Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

कोटी कोटी प्रणाम !

सनातनच्या ५२ व्या संत 
पू. (सौ.) मालिनी देसाई यांचा आज वाढदिवस

कैराना (उत्तरप्रदेश) येथे धर्मांधांच्या भीतीमुळेच हिंदूंचे पलायन !

  • कैरानामधून हिंदूंचे पलायन होत असतांना काहीही करू न शकणार्‍या हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे हे अपयशच होय !
  • उत्तरप्रदेश दुसरा काश्मीर होण्याच्या वाटेवर !
  • राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचा अहवाल
        नवी देहली - राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या पथकाने सादर केलेल्या अहवालानुसार उत्तरप्रदेशच्या कैरानामध्ये धर्मांधांच्या भीतीमुळे हिंदूंनी पलायन केले आहे. तसेच या प्रकरणी कोणतीही कारवाई का करण्यात आली नाही, याचे कारण स्पष्ट करण्यासाठी उत्तरप्रदेश सरकारला निर्देश दिले आहेत. (समाजवादी पक्षाच्या राज्यातील हिंदूंच्या या दुःस्थितीविषयी एकही निधर्मीवादी किंवा पुरोगामी आणि प्रसारमाध्यमे तोंड उघडणार नाहीत; मात्र अशी स्थिती अल्पसंख्यांकांची झाली असती, तर एव्हाना या सर्वांनी आक्रोश केला असता ! - संपादक)
१. वर्ष २०१३ मध्ये राज्यातील मुझफ्फरनगर येथील दंगलीनंतर कैरानामध्ये २५ ते ३० सहस्र मुसलमानांचे पुनर्वसन करण्यात आले. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे अहवालात म्हटले की, हिंदूंच्या पलायनामागे हेच एक मोठे कारण आहे. (मुसलमानांचे पुनर्वसन करण्यासाठी हिंदूंना निर्वासित करण्याचा अधिकार कुणाला आहे का ? - संपादक)

दाभोलकरांनी न्यासांच्या कोट्यवधी रुपयांच्या देणग्या कोठे व्यय केल्या, याचा तपास केल्यास सत्य बाहेर येईल !

सातारा येथे सनातनचे 
प्रवक्ता श्री. अभय वर्तक यांचे परखड मत ! 

डावीकडून विश्‍व हिंदु परिषदेचे सातारा शहरमंत्री श्री. जितेंद्र वाडेकर,
ह.भ.प. कृष्णराव क्षीरसागर महाराज, सनातनचे प्रवक्ता
श्री. अभय वर्तक, हिंदु जनजागृती समितीचे श्री. हेमंत सोनवणे
आणि श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्री. सुधन्वा गोंधळेकर

         सातारा, २२ सप्टेंबर (वार्ता.) - दाभोलकर कुटुंबियांनी अंधश्रद्धा निर्मूलन समिती या न्यासामध्ये आर्थिक घोटाळे केले. त्यांनी आपल्या ट्रस्टचे आर्थिक ताळेबंदही योग्य त्या कालावधीत धर्मादाय आयुक्तांना वेळेवर सादर केलेले नाहीत, तसेच दाभोलकर यांच्या परिवर्तन या न्यासाने व्यसनमुक्तीसाठीच्या कार्यासाठी म्हणून अंबांनींकडून १ कोटी रुपये घेतले. अजूनही न्यासाला अशा प्रकारे कोट्यवधी रुपयांच्या देणग्या मिळाल्या असू शकतात. एवढे कोट्यवधी रुपये घेऊन न्यासाने व्यसनमुक्तीचे असे काय कार्य केले ? हे पैसे कुठे व्यय झाले ? अन्वेषण यंत्रणांनी या आर्थिक घोटाळ्याच्या अनुषंंगाने का तपास केला नाही ? अन्वेषण यंत्रणांना खरेच डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचे अन्वेषण करायचे असेल, तर त्यांनी दाभोलकर कुटुंबियांचीही चौकशी करावी. तसेच अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा एकूण आर्थिक कारभार हा संशयास्पद असून न्यासातील आर्थिक घोटाळ्याची चौकशी केल्यास त्यातून सत्य बाहेर पडू शकेल, असे परखड प्रतिपादन सनातन संस्थेचे राष्ट्र्रीय प्रवक्ता श्री. अभय वर्तक यांनी केले. येथील राजवाडामधील पत्रकार परिषद कार्यालयात २२ सप्टेंबर या दिवशी समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

तमिळनाडूमध्ये हिंदु मुन्नानीच्या (हिंदू आघाडीच्या) सदस्यावर धर्मांधांकडून प्राणघातक आक्रमण !

  • पुरोगामी आणि साम्यवादी यांच्या हत्या झाल्या किंवा त्यांच्यावर आक्रमणे झाली, तर आकाश-पाताळ एक केले जाते; मात्र हिंदूंच्या नेत्यांवर आक्रमणे झाली, त्यांच्या हत्या झाल्या, तरी त्याची कोणीच दखल घेत नाही !
  • तमिळनाडूतील असुरक्षित हिंदुत्वनिष्ठ नेते !
       मदुराई - तमिळनाडूच्या दिंडीगल जिल्ह्यातील हिंदु मुन्नानीचे (हिंदू आघाडीचे) सदस्य श्री. शंकर गणेश यांच्यावर १९ सप्टेंबरला रात्री काही धर्मांधांनी धारदार हत्यारांनी आक्रमण केले. या आक्रमणात शंकर गणेश हे गंभीररित्या घायाळ झाले असून त्यांना दिंडीगल शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथून त्यांना पुढील उपचारासाठी मदुराई येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तमिळनाडूमध्ये हिंदु नेत्यांवर आक्रमण करण्याची अलीकडील दिवसांतील ही दुसरी घटना आहे. यापूर्वी विश्‍व हिंदु परिषदेच्या होसूर शाखेचे सचिव आर्. सुरी यांची धर्मांधांनी हत्या केली होती. तसेच हिंदु मक्कल कत्छीचे (हिंदु जनता पक्षाचे) अध्यक्ष श्री. अर्जुन संपथ यांची चारचाकी जाळण्यात आली होती.
१. श्री. शंकर गणेश त्यांची दुचाकी रस्त्यावर उभी करून त्यांच्या मित्राच्या दुकानाकडे जात असतांना त्यांच्या मागावर असलेल्या टोळीने त्यांच्यावर आक्रमण केले आणि नंतर तेथून पळ काढला.

पोलिसांच्या संदर्भातील कटू अनुभव !

        सध्या सनातनचे साधक आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते यांना पोलिसांच्या शारीरिक आणि मानसिक छळाला सामोरे जावे लागत आहे. या अनुषंगाने विविध ठिकाणच्या पोलिसांविषयी सनातनचे साधक, हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते किंवा हिंदुत्वनिष्ठ यांना यापूर्वी पोलिसांच्या सतावणुकीविषयी आलेले अनुभव येथे क्रमशः प्रसिद्ध करत आहोत.
पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू 
यांच्या भक्तांना मारहाण करणारे पोलीस !
        १५ वर्षांच्या विद्यार्थिनीच्या कथित लैंगिक शोषणाच्या प्रकरणी पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू यांना अटक करण्यात आली. त्यांना राजस्थानमधील जोधपूरच्या मध्यवर्ती कारागृहात नेण्यात आले. तेथे प.पू. बापूंचे भक्त मोठ्या संख्येने जमा झालेे. ते येथे रस्त्यावर बसून शांतपणे निदर्शने करत होते. असे असतांना पोलिसांनी त्यांच्यावर निर्दयपणे लाठीमार चालू केला. या भक्तांमध्ये महिलाही होत्या. त्यांच्यावरही लाठीमार करण्यात आला. त्यामुळे भक्तांची पळापळ झाली. त्यानंतर पोलीस त्यांच्या मागे धावत त्यांना मारहाण करत होते.
पोलिसांविषयी चांगले आणि वाईट अनुभव असल्यास 
वाचकांनी नजीकच्या दैनिक कार्यालयात पाठवावेत !

(म्हणे) सरसंघचालक मोहन भागवत हे देशाचे हिटलर !

लोकशाहीसाठी संघर्ष यात्रेमध्ये समाजवादी नेते भाई वैद्य यांची संघद्वेषी टीका
लोकशाहीसाठी संघर्ष यात्रेचा उडालेला फज्जा
        पुणे, २२ सप्टेंबर - केंद्र सरकार हे मोदी अथवा भाजप यांचे असल्याचा भ्रम आहे. त्याचा आपण प्रतिकार करणे आवश्यक आहे. पुढील निवडणुकीत आपला पराभव होईल, असे दिसू लागल्यास संघ लष्कराच्या साहाय्याने सत्ता बळकावेल. वास्तविक हे सरकार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही फॅसिस्ट संघटना असून सरसंघचालक मोहन भागवत हे देशाचे हिटलर आहेत, अशी द्वेषमूलक टीका समाजवादी नेते भाई वैद्य यांनी केली. (भागवत हे जर हिटलरसारखे वागले असते, तर भाई वैद्य यांना असे बोलण्याचे धाडसच झाले नसते. - संपादक) विविध परिवर्तनवादी संघटनांच्या वतीने २१ सप्टेंबर या दिवशी लोकशाहीसाठी संघर्ष यात्रा या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या वेळी मार्क्सवादी पक्षाचे कॉम्रेड अशोक ढवळे, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे कॉम्रेड भालचंद्र कांगो, दक्षिणायनचे डॉ. गणेश देवी, विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे धनाजी गुरव, अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या नंदिनी जाधव आदींसह अनेक जण उपस्थित होते.

हिंदुत्वनिष्ठ संघटनांना वेठीस धरल्यामुळेच डॉ. दाभोलकरांचे खरे मारेकरी पसार झाले ! - पू. सुनील चिंचोलकर, ज्येष्ठ समर्थभक्त

सनातनवरील कठीण काळात संस्था आणि साधक यांच्या 
मागे ठामपणे उभे राहून आधार देणार्‍या पू. सुनील 
चिंचोलकर यांच्या चरणी सनातन परिवार कृतज्ञ आहे ! 
       डॉ. दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी पुरो(अधो)गामी आणि अन्वेषण यंत्रणा यांच्याकडून केल्या जाणार्‍या सनातनच्या अपकीर्तीविषयी पुणे येथील ज्येष्ठ समर्थभक्त पू. सुनील चिंचोलकर यांनी मांडलेली परखड मते
१. सनातन संस्थेने अंधश्रद्धा निर्मूलन समितीशी सतत वैचारिक संघर्ष केला आहे. त्यांना जर डॉ. दाभोलकर यांची हत्याच करायची असती, तर विरोधी लेखन न करता त्यांनी न बोलता आपले काम साधले असते.
२. दाभोलकर परिवार आरंभापासून सनातनच्या मागे लागल्याने पोलिसांची दिशाभूल झाली आणि खरे मारेकरी निसटले. दाट शक्यता आहे की, एखाद्या मांत्रिकाने त्याच्या व्यवसायावर गदा येऊ नये; म्हणून सुपारी देऊन दाभोलकरांची हत्या केली असेल; पण एकाही मांत्रिकाला पकडले गेले नाही. हिंदुत्वनिष्ठ संघटनांचाच वेठीला धरल्यामुळे खर्‍या मारेकर्‍यांना पसार व्हायला संधी मिळाली.

भारतात मनोविकार रुग्णांची वाढती संख्या आणि रुग्णालयांची विदारक स्थिती !

      मुंबई - देशातील ४३ शासकीय मनोविकार रुग्णालयांची विदारक स्थिती समोर आली आहे. या रुग्णालयांत केवळ महिलांचीच नव्हे, तर पुरुष मनोरुग्णांचीही परवड होत आहे. बहुतेक शासकीय रुग्णालयांमध्ये पुरेसे मनोविकारतज्ञ नाहीत, तसेच प्रशिक्षित परिचारिकांचाही अभाव आहे. देहलीमध्ये राष्ट्रीय महिला आयोग आणि नॅशनल इन्स्टिट्यूूट ऑफ मेंटल हेल्थ यांच्या अभ्यासातून देशातील शासकीय मनोरुग्णालयांमधील महिला रुग्णांच्या करण्यात आलेल्या अभ्यासात महिला रुग्णांच्या दुरवस्थेचा पंचनामा करण्यात आला असून अनेक उपाययोजना सुचवण्यात आल्या आहेत. तथापि यासाठी लागणारा निधी कोण उपलब्ध करून देणार?, या कळीच्या प्रश्‍नावर कोणाकडेही ठोस उत्तर नाही.

कोहिनूर हिरा परत आणणे कठीण ! - सरकारचे सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर

हिंदु राष्ट्रात कोहिनूरच नाही, तर जगभरातील अन्य भारतीय ठेवाही परत आणला जाईल !
      नवी देहली - आंतरराष्ट्रीय नियम आणि कायदे यांच्यामुळे कोहिनूर हिरा भारतात परत आणण्यात अनेक अडचणी आहेत. त्यामुळे तो इंग्लंडकडून परत मिळवणे कठीण आहे, असे प्रतिज्ञापत्र भारत सरकारने सर्वोच्च न्यायालयात नुकतेच सादर केले आहे.
     कोहिनूर हिरा भारतात परत आणण्यासाठी न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. हा हिरा भारतात परत आणण्यासाठी केंद्रसरकारचे प्रयत्न चालू आहेत का ? याविषयी विचारणा करण्यासाठी न्या. टी.एस्. ठाकूर यांच्या खंडपिठाने सरकारला नोटीस पाठवली होती. या वेळी न्यायालयाला माहिती देतांना सरकारने सांगितले की, इंग्लंडच्या व्हिक्टोरिया राणीला कोहिनूर हिरा भेट देण्यात आला होता, याचा कोणताच सबळ पुरावा आपल्याकडे नाही. त्यामुळे यावर इंग्लंडशी सामोपचाराने तोडगा काढण्यासाठी प्रयत्न केले जातील. वर्ष १९७२ चा पुरातन आणि कलात्मक वस्तू कायदा लागू होण्यापूर्वीच कोहिनूर हिरा दुसर्‍या देशात गेला असल्याने या कायद्याच्या अटीही लागू करता येत नाहीत.

१०० चिनी विद्यापिठांमध्ये योग अभियानाला प्रारंभ !

चीनकडून बोध घेऊन भारतीय विद्यापिठांनीही योगाचे 
अभियान चालू केल्यास विद्यार्थ्यांचा तणाव दूर होण्यास साहाय्य होईल !
      बीजिंग - विद्यार्थ्यांमधील वाढता तणाव आणि नैराश्य दूर करण्यासाठी चीनमधील १०० विद्यापिठांमध्ये योग अभियान चालू करण्यात आले आहे. चीनच्या माजी पत्रकार यिन यान आणि त्यांचे पती मोहन सिंह भंडारी (मोहन सिंह भंडारी हे भारतीय आहेत.) यांच्याकडून चीनमध्ये प्रसिद्ध योगी योग ही योग संस्था चालवण्यात येते. या संस्थेकडून पीकिंग विद्यापिठाच्या साहाय्याने १०० विद्यापिठांमध्ये १०० दिवस या नावाने हे अभियान चालवण्यात येत आहे. या अभियानाला विद्यार्थ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.काश्मिरी विद्यार्थ्याची अलीगड मुस्लिम विश्‍वविद्यालयातून हकालपट्टी !

काश्मिरी विद्यार्थ्याच्या मानसिकतेवरून तेथील लोकांची 
मानसिकता लक्षात येते ! अशा देशद्रोह्यांना पाकमध्येच हाकलले पाहिजे ! 
उरी येथील आक्रमणाविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याचे प्रकरण
      अलीगड - येथील अलीगड मुस्लिम विश्‍वविद्यालयात रसायनशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण घेत असलेल्या मुदस्सर युसुफ या काश्मिरी विद्यार्थ्याने उरी आक्रमणाविषयी आक्षेपार्ह लिखाण त्याच्या फेसबूक खात्यावर प्रकाशित केल्याने त्याला विश्‍वविद्यालयातून काढून टाकण्यात आले आहे.
       अलीगड मुस्लिम विश्‍वविद्यालयाचे कुलगुरु लेफ्टनन्ट झामिरुद्दीन शाह यांनी वरील निर्णय घेतांना म्हटले की, विश्‍वविद्यालयात अशा प्रकारची देशविरोधी कृत्ये खपवून घेतली जाणार नाहीत. मुदस्सर युसुफ याने त्याच्याकडून ही चूक भावनेच्या भरात झाली, असे सांगून क्षमायाचना केली; मात्र विश्‍वविद्यालयाच्या व्यवस्थापनाने घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन त्याचा युक्तीवाद फेटाळून लावला. युसुफ याने नेमके काय आक्षेपार्ह लिखाण केले होते, हे समजू शकलेले नाही.कुख्यात गुंड शहाबुद्दीनच्या भीतीने न्यायाधिशांनी स्थानांतर करून घेतले !

बिहारमध्ये जंगलराज ! गुंडाच्या भीतीने न्यायाधिशांना 
जिल्हा सोडावे लागणे, हे लोकराज्यासाठी लज्जास्पद ! 
      पाटणा - बिहारमधील कुख्यात गुंड आणि राष्ट्रीय जनता दलाचे माजी खासदार महंमद शहाबुद्दीनला दुहेरी हत्याकांडाच्या प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावणारे सिवान न्यायालयाचे न्यायाधीश अजयकुमार श्रीवास्तव यांनी शहाबुद्दीनच्या भितीने स्थानांतर करून घेतले आहे. (जेथे न्यायाधीश सुरक्षीत नाहीत, तेथे सामान्य नागरिक सुरक्षित असेल का ? - संपादक)
१. शहाबुद्दीनने ऑगस्ट २००४ मध्ये त्याच्या प्रतापपूर गावात सतीश राज आणि गिरीश राज या दोघा भावांची अ‍ॅसिडमध्ये बुडवून हत्या केली होती. या दुहेरी हत्याकांडाच्या प्रकरणी सिवानच्या विशेष न्यायालयात खटला चालू होता. 
२. या हत्याकांडाचे एकमेव साक्षीदार आणि ठार झालेल्या २ भावंडांचे तिसरे भाऊ राजीव रोशन यांचीही १६ जून २०१४ ला भर चौकात गोळी मारून हत्या करण्यात आली होती.

धर्मांतर करणार्‍यांची जागा कारागृहात ! - झारखंडचे मुख्यमंत्री रघुवर यांचे प्रतिपादन

धर्मांतराच्या विरोधात कठोर भूमिका घेणार्‍या झारखंडच्या मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन !
      रांची (झारखंड) - कोणी आमीष आणि भीती दाखवून आदिवासींचे धर्मांतर करत असेल, तर ते अवैध आहे. आम्ही राजधर्माचे पालन करतो. अशा प्रकारे कोणी धर्मांतर करत असेल, तर त्याची जागा राज्यातील होटवार कारागृह असेल, अशी चेतावणी झारखंडचे मुख्यमंत्री रघुवर यांनी येथे एका कार्यक्रमात दिली. या वेळी येथील महापौर आशा लकडा यांनी सरकारने धर्मांतरविरोधी कायदा करावे, अशी मागणी केली.ममाज् बॉइज या लघुपटात पांडवांचे अश्‍लाघ्य विडंबन !

हिंदू संघटित नसल्यामुळेच हिंदुद्रोही असे विडंबन करण्याचे दुःसाहस करतात ! 
     मुंबई - ममाज् बॉइज(आईची मुले) हा लघुपट प्रसारित झाला आहे. या लघुपटात महाभारतातील मुख्य व्यक्तीरेखांची खिल्ली उडवण्यात आली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक अक्षत वर्मा आहेत.
      या लघुपटात अर्जुन माशाचा डोळा भेदून द्रौपदीशी विवाह करतो; परंतु घरी आल्यावर कुंती त्यांच्याकडे न बघताच जे काही आणले आहे, ते इतर चार भावंडांमध्ये वाटून घे, असे सांगते. त्यामुळे द्रौपदी त्याची पत्नी असतांना तिला इतरांमध्ये कसे वाटून घ्यायचे ?, असा प्रश्‍न अर्जुनाला पडतो आणि तो कुंतीला पुष्कळ समजावतो. अशाही स्थितीत कुंती तिच्या निर्णयावर ठाम असते, असे चित्रण या लघुपटात दाखवण्यात आले आहे. त्यानंतर अर्जुन त्याच्या चारही भावंडांना समजवण्याचा प्रयत्न करतो; पण चारही जण द्रौपदीकडे वासनांध दृष्टीने पहातात, असे चित्रपटातील विविध दृश्यांमध्ये दाखवण्यात आले आहे. चित्रपटात नकुल आणि सहदेव समलिंगी दाखवण्यात आले आहेत.

आम आदमी पक्षाचे आमदार सोमनाथ भारती यांना अटक !

गुन्हेगारांचा भरणा असलेला आम आदमी पक्ष !
      नवी देहली - आम आदमी पक्षाचे देहलीतील आमदार आणि माजी कायदामंत्री सोमनाथ भारती यांना पोलिसांनी अटक केली आहे. एम्स रुग्णालयाच्या कर्मचार्‍यांशी गैरवर्तन केल्याच्या आरोपाखाली त्यांना अटक करण्यात आली आहे. मेव्हण्याच्या पत्नीची छेडछाड केल्याच्या आरोपावरून आदल्या दिवशी पोलिसांनी आपचे आमदार अमानतुल्लाह यांना अटक केली होती. 
     पंजाबच्या निवडणुका पार पडेपर्यंत आपच्या आमदारांचे अटकसत्र असेच चालू राहील, असे देहलीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र सिंह यांनी म्हटले आहे.

पाकिस्तान आतंकवादी राष्ट्र ! - संयुक्त राष्ट्रसंघात भारताने ठणकावले

      जिनेव्हा - पाकिस्तान आतंकवादी राष्ट्र आहे. पाक आतंकवादाचा वापर भारताच्या विरोधात करत आहे, असे ठाम प्रतिपादन भारताने संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेत केले. भारताच्या पूर्वी पाकचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी काश्मीर प्रश्‍नावर तोडगा काढल्याशिवाय भारत-पाक यांच्यात शांतता निर्माण होणे अशक्य आहे, असे सांगत आतंकवादी बुरहान वानी याला शांततेसाठी काम करणारा युवा नेता असल्याचे म्हटले होते.
    संयुक्त राष्ट्रसंघातील भारताच्या स्थायी प्रतिनिधी इनाम गंभीर म्हणाल्या, पाक पुरस्कृत आतंकवादाचा सामना आमच्या देशाला करावा लागत आहे. पाकच्या या भूमिकेचा फटका संपूर्ण जगाला बसला आहे. आत्मकेंद्रीत भूमिकेमुळे पाक जागतिक आतंकवादाचे केंद्र ठरत असून जगाकडून मिळणारे आर्थिक साहाय्य आतंकवादाला प्रोत्साहन देण्यासाठी वापरत असतो. पाक हा पैसा आतंकवाद्यांना भारताच्या विरोधात लढण्यासाठी देत असतो. आतंकवाद्यांना प्रशिक्षण देणे, त्यांना प्रोत्साहन देणे यांसाठी हा पैसा वापरला जातो. अनेक आतंकवादी संघटना आणि त्यांचे नेते पाकच्या सहकार्याने मुक्तपणे सगळीकडे वावरतात.

गायीच्या वासराला ठार करून त्याचे मांस खाणार्‍या चार धर्मांधांना अटक !

      भोपाळ - गायीच्या वासराची हत्या करून त्याचे मांस खाण्याच्या प्रकरणी भिंड येथील ४ धर्मांधांना अटक करण्यात आली आहे. हिंदुत्वनिष्ठांनी पोलीस ठाण्याबाहेर आंदोलन करून या गुन्हेगारांना अटक करण्याची मागणी केल्यावर पोलिसांनी ही कारवाई केली. (आरोपींना अटक करण्यासाठी आंदोलन का करावे लागते ? - संपादक) लल्ला खान, मुस्ताक खान, शमशाद खान आणि सलामत खान अशी या आरोपींची नावे आहेत. अंतार सिंह राजावत यांच्या गायीचे वासरू आरोपींच्या शेतात गेले असता त्यांनी त्याला ठार करून त्याचे मांस खाल्ले. (दादरी प्रकरणावरून ऊर बडवणारे या प्रकरणावर तोंड उघडतील का ? - संपादक)

पाकिस्तान बेचिराख करायला हवा ! - दिलीपजी बारटक्के, शिवसेना ठाणे माजी नगरसेवक

ठाणे येथे अमर जवान श्रद्धांजली सभा
      ठाणे - हुतात्मा झालेल्या सैनिकांचे अश्रू व्यर्थ जाणार नाहीत. आपण सर्वांनी पक्षीय मतभेद विसरून सैनिकांचे मनोधैर्य वाढवले पाहिजे, तसेच पाकिस्तान बेचिराख केला पाहिजे. हीच सैनिकांना खरी आदरांजली ठरेल, असे प्रतिपादन शिवसेनेचे ठाणे येथील माजी नगरसेवक श्री. दिलीपजी बारटक्के यांनी केले. उरी येथे झालेल्या आतंकवादी आक्रमणाच्या निषेधार्थ येथील रवेची माता मंदिर चौकात झालेल्या अमर जवान श्रद्धांजली सभेत ते बोलत होते.

सनातन संस्थेच्या वतीने गोकुळाष्टमीनिमित्त देहली, हरियाणा आणि उत्तरप्रदेश यांठिकाणी ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन !

       देहली येथे जी.के. २, वसंत कुंज, न्यू कोण्डली, न्यू अशोकनगर, अशा एकूण ४ ठिकाणी, हरियाणातील गुरुग्राम आणि उत्तरप्रदेशमध्ये नोएडा येथे एका ठिकाणी गोकुळाष्टमीच्या निमित्ताने ग्रंथप्रदर्शन लावण्यात आले होते. गुरुग्राम, हरियाणा येथे गोकुळाष्टमीच्या निमित्ताने श्री सनातन धर्म प्रचारिणी सभेच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या वेळी ग्रंथप्रदर्शन आणि धर्मशिक्षण देणारे फलक यांचे प्रदर्शन लावण्यात आले होते. 
- कु. कृतिका खत्री, देहली (६.९.२०१६)

भारताने पाकव्याप्त काश्मीरमधील आतंकवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करावे ! - अखंड भारत मोर्चा

पाकविरोधी अखंड भारत मोर्चाच्या आंदोलनाला देहली पोलिसांचा विरोध
पाकच्या विरोधात आंदोलन
करतांना अखंड भारत मोर्चाचे कार्यकर्ते
      नवी देहली - काश्मीरमधील उरी येथे पाकिस्तानी आतंकवाद्यांनी १८ भारतीय सैनिकांना ठार केल्याच्या विरोधात अखंड भारत मोर्चाकडून येथील जंतरमंतर येथे आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते; मात्र हे आंदोलन चालू होण्यापूर्वीच पोलिसांनी मोर्चाच्या सर्व कार्यकर्त्यांना बलपूर्वक अटक करून संसद मार्ग पोलीस ठाण्यात बंद केले.
     या वेळी अखंड भारत मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. संदीप आहुजा म्हणाले, सातत्याने भारतीय सैनिकांच्या तळांवर होणारी आतंकवाद्यांची आक्रमणे ही देशाच्या अस्मितेवर घाला आहे. भारत सरकारने त्वरित पाकव्याप्त काश्मीरवर आक्रमण करून आतंकवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करावेत आणि पाकव्याप्त काश्मीरही कह्यात घ्यावे. 
     अखंड भारत मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष श्री. भारत बत्रा म्हणाले, सरकारकडून काश्मीरच्या फुटीरतावादी नेत्यांना सुविधा देण्यात येऊ नये, तसेच त्यांना अटक करून कारागृहात टाकावे.

अक्षरधाम मंदिरातील आक्रमणाच्या प्रकरणी निर्दोष सुटलेल्या चांद खान याला गोहत्येच्या प्रकरणी अटक !

       नवी देहली - गुजरातमधील अक्षरधाम मंदिरावर वर्ष २००२ मध्ये झालेल्या आक्रमणाच्या प्रकरणी ११ वर्षे कारावासात घालवल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने वर्ष २०१४ मध्ये चांद खान उपाख्य शान खान याला निर्दोष सोडले होते. वर्ष २००६ मध्ये कनिष्ठ न्यायालयाने चांद खान याला दोषी धरत मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली होती. गुजरात उच्च न्यायालयानेही त्याची शिक्षा कायम ठेवली होती. मे २०१४ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने चांद खान आणि अन्य ४ जण यांची निर्दोष मुक्तता केली होती. (कनिष्ठ न्यायालयाचा आदेश वरिष्ठ न्यायालय पालटते ! अशाने जनतेच्या मनात न्यायव्यवस्थेच्या निर्णयांविषयी शंका निर्माण झाल्यास आश्‍चर्य ते काय ? - संपादक) मात्र आता चांद खान याला गोहत्येच्या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. (यावरून लक्षात येते की चांद खान हा गुन्हेगारी वृत्तीचा आहे. असे गुन्हेगार मोकाट सुटतात, हे व्यवस्थेचे अपयश म्हणावे लागेल ! - संपादक) चांद हा उत्तरप्रदेशातील नवाडिया सितारगंज येथे चारचाकीमधून ५०० किलो गोमांस घेऊन जातांना चांद खान याच्यासह अतिक आणि फैजान या त्याच्या सहकार्‍यांना अटक करण्यात आली होती.बेल्जियममध्ये पाइपलाइनद्वारे बियर पुरवठा !

भारतियांमध्ये वाढते मद्याचे व्यसन पहाता आणि मद्याद्वारे महसूल मिळवणारे 
राज्यकर्ते असता येथेही अशाच प्रकारची पाईपलाईन घातली गेल्यास आश्‍चर्य वाटू नये ! 
       ब्रसेल्स - आतापर्यंत आपण पाणी, तेल आणि गॅस यांच्या पाइपलाइनविषयी ऐकून होतो; मात्र युरोपमधील बेल्जियम देशात पाईपलाईनद्वारे बियरचा पुरवठा केला जात आहे. बेल्जियममधील हाल्वे मान या बियर उत्पादक आस्थापनाने ब्रजेस शहरात दोन मैल लांबीची बियरची पाइपलाइन टाकली आहे. ब्रजेस शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या दारू भट्टीला उपनगरातील कारखान्याशी जोडणारी ही पाइपलाइन नुकतीच चालू करण्यात आली आहे. दारूचा पुरवठा करण्यासाठी टाकण्यात आलेली जगातील ही पहिलीच पाइपलाइन आहे. यामुळे बॉटलिंग प्लांटपासून भट्टीपर्यंत होणारी गाड्यांची ये-जा थांबेल आणि शहरातील वाहतूक कोंडी न्यून होईल, असा आस्थापनाचा दावा आहे.
      या पाइपलाइननंतर हाल्वे मानने आणखी एक २ मैल लांबीची पाइपलाइन टाकण्याचं काम चालू केले आहे. त्यातून एका घंट्यात सुमारे ४ सहस्र लिटर बियरचा पुरवठा केला जाणार आहे. पाइपलाइनद्वारे वाहून नेल्या जाणार्‍या बियरची गुणवत्ता राखण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे.


अमेरिकेतील बॉम्बस्फोटांना उत्तरदायी असणार्‍या धर्मांधाला अटक !

अटकेसाठी भारतीय वंशाच्या शीख नागरिकाचे साहाय्य
      न्यूयॉर्क - १७ सप्टेंबरला झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणी पोलिसांनी अहमद खान राहामी या २८ वर्षीय धर्मांधास अटक केली. त्यानेच याच दिवशी न्यू जर्सी येथे एका बॉम्बचा स्फोट केला होता; तसेच २ बॉम्ब ठेवले होते. 
      न्यूयॉर्क येथेही आणखी एक बॉम्ब ठेवलेला आढळून आला होता. न्यूयॉर्कजवळील बॉम्बस्फोटात एकूण २९ जण घायाळ झाले. विशेष म्हणजे अहमद खान राहामी याला पकडण्यासाठी भारतीय वंशाच्या हरिंदर बैंस नावाच्या शीख नागरिकाचे पोलिसांना साहाय्य झाले.

इंदिरा आवास योजनेचे नामांतर !

      नवी देहली - माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी चालू केलेल्या इंदिरा आवास योजनेला नवीन स्वरूप देतांना मोदी शासनाने तिचे पंतप्रधान आवास योजनाअसे नामकरण केले आहे. इंदिरा आवास योजनेच्या अंतर्गत चालू आर्थिक वर्षाच्या शेवटपर्यंत ३८ लक्ष घरांचे लक्ष्य निर्धारित करण्यात आले होते यांपैकी १० लक्ष घरे सिद्ध झाली आहेत. नवीन योजनेच्या अंतर्गत सरकारने वर्ष २०१९ पर्यंत देशात एका कोटी घरे निर्माण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.

काश्मीरमध्ये एक आतंकवादी ठार !

      श्रीनगर - काश्मीरच्या बंदिपूर जिल्ह्यात २२ सप्टेंबरला सकाळी झालेल्या चकमकीत एका आतंकवाद्याला सुरक्षादलाने ठार केले. अरागाम गावाजवळील जंगलात ही चकमक झाली.

भांडुप येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने 'पितृपक्षातील श्राद्धाचे महत्त्व अन् माहिती तसेच नवरात्रीमागील अध्यात्मशास्त्र' यांवर मार्गदर्शन


     भांडुप, २२ सप्टेंबर (वार्ता.) - येथील पराग विद्यालयात 'पितृपक्षातील श्राद्धाचे महत्त्व अन् माहिती तसेच नवरात्रीमागील अध्यात्मशास्त्र' या विषयांवर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सौ. राघवी कोनेकर यांनी मार्गदर्शन केले. 'जय संतोषी माता ट्रस्ट'चे अध्यक्ष श्री. रुपेश बांदिवडेकर यांनी पुढाकार घेऊन याचे आयोजन केले होते. या वेळी सनातनच्या सात्विक ग्रंथ आणि उत्पादन यांचे प्रदर्शन लावण्यात आले होते. जिज्ञासूंनी प्रदर्शनाला भेट देऊन ग्रंथ आणि उत्पादने विकत घेतली. 
क्षणचित्र - उपस्थितांपैकी एका जिज्ञासूने दैनिक सनातन प्रभातचे वाचक होण्याची इच्छा दर्शवली तर काहींनी समितीच्या धर्मशिक्षण वर्गात येणार असल्याचे सांगितले.

संगमनेर येथील शनि मंदिरातील २ दानपेट्यांतील रकमेची चोरी

मंदिरातील चोरीच्या वाढत्या घटना रोखण्यासाठी हिंदूसंघटनच हवे ! 
     संगमनेर (जिल्हा नगर) - शहरातील रंगारगल्ली येथील शनि मंदिरातील दोन दानपेट्या चोरांनी १९ सप्टेंबरला उत्तररात्री २ वाजता फोडल्या. ही घटना मंदिराचे पुजारी श्री. दत्तात्रय कुलकर्णी यांच्या सकाळी लक्षात आली. दानपेट्यांमधील अनुमाने ६ सहस्र ५०० रुपये इतकी रक्कम चोरीला गेली आहे. याविषयी पुजार्‍यांनी पोलिसांत तक्रार दिली असून चोरांविरुद्ध गुन्हा प्रविष्ट करण्यात आला आहे.

उरी येथील आक्रमणाची केंद्रीय स्तरावर चर्चा न करता पाकिस्तानला अद्दल घडवण्यासाठी युद्ध पुकारा ! - सुधाकर चौधरी, हिंदु जनजागृती समिती

चोपडा (जिल्हा जळगाव) येथे आंदोलन 
राष्ट्रप्रेमींकडून निवेदन स्वीकारतांना तहसीलदार
     चोपडा - पाकिस्तानमधील आतंकवाद्यांनी जम्मू खोर्‍यातील उरी येथे केलेल्या आक्रमणात १८ भारतीय सैनिकांना प्राण गमवावे लागले. या आक्रमणाची केंद्रीय स्तरावर चर्चा न करता आता पाकिस्तानला अद्दल घडवण्यासाठी युद्ध पुकारा, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने श्री. सुधाकर चौधरी यांनी केले. येथील तहसील कार्यालयाच्या आवारात झालेल्या आंदोलनाच्या वेळी ते बोलत होते. आंदोलनानंतर समितीच्या वतीने तहसीलदार दीपक गिरासे यांना निवेदनही देण्यात आले. निवेदन गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्यासाठीही पाठवण्यात आले.

उरण (जिल्हा रायगड) येथे ४ संशयित शस्त्रसज्ज व्यक्ती दिसल्याने खळबळ

  • आतंकवादग्रस्त महाराष्ट्र !
  • आतंकवादी घुसल्याच्या शक्यतेने मुंबईत अतीदक्षतेची चेतावणी
        रायगड, २२ सप्टेंबर - उरणजवळ असलेल्या नौदलाच्या शस्त्रसाठा भांडार आयएन्एस् अभिमन्यूजवळ ४ शस्त्रसज्ज संशयित व्यक्ती दिसल्याचा दावा २ विद्यार्थ्यांनी २२ सप्टेंबर या दिवशी केला. त्यानंतर त्या संशयित व्यक्तींना शोधण्यासाठी शोधमोहीम नौदलाने चालू केली आहे. सध्या उरणमधील शाळा आणि महाविद्यालये यांना सुट्टी जाहीर केली आहे. या प्रकरणामुळे नौदलासह लष्कर आणि मुंबई आतंकवादविरोधी पथकासह सर्व सुरक्षा यंत्रणा यांना अतीदक्षतेची चेतावणी देण्यात आली आहे. या घटनेनंतर सुरक्षा व्यवस्था सतर्क असल्याचे राज्याचे गृहराज्यमंत्री तथा शिवसेनेचे दीपक केसरकर यांनी सांगितले.
        मुंबई पोलिसांनीही ठिकठिकाणी नाकेबंदी केली असून वाहनांची पडताळणी करण्यात येत आहे, तसेच अधिकार्‍यांनाही तशी सूचना दिलेली असून सुरक्षेवर लक्ष ठेवण्याचे आदेशही दिले आहेत. असे असले, तरी गुप्तचर विभागाने सध्या तरी अशी कोणतीही संशयित गोष्ट आढळली नसल्याचे म्हटले आहे.

हिंदु गोवंश रक्षा समितीच्या कार्यकर्त्यांनी खडसवल्यावर महानगरपालिकेच्या अधिकार्‍यांनी चूक मान्य केली

धर्मरक्षणासाठी तत्पर असणार्‍या हिंदु गोवंश रक्षा समितीच्या कार्यकर्त्यांचे अभिनंदन !
वसई-विरार महानगरपालिकेने निर्माल्य कलशाच्या ठिकाणी कचराकुंड्या ठेवल्याचे प्रकरण
      वसई-विरार - येथील महानगरपालिकेने श्री गणेशविसर्जन सोहळ्यातील निर्माल्य विसर्जनासाठी कलश न ठेवता कचराकुंड्या ठेवल्या. (आज हिंदू असंघटित असल्यानेच त्यांच्या उत्सवांत असे प्रकार घडतात. - संपादक) यामुळे हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या. हिंदु गोवंश रक्षा समितीच्या कार्यकर्त्यांना याविषयी लक्षात येताच त्यांनी महानगरपालिकेच्या अधिकार्‍यांना खडसावले. प्रारंभी त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली आणि निर्माल्य कलश ठेवण्यासाठी अधिक जागा लागत असल्याने कुंड्या ठेवल्याचे सांगितले. समितीच्या कार्यकर्त्यांनी तुम्ही जाणीवपूर्वक हिंदूंच्या धर्मश्रद्धांचा अवमान करत आहात, हे अधिकार्‍यांच्या निदर्शनास आणून दिल्यावर त्यांनी चूक मान्य केली आणि पुढील वेळी असे होणार नाही, हे आश्‍वासन दिले. (पुढील वर्षी महानगरपालिकेच्या अधिकार्‍यांना निर्माल्य कलश ठेवण्यासाठी हिंदूंनी भाग पाडावे ! - संपादक)पुणे महानगरपालिका शिक्षण मंडळाच्या ३५ शाळांमध्ये पिण्याचे पाणीच नाही !

स्वातंत्र्याच्या ६९ वर्षांनंतर शाळांमध्ये अशी स्थिती असणे हे दुर्दैवच ! 
     पुणे, २२ सप्टेंबर - शहरातील विविध भागांत पुणे महानगरपालिका शिक्षण मंडळाच्या एकूण ३०९ शाळा असून त्यातील ३५ शाळांमध्ये विद्यार्थ्यांना पिण्याचे पाणीच मिळत नसल्याची माहिती नगरसेवक पृथ्वीराज सुतार यांनी विचारलेल्या प्रश्‍नोत्तराच्या माध्यमातून समोर आली आहे. विद्यार्थ्यांना सर्व प्रकारच्या पायाभूत सुविधा पुरवण्यासाठी कोट्यवधी रुपये व्यय करणार्‍या शिक्षण मंडळाला गेल्या २ वर्षांपासून हा प्रश्‍न सोडवता आलेला नाही, ही भयावह वस्तूस्थितीही यामुळे पुढे आलेली आहे. (यावरून शाळा प्रशासन, शिक्षण मंडळ आणि पालिका यांचा कारभार किती हलगर्जीपणे आणि कूर्मगतीने चालत असेल, याचा विचारच न केलेला बरा ! या प्रकरणी पालिका आयुक्त लक्ष घालून तातडीने उपाययोजना करून संबंधितांवर कठोर कारवाई करतील का ? - संपादक)

पोलिसांवरील आक्रमणे रोखण्यासाठी लवकरच कायदा होणार ! - मुख्यमंत्र्यांचे आश्‍वासन

उशिरा जागे झालेले शासन ! नुसते कायदे करून उपयोगी
 नाही,  तर त्याची कठोर अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. 
     पुणे - शासकीय कर्मचारी आणि पोलीस यांना होणार्‍या मारहाणीच्या विरोधात नुकतेच महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाच्या एका शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन निवेदन दिले आणि आंदोलनाची चेतावणी दिली. त्या वेळी फडणवीस यांनी शासकीय कर्मचारी आणि पोलीस यांच्यावर होणार्‍या आक्रमणाची राज्य सरकारने गंभीर नोंद घेतली असून त्यासंदर्भात परिणामकारक कायदा लवकरच केला जाणार असल्याचे आश्‍वासन महासंघाला दिले.

भाजप नेत्यांकडून नुसते बोलणे नाही, तर मोदींकडून कृती करवून घेणे अपेक्षित आहे !

अ. 'दातांच्या बदल्यात दात पाडण्याचे अर्थात्, 'जशास तसे' प्रत्युत्तर देण्याचे धोरण आता पुरे झाले. संयम राखण्याचे दिवस संपले आहेत. आता एका दाताच्या बदल्यात शत्रूचा अख्खा जबडाच फाडावा लागेल.' 
- राम माधव, भाजप नेते 
आ. 'आता केवळ निषेधाची खलिते पाठवून उपयोग होणार नाही, तर पाकच्या वर्मावर घाव घालावा लागेल.'
- केंद्रीयमंत्री जीतेंद्र सिंह

कल्याण येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन !

स्थळ : दीपक हॉटेल समोर, कल्याण रेल्वे स्थानकाजवळ, कल्याण (पश्‍चिम) 
दिनांक : २५ सप्टेंबर २०१६ वेळ : सायंकाळी ५ 
संपर्क : ९३२११२१४८४ 
 आंदोलनात केल्या जाणार्‍या मागण्या 
१. सनी लिओनच्या संकेतस्थळांवर बंदी आणावी ! 
२. मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशांचे पालन करून शासनाने अनधिकृत भोंगे त्वरित काढावेत. 
३. 'गो इंडिया, गो बॅक' या देशविरोधी घोषणा देणार्‍या देशद्रोह्यांवर कारवाई व्हावी !

सनातननिर्मित फ्लेक्स फलकांच्या प्रदर्शनाचा सहस्रो भाविकांनी घेतला लाभ !

पंढरपूर (जिल्हा सोलापूर) येथील रुक्मिणी पटांगण गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम
       पंढरपूर (जिल्हा सोलापूर), २२ सप्टेंबर (वार्ता.) - येथील रुक्मिणी पटांगण गणेश मंडळाने सनातन-निर्मित फ्लेक्स प्रदर्शनाद्वारे धर्मप्रसार करून सहस्रो भाविकांपर्यंत धर्मशिक्षण पोचवण्याचा स्तुत्य प्रयत्न केला. मंडळाने गणेशोत्सवात लावण्यासाठी १० धर्मशिक्षण फलक प्रायोजित केले होते. हे फलक श्रीविठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या बाहेरील बाजूस असलेल्या संरक्षक भिंतीच्या ग्रीलच्या बाहेरील बाजूस लावण्यात आले. चातुर्मासात येणारी एकादशी महत्त्वाची असते. त्यामुळे जवळपास १ लक्ष भाविक दर्शनाला येतात. प्रदर्शन लावण्यासाठी हिंदु महासभेचे पंढरपूर अध्यक्ष बाळकृष्ण डिंगरे यांसह गणेश मंडळातील कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला. 
     अनेक भाविक गर्दीतही उभे राहून फलक वाचत होते. जवळपास २० सहस्र वारकरी आणि अन्य यांनी या प्रदर्शनाचा लाभ घेतला.

ऐन गणेशोत्सवात बकरी ईदच्या काळात गोरक्षकांना रहात्या गावात प्रवेशबंदी !

गोरक्षकांवर अन्याय करणारे धर्मद्रोही जिल्हाधिकारी !
जिल्हाधिकार्‍यांकडून गोरक्षकांना १४४ ची नोटीस
      पालघर - ऐन गणेशोत्सवात येथील नालासोपारा या भागात बकरी ईदच्या काळात गोरक्षकांना त्यांच्या रहात्या गावातच प्रवेशबंदी करण्यात आली. जिल्हाधिकार्‍यांनी गोरक्षकांना १४४ ची नोटीस पाठवली होती. जातीय तेढ निर्माण करण्याच्या उद्देशाने प्रक्षोभक वक्तव्ये करून कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्‍न उपस्थित होऊ शकतो, असा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. सर्वश्री वैभव राऊत, नीलेश भट, हितेंद्र मेहता, रतनदास वैष्णव, परेश बावेशी, मिलन बावेशी, प्रदीप दुबे, शिवकुमार पांडे आणि राजेश पाल या गोरक्षकांना प्रवेश बंदी करण्यात आली होती.
      गणेशोत्सव सर्वत्र मोठ्या प्रमाणात साजरा होत असतांना गोरक्षकांना प्रवेशबंदी करून प्रशासन हिंदूंना काय संदेश देऊ इच्छिते ? अल्पसंख्यांक वाम मार्गाचा वापर करून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावत असतील, तर त्यांना खडसवण्यासाठी गोरक्षकांसारखे धर्मनिष्ठ हिंदुत्वनिष्ठ हवेच, अशी चर्चा केली जात आहे.राज्यात दुर्मिळ पक्ष्यांची होणारी अवैध विक्री आणि तस्करी रोखण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश

प्रत्येक गोष्टीत न्यायालयाने आदेश द्यायचे असतील, तर प्रशासकीय यंत्रणा हवीच कशाला ?
     मुंबई, २२ सप्टेंबर - मुंबईसह राज्यभरातील विविध भागांतून दुर्मिळ पक्षांची होणारी अवैध विक्री आणि तस्करी रोखण्यासाठी तपासणी करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती मंजुळा चेल्लूर यांनी मुंबई महानगरपालिका आणि राज्य सरकार यांना दिले आहेत. (कायद्याचा धाक राहिला नसल्यानेच दुर्मिळ पक्षांची अवैध विक्री आणि तस्करी वाढत आहे. त्यासाठी कठोर शिक्षा आणि त्याची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. - संपादक) 

नागपूर येथे धर्मप्रचार सभेच्या वतीने खाऊचे वाटप

खाऊचे वाटप करतांना कार्यकर्तेअसे पोलीस एकाचे तरी रक्षण करू शकतील का ?

     'अनंतनाग जिल्ह्यातील पीडीपीचे अध्यक्ष अधिवक्ता जावेद अहमद शेख यांच्या घराबाहेर सुरक्षेसाठी तैनात असणार्‍या पोलीस शिपायाकडील ४ एके-४७ रायफली आतंकवाद्यांनी पळवून नेल्या.'

हास्यास्पद आणि देशघातकी एकमत ! आता हिंदु राष्ट्रच हवे !

     'काश्मीरमधील उरी येथील सैन्याच्या मुख्यालयावर १८ सप्टेंबर २०१६ला झालेल्या आतंकवादी आक्रमणात १८ सैनिक हुतात्मा झाले. या आक्रमणाच्या संदर्भात पंतप्रधान मोदी यांच्या निवासस्थानी झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत पाकला आंतरराष्ट्रीय स्तरावर एकटे पाडण्याचा प्रयत्न करण्यावर एकमत झाले. या बैठकीला केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह, अर्थमंत्री अरुण जेटली, संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर, सैन्यदलाचे प्रमुख आदी उपस्थित होते.'

भंडारा येथील एका मुख्याध्यापिकेला लाच घेतांना अटक

मेकॉलेप्रणीत शिक्षणाचे (कु)फलित !
     नागपूर, २२ सप्टेंबर - भंडारा येथील सावित्रीबाई फुले पूर्व माध्यमिक शाळेतील मुख्याध्यापिका मंदा भारतलाल कटकवार यांना विद्यार्थ्यांकडून २०० रुपयांची लाच घेतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. (असे शिक्षक विद्यार्थ्यांवर काय संस्कार करत असतील ? अशांना कठोर शिक्षा केल्यासच आळा बसेल ! - संपादक) तक्रारदाराच्या मुलाने पाचव्या वर्गातून सहाव्या वर्गात गुणपत्रिकेच्या आधारावर दुसर्‍या शाळेत प्रवेश घेतला होता. या प्रवेशासाठी त्याला शाळा सोडल्याच्या प्रमाणपत्राची आवश्यकता होती. ती मागण्यासाठी तक्रारदार गेला असता कटकवार यांनी लाच मागितली. त्यामुळे तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली आणि त्यानुसार २१ सप्टेंबर या दिवशी लाच घेतांना मंदा कटकवार यांना अटक केली.

मुंबईत पावसामुळे जनजीवन विस्कळीत !

      मुंबई, २२ सप्टेंबर - गेल्या ४ दिवसांपासून सतत चालू असलेल्या पावसामुळे मुंबईतील जनजीवन विस्कळीत झाले आहे. 
१. कुर्ला, घाटकोपर, चेंबूर, कांजूरमार्ग, मुलुंड, भांडुप, माहीम, माटुंगा, वांद्रे, कलानगर, वडाळा, सांताक्रूझ, मालाड आदी ठिकाणी पुष्कळ पाणी साचले होते. खड्ड्यांमुळे अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी होऊन वाहतुकीचा बोजवारा उडाला. 
२. रेल्वेच्या उपनगरी सेवेलाही पावसामुळे विलंब होत होता. पश्‍चिम रेल्वेमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने गाड्या १० ते १५ मिनिटे विलंबाने धावत होत्या.
३. मुंबई शहरात एकूण ११ झाडे उन्मळून पडली आहेत. 
४. वसई येथे मिठागरातील संपूर्ण वस्ती पाण्याखाली गेली. तेथील १२५ घरांत पाणी शिरल्याने जवळजवळ ४०० लोक अडकले. 
५. पावसामुळे रोहा-अलिबाग मार्ग बंद करण्यात आला. 
६. पावसामुळे झालेल्या वाहतूक कोंडीत ३ घंट्यांपासून अडकलेले राज्याचे पालकमंत्री दीपक सावंत गाडीतून उतरून २ किमी चालत गेले.


महाराष्ट्रात वर्षभरात कुपोषणाने १७ सहस्र मृत्यू ! - मुंबई उच्च न्यायालयात याचिका

एकीकडे देशात ६७ लक्ष टन अन्नाची नासाडी होत असतांना राज्यातील ही परिस्थिती 
विदारक आणि भयावह आहे. ही समस्या दूर करण्यासाठी राज्य शासन कोणते प्रयत्न करणार आहे ?
      मुंबई, २२ सप्टेंबर - राज्यात वर्षभरात १७ सहस्र बालकांचा कुपोषणामुळे मृत्यू झाला आहे, अशी याचिका मुंबई उच्च न्यायालयात प्रविष्ट झाली आहे. या वेळी कुपोषणामुळे होणारे मृत्यू गंभीर आहेत, असे निरीक्षण नोंदवत सरकारला खडसावले आहे. यापूर्वीही कुपोषणासंदर्भात अनेक याचिका प्रविष्ट झाल्या असून त्यावरील एकत्रित सुनावणी २१ सप्टेंबर या दिवशी झाली. 
     कुपोषण रोखण्यासाठी सरकारकडून मिळणारे अनुदान नेमके कोठे जाते ?, अनुदान वाटपाची पद्धत कशी आहे ? असे प्रश्‍न उच्च न्यायालयाने स्थानिक प्रशासनाला उपस्थित केले आहेत.

फलक प्रसिद्धीकरता

तमिळनाडूमधील हिंदु नेत्यांच्या विरोधात वाढती 'असहिष्णुता' ! 
     तमिळनाडूच्या दिंडीगल जिल्ह्यातील हिंदु मुन्नानीचे (आघाडीचे) श्री. शंकर गणेश यांच्यावर धर्मांधांनी धारदार हत्यारांनी केलेल्या आक्रमणात ते गंभीररित्या घायाळ झाले. काही दिवसांपूर्वी विहिंपच्या होसूर शाखेचे सचिव आर्. सुरी यांची धर्मांधांनी हत्या केली होती.

हिंदू तेजा जाग रे !

Jago !
Tamilnadume Hindu Munnani sangathanke neta
Shankar Ganeshpar akraman kar, dharmandhone unhe kiya ghayal.
- Hindu netayopar akraman, 'Asahishnuta' hi hai!

जागो ! :
तमिलनाडु में हिन्दू मुन्नानी संगठन के नेता 
शंकर गणेश पर आक्रमण कर, धर्मांधों ने उन्हें किया घायल ।
- हिन्दू नेताआें पर आक्रमण, 'असहिष्णुता' ही है !

जातीच्या आधारावर आरक्षण मागणारा मराठा समाज भविष्यात गुणवत्तेवर आरक्षण मागेल ! - पू. भिडे गुरुजी

सांगली येथील मराठा समाजाच्या मोर्च्यास श्रीशिवप्रतिष्ठानचा पाठिंबा !
      सांगली, २२ सप्टेंबर (वार्ता.) - जो मराठा समाज आज जातीच्या आधारावर आरक्षण मागत आहे, तोच समाज भविष्यात गुणवत्तेवर आरक्षण मागेल, अशी स्थिती येईल, असे उद्गार श्रीशिवप्रतिष्ठानचे पू. भिडे गुरुजी यांनी काढले. सांगली येथे २७ सप्टेंबर या दिवशी होणार्‍या मराठा समाजाच्या मोर्च्यास श्रीशिवप्रतिष्ठानने पाठिंबा घोषित केला. त्या वेळी ते उपस्थित होते. 
      ते पुढे म्हणाले, रांझे पाटील याला शिक्षा करून बलात्कार करणार्‍यांना कशा प्रकारे शासन करावे, याचा आदर्श छत्रपती शिवाजी महाराजांनी घालून दिला आहे. अशाच प्रकारे महिलेशी गैरवर्तवणूक करणार्‍या स्वत:च्या नातेवाइकासही छत्रपती शिवाजी महाराजांनी शिक्षा केली होती.सार्वजनिक नवरात्रोत्सवात होणारे अपप्रकार थांबवा - हिंदु जनजागृती समितीचे पोलीस निरीक्षक यांना निवेदन

पोलीस निरीक्षक श्रीकांत पिंगळे (डावीकडे)
यांना निवेदन देतांना हिंदुत्वनिष्ठ 
       सांगली, २२ सप्टेंबर (वार्ता.) - भारतीय संस्कृतीचे जतन करणे, तसेच समाज, राष्ट्र आणि धर्म यांविषयी जागृती करणे या उद्देशाने सार्वजनिक नवरात्रोत्सवाला आरंभ झाला; मात्र सध्या सार्वजनिक नवरात्रोत्सवात अनेक अपप्रकार शिरले आहेत. चित्रपटगीतांच्या तालावर गरबा खेळणे, मद्यपान करणे, अश्‍लील अंगविक्षेप करत नाचणे, बळजोरीने वर्गणी गोळा करणे, सजावटीवर अनाठायी व्यय करणे, मंडपात जुगार खेळणे आदी कारणांनी उत्सवाचे पावित्र्य नष्ट होत आहे. तरी सार्वजनिक नवरात्रोत्सवात होणारे अपप्रकार थांबवण्यासाठी पोलीस प्रशासनाने पुढाकार घ्यावा, या मागणीचे निवेदन पोलीस अधीक्षक कार्यालयात गृहखात्याचे पोलीस निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांना हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देण्यात आले. या वेळी समितीचे कार्यकर्ते आणि अन्य उपस्थित होते.

विकासासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठातील वृक्षांची तोड !

आता कुठे आहेत तथाकथित पर्यावरणवादी आणि अंनिसवाले ?
      पुणे, २२ सप्टेंबर - येथील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाचा विकास करण्यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड करण्यात येत आहे. विद्यापिठाचे विद्रूपीकरण होत असतांना वृक्षतोड करण्यासाठी विद्यापिठाने कोणतीही अनुमती घेतलेली नाही. (कायदा न मानणार्‍या अशा विद्यापिठाकडून विद्यार्थ्यांना कायदा पाळण्याविषयी कितपत शिकवले जात असेल, याचा विचारच न केलेला बरा ! - संपादक)
१. विद्यापिठामध्ये काही इमारती विनावापर पडून असतांनाही विकासाच्या नावाखाली निसर्गसंपदेवर अतिक्रमण चालू आहे. विद्यापिठाच्या ४११ एकर परिसरामध्ये अनेक महत्त्वाचे वृक्ष जेसीबीच्या साहाय्याने पाडण्यात आले आहेत. तोडलेल्या वृक्षांचीही त्याच जागेवर विल्हेवाट लावण्यात येत आहे. विद्यापिठाच्या परिसरात असलेले चंदनाचे वृक्षही तोडण्यात आले आहेत.

मराठा समाजाच्या आंदोलनाविषयी सनातनचा दृष्टीकोन

१. सध्या महाराष्ट्रात ठिकठिकाणी मराठा समाज एकत्रित येऊन भव्य मोर्चे काढत आहे. मराठा समाज हिंदु समाजाचे अभिन्न अंग आहे. त्यामुळे या माध्यमातून हिंदु समाजाचेच एक प्रकारे संघटन होत आहे, अशी सनातनची एकप्रकारे धारणा आहे.
२. या भव्य मोर्च्यामध्ये जी पहिली मागणी केली जात आहे, ती म्हणजे अ‍ॅट्रॉसिटीचा कायदा रहित व्हावा. या मागणीचे सनातन पूर्णतः समर्थन करते; कारण अन्याय किंवा अत्याचार कधी जात किंवा समूह पाहून केला जात नाही, तर तो कुठल्याही समुदायावर कधीही होऊ शकतो. त्यामुळे अ‍ॅट्रॉसिटीचा कायदा केवळ एका समाजासाठी नको, तर सर्व समाजासाठी असावा; कारण ते घटनेच्या समानतेच्या तत्त्वाला धरून आहे. एखाद्या समाजासाठी अ‍ॅट्रॉसिटीचा कायदा करणे, ही असमानता असून त्यामुळे त्याचा अनुचित लाभ घेतला जाऊ शकतो, असे सनातनचे मत आहे.
३. या भव्य मोर्च्यामध्ये केली जाणारी दुसरी मागणी मराठा आरक्षणाच्या संदर्भातील आहे. सनातनने आरक्षण धोरणाला नेहमीच विरोध केला आहे; कारण गुणवत्ता डावलून लिंग आणि जात यांच्या आधारे दिले जाणारे आरक्षण देशाला कधीही प्रगतीपथावर नेऊ शकत नाही. ज्या मराठ्यांनी कर्तृत्वाच्या बळावर अटकेपार झेंडे फडकवले आणि देहलीच्या सत्ताधीश बादशहांना हातचे बाहुले बनवले, त्या मराठ्यांनी आरक्षणाच्या कुबड्या घेणे योग्य नव्हे, हीच सनातनची भूमिका आहे.

हिंदु जनजागृती समितीच्या देहली येथील धर्मप्रसाराच्या कार्याचा ऑगस्ट २०१६ मधील आढावा

१. राष्ट्रीय हिंदू आंदोलन
      काश्मीरमध्ये त्वरित राष्ट्रपती राजवट लागू करावी आणि सैन्यावर आक्रमण करणार्‍या देशद्रोह्यांवर कठोर कार्यवाही करावी, या मागणीसाठी ७.८.२०१६ या दिवशी नवी देहली येथील जंतरमंतर येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामध्ये वैदिक उपासना पीठ, भाजप, युवा एकता मंच, रणरागिणी, सनातन संस्था, हिंदुु जनजागृती समिती यांसह अनेक हिंदुत्वनिष्ठ आणि माजी भारतीय नौदल सैनिक सहभागी झाले होते. या आंदोलनाच्या वेळी पुढील मागण्या करण्यात आल्या.
अ. आतंकवाद्यांचे समर्थन करणार्‍या लोकप्रतिनिधींना तात्काळ निलंबित करावे आणि देशाच्या अखंडतेसाठी जम्मू काश्मीरमध्ये तात्काळ राष्ट्रपती राजवट लागू करावी.

पितृपक्षातील श्राद्ध !

        ४ ऋणांपैकी पितृऋण फेडण्यासाठी श्राद्ध आवश्यक असते. माता-पिता, तसेच निकटवर्तीय यांचा मृत्यूनंतरचा प्रवास हा सुखमय आणि क्लेशरहित व्हावा, त्यांना सद्गती मिळावी यांसाठीचा संस्कार म्हणजेच श्राद्ध. श्राद्धातील मंत्रोच्चारांमध्ये पितरांना गती देण्याची सूक्ष्म शक्ती सामावलेली असते. श्राद्धात पितरांना हविर्भाग दिला गेल्याने ते संतुष्ट होतात. श्राद्धाचे इतके महत्त्व असतांनाही आज हिंदूंमधील धर्मशिक्षणाच्या अभावामुळे श्राद्धविधी दुर्लक्षिला जाऊ लागला आहे; म्हणूनच अन्य संस्कारांइतकाच श्राद्ध हा संस्कारही अत्यावश्यक कसा आहे, हे सांगणे क्रमप्राप्त ठरते. १७ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर २०१६ या कालावधीत पितृपक्ष आहे. त्यानिमित्ताने श्राद्धविषयक लिखाण देत आहोत.

हिंदु जनजागृती समितीचा ठाणे जिल्ह्याचा सप्टेंबर २०१६ च्या दुसर्‍या सप्ताहातील प्रसारकार्याचा आढावा !

१. गणेशोत्सवाच्या माध्यमातून करण्यात आलेली जनजागृती !
१ अ. धर्माभिमान्यांनी श्री गणेशमूर्तीचे वहात्या पाण्यात विसर्जन करण्याविषयी केलेले प्रबोधन !
१. डोंबिवली येथे एका ठिकाणी आणि कल्याण येथे २ ठिकाणी गणेशमूर्तीच्या विसर्जनासाठी कृत्रिम हौदाचा वापर टाळा ! या संदर्भात प्रबोधन केले. या वेळी 
३ ठिकाणी याविषयी प्रवचने घेण्याची संधी मिळाली. प्रवचन ऐकलेल्या ८० टक्के लोकांना मूर्ती वहात्या पाण्यात विसर्जित करण्याचे शास्त्र आणि कृत्रिम हौदाचे दुष्परिणाम पटले अन् त्यांनी आम्ही गणेशमूर्तीचे विसर्जन वहात्या पाण्यात करू, असे सांगितले.
२. धर्माभिमानी श्री. विजय ठाकरे आणि डॉ. उपेंद्र डहाके यांनी सुमारे ६० जणांचे मूर्तीचे वहात्या पाण्यात विसर्जन करण्याचे महत्त्व आणि अशास्त्रीय मूर्तीदान अन् कृत्रिम तलाव यांविषयी प्रबोधन केले.

मंडपातील पावित्र्य टिकून ठेवणे महत्त्वाचे !

      मुंबईतील प्रसिद्ध अंधेरीचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने जीन्स, स्कर्ट परिधान करून येणार्‍या महिलांना, तसेच अर्धविजार घालून येणार्‍या पुरुषांना गणपतीचे दर्शन घेण्यास प्रतिबंध केला. फ्लेक्स फलकावरील छायाचित्रांद्वारे हे सांगण्यात आले. सात्त्विकता टिकवण्याच्या दृष्टीने मंडळाने निर्णय घेतला. आपण आपला देश, धर्म, संस्कृती आणि धार्मिक उत्सव यांवर परकीय प्रथांचे जाळे पसरवले आहे. हिंदु धर्मातील सण आणि उत्सव यांत कोणते कपडे घालू नयेत हे सांगावे लागणे, हे हिंदूंना धर्मशिक्षण देण्याची आवश्यकता असल्याचे दर्शवते.

हिंदूंचे धर्मांतर करणार्‍या मदर तेरेसा यांचे विशेष टपाल तिकीट काढले जाते, हे भारताला लज्जास्पद !

      गरिबांची कथित सुश्रुषा करण्याच्या नावाखाली हिंदूंचे धर्मांतर करण्याचा आरोप असणार्‍या मदर तेरेसा यांना संतपद देण्याचा समारंभ व्हॅटिकन सिटी येथे झाला. या पार्श्‍वभूमीवर भारताकडून त्यांना आदरांजली वाहण्यासाठी एक विशेष टपाल प्रकाशित करण्याचा निर्णय घेण्यात आला.

गणेशोत्सवाच्या काळात होणार्‍या प्रदूषणावर बोलणारे कथित पर्यावरणवादी पशूवधगृहामुळे होणार्‍या प्रदूषणावर का बोलत नाही ?

      केवळ मुंबईतील देवनार पशूवधगृहात बकरी ईदला कत्तलीतून ३० लक्ष लिटर प्रदूषित पाणी निर्माण होते, तर महाराष्ट्रात किती प्रदूषित पाणी निर्माण होत असेल ? असे असतांना त्यावर कोणी काहीच न बोलता केवळ गणेशोत्सवाच्या निमित्ताने होणार्‍या प्रदूषणावर बोलतात, हे अत्यंत चुकीचे आहे. - श्री. रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ता, हिंदु जनजागृती समिती.

तमोगुणाचा प्रभाव न्यून करून व्यक्ती, समाज आणि राष्ट्र यांत सात्त्विक परिवर्तन करणारी सात्त्विक उत्पादने !


श्री. प्रसाद म्हैसकर
१. व्यक्तीचे आचरण त्याचे संस्कार आणि त्याच्यातील सत्त्व-रज-तम या त्रिगुणांवर अवलंबून असणे : व्यक्तीचे आचरण त्याचे संस्कार आणि त्याच्यातील सत्त्व-रज-तम हे त्रिगुण यांवर अवलंबून असते, उदा. सामान्य स्थितीत भांडी घासतांना होणारा भांड्यांचा आवाज आणि राग आल्यानंतर होणारा आवाज यांत पालट होतो. याचे कारण राग येतो, तेव्हा व्यक्तीत विकार आणि तमोगुण वाढतो.
२. तामसी वस्तूंच्या वापराने व्यक्तीमध्ये तमोगुणाचा प्रभाव वाढून अनैतिकता, अपराध यांत वृद्धी होणे : सध्या बाजारात विविध बॉडी स्प्रे मिळतात. त्यात पुरुषांसाठी वेगळे आणि स्त्रियांसाठी वेगळे असतात. स्त्री-पुरुषांना एकमेकांचे कोणते गंध आवडतात, या भोगवादी विचारांवर आधारित त्यांची निर्मिती केलेली असते. असे एकमेकांना हुंगून प्रेम करणार्‍या पशूतुल्य तामसी वस्तूंच्या वापराने व्यक्तीमध्ये तमोगुणाचा प्रभाव वाढतो. समाजात अनैतिकता, अपराध यांची वाढ होते.
३. व्यक्तीत चांगले पालट करायचे असतील, तर तिच्यातील सत्त्वगुणाचे वर्धन करणे आवश्यक ! : सध्या तमोगुण वाढवणार्‍या अज्ञानी विचारांचा प्रभाव सर्वत्र वाढला आहे. अशा वेळी व्यक्तीत चांगले पालट करायचे असतील, तर तिच्या संस्कारांसह तिच्यामध्ये सत्त्वगुण वाढवणे आवश्यक आहे. यासाठी व्यक्तीने साधना आणि धर्माचरण करणे आवश्यक आहे.

प्रार्थना

१. सर्वसाधारण व्यक्ती
     ज्याला मायेतील काही पाहिजे असेल, तो देवाची प्रार्थना करतो. त्याच्या लक्षात येत नाही की, देवाची भक्ती केल्याशिवाय तो प्रार्थनेनुसार काही देत नाही. अनेकदा प्रार्थना करून तिचे फळ मिळाले नाही, तर काही जणांचा देवावरचा विश्‍वास न्यून होतो.
२. भक्तीमार्गाने साधना करणारा
     भक्तीयोग सोडून कर्मयोग, ज्ञानयोग इत्यादी मार्गांनी साधना करणारे बहुधा प्रार्थना करत नाहीत.
अ. त्याच्या लक्षात येत नाही की, देवाची भक्ती मनापासून केल्याशिवाय आणि प्रार्थनेत भाव असल्याशिवाय देव अपेक्षित देत नाही.
आ. त्याच्या लक्षात येत नाही की, सर्व ईश्‍वरेच्छेने होत असल्यामुळे स्वेच्छेने काही मागणे व्यर्थ आहे. प्रत्यक्षात स्वेच्छा नष्ट करण्यासाठीच साधना करतात.
इ. काय मागावे, हेही बर्‍याच जणांना कळत नसल्यामुळे त्यांनी मागितलेले साधनेला पूरक नसले, तर देव देत नाही.
ई. प्रार्थनेचा महत्त्वाचा लाभ म्हणजे अहं अल्प होण्यास साहाय्य होते.
उ. प्रार्थना करायचीच असली, तर साधनेत साहाय्य मिळावे; म्हणून देवाची प्रार्थना करणे योग्य आहे.
ऊ. साधनेत प्रगती झाल्यावर भक्त देवाकडे काही मागत नाही; कारण त्याला ज्ञात असते की, त्याला आवश्यक असलेले सर्व काही देव योग्य वेळी देतो.
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले

स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाच्या संदर्भात पू. उमेश शेणै यांनी केलेले अमूल्य मार्गदर्शन !

पू. उमेश शेणै
     साधकांच्या मनात सातत्याने काही ना कारणाने विकल्प येत असतात. त्यामुळे त्यांच्या मनाची स्थिती खाली-वर होत असते. भूतकाळातील विचार, साधक आणि सेवा, मुले, संसार, तसेच स्वतःच्या संदर्भातील नकारात्मक विचार इत्यादींमुळे अनेक साधकांच्या केवळ वेळेचीच नव्हे, तर व्यष्टी आणि समष्टी साधनेचीसुद्धा हानी होते. नकारात्मक विचार येताच ते आपलेच आहेत, असे वाटत असल्याने त्यातून बाहेर पडणे कठीण होते. अशा स्थितीत असतांना मी माझ्या मनाच्या स्थितीविषयी पू. उमेशअण्णांशी दूरभाषवर बोलले. याच संदर्भात पू. उमेशण्णांना सांगत असतांना मी मला येत असलेले नकारात्मक विचार माझ्यातून नाहिसे होणारच नाहीत का ?, असे विचारताच त्यांनी पुढील गोष्टी सांगितल्या. त्या वेळी दोष निवारणासाठी संत किती सखोलतेने विचार करतात आणि साधकांना समजावून सांगतात, हे गुरुकृपेने शिकायला मिळाले. ते शब्दांत मांडण्याचा प्रयत्न करत आहे.
१. नकारात्मक विचार येण्याची कारणे आणि ते दूर करण्यासाठी करावयाचे उपाय
१ अ. नकारात्मक विचारांचे प्रकार : यात मुख्यत्वे अपेक्षा, पूर्वग्रह, मी सांगितलेले योग्य आहे, मला कुणी विचारत नाही, कुणी माझ्याकडे लक्ष देत नाही, मला काहीच नीट करता येत नाही, माझ्याकडून योग्य रितीने साधना, सेवा, व्यष्टी साधनेचे प्रयत्न होत नाहीत, इत्यादी विचार अधिक असतात.
१ आ. नकारात्मक विचार केल्याने मनाच्या शक्तीचा अनावश्यक व्यय होणे आणि साधक प्रतिक्षणी मिळणार्‍या आनंदापासून दूर जाणे : वेगवेगळ्या प्रसंगांना (नकारात्मक विचारांच्या) वेगवेगळ्या रितीने सूचना आणि दृष्टीकोन देत रहावे. वरचेवर त्या सूचना आणि दृष्टीकोन पालटत रहावे, उदा. नकारात्मक विचार केल्याने मनाच्या शक्तीचा अनावश्यक व्यय होतो.

क्षणोक्षणी साधकांचा विचार करणार्‍या आणि सेवेची तळमळ, तत्त्वनिष्ठता आदी अनेक गुणांचा समुच्चय असलेल्या ६४ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. सुप्रिया माथुर !

सौ. सुप्रिया माथुर
१. परिपूर्ण नियोजन
कु. वर्षा जाधव
     सौ. सुप्रियाताई सेवेचे नियोजन परिपूर्ण आणि कौशल्याने करते. त्यामुळे कोणालाही सेवेत कुठलीच अडचण येत नाही.
२. साधनेचे गांभीर्य निर्माण करणे
     एकदा एका साधिकेकडून चूक झाल्यावर ताई म्हणाली, उपाहारगृहामध्ये नोकरी करतांना चूक झाली, तरी तेथे वेतन मिळतेे; परंतु आश्रमातील स्वयंपाकघरात सेवा करतांना साधना हेच वेतन असतेे. सेवा करतांना चुका झाल्यास साधना व्यय होते.
३. साधकांचा विचार
अ. सौ. सुप्रियाताई प्रत्येक साधकाचे कौशल्य आणि आवड यांचा अभ्यास करून त्यांना सेवा देते. सेवा देतांना प्रत्येक साधक परिपूर्ण होऊन त्याला सर्व प्रकारच्या सेवा करता यायला हव्यात, असा तिचा सतत प्रयत्न असतो.
आ. सेवा करतांना कुणी दमले आहे, हे लक्षात आल्यावर ती त्यांना लगेच विश्रांती घेण्यास सांगते; परंतु ती उगाचच कुठलीही सवलत घेऊ देत नाही.
४. सेवेची तळमळ
     सेवा करतांना ताई म्हणते, मन अर्पण करता आले नाही; पण कोणतीही सेवा करून आपले शरीर तरी देवाच्या चरणी झिजवू शकतो ना ? ताईच्या बोलण्यातून तिचा भाव आणि तळमळ प्रकर्षाने जाणवते.
५. तत्त्वनिष्ठता
     ताईने चुका सांगितल्यावर मला लगेच वाईट वाटून रडायला येते; पण ती माझ्या रडण्याकडे लक्ष न देता तेवढ्याच कठोरपणे चुका सांगते.
६. भाव
६ अ. अव्यक्त भाव : सुप्रियाताईमध्ये अव्यक्त भाव आहे.

रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात आल्यावर साधिकेला आलेल्या अनुभूती

सौ. नंदिनी साळोखे
१. आश्रमदर्शनाच्या वेळी पाय दुखत असतांना सूक्ष्मातून प.पू. डॉक्टरांच्या सपाता (स्लीपर) घातल्या आहेत, असा भाव ठेवल्यावर काही त्रास न होणे
     रामनाथी आश्रमात आल्यावर आश्रमदर्शनाच्या वेळी माझ्या पायांत गोळे येत होते आणि पाय दुखत होते. आश्रमदर्शन करायचे म्हणजे २ घंटे तरी चालावे लागणार होते. तेव्हा मी प.पू. डॉक्टरांना प्रार्थना केली. सूक्ष्मातून प.पू. डॉक्टरांच्या सपाता (स्लीपर) घातल्या आहेत, असा भाव ठेवून मी आश्रमदर्शनासाठी गेले. त्यामुळे मला त्रास झाला नाही. आश्रमदर्शन करतांना माझी नमस्काराची मुद्रा आपोआप होऊन कृतज्ञताभावाने माझ्या डोळ्यांतून अश्रू येत होते.
२. कलशामध्ये संपूर्ण ब्रह्मांडातील चैतन्य एकवटून आश्रमात पसरत असल्याचे जाणवणे
     आश्रमावरील तीन कलश पहातांना त्या कलशांमध्ये संपूर्ण ब्रह्मांडातील चैतन्य एकवटून ते आश्रमात पसरत आहे, असे मला जाणवले आणि त्या चैतन्याचे आश्रमाभोवती संरक्षककवच निर्माण झालेले दिसले.
३. कुलदेवी श्री भवानीदेवीला प.पू. डॉक्टरांना अपेक्षित
अशी साधना करून घेण्यासाठी प्रार्थना होणे
      ध्यानमंदिरात गेल्यावर माझी पुष्कळ भावजागृती झाली आणि मला प.पू. डॉक्टरांविषयी पुष्कळ कृतज्ञता वाटत होती. आमची कुलदेवी श्री भवानीदेवी आहे.

मोठ्या घराण्यातील महिला असूनही नम्र, प्रेमळ, सेवाभावी वृत्तीच्या आणि प.पू. डॉक्टरांवर श्रद्धा असलेल्या ६१ टक्के आध्यात्मिक पातळी असलेल्या सौ. लता ढवळीकर !

सौ. लता ढवळीकर
     सौ. लता ढवळीकर या गोवा राज्यातील फोंडा येथे प्रसारसेवा करतात. त्यांनी जुलै २०१६ या मासात गुरुपौर्णिमेच्या दिवशी ६१ टक्के आध्यात्मिक स्तर गाठल्याचे घोषित करण्यात आले. त्यांच्या समवेत सेवा करणार्‍या साधकांना त्यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे पुढे देत आहोत.
१. नम्रता
     सौ. लताताई यांचे बोलणे मृदू असते आणि बोलण्यात नम्रता असते. - सौ. दीपा मामलेदार, दुर्गाभाट
२. भाव
२ अ. प.पू. डॉक्टर सर्व काही करून घेणार आहेत, असा भाव असल्याने ताण न घेणे : साधकांच्या अडचणी सोडवतांना त्यांना कधीही ताण येत नाही; कारण हे सर्व प.पू. डॉक्टर करून घेणार आहेत, असा त्यांचा भाव असतो. - सौ. दीपा मामलेदार, दुर्गाभाट
२ आ. सत्संग भावपूर्ण आणि परिपूर्ण घेणे : लताताई सत्संगात प्रार्थना पुष्कळ उत्कट भावाने सांगतात. त्यामुळे सर्वांचा भाव जागृत होतो. त्या सत्संग भावपूर्ण आणि परिपूर्ण घेतात. - सौ. निलांगी देसाई, बोरी
२ इ. भावपूर्ण प्रार्थना करणे : भावपूर्ण प्रार्थना कशी करावी ?, हे त्यांच्याकडून शिकायला मिळते.
- श्री. श्रीराम खेडेकर, फोंडा
२ ई. सद्गुरु (सौ.) बिंदाताई यांनी साधनेविषयी सांगितलेली सूत्रे प.पू. डॉक्टरांनी सांगितली आहेत, असा भाव असणे : ताईंची प.पू. डॉक्टरांवर अपार भक्ती आणि श्रद्धा आहे. सद्गुरु (सौ.) बिंदाताई यांनी साधनेविषयी सांगितलेली सर्व सूत्रे गुरुदेवांनी सांगितली आहेत, असा भाव ठेवून त्या ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात. - सौ. दीपा मामलेदार, दुर्गाभाट
२ उ. प्रार्थना आणि कृतज्ञता भावपूर्ण सांगत असल्याने ती चांगली लक्षात रहात असल्याचे मुलाने सांगणे : माझा मुलगा प्रथमेश (वय ९ वर्ष) हाही सत्संगाला येतो. एकदा आम्ही सत्संगाला गेल्यावर सौ. लताताई प्रार्थना आणि कृतज्ञता सांगत होत्या.

प्राणी आणि पक्षी यांना मृत्यूत्तर चांगली गती मिळण्यासाठी त्यांच्या मृत्यूसमयी करावयाचे आध्यात्मिक उपाय !

१. स्वप्नात एक मनुष्य मृत्यू जवळ आलेल्या पांढर्‍या रंगाच्या 
एका प्राण्याला उन्हात घेऊन येतांना दिसणे
श्री. राम होनप
      १५.९.२०१६ या दिवशी सकाळी मला एक स्वप्न पडले. त्यात एक मनुष्य मृत्यू जवळ आलेल्या पांढर्‍या रंगाच्या एका प्राण्याला उन्हात घेऊन येतांनाचे दृश्य दिसले. त्यानंतर मला हे दृश्य दिसणे बंद झाले. सकाळी उठल्यावर मला मरणासन्न प्राणी किंवा पक्षी यांना गती मिळण्यासाठी त्यांचे पालन करणार्‍या व्यक्तीने कुठले आध्यात्मिक उपाय करावेत, यासंदर्भात पुढील ज्ञान मिळून मला स्वप्नात दिसलेल्या दृष्याचा उलगडा झाला.
२. मरणासन्न प्राणी किंवा पक्षी शक्य असल्यास उन्हात आणून 
विशिष्ट मंत्र म्हणणे आणि ते ज्ञात नसल्यास गंगा नदीचे 
अथवा देवपूजेतील तीर्थाचे दोन थेंब किंवा चिमूटभर 
विभूती संबंधित जिवाच्या तोंडात घालणे
     पालन करणार्‍या व्यक्तीने मरणासन्न प्राणी किंवा पक्षी शक्य असल्यास उन्हात आणून त्या वेळी विशिष्ट मंत्र म्हणावेत. विशिष्ट मंत्रांचे ज्ञान नसल्यास संबंधिताने गंगा नदीचे अथवा देवपूजेतील तीर्थाचे दोन थेंब किंवा चिमूटभर विभूती संबंधित जिवाच्या तोंडात घालावी आणि त्या जिवाला गती मिळण्यासाठी दत्तगुरूंना प्रार्थना करावी.

आनंदी आणि सात्त्विक गोष्टींची आवड असणारी उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली ५३ टक्के आध्यात्मिक पातळीची स्कॉटलंड, युरोप येथील चि. अवनी महेश जाजड (वय १ वर्ष) !

     पुणे येथील श्री. कृष्णाजी पाटील यांची नात (मुलीची मुलगी) आणि सौ. कीर्ती जाजड (स्कॉटलंड, युरोप) यांची कन्या चि. अवनी महेश जाजड (वय १ वर्ष) हिच्या जन्मापूर्वी तिच्या आईला गरोदरपणात आलेल्या अनुभूती, मुलीच्या गरोदरपणात तिच्या वडिलांना आलेल्या अनुभूती आणि जन्मानंतर कु. अवनी हिची जाणवलेली गुणवैशिष्ट्येे येथे देत आहोत.
१. आईला गरोदरपणात आलेल्या अनुभूती
१ अ. गर्भधारणा झाल्यावर परदेशातील वातावरणाच्या परिणामाची वाटणारी भीती भगवान श्रीकृष्ण समवेत आहे, या विचाराने उणावणे : गर्भधारणा झाल्याचे समजल्यावर परदेशात रहात असल्यामुळे मला थोडी काळजी आणि भीती वाटत होती; पण भगवान श्रीकृष्ण समवेत आहे, या विचाराने भीती उणावली.

पारायण (मायेच्या पार जाण्यासाठी मार्गक्रमण करणे) केल्यासच भगवंताशी एकरूप होता येणे शक्य !

प.पू. परशराम पांडे
    माझा जन्म होण्यापूर्वी माझ्यासाठी कुणीतरी परिश्रम घेतले आहेत. त्यामुळे माझा जन्म झाल्यावर त्यांनी निर्माण केलेल्या सुविधांचा मी लाभ घेऊ शकत आहे. यासाठीच शास्त्राने आपल्याला ४ ऋणांची परतफेड करायला सांगितली आहे. देव, ऋषी, पितर आणि समाज यांचे आपल्यावर ऋण आहे.
१. प.पू. डॉक्टरांनी साधकांपर्यंत पोचवलेले ज्ञान साधकांनी साधना करून आचरणात आणून ते निष्काम भावनेने सर्वांना दिल्यास ते ऋण फिटेल ! :
ऋषींकडून मिळालेले ज्ञान परात्पर गुरु डॉ. आठवले विविध माध्यमांतून आपल्यापर्यंत पोचवत आहेत. हे आपल्यावर त्यांचे ऋण आहे, याची जाणीव ठेवून ते आचरणात आणण्यासाठी त्यांनी सांगितलेल्या अष्टांग योगाप्रमाणे व्यष्टी साधना करून समर्थ होणे आवश्यक आहे. अशा समर्थतेने मिळालेले हे दान समष्टीद्वारे निष्काम भावनेने सर्वांना देऊन त्यांनाही समर्थ केल्यास ते ऋण फिटणार आहे. भगवान श्रीकृष्णाने समर्थ होण्यासाठी गीतेतील (अध्याय २, श्‍लोक ५५ मध्ये) स्थितप्रज्ञाची लक्षणे सांगितली आहेत, तसेच (अध्याय ३, श्‍लोक २० मध्ये) ते ज्ञान समष्टी साधनेद्वारे लोकसंग्रह जागृत करून ते लोकांना देऊन त्यांना समर्थ करण्याविषयी सांगितले आहे.
२. कृण्वन्तो विश्‍वमार्यम् होण्यासाठी ज्ञानाच्या प्रचार-प्रसारार्थ बाहेर पडणे, म्हणजेच समष्टी साधना करणे आवश्यक ! : एवं प्रवर्तितं चक्रम् असे ज्ञान सतत पिढ्यान्पिढ्या पुढे चालू रहाण्यासाठी आपण परिपूर्ण होणे आवश्यक आहे. त्याविना कृण्वन्तो विश्‍वमार्यम् (अर्थ : संपूर्ण जगाला आर्य (सुसंस्कृत) करू.) होणार नाही आणि असे होण्यासाठी आपल्याला या ज्ञानाच्या प्रचार-प्रसारार्थ, जगाला सज्ञान करण्यासाठी बाहेर पडायचे आहे. असे केल्यानेच आपली समष्टी साधना होणार आहे.

अकस्मात् श्री गणेशाय नमः । हा नामजप चालू होणे आणि त्यानंतर आश्रमात गणेश याग असल्याचे समजणे

     १३.९.२०१६ या दिवशी दुपारी १ ते १.३० च्या सुमारास मनात अकस्मात् श्री गणेशाय नमः । हा नामजप ३ - ४ सेकंद चालू होता. मी पुन्हा नामजप करायचा प्रयत्न केला; पण तसे झाले नाही. नंतर समजले, की, आज गणेश याग आहे. गणरायाने माझी आठवण काढली, असे मला वाटले. माझ्याकडून पुष्कळ कृतज्ञता व्यक्त झाली.
- सौ. कविता घाणेकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१४.९.२०१६)
गणेश यागाच्या वेळी आलेल्या अनुभूती
१. यज्ञाच्या वेळी आम्ही सर्व जण देवलोकात आहोत, असे जाणवले.
२. सद्गुरु (सौ.) बिंदाताई यज्ञाला बसलेल्या असतांना साक्षात् देवीसारख्या दिसत असल्याचे जाणवले.
- सौ. कविता घाणेकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१४.९.२०१६)

नामजप करतांना प.पू. डॉक्टर दोन वर्षे सतत आसनावर बसलेले दिसणे आणि अमृत महोत्सवातील त्यांचे सिंहासनावर बसलेले छायाचित्र पाहून त्याचा उलगडा होणे

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त...
     मागील दोन वर्षे नामजप करतांना अधूनमधून मला परात्पर गुरु (प.पू. डॉक्टर) आसनावर बसलेले दिसायचे. तेव्हा मला त्याचे कारण लक्षात येत नव्हते. आज दैनिकात सेवा करतांना प.पू. डॉक्टरांचे आसनावर बसलेले छायाचित्र पाहिले आणि त्याचा उलगडा झाला. प.पू. डॉक्टर आज ज्या आसनात बसले होते, तसेच ते बसलेले मला दिसायचे.
- श्री. प्रकाश जोशी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

संत आणि देवता यांच्याप्रती भाव असणारे अन् अंगी लीनता असणारे सनातन साधक पुरोहित पाठशाळेचे अध्यापक वेदमूर्ती केतन शहाणे ! (वय ३० वर्षे)

वेदमूर्ती श्री. केतन शहाणे
     श्री. केतन रामनाथी आश्रमात रहायला आले, तेव्हा त्यांनी बाबा महाराज समाधी मंदिर, पुणे येथून वैदिक शिक्षण घेऊन ६ ते ७ मास (महिने) झाले होते. त्या वेळी त्यांना विधी करायला पुष्कळ दडपण येत असे. काही चुकेल का ?, अशी त्यांना भीती वाटायची. त्यांच्यात आत्मविश्‍वास अल्प आहे, असे वाटायचे; पण आता ते भावपूर्ण आणि आत्मविश्‍वासाने विधी करत असल्याचे जाणवते. त्यांच्यात जाणवलेले पालट आणि त्यांच्यासंदर्भात आलेली अनुभूती येथे देत आहे.
वेदमूर्ती श्री. केतन शहाणे यांना वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराकडून नमस्कार !
१. तोंडवळा तेजस्वी आणि आनंदी जाणवणे
     पूर्वी केतन घरी आला, तरी आध्यात्मिक त्रासामुळे त्याला काही सुचायचे नाही. तेव्हा तो मला सांगायचा, आई, तुम्ही मला जे सांगता, ते माझ्या बुद्धीपर्यंत पोचतच नाही. मला काही समजत नाही. आता त्याचा त्रास अल्प झाला आहे. त्यामुळे त्याचा तोंडवळा तेजस्वी वाटतो. आता केतन घरी कुठलाही विधी करतो, तेव्हा त्याने केलेला विधी पाहून सर्वांना बरे वाटते आणि आनंद मिळतो.
      प.पू. गुरुमाऊली, केतन जे काही विधी करत आहे, ते आपल्या कृपाशीर्वादामुळे आणि आश्रमातील चैतन्यामुळे. आता त्याचे त्रास न्यून होऊन तो आनंदी दिसत आहे.
२. स्पष्टवक्तेपणा
     त्याच्या विवाहाच्या कालावधीत एका प्रसंगात माझा निर्णय भावनाशीलतेने घेतला गेला होता.

सौ. कल्याणी शहाणे यांना जाणवलेली वेदमूर्ती केतन शहाणे यांची गुणवैशिष्ट्ये

     आमचा विवाह ठरला तेव्हापासून आतापर्यंत देवाच्या कृपेने श्री. केतन शहाणे यांची लक्षात आलेली काही गुणवैशिष्ट्ये आणि त्यांच्याकडून मला शिकायला मिळालेली सूत्रे येथे देत आहे.
१. शांत स्वभाव : श्री. केतन यांचा स्वभाव फार शांत आहे, असे वाटते. ते प्रत्येक प्रसंगात शांतपणे आणि अभ्यासपूर्ण उपाययोजना करतात.
२. इतरांना समजून घेणे : प्रत्येक परिस्थितीत ते इतरांना साहाय्य करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे सर्वांनाच त्यांचे साहाय्य घेऊया, असे वाटत असते. समोरचा कितीही प्रतिक्रियात्मक बोलला, तरी त्यांना कधी प्रतिक्रिया येत नाहीत.
३. इतरांना साधनेत साहाय्य करणे : श्री. केतन प्रत्येक प्रसंगाचा साधनेच्या स्तरावर विचार करतात. माझे काही चुकले, तरी ते मला शांतपणे आणि परखडपणे सांगतात. तसेच मी नक्की काय करायला हवे ? हेसुद्धा ते सांगतात. त्यात त्यांच्या कोणत्याही अपेक्षा किंवा मला कळते, असा भाग नसतो.
४. स्वत:ला पालटण्याची तळमळ : विवाह ठरल्यापासून अनेक गोष्टींची तडजोड करावी लागणार; म्हणून ते स्वतःला पालटायचा प्रयत्न करत आहेत. त्या वेळी स्वतःला पालटले, तरच मी ईश्‍वराला अपेक्षित असा होईन, असा त्यांचा भाव असतो.
५. स्वीकारण्याची वृत्ती : काही प्रसंगात मी त्यांना त्यांचे दोष आणि चुका सांगितल्या. तेव्हा त्यांनी त्या मनापासून स्वीकारल्या.
     हिंदूंनो, आपल्यासमोर गांधी, नेहरू आणि सर्वपक्षीय राजकारणी यांचा आदर्श नको, तर धर्म अन् राष्ट्र यांसाठी त्याग केलेले छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप, छत्रपती संभाजी महाराज, गुरु गोविंद सिंग, स्वातंत्र्यवीर सावरकर इत्यादी धर्माभिमान्यांचा आदर्श हवा !

साधकांना सूचना

सनातनच्या संतांना त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी भ्रमणभाष करू नका ! 
     'सनातनच्या संतांचा वाढदिवस असलेल्या दिवशी त्यांच्या संदर्भात साधकांनी दैनिक सनातन प्रभातमध्ये गुणवैशिष्ट्ये लिहून दिलेली असतात. त्यामुळे सर्वत्रच्या साधकांचे त्या संतांना भ्रमणभाष येतात. संतांना दिवसभर अनेक साधकांशी भ्रमणभाषवर बोलावे लागत असल्याने त्यांच्या सेवेतील अमूल्य वेळ वाया जातो. सध्या आपत्काळाला आरंभ झाल्यामुळे एकेक क्षण महत्त्वाचा आहे. स्थुलापेक्षा सूक्ष्म श्रेष्ठ असल्याने साधकांनी संतांना भ्रमणभाष न करता त्यांना मानस नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद मिळवावेत.' - (परात्पर गुरु) डॉ. आठवले

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले
        गीता केवळ शिकू नका, तर तिच्यातील शिकवण कृतीत आणून हिंदु राष्ट्राची स्थापना करा !
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले

बोधचित्र

॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज
सनातनचे श्रद्धास्थान
योगी आणि भक्त
अ. मेणबत्तीचा प्रकाश म्हणजे भक्ती आणि मोठा प्रकाश म्हणजे योग. योग्याचे तेजही सहन होत नाही आणि भक्तीच्या मिणमिणत्या प्रकाशामुळे तिचे मूल्य कळत नाही. योग्याचे तेज दिसते; पण भक्तीचे सामर्थ्य लपलेले असते.
आ. ज्याच्याकडे श्‍वासोच्छ्वासाचे अनुसंधान आहे, तो खरा योगी.
भावार्थ : ध्यानयोग्याचे ध्यान संपले की, त्याचे अनुसंधान खंडित होते. ज्याचा नामजप श्‍वासोच्छ्वासावर होत असतो, म्हणजे नामाच्या ठिकाणी केवळ श्‍वासाची जाणीव असते, त्याचे श्‍वासाप्रमाणेच अखंड अनुसंधान असते.
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.)
प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी

॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥ 
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥
     या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो. 
 - प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

आधाराची अपेक्षा नको 
दुसर्‍याच्या आधाराची अपेक्षा करत राहिलो, तर कधीच उभे रहाता येणार नाही; 
म्हणूनच धडपडत का होईना, धारिष्ट्य करून स्वतःच्या पायांवर उभे रहाणे इष्ट ! 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)


भय इथले संपेना... !

संपादकीय 
       बिहार राज्याचा उल्लेख एकेकाळी ज्याच्यामुळे जंगलराज असा केला जात होता तो कुख्यात गुंड आणि राष्ट्रीय जनता दलाचा माजी खासदार महंमद शहाबुद्दीन यास जामीन संमत झाल्याने सध्या तो कारागृहाबाहेर आहे. त्याची अमानवी कृत्ये अंगावर शहारे आणणारी आहेत. सीवान येथील व्यापारी चंद्रकेश्‍वर प्रसाद यांची ३ मुले सतीशराज, गिरीशराज आणि राजीव यांचे १६ ऑगस्ट २००४ या दिवशी अपहरण करण्यात आले होते. यांपैकी सतीशराज आणि गिरीशराज यांना शहाबुद्दीनच्या उपस्थितीत चक्क अ‍ॅसिडमध्ये बुडवून त्यांची हत्या करण्यात आली !

पाकवर बहिष्कार घाला !

संपादकीय 
   उरी येथील आक्रमणानंतर देशभरातून पाकच्या विरोधात जनतेची संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. पाकला नष्ट करण्यासाठी अणूबॉम्बचाही वापर करण्यास मागे पुढे पाहू नये, अशा पद्धतीच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. पाकसमवेत युद्ध करण्याच्या दृष्टीने केंद्रातील सरकार काही प्रयत्न करत आहे किंवा करील, हे अद्यापतरी दिसून आलेले नाही. त्यामुळे सरकारकडून तसे प्रयत्न झाले नाहीत, तर जनतेला चरफडत बसण्याशिवाय गत्यंतर नसणार. कारण सत्तेपुढे शहाणपण चालत नाही, असे म्हणतात. परत पाकपुरस्कृत आतंकवाद्यांनी गुरुदासपूर, पठाणकोट आणि उरी येथील आक्रमणाप्रमाणे पुन्हा आक्रमण झाले, तर परत त्यात संतप्त भावना उमटतील. गेली अनेकवर्षे हेच चालू आहे.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn