Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

आज वामन जयंती

विनम्र अभिवादन !

क्रांतीकारक जतींद्रनाथ दास यांचा आज स्मृतीदिन

(म्हणे) डॉ. दाभोलकर यांची हत्या तसेच विविध ठिकाणचे स्फोट यांत सनातन संस्थेचा हात असल्याचे सिद्ध !

दैनिक लोकसत्तामधून अंनिसचे डॉ. हमीद दाभोलकर यांचा खोटारडेपणा !
 • कोणतीही शहानिशा न करता दैनिक लोकसत्ताने खोटे वृत्त प्रसिद्ध केले !
 • (म्हणे) डॉ. झाकीर नाईक आणि आठवले हे एकाच माळेचे मणी !
     मुंबई - चिथावणीखोर भाषणे किंवा हिंसाचाराला उद्युक्त केल्यामुळे झाकीर नाईक यांची सध्या चौकशी करण्यात येत आहे. त्याच धर्तीवर बॉम्बस्फोट किंवा हत्या यांमध्ये सनातन संस्थेचा सहभाग असल्याचे सिद्ध झाल्याने या संस्थेचे प्रमुख डॉ. जयंत आठवले यांची सखोल चौकशी करावी, अशी मागणी अंनिसचे डॉ. हमीद दाभोलकर यांनी राज्यसरकारकडे केली आहे. (धादांत खोटे वक्तव्य करणारे डॉ. हमीद दाभोलकर ! कोणत्याही हत्येत किंवा बॉम्बस्फोटात सनातनचा सहभाग असल्याचे कुठेही उघड झालेले नाही. सनातन संस्थेच्या विरोधात कोणत्याही पोलीस ठाण्यात साधा गुन्हाही नोंद नाही. - संपादक) त्यांनी पुढे म्हटले आहे की, आठवले यांचे व्यक्तिमत्त्व गूढ असल्याचा आक्षेप अनेक संस्थांनी यापूर्वीच घेतला आहे. डॉ. झाकीर नाईक आणि आठवले हे एकाच माळेचे मणी आहेत. (परात्पर गुरु आणि आतंकवादी यांना एका तराजूत तोलणारे डॉ. हमीद दाभोलकर यांच्या विवेकबुद्धीची कीव करावी तेवढी थोडीच आहे ! - संपादक)

सनातनच्या आश्रमात जाऊन घातला तसा धुडगूस घालण्याचे धैर्य पोलीस डॉ. झाकीर यांच्या संदर्भात दाखवत नाहीत ! - शिवसेना

     मुंबई - कोणीही उठतो आणि हिंदु संस्था, संघटना यांना गुन्हेगार ठरवतो आणि त्याबरहुकूम आमची सरकारे या संघटनांना चिरडून टाकतात. डॉ. झाकीर नाईकसारख्या लोकांना बळ मिळते, ते याच प्रवृत्तीमुळे ! डॉ. झाकीर यांनी आता आपल्यावरील कारवाई म्हणजे तमाम मुसलमानांवरच आक्रमण ठरेल, असे बजावून पोलिसांनाच धमकावले आहे. हिंदुत्ववादाचा पराभव करून येथे संपूर्ण इस्लामचे राज्य निर्माण करणे, त्यासाठी आतंकवादापासून धर्मांतरापर्यंत सर्व हातखंडे वापरायचे, हेच त्यांचे धोरण आहे आणि त्यांच्यावर कारवाई केली, तर ती समस्त इस्लाम आणि मुसलमानांवरील कारवाई ठरते. त्यामुळे ज्या बेगुमान पद्धतीने मुंबई आणि महाराष्ट्रात आतंकवादविरोधी पथके सनातनच्या आश्रमात जाऊन हैदोस आणि धुडगूस घालतात, ती हिंमत डॉ. झाकीरच्या संदर्भात दाखवत नाहीत. हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांसमोर डरकाळ्या फोडणारे इस्लामी संस्था, संघटनांपुढे मांजरीच्या पिलांसारखे गप्प बसतात. डॉ. झाकीर अरब राष्ट्रात बसून आपल्या पोलीस यंत्रणेला धमक्या देत आहेत आणि तेच पोलीस अन् तपास पथके सनातनआश्रमात जाऊन मर्दानगी गाजवत आहेत, असे शांतीदूताची धमकी ! या १२ ऑगस्टच्या सामनाच्या संपादकीयमध्ये म्हटले आहे.
     यात पुढे म्हटले आहे की, डॉ. झाकीरच्या बाजूने देशातील अनेक मुसलमान पुढारी, त्यांचे राजकीय पक्ष उभे राहिले.

डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांना आता स्वतंत्र कोठडी !

उच्च रक्तदाबाच्या त्रासामुळे डॉ. तावडे यांची वैद्यकीय पडताळणी !
कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरण !
     कोल्हापूर - कॉ. पानसरे हत्या प्रकरणातील संशयित आरोपी आणि सनातनचे साधक डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांना राजारामपुरी पोलीस ठाण्यातील स्वतंत्र कोठडीत ठेवण्यात आले आहे. ११ सप्टेंबर या दिवशी डॉ. तावडे यांच्या सोबत कोठडीत असलेल्या इतर गुन्ह्यांतील संशयित आरोपींना करवीर आणि लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यांतील पोलीस कोठडीत हालवण्यात आले आहे. डॉ. तावडे यांच्या जीवितास कोणताही धोका निर्माण होणार नाही, याची काळजी पोलिसांकडून घेतली जात आहे.
     राजारामपुरी पोलीस ठाण्यातील पोलीस कोठडीमध्ये असुरक्षिततेचे वातावरण आहे. या कोठडीत ठेवण्यात आलेल्या अन्य गुन्ह्यांतील सराईत गुन्हेगारांकडून कोणत्याही क्षणी आपणावर वाईट प्रसंग बेतला जाऊ शकतो, अशी भीती व्यक्त करत पोलीस ठाण्यातील पोलीस कोठडीऐवजी अन्यत्र कोठेही हालवण्यात यावे, अशी मागणी डॉ. तावडे यांनी त्यांचे अधिवक्ता श्री. समीर पटवर्धन यांच्याकडे १० सप्टेंबर या दिवशी केली होती.
     या संदर्भातील वृत्त विविध वर्तमानपत्रांतून प्रसिद्ध झाल्यानंतर याची नोंद घेत राजारामपुरी पोलिसांनी डॉ. तावडे यांना स्वतंत्र कोठडीत ठेवले आहे.

हिंदूंनी स्वतःकडे आणि अन्य धर्मांकडे त्यांनी दिलेल्या डोळ्यांनी नव्हे, तर आपल्या स्वतःच्या डोळ्यांनी पहायला शिकायला हवे !- कै. राम स्वरूप गर्ग


राष्ट्रद्रोही आणि हिंदुद्रोही घटनांचा निषेध संयत मार्गाने करा !

   हिंदुद्रोह्यांचा निषेध करण्यामागचा मुख्य उद्देश त्यांचे वैचारिक परिवर्तन करणे, हा आहे. त्यामुळे कोणाचाही निषेध करतांना तात्त्विक सूत्रांच्या आधारे वैचारिक स्तरावर करा ! चुकणार्‍या व्यक्तीला तिच्या चुका सांगून योग्य मार्गावर आणणे, हा व्यापक दृष्टीकोन निषेध व्यक्त करण्यामागे हवा !

(म्हणे) इसिसप्रमाणेच सनातन संस्था घातक !

आदर्श घोटाळ्यातील आरोपी अन् काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण
यांच्याकडून इसिस आणि सनातन यांची तुलना !
     सनातन इसिसप्रमाणे आतंकवादी असती, तर अशोक चव्हाण असे वक्तव्य तरी करू शकले असते का ? एवढ्या उघडपणे ते सनातनच्या विरोधात गरळओक करू शकतात, यातूनच सनातन इसिसप्रमाणे घातक नाही, हे सिद्ध होते !
       परभणी - देशात इसिस या आतंकवादी संघटनेप्रमाणेच सनातन संस्था घातक आहे. ही काँग्रेसची भूमिका असून सनातन संस्थेवर बंदी घातली पाहिजे, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी केली. परभणी येथे पत्रकारांशी बोलतांना त्यांनी वरील वक्तव्य केले. (काँग्रेसने देशासाठी केलेल्या अनन्वित राष्ट्रद्रोहाचा हिशोब केला, तर काँग्रेसवर १०० वेळा बंदी घातली तरी ती अल्पच ठरेल ! - संपादक)

बकरी ईदला पशूंच्या कुर्बानीनंतर हिंदूंची कुर्बानी देऊ ! - बंगालमधील धर्मांधांची हिंदूंना चेतावणी

 • बंगाल भारतात आहे कि पाकिस्तानमध्ये ?
 • बलुचिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरयेथील लोकांच्या सुरक्षेसाठी प्रयत्न करणार्‍या सरकारने बंगालमधील हिंदूंच्या सुरक्षेकडेही लक्ष द्यावे !
 • हिंदूंना तालिबानी ठरवणारे पुरो(अधो)गामी आता कुठे आहेत ?
 • कुठे आहेत प्रसारमाध्यमे ?
     रामचंद्रपूर (दक्षिण २४ परगणा जिल्हा, बंगाल) - पशूंचा व्यापार करणार्‍या रौफ लासकर नावाच्या धर्मांधाची व्यावसायिक वैरातून ४ सप्टेंबर या दिवशी हत्या झाली होती. धर्मांधांनी या हत्येचा आरोप येथील हिंदूंवर ठेवला आहे. धर्मांधांनी रामचंद्रपूर, बेनेपारा, मंदिरताला, निश्‍चिंतपूर आणि जुमाई लासकर बाजार येथील हिंदूंवर अनन्वित अत्याचार केले. तसेच रामचंद्रपूर येथील पोलीस ठाण्याला आग लावून भस्मसात केले. त्यात पोलीस ठाण्यातील सर्व कागदपत्रे जळून खाक झाली आणि पोलिसांना पळ काढावा लागला. तसेच १३ सप्टेंबर या दिवशी होणार्‍या बकरी ईदला पशूंच्या कुर्बानीनंतर हिंदूंची कुर्बानी देऊ, अशी चेतावणी धर्मांधांनी दिली आहे.
     धर्मांधांनी रामचन्द्रपूर येथील हिंदूंच्या दुकानांवर आक्रमण करून त्यांना ते बंद करण्यास भाग पाडलेे. धर्मांधांच्या धमकीला घाबरून अनेक हिंदूंनी गाव सोडून इतरत्र सुरक्षित ठिकाणी स्थलांतर केले आहे.

इस्लाममधील धर्मांधतेला पराजित करणे आमचे लक्ष्य ! - डोनाल्ड ट्रम्प

 • गेली ३ दशके जिहादी आतंकवाद भारतात धुमाकूळ घालत असतांना भारतातील एकाही राजकारण्याचे असे बोलण्याचे धाडस झालेले नाही; त्यामुळे देशातील आतंकवाद नष्ट होणे दूरच राहिले !
 • डोनाल्ड ट्रम्प हिंदु आणि हिंदुत्वनिष्ठ नसतांनाही देशाच्या सुरक्षेसाठी निर्भयतेने स्वतःच्या धोरणांविषयी बोलतात, याचा विचार भारतातील ढोंगी निधर्मीवादी करतील का ?
      वॉशिंग्टन - इस्लाममधील धर्मांधता अमेरिकेच्या सुरक्षेवर घोंघावणारे सर्वांत मोठे संकट बनले आहे. याला पराजित करणे हेच आपले लक्ष्य असले पाहिजे, असे प्रतिपादन अमेरिकेच्या राष्ट्रपतीपदाचे रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी येथे केले. ट्रम्प पुढे म्हणाले की, ज्याप्रमाणे सर्व सहमतीद्वारे आपण शीतयुद्ध जिंकले होते, तसेच इस्लामी आतंकवादाला संपवण्यासाठी करावे लागेल.
     ट्रम्प यांनी हेही स्पष्ट केले की, इस्लामिक स्टेट मध्य-पूर्वेत ख्रिस्त्यांचा नरसंहार करत आहे. माझे सरकार आल्यावर ख्रिस्त्यांचे संरक्षण केले जाईल, त्यांना सुरक्षा दिली जाईल. (अमेरिका ख्रिस्तीबहुल आहे आणि तेथील राष्ट्रपतीपदाचा उमेदवार ख्रिस्त्यांच्या संरक्षणाविषयी जाहीरपणे वाच्यता करतो; मात्र भारत हिंदूबहुल असतांनाही हिंदूंच्या सुरक्षेसाठी आणि संरक्षणासाठी शिवसेना वगळता अन्य एकाही राजकीय पक्षाचा नेता असे बोलण्याचे धाडस करत नाही ! - संपादक)

पोलिसांच्या संदर्भातील कटू अनुभव !

     सध्या सनातनचे साधक आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते यांना पोलिसांच्या शारीरिक आणि मानसिक छळाला सामोरे जावे लागत आहे. या अनुषंगाने विविध ठिकाणच्या पोलिसांविषयी सनातनचे साधक, हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते किंवा हिंदुत्वनिष्ठ यांना यापूर्वीही पोलिसांच्या सतावणुकीविषयी आलेले अनुभव येथे आजपासून क्रमशः प्रसिद्ध करत आहोत.
पोलीस निरीक्षकाने शिवसेनेच्या शाखाप्रमुखाला हिंदु जनजागृती समितीपासून 
दूर रहाण्यास सांगणे आणि नंतर त्यांच्यावर लक्ष ठेवणे !
     वर्ष २००९ मध्ये जळगाव येथील गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक श्री. कुळकर्णी यांनी शिवसेनेचे शाखाप्रमुख श्री. तिवारी यांना दूरभाष करून बोलावले आणि त्यांच्याकडे, सध्या हिंदु जनजागृती समितीच्या धर्मजागृती सभा कुठे आहेत ? तुम्ही समितीला काय साहाय्य करता ? ते स्फोट करतात. कशाला त्यांच्या नादी लागता ? चांगले चांगले लोक बरबाद होतात. तुम्ही त्यात गुंतू नका. आम्ही दैनिक देशदूतमध्ये धरणगाव येथील सभेची बातमी वाचली. त्या सभेत उपस्थित असलेले समितीचे कार्यकर्ते श्री. बुणगे कुठे असतात ? आता काय करतात ? आदी चौकशी केली.

पंचगंगा घाटावर प्रबोधनानंतर असंख्य भाविकांकडून विसर्जन कुंडाऐवजी वहात्या पाण्यात श्री गणेशमूर्तींचे विसर्जन !

 • कोल्हापूर येथे आदर्श गणेशोत्सव विसर्जन मोहीम !
 • मूर्तीदान मोहिमेचा फज्जा !

मूर्तीविसर्जन मोहिमेत सहभागी सनातनचे साधक, समितीचे
कार्यकर्ते आणि सोबत हिंदुत्वनिष्ठ, वर्तुळात आमदार श्री. राजेश क्षीरसागर

वहात्या पाण्यात विसर्जन
करण्यासाठी घाटावर बहुसंख्येने जमलेले भाविक !

फलक आणि उद्घोषणा यांद्वारे
मूर्तीविसर्जनाचे धर्मशास्त्र सांगून प्रसार !

संकलक श्री. सचिन कौलकर आणि 
छायाचित्रकार : श्री. गजानन नागपुरे, कोल्हापूर.
        कोल्हापूर, ११ सप्टेंबर (वार्ता.) - हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने १० सप्टेंबर या दिवशी येथील पंचगंगा घाटावर आदर्श गणेशोत्सव मोहीम राबवण्यात आली. या ठिकाणी कोल्हापूर महापालिका आणि पंचगंगा घाट संवर्धन समितीच्या वतीने पर्यावरणपूरक गणेशोत्सव २०१६ अशी मूर्तीदान मोहीम राबवण्यात येत होती; मात्र समिती आणि सनातन संस्था यांनी केलेल्या शास्त्रानुसार मूर्ती विसर्जनाच्या आवाहनामुळे असंख्य भाविकांनी पंचगंगा नदीच्या वहात्या पाण्यात गणेशमूर्तींचे विसर्जन केले. त्यामुळे कोल्हापूर महापालिका आणि संवर्धन समितीच्या मूर्तीदान मोहिमेचा फज्जा उडाला.

...तर पाकचा रस्ता बंद करू ! - अफगाणिस्तान

       काबुल - अफगाणिस्तानच्या व्यापार्‍यांना वाघा सीमेवरून भारतात जाऊ दिले नाही, तर पाकिस्तानच्या व्यापार्‍यांना मध्य आशियामधील देशांमध्ये जाण्यासाठी उपयोगात येणारा ट्रांजिट रूट देखील बंद केला जाईल, अशा शब्दांत अफगाणिस्तानचे राष्ट्र्राध्यक्ष अश्रफ घनी यांनी पाकिस्तानला चेतावणी दिली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गनी यांनी ९ सप्टेंबरला ब्रिटेनमधील पाक आणि अफगाणिस्तानचे विशेष दूत ऑवन जेनकिन्स यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर त्यांनी पाकला ही चेतावणी दिल्याचे सांगण्यात येते. अफगानिस्तान आणि पाकिस्तानमध्ये तोरखम सीमेवरून सध्या तणावाचे वातावरण आहे. आताही दोन्ही देशांमध्ये बरेच वाद आहेत. अफगाणिस्तानचे भारताशी सुधारत चाललेले संबंध आणि आता अफगाणिस्तानने पाकिस्तानला रस्त्याच्या वादावरुन खडसावल्यानंतर पाकिस्तानचा तीळपापड झाला आहे.

जमशेदपूर (झारखंड) मध्ये दुर्गा पूजा समितीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत हिंदु जनजागृती समितीचा सहभाग !

     जमशेदपूर (झारखंड) - येथे जमशेदपूर दुर्गा पूजा केंद्रीय समितीची सर्वसाधाररण वार्षिक सभा पार पडली. यात जमशेदपूरमधील ३०६ दुर्गा पूजा समितींचे प्रतिनिधी, तसेच हिंदु जनजागृती समितीचे पूर्व आणि पूर्वोत्तर भारत समन्वयक श्री. चित्तरंजन सुराल सहभागी झाले होते. या सभेचा प्रारंभ दुर्गा स्तोत्र म्हणून करण्यात आला. या वेळी केंद्रीय समितीचे अध्यक्ष श्री. तारा चंद मोहांती, उपाध्यक्ष श्री. राम बाबू सिंह यांनी सभेचा उद्देश सांगितला.

आपच्या २१ आमदारांचे संसदीय सचिवपद रहित झाल्यास केजरीवाल उत्तरदायी !

 • आप च्या आमदारांवर एकापाठोपाठ आरोप होणे, हे त्यांनी जनतेला निवडणुकीपूर्वी मोठमोठी आश्‍वासने देऊन फसवल्याचे द्योतक ! असा पक्ष जनतेला कधीतरी कायद्याचे राज्य देईल का ? ही परिस्थिती पालटण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे !
 • आपचे बंडखोर आमदार देवेंद्र सेहरावत यांचा आरोप
        नवी देहली - देहली उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे आम आदमी पक्षाच्या २१ आमदारांचे संसदीय सचिवपद रहित होण्यासह आमदारकीही जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यास स्वत: मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल उत्तरदायी आहेत, असा आरोप आपचे बंडखोर आमदार देवेंद्र सेहरावत यांनी केजरीवाल यांना लिहलेल्या पत्रात केला आहे.
        आमदार देवेंद्र सेहरावत यांनी केजरीवाल आणि पक्षाच्या पंजाबमधील प्रमुखांनी निवडणुकीत निवडणुकीत तिकिटे विकल्याचा आरोप केला होता. त्यामुळे सेहरावत यांना पक्षातून निलंबित करण्यात आलेे. त्याचप्रमाणे पंजाबमधील नेत्यांनी तिकिटासाठी महिलांचे शोषण केल्याचा आरोपही सेहरावत यांनी केल्याने नेत्यांनी त्यांच्या विरोधात मानहानीचा आरोप केला आहे. या पत्रात सेहरावत म्हणाले, देहली उच्च न्यायालयाने ऑगस्टमध्ये आपने नियुक्त केलेल्या २१ आमदारांचे सांंसदीय सचिवपद रहित केले आहे. सध्याच्या परिस्थितीत या २१ जणांची आमदारकीही धोक्यात आली असून त्याला सर्वस्वी केजरीवाल उत्तरदायी आहेत. त्याचप्रमाणे विद्यमान परिस्थितीत आप निवडणुकीला समोरे जाण्यासही सिद्ध नाही. पुन्हा निवडणुका झाल्या, तर त्याचा भार देहलीच्या नागरिकांवरच पडणार आहे.

जप्त केलेल्या वस्तूंची देखभाल न करणार्‍या अन्वेषण अधिकार्‍यांकडून वस्तूची हानीभरपाई वसूल करा !

      विविध प्रकरणांच्या अन्वेषणासाठी अन्वेषण यंत्रणा गाड्या, संगणक, भ्रमणभाष संच आदी अनेक प्रकारच्या वस्तू जप्त करतात. पुढे अन्वेषण पूर्ण झाल्यानंतर न्यायालयात सुनावणी चालू असतांना किंवा खालच्या न्यायालयात मिळालेल्या निकालाच्या विरोधात वरच्या न्यायालयात सुनावणी चालू असतांनाही या वस्तू अन्वेषण यंत्रणा किंवा न्यायालयाकडे जमा असतात. न्यायदानाच्या प्रक्रियेत अनेकदा कित्येक वर्षांचा काळ लोटतो. त्या काळात त्या वस्तूंची योग्य देखभाल आणि सुरक्षा न केल्यामुळे किंवा सुरक्षेची काळजी न घेतल्यामुळे त्या वस्तूंची हानी होते. काही वेळा या वस्तू गंजतात, मोडतात किंवा गाड्या असल्यास त्यांच्या भागांची चोरी होते. त्यामुळे जप्त करतांना वापरात असलेली वस्तू पुन्हा ताब्यात मिळते त्या वेळी ती वापरण्याच्या स्थितीत नसते. अशा प्रकारे लाखो प्रकरणांतील लक्षावधी वस्तू अन्वेषण यंत्रणांकडे जमा आहेत. या वस्तू सुस्थितीत ठेवण्यासाठी त्याची देखभाल करण्याचे दायित्व शासनाने घ्यायला हवे. कोणत्याही कारणांमुळे या वस्तू जप्त केल्या, त्या वेळी ज्या स्थितीत होत्या तशा पुन्हा ताबा देतांना नसल्यास त्या वस्तूची हानीभरपाई संबंधित व्यक्तीस द्यावी. ही हानीभरपाई शासनाच्या तिजोरीतून न करता त्या वस्तूची देखभाल करण्यास त्या अधिकार्‍याने कुचराई केली त्याच्या वेतनातून किंवा संपत्तीतून करायला हवी.
जप्त केलेल्या वस्तूंविषयी सनातनला आलेले कटू अनुभव
 अ. वर्ष २००८ मध्ये ठाणे येथील गडकरी रंगायतन स्फोट प्रकरणात सनातनच्या साधकांच्या उत्तम स्थितीत असलेल्या दोन दुचाकी दहशतवादविरोधी पथकाने जप्त केल्या. पुढे दोन-तीन महिन्यांनी न्यायालयाकडून त्या साधकांना परत मिळाल्या.

आतंकवाद्यांशी लढता न येणारे सैनिक पाकिस्तानी सैनिकांशी लढू शकतील का ?

     काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यातील बारमुला-कुपवाडा मार्गावर ७ सप्टेंबर २०१६ या दिवशी जिहादी आतंकवाद्यांनी सैन्याच्या ताफ्यावर केलेल्या आक्रमणात ३ सैनिक घायाळ झाले.

चारित्र्यहीन, भ्रष्ट आणि गुन्हेगारांना आधी पक्षात घेतले का ? त्यांची पारख नसणारे आप राज्य करण्याच्या लायकीचे आहेत का ?

      आम आदमी पक्षाने उमेदवारांची निवड करतांना चांगले उमेदवार निवडण्याचा प्रयत्न केला होता, तसेच निवडणुकीनंतरही ज्या उमेदवारांनी अयोग्य कृती केली, अशा सर्वांवर आम्ही कडक कारवाई केली आहे. भ्रष्टाचार, चारित्र्यशून्यता आणि गुन्हे यांवर कारवाई करण्यासाठी आम्ही बांधील आहोत. अन्य पक्षांनी आपप्रमाणे त्यांच्या भ्रष्ट, चारित्र्यहीन आणि गुन्हेगारी पार्श्‍वभूमी असलेल्या नेत्यांवर कारवाई करून दाखवावी, असे माझे या पक्षांना आव्हान आहे. - मनीष सिसोदिया, उपमुख्यमंत्री, आम आदमी पक्ष, देहली.

तत्कालीन काँग्रेस सरकारचा आणखी एक संरक्षण व्यवहार वादाच्या भोवर्‍यात !

घोटाळेबाज काँग्रेसचा दिवसेंदिवस उघड होत असलेला भ्रष्टाचार !
     नवी देहली - तत्कालीन संयुक्त पुरोगामी आघाडी (संपुआ) सरकारचा ऑगस्टा वेस्टलण्ड हेलिकॉप्टर खरेदीच्या प्रकरणातील घोटाळा गाजत असतांना त्यांच्या राजवटीतील कोट्यवधी रुपयांचा आणखी एक संरक्षण व्यवहार वादात अडकला आहे. ब्राझीलच्या फोल्हा डे साओ पावलो या वर्तमानपत्रातील वृत्तानुसार, ३ ईएम्बी-१४५ जेट विमानांच्या विक्री प्रकरणात मध्यस्थाला लाच दिल्याच्या आरोपाच्या प्रकरणी अ‍ॅम्ब्रायर ही ब्राझीलची विमान उत्पादक कंपनी आरोपांत अडकली आहे. ब्राझील आणि अमेरिकेतील विधी मंत्रालयाकडून या प्रकरणाची चौकशी चालू आहे. या प्रकरणी आता संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (डीआर्डीओ) कंपनीकडून स्पष्टीकरण मागवल्याचे सांगण्यात येत आहे. अ‍ॅम्ब्रायर कंपनीशी भारताने वर्ष २००८ मध्ये करार केला होता. या कंपनीकडून डीआर्डीओने एका प्रकल्पासाठी जेट विमान घेतले होते. ही तिन्ही विमाने डिसेंबर २०१५ मध्येच डीआर्डीओच्या प्रकल्पात कार्यान्वित झाली आहेत.
      या वृत्तात पुढे म्हटले आहे की, डॉमिनिक प्रजासत्ताकासह झालेल्या या करारातील संशयावरून अमेरिकेने वर्ष २०१० पासूनच या प्रकरणाची चौकशी चालू केली आहे. नंतर त्यांनी यात भारत आणि सौदी अरेबियासह अन्य देशांशी झालेल्या करारांचाही या चौकशीत समावेश करून घेतला. या करारासाठी अ‍ॅम्ब्रायरने लाच घेतली का ? याची चौकशी अमेरिकेच्या विधी मंत्रालयाकडून चालू आहे.

आता कागदपत्रे गाडीमध्ये बाळगण्याची आवश्यकता नाही !

वाहनांच्या कागदपत्रांसाठी डिजिलॉकरच्या सुविधा !
     नवी देहली - वाहतुकीचा नियम मोडला किंवा इतर तपासणीसाठी वाहतूक पोलिसांनी कोणतेही वाहन बाजूला घेतले की, पहिल्यांदा त्यांना वाहन चालवण्याची अनुज्ञप्ती (लायसन्स) आणि गाडीची इतर कागदपत्रे दाखवावी लागतात. यामुळे प्रत्येक वाहनचालकाला ही कागदपत्रे जवळ बाळगूनच वाहन चालवावे लागते; मात्र आता ही कागदपत्रे जवळ न बाळगताही वाहन चालवता येणार आहे. डिजिटल स्वरूपात ही कागदपत्रे वाहनचालकाजवळ असतील, तर त्याला तीसुद्धा पोलिसांना दाखवता येऊ शकतील. यासाठी केंद्रसरकारकडून डिजिलॉकर सुविधेचा प्रारंभ करण्यात आला आहे. डिजिलॉकरमध्ये ठेवलेली कागदपत्रे आवश्यकता वाटल्यास पोलिसांना दाखवता येतील. त्यासाठी हे डिजिलॉकर वाहनचालकाच्या भ्रमणभाष संचालाही जोडले जाणार आहे.
     वाहतूक आणि माहिती-तंत्रज्ञान मंत्रालयांनी एकत्रितपणे या सुविधेची घोषणा केली होती. आधारकार्ड क्रमांक हा भ्रमणभाष क्रमांकाशी जोडला असेल, तर या सुविधेचा वाहनचालक लगेचच लाभ घेऊ शकतील. त्यामुळे त्यामधूनच त्याच्याकडील लायसन्स आणि नोंदणीची कागदपत्रे पहाता येतील.

सनी लिओनच्या अश्‍लील संकेतस्थळावर बंदी घालण्याची मागणी !

वाराणसीमध्ये राष्ट्रीय आंदोलन
    वाराणसी - अभिनयाच्या नावाखाली अश्‍लीलता पसरवणार्‍या कॅनडास्थित सनी लिओन हिच्या संकेतस्थळावर बंदी घालणे, काश्मीरमध्ये देशद्रोह्यांकडून गो इंडिया, गो बॅकच्या घोषणा देणार्‍यांच्या विरोधात कठोर कारवाई करणे आदी मागण्यांच्या संदर्भात, तसेच पंजाब गोरक्षा दलाचे प्रमुख श्री. सतीश कुमार प्रधान यांना खोट्या आरोपांखाली अटक करण्याच्या निषेधार्थ १० सप्टेंबरला वाराणसी येथील शास्त्रीघाट, वरुणापुलाजवळ राष्ट्रीय हिंदु आंदोलन करण्यात आले. आंदोलनानंतर पंतप्रधान आणि गृहमंत्री यांना जिल्ह्याधिकार्‍यांच्या माध्यमातून निवेदन देण्यात आले.

आतंकवादाच्या सूत्रावरून भारत पाकला कोंडीत पकडणार !

       नवी देहली - पाकपुरस्कृत आतंकवादाचे सूत्र आंतरराष्ट्र्रीय पातळीवर ठळकपणे मांडण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह पुढील आठवड्यात रशिया आणि अमेरिकेचा दौरा करणार आहेत. (पाकपुरस्कृत आतंकवाद जगभरात कुप्रसिद्ध आहे. त्यामुळे गृहमंत्री रशिया आणि अमेरिकेला जाऊन याहून वेगळे काय सांगणार ? देश जिहादी आतंकवादात होरपळत असतांना दुसर्‍यांकडे जाऊन चर्चा करण्यापेक्षा स्वत:च्या हिंमतीवर त्याचा बीमोड करणे अपेक्षित ! - संपादक) याशिवाय भारतीय उपखंडातील इसिसच्या कारवायांना आळा घालण्याविषयीही ते चर्चा करणार आहेत. (स्वत:चा लढा स्वत:च द्यावा लागतो, हे साधे सूत्रही आजपर्यंतच्या राजकारण्यांना लक्षात न आल्याने पाक नावाची डोकेदुखी आपण आजतागायत संपवू शकलेलो नाही. यासाठी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेला पर्याय नाही ! - संपादक)

राष्ट्र्राला आलेली अवकळा दूर करण्यासाठी गोरक्षनाथांचे शिष्य सिद्ध करणे आवश्यक ! - श्री. अभय वर्तक, प्रवक्ता, सनातन संस्था

श्री. अभय वर्तक मार्गदर्शन करतांना
श्री क्षेत्र मढी (जिल्हा नगर) येथे गर्भगिरीत
 पहिले नाथ संमेलन
     नगर - गोरक्षनाथांनी १२ व्या शतकात हिंदु समाजाला तंत्रमार्गापासून मुक्त केले. त्या वेळी धर्माला अवकळा आली होती. तत्कालीन लोक वेदपरंपरेवर टीका करून मनाप्रमाणे वागत होते. अशा स्थितीमध्ये गोरक्षनाथांनी पुष्कळ मोठे धर्मसंकट परतवून लावत धर्माला आलेली अवकळा दूर केली होती. आजही पुन्हा वाममार्गी असलेल्यांकडून भ्रष्टाचार, गुंडगिरी, आतंकवाद याद्वारे राष्ट्राची हानी केली जात आहे. त्या वाममार्गियांपासून राष्ट्राला पुन्हा एकदा बाहेर काढण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे आपल्याला खर्‍या अर्थाने गावागावात गोरक्षनाथांचे शिष्य सिद्ध करायचे आहेत की, जे पुन्हा राष्ट्र्राला दिशा देतील आणि ईश्‍वराचे धर्म राज्य स्थापन करतील, असे प्रतिपादन सनातन संस्थेचे प्रवक्ता श्री. अभय वर्तक यांनी केले. येथील श्री क्षेत्र मढी येथे श्री कान्होबा ऊर्फ कानिफनाथ देवस्थान ट्रस्ट, मढी यांनी आयोजित केलेल्या पहिल्या २ दिवसीय नाथ संमेलनामध्ये १० सप्टेंबर या दिवशी बोलत होते.

परभणीतील धान्य घोटाळ्यात धर्मांध माजी नगराध्यक्षास अटक

धर्मांध गुन्हेगारीत अग्रेसर !
     परभणी - येथील ४ कोटी रुपयांहून अधिक रकमेच्या धान्य घोटाळ्यात पोलिसांनी माजी नगराध्यक्ष सय्यद महेबूब अली पाशा यांना अटक केली आहे. पाशा यांच्याकडे स्वस्त धान्य दुकान आणि रॉकेलची एजन्सी आहे. ते काही काळ परभणी नगरपरिषदेचे अध्यक्ष होते. येथील पुरवठा विभागाच्या ३ गोदामांतील ४ कोटी ९७ लक्ष रुपयांचे १९ सहस्र १४१ क्विटल धान्य घोटाळा झाला होता. त्यामध्ये त्यांचा हात असल्याच्या कारणावरून त्यांना अटक करण्यात आली आहे. जिल्हाधिकार्‍यांच्या अहवालावरून धान्य घोटाळा प्रकरणात तहसीलदार संतोष रुईकर यांच्यावर यापूर्वीच निलंबनाची कारवाई झालेली आहे.


मुंब्रा येथील स्मशानभूमीजवळ बकरी बाजारप्रकरणी पत्र देणार्‍या हिंदुत्वनिष्ठाला राष्ट्रवादी काँग्रेसच्या धर्मांध नगरसेवकांकडून धमकी

राज्यात हिंदुत्वनिष्ठ असुरक्षित ! 
     ठाणे, १२ सप्टेंबर - मुंब्रा येथील स्मशानभूमीजवळ 'ईद'च्या निमित्ताने अवैधरित्या बकर्‍यांचा बाजार भरवला जात असल्याने विश्‍व हिंदू परिषदेचे श्री. सुजित गुप्ता यांनी याविषयीचे पत्र काही दिवसांपूर्वी ठाणे महानगरपालिकेच्या प्रभाग समितीला दिले होते. (या प्रकरणी पालिका आयुक्त आणि पोलीस आयुक्त यांनी लक्ष घालून अवैधरित्या चालू असलेला बकरी बाजार बंद करणार का ? हा बाजार चालू करणार्‍या संबंधितांवर कारवाई करणार का ? - संपादक) या पत्राचे राजकारण करत आणि खाजगी गोष्ट म्हणून घेत प्रभाग समितीचे अध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शानू पठाण यांनी श्री. सुजित गुप्ता यांना 'तुला बकरी ईद नंतर बघून घेतो' अशी धमकी दिली आहे, तसेच त्यांचे काही कार्यकर्तेही धमकी देत आहेत. (राष्ट्रवादी काँग्रेसची गुंडगिरी ! या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस पठाण यांच्यावर कारवाई करणार कि मुसलमानांची तळी उचलणार ? - संपादक) 

(संस्कृतीशी नाळ तोडणारा) 'सनबर्न फेस्टिव्हल' यंदा पुण्यात ! - पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांची घोषणा

     पुणे, १२ सप्टेंबर (वार्ता.) - गोवा येथे आयोजित केल्या जाणार्‍या सनबर्न फेस्टिव्हलमुळे अनेक जण नववर्षाच्या स्वागतासाठी गोवा येथे जातात. पर्यटनमंत्री या नात्याने पुण्याला एक भेट द्यावी म्हणून 'सनबर्न फेस्टिव्हल' यंदाच्या वर्षी पुणे येथे आयोजित करण्यात येणार आहे, अशी घोषणा पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी केली. २८ व्या पुणे फेस्टिव्हलच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते. या प्रसंगी दिग्विजय सिंह, सुशीलकुमार शिंदे, अभिनेत्री शर्मिला टागोर, उद्योगपती राहुल बजाज, पालकमंत्री गिरीश बापट, फेस्टिव्हलचे अध्यक्ष सुरेश कलमाडी यांच्यासह चित्रपटसृष्टीतील कलाकार उपस्थित होते. (पर्यटनाला चालना मिळावी यासाठी अनेक चांगल्या गोष्टी करता येण्यासारख्या आहेत. पुणे शहराची सांस्कृतिक अन् ऐतिहासिक शहर म्हणून ख्याती आहे. हा नावलौकिक वाढण्यासाठी पर्यटन मंडळाने प्रयत्न करावेत. भारतीय संस्कृतीशी संबंध नसलेले कार्यक्रम केवळ महसूलवाढीसाठी आयोजित करू नयेत, अशी संस्कृतीप्रेमी पुणेकरांची अपेक्षा आहे. - संपादक) 
     

पुणे येथे गणेशोत्सवात महिलांची छेडछाड केल्याप्रकरणी ६९ जणांवर कारवाई !

उत्सवातील असे विकृतीकरण थांबवण्यासाठी हिंदु 
जनजागृती समिती प्रबोधन चळवळ राबवत आहे.
     पुणे - महिलांमध्ये सुरक्षिततेचे वातावरण निर्माण होण्यासाठी गेल्या २ दिवसांत गणेशोत्सवाच्या वेळी महिलांची टिंगलटवाळी आणि आक्षेपार्ह वर्तन करणार्‍या ६९ जणांच्या विरोधात गुन्हे शाखेच्या छेडछाडविरोधी पथकाने कारवाई केली. (पोलिसांनी नेहमीच अशा गुन्हेगारांवर कठोर कारवाई करणे अपेक्षित आहे ! - संपादक) तसेच बाँबशोधक आणि नाशक पथकाने ५४ सार्वजनिक ठिकाणांची पडताळणी केली असून ४९ गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकार्‍यांना संशयित वस्तू आढळल्यास नेमके काय करायचे, याविषयी प्रशिक्षण दिले. सुमीत कांबळे याला अटक करून त्याच्या कह्यातून पोलिसांनी गावठी पिस्तुल जप्त केले आहे.

बकरी ईदच्या निमित्ताने अपप्रकार न घडण्यासाठी जिल्ह्यात विशेष पथके - जिल्हाधिकारी शेखर गायकवाड

     सांगली, १२ सप्टेंबर (वार्ता.) - बकरी ईदच्या निमित्ताने गोवंशहत्या बंदी कायद्याची अंमलबजावणी आणि अन्य गोष्टी या अनुषंगाने प्रशासनाने बैठका घेतल्या आहेत. जिल्हा पशुवैद्यकीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली विशेष पथके नेमून गेल्या आठ दिवसांपासून ठिकठिकाणी तपासणी चालू आहे. कत्तलीसाठी नोंदणी आवश्यक केली आहे. या संदर्भात पोलीस प्रशासनाचेही लक्ष असून काही आढळल्यास पशुवैद्यकीय अधिकारी अथवा पोलिसांना संपर्क करावा, अशी माहिती सांगलीचे जिल्हाधिकारी श्री. शेखर गायकवाड यांनी दिली. बकरी ईदच्या पार्श्‍वभूमीवर गोवंशहत्या बंदी कायद्याची अंमलबजावणी होण्यासाठी प्रशासनाने काय उपाययोजना केल्या आहेत, असे विचारले असता त्यांनी हे उत्तर दिले.

बकरी ईदच्या पार्श्‍वभूमीवर महाराष्ट्रातील प्राण्याच्या संदर्भातील कायद्यांची काटेकोर अंमलबजावणीसाठी ठाणे येथे निवेदन

     ठाणे - बकरी ईदच्या दिवशी प्राण्यांची कुर्बानी देऊ इच्छिणार्‍या प्रत्येक व्यक्तीने राज्यातील प्राण्यांच्या संबंधित कायद्यांची काटेकोर अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. विशेषकरून 'द मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन अ‍ॅक्ट, १९८८' च्या या संबंधीच्या प्रावधानांचे पालन करणे बंधनकारक आहे, ज्यानुसार एखाद्या शेळीची अथवा मेंढीची हत्या करायची असली, तरी महानगरपालिकेची अनुमती घेणे बंधनकारक आहे; परंतु बकरी ईदच्या दिवशी अनेक ठिकाणी कोणतीही अनुमती न घेता अनधिकृतरीत्या प्राण्यांची हत्या केली जाते, ज्याकडे पोलीस प्रशासन पूर्णत: कानाडोळा करते. तरी या वर्षी बकरी ईदच्या दिवशी पोलिसांनी विशेष दक्षता बाळगून कोणत्याही प्राण्याची अनधिकृतरित्या हत्या होणार नाही आणि प्राण्यासंबंधीच्या सर्व कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे निवेदन ठाण्यातील नागरिकांनी कळवा पोलीस ठाण्यात दिले. कळवा, ठाणे येथील श्री. आदित्य देशमुख, श्री. तेजस आर्यमाने, श्री. संदीप यादव, श्री. सुधीर जयस्वार, श्री. विनोद कोकणे, श्री. राजेश देशपांडे आणि श्री. एम्.एस्. ढेरे यांनी सदर निवेदन सादर केले.

पोलीस निरीक्षक सर्जेराव गायकवाड यांच्यावर कारवाईची हिंदुत्ववाद्यांची मागणी !

इचलकरंजी येथे पोलिसांनी हिंदुत्ववाद्यांना मारहाण केल्याचे प्रकरण !
     इचलकरंजी (जिल्हा कोल्हापूर), १२ सप्टेंबर (वार्ता.) - २६ ऑगस्ट या दिवशी येथील विश्‍व हिंदू परिषद, बजरंग दल यांचे कार्यकर्ते आणि हिंदुत्ववादी यांच्यावर पोलिसांनी अन्याय्य अमानुष लाठीमार केल्याची चौकशी करून संबंधित पोलीस निरीक्षक सर्जेराव गायकवाड यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी विश्‍व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांच्या वतीने मुख्यमंत्री, मानवी हक्क आयोग, पोलीस महानिरीक्षक, पोलीस अधीक्षक यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

पुण्यातील उपहारगृहे आणि खानावळी यांमधून प्रतिदिन ६० सहस्र व्यक्तींचे अन्न जाते वाया !

देशात लक्षावधी लोकांना अन्नाची भ्रांत असतांना 
एवढ्या मोठ्या प्रमाणात अन्न वाया घालवणे, हा समाजद्रोहच ! 
हिंदूंच्या सणांच्या वेळी काटकसरीची सूत्रे पुढे 
तथाकथित पुरोगामी या संदर्भात कधी आवाज का उठवत नाहीत ?
     पुणे, १२ सप्टेंबर - शहरातील उपाहारगृहे, खानावळी आणि मंगल कार्यालये यांमधून प्रतिदिन ६० सहस्र व्यक्तींचे पोट भरेल, इतके अन्न फेकून दिले जात असल्याचे वास्तव रेस्टॉरंट आणि हॉटेलिअर्स असोसिएशनचे सचिव किशोर सरपोतदार यांनी केलेल्या सर्वेक्षणात समोर आले आहे. (धर्मशिक्षणाअभावी अन्नाची होत असलेली हेळसांड रोखण्याची आवश्यकता स्पष्ट करणारे सर्वेक्षण ! - संपादक) हे अन्न ८०० टन एवढे असून निमंत्रित किंवा उपाहारगृहे या ठिकाणी येणार्‍या अपेक्षित ग्राहकांची संख्या अल्प-अधिक होत असल्याने अन्न फेकून देण्याची वेळ येत असल्याचे या सर्वेक्षणात म्हटले आहे. (एकट्या पुणे जिल्ह्यातून एवढे अन्न वाया जात असेल, तर देशपातळीवर किती अन्न वाया जात असेल, याचा विचारच न केलेला बरा ! - संपादक) याविषयी पालिकेचे घनकचरा विभागाचे अधिकारी सुरेश जगताप म्हणाले की, एकूण कचर्‍याच्या ४५ ते ५० टक्के अन्नपदार्थाचा कचरा प्रतिदिन निर्माण होत आहे. यामुळे पालिकेकडून या कचर्‍यावर बायोगॅस आणि खत सिद्ध करण्याची प्रक्रिया केली जात आहे.

श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपति ट्रस्टच्या विश्‍वस्तांना धमकीचे पत्र

      पुणे - येथील भारतातील पहिला सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करणारे आणि वर्ष १८९२ मध्ये सार्वजनिक गणपतीची स्थापना करणारे भाऊसाहेब रंगारी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आणि ट्रस्टमधील सभासदांना ९ सप्टेंबर या दिवशी निनावी धमकीचे पत्र मिळाले आहे. या संदर्भातील तक्रार पोलीस ठाण्यात देण्यात आली आहे.
     या संदर्भात तेे म्हणाले की, भाऊसाहेब रंगारी ट्रस्टच्या माध्यमातून सार्वजनिक गणेशोत्सवाचा खरा इतिहास समाजासमोर आणला जात आहे. महत्त्वाचे जुने दस्तऐवज शोधून काढल्याने खरा इतिहास बाहेर येत आहे. यामध्ये आम्हाला लोकमान्य टिळक यांचा आदर आणि मान न्यून करायचा नाही. तसेच इतिहासकालीन शस्त्रांच्या संग्रहालयाचे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते नुकतेच उद्घाटन झाले होते. वरील गोष्टी काही लोकांना खटकलेल्या आहेत.

केवळ पाश्‍चात्त्यांचे अनुकरण हे देशाच्या आणि समाजाच्या एकात्मतेला पूर्ण मारक आहे. - गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी (साप्ताहिक सनातन चिंतन, ६.८.२०१०)


चिंचवड (पुणे) येथे ७ व्या दिवशीही श्री गणेशमूर्तींचे विसर्जन नदीच्या वहात्या पाण्यात करण्याकडे भाविकांचा कल

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेनेही विसर्जनासाठी नदीमध्ये पाणी सोडलेच नाही ! 
     चिंचवड, १२ सप्टेंबर (वार्ता.) - चिंचवड परिसरातील मोरया गोसावी घाट, थेरगाव घाट, रावेत घाट येथे हिंदु जनजागृती समिती आणि लष्कर-ए-हिंद या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी भाविकांचे प्रबोधन केल्यावर अनेक भाविकांनी श्री गणेशमूर्तींचे विसर्जन नदीच्या वहात्या पाण्यात केले. या वेळी हिंदुत्ववाद्यांनी हातात प्रबोधनात्मक फलक, प्रबोधनात्मक हस्तपत्रके, उद्घोषणा या माध्यमातून भाविकांना गणेशमूर्ती विसर्जनाचे शास्त्र सांगून धर्मशास्त्रानुसार नदीच्या वहात्या पाण्यात गणेशमूर्तींचे विसर्जन करण्याचे आवाहन केले. थेरगाव घाटावर प्रशासनाने नदीमध्ये पाणी न सोडल्यामुळे श्री गणेशमूर्ती या पाण्यावर तरंगत होत्या. पाणी मुबलक प्रमाणात असूनही काही भाविक श्री गणेशमूर्तीदान करत होते. 

डोंबिवली (जिल्हा ठाणे) येथे कृत्रिम हौदात गणेशमूर्ती विसर्जन करतांना त्यांच्यावर पाय ठेवून गणेशमूर्तींची घोर विटंबना !

     डोंबिवली (ठाणे) १२ सप्टेंबर (वार्ता.) - प्रदूषणाच्या नावाखाली कल्याण-डोंबिवली नगरपालिकेने अनेक ठिकाणी कृत्रिम हौद सिद्ध केले होते. कान्होजी जेधे मैदान (भागशाळा मैदान) येथेही विसर्जनाच्या ठिकाणी पाण्याच्या टाक्या ठेवल्या होत्या. दीड दिवसांच्या गणेशमूर्ती विसर्जनाच्या वेळी कृत्रिम हौदात उभे राहून एक व्यक्ती गणेशमूर्ती घेऊन त्यात ठेवत होती. कधी कधी जास्त मूर्ती विसर्जनासाठी आल्या की एक मूर्ती ती अक्षरशः पायाखाली ठेवत असे आणि दुसरी मूर्ती घेत असे. त्यामुळे मूर्तीला पाय लागत होते. 

'अनंतचतुर्दशीला श्री गणेशमूर्ती विसर्जनासाठी पवना धरणातून नदीला पाणी सोडावे !'

शिवसेना नगरसेविका सौ. अश्‍विनी चिंचवडे-पाटील यांची मागणी 
     पिंपरी (पुणे), १२ सप्टेंबर - येथील चिंचवड भागातील थेरगाव, पिंपळे सौदागर, रहाटणी, पिंपरीगाव, पिंपळे गुरव, सांगवी या ठिकाणी नदीच्या पात्रातील पाण्याची पातळी घटली आहे. त्यामुळे श्री गणेशमूर्तींचे विसर्जन होण्यास अडचण येत आहे. येथील थेरगाव घाटावर आतापर्यंत विसर्जन झालेल्या श्री गणेशमूर्ती अत्यल्प पाण्यामुळे खडकावर तशाच पडून आहेत. त्यामुळे मूर्तीची विटंबना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अनंत चतुर्दशीच्या दिवशी म्हणजेच, १५ सप्टेंबर या दिवशी पालिकेने पाटबंधारे विभागाला सांगून नदीला पाणी सोडावे. तसेच पालिका आयुक्तांनी यामध्ये लक्ष घालून लवकरात लवकर निर्णय द्यावा, अशी मागणी करणारे पत्र पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील शिवसेना नगरसेविका सौ. अश्‍विनी चिंचवडे-पाटील यांनी पालिका आयुक्तांना दिले आहे. (शिवसेनेच्या एका नागरसेविकेला जे दिसते, ते अन्य लोकप्रतिनिधींना का वाटत नाही ? - संपादक) त्या पत्रात पुढे म्हटले आहे की, 

नगरपालिकेने नदीला पाणी न सोडूनही भोरवासियांनी जपली पारंपरिक पद्धतीने गणेशमूर्ती विसर्जनाची परंपरा !

पर्यावरणवादी आणि अंनिसचे कार्यकर्ते फिरकले नाहीत ! 

निर्माल्य गोळा करण्यासाठी
ठेवलेली कचरा गोळा करणारी गाडी
भूमीचा तळ स्पष्ट दिसणार्‍या
नदीच्या पाण्यात विसर्जन करतांना भाविक
      
     भोर, १२ सप्टेंबर (वार्ता.) - गेल्या १० वर्षापूर्वी अंनिसने मूर्तीदान मोहिमेचा आरंभ भोरमधून करून 'भोर पटर्न' म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात अशास्त्रीय मोहीम राबवली होती. हिंदु जनजागृती समितीने केलेल्या प्रबोधनामुळे अंनिसचा हा बालेकिल्ला हिंदुत्ववाद्यांनी जिंकला आणि तीच परंपरा कायम ठेवत यंदाच्या वर्षीही नदीला पाणी अल्प असूनही भोरवासियांनी गौरी विसर्जन आणि ७ व्या दिवशी नदीच्या वहात्या पाण्यात श्रीगणेश मूर्तींचे विसर्जन केले. या वर्षीही समितीच्या वतीने राजवाडा चौकातील शनिघाट, निरामाता घाट आणि भोर शहरात भित्तीपत्रके अन हस्तपत्रके याद्वारे जागृती केली. त्याला गणेशभक्तांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. यंदाच्या वर्षी नगरपालिकेने नदीला पाणी सोडले नाही. त्यामुळे अल्प पाण्यातही भाविकांनी श्री गणेशमूर्तींचे विसर्जन केले. प्रदूषणाचा कांगावा करणारे पर्यावरणवादी आणि अंनिसचे कार्यकर्ते या वर्षीही विसर्जन घाटाकडे फिरकले नाहीत. 

चिंचवड (पुणे) येथे ७ व्या दिवशीही श्री गणेशमूर्तींचे विसर्जन नदीच्या वहात्या पाण्यात करण्याकडे भाविकांचा कल

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेनेही विसर्जनासाठी नदीमध्ये पाणी सोडलेच नाही ! 
     चिंचवड, १२ सप्टेंबर (वार्ता.) - चिंचवड परिसरातील मोरया गोसावी घाट, थेरगाव घाट, रावेत घाट येथे हिंदु जनजागृती समिती आणि लष्कर-ए-हिंद या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी भाविकांचे प्रबोधन केल्यावर अनेक भाविकांनी श्री गणेशमूर्तींचे विसर्जन नदीच्या वहात्या पाण्यात केले. या वेळी हिंदुत्ववाद्यांनी हातात प्रबोधनात्मक फलक, प्रबोधनात्मक हस्तपत्रके, उद्घोषणा या माध्यमातून भाविकांना गणेशमूर्ती विसर्जनाचे शास्त्र सांगून धर्मशास्त्रानुसार नदीच्या वहात्या पाण्यात गणेशमूर्तींचे विसर्जन करण्याचे आवाहन केले. थेरगाव घाटावर प्रशासनाने नदीमध्ये पाणी न सोडल्यामुळे श्री गणेशमूर्ती या पाण्यावर तरंगत होत्या. पाणी मुबलक प्रमाणात असूनही काही भाविक श्री गणेशमूर्तीदान करत होते. 

फलक प्रसिद्धीकरता

भारतीय राजकारणी अशी राष्ट्रप्रेमी मनीषा कधी बाळगणार ?
     इस्लाममधील धर्मांधता अमेरिकेच्या सुरक्षेवर घोंगावणारे सर्वात मोठे संकट बनले आहे. याला पराजित करणे, हेच आपले लक्ष्य असले पाहिजे, असे प्रतिपादन अमेरिकेच्या राष्ट्रपतीपदाचे रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी वॉशिंग्टन येथे केले.

हिंदू तेजा जाग रे !

Jago ! : Islamki dharmandhatako harana hamara lakshya- Amrikake rashtrapati padke pratyashi Donald Trump - Rashtrahitme Bharatiya rajkarta aisi bhumika nahi lete

जागो ! : इस्लाम की धर्मांधता को हराना, हमारा लक्ष्य - अमरीका के राष्ट्रपति पद के प्रत्याशी डोनाल्ड ट्रम्प - राष्ट्रहित में भारतीय राजकर्ता ऐसी भूमिका नहीं लेते !

कोल्हापूर महापालिकेने श्री गणेशमूर्ती विसर्जनासाठी अमोनियम बायकार्बोनेटचा वापर टाळला !

     कोल्हापूर - श्री गणेशमूर्तींचे विसर्जन करतांना साध्या पाण्यात अमोनियम बायकार्बोनेटचा वापर करू नये, अशी मागणी ७ सप्टेंबर या दिवशी हिंदु संघटनांच्या वतीने महापालिकेचे उपायुक्त श्री. विजय खोराटे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली होती. त्याप्रमाणे त्यांनी 'अमोनियम बायकार्बोनेटचा वापर केला जाणार नाही', असे आश्‍वासन हिंदुत्ववाद्यांना दिले होते. त्या अनुषंगाने १० सप्टेंबर या दिवशी पंचगंगा घाटासह इतर घाटांवर श्री गणेशमूर्तींचे विसर्जन करतांना अमोनियम बायकार्बोनेटचा वापर केला नसल्याचे दिसून आले.

लाचप्रकरणी इचलकरंजी पालिका कर्मचारी अटकेत !

भ्रष्टाचाराने पोखरलेले महापालिका प्रशासन ! 
     इचलकरंजी, १२ सप्टेंबर (वार्ता.) - १२ सप्टेंबर या दिवशी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने येथील नगरपालिकेच्या कर्मचार्‍याला ८ सहस्र रुपयांची लाच घेतांना अटक केली आहे. शशिकांत बागी असे या कर्मचार्‍याचे नाव आहे. नगरपालिकेतील मालमत्ता विभागात त्याची नेमणूक आहे. घरफाळा अल्प करून देण्यासाठी त्याने ही लाच मागितली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे प्रमुख उदय आफळे आणि त्यांच्या सहकार्‍यांनी ही कारवाई केली.

सिल्लोड (जिल्हा संभाजीनगर) येथील ४० वर्षे जुना पूल कोसळला

आणखी किती जणांचे जीव गेल्यावर सार्वजनिक 
बांधकाम विभाग आणि संबंधित खाते धोकादायक पुलांची दुरुस्ती करणार ? 
     सिल्लोड १२ सप्टेंबर - महाड येथील पूल कोसळल्याची घटना काही आठवड्यांपूर्वीची असतांनाच येथील सिल्लोड-कन्नड राज्य महामार्ग क्र. ५१ वरील मोढावाडीजवळच्या नाल्यावरील ४० वर्षे जुना पूल ५ सप्टेंबर या दिवशी दुपारी कोसळला. या वेळी पुलासह २ मोटारसायकली २० फूट खोल नाल्यात कोसळल्या असून ४ जण घायाळ झाले आहेत. त्यातील दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. जवळपास ६० फूट लांबीच्या या पुलाचे भिंतीसदृश २ खांब पाण्याच्या प्रवाहाने कमकुवत झाले होते. त्यातील एक खांब कोसळल्यामुळे पुलाचे मधोमध २ तुकडे झाले. त्यामुळे सिल्लोड, भराडी, कन्नड, चाळीसगाव, धुळे आणि आसपासच्या ५० पेक्षा जास्त गावांचा संपर्क तुटला आहे. सध्या जेसीबी यंत्राच्या सहाय्याने पर्यायी रस्ता सिद्ध करून मोटारसायकलसह पायी जाणार्‍यांची सोय जिल्हा प्रशासनाने केली आहे.

गणेशोत्सव पारंपरिकपणेच साजरा व्हावा !

सध्या चालू असलेल्या 
गणेशोत्सवाच्या निमित्ताने... 
        आपले सर्व उत्सव धुमधडाक्यात साजरे होतात; तथापि उल्हास आणि उन्माद यांतील सीमा आपण सुबुद्ध म्हणविणार्‍या नागरिकांनी ओळखायला हवी. हिंदु श्रद्धा निर्मूलनवाले आपल्या प्रत्येक गोष्टीत नाक खुपसायला टपून बसले आहेतच. ते अन्य धर्मियांच्या चमत्कार आणि तत्सम गोष्टींविषयी मूग गिळून गप्प बसतील; पण हिंदूंच्या गोष्टींना मात्र नाक मुरडायला तयार असतात.
        अशा फेक्युलर्सना (खोटारड्यांना) आपण संधी का द्यायची ? म्हणून काही गोष्टी आपणच पाळायला हव्यात.

कारागृहातील सहकारी क्रांतीकारकांना नीट जगता यावे म्हणून स्वत: मरणारे थोर क्रांतीकारक जतींद्रनाथ दास !

 • लोकहो, सर्व राजकारणी क्रांतीकारकांना सोयीस्कररित्या विसरले असले, तरी तुम्ही असा कृतघ्नपणा करू नका !
 • क्रांतीकारक जतींद्रनाथ दास यांच्या स्मृतीदिनानिमित्त...
       जतींद्रनाथ दास यांचा जन्म २७ ऑक्टोबर १९०४ या दिवशी कोलकाता येथे झाला. वयाच्या १६ व्या वर्षीच त्यांनी इंग्रजांविरुद्ध चालू असलेल्या असहकार आंदोलनात उडी घेतली. या आंदोलनाच्या अंतर्गत त्यांना २ वेळा कारागृहातही जावे लागले होते. तथापि त्यांचे मनोधैर्य जराही खचले नाही. दास हे नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या निकटवर्तीयांपैकी एक होते. कारागृहातून सुटून आल्यानंतर त्यांनी दक्षिण कलकत्ता तरुण समिती स्थापन केली. परिणामतः बेंगाल ऑर्डिनन्स या दंडविधानान्वये जतींद्रनाथांना पुन्हा कारागृहात डांबण्यात आले. कारागृहातील छळाचा निषेध म्हणून त्यांनी अन्नत्याग केला. त्यानंतर त्यांची सुटका झाली खरी; पण त्यांना लाहोर कटात गोवून पुन्हा कारागृहात डांबण्यात आले. स्वातंत्र्यासाठी कारागृहात जाण्याची ही त्यांची ६ वी वेळ होती. तेथे राजकीय बंदींचा अतोनात छळ केला जात होता. त्यांना मारहाण तर करण्यात येत होतीच; पण अत्यंत निकृष्ट दर्जाचे जेवण दिले जाई. घालायला पुरेशी वस्त्रेही दिली जात नसे. क्रांतीकारकांना मिळणार्‍या निकृष्टतम वागणुकीचा क्रांतीकारकांमध्ये संताप होता. अनेकांनी त्याविरोधात उपोषण आरंभिले होते. सहकारी क्रांतीकारकांना छळणार्‍या इंग्रजांचा निषेध म्हणून जतींद्रनाथ दास यांनीही कारागृहातच उपोषण करण्याचा निर्धार केला. त्यांनी त्यांच्या सहकार्यांसमवेत उपोषण चालू केले. क्रांतीकारकांचे हे आंदोलन मोडून काढण्यासाठी कारागृहाच्या अधिकार्‍याने त्यांना उत्तम भोजन, दूध आदी दिले. तथापि सर्व क्रांतीकारक ते फेकून देत. त्यामुळे इंग्रजांनी हे आंदोलन बलपूर्वक चिरडण्याचा निश्‍चय केला. इंग्रजांनी क्रांतीकारकांचे हातपाय बांधून त्यांच्या नाकातून नळ्या घालून त्यांना अन्न दिले. जतींद्रनाथ यांनाही अशाप्रकारे अन्न देण्याचा प्रयत्न करण्यात आला. जतींद्रनाथांनी यास तीव्र विरोध केला. त्यामुळे ७-८ जण त्यांच्या छातीवर बसले. आधुनिक वैद्यांनी त्यांच्या नाकात नळी घालून त्यांना बलपूर्वक दूध पाजले. त्या वेळी जतींद्रनाथ खोकले. त्यामुळे दूध त्यांच्या फुफ्फूसात जाऊन त्यांची प्रकृती अधिकच बिघडली. आधुनिक वैद्यांना पुन्हा बलपूर्वक घशात दूध घालणे अशक्य झाले. पुढे जतींद्रनाथ दास दिवसेंदिवस अशक्त होत गेले. हात हलवेना. अंगात त्राण नव्हते. शेवटी इंग्रजांनी त्यांना बाहेरील रुग्णालयात नेऊन कोणाचा तरी खोटा जामीन देऊन सोडून देण्याचे ठरवले; पण जतींद्रनाथ यांनी खूण करून त्यास नकार दिला. त्या वेळी त्यांच्या खोलीतील अन्य क्रांतीकारकांनी पोलिसांना आमच्या मुडद्यांवरून त्यांना न्यावे लागेल, अशा शब्दांत ठणकावले.

कुत्रे चावल्यावर जागे होणारे सरकार नको !

     कुडाळ शहरातील तुपटवाडी येथे रमझान जाफर दड्डीगेरी या पाच वर्षांच्या बालकाला आठ ते दहा भटक्या कुत्र्यांनी गंभीर जखमी केले. या घटनेनंतर नगराध्यक्ष विनायक राणे यांनी चार दिवसांत कुत्र्यांचा बंदोबस्त करणार असल्याची ग्वाही दिली.

तेच तेच अन्वेषण पुन:पुन्हा करण्यात वेळ वाया घालवणार्‍या अन्वेषण यंत्रणा !

     डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि कॉ. पानसरे हत्या प्रकरणाचे अन्वेषण करणारी केंद्रीय अन्वेषण यंत्रणा (सीबीआय) आणि विशेष अन्वेषण पथक (एस्आयटी) सनातनच्या साधकांची चौकशी करत आहेत. चौकशीच्या नावाखाली या दोन्ही अन्वेषण यंत्रणा स्वत:चा आणि सनातनच्या साधकांचा वेळ वाया घालवत असल्याचे खालील उदाहरणांतून स्पष्ट होते.
 • अन्वेषण यंत्रणेचे अधिकारी काही वेळा चौकशी चालू असतांना एकच प्रश्‍न वारंवार विचारतात. अशाच एका चौकशीत एका साधकाला एक प्रश्‍न नऊ वेळा विचारला गेला.
 • चौकशी करणारे अधिकारी सविस्तर माहिती विचारतात; पण ती त्याचवेळी नोंदवून घेत नाहीत. सर्व चौकशी झाल्यावर ती माहिती लिहिण्यासाठी पुन्हा प्रश्‍न विचारून उत्तरे लिहिण्यात वेळ घालवतात. प्रश्‍न विचारतांनाच प्रश्‍नोत्तरांचे ध्वनीमुद्रण करून हा वाया जाणारा वेळ वाचवता येऊ शकतो.

समाजातील सर्वच स्तरांतील नागरिकांकडून सनातन संस्थेला मिळत आहे ठाम पाठिंबा !

     डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि कॉ. पानसरे यांच्या हत्या प्रकरणांत अन्वेषण यंत्रणांनी संशयावरून सनातनचे निष्पाप साधक डॉ. वीरेंद्रसिंह तावडे आणि श्री. समीर गायकवाड यांना अटक करून कारागृहात ठेवले आहे. पुरोगाम्यांच्या दबावापोटी आणि हिंदुत्वाचे दमन करण्यासाठी सनातनला हत्या प्रकरणात गोवण्याचे कारस्थान चालू आहे. पोलीस आणि अन्वेषण यंत्रणा यांच्याकडून अटकेतील साधक, तसेच अन्य साधक यांचाही अतोनात छळ होत आहे. हिंदुविरोधी प्रसिद्धीमाध्यमांकडूनही सनातनची अपकीर्ती केली जात आहे. या पार्श्‍वभूमीवर सनातन प्रभातने पोलिसांच्या सनातनद्वेषाचे कटू वास्तव, हा विशेषांक ६ सप्टेंबर या दिवशी प्रसिद्ध केला. त्याला भरघोस प्रतिसाद मिळाला. या अनुषंगाने समाजातील मान्यवर आणि हिंदुत्वनिष्ठ यांनी व्यक्त केलेल्या प्रतिक्रिया येथे देत आहोत.

पुढील वर्षी वहात्या पाण्यात श्री गणेशमूर्ती विसर्जन करण्याची प्रखर मोहीम राबवू ! - श्री. राजेश क्षीरसागर, आमदार, शिवसेना.

        पंचगंगा घाटावर वहात्या पाण्यात गणेशमूर्तींचे विसर्जन करण्याविषयी मोहीम राबवणार्‍या हिंदु जनजागृती समितीचे अभिनंदन करतो. हिंदु धर्म संपवू पहाणार्‍या प्रवृत्तींना आज प्रगट विरोध करण्याचे काम हिंदुत्ववादी संघटनांमध्ये हिंदु जनजागृती समिती करत आहे. खरे म्हणजे हिंदु संस्कृतीच्या विरोधात जाऊन कृती करणे अयोग्य आहे. हिंदु संस्कृतीत सांगितल्याप्रमाणे श्री गणेशमूर्तीचे वहात्या पाण्यात विसर्जन झाले पाहिजे. त्याच्या विरोधात जाऊन काही मंडळी हिंदु धर्म संपवण्याचा प्रयत्न करत आहेत; मात्र हिंदु जनजागृती समितीसारख्या कट्टर हिंदुत्ववादी संघटना आज जिवंत असल्याने हा त्यांचा प्रयत्न कधीही यशस्वी होणार नाही. येथे घाटावर ज्या ठिकाणी श्री गणेशमूर्तीचे विसर्जन होते, तेथे महापालिकेने विद्युत् दिव्यांची व्यवस्था केलेली नाही; मात्र मूर्तीदान करण्याच्या ठिकाणी विद्युत् दिव्यांची व्यवस्था केलेली आहे. याविषयी मी महापालिकेच्या सर्व अधिकार्‍यांचा निषेध करतो. श्री गणेशमूर्तींचे विसर्जन हे पंचगंगा नदीतच करावे, कारण दान केलेल्या मूर्ती इराणी खणीत कशाही वरून फेकल्या जातात. त्यामुळे श्री गणेशाचे मोठे विडंबन होते. आपण ५ ते ६ दिवस श्री गणेश मूर्तीची भक्तीभावाने पूजा केल्यानंतर अशा पद्धतीने मूर्ती फेकून देणे चुकीचे आहे. हिंदु धर्माची जी संस्कृती आहे, त्याप्रमाणे सर्व हिदूंनी वागावे. बरेच जण तसे वागण्याचा प्रयत्न करत असतांना काही प्रवृत्त्या मूर्तीदान करण्यासाठी परावृत्त करत आहेत. याचा विरोध म्हणून पुढील वर्षी आपण या वहात्या पाण्यात विसर्जन करण्याची प्रखर मोहीम राबवू.

वृक्षांच्या शत्रूंपासून सावधान !

     मुंबईस्थित दोन बड्या विकासकांच्या गृहसंकुलाचा मार्ग मोकळा करून देण्यासाठी ठाणे महानगरपालिकेने तब्बल १५०० वृक्षांच्या कापणीला हिरवा कंदील दाखवला आहे. शिवसेनेच्या ठाणे जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनीच्या आक्रमकतेपुढे नमते घेत लोकप्रतिनिधी आणि अन्य पदाधिकारी यांच्या संयुक्त समितीसह कत्तल होणार्‍या झाडांची पाहणी केल्याशिवाय पुढील कार्यवाही होणार नाही, असे लेखी आश्‍वासन पालिका प्रशासनाने सेनेच्या शिष्टमंडळास दिले.
     मनपा प्रशासन पर्यावरणाच्या रक्षणाविषयी निष्काळजी आहे, असे म्हटल्यास वावगे वाटू नये. हे प्रकरण तर एक उदाहरण झाले. देशातील एका राज्यातील एका शहराच्या मनपातील हे प्रकरण आहे, तर देशभर किती वृक्षांचे बळी जात असतील, हा विचारही थक्क करणारा आहे. मूळ सूत्र आहे ते निसर्गरक्षणाचे. ते प्रकल्प झाले नाहीत, तर ते दोन विकासक नाक मुरडतील; पण सहस्रो झाडांच्या कत्तली करून, ते प्रकल्प झाले, तर निसर्गाची होणारी हानी ते कशी भरून देणार आहेत ? तोडणे सोपे आहे आणि लागवड करणे (वृक्षारोपण) मात्र कठीण आहे. वृक्षारोपणासाठी किती विकासक पुढे येतात आणि समाज आलेच (?), तरी ती रोप जगवण्यासाठी किती जण त्याची आश्‍वासक ती देखभाल करतात ? सदर प्रकल्प न झाल्याने निवार्‍याअभावी कठीण स्थितीत दिवस काढले जात आहेत, अशी जनतेची स्थिती आहे का ? निसर्गाचा अक्षरशः खेळ मांडला आहे. त्या गृहसंकुल प्रकल्पाच्या ठिकाणी ते वृक्ष अचानक अवतरलेले नाहीत. त्या जागी तो प्रकल्प उभारायचा म्हणजे वृक्षतोड आलीच. तरीही अनेक वृक्ष असलेला तो भाग कोणत्याही प्रकल्पासाठी न वापरण्यासाठी आरक्षित का ठेवण्यात आला नाही ?

कुठे अपार श्रद्धेने जाणूनी श्री गुरूंचे मनोगत या उक्तीनुसार साधना करून गुरुकृपेचा ओघ अनुभवणारे कर्नाटक राज्यातील साधक, तर कुठे गुरुदेवांनी सांगितलेल्या साधनेकडे पूर्णतः दुर्लक्ष करून गुरुकृपेपासून वंचित राहिलेले इतरत्रचे कार्यकर्ते !

सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ
      व्यष्टी आणि समष्टी साधना या दोन्ही स्तरांवर कर्नाटक राज्यातील साधकांचे प्रयत्न प्रशंसनीय आहेत. साधनेचे गमक उमगल्याने गत २ वर्षांत तेथील अनेक साधक जलद गतीने आध्यात्मिक उन्नती करून जन्म-मृत्यूचा फेरा ओलांडत आहेत. प्रगती झालेल्या साधकांमध्ये जाणवणारे विशेष गुण म्हणजे इतरांविषयीचा प्रेमभाव, प.पू. गुरुदेवांप्रती भोळा भाव अन् सेवेची तळमळ ! या गुणांमुळे ते गुरूंच्या समष्टी कार्याची फलनिष्पत्ती वेगाने वाढण्यासाठी प्रयत्नरत आहेत.
      सर्वसाधारणपणे भारतातील अन्य राज्ये आणि कर्नाटक राज्य येथील साधक यांच्यातील साधनेच्या दृष्टीकोनातून लक्षात आलेला भेद पाहूया.

६२ टक्के आध्यात्मिक पातळीच्या श्रीमती विजया वसंत पानवळकर (वय ७७ वर्षे) यांनी श्रीकृष्णाशी साधलेला भावसंवाद आणि श्रीकृष्णाने त्यांना केलेले मार्गदर्शन

श्रीमती विजया
वसंत पानवळकर
     देवरुख येथील श्रीमती विजया वसंत पानवळकर (वय ७७ वर्षे) यांनी घरी राहून तळमळीने साधना केली. त्यामुळे श्रीकृष्णानेही त्यांना प्रत्येक वेळी साहाय्य केले. त्यांनी साधना करून ६२ टक्के आध्यात्मिक स्तर गाठला आहे. त्यांनी श्रीकृष्णाशी केलेला भावसंवाद आणि त्याच्या चरणी वाहिलेली कृतज्ञतारूपी शब्दसुमने पुढे देत आहोत.
१. भावपूर्ण नामजप होण्यासाठी केलेली विनवणी
      मी श्रीकृष्णाला सतत विनवणी करत असते, मला अध्यात्मात प्रगती करायची आहे. मला साधनाच करायची आहे. माझ्याकडून तू नामजप करवून घेतोस; पण जसा एकाग्र चित्ताने, भावपूर्ण असा नामजप करायला हवा, तसा व्हायला तू मला साहाय्य का करत नाहीस ? माझ्या मनात काही वेळा दूरचित्रवाहिनीवरील मालिका, घरातील गोष्टी, तर काही वेळा अध्यात्मातील प्रगती यांविषयी अनावश्यक विचार येतात आणि मी नामजप करायचे विसरते.

श्रीकृष्ण जयंतीच्या दिवशी श्रीकृष्णाचा नामजप करतांना साधकाला आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती

श्री. जगदीश पाटील
१. श्रीकृष्ण जयंतीच्या दिवशी संहितावाचक डॉ. विशाल शर्मा यांच्या माध्यमातून भृगु महर्षींनी सांगितलेला श्रीकृष्णाचा नामजप करतांना आनंदाच्या उकळ्या फुटणे, श्रीकृष्णासमवेत रासलीला करावीसी वाटणे आणि दिवसभर भावस्थिती टिकून रहाणे : श्रीकृष्ण जयंतीच्या दिवशी (२४.८.२०१६ या दिवशी) संहितावाचक डॉ. विशाल शर्मा यांच्या माध्यमातून भृगु महर्षींनी साधकांना श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी । हे नाथ नारायण वासुदेव ॥, हा नामजप करण्यास सांगितले होते. हा नामजप करतांना मला आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या. गोप-गोपींमध्ये श्रीकृष्णासमवेत रासलीला करावी, असे आतून वाटत होते आणि तशी मानस कृतीही झाली. दिवसभर माझी भावस्थिती टिकून होती.
२. माझ्या आज्ञाचक्रावर संवेदना जाणवत होत्या, तसेच सहस्रारचक्रातून संपूर्ण शरिरात चैतन्याचा स्रोत आत जात होता.
३. मी कुठल्यातरी लोकात आहे, अशी माझी स्थिती होती.

... मग होईन तवचरणी एकरूप लवकर ।

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त...
कु. वर्षा जाधव
     प.पू. डॉ. आठवले यांची पुष्कळ आठवण यायची. तेव्हा रामनाथी आश्रमात राहून त्यांचे दर्शन होत नाही, तर इतर आश्रमांत, तसेच प्रसारात सेवा करणार्‍या साधकांची कशी स्थिती होत असेल ?, असा विचार माझ्या मनात आला. त्या वेळी देवाने मला पुढील कविता सुचवली.
अशी कशी गुरुरायाची मूर्ती ।
दर्शनाची करी पूर्ती ॥ १ ॥
देवा, निर्गुण निराकार तू ।
गुरूंच्या रूपातून झालास साकार तू ॥ २ ॥
भेटशील कधी मला ।
दर्शन देऊनी पावन करशील मला ॥ ३ ॥

स्वयंसूचनांची गोडी लागण्यासाठी किंवा त्यावरील श्रद्धा वाढवण्यासाठी करावयाचे प्रयत्न

कु. गायत्री बुट्टे
        प्रारंभी तीव्र स्वभावदोषांवर स्वयंसूचना दिल्यामुळे ते स्वभावदोष न गेल्यास साधकांना स्वयंसूचना देऊनही दोष जात नाहीत, असे वाटते. त्यामुळे साधकांमध्ये स्वयंसूचना दिल्याने दोष जातात, ही श्रद्धा निर्माण होत नाही. ही श्रद्धा निर्माण होण्यासाठी पुढील प्रयत्न करावेत.
१. प्रारंभी मनाचा विरोध जास्त होणार नाही, असा स्वभावदोष निवडावा.
२. जशी स्वयंसूचना बनवली आहे, त्याच शब्दांमध्ये द्यावी. त्यातील शब्दांची रचना सारखी पालटू नये.
३. स्वयंसूचना शक्यतो एक किंवा दोनच वाक्यांत बनवावी. मोठी वाक्यरचना असलेली स्वयंसूचना बनवल्यास ती देतांना प्रारंभी एकाग्रता साधणे कठीण जाते.
४. स्वयंसूचना नीट लक्षात रहाण्यासाठी ती तोंडपाठ करावी. तोंडपाठ केलेल्या स्वयंसूचनेवर मन एकाग्र करणे सोपे जाते. ज्याप्रमाणे आपण नामजपावर मन एकाग्र करतो, त्याप्रमाणे स्वयंसूचनेवर मन एकाग्र करण्याचा, म्हणजेच स्वयंसूचनेतील वाक्यांशी मनाने एकरूप होण्याचा प्रयत्न करावा.

आश्रमदर्शनाची सेवा करतांना आश्रम सजीव, ऋषीसम आणि सनातन धर्मराज्याची लहान प्रतिकृती आहे, याची डॉ. (सौ.) नंदिनी सामंत यांना आलेली अनुभूती

डॉ. (सौ.) नंदिनी सामंत
१. साधकांना आश्रम दाखवण्यापूर्वी पूर्वी कधीही न जाणवलेले आश्रमाचे अद्वितीयत्व जाणवून पुष्कळ भावजागृती होऊन डोळ्यांतून अश्रूधारा वाहू लागणे आणि आश्रमाप्रती अपार कृतज्ञता अन् शरणागती जाणवून कंठ दाटून येणे
     देवाने मला काही साधकांना रामनाथी आश्रम दाखवण्याची सेवा दिली होती. आश्रमदर्शनाला आरंभ करण्यापूर्वी आश्रमदर्शनाचा त्यांना पूर्ण लाभ होण्यासाठी आश्रमदर्शनाच्या वेळी त्यांनी कोणता दृष्टीकोन ठेवावा ?, हे मी त्यांना थोडक्यात सांगणार होते; परंतु त्या क्षणी पूर्वी कधीही न जाणवलेले आश्रमाचे अद्वितीयत्व जाणवून माझीच पुष्कळ भावजागृती होऊन माझा कंठ दाटून आला. डोळ्यांतून अश्रूधारा वाहू लागल्या आणि आश्रमाप्रती अपार कृतज्ञता अन् शरणागती जाणवून मला एक शब्दही बोलता येईना.

साधकाला ॐ काराविषयी आलेली अनुभूती आणि मिळालेले ज्ञान

१. नामजप करतांना 
आकाशात सर्वत्र ॐ दिसणे
        १.८.२०१६ या दिवशी नामजप करतांना मला सूक्ष्मातून आकाश दिसू लागले. त्या वेळी मला या आकाशात काय आहे ?, असा प्रश्‍न पडला. तेव्हा आकाशात सर्वत्र लहान लहान आकाराचे ॐ दिसत होते. थोड्या वेळाने मला ॐ कार ऐकू येऊ लागला. एखादी ॐ काराची ध्वनीफीत चालू केल्यावर सतत ॐ ऐकू येतो, त्याप्रमाणे पूर्ण आकाशात सतत ॐ चा नाद चालू होता. हा नाद पुरुषी आवाजात ऐकू येत होता.
२. ॐ काराविषयी मिळालेले ज्ञान
        वातावरणातील ॐ हे परमेश्‍वराचे पहिले संगीत आहे, ज्यात लय आणि नाद यांचा समावेश आहे. या संगीताला शुद्ध संगीत म्हणतात. पृथ्वीवरील संगीताला मनुष्याच्या दोषांचा स्पर्श होतो, त्या वेळी ते अशुद्ध संगीत म्हणून गणले जाते. शिवाच्या आज्ञाचक्राच्या ठिकाणी ॐ काराचे स्थान असून त्याला तेजोप्रकाश म्हणतात. शिवाच्या तेजातून निर्माण झालेला प्रकाश म्हणजे ॐ. वातावरणातील ॐ कार नादाला अनाहत नाद म्हणतात. हा ॐ कार साक्षात् भगवान शिवच म्हणत असतात. त्यामुळे त्याला शुद्धसंगीत म्हटले आहे. मनुष्याच्या सहस्रारचक्रात ॐ चे स्थान आहे. तेथून उन्नत जिवाला ॐ काराचा नाद ऐकू येतो.
- श्री. राम होनप, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (४.८.२०१६)

पू. पिंगळेकाकांनी व्यष्टी साधनेविषयी केलेले अमूल्य मार्गदर्शन !

पू. चारूदत्त पिंगळे
        एकदा मी पू. पिंगळेकाकांना माझ्या व्यष्टी साधनेच्या स्थितीविषयी सांगत होतो. त्या वेळी आमच्यात पुढील संभाषण झाले.
१. व्यष्टी साधना 
केल्याने जीवनाची घडी बसते
साधक : व्यष्टी साधना नीट झाल्यावर सेवा अल्प वेळेत सहज आणि सुलभ होते. सेवा करण्यासाठी काही कष्ट घ्यावे लागत नाहीत.
पू. पिंगळेकाका : व्यष्टी साधना केल्याने सेवेचीच नाही, तर जीवनाची घडी बसते !
२. व्यष्टी साधना करणे, ही सेवाच आहे 
आणि ती केल्याविना पुढील सेवा परिपूर्ण होत नसणे
साधक : सत्र किंवा सारणी लिखाणाची वेळ झाल्यावर लिखाणाऐवजी सेवाच करावीशी वाटते.
पू. पिंगळेकाका : सारणी लिखाण करणे, ही सेवाच आहे, हा संस्कार मनावर झाला नाही. त्यामुळे असे होते. इतर सेवा करतांना व्यष्टी साधना (सारणी लिखाण, सत्र आदी) करण्याची वेळ झाल्यावर तीही एक सेवाच आहे. ती पूर्ण केल्याविना माझी पुढील सेवा परिपूर्ण होणार नाही, हे लक्षात घ्यावे.

प.पू. पांडे महाराज यांचे अनमोल विचारधन

प.पू. पांडे महाराज
१. सध्याच्या आपत्काळात व्याधी दूर होण्यासाठी प.पू. पांडे महाराज यांनी सुचवलेला उपाय : आपल्यातील रज-तमाचा प्रभाव वाढला की, व्याधी निर्माण होतात. त्यामुळे दुःख आणि त्रास होतो. यावर साधना करून चैतन्य वाढवणे, एवढाच उपाय आहे. साधनेद्वारे तुमचे चैतन्य वाढले की, भगवंत त्याचे वलय निर्माण करून तुमच्यावरील आवरण बाजूला करतो.
२. औषधी म्हणजे भगवंताची त्या त्या व्याधीच्या अनुषंगाने गुणविशेषतेने कार्यरत होण्यासाठी त्या वनस्पतीत संयोजित असलेली चैतन्याची साठवणूक : औषध म्हणजे चैतन्य शक्ती. औषधी म्हणजे भगवंताची त्या त्या व्याधीच्या अनुषंगाने गुणविशेषतेने कार्यरत होण्यासाठी त्या वनस्पतीत संयोजित असलेली चैतन्याची साठवणूक. त्या औषधी वनस्पतीमधील गुणविशेषतेमुळे आपण तिला औषध म्हणून उपयोगात आणतो. त्या गुणविशेषतेमध्ये असलेली ती मूळ शक्ती आहे. वातावरणातील रज-तमाचा त्या औषधी वनस्पतींवरही प्रभाव होतो. त्यामुळे औषधांची मात्रा वाढवावी लागत आहे. यासाठी औषधीची मात्रा वाढवत जाण्यापेक्षा साधनेने चैतन्य वाढवत जाणे आवश्यक आहे.

सनातनचे साधक आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते यांना सूचना

     पोलिसांशी संबंधित एखाद्या घटनेविषयी दैनिक सनातन प्रभातला बातमी पाठवतांना पोलिसांचे केवळ आडनाव, तर कधी आडनाव आणि पद लिहिले जाते. एकच आडनाव असलेले दोन किंवा अधिक पोलीस अथवा पोलीस अधिकारी एकाच ठाण्यात किंवा परिसरात असू शकतात. त्यामुळे पोलिसाचे पूर्ण नाव आणि पद लिहावे.

विशेष !

७ वर्षांच्या मुलाच्या आग्रहावरून 
वहात्या पाण्यात गणेशमूर्ती विसर्जन !
         एक कुटुंब मूर्तीदान करणार होते; मात्र वहात्या पाण्यात मूर्ती विसर्जन करा, असे करत असलेले आवाहन त्या कुटुंबातील कु. पियुष सावंत या सात वर्षांच्या लहान मुलाने ऐकले. त्यानंतर पियुष याने नदीमधील वहात्या पाण्यातच गणेशमूर्तीचे विसर्जन करण्याचा हट्ट आपल्या कुटुंबियांंकडे धरला. त्यामुळे त्याच्या कुटुंबियांनी मूर्तीदान न करता वहात्या पाण्यात श्री गणेशमूर्तीचे विसर्जन केले ! (शास्त्राप्रमाणे मूर्ती विसर्जन करण्याचा हट्ट धरणार्‍या कु. पियुष सावंत आणि त्याच्या कुटुंबीय यांचे अभिनंदन ! - संपादक)

शिवरायांची प्रेरणा घेऊन असेही आवाहन करण्यात आले...!
वंशज आम्ही शिवरायांचे । नाही करणार मूर्तीदान ॥
करूनी वहात्या पाण्यात विसर्जन । राखू गणरायांचा मान ॥

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

सद्गुरूंचे महत्त्व 
        परमेश्‍वराशी संपर्क साधण्याएवढी पुण्याई अभावनेच आढळते; म्हणूनच सद्गुरु आवश्यक आहेत; मात्र त्यांच्याशी संपूर्णपणे एकनिष्ठ रहावे.
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

बोधचित्र

॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज सनातनचे श्रद्धास्थान
मायेचे आकर्षण
सततच्या दिव्याकडे कोणाचे लक्ष नसते. 
लुकलुकणार्‍या दिव्याकडे लक्ष जाते.
भावार्थ : सततचा दिवा म्हणजे आत्मज्योत (ब्रह्म). ही स्थिर असते. लुकलुकणारा दिवा म्हणजे माया. तिच्याकडे सर्वांचे लक्ष चटकन वेधले जाते.
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.)परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले
     कुठे स्वतंत्र विदर्भ मागणारे विदर्भवादी, तर कुठे विश्‍वचि माझे घर म्हणणारे संत ! - (परात्पर गुरु) डॉ. आठवले

॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥

या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो.
- प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

पाटणकर यांचे कोंबिंग ऑपरेशन करा !

       श्रमिक मुक्ती दल ही संघटना म्हणे साम्यवाद, फुलेवाद आणि आंबेडकरवाद यांच्या एकत्रित विचारधारा घेऊन स्थापन झालेली संघटना. भारत पाटणकर हे या संघटनेचे म्होरके ! विचारवंत म्हणून प्रस्थापित होण्यासाठी जे जे आवश्यक (अव)गुण अंगी असणे आवश्यक असतात, ते सर्व त्यांच्यात ठासून भरले आहेत. त्याच बरोबर निधर्मीवादी, सुधारणावादी आदी विविध बिल्ले ते मिरवत असतात. आता एवढे सगळी बिरूदे असणारी व्यक्ती सनातनद्वेष्टी असणे, हे अभावाने आलेच. त्यात पाटणकर यांचे अंनिसवाल्यांशी विशेष सख्य असल्यामुळे त्यांचा सनातनद्वेषाचा ज्वर उतरता उतरत नाही. या द्वेषापायी त्यांनी सनातनच्या आश्रमांचे कोंबिंग ऑपरेशनची मागणी लावून धरली आहे. अलीकडेच कराड शहरातील कुठल्याशा भागात मेळावा पार पडला. या मेळाव्यात डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे आणि प्रा. कलबुर्गी यांच्या हल्लेखोरांना पकडण्यासाठी शोधमोहीम राबवणार, असा ठराव करण्यात आला आहे. हा सरळसरळ कायदा हातात घेण्याचा प्रकार आहे. ही मंडळी घटनेला सर्वस्व मानतात; मात्र वास्तवात घटनाद्रोही कृती करत असतात. त्यांची ही विध्वसंक वृत्ती केवळ सनातनलाच नव्हे, तर धर्माचरणी हिंदूंसाठीही घातक ठरणारी आहे.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn