भविष्याचा निर्णय घेण्याची संधी मिळाली पाहिजे. जर त्यांना वाटते की, ते भारतासमवेत राहून अधिक आनंदी आहेत, तर पाकला त्यावर कोणताही आक्षेप नसेल, असे प्रतिपादन पाकचे भारतातील उच्चायुक्त अब्दुल बासित यांनी केले आहे. एका इंग्रजी दैनिकात प्रसिद्ध झालेल्या त्यांच्या मुलाखतीत असे म्हटले आहे. युद्ध कोणत्याही समस्येवर उत्तर नाही, असेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले.

काश्मीरमध्ये पकडलेल्या आतंकवाद्याची तो पाकिस्तानी असल्याची स्वीकृती !

अशांना तात्काळ खटला चालवून कठोर शिक्षा करायला हवी !
      श्रीनगर - काश्मीरमध्ये सीमा सुरक्षा दलाच्या सैनिकांनी घुसखोरी करतांना पकडलेला आतंकवादी अब्दुल कयूम याने त्याला लष्कर-ए-तोयबाचा प्रमुख हाफिज सईद याच्याकडून प्रशिक्षण मिळाले असल्याची स्वीकृती दिली आहे. तसेच तो पाकिस्तानच्या सियालकोट येथील रहिवाशी असल्याचेही त्याने मान्य केले आहे. (असे पाकचे कितीही आतंकवादी पकडले, तरी त्याचा पुरावा म्हणून उपयोग शून्य आहे आणि तसेच असे पकडलेल्यांना आयुष्यभर पोसावे लागते, हा आणखी वेगळा भाग ! भारताने पाकची घुसखोरी थांबवण्यासाठी कठोर कायदे करायला हवेत ! - संपादक) १२ वी पर्यंत शिकलेला कयूम हा १६ व्या वर्षांपासून कट्टरतावादाकडे झुकला. पाकमधील मानसेरा केंद्रात आतंकवादाचे प्रशिक्षण घेत असल्याचे त्याने सांगितले.

आरोग्याच्या संदर्भात १८८ देशांमध्ये भारत १४३ व्या स्थानी !

स्वातंत्र्याच्या ६९ वर्षांत भारताने केलेली प्रगती !
      नवी देहली - आरोग्याच्या संदर्भात भारत बराच पिछाडीवर असून जगभरातील १८८ देशांच्या सूचीमध्ये भारत १४३ व्या स्थानी आहे. आरोग्यशास्त्र, मृत्यूचे प्रमाण, मलेरिया आणि वायूप्रदूषण यांसह अनेक आघाड्यांवर भारत मागे आहे, असे एका आंतरराष्ट्रीय अभ्यासातून स्पष्ट झाले आहे. याविषयीची माहिती लँसेट नावाच्या वैद्यकीय नियतकालिकामध्ये प्रसिद्ध झाली आहे. भारताची आर्थिक वाढ जलदगतीने होत आहे, तरी आरोग्याच्या संदर्भात भारत घाना आणि कोमोरोस यांच्यापेक्षा मागे आहे.

दंगा या चित्रपटाला मान्यता देण्यास चित्रपट परिनिरीक्षण मंडळाचा नकार

 • कोलकाता दंगलीतील वास्तवापासून समाजाला अंधारात ठेवू पाहणारे चित्रपट परिनिरीक्षण मंडळ !
 • कोलकाता दंगलीवर आधारित या चित्रपटात नेहरूंना दाखवले विलासी ! 
     नवी देहली - कोलकाता दंगलीवर आधारित दंगा या चित्रपटावरून चित्रपट परिनिरीक्षण मंडळाचे प्रमुख पहलाज निहलानी आणि फिल्म अ‍ॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टीट्यूट ऑफ इंडियाचे प्रमुख गजेंद्र चौहान समोरासमोर आले आहेत. एका वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार या चित्रपटामध्ये जवाहरलाल नेहरू यांना विलासी दाखवण्यात आले आहे, तर जनसंघाचे संस्थापक श्यामा प्रसाद मुखर्जी यांची स्तुती करण्यात आली आहे. त्यामुळे परिनिरीक्षण मंडळाने या चित्रपटाला मान्यता देण्यास नकार दिला आहे. (जवाहरलाल नेहरू हे विलासी असल्याचे जगजाहीर असतांना ते समाजापासून लवपण्याचा प्रयत्न करणारे परिनिरीक्षण मंडळ कोणाची भलामण करत आहेत ? - संपादक)

(म्हणे) बुरहान वानी युवा नेता होता !

भाकपचे महासचिव दीपंकर भट्टाचार्य यांची मुक्ताफळे
      पटणा - बुरहान वानी काश्मीरमध्ये स्थानिक समस्यांना घेऊन आंदोलन करणारा युवा नेता होता, अशी मुक्ताफळे भाकपचे महासचिव दीपंकर भट्टाचार्य यांनी उधळली आहेत. (पाकिस्तानमधील राजकारण्यांप्रमाणे बोलणारे भाकपचे नेते ! असे नेते भारतीय लोकराज्यासाठी लायक आहेत का ? - संपादक) बुरहान हा सुरक्षा दलाच्या चकमकीत मारला गेला होता. त्यानंतर काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचार भडकला होता. हा हिंसाचार नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करणार्‍या सैन्याच्या कारवाईलाही भट्टाचार्य यांनी चुकीचे ठरवले आहे.

भारत-बांगलादेश सीमेवरील गायींच्या अमानुष तस्करीविषयीची ध्वनीचित्रफीत संकेतस्थळावर प्रसारित !

ही ध्वनीचित्रफीत पाहिल्यानंतरही सरकार गोतस्करी 
रोखण्यासाठी कठोर पाऊल उचलेल अशी शक्यता अल्प !
     नवी देहली - भारत-बांगलादेश सीमेवर काटेरी तारांच्या कुंपणावरून दोन गायींना गळ्याला दोरी बांधून अमानुषरित्या सीमापार कसे फेकले जाते, याविषयीची एक ध्वनीचित्रफीत यू ट्यूब या संकेतस्थळावर प्रसिद्ध झाली आहे. ढाका ट्रीब्यून या बांगलादेशातील दैनिकाने हे वृत्त प्रसिद्ध केले आहे. या वृत्तपत्राने त्याच्या संकेतस्थळावरील वृत्तात http://www.dhakatribune.com/bangladesh/2016/09/09/video-cow-smuggling-shocks-two-nations/ या मार्गिकेवर ही ध्वनीचित्रफीत ठेवली आहे. पोलीस साहाय्यक उपनिरीक्षक इस्माईल हुसेन यांनी ही ध्वनीचित्रफीत यू ट्यूब संकेतस्थळावर प्रसारीत केली होती. सुमारे १ लक्ष ४८ सहस्र लोकांनी ध्वनिचित्रफीत पाहिली आणि इतरांनाही पाठवली. भारत-बांगलादेश सीमेवर गायींची अमानुषरित्या चाललेल्या तस्करीविषयी लोकांनी संताप व्यक्त केला आहे.

गोव्यात मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याच्या प्रकरणात शिक्षकाला चार वर्षे सक्तमजुरीसह एक लक्ष रुपयांचा दंड

मुलींवरील अत्याचाराच्या प्रकरणी ९ वर्षांनंतर मिळणारा न्याय हा अन्याय !
      असे वासनांध शिक्षक शिक्षण क्षेत्राला काळीमाच आहेत. अशा शिक्षकांकडून विद्यार्थ्यांवर नैतिकतेचे संस्कार कसे होणार ? त्यामुळे भावी पिढीचेही अधःपतन झाले असणार. हे रोखण्यासाठी शिक्षणातच धर्मशिक्षण देणे किती अपरिहार्य आहे, हे लक्षात येते ! - संपादक
     पणजी - राज्य बाल न्यायालयाने एका ऐतिहासिक निवाड्यात शाळकरी मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याच्या प्रकरणी दोषी आढळलेले निवृत्त शिक्षक संतोष भगत यांना चार वर्षे सक्तमजुरीसह एक लक्ष रुपयांचा दंड ठोठावला आहे. दोषी शिक्षकाचे सध्याचे वय ६८ वर्षे असून एकूणच प्रकार नैतिक अध:पतन आहे, असे न्यायाधिशांनी त्यांच्या निवाड्यात म्हटले आहे, असे वृत्त दैनिक गोवन वार्ताने प्रसिद्ध केले आहे.

श्रीराम सेनेचे अध्यक्ष तथा प्रखर हिंदुत्वनिष्ठ प्रमोद मुतालिक यांच्यावरील गोवा प्रवेशबंदी १५ जानेवारीपर्यंत वाढवली !

निधर्मी शासन असल्याचे भासवण्यासाठी राज्यशासन ज्याप्रमाणे ख्रिस्त्यांना झुकते 
माप देणारे निर्णय घेते; त्याप्रमाणे हिंदूंसाठी प्रमोद मुतालिक यांच्यावरील बंदी का उठवत नाही ?
 • पोलीस अहवालानुसार बंदी वाढवली 
 • प्रमोद मुतालिकांवरील बंदीचे तिसरे वर्ष
     पणजी - श्रीराम सेनेचे अध्यक्ष तथा प्रखर हिंदुत्वनिष्ठ श्री. प्रमोद मुतालिक आणि त्यांचे सहकारी यांंच्यावरील गोवा प्रवेशबंदी राज्यातील भाजप शासनाने १५ जानेवारीपर्यंत वाढवली आहे. राज्यातील दोन्ही जिल्ह्यांच्या पोलीस अधीक्षकांच्या अहवालानुसार ही प्रवेशबंदी वाढवली आहे. प्रखर हिंदुत्वनिष्ठ मुतालिक यांच्यावरील बंदीचे हे तिसरे वर्ष चालू आहे.
      प्रखर हिंदुत्वनिष्ठ श्री. प्रमोद मुतालिक आणि त्यांचे सहकारी यांच्यावर प्रथम १९ ऑगस्ट २०१४ या दिवशी सहा मासांसाठी गोवा प्रवेशबंदी घालण्यात आली होती आणि यानंतर दर सहा मासांनी या बंदीमध्ये वाढ करण्यात आली.

बायकोला मारण्यापेक्षा सीमेवर जाऊन लढा !

गुजरात उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी आरोपीला सुनावले !
      कर्णावती (अहमदाबाद) - जम्मू-काश्मीरमध्ये सध्या तणावाचे वातावरण आहे. तेथे सीमेवर अधिकाधिक लोकांची आवश्यकता आहे. पराक्रम गाजवण्याची एवढी हौस असेल, तर बायकोला मारण्यापेक्षा सीमेवर जाऊन लढा, अशा कठोर शब्दांत गुजरात उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती सोनिया गोकणी यांनी एका आरोपीला सुनावले.
     गांधीनगर येथील व्यवसायाने चालक असलेल्या वनराजसिंह राणा याच्या विरोधात त्याच्या पत्नीने मारहाण करणे आणि जिवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार प्रविष्ट केली होती. या तक्रारीवरून चिलोडा पोलिसांनी राणा याच्यावर गुन्हा प्रविष्ट केला होता. कालांतराने वाद शांत झाल्यानंतर राणाने त्याच्या विरोधातील गुन्हा मागे घेण्यासाठी उच्च न्यायालयात दाद मागितली होती. न्या. गोकणी यांच्या खंडपिठापुढे नुकतीच राणा यांच्या याचिकेवर सुनावणी झाली.

गायक कुमार सानू आणि हास्य कलाकार राजू श्रीवास्तव यांच्याकडून पाक दौरा रहित !

      मुंबई - उरी येथील आतंकवादी आक्रमणाचा निषेध म्हणून पार्श्‍वगायक कुमार सानू आणि हास्य कलाकार राजू श्रीवास्तव यांनी पाकचा नियोजित दौरा रहित केला आहे. 
   कुमार सानू म्हणाले की, माझ्या देशावर आणि देशाचे रक्षण करणार्‍या सैनिकांवर माझे प्रेम आहे. त्यांच्याप्रती माझ्या मनात नितांत आदर आहे. त्या आदरामुळेच मी हा निर्णय घेतला आहे. (कुमार सानू आणि राजू श्रीवास्तव यांनी घेतलेला निर्णय अभिनंदनीय आहे; मात्र पाकने आतापर्यंत शेकडो आतंकवादी आक्रमणे केली आणि त्यात सैनिकांसह नागरिक ठार झाले आहेत. उरी पूर्वी भारतात असे आक्रमण झाली नाहीत का ? तरीही भारतीय कलाकार पाकमध्ये जाण्याचे नियोजन का करतात ? उरीचे आक्रमण झाले नसते, तर हे कलाकार पाकमध्ये गेलेच असते ना ? - संपादक)भारताला फ्रान्सकडून मिळणार ३६ राफेल लढाऊ विमाने !

केवळ लढाऊ विमानांनी भारताच्या लष्कराची शोभा वाढवू नका, 
तर त्यांचा शत्रूच्या विरोधात वापरही करा !
भारत-फ्रान्समध्ये राफेल विमान करार
 • ५९ सहस्र कोटी रुपयांचा करार 
 • भारताच्या भूमीवरून पाकिस्तानवर लक्ष्य साधता येणार
       नवी देहली - नुकतेच भारत आणि फ्रान्स यांच्यात झालेल्या करारानुसार भारताला ३६ राफेल लढाऊ विमाने मिळणार आहेत. या विमानांमुळे भारताच्या भूमीवरून पाकिस्तानवर अचूक लक्ष्य साधणे शक्य होणार असून भारतीय हवाई दलाच्या सामर्थ्यात मोठी भर पडणार आहे. या विमानात मिटीअर आणि मायका या दोन मिसाईल प्रणाली असतील. या प्रणाली पाकिस्तानकडे सध्या असलेल्या प्रणालींपेक्षा अधिक संहारक आहेत. (अनेक वर्षांपासून पाक पुरस्कृत आतंकवाद्यांच्या आक्रमणात शेकडो सैनिक आणि भारतीय जनता मृत्यूमुखी पडत असतांना भारताचे सैनिकी सामर्थ्य केवळ १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी या दिवशी देशाला दाखवण्यापुरतेच मर्यादित राहिले आहे. त्यामुळे यापुढे या सामर्थ्याचा उपयोग देशसेवेसाठी व्हावा, अशी जनतेची सरकारकडून अपेक्षा आहे ! - संपादक)

पंजाब गोरक्षा दलाचे अध्यक्ष सतीशकुमार प्रधान यांच्यावरील कारवाई रहित करावी !

बडोदा येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलनाच्या अंतर्गत जिल्हाधिकार्‍यांना निवेदन
जिल्हाधिकारी लोचन सेहरा यांना निवेदन सादर
करतांना उजवीकडून सर्वश्री दीप दोडिया,
अनुप सुकुमारन् आणि वैभव आफळे
     बडोदा - देशद्रोहाचे समर्थन करणारी अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनल इंडिया आणि काश्मीरमधील राष्ट्रद्रोही फुटीरतावादी, तसेच समाजात अश्‍लीलता पसरवणारी सनी लिओन यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी, पंजाब गोरक्षा दलाचे अध्यक्ष सतीशकुमार प्रधान यांच्यावरील कारवाई रहित करावी याकरता राष्ट्रीय हिंदू आंदोलनाच्या अंतर्गत नुकतेच बडोद्याचे जिल्हाधिकारी लोचन सेहरा यांना निवेदन सादर करण्यात आले. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. वैभव आफळे, श्रीमती अंशू संत, धर्माभिमानी श्री. अनुप सुकुमारन् आणि श्री. दीप दोडिया उपस्थित होते.

सोमेश्‍वर (जिल्हा पुणे) येथील मद्यभट्टी महिलांकडून उद्ध्वस्त

पोलीस आणि महसूल प्रशासन यांनी 
वेळीच नोंद न घेतल्याचा हा परिणाम ! पुढे अशा 
प्रकारचा जनक्षोभ उसळल्यास आश्‍चर्य ते काय ?
       पुणे, २५ सप्टेंबर - येथील बारामती तालुक्यातील लक्ष्मीनगर परिसरात करण्यात येणार्‍या अवैधरित्या गावठी मद्यनिर्मितीच्या बंदीसाठी महिलांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यांनी निवेदनाद्वारे मद्यभट्टी आणि विक्री त्वरित बंद करावी, अशी मागणी २१ सप्टेंबर या दिवशी केली; मात्र दुसर्‍या दिवशीही मद्यविक्री चालूच राहिल्याने २५ हून अधिक महिलांनी थेट मद्यभट्टीच उद्ध्वस्त केली. (जनहितार्थ मद्यबंदी करण्यासाठी संघटितपणे प्रयत्न करणार्‍या महिलांची कौतुकास्पद कृती ! - संपादक)
       मद्यामुळे कोवळ्या वयातील अनेक मुले व्यसनाधीन झाली आहेत. विषारी मद्यपानामुळे एक युवक अत्यवस्थ झाल्याने त्याला रुग्णालयात भरती करण्यात आले होते. त्या विरोधात महिला आक्रमक झाल्या होत्या.

मतदानाच्या वेळी मद्याची प्रलोभने दाखवल्याने आजची पिढी व्यसनाधीन ! - माजी मुख्यमंत्री डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर

काँग्रेसला घरचा अहेर !
       चिंचवड (पुणे), २५ सप्टेंबर - लोकशाहीची जाण नसणार्‍या १८ वर्षे वयाच्या तरुणांना मतदानाचा अधिकार दिला. मतदानाच्या वेळी मद्याची प्रलोभने दाखवली जात असल्याने आजची पिढी व्यसनाधीन बनत चालली आहे. ही स्थिती पालटण्यासाठी आजच्या शालेय अभ्यासक्रमात पालट करून चारित्र्य आणि व्यसनमुक्ती यांच्या जागृतीचे धडे दिले पाहिजेत, असे मत काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री डॉ. शिवाजीराव पाटील-निलंगेकर यांनी व्यक्त केले. (१८ व्या वर्षी युवकांना मतदानाचा अधिकार देणे आणि मतदारांना प्रलोभने दाखवणे या सर्वाला काँग्रेसच उत्तरदायी आहे. असे असतांना ही परिस्थिती पालटण्यासाठी निलंगेकर यांनी स्वतःच्या हातात सत्ता असतांना काही प्रयत्न का केले नाहीत ? - संपादक) येथील मराठवाडा युवा मंचच्या ४ थ्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
       स्वतंत्र विदर्भाच्या सूत्रावर बोलतांना डॉ. निलंगेकर म्हणाले की, महाराष्ट्राचे तुकडे पडू नयेत. विदर्भ आणि मराठवाडा वेगळे मागण्याची भाषा चुकीची आहे. अनुशेष राहिला असेल; मात्र ते कारण वेगळे होण्यासाठी योग्य नाही. संयुक्त महाराष्ट्रच कायम राहिला पाहिजे.

मनसेचे अमेय खोपकर यांंना पोलिसांची कलम १४९ अंतर्गत नोटीस !

       मुंबई - उरी येथील लष्करी तळावर झालेल्या आतंकवादी आक्रमणानंतर पाकिस्तानी कलाकारांनी येत्या ४८ घंट्यांमध्ये देश सोडून जावे, अशी चेतावणी महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी दिली होती. मुंबई पोलिसांनी त्याची गंभीर नोंद घेत खोपकर यांना कलम १४९ अंतर्गत नोटीस बजावली आहे. (अशी नोटीस अन्य धर्मियांना देण्याचे पोलिसांचे धाडस झाले असते का ? - संपादक)
       पोलिसांचा हा प्रकार म्हणजे चोर सोडून संन्याशाला फाशी देण्यासारखे आहे, असे वाटल्यास वावगे ते काय ? जनतेला संरक्षण देणार्‍या प्रशासकीय यंत्रणा राष्ट्रप्रेमाने भारलेल्या हव्यात, अशी अपेक्षा असतांना उलट त्या राष्ट्रप्रेमी जनतेलाच अटकाव करत आहेत, हे नवल नव्हे का ?

मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याला विलंब का ? - मुंबई उच्च न्यायालयाने खुलासा मागवला

आतातरी अन्वेषण यंत्रणा खरे कारण सांगतील 
का ? इतके वर्षे खटला प्रलंबित ठेवल्याच्या प्रकरणी 
न्यायालयाने अन्वेषण यंत्रणांतील उत्तरदायींवर 
कठोर कारवाई करावी, अशी जनतेची इच्छा आहे !
       मुंबई, २५ सप्टेंबर - सप्टेंबर २००६ मध्ये मालेगाव येथे घडवण्यात आलेल्या बॉम्बस्फोटाशी संबंधित खटला अद्याप चालू का झालेला नाही, असा प्रश्‍न मुंबई उच्च न्यायालयाने केला. त्याचसमवेत या खटल्याला होणार्‍या विलंबाच्या कारणांचा अहवाल विशेष न्यायालयाकडून मागण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती नरेश पाटील आणि न्यायमूर्ती प्रकाश नाईक यांच्या खंडपिठाने न्यायालयीन निबंधकांना दिला आहे. राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेच्या (एन्आयएच्या) विशेष न्यायालयाने जामीन फेटाळून लावल्याच्या आदेशाच्या विरोधात बॉम्बस्फोटातील आरोपी लोकेश शर्मा आणि धनसिंह यांनी याचिका प्रविष्ट केली आहे.
       २४ सप्टेंबर या दिवशी झालेल्या सुनावणीच्या वेळी पथकाच्या अधिवक्त्यांना न्यायालयाला समाधानकारक उत्तर देता न आल्याने न्यायालयाने हे आदेश दिले. तसेच आरोपींच्या याचिकेवर उत्तर प्रविष्ट करण्याचे आदेशही पथकाला दिले आहेत.

गेल्या ३ वर्षांत काश्मीर सीमेवर आतंकवाद्यांच्या आक्रमणात १८६ सैनिक हुतात्मा !

सैनिकांच्या या आकडेवारीत भविष्यात वाढ झाली, तरी 
पाकपुरस्कृत आतंकवाद्यांच्या विरोधात भारत काही कृती 
करील, अशी अपेक्षा नाही; म्हणून राष्ट्रप्रेमींनी आतंकवादाचे 
समूळ उच्चाटन करण्यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना करावी !
       नवी देहली - गृहमंत्रालयाने लोकसभेत दिलेल्या माहितीनुसार २०१३ पासून आतापर्यंत जम्मू-काश्मीर भागात ७३८ वेळा पाकिस्तानी आतंकवाद्यांनी आक्रमणाचा प्रयत्न केला. या वेळी झालेल्या चकमकीत १८६ सैनिक हुतात्मा झाले, तर २५३ सैनिक घायाळ झाले. याच कालावधीत सैनिकांनी सीमारेषेवरील कारवाईत १४१ आतंकवाद्यांना ठार केले आहे. या वेळी ६४ नागरिकांनाही प्राण गमवावे लागले, तर १८२ नागरिक घायाळ झाले आहेत. या कालावधीत भारतातील आतंकवाद्यांच्या विविध आक्रमणांत नागरिकांसह ४२ सैनिक ठार झाले, तर ३०७ जण घायाळ झाले. मागच्या ३ वर्षांच्या तुलनेत यंदा घुसखोरीचे प्रमाण कमी आहे. २०१३ मध्ये २७७, २०१४ मध्ये २२२, तर २०१५ मध्ये १२१ वेळा भारतीय सीमारेषेत घुसखोरीचे प्रयत्न करण्यात आले. यंदा आतापर्यंत अशा ५१ घटना घडल्या आहेत.

पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षकांच्या संगणकीय पत्त्यावर अज्ञाताकडून अश्‍लील छायाचित्र

गुन्हेगारांना पोलीस आणि 
शिक्षा यांचे भय न वाटण्याचेच द्योतक !
       पुणे - पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षकांच्या संगणकीय पत्त्यावर एका अज्ञात व्यक्तीने स्त्री आणि पुरुष यांचे अश्‍लील छायाचित्र पाठवले आहे. या प्रकरणी पोलीस नाईक कुरळे यांनी चतुःश्रृंगी पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून अज्ञाताच्या विरोधात गुन्हा प्रविष्ट करण्यात आला आहे. आधुनिक तंत्रज्ञानावर भर देत शासन पोलिसांना अद्ययावत बनवत असतानांच पोलीसच सायबर गुन्हेगारांपासून सुरक्षित नाहीत, अशी चर्चा नागरिकांमध्ये होत आहे.
       कुरळे हे पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयात वाचक शाखेत नेमणुकीस आहेत. कुरळे यांनी काम करताना हा प्रकार पाहिला. ६ सप्टेंबर या दिवशी असे अश्‍लील छायाचित्र पाठवण्यात आले आहे. त्यानंतर कुरळे यांनी हा प्रकार वरिष्ठांना कळवला. (यावरून पोलीस प्रशासनाचा कूर्मगती कारभार दिसून येतो. - संपादक)

कोल्हापूर येथे पोलीस हवालदारावर प्राणघातक आक्रमण !

पोलिसांवरील वाढती आक्रमणे
       कोल्हापूर - मध्यवर्ती बसस्थानकाच्या परिसरात २४ सप्टेंबरला रात्री ठाणे शहर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलीस हवालदारावर अज्ञातांनी धारदार शस्त्राने आक्रमण केले. हे हवालदार रात्री साडेअकराच्या सुमारास ते मध्यवर्ती बसस्थानक येथे बसगाडीतून उतरून चालत रिक्शा शोधण्यासाठी जात होते. या वेळी अचानक दुचाकीवरून तिघे जण त्यांच्या पाठीमागून आले. या तिघांतील एकाने आमच्याकडे काय बघतोस म्हणून धारदार शस्त्राने त्यांच्या पोटाच्या बाजूला वार केला. त्यांनी जोरजोरात आरडाओरडा करण्यास आरंभ केला. तोपर्यंत दुचाकीवरुन आक्रमणकर्ते पसार झाले. या हवालदारांवर उपचार चालू आहेत आणि या संदर्भात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

पनवेल येथील सनातनच्या आश्रमाजवळील सनातन संकुलाच्या परिसरात पोलिसांची गाडी १५ मिनिटे थांबली !

        पनवेल - सनातनच्या देवद (पनवेल) येथील आश्रमाजवळील सनातन संकुलाच्या परिसरात २५ सप्टेंबर या दिवशी दुपारी १२.४५ वाजता काही साध्या वेषातील पोलीस चारचाकी वाहनातून आले होते. १५ मिनिटे ते गाडीत होते. त्यानंतर दोन गणवेषधारी पोलीस आले. त्यांच्याशी गाडीतील पोलिसांचे बोलणे झाल्यावर सर्व पोलीस परत गेले.

(म्हणे) डॉ. दाभोलकरांचे मारेकरी सापडल्यास त्यांना आजन्म अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्य करण्याची शिक्षा ठोठावण्यात यावी ! - हमीद दाभोलकर

हमीद दाभोलकर यांच्या विधानावरून डॉ. दाभोलकर आणि कॉ. पानसरे यांची हत्या 
करणारे श्री. समीर गायकवाड आणि डॉ. वीरेंद्र तावडे हे मारेकरी नाहीत, हे सिद्ध होते !
      सातारा, २५ सप्टेंबर (वार्ता.) - आज भारतामध्ये लोकशाहीसाठी संघर्ष यात्रा करावी लागत आहे. या देशात विचारांचा प्रतिवाद विचारांनी नाही, तर गोळ्या झाडून केला जातो. काही वर्षांपूर्वी गोवा राज्यातील मडगाव येथे बॉम्बस्फोट झाले. या बॉम्बस्फोटातील आरोपींची कसून चौकशी केली असती, तर आज डॉ. दाभोलकर, कॉ. पानसरे आणि प्रा. कलबुर्गी यांचे मारेकरी निश्‍चित सापडले असते. आता जर पोलिसांना डॉ. दाभोलकरांचे मारेकरी सापडले, तर त्यांना आजन्म अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्य करण्याची शिक्षा ठोठावण्यात यावी, असे आवाहन अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे श्री. हमीद दाभोलकर यांनी केली. लोकशाहीसाठी संघर्ष यात्रा संयोजन समितीने आयोजित केलेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. या वेळी व्यासपिठावर मेधा पानसरे उपस्थित होत्या.

लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांनी मनात आणल्यास सर्वसामान्यांच्या जीवनात आमूलाग्र पालट शक्य ! - मुख्यमंत्री फडणवीस

जनतेला हेच अपेक्षित आहे !
       पुणे, २५ सप्टेंबर - लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांनी मनात आणले, तर सर्वसामान्य लोकांच्या जीवनात आमूलाग्र पालट घडवून आणणे निश्‍चितच शक्य आहे. प्रशासनाने झोकून देऊन केलेले काम, त्याला विविध स्वयंसेवी संस्थांनी दिलेली साथ आणि प्रचंड लोकांचा सहभाग यांमुळे पुणे विभागात जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत झालेल्या लक्षणीय कामामुळे हे दिसून येत आहे, असे उद्गार मुख्यमंत्री
       श्री. देवेंद्र फडणवीस यांनी २३ सप्टेंबर या दिवशी आयुक्तांच्या झालेल्या बैठकीत काढले. पुणे विभागामध्ये राबवण्यात आलेल्या विविध योजनांचा आढावा मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत घेण्यात आला. या वेळी अनेक प्रशासकीय अधिकारी आणि लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

मनसेच्या चेतावणीनंतर रेडिओ मिर्चीवरील पाक कलाकार आतिफ असलमचा कार्यक्रम रहित !

अन्य पक्षांमध्ये राष्ट्रप्रेम नाही का ?
      मुंबई - रेडिओ मिर्ची या आकाशवाणीच्या वाहिनीवर पाकिस्तानचा गायक आतिफ असलम याच्या मुलाखतीचा कार्यक्रम रहित केला. मनसे कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमाला विरोध केला आणि रेडिओ मिर्चीच्या कार्यालयात जाऊन मनसेने त्यांना चेतावणी दिली. त्यानंतर हा कार्यक्रम रहित करण्यात आला.
      पाकिस्तानी कलाकारांना मुंबई आणि महाराष्ट्रात काम करू देणार नाही, या आमच्या निर्णयावर आम्ही ठाम असल्याचे महाराष्ट्र्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी सांगितले आहे.

कराड येथील श्री गजानन नाट्य मंडळाकडून सनातनच्या उपक्रमाचे कौतुक !

       मोहिमेच्या वेळी कराड नगरीतील मानाचा पहिला गणपति श्री गजानन नाट्य मंडळाने मात्र सनातन संस्थेच्या या प्रबोधनात्मक उपक्रमाविषयी कौतुक केले आणि नारळ अन् पुष्पहार देऊन साधकांचा सत्कार केला. मंडळाचे कार्यकर्ते सनातनच्या प्रबोधनाचे फलक स्वत: हातात धरून ते नदीपर्यंत घेऊन गेले. तेथे असणार्‍या भाविकांना त्यांनी मूर्तींचे विसर्जन वहात्या पाण्यात करण्याचे आवाहन केले. (सनातनच्या प्रबोधनानुसार भाविकांना शास्त्रानुसार कृती करण्याचे आवाहन करणार्‍या श्री गजानन नाट्य मंडळाचे अभिनंदन ! - संपादक)

(म्हणे) काश्मीर केवळ काश्मिरी लोकांचा ! - भाकपचे सरचिटणीस के.एन्. रामचंद्रन्

अशा प्रकारची देशद्रोही विधाने करणार्‍यांना सरकारने कारागृहातच डांबायला हवे !
      नागपूर - काश्मीर कुणाचाही नाही, तो फक्त काश्मिरी लोकांचा आहे. तेथील लोकांवर गोळीबार करणे हा उपाय नाही. (काश्मीर राज्य भारत देशाचे अविभाज्य अंग आहे. ज्यांना ७०-८० वर्षांचा इतिहासही माहीत नाही आणि देशाभिमान कसा असतो, याची कल्पना नाही, ते अशी विधान करतात. सैनिकांनाही त्यांचे कर्तव्य बजावण्याविषयी सांगणारे बोलतांना कशा चुका करतात, हे यातून लक्षात येते - संपादक) उलट तेथील सैन्यदल हटवण्यात यावे, तेथील लोकांना नेमके काय हवे आहे याकरता त्यांचे मतदान घ्यावे आणि त्यांच्या इच्छेनुसार निर्णय घ्यावा, असे मत भारतीय मार्क्सवादी लेनीन कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस के.एन्. रामचंद्रन् यांनी व्यक्त केले. (पाकिस्तानी विचारसरणीने झपाटलेले मार्क्सवादी लेनीन कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस के.एन्. रामचंद्रन् - संपादक)

(म्हणे) विदर्भवादी कार्यकर्त्यांनी शांत रहाण्याची आवश्यकता नाही !

वेगळ्या विदर्भाच्या नावाखाली पक्ष काढण्यामागेही स्वार्थी राजकारणच !
श्रीहरि अणे यांचे चिथावणीखोर वक्तव्य
विदर्भ राज्य आघाडी राजकीय पक्ष स्थापन
      नागपूर, २५ सप्टेंबर - स्वतंत्र विदर्भ राज्य मिळवायचे असेल, तर राजकीय पक्ष स्थापन करून सत्ता मिळवून स्वतंत्र विदर्भ राज्याची निर्मिती करणे, हा एकच पर्याय आहे. पश्‍चिम महाराष्ट्राची मक्तेदारी बंद करण्याची हीच वेळ असल्याने युवकांनी समोर येण्याची आवश्यकता आहे. स्वतंत्र विदर्भाची मागणी करणार्‍या नेत्यांविरोधात शिवसेना किंवा मनसे हे राजकीय पक्ष आक्रमक होत असतील, तर विदर्भवादी कार्यकर्त्यांनी शांत रहाण्याची आवश्यकता नाही. (ही सहिष्णुता आहे का ? - संपादक) जेथे कुठे विदर्भाचा आणि विदर्भातील नेत्यांचा अपमान केला जात असेल, तर तो सहन न करता त्यांना उत्तर द्या, असे अधिवक्ता श्रीहरि अणे अधिवक्ता श्रीहरि अणे यांनी सांगितले. (अशा चिथावण्यांवर पोलीस प्रशासन कारवाई करणार का ? - संपादक) आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर विदर्भ राज्य आघाडी या नव्या राजकीय पक्षाची घोषणा त्यांनी केली. त्या वेळी ते बोलत होते.
      कुठलाही राजकीय पक्ष वेगळे विदर्भ राज्य देणार नाही. स्वतंत्र विदर्भासाठी आजपर्यंत अनेक मोर्चे काढले गेले. नंतर ते विस्मरणात जातात. त्याचा राजकीय आणि प्रशासन पातळीवर काहीच परिणाम होत नाही, असेही ते या वेळी ते म्हणाले.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना जीवे मारण्याची धमकी

राज्यात सत्तारूढ पक्षाचे प्रदेशाध्यक्षच 
सुरक्षित नसतील, तिथे सर्वसामान्य 
नागरिकांच्या सुरक्षेची काय व्यथा असेल ?
       जालना, २५ सप्टेंबर - भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार रावसाहेब दानवे यांना एका संगणकीय पत्राद्वारे (ई-मेल) जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. दानवे यांनी प्रदेशाध्यक्षपद आणि खासदारकी यांचा राजीनामा दिला नाही, तर त्यांना गोळ्या घालून जीवे मारू अशी धमकी त्या पत्रामध्ये देण्यात आली आहे. या प्रकरणी दानवे यांचे स्वीय साहाय्यक राजेश जोशी यांनी विलास देशमुख या व्यक्तीविरोधात येथील कदीम जालना पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली आहे.

पुण्यात न भूतो न भविष्यती अशा संख्येने मराठा क्रांतीचा विराट (मूक) मोर्चा

मोर्च्यात लक्षावधींच्या संख्येत
सहभागी झालेले नागरिक
      पुणे, २५ सप्टेंबर - कोपर्डी घटनेतील दोषींना फाशीची शिक्षा व्हावी, अ‍ॅट्रॉसिटी कायद्यात सुधारणा व्हाव्यात, मराठा समाजाला आरक्षण मिळावे, पिकांना चांगला दर मिळावा, अरबी समुद्रात शिवस्मारक उभे रहावे, आत्महत्या केलेल्या शेतकर्‍यांच्या कुटुंबियांना साहाय्य मिळावे अशा विविध मागण्या घेऊन येथे न भूतो न भविष्यती अशा लक्षावधी संख्येने मराठा क्रांतीचा विराट (मूक) मोर्चा पार पडला. या मोर्च्याचा प्रारंभ डेक्कन येथील संभाजी पुतळ्याला पुष्पहार घालून झाला. पुढे हा मोर्चा लक्ष्मी रस्ता मार्गे विधान भवन चौक येथे जाऊन थांबला. मोर्च्यात सर्वांत पुढे असलेल्या ५ महाविद्यालयीन युवतींनी जिल्हाधिकारी सौरभ राव यांना भेटून निवेदन दिले. त्यानंतर मोर्च्यातील युवतींनी व्यासपिठावर जाऊन मागण्यांचे निवेदन वाचून दाखवले.

आधुनिक शिक्षणपद्धतीत गुरु-शिष्य परंपरेचा समावेश व्हावा ! - पंडित सुरेश तळवलकर

याचा केंद्र आणि राज्य शासन गांभीर्याने विचार करेल का ?
       पुणे, २५ सप्टेंबर - गुरूंविना कोणतीही व्यक्ती आयुष्यात सर्वोच्च स्थान गाठू शकत नाही. सर्मपण, त्याग, कष्ट, वेळेचे पालन आणि प्रामाणिकपणा या गोष्टींचा अवलंब शिष्यांनी करावा, तसेच गुरूंच्या पुढे जाऊन अधिक प्रगती करावी, अशी गुरूची अपेक्षा असते. शिक्षकांना हे ठाऊक असायला हवे की, ज्ञान हे कधीही बाहेरून येत नाही. ते उपजतच असते. फक्त त्याची जाणीव करून दिली पाहिजे. ही जाणीव साधनेविना येत नाही. त्यासाठी गुरूंनी शिष्यांना चांगले संस्कार दिले पाहिजेत. त्यांना साधनेच्या मार्गावर घेऊन जाणारा खरा गुरु असतो.

यवतमाळ येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन

      यवतमाळ - येथील हिंदु जनजागृती समिती आणि अन्य हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने राष्ट्रीय हिंदू आंदोलन स्थानिक श्रीदत्त मंदिर दत्त चौक येथे दुपारी ४ ते सायंकाळी ६ या वेळेत पार पडले. या आंदोलनात श्रीराम जन्मोत्सव समितीचे श्री. मनोज औदार्य, श्री दत्त मंदिर संस्थानचे श्री. भिसे, भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलन समितीचे विनोद अरेवार, सनातन संस्थेच्या सौ. सुनीता खाडे आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. मंगेश खान्देल यांसह २५ कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

धुळे येथे शाळेच्या आवारातच धर्मांधाकडून अल्पवयीन विद्यार्थिनीवर बलात्कार, तर दुसरीचा विनयभंग

आज छत्रपती शिवाजी महाराज असते, तर त्यांनी अशा वासनांधांचा कडेलोटच केला असता ! 
      धुळे - येथील साक्री येथे धर्मांध अमजद शाह नशिरशाह (वय २५ वर्षे) याने छत्रपती शिवाजी महाराज इंग्रजी माध्यमाच्या शाळेच्या आवारातच एका अल्पवयीन विद्यार्थिनीवर बलात्कार केला, तर दुसर्‍या विद्यार्थिनीचा विनयभंग केला. हा प्रकार कोणाला सांगितल्यास दोघींना मारून टाकण्याची धमकीही त्याने दिली. दोघीही रडत रडत वर्गात आल्याने हे लक्षात आले. अमजद याला पोलिसांनी कह्यात घेतल्यावर संतप्त नागरिक पोलीस ठाण्याबाहेर जमले होते. पोलिसांनी जमावाची समजूत घातली. (जमावाची समजूत काढण्यापेक्षा वासनांध धर्मांधाला पोलिसांनी कठोर शासन करायला हवे ! - संपादक) याप्रकरणी अमजदच्या विरोधात गुन्हा प्रविष्ट करण्यात आला आहे.लातूर येथील बामणी पूल वाहून गेला

      लातूर - येथील बामणी या गावचा पूल सततच्या पावसामुळे वाहून गेला आहे. गावाला जाण्यासाठी रस्ताच राहिलेला नसल्याने ३ सहस्र ग्रामस्थांसमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत. पूल वाहून गेल्याने गावात किंवा शेतात जाण्यासाठी सर्वांना ४० किलोमीटर अंतर पार करावे लागत आहे.

सनातन संस्थेचे कार्य जवळून पाहिले असल्याने सर्वतोपरी साहाय्य करण्यास सदैव सिद्ध असलेले जळगाव जिल्ह्यातील पत्रकार आणि छायाचित्रकार !

श्री. रवींद्र हेम्बाडे
      जळगाव जिल्ह्यातील पत्रकार आणि छायाचित्रकार यांचा सनातन संस्थेविषयी नेहमीच सकारात्मक दृष्टीकोन असतो. सनातनविषयी अनेकांनी चुकीचा प्रसार केला, तरी हे लोक कधीच वाईट कामे करणार नाहीत, याची त्यांना निश्‍चिती वाटते आणि कोणतीही अडचण असल्यास तुम्ही केवळ कळवा, असे ते उत्स्फूर्तपणे सांगतात. जिल्ह्यातील बरेच छायाचित्रकार इतर वृत्तपत्रांतील दैनंदिन सदर वाचून पुष्कळ वेळा आपल्या उपक्रमाला उपस्थित रहातात. कधी कोणाला निमंत्रण द्यायचे राहिल्यास आम्हालाही कळवत जा, असे आपुलकीने सांगतात. आपली हिंदु धर्मजागृती सभा किंवा मोठे आंदोलन असतांना वृत्तपत्र क्षेत्रातील सर्व पत्रकारांच्या उत्स्फूर्त आणि सकारात्मक प्रतिक्रिया मिळतात किंवा काही त्रुटी असल्यास ते आपल्या लक्षातही आणून देतात. त्यांच्याकडून वेगवेगळ्या स्तरांवर मिळत असलेल्या सहकार्याविषयी पुढे देत आहोत.

पितृपक्षातील श्राद्ध !

      ४ ऋणांपैकी पितृऋण फेडण्यासाठी श्राद्ध आवश्यक असते. माता-पिता, तसेच निकटवर्तीय यांचा मृत्यूनंतरचा प्रवास हा सुखमय आणि क्लेशरहित व्हावा, त्यांना सद्गती मिळावी यांसाठीचा संस्कार म्हणजेच श्राद्ध. श्राद्धातील मंत्रोच्चारांमध्ये पितरांना गती देण्याची सूक्ष्म शक्ती सामावलेली असते. श्राद्धात पितरांना हविर्भाग दिला गेल्याने ते संतुष्ट होतात. श्राद्धाचे इतके महत्त्व असतांनाही आज हिंदूंमधील धर्मशिक्षणाच्या अभावामुळे श्राद्धविधी दुर्लक्षिला जाऊ लागला आहे; म्हणूनच अन्य संस्कारांइतकाच श्राद्ध हा संस्कारही अत्यावश्यक कसा आहे, हे सांगणे क्रमप्राप्त ठरते. १७ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर २०१६ या कालावधीत पितृपक्ष आहे. त्यानिमित्ताने श्राद्धविषयक लिखाण देत आहोत.

धर्मांधांच्या तुष्टीकरणातून उन्मादाचा जन्म !

    स्वातंत्र्यापासून आतापर्यंत सत्तेत आलेल्या राजकीय नेत्यांनी अल्पसंख्यांकांची मुख्यतः मुसलमानांची मते मिळवण्याकडेच लक्ष दिले. प्रत्येकामध्ये जणू मुसलमानांच्या तुष्टीकरणाची स्पर्धा लागली. मुसलमानांची मते आपल्यालाच कशी मिळतील, यावरच वर्षानुवर्षे त्यांनी लक्ष दिले. त्यामुळे बहुसंख्य हिंदू असलेले, हे धर्मनिरपेक्ष राष्ट्र कधी हिंदु राष्ट्र बनलेच नाही. नेहरूंपासून आतापर्यंत मुसलमानांच्या तुष्टीकरणाची स्पर्धाच चालूच आहे, असे दिसते.

पोलिसांच्या संदर्भातील कटू अनुभव !

       सध्या सनातनचे साधक आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते यांना पोलिसांच्या शारीरिक आणि मानसिक छळाला सामोरे जावे लागत आहे. या अनुषंगाने विविध ठिकाणच्या पोलिसांविषयी सनातनचे साधक आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते यांना पोलिसांच्या सतावणुकीविषयी नुकताच आलेला अनुभव येथे देत आहोत.
कराड येथे श्री गणेशमूर्ती विसर्जनस्थळी प्रबोधन 
करणार्‍या सनातनच्या साधकांना पोलिसाकडून दमदाटी
 • प्रबोधनात्मक फलक काढून ठेवण्यास भाग पाडले ! 
 • कराड पोलिसांचा सनातनद्वेष !        
       कराड, २५ सप्टेंबर (वार्ता.) - अनंत चतुर्दशीनिमित्त येथील कृष्णामाई घाट येथे श्री गणेशमूर्ती विसर्जन मोहिमेत वैध मार्गाने प्रबोधनाचे फलक घेऊन उभे असणार्‍या सनातनच्या साधकांना गोपनीय पोलीस नाईक प्रशांत पाटील यांनी दमदाटी केली. (असे पोलीस सर्वसामान्य जनतेशी कसे वागत असतील, याची कल्पना येते ! - संपादक) त्यांनी साधकांना हातातून फलक काढून ठेवण्यास भाग पाडले. (उद्दाम पोलीस ! - संपादक) तसेच पोलीस अधीक्षक येत असल्याने फलक धरून उभे राहू नका, असे सांगितले. साधकांनी त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला; परंतु ते ऐकण्याच्या स्थितीत नव्हते.
पोलिसांविषयी चांगले आणि वाईट अनुभव असल्यास 
वाचकांनी नजीकच्या दैनिक कार्यालयात पाठवावेत !

जलप्रदूषण म्हणजे नद्यांवरील अत्याचार !

२५ सप्टेंबर या दिवशी झालेल्या जागतिक नदीदिनाच्या निमित्ताने...
      वर्ष २०११ मध्ये दैनिक लोकमतने प्रसिद्ध केलेला सदर लेख आमच्या वाचकांसाठी साभार प्रसिद्ध करत आहोत. त्या काळची यमुना नदीची स्थिती आणि आजच्या स्थितीत काहीच अंतर नाही. उलट गेल्या ५ वर्षांमध्ये प्रदूषणाचा भस्मासूर वाढत असल्याचेच आपल्याला लक्षात येईल.
१. पवित्र नदीचे नाल्यात केलेले रूपांतर ! : दिल्लीला खेटून वहाणार्‍या यमुना नदीवर या नगराने अक्षरशः अत्याचार चालवले आहेत. नगरातील ५७ टक्के, म्हणजेच प्रतिदिन ३ अब्ज लीटर दूषित पाणी नदीत सोडले जाते. केवळ एका घंट्यात २४ जणांनी लोकनायक सेतू या नवीन पुलावरून अनेक सटरफटर वस्तू नदीत टाकल्या, तर एका पंचतारांकित उपहारगृहामध्ये (फाइव स्टार हॉटेलमध्ये) उरलेले, तसेच ग्राहकांचे उष्टे अन्न एका बंद पॅजो रिक्शामधून आणून ते निर्लज्जपणे पुलावरून यमुनेत टाकून देण्यात आलेे, असे स्थानिक लोकांनी सांगितले.
      सर्वांना सुख देणारे हिंदु राष्ट्र हे एक दैवी राष्ट्र आहे. - आद्यसरसंघचालक डॉ. केशव बळीराम हेडगेवार

इंग्रजी भाषेच्या तुलनेत मराठी भाषेचे वैशिष्ट्य

१. इंग्रजी 
१ अ. आरंभ : A फॉर Apple 
१ आ. शेवट : Z फॉर Zebra 
म्हणजे शेवटी जनावर बनवून सोडते. 
२. मराठी 
मराठी अशी भाषा आहे, जी व्यक्तीला 
२ अ. आरंभ : अ - अज्ञानी पासून 
२ आ. शेवट : ज्ञ - ज्ञानी बनवून टाकते. 
(संदर्भ : व्हॉट्स अ‍ॅप वरून साभार) 


      भारतात रहाणार्‍या लोकांचे साधारणतः दोनच प्रकारांत वर्गीकरण केले जाऊ शकते. काही लोक हिंदु आहेत आणि काही लोक हिंदु होते ! - स्वामी चिन्मयानंद

तस्करांना रोखू न शकणारे सीमा सुरक्षा दलाचे सैनिक कधी आतंकवाद्यांना रोखू शकतील का ?

     सीमा सुरक्षा दलाच्या माहितीनुसार बांगलादेशच्या सीमेवरून प्रतिवर्षी भारतातून साडेतीन लाख गायींची तस्करी केली जाते. प्रतिवर्षी या व्यवसायाची उलाढाल १५ सहस्र कोटी रुपयांची आहे. बंागलादेशात भारतीय गायींची मागणी अधिक असल्याने त्यांच्यासाठी पाहिजे ते मूल्य दिले जाते. सनातनचे पू. भगवंतकुमार मेनरायकाका यांनी साधकांना आध्यात्मिक उपाय आणि साधना यांची परिणामकारकता वाढवण्यासंबंधी केलेले मार्गदर्शन

पू. भगवंतकुमार मेनराय
    १६.९.२०१६ या दिवशी सनातनचे पू. भगवंतकुमार मेनरायकाका यांनी तीव्र आध्यात्मिक त्रास असलेल्या साधकांना नामजप आणि साधना यांची परिणामकारकता वाढवण्यासंबंधी मार्गदर्शन केले. ती सूत्रे सर्वच साधकांना उपयोगी असल्याने पुढे देत आहे.
१. नामजप एकाग्रतेने होण्यासाठी करायचे प्रयत्न
     बर्‍याचदा आध्यात्मिक उपायांच्या वेळी अनेक साधकांचा नामजप एकाग्रतेने होत नसतो. नामजप एकाग्रतेने होण्यासाठी पुढील प्रयत्न करावेत.
अ. डोळे मिटून नामजप करण्यापेक्षा डोळे उघडे ठेवून नामजप करावा.
आ. ज्याप्रमाणे दूरदर्शनवरील कार्यक्रमाच्या वेळी तळपट्टी धावत असते. तेव्हा आपले लक्ष कार्यक्रमातील दृश्यांकडे न जाता तळपट्टीकडे जाते, त्याचप्रमाणे नामजप करतांना आपल्या डोळ्यांसमोरून नामजपाची पट्टी धावत आहे, असा भाव ठेवावा आणि नामजप करतांना मनात येणार्‍या विचारांकडे लक्ष न देता त्या नामजपाच्या पट्टीकडे लक्ष एकाग्र करावे.
इ. नामजप मनातल्या मनात होत नसेल, तर तो पुटपुटत करावा.
ई. नामजप करतांना विचारांचे प्रमाण अधिक असेल, तर नामजपाची गती वाढवावी.
२. आध्यात्मिक त्रास लवकर दूर होण्याच्या दृष्टीने नामजपाचे महत्त्व
२ अ. नामजपाविना न्यास किंवा मुद्रा केली किंवा स्वतःवरील काळ्या शक्तीचे आवरण काढले, तर त्याचा काहीच लाभ होत नसणे : गेल्या १० - १५ वर्षांपासून साधक आध्यात्मिक उपाय करतात; परंतु त्यांना त्या उपायांचा म्हणावा तितका लाभ झाला नाही; कारण त्यांनी नामजपासहित उपाय केले नाहीत.

अहंचा पूर्णपणे लय होणे, म्हणजेच अध्यात्मातले खरे मरण असल्याची जाणीव होऊन साधकाकडून झालेल्या विविध प्रार्थना !

श्री. कौस्तुभ येळेगावकर
      सद्गुरु (श्री.) राजेंद्रदादा यांनी जर आयुष्यातील शेवटचे २ दिवसच शिल्लक आहेत, असे तुम्हाला सांगितले, तर अशा वेळी साधनेचे काय आणि कसे प्रयत्न करणार ?, याविषयीचे चिंतन लिहून आणण्यास सांगितले होते. हे चिंतन लिहून देतांना साधकाची झालेली विचारप्रक्रिया आणि त्याने केलेल्या विविध प्रार्थना पुढे देत आहोत.
     हे गुरुमाऊली, हे श्रीकृष्णा, मधुसूदना, कृपाळू भगवंता, तुम्हाला अपेक्षित असे प्रयत्न होण्यासाठी तुम्हीच माझ्या साधनेसाठी योग्य चिंतन सुचवून त्यानुसार कृतीही करवून घ्या. या पामराकडून अनेक चुका, अनेक अपराध झालेले आहेत. हे कृपासिंधू, हे गुरुमाऊली, ज्ञात-अज्ञातपणे माझ्याकडून झालेले सर्व अपराध आणि चुका आपल्या पोटात घेऊन या लेकरास आपल्या चरणी घ्यावे, अशी कळकळीची प्रार्थना आहे.
     सद्गुरु (श्री.) राजेंद्रदादा यांनी सांगितलेल्या सूत्रावर चिंतन करण्यास बसल्यावर माझ्या मनामध्ये द्वंद्व चालू झाले. हे द्वंद्व चालू असतांना एक मन म्हणत होते, मी असे प्रयत्न करणार, मी हे करणार. त्याच वेळी दुसरे मन म्हणत होते, अरे ! हे सर्व तू करणार ? साधनेत येऊन इतके दिवस झाले, अजून तुझ्यात किती कर्तेपणा आहे ! हे तुझ्या लक्षात कसे येत नाही ? तुझी नाळ श्री गुरुमाऊलीशी जोडलेली आहे. स्वपणा, अहं यांचा पूर्णपणे लय होणे, म्हणजेच अध्यात्मातले खरे मरण होय.

सत्पात्री दानाचे महत्त्व !

प.पू. पांडे महाराज
प.पू. पांडे महाराजांचे अनमोल विचारधन
     आपण एखाद्याकडून अर्पण घेतो, तेव्हा आपल्याला त्या अर्पणदात्याचे पाप घ्यावे लागते. आपल्या साधनेद्वारे त्याचा उद्धार होतो. समर्थ रामदासस्वामी आेंजळभर भिक्षा का घेत, तर देणार्‍याचे पाप संपावे, यासाठी ! अर्पण घेणार्‍याला अर्पण देणार्‍याचे पाप फिटण्यासाठी सहस्रो पट साधना करावी लागते, तर ते फिटते. अन्यथा त्याचा उलट परिणाम घेणार्‍यावर होतो. समजा, मी एखाद्या भिकार्‍याला पैसे दिले. तो भिकारी त्या पैशाने दारू प्यायला, तर त्याचे पाप मला लागते; कारण मी दिलेले दान हे सत्पात्री नसते.
- प.पू. परशराम पांडे महाराज, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२२.१२.२०१५)


साधनेत तन-मन-धनाचा त्याग करण्याचे महत्त्व

     मी तन-मन-धनाचा त्याग केल्यावर माझे गुरु प.पू. भक्तराज महाराज मला म्हणाले, डॉक्टर, तुम्ही तन-मन-धनाचा त्याग केलात. आम्ही तुम्हाला ज्ञान, भक्ती आणि वैराग्य देतो ! त्यांनी ज्ञान, भक्ती आणि वैराग्य दिल्यामुळे माझे कार्य स्थळ-काळाची मर्यादा ओलांडून पुढे गेले आहे.
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले
साधनेचे महत्त्व समजल्यावर गुरूंवरील श्रद्धेने व्यवहारातील सर्व दोर कापून टाकून तळमळीने सेवा करणारे आणि ६१ टक्के आध्यात्मिक पातळी असलेले सोलापूर येथील श्री. हिरालाल तिवारी (वय ५२ वर्षे) !

श्री. हिरालाल तिवारी
      सोलापूर येथील श्री. हिरालाल तिवारी यांचा भाद्रपद कृष्ण पक्ष एकादशी (२६.९.२०१६) या दिवशी ५२ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांच्या पत्नी सौ. राजश्री तिवारी यांनी त्यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये दिली आहेत.
श्री. हिरालाल तिवारी यांना सनातन परिवाराकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा !
१. नातेवाइकांची काळजी घेणे
     श्री. तिवारी महाविद्यालयीन शिक्षण घेत असतांना त्यांच्या मोठ्या भावाकडे रहायचे. तेव्हा भावाची काळजी घेणे, कपडे इस्त्री करणे, वेळप्रसंगी स्वयंपाक करणे, हे सर्व मन लावून करत. त्याचप्रमाणे वर्ष २००९ ते २०१२ या कालावधीत मी घरी नसतांना ते माझ्या आई-वडिलांचीही काळजी घ्यायचे. केंद्रातील सर्व वयस्कर साधकांचीही ते अशीच काळजी घेतात. त्यांना हवे-नको ते पहातात. त्यांना आवश्यकता असल्यास कितीही व्यस्त असले, तरीही जाऊन भेटतात.
२. परेच्छेने रहाणे
     साधनेत येण्यापूर्वीपासून ते परेच्छेने रहातात. त्यांनी व्यवसाय निवडतांनाही स्वतःचे कौशल्य, आवड न पहाता त्यांचे मोठे भाऊ आणि माझे वडील यांच्या इच्छेला प्राधान्य दिले. त्यांच्या माध्यमातून देवच सांगत आहे आणि देवाचीच इच्छा आहे, असा त्यांनी विचार केला.
३. व्यवहारातील अनेक कौशल्ये अंगी असतांना सर्व प्रमाणपत्रे
जाळून टाकून पूर्णवेळ साधना करण्यास प्राधान्य देणे
     श्री. तिवारी यांच्याकडे अनेक प्रकारची कौशल्ये आहेत. पूर्वी त्यांना अनेक प्रमाणपत्रे मिळाली होती. पैठणी विणणे, कुक्कुटपालन, साबण बनवणे, टंकलेखन करणे आणि त्यासमेवत विद्यापिठातील प्रमाणपत्रेही होती. त्यांनी पूर्णवेळ साधना करण्याचा निर्णय घेतल्यावर सर्व प्रमाणपत्रे जाळून टाकली.

६१ टक्के आध्यात्मिक पातळी असलेला कु. कन्हैया श्रीवास्तव (वय १२ वर्षे) याला संतसेवा करतांना संतांच्या संदर्भात आलेल्या अनुभूती

कु. कन्हैया श्रीवास्तव
१. पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांच्या खोलीतील पांघरायची चादर बोलत असल्याचे जाणवून तिने मला पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांचा स्पर्श होण्यासाठी त्यांच्या पलंगावर ठेव ना !, असे म्हटल्याचे जाणवणे आणि दुसर्‍या दिवशी पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांच्या वास्तव्यामुळे संपूर्ण खोली, पलंग अन् चादर यांना पुष्कळ आनंद होत असल्याचे जाणवणे      २८.५.२०१६ या दिवशी पू. डॉ. ॐ उलगनाथन् रामनाथी आश्रमात आले होते. त्या वेळी मला त्यांची सेवा करण्याची संधी मिळाली. त्यांच्या खोलीमध्ये दोन पलंग होते. एका पलंगावर त्यांच्या वस्तू ठेवलेल्या होत्या आणि दुसर्‍या पलंगावर ते झोपत होते. तेथे सेवा करतांना दुसर्‍या पलंगावर ठेवलेली पांघरायची चादर जणूकाही मला सांगत होती, मला पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांच्या पलंगावर ठेव ना. म्हणजे मलाही त्यांचा स्पर्श होईल ! मी लगेच तसे केले. दुसर्‍या दिवशी मी त्यांच्या खोलीत गेल्यावर मला संपूर्ण खोली, पलंग आणि चादर या सर्वांना पुष्कळ आनंद होत आहे, असे जाणवले. त्या वेळी खोलीत पुष्कळ चैतन्य जाणवत होते.
२. पू. पिंगळेकाका यांना पाहून महर्षि बसले असल्याचे जाणवून भावजागृती होणे
     १६.६.२०१६ या दिवशी पू. डॉ. चारुदत्त पिंगळेकाका रामनाथी आश्रमात आले होते. त्यांची सेवा करण्याचीही संधी मला मिळाली. तिसर्‍या दिवशी मी त्यांच्या खोलीमध्ये सेवा करत असतांना पू. काकाही तेथे सेवा करत होते. त्यांना पाहून वाटले, महर्षिच बसले आहेत आणि माझी भावजागृती झाली.
- कु. कन्हैया श्रीवास्तव, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२०.६.२०१६)

जर आपले आयुष्य केवळ २ दिवसांचे असेल, असा विचार ठेवून सेवा केल्याने स्वतःत जाणवलेले पालट आणि झालेले साधनेचे प्रयत्न

कु. नलिनी राऊत
१. सामूहिक स्वच्छतेच्या वेळी मान-पाठ दुखू लागल्याने
विश्रांती घेण्याचा विचार मनात येणे आणि आपले आयुष्य
 दोनच दिवसांचे आहे, या विचाराने पुढील सेवा भावपूर्ण 
अन् परिपूर्ण होण्यासाठी प्रयत्न होऊन वेदनांची जाणीव न रहाणे
     सद्गुरु (श्री.) राजेंद्रदादा यांचा जर आयुष्याचे शेवटचे दोन दिवस असतील तर साधनेचे कसे प्रयत्न कराल, असा निरोप मिळाला, त्या वेळी आमची सामूहिक स्वच्छता चालू होती. सकाळी पावणे आठ वाजल्यापासून सेवेला आरंभ केला होता. अल्पाहारासाठी अर्धा घंटा थांबलो होतो. तीन-साडेतीन घंटे सलग शारीरिक सेवा झाल्यामुळे मान आणि पाठ यांतून पुष्कळ वेदना चालू झाल्या होत्या. त्यामुळे आता बसूया. विश्रांती घेऊया, असे विचार मनात येऊ लागले होते.
     सामूहिक स्वच्छतेमध्ये अंतर्भूत सेवांची सूची काढली होती. ती सूची पाहून राहिलेल्या सेवांपैकी लगेच कोणती सेवा करायची ?, हे कु. लीनाताई (कु. लीना कुलकर्णी) आम्हाला सांगत होती. तेव्हा ही सेवा आता जमणार नाही, असे मला वाटत होते; पण सद्गुरु (श्री.) राजेंद्रदादा यांचा निरोप मिळाल्यामुळे आता आपले दोन दिवसांचेच आयुष्य आहे. देवाने आपल्याला सेवेची संधी दिली आहे. नंतर ही संधी आपल्याला मिळणार नाही, असा विचार करून सांगितलेल्या पुढच्या सेवा चालू केल्या. या सेवा सकाळच्या सत्रात झालेल्या सेवांपेक्षा भावपूर्ण आणि परिपूर्ण होण्यासाठी प्रयत्न होऊ लागले. २ दिवसांचे आयुष्य, मग आपल्याला सेवेची संधी नाही, हा विचार प्रबळ असल्यामुळे मान आणि पाठ यांमधील वेदनांची जाणीवच राहिली नाही.
२. एका साधिकेचे अव्यवस्थित पटल मनापासून आवरले जाणे
     एका काकूंच्या पटलाची स्वच्छता करतांना खण किती अव्यवस्थित ठेवले आहेत.

आनंदी, प्रेमळ आणि देवाची ओढ असणारी बेळगाव जिल्ह्यातील खानापूर येथील ५१ टक्के आध्यात्मिक पातळीची उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली चि. गोजिरी काटगालकर (वय ४ वर्षे) !

चि. गोजिरी काटगालकर
       भाद्रपद कृष्ण पक्ष एकादशी (२६.९.२०१६) या दिवशी बेळगाव जिल्ह्यातील खानापूर येथील चि. गोजिरी काटगालकर हिचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त तिची आई आणि मावश्या यांना तिची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये पुढे देत आहोत. 
चि. गोजिरी काटगालकर हिला वाढदिवसाप्रीत्यर्थ 
सनातन परिवाराकडून अनेक शुभाशीर्वाद !
१. आनंदी
     गोजिरी सतत आनंदी असते. इतरांनीही सतत आनंदी रहावे, असे तिला वाटते. - सौ. रेणुका लक्ष्मण काटगालकर (गोजिरीची आई), खानापूर, बेळगाव.

साधनेचे प्रगल्भ दृष्टीकोन असलेली आणि साधनेसाठी घर सोडून आश्रमात येऊन रहाण्याची सिद्धता असलेली अन् महर्लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली ६३ टक्के आध्यात्मिक पातळीची कु. संजना संकेत कुलकर्णी (वय ११ वर्षे) !

कु. संजना कुलकर्णी
       (कु. संजना हिची वर्ष २०१४ मध्ये ६१ टक्के आध्यात्मिक पातळी होती.)
     भाद्रपद कृष्ण पक्ष एकादशी (२६.९.२०१६) या दिवशी कु. संजना कुलकर्णी हिचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त आईला तिची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये पुढे देत आहोत. 
कु. संजना कुलकर्णी हिला वाढदिवसानिमित्त 
सनातन परिवाराकडून हार्दिक शुभेच्छा !
१. गुणवैशिष्ट्ये
१ अ. संजना कोणत्याही प्रसंगामध्ये स्थिर आणि शांत राहून तो प्रसंग स्वीकारते.

स्थिरता, प्रांजळपणा, प्रेमभाव आणि तत्त्वनिष्ठता आदी गुणांचा समुच्चय असलेले ६४ टक्के आध्यात्मिक पातळीचेे श्री. भूषण केरकर (वय ४१ वर्षे) !

श्री. भूषण केरकर
     ६४ टक्के आध्यात्मिक पातळी असलेले आणि रामनाथी आश्रमात दैनिक सनातन प्रभातची सेवा करणारे श्री. भूषण केरकर यांचा भाद्रपद कृष्ण पक्ष एकादशी (२६.९.२०१६) या दिवशी तिथीनुसार वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने रामनाथी आश्रमातील सहसाधकांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये अन् त्यांनी सहसाधकांना केलेले मार्गदर्शन पुढे देत आहोत.
श्री. भूषण केरकर यांना सनातन परिवाराकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा !
१. अनुसंधान
     श्री. भूषणदादा नेहमी अनुसंधानात असतात. त्यांच्याकडून आनंदाच्या लहरी प्रक्षेपित होत असल्याचे जाणवते. त्यांच्याकडे पाहून इतरांचाही उत्साह वाढतो. दादांच्या निर्मळतेमुळे त्यांच्याकडे मन मोकळे करण्यास काहीच वाटत नाही. त्यांना मनाची स्थिती किंवा सेवांच्या अडचणींविषयी विचारले, तर ते योग्य मार्गदर्शन करतात.
२. आरंभी भूषणदादांना घाबरत असणे आणि त्यांना हे कळल्यावर त्यांनी 
स्वतःहून विचारपूस करण्यास प्रारंभ केल्यामुळे मनातील भीती निघून जाणे
     पहिल्यांदा मी दैनिकात सेवेला आले, त्या वेळी मला भूषणदादांची भीती वाटायची. त्यांच्याशी बोलायला मी घाबरायचे किंवा ते कुठे दिसले, तर मी वाट बदलायचे. हे मी सहसाधिका कु. आरती सुतार हिला सांगितले. तिच्याकडून हे त्यांना कळल्यापासून ते माझ्याशी स्वतःहून बोलायचे आणि माझी विचारपूस करायचे. त्यामुळे माझ्या मनातील भीती बर्‍यापैकी निघून गेली. - कु. मानसी प्रभु
३. प्रेमभाव
३ अ. आजारी साधकांची काळजी घेणे : दैनिकाच्या सेवेतील कोणी आजारी असेल, तर दादा स्वतःहून सेवेतून वेळ काढून त्या साधकांना अल्पाहार आणि महाप्रसाद दिला ना ?, हे पहातात. आजारी साधकांची आपुलकीने चौकशी करून त्यांची काळजी घेतात.

परात्पर गुरुदेवांची महती !

श्री. श्याम सांगूनवेढे
परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या
 अमृत महोत्सवी वर्षानिमित्त...
चहूकडे उंचच उंच टेकड्या अन् हिरवा निसर्ग ।
अशा निसर्गरम्य वातावरणात वसलाय गुरुदेवांचा स्वर्ग ॥ १ ॥

काय सांगावी परात्पर गुरुदेवांची महती ।
गुरूंमुळे मिळाली हिंदु राष्ट्राची दिशा अन् साधनेला गती ॥ २ ॥

अखंड ईश्‍वरी चैतन्याचा स्रोत असलेले परात्पर गुरु ।
लागले देश-विदेशातील साधकांचे जीवन उद्धारू ॥ ३ ॥

जिभेवरील ॐ, सोनेरी केस अन् होणे पिवळी त्वचा ।
ईश्‍वरी चैतन्यामुळे आलेल्या या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती गुरूंच्या ॥ ४ ॥

विश्‍वकल्याणार्थ विष्णुस्वरूप परात्पर गुरु अवतरले ।
जन्म-मृत्यूच्या चक्रातून कित्येक साधक तरले ॥ ५ ॥

थोर संत घडवणार्‍या गुरूंचा अवघ्या विश्‍वाला वाटेल आदर ।
गुरुचरणी नतमस्तक होऊन केले गुरुमाहात्म्य सादर

साधिकेला तिच्या नातेवाइकाने श्राद्धासंदर्भात पाठवलेला अयोग्य लघुसंदेश आणि त्यासंदर्भातील साधिकेची विचारप्रक्रिया

      माझे वडील २२.९.२०१६ या दिवशी रामनाथी आश्रमात महालय श्राद्ध करणार होते. त्यामुळे श्राद्धविधीसंदर्भात मी नातेवाइकांना भ्रमणभाषवर लघुसंदेश पाठवला. त्यातील दोघांनी माझाही नमस्कार सांग, असे म्हटले आणि बाकीच्या ३ जणांनी काहीच उत्तर पाठवले नाही आणि एका नातेवाइकाने व्हॉट्स अ‍ॅपवर पुढील लघुसंदेश पाठवला. 
१. श्राद्धासंदर्भात पाठवलेला अयोग्य लघुसंदेश
      माणूस मेल्यानंतर त्यांच्या स्वर्गातल्या आत्म्याला शांती मिळावी; म्हणून पितर जेवू घालतात. आता बघा हं ! ब्राह्मणाचा बाप ब्राह्मण, मराठ्याचा बाप मराठा, माळ्याचा बाप माळी, कोळ्याचा बाप कोळी, महाराचा बाप महार, मांगाचा बाप मांगच. सगळेच वेगवेगळ्या जातीचे, तर मग माणूस मेल्यावर सगळ्यांचा बाप कावळाच का ? कुणाचा राजहंस असावा. कुणाचा बगळा असावा. कुणाचा मोर, तर कुणाचा बदक असावा. जिवंतपणी माणसा-माणसांत भेदभाव, तर मेल्यावर समानता. असे का ? कोणी रचला हा ढोंगीपणा ?

पहाटे स्वप्नामध्ये शेषनागासारख्या एका मोठ्या नागाने देवद (पनवेल) येथील सनातन आश्रमाच्या प्रवेशद्वारात एक मोठा शंख ठेवला, असे दिसणे

      २२.९.२०१६ या दिवशी सकाळी ५.३० ते ६ वाजण्याच्या सुमारास मला एक दृश्य दिसले. त्यात चट्टे असलेला शेषनागासारखा एक मोठा नाग देवद (पनवेल) येथील सनातन आश्रमाच्या प्रवेशद्वारातून बाहेर चालला होता. तेव्हा त्याने जातांना शेपटीकडून एक मोठा शंख आश्रमाच्या प्रवेशद्वाराजवळ सोडला. 
       मी सकाळी उठल्यावर कुटुंबियांना वरील स्वप्न सांगून विचारले, काल आपण श्राद्ध केल्याने स्वप्नात नाग दिसला का ? तेव्हा माझा मुलगा श्री. महेश म्हणाला, हे चांगले आहे कारण शंख हे विष्णूचे प्रतीक आहे. 
- श्रीमती शर्मिला पळणीटकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२२.९.२०१६) पूर्वजांना सद्गती मिळणे आणि अतृप्त पूर्वजांच्या त्रासांपासून रक्षण होणे यांसंदर्भात श्राद्धविधींप्रमाणेच दत्ताच्या नामजपाचे महत्त्व

पूर्वज अधिक प्रमाणात वाईट शक्तींच्या रूपात भोग भोगत असल्यास श्राद्धाच्या 
जेवणानंतर वांत्या, जुलाब यांसारखे त्रास होणे आणि त्यावरील उपाय म्हणजे दत्ताचा नामजप 
      ज्या घराण्यातील पूर्वज आधिक्याने वाईट शक्तींच्या रूपात भोग भोगत असतील, अशा लिंगदेहांच्या श्राद्धस्थळी होणार्‍या तमोगुणी आगमनामुळे श्राद्धस्थळीचे त्रासदायक स्पंदनांचे प्रमाण वाढून त्यांचे संक्रमण अन्नात, तसेच इतर जिवांच्या देहात होण्याची दाट शक्यता असते. असे त्रासदायक लहरींनी भारित अन्न सेवन केल्याने त्यातील काळ्या शक्तीच्या देहातील संक्रमणाचा त्रासदायक परिणाम म्हणून विषबाधा, वांत्या, रेच (जुलाब) यांसारखे त्रास होऊ शकतात. या सर्व त्रासदायक परिणामांपासून आपले रक्षण होण्यासाठी सर्वांनी श्राद्धस्थळी श्री गुरुदेव दत्त । हा नामजप करून स्वतःभोवती या नामजपाचे तेजोमंडल निर्माण करण्याची आवश्यकता असते. - एक विद्वान (सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ एक विद्वान, गुरुतत्त्व या टोपणनावानेही लिखाण करतात) 

श्राद्धाची मर्यादा

    श्राद्ध केवळ मर्त्यलोकाची कक्षा भेदण्यासाठी उपयोगी पडते; परंतु त्यापुढे मात्र जीव साधनेनेच पुढच्या योनीत जाऊ शकतो. 
- एक विद्वान (सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ एक विद्वान, गुरुतत्त्व या टोपणनावानेही लिखाण करतात)

स्वप्नात आकाशातून पांढर्‍या रंगाचे पुष्कळ किरण रामनाथी आश्रमावर पडून तो उजळून निघाला असून सोन्यासारखा पिवळसर दिसणे आणि सर्वत्र लख्ख पिवळा प्रकाश पसरून ऊर्जा मिळत असल्याचे दृश्य दिसणे

     २६.७.२०१६ या दिवशी मी रात्री एक सेवा करून खोलीत आलो. त्यानंतर रात्री ११ वाजता मी घरी येऊन अंथरुणावर पहुडलो. त्या वेळी माझा नामजप चालू होता आणि अर्धवट झोपेतच मला रामनाथी आश्रमाच्या संदर्भात पुढील दृश्य दिसले - आश्रमात सगळीकडे शुकशुकाट आणि अंधार होता. तेथे एकही घर किंवा झाडेझुडपे दिसत नव्हती. एके ठिकाणी उंचावर पांढर्‍या रंगाचा रामनाथी आश्रम दिसत होता आणि केवळ आश्रमावरच आकाशातून पांढर्‍या रंगाचे पुष्कळ किरण पडल्यामुळे संपूर्ण आश्रम उजळून निघाला होता. दोन मिनिटांनी आश्रमाकडे बघितल्यावर संपूर्ण आश्रम सोन्यासारखा पिवळसर दिसू लागला. त्या वेळी सर्वत्र लख्ख पिवळा प्रकाश पसरून ऊर्जा, शक्ती मिळत आहे, असे मला जाणवत होते. मला त्याचा अर्थ कळला नाही; परंतु भगवंताच्या कृपेमुळे अनुभवता आले.
     ही अनुभूती मला प.पू. गुरुदेवांच्या कृपाशीर्वादाने मिळाली आणि मी धन्य झालो. प.पू. गुरुदेवांच्या चरणी कोटी कोटी कृतज्ञता !
- श्री. ज्ञानेश्‍वर वैद्य, नागपूर (२६.७.२०१६)


महालय श्राद्धाच्या दिवशी श्री गुरुदेव दत्त हा नामजप सतत होऊन आनंद जाणवणे

      २१.९.२०१६ या दिवशी माझा मुलगा श्री. महेश हा माझ्या दिवंगत यजमानांचे महालय श्राद्ध करत होता. त्या प्रसंगी माझा श्री गुरुदेव दत्त । हा नामजप सतत होत होता आणि मनाला चांगले वाटून आनंदही जाणवत होता. 
- श्रीमती शर्मिला पळणीटकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२२.९.२०१६)

सनातन प्रभातसाठी वार्तांकन करू इच्छिणारे साधक, वाचक आणि धर्मप्रेमी यांच्यासाठी सुवर्णसंधी !

८ आणि ९ ऑक्टोबर २०१६ या दिवशी 
रामनाथी आश्रमात आयोजित करण्यात 
आलेल्या वार्ताहर प्रशिक्षण शिबिरात सहभागी व्हा !
       सनातन प्रभात म्हणजे ज्वलंत हिंदुत्व आणि हिंदु राष्ट्राची स्थापना यांचा वसा घेतलेले एकमेव नियतकालिक ! सनातन प्रभातमध्ये प्रतिदिन राष्ट्र आणि धर्म यांवरील संकटांविषयी जागृती करणारी वृत्ते, लेख, तसेच अन्य लिखाण प्रसिद्ध केले जाते.
१. वार्तांकन करण्यास शिकून अर्धवेळ 
किंवा पूर्णवेळ वार्ताहराची सेवा करण्यास इच्छुक 
असलेल्यांसाठी रामनाथी आश्रमात शिबिराचे आयोजन !
       प्रतिदिन घडणार्‍या राष्ट्र-धर्म विरोधी घटनांचे वार्तांकन करण्यासाठी मुंबई, पुणे, कोल्हापूर, सोलापूर, संभाजीनगर, नागपूर, जळगाव आदी प्रमुख शहरांमध्ये वृत्तसंकलनाच्या सेवेसाठी पूर्णवेळ वार्ताहर, तर अन्य जिल्ह्यांमध्ये अर्धवेळ वार्ताहर आवश्यक आहेत.

फलक प्रसिद्धीकरता

दुर्गापूजेला अनुमती नाकारण्यासाठी 
बंगाल पाकमध्ये आहे का ?
      बंगालमधील बीरभूम जिल्ह्यात असलेल्या कांगलापहार गावात धर्मांधांना घाबरून प्रशासनाने कायदा आणि सुव्यवस्था बिघडण्याचे कारण देत हिंदूंना दुर्गापूजा उत्सव साजरा करण्यास अनुमती नाकारली आहे. अशा प्रकारे अनुमती नाकारण्याचे हे चौथे वर्ष आहे.

हिंदू तेजा जाग रे !

Jago ! : Bangalke Birbhum jileme dharmandhoke bhayse sarkarne Durgapuja utsav ko anumati nahi di.
Hindubahul Bharatme aisa nirnay hona, kya yah Pakistan hai ?
जागो ! : बंगाल के बीरभूम जिले में धर्मांधों के भय से सरकार ने दुर्गापूजा उत्सव को अनुमती नहीं दी.
हिन्दुबहूल भारत में ऐसा निर्णय होना, क्या यह पाकिस्तान है ?
       हिंदु राष्ट्राची पहाट पहायची असेल, तर संघर्ष आणि संघर्षच करावा लागेल !
- पू. (कु.) स्वाती खाडये, सनातन संस्था

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले
      जेथे हिंदूंनी अनेक वर्षे साम्यवाद्यांना निवडून दिले, त्या बंगाल आणि केरळ राज्यांमध्ये हिंदूंची स्थिती आता अत्यंत केविलवाणी झाली आहे. आतातरी हिंदूंनी सावध व्हावे, नाहीतर त्यांचे अस्तित्वच उरणार नाही.
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले

बोधचित्र

॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥

या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो.
- प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज
सनातनचे श्रद्धास्थान
गुरूंकडे काय मागावे ?
     माझ्याकडे सुख मागू नका, दुःख सहन करण्याचे बळ मागा.
भावार्थ :
सुख हे प्रकृतीतील असल्याने अशाश्‍वत असते, म्हणून गुरूंकडे मागू नये. तसेच हेही लक्षात ठेवले पाहिजे की, शाश्‍वत आनंद मिळवून देणे, हेच गुरूंचे खरे कार्य असते. प्रारब्धामुळे दुःख भोगावे लागणार असल्यास, त्या दुःखदायक प्रसंगांमुळे होणारे दुःख सहन करण्याची शक्ती मात्र गुरु निश्‍चित (नक्कीच) देतात; म्हणून ती मागायला आडकाठी (हरकत) नाही.
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.)

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

चुकांकडे कसे पहावे ?
इतरांच्या चुका दाखवणेे सोपे असते; पण इतरजन सुधारावेत, असे खरोखरच वाटत असेल, 
तर नुसत्या चुका न दाखवता त्या कशा सुधारायच्या, तेही सांगावे ! 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

शिक्षणाची दयनीय स्थिती !

संपादकीय 
       भारत सध्या सर्वच क्षेत्रात वेगाने घोडदौड करत आहे. भारत विश्‍वगुरु बनण्याच्या दृष्टीने प्रयत्नात आहे, अशी वक्तव्ये राजकर्ते करत असले, तरी देशातील वस्तुस्थिती मात्र वेगळीच आहे. देशातील ८ कोटी ४० विद्यार्थी शाळेत जात नाहीत, अशी धक्कादायक आकडेवारी नुकतीच प्रसिद्ध झाली आहे. ही आकडेवारी काँग्रेसने आजपर्यंत दाबून टाकलेल्या जनगणना अहवाल-२०११मधून समोर आली आहे. ही आकडेवारी वर्ष २०११ ची असून २०१६ मध्ये तर यापेक्षा निश्‍चितच स्थिती वाईट असणार, यात शंकाच नाही. याच समवेत कॅगचा अहवाल नुकताच आला असून त्यात देशातील ३ सहस्र ६८० सरकारी शाळांत फळा नाही, देशातील २० प्रतिशत शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवण्यास योग्य नाहीत, ८४ प्रतिशत शिक्षकांना प्रथमोपचार येत नाही यांसह अन्य काही निष्कर्षही देण्यात आले आहेत. ज्या देशात इतक्या मोठ्या प्रमाणात विद्यार्थी शाळेतही जात नाहीत, त्या देशाचे भवितव्य काय असेल, हे सांगण्यासाठी कोण्या भविष्यवेत्याची आवश्यकता नाही ! कोणताही राज्यकर्ता आला आणि कोणत्याही पक्षाचे शासन आले, तरी या स्थितीत पालट होईल, असे नाही. त्यामुळे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) हेच त्यावर उत्तर आहे !

पाक कलाकारांना देशातून हाकला !

संपादकीय 
     काश्मीर येथील उरी येथे सैन्यतळावर झालेल्या आक्रमणाचा भारतात सर्व स्तरांतून निषेध व्यक्त होत आहे. निषेध मोर्चा, आंदोलन, घोषणा, पुतळा दहन यांसह सामाजिक संकेतस्थळांवरही पाकिस्तानच्या विरोधात मोठ्या प्रमाणात असंतोष पहायला मिळत आहे. ट्विटरवर बॅन पाक आर्टिस्ट आणि से नो टू पाक आर्टिस्ट हे हॅश टॅग वापरून मोठ्या प्रमाणात अभियानही चालू आहे. अगदी सामान्य नागरिकही ज्याला जो मार्ग निषेध करण्यासाठी शक्य आहे, तो वापरून ते करत आहे. त्यातीलच एक भाग म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पाकिस्तानातील चित्रपट आणि कलाकार यांना भारतातून हाकलून देण्याची मागणी केली आहे. खरे तर, जो पाकिस्तान प्रतिदिन सीमेवर कुरघोड्या काढत आहे, भारतीय सैनिकांची हत्या करत आहे, वारंवार पाकपुरस्कृत आतंकवादी पाठवून भारतात अशांतता माजवत आहे, अशा शत्रूराष्ट्रातील गायक आणि कलाकार यांना भारतात काम करण्यास अनुमती देणे म्हणजे राष्ट्रद्रोहच आहे.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn