Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

कोटी कोटी प्रणाम

गौरी आवाहन 
प.पू. भाऊ मसुरकर 
यांची आज पुण्यतिथी


डॉ. तावडे यांना झालेल्या मारहाणीविषयी लक्ष घालण्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालकांचे आश्‍वासन !

कोल्हापूर येथे पत्रकार परिषद 
डावीकडून अधिवक्ता श्री. वीरेंद्र इचलकरंजीकर आणि डॉ. मानसिंग शिंदे
     कोल्हापूर - 'कोल्हापूर येथे डॉ. वीरेंद्र तावडे यांना झालेल्या मारहाणीविषयी लक्ष घालतो. रवी पाटील हे पोलीस अधिकारी जर 'सीबीआय'चे असतील, तर त्यांनी कोल्हापुरात येऊन मारहाण करणे योग्य नाही. यात मी पूर्ण लक्ष घालीन. डॉ. तावडेंना आवश्यक ती सुरक्षा देणे आवश्यक आहेच, त्यामुळे त्यातही मी लक्ष घालतो, कोल्हापूरच्या पोलीस अधीक्षकांशी मी स्वत: बोलतो', असे आश्‍वासन पोलीस महासंचालक श्री. एस्.पी. यादव यांनी हिंदुत्ववाद्यांच्या शिष्टमंडळाला दिलेे, अशी माहिती सनातन संस्थेचे डॉ. मानसिंग शिंदे यांनी येथील पत्रकार परिषदेत दिली. या वेळी हिंदु विधीज्ञ परिषदेचे अध्यक्ष अधिवक्ता श्री. वीरेंद्र इचलकरंजीकर हेही उपस्थित होते. 
     या शिष्टमंडळात हिंदु विधीज्ञ परिषदेचे अधिवक्ता श्री. संजीव पुनाळेकर, राष्ट्रीय वारकरी सेनेचे ह.भ.प. बापू महाराज रावकर, गोवंश रक्षा समितीचे श्री. वैभव राऊत, सनातन संस्थेच्या प्रवक्त्या सौ. नयना भगत, रायगड संवर्धन प्रतिष्ठानचे श्री. राजेंद्र सावंत, श्री शिवकार्य प्रतिष्ठानचे श्री. प्रभाकर भोसले, हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्र्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे आणि समितीचे श्री. नरेंद्र सुर्वे यांचा समावेश होता.

साधकांनो, संत, महर्षि आणि ईश्‍वर आपल्या पाठीशी आहे, हे लक्षात घ्या !

     पोलिसांकडून साधकांचा छळ होत असला, तरीही अनेक संत सनातनच्या पाठीशी आहेत. प्रसंगांना सामोरे जाण्यासाठी भगवंतच आपल्याला आत्मबळ देत आहे. महर्षींनीही नुकतेच आमचे आश्रमाकडे लक्ष आहे. त्यांना काही करता येणार नाही. त्यांना जे काही पूर्ण करायचे आहे, ते पूर्ण करू दे. शेवटी जय आपलाच आहे, असा संदेश दिला आहे. या सर्व रूपांनी साक्षात् ईश्‍वर आपल्या पाठीशी असतांना आणखी काय हवे आहे ?

गुन्हा सिद्ध होत नाही, तोपर्यंत आरोपी निर्दोष मानले जावेत ! - केंद्रीय अन्वेषण विभाग

दाभोलकर हत्याप्रकरणी डॉ. तावडे यांच्यावर आरोपपत्र 
     नवी देहली - डॉ. दाभोलकर हत्याप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सी.बी.आय.ने) ६ सप्टेंबर या दिवशी पुणे येथील शिवाजीनगर न्यायालयात डॉ. वीरेंद्र तावडे यांच्यावर आरोपपत्र प्रविष्ट केले आहे. या संदर्भात सी.बी.आय.ने एक प्रसिद्धीपत्रक त्यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केले आहे. 'अजून पुढील अन्वेषण चालू असून हत्येचा कट आणि त्यात सामील असलेल्या ज्ञात आणि अज्ञात व्यक्तींची ओळख अजून पटलेली नाही. दाभोलकर हत्याप्रकरणी आतापर्यंत झालेले अन्वेषण हे सी.बी.आय.ने आतापर्यंत केलेल्या तपासावर आणि गोळा केलेल्या पुराव्यावर अवलंबून असून भारतीय कायद्यानुसार जोपर्यंत गुन्हा न्यायालयात निष्पक्ष सुनावणीनंतर सिद्ध होत नाही, तोपर्यंत आरोपी निर्दोष आहेत, असेच मानले जावे', असे म्हटले आहे. 

(म्हणे) सनातन आणि हिंदु जनजागृती समिती यांच्याविषयी सरकारने भूमिका स्पष्ट करावी !

अंनिसचे डॉ. हमीद दाभोलकर यांचा थयथयाट ! 
      पुणे, ७ सप्टेंबर - 'डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी आरोपपत्र दाखल होण्यास उशीर झाला; पण आता आरोपपत्र प्रविष्ट होणे, हे तपासाला योग्य दिशेने नेणारे पाऊल म्हणता येईल. सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्याविषयी सरकारने त्यांची भूमिका आतातरी स्पष्ट करावी', अशी मागणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य सरचिटणीस डॉ. हमीद दाभोलकर यांनी केली. ('गुन्हा न्यायालयात सिद्ध होत नाही, तोपर्यंत आरोपी निर्दोष आहेत, असेच मानले जावे !', असे स्वत: केंद्रीय अन्वेषण विभागाने म्हटले असतांना हमीद दभोलकर यांनी असे म्हणणे ही त्यांची बौद्धिक दिवाळखोरीच म्हणावी लागेल ! - संपादक) मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांनी त्याविषयी अद्यापही भूमिका स्पष्ट केलेली नाही, असे ते म्हणाले.

आश्रमात चौकशीच्या उद्देशाने भ्रमणभाष करणार्‍यांपासून सावध रहा !

     एका आश्रमात एका रुग्णाईत व्यक्तीला आश्रमात ठेवायचे आहे. 'तुम्ही आश्रमात रुग्ण ठेवता का ?', अशी विचारणा मुंबईतील एका महिलेने भ्रमणभाष करून केली. सनातनच्या आश्रमात अशा प्रकारे रुग्ण ठेवले जात नसल्याने त्यांना 'नाही' म्हणून सांगितले, तरीही त्यांनी परत विचारले की, 'सनातनच्या रामनाथी आश्रमात तरी रुग्णाईत व्यक्तींना ठेवून घेतात का ?' त्यावरही त्यांना 'नाही' म्हणून सांगितले. त्यानंतर त्यांना 'आश्रमाचा क्रमांक कुठून मिळाला ?', असे विचारल्यावर त्या महिलेनेे 'आश्रमाचा भ्रमणभाष क्रमांक मंदिरात मिळाला', असे सांगितले. प्रत्यक्षात कोणत्याही मंदिरात आश्रमाचा क्रमांक दिलेला नाही, तरी अशा प्रकारे चौकशीच्या उद्देशाने संपर्क करणार्‍या व्यक्तींपासून सावध रहावे.

मुंबई, पुणे, नाशिक, कल्याण आणि शिर्डी येथे पोलिसांवर आक्रमण !

      मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, कल्याण आणि शिर्डी (जिल्हा नगर) येथे पोलिसांवर आक्रमण करण्याच्या घटना घडल्या आहेत. या घटना म्हणजे महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्था ढासळली असून गुन्हेगारांना खाकी वर्दीचे भय उरले नसल्याचे द्योतक आहे. 
१. ठाणे येथे बंदोबस्त करण्यासाठी असलेल्या वाहतूक पोलिसांवर आक्रमण
ठाणे - मुंबईतील वाहतूक पोलीस कर्मचारी विलास शिंदे यांचा जीवघेण्या आक्रमणात मृत्यू झाल्याची दुर्घटना ताजी असतांनाच वाहतूक पोलिसाला धडक देऊन त्याला तब्बल अर्धा किलोमीटर अंतरापर्यंत फरफटत नेण्याचा धक्कादायक प्रकार नुकताच ठाणे येथे घडला. वाहतूक पोलीस नरसिंह महापुरे यांनी गाडीच्या बोनेटला घट्ट पकडून ठेवल्याने ते वाचले. या प्रकरणी पोलिसांनी मद्यधुंद चालकाला अटक केली आहे.

वाचकांना विनंती !

सनातन प्रभातचा पोलिसांच्या सनातनद्वेषाचे कटू वास्तव हा 
विशेषांक वाचून अन्वेषण यंत्रणा, पोलीस, आणि साधक यांच्याविषयी काय वाटले, ते कळवा !
   डॉ. नरेंद्र दाभोळकर आणि कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्याप्रकरणी सनातनचे निरपराध साधक श्री. समीर गायकवाड आणि डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांना अनुक्रमे १ वर्ष आणि ३ मासांपूर्वी (महिन्यांपूर्वी) अटक करण्यात आली. सीबीआय आणि विशेष तपास पथक (एसआयटी) तपासाच्या नावाखाली या दोघांचा शारीरिक तसेच मानसिक छळ करत आहेत. ऐन गणेश चतुर्थीच्या दिवशी सकाळी ११.३० वाजता पोलिसांनी सनातनच्या देवद, पनवेल येथील आश्रमात येऊन दुसर्‍या दिवशी पहाटे साडेचार पर्यंत चौकशीच्या नावाखाली साधकांना वेठीस धरले. पोलिसांकडून हिंदुत्ववादी संघटना आणि निरपराध साधक यांचा होणारा हा छळ मंगळवार, ६ सप्टेंबर २०१६ या दिवशी दैनिक सनातन प्रभातच्या पोलिसांच्या सनातनद्वेषाचे कटू वास्तव या विशेषांकात प्रसिद्ध करण्यात आला. हे अनुभव वाचून अन्वेषण यंत्रणा, तपास अधिकारी, पोलीस आणि साधक यांच्याविषयी तुम्हाला काय वाटले, याविषयी आम्हाला अवश्य कळवा. हिंदुत्ववादी संघटनांवर पोलिसांनी केलेल्या अत्याचारांच्या विरोधात लढण्यासाठी तुमचे विचार इतरांना प्रेरणा देतील.

साधकांनो, चौकशीसाठी येणार्‍या पोलिसांपासून सावध रहा !

पोलीस चौकशी करण्याच्या निमित्ताने आश्रमात येतील, तेव्हा ते काही शस्त्रास्त्रेे अथवा आक्षेपार्ह वस्तू आश्रमात ठेवून मग छापा घालून ती जप्त केली, असे दाखवतील. त्यामुळे पोलिसांच्या चौकशीच्या संदर्भात सावधानता बाळगा !याची काही उदाहरणे पुढील प्रमाणे आहेत. 
१. कोल्हापूर येथील एका हॉटेल मालकाला फसवण्यासाठी पोलिसांनीच हॉटेलमध्ये अमली पदार्थ ठेवले होते. 
२. आनंद संप्रदायाच्या आश्रमात पोलिसांनी प्लास्टिकच्या मानवी कवट्या ठेवून त्यांची मानहानी करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली होती. संप्रदायाच्या गुरूंचे कारागृहातच निधन झाले. ही गोष्ट ३५ वर्षांनंतर एका निवृत्त पोलीस अधिकार्‍याने उघड केली. 
     या गोष्टी लक्षात घ्या आणि पोलीस तसे काही करत नाहीत ना यावर सतर्कतेने लक्ष ठेवा ! 

फुटीरतावाद्यांवर देशद्रोहाचा गुन्हा प्रविष्ट करून त्यांना भारतातून हाकलून द्या ! - अजमेर दर्ग्याचे दीवाण सय्यद जैनुल आबेदीन अली खान

किती मुसलमान नेते असे बोलतात ? भारतातील मुसलमान देशभक्त आहेत, तर ते हिंदूंप्रमाणे उघडपणे देशद्रोह्यांच्या विरोधात असल्याचे दाखवत का नाहीत ? 
     अजमेर - येथील ख्वाजा मोईनुद्दीन हसन चिश्तीच्या दर्ग्याचे दीवाण सय्यद जैनुल आबेदीन अली खान यांनी म्हटले आहे की, काश्मीरमधील फुटीरतावादी पाकमधील आतंकवाद्यांपेक्षा अधिक धोकादायक आहेत. या फुटीरतावाद्यांच्या विरोधात देशद्रोहाचा खटला प्रविष्ट करून त्यांना काश्मीरमधून हाकलून लावले पाहिजे. 
दीवाण यांनी मांडलेली सूत्रे 
१. भारताचे सैन्य शत्रूशी दोन हात करण्यास सक्षम आहे; मात्र देशांतर्गत धर्माच्या नावावर राजकारण केले जाते आणि तरुणांना धार्मिक कट्टरता शिकवून दिशाभूल करण्याचे षडयंत्र रचले जाते, तेव्हा सैन्याला त्याविरोधात कृती करण्यास कठीण होते. 

सनातनविषयी पूर्ण आकस ठेवून साधकांशी अपामानास्पद वर्तणूक करणारे अतिरिक्त पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा !

सुहेल शर्मा
     कॉ. पानसरे हत्या प्रकरणी तपास करणार्‍या विशेष अन्वेषण पथकाने ५ सप्टेंबरला ऐन चतुर्थीच्या दिवशी देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमात तपास केला. या पथकातील अधिकारी अतिरिक्त पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा या वेळी सनातनविषयी पूर्ण आकस ठेवून साधकांशी अपामानास्पद वर्तणूक करत असल्याचे आढळले. त्यांच्याविषयी साधकांना जाणवलेली सूत्रे पुढीलप्रमाणे... 
१. सहकार्‍यांशीही रागाने आणि अधिकारवाणीने बोलणे !
१ अ. सुहेल शर्मा यांचे त्यांच्या सहकार्‍यांशी सतत चिडचीड करणे, रागाने बोलणे, हिडीसफिडीस करणे, असे वागणे होते. (सहकार्‍यांशी असे वागणारे जनतेशी कसे वागत असतील, याची कल्पनाच नको ! - संपादक) 
१ आ. ते कोणतीही वस्तू नीट ठेवत नव्हते. सतत वस्तूंची आदळआपट करत होते. 
१ इ. त्यांचे वागणे अतिशय अधिकारवाणीचे आणि उद्धटपणाचे होते. ते बोलतांना सर्वांना कमी लेखत होते. 
१ ई. समोरची व्यक्ती घाबरावी आणि तिला ताण यावा, असे ते वागत होते. 

पीडित काश्मीर आणि बांगलादेशमधील पीडित हिंदूंच्या साहाय्यासाठी निधी जमवणार !

डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेतील हिंदूंच्या परिषदेला संबोधित करणार !
     न्यू जर्सी (अमेरिका) - येत्या नोव्हेंबर मासात अमेरिकेत होणार्‍या अध्यक्षीय निवडणुकीतील रिपब्लिकन पक्षाचे अधिकृत उमेदवार डोनाल्ड ट्रम्प येथील होम्डेल शहरातील पी.एन्.सी. बँकेच्या कला मंदिरात २४ सप्टेंबर या दिवशी रिपब्लिकन पक्षाच्या हिंदु युतीने आयोजित केलेल्या एका परिषदेला संबोधित करणार आहेत, अशी माहिती सभेचे आयोजक आणि अमेरिकेतील व्यावसायिक श्री. शलभ उपाख्य शल्ली कुमार यांनी दिली आहे. या सभेस अमेरिकेच्या संसदेचे माजी सभापती न्यूट गिन्ग्रीच उपस्थित रहाणार आहेत.

उडुपी येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सोशल मिडिया शिबीर संपन्न

शिबिरार्थिंना मार्गदर्शन करतांना श्री. शशिधर पै
     उडुपी (कर्नाटक) - हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथील पू. शांताराम भांडारकर गृहामध्ये जिल्हास्तरीय सोशल मीडिया शिबीर पार पडले. या शिबिरामध्ये ट्विटर, फेसबूक, आदींचा धर्मप्रसारासाठी परिणामकारक वापर कसा करू शकतो, याविषयी माहिती देण्यात आली.

हिंदु मंदिर उद्ध्वस्त केल्यामुळे पाकमधील मुसलमान अधिवक्त्याची पाक सरकारवर टीका !

भारतातील एकातरी पुरो(अधो)गाम्याने पाकमधील 
अत्याचारग्रस्त हिंदूंविषयी कधी तोंड उघडले आहे का ? जितेंद्र आव्हाड यांनी 
काही वर्षांपूर्वी इस्रायलने पॅलेस्टाईनवर आक्रमण केल्यावर पॅलेस्टिनी मुसलमानांच्या 
समर्थनार्थ टी-शर्ट घातले होते. तेच आव्हाड पाकमधील हिंदूंच्या समर्थनार्थ कधी तोंड उघडत नाहीत.
      पेशावर (पाकिस्तान) - पाकमधील खैबरपख्तूनख्वा राज्यातील करिमपुरा येथील मोहल्ला वान्ग्री ग्रान येथील प्राचीन हिंदू मंदिर उद्ध्वस्त करून तेथे व्यावसायिक इमारत बांधण्यात आली आहे. त्याविरुद्ध पेशावर उच्च न्यायालयातील वरिष्ठ अधिवक्ता मोझ्झाम बट यांनी राज्याच्या पाकिस्तान तहरिक-ए- इन्साफ पक्षाच्या सरकारवर टीका केली आहे. या पक्षाचे अध्यक्ष क्रिकेटपटू इम्रान खान आहेत.

पॅरिसमध्ये ऑक्टोबरपर्यंत शरणार्थ्यांची पहिली छावणी !

      युरोपची शरण घेतलेल्या लाखो मुसलमान शरणार्थ्यांपैकी अनेकांकडून युरोपीय देशांत बलात्कार, चोर्‍या इत्यादी घटना घडल्या असूनही आणि युरोपीय देशांत जिहादी आतंकवादी आक्रमणांची सर्वाधिक झळ पोचलेल्या फ्रान्सची स्थिती पहाता पॅरिसमध्ये शरणार्थ्यांच्या छावण्या उभारण्याचा निर्णय घेण्यात येणे, हे हास्यास्पद नव्हे का ?
     पॅरिस - ऑक्टोबरच्या २०१६ च्या मध्यापर्यंत पॅरिसमध्ये शरणार्थ्यांची पहिली छावणी उभारण्यात येणार आहे, असे पॅरिसचे महापौर अ‍ॅनी हिदाल्गो यांनी सांगितले. या केंद्राची क्षमता ४०० असून यामध्ये पुरुष शरणार्थींनाच आश्रय देण्यात येणार आहे. फ्रान्स ट्वेन्टी फोर या वृत्त संकेतस्थळाने दिलेल्या माहितीनुसार सध्या उत्तर पॅरिसमधील मेट्रो लाईनवर शरणार्थींची तात्पुरती सोय करण्यात आली आहे. आपल्या नीतीमूल्यांना आणि मानवतेला धरून या निर्वासित छावण्या उभारण्यात येणार आहेत, असे हिदाल्गो यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. या वर्षाच्या अखेरीस दक्षिण पॅरिसमध्ये दुसरी निर्वासित छावणी उभारण्यात येणार आहे. या छावणीमध्ये महिला, लहान मुले आणि अन्य शरणार्थी यांना सामावून घेतले जाणार आहे, असे हिदाल्गो म्हणाले. 
      सीरिया आणि उत्तर आफ्रिकेतून लाखो शरणार्थी मुसलमान युरोपमध्ये पलायन करत आहेत. तसेच फ्रान्सला गेल्या २ वर्षात अनेक जिहादी आक्रमणांना सामोरे जावे लागले आहे.

जर्मनीच्या निवडणुकीत चान्सलर अंजेला मर्केल यांना मुसलमान शरणार्थीविरोधी एएफ्डीपक्षाचे आव्हान !

      बर्लिन (जर्मनी) - जर्मनीमध्ये सीरिया इत्यादी मुसलमान देशांमधून होत असलेले सामूहिक स्थलांतर रोखणे आणि त्याद्वारे जर्मनीचा विध्वंस थांबवणे, यासाठी जर्मनीला पर्याय म्हणून एएफ्डी(ऑल्टरनेटिव्ह फॉर जर्मनी - जर्मनीसाठी पर्याय) या पक्षाला मतदान करा, असे आवाहन करणारे फलक जर्मनीच्या पूर्व प्रातांमध्ये झळकत आहेत. एएफ्डी पक्षाची ३ वर्षांपूर्वीच स्थापना झाली असूनही हा पक्ष देशातील सर्वांत जलदगतीने वाढणारी राजकीय चळवळी या रूपात समोर आला आहे.
     जर्मनीच्या निवडणुकीत मेकलेनबर्ग-पश्‍चिम पोमेरानिया या राज्यात प्रथमच एएफ्डी पक्षाने विद्यमान चान्सलर अंजेला मर्केल यांच्या कंजर्वेटिव्ह ख्रिश्‍चन डेमोक्रॅट्स (सीडीयू) पक्षाला मागे टाकले आहे. या मासात निवडणूक होणार्‍या जर्मनीतील विविध राज्यांमध्येही सीडीयू पक्ष पिछाडीवर आहे.

इराकमधील इसिसच्या सुरक्षा केंद्रांवर बुरखा बंदी !

       बगदाद - उत्तर इराकच्या मोसुल शहरात इसिसच्या सुरक्षा केंद्रांमध्ये बुरख्यावर बंदी घालण्यात आली आहे. यापूर्वी महिलांनी सक्तीने बुरखा घालण्याच्या कायद्याचा इराक आणि सीरिया या देशांमध्ये इसिसकडून अमानुषपणे अवलंब केला जात होता. डेली मेल या इंग्लंडच्या वृत्त संकेतस्थळाने दिलेल्या माहितीनुसार बुरखा न घातलेल्या महिलांना मारहाण केली जायची किंवा ठार मारले जायचे. बुरखा घातलेल्या महिलांनी इसिसच्या अनेक कमांडरांची हत्या केल्यानंतर मोसुल शहरातील इसिसच्या सुरक्षा केंद्रांमध्ये प्रवेश करणार्‍या महिलांना बुरखा बंदी करण्यात आली आहे. मोसुल शहरातील सुरक्षा केंद्र वगळता इसिसच्या नियंत्रणाखालील प्रदेशांत महिलांनी अंगठ्यापासून डोक्यापर्यंत बुरखा घालणे आताही बंधनकारक आहे. उत्तर सीरियातील आलेप्पोमधील अबू कलकल शहरात इसिसचा पराभव झाल्यानंतर सहस्रावधी स्थलांतरित नागरिक तेथे परतले आणि त्यांनी काळा बुरखा घेण्याविषयीच्या कडक कायद्यापासून सुटका झाल्याने आनंदोत्सव साजरा केला होता.

अंत्यसंस्काराकरता पैसे नसल्याने वनवासी हिंदूला पत्नीचा मृतदेह कचर्‍याच्या ढिगार्‍यात जाळावा लागला !

स्वातंत्र्यानंतर ७० वर्षे लोटून गेल्यानंतरही जनतेच्या किमान 
आवश्यकताही पूर्ण करू न शकलेले भारताचे लोकराज्य !
     निमच (मध्यप्रदेश) - पत्नीचा मृत्यू झाल्यानंतर अंत्यसंस्कार करण्यासाठी पैसे जवळ नसल्याने एका वनवासी हिंदूला कचर्‍याच्या ढिगार्‍यात मृतदेह जाळावा लागल्याची घटना इंदूरपासून २७५ किलोमीटर अंतरावर असणार्‍या रतनगड गावात घडली आहे. (स्वातंत्र्यापूर्वी देशात कोणीही गरीब नव्हता. निदान मृत्यूसमयी तरी समाज व्यक्तीला साहाय्य करत होता. आता तेही राहिलेले नाही. त्यामुळे जनतेला व्यापक बनवणारे धर्मशिक्षण देणे आवश्यक आहे. - संपादक)

तिवारीपूर (उत्तरप्रदेश) येथे गणपतीची मूर्ती ठेवण्यावरून धर्मांधांचे हिंदूंवर आक्रमण

हिंदूंचे सण-उत्सव शांततेत साजरे करण्यासाठी आता हिंदु राष्ट्राशिवाय पर्याय नाही !
      गोरखपूर (उत्तरप्रदेश) - तिवारीपूर येथील लाला टोलामध्ये श्री गणेशाची मूर्ती ठेवण्यावरून मुसलमानांनी हिंदूंवर दगडफेक केली. सायंकाळी घडलेला हा प्रकार नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी बळाचा वापर केला. याप्रकरणी पोलिसांनी दोन्ही बाजूच्या ३० लोकांना अटक केली आहे. (जेव्हा हिंदू आनंदात असतात, तेव्हा त्यांचा आनंद धर्मांधांना पहावला जात नाही. कधी गणेशोत्सव, दुर्गोत्सव नाही, तर दिवाळी या सणांंच्या दिवशी हटकून धर्मांधांकडून काहीतरी कुरापत काढून हिंदूंवर आक्रमण करण्यात येते आणि पोलीस काही समाजकंटकांसह बहुसंख्य हिंदूंनाच कारागृहात डांबते. त्यामुळे ऐन सणाच्या दिवशी त्यांच्या आनंदावर विरजण पडते. हिंदूंच्याच देशात असे किती दिवस चालू रहाणार आहे ? - संपादक)

हिंदूंनी त्यांच्या स्वरक्षणासाठी आत्मनिर्भर होणे आवश्यक !

गाझियाबाद येथे हिंदु नारी संसदेचे आयोजन
हिंदू स्वभिमानच्या राष्ट्रीय अध्यक्षा चेतना शर्मा यांचे प्रतिपादन
      गाझियाबाद (उत्तरप्रदेश) - देशात ज्या भागात हिंदूंची लोकसंख्या घटली, त्या ठिकाणी हिंदु महिलांना अधिक प्रमाणात अत्याचार सहन करावे लागते आहेत. मुसलमान स्वत: एक मतपेढीच्या स्वरूपात प्रस्थापित झाले आहेत. या मतपेढीसाठी आपले स्वार्थी नेते मुसलमानांच्या कृत्यांवर पडदा टाकण्यात मग्न आहेत. त्यामुळे आता हिंदूंनाच त्यांच्या सुरक्षेसाठी आत्मनिर्भर होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन हिंदू स्वभिमानच्या राष्ट्रीय अध्यक्षा चेतना शर्मा यांनी हिंदु नारी संसदेत केले. येथील डासना देवी मंदिरामध्ये महिलांसाठी दोन दिवशीय हिंदु नारी संसद पार पडली. यात १५ राज्यांमधून आलेल्या महिलांनी भाग घेतला. या कार्यक्रमाला आध्यात्मिक गुरु मॉ कांचन गिरी, दक्षिण भारतातील चित्रपट अभिनेत्री प्राची अधिकारी, गोव्यातून कृतीका देसाई, महाराष्ट्रातून हिंदु जनजागृती समितीच्या क्षिप्रा जुवेकर, तमिळनाडूच्या सीता उत्थपन्न, देहलीच्या आरती जुनेजा आदींनी विचार मांडले.

आतंकवाद्यांच्या आक्रमणात ३ सैनिक घायाळ !

      श्रीनगर - काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यातील बारमुला-कुपवाडा मार्गावर जिहादी आतंकवाद्यांनी सैन्याच्या ताफ्यावर केलेल्या आक्रमणात ३ सैनिक घायाळ झाले. यातील एका सैनिकाची प्रकृती चिंताजनक असून त्याला उपचारांसाठी विशेष विमानाने श्रीनगर येथील सैनिकी रुग्णालयात हालवण्यात आले आहे.

कोर्सिका येथे हिजाब घालून आल्याने दोन मुसलमान महिलांना शाळेत प्रवेश नाकारला

असे भारतात घडले असते, तर प्रसारमाध्यमांनी रान उठवले असते ! 
      बोनिफासियो (कोर्सिका बेट) - हिजाब (डोके झाकणारा रूमाल) परिधान करून आल्यामुळे दोन मुसलमान महिलांना येथील नर्सरी शाळेत प्रवेश नाकारण्यात आला. या महिला त्यांच्या लहान मुलांना सोडण्यासाठी शाळेत आल्या होत्या. कोर्सिका हे बेट वर्ष १७७८ पासून फ्रान्सच्या कह्यात आहे. 
     स्थनिक अधिवक्ता एरिक बोलिवर्ड यांनी सांगितले, दोन्ही महिलांनी हिजाब घातला होता. त्यामुळे शाळेत प्रवेश करण्यापासून थांबवण्यात आले. त्यांच्या मते, शाळेच्या आत मुलांना त्यांच्या धर्माशी संबंधित कोणत्याच प्रतिकांना घालून येण्याची परवागी नाही आहे. त्यामुळे या महिलांनाही प्रवेश करण्यापासून थांबवण्यात आले.

कार्बन उत्सर्जनावर नियंत्रण न ठेवल्यास विनाश नक्की ! - अमेरिकेच्या विशेष दूताची चेतावणी

   मुंबई - जगातील तापमान झपाट्याने वाढत आहे, ही वाढ चिंताजनक आहे. केवळ साडेचार अंशाने तापमान वाढले, तर समुद्राची उंची दोन मीटरने वाढेल आणि त्यामुळे अनेक देश पाण्याखाली जातील. हे थांबवायचे असेल, तर कार्बन उत्सर्जनावर नियंत्रण ठेवावे लागेल. अन्यथा विनाश पक्का आहे, अशी चेतावणी अमेरिकेचे विशेष दूत डॉ. जोनाथन परशिंग यांनी दिली आहे.
    अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या प्रशासनात हवामान पालट या विभागात विशेष दूत म्हणून काम करणारे डॉ. परशिंग सेंट झेव्हियर्स महाविद्यालयात झालेल्या वार्तालापात वरील माहिती देत होते.
या वेळी ते म्हणाले -
१. यात चीन आणि अमेरिकाही अनुक्रमे पहिल्या आणि दुसर्‍या स्थानावर आहेत. इतर जगाच्या तुलनेत ही दोन राष्ट्रे सर्वाधिक हरितगृह वायू उत्सर्जन करत आहेत.
२. विविध राष्टाचा प्रदूषणातील वाटा वेगळा आहे; पण परिणाम सर्वांनाच भोगावे लागत आहेत. त्याचे चित्र गेल्या काही दिवसांत दिसत आहे. कधी जोरदार पाऊस पडतो, तर कधी उन्हाचा पारा चढतो आहे.

काँग्रेसचे नेते भूपिंदरसिंह हुड्डा यांंच्या निवासस्थानांवर सीबीआयचे छापे !

सर्व घोटाळेबाज काँग्रेसींच्या संपत्तीची चौकशी करून दोषींवर कारवाई व्हायला हवी !
   नवी देहली - मानेसर भूमीवाटप घोटाळ्याच्या प्रकरणी हरियाणाचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते भूपिंदरसिंह हुड्डा यांची विविध ठिकाणची निवासस्थाने आणि अन्य ठिकाणी केंद्रीय अन्वेषण विभागाकडून छापे टाकण्यात आले. हुड्डा यांच्यासमवेत माजी पोलीस अधिकारी छतरसिंह, एम्.एल्. दयाल आणि एस्.बी. ढिल्लन यांच्या निवासस्थानांवरही छापे टाकण्यात आले आहेत. हरियाणामध्ये काँग्रेसचे सरकार असतांना मानेसर येथे ९१२ एकर भूमीचे अधिग्रहण करून ती डीएल्एफ् आणि अन्य काही बांधकाम व्यावसायिकांना देण्यात आली होती. या प्रकरणी सध्याच्या भाजपप्रणित सरकारने चौकशीचे आदेश देत गुन्हा प्रविष्ट केला होता.

पुणे येथे प्रबोधनानंतर भाविकांकडून हौदाऐवजी वहात्या पाण्यात श्री गणेशमूर्तींचे विसर्जन !

हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांची 'आदर्श गणेशोत्सव विसर्जन मोहीम' ! 
हिंदु जनजागृती समितीच्या प्रबोधनानंतर आेंकारेश्‍वर घाटावर संरक्षक कठडे बसवले ! 
     पुणे, ७ सप्टेंबर (वार्ता.) - हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने शहरात ठिकठिकाणी 'आदर्श गणेशोत्सव मोहीम' राबवण्यात येत आहे. या अनुषंगाने या मोहिमेच्या अतंर्गत पुणे आणि चिंचवड येथे ६ सप्टेंबर या दिवशी आदर्श गणेशोत्सव विसर्जन मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन भाविकांनी वहात्या पाण्यात विसर्जन केले. 
१. येथील गणेशमूर्ती विसर्जन करण्याच्या संदर्भात आेंकारेश्‍वर घाटावरील असुविधा आणि सर्व समस्या हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी विविध वृत्तवाहिन्यांच्या प्रतिनिधींच्या निदर्शनास आणून दिल्या. महापालिका प्रशासनाने नदीला पाणी न सोडल्याविषयी, तसेच पालिकेच्या भोंगळ कारभाराविषयी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने प्रसारमाध्यमांना माहिती देण्यात आली. या सर्व घडामोडींची माहिती वृत्तवाहिन्यांवर प्रसिद्ध झाल्यानंतर महापालिका प्रशासन जागे झाले. त्यानंतर त्यांनी आेंकारेश्‍वर पुलावर संरक्षक कठडे बांधण्यास प्रारंभ केला. 
२. आेंकारेश्‍वर घाटावर श्रीगणेशमूर्तींचे नदीत विसर्जन करण्यासाठी महापालिकेचे जीवरक्षक उपलब्ध नव्हते, तसेच काही जीवरक्षक लांब उभे असल्याने ते दिसतही नव्हते. या घाटावर संरक्षक कठडे नव्हते. त्यामुळे श्रीगणेशमूर्तींचे विसर्जन करणार्‍या भाविकांची सुरक्षा ऐरणीवर आली होती. 
३. या वेळी महापालिकेच्या असुविधांविषयी भाविकांनी महापालिका प्रशासनाचा निषेध केला.

'पोकेमॉन गो' या भ्रमणभाषवरील खेळामुळे हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्यावरून गुजरात न्यायालयाची नोटीस !

     गांधीनगर - भ्रमणभाषवरील 'पोकेमॉन गो' या खेळावरून गुजरात उच्च न्यायालयात प्रविष्ट करण्यात आलेल्या एका जनहित याचिकेवर सुनावणी करतांना न्यायालयाने केंद्र आणि राज्य सरकार अन् या खेळाची निर्मिती करणारे अमेरिकेतील आस्थापन यांना नोटीस बजावली आहे. या याचिकेत म्हटले आहे की, या खेळामुळे हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याने या खेळावर बंदी घालण्यात यावी. या खेळामध्ये पवित्र धार्मिक स्थानांच्या ठिकाणी अंडे दाखवण्यात आले आहे.

पुण्यात गणेशोत्सव मंडळ आणि भाविक यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांची आदर्श गणेशोत्सव जनजागृती मोहीम !
  • अनेक गणेशोत्सव मंडळांचे अध्यक्ष दैनिक सनातन प्रभातचे वार्षिक वर्गणीदार झाले ! 
  • फ्लेक्स प्रदर्शन आणि पथनाट्य यांना उदंड प्रतिसाद ! 
  • सनातनचे ग्रंथ आणि उत्पादन यांच्या संच खरेदीला भाविकांची मोठी मागणी !
        पुणे, ७ सप्टेंबर (वार्ता.) - गणेशोत्सवाच्या निमित्ताने हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आदर्श गणेशोत्सव प्रबोधन मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेला गणेशोत्सव मंडळ आणि समाजातील नागरिक यांच्याकडून पुण्यामध्ये उदंड प्रतिसाद मिळाला. विशेष म्हणजे बहुतांश गणेशोत्सव मंडळांनी स्वतःहून पथनाट्य, राष्ट्र आणि धर्म रक्षणावरील प्रदर्शन लावण्याला अनुमती दिली. तसेच काही मंडळांनी गणेशोत्सवाच्या काळात ११ दिवस दैनिक सनातन प्रभातचे वर्गणीदारही होणे पसंत केले. काही गणेशोत्सव मंडळांच्या अध्यक्ष दैनिक सनातन प्रभातचे वार्षिक वर्गणीदारही झाले. सनातन-निर्मित उत्पादने आणि ग्रंथ विक्रीलाही भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अनेक भाविकांनी सात्त्विक उत्पादनांचे संच खरेदी करण्यासाठी प्रदर्शनाच्या ठिकाणी गर्दी केली होती. तसेच श्री गणेशमूर्ती शाडूची आणि शास्त्रानुसार असण्याविषयी सनातन संस्थेने समाजात प्रबोधन केल्यानंतर त्यालाही समाजातील भाविकांकडून उदंड प्रतिसाद मिळाला. शाडूपासून बनवलेल्या श्री गणेशाच्या मूर्तींचे जलद गतीने वितरण झाले.

पांगरी (जिल्हा सोलापूर) येथे १२ गोवंशांची अवैध वाहतूक करणार्‍या २ धर्मांधांना अटक

   पांगरी, ७ सप्टेंबर - पुणे-लातुर राज्य मार्गावर कुसळंब (तालुका बार्शी) येथील पथकर नाक्यावर अवैधरित्या १२ जनावरे घेऊन पशूवधगृहाकडे घेऊन निघालेला टेम्पो पोलिसांनी अडवून रमिज शौकत शेख आणि मुक्तार सादिक सौदागर यांना अटक केली. या वेळी पांगरी पोलिसांनी १२ लक्ष रुपये किमतीच्या जनावरांसह ४ लक्ष ७० सहस्र रुपयांचा माल शासनाधीन करून गुन्हा प्रविष्ट केला आहे.
पुणे येथे सनातन संस्था आयोजित सात्त्विक उत्पादने आणि ग्रंथ यांचे धर्मरथ प्रदर्शन
स्थळ : महाराणा प्रताप उद्यानासमोर, बाजीराव रस्ता, पुणे.
गुरुवार, दिनांक ८ सप्टेंबर ते १४ सप्टेंबर २०१६ पर्यंत
वेळ : सकाळी ९ ते रात्री ९

मुंबईतील एका सुप्रसिद्ध गणेशोत्सव मंडळाने गणेशमूर्तीच्या मागे साकारली घुबडाची प्रतिकृती !

हिंदूंनो , गणेशोत्सवाचे मांगल्य जपा 
गणेशोत्सव प्रबोधन २०१६ 
     मुंबईतील एका सुप्रसिद्ध गणेशोत्सव मंडळाच्या मूर्तीमागे घुबडाची प्रतिकृती साकारण्यात आली आहे. घुबड हे अपशकुनी असल्याने गणेशोत्सव मंडळाच्या या कृतीमुळे भाविकांनी आश्‍चर्य व्यक्त केले असून याविषयी उलटसुलट चर्चा होऊ लागल्या आहेत. 

म.फि. हुसेन यांच्या देहली येथे चित्रांच्या विक्रीस हिंदु जनजागृती समितीचा विरोध !

     नवी देहली - येत्या ९ सप्टेंबर या दिवशी नवी देहली येथील 'सॅफ्रन आर्ट गॅलरी' येथे म.फि. हुसेन यांच्या चित्रांचा लिलाव करण्यात येणार आहे. या चित्रांत हुसेन यांनी काढलेल्या वादग्रस्त आणि विडंबनात्मक चित्रांचा समावेश आहे. या विक्रीची माहिती मिळताच अनेक धर्माभिमान्यांनी हिंदु जनजागृती समितीला संपर्क केला. समितीने त्वरित 'सॅफ्रन आर्ट गॅलरी'च्या व्यवस्थापनाला पत्र देऊन हुसेन यांच्या चित्रांचा लिलाव करू नये, अशी विनंती केली आहे. 

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक पू. भिडे गुरुजी यांचे श्री शिवचरित्र या विषयावर मार्गदर्शन !

   सातारा, ७ सप्टेंबर - श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने दिनांक ८ सप्टेंबर २०१६ या दिवशी सायंकाळी ६.३० वाजता मौजे लिंब येथील गांधीमैदान येथे सभेचे आयोजन करण्यात आले आहे. सभेमध्ये श्री शिवप्रतिष्ठानचे संस्थापक पू. भिडे गुरुजी यांचे श्री शिवचरित्र या विषयावर मार्गदर्शन होईल. तरी या सभेला श्री शिवशंभु भक्तांनी बहुसंख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे सातारा जिल्हा संघटक श्री. सतीश बापू ओतारी यांनी केले आहे.

जपानला भूकंपाचा धक्का !

     टोकियो (जपान) - टोकियोमध्ये ७ सप्टेंबरला सकाळी भूकंपाचा धक्का जाणवला; मात्र यामध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. या भूकंपाची तीव्रता रिश्टल स्केलवर ४.९ एवढी होती. या भूकंपानंतर त्सुनामीची चेतावणी देण्यात आलेली नाही.

मालाड (मुंबई) येथील गणेशमूर्तीच्या मिरवणुकीवर धर्मांधांकडून आक्रमण !

  • धर्मांधांकडून पोलिसांना मारहाण ! 
  • पोलिसांकडून (नेहमीप्रमाणे) निरपराध हिंदूंना अटक ! 
  • आक्रमणकर्ते धर्मांध अद्यापही मोकाट ! 
  • धर्मांधांचे हिंदूंवरील आक्रमण पूर्वनियोजित ? 
* अशा घटना घडायला हा भारत आहे कि पाक ? हिंदूंनो, तुम्हाला सणही सुरळीतपणे साजरे करू न देणार्‍या धर्मांधांवर कारवाई होण्यासाठी शासनदरबारी संघटितपणे पाठपुरावा करा !
* चर्चवर कथित आक्रमण झाल्यानंतर दिवसभर वृत्ते दाखवणारी निधर्मी प्रसारमाध्यमे हिंदूंवरील आक्रमणाविषयी एका ओळीचेही वृत्त देत नाहीत, हे लक्षात घ्या ! 
* सण साजरे करतांना बहुसंख्यांकांना अल्पसंख्यांकांकडून मार खावा लागणारा जगातील एकमेव देश भारत ! 

फुटीरतावादी पोलिसांना घाबरतात आणि बंदुकांसमोर मुलांना उभे करतात ! - मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती

     श्रीनगर - फुटीरतावादी नेत्यांची मुले विदेशात आणि भारतात इतरत्र शिक्षण घेतात, तर दुसरीकडे हेच फुटीरतावादी इतर काश्मिरी मुलांना भडकवून त्यांना पोलिसांच्या बंदुकीचा सामना करायला भाग पाडतात, या शब्दांत जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी फुटीरतावादी नेत्यांना फटकारले आहे. मेहबुबा पुढे म्हणाल्या की, आई तिच्या मुलांना मार देते; कारण तिला त्यांचे हित बघायचे असते. त्याच प्रकारे मी सत्य सांगत आहे; कारण मला काश्मीरमधील मुलांची चिंता आहे. या निष्पाप मुलांचा ढालीसारखा उपयोग करणे आणि स्वत:च्या मुलांना विदेशात मलेशिया, दुबई आणि भारतात राजस्थान, बेंगळुरू, असे इतरत्र शिक्षण घेण्यासाठी सुरक्षित ठेवणे, असा फुटीरतावाद्यांचा कट आहे. हीच मंडळी पोलिसांना घाबरून घरापासून पळून जाऊन लपतात आणि रात्र झाली की, मुलांना भडकवण्याचे काम करतात. भारतातील सर्वपक्षीय शिष्टमंडळाला भेटण्यासाठी फुटीरतावादी नकार देतात, याचाच अर्थ त्यांना काश्मीरचे भले व्हावे, अशी इच्छा नाही. केवळ हिंसेवर विश्‍वास आहे.

काश्मीरमधील फुटीरतावाद्यांवर कठोर कारवाई करा ! - मौलवींची मागणी

   नवी देहली - काश्मीरमधील हिंसाचाराला चिथावणी देणारे आणि सरकारशी चर्चा करण्यास नकार देणारे फुटीरतावादी यांच्याशी चर्चा करण्याची आवश्यकता नाही, अशी मागणी मौलवींच्या एका शिष्टमंडळाने केंद्रसरकारकडे केली आहे. या शिष्टमंडळाने गृहमंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेऊन म्हटले की, या फुटीरतावाद्यांविषयी कुठलीही सौम्य भूमिका घेऊ नका. कठोर कारवाई करून त्यांना धडा शिकवा. काश्मीरमधील परिस्थितीवर निर्णायक तोडगा काढण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्यात उच्चस्तरीय बैठक झाली. या बैठकीत फुटीरतावाद्यांना देण्यात येणार्‍या सर्व सुविधा रहित करून त्यांना वेसण घालण्याचा निर्णय झाल्याचे म्हटले जात आहे.

माझ्यासह 'आप'मधील ५२ महिलांवर 'आप'च्या नेत्यांकडून लैंगिक अत्याचार !

'आप'च्या पंजाबमधील महिला पदाधिकारी अमनदीप कौर यांचा आरोप ! 
'आम आदमी पक्षा'चे खरे स्वरूप ! 'सनातनने हिंदु धर्माचे नाव 
कलंकित केले' असे म्हणणारा 'आप' किती कलंकित आहे, हे लक्षात येते ! 
     चंडीगड - माझ्यासह पक्षातील ५२ महिला नेत्या आणि कार्यकर्त्या यांच्यावर 'आम आदमी पक्षा'च्या नेत्यांनी लैंगिक अत्याचार केले, असा आरोप पंजाबच्या फिरोजपूर जिल्ह्यातील 'आम आदमी पक्षा'च्या माजी समन्वयक आणि राज्य समितीच्या सदस्य अमनदीप कौर यांनी केला आहे. एका इंग्रजी वृत्तवाहिनीने हे वृत्त प्रकाशित केले आहे. या आरोपानंतर पंजाबच्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा परमजीत कौर यांनी पंजाब पोलिसांना पत्राद्वारे 'आम आदमी पक्षा'तील नेत्यांच्या चौकशीचा आदेश दिला आहे.

सनी लिऑनच्या अश्‍लील संकेतस्थळावर बंदी घालण्यासाठी हिंदु जनजागृती समितीची चळवळ !

     वाराणसी - अभिनेत्री सनी लिऑन हिच्या अश्‍लील संकेतस्थळावर भारतात बंदी घालण्यात यावी, यासाठी हिंदु जनजागृती समितीने चळवळ हाती घेतली आहे. समितीचे कार्यकर्ते १० सप्टेंबरपासून राष्ट्रीय चळवळ चालू करणार आहेत. याचा प्रारंभ काशी येथील शास्त्री घाटापासून होणार आहे. भारताची सांस्कृतिक राजधानी काशी असल्यामुळे या चळवळीस तेथून प्रारंभ होणार असल्याचे समितीचे श्री. नीलेश सिंगबाळ यांनी म्हटले आहे. एका पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. 

कराचीमधील भारतीय आयुक्तांचा कार्यक्रम पाककडून रहित !

पाकशी मैत्री करणार्‍यांना चपराक ! 
     नवी देहली / कराची - पाकमधील भारतीय उच्चायुक्त गौतम बंबवाले यांचा एक कार्यक्रम कराची चेम्बर ऑफ कॉमर्सने आयोजित केला होता; मात्र तो अखेरच्या क्षणी रहित करण्यात आला. आदल्या दिवशीच बंबवाले यांनी पाककडून काश्मीरमध्ये हस्तक्षेप होत असल्याची टीका केली होती. याचाच राग धरून हा कार्यक्रम रहित केला असावा, असे म्हटले जात आहे. हा सर्व प्रकार अपमानास्पद आहे, अशी प्रतिक्रिया भारतीय अधिकार्‍यांनी व्यक्त केली. (पाकवर केवळ टीका केल्यावर पाक भारताच्या उच्चायुक्तांचा कार्यक्रम रहित करतो, तर भारत पाकच्या उच्चायुक्तांकडून सातत्याने काश्मीरमधील फुटीरतावाद्यांशी चर्चा केली जात असतांनाही त्यावर कोणतीही कृती करत नाही ! - संपादक)

श्री गणेशमूर्तीच्या विविध भागांचा भावार्थ

१. संपूर्ण मूर्ती : ओंकार, निर्गुण.
१ अ. सोंड
उजव्या सोंडेचा गणपति
डाव्या सोंडेचा गणपति
१ अ १. उजवी सोंड : उजव्या सोंडेच्या गणपतीची मूर्ती म्हणजे दक्षिणाभिमुखी मूर्ती. दक्षिण म्हणजे दक्षिण दिशा किंवा उजवी बाजू. दक्षिण दिशा यमलोकाकडे नेणारी, तर उजवी बाजू सूर्यनाडीची आहे. यमलोकाच्या दिशेला जो तोंड देऊ शकतो तो शक्तीशाली असतो. तसेच सूर्यनाडी चालू असलेला तेजस्वीही असतो. या दोन्ही अर्थी उजव्या सोंडेचा गणपति जागृत आहे, असे म्हटले जाते. दक्षिणाभिमुखी मूर्तीची पूजा नेहमीसारखी केली जात नाही; कारण दक्षिणेकडून तिर्यक (रज-तम) लहरी येतात. अशा मूर्तीची पूजा कर्मकांडातील पूजाविधीचे सर्व नियम काटेकोरपणे पाळून केली जाते. त्यामुळे सात्त्विकता वाढते आणि दक्षिणेकडून येणार्‍या रज-तम लहरींचा त्रास होत नाही.
१ अ २. डावी सोंड : डाव्या सोंडेचा गणपति म्हणजे वाममुखी गणपति. वाम म्हणजे डावी बाजू किंवा उत्तर दिशा. डाव्या बाजूला चंद्रनाडी आहे, ती शीतलता देते. तसेच उत्तर दिशा अध्यात्माला पूरक आहे, आनंददायी आहे; म्हणून बहुधा वाममुखी गणपति पूजेत ठेवतात. याची पूजा नेहमीच्या पद्धतीने केली जाते.

मदर तेरेसा यांचे खरे स्वरूप !

फ्रान्सुआ गोतिए
      हिंदूंवरील आघातांविषयी जे एका फ्रेंच पत्रकाराच्या लक्षात येते ते भारतातील एकाही हिंदु पत्रकाराच्या, तर सोडाच; पण सरकारच्याही लक्षात का येत नाही ? हे हिंदूंसाठी लज्जास्पद होय !
     तथाकथित सामाजिक कार्यकर्त्या मदर तेरेसा यांनी कोलकात्यातील गरीब हिंदूंची आमरण सेवा केली आणि व्हॅटीकनच्या परिभाषेतील २ चमत्कार केले म्हणून ४ सप्टेंबरला व्हॅटीकन येथे झालेल्या एका समारंभात ख्रिस्तींचे सर्वोच्च धर्मगुरु पोप फ्रान्सिस यांच्या हस्ते मदर तेरेसा यांना मरणोत्तर संतपद बहाल करण्यात आले. तथापि फ्रान्सचे प्रसिद्ध पत्रकार आणि गेल्या काही दशकांपासून भारतात रहाणारे फ्रान्सुआ गोतिए यांनी एका लेखाद्वारे मदर तेरेसा यांचे खरे स्वरूप उघड करून त्यांच्या जीवनकार्याला हिंदूंचा विरोध असण्यामागील कारण सुस्पष्ट केले आहे. हा लेख आमच्या वाचकांसाठी येथे साभार प्रसिद्ध करत आहोत.

श्री गणेशाचे कार्य आणि वैशिष्ट्ये

१. विघ्नहर्ता 
      विघ्नहर्ता असल्याने लोकनाट्यापासून विवाहापर्यंत, तसेच गृहप्रवेशादी सर्व विधींच्या आरंभी श्री गणेशपूजन असते. 
२. विवेकबुद्धी निर्माण करून चित्त शांत करणारा
      श्री गणेश हा ब्रह्मांडातील दूूषित शक्ती आकर्षून घेणारा आहे, तसेच मनुष्याच्या बुद्धीमध्ये विवेक निर्माण करणारा आहे. श्री गणेशाच्या उपासनेमुळे विकल्पशक्ती प्रभाव पाडत नाही. बुद्धी स्थिर राहून चित्त शांत रहाते. ‘मी कोण, भगवंताने मला या जगतात कशासाठी पाठवले, याची साधकाला जाणीव होऊन तो श्रद्धापूर्वक कार्य करू लागतो. साधकाच्या भावात वाढ होऊन त्याची उत्तरोत्तर प्रगती होऊ लागते. - प.पू. परशराम पांडे महाराज, सनातन आश्रम, देवद, पनवेल.

अथर्वशीर्ष म्हणतांना पाळावयाचे नियम आणि लाभ

अथर्वशीर्ष : थर्व म्हणजे गरम, अथर्व म्हणजे शांती आणि शीर्ष म्हणजे मस्तक. ज्याच्या पुरश्‍चरणाने मस्तकास शांती प्राप्त होते ते अथर्वशीर्ष होय. भगवान जैमिनीऋषींचे सामवेदीय शाखेतील शिष्य मुद्गलऋषी यांनी साममुद्गल गणेशसूक्त लिहिले. त्यानंतर त्यांचे शिष्य गणकऋषी यांनी श्री गणपति अथर्वशीर्ष लिहिले. बहुतेक मंत्रांत देवतेचे ध्यान, म्हणजे मूर्तीचे वर्णन आधी असते आणि स्तुती नंतर असते. याउलट अथर्वशीर्षात स्तुती आधी आणि ध्यान नंतर आहे.
अथर्वशीर्षाचे पुढील तीन प्रमुख भाग आहेत -
१. शांतीमंत्र : सुरुवातीला ॐ भद्रं कर्णेभिः आणि स्वस्तिनः इंद्रा..... हे मंत्र आणि शेवटी सह नाववतु ।...... हे मंत्र
२. ध्यानविधी : ॐ नमस्ते गणपतये येथपासून ते वरदमूर्तये नमः येथपर्यंतचे दहा मंत्र
३. फलश्रुती : एतदथर्वशीर्ष योऽधीते इत्यादी चार मंत्र

उत्सवाच्या नावे झुंडशाही नकोच !

      रानावनात अनेक दिवसांपासून उपाशी असलेली हिंस्र जनावरे शिकारीवर तुटून पडत त्याचे जसे लचके तोडतात, त्या प्रकारे राज्याच्या नगर जिल्ह्यातील सिद्धार्थ नगरमधील दुकानदाराकडे गणेशोत्सव मंडळाची पाच सहस्र रुपयांची वर्गणी, तसेच महिन्याला ६०० रुपये हप्ता मागितला असता तो देण्यास त्याने नकार दिल्यावर दुकानाची तोडफोड करत त्यास मारहाण करण्यात आली. तसेच त्याची पत्नी आणि मुले यांनाही मारहाण केली गेली. त्यानेही समाधान न झाल्याने उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात गेलेल्या त्या दुकानदारास तेथेही मोठ्या प्रमाणात मारहाण केल्याचे रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेजवरून कळते. त्या मारहाणीचा थरारक व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे.

श्री गणेशाला करायच्या काही प्रार्थना

१. हे बुद्धीदाता श्री गणेशा, मला सद्बुद्धी दे. हे विघ्नहर्ता, माझ्या जीवनात येणार्‍या संकटांचे निवारण कर.
२. हे श्री गणेशा, तू प्राणशक्ती देणारा आहेस. दिवसभर उत्साहाने कार्य करता येण्यासाठी मला आवश्यक तेवढी शक्ती दे.
३. श्री गणेशपूजेला आरंभ करतांना करायच्या प्रार्थना 
अ. हे श्री गजानना, या पूजाविधीद्वारे माझ्या अंतःकरणात तुझ्याप्रती भक्तीभाव निर्माण होऊ दे.
आ. या पूजाविधीतून प्रक्षेपित होणारे चैतन्य तुझ्या कृपेने मला अधिकाधिक ग्रहण करता येऊ दे.
४. गणेशोत्सवाच्या काळात करायची प्रार्थना : हे श्री गणेशा, गणेशोत्सवाच्या काळात नेहमीपेक्षा सहस्र पट कार्यरत असलेल्या तुझ्या तत्त्वाचा मला अधिकाधिक लाभ होऊ दे. 
(श्रीगणेशविषयक सर्व मजकुरासाठी संदर्भ : सनातनचा ग्रंथ श्रीगणपति)

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने गुरुग्राम (हरियाणा) येथे मार्गदर्शन

पू. डॉ. चारुदत्त पिंगळे
      गुरुग्राम (हरियाणा) - हिंदु जनजागृती समितीच्या वतीने गुरुग्राम येथील राव राम सिंह विद्यालयात समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक पू. डॉ. चारुदत्त पिंगळे यांच्या मार्गदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना पू. डॉ. पिंगळे यांनी विज्ञानाच्या मर्यादा सांगून अध्यात्माचे महत्त्व सांगितले. जीवनात साधना आणि भारतीय संस्कृती यांचे महत्त्व, वर्तमान हिंदूंची स्थिती आणि हिंदु राष्ट्राची स्थापना यांविषयीही पू. डॉ. पिंगळे यांनी मार्गदर्शन केले. 
क्षणचित्रे 
  • कार्यक्रमात ध्वनीचित्रतबकडीच्या माध्यमातून हिंदु जनजागृती समितीची ओळख करून देण्यात आली. 
  • तमिळनाडूचे संत प.पू. रामभाऊ स्वामी यांच्या अग्नीप्रवेशाची ध्वनीचित्रतबकडी उपस्थितांना दाखवण्यात आली.

सर्वांना सुख देणारे हिंदु राष्ट्र हे एक दैवी राष्ट्र आहे. - आद्यसरसंघचालक डॉ. केशव बळीराम हेडगेवार
       आज हिंदू समाज सामाजिक आणि राष्ट्रीय पातळीवर अत्यंत प्रतिकूल आहे. या सर्वांमध्ये मोठा दोष कोणता ? तर आपल्याला आपला शत्रू कोण आहे ?, हे कळत नाही. - पू. संभाजीराव भिडेगुरुजी, संस्थापक, श्री शिवप्रतिष्ठान

फलक प्रसिद्धीकरता

हिंदूंचे असुरक्षित झालेले धार्मिक उत्सव !
    मुंबईतील मालाड येथील सोनावला मित्र मंडळाच्या मिरवणुकीवर धर्मांधांनी आक्रमण केले. हिंदूंना मारहाण केली आणि गणेशमूर्ती तोडण्याची धमकी दिली. या वेळी प्रतिकार करणार्‍या मंडळाच्या १५ हिंदूंना पोलिसांनी अटक केली असून एकाही धर्मांधाला अटक झालेली नाही.

हिंदू तेजा जाग रे !

Jago ! : Mumbaike Maladme ek Ganesh mandaldwara nikale gaye shobhayatrapar dharmandhone akraman kar Hinduoko peeta. - Hindusangathan ke abhavka hi yah parinam hai
जागो ! : मुंबई के मालाड में एक गणेश मंडलद्वारा निकाले गए शोभायात्रा पर धर्मांधों ने आक्रमण कर हिन्दुआें को पीटा. - हिन्दूसंगठन के अभाव का ही यह परिणाम है !

महर्षींचे सांगणे आणि आमचे केवळ ऐकणे !

सद्गुरु (सौ.) अंजली
गाडगीळ
१. २९.८.२०१६ या दिवशी महर्षींनी रामनाथी, गोवा आश्रमात 
प्रवेश करण्याच्या वेळी सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ, 
सद्गुरु (सौ.) बिंदाताई आणि प.पू. डॉक्टर यांच्या 
खोलीत गुग्गुळ धूप दाखवण्यास सांगणे
      महर्षींनी आम्हाला केरळच्या दिशेने प्रवास करण्यास सांगितला होता. तेथील श्रीरामाचे आणि गुरुवायूर येथील श्रीकृष्णाचे दर्शन घेऊन आम्ही मंगळुरू येथे आलो. या वेळी महर्षींनी सांगितले, आता तुम्ही रामनाथी आश्रमात गुरूंच्या भेटीला जा. तुम्ही रामनाथी आश्रमात ज्या वेळी प्रवेश कराल, त्या वेळी तुमच्या, सद्गुरु (सौ.) बिंदाताई आणि प.पू. डॉक्टर यांच्या खोलीत गुग्गुळ धूप दाखवा. आम्ही महर्षींना विचारले, असे सांगण्याचे कारण काय ? त्या वेळी महर्षींनी उत्तर दिले, याचे कारण काय, हे तुम्हाला नंतर कळेल.

रामनाथी आश्रमाचे दर्शन घेतांना आलेल्या अनुभूती

रामनाथी आश्रम
१. कळसाची स्थापना झालेली जागा बघतांना तेथे पुष्कळ 
चैतन्य जाणवून कळसाभोवती असंख्य दैवी कण 
चमकतांना दिसणे
     आश्रमदर्शन करतांना एका ठिकाणी कळसाची स्थापना झालेली जागा दाखवून आश्रम दाखवणार्‍या साधिकेने मला विचारले, त्या ठिकाणी बघून कसे वाटते ? कळसाकडे बघतांना मला पुष्कळ चैतन्य जाणवले. तिथे (कळसाभोवती) असंख्य कण चमकतांना दिसले. तेथून दृष्टी हलवूच नये आणि तिथे असणारे चैतन्य अन् गारवा यांमुळे तेथून जाऊच नये, असे मला वाटत होते.

आनंदी, उत्साही, अंतर्मुख वृत्तीची ५५ टक्के आध्यात्मिक पातळीची उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली बेंगळुरू येथील कु. नियंत्री विनय जगताप (वय ७ वर्षे) !

कु. नियंत्री जगताप
     भाद्रपद शुक्ल पक्ष सप्तमी (८.९.२०१६) या दिवशी बेंगळुरू येथील कु. नियंत्री जगताप हिचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने तिच्या आईला जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे प्रसिद्ध करत आहोत.
कु. नियंत्री जगताप हिला वाढदिवसानिमित्त सनातन 
परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा !
१. गुणवैशिष्ट्ये
१ अ. धर्माचरण करणे : कु. नियंत्री प्रतिदिन सकाळी झोपेतून उठताच कराग्रे वसते लक्ष्मी.., समुद्रवसने देवी... इत्यादी श्‍लोक म्हणते. ती शाळेत जातांना कुंकू लावून जाते.

प.पू. डॉक्टरांप्रतीच्या भावाच्या बळावर प्रतिकूल प्रसंगांवर मात करून ईश्‍वराच्या अनुसंधानात रहाणार्‍या आणि मोहमायेला न भुलता पूर्णवेळ साधना करण्याचा निश्‍चय करणार्‍या कु. सुप्रिया टोणपे !

कु. सुप्रिया टोणपे
      देवा, लहानपणापासून आतापर्यंत माझ्या जीवनात दुःखद आणि कठीण प्रसंग आले. तेव्हा तूच मला अलगद आपल्या कोमल हातात उचलून धरलेस आणि सगळे सहन करण्याचे अन् जिद्दीने लढण्याचे बळही दिलेस. समजण्याजोगे वय झाल्यानंतर तूच लोहचुंबकासारखे मला साधनेत ओढलेस आणि दर्शन देऊन हे सर्व करणारा कोण आहे ?, याची मला जाणीव करून दिलीस. एवढी अतोनात काळजी घेणार्‍या गुरुदेवांच्या कोमल चरणी कोटी कोटी प्रणाम करून चार शब्द लिहिण्याचा हा प्रयत्न !
१. प्रतिकूल परिस्थितीत अभियांत्रिकीची परीक्षा देऊनही प्रथम श्रेणीत 
उत्तीर्ण होणे, मोठ्या भारतीय आस्थापनात नोकरी मिळणे आणि 
पुढे याच आस्थापनातून अल्प कालावधीत अमेरिकेला जाणे
      अभियांत्रिकीचे (इंजिनियरींगचे) शिक्षण घेत असतांनाच मी सनातन संस्थेच्या संपर्कात आले होते. त्या वेळी मला साधना आणि अध्यात्म यांविषयी माहिती मिळाली होती. शिक्षण चालू असतांना अमेरिकेला जाण्याचे स्वप्न होते. (त्या वेळी मायेची आसक्ती होती.) मोठ्या भारतीय आस्थापनात नोकरी मिळणे, हीसुद्धा प.पू. गुरुदेवांनी दिलेली अनुभूतीच होती.

घरोघरी बसवल्या जाणार्‍या श्री गणेशाला साधकांच्या मनमंदिरात स्थापित करणारे अवतारी गुरु प.पू. डॉक्टर !

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचे अमृत महोत्सवी वर्ष
आणि गणेशोत्सव यानिमित्त गणेशभक्तांना भावभक्तीची भेट !
हिंदु समाजाला ब्रिटिशांच्या तावडीतून मुक्त करून देणारा लोकमान्य
टिळकांचा गणेशोत्सव आणि साधकांच्या मनमंदिरात श्रीगणेशाची
स्थापना करणारा परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा गणेशोत्सव !
कु. सर्वमंगला मेदी
    लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव चालू केला आणि हिंदु समाजामध्ये संघटितपणा निर्माण करून त्याला ब्रिटिशांपासून मुक्त करण्याचा प्रयत्न केला.
    अवतारी गुरु प.पू. डॉक्टर यांनी घरात बसवल्या जाणार्‍या गणेशतत्त्वाला साधकांच्या मनमंदिरात स्थापित केले आणि बाजूच्या चित्रात दाखवल्याप्रमाणे ते साधकांकडून त्याची सूक्ष्मातून पूजा (साधना) करवून घेत आहेत. अशी पूजा (साधना) करवून घेऊन साधकांवर असलेल्या ब्रिटिशांच्या प्रभावापासून ते साधकांना मुक्त करत आहेत. जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्ती देणारे प.पू. डॉक्टर हे एकमेवाद्वितीय अवतारी गुरु आहेत.

प.पू. डॉक्टरांचे द्रष्टेपण !

आधुनिक वैद्य
भिकाजी भोसले
१. रामनाथी आश्रम मोठे तीर्थक्षेत्र होणार आहे, असे प.पू. डॉक्टरांनी सांगणे
आणि ३०.५.२०१६ या दिवशी झालेल्या नाडीवाचनात महर्षींनी तसेच उद्गार काढणे
    मी आरंभीच्या काळात बांधकाम विभागात सेवा करत होतो. त्या वेळी आश्रमाच्या दर्शनी भागात एका कोपर्‍यात सुतार विभाग, नळजोडणी विभाग असे वेगवेगळे विभाग कार्यरत होते. त्या वेळी माझ्या मनात त्या जागी नंतर भव्य हिरवळ (लॉन) निर्माण करावी, असा विचार आला आणि मी तो सहज प.पू. डॉक्टरांना बोलून दाखवला. तेव्हा ते म्हणाले, हिरवळीचा (लॉनचा) विचार कुठे करता ? पुढे हा आश्रम मोठे तीर्थक्षेत्र होईल. अनेक लोक येथे येतील. आश्रमासमोर गाड्यांची मोठी रांग असेल. तेव्हा आश्रमाला भेट देणार्‍यांसाठी आपल्याला प्रसाधनगृहांची व्यवस्था करावी लागेल. या जागेत ती व्यवस्था करू. ३०.५.२०१६ या दिवशी झालेल्या नाडीवाचनात महर्षींनीही रामनाथी आश्रम मोठे तीर्थक्षेत्र असल्याचे सांगितले. यावरून प.पू. डॉक्टरांचे द्रष्टेपण लक्षात येतेे.

मिरज येथील साधिका सौ. स्मिता कानडे यांना आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती !

सौ. स्मिता कानडे
    गुरुपौर्णिमा हा साधकांच्या जीवनातील सर्वांत महत्त्वाचा सण ! या दिवशी सेवेत कोणतीही चूक होऊ नये; म्हणून त्या दिवशी करावयाच्या सेवांचा प्रायोगिक भाग (सराव) गुरुपौर्णिमेच्या काही दिवस आधी करवून घेतला जातो. दहा वर्षांपूर्वी सांगली जिल्ह्यातील तासगाव येथे अशाच एका प्रायोगिक भागात संत म्हणून सेवा करतांना आलेली अनुभूती पुढे देत आहे.
१. एकदा प्रायोगिक भागात मला संत म्हणून जाण्याची संधी मिळाली होती. ही सेवा मिळाल्यामुळे माझा कृतज्ञताभाव जागृत झाला.
१ अ. सेवेच्या ठिकाणी असलेल्या देवळातील श्रीविष्णुला प्रार्थना होणे आणि प्रार्थना केल्यानंतर वेगळे वाटून सेवा चांगली होणे : प्रायोगिक भाग दाखवण्याची सेवा जिथे करायची होती, तेथून जवळच श्री विष्णूचे मंदिर होते. मी श्रीविष्णुला हे भगवंता, माझी काहीही लायकी नाही, तरी मला संत होण्याची सेवा मिळाली आहे. तूच माझ्यामध्ये ये आणि ही सेवा करण्यास मला साहाय्य कर, अशी प्रार्थना केली. प्रार्थना केल्यावर मला वेगळे वाटू लागले आणि माझ्याकडून सेवा चांगली झाली.

गुरुंची कृपा शिष्याला कशी साहाय्यक असते, याविषयी साधिकेला सुचलेली सूत्रे

सौ. निशिगंधा नाफडे
    १२.१२.२०१५ या दिवशी सकाळी आध्यात्मिक उपायांना बसले असतांना मला पुढील सूत्रे सुचली 
१. गुरूंनी शिकवलेले आणि करवून घेतलेले अंतर्मनापर्यंत जात असणे
     गुरु जे कृतीतून शिकवतात आणि आपल्याकडून करवून घेतात, ते अंतर्मनापर्यंत जाते. तेव्हा आपल्यात होणारे पालट आतून, अंतर्मनातून आपोआप होतात. ते पालट करण्यासाठी आपल्याला विशेष प्रयत्न करावे लागत नाहीत, सहजतेने होतात.
२. देवाला शरण गेल्यावर गुरु तत्परतने धावून येत असणे
    ज्या क्षणी आपण बाह्य साधनांकडून मिळणार्‍या साहाय्याविषयी अपेक्षा न करता हतबल होऊन देवाला शरण जातो, तुझ्याविना मला कोणी नाही, ही आर्तता येते, तेव्हा गुरु आपल्यासाठी तत्परतेने धावून येतात आणि आपल्याला उचलून घेतात. ते आपल्याला कवेत घेऊन सर्व कार्य निर्विघ्नपणे करवून घेतात.

आत्मज्ञान देऊन मायेतूनसोडवावे, हीच गुरुदेवांना प्रार्थना !

     गुरुदेव, आपण मला आतापर्यंत विविध विषयांवर स्वतःहून ज्ञान दिले आणि देत आहात. गुरुदेव, आता मला आत्मज्ञान देऊन मायेतून सोडवावे, हीच आपल्या चरणी प्रार्थना ! 
- श्री. राम होनप, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२४.६.२०१६) अध्यात्म समजून न घेणारे बुद्धीवादी खर्‍या आनंदापासून वंचितच !

श्री. राम होनप
     बुद्धीवादी लोक अध्यात्म जाणून न घेता त्याची चिरफाड करण्यात धन्यता मानतात. अध्यात्म समजून न घेतल्याने त्यांना जीवनातील खरा आनंद मिळत नाही. त्यामुळे असे जीव नर्मदेतील गोट्यांप्रमाणे पाण्यात राहूनही कोरडेच रहातात.
- श्री. राम होनप, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१३.६.२०१६)

फेरीवाल्यांसाठी फलक बनवतांना झालेली एक गंमत !

    एका सोसायटीच्या परिसरात फेरीवाल्यांसाठी प्रवेश नाही असा फलक लावायचा होता. त्यासाठी सोसायटीतील एका साधकाने सोसायटीच्या शेजारील आश्रमात लोखंडी पत्रा किंवा तसा सांगाडा मिळण्यासाठी साहाय्य मागितले. त्या संदर्भात आश्रमाकडून एका पत्र्याचा सांगाडा दाखवला गेला. तो पत्रा थोडा जड होता; परंतु त्या पत्र्यापासून फलक बनवण्याचे ठरले. पत्रा घेऊन जातांना अन्य साधक म्हणाला, तो सांगाडा चालणार नाही; कारण तो पुष्कळ जड आहे. त्याला हा का चालणार नाही ?, असे विचारल्यावर तो म्हणाला तो जड आहे ना. हातात धरून फिरायला जड होईल आणि हात दुखतील. त्याला हा पत्रा फेरीवाल्यांसाठी, म्हणजे प्रसारफेरीमध्ये हातात धरण्यासाठी आहे, असे वाटले होते.
    त्या वेळी त्याला सांगितले, अरे, हा पत्रा प्रसाराच्या फेरीसाठी नाही, तर सोसायटीमध्ये येणार्‍या फेरीवाल्यांना उद्देशून सूचना लिहिण्यासाठी लावायचा आहे. तेव्हा फेरीवाले या शब्दामुळे झालेल्या या गमतीवर आम्ही पुष्कळ हसलो.
- श्री. शंकर नरुटे. (३०.६.२०१६)

महाविद्यालयीन युवकांप्रमाणे इतरांना चिडवण्यात, तसेच चेष्टा-मस्करी करण्यात गुरुसेवेतील अमूल्य वेळ वाया घालवणारे गांभीर्यशून्य कार्यकर्ते !

१. साधकांना त्यांचे नाव, शिक्षण यासंदर्भात चिडवणे
१ अ. क्रांती असे नाव असलेल्या साधिकेला विनोदाने धर्मक्रांती म्हणणे : एका जिल्ह्यातील एका साधिकेचे नाव क्रांती आहे. अन्य साधिका विनोदाने तिला धर्मक्रांती म्हणतात, असे लक्षात आले.
१ आ. अधिवक्ता असलेल्या साधिकेला लॉयरऐवजी लायर असे म्हणून चिडवणे : एका सेवाकेंद्रातील एका साधिकेचे वकिलीपर्यंतचे शिक्षण पूर्ण झाले आहे. एक कार्यकर्ती त्या साधिकेला ग्रामीण भाषेप्रमाणे लायर लायर असे चिडवते. (इंग्रजीत अधिवक्त्यांना लॉयर असे म्हटले जाते, तर लायरचा अर्थ आहे खोटे बोलणारा !) अन्य २ कार्यकर्त्यांकडूनही या साधिकेला शिक्षणाच्या संदर्भात वारंवार चिडवले जाते.

भारतातील पोलीस लाखो निरपराध्यांना छळतात ! अशांची नावे सनातन प्रभातला कळवा !

   पोलिसांनी गुन्हेगार म्हणून पकडलेले ९१ टक्के आरोपी निर्दोष सुटतात, असे गुन्हे अन्वेषण विभागाने प्रकाशित केलेल्या महाराष्ट्रातील गुन्हे २०१० या अहवालातून उघड झाले आहे. यावरून असे लक्षात येते की, भारतातील पोलिसांनी अशा लाखो निरपराध्यांना गुन्हेगार ठरवून त्यांचा छळ केलेला असतो. निष्पाप असूनही पोलिसांचा छळ अनुभवणार्‍यांनी त्यांचे अनुभव सनातन प्रभातच्या कार्यालयात (पत्ता : सनातन आश्रम, २४/बी, रामनाथी, बांदिवडे, फोंडा, गोवा - ४०३ ४०१, फॅक्स : ०८३२ - २३१८१०८ किंवा इ-मेल dspgoa1@gmail.com पाठवावेत. - संपादक

नवरात्रोत्सवानिमित्त प्रबोधन करणारे प्रसारसाहित्य उपलब्ध !

नवरात्रोत्सवानिमित्त भाविकांचे प्रबोधन करणारे पुढील प्रसारसाहित्य नेहमीच्या ठिकाणी उपलब्ध करण्यात आले आहे.
१. उत्सवाविषयी प्रबोधन करणारे ए ५ आकारातील हस्तपत्रक
२. उत्सवाशी संबंधित सात्त्विक वस्तूंच्या संदर्भातील ए ५ आकारातील हस्तपत्रक
३. नवरात्रोत्सवात काय असावे आणि काय नसावे याविषयी प्रबोधन करणारे ए २ आकारातील भित्तीपत्रक (या भित्तीपत्रकांची मागणी नेहमीप्रमाणे जिल्ह्यातील उत्तरदायी कार्यकर्त्यांनी त्यांच्या जिल्ह्याशी संबंधित समन्वयकांकडे करावी.)
४. सार्वजनिक ठिकाणी लावण्यासाठी ८ फूट ७ फूट आकारातील होर्डींग
त्याचे विषय पुढीलप्रमाणे...
४ अ. नवरात्रोत्सवात नैसर्गिक सजावट करा !

॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज
सनातनचे श्रद्धास्थान
मी रस्त्यावर प्रेम करतो. रस्त्यात भेटणार्‍यावर प्रेम
करीत नाही; कारण आमची माघार नाही; म्हणून मी हरलो.
भावार्थ : मी रस्त्यावर प्रेम करतो म्हणजे साधनेवर प्रेम करतो. रस्त्यात भेटणार्‍यावर प्रेम करीत नाही म्हणजे साधनेत येणार्‍या अडचणी, सिद्धी आदींकडेे दुर्लक्ष करतो. कारण आमची माघार नाही म्हणजे मोक्षाला जाऊन, नामाशी एकरूप झाल्यावर आम्हाला तेथून परत यावयाचे नाही. म्हणून मी हरलो यातील मी म्हणजे मीपणा, अहंभाव हरलो.
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.)

बोधचित्र


योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

खरे यश !
स्वतःच्या यशाच्या धुंदीत रहाणार्‍यांपेक्षा जो दीन-दुबळे, दरिद्री आणि गरजू अशा व्यक्तींच्या 
साहाय्याला धावून जातो अन् यालाच कर्तव्य मानतो, तोच खरा यशस्वी माणूस !
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥
या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो.
- प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

चेतावण्या कि विनवण्या ?

संपादकीय 
      चुकीचे वागणार्‍या एखाद्या कोडग्या मुलाला कितीही ओरडले, तरी काही उपयोग नसतो. पाकची अवस्था अशा कोडग्या मुलापेक्षा वेगळी नाही. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनमध्ये झालेल्या जी-२० देशांच्या परिषदेत दक्षिण आशियात एकाच देशाकडून आतंकवादाला खतपाणी घातले जात आहे, अशा आशयाचे वक्तव्य केले. पंतप्रधानांनी त्या एका देशाचे नाव घेतले नसले, तरी ते पाकलाच बोलले, हे उघड आहे. पाकला चेतावणी देण्याची वा आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याला उघडे पाडण्याची भारताची ही काही पहिली वेळ नाही. यापूर्वीही भारताने वेळोवेळी हे काम अत्यंत चोखपणे केले आहे.

व्हिएतनामशी मैत्री आवश्यक !

संपादकीय
      पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच व्हिएतनामचा दौरा केला. व्हिएतनाम हा तसा पिटुकला देश. या देशाने अनेक युद्धे पाहिली आहेत. एक काळी अमेरिकेने या देशावर आक्रमण केले होते; मात्र अमेरिकेलाही माघार घ्यावी लागली होती. चीनने व्हिएतनामवर आक्रमण केले होते; मात्र या छोट्याशा देशाने बलाढ्य चीनला धूळ चारली होती. ही गोष्ट चीन अजूनही विसरलेला नाही. व्हिएतनाम हा चीनचा शत्रू ! स्वतःच्या देशाच्या सीमा विस्तारण्याची चीनची भूक दिवसेंदिवस वाढत आहे. त्याचाच एक भाग म्हणून दक्षिण चिनी समुद्रात चीनने मानवनिर्मित बेटे निर्माण केली असून तेथे स्वतःचे सैन्य आणि युद्धसामग्री तैनात केली आहे. दक्षिण चिनी समुद्रावर स्वतःची मालकी सांगून तेथे जाणारे प्रत्येक जहाज आदी हालचालींवर चीनला स्वतःचे नियंत्रण हवे आहे. साहजिकच चीनच्या या भूमिकेमुळे जपान, व्हिएतनाम, मलेशिया, ब्रुनोई या देशांनी अप्रसन्नता दर्शवली आहे. या छोट्या देशांना पाण्यात पहाणार्‍या चीनला भारत तर नकोसा झाला आहे.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn