Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

आज गौरी विसर्जन


पनवेल आश्रमातून नार्कोटिक औषधे जप्त केल्याचा पोलिसांचा दावा खोटा ! - अभय वर्तक, सनातन संस्था

मुंबई येथे पत्रकार परिषद
अन्वेषण यंत्रणांचे पितळ उघडे !
डावीकडून अधिवक्ता श्री. हिंदुराव साळुंखे, श्री. अभय वर्तक,
 अधिवक्ता श्री. संजीव पुनाळेकर आणि श्री. रमेश शिंदे
     मुंबई - श्री गणेशचतुर्थीच्या दिवशी साधक गणेशपूजनात मग्न असतांना देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमात विशेष तपास पथक कॉ. पानसरे हत्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी आले. दुसर्‍या दिवशी म्हणजे ५ सप्टेंबरला पहाटे ४.३० वाजेपर्यंत १६ घंटे साधकांना चौकशीत गुंतवून त्यांचा मानसिक छळ केला. खरे तर सर्वोच्च तपास यंत्रणा मानल्या जाणार्‍या केंद्रीय अन्वेषण यंत्रणेने (सीबीआय) यापूर्वी पनवेल आश्रमात कसून चौकशी केलेलीच होती. त्याचा सर्व अहवाल यंत्रणेकडून मिळू शकत असतांनाही केवळ प्रसिद्धीच्या दृष्टीने धाड घालण्याचे नाटक करण्यात आले. या धाडीत काहीही सापडत नाही, हे लक्षात आल्यावर पोलीस अधिकार्‍यांनी आश्रमातील चिकित्सालयामध्ये असलेली औषधे कह्यात घेतली आणि केवळ सनातन संस्थेची अपकीर्ती करण्यासाठी नार्कोटिक औषधे शासनाधीन (जप्त) केल्याचा खोटा दावा प्रसिद्धी माध्यमांसमोर केला, असा आरोप सनातन संस्थेचे प्रवक्ता श्री. अभय वर्तक यांनी ९ सप्टेंबर या दिवशी मुंबई मराठी पत्रकार संघात झालेल्या पत्रकार परिषदेत केला. या पत्रकार परिषदेस महाराष्ट्र राज्याच्या अन्न आणि औषध प्रशासन खात्याचे निवृत्त साहायक आयुक्त, तथा अधिवक्ता श्री. हिंदुराव साळुंखे, हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय सचिव अधिवक्ता श्री. संजीव पुनाळेकर आणि हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ता श्री. रमेश शिंदे उपस्थित होते.

मशिदीमध्ये लहान मुलांना मिळणार्‍या अमानुष वागणुकीविषयी चौकशी करण्यास गेलेल्या मंगळुरूमधील पत्रकारांना धर्मांधांकडून मारहाण !

     मंगळुरू - येथून सुमारे २० किलोमीटरवरील सुरलपाडी येथील जुम्मा मशिदीमध्ये लहान मुलांना पावसात उभे करण्याच्या घटना वरचेवर घडत असल्याच्या तक्रारी काही पालकांनी पत्रकारांकडे केल्या होत्या. या तक्रारीविषयी माहिती मिळवण्यासाठी मशिदीमध्ये गेलेल्या मंगळुरूमधील ३ वृत्तवाहिन्यांच्या ४ पत्रकारांना सुमारे ३०० धर्मांधांकडून मारहाण करण्यात आली.
     पत्रकारांनी त्यांच्या येण्यामागचे कारण सांगण्याचा प्रयत्न केला; मात्र धर्मांधांनी ते ऐकून न घेता ध्वनीवर्धकावरून आपल्या धर्माचा अवमान करण्यासाठी काही जण मशिदीमध्ये शिरले आहेत, सर्वांनी यावे, अशी घोषणा केली. काही क्षणांत सुमारे ३०० धर्मांध तेथे उपस्थित झाले. त्यांनी त्या पत्रकारांचे माईक हिसकावून घेतले. कॅमेर्‍यांची तोडफोड केली. पत्रकारांना हुसकावून लावतांना त्यांना मारहाणही केली. पोलीस घटनास्थळी आल्यानंतरच पत्रकारांची धर्मांधांच्या कचाट्यातून सुटका झाली.

पुणे महानगरपालिकेच्या ट्विटर खात्यावरून गणरायाचे विडंबन

महानगरपालिकेने केलेले गणरायाचे विडंबन 

       (हे चित्र कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्यासाठी प्रसिद्ध केले नसून केवळ विडंबन काय आहे, हे समजावे यासाठी प्रसिद्ध केले आहे.) 

  • हिंदूंनो, विज्ञापनातून होणारे श्री गणेशाचे विडंबन थांबवा ! 
  • गणरायाला दाखवले हेल्मेट वापराचा संदेश देताना ! 
  •  गणेशभक्त असप्रसन्न
        पुणे, ९ सप्टेंबर (वार्ता.) - गणेशविसर्जनासाठी धर्मविरोधी पर्यायांचा पुरस्कार करणार्‍या पुणे महानगरपालिकेने महानगरपालिकेच्या ट्विटर खात्यावरून pmc care अंतर्गत श्री गणरायाचे विडंबन केले आहे. महानगरपालिकेच्या ट्विटर खात्यावरून वाहतुकीचे नियमपालन करण्याच्या संदर्भात प्रबोधन करण्याच्या नावाखाली गणरायाला हातात हेल्मेट धरून वाहतूक पोलिसाप्रमाणे संदेश देतांना दाखवले आहे. (श्री गणेशाचे मानवीकरण करून विज्ञापनासाठी उपयोग करणे, हे त्याचे विडंबनच होय ! - संपादक) 

पुणे महानगरपालिकेने विसर्जन घाटावरील असुविधा दूर केली !

हिंदु जनजागृती 
समितीच्या आंदोलनाचा परिणाम ! 

कृत्रिम हौदावरील हौदातच शब्दातील च काढला !

विसर्जन घाटावर संरक्षक कठडे बसवून जीवघेणा खड्डाही बुजवला !

       पुणे - येथील सर्व विसर्जन घाटांवर संरक्षक कठडे नसणे, घाटावर जाण्यासाठी चांगला रस्ता उपलब्ध नसणे आदी असुविधांविषयी हिंदु जनजागृती समिती आणि अन्य हिंदुत्ववादी संघटना यांच्या वतीने ८ सप्टेंबर या दिवशी पत्रकार परिषद घेतली, तसेच पालिका अधिकार्‍यांवर कारवाई करण्यासाठी विभागीय आयुक्तांकडे तक्रारही प्रविष्ट केली होती, तसेच पुणे महानगरपालिका आयुक्त कुणाल कुमार यांना भेटून निवेदनही दिले होते. तसेच कृत्रिम हौदावर श्री गणेशमूर्ती हौदातच विसर्जन करा ! असे लिहिले असून त्यातील हौदातच या शब्दातील च हा शब्द काढण्याविषयीही सुचवले होते. त्याचाच परिणाम म्हणून उपरोक्त असुविधांचे पालट कसबा क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने पालट करण्यात आले. हे पालट केल्याचे क्षेत्रीय कार्यालयाचे अधिकारी अरुण खिलारे यांनी भ्रमणभाष करून समितीचे महाराष्ट्र संघटक श्री. सुनील घनवट यांना कळवले आणि प्रत्यक्ष येऊन पहाण्यास सांगितले. (हिंदूंनो, मिळालेल्या या यशाविषयी ईश्‍वरचरणी कृतज्ञता व्यक्त करूया ! - संपादक)

उत्तर कोरियाने पाचवी अणुचाचणी घेतल्याचा दक्षिण कोरियाचा दावा !

        सेऊल - उत्तर कोरियाने पाचवी अणुचाचणी घेतली असल्याचा दावा दक्षिण कोरियाने केला आहे. ही चाचणी आतापर्यंतची सर्वांत शक्तीशाली असल्याचे सांगितले जात आहे. दक्षिण कोरियाची वृत्तसंस्था योनहापला एका हवामान अधिकार्‍याने दिलेल्या माहितीनुसार उत्तर कोरियाच्या अणुचाचणीचे ठिकाण असलेल्या पुंगे री येथे ५.३ रिश्टर स्केल तीव्रतेचे कृत्रिम भूकंपाचे धक्के बसले आहेत. यातून उत्तर कोरियाने अणुचाचणी केल्याची शक्यता बळावत असल्याची शक्यता अधिकार्‍यांनी वर्तवली. दक्षिण कोरियातील तज्ञांच्या मते उत्तर कोरियाच्या या बॉम्बची क्षमता वर्ष १९४५ मध्ये अमेरिकेने हिरोशिमावर टाकलेल्या अणुबॉम्बपेक्षा अधिक आहे. उत्तर कोरियाने जानेवारी २०१६ हायड्रोजन बॉम्बची चाचणी घेतली होती. ९ सप्टेंबर रोजी उत्तर कोरिया त्याचा स्थापना दिवस साजरा करत असतो. वर्ष १९४८ मध्ये याच दिवशी उत्तर कोरिया हा स्वातंत्र देश म्हणून अस्तित्वात आला होता. यानिमित्त उत्तर कोरिया अणुचाचणी करून स्थापना दिन साजरा करू शकतो, असेही म्हटले जात आहे.

ट्विटरवर चालू असलेल्या सनातनविरोधी ट्रेंडला धर्मप्रेमींकडून मोठ्या प्रमाणात विरोध !

डॉ. वीरेंद्रसिंह तावडे अटक प्रकरण
     ८ सप्टेंबर २०१६ या दिवशी ट्विटरवर डॉ. दाभोलकर प्रकरणात अटकेत असलेले सनातनचे साधक डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांच्याविषयी दिवसभरात ३ ट्रेंड चालू होते. यामध्ये सनातन संस्थेने सहभागी होऊन सत्य बाजू मांडणार्‍या ट्विट्स सनातनच्या अधिकृत खात्यावरून (twitter.com/sanatansanstha) करण्यात आल्या. त्याचा संक्षिप्त आढावा येथे देत आहोत. धर्मप्रेमी लोकांनी या ट्विट्सद्वारे सनातनचे समर्थन केले.

* रीच : ट्विट्स पहाणार्‍यांची एकूण संख्या
* इम्प्रेशन्स : ट्विट्स किती वेळा पाहिल्या गेल्या याची एकूण संख्या

मुसलमान, ख्रिस्ती आणि सुशिक्षित पुरोगामी हेच देशाचे खरे शत्रू ! - पू. संभाजीराव भिडेगुरुजी

        सातारा, ९ सप्टेंबर (वार्ता.) - सध्या देव, देश अन् धर्म यांची अवस्था अत्यंत बिकट झाली असून या सर्वाला देशातील शिक्षणपद्धती कारणीभूत आहे. भारतीयही पाश्‍चिमात्यांचे अंधानुकरण करण्यात धन्यता मानत असून प्रत्येक जण स्वार्थांध झाला आहे. भारतीय कुटुंबव्यवस्था पूर्वीप्रमाणे देश पोसणारी राहिली नाही. त्यामुळे आपली संस्कृती, आचार-विचार लयाला चालले आहेत. शिवछत्रपतींना सर्वधर्मसमभावी ठरवू पहाणारे मुसलमान, ख्रिस्ती आणि सुशिक्षित पुरोगामी हेच देशाचे खरे शत्रू आहेत, असा घणाघात पू. संभाजीराव भिडे यांनी केला. श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आणि लिंब ग्रामस्थ यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेत ते बोलत होते.
पू. संभाजीराव भिडेगुरुजी पुढे म्हणाले की,
१. मुसलमान कितीही चांगला असला, तरी तो प्रथम मुसलमान असतो आणि नंतर देशाचा नागरिक असतो.
२. महाराष्ट्र ही साधू-संत-महंत यांची भूमी असून त्यांनी यामागेही देशाला तारले आहे आणि आताही तेच देशाला तारत आहेत. विरक्तपणाचा परमोच्च बिंदू म्हणजे महाराष्ट्रातील संत होत. या साधू-संतांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा गुणगौरव केला होता; मात्र आताची सुशिक्षित पुरोगामी आणि कपाळ-करंटी धेंडे संतांनाही नावे ठेवायला मागे-पुढे पहात नाहीत.

हरियाणामध्ये बिर्याणीत गोमांस असल्याचा संशय !

     मेवात (हरियाणा) - येथे ईदच्या पार्श्‍वभूमीवर बिर्याणी मेजवानीचे आयोजन करण्यात आले होते. या बिर्याणीमध्ये गोमांस असल्याची तक्रार पोलिसांकडे करण्यात आली होती. यामुळे पोलिसांनी घटनास्थळी येऊन बिर्याणीचे नमुने घेतले. राज्यमंत्री अनिल विज म्हणाले की, पोलिसांनी तपास करून दोषींवर कारवाई करायला हवी.

१८ वर्षांची हिंदु मुलगी मुसलमान मुलांना मंदिरात कुराण शिकवते !

१८ वर्षांची अन्य धर्मीय मुलगी कधी हिंदूंना तिच्या धार्मिक 
स्थळांमध्ये गीता शिकवू शकते का ?
     नवी देहली - आग्रा येथील संजयनगर कॉलनीतील मंदिरात पूजा कुशवाह ही १८ वर्षीय हिंदु मुलगी प्रतिदिन सुमारे ३५ मुसलमान मुलांना कोणत्याही प्रकारचे शुल्क न घेता कुराण वाचण्यास शिकवते. अरबी भाषेतील कठीण स्वर योग्य उच्चारणासह ती कुराण वाचण्यास शिकवते. 
     पूजा म्हणाली की, काही वर्षांपूर्वी आमच्या घराशेजारी संगीता बेगम राहत होत्या. तिचे वडील मुसलमान, तर आई हिंदू होती. (याला लव्ह जिहाद समजायचे का ? - संपादक) त्या मुलांना कुराण शिकवत असत. हळूहळू मलाही कुराण वाचण्याची आवड निर्माण झाली आणि मी त्या शिकवणी वर्गाला जाऊ लागले. (हिंदूंनो, तुमची मुले काय शिकतात याकडे लक्ष द्या ! हिंदू त्यांच्या मुलांना धर्मशिक्षण देत नसल्याचे अन्य धर्मीय त्याचा अपलाभ घेतात, याचेच हे उदाहरण होय ! - संपादक) काही कारणांमुळे संगीता बेगम यांना शिकवणी वर्ग बंद करावा लागला. त्यांनी मला आग्रह करून ही शिकवणी चालू ठेवण्यास सांगितले. जोपर्यंत तुम्ही तुमचे ज्ञान दुसर्‍यांना देत नाही, तोपर्यंत त्या ज्ञानाचा काहीच उपयोग नसल्याचे संगीता बेगम यांनी मला समजावून सांगितले. (धूर्त संगीता बेगम ! - संपादक) अनेक मुले गरीब घरातून येतात. हा वर्ग घेण्यासाठी जेव्हा माझ्या घरातील जागा अल्प ठरत आहे. परिसरातील लोकांनी मला यासाठी मंदिरात जागा दिली. (मंदिराची जागा हे हिंदूंचे धार्मिक स्थान आहे, ती अन्य धर्मियांना शिक्षण देण्याची जागा नाही ! अन्य धर्मियांच्या धार्मिक स्थळांमध्ये हिंदूंना धर्मशिक्षण देण्याची अनुमती मिळेल का ? - संपादक) पुजाची मोठी बहीण नंदिनीही मुलांना हिंदी आणि गीता शिकवते.

विशाखापट्टणम् येथे ७८ फूट गणेशमूर्तीसाठी २९ सहस्र ४६५ किलोचा महालाडू !

धर्मशिक्षणाअभावी गणेशमूर्ती मागील शास्त्र न समजणारे हिंदू !
      चेन्नई - ७८ फूट गणेशमूर्तीसाठी २९ सहस्र ४६५ किलोचा महालाडू तयार केल्याच्या उपक्रमाची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस्ने नोेंद घेतली आहे. विशाखापट्टणम् शहरातील गाजूकावा येथील ७८ फूट उंच गणेशमूर्तीसाठी तापेस्वरम् येथील श्री भक्तंजनेय सुरुची फूडस या आस्थापनाने हा महालाडू बनवला आहे. या महालाडूने गणेशभक्तीचा नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. हा लाडू २० लोकांनी बनवला आणि त्यासाठी ५० लाख रुपये खर्च आला. लाडू बनवण्यास २० घंटे लागले. या महालाडूमधे ४५ टक्के साखर, २३ टक्के बेसन, २७ टक्के तूप आणि ५ टक्के सुका मेवा आहे, अशी माहिती श्री भक्तांजनेय सुरुची फूडसचे पी.व्ही.व्ही.एस्. मल्लिकार्जुन यांनी दिली. हा लाडू गणेशभक्तांना प्रसाद म्हणून दिला जाणार आहे.बांगलादेशातील हिंदूंच्या डोक्यावर मृत्यूची टांगती तलवार !

हिंदूंवरील अत्याचारांच्या वेळी मानवाधिकारवाले कुठे असतात ?
  • ढाकेश्‍वरीदेवीच्या मंदिराला कडक सुरक्षा !
  • हिंदु पुजार्‍यांनी पारंपरिक वेश धारण करणे सोडले !
  • महिला हातात बांगड्या घालण्यास घाबरत आहेत !
बहुसंख्यांक हिंदूंच्या भारतातील राजकारणी बांगलादेशातील अल्पसंख्यांक
 हिंदूंसाठी स्वत:हून काही करतील, याची शाश्‍वती नाही ! त्यामुळे आता हिंदूंनीच 
त्यांच्या बांधवांच्या संरक्षणासाठी संघटित होऊन आवाज उठवायला हवा !
     ढाका - बांगलादेश अस्तित्वात येण्यापूर्वी वर्ष १९४७ मध्ये या ठिकाणी २७ टक्के अल्पसंख्यांक होते; मात्र आता त्याच्यात घट होऊन ते ९ टक्क्यांवर आले आहे. हिंदु पुजारी आणि बौद्ध गुरु यांना शोधून काढून ठार मारण्यात येत आहेत. त्यामुळे हिंदूंमधील भीती दिवसेंदिवस वाढत आहे. आम्हाला बाहेर पडणेही कठीण झाले आहे, अशी भीती बांगलादेशातील प्रसिद्ध ढाकेश्‍वरी मंदिरातील पुजारी विजय कृष्ण गोस्वामी यांनी व्यक्त केली आहे.

हवेच्या प्रदूषणामुळे वर्षभरात भारतात १४ लाख जणांचा मृत्यू !

जगभरात ५० लाख मृत्यू ! 
         नवी देहली - हवेच्या प्रदूषणामुळे भारतामध्ये वर्ष २०१३ या एकाच वर्षात तब्बल १४ लाख जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब जागतिक बँकेने प्रसिद्ध केलेल्या एका अहवालातून समोर आली आहे.
         जागतिक बँक आणि इन्स्टिट्युट फॉर हेल्थ मेट्रिक्स अ‍ॅण्ड इव्हॅल्युऐशनने अहवाल प्रसिद्ध केला आहे. खराब हवेमुळे आणि हवेच्या प्रदूषणामुळे मानवी आरोग्यावर परिणाम होऊन २०१३ या एकाच वर्षात जगभरात ५० लाख जणांचा मृत्यू झाल्याचे म्हटले आहे. त्यापैकी जवळपास ६० टक्के मृत्यू हे जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या देशात झाले आहेत. या देशांमध्ये भारतासह चीनचा समावेश आहे. हवेच्या प्रदूषणामुळे चीनमध्ये वर्ष २०१३ मध्ये तब्बल १६ लाख जणांचा मृत्यू झाला आहे. अहवालातून भारत आणि चीनमध्ये मृत्यूंची संख्या फार मोठी असली तरीही प्रती लाख लोकसंख्येच्या तुलनेत ही इतर देशांच्या तुलनेत कमी असल्याचे आढळून आले आहे. या सूचित चीन ४ थ्या, तर भारत ६ व्या क्रमांकावर आहे. जगात जॉर्जिया येथे प्रति लाख लोकसंख्येमागे हवेच्या प्रदूषणामुळे होणार्‍या मृत्यूंची संख्या २ सहस्र ११७ एवढी असल्याचे अहवालात म्हटले आहे. त्यानंतर कंबोडियाचा (१ सहस्र ३०० जण मृत्युमुखी) क्रमांक लागतो. या अहवालात जगातील एकूण १४२ देशांचा अभ्यास करण्यात आला. त्यामध्ये १० देशांमध्ये प्रति लाख लोकसंख्येमागे १ सहस्र पेक्षा अधिक मृत्यूंची संख्या असल्याचे म्हटले आहे. हवेच्या प्रदूषणामुळे मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम होऊन फुफ्फुसाचा कर्करोग, हृदयाशी संबंधित व्याधी उद्भवतात.

२ मासांनंतरही काश्मीरमधील जनजीवन विस्कळीत !

फुटीरतावाद्यांना २ मासांहून अधिक काळ देशातील 
एक भाग बंद ठेऊ देणारा जगातील एकमेव देश भारत !
       श्रीनगर - सुरक्षा सैनिकांनी जिहादी आतंकवादी बुरहान वानी यास ठार केल्याच्या दिवसापासून काश्मीर खोर्‍यात चालू झालेला हिंसाचार २ मासांनंतरही कायम आहे. फुटीरतावाद्यांनी पुकारलेल्या बंदमुळे खोर्‍यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे.
       या बंदमुळे येथील दुकाने, बाजारपेठा आणि पेट्रोल पंप बंद होते. सायंकाळनंतर श्रीनगरसह इतर काही ठिकाणच्या बाजारपेठा चालू झाल्या. फुटीरतावाद्यांनी बंदची मुदत १६ सप्टेंबपर्यंत वाढवली आहे. काश्मीर खोर्‍यातील शाळा, महाविद्यालये आणि इतर शैक्षणिक संस्था अद्याप बंद आहेत. येथे कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी सर्व संवेदनशील ठिकाणी सुरक्षा दले तैनात करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांच्या प्रवक्त्याने दिली.

(म्हणे) डॉ. नरेंद्र दाभोलकर यांना मारणारे देशी आतंकवादीच आहेत !

आतंकवाद्यांशी सनातनधर्मियांची तुलना करणार्‍या 
डॉ. बाबा आढाव यांची कीव करावी तेवढी थोडीच !
     पुणे - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घटना लिहिल्यानंतर धर्मनिरपेक्षता आणि समाजवाद अशी दोन कलमे लिहिली होती. ही दोन कलमे आता संकटात आली आहेत. त्यांना ती हटवायची आहेत. ही आणीबाणीच्या काळात घातलेली कलमे आहेत. समाजवाद आणि धर्मनिरपेक्षता ही कलमे हटवून तेथे मनुस्मृती घ्यायची आहे. महिलांच्या दर्गा प्रवेशाच्या वेळी तेथे सनातन बसलेले आहे. दुसरीकडे सनातन धर्म म्हणून नाव घेऊन चाललेले आहे. गुजरातमध्ये सर्वत्र सनातनचे वादळ चालू झाले आहे. आंतरराष्ट्रीय आतंकवादाचे केंद्रबिंदू पाकिस्तान असल्याचे सांगितले जाते; मात्र डॉ. नरेंद्र दाभोलकर यांना मारणारे देशी आतंकवादीच होते. त्या आतंकवादाविषयी कुणी काही बोलत नाही, अशी मुक्ताफळे डॉ. बाबा आढाव यांनी येथे झालेल्या एका कार्यक्रमात उधळली. (बाबा आढाव यांना एवढी माहिती आहे, तर त्यांनी ती पोलिसांना द्यावी. तशी ते का देत नाहीत ? या हत्या प्रकरणात सनातन संस्थेचा हात असल्याचा एकही पुरावा नसतांना देशी आतंकवाद्याची भाषा करणे मूर्खपणाचे लक्षण आहे, हे आढाव यांच्या कधी लक्षात येणार ? - संपादक)

पाचोरा, जळगाव येथे हिंदु धर्मजागृती सभा

उपस्थित धर्माभिमान्यांना मार्गदर्शन करतांना पू. नंदकुमार जाधव
     पाचोरा (जिल्हा जळगाव) - ऑलिम्पिकमध्ये भारताला एकही सुवर्णपदक मिळाले नाही; मात्र गोमांस निर्यातीत भारताचा प्रथम क्रमांक लागतो. गायीचे दूध आपल्या खेळाडूंना पिण्यास दिले, तर ऑलिम्पिकमधील सर्वच सुवर्णपदके भारतात आणण्याचे सामर्थ्य गायीच्या दूधात आहे. असे उद्गार सनातनचे २४ वे समष्टी संत पू. नंदकुमार जाधव यांनी पाचोरा तालुक्यातील शेवाळे या गावात गणेशोत्सवानिमित्त आयोजित केलेल्या हिंदु धर्मजागृती सभेत काढले. या सभेला पू. नंदकुमार जाधव यांच्यासह हिंदु जनजागृती समितीप्रणित रणरागिणी शाखेच्या कु. पूजा जाधव यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. या सभेला ४०० हून अधिक हिंदु धर्माभिमानी उपस्थित होते. या वेळी पू. नंदकुमार जाधव यांनी आदर्श गणेशोत्सव कसा असावा याविषयी मार्गदर्शन केले. रणरागिणी शाखेच्या कु. पूजा जाधव म्हणाल्या, धर्माचरण हे धर्मांधांपासून रक्षण होण्यासाठी एकप्रकारे चिलखत असून ते न घालता युद्धभूमीत उभे राहिल्याने आज हिंदू मुली लव्ह जिहादच्या विळख्यात सहजतेने अडकत आहेत.

समाजाला सात्त्विकता देण्यासाठी सनातन संस्थेची आवश्यकता ! - भाजप नगरसेवक दिलीप काळोखे

पुणे येथे सनातन संस्थेच्या वतीने 
चैतन्यदायी धर्मरथाच्या ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन 

प्रदर्शनातील ग्रंथ न्याहाळतांना भाजपचे नगरसेवक श्री. काळोखे

         पुणे, ९ सप्टेंबर (वार्ता.) - सनातन संस्थेचे कार्य चांगले असून ते समाजाला उपयुक्त आहे. आज समाजात सात्त्विकता हवी असून ती देण्यासाठी सनातन संस्थेची आवश्यकता आहे. समाजाने अशा चैतन्यदायी प्रदर्शनाचा लाभ घेऊन धर्माचरणाची कास धरावी. त्यासाठी सनातन संस्थेचे मार्गदर्शन घ्यावे, असे प्रतिपादन पुणे महानगरपालिकेतील भाजपचे नगरसेवक आणि कसबा-विश्राम प्रभाग समिती अध्यक्ष श्री. दिलीप काळोखे यांनी केले. येथील बाजीराव रस्त्यावरील महाराणा प्रताप उद्यानासमोर सनातन संस्थेच्या वतीने गणेशोत्सवाचे औचित्य साधून महर्षींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या चैतन्यदायी धर्मरथ ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या प्रदर्शनाचे उद्घाटन श्री. काळोखे यांनी धर्मरथपूजन आणि श्रीफळ वाढवून केले. या वेळी श्री. काळोखे यांनी संपूर्ण प्रदर्शन सनातनचे साधक श्री. शिरीष शहा यांच्याकडून जिज्ञासेने जाणून घेतले आणि काही ग्रंथ, सात्त्विक उत्पादनेही खरेदी केली.

सनातनचे साधक डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांना झालेली अमानुष मारहाण, कायद्याचा अपवापर, न्यायालयाचा आदेश असूनही वकिलांना भेटू न देणे या संदर्भात भाजपचे आमदार सुरेश (राजूमामा) भोळे आणि शिवसेनेचे आमदार किशोर(आप्पा) पाटील यांना निवेदने !

डावीकडून सौ. मिना जाधव, सौ. रेखा जाधव, आमदार श्री. किशोरआप्पा
पाटील, पू. नंदकुमार जाधव, श्री. दत्तात्रय वाघुळदे, श्री. प्रशांत जुवेकर

डावीकडून श्री. प्रशांत जुवेकर, आमदार श्री. सुरेश
भोळे, पू. नंदकुमार जाधव, श्री. दत्तात्रय वाघुळदे

काश्मीरमधील हिंसाचार रोखण्यासाठी सरकारने कठोर पावले उचलावीत !

कराड येथील निवासी नायब तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे मागणी
     कराड - आतंकवादी आणि फुटिरतावादी यांमुळे काश्मीरमधील परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. त्यामुळे केंद्रीय गृहमंत्री, भारत सरकार यांनी योग्य ती कठोर पावले उचलावीत, या आशयाचे निवेदन येथील निवासी नायब तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी श्री. अजित कुर्‍हाडे यांना हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देण्यात आले. या वेळी समितीचे कार्यकर्ते, हिंदु एकता आंदोलनचे सर्वश्री भूषण जगताप, अनुप कुंभार, संपत निकम, सनातन संस्थेचे साधक उपस्थित होते.
पंतप्रधानांनी गोरक्षकांना समाजकंटक म्हटल्याचे 
वक्तव्य मागे घेण्यासाठी नायब तहसीलदारांना निवेदन
     कराड - पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी गोरक्षकांना समाजकंटक म्हटल्याविषयीचे आपले वक्तव्य मागे घेऊन गोमातेची क्षमा मागावी, अशा आशयाचे निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने निवासी नायब तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी श्री. अजित कुर्‍हाडे यांना देण्यात आले.

संभाजीनगर परिक्षेत्रात गेल्या ४ वर्षांत २३० पोलिसांवर आक्रमणे, ३० गंभीर घायाळ

     संभाजीनगर - संभाजीनगर परिक्षेत्रातील ४ जिल्ह्यांत गेल्या ४ वर्षांत २३० पोलिसांवर आक्रमणे झाली असून त्यात ३० कर्मचारी गंभीर घायाळ झाले असल्याची माहिती संभाजीनगर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक अजित पाटील यांनी ६ सप्टेंबर या दिवशी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. (अशी माहिती देणार्‍या पोलिसांऐवजी पोलिसांनी कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी कठोर प्रयत्न करणे आवश्यक आहे. - संपादक)
     ते पुढे म्हणाले की, संभाजीनगर, जालना, बीड आणि धाराशिव येथील संवेदनशील आणि अतिसंवेदनशील भागात पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली पथसंचलन करण्यात आले. तसेच विविध भागांत दंगल नियंत्रण पथकाने सराव केला असून वेळप्रसंगावधान म्हणून गोळीबाराचा सरावही करण्यात आला.

ठामपाच्या शाळातून विद्यार्थ्यांना देण्यात येणार्‍या पोषक आहारात अळ्या !

विद्यार्थ्यांना योग्य पोषक आहार मिळतो कि नाही, 
हे पहाण्याची कार्यपद्धत एवढे वर्षांत बसवू न शकणारे प्रशासन 
पालिकांच्या शाळांची स्थिती कधी तरी सुधारू शकेल काय ?
        ठाणे - ठाणे महापालिकेच्या शाळातून विद्यार्थ्यांना देण्यात येणार्‍या पोषक आहारात अळ्या आढळल्याने पुन्हा एकदा महिला बचत गटांच्या खिचडीविषयी संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे. शिळफाटा येथील शाळा क्रमांक २६ मध्ये हा प्रकार उघडकीस आला आहे. नगरसेवक हिरा पाटील यांनी हा प्रकार शाळेच्या मुख्याध्यापकांच्या निदर्शनास आणून दिला. मात्र संबंधितावर कुठलीच कारवाई न करण्यात आल्याने हिरा पाटील यांनी घडलेल्या प्रकारची माहिती पालिका आयुक्त संजीव जयस्वाल आणि शिक्षणाधिकारी यांना पत्र पाठवून कारवाईची मागणी केली आहे.
        ठामपा शाळेमध्ये खिचडी हा पोषक आहार देणार्‍या १२७ हून अधिक महिला बचतगट असून येथील ठाणे महापालिकेच्या वतीने २००३ पासून शालेय पोषण आहार योजनेच्या अंतर्गत शालेय विद्यार्थ्यांना खिचडी पुरवली जाते. ठाणे मनपा शाळेत वाटप होणार्‍या खिचडीविषयी पालकसभेत अनेक तक्रारी प्राप्त होत होत्या.

मालाड येथील नौदलाच्या परीक्षेदरम्यान चेंगराचेंगरीत उमेदवार घायाळ

       मुंबई - मालाडमध्ये नौदलाच्या परीक्षेच्या काळात झालेल्या चेंगराचेंगरीत काही उमेद्वार घायाळ झाले. येथील आयएन्एस् हमला येथे ९ सप्टेंबरला सकाळी देशभरातून दहा सहस्रांहून अधिक मुले परीक्षेसाठी आली होते. पोलिसांनी लाठीचार्ज केल्यामुळे चेंगराचेंगरी झाली, असा आरोप उमेद्वारांनी केला आहे. तर वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी सांगितले की, आम्ही लाठीचार्ज केला नसून मोठी गर्दी झाल्याने चेंगराचेंगरी झाली.

गणेशमूर्ती विसर्जनासाठी अमोनियम बायकार्बोनेटचा वापर केल्यास हिंदूंच्या रोषाला सामोरे जावे लागेल ! - कोल्हापूरवासीय हिंदुत्वनिष्ठांची धर्मद्रोह्यांना चेतावणी

      कोल्हापूर, ९ सप्टेंबर (वार्ता) - शहरातील पंचगंगेच्या घाटावर नॅशनल केमिकल लॅबोरेटरी आणि स्थानिक पर्यावरणप्रेमी संघटना यांच्या वतीने अमोनियम बायकार्बोनेटमध्ये प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्तींचे विसर्जन करून दाखवण्याच्या प्रात्यक्षिकाचे आयोजन केले होते. सायंकाळी उशिरा हे जेव्हा हिंदुत्ववाद्यांना कळले, तेव्हा त्यांनी एकत्रितपणे जाऊन त्या ठिकाणी धर्मद्रोह्यांना दम भरला. अशाप्रकारे प्रयोग करून तुम्ही हिंदूंच्या श्रद्धा पायदळी तुडवत आहात. असे धाडस तुम्ही बकरी ईदला करणार का ? पुन्हा अशाप्रकारे प्रयोग केले, तर हिंदूंच्या रोषाला तुम्हाला सामोरे जावे लागेल, अशा शब्दांत धर्मद्रोह्यांना खडसवले. त्या वेळी धर्मद्रोह्यांनी माघार घेत पुन्हा कोल्हापुरात हा प्रयोग घेणार नाही, असे सांगितले.
     या वेळी शिवसेनेचे कोल्हापूर शहर उपप्रमुख श्री. शशी बिडकर, शिवसेनेचे कागल शहर प्रमुख श्री. किरण कुलकर्णी, पतंजली योग समितीचे श्री. संजय पाटील, हिंदु जनजागृती समितीचे श्री. मधुकर नाझरे, श्री. शिवानंद स्वामी, श्री. किरण दुसे, धर्माभिमानी श्री. अमोल कुलकर्णी, श्री. नितीश कुलकर्णी, श्री. गजानन नागपूरे, श्री. कृष्णा भोसले आदी हिंदुत्वनिष्ठ उपस्थित होते.

येरवडा कारागृहातील संचित (पॅरोल) आणि अभिवचन (फर्लो) मिळण्यासाठी २०० कैद्यांनी केलेले उपोषण घेतले मागे

     पुणे - कोणत्याही गुन्ह्यातील कैद्याला यापुढे संचित (पॅरोल) आणि अभिवचन (फर्लो) याची सुट्टी मिळणार नसल्याचे कळल्यामुळे येथील येरवडा कारागृहातील २०० कैद्यांनी राज्य सरकारच्या निर्णयाविरुद्ध ६ सप्टेंबर या दिवशी उपोषण केले होते; मात्र कारागृह प्रशासनाने सर्व कैद्यांना सरकारचा निर्णय वाचून दाखवून तो समजून सांगितला. त्यानंतर अपसमज झालेल्या कैद्यांनी उपोषण मागे घेतले.
     नॅशनल क्राईम रेकॉर्ड्स ब्युरोच्या आकडेवारीनुसार राज्यातील विविध कारागृहांतून संचित आणि अभिवचन यांवर सुटलेले सुमारे २०० कैद्यांनी पलायन केल्याची घटना आली. त्यामुळे राज्य सरकारने संचितची सुट्टी २८ दिवसांवरून २१, तर अभिवचनची सुट्टी ९० वरून ४५ दिवस केली आहे. सरकारने सर्वच कैद्यांना हा निर्णय लागू केल्याचा अपसमज निर्माण झाला होता. त्यामुळे कारागृहातील कैद्यांनी याविरोधात उपोषण करण्याचा निर्णय घेतला होता.

विलेपार्ले (मुंबई) येथे महिला वाहतूक पोलिसाला एका महिलेकडून मारहाण

     मुंबई - सध्या पोलिसांना मारहाण करण्याचे अपप्रकार वाढत चालले असून येथील विलेपार्ले महिला संघ महाविद्यालयाजवळ महिला वाहतूक पोलीस कर्मचारी प्रियांका खोत यांना दुचाकीस्वार महिला आरती पाटलेकर यांनी मारहाण केल्याची घटना घडली आहे. (पोलीस खात्यातील महिला कर्मचारीही असुरक्षित ! - संपादक) खोत या त्यांचे कर्तव्य बजावत असतांना विनाशिरस्त्राण दुचाकी चालवत असल्याप्रकरणी त्यांनी पाटलेकर यांच्यावर कारवाई केली. या वेळी त्या दोघींमध्ये वादावादी झाली आणि पाटलेकर यांनी खोत यांच्या कानशिलात लगावत मारहाण केली. (जनतेसमवेत पोलिसांनाही आता स्वरक्षणाचे धडे शिकवायचे का ? - संपादक) या वेळी पाटलेकर यांचा भाऊ सुदर्शन पाटलेकर याने खोत यांना धमकीही दिली. पोलिसांनी त्या दोघांना अटक केली आहे.

दूरचित्रवाहिन्यांमधील मालिकांमधून श्रीगणेशमूर्ती विसर्जनाविषयी धर्मद्रोहाचे उदात्तीकरण !

  • अन्य पंथियांच्या उत्सवांत असे पर्याय देण्याचे धाडस या मालिकांतून दाखवले गेले आहे का ? हिंदूंनो, गणेशमूर्ती विसर्जनामुळे जलस्रोतांचे प्रदूषण होत नसून हिंदुद्वेष्ट्यांनी केलेला हा अपप्रचार आहे, हे जाणा !
  • गणेशोत्सव प्रबोधन २०१६
        मुंबई - झी मराठी या वाहिनीवर चालू असलेल्या नांदा सौख्यभरे आणि काहे दिया परदेस या मालिकांमधून सध्या गणेशोत्सवाचे भाग दाखवण्यात येत आहेत. त्यामध्ये समुद्र किंवा पाण्याचे जलस्रोत प्रदूषित होऊ नये, यासाठी श्री गणेशमूर्तीचे वहात्या पाण्यात विसर्जन करण्याऐवजी घरामध्ये एका प्लास्टिकचा पिंप किंवा प्लास्टिकचा टब यांमध्ये विसर्जन करण्यात येत असल्याचे दाखवण्यात आले आहे. याशिवाय असे विसर्जन करणे किती योग्य आहे, हेही दाखवण्याचा प्रयत्न या करण्यात आला आहे. (महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळ, तसेच पुण्याच्या सृष्टी इको रिसर्च फाऊंडेशन या संस्थांनी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या श्रीगणेश मूर्तींनी पाण्याचे प्रदूषण होत नाही, असा अहवाल दिला आहे. - संपादक)

वादग्रस्त पोलीस अधीक्षक ज्योतीप्रिया सिंह यांची दोन मासाच्या आत चौकशी होणार !

आमदार राजेश क्षीरसागर यांनी समस्या मांडल्यावर गृहराज्यमंत्री 
डॉ. रणजीत पाटील यांचे कारवाईचे आदेश !
     कोल्हापूर - दुहेरी बलात्कार खटला, प्रशिक्षणाच्या वेळी मद्य पिऊन धिंगाणा घालणे, अटक केलेल्या आरोपीची अनधिकृत सुटका करणे यांसह लोकप्रतिनिधींची अपकीर्ती करण्याकरिता त्यांच्यावर खोटे गुन्हे प्रविष्ट करणे, असे अनेक अपकारभार करून पोलीस प्रशासनाच्या प्रतिमेस काळीमा फासणार्‍या कोल्हापूरच्या तत्कालीन पोलीस अधीक्षक आणि सध्या जालना येथे कार्यरत असणार्‍या विद्यमान पोलीस अधीक्षक श्रीमती ज्योतीप्रिया सिंह यांची एक मासाच्या आत चौकशी करून अहवाल सादर करण्याचा आदेश गृहराज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी संभाजीनगर येथील विशेष पोलीस महानिरीक्षकांना दिला आहे. शिवसेनेचे आमदार श्री. राजेश क्षीरसागर यांनी हिवाळी अधिवेशन २०१५ मधे उपस्थित केलेल्या औचित्याच्या सूत्रावर डॉ. रणजीत पाटील यांनी केलेल्या कारवाईविषयीचे लेखी पत्र दिले आहे.

फलक प्रसिद्धीकरता

पर्यावरण रक्षणाच्या नावाखाली हिंदूंच्या उत्सवांना विरोध करणारे आता गप्प !
     मुसलमानांनी इको फ्रेण्डली बकरी ईद साजरी करण्याच्या विषयाचा उपहास करत राष्ट्र्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक म्हणाले, इको फ्रेण्डली कुर्बानी म्हणजे आता मातीचा बोकड बनवून आणि कापून ती माती खायची का ?

हिंदू तेजा जाग रे !

Jago ! : Ecofriendly Eid ka virodh kar NCPke Nawab Malikne kaha kya ab mittike bakreki kurbani de?
     Hindu utsavoka virodh karnewale Paryavaranpremi ab chup kyu ?
जागो !
: इको-फ्रेंडली ईद का विरोध कर एन्सीपी के नबाव मलिकने कहा, क्या अब मिट्टी के बकरे की कुर्बानी दें ?
     हिन्दू उत्सवों का विरोध करनेवाले पर्यावरणप्रेमी अब चुप क्यों ?

केरळमध्ये सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाकडून होणार्‍या हिंसाचाराच्या निषेधार्थ बेंगळुरू येथे १० सप्टेंबरला मेणबत्ती मोर्चा !

हेच कम्युनिस्ट असहिष्णुतेच्या 
सूत्रावर हिंदूंवर टीका करण्यात, पुरस्कार 
परत करण्यात अग्रेसर असतात, हे आश्‍चर्य !
       बेंगळुरू - केरळमध्ये सामाजिक कार्यकर्त्यांच्या विरोधात चालू असलेल्या सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाच्या हिंसाचाराच्या निषेधार्थ सिटीझन्स् फॉर डेमोक्रसी, बेंगळुरू यांच्या वतीने शनिवार, १० सप्टेंबर या दिवशी सायंकाळी ६ ते ८ या वेळेत शहरातील टाऊन हॉलसमोर मेणबत्ती मोर्चा काढण्यात येणार आहे. कम्युनिस्टांनी द्वेषाचे राजकारण थांबवण्याची मागणी या वेळी करण्यात येईल. कम्युनिस्टांनी हिंसाचार थांबवावा. तसेच लोकशाहीची नीतीमूल्ये जपावी आणि शांती प्रस्थापित करावी, अशी मागणी करण्यात येणार आहे.

(म्हणे) मी जिल्हाधिकारी असल्याने कोणाला आत घालायचे आणि कोणाला सोडायचे, हे मी ठरवतो !

पत्रकारांशी उद्दामपणे बोलणारे जिल्हाधिकारी सामान्य नागरिकांशी 
कसे वागत असतील, याचा विचारही न केलेला बरा ! 
धाराशिव जिल्हाधिकार्‍यांचे पत्रकारांना उद्दाम उत्तर !
      तुळजापूर (जिल्हा धाराशिव), ९ सप्टेंेंबर (वार्ता.) - भाविकांच्या सुरक्षेचे सूत्र पुढे करून नवरात्रोत्सवात भाविकांना घाटशिळामार्गे श्री भवानीदेवीच्या मंदिरात सोडण्याच्या प्रशासनाच्या निर्णयाविरुद्ध शहरवासियांनी रोष व्यक्त करून भव्य मोर्चा काढला. त्यानंतर चर्चेसाठी दोन आमदार, पुजारी मंडळाचे तीन सदस्य, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आणि तुळजापूर येथील मान्यवरांच्या उपस्थितीत एक बैठक बोलावली होती. या वेळी एका पुजार्‍याने घाटशिळामार्गे मंदिरात प्रवेश हे वृत्तपत्रांत आलेल्या वृत्तांविषयी विचारले असता धाराशिवचे जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे म्हणाले, याविषयी मला माहीत नाही. घाटशिळामार्गे सोडण्याचा निर्णय कोणालाही विश्‍वासात न घेता घेण्यात आला आहे, असे पत्रकारांनी विचारले असता जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे म्हणाले, मी जिल्हाधिकारी आहे. कोणाला आत घालायचे आणि आणि कोणाला सोडायचे, हे मी ठरवतो.
    अशाच प्रकारचा अनुभव काही व्यक्ती याच विषयाच्या संदर्भात निवेदन देण्यास गेल्या असता त्यांना आला. त्या निवेदनकर्त्यांना जिल्हाधिकारी म्हणाले, मी तुम्हाला आत टाकू शकतो. जिल्हाधिकार्‍यांच्या अशा भूमिकेमुळे भाविक अप्रसन्न आहेत. आता मुख्यमंत्र्यांनीच यामध्ये लक्ष घालावे, अशी मागणी भाविकांतून होऊ लागली आहे.

लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळामध्ये घोटाळा

       मुंबई - लालबागच्या राजाच्या चरणी भाविक भक्तिभावाने दान करतात. मात्र यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याची तक्रार मंडळातील माजी कार्यकर्ता महेश वेंगुर्लेकर यांनी केली आहे. गणेशोत्सव मंडळाची तक्रार आता राज्यपाल, मुख्यमंत्री, ईडी आणि धर्मादाय आयुक्तांपर्यंत पोचली आहे. वेंगुर्लेकर यांच्या तक्रारीनंतर राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी न्याय विभागाच्या मुख्य सचिवांना पत्र लिहून चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. धर्मादाय आयुक्तांनीही या विषयाची माहिती मागवली आहे.

गेल्या २० वर्षांपासून शाडू मातीच्या श्रीगणेशमूर्ती बनवण्याचे कार्य तळमळीने करणारे पुणे येथील शिल्पकार श्री. विवेक दत्तात्रय खटावकर !

सध्या चालू असलेल्या गणेशोत्सवाच्या निमित्ताने...
श्री. विवेक खटावकर
      श्री. विवेक दत्तात्रय खटावकर हे पुण्यातील मानाच्या ४थ्या श्री तुळशीबाग गणपती मंडळाचे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. सुप्रसिद्ध शिल्पकार डी.एस्. खटावकर यांचे ते चिरंजीव आहेत. श्री. विवेक खटावकर स्वत:ही एक शिल्पकार असून गेल्या २० वर्षांपासून पर्यावरणपूरक शाडू मातीच्या श्रीगणेशमूर्ती बनवण्याचे कार्य करतात. त्यांच्या प्रयत्नांमुळे त्यांच्या मंडळाच्या श्रीगणेशमूर्ती विसर्जन मिरवणुकीतील गुलाल उधळणे, फटाके फोडणे आदी अपप्रकार बंद झाले आहेत. (इतर गणेशोत्सव मंडळांनीही हा आदर्श घ्यावा ! - संपादक) हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते आणि सनातन संस्थेचे साधक यांनी गणेशोत्सव जनजागृती मोहिमेनिमित्त श्री. विवेक खटावकर यांची नुकतीच भेट घेतली. या वेळी त्यांच्याशी झालेल्या वार्तालापातील सूत्रे येथे देत आहोत.

सनातनच्या साधकांना छळणार्‍या पोलिसांवर शासनाने कारवाई करणे आवश्यक ! - मान्यवरांची प्रतिक्रिया

      डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि कॉ. पानसरे यांच्या हत्या प्रकरणांत अन्वेषण यंत्रणांनी संशयावरून सनातनचे निष्पाप साधक डॉ. वीरेंद्रसिंह तावडे आणि श्री. समीर गायकवाड यांना अटक करून कारागृहात ठेवले आहे. पुरोगाम्यांच्या दबावापोटी आणि हिंदुत्वाचे दमन करण्यासाठी सनातनला हत्या प्रकरणात गोवण्याचे कारस्थान चालू आहे. पोलीस आणि अन्वेषण यंत्रणा यांच्याकडून अटकेतील साधक, तसेच अन्य साधक यांचाही अतोनात छळ होत आहे. हिंदूविरोधी प्रसिद्धीमाध्यमांकडूनही सनातनची अपकीर्ती केली जात आहे. या पार्श्‍वभूमीवर सनातन प्रभातने पोलिसांच्या सनातनद्वेषाचे कटू वास्तव, हा विशेषांक ६ सप्टेंबर या दिवशी प्रसिद्ध केला. त्याला भरघोस प्रतिसाद मिळाला. या अनुषंगाने संत-महंत, समाजातील मान्यवर आणि हिंदुत्वनिष्ठ यांनी व्यक्त केलेल्या प्रतिक्रिया येथे देत आहोत.

मोरगावचा मयुरेश्‍वर : भूलोकात अधिक आनंद देणारे स्थान !

प्रा. श्रीकांत भट
       गणेशोत्सव हा महाराष्ट्राचा मानबिंदू आहे. गणरायाच्या आगमनाचे वेध बाल-गोपालांपासून वयोवृद्धांपर्यंत सर्वांना पुष्कळ आधीपासूनच लागतात. मूर्तीकार गणेशमूर्ती साकारत असतांना गणेशोत्सव कसा साजरा करायचा, याचे नियोजन गणेशमंडळे करू लागतात.गणपतीबाप्पा मोरया या जयघोषाची उजळणी मनातून उसळी मारू लागते. दहा दिवसांसाठी पाहुणा येणारा श्री गणेश सर्व कुटुंबाला आनंदाचे मोदक देऊन सर्वांचे मनोरथही पूर्ण करू लागतो. अशा या श्री गणेशतत्त्वाचा लाभ करून घेण्यासाठी मोरगाव या गणेशाच्या भूस्वानंद क्षेत्राचा (स्वानंदलोकाचा) हा महिमा जाणून घेऊया.
१. मोरगाव क्षेत्र अविनाशी असल्याचे वेद आणि पुराणात वर्णन असणे : ब्रह्मदेवाच्या कमंडलूतील पाणी खाली पृथ्वीवर पडून कर्‍हा नावाची नदी उदयास आली. या नदीच्या तीरावर मयुरेश्‍वर हे आद्य क्षेत्र फार पुरातन काळापासून वसले आहे. मोरगावचा गणपति म्हणून विख्यात क्षेत्र पुणे जिल्ह्यात येते. हे क्षेत्र अविनाशी आहे. कैलास, स्वर्ग, काशी आणि इतर क्षेत्रे ब्रह्मांडाच्या शेवटच्या प्रलयकाली नष्ट होतात; परंतु हे क्षेत्र नष्ट होत नाही, सर्व वेद आणि पुराण यांत या क्षेत्राचे वर्णन आहे.

उत्सवकाळात आदर्श मिरवणूक कशी काढावी ?

पू. डॉ. वसंत आठवले
      मिरवणूक म्हणजे उत्सवमूर्तीविषयी व्यक्त करण्यात आलेले प्रेम ! परंतु मिरवणुकीच्या नावाखाली जर अपप्रकार होत असतील, तर तो उत्सवमूर्तीचा अवमानच झाला. मग अशी मिरवणूक उत्सवमूर्तीला तरी आवडेल का ? नाही ना ! यासाठी पुढील गोष्टींकडे लक्ष द्या -
१. मिरवणूक काढण्यासाठी पैसे वा साहित्य बळाने गोळा करू नका, तर स्वेच्छेने दिलेली वर्गणी स्वीकारा !
२. मिरवणुकीचा आरंभ पवित्र स्थानापासून किंवा ऐतिहासिक स्थळापासून करा !
३. प्रारंभी स्थानदेवता अन् आपली उपास्यदेवता यांना भावपूर्ण प्रार्थना करा !
४. मिरवणुकीत पुरुषांनी धोतर-सदरा वा सदरा-पायजमा, तर स्त्रियांनी नऊवारी वा सहावारी साडी नेसावी.

फलकप्रसिद्धीची सेवा करतांना शिकायला मिळालेली सूत्रे आणि समाजातून मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद !

सौ. सविता देवधर
१. फलकप्रसिद्धीची सेवा मिळाल्यावर ही सेवा मी एकटी कशी करणार ?, असा विचार मनात येणे आणि देवाला प्रार्थना करून एक फलक लिहिल्यावर चांगले वाटणे : मला फलकप्रसिद्धीची सेवा करायची होती. तेव्हा मी ही सेवा एकटीच कशी करणार ? समवेत कुणीतरी हवे, असे पुष्कळ विचार माझ्या मनात होते. सहसाधकांनाही अन्य सेवा असल्याने प्रत्येक वेळी ते उपलब्ध होत नव्हते. शेवटी मी देवाला प्रार्थना केली, देवा, तूच तुला अपेक्षित असे करवून घे रे ! मला काही येत नाही आणि कळतही नाही. ही सेवा मी कधी एकटीने केली नाही. तूच माझ्याकडून लिहून घे. माझे अक्षर चांगले नाही, तरी तू सेवा दिली आहेस. तूच करवून घे. एक फलक लिहिल्यावर मला छान वाटले.
२. दुसर्‍या सप्ताहात अनेक फळ्यांवर लिखाण करता येणे आणि प.पू. डॉक्टर, फलकाचे सर्व साहित्य, फलक अन् अनुमती देणारे यांच्याप्रती कृतज्ञता वाटणे : दुसर्‍या सप्ताहात आणखी कुठे प्रयत्न करू शकतो का ?, असा विचार मनात आला. मग देवाच्या कृपेने आपोआप फळे दिसत गेले आणि अनुमती घेऊन लिहिता आले. अनुमती घ्यायलाही देवाने शिकवले. तेव्हा मला आनंद मिळत होता आणि बरेच शिकायला मिळत होते. प.पू. डॉक्टर, फलकाचे सर्व साहित्य, फलक आणि अनुमती देणारे या सर्वांप्रती कृतज्ञता वाटत होती. प्रत्येक वेळी देव नवीन सूत्र सांगत होता आणि त्याप्रमाणे कृतीही करवून घेत होता. मला प्रत्येक वेळी आश्‍चर्य वाटत होते, अरे ! असेही होऊ शकते !

अभिजातसह मराठी लोकभाषाही व्हावी !

       मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासंदर्भात गेल्या काही वर्षांपासून भिजत असलेले घोंगडे आता वाळत टाकले जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मराठी भाषा अभिजात होण्याच्या उंबरठ्यावर असल्याने मराठी भाषिकांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे. अर्थात् मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळणे ही गौरवास्पद गोष्ट असली, तरी आज झालेली मराठीची अवस्था पहाता केवळ अभिजातपणावर समाधान मानून चालणार नाही.
       भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी ती भाषा दीड ते दोन सहस्र वर्षे जुनी असावी लागते, त्या भाषेची स्वतःची परंपरा असावी लागते, प्राचीन भाषा आणि तिचे आधुनिक रूप यांमध्ये आंतरिक नाते असावे लागते, तसेच मौल्यवान वारसा म्हणून जपलेले प्राचीन साहित्य असावे लागते. आतापर्यंत तमिळ, संस्कृत, तेलगु, कन्नड आणि मल्याळम्, उडिया या भाषांना अभिजात भाषा हा दर्जा मिळाला आहे. मराठी भाषेला हा दर्जा मिळण्यासाठी मराठी साहित्य परिषदेने साहित्यिकांच्या स्वाक्षर्‍या असलेले निवेदन पंतप्रधान मोदी यांना पाठवण्याची घोषणा केली आहे. संस्कृतपासून मराठी भाषेची निर्मिती झाली आहे. संस्कृतपाठोपाठ मराठी ही समृद्ध आणि सात्त्विक भाषा आहे. मराठी भाषेतील स्वर आणि व्यंजन यांच्या उच्चारांचा पाठीतील मणक्यांवरही परिणाम होतो, असे सांगितले जाते. आज जागतिकीकरणामुळे इंग्रजी भाषेचा कितीही उदोउदो होत असला, तरी मराठी भाषेचा गोडवा इंग्रजी भाषेमध्ये नाही.
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून
 घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! www.hindujagruti.org

बहुसंख्य हिंदूंपेक्षा अधिक लाभ घेणारे देशातील अल्पसंख्य मुसलमान !

     आर्म्ड फोर्सेस ट्रिब्यूनल (एएफ्टी)च्या मुख्य पिठाने दिलेल्या आदेशानुसार आता मुसलमान सैनिकाच्या दुसर्‍या पत्नीलाही पहिल्या पत्नीप्रमाणे आरोग्य योजना आणि निवृत्ती वेतन यांचा लाभ मिळणार आहे. मुसलमान सैनिक पहिल्या पत्नीसमवेतचे संबंध कायम ठेवत दुसरा विवाह करत असेल, तर तिलाही पहिल्या पत्नीला मिळणार्‍या सर्व सुविधा मिळायला हव्यात, असे पिठाने म्हटले आहे. हे भारत सरकारला कधी सुचेल का ?

      जर्मनीवर जिहादी आतंकवादी आक्रमणाची शक्यता असल्याच्या भीतीने जर्मन सरकारने नागरिकांना घरात कमीत कमी १० दिवस पुरेल इतका खाद्यपदार्थांचा आणि पाण्याचा साठा करायला सांगितले आहे.

संमोहन उपचारशास्त्राच्या मर्यादा लक्षात आल्यानंतर परात्पर गुरु डॉ. आठवले अध्यात्मशास्त्राकडे वळले, तर त्यांच्या आश्रमात संमोहन कसे केले जाईल ?

     सनातनच्या पनवेल आश्रमात असणार्‍या काही साधकांना मानसिक त्रासासाठी एच् आणि एच् १ ही औषधे देण्यात येतात. असे असतांना विशेष अन्वेषण पथकाने आश्रमात येऊन चौकशी केल्यावर तेथे ही औषधे मोठ्या प्रमाणात सापडली, असा दावा न्यायालयात केला. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या क्लिनिकल हिप्नोथेरपी या ग्रंथातील सोयीस्कररित्या संदर्भ देत ही औषधे दिल्यास रुग्ण काहीही करण्यास सिद्ध होतो. ही औषधे संमोहनासाठी वापरण्यात येतात. त्यामुळे आश्रमातील या औषधांचा वापर संमोहनासाठी करण्यात येतो, हे तपासावे लागेल, असा अजब दावा सरकार पक्षाच्या वतीने न्यायालयात करण्यात आला.
     परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी वर्ष १९९६ मध्ये संकलित केलेल्या अध्यात्माचे प्रास्ताविक विवेचन या ग्रंथात लिहिले आहे, परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी १९६७ ते १९८२ या १५ वर्षांत संमोहन उपचारतज्ञ म्हणून संशोधन केल्यावर त्यांच्या लक्षात आले की, जवळजवळ ३० टक्के रुग्ण नेहमीच्या औषधोपचारांनी बरे होत नाहीत. कालांतराने हेच रुग्ण आध्यात्मिक साधना केल्याने बरे झाल्याचे पाहिल्यानंतर त्यांच्या हेही लक्षात आले की, मनोविकारावरील संमोहन उपचारशास्त्रापेक्षा अध्यात्म हे उच्च प्रतीचे शास्त्र आहे.

भक्तांना घडवणारा भगवंतच अजिंक्य असतो !

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त...
परात्पर गुरु डॉ. जयंत
आठवले
      परम पूज्य, तुम्ही लिहिलेली साधकांनो, तुम्ही जिंकलात, मी हरलो ! ही कविता मी वर्ष २०१४ मध्ये वाचली. तेव्हा मला पुष्कळ वाईट वाटायचे आणि त्याविषयी काहीतरी लिहूया, असे वाटायचे. आज नामजप करतांना देवाने मला पुढील कविता सुचवली. 
दाविली आम्हासी ईश्‍वरप्राप्तीची वाट ।
वाटेत असती जरी असंख्य काटेकुटे ।
परि त्याचे फुलांत रूपांतर करून ।
त्यावर चालायला शिकवलेत केवळ तुम्ही ॥ १ ॥

व्यष्टी साधनेसह समष्टी साधनाही शिकवली ।
आणि समाजाच्या विरोधातूनही ।
साधना अन् धर्माची साथ न सोडण्याची । 
जिद्द अन् चिकाटी दिली ॥ २ ॥

महर्षींनी सांगितलेल्या चार जपांच्या संयुक्त जपाद्वारे ते साधकांना प.पू. डॉक्टरांच्या निर्गुण रूपाशी अनुसंधानित ठेवून साधकांच्या चारही देहांची शुद्धी करून घेत आहेत, असे जाणवणे

       मनुष्याचे चार देह असतात आणि हे चारही देह मिळून जीव बनतो. त्याच स्वरूपात महर्षींनी साधकांना चार जपांचा समूह असलेला एक जप करायला सांगितला आहे. साधनेत हळूहळू देहबुद्धी नष्ट होत जाते आणि अंतिमतः केवळ आत्मस्वरूपाची अनुभूती येते, तसेच हा चार जपांच्या समूहाचा जप करतांना हळूहळू चारही जपांतील भेद नष्ट होऊन श्रीविष्णु अवतार श्रीमद्नारायण श्रीश्रीजयंत आठवले यांच्याशी साधकांचे साररूपी अनुसंधान निर्माण होईल. तेव्हा साधकांचा खर्‍या अर्थाने उद्धार होईल. साधकांवर अशी अनन्य कृपा करणारा हा जप मिळालेले साधक अत्यंत भाग्यवान आहेत. यासाठी महर्षि आणि प.पू. डॉक्टर यांच्या चरणी कोटी कोटी कृतज्ञता व्यक्त करतो. या प्रत्येक जपाचा मला जाणवलेला भावार्थ पुढीलप्रमाणे आहे.

कर्नाटकातील मंगळुरू येथील श्री. धर्मपाल यांना रामनाथी आश्रमात आल्यावर आलेल्या अनुभूती

१. अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाच्या वेळी श्री. कुशलदादा (श्री. कुशल गुरव) मला सेवा समजावून सांगत असतांना माझ्या अंगावर शहारे येत होते.
२. प्रसाधनगृहाची स्वच्छता करतांना गुरुचरणी प्रार्थना केल्यावर सर्व डाग नाहीसे होणे
       आश्रमातील शौचालय स्वच्छता करतांना कितीही घासले, तरी डाग निघत नव्हते. तेव्हा माझे मनही असेच अस्वच्छ असणार, असे विचार मनात आले आणि गुरुचरणी प्रार्थना केल्यावर सर्व डाग स्वच्छ झाल्याचे अनुभवायला मिळाले. 
३. स्वतः कुठल्यातरी उच्च लोकात असल्याचे जाणवणे आणि 
आश्रमातील साधिका देवीप्रमाणे दिसणे
     एके दिवशी मला भोजनकक्ष रंगीबेरंगी दिसत होते आणि मी कुठल्यातरी उच्च लोकात आहे, असे मला वाटत होते. त्याच दिवशी सौ. पार्वतीताई (सौ. पार्वती जनार्दन), शोभाताई (कु. शोभा मिसाळ) आणि सौ. प्राची मेहता या देवीप्रमाणे दिसत होत्या. 

धर्माभिमान्यांचा विश्‍वास संपादन करणारे ६७ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. रमानंद गौडा !

श्री. रमानंद गौडा
      माझा प्रसारातील सेवांशी विशेष संपर्क येत नाही; परंतु दादा धर्माभिमानींना कसे घडवतात ? याचे मला आलेले अनुभव येथे देत आहे.
१. रमानंदअण्णांवर धर्माभिमान्यांचा पूर्ण विश्‍वास असल्यामुळे 
त्यांनी कोणतेही साहाय्य आनंदाने करणे
     एकदा दादांनी एका धर्माभिमान्यांना सांगितले, माझी ताक थेरपी चालू आहे; म्हणून मला ताक हवे आहे. त्यांनी लगेच १० लीटर ताक पाठवले. आता ते अधूनमधून सेवाकेंद्रात १० - २० लिटर ताक पाठवतात. त्यांची गोशाळा आहे; म्हणून ते प्रतिदिन सेवाकेंद्रासाठी विनामूल्य दूध पाठवतात. तेव्हा रमानंदअण्णा त्यांना म्हणाले, तुमच्याकडे काही मागितले की, तुम्ही ते लगेच देता. तुमच्याकडे सर्व काही आहे. त्यावर ते म्हणाले, तलावाचे पाणी तलावाला ! (एका संतांचे वचन आहे, जे देवाने दिले आहे, ते त्यालाच परत द्यायचे.) ते धर्माभिमानी सेवेसाठी कधीही आपल्याला वाहन देतात. एकदा रमानंदअण्णानी त्यांना सांगितले, मी वैयक्तिक कामासाठी गावाला जाऊन येतो. तेव्हा ते लगेच म्हणाले, माझे वाहन घेऊन जा. रमानंदअण्णा नको म्हणाले, तरीही ते आग्रहाने सांगत होते की, घरासमोर खड्डा खोदल्याने ती बाहेरच नुसतीच उभी आहे, तुम्ही घेऊन जा.

श्री. रमानंद गौडा यांच्याशी ८ ते १० मिनिटेच बोलतांना पुष्कळ भाव जागृत होऊन त्यांच्याकडून प्रेम आणि आत्मविश्‍वास मिळणे

       धर्मशिक्षणवर्गाची सेवा आध्यात्मिक स्तरावर आणि देवाला नेमकेपणाने कशी अपेक्षित आहे ?, हा प्रश्‍न माझ्या मनात सतत असायचा; म्हणून मी तो श्री. रमानंदअण्णांशी बोलतांना त्यांना विचारला. तेव्हा त्यांनी मला काही सूत्रे सांगितली. ती ऐकत असतांना माझे मन शांत आणि आनंदी झाले. माझ्या मनाची अस्वस्थता न्यून झाली. त्यांच्या जवळ बसल्यावर मला पुष्कळ चैतन्य मिळाले आणि माझी सकारात्मकता वाढली. त्यांनी सांगितलेली सूत्रे येथे मांडत आहे.

सनातनच्या रामनाथी आश्रमात रहायला मिळाल्याने आनंद होणे आणि शिबिरात मनाच्या प्रक्रियेचा अभ्यास होऊन अंतर्मुखता वाढणे

श्री. अभिजीत कुलकर्णी
१. आश्रमात आध्यात्मिक वस्तूंचे प्रदर्शन 
पहाण्याची संधी देवाने देणे
      आश्रमात आध्यात्मिक वस्तूंचे प्रदर्शन पहाण्याची संधी मिळाली. त्या वेळी मी पूर्णवेळ भावास्थेत होतो आणि मनात जय गुरुदेव, जय गुुरुदेव, असा नामजप चालू होता. प्रदर्शन अगदी साधेपणाने लावलेले होते. त्यात कुठेही खर्चिक मांडणी नव्हती, तरी प्रदर्शनातून गुरुदेवांचे चैतन्य वस्तू आणि छायाचित्र यांतून मिळत होते अन् पुष्कळ आनंदही मिळत होता. मनात ते प्रदर्शन आठवले, तरी तोच आनंद पुनःपुन्हा मिळत होता.

रामनाथी आश्रमात दत्तमाला सामूहिक मंत्रपठण ऐकतांना आलेली अनुभूती

मंत्रांच्या शक्तीमुळे त्रासदायक आवरण वेगाने घटणे आणि 
मंत्रातील देवतांचे रूप डोळ्यांसमोर येणे
      सनातनच्या रामनाथी आश्रमात ध्यानमंदिरात सकाळी काही साधक प.पू. गुरुदेवांचे आयुरारोग्य सुधारावे, या हेतूने एक घंटा दत्तमाला मंत्राचे पठण करतात. या पठणासाठी तू उपायांच्या दृष्टीने बसून पाहू शकतोस, असे सहसाधिकेने मला सुचवले. तेव्हा प्रयोग म्हणून मी हे पठण ऐकण्यासाठी बसलो. पठणाच्या पहिल्या दिवसापासूनच मंत्र ऐकतांना देहावरील त्रासदायक आवरण तापून निघत आहे, असे मला जाणवत होते. मंत्राच्या शक्तीमुळे माझ्यावरील आवरण वेगाने घटत होते. तसेच मंत्रजपाच्या आधी म्हटल्या जाणार्‍या ॐ आनंद हिमालयं.... या श्‍लोकामुळे त्या त्या देवतांचे रूप माझ्या डोळ्यांसमोर येत होते. 
- श्री. यज्ञेश सावंत, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२१.८.२०१६)       

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी सांगितल्याप्रमाणे श्री सूर्यस्तोत्राचे पठण केल्यामुळे झालेले पालट आणि आलेल्या अनुभूती

      प.पू. पांडे महाराज यांनी मला काही ग्रहदोषांमुळे श्री सूर्यस्तोत्र म्हणण्यास सांगितले होते. प्रारंभी मला योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी ते सिद्ध केले आहे, एवढेच ठाऊक होते. त्यामुळे प्रारंभी ७ - ८ मास (महिने) नेहमीचे एक स्तोत्र म्हणून मी त्याचे पठण केले. ते दैवी आहे, हे कळल्यावर पुढील ४ - ५ मास मी ते अधिक श्रद्धेने पठण केले. श्री सूर्यस्तोत्रात सूर्याची १ सहस्र नावे आहेत. या पूर्ण स्तोत्राचे पठण मला करता येत नव्हते. त्यामुळे प्रारंभी केवळ काही पाने, कधी एक पान असे मी पठण करत होतो.

मनाची प्रक्रिया करत असतांना सौ. राजश्री गडेकर यांना शिकायला मिळालेली सूत्रे

१. प्रक्रिया करत असतांना अहंला तडा जाऊ नये; म्हणून वेगळ्या दिशेने न जाता मुळापर्यंत जाण्याचा प्रयत्न करावा.
२. मनात आलेला प्रत्येक अयोग्य विचार उत्तरदायी साधकाला सांगून मन मोकळे करण्यासाठी प्रयत्न वाढवावे. 
३. मनात नकारात्मक विचार आले की, काही सुचत नाही, अशा वेळी लगेच उदबत्ती लावावी आणि कापूर अन् अत्तर यांचा वापर करावा.
४. अहं-दोष घालवण्यासाठी जोपर्यंत देवाला शरण जात नाही, तोपर्यंत ईश्‍वराचे साहाय्य मिळत नाही.
५. समोरचा कितीही चुका करू दे, माझ्या कितीही चुका सांगू देत; अशा वेळी बहिर्मुख न होता अंतर्मुख होऊन मी कुठे चुकले, हे शोधून काढण्यासाठी प्रयत्न करावे.
६. अडचणी आहेत; म्हणून मी थांबल्यास अडचण सुटणारच नाही. अडचण म्हणजे आपली साथी आहे, तरीही शरणागतीने पुढे जायचे आणि भावाच्या स्तरावर प्रयत्न करायचे.
७. स्वेच्छेचा त्याग केला नाही, तर अधोगती होते.
८. आपण इतरांना तुच्छ लेखले, तर जवळीक करणे आणि संघटन करणे शक्य होणार नाही, त्यासाठी त्यांच्याशी प्रेमाने वागले पाहिजे.
- सौ. राजश्री गडेकर, गोवा (५.७.२०१६)

सौ. सुप्रिया माथूर यांनी साधिकांना साधनेविषयी केलेले मार्गदर्शन !

      ६४ प्रतिशत आध्यात्मिक पातळी असलेल्या सौ. सुप्रिया माथुर या रामनाथी आश्रमात स्वयंपाक-विभागात सेवा करतात. त्या काही साधकांचे व्यष्टी आढावेही घेतात. सौ. सायली करंदीकर आणि कु. वर्षा जाधव या स्वयंपाक-विभागात सेवा करतांना सौ. सुप्रिया माथुर यांनी त्यांना वेळोवेळी आणि सोप्या शब्दांत केलेले अमूल्य मार्गदर्शन येथे देत आहोत.
१. स्वभावदोष आणि अहं-निर्मूलन 
अ. स्वभावदोष आणि अहं-निर्मूलनाचा सोपा अर्थ म्हणजे आपले मन सर्वांसमोर उघड करणे. 
आ. भावाची स्थिती सतत अनुभवण्यासाठी कोणत्या स्वभावदोषांमुळे किंवा अहंमुळे खंड पडतो, ते शोधून काढायला हवे.
इ. प्रतिमेचा विचार मनात ठेवून दिखाव्यासाठी एखादी योग्य कृती करणे, हाही एक अहंचाच पैलू आहे.

स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रियेच्या वेळी साधकांना तत्त्वनिष्ठपणे सहाय्य करणार्‍या ६४ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. सुप्रिया माथूर यांची लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये !

सौ. सुप्रिया माथूर
१. प्रतिदिन व्यष्टी आढाव्यातून अंतर्मुखता 
वाढवून चिंतन करण्यास शिकवणे
     प्रारंभी लहान लहान प्रसंगांकडे माझे दुर्लक्ष होत असे. आढाव्याच्या माध्यमातून लहान लहान कृती, उदा. स्वयंपाक विभागात भांडी लावतांना आवाज न करता भांडी कशी लावायची, हे ऐकले नाही. साधकांशी चेष्टेने बोलले. अशा कृतींमध्येही अहंचे प्रमाण किती असते, याची त्यांनी जाणीव करून दिली. जिल्ह्यात अथवा इथे झालेल्या प्रसंगांमध्ये कोणते प्रसंग दोषांमुळे आणि कोणते अहंमुळे होतात, याचा अभ्यास करण्यास सांगितला. प्रमुख दोष, तसेच अहं यांची व्याप्ती त्याच वेळी काढण्यास सांगत असल्याने त्यांची तीव्रता किती आहे, हे लक्षात येत असे.

श्रीकृष्ण कोडे आणि त्याचे उत्तर !

श्री. कृष्णा आय्या
(गंगाखेडकर)
श्री हनुमंताच्या हृदयी श्रीराम, लक्ष्मण आणि सीता वसती ।
परंतु भगवान श्रीकृष्णाच्या हृदयी प.पू. गुरुदेव कसे काय दिसती ?
उत्तर : हनुमंत कुठेही गेला, तरी श्रीरामाला घेऊनच जात असे; कारण प्रभु श्रीरामाच्या आज्ञेविना हनुमंत कुठे जातच नसे; म्हणून हनुमंताच्या हृदयी श्रीराम वसतो. 
     प.पू. गुरुदेवांच्या विषयी सांगायचे झाले, तर प.पू. गुरुदेवांना साधकांच्याच उद्धाराचा ध्यास असल्याने ते नेहमी साधकांचाच विचार करत असतात. एकदा प.पू. गुरुदेवांनी सांगितले होते, मला नेण्यासाठी विमान आले, तर मी प्रथम साधकांना घेणार आणि नंतरच विमानात बसणार. प.पू. गुरुदेवांना श्रीकृष्णाने हृदयात घेतले, म्हणजे प.पू. डॉक्टर श्रीकृष्णाच्या हृदयात एकटे गेले नाहीत, तर साधकांनाही घेऊन गेले. याचाच अर्थ, प.पू. गुरुदेवांनी प्रत्येक साधकाला श्रीकृष्णमय केेेले आणि म्हणूनच श्रीकृष्णाच्या हृदयी प.पू. गुरुदेव दिसतात. 
- श्री. कृष्णा आय्या (गंगाखेडकर), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१७.६.२०१६)

कु. सर्वमंगला मेदी यांनी चित्र रेखाटून साकारलेली श्री गणेशाची भावपूर्ण पूजा !

कु. सर्वमंगला मेदी
      सौ. उमाक्कांनी गणेशचतुर्थीचे काढलेले चित्र पाहून आपण काय शिकायला हवे ?, असा विचार करत असतांना पुढील चित्र सुचले.
      प.पू. गुरुदेव, प्रतिदिन आमच्याकडून सूक्ष्म रूपाने गणपतीची पूजा (साधना) करवून घेऊन पुढे पुढे घेऊन जात आहेत. आता आपण पुरोहितरूपी श्रीकृष्णाने सांगितल्यानुसार सूक्ष्म रूपाने श्री गणेशाची पूजा (साधना) श्री गणेशाला आपल्या मनमंदिरात सदैव बसवून करूया आणि सतत आनंद मिळवूया.
१. श्री गणेशाला बसवण्याचे स्थान स्वच्छ करणे : नामजपाच्या झाडूने मनातील अयोग्य विचार झाडणे (स्वच्छ करणे)

नामजप आणि सत्सेवा यांची आवड असणारी ५३ टक्के आध्यात्मिक पातळीची उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली कुणिगल (कर्नाटक) येथील कु. चैतन्या गंगाधर (वय ९ वर्षे) !

कु. चैतन्या गंगाधर
१. बालपणापासून कधीही बोबडे न बोलणे : कु. चैतन्या बोलतांना मोठ्यांसारखे स्पष्ट उच्चार करते. ती बालपणापासून कधीही बोबडे बोलली नाही. 
२. सेवेची तळमळ असणे : तिला सत्सेवा करायला आवडते आणि तिला कोणतीही सेवा समजावून सांगितली की, ती मनःपूर्वक अन् चुकांविरहित सेवा करते. 
अ. ती सुंदर अक्षरांत धर्मशिक्षण फलक लिहिते. 
आ. मी माझ्या भ्रमणभाषवरून हिंदु धर्माभिमान्यांना जागो लघुसंदेश पाठवतांना ती मला साहाय्य करते. 
इ. ग्रंथप्रदर्शनस्थळी सनातनच्या सात्त्विक वस्तूंची नीट मांडणी करणे, ग्रंथ व्यवस्थित लावणे, अशा सेवा ती आनंदाने करते.
३. अध्यात्मिक उपायांचे गांभीर्य असणे 
अ. कु. चैतन्या नित्यनेमाने नामजप करते. 
आ. तिला स्वत:ला त्रास होत आहे, याची जाणीव होताच ती लगेच स्वतःहून नामजप करायला बसते.
इ. मी अध्यात्मिक उपाय करतांना पाहून तीही ते करते. 
- सौ. शैलजा गंगाधर (कु. चैतन्याची आई), कुणिगल, बेंगळुरू. (२९.४.२०१६)

प.पू. पांडे महाराज यांच्या विचारांवर श्री. अनंत (भाऊकाका) आठवले यांनी दिलेला अभिप्राय !

प.पू. पांडे महाराज
श्री. अनंत आठवले
     ६.९.२०१६ या दिवशी दैनिक सनातन प्रभातच्या पृष्ठ १ वर पालिसांनो, हे लक्षात घ्या ! या मथळ्याखाली प.पू. पांडे महाराज यांचे विचार प्रकाशित झाले होते. ते वाचून सनातन संस्थेचे संस्थापक प.पू. डॉ. आठवले यांचे ज्येष्ठ बंधू श्री. अनंत आठवले यांनी त्या लिखाणाविषयी त्यांचा अभिप्राय कळवला आहे. तो पुढीलप्रमाणे...
     थोडक्यात संयमित शब्दांत पोलिसांना त्यांच्या कर्मांची आणि त्या कर्मांच्या परिणामांची जाणीव करून देणारा उत्कृष्ट लेख ! गीतेत वर्णिलेले बुद्धीचे समत्व प्राप्त झालेले असे महात्मेच क्रोध न येता, कटुतारहित मनाने संशयित व्यक्ती आणि पोलीस, अशा दोघांच्याही कल्याणाचा विचार करू शकतात !
     हा अभिप्राय प.पू. पांडे महाराज यांना सांगितल्यावर ते म्हणाले, जेव्हा मला या विषयावरील विशेषांक निघणार आहे असे समजले, तेव्हा मला लेखासाठीची सूत्रे उत्स्फूर्तपणे सुचली. मला विचार करावा लागला नाही.

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

साधकांनी अहंकार बाळगू नये
        साधकांनी मी, माझे, माझ्यासाठी हा अहंकार न ठेवल्यास हितावह ठरते. अहंकार हा साधकांच्या प्रगतीमधील फार मोठा अडथळा आहे.
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

बोधचित्र

॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज
सनातनचे श्रद्धास्थान
हे असे आहे का ? ते तसे आहे का ? हे असेही नाही,
 तसेही नाही. ते कशात नाही ? मग ते असेही आहे आणि तसेही आहे.
भावार्थ : हे असे आहे का ? मधील हे मायेविषयी आहे. ते तसे आहे का ? मधील ते ब्रह्मासंबंधी आहे. हे असेही नाही, तसेही नाही, म्हणजे म्हटले तर ही म्हणजे माया, असेही नाही म्हणजे दिसते तशी नसून ब्रह्म आहे आणि तशीही नाही म्हणजे ब्रह्म म्हटले तर ब्रह्मस्वरूपातही नाही. ते कशात नाही ? म्हणजे ब्रह्म सर्वत्र आहे, मायेतही आहे. मग ते असेही आहे आणि तसेही आहे म्हणजे माया व ब्रह्म दोन्ही एकच आहेत.
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.)

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

   
परात्पर गुरु डॉ. आठवले
  कुठे अर्थ आणि काम यांवर आधारित पाश्‍चात्त्य संस्कृती, तर कुठे धर्म आणि मोक्ष यांवर आधारित हिंदु संस्कृती ! हिंदू पाश्‍चात्त्यांचे अंधानुकरण करत असल्यामुळे त्यांचीही झपाट्याने विनाशाकडे वाटचाल होत आहे ! - (परात्पर गुरु) डॉ. आठवले
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥
या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो. - प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

अध्यात्मशास्त्रात अपूर्व आणि सखोल संशोधन करणारे एकमेव शास्त्रज्ञ - प.पू. डॉक्टर !

      प.पू. डॉक्टरांनी आतापर्यंत मनुष्याच्या जीवनातील विविध घटना, अनुभूती, अलौकिक घटना, वाईट शक्ती इत्यादी गोष्टींमागे अध्यात्म असून त्याचे शास्त्र सांगितले आहे. अध्यात्मशास्त्रात इतके अपूर्व आणि सखोल संशोधन करणारे अध्यात्मातील एकमेव शास्त्रज्ञ म्हणजे प.पू. डॉक्टर ! 
- श्री. राम होनप, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१४.६.२०१६)

जागतिक महासत्तेचे स्वप्न !

      गणेशोत्सव चालू आहे. प्रतिवर्षी महाराष्ट्र राज्यात मोठ्या धूमधडाक्यात साजरा होणारा हा हिंदूंचा उत्सव ! श्री गणेश ही बुद्धीची देवता आहे. महाराष्ट्र राज्यात तल्लख आणि तीक्ष्ण बुद्धी लाभलेले अनेक मान्यवर होऊन गेले आहेत. या उत्सवाच्या निमित्ताने त्यांचे स्मरण होते. मराठी वृत्तसृष्टीचे जनक म्हणून प्रसिद्ध असलेले बाळशास्त्री जांभेकर ! स्वतःला अभिमानपूर्वक ऋषिवंशज म्हणवून घेणारे बाळशास्त्री हे विज्ञानयुगातील एक भारतीय ऋषीच होते. वर्ष १८१२ ते १८४६ हा त्यांचा जीवनकाळ. केवळ ३४ वर्षांचे आयुष्य लाभलेले बाळशास्त्री यांनी केवढे कर्तृत्व दाखवावे ! एक लेखक, पत्रकार, इतिहाससंशोधक, समाजसुधारक आणि शिक्षणप्रसारक म्हणून संपादन केलेले यश हे त्यांच्या तपाचे फळ होते. साधी राहणी आणि उच्च विचारसरणी, या वर्तनसूत्राचा त्यांनी अंगीकार केला होता. इंग्रजी शिक्षणाच्या ओढीने ते वर्ष १८२५ मधे मुंबईत जाऊन स्थिरावले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पोंभुर्ले हे त्यांचे जन्मस्थान. बाळशास्त्री मुंबईत गेले तो काळ देशाच्या दृष्टीने महत्त्वाचा होता. पेशवाईचा अस्त झाला होता. स्वराज्य नव्हते. रामराज्य आठवणीत होते. लोकराज्य अस्तित्वात नव्हते. विज्ञानाच्या बळावर दिग्विजय करू पहाणार्‍या इंग्रजांचा झेंडा सर्वत्र फडकत होता. इंग्रज परकीय असले, तरी त्यांच्या जीवनात विद्येमुळे एक प्रकारची शिस्त आणि प्रगतीपरता होती, ही गोष्ट बाळशास्त्री यांनी योग्य प्रकारे हेरली आणि कानावर पडणारी प्रत्येक भाषा शिकण्याचा त्यांनी निश्‍चय केला. वर्ष १८२६ मधे शाळेत पाऊल टाकले तेव्हा कोकणात केलेली कमाई त्यांच्या पदरी होतीच. रामदास, तुकाराम, वामन पंडित, मोरोपंत त्यांनी कंठगत केले होते. गीतापाठ, अमरकोश, लघुकौमुदी, संस्कृत स्तोत्रपाठ, मराठी व्याकरण हे सर्व त्यांच्याबरोबर होते. बंगाली भाषा त्यांना कळू लागली. कन्नड, तेलगू त्यांना उमगू लागली. या भाषा ते लिहू-बोलू लागले. गुजराती भाषेतून संभाषण करू लागले. इंग्रजी, लॅटिन आणि फ्रेंच या भाषांतही ते पारंगत झाले. हे सगळे अकल्पीत आणि नवलपूर्ण होते. बाळशास्त्रींना आचार्य व्हायचे होते. प्राचीन आचार्यकुलाच्या ऐश्‍वर्यात आधुनिकतेची भर टाकणार्‍या बाळशास्त्रींनी लिहिलेली पुस्तके आणि भूषवलेली पदे विचारात घेतली, तर आपण आश्‍चर्यमूढ होतो. बालव्याकरण, भूगोलविद्या, शून्यलब्धि गणित, हिंदुस्थानचा इतिहास, इंग्लंड देशाची बखर, इंग्रजी-मराठी धातूकोश, शब्दसिद्धी, निबंध, ज्ञानेश्‍वरीची चिकित्सक आवृत्ती, हे सर्व बाळशास्त्री यांनी का, कसे आणि कोणासाठी केले ? त्यांना त्यातून काय मिळाले ? निस्पृह, निर्भय, निर्लोभ, ज्ञानसाधकाचे हे धर्माचरण होते. या देशाच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी आपण काय करू शकू, याचा विचार करत असतांना लोकमान्यांप्रमाणे त्यांनाही पत्रकारितेचे स्फुरण घडले. लोकमान्यांच्या कितीतरी अगोदर म्हणजे वर्ष १८३२ मधे त्यांनी लोकशिक्षणाच्या हेतूने दर्पण हे पाक्षिक वृत्तपत्र चालू केले. चार मासांनंतर त्याला साप्ताहिकाचे स्वरूप प्राप्त झाले. आपल्या पत्रकारितेचे प्रयोजन सांगतांना बाळशास्त्री यांनी म्हटले आहे, स्वदेशातील लोकांना युरोपीय विद्यांचा अभ्यास व्हावा आणि या देशाची समृद्धी अन् येथील लोकांचे कल्याण याविषयी स्वतंत्रपणे आणि उघडपणे विचार करण्यासाठी एखादे स्थळ असावे, यासाठी दर्पण नावाचे पत्र आम्ही प्रसिद्ध करत आहोत.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn