Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

कोटी कोटी प्रणाम !

सनातनचे दुसरे संत प.पू. कालीदास देशपांडे यांची आज पुण्यतिथी

कोटी कोटी प्रणाम !

आज विश्‍वकर्मा पूजन

उमरखेड (जिल्हा यवतमाळ) येथे श्री गणेशमूर्ती विसर्जनाच्या मिरवणुकीवर दगडफेक !

गोळीबारात पुण्याचे भाजपचे नगरसेवक घायाळ
  • हिंदूंच्या मिरवणुकांवर दगडफेक व्हायला हा भारत आहे कि पाक ?
  • ईदच्या वेळी गोरक्षकांना नाहक तडीपार करणारे पोलीस हिंदूंच्या सणांच्या वेळी धर्मांधांना तडीपारीच्या नोटिसा कधी बजावतात का?
  • पोलिसांसह १५ नागरिक घायाळ
  • अपुर्‍या पोलीस बळामुळे गोंधळ
     उमरखेड - अनंतचतुर्दशीच्या दिवशी येथील शिवाजी वॉर्ड परिसरातील छावा गणेशोत्सव मंडळाची श्री गणेशमूर्ती विसर्जन मिरवणूक शहरातील रोहिलीपुरा या भागात आल्यावर मिरवणुकीवर दगडफेक चालू झाली. यात तीन पोलिसांसह १५ भाविक घायाळ झाले. (हिंदूंच्या मिरवणुकांवर दगडफेक कोण करतात, हे उघड असतांना पोलीस आवश्यक तो बंदोबस्त का करत नाहीत ? हिंदूंनो, सुरक्षित मिरवणुकांसाठी पोलिसांवर अवलंबून न रहाता आता हिंदूंनीच संरक्षककडे उभारण्याला आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण घेण्याला पर्याय नाही ! - संपादक) या वेळी पोलीस बंदोबस्त अपुरा असल्याने गोंधळ निर्माण झाला. पोलिसांनी अश्रूधुराच्या दोन नळकांड्या फोडल्या; मात्र परिस्थिती हाताबाहेर गेली. त्याच वेळी आलेल्या पावसामुळे परिस्थितीवर नियंत्रण मिळवता आले. या घटनेची माहिती मिळताच रात्री उशिरा जिल्हा पोलीस अधीक्षकांनी उमरखेडला भेट दिली. दगडफेक झाल्याचे कळताच शहरातील अन्य गणेशोत्सव मंडळांनी काही काळ मिरवणुका जागेवरच थांबवल्या होत्या.

पुणे येथे विसर्जन घाटांवर हिंदु जनजागृती समितीच्या वैध मोहिमेस पोलिसांचा विरोध !

पोलिसांनी मोहीम (प्रबोधन) थांबवण्यास सांगितले !
     पुणे - हिंदु जनजागृती समितीच्या वतीने प्रतिवर्षीप्रमाणे पुणे शहरातील घाटांवर आदर्श गणेशोत्सव मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेच्या अंतर्गत समितीचे कार्यकर्ते श्रीगणेशमूर्ती वहात्या पाण्यात विसर्जित करण्याचे धर्मशास्त्र भाविकांना सांगून त्यांचे प्रबोधन करतात. सनदशीर मार्गाने होणार्‍या या मोहिमेला अनंतचर्तुदशीच्या दिवशी म्हणजे १५ सप्टेंबर या दिवशी पोलिसांनी त्यांच्या अधिकारांचा अन्याय्य वापर करत विरोध केला. समितीच्या प्रबोधनानंतर भाविकांना श्रीगणेशमूर्ती विसर्जन करण्याकडे पुष्कळ कल वाढला. महानगरपालिकेने बांधलेले हौद ओस पडू लागल्याचे चित्र निर्माण झाले होते. त्यानंतर डेक्कन पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी अन्य पोलिसांसमवेत येऊन मोहिमेस विरोध करून ती थांबवण्यास सांगितले. विशेष म्हणजे मोहिमेला आडकाठी करण्यामागील कोणतेही स्पष्ट कारण पोलिसांनी सांगितले नाही. (वैध मार्गाने प्रबोधन करण्यास पोलिसांची आडकाठी का ? पोलिसांच्या अशा मनमानी आणि अन्याय्य वर्तणुकीमुळेच सर्वसामान्यांना त्यांचा आधार वाटत नाही ! - संपादक)

जळगाव येथे पोलीस प्रशासनाकडून हिंदुत्वनिष्ठांना प्रबोधन करण्यासही मज्जाव !

हिंदूंना धर्मप्रसार करण्यास अनुमतीविषयी विचारणारे 
ख्रिस्त्यांच्या उघड धर्मांतराला कधी विरोध करतात का ?
         जळगाव - हिंदुत्वनिष्ठ सागर पार्क मैदानाच्या आजूबाजूला थांबून गणेशभक्तांचे प्रबोधन करत असतांना सकाळी १०.३० वाजता १२ पोलीस कर्मचार्‍यांनी हिंदुत्वनिष्ठांना प्रबोधन करण्यापासून रोखले. ते हिंदुत्वनिष्ठांकडे अनुमती काढली आहे का ? अशी विचारपूस करत होते. (मिरज येथे पोलीस अधिकारी कृष्णप्रकाश यांच्यासमोर पोलिसांच्या वाहनावर चढून हिरवा झेंडा फडकवणार्‍या धर्मांध युवकाने कोणाची अनुमती काढली होती ? सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातली असतांनाही सकाळी ६ वाजण्यापूर्वी भोंग्यांवरून जी कर्णकर्कश आवाजात बांग दिली जाते, त्यासाठी कोणाची अनुमती काढलेली असते ? हिंदुत्वनिष्ठांना प्रबोधनाची अनुमती काढली आहे का ?, असे विचारणारे पोलीस कर्मचारी या प्रश्‍नांचे उत्तर देतील का ? - संपादक)
१. पोलीस अधिकार्‍यांच्या सांगण्यानुसार पोलीस कर्मचार्‍यांनी प्रबोधन करत असलेल्या सर्व हिंदुत्वनिष्ठांचे संपूर्ण नाव, संपर्क क्रमांक आणि पत्ता नोंदवून घेतला. त्यात त्यांनी महिला कार्यकर्त्यांचीही माहिती घेतली.

जमावाने केलेल्या गोळीबारात ४ धर्मांध ठार !

उत्तरप्रदेशच्या बिजनौरमध्ये धर्मांधांकडून हिंदु मुलींची छेडछाड
     बिजनौर (उत्तरप्रदेश) - बिजनौरच्या पेदा गावात हिंदु मुलींची धर्मांधांकडून छेडछाड करण्याच्या घटनेवरून जमावाने केलेल्या गोळीबारात अहसान, सरताज, अनीस आणि रिजवान हे चौघे ठार झाले, तर सलीम, अंसार, शाहनवाज, अलाउद्दीन, फुरकान आणि सरफराज यांसह एकूण १२ जण घायाळ झाले. यामुळे येथे तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली आहे. सकाळी शाळेत जात असतांना या मुलींची छेड काढण्यात आली. गोळीबारात ठार झालेल्यांच्या नातेवाइकांनी नजीबाबाद मार्ग रोखून धरला आणि वाहनांची तोडफोड केली. तसेच पोलिसांसमोरच त्यांनी हत्येचा सूड हत्या करूनच घेऊ, अशी धमकी दिली. यानंतर पोलिसांनी मोठ्या प्रमाणात बंदोबस्त ठेवला आहे.

कोइम्बत्तूरमध्ये झहीर नावाच्या युवकाकडून हिंदु युवतीची एकतर्फी प्रेमातून गळा चिरून हत्या !

   
      कोइम्बतूर - तमिळनाडूच्या कोइम्बत्तूरमध्ये झहीर नावाच्या युवकाने एकतर्फी प्रेमात आलेल्या अपयशाने २३ वर्षीय तरुणी एस्. धान्या हिची तिच्याच घरात घुसून गळा कापून निर्घृण हत्या केली. ती घरात एकटीच असताना झहीर तिच्या घरात मागील दरवाज्यातून घुसला. त्याने धान्या हिच्यावर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. धान्याने विरोध करताच झहीरने धान्यावर तीक्ष्ण हत्याराने आक्रमण केले. गेल्या ३ महिन्यांतील अशा प्रकारे घडलेली ही चौथी घटना आहे. घटनेनंतर झहीरने विष प्राशन केले. त्याच्यावर रुग्णालयात उपचार चालू असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. एस्. धान्या हिचा साखरपुडा नुकताच झाला होता. ती खाजगी आस्थापनात नोकरी करत होती.

आतंकवाद प्रभावित देशांमध्ये भारत चौथ्या क्रमांकावर !

भारताची अशी स्थिती असतांना आतंकवाद मुळासकट 
मोडून काढण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत, अशी 
कुठलीही स्थिती दिसून येत नाही, त्यामुळे भविष्यात 
भारतात कोणती स्थिती येईल, याची कल्पना करता येते !
        नवी देहली - आतंकवादाने प्रभावित झालेल्या देशांची सूची घोषित करण्यात आली असून यामध्ये भारताचा क्रमांक ४ था आहे. पहिल्या ३ क्रमांकावर अनुक्रमे इराक, अफगाणिस्तान आणि पाकिस्तान हे देश आहेत. तसेच जगभरात तालिबान, इसिस आणि बोको हराम या आतंकवादी संघटनांची दहशत आहे. त्यानंतर नक्षलवाद्यांचा क्रमांक लागतो. कुर्दिस्तान वर्कर्स पार्टी संघटना ५ व्या क्रमांकावर आहे.
१. २०१५ मध्ये जगभरात एकूण ११ सहस्र ७७४ आतंकवादी आक्रमणे झाली असून यामध्ये २८ सहस्र ३२८ जणांचा बळी गेला आहे, तर ३५ सहस्र ३२० लोक घायाळ झाले आहेत.
२. भारतात यांपैकी ४३ टक्के आक्रमणे झाली असून या आक्रमणांंमध्ये २८९ भारतीय मृत्युमुखी पडले आहेत.
३. २०१५ मध्ये नक्षलवाद्यांनी ३४३ आक्रमणे केली असून यामध्ये १७६ जण ठार झाले.

रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमातून गो-सेवक (किंकर) यात्रेला प्रारंभ !

डावीकडून सनातनचे संत पू. सीताराम देसाई, गोपूजन करतांना
पू. (सौ.) मालिनी देसाई, सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि अन्य

गोसंवर्धनासाठीची प्रतिज्ञा घेतांना मान्यवर

       रामनाथी, १६ सप्टेंबर (वार्ता.) - जगद्गुरु शंकराचार्य महासंस्थानम् श्रीसंस्थान गोकर्ण, श्रीरामचंद्रापूर मठाच्या वतीने गोव्यात १६ सप्टेंबर या दिवशी रामनाथी ते लोलये अशी गो-सेवक (किंकर) यात्रा काढण्यात आली. गोवंशरक्षणाविषयी जागृती करण्यासाठीच्या या यात्रेचा प्रारंभ १६ सप्टेंबर या दिवशी सकाळी रामनाथी, फोंडा, गोवा येथील सनातनच्या आश्रमात अनेक संतांच्या उपस्थितीत भावपूर्ण वातावरणात झाला.

पोलिसांनी पोलीस कोठडीची मागणी न केल्याने डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांना मिळाली न्यायालयीन कोठडी

कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरण !
     कोल्हापूर - सनातनचे साधक डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांना मोठा आकांडतांडव करून विशेष पोलीस पथकाने अटक केल्यापासून प्रथम पाच दिवस आणि नंतर नऊ दिवस पोलीस कोठडी घेतली. या कोठडीची मुदत १६ सप्टेंबरला संपल्यामुळे त्यांना येथील न्यायालयात हजर करण्यात आले होते.
     या सुनावणीच्या वेळी पोलीस अजून एक दिवस पोलीस कोठडी घेऊ शकत होते; मात्र तसे न करता पोलिसांनी डॉ. तावडे यांना न्यायालयीन कोठडी देण्यात यावी, असे न्यायालयात सांगितले. ही सुनावणी सहावे सहदिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर यु.बी. काळपगार यांच्यासमोर झाली. डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांच्या बाजूने अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर आणि अधिवक्ता समीर पटवर्धन उपस्थित होते, तर सरकारी पक्षाच्या वतीने अधिवक्ता चंद्रकांत बुधले उपस्थित होते.

बचावपक्षाच्या अधिवक्त्यांचे मानधन अल्प असल्याने भारतातील पाकिस्तानी आतंकवाद्याच्या विरोधातील खटला रखडला !

  • न्यायालयाने नेमलेल्या बचावपक्षाच्या अधिवक्त्याला केवळ १ सहस्र ५०० रुपये मानधन !
  • बचावपक्षाच्या अधिवक्त्यांना राज्यसरकारनेच मानधन देण्याविषयीचा कायदा ठरला राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेची डोकेदुखी !
     नवी देहली - अवघ्या १ सहस्र ५०० रुपयांसाठी भारतातील पाकिस्तानी आतंकवाद्याच्या विरोधातील खटला रखडला. आतंकवाद्याच्या बचावासाठी नेमलेल्या अधिवक्त्याला मिळणारे मानधन अवघे १ सहस्र ५०० रुपये असल्याने अधिवक्त्याने या खटल्यासाठी वेळ देता येणार नाही, असे म्हटले आहे.
१. लष्कर-ए-तोयबाचा आतंकवादी महंमद नावेद याला ५ ऑगस्ट २०१५ या दिवशी अटक करण्यात आली होती.
२. नावेद आणि त्याचा साथीदार नोमान या दोघांनी उधमपूरमध्ये सीमा सुरक्षा दलाच्या ताफ्यावर आक्रमण केले होते. या आक्रमणात २ सैनिक हुतात्मा झाले होते. 
३. यानंतर सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत नोमानला कंठस्नान घालण्यात, तर नावेदला स्थानिकांच्या साहाय्याने जिवंत पकडण्यात सैन्याला यश आले होते.

चिनी कामगारांच्या संरक्षणासाठी पाकचे १५ सहस्र सैनिक तैनात !

     इस्लामाबाद - पाक आणि चीन यांची मैत्री सर्वश्रृत आहे. आता पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात चालू असलेल्या चीनच्या इकॉनॉमिक कॉरिडोर प्रकल्पावर काम करणार्‍या ७ सहस्र ३६ चिनी कामगारांच्या सुरक्षेसाठी पाकिस्तानने तब्बल १४ सहस्र ५०३ सैनिक तैनात केले आहेत. पाकच्या संसदेत एका लिखित प्रश्‍नाच्या उत्तरात ही माहिती देण्यात आली. या प्रकल्पामुळे चीनला थेट पाकव्याप्त काश्मीरमध्ये प्रवेश मिळणार आहे. पाक आणि चीन या दोन्ही देशांसाठी अत्यंत महत्त्वाचा असलेल्या या प्रकल्पाच्या ठिकाणी काम करणार्‍या चिनी कामगारांवर आतापर्यंत अनेक आक्रमणे झाली आहेत. त्यामुळे या भागात काम करणार्‍या ७ सहस्र ३६ चीनी कामगारांना सुरक्षा पुरवण्यासाठी पाकिस्तानने प्राधान्य दिले आहे. पंजाबमध्ये चिनी नागरिकांच्या संरक्षणासाठी ६ सहस्र ३६४, बलुचिस्तानमध्ये ३ सहस्र १३४, सिंधमध्ये २ सहस्र ६५४, खैबर पख्तूनख्वाह भागात १ सहस्र ९१२, तर इस्लामाबाद येथे ४३९ पाकचे सैनिक तैनात करण्यात आले आहेत.



माजी खासदार शहाबुद्दीनची मुक्तता हा माझा मृत्यूदंड ! - चंद बाबू

बिहारमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाल्याचे द्योतक !
      सिवान (बिहार) - बिहारच्या जंगलराचा चेहरा, तसेच राष्ट्रीय जनता दलाचा माजी खासदार महंमद शहाबुद्दीन याची जामिनावर मुक्तता होणे, हा माझ्यासाठी मृत्यूदंडच आहे, अशा शब्दांत ७० वर्षीय चंद बाबू यांनी शहाबुद्दीनच्या जामिनाविषयी येथे प्रतिक्रिया व्यक्त केली. शहाबुद्दीनच्या साथीदारांवर चंद बाबू यांच्या ३ पुत्रांची हत्या केल्याचा आरोप आहे. चंद बाबू यांचे ज्येेष्ठ पुत्र राजीव रोशन यांच्या हत्येच्या प्रकरणी शहाबुद्दीनची नुकतीच जामिनावर मुक्तता झाली. राजीव रोशन हे त्यांच्या २ बंधूंच्या हत्या प्रकरणातील साक्षीदार होतेे. चंद्रकेश्‍वर प्रसाद उपाख्य चंद बाबू हे सध्या सिवान शहरात त्यांची आजारी पत्नी आणि अपंग मुलगा यांच्यासह रहात आहेत. ते म्हणाले, वर्ष २००४ मध्ये माझी २ मुले गिरीश आणि सतीश यांना शहाबुद्दीनच्या माणसांनी पळवून नेऊन प्रतापूर येथे अ‍ॅसिडमध्ये बुडवून त्यांची हत्या केली होती. राजीव यांनाही पळवण्यात आले होते; मात्र त्यांनी त्या वेळी स्वत:ची सुटका करून घेतली होती. वर्ष २०१४ मध्ये सिवान येथे परतला होता. राजीव यांच्या विवाहानंतर २१ व्या दिवशी शहाबुद्दीनच्या साथीदारांनी त्यांची हत्या केली, असे चंद बाबू यांनी सांगितले. एके काळी फार मोठे उद्योजक असलेले चंद बाबू यांची स्थिती सध्या अत्यंत हालाखीची झाली आहे.



भारताने संयुक्त राष्ट्रात प्रथमच बलुचिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरचे सूत्र उपस्थित केले !

संयुक्त राष्ट्रात पाकव्याप्त काश्मीरचा विषय उपस्थित 
केल्यानंतर आता भारत तो विषय उपस्थित करत आहे. या विलंबाला 
काँग्रेस उत्तरदायी आहे. या निष्क्रीयतेविषयी काँग्रेसने उत्तर दिले पाहिजे !
      नवी देहली - भारताने प्रथमच संयुक्त राष्ट्रसंघात बलुचिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर येथील मानवाधिकाराचे सूत्र उपस्थित केले. संयुक्त राष्ट्रसंघातील मानवाधिकार परिषदेच्या ३३ व्या अधिवेशनात भारताने पाकवर टीका केली. संयुक्त राष्ट्रसंघातील भारताचे राजदूत अजित कुमार यांनी सांगितले की, संपूर्ण जम्मू-काश्मीर भारताचे अविभाज्य अंग आहे. पाकने अवैधरित्या घेतलेला काही भाग आता मुक्त करणे शिल्लक आहेे. पाकने त्याची ऊर्जा देश आणि व्याप्त काश्मीरमधील मानवाधिकाराची स्थिती सुधारण्यासाठी व्यय (खर्च) करावी, असा सल्लाही भारताने दिला.

केरळच्या मौलवीने अर्थमंत्री आणि विद्यार्थिनी यांच्यातील हस्तांदोलनाच्या कृतीला लैंगिक कृती म्हणून संबोधले !

काविळ झालेल्यांना ज्याप्रमाणे सर्वत्र पिवळे दिसते, तसे वासनांधांना सर्वत्र लैंगिकता दिसते !
       कोझिकोडे - केरळचे अर्थमंत्री थॉमस आयसॅक आणि एक विद्यार्थिनी यांच्यातील हस्तांदोलनाला लैंगिक कृती संबोधणार्‍या मुसलमान मौलवीच्या विरोधात पोलिसात तक्रार प्रविष्ट करण्यात आली आहे. नौशद अहसानी या मौलवीने त्यांच्या जाहीर भाषणामध्ये मंत्री आणि ती मुलगी यांच्यातील हस्तांदोलन ही लैंगिक कृती असल्याचे घोषित केले होते. कोझिकोडे येथील मुलींच्या कायदा महाविद्यालयामध्ये दुसर्‍या वर्षांत शिकणार्‍या त्या मुलीने तिचा जाहीर अवमान झाल्याचे कुन्नामंगलम् पोलीस ठाण्यात केलेल्या तक्रारीत म्हटले आहे. केरळचे अर्थमंत्री थॉमस आयसॅक यांनी १८ ऑगस्ट या दिवशी कोझिकोडे येथील मुलींच्या कायदा महाविद्यालयाला भेट दिली होती. या वेळी बक्षीस वितरण केल्यानंतर त्यांनी मुलींशी हस्तांदोलन केले होते.


अमेरिकेत जागतिक हिंदु एकता दिन साजरा

फोरम फॉर हिंदु अवेकनिंगचा सहभाग
      न्यू जर्सी - अमेरिकेच्या न्यू जर्सी राज्यातील एडिसन येथे ११ सप्टेंबर २०१६ हा दिवस जागतिक हिंदु एकता दिन म्हणून साजरा करण्यात आला. न्यू जर्सी येथील ओम क्रिया योग फाऊंडेशनच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून भाजपचे प्रसिद्ध नेते डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी उपस्थित होते. हिंदु समाजाची सद्यस्थिती, सनातन हिंदु धर्माच्या सखोल ज्ञानाअभावी तरुण पिढीला धर्माचरण करण्याविषयी येणार्‍या अडचणी या विषयांवर या वेळी मार्गदर्शन करण्यात आले. फोरम फॉर हिंदु अवेकनिंगने या कार्यक्रमात भाग घेतला. या संस्थेच्या वतीने ग्रंथप्रदर्शन आणि सात्त्विक उत्पादनांचे प्रदर्शन लावण्यात आले होते. या प्रदर्शनाला उपस्थितांचा चांगला प्रतिसाद लाभला. बर्‍याच जिज्ञासूंनी आचारधर्म, सात्त्विक जीवन, आयुर्वेद आणि अध्यात्म इत्यादी ग्रंथ विकत घेतले. त्यांनी ऑनलाईन सत्संगात सहभागी होण्याची सिद्धता दर्शवली. त्यांनी त्यांचा ई-मेल पत्ताही सुपुर्द केला. या वेळी न्यू जर्सीमधील सर्वश्री जितेंद्र औलकर, संजीव, प्रकाश आणि सरिता कुनिगिरी इत्यादी साधक सेवेत सहभागी झाले होते. 



दुष्काळाची तीव्रता न्यून करण्यासाठी दक्षिण आफ्रिका ३५० पाणघोड्यांना ठार करणार !

चारा वाचवण्यास रानरेड्यांनाही मारणार !
      जोहान्सबर्ग (दक्षिण आफ्रिका) - दक्षिण आफ्रिकेतील सध्या दुष्काळ असून तो गेल्या ३५ वर्षांतील सर्वांत भीषण असल्याचे मानले जात आहे. या दुष्काळाची तीव्रता न्यून व्हावी यासाठी क्रुगेर नॅशनल पार्क या सर्वांत मोठ्या राष्ट्रीय उद्यानातील अधिकारी तेथील सुमारे ३५० पाणघोडे आणि रानरेडे यांना ठार मारणार आहेत. क्रुगेर नॅशन पार्कमध्ये सध्या ७ सहस्र ५०० पाणघोडे आणि ४७ सहस्र रानरेडे असून त्यांची ही संख्या आजवरची सर्वाधिक आहे. पार्क सर्व्हिसचे प्रवक्ते इक फाहला म्हणाले की, पाणघोडे आणि रानरेडे हे प्राणी खूप मोठ्या प्रमाणावर गवत आणि झाडपाला खातात. दुष्काळामुळे तृणभक्षक प्राण्यांच्या अन्नाची उपलब्धता अल्प झाल्याने एरवीही यापैकी बरेच प्राणी उपासमारीने मेलेच असते. त्यांची संख्या पद्धतशीरपणे न्यून केल्याने निदान उरलेल्या प्राण्यांना तरी उपलब्ध खाद्य अधिक दिवस पुरू शकेल.



केरळमध्ये ओणम उत्सवाच्या काळात ४१० कोटी रुपयांची मद्यविक्री

धर्माचरणाअभावी धार्मिक सणांच्या वेळी मद्यपान करणारे जन्महिंदू ! 
     थिरुवनंतपुरम् - केरळमध्ये ओणम उत्सवाच्या ८ दिवसांत ४१० कोटी रुपयांची भारतीय बनावटीची विदेशी दारूची विक्री करण्यात आली. गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी दारूच्या विक्रीत १६ टक्क्यांनी वाढ झाली आहे. केरळ स्टेट बिव्हरेजीस कॉर्पोरेशनच्या दुकानांमधून या दारूची विक्री करण्यात आली. गेल्या वर्षी याच कालावधीत ३५३ कोटी रुपयांच्या दारूची विक्री करण्यात आली होती.

हिमाचल प्रदेशमध्ये मंदिरांच्या सुरक्षेसाठी पुजार्‍यांना सरकारकडून बंदूक बाळगण्यासाठी अनुज्ञप्ती (लायसन्स) !

स्वतःचे दायित्व पुजार्‍यांवर ढकलण्याचा प्रयत्न करणारे हिमाचल प्रदेशचे काँग्रेस सरकार !
     शिमला - हिमाचल प्रदेशातील अनेक गावांतील पुजार्‍यांना सरकाकडून बंदूक बाळगण्यासाठी अनुज्ञप्ती (लायसन्स) देण्यात येत आहे. गेल्या काही वर्षांत राज्यात मंदिरांच्या पुजार्‍यांच्या हत्या करून प्राचीन मूर्ती आणि मौल्यवान वस्तू यांची चोरी झाल्याने हे पाऊल उचलण्यात आले आहे. हिमाचल प्रदेशमध्ये गेल्या १० वर्षांत १५० हून अधिक मंदिर आणि मठ लुटण्यात आले. डिसेंबर २०१४ मध्ये रघुनाथ मंदिरात भगवान रघुनाथाच्या अमूल्य मूर्तीची चोरी झाली होती. राज्यातील मंदिरांमध्ये मोठ्या प्रमाणात रोख रक्कम आणि मौल्यवान दागिने असतात. सरकार प्रत्येक मंदिराला सुरक्षा देऊ शकत नसल्याने सरकारने मंदिरात सीसीटीव्ही लावण्याचा आणि पुजार्‍यांना बंदुकांची अनुज्ञप्ती देण्याचा निर्णय घेतला.

स्वामी असीमानंद यांना समझौता एक्सप्रेस स्फोटाच्या प्रकरणी एन्आयए न्यायालयाकडून जामीन

     पंचकुला (हरियाणा) - वर्ष २००७ मध्ये झालेल्या समझौता एक्स्प्रेस स्फोटाच्या प्रकरणातील संशयित आरोपी स्वामी असीमानंद यांना १६ सप्टेंबरला राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेच्या विशेष न्यायालयाने जामिनावर मुक्त केले. या वेळी झालेल्या सुनावणीच्या वेली या स्फोटातील सर्व संशयितांना न्यायालयात उपस्थित करण्यात आले होते. सुनावणीच्या वेली ३ साक्षीदारांच्या साक्षही घेण्यात आल्या. या प्रकरणात आतापर्यंत १७४ जणांची साक्ष घेण्यात आली आहे.

भारतीय वायूसेनेच्या बेपत्ता विमानातील प्रवासी मृत घोषित !

      नवी देहली - भारतीय वायूदलाचे मालवाहू विमान एएन्-३२ मधील सर्व २९ प्रवाशांना मृत घोषित करण्यात आले आहे. या विमानात प्रवास करणार्‍यांच्या नातेवाइकांना सांगण्यात आले आहे की, त्यांचे नातेवाईक घरी येण्याची शक्यता मावळली आहे. यापुढे त्यांना मृत समजावे. या विमानात पुण्यातील निगडी येथील फ्लाइट लेफ्टनंट कुणाल बारपट्टे (वय २८ वर्षे) या अधिकार्‍याचा समावेश होता.
     २२ जुलैला सकाळी चेन्नई येथील विमानतळावरून या विमानाने पोर्टब्लेअरला जाण्यासाठी उड्डाण केले. बंगालच्या उपसागरावरून जात असतांनाच टेकऑफनंतर १६ मिनिटांतच विमानाचा संपर्क तुटला. युद्धपातळीवर प्रयत्न केले असले, तरी या विमानाचा ठावठिकाणा लागला नसल्याने यातील प्रवाशांना मृत घोषित करण्यात आले आहे.



भारतीय वंशाचे जितेश गढीया यांच्याकडून ब्रिटनच्या हाऊस ऑफ लॉर्डस्मध्ये ऋग्वेदावर हात ठेवून शपथ !

भारतात अशी शपथ किती हिंदु लोकप्रतिनिधी घेतात ?
      नवी देहली - भारतीय वंशाचे जितेश गढीया यांनी ब्रिटनच्या हाऊस ऑफ लॉर्डस्मध्ये भारताचा प्राचीन वैदिक ग्रंथ ऋग्वेदावर हात ठेवून शपथ घेतली. (जितेश गढीया यांचे अभिनंदन ! - संपादक) ते हाऊस ऑफ लॉर्डसमधील सर्वांत अल्प वयाचे सदस्य आहेत. ब्रिटीश संसदेच्या या वरिष्ठ सभागृहात मूळ भारतीय वंशाचे २० सदस्य आहेत. ब्रिटनच्या संसदेत नव्या सदस्यांना शपथ घेतांना बायबल व्यतिरिक्त दुसर्‍या एका धार्मिक ग्रंथाची निवड करण्याची अनुमती असते. यापूर्वी कधी कुणीही ऋग्वेदची निवड केली नव्हती. गढीया हे संसदेला ऋग्वेदाची १६७ वर्षे जुनी प्रत भेट म्हणून देणार आहेत. ही प्रत १८४९ मध्ये जर्मन शिक्षक डॉ. मॅक्सम्युलर यांनी संपादित आणि प्रकाशित केली होती.



पाक सैन्यदल प्रमुख राहील शरीफ यांच्या कथित अवमानावरून इंडिया टुडेच्या संकेतस्थळावर पाकमध्ये बंदी !

पाकने आक्षेप घेतलेले हेच ते
मुखपृष्ठावरील छायाचित्र
     नवी देहली - इंडिया टुडे या इंग्रजी नियतकालिकाच्या ताज्या अंकात पाकचे सैन्यदल प्रमुख राहील शरीफ यांचे छायाचित्र मुखपृष्ठावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. यात त्यांच्या गालावर थापड मारल्यावर उमटलेला पंजा चित्रीत करण्यात आला आहे. या चित्रामुळे संतापलेल्या पाकने इंडिया टुडेच्या संकेतस्थळावर बंदी घातली आहे.(कुठे स्वतःच्या सैन्यप्रमुखांविषयी सत्य चित्र रेखाटणार्‍या भारतीय नियतकालिकाच्या संकेतस्थळावर बंदी घालणारा पाक, तर कुठे संस्कृती आदान-प्रदानाच्या नावाखाली पाकचे कलाकार, लेखक यांना पायघड्या घालणारा भारत ! - संपादक)

रशियामध्ये पॉर्न संकेतस्थळांवर बंदी !

      मॉस्को - जगातील सर्वांत मोठी पॉर्न संकेतस्थळे पॉर्नहब आणि यूपॉर्न यांवर रशियामध्ये बंदी घालण्यात आली आहे. रशियाच्या माहिती तंत्रज्ञान आणि मास मीडिया डिपार्टमेंट यांनी ही बंदी घातली आहे. पॉर्नहबवर वर्ष २०१५ मध्येही बंदी घालण्यात आली होती; मात्र नंतर ती उठवण्यात आली. (भारतात अशा संकेतस्थळांवर सरकारने बंदी घातल्यावर त्याला विरोध झाल्याने ती उठवावी लागली होती. रशियाकडून बोध घेऊन भारत शासन हा निर्णय पालटेल का ? - संपादक)



रेल्वेची ई-टिकेट आरक्षित करतांना प्रवासी विमा योजनेचा लाभ घ्या ! - रेल्वेचे आवाहन

      नवी देहली - रेल्वेची ई-तिकीट आरक्षित करतांना प्रवासी विमा योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन भारतीय रेल्वेने केले आहे. भारतीय रेल्वेने प्रवासी विमा योजना १ सप्टेंबर २०१६ पासून चालू झाली आहे. प्रवासी विमा योजनेच्या सुविधेचा लाभ मिळवण्यासाठी प्रवासाविषयीचा अर्ज भरतांना त्याविषयीचा पर्याय निवडावा लागेल. या विमा योजनेची सुविधा मिळवण्यासाठी आरक्षणाच्या वेळी प्रत्येक प्रवाशाला ९२ पैसे भरावे लागतील. त्यानंतर विमा योजनेची सुविधा पुरवणार्‍या आस्थापनाकडून प्रवाशाला विम्याविषयीचा लघुसंदेश प्राप्त होईल.

स्त्री आणि पुरुष यांच्या मेंदूच्या कार्यपद्धतीत भेद नाही ! - संशोधनाचा निष्कर्ष

     लंडन - बर्मिगहॅमच्या अ‍ॅस्टन विद्यापिठाच्या बोधनशक्तीविषयक मेंदूवैज्ञानिक गिना रिपॉन यांनी म्हटले आहे की, स्त्रिया आणि पुरुष यांच्या मेंदूतील जोडण्या वेगळ्या पद्धतीच्या असतात, याला काहीच आधार नाही. आमच्या संशोधनानुसार आपण एका स्पेक्ट्रमचे सर्व भाग बायनरी पद्धतीने जोडल्याचे गृहित धरल्यास चुकीचे निष्कर्ष येतात. आपला मेंदू आणि वर्तन हे विविध गुणांचे पट असतात अन् त्यात पुरुष आणि स्त्रिया यांचा मेंदू असे वेगळे काही नसते. रिपॉन यांनी म्हटले आहे की, हे संशोधन ब्रिटीश विज्ञान महोत्सवात स्वानसी येथे मांडणार आहे. 



पाककडून ३६ भारतीय मच्छीमारांना अटक !

     राजकोट (गुजरात) - पाकने भारताच्या ३६ मच्छीमारांचे आंतरराष्ट्रीय सागरी सीमेजवळून अटक केली आहे. तसेच त्यांच्या ६ नौकाही जप्त केले आहे. पोरबंदर मच्छीमार समितीचे अध्यक्ष भरत मोदी यांनी याला दुजोरा दिला आहे. जानेवरी २०१६ ते आतापर्यंत २५५ मच्छीमारांना पाकने पकडून नेले आहे.



कराचीत गणेशोत्सव उत्साहात साजरा

     कराची (पाकिस्तान) - श्री महाराष्ट्र पंचायत या हिंदुत्ववादी संघटनेच्या वतीने येथे उत्साहात गणेशोत्सव साजरा केला. फाळणीच्या आधीपासून येथील डोली खाटा आणि क्लिफ्टन येथील शिवाच्या मंदिरात सर्वांत मोठ्या गणेशोत्सवाचे आयोजन केले जाते. कराचीमध्ये मराठी संस्कृती जोपासणारे ८०० जण रहातात. येथे होळी, दिवाळी, गोकुळाष्टमी हे सणही साजरे केले जातात. गणेशोत्सवाविषयी महाराष्ट्र पंचायत सदस्य विशाल रजपूत यांनी सांगितले, या वर्षी २५ ते ३० ठिकाणी गणेशोत्सवाचे आयोजन केले होते. या उत्सवासाठी पारंपरिक पद्धतीप्रमाणे मोदक, करंज्या, लाडू केले जातात. मुंबईप्रमाणे कराचीतही गणपतीचे विसर्जन मिरवणुकीने केल्या जाते.



प्रतिबंधित आतंकवाद्यांच्या सूचीमध्ये तालिबानी नेत्याचे नाव का नाही ? - भारताचा संयुक्त राष्ट्राला प्रश्‍न

     संयुक्त राष्ट्र - संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेच्या प्रतिबंधित लोकांच्या सूचीमध्ये तालिबानी नेत्याचा आतंकवादी म्हणून समावेश करण्यात न आल्याचा भारताने तीव्र आक्षेप घेतला आहे. 
     सुरक्षा परिषदेत अफगाणिस्तानच्या संदर्भात चालू असलेल्या एका चर्चेत बोलतांना भारताचे स्थायी उपप्रतिनिधी तन्मय लाल म्हणाले की, तालिबान या प्रतिबंधित संघटनेच्या नेत्याला आतंकवादी म्हणून घोषित न करणे हे आमच्यासाठी एक रहस्य बनलेले आहे. संयुक्त राष्ट्राने घेतलेल्या या भूमिकेमागची कारणे आम्हाला कळू शकतील का? अफगाणिस्तानमध्ये हिंसाचाराचा कट रचणार्‍या लोकांना त्यांच्याच शेजारी देशात सुरक्षित स्थळ मिळू नये, असेही त्यांनी स्पष्ट केले. 
       गेल्या मे मध्ये मुल्ला महंमद मंसूर हा अमेरिकेच्या ड्रोन आक्रमणात मारला गेल्यानंतर तालिबानने मौलवी हैबतुल्ला अखुंदजादा याला नवा नेता घोषित केले होते; परंतु अखुंदजादा याचे नाव आतंकवाद्यांच्या सूचीमध्ये कुठेही नाही.


कॉ. पानसरे हत्येच्या प्रकरणी विशेष अन्वेषण पथकाकडून एका डॉक्टर साधकाची चौकशी

तेच तेच प्रश्‍न पुन: पुन्हा विचारून स्वतःसह इतरांचाही वेळ घालवणारे पोलीस !
     हिंदुबहुल भारतात हिंदु म्हणून जगणे दिवसेंदिवस महाकठीण होत चालले आहे. देशात राजवट कोणाचीही असो हिंदूंचा छळ ठरलेलाच ! स्वातंत्र्यपूर्व काळात जुलमी ब्रिटीश पोलिसांनी क्रांतीकारकांचा आतोनात छळ केल्याच्या कथा आपण वाचल्या असतील. आज त्या क्रांतीकारकांच्या जागी आहेत निष्पाप हिंदू, तर ब्रिटीश पोलिसांच्या जागी आहेत त्यांचे वंशज, म्हणजेच आजचे पोलीस ! गेल्या अनेक वर्षांपासून धर्मनिष्ठ सनातनसारख्या हिंदुत्वनिष्ठ संघटनांना संपवण्याचे षड्यंत्र अत्यंत थंड डोक्याने राबवले जात आहे. याचाच एक भाग म्हणून पोलिसांकडून सनातनचे साधक आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते यांचा विविध प्रकरणांशी संबंध लावून त्यांचा चौकशीच्या नावाखाली चालू असलेल्या छळाला वाचा फोडणारे हे सदर !

मेरांती वादळाचा चीन आणि तैवान यांना फटका !

       बीजिंग - सर्वाधिक शक्तिशाली वादळांपैकी एक मानल्या जाणार्‍या मेरांती वादळाने चीनच्या फुजियान प्रांताला मोठी हानी पोेचवली. शियामेन शहरातील शियानगानमध्ये आलेले हे वादळ दक्षिण फुजियान प्रांतात १९४९ नंतर आलेले सर्वात शक्तिशाली वादळ आहे. यामुळे परिसरातील पाणी आणि वीज पुरवठा पूर्णत: ठप्प पडला असून वेगवान हवा आणि पाऊस यांनी थैमान घातले आहे, अशी माहिती शिन्हुआ या शासकीय वृत्तसंस्थेने दिली आहे. चीनच्या पूर्व फुजान प्रांतातील झियामेन भागाला २३० कि.मी. वेग असलेल्या वादळाने धडक दिल्यानंतर अनेक घरे जमीनदोस्त झाली.
       तैवानलाही मेरांंती चक्रीवादळाने तडाखा दिला. या वादळामुळे काओसुईंग भागातील शिझिवान येथे मासेमारीवर निघालेली बोट उलटली.

अरुणाचल प्रदेशमध्ये मुख्यमंत्र्यांसह काँग्रेसच्या ४४ आमदारांचे बंड !

       नवी देहली - अरुणाचल प्रदेशचे विद्यमान मुख्यमंत्री पेमा खांडू यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या ४५ पैकी ४४ आमदारांनी बंड पुकारत पीपल्स पार्टी ऑफ अरुणाचलमध्ये (पीपीएमध्ये) प्रवेश केला आहे. त्यामुळे अरुणाचलमधील काँग्रेसची राजवट आपोआपच संपुष्टात आली आहे.
       २ महिन्यांपूर्वीच कालिखो पुल यांनी काँग्रेसमध्ये बंड करत भाजपच्या साहाय्याने सरकार स्थापन केले होते. राज्यपालांनीही या सरकारला मान्यता दिली होती; मात्र काँग्रेसने सर्वोच्च न्यायालयापर्यंत संघर्ष करून ही सत्ता पुन्हा मिळवली. न्यायालयाच्या आदेशानंतर सत्ता स्थापन करतांना काँग्रेस नेतृत्वाने नाबाम तुकी यांच्या जागी पेमा खांडू यांच्या हाती राज्याची धुरा दिली होती.

पुणे येथील विविध भागातील विविध भागांमध्ये आणि मंचर (जिल्हा पुणे) येथे गणेश मंडळांमध्ये प्रवचनांना उत्स्फूर्त प्रतिसाद

    
श्री. अभिजीत देशमुख (क्रमांक १) यांच्याशी बोलतांना युवक वर्ग
      पुणे - येथील हडपसर, आंबेगाव पठार, बावधन, पाषाण, तसेच जिल्ह्यातील मंचर येथील नवलेमळा भावडी, कुदळेवाडी भावडी आणि सवाईमळा येथे आदर्श गणेशोत्सव कसा साजरा करावा ?, गणेशोत्सवाचे महत्त्व आणि धर्मशिक्षणाची आवश्यकता आणि श्री गणेशाविषयीचे शास्त्र आणि राष्ट्र-धर्म यांची सद्यस्थिती या विषयांवर हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांनी मार्गदर्शन केले. त्या मार्गदर्शनानंतर अनेक जिज्ञासूंनी आम्ही श्री गणेशमूर्तींचे विसर्जन नदीच्या वहात्या पाण्यातच करू !, असे उत्स्फूर्तपणे सांगितले.

हिंदूंच्या सणांबाबत बोलणारे पुरोगामी पर्यावरणपूरक बकरी ईद साजरी करण्याविषयी काहीच बोलत नाहीत ! - अभय वर्तक, प्रवक्ता, सनातन संस्था

एबीपी माझा या वृत्तवाहिनीवरील चर्चासत्रात सनातनचा सहभाग !
चर्चासत्रात डावीकडून नवाब मलिक,
श्री. अभय वर्तक आणि माधव भंडारी
      मुंबई - मांढरदेवीच्या यात्रांमध्ये दिल्या जाणार्‍या पशूंच्या बळीसंदर्भात किंवा तथाकथित पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासंदर्भात पुरोगामी सातत्याने बोलतात; मात्र पर्यावरणपूरक बकरी ईद साजरा करण्याविषयी मात्र काहीच बोलत नाहीत, याकडे सनातन संस्थेचे प्रवक्ता श्री. अभय वर्तक यांनी लक्ष वेधले. एबीपी माझा या वृत्तवाहिनीवरील बकरी ईद पर्यावरणपूरक साजरी करता येईल का ? या विषयावर आयोजित करण्यात आलेल्या चर्चासत्रात ते बोलत होते. या वेळी भाजपचे प्रवक्ता माधव भंडारी, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ता नवाब मलिक आणि एम्आयएम् पक्षाचे आमदार अधिवक्ता वारिस पठाण उपस्थित होते. मयुरेश कोण्णूर यांनी या चर्चासत्राचे सूत्रसंचालन केले. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस श्रीकांत शर्मा यांनी बकरी ईद हा सण इकोफ्रेंडली का होऊ नये ? असा प्रश्‍न उपस्थित केला होता. त्या पार्श्‍वभूमीवर या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.

हिंदु जनजागृती समितीप्रणित रणरागिणी शाखेचा सोलापूर येथील मानाच्या आजोबा गणपति मंडळाच्या गणेशमूर्ती विसर्जन मिरवणुकीत सहभाग !

गणेशमूर्ती विसर्जन मिरवणुकीत रणरागिणी शाखेच्या कार्यकर्त्या

       सोलापूर, १६ सप्टेंबर (वार्ता.) - येथील मानाच्या आजोबा गणपति मंडळाच्या गणेशमूर्ती विसर्जन मिरवणुकीत हिंदु जनजागृती समितीप्रणित रणरागिणी शाखेच्या कार्यकर्त्या सहभागी झाल्या होत्या. त्यांनी नऊवारी साडी आणि फेटा परिधान करून हातात काठ्या, तसेच महिलांवरील अत्याचारांना वाचा फोडणारे आणि महिलांमध्ये आत्मविश्‍वास जागवणारे लिखाण असलेले फलक धरले होते. या रणरागिणी मिरवणुकीचे विशेष आकर्षण ठरल्या. मिरवणूक पहाण्यासाठी आलेल्या जिज्ञासूंनी फ्लेक्सवरील संपर्क क्रमांक लिहून घेतला. मिरवणुकीदरम्यान रणरागिणी देत असलेल्या घोषणांमध्ये जिज्ञासूही सहभागी झाले होते. महिलांवरील अत्याचारांच्या विरोधात प्रतिकार करण्यासाठी महिलांनी संघटित होण्याचा संदेश रणरागिणी शाखेच्या माध्यमातून देण्यात आला.

चौकशीच्या नावाखाली सनातनला गोवण्याचे षड्यंत्र ! - मान्यवरांचे विचार

     पुरोगाम्यांच्या हत्यांच्या प्रकरणात सनातनला गोवण्याचे कारस्थान चालू आहे. पोलीस आणि अन्वेषण यंत्रणा यांच्याकडून अटकेतील साधक, तसेच अन्य साधक यांचाही अतोनात छळ होत आहे. हिंदुविरोधी प्रसिद्धीमाध्यमांकडूनही सनातनची अपकीर्ती केली जात आहे. या पार्श्‍वभूमीवर सनातन प्रभातने पोलिसांच्या सनातनद्वेषाचे कटू वास्तव, हा विशेषांक ६ सप्टेंबर या दिवशी प्रसिद्ध केला. त्याला भरघोस प्रतिसाद मिळाला. या अनुषंगाने समाजातील मान्यवर आणि हिंदुत्वनिष्ठ यांनी व्यक्त केलेल्या प्रतिक्रिया येथे देत आहोत. 
नंदूरबार 
१. हिंदुत्वनिष्ठ आहेत; म्हणून कारवाई होत असेल, तर हे खपवून घेणार नाही ! 
- श्री. दीपक गवते, नंदूरबार, जिल्हाप्रमुख, शिवसेना 
      हिंदुत्वासाठी कार्य करणार्‍यांचा चौकशीच्या नावाखाली छळ केला जातो. हे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्यात घडले असते, तर समजू शकलो असतो; परंतु हिंदुत्वनिष्ठ म्हटल्या जाणार्‍यांच्या राज्यात हे घडत आहे, ही मोठी दुर्दैवी गोष्ट वाटते. दोषी असतील, तर अवश्य कारवाई करावी; परंतु केवळ हिंदुत्वनिष्ठ आहेत; म्हणून कारवाई करत असाल, तर हे कधी खपवून घेणार नाही. असेच घडत राहिल्यास आम्ही रस्त्यावर उतरून विरोध करू.

आरोपी पसार होण्यात महाराष्ट्राचा उत्तरप्रदेशानंतर दुसरा क्रमांक !

गुन्हेगारांवर धाक ठेवू न शकणारे 
पोलीस जनतेचे काय रक्षण करणार ?
        नागपूर - देशांत आरोपी पसार होण्यात महाराष्ट्राचा उत्तरप्रदेशानंतर दुसरा क्रमांक लागतो, अशी माहिती नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरो ने दिलेल्या आकडेवारीतून समोर आली आहे. आरोपी फरार होण्यात महाराष्ट्रानंतर मध्यप्रदेश राज्याचा क्रमांक लागतो.
        २०१५ या वर्षात देशभरात आरोपी फरार होण्याच्या १ सहस्र ८७ घटना घडल्या असून १३३८ आरोपी फरार झाले. यातील महाराष्ट्रात घडलेल्या १०६ घटनांमध्ये १२७ आरोपी पसार झाले. राज्यात गुन्हेगारांवर पोलिसांचा असलेला धाक कमी झाल्याने गुन्हेगारी वाढल्याचे सांगण्यात येत आहे. राज्याची उपराजधानी असलेल्या नागपुरात प्रत्येक ८ दिवसांनी गोळीबार होत आहे. १५ सप्टेंबरला सीताबर्डी पोलीस ठाण्यातून पोलिसांवर आक्रमण करणारा आरोपी पसार झाला होता.

दैनंदिन जीवनातील आवश्यक असे धर्माचरणाचे महत्त्व समजले ! - जिज्ञासूंची प्रतिक्रिया

जय जवान गणेशोत्सव मंडळात धर्मशिक्षण आणि 
क्रांतीकारकांची माहिती देणारे फ्लेक्सप्रदर्शन !
     कसबे डिग्रज (सांगली) - आम्ही आजपर्यंत केवळ कृती करत होतो; मात्र प्रदर्शन पाहून दैनंदिन जीवनातील आवश्यक असे धर्माचरणाचे महत्त्व समजले, अशी प्रतिक्रिया जिज्ञासूंनी व्यक्त केली. येथील जुन्या ग्रामपंचायतीजवळ असलेल्या जय जवान गणेशोत्सव मंडळात हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांचे धर्मशिक्षण देणार्‍या आणि क्रांतीकारकांंची माहिती देणार्‍या ५८ फ्लेक्सचे फलक लावण्यात आले होते. हे फलक वाचून जिज्ञासूंनी वरील प्रतिक्रिया व्यक्त केली. मंडळाच्या कार्यकर्त्यांनी नृसिंहवाडी येथे कन्यागत पर्व काळात हे प्रदर्शन पाहिले होते. त्या वेळी अशाच प्रकारे प्रदर्शन त्यांच्या गावात लावण्याची त्यांनी मागणी केली होती.

जळगाव महापालिका प्रशासनाने निर्माल्यासाठी कचराकुंडी ठेवल्यामुळे गजु तांबड आणि मित्रपरिवार यांनी नोंदवलेला प्रशासनाचा बोलका निषेध !

पालघर येथे कुपोषणाचा आणखी एक बळी

       पालघर - येथे वाडा तालुक्यात कुपोषणाचा आणखी एक बळी गेला आहे. जिल्ह्यात ७ सहस्र कुपोषित बालकांची नोंद करण्यात आली आहे, तर ६०० मुलांचा कुपोषणामुळे बळी गेला आहे. विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी वाढत्या कुपोषणास सरकार उत्तरदायी असल्याची टीका केली, तसेच आदिवासी विकास मंत्री विष्णु सावरा यांच्या हकालपट्टीची मागणी केली, तर धनंजय मुंडे यांनी याला महिला आणि बालकल्याण विभागही उत्तरदायी असल्याचा आरोप केला. काही दिवसांपूर्वी एका बालकाचा कुपोषणामुळे मृत्यू झाल्यानंतर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि आदिवासी विकास मंत्री विष्णु सावरा यांनी १५ दिवसांनंतर त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली होती. सावरा यांनी अन्य दौर्‍यामुळे ही भेट उशिरा घेतली, असे म्हटले आहे.

फलक प्रसिद्धीकरता

हिंदूंच्या मिरवणुकांवर दगडफेक व्हायला हा काय पाकिस्तान आहे ?
     अनंतचतुर्दशीच्या दिवशी यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेडच्या छावा गणेशोत्सव मंडळाच्या गणेशमूर्ती विसर्जन मिरवणुकीवर धर्मांधांनी दगडफेक केली. यात ३ पोलिसांसह १५ भाविक घायाळ झाले. हे कळताच शहरातील अन्य गणेशोत्सव मंडळांनी काही काळ मिरवणुका थांबवल्या होत्या.

हिंदू तेजा जाग रे !

Jago ! : Maharashtrake Umarkhedme Ganeshmurti visarjan shobhayatrapar dharmandhoka pathrav, 15 Hindu ghayal.
     Hindu yatraopar akraman honeke liye kya yah Pak hai
जागो !
: महाराष्ट्र के उमरखेड में गणेशमूर्ति विसर्जन शोभायात्रा पर धर्मांधों का पथराव, १५ हिन्दू घायल.
     हिन्दू यात्राआें पर आक्रमण होने के लिए क्या यह पाक है ?

संभाजीनगर महापालिकेने गणेशमूर्ती विसर्जन मिरवणुकीसाठी रस्ते चांगले केले, तसेच विहिरींत पाणी सोडले !

       संभाजीनगर - गणेशमूर्ती विसर्जन मिरवणुकीसाठी मनपाने ९० लाख रुपये खर्चून मिरवणुकांच्या मार्गांवरील रस्त्यांवरील खड्डे बुजवले, तर आठ विसर्जन विहिरींमध्ये ४० टँकरच्या माध्यमातून १५० टँकर पाणी ओतले.

अमेरिकेत बकरी ईदच्या आदल्या दिवशी मशीद जाळली !

       न्यूयॉर्क - अमेरिकेच्या फ्लोरिडामध्ये एक मशीद बकरी ईदच्या आदल्या आणि ९/११ च्या स्मृतीदिनाच्या दिवशी जाळण्यात आली. ही तीच मशीद होती ज्यात ओरलँडो येथील नाइट क्ल्बवर आक्रमण करणारा आतंकवादी उमर मतीन जात होता. आग ५ घंट्याहून अधिक काळ चालू होती. यात कोणीही घायाळ झालेले नाही.

१८ सप्टेंबरला डोंबिवली येथे धर्मजागृती सभा !

स्थळ : समाज मंदिर सभागृह, दावडी गाव, डोंबिवली (पूर्व).
वेळ : सायंकाळी ५
संपर्क क्रमांक : ९७६९६९४७७९
हिंदु धर्माभिमान्यांनी अधिकाधिक संख्येने सभेत सहभागी व्हावे !

पितृपक्षातील श्राद्ध !

    हिंदु धर्माने सांगितलेल्या ईश्‍वरप्राप्तीच्या मूलभूत सिद्धांतांपैकी एक म्हणजे देवऋण, ऋषिऋण, पितृऋण आणि समाजऋण ही चार ऋणे फेडणे होय. यांपैकी पितृऋण फेडण्यासाठी श्राद्ध आवश्यक असते. माता-पिता, तसेच निकटवर्तीय यांचा मृत्यूनंतरचा प्रवास हा सुखमय आणि क्लेशरहित व्हावा, त्यांना सद्गती मिळावी यांसाठीचा संस्कार म्हणजेच श्राद्ध. श्राद्धातील मंत्रोच्चारांमध्ये पितरांना गती देण्याची सूक्ष्म शक्ती सामावलेली असते. श्राद्धात पितरांना हविर्भाग दिला गेल्याने ते संतुष्ट होतात. याउलट श्राद्ध न केल्यास पितरांच्या इच्छा अतृप्त राहिल्यामुळे, तसेच असे वासनायुक्त पितर वाईट शक्तींच्या नियंत्रणात जाऊन त्यांचे दास (गुलाम) झाल्याने वाईट शक्तींनी पितरांचा उपयोग करून कुटुंबियांना त्रास देण्याची शक्यता अधिक असते. श्राद्धामुळे पितरांची या त्रासांतून मुक्तता होऊन आपले जीवनही सुसह्य होते.

तृप्ती देसाईंची ताईगिरी !

      देहलीतील निर्भया घटनेपासून कोपर्डीतील अलीकडे घडलेल्या घटना पहाता महिलांच्या सुरक्षेसंदर्भात मोठे प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. समाजातील अनेक व्यक्तींनी, मान्यवरांनी यासंदर्भात प्रतिक्रियाही व्यक्त केल्या, तसेच निषेध मोर्चे काढले; मात्र दिवसेंदिवस अशा घटनांमध्ये वाढच होत आहे. पुण्यातील तृप्ती देसाई यांनी या वाढत्या अत्याचारांच्या पार्श्‍वभूमीवर महिलांच्या सुरक्षेसाठी ताईगिरी पथक स्थापन करण्याची योजना आणली आहे. या संकल्पनेला प्रसिद्धीमाध्यमांतून प्रसिद्धी मिळाली; मात्र प्रत्यक्षात याचा किती लाभ होणार आहे, हे सांगता येणे कठीण आहे.

भारतात राज्य सरकारचे कि धर्मांधांचे ?

     राऊरकेला (ओडिशा) येथे गणेशमूर्ती विसर्जन मिरवणुकीवर धर्मांधांनी दगडफेक करून गणपतीची मूर्ती फोेडली, अनेक वाहनांना आग लावली, तसेच हिंदूंच्या दुकानांनाही लक्ष्य केले. त्यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला.

चेन्नई येथे झालेल्या हिंदु स्पिरिच्युअल सर्व्हिस फेअर (HSSF) मधील सनातनच्या ग्रंथप्रदर्शनाला लाभलेला उत्स्फूर्त प्रतिसाद !

       २.८.२०१६ ते ८.८.२०१६ या कालावधीत चेन्नई येथे हिंदु स्पिरिच्युअल सर्व्हिस फेअर (HSSF) पार पडला. यामध्ये विविध हिंदुत्ववादी आणि आध्यात्मिक संघटना यांच्या वतीने ४०० स्टॉल्स लावण्यात आले होते. गेल्या ८ वर्षांपासून या प्रदर्शनात सनातन संस्था, तर ४ वर्षांपासून हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने ग्रंथ अन् उत्पादने आणि बोधप्रद फ्लेक्स यांचे प्रदर्शन लावण्यात येते.
१. सनातनचे ग्रंथ नुसते न वाचता 
त्यातील ज्ञान कृतीत आणणारे जिज्ञासू !
       पूर्वी ग्रंथ खरेदी केलेले जिज्ञासू प्रदर्शनस्थळाला आवर्जून भेट देतात. ग्रंथांविषयी बोलतांना ते आपुलकीने ग्रंथांची वैशिष्ट्ये सांगतात. ग्रंथातील ज्ञान सोप्या भाषेत असून आम्ही प्रतिदिन ते कृतीत आणतो, असे ते सांगतात. या प्रदर्शनाला लक्षावधी जिज्ञासू भेट देतात. संस्थेच्या वतीने लावण्यात येणार्‍या आचारधर्म या विषयावरील फ्लेक्स प्रदर्शनाचे ते वेळ काढून वाचन करतात. अनेकांनी तमिळ भाषेतील धर्मशिक्षण फलक हा ग्रंथ विकत घेतला आहे.

हे लोकमान्य टिळकांच्या पुण्याला बदनामीकारक !

     पुणे महानगरपालिकेच्या पीएम्सी केअर या ट्विटर खात्यावरून वाहतूक नियमांच्या संदर्भात नागरिकांचे प्रबोधन करणार्‍या विज्ञापनाच्या चित्रामध्ये श्री गणेशाचे विडंबन करण्यात आले होते.

तुम्ही सर्वधर्मसमानता मानता का ? मग या प्रश्‍नांची उत्तरे शोधा !

      भारत शासनाकडून हजयात्रेसाठी मुसलमानांना अर्थसाहाय्य दिले जाते; पण हेच शासन हिंदु यात्रेकरूंना कैलास, मानससरोवर, तिबेट आणि पशुपतिनाथ-नेपाळ, तसेच अमरनाथ, शबरीमला या यात्रांसाठी अर्थसाहाय्य न देता उलट या यात्रेकरूंवर कर लादते. हे सर्वधर्म समानतेचे आचरण आहे का ?- पी. देवमुथ्थु, संपादक, हिन्दू व्हॉईस

चूक आणि सुधारणा

      १६ सप्टेंबरच्या दैनिकात पृष्ठ ३ वर सनातनच्या मागे समाज खंबीरपणे उभा रहाणे, ही सनातनच्या कार्याला मिळालेली पोचपावती !, या लेखातील मथळ्याखाली पोलिसांविषयी असलेल्या जनभावना पोलीस दल समजून घेईल का ?, ही प्रतिक्रिया प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यामध्ये दोन श्‍लोकांचे चुकीचे अर्थ प्रसिद्ध झाले आहेत. ते दोन्ही श्‍लोक आणि अर्थ खालीलप्रमाणे वाचावे...
१. ध्यायतो विषयान्पुंसः सङ्गस्तेषूपजायते ।
सङ्गात्सञ्जायते कामः कामात्क्रोधोऽभिजायते ॥
     श्रीमद्भगवद्गीता, अध्याय २, श्‍लोक ६२ 
अर्थ : विषयांचे चिंतन करणार्‍या पुरुषाची त्या विषयात आसक्ती उत्पन्न होते. आसक्तीमुळे त्या विषयांची कामना उत्पन्न होते. कामना पूर्ण झाल्या नाहीत की क्रोध म्हणजे राग येतो. ॥ २-६२ ॥
२. क्रोधाद्भवति सम्मोहः सम्मोहात्स्मृतिविभ्रमः ।
स्मृतिभ्रंशाद् बुद्धिनाशो बुद्धिनाशात्प्रणश्यति ॥ 
    श्रीमद्भगवद्गीता, अध्याय २, श्‍लोक ६३
अर्थ : रागामुळे अत्यंत मूढता येते अर्थात अविचार उत्पन्न होतो. मूढतेमुळे स्मरणशक्ती भ्रष्ट होते. स्मरणशक्ती भ्रष्ट झाली की बुद्धीचा म्हणजे ज्ञानशक्तीचा नाश होतो. आणि बुद्धीचा नाश झाल्यामुळे माणसाचा अधःपात होतो. ॥ २-६३ ॥
या चुकीसाठी संबंधित कार्यकर्ते प्रायश्‍चित्त घेत आहेत



सौ. माधवी घाटे यांना गण होमाच्या (गणेश यागाच्या) वेळी आलेली अनुभूती

सौ. माधवी घाटे
       यज्ञस्थळी प्रत्यक्ष त्रिमुखी गणेशाचे दर्शन होणे आणि यज्ञातून येणारा धूर आधी लाल, नंतर पिवळा अन् निळ्या रंगाचा दिसणे : महर्षींच्या आज्ञेनुसार सर्व संकटांच्या निवारणासाठी १२ ते १४.९.२०१६ या कालावधीत रामनाथी आश्रमात गण होम (गणेश याग) करण्यात आला. १२.९.२०१६ या दिवशी मी यज्ञस्थळी गेले असता तेथे प्रत्यक्ष त्रिमुखी गणेश आल्याचे दिसले. त्याचे जागृत हात आहुती घेण्यासाठी यज्ञातून येत असल्याचे दिसत होते. यज्ञातून येणारा धूर आधी लाल, नंतर पिवळा आणि निळ्या रंगाचा दिसला. यज्ञातून येणार्‍या ज्वाळा केशरी पारदर्शक दिसत होत्या. क्षात्रतेज तीव्रतेने प्रक्षेपित होत असल्याचे लक्षात आले. श्री गणेशाने दिलेले दर्शन इतके गोड होते की, ते शब्दांत मांडता येत नाही. श्री गणेशाने प्रत्यक्ष दर्शन दिल्याने त्याच्याप्रती पुष्कळ कृतज्ञता व्यक्त होत होती.
- सौ. माधवी घाटे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१२.९.२०१६)

गणेशयागाची ज्योतिषशास्त्रानुसार माहिती, यागाच्या वेळी पू. सौरभ जोशी यांच्या संदर्भात जाणवलेली सूत्रे आणि सौ. प्राजक्ता जोशी यांना आलेली अनुभूती

सौ. प्राजक्ता जोशी
     महर्षींच्या आज्ञेनुसार सर्व संकटांच्या निवारणासाठी १२ ते १४.९.२०१६ या कालावधीत रामनाथी आश्रमात गण होम (गणेशयाग) करण्यात आला. ज्योतिष फलित विशारद सौ. प्राजक्ता जोशी यांनी सांगितलेली गणेशयागाची ज्योतिषशास्त्रानुसार माहिती, गणेशयागाच्या आरंभी आणि याग चालू असतांना पू. सौरभ जोशी यांच्या संदर्भात जाणवलेली सूत्रे अन् सौ. जोशी यांना आलेली अनुभूती पुढे देत आहोत. 
    श्री गणपति अथर्वशीर्षाच्या फलश्रुतीत सांगितल्याप्रमाणे तुपात भिजवलेल्या समिधा, मोदक, दूर्वा आणि लाह्या या चार द्रव्यांनी श्री गणपति अथर्वशीर्षाची सहस्र संख्येने आहुती देऊन जो याग करतात, त्याला गणेशयाग म्हणतात.
      गणेशयागात जप आणि हवन हे मुख्य कर्म करण्यापूर्वी पंचगव्यप्राशन, गणेशपूजन, पुण्याहवाचन इत्यादी प्रारंभिक कर्मे करणे आवश्यक आहे.

पोलिसांच्या संदर्भातील कटू अनुभव !

      सध्या सनातनचे साधक आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते यांना पोलिसांच्या शारीरिक आणि मानसिक छळाला सामोरे जावे लागत आहे. या अनुषंगाने विविध ठिकाणच्या पोलिसांविषयी सनातनचे साधक, हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते किंवा हिंदुत्वनिष्ठ यांना यापूर्वीही पोलिसांच्या सतावणुकीविषयी आलेले अनुभव येथे क्रमशः प्रसिद्ध करत आहोत.
हिंदु धर्मजागृती सभेला आयत्या वेळी अनुमती नाकारणारे 
आणि त्यामुळे सभा रहित होऊनही हिंदु जनजागृती समितीच्या 
कार्यकर्त्याला पोलीस ठाण्यात ६ घंटे बसवून ठेवणारे नगर पोलीस !
     हिंदु जनजागृती समितीच्या वतीने नगर येथे १२ एप्रिल २०१५ या दिवशी हिंदु धर्मजागृती सभेचे आयोजन केले होते. नगर पोलिसांनी मात्र सभेला दिलेली अनुमती आयत्या वेळी नाकारली. त्या संदर्भात समितीने पत्रकार परिषद घेऊन नियोजित सभा रहित झाल्याचे स्पष्ट केले. त्यानंतरही नगर पोलिसांनी हिंदु जनजागृती समितीच्या स्थानिक कार्यकर्त्याला १२ एप्रिल या दिवशी कोतवाली पोलीस ठाण्यात तब्बल ६ घंटे विनाकारण बसवून ठेवले. तुम्हाला काही अडचण येऊ नये; म्हणून पोलीस ठाण्यात बसवून ठेवत आहोत, असे उत्तर कार्यकर्त्याला दिले. समितीच्या कार्यकर्त्याने पोलिसांना ते चुकीचे करत आहेत, असे सांगूनही त्यांनी कार्यकर्त्याला दुपारी १ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत पोलीस ठाण्यात बसवून ठेवले.

सनातन प्रभातमध्ये प्रसिद्ध झालेला लेख वाचून परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या अमृत महोत्सवाचे सौ. उमा रविचंद्रन् यांनी रेखाटलेले भावचित्र !

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले 
यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त... 
हे भगवंता,
        दैनिक सनातन प्रभातमध्ये छापून आलेला एका साधिकेचा लेख मी वाचला. त्यामध्ये त्या साधिकेचे प.पू. डॉक्टरांच्या देवलोकात होत असलेल्या अमृत महोत्सवी वर्ष सोहळ्याच्या सूक्ष्म दर्शनाचे वर्णन होते. त्यात सर्व देवता आणि ऋषिमुनी यांच्या उपस्थितीत प.पू. गुरुदेव एका रत्नजडित सिंहासनावर बसले होते. त्यांचे दिव्य शरीर अलंकारांनी सजवले होते, असे लिहिले होते. तो लेख वाचल्यावर मला फार आनंद झाला आणि हे चित्र काढण्याची प्रेरणा मिळाली. हे दयाघना, तुम्ही आम्हाला स्थुलातून आभरणांनी सजवण्यास आणि रत्नजडित मुकुट घालण्यास कधीच अनुमती देणार नाही; मात्र सूक्ष्मातून तसे करण्यास आम्हाला मोकळीक आहे. हे प्रभो ! सर्व आभरणांना तुमच्यामुळे सौंदर्य प्राप्त होते.

अकस्मात् प्रकृती बिघडून रक्तदाब वाढणे आणि सनातनच्या ग्रंथात सांगितल्याप्रमाणे मुद्रा केल्यावर तो उणावणे

श्रीमती वसुधा देशपांडे
१. अकस्मात् प्रकृती बिघडून रक्तदाब वाढल्याने वैद्यांनी औषध देऊन रुग्णालयात भरती होण्यास सांगणे : २१.१२.२०१५ या दिवशी मी यवतमाळ येथे घरी असतांना सकाळी १० वाजता माझी प्रकृती अकस्मात् बिघडली. मला चक्कर येत होती. मला मळमळत होते आणि सारखे शौचाला जावे लागत होते. मी रामनाथी आश्रमातील वैद्या (कु.) अपर्णा महांगडे यांना संपर्क करून सर्व परिस्थिती सांगितली. त्यांनी मला रक्तदाब (बी.पी.) तपासून घ्यायला सांगितला. त्या वेळी माझा रक्तदाब १९० होता. मी हे वैद्या (कु.) अपर्णा महांगडे यांना सांगितल्यावर त्यांनी रक्तदाब अल्प होण्यासाठी कोणते औषध घ्यायचे, ते सांगितले आणि जवळच्या रुग्णालयात भरती व्हायला सांगितले.

आध्यात्मिक दृष्टीकोन अंगीकारल्यामुळे राग येणे या दोषावर मात करण्यासाठी साधकाला झालेले साहाय्य

श्री. सदाशिव तिवारी
१. राग येणे या दोषामुळे साधकाला पत्नीच्या 
कृती सावकाश करण्याचा राग येणे 
      माझ्या पत्नीकडून तिच्या प्रकृतीनुरूप प्रत्येक कृती सावकाशपणे होत असे, उदा. सावकाशपणे चालणे, रस्ता सावकाशपणे ओलांडणे, मंदगतीने झाडणे. साधना चालू करण्यापूर्वी पत्नीकडून हळुवारपणे होणार्‍या कृती बघून मला पुष्कळ राग येत असे. काही वेळानंतर राग आल्याबद्दल मला वाईटही वाटायचे; पण राग येणे बंद होत नव्हते. 
२. जगातील सर्व घटनांचा कर्ता-करविता ईश्‍वरच असल्याने आपण 
कुणावरही रागावणे म्हणजे ईश्‍वरनिर्धारित संहितेत अडथळा आणण्याप्रमाणे आहे, हे लक्षात येणे 
       एके दिवशी माझ्या मनात विचार आला, ईश्‍वराच्या संहितेप्रमाणे पत्नी सावकाशपणे चालते आणि सावकाशपणे कार्यही करते. त्यामुळे तिच्यावर रागावणे, म्हणजे ईश्‍वरनिर्धारित भूमिकेत हस्तक्षेप करण्यासारखे होईल; म्हणून तिच्यावर रागवायचे नाही. वरील दृष्टीकोन अंगीकारल्यामुळे माझे पत्नीवर रागावणे घटले आहे. स्वयंसूचना सत्रात हा दृष्टीकोन देणे चालू केले आहे. (सनातनचे साधक स्वभावदोष-निर्मूलनासाठी स्वयंसूचनांची अभ्याससत्रे करतात. - संकलक)

रामनाथी आश्रमात झालेल्या एका विवाहात वधूचे माता-पिता होण्याची सेवा भावपूर्णरित्या करून आनंद आणि कृतज्ञता अनुभवणारे रेणके दांपत्य !

श्री. अशोक रेणके
    रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात एक विवाह झाला. प.पू. गुरुदेवांच्या कृपेने या विवाहाच्या वेळी आम्हा उभयतांना वधूचे माता-पिता म्हणून सेवा करण्याची संधी मिळाली. त्या वेळी आम्हाला शिकायला मिळालेली सूत्रे येते देत आहोत. 
१. विवाहविधीत वधूचे माता-पिता होण्याची सेवा करण्याचा 
निरोप मिळताच भूतकाळातील दोन    घटनांचे झालेले स्मरण !
१ अ. तुम्हाला आश्रमातील सर्व मुलींचे आई-बाबा व्हायचे आहे, असे एका संतांनी सांगणेे : मागे एकदा एका संतांनी आम्हाला सांगितले होते, तुम्हाला केवळ कु. अक्षता (रामनाथी आश्रमात सेवा करणार्‍या सौ. अक्षता रेडकर (पूर्वाश्रमीच्या कु.
सौ. सुजाता रेणके
अक्षता रेणके) ही एकटी मुलगी नसून आश्रमातील सर्व मुलींचे तुम्हाला आई-बाबा व्हायचे आहे. त्याचा उलगडा झाला. या विवाहाच्या निमित्ताने कन्यादान करण्याची संधी देऊन ते पूर्ण करून घेतले आहे. 
१ आ. प्रत्यक्षात दोनच मुली असतांना एका ज्योतिषाने तुम्हाला तीन मुली आहेत, असे सांगणे : सुमारे २० वर्षांपूर्वी घरी एक ज्योतिषी आले होते. त्यांनी आम्हाला सांगितले होते, तुम्हाला तीन मुली आहेत. प्रत्यक्षात आम्हाला दोनच मुली आहेत. या विवाहाच्या निमित्ताने आमच्याकडून कन्यादान करून घेऊन आम्हाला तिसरी मुलगीही आहे, हे देवाने दाखवून दिले आणि त्या ज्योतिषाचे भविष्य खरे ठरले. देवाच्या दरबारात सर्वकाही त्याच्या इच्छेनुसार चालते. सामान्य माणसांच्या लक्षात येत नाही, हेच खरे !

रामनाथी (गोवा) येथील सनातन आश्रमातील स्वयंपाकघराच्या नूतनीकरणाच्या सेवेसंबंधी जाणवलेली सूत्रे अन् आलेल्या अनुभूती

१. स्वयंपाकघराच्या नूतनीकरणाची सेवा बांधकाम विभागातील सर्व 
साधकांनी तळमळीने आणि भावपूर्ण केल्याने ती केवळ ६ मासांत (महिन्यांत) पूर्ण होणे
    दिवशी संक्रांतीच्या शुभमुहूर्तावर रामनाथी आश्रमाच्या नूतन स्वयंपाकघराचा शुभारंभ करण्यात आला. स्वयंपाकघराचे एवढे मोठे बांधकाम अवघ्या सहा मासांत (महिन्यांत) झाले. ते केवळ प.पू. डॉक्टरांच्या कृपाशीर्वादाने ! बांधकाम विभागातील सर्व साधकांनी प्रेरित होऊन, तळमळीने आणि भावपूर्ण सेवा केल्यामुळे या नूतन वास्तूमध्ये भरपूर चैतन्य जाणवत आहे. या संदर्भात एका संतांनी बांधकाम विभागातील सवर्र् साधकांचे कौतुक करतांना सांगितले, सर्व साधकांनी तळमळीने आणि भावपूर्ण सेवा केल्यामुळे तिकडे चांगली स्पंदने येत आहेत. धन्य ते सर्व साधक ! 
      इतक्या अल्प कालावधीत एवढे मोठे नूतनीकरणाचे बांधकाम करतांना कुठेही गडबड किंवा गोंधळ जाणवत नव्हता. आश्रमात सेवा करणार्‍या साधकांना कोणताही त्रास होऊ नये; म्हणून आवश्यक त्या सर्व उपाययोजना (उदा. त्या त्या वेळी ठिकठिकाणी आवश्यक ते सूचना फलक लिहून ठेवले होते.) करण्यात आल्या होत्या.

नेतृत्वगुण असलेली आणि संतांचे आज्ञापालन करणारी ५३ टक्के आध्यात्मिक पातळी असलेली अन् उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली पुणे येथील कु. निधी शंभू गवारे ! (वय ८ वर्षे ९ मास)

कु. निधी गवारे 
      (वर्ष २०११ मध्ये कु. निधी उच्च स्वर्गलोकातून आल्याचे घोेषित झाले होते. - संकलक)
१. प्रेमभाव 
     निधी तिची मैत्रीण, रिक्षावालेकाका, अशा जवळीक असलेल्यांपैकी ज्यांचा वाढदिवस असेल, त्यांच्यासाठी स्वतः शुभेच्छापत्र बनवून त्यांना देते.
२. समंजस
     तिला एखादी गोष्ट प्रेमाने समजून सांगितली, तर ती ऐकते आणि त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करते.

भोळा भाव असलेली, सदा कृष्णाला अनुभवणारी ५४ टक्के आध्यात्मिक पातळीची उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली आग्रा, उत्तरप्रदेश येथील कु. अरिप्रा राज (वय ११ वर्षे) !

कु. अरिप्रा राज
      (कु. अरिप्राची आध्यात्मिक पातळी २०११ मध्ये ५१ टक्के होती.)
१. साधना
      कु. अरिप्रा नियमितपणे प्रार्थना करून आणि कृतज्ञता व्यक्त करून नामजप करते. सध्या ती सेवा करत नाही.
२. गुण
      तिच्यामध्ये प्रेमभाव, भोळा भाव, नम्रता, इतरांचा विचार करणे, प्रत्येकाला साहाय्य करणे, तसेच कोणतीही सेवा परिपूर्ण करणे, हे गुण आहेत.
३. कृष्णाला अनुभवणे
३ अ. खेळतांना कृष्ण समवेत असल्याचे अनुभवणे : एकदा माझ्याशी बोलतांना ती म्हणाली, एक दिवस शाळेतील विद्यार्थ्यांसह खेळत असतांना मला वाटत होते की, मी एका पिवळ्या रंगाच्या गोळ्यात आहे आणि श्रीकृष्ण माझ्यासमवेत धावत आहे.

साधकांना सूचना !

नामजपाला बसण्यापूर्वी त्या 
जागेची किंवा सत्संगाच्या जागेची शुद्धी करा ! 
पू. डॉ. मुकुल गाडगीळ
        काही साधकांचा बसून नामजप करतांना तो एकाग्रतेने होत नाही, तसेच काही वेळा साधकांना नवीन ठिकाणी सत्संग घेतांना दाब जाणवतो. साधनेला किंवा सत्संगाला बसण्यापूर्वी त्या वास्तूची शुद्धी करावी.
१. वास्तूची शुद्धी का करावी लागते ?
अ. वास्तूची रचना वास्तूशास्त्रानुसार नसेल, तर त्या वास्तूत दोष असतो. भूखंडाचा आकार लहान असल्यामुळे किंवा अन्य कारणांमुळे वास्तूशास्त्रानुसार वास्तू बांधण्याला मर्यादा येतात. त्यामुळेही वास्तूदोष उत्पन्न होतात.
आ. वास्तूत रहाणार्‍या व्यक्तींची स्पंदने वास्तूत असतात. वास्तूत रहाणार्‍यांमध्ये विविध स्वभावदोष असतात. त्यामुळेही वास्तू अशुद्ध किंवा दूषित होते.
इ. वास्तू अस्वच्छ असणे, वास्तूत दूरचित्रवाणी (टिव्ही), रेडिओ मोठ्या आवाजात लावून ठेवणे यांमुळे वास्तूत त्रासदायक स्पंदने निर्माण होतात.

साधकांसाठी सूचना आणि कृतीशील धर्माभिमान्यांना नम्र विनंती !

ब्राह्मतेज आणि क्षात्रतेज यांचा अनोखा 
संगम असलेले सनातन पंचांग घरोघरी पोचवा ! 
       राष्ट्रीय अस्मिता वृद्धींगत करणारे आणि राष्ट्रहिताचा दृष्टिकोन देणारे विचारधन म्हणून अनेक धर्मप्रेमींनी सनातन पंचांगाचा गौरव केला आहे. हिंदूंना धर्मशिक्षण देणारे, तसेच धर्मरक्षणाविषयी प्रबोधन करणारे हे पंचांग एकमेवाद्वितीय आहे. पंचांगातील बहुमूल्य ज्ञानामुळे जिज्ञासूंमध्ये साधनेची रूची निर्माण होत आहे. चैतन्याचा स्रोत असणारे हे पंचांग ब्राह्मतेज आणि क्षात्रतेज यांचा अनोखा संगमच आहे.
       मराठीसह हिंदी, इंग्रजी, कन्नड, गुजराती, तेलुगु, ओरिया आणि तमिळ या ८ भाषांत प्रकाशित होणारे सनातन पंचांग अधिकाधिक हिंदूंंपर्यंत पोचणे आवश्यक आहे. सर्वत्रचे साधक आणि कृतीशील धर्माभिमानी यांनी पंचांग वितरणासाठी पुढील प्रयत्न करावेत.

साधकांना सूचना !

सनातनच्या ग्रंथसंपदेविषयी जिज्ञासू 
वाचकांना आलेले वैशिष्ट्यपूर्ण अनुभव कळवा !
     चेन्नई येथे लावण्यात आलेल्या सनातनच्या ग्रंथप्रदर्शनास जिज्ञासूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सनातनच्या ग्रंथांचे नुसते वाचन न करता हे जिज्ञासू कृतीशील आहेत. जिज्ञासूंनी स्वतःहून ग्रंथाची वैशिष्ट्ये अन् अनुभवही सांगितले. हे वाचल्यावर सनातनच्या ग्रंथांची लोकप्रियता लक्षात येते. अशा प्रकारे सनातनच्या ग्रंथांच्या संदर्भात साधकांना काही अनुभव आले असल्यास पुढील पत्त्यावर लिखित स्वरूपात किंवा संगणक पत्त्यावर पाठवावेत.
पत्ता : संकलन विभाग, सनातन आश्रम, २४ / बी, रामनाथी, बांदिवडे, गोवा ४०३४०१.
भ्रमणभाष : ९४०४९५६०७४
संगणकीय पत्ता : sankalak.goa@gmail.com

संपूर्ण विश्‍वात आज एकही हिंदु राष्ट्र नाही, हेही ठाऊक नसणारे हिंदू !

       हिंदु जनजागृती समितीच्या वतीने लावण्यात आलेल्या फ्लेक्स फलकांच्या प्रदर्शनाला भेट देणार्‍यांना संपूर्ण विश्‍वात आज एकही हिंदु राष्ट्र नाही, हे ठाऊक नव्हते. काही जण भारत हिंदु राष्ट्र असल्याचे आम्हालाच सांगत होते. (भारतीय राज्यकर्त्यांनी अवलंबलेली निधर्मी लोकशाही आणि शिक्षणपद्धती यांमुळे झालेली हिंदूंची ही दुःस्थिती दूर करण्यासाठी हिंदु राष्ट्राविना पर्याय नाही. - संकलक)
- श्री. श्रीराम लुकतुके, चेन्नई (१७.८.२०१६)

पितृपक्षात दत्ताचा नामजप, प्रार्थना आणि श्राद्धविधी करा !

साधकांना सूचना
१. सध्या अनेक साधकांना वाईट शक्तींचा त्रास होत आहे. पितृपक्षात (या वर्षी १७ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर २०१६ या कालावधीत) हा त्रास वाढत असल्याने या कालावधीत प्रतिदिन ॐ ॐ श्री गुरुदेव दत्त ॐ ॐ । हा नामजप किमान १ घंटा करावा. 
अ. जे साधक उपाय करतात, त्यांनी त्यांच्या उपायाच्या नामजपाच्या व्यतिरिक्त दत्ताचा नामजप किमान १ घंटा करावा. दत्ताचा नामजप करतांना हातांच्या पाचही बोटांची टोके जुळवून अनाहतचक्र आणि मणिपुरचक्र यांच्या ठिकाणी न्यास करावा.
आ. जे साधक उपाय करत नाहीत, त्यांनी वैयक्तिक आवरणे, स्नान, स्वच्छता-सेवा आदींच्या वेळी दत्ताचा नामजप किमान १ घंटा होईल, असे पहावे; मात्र त्रास जाणवल्यास त्यांनीही दत्ताचा नामजप बसून अन् मुद्रा करून करावा. 
२. पितृपक्षाच्या कालावधीत पूर्वजांच्या त्रासांपासून रक्षण होण्यासाठी मधेमधे दत्ताला प्रार्थना करावी.
३. पितृपक्षात ज्या साधकांना शक्य असेल, त्यांनी श्राद्धविधी अवश्य करावा.






आज सांगली येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन !

       सनातनचे साधक डॉ. वीरेंद्रसिंह तावडे आणि समीर गायकवाड यांना न्याय द्या, या तसेच अन्य मागण्यांसाठी सांगली येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन !
ठिकाण - मारुती चौक, सांगली
वेळ - सायंकाळी ५ ते ७.३०
हिंदूंनो, मोठ्या संख्येने सहभागी व्हा !

साधकांना सूचना

पौर्णिमा आणि अमावास्या या तिथींना प्रार्थना, नामजप, तसेच साधना अधिकाधिक करा.
काल पौर्णिमा झाली.
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥
या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो. - प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

बोधचित्र

॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज
सनातनचे श्रद्धास्थान
जिवात्मा आणि शिवात्मा म्हणजे काय ?
बाबा : मी कशासाठी जन्माला आलो आहे आणि मला काय करायचे आहे, याचे ज्ञान जिवाला झाले, तर त्या आत्म्याला जिवात्मा म्हणतात. कोणीतरी माझ्याकडून कार्य करवून घेत आहे, याचे ज्ञान झाले की, त्या आत्म्याला शिवात्मा म्हणतात. शिवात्मा शोधणे, म्हणजे खरे ज्ञान. शिवात्मा कार्यकारणभावापुरता जन्माला येतो, तर जीव प्रारब्धभोगामुळे जन्माला येतो.
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.)

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

    
परात्पर गुरु डॉ. आठवले
पूर्वी एखाद्याने लाच घेतली, तर ती बातमी व्हायची. आता एखाद्याने लाच घेतली नाही, तर ती बातमी होते. - (परात्पर गुरु) डॉ. आठवले

सत्संग

प.पू. पांडे महाराजांचे अनमोल विचारधन
प.पू. पांडे महाराज
      डोळे उघडून सत्य दर्शन देणे आणि घेणे, हा खरा सत्संग आहे. सत्याची जाणीव करून देणे, सत्मध्ये ठेवणे आणि भ्रमातून काढणे, याला ज्ञान म्हणतात. आपण मात्र स्वतःला नेहमी भ्रमात (मायेत) ठेवत असतो.
- प.पू. परशराम पांडे, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (मे २०१५) (श्री. सचिन हाके संग्रहित)



योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

संयमाची आवश्यकता !
संस्कृती हा केवळ विद्वत्तापूर्ण चर्चा करण्याचा विषय नसून नित्य आपल्या मनावर 
नियंत्रण ठेवणे आणि इतरांच्या दुःखाची जाणीव ठेवणे, हीच खरी संस्कृती ! 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)



अधिकोषांची थकबाकीतील कर्जे !

संपादकीय 
       भारतीय अधिकोषांकडून घेतलेले कोट्यवधी रुपयांचे कर्ज परत फेडू शकत नाही, या भीतीमुळे मद्यसम्राट म्हणून प्रसिद्ध असलेले विजय मल्ल्या हे मागील सात-आठ मासांपासून देश सोडून परदेशात गेले आहेत. नऊ सहस्र कोटी रुपये एवढी थकबाकीची रक्कम त्यांच्या नावावर असून सध्या ते इंग्लंडमध्ये बसलेले आहेत. विविध उद्योगक्षेत्रांत व्यवसाय चालू करतांना त्यांनी देशातील जवळपास सर्वच अधिकोषांकडून कर्ज घेतले असून त्यांची सर्वच उद्योगक्षेत्रांत अधोगती झाल्यामुळे कर्जाची थकबाकी वाढली. कर्ज वसुली शक्य नसल्यामुळे त्यांनी अधिकोषांकडे तारण ठेवलेली मालमत्ता लिलावात विक्री करून पैसे वसूल करण्याचे अनेक प्रयत्न चालू आहेत. अर्थात् अजून कोणत्याच अधिकोषाला त्यात यश आलेले नाही. मुंबईतील किंगफिशर हाऊस विकण्याचा मार्च मासात प्रयत्न झाला. १५० कोटी रुपयांची प्राथमिक बोली असतांना कोणी पुढे आले नाही.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn