Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

पंतप्रधान मोदी यांनी देशाला पाकविरुद्ध युद्धासाठी सिद्ध करावे ! - शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती

संतांना जे वाटते, ते सरकारला का वाटत नाही ? पूर्वीच्या काळात राज्यकर्ते 
 राजगुरूंचे, संतांचे मार्गदर्शन घेऊन राज्यकारभार करत होते; मात्र आता संतांचे 
 मार्गदर्शन म्हणजे मागासलेपणाचे लक्षण मानले जात आहे, हे भारतियांना लज्जास्पद आहे ! 
     
     भोपाळ - पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी विदेश दौरे सोडून देशाला पाकच्या विरोधात युद्ध करण्यासाठी सिद्ध करावे, असे मार्गदर्शन द्वारका आणि ज्योतिष पीठाचे शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांनी केले आहे. 
     प्रसारमाध्यमांशी बोलतांना शंकराचार्य म्हणाले, "पाकविषयी आणि परराष्ट्र धोरणांमध्ये काँग्रेसच्या सरकारने ज्या चुका केल्या त्या मोदी सुधारतील, अशी आशा होती; मात्र आता असे वाटत आहे की, मोदी यांची विदेश नीतीही निराधार आहे. तसेच नेहरू यांनी चीनसमवेत पंचशील कराराच्या वेळी केलेल्या चुका मोदी पुन्हा करत आहेत."

उरी येथील आक्रमणास सैन्याचा संपूर्ण वापर करून प्रत्युत्तर द्यावे ! - जनमताचा कौल

जनतेला असे कितीही वाटले, तरी जनतेने निवडून दिलेल्या
 सरकारमध्ये ते धाडस नसल्याने त्याचा काहीही उपयोग नाही ! 
     नवी देहली - उरी येथील आत्मघातकी जिहादी आक्रमणाविषयी जनतेच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी 'टाइम्स ऑफ इंडिया' या वृत्तपत्राने वाचकांकडून ऑनलाईन जनमत घेतले. केवळ ८ घंटे चाललेल्या या चाचणीत १ लक्ष १० सहस्र लोकांनी सहभाग घेतला. त्यातील ७३ सहस्र म्हणजे ६६.६ टक्के लोकांनी 'भारताने उरी आक्रमणास सैन्याचा संपूर्ण वापर करून प्रत्त्युत्तर द्यावे', असे मत व्यक्त केले. भारतीय सैन्यबळाचा पाकला धक्का देऊन धडा शिकवण्याची आवश्यकता व्यक्त केली आहे. 

उरी येथे घुसखोरी करणारे १० आतंकवादी ठार !

पाककडून शस्त्रसंधीचे उल्लंघन ! 
     श्रीनगर - उरी येथील सैन्य मुख्यालयावरील आक्रमणाला दोन दिवसही उलटत नाहीत तोच पाकने परत येथे कुरापत काढण्याचा प्रयत्न केला. पाकने पुन्हा एकदा गोळीबार करून शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. सीमेवर गोळीबाराच्या आड आतंकवाद्यांना घुसखोरी करू देण्याचा पाक सैन्याचा प्रयत्न भारतीय सैन्याने हाणून पाडत १० आतंकवाद्यांना ठार केले.

अमेरिकेत पाकने भारतीय पत्रकाराला परिषदेतून बाहेर काढले !

पाकचा भारतद्वेष पुन्हा एकदा उघड ! 
पाकशी मैत्री करण्याचे दिवास्वप्न पहाणार्‍या पाकप्रेमींना चपराक ! 
     नवी देहली - पाकचे परराष्ट्र सचिव एजाज अहमद चौधरी हे अमेरिका दौर्‍यावर आहेत. न्यूयॉर्कमधील रुझवेल्ट हॉटेलमध्ये चौधरी यांची पत्रकार परिषद होणार होती. या पत्रकार परिषदेला भारतातील 'एनडीटीव्ही'  वृत्तवाहिनीच्या पत्रकार नम्रता बरार उपस्थित होत्या; पण पत्रकार परिषद चालू होण्यापूर्वीच या महिला पत्रकाराला बाहेर काढण्याचा आदेश देण्यात आला. त्यामुळे तिला बाहेर काढण्यात आले.

पाकच्या विरोधात रशिया आणि अन्य देशांचे भारताला समर्थन !

     मॉस्को - उरी येथील आतंकवादी आक्रमणानंतर रशियाने आणि जर्मनीने भारताला समर्थन देत पाकचा विरोध केला आहे. रशियाने पाकसमवेतचा एकत्रित युद्धसराव अनिश्‍चित काळासाठी स्थगित केला आहे. तसेच युद्धसामग्रीचे करारही अर्ध्यावर थांबवून पाकची कोंडी केली आहे. 

(म्हणे) 'भारताने काश्मिरींवरील अन्याय थांबवावा !'

मुसलमान देशांच्या संघटनेकडून पाकचे समर्थन ! 
 मुसलमान देश आणि धर्मीय त्यांच्या धर्मियांच्या 
साहाय्यासाठी तात्काळ पुढे येतात, हे हिंदूंनी लक्षात घ्यावे ! 
     न्यूयॉर्क - मुसलमान देशांची संघटना 'ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशन' (ओआयसी)ने काश्मीरप्रश्‍नी पाकचे समर्थन करतांना, भारताने काश्मिरी नागरिकांवरील अत्याचार तात्काळ थांबवावेत, असे म्हटले आहे. काश्मीरचा प्रश्‍न काश्मीरमधील नागरिकांची इच्छा आणि संयुक्त राष्ट्र संघाच्या सुरक्षा परिषदेचा प्रस्ताव, यांच्या पार्श्‍वभूमीवर सोडवला जावा, असे म्हटले आहे.

भारताकडून बराक-८ क्षेपणास्त्राची चाचणी

भारताने अशी कितीही क्षेपणास्त्रे विकसीत केली, तरी
त्याचा वापर करणारे राज्यकर्ते नसल्याने याचा काहीही उपयोग नाही ! 
     भुवनेश्‍वर - भारत आणि इस्रायल यांनी संयुक्तरित्या विकसित केलेल्या बराक-८ या दीर्घ पल्ल्याच्या, भूमीवरून जमिनीवर मारा करणार्‍या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेण्यात आली. ओडिशातील चंडीपूर येथील तळावरून ही चाचणी घेण्यात आली.

वारकरी संप्रदायाचे सातारा येथील ह.भ.प. कृष्णराव क्षीरसागर महाराज आणि वारकरी महामंडळाचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष ह.भ.प. भगवान महाराज कोकरे यांची रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट !

सनातनच्या वतीने दोन्ही हरिभक्तांचा सन्मान
 (डावीकडून) सौ. सुवर्णा सुधीर गोेंधळेकर, सौ. गीतांजली सुधन्वा 
गोंधळेकर, श्री. सुधीर गोंधळेकर, ह.भ.प. कृष्णराव क्षीरसागर 
महाराज आणि त्यांना 
आश्रम दाखवतांना श्री. रूपेश रेडकर, 
तसेच समोर 
कु. सई आणि कु. सौम्या

विनंती अर्जावर म्हणणे सादर न केल्याने न्यायालयाची अन्वेषण अधिकार्‍यांना नोटीस !

डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातील संशयित नागोरी 
आणि खंडेलवाल यांच्या विरुद्धचा खटला बंद करण्याचे प्रकरण 
     पुणे, २० सप्टेंबर - डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी आतंकवादविरोधी पथकाने संशयित म्हणून अटक केलेले आरोपी मनीष नागोरी आणि विकास खंडेलवाल यांच्या विरुद्ध न्यायालयात प्रविष्ट असलेला खटला बंद करावा, यासाठी केलेल्या विनंती अर्जावर म्हणणे मांडण्यास सांगूनही तसे म्हणणे सादर न करणार्‍या अन्वेषण अधिकार्‍यांना न्यायालयाने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. तसा आदेश न्यायाधीश व्ही.बी. गुळवे-पाटील यांनी दिला आहे. 

पाकला धडा शिकवण्यासाठी १९६० चा सिंधू पाणीवाटप करार मोडण्याची देशवासियांकडून मागणी !

युद्ध करण्याचे साहस न दाखवू शकणार्‍या 
सरकारला निदान एवढे तरी करायला काहीही अडचण नसावी !
     नवी देहली - पाकिस्तानसमवेत असलेला १९६० चा सिंधू पाणीवाटप करार भारताने मोडला, तर पाकला चांगला धडा शिकवता येईल आणि तो शरण येईल, असे म्हटले जात आहे. (जर असे करता येणे शक्य आहे, तर भारताने ते लगेच करायला हवे ! - संपादक) 

हाफीज सईद याचा शिरच्छेद करणार्‍यास ५ कोटी रुपये देणार ! - डॉ. सलीमराज यांची घोषणा

     रायपूर (छत्तीसगड) - छत्तीसगडच्या हज समितीचे माजी अध्यक्ष डॉ. सलीमराज यांनी पाकमधील जिहादी आतंकवाद्यांचा प्रमुख हाफीज सईद याचा शिरच्छेद करणार्‍यास ५ कोटी रुपये देण्याची घोषणा केली आहे. हा पैसा भारतीय मुसलमान आणि सैन्यातील हुतात्म्यांच्या परिवाराकडून जमा केला जाईल. तरीही तो अल्प पडला, तर स्वतःची संपत्ती विकून हा पैसा उभारला येईल. माझ्या संपत्तीपेक्षा देशाचा सन्मान मोठा आहे. डॉ. सलीमराज यांनी इमाम, मौलाना आणि मुसलमानांतील प्रमुख नेते यांना आवाहन केले आहे की, निरापराध्यांची हत्या करणार्‍या आतंकवाद्यांच्या विरोधात पुढे यावे आणि त्यांच्या विरोधात फतवा काढावा. वन्दे मातरम्च्या विरोधात फतवा काढता, तसा आतंकवाद्यांच्या विरोधातही काढला पाहिजे. 

पोलिसांच्या संदर्भातील कटू अनुभव !

     सध्या सनातनचे साधक आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते यांना पोलिसांच्या शारीरिक आणि मानसिक छळाला सामोरे जावे लागत आहे. या अनुषंगाने विविध ठिकाणच्या पोलिसांविषयी सनातनचे साधक, हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते किंवा हिंदुत्वनिष्ठ यांना यापूर्वीही पोलिसांच्या सतावणुकीविषयी आलेले अनुभव येथे क्रमशः प्रसिद्ध करत आहोत. 

विजयवाडा (आंध्रप्रदेश) येथे होणारे श्री गणेशाचे विडंबन हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या प्रबोधनानंतर रोखले गेले !

    हिंदूंनो, या यशाविषयी ईश्‍वरचरणी कृतज्ञता व्यक्त करा !
       विजयवाडा - येथे एका तयार कपड्यांच्या दुकानातील शोकेसमध्ये ठेवण्यात आलेल्या पुतळ्याला श्री गणेशाचा मुखवटा आणि वेष घालण्यात आला होता. यामुळे श्रीगणेशाचा अवमान होऊन लाखो गणेशभक्तांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या. याविषयी हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते श्री. चंद्र मोगेर आणि सौ. तेजस्वी यांनी दुकानदाराचे प्रबोधन केल्यावर सदर दुकानाच्या मालकाने पुतळ्याला घातलेला गणपतीचा वेष त्वरित काढून टाकला. (श्री गणेशाचे विडंबन रोखण्यासाठी तत्परतेने कृती करणारे श्री. चंद्र मोगेर आणि सौ. तेजस्वी यांचे अभिनंदन ! सर्वत्रच्या हिंदूंनी यातून बोध घ्यावा ! - संपादक)

वर्ष १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटातील एका प्रमुख आरोपीस २३ वर्षानंतर मुंबईत अटक !

बॉम्बस्फोटातील देशद्रोह्यांना २३ वर्षानंतर पकडणार्‍या अन्वेषण 
यंत्रणा सनातनच्या निरपराध साधकांना मात्र तात्काळ अटक करून त्यांचा छळ करतात !
अन्वेषण यंत्रणांची कार्यक्षमता ! 
      कर्णावती / मुंबई - मुंबई येथे वर्ष १९९३ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटातील एक प्रमुख आरोपी अब्दुल सत्तार बाटलीवाला (वय ६० वर्षे) याला तब्बल २३ वर्षांनतर गुजरातच्या आतंकवादविरोधी पथकाने मुंबईतील वांद्रे परिसरातून अटक केली. बाटलीवाला याच्यावर वर्ष १९९३ मध्ये पाकमधून आलेली आर्.डी.एक्स्. स्फोटके आणि बंदुका पोरबंदर धक्क्याजवळील गोसाबारा येथे उतरवून घेण्याचा आरोप आहे.
      आतंकवादविरोधी पथकाच्या दाव्यानुसार मुंबई स्फोटातील प्रमुख आरोपींत बाटलीवाला याचा समावेश आहे. मुंबईत स्फोट घडवून आणण्यासाठी पाकमधून सदाबहार आणि बिस्मिल्ला या दोन नौकांमधून आर्.डी.एक्स्. स्फोटके आणि बंदुका आणण्यात आल्या. त्यांपैकी बिस्मिल्ला ही नौका महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील शेखाडी येथे आली. तर दुसरी सदाबहार नौका गोसाबार येथे आली. त्यातील स्फोटके आणि शस्त्रे ट्रक आणि इतर छोट्या वाहनांतून वलसाड येथील उमरगाव येथे हालवण्यात आली. तेथून ती पंजाब, उत्तरप्रदेश आणि मध्यप्रदेश येथे नेण्यात आली.

राष्ट्रगीत म्हणवून घेतले म्हणून प्राध्यापकाला बंदी बनवले !

राष्ट्रगीताला विरोध करणार्‍यांना कठोर शिक्षा केली 
असती, तर या देशात पुन्हा तसे करण्याचे धाडस कुणी केले नसते !
उत्तरप्रदेशमध्ये महाविद्यालय व्यवस्थापनाचे राष्ट्रद्रोही कृत्य
     लक्ष्मीपूर (महराजगंज, उत्तरप्रदेश ) - विद्यार्थ्यांकडून राष्ट्रगीत म्हणवून घेतले म्हणून महाविद्यालयाच्या व्यवस्थापनाने बंदी बनवले, असा आरोप आझादनगर बभनी येथील इंटर महाविद्यालयातील प्राध्यापक भरत शरण राय यांनी केला आहे. याप्रकरणी त्यांनी जिल्हाधिकारी, राज्यपाल यांच्यासह संबंधित अधिकारी यांच्याकडे तक्रार केली आहे.
       प्राध्यापक राय यांनी या तक्रारीत म्हटले आहे, १२ सप्टेंबर या दिवशी ते महाविद्यालयात विद्यार्थ्यांकडून राष्ट्रगीत म्हणवून घेत असतांना महाविद्यालयाचे व्यवस्थापक मौलाना अब्दुल वाजिद फैजी, प्राचार्य अब्दुल रऊफ अंसारी आणि व्यवस्थापकांचे पुत्र एहतेशाम इलाही यांनी त्या ठिकाणी येऊन राष्ट्रगीत थांबवले. याला विरोध केल्यावर प्राध्यापक राय यांना महाविद्यालयातच ५ घंटे बंदी बनवण्यात आले. सदर महाविद्यालय नेपाळ सीमेपासून केवळ २ किलोमीटरवर असल्यामुळे महाविद्यालयात मिनार आदी बांधकामासाठी जिल्हा प्रशासनाची अनुमती आवश्यक असते; मात्र महाविद्यालयाने विनाअनुमती महाविद्यालयात मशीद आणि मिनार यांचे बांधकाम केले. त्याचबरोबर महाविद्यालयाचील हालचाली संशयास्पद असल्यामुळे संबंधितांवर कारवाई करण्यात यावी. प्राचार्य अंसारी यांच्या मते राय यांना ११ सप्टेंबर या दिवशीच महाविद्यालयातून पदच्युत करण्यात आले आहे. ते १२ तारखेला आले होते; मात्र त्यांच्याकडून कोणतेही कार्य करून घेतले नाही.

टीकमगड (मध्यप्रदेश) येथे धार्मिक कार्यक्रमात बारबालांना नाचवले !

धर्मशिक्षण न दिल्यामुळे हिंदूंचे झालेले नैतिक अध:पतन ! \
अशांवर देवतांची कृपा कधी तरी होईल का ?
      टीकमगड - जिल्ह्यातील पृथ्वीपूर येथे जलविहार महोत्सवात बारबालांना नाचवण्यात आल्याची घटना घडली आहे. चित्रपटातील गाण्यांवर बारबालांचे अश्‍लील नृत्य चालू होताच तेथे उपस्थित महिला भाविकांनी तेथून काढता पाय घेतला. जलविहार समितीने या कार्यक्रमाची रुपरेषा बनवली होती. धार्मिक कार्यक्रमात बारबाला नाचवण्यात आल्यामुळे कार्यक्रमाच्या आयोजकांंवर टीका करण्यात येत आहे.

श्रीलंकेतील तमिळीबहुल भागात बुद्धाचा पुतळा उभारण्याच्या विरोधात तेथील तमिळ पीपल्स काऊन्सिल मोर्चा काढणार !

श्रीलंकेतील तमिळीबहुल भागात पद्धतशीरपणे बौद्धांचा शिरकाव करण्याचा प्रयत्न !
      कोलंबो - येथील उत्तर प्रांतातील तमिळीबहुल भागात प्राचीन हिंदु मंदिराच्या समोर बुद्धाचा पुतळा उभारण्याच्या विरोधात तमिळ पीपल्स काऊन्सिल २४ सप्टेंबर या दिवशी जाफना शहरात मोर्चा काढणार आहे. बौद्धांची वस्ती नसलेल्या या प्रांतामध्ये सिंहलींची वसाहत निर्माण करण्याचा शासनाचा डाव आहे. शासनाचा हा डाव हाणून पाडण्यासाठी लोकांनी मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन उत्तर प्रांताचे मुख्यमंत्री सी.व्ही. विघ्नेश्‍वरन् यांनी केले आहे. तमिळी लोकांचे वास्तव्य असलेल्या क्षेत्रातून सिंहली-बौद्ध सशस्त्र दल माघारी घ्यावे, तसेच उत्तर आणि पूर्व प्रांतांचे विलिनीकरण करून तामिळींसाठी एकच जागा निर्माण करण्यात यावी, अशी मागणी या वेळी करण्यात येणार आहे. तमिळींच्या दीर्घकालीन प्रलंबित मागण्या मार्गी लावण्यासाठी भारत आणि अमेरिका यांनी श्रीलंकेवर दबाव आणावा, अशी मागणीही या वेळी करण्यात येणार आहे, असे तमिळ पीपल्स काऊन्सिलने घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. (तमिळी हिंदूंच्या न्याय्यहक्कांसाठी, तसेच त्यांच्या सुरक्षेसाठी भाजप शासन पावले उचलणार का ? - संपादक)बलुची मुसलमान करतात हिंगलाज मातेची पूजा !

हिंगलाज मातेचे मंदिर महत्त्वाच्या ५१ शक्तिपिठांपैकी एक 
      नवी देहली - बलुचिस्तानमधील मुसलमान ५१ शक्तिपिठांपैकी एक असलेल्या हिंगलाज मातेची पूजा करतात. हिंगलाज मातेचे मंदिर पाकिस्तानच्या बलुचिस्तानमध्ये आहे. पाकिस्तानी लेखक तारक फतह यांच्या मते पाकिस्तानी सत्ताधिशांनी अनेक वेळा हे मंदिर नष्ट करण्याचा प्रयत्न केला; परंतु बलुच लोकांनी प्राणपणाने या मंदिराचे रक्षण केले आहे. हिंगलाज मातेचे मंदिर कराचीच्या पश्‍चिमेस २५० किलोमीटर लांब हिंगोल नदीच्या किनार्‍यावर आहे. ही देवी पांडव आणि क्षत्रिय यांची कुलदेवता आहे. येथे प्रतीवर्षी २२ एप्रिल या दिवशी मोठी यात्रा भरते. या ठिकाणी पाकिस्तानातील थरपारकर जिल्ह्यातून मोठ्या संख्येने हिंदू तेथे दर्शनाला जातात.

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने एर्नाकुलम् (केरळ) येथे पितृपक्ष विषयावर प्रवचन

कु. अदिती सुखटणकर यांचे
मार्गदर्शन ऐकतांना जिज्ञासू
      एर्नाकुलम् (केरळ) - हिंदु जनजागृती समितीच्या वतीने कुझिक्काट भगवती मंदिरात पितृपक्ष या विषयावर प्रवचन घेण्यात आले. या वेळी समितीच्या कु. अदिती सुखटणकर यांनी धर्माचरणाच्या अंतर्गत कुंकू लावणे, प्रार्थना करणे यांविषयीही माहिती दिली. या प्रवचनासाठी मंदिराच्या विश्‍वस्तांनी पुढाकार घेतला होता. या विश्‍वस्तांनी दर आठवड्याला सत्संग घेण्याची मागणी केली आहे. 
क्षणचित्र
      केरळमध्ये अनेकांना पितृपक्ष ज्ञात नाही. येथील लोक शिवरात्री आणि गुरुपौर्णिमेनंतरच्या अमावस्येला श्राद्ध करतात. पितृपक्षात श्राद्ध करण्याचे महत्त्व आणि दत्ताच्या नामजपाचे महत्त्व सांगितल्यावर उपस्थित जिज्ञासूंनी ते त्वरित स्वीकारले. त्याचबरोबर अनेकांनी या पंधरवड्यात श्राद्ध विधी करण्याची सिद्धता दर्शवली. ही घटना खूप अपूर्व वाटली.


लाहोरमधून इसिसच्या १२ आतंकवाद्यांना अटक !

      लाहोर - लाहोर शहरातून इसिसच्या ८ आतंकवाद्यांना पाकच्या पोलिसांनी अटक केली आहे. ते पाकच्या पंजाब राज्यात आतंकवादी आक्रमण करण्याचा कट रचत होते. त्यांच्याकडून १ सहस्र ६०० किलोग्रॅम स्फोटके, सेफ्टी फ्यूज आणि डिटोनेटर जप्त करण्यात आले आहे. लाहोरपासून ८० कि.मी. अंतरावरील एका ठिकाणावरून पोलिसांनी इसिसच्या अन्य ४ आतंकवाद्यांना अटक केली. त्यांच्याकडूनही स्फोटके जप्त करण्यात आली आहेत. अटक करण्यात आलेल्या आंतकवाद्यांचे लाहोर आणि फैसलाबाद येथे पोलिसांची हत्या करणार्‍या आतंकवाद्यांशी संबंध होते.

कर्नाटकात महिलेने १०० रुपये आणि बिर्याणी यांसाठी ४२ बस जाळल्या !

कुठल्याही मागणीसाठी समाजाला वेठीस धरणे, हा समाजद्रोहच होय !
कावेरी पाणी वाटप वाद !
     बेंगळुरू - कर्नाटक आणि तमिळनाडू या राज्यांतील कावेरी पाणीवाटपावरून नुकत्याच झालेल्या हिंसाचारात बेंगळुरूमध्ये ४२ बसगाड्या भाग्या नावाच्या एका महिलेकडून जाळण्यात आल्याचे समोर आले आहे. २२ वर्षीय भाग्याने १०० रुपये आणि एक थाळी मटण बिर्याणी यांसाठी या बस जाळल्याचे तिने पोलिसांना सांगितले. तिला स्थानिक नागरिकांनी केपीएन् ट्रॅव्हल्स कंपनीच्या गॅरेजमध्ये उभ्या असलेल्या ४२ बसेस जाळण्यासाठी प्रवृत्त केले होते. भाग्या तिच्या कुटुंबासह गॅरेजजवळच रहात होती. ती मजुरी करून तिचे कुटुंब चालवत होती. या प्रकरणी पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे भाग्यासह ११ जणांना अटक केली आहे.

हिंदूंचे धर्मांतर करणार्‍या ख्रिस्ती संस्थांना काँग्रेसच्या कर्नाटक सरकारने दिले कोट्यवधी रुपये !

सरकारी धन ख्रिस्ती संस्थांना देणे, ही जनतेच्या 
पैशाची उधळपट्टी आहे. अशी उधळपट्टी किती दिवस चालू देणार ?
      नवी देहली - कर्नाटकातील काँग्रेसच्या सिद्धरामैय्या सरकारने ख्रिस्ती संस्थांना कोट्यवधी रुपये दिल्याचे समोर आले आहे. हे पैसे राज्यातील चर्चची दुरुस्ती आणि सुशोभिकरण, तसेच ख्रिस्ती समाजाचे सभागृह यांच्या नावावर देण्यात आले. माहिती अधिकाराच्या अंतर्गत कर्नाटक सरकारला संबंधित माहिती विचारण्यात आली होती. भारत धर्मनिरपेक्ष देश असल्यामुळे कोणतेही सरकार धार्मिक संस्थांना आर्थिक साहाय्य करू शकत नाही. त्यामुळे हे राज्यघटनेचे उल्लंघन असल्याचे म्हटले जाते. (कर्नाटक शासन ख्रिस्ती संस्थांच्या तुंबड्या भरण्याचे काम काँग्रेस अध्यक्षांच्या सांगण्यावरून करत आहे का ? याची चौकशी झाली पाहिजे ! - संपादक)

मैनपुरी (उत्तरप्रदेश) येथे गोहत्येसाठी घेऊन जाणार्‍या २७ गोवंशांची सुटका !

      मैनपुरी (उत्तरप्रदेश) - गोहत्येसाठी ट्रकमधून नेण्यात येणार्‍या २७ गोवंशाची पोलिसांनी सुटका केली. (पोलिसांनी अशी अवैध वाहतून करणार्‍या संबंधित गोद्रोह्यांनाही कठोर शिक्षा करणे अपेक्षित आहे ! - संपादक) पोलिसांनी पाठलाग करून या ट्रकला अडवले. 
        २७ पैकी ५ गोवंशाचा गुदमरल्यामुळे मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी दोघा धर्मांधांना अटक केली आहे. (वारंवार हिंदूंच्या धर्मभावना दुखावून धर्मांध गोवंशाचा व्यापार करून त्यांची हत्या करतात ! आणि भारतातील कथित बुद्धीजीवी, पुरोगामी, सुधारणावादी हे व्यक्तीस्वातंत्र्याच्या आरोळ्या ठोकत हिंदूंनाच दोष देतात ! हा प्रकार कधी थांबणार ? आता शासनानेच हिंदूंच्या धर्मभावनांचा आदर राखत भारतात सर्वत्र गोहत्याबंदी कायदा लागू करावा, अशी हिंदूंची विनंती आहे ! - संपादक)

भारताच्या सद्यस्थितीवर चर्चा करण्यासाठी पॅट्रीऑटीक फोरमच्या वतीने परिषदेचे आयोजन !

      नवी देहली - पॅट्रीऑटीक फोरम या देशप्रेमी संघटनेच्या विद्यमाने नवी देहालीतील इंडिया इंटरनॅशनल सेंटर येथे २४ सप्टेंबर या दिवशी भारताची सद्यस्थिती या विषयावर परिषद आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेच्या अध्यक्षस्थानी पंजाबचे माजी पोलीस महासंचालक के.पी.एस्. गिल असतील. या परिषदेत मुख्यत: भारताच्या सद्यस्थितीविषयी चर्चा करण्यात येईल. अभिलीत भट्टाचार्य, प्रकाश सिंह, हिरण्यमय कार्लेकर, पी.सी. हलधर आणि महंमद आरिफ खान हे चर्चेत सहभाग घेतील. नंतर उपस्थितांच्या प्रश्‍नाला उत्तरे देण्यात येतील. के.पी.एस्. गिल परिषदेचा समारोप करतील आणि कॅप्टन एस्.बी. त्यागी आभारप्रदर्शन करतील. या परिषदेस देशप्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन पॅट्रीऑटीक फोरमने केले आहे.

पॉर्न अभिनेत्री सनी लिओन हिच्यावर कारवाई करा !

भाग्यनगरच्या प्रशासनाला हिंदु जनजागृती समितीकडून निवेदन !
डावीकडून श्री. नागपाल, श्री. चंद्र मोगेर
आणि सहजिल्हाधिकारी भारती होल्लीकर
     भाग्यनगर - हिंदु जनजागृती समितीकडून भाग्यनगरच्या सह जिल्हाधिकारी भारती होल्लीकर यांना ३ विषयांसंदर्भात निवेदन देण्यात आले. यात सनातनचे साधक डॉ. तावडे यांचा पोलिसांकडून होणारा छळ रोखणे, पॉर्न अभिनेत्री सनी लिओन हिच्यावर कारवाई करणे आणि पंजाब गोरक्षादलाचे प्रमुख श्री. सतीश कुमार प्रधान यांना पोलिसांनी अयोग्य पद्धतीने अटक केली असून त्यांची सुटका केली जावी. या मागण्यांचा समावेश होता. 
      निवेदन देतांना हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते श्री. चंद्र मोगेर, श्री. मुरली गुडीसा आणि पूज्यपाद संतश्री आसाराम बापू यांच्या आश्रमाचे श्री. नागपाल उपस्थित होते.


गणेशमूर्ती विसर्जनाच्या वेळी प्रशासनाने हिंदूंच्या धर्मभावनांचा आदर राखला पाहिजे ! - अभय वर्तक, प्रवक्ता, सनातन संस्था

एबीपी माझा या वृत्तवाहिनीवरील चर्चासत्रात सनातनचा सहभाग !
श्री. अभय वर्तक
       मुंबई - गणेशमूर्ती ही शाडूच्या मातीची असली पाहिजे, असे आमचे धर्मशास्त्र सांगते. जेव्हा आपण घरात गणेशाची मूर्ती आणतो, तेव्हा ती केवळ मातीची मूर्ती नसते, तर त्यात गणेशाचे तत्त्व असते. या मूर्ती कृत्रिम तलावात विसर्जित करण्याचे प्रशासन, तसेच महानगरपालिका यांच्याकडून लोकांना आवाहन केले जाते. त्यांचे कार्यकर्ते भाविकांच्या हातातील मूर्ती घेतात, त्या तलावात विसर्जित करतात. विसर्जन संपल्यानंतर ते त्याच कृत्रिम तलावातील मूर्ती काढून विहिरी बुजवण्यासाठी वापरतात, किंवा खोल समुद्रात नेऊन सोडतात. याठिकाणी हिंदूंसाठी गणपति हा काही दगड नाही, तर एक धर्मभावना आहे. त्यामुळे प्रशासनाने या भावनेचा आदर राखला पाहिजे. खर्‍या अर्थाने प्रदूषणविरहित गणेशोत्सव साजरा करायचा असेल, तर ही चळवळ अर्धवट सोडून न देता पुढच्या वर्षीची सिद्धता आतापासूनच चालू करूया आणि आपण एक दिवस या देशात असा निश्‍चितपणे आणूया की, प्रत्येक घरात शाडूच्या मातीच्या मूर्ती असतील, असे प्रतिपादन सनातन संस्थेचे प्रवक्ता श्री. अभय वर्तक यांनी चर्चासत्रात केले.

महानगरपालिका आयुक्तांवर गुन्हा प्रविष्ट करण्याची हिंदुत्वनिष्ठांची मागणी !

जळगाव येथे गणेशमूर्तींची विटंबना झाल्याचे प्रकरण
संतप्त हिंदुत्वनिष्ठांकडून रस्ता बंद आंदोलन
कृत्रिम हौदाजवळ जमलेले संतप्त
हिंदुत्ववादी आणि त्याची पाहणी
करतांना स्थानिक भाजप आमदार
सुरेश दामू भोळे
     जळगाव - येथे बांधण्यात आलेल्या कृत्रिम हौदात अनंतचतुर्दशीला ४ दिवस उलटून गेल्यावरही गणेशमूर्ती पाण्याअभावी अर्धवट विसर्जित झालेल्या स्थितीत आढळल्या. गणेशमूर्तींची झालेली ही विटंबना पाहून हिंदुत्वनिष्ठांनी तेथे रस्ता बंद आंदोलन केले. तसेच महानगरपालिका आयुक्तांवर गुन्हा प्रविष्ट करण्याची मागणीही केली. (धर्मरक्षणासाठी सतर्क असणार्‍या हिंदुत्वनिष्ठांचे अभिनंदन ! - संपादक)
१. येथे महानगरपालिकेच्या वतीने अनंत चतुर्दशीच्या दिवशी काही ठिकाणी कृत्रिम हौदाची निर्मिती करण्यात आली होती. अशाच प्रकारचा हौद शिवतीर्थ मैदानाच्या बाजूलाही तयार करण्यात आला होता. 
२. १९ सप्टेंबर या दिवशी उरी येथे झालेल्या आतंकवादी आक्रमणाच्या विरोधात काढण्यात आलेल्या मूक मोर्च्यानंतर हिंदुत्वनिष्ठ परतत असतांना त्यांना त्या हौदात अर्धवट विसर्जन झालेल्या काही गणेशमूर्ती आढळल्या. 
३. संतप्त हिंदुत्वनिष्ठांनी तेथे रस्ता बंद आंदोलन केले. कृत्रिम हौदाची निर्मिती करणार्‍या महानगरपालिकेचे आयुक्त जीवन सोनवणे आणि आर्य चाणक्य संस्थेचे अध्यक्ष अतुलसिंह हाडा यांच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या.

माझा संदीप भारतमातेला दिला ! - मीरा ठोक, शहीद संदीप ठोक यांच्या मातोश्री

अशा वीरमातांचा आदर्श सर्वांनी घ्यावा !
      नाशिक - माझा संदीप भारतमातेला दिला गं बाई, असे उद्गार शहीद सैनिक संदीप ठोक यांच्या मातोश्री मीरा ठोक यांनी मुलाच्या अंत्यदर्शनाच्या वेळी काढले. त्यांना अग्नी दिल्यावर तेथील ग्रामस्थांनी पाकिस्तान मुर्दाबाद अशा घोषणाही दिल्या.

(म्हणे) हत्येमागील मुख्य सूत्रधार आणि त्याची यंत्रणा पकडेपर्यंत आंदोलन करत रहाणार !

अंनिसच्या मुक्ता दाभोलकर यांचा कंठशोष !
    पुणे, २० सप्टेंबर - डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येच्या प्रकरणी अन्वेषण यंत्रणांनी न्यायालयात आरोपपत्र प्रविष्ट केले आहे. असे असले, तरी डॉ. दाभोलकर, कॉ. पानसरे आणि कलबुर्गी यांच्या हत्यांमागील मुख्य सूत्रधाराला (मास्टरमाईंडला) आणि त्याच्या यंत्रणेला पकडेपर्यंत आंदोलन करत रहाणार, असे प्रतिपादन अंनिसच्या मुक्ता दाभोलकर यांनी केले. (अन्वेषण यंत्रणांवर दबाव आणण्याचाच हा प्रयत्न नव्हे का ? - संपादक) डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येच्या निषधार्थ येथील महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलावर २० सप्टेंबर या दिवशी आंदोलन करण्यात आले. त्या वेळी त्या बोलत होत्या. या वेळी अंनिसचे मिलिंद देशमुख यांच्यासह २५ कार्यकर्ते उपस्थित होते.
(म्हणे) धर्मांधांच्या आवाहनाला झुगारून लोकांचा श्री गणेशमूर्तीदान उपक्रमास चांगला प्रतिसाद !
    मुक्ता दाभोलकर पुढे म्हणाल्या की, यंदाच्या वर्षी गणेशमूर्तीदान उपक्रमास चांगला प्रतिसाद मिळाला. काही धर्मांध लोक वाहत्या पाण्यात गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यासाठी नागरिकांना सांगत होते; परंतु त्या आवाहनाला झुगारून लोकांनी मूर्तीदानास चांगला प्रतिसाद दिला. (धर्मद्रोही मूर्तीदान मोहिमेस वैध मार्गाने विरोध करून धर्मरक्षण करणार्‍या हिंदुत्वनिष्ठांना धर्मांध असे संबोधणार्‍या मुक्ता दाभोलकर यांच्या बुद्धीची कीव करावी तेवढी थोडीच ! - संपादक)

मुलुंड येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून अज्ञाताकडून तिची हत्या

बलात्कार्‍यांचा देश अशी भारताची ओळख पुसण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे !
      मुंबई, २० सप्टेंबर - येथील मुलुंडमधील नवघर परिसरात घराबाहेर खेळणार्‍या ७ वर्षीय मुलीवर अज्ञात व्यक्तीने अत्याचार करून तिची हत्या केली. मुलगी अचानक बेपत्ता झाल्याने तिचे कुटुंबीय आणि शेजारी यांनी तिचा रात्रभर शोध घेतला. त्या वेळी त्याच परिसरात एका ट्रकखाली ती मुलगी बेशुद्धावस्थेत आढळली. उपचारांसाठी तिला रुग्णालयात नेण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला.

हिंदू तेजा जाग रे !

Jago !
    Pak ke virudh yuddha karneke liye Modiji desh ko siddh kare - Shankaracharya Swarupanand Saraswati
Rajdharmka palan karne hetu kya sarkar Santoki sunegi
जागो !
    पाक के विरुद्ध युद्ध करने के लिए मोदीजी देश को सिद्ध करें ! - शंकराचार्य स्वरूपानंद सरस्वती
राजधर्म का पालन करने हेतु क्या सरकार संतों की सुनेगी ?

फलक प्रसिद्धीकरता

संतांना जे वाटते ते सरकारला का वाटत नाही ?
    पंतप्रधान मोदी परराष्ट्र धोरणे सुधारतील, अशी आशा होती; मात्र आता असे वाटत आहे की, मोदी यांची विदेश नीतीही निराधार आहे. मोदी यांनी देशाला पाकच्या विरोधात युद्ध करण्यासाठी सिद्ध करावे, असे मार्गदर्शन शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांनी केले.

घेऊ नको माघार मर्दा, घेऊ नको माघार ।

परात्पर श्री गुरु डॉ. आठवले यांच्या परम पावन चरणी सद्भावपूर्वक समर्पण !
धर्म जागरगीत
भारतभूच्या शूरविरांनो । शिवछत्रपतींच्या छाव्यांनो ।
भिडवा खांदा खांद्याला ।
हिंदु राष्ट्र हे स्थापन करण्या, लावा प्राण पणाला ।
घेऊ नको माघार मर्दा, घेऊ नको माघार ॥ धृ.॥

शूरांची महाराष्ट्र भूमी ही, करू छातीची ढाल ।
साथ देण्या धावत येतील घराघरांतील लाल ।
सांग शत्रूला खबरदार । का बोलतोस बेताल ।
भिणार नच मरणाला, ही औलाद असे शिवबाची ।
होई आता तय्यार, मर्दा घेऊ नको माघार ॥ १ ॥

पदाची हौस : विकासातील एक अडथळा !

     पुण्याजवळील ढोरे-भांबूरवाडी या गावच्या सरपंचपदी नुकतीच ९४ वर्षांच्या गंगूबाई भांबुरे या आजीबाईंची बिनविरोध निवड झाली. विशेष म्हणजे खेड तालुक्यातील जेरवाडी, ढोरेवाडी आणि भांबुरवाडी या तिन्ही गावांच्या संयुक्त ग्रामपंचायतीचा गाडा हाकू पहाणार्‍या भांबरेआजी या अंगठेबहाद्दर आहेत. त्या गावाचे सरपंचपद महिलांसाठी राखीव होताच त्या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या; मात्र त्या वेळी सुमित्रा ढोरे या सरपंच झाल्या. ढोरे यांनी त्यागपत्र दिल्यानंतर गंगूबाईंची सरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली. भांबुरे यांच्या निवडीची घटना माध्यमांसाठी औत्सुक्याचा विषय झाली असली, तरी ती अपवादात्मक घटना नव्हे. भारतीय लोकशाहीमध्ये इतरत्रही अशीच स्थिती पहायला मिळते. वर्ष २०११ च्या जनगणनेनुसार भारतीय नागरिकांचे सर्वसाधारण (अ‍ॅव्हरेज) वय २५ वर्षे, तर भारतीय लोकप्रतिनिधींचे सर्वसाधारण वय ६५ वर्षे होते. म्हणजेच राज्यकर्ते आणि नागरिक यांच्यामधील ४० वर्षांचे अंतर होते. ही स्थिती गेल्या ४ वर्षांत पालटलेली नाही.

पितृपक्षातील श्राद्ध !

      ४ ऋणांपैकी पितृऋण फेडण्यासाठी श्राद्ध आवश्यक असते. माता-पिता, तसेच निकटवर्तीय यांचा मृत्यूनंतरचा प्रवास हा सुखमय आणि क्लेशरहित व्हावा, त्यांना सद्गती मिळावी यांसाठीचा संस्कार म्हणजेच श्राद्ध. श्राद्धातील मंत्रोच्चारांमध्ये पितरांना गती देण्याची सूक्ष्म शक्ती सामावलेली असते. श्राद्धात पितरांना हविर्भाग दिला गेल्याने ते संतुष्ट होतात. श्राद्धाचे इतके महत्त्व असतांनाही आज हिंदूंमधील धर्मशिक्षणाच्या अभावामुळे श्राद्धविधी दुर्लक्षिला जाऊ लागला आहे; म्हणूनच अन्य संस्कारांइतकाच श्राद्ध हा संस्कारही अत्यावश्यक कसा आहे, हे सांगणे क्रमप्राप्त ठरते. १७ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर २०१६ या कालावधीत पितृपक्ष येत आहे. त्यानिमित्ताने श्राद्धविषयक लिखाण देत आहोत.

शिक्षणापेक्षा सेवेला महत्त्व देऊन पूर्णवेळ साधना करण्याचा निर्णय घेणारी ५९ टक्के आध्यात्मिक पातळीची उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली कु. मानसी कुलकर्णी (वय १७ वर्षे) !

कु. मानसी कुलकर्णी
     भाद्रपद कृष्ण पक्ष पंचमी (२१.९.२०१६) या दिवशी कु. मानसी अरुण कुलकर्णी हिचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त तिच्या आईला तिची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये पुढे देत आहोत. 
कु. मानसी अरुण कुलकर्णी हिला वाढदिवसानिमित्त 
सनातन परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा ! 
१. चित्रकलेची आवड
     मानसीला चित्रकलेची फार आवड आहे. तिने सनातन संस्थेच्या बोधचिन्हाचे चित्र काढले आणि कु. प्रियांका जगताप हिला सांगितले, तू पूर्णवेळ साधिका होण्यासाठी आश्रमात जात आहेस, तर तुला भेट म्हणून घे.
२. दहावीला चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाल्याबद्दल सत्कार होणे 
     तिला १० वीला ८६ टक्के गुण मिळाल्याने पू. अनुताईंच्या हस्ते तिचा सत्कार झाला. त्या वेळी प.पू. डॉक्टर आणि पू. अनुताई यांच्याबद्दल तिच्याकडून पुष्कळ कृतज्ञता व्यक्त झाली.

उपजतच देवाची ओढ असलेला, सर्वांकडून नामजप करून घेणारा ५५ टक्के आध्यात्मिक पातळीचा आणि उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला धुळे येथील चि. श्रीकृष्ण पंकज बागुल (वय ४ वर्षे) !

चि. श्रीकृष्ण बागुल
     चि. श्रीकृष्ण पंकज बागुल याचा भाद्रपद कृष्ण पक्ष पंचमी (२१.९.२०१६) या दिवशी तिथीनुसार वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्याचे आई-बाबा आणि आजी-आजोबा यांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये देत आहोत.
चि. श्रीकृष्ण पंकज बागुल याला वाढदिवसाप्रीत्यर्थ 
सनातन परिवाराच्या वतीने शुभाशीर्वाद !
१. काम करण्याची आवड
     श्रीकृष्ण जेवण झाल्यावर स्वतःचे जेवणाचे ताट आणि सर्वांचे आसन उचलून घडी करून ठेवतो. 
२. समजूतदार
     मी सेवेसाठी गेल्यावर श्रीकृष्ण त्याचे आजी-आजोबा आणि काकू यांच्याशी चांगला खेळतो. तो त्यांच्यासमवेत असतांना त्यांना वेळेचे भान रहात नाही.

कृष्णा तुझे हे पावन चरण

कृष्णा तुझे पावन चरण ।
अनन्यभावे आले मी शरण ।
देवा, चुकवी आता जन्म-मरण ।
भवदुःखे तापले मम मन(टीप १) ॥ १ ॥

प्रारब्ध भोगता थकले तन ।
घे मज कुशीत दयाघना ॥
तुझ्या कृपे हे शांतवी जीवन(टीप २) ।
नाही सोसवे हा विरहाचा ताण ॥ २ ॥

घे ना हे अपूर्ण तन-मन-जीवन(टीप ३) ।
या पामराचे तुज लोटांगण ॥
देवा ब्रीद तुझे पतीत-पावन ।
बहुत पतितांचे केले तू तारण(टीप ४) ॥ ३

श्री दुर्गादेवीची मूर्ती सिद्ध करतांना मूर्तीकाराने पाळावयाचे आचारधर्म, करावयाची साधना अन् त्यामागील शास्त्र

श्री. राम होनप
१. देवाज्ञा
     मूर्तीत श्री दुर्गादेवीचे अधिकधिक तत्त्व येण्यासाठी मूर्तीकाराने मूर्ती पूर्ण होईपर्यंत विशिष्ट आचारधर्मांचे पालन आणि उपासना करणे आवश्यक आहे. (देवाज्ञा हा शब्द समाजातील व्यक्तीचे देहावसान झाले की, वापरतात; परंतु येथे देवाने दिलेली आज्ञा या अर्थाने हा शब्द वापरला आहे.)
२. मूर्तीत तत्त्व आकृष्ट होईल, अशा पद्धतीने तिची रचना करणे आवश्यक !
     मूर्तीविज्ञान हे तत्त्वधारणेवर आधारित आहे. मूर्तीत देवतेचे तत्त्व येण्यासाठी मनुष्याचे आचरण देवतेला अनुसरून असायला हवे. हे तत्त्वज्ञान मूर्ती घडवण्याचा पाया मानले जाते. मूर्तीला मनाप्रमाणे कसाही आकार दिला, तर तिच्यात देवतेचे तत्त्व येत नाही. त्यामुळे मूर्तीत तत्त्व आकृष्ट होईल, अशा पद्धतीने तिची रचना करावी लागते.
३. मूर्ती घडवतांना पाळावयाचे आचारधर्म
३ अ. आहार : फलाहार अथवा सात्त्विक आहार ग्रहण करावा. अगदी साध्या सुपारीचेही व्यसन टाळावे. पुष्कळ पोट भरलेले असतांना किंवा उपाशीपोटी मूर्ती घडवू नये. या दोन्ही स्थितीत लक्ष मूर्तीऐवजी स्वतःच्या शरिराकडे अधिक असते.

प्रसंगावधानी, निर्भय आणि श्रीकृष्णाच्या अनुसंधानात असणारी ५३ टक्के आध्यात्मिक पातळीची उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली मिरज येथील कु. ऐश्‍वर्या रमेश वांडरे ! (वय १२ वर्षे)

कु. ऐश्‍वर्या वांडरे
      भाद्रपद कृष्ण पक्ष पंचमी (२१.९.२०१६) या दिवशी कु. ऐश्‍वर्या रमेश वांडरे हिचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त तिच्या आईला तिची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये पुढे देत आहोत. 
कु. ऐश्‍वर्या वांडरे हिला वाढदिवसानिमित्त 
सनातन परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा ! 
१. धर्माचरण आणि सात्त्विकतेची आवड असणे
     ऐश्‍वर्याला लहानपणापासून सात्त्विक वेशभूषा आणि केशभूषा आवडते. शाळेतील मुली तिच्या साधेपणावरून तिला चिडवतात; पण त्यांच्याकडे लक्ष न देता ती केस मोकळे न सोडता दोन वेण्या घालणे, चुडीदार (पंजाबी) पोषाख वापरणे, कपाळाला कुंकू लावणे, हे सर्व करत असते. 
२. मैत्रिणींनी अंताक्षरी खेळतांना सहभागी 
करून घेतले नाही, तर श्‍लोक म्हणत बसणे
     तिला चित्रपट गीते, नट-नट्यांची नावे, अंताक्षरी, चित्रपटातील संवाद, दूरचित्रवाणीवरील मालिका पहाणे आवडत नाहीत. यावरून तिला मैत्रिणींनी चिडवले, तरी ती शांतपणे सहन करते. अंताक्षरी आवडत नसल्यामुळेे मुली तिला अंताक्षरी खेळतांना सहभागी करून घेत नाहीत. तेव्हा ती मनाचे श्‍लोक आणि अथर्वशीर्ष म्हणत बसते.

देवद आश्रमातील ६३ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. सुलोचना जाधवआजी (वय ६८ वर्षे) यांनी सांगितलेले श्रीमद्भगवद्गीतेचे महत्त्व आणि त्यातील श्‍लोकाचा सांगितलेला सुंदर भावार्थ !

सौ. सुलोचना जाधव
१. भगवंताला शरण येणार्‍या मनुष्याचे दायित्व भगवंत घेतो !
सर्वधर्मान्परित्यज्य मामेकं शरणं व्रज ।
अहं त्वा सर्वपापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः ॥
- श्रीमद्भगवद्गीता अध्याय १८, श्‍लोक ६६
अर्थ : सर्व धर्म म्हणजे सर्व कर्तव्यकर्मे मला अर्पण करून तू केवळ सर्वशक्तीमान, सर्वाधार अशा मला परमेश्‍वरालाच शरण ये. मी तुला सर्व पापांपासून सोडवीन. तू शोक करू नकोस.
     अशा रितीने जो भगवंताला शरण येतो, त्याच्याविषयीचे सर्व उत्तरदायित्व भगवंत घेतो. तो अशा शरणागताला सर्व पापकर्मांच्या परिणामांपासून वाचवतो.
२. भगवान श्रीकृष्णाने सांगितलेली श्रीमद्भगवद्गीता ही मनुष्यासाठी परिपूर्ण
मार्गदर्शक असून केवळ तिचे श्रद्धापूर्वक अध्ययन आणि आचरण आवश्यक आहे !
      मनुष्य प्रतिदिन पाण्याने स्नान करून स्वतःला स्वच्छ करतो; परंतु जो मनुष्य श्रीमद्भगवद्गीतारूपी पवित्र ज्ञानगंगेत केवळ एकदाच स्नान करतो, तो भौतिक जीवनाच्या सर्व मलिनतेपासून मुक्त होतो. आदिनारायण श्रीविष्णुरूप साक्षात् भगवान श्रीकृष्णाने श्रीमद्भगवद्गीता सांगितली असल्याने मनुष्याला इतर कुठल्याही ग्रंथाचे अध्ययन करण्याची आवश्यकता नाही.

कै. (सौ.) पांडेआजींची सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर यांना लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये आणि त्यांना आलेल्या अनुभूती

१. गुणवैशिष्ट्ये
१ अ. परेच्छेने आणि ईश्‍वरेच्छेने वागणे : सौ. पांडेआजींचा मला बराच सहवास लाभला. प.पू. पांडे महाराज यांच्याकडे मी आध्यात्मिक उपाय करण्यासाठी गेल्यावर त्यांची माझी भेट होत असे. त्यांच्या संपूर्ण आयुष्यात त्यांनी परेच्छेने आणि ईश्‍वरेच्छेने वागल्याने अन् केलेल्या अखंड त्यागामुळे त्यांची आध्यात्मिक उन्नती झाली होती.
१ आ. कर्तव्यदक्ष अर्धांगिनी : प.पू. पांडे महाराज इरिगेशन इंजिनियर असल्याने त्यांना बर्‍याच वेळा बाहेर काम असे. त्यामुळे सौ. पांडेआजींना अनेक वेळा घरात एकट्याने अधिक काळ घालवावा लागत असे. घनदाट जंगलात त्यांच्या खोल्या असत. जंगली श्‍वापदांचा आणि सर्प यांचा वावर घराभोवती असतांनाही त्यांनी नेटाने एक कर्तव्यदक्ष अर्धांगिनी म्हणून तिथेच राहून संसार केला. प.पू. पांडे महाराज यांच्या सावलीप्रमाणे प्रत्येक गोष्टीत त्यांनी त्यांना साथ दिली असल्याचे त्यांच्या एकेका प्रसंगातून लक्षात येते.
१ इ. नम्रता : प.पू. पांडे महाराज यांच्याकडून त्यांची काहीच अपेक्षा नसे. बर्‍याच वेळा प.पू. महाराज त्यांना भेटायला आलेल्यांशी बोलत असतांना आजी ते बोलणे शांतपणे ऐकत. त्यामध्येही त्या स्वतःहून कधीच बोलत नसत. आपल्याला महत्त्व द्यावे, येणार्‍यांनी आपल्याशीही बोलावे, असे त्यांना कधीच वाटत नसे. त्यांच्यात अत्यंत नम्रता होती.

होई गुरुचरणी जीवन सार्थक ।

कु. अदिती सुखटणकर
परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त...

गुरु म्हणजे कोण ।
आई, माई, ताई, आजी, काकी ।
बाबा, मामा, दादा, आबा, काका ।
सर्वच नाती गुरूंमध्ये सामावून गेली ॥ १ ॥

ज्यांनी जन्मोजन्मी आपले
बोट धरून ठेवले ।
ज्यांनी कधीही आपला
हात नाही सोडला ।
ज्यांनी सतत केली पराकाष्ठा मला पालटण्यास ।
अशा गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करायचा सण गुरुपौर्णिमा ॥ २ ॥

मोठ्या मनाच्या आणि सर्व साधकांवर अंतःकरणपूर्वक प्रेम करणार्‍या सौ. आशा पांडेआजी यांच्या निधनाने स्वतःच्या आईला पुन्हा एकदा गमावले असल्याचे सांगणारे साधिकेचे पत्र !

श्रीमती शिरीन चाइना
प्रिय आनंदी,
नमस्कार !
     प.पू. पांडे महाराज यांच्या पत्नीचे निधन झाल्याची वार्ता दैनिक सनातन प्रभातमध्ये वाचल्यावर मला धक्का बसला; कारण हे मला अनपेक्षित होते. ही वार्ता वाचून मी अस्वस्थ झाले. मी जूनच्या मध्यात देवद आश्रमात आले होते. तेव्हा त्यांची आणि माझी भेट झाली होती. ही आमची शेवटची भेट असेल, असे मला वाटले नव्हते. कै.सौ. पांडेआजी या मोठ्या मनाच्या आणि सर्व साधकांवर अंतःकरणपूर्वक प्रेम करणार्‍या होत्या.
     त्या आपल्या सर्वांच्या मनात अजूनही आहेत, असे मला वाटते. ज्या वेळी मला प.पू. पांडे महाराज यांना भेटायचे असे, तेव्हा मी त्यांना तुमची पारसी मुलगी भेटायला आली आहे, असे सांगा, असे म्हणताच त्या हसत जाऊन महाराजांना तसा निरोप देत असत.

मृत्यूत्तर विधींच्या शेवटच्या दिवशी पांडे परिवाराला साधनेविषयी माहिती देण्यासाठी आयोजित केलेले विविध उपक्रम

१. ३.९.२०१६ या दिवशी मृत्यूत्तरविधी झाल्यानंतर आमच्या कुटुंबियांतील सर्वांना आश्रमदर्शन करवण्यात आले.
२. आमच्या परिवाराला विधी कसा करावा ?, यासंबंधीची ध्वनी-चित्रचकती दाखवण्यात आली.
३. सनातन संस्थेच्या वतीने ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांचे प्रदर्शन लावण्यात आले होते. त्याचा लाभ आम्ही घेतला. परिवारातील काही जण दैनिक सनातन प्रभातचे वर्गणीदार झाले.
४. इतर सूत्रे
अ. कु. गौरी पांडे (प.पू. पांडे महाराजांची नात) हिने आजींची वेगवेगळ्या प्रसंगांतील छायाचित्रे संगणकावर दाखवली.
आ. डॉ. अरुण पांडे (प.पू. पांडे महाराज यांचा पुतण्या) यांनी २ भजने भावपूर्ण होऊन म्हटली.
- प.पू. परशराम पांडे आणि पांडे परिवार (१४.९.२०१६)

कै. (सौ.) पांडेआजींसाठी ठेवलेल्या पिंडापासून निर्माण झालेल्या चैतन्यकक्षेला भेदून कावळे येऊ न शकणे

     कै. (सौ.) पांडेआजींच्या मृत्योत्तर ११ व्या दिवशी काकस्पर्शासाठी तीळमिश्रित पिंड ठेवले होते. तेव्हा झाडावर अनेक कावळे असूनही ते स्पर्श करण्यासाठी पुढे आले नाहीत. तेव्हा शहाणेगुरुजी म्हणाले, सौ. पांडेआजींसाठी ठेवलेल्या पिंडापासून निर्माण झालेल्या चैतन्यकक्षेला भेदून कावळे येऊ शकले नाहीत. शेवटी त्यांनी पिंडाला दर्भाचा स्पर्श करून विधी पूर्ण केला.
- प.पू. परशराम पांडे, सनातन आश्रम, देवद, पनवेल.(१८.९.२०१६)

सौ. आशा पांडेआजी यांच्या देहावसानानंतर आलेल्या अनुभूती

१. सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर यांनी मला सांगितले,सौ. पांडेआजींनी देह ठेवल्यावर त्या सौभाग्याचे लेणे लेऊन मला सूक्ष्मातून भेटल्याचे जाणवले आणि त्या वेळी त्यांनी मी जाते, असे मला सांगितले. - प.पू. परशराम पांडे महाराज
२. श्राद्धाच्या वेळी कणकेवर ठेवलेला दिवा उचलल्यानंतर त्या ठिकाणी ॐ स्पष्ट उमटला होता. - प.पू. परशराम पांडे आणि पांडे परिवार (१४.९.२०१६)

सात्त्विक गोष्टींची आणि धर्माचरणाची आवड असणारी, देवावर श्रद्धा असणारी ५१ प्रतिशत आध्यात्मिक स्तर असलेली आणि उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली अमरावती येथील बालसाधिका कु. भार्गवी योगेश मालोकार (वय ६ वर्षे) !

कु. भार्गवी मालोकार
कु. भार्गवी मालोकार हिला वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराकडून शुभाशीर्वाद !
१. पत्नीचे गर्भारपण
१ अ. पहिला मास - गर्भात २ जीव वाढत असल्याचे समजणे : गर्भारपणाच्या पहिल्या मासात माझी पत्नी सौ. सोनाली हिची वैद्यकीय चाचणी केली असता गर्भात २ जीव वाढत असल्याचे समजले. ही स्थिती चांगली नसल्याचे आधुनिक वैद्यांनी (डॉक्टरांनी) सांगितले आणि त्यांनी १५ दिवसांनी पुन्हा वैद्यकीय चाचणी करण्यास सांगितली. त्या वेळी गर्भात वाढत असलेल्या दोन पैकी एक जीव नसल्याचे लक्षात आले.
१ आ. तिसरा मास - उच्च रक्तदाबाचा त्रास होऊ लागणे, औषधोपचारांनी तो नियंत्रणात न येणे आणि तज्ज्ञांनी सांगितल्यानुसार केलेल्या वैद्यकीय चाचण्यांचे अहवाल सकारात्मक येणे : तिसर्‍या मासापासून सौ. सोनालीला उच्च रक्तदाबाचा त्रास होऊ लागला. औषधोपचारांनी रक्तदाब नियंत्रणात येत नव्हता; म्हणून उपचार करणार्‍या डॉक्टरांनी तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन घेण्यास सांगितले. त्यानुसार तज्ज्ञांना दाखवले. काही वैद्यकीय चाचण्याही करण्यात आल्या. श्रीकृष्णाच्या कृपेमुळे सर्व चाचण्यांचे अहवाल सकारात्मक आले.

सौ. आशा पांडेआजी यांच्या निधनानंतरचे सर्व विधी देवद आश्रमात यथास्थित पार पडल्यावर प.पू. पांडे महाराज आणि त्यांचा परिवार यांनी प.पू. डॉक्टरांप्रती व्यक्त केलेली कृतज्ञता !

प.पू. परशराम पांडे
कै. (सौ.) आशा पांडे
कै. (सौ.) आशा पांडेआजी यांच्या 
मासिक श्राद्धानिमित्त...
     प.पू. पांडे महाराज यांच्या धर्मपत्नी सौ. आशा पांडे यांचे २२.८.२०१६ या दिवशी निधन झाले. त्यानंतर त्यांचा अंत्यविधी, त्यानंतरचे क्रियाकर्म आणि श्राद्धादी विधी रामनाथी आश्रमातील पुरोहितांच्या उपस्थितीत देवद आश्रमात पार पडले. हे शास्त्रशुद्ध विधी, म्हणजे एक सोहळाच झाला, असे पांडे परिवाराला वाटले. याविषयी प.पू. पांडे महाराज आणि त्यांचा परिवार यांनी व्यक्त केलेली कृतज्ञता पुढे देत आहोत.
१. सौ. पांडेआजींच्या अंत्यविधीच्या वेळी आश्रमातील साधकांनी कोणतीही 
उणीव भासू न देणे आणि आश्रमातील एकंदर सर्व व्यवस्था पाहून भारावून जाणे
     सौ. आशा पांडेआजी रुग्णाईत असतांना देवद आश्रमातील साधकांनी त्यांची अत्यंत तळमळीने शुश्रुषा केली. त्यानंतर त्यांच्या निधनानंतर आश्रमातील साधक, संत आणि व्यवस्थापन सेवेतील साधक यांनी स्वतः लक्ष घालून सर्व विधी पूर्ण होईपर्यंत कोणत्याही प्रकारची उणीव किंवा न्यूनता भासू दिली नाही. पांडे परिवारातील सर्वांची रहाण्याची, जेवणाची व्यवस्थासुद्धा उत्तम प्रकारे केली. येथील एकंदर सर्व व्यवस्था पाहून आम्ही भारावून गेलो.

आधुनिक वैद्या सौ. मधुवंती पिंगळे यांना सेवेदरम्यान झालेले त्रास, आलेल्या अनुभूती आणि त्यांचे झालेले चिंतन

डॉ. (सौ.) मधुवंती पिंगळे
     आधुनिक वैद्या सौ. मधुवंती पिंगळे या कर्नाटक राज्यातील जिल्ह्यांमध्ये सेवेसाठी करण्यासाठी गेल्या होत्या. या वेळी त्यांना पुष्कळ त्रास झाले. त्यांना झालेले त्रास, त्या वेळी त्यांना आलेल्या अनुभूती आपण पाहिल्या. आज आपण त्यांचे त्रासांवर झालेले चिंतन आणि त्यांतून त्यांना शिकायला मिळालेली सूत्रे पुढे देत आहोत.
३. श्रद्धा दृढ होऊन समर्पणभाव वाढवण्यासंबंधी प्रार्थना होणे
     अध्यात्मामध्येे श्रद्धा हे चलनी नाणे आहे, असे प.पू. डॉक्टरांचे वाक्य आहे. प.पू. डॉक्टर, माझ्यातील श्रद्धा दृढ होऊन समर्पणभाव वाढवा अन् गुरुचरणी मला समर्पित करवून घ्या, अशी तुमच्या चरणी मी प्रार्थना करते.
     या कालावधीमध्ये सर्व संत आणि साधक यांनी मला सर्वच स्तरावर मोलाचे साहाय्य केले. त्यांच्या प्रती मी अनंत कोटी कृतज्ञ आहे.

त्रिपिंडी श्राद्ध केल्यानंतर पूर्वजांना मुक्ती मिळाल्याची साधिकेला आलेली अनुभूती !

सौ. नंदा खंडागळे
      नागपूर येथील ६१ टक्के पातळी गाठलेल्या साधिका सौ. नंदा खंडागळे यांना ३१.१२.२०१५ या दिवशी त्रिपिंडी श्राद्ध करतांना आणि त्यानंतर घरी आल्यावर झालेले त्रास अन् आलेल्या अनुभूती पुढे देत आहोत.
१. श्राद्धविधीच्या दिवशी झालेले त्रास 
१ अ. डोळ्यांना कंड सुटून डोळे सुजणे : ३१.१२.२०१५ या दिवशी त्रिपिंडी श्राद्धाचा विधी चालू असतांना अनुमाने दोन घंटे माझ्या डोळ्यांना कंड येत होती. माझ्या डोळ्यांतून चिकट पाणी येत होते आणि डोळेही सुजले होते.
१ आ. घसा दुखायला लागून प्राणशक्ती अल्प होणे आणि श्‍वास घ्यायलाही त्रास होत असल्याने रात्री झोपू न शकणे : ३१.१२.२०१५ या दिवशी तेथून निघतांना माझा घसा अकस्मात् दुखायला लागला. मला काही गिळायलाही त्रास होत होता. माझी प्राणशक्ती अल्प झाली होती. मला रात्री झोपतांना श्‍वास घ्यायलाही त्रास होत होता. माझा जीव गुदमरायला लागल्यामुळे मी तोंडाने श्‍वास घेत होते. त्यामुळे रात्री झोप लागली नाही.

सौ. पांडेआजींनी मृत्यूपूर्वी १० ते १५ दिवस आधीच मृत्यूनंतर नेसायची साडी आणि घालायच्या बांगड्या यांचे नियोजन करून ठेवणे

     सौ. पांडेआजींचे निधन होण्यापूर्वी १० ते १५ दिवस आधी आश्रमात सात्त्विक कपड्यांचे प्रदर्शन लागले होते. पांडेआजी माझा हात पकडून म्हणाल्या, स्मिता, तुझ्या पसंतीची मला एक साडी घ्यायची आहे. आजींना विचारूनच मी एक साडी पसंत केली. तेव्हा त्या म्हणाल्या, मला बांगड्याही घ्यायच्या आहेत. तू माझ्या हातात त्या बांगड्या जातात कि नाही, ते बघ. त्यांच्या हातात बसणार्‍या ४ बांगड्या घेतल्या आणि मी त्यांना खोलीत घेऊन गेले.
     आजींचे निधन झाले, तेव्हा त्यांना अंघोळ घालून नवीन साडी घालायची होती. बांगड्याही घालायच्या होत्या. तेव्हा प.पू. पांडे महाराज कु. सविता भणगे यांना म्हणाले, तिला प्रदर्शनातून जी साडी घेतली, ती नेसव आणि बांगड्याही घाल. आजींना अंघोळ घातल्यावर त्यांच्यासाठी काढलेली साडी बघून आजींनी हीच साडी मला घ्यायला सांगितली होती. जणू आजींनी स्वतःच कोणती साडी मृत्यूनंतर घालणार याचे नियोजन केले होते, असे मला वाटले. - सौ. स्मिता नाणोसकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (६.९.२०१६)

बोधचित्र


॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥

या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो. - प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

हरि ॐ तत्सत

संत भक्तराज
सनातनचे श्रद्धास्थान
हे असे आहे का ? ते तसे आहे का ? हे असेही नाही, तसेही नाही.
ते कशात नाही ? मग ते असेही आहे आणि तसेही आहे.
   भावार्थ : हे असे आहे का ? मधील हे मायेविषयी आहे. ते तसे आहे का ? मधील ते ब्रह्मासंबंधी आहे. हे असेही नाही, तसेही नाही, म्हणजे म्हटले तर ही म्हणजे माया, असेही नाही म्हणजे दिसते तशी नसून ब्रह्म आहे आणि तशीही नाही म्हणजे ब्रह्म म्हटले तर ब्रह्मस्वरूपातही नाही. ते कशात नाही ? म्हणजे ब्रह्म सर्वत्र आहे, मायेतही आहे. मग ते असेही आहे आणि तसेही आहे म्हणजे माया आणि ब्रह्म दोन्ही एकच आहेत.
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण)

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले
     'आद्य शंकराचार्यांनी विरोधी पंडितांशी वाद-विवाद करून त्यांचा पराभव केला; मात्र हल्लीच्या बुद्धीप्रामाण्यवाद्यांना, धर्मद्रोह्यांना वाद-विवाद करून हरवता येत नाही; कारण त्यांचा धर्माचा काडीइतकाही अभ्यास नसल्याने ते वाद-विवाद करण्यास पुढे येत नाहीत !' 
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले 

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

इच्छांवर मर्यादा हवी ! 
मनात निर्माण होणार्‍या इच्छा कशा पूर्ण होतील, याचा सतत विचार करून त्या पूर्ण 
करण्यापेक्षा इच्छा मर्यादित केल्या, तरच मानसिक शांतीचा लाभ होईल !
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)मार खाणारे पोलीस !

संपादकीय 
    नु कतेच मुंबई उच्च न्यायालयाने मुंबई पोलिसांची राज्य पोलीस संघटना स्थापन करण्याची याचिकेद्वारे केलेली मागणी फेटाळून लावली; मात्र त्याच वेळी पोलिसांवरील आक्रमणांविषयी चिंता व्यक्त करत राज्यशासनाला उपाययोजना करण्याची सूचना केली. पोलिसांवर होत असलेल्या आक्रमणांच्या संदर्भात अन्य कामगार संघटनांप्रमाणे संघटना स्थापन करण्याचा प्रयत्न पोलिसांकडून पुन्हा एकदा होत आहे. यापूर्वी अनेकदा असे प्रयत्न झाले आहेत; मात्र त्याला यश मिळालेले नाही. वर्ष १९८२ मध्ये पोलिसांनी संघटना स्थापन करून संप पुकारल्याने शहरात अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली होती; मात्र सरकारने ही संघटना आणि संप मोडून काढला होता. त्यानंतर पुन्हा कधी अशी स्थिती आली नाही; मात्र मागणी सतत होतच राहिली. आताही ती होत आहे. कारण जनतेच्या सुरक्षेचे दायित्व असणारे पोलीसच आता असुरक्षित झाले आहेत. कधी आणि कुठे पोलिसांना मारहाण केली जाईल, याची कल्पना नाही. सर्वसामान्य नागरिक घरातून बाहेर पडल्यावर तो सायंकाळी सुखरूप घरी परतेल का, या भीतीत त्याचे कुटुंब असते. तसेच ते पोलिसांच्या कुटुंबाविषयी झाले आहे, ही अतिशयोक्ती ठरणार नाही. या स्थितीला पोलीस आणि सरकार उत्तरदायी आहे, हे वेगळे सांगायला नको. देशाची अधोगती आणि अन्य समस्या यांना अपयशी ठरलेली लोकशाही आणि त्या तिने दिलेले राज्यकर्ते हेच उत्तरदायी आहेत. न्यायालयानेही याचिका फेटाळतांना म्हटले आहे की, पोलिसांवरील आक्रमणांचे वाढते प्रकार आणि पोलिसांना कर्तव्य बजावतांना असुरक्षित वाटणे, हे कायदा-सुव्यवस्थेची स्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचे लक्षण आहे. राज्यसरकारने याची जाणीव ठेवून ही परिस्थिती रोखण्यासाठी तातडीने उपाय योजायला हवेत.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn