Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

बांगलादेश सीमेवरून प्रतिवर्षी साडेतीन लाख गायींची तस्करी !

हे सर्व शासनाला का कळत नाही ? कि याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केले जाते ?
     नवी देहली - भारतातील अनेक राज्यांत गोहत्येवर आणि देशात गायीची तस्करी करण्यावर बंदी आहे, तरीही देशात हे दोन्ही प्रकार मोठ्या प्रमाणात चालू आहेत, हे जगजाहीर आहे. एका वृत्तवाहिनीने नुकतेच याविषयी एक वृत्त प्रसारित केले. याद्वारे बांगलादेशातील सीमेवरून केल्या जाणार्‍या गायीच्या आंतरराष्ट्रीय तस्करीची माहिती देण्यात आली.
१. सीमा सुरक्षा दलाच्या माहितीनुसार बांगलादेशच्या सीमेवरून प्रतिवर्षी साडेतीन लाख गायींची तस्करी केली जाते. प्रतिवर्षी हा व्यवसाय १५ सहस्र कोटी रुपयांचा आहे. बांगलादेशात गोमांसाची सर्वांत अधिक मागणी आहे आणि भारतीय गायींना हवे तेवढे मूल्य दिले जाते.
२. वर्ष २०१४ आणि २०१५ या कालावधीत सीमा सुरक्षा दलाने ३४ गोतस्करांना ठार केले. या दलाकडून प्रतिदिन २०० ते २५० गायींना तस्करांकडून कह्यात घेण्यात येते.
३. आसामच्या सीमेवरून मोठ्या प्रमाणात ही तस्करी केली जाते. येथे बांगलादेशला लागून २६३ कि.मी.ची सीमा आहे. येथूनच भारतातील गायींना बांगलादेशात नेले जाते.

कॉ. पानसरे यांना ईश्‍वर आणि हिंदु धर्माचे एवढे वावडे आहे, तर नाव गोविंद का पाहिजे ? - राजेंद्र पटवर्धन सरकार, तासगाव

     तासगाव (जिल्हा सांगली) - शतकानुशतके अव्याहत चालू असलेल्या आनंद सोहळ्यात काही आंबटशौकीन स्वत:ला अपात्र तर ठरवतात; परंतु विनाकारण आपली सनातन हिंदु संस्कृती आणि परंपरा यांना नावे ठेवून त्यांची घातकी-अर्थहीन निंदा करून स्वत:च्या टिमक्या वाजवत स्वत:ला पुरोगामी, थोर विचारवंत असा डांगोरा पिटून घेतात. हे भारताच्या विद्यापिठांत भरलेले मूठभर, तथाकथित विचारवंत आले कुठून ? आणि त्यांना पुरोगामी ठरवले कोणी ? पत्रकारिता, प्रसिद्धीमाध्यमे आणि शैक्षणिक क्षेत्रातील धुरिण यांनी याचे आत्मपरीक्षण केले पाहिजे. या स्वयंघोषित विचारवंतांना जाब विचारायला हवा की, कॉ. पानसरे यांना ईश्‍वर आणि हिंदु धर्माचे एवढे वावडे आहे, तर नाव गोविंद का पाहिजे ?, असे परखड प्रश्‍न तासगाव येथील श्री. राजेंद्र पटवर्धन सरकार (पूर्वीचे संस्थानिक) यांनी उपस्थित केला. ते तासगाव येथे नुकत्याच झालेल्या रथोत्सवात बोलत होते. या वेळी सहस्रो भाविक उपस्थित होते.

डॉ. झाकीर नाईक यांची संस्था आणि सनातन संस्था यांच्यात जमीन-आकाशाएवढा भेद ! - श्री. अभय वर्तक, प्रवक्ता, सनातन संस्था

टी.व्ही ९च्या चर्चासत्रात सनातनवरील आरोपांना श्री. वर्तक यांचा सडेतोड प्रतिवाद !
चर्चासत्रात डावीकडून  निखिला म्हात्रे सूत्रसंचालिका, हुसैन दलवाई, 
माधव भंडारी आणि श्री अभय वर्तक 
      मुंबई - डॉ. झाकीर नाईक यांची इस्लामिक रिसर्च फाऊंडेशन(आयआर्एफ्) ही संस्था आणि सनातन संस्था यांची तुलना करण्यात येत आहे; मात्र त्यांच्यात आणि सनातनमध्ये जमीन-आकाशाएवढा भेद आहे, असे प्रतिपादन संस्थेचे प्रवक्ता श्री. अभय वर्तक यांनी केले. टी.व्ही ९ या वृत्तवाहिनीवरील बोल महाराष्ट्राचा या कार्यक्रमात डॉ. झाकीर नाईक यांच्यावर करडी नजर आणि सनातनवर मेहेरनजर ? या विषयावर आयोजित केलेल्या चर्चासत्रात ते बोलत होते. या वेळी श्री. अभय वर्तक यांच्यासह भाजपचे प्रवक्ता माधव भंडारी, काँग्रेसचे खासदार हुसेन दलवाई आणि अंनिसचे राज्य प्रधान सचिव मिलिंद देशमुख उपस्थित होते. निखिला म्हात्रे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

नागपूरमधील एका कन्या वसतिगृहात विद्यार्थिनींना अनिवार्य केलेल्या श्री सरस्वतीदेवीच्या आराधनेच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट

श्री सरस्वतीदेवीच्या आराधनेला भारतात 
अनिवार्यता न करण्यासाठी हा देश पाकिस्तान आहे काय ?
        नागपूर, १५ सप्टेंबर - येथील इन्स्टिट्युट ऑफ सायन्सच्या कन्या वसतिगृहात विद्येची देवता असलेल्या श्री सरस्वतीदेवीच्या आराधनेची सक्ती करण्यात येत असल्याचे कारण देत क्षमता वासनिक या विद्यार्थिनीचे वडील सिद्धार्थ वासनिक यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात १२ सप्टेंबर या दिवशी जनहित याचिका प्रविष्ट केली आहे.
१. क्षमता वासनिक ही मौदा येथील रहिवासी असून ती इन्स्टिट्युटमध्ये विज्ञान शाखेच्या प्रथम वर्षात शिकत आहे. ती जुलैमध्ये इन्स्टिट्युटच्या वसतिगृहात रहायला गेली. त्या वसतिगृहाच्या कार्यालयात श्री सरस्वतीदेवीची मूर्ती ठेवण्यात आली असून तिची प्रतिदिन आराधना केली जाते. त्या आराधनेसाठी वसतीगृहातील सर्व विद्यार्थिनींनी उपस्थित रहाणे अनिवार्य केले आहे.

पिंपरी-चिंचवडमधील नवी सांगवी येथील पवना घाटावर गणेशमूर्तींची विटंबना

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडून कृत्रिम हौदाच्या 
नावाखाली दिशाभूल करत श्री गणेशमूर्तींची विटंबना ! 

कृत्रिम हौदातील गणेशमूर्तींची विटंबना

        नवी सांगवी (पुणे), १५ सप्टेंबर (वार्ता.) - येथील पवना घाटावर कृत्रिम हौदातील गणेशमूर्तींची अशा प्रकारे विटंबना झाल्याचे चित्र पहायला मिळाले. (या संदर्भात महापालिका आयुक्तांनी खुलासा करणे अपेक्षित आहे.- संपादक) नदीपात्रामध्ये पाण्याअभावी अनेक भाविकांना पालिकेने सिद्ध केलेल्या कृत्रिम हौदांमध्ये गणेशमूर्तीचे विसर्जन करावे लागले. हौदात विसर्जन झालेल्या गणेशमूर्ती पालिकेचे कर्मचारी तेथेच आणि परिसरात सोडून गेल्याचे निदर्शनास आले. यामुळे श्री गणेशमूर्तींची घोर विटंबना झाली असून सहस्रो हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत.
        हे छायाचित्र कुणाच्या धार्मिक भावना दुखावण्यासाठी नाही, तर केवळ वस्तूस्थिती कळावी, यासाठी प्रसिद्ध करत आहोत.

इसिस आणि सनातन यांच्यामध्ये हमीद दाभोलकर यांना काहीच फरक दिसत नाही, कारण त्यांच्या बुद्धीची झेपच तेवढी आहे !

अंनिसचे डॉ. हमीद दाभोलकर यांच्या वक्तव्यावर 
नेटिझन्सने (संकेतस्थळावरून) घेतला खरपूस समाचार !
     डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी आरोपपत्र दाखल होण्यास उशीर झाला; पण आता आरोपपत्र प्रविष्ट होणे, हे तपासाला योग्य दिशेने नेणारे पाऊल म्हणता येईल. सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्याविषयी सरकारने आपली भूमिका आतातरी स्पष्ट करावी, असे वक्तव्य महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य सरचिटणीस डॉ. हमीद दाभोलकर यांनी केले होते. त्यांच्या त्या वक्तव्यावर संकेतस्थळावर नेटिझन्सने घेतलेला खरपूस समाचार वाचकांसाठी येथे देत आहोत.
हमीद यांच्या बुद्धीची झेपच तेवढी आहे ! - किरण
      आपल्या बुद्धीला झेपेल एवढेच बोलावे बरं का ? नाहीतर हसे होते. कारण हमीदला इसिस आणि सनातनमध्ये काहीच फरक दिसत नाही. त्याच्या बुद्धीची झेपच तेवढी आहे, तर तो तरी काय करणार ?

दक्षिण काश्मीरमधून मोठ्या प्रमाणात तरुण बेपत्ता !

  • भारतातील आतंकवादी हे भारतीय नसून ते पाकिस्तानमधून आले आहेत, असे म्हणणार्‍या राजकारण्यांना आता काय म्हणायचे आहे ?
  • आतंकवादी संघटनांमध्ये सहभागी झाल्याची भीती व्यक्त
         श्रीनगर - गेल्या दोन महिन्यांच्या काळात दक्षिण काश्मीरमधून ८० हून अधिक तरुण बेपत्ता झाले आहेत. हे तरुण विविध आतंकवादी संघटनांमध्ये सहभागी झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार अनेक तरुण हिजबुल मुजाहिद्दीन या संघटनेत सहभागी झाले असून काही जण प्रतिबंधित लष्कर-ए-तोयबा या संघटनेमध्येही सहभागी झाले आहेत.
         दक्षिण काश्मीर हा राजकीयदृष्ट्या संवेदनशील भाग आहे. त्यामुळे सध्या या प्रदेशात सैन्याकडून सावधानता बाळगण्यात येत आहे. दोन महिन्यांपूर्वी आतंकवादी बुरहान वानीला ठार केल्यानंतर याच प्रदेशात सर्वाधिक असंतोष पसरला होता. आता येथील तरुण आतंकवादाकडेही वळत आहे. पुलवामा, कुळगाव, शोपिया आणि अनंतनाग या जिल्ह्यांमधून तरुण बेपत्ता होत आहेत. त्यापैकी पुलवामा येथील तरुणांचे बेपत्ता होण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे.

फुटीरतावाद्यांना मिळणार्‍या सवलतींच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिका !

यासाठी न्यायालयात याचिका 
का प्रविष्ट करावी लागते; सरकारने 
स्वतःहून या सवलती बंद करायला हव्यात !
        नवी देहली - काश्मीरमधील फुटीरतावाद्यांना मिळणार्‍या सवलती थांबवण्यात याव्यात, यासाठी सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली. विधिज्ञ एम्.एल्. शर्मा यांनी ही याचिका दाखल केली.
        आपल्या भावनांचा न्यायालय आदर राखत आहे; मात्र आपल्यासाठी नियमात पालट केले जाऊ शकत नाही. आपण या संदर्भातील कागदपत्रे न्यायालयासमोर सादर करा. त्यानंतर पुढील सुनावणीचा दिनांक निश्‍चित केला जाईल, असे न्या. अनिल दवे आणि न्या. एल्. नागेश्‍वर राव यांच्या खंडपिठाने स्पष्ट केले.
        केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी म्हटले की, फुटीरतावाद्यांना आतंकवाद्यांसारखी वागणूक दिली पाहिजे. त्यांना दिल्या जाणार्‍या सवलती, सोयी-सुविधा काढून घेतल्या पाहिजेत. त्याचप्रमाणे त्यांच्याविरोधात राजद्रोहाचा खटला दाखल केला गेला पाहिजे.

गणेशोत्सवात खांदेश्‍वर (नवी मुंबई) मध्ये २० जुगार्‍यांवर कारवाई !

     नवी मुंबई - गणेशोत्सवात जुगार खेळणार्‍या २० जुगार्‍यांवर खांदेश्‍वर पोलिसांनी कारवाई केली. खांदेश्‍वर वसाहतीमधील सेक्टर क्रमांक ९ येथील मार्केटचा राजा या गणेशोत्सव मंडळाच्या मंडपाचा आधार घेऊन हे जुगारी तीन पत्त्यांचा जुगार खेळत होते. त्या वेळी पोलिसांनी धाड टाकली आणि या सर्व जुगार्‍यांना अटक केली. डावातील साडेआठ सहस्र रुपये आणि या मंडळींच्या खिशामधील सुमारे ३५ सहस्र अशी एकूण ४३ सहस्र रुपयांची रोकड पोलीस अधिकारी अमर देसाई यांच्या पथकाने जप्त केली. या कारवाईचा धसका खारघर, कामोठे, कळंबोली येथील गणेशोत्सवांत अशा प्रकारे अपप्रकार करणार्‍यांनी घेतला आहे. येथे रहाणारे रहिवासी आणि रस्त्यांवरील फेरीवाले वर्गणी देऊन हा उत्सव साजरा करतात; मात्र मंडळाने मंडपाच्या पाठीमागे बसण्याची आणि विजेची सोय करून येथे जुगाराचा अड्डाच चालू केला होता.

व्हॉट्स अ‍ॅपच्या गटात आय लव्ह पाकिस्तान असा मजकूर पोस्ट करणार्‍या धर्मांध बदरुद्दीन युनूस बागवानला अटक !

धर्मांधांचे पाकिस्तानप्रेम ! भारतात राहून उघडपणे 
शत्रूराष्ट्राला पाठिंबा देणार्‍या धर्मांधांवर कठोरात कठोर कारवाई व्हावी !
     विटा (जिल्हा सांगली) - मोरया नावाच्या व्हॉट्स अ‍ॅपच्या गटात आय लव्ह पाकिस्तान असा मजकूर आणि पाकिस्तानचा झेंडा पोस्ट करणार्‍या धर्मांध बदरुद्दीन युनूस बागवान याला विटा शहर पोलिसांनी अटक केली आहे. हा मूळचा बिहार येथील असून व्हॉट्स अ‍ॅप गटचालक श्री. सुरेश शिंदे यांनी तसेच ५० हून अधिक तरुणांनी यासंदर्भात शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानंतर बदरुद्दीन याच्यावर सोेशल मिडीयावर मजकूर टाकून हिंदु धर्मियांच्या, तसेच भारतियांच्या भावना दुखावल्याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला. पोलिसांनी बदरुद्दीन आणि त्याचे वडील यांना चौकशीसाठी कह्यात घेतले असता, हा मजकूर मला माझ्या सौदी अरेबियातील भावाने पाठवला असून तोच मजकूर मी गटात टाकला, अशी स्वीकृती दिली. (संदर्भ : दैनिक पुढारी)

पुण्यातील भरत मित्र मंडळाने उभारलेल्या कमानीवर लावले धर्मशिक्षण देणारे फ्लेक्स

  
कमानीवर लावलेले धर्मशिक्षण देणारे फ्लेक्स
   पुणे - येथील नारायण पेठ भागातील मोदी गणपती मंदिराच्या येथे भरत मित्र मंडळाच्या वतीने कमान उभारण्यात आली आहे. त्यावर श्री गणेशपूजन आणि वहात्या पाण्यात श्री गणेश मूर्तींचे विसर्जन करणे यामागील शास्त्र यासंबंधी फ्लेक्स, तसेच पुण्यामध्ये २३ ऑक्टोबर या दिवशी होणार्‍या काश्मीर-एक भारत अभियान या जाहीर सभेचा फ्लेक्स लावून प्रसार करण्यात येत आहे. (धर्मशिक्षण आणि जाहीर सभेचा फ्लेक्स लावून धर्मकार्यात सहभाग घेणार्‍या भरत मित्र मंडळाचे अभिनंदन ! - संपादक)

शिरोळ (जिल्हा कोल्हापूर) येथे जैन मंदिरात प्रवेश दिला नसल्याने १३ कुटुंबियांचे उपोषण चालू !

     शिरोळ - येथील जैन मंदिरात प्रवेश दिला जात नसल्याने १३ कुटुंबियांनी जैन बस्तीमध्ये आमरण उपोषण चालू केले आहे. या मंदिरात गेल्या २५ वर्षांपासून संस्थेची निवडणूक घेण्यात आली नसून कोणत्याही प्रकारचे लेखापरीक्षण करण्यात आलेले नाही. वरिष्ठ पातळीवरून राजकीय दबावाखाली संस्थेचे कामकाज चालविले जाते. याची चौकशी करून संबंधितांवर गुन्हे प्रविष्ट करावे, अशी मागणी श्री. प्रमोद लडगे यांनी या वेळी केली.
     सध्या चालू असलेल्या पर्युषण पर्वात जलाभिषेक करण्यासाठी मंदिरातील पंडितांकडून प्रवेश नाकारण्यात येत असून आम्हाला पूजा-अर्चा करू दिली जात नाही. तसेच मंदिराच्या प्रवेशावरून अपशब्द वापरले जात आहेत. मंदिराच्या पंडितांकडून नेहमीचे पूजेचे साहित्य नेले जात नाही. महिलांच्या स्वाध्याय वेळेत मंदिर बंद केले जात आहे. अशा प्रकारचा अन्याय करून आम्हा १३ कुटुंबियांना समाजातून बहिष्कृत करून वाळीत टाकल्याने संबंधितांवर कठोर कारवाई करून आम्हा श्रावक-श्राविक्रांना न्याय द्यावा, अशी मागणीही त्यांच्याकडून या वेळी करण्यात आली.

बकरी ईदला गोव्यातील मोतीडोंगर येथे ८ गोवंशांची अनधिकृतपणे कुर्बानी

     मडगाव (गोवा) - बकरी ईदच्या निमित्ताने मोतीडोंगर येथे बैल, वासरू आदी मिळून एकूण ८ गोवंशांची अनधिकृतपणे हत्या करण्यात आल्याचे उघडकीस आले असून या प्रकरणी मडगाव पोलिसांनी मांसाची वाहतूक करणारा रिक्शाचालक बशीर अंगडी, तसेच अन्य एक संशयित रफीक यांना कह्यात घेऊन त्यांच्यावर भारतीय दंड संहिता कलम ४२९, तसेच प्राणी हत्येसंबंधी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे भरदिवसा मोतीडोंगर येथे नागेश गार्डनच्या मागे हा प्रकार घडला आहे. मडगाव पोलीस सूत्रांनुसार एका बैलाची हत्या करण्यात आली आहे, तर अ‍ॅनिमल रेस्क्यू स्कॉडचे गौतम यांच्या मते बैल, वासरू आदी मिळून ८ गोवंशांची हत्या करण्यात आली आहे. (दिवसाउजेडी उघड्यावर प्राणीहत्या होते, याचा अर्थ राज्यात कायदा-सुव्यवस्था आहे का ? - संपादक)

इंग्लंडच्या राणीला भारतभेटीसाठी ब्रिटीश पारपत्राची आवश्यकता नाही !

        नवी देहली - इंग्लंडच्या राणीला भारतभेटीसाठी ब्रिटीश पारपत्राची आवश्यकता नाही, अशी माहिती भारतीय परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने माहिती हक्क कायद्याखाली ब्रिटीश शासनाच्या संदर्भासह दिली आहे. ब्रिटीश पारपत्र ब्रिटीश राणीच्या नावे संमत केले जात असल्याने राणीला त्याची आवश्यकता नाही, असे स्पष्टीकरण देण्यात आले आहे. राष्ट्रकुल देशांनी एकमताने हा निर्णय घेतल्याने ब्रिटनच्या राणीला पारपत्राची आवश्यकता लागत नाही.
        इंग्लंडच्या राणीला भारताला भेट देण्यासाठी व्हिसा आवश्यक नाही का ? असा प्रश्‍न माहिती हक्क कार्यकर्ता राहुल शेहरावत यांनी माहिती हक्क कायद्याखाली विचारला होता. भारताच्या व्हिसा विषयीच्या प्रश्‍नाकडे मंत्रालयाने काणाडोळा केला आहे; मात्र भारताचे राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांना इंग्लंडला जाण्यासाठी त्या देशाचा व्हिसा आवश्यक आहे, असे स्पष्टीकरण दुसर्‍या एका प्रश्‍नावर देण्यात आले आहे.

सोमनाथ मंदिराला मिळणार सोनेरी वैभव !

केवळ मंदिराचे सुशोभिकरण करून 
भागणार नाही, तर त्याच्या संरक्षणाचीही 
उपाययोजना करणे आवश्यक आहे !
       नवी देहली - गुजरातच्या समुद्र किनार्‍यावर असलेले सोमनाथ मंदिर १२ ज्योतीर्लिंगापैकी एक आहे. या मंदिराला सोन्याने सजवण्यात येत आहे. त्यामुळे त्याला पूर्वीचे सोनेरी वैभव प्राप्त होणार आहे.
१. मंदिराला अधिक सुंदर करण्यासाठी देहलीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली न्यासाची एक बैठक झाली. या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. या मंदिराचा आतील भाग सोन्याने सजवण्यात आला आहे. यावर १०५ किलो सोने वापरण्यात आले आहे. मंदिराची शोभा वाढवणार्‍या कळसाचेही सुशोभिकरण झाले आहे. आता मंदिराच्या स्तंभाचे सुशोभिकरण करणे शिल्लक आहे.
२. अमिताभ बच्चन यांच्या आवाजात लाईट अ‍ॅण्ड साऊंड कार्यक्रम सिद्ध करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून मंदिराची भव्यता दर्शवण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन दिवाळीला करण्यात येणार आहे.

प्रा. वेलिंगकर यांचा त्याग अन् संघर्ष मातृभूमीच्या हितासाठी ! - खासदार संजय राऊत

   
श्री. संजय राऊत
  पणजी - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वतंत्र गोवा प्रांताचे संघचालक प्रा. सुभाष वेलिंगकर यांचा त्याग आणि संघर्ष हा मातृभाषा अन् मातृभूमी यांच्या हितासाठीचा लढा आहे. हा राष्ट्रद्रोह नव्हे, असे शिवसेनेचे खासदार आणि दैनिक सामनाचे कार्यकारी संपादक श्री. संजय राऊत पणजी येथे पत्रकार परिषदेत म्हणाले. या वेळी गोवा राज्यप्रमुख सुदीप ताम्हणकर आणि सेनेचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
     श्री. राऊत म्हणाले, शिवसेनेचा प्रा. वेलिंगकर यांना पूर्ण पाठिंबा आहे. प्रा. वेलिंगकर यांनी जे कार्य हाती घेतले आहे, ते पूर्णत्वास नेण्यासाठी गोव्यातील सेना संपूर्ण शक्तीनिशी त्यांच्या पाठीशी असणार आहे. प्रा. वेलिंगकर यांना राजकीय दबावाखाली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या गोवा संघचालक पदावरून हटवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील सर्व तालुक्यांत शिवसेनेची कामे चालू आहेत. गोव्यातील प्रत्येक घडामोडींवर शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांचे लक्ष आहे.

पुणे आणि पिंपरी-चिंचवड येथे हिंदु जनजागृती समितीच्या उठ, भगिनी जागी हो ! या पथनाट्याला उत्स्फूर्त प्रतिसाद

पथनाट्य सादर करतांना समितीचे कार्यकर्ते 
      पुणे, १४ सप्टेंबर (वार्ता.) - सध्या चालू असलेल्या गणेशोत्सवामध्ये हिंदु जनजागृती समितीच्या वतीने पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवड परिसरामध्ये उठ, भगिनी जागी हो ! हे पथनाट्य विविध गणेशोत्सव मंडळांमध्ये सादर करण्यात येत आहे. या पथनाट्याच्या माध्यमातून सध्या महिलांवर होणारे अत्याचार आणि त्यावर उपाययोजना म्हणजेच स्वसंरक्षण हे दाखवण्यात येते.

डॉ. तावडे यांना अधिवक्त्यांना भेटू न देण्याच्या संदर्भातील सुनावणी २६ सप्टेंबरला !

      कोल्हापूर - न्यायालयाच्या आदेशानंतरही सनातनचे साधक डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांना त्यांच्या अधिवक्त्यांना भेटू दिले नव्हते. या संदर्भात ५ सप्टेंबर या दिवशी अधिवक्ता श्री. वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकार्‍यांच्या निदर्शनास आणून दिले आहे. या प्रकरणात आज सुनावणी झाली. यावर २६ सप्टेंबरला युक्तिवाद होईल.
      डॉ. तावडे यांची छायाचित्रे प्रसारमाध्यमांत प्रसिद्ध झाल्याच्या प्रकरणी ८ सप्टेंबर या दिवशी कोल्हापूर पोलिसांच्या विरोधात अवमान याचिका प्रविष्ट करण्यात आली आहे. या दोन्ही सुनावण्या सातवे सहदिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर) श्रीमती व्ही.व्ही. पाटील यांच्यासमोर झाल्या. या सर्व सुनावण्यांच्या वेळी अधिवक्ता श्री. समीर पटवर्धन, अधिवक्ता श्री. वीरेंद्र इचलकरंजीर आणि अधिवक्ता श्री. आनंद देशपांडे उपस्थित होते. पुढील सुनावणी १९ सप्टेंबर या दिवशी होईल.

पाकमध्ये पोलिसाने एका हिंदु युवतीला ५० सहस्र रुपयांत विकले !

पाकमध्ये हिंदूंचे नरकमय जीवन ! भारत
 सरकारने पाकमधील हिंदूंची या नरकमय
 जीवनातून सुटका करावी, अशी अपेक्षा आहे !
        कराची - सिंध प्रांतातील मीरपूर शहरामध्ये सज्जाद काझी या पोलीस कर्मचार्‍याने एका हिंदु युवतीला ५० सहस्र रुपयांना विकले. त्यानंतर तिचे बलपूर्वक धर्मांतर करण्यात आले. काझी याला निलंबित करण्यात आले असून पुढील तपास चालू आहे.
        स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार माथेलो पोलीस ठाण्याचे मुख्य लिपीक सज्जाद काझी याने हिंदु युवती अनिला बागरी हिची विक्री केली. स्थानिक हिंदु युवकाने सांगितले की, पाकिस्तानमध्ये हिंदु युवतींचे अपहरण, बलात्कार आणि त्यांचे बलपूर्वक धर्मांतरण करून विवाह करणे ह्या घटना नेहमीच्याच झाल्या आहेत. पाकिस्तानमधून हिंदूंना बाहेर काढून केवळ मुसलमानांचा देश रहावा, अशी येथील नागरिकांची इच्छा आहे.

संयुक्त राष्ट्र सनदेचे (युएन् चार्टरचे)े संस्कृतमध्ये भाषांतर !

       संयुक्त राष्ट्र - संयुक्त राष्ट्रांचे प्रारंभीचे करारपत्र असलेल्या युएन् चार्टरचे संस्कृतमध्ये भाषांतर करण्यात आले आहे. लखनऊस्थित अखिल भारतीय संस्कृत परिषदेचे सचिव डॉ. जितेंद्र कुमार त्रिपाठी यांनी हे शोधकार्य केले आहे, अशी माहिती संयुक्त राष्ट्रांचे भारताचे कायमस्वरूपी सदस्य सय्यद अकबरुद्दीन यांनी दिली आहे.
       सन फ्रान्सिस्को येथे संयुक्त राष्ट्रांविषयीच्या आंतरराष्ट्रीय परिषदेत २६ जून १९४५ या दिवशी युएन् चार्टरवर स्वाक्षरी करण्यात आली होती. त्यानंतर २४ ऑक्टोबर १९४५ या दिवशी युएन् चार्टरची अंमलबजावणी चालू झाली होती.

महिलांच्या सुरक्षेसाठी ताईगिरी पथकाची स्थापना !

तृप्ती देसाईंचा नवीन स्टंट
     पुणे - भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई आता महिलांच्या रक्षणासाठी ताईगिरी पथकाची स्थापना करणार आहेत. (अशा प्रकारचे गुंडगिरी किंवा भीती दर्शवणारे नाव देण्यापेक्षा आणखी चांगले नाव देता आले असते. कायदा सुव्यवस्था न मानणार्‍या देसाई यांच्याकडून आणखी कोणती अपेक्षा करणार ? - संपादक) येत्या नवरात्रोत्सवातील दुर्गाष्टमीच्या दिवशी पुण्यात या पथकाची स्थापना केली जाईल. त्यानंतर टप्प्याटप्प्याने संपूर्ण राज्यभरात पथक चालू केले जाईल, अशी माहिती तृप्ती देसाई यांनी दिली. या पथकात ४ महिला आणि २ पुरुष सदस्यांचा समावेश असून दुचाकीवरून संबंधित परिसरात गस्त घालण्यात येणार आहे.

परधर्मियांशी संबंध न ठेवण्याचे शमसुद्दीन फरीद यांचे मुसलमानांना आवाहन

केरळच्या इस्लामी 
धर्मगुरूंचा ख्रिस्ती आणि हिंदु द्वेष !
        कासरगोड (केरळ) - केरळचे इस्लामी धर्मगुरु शमसुद्दीन फरीद यांनी मुसलमानांना परधर्मियांशी संबंध न ठेवण्याचे आणि त्यांचा आदर न करण्याचे आवाहन केले आहे. तसेच ओनम आणि नाताळ हे सण मुसलमानांसाठी हराम असल्याचे घोषित केले आहे. फरीद यांच्या या द्वेषपूर्ण भाषणाविषयी त्यांच्या विरोधात कासरगोड येथील अधिवक्ता सी. शुक्कुर यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. इस्लाम धर्माच्या प्रचाराच्या नावाखाली फरीद द्वेष पसरवत आहे आणि समाजामध्ये फूट पाडत आहेत, असे शुक्कुर यांनी तक्रारीत म्हटले आहे. फरीद यांच्या द्वेषपूर्ण भाषणाच्या २ ध्वनिचित्रफिती त्यांनी पोलिसांकडे सुपूर्द केल्या आहेत. कन्नूर येथील सलाफी मशिदीमध्ये मुसलमानांना मार्गदर्शन करतांना फरीद यांनी मुसलमानेतरांशी कुठलाच संबंध न ठेवण्याचे आणि त्यांचा आदर न करण्याचे आवाहन केले. मुसलमानांनी स्थलांतर करून एकत्रित रहावे, असे आवाहन त्यांनी त्यांच्या भाषणातून केले आहे.

पाकिस्तान आणि रशिया संयुक्तपणे युद्ध सराव करणार !

भारताचा मित्रराष्ट्र असलेला रशिया पाकिस्तानशी 
जवळीक साधत असेल, तर त्याला मित्रराष्ट्र म्हणता येईल का ?
         इस्लामाबाद - पाकिस्तान आणि रशिया यांचे सैन्य संयुक्तपणे प्रथमच युद्ध सराव करणार आहेत. या संयुक्त सैनिकी सरावात दोन्ही देशांचे प्रत्येकी २०० सैनिक सहभागी होणार आहेत, अशी माहिती पाकिस्तानच्या एका वरिष्ठ अधिकार्‍याने दिली. याशिवाय रशियाकडून लढाऊ विमानेही खरेदी करण्याचा पाकिस्तानचा विचार आहे, असे द एक्स्प्रेस ट्रिब्यून च्या वृत्तात म्हटले आहे. दोन्ही देशांचे द्वीपक्षीय संबंध दृढ करण्यासाठी आणि उभय देशांच्या सैन्यात ताळमेळ ठेवण्याच्या दृष्टीने या संयुक्त युद्ध सरावाकडे पाहिले जात आहे. हा सराव कधी होणार, हे अद्याप सांगण्यात आले नाही.
         पाकिस्तानचे अमेरिकेशी संबंध बिघडत चालल्याने पाकिस्तानने त्यांच्या परराष्ट्र धोरणात पालट केले असून इतर देशांशी चांगले संबंध प्रस्थापित करण्याचे प्रयत्न चालू केले आहेत. भारत आणि रशियाचे अतिशय जुने मैत्रिपूर्ण संबंध आहेत. अशा स्थितीत पाकिस्तान आणि रशियाची ही जवळीक भारतासाठी अडचणीची ठरू शकते.

फलक प्रसिद्धीकरता

केरळच्या इस्लामी धर्मगुरूंचा ख्रिस्ती आणि हिंदुद्वेष !
     केरळच्या कासरगोड येथील इस्लामी धर्मगुरु शमसुद्दीन फरीद यांनी मुसलमानांना परधर्मियांशी संबंध न ठेवण्याचे आणि त्यांचा आदर न करण्याचे आवाहन केले आहे. तसेच ओणम आणि नाताळ हे सण मुसलमानांसाठी हराम असल्याचे घोषित केले आहे.

हिंदू तेजा जाग रे !

Jago ! : Onam aur Christmas Musalmanoke liye Haram! - Keralke Islami Dharmaguru Shamsuddin Fareed
     Kya Dharmanirpeksh Bharatme aisa kehna Sahishnutaka pratik hai ?
जागो !
: ओणम और क्रिसमस मुसलमानों के लिए हराम हैं ! - केरल के इस्लामी धर्मगुरु शमसुद्दीन फरीद
     क्या धर्मनिरपेक्ष भारत में ऐसा कहना सहिष्णुता का प्रतीक है ?

एका ट्विटवरून भ्रष्ट रेल्वे तिकीट तपासनिकाची हकालपट्टी !

रेल्वे खात्याकडून प्रेरणा घेऊन इतरही 
विभागांनी त्यांच्या भ्रष्ट कर्मचार्‍यांची हकालपट्टी 
केल्यास देशाला चांगले दिवस येण्यास वेळ लागणार नाही !
       बिकानेर (राजस्थान) - राजस्थानच्या बाडमेरवरून बिकानेरला जाणार्‍या कालका एक्स्प्रेसमध्ये प्रवाशांकडून तिकिटापेक्षा अधिक पैशे घेणार्‍या एका तिकीट तपासनिकाची रेल्वे खात्याने एका ट्विटवरून नोकरीमधून हकालपट्टी केली.
       राजस्थानच्या बाडमेरवरून बिकानेरला जाणार्‍या कालका एक्स्प्रेसमध्ये श्यामलाल हा तिकीट तपासनिक प्रवाशांकडून १५ रुपये घेऊन सर्वसाधारण डब्यामध्ये जागा देत होता; परंतु त्यावेळी पैसे घेतल्यानंतर त्याने प्रवाशांना कोणतीही पावती अथवा तिकीट दिले नाही. याविषयी गोविंद नारायण या प्रवाशाने विचारणा केली असता श्यामलालाने त्याला उडवाउडवीची उत्तरे देऊन पैसे उकळण्याचे काम चालूच ठेवले. गोविंद नारायण यांना पावती न मिळाल्याने त्यांनी या भ्रष्टाचाराची माहिती सबंधित गाडीचे नाव आणि डब्याच्या क्रमांकासह भ्रमणध्वनीसंचावरून ट्विट केली. या ट्विटमध्ये त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, रेल्वेमंत्री सुरेश प्रभू, जोधपूरचे जिल्हाधिकारी यांच्या खात्यालाही टॅग केले. त्यानंतर पुढील रेल्वेस्थानक येण्याच्या आतच रेल्वेचे तपास पथक गोविंद यांना फोन करून संबंधित डब्यामध्ये शिरले आणि त्यांनी श्यामलालला पकडले. गाडी शेवटच्या स्थानकावर पोचण्यापूर्वीच श्यामलालला नोकरीवरून काढून टाकल्याचे पत्रही देण्यात आले. त्याचा बॅच जप्त केला आणि त्याला पुढच्या स्थानकावर गाडीतून उतरवण्यात आले.

बकरी ईइदला अवैधपणे बकर्‍या कापण्यास एका घंट्यात अनुमती !

नवी मुंबई महानगरपालिकेचा
पक्षपाती आणि गलथान कारभार !
        वाशी, १५ सप्टेंबर - येथील मॅफको मार्केटच्या सार्वजनिक जागेत अनुमती नसतांनाही बकरी ईदच्या दिवशी धर्मांधांकडून सोसायटीच्या आवारातच बकर्‍या कापण्यात आल्या. स्थानिक रहिवाशांनी याला विरोध करून पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसांनी यात त्वरित हस्तक्षेप करून सोसायटीऐवजी मार्केटच्या आवारात उर्वरित बकर्‍यांची कत्तल करण्यास सांगितले.
        पोलिसांच्या आदेशानंतर धर्मांधांनी आडमुठेपणाने मुंबई महानगरपालिकेचे पशु वैद्यकीय अधिकारी श्री. वैभव झुंजारे यांच्याकडून सोसायटीच्या आवारात बकर्‍या कापण्याची अनुमती घेतली. स्थानिकांचे मत विचारात न घेता तसेच जागेची पाहणी न करता अवघ्या १ घंट्याच्या आत त्यांना अनुमतीचे प्रमाणपत्र देण्यात आले. अनुमती देतांना येथे सांडपाणी आणि जैविक अवशेष यांची विल्हेवाट लावण्याची सोय आहे कि नाही हे देखील पहाण्यात आले नाही. त्यामुळे सर्वत्र घाण आणि दुर्गंधी पसरली आहे. (बकरी ईदमुळे प्रदूषण होत नाही असा कांगावा करणार्‍यांना चपराक ! - संपादक) महापालिकेच्या या पक्षपातीपणाविषयी आणि गलथान कारभाराविषयी स्थानिकांमध्ये असंतोष पसरला आहे.

विविध, चित्रविचित्र, तसेच विकृत रूपात साकारली जाणारी श्री गणेशाची चित्रे आणि मूर्ती हा धर्मशिक्षणाच्या अभावाचा परिणाम !

सनातन-निर्मित सात्त्विक श्री गणेशमूर्ती
       केवळ कला म्हणून साकारलेल्या श्री गणेशाच्या चित्रात सात्त्विकता अल्प असते आणि गणेशाचे चित्र मूळ रूपाशी फारकत घेऊन साकारलेले असेल, तर त्यात तेवढीही सात्त्विकता येत नाही. श्री गणेशाचे विडंबन जेवढे अधिक तेवढी त्यातून अधिक नकारात्मक स्पंदने येतात. म्हणून देवतेचे मानवीकरण करून त्याच्या तोंडी काही वाक्य टाकणे किंवा मूळ रूपापेक्षा वेगळ्या रूपात दाखवणे अथवा त्यांना चित्रविचित्र रूप काढणे किंवा विकृतीकरण करणे, तसेच विविध वस्तूंपासून त्याची निर्मिती करणे, हे स्पंदनशास्त्राच्या दृष्टीने चुकीचे ठरते. त्यामुळे देवतेची अवकृपाच होते.

स्थानिक स्वराज्य संस्था : पुरोगाम्यांच्या वैज्ञानिक अंधश्रद्धेचे बळी !

गणेशोत्सवात होत असलेला धर्मद्रोह, हा हिंदूंना धर्मशिक्षण नसल्याचा परिणाम ! 
प्राध्यापक कु. शलाका
सहस्त्रबुद्धे
        हिंदु धर्मातील श्रद्धा, रूढी, परंपरा अन् धर्मशास्त्र यांना अंधश्रद्धेचे लेबल लावून श्रद्धावानांना हिणवणे हा पुरोगाम्यांचा महत्त्वाचा उद्योग ! या मंडळींकडून पर्यावरणप्रेमाचा खोटा आधार घेत केवळ हिंदूंच्या सणांच्या निमित्ताने विविध क्लृप्त्या वापरून हिंदूंना धर्माचरणापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. गणेशोत्सवाच्या निमित्ताने ही गोष्ट प्रकर्षाने अनुभवायला येत आहे. गेल्या काही वर्षांपासून पुरोगामी आणि कथित पर्यावरणवादी यांनी गणेशमूर्तींच्या विसर्जनामुळे जलप्रदूषण होत असल्याची आरोळी ठोकल्यानंतर अनेक बुद्धीवादी म्हणवणार्‍या लोकांसह महानगरपालिका प्रशासनाने या अपप्रचाराविषयीची निश्‍चिती करण्याचे कष्ट घेतले नाहीत.

सनातनच्या देवद, पनवेल येथील आश्रमात नार्कोटिक औषधे सापडली, हा पोलिसांचा दावा पोकळच नव्हे, तर हास्यास्पद !

डॉ. दुर्गेश सामंत
       कॉ. पानसरे हत्या प्रकरणाचे अन्वेषण करणार्‍या विशेष अन्वेषण पथकाकडून देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमातून मानसोपचारासाठी उपयोगात आणली जाणारी औषधे कह्यात घेण्यात आली आहेत. त्या संबंधाने वर्तमानपत्रांत आणि पोलिसांकडून काही वार्ता प्रसृत झाल्या. या वार्तांमधून काही जणांच्या मनात विविध शंका उपस्थित होऊ शकतात, हे लक्षात आलेे. यामुळे या वार्तांमध्ये मांडण्यात आलेले आक्षेप, त्या अनुषंगाने निर्माण होऊ शकणार्‍या शंका आणि त्यांचा खुलासा येथे देत आहोत. 
१. सनातनच्या आश्रमात सापडलेली औषधे, हे काही मादक पदार्थ नव्हेत !
आक्षेप : नार्कोटिक औषधे जप्त करण्यात आली. 
खंडण : काही जणांना यावरून सनातनच्या आश्रमातून नशा आणणारे मादक पदार्थ जप्त करण्यात आले, असे वाटू शकते. प्रत्यक्षात चरस, गांजा, अफू यांसारखा कोणताही मादक पदार्थ आश्रमात सापडलेला नाही.

समीर गायकवाड यांच्यावरील आरोप निश्‍चितीची सुनावणी २६ सप्टेंबरला !

कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरण !
       कोल्हापूर, १५ सप्टेंबर (वार्ता.) - सनातन संस्थेचे साधक श्री. समीर गायकवाड यांच्यावर कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरणात आरोप निश्‍चित करण्याच्या विषयीची पुढील सुनावणी २६ सप्टेंबरला होईल. आरोप निश्‍चित प्रकरणात अद्याप उच्च न्यायालयात स्थगिती असून तेथील सुनावणी २० सप्टेंबर या दिवशी होणार आहे. येथील जिल्हा न्यायाधीश एल्.डी. बिले यांच्यासमोर कॉ. गोविंद पानसरे खून प्रकरणाची सुनावणी चालू आहे.

भारताच्या आकाशवाणीकडून बलुच संकेतस्थळ आणि मोबाइल अ‍ॅप चालू होणार !

          नवी देहली - ऑल इंडिया रेडिओ लवकरच बलुच भाषिकांसाठी संकेतस्थळ (वेबसाइट) आणि मोबाइल अ‍ॅप चालू करणार आहे. त्यामुळे बलुच भाषिकांचे प्रश्‍न जागतिक स्तरावर मांडण्यास साहाय्य होणार आहे. रेडिओवरून १९७४ पासून प्रतिदिन एक घंटा बलुच भाषिकांसाठी कार्यक्रम सादर केला जातो. तो बलुचिस्तान प्रांतातही ऐकता येतो. काही दिवसांपूर्वी दूरदर्शनने स्वित्झर्लंडमधील जीनिव्हा येथे आश्रय घेतलेले बलुच रिपब्लिकन पार्टीचे नेते ब्रह्मदाग बुगटी यांची मुलाखत घेतली होती.

बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यलढ्याला समर्थन देण्यास अमेरिकेचा नकार !

अमेरिकेबरोबर मैत्री 
करणार्‍या भारताला चपराक !
       वॉशिंग्टन - पाकचे सार्वभौमत्व आणि एकता यांचा आम्ही सन्मान करतो, त्यामुळे बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यास आमचे समर्थन नाही, असे अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते जॉन किरबी यांनी सांगितले. १५ ऑगस्टच्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बलुचिस्तानचे सूत्र उपस्थित केले होते.
       बलुचिस्तान प्रांतात स्वातंत्र्याच्या मागण्या होत असून तेथे पाकिस्तानी सुरक्षा दले मानवी अधिकारांचा भंग करत आहेत, त्यावर अमेरिकेचे मत विचारण्यात आले होते.

१८ सप्टेंबरला डोंबिवली येथे धर्मजागृती सभा !

स्थळ : समाज मंदिर सभागृह, दावडी गाव, डोंबिवली (पूर्व).
वेळ : सायंकाळी ५
संपर्क क्रमांक : ९७६९६९४७७९
हिंदु धर्माभिमान्यांनी अधिकाधिक संख्येने सभेत सहभागी व्हावे !

कृत्रिम हौदामागचे गुह्य !

सौ. रूपाली वर्तक
       गेल्या काही वर्षांपासून मूर्तीदान आणि चार-पाच वर्षांपासून चालू झालेले कृत्रिम हौदाचे प्रस्थ या वर्षी पुष्कळ मोठ्या प्रमाणात वाढल्याचे लक्षात आले. महाराष्ट्रातील महापालिका आणि नगरपालिका ही सर्व यंत्रणा पुढाकार घेऊन राबवत आहेत. यामध्ये अनेक त्रुटी तर लक्षात येतच आहेत; शिवाय भाविकांनी वहात्या पाण्यात विसर्जनच करू नये, म्हणून नदीला पाणी न सोडणे, कृत्रिम हौदाचा प्रसार करण्यासाठी योजना राबवून त्याच्या प्रसाराचा खर्च करणे, त्या योजना प्रत्यक्षात कृतीत आणण्यासाठी प्रचंड पैसा खर्च करणे आदी गोष्टी महापालिका आणि नगरपालिका करत आहेत अन् हिंदूंना धर्माचरणापासून परावृत्त करत आहेत ! या यंत्रणा राबवतांना त्यात भ्रष्ट कारभार झाला असण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे धर्मद्रोहासमवेतच समाजद्रोहाचेही पाप त्यांच्या माथी लागणार आहे.

पनवेल येथील सनातनच्या आश्रमात अन्वेषणासाठी आलेल्या कोल्हापूर येथील पोलिसांच्या विशेष अन्वेषण पथकासंदर्भात जाणवलेली सूत्रे

     ५.९.२०१६ या दिवशी सकाळी ११.३० वाजता कोल्हापूर येथून अन्वेषणासाठी पोलिसांचे एक विशेष पथक आणि स्थानिक पोलीस यांंचे एक पथक असे एकूण ४० - ५० जण देवद, पनवेल येथील सनातन आश्रमात आले होते. त्या वेळी अन्वेषण पथकासंदर्भात जाणवलेली सूत्रे येथे प्रसिद्ध करत आहोत.
१. स्थानिक परिस्थितीचा अंदाज न घेता अधिक 
संख्येने पोलीस बोलवून त्यांचा वेळ वाया घालवणे
       बहुदा आश्रमातील साधक गुंडच आहेत, अशा कल्पनेने अन्वेषण पथकाने स्थानिक पोलिसांचे एक पथक सोबत आणले होते; पण साधक चौकशीत सहकार्य करत आहेत, हे पाहून तरी उर्वरित पोलिसांना दुसर्‍या कामासाठी पाठवायला हवे होते. तसे न केल्यामुळे पूर्ण दिवसभर या अतिरिक्त पोलिसांचे मनुष्यबळ वाया गेले. इतर वेळी हेच लोक मनुष्यबळ नाही, असे स्पष्टीकरण देऊन शंकराचार्यांसारख्या महनीय व्यक्तीच्या सुरक्षेचे दायित्व झटकतात.

हिंदुत्वनिष्ठांची चौकशी : हिंदुत्व संपवण्याचा पोलिसी विडा !

पोलिसांकडून सनातनचे साधक आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते यांचा विविध प्रकरणांशी 
संबंध लावून त्यांचा चौकशीच्या नावाखाली चालू असलेल्या छळाला वाचा फोडणारे नवे सदर !
     हिंदुबहुल भारतात हिंदु म्हणून जगणे दिवसेंदिवस महाकठीण होत चालले आहे. देशात राजवट कोणाचीही असो हिंदूंचा छळ ठरलेलाच ! स्वातंत्र्यपूर्व काळात जुलमी ब्रिटीश पोलिसांनी क्रांतीकारकांचा आतोनात छळ केल्याच्या कथा आपण वाचल्या असतील. आज त्या क्रांतीकारकांच्या जागी आहेत निष्पाप हिंदू, तर ब्रिटीश पोलिसांच्या जागी आहेत त्यांचे वंशज, म्हणजेच आजचे पोलीस !
   सद्रक्षणाय खलनिग्रहणाय, असे पोलिसांचे ब्रीद आहे; मात्र आतापर्यंत आम्ही घेतलेल्या अनुभवांनुसार पोलिसांचे वर्तन त्यांच्या ब्रीदवाक्याच्या अगदी उलट आहे. मडगाव स्फोट प्रकरण, दाभोलकर-पानसरे हत्या प्रकरण यांसारख्या घटनांत सनातनला गोवण्याचा आटोकाट प्रयत्न झाला. कोणताही पुरावा नसतांना साप साप म्हणून भुई धोपटण्याच्या या प्रकारांमुळे साधकांना अनेक शारीरिक आणि मानसिक त्रास सोसावे लागले. पोलिसांच्या अत्यंत क्रूर वर्तणुकीमुळे अनेक प्रसंगांत सनातनच्या साधकांच्या मानवाधिकारांचेही हनन झाले आहे. अर्थात् ते सर्व हिंदू असल्याने तथाकथित मानवाधिकारवाल्यांकडून त्याची कदापि दखल घेतली जाणार नाही, हेही आम्ही जाणून आहोत.

हिंदुस्थान महती : उत्तम नररत्नांसह स्त्रीरत्नांना जन्म देणारा श्रेष्ठ देश !

      भारतभूमी नुसती सत्पुरुषांना उत्पन्न करत नाही, तर या भूमीच्या पोटी जितकी नररत्ने जन्माला आली, तितकीच स्त्रीरत्नेही येथे निर्माण झाली. ऋषिवृंदाना भरसभेत ब्रह्मविचारात जिंकून टाकणारी गार्गी इथे जन्माला आली आहे. या भूमीत लोपामुद्रा, अहिल्या, मंदोदरी, दमयंती आणि सावित्री या जन्माला आल्या आहेत. ज्या नामोच्चाराने आम्ही आणि आमचा देश हे सदैव पावन होतील, असे आता एकच नाव सांगतो, ते ऐका. हे जगातील प्राणीमात्रांनो नि स्वर्गातील देवतांनो, ते नाव श्री सीतादेवीचे होय. सीतादेवी या भूमीच्या उदरी जन्माला आली. ज्या भूमीच्या उदरी श्री जानकीदेवी जन्माला आली, त्याच भूमीच्या उदरी आमचाही जन्म झाला, ही कल्पना मनात प्रवेश करताच ते आकाशाहून विस्तृत होते ! जे क्षेत्र उत्तम धान्य देते, ते श्रेष्ठ. तसेच जो देश उत्तम स्त्री-पुरुषांना जन्म देतो, तो श्रेष्ठ आहे.
- स्वातंत्र्यवीर सावरकर (संदर्भ : स्वातंत्र्यवीर, दिवाळी अंक, वर्ष २०१४) 

     आज प्रत्येक आई-वडील माझा मुलगा डॉक्टर, अभियंता वगैरे व्हावा, असे म्हणतात; पण कोणीही सत्पुरुष व्हावा, असे म्हणत नाहीत ! - प.पू. झुरळे महाराज, डोंबिवली
     इतर पंथीय त्यांच्या पंथाप्रमाणे विनासंकोच धर्माचरण करतात. मग हिंदूंचे धर्माचरण उंबरठ्याच्या आत मर्यादित का ? - प.पू. वामनाचार्य महाराज

पुण्यासारख्या सार्वजनिक गणेशोत्सवाच्या मूळ स्रोतात राहून सार्वजनिक गणेशोत्सवचा उद्देशच न लक्षात आलेली अशी मंडळे जनतेचे काय प्रबोधन करणार ?

गणेशक्तांनो, छत्रपती शिवराय इतरांनी 
व्हावे, ही मानसिकता त्यागून स्वतःच धर्म 
अन् राष्ट्र रक्षणार्थ झोकून देऊन कार्यरत व्हा !
       पुणे येथे २३ ऑक्टोबर २०१६ या दिवशी काश्मिरी हिंदूंवरील अन्याय आणि जिहादी आतंकवाद यांच्या विरोधात राष्ट्रनिष्ठ संघटनांच्या वतीने जाहीर सभा घेण्यात येणार आहे. त्या संदर्भातील फलक शहरात लावण्यात आले आहेत. या ज्वलंत राष्ट्रीय विषयाचा अधिकाधिक प्रसार होण्याच्या हेतूने जाहीर सभेच्या प्रसाराचा फलक लावण्यासाठी ठिकाणी एका गणेशोत्सव मंडळाला संपर्क साधण्यात आला. त्या वेळी त्या मंडळाचे पदाधिकारी हा फ्लेक्स पाहून म्हणाले, असा फ्लेक्स लावला, तर जातीय दंगली भडकतील. आमचे कार्यकर्ते आर्थिकदृष्ट्या कमकुवत आहेत. पोलीस आमच्यावरच कारवाई करतील. काश्मीरमध्ये सैनिकांवर दगडफेक होत असली, तरी ही परिस्थिती हाताळायला पंतप्रधान मोदी समर्थ आहेत. मोदी सत्तेवर आल्याने सर्वांना काय काय करू असे झाले आहे. काश्मीरमध्ये फुटीरतावादी दगडफेक करतात; म्हणून आपणही तसेच करायचे का ? या फ्लेक्समुळे आमचे कार्यकर्ते मंडळात येण्यास घाबरतील. (काश्मीर हा भारताचा भाग असूनही भारतियांच्या त्याच्याविषयीच्या उदासीनतेमुळेच ४ लाख हिंदूंना १९९० मध्ये विस्थापित होऊन आज विस्थापितांचे जिणे जगावे लागत आहे. काश्मीर अनेक वर्षे सातत्याने धुमसत असूनही तेथील वृत्ते बाहेर येत नसल्याने अन्य भारतियांकडून काश्मिरींविषयीच्या अपेक्षित भावना व्यक्त केल्या जात नाहीत. गेले दोन महिने काश्मीरमध्ये आतंकवाद्यांकरवी प्रचंड दगडफेकीत सैन्य आणि जनता भरडून गेले आहेत. अशी स्थिती असतांना आपल्याच देशाचा एक भाग असणार्‍या काश्मीरविषयीची अशी उदासिनता दाखवणे राष्ट्राभिमान नसल्याचेच द्योतक आहे. अशा संकुचित व्यक्तींमुळेच भारतापासून एक एक राज्य तुटत चालले आहे. लोकमान्य टिळकांचा सार्वजनिक उत्सवाचा उद्देश विसरलेल्या अशा मंडळांनी यांच्याप्रमाणे राष्ट्र आणि धर्म रक्षणार्थ कृतीशील होणे, ही आताच्या काळातील ईश्‍वराची उपासनाच आहे, हे लक्षात घेऊन कार्यरत व्हा ! - संपादक)
     समुद्रकिनारी असलेल्या वाळूचे कण एकमेकांना अजिबात चिकटत नाहीत. त्याप्रमाणे हिंदु समाजाची स्थिती आहे.

धर्मशिक्षणाअभावी भरकटलेले हिंदू काय करू शकतात, याचे हा देखावा म्हणजे एक उदाहरण !

    आपल्या आराध्य देवतेला सैराट चित्रपटातील नायकाप्रमाणे (नायिकेवर प्रभाव पाडण्यासाठी ती विहिरीच्या पायर्‍यांवर उभी असतांना) विहिरीत उडी मारल्याचे अशा प्रकारे दाखवणे, हा तिचा घोर अवमानच ! सध्या सोशल मीडियावर एका गणेश मंडळाचा हा देखावाव्हायरल होत आहे. 
     लोकमान्य टिळकांनी ज्या राष्ट्र आणि धर्म कार्याच्या व्यापक उद्देशाने सार्वजनिक गणेशोत्सव चालू केला त्याला लागलेला हा कलंक नव्हे का ? शास्त्र समजून सण-उत्सव साजरे केले, तर देवाचे आशीर्वादच आपल्याला मिळणार आहेत. मग कोणाचीही आमच्या उत्सवाला, आमच्या मिरवणुकांना, आमच्या सणांना गोंधळ घालून रक्तपात करण्याचे धैर्य होणार नाही. यासाठी हिंदूंनो, उठा ! जागे व्हा ! धर्मशिक्षण घ्या ! धर्माभिमान वाढवून देवाची कृपा संपादन करा !
      या पृष्ठावरील छायाचित्रे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याच्या हेतूने प्रसिद्ध केलेली नसून केवळ हिंदूंना वस्तुस्थिती लक्षात यावी, या उद्देशाने प्रसिद्ध करत आहोत.

सनातनच्या मागे समाज खंबीरपणे उभा रहाणे, ही सनातनच्या कार्याला मिळालेली पोचपावती !

        पुरोगाम्यांच्या हत्यांच्या प्रकरणात सनातनला गोवण्याचे कारस्थान चालू आहे. पोलीस आणि अन्वेषण यंत्रणा यांच्याकडून अटकेतील साधक, तसेच अन्य साधक यांचाही अतोनात छळ होत आहे. हिंदुविरोधी प्रसिद्धीमाध्यमांकडूनही सनातनची अपकीर्ती केली जात आहे. या पार्श्‍वभूमीवर सनातन प्रभातने पोलिसांच्या सनातनद्वेषाचे कटू वास्तव, हा विशेषांक ६ सप्टेंबर या दिवशी प्रसिद्ध केला. त्याला भरघोस प्रतिसाद मिळाला. या अनुषंगाने समाजातील मान्यवर आणि हिंदुत्वनिष्ठ यांनी व्यक्त केलेल्या प्रतिक्रिया येथे देत आहोत.
सोलापूर
शहरात अंक वितरण करतांना 
नागरिकांचा मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद !
१. एका महिलेने स्वतः काही अंक मागून घेणे : दैनिक सनातन प्रभात हे सत्य छापणारे दैनिक आहे. सर्व साधक निरपेक्षपणे सेवा करत आहेत. शेवटी विजय आपलाच आहे, असे म्हणून त्या महिलेने ओळखीच्या लोकांना देण्यासाठी ५ जादा अंक मागून घेतले.

कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरणात समीर गायकवाड यांच्या अन्याय्य अटकेला एक वर्ष पूर्ण

दिशाहीन, भरकटलेला तपास आणि राजकीय अनास्थेचा बळी !
     १६ सप्टेंबर २०१६ ! या दिवशी श्री. समीर गायकवाड या सनातन संस्थेच्या निष्पाप साधकाला कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या प्रकरणात गोवल्याला एक वर्ष पूर्ण होत आहे. श्री. समीर गायकवाड यांना अटक करून फार मोठा तीर मारला, अशा आवेशात एक वर्षापूर्वी पत्रकार परिषद घेणारे राज्य गुन्हे अन्वेषण शाखेच्या आणि विशेष पोलीस पथकाचे प्रमुख श्री. संजयकुमार यांच्या अन्वेषण यंत्रणेवर ओढवलेली समीर यांचा खटलाही चालवू न शकण्याची नामुष्कीच श्री. समीर यांचे निर्दोषत्व आणि ते एका व्यापक षड्यंत्राला बळी पडल्याचे सिद्ध करते !
श्री. समीर गायकवाड यांच्या घरातून जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालातून काय सिद्ध झाले ?
     श्री. समीर यांच्यावर आम्ही तीन महिने लक्ष ठेवून त्याला अटक केली. त्याच्या घरी धाड मारल्यावर २३ भ्रमणभाष, एक चाकू आणि क्षात्रधर्म साधना ग्रंथ असा मुद्देमाल जप्त केल्याच्या वल्गना पोलिसांनी केल्या. एक वर्षानंतरही पोलिसांना या मुद्देमालातून काय मिळाले, हे सांगता आलेले नाही.

उत्सवकाळात शास्त्रविसंगत फटाक्यांची आतषबाजी करणे, हा राष्ट्रद्रोह आणि धर्मद्रोह !

      श्री गणेशमूर्तींचे मंगलमूर्ती मोरया या गजरात विसर्जन करतांना मोङ्ग्या प्रमाणात फटाक्यांची आतषबाजी करण्यात येते. देश आर्थिक संकटात आणि आतंकवादाच्या सावटाखाली असतांना शास्त्रविसंगत फटाक्यांची आतषबाजी करणे, हा राष्ट्रद्रोह अन् धर्मद्रोह आहे !

भारतातील पोलीस लाखो निरपराध्यांना छळतात ! अशांची नावे सनातन प्रभातला कळवा !

वाचकांना विनंती !
      पोलिसांनी गुन्हेगार म्हणून पकडलेले ९१ टक्के आरोपी निर्दोष सुटतात, असे गुन्हे अन्वेषण विभागाने प्रकाशित केलेल्या महाराष्ट्रातील गुन्हे २०१० या अहवालातून उघड झाले आहे. यावरून असे लक्षात येते की, भारतातील पोलिसांनी अशा लाखो निरपराध्यांना गुन्हेगार ठरवून त्यांचा छळ केलेला असतो. निष्पाप असूनही पोलिसांचा छळ अनुभवणार्‍यांनी त्यांचे अनुभव सनातन प्रभातच्या कार्यालयात पाठवावे. 
पत्ता : सनातन आश्रम, १०७, सनातन संकुल, देवद, पोस्ट - ओ.एन्.जी.सी., तालुका - पनवेल, जिल्हा - रायगड ४१० २२१ 
फॅक्स : (०२१४३) २३३०४२. इ-मेल : panveldainik@gmail.com

पोलिसांच्या संदर्भातील कटू अनुभव !

     सध्या सनातनचे साधक आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते यांना पोलिसांच्या शारीरिक आणि मानसिक छळाला सामोरे जावे लागत आहे. या अनुषंगाने विविध ठिकाणच्या पोलिसांविषयी सनातनचे साधक, हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते किंवा हिंदुत्वनिष्ठ यांना यापूर्वीही पोलिसांच्या सतावणुकीविषयी आलेले अनुभव येथे क्रमशः प्रसिद्ध करत आहोत.
काँग्रेस शासनाच्या काळातील गृहमंत्र्यांच्या सांगण्यावरून दुचाकी 
वाहनांवर जीवघेण्या कसरती करणार्‍या धर्मांधांना पाठीशी घालणारे; मात्र तसे 
करणार्‍या हिंदु दुचाकीस्वारांना अमानुष मारहाण करून अटक करणारे हिंदूद्वेष्टे पोलीस !
     वर्ष २०१४ मध्ये शब्बे बरातच्या रात्री धर्मांधांनी देहलीच्या मुख्य रस्त्यांवरून दुचाकी वाहने अतिशय वेगाने चालवून आणि त्या वाहनांवर जीवघेण्या कसरती करून पोलिसांना आव्हान दिले होते. ५.४.२०१४ या दिवशी अशाच प्रकारे मोठ्या प्रमाणात डोक्यावर गोल इस्लामी टोप्या घालून धर्मांध मुसलमानांच्या दुचाक्या देहलीच्या टिळक मार्ग, देहली गेट, बहादूर शाह जाफर मार्ग या मुख्य रस्त्यावरून पूर्व देहलीच्या दिशेने गेल्या. देहलीतील नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणारा हा प्रकार पोलिसांनी मुकाट्याने पाहिला; मात्र त्या वाहनधारकांवर काहीच कारवाई केली नाही;

घे तवचरणी सत्वर ।

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त...
परात्पर गुरु डॉ. जयंत
आठवले

साधकांना सूचना

पौर्णिमा आणि अमावास्या या तिथींना प्रार्थना, नामजप, तसेच साधना अधिकाधिक करा.
प्रारंभ - भाद्रपद शुक्ल पक्ष चतुर्दशी (१५.९.२०१६) उ.रात्री ३.१६ वाजता
समाप्ती - भाद्रपद पौर्णिमा (१६.९.२०१६) उ.रात्री १२.३५ वाजता
आज पौर्णिमा आहे.

पोलिसांनी केलेल्या चौकशीची माहिती त्वरित दैनिक कार्यालयात कळवा !

सनातन संस्थेचे साधक आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते यांना सूचना !
    कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या प्रकरणी सनातनच्या साधकांची आणि हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांची ठिकठिकाणी पोलिसांकडून चौकशी करण्यात येत आहे. पोलिसांनी प्रत्यक्ष बोलावून, घरी येऊन किंवा भ्रमणभाषवर संपर्क करून चौकशी केल्यास त्या चौकशीची माहिती (कोणत्या दिवशी चौकशी झाली, काय प्रश्‍न विचारले, पोलिसांचे नाव, पोलीस ठाणे, किती वेळा चौकशी केली आदी सर्व तपशील) नजीकच्या दैनिक सनातन प्रभातच्या कार्यालयात त्वरित पाठवावा. आपल्या जिल्ह्यातील साधक किंवा कार्यकर्ते यांनी झालेल्या चौकशीचा तपशील पाठवला आहे कि नाही, याचा जिल्हा समन्वयकांनी आढावा घ्यावा.
इ-मेल : panveldainik@gmail.com 
संपर्क : ९४०४९५६०८७


पोलीस चौकशीला आल्यास डगमगून न जाता खंबीर रहा !

सनातन संस्थेचे साधक आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते यांना सूचना !
     अंनिसचे डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. पानसरे यांच्या हत्येच्या प्रकरणी सनातन संस्थेला आणि साधकांना नाहक गोवण्याचा प्रयत्न पोलिसांकडून केला जात आहे. पोलीस चौकशीला आल्यास साधकांनी घाबरून न जाता, पोलिसांनी विचारलेल्या प्रश्‍नांना योग्यप्रकारे शांतपणे उत्तरे द्यावीत. कारण सनातन संस्थेचे सर्व कार्य वैध मार्गाने चालते. यापूर्वीही अशा घटनांमध्ये साधकांची चौकशी करण्यात आलेली आहे; मात्र अशा चौकशांमधून काहीही निष्पन्न झालेले नाही.
     कर नाही, त्याला डर कशाला या उक्तीप्रमाणे आपण काहीही केलेले नसल्यामुळे साधकांनी घाबरून जाण्याची आवश्यकता नाही.      भगवान श्रीकृष्ण पाठीशी असल्यामुळे साधकांनी अशा प्रसंगांत कोणतीही भीती न बाळगता प्रार्थना आणि नामजप करत खंबीरपणे प्रसंग हाताळावा.

साधकांनो, चौकशीसाठी येणार्‍या पोलिसांपासून सतर्क रहा !

     पोलीस चौकशी करण्याच्या निमित्ताने आश्रमात किंवा घरी येतील, तेव्हा ते काही शस्त्रास्त्रेे अथवा आक्षेपार्ह वस्तू आश्रमात ठेवून मग छापा घालून ती जप्त केली, असे दाखवतील. त्यामुळे पोलिसांच्या चौकशीच्या संदर्भात सावधानता बाळगा ! १. कोल्हापूर येथील एका हॉटेल मालकाला फसवण्यासाठी पोलिसांनीच हॉटेलमध्ये अमली पदार्थ ठेवले होते.
२. आनंद संप्रदायाच्या आश्रमात पोलिसांनी प्लास्टिकच्या मानवी कवट्या ठेवून त्यांची मानहानी करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली होती. संप्रदायाच्या गुरूंचे कारागृहातच निधन झाले. ही गोष्ट ३५ वर्षांनंतर एका निवृत्त पोलीस अधिकार्‍याने उघड केली.
३. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाच्या आरोपपत्रात कर्नल प्रसाद पुरोहित यांच्या देवळाली येथील घरात महाराष्ट्र आतंकवादविरोधी पथकानेच (एटीएस्नेच)आर्डीएक्स ठेवून त्यांना चुकीच्या पद्धतीने अटक केली, असे राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने म्हटले आहे.
     या गोष्टी लक्षात घ्या आणि पोलीस तसे काही करत नाहीत ना, यावर सतर्कतेने लक्ष ठेवा !      सनातनच्या आश्रमांत पोलीस येतील, तेव्हा त्यांच्यावर लक्ष ठेवा, असे सनातन संस्था का सांगते, हे या उदाहरणावरून लक्षात येईल.
       तरुणांनो, जर हे राष्ट्र जिवंत रहावं अशी आपली धडपड असेल, तर हे राष्ट्र पूर्णपणे हिंदु धर्माधिष्ठित जीवनप्रणाली स्वीकारलेले असले पाहिजे. - स्वामी विवेकानंद
        संस्कृतीद्वेष्टे अंधश्रद्धा अशी शिवी हासडून स्वतःला कृतार्थ मानतात. अंधश्रद्ध अशी श्रद्धावानाची हेटाळणी करणारे हे कॉन्व्हेंट, पॉप संस्कृतीचे पोषक नि संवर्धक स्वतः मात्र अंधश्रद्धेने पछाडलेले असतात ! 
- प.पू. गुरुदेव डॉ. काटेस्वामी

बोधचित्र

॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज
सनातनचे श्रद्धास्थान
कितीही कल्पनातीत आनंदलहरी असल्या,
 तरी त्यांची शीतलताच त्यांचा दाब उसळेल.
भावार्थ : आनंदलहरी कल्पनातीत आहेत; कारण साधारण व्यक्तीला आध्यात्मिक आनंदाची, आत्मानंदाची अनुभूती नसतेच, केवळ व्यावहारिक सुखाची असते. त्यांची शीतलताच त्यांचा दाब उसळेल म्हणजे आनंदाची अनुभूती घ्यावी, अशी प्रत्येक जिवाला नैसर्गिक ओढ असतेच, म्हणून आनंद मिळावा हा विचार कधी ना कधी उफाळून येतोच.
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.)

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले
बुद्धीप्रामाण्यवादी खरंच बुद्धीप्रामाण्यवादी आहेत का ?
     त्या त्या विषयातील तज्ञ एकमेकांशी वाद करू शकतात, उदा. आधुनिक वैद्य (डॉक्टर) आधुनिक वैद्यांशी, वकील वकिलांशी, संगणकतज्ञ संगणकतज्ञांशी; पण अध्यात्माचा काहीच अभ्यास नसलेले आणि साधना न केलेले बुद्धीप्रामाण्यवादी अध्यात्मातील अधिकार्‍यांशी वाद करतात. यापेक्षा मूर्खपणाचे दुसरे उदाहरण आहे का ? - (परात्पर गुरु) डॉ. आठवले
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥
या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो.
- प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

परमेश्‍वराची उपासना सोडू नये
कितीही संकटांशी सामना करावा लागला, तरी परमेश्‍वरी उपासना सोडू नये. 
हताश होऊ नये. उपासनाच आपल्याला तारते. 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

मतदारांचे ध्रुवीकरण

संपादकीय 
      सध्या गोव्यातील राजकारणाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. एरव्ही शांत असलेल्या गोव्यातील राजकीय घडामोडींविषयी आता विविध माध्यमांतून चर्चा झडू लागल्या आहेत. गोव्यात प्राथमिक शिक्षणाचे माध्यम कोणते असावे, याविषयी आतापर्यंत गेली अनेक वर्षे भाषाप्रेमी आणि शासन असा संघर्ष चालू आहे. यापूर्वी काँग्रेसचे शासन असतांना त्या वेळी विरोधी पक्षात असलेल्या भाजपच्या आमदारांनीही या माध्यमप्रश्‍नावरील आंदोलनात सक्रीय सहभाग घेतला होता.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn