Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

काश्मीरच्या उरी येथील सैन्य मुख्यालयावरील आतंकवादी आक्रमणात १७ सैनिक ठार !

  • आतंकवादाचे मूळ जोपर्यंत नष्ट केले जात नाही, तोपर्यंत या घटना थांबणार नाहीत, हे सरकारला समजत नाही कि त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे, हे जनतेला समजले पाहिजे ! पूर्वसूचना मिळूनही निष्काळजी रहाणार्‍यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे !
  • काँग्रेसच्या काळात जे चालू होते, तेच मागील पानावरून पुढे प्रमाणे चालू असल्याने ही स्थिती हिंदु राष्ट्राची स्थापना अपरिहार्य करते !
  • आक्रमणाची पूर्वसूचना असतांनाही सैन्याकडून निष्काळजीपणा !
        श्रीनगर - जम्मू-काश्मीरमधील उरी येथे असलेल्या सैन्याच्या मुख्यालयावर १८ सप्टेंबरच्या पहाटे साडेपाच वाजता जैश-ए-महंमदच्या ४ जिहादी आतंकवाद्यांनी केलेल्या आक्रमणात १७ सैनिक ठार झाले, तर ८ सैनिक घायाळ झाले. सैनिकांनी आक्रमण करणार्‍या चारही आतंकवाद्यांना ठार केले असून परिसरात शोधमोहीम चालू आहे. घायाळ सैनिकांना एअरअ‍ॅम्ब्युलन्सने श्रीनगर येथे नेण्यात आले आहे. त्यांच्यापैकी काहींची प्रकृती गंभीर आहे. आक्रमणाच्या वेळी सर्वच सैनिक बेसावध होते. तसेच मुख्यालयात राज्यात बंदोबस्तावर असलेल्या सैनिकांच्या तुकड्याही होत्या. यातील काही तुकड्या मुख्यालयाच्या आवारातील तंबूत मुक्कामास होत्या. तसेच तिथे दारूगोळाही ठेवण्यात आला होता. आतंकवाद्यांनी याचाच लाभ घेतला. त्यांनी केलेल्या गोळीबारात आणि स्फोटात तंबूने पेट घेतला अन् यात १७ सैनिक होरपळून हुतात्मा झाले. आतंकवाद्यांकडून सैन्याच्या तळांवर आक्रमण होऊ शकते, अशी माहिती गुप्तचर विभागाकडून देण्यात येऊनही सतर्कता बाळगण्यात न आल्यानेच ही हानी झाल्याचे म्हटले जात आहे. (पठाणकोट वायूदल केंद्र आणि आता उरी येथील सैन्य मुख्यालय या दोन्ही ठिकाणी आतंकवादी आक्रमण होण्याची शक्यता असल्याची माहिती मिळाल्यानंतरही मोठ्या प्रमाणात हानी होणे, हे भारतीय सैन्याला आणि सरकारला लज्जास्पद आहे ! जर माहिती मिळूनही हानी टाळता येत नसेल, तर त्या माहितीचा उपयोग तरी काय ? - संपादक) वर्ष २०१४ मध्येही अशाच प्रकारचे आक्रमण झाले होते, त्यात १० सैनिक हुतात्मा झाले होते. जैशच्या आतंकवाद्यांकडून सापडलेल्या शस्त्रांवर पाकचे नाव चिन्हांकीत केलेले आढळून आले आहे.

पनवेल तालुक्यातील (जिल्हा रायगड) मराठी शाळांच्या पटसंख्येत मोठी घसरण

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा 
देण्यासाठी प्रयत्न करणारे राज्य सरकार 
शिक्षणाच्या या दुःस्थितीकडे लक्ष देईल का ?
        पनवेल - सर्व शिक्षा अभियानावर कोट्यवधी रुपये व्यय करूनही पनवेल तालुक्यात हे अभियान फोल ठरत आहे. विद्यार्थ्यांनी मराठी माध्यमाकडे पाठ फिरवली असल्याचे पनवेल तालुक्यात असणार्‍या जिल्हा परिषदेच्या शाळांच्या पटसंख्येतून दिसून येत आहे. तालुक्यात शून्य पटसंख्या असलेल्या शाळा आढळून आल्या आहेत. इंग्रजी माध्यमाच्या वाढत्या स्तोमामुळे जिल्हा परिषदेच्या मराठी शाळांमधील पटसंख्या जरी न्यून होत असली, तरी तालुक्यातील शिक्षण विभागाच्या गलथानपणामुळेही मराठी शाळा बंद होत आहेत.
        पनवेल तालुक्यातील शिक्षक शाळेत जात नसल्यामुळे आदिवासी पाड्यावरील शाळा बंद होत आहेत. (अशा शिक्षकांवर शिक्षण विभाग कोणती कारवाई करणार आहे ? आदिवासी पाड्यावरील शाळा चालू ठेवण्यासाठी शिक्षण विभाग कोणती उपाययोजना करणार आहे ? - संपादक) तालुक्यात एकूण ४६ शाळा या २० पटाखालच्या आढळून आल्या आहेत, तर ६ शाळा बंद होणार आहेत. ३० सप्टेंबरनंतर हा निर्णय घेण्यात येणार आहे.

पोलिसांना असुरक्षित वाटणे, हे कायदा-सुव्यवस्थेची स्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचे लक्षण !

  • जे न्यायालयाला वाटते, ते शासनकर्ते, लोकप्रतिनिधी आणि पोलीस प्रशासन यांना का वाटत नाही ?
  • मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारले सुनावले !
        मुंबई, १८ सप्टेंबर - पोलिसांवरील आक्रमणांचे वाढते प्रकार आणि पोलिसांना कर्तव्य बजावतांना असुरक्षित वाटणे, हे कायदा-सुव्यवस्थेची स्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचे लक्षण आहे. राज्य सरकारने याची जाणीव ठेवून ही परिस्थिती रोखण्यासाठी तातडीने उपाय योजायला हवेत, असे परखड प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती डॉ. शालिनी फणसळकर-जोशी यांच्या खंडपिठाने केले. राज्य पोलिसांनी संघटना स्थापनेसाठी केलेली जनहितार्थ याचिका खंडपिठाने फेटाळतांना अनुषंगिक विषय म्हणून पोलिसांवरील वाढत्या आक्रमणांचा उल्लेख करून त्याविषयी चिंता व्यक्त केली.
खंडपिठाने सुनावलेले खडे बोल !
१. पोलिसांवरील आक्रमणांच्या घटना या धोक्याचे संकेत देणार्‍या आहेत. कायद्याचे पालन न करण्याची प्रवृत्ती लोकांमध्ये दिसून येते.
        जे आपल्या रक्षणाचे काम करतात, त्यांच्यावरच आक्रमणे करण्यास नागरिक धजावू लागले आहेत.

खोट्या ऑनलाईन लॉटरीवर कारवाईची भूमिका मांडा किंवा २ आठवड्यांत कारवाई करा ! - मुंबई उच्च न्यायालय

        मुंबई - राज्यातील खोट्या ऑनलाईन लॉटरीवर कारवाई कशी करणार, त्याविषयी विचारणा करत मुंबई उच्च न्यायालयाने त्याविषयी भूमिका मांडणार नसाल, तर २ आठवड्यांत कारवाई करा, असे निर्देश १४ सप्टेंबरला राज्य सरकारला दिले आहेत. राज्यातील ऑनलाईन लॉटरीवर बंदी आणा आणि ग्राहकांना लुटणार्‍या अशा आस्थापनांवर कारवाई करा, अशी मागणी करणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठामध्ये सामाजिक कार्यकर्ते चंदन त्रिवेदी यांनी प्रविष्ट केली आहे.
        राज्यात सध्या १ सहस्र ३०० हून अधिक खोट्या ऑनलाईन लॉटर्‍या चालू असून त्यामध्ये होणार्‍या गैरव्यवहारामुळे ग्राहकांची आर्थिक फसवणूक होत आहे. (हे प्रशासनाच्या लक्षात कसे येत नाही ? एवढ्या मोठ्या प्रमाणात खोट्या लॉटर्‍या चालू होणे, हे कायद्याचे भय संपल्याचे लक्षणच म्हणावे लागेल. - संपादक) त्या लॉटरी चालकांकडे शासकीय अनुज्ञप्ती (परवाना) नाही आणि कोणत्याही नियमांची कार्यवाही करत नाहीत. त्यामुळे त्यांच्यावर तातडीने बंदीची कारवाई करावी आणि त्यांना कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी त्रिवेदी यांनी केली आहे.

कथित समाजकार्य करणार्‍या तेरेसा या भारतियांच्या मदर नव्हे, मिशनरी होत्या ! - रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ता, हिंदु जनजागृती समिती

महाराष्ट्र १ वृत्तवाहिनीवरील चर्चासत्रात रमेश शिंदे यांनी मांडले परखड सत्य ! 
      मुंबई, १८ सप्टेंबर (वार्ता.) - ज्यांना आपण मदर तेरेसा म्हणतो, त्या भारतियांच्या मदर नाहीत. त्या मिशनरी म्हणून हिंदूंचे धर्मांतर करण्यासाठी भारतात आल्या होत्या. आपल्याकडे सिंधुताई सकपाळ यांच्यासारख्या अनेक सामाजिक कार्यकर्त्या आहेत. त्यांची तुलना तेरेसांशी होऊ शकत नाही. तेरेसा यांनी सामाजिक कार्याच्या नावाखाली हिंदूंचे धर्मांतर केले. गोव्यामध्ये इन्क्विझीशनद्वारे (ख्रिस्त्यांची धर्मसमीक्षणाची पद्धत) हिंदूंचा अनन्वित अत्याचार करून हिंदूंचे धर्मांतर करणारा झेवियर आणि सामाजिक सेवेच्या आड गरीब हिंदूंच्या असह्यतेचा लाभ उठवून त्यांचे धर्मांतर करणार्‍या तेरेसा या एकाच माळेचे मणी आहेत. अशा पद्धतीने धर्मांतर करणार्‍या किंवा धर्माचा प्रसार करणार्‍यांनी चमत्कार केल्याचे दाखले देऊन पोपकडून संतपद दिले जाते. तेरेसा यांनी दोन चमत्कार केल्याचा जो दावा केला जातो, ते दोन्ही चमत्कार खोटे आहेत, असे परखड प्रतिपादन मदर तेरेसा यांना संतपद देण्यात आल्याच्या पार्श्‍वभूमीवर महाराष्ट्र १ या वृत्तवाहिनीवर आयोजित चर्चासत्रात हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ता श्री. रमेश शिंदे यांनी केले. या चर्चासत्रात महाराष्ट्र टाइम्सचे साहाय्यक संपादक विजय चोरमारे, महाराष्ट्र प्रबोधन सेवा मंडळाचे प्रमुख फादर वेन्सी डिलिमा आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील सहभागी झाले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वाहिनीचे संपादक निखिल वागळे यांनी केले.

कारागृहांत क्षमतेपेक्षा अधिक कैदी असल्याप्रकरणी उच्च न्यायालयाचेे गृहखात्याच्या सहसचिवांना उपस्थित रहाण्याचे आदेश

       मुंबई - राज्यातील कारागृहांत क्षमतेपेक्षा अधिक कैदी ठेवण्यात आल्याने ती पूर्णपणे भरली आहेत, तर कच्च्या कैद्यांना न्यायालयात उपस्थित करण्यास पोलीस प्रशासनाकडून टाळाटाळ होत असल्याने उच्च न्यायालयाने याची गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणी गृहखात्याच्या सहसचिवांना न्यायालयात उपस्थित रहाण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कारागृहांतील कैद्यांच्या समस्या आणि फौजदारी प्रशासकीय प्रणालीसंबंधी विविध प्रश्‍नांकडे लक्ष वेधण्यासाठी शेख अब्दुल नईम यांनी उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली आहे.

काश्मीरमध्ये आंतरराष्ट्रीय निष्पक्ष शिष्टमंडळ पाठवणे भारताला अमान्य ! - संयुक्त राष्ट्राला भारताने ठणकावले

पाकने काश्मीरचा भूभाग अवैधरित्या बळकवला आहे असे सांगणारे नव्हे, तर पाकला 
धडा शिकवून त्याच्या कह्यातून तो परत मिळवणारे राज्यकर्ते हवेत ! यासाठी हिंदु राष्ट्रच हवे !
पाकव्याप्त काश्मीरसह काश्मीरचा सर्व भूभाग भारताचाच असल्याचे ठाम प्रतिपादन !
      जिनिव्हा - काश्मीरमध्ये मानवी हक्कांची पायमल्ली होत असल्याच्या तक्रारींची शहानिशा करण्यासाठी भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांनी त्यांच्या नियंत्रणातील काश्मीरमध्ये एका स्वतंत्र आंतरराष्ट्रीय निष्पक्ष शिष्टमंडळाला भेटीची अनुमती देण्याची आवश्यकता आहे, या संयुक्त राष्ट्रसंघांच्या मानवी हक्क विभागाच्या उच्चायुक्तांनी केलेल्या मागणीवर भारताने तीव्र आक्षेप घेतला आहे.

जर्मनीमध्ये मुसलमान शरणार्थी आणि स्थानिक नागरिक यांच्यातील हिंसक घटना चालूच !

      बर्लीन - मध्य-पूर्वेतील युद्धग्रस्त स्थितीमुळे जर्मनीत शरणार्थी म्हणून आलेले मुसलमान आणि स्थानिक नागरिक यांच्यातील हिंसक घटना युरोपमध्ये अनेक ठिकाणी चालूच आहेत. जर्मनीत शरणार्थींची संख्या सर्वाधिक आहे. नुकतेच येथील बाउत्सेन शहरामध्ये २० मुसलमान शरणार्थी आणि ८० स्थानिक नागरिक यांच्यात हिंसाचार झाला. दोन्ही बाजूंनी एकमेकांवर बाटल्या फेकण्यात आल्या आणि शिवीगाळ करण्यात आली. या स्थितीवर नियंत्रण मिळवतांना काही पोलीस घायाळ झाले. यात एक शरणार्थी घायाळ झाला. त्याला रुग्णालयात नेणार्‍या रुग्णवाहिकेवर आक्रमण करण्यात आल्याने दुसरी रुग्णवाहिका बोलावण्यात आली.चेहरा उजळवण्याचा दावा करणार्‍या ३०० क्रिम्स त्वचेसाठी हानीकारक !

अशा हानीकारक क्रिम्सवर सरकार बंदी घालील का ?
     भाग्यनगर - चेहरा उजळवण्याचा दावा करणार्‍या ३०० क्रीम्समध्ये त्वचेला अतिशय हानीकारक असे रसायन आढळून आले आहे. त्यामुळे या क्रिम्सवर बंदी घालण्यासाठी त्वचा आणि कुष्ठरोग तज्ञांची संघटना (आयएडीव्हीएल्) आणि त्यांच्या २०० सदस्यांनी लवकरच एक बैठक बोलावली आहे. 
१. अल्पावधीत गोरेपण मिळवून देण्याचा दावा करणार्‍या क्रिम्सची भारतियांकडून मोठ्या प्रमाणात मागणी आहे. 
२. ड्रग्स जनरल कंट्रोलर ऑफ इंडियाने (डीजीसीएल्ने) मार्च मासात स्टेरॉइड असणार्‍या १०० क्रिम्सना धोकादायक ठरवले होते.
३. त्वचारोग तज्ञांकडूनही असे क्रिम्स वापरणार्‍या लोकांना त्याचे तोटे सांगण्यात येतात. त्वचारोग तज्ञ डॉ. लक्ष्मी सौजन्या यांनी सांगितले की, आजही बाजारात अशा अनेक क्रिम्स मिळतात, ज्यात धोकादायक रसायन मिसळलेले आढळून येते.


प्रदूषणाच्या नावाखाली विहिरीऐवजी कृत्रिम हौदात श्री गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यास भाग पाडणारी कल्याण-डोंबिवली महानगरपालिका !

     डोंबिवली (ठाणे), १८ सप्टेंबर (वार्ता.) - डोंबिवली पूर्व येथील संगीतावाडी येथे एका विहिरीत प्रतीवर्षी घरगुती श्री गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात येते. यंदा कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या निर्णयामुळे गणेशभक्तांना इच्छेविरुद्ध कृत्रिम हौदात श्री गणेशमूर्तींचे विसर्जन करावे लागले. (गणेशभक्तांनो, इच्छेविरुद्ध विसर्जन करण्यापेक्षा महानगरपालिकेला या निर्णयाविषयी वेळीच खडसावले का नाही ? - संपादक) 
१. संगीतावाडी येथील विहिरीच्या जवळच्या विहिरीचे पाणी दूषित असल्याने श्री गणेशमूर्ती विसर्जनाची सोय कृत्रिम पद्धतीने सावरकर गार्डनलगत प्रगती कॉलेजसमोर करण्यात आली आहे, अशा प्रकारचे फ्लेक्स लावण्यात आले होते. 
२. विसर्जन करण्यास आलेल्या एका भाविकाने दिलेल्या माहितीनुसार दीड दिवसाच्या, तसेच पाच दिवसांचे श्री गणेशमूर्ती विसर्जन विहिरीत केले होते; पण प्रदूषणाचे कारण देत सात दिवसांच्या मूर्तींचे विसर्जन कृत्रिम हौदात करण्यास सांगितले गेले. 
३. पालिकेच्या वतीने लावण्यात आलेल्या ३ फ्लेक्समध्ये आकड्यांचा क्रम १, २ आणि ६ असा चुकीचा देण्यात आला. (महानगरपालिकेचा गलथान कारभार ! - संपादक)

(म्हणे) गोरक्षणाच्या नावाखाली होणारी आक्रमणे चिंताजनक ! - अल्पसंख्यांक आयोग

देशातील अल्पसंख्यांक मात्र काश्मीरमधील बहुसंख्यांक ! 
धर्मांधांंकडून गेली २५ वर्षे तेथील अल्पसंख्यांक हिंदूंवर 
होत असलेली आक्रमणे अल्पसंख्यांक आयोगाला दिसत नाहीत का ?
        नवी देहली - देशात गोरक्षणाच्या नावाखाली कथित गोरक्षकांकडून होणारी अल्पसंख्यांक समाजातील लोकांवरील आणि दलितांवरील आक्रमणे चिंताजनक आहेत, असे विधान राष्ट्रीय अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष नसीम अहमद यांनी केले आहे. प्रशासनाने त्या रोखण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असेही त्यांनी म्हटले. नसीम अहमद यांनी पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हरियाणाच्या मेवातमध्ये दोन महिलांवर झालेला सामूहिक बलात्कार, बिर्याणीमध्ये गोमांसाचे अवशेष आहेत का हे पडताळण्यासाठी घेतले गेलेले त्यांचे नमुने आणि देहलीत दोघांना गोरक्षकांकडून झालेली मारहाण ही उदाहरणे दिली.

हिंदुत्वनिष्ठांनी चिकाटीने केलेल्या प्रबोधनामुळे पोलिसांची माघार !

थेरगाव घाटावरील प्रबोधन मोहीम थांबवण्यासाठी पोलिसांचा दबाव
     चिंचवड, १८ सप्टेंबर (वार्ता.) - येथील थेरगाव घाटावर पिंपरी-चिंचवडमधील विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी १५ सप्टेंबर या दिवशी भाविकांना धर्मशास्त्राप्रमाणे श्री गणेशमूर्तींचे नदीत विसर्जन करण्याचे आवाहन करत प्रबोधन मोहीम राबवली. यामुळे मूर्तीदान करण्याकडे नागरिकांचा ओघ न्यून होऊ लागला तेव्हा पोलिसांनी हिंदुत्वनिष्ठांना ही मोहीम थांबवण्यास सांगितले. त्याचवेळी संस्कार प्रतिष्ठानकडून राबवण्यात येणार्‍या मूर्तीदानाच्या मोहिमेस मात्र पोलिसांनी कोणताही आक्षेप घेतला नाही. त्यामुळे हिंदुत्वनिष्ठांनी ठाम भूमिका घेत तुम्ही आधी संस्कार प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनाही घाटाच्या बाहेर काढा. मग आम्हीही जाऊ असे सांगितले. यानंतर मात्र पोलिसांनी माघार घेतली. (पोलिसांच्या अन्याय्य दबावाला बळी न पडता ठामपणे योग्य बाजू पटवून देणार्‍या हिंदुत्वनिष्ठांचे अभिनंदन ! - संपादक) भाविकांचा श्री गणेशमूर्तींचे नदीत विसर्जन करण्याकडे कल वाढल्यानंतर संस्कार प्रतिष्ठानलाही गाशा गुंडाळावा लागला. 

हिंदु जनजागृती समितीच्या महिला कार्यकर्त्यांचा धर्मरक्षणासाठी निकराचा लढा !

एका गावातील तथाकथित पर्यावरणवादी संस्थेचा धर्मद्रोह !
     एका गावातील पर्यावरणवादी संस्थेने तथाकथित प्रदूषणाच्या नावाखाली भाविकांना मूर्तीदान करणे सक्तीचे केले. संस्थेचे कार्यकर्ते भाविकांना श्री गणेशमूर्तींचे पाण्यात विसर्जन करण्यास विरोध करत होेते आणि त्यांच्याकडून मूर्ती घेऊन नगरपरिषदेच्या गाडीत ठेवत होते. त्यांनी साहाय्यासाठी २ पोलिसांनाही आणले होते. तेही भाविकांना विसर्जन करू देत नव्हते. हिंदु जनजागृती समितीच्या महिला कार्यकर्त्यांनी एका पोलिसाला भाविकांना मूर्तीचे पाण्यात विसर्जन करू देण्याविषयी सांगिल्यावर त्याने सांगितले, 'मला तुमचे म्हणणे पटते; पण हे लोक आमच्यावर दबाव आणतात. यापुढे श्री गणेशमूर्तीचे पाण्यात विसर्जन करण्यापासून मी कोणालाही अडवणार नाही'. तथाकथित पर्यावरणवादी संस्थेच्या कार्यकर्त्यांनी मात्र मूर्तीदानाची मोहीम चालूच ठेवली. समितीच्या कार्यकर्त्या भाविकांचे प्रबोधन करून त्यांना धर्मशास्त्रानुसार मूर्ती पाण्यात विसर्जित करण्यास सांगत होत्या. त्या वेळी धर्मद्रोही संस्थेच्या महिलांनी येऊन त्यांच्याशी वाद घातला. बर्‍याच जणांनी नाईलाजाने मूर्तीदान केले. (ही तर उघड दडपशाही आहे. एरव्ही विवेकाचा आव आणणार्‍या पर्यावरणवादी संघटनांचा हा विवेक आहे का ? - संपादक) विसर्जनाच्या ठिकाणी नगरपरिषदेने लाकडी कुंपण घातल्याने भाविकांना मूर्तींचे पाण्यात विसर्जन करता येत नव्हते.

नवी मुंबईत अमली पदार्थांची विक्री करणारा धर्मांध अटकेत

       नवी मुंबई - अमली पदार्थांची विक्री करणार्‍या राफे उपाख्य रफिक कादिर खान या धर्मांधाला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून अनुमाने ५ लक्ष रुपयांचे १७५ ग्रॅम मॅफेडॉन अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. नवी मुंबईच्या परिसरात अमली पदार्थाचे मोठ्या प्रमाणात जाळे पसरत असून महाविद्यालयीन तरुण याच्या अधिक आहारी जात आहेत. याला आळा घालण्यासाठी नवी मुंबई पोलिसांनी अँटी नार्कोटिक सेलची स्थापना केली होती. या पथकाला रफिक खान हा रबाळे एम्आयडीसीमधील एका आस्थापनाजवळ मॅफेडॉन विकण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार त्यांनी ही कारवाई केली.

कानपूरमध्ये श्री गणेशमूर्ती विसर्जनाच्या मिरवणुकीत गावठी बॉम्बचे स्फोट

  • फटाक्यांसारखे बॉम्बचे स्फोट होणारा भारत !
  • १० पोत्यांमधून १० सहस्र गावठी बॉम्ब जप्त
       कानपूर (उत्तरप्रदेश) - येथील पतारा गावात श्री गणेशमूर्ती विसर्जनाच्या मिरवणुकीत समाजकंटकांनी गावठी बॉम्बचे स्फोट केले. त्यामुळे गोंधळ उडून चेंगराचेंगरी झाली. मिळालेल्या माहितीनुसार हे बॉम्ब हमीरपूर जिल्ह्यातील भरूआ सुमेरपूर येथून एका वाहनाद्वारे कानपूर येथे आणण्यात येत होते. या वाहनातील युवकांनी पतारा गावाजवळ गणेशमूर्ती विसर्जनाची मिरवणूक पाहून त्यात काही बॉम्ब फोडले. त्यामुळे तेथे गोंधळ उडून चेंगराचेंगरी झाली. एकापाठोपाठ होत असलेल्या बॉम्बच्या स्फोटांमुळे जमावाने वाहनाला थांबवले आणि त्याची तोडफोड केली. या वेळी वाहनातील शाहरूख आणि मोहीत यांना कह्यात घेऊन जमावाने त्यांना चोप दिला. त्यांच्याकडून १० पोत्यांमध्ये भरलेले १० सहस्र बॉम्ब जप्त करण्यात आले आहेत. पोलीस पुढील तपास करत आहेत. (उत्तरप्रदेशमध्ये कायदा आणि सुव्यवस्था आहे का ? - संपादक)

पालिका कर्मचार्‍यांच्या दबावाला बळी न पडता भाविकांचा हिंदु जनजागृती समितीच्या प्रबोधन मोहिमेस पाठिंबा !

     फलटण (जिल्हा सातारा), १८ सप्टेंबर (वार्ता.) - येथे हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या प्रबोधनानंतर भाविकांनी पालिका कर्मचार्‍यांच्या दबावाला बळी न पडता श्री गणेशमूर्तींचे वहात्या पाण्यात विसर्जन केले. यशवंतराव माध्यमिक शाळेच्या पटांगणात फलटण नगरपालिकेने दोन हौद बांधले होते. भाविक विसर्जनासाठी आल्यावर नगरपालिकेच्या कर्मचार्‍यांनी तथाकथित प्रदूषणाचे कारण पुढे करून त्यांना हौदात मूर्तींचे विसर्जन करण्यास सांगितले. समितीच्या कार्यकर्त्यांच्या प्रबोधनानंतर, तसेच 'कर्मचार्‍यांनी भाविकांवर दबाव आणू नये', असे सांगितल्यावर सहस्रो मूर्तींचे वहात्या पाण्यात विसर्जन करण्यात आले. केवळ २० ते २५ मूर्तींचे कृत्रिम हौदात विसर्जन करण्यात आले. या वेळी शिवसेनेचे माजी सातारा जिल्हा उपप्रमुख श्री. दशरथ चांगण, श्री. माऊली चव्हाण, सातारा ग्राहक संरक्षण कमिटीचे श्री. शैलेंद्र नलवडे, तसेच समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते. हौदात विसर्जन केलेल्या मूर्ती तशाच ठेवून पालिकेचे कर्मचारी निघून गेले. (पालिकेचे दायित्वशून्य कर्मचारी ! - संपादक) समितीच्या कार्यकर्त्यांनीच नंतर त्यांचे वहात्या पाण्यात विसर्जन केले.

सोलापूर येथे तथाकथित पर्यावरणवाद्यांच्या मूर्तीदान मोहिमेचा फज्जा !

हिंदु जनजागृती समितीच्या गणेशमूर्ती विर्सजन मोहिमेस समाजातून उत्स्फूर्त प्रतिसाद ! 
      सोलापूर, १८ सप्टेंबर (वार्ता.) - हिंदु जनजागृती समितीच्या वतीने १५ सप्टेंबर या दिवशी राबवण्यात आलेल्या श्री गणेशमूर्ती विसर्जन मोहिमेला समाजातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सिद्धेश्‍वर तलावावर भाविक श्री गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यासाठी आल्यावर काही महाविद्यालयीन तरुणांनी त्यांना मूर्तीदानाचा आग्रह केला. समितीच्या कार्यकर्त्यांनी प्रबोधनानंतर भाविकांनी मूर्ती पाण्यात विसर्जित करण्यासच प्राधान्य दिले. या वेळी महानगरपालिकेचे कर्मचारी कचर्‍याच्या गाडीतून निर्माल्य वाहून नेत होते. माजी नगरसेवक श्री. बापू ढगे यांनी प्रखर विरोध करून निर्माल्य अन्य वाहनांमधून नेण्यास भाग पाडले. (धर्मरक्षणासाठी तत्पर असणारे श्री. बापू ढगे यांचे अभिनंदन ! - संपादक) मूर्तीदान मोहिमेला प्रतिसाद मिळत नसल्याने पर्यावरणवादी संभाजी तलावाकडे गेले. समितीचे कार्यकर्ते आणि बापू ढगे यांनी खडसावल्यावर त्यांनी त्यांची मोहीम थांबवली.

सांगली येथील धर्माभिमानी श्री. संतोष दाभाडे आणि धर्मशिक्षणवर्गातील जिज्ञासूंनी गणेशोत्सवाच्या कालावधीत केलेल्या आदर्श कृती !

     मिरज - येथील हिंदु धर्माभिमानी श्री. संतोष दाभाडे यांच्या घरातील धर्मशिक्षणवर्गातील जिज्ञासूंनी गणेशोत्सवाच्या कालावधीत अनेक आदर्श कृती केल्या. प्रतिवर्षी श्री. दाभाडे हे तळ्यात श्री गणेशमूर्तीचे विसर्जन करतात. यंदा शास्त्र समजल्यावर त्यांनी वहात्या पाण्यात विसर्जन केले. श्री. विनायक पांडव यांनी तीन मंडळांत कार्यक्रमाविषयी प्रबोधन केल्यावर एका मंडळाने 'फॅशन शो'चा कार्यक्रम रहित करून त्याठिकाणी भक्तीगीते लावली. 

ठाणे जिल्ह्यात आदर्श गणेशोत्सव मोहिमेस सकारात्मक प्रतिसाद !

सनातन आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने प्रबोधन !
(वर्तुळात) मंडळाने मंडपात लावलेल्या
सनातन-निर्मित सात्त्विक नामपट्ट्या
      ठाणे - जिल्ह्यातील शाळांमध्ये, घरोघरी, तसेच गणेशोत्सव मंडळ आणि शिवसेना शाखा यांमध्ये मार्गदर्शन करण्यात आले होते. नगरसेविका अधिवक्ता सौ. रत्नप्रभा पाटील यांनी जनसंपर्क कार्यालयात आयोजित केलेल्या कार्यक्रमात सनातन संस्थेच्या वतीने मार्गदर्शन करण्यात आले. तसेच जिल्हापरिषदेच्या शाळा क्र. १३ (खोपट) आणि शाळा क्र. ४१ (उथळसर) या २ शाळांमध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
कल्याण 
     कल्याण पश्‍चिम येथे १० ठिकाणी आदर्श गणेशोत्सव कसा साजरा करावा ? या संदर्भात प्रवचने घेण्यात आली. या वेळी भाविकांच्या शंकांचे निरसन करण्यात आले. प्रवचन ऐकून मोठ्या प्रमाणात भाविकांनी सनातनचे ग्रंथ आणि उत्पादने विकत घेतली, तसेच त्यांची मागणीही केली.

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने मुंबईत ठिकठिकाणी व्याख्यानांच्या माध्यमांतून जनप्रबोधन !

      मुंबई - हिंदु जनजागृती समितीच्या गणेशोत्सव मोहिमेच्या अंतर्गत मुंबईत ठिकठिकाणी व्याख्यानांच्या माध्यमांतून जनप्रबोधन करण्यात आले. भांडुप (पश्‍चिम) येथील सह्याद्रीनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आणि नवदुर्गा मित्र मंडळ, काजूटेकडी, मुलुंड (पूर्व) येथील म्हाडा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, घाटकोपर (प.) येथील अखिल शिवाजीनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, असल्फा मार्केट, सेव्हन स्टार स्पोर्ट्स क्लब, तसेच नालासोपारा येथील दीप हाईट्स, सानपाडा येथील प्रियांका पॅलेस, सेक्टर १० आणि कोपरखैरणे येथील सामना मित्र मंडळ, सेक्टर ३ या ठिकाणी समितीच्या कार्यकर्त्यांनी आदर्श गणेशोत्सव कसा साजरा करावा, श्री गणेशाच्या उपासनेमागील शास्त्र, आनंदी जीवनासाठी साधना, नामस्मरणाचे महत्त्व आणि हिंदु राष्ट्राची आवश्यकता आदी विषयांवर मार्गदर्शन केले. काही ठिकाणी गणेशोत्सवातील अपप्रकार, मूर्तीदान करू नका या विषयांवर ध्वनीचित्रचकती दाखवण्यात आली. तसेच काही मंडळाच्या मंडपात प्रबोधनात्मक फ्लेक्सचे प्रदर्शन लावण्यात आले होते.

धर्मजागृतीसाठी सनातन संस्थेच्या ग्रंथप्रदर्शनाची समाजाला आवश्यकता ! - ह.भ.प. सुधाकर महाराज इंगळे, अखिल भारतीय वारकरी मंडळाचे अध्यक्ष

सोलापूर येथील फिरत्या ग्रंथप्रदर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन ! 
 ग्रंथप्रदर्शन पहातांना ह.भ.प. सुधाकर महाराज इंगळे आणि समवेत जिज्ञासू
     सोलापूर, १८ सप्टेंबर (वार्ता.) - धर्मजागृतीसाठी सनातन संस्थेच्या ग्रंथप्रदर्शनाची समाजाला अत्यंत आवश्यकता आहे, असे प्रतिपादन अखिल भारतीय वारकरी मंडळाचे अध्यक्ष ह.भ.प. सुधाकर महाराज इंगळे यांनी केले. सनातनच्या फिरत्या ग्रंथप्रदर्शनाचा सोलापुरातील जिज्ञासूंनी अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन करत त्यांनी सनातनने प्रकाशित केलेल्या ग्रंथांची प्रशंसाही केली आणि कार्याला शुभेच्छा दिल्या. येथील दत्त चौकात फिरत्या प्रदर्शनाचे उद्घाटनही त्यांच्याच हस्ते पार पडले. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी सनातनचे साधक आणि जिज्ञासू उपस्थित होते. हे ग्रंथप्रदर्शन सोलापूर येथील दत्त चौकात १८ सप्टेंबर ते २० सप्टेंबर या कालावधीत सकाळी १० ते रात्री ९ पर्यंत चालू रहाणार आहे. 

सोलापूर शहरात 'आदर्श गणेशोत्सव मोहिमे'स उत्स्फूर्त प्रतिसाद !

१. 'वृत्तदर्पण' या स्थानिक वृत्तवाहिनीवर 'टॉक शो' या कार्यक्रमात समितीच्या कार्यकर्त्या सौ. राजश्री तिवारी यांनी 'इको फ्रेंडली गणेशोत्सव' या विषयावर धर्मशास्त्राची भूमिका मांडली. 
२. वर्धमाननगर गणेशोत्सव मंडळाने 'लव्ह जिहाद'च्या विरोधात प्रबोधन करण्यासाठी स्वत:हून समितीच्या कार्यकर्त्यांशी संपर्क केला. तसेच नवरात्रातही अशा कार्यक्रमाची मागणी केली. 
३. संयुक्त चौक तरुण मंडळात ९ दिवस धर्मशिक्षण देणार्‍या फ्लेक्सचे प्रदर्शन लावण्यात आले. या मंडळातील श्री. संदीप ढगे यांनी पुढाकार घेऊन अन्य १० मंडळांत दैनिक सनातन प्रभात चालू केले. 
४. विडी घरकुल या भागातील धर्माभिमानी श्री. मल्लु हिरेमठ यांनी स्वखर्चातून वर्गणी देऊन अन्य १० गणेशोत्सव मंडळांना ४ दिवसासांठी दैनिक सनातन प्रभात चालू केले.

पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू देहलीत !

     नवी देहली - वैद्यकीय पडताळणीसाठी पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू यांना जोधपूर कारागृहातून विमानाने देहलीत आणण्यात आले आहे. पडताळणीनंतर त्यांना पुढील आदेश मिळेपर्यंत तिहार कारागृहात ठेवण्यात येणार आहे. या वेळी पू. बापू यांच्या भक्तांच्या गर्दीमुळे येथे मोठ्या संख्येने पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

एका शहरात हिंदु धर्मजागृती सभेसाठी अनुमती काढण्यास गेलेल्या कार्यकर्त्याकडे पोलिसांकडून चौकशी

अशी चौकशी अन्य धर्मियांच्या कार्यक्रमाविषयी पोलीस कधी करतात का ? 
     एका शहरात नुकतेच हिंदु धर्मजागृती सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेला अनुमती मिळण्यासाठी हिंदु जनजागृती समितीकडून तेथील पोलीस ठाण्यात अर्ज करण्यात आला होता. त्या वेळी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या दोन पोलीस अधिकार्‍यांनी हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्याकडे सभेविषयी आणि समितीच्या कार्याविषयी चौकशी केली. या वेळी कार्यकर्ता आणि पोलीस अधिकारी यांच्यात झालेले संभाषण पुढे देत आहोत. 
पोलीस : तुम्हाला अर्पण कोठून मिळते ? 
कार्यकर्ता : आम्ही समाजातून अर्पण गोळा करतो. 
पोलीस : तुम्ही कोणत्या पक्षाशी संबंधित आहात ? 
कार्यकर्ता : आम्ही कोणत्याही पक्षाशी संबंधित नाही. आम्ही राष्ट्र आणि धर्म यांसाठी कार्य करतो. 
पोलीस : तुम्ही कोणत्याही धर्माविषयी प्रक्षोभक विधाने करणार नाहीत ना ? 
कार्यकर्ता : नाही. 

संभाजीनगर येथील मंदिरे अधिकृत करण्याच्या संदर्भातील धोरण मार्गी ! - शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे

        संभाजीनगर - मुंबईच्या धर्तीवर येथील विक्री योग्य भूखंडावरील ५०० चौरस मीटरपर्यंतची मंदिरे ही नोंदणी आणि मुद्रांक रकमेच्या २० प्रतिशत रक्कम भरून अधिकृत करण्यात यावी, यासाठीचे धोरण सिद्ध करून सिडकोकडे पाठवले आहे, असेे शिवसेनेचे उपनेते खासदार चंद्रकांत खैरे यांनी सिडकोच्या समस्यांविषयी मुख्य प्रशासक सुनील केंद्रेकर यांच्या दालनात घेतलेल्या बैठकीत स्पष्ट केले. (मंदिरांविषयी शिवसेनेच्या एका लोकप्रतिनिधीला वाटते, ते राज्यातील इतर लोकप्रतिनिधींना का वाटत नाही. - संपादक) येथील कोणतीही धार्मिक स्थळे पाडण्याची कारवाई केली जाणार नसून मोकळ्या जागेतील मंदिरे वाचवण्यासाठी मंत्रालय स्तरावर निर्णय होणे अपेक्षित आहे. सद्यस्थितीतील भाडे करार (लीज) स्थगित करण्याच्या संदर्भातही वरिष्ठ पातळीवर चर्चा चालू असल्याचे सुनील केंद्रेकर यांनी याच बैठकीत सांगितले.

(म्हणे) अस्तित्वावर संकट निर्माण झाल्यास भारताच्या विरोधात अणुबॉम्बचा वापर करू ! - पाकच्या

संरक्षण मंत्र्यांची धमकी पाकने 
असे आक्रमण केल्यास त्याला सामोरे 
जाण्याची क्षमता भारताकडे आहे का ?
       नवी देहली - जर आमच्या अस्तित्वावर संकट निर्माण झाले, तर आम्ही भारताच्या विरोधात अणुबॉम्बचा वापर करण्यास मागेपुढे पहाणार नाही, अशी धमकी पाकचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत दिली.

पिंपरी-चिंचवड पालिकेने थेरगाव घाटावरील दुरुस्त केलेला रस्ता खचला

थेरगाव घाटावरील खचलेला भाग (वर्तुळात)
     चिंचवड, १८ सप्टेंबर (वार्ता.) - येथील थेरगाव घाटावरील रस्त्याची पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने काही दिवसांपूर्वी दुरुस्ती केली होती. १८ सप्टेंबरला घाटावरील रस्त्याचा काही भाग खचला असून त्यावर लावलेले पेव्हर ब्लॉकही निघाले आहेत. पालिकेने घाईगडबडीत केलेल्या कामाचा निकृष्ट दर्जा कसा असतो, याचे उत्तम उदाहरण म्हणून नागरिकांमध्ये चर्चा होत आहे. (पालिका आयुक्तांनी या प्रकरणी चौकशी करून संबंधित कंत्राटदारावर दंडात्मक कारवाई करायला हवी. - संपादक) 

भारतीय सैनिकांचा पोशाख करून गणेशमूर्ती विसर्जनाची डॉल्बीविरहीत मिरवणूक

उल्हासनगर येथील गणेशोत्सव मंडळाचा स्तुत्य उपक्रम ! 
     उल्हासनगर, १८ सप्टेंबर (वार्ता.) - येथील भाटिया चौकातील कृष्ण माता ग्रुप मंडळाच्या कार्यकर्त्यांनी भारतीय सैनिकांचा पोशाख करून गणेशमूर्ती विसर्जनाची मिरवणूक काढली. डॉल्बीविरहीत, तसेच गुलाल न उधळता काढलेल्या या मिरवणुकीत केवळ 'गणपति बाप्पा मोरया', 'अगले बरस तू जल्दी आ', अशी घोषणा देण्यात आली. मंडळाचे श्री. नरेश गेमनानी आणि श्री. तरुण मंगतानी म्हणाले, "आपण घरी उत्सव साजरे करतो; पण सैनिक सीमेवर आपल्या रक्षणासाठी रात्रंदिवस उभे असतात. त्यांच्यामुळे आपण सुरक्षित आहोत. आम्हाला सैनिकांविषयी आदर असून तो लोकांपर्यंत पोचावा आणि त्यांनीही आदर बाळगावा, यासाठी ही मिरवणूक काढली आहे."

नांदेड, फलटण, इंदापूर येथे मराठा समाजातील लक्षावधी नागरिकांचा मूक मोर्चा

     नांदेड, फलटण, इंदापूर, १८ सप्टेंबर - येथे १८ सप्टेंबर या दिवशी मराठा समाजाने काढलेल्या मूक मोर्च्यात मराठा समाजाचे लक्षावधी नागरिक सहभागी झाले होते. जिल्ह्यातील १६ तालुक्यांतून नागरिकांनी मोर्च्यात सहभाग घेतला. या वेळी 'कोपर्डी घटनेतील आरोपींना फाशी द्या', 'अ‍ॅट्रॉसिटी कायद्याचा अपवापर थांबवा', 'मराठा समाजाला आरक्षण द्या', 'शेतकर्‍यांना संपूर्ण कर्जमाफी द्या', 'शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार परत घ्या', अशा विविध मागण्या करण्यात आल्या आहेत. (यावरून मोर्च्याच्या माध्यमातून ब्राह्मणद्वेषच पोसला जात आहे आणि आरक्षणाच्या नावाखाली राजकारणच केले जात आहे, असे वाटल्यास चुकीचे काय ? - संपादक) फलटण शहरातही मूक मोर्च्यात लक्षावधी नागरिक सहभागी झाले होते. येथे वरीलप्रमाणेच मागण्यांचे निवेदन देण्यात आले. या मोर्च्यासाठी पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. इंदापूर आणि गुहागर येथेही मोर्चा काढण्यात आला.

पुण्यातील खडकवासला, तसेच अन्य धरणांतून गणेशमूर्ती विसर्जनासाठी सोडलेले पाणी पावसाद्वारे पुन्हा जमा झाले !

तथाकथित पुरोगामी, नास्तिकतावादी आणि बुद्धीप्रामाण्यवादी यांना सणसणीत चपराक ! 
     पुणे, १८ सप्टेंबर - येथील खडकवासला, पानशेत, वरसगाव, पवना या धरणांच्या खोर्‍यात गेल्या २ दिवसांपासून पाऊस संततधार चालू असून धरणातील साठा ५ टक्क्यांनी वाढला आहे. परिणामी या धरणांतून पाणी सोडण्यात येत आहे. खडकवासला धरण आणि अन्य धरणांतून गणेशमूर्ती विसर्जनासाठी ८० दशलक्ष घनफूट पाणी सोडले होते. आश्‍चर्य म्हणजे तेवढेच पाणी खडकवासला धरणात पावसाद्वारे पुन्हा जमा झाले आहे. (वरुणदेवतेने केलेली ही कृपादृष्टीच नव्हे का ? - संपादक) पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता पांडुरंग शेलार यांनी ही माहिती दिली.

न्यूयॉर्कमधील स्फोटात २९ जण घायाळ !

     न्यूयॉर्क - न्यूयॉर्क शहराजवळील चेल्सिआ येथे १७ सप्टेंबरच्या संध्याकाळी (भारतीय वेळेनुसार रविवारी सकाळी) भीषण स्फोट झाला. यात २९ जण घायाळ झाले आहेत. यातील एकाची प्रकृती चिंताजनक आहे. या स्फोटामागे आतंकवाद्यांचा हात असल्याचा अजून कोणताही पुरावा सापडलेला नाही, असे पोलिसांनी सांगितले. स्फोट नक्की कशामुळे झाला, याचा पोलीस तपास करत आहेत. न्यूयॉर्क येथे घडवण्यात आलेला स्फोट हा योजनाबद्ध पद्धतीने घडवण्यात आल्याचे मत शहराचे महापौर बेल डे ब्लासिओ यांनी व्यक्त केले आहे. 

हिंदु ऐक्यासाठी संकेतस्थळाला भेट द्या !

English : www.hindujagruti.org 
 हिंदी : www.hindujagruti.org/hindi/ 
मराठी : www.hindujagruti.org/marathi/

काश्मीरमधील पीडीपी-भाजप सरकार विसर्जित करून राज्यपाल शासन लागू करा ! - डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी

       नवी देहली - काश्मीरमधील पीडीपी-भाजप सरकारचा प्रयोग अयशस्वी झाल्याने मेहबुबा मुफ्ती यांचे सरकार विसर्जित करून तेथे राज्यपाल शासन लागू करावे, अशी मागणी भाजपचे खासदार आणि वरिष्ठ नेते डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांनी केली आहे. काश्मीरमधील स्थिती नियंत्रित करण्यासाठी सैन्याच्याच शक्तीची आवश्यकता आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखातीत त्यांनी हे वक्तव्य केले आहे.

पोलिसांच्या संदर्भातील कटू अनुभव !

        सध्या सनातनचे साधक आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते यांना पोलिसांच्या शारीरिक आणि मानसिक छळाला सामोरे जावे लागत आहे. या अनुषंगाने विविध ठिकाणच्या पोलिसांविषयी सनातनचे साधक, हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते किंवा हिंदुत्वनिष्ठ यांना यापूर्वीही आलेले अनुभव येथे क्रमशः प्रसिद्ध करत आहोत.
दुचाकी फेरीची अनुमती देण्यासाठी हिंदु 
जनजागृती समितीची छळवणूक करणारे 
विजापूरचे पोलीस अधीक्षक आणि उपअधीक्षक !
१. हिंदु धर्मजागृती सभेच्या निमित्ताने २३ डिसेंबर या दिवशी सकाळी ११ वाजता दुचाकी फेरी काढण्यात येणार होती. या फेरीच्या अनुमतीसाठी हिंदू जनजागृती समितीचे एक कार्यकर्ते पोलीस अधीक्षक अजय हिलोरी आणि उपअधीक्षक चेतन कुमार यांच्याकडे गेले होते. तेव्हा या दोघांनी कार्यकर्त्याला अनावश्यक प्रश्‍न विचारून ध्येयापासून विचलित करण्याचा प्रयत्न केला. तुमचे काम काय ? तुम्ही हे का करता ? तुम्ही करत असलेल्या हिंदुत्वाच्या कार्यामुळे समाजाला काहीच लाभ नाही. (हे हिलोरी आणि चेतन कुमार सिद्ध करू शकतील का ? काँग्रेसचे बटीक झाल्यामुळे हिंदुत्वावर टीका करणारे कर्नाटकातील पोलीस अधिकारी ! - संपादक) त्यापेक्षा गरिबांना जेवण, कपडे आदी देणे योग्य आहे. (हिलोरी आणि चेतन कुमार किती गरिबांना जेवण, कपडे इत्यादी देतात ? ते किती पोलिसांना यासाठी उद्युक्त करतात ? जेवण, कपडे देणे हे शासनाचे कर्तव्य आहे. शासन ते करत नाही, तर शासनाला ते सांगायला हवे. हिलोरी आणि चेतन कुमार हे शासनाला तसे सांगतील का ? - संपादक) तुम्ही लव्ह जिहाद वगैरे म्हणता, ते सर्व खोटे आहे. तो शब्दच नाही. (लव्ह जिहादच नाही, असे सांगणारे पोलीस कधीतरी लव्ह जिहादच्या विरोधात कृती करतील का ? हिंदूंनो, अशा हिंदुद्रोही पोलिसांच्या जागेवर धर्माभिमानी पोलिसांना बसवण्यासाठी राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी यांना सत्तेवर बसवा ! - संपादक) केरळच्या उच्च न्यायालयानेच याविषयी म्हटल्याचे कार्यकर्त्याने सांगितल्यावर कुठल्या न्यायाधिशांनी हा निकाल दिला आहे ? त्याच्या निकालाची कागदपत्रे द्या.

समीर गायकवाड यांच्या अन्याय्य अटकेचा निषेध करत ट्विटरवर धर्मप्रेमी हिंदूंनी केली जामीन देण्याची मागणी !

        कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरणात सनातन संस्थेचे साधक श्री. समीर गायकवाड यांच्या अन्याय्य अटकेला एक वर्ष पूर्ण झाले, तरीही अन्वेषण यंत्रणेच्या हाती अजून कोणतेही ठोस पुरावे हाती लागले नाहीत. केवळ सनातनला बळीचा बकरा बनवण्याचे हे षड्यंत्र पुरोगाम्यांनी चालू ठेवले आहे. या अन्याय्य अटकेचा निषेध म्हणून तसेच समीर गायकवाड यांना जामीन मिळावा या मागणी करता धर्मप्रेमी हिंदूंनी १७ सप्टेंबर २०१६ या दिवशी ट्विटरवर #Bail4SamirGaikwad हा ट्रेंड केला. या ट्रेंडद्वारे श्री. समीर गायकवाड यांच्यावर अटक केल्याच्या दिवसापासून कशाप्रकारे कल्पोल्कल्पित आरोप करून अन्वेषण यंत्रणेने त्यांच्या विरोधात खोटे पुरावे सादर केले, प्रसारमाध्यमांतून केला गेलेला चुकीचा प्रसार तसेच समाजातील हिंदुत्वनिष्ठ संघटनांकडून सनातन संस्थेला मिळालेले समर्थन या विषयीच्या ट्विट्स करण्यात आल्या. यामध्ये पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू यांच्या भक्तांनीदेखील मोठ्या प्रमाणात ट्विट्स करून हा विषय अनेक लोकांपर्यंत पोेचवण्यास साहाय्य केले. हा विषय ८ लक्ष २४ सहस्र हून अधिक लोकांपर्यंत पोेचला.
धर्मप्रेमी हिंदूंनी उत्स्फूर्तपणे व्यक्त केलेल्या काही प्रतिक्रिया वाचकांसाठी देत आहोत.
१. समाजातून सनातनला लाखोंच्या संख्येने मिळत असलेल्या प्रतिसादातूनच समीर गायकवाड यांचे निर्दोषत्व सिद्ध होते. - उषा

सुभाषचंद्र बोस यांच्यामुळेच स्वातंत्र्य मिळाल्याचे त्यांच्याविषयी उघड झालेल्या कागदपत्रांतून स्पष्ट !

१. सुभाषचंद्र बोस यांच्यामुळे भारत स्वतंत्र झाला, हे सत्य असणे !
     नव्या पिढीने जनरल जी.डी. बक्शींचे बोस, द इंडियन सामुराई हे पुस्तक आवर्जून वाचले पाहिजे. या धारिका वा कागदपत्रे नुकतीच सार्वजनिक झाल्यामुळे गांधीजींच्या सत्य आणि अहिंसा यांमुळे भारत स्वतंत्र झाला नसून तो सुभाषचंद्र बोस यांच्यामुळे झाला असल्याचे स्पष्ट होत आहे. म्हणजे सावरकरांच्या रणाविण स्वातंत्र्य कोणा मिळाले ? यातील सत्य आता नव्या पिढीस उमजेल.
१ अ. सुभाषचंद्र बोस यांनी निर्माण केलेल्या आझाद हिंद सेनेेमुळे घाबरून ब्रिटनने भारत सोडला असल्याचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगणे ! : वर्ष १९५५ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बीबीसीच्या फ्रान्सिस वॉटसनने घेतलेल्या मुलाखतीत सांगितले, वर्ष १९४७ मध्ये ब्रिटनचे पंतप्रधान अकस्मात् भारतास स्वातंत्र्य देण्यास सिद्ध का आणि कसे झाले ?, याचे मला मोठे रहस्य वाटते; पण ते कधीतरी बाहेर येईल. बोस यांनी निर्माण केलेल्या आझाद हिंद सेनेेमुळे इंग्रज घाबरून गेले. गांधीजींच्या अहिंसेमुळे ब्रिटीश भारतीय सेनेवर काही फरक पडणार नव्हता. भारतावरची सत्ता भारतीय सेनेविना दुसरे कुणीच काबीज करू शकणार नव्हते. ते काम सुभाषचंद्रांंनी केले; म्हणून ब्रिटनने भारत सोडला.

पितृपक्षातील श्राद्ध !

      हिंदु धर्माने सांगितलेल्या ईश्‍वरप्राप्तीच्या मूलभूत सिद्धांतांपैकी एक म्हणजे देवऋण, ऋषिऋण, पितृऋण आणि समाजऋण ही चार ऋणे फेडणे होय. यांपैकी पितृऋण फेडण्यासाठी श्राद्ध आवश्यक असते. माता-पिता, तसेच निकटवर्तीय यांचा मृत्यूनंतरचा प्रवास हा सुखमय आणि क्लेशरहित व्हावा, त्यांना सद्गती मिळावी यांसाठीचा संस्कार म्हणजेच श्राद्ध. श्राद्धातील मंत्रोच्चारांमध्ये पितरांना गती देण्याची सूक्ष्म शक्ती सामावलेली असते. श्राद्धात पितरांना हविर्भाग दिला गेल्याने ते संतुष्ट होतात. याउलट श्राद्ध न केल्यास पितरांच्या इच्छा अतृप्त राहिल्यामुळे, तसेच असे वासनायुक्त पितर वाईट शक्तींच्या नियंत्रणात जाऊन त्यांचे दास (गुलाम) झाल्याने वाईट शक्तींनी पितरांचा उपयोग करून कुटुंबियांना त्रास देण्याची शक्यता अधिक असते. श्राद्धामुळे पितरांची या त्रासांतून मुक्तता होऊन आपले जीवनही सुसह्य होते.

बुलेट ट्रेन आणि कोकण रेल्वे

      राजकारण्यांनी भारतात बुलेट ट्रेन आणण्याचे सुतोवाच केले आहे. एका तासात मुंबई ते गुजरात अंतर कापू शकणार्‍या या रेल्वेच्या प्रकल्पाचा खर्च ९८ सहस्र कोटी रुपये एवढा अवाढव्य आहे आणि वर्ष २०२३ मध्ये पहिली रेल्वे या प्रस्तावित मार्गावरून धावू शकणार आहे. विमानाच्या भाड्यापेक्षाही अल्प भाडे या प्रवासासाठी असेल, असे सध्या सांगण्यात येत आहे. भाईंदरच्या मोठ्या खाडीच्या खालून भुयारातून ही रेल्वे धावणार असून कामही जोखमीचे आहे. मुळात भारतासारख्या विकसनशील देशाला एवढा खर्च एका मार्गासाठी करणे परवडणार आहे का, तसेच याची सध्या खरोखरच एवढी आवश्यकता आहे का, असे मूलभूत प्रश्‍न उपस्थित करण्यात आले आहेत. गतिमान प्रवास, वेळेची बचत, रोजगाराच्या संधी अशा विविध कारणांसाठी प्रकल्पाची आवश्यकता राजकारणी मांडत असले, तरी भारतातील काही रेल्वे सुविधांचे चित्र अगदी उलट आहे.

जागतिक पर्यावरण संमेलने : विकसित राष्ट्रांचा दिखावा !

१६ सप्टेंबर या दिवशी झालेल्या आंतरराष्ट्रीय ओझोनदिनाच्या निमित्ताने...
      वर्ष १६६७ मध्ये क्योटो (जपान) येथे एक पर्यावरणविषयक संमेलन झाले. या संमेलनात परस्पर संमतीने जगाला प्रदूषणाच्या तीव्रतेनुसार अत्याधिक, मध्यम आणि अल्प, अशा तीन भागांत वाटले गेले. त्यानंतरही रियो, कोपेनहेगन येथे पृथ्वी संमेलन पार पडले. डिसेंबर २०१० मध्ये कानकुल (मेक्सिको) येथे संयुक्त राष्ट्र पर्यावरण संमेलन पार पडले. प्रामुख्याने विकसित राष्ट्रांकडून अशा संमेलनाच्या माध्यमातून प्रदूषणाच्या समस्येवर तोंडदेखले अश्रू ढाळले जातात; पण त्यासाठी कोणताही पर्याय स्वीकारण्याची त्यांची सिद्धता नसते. त्यामुळे ही संमेलने केवळ दिखावा ठरतात.

साहाय्यासाठी सदैव तत्पर असणारे आणि भावपूर्ण सेवा करणारे विदेशातील संत अन् साधक !

रामनाथी आश्रमात होणार्‍या साधनावृद्धी शिबिराच्या निमित्ताने अनेक विदेशी 
साधक येत असतात. त्या वेळी मला जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये पुढे देत आहे.
श्री. संजय जोशी 
१. पू. सौरभदादांच्या सेवेत असतांना 
साहाय्यासाठी तत्पर असणारे संत आणि साधक 
१ अ. स्वतः संत असूनही पू. सौरभदादांची सेवा करण्यापूर्वी आणि झाल्यावर प्रार्थना आणि कृतज्ञता व्यक्त करणारे पू. सिरीयाकदादा ! : पू. सौरभदादांचे कपडे पालटतांना त्यांना अधूनमधून उचलावे लागते. त्या वेळी साहाय्यासाठी साधकांना बोलवावे लागते. साधकांना बोलावण्यासाठी मी खोलीच्या बाहेर आल्यावर कधीकधी मला पू. सिरीयाकदादा समोर दिसतात. त्यांना मी पू. दादांना उचलण्यासाठी साहाय्य कराल का ?, असे विचारल्यावर ते त्वरित होकार देतात. पू. सिरीयाकदादा खोलीत दादांकडे आल्यावर प्रथम पू. सौरभदादांना प्रार्थना करतात आणि पू. सौरभदादांचे कपडे पालटून झाल्यावर पुन्हा पू. दादांना कृतज्ञता व्यक्त करतात. स्वतः संत असूनही पू. सिरीयाकदादा यांच्या प्रत्येक कृतीतून संतांप्रती भाव कसा असावा ?, याची जाणीव झाली.

लेखा सेवा करतांना डॉ. (सौ.) मधुवंती पिंगळे यांना झालेले त्रास, आलेल्या अनुभूती आणि त्यांचे झालेले चिंतन

(डॉ.) सौ. मधुवंती पिंगळे
        सनातनच्या लेखा संदर्भात सेवा करणार्‍या डॉ. (सौ.) मधुवंती पिंगळे या कर्नाटक राज्यातील जिल्ह्यांमध्ये लेखा सेवा करण्यासाठी गेल्या होत्या. त्यांना १५.८ ते १५.९.२०१४ या कालावधीमध्ये पुष्कळ त्रास झाले. त्यांना झालेले त्रास, त्या वेळी त्यांना आलेल्या अनुभूती, त्यावर त्यांचे झालेले चिंतन आणि त्यांतून त्यांना शिकायला मिळालेली सूत्रे पुढे देत आहोत.
१. त्रासांचे स्वरूप 
आणि त्यावर केलेले उपाय
१ अ. आरंभी होणारे त्रास आणि 
संतांनी सांगितलेली उपाययोजना
१ अ १. अचानक तीव्र कंबरदुखीचा त्रास चालू होणे आणि त्यामुळे जिल्ह्यांतील सेवांचे पुढील नियोजन रहित करण्याचा निर्णय घेणे : लेखा विभागाच्या सेवेअंतर्गत २.८.२०१४ पासून माझे कर्नाटक राज्यातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाण्याचे नियोजन होते. ३ जिल्ह्यांतील सेवा पूर्ण झाल्यावर १४.८.२०१४ या दिवशी माझ्या कमरेमध्ये अचानक तीव्र वेदना चालू झाल्या. मला चालणेही कठीण होऊ लागले. यापूर्वी अधूनमधून व्हायचा, तसाच हा त्रास असावा, असे वाटून मी वेदनाशामक गोळी घेतली; पण तरीही वेदनांची तीव्रता न्यून न होता वाढतच होती. वेदनांमुळे बसने पुढील प्रवास करणे अशक्य वाटल्याने मी अन्य जिल्ह्यांतील नियोजन रहित करून मंगळूरु येथील सेवाकेंद्रात परत जाण्याचा निर्णय घेतला.

मिरज येथील आश्रमात असतांना साधिकेला जाणवलेली आणि शिकायला मिळालेली सूत्रे

कु. कविता कुलकर्णी
१. सनातनचे आश्रम म्हणजे चैतन्याची दिव्य पेटी असून साधकांना तिच्यात सुरक्षित आणि रज-तमापासून दूर अशा सात्त्विक वातावरणात ठेवल्याचे जाणवणे : ९.७.२०१६ या दिवशी मी मिरज आश्रमात होते. त्या वेळी वरच्या माळ्यावरील एका खिडकीतून बाहेर पहात होते. ती काचेची खिडकी होती. तिच्यातून बाहेर जोरात पडत असलेला पाऊस पहात असतांना मला पुढीलप्रमाणे जाणवले. बाहेरील जंतू आणि वातावरण यांचा त्रास होऊ नये; म्हणून एखाद्या बाळाला जसे काचेच्या पेटीत सुरक्षित ठेवलेले असते, तसेच सनातनचे आश्रम म्हणजे साधकांसाठी चैतन्याची दिव्य पेटी आहे. तिच्यात साधकांना सुरक्षित ठेवले आहे. त्यामुळे बाहेरील रज-तम वातावरणाची झळ त्यांना बसत नाही आणि ते सात्त्विक वातारणात चांगल्या पद्धतीने साधना करू शकतात.
२. जिवंतपणीच वैकुंठवासी झाल्याची गंमत ! : मी मिरज आश्रमात असतांना पूर्वी प.पू. डॉक्टर आश्रमात रहात असलेल्या खोलीत झोपले होते. तेव्हा मी प्रत्यक्ष शेषशायी श्रीविष्णूंच्या वैकुंठात आहे, असे मला वाटत होते. त्यामुळे मी वैकुंठवासी झाले म्हणजेच वैकुंठात वास करून आले, असे आता मला सांगता येणार होते. अशा प्रकारे मी जिवंतपणीच वैकुंठवासी झाले, याची मला गंमत वाटली. (समाजात एखादी व्यक्ती मृत झाल्यावर ती वैकुंठवासी किंवा कैलासवासी झाली, असा तिच्याविषयी उल्लेख केला जातो.)

समजूतदार, नम्र आणि मनापासून सेवा करणारा ५१ टक्के आध्यात्मिक पातळीचा उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला सनातन आश्रम, रामनाथी, गोवा येथील कु. आशुतोष दामोदर गायकवाड (वय १६ वर्षे) !

कु. आशुतोष गायकवाड
      भाद्रपद कृष्ण पक्ष द्वितीया (१८.९.२०१६) या दिवशी कु. आशुतोष गायकवाड याचा वाढदिवस झाला. त्यानिमित्त त्याचे आई-वडील, भाऊ आणि मामा यांना त्याची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये पुढे देत आहोत.
१. आशुतोष सतत हसतमुख असतो. 
- सौ. मनीषा गायकवाड (आशुतोषची आई)
२. व्यवस्थितपणा
     आशुतोष लहानपणापासून त्याचे सर्व साहित्य व्यवस्थित ठेवतोे. त्याचा खण नेहमीच आवरलेला असतो. तो प्रत्येक वस्तू जेथून घेतली, तेथेच ठेवतो.

प्रतिदिन होणारे शुद्धीयज्ञ सत्संग, म्हणजे चैतन्याचा महासागर असून त्यातून पुढच्या दिवसासाठी ऊर्जा आणि चैतन्य मिळणे

श्री. श्रीराम लुकतुके
       प्रतिदिन होणार्‍या शुद्धीयज्ञ सत्संगातून पुढच्या दिवसासाठी ऊर्जा आणि चैतन्य मिळते. त्यामुळे हा सत्संग एकही दिवस चुकू नये, असे वाटते. प्रत्यक्षातही प्रवास किंवा काही अडचण आल्याविना सत्संग कधी चुकला नाही. सेवेवरून कधी येण्यास उशीर झाला, तरी शेवटची ५ - १० मिनिटे तरी का होईना, सत्संग ऐकावा, असे वाटते. नेमके त्याच वेळी माझ्यासाठी आवश्यक असणारे सूत्र अथवा सत्संगाचे सार देव संतांच्या माध्यमातून सांगतो. केवढी ही देवाची प्रीती ! आम्ही कुठेही अगदी जगाच्या कानाकोपर्‍यात असलो, तरी देवच प्रतिदिन या सत्संगातून आम्हाला भेटत आहे, भरभरून चैतन्य देत आहे, तरीही या सत्संगाचा अपेक्षित असा लाभ करून घेण्यास आम्ही अल्प पडतो; म्हणून दयाळू गुरुमाऊलीच्या चरणी क्षमायाचना करतो. या सत्संगांचा आम्हा साधकांना गुरुमाऊलीला अपेक्षित असा लाभ करून घेता येऊ दे, ही कळकळीची प्रार्थना. - गुरुचरणी, 
श्री. श्रीराम लुकतुके, चेन्नई (१७.८.२०१६)
नीटनेटकेपणा असणारी, चुकांची खंत वाटणारी आणि योग्य दृष्टीकोन देऊ शकणारी ५३ टक्के आध्यात्मिक पातळीची अन् उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली अंबरनाथ, जिल्हा ठाणे येथील कु. चैत्राली कुलकर्णी (वय १० वर्षे) !

कु. चैत्राली कुलकर्णी
      (वर्ष २०१० मध्ये कु. चैत्राली हिची आध्यात्मिक पातळी ५१ टक्के असल्याचे घोषित झाले होते. - संकलक)
     कु. चैत्राली कुलकर्णी हिचा भाद्रपद कृष्ण पक्ष तृतीया (१९.९.२०१६) या दिवशी तिथीनुसार वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने तिच्या आईला जाणवलेली गुणवैशिष्ट्ये देत आहोत.
कु. चैत्राली कुलकर्णी हिला वाढदिवसानिमित्त 
सनातन परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा !
१. उपजतच कलागुण असणे
     कु. चैत्रालीमध्ये उपजतच कलागुण आहेत. तिची चित्रकला पुष्कळ चांगली आहे.

पंचतत्त्वाच्या उपायांद्वारे आलेल्या अनुभूती

श्री. यज्ञेश सावंत
      मला होणार्‍या त्रासामध्ये मन आणि बुद्धी यांवर आवरण येणे, छातीवर प्रचंड दाब जाणवणे, अखंड अनावश्यक विचारांची शृंखला चालू रहाणे, भीती वाटून तिचे प्रमाण वाढणे, त्यामुळे व्यष्टी आणि समष्टी साधना करतांना पुष्कळ अडथळे येणे, असे त्रास होत होते. या त्रासासाठी नामजप आणि मंत्रजप असे उपाय केल्यावर थोड्या प्रमाणात फरक जाणवायचा; मात्र त्रासांची लक्षणे पुन्हा दिसून यायची. गेल्या महिन्यापासून त्रासांचे प्रमाण वाढल्यावर मी पंचतत्त्वाच्या उपायांविषयी जाणून घेतले आणि रामनाथी आश्रमात आल्यावर हे उपाय चालू केले. त्यामुळे पुढील लाभ झाले.

सलग दोन बुधवारी नादाची अनुभूती येऊन ईश्‍वराने नाद ऐकू यावा, ही इच्छा पूर्ण करणे

पू. अशोक पात्रीकर
१. रात्री जागेपणी विठ्ठल, विठ्ठल, हे मधुर शब्द प.पू. भक्तराज महाराजांच्या आवाजापेक्षा वेगळ्या आवाजात अन् लयीत ऐकायला येणे : २३.७.२०१६ पासून मी रुग्णाईत असल्याने दिवसभर विश्रांतीसाठी खोलीतच असायचो. बुधवार, २७.७.२०१६ या दिवशी रात्री मला झोप येत नव्हती; म्हणून मी नामजप करत होतो. काही वेळाने अकस्मात् मला विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल, असे मधुर आवाजातील शब्द ऐकू आले. हे शब्द प.पू. भक्तराज महाराजांच्या आवाजातील किंवा मी ऐकलेल्या त्यांच्या एकाही भजनात लय म्हणून म्हटलेले नव्हते. कदाचित् हे भजन माझ्या पलीकडच्या खाटेवर झोपलेल्या साधकाच्या भ्रमणभाषमध्ये असेल, तर ते उद्या माझ्या भ्रमणभाषमध्ये घेऊया, असा विचार करून मी दिशा पालटली. नंतर मला झोप लागली.

चैतन्यसिंधू गुरुराज माझा

चैतन्याचे ओठी । चैतन्याची गोठी ।
चैतन्याची दिठी । फिरे सदा ॥ १ ॥
चैतन्य चरण । चैतन्य कारण ।
चैतन्यापायी । ऊठाऊठी ॥ २ ॥
चैतन्यसिंधू । गरुराज (टीप १) माझा ।
चैतन्यसदन । रामनाथी (टीप २) ॥ ३ ॥
चैतन्यचांदणे । पाझरे अखंड ।

आहोत कृतज्ञ तव चरणी ।

कु. माधुरी दुसे
परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले 
यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त...
ठेविलेस या आश्रमात तुझ्या ।
आहोत कृतज्ञ तव चरणी ॥ १ ॥
करूनी घेई प्रयत्न ।
होण्या लीन तव चरणी ॥ २ ॥
- कु. माधुरी दुसे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१५.५.२०१४)

सोवळे असावे मनाचे न केवळ शरिराचे ।

        सोवळे पाळण्याविषयी माझ्या मनात पुढील विचार येऊन ते पद्यात व्यक्त झाले.
सोवळे असावे मनाचे ।
न केवळ शरिराचे ।
मनाला स्पर्शू नये एकही अविचार ।
पाळूया मनाचा हा आचार ॥ १ ॥
स्पर्श झाला मनास दुर्विचाराचा ।
विटाळेल ते मन स्पर्श होईल अपवित्रतेचा ॥
ध्येय ठेवू अशा मनाला शुद्ध करण्याचे ।
सूचना देऊन प्रयत्न करू स्वभावदोष अन् अहं निर्मूलनाचा ॥ २ ॥
मन मग होईल सोवळे ।
सर्वांनाच मग आपण ओवळे ॥
अशा पवित्र मनाने केले काही ।
भगवंताची पूजाच ती होई ॥ ३ ॥
- कु. कविता कुलकर्णी, सांगली (१२.७.२०१६)
        मुसलमान आणि ख्रिस्ती हिंदूंपेक्षा संख्येने पुष्कळ अल्प असूनही ते त्यांच्या धर्मश्रद्धांचा प्रश्‍न उपस्थित झाला की, हिंदूंच्या कित्येक पट जास्त संख्येने आंदोलने करतात ! म्हणून त्यांच्या धर्मश्रद्धा जपण्यासाठी राज्यकर्ते सतर्क असतात. मुसलमान आणि ख्रिस्ती यांना समजलेले संघटित शक्तीचे महत्त्व हिंदूंना केव्हा समजणार ?

सनातनचे साधक आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते यांना सूचना

दसरा आणि दिवाळी यानिमित्त ग्राहकांना भेटवस्तू 
देणार्‍या आस्थापनांना सनातनची उत्पादने अन् ग्रंथ 
भेट देण्यास सांगण्यासाठी संपर्काचे नियोजन करा !
       दसरा आणि दिवाळी यानिमित्त मिठाईचे व्यापारी, सोने-चांदी यांचे व्यावसायिक, दुचाकी-चारचाकी वाहने विकणारी आस्थापने, अधिकोष (बँक) आणि मोठी कपड्यांची दुकाने, अशा अनेक ठिकाणी ग्राहकांना भेटवस्तू देण्यात येतात. तरी सनातनचे साधक आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते यांनी असे व्यापारी आणि आस्थापनांचे मालक यांना भेटून त्यांना अमूल्य ज्ञानसंपदा असलेले सनातनचे ग्रंथ (उदा. सात्त्विक रांगोळी, अलंकारविषयक ग्रंथ, आचार पद्धतीविषयक ग्रंथ, सण, उत्सव आणि धार्मिक व्रते यांचे महत्त्व सांगणारे ग्रंथ आदी), सनातन पंचांग आणि सात्त्विक उत्पादने भेट देण्यासाठी सुचवू शकतो. तसेच ज्या विज्ञापनदात्यांनी सनातन पंचांगसाठी विज्ञापन दिले आहे, त्यांनाही त्यांच्या ग्राहकांना दिवाळीनिमित्त भेट देण्यासाठी म्हणून सनातन पंचांग घेण्यास सांगू शकतो.

राष्ट्रधर्म सर्वश्रेष्ठ

       राष्ट्रापेक्षा श्रेष्ठ काहीही नाही. जर भारताची एकता, अखंडता, धर्म आणि संस्कृती धोक्यात असेल, तर आपल्या सर्वस्वाचे बलीदान करून देश वाचवणे, हे प्रत्येक भारतियाचे आद्य कर्तव्य आहे. हाच सनातन धर्म आहे.
- समर्थ रामदास स्वामी (अभय भारत, १५ मे ते १४ जून २०१०)

फलक प्रसिद्धीकरता

आतंकवाद नष्ट करण्यासाठी 
हिंदु राष्ट्र स्थापन करा !
        जम्मू-काश्मीरमधील उरी येथे असलेल्या सैन्याच्या मुख्यालयावर १८ सप्टेंबरच्या पहाटे साडेपाच वाजता जैश-ए-महंमदच्या ४ जिहादी आतंकवाद्यांनी केलेल्या आक्रमणात १७ सैनिक ठार झाले, तर ८ सैनिक घायाळ झाले.

हिंदू तेजा जाग रे !

Jago : Kashmir ke Uri me sena ke Mukhyalay par huye atanki akraman me 17 sainikonki mrutyu !
Atankwad ki jad nasht karne ka sahas sarkar kab dikhayegi ?
जागो : कश्मीर के उरी में सेना के मुख्यालय पर हुए आतंकी आक्रमण में १७ सैनिकों की मृत्यू !
आतंकवादकी जड नष्ट करने का साहस सरकार कब दिखाएगी ?
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥
या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो. - प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले
       जात्यंधता, सर्वधर्मसमभाव आणि बुद्धीप्रामाण्यवाद यांच्या आहारी गेलेल्या हिंदूंनी स्वातंत्र्यानंतर प्रगती केली आहे, असे एकतरी क्षेत्र आहे का ?
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले

बोधचित्र

॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज
सनातनचे श्रद्धास्थान
घरघर नसणे
       एकदा घर सुटले की तो दारोदार होतो, दारोदार झाला की घरोघर होतो आणि घरोघर झाला म्हणजे तो सर्वत्र असतो; म्हणून त्याला घरघर नाही.
भावार्थ : एकदा घर सुटले येथे घर हा शब्द माया या अर्थाने वापरला आहे. दारोदार होतो ... सर्वत्र असतो येथे सर्वव्यापी ब्रह्म किंवा ईश्‍वर या अर्थाचे वर्णन आहे. म्हणून त्याला घरघर नाही म्हणजे त्याला मृत्यूची घरघर नाही. तो अमर झालेला असतो.
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.)

प.पू. पांडे महाराजांचे अनमोल विचारधन

प.पू. पांडे महाराज
कृतज्ञता
     मला प्रत्येक क्षण देवाच्या कृपेने मिळाला आहे, म्हणजे मला उत्क्रांत होण्यासाठी त्यानेच मला ही संधी दिली आहे; म्हणून आपल्याला प्रत्येक क्षणाला त्याबद्दल कृतज्ञता वाटली पाहिजे. देवाने प्रत्येक क्षणाला मला जिवंत ठेवले, यासाठी त्याच्याप्रती कृतज्ञता वाटणे महत्त्वाचे आहे. प्रत्येक क्षणी सतर्क राहिल्याने प्रत्येक कर्म कौशल्यपूर्ण होऊन आनंदमय होईल. असे झाले, म्हणजे तो प्रत्येक क्षण जगला, असे होईल. 
- प.पू. परशराम पांडे, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (मे २०१५)

घरी भांडणे होतात, तशी आश्रमात कशी होत नाहीत ?

      बर्‍याच जणांना आश्‍चर्य वाटते की, एकत्र नाही, तर विभक्त कुटुंबातही फक्त ५ - ७ व्यक्ती असतांना त्यांची आपापसांत भांडणे होतात, तर रामनाथी आश्रमात ३५० हून अधिक साधक असतांना त्यांची आपापसांत भांडणे कशी होत नाहीत ? याचे उत्तर हे की, ईश्‍वरप्राप्ती हे एकच ध्येय असलेले सात्त्विक किंवा सात्त्विक होऊ इच्छिणारे जीव आश्रमात रहातात, तर घरी रज-तमप्रधान वृत्तीचे आणि देवाण-घेवाण हिशोब फेडण्यासाठी एका कुटुंबात जन्माला आलेले जीव एकत्र असतात. - (परात्पर गुरु) डॉ. आठवले

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

साधकाचे शत्रू 
द्वेष, मत्सर आणि अहंकार हे साधकाचे प्रमुख शत्रू आहेत. 
त्यांच्यावर विजय मिळवला की, प्रगती झालीच ! 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)


मनातले बोलले...!

संपादकीय 
      राजकारण म्हटले की, काहीतरी विधाने करून सतत विरोधकांना डिवचणे आणि प्रसिद्धीच्या झोतात रहाणे ओघानेच येते. सातत्याने जे जिभेला हाड नसल्याप्रमाणे बोलतात, तेच हाडाचे राजकारणी होऊ शकतात, असे एक समीकरण आता रूढ झाले आहे. त्यामुळेच जनता राजकारण्यांची मोठमोठी भाषणे आणि टाळ्यांची विधाने यांकडे विशेष लक्ष देत नाही. जसे आपच्या उथळ नेत्यांच्या स्वप्नरंजनाकडे, तसेच काँग्रेसवाल्यांच्या विद्वेषी टीकेकडेही दुर्लक्ष केले जाते.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn