Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।


आज हिंदी राजभाषा दिन

कोटी कोटी प्रणाम !

श्री गोविंदप्रभु जयंती

काश्मीरमध्ये ईदच्या नमाजपठणानंतर धर्मांध दंगलखोरांकडून हिंसाचार !

काश्मीरमध्ये चालू असलेला हिंसाचार धार्मिक 
स्वरूपाचा आहे; त्याला सरकारने मोडून काढले पाहिजे !
     श्रीनगर - बकरी ईदच्या नमाजपठणानंतर काश्मीरमध्ये विविध ठिकाणी झालेल्या हिंसाचारात एका दंगलखोराचा मृत्यू झाला, तर अनेक जण घायाळ झाले आहेत. आतंकवादी बुरहान मारला गेल्यापासून चालू असलेल्या हिंसाचारात मरणार्‍यांची संख्या आता ८० झाली आहे. नमाजपठणानंतर ऐतिहासिक मशिदींबाहेर एकत्र जमण्यावर प्रशासनाने बंदी घातली असून १० जिल्ह्यांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. उत्तरकाश्मीरात बांदीपोरामध्ये सुरक्षा पथकांबरोबर झालेल्या चकमकीत एक दंगलखोर युवक ठार झाला. अनंतनागमध्ये अशाच प्रकारच्या हिंसाचारात अनेक जण घायाळ झाले.

काश्मीरमध्ये ईदच्या दिवशी मशिदी बंद ठेवल्याचे गंभीर पडसाद उमटतील ! - ओमर अब्दुल्ला

स्वतः निधर्मी असल्याचे सांगणारे मुसलमान नेते त्यांच्या धार्मिक 
स्थळांचा विषय आल्यावर आवाज उठवतात, तर स्वतःला निधर्मी 
म्हणणारे जन्महिंदू नेते त्यांच्या धार्मिक स्थळांच्या संदर्भात विरोधी भूमिकाच घेतात !
     श्रीनगर - ईदच्या दिवशी काश्मीरमधील मशिदी आणि पवित्र धार्मिक स्थळे बंद ठेवल्याच्या सूत्रावरून माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे.
     ओमर अब्दुल्ला पुढे म्हणाले की, काश्मीरच्या आजपर्यंतच्या इतिहासात असे कधीच घडले नव्हते. ईदगाह, हजरतबल, मकदूम, साहिब, जामा मशीद आणि सय्यद साहिब ही काश्मिरी मुसलमानांंसाठी अत्यंत पवित्र धार्मिक स्थळे आहेत; मात्र सरकारने ईदच्या निमित्ताने मशिदी आणि दर्ग्याच्या ठिकाणी आलेल्या लोकांना आत जाऊ दिले नाही. मलाही ईदचे नमाज पठण करता आले नाही. याचे गंभीर परिणाम होतील, अशी चेतावणी त्यांनी दिली.

(म्हणे) काश्मिरींच्या असीम त्यागास ईद समर्पित ! - पाकचे पंतप्रधान नवाज शरीफ

काश्मीरचा पांढरा हत्ती पोसणारे भारतीय शासन असा अपमान किती वर्षे सहन करणार ?
     लाहोर - काश्मिरींच्या त्यागाकडे आम्ही दुर्लक्ष करू शकत नाही. त्यांच्या या त्यागाचे फळ त्यांना नक्कीच मिळेल. काश्मिरी नागरिकांच्या प्रचंड त्यागास आम्ही ईदचा हा सण समर्पित करतो. काश्मीरची समस्या सुटत नाही, तोपर्यंत पाक काश्मिरींसाठी हा सण समर्पित करत राहील, असे पाकचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी म्हटले आहे.
     शरीफ पुढे म्हणाले की, आता काश्मीरमधील तिसर्‍या पिढीने भारतापासून स्वातंत्र्य मिळवण्यासाठी बलिदान देण्यास प्रारंभ केला आहे. ते स्वयंनिर्णयाच्या अधिकारासाठी संघर्ष करत आहेत आणि भारताच्या अत्याचाराचा सामना करत आहेत. काश्मिरींचा आवाज अशी दडपशाही करून दाबता येणार नाही. (बलुचिस्तान, पाव्याप्त काश्मीर, गिलगिट आणि बाल्टीस्थान येथे दडपशाही करून पाकला त्यांचा आवाज दाबता येणार नाही ! - संपादक)

राऊरकेला (ओडिशा) येथे गणेशमूर्ती विसर्जन मिरवणुकीवर धर्मांधांची दगडफेक

हिंदू सहिष्णु आणि असंघटित असल्यामुळे त्यांच्या सणांच्या वेळी 
धर्मांधांकडून जाणीवपूर्वक दंगल घडवण्याचा प्रयत्न केला जातो, हे लक्षात घ्या !
  • गणपतीची मूर्ती भंग पावली वाहनांना आग लावली
  • घरांवर दगडफेक, हिंदूंच्या दुकानांची तोडफोड
     राऊरकेला (ओडिशा) - येथे गणेशमूर्ती विसर्जन मिरवणुकीवर धर्मांधांनी दगडफेक करून गणपतीची मूर्ती फोेडली, अनेक वाहनांना आग लावली, तसेच हिंदूंच्या दुकानांनाही लक्ष्य केले. त्यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला. येथील मुख्य मार्गावरील विविध गणेशोत्सव मंडळांनी १२ सप्टेंबरच्या रात्री श्री गणेशमूर्तीची विसर्जन मिरवणूक काढली होती. मिरवणूक नाला रोडजवळ पोचताच भाविकांनी जयघोष केला. त्यानंतर धर्मांधांनी मिरवणुकीवर दगडफेक केली, या दगडफेकीमुळे गणपतीच्या मूर्तींना हानी पोचली. त्यानंतर त्यांनी भाविकांच्या गाड्या पेटवल्या आणि दुकानांची मोडतोड केली.

उत्तर कोरियावर आक्रमण शक्य ! - अमेरिका

     वॉशिंग्टन - अणुचाचणी घेणार्‍या उत्तर कोरियावर आक्रमण करण्याच्या दुसर्‍या योजना अमेरिका आखत आहे. त्यामध्ये अमेरिका जपान आणि दक्षिण कोरिया यांचे साहाय्य घेऊ शकते, असे म्हटले जात आहे.

कावेरी पाणी वाटपाच्या वादातून उसळलेल्या हिंसाचारामुळे बेंगळुरूमध्ये संचारबंदी !

     नवी देहली - कर्नाटकने २० सप्टेंबरपर्यंत तमिळनाडूला कावेरी नदीचे प्रतिदिन १२ सहस्र क्युसेक पाणी द्यावे, असा आदेश १२ सप्टेंबरला सर्वोच्च न्यायालयाने दिला; मात्र यानंतर निर्णय न मानणार्‍या कर्नाटकात हिंसाचार झाला. त्याला प्रत्युत्तर म्हणून तमिळनाडूतही हिंसाचार उसळला. दोन्ही राज्यांत असंख्य वाहनांची तोडफोड, जाळपोळीच्या आणि दगडफेकीच्या घटना घडल्या. कर्नाटकातील तमिळ भाषिकांवर आणि तमिळनाडूतील कानडी भाषिकांवर आक्रमणे करण्याचे सत्र चालू झाले आहे. बेंगळुरूमध्ये हिंसाचार चालूच असल्यामुळे तिथे संचारबंदी लागू करण्यात आली आहे. येथे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात एक जण ठार झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही नागरिकांना शांततेचे आवाहन केले आहे.

खुनात सनातनचाच हात असल्याचे तपास यंत्रणा आणि सरकार यांनी सिद्ध करावे, यासाठी संपादकियाच्या माध्यमातून दबाव आणण्याचा अश्‍लाघ्य प्रयत्न !

लोकमतचा वैचारिक आतंकवाद !
     मुंबई - खुनात सनातनचाच हात असल्याचे अन्वेषण यंत्रणा आणि सरकार यांनी सिद्ध करावे, यासाठी संपादकियाच्या माध्यमातून दबाव आणण्याचा अश्‍लाघ्य प्रयत्न लोकमत या दैनिकात १३ सप्टेंबर या दिवशी प्रसिद्ध झालेल्या संपादकियातून करण्यात आला आहे.
यामध्ये मांडण्यात आलेली सूत्रे...
१. नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे आणि डॉ. कलबुर्गी यांच्या गेल्या तीन वर्षांत झालेल्या हत्या व्यक्तीगत कारणांखातर वा कौटुंबिक वैरासाठी झाल्या नाहीत. (हे लोकमतला कसे कळले ? या हत्या नेमक्या कोणत्या कारणातून झाल्या आहेत, याचा शोध चालू आहे आणि तो पूर्ण झालेला नाही. लोकमतच्या संपादकांना कारण ठाऊक असेल, तर अन्वेषण यंत्रणांनी त्यांचीच चौकशी करावी. - संपादक) या आरोपींनी ज्यांचे खून केले, त्या तिघांशीही त्यांचे खाजगी भांडण नव्हते. त्यांच्यातील वैराचे कारण वैचारिक व श्रद्धाविषयक आहे. सरकार चालवणार्‍यांना ते कळत नसेल, तर त्यांनी डोळ्याएवढेच डोक्यावरही कातडे ओढून घेतले आहे, असे म्हटले पाहिजे. (आरोपींनी खून केले असे म्हणणेच चुकीचे आहे. आरोपी हा आरोपी असतो, तो खुनी आहे कि नाही, हे सिद्ध व्हावे लागते. एवढे साधे लॉजिकही ज्यांना कळत नाही, त्यांनी सरकारवर टीका करावी, हे आश्‍चर्यच ! - संपादक)

कोइम्बत्तूर (तमिळनाडू) येथे हिंदु मुन्नानी नेत्याच्या घरावर पेट्रोल बॉम्ब फेकल्याने तणाव !

हिंदुत्वनिष्ठांवर होणार्‍या आक्रमणाच्या विषयी एकही पुरोगामी कधी 
आवाज उठवत नाही कि एकही प्रसारमाध्यम त्याचे वृत्त प्रसिद्ध करत नाही !
     कोइम्बत्तूूर - तिरुपूर येथे हिंदु मुन्नानी नेत्याच्या घरावर पेट्रोल बॉम्ब फेकल्याच्या निषेधार्थ १३ सप्टेंबरला पुकारलेल्या तिरुपूर बंदमुळे तणावाची स्थिती निर्माण झाली. १२ सप्टेंबरच्या रात्री २ च्या सुमारास अज्ञातांनी फेकलेल्या पेट्रोल बॉम्बमुळे हिंदु मुन्नानी नेत्याच्या घराची बरीच हानी झाली होती. हिंदु मुन्नानीचे तिरुपूर शाखेचे कोषाध्यक्ष आणि तिरुपूर उद्योग सुरक्षा समितीचे सदस्य षण्मुगम् यांच्या घरावर हे आक्रमण झाले होते. या आक्रमणाच्या निषेधार्थ हिंदु मुन्नानी आणि तरुपूर उद्योग सुरक्षा समिती यांनी तिरुपूर बंदचे आवाहन केले होते. २ दिवसांपूर्वीच वेळ्ळुर जिल्ह्यात हिंदु मुन्नानी नेत्याच्या घरावर पेट्रोल बॉम्ब फेकण्यात आला होता. ३ दिवसांपूर्वी वेळ्ळुर जिल्ह्यात एका संशयिताच्या घरात ३ पेट्रोल बाँब सापडले होते. (पोलिसांनी या संशयिताच्या विरोधात कारवाई करणे अपेक्षित आहे ! - संपादक)

हिंदुराष्ट्र सेनेचे प्रमुख धनंजय देसाई यांना कारागृहात एकांतवासात ठेवून छळ होत असल्याची तक्रार !

हिंदूंचा छळ आणि जिहादी आतंकवाद्यांना सूट अशीच सध्याची लोकशाही झाली आहे !
     पुणे - वर्ष २०१४ मध्ये फेसबूकवर छत्रपती शिवाजी महाराज आणि दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या अवमानाचा मजकूर प्रकाशित झाल्यानंतर उसळलेल्या दंगलीत शेख नावाच्या व्यक्तीची २ जून या दिवशी हत्या झाल्याच्या प्रकरणी हिंदूराष्ट्र सेनेचे प्रमुख श्री. धनंजय देसाई यांना ९ जून २०१४ या दिवशी अटक करण्यात आली. तेव्हापासून ते येरवडा कारागृहात बंदिस्त आहेत. या काळात त्यांना अंडा सेलमध्ये एकटे ठेवून त्यांचा छळ करण्यात आला, अशी तक्रार श्री. देसाई यांनी मोक्का न्यायालयाला केली आहे. तसेच कारागृहाचे कर्मचारी त्यांना शिवीगाळ करतात, असेही या तक्रारीत म्हटले आहे. मोक्का न्यायालयाचे न्यायाधीश उत्पात यांनी या अर्जाची दखल घेऊन २२ सप्टेंबर २०१६ या दिवशी सुनावणी ठेवली आहे.

राजीव गांधी यांच्या मारेकर्‍यावर कारागृहात आक्रमण !

भारतातील असुरक्षित कारागृहे !
सनातनचे साधक डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांनीही स्वतंत्र 
कोठडीची मागणी का केली होती हे येथे लक्षात येते !
     चेन्नई - माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या मारेकर्‍यांपैकी ४४ वर्षीय ए.जी. पेरारिवलन् याच्यावर १३ सप्टेंबरला कारागृहात आक्रमण करण्यात आले. पेरारिवलन् याच्यासमवेत असलेला आरोपी राजेश याच्याकडून आक्रमण करण्यात आलेे. पेरारिवलनला दुखापत झाली असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
     राजीव गांधी यांच्या हत्येप्रकरणी नलिनी, मुरुगन्, पेरारिवलन्, रॉबर्ट पायस, जयकुमार, संथन् आणि रवीचंद्रन् या ७ जणांना दोषी ठरवण्यात आलेले आहे. या सातही जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

गडहिंग्लज येथे नगराध्यक्ष आणि नगरसेवक यांच्याकडून गणेशमूर्ती विसर्जनाची कौतुकास्पद कृती !

हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांची 'आदर्श गणेशोत्सव विसर्जन मोहीम '! 
विसर्जनासाठी सिद्ध केलेले प्लॅटफॉर्म
     गडहिंग्लज (जिल्हा कोल्हापूर), १३ सप्टेंबर (वार्ता.) - १० सप्टेंबर या दिवशी येथील नगरपालिकेचे नगराध्यक्ष श्री. राजेश बोरगावे आणि नगरसेवक श्री. नरेंद्र भद्रापूर यांनी कौतुकास्पद कृती केली. भाविकांना मूर्ती विसर्जन करायला सोपे व्हावे यासाठी नगरपालिकेने प्लास्टिकच्या टाक्यांवर (बॅरलवर) फळी बसवून (होडीसारखे) प्लॅटफॉर्म बनवले होते. यावर स्वतः जाऊन या दोघांनी भाविकांनी दिलेल्या श्री गणेशमूर्तींचे हिरण्यकेशी नदीमध्ये विसर्जन केले. (शास्त्रानुसार श्री गणेशमूर्तीचे विसर्जन करण्याची कृती करणारे श्री. राजेश बोरगावे आणि श्री. नरेंद्र भद्रापूर यांचे अभिनंदन ! - संपादक) 

बेळगाव महापालिकेकडून फिरते कृत्रिम हौद निर्माण करून धर्मद्रोह !

बेळगावच्या महापौर सरिता पाटील
(मध्यभागी निवेदन वाचतांना) यांना निवेदन देतांना हिंदुत्वनिष्ठ
     बेळगाव (कर्नाटक), १३ सप्टेंबर (वार्ता.) - बेळगाव महापालिकेने यंदा भाविकांनी मूर्तीविसर्जन करावे म्हणून फिरते कृत्रिम हौद वाहनांमध्ये निर्माण करून आणि ते विविध भागांमध्ये फिरवून श्री गणेशमूर्ती गोळा करून त्यांची घोर विटंबना केली. (धर्माभिमान्यांनी वरील गोष्टीचा महापालिकेला जाब विचारून अनंतचतुर्दशीला असे होऊ नये यासाठी संघटित प्रयत्न करावेत ! - संपादक) 

गणेशमूर्ती कृत्रिम हौदातील अमोनियम बायकार्बोनेटमिश्रित पाण्यात विरघळवणार असल्याचा पुणे महापालिकेचा दावा फोल !

  • धर्मद्रोही स्वयंसेवी संस्थांच्या नादी लागून पुणे महानगरपालिचे कुकृत्य ! 
  • कृत्रिम हौदातील गणेशमूर्ती ट्रकमध्ये अस्ताव्यस्त टाकून नेल्या खाणीत विसर्जनासाठी !
       पुणे, १३ सप्टेंबर (वार्ता.) - गणेशमूर्ती विसर्जनाने जलप्रदूषण होते, या धर्मद्रोह्यांच्या कांगाव्याला बळी पडून काही भाविकांनी गणेशमूर्तींचे महानगरपालिकेने उभारलेल्या कृत्रिम हौदात विसर्जन केले. या भाविकांची मात्र पुणे महानगरपालिकेने मागील वर्षीप्रमाणेच घोर फसवणूक केली असल्याचे गौरी विसर्जनाच्या दुसर्‍या दिवशीच उघड झाले !
     ११ सप्टेंबर या दिवशी पुणे महानगरपालिकेने कृत्रिम हौदात विसर्जित केलेल्या गणेशमूर्ती काढून एका ट्रकमध्ये भरल्याचे आढळून आले. या ट्रकमध्ये पालिकेचे काही कर्मचारी उभे होते, तसेच वेड्यावाकड्या पद्धतीने या गणेशमूर्ती ट्रकमध्ये भरल्या जात असल्याचे आढळून आले. विशेष म्हणजे हे कुकृत्य झाकण्यासाठी ट्रकवर काळे कापड टाकण्यात आले होते. त्या ठिकाणी नागरिकांना थांबण्यासही पोलीस मज्जाव करत होते. या गणेशमूर्ती पुढे वाघोली येथील खाणीत टाकण्यात येणार असल्याची महिती घनकचरा विभागाचे प्रमुख सुरेश जगताप यांनी दिली.

हिंदु विधीज्ञ परिषदेचे गोवा राज्य सचिव अधिवक्ता श्री. नागेश ताकभाते यांना पितृशोक

     फोंडा - हिंदु विधीज्ञ परिषदेचे गोवा राज्य सचिव अधिवक्ता श्री. नागेश ताकभाते यांचे वडील श्री. चंद्रकांत दिगंबर ताकभाते (वय ७५ वर्षे) यांचे १२ सप्टेंबर या दिवशी दुपारी दोन वाजता निधन झाले. त्यांच्या पश्‍चात पत्नी, दोन मुलगे, एक विवाहित कन्या, सुना, नातवंडे, असा परिवार आहे. अधिवक्ता नागेश ताकभाते आणि त्यांच्या धर्मपत्नी सौ. साक्षी ताकभाते सनातनच्या रामनाथी (गोवा) येथील आश्रमात पूर्णवेळ साधना करतात. सनातन परिवार ताकभाते कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे.

अंनिसकडून श्री गणेशमूर्तींचे विडंबन झाल्याने भाविक संतप्त !

     प्रदूषणाच्या नावाखाली अंनिसने असे खोटा प्रचार करून भाविकांना मूर्तीदान करण्यास सांगितले; मात्र त्या मूर्ती परत नदीत विसर्जित करण्याविषयी त्यांच्याकडून प्रत्यक्षात कोणतीच कृती झाली नाही. भाविकांनी विश्‍वासाने दिलेल्या मूर्ती अनेक घंटे उघड्यावरच ठेवण्यात आल्या होत्या. त्यामुळे अंनिसच्या कार्यकर्त्यांनी श्री गणेशमूर्तीचे एकप्रकारे विडंबनच केले. अंनिसचे दोन-तीन कार्यकर्ते काही वेळेपुरते यायचे आणि दान केलेल्या मूर्तीसमोर उभे राहून छायाचित्र काढण्याव्यतिरिक्त त्यांनी काहीच केले नाही. हे सर्व पाहून नगरपालिकेचे पदाधिकारी, काही अधिकारी, कर्मचारी आणि भाविक यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या, "अंनिसवाले नगरपालिकेला निवेदन द्यायचे आणि प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी यांच्यावर मूर्तीदानासाठी दबाव आणायचा, असे करतात; मात्र स्वतःहून काही कृती करत नाहीत." उघड्यावर ठेवलेल्या मूर्ती पाहून श्री गणेशमूर्ती विसर्जन करण्यासाठी येणार्‍या भाविकांना पुष्कळ वाईट वाटत होते.

कुरुंदवाड नगरपरिषदेकडून दान घेतलेल्या श्री गणेशमूर्तींचे अत्यंत खराब पाण्यात पुनर्विसर्जन !

भाविकांनो, तुम्ही भक्तीभावाने पूजा केलेल्या 
श्री गणेशमूर्तींची अशा विटंबना करणार्‍या नगरपरिषदेस जाब विचारा ! 
खंदकातील पाण्यात अत्यंत अयोग्य पद्धतीने
श्री गणेशमूर्ती विसर्जन करतांना नगरपरिषदेचे कर्मचारी
     कुरुंदवाड (जिल्हा कोल्हापूर), १३ सप्टेंबर (वार्ता.) - कुरुंदवाड येथे १० सप्टेंबर या दिवशी भाविकांकडून एका राजकीय पक्षाच्या महिला कार्यकर्त्यांकडून श्री गणेशमूर्तींचे दान घेण्यात येत होते. हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते डॉ. उमेश लंबे यांनी ही गोष्ट त्या पक्षाच्या प्रमुखांना लक्षात आणून दिली. त्या वेळी त्या पक्षाच्या प्रमुखांनी त्यांना "असा काही प्रकार चालू आहे, हे माहितीच नाही", असे सांगितले. यानंतर त्या प्रमुखांनी त्या महिला कार्यकर्त्यांना दूरभाष करेपर्यंत त्या निघून गेल्या होत्या. 

आळंदी, पुणे येथील इंद्रायणी घाट अडवून नगरपरिषदेकडून भाविकांना कृत्रिम तळ्यात गणेशमूर्ती विसर्जन करण्याची सक्ती !

हिंदु जनजागृती समितीसह अन्य हिंदुत्वनिष्ठांनी केलेल्या 
प्रबोधनानंतर नदीकडे जाणारा मार्ग मोकळा करण्यात आला ! 
     आळंदी (जिल्हा पुणे), १३ सप्टेंबर (वार्ता.) - येथे आळंदी नगरपरिषदेकडून इंद्रायणी घाट अडवून भाविकांना कृत्रिम तळ्यात गणेशमूर्तींचे विसर्जन करण्याची सक्ती करण्यात आली. एका खड्ड्यामध्ये प्लास्टिक टाकून त्यामध्ये पाणी टाकून हे कृत्रिम तळे निर्माण केले होते. काही कर्मचारी नदीकडे जाणार्‍या मार्गावर उभे राहून भाविकांना कृत्रिम तळ्यातच विसर्जन करण्यास भाग पाडत होते. 

मुलींवरील वाढत्या अत्याचारात मुलींचे अयोग्य वागणे हाही एक प्रमुख घटक ! - अधिवक्त्या अपर्णा रामतीर्थकर

     गणेशवाडी (जिल्हा कोल्हापूर) - पूर्वीच्या काळी महिला धर्माचरण करत होत्या; मात्र सध्याच्या काळात मुलींचा धर्माचरण न करण्याकडेच कल आहे. आजच्या मुली जीन्स पँट घालणे, केस मोकळे सोडणे, कुंकू न लावणे अशा कृतीच अधिक करत आहेत. त्यामुळे मुलींवरील वाढत्या अत्याचारात मुलींचे अयोग्य वागणे हाही एक प्रमुख घटक आहे, असे मत सोलापूर येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या अधिवक्त्या अपर्णा रामतीर्थकर यांनी व्यक्त केले. शेतकरी मित्र गणेशोत्सव मंडळ, गावभाग यांच्या वतीने गणेशवाडी येथील वाचनालयात घेण्यात आलेल्या व्याख्यानात त्या बोलत होत्या. याचा लाभ २५० हून अधिक तरुणी आणि महिला यांनी घेतला. या वेळी अधिवक्त्या अपर्णा रामतीर्थकर यांनी धर्माचरण न केल्याने होणारे तोटे सांगून धर्माचरण केल्याने लाभ कसा होतो, हे उदाहरणासहित स्पष्ट केले. मंडळाचे अध्यक्ष श्री. राजेंद्र मल्लाप्पा हेही या कार्यक्रमाला उपस्थित होते. या वेळी हिंदु जनजागृती समितीनिर्मिती लव्ह जिहाद ही ध्वनीचित्र चकती दाखवण्यात आली. तसेच सनातन संस्थेच्या वतीने सात्त्विक उत्पादने आणि वस्तू यांचे प्रदर्शन लावण्यात आले होते.

श्री गणेशमूर्तींचे विसर्जन न करण्याचा तुळजापुरातील मंडळांचा निर्णय

नवरात्रोत्सवात भाविकांना महाद्वारातून प्रवेश न दिल्याचे प्रकरण 
     तुळजापूर, १३ सप्टेंबर - नवरात्रोत्सवाच्या काळात भाविकांना महाद्वारातून प्रवेश करण्यास बंदी घालण्याचा निर्णय तुळजापूर मंदिर संस्थानचे अध्यक्ष आणि धाराशिवचे जिल्हाधिकारी प्रशांत नारनवरे यांनी सलग दुसर्‍या वर्षी कायदा सुव्यस्थेचे कारण देत घेतला आहे. त्याच्या निषेधार्थ तुळजापुरातील सर्व गणेशोत्सव मंडळांनी श्री गणेशमूर्तींचे विसर्जन न करण्याचा निर्णय घेतला आहे. (अशा प्रकारे देवतेच्या मूर्तीला वेठीस धरून श्री गणेशाची अवकृपा ओढवण्यापेक्षा गणेशोत्सव मंडळांनी जिल्हाधिकार्‍यांचा आदेश पालटण्यासाठी इतर सनदशीर मार्गांचा अवलंब करायला हवा. - संपादक) 

मनसेने स्वतंत्र विदर्भवाद्यांची पत्रकार परिषद उधळली !

महाराष्ट्राची एकात्मता अबाधित रहाण्यासाठी अन्य पक्ष पुढाकार का घेत नाहीत ? 
     मुंबई - येथे स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसाठी विदर्भवाद्यांकडून घेण्यात आलेली पत्रकार परिषद मनसेच्या कार्यकर्त्यांनी उधळून लावली. मनसेचे नेते संदीप देशपांडे आणि अमेय खोपकर यांच्या नेतृत्वाने कार्यकर्त्यांनी अखंड महाराष्ट्राच्या घोषणा देत पत्रकार परिषदेत गोंधळ घातला. यामुळे पत्रकार परिषद बंद करण्यात आली. काही वेळाने विदर्भवादी नेत्यांनी पुन्हा पत्रकार परिषद घेतली. 

गणेशोत्सवात विजेचा खंड खपवून घेणार नाही ! - शिवसेना खासदार चंद्रकांत खैरे

बहुसंख्य हिंदूंच्या देशात हिंदूंचे सण सुरळीत पार 
पडावेत, यासाठी संघर्ष करावा लागतो, हे लज्जास्पद ! ही स्थिती 
पालटण्यासाठी  हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) स्थापण्याला पर्याय नाही ! 
     संभाजीनगर, १३ सप्टेंबर - उत्सवात शेवटचे ४ दिवस विद्युत पुरवठा खंडित होणार नाही, याची काळजी महावितरणाने घ्यावी. हिंदूंच्या सण-उत्सवातच विद्युत पुरवठा खंडित कसा होतो ? गणेशोत्सवात विजेचा खंड खपवून घेणार नाही, अशा शब्दांत शिवसेनेचे खासदार श्री. चंद्रकांत खैरे यांनी महावितरण आस्थापनांच्या पदाधिकार्‍यांना तातडीची बैठक घेऊन सुनावले. (गणेशोत्सवात मूलभूत सोयी सुविधा मिळण्यासाठी तत्परतेने कृती करणार्‍या श्री. खैरे यांचे अभिनंदन ! शिवसेनेच्या एका लोकप्रतिनिधीला जे वाटते, ते अन्य लोकप्रतिनिधींना का वाटत नाही ? - संपादक)

वाजपेयी सरकारने डॉ. झाकीर नाईक यांच्या काश्मीर दौर्‍याची व्यवस्था केली होती ! - काँग्रेसचा आरोप

     नवी देहली - सोनिया गांधी अध्यक्ष असलेल्या राजीव गांधी चॅरिटेबल ट्रस्टने डॉ. झाकीर नाईक यांच्या ट्रस्टकडून देणगी घेतल्याची घटना समोर आली असतांना आता काँग्रेसने भाजपवर आरोप केला आहे. अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारने वर्ष २००३ मध्ये डॉ. झाकीर नाईक यांच्या जम्मू-काश्मीर यात्रेचे आयोजन आणि व्यवस्था केली होती. त्या वेळी झाकीर नाईक यांना राजभवनात बोलावण्यात आले होते, असा आरोप काँग्रेसने केला आहे. तत्कालीन सरकारने डॉ. झाकीर यांचा काश्मीरचा ३ दिवसांचा दौरा यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले होते. त्यामुळे भाजपने दुसर्‍यांकडे बोट करण्यापेक्षा स्वत: आत्मपरीक्षण करावे. जर डॉ. झाकीर नाईक आता आतंकवाद्यांशी संबंधित वाटत असतील, तर २००३ मध्ये त्यांचे संबंध नव्हते का ?, असा प्रश्‍न काँग्रेस प्रवक्ते मनीष तिवारी यांनी केला आहे. भाजपनेही काँग्रेसच्या या आरोपांना उत्तर दिले. काँग्रेसचे हे नेहमीचेच आहे. जेव्हा ते रंगेहात सापडतात, तेव्हा ते पूर्वीच्या सरकारला दोष देतात, अशी टीका भाजपचे श्रीकांत शर्मा यांनी केली.

फलक प्रसिद्धीकरता

आता या धर्मांधतेविषयी सगळे गप्प का ?
     ईदच्या दिवशी काश्मीरमधील मशिदी आणि पवित्र धार्मिक स्थळे बंद ठेवल्याच्या सूत्रावरून माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी केंद्र सरकारला चेतावणी दिली की, काश्मीरच्या आजपर्यंतच्या इतिहासात असे कधीच घडले नव्हते. याचे गंभीर परिणाम होतील.

हिंदू तेजा जाग रे !

Jago ! : Sarkardwara Eidke din band rakhi gayi Kashmiri masjidoke parinam gambhir honge- J&K ke purva CM Omar Abdullah
     Is dharmandhata par ab pura desh chup kyu
जागो !
: सरकार द्वारा ईद के दिन बंद रखी गई कश्मीरी मस्जिदों के परिणाम गंभीर होंगे ! - जम्मू-कश्मीर के पूर्व सीएम् ओमर अब्दुल्ला
     इस धर्मांधता पर अब पूरा देश चुप क्यों ?

बोरिवलीमध्ये विसर्जनाच्या वेळी पोलिसांवर दगडफेक

     मुंबई, १३ सप्टेंबर - येथील बोरिवली भागातील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये ११ सप्टेंबरला ७ दिवसांच्या श्री गणेशमूर्ती विसर्जनाच्या वेळी एका मंडळातील कार्यकर्त्यांनी पोलिसांवर दगडफेक केल्याची घटना घडली. या दगडफेकीत एक महिला पोलीस आणि एक भाविक घायाळ झाला. पोलिसांनी या प्रकरणी एकाला अटक केली असून २ युवक पसार झाले आहेत. 

केरळमधील २२ मुसलमान इसिसमध्ये सहभागी झाले !

आतंकवाद्यांना धर्म असतो, हे पुन्हा एकदा उघड करणारी घटना ! 
     नवी देहली - केरळमधील कासरगोड आणि पल्लकड येथून जुलैमध्ये बेपत्ता झालेल्या २२ मुसलमान व्यक्ती अफगाणिस्तानमधील इसिसच्या केंद्रात सहभागी झाल्या आहेत. येथे त्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. 'द पायोनिअर' वृत्तपत्राने राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेच्या ('एन्आयए'च्या) सूत्रानुसार हे वृत्त दिले आहे. यात १३ पुरुष, ६ महिला आणि ३ मुले यांंचा समावेश असल्याचे वृत्तात म्हटले आहे. 

मी 'काय खावे' हे सांगणारे गोरक्षक कोण लागतात ? - ममता बॅनर्जी

देशात 'गोमांस' हे सूत्र अतीसंवेदनशील झालेले असतांना 
जनतेच्या भावनेचा आदर न करणार्‍या बंगालच्या मुख्यमंत्री ! 
     कोलकाता - एखादी शाकाहारी व्यक्ती शाकाहारी भोजन करील, तर मांसाहारी व्यक्ती मांसाहार करील. गोरक्षक कोण लागतात की, मी काय खावे, हे त्यांनी सांगावे ?, असा प्रतीप्रश्‍न बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्‍नावर केला. ममता बॅनर्जी पुढे म्हणाल्या की, सर्वांना स्वतःच्या धर्माचे पालन करण्याचा अधिकार आहे. युरोपमध्ये गोमांस खाल्ले जाते, आदिवासीही गोमांस खातात.

ऑपरेशन टोपॅक : काश्मिरी हिंदूंना विस्थापित करणारी धर्मांधांची विखारी योजना !

काश्मिरी हिंदू बलीदान दिनाच्या निमित्ताने...
       धर्मांधांनी ऑपरेशन टोपॅक या विखारी अन् हिंदुद्वेषी योजनेद्वारे काश्मिरी हिंदूंना काश्मीर खोर्‍यातून पद्धतशीरपणे विस्थापित केले. हे ऑपरेशन म्हणजे काश्मिरी हिंदूंचा कर्दनकाळच ठरली. मुसलमानबहुल भागात हिंदूंचे कसे हाल केले जातात, याचा मागोवा घेणारा हा लेख.
१. काश्मिरी हिंदूंना हाकलून लावण्याची 
धर्मांधांची पद्धतशीर पूर्वसिद्धता !
      ८० च्या दशकात काश्मीर खोर्‍यात पंडितोंके बगैर, पंडिताईनों के साथ । मिलकर बनाए पाकिस्तान, अशा घोषणा देऊन गावागावांतील काश्मिरी हिंदूंना (पंडितांना) घाबरवून टाकण्याचा यशस्वी प्रयत्न चालू झाला. ऑपरेशन टोपॅकच्या अंतर्गत येणारी ही योजना होती. या ऑपरेशनला झिया आणि आयएस्आय यांचे सहकार्य होते. वर्ष १९८३-१९८४ पासून गावागावांत अल्लावाले येऊन फिरू लागले. यात बहुतांशी मुल्ला-मौलवी उत्तरप्रदेश आणि बिहार येथील होते (देशात मौलवींना सरकार पगार देते; पण पुजार्‍यांना नाही, ही माहिती जाता जाता सांगून टाकतो.) वर्ष १९८७-१९८८ पासून या लोकांनी पेरलेल्या विषबीजाची रोपे अंकुरित होऊ लागली.

जनहो, हिंदी भाषेवरील अन्याय वेळीच न रोखल्यास सामान्यजनांच्या मनातून देशभक्तांच्या स्मृतींचे अवशेष पूर्णतः नष्ट होतील !

हिंदी राजभाषा दिनाच्या निमित्ताने...
१. हिंदी भाषा सोपी होण्यासाठी एखाद्या शब्दाला पर्याय म्हणून 
विदेशी शब्द वापरण्याचा आदेश देणारे (तत्कालीन) पंतप्रधान मनमोहन सिंह 
आणि ग्रामीण क्षेत्रांचे इंग्रजीकरण करण्यासाठी इंग्रजी माध्यमाच्या ६ सहस्र शाळा 
चालू करण्याची घोषणा करणारे काँग्रेसचे केंद्रीय मानव संसाधन विकास मंत्रालय !
     काही कालावधीपूर्वी केंद्रीय हिंदी परिषदेच्या बैठकीचे अध्यक्षपद भूषवतांना (तत्कालीन) पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी हिंदी भाषा सोपी करण्याच्या नावावर भोजन (जेवण) या शब्दाला पर्याय म्हणून लंच, डिनर या शब्दांचा उपयोग करण्याचा आदेश दिला. मागील ६६ वर्षांत कार्यरत असलेल्या शासनाला अशा प्रकारच्या अनावश्यक विदेशी शब्दांचा उपयोग हिंदी भाषेत करण्याची आवश्यकता भासली नाही. काँग्रेसच्या शासनकाळात केंद्रीय मानव संशोधन विकास मंत्रालयाने देशातील ग्रामीण क्षेत्रांचे इंग्रजीकरण करण्याच्या पहिल्या टप्प्यात इंग्रजी माध्यमाच्या ६ सहस्र शाळा चालू करण्याची घोषणा केली आहे. या व्यतिरिक्त अन्य शासकीय शाळांतून इंग्रजी भाषेला प्राधान्य देण्याचा आग्रह केला आहे.

दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सचे एक युरोपियन प्रोफेसर जीन ड्रेझ सांगतात, काश्मिरातून हिंदूंची हद्दपारी आणि कत्तल यांत काहीच दोष नाही !

१. काश्मीरमध्ये हिंदु-मुसलमान संबंध अत्यंत सलोख्याचे असतांना जिहादचे 
आदेश मिळताच मुसलमान हिंदु बांधवांची निर्घृण हत्या करतात !
     हिंदु शरणार्थींची वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट पहा ! काश्मीरमधील पंडित अभिमानाने सांगायचे की, काश्मिरी मुसलमान त्यांचे बांधव आहेत. तिथे शेकडो वर्षांपासून हिंदु-मुसलमान यांच्यातील संबंध अत्यंत सलोख्याचे आहेत. त्याचा त्यांना अभिमान आहे. तेच शेजारी मुसलमान उर्दू वार्तापत्रांंतून आणि मशिदीच्या ध्वनीक्षेपकातून जिहादचा आदेश मिळताच त्या हिंदु बांधवांची निर्घृणपणे हत्या करतात !

श्री गणेशाने कथन केलेला मौनाचा (वाक्-संयमाचा) महिमा !

सध्या चालू असलेल्या गणेशोत्सवाच्या निमित्ताने...
       श्री गणेश हे महर्षि वेदव्यासांच्या काव्यांचे लेखनिक म्हणून कार्यरत होते. श्री गणेशाने शेवटच्या दिवशी भोजपत्रावर इति असे लिहून लेखनकार्याला विराम दिला. काव्य पूर्ण झाले होते. त्यामुळे दोघांच्याही मुखकमलावर समाधानाचे तेज झळकत होते.
१. महर्षि वेदव्यासांनी श्री गणेशाच्या वाक्-संयमाची 
(मौनाची) प्रशंसा करणे 
      या प्रसंगी महर्षि वेदव्यासांनी श्री गणेशाला (लंबोदराला) साष्टांग नमस्कार करून त्यांच्या परिश्रमाची वाहवा केली आणि म्हणाले, तुझ्या बळावरच माझ्या चिंतनाला मूर्त रूप प्राप्त होऊ शकले. हे सर्व संभाषण चालू असतांनाही श्री गणेश काहीच बोलत नव्हते; म्हणून व्यासांनी त्याच्या वाक्-संयमाची (मौनाची) प्रशंसा करून पुन्हा गणेशाला वंदन केले.

श्रीगणेशोत्सव

सौ. अनिता पाटणकर
श्रीगणेशा, तुझ्याच कृपेने राहू दे । आम्हावरी सद्बुद्धीचे बंधन ॥
पुजूनी तुला करितो आम्ही वंदन । 
तुझ्याच कृपेने राहू दे ।
आम्हावरी सद्बुद्धीचे बंधन ॥ १ ॥

तूच शिकवलेस श्रीगणेशा । 
तूच वदविलेस विद्या विनयेन शोभते ।
प्रयत्नांती परमेश्‍वर हे सुविचार ॥ २ ॥

घट भरूनी दिलास तू अध्यात्मज्ञानाचा ।
तो सेवूनी आम्ही । नाश करू षड्रिपूंचा ॥ ३ ॥

तुझ्या नामाचे सत्त्वगुणी वस्त्र लाभू दे ।
आमच्या रज-तम वस्त्रांचे । तुझ्या चरणी निर्माल्य होऊ दे ॥ ४ ॥

- आपली चरणरजसेविका, 
सौ. अनिता आनंद पाटणकर, राजापूर, जि. रत्नागिरी (१६.६.२०१४)

समाजातील सर्वच स्तरांतील नागरिकांकडून सनातन संस्थेला मिळत आहे ठाम पाठिंबा !

     पुरोगाम्यांच्या हत्यांच्या प्रकरणात गोवण्याचे कारस्थान चालू आहे. पोलीस आणि अन्वेषण यंत्रणा यांच्याकडून अटकेतील साधक, तसेच अन्य साधक यांचाही अतोनात छळ होत आहे. हिंदुविरोधी प्रसिद्धीमाध्यमांकडूनही सनातनची अपकीर्ती केली जात आहे. या पार्श्‍वभूमीवर सनातन प्रभातने पोलिसांच्या सनातनद्वेषाचे कटू वास्तव, हा विशेषांक ६ सप्टेंबर या दिवशी प्रसिद्ध केला. त्याला भरघोस प्रतिसाद मिळाला. या अनुषंगाने समाजातील मान्यवर आणि हिंदुत्वनिष्ठ यांनी व्यक्त केलेल्या प्रतिक्रिया येथे देत आहोत.

सार्वजनिक गणेशोत्सवाचा श्रेय वाद कशासाठी ?

      सार्वजनिक गणेशोत्सव कोणी चालू केला हा श्रेयवाद राज्याची सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्यामध्ये चालू झाला आहे. पुण्यातील श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्टने चालू केलेला गणेशोत्सव सवाशे वर्षे जुना असला, तरी हाच भारतातील पहिला गणेशोत्सव असल्याचा ट्रस्टचा दावा आहे. यावरून चालू असलेला वाद प्रसारमाध्यमांतून समोर आला आहे. भाऊसाहेबांनी त्या वेळी बसवलेला गणपति आपल्या स्वतःच्या वाड्यात बसवला होता. त्या काळी भारतात इंग्रजांचे शासन होते.

पुरोगामित्वाचा आणि आधुनिकतेचा सोस मिरवण्याच्या नावाखाली गणेशोत्सवात अनेक जन्महिंदूंकडून धर्मशास्त्राचे उल्लंघन !

  • आपण आजारी पडल्यावर वैद्यांच्या सल्ल्याने औषधोपचार करतो. आधुनिकतेच्या नावाखाली मनाला वाटेल ती गोळी घेत नाही. मग धार्मिक विधी करतांना ते धर्मशास्त्राला धरून का करत नाही ? त्यात मनाने पालट करणारे, स्वतःला धर्मशास्त्रापेक्षा शहाणे समजणारे हिंदू कलियुगातील धर्माच्या र्‍हासाला कारणीभूत झाले आहेत !
  • स्वतःच्या अहंकारापोटी समाजाची दिशाभूल करणार्‍या कृती करणार्‍यांवर देवतांची कृपा कधीतरी होईल का ?
      मुंबई - गणपतीच्या मूर्तींचे नदी, तलाव येथे विसर्जन केल्याने जलप्रदूषण होते, हिंदु धर्मशास्त्रात स्त्रियांना पूजेचा अधिकार नाही इत्यादी कारणे पुढे करत हिंदूच धर्मपरंपरांचे उल्लंघन करत असल्याचे अनेक घटनांमधून दिसून येत आहे. धर्मपरंपरांचे उल्लंघन करणार्‍या हिंदूंसह चुकीच्या गोष्टींचे उदात्तीकरण करणारी माध्यमेही तितकीच उत्तरदायी आहेत; कारण त्यामुळेच या चुकीच्या कृतींचा वेगाने प्रसार होऊन अन्य हिंदूही त्याचे अनुकरण करत आहेत. एखादी कृती विशिष्ट पद्धतीने करण्याविषयी धर्मशास्त्रात काय सांगितले आहे, हे समजून न घेता पराचा कावळा करण्याच्या पद्धतीमुळे हिंदु धर्म अपकीर्त होत आहे, तसेच हिंदूंचा बुद्धीभेदही होत आहे. माध्यमांकडून उदात्तीकरण होत असलेल्या धर्मशास्त्राच्या विरोधात केल्या जाणार्‍या काही अयोग्य कृती आणि त्या संदर्भातील धर्मशास्त्रीय योग्य दृष्टीकोन प्रसिद्ध करत आहोत.
     राष्ट्रधर्म सर्वश्रेष्ठ राष्ट्रापेक्षा श्रेष्ठ काहीही नाही. जर भारताची एकता, अखंडता, धर्म आणि संस्कृती धोक्यात असेल, तर आपल्या सर्वस्वाचे बलीदान करून देश वाचवणे, हे प्रत्येक भारतियाचे आद्य कर्तव्य आहे. हाच सनातन धर्म आहे. - समर्थ रामदास स्वामी (अभय भारत, १५ मे ते १४ जून २०१०)

पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा निषेध करावा तेवढा थोडाच ! - सुनील घनवट, हिंदु जनजागृती समिती

     पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने कृत्रिम हौदातील गणेशमूर्ती ट्रकमध्ये भरून त्या खाणीत टाकणार्‍या, तसेच कृत्रिम हौदातील पाणी पुन्हा नदीतच सोडून भाविकांची घोर फसवणूक केली आहे. गणेशमूर्तींचे पावित्र्य न राखणार्‍या महानगरपालिकांचा निषेध करावा तेवढा थोडाच आहे. आता भाविकांनीच जागृत होऊन कृत्रिम हौदातील गणेशमूर्तींचे पुढे काय होते हे जाणून घेऊन गणेशमूर्ती विसर्जन धर्मशास्त्रानुसार वहात्या पाण्यातच करावे.
     श्री गणेशचतुर्थीच्या शुभेच्छा दैनिकांत विज्ञापने देऊन व्यक्त करणारे श्री गणेश आणि इतर देवता यांचे विडंबन होत असतांना कुठे असतात ?

हिंदी भाषेचा विश्‍वभरात होत असलेला प्रसार

      रशियातील मॉस्को आणि सेंट पीटर्सबर्ग येथे तेथील शासनाने एक हिंदी विश्‍वविद्यालय स्थापन केले आहे. संपूर्ण विश्‍वातील हिंदी शिकण्याच्या सर्वोत्तम सुविधा रशियामध्ये उपलब्ध आहेत. हिंदी संयुक्त राष्ट्रांच्या भाषांमध्ये सामील होण्याची दाट शक्यता आहे. विश्‍वातील ३३ देशांतील १२७ विश्‍वविद्यालये आज स्वेच्छेने हिंदी भाषेला जवळ करत आहेत. हिंदी भाषेतील शब्दसंख्या ७ लक्ष आहे. इंग्रजी भाषेत मात्र केवळ अडीच लाख शब्द आहेत. 
(साप्ताहिक हिन्दू सभा वार्ता, २६ नोव्हेंबर से २ डिसेंबर २०१४ ) तक्रारदारावरच आक्रमण करणारे गुंड पोलीस !

      कुर्ला (मुंंबई) येथील मसरानी गल्ली येथे फटाके वाजवण्यावरून २ गटांमध्येे वादावादी झाली. या प्रकरणी गार्‍हाणे (तक्रार) करण्यास गेलेले गुलाब विश्‍वकर्मा यांच्यावर पोलिसांनीच काही तरुणांच्या साहाय्याने आक्रमण केल्याचे उघडकीस आले. व्ही.बी. नगर पोलिसांनी या प्रकरणी ३ पोलिसांसह ५ जणांना अटक केली. आक्रमणकर्त्यांमध्ये काही पोलीसही होते, असा जबाब विश्‍वकर्मा यांनी दिल्यामुळे व्ही.बी. नगर पोलिसांनी सशस्त्र दलाचेे २ हवालदार आणि व्ही.बी. नगर पोलीस ठाण्याचे शेळके यांना अटक केली. (संदर्भ : दैनिक लोकसत्ता, ३१.१०.२०११) हिंदूंचे धर्मरक्षणाचे प्रयत्न अराष्ट्रीय नाहीत !

     स्वातंत्र्यपूर्व काळात हिंदुस्थान सरकारच्या मंत्रीमंडळात असलेल्या सर फजली हुसेन यांनी उत्तर हिंदुस्थानातील मुसलमानांत गुप्त पत्रक मोठ्या प्रमाणावर प्रसृत केले होते. त्यात म्हटले होते, सांभाळा ! या हिंदु-मुसलमानांच्या एकीच्या जाळ्यात सापडू नका ! आपणाला भिकारड्या हिंदूंशी एकी करून काय लाभ ? आपण इंग्रजांशी एकी करून आपला लाभ करून घेतला पाहिजे. त्यामुळेच हिंदु धर्म आणि संस्कृती यांच्या रक्षणाकरता हिंदुस्थानातील हिंदूंनी केलेले प्रयत्न हे जातीय आणि अराष्ट्रीय असूच शकत नाहीत.
(लोकजागर, वर्ष २ रे, अंक ४०, १२ एप्रिल २०१३)

पोलिसांच्या संदर्भातील कटू अनुभव !

     सध्या सनातनचे साधक आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते यांना पोलिसांच्या शारीरिक आणि मानसिक छळाला सामोरे जावे लागत आहे. या अनुषंगाने विविध ठिकाणच्या पोलिसांविषयी साधक, समितीचे कार्यकर्ते किंवा हिंदुत्वनिष्ठ यांना यापूर्वीही पोलिसांच्या सतावणुकीविषयी आलेले अनुभव येथे क्रमशः प्रसिद्ध करत आहोत.
मंदिराच्या बैलाची क्रूरपणे हत्या करणार्‍या हिंदुद्वेष्ट्यांना 
पकडण्याऐवजी प्रकरण मिटवू पहाणारे हिंदुद्रोही आणि कर्तव्यचुकार पोलीस !
     २७.१२.२०१३ या दिवशी कर्नाटकातील कोट्टायम् येथील कांज्ञीरापळ्ळी देवस्वम् मंडळाच्या श्री गणपति देवालयाच्या अंगणातच अज्ञातांनी मंदिराच्या गणेश नावाच्या बैलाचा गळा दोरीने आवळून त्याची क्रूरपणे हत्या केली. घटनेची माहिती मिळाल्यावर तेथे आलेल्या पोलिसांनी मृत बैलावर अंत्यसंस्कार करण्याचा प्रयत्न केल्यावर लोकांचा संताप अनावर झाला. भक्तांच्या मागणीमुळे फॉरेन्सिक तज्ञ, श्‍वानपथक घटनास्थळी आले आणि त्यांनी परीक्षण केले. त्या ठिकाणी एक लहान हिरवी मूठ असलेली तलवार सापडली.
चांगल्या पोलिसांविषयी अनुभव असल्यास वाचकांनी नजीकच्या दैनिक कार्यालयात पाठवावेत !

सद्गुरु पदावर असूनही सतत शिकण्याच्या वृत्तीत असणारे सद्गुरु (श्री.) सत्यवान कदम !

प्रत्येक विचार आणि कृती यांमध्ये सनातनचे संत हेच आदर्श !
सद्गुरु सत्यवान कदम
    ११.७.२०१६ या दिवशी मला सद्गुरु (श्री.) सत्यवानदादांशी भ्रमणभाषवर बोलण्याचे भाग्य लाभले. त्या वेळी आमच्यात पुढील संभाषण झाले.
मी : पू. दादा, साष्टांग नमस्कार.
सद्गुरु सत्यवानदादा : मला तुमचा दैनिकातील लेख वाचून पुष्कळ काही शिकायला मिळाले.
      सद्गुरु (श्री.) सत्यवानदादांचा केवळ आवाज ऐकूनच माझा भाव जागृत झाला. जेव्हा मी त्यांचे पूर्ण वाक्य ऐकले, तेव्हा मी प.पू. गुरुदेवांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त केली आणि प्रार्थना केली, प.पू. गुरुदेव, तुम्ही मलाही सतत शिकण्याच्या स्थितीत ठेवा. 
      शिकवण्याची वृत्ती, हा माझ्यातील पुष्कळ मोठा दोष आहे. मी नेहमी शिकवण्याच्या भूमिकेतच असतो. वरील प्रसंगात मला त्याची जाणीव झाली आणि मनात विचार आला, प्रत्येक विचार आणि कृती यांमध्ये सनातनचे संत हेच आदर्श आहेत. 
       प.पू. गुरुदेवांच्या कृपेनेच हा विचार आला. तो त्यांच्याच चरणी अर्पण करतो.
- श्री. वेंकटेश अय्यंगार, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३.७.२०१६) 

नैसर्गिक आपत्तीच्या वेळी मारुतिराय रक्षण करतील, असे सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांनी सांगणे आणि धर्मरथावर बसलेल्या दोन माकडांच्या रूपात मारुतिरायांनी दर्शन दिल्याची अनुभूती साधकांना येणे

सद्गुरु (कु.) स्वाती
खाडये
       कन्यागत महापर्वाच्या निमित्ताने नृसिंहवाडी येथे ग्रंथप्रदर्शन लावले होते. ज्या ठिकाणी ग्रंथप्रदर्शन लावण्यात आले होते, त्या ठिकाणी प्रदर्शनानजीक धर्मरथामध्येही प्रदर्शन लावण्यात आले होते. या धर्मरथावर सेवा करणार्‍या साधकांच्या मनात विचार आला की, आपण एवढा मोठा धर्मरथ घेऊन बर्‍याच ठिकाणी जातो. काही ठिकाणी पुलावरूनही प्रवास करावा लागतो. या पुलाच्या खालून नदी वहात असते. अशा वेळी महाड (जिल्हा रायगड) येथे पूल कोसळून घडलेली दुर्घटना आठवते आणि भीती वाटते. (२.८.२०१६ या दिवशी महाड येथील सावित्री नदीवरील पूल कोसळून त्यात दोन बसगाड्या आणि अन्य काही चारचाकी गाड्या वाहून गेल्या अन् त्यात ४० हून अधिक जण मृत्यूमुखी पडले होते ! - संकलक) त्या वेळी मी साधकांना सांगितले, कशाला घाबरायचे ? आपण जेव्हा पुलावरून प्रवास करत असू, तेव्हा मारुतिरायांनाच प्रार्थना करूया. तेच आपल्याला झेलतील आणि रक्षण करतील. त्याच दिवशी साधक धर्मरथ घेऊन एका पुलावरून दुसर्‍या गावात प्रदर्शन लावण्यासाठी गेले. धर्मरथ गावात थांबवल्यावर दोन माकडे धर्मरथाच्या छतावर येऊन बसली. थोड्या वेळाने आणखी माकडे आली. त्या वेळी एका साधकाने त्यांना खाऊ दिला. त्याच क्षणी माकड खायला जवळ आले आणि शांतपणे खाऊन काहीवेळ थांबून गेले. या माकडांच्या माध्यमातून प्रत्यक्षात मारुतिरायच दर्शन देऊन गेले, याची अनुभूतीच साधकांना आली. 
- (सद्गुरु) कु. स्वाती खाडये

भारतभरातील सर्व राज्यांत कर्नाटक राज्य घेत आहे गरुडभरारी !

१. कर्नाटकातील शेकडो साधक जीवन्मुक्त झाले ! 
सद्गुरु (सौ.) बिंदा
सिंगबाळ
      भाव तेथे देव या वचनानुसार भाव असणार्‍या साधकांवर भगवंत कृपेचा सदोदित वर्षाव करतच असतो. श्री गुरूंप्रती भोळा भाव आणि साधकांप्रती प्रेमभाव असणारे कर्नाटकातील साधक श्री गुरूंची कृपा संपादन करण्यासाठी धडपडत असल्याने भगवंतही त्यांची जलद आध्यात्मिक उन्नती करून घेत आहे.
     कर्नाटकातील २८५ हून अधिक साधकांनी ६० आणि त्याहून अधिक आध्यात्मिक पातळी गाठली आहे, तसेच ४ साधकांनी संतपद प्राप्त केले आहे. कर्नाटक राज्याचे वैशिष्ट्य म्हणजे साधकांनी जोडलेले समाजातील वाचक, हितचिंतक, तसेच धर्मप्रेमी यांच्यावरही भावाचे प्रतिबिंब पडत आहे. साधनेत नवीन असूनही त्यांच्यात मुळातच साधकत्व असल्याने त्यांना भेटल्यावर साधकांनाच भेटल्याचे अनुभवायला येते. त्यामुळेच २० हून अधिक वाचक, हितचिंतक आदींनी जन्म-मृत्यूचा फेरा ओलांडून सनातनची शिकवण किती अनमोल आहे, ते सिद्ध केले आहे.

श्‍वासात, ध्यासात, मनात । गुरुदेवा, केवळ तूच रहाशी प्रतिदिन ।

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले 
यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त...
हे गुरुराया......
तुझी कृपा हेच माझे अंतिम ध्येय ।
तुझे मन जिंकण्याचे प्रयत्न करणे, हीच माझी साधना ॥ १ ॥
तुझ्या चरणी लीन होणे, हीच शरणागती ।
तुझ्या कृपेची जाणीव अखंड ठेवणे, हीच कृतज्ञता ॥ २ ॥
तूच माझे सर्वस्व, हाच माझा ध्यास ।
तूच ईश्‍वर, हाच माझा भाव ॥ ३ ॥
देवा....

प्रतिवर्षी केवळ २ किंवा ३ फुले येणारे मोगर्‍याचे झाड पाहून ते उपयोगाचे नाही, असे वाटणे आणि गुरुपौर्णिमेच्या आधी कळ्यांनी बहरलेले झाड पाहून स्वतःविषयी चिंतन होणे

      मागील ३ - ४ वर्षांपासून आमच्याकडील मोगर्‍याच्या झाडाला प्रतिवर्षी केवळ २ किंवा ३ फुले येत असत; परंतु या वर्षी गुरुपौर्णिमेच्या आधी दोन दिवस मोगर्‍याचे संपूर्ण झाड कळ्यांनी बहरले होते आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशी त्याला ३ मोठी फुले आली. त्या झाडाकडे पहातच रहावे, असे वाटून पुष्कळ आनंद जाणवत होता. 
      आतापर्यंत या झाडाला पाने-फुले व्यवस्थित येत नसल्यामुळे हे झाड उपयोगाचे नाही, असे मला वाटायचे; पण या प्रसंगानंतर लक्षात आले की, माझेही स्वभावदोष तीव्र आहेत; परंतु गुरुदेव ते दूर करून एक दिवस मला त्यांच्या चरणांजवळ घेतील. त्यासाठी मला मात्र संयम ठेवून साधनेसाठी प्रयत्न करत रहायला हवेत. 
        गुरुदेव, तुमच्या चरणी अनंत कोटी कृतज्ञता !
- सौ. भारती बागवे, कॅनडा (२१.७.२०१६)

हसतमुख आणि समजूतदार असलेला ५१ टक्के आध्यात्मिक पातळीचा उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला विलेपार्ले, मुंबई येथील चि. नंदन विश्‍वजित दांडेकर (वय २ वर्षे) !

      भाद्रपद शुक्ल पक्ष त्रयोदशी (१४.९.२०१६) या दिवशी चि. नंदन विश्‍वजित दांडेकर याचा तिथीनुसार दुसरा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्याच्या आत्याला त्याची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये देत आहोत.
चि. नंदन याला वाढदिवसानिमित्त सनातन 
परिवाराच्या वतीने शुभाशीर्वाद !
१. चि. नंदनची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये
१ अ. नंदन हसतमुख असतो. त्याला भूक लागल्यावरच तो रडतो.

पंचकर्माच्या उपचारांसाठी चिपळूणला परशुराम रुग्णालयात गेल्यावर एका साधिकेने भाववृद्धीसाठी केलेले वैशिष्ट्यपूर्ण प्रयत्न !

सौ. विजया वेसणेकर
१. पंचकर्म उपचारांसाठी आपले नाव असल्याचे कळल्यावर हे शरिराचे पंचकर्म नसून मनाचे आहे, असे वाटून कृतज्ञता व्यक्त होणे : चिपळूण येथील परशुराम रुग्णालयात पंचकर्म उपचारांसाठी माझे नाव आहे, हे कळल्यावर माझी भगवंताप्रती (गुरुमाऊलींप्रती) कृतज्ञता व्यक्त झाली. तसेच माझ्याकडून देवा, हे माझ्या शरिराचे पंचकर्म नसून मनाचे आहे आणि ते करण्याची संधी तू मला दिली आहेस, असा माझा भाव राहू दे अन् तसा प्रयत्न करण्याचा दृढ निश्‍चयही तूच करवून घे, अशी प्रार्थना होत होती.
२. रुग्णालयात सनातनच्या साधकांना भेटल्यावर रामनाथी आश्रमात आल्याचे जाणवणे आणि भाव जागृत होणे : रुग्णालयात गेल्यावर तिथे उपचारांसाठी आलेले सनातनचे एक एक साधक मला भेटत होते. तेव्हा आपण रुग्णालयात आलो नसून सनातनच्या रामनाथी आश्रमात आहोत, असे वाटून माझा भाव जागृत झाला.

देवा, कशी होऊ उतराई ?

कशी होऊ उतराई । देवा, तूच दिले सर्वकाही ॥ १ ॥
या स्वभावदोषांमुळे केले काही ।
त्याने निघाले मन डबघाईस ॥ २ ॥
धाव धाव रे देवा । काढ या चक्रातून बाहेर ॥ ३ ॥
लाव नाव पैलतिरी । करण्या भवसागर पार ॥ ४ ॥
होऊ दे गंधयुक्त । तुझ्या गुणांनी ।
तूच अर्पून घे । या फुलांना तुझ्या चरणी ॥ ५ ॥
- सौ. सुप्रिया पाटील, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३०.८.२०१६)

धर्माभिमानी आणि इतरांनीही साधना करावी, अशी तळमळ असणारा ५३ टक्के आध्यात्मिक पातळीचा उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला कु. पार्थ पाटील (वय ७ वर्षे) !

कु. पार्थ पाटील
     भाद्रपद शुक्ल पक्ष द्वादशी (१४.९.२०१६) या दिवशी कु. पार्थ पाटील याचा तिथीनुसार वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्याच्या आईला त्याची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये देत आहोत.
कु. पार्थ पाटील याला वाढदिवसाप्रीत्यर्थ सनातन 
परिवाराच्या वतीने शुभाशीर्वाद !
१. समंजस
      मला पार्थशी जुळवून घ्यायला प्रयत्न करावे लागतात. माझी त्याच्यावर सतत चिडचिड होते. मी कधी कधी त्याला ओरडते; पण तो कधीही गार्‍हाणे करत नाही. पार्थला ओरडले, तरी तो तेवढ्याच प्रेमाने माझ्याजवळ येतो. त्याला मी तुझ्यामुळे माझा वेळ जातो. तुझ्यामुळे मला त्रास होतो, असे म्हटले, तरी त्याला कधीच निराशा येत नाही.

प.पू. गुरुदेव साक्षात् श्रीमत् नारायण आहेत, याची साधिकेने घेतलेली अनुभूती !

कु. सोनम फणसेकर
         कु. सोनम फणसेकर यांचा भाद्रपद शुक्ल पक्ष त्रयोदशी (१४ सप्टेंबर २०१६) या दिवशी तिथीनुसार वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांना आलेली अनुभूती आणि कु. रूपाली कुलकर्णी यांना जाणवलेली त्यांची वैशिष्ट्ये येथे देत आहोत.
सनातन परिवाराच्या वतीने कु. सोनम
फणसेकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
१. मनात नकारात्मक विचार येत असतांना प.पू. गुरुदेवांना आत्मनिवेदन केल्यावर एका संतांच्या खोलीबाहेर ठेवलेल्या तुपाच्या दिव्यांकडे लक्ष ठेवण्याची सेवा मिळणे आणि आनंद होऊन प.पू. गुरुदेवांनी जवळ घेतले, या विचाराने रडू येणे : २९.८.२०१६ या दिवशी सायंकाळी माझ्या मनात नकारात्मक विचार येत होते. मी अस्वस्थ मनाने परात्पर गुरुदेवांना आत्मनिवेदन केले, हे गुरुदेवा, माझ्या मनातील नकारात्मक विचार तुम्हीच नष्ट करा. मला या विचारांचा त्रास होत आहे. मला आनंद हवा आहे. तुम्हीच मला आनंद द्या. मला तुमचे अस्तित्व अनुभवायचे आहे. मला तुमचीच ओढ लागू दे. तुमच्या भक्तीत मला रमता येऊ दे. त्यानंतर मी एका सेवेसाठी गेले. तेव्हा एका साधकाने मला सांगितले, एका संतांच्या खोलीबाहेर दाराला लागून महर्षींनी सांगितल्याप्रमाणे तुपाचे दोन दिवे लावले आहेत. तू प्रत्येकी एक घंट्याने दिवा तेवत आहे ना ? दिव्यात तूप आहे ना ?, ते बघ. हे ऐकून मला पुष्कळ आनंद झाला आणि प.पू. गुरुदेवांनी मला जवळ घेतले, या विचाराने रडूही आले.

देवाप्रती भोळा भाव असणारी आणि देवाशी बोलण्यातील आनंद घेणारी कु. सोनम फणसेकर !

        ३.९.२०१६ या दिवशी मी आणि कु. सोनम फणसेकर एका आजारी साधिकेसाठी उकड (तांदुळाच्या पिठाचा एक पदार्थ) बनवत होतो. सोनम हा पदार्थ प्रथमच करत असल्याने तिला थोडा ताण आला होता. मी तिला शेजारी उभी राहून सांगत होते. त्या वेळी ती उत्साहाने ही सेवा करत होती. तिने मला सांगितले, आपण कृष्णासाठी करत आहोत, असा भाव ठेवूया. तिने भावपूर्ण प्रार्थना केली. माझ्याकडून उकडीत साखर अधिक घातली गेली. त्या वेळी सोनम म्हणाली, आता त्या साधिकेला आवडेल का ? त्यावर मी म्हणाले, तू आधीच त्यांना रूपालीकडून अधिक साखर घातली गेली आहे. अजून काही सुधारणा असेल, तर सांगा. पुढच्या वेळी तसे करून देईन, असे सांग.
        तिने तसे त्या आजारी साधिकेला सांगितले. थोड्या वेळाने त्या आजारी साधिकेने दूरभाष करून उकड चांगली झाली असल्याचे सांगितले. ते ऐकल्यावर सोनम म्हणाली, उकड झाल्यावर मी ती श्रीकृष्णाला भरवली. तेव्हा श्रीकृष्ण म्हणाला, उकड चांगली झाली. श्रीकृष्णाने आधी उकड खाल्ल्याने साधिकेला ती चांगली लागली.
        सोनमचा भोळा भाव आहे. ती देवाशी बोलते आणि त्यातून आनंदही घेते. तिच्या सहवासात चांगले वाटते.
- कु. रूपाली कुलकर्णी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (५.९.२०१६)

पणजी, गोवा येथील सनातनच्या साधिका आधुनिक वैद्या (सौ.) मंगला प्रभाकर वेरेकर यांचे निधन

     पणजी, गोवा येथील सनातनच्या साधिका आधुनिक वैद्या (सौ.) मंगला प्रभाकर वेरेकर (वय ७२ वर्षे) यांचे १२ सप्टेंबर २०१६ या दिवशी निधन झाले. त्यांच्या पश्‍चात साधक पती श्री. प्रभाकर (भाई) वेरेकर, मुलगा श्री. संदीप वेरेकर, सून सौ. सोनाली वेरेकर, कन्या सौ. शिल्पा राजीव कुडतरकर, जावई श्री. राजीव कुडतरकर आणि नातवंडे असा परिवार आहे. त्यांची कन्या सौ. शिल्पा कुडतरकर याही सनातनच्या मार्गदर्शनाखाली साधना करत आहेत. वर्ष २०१५ मध्ये आधुनिक वैद्या (सौ.) मंगला वेरेकर यांची आध्यात्मिक पातळी ६३ टक्के होती. तसेच श्री. प्रभाकर वेरेकर यांची पातळी ६२ टक्के आणि सौ. शिल्पा कुडतरकर यांची पातळी ६५ टक्के आहे. आधुनिक वैद्या (सौ.) मंगला प्रभाकर वेरेकर या बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयातील पॅथोलॉजी विभागाच्या प्रमुख म्हणून निवृत्त झाल्या होत्या. सनातन परिवार वेरेकर आणि कुडतरकर कुटुंबियांच्या दु:खात सहभागी आहे.

तळमळीने सेवा करणार्‍या आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असलेल्या आधुनिक वैद्या (सौ.) मंगला वेरेकर !

आधुनिक वैद्या 
सौ. मंगला वेरेकर
     आधुनिक वैद्या (सौ.) मंगला प्रभाकर वेरेकर या गोव्यातील वैद्यकीय महाविद्यालयात प्राध्यापक होत्या. तेथून निवृत्ती घेऊन त्यांनी पूर्णवेळ साधनेला आरंभ केला. त्या अतिशय हुशार, वैद्यकीय शिक्षणात प्रथम आलेल्या आणि नावाजलेल्या असल्याने त्यांच्या शब्दाला वैद्यकीय महाविद्यालयात मान होता. त्यांना सर्व वेरेकर मॅडम या नावाने हाक मारत असत. त्यांचे मराठी चांगले असल्याने त्यांनी अनेक वर्षे दैनिक सनातन प्रभातसाठी वृत्त संकलनाची सेवा केली. सनातन प्रभातची सेवा करणारे श्री. भूषण केरकर यांना त्यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये आज येथे पाहूया. ही गुणवैशिष्ट्ये सौ. मंगला वेरेकर यांचे निधन होण्यापूर्वी लिहिलेली आहेत.
१. गावातील एका मंदिराच्या अस्वच्छतेविषयी जाणीव करून देणे
     सौ. वेरेकर यांच्याशी ख्रिस्ताब्द १९९७ मध्ये प्रथम संपर्क आला. त्या वेळी सौ. वेरेकर, त्यांचे पती श्री. प्रभाकर (भाई) वेरेकर आणि अन्य कुटुंबिय देवदर्शनासाठी आमच्या गावी (रेडी, जिल्हा सिंधुदुर्ग) येथे आले होते. तेव्हा त्यांनी आणलेल्या वाहनावर सनातन संस्थेचे नाव पाहून मी त्यांची भेट घेतली. त्या वेळी सौ. वेरेकर यांनी गावातील एका मंदिराच्या अस्वच्छतेविषयी मला जाणीव करून दिली. त्यानंतर दुसर्‍या दिवशी मी सत्संगात येणार्‍या साधकांना एकत्र करून मंदिराची स्वच्छता केली. सौ. वेरेकर यांच्यातील तळमळीपोटीच देवाने सर्व करवून घेतले. या एका प्रसंगानंतर त्यांच्याशी जवळीक वाढली. नंतर सौ. वेरेकर यांची ज्या ज्या वेळी भेट होत असे, त्या वेळी त्या या प्रसंगाचा आवर्जून उल्लेख करत. कोणतीही सेवा चांगली आणि परिपूर्ण करण्याची त्यांची तळमळ असते.

सौ. मंगला वेरेकर यांनी केलेल्या काही कविता

साधकांचे आवडते प.पूू. डॉक्टर !
उंच, गोरेपान अन् शांत प्रवृत्तीचे ।
धीरोदात्त अन् आवडते साधकांचे ॥ १ ॥
साधकांना चुका सांगणारे ।
सर्वांसाठी अखंड तळमळणारे ॥ २ ॥
चुकलो आम्ही तरी न रागावणारे ।
सर्वांवर सारखेच प्रेम करणारे ॥ ३ ॥
असे आमचे प.पूू. डॉ. आठवले ।
प.पू. डॉक्टर आठवले असे दिसतात !
जणू सूर्याचे सहस्र नेत्र । सुवर्णापरी असे त्यांचे वस्त्र ॥
असेच दिसती प.पू. डॉक्टर । सज्जनांनाही असती सुखकर ॥
- आधुनिक वैद्या (डॉ.) सौ. मंगला वेरेकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

ब्राह्मतेज प्रदान करणार्‍या सेवेत सहभागी होण्याची सर्वत्रच्या पुरोहितांना सुवर्णसंधी !

योग्य दक्षिणा घेऊन किंवा दक्षिणा न घेता 
शास्त्रोक्त पद्धतीने धार्मिक विधी करण्यास इच्छुक 
पुरोहितांनी पौरोहित्याच्या सेवेत सहभागी व्हावे !
१. यज्ञ हे एक वरदानच !
        श्रीमद् भगवद्गीतेत श्रीकृष्णाने यज्ञाला कामधेनू म्हटले आहे. पुरोहितांनी एकाग्रतेने केलेल्या शास्त्रोक्त मंत्रपठणामुळे वायूमंडलाची शुद्धी तर होतेच; पण व्यक्ती, समाज आणि राष्ट्र या सर्वांनाही त्या मंत्रशक्तीचा लाभ होतो. अवर्षणादी नैसर्गिक प्रकोपांना रोखून पर्जन्यवृष्टी करण्याचे सामर्थ्य यज्ञयागात आहे. यज्ञ हे भारतीय संस्कृतीला लाभलेेले फार मोठे वरदानच आहे.
२. सनातन साधक-पुरोहित 
पाठशाळेच्या स्थापनेचा व्यापक उद्देश !
        यज्ञसाधनेचे अनन्यसाधारण महत्त्व लक्षात घेऊन सनातन संस्थेने वर्ष २००९ मध्ये सनातन साधक-पुरोहित पाठशाळेची स्थापना केली. विविध विधींच्या माध्यमातून समाजाला साधनेकडे वळवणे आणि आदर्श अन् सात्त्विक पुरोहितांना घडवून त्यांची संतपदाकडे वाटचाल करून घेणे, हा या स्थापनेमागील उद्देश होता.

पौरोहित्याचे शिक्षण घेण्यास इच्छुक साधकांना सूचना आणि वाचक, हितचिंतक अन् धर्मप्रेमी यांना नम्र विनंती !

शास्त्रशुद्ध पद्धतीने पौरोहित्य करण्यासह 
आध्यात्मिक प्रगतीसाठी मार्गदर्शन करणार्‍या सनातन 
साधक-पुरोहित पाठशाळेत पूर्णवेळ प्रवेश घेण्यासाठी संपर्क करावा !
१. साधना म्हणून वेदाध्ययन करण्यास 
शिकवणारी सनातनची वेदपाठशाळा !
        धर्माचरणी समाज घडवण्यासाठी सनातन संस्थेने आरंभलेला शुद्धीयज्ञ म्हणजे सनातन साधक-पुरोहित पाठशाळा ! बहुमूल्य सांस्कृतिक ठेवा असणारे वेदशिक्षण घेता घेता पुरोहितांची सर्वांगीण आध्यात्मिक उन्नतीही व्हावी, यासाठी या पाठशाळेत प्रामुख्याने प्रयत्न केले जातात. अर्थार्जनासाठी नव्हे, तर साधना म्हणून शास्त्रशुद्ध पद्धतीने पौरोहित्य करण्यास शिकवणारी ही एकमेव पाठशाळा आहे.
२. साधक-पुरोहितांमधील मंत्रसामर्थ्य आणि साधनेचे 
बळ यांमुळे विधीनंतर यजमानांची उद्देशपूर्ती होणे
        प.पू. डॉक्टरांचा वेदपाठशाळेच्या स्थापनेमागील संकल्प फलद्रूप होण्यासाठी सर्व साधक-पुरोहित निष्काम भावाने आणि सेवाभावी वृत्तीने विधी अन् अनुष्ठाने करत आहेत. साधना बळामुळे त्यांनी केलेल्या धार्मिक विधींनंतर त्यामागील उद्देश सफल होत असल्याची अनुभूतीही आतापर्यंत अनेकांनी घेतलेली आहे. विधीनंतर उद्देशपूर्ती होणे, ही साधक-पुरोहितांनी भावपूर्णरित्या केलेल्या पौरोहित्य कर्माची पोचपावतीच आहे !

साधकांना सूचना !

       सनातनच्या सात्त्विक उत्पादनांमध्ये गळ्यात देवतेचे पदक घालण्यासाठी किंवा हाताला अन् पायाला बांधण्याचा लाल धागा उपलब्ध असतो. १४ ऑगस्ट २०१६ या दिवशीच्या दैनिक सनातन प्रभातमध्ये पृष्ठ ९ वर आध्यात्मिक उपाय म्हणून हाताला (किंवा पायाला) बांधायचा धागा कुठून आणला किंवा तो कुणी दिला ? यानुसार तो हाताला (किंवा पायाला) बांधण्याचा कालावधी या मथळ्याखाली चौकट प्रसिद्ध झाली आहे. त्यानुसार सनातनच्या वितरण कक्षांवर वितरित केला जाणारा लाल धागा मंदिरातून आणलेल्या धाग्याप्रमाणे ८ दिवस बांधावा. त्यानंतर तो विसर्जन करून त्याच दिवशी प्रसिद्ध झालेल्या हाता-पायांना दोरा बांधण्याची पद्धत या सूचनेतील सूत्रांनुसार दुसरा धागा बांधावा.
- पू. डॉ. मुकुल गाडगीळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

साधकांना सूचना

पौर्णिमा आणि अमावास्या या तिथींना प्रार्थना, नामजप, तसेच साधना अधिकाधिक करा.
प्रारंभ - भाद्रपद शुक्ल पक्ष चतुर्दशी (१५.९.२०१६) उ.रात्री ३.१६ वाजता
समाप्ती - भाद्रपद पौर्णिमा (१६.९.२०१६) उ.रात्री १२.३५ वाजता
दोन दिवसांनी पौर्णिमा आहे.
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥

या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो. - प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

बोधचित्र

॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज
सनातनचे श्रद्धास्थान
ईश्‍वरालाच जिंकणे
विषयांपेक्षा विषयांच्या निर्मात्यालाच का जिंकू नये ?
भावार्थ : एकेक विषय जिंकत जायचे म्हटले तर वासना, आवडी-निवडी, स्वभावातील दोष, असे लाखो विषय जिंकायला, म्हणजे त्यांच्यावर नियंत्रण मिळवायला लाखो जन्म लागतील. त्यापेक्षा त्या सर्वांच्या निर्मात्यालाच भक्तीने या जन्मात जिंकले, तर त्या सर्वांवर या जन्मातच नियंत्रण मिळविता येईल; म्हणूनच म्हटले आहे, एक साधै सब साधै । सब साधै सब जाय ॥ म्हणजे एका नामाला, भगवंताला (नाम आणि भगवंत एकच आहेत.) साध्य केले म्हणजे सर्वच साध्य होते. सर्व साध्य करायला गेलो, तर काहीच साध्य होत नाही.
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.)

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

    
परात्पर गुरु डॉ. आठवले
कुठे आरक्षण मागणारे आणि स्वतंत्र विदर्भ मागणारे विदर्भवादी, तर कुठे कोणत्याही प्रसंगी एक होणारे जगभरचे मुसलमान ! - (परात्पर गुरु) डॉ. आठवले

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

नेहमी सत्संगात रहावे
व्यक्तीचा मित्रपरिवार कसा आहे, यावरून त्याची ओळख ठरते; म्हणूनच आपल्याभोवती 
सात्त्विक वृत्तीच्या व्यक्तींचा वावर असेल, याची दक्षता कटाक्षाने घ्यावी. 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)


(परात्पर गुरु) डॉ. आठवले यांच्या शिकवणीमुळे प्रतिकूल परिस्थितीतही संयत मार्गापासून तसूभरही न ढळणारी सनातन संस्था !

१. धर्मद्रोही आणि नास्तिक मंडळी करत असलेल्या टीकेच्या निषेधासाठी हिंसेद्वारे नव्हे, तर सनदशीर मार्ग अवलंबणारी सनातन संस्था ! : राजकीय पक्षाचा प्रमुख नेता एखाद्या प्रकरणात अडकल्यास त्या पक्षातील कार्यकर्त्यांचा भावनिक उद्रेक होतो. मग ते जिकडे तिकडे तोडफोड आणि जाळपोळ करण्यास प्रारंभ करतात. तसे करण्यासाठी संबंधित नेत्याची कार्यकर्त्यांना फूस असते. आतापर्यंत सनातन संस्थेवर धर्मद्रोही आणि नास्तिक मंडळींनी टीकेद्वारे बरीच चिखलफेक केली; परंतु सनातन संस्थेच्या साधकांचा भावनिक उद्रेक झाला आणि त्यांनी टीका करणार्‍यांना झोडपले, अशी बातमी कधीच वाचनात येत नाही; कारण सनातनचा मार्ग हिंसेचा नसून प्रबोधनाद्वारे कार्य करण्याचा आहे.

कावेरीचे पेटलेले पाणी !

संपादकीय 
      कावेरी नदीतून तमिळनाडूसाठी पाणी सोडण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने कर्नाटक शासनाला दिले. त्याचे तीव्र पडसाद कर्नाटकात उमटत आहेत. १३ सप्टेंबरला या उद्रेकाचे जाळपोळीत रूपांतर झाले आणि बेंगळुरूमध्ये १४४ कलम लावावे लागले आहे. स्वातंत्र्यानंतर काँग्रेसच्या कार्यकाळात महाराष्ट्र-कर्नाटक सीमा वाद, काश्मीर प्रश्‍न हे जसे न सुटलेले जटील प्रश्‍न बनले आहेत, तशाच प्रकारे कर्नाटक-तामिळनाडू राज्यातील कावेरी पाणी तंटाहाही सध्या न सुटलेला प्रश्‍न आहे.

अ‍ॅट्रॉसिटी कायदा आणि मराठा समाज !

संपादकीय
      कोपर्डी बलात्कार घटनेनंतर देहलीप्रमाणे महाराष्ट्रातील वातावरणही ढवळून निघाले आहे. विशेषकरून मराठा समाजाचे कोणत्याही राजकीय नेतृत्वाशिवाय जवळपास प्रत्येक जिल्ह्यात लक्षावधींच्या संख्येने मराठा क्रांती मूक मोर्चे निघत आहेत. आजपर्यंत ज्या समाजाला काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आपली मतपेढी समजत होते, त्या समाजाचा संघटित आविष्कार पाहून दोन्ही काँग्रेसचे धाबे दणाणले आहेत. हातातून गेलेली सत्ता या निमित्ताने परत मिळावी यासाठी दोन्ही काँग्रेसने या मोर्च्यांच्या निमित्ताने प्रयत्न चालू आहेत. आजपर्यंत जातीय राजकारण करणार्‍या शरद पवार यांनी अ‍ॅट्रॉसिटी कायदा तपासून बघण्याची आवश्यकता आहे, असे तोंड उघडले आहे. अर्थात् शरद पवार यांच्या पोटात एक आणि ओठात दुसरेच असते, एवढे समजायला महाराष्ट्रातील जनता दूधखुळी नक्कीच नाही.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn