Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

अपराधी सापडत नाहीत; म्हणून समीर गायकवाड आणि डॉ. वीरेंद्र तावडे यांचा बळी देऊ नका ! - श्री. अभय वर्तक

सनातन म्हणजेच सत्य असल्याने एक दिवस समीर 
गायकवाड आणि डॉ. तावडे यांचे निर्दोषत्व सिद्ध होईल ! 

डावीकडून डॉ. मानसिंग शिंदे, श्री. अभय वर्तक, अधिवक्ता
श्री. समीर पटवर्धन आणि अधिवक्ता श्री. वीरेंद्र इचलकरंजीकर

        कोल्हापूर, १७ सप्टेंबर (वार्ता.) - कॉ. गोविंद पानसरे हत्येच्या प्रकरणी महाराष्ट्र पोलिसांचे विशेष अन्वेषण पथक (एस्आयटी) खोट्या पुराव्यांच्या आधारे आणि कपोलकल्पित कहाण्या रचून सनातन संस्थेची अपकीर्ती करत आहे.
        डॉ. वीरेंद्रसिंह तावडे हे एक एम्.एस्. डॉक्टर असून त्यांना एका व्यापक षड्यंत्राद्वारे या हत्येच्या आरोपाखाली गोवण्यात येत आहे. विशेष अन्वेषण पथकाचे पोलीस कायदाबाह्य वर्तन करून, तसेच मानवाधिकारांचे उल्लंघन करून सनातन संस्थेच्या साधकांचा छळ करत आहेत. आम्ही संपूर्ण आयुष्य हिंदु धर्माच्या कार्यासाठी वाहून घेतले आहे. सनातन म्हणजेच सत्य आणि सत्य म्हणजेच सनातन आहे. यापुढील काळात डॉ. तावडे आणि श्री. समीर गायकवाड यांची निर्दोष मुक्तता झाल्यावर याच कोल्हापुरात एक दिवस आम्ही पत्रकार परिषद घेऊ, असे ठाम प्रतिपादन सनातन संस्थेचे प्रवक्ता श्री. अभय वर्तक यांनी केले. ते शाहू स्मारक येथे झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. या वेळी हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष अधिवक्ता श्री. वीरेंद्र इचलकरंजीकर, अधिवक्ता श्री. समीर पटवर्धन आणि सनातन संस्थेचे डॉ. मानसिंग शिंदे उपस्थित होते.

सनातन संस्थेची अपकीर्ती केल्याच्या प्रकरणी दैनिक लोकमतचे संपादक, मालक, मुद्रक आणि प्रकाशक यांच्या विरोधात संस्थेचा मानहानी भरपाईसाठी न्यायालयात दिवाणी दावा

         रामनाथी (गोवा), १७ सप्टेंबर (वार्ता.) - सनातन संस्थेच्या धर्मप्रसाराच्या समाजातील वाढत्या कार्याची व्याप्ती आणि संस्थेचा नावलौकिक ठाऊक असतांना संस्थेची अपकीर्ती करण्याच्या हेतूने दैनिक लोकमतचे संपादक राजू नायक यांनी सनातनी नव्हे ! विकृत ! या मथळ्याखाली मानहानीकारक लेख लिहून पणजी, गोवा येथून प्रसिद्ध होणार्‍या दैनिक लोकमतच्या गोवा आवृत्तीच्या १९ जून २०१६ या दिवशीच्या अंकाच्या हॅलो रविवार पुरवणीत प्रसिद्ध करून सनातनची मानहानी केली. त्यामुळे संस्थेची अपरिमित हानी झाली. त्यामुळे सनातन संस्थेचे व्यवस्थापकीय विश्‍वस्त श्री. वीरेंद्र मराठे यांनी संस्थेचे मानद कायदेविषयक सल्लागार श्री. रामदास केसरकर यांच्या मार्फत दैनिक लोकमतचे संपादक राजू नायक, मालक लोकमत मिडिया प्रा. लि., मुद्रक आणि प्रकाशक बालाजी मुळे यांना १४ जुलै २०१६ या दिवशी कायदेशीर नोटीस बजावून मानहानी भरपाईपोटी १० कोटी रुपयांची मागणी केली होती; परंतु त्यांनी या कायदेशीर नोटिशीतील संस्थेच्या मागणीची पूर्तता केली नाही. त्यामुळे सनातन संस्थेचे व्यवस्थापकीय विश्‍वस्त श्री. वीरेंद्र मराठे यांनी हिंदुत्वनिष्ठ अधिवक्ता श्री. गजानन नाईक, अधिवक्ता श्री. नागेश ताकभाते, अधिवक्त्या कु. दीपा तिवाडी आणि अधिवक्ता श्री. रामदास केसरकर यांच्या मार्फत दैनिक लोकमतचे संपादक, मालक, मुद्रक आणि प्रकाशक यांच्या विरोधात मानहानी भरपाईपोटी १० कोटी रुपये मागणीचा दिवाणी दावा फोंडा, गोवा येथील दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) यांच्या न्यायालयात दाखल केला आहे.

विकासासाठी हिंदुत्वाला वाढवण्याची आवश्यकता ! - डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी

       नवी देहली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकासासाठी हिंदुत्वाला वाढण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन भाजपचे खासदार आणि ज्येष्ठ नेते डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांनी केले आहे. राममंदिर उभारल्यास भाजप विजयी होऊ शकतो, असेही त्यांनी स्पष्ट केले. डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी म्हणाले की, आपल्याला माहीतच आहे की, भारताच्या विकासाचा आरंभ नरसिंह राव यांच्या कार्यकाळात झाला. अटल बिहारी वाजपेयी यांनीही विकास केला; मात्र इंडिया शायनिंग अपयशी ठरल्याने भाजप कमजोर झाला; जर राममंदिराची उभारणी झाली, तर भाजप पुन्हा विजयी होऊ शकतो.

धादांत खोटे वृत्त प्रसारित करून सनातन संस्थेची अपकीर्ती केल्याच्या प्रकरणी दैनिक लोकमतला सनातनची कायदेशीर नोटीस !

       फोंडा - सनातनची अपकीर्ती करण्याच्या हेतूने दैनिक लोकमत या मराठी वृत्तपत्राने १४ सप्टेंबर २०१६ या दिवशीच्या गोवा आवृृत्तीच्या अंकात पृष्ठ १ वर सनातन आश्रमातील महिला डॉक्टर ताब्यात, या मथळ्याखाली मानहानीकारक वृत्त प्रसिद्ध करून संस्थेची आणि मानसोपचार तज्ञ डॉ. (सौ.) आशा ठक्कर यांची अपकीर्ती केली आहे. त्यामुळे सनातन संस्थेचे व्यवस्थापकीय विश्‍वस्त श्री. वीरेंद्र मराठे यांनी अधिवक्त्या कु. दीपा तिवाडी यांच्यामार्फत दैनिक लोकमतचे संपादक राजू नायक, मालक लोकमत मिडिया प्रा.लि., तसेच मुद्रक आणि प्रकाशक बाळाजी मुळ्ये यांना १४.९.२०१६ या दिवशी कायदेशीर नोटीस बजावून मानहानी भरपाईपोटी १० कोटी रुपयांची मागणी केली आहे.
       या वृत्तात दैैनिक लोकमतने मुख्य मथळ्याच्या वर रामनाथी आश्रम : पानसरे हत्याप्रकरणी एस्आयटीची कारवाई, असे म्हटले आहे. तसेच डॉ. वीरेंद्र तावडे हे कान, नाक, घसा तज्ञ असतांना आणि डॉ. (सौ.) आशा ठक्कर या स्वतः मानसोपचारतज्ञ असतांना त्या डॉ. तावडे यांना विचारून खास साधकांना म्हणजे मानसिक आजार असलेल्या साधकांना औषधे देत होत्या, असे अत्यंत विपर्यस्त आणि डॉ. (सौ.) आशा ठक्कर आणि सनातन संस्था यांची अपकीर्ती करणारे वृत्त प्रसिद्ध केले आहे.

हणखणे (गोवा) येथे श्री गणेशमूर्तींची विटंबना करणार्‍या धर्मांध युवकाला ग्रामस्थांनी चोपले !

धर्मांधांच्या सणांच्या वेळी ते दंगल घडवून हिंदूंवर आक्रमण करतात, तर हिंदूंच्या 
सणांच्या वेळी असे विटंबनेचे प्रकार घडवून सामाजिक स्वास्थ्य बिघडवण्याचा प्रयत्न करतात !
      ऐन गणेशोत्सवात हणखणे, गोवा येथील बाबू वरक यांच्या घरात पूजलेल्या श्री गणेशमूर्तीची विटंबना करणार्‍या दुरारी बर्मन या मूळ उत्तरप्रदेशातील धर्मांध युवकाला ग्रामस्थांनी चोप देऊन पोलिसांच्या स्वाधीन केल्याची घटना घडली. घरातील पुरुष आरतीसाठी बाहेर गेले असतांना बर्मन हा विकृत युवक अर्धनग्न अवस्थेत वरक यांच्या घरात घुसला आणि या अल्ला या अल्ला असे ओरडत घरातील श्री गणेशमूर्ती आसनावरून खाली खेचली. त्याने घरातील महिलांवरही हात टाकून त्यांचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला.

खोट्या पुराव्यांच्या आधारे सनातन संस्थेची अपकीर्ती करण्याचे षड्यंत्र बंद करा ! - अभय वर्तक, प्रवक्ता, सनातन संस्था

सांगली येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन ! 
      सांगली, १७ सप्टेंबर (वार्ता.) - ३ सप्टेंबर २०१६ या दिवशी महाराष्ट्र पोलिसांच्या विशेष तपास पथकाने सनातन संस्थेचे साधक डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांना कॉ. पानसरे खून प्रकरणात अटक केली. डॉ. तावडे अनेक व्याधींनी त्रस्त असतांनाही त्यांना बेकायदेशीरपणे पोलीस कोठडीत अमानुष मारहाण करण्यात आली. तसेच त्यांच्या वैद्यकीय चाचणीचा अहवाल न्यायालयाने खडसावल्यावर सादर करण्यात आला. डॉ. वीरेंद्रसिंह तावडे हे एक प्रतिथयश 'एम.डी.' डॉक्टर असून एका व्यापक षड्यंत्राद्वारे त्यांना कॉ. पानसरे खून प्रकरणात गोवण्यात येत आहे. अशाच प्रकारे कोणत्याही सबळ पुराव्याशिवाय श्री. समीर गायकवाड यांना अटक करून गेले वर्षभर खटला चालू न देता कारागृहात डांबून ठेवले आहे. या प्रकरणी सनातन संस्थेच्या आश्रमावर छापा टाकून दवाखान्यातील वैद्यकीय औषधे जप्त करून 'नार्कोटिक' औषधे जप्त केल्याच्या खोटी वृत्ते प्रसिद्धीमाध्यमांना दिली जात आहेत.

हिंदुत्वनिष्ठ नेत्यांच्या हत्येचा कट रचणारे १३ धर्मांध दोषी !

     बेंगळुरू - येथील विशेष न्यायालयाने हिंदूंच्या हत्येचा कट रचणार्‍या १३ धर्मांधांना दोषी ठरवले आहे. हे धर्मांध लष्कर-ए-तोयबाशी संबंधित आहेत. राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने प्रविष्ट केलेल्या आरोपपत्राप्रमाणे ते महाराष्ट्र, तेलंगण आणि कर्नाटक राज्यांतील काही हिंदुत्वनिष्ठ नेत्यांच्या हत्येचा कट रचत होते. त्यातही एका दैनिकातील स्तंभलेखकाचीही हत्या करण्याचा कट रचण्यात येत होता. हे आरोपी पाक आणि सौदी अरेबियातील व्यक्तींच्या संपर्कात होते. त्यांचे पूर्ण षड्यंत्र सौदीच्या रियाध शहरात आखण्यात आले होते. त्यानुसार नांदेड, भाग्यनगर, बेंगळुरू आणि हुबळी येथील हिंदुत्वनिष्ठ नेते, पत्रकार आणि पोलीस यांना लक्ष्य करण्यात येणार होते. यातील एक आरोपी अद्याप फरार आहे.

बारामती येथे भाविकांच्या धर्मभावना पायदळी तुडवत नगरपरिषदेची मूर्तीदान मोहीम !

     बारामती (जिल्हा पुणे), १७ सप्टेंबर (वार्ता.) - येथे भाविकांच्या धर्मभावना पायदळी तुडवत बारामती नगरपरिषदेने धर्मद्रोही मूर्तीदान मोहीम राबवली. १५ सप्टेंबरच्या दिवशी बारामती येथे नगरपरिषदेकडून ठिकठिकाणी कृत्रिम हौद ठेवले होते. विसर्जनासाठी येणार्‍या भाविकांना त्या हौदात मूर्ती बुडवून नगरपरिषदेने ठेवलेल्या गाडीत मूर्ती ठेवण्यास नगरपरिषदेचे कर्मचारी सांगत होते. काही कर्मचारी तर भाविकांनी वहात्या पाण्यात मूर्ती बुडवल्यावर लगेच त्यांच्या हातातून मूर्ती घेत होते. त्या ठिकाणी काही गरजू मुले भाविकांना मूर्तीविसर्जन करण्यास साहाय्य करत होती. त्या मुलांना परिषदेचे कर्मचारी पाण्यात विसर्जित केलेल्या मूर्ती आणून जमा करायला लावत होते.

हिंदु जनजागृती समितीच्या प्रबोधनानंतर निपाणी नगरपालिकेने चुकीची सूचना मागे घेतली !

     निपाणी (बेळगाव) - निपाणी नगरपालिकेच्या वतीने गणेशमूर्ती विसर्जनाविषयी नागरिकांना रिक्शातून उद्घोषणा करून केलेल्या सूचनांमध्ये 'नदीत गणेशमूर्ती विसर्जन करू नका', असे सांगण्यात आले होते. त्यानंतर हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांनी नदीत गणेशमूर्ती विसर्जन केल्याने प्रदूषण होत नाही, असे निपाणी नगरपालिकेतील नगराध्यक्षांच्या निदर्शनास आणून दिले. त्यानंतर सदर सूचना मागे घेत आहोत, असे त्यांनी सांगितले. 
गणेशमूर्ती विसर्जनाने प्रदूषण होते कि नाही, याची खात्री न करता शहरात रिक्शातून अशी चुकीची उद्घोषणा करून निपाणी नगरपालिकेने धर्मद्रोहच केला आहे !

(म्हणे) सनातन संस्थेचे प्रमुख डॉ. जयंत आठवले यांची चौकशी झाली पाहिजे !

अंनिसचे डॉ. हमीद दाभोलकर यांचा सनातनद्वेष !
  • डॉ. दाभोलकर यांची हत्या, तसेच विविध ठिकाणचे स्फोट यांत सनातन संस्थेचा हात असल्याचे सिद्ध झाल्याचा धादांत खोटा आरोप !
      चिथावणीखोर भाषणे किंवा हिंसाचाराला उद्युक्त केल्यामुळे डॉ. झाकीर नाईक यांची सध्या चौकशी करण्यात येत आहे. त्याच धर्तीवर बॉम्बस्फोट किंवा हत्या यांमध्ये सनातन संस्थेचा सहभाग असल्याचे सिद्ध झाल्याने या संस्थेचे प्रमुख डॉ. जयंत आठवले यांची सखोल चौकशी करावी, अशी मागणी अंनिसचे डॉ. हमीद दाभोलकर यांनी राज्यसरकारकडे केली आहे. (धादांत खोटे वक्तव्य करणारे डॉ. हमीद दाभोलकर ! कोणत्याही हत्येत किंवा बॉम्बस्फोटात सनातनचा सहभाग असल्याचे कुठेही उघड झालेले नाही. सनातन संस्थेच्या विरोधात कोणत्याही पोलीस ठाण्यात साधा गुन्हाही नोंद नाही. - संपादक) त्यांनी पुढे म्हटले आहे की, आठवले यांचे व्यक्तिमत्त्व गूढ असल्याचा आक्षेप अनेक संस्थांनी यापूर्वीच घेतला आहे. डॉ. झाकीर नाईक आणि आठवले हे एकाच माळेचे मणी आहेत. (परात्पर गुरु आणि आतंकवादी यांना एका तराजूत तोलणारे डॉ. हमीद दाभोलकर यांच्या विवेकबुद्धीची कीव करावी तेवढी थोडीच आहे ! - संपादक) या संदर्भातील वृत्त दैनिक लोकसत्ताच्या संकेतस्थळावरील मुंबई या भागाच्या अंतर्गत प्रसिद्ध झाले आहे.

जळगाव येथे हिंदुत्वनिष्ठांच्या प्रबोधनानंतर सहस्रो गणेशभक्तांनी कृत्रिम हौदात गणेशमूर्तींचे विसर्जन करण्याचा निर्णय पालटला !

हिंदुत्वनिष्ठांनो, या यशाविषयी विघ्नहर्त्या श्रीगणेशाच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करूया !
  • २ सहस्रांहून अधिक गणेशभक्त कृत्रिम हौदाच्या ठिकाणी जाऊन माघारी फिरले !
  • शेकडो गणेशभक्तांनी हिंदुत्वनिष्ठांजवळ व्यक्त केली कृत्रिम हौद उपक्रमाच्या संदर्भात तीव्र शब्दांत अप्रसन्नता !
कार्यकर्त्यांच्या प्रबोधनानंतर कृत्रिम हौदात
मूर्ती विसर्जन न करता परत निघालेले गणेशभक्त
     जळगाव - जळगाव येथे महानगरपालिका आणि आर्य चाणक्य संस्था यांनी एकत्रितपणे सागर पार्क या मैदानावर कृत्रिम हौदाची निर्मिती केली होती. त्यांना शहरातीलच काही स्वयंसेवी संघटनांनी साहाय्य केले, तसेच प्रसारमाध्यमांनीही मोठ्या प्रमाणात या धर्मशास्त्रविरोधी उपक्रमाचा प्रसार केला होता. या उपक्रमाच्या आयोजकांना सहस्रो गणेशमूर्तींचे या कृत्रिम हौदात विसर्जन होईल, अशी खात्री होती; पण सनातन संस्थेचे साधक आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते यांनी केलेल्या प्रबोधनाला प्रतिसाद देत २ सहस्रांहून अधिक गणेशभक्तांनी कृत्रिम हौदात गणेशमूर्तींचे विसर्जन न करता मेहरूण येथील नैसर्गिक जलस्रोतात त्यांचे विसर्जन करण्याचा निर्णय घेतला. ते कृत्रिम हौद बांधण्यात आलेल्या सागर पार्क मैदानाजवळ येऊन माघारी फिरले. (धर्मशास्त्रानुसार नैसर्गिक जलस्रोतात गणेशमूर्तींचे विसर्जन करण्याचा निर्णय घेणार्‍या सर्व गणेशभक्तांचे अभिनंदन ! धर्मशास्त्राचे पालन करणारे हिंदू हीच हिंदु धर्माची खरी शक्ती ! - संपादक)

शाळांमध्ये योग आणि सूर्यनमस्कार सक्तीचे करण्याच्या निर्णयाला स्थगिती देण्यास मुंबई उच्च न्यायालयाचा नकार

     मुंबई, १७ सप्टेंबर - मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमध्ये योग आणि सूर्यनमस्कार सक्तीचे करण्याविषयी घेतलेल्या निर्णयाला स्थगिती देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. पालिकेच्या निर्णयाच्या विरोधात कुर्ला येथील मन्सूर अन्सारी यांनी जनहित याचिका प्रविष्ट केली होती. या याचिकेवर १६ सप्टेंबर या दिवशी मुख्य न्यायमूर्ती मंजुळा चिल्लूर आणि न्यायमूर्ती एम.एस्. सोनक यांच्या खंडपिठासमोर सुनावणी झाली. सूर्यनमस्कार हा व्यायामाचा प्रकार असून तो आरोग्यासाठी उपकारक आहे. त्यामुळे सूर्यनमस्कार या नावाकडे न पहाता त्यातून मिळणार्‍या लाभांकडे पहायला हवे, असेही मत न्यायालयाने या वेळी व्यक्त केले. (आज संपूर्ण जगाने योगाभ्यासाचे लाभ आणि महत्त्व जाणले आहे. असे असतांना भारतातच त्याला अशा प्रकारे विरोध करणे हा कर्मदरिद्रीपणा आहे. हिंदुद्वेषातून सूर्यनमस्काराला विरोध करणार्‍यांनी खुशाल हिंदुस्थानाच्या बाहेरचा रस्ता धरावा ! - संपादक) २ आठवड्यांनंतर या प्रकरणाची पुढील सुनावणी होणार आहे.

मदरशामध्ये लैंगिक शोषणानंतर मुलगी गर्भवती !

     कांकेर (छत्तीसगड) - येथील मदरशामध्ये शिकणार्‍या १४ वर्षांच्या मुलीचे गेल्या वर्षभरापासून मदरशाच्या संचालकाच्या मुलाकडून लैंगिक शोषण केले जात होते. यामुळे ही मुलगी गर्भवती झाली. तिने एका मुलीला जन्म दिला आणि दुसर्‍या दिवशीच या नवजात मुलीला मदरशाच्या बाहेर बेवारस स्थितीत ठेवण्याची घटना समोर आली. यानंतर पोलिसांनी केलेल्या चौकशीनंतर मदरशाचे संचालक महंमद अली फारुख यांचा मुलगा आबाद फारुख याच्या विरोधात गुन्हा प्रविष्ट करण्यात आला.

खाजगी तळ्यातही मूर्ती विसर्जनाला विरोध करणारे सातार्‍याचे हटवादी पोलीस आणि धर्मद्रोही !

     पाच दिवसांच्या श्री गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यासाठी सातारा येथील खाजगी मंगळवार तळ्यावर भाविकांनी गर्दी केली होती. या वेळी स्थानिक पोलीस प्रशासनाने श्री गणेशमूर्ती पारंपरिक पद्धतीने विसर्जन करण्यासाठी बंदी असल्याचे कारण पुढे करत भाविकांना श्री गणेशमूर्ती विसर्जनास मज्जाव केला. या वेळी घटनास्थळी श्री गणेशमूर्ती विसर्जनासाठी कुटुंबियांसमवेत आलेले सनातन प्रभातचे वार्ताहर श्री. राहुल कोल्हापुरे यांनी पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत बेंद्रे यांना मुंबई उच्च न्यायालयाने जिल्हा प्रशासनाला मूर्ती विसर्जनाविषयी दिलेले आदेश, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे दिशानिर्देश, पुणे येथील सृष्टी इको रिसर्च सेंटरचा पर्यावरणीय अभ्यासाचा दाखला आदी कागदपत्रे दाखवली; मात्र तरीही त्यांचे काहीही ऐकून न घेता पोलिसांंनी श्री. कोल्हापुरे यांनाच दमदाटी करण्यास प्रारंभ केला. श्री. कोल्हापुरे यांनी हे खाजगी तळे असल्याने त्याचे मालक आणि भाविक यांच्यामधील हा प्रश्‍न आहे. येथे प्रशासनाचा संबंध नाही, असेही सांगितले; मात्र तरीही पोलीस ऐकत नव्हते. (तळ्यात मूर्तीविसर्जन करू नये, असा कुणाचाही आदेश नसतांना पोलीस कुणाच्या दबावाखाली हिंदु धर्माविरुद्ध वागत होते ? - संपादक)

राजस्थानमध्ये ३६ गोहत्यांप्रकरणी ११ धर्मांधांना अटक !

      अलवर (राजस्थान) - अलवर जिल्ह्यातील रेवाडा गावात ३६ गायींचे सांगाडे सापडल्याच्या प्रकरणी पोलिसांनी ११ धर्मांधांना अटक केली आहे. येथे गोहत्या केली जात असल्याची माहिती मिळाल्यावर पोलीस घटनास्थळी पोचले होते. या वेळी स्थानिक नागरिकांनी पोलिसांवर दगडफेक केली. त्यामुळे येथे तणाव निर्माण झाला होता. बकरी ईद निमित्त येथे गोहत्या करण्यात आल्याचे म्हटले जात आहे.

साधकांना सूचना

पौर्णिमा आणि अमावास्या या तिथींना प्रार्थना, नामजप, तसेच साधना अधिकाधिक करा. 
२ दिवसांपूर्वी पौर्णिमा झाली.

सासवड येथील संघचालकांकडून नदीमध्ये निर्माल्य आणि प्लास्टिक न टाकण्याचे गणेशभक्तांना आवाहन !

      राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील सासवड येथील संघचालक श्री. केशव तथा अप्पासाहेब पुरंदरे यांनी त्या भागातील सर्व गणेशोत्सव मंडळांना आवाहनपर पत्र प्रसिद्ध केले आहे. त्यानुसार नदीमध्ये निर्माल्य आणि प्लास्टिक न टाकण्यास सांगितले. त्याचसमवेत त्या पत्रामध्ये म्हटले आहे की, आपल्या गावची जीवनवाहिनी आपल्या गावातून वाहणारी कर्‍हामाई नदी आपल्याकडून प्रदूषित होणार नाही, याविषयी आपणच काळजी घ्यायला हवी. जागृतीपर हा प्रयत्न असून इतर लोकांमध्येही त्याविषयी जागृती करावी. (संघचालकांनी निर्माल्य वहात्या पाण्यात विसर्जित करण्यामागील धर्मशास्त्र जाणून घ्यावे, अशी अपेक्षा आहे. त्यांनी वर्षभर नदीमध्ये सोडले जाणारे सांडपाणी अन् विविध रासायनिक द्रव्ये, तसेच बकरी ईद आणि अन्य वेळी नदीत सोडले जाणारे पशूंचे रक्त यांविरोधात आवाज उठवावा ! - संपादक)

१८ वर्षांची हिंदु मुलगी मुसलमान मुलांना मंदिरात कुराण शिकवते !

१८ वर्षांची अन्य धर्मीय मुलगी कधी हिंदूंना तिच्या धार्मिक स्थळांमध्ये गीता शिकवू शकते का ?
      आग्रा येथील संजयनगर कॉलनीतील मंदिरात पूजा कुशवाह ही १८ वर्षीय हिंदु मुलगी प्रतिदिन सुमारे ३५ मुसलमान मुलांना नि:शुल्क कुराण वाचण्यास शिकवते. अरबी भाषेतील कठीण स्वर योग्य उच्चारणासह हे कार्य ती पार पाडते. पूजा म्हणाली की, काही वर्षांपूर्वी आमच्या घराशेजारी संगीता बेगम मुसलमान मुलांना कुराण शिकवत असत. तिचे वडील मुसलमान, तर आई हिंदू होती. (हिंदूंनो, लव्ह जिहाद जाणा ! - संपादक) त्यांच्याकडून मी कुराण वाचणे शिकले. काही कारणांमुळे संगीता बेगम यांना शिकवणी वर्ग बंद करावा लागला. त्यांनी मला आग्रह करून ही शिकवणी चालू ठेवण्यास सांगितले. हा वर्ग घेण्यासाठी माझ्या घरातील जागा अल्प ठरत आहे. तेव्हा परिसरातील लोकांनी मला यासाठी मंदिरात जागा दिली. पूजाची मोठी बहीण नंदिनीही मुलांना हिंदी आणि गीता शिकवते.

खुनात सनातनचाच हात असल्याचे तपास यंत्रणा आणि सरकार यांनी सिद्ध करावे, यासाठी लोकमतचा संपादकीयाच्या माध्यमातून दबाव आणण्याचा अश्‍लाघ्य प्रयत्न !

लोकमतचा वैचारिक आतंकवाद !
   खुनात सनातनचाच हात असल्याचे अन्वेषण यंत्रणा आणि सरकार यांनी सिद्ध करावे, यासाठी संपादकीयाच्या माध्यमातून दबाव आणण्याचा अश्‍लाघ्य प्रयत्न लोकमत या दैनिकात १३ सप्टेंबर या दिवशी प्रसिद्ध झालेल्या संपादकियातून करण्यात आला आहे.
यामध्ये मांडण्यात आलेली सूत्रे संक्षिप्तपणे ...
१. नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे आणि डॉ. कलबुर्गी यांच्या गेल्या तीन वर्षांत झालेल्या हत्या व्यक्तीगत कारणांखातर वा कौटुंबिक वैरासाठी झाल्या नाहीत. (हे लोकमतला कसे कळले ? लोकमतच्या संपादकांना कारण ठाऊक असेल, तर अन्वेषण यंत्रणांनी त्यांचीच चौकशी करावी. - संपादक) 
२. दाभोलकर-पानसरे-कलबुर्गी हे विज्ञानवादी, पुरोगामी, सत्यशोधनाचे पुरस्कर्ते आहेत, तर त्यांचा खून करणार्‍यांचा संबंध सनातनी म्हणवणार्‍या एका गूढ संघटनेशी आहे. (सनातनचा कारभार पूर्णतः पारदर्शक आहे. त्यांची ध्येयधोरणे साधकांचा सूचना या सदराद्वारे दैनिक सनातन प्रभातमधून जाहीररित्या प्रसिद्ध होतात ! - संपादक)

(परात्पर गुरु) डॉ. आठवले यांच्या शिकवणीमुळे प्रतिकूल परिस्थितीतही संयत मार्गापासून तसूभरही न ढळणारी सनातन संस्था !

१. धर्मद्रोही आणि नास्तिक मंडळी करत असलेल्या टीकेच्या निषेधासाठी हिंसेद्वारे नव्हे, तर सनदशीर मार्ग अवलंबणारी सनातन संस्था ! : राजकीय पक्षाचा प्रमुख नेता एखाद्या प्रकरणात अडकल्यास त्या पक्षातील कार्यकर्त्यांचा भावनिक उद्रेक होतो. मग ते जिकडे तिकडे तोडफोड आणि जाळपोळ करण्यास प्रारंभ करतात. तसे करण्यासाठी संबंधित नेत्याची कार्यकर्त्यांना फूस असते. आतापर्यंत सनातन संस्थेवर धर्मद्रोही आणि नास्तिक मंडळींनी टीकेद्वारे बरीच चिखलफेक केली; परंतु सनातन संस्थेच्या साधकांचा भावनिक उद्रेक झाला आणि त्यांनी टीका करणार्‍यांना झोडपले, अशी बातमी कधीच वाचनात येत नाही; कारण सनातनचा मार्ग हिंसेचा नसून प्रबोधनाद्वारे कार्य करण्याचा आहे. 

गणेशोत्सवात राज्यभरात लावलेले अवैध कापडी फलक काढण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश

  • अवैध फलक उभेच कसे रहातात ? 
  • न्यायालयाला असे आदेश का द्यावे लागतात ? पालिका प्रशासन स्वतःहून कारवाई का करत नाही ? 
     मुंबई, १७ सप्टेंबर - गणेशोत्सवाच्या वेळी राज्यभरात लावलेले अवैध कापडी फलक लगेच काढून टाकावेत, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक आणि न्यायमूर्ती बी.पी. कुलाबावाला यांच्या खंडपिठाने सर्व महानगरपालिकांना दिले आहेत. (हे अवैध फलक प्रशासनाला दिसत नाहीत कि त्यातही काही आर्थिक लागेबांधे असतात ? - संपादक) एवढेच नव्हे तर या कारवाईला विरोध करणारे राजकीय पक्ष, नेते आणि कार्यकर्ते यांच्यावर पोलीस आयुक्तांनी कारवाई करून अहवाल अन् अवैध फलक लावणार्‍या कार्यकर्त्यांवर कशी कारवाई करणार, याविषयीचा तपशील सादर करावा, असे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत. (कायदे न पाळण्याची राजकीय पक्षांची मानसिकता असल्यानेच न्यायालयाला असे निर्देश द्यावे लागतात. असे पक्ष आणि कार्यकर्ते कायद्याचे राज्य कसे देणार ? - संपादक) त्याचसमवेत येत्या नवरात्रोत्सवात अवैध फलकबाजी होणार नाही, याची दक्षता घेण्याची सूचनाही खंडपिठाने केली आहे. (एवढे सर्व आदेश न्यायालयाला द्यावे लागत असतील, तर प्रशासन हवे कशाला ? - संपादक) 

पुण्यात गणेशोत्सवाच्या कालावधीत महिलांच्या छेडछाडीचे एकूण ४२३ गुन्हे प्रविष्ट !

धर्मशिक्षणाअभावी उत्सवाचा उद्देश ध्यानात न आलेल्या जन्महिंदूंचे अयोग्य वर्तन ! 
      पुणे, १७ सप्टेंबर - येथे गणेशोत्सवानिमित्त देखावे पहाण्याच्या वेळी गर्दीचा अपलाभ उठवत शहरामध्ये ७ ते १२ सप्टेंबर या कालावधीत महिलांच्या छेडछाडीचे एकूण ४२३ गुन्हे प्रविष्ट झाले आहेत. (शेकडोंनी गुन्हे प्रविष्ट झाले म्हणजे गुन्हे प्रविष्ट न झालेल्या किती घटना असतील ? - संपादक) त्यामध्ये १२ सप्टेंबर या एकाच दिवशीच्या रात्री महिलांची छेडछाड करण्याचे १२० गुन्हे पोलिसांनी प्रविष्ट केले आहेत. (अशा आंबटशौकिनांना कठोर शिक्षा आणि समाजाला धर्मशिक्षण दिल्यासच असे प्रकार रोखता येतील. उत्सवांचा खरा उद्देश समजून ते साजरे होण्यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना (सनातन धर्म राज्य) अनिवार्य आहे ! - संपादक)

थेरगाव (पुणे) येथे पोलिसांवर आक्रमण करणारे मंडळाचे कार्यकर्ते अटकेत

     चिंचवड (पुणे), १७ सप्टेंबर - येथील थेरगाव घाटावर १५ सप्टेंबर या दिवशी गणेशमूर्ती विसर्जनासाठी जाणार्‍या बी.व्ही.जी. इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या आस्थापनाच्या गणेशोत्सव मंडळाचा ट्रक रस्त्याच्या मध्येच उभा केल्याने वाहतूककोंडी झाली होती. पोलिसांनी त्या मंडळाच्या कार्यकर्त्यांना पुढे सरण्यास सांगितल्यावर ३ कार्यकर्त्यांनी त्यांच्याकडे अनुमती पत्र असल्याचे सांगत त्यांच्यावर धावून गेले. या संदर्भात संबंधित पोलीस कर्मचार्‍याने तक्रार केल्यावर त्या तिघांना पोलिसांनी कह्यात घेतले. (गणेशोत्सवात अशा गैरकृत्यांचा अवलंब करणारे जन्महिंदूच हिंदु धर्माचे खरे वैरी ! - संपादक)

अमोनियम बायकार्बोनेट न घातलेल्या कृत्रिम हौदात पुण्यातील मानाच्या ५ गणपतींचे विसर्जन; शहरात अपप्रकारांना उधाण !

हौशा-गौशांचे द्वयर्थी चित्रगीतांवर अश्‍लाघ्य नृत्य 
मानाचा तांबडी जोगेश्‍वरी गणपति कृत्रिम हौदात विसर्जित करतांना 
आणि शेजारी झाकण्यासाठी ठेवलेले निळे कापड !
     पुणे - येथील मानाच्या गणपतींना ढोल-ताशांच्या गजरात गणरायाला निरोप देत असतांनाच एकूण शहर आणि परिसरातील विसर्जन मिरवणुकांमध्ये काही अपप्रकारांना उधाण आले होते. पुण्याच्या मानाच्या पाचही गणेशमंडळांनी महानगरपालिकेने सिद्ध केलेल्या कृत्रिम हौदात गणेशमूर्तींचे विसर्जन केले. पुण्यातील मानाचा पहिला कसबा गणपति, त्यानंतर दुसरा तांबडी जोगेश्‍वरी तसेच गुरुजी तालीम मंडळांच्या गणपतींचे नटेश्‍वर घाट येथे, तर तुळशीबाग गणपति आणि केसरी वाडा गणपति यांचे पांचाळेश्‍वर घाट येथे विसर्जन करण्यात आले. विशेष म्हणजे मानाच्या गणपतींसाठी सिद्ध करण्यात आलेल्या कृत्रिम हौदात अमोनियम बायकार्बोनेट घालण्यात आले नव्हते. गणेशमूर्तीचे विसर्जन झाल्यानंतर कृत्रिम हौद निळ्या ताडपत्रीने झाकून ठेवण्यात येत होता. (मानाच्या गणेशोत्सव मंडळांचा आदर्श अन्य मंडळे घेत असल्याने त्यांनी धर्मशास्त्रानुसार परंपरेप्रमाणे गणेशमूर्तींचे वहात्या पाण्यात विसर्जन केले असते, तर योग्य संदेश गेला असता. - संपादक) तुळशीबाग गणपतीच्या विसर्जनाच्या वेळी कृत्रिम हौदाच्या ठिकाणी सिद्ध केलेले लाकडी व्यासपीठ खचले. व्यासपिठावरील गर्दी त्यानंतर लगेच न्यून केल्याने पुढील दुर्घटना टळली.

सनातनचे साधक आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते यांना सूचना

पोलिसांनी केलेल्या चौकशीची माहिती त्वरित दैनिक सनातन प्रभातला कळवा ! 
     डॉ. दाभोलकर आणि कॉ. पानसरे यांच्या हत्येच्या प्रकरणी सनातनचे साधक आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते यांची ठिकठिकाणी पोलिसांकडून चौकशी करण्यात येत आहे. पोलिसांनी प्रत्यक्ष बोलावून, घरी येऊन किंवा भ्रमणभाषवर संपर्क करून चौकशी केल्यास त्या चौकशीची माहिती (कोणत्या दिवशी चौकशी झाली, काय प्रश्‍न विचारले, पोलिसांचे नाव, पोलीस ठाणे, किती वेळा चौकशी केली आदी सर्व तपशील) नजीकच्या दैनिक सनातन प्रभातच्या कार्यालयात त्वरित पाठवावी. आपल्या जिल्ह्यातील साधक किंवा कार्यकर्ते यांनी झालेल्या चौकशीचा तपशील पाठवला आहे कि नाही, याचा जिल्हा समन्वयकांनी आढावा घ्यावा. 

कानपूरमध्ये श्री गणेशमूर्ती विसर्जन मिरवणुकीवर आक्रमण करून धर्मांधांकडून मूर्तीची तोडफोड !

भारत पाकिस्तान होण्याच्या मार्गावर !
      कानपूर - येथे अनंत चतुर्दशीच्या दिवशी धर्मांधांनी श्री गणेशमूर्ती विसर्जन मिरवणुकीवर केलेल्या आक्रमणात मूर्तीची तोडफोड करण्यात आली. यानंतर झालेल्या हिंसाचारात ४ जण घायाळ झाले. या वेळी हिंदूंनी पोलीस ठाण्याला घेराव घालून धर्मांधांना तात्काळ अटक करण्याची मागणी केली.

स्पिरिच्युअल सायन्स रिसर्च फाउंडेशन (एस्.एस्.आर्.एफ्.)च्या जुलै २०१६ मधील प्रसारकार्याचा आढावा

१. संकेतस्थळाच्या संदर्भातील संख्यात्मक आढावा 
१ अ. विविध माध्यमांतून संकेतस्थळाला भेट देणार्‍यांची संख्या

पुणे येथील संत प.पू. आबा उपाध्ये यांचा हिंदु धर्माला पाण्यात पहाणार्‍या नास्तिकांना अंतर्मुख करायला लावणारा प्रश्‍न !

प.पू. आबा उपाध्ये
      देव न मानणारी मंडळी सातत्याने हिंदु धर्म आणि सनातन संस्था यांना पाण्यात पहात असतात; पण धर्म म्हणजेच ईश्‍वर सर्वज्ञ, सर्वशक्तीमान आणि सर्वव्यापी आहे. त्यामुळे देव न मानणार्‍या नास्तिकांवरही आपत्कालीन प्रसंग ओढावला, तरी ते मनातून का होईना, देवाचाच धावा करतील. यासंदर्भात पुणे येथील संत प.पू. आबा उपाध्ये यांनी कथन केलेला प्रसंग येथे प्रसिद्ध करत आहोत. 
१. विज्ञानाने कृत्रिम पाऊस पाडता येणे; 
मात्र पडणारा पाऊस थांबवणे अशक्य असणे 
      अहो, देव न मानणार्‍या मंडळींनो, मध्यंतरी पावसाने महाराष्ट्रच नव्हे, तर संपूर्ण भारतात थैमान घातले होते. त्यात पुष्कळ मनुष्यहानी झाली, तसेच घरे, गाड्या यांची आतोनात हानी होऊन जनावरांचेही हाल झाले. त्या वेळी विचार आला, विज्ञाननिष्ठांनो, तुमचे विज्ञानाचे ज्ञान किती आहे ? कृत्रिम पाऊस (तोही अपायकारक असतो) पाडता येतो; पण पाऊस थांबवता येत नाही का ? तुम्हाला केवळ सनातन संस्था हीच समस्या रात्रंदिवस भेडसावत असते का ? तुम्हाला संसार इत्यादी करायला सुचत नाही का ? तर आता ऐका !

हिंदूंनो, कर्नाटकमधील प्रस्तावित अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याचे भीषण स्वरूप लक्षात घ्या आणि हा कायदा येऊ नये, यासाठी संघटित होऊन वैध मार्गाने प्रयत्न करा !

श्री. हर्षवर्धन शेट्टी
     महाराष्ट्र सरकारने अंधश्रद्धा निर्मूलन कायदा पारित केला आहे. त्या पार्श्‍वभूमीवर कर्नाटकमधील काँग्रेस सरकारने हा कायदा आणण्याचा प्रयत्न केला होता; परंतु हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि काही राजकारणी यांचा विरोध यांमुळे तो कायदा पारित झाला नाही. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी आम्ही तो कायदा पुढील अधिवेशनात पारित करूच, असे सांगितले आहे. त्यामुळे हिंदूंनी तो कायदा संमत होऊ नये, यासाठी वैध मार्गाने प्रयत्न करणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रथम या कायद्याची भीषणता आपण समजून घेतली पाहिजे.
१. अनेक संस्कृती उदयाला येऊन लोप पावणे; परंतु 
काळाच्या ओघात अनेक आक्रमणे होऊनही प्राचीन आणि महान हिंदु संस्कृती टिकून असणे 
     विश्‍वात अनेक संस्कृती उदयाला आल्या आणि लोप पावल्या; परंतु प्राचीन अन् महान हिंदु संस्कृती नष्ट करणे कुणालाही शक्य झाले नाही. शेकडो वर्षांपासून आणि आजही हिंदु संस्कृती नष्ट करण्याचे प्रयत्न होत आहेत. काही पंथियांनी हिंदु संस्कृतीचा नाश करण्याचा प्रयत्न केला; परंतु आदि शंकराचार्यांनी तो प्रयत्न हाणून पाडला. त्यानंतर मोगल आणि ब्रिटीश यांनी सर्व शक्ती पणाला लावून हिंदु धर्माचा नाश करण्याचा प्रयत्न केला; परंतु त्यांचे प्रयत्न विफल झाले. स्वातंत्र्यानंतर सर्व राजकारणी अल्पसंख्यांकांचे अमर्याद तुष्टीकरण करून हिंदु समाज आणि संस्कृती यांचा विनाश करण्याचा प्रयत्न करत आहेत. दुसरीकडे डाव्या विचारसरणीचे पक्ष नास्तिकवाद पसरवून आस्तिक हिंदूंना नास्तिक करण्याचा प्रयत्न करत आहेत.

अनेक भाविकांनी केले धर्मशास्त्रानुसार वहात्या पाण्यात विसर्जन !

पुण्यात हिंदु जनजागृती समितीच्या मोहिमेस यश !
भाविकांना श्री गणेशमूर्ती विसर्जनाचे
महत्त्व सांगतांना समितीची कार्यकर्ती
     पुणे - गणेशोत्सवाच्या शेवटच्या दिवशी अनेक भाविकांनी परंपरेप्रमाणे गणेशमूर्तींचे नदीमध्ये म्हणजेच वहात्या पाण्यात विसर्जन करत धर्मशास्त्राचे पालन केले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथील भिडे पूल, एस्.एम्. जोशी पूल, तसेच आेंकारेश्‍वर पूल येथील घाटांवर प्रबोधन मोहीम राबवण्यात आली. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद देत भाविकांनी श्री गणेशमूर्तींचे विसर्जन केले. या वेळी मुठा नदीला पाणीही सोडण्यात आले होते.
क्षणचित्रे : १. महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभेचे सचिव प्रा. रविकिरण गळंगे यांनी समितीचे प्रबोधन फलक पाहून स्वतःहून लोकांचे प्रबोधन करत वहात्या पाण्यात मूर्ती विसर्जित करण्याचे आवाहन केले. 
हातात फलक घेऊन उभे असलेले समितीचे कार्यकर्ते
२. एस्.एम्.जोशी पुलाजवळील घाटावर एका व्यक्तीला धर्मशास्त्र सांगून वहात्या पाण्यात विसर्जन करण्याचे आवाहन केल्यानंतर तिने त्याप्रमाणे कृती केली आणि जातांना समितीच्या कार्यकर्त्यांना प्रसाद देऊन साधकांना नमस्कार केला. 
३. आेंकारेश्‍वर घाट येथे महापालिकेच्या वतीने गणेशमूर्तींच्या पूजनासाठी ठेवण्यात आलेले पटल दक्षिण-उत्तर ठेवण्यात आले होते. हे एका भाविकाच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी ते तत्परतेने पालटून पूर्व-पश्‍चिम ठेवले.

सनातनच्या मागे समाज खंबीरपणे उभा रहाणे, ही सनातनच्या कार्याला मिळालेली पोचपावती !

अंतिम विजय सत्याचाच होतो ! सनातन हेच सत्य आहे !!
     सनातन प्रभातने पोलिसांच्या सनातनद्वेषाचे कटू वास्तव, हा विशेषांक ६ सप्टेंबर या दिवशी प्रसिद्ध केला. त्याला भरघोस प्रतिसाद मिळाला. या अनुषंगाने समाजातील मान्यवर आणि हिंदुत्वनिष्ठ यांनी व्यक्त केलेल्या प्रतिक्रिया येथे देत आहोत.
कोल्हापूर 
अंक वितरण करतांना नागरिकांचा मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद ! 
१. सनातनचे कार्य पुष्कळ चांगले असल्याचे सांगणे : कोल्हापूर शहरातील महाद्वार रोड येथे अंक वितरण करतांना समाजातील अनेकांनी सनातनचे कार्य पुष्कळ चांगले आहे. या अंकाच्या माध्यमातून जे सत्य परखडपणे तुम्ही समाजापर्यंत पोचवत आहात, त्याची आज आवश्यकता आहे, अशाप्रकारे भावना व्यक्त केल्या. 

पिंपरी-चिंचवड येथेही भाविकांनी कृत्रिम हौदांकडे फिरवली पाठ !

धर्माभिमान्यांनी मध्यरात्रीपर्यंत देहभान विसरून केली धर्मसेवा !
अधिवक्ता श्री. देवदास शिंदे (वर्तुळात)
     चिंचवड - पिंपरी-चिंचवड परिसरातही भाविकांनी कृत्रिम हौदाच्या संकल्पनेकडे पाठ फिरवत परंपरेप्रमाणे नदीत गणेशमूर्तींचे विसर्जन केले. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी गणेशमूर्तींचे नदीतच विसर्जन करण्यास प्राधान्य दिले. संस्कार प्रतिष्ठानच्या वतीने विसर्जन घाटांवर प्रतीवर्षी मूर्तीदान मोहीम राबवण्यात येते; पण मूर्तीदान उपक्रमाला भाविकांचा अत्यल्प प्रतिसाद मिळाल्याने या मोहिमेचा फज्जा उडाल्याचे चित्र होते. या वेळी धर्माभिमानी अधिवक्ता श्री. देवदास शिंदे, तसेच शिववंदना गटातील धर्माभिमानी युवक हेही थेरगाव घाटावर वहात्या पाण्यात विसर्जन करण्याचे भाविकांना आवाहन करत होते.

सनातनच्या एका सेवाकेंद्रात जाऊन पोलिसांकडून साधकांची चौकशी

       राष्ट्र आणि धर्म यांसाठी निःस्वार्थी वृत्तीने कार्य करणार्‍या सनातनच्या सेवाकेंद्रांची वारंवार पाहणी करणारे आणि साधकांच्या मागे चौकशीचा नाहक ससेमिरा लावून त्यांना त्रास देणारे पोलीस अन्य धर्मियांविषयी अशी भूमिका कधी घेतात का ?
       हिंदुबहुल भारतात हिंदु म्हणून जगणे दिवसेंदिवस महाकठीण होत चालले आहे. देशात राजवट कोणाचीही असो हिंदूंचा छळ ठरलेलाच ! स्वातंत्र्यपूर्व काळात जुलमी ब्रिटीश पोलिसांनी क्रांतीकारकांचा आतोनात छळ केल्याच्या कथा आपण वाचल्या असतील. आज त्या क्रांतीकारकांच्या जागी आहेत निष्पाप हिंदू, तर ब्रिटीश पोलिसांच्या जागी आहेत त्यांचे वंशज, म्हणजेच आजचे पोलीस ! गेल्या अनेक वर्षांपासून धर्मनिष्ठ सनातनसारख्या हिंदुत्वनिष्ठ संघटनांना संपवण्याचे षड्यंत्र अत्यंत थंड डोक्याने राबवले जात आहे. याचाच एक भाग म्हणून पोलिसांकडून सनातनचे साधक आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते यांचा विविध प्रकरणांशी संबंध लावून त्यांच्या चौकशीच्या नावाखाली चालू असलेल्या छळाला वाचा फोडणारे हे सदर !

पोलिसांच्या संदर्भातील कटू अनुभव !

       सध्या सनातनचे साधक आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते यांना पोलिसांच्या शारीरिक आणि मानसिक छळाला सामोरे जावे लागत आहे. या अनुषंगाने विविध ठिकाणच्या पोलिसांविषयी सनातनचे साधक, हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते किंवा हिंदुत्वनिष्ठ यांना यापूर्वीही पोलिसांच्या सतावणुकीविषयी आलेले अनुभव येथे क्रमशः प्रसिद्ध करत आहोत.
हिंदु धर्मजागृती सभेला अनुमती 
देण्यास विनाकारण अडथळे आणणारे 
विजापूरचे पोलीस अधीक्षक अजय हिलोरी !
       कर्नाटक राज्यातील विजापूर येथे २५.१२.२०१३ या दिवशी हिंदु धर्मजागृती सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेला अनुमती देण्यास पोलिसांनी विविध अडथळे आणले. यामुळे सभा रहित करावी लागते कि काय ? अशी स्थिती निर्माण झाली. शेवटी हिंदु विधीज्ञ परिषदेच्या अधिवक्त्यांनी न्यायालयात याचिका दाखल केल्यावर न्यायाधिशांनी अनुमती देण्यास सांगितली. या वेळी पोलिसांची लक्षात आलेली मानसिकता पुढीलप्रमाणे...
१. १७.१२.२०१३ : विजापूर येथील एका महिला पोलीस अधिकार्‍याने ध्वनीक्षेपकावरून धर्मजागृती सभेचा प्रसार करणारे वाहन अडवले आणि विविध परवान्यांची मागणी केली.

बलाढ्य हिंदुत्ववादी संघटना भारतातील हिंदूंचे रक्षण करत नाहीत, तर त्या बांगलादेशातील हिंदूंसाठी काही करतील, अशी अपेक्षा करू नका. जगभरच्या हिंदूंच्या रक्षणासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना करा !

     बांगलादेश अस्तित्वात येण्यापूर्वी तेथे २७ टक्के अल्पसंख्यांक होते; मात्र आता त्यात घट होऊन ते ९ टक्क्यांवर आले आहे. हिंदु पुजारी आणि बौद्ध गुरु यांना वेचून काढून ठार मारण्यात येत आहेत. घाबरलेले पुजारी त्यांचा वेष पालटून रहात आहेत. त्यांनी धोतर घालणे सोडून पॅन्ट-शर्ट घालणे चालू केले आहे. हिंदु महिलाही हातात बांगड्या घालण्यास घाबरत आहेत; कारण त्यांना मरणाची भीती सतावत आहे. हिंदु आणि मुसलमान स्त्री यांच्या वागण्यात जाणवणार्‍या भेदामुळे हिंदु धर्म रसातळाला जाण्याची कारणे लक्षात येणे

        स्त्री हीच विश्‍वाची जननी आहे. स्त्रीने धर्मपालन केले नाही, तर जग विनाशाकडे जाते. सध्या हिंदु स्त्रीच्या वर्तणुकीने हिंदु धर्म रसातळाला जात आहे. श्रीकृष्णाच्या कृपेने मला हिंदु आणि मुसलमान या दोन्ही धर्मांतील स्त्रियांशी जवळीकता साधण्याची संधी मिळाली. प.पू. डॉक्टरांच्या शिकवणुकीप्रमाणे आपण सर्वांकडून काहीना काही शिकण्याचा प्रयत्न केला पाहिजे, या विचाराने मी या महिलांशी जवळीक साधू लागले. त्यांना भेटून त्यांची सध्याची परिस्थिती आणि अध्यात्म या विषयांवर चर्चा करतांना लक्षात आलेली काही सूत्रे पुढीलप्रमाणे आहेत.
१. मानसिकता
अ. हिंदु स्त्रिया चित्रपटसृष्टीविषयी चर्चा करण्यात धन्यता मानतात. याउलट मुसलमान स्त्रिया समाजात निर्माण होणार्‍या सद्य:स्थितीविषयी जाणून घेण्यात शहाणपणा समजतात.

महानगरपालिकेतील उत्तरदायींना हिंदु राष्ट्रात आयुष्यभर साधना करून विषय समजून घेण्याची कडक शिक्षा करण्यात येईल !

१. जलप्रदूषणाच्या बागुलबुव्याला घाबरत पुणे महानगरपालिकेने मोठ्या प्रमाणात कृत्रिम हौदांचा प्रचार केला. कृत्रिम हौदातील गणेशमूर्तींचे पुढे काय करायचे ? छोट्याशा हौदात शेकडो गणेशमूर्ती विरघळू शकतील का ? या प्रश्‍नांची कोणतीही समाधानकारक उत्तरे महानगरपालिकेकडे नव्हती. 
२. महानगरपालिकेने कृत्रिम हौदांच्या एक पाऊल पुढे जात अमोनियम बायकार्बोनेटमध्ये गणेशमूर्ती विरघळवा असा अजब पर्याय उपलब्ध करून दिला.
३. त्यामुळेच अमोनियम बायकार्बोनेटचा प्रचार अचानकपणे भित्तीपत्रके, हस्तपत्रके आदी माध्यमातून करण्यामागे नक्कीच गहन अर्थ असायला हवा. हा अर्थ शोधून काढल्यास महानगरपालिकेचे आणखी कारनामे समोर येऊ शकतील.
४. नदीमध्ये गणेशमूर्ती विसर्जित करू पहाणार्‍या भाविकांची गैरसोय कशी होईल, यासाठी महानगरपालिकेने प्रयत्न केले.


गणेशोत्सवाच्या काळात होणार्‍या प्रदूषणावर बोलणारे कथित पर्यावरणवादी पशूवधगृहामुळे होणार्‍या प्रदूषणावर का बोलत नाहीत ?

      केवळ मुंबईतील देवनार पशूवधगृहात बकरी ईदला कत्तलीतून ३० लक्ष लिटर प्रदूषित पाणी निर्माण होते, तर महाराष्ट्रात किती प्रदूषित पाणी निर्माण होत असेल ? असे असतांना त्यावर कोणी काहीच न बोलता केवळ गणेशोत्सवाच्या निमित्ताने होणार्‍या प्रदूषणावर बोलतात, हे अत्यंत चुकीचे आहे. - श्री. रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ता, हिंदु जनजागृती समिती.

विज्ञापनांवर ५२६ कोटी रुपये खर्च करणारे आम आदमी पक्षाचे जनताद्रोही शासन !

     देहलीतील आम आदमी पक्षाच्या सरकारने शासकीय कामांची माहिती देण्यासाठी केलेल्या विज्ञापनांवर तब्बल ५२६ कोटी रुपये खर्च केले असून यातील १०० कोटी रुपयांचा हिशेब त्यांनी दिला नसल्याचे भारताचे नियंत्रक महालेखापरीक्षकांच्या (कॅगच्या) अहवालातून समोर आले आहे.

विहिंपने आता केवळ बोलणे नव्हे, तर कृती करणे अपेक्षित आहे !

     भारताला हिंदु राष्ट्र बनवण्यासाठी राज्यघटनेत पालट करायला हवा. - डॉ. प्रवीण तोगाडिया, नेते, विश्‍व हिंदु परिषद

न्यायाधीश असक्षम कि इतर कारणामुळे त्यांचा न्याय चुकला ! त्यांनी आतापर्यंत दिलेले न्यायही पडताळून पहा !

     बलात्काराच्या गुन्ह्याखाली दोषी ठरवला गेलेला मॉडेल सिद्धार्थ जुवेकर याला बलात्कार आणि फसवणुकीच्या गुन्ह्याखाली मडगावचे सत्र न्यायाधीश पॉल यांनी ७ वर्षांच्या कठोर कारावासाची शिक्षा सुनावली. जुवेकर याने नावेलीच्या एका युवतीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले होते, तसेच तिची आर्थिक फसवणूकही केली होती. यापूर्वी दक्षिण गोव्याच्या तत्कालीन अतिरिक्त सत्रन्यायाधीश वंदना तेंडुलकर यांनी सिद्धेशवर आरोप दाखल करण्याएवढे पुरावे समोर न आल्याचे कारण दाखवून ४ जुलै २०१४ या दिवशी त्याला दोषमुक्त केले होते.

श्री गणेशयागातील अभिमंत्रित पाण्याची आध्यात्मिक स्तरावरील वैशिष्ट्ये अभ्यासण्यासाठी यू.टी.एस्. (Universal Thermo Scanner) या उपकरणाद्वारे महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाने केलेली वैज्ञानिक चाचणी !

डावीकडून सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ, तसेच
श्री गणेशयागात पूर्णाहुती देतांना साधक-पुरोहित

       यज्ञ हे सनातन वैदिक धर्मातील एक महत्त्वाचे अंग आहे. धर्मग्रंथांत राजसूय, अश्‍वमेध, पुत्रकामेष्टी आदी यज्ञांविषयी सविस्तर माहिती आढळते. धर्मग्रंथांत वर्णिलेल्या यज्ञांचा समाजाला लाभ व्हावा, यासाठी काही संत प्रयत्नरत आहेत. संतांच्या अथक प्रयत्नांमुळेच यज्ञसंस्कृती टिकून आहे. तमिळनाडू येथील सप्तर्षि जीवनाडीपट्टीचे वाचन करणारे पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांनी सनातन आश्रमात श्री गणेशयाग करून त्याचे अभिमंत्रित जल आश्रमात सर्वत्र शिंपडावे, अशी नाडीपट्टीतील ऋषींची आज्ञा असल्याचे सांगितले. त्यानुसार धर्मप्रसाराच्या कार्यातील अडथळे दूर व्हावेत आणि साधकांचे रक्षण व्हावे, यासाठी १२ ते १४.९.२०१६ या कालावधीत गोवा येथील सनातन आश्रमात श्री गणेशयाग (यज्ञ) करण्यात आला. त्याचा वैज्ञानिक दृष्टीकोनातून अभ्यास करण्यासाठी यागाच्या वेळी वापरण्यात आलेल्या कलशातील पाण्याची यू.टी.एस्. (Universal Thermo Scanner) या उपकरणाच्या साहाय्याने चाचणी घेण्यात आली. या चाचणीची निरीक्षणे आणि त्यांचे विवरण पुढे दिले आहे.

फलक प्रसिद्धीकरता

दायित्व झटकून हास्यास्पद पाऊल उचलणारे हिमाचलचे काँग्रेस सरकार !
   हिमाचल प्रदेशातील पुजार्‍यांना राज्य सरकारकडून बंदूक बाळगण्यासाठी अनुज्ञप्ती (लायसन्स) देण्यात येत आहे. गेल्या काही वर्षांत राज्यात मंदिरांच्या पुजार्‍यांच्या हत्या करून प्राचीन मूर्ती आणि मौल्यवान वस्तू यांची चोरी झाल्याने हे पाऊल उचलण्यात आले आहे.

खरे संत आणि भोंदू संत यांच्यातील भेद

(सद्गुरु) श्री. राजेंद्र शिंदे
     आजकाल समाजामध्ये भगवी वस्त्रे घालून मोठमोठ्या पदव्या लावून अनेक व्यक्ती संत म्हणून मिरवतांना दिसतात. साधना आणि धर्म यांविषयाशी अनभिज्ञ असलेले सामान्य जन अशा भोंदू संतांच्या मागे लागून आपल्या आयुष्यातील साधनेची अमूल्य वर्षे आणि पैसा अनाठायी व्यय करतात आणि पदरी काहीच न पडल्याने हताश अन् निराश होतात. त्यामुळे त्यांचा गुरु, संत आणि देवता यांच्यावरील विश्‍वास उडतो. 
    ज्यांनी साधना करून न्यूनतम ७० टक्के आध्यात्मिक स्तर गाठला आहे, त्यांनाच आपण संत म्हणू शकतो. हा सगळा सूक्ष्मातील भाग असल्याने तो सर्वसामान्यांना कळत नाही. पुढील तक्त्यात भोंदू संत आणि खरे संत यांमधील भेद दिला आहे. त्याचा अभ्यास केल्यास आपल्याला काही प्रमाणात खरे संत ओळखता येतील.

हिंदू तेजा जाग रे !

Jago ! : Mandir-pujariyoki hatyaein rokne hetu Himachalki Congress sarkar unhe banduk ka license de rahi hai. - Raksha na kar panewali Congresska hasyaspad nirnay
जागो ! : मंदिर-पुजारियों की हत्याएं रोकने हेतु हिमाचल की कांग्रेस सरकार उन्हें बंदूक का लायसन्स दे रही है. - रक्षा न कर पानेवाली कांग्रेस का हास्यास्पद निर्णय !

रामनाथी आश्रमात श्राद्धविधी करण्याची मिळालेली संधी आणि शास्त्रशुद्ध विधी, सात्त्विक वातावरण, तसेच पुरोहित आदींमुळे पूर्वजांच्या संदर्भात आलेल्या अनुभूती !

पितृपक्षातील श्राद्ध ! 
       हिंदु धर्माने सांगितलेल्या ईश्‍वरप्राप्तीच्या मूलभूत सिद्धांतांपैकी एक म्हणजे देवऋण, ऋषिऋण, पितृऋण आणि समाजऋण ही चार ऋणे फेडणे होय. यांपैकी पितृऋण फेडण्यासाठी श्राद्ध आवश्यक असते. माता-पिता, तसेच निकटवर्तीय यांचा मृत्यूनंतरचा प्रवास हा सुखमय आणि क्लेशरहित व्हावा, त्यांना सद्गती मिळावी यांसाठीचा संस्कार म्हणजेच श्राद्ध. श्राद्धातील मंत्रोच्चारांमध्ये पितरांना गती देण्याची सूक्ष्म शक्ती सामावलेली असते. श्राद्धात पितरांना हविर्भाग दिला गेल्याने ते संतुष्ट होतात. याउलट श्राद्ध न केल्यास पितरांच्या इच्छा अतृप्त राहिल्यामुळे, तसेच असे वासनायुक्त पितर वाईट शक्तींच्या नियंत्रणात जाऊन त्यांचे दास (गुलाम) झाल्याने वाईट शक्तींनी पितरांचा उपयोग करून कुटुंबियांना त्रास देण्याची शक्यता अधिक असते. श्राद्धामुळे पितरांची या त्रासांतून मुक्तता होऊन आपले जीवनही सुसह्य होते.
       श्राद्धाचे इतके महत्त्व असतांनाही आज हिंदूंमधील धर्मशिक्षणाचा अभाव, त्यांचा अध्यात्मावरील अविश्‍वास, त्यांच्या विचारसरणीवर पाश्‍चात्त्य संस्कृतीच्या अंधानुकरणाची चढलेली पुटे आदींमुळे श्राद्धविधी दुर्लक्षिला वा अवास्तव अवाजवी कर्मकांडात गणला जाऊ लागला आहे; म्हणूनच अन्य संस्कारांइतकाच श्राद्ध हा संस्कारही अत्यावश्यक कसा आहे, हे सांगणे क्रमप्राप्त ठरते. १७ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर २०१६ या कालावधीत पितृपक्ष आहे. त्यानिमित्ताने श्राद्धविषयक लिखाण देत आहोत.

पू. (सौ.) आशालता सखदेवआजी यांच्या मृत्यूत्तरकर्मांतर्गत विविध दिवशी केलेल्या धार्मिक विधींचे सूक्ष्म-परीक्षण

पू. (सौ.) आशालता सखदेव
पू. (सौ.) आशालता सखदेवआजी यांचे १७ ऑगस्ट या दिवशी देहावसान झाले. त्यांच्या मृत्यूत्तर कर्मांतर्गत धार्मिक विधींचे सनातनच्या साधिका कु. मधुरा भोसले यांनी केलेले सूक्ष्म-परीक्षण येथे देत आहोत.
१. काही वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे
१ अ. धर्मशास्त्रानुसार १० व्या दिवशी अश्म्याचे
विसर्जन करण्यामागे असणारा कार्यकारणभाव
  विविध धार्मिक कृतींमुळे मृत लिंगदेहाची प्रेतयोनीतून मुक्तता होऊन त्याला विविध अवयवांनी युक्त असणारे सूक्ष्म शरीर प्राप्त होऊन विविध मासांना (महिन्यांना) केलेल्या श्राद्धामुळे त्याला १६ मासांनी पिंड प्राप्त होऊन त्याची गणना पितरांमध्ये केली जाते. यासाठी १० व्या दिवसापर्यंत अश्म्यावर प्रतिदिन तिलांजली देण्यास सांगितली असून १० व्या दिवशीच्या वेदिकाश्राद्धानंतर अश्म्यावर तिलांजली देऊन तेल अर्पण करून अश्म्याचे विसर्जन करण्याचे प्रयोजन धर्मशास्त्रामध्ये सांगितले आहे.
   वरील उदाहरणातून हिंदु धर्मशास्त्रात मृत्यूत्तर जीवनाचाही किती सखोल अभ्यास करून लिंगदेहाला टप्प्याटप्प्याने प्राप्त होणार्‍या विविध अवस्थांप्रमाणे प्रथम अश्मा, नंतर सातूचा पिंड आणि शेवटी सपिंडीकरण श्राद्धात भाताच्या पिंडावर उपचार करण्याविषयी सांगितले आहे. यावरून हिंदु धर्मशास्त्राची सखोलता आणि परिपूर्णता प्रकर्षाने दिसून येते.

श्राद्ध करण्याच्या संदर्भातील कृती !

श्राद्धकर्ता आणि श्राद्धभोक्ता 
यांसाठीचे विधीनिषेध आणि त्यांमागील शास्त्र
        आपल्या पितरांसाठी श्राद्ध करणारा तो श्राद्धकर्ता आणि श्राद्धासाठी निमंत्रित केलेला ब्राह्मण तो श्राद्धभोक्ता होय.श्राद्धादिवशी पुनर्भोजन, असत्य भाषण, द्यूत, हिंसा, प्रवास आणि कलह, श्राद्धाच्या दिवशी अन् त्याच्या आदल्या रात्री स्त्रीसंग या गोष्टी कर्त्याला आणि भोक्त्यालाही निषिद्ध आहेत.
        श्राद्धाचे भोजन हा अशुभ कर्मविधी मानला आहे. श्राद्धकर्मातील भोजन हे पितरांच्या नावे केलेल्या आवाहनात्मक मंत्रांच्या उच्चारणाने भारित झालेले असल्याने, ते वासनात्मक म्हणजेच रज-तमात्मक असते. याव्यतिरिक्त लिंगदेहांच्या आगमनाने वातावरणही दूषित झालेले असते. यामुळे श्राद्धाचे जेवण ग्रहण करणार्‍या जिवाला त्रास होण्याची शक्यता जास्त असते; म्हणून असे रज-तमात्मक जेवण ग्रहण करायला जाण्यापूर्वी कर्मकांडाने काही बंधने घातली आहेत. ती बंधने पाळून आपल्या देहावर वरील रज-तमात्मक विधीतून निर्माण होणारा परिणाम न्यूनतम होऊ देणे आणि त्याचा आपल्याला त्रास होऊ न देेणे, हा यामागे दडलेला हिंदु धर्माचा उद्देश आहेेे.

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त...

डॉ. (सौ.) मिनू रतन
श्री गुरुदेव, आप ही आप हो जाऊं ।
श्रीकृष्णस्वरूप श्री गुरुदेव के चरणोंमें,
आपकी आहट सुन पाऊं इतनी शांत हो जाऊं ।
आपकी वाणी सुन लूं इतनी गूंग हो जाऊं ।
आप ही आप हो जाऊं ऐसी मिट्टी बन जाऊं ।
निर्जीव हो जाऊं अथवा आपमें जीवित हो जाऊं ॥
(प.पू. डॉक्टराविषयी स्फुरलेल्या ओळी)
- डॉ. (सौ.) मिनू रतन, मुंबई (१.८.२०१५) 

पुणे जिल्ह्यातील मंचर येथील श्री. राजेंद्र आणि सौ. वैशाली महाजन यांना घरात जाणवलेले पालट

श्री. राजेंद्र महाजन
सौ. वैशाली महाजन
आम्ही दोघे प.पू. डॉक्टरांच्या कृपेने गेल्या ५ वर्षांपासून सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना करत आहोत. आमच्या घरी जगद्गुरु तुकाराम महाराज यांनी महाजन घराण्याला प्रसाद म्हणून दिलेले ५३७ अभंग आहेत. ते मंचर, पुणे येथील घरी जतन केले आहेत.
१. सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांनी
घरातील पिराच्या ठाण्याच्या जागी
नाथांची संजीवन समाधी आहे, असे सांगणे,
तेथून दिव्य सुगंध येणे आणि त्यावरील चुना काढल्यावर शिवलिंग आढळणे
    तीन वर्षांपूर्वी सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ घरी आल्या होत्या. त्या वेळी त्यांना घरातील पूर्वीपासून असलेले पिराचे ठाणे दाखवले. सद्गुरु अंजलीताईंनी सूक्ष्म-परीक्षण करून ही नाथांची संजीवन समाधी असून १२ फूट खोल पाण्यात आहे, असे सांगितले. त्यानंतर आम्ही समाधीवर लावलेला चुना काढल्यावर तेथे शिवलिंग आढळले. समाधीस्थानातून दिव्य सुगंध येतो आणि उष्णतेचे झोत बाहेर पडतात.

साधिकेने मंदिरात महाप्रसाद वाढणार्‍या मुलाला आंटी म्हणण्यापासून परावृत्त करणे, ते पाहून सनातनचे साधकच असे निर्भयपणे सांगू शकतात, असे एका महिलेने म्हणणे आणि या प्रसंगातून साधकांचे वागणे आदर्शच असायला हवे, हे साधिकेला शिकायला मिळणे

सौ. सुशांती मडगावकर
महाशिवरात्रीच्या दिवशी गोव्यातील वास्कोमधील सडा या गावी असलेल्या शिवमंदिरात सनातन संस्थेतर्फे ग्रंथप्रदर्शन लावले होते. मंदिरात महाप्रसादाची सोय करण्यात आली होती. आम्ही महाप्रसाद घ्यायला पंक्तीमध्ये बसलो होतो. माझ्या ताटातील भात संपल्याचे बघून महाप्रसाद वाढणार्‍या एका मुलाने मला विचारले, आंटी, तुला भात वाढू का ? हे ऐकून मी मान वर करून बघितले आणि त्याला सांगितले, मला भात नको; पण तुला एक सांगायचे आहे की, मला आंटी म्हणू नकोस. त्या ऐवजी मला आई, ताई, काकी, मामी यांपैकी काही म्हण. हिंदु धर्मात आंटी म्हटले जात नाही. माझे शब्द ऐकून तो मुलगा मला क्षमा करा, असे म्हणून पुढे गेला. त्या वेळी माझ्या जवळ बसलेल्या काही महिला मला बघतच राहिल्या. त्यांतील एका महिलेने मला विचारले, ताई, तुम्ही सनातनच्या साधिका ना ? सनातनचे साधकच असे निर्भयपणे सांगू शकतात. या प्रसंगाच्या माध्यमातून ईश्‍वरानेच माझ्या लक्षात आणून दिलेे की, साधकांच्या वागण्याकडे समाजाचे लक्ष असते. साधकांचे वागणे आदर्शच असायला हवे. - सौ. सुशांती मडगावकर, वास्को, गोवा. (८.३.२०१६)

सनातनच्या रामनाथी आश्रमाला भेट देणार्‍या जिज्ञासूंचे अभिप्राय

१. आश्रमातील स्वच्छता आणि सात्त्विक वातावरण यांमुळे मन निर्विचार झाले आणि शांती अनुभवली. इथे सेवेची संधी कधी मिळेल ?, असे वाटले. - अधिवक्ता जयप्रकाश पाटील, पुणे (२५.६.२०१६)
१. आयुष्यात कधीतरी आश्रमात येऊन साधना करायला पुष्कळ आवडेल. - चेतन चंदू तलवार, पुणे (२४.६.२०१६)
२. आश्रम पाहून एका वेगळ्या जगात आल्याचे जाणवले ! : आश्रम पाहून चेतना मिळाली आणि आनंद वाटला, तसेच शांतता अन् स्थिरता जाणवली. साधकांना भेटून प्रसन्न वाटले. सेवाभाव, तळमळ, प्रेम अशा भावनांची जाणीव झाली. एका वेगळ्या जगात आल्याचे जाणवले. - श्री. देवेंद्र ह. परब, ठाणे (२४.६.२०१६)

श्रीकृष्णाची बासरी आणि धर्मद्रोह्यांचे संमोहन !

श्री. राम होनप
   द्वापरयुगात जेव्हा श्रीकृष्ण बासरी वाजवत असतांना बासरीतून उत्पन्न होणार्‍या दैवी नादामुळे गोप-गोपी, विविध प्राणी आणि पक्षी श्रीकृष्णाकडे आकर्षित होत होते. भक्त आपल्या हातातील कामे टाकून लगबगीने श्रीकृष्णाकडे धाव घ्यायचे. सध्या कलियुगात जसे नास्तिक आणि धर्मद्रोही आहेत, तसे द्वापरयुगात नव्हते, हे बरे झाले, अन्यथा ते श्रीकृष्णाविषयी म्हणाले असते, बघा ! हा श्रीकृष्ण बासरीने सगळ्यांना कसे संमोहित करतो ते !
- श्री. राम होनप, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१०.९.२०१६)

आजचा वाढदिवस

कु. आशुतोष गायकवाड
रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमातील साधक कु. आशुतोष गायकवाड (वय १६ वर्षे) याचा आज भाद्रपद कृष्ण पक्ष द्वितीया (१८.९.२०१६) या दिवशी वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्याचे आई-वडील, भाऊ आणि मामा यांना त्याची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये उद्याच्या अंकात प्रसिद्ध करत आहोत.
कु. आशुतोष गायकवाड याला
वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराकडून शुभाशीर्वाद !

भावी आपत्काळात अन् नेहमीसाठीही उपयुक्त ठरणारी सनातनची ग्रंथमालिका : भावी आपत्काळातील संजीवनी !

बिंदूदाबन उपचारपद्धतीवर 
मार्गदर्शक सनातनचे ग्रंथ !
        संत-महात्मे, ज्योतिषी आदींच्या सांगण्यानुसार आगामी काळ हा भीषण आपत्काळ असून या काळात समाजाला अनेक आपत्तींना तोंड द्यावे लागणार आहे. आपत्काळात दळणवळण तुटल्यामुळे रुग्णाला रुग्णालयात नेणे, डॉक्टर वा वैद्य यांच्याशी संपर्क साधणे आणि पेठेत (बाजारात) औषधे मिळणेही कठीण होते. आपत्काळात ओढवणार्‍या विकारांना (आजारांना) तोंड देेण्याच्या पूर्वसिद्धतेचा एक भाग म्हणून सनातन भावी आपत्काळातील संजीवनी ही ग्रंथमालिका सिद्ध (तयार) करत आहे. या मालिकेतील १३ ग्रंथ आतापर्यंत प्रकाशित झाले आहेत. या ग्रंथांचा अभ्यास आतापासूनच केला, तर प्रत्यक्ष आपत्काळात विकारांना सामोरे जाण्यासाठी लागणारा आत्मविश्‍वास निर्माण होण्यास साहाय्य होईल. यासाठी हे सर्व ग्रंथ वाचकांनी अवश्य संग्रही ठेवावेत !

श्राद्धकर्माचे अध्यात्मशास्त्रीय महत्त्व सांगणारे सनातनचे ग्रंथ !

श्राद्ध (भाग १) 
महत्त्व आणि शास्त्रीय विवेचन
अतृप्त पूर्वजांच्या 
त्रासांपासून रक्षण करण्याचा उपाय !
१. श्राद्धामुळे पूर्वजांना गती कशी मिळते ?
२. श्राद्धामुळे पूर्वजांच्या त्रासांपासून रक्षण कसे होते ?
३. श्राद्ध कोणी, कधी आणि कोठे करावे ?
४. पितृपक्षात श्राद्ध केल्याने काय लाभ होतो ?
५. कावळा पिंडाला शिवणे, यामागील शास्त्र काय ?
-----------------------------------------------
श्राद्ध (भाग २) 
कृतींमागील अध्यात्मशास्त्र
श्राद्धविधीमागील शास्त्र 
समजून घेऊन तो भावपूर्ण करा !
१. श्राद्धात जानवे उजव्या खांद्यावरून (अपसव्य) का घालतात ?
२. श्राद्धात ब्राह्मणांना दिलेले अन्न पितरांपर्यंत कसे पोचते ?
३. श्राद्धात अर्पण करण्यात येणारे पिंड गर्भवतीने का पाहू नयेत ?
४. श्राद्धामुळे पितृऋणातून मुक्त कसे होता येते ?
५. श्राद्धविधी शास्त्रानुसार न केल्याने काय हानी होते ?

पितृपक्षात दत्ताचा नामजप, प्रार्थना आणि श्राद्धविधी करा !

साधकांना सुधारित सूचना
       या सूचनेतील मुद्रा सुधारित आहे. ते अधोरेखित केले आहे.
१. सध्या अनेक साधकांना वाईट शक्तींचा त्रास होत आहे. पितृपक्षात (या वर्षी १७ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर २०१६ या कालावधीत) हा त्रास वाढत असल्याने या कालावधीत प्रतिदिन ॐ ॐ श्री गुरुदेव दत्त ॐ ॐ । हा नामजप किमान १ घंटा करावा.
अ. जे साधक उपाय करतात, त्यांनी त्यांच्या उपायाच्या नामजपाच्या व्यतिरिक्त दत्ताचा नामजप किमान १ घंटा करावा. दत्ताचा नामजप करतांना हाताच्या अंगठ्याचे टोक अनामिकेच्या (करंगळीच्या शेजारील बोट) टोकाशी जुळवून अनाहतचक्र आणि मणिपूरचक्र यांच्या ठिकाणी न्यास करावा.
आ. जे साधक उपाय करत नाहीत, त्यांनी वैयक्तिक आवरणे, स्नान, स्वच्छता-सेवा आदींच्या वेळी दत्ताचा नामजप किमान १ घंटा होईल, असे पहावे; मात्र त्रास जाणवल्यास त्यांनीही दत्ताचा नामजप बसून अन् मुद्रा करून करावा.
२. पितृपक्षाच्या कालावधीत पूर्वजांच्या त्रासांपासून रक्षण होण्यासाठी मधेमधे दत्ताला प्रार्थना करावी.
३. पितृपक्षात ज्या साधकांना शक्य असेल, त्यांनी श्राद्धविधी अवश्य करावा.

सनातनच्या निरपराध साधकांवरील हा अन्याय लक्षात ठेवा !

        कोणताही गुन्हा केला नसतांना श्री. समीर गायकवाड यांना मागील ११ महिने ३० दिवसांपासून, तर डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांना ३ महिने ८ दिवसांंपासून कारागृहात डांबण्यात आले आहे.
केवळ हिंदुत्वाची मानहानी करण्यासाठी 
सनातनच्या निरपराध साधकांना कारागृहात 
डांबणार्‍यांना हिंदु राष्ट्रात दामदुप्पटीने शिक्षा देण्यात येईल !
       प्रवाहाच्या बरोबर वहाणारे मुडदे असतात. त्या प्रवाहात स्वतःची दिशा ठरवणारे जिवंत असतात ! - डॉ. सच्चिदानंद शेवडे, राष्ट्रीय प्रवचनकार आणि साहित्यिक, डोंबिवली, ठाणे.

जप्त केलेल्या वस्तूंची देखभाल न करणार्‍या अन्वेषण अधिकार्‍यांकडून वस्तूची हानीभरपाई वसूल करा !

    विविध प्रकरणांच्या अन्वेषणासाठी अन्वेषण यंत्रणा गाड्या, संगणक, भ्रमणभाष संच आदी अनेक प्रकारच्या वस्तू जप्त करतात. पुढे अन्वेषण पूर्ण झाल्यानंतर न्यायालयात सुनावणी चालू असतांना किंवा खालच्या न्यायालयात मिळालेल्या निकालाच्या विरोधात वरच्या न्यायालयात सुनावणी चालू असतांनाही या वस्तू अन्वेषण यंत्रणा किंवा न्यायालयाकडे जमा असतात. न्यायदानाच्या प्रक्रियेत अनेकदा कित्येक वर्षांचा काळ लोटतो. त्या काळात त्या वस्तूंची योग्य देखभाल आणि सुरक्षा न केल्यामुळे किंवा सुरक्षेची काळजी न घेतल्यामुळे त्या वस्तूंची हानी होते. काही वेळा या वस्तू गंजतात, मोडतात किंवा गाड्या असल्यास त्यांच्या भागांची चोरी होते. त्यामुळे जप्त करतांना वापरात असलेली वस्तू पुन्हा ताब्यात मिळते त्या वेळी ती वापरण्याच्या स्थितीत नसते. अशा प्रकारे लाखो प्रकरणांतील लक्षावधी वस्तू अन्वेषण यंत्रणांकडे जमा आहेत. या वस्तू सुस्थितीत ठेवण्यासाठी त्याची देखभाल करण्याचे दायित्व शासनाने घ्यायला हवे. कोणत्याही कारणांमुळे या वस्तू जप्त केल्या त्या वेळी ज्या स्थितीत होत्या तशा पुन्हा ताबा देतांना नसल्यास त्या वस्तूची हानीभरपाई संबंधित व्यक्तीस द्यावी. ही हानीभरपाई शासनाच्या तिजोरीतून न करता त्या वस्तूची देखभाल करण्यास त्या अधिकार्‍याने कुचराई केली त्याच्या वेतनातून किंवा संपत्तीतून करायला हवी.

परात्पर गुरु डॉ. आठवले संकलित करत असलेल्या ग्रंथांच्या निर्मिती-कार्यात सहभागी व्हा !

१. परात्पर गुरु डॉ. आठवले संकलित करत
असलेल्या अध्यात्म या विषयावरील ग्रंथांच्या
निर्मितीचे कार्य लवकरात लवकर करण्याची आवश्यकता !
    सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले संकलित करत असलेल्या धर्म, अध्यात्म, साधना, ईश्‍वरप्राप्तीसाठी कला, आध्यात्मिक संशोधन यांसारख्या विविधांगी विषयांवरील मराठी भाषेतील सुमारे ४५०० ग्रंथ लवकरात लवकर अंतिम करणे आणि त्यांचे विविध भाषांत भाषांतर करणे भावी काळाच्या दृष्टीकोनातून अत्यावश्यक झाले आहे. याची कारणे पुढे दिली आहेत.
१ अ. दूरचित्रवाहिन्यांसाठी धर्मशिक्षणाचे कार्यक्रम सिद्ध करणे : विविध दूरचित्रवाहिन्यांसाठी या ग्रंथांतील ज्ञानावर आधारित धर्मशिक्षणाचे कार्यक्रम सिद्ध करता येणार आहेत.
१ आ. आगामी भीषण काळापूर्वी करावयाची सिद्धता : तिसर्‍या महायुद्धाला काही वर्षांतच आरंभ होणार असल्यामुळे या ग्रंथांच्या संगणकीय धारिका लवकरात लवकर सिद्ध करायच्या आहेत.
१ इ. अखिल मानवजातीला पुढील सहस्रो वर्षे मार्गदर्शक ठरणे : हे ग्रंथ अखिल मानवजातीला पुढील सहस्रो वर्षे मार्गदर्शक ठरणार आहेत. या संदर्भातील ग्रंथांची वैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

सर्वत्रचे वाचक, हितचिंतक आणि धर्मप्रेमी यांना नम्र विनंती !

सनातनच्या विविध आश्रमांमध्ये खालील उपकरणांची आवश्यकता !
   सनातनच्या विविध आश्रमांमध्ये शेकडो साधक पूर्णवेळ साधना करत आहेत. राष्ट्र-धर्म यांच्या कार्यासाठी अधिकाधिक वेळ देता यावा, यासाठी पूर्णवेळ साधनेस आरंभ करणारे साधक, तसेच राष्ट्र आणि धर्म प्रेमी यांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. त्यामुळे सध्या आश्रमांमध्ये खालील उपकरणांची तातडीने आवश्यकता आहे.
   जे वाचक, हितचिंतक अथवा धर्माभिमानी वरील उपकरणे विकत घेण्यासाठी धनरूपात साहाय्य करू इच्छितात, त्यांनी श्री. विनायक आगवेकर यांना vaastunirmiti@gmail.com या संगणकीय पत्त्यावर अथवा ०८४५१००६०३६ या क्रमांकावर संपर्क साधावा.
    धनाच्या त्यागाद्वारे राष्ट्र आणि धर्म यांच्या कार्यात सहभागी होण्याची संधी दवडू नका !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले
बुद्धीप्रामाण्यवादी म्हणजे धर्मद्रोही !
       धर्म बुद्धीच्या पलीकडे असल्यामुळे बुद्धीप्रामाण्यवाद्यांनी धर्म समजून न घेता धर्मावर टीका करणे, हा धर्मद्रोहच आहे.
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले

बोधचित्र

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

संतांचा आदर करा !
सत्पुरुष आणि संत यांच्याविषयी आदर बाळगावा. ते परमेश्‍वराचे प्रेषित आणि प्रतिनिधी असतात. त्यांचा जन्म मानवी कल्याणासाठी आणि शोषितांच्या उद्वारासाठी असतो. 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज
सनातनचे श्रद्धास्थान
माया आणि परमेश्‍वर
अ. परमेश्‍वराची माया समजून घेऊन आहे तिथेच समाधानाने रहावे.
भावार्थ : माया समजून घेऊन म्हणजे मायेतील ब्रह्म समजून घेऊन. ते झाले की समाधान, आनंदच आहे.
आ. परमेश्‍वर पहाण्यापेक्षा परमेश्‍वराच्या रचनेची जाणीव करून घेणे, हेच खरे ज्ञान.
भावार्थ : परमेश्‍वराची रचना म्हणजे माया. तिची खरी जाणीव, ओळख करून घेणे, म्हणजेच मायेतील ब्रह्म ओळखणे. हेच खरे ज्ञान.
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.)
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥
या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो. - प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

राजधानीचे स्वरूप !

संपादकीय 
      राजधानी देहलीचे नाव कलंकित होण्यासाठी आता काय शिल्लक आहे, हे शोधून काढणे हा संशोधनाचा विषय आहे. गुंडगिरी, खून, मारामार्‍या, हिंसाचार, सर्व प्रकारचे प्रदूषण, बलात्कार आणखी काही... आणखी काही ! निर्भया बलात्कार प्रकरण वर्ष २०१३ मध्येे झाले. तेव्हापासून राजधानीतील नित्याच्या अश्‍लाघ्य गोष्टी बाहेर पडायला लागल्या. आज देशाची राजधानी देहली म्हणजे जागतिक असुरक्षित शहर बनले आहे. निर्भया प्रकरण अमानुष कृत्य होते. जगभर ते पसरले आणि शासन काहीतरी प्रभावी पाऊल उचलेल अन् अशा प्रकरणाची पुनरावृत्ती होणार नाही, अशी देशवासियांची खात्री बनली होते. प्रत्यक्षात जनतेचा अनुभव वेगळाच राहिला. बलात्काराच्या प्रकरणात काही पालट झाला नाही.

श्री गणेश मूर्तीविसर्जनआणि दगडफेक !

संपादकीय 
     गणेशोत्सव नुकताच समाप्त झाला. अनंतचतुर्दशीला सार्वजनिक आणि घरोघरच्या गणेशमूर्तींचे विसर्जन झाले. मुंबई-पुणे येथील गणेशमूर्ती विसर्जन मिरवणुका २१ पासून २८ घंट्यांपर्यंत चालल्या. हिंदु भाविकांच्या उत्साहाचे ते प्रतीक होते. आपल्या आराध्य दैवताला प्रतिवर्षी आनंदाने निरोप द्यायची त्यांची प्रथा आहे. त्यासाठी ते मैलोन्मैल पायपीट करत मिरवणुकीतून चालत असतात. तहान-भुकेचा विसर पडलेला असतो, मनात विचारांचे थैमान नसते. उद्याचा विचार नसतो. केवळ त्यागाचे प्रात्यक्षिक दिसत असते. केवळ भावावस्था अनुभवत ते गणेशमूर्तीच्या मागे चालत असतात.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn