Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

कोटी कोटी प्रणाम !

दधीचिऋषि जयंती
गौरीपूजन

अधिवक्ता इचलकरंजीकर यांच्याकडून सरकारी अधिवक्त्यांच्या युक्तीवादाची चिरफाड !

 कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरण !
डॉ. तावडे यांना १६ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी
      कोल्हापूर - कॉ. पानसरे हत्या प्रकरणात प्रत्यक्षदर्शी साक्षीदार त्या वेळी पल्सरगाडी पाहिल्याचे सांगतो. दाभोलकर प्रकरणात पोलीस ती स्प्लेंडरअसल्याचे सांगतात. अशा स्थितीत डॉ. तावडे यांच्याकडे असलेल्या बॉक्सर गाडीची चौकशी पोलीस का करत आहेत ? हे कॉ. पानसरे खुनाचे अन्वेषण चालू आहे कि डॉ. तावडेंचे तेच कळत नाही. डॉ. तावडेंचे अन्वेषण करायचा अधिकार पोलिसांना नाही. त्यांच्याकडे बॉक्सरचा संदर्भ आला म्हणून आता पोलीस बॉक्सर म्हणत आहेत. कदाचित् त्यांच्याकडे सायकल मिळाली असती, तर पोलीस म्हणाले असते की, कॉ. पानसरेंचे मारेकरी सायकलवरूनच आले असावेत आणि ती सायकल डॉक्टरांची म्हणून ! याचा अर्थ आधीचे तपासपत्र खोटे आहे अथवा हा तपास खोटा आहे. सनातन संस्थेच्या पनवेल येथील आश्रमात लोकांना संमोहित करण्याची औषधे सापडण्याचा दावा पोलीस करतात, प्रत्यक्षात ही औषधे तेथील तज्ञ डॉक्टरच देतात, त्याबाबत अन्न व औषध आयुक्तांनी डॉक्टरांना साठा करायचा अधिकार असतो, हे लेखी दिले आहे, याचा विचार व्हायला नको का ? एकवेळ असे गृहित धरले की, अशी औषधे दिली जात होती, तरी ज्या व्यक्तीने औषधे दिली जात असल्याचे सांगितले आहे, त्या व्यक्तीला अशी औषधे देऊन पानसरे खून प्रकरणात सहभागी व्हायला लावले आहे, असा पोलिसांचा दावा नाही.

भाविकांसाठी मूर्तीदान ऐच्छिक विषय ! - कोल्हापूर मनपा उपायुक्तांचे हिंदु संघटनांच्या शिष्टमंडळास आश्‍वासन

   
उपायुक्त खोराटे (डावीकडे) यांना निवेदन देतांना हिंदू संघटनांचे प्रतिनिधी
      कोल्हापूर - कोल्हापूर महापालिकेच्या वतीने श्रीगणेशमूर्तीदान हा विषय पूर्णपणे ऐच्छिक असेल. त्यासाठी कोणावरही बळजोरी करण्यात येणार नाही, याची आम्ही काळजी घेऊ, असे आश्‍वासन कोल्हापूर मनपा उपायुक्त श्री. विजय खोराटे यांनी दिले. हिंदु संघटनांच्या वतीने ७ सप्टेंबर या दिवशी मूर्तीदान नको, तर मूर्तीविसर्जनच करा, या मागणीसाठी निवेदन सादर करण्यात आले. त्या वेळी हे आश्‍वासन त्यांनी दिले. या वेळी शिवसेनेचे श्री. किशोर घाटगे, कुंभार समाजाचे श्री. बाळासाहेब निगवेकर, हिंदू एकता आंदोलनाचे श्री. शिवाजीराव ससे, हिंदु जनजागृतीचे सर्वश्री मधुकर नाझरे, किरण दुसे, सुधाकर सुतार यांसह अन्य उपस्थित होते.
या वेळी हिंदुत्ववाद्यांनी व्यक्त केलेली मते... 
 १. शिवसेनेचे श्री. किशोर घाटगे म्हणाले, श्री गणेश मूर्ती विसर्जन ही परंपरा पूर्वापार चालत आली आहे. ही महापालिकेने रोखू नये. मूर्तीदान मोहिमेच्या वेळी एखादी मूर्ती दुखावली गेल्यास याला सर्वस्वी महापालिका उत्तरदायी असेल. मूर्तीदान मोहीम महापालिका चालवत आहे, तर व्यापारीदृष्ट्या जाहिराती घेऊन मूर्तीदान घेणार्‍या संघटना व्यापार करत आहेत का ?

गणेशभक्तांच्या जिवाशी खेळणार्‍या पुणे महानगरपालिकेच्या अधिकार्‍यांवर कारवाई करा ! - हिंदु जनजागृती समिती

कृत्रिम हौदाच्या धर्मद्रोही उपक्रमाला प्रतिसाद मिळावा, म्हणूनच 
महानगरपालिकेने विसर्जनासाठी पाणी सोडले नसल्याचा हिंदुत्वनिष्ठांचा आरोप
  
डावीकडून सर्वश्री विजय गावडे, स्वप्नील तळेकर, शंभू गवारे, सुनील घनवट, 
अधिवक्ता देवदास शिंदे, अधिवक्ता चंद्रकांत भोसले, अधिवक्ता प्रकाश शेजाळ
   पुणे - पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने ते राबवत असलेल्या कृत्रिम हौदाच्या, तसेच अमोनियम बायकार्बोनेट वापरण्याच्या धर्मद्रोही उपक्रमाला प्रतिसाद मिळावा, यासाठीच जाणीवपूर्वक दीड दिवसाच्या श्री गणेशमूर्ती विसर्जनाच्या दिवशी नदीत पाणी सोडले नाही. धर्मशास्त्रानुसार नदीमध्ये श्री गणेशमूर्ती विसर्जित करू पहाणार्‍या भाविकांची गैरसोय कशी होईल, याची पुरेपूर काळजी घेतल्याचे चित्र दीड दिवसांच्या श्री गणेशमूर्तीच्या विसर्जनाच्या दिवशी पहायला मिळाले. विसर्जन घाटावरील पुलाला सुरक्षाकठडे नसणे, पुलाला पुष्कळ मोठे खड्डे पडलेले असणे, मार्गावर तारेचे कुंपण घालणे, अशा प्रकारच्या असुविधा तेथे होत्या. याचा अनेक भाविकांना मनस्ताप झाला. त्यामुळे भाविकांची अशा प्रकारे फसवणूक करणारे आणि अप्रत्यक्षरित्या त्यांना धर्माचरणापासून परावृत्त करणारे पुणे महानगरपालिकेचे आयुक्त कुणाल कुमार, महापौर प्रशांत जगताप, घनकचरा विभागाचे प्रमुख सुरेश जगताप आणि अन्य संबंधित अधिकार्‍यांवर त्वरित कारवाई करण्यात यावी. त्याचसमवेत विसर्जनाच्या आगामी सर्व दिवशी नदीला पाणी सोडून श्री गणेशमूर्तींचे नदीत विसर्जन करू इच्छिणार्‍या भाविकांसाठी आवश्यक त्या सर्व सुविधा द्याव्यात, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र राज्य समन्वयक श्री. सुनील घनवट यांनी येथे एका पत्रकार परिषदेत केली.

विसर्जन घाटांविषयीच्या मागण्या येत्या २४ घंट्यामध्ये पूर्ण करू ! - महानगरपालिका आयुक्त कुणाल कुमार

हे आधीच का केले नाही ? त्यासाठी हिंदूंना मागणी का करावी लागते ?
   
महापालिका आयुक्तांना निवेदन देतांना हिंदुत्वनिष्ठ
    पुणे - सर्व घाटांवर विद्युत् दिवे, संरक्षक कठडे बसवणे, घाटावर जाण्यासाठी चांगला रस्ता करणे, कर्मचार्‍यांकडून भाविकांना कृत्रिम हौदात श्री गणेशमूर्तींचे विसर्जन करण्याविषयी कोणत्याही प्रकारचा दबाव न आणणे, प्रत्येक घाटावर सुरक्षारक्षक घाटाच्या किनारी भाविकांचे संरक्षण करण्यासाठी थांबणे, अशा प्रकारचे आदेश देण्यात येतील. या सर्व गोष्टी येत्या २४ घंट्यांमध्ये पूर्ण करू, असे आश्‍वासन पुणे महानगरपालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी हिंदुत्वनिष्ठांच्या शिष्टमंडळाला दिले.
     या वेळी अधिवक्ता देवदास शिंदे, अधिवक्ता चंद्रकांत भोसले, श्री. शैलेंद्र दीक्षित, हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र राज्य संघटक श्री. सुनील घनवट, समितीचे श्री. पराग गोखले आदी उपस्थित होते. या प्रसंगी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने शहरातील विविध ठिकाणच्या घाटांवरील अव्यवस्था आणि गलथान कारभार यांच्या विरोधातील विविध मागण्यांचे निवेदन दिले. या वेळी आयुक्तांनी कसबापेठ क्षेत्रीय कार्यालयाचे अधिकारी खिलारे आणि घनकचरा विभागाचे प्रमुख सुरेश जगताप यांना तात्काळ संपर्क साधून २४ घंट्यांमध्ये उपरोक्त गोष्टींवर कारवाई करून ती कामे पूर्ण झाल्याचा लेखी तपशील स्वतःकडे मागवला आहे.

सनातन संस्थेची अपकीर्ती करणार्‍यांच्या ट्विटर ट्रेंडच्या प्रत्युत्तराच्या ट्रेंडला सनातनप्रेमींकडून समर्थन !

डॉ. वीरेंद्रसिंह तावडे मारहाण प्रकरण
     मुंबई - प्रसारमाध्यमांतून डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी अटकेत असलेले संशयित डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांच्याविषयीची, तसेच सनातनविरोधी वृत्ते प्रसिद्ध झाल्यानंतर सनातनची बाजू मांडण्यासाठी आणि अपकीर्ती करणार्‍या वृत्तांचे खंडण करण्यासाठी सनातन संस्थेच्या अधिकृत ट्विटर खात्यावरून (@sanatansanstha) प्रसार केला जात आहे. त्याला सनातनप्रेमींचा पाठिंबा मिळत आहे. याविषयीचा आढावा येथे देत आहोत.
१. दिनांक ५ सप्टेंबर २०१६ या दिवशी सनातनच्या देवद आश्रमात एस्आयटीकडून छापा या प्रसारित झालेल्या वृत्तानंतर ट्विटरवर #StopInjusticeOnVirendraTawade (वीरेंद्र तावडे यांच्यावर होणारा अन्याय थांबवा) या हॅशटॅगने ट्रेंड करण्यात आला. या ट्रेंडला घेऊन भारतभरातून ट्विट्स करण्यात आल्या. या ट्रेंडचा विषय १ लाख ३९ सहस्र ६४२ एवढ्या लोकांपर्यंत पोचला. त्याचबरोबर समाजातील लोकांचे जनमत (पोल) घेण्यात आले. यात ९६ टक्के लोकांनी हा हिंदूंवर अन्याय असल्याचे मत व्यक्त केले.

सनातनवर होत असलेल्या अन्यायाच्या संदर्भातील दैनिक सनातन प्रभातच्या विशेषांकास पुणे जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद !

विशेषांक पुण्यातील लक्षावधी लोकांपर्यंत पोचला !
     पुणे - डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि कॉ. पानसरे यांच्या हत्या प्रकरणांत अन्वेषण यंत्रणांनी संशयावरून सनातनचे निष्पाप साधक डॉ. वीरेंद्रसिंह तावडे आणि श्री. समीर गायकवाड यांना अटक करून कारागृहात ठेवले आहे. पुरोगाम्यांच्या दबावापोटी आणि हिंदुत्वाचे दमन करण्यासाठी सनातनला हत्या प्रकरणात गोवण्याचे कारस्थान चालू आहे. पोलीस आणि अन्वेषण यंत्रणा यांच्याकडून अटकेतील साधक, तसेच अन्य साधक यांचाही अतोनात छळ होत आहे. हिंदूविरोधी प्रसिद्धीमाध्यमांकडूनही सनातनची अपकीर्ती केली जात आहे. या पार्श्‍वभूमीवर सनातन प्रभातने पोलिसांच्या सनातनद्वेषाचे कटू वास्तव, हा विशेषांक ६ सप्टेंबर या दिवशी प्रसिद्ध केला होता. पुणे जिल्ह्यातील साधकांनी शहर आणि उपनगर येथील चौकाचौकांत, तसेच गर्दीच्या ठिकाणी विशेषांकाचे वितरण केले. या अंकाला समाजातून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

गणेशोत्सवात महिला भाविकांच्या सुरक्षिततेसाठी गणेशोत्सव मंडळांनी आवश्यक उपाययोजना कराव्यात !

हिंदु जनजागृती समितीच्या 'रणरागिणी शाखे'चे 'धार्मिक उत्सव स्त्री-सुरक्षा अभियान' ! 
     मुंबई - लोकमान्य टिळकांनी उदात्त अशा राष्ट्रजागृती आणि संघटन या हेतूने चालू केलेल्या गणेशोत्सवाला राज्यभर मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला आहे. हा उत्सव शतकोत्तर रौप्य महोत्सवाकडे वाटचाल करत असतांना मूळ उद्देशापासून भरकटत असल्याचे चित्र दिसत आहे. या उत्सवातील विविध अपप्रकारांच्या समवेत गर्दीचा लाभ उठवत महिलांची होणारी छेडछाड, ही एक मोठी समस्या निर्माण झाली आहे. या समस्येच्या निवारणासाठी हिंदु जनजागृती समितीच्या रणरागिणी शाखेने 'धार्मिक उत्सव स्त्री-सुरक्षा अभियान' राबवण्यास प्रारंभ केला आहे. त्या निमित्ताने विविध गणेशोत्सव मंडळांचे प्रबोधन करण्यात येत आहे. अनेक मंडळांचा याला सकारात्मक प्रतिसाद लाभत आहे, असे हिंदु जनजागृती समितीच्या रणरागिणी शाखेने म्हटले आहे. 

पोलिसांच्या निष्क्रीयतेमुळे गोव्यात दीड दिवसाच्या श्री गणेशमूर्तीच्या विसर्जनाच्या निमित्ताने अनेक ठिकाणी कायदाभंग

रात्री १ वाजल्यानंतरही प्रचंड प्रमाणात
 फटाके वाजवल्यामुळे स्थानिक त्रस्त
        पणजी - ७ सप्टेंबर या दिवशी दीड दिवसाच्या श्री गणरायाला भाविकांनी निरोप दिला. राज्यभरात अनेक ठिकाणी विसर्जन भावपूर्ण वातावरणात करण्यात आले; मात्र काही ठिकाणी याला अपप्रकारांचे गालबोट लागले. फोंडा परिसरात श्री गणेश विसर्जनाच्या नावाखाली रात्री १ वाजेनंतरही मोठ्या प्रमाणात फटाके फोडले जात होते. त्याचा धूर एवढा झाला होता की, समोरची व्यक्ती, वास्तू दिसणे कठीण झाले होते. फटाक्यांचा आवाज आणि धूर यांमुळे परिसरात रहाणारी बालके, रुग्ण आणि वयोवृद्ध यांना पुष्कळ त्रास सहन करावा लागला. असा नियमभंग होत असूनही पोलिसांनी त्यासंदर्भात कारवाई केली नाही. (रात्री १० वाजेनंतर मोठ्या आवाजात गाणी लावणे, फटाके फोडणे आदींवर न्यायालयाच्या आदेशानुसार बंदी आहे. असे असूनही रात्री १ वाजेनंतरही मोठ्या प्रमाणात फटाके फोडले जात असतांना पोलीस कारवाई का करत नाहीत ? उघडपणे फटाके फोडले जात असतांना, तसेच त्याचा प्रचंड आवाज आणि धूर सर्वत्र पोचत असतांना पोलिसांना ते ऐकू गेले नाही कि पोलीस कान असून बहिरे अन् डोळे असून आंधळे आहेत ? - संपादक)

गोव्यातील विद्यार्थ्यांमध्ये गांजा लोकप्रिय होत आहे ! - जितेंद्र रंजन, अधीक्षक, अमली पदार्थ नियंत्रण यंत्रणा

गोवा राज्याला अमली पदार्थाचा विळखा !
       पणजी - गोव्यातील विद्यार्थी आणि मजूरवर्ग यांच्यामध्ये गांजा हा बंदी असलेला अमली पदार्थ लोकप्रिय ठरत आहे. गांजा हा अमली पदार्थ इतर अमली पदार्थांच्या तुलनेत कमी किमतीत मिळत असल्याने तो लोकप्रिय ठरत आहे, अशी माहिती अमली पदार्थ नियंत्रण यंत्रणेचे (एन्सीबीचे) अधीक्षक जितेंद्र रंजन यांनी त्यांना मिळालेल्या माहितीच्या आधारावर प्रसारमाध्यमांना दिली आहे.
       अधीक्षक रंजन यांनी म्हटले आहे की, गांजा या अमली पदार्थाचा दर १०० रुपयांवरून प्रारंभ होतो. अमली पदार्थ नियंत्रण यंत्रणा राज्यात अमली पदार्थाच्या वापराला आळा घालण्यासाठी अमली पदार्थाच्या वापराच्या दुष्परिणामासंबंधी जागृती करत आहे. विशेषत: शैक्षणिक संस्थांच्या ठिकाणी ही जागृती करण्यात येत आहे. एन्सीबीने नुकतीच होंडा, सत्तरी येथे एका ठिकाणी धाड घालून ३.८ किलो गांजा कह्यात घेतला होता, तसेच एन्सीबीने घातलेल्या अनेक धाडींमध्ये अधिक ठिकाणी गांजाच सापडला आहे. चालू वर्षी एप्रिल मासात फर्मागुडी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रांगणात दोन विद्यार्थ्यांना गांजा बाळगल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती, तसेच नुकत्याच गोवा विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात मुख्यमंत्री पार्सेकर यांनी राज्यात अमली पदार्थ व्यावसायिकाच्या संख्येत वाढ झाल्याचे म्हटले होते.

नेहमी हिंदु धर्मातील सणांनाच विरोध का करता ?

मुंबई उच्च न्यायालयाने नागरी संरक्षण हक्क समितीला फटकारले ! 
ही नागरी संरक्षण हक्क समिती कि हिंदूविरोधी समिती ? 
     मुंबई - तुम्ही नेहमी हिंदु धर्मातील सणांनाच विरोध का करता ? तुम्ही याचिका मागे घ्या किंवा मग दंड भरा. सरकारने नागपूरमधील दीक्षाभूमी आणि मोठा ताजसाठीही खर्च केला आहे, अशा शब्दांत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठाने नागरी संरक्षण हक्क समितीला फटकारले आहे. 

प्रीती राठीवर आम्ल फेकणार्‍यास फाशीची शिक्षा !

     मुंबई - २०१३ मध्ये झालेल्या देहलीतून निघालेल्या प्रीती राठी हिच्यावर वांद्रे स्थानकात आम्ल फेकल्याच्या प्रकरणी दोषी अंकुर पनवार याच्या गुन्ह्याचे स्वरूप गंभीर असल्याचे मान्य करत सत्र न्यायालयाने त्याला फाशीची शिक्षा दिली आहे. या निकालानंतर प्रीतीला न्याय मिळाल्याची भावना तिच्या कुटुंबियांकडून व्यक्त करण्यात येत होती. 

'एबीपी माझा' आणि 'साम' या वृत्तवाहिन्यांकडून सनातनच्या साधकांच्या विरोधात विपर्यस्त वार्तांकन !

     मुंबई - डॉ. दाभोलकर आणि कॉ. पानसरे यांच्या हत्या प्रकरणाच्या संदर्भात 'एबीपी माझा' आणि 'साम' या वृत्तवाहिन्यांनी सनातनच्या साधकांच्या विरोधात विपर्यस्त वार्तांकन केले. डॉ. दाभोलकर आणि कॉ. पानसरे यांच्या हत्याकांडांसंबंधीचे वृत्त ८ सप्टेंबर या दिवशी प्रसारित करतांना एबीपी माझा वृत्तवाहिनीचा प्रतिनिधी मंदार गोंजारी यांनी सांगितले की, 'कोल्हापूर येथे कॉ. पानसरे हत्या प्रकरणाचा तपास करणार्‍या विशेष अन्वेषण पथकाने न्यायालयाला दिलेल्या माहितीनुसार सनातनचे साधक विनय पवार यांनी पानसरे यांच्या घराची टेहळणी केली होती. महत्त्वाची गोष्ट ही की, प्रत्यक्षदर्शीने पवार यांना ओळखले आहे. काल केंद्रीय अन्वेषण पथकाने डॉ. दाभोलकर हत्येसंदर्भात सादर केलेल्या आरोपपत्रातही पवार यांचे नाव असल्याने पवार यांचा डॉ. दाभोलकर आणि कॉ. पानसरे अशा दोघांच्या हत्याकांडात असलेला सहभाग स्पष्ट होतो. तसेच डॉ. वीरेंद्रसिंह तावडे हेच दोन्ही हत्याकांडांचे मुख्य सूत्रधार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. सारंग अकोलकर आणि विनय पवार यांनी दाभोलकर यांची हत्या केल्याचा संशय आहे, अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे. त्यामुळे सनातन संस्थेचे साधकच दोन्ही प्रकरणी गुंतलेले आहेत. किंबहुना तशा प्रकारचे पुरावेच तपास यंत्रणांकडून न्यायालयामध्ये सादर करण्यात आले आहेत.' (एबीपी माझा वृत्तवाहिनीचा प्रतिनिधी मंदार गोंजारी यांनी यापूर्वी अशाच प्रकारे गोरक्षकांच्या विरोधात विपर्यस्त वार्तांकन केले होते. त्यानंतर त्यांना गोरक्षकांची क्षमा मागावी लागली होती. तरीही सुंभ जळला तरी पीळ जात नाही, या म्हणीप्रमाणे गोंजारी अजूनही हिंदुत्वनिष्ठांच्या विरोधात गरळओक करतात. - संपादक) त्यामुळे विनय पवारच्या रूपात पानसरे हत्येच्या प्रकरणात ठोस नाव समोर आले आहे, असे नंतर एबीपी माझा वृत्तवाहिनीच्या वृत्तनिवेदकाने म्हटले. 

उच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी कोल्हापूर पोलिसांच्या विरोधात अवमान याचिका प्रविष्ट !

डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांची छायाचित्रे प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिद्ध झाल्याचे प्रकरण ! 
     कोल्हापूर, ८ सप्टेंबर (वार्ता.) - संशयित आरोपींना न्यायालयात उपस्थित करत असतांना त्यांचा चेहरा वर्तमानपत्रे आणि वृत्तवाहिन्या यांवर प्रसिद्ध होऊन त्यांच्या जीविताला धोका निर्माण होऊ नये, यासाठी पोलिसांनी दक्षता घेतली पाहिजे, असा आदेश उच्च न्यायालयाने दिला आहे. असे असतांना कोल्हापूर पोलिसांनी कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरणी अटक करण्यात आलेले संशयित आरोपी आणि सनातनचे साधक डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांना न्यायालयात घेऊन जात असतांना प्रसारमाध्यमांसमोर उभे केले. डॉ. तावडे यांची सर्व छायाचित्र प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिद्ध होऊन त्यांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे येथील पोलिसांनी उच्च न्यायालयाचा अवमान केल्याच्या प्रकरणी हिंदु विधीज्ञ परिषदेचे अधिवक्ता श्री. वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी डॉ. तावडे यांच्या वतीने येथील न्यायालयात ८ सप्टेंबर या दिवशी कोल्हापूर पोलिसांच्या विरोधात अवमान याचिका प्रविष्ट केली. पोलीस कोठडी देण्यापूर्वी पोलिसांची वर्तवणूक कशी आहे, हेही न्यायालयाने समजून घ्यायला हवे. पोलिसांनी डॉ. तावडे यांना न्यायालयात उपस्थित करतांना उच्च न्यायालयाने दिलेला आदेश पाळला पाहिजे, असा युक्तीवाद अधिवक्ता श्री. वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी न्यायालयात केला.

पिंपरीमध्ये 'बंद पशूवधगृह' 'बकरी ईद'साठी चालू करण्याचा पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचा हिंदुद्वेषी प्रयत्न ! - गोवंश रक्षा समितीचे संदीप वाघेरे

  • पशूवधगृह चालू करण्यास विविध हिंदुत्ववादी संघटनांचा तीव्र विरोध 
  • हिंदुत्ववादी संघटनांची आंदोलन करण्याची चेतावणी ! 

     पिंपरी, ८ सप्टेंबर - पिंपरी उड्डाणपुलाखालील गेल्या ४ वर्षांपासून बंद असलेले पशूवधगृह 'बकरी ईद'च्या निमित्ताने पुन्हा चालू करण्याचा प्रयत्न पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडून करण्यात येत असल्याचा आरोप गोवंश रक्षा समितीचे श्री. संदीप वाघेरे यांनी केला. येथील हॉटेल घरोंदा येथे ७ सप्टेंबर या दिवशी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी हिंदू स्वाभिमान प्रतिष्ठानचे अधिवक्ता देवदास शिंदे, गोवंश रक्षा समितीचे श्री. नितीन वाटकर, विश्‍व हिंदू परिषदेचे श्री. धनाजी शिंदे, पतंजलीचे श्री. अजित जगताप, धर्मरक्षण समितीचे श्री. योगेश सातवडे, केंद्राई गोशाळेचे श्री. धनंजय गावडे, बजरंग दलाचे श्री. कुणाल साठे, अखिल दहीहंडी उत्सव समितीचे श्री. अभिजित शिंदे, सेवा विकास बँकेचे संचालक श्री. शेखर अहिरराव, माजी नगरसेवक श्री. प्रवीण कुदळे, सिंधु एकता मंचचे श्री. दादा अछरा, श्री. विजय कोतवाणे, हिंदु जनजागृती समितीचे श्री. पराग गोखले आदी हिंदुत्ववादी उपस्थित होते. या पत्रकार परिषदेनंतर हिंदुत्ववाद्यांनी पिंपरी- चिंचवड महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त तानाजी शिंदे यांची भेट घेऊन त्यांना पशुवधगृह उभारण्यास विरोध दर्शवणारे निवेदन दिले. 

पुणे येथील हिंदु जनजागृती समितीची आदर्श गणेशोत्सव मोहीम

आेंकारेश्‍वर घाटाची दु:स्थिती ! 
अशा दु:स्थितीत भाविकांनी विसर्जन तरी कसे करावे ?
आेंकारेश्‍वर घाटाची दु:स्थितीत भाविक विसर्जन करतांना

जळगाव जिल्ह्यातील अनुदानित निवासी आश्रमशाळांत खोटी विद्यार्थी संख्या दाखवून कोट्यवधी रुपयांचा घोटाळा

     मुंबई - जळगाव जिल्ह्यातील अनुदानित निवासी आश्रमशाळांतील पटनोंदणी (हजेरीपट) खोटी विद्यार्थी संख्या दाखवून कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाल्याचे उघड झाले आहे. विद्यार्थ्यांसाठी आधार कार्डाच्या नोंदणीची मोहीम राबवल्यामुळे हा घोटाळा उघडकीस आला, असे जळगावच्या जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांनी सांगितले. या गैरप्रकारातून गेल्या वर्षभरात खोट्या विद्यार्थ्यांपोटी सरकारची ६८ कोटी रुपयांची हानी झाल्याचा अंदाज आहे. (घोटाळा करणार्‍यांची तात्काळ चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी आणि त्यांच्याकडून हानीभरपाईही वसूल करून घ्यावी ! - संपादक)
अग्रवाल यांनी सांगितले की...

१. जळगावमधील निवासी आश्रमशाळांच्या पटनोंदणी (हजेरीपट) असलेल्या २५ सहस्र ९२२ विद्यार्थ्यांपैकी ८ सहस्र १७७ विद्यार्थ्यांचा पत्ताच लागत नसल्याचे कागदपत्रांवरून समोर आले.
२. पटनोंदणीवरील अनेक विद्यार्थी हे मध्यप्रदेशचे अथवा शेजारच्या जिल्ह्यांचे रहिवासी आहेत. संबंधित शाळेच्या व्यवस्थापनाकडे विचारणा केल्यावर त्यांच्याकडून संदिग्ध उत्तरे मिळाली असल्याचे जिल्हा प्रशासनाने सरकारला सादर केलेल्या अहवालात नमूद केले आहे.

(म्हणे) 'भारत कधीही हिंदु राष्ट्र होणार नाही !'

हिंदुद्वेषी डॉ. श्रीपाल सबनीस यांचा जळफळाट ! 
     पुणे, ८ सप्टेंबर - देशात हिंदूू आहेत, म्हणून देशाला हिंदूू राष्ट्र करणार का ? मग इतर धर्मांचे काय ? (मुसलमान राष्ट्रात हिंदु रहात नाहीत का ? - संपादक) हिंदु राष्ट्रवादाविषयी हिंदूूंमध्येच वाद आहेत. त्यामुळे भारत कधीही हिंदू राष्ट्र होणार नाही, असे हिंदुद्वेषी मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले. (सबनीस ज्या विचारसरणीच्या लोकांमध्ये जातात, त्यांना हवे तसे बोलतात. केवळ प्रसिद्धीसाठी अशा प्रकारे अविचारी विधाने करणारे म्हणे साहित्यिक ! - संपादक) आकुर्डी येथे 'जमात ए इस्लामी हिंद' या संघटनेच्या वतीने श्रमशक्ती भवनात आयोजित शांती आणि सद्भावना सभेत ते बोलत होते. या वेळी भन्ते राजरतन, अंनिसचे सचिव मिलिंद देशमुख, रियाज तांबोळी, संघटनेचे अध्यक्ष उमर फारुकी आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

राजकीय हस्तक्षेपामुळेच पोलिसांवरील आक्रमणात वाढ !

पुणे येथे माजी पोलीस कर्मचार्‍यांचे आंदोलनात प्रतिपादन ! 
     पुणे - दिवसेंदिवस वाढत जाणार्‍या राजकीय हस्तक्षेपामुळेच पोलिसांवरील आक्रमणात वाढ होत आहे, असे प्रतिपादन माजी पोलीस कर्मचार्‍यांनी केले. पोलिसांवर होणार्‍या आक्रमणांंच्या विरोधात आयुक्त कार्यालयाबाहेर २५० ते ३०० माजी पोलीस कर्मचार्‍यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले आणि पोलिसांवरील आक्रमणाचा निषेध केला. या आंदोलनात माजी पोलीस कर्मचार्‍यांनी त्यांचे विचार मांडले. माजी वरिष्ठ अधिकारीही या आंदोलनात सहभागी झाले होते.

इस्रोच्या 'इन्सॅट-थ्रीडीआर्' उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण !

     चेन्नई - भारतीय अवकाश संशोधन संस्था 'इस्रो'ने ८ सप्टेंबरला हवामानासंबंधी नेमकी माहिती देणार्‍या 'इन्सॅट-थ्रीडीआर्' या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले आहे. आंध्रप्रदेशातील श्रीहरिकोटा येथून 'जीएस्एल्व्ही-एफ्०५' या प्रक्षेपक यानातून हा उपग्रह सोडण्यात आला.

नाना काटे सोशल फाऊंडेशनच्या वतीने आदर्श गणेशोत्सव विसर्जन मोहीम !

स्वच्छ पाण्यात मूर्ती पुनर्विसर्जन करतांना कार्यकर्ते
रावेत नदीमध्ये मूर्तीविसर्जनासाठी घेऊन जातांना गाडीत ठेवलेल्या मूर्ती

पुणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार !

१. होडीतून मूर्तींचे विसर्जन करतांना महापालिका कर्मचार्‍यांनी भाविकांना लुबाडले ! 
     आेंकारेश्‍वर घाटावर होडीतून नदीत मूर्ती विसर्जित करण्यासाठी भाविक गेले असता होडीत बसलेल्या महापालिकेच्या कर्मचार्‍याने ५१ रुपयांची भाविकांकडे मागणी केली. त्यापूर्वी ते भाविकांकडून ३० रुपयांची मागणी करत होते. नंतर भाविकांची गर्दी वाढल्यानंतर कर्मचार्‍यांनी पैशाच्या मागणीत वाढ केली. अशा प्रकारे कर्मचारी मूर्ती विसर्जन करण्यासाठी भाविकांची लुबाडणूक करत होते. 
२. हौदात पाणी अल्प असल्याने भिडे पुलावर हौदात मूर्ती तरंगू लागल्या
अ. या घाटावर बांधण्यात आलेल्या कृत्रिम हौदात गणेश मूर्ती विसर्जित केल्यानंतर त्या पाण्यावर तरंगतांना दिसत होत्या. भिडे पुलावरही महापालिकेच्या कर्मचार्‍यांनी लोकांकडून विसर्जनाचे पैसे घेतले. 
आ. भिडे पूल येथे भाविकांकडून घेण्यात आलेले निर्माल्य कचर्‍याच्या डब्यात टाकण्यात आले. वाकड घाट येथील हौदात पाणी नसल्याने मूर्तींचे विसर्जन नदीत करण्यात आले.

फलक प्रसिद्धीकरता

हिंदुत्वनिष्ठांचा गळा घोटणार्‍या साम्यवाद्यांची सहिष्णुता !
     केरळमध्ये कम्युनिस्टांनी अनेक संघकार्यकर्त्यांच्या हत्या केल्या आहेत. आता केरळमधील कम्युनिस्ट पक्षाच्या सरकारने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मंदिरांच्या आवारात भरणार्‍या शाखांवर प्रतिबंध लावण्यासाठी प्रयत्न चालू केले आहेत.

हिंदू तेजा जाग रे !

Jago ! :
Anek swayamsevakonki hatya karnewale samyavadiyonki Keral sarkar ab mandirome lagnewali RSSki shakhaye band karegi.
     Hinduo, is Hindudweshka virodh kare!
जागो !
: अनेक स्वयंसेवकों की हत्या करनेवाले साम्यवादियों की केरल सरकार अब मंदिरों में लगनेवाली आर्एस्एस् की शाखाएं बंद करेगी.
     हिन्दुओ, इस हिन्दूद्वेष का विरोध करें !

नथुराम गोडसे अखेरपर्यंत रा.स्व. संघाचे सदस्य होते; पण संघाच्या मवाळ भूमिकेमुळे त्यांचा भ्रमनिरास झाला होता ! - सात्यकी सावरकर

     नवी देहली - गांधीवध करणारे पंडित नथुराम गोडसे हे अखेरपर्यंत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सदस्य होते; पण संघाच्या मवाळ भूमिकेमुळे त्यांचा भ्रमनिरास झाला होता. त्यांना संघातून काढण्यात आले नव्हते किंवा त्यांनी संघाचा त्यागही केला नव्हता, अशी माहिती गोडसे यांचे नातू आणि दिवंगत हिमानी सावरकर यांचे पुत्र सात्यकी सावरकर यांनी दिली आहे. संघ हत्येच्या कृत्याचे समर्थन करू शकत नाही, हे मला मान्य आहे; मात्र ते सत्य टाळू शकत नाहीत, असेही ते म्हणाले. राहुल गांधी यांनी गांधी यांच्या हत्येमागे संघाचा हात असल्याचे वक्तव्य केले होते. त्यांच्यावर मानहानीचा खटला प्रविष्ट करण्यात आला आहे. त्यामुळे श्री. सात्यकी सावरकर यांच्या या विधानावरून राहुल गांधी यांच्या विधानाला पुष्टी मिळाल्याचे म्हटले जात आहे. 

'पोलिसांच्या सनातनद्वेषाचे कटू वास्तव' या विशेषांकाच्या अंक वितरणाच्या संदर्भातील महत्त्वाच्या घटना

१. श्रीमंत दगडूशेठ गणपति मंदिराजवळ अंक घेण्यासाठी लोकांची अक्षरशः झुंबड उडाली. त्या वेळी अनेक जणांनी आपणहून अंक मागून घेतला, तर काही जणांनी स्वतःही काही अंक घेऊन ते वितरित केले. 
२. साधक अंक वितरण करण्यासाठी पुष्कळ अंक घेऊन गेले होते, तेव्हा एका फुलविक्रेत्याने अंकांचे गठ्ठे करण्यासाठी आपणहून साहाय्य केले. 
३. काही दुकानदारांनीही अंक वितरण करण्यासाठी स्वत:हून काही अंक घेतले. 
४. टपाल खात्यातील काही कर्मचार्‍यांनी कार्यालयातून बाहेर येऊन अंक वितरण करणार्‍या सनातनच्या साधिकांकडून अंक मागून घेतले. 
५. एका वृत्तपत्र विक्रेत्याने लोकांना देण्यासाठी ५० अंक मागून घेतले आणि वितरण केले. 
६. वाहतूक सिग्नलसाठी थांबलेल्या लोकांनीही आवर्जून अंक विकत घेतला. 
७. अनेक जणांनी सनातन प्रभातचे वर्गणीदार होण्याची इच्छा प्रकट केली आणि अनेकांनी सनातनच्या साधकांकडून दैनिकाचे अंक मागवून घेतले. 
८. शहरामध्ये अंक वितरण करत असतांना एका रिक्शाचालकाने दैनिकाचे २० अंक घेऊन स्वतः वितरण केले. 
९. शहरातील ९ गणेश मंडळांनी त्यांच्या मंडळामध्ये चालू असलेल्या कार्यक्रमात व्यासपिठावर जाऊन दैनिकाच्या विशेषांकाची माहिती ध्वनीक्षेपकावरून सांगण्यास अनुमती दिली. त्यामुळे मोठ्या प्रमाणात दैनिकाचे वितरण झाले. 
१०. चिंचवड येथील थेरगाव घाटावर दैनिकाचे वितरण होत असतांना श्री. शेलार या जिज्ञासूने वर्गणीदार होणार, असे सांगितले. श्री. आणि सौ. रवींद्र पंडित हे गणेशमूर्ती विसर्जनासाठी आले होते, त्या वेळी त्यांनी म्हटले की, मला तुमचे कार्य थोडे ठाऊक आहे. मलाही तुमच्यासारखी सेवा करायची आहे. या वेळी त्यांच्या पत्नीनेही सेवा करण्याची सिद्धता दर्शवली. 
११. दैनिक वितरणाची सेवा करत असतांना बर्‍याच जणांनी सनातनच्या कार्याला शुभेच्छा दिल्या. वाचा उद्याच्या अंकात : महाराष्ट्रातील अन्य जिल्ह्यातही विशेषांकाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. याविषयी आणि मान्यवर, हिंदुत्वनिष्ठ, वाचक यांनी व्यक्त केलेले अभिप्राय !

चिंचवड येथे मूर्तीदान मोहीम राबवणारे संस्कार प्रतिष्ठानचे कार्यकर्ते फिरकलेच नाहीत !

मूर्तीदान मोहीमेचा बोजवारा ! 
       येथील मोरया घाट, बिर्ला रुग्णालय जवळील घाट, काकडे पार्क येथील घाट या ठिकाणी घरगुती गणपतीचे विसर्जन झाले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने मोहीम राबवत असल्याने या तिन्ही ठिकाणी संस्कार प्रतिष्ठानचे कार्यकर्ते मूर्तीदान मोहीम राबवतांना दिसले नाहीत. भाविकांना त्यांच्या इच्छेनुसार मूर्ती विसर्जन करता आल्या. काकडे पार्क येथील हौदात नगण्य प्रमाणात विसर्जन होत होते. मोरया घाटावर मूर्ती विसर्जनासाठी होडीची व्यवस्था करण्यात आली होती. मनसेने ठेवलेल्या होड्यांचा वापर भाविकांनी केला.

मूर्तीविसर्जनासाठी भाविकांचे प्रबोधन आणि मूर्तीदान करणार्‍यांच्या विरोधात प्रसंगी कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय !

हिंदु जनजागृती समितीच्या पुढाकाराने समस्त हिंदुत्ववादी संघटनांची 
मूर्तीदान नको, तर मूर्तीविसर्जन करा यासाठी बैठक ! 
बैठकीला उपस्थित हिंदु धर्माभिमानी
      कोल्हापूर, ८ सप्टेबर (वार्ता.) - परंपरेनुसार भाविकांनी मूर्तीदान न करता मूर्तीविसर्जन करावे यांसाठी हस्तपत्रकांच्या माध्यमातून प्रबोधन करणे, विविध प्रशासकीय अधिकार्‍यांना निवेदन देणे, प्रसंगी धार्मिक भावना दुखावल्यास तक्रार दाखल करणे आणि घरगुती श्रीगणेश मूर्तीविसर्जनाच्या दिवशी प्रबोधन करणे, असे निर्णय बैठकीत घेण्यात आले. हिंदु जनजागृती समितीच्या पुढाकाराने समस्त हिंदुत्ववादी संघटनांची मूर्तीदान नको, तर मूर्तीविसर्जन करा यासाठी हिंदु एकता आंदोलनाच्या कार्यालयात बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत श्री. किरण दुसे यांनी उपस्थितांसमोर विषय मांडला आणि श्री. मधुकर नाझरे यांनी प्रस्तावना केली.

गणेशभक्तांच्या जिवाशी खेळणार्‍या महापालिका आयुक्तांसह अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर कारवाई करावी ! - हिंदु जनजागृती समितीचे महापालिका उपायुक्तांना निवेदनाद्वारे मागणी

महापालिका उपायुक्त श्रीमती कविता द्विवेदी 
यांना निवेदन देतांना धर्माभिमानी
     पुणे, ८ सप्टेंबर (वार्ता.) - गणेशोत्सव विसर्जनाच्या वेळी संरक्षण कठडे न बांधणे आणि पुलाची दुरवस्था यांमुळे गणेशभक्तांच्या जिवाशी खेळणारे पुणे महापालिका आयुक्त आणि संबंधित अधिकारी अन् कर्मचारी यांच्यावर कारवाई करावी, या मागणीचे निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने महापालिकेच्या उपायुक्त श्रीमती कविता द्विवेदी यांना देण्यात आले. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र राज्यसंघटक श्री. सुनील घनवट, हिंदु एकता आंदोलनाचे सचिव आणि अधिवक्ता चंद्रकांत भोसले, धर्माभिमानी सागर शिरोडकर, विजय गावडे आदी उपस्थित होते. या वेळी श्रीमती द्विवेदी यांनी समितीच्या भावना वरिष्ठ अधिकार्‍यांना सांगण्यात येतील, असे आश्‍वासन दिले.

गणपति ही भारताचीच नव्हे, तर विश्‍वव्यापी वैदिक संस्कृतीची देवता !

सध्या चालू असलेल्या गणेशोत्सवाच्या निमित्ताने...
      अग्रपूजेची देवता असलेला गणपति, ही भारताची नव्हे, तर विश्‍वव्यापी वैदिक संस्कृतीची देवता होती. इस्लामी राष्ट्रांतही पूर्वी तेथे गणपति पुजला जात असल्याचे पुरावे मिळालेले आहेत. काबूलपासून थेट कॅस्पियन समुद्रापर्यंत भारतीय संस्कृती पसरली असल्याने त्या ठिकाणी हिंदु मंदिरांचे अस्तित्व स्वाभाविक आहे. हिंदु देवतांमध्ये शिव आणि श्री गणेश यांचे स्थान उच्च असल्यामुळे या दोन देवतांच्या मूर्ती मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. जगातील ६६ देशांत कोणत्या ना कोणत्या स्वरूपात श्री गणेश मंदिरे आणि त्यातील श्री गणेशमूर्ती विद्यमान आहेत. त्याची काही उदाहरणे - 
१. अफगाणिस्तान : येथे हिंदु राजांनी अनेक वर्षे राज्य केले. या कालखंडात केवळ मोठी मंदिरेच निर्माण करण्यात आली नाहीत, तर अनेक सार्वजनिक ठिकाणी हिंदु देवतांच्या मूर्तींचीही प्रतिष्ठापना करण्यात आली. त्यात श्री गणेशमूर्तींची संख्या सर्वाधिक होती. काबूलमधील प्रख्यात संग्रहालयामध्ये श्री गणेशाशी संबंधित मूर्तींची संख्या ६० होती.

स्वराज्याचे कार्य होण्यासाठी ईश्‍वरी साहाय्य आवश्यक आहे, हे ओळखून सार्वजनिक गणेशोत्सव चालू करणारे लोकमान्य टिळक !

    लोकमान्य टिळकांनी ह.भ.प. श्रीपतिबुवा भिंगारकर यांना विचारले, मी स्वराज्यप्राप्तीसाठी प्रयत्न करीत आहे; पण ईश्‍वरी साहाय्यावाचून कोणतेही कार्य शेवटास जात नाही, तेव्हा या स्वराज्याच्या कार्याचा राष्ट्रभर प्रसार होण्यासाठी कोणाची आराधना करावी ?
     बुवा म्हणाले, तुम्ही श्री गणपतीची पार्थिव पूजा चालू करा, म्हणजे तुमचे सर्व हेतू सिद्धीस जातील. त्यावर लोकमान्य टिळक म्हणाले, मी एकट्याने अशी पूजा करून भागणार नाही. राष्ट्रभर ती सर्वांनी केली पाहिजे. आपल्याकडे भाद्रपद शुक्ल चतुर्थीस घरोघर पार्थिव गणपतीची पूजा करायचा पूर्वीचा प्रघात आहेच. तो आता राष्ट्रभर चालू करूया.
तेव्हापासून लोकमान्यांच्या प्रेरणेने सार्वजनिक गणेशोत्सव चालू झाला !
- ह.त्र्यं. देसाई (गुणसागर टिळक)
हिंदूंनो, गणेशोत्सवामागील पूर्वजांचा हेतू लक्षात घ्या !
      आमची धर्मबुद्धी जागृत रहावी, आमच्या राजकीय मनोवृत्ती जोमात रहाव्यात, आमची राष्ट्रीयत्वाची ज्योत नेहमीच प्रकाश देणारी असावी; म्हणूनच आमच्या वाडवडिलांनी उत्सवांची योजना केली आहे ! - लोकमान्य टिळक (केसरी, ८.९.१८९४)

श्री गणेश : जगताचे आराध्य दैवत !

१. एके काळी संपूर्ण विश्‍वात केवळ हिंदूंच्या गौरवशाली संस्कृतीचाच प्रभाव असणे 
     गणेशभक्ती करणारे भृशुंडीऋषि, गणकऋषि, पराशरऋषि आदी अनेक ऋषिमुनी या पवित्र भारतभूमीत होऊन गेले. या थोर ऋषिमुनींचे आदर्श जीवनचरित्र आणि उज्ज्वल वाङ्मय संपूर्ण जगताचे चिरंतन प्रेरणास्थान आहे. प्र्राचीन काळापासून जगातील अनेक देशांनी भारतातील आर्यांच्या श्रेष्ठतम् हिंदु धर्माचे अनुसरण केले आहे. एके काळी संपूर्ण विश्‍वात केवळ हिंदूंच्या गौरवशाली संस्कृतीचाच प्रभाव होता. याचे अनेक ठोस पुरावे आजही उपलब्ध आहेत. 
१ अ. पृथ्वीवरील विविध देशांत श्री गणेशाची प्रचलित असलेली नावे 
(संदर्भ : सनातनचा ग्रंथ श्री गणपति - भाग १) 

स्पिरिच्युअल सायन्स रिसर्च फाउंडेशन (एस्.एस्.आर्.एफ्.)च्या वतीने सिंगापूर येथे घेतलेल्या प्रवचनाला जिज्ञासूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद

स्पिरिच्युअल सायन्स रिसर्च फाउंडेशनच्या
प्रवचनाला उपस्थित जिज्ञासू
     १.९.२०१६ या दिवशी स्पिरिच्युअल सायन्स रिसर्च फाउंडेशनच्या वतीने सिंगापूर येथे एक प्रवचन घेण्यात आले. या प्रवचनाचे आयोजन येथील सौ. हिरवा पोटा यांनी केले होते. (सौ. पोटा अनेक हिंदुत्वनिष्ठ संघटनांशी जोडलेल्या आहेत. त्या मूळ गुजरातच्या असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निकटवर्ती आहेत.) या प्रवचनाचा लाभ ४० जिज्ञासूंनी घेतला.
    १. स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रिया या विषयावर प्रवचन घेणे : प्रवचनाला आलेल्या जिज्ञासूंनी पूर्वज, स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रिया, आध्यात्मिक पातळी इत्यादींविषयी जिज्ञासेने शंका विचारून घेतल्या. आरंभी पूर्वज हा विषय घेण्यास आम्ही आरंभ केला; मात्र उपस्थितांना मानसिक तणाव दूर कसे करायचे ?, याविषयी जाणून घ्यायचे असल्याने आम्ही स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रिया हा विषय घेतला.

वास्तवातले आणि मनातले !

       बहुतांश विचारवंत सामान्य बुद्धीचे नसतात. त्यांना प्रत्येक गोष्टीत काहीतरी दडलेले असल्याच्या संशयाने कायम पछाडलेले असते. अश्‍लीलता किंवा सौंदर्य हे मानवी दृष्टीत असते. ज्याची जशी नजर असते, तसे त्याला समोरचे दृष्य दिसते. एक संतवचनही त्याचीच ग्वाही देते. जिसकी रही भावना जैसी, प्रभू मुरत तिन देखी तैसी ! हे सगळे तुमच्या मनाचे खेळ असतात. मग आपापल्या समजूतीनुसार कोणाला चोर किंवा कोणाला थोर ठरवण्याची अहमहमिका सुरू होत असते.
श्री. भाऊ तोरसेकर
१. नग्नतेचे गुणगान करणार्‍यांकडून मुनिश्री 
तरुणसागर यांच्या नग्नतेला विरोध हे हास्यास्पद !
       हरयाणाच्या विधानसभेत दिगंबर पंथाचे मुनिश्री तरूणसागर यांना आमंत्रित करण्यात आल्यावर त्यांच्या विचारांचे समर्थन वा खंडन करण्यापेक्षा त्यांचे कपडे वा नग्नता यांवर मोठीच मल्लीनाथी झाली. ती करण्यातला वैचारिक संदर्भ कमी आणि विकृत आनंद सहज डोळ्यात भरणारा होता. आपण कपड्यांनी झाकलेलो आहोत आणि म्हणून सभ्य वा सुसंस्कृत, तर ते मुनिश्री विवस्त्र वावरतात, म्हणून असभ्य असल्याच्या प्रतिक्रिया लज्जास्पद होत्या. त्यात सभ्यतेचे लक्षणही नव्हते; कारण या प्रतिक्रिया बहुतांशी नग्नतेचे गुणगान करणार्‍या लोकांकडून आलेल्या होत्या. अन्य वेळी नग्नता किंवा वेशभूषेच्या दंडकांना शिव्या घालणार्‍यांनी इथे नग्नतेवर हल्ला कशाला करावा ?

नगरसेवकांना पारदर्शक कार्यप्रणाली का नको ?

       राज्यातील प्रशासकीय कारभाराची वाटचाल सध्या इ-गव्हर्नंसकडे (संगणकीकृत प्रशासन) चालू आहे. त्याच अंतर्गत नगरसेवकांच्या पारंपरिक पटनोंदणी पुस्तकाची जागा बायोमेट्रिक प्रणालीने घेतली आहे. या प्रणालीद्वारे उपस्थितीची नोंद करणे नगरसेवकांना बंधनकारक केलेले नाही. तरीही प्रत्यक्षात ही प्रणाली राबवल्यावर त्याद्वारे उपस्थितीची नोंद करणार्‍या नगरसेवकांची संख्या पाहिल्यास ती विचार करायला लावणारी आहे. नुकतेच पुणे महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेला येणार्‍या नगरसेवकांची उपस्थिती बायोमेट्रिक पद्धतीने घेण्याचे नियोजन पालिका प्रशासनाने केले आहे. पालिकेतील १५२ पैकी ९५ नगरसेवकांची बायोमेट्रिकसाठी नोंदणी केली आहे. त्यांपैकी २० नगरसेवकांनी बायोमेट्रिकचा वापर करत हजेरी नोंदवली आहे. थोडक्यात सांगायचे, तर या प्रणालीद्वारे उपस्थिती नोंदवण्यास उर्वरित १३० नगरसेवकांनी अप्रत्यक्षरीत्या विरोधच केलेला आहे.
       गेल्या २ वर्षांपासून बायोमेट्रिक प्रणाली ही वापराविना पडून असल्याचे यापूर्वी स्पष्ट झाले होते. असे असतांना संगणकीकृत अथवा कागद रहित प्रशासनाच्या कामकाजाचा आग्रह धरणार्‍या नगरसेवकांनी ही प्रणाली नाकारणे म्हणजे, पारदर्शक कामकाज करण्याचे नाकारणेच नव्हे का ? ही प्रणाली न वापरणार्‍या नगरसेवकांचा जनतेने अथवा इतर कोणीही जाब विचारायला नको, असा विचार असतो का ? याचाच दुसरा अर्थ म्हणजे अप्रत्यक्षरीत्या आम्हाला कोणी आमच्या कामकाजासंदर्भात प्रश्‍न विचारू नयेत. कोणालाही उत्तर द्यायला आम्ही बांधील नाही, असेच त्यांनी सुचवले आहे. वस्तुतः लोकशाहीमध्ये नगरसेवक हा त्या नगरातील लोकांचा सेवक असतो आणि म्हणूनच त्याचे काम आणि उपस्थिती या संदर्भात त्याने पारदर्शी असणे बंधनकारक असले पाहिजे. ही प्रणाली वापरल्यास नगरसेवकांच्या मनमानीस खीळ बसणार असल्यानेच ती प्रणाली सर्वपक्षीय नगरसेवकांकडून नाकारण्यात आली आहे.

पूर्वी किंमत नसलेल्या त्वचारोग तज्ञांची संख्या वाढण्यामागील कारण

       १५ ते २० वर्षांपूर्वी एम्.बी.बी.एस्. नंतर पदव्युत्तर शिक्षणासाठी त्वचारोग या विषयाकडे फार कोणी वळत नसत. पदव्युत्तर शिक्षणाच्या सूचीमध्ये सर्वात शेवटचे प्राधान्य त्वचारोग असायचे; कारण या विशेषज्ञांना केवळ रुग्ण पडताळणे एवढेच काम असायचे. रुग्णांना दाखल करणे, शस्त्रक्रिया करणे असे काही नसायचे. त्यामुळे त्वचारोग तज्ञ आधुनिक वैद्यांचे उत्पन्न इतर विशेषज्ञ वैद्यांपेक्षा अल्प असायचे. आता अलीकडील काही वर्षांमध्ये त्वचारोगतज्ञांकडे लेसर आणि कॉस्मेटिक्स उपचार आल्यामुळे त्यांचेही उत्पन्न वाढले आहे. त्यामुळे रुग्णाला भरती न करता आणि शस्त्रक्रियेचा कोणताही ताण न घेता केवळ कार्यालयाच्या वेळेत सराव करून चांगले उत्पन्न मिळत आहे. त्यामुळे एम्.बी.बी.एस्. नंतर त्वचारोग या विषयाकडे विद्यार्थ्यांचा कल वाढला आहे. खाजगी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये एम्.डी. स्किन या पदवीसाठी दीड कोटी रुपये मोजावे लागतात !
- आधुनिक वैद्य मानसिंग शिंदे, कोल्हापूर (त्वचारोग तज्ञ) (६.८.२०१६)

श्रीगणेशमूर्तीकारांनो धर्मशास्त्रविरोधी अशा मूर्ती करू नका !

      कोल्हापूर - कोल्हापूर येथे एका मूर्तीकाराने श्रीगणेशमूर्तीच्या डोक्यावर अत्यंत विचित्र पद्धतीने केस दाखवले आहेत. वास्तविक श्रीगणेशाच्या डोक्यावर मुकूटच हवा. मूर्तीकारांनी धर्मशास्त्राच्या विरोधात जाऊन त्यांना हवी तशी मूर्ती बनवल्यास त्यांना पाप लागू शकते. त्यामुळे श्रीगणेशमूर्तीकारांनी श्रीगणेशमूर्ती ही अध्यात्मशास्त्रानुसारच करायला हवी !
     सर्वधर्मसमभाव म्हणजे हिंदुस्थानाच्या भवितव्याशी केलेला व्यभिचार आहे. तो आम्ही कदापी चालू देणार नाही. - पू. संभाजीराव भिडेगुरुजी, संस्थापक, श्री शिवप्रतिष्ठान

आशीर्वचन सद्गुरु (सौ.) गाडगीळकाकूंचे, तीच मजसाठी प्रेरणा असे ।

सद्गुरु (सौ.)
अंजली गाडगीळ
प्रीतीमय मन तुझे तळमळे आमच्या आनंदासाठी ।
देहास तुझ्या कितीतरी कष्ट होती ।
तेही तू हसत झेलसी आमच्यासाठी ॥ १ ॥

उगाच नाही माऊली ।
तू वाटे आम्हा प.पू. गुरुदेवांचीच सावली जणू ॥
दुःखी-कष्टी जनांच्या जीवनी ।
आनंद फुलवण्यासाठी त्यांनी निर्मिलेले इंद्रधनु तू ॥ २ ॥

आई, होते जरी स्थूलदेहाने तुझ्यापासून लांब ।
तरी तुझी आणि सद्गुरु बिंदामाईंची आठवण मनी नित्य असे ॥
हिमालयाहूनी उत्तुंग आपण दोघी मजसाठी ।
परि तुझ्या मार्गावरूनी चालण्याचे ध्येय मनी असे ॥ ३ ॥

भक्तीगंगेच्या काठावरील सनातनच्या उद्यानातील गुरुचरणी लीन आणि भावमग्न असणारे सुमन म्हणजेच संतरत्न फोंडा, गोवा येथील पू. (सौ.) सुमन नाईक !

पू. (सौ.) सुमन नाईक
     सनातनच्या संत पू. (सौ.) सुमनमावशी यांना आलेल्या अनुभूती, जीवनातील सुख-दुःखाच्या प्रसंगी आर्ततेने गुरुचरणी केलेल्या काही प्रार्थना, त्यांच्याकडून झालेल्या भावपूर्ण कृती आणि त्यांची सून अन् मुलगी यांना त्यांच्याविषयी जाणवलेली सूत्रे पुढीलप्रमाणे आहेत.
१. अनुभूती 
१ अ. सत्संगात सांगितल्याप्रमाणे प.पू. डॉक्टरांच्या खोलीत मानसरित्या नित्यनेमाने जाणे : काही दिवसांपूर्वी सत्संगात सांगितल्याप्रमाणे मी मानसभावाने प.पू. डॉक्टरांच्या खोलीत आध्यात्मिक उपाय करण्यासाठी जायचे ठरवले. तिथे गेल्यावर मी त्यांच्या खोलीच्या दारापाशीच थांबले. तेथूनच त्यांना मनोमन वंदन करून म्हणाले, हे परमेश्‍वरा, माझी पात्रता नसतांना मी आत कशी येऊ ? मी खोलीच्या बाहेर थांबलेली पाहून शेजारील आसंदी सरकवत प.पू. डॉक्टर म्हणाले, मावशी, तुम्ही आत या आणि आसंदीत बसा. तुम्हाला कंबरदुखीचा त्रास आहे ना ? हे गुरुमाऊलीचे शब्द कानी पडताच मी शरण जाण्यापलीकडे काहीच करू शकले नाही. या अनुभूतीनंतर मी नित्यनेमाने मानसरित्या प.पू. डॉक्टरांच्या खोलीत जाऊ लागले.

६१ टक्के आध्यात्मिक पातळी असलेली आणि महर्लोकातून पृथ्वीवर जन्म घेतलेली चि. श्रेयसी नीलेश सांगोलकर (वय २ वर्षे ११ महिने) या पंढरपूर येथील बालसाधिकेला आलेली अनुभूती

चि. श्रेयसी सांगोलकर
      पंढरपूरला केलेल्या आंदोलनाच्या वेळी वडिलांसमवेत आलेल्या चि. श्रेयसीने आंदोलन झाल्यानंतर विठ्ठल आणि रुक्मिणी यांच्या आंदोलनाच्या ठिकाणी केलेल्या पूजनाचे छायाचित्र पाहून ते कमरेवर हात ठेवलेले दोघे बाप्पा आंदोलनाच्या ठिकाणी आल्याचे सांगणे अन् ते ऐकून आंदोलनाला सूक्ष्मातून देवीदेवता आले असल्यामुळेच आंदोलन यशस्वीरित्या पार पडल्याची जाणीव वडिलांना होणे : ३०.७.२०१६ या दिवशी पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या भोंगळ काराभाराविरुद्ध हिंदु जनजागृती समितीच्या वतीनेे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला माझी मुलगी चि. श्रेयसी (वय २ वर्षे ११ महिने) माझ्या समवेत आली होती. आंदोलन झाल्यानंतर मी घरी आल्यावर श्रेयसीला विचारले, आंदोलनाच्या ठिकाणी कोण कोण आले होते ? त्या वेळी तिने सगळे बाप्पा आले असल्याचे सांगितले. त्यानंतर मी आंदोलनाची बातमी आणि त्याचे छायाचित्र पाठवत होतो. त्या वेळी तिने आंदोलनाच्या ठिकाणी विठ्ठल आणि रुक्मिणी यांच्या चित्रांचे पूजन केलेले छायाचित्र पाहिले. तेव्हा ती म्हणाली, बाबा, ते कमरेवर हात ठेवलेले दोघे बाप्पा तेथे आले होते. त्या वेळी मला आंदोलनाला सूक्ष्मातून देवीदेवता आले असल्यामुळेच आंदोलन यशस्वीरित्य पार पडल्याची जाणीव झाली. 
- अधिवक्ता नीलेश सांगोलकर, पंढरपूर, जिल्हा सोलापूर.

श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हा नामजप करतांना श्री. सुधाकर पाध्ये यांना आलेल्या अनुभूती

श्री. सुधाकर पाध्ये
१. जप करतांना श्रीकृष्ण पावा वाजवत उभा असल्याचे दृश्य दिसणे
     गोपाळकाल्याच्या दिवशी, म्हणजे २५.८.२०१६ या दिवशी श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव । हा नामजप करायचा असल्याचेे मला सायंकाळी ५.३० वाजता समजले. तेव्हापासून मी हा नामजप एकाग्रतेने करू लागलो. त्या वेळी हा नामजप न थांबता सतत चालू होता आणि जप करतांना माझ्या डोळ्यांसमोर श्रीकृष्ण पावा वाजवत उभा असल्याचे दृश्य दिसत होते. 
२. रात्री खोलीत असंख्य चमकणारे तारे दिसणे, रात्रभर चमकणारे तारे 
आणि हसणारा श्रीकृष्ण दिसून नामजप तल्लीनतेने होणे अन् स्वतः 
नामजपाच्या तालावर भान हरपून नाचत असून आनंदावस्थेत 
असल्याचे जाणवणे
     रात्री ८.३० वाजता मी झोपायला गेलो. अंथरुणावर पडलो, तरी माझा नामजप चालूच आहे, हे माझ्या लक्षात आले. तेव्हा मला कसलेच भान नव्हते. माझ्या डोळ्यांसमोरून श्रीकृष्ण हलत नव्हता. तसेच नंतर मला खोलीत एकामागून एक चमकणारे तारे दिसू लागले. नंतर त्या तार्‍यांची संख्या वाढत जाऊन संपूर्ण खोलीभरच ते दिसू लागले. दीड घंटा मला चमकणारे तारे आणि हसणारा श्रीकृष्ण दिसत होता अन् माझा नामजप तल्लीनतेने होत होता. या वेळी मी मोठ्यानेे म्हणालो, मला सगळीकडे तारे चमकतांना दिसत आहेत. त्या वेळी मी नामजपाच्या तालावर भान हरपून नाचत आहे, असेही मला जाणवत होते.

सर्वांचीच प्रेमाने काळजी घेणारा आणि गोमातेविषयी उपजतच भाव असणारा ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचा महर्लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला चि. नंदन कुदरवळ्ळी (वय ४ वर्षे) !

चि. नंदन कुदरवळ्ळी
      भाद्रपद शुक्ल पक्ष अष्टमी (९.९.२०१६) या दिवशी चि. नंदन कुदरवळ्ळी याचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्याच्या मावशीला त्याची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये पुढे देत आहोत. 
चि. नंदन कुदरवळ्ळी याला वाढदिवसानिमित्त 
सनातन परिवाराच्या वतीने शुभाशीर्वाद ! 
     चि. नंदनविषयी देवाने जे अनुभवायला दिले, त्यासाठी कृतज्ञता व्यक्त करून ते लिहिण्याचा प्रयत्न करते. 
१. प्रेमभाव 
     नंदन जेव्हा घरी आला होता, तेव्हा २ वर्षांचा होता. तेव्हा छोट्या छोट्या कृतीतून त्याचा प्रेमभाव व्यक्त होत असे. 
अ. एकदा माझे बाबा सहज म्हणत होते, माझे पाय दुखतात. तेव्हा नंदन खेळत होता. मी पाय चेपून देतो, असे म्हणून त्याने बाबांचे पाय चेपून दिले.

अयोध्या येथील सौ. मिथिलेश कुमारी यांना रामनाथी आश्रमात असतांना आलेल्या अनुभूती

रामनाथी (गोवा) येथील सनातनचा आश्रम
१. ध्यानमंदिरातील लाद्यांमधून प्रकाश 
निघत असल्याचे जाणवणे
     १९.६.२०१६ या दिवशी मी ध्यानमंदिरात नामजप करत असतांना ध्यानमंदिरातील लाद्यांमधून हलकासा प्रकाश निघत आहे आणि त्याचे रूपांतर लहरींमध्ये होत आहे, असे मला जाणवत होते. त्या वेळी ध्यानमंदिरातील सर्व साधकांवर तो प्रकाश मोठ्या प्रमाणात प्रक्षेपित होत होता. माझे डोळे बंद असतांनाही आज्ञाचक्रावर त्याची स्पंदने मला पुष्कळ वेळपर्यंत जाणवत होती. त्या वेळी माझा नामजप चांगला होऊन आनंदही मिळत होता आणि भावजागृती होऊन मला डोळे उघडू नयेत, असे वाटत होते.

प.पू. डॉक्टरांमध्ये आहे भगवान श्रीकृष्ण ।

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त...
परात्पर गुरु डॉ.
जयंत आठवले
     २४.८.२०१६ या दिवशी दैनिक सनातन प्रभातमध्ये प.पू. डॉक्टरांची प.पू. डॉक्टर कृष्ण नसल्याचे आणखीन एक विश्‍लेषण ही चौकट वाचली. तेव्हा देवाने मला पुढील काव्यपुष्प सुचवले.
साधकांना त्रासांशी लढायला ।
शिकवतात प.पू. डॉक्टर ॥
प.पू. डॉक्टरांना त्रासांशी लढायला ।
बळ देतो भगवान श्रीकृष्ण ॥ १ ॥

साधकांना साधनेसाठी शक्ती देतात प.पू. डॉक्टर ।
प.पू. डॉक्टरांना शक्ती देतो भगवान श्रीकृष्ण ॥ २ ॥

साधकांची काळजी घेतात प.पू. डॉक्टर ।
प.पू. डॉक्टरांची काळजी घेतो भगवान श्रीकृष्ण ॥ ३ ॥

गोकुळाष्टमीच्या दिवशी करायचा नामजप आपोआप आधीपासून चालू झाल्याचे लक्षात येणे

     दोन दिवसांपूर्वी खोलीत आवरत असतांना अचानक वैखरीतून (मोठ्याने) माझा श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव । असा नामजप होऊ लागला. त्या वेळी तो १० मिनिटे झाला. नंतर मी ते सूत्र विसरून गेले. आज दुपारी २.२० ते ४.०० या वेळी सत्संग झाल्यावर सौ. कीर्ती जाधव यांनी सूचना सांगितली, आज श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव । हा नामजप अधिकाधिक करावा. त्याचा लाभ होणार आहे. तेव्हा म्हणूनच माझ्याकडून तो नामजप आधीपासूनच होऊ लागला होता, असे लक्षात आले. साक्षात् श्रीकृष्णाचे चैतन्य अनुभवायला मिळाले; म्हणून प.पू. गुरुदेवांच्या चरणी अनंत कोटी कृतज्ञ आहे. - कु. प्रतिमा लोणे, पुणे (२५.८.२०१६) 

श्रीकृष्ण आणि प.पू. डॉक्टर यांच्याप्रती भाव असणारा चि. नंदन कुदरवळ्ळी !

     चि. नंदन कुदरवळ्ळी २ वर्षांचा असतांना त्याला सांभाळण्याची सेवा मला मिळाली होती. त्या वेळी त्याची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये पुढे देत आहे. 
१. व्यवस्थितपणा 
     खेळतांना तो सर्व खेळणी व्यवस्थित रचून ठेवतो. त्याच्याकडे विविध प्राणी आणि पक्षी यांची चित्रे असलेली पुस्तके आहेत. तो ती व्यवस्थित हाताळतो. 
२. नम्रता 
     त्याला एखादी गोष्ट आणि वस्तू हवी असेल, तर तो नम्रपणे मला ते देशील का ?, असे विचारतो. त्याला खोलीतील पंखा लावायचा असेल, तर तू पंखा लावशील का ?, असे विचारतो. 
३. आज्ञाधारकपणा 
      आपण प्रार्थना करूया असे सांगितल्यावर तो खेळणी बाजूला ठेवून लगेच मांडी घालून बसतो आणि प्रार्थना करतो.

कु. कल्याणी गांगण यांना देवीच्या संदर्भात आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती

कु. कल्याणी गांगण
१. श्रीकृष्णाला प्रार्थना होण्याऐवजी देवीला आपोआप 
प्रार्थना होणे आणि बगलामुखी यज्ञाच्या वेळी देवीच्या 
मूर्तीची पूजा केली आहे, हे नंतर समजणे
     ११.८.२०१६ या दिवशी पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांनी साधकांच्या रक्षणासाठी बगलामुखी यज्ञ करायला सांगितला होता. या यज्ञाच्या वेळी देवीच्या मूर्तीची पूजा केली आहे, हे मला ठाऊक नव्हते. मी प्रतिदिन श्रीकृष्णाला प्रार्थना करते. या दिवशी मी दिवसभर देवीला प्रार्थना करत होते. हे कसे झाले ?, ते मलाही कळत नव्हते. रात्री यज्ञस्थळी दर्शन घ्यायला गेल्यावर यज्ञाच्या ठिकाणी देवीची पूजा केली आहे, हे पहिल्यावर माझ्याकडून सकाळपासून देवीला प्रार्थना का होत आहे ?, हे लक्षात आले.

अनेक गुणांचा समुच्चय आणि भाव असणारे रामनाथी आश्रमातील ६२ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. राजाभाऊ सप्तर्षि (वय ८३ वर्षे) !

श्री. राजाभाऊ सप्तर्षि
     श्री. राजाभाऊ सप्तर्षिकाका साधारणतः एक मास आमच्या खोलीत निवासाला होते. त्या वेळी त्यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे देत आहे.
१. स्वावलंबन : श्री. सप्तर्षिकाकांचे वय ८३ वर्षे असूनही ते सकाळी ६ वाजता उठून स्वतःचे आवरतात. ते त्यांना झेपेल एवढा व्यायाम करतात आणि उपायही नियमित करतात.
२. मिताहारी : त्यांचा आहार अल्प आहे. त्यांना दात नाहीत. आता दात कशाला पाहिजेत ? उगीचच पैसे व्यय करायला नकोत, असे ते म्हणतात.
३. मितभाषी : ते आवश्यक तेवढेच बोलतात. ते म्हणतात, मला अल्प ऐकू येते, ते एका दृष्टीने चांगलेच आहे. त्यामुळे इतर गोष्टी ऐकण्यात वेळ घालवण्यापेक्षा देवाच्या अनुसंधानात रहाता येते.

ईश्‍वरप्राप्तीचा मार्ग

श्री. राम होनप
       साधकाला ईश्‍वरप्राप्तीच्या मार्गात त्याचे कर्मदोष भेटतात. ते साधकाला वाटेत अडवतात. साधक कर्मदोषांना म्हणतो मी जे केले, ते भोगतो; पण साधनेची वाट सोडणार नाही. त्यानंतर साधक हे अडथळे पार करून पुढे जातो. थोड्याच अंतरावर त्याला मोठे कर्मदोष भेटतात. ते साधकाला उचलून परत मार्गाच्या पहिल्या टप्प्याला आणून सोडतात. साधक म्हणतो, मी साधनेचा प्रवास परत करीन; पण ध्येयापासून हटणार नाही. असे साधकाचे वर्षानुवर्षे चालू असते. साधकाची निष्ठा बघून ईश्‍वराला दया येते. तो साधकाला म्हणतो, आता तुझी वाट मी मोकळी करतो. त्यानंतर साधकाला महामार्ग (हायवे) लागतो आणि त्याचा ईश्‍वरप्राप्तीचा मार्ग विनाअडथळा पूर्ण होतो. 
- श्री. राम होनप, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२८.४.२०१६)
पितृपक्षात दत्ताचा नामजप, प्रार्थना आणि श्राद्धविधी करा !

साधकांना सूचना
१. सध्या अनेक साधकांना वाईट शक्तींचा त्रास होत आहे. पितृपक्षात (या वर्षी १७ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर २०१६ या कालावधीत) हा त्रास वाढत असल्याने या कालावधीत प्रतिदिन ॐ ॐ श्री गुरुदेव दत्त ॐ ॐ । हा नामजप किमान १ घंटा करावा. 
अ. जे साधक उपाय करतात, त्यांनी त्यांच्या उपायाच्या नामजपाच्या व्यतिरिक्त दत्ताचा नामजप किमान १ घंटा करावा. दत्ताचा नामजप करतांना हातांच्या पाचही बोटांची टोके जुळवून अनाहतचक्र आणि मणिपुरचक्र यांच्या ठिकाणी न्यास करावा.
आ. जे साधक उपाय करत नाहीत, त्यांनी वैयक्तिक आवरणे, स्नान, स्वच्छता-सेवा आदींच्या वेळी दत्ताचा नामजप किमान १ घंटा होईल, असे पहावे; मात्र त्रास जाणवल्यास त्यांनीही दत्ताचा नामजप बसून अन् मुद्रा करून करावा. 
२. पितृपक्षाच्या कालावधीत पूर्वजांच्या त्रासांपासून रक्षण होण्यासाठी मधेमधे दत्ताला प्रार्थना करावी.
३. पितृपक्षात ज्या साधकांना शक्य असेल, त्यांनी श्राद्धविधी अवश्य करावा. ब्राह्मतेज आणि क्षात्रतेज यांचा अनोखा संगम असलेले सनातन पंचांग घरोघरी पोचवा !

साधकांसाठी सूचना आणि कृतीशील धर्माभिमान्यांना नम्र विनंती !
      राष्ट्रीय अस्मिता वृद्धिंगत करणारे आणि राष्ट्रहिताचा दृष्टिकोन देणारे विचारधन म्हणून अनेक धर्मप्रेमींनी सनातन पंचांगाचा गौरव केला आहे. हिंदूंना धर्मशिक्षण देणारे, तसेच धर्मरक्षणाविषयी प्रबोधन करणारे हे पंचांग एकमेवाद्वितीय आहे. पंचांगातील बहुमूल्य ज्ञानामुळे जिज्ञासूंमध्ये साधनेची रूची निर्माण होत आहे. चैतन्याचा स्रोत असणारे हे पंचांग ब्राह्मतेज आणि क्षात्रतेज यांचा अनोखा संगमच आहे.
       मराठीसह हिंदी, इंग्रजी, कन्नड, गुजराती, तेलुगु, ओरिया आणि तमिळ या ८ भाषांत प्रकाशित होणारे सनातन पंचांग अधिकाधिक हिंदूंंपर्यंत पोचणे आवश्यक आहे. सर्वत्रचे साधक आणि कृतीशील धर्माभिमानी यांनी पंचांग वितरणासाठी पुढील प्रयत्न करावेत.

सनातन प्रभातचा पोलिसांच्या सनातनद्वेषाचे कटू वास्तव हा विशेषांक वाचून, तसेच पोलिसांकडून सनातनची अपकीर्ती करणारे द्वेषमूलक अन्वेषण पाहून अन्वेषण यंत्रणा, पोलीस, आणि साधक यांच्याविषयी काय वाटले, ते कळवा !

वाचकांना विनंती !
     डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या प्रकरणी सनातनचे निरपराध साधक श्री. समीर गायकवाड आणि डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांना अनुक्रमे १ वर्ष आणि ३ मासांपूर्वी (महिन्यांपूर्वी) अटक करण्यात आली. केंद्रीय अन्वेषण विभाग आणि विशेष अन्वेषण पथक (एस्आयटी) तपासाच्या नावाखाली या दोघांचा शारीरिक, तसेच मानसिक छळ करत आहेत. ऐन गणेशचतुर्थीच्या दिवशी सकाळी ११.३० वाजता पोलिसांनी सनातनच्या देवद, पनवेल येथील आश्रमात येऊन दुसर्‍या दिवशी पहाटे साडेचारपर्यंत चौकशीच्या नावाखाली साधकांना वेठीस धरले. पोलिसांकडून हिंदुत्ववादी संघटना आणि निरपराध साधक यांचा होणारा छळ यांविषयी मंगळवार, ६ सप्टेंबर २०१६ या दिवशी दैनिक सनातन प्रभातच्या पोलिसांच्या सनातनद्वेषाचे कटू वास्तव या विशेषांकात प्रसिद्ध करण्यात आले. हे अनुभव वाचून अन्वेषण यंत्रणा, तपास अधिकारी, पोलीस आणि साधक यांच्याविषयी तुम्हाला काय वाटले, याविषयी आम्हाला अवश्य कळवा. हिंदुत्वनिष्ठ संघटनांवर पोलिसांनी केलेल्या अत्याचारांच्या विरोधात लढण्यासाठी तुमचे विचार इतरांना प्रेरणा देतील.

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

परमार्थ म्हणजे काय ?
स्वार्थाची (स्वचा अर्थ जाणून घ्यायची) पराकाष्ठा, म्हणजे परमार्थ !
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

बोधचित्र

॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज
सनातनचे श्रद्धास्थान
दुसरा आणि स्वतः दुसर्‍याला उमजू न देणे, स्वतःचे स्वतःला
 न उमजणे, स्वतःचे दुसर्‍याला उमजू न देणे, ही अवस्था आल्यास
 तो जीव ईश्‍वराच्या अगदी निकट आला आहे, असे समजावे.
भावार्थ : दुसर्‍याला उमजू न देणे म्हणजे आपल्यातील शक्ती दुसर्‍याला समजणार नाही, असे वागणे. स्वतःचे स्वतःला न उमजणे म्हणजे अद्वैतात गेल्यावर स्वतःचे स्वतःला उमजण्यासारखे काही उरत नाही; कारण तो स्वतःला विसरूनच गेलेला असतो. स्वतःचे दुसर्‍याला उमजू न देणे म्हणजे आपण स्वतः ब्रह्मस्थितीत आहोत, हे प्रकृतीतील दुसर्‍याला उमजून येत नाही. ही ईश्‍वराची, ब्रह्माची लक्षणे असल्याने तशा स्थितीत जो असेल, तो साहजिकच ईश्‍वराच्या निकट आलेला असतो.
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.)
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥
या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो.
- प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

   
परात्पर गुरु डॉ. आठवले
   कुठे आई-वडिलांनाही वृद्धाश्रमात अडगळीप्रमाणे टाकून देणारी पाश्‍चात्त्य वळणाची हल्लीची पिढी, तर कुठे हे विश्‍वचि माझे घर, असे शिकवणार्‍या हिंदु धर्मातील आतापर्यंतच्या पिढ्या ! - (परात्पर गुरु) डॉ. आठवले

विचारवंतांची कसोटी !

       बहुपत्नीत्व आणि तीनदा तलाक शब्द उच्चारून घटस्फोट देणे, हे प्रकार रहित करण्यात यावेत, यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट करण्यात आली आहे. भारतात मुसलमानांच्या कथित संरक्षणाचा ठेका घेतलेले मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड याला प्राणपणाने विरोध करत आहे. बहुपत्नीत्व आणि तलाक यांना विरोध करणे म्हणजे इस्लाम खतरें में असेच या बोर्डाला वाटते. या बोर्डाचे पदाधिकारी बहुदा आम्ही सौदी अरेबियामध्ये वास्तव्य करत आहोत, या दिवास्वप्नात वावरत आहेत. त्यामुळे भारतीय कायदे वगैरे मानायला ते सिद्ध नाहीत. हम दो हमारे दो हे बिरूद त्यांना मान्य नाही. या बोर्डाचे दुर्दैव म्हणा भारतात न्यायव्यवस्था अस्तित्वात आहे ! त्यामुळे न्यायदेवतेसमोर बहुपत्नीत्वाविषयी स्वतःची बाजू मांडणे बोर्डासाठी बंधनकारक आहे. बहुपत्नीत्व रहित केले, तर हम चार हमारे चालीस हा खास मुसलमानांनी अंगीकारलेला वसा अमलात आणता येणार नाही; म्हणून बोर्डाने थयथयाट केला आहे. बहुपत्नीत्वाचे सूत्र रेटून नेण्यासाठी बोर्डाचे पदाधिकारी नैतिकतेचा आधार घेऊ लागले आहेत. बहुपत्नीत्वावर बंदी आणल्यास समाजात व्यभिचार बोकाळेल, असा युक्तीवाद त्यांनी केला आहे. बहुपत्नीत्वामुळे सामाजिक आणि नैतिक आवश्यकता भागवल्या जातात, तसेच यामागे महिलांची काळजी घेणे आणि त्यांना सहानुभूती प्रदान करणे हे हेतू आहेत, अशी मुक्ताफळे बोर्डाने शपथपत्राद्वारे न्यायालयात उधळली आहेत. आताही चार निकाह करून या समाजातील धर्मांध नीतीने वागत आहेत, असे नव्हे. लैंगिक अत्याचाराचे अनेक गुन्हे या समूदायातील वासनांधांवर प्रविष्ट आहेत, हे विसरून चालणार नाही. आजही हिंदु युवतींना पळवून नेणारे धर्मांध हे बहुतांश वेळा विवाहित असतात. असे असतांना समाजातील एका घटकाची वासनांधता भागवण्यासाठी बहुपत्नीत्वाचे केलेले अश्‍लाघ्य समर्थन संतापजनक आहे. दुसरी बाब म्हणजे बहुपत्नीत्व जर मुसलमान महिलांच्या कल्याणासाठी आहे, तर मुसलमान महिलांनाच या प्रथांविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याची आवश्यकताच भासली नसती. एवढी साधी गोष्टही पर्सनल लॉ बोर्डाने लक्षात घेऊ नये, याचे आश्‍चर्य वाटते. ही सर्व सूत्रे लक्षात घेता या बोर्डाला आता ताळ्यावर आणणे आवश्यक आहे. हे सत्कार्य करण्याचे दायित्व मुसलमान विचारवंत स्वीकारतील का ?
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn