Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

आज अनंतचतुर्दशी

कोटी कोटी प्रणाम !

स्वामी वरदानंद भारती यांची आज जयंती

बांगलादेशाची राजधानी ढाक्यामध्ये बकरी ईदमुळे रस्त्यावर रक्ताचे पाट !

इको-फ्रेंडली सण साजरा करण्याची टुम केवळ भारतात आणि 
हिंदूंच्या सणांच्या वेळी पुरो(अधो)गाम्यांकडून काढली जाते अन्य 
धर्मियांच्या पर्यावरणाला हानी पोचवणार्‍या प्रथांच्या विरोधात हे पुरो
(अधो)गामी कुठल्या बिळात लपून बसतात, हा संशोधनाचाच विषय होईल !
     ढाका - बांगलादेशाची राजधानी ढाक्यामध्ये १३ सप्टेंबरला बकरी ईदच्या दिवशी रस्ते आणि नाले यात रक्ताचे पाट वहात असल्याची छायाचित्रे सामाजिक संकेतस्थळांवरून सर्वत्र प्रसारित झाली. येथे बकरी ईदला बकर्‍यांची कत्तल केल्यानंतर मोठ्या प्रमाणात पाऊस आल्याने नाल्यात सोडण्यात आलेले रक्त रस्त्यावर पाण्यात मिसळून वाहू लागले. त्यामुळे शहरातील अनेक रस्ते लाल झाले होते. पशूंच्या हत्येसाठी दोन जागा निश्‍चित करण्यात आल्या होत्या; मात्र नागरिकांनी घर, गल्ली, गॅरेज आदी ठिकाणी कत्तली केल्या. पावसाच्या पाण्याचा योग्य निचरा होत नसल्याच्या तक्रारी स्थानिकांनी केल्या आहेत, तसेच हे अवशेष फेकून देण्यासाठी कोणतीही सोय नसल्याची नाराजीही रहिवाशांनी व्यक्त केली आहे.

सनातनची अपकीर्ती करणारे खोटे वृत्त छापल्याने दैनिक लोकसत्तावर बहिष्कार घालण्याची धर्मप्रेमी हिंदूंची ट्विटरवर मागणी !

       मुंबई - १२ सप्टेंबर २०१६ या दिवशी दैनिक लोकसत्तामध्ये डॉ. झाकीर नाईक आणि आठवले हे एकाच माळेचे मणी असे अंनिसचे डॉ. हमीद दाभोलकर यांनी केलेले वक्तव्य कोणतीही शहानिशा न करता प्रसिद्ध करण्यात आले. तसेच आदर्श घोटाळ्यातील आरोपी आणि काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी सनातन संस्थेची इसिसशी तुलना करणारे वक्तव्य केले, ते देखील लोकसत्तामध्ये छापण्यात आले आहे. या बातम्यांचा निषेध म्हणून धर्मप्रेमी हिंदूंनी #BoycottLoksatta या नावाने ट्विटरवर ट्रेंड केला. या ट्रेंडमध्ये हिंदूंनी सनातनच्या समर्थनार्थ प्रतिक्रिया देऊन लोकसत्ताचे संपादकांच्या विरोधात मानहानीचा दावा दाखल करण्यात यावा आणि लोकसत्तावर बहिष्कार घालावा, अशी मागणी ट्विटद्वारे केली. #BoycottLoksatta या ट्रेंडद्वारे हा विषय १ लक्ष ८९ सहस्रांहून अधिक लोकांपर्यंत पोेचला आहे.

महाराष्ट्रातील मुसलमानांच्या शहरी लोकसंख्येत गेल्या दशकात २६.३० टक्के, तर गोव्यात ८.३३ टक्के वाढ !

युरोपीय देशांत मुसलमान निर्वासितांच्या घुसखोरीमुळे वातावरण सध्या
 तणावपूूर्ण आहे. भारतीय शासनाने ही गोष्ट लक्षात घेतल्यास समान 
नागरी कायदा करण्यासाठी जनतेकडून दबाव का येत असतो, याचे उत्तर सापडेल !
     चेन्नई - येथील सेंटर फॉर पॉलिसी स्टडीज या संस्थेने वर्ष २०११ मध्ये झालेल्या जनगणनेच्या आकडेवारीचे शास्त्रशुद्ध परीक्षण केले आहे. त्यानुसार महाराष्ट्रातील मुसलमानांची ७३ टक्के लोकसंख्या शहरी भागात स्थायिक झाली आहे. केवळ मुंबईतील मुसलमानांची लोकसंख्या वर्ष १९६१ मध्ये १३ टक्के होती, ती वर्ष २०११ मध्ये २१ टक्के झाली आहे.
     शहरी भागातील मुसलमानांची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. लोकसंख्येच्या शहरीकरणावर समाजाची सुबत्ता अवलंबून असते. त्यामुळे महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यात मुसलमानांच्या शहरीकरणाचा कल बघता देशातील मुसलमान दरिद्री असून त्यांच्याप्रती भेदभाव केला जातो हा समज खोटा ठरतो. उलट विकासाचे काही मापदंड, उदा. अर्भकांचा मृत्यू दर, लहान मुलांचा मृत्यू दर, शहरीकरण, आयुष्यमान इत्यादी गोष्टी लक्षात घेता मुसलमान हिंदूंपेक्षा अधिक पुढारलेले आहेत हेच दिसून येते.

बकरी ईदच्या दिवशी इसिसने पशूवधगृहात कैद्यांना उलटे टांगून केला शिरच्छेद !

इसिसची क्रूरता !
     दमिश्क - इसिसने प्रसारित केलेल्या द मेकिंग ऑफ इल्यूशन या नावाच्या नव्या व्हिडिओमध्ये कैद्यांना उलटे टांगून त्यांचा शिरच्छेद केल्याचे दाखवण्यात आले आहे. सिरीयाच्या एका पशूवधगृहात कत्तलीसाठी आणलेल्या पशूंप्रमाणे या कैद्यांना टांगण्यात आले होते.

मदरशाला अनुमती दिल्यावरून महिला ग्रामसेविकेच्या पतीवर आक्रमण

     ठाणे - भिवंडी येथील भोकरी ग्रामपंचायतीचे उत्पन्न न्यून असतांना महिला लिपिकाची केलेली नेमणूक आणि मदरशाला दिलेली अनुमती यातून उफाळलेल्या वादातून आक्रमणकर्त्यांनी लिपिक महिलेच्या पतीवर जीवघेणे आक्रमण करून त्याचा कान कापल्याची घटना भिवंडीत घडली. लिपिक महिलेचे पती हे ग्रामसेवक आहेत.

सीसका आस्थापनाद्वारे करण्यात आलेले श्री गणेशाचे विडंबन ट्विटरवरून धर्मप्रेमी हिंदूंनी केलेल्या निषेधानंतर काढले !

संघटित हिंदूंचे यश !
     मुंबई - सीसका हे प्रकाशयोजना करणारे आस्थापन आहे. ५ सप्टेंबर २०१६ या दिवशी त्यांनी स्वतःच्या उत्पादनांचे विज्ञापन ट्विटरवर प्रसिद्ध केले. या विज्ञापनामध्ये विविध प्रकारच्या दिव्यांची रचना करून गणपतीसारखा आकार साकारण्यात आला आहे आणि सर्वांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. हिंदूंचे आराध्य दैवत असलेल्या श्री गणेशाला धर्मशास्त्रापेक्षा विसंगत रूपात दाखवून एकप्रकारे त्याचे विडंबनच करण्यात आले आहे. यामुळे सर्व हिंदूंनी याचा निषेध केला. त्यांनी सीसका आस्थापनाच्या या विज्ञापनाच्या ट्विटला उत्तर (रिप्लाय) देत त्यांना हे विज्ञापन मागे घेण्याची मागणी केली. याचा परिणाम म्हणजे आस्थापनाने विज्ञापनाची ही ट्वीट त्यांच्या ट्वीटर खात्यावरून काढून टाकली आहे.

पाकमधून आलेल्या निर्वासित हिंदु मुलीला परराष्ट्र्रमंत्री सुषमा स्वराज शाळेत प्रवेश मिळवून देणार !

सरकारने आता पाक आणि बांगलादेश येथील हिंदूंचेही रक्षण करणे अपेक्षित आहे !
      नवी देहली - पाकमध्ये धार्मिक छळ झाल्याने निर्वासित म्हणून भारतात आलेल्या मधु नावाच्या हिंदु मुलीला शाळेत प्रवेश मिळावा, यासाठी परराष्ट्र्रमंत्री सुषमा स्वराज यांनी पुढाकार घेऊन तिला शाळेत प्रवेश मिळवून देण्याचे आश्‍वासन दिले.
      पाकमधील पंजाब प्रांतात रहाणार्‍या मधुचा तेथे धार्मिक छळ झाल्याने ती तिची आई, मामा आणि चुलत बहिणींसह २ वर्षांपूर्वी निर्वासित म्हणून भारतात आली होती. तिच्याकडे आवश्यक ती कागदपत्रे नसल्यामुळे तिला शाळेत प्रवेश घेण्यास अडचण येत होती. परराष्ट्र्रमंत्री स्वराज यांनी सदर विषयाची दखल घेऊन मधूला भेटीला बोलावले आणि तिला वरील आश्‍वासन दिले.(म्हणे) 'सार्वजनिक मंडळांनी 'श्रीं'च्या मूर्तींचे विसर्जन कृत्रिम हौदात करावे !'

पुण्याचे महापौर प्रशांत जगताप यांचे धर्मद्रोही आवाहन 
     पुणे - शहर आणि परिसरात यंदा चांगला पाऊस झाला असतांनाही मानाच्या ५ ही गणेश मंडळांनी 'श्रीं'च्या मूर्तींचे विसर्जन हौदातील पाण्यात करण्याचा घेतलेला निर्णय स्वागतार्ह आहे. अन्य सार्वजनिक गणेश मंडळांनीही त्यांचे अनुकरण करावे. त्यासाठी पुरेशा सेवासुविधा उपलब्ध करून दिल्या जातील, असे आवाहन महापौर प्रशांत जगताप यांनी केले आहे. (कोणत्या सुविधा दिल्या जातात ? उलट हौदामध्ये विसर्जन केल्यानंतर त्या श्री गणेशमूर्ती पुन्हा कचर्‍याच्या गाडीतून खाणीमध्ये फेकल्या जातात आणि त्या मूर्तींची विटंबनाच होते. यामुळे हिंदु धर्मियांच्या भावना दुखावल्या जातात, त्याविषयी महापौर काही उपाययोजना करणार का ? - संपादक) पालिका प्रशासनातील वरिष्ठ अधिकार्‍यांशी महापौरांनी चर्चा करून नेमक्या कोणत्या सुविधा देता येतील, याचा आढावा घेतला. त्यानंतर ते बोलत होते.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका प्रशासनाकडून घाटांवर असुविधा असणे आणि कृत्रिम हौदात श्री गणेशमूर्तींची विटंबना होत असल्याप्रकरणी हिंदुत्वनिष्ठांकडून निवेदन

     पिंपरी (पुणे), १४ सप्टेंबर (वार्ता.) - नदीपात्रामध्ये पाण्याअभावी अनेक भाविकांना पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने सिद्ध केलेल्या कृत्रिम हौदांमध्ये गणेशमूर्तींचे विसर्जन करावे लागले. सर्व घाटांवर पालिकेने परिपूर्ण सुविधा का पुरवल्या नाहीत, याचा लेखी खुलासा प्रशासनाने करावा. महापालिकेचे कर्मचारी भाविकांना कृत्रिम हौदात मूर्तींचे विसर्जन करण्याविषयी दबाव आणत आहेत. तरी असा दबाव न घालण्याविषयी अशा कर्मचार्‍यांना सक्त ताकीद द्यावी. तसेच हौदात विसर्जन झालेल्या गणेशमूर्ती पालिकेचे कर्मचारी तेथेच आणि परिसरात सोडून गेल्याचे निदर्शनास आले. यामुळे श्री गणेशाची घोर विटंबना झाली असून कोट्यवधी हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत. याचबरोबर सर्व घाटांवर गणेशभक्तांना कोणताही त्रास न होण्यासाठी सर्व मागण्यांची पालिका आयुक्तांनी गंभीर दखल घेऊन तातडीने अंमलबजावणी करावी, अशी मागणी करणारे निवेदन समस्त गणेश भक्त, विविध हिंदुत्ववादी संघटना आणि हिंदु जनजागृती समिती यांनी १४ सप्टेंबर या दिवशी महानगरपालिका आयुक्त श्री. दिनेश वाघमारे यांच्या नावे दिले. या वेळी लष्कर-ए-हिंदचे प्रदेशाध्यक्ष अधिवक्ता श्री. देवदास शिंदे, हिंदु जनजागृती समितीचे श्री. निलेश जोशी आणि अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे प्रतिनिधी हे उपस्थित होते.

(म्हणे) सनातन आश्रमातील महिला डॉक्टर डॉ. तावडेंच्या सांगण्यावरून खास साधकांना औषधे देत होती !

सनातनची अपकीर्ती करण्यासाठी कपोलकल्पित 
कहाण्या रचून धादांत खोटे वृत्त देणारे दैनिक लोकमत !
एखादा मानसोपचार तज्ञ कधी मानसिक रुग्णाला 
कान-नाक-घसा तज्ञाच्या सांगण्यावरून औषध देईल का ?
     कोल्हापूर - पनवेल येथील सनातन आश्रमात सापडलेल्या नार्कोटिक औषधांच्या साठ्याप्रकरणी एस्आयटीने गोवा आश्रमातील महिला डॉक्टर आशा ठक्कर हिला ताब्यात घेतले आहे. (सनातनच्या रामनाथी आश्रमातील साधिका डॉ. (सौ.) आशा ठक्कर या मानसोपचार तज्ञ असल्याने विशेष तपास पथकाने पनवेल आश्रमातून जप्त केलेल्या औषधांविषयी चौकशीत त्यांचा जबाब घेण्यासाठी त्यांना गोव्याहून कोल्हापूरला बोलावले आहे. असे असतांना त्यांना ताब्यात घेतले असे म्हणणे अत्यंत चुकीचे आहे. तसेच चौकशी केलेल्या डॉक्टर व्यक्तीला एकेरी संबोधून दैनिक लोकमतने त्यांची मानसिकता दाखवून दिली आहे. अशा दैनिकांमुळेच पत्रकारिता क्षेत्राची अधोगती झाली आहे आणि कुणालाही त्याविषयी विश्‍वास राहिलेला नाही. - संपादक) ती वीरेंद्र तावडेच्या सांगण्यावरून आश्रमातील खास साधकांना औषधे देत होती. (डॉ. (सौ.) आशा ठक्कर या मानसोपचार तज्ञ आहेत, तर डॉ. वीरेंद्र तावडे हे कान, नाक, घसा तज्ञ आहेत. एखादा मानसोपचार तज्ञ कान-नाक-घसा तज्ञाच्या सांगण्यावरून कधी रुग्णाला मानसिक आजारांवरील औषध देईल का ? - संपादक) त्यामुळे तिला पानसरे हत्येसंबंधी माहिती असण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने पोलिस तिच्याकडे कसून चौकशी करत आहेत, असे धादांत खोटे वृत्त दैनिक लोकमतमध्ये १४ सप्टेंबर २०१६ च्या अंकात प्रसिद्ध करण्यात आले आहे.

श्री गणेशमूर्तीवरील निर्माल्य वहात्या पाण्यात विसर्जित करण्यामागील अध्यात्मशास्त्र !

     पूजेतील निर्माल्यामध्येही चैतन्य आलेेले असल्यामुळे निर्माल्य वहात्या जलस्रोतात विसर्जित केल्यास ते पाण्यासमवेत सर्वदूर पसरून आध्यात्मिक स्तरावर लाभ होतो. पाने-फुले असे नैसर्गिक घटक असलेल्या निर्माल्यामुळे जलप्रदूषण होण्याचा प्रश्‍न उद्भवत नाही. याउलट रासायनिक घटक असलेल्या गोष्टींमुळे जलप्रदूषण होते. अपवादात्मक परिस्थितीत उदा. दुष्काळामुळे निर्माल्य विसर्जित करता येईल एवढा पाण्याचा साठा उपलब्ध नसेल किंवा पाणी शुद्ध नसल्याने निर्माल्य पाण्यात विसर्जित करता येत नाही. अशा वेळी वैयक्तिक स्तरावर तरी निर्माल्यातील चैतन्याचा लाभ मिळावा, यासाठी निर्माल्य पाण्यात बुडवून काढावे आणि नंतर त्या पाण्याचा वापर स्नानासाठी करावा किंवा ते पाणी अंगणातील फुलझाडांना घालावे. नंतर त्या निर्माल्याचा वापर खत-निर्मितीसाठी करावा. निर्माल्य खत-निर्मितीसाठी वापरणे शक्य नसल्यास देवाला प्रार्थना करून ते टाकून द्यावे; मात्र धर्मशास्त्र पालन करण्याचाच प्रयत्न करणे आवश्यक. 
(संदर्भ : सनातनचा ग्रंथ 'गणपति' भाग १) 
 हिंदूंनो, पाने, फुले असलेले निर्माल्य वहात्या 
पाण्यात विसर्जित केल्यामुळे जलप्रदूषण होत नाही, हे जाणा !

पुणे आणि पिंपरी-चिंचवड येथे श्री गणेशमूर्ती विसर्जनासाठी धरणातून पाणी सोडण्यात येणार

     पुणे, १४ सप्टेंबर - पुणे आणि पिंपरी-चिंचवड येथे श्री गणेशमूर्ती विसर्जन आणि नागरिकांना पुरेसे पाणी मिळावे म्हणून धरणातून जादा पाणी सोडण्याचे नियोजन पाटबंधारे विभागाने केले आहे, अशी माहिती पालकमंत्री गिरीश बापट यांनी १३ सप्टेंबर या दिवशी दिली. खडकवासला धरणात सध्या ९५ टक्के पाणीसाठा असून पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणारे पवना धरणही पूर्ण भरले आहे. त्यामुळे या दोन्ही धरणांमधून विसर्जनासाठी पाणी सोडण्याचा आदेश जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा करूनच दिला असल्याचेही बापट यांनी स्पष्ट केले. 

गणेशमूर्तींचे वहात्या पाण्यात विसर्जित करा !

नाशिक येथे हिंदु जनजागृती समितीचे पत्रकार परिषदेद्वारे प्रबोधन ! 
     नाशिक - वर्षाचे ३६४ दिवस झोपलेले तथाकथित पर्यावरणवादी आणि अंनिस गणेशोत्सव आला की 'प्रदूषण होते' म्हणून ओरडायला लागतात. कधी बकरी ईदला वा नाताळाच्या वेळी प्रदूषण होते म्हणून आक्षेप घेतला आहे का ? इकोफ्रेंडली गणेशोत्सव साजरा करण्याच्या नावाखाली गणेशमूर्तींचे कृत्रिम तलावात विसर्जन करा म्हणणारे 'इकोफ्रेंडली बकरी ईद साजरी करून मातीची बकरी कापा', 'ताबूतांचे पाण्यात विसर्जन करू नका', 'ख्रिस्त्यांच्या नाताळच्या वेळेस 'थर्माकॉल' आणि 'प्लास्टिक'च्या साहित्यांचा वापर करू नका', असेही कधी म्हणत नाहीत. केवळ हिंदूंच्या सणांना विरोध करून लक्ष जात आहे. कृत्रिम हौदात गणेशमूर्तींचे विसर्जन केल्यावर त्यांची पुढे विटंबना होते. हे टाळण्यासाठी गणेशभक्तांनी अनंतचतुर्थीला गणेशमूर्तींचे कृत्रिम हौदात विसर्जन करण्यापेक्षा धर्मशास्त्रानुसार वहात्या पाण्यात मूर्तींचे विसर्जन करून श्रीगणेशाची कृपा संपादन करा, असे आवाहन श्री. शशिधर जोशी यांनी केले. नाशिक येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी अखिल भारतीय वैष्णव परिषदचे श्री. दीपक बैरागी, पुरोहित संघाचे अध्यक्ष श्री. सतीश शुक्ल, शिवसृष्टी बहुउद्देशीय विकास संस्था, कॉलेज रोड, नाशिकचे श्री. प्रफुल्ल पाठक, सनातन संस्थेच्या सौ. ज्योती पंडित हे उपस्थित होते.

नृसिंहवाडी (सांगली) येथील जय जवान गणेशोत्सव मंडळात राष्ट्र आणि धर्म यांविषयक फ्लेक्स प्रदर्शन !

दैनंदिन जीवनातील आवश्यक असे धर्माचरणाचे महत्त्व समजले ! - जिज्ञासूंची प्रतिक्रिया
     कसबे डिग्रज (सांगली) - येथील जुन्या ग्रामपंचायतीजवळ असलेल्या जय जवान गणेशोत्सव मंडळात हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांचे धर्मशिक्षण देणार्‍या आणि क्रांतीकारकांची माहिती देणार्‍या ५८ फ्लेक्सचे प्रदर्शन ६ ते ९ सप्टेंबर या कालावधीत लावण्यात आले होते. हे प्रदर्शन पाहून जिज्ञासूंनी, आम्ही आजपर्यंत केवळ कृती करत होतो; मात्र प्रदर्शन पाहून दैनंदिन जीवनातील आवश्यक असे धर्माचरणाचे महत्त्व समजले, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. मंडळाच्या कार्यकर्त्यांनी नृसिंहवाडी येथे कन्यागत पर्वकाळात हे प्रदर्शन पाहिले होते. त्या वेळी अशाच प्रकारे प्रदर्शन त्यांच्या गावात लावण्याची मागणी त्यांनी केली होती.
      या प्रदर्शनाचा ६०० हून अधिक जिज्ञासूंनी लाभ घेतला. पोलीस उपनिरीक्षक श्री. रत्नदीप साळोखे यांनी प्रदर्शन पाहून अन्य गोष्टींना फाटा देऊन एक चांगला उपक्रम राबवल्याविषयी मंडळातील कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले. हे प्रदर्शन लावण्यात जय जवान गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष योगेश घुले, उपाध्यक्ष संजय वाले, गणेश तेली, विक्रम सूर्यवंशी यांसह अन्य कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला. (धर्माचरणाचे महत्त्व लक्षात आल्यावर त्वरित कृती करून सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांचे प्रदर्शन लावणार्‍या जय जवान गणेशोत्सव मंडळातील सर्वांचे अभिनंदन ! प्रत्येक हिंदूंनी याप्रमाणे कृतीशील होत धर्मकार्यातील आपला खारीचा वाटा उचलला पाहिजे ! - संपादक)

पुणे महानगरपालिकेकडून आकाशवाणीद्वारेही अमोनियम बायकार्बोनेटच्या धर्मविरोधी पर्यायाचा प्रसार !

     पुणे - पुणे महानगरपालिकेने गणेशविसर्जनासाठी अमोनियम बायकार्बोनेट वापरण्याचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. या संदर्भात पालिकेने आकाशवाणीसह फ्लेक्स फलक, रंगीत हस्तपत्रके, रंगीत भीत्तीपत्रके यांच्या माध्यमातून, तसेच विविध वर्तमानपत्रांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात प्रचार केला आहे. (पालिकेने धर्मद्रोही कार्यावर एवढ्या मोठ्या प्रमाणात व्यय करण्यापेक्षा तोच पैसा विकासकामांवर वा भाविकांना श्री गणेशमूर्तींचे वहात्या पाण्यात विसर्जन करण्यासाठीच्या सुविधांवर व्यय केला असता, तर ते सयुक्तिक ठरले असते. - संपादक) प्रत्यक्षात हा पर्याय धर्मशास्त्रसंमत नसून परंपरेप्रमाणे भाविकांनी गणेशमूर्तींचे वहात्या पाण्यातच विसर्जन करणे अपेक्षित आहे.

दैनिक केसरीच्या वतीने आदर्श पालखी मिरवणूक !

    
दैनिक केसरीची निघालेली पालखी मिरवणूक
      सांगली - दैनिक केसरीच्या वतीने प्रतिवर्षीप्रमाणे लोकमान्य टिळकांनी घालून दिलेली आदर्श परंपरा जपत आदर्श पालखी मिरवणूक काढण्यात आली. या प्रसंगी लोकमान्य टिळक आणि अन्य राष्ट्रपुरुष यांची वेशभूषा करण्यात आली होती. या वेळी केसरीचे व्यवस्थापक श्री. पेशवे, वार्ताहर श्री. संजय हेब्बाळकर आणि श्री. हरीश यमगर, तसेच अन्य कर्मचारीवर्ग उपस्थित होता. ११ सप्टेंबर या दिवशी सकाळी श्री गणपति मंदिरासमोर महिलांचा सामूहिक अथर्वशीर्ष पठणाचा कार्यक्रमही घेण्यात आला होता.

सरस्वती चहा आस्थापनाकडून श्री गणेशाचे विडंबन !

     मिरज - सरस्वती चहा आस्थापनाने श्री गणेशोत्सवाच्या निमित्ताने प्रसिद्ध केलेल्या विज्ञापनात श्री गणेशाचे विडंबन केले आहे. यात श्री गणेश आणि श्री सरस्वती देवी यांना चहा पितांना दाखवण्यात आले आहेत. एका हिंदु धर्माभिमान्याने आस्थापनास या संदर्भात दूरभाष केल्यावर त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. या विज्ञापनामुळे भाविकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. सांगली महापालिका क्षेत्रात या विज्ञापनांची होर्डींग लावण्यात आली आहेत. (श्री गणेश आणि श्री सरस्वती हे काही मनुष्यरूपात नसतात की त्यांना तहान-भूक लागेल. त्यामुळे दोन्ही देवतांचे मानवीकरण करून त्यांना चहा पितांना दाखवणे हा धर्मद्रोहच आहे ! - संपादक)

१६ सप्टेंबर २०१६ या दिवशी असणार्‍या छायाकल्प चंद्रग्रहणाविषयीची माहिती

 
सौ. प्राजक्ता जोशी
    भाद्रपद पौर्णिमा म्हणजे शुक्रवार, १६ सप्टेंबर २०१६ या दिवशी छायाकल्प चंद्रग्रहण आहे. हे ग्रहण छायाकल्प असल्याने ग्रहणाचे वेधादी कोणतेही नियम पाळू नयेत.
ग्रहण दिसणारे प्रदेश आणि वेळ
: भारतासह आशिया, युरोप, आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, हिंदी महासागर, प्रशांत महासागर, अटलांटिक महासागर
ग्रहण आरंभ : २२.२५ मि. (रात्री १०.२५)
ग्रहण मध्य : २४.२४ मि. (रात्री १२.२४)
ग्रहण समाप्ती : (१७ सप्टें.) २.२४ मि. (पहाटे २.२४)
(सर्व वेळा भारतीय प्रमाण वेळेनुसार)
(संदर्भ : दाते पंचाग)
- सौ. प्राजक्ता जोशी, ज्योतिष फलित विशारद, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (११.९.२०१६)

सासवड येथील संघचालकांकडून 'नदीमध्ये निर्माल्य आणि प्लास्टिक न टाकण्याचे गणेशभक्तांना आवाहन !'

रा.स्व. संघाने असे आवाहन करण्यापूर्वी धर्मशास्त्र जाणून घ्यावे ! 
     पुणे - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील सासवड येथील संघचालक श्री. केशव तथा अप्पासाहेब पुरंदरे यांनी त्या भागातील सर्व गणेशोत्सव मंडळांना आवाहनपर पत्र प्रसिद्ध केले आहे. त्यानुसार 'नदीमध्ये निर्माल्य आणि प्लास्टिक न टाकण्यास' सांगितले आहे. (प्लास्टिक नदीत विसर्जित न करण्याची संघचालकांची सूचना योग्यच आहे; परंतु त्यांनी निर्माल्य वहात्या पाण्यात विसर्जित करण्यामागील धर्मशास्त्र जाणून घ्यावे, अशी अपेक्षा आहे. तसेच त्यांनी श्री गणेशमूर्तीभोवती आरास करतांना प्लास्टिक किंवा थर्मोकोल यांचा वापर न करता नैसर्गिक वस्तूंपासून आरास करण्याचेही आवाहन करावे आणि वर्षभर नदीमध्ये सोडले जाणारे सांडपाणी अन् विविध रासायनिक द्रव्ये, तसेच बकरी ईद आणि अन्य वेळी नदीत सोडले जाणारे पशूंचे रक्त यांविरोधात आवाज उठवावा ! - संपादक)

पोलीस उपनिरीक्षक श्री. चंद्रकांत बेंद्रे यांची विभागीय चौकशी करू ! - पोलीस अधीक्षक संदीप पाटील

श्री. राहुल कोल्हापुरे यांच्यावर आकसाने कारवाई केल्याचे प्रकरण 
पोलीस अधीक्षक संदीप पाटील (उजवीकडे) यांना निवेदन देतांना हिंदुत्वनिष्ठ
     सातारा, १४ सप्टेंबर (वार्ता.) - मूर्तीविसर्जन करण्यासाठी गेलेले दैनिक सनातन प्रभातचे वार्ताहर श्री. राहुल कोल्हापुरे यांच्या संदर्भात दमदाटी करून कह्यात घेण्याचा जो प्रकार झाला, तो योग्य नाही. असे घडायला नको होते. पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत बेंद्रे यांची विभागीय चौकशी करू, असे आश्‍वासन सातारा येथील पोलीस अधीक्षक श्री. संदीप पाटील यांनी दिले. श्री. राहुल कोल्हापुरे यांच्यावर आकसाने कारवाई केल्याच्या प्रकरणात पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत बेंद्रे यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी १३ सप्टेंबर या दिवशी हिंदुत्वनिष्ठांच्या शिष्टमंडळाने पोलीस अधीक्षक श्री. संदीप पाटील यांनी निवेदन सादर केले. त्या वेळी त्यांनी हे आश्‍वासन दिले. 

परभणी येथे २६ गोवंशांची वाहतूक करणार्‍या ४ धर्मांधांना अटक

गोवंश हत्या बंदी कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीची आवश्यकता दर्शवणारी घटना ! 
   
     परभणी, १४ सप्टेंबर - येथील परभणी-वसमत या राष्ट्रीय महामार्गावर २६ गोवंशियांना घेऊन जाणार्‍या एका टेम्पोला पोलिसांनी अडवून शेख मिराज शेख मुमताज, शेख युनूस शेख युसूफ, रहमान शेख वलिमिया आणि मोहंमद यातेशाम यांना अटक केली. पोलिसांनी त्यांची चौकशी केल्यावर ते गोवंश पशूवधगृहाकडे हत्या करण्यासाठी नेण्यात येत असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी त्या आरोपींना न्यायालयात उपस्थित केले असता न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली आहे.

काश्मीरचे दुखणे म्हणजे यापूर्वीच्या नालायक राज्यकर्त्यांचे देणे ! - अधिवक्ता नितीन आपटे

याविषयी काँग्रेसवाले उत्तर देतील का ?
     पुणे - स्वातंत्र्य मिळून आम्हाला ६९ वर्षांचा कालावधी लोटला, तरी जम्मू-काश्मीरचा प्रश्‍न आजही आमच्यासाठी त्रासदायकच आहे. पूर्वीच्या सरकारची चुकीची धोरणे आजही आम्ही भोगतो आहोत. आज असलेले काश्मीरचे दुखणे म्हणजे यापूर्वीच्या नालायक राज्यकर्त्यांचे देणे असल्याचे प्रतिपादन अधिवक्ता नितीन आपटे यांनी केले. जम्मू-काश्मीरमध्ये लागू असलेले कलम ३७० या विषयावर अधिवक्ता आपटे यांचे व्याख्यान रोटरी क्लबच्या वतीने आयोजित केले होते. त्या वेळी ते बोलत होते.
     ते पुढे म्हणाले की, स्वातंत्र्यानंतर अवघ्या काही दिवसातच पाकिस्तानने काश्मीरवर आक्रमण केले होते. त्या वेळी भारताने त्याला सडेतोड उत्तर देत पाक सैन्याला सळो कि पळो करून सोडले होते. त्या वेळी तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरू यांनी हा विषय संयुक्त राष्ट्रसंघात नेला नसता, तर आज जम्मू-काश्मीरचा बहुतांश प्रदेश भारताच्या अधीन राहिला असता.

पुणे शहरात संभाव्य आतंकवादी आक्रमणांच्या पार्श्‍वभूमीवर अतिदक्षतेची चेतावणी

अशा चेतावण्या किती दिवस देत रहाणार ? सरकारने सुरक्षित आणि भयमुक्त 
जीवन देण्यासाठी आतंकवादाविरोधात कठोर पावले उचलावीत, अशी जनतेची अपेक्षा आहे.
     पुणे - गणेशोत्सवात घातपाती कारवायांसाठी मोटारीचा वापर होऊ शकतो, अशा सूचना गुप्तचर यंत्रणांनी पुणे पोलिसांना दिल्या आहेत. या पार्श्‍वभूमीवर पुणे पोलिसांनी शहरात अतिदक्षतेची चेतावणी दिली आहे. गणेशोत्सवात अनुचित प्रकार घडू नयेत म्हणून शहरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. संभाव्य आतंकवादी आक्रमणांच्या पार्श्‍वभूमीवर पोलिसांनी संशयित व्यक्ती, बेवारस वस्तू आणि बेवारस वाहन आढळल्यास त्वरित पोलीस नियंत्रण कक्षात संपर्क साधावा. तसेच कोणत्याही अफवांवर विश्‍वास ठेवू नये, असे आवाहन पुणे पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी केले आहे.

मध्य रेल्वेच्या दिवा स्थानकावर यापुढे १० फास्ट लोकल थांबणार

     ठाणे - यापुढे मध्य रेल्वेच्या दिवा स्थानकावर १० फास्ट लोकल थांबणार असून ऑक्टोबरपर्यंत २ नवीन प्लॅटफॉर्म बांधण्याचे काम पूर्ण करण्यात येणार आहे. त्यानंतर कल्याण आणि छत्रपती शिवाजी टर्मिनस या स्थानकांदरम्यान धावणार्‍या लोकल येथे थांबणार आहेत. काही मासांपूर्वी दिवा येथे थांबणार्‍या लोकल गाड्यांची संख्या प्रवाशांच्या तुलनेत अल्प असल्याने रेल रोको आंदोलन करण्यात आले होते. त्या पार्श्‍वभूमीवर रेल्वे प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.

बलात्कार करणार्‍या नराधमांना फाशीचीच शिक्षा दिली पाहिजे ! - डॉ. श्रीपाल सबनीस

उशिरा जागे झालेले डॉ. श्रीपाल सबनीस ! 
     भोसरी (पुणे), १४ सप्टेंबर - महाराष्ट्रात बलात्काराच्या घटना वाढू लागल्या आहेत. दिवसेंदिवस वाढत जाणार्‍या त्या घटना मन पिळवटून टाकणार्‍या आहेत. बलात्कार करणार्‍या नराधमांना दयामाया दाखवता कामा नये, तर त्यांना फाशीचीच शिक्षा दिली पाहिजे, असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले. (अशा नराधमांना कठोर शिक्षा होण्यासाठी सबनीस काय प्रयत्न करणार ? - संपादक) कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृहात भोसरी कला क्रीड़ा मंच आयोजित भोसरी महोत्सवात ते बोलत होते.

...तर महाडची दुर्घटना टळली असती ! - नितीन गडकरी

     मुंबई, १४ सप्टेंबर - महाड येथील सावित्री नदीवरच्या पर्यायी पुलासाठी वेळीच पर्यावरण खात्याची संमती मिळाली असती आणि भूसंपादन वेळेत झाले असते, तर या ब्रिटीशकालीन पुलावरचे अवलंबित्व अल्प झाले असते आणि महाडची दुर्घटना टळली असती, असे खंतयुक्त प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले. (श्री. गडकरी यांनी चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी. तसेच प्रशासकीय यंत्रणा गतिमान करण्यासाठी प्रयत्न करावेत, ही अपेक्षा ! - संपादक) 'लोकमत इन्फ्रा कॉनक्लेव्ह' या परिषदेमध्ये ते बोलत असतांना त्यांनी वरील वक्तव्य केले. २ ऑगस्ट या दिवशी महाड पूल दुर्घटनेत २६ जणांनी प्राण गमावले होते. त्या दुर्घटनेचे दायित्व सरकार या नात्याने आमचेच असल्याचे गडकरी यांनी त्याच वेळी सांगितले होते.

डोंबिवलीत महाविद्यालयीन तरुणीचा लुटारूला धाडसी प्रतिकार

     मुंबई, १४ सप्टेंबर - खंबाळपाडा मार्गावरून परीक्षेचा निकाल घेऊन घरी परतणार्‍या एका तरुणीवर नुकतेच एका लुटारूने आक्रमण केले. त्या वेळी त्या तरुणीने न डगमगता त्याचा धाडसाने प्रतिकार केला. त्यामुळे आक्रमण करून तिला घायाळ करत तो पळून गेला. लुटारूने तरुणीवर ब्लेडने वार केले. ही झटापट बराच वेळ चालू होती. अनेक वार झेलल्यानंतर अखेर तिचा धीर सुटला आणि तिच्या अंगावरील खोटे दागिने घेऊन तो पसार झाला; परंतु या आक्रमणामुळे शहरातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्‍न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

नागपूरमध्ये पोलिसांना शिवीगाळ आणि मारहाण केल्याप्रकरणी दोघांना अटक

राज्यातील असुरक्षित पोलीस ! 
     नागपूर, १४ सप्टेंबर - राज्यात पोलिसांवरील आक्रमणे दिवसेंदिवस वाढत असून नागपूरमधील कळमना पोलीस ठाण्यातच रमण शाम असुफा आणि रजत शाम असुफा या दोघांनी साहाय्यक पोलीस निरीक्षक पवार यांनी मारहाण, तर महिला पोलिसांना शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली आहे. (पोलिसांवरील वाढत्या आक्रमणांची नोंद घेऊन पोलीस दल आणि गृह विभाग आपले धोरण पालटणार कि राजकीय दबावाखाली आक्रमणे सहन करत रहाणार ? - संपादक) 

नागपुरात विदर्भवाद्यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची छायाचित्रे जाळून केला निषेध !

     नागपूर - वेगळया विदर्भाविरोधात भूमिका घेणार्‍या मनसेसह शिवसेनेचा निषेध म्हणून विदर्भवाद्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसेप्रमुख राज ठाकरे यांचे येथे छायाचित्रे जाळली. विदर्भ सर्मथकांनी १३ सप्टेंबर या दिवशी मुंबई पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. ही पत्रकार परिषदत मनसे कार्यकर्त्यांनी गोंधळ घालून ती उधळून लावण्याचा प्रयत्न केला होता. त्याचेच पडसाद नागपूर येथे उमटले.
राज ठाकरे यांच्यात हिंमत असल्यास त्यांनी माझ्याविरुद्ध 
निवडणुकीत जिंकून दाखवावे ! - भाजप आमदार आशिष देशमुख
     विदर्भवाद्यांची पत्रकार परिषद उधळल्यानंतर भाजप आमदार आशिष देशमुख यांनी राज ठाकरे यांना जाहीर आव्हान दिले आहे. मी विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा देतो. राज ठाकरे यांच्यात धैर्य असल्यास त्यांनी काटोलमध्ये येऊन माझ्याविरुद्ध निवडणुकीत जिंकून दाखवावे, असे म्हटले आहे. राज ठाकरे यांनी दूध का दूध आणि पानी का पानी करण्यासाठी काटोलमधून निवडणूक लढवावी. मी विदर्भाच्या आणि त्यांनी महाराष्ट्राच्या बाजूने मैदानात उतरावे. त्यानंतर जनताच योग्य ते उत्तर देईल, असेही आशिष देशमुख यांनी म्हटले आहे.

नदीतील गणेशमूर्ती काढून पुन्हा कृत्रिम कुंडात विसर्जित केल्या

आळंदी नगरपरिषदेकडून भाविकांची फसवणूक
     आळंदी (जिल्हा पुणे) - आळंदी नगरपरिषदेने जलप्रदूषणाच्या खोट्या प्रचाराला बळी पडत भाविकांना कृत्रिम कुंडात गणेशमूर्ती विसर्जित करण्याचे आवाहन केले होते. केवळ आवाहन नाही, तर काही प्रसंगात नगरपरिषदेच्या कर्मचार्‍यांकडून त्यासाठी सक्तीही केली जात होती. या संदर्भात हिंदु जनजागृती समितीने पुढाकार घेऊन आवाज उठवल्यानंतर ही सक्ती थांबवण्यात आली आणि अनेक भाविकांनी इंद्रायणी नदीत गणेशमूर्तींचे विसर्जन केले. नगरपरिषदेने मात्र दुसर्‍या दिवशी नदीत विसर्जित केलेल्या गणेशमूर्ती नदीतून काढून पुन्हा कृत्रिम कुंडात विसर्जित करण्याचा उपद्य्वाप केला. नदीचे प्रदूषण होऊ नये, यासाठी ही कृती केल्याचे नगराध्यक्षांनी सांगितले. प्रत्येक वर्षीच नगरपरिषदेकडून अशी कृती घडते. (गणेशमूर्तींचे वहात्या पाण्यात विसर्जन करण्याची हिंदूंची परंपरा आहे. गणेशमूर्ती विसर्जनामुळे कोणतेही प्रदूषण होत नसल्याचे शास्त्रीय अहवाल उपलब्ध आहेत. असे असतांना धर्मशास्त्रविरोधी कृती करणे हा भाविकांच्या धार्मिक भावानांशी खेळ आहे. असे करण्यापेक्षा नदीत पाणी सोडण्यासाठी प्रयत्न केल्यास नगरपरिषदेचे कृत्रिम कुंडाच्या नियोजनासाठी करावे लागणारे कष्ट वाचतील. - संपादक)

जीन्स, स्कर्ट घालणार्‍या मुली अन् अर्ध विजारीतील पुरुषांना दर्शनास प्रतिबंध

'अंधेरीचा राजा' गणेशोत्सव मंडळाचा आदर्श निर्णय 
     

     मुंबई, १४ सप्टेंबर - मुंबईतील प्रसिद्ध 'अंधेरीचा राजा' सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने धर्माला अनुसरून आदर्श निर्णय घेतला आहे. मंडळाने जीन्स, स्कर्ट परिधान करून येणार्‍या महिलांना, तसेच अर्धविजार घालून येणार्‍या पुरुषांना गणपतीचे दर्शन घेण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. (अशा प्रकारे समाजात बोकाळलेल्या पाश्‍चात्त्य संस्कृतीला आळा बसवण्यासाठी अंधेरीच्या राजा मंडळाने घेतलेला हा निर्णय स्तुत्य आहेच, तसेच यामुळे मंडपातील पावित्र्यही टिकून रहाणार आहे, असे निर्णय अन्य मंडळे ज्या दिवशी घेतील तो सुदिन ! - संपादक) 

माकडटोपी न दिल्याने नाशिक कारागृहात कैद्याकडून सहकैद्याची हत्या

कैद्यांमधील हिंसकवृत्ती वाढवणारी कारागृह व्यवस्था ! 
     नाशिक,१४ सप्टेंबर - कारागृहात दोन कैद्यांमध्ये क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादावादीत एकाचा मृत्यू झाला आहे. माकडटोपी न दिल्याच्या वादातून नाशकातील कारागृहामध्ये सचिन चावरेने ७० वर्षीय तानाजीला वीट फेकून मारली, यात त्याचा मृत्यू झाला. (सनातनचे साधक डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांनीही स्वतंत्र कोठडीची मागणी का केली होती, हे येथे लक्षात येते. - संपादक)

अकोला येथे लक्षावधी रुपयांच्या नोटांपासून सिद्ध केली श्री गणेशाची मूर्ती

     अकोला, १४ सप्टेंबर - येथील मनकर्ण प्लॉट येथे ११ लक्ष रुपयांच्या नोटांपासून श्री गणेशाची मूर्ती सिद्ध करून तिची स्थापना करण्यात आली आहे. (धर्मशिक्षणाच्या अभावी केलेली श्री गणेशमूर्ती ! - संपादक) त्या ठिकाणी चोरी होऊ नये, म्हणून तेथे पोलिसांचा २४ घंटे कडक पहारा ठेवण्यात आला आहे. (देश आतंकवादग्रस्त असतांना अशा प्रकारे विडंबनात्मक मूर्ती सिद्ध करून पोलिसांना अशा ठिकाणी बंदोबस्ताला ठेवावे लागणे कितपत योग्य ? - संपादक)

फलक प्रसिद्धीकरता

इको-फ्रेंडली गणेशोत्सवाचा ढोल वाजवणारे आता आरोळी का ठोकत नाहीत ?
     बांगलादेशची राजधानी ढाक्यामध्ये बकरी ईदला रस्ते आणि नाले यात रक्ताचे पाट वहात असल्याची छायाचित्रे संकेतस्थळांवरून सर्वत्र प्रसारित झाली. येथे बकर्‍यांची कत्तल केल्यानंतर मोठ्या प्रमाणात पाऊस आल्याने ते रक्त रस्त्यावर पाण्यात मिसळून वाहू लागले.

हिंदू तेजा जाग रे !

Jago ! : Bangladeshke Dhakame Bakri Eidpar bakroka rakt varshake jalme milnese raktki dharaye behne lagi.
     Eco-Friendly Ganeshotsavka dhol peetnewale ab chup kyu
जागो !
: बांग्लादेश के ढाका में बकरी ईद पर बकरों का रक्त वर्षा के जल में मिलने से रक्त की धाराएं बहने लगीं ।
     इको-फ्रेंडली गणेशोत्सव का ढोल पीटनेवाले अब चुप क्यों ?

परकियांनी विशद केलेले भारताचे अनन्यसाधारण महत्त्व !

श्री. वा.ना. उत्पात
       हिंदु संस्कृतीचे महत्त्व पाश्‍चात्त्यांच्या लक्षात येते; मात्र देशातील जन्महिंदूंच्या लक्षात येत नाही, हे दुर्दैवी ! हिंदूंना हिंदु संस्कृतीची महती लक्षात येण्यासाठी त्यांना धर्मशिक्षण देण्याला पर्याय नाही ! पाश्‍चात्त्यांचे अंधानुकरण करणारे भारतीय हिंदु संस्कृतीची महती जाणून त्याप्रमाणे आचरण करतील तो सुदिन ! 
१. सर्व जगाच्या संस्कृतीत हिंदु संस्कृतीचे 
स्थान अत्यंत वरच्या (उच्च) दर्जाचे ! - मॅक्सम्युलर
     हिंदुस्थानपासून आपण काय शिकावे ? या त्याच्या ग्रंथात मॅक्सम्युलर म्हणतो, संपत्ती, शक्ती आणि निसर्गसौंदर्याची विपुलता असलेला, पृथ्वीवरील स्वर्ग असलेला असा जर एखादा देश मला कोणी शोेधून काढावयास सांगेल, तर मी हिंदुस्थानकडेच अंगुलीनिर्देश करीन. सर्व जगात बुद्धीचा विकास कोठे झालेला आहे, असे जर मला कोणी विचारले, तरीसुद्धा मला हिंदुस्थानचेच नाव घ्यावे लागेल. सर्व जगाच्या संस्कृतीत हिंदु संस्कृतीचे स्थान अत्यंत वरच्या (उच्च) दर्जाचे आहे, यात शंका नाही. युरोप खंडाला हिंदुस्थानपासून बर्‍याच गोष्टी शिकल्या पाहिजेत. विश्‍वाच्या उषःकालात जेव्हा सर्व विश्‍व रानटी स्थितीत होते, तेव्हा हिंदुस्थान अभ्युदयाच्या, संस्कृतीच्या, सामाजिक सुस्थितीच्या, पूर्णावस्थेच्या उत्तुंग शिखरावर होता.

सर्व क्षेत्रांत सर्वोच्च पदवीला पोचलेले एकच राष्ट्र आहे आणि ते म्हणजे हिंदु राष्ट्र !

      प्रा. होरेन हे हिस्टॉरिकल रिसर्सेस, खंड २, पान ४५मध्ये लिहितात, केवळ आशिया खंडाचेच नव्हे, तर युरोप खंडातील लोकांच्याही सर्व धर्मांचा आणि ज्ञानाचा उगम हिंदुस्थानातच आहे.
    राष्ट्राचे कोणतेही अंग घ्या किंवा मानवी बुद्धी, मन, विकासाच्या कोणत्याही अंगाचा विचार करा, त्या प्रत्येकात हिंदु लोक श्रेष्ठ आणि अग्रगण्य होते. हे वैशिष्ट्य जगातील कोणत्याही देशात दिसून येत नाही. एखादे राष्ट्र युद्धविद्येत, एखादे व्यापारात, एखादे तत्त्वज्ञानात, एखादे काव्यात, एखादे शास्त्रात श्रेष्ठपदाला गेले असेल; पण या सर्व क्षेत्रांत सर्वोच्च पदवीला पोचलेले एकच राष्ट्र आहे आणि ते म्हणजे हिंदु राष्ट्र. त्या राष्ट्राच्या तोडीच एकही राष्ट्र पृथ्वीतलावर नाही.
      असिरीयन, बॅबिलॉनियन, इजिप्शीयन, फीनिशियन, ग्रीक, इराणी, रोमन ही राष्ट्रे उदयास आली, वैभवाच्या शिखरावर पोचली आणि परकीय आक्रमणामुळे नामशेष झाली. या सर्व आक्रमणातून, आपत्तीतून भाग्यशाली हिंदु राष्ट्र आपले हिंदुस्वरूप कायम राखून जिवंत राहिले आहे. हिंदु धर्माची इमारत सनातन सत्यावर उभारलेली आहे. तिच्यात विलक्षण चिवटपणा आणि श्रेष्ठता आहे; म्हणून सनातन धर्मावर वाढलेले आणि संस्कृतीवर पोसलेले हे हिंदु राष्ट्र जिवंत आहे.
- श्री. वा.ना. उत्पात (संदर्भ : स्वातंत्र्यवीर, दिवाळी अंक, वर्ष २०१४)नापास शब्दाची भीती आणि गुरुकुलपद्धती !

       वर्षातील मार्च आणि जून हे महिने आले की इयत्ता दहावीतील बहुतांश विद्यार्थ्यांच्या पोटात गोळा येतो. वर्षभर परीक्षेच्या ताणाचा गाडा ओढून विद्यार्थीवर्ग थकूनभागून गेलेला असतो. हातात येणार्‍या गुणपत्रिकेची आणि पर्यायाने स्वत:च्या भविष्यात काय वाढून ठेवले असेल, याची चिंता त्याला असते. अशा चिंतातूर विद्यार्थ्यांना दिलासा मिळावा या हेतूने शासनाने दहावी झालेल्या विद्यार्थ्यांच्या गुणपत्रकावरून नापास हा शब्द कालबाह्य करण्याचा निर्णय घेतला आहे. या विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊ नये, यासाठी लगेचच पुनर्परिक्षा घेण्यात येऊन एटीकेटीसह त्यांना विशेष सवलती देण्यात येणार आहेत, तसेच अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या गुणपत्रकावर केवळ कौशल्य विकास अभ्यासक्रमासाठी पात्र असा शेरा देण्यात येणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा संधी मिळेल आणि विद्यार्थ्यांमध्ये स्वत:च्या पायावर उभे रहाण्याचा आत्मविश्‍वास निर्माण होईल. हे जरी शक्य असले, तरी या निर्णयातून १०० टक्के गुणवत्तापूर्ण पिढी निर्माण होण्याची शाश्‍वती देता येत नाही. त्यामुळे शासनाचा हा निर्णय म्हणजे गँग्रीन झाल्यावर मलमपट्टी करण्यासारखा वरवरचा आहे, असे वाटते.

केवळ माहिती देणारे नकोत, तर परिणामकारक उपाय करणारे लेखापाल हवेत !

     अनेक प्रकारचे कर, शासनाविषयी अविश्‍वासार्हता, शासनाकडून करावरील सवलत मिळण्यास अडचण होणे, करवसुली खात्याची अकार्यक्षमता आदी अनेक गोष्टींमुळे एकूण ५६ टक्के व्यावसायिक कर भरण्यास इच्छुक नसतात, असे सनदी लेखापालांना (चार्टड अकाऊटंटस्ना) वाटते.
     शाळेत धर्मशिक्षण न दिल्याचा, नैतिकता न शिकवल्याचा, तसेच कर न भरणार्‍यांना कडक शिक्षा न करण्याचा हा परिणाम आहे, हे सरकारला कधीच कळणार नाही ! त्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे ! - संपादक)

श्री गणेशमूर्ती विसर्जन

१. भाद्रपद शुक्ल पक्ष चतुर्थीला गणेशपूजन करण्याची प्रथा पडण्याचे कारण
      भाद्रपद शुक्ल पक्ष चतुर्थीला सर्व लोक मातीची गणपतीची मूर्ती करून तिची पूजा करतात. याचे मूळ असे आहे की, श्रावण शुक्ल पक्ष चतुर्थी ते भाद्रपद शुक्ल पक्ष चतुर्थीपर्यंत प्रत्येक दिवशी गणपतीची मूर्ती करून पूजा करायची आणि तिचे विसर्जन करायचे, असे एक मास (महिना) करण्याचे हे व्रत आहे. पुष्कळ गणेशभक्त हे व्रत करतात. हे व्रत पूर्वी देवी पार्वतीने केले. भाद्रपद शुक्ल पक्ष चतुर्थीच्या दिवशी ती पार्थिव मूर्ती सजीव झाली आणि त्याला पार्वतीदेवीचा मुलगा म्हणू लागले.
     हिंदूंची दिवाळी आली की, बॉम्बस्फोट होतात, रामनवमीच्या दिवशी मुसलमान दंगल घडवतात आणि रामाची मूर्ती तोडतात, गणेशमूर्ती विसर्जनाची मिरवणूक मशिदीवरून जाऊ नये; म्हणून अडवणूक करतात. हिंदूंच्या धार्मिक उत्सवांच्या वेळी इतर पंथियांचे हिंदूंच्या श्रद्धास्थानांवर होणारी ही आक्रमणे लक्षात ठेवा !

समाजातील सर्वच स्तरांतील नागरिकांकडून सनातन संस्थेला मिळत आहे उत्स्फूर्त प्रतिसाद !

        पुरोगाम्यांच्या हत्यांच्या प्रकरणात सनातनला गोवण्याचे कारस्थान चालू आहे. पोलीस आणि अन्वेषण यंत्रणा यांच्याकडून अटकेतील साधक, तसेच अन्य साधक यांचाही अतोनात छळ होत आहे. हिंदुविरोधी प्रसिद्धीमाध्यमांकडूनही सनातनची अपकीर्ती केली जात आहे. या पार्श्‍वभूमीवर सनातन प्रभातने पोलिसांच्या सनातनद्वेषाचे कटू वास्तव, हा विशेषांक ६ सप्टेंबर या दिवशी प्रसिद्ध केला. त्याला भरघोस प्रतिसाद मिळाला. या अनुषंगाने समाजातील मान्यवर आणि हिंदुत्वनिष्ठ यांनी व्यक्त केलेल्या प्रतिक्रिया येथे देत आहोत. 

पोलिसांनी पनवेल आश्रमात नार्कोटिक सापडल्याच्या कंड्या पिकवल्या !

महाराष्ट्र १ वृत्तवाहिनीवरील 
चर्चासत्रात हिंदु विधीज्ञ परिषदेचे सचिव 
अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांचे ठाम प्रतिपादन ! 
अधिवक्ता संजीव पुनाळेकर
         गणेश चतुर्थीच्या दिवशी पोलिसांनी टाकलेल्या धाडीमध्ये कुठेही नार्कोटिक ड्रग्ज मिळाले नाहीत, तसेच तसा उल्लेखही पोलिसांनी केलेल्या पंचनाम्यामध्ये नाही. त्याविषयी पोलिसांनी अन्न आणि औषध कार्यालयातील अधिकार्‍यांना बोलावून घेतले आणि त्यांनी आश्रमात कुठेही नार्कोटिक नसल्याचे स्पष्ट सांगितले; मात्र न्यायालयात डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांची पोलीस कोठडी वाढवून मिळण्यासाठी पोलिसांनी आश्रमात नार्कोटिक सापडले असून आम्हाला आश्रमात तपास करायचा आहे, असे बिनदिक्कतपणे खोटे सांगून टाकले. आश्रमात जी काही चौदाशे ते पंधराशे रूपयांची औषधी मिळाली, ती आश्रमात रहाणार्‍या दीडशे साधकांसाठी आहेत. काही औषधे आम्ही येथून विकत घेऊन ती गोव्यातील आश्रमात पाठवतो. आमच्या संस्थेमध्ये काही डॉक्टर्स आहेत. त्यांनी याविषयी माहिती दिली आहे. त्यामुळे पोलिसांनी न्यायालयात केवळ कंड्या (अफवा) पिकवायचे काम केले असून पोलिसांनी न्यायालयात सनातनच्या विरोधात केलेले विधान ढळढळीत खोटे आहे, असे ठाम प्रतिपादन हिंदु विधीज्ञ परिषदेचे सचिव अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांनी चर्चासत्रात केले.


  शिवाजी महाराजांच्या वेळी हिंदवी स्वराज्य मिळण्याअगोदर समाजाची जशी स्थिती होती, तशी स्थिती आजही आहे. निधर्मीवादी, बुद्धीप्रामाण्यवादी आणि पुरोगामी विचारांचे लोक आपल्या देशात सर्वधर्मसमभावाचे विचार पसरवून समाजाची फारच हानी करत आहेत. याच लोकांनी या देशाचे तीन तुकडे केले, ते धर्माच्या नावावर ! - पू. संभाजीराव भिडेगुरुजी, संस्थापक, श्री शिवप्रतिष्ठान

विनाशकारी फटाक्यांवर बंदी आणा !

     कानाचे पडदे फाडणारे, निरोग्यांचे मरण जवळ आणणारे, बालकांचा थरकाप उडवणारे आणि आवाजाबरोबर प्रचंड प्रदूषण वाढवणारे फटाके, हा श्री गणेश चतुर्थी, दिवाळी, क्रिकेटच्या सामन्यातील विजय आणि धार्मिक वा राजकीय मिरवणुका यांचा अविभाज्य भाग झाला आहे. फटाक्यांमुळे होणारा विनाश स्वतःहून ओढवून घेण्याचा अट्टाहास आपण कशासाठी करतो ?

उत्सवकाळात शास्त्रविसंगत फटाक्यांची आतषबाजी करणे, हा राष्ट्र आणि धर्मद्रोह !

     श्री गणेशमूर्तींचे मंगलमूर्ती मोरया या गजरात विसर्जन करतांना मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतषबाजी करण्यात येते. देश आर्थिक संकटात असतांना आणि आतंकवादाच्या सावटाखाली गणेशोत्सव साजरा करण्याची लाजिरवाणी स्थिती आली असतांना शास्त्रविसंगत फटाक्यांची आतषबाजी करणे, हा राष्ट्र आणि धर्मद्रोह आहे ! हिंदूंनो, श्री गणेशमूर्तीच्या विसर्जन मिरवणुकीत मद्य पिऊन आणि रज-तमात्मक चित्रपटगीतांच्या तालावर नाचून धर्महानी करू नका !

श्री गणेशमूर्ती विसर्जनाच्या निमित्ताने...
      श्री गणेशाच्या विसर्जन मिरवणुकीत बहुसंख्य तरुण मुले रज-तमात्मक चित्रपटगीतांच्या तालावर नाचत असतात. ही चित्रपटगीते बहुधा अश्‍लील असतात आणि मुले विचित्र अंगविक्षेप करत नाचत असतात. यातील बरेच जण मद्य प्यायलेले असतात. त्यामुळे धर्महानी होते आणि पाप लागते. खरेतर या चित्रपटगीतांचा आणि गणेशोत्सवाचा काहीतरी संबंध आहे का ? श्री गणेशाच्या सात्त्विक मूर्तीसमोर अशी हिडीस नृत्ये करून काय साध्य होते ? अशाने श्रीगणेश प्रसन्न होईल का ? हिंदूंना धर्मशिक्षण नसल्यानेच असे घडत आहे. काही गणेशोत्सव मंडळांच्या विसर्जन मिरवणुकीत मात्र शाळकरी मुला-मुलींचे लेझिम पथक असते. ही मुले लयबद्धरित्या आपली कला सादर करतात. हे बघायला फार छान वाटते. ते करतांना मुला-मुलींनी गणेशाचा नामजप केल्यास त्यांना अधिक लाभ होईल. इतर गणेशोत्सव मंडळांनीही हा आदर्श घ्यायला हवा.
पोलिसांच्या संदर्भातील कटू अनुभव !

      सध्या सनातनचे साधक आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते यांना पोलिसांच्या शारीरिक आणि मानसिक छळाला सामोरे जावे लागत आहे. या अनुषंगाने विविध ठिकाणच्या पोलिसांविषयी सनातनचे साधक, हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते किंवा हिंदुत्वनिष्ठ यांना यापूर्वीही पोलिसांच्या सतावणुकीविषयी आलेले अनुभव येथे क्रमशः प्रसिद्ध करत आहोत.
तक्रारदाराला तक्रार करण्यापासून परावृत्त करणारे पोलीस !
     १६.८.२०१४ या दिवशी कुडचडे, गोवा पोलीस ठाण्यात धार्मिक भावना दुखावल्याची तक्रार करण्यासाठी गेलेले तक्रारदार श्री. मनोहर बोरकर यांना पोलीस निरीक्षक रवि देसाई यांनी वरिष्ठांना विचारून मगच ही तक्रार प्रविष्ट करून घेणार, असे सांगितले. वर देसाई यांनी श्री. बोरकर यांना तुम्ही गडबड करणार आहात का ?, तुम्ही या भानगडीत का पडता ? तुम्ही श्रीराम सेनेचे कार्यकर्ते आहात का ?, असे प्रश्‍न केले.
पोलिसांविषयी चांगले आणि वाईट अनुभव असल्यास 
वाचकांनी नजीकच्या दैनिक कार्यालयात पाठवावेत !

पू. (सौ.) आशालता सखदेवआजी यांच्या देहत्यागापूर्वी आणि नंतर आलेल्या अनुभूती

सौ. सुप्रिया पाटील
१. पू. सखदेवआजींनी देहत्याग केला आहे, हे समजण्यापूर्वी
१ अ. सत्संगात सद्गुरु (सौ.) बिंदाताईंचा आवाज एखाद्या वृद्ध स्त्रीच्या आवाजाप्रमाणे जाणवून आनंद वाटू लागणे : पू. सखदेवआजींनी देहत्याग केला. त्या वेळी मी सत्संगात होते. तेव्हा मध्येच मला सद्गुरु (सौ.) बिंदाताईंचा आवाज एखाद्या वृद्ध स्त्रीच्या आवाजाप्रमाणे; पण पुष्कळ प्रेमळ असा वाटत होता. यापूर्वी त्यांचा आवाज ऐकून असे काही वाटले नव्हते. मला अकस्मात् आनंद वाटू लागला.
२. पू. सखदेवआजींच्या देहत्यागानंतर 
२ अ. पू. आजींना घेऊन जाण्यासाठी आकाशातून देवता, देवदूत आणि अनेक संत आले आहेत, असे दिसून वातावरण आनंदी जाणवणे; पण डोके जड होणे : पू. सखदेवआजींनी देहत्याग केल्याचे मला त्यांनी देहत्याग केल्यानंतर ३० मिनिटांनी समजले. त्यानंतर मी काही वेळाने आगाशीत फेर्‍या मारत असतांना मला आकाशातून देवता, देवदूत आणि अनेक संत पू. आजींना घेऊन जाण्यासाठी आले आहेत, असे दिसले. मला गोल पिंपाप्रमाणे वरच्या दिशेने गेलेला बराच उंच असा चैतन्याचा दंडगोल दिसला. त्यात हे सर्व घडत आहे, असे दिसले. त्या वेळी पू. आजीही आनंदात होत्या. सर्व मार्ग फुलांनी सजवला होता आणि सर्वत्र आनंदी वातावरण होते. त्यानंतर माझा कृतज्ञताभाव दाटून आला; पण लगेच माझे डोके जड झाले.

पू. (सौ.) सखदेवआजींच्या देहत्यागाविषयी कु. शिवांजली होसाहोळलू (वय १६ वर्षे) हिला जाणवलेली सूत्रे आणि झालेली विचारप्रक्रिया !

उद्या भाद्रपद पौर्णिमा (१६ सप्टेंबर) या दिवशी सनातनच्या 
२० व्या संत पू. (सौ.) सखदेवआजी यांच्या देहत्यागाला एक मास होत आहे त्या निमित्ताने...
पू. (सौ.) सखदेवआजी
      पू. (सौ.) सखदेवआजींच्या देहत्यागाच्या आदल्या दिवशी म्हणजे १६.८.२०१६ या दिवशी मी अकस्मात् पू. आजींच्या खोलीकडे गेले. दार उघडे पाहून पू. आजींना भेटूया, असा माझ्या मनात विचार आला आणि मी त्यांची कन्या राजश्रीताईंना विचारून आत गेले. त्यावेळी आणि पू. आजींच्या देहत्यागानंतर मला जाणवलेली सूत्रे पुढे देत आहे.
१. पू. सखदेवआजींचे शरीर अत्यंत कृश झालेले आणि हात-पाय अन् तोंडवळा बराच सुजलेला दिसणे आणि त्यांची ही अवस्था पाहून मानसिक धक्का बसून रडू येणे : खोलीत गेल्यावर मला पू. आजींची जी स्थिती दिसली, त्यामुळे मला
कु. शिवांजली होसाहोळलू
पुष्कळ मानसिक धक्का बसला. पू. आजी अतिशय अशक्त झालेल्या असून त्यांना नीट बसताही येत नव्हते. त्यांना पुष्कळ धाप लागली होती. त्यांचे शरीर अत्यंत कृश आणि हात-पाय अन् तोंडवळा बराच सुजलेला होता. एक क्षण या पू. सखदेवआजी आहेत, यावर माझा विश्‍वासच बसेना. त्यांची ही अवस्था पाहून मी त्यांच्या चरणांशी बसले आणि मला पुष्कळ रडायला येऊ लागले. मला काहीच बोलता येईना. माझे अंग थरथरायला लागलेे. मला रडतांना पाहून पू. आजींनी मान उचलली आणि माझ्याकडे पाहून स्मित केले. एवढा असह्य त्रास होत असतांनासुद्घा मला बरे वाटावे; म्हणून त्या हसल्या, हे पाहून माझी भावजागृती झाली. मला अधिकच रडू यायला लागले.

सनातनच्या पू. (सौ.) सखदेवआजी यांच्या देहत्यागानंतर त्यांचे पती श्री. शशिकांत सखदेव यांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी व्यक्त केलेली कृतज्ञता आणि प्रार्थना !

श्री. शशिकांत सखदेव
      सौ. आशालता (श्री. सखदेवआजोबा यांची धर्मपत्नी आणि सनातनच्या पू. (सौ.) आशालता सखदेवआजी) यांचा स्वभाव मनमिळावू अन् शांत वृत्तीचा होता. सनातनचे परात्पर गुरु डॉ. जयंतजी आठवले यांची आमच्या परिवारावर फार कृपा आहे. त्यांचे ऋण आम्ही सात जन्म फेडू शकणार नाही, इतके त्यांनी आमच्यासाठी केले आहे. आश्रमातील बंधू आणि भगिनी यांनी अलोट प्रेम दिले अन् सेवा केली. कै. (सौ.) आशालता सखदेव यांना मुक्ती प्राप्त होऊन सद्गती मिळावी, ही देवाजवळ प्रार्थना. 
- श्री. शशिकांत प. सखदेव, मिरज, जिल्हा सांगली. (२८.८.२०१६)

सखदेव परिवाराने पू. (सौ.) सखदेवआजी यांची सेवा करणार्‍यांप्रती व्यक्त केलेली कृतज्ञता !

      सर्व साधकांनी पूज्य (सौ.) सखदेवआजींची अव्याहतपणे, अविरतपणे आणि अत्यंत तळमळीने जी सेवा केली, तसेच देहत्यागानंतरही साधक, आश्रम व्यवस्थापक यांसह पूज्य संतांनीही स्वतः लक्ष घालून सर्व विधी पूर्ण होईपर्यंत कोणत्याही प्रकारची उणीव किंवा न्यूनता न ठेवता जी व्यवस्था ठेवली, त्याविषयी परमेश्‍वराच्या चरणी आम्ही कोटी कोटी कृतज्ञ आहोत ! - सखदेव परिवार (२८.८.२०१६)
     प्रत्यक्षात सखदेव परिवाराने पू. (सौ.) सखदेवआजी यांची सेवा करण्याची संधी साधकांना दिली; म्हणून साधक कृतज्ञ आहेत. - (परात्पर गुरु) डॉ. आठवलेपू. (सौ.) सखदेवआजी यांनी देहत्याग केल्यानंतर साधकांना आलेल्या अनुभूती

सौ. सुजाता कुलकर्णी 
सौ. सुजाता कुलकर्णी 
१. पू. (सौ.) सखदेवआजींच्या पार्थिवाचे दर्शन घेतल्यावर दुसर्‍या दिवशीही श्रीरामरक्षास्तोत्र आदींचे भावपूर्ण पठण करता येणे : पू. (सौ.) सखदेवआजींच्या पार्थिवाचे १७.८.२०१६ या रात्री दर्शन घेतांना मला त्यांचे मुखमंडल तेजस्वी दिसले आणि त्या वेळेपासून माझे मन निर्विचार झाले. तसेच दुसर्‍या दिवशी सकाळी मी ध्यानमंदिरात गेल्यावर मनात अन्य विचार न येता श्रीरामरक्षास्तोत्र आदींचे भावपूर्ण पठण झाले; पण इतर वेळी पठण करतांना माझ्या मनात बराच वेळ विचारांचा गोंधळ असतो.

प.पू. डॉक्टरांमध्ये आहे भगवान श्रीकृष्ण ।

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त...
परात्पर गुरु डॉ. जयंत
आठवले
    २४.८.२०१६ या दिवशी दैनिक सनातन प्रभातमध्ये प.पू. डॉक्टरांची प.पू. डॉक्टर कृष्ण नसल्याचे आणखीन एक विश्‍लेषण ही चौकट वाचली. तेव्हा देवाने मला पुढील काव्यपुष्प सुचवले.
साधकांना आध्यात्मिक त्रासांशी लढायला । 
शिकवतात प.पू. डॉक्टर ॥
प.पू. डॉक्टरांना त्रासांशी लढायला ।
बळ देतो भगवान श्रीकृष्ण ॥ १ ॥

साधकांना साधनेसाठी शक्ती देतात प.पू. डॉक्टर ।
प.पू. डॉक्टरांना शक्ती देतो भगवान श्रीकृष्ण ॥ २ ॥

एस्.एस्.आर्.एफ्.च्या साधिका सौ. कॅरन रॉद्रीगेज यांना पू. (सौ.) आशालता सखदेवआजी यांच्या देहत्यागाच्या दिवशी आणि अंत्यसंस्काराच्या वेळी आलेल्या अनुभूती

सौ. कॅरन रॉद्रीगेज
१. देहत्यागाच्या दिवशी आलेल्या अनुभूती (१७.८.२०१६)
१ अ. वातावरणात शांतता जाणवणे, प.पू. डॉक्टर समोरून येऊन चालत न जाता एखाद्या उद्वाहनातून (लिफ्टमधून) गेल्यासारखेे हवेत तरंगत गेल्याप्रमाणे एका खोलीत गेल्याचे जाणवणे आणि त्यानंतर १५ मिनिटांनी पू. (सौ.) सखदेवआजींनी देहत्याग केल्याची वार्ता कळणे : १७.८.२०१६ या दिवशी सायंकाळी ६ वाजता मला माझ्या मागच्या बाजूला वातावरणात एकदम शांतता जाणवत होती. थोड्याच वेळात मला प.पू. डॉक्टरांसारखे कोणीतरी आल्याचे जाणवले. मी मागे वळून पाहिले, तेव्हा मला प.पू. डॉक्टर अगदी माझ्या उजव्या बाजूला दिसले. माझ्या समोरून ते चालत न जाता एखाद्या उद्वाहनातून (लिफ्टमधून) गेल्याप्रमाणे हवेत तरंगत गेल्याचे जाणवलेे. माझ्या आणि सहसाधकांच्या समोरून ते अतिशय जलद गतीने एका खोलीत गेले. ते खोलीतून गेल्यानंतर १५ मिनिटांनी मला पू. (सौ.) सखदेवआजींनी देहत्याग केल्याची वार्ता कळली.

पू. (सौ.) सखदेवआजी यांच्या देहत्यागानंतर सनातनच्या पू. (कु.) रेखा काणकोणकर यांना जाणवलेली सूत्रे

पू. (कु.) रेखा काणकोणकर
१. पू. आजींचा अंत्यविधी चालू असतांना 
अ. पू. आजींच्या पार्थिवाकडे पहातांना पू. आजींचा श्‍वासोच्छ्वास चालू आहे, असे जाणवत होते. 
आ. पू. आजींच्या पायांतून चैतन्य प्रक्षेपित होत असल्याचे जाणवले.
इ. परात्पर गुरु डॉ. आठवले आणि पू. (सौ.) सखदेवआजी यांचे सूक्ष्मातून संभाषण चालू असल्याचे जाणवले.
२. पू. (सौ.) सखदेवआजींचे पार्थिव दहनसंस्कारासाठी 
नेल्यानंतर ते आधी स्वागतकक्षाच्या प्रांगणात ठेवलेल्या ठिकाणी 
अ. मनाला शांत वाटत होते आणि अंतर्मुख व्हायला होत होते. 
आ. त्या ठिकाणच्या लाद्यांद्वारे स्वतःच्या पायांच्या माध्यमातून शरिरात चैतन्य ग्रहण होत होते. 
- (पू.) कु. रेखा काणकोणकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१९.८.२०१६)

सर्वसामान्य व्यक्तीचे निधन झाल्यानंतरची स्थिती आणि पू. (सौ.) सखदेवआजी यांच्या देहत्यागानंतरची स्थिती याविषयी जाणवलेली सूत्रे !

१. सर्वसामान्य व्यक्तीचे निधन झाल्यावर 
१ अ. भीती वाटून तेथे थांबू नये, असे वाटणे : मी एखाद्या व्यक्तीचे निधन झाल्यावर तेथे गेल्यावर मला त्या घरात पुष्कळ दाब जाणवायचा आणि तेथे थांबू नये, असे वाटायचे. मला मृतदेह बघतांना पुष्कळ भीती वाटायची आणि त्या रात्री मला झोप लागायची नाही. 
१ आ. मृतदेहाला दुर्गंध येऊ नये, यासाठी निलगिरी तेल, अत्तर, गुलाबपाणी अशी वेगवेगळी सुगंधी द्रव्ये लावत असणे : सर्वसामान्य व्यक्तीचे निधन झाल्यावर मृतदेहाचे सांधे आखडू नयेत, यासाठी थोड्या थोड्या वेळाने मृतदेहाला तेल लावतात. काही वेळा सांधे आखडल्यामुळे मृतदेहावरील कपडे फाडून काढावे लागतात. एके ठिकाणी देहांत होऊन १० घंट्यांच्या आतच त्या मृतदेहाला दुर्गंध येत होता. काही जण मृतदेहाला दुर्गंध येऊ नये, यासाठी निलगिरी तेल, अत्तर, गुलाबपाणी आदी सुगंधी द्रव्ये लावतात.

प्रेमभाव, सेवाभाव आणि अनासक्त वृत्ती या गुणांचा समुच्चय असलेली ६१ टक्के आध्यात्मिक पातळीची महर्लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली डोंबिवली, ठाणे येथील चि. हर्षदा देवानंद हडकर (वय ४ वर्षे) !

चि. हर्षदा हडकर
१. जन्मापूर्वी
१ अ. नामजप करतांना आणि स्तोत्रे म्हणतांना बाळ हालचाल करत असल्याचे जाणवणे : मी गरोदरपणात पोटावर हात ठेवून दत्त आणि कृष्ण यांचा जप करत असतांना बाळ आतून हालचाल करत असे. मी प्रतिदिन गणपति स्तोत्र, रामरक्षा आणि गुुरुचरित्र वाचत होते. तेव्हा मला आनंद होत होता. पोटाकडे पाहिल्यावर मला चैतन्य जाणवायचे.
१ आ. मी ५ मास (महिने) पूर्ण होईपर्यंत सेवेसाठी शहापूरला जात होते. त्या वेळी मला आनंद वाटायचा. 
१ इ. पोट दुखत असल्याने आधुनिक वैद्यांनी रुग्णालयात भरती होण्यास सांगणे आणि घरी जाऊन झोपूनच जप करत राहिल्याने बरे वाटणे : सहाव्या मासात (महिन्यांत) माझ्या पोटात दुखायला लागले; म्हणून मी आधुनिक वैद्यांकडे गेले असता त्यांनी सांगितले, तुम्हाला रुग्णालयात भरती करून घ्यावे लागेल. तेव्हा मी आधुनिक वैद्यांंना सांगितले, मी घरी जाऊन विश्रांती घेईन. मी रुग्णालयातून घरी आले. थोडा थकवा जाणवत होता. मी पाणी पिऊन विश्रांती घेण्यास गेले आणि झोपूनच जप करत राहिले. नंतर थोडे बरे वाटले.

पू. (सौ.) सखदेवआजींच्या देहत्यागाविषयी जाणवलेली सूत्रे

डॉ. ज्योती काळे
१. पू. आजींच्या देहत्यागापूर्वी त्यांची आठवण होणे : १७.८.२०१६ या दिवशी दुपारी अचानक पू. आजींची आठवण आली. त्यांची प्रकृती पुष्कळ खालावली आहे आणि त्या अशक्त झाल्या आहेत, असे जाणवले. त्यांना काही तरी शक्तीवर्धक दिले पाहिजे, असा विचार मनात आला. त्यानंतर सायंकाळी त्यांनी देहत्याग केल्याचे कळले.
२. सकाळी पू. आजींच्या अंत्यविधीचे दृश्य दिसणे : १८.८.२०१६ या दिवशी सकाळी १० वाजता पू. आजींचे विधी करणार असल्याचे कळले होते. त्यांचे चैतन्य ग्रहण होण्यासाठी प्रार्थना करत असतांना पू. (सौ.) आजींना हिरवी साडी नेसवली आहे, मोठे कुंकू लावले आहे आणि मंगळसूत्र अन् दागिनेही घातले आहेत, असे दिसले. त्यांचा तोंडवळा अतिशय तेजःपुंज दिसत होता. सर्वत्र अष्टगंधाचा सुगंध दरवळत आहे, असे जाणवले. त्यांचे पार्थिव स्वागतकक्षाकडे नेत असतांना तिथे प.पू. डॉक्टरही आहेत, असे दिसले. प.पू. डॉक्टरांनी पू. आजींना तुळशीपत्र वाहून नमस्कार केला. 
      अग्नि दिल्यावर त्यातून पांढरा धूर निघत असून साधकांच्या दिशेने पांढरा प्रकाश येत आहे आणि त्यामुळे साधकांना चैतन्य मिळत असल्याचे जाणवले. हे गुरुमाऊली, तुमच्याच कृपेने मला हे सर्व अनुभवता आले, त्यासाठी तुमच्या चरणी कृतज्ञ आहे.
- डॉ. ज्योती काळे, सिंहगड रस्ता, पुणे. (१८.८.२०१६)

पू. (सौ.) आजींच्या देहत्यागानंतर आलेल्या अनुभूती

श्री. रामचंद्र कुंभार
१. पू (सौ.) आजींच्या अंतिम संस्काराच्या संदर्भातील सेवा करतांना 
१ अ. आश्रमाकडून चंदनाचा सुगंध येतांना जाणवणे : मला पू. (सौ.) सखदेवआजींनी देहत्याग केल्याचे सायंकाळी ५.३० वाजता समजले. मी पुढील सेवेचे नियोजन केले आणि दोन साधकांना घेऊन अंत्यविधीसाठी बांबू तोडायला गेलो. आरंभी मी पू. (सौ.) आजींकडून प्रक्षेपित होणारे चैतन्य मिळू दे, अशी प्रार्थना करून बांबू तोडू लागलो. तेव्हा मला आश्रमाच्या दिशेकडून चंदनाचा सुगंध येत होता. तुम्ही अत्तर लावले आहे का ?, असे मी सहसाधकांना विचारले. त्यांनी नाही असे सांगताच ही वेगळी अनुभूती आहे, हे माझ्या लक्षात आले आणि माझी भावजागृती झाली. पुन्हा दुसर्‍या बांबूच्या झाडाकडे गेल्यावरही मला तोच सुगंध आला.

साधकांना सूचना

पौर्णिमा आणि अमावास्या या तिथींना प्रार्थना, नामजप, तसेच साधना अधिकाधिक करा.
प्रारंभ - भाद्रपद शुक्ल पक्ष चतुर्दशी (१५.९.२०१६) उ.रात्री ३.१६ वाजता
समाप्ती - भाद्रपद पौर्णिमा (१६.९.२०१६) उ.रात्री १२.३५ वाजता
उद्या पौर्णिमा आहे.

बोधचित्र

॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज
सनातनचे श्रद्धास्थान
देवाकडे ऐहिक सुख मागू नये
     मुलाने विष मागितले, तरी आई आणि डॉक्टर त्याला विष देत नाहीत. तसेच देवही ऐहिक सुख देत नाही; कारण त्याला ठाऊक असते की, हे त्याला पेलवणार नाही. म्हणून देवाकडे भीक (ऐहिक सुख) मागण्यात अर्थ नाही.
भावार्थ : देव, म्हणजे गुरु, हे देवापासून दूर नेणारे ऐहिक सुख देत नाहीत. देवापासून दूर जाणे हे साधकाच्या दृष्टीने मरणच होय; म्हणून ऐहिक सुख हे विषासमान मानले आहे.
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण)

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले
     जनता दारिद्य्रात जगत असतांना पैसे जाळणार्‍या आणि आरोग्यहानी करणार्‍या तमप्रधान फटाक्यांवर हिंदु राष्ट्रात बंदी असेल ! - (परात्पर गुरु) डॉ. आठवले
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥
या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो.
- प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

खरा ज्ञानी 
खरा ज्ञानी निरिच्छ असतो. त्याने षड्रिपूही जिंकलेले असतात. 
त्याच्या प्रत्येक कृतीला कार्यकारणभाव असतो. 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

बिहार जंगलराजच्या दिशेने !

संपादकीय 
      ज्याच्या नावावर दरोडे, हत्या, खंडणी, मारामारी यांसारखे ४० हून अधिक गुन्हे प्रविष्ट आहेत, असे माजी खासदार शहाबुद्दीन ११ वर्षांनंतर जेव्हा भागलपूर कारागृहातून बाहेर पडले तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी अकरा आमदार, ४०० गाड्यांचा ताफा, घरी जाईपर्यंत प्रत्येक चौकात आतषबाजी करत झालेले स्वागत पाहिल्यावर बिहार खरोखरंच परत एकदा जंगलराजच्याच दिशेने वाटचाल करत आहे, असेच म्हणावे लागेल. शहाबुद्दीन यांच्यावर वर्ष २००४ मध्ये गितीश आणि सतीश या दोघा भावांना अ‍ॅसिडमध्ये बुडवून ठार मारल्याचा आरोप आहे.

देहलीची दैना !

संपादकीय 
       गेल्या काही महिन्यांपासून आपचे मंत्री, आमदार, पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या कुकृत्यांनी देहलीकर त्रस्त झाले आहेत. अशातच डेंग्यूच्या साथीनेही देहलीकरांसमोर जीवनमृत्यूचा प्रश्‍न उभा राहिला आहे ! देशाची राजधानी काही दिवसांपासून चिकनगुनिया, डेंग्यू आणि मलेरिया यांची साथ इतक्या वेगाने पसरत आहे की, गेल्या दोन दिवसांत १५ जणांचे बळी गेले आहेत. खरं तर अशा वेळी आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांनी देहलीत असणे अपेक्षित आहे. सद्या ते आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे दोघेही देहलीकरांना वार्‍यावर सोडून गोव्याच्या प्रचारात मग्न आहेत, तर उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया फिनलंडला गेले आहेत. ज्या अपेक्षेने नागरिकांनी आपला महाप्रचंड आमदारसंख्येने निवडून दिले, त्या अपेक्षा सर्वस्तरांवर पूर्णपणे व्यर्थ ठरत असून देहलीकरांना मात्र पुढची तीन वर्षे केवळ पश्‍चात्ताप करण्याशिवाय हातात काहीच रहात नाही !
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn