Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

डॉ. झाकीर नाईक यांच्या संस्थेने राजीव गांधी ट्रस्टला दिली ५० लाख रुपयांची देणगी !

देशात इतक्या संस्था असतांना याच ट्रस्टला देणगी देण्यामागील हेतूचा शोध घेतला पाहिजे !
आतंकवाद्यांचा आदर्श असणार्‍या डॉ. झाकीर यांच्या संस्थेकडून काँग्रेसची संस्था 
पैसे स्वीकारते यात आश्‍चर्य वाटण्यासारखे काही नाही; कारण आतंकवाद्यांना 
बिर्याणी खाऊ घालून हिंदुत्वनिष्ठांना आतंकवादी ठरवण्याचाच काँग्रेसचा इतिहास आहे !
     नवी देहली - डॉ. झाकीर नाईक यांच्या इस्लामिक रिसर्च फाऊंडेशन या संस्थेकडून राजीव गांधी फाऊंडेशनला ५० लाख रुपयांची देणगी दिल्याचे समोर आले आहे. वर्ष २०११ मध्ये ही देणगी देण्यात आली होती. ही रक्कम स्वीकारली असली, तरीही ही रक्कम राजीव गांधी फाऊंडेशनला नव्हे, तर राजीव गांधी चॅरिटेबल ट्रस्टला दिल्याचा दावा काँग्रेसने केला आहे. तसेच झाकीर यांच्यासंबंधी चालू असलेल्या विवादानंतर सर्व कागदपत्रे पाहिली आणि काही महिन्यांपूर्वीच देणगीची ही रक्कम परत केल्याचा दावाही काँग्रेसच्या वतीने करण्यात आला आहे. काँग्रेसने परत केलेली रक्कम अद्याप आमच्या खात्यात जमा झालेली नाही, असे इस्लामिक रिसर्च फाऊंडेशनकडून सांगण्यात आले आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, उपाध्यक्ष राहुल गांधी, प्रियांका गांधी या संस्थेचे संस्थापक असून माजी पंतप्रधान मनमोहन सिंह हे या संस्थेचे विश्‍वस्त (ट्रस्टी) आहेत.

धर्मप्रेमी सनातनच्या साधकांचा छळ थांबवा ! - ट्विटरवर धर्मप्रेमींची एकमुखी मागणी

सनातनवरील आरोपांमधील फोलपणा सिद्ध करणार्‍या ट्विट्स लक्षावधी लोकांपर्यंत पोचल्या !
     ८ सप्टेंबर २०१६ या दिवशी ट्विटर वर चालू असलेल्या ट्रेंडमध्ये सनातनच्या अधिकृत ट्विटर खात्यावरून सहभाग घेऊन संस्थेवर होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडली. या प्रकरणात सनातनची सत्य बाजू समाजासमोर मांडण्यात आली.
१. सनातनचे साधक डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांच्या अटकेप्रकरणी Virendra Singh Tawade हा ट्रेंड चालू होता. या माध्यमातून डॉ. तावडे यांच्यावर होत असलेल्या आरोपांमधील फोलपणा सिद्ध करणार्‍या ट्विट्स करण्यात आल्या. हा विषय १ कोटी ३ लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोचला.
२. Kolhapur या नावाने चालू असलेल्या ट्रेंडद्वारे ८८ लाखांहून अधिक लोकांपर्यंत हा विषय पोचवण्यात आला.
३. #AntiHinduPolice या ट्रेंडमध्ये सनातनवर पोलिसांकडून होत असलेल्या छळाचे ट्विट्सद्वारे कथन करण्यात आले. हा विषय दीड लाखांहून अधिक लोकांपर्यंत गेला.

सनातन संस्थेची अपकीर्ती केल्याच्या प्रकरणी सण्डे टाईम्सचे संपादक, मालक, प्रकाशक आणि मुद्रक यांच्या विरोधात संस्थेचा मानहानी भरपाईसाठी न्यायालयात दिवाणी दावा

     रामनाथी (गोवा) - सनातन संस्थेच्या धर्मप्रसाराच्या समाजातील वाढत्या कार्याची व्याप्ती आणि संस्थेचा नावलौकीक ठाऊक असतांना संस्थेची अपकीर्ती करण्याच्या हेतूने सण्डे टाईम्स या पणजी येथून प्रसिद्ध होणार्‍या इंग्रजी वृत्तपत्राने १९ जून २०१६ या दिवशीच्या अंकात रिटायर्ड कॉप डिनाईज कनेक्शन्स टू दाभोलकर मर्डर प्लॉटर या मथळ्याखाली मानहानीकारक वृत्त प्रसिद्ध करून सनातन संस्थेची मानहानी केली. त्यामुळे संस्थेची अपरिमित हानी झाली. त्यामुळे सनातन संस्थेचे व्यवस्थापकीय विश्‍वस्त श्री. वीरेंद्र मराठे यांनी संस्थेचे मानद कायदेविषयक सल्लागार श्री. रामदास केसरकर यांच्या मार्फत या नियतकालिकाचे संपादक के.आर्. श्रीनिवास, मालक बेनेट कोलमन अ‍ॅण्ड कंपनी लि., मुद्रक आणि प्रकाशक सोनूकुमार यांना दिनांक ११.७.२०१६ या दिवशी कायदेशीर नोटीस बजावली.

सनातनविषयी पूर्ण आकस ठेवून साधकांशी अपमानास्पद वर्तणूक करणारे अतिरिक्त पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा !

सुहेल शर्मा
       कॉ. पानसरे हत्या प्रकरणी अन्वेषण करणार्‍या विशेष अन्वेषण पथकाने ५ सप्टेंबर २०१६ म्हणजे ऐन गणेशचतुर्थीच्या दिवशी देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमात तपास केला. या पथकातील अधिकारी अतिरिक्त पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा या वेळी सनातनविषयी पूर्ण आकस ठेवून साधकांशी अपमानास्पद वर्तणूक करत असल्याचे आढळले. त्यांच्याविषयी साधकांना जाणवलेली सूत्रे पुढीलप्रमाणे,
१. सहकार्‍यांशीही रागाने आणि अधिकारवाणीने बोलणे !
१ अ. सुहेल शर्मा यांचे त्यांच्या सहकार्‍यांशी सतत चिडचीड करणे, रागाने बोलणे, हिडीसफिडीस करणे, असे वागणे होते. (सहकार्‍यांशी असे वागणारे जनतेशी कसे वागत असतील, याची कल्पनाच नको ! - संपादक)

राजस्थानमध्ये मिग-२१ विमान कोसळले !

उडत्या शवपेट्या झालेली वायूदलाची विमाने !
     बाडमेर - राजस्थानमधील बाडमेर जिल्ह्यात १० सप्टेंबरला सकाळी वायू दलातील मिग-२१ हे लढाऊ विमान सरावाच्या वेळी कोसळले. वैमानिकाने पॅराशूटच्या साहाय्याने स्वतःचा बचाव केला. मिग-२१ विमाने यापूर्वीही कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत.

साधकांना १ घंट्याच्या चौकशीसाठी पनवेलहून कोल्हापूरला बोलावून दोन दिवस ताटकळत ठेवणारे अतिरिक्त पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा !

कॉ. पानसरे हत्या प्रकरणात सनातनच्या साधकांना पोलिसी छळाचा आलेला अनुभव !
      ५.९.२०१६ या दिवशी सनातन आश्रम, देवद, पनवेल येथे आश्रमाची झडती, तसेच वैद्यकीय आणि वाहन विभागाची १५ घंटे सखोल चौकशी झाल्यानंतर ६.९.२०१६ च्या पहाटे ४.३० वाजता परत जातांना अतिरिक्त पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी दोन्ही विभागांशी संबंधित साधकांना पोलीस मुख्यालय, कोल्हापूर येथे ७.९.२०१६ या दिवशी सकाळी ११ वाजता चौकशीसाठी येण्याचे पत्र आश्रम व्यवस्थापनाकडे दिले. त्यानंतर साधक कोल्हापूर येथे चौकशीसाठी गेल्यावर त्यांना आलेला पोलिसी कारभाराचा कटू अनुभव येते देत आहोत.

मुंबईवरील आक्रमणातील आतंकवाद्याला पाकने दोषमुक्त केले !

आतंकवाद्यांचा निर्माता असणारा पाक कधीतरी आतंकवाद्यांवर कारवाई करील का ?
     लाहोर - वर्ष २००८ मधे मुंबईवर झालेल्या आतंकवादी आक्रमणात सहभाग असणार्‍या सुफायन जफर या आतंकवाद्याला पाकने अटक केली होती; मात्र आता पाकच्या अन्वेषण यंत्रणेने त्याच्यावरील आरोप सिद्ध होऊ न शकल्याने दोषमुक्त केले आहे. जफर याच्यावर या आक्रमणासाठी १४ सहस्र ८०० रुपये साहाय्य देण्याचा आरोप होता, तसेच सहआरोपी जमील रियाज याला ३० लाख ९८ रुपये देण्याचाही आरोप होता.

धर्मादाय आयुक्तांनी मागवले भाविकांचे जबाब !

धार्मिक गोष्टींविषयीचे निर्णय धार्मिक क्षेत्रातील तज्ञ म्हणजेच शंकराचार्य वा संत यांच्या सल्ल्याने घ्यायला हवेत, एवढी साधी गोष्टही का लक्षात येत नाही ?
 खंडोबा मंदिरातील अभिषेकांवर बंदी घातल्याचे प्रकरण ! 
     पुणे, १० सप्टेंबर (वार्ता.) - तीर्थक्षेत्र जेजुरी गडावरील खंडोबा मंदिरातील धर्मादाय आयुक्तांनी २ मे २०१६ पासून अभिषेकावर बंदी आणली होती. यामुळे जेजुरी ग्रामस्थ आणि भाविक अप्रसन्न (नाराज) होते. मार्तंड देव संस्थानचे विश्‍वस्त डॉ. प्रसाद खंडागळे यांनीही अभिषेकाच्या बंदीमुळे देव संस्थानच्या उत्पन्नात मोठी घट झाल्याचे आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिले होते. अभिषेकांवरील बंदी उठवण्याची मागणीही त्यांनी धर्मादाय आयुक्तांकडे केली होती, तसेच या निषेधार्थ ग्रामस्थांनी एक दिवस गावही बंद ठेवले होते. (धार्मिक प्रथा बंद करणार्‍यांच्या विरोधात संघटित होणार्‍या ग्रामस्थ भाविकांचे अभिनंदन ! - संपादक) त्यामुळे नंतर धर्मादाय सहआयुक्तांनी वस्तुनिष्ठ अहवाल सादर करण्याचा आदेश दिला. या आदेशानुसार साहाय्यक धर्मादाय आयुक्तांनी चौकशी करून भाविकांचे जबाब मागितले आहेत. १२ ते २३ सप्टेंबर या कालावधीत दुपारी ३ ते ५ या वेळेत साहाय्यक धर्मादाय आयुक्तांचे दालनात उपस्थित राहून तक्रारी नोंदवाव्यात आणि त्यांची भूमिका मांडावी, असे आवाहन केले आहे. (खंडोबा मंदिरातील अभिषेकांवर बंदी घालण्यापूर्वी शंकराचार्य किंवा संत, महंत यांना विचारून कृती केली असती, तर ही वेळ आली नसती. - संपादक) 

डॉ. दाभोलकर आणि कॉ. पानसरे हत्या प्रकरणातील चौकशांच्या बातम्यांना वस्तूनिष्ठ प्रसिद्धी देणारी आणि पक्षपाती प्रसिद्धी देणारी वृत्तपत्रे !

    
पक्षपाती वृत्तांकन करणारी वृत्तपत्रे समाजाचे काय प्रबोधन करणार ?
     १० सप्टेंबर या दिवशी सकाळ, पुढारी, तरुणभारत, लोकमत, महाराष्ट्र टाईम्स, पुण्यनगरी यांनी पनवेल आश्रमातून दोघे ताब्यात, अशी खोटी वृत्ते प्रसिद्ध केली आहेत. प्रत्यक्षात पनवेल आश्रमातून कोणत्याही साधकास विशेष पोलीस पथकाने कह्यात घेतलेले नाही. त्याच प्रकारे दैनिक सकाळ, दैनिक लोकमत यांनी नार्कोटेकचा वापर कशासाठी ? गैरकृत्ये करून घेण्यासाठी नार्कोटेकचा वापर, अशा आशयाची अत्यंत खोटी माहिती देणारी वृत्ते प्रसिद्ध केली आहेत. दैनिक सकाळने ८ आणि ९ सप्टेंबर या दिवशीही पनवेलच्या आश्रमात नार्कोटेक, अशा मथळ्याखाली वृत्ते प्रसिद्धे करून सनातनची अपकीर्ती केली आहे. (सनातन या सर्वांच्या विरोधात कायदेशीर कारवाईसाठी अधिवक्त्यांचा सल्ला घेत आहे. - संपादक)

संमोहन उपचारशास्त्राच्या मर्यादा लक्षात आल्यानंतर परात्पर गुरु डॉ. आठवले अध्यात्मशास्त्राकडे वळले, तर त्यांच्या आश्रमात संमोहन कसे केले जाईल ?

     सनातनच्या पनवेल आश्रमात असणार्‍या काही साधकांना मानसिक त्रासासाठी एच् आणि एच् १ ही औषधे देण्यात येतात. असे असतांना विशेष अन्वेषण पथकाने आश्रमात येऊन चौकशी केल्यावर तेथे ही औषधे मोठ्या प्रमाणात सापडली, असा दावा न्यायालयात केला. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या क्लिनिकल हिप्नोथेरपी या ग्रंथातील सोयीस्कररित्या संदर्भ देत ही औषधे दिल्यास रुग्ण काहीही करण्यास सिद्ध होतो. ही औषधे संमोहनासाठी वापरण्यात येतात. त्यामुळे आश्रमातील या औषधांचा वापर संमोहनासाठी करण्यात येतो, हे तपासावे लागेल, असा अजब दावा सरकार पक्षाच्या वतीने न्यायालयात करण्यात आला.
     परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी वर्ष १९९६ मध्ये संकलित केलेल्या अध्यात्माचे प्रास्ताविक विवेचन या ग्रंथात लिहिले आहे, परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी १९६७ ते १९८२ या १५ वर्षांत संमोहन उपचारतज्ञ म्हणून संशोधन केल्यावर त्यांच्या लक्षात आले की, जवळजवळ ३० टक्के रुग्ण नेहमीच्या औषधोपचारांनी बरे होत नाहीत. कालांतराने हेच रुग्ण आध्यात्मिक साधना केल्याने बरे झाल्याचे पाहिल्यानंतर त्यांच्या हेही लक्षात आले की, मनोविकारावरील संमोहन उपचारशास्त्रापेक्षा अध्यात्म हे उच्च प्रतीचे शास्त्र आहे.

धारा खाद्यतेलाच्या विज्ञापनातून श्री गणेशाचे विडंबन

हिंदूंकडून वारंवार होणारे देवतांचे विडंबन रोखण्यासाठी धर्मशिक्षण देणे अपरिहार्य आहे !
   
धारा खाद्यतेलाच्या विज्ञापनात शेंगदाण्यांनी श्री गणेशाचे चित्र
      मुंबई - धारा फिल्टर्ड ग्राऊण्डनट ऑईल या खाद्यतेलाच्या विज्ञापनामध्ये या गणेशचतुर्थीला, गणपतीला द्या एक हेल्दी ट्रीट, असा उल्लेख करून शेंगदाण्यांनी श्री गणेशाचे चित्र साकारण्यात आले आहे. ठाणे महानगरपालिका परिवहन मंडळाच्या बसगाड्यांवरही अशा प्रकारची विज्ञापने देण्यात आली आहेत. (श्रीगणेशाला विटंबनात्मक रूपात दाखवून उत्पादनाचे विज्ञापन करणार्‍या आस्थापनावर कधीतरी श्रीगणेशाची कृपा होईल का ? अन्य धर्मीय स्वत:च्या श्रद्धास्थानांचे असे विटंबन कधीतरी खपवून घेतील का ? - संपादक)

आश्रमावरील छाप्याचे वृत्त ठळकपणे प्रसारित करणार्‍या 'एबीपी माझा' वृत्तवाहिनीकडून सनातनच्या पत्रकार परिषदेच्या वृत्ताकडे दुर्लक्ष !

'एबीपी माझा' वृत्तवाहिनीचा सनातनद्वेष पुन्हा एकदा सिद्ध ! 
     मुंबई - डॉ. दाभोलकर आणि कॉ. पानसरे यांच्या हत्या प्रकरणाच्या संदर्भात अन्वेषण यंत्रणांकडून सनातनच्या साधकांवर ठेवण्यात आलेल्या आरोपांविषयी 'एबीपी माझा' या वृत्तवाहिनीने ८ सप्टेंबरच्या रात्री सविस्तररित्या वृत्ते दाखवली; परंतु ९ सप्टेंबर म्हणजे दुसर्‍याच दिवशी सनातन संस्थेने पत्रकार परिषद घेऊन मांडलेल्या भूमिकेविषयी कोणतेच वृत्त प्रसारित केले नाही. (यातून सदर वृत्तवाहिनीचा सनातनद्वेष आणि पर्यायाने हिंदुद्वेषच पुन्हा एकदा सिद्ध झाला आहे. - संपादक) सनातनवर पोलीस आणि तपास यंत्रणा यांच्याकडून करण्यात आलेल्या निराधार आरोपांच्या विरोधात सनातन संस्थेने ९ सप्टेंबर या दिवशी मुंबई येथे पत्रकार परिषद घेतली होती. सनातन संस्थेचे प्रवक्ता श्री. अभय वर्तक आणि हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय सचिव अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांनी सनातनवर होत असलेल्या निराधार आरोपांचे सखोल अन् अभ्यासपूर्ण खंडन केले होते,

सानपाडा (नवी मुंबई) येथील श्री नागेश्‍वर मंदिराची हिंदु जनजागृती समितीच्या वतीने स्वच्छता

   
मंदिराची स्वच्छता करतांना हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते
  सानपाडा - १३ ऑगस्ट या दिवशी दुपारी २ ते ३ या वेळेत येथील श्री नागेश्‍वर देवस्थान सेक्टर ५ मधील श्री नागेश्‍वर मंदिराची हिंदु जनजागृती समितीच्या वतीने स्वच्छता करण्यात आली. यामध्ये देवळाचे प्रांगण, सभामंडप आणि अन्य भाग यांची स्वच्छता करण्यात आली. या स्वच्छतेच्या सेवेत हिंदु जनजागृती समितीच्या धर्मशिक्षणवर्गात येणार्‍या सौ. शारदा आमले, सौ. पूनम जाधव, समितीच्या वतीने सौ. अनिता वागराळकर, श्री. अशोक सावंत सहभागी झाले होते. हिंदु जनजागृती समितीच्या या कार्याचे देवस्थानच्या पदाधिकार्‍यांनी कौतुक करून कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

बेळगाव येथे महापालिका, प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि अन्य संस्थांच्या सहकार्याने फिरत्या कुंडाचा (कृत्रिम हौदाचा) धर्मद्रोही उपक्रम !

     बेळगाव, १० सप्टेंबर (वार्ता.) - विहिरीत श्रीगणेशमूर्ती विसर्जित केल्यास पाणी दूषित होते, असा अपप्रचार करत बेळगाव येथे महापालिका, प्रदूषण नियंत्रण मंडळ, बुडा, कॅन्टोन्मेट बोर्ड आणि कर्नाटक गृहनिर्माण खाते या संस्थांच्या एकत्रिकरणाने शहरात फिरत्या कुंडाचा धर्मद्रोही उपक्रम राबवण्यात आला. यात फिरत्या वाहनात विसर्जन कुंड करून त्यात भाविकांकडून श्रीगणेशमूर्ती विसर्जित करून घेण्यात आल्या. यांसाठी आठ वाहने उपलब्ध करून देण्यात आली होती.

श्रीगणेशमूर्ती दान घेऊन सोडियम बायकार्बोनेटद्वारे मूर्तींचे विघटन करणार !

नगरपालिका विशेष सभेत ठराव घेऊन संमती !
 वाई नगरपालिकेचा धर्मद्रोही निर्णय ! 
     सातारा, १० सप्टेंबर (वार्ता.) - वाई नगरपालिकेने यंदा पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचा संकल्प केला असून गणेशमूर्ती विसर्जनामुळे कृष्णा नदीचे होणारे प्रदूषण रोखण्याचा संकल्प केला आहे. यासाठी वाई नगरपालिकेच्या वतीने श्रीगणेशमूर्तींचे दान घेण्यात येणार असून त्या एके ठिकाणी जमा करून नंतर शेततळ्यात सोडण्यात येणार आहेत. मूर्तींचे विघटन करण्यासाठी सोडियम बायकार्बोनेट खरेदी करून ते शेततळ्यात सोडण्यात येणार आहे, असा ठराव वाई नगरपालिकेच्या विशेष सभेत नुकताच करण्यात आला आणि त्यास सर्वानुमते संमतीही देण्यात आली. 

सनातनचे साधक डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांच्यावरील अन्यायाच्या निषेधार्थ जलसंपदामंत्री यांना निवेदन !

डावीकडून सौ. जयश्री पाटील, पू. नंदकुमार जाधव, श्री. दत्तात्रय वाघुळदे, 
जलसंपदामंत्री श्री. गिरीश महाजन, श्री. प्रशांत जुवेकर, सौ. मिनाक्षी पाटीलभाविकांनी मागणी करूनही विसर्जनासाठी पाणी सोडले नाही !

भाविकांना पाचव्या दिवशीही करावे लागले अत्यल्प पाण्यात गणेशविसर्जन ! 
पुणे महानगरपालिकेचा कोडगेपणा !! 
     पुणे - गणेशोत्सव हा भाविकांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा उत्सव. पुणे महानगरपालिकेने मात्र हा उत्सव हिंदूंना धर्मशास्त्रानुसार करू द्यायचे नाही, असेच ठरवले असल्याचे महानगरपालिकेच्या कृतींवरून दिसून येत आहे, कारण भाविकांनी मागणी करूनही नदीला पुरेसे पाणी सोडलेले आढळून आले नाही. त्यामुळे भाविकांना कमी पाण्यातच गणेशमूर्तींचे विसर्जन करावे लागले. 
      या वेळी पुण्यात भिडे पूल, ओंकारेश्‍वर घाट, एस्.एम्. जोशी पूल येथे हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते कार्यकर्त्यांनी प्रबोधन मोहीम राबवली. या वेळी समितीचे कार्यकर्ते हातात गणेशमूर्ती विसर्जनाचे शास्त्र सांगणारे फलक हातात धरून प्रबोधन करत होते. या वेळी प्रबोधनपर हस्तपत्रकेही वितरित करण्यात येत होती. 

असे हिंदु धर्माभिमानी सर्वत्र हवेत !

शिवसैनिक आणि हिंदुत्वनिष्ठ यांच्या विरोधामुळे मिरज महापालिकेने विसर्जन कुंड (कृत्रिम हौद) हटवले !
     मिरज - श्री गणेशमूर्ती विसर्जनासाठी मिरज महापालिका प्रशासन महापालिका क्षेत्रात काही ठिकाणी कुंड (कृत्रिम हौद) ठेवते. गतवर्षी ब्राह्मणपुरी परिसरात असणार्‍या कुंडांच्या संदर्भात अयोग्य प्रकार घडल्याने शिवसैनिकांनी महापालिकेच्या लक्षात आणून दिले होते. त्या वेळी आणि यंदाही महापालिका प्रशासनाने कुंड न ठेवण्याचे आश्‍वासन दिले होते. असे असतांना एका राजकीय पक्षाचे प्रमुख आणि एक कथित समाजसेवक यांच्या आग्रहामुळे प्रशासनाने यंदा हे कुंड परत त्याच ठिकाणी ठेवण्याचा निर्णय घेतला होता. ही गोष्ट हिंदुत्वनिष्ठांच्या लक्षात येताच या सर्वांनी ९ सप्टेंबर या दिवशी तात्काळ महापालिकेत उपायुक्तांची भेट घेऊन गतवर्षी झालेला अपप्रकार आणि त्यामुळे धार्मिक भावना कशा दुखावल्या जातात, हे सांगितले. यावर उपायुक्तांनी हिंदुत्वनिष्ठांचे म्हणणे मान्य करत विसर्जन कुंड काढून घेत असल्याचे सांगितले. 

गणेशमूर्तींचे वहात्या पाण्यातच विसर्जन झाले पाहिजे ! - भाजपचे आमदार श्री. बाळासाहेब सानप

डावीकडून श्री. रवींद्र सोनईकर, श्री. अनिल 
पाटील आणि आमदार श्री. बाळासाहेब सानप
      नाशिक - गणेशमूर्तींचे शास्त्रानुसार, पारंपरिक पद्धतीने आणि वहात्या पाण्यातच विसर्जन झाले पाहिजेे. तुमच्या मोहिमेला माझा पाठिंबा आहे. मी तुमच्या सोबत आहे. या गोष्टीचा अधिकाधिक प्रसार झाला पाहिजे, असे प्रतिपादन भाजपचे आमदार श्री. बाळासाहेब सानप यांनी केले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने गणेशमूर्तींचे पारंपरिक पद्धतीने विसर्जन झाले पाहिजे, असे आवाहन करा, अशा आशयाचे निवेदन आमदार श्री. बाळासाहेब सानप यांची भेट घेऊन त्यांना देण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते.

फलक प्रसिद्धीकरता

आतंकवाद्यांकडून पोसण्यात येणारा राष्ट्रद्रोही काँग्रेस पक्ष !
     जिहादी आतंकवादाचे उघड समर्थन करणार्‍या आणि अनेक जिहाद्यांचे आदर्श असणार्‍या डॉ. झाकीर नाईक यांच्या इस्लामिक रिसर्च फाऊंडेशन या संस्थेकडून वर्ष २०११ मध्ये राजीव गांधी फाऊंडेशनला ५० लाख रुपयांची देणगी दिल्याचे समोर आले आहे.

हिंदू तेजा जाग रे !

Jago !
Jihadiyo ke adarsh Zakir Naik ke IRF sangathan ne Congress ko 50 lakh rupayoka daan kiya tha.
     Bharatiyo, Congress ka rashtradrohi swaroop ab to jano !
जागो !
जिहादियों के आदर्श जाकिर नाईक के आइआरएफ संगठन ने कांग्रेस को ५० लाख रुपयों का दान किया था.
     भारतियो, कांग्रेस का राष्ट्रद्रोही स्वरुप अब तो जानो !

वर्ष २००६ च्या भिवंडी पोलीस चौकीवरील आक्रमणाच्या प्रकरणी १८ धर्मांधांची निर्दोष मुक्तता !

पोलिसांवर आतापर्यंत धर्मांधांनी अनेक वेळा आक्रमण केले आहे, त्याची नोंद शासनाने किती वेळा घेतली आणि मोर्चे निघाले ? 
     ठाणे - ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथे ५ जुलै २००६ या दिवशी पोलीस चौकीवर शेकडो धर्मांधांच्या जमावाने केलेल्या आक्रमणाच्या प्रकरणी जिल्हान्यायाधीश ए.एस्. भैसरे यांनी सबळ पुराव्याअभावी १८ धर्मांधांची निर्दोष मुक्तता केली. या चौकीचे येथे बांधकाम चालू असतांना हे आक्रमण करण्यात आले. या आक्रमणाच्या वेळी धर्मांधांनी पोलिसांकडून मौल्यवान वस्तूही चोरून नेल्या होत्या.

सांगलीत श्रीगणेश विसर्जनाची परंपरा जपत दीड, तसेच पाच दिवसांच्या श्री गणेशाचे भाविकांकडून कृष्णा नदीत विसर्जन करण्यात आले !


भाविकांना त्यांच्या इच्छेनुसार मूर्ती विसर्जन करू देऊ ! - नगरपालिका मुख्याधिकारी

गडहिंग्लज येथे निवेदन स्वीकारतांना उजवीकडून मुख्याधिकारी 
श्री. तानाजी नराळे आणि निवेदन देतांना हिंदु संघटनांचे प्रतिनिधी
     गडहिंग्लज (जिल्हा कोल्हापूर), १० सप्टेंबर - येथील नगरपालिकेत मुख्याधिकारी श्री. तानाजी नराळे आणि नायब तहसिलदार श्री. बी.टी. पाटील यांना मूर्तीदानाऐवजी मूर्तीविसर्जन करणेसंदर्भात निवेदन देण्यात आले. या वेळी श्री. तानाजी नराळे म्हणाले, "आम्ही केवळ शासनाच्या सूचनांचे पालन करतो. तुम्ही सांगितलेली सर्व सूत्रे योग्य आहेत. त्या सूचनांची आम्ही प्रशासकीय बैठकीत चर्चा करू. आमचा कोणताही कर्मचारी दान घेण्यासंदर्भात कोणालाही सांगणार नाही. लोकांना त्यांच्या इच्छेने विसर्जन करू देत." 

कोल्हापूर येथे प्रबोधनानंतर भाविकांकडून वहात्या पाण्यात श्री गणेशमूर्तींचे विसर्जन !

हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांची आदर्श गणेशोत्सव मोहीम 
     कोल्हापूर, १० सप्टेंबर (वार्ता.) - हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने पंचगंगा घाटावर आदर्श गणेशोत्सव मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेमध्ये भाविकांना शास्त्रानुसार नदीतील वहात्या पाण्यात गणेश मूर्तींचे विसर्जन करण्याचे आवाहन ध्वनीक्षेपकावरून करण्यात आले. त्याला भाविकांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. अनेक भाविकांनी नदीच्या वहात्या पाण्यात मूर्तींचे विसर्जन केले. महापालिकेने भव्य मंडप उभा करून भाविकांना पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करून मूर्तीदान करण्याचे ध्वनीक्षेपकावरून आवाहन केले; मात्र भाविकांनी याकडे दुर्लक्ष करून शास्त्रानुसार मूर्ती विसर्जनाला महत्त्व दिले. याविषयीचे सविस्तर वृत्त उद्या वाचा

आमदार हळवणकर यांच्यासह १० जण शहापूर खाणीत पडले

     कोल्हापूर - गणेशमूर्ती विसर्जनासाठी गेलेले भाजपचे इचलकरंजीचे आमदार हळवणकर यांच्यासह १० जण तराफ्यातून शहापूर खाणीत उतरले होते. तराफा उलटल्याने सर्वजण खाणीत पडले; मात्र सुरक्षा रक्षकांनी तातडीने सर्वांना सुरक्षित बाहेर काढले.

तेजोमय अशा सनातन हिंदु धर्माच्या प्रसाराची केंद्रे असलेल्या संतांच्या मठांची दुरवस्था !

श्री. दिवाकर आगावणे
       सनातन संस्थेच्या भावी अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या कार्यासाठी आम्ही सदगुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांच्यासमवेत गेल्या काही मासांपासून (महिन्यांपासून) अभ्यास दौर्‍यावर आहोत. या निमित्ताने आम्ही विविध तीर्थक्षेत्रे, देवस्थाने, आश्रम, मठ, ऐतिहासिक अन् पौराणिक स्थान, गुरुकुल आदींना भेट देतोे. ही सेवा करत असतांना आम्हाला पुष्कळ नवीन नवीन गोष्टी शिकायला मिळतात. सांप्रतची हिंदु धर्माची अत्यंत बिकट अवस्था पहाता सनातन धर्म आणि संस्कृती टिकवणे अन् त्यांचे रक्षण करणे, याची आज नितांत आवश्यकता आहे. हे करत असतांना समाजातील विविध लोकांशी आमच्या भेटीगाठी होतात. तेव्हा काही चांगले, तर काही कटू अनुभवही येतात. सर्वांना यातून शिकता यावे आणि हिंदूंचे मठ, मंदिरे आणि धर्मप्रसाराची केंद्रे येथील दुरवस्था दूर होऊन त्यांच्यात सुधारणा व्हावी, या उद्देशाने हा लेखनप्रपंच आहे.

शासकीय चाकरीत असतांना लक्षात आलेली तेथील दुरावस्थेची सूत्रे

१. जातीयतावादाला प्रोत्साहन : शासकीय कार्यालयांतून जातीयता आणि राजकारण यांचे पेव फुटलेले दिसते. येथे नेमणूक करतांना ती आरक्षण किंवा राजकीय ओळखीतून झालेली असते. त्यामुळे पुढे ते त्याच पद्धतीने काम करतात. संघटनाही जातीय आणि पक्षाच्या नावे काम करतात. आपल्या संघटनेच्या लोकांचा प्रश्‍न निर्माण झाल्यास ते लगेच आवाज उठवतात. ते सत्याच्या बाजूने आवाज उठवतीलच, असे नाही. अशा प्रकारे जातीयतावादाला प्रोत्साहन दिले जाते. कार्यालयात इतर धर्मीय अधिकारी असल्यास ते आपल्या धर्मियांचे काम लगेच करतांना आढळतात, मग ते नियमात असो किंवा नसो.
     शिवाजी महाराजांच्या वेळी हिंदवी स्वराज्य मिळण्याअगोदर समाजाची जशी स्थिती होती, तशी स्थिती आजही आहे. निधर्मीवादी, बुद्धीप्रामाण्यवादी आणि पुरोगामी विचारांचे लोक आपल्या देशात सर्वधर्मसमभावाचे विचार पसरवून समाजाची फारच हानी करत आहेत. याच लोकांनी या देशाचे तीन तुकडे केले, ते धर्माच्या नावावर ! - पू. संभाजीराव भिडेगुरुजी, संस्थापक, श्री शिवप्रतिष्ठान

मन शुद्ध केल्यावरच खर्‍या सुखाची आणि आनंदाची अनुभूती घेता येईल !

      एकदा समर्थ रामदासस्वामी भिक्षा मागण्यासाठी एका घरासमोर उभे राहिले. त्यांनी दार वाजवून जय जय रघुवीर समर्थ । असा आवाज दिला. त्या वेळी घराचे दार उघडून एक स्त्री बाहेर आली. तिने महाराजांच्या झोळीत भिक्षा घातली आणि म्हणाली,
स्त्री : महाराज, काही उपदेश द्या. 
समर्थ : आज नाही. उद्या देतो. 
दुसर्‍या दिवशी समर्थांनी पुन्हा त्या घरासमोर उभे राहून आवाज दिला. त्या दिवशी त्या महिलेने बदाम आणि पिस्ता घालून खीर बनवली होती. ती स्त्री खीरीचा वाडगा घेऊन बाहेर आली. समर्थांनी कमंडलू पुढे केल्यावर खीर त्या कमंडलुत ओतण्याआधी तिला त्यात शेण आणि कचरा दिसला. त्यामुळे ती खीर घालण्यासाठी थांबली. ती समर्थांना म्हणाली,
स्त्री : महाराज, हा कमंडलू तर खराब आहे.
समर्थ : खराब तर आहे; पण तू त्यातच खीर घाल.

संतांची नामजपाशी असलेली एकरूपता !

        संत जनाबाईच्या गोवर्‍यांतून आणि संत चोखा मेळा यांच्या हाडांतून नामजप ऐकू यायचा.
१. संत जनाबाई
       संत जनाबाई ही नामयाची दासी म्हणून संत नामदेव परिवारातच आध्यात्मिक जीवन जगत होती. कामे करतांना ती मुखाने विठ्ठलाचे नाम गात होती. तिचे प्रत्येक कर्म ब्रह्मरूप झालेले होते. एकदा जनाबाईचे आणि तिच्या शेजारच्या बाईचे शेणाच्या गोवर्‍यांवरून कडाक्याचे भांडण झाले; कारण दोघींनी जवळजवळच गोवर्‍या उन्हात सुकण्यासाठी घातल्या होत्या. त्यांचा हा वाद मिटवण्यासाठी त्याच गावातील पंच तेथे आले. त्यांनी तुमच्या गोवर्‍या कशा ओळखायच्या ?, असे त्या दोघींना विचारले. तेव्हा जनाबाईने सांगितले, ज्या गोवरीतून विठ्ठल नामध्वनी ऐकू येईल, ती माझी ! त्याप्रमाणे पंचांनी गोवर्‍या कानाला लावून पहाताच ज्या गोवरीतून विठ्ठल नामध्वनी ऐकू येईल, ती गोवरी जनीच्या नावाने जमा करून त्यांनी उरलेल्या गोवर्‍या त्या दुसर्‍या बाईला दिल्या. (संदर्भ : सकल संत चरित्र गाथा)

पुरोगाम्यांच्या दबावापोटी सनातनच्या साधकांचा छळ केला जाणे, हे संतापजनक ! - मान्यवरांच्या प्रतिक्रिया

      डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि कॉ. पानसरे यांच्या हत्या प्रकरणांत अन्वेषण यंत्रणांनी संशयावरून सनातनचे निष्पाप साधक डॉ. वीरेंद्रसिंह तावडे आणि श्री. समीर गायकवाड यांना अटक करून कारागृहात ठेवले आहे. पुरोगाम्यांच्या दबावापोटी आणि हिंदुत्वाचे दमन करण्यासाठी सनातनला हत्या प्रकरणात गोवण्याचे कारस्थान चालू आहे. पोलीस आणि अन्वेषण यंत्रणा यांच्याकडून अटकेतील साधक, तसेच अन्य साधक यांचाही अतोनात छळ होत आहे. हिंदुविरोधी प्रसिद्धीमाध्यमांकडूनही सनातनची अपकीर्ती केली जात आहे. या पार्श्‍वभूमीवर सनातन प्रभातने पोलिसांच्या सनातनद्वेषाचे कटू वास्तव, हा विशेषांक ६ सप्टेंबर या दिवशी प्रसिद्ध केला. त्याला भरघोस प्रतिसाद मिळाला. या अनुषंगाने समाजातील मान्यवर आणि हिंदुत्वनिष्ठ यांनी व्यक्त केलेल्या प्रतिक्रिया येथे देत आहोत.

राष्ट्रधर्म सर्वश्रेष्ठ

      राष्ट्रापेक्षा श्रेष्ठ काहीही नाही. जर भारताची एकता, अखंडता, धर्म आणि संस्कृती धोक्यात असेल, तर आपल्या सर्वस्वाचे बलीदान करून देश वाचवणे, हे प्रत्येक भारतियाचे आद्य कर्तव्य आहे. हाच सनातन धर्म आहे. - समर्थ रामदास स्वामी (अभय भारत, १५ मे ते १४ जून २०१०)

लोकमान्य टिळकांनी प्रेरणा दिलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाचा इतिहास आणि त्याद्वारे स्वातंत्र्य चळवळीला मिळालेली नवी दिशा !

१. देशभरात अनेक राज्यांत सार्वजनिक गणेशोत्सव चालू होण्यास लोकमान्यांची प्र्र्रेरणा आणि ग्वाल्हेरचा गणपति अधिक कारणीभूत असणे : देशाच्या बहुतांश भागांत गणेशोत्सव हा जवळजवळ राष्ट्रीय महोत्सव म्हणूनच साजरा केला जातो. त्यात महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, गोवा, गुजरात, मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश आणि तमिळनाडू या राज्यांचा समावेश आहे. हा गणेशोत्सव चालू होण्यास लोकमान्यांची प्र्र्रेरणा कारणीभूत आहे, हे स्पष्ट आहे. तसेच गणपतीला सार्वजनिक गणेशाचे जे रूप मिळाले, त्याला ग्वाल्हेरचा गणपतिही कारणीभूत आहे.

पोलिसांच्या संदर्भातही स्वसंरक्षणाचा घटनादत्त अधिकार आहे !

     राज्यघटनेने नागरिकांच्या मूलभूत अधिकारांमध्ये स्वतःच्या जिवाचे रक्षण करण्याचा अधिकार दिला आहे. त्यामध्ये स्वतःचे शरीर अन् संपत्ती यांचे रक्षण, कुटुंबियांचे रक्षण, अपंग, निराधार व्यक्तीचे रक्षण आदींचा समावेश आहे. बंधूंनो, कायद्याने दिलेला हा अधिकार कायदाबाह्य वर्तन करून आपल्याला छळणार्‍या पोलिसांच्या विरोधातही वापरता येऊ शकतो. एखाद्या पोलिसाने अकारण घरात घुसून कुटुंबियांसमोर मारहाण केल्यास त्यांना प्रतिकार करण्याचा आणि स्वतःचे रक्षण करण्याचा न्याय्य अधिकार नागरिकाला आहे.

सत्यान्वेषी, निर्भीडता आदी वैशिष्ट्ये असलेल्या सनातन प्रभातवरील वाचकांचे प्रेम आणि निष्ठा !

वाचकवृद्धी मोहिमेच्या निमित्ताने...
        नियतकालिक सनातन प्रभात म्हणजे वाचकांना राष्ट्र, धर्म आणि अध्यात्म या विषयांवर योग्य मार्गदर्शन करणारा दीपस्तंभ ! राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी यांच्या उदंड प्रतिसादाबरोबरच हे नियतकालिक आता वाचकांचे अपार प्रेम अन् निष्ठाही अनुभवत आहे.
१. वाचकांमध्ये सनातन प्रभातविषयी 
असलेली विश्‍वासार्हता दर्शवणारा प्रसंग !
        एका जिज्ञासूने मासिक सनातन प्रभातचा वर्गणीदार होण्याची इच्छा व्यक्त केली. तेव्हा साधकांनी ज्या पत्त्यावर तुमचे सर्व पत्रव्यवहार होतात, तोच पत्ता आम्हाला द्या. आम्ही त्यावरच अंक पाठवू, असे त्यांना सांगितले. त्यावर ते जिज्ञासू म्हणाले, तुमचे मासिक मला मिळाले नाही, तरी अडचण नाही. माझ्या मनात इतका तरी विचार राहील की, मी चांगल्या संघटनेला मासिकाचे शुल्क दिले आहे.
२. दैनिक उशिरा पोचले, तरी आम्हाला 
तेच हवे, असा आग्रह धरणारे काही वाचक !
        महाराष्ट्रातील २ - ३ जिल्ह्यांत वाहतुकीच्या सोयीअभावी दैनिक उशिरा पोचते. प्रतिदिन सायंकाळी अथवा दुसर्‍या दिवशी सकाळी वाचकांना ते मिळते. अशा अडचणी येऊनही तेथील वाचकांनी दैनिक उशिरा मिळाले, तरी चालेल; पण आम्हाला दैनिकच हवे आहेे. त्या माध्यमातून आम्हाला अमूल्य मार्गदर्शनाचा लाभ होत आहे, असे सांगितले.

सनातन प्रभातचा पोलिसांच्या सनातनद्वेषाचे कटू वास्तव हा विशेषांक वाचून, तसेच पोलिसांकडून सनातनची अपकीर्ती करणारे द्वेषमूलक अन्वेषण पाहून अन्वेषण यंत्रणा, पोलीस, आणि साधक यांच्याविषयी काय वाटले, ते कळवा !

वाचकांना विनंती !
   डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या प्रकरणी सनातनचे निरपराध साधक श्री. समीर गायकवाड आणि डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांना अनुक्रमे १ वर्ष आणि ३ मासांपूर्वी (महिन्यांपूर्वी) अटक करण्यात आली. केंद्रीय अन्वेषण विभाग आणि विशेष अन्वेषण पथक (एस्आयटी) तपासाच्या नावाखाली या दोघांचा शारीरिक, तसेच मानसिक छळ करत आहेत. ऐन गणेशचतुर्थीच्या दिवशी सकाळी ११.३० वाजता पोलिसांनी सनातनच्या देवद, पनवेल येथील आश्रमात येऊन दुसर्‍या दिवशी पहाटे साडेचारपर्यंत चौकशीच्या नावाखाली साधकांना वेठीस धरले. पोलिसांकडून हिंदुत्ववादी संघटना आणि निरपराध साधक यांचा होणारा छळ यांविषयी मंगळवार, ६ सप्टेंबर २०१६ या दिवशी दैनिक सनातन प्रभातच्या पोलिसांच्या सनातनद्वेषाचे कटू वास्तव या विशेषांकात प्रसिद्ध करण्यात आले. हे अनुभव वाचून अन्वेषण यंत्रणा, तपास अधिकारी, पोलीस आणि साधक यांच्याविषयी तुम्हाला काय वाटले, याविषयी आम्हाला अवश्य कळवा. हिंदुत्वनिष्ठ संघटनांवर पोलिसांनी केलेल्या अत्याचारांच्या विरोधात लढण्यासाठी तुमचे विचार इतरांना प्रेरणा देतील. तसेच हे विचार हिंदु राष्ट्र स्थापनेतील अडथळ्यांवर मात करून अंतिम विजय धर्माचा म्हणजे सत्याचाच होणार आहे, याचीही ग्वाही देतील. या संदर्भात लिखाण पाठवतांना स्वतःचे नाव, पत्ता आणि दिनांक लिहावा.

भारतात एकातरी पक्षाच्या मनात काश्मीर आणि बांगलादेश येथील हिंदूंना साहाय्य करण्याचा विचार तरी येतो का ?

      नोव्हेंबर २०१६ मासात अमेरिकेत होणार्‍या अध्यक्षीय निवडणुकीतील रिपब्लिकन पक्षाचे अधिकृत उमेदवार डोनाल्ड ट्रम्प हे येथील रिपब्लिकन पक्षाच्या हिंदु युतीच्या वतीने २४ सप्टेंबर २०१६ या दिवशी आयोजित करण्यात आलेल्या एका परिषदेला संबोधित करणार आहेत. या परिषदेत आतंकवाद विरुद्ध मानवता या विषयावर डोनाल्ड ट्रम्प यांच्यासह अनेक मान्यवर त्यांचे विचार मांडणार आहेत. या परिषदेत मुंबईतील चित्रपट सृष्टीशी संबंधित अनेक व्यक्ती उपस्थित रहाणार असून त्या वेळी आतंकवादाने पीडित लोकांच्या साहाय्यासाठी निधी गोळा करण्यात येईल. या निधीतून काश्मीरमधील धर्मांधांच्या अत्याचाराला बळी पडलेले काश्मिरी हिंदू आणि बांगलादेशमधील पीडित हिंदू यांना साहाय्य करण्यात येईल, अशी माहिती या सभेचे आयोजक आणि अमेरिकेतील व्यावसायिक श्री. शलभ उपाख्य शल्ली कुमार यांनी दिली आहे.

धर्मशिक्षणवर्गात विचारलेला प्रश्‍न आणि त्याचे उत्तर

प्रश्‍न : सोमवारी, तसेच शिवाच्या देवळात नारळ का फोडू नये ? 
वेदमूर्ती केतन शहाणे : एखाद्या कार्याला आरंभ करतांना शुभसूचक म्हणून नारळ फोडतात. शिव ही लयाची देवता आहे; म्हणून शिवाच्या देवळात नारळ फोडू नये. सोमवारी शिवतत्त्व अधिक प्रमाणात कार्यरत असते. त्यामुळे सोमवारी नारळ फोडू नये. (१४.७.२०१६)

(म्हणे) सनातन आश्रमातून मिळालेल्या औषधांचा वापर प्रसाद म्हणून केला जातो !

दैनिक महाराष्ट्र टाईम्सचा जावईशोध !
सनातन संस्था कायदेशीर कारवाई करण्यासाठी वकिलांचा सल्ला घेणार !
     मुंबई - १० सप्टेंबर २०१६ च्या दैनिक महाराष्ट्र टाईम्सच्या पृष्ठ १२ वर प्रसिद्ध झालेल्या सनातनच्या दोघांची चौकशी या मथळ्याखालील वृत्तात म्हटले आहे की, पोलिसांनी ५ आणि ६ सप्टेंबरला पनवेल येथील सनातन संस्थेच्या आश्रमात झडती घेतली होती. झडतीदरम्यान पोलिसांना एच् आणि एच् १ गटातील संशयास्पद औषधे मिळाली. त्यांचा वापर प्रसाद म्हणून केला जात असल्याची धक्कादायक माहितीही एस्आयटीला मिळाली. (कोणतीही शहानिशा न करता बातम्या प्रसिद्ध करणारे अविश्‍वासू दैनिक महाराष्ट्र टाईम्स ! सनातनच्या आश्रमात कोणतेही औषध कोणत्याही साधकाला प्रसाद म्हणून देण्यात येत नाही. ९ सप्टेंबर २०१६ या दिवशी संस्थेचे प्रवक्ता श्री. अभय वर्तक यांनी मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत या संदर्भात सविस्तर खुलासा केला होता; मात्र महाराष्ट्र टाईम्सने या पत्रकार परिषदेचे वृत्त प्रसिद्ध करण्याचे सौजन्यही दाखवलेले नाही. वरून खोटे वृत्त प्रसिद्ध करून सनातन संस्थेची अपकीर्ती केली आहे. सनातन संस्था या विरोधात कायदेशीर कारवाई करण्यासाठी वकिलांचा सल्ला घेणार आहे ! - संपादक)

सनातनच्या निरपराध साधकांवरील हा अन्याय लक्षात ठेवा !

     कोणताही गुन्हा केला नसतांना श्री. समीर गायकवाड यांना मागील ११ महिने २३ दिवसांपासून, तर डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांना ३ महिने १ दिवसांंपासून कारागृहात डांबण्यात आले आहे.
     केवळ हिंदुत्वाची मानहानी करण्यासाठी सनातनच्या निरपराध साधकांना कारागृहात डांबणार्‍यांना हिंदु राष्ट्रात दामदुप्पटीने शिक्षा देण्यात येईल !

समाजात सनातन संस्थेविषयी निर्माण झालेली विश्‍वासार्हता !

      मी काही कामानिमित्त पणजीत शिक्षण खात्याच्या कार्यालयामध्ये गेलो होतो. त्या ठिकाणी मला एक व्यक्ती भेटली. त्यांनी मला विचारले, तुम्ही कुठल्या संप्रदायाच्या मार्गदर्शनाखाली साधना करता का ? तुमच्याकडे पाहिल्यावर तसे वाटते. मी सनातन संस्थेचा साधक असल्याचे त्यांना सांगितले. तेव्हा ते म्हणाले, सनातनचे कार्य चांगले आहे; मात्र काही जण सनातनच्या विरोधात बोलतात. त्यावर मी म्हटले, सनातनचे कार्य हे सत्चे कार्य आहे आणि अखेर सत्चाच विजय होणार आहे. ते त्यांना पटले. ते म्हणाले, सनातनच्या शिकवणीनुसार बरेच लोक आचरण करत आहेत; मात्र ते उघडपणे पुढे येत नाहीत. त्यावर मी त्यांना म्हटले, हे लोक पुढे योग्य वेळी सनातनच्या बाजूने उभे रहाणार आहेत. त्यावर ते हो म्हणाले.
- श्री. उमेश नाईक, फोंडा, गोवा. (२२.८.२०१६)
     श्री गणेशचतुर्थीच्या शुभेच्छा दैनिकांत विज्ञापने देऊन व्यक्त करणारे श्री गणेश आणि इतर देवता यांचे विडंबन होत असतांना कुठे असतात ?

देवतांची विडंबनात्मक गीते लावून बालमनावर कुसंस्कार करणारे जन्महिंदू !

      श्री गणेशचतुर्थीच्या काळात अनेक घरांमध्ये मारुती नाही, सेंट्रो नाही... मूषक कंपनीची पमपम छान, उंदीरमामा.... भाग्यवान !, अशा गीतांना बालगीते म्हणून वाजवणारे पालक लहान मुलांना धार्मिकतेचे बाळकडू काय पाजणार ?

मुंबई महानगरपालिकेची अनुमती न घेता शहरात कुठेही प्राण्यांची हत्या करण्याचा परस्पर आदेश देणार्‍या पशूवधगृहाच्या संबंधित अधिकार्‍यांवर कारवाई करा !

      मुंबईतील देवनार येथील पशूवधगृहाने १६ ऑगस्ट २०१६ या दिवशी एक परिपत्रक प्रसिद्ध करून बकरी ईदच्या दिवशी मुंबईतील कोणत्याही भागात प्राण्यांच्या हत्या करण्यासाठी अनुमती दिली होती.
      घर, संस्कृती आणि देवालय हे हिंदु समाजाचे केंद्रबिंदू आहेत. सद्यस्थितीत ही जीवनव्यवस्था मोडकळीस आली आहे. त्यामुळे अराष्ट्रीयतेचे संकट आपल्यासमोर उभे ठाकले आहे. ते दूर करण्यासाठी धार्मिकता आणि राष्ट्रीयता यांची सांगड घालावी लागेल. तरच आपण हिंदु म्हणून जगू शकू ! 
- प्राचार्य सुभाष वेलींगकर, गोवा 

चले जावची रणधुमाळी !

प.पू. आबा उपाध्ये
       माझा जन्म वर्ष १९२८ मध्ये झाला. आज माझे वय ८९ वर्षे आहे. बालवयापासून आजपर्यंत जी युद्धे, महायुद्धे झाली, त्याचा चटका बसलेल्यांपैकी मी एक आहे. त्या वेळी काँग्रेस पक्षाचेच प्राबल्य होते आणि ही माणसे गांधी यांच्या जिवावरच नाचणारी होती. शाळेत असतांना आम्हाला पाठ्यपुस्तकाच्या मुखपृष्ठाच्या मागील बाजूस त्या वेळचा ब्रिटिशांचा राजा पंचम जॉर्ज यांची स्तुतीपर कविता होती. ही कविता आम्हाला प्रतिदिन म्हणावी लागे, तसेच त्या वेळी प्रतिदिन ब्रिटिशांच्या राज्यात सूर्य कधीच मावळत नाही, असेही म्हणावे लागे.
       त्या वेळी खादीचे प्राबल्य होते. रविवारी खादीचे कपडे आणि पांढरी टोपी (या टोपीला गांधी टोपी म्हणत) घालून आम्हा मुलांची प्रभातफेरी निघे. या फेरीत म्हटले जाई लेंगे स्वराज्य लेंगे । आम्ही त्या वेळी स्वातंत्र्यलढ्यात भागीदार होतो. दुसरे म्हणजे चरखा फिरवला जाई आणि सूत गांधी धामला पाठवले जाई. म्हणजे त्या वेळेपासून आम्ही सर्व चले जाव चळवळीचे भागीदार होतो. मग केवळ काँग्रेसनेच आपली टीमकी का वाजवावी ? स्वातंत्र्यलढ्यात सिंहाचा वाटा असलेले वासुदेव बळवंत फडके, वर्ष १८५७ च्या लढ्यातील वीरमाता झाशीची राणी यांच्यापासून स्वातंत्र्यवीर सावरकर, चाफेकर बंधू, भगतसिंह आदींनी ब्रिटिशांना नामोहरम केले. त्यामुळे काँग्रेसकडे सत्ता देऊन ब्रिटिशांनी काढता पाय घेतला. स्वातंत्र्यानंतर याच क्रांतीविरांचे नाव काँग्रेसच्या राजवटीत पुसण्याचा प्रयत्न केला. त्यामुळेच काँग्रेसला राज्य (सत्ता) गमवावे लागले. आता भाजपची राजवट आली आहे. त्यांनी आता ही राजवट टिकवून ठेवण्यासाठी जोमाने प्रयत्न करणे आवश्यक आहे.

महाबळेश्‍वर येथे प्रती १२ वर्षांनी कन्यागत महापर्वकालात गंगेचा प्रवाह कृष्णा नदीत प्रवेश करतो आणि या चमत्काराचे केलेले संशोधन, तसेच त्याची कथा !

बुद्धीप्रामाण्यवाद्यांना 
चपराक आणि वैज्ञानिकांना आवाहन ! 
सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ
१. गुरु ग्रहाने कन्या राशीत प्रवेश करणे, म्हणजे कन्यागत महापर्वकाल ! : ११.८.२०१६ या दिवशी गुरु ग्रहाने कन्या राशीत प्रवेश केला. या शुभमुहूर्तावर कृष्णा नदीच्या काठी कन्यागत महापर्वकाल साजरा केला जातो. या मुहूर्तावर गंगेचे पाणी कृष्णा नदीत प्रवेश करते. कृष्णेचा उगम महाबळेश्‍वर येथे आहे. ११.८.२०१६ या दिवशी बरोबर रात्री ९ वाजून २९ मिनिटांनी गंगेचे पाणी गोमुखातून खाली आले. प्रती १२ वर्षांनी एकदा हा चमत्कार घडतो.
२. गुरु ग्रहाने कन्या राशीत प्रवेश करण्याच्या मुहूर्तकाळीच गंगेने तत्त्वरूपामध्ये महाबळेश्‍वर येथील पाण्याच्या पन्हाळीकडे धाव घेणे आणि या घटनेचे महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाने टिपलेले क्षण ! : या क्षणाचे चित्रीकरण करण्यासाठी गोवा येथील महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाचे साधक गेले होते. तसेच या क्षणाचे संशोधन करण्यासाठी त्याच मुहूर्तावर तेथील पन्हाळीतून येणार्‍या पाण्याचा नमुनाही रामनाथी आश्रमात आणला गेला. काही भौगोलीक कारणांमुळे या वेळी जरी गंगेचे पाणी प्रत्यक्ष या गोमुखातून येतांना दिसले नाही, तरी गंगेचे तत्त्व तरी या पाण्यात नक्कीच प्रवेश करत असणार; कारण आपल्या परंपरांना असलेला अध्यात्मशास्त्रीय आधार. यापूर्वी महाबळेश्‍वर परिसरात झालेल्या अतीवृष्टीमुळे गंगेच्या मुखामध्ये आधीच काही प्रमाणात पाण्याचा ओलावा आणि थोडे पाणी दिसत होते.

ॐची आध्यात्मिक स्तरावरील वैशिष्ट्ये अभ्यासण्यासाठी यू.टी.एस्. (Universal Thermo Scanner) या उपकरणाद्वारे महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाने केलेली वैज्ञानिक चाचणी !

      प्रत्येक आकाराला विशिष्ट स्पंदने असतात, त्याचप्रमाणे ॐ या अक्षराला त्याची स्पंदने आहेत. ज्या वेळी एखाद्या अक्षराचा आपण तोंडाने उच्चार करतो, त्या वेळी त्यातून निघणार्‍या ध्वनीलहरींतून ठराविक स्पंदने बाहेर पडतात.
      येथे मंत्राचा ॐविरहित उच्चार केल्यावर आणि ॐसहित उच्चार केल्यावर व्यक्तीवर होणारा परिणाम वैज्ञानिकदृष्ट्या अभ्यासण्याच्या उद्देशाने यू.टी.एस्. (Universal Thermo Scanner) या उपकरणाच्या साहाय्याने चाचणी घेण्यात आली. या चाचणीची निरीक्षणे आणि त्यांचे विवरण पुढे दिले आहे. येथे देण्यात आलेल्या वैज्ञानिक चाचणीतून ॐचे महत्त्व लक्षात येऊन तिचा आध्यात्मिक स्तरावर लाभ करून घेण्याची प्रेरणा सर्वांना मिळावी, अशी ईश्‍वरचरणी प्रार्थना !
१. वैज्ञानिक चाचणी करण्याचा उद्देश
      एखाद्या घटकात (वस्तू, वास्तू आणि व्यक्ती यांत) किती टक्के सकारात्मक स्पंदने आहेत, तो घटक सात्त्विक आहे कि नाही किंवा तो घटक आध्यात्मिकदृष्ट्या लाभदायक आहे कि नाही, हे सांगण्यासाठी सूक्ष्मातील कळणे आवश्यक असते. संत सूक्ष्मातील जाणू शकत असल्याने ते प्रत्येक घटकातील स्पंदनांचे अचूक निदान करू शकतात. भाविक आणि साधक संतांनी सांगितलेले शब्द प्रमाण मानून त्यावर श्रद्धा ठेवतात; परंतु बुद्धीप्रामाण्यवाद्यांना मात्र शब्दप्रमाण नाही, तर प्रत्यक्ष प्रमाण हवे असते. त्यांना प्रत्येक गोष्ट वैज्ञानिक चाचणीद्वारे, म्हणजेच यंत्राने सिद्ध करून दाखवली असेल, तरच ती खरी वाटते.

एस्.एस्.आर्.एफ्.च्या साधकांच्या साधनेतील अडथळे दूर होऊन त्यांच्या व्यष्टी-समष्टी साधनेला गती मिळावी, अशा बहुविध उद्देशांनी आयोजित केलेल्या कार्यशाळेतील मार्गदर्शनपर सत्रे !

डावीकडून श्री. रेन्डी आणि कु. मिथुना एस्.

       स्पिरिच्युअल सायन्स रिसर्च फाऊंडेशनच्या (एस्.एस्.आर्.एफ्.च्या) विदेशातील साधकांसाठी सनातनच्या रामनाथी येथील आश्रमात कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. २६ जुलै ते १ ऑगस्ट २०१६ या कालावधीत झालेल्या या कार्यशाळेत भारत, इंडोनेशिया, नेपाळ, श्रीलंका, कॅनडा, अमेरिका, क्रोएशिया, जर्मनी, हंगेरी, संयुक्त अरब अमिराती आदी ११हून अधिक देशांतील २५ साधक सहभागी झाले होते.
       या कार्यशाळेत प्रामुख्याने समष्टी साधना कशी करावी ? याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. त्याचप्रमाणे व्यष्टी आणि समष्टी साधनेत अडथळे ठरणारे स्वतःतील स्वभावदोष-अहं यांच्याविषयी चिंतन करून ते कसे घालवावेत ? अध्यात्मप्रसार कसा करावा ? यांविषयी मार्गदर्शन झाले.

स्वतंत्र भारतातील भावनिक स्तरावरील सर्वधर्मसमभाव, तसेच अल्पसंख्यांकांचे तुष्टीकरण आणि हिंदु राष्ट्रातील (सनातन धर्म राज्यातील) भावाच्या स्तरावर असणारा खरा सर्वधर्मसमभाव !

सौ. शालिनी मराठे
      हे देवकीनंदना, वासुदेवा ! सर्वधर्मसमभाव आणि अल्पसंख्यांकांचे हितरक्षण, असे गोंडस नाव धारण केलेले हे आसुरी शस्त्र हिंदूंसाठी दुधारी, तर अहिंदूंसाठी ढाल बनत आहे. देवा, आता तुझे सुदर्शनचक्र सोड आणि मायावी सोनेरी आवरणाच्या आड लपलेल्या या शस्त्राचे सत्यरूप उघड कर (काळे रूप दाखव) आणि सर्व हिंदूंना जागृत कर, हीच तुझ्या चरणी प्रार्थना.
१. हिंदूंसाठी अहितकारक ठरलेली भारतातील लोकशाही !
     स्वातंत्र्यानंतर भारतातील राजकारण्यांच्या घरात प्रथम सर्व धर्म घुसले. नंतर त्यांच्या मन-बुद्धीमध्ये भावनिक स्तरावरचा विपरीत सर्वधर्मसमभाव घुसला. त्यानंतर तो भारताच्या राज्यघटनेत कुणाला कळू न देता घुसवला गेला. त्यामुळे बहुसंख्यांकांचे, म्हणजे हिंदू आणि हिंदुत्व यांचे वाटोळे झाले. जन्महिंदूंनी हिंदूंचीच साधनसामुग्री वापरून हिंदूंसह हिंदुत्वाचा संहार केला. त्यामुळे हिंदुस्थानातील लोकशाही बहुसंख्यांक असलेल्या हिंदूंसाठी अहितकारक ठरली आहे.

मानवाचे शरीर, मन, बुद्धी आणि चित्त यांवर सकारात्मक परिणाम करणारा अन् पूर्णत्वाची अनुभूती देणारा ॐ

कु. प्रियांका लोटलीकर
प्रयोग १ चे उत्तर : या मंत्राचा ॐविरहित उच्चार केल्यावर मंत्रामध्ये काहीतरी अपूर्णता जाणवते.
प्रयोग २ चे उत्तर : ॐसहित उच्चार केल्यावर मंत्रामध्ये शक्ती कार्यरत असल्याचे जाणवते आणि मनाला आनंद मिळून पूर्णत्वाची अनुभूती येते.
        नादब्रह्मस्वरूप, अनादि आणि अनंत परमेश्‍वराचे सगुण-साकार रूप असलेला ॐकार ! अशा या परमेश्‍वराच्या सगुण-साकार रूपाच्या संदर्भात ज्ञानेश्‍वर माऊली म्हणतात,
अकार चरण युगल । उकार उदर विशाल ।
मकार महामंडल । मस्तकाकारें ॥१९॥
हे तीन्ही एकवटले । तेथ शब्दब्रह्म कवळलें ।
तें मियां श्रीगुरुकृपा नमिलें । आदिबीज ॥२०॥
- ज्ञानेश्‍वरी, अध्याय १
अर्थ :
        अकार म्हणजे सर्व स्थूल नामरूपे, ही गणपतीचे दोन्ही चरण होत. उकार म्हणजे सर्व सूक्ष्म नामरूपे, हे गणेशाचे पोटाचे ठिकाण होत आणि मकार म्हणजे नामरूपांची अव्यक्तदशा, ही गणेशाच्या विशाल मंडलाकार मस्तकाचे ठिकाण होय. ॥१९॥

सनातनच्या रामनाथी आश्रमाविषयी आलेल्या अनुभूती

रामनाथी आश्रम हा क्षीरसागर असून शेषशैय्येवर 
विराजमान श्रीविष्णु विशाल रूपातील परात्पर गुरु डॉ. आठवले 
यांना तुला पृथ्वीवरील माझे कार्य करायचे आहे, असे सांगत असल्याचे 
दृश्य दिसणे आणि ते पाहून मन निर्विचार होऊन आनंद जाणवणे 
सौ. मिथिलेशकुमारी
        मागील एक मासापासून (महिन्यापासून) मला गोव्यातील रामनाथी येथील सनातनचा आश्रम हा क्षीरसागर आहे, असे वाटत आहे. ९.६.२०१६ या दिवशी मला पुढील दृश्य दिसले. गोव्यातील सनातनचा आश्रम हा क्षीरसागर आहे. या सागरामध्ये मंद लहरी येत आहेत. भगवान श्रीविष्णु शेषनागाच्या शैयेवर पहुडले आहेत. त्यांच्या एका हातात कमळाचे फूल आहे, तर दुसर्‍या हाताने ते आशीर्वाद देत आहेत. श्री लक्ष्मीमाता त्या विशाल शैयेवर श्रीविष्णूंच्या चरणांजवळ बसली आहे. ती स्मित करत आहे. तेथे परात्पर गुरु डॉ. आठवले विशाल रूपात उपस्थित आहेत. त्यांनी श्‍वेतवस्त्र धारण केले आहे. श्रीविष्णु स्मित करत त्यांना काही सांगत आहेत. बहुदा ते त्यांना सांगत आहेत, मनुष्य रूपात तुला पृथ्वीवर राहून माझे कार्य करायचे आहे. शेषशैयेपासून लांब समुद्रातच अनेक जीव शरणागतभावाने हात जोडून प्रार्थना करत आहेत.
       हे दिव्य दृश्य मला पुनःपुुन्हा दिसत होते. त्या वेळी आतून पुष्कळ आनंद जाणवत होता. मला कशाचेही भान नव्हते. या विचारानेही माझे मन निर्विचार होऊन मला आनंद होत होता.
- सौ. मिथिलेशकुमारी, फैजाबाद (९.६.२०१६)

राजस्थानमधील सवाई माधोपूर येथील त्रिनेत्र श्री गणेश मंदिराची वैशिष्ट्ये आणि श्री गणेशाला संकटनिरसनासाठी प्रार्थना करण्यास जातांना झालेला त्रास अन् आलेल्या अनुभूती

१. रणथंभोर येथील 
त्रिनेत्र गणेश मंदिराची वैशिष्ट्ये 

त्रिनेत्र गणेशाचे चित्र

१ अ. रणथंबोरच्या जंगलातील डोंगराच्या कड्यातून स्वयंभू गणेश प्रकट होणे : समुद्र सपाटीपासून २ सहस्र फूट उंचावर असलेल्या रणथंभोरच्या जंगलातील एका डोंगराच्या कड्यातून हा स्वयंभू गणपति प्रकट झाला आहे. श्री गणेशाची मूर्ती पूर्ण नसून डोंगरातून बाहेर आलेल्या भागात श्री गणेशाच्या केवळ मुखाचा आणि सोंडेचा भाग आपल्याला दिसतो. श्री गणेशाच्या दोन्ही बाजूंना त्याचे पुत्र शुभ-लाभ आणि त्यांच्या शेजारी पत्नी रिद्धी-सिद्धी आहेत. अशा प्रकारे गणेश पंचायतन आहे. त्रिनेत्री गणेशाचा तिसरा नेत्र म्हणजे बुद्धी असल्याचे तेथील पुरोहितांनी सांगितले. श्री गणेशाच्या समोर श्रीविष्णूची मूर्ती आहे. त्या मूर्तीमध्ये जिवंतपणा आणि तारक-मारक भाव जाणवतो.
१ आ. पंचक्रोशीतील भक्तांनी कोणत्याही कार्याचे पहिले निमंत्रण श्री गणेशाला देणे : द्वापरयुगात भगवान श्रीकृष्णाचा अवतार झाला होता. तेव्हा त्रिनेत्र गणेश प्रथम प्रकट झाल्याचे तेथील पुरोहित सांगतात. त्रिनेत्र गणपतीचे हे पहिले मंदिर आहे. पंचक्रोशीतील भक्त कोणत्याही कार्याचे पहिले निमंत्रण श्री गणेशाला देतात.

एस्एस्आर्एफ् या आध्यात्मिक संकेतस्थळाने प्रथमच गाठला १० लाख वाचकसंख्येचा टप्पा !

     स्थूल आणि सूक्ष्म जगताचा सेतू (ब्रिजिंग द नोन अ‍ॅण्ड अन्नोन वल्डर्र्) हे ब्रीदवाक्य असलेल्या www.ssrf.org (एस्एस्आर्एफ् डॉट ऑर्ग) या जगप्रसिद्ध संकेतस्थळाने प्रथमच १० लक्ष वाचकसंख्येचा ऐतिहासिक टप्पा गाठला आहे.
     ९ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर २०१६ या ३१ दिवसांच्या कालावधीत स्पिरिच्युल सायन्स रिसर्च फाउन्डेशन (एस्एस्आर्एफ्) या आध्यात्मिक संघटनेच्या संकेतस्थळाला १० लक्ष १ सहस्र ५४० इतक्या वाचकांनी भेटी दिल्या. यात सर्वाधिक लोकांनी भेट दिलेल्या राष्ट्रांमध्ये अमेरिकेचा प्रथम, भारताचा दुसरा, तर इंडोनेनिशयाचा तिसरा क्रमांक असून या देशांतील अनुक्रमे १ लक्ष ७३ सहस्र ७७१, १ लक्ष ३२ सहस्र ८७१ आणि ८२ सहस्र २९२ लोकांनी संकेतस्थळाला गेल्या एका मासात भेट दिली आहे.
     एस्एस्आर्एफ संकेतस्थळाचा शुभारंभ जानेवारी २००६ मध्ये झाला. आतापर्यंत जेव्हा जेव्हा संकेतस्थळाद्वारे एखादी विशेष मोहीम राबवण्यात आली अथवा विशेष जागतिक घटना घडली, तेव्हा तेव्हा संकेतस्थळाला त्या मासात ९ लाखांहून अधिक लोकांनी भेटी दिल्या होत्या; परंतु अशी कुठलीही विशेष मोहीम न राबवताही संकेतस्थळावरील वैशिष्ट्यपूर्ण आध्यात्मिक ज्ञानभंडाराकडे आकृष्ट होऊन ९ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर या कालावधीत प्रथमच जगभरातील १० लाखांहून अधिक लोकांनी यास भेट दिली. या विषयी संकेतस्थळाची सेवा करणार्‍या एस्एस्आर्एफ्च्या साधकांनी परात्पर गुरु डॉ. आठवले आणि महर्षि यांची कृपा अन् संतांचा आशीर्वाद यांच्यामुळेच हा टप्पा गाठता आला, अशी कृतज्ञता व्यक्त केली आहे.

आश्रमात प्रत्येक ठिकाणी ईश्‍वराचा वास जाणवून आश्रमातून परत जाऊ नये, असे वाटले !

       आश्रमदर्शन करतांना मला काय जाणवले, ते शब्दांत मांडणे शक्य नाही; तरीही मी प्रयत्न करत आहे. आश्रमाच्या संपूर्ण परिसरात वावरतांना स्वर्ग या पलीकडे काय असू शकतो ?, असे मला वाटले. माझे मन अतिशय शांत होते. मला सतत आनंद जाणवत होता. मला आश्रमात प्रत्येक ठिकाणी ईश्‍वराचा वास जाणवत होता. आश्रमातून परत जाऊच नये, असे मला वाटले.
- श्री. श्रीकांत पांगारकर, जालना (२२.६.२०१६)

गुरुमाऊली झाली माझी आई ।

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले 
यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त...
        ३.५.२०१६ या दिवशी सकाळी ११.४५ वाजता मी नामजप करत असतांना मला प.पू. डॉक्टरांची पुष्कळ आठवण येऊ लागली. त्या वेळी मला पुढील कविता सुचली.
तळहाताच्या फोडाप्रमाणे जपले ।
अनेकदा पुनर्जन्म दिले ॥
हिंदु राष्ट्रासाठी साधना होण्यासाठी ।
बळ देऊनी अरिष्ट स्वतःवर घेतले ॥
कशी होऊ मी उतराई ।
गुरुमाऊली झाली माझी आई ॥ १ ॥

ॐचे आध्यात्मिक महत्त्व स्पष्ट करणारा प्रयोग !

प्रयोग १ : पुढील ओळींचा ॐ विरहित उच्चार केल्यावर काय जाणवते ?
प्रयोग २ : पुढील ओळींचा ॐ सहित उच्चार केल्यावर काय जाणवले ?
ॐ शान्तिप्रियः प्रसन्नात्मा प्रशान्तः प्रशमप्रियः।
ॐ उदारकर्मा सुनयः सुवर्चा वर्चसोज्ज्वलः ॥ - सूर्यसहस्रनामस्तोत्र

वाचकवृद्धी मोहीमेतील वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे

        भारतभरात वाचकवृद्धी मोहीम नुकतीच झाली होती. या वेळी अनेकानेक जणांना वाचक बनवण्यासाठी साधक तळमळीने प्रयत्न करत होते. त्याला समाजमनातून मिळालेला प्रतिसाद पुढे देत आहे.
१. एका वाचकांनी आपल्या 
परिचितांना स्वखर्चाने अंक चालू करणे
        एका गावातील एका वाचकांना स्थानिक साधकांनी तुमच्या परिचयातील कुणाला वाचक होण्यासाठी उद्युक्त करू शकतो का ? असे विचारले. तेव्हा त्यांनी काहींची नावे सांगितली. साधकांनी त्या व्यक्तींना संपर्क करण्याचा प्रयत्न केला; पण झाला नाही. हे त्या वाचकांना समजल्यावर त्यांनी त्या व्यक्तींनाही या नियतकालिकातील ज्ञानाचा लवकरात लवकर लाभ व्हावा, या उद्देशाने आपल्या २ परिचितांच्या वर्गणीचे पैसे स्वतः भरले.
२. काही वाचकांनी सांगितले, तुम्हाला वाटेल त्या कोणत्याही २ - ३ जिज्ञासूंना माझ्या वतीने सनातन प्रभात चालू करा.

भावी आपत्काळात अन् नेहमीसाठीही उपयुक्त ठरणारी सनातनची ग्रंथमालिका : भावी आपत्काळातील संजीवनी !

प्रथमोपचार प्रशिक्षण 
        संत-महात्मे, ज्योतिषी आदींच्या सांगण्यानुसार आगामी काळ हा भीषण आपत्काळ असून या काळात समाजाला अनेक आपत्तींना तोंड द्यावे लागणार आहे. आपत्काळात दळणवळण तुटल्यामुळे रुग्णाला रुग्णालयात नेणे, डॉक्टर वा वैद्य यांच्याशी संपर्क साधणे आणि पेठेत (बाजारात) औषधे मिळणेही कठीण होते. आपत्काळात ओढवणार्‍या विकारांना (आजारांना) तोंड देेण्याच्या पूर्वसिद्धतेचा एक भाग म्हणून सनातन भावी आपत्काळातील संजीवनी ही ग्रंथमालिका सिद्ध (तयार) करत आहे. या मालिकेतील १३ ग्रंथ आतापर्यंत प्रकाशित झाले आहेत. या ग्रंथांचा अभ्यास आतापासूनच केला, तर प्रत्यक्ष आपत्काळात विकारांना सामोरे जाण्यासाठी लागणारा आत्मविश्‍वास निर्माण होण्यास साहाय्य होईल. यासाठी हे सर्व ग्रंथ वाचकांनी अवश्य संग्रही ठेवावेत !
भाग १ : रुग्णतपासणी, गंभीर स्थितीतील रुग्णाचे जीवितरक्षण आणि मर्माघातादी विकारांवर प्रथमोपचार

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती निर्मित धर्मसत्संगांचे केबल अथवा दूरचित्रवाणी यांवरून प्रसारण करण्याचे नियोजन करावे !

जिल्हासेवक आणि साधक यांच्यासाठी महत्त्वाची सूचना
     १७.९.२०१६ या दिवसापासून पितृपक्षाला प्रारंभ होत आहे. त्या निमित्ताने या संदर्भातील महत्त्व विशद करणारा हिंदी विशेष धर्मसत्संग सिद्ध करण्यात आला आहे. या धर्मसत्संगांतर्गत धार्मिक कृतियोंका शास्त्र या विषयाचे दहा धर्मसत्संग आहेत आणि अध्यात्मशास्त्र या विषयाचे नऊ धर्मसत्संग आहेत. या सत्संगांचा कालावधी २८ मिनिटे आहे.
     या धर्मसत्संगांच्या माध्यमातून अधिकाधिक धर्मप्रसार होण्यासाठी साधकांनी पुढील प्रयत्न करावेत.
१. स्थानिक केबल अथवा दूरचित्रवाणी यांवरून या धर्मसत्संगांचे प्रसारण करण्याचे नियोजन करावे.
२. गावोगावी चालू असणार्‍या धर्मशिक्षणवर्गात आवश्यकतेनुसार हे धर्मसत्संग दाखवावेत.
३. सध्या सर्वत्र चालू असलेल्या सभा, अधिवेशने यांमधून जोडल्या जाणार्‍या धर्माभिमान्यांना हे धर्मसत्संग आसपासच्या गावांत दाखवण्याची सेवा द्यावी.

परीक्षणासाठी साधकांची अथवा बालसाधकांची संगणकावर पालट केलेली छायाचित्रे न पाठवता त्यांची मूळ छायाचित्रे पाठवा !

     दैवी बालके आणि साधक यांच्या संदर्भात लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये लिहून पाठवतांना त्यांची छायाचित्रेही समवेत पाठवली जातात. काही वेळा छायाचित्र चांगले दिसण्याच्या दृष्टीने मूळ छायाचित्रावर संगणकीय प्रणालीच्या साहाय्याने पालट करून ते पाठवले जाते.
     मूळ छायाचित्र असल्यास त्यावरून साधक किंवा बालसाधक यांचे डोळे आणि त्वचा यांचा अभ्यास करता येतो, तसेच आध्यात्मिक पातळी काढतांना परीक्षणाच्या दृष्टीने ते अधिक योग्य ठरते. त्यामुळे यापुढे साधकांची/बालसाधकांची गुणवैशिष्ट्ये पाठवतांना कॅमेर्‍याने काढलेली मूळ छायाचित्रे पाठवावीत.
     परीक्षणास पाठवलेल्या मूळ छायाचित्रावरच संगणकात पालट केलेले असल्यास ते छायाचित्रही मूळ छायाचित्रासमवेत पाठवावे.
- कु. प्रियांका लोटलीकर, महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय (२९.८.२०१६)

सनातन संस्थेचे साधक आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते यांना सूचना !

पोलीस चौकशीला आल्यास डगमगून न जाता खंबीर रहा !
    अंनिसचे डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. पानसरे यांच्या हत्येच्या प्रकरणी सनातन संस्थेला आणि साधकांना नाहक गोवण्याचा प्रयत्न पोलिसांकडून केला जात आहे. पोलीस चौकशीला आल्यास साधकांनी घाबरून न जाता, पोलिसांनी विचारलेल्या प्रश्‍नांना योग्यप्रकारे शांतपणे उत्तरे द्यावीत. कारण सनातन संस्थेचे सर्व कार्य वैध मार्गाने चालते. यापूर्वीही अशा घटनांमध्ये साधकांची चौकशी करण्यात आलेली आहे; मात्र अशा चौकशांमधून काहीही निष्पन्न झालेले नाही.
     कर नाही, त्याला डर कशाला या उक्तीप्रमाणे आपण काहीही केलेले नसल्यामुळे साधकांनी घाबरून जाण्याची आवश्यकता नाही.      भगवान श्रीकृष्ण पाठीशी असल्यामुळे साधकांनी अशा प्रसंगांत कोणतीही भीती न बाळगता प्रार्थना आणि नामजप करत खंबीरपणे प्रसंग हाताळावा.

विनाशकारी फटाक्यांवर बंदी आणा !

       कानाचे पडदे फाडणारे, निरोग्यांचे मरण जवळ आणणारे, बालकांचा थरकाप उडवणारे आणि आवाजाबरोबर प्रचंड प्रदूषण वाढवणारे फटाके, हा श्री गणेशचतुर्थी, दिवाळी, क्रिकेटच्या सामन्यातील विजय आणि धार्मिक वा राजकीय मिरवणुका यांचा अविभाज्य भाग झाला आहे. फटाक्यांमुळे होणारा विनाश स्वतःहून ओढवून घेण्याचा अट्टाहास आपण कशासाठी करतो ?
--------------------------------------------
उत्सवकाळात शास्त्रविसंगत फटाक्यांची 
आतषबाजी करणे, हा राष्ट्र आणि धर्म द्रोह !
        श्री गणेशमूर्तींचे मंगलमूर्ती मोरया या गजरात विसर्जन करतांना मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतषबाजी करण्यात येते. देश आर्थिक संकटात असतांना आणि आतंकवादाच्या सावटाखाली गणेशोत्सव साजरा करण्याची लाजिरवाणी स्थिती आली असतांना शास्त्रविसंगत फटाक्यांची आतषबाजी करणे, हा राष्ट्र आणि धर्म द्रोह आहे !
       स्वा. सावरकरांचे कोणतेही साहित्य वाचा त्यातून सुगंध येतो, मातृभूमीच्या मातीचा. तसे सनातन प्रभातचा कोणताही अंक वाचा त्यातून हुंकार येतो, राष्ट्रप्रेमाचा आणि हिंदु राष्ट्राचा !
- श्री. विद्याधरपंत नारगोलकर, महामंत्री, सावरकर स्मृती प्रतिष्ठान, पुणे

साधकांनो, चौकशीसाठी येणार्‍या पोलिसांपासून सतर्क रहा !

     पोलीस चौकशी करण्याच्या निमित्ताने आश्रमात किंवा घरी येतील, तेव्हा ते काही शस्त्रास्त्रेे अथवा आक्षेपार्ह वस्तू आश्रमात ठेवून मग छापा घालून ती जप्त केली, असे दाखवतील. त्यामुळे पोलिसांच्या चौकशीच्या संदर्भात सावधानता बाळगा ! १. कोल्हापूर येथील एका हॉटेल मालकाला फसवण्यासाठी पोलिसांनीच हॉटेलमध्ये अमली पदार्थ ठेवले होते.
२. आनंद संप्रदायाच्या आश्रमात पोलिसांनी प्लास्टिकच्या मानवी कवट्या ठेवून त्यांची मानहानी करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली होती. संप्रदायाच्या गुरूंचे कारागृहातच निधन झाले. ही गोष्ट ३५ वर्षांनंतर एका निवृत्त पोलीस अधिकार्‍याने उघड केली.
३. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाच्या आरोपपत्रात कर्नल प्रसाद पुरोहित यांच्या देवळाली येथील घरात महाराष्ट्र आतंकवादविरोधी पथकानेच (एटीएस्नेच)आर्डीएक्स ठेवून त्यांना चुकीच्या पद्धतीने अटक केली, असे राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने म्हटले आहे.
     या गोष्टी लक्षात घ्या आणि पोलीस तसे काही करत नाहीत ना, यावर सतर्कतेने लक्ष ठेवा !      सनातनच्या आश्रमांत पोलीस येतील, तेव्हा त्यांच्यावर लक्ष ठेवा, असे सनातन संस्था का सांगते, हे या उदाहरणावरून लक्षात येईल.

श्री गणेश अथर्वशीर्ष व संकष्टनाशनस्तोत्र (अर्थासह)

श्री गणेशाच्या उपासनेमागील शास्त्र 
समजून घेण्यासाठी वाचा सनातनचा लघुग्रंथ
       गणेशस्तोत्राचे पठण केल्याने स्मरणशक्ती वाढते आणि शरिराभोवती सूक्ष्म संरक्षक-कवच निर्माण होते. स्तोत्रातील संस्कृत भाषेमुळे उच्चारही सुधारतात. यासाठी नित्य गणेशस्तोत्राचे पठण करा आणि मुलांकडून करवून घ्या !
      राष्ट्र आणि धर्म संकटात असतांना, राज्यातील काही भाग दुष्काळग्रस्त असतांना फटाके वाजवून पैसे जाळणे हा समाजद्रोह, राष्ट्रद्रोह आणि धर्मद्रोह आहे !

पितृपक्षात दत्ताचा नामजप, प्रार्थना आणि श्राद्धविधी करा !

साधकांना सूचना
१. सध्या अनेक साधकांना वाईट शक्तींचा त्रास होत आहे. पितृपक्षात (या वर्षी १७ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर २०१६ या कालावधीत) हा त्रास वाढत असल्याने या कालावधीत प्रतिदिन ॐ ॐ श्री गुरुदेव दत्त ॐ ॐ । हा नामजप किमान १ घंटा करावा.
अ. जे साधक उपाय करतात, त्यांनी त्यांच्या उपायाच्या नामजपाच्या व्यतिरिक्त दत्ताचा नामजप किमान १ घंटा करावा. दत्ताचा नामजप करतांना हातांच्या पाचही बोटांची टोके जुळवून अनाहतचक्र आणि मणिपुरचक्र यांच्या ठिकाणी न्यास करावा.
आ. जे साधक उपाय करत नाहीत, त्यांनी वैयक्तिक आवरणे, स्नान, स्वच्छता-सेवा आदींच्या वेळी दत्ताचा नामजप किमान १ घंटा होईल, असे पहावे; मात्र त्रास जाणवल्यास त्यांनीही दत्ताचा नामजप बसून अन् मुद्रा करून करावा.
२. पितृपक्षाच्या कालावधीत पूर्वजांच्या त्रासांपासून रक्षण होण्यासाठी मधेमधे दत्ताला प्रार्थना करावी.
३. पितृपक्षात ज्या साधकांना शक्य असेल, त्यांनी श्राद्धविधी अवश्य करावा.
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥
या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो. - प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज
सनातनचे श्रद्धास्थान
मी कोणाचा नाही. माझा कुणी नाही.
ज्याचा त्याचा तोच मी; म्हणून मी सर्वांचा आहे.
भावार्थ : मी सर्वस्व गुरुचरणांवर वाहिल्यानंतर मी दुसर्‍या कुणाचा होऊच शकत नाही. गुरूंना अर्पण झाल्यानंतर माझा कुणी असायला मी शिल्लक राहिलोच कुठे ? परंतु सर्वांचा खरा मी एकच आणि सर्वव्यापी असल्यामुळे आता मी सर्वांचा आहे.
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण)

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले
      गांधी खुनाच्या खटल्यात स्वा. सावरकर आणि रा. स्व. संघ यांना पोलिसांनी अडकवले होते. पुढे ते निर्दोष सुटले. तसेच सनातनचे साधकही खुनाच्या खटल्यात निर्दोष सुटतील. - (परात्पर गुरु) डॉ. आठवले

     पोलिसांना कायदे, नीती आणि धर्म शिकवा, म्हणजे ते निरपराध्यांचा छळ करण्याचे आणि खोटे अहवाल तयार करण्याचे पाप करणार नाहीत ! - (परात्पर गुरु) डॉ. आठवले

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

व्यक्तीच्या सद्गुणाकडे लक्ष द्या 
प्रत्येक व्यक्तीमध्ये कुठला ना कुठला सद्गुण असतोच. त्याच्याकडेच लक्ष द्यावे. 
दोष दृष्टीआड करावेत, म्हणजे जग सुंदर दिसते. 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

कम्युनिस्टांची हुकूमशाही !

संपादकीय 
      मार्क्सवादाचा उदय ज्या युरोपमधून झाला, तेथील मार्क्सवाद केव्हाचा मुळासकट उचलून फेकून देण्यात आला आहे; मात्र इंग्रजांच्या शिक्षणांवर पोसलेल्या आणि पाश्‍चात्त्यांचे अंधानुकरण करणार्‍या तथाकथित बुद्धीवादी आणि पुरो(गामी) कम्युनिस्टांची अजून भारतात वळवळ चालूच आहेत. भारतातील बंगालमधील कम्युनिस्टांची वळवळ ५ वर्षांपूर्वीच संपुष्टात आणली गेली, तरी केरळमध्ये ती अद्याप कायम आहे आणि काही महिन्यांपूर्वी झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत कम्युनिस्ट पक्ष सत्तेवर आला अन् त्याने पुन्हा एकदा स्वतःचे आसुरी रूप दाखवण्यास प्रारंभ केला आहे.

काँग्रेसवरही बंदी घाला !

संपादकीय 
       डॉ. झाकीर नाईक यांच्या इस्लामिक रिसर्च फाऊंडेशन या संस्थेने राजीव गांधी फाऊंडेशनला वर्ष २०११ मध्ये ५० लाख रुपयांची देणगी दिल्याचे उघडकीस झाल्यावर सर्व धर्मप्रेमींच्या मनात एकच विचार आला असणार की, जिहादी आतंकवाद्यांचा आदर्श असलेल्या डॉ. झाकीर यांच्याकडून पैसे घेणार्‍या काँग्रेसवरच बंदी घातली पाहिजे. आतापर्यंत काँग्रेसने सत्तेत असतांना निरपराध्यांना कोणतेही पुरावे नसतांना नाहक विविध गुन्ह्यांत अडकवून त्यांचा अमानुष छळ केला आता तीच काँग्रेसच पुराव्यासह सापडली आहे. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, उपाध्यक्ष राहुल गांधी, प्रियांका गांधी (वढेरा) या संस्थेच्या संस्थापक असून माजी पंतप्रधान मनमोहनसिंह हे विश्‍वस्त आहेत.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn