Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

पाकला धडा शिकवण्यासाठी आम्हाला सूट द्या ! - भारतीय सैन्य

        नवी देहली - काश्मीरच्या उरी येथील आतंकवादी आक्रमणानंतर पाकला धडा शिकवण्यासाठी भारतीय सैन्याचे हात शिवशिवत आहेत. पाकला धडा शिकवण्यासाठी मर्यादित; परंतु प्रभावी आक्रमण करण्याच्या योजनेचा सरकारने विचार करावा, अशी मागणी सैन्यातील गटाकडून केली जात आहे. सीमेपलीकडे आक्रमण करण्यात आल्यास पाक सैन्याकडून प्रतिकार करण्यात येईल; मात्र त्यास प्रभावी उत्तर देता येईल, असा विश्‍वास भारतीय सैन्याने व्यक्त केला आहे.
        भारत-पाकमधील प्रत्यक्ष नियंत्रणरेषेवरील सुरक्षा अधिक कडेकोट करण्यासाठीही नव्या उपाययोजना राबवण्यात येणार आहेत; मात्र सीमेवरची सुरक्षाव्यवस्था अधिक बळकट करण्याबरोबरच पाकव्याप्त काश्मीरमधील आतंकवाद्यांच्या प्रशिक्षण शिबिरांवर थेट आक्रमण करण्यासंदर्भातील प्रस्तावाचाही विचार सरकारला करावा लागणार आहे.

पाकिस्तानच्या हिरव्या नांग्या ठेचून काढा ! - अभय वर्तक, प्रवक्ता, सनातन संस्था

काश्मीरमध्ये सैनिकांची हत्या केल्याच्या 
निषेधार्थ समस्त हिंदू संघटनांच्या वतीने संतप्त निदर्शने 

निदर्शनात बोलतांना श्री. अभय वर्तक (मध्यभागी)

        कोल्हापूर, १९ सप्टेंबर (वार्ता.) - आपल्या देशात प्रभु श्रीराम, श्रीकृष्ण, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांसह अनेकांनी युद्ध करूनच विजय मिळवला आहे. आता आम्हाला शासनाला सांगावे लागते की, युद्ध करा. पंतप्रधानांनी त्यांना ही खुर्ची अखंड हिंदुस्थानसाठीच मिळाली आहे, हे लक्षात ठेवावे. आमचे सैनिक पाकिस्तानला नष्ट करण्यासाठी जन्माला आले आहेत. अजून किती काळ आम्ही केवळ सैनिकांना श्रद्धांजलीच वाहायची ? आता पाकिस्तानच्या हिरव्या नांग्या ठेचून काढण्याची वेळ आली आहे, असे परखड मत सनातन संस्थेचे प्रवक्ता श्री. अभय वर्तक यांनी व्यक्त केले. समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आंदोलन करण्यात आले. त्या वेळी श्री. वर्तक बोलत होते. पाकपुरस्कृत आतंकवाद्यांनी काश्मीर येथील लष्करी तळावर आक्रमण करून १८ सैनिकांचा बळी घेतला. त्याची संतप्त प्रतिक्रिया कोल्हापूर येथे उमटली आणि राष्ट्रप्रेमींनी उत्स्फूर्तपणे आंदोलन केले.

धर्मांतर करण्याचे षड्यंत्र हाणून पाडा ! - श्री. चंद्रमणी चौबे, विहिंपच्या कोकण प्रांत मठमंदिर विभागाचे अध्यक्ष

डोंबिवली येथे हिंदु धर्मजागृती सभा 

बोलतांना श्री. चंद्रमणी चौबे (उजवीकडे), बसलेले (डावीकडून)
सौ. दीक्षा पेंडभाजे, सौ. सुनीता पाटील आणि श्री. प्रसाद वडके

        डोंबिवली, १९ सप्टेंबर (वार्ता.) - भाषा, जात, पात, संप्रदाय यांत लोकांना गुरफटत ठेवून हिंदु धर्म, रुढी, परंपरा यांना खिळखिळे करण्याचा प्रयत्न हेतुपुरस्सर केला जात आहे. लोकांनी मतभेद विसरून एक व्हावे. हिंदूंना विविध अमिषे दाखवून त्यांचे धर्मांतर करण्याचे षड्यंत्र हाणून पाडायला हवे, असे प्रतिपादन विहिंपच्या कोकण प्रांत मठमंदिर विभागाचे अध्यक्ष श्री. चंद्रमणी चौबे यांनी केले. ते १८ सप्टेंबर या दिवशी झालेल्या हिंदु धर्मजागृती सभेत बोलत होते. या वेळी व्यासपिठावर सनातन संस्थेच्या सौ. दीक्षा पेंडभाजे, रणरागिणी शाखेच्या सौ. सुनीता पाटील आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. प्रसाद वडके उपस्थित होते.

पाकने युद्ध पुकारले; पण भारत मात्र चेतावण्याच देत आहे !

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची 
दैनिक सामनाच्या संपादकियातून संतप्त प्रतिक्रिया
        मुंबई - काश्मीरसंदर्भात परिस्थिती पूर्वीपेक्षा चिघळली आहे आणि पाकिस्तानने सरळसरळ युद्ध पुकारले आहे; पण भारताचे सर्वच राज्यकर्ते केवळ चेतावणी देण्याविना काहीच करत नाहीत. पाकिस्तानातील हाफिज सईदसारखे लोक काश्मीरप्रश्‍नी भारताला धडा शिकवण्याची धमकी देऊन थांबत नाहीत, तर पठाणकोटपासून उरीपर्यंत आपल्या लष्करी तळांवर आक्रमण घडवून आणत आहेत. पठाणकोट आक्रमणानंतरही आपण केवळ पाकिस्तानी हाताचे पुरावे शोधत राहिलो आणि आताही त्यापेक्षा वेगळे घडणार नाही. पाकिस्तानी कारस्थानाचे पुरावे कसले शोधता ? असे पुरावे आंतरराष्ट्रीय व्यासपिठावर कवडीमोलाचे ठरतात, अशी संतप्त प्रतिक्रिया शिवसेना पक्षप्रमुख श्री. उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली आहे. उरी येथील पाकपुरस्कृत आतंकवादी आक्रमणात १८ भारतीय सैनिकांना वीरमरण आले. यासंदर्भात दैनिक सामनाच्या संपादकियातून मोदी शासनाच्या पाकविरोधातील भूमिकेवर टीका करण्यात आली आहे.
श्री. उद्धव ठाकरे यांनी पुढे म्हटले आहे,
१. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कर्तबगारीचा डंका विश्‍वात पिटला जात आहे. रविवारी दिवसभर मोदी यांच्यावर त्यांच्या वाढदिवसानिमित्त जागतिक नेत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत असतांनाच काश्मीरमधील आमच्या लष्करी तळांवर पाकड्या आतंकवाद्यांनी भयंकर आतंकवादी आक्रमण करून देशाला हादरा दिला.

पाकबरोबर युद्ध नाहीच !

  • १८ सैनिकांच्या मृत्यूवर देशातील जनता क्षुब्ध असतांना सरकार जर उत्तरदायींना धडा शिकवण्यासाठी काहीच करणार नसेल, तर ते लोकशाहीचे अपयशच होय !
  • पंतप्रधानांच्या घरी झालेल्या बैठकीत पाकला आंतरराष्ट्रीय स्तरावर एकटे पाडण्याचे नेहमीचे फुसके प्रयत्न करण्यावर एकमत !
       नवी देहली - काश्मीरमधील उरी येथील सैन्याच्या मुख्यालयावर झालेल्या आतंकवादी आक्रमणात हुतात्मा झालेल्या सैनिकांची संख्या १८ झाली आहे. या आक्रमणाच्या संदर्भात १९ सप्टेंबरला पंतप्रधान मोदी यांच्या निवासस्थानी उच्चस्तरीय बैठक घेण्यात आली. या वेळी पाकपुरस्कृत आतंकवाद्यांच्या या आक्रमणाला कसे प्रत्युत्तर द्यायचे, यावर चर्चा करण्यात आली. या चर्चेतून अखेर पाकला आंतरराष्ट्रीय स्तरावर एकटे पाडण्याचा प्रयत्न करण्यावर एकमत झाले. (पाकला एकटे पाडा किंवा पाडू नका, त्याने देशातील आतंकवादी आक्रमणे थांबणार नाहीत, हे भारतातील लहान मुलही सांगू शकतो ! पाकपुरस्कृत आतंकवाद नष्ट करण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे ! - संपादक) तसेच या आक्रमणामागे पाकचा हात असल्याचे पुरावे पाकला देण्यात येण्याचाही निर्णय घेण्यात आला. (अशा पुराव्यांना पाक नेहमीच केराची टोपली दाखवत आला असल्याने यातून भारत काय साध्य करणार आहे ? - संपादक) या बैठकीला गृहमंत्री राजनाथ सिंह, अर्थमंत्री अरुण जेटली, संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर आणि अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या वेळी सैन्यदल प्रमुखांनी सैन्य कोणत्याही कारवाईसाठी सिद्ध असल्याचे स्पष्ट केले; मात्र तशी कोणतीही कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला नाही.

झारखंडच्या कोडरमा येथे संघाच्या कार्यकर्त्याच्या हत्येनंतर तणाव

हिंदुत्वनिष्ठांना वेचून ठार मारण्याचे षड्यंत्र धर्मांधांनी रचले आहे ! 
ते हाणून पाडण्यासाठी शासन-प्रशासन काही पावले उचलणार का ?
      कोडरमा (झारखंड) - येथील चंदवारा गावामध्ये कवीकुमार गुप्ता या संघाच्या कार्यकर्त्याचा येथील गौरी नदीत मृतदेह सापडला. या मृतदेहावर अनेक ठिकाणी जखमा होत्या. कवी यांची धर्मांधांकडून हत्या करण्यात आल्यावरून येथे हिंदूंनी निदर्शने करत पोलीस ठाण्याचे प्रभारी वकार हुसेन यांना हटवण्याची मागणी केली. यामुळे येथे तणाव निर्माण झाला होता. कवीकुमार यांची आई आशा देवी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून महंमद सरफराज आणि महंमद मेराज यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. स्थानिक सरपंच महंमद नसिम यांच्या आदेशाने कवीकुमार यांची हत्या करण्यात आल्याचा आरोपही केला आहे. गावामध्ये संघाची शाखा उघडण्याच्या सूत्रावरून नसिम यांच्या मुलांशी कवीचा वाद झाला होता. ११ सप्टेंबरला महंमद सरफराज कवीकुमार यांच्या घरी आला होता आणि तो कवी यांना घेऊन गेला. काही घंट्यानंतरही कवी परत आला नाही. यानंतर नदीत त्याचा मृतदेह सापडला.आश्रमांनी सौरऊर्जा निर्मितीसाठी पुढाकार घ्यावा ! - सरकारचे आवाहन

आश्रमांना कधीही साहाय्य न करणारे सरकार 
आश्रमांकडून मात्र साहाय्याची अपेक्षा करते, हे लक्षात घ्या !
       नवी देहली - केंद्रीय नैसर्गिक ऊर्जा मंत्रालयाने ४० सहस्र मेगावॅट सौरऊर्जा निर्मितीचे लक्ष्य ठेवले आहे. देशभरातील धर्मगुरूंनी त्यांच्या आश्रमांमध्ये सौरऊर्जा निर्मितीसाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन मंत्रालयाचे सचिव उपेंद्र त्रिपाठी यांनी केले. (आश्रम हे भक्तांसाठी आध्यात्मिक मार्गदर्शनाची केंद्रे होत. त्यामुळे आश्रमांकडून अशी अपेक्षा करण्यापेक्षा सर्व यंत्रणा हाताशी असणारे सरकारच ते का करत नाही ? - संपादक) त्रिपाठी पुढे म्हणाले, धर्मगुरु आंतरराष्ट्रीय सौरऊर्जा गटामध्ये भागीदार म्हणून काम करू शकतात. या धर्मगुरूंच्या आश्रमांमध्ये त्यांचे जगभरातील भक्त भेटी देत असतात. त्यांना आश्रमांमध्ये सौरऊर्जा निर्मितीची प्रात्यक्षिके करून दाखवण्यात यावीत.

व्यक्तीने संन्यास घेतला, तरी त्याचे कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचे उत्तरदायित्व संपत नाही ! - उच्च न्यायालयाचा संन्याशाला सल्ला

हिंदु राष्ट्रात संन्याशांची काळजी राज्यकर्ते घेतील. 
त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांना असे न्यायालयात जावे लागणार नाही !
      कर्णावती (गुजरात) - एखाद्या व्यक्तीने संसाराचा त्याग करून संन्यास घेतला, तरी कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचे त्याचे उत्तरदायित्व संपत नाही, असे गुजरात उच्च न्यायालयाने त्यांच्या एका आदेशात म्हटले आहे. स्वत:ची नोकरी सोडून समाजसेवा आणि अध्यात्म यांकडे वळलेले श्री. सुनील उदासी यांना संबंध तोडलेल्या त्यांच्या पत्नीच्या उदरनिर्वाहाची काळजी घेण्याचा सल्ला न्यायालयाने दिला आहे. (पूर्वीच्या काळी सन्याश्यांंना राजाश्रय होता, तसेच जनताही संन्याशांच्या कुटुंबांची काळजी घेत असे; मात्र आता राजा आणि जनता दोघेही धर्मापासून लांब असल्यामुळे संन्याशाच्या पत्नीवर पोटगी मागण्याची वेळ आली आहे ! - संपादक)

भाला, तलवार, कट्यार आणि एअर गन बाळगण्यासाठी अनुज्ञप्ती घ्यावी लागणार !

कायदा बनवला, तरी तो उल्लंघून तलवारी बाळगणार्‍या धर्मांधावर कारवाई होणे अपेक्षित आहे !
केंद्रसरकारची अधिसूचना
     बरेली (उत्तरप्रदेश) - भाला, कट्यार, लोखंडी सळी आणि तलवार ही शस्त्रे बाळगण्यासाठी अनुज्ञप्ती (लायसन्स) घ्यावी लागणार आहे. केंद्रसरकारने १५ जुलैला काढलेल्या अधिसूचनेद्वारे हा आदेश काढला आहे. याव्यतिरिक्त १०० मीटरहून अधिक मारक क्षमतेचे एअर पिस्टोल आणि एअर गन यांच्यासाठीही आता अनुज्ञप्ती घ्यावी लागणार आहे; मात्र अद्याप अनुज्ञप्तीसाठी नियमावली बनवण्यात आली नसल्याचे समोर आले आहे. या अधिसूचनेची माहिती जनतेला नसल्याने अनुज्ञप्तीसाठी प्रयत्न होतांना दिसत नाहीत. अनुज्ञप्तीसाठी ५०० रुपये शुल्क निर्धारित करण्यात आले आहे. प्रत्येक २ वर्षांनी याचे नूतनीकरण करावे लागणार आहे. त्यासाठी १०० रुपये शुल्क द्यावे लागणार आहे. कट्यारसाठी शीख पंथियांना पूर्वीप्रमाणेच सूट देण्यात आली आहे.

इंग्लंडमध्ये महिला पोलीस अधिकार्‍यांना बुरखा घालण्याची अनुमती देण्याचा विचार

मुसलमान कुठेही असले, तरी त्यांच्या धर्माचरणाशी तडजोड करत नाहीत, हे लक्षात घ्या !
सौदी अरेबियातील वाळवंटात प्रस्ताव गाडून टाकण्याचा लोकांचा सल्ला
    लंडन - इंग्लंडमधील पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या महिला मुसलमान पोलीस अधिकार्‍यांना बुरखा घालण्याची अनुमती देण्याचा विचार शासन स्तरावर चालू आहे. 
१. इंग्लंडमध्ये वर्ष १९६०मध्ये मुसलमानांची लोकसंख्या नगण्य होती. आता ती ३० लक्ष झाली आहे. या कालावधीत इंग्लंडच्या संस्कृतीत समरस होण्यासाठी मुसलमानांमध्ये आवश्यक पालट होतील, या आशेने वाट पाहून निराश झालेल्या इंग्लंडने शेवटी स्वत:तच पालट घडवून आणण्याचा निर्णय घेतला आहे. येथे मुसलमानांच्या लांगूलचालनासाठी हलाल मांसाहारी पदार्थ कारागृहात, शाळांमध्ये, रुग्णालयांत आणि उपाहारगृहांतही उपलब्ध करून देण्यात आले आहेत. 
२. आता पोलीस ठाण्यातील महिला मुसलमान पोलीस अधिकार्‍यांना कामावर असतांना बुरखा घालण्याची अनुमती देण्यात येईल, असे शासनाने म्हटले आहे. यासंबंधी इंग्लंडमधील आकाशवाणी केंद्रावर एक परिसंवाद आयोजित करण्य्यात आला होता. त्यात सहभागी झालेल्या बहुसंख्य श्रोत्यांनी वरील संकल्पनेला विरोध दर्शवला आणि हा प्रस्ताव सौदी अरेबियातील वाळवंटात गाडून टाकण्याचा सल्ला दिला.

काश्मीरमध्ये चारच्या गटांत १२ आतंकवादी सक्रीय !

   १८ सप्टेंबरला सीमेवरून १६ आतंकवादी भारतात घुसले आणि यापैकी केवळ चौघांनी उरी येथे आक्रमण केले. अन्य १२ आतंकवादी प्रत्येकी ४ जणांच्या गटांमध्ये विभागले गेले आहेत. त्यातील एक गट पूंछ येथे, तर दुसरा श्रीनगरच्या दिशेने गेला आहे. त्यामुळे त्यांच्याकडून आक्रमण होण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
पीडीपी नेत्याच्या घराबाहेरील पोलीस शिपायाकडून आतंकवाद्यांनी पळवल्या ४ रायफली !
    अनंतनाग जिल्ह्यातील पीडीपीचे अध्यक्ष अधिवक्ता जावेद अहमद शेख यांच्या घराबाहेर सुरक्षेसाठी तैनात असणार्‍या पोलीस शिपायाकडील ४ एके ४७ रायफली आतंकवाद्यांनी पळवून नेल्या.

डॉ. तावडे यांच्या न्यायालयीन कोठडीत १ ऑक्टोबरपर्यंत वाढ

      पुणे - डॉ. दाभोलकर हत्येप्रकरणी संशयित म्हणून अटक केलेले सनातनचे साधक डॉ. तावडे यांची १९ सप्टेंबर या दिवशी न्यायालयीन कोठडी संपत असल्यामुळे पुढील सुनावणी झाली. न्यायालयाने आज आरोपपत्र प्रविष्ट केल्याचे सांगत १ ऑक्टोबरपर्यंत पुढील न्यायालयीन कोठडी सुनावली असल्याचे न्यायाधीश व्ही.बी. गुळवे-पाटील यांनी सांगितले. या वेळी डॉ. तावडे यांना न्यायालयात उपस्थित करण्यात आले होते. शासकीय अधिवक्ता उज्ज्वला पवार आणि डॉ. तावडे यांच्या बाजूने अधिवक्ता नीता धावडे यांनी कामकाज पाहिले.

पाकिस्तानला जशास तसे उत्तर द्या ! - पंजाबच्या शाही इमामांची मागणी

       संपूर्ण देशातून केवळ एका इमामाला असे बोलावेसे वाटले. अन्य इमाम आणि मुसलमानांचे नेते पाकच्या विरोधात आणि जिहादी आतंकवाद्यांच्या विरोधात का बोलत नाहीत ? असे न बोलणार्‍यांच्या विरोधात पुरोगामी तोंड का उघडत नाहीत ?
       चंदीगड - उरी येथील आतंकवादी आक्रमणाची पंजाबचे शाही इमाम यांनी निंदा केली आहे. मौलाना हबीब उर रहमान सानी लुधियानवी यांनी म्हटले आहे की, भारत सरकारने पाकसमवेत असणारे सर्व राजकीय आणि अन्य संबंध समाप्त केले पाहिजे. त्याला जशास तसे उत्तर दिले पाहिजे. ते लुधियाना येथील जामा मशिदीतील एका सभेला संबोधित करत होते. या वेळी आतंकवादाच्या विरोधात प्रस्ताव संमत करून हुतात्मा झालेल्या सैनिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
       शाही इमाम पुढे म्हणाले की, पाक नेहमीच भारताला धोका देत आला आहे. त्याला आता सहन केले जाऊ नये. पाकचे राज्यकर्तेच आतंकवादाचे सूत्रधार आहेत. अशा शेजारी देशाशी चर्चा होऊ शकत नाही. जो कोणी आतंकवाद करत आहे, त्याला नष्टच केले पाहिजे.
       या वेळी मजलिस अहरार इस्लाम हिंद या संस्थेने हुतात्मा सैनिकांच्या परिवाराला प्रत्येकी एक कोटी रुपयांचे साहाय्य करण्याची मागणी केंद्र सरकारकडे केली.

अंनिसवाल्यांना अधिकारकक्षेच्या बाहेर जाऊन आंदोलनाची अनुमती देणार्‍या पोलीस अधिकार्‍यांवर कारवाई करा ! - शैलेंद्र दीक्षित, हिंदु एकता आंदोलन

हिंदुनिष्ठांना वैध मार्गाने केल्या जाणार्‍या आंदोलनांना वारंवार आडकाठी आणणारे पोलीस मात्र अंनिसवाल्यांच्या अवैध आंदोलनावर कोणतीही कारवाई करत नाही. यावरून पोलिसांना केवळ हिंदुत्वनिष्ठांनाच नाहक त्रास द्यायचा असतो, असे हिंदूंना वाटल्यास चूक ते काय ? ही स्थिती पालटण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे !
  • विवेकवादाची भाषा करणार्‍या अंनिसवाल्यांकडून प्रतिबंधात्मक आदेश झुगारून आंदोलन करण्याचा अविवेकीपणा
  • पोलिसांकडून दाभोलकर कुटुंबियांना पाठीशी घालण्यासाठी अनुमतीपत्राच्या दिनांकामध्ये फेरफार ?
    पुणे, १९ सप्टेंबर (वार्ता.) - डॉ. दाभोलकर यांची हत्या झाल्यानंतर अंनिसवाल्यांकडून प्रत्येक महिन्याच्या २० दिनांकाला येथील विठ्ठल रामजी शिंदे पूलावर आंदोलन केले जाते. २० जून २०१६ या दिवशीही आंदोलन घेऊन अंनिस, तसेच मुस्लिम सत्यशोधक समाज यांच्या कार्यकर्त्यांनी नेहमीप्रमाणे सनातन संस्थेवर आगपाखड केली. वास्तविक शहरात कायदा आणि सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने पुणे पोलिसांनी १८ जून ते १ जुलै या कालावधीत प्रतिबंधात्मक आदेश लागू केले होते. या आदेशान्वये मोठ्याने घोषणा देणे, भाषण करणे, सभा घेणे, तसेच पाचपेक्षा अधिक जणांचा जमाव करणे यांस प्रतिबंध असतो. तरीही अंनिसच्या वतीने प्रतिबंधात्मक आदेश झुगारून २० जून या दिवशी शिंदे पुलावर आंदोलन घेण्यात आले होते. त्यामुळे पोलिसांचे आदेश न जुमानता अवैधरित्या आंदोलन घेणारी अंधश्रद्धा निर्मूलन समिती, अन्य संलग्न संस्था, तसेच या अवैधरित्या आंदोलनाला अनुमती देणारे पोलीस अधिकारी यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी हिंदु एकता आंदोलन पक्षाचे पुणे शहर उपाध्यक्ष श्री. शैलेंद्र दीक्षित यांनी केली आहे. या संदर्भात श्री. दीक्षित यांनी मुख्यमंत्री, तसेच गृहसचिव यांच्याकडे तक्रार नोंदवली आहे.

नागपूरमध्ये मद्यपीकडून वाहतूक पोलिसावर प्राणघातक आक्रमण

नागपूरमध्ये नष्ट 
होत चाललेला कायद्याचा धाक !
      नागपूर, १९ सप्टेंबर - येथील रामझुला परिसरात मद्यप्राशन करून दुचाकी चालवणार्‍या एका दुचाकीस्वाराला वाहतूक पोलीस प्रकाश बारंगे यांनी १४ सप्टेंबर या दिवशी रात्री अडवले. तेव्हा मद्यपी दुचाकीस्वार आणि पोलीस यांच्यामध्ये वादावादी झाली. त्यांच्यातील वाद वाढल्याने मद्यपी दुचाकीस्वाराला पोलीस ठाण्यात नेत असतांना बारंगे यांच्यावर शिरस्त्राण आणि दगड यांच्या साहाय्याने आक्रमण करून तो पसार झाला. या आक्रमणाने बारंगे गंभीर घायाळ झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात प्रविष्ट करण्यात आले आहे. (अशा मद्यपींना कठोर शिक्षा झाल्यासच अन्य गुन्हेगारांना वचक बसेल. तसेच पोलिसांवर होणारी आक्रमणे रोखण्यासाठी ठोस उपाययोजना केल्यासच पोलिसांचे मनोधैर्य टिकून राहील. त्यासाठी गृह विभाग पाऊल उचलेल का ? - संपादक)

डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांना दिली चुकीची औषधे !

  • डॉ. तावडे कारागृह प्रशासनाकडे तक्रार करणार !  
  • कॉ. पानसरे हत्या प्रकरण
         कोल्हापूर - कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरणी विशेष अन्वेषण पथकाने (एस्आयटीने) सनातनचे साधक डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांना अटक केली होती. डॉ. तावडे यांना रक्तदाबाचा त्रास आहे. त्यांची नुकतीच येथील सीपीआर् रुग्णालयात वैद्यकीय तपासणी केल्यानंतर तेथे रक्तदाबाची औषधे न देता त्यांना हृदयावरील शस्त्रक्रियेनंतरची औषधे देण्यात आली. डॉ. तावडे यांनी ही औषधे सेवन केल्यानंतर त्याचा त्यांना त्रास होऊ लागला. त्यामुळे यासंबंधी पुणे येथील येरवडा कारागृह प्रशासनाकडे तक्रार करणार असल्याची माहिती डॉ. तावडे यांची बाजू लढवणारे अधिवक्ता समीर पटवर्धन यांनी दिली. (सनातनच्या आश्रमातील औषधांचा हत्या प्रकरणाशी कोणताही संबंध नसतांना त्याचा बाऊ करणारे पोलीस डॉ. तावडे यांना चुकीची औषधे देऊन त्यांच्या जिवावर उठलेल्या रुग्णालयातील वैद्यकीय अधिकार्‍यांची चौकशी करतील का ? - संपादक)

पालघर जिल्ह्यातील ठक्कर बाप्पा आदिवासी वस्ती सुधारणा योजनेत १०० कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराची शक्यता

       ठाणे, १९ सप्टेंबर - राज्य शासनाच्या आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून आदिवासी गावांचा विकास जलद गतीने व्हावा, यासाठी वर्ष २००७-२००८ पासून ठक्कर बाप्पा आदिवासी वस्ती सुधारणा ही योजना राबवली जात आहे. या योजनेत १०० कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप शिवक्रांती संघटनेचे शरद पाटील यांनी मुख्यमंत्री आणि पालघर जिल्हाधिकारी अभिजीत बांगर यांना दिलेल्या निवेदनातून केला आहे. (या प्रकरणात दोषी असणार्‍यांना तत्परतेने कठोर शासन करावे ! - संपादक)
       निवेदनात पुढे म्हटले आहे की, त्या योजनेअंतर्गत विक्रमगड तालुक्यातील खुडेद आणि घोडीचा पाडा या गावातील मंगल कार्यालयाच्या इमारतीचे काम पूर्ण झाल्याचे दाखवले आहे; पण प्रत्यक्षात तेथे मंगल कार्यालयाची इमारतच अस्तित्वात नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे असून यासंदर्भात चौकशी करावी.

अझर मसूद याला वाजपेयी सरकारच्या काळात सोडल्याचेच परिणाम भारत भोगत आहे ! - काँग्रेस नेते दिग्विजय सिंह

        भारताची फाळणी करून पाकला ५५ कोटी रुपये (आताचे २८ सहस्र कोटी रुपये) देणार्‍या आणि पाकव्याप्त काश्मीरचे प्रकरण संयुक्त राष्ट्रात नेऊन ठेवणार्‍या काँग्रेसच्या चुकांचे फळ भारत अद्यापही भोगत आहे, हे दिग्विजय सिंह का सांगत नाहीत ?
        नवी देहली - उरी येथील सैन्य मुख्यालयावर झालेल्या आक्रमणानंतर काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांनी केंद्रातील भाजप सरकारवर टीका केली आहे. हे सरकार मोठमोठ्या गोष्टी करते; मात्र जे काही घडत आहे त्यातून त्यांचे अपयशच दिसून येत आहे. वाजपेयी सरकारच्या वेळी अझर मसूदसह ५ आतंकवाद्यांची सुटका करण्यात आली होती. त्याची शिक्षा भारत अजूनही भोगत आहे. अझर मसूदच्या जैश-ए-महंमदच्या आतंकवाद्यांनीच हे आक्रमण केल्याचे उघड झाले आहे. ट्वीटरवर प्रतिक्रिया व्यक्त करतांना दिग्विजय सिंह यांनी म्हटले आहे की, आता वेळ आली आहे की, पाकला वेगळे पाडण्यासाठी पाऊल उचलले पाहिजे.

अमेरिकेतील मॉलमध्ये अल्ला म्हणत चाकूद्वारे झालेल्या आक्रमणात ८ जण घायाळ !

वॉशिंग्टन - अमेरिकेतील मिनेसोटा राज्यातील शॉपिंग मॉलमध्ये अल्लाच्या नावाचा उल्लेख करत एका व्यक्तीने केलेल्या भोसकाभोसकीत किमान ८ जण घायाळ झाले आहेत. या आक्रमणकर्त्याला नंतर अधिकार्‍याने ठार केले. आक्रमणकर्त्याने खाजगी सुरक्षा गणवेश घातला होता. त्याने आक्रमणापूर्वी एका व्यक्तीला येथे कुणी मुसलमान आहेत का ?, असे विचारले आणि नंतर आक्रमण केले, असे सेंट क्लाऊड सिटीचे पोलीस प्रमुख ब्लेअर अँडरसन यांनी सांगितले. त्याचा उद्देश नेमका काय होता हे समजू शकलेले नाही आणि तो आतंकवादी होता कि नाही, हे आताच सांगता येणार नाही, असे अँडरसन यांनी स्पष्ट केले.

इतर देशांवर अवलंबून न रहाता आपले युद्ध आपल्यालाच लढावे लागेल ! - लेफ्टनंट जनरल (निवृत्त) डी.बी. शेकटकर

जे एका निवृत्त लष्करी अधिकार्‍याला वाटते, ते एकाही राज्यकर्त्याला का वाटत नाही ?
    पुणे, १९ सप्टेंबर - पाकिस्तानने भारतावर अघोषित युद्ध थोपवले आहे. अघोषित युद्धाला घोषित युद्ध हा पर्याय नाही. त्याला अघोषित युद्धाप्रमाणेच उत्तर द्यावे लागेल. त्यासाठी इंटरसर्व्हिस इंटेलिजन्स (आयएस्आय) आणि पाकिस्तानी सैन्य यांना लक्ष्य केले पाहिजे. त्यासाठी इतर देशांवर अवलंबून राहू नये. जगात कोणतेच राष्ट्र आपले युद्ध लढणार नाही. आपले युद्ध आपल्यालाच लढावे लागेल, असे प्रतिपादन लेफ्टनंट जनरल (निवृत्त) डी.बी. शेकटकर यांनी उरी येथील लष्कराच्या मुख्यालयावर झालेल्या आक्रमणाच्या पार्श्‍वभूमीवर व्यक्त केले.

ठाणे जिल्ह्यातील पाडाळे धरणाच्या भिंतीतून पाण्याची गळती

लघु पाटबंधारे विभागाचा गलथान आणि समाजद्रोही कारभार !
    ठाणे, १९ सप्टेंबर - येथील मुरबाड तालुक्यातील खुटारवाडी, वडाचीवाडी आणि पाडाळे हद्दीमध्ये लघु पाटबंधारे विभागाने मातीचे धरण ४ वर्षांपूर्वी बांधले आणि सिमेंटच्या २ भिंती बांधून सांडवा बनवला आहे. सध्या या धरणाच्या सांडव्याच्या एका भिंतीतून पाण्याच्या चिळकांड्या उडत आहेत. धरणाच्या संरक्षण भिंतीमधून पाणी झिरपत आहे. (धरणाचे बांधकाम किती निकृष्ट दर्जाचे असेल, हेच यावरून सिद्ध होते. - संपादक) तो सांडवा आणि बंधारा याची देखभाल दुरुस्ती लघु पाटबंधारे विभाग आणि ठेकेदार यांच्याकडे आहे; परंतु देखभाल दुरुस्ती करणारा ठेकेदार हा आंध्र प्रदेशातील असल्याने या धरणाकडे दुर्लक्ष होत आहे. (देखभाल दुरुस्तीसाठी राज्यातील एकही ठेकेदार मिळाला नाही कि त्यामध्येही काही काळेबेरे आहे ? - संपादक) गेल्या मासापासून त्यातच या धरणालगतच्या गावामध्ये जमिनीतून गूढ आवाज येत असून भूकंपाचे धक्केही जाणवत आहेत.

मराठा समाजाच्या मोर्च्यासाठी दशक्रिया विधी एक दिवस अगोदर करण्याचा निर्णय

जातीपातीच्या राजकारणाला प्राधान्य देत धर्मपरंपरांचे उल्लंघन करणे अयोग्यच !
    श्रीगोंदा - नगर शहरात २३ सप्टेंबरला आयोजित केलेल्या मराठा समाजाच्या मोर्च्यासाठी तालुक्यातील हिरडगाव येथील एका कुटुंबाने घरातील ज्येष्ठ व्यक्तीच्या निधनानंतर करण्यात येणारा दशक्रिया विधी एक दिवस अगोदर म्हणजे २२ सप्टेंबरला करण्याचा निर्णय घेतला आहे. २३ सप्टेंबरच्या मोर्च्यात नातेवाइकांसह सर्वांना जाता यावे, तसेच मोर्च्याला जाणार्‍या मराठा बांधवांची अडचण होऊ नये, यासाठी सदर कुटुुंबियांनी हा निर्णय घेतला आहे.

सांगली येथे जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन

      सांगली - काश्मीर येथील लष्करी तळावर आक्रमण करून सैनिकांचे बळी घेणार्‍या पाकला धडा शिकवण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल तहसीलदार श्री. योगेश खरमाटे यांना निवेदन देण्यात आले. या वेळी शिवसेनेचे श्री. धमेंद्र कोळी, श्रीशिवप्रतिष्ठानचे श्री. सचिन पवार, धर्मजागरण मंचचे श्री. चंद्रकांत आवळे, हिंदु धर्माभिमानी श्री. किरण बुटाले आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. संतोष देसाई उपस्थित होते.

पाकला जशास तसे उत्तर द्या ! - योगऋषी रामदेवबाबा

       कोलकाता - पंतप्रधान मोदी यांनी बुद्ध आणि युद्ध यांवर बोलले पाहिजे. केवळ बोलून नव्हे, तर प्रत्यक्षात जशास तसे उत्तर दिले पाहिजे, अशी प्रतिक्रिया योगऋषी रामदेवबाबा यांनी उरी येथील आक्रमणाविषयी व्यक्त केली आहे. भारताने नेहमीच अहिंसेचा गौरव केला आहे. तसेच वीरतेलाही तितकाच गौरव दिला पाहिजे, असेही ते म्हणाले. रामदेवबाबा पुढे म्हणाले की, पाकव्याप्त काश्मीरमधील आतंकवादी प्रशिक्षण केंद्रांत घुसून आक्रमण केले पाहिजे. ही केवळ माझी मागणी नाही, तर देशातील जनतेची इच्छा आहे. प्रतीदिन मार खायचा नाही. कोणत्याही वीर देशाला हे लज्जास्पद आहे.

पापस्तानला नेस्तनाबूत करा !

जळगाव येथे हिंदुत्वनिष्ठांची मोदी शासनाकडे मागणी
मोर्च्यात सहभागी हिंदुत्वनिष्ठ
जळगाव - उरी येथे भारतीय सैन्यावर झालेल्या आतंकवादी आक्रमणाच्या निषेधार्थ जळगाव येथे स्वराज्य निर्माण सेनेच्या वतीने १९ सप्टेंबरला मूक मोर्च्याचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्च्यात शिवसेना, हिंदु महासभा, वकील संघ, सार्वजनिक गणेश महामंडळ, शिवगंध ढोल पथकातील महिला, महिला आघाडी, हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था या हिंदुत्वनिष्ठ संघटना, तसेच माहिती अधिकार कार्यकर्ते श्री. दीपक गुप्ता, सामाजिक कार्य करणारे श्री. दीपक जोशी, श्री. नारायण अग्रवाल आदींनी सहभाग घेतला होता. शिवतीर्थापासून आरंभ झालेल्या या मोर्च्याची सांगता जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ झाली. या वेळी जिल्हाधिकार्‍यांना निवेदन दिले.

पुणे आणि कल्याण येथील गणेशोत्सवात कुटुंब आणि राष्ट्र यांच्यासाठी सैराट होण्याचे आवाहन करणारे देखावे सादर

   मुंबई, १९ सप्टेंबर (वार्ता.) - सध्या समाजात सैराट मराठी चित्रपटाचे वेड असल्यामुळे त्या चित्रपटाच्या माध्यमातून तरुण पिढीसमोर चुकीचा आदर्श ठेवला. या चित्रपटाचा दुष्परिणाम इतका झाला की, शालेय विद्यार्थी पळून जाण्याच्या घटनाही घडल्या आहेत. त्या चित्रपटाचे वेड न्यून होण्यासाठी कुटुंब आणि राष्ट्र यांच्यासाठी सैराट होण्याचे आवाहन करणारे देखावे गणेशोत्सवातही दिसून आले. पुण्यामध्ये अलका चौकातील समाज विकास मंडळ आणि कल्याणमधील कदम बंधू यांनी केलेल्या देखाव्यात कुटुंब आणि राष्ट्र यांसाठी सैराट होण्याचे आवाहन केले होते. हे दोन्ही देखावे समाजाच्या डोळ्यात अंजन घालणारे होते.

शिवसेना निरपेक्षपणे धर्मकार्य करणार्‍या सनातनच्या साधकांच्या पाठीशी ! - धर्मेंद्र कोळी, शिवसेना

सांगली येथे १७ सप्टेंबर या दिवशी झालेले राष्ट्रीय हिंदू आंदोलन
     सांगली - सध्याच्या काळात हिंदू सुरक्षित नाहीत. बलात्कारांचे प्रमाण वाढत असल्याने महिलाही असुरक्षित आहेत. सनातनचे साधक धर्मकार्य निरपेक्षपणे करत असून शिवसेना त्यांच्या पाठीशी आहे, असे प्रतिपादन शिवसेनेचे श्री. धर्मेंद्र कोळी यांनी केले. ते येथील राष्ट्रीय हिंदू आंदोलनात बोलत होते. 
अन्य मान्यवरांचे विचार 
गोरक्षणासाठी आम्ही बलीदान देण्यासही मागे-पुढे पहाणार नाही ! 
- सचिन पवार, श्रीशिवप्रतिष्ठान 
      सध्याच्या काळात गोहत्या करणार्‍यांवर कोणतेही निर्बंध नसून गोरक्षा करणार्‍यांना पकडले जातात. गोरक्षणासाठी आम्ही बलीदान देण्यासही मागे-पुढे पहाणार नाही. सनातन संस्था धर्म, संस्कृती यांचे ज्ञान देते. अशा संस्थेच्या साधकांवर खोटे आरोप केले जातात. मडगाव स्फोट प्रकरणांत सहा वर्षांनंतर साधकांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. भगवंतावर आमचा विश्‍वास आहे. या कार्याच्या शेवटपर्यंत आमचा भगवा त्यांच्या पाठीशी आहे.

पिंपरी-चिंचवड येथे यंदा ६ सहस्रच्या संख्येत गणेश मूर्तीदान अल्प ! - संस्कार प्रतिष्ठानचे अध्यक्ष मोहन गायकवाड

हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांनी शास्त्रसुसंगत राबवलेल्या मोहिमेचे सुयश !
      पिंपरी, १९ सप्टेंबर - येथील विविध घाटांवर प्रदूषणाचे कारण पुढे करत प्रतीवर्षीप्रमाणे यंदाही गणेश मूर्तीदान करण्याचे धर्मद्रोही आवाहन संस्कार प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले होते. हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते आणि सनातन संस्थेचे साधक हे गणेशमूर्ती विसर्जनास येणार्‍या भाविकांचे प्रबोधन करत त्यांना वहात्या पाण्यात मूर्ती विसर्जनाचे शास्त्र सांगत होते. परिणामतः गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी ६ सहस्रच्या संख्येत मूर्तीदान अल्प झाले. या वर्षी एकूण २१ सहस्र ३२२ मूर्तीदान, तर ३६ टन निर्माल्य गोळा केले, अशी माहिती संस्कार प्रतिष्ठानचे अध्यक्ष मोहन गायकवाड यांनी दिली.

सरकार पक्षाने म्हणणे मांडण्यासाठी मुदत मागितली

डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांची छायाचित्रे प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिद्ध झाल्याचे प्रकरण
   कोल्हापूर, १९ सप्टेंबर (वार्ता.) - सनातन संस्थेचे साधक डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांची छायाचित्रे प्रसारमाध्यमांत प्रसिद्ध झाल्याच्या प्रकरणी ८ सप्टेंबर या दिवशी कोल्हापूर पोलिसांच्या विरोधात अवमान याचिका प्रविष्ट करण्यात आली आहे. या प्रकरणात म्हणणे मांडण्यासाठी सरकार पक्षाने मुदत मागितली आहे. त्यामुळे या प्रकरणाची सुनावणी आता २६ सप्टेंबर या दिवशी होईल. ही सुनावणी सातवे सहदिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर) श्रीमती व्ही.व्ही. पाटील यांच्यासमोर चालू आहे.

मराठा आरक्षणावर मुंबई उच्च न्यायालयात दाद मागावी ! - सर्वोच्च न्यायालय

    नवी देहली - मराठा आरक्षणाच्या प्रश्‍नावर प्रविष्ट करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार देतांना त्या संदर्भात उच्च न्यायालयात दाद मागण्याचे निर्देश याचिकाकर्त्याला दिले आहेत. या वेळी राज्य सरकारच्या वतीने याचिकाकर्त्याला पूर्ण सहकार्य करण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले. मराठा आरक्षणावरून प्रलंबित याचिका तातडीने निकाली काढण्याविषयी विनोद पाटील यांनी केलेली विनंती याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळल्यानंतर पाटील यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. राज्यातील मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षणात १६ टक्के आरक्षण देण्याविषयीच्या निर्णयाला आव्हान देणार्‍या याचिका मुंबई उच्च न्यायालयात अद्यापही प्रलंबित आहेत.

लातूर, अकोला आणि जालना येथे मराठा समाजाचे मूक मोर्चे

   मुंबई, १९ सप्टेंबर - कोपर्डी घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी, अ‍ॅट्रॉसिटी कायद्याचा दुरुपयोग टाळण्यासाठी सक्षम यंत्रणा उभारावी, मराठा समाजाला आरक्षण द्यावे आदी विविध मागण्यांसाठी लातूर, जालना आणि अकोला येथे १९ सप्टेंबर या दिवशी विराट मूक मोर्च्याचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चामध्ये लक्षावधी नागरिक सहभागी झाले होते. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर, माजी मंत्री राजेश टोपे, पालकमंत्री बबनराव लोणीकर, भोकरदनचे आमदार संतोष दानवे आदींसह अनेक नेते मोर्चाला उपस्थित होते. यापुढे मराठा क्रांती मूक मोर्च्यांचे आयोजन पुणे, सातारा, सांगली, नवी मुंबई आणि सोलापूर या शहरांमध्येही करण्यात आले आहे.

पुण्यात आवाजाची पातळी ओलांडणार्‍या ४४६ गणेश मंडळांवर गुन्हे प्रविष्ट

कायदा-सुव्यवस्थेचा अभाव, कठोर शिक्षेचा अभाव आणि 
कायद्याची कठोर अंमलबजावणी न करणे याच गोष्टी अशा घटनांना कारणीभूत !
     पुणे, १९ सप्टेंबर - नुकत्याच झालेल्या गणेशोत्सवामध्ये पुणे पोलीस आयुक्तालयाच्या परिक्षेत्रामध्ये न्यायालयाने ठरवून दिलेली आवाजाची पातळी ओलांडणार्‍या ४४६ गणेश मंडळांवर गुन्हे प्रविष्ट करण्यात आले आहेत. त्यामध्ये परिमंडळ-१ मध्ये ९२, परिमंडळ-२ मध्ये ११४, परिमंडळ-३ मधील ११५ आणि परिमंडळ-४ मध्ये सर्वाधिक म्हणजे १२५ गणेश मंडळावर गुन्हे प्रविष्ट करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या हद्दीतील एकाही गणेश मंडळाने नियमबाह्य वर्तन केले नाही.पुण्यात कृत्रिम हौदांमधील गणेशमूर्ती पालिकेकडून खाणीत विसर्जित

धर्मद्रोही पुणे महानगरपालिकेकडून भाविकांची फसवणूक चालूच !
      पुणे, १९ सप्टेंबर - अनंत चतुर्दशीला, म्हणजेच १५ सप्टेंबर या दिवशी भाविकांनी श्री गणेशमूर्तींचे कृत्रिम हौद आणि लोखंडी टाक्यांमधील पाणी यांत विसर्जन केले होते. त्या गणेश मूर्ती वाघोली येथील खाणीत पुन्हा विसर्जित केल्याची माहिती पुणे महानगरपालिकेचे सहआयुक्त सुरेश जगताप यांनी दिली. 
    ते पुढे म्हणाले की, त्या हौदांमध्ये अमोनिअम बायकोर्बोनेट घातले असल्याने विसर्जित केलेल्या मूर्ती विरघळल्या आहेत. त्या मूर्ती वाघोली येथील खाणीत नेण्यासाठी ४० ट्रकची व्यवस्था करण्यात आली होती. एकूणच या प्रक्रियेवर नियंत्रण ठेवण्यासाठी वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी नेमले होते.

महिलांनी इतिहासातील वीरांगनांचा आदर्श घेऊन वाटचाल करायला हवी ! - सौ. सुनीता दीक्षित, रणरागिणी शाखा

अकलूज येथील सुजयनगर गणेश मंडळाच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन
      अकलूज (जिल्हा सोलापूर), १९ सप्टेंबर (वार्ता.) - गर्दीच्या ठिकाणी होणारी छेडछाड, तसेच उत्सवांतील अपप्रकार किंवा लव्ह जिहाद यांसारख्या घटना असोत, महिलांनी त्यांचा विरोध करायला शिकले पाहिजे. महिलांनी झाशीची राणी लक्ष्मीबाई, पुण्यश्‍लोक अहल्याबाई होळकर या इतिहासातील वीरांगनांचा आदर्श घेऊन वाटचाल करायला हवी, असे मत रणरागिणी शाखेच्या सौ. सुनीता दीक्षित यांनी व्यक्त केले. सुजयनगर गणेश मंडळाच्या वतीने आयोजित केलेल्या व्याख्यानात त्या बोलत होत्या. 
      त्या पुढे म्हणाल्या, स्वसंरक्षण प्रशिक्षण घेऊन सक्षम होणे, तसेच धर्माचरण करणे ही काळाची आवश्यकता आहे. प्रत्येक स्त्रीने चूल आणि मूल यांतून वेळ काढून बाहेरच्या जगात घडणार्‍या घटनांकडे डोळसपणे पहायला शिकले पाहिजे. या वेळी सुजयनगर गणेश मंडळाच्या वतीने सौ. दीक्षित यांचा शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला १५० जणांची उपस्थिती होती.

प्रतिज्ञापत्र सादर करण्यास टाळाटाळ करणार्‍या सोलापूर महानगरपालिका आयुक्तांना मुंबई उच्च न्यायालयाकडून दंड !

उच्च न्यायालयाच्या आदेशाला वाटाण्याच्या अक्षता लावणारे 
पालिका आयुक्त कायद्याचे किती पालन करत असतील, याविषयी शंकाच आहे !
      मुंबई, १९ सप्टेंबर - सोलापूर महानगरपालिकेतील परिवहन विभागाच्या कर्मचार्‍यांना ६ वा वेतन आयोग आतापर्यंत का लागू केला नाही, याविषयी मुंबई उच्च न्यायालयाने सोलापूरच्या पालिका आयुक्तांना प्रतिज्ञापत्र सादर करण्याचा आदेश वर्ष २०१५ मध्ये दिला होता. तेव्हापासून न्यायालयाने ३ वेळा संधी देऊनही आतापर्यंत आयुक्तांनी प्रतिज्ञापत्र सादर करण्यास टाळाटाळ केल्याने आयुक्तांना ३० सहस्र रुपयांचा दंड भरण्याचा आदेश न्यायमूर्ती अनुप मोहता आणि न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपिठाने दिला. सोलापूर परिवहन विभागातील कर्मचार्‍यांनी उच्च न्यायालयात प्रविष्ट केलेल्या याचिकेवरील १७ सप्टेंबर या दिवशी झालेल्या सुनावणीच्या वेळी वरील आदेश दिला आहे.वसई येथे घर देण्यास विरोध केल्याने मुसलमानाकडून तक्रार प्रविष्ट

मुसलमानाचा उद्दामपणा !
११ जणांवर गुन्हा नोंद
     वसई - येथील हॅपी हाऊसिंग सोसायटीमध्ये घर देण्यास विरोध केल्याप्रकरणी अहमद खान या मुसलमानाने दिलेल्या तक्रारीनुसार तेथील ११ जणांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. 
      खान यांना सोसायटीतील कांताबेन पटेल स्वत:चे घर विकणार होत्या; मात्र तसे केल्यास इमारतीतील वातावरण बिघडेल, तसेच त्यांच्याकडून मांसाहार शिजवण्यात येईल, या कारणांमुळे सोसायटी कमिटीने विरोध केला. कमिटीने सोसायटीत मुसलमान घर खरेदी करू शकत नाही, असा प्रस्ताव पारित केला; मात्र कांताबेन यांनी खान यांना घर विकण्यास हरकत घेतलेली नाही.

ठाणे येथे बकरी ईदच्या दिवशी हिंदु पती आणि मुसलमान पत्नी यांची हत्या

     ठाणे - येथील डायघर परिसरात विवाहित हिंदु तरुण आणि त्याची मुसलमान पत्नी यांची धारदार शस्त्राने बकरी ईदच्या दिवशी हत्या करण्यात आली. ही विवाहिता गर्भवती होती. मूळचे उत्तरप्रदेशातील असलेले हे जोडपे दीड वर्षांपासून येथे रहात होते. निकटवर्तियांकडून ही हत्या झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
    गेल्या चार दिवसांपासून दोघांना कुणीही पाहिले नव्हते. त्यांच्या घरातून प्रचंड दुर्गंधी येत होती. पोलिसांना याविषयी कळवण्यात आले. पोलिसांनी दरवाजा उघडल्यानंतर दोघांची हत्या झाल्याचे समजले. डायघर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा प्रविष्ट करण्यात आला आहे. तसेच तपासासाठी पोलिसांची पथके उत्तरप्रदेशात तरुणाच्या मूळ गावी गेली आहेत.

पोलिसांच्या संदर्भातील कटू अनुभव !

        सध्या सनातनचे साधक आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते यांना पोलिसांच्या शारीरिक आणि मानसिक छळाला सामोरे जावे लागत आहे. या अनुषंगाने विविध ठिकाणच्या पोलिसांविषयी सनातनचे साधक, हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते किंवा हिंदुत्वनिष्ठ यांना यापूर्वीही पोलिसांच्या सतावणुकीविषयी आलेले अनुभव येथे क्रमशः प्रसिद्ध करत आहोत.
साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यावर अमानुष 
अत्याचार करणारे मुंबई आतंकवादविरोधी पथक !
        मालेेगाव बाँबस्फोट प्रकरणी ८ वर्षांपासून कारागृहात असलेल्या साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यावर कथित गुन्हा स्वीकारण्यासाठी आतंकवादविरोधी पथकाकडून अनन्वित अत्याचार करण्यात आले. या अत्याचारांची भोपाळ येथील मध्यवर्ती कारागृहात जाऊन गुन्हे अन्वेषण विभागाने साध्वी प्रज्ञा यांची साक्ष नोंदवून दखल घेतली.
साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी सांगितले की,
१. मुंबई येथे गेल्यावर मुंबई आतंकवादविरोधी पथकाने ११ ऑक्टोबर ते २३ ऑक्टोबर २००८ या कालावधीत त्यांना अमानुष मारहाण केली; तसेच वेश्या यांसारख्या हीन स्तरावरच्या शिव्या दिल्या.

संत आणि विचारजंत !

१. मदर तेरेसांवर अग्रलेख लिहिणार्‍या प्रतिष्ठित वृत्तपत्राला 
धमकी मिळणे आणि नंतर त्या वृत्तपत्राने सदर अग्रलेख मागे घेणे !
      आजपासून जवळपास ६ मासांपूर्वी मराठीतील एका प्रतिष्ठित वर्तमानपत्रात एक अग्रलेख आला होता. त्या लेखात मदर तेरेसा यांच्यावर खरपूस टीका झाली होती; पण दुसर्‍याच दिवशी हा लेख वृत्तपत्राने मागे घेतला. त्याविषयी कुठलेही स्पष्टीकरण दिले गेले नाही. हा तडफदार अग्रलेख तडकाफडकी मागे घेतला गेला; कारण मदर तेरेसांवर अशा स्वरूपाचा अग्रलेख लिहिल्यामुळे त्या धर्मातील सज्जनांच्या भावना दुखावल्या जाऊन त्याची परिणती सदर वृत्तपत्राच्या प्रती मोठ्या प्रमाणात जाळण्यात झाली होत्या. संपादकाला बघून घेऊ, अशा स्वरूपाच्या धमक्या दिल्या गेल्या. अर्थात् या सर्व गोष्टी सदर वृत्तपत्राने कधीच जाहीर केल्या नाहीत; पण वृत्तपत्राचे संपादक त्याच वृत्तपत्रात एक सदर लिहितात. त्यातून त्यांनी हे सांगायचे काम केले. या सगळ्या प्रकारात वृत्तपत्राचा नेभळट स्वभाव दिसला म्हणण्यापेक्षा त्या वृत्तसमूहाची घाबरट वृत्ती दिसली. मग मन काही काळ मागे, म्हणजे जवळपास १२ मास मागे गेले.

रामसेतूच्या रक्षणाचे शिलेदार डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांची न्यायाधिशांकडे सेतू समुद्रम् हा प्रकल्प रहित करण्याची मागणी !

डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी
        त्रेतायुगात हनुमान आणि त्याच्या वानरसेनेने श्रीरामाला रावणाच्या लंकेत सीतेला सोडवण्यासाठी जायला रामेश्‍वरम् येथे रामसेतू बांधला, याला वैज्ञानिक आधार उपलब्ध आहे. तो सेतू तोडून श्रीलंका आणि भारत यांच्यामधील अंतर अल्प करण्यासाठी लघू जलमार्ग बनवण्याच्या सेतू समुद्रम् या केंद्रशासनाच्या प्रकल्पाविरुद्ध माजी केंद्रीयमंत्री आणि जनता पक्षाचे अध्यक्ष डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांनी न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर न्यायालयात सुनावणी चालू असतांना न्यायालयाने रामसेतूची पूजा करण्यासाठी समुद्रात कोण जातो ?, असा खोचक प्रश्‍न विचारला होता. त्यावर श्री. सुब्रह्मण्यम् स्वामी यांनी केलेला सडेतोड युक्तीवाद देत आहोत.

बलुचिस्तानमध्ये रहात आहेत पेशवे आणि मराठे यांचे वंशज !

        पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनी केलेल्या भाषणानंतर बलुचिस्तान चर्चेचा विषय बनला आहे; मात्र आश्‍चर्याची गोष्ट अशी की, बलुचिस्तानच्या १ कोटी ३१ लाख लोकसंख्येपैकी २० लाख लोकसंख्या ही मराठ्यांची वंशज आहे. इंग्रजी राजवटीपूर्वी अफगाणिस्तानचा भाग असलेला बलुचिस्तान नंतर भारताचा भाग बनला. वर्ष १९४७ मध्ये विभाजनानंतर बलुचिस्तानला बलपूर्वक पाकिस्तानमध्ये विलीन करण्यात आले. तेव्हापासून बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यासाठी ४ मोठ्या क्रांती झाल्या. या सर्वांचे नेतृत्व मराठ्यांच्या वंशजांनी केले होते.

भक्तीविरहित गणेशोत्सव : हिंदूंच्या दैन्यावस्थेचे लक्षण !

      हिंदूंचे आराध्य दैवत श्रीगणरायाचा जयजयकार करणारा गणेशोत्सव नुकताच पार पडला. त्याच्या स्मृती हिंदूंच्या मन:पटलावर ताज्या आहेत. या पार्श्‍वभूमीवर गणेशोत्सवाच्या काळात हिंदूंकडूनच उत्सवात होणारे अपप्रकार आणि गणरायाचा होत असलेला घोर अनादर यांवर गांभीर्याने दृष्टीक्षेप टाकणे आवश्यक आहे. यातून आपण शिकलो, तर येणार्‍या नवरात्रोत्सवात आणि नंतरही अशा घोडचुका टाळण्यासाठी प्रयत्न होऊ शकतील. यासाठीच हा लेखप्रपंच ! सदर लेख हा मागील वर्षीच्या गणेशोत्सवासंदर्भात असला, तरी तो आजही तेवढाच समर्पक आहे.
     मागील वर्षी गणेश चतुर्थीच्या कालावधीत मुंबईत असल्याने फार वर्षांनी मला तेथील गणेशोत्सव पहाण्याची संधी मिळाली. त्या वेळी गणेशोत्सवाच्या सद्यस्थितीसंदर्भात काही सूत्रे लक्षात आली. ती पुढे देत आहे.

मंदिर कि क्रीडाक्षेत्र ?

      एका मराठी वाहिनीवरील एका खेळाचे कार्यक्रम नुकतेच पहाण्यात आले. हे कार्यक्रम पटांगण, वसाहती किंवा इमारत येथे आयोजित न करता गणेशोत्सवाच्या निमित्ताने चक्क गणेश मंदिरातच आयोजित केले होते. शहरातील खेळण्यासाठीच्या सर्वच जागा संपल्या कि काय, असा प्रश्‍न पडला. मंदिरातही सभोवतालच्या परिसरात नव्हे, तर अगदी गणपतीबाप्पाच्या मूर्तीसमोरच खेळ खेळले गेले. खेळ खेळणारे कुणी अन्य धर्मीय नसून गणेशाची आराधना करणारे जन्महिंदूच होते. ज्या गणेशाला आपण गणेशचतुर्थीच्या कालावधीत पूजतो, त्याची आरती करतो, त्याला मनोभावे नमस्कार करतो, आपल्या मनोकामना पूर्ण होण्यासाठी त्याला साकडे घालतो, त्याचे आशीर्वादही घेतो, त्याच देवापुढे खेळ खेळला जातो, याचे हिंदूंना काहीच कसे वाटत नाही, असे वाटून संताप आला. मंदिरातील पावित्र्य, सात्त्विकता टिकवणे राहिले बाजूलाच; पण चेंडूच्या साहाय्याने खेळ खेळून तेथील धर्मश्रद्धा एकप्रकारे पायदळी तुडवल्यासारखेच झाले.

पितृपक्षातील श्राद्ध !

       हिंदु धर्माने सांगितलेल्या ईश्‍वरप्राप्तीच्या मूलभूत सिद्धांतांपैकी एक म्हणजे देवऋण, ऋषिऋण, पितृऋण आणि समाजऋण ही चार ऋणे फेडणे होय. यांपैकी पितृऋण फेडण्यासाठी श्राद्ध आवश्यक असते. माता-पिता, तसेच निकटवर्तीय यांचा मृत्यूनंतरचा प्रवास हा सुखमय आणि क्लेशरहित व्हावा, त्यांना सद्गती मिळावी यांसाठीचा संस्कार म्हणजेच श्राद्ध. श्राद्धातील मंत्रोच्चारांमध्ये पितरांना गती देण्याची सूक्ष्म शक्ती सामावलेली असते. श्राद्धात पितरांना हविर्भाग दिला गेल्याने ते संतुष्ट होतात. याउलट श्राद्ध न केल्यास पितरांच्या इच्छा अतृप्त राहिल्यामुळे, तसेच असे वासनायुक्त पितर वाईट शक्तींच्या नियंत्रणात जाऊन त्यांचे दास (गुलाम) झाल्याने वाईट शक्तींनी पितरांचा उपयोग करून कुटुंबियांना त्रास देण्याची शक्यता अधिक असते. श्राद्धामुळे पितरांची या त्रासांतून मुक्तता होऊन आपले जीवनही सुसह्य होते.

हिंदु संस्कृती आणि पाश्‍चात्त्य संस्कृती यातील भेद

      पाश्‍चात्त्य संस्कृती बाहेरचे जग बघायला आणि अनुभवायला शिकवते, तर हिंदु संस्कृती आपल्या हृदयातील भगवंताला पहायला आणि अनुभवायला शिकवते.
- श्री. राम होनप, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२१.५.२०१६)
      घर, संस्कृती आणि देवालय हे हिंदु समाजाचे केंद्रबिंदू आहेत. सद्यस्थितीत ही जीवनव्यवस्था मोडकळीस आली आहे. त्यामुळे अराष्ट्रीयतेचे संकट आपल्यासमोर उभे ठाकले आहे. ते दूर करण्यासाठी धार्मिकता आणि राष्ट्रीयता यांची सांगड घालावी लागेल. तरच आपण हिंदु म्हणून जगू शकू ! - प्राचार्य सुभाष वेलींगकर, गोवा

कोल्हापूर येथे १७ सप्टेंबर २०१६ या दिवशी सनातन संस्थेने घेतलेल्या पत्रकार परिषदेचे वृत्त प्रसिद्ध करणारी आणि न करणारी वृत्तपत्रे

  
सनातन संस्थेच्या विरोधातील वृत्तांना वृत्तपत्रे अन्य वेळी ठळक प्रसिद्धी देतात; परंतु सनातनची बाजू मांडणार्‍या वृत्तांना मात्र अल्प प्रसिद्धी दिली जाते. यातून वृत्तपत्रांची दुटप्पी भूमिका आणि सत्यकथन न करण्याची वृत्ती दिसून येते. - संपादक

सनातनचे संत पू. नंदकुमार जाधव यांना आश्रमात सिद्ध केलेल्या श्री दुर्गादेवीच्या मूर्तीकडे पाहिल्यावर शक्ती जाणवणे

पू. नंदकुमार जाधव
१. सनातन संस्था सिद्ध करत असलेली श्री दुर्गादेवीची 
मूर्ती अपूर्ण अवस्थेत असूनही तिच्यात शक्ती जाणवणे
     सनातन संस्थेने सात्त्विक गणेशमूर्ती सिद्ध केली आणि तिच्या अनुभूती समाजातही अनेकांना आल्या. आता संस्था श्री दुर्गादेवीची अष्टभुजा आणि एका पायावर उभी असलेली मूर्ती सिद्ध करत आहोत. ती सेवा चालू असतांना मी त्या मूर्तीचे अपूर्ण अवस्थेतील रूप पाहिले आणि मला तिच्यामध्ये पुष्कळ शक्ती आहे, असे जाणवले. मी त्या मूर्तीच्या मागे उभा असतांना मला माझे शरीर पुढे-मागे हलत आहे, असे वाटले. मूर्ती संपूर्ण सिद्ध झाल्यावर यापेक्षाही अधिक शक्ती असेल, असे वाटले.

साधकाच्या निरीक्षणाचे कौतुक करणारे आणि पुनःपुन्हा आश्रमदर्शनाची इच्छा प्रगट करणारे पुणे येथील संत प.पू. आबा उपाध्ये आणि पू. (सौ.) मंगला उपाध्ये यांनी लिहिलेले पत्र !

प.पू. आबा उपाध्ये आणि पू. (सौ.) मंगला उपाध्ये
      ३०.८.२०१६ या दिवशीच्या दैनिक सनातन प्रभातमध्ये सनातनचे साधक श्री. परशुराम गोरल यांनी पुणे येथील संत प.पू. आबा उपाध्ये आणि पू. (सौ.) मंगला उपाध्ये यांच्याविषयी लिहिलेला लेख प्रसिद्ध झाला होता. तो वाचून प.पू. आबा आणि पू. (सौ.) मंगला उपाध्ये यांनी श्री. परशुराम यांना पाठवलेले पत्र पुढे देत आहोत.

प.पू. गुरुदेवांनी प्रत्येक क्षणी आणि प्रत्येक कृतीतून सहजतेने दिलेली अनमोल शिकवण !

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले 
यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त... 
        वर्ष १९९० मध्ये श्री. मनोज कुवेलकर मुंबईत नोकरी करत होते. वर्ष १९९३ मध्ये सनातन संस्थेशी परिचय होऊन त्यांनी साधनेला आरंभ केला आणि वर्ष १९९५ पासून पूर्ण वेळ साधना चालू केली. त्या वेळी ते ग्रंथ निर्मितीच्या सेवेत असल्याने त्यांना प.पू. डॉक्टरांचा सहवास लाभला. प.पू. डॉक्टर सेवा करणार्‍या साधकांना लहान लहान उदाहरणांतून सहजतेने चुका दाखवून परिपूर्ण सेवा करायला शिकवत. याविषयीची काही उदाहरणे येथे देत आहोत.
१. सनातनच्या ग्रंथ निर्मितीची प्रक्रिया
१ अ. प.पू. गुरुदेवांनी हाताने केलेल्या लिखाणाचे टंकलेखन करून त्याचे मुद्रितशोधन केले जाणे : मी शीव सेवाकेंद्रात असतांना ग्रंथाची सेवा करत होतोे. त्या वेळी प.पू. गुरुदेव हाताने ग्रंथांचे लिखाण करून ते मला टंकलेखन करायला सांगायचे. टंकलेखन झाल्यावर त्याची छापील प्रत (प्रिंट) काढून मी ती प.पू. गुरुदेवांना द्यायचो. नंतर त्यात काही सुधारणा किंवा नवीन लिखाण केले असेल, तर तसे लिहून प.पू. गुरुदेव सुधारणा करण्यासाठी ते मला परत द्यायचे. सुधारणा झाल्यावर मी पुन्हा त्याची छापील प्रत काढायचो. त्यानंतर सेवाकेंद्रात सेवेला येणार्‍या इतर साधकांना जुनी आणि नवीन छापील प्रत मुद्रित शोधनासाठी दिली जायची.

कु. विनंती मळीक यांनी साधनेविषयी सांगितलेली महत्त्वपूर्ण सूत्रे

कु. श्रद्धा तारी
१. साधनेचे प्रयत्न चांगले होऊ लागल्यावर 
ईश्‍वर साधकाच्या साधनेचे दायित्व घेतो !
      सर्वकाही ईश्‍वराची इच्छा असते. साधक साधना चांगली करून पुढे-पुढे जातात. साधक करत असलेल्या चांगल्या प्रयत्नांमुळे ईश्‍वर त्याच्यावर प्रसन्न होतो; म्हणून साधकाच्या या प्रयत्नांत अजून कशी वाढ होईल ?, या विचाराने ईश्‍वर त्याच्या साधनेचे दायित्व घेतो. 
२. निरागस भक्ती करणार्‍याला ईश्‍वराची 
ओळख सहज होऊ लागते !
      ईश्‍वर स्वतःची ओळख कधीच देत नाही. जो त्याच्यावर निरागस भक्ती करतो, त्याला ईश्‍वराची ओळख सहज होऊ लागते; कारण ते भक्तीतील एक बीज आहे.

लेखा सेवा करतांना डॉ. (सौ.) मधुवंती पिंगळे यांना झालेले त्रास, आलेल्या अनुभूती आणि त्यांचे झालेले चिंतन

(डॉ.) सौ. मधुवंती पिंगळे
       सनातनच्या लेखा विभागात सेवा करणार्‍या डॉ. (सौ.) मधुवंती पिंगळे या कर्नाटक राज्यातील जिल्ह्यांमध्ये लेखा सेवा करण्यासाठी गेल्या होत्या. त्यांना १५.८ ते १५.९.२०१४ या कालावधीमध्ये पुष्कळ त्रास झाले. त्यांना झालेले त्रास, त्या वेळी त्यांना आलेल्या अनुभूती, त्यावर त्यांचे झालेले चिंतन आणि त्यांतून त्यांना शिकायला मिळालेली सूत्रे येथे देत आहोत. १९ सप्टेंबर या दिवशी त्रासांचे स्वरूप आणि त्यावर केलेले उपाय हा भाग पाहिला. आज त्या पुढील भाग पाहूया.
२. शिकायला मिळालेली सूत्रे
२ अ. शरणागत भाव निर्माण होण्यासाठीच देवाने प्रसंग घडवल्याची जाणीव होणे : मला देवाने या सर्व प्रसंगांतून पुष्कळ शिकवले आणि माझ्या मनाची सिद्धता करवून घेतली. माझे प्रारब्ध संपवले, तसेच साधना अन् सेवाही करवून घेतली. देवा, कोणत्या शब्दांत कृतज्ञता व्यक्त करू, हेच कळत नाही. प.पू. डॉक्टर, कर्ते-करविते आपणच आहात. माझ्यात शरणागत भाव निर्माण व्हावा, यासाठी आपल्याला काय काय प्रसंग घडवावे लागले !

प.पू. पांडे महाराज यांनी हरवलेली वस्तू शोधण्यासाठी दिलेल्या मंत्राविषयी आलेल्या अनुभूती

श्री. यज्ञेश सावंत
       प.पू. पांडे महाराज यांनी हरवलेली वस्तू सापडण्यासाठी पुढील मंत्रजप दिला होता.
      कार्तवीर्याऽर्जुनो नाम राजा बाहुसहस्रवान् ।
     तस्य स्मरणमात्रेण गतं नष्टं च लभ्यते ॥- श्री. द.शं. केळकर (संदर्भ : संकट निवारण करणारी स्तोत्रे व मंत्र, पृष्ठ ६१)
अर्थ : सहस्र बाहू असलेल्या राजा कार्तवीर्य अर्जुनाचे (सहस्रार्जुनाचे) केवळ स्मरण केले असता हरवलेले अथवा नष्ट झालेले परत लाभते.
१. हरवलेले पाकीट मिळण्यासाठी मंत्रजप 
केल्यावर दुचाकीच्या मडगार्डवर पाकीट सापडणे
      वर्ष २०१४ मध्ये वडिलांच्या एक शस्त्रक्रियेच्या वेळी स्थानिक रुग्णालय ते घर असा अनेक वेळा प्रवास झाला. हा प्रवास करतांना एक दिवस माझे पैशांचे पाकीट हरवल्याचे लक्षात आले. पाकिटात पैशांसमवेत वाहन परवाना, पॅन कार्ड असे महत्त्वाचे साहित्य होते. ५ - ६ किलोमीटरच्या प्रवासात बराच वेळ शोध घेऊनही पाकीट सापडत नव्हते. शेवटचा उपाय म्हणून मी वरील मंत्राचा अधिकाधिक जप केला. २ दिवसांनी शोध घेतल्यावर ते पाकीट माझ्या दुचाकीच्या मडगार्डवर दोरीवर कपडे घालतो त्याप्रमाणे अलगद पडलेले मिळाले. पाकिटातील साहित्य कोणी काढून पुन्हा आणून ठेवले कि काय, असे वाटून मी पाकीट पाहिले असता आतमध्ये पैशांसकट सर्व साहित्य व्यवस्थित होते. तेव्हा कृतज्ञता व्यक्त झाली.

देव आपल्या हाकेला धावून येतो, याविषयी बालसाधिका कु. ऐश्‍वर्या जोशी (वय १३ वर्षे) हिला आलेली अनुभूती

कु. ऐश्‍वर्या जोशी
१. झोपेत कुणीतरी पाय ओढू लागल्यावर आईला त्याविषयी ओरडून सांगणे; पण त्या वेळी तिला कुणीही न दिसणे : १७.७.२०१६ या दिवशी मला पुष्कळ ताप आला होता. मला काहीही खाता येत नव्हते. त्यामुळे अशक्तपणा येऊन प्राणशक्ती न्यून झाली होती. रात्री ८ वाजण्याच्या सुमारास आईने मला भात भरवला आणि ती जेवायला बसली. तेव्हा मला पुष्कळ झोप येऊ लागली आणि मी झोपले. झोपल्यावर ५ मिनिटांनी कुणीतरी माझे पाय जोरजोरात ओढू लागले. मी डोळे उघडून आईला ओरडून सांगू लागले, आई, ते बघ. मला तो ओढत आहे; पण तिला कुणीही दिसत नव्हते. तेव्हा आई मला म्हणाली, जय गुरुदेव ! म्हण. मी पू. आबांना (पू. जोशीआजोबांना) बोलावून आणते.

लहानपणापासूनच सेवेची आवड असणारी आणि ऐकण्याची अन् स्वीकारण्याची वृत्ती असलेली ५३ टक्के आध्यात्मिक पातळी असलेली उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली संभाजीनगर येथील कु. माही भावेश सराफ (वय ११ वर्षे) !

कु. माही सराफ
१. प्रेमभाव
     माहीला कोणीही साहाय्य मागितले, तरी ती आनंदाने सर्वांना साहाय्य करते. ती घरातील सर्वांची काळजी घेते.
२. ऐकण्याची वृत्ती
     माही कधीच हट्टीपणा करत नाही. तिला एकदा एखादी गोष्ट करू नकोस, असे सांगितल्यावर ती लगेच ऐकते आणि पुन्हा त्या गोष्टीविषयी विचारणा करत नाही.
- सौ. फल्गुनी सराफ (माहीची आई)

निर्मळ मनाच्या आणि संत अन् साधक यांच्याप्रती भाव असलेल्या ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. मनीषा गाडगीळ !

सौ. मनीषा गाडगीळ
१. निर्मळता आणि मनमिळाऊपणा
       मी सौ. मनीषा गाडगीळकाकू यांच्यासमवेत कधी सेवा केली नाही किंवा त्यांच्या विशेष संपर्कातही नसते, तरीही त्यांचा निर्मळ स्वभाव आणि मनमिळाऊपणा यांमुळे माझी आणि त्यांची पुष्कळ वर्षांपासून ओळख आहे, असे मला जाणवते.
२. इतरांचे कौतुक करणे
       काकू सनातनच्या देवद, पनवेल येथील आश्रमात नेहमी येत नाहीत; पण आमच्याकडून एखादा चांगला प्रयत्न झाल्याचे त्यांना कळले, तर त्या लगेच आमचे कौतुक करतात.
३. अहं नसणे
       काकू सनातनच्या पहिल्या संत कै. पू. फडकेआजींच्या कन्या आहेत, तरी त्यांच्या बोलण्यात त्याविषयीचा अहं कधी जाणवत नाही.

देवबाप्पा, देवबाप्पा आवडतोस मला ।

कु. मानसी प्रभु
प.पू. डॉक्टरांना,
      साष्टांग नमस्कार !
      परम पूज्य, मला पुण्याच्या शाळेत एक कविता शिकवली होती. ती पुढे देत आहे.
देवबाप्पा,
देवबाप्पा आवडतोस मला ।
छोट्या-छोट्या हातांचा नमस्कार तुला ॥ १ ॥
आई दिलीस, बाबा दिलेस, आवडतोस मला ।
छोट्या-छोट्या हातांचा नमस्कार तुला ॥ २ ॥
सूर्य दिलास, चंद्र दिलास, आवडतोस मला ।
छोट्या-छोट्या हातांचा नमस्कार तुला ॥ ३ ॥
फूल दिलेस, फळ दिलेस, आवडतोस मला ।
छोट्या-छोट्या हातांचा नमस्कार तुला ॥ ४ ॥

अशी मागणी करावी लागते, हे पोलिसांसाठी लज्जास्पद !

      कानपूर येथे अनंतचतुर्दशीच्या दिवशी धर्मांधांनी श्री गणेशमूर्ती विसर्जन मिरवणुकीवर केलेल्या आक्रमणात मूर्तीची तोडफोड करण्यात आली. यानंतर हिंदूंनी पोलीस ठाण्याला घेराव घालून धर्मांधांना तात्काळ अटक करण्याची मागणी केली.

मंदिराला सजवण्यापेक्षा सध्या आपत्काळ असल्याने आणि हिंदूंच्या जीवनमरणाचा प्रश्‍न असल्याने हिंदूंना धर्मशिक्षण देणे आणि मंदिराचे रक्षण करणे, यांसाठी पैसे वापरले असते, तर ते योग्य झाले असते !

      गुजरातच्या समुद्र किनार्‍यावर असलेल्या सोमनाथ मंदिराला सोन्याने सजवण्यात येत आहे. हा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या देहली येथील न्यासाच्या बैठकीत घेण्यात आला.
      स्वधर्म आणि स्वभाषा यांच्यामुळे मुसलमान जगभर दबाव आणू शकतात, तर स्वधर्म अन् स्वभाषा सोडल्यामुळे जगात काय भारतातही हिंदूंची किंमत शून्य झाली आहे !

राष्ट्रधर्म सर्वश्रेष्ठ

       राष्ट्रापेक्षा श्रेष्ठ काहीही नाही. जर भारताची एकता, अखंडता, धर्म आणि संस्कृती धोक्यात असेल, तर आपल्या सर्वस्वाचे बलीदान करून देश वाचवणे, हे प्रत्येक भारतियाचे आद्य कर्तव्य आहे. हाच सनातन धर्म आहे.
- समर्थ रामदास स्वामी (अभय भारत, १५ मे ते १४ जून २०१०)

फलक प्रसिद्धीकरता

पाकशी युद्ध करण्यासाठी 
निर्भिड राजकारण्यांची आवश्यकता !
      काश्मीरच्या उरी येथील सैन्याच्या मुख्यालयावर झालेल्या आतंकवादी आक्रमणाच्या संदर्भात घेण्यात आलेल्या उच्चस्तरीय बैठकीत पाकशी युद्ध करण्याऐवजी नेहमीप्रमाणे त्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर एकटे पाडण्याचा प्रयत्न करण्यावरच एकमत झाले.

हिंदू तेजा जाग रे !

Jago ! : Uri akramanke virudh Dehalime hui baithakme Pak ko antar rashtriya starpar alag-thalag karnepar hi sahmati. 
Israelki bhati uttar dena hum kab sikhenge?
जागो ! : उरी आक्रमण के विरुद्ध देहली में हुई बैठक में पाक को अंतरराष्ट्रीय स्तर पर अलग-थलग करने पर ही सहमती. 
इजराइल की भांति उत्तर देना हम कब सीखेंगे ?
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥
या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो. - प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले
      हिंदूंची धर्मनिष्ठा बुद्धीप्रामाण्यवाद्यांनी (धर्मद्रोह्यांनी) नष्ट केल्यामुळे धर्मनिष्ठ अल्पसंख्यांक मुसलमान, ख्रिस्ती आणि बौद्ध बहुसंख्य हिंदूंना भारी झाले आहेत.
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले

बोधचित्र

॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज
सनातनचे श्रद्धास्थान
      मी रस्त्यावर प्रेम करतो. रस्त्यात भेटणार्‍यावर प्रेम करीत नाही; कारण आमची माघार नाही; म्हणून मी हरलो.
भावार्थ :
मी रस्त्यावर प्रेम करतो म्हणजे साधनेवर प्रेम करतो. रस्त्यात भेटणार्‍यावर प्रेम करीत नाही म्हणजे साधनेत येणार्‍या अडचणी, सिद्धी आदींकडेे दुर्लक्ष करतो. कारण आमची माघार नाही म्हणजे मोक्षाला जाऊन, नामाशी एकरूप झाल्यावर आम्हाला तेथून परत यावयाचे नाही. म्हणून मी हरलो यातील मी म्हणजे मीपणा, अहंभाव हरलो.
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.)

प.पू. पांडे महाराजांचे अनमोल विचारधन !

प.पू. पांडे महाराज
चैतन्याची कार्यप्रवणता
      साधना करून आपल्यात चैतन्य निर्माण करणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे हिंदू जागृत होतील. केवळ बोलून कार्य होत नसते, उदा. बाजी प्रभु देशपांडे यांच्यातील वीरश्रीयुक्त चैतन्यशक्ती मृत्यूनंतरही कार्यरत होती. त्या चैतन्यशक्तीमध्ये त्यांच्या ध्येयाची स्मृती उद्धृत झाली होती. त्यामुळे ती चैतन्यशक्ती गडावरून राजा पोचल्याच्या तोफांचा ध्वनी येईपर्यंत कार्यरत होती. ध्वनी आल्यानंतरच ती कार्यरत होण्याची थांबली आणि तो देह धरतीवर पडला.
     देह हा निमित्त आहे, हे यावरून दिसून येते. तुम्ही जितके त्या ध्येय धोरणाला चैतन्यात प्रभावीपणे प्रस्थापित-अनुस्युत कराल, तितकी ती शक्ती ध्येय धोरणाने युक्त होऊन कार्य सफल करते. भिंतीवरील पालीवर आक्रमण होते, तेव्हा ती तिची शेपूट सोडून देते. जोपर्यंत त्या शेपटीत चैतन्यशक्ती कार्यरत असते, तोपर्यंत ते शेपूट वळवळत रहाते. यावरून कार्य करणारी चैतन्यशक्ती कशी कार्य करते, हे लक्षात येते. हीच चैतन्यशक्ती बाजीप्रभूच्या ठायी कार्यरत होती. संत ज्ञानेश्‍वर महाराजांनी भिंत चालवली, रेड्याच्या मुखातून वेद वदवले, हेसुद्धा या चैतन्यशक्तीद्वारेच कार्यान्वित असल्याचे प्रयोग आहेत. 
- प.पू. परशराम पांडे, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२०.७.२०१६)

शरपंजरी पडलेल्या भीष्माचार्यांचे उदाहरण आठवल्यावर प.पू. डॉक्टरांना त्यांच्या आजारपणाबद्दल काही न वाटणे

       माझ्या महामृत्यूयोगामुळे मी गेली १३ वर्षे कुठे बाहेर जाऊ शकत नाही. त्यातील पहिली ३ - ४ वर्षे मला बाहेर जाता येत नाही, याचे थोडे वाईट वाटायचे. पुढे लक्षात आले की, भीष्माचार्य देहत्याग करीपर्यंत शरपंजरी होते, म्हणजे बाणांच्या टोकांवर पहुडले होते. तेव्हा त्यांना किती वेदना झाल्या असतील, याची कल्पनाही करता येत नाही. त्यांच्या मानाने मी पुष्कळ सुखी आहे, हे लक्षात आल्यावर मला कधी वाईट वाटले नाही.
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

मनातील वादळे नकोत !
समुद्रातील वादळ थोड्या काळात नाहीसे होते; पण मनातील वादळ एकदा निर्माण झाले की, 
ते आवरणे कठीण ! म्हणून मनातील ही वादळे निर्माण होऊ न देणेच श्रेयस्कर ! 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

कागदी चपराक आणि खरी चपराक !

संपादकीय
      उरी येथील आतंकवादी आक्रमणात १७ सैनिकांना वीरमरण आले. यानंतर पुढे काय ?, हा नेहमीचाच प्रश्‍न उपस्थित झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेत आल्यावर त्यांनी प्रथम पाकशी मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करण्याचे धोरण अवलंबले. तरीही पाकने कुरापती चालू ठेवल्या. त्यानंतर पाकला जागतिक स्तरावर एकटे पकडून त्याचे आतंकवादी स्वरूप जगासमोर आणण्याची कूटनीती पंतप्रधान मोदी यांनी अवलंबली. पाकने काश्मीरचा प्रश्‍न उपस्थित केल्यावर पंतप्रधान मोदी यांनी स्वातंत्र्यदिनी बलुचिस्तानचे सूत्र उपस्थित केले.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn