Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

कोटी कोटी प्रणाम !

आज बलराम जयंती
----------
सनातनचे ६ वे संतसद्गुरु राजेंद्र शिंदे यांचा आज वाढदिवस

सनातनच्या पनवेल आश्रमात पोलिसांकडून तपास नव्हे छळ !

ऐन गणेशचतुर्थीला, राज्यातील सर्व समस्या संपल्याप्रमाणे
आणि सनातन हे मोठे संकट असल्याप्रमाणे मोठ्या संख्येने
पोलीस सनातनच्या आश्रमात तपासण्यासाठी येतात, हे लक्षात घ्या !
    पनवेल - सनातनच्या देवद (पनवेल) येथील आश्रमात गणेशचतुर्थीच्या दिवशी म्हणजे ५ सप्टेंबरला कॉ. पानसरे यांच्या हत्येच्या प्रकरणी महाराष्ट्र पोलिसांच्या विशेष अन्वेषण पथकाने (एस्.आय.टी.ने) तपास केला. या वेळी तपासाच्या नावाखाली साधकांचा अक्षरशः छळच करण्यात आला.
१. तपास ५ सप्टेंबरला सकाळी ११ वाजता चालू झाला, तो ६ सप्टेंबरला पहाटे ४ वाजता म्हणजे १५ घंट्यांनी पूर्ण झाला. तोपर्यंत आश्रमातील सर्व साधकांना जागे रहावे लागले. (सणासुदीच्या दिवशी आश्रमातील साधकांना पोलिसांकडून अशी अन्याय्य वागणूक दिल्याविषयी महाराष्ट्रातील शासनकर्त्यांनी उत्तर दिले पाहिजे ! - संपादक)
२. आश्रमामध्ये झडतीसाठी येण्यापूर्वी पोलिसांनी अलिबाग न्यायालयाची अनुमती घेणे अपेक्षित असतांना केवळ कोल्हापूर न्यायालयाची अनुमती घेतली होती. त्यामुळे त्यांच्याकडे कोल्हापूर न्यायालयाचे सर्च वॉरंट होते, तरीही अन्वेषणात सहकार्य करायला हवे, या हेतूने आश्रमातील पदाधिकार्‍यांनी अन्वेषणात सहकार्य केले. (साध्या साध्या कार्यपद्धतीही पाळता न येणारे म्हणे विशेष अन्वेषण पथक ! - संपादक) 

सनातन संस्थेकडून महाराष्ट्राचे गृह राज्यमंत्री श्री. दीपक केसरकर यांना निवेदन

गृहराज्यमंत्री श्री. दीपक केसरकर (उजवीकडे) यांना
निवेदन देतांना श्री. मनोज खाडये आणि बाजूला डॉ. रमेश पेंढारकर
कॉ. गोविंद पानसरे हत्येप्रकरणी सनातनचे
डॉ. वीरेंद्रसिह तावडे यांना पोलिसांनी मारहाण केल्याचे प्रकरण
    सावंतवाडी, ६ सप्टेंबर (वार्ता.) - सनातन संस्थेचे साधक डॉ. वीरेंद्रसिह तावडे यांच्यावर अद्याप कोणतेही दोषारोप सिद्ध झाले नसतांना त्यांना कोल्हापूर पोलिसांच्या विशेष अन्वेषण पथकाकडून करण्यात येत असलेली अमानुष मारहाण आणि हीन वागणुकीच्या विरोधात महाराष्ट्राचे गृह राज्यमंत्री श्री. दीपक केसरकर यांना ६ सप्टेंबर या दिवशी सावंतवाडी येथील त्यांच्या कार्यालयात हिंदुत्वनिष्ठांनी निवेदन दिले. या प्रकरणात व्यक्तीगतरित्या लक्ष घालून पोलिसांकडून निरपराध डॉ. तावडे यांचा करण्यात येत असलेला कायदाबाह्य छळ थांबवण्यात यावा, अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
    या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. मनोज खाडये आणि सनातनचे डॉ. पेंढारकर उपस्थित होते.

डॉ. दाभोलकर हत्याप्रकरणी सनातनचे साधक डॉ. वीरेंद्र तावडे यांच्यावर आरोपपत्र प्रविष्ट

     पुणे, ६ सप्टेंबर - डॉ. दाभोलकर हत्याप्रकरणी संशयित म्हणून अटक केलेले सनातनचे साधक डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांच्यावर ६ सप्टेंबर या दिवशी शिवाजीनगर न्यायालयात केंद्रीय अन्वेषण विभागाने आरोपपत्र प्रविष्ट केले. या वेळी अन्वेषण विभागाचे आर्.पी. सिंह यांनी न्यायाधीश व्ही.बी. गुळवे-पाटील यांच्यासमोर आरोपपत्र आणि अन्य पुरावे सादर केले. या वेळी डॉ. तावडे कोल्हापूर येथे असल्यामुळे व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारेे त्यांना उपस्थित करण्यात आले नव्हते. आज न्यायालयीन कोठडीची मुदत संपली असल्याने पुढील सुनावणी झाली.

(म्हणे) गोवा, नवी मुंबई, ठाणे येथे झालेल्या बॉम्बस्फोटांत सनातनचे साधक नेमके काय करत होते ?

नक्षलवाद्यांकडून प्रशिक्षण घेणारा आणि संविधानाचे राज्य उलथवून टाकण्याची भाषा 
करणारा कबीर कला मंच नव्हे कम्युनिस्ट कला मंचचा फुकाचा प्रश्‍न ! 
       मुंबई - डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला तीन वर्षे पूर्ण झाल्याच्या प्रीत्यर्थ व्हॉट्स अ‍ॅपच्या काही ग्रुप्सवर कबीर कला मंचच्या नावावर सनातनविरोधी मजकूर प्रसारित होत आहे. या मजकूरातील लेखात गोवा, नवी मुंबई, ठाणे येथे झालेल्या बॉम्बस्फोटांत सनातनचे साधक नेमके काय करत होते ?, असा प्रश्‍न विचारण्यात आला आहे. (भारतात अनेक वेळा लोकप्रतिनिधींच्या घरासमोर अथवा त्यांच्या गाडीत बॉम्बस्फोट झाले आहेत. त्या वेळी हे कम्युनिस्टवाले त्यांना बॉम्बस्फोटाच्या वेळी तुम्ही तेथे काय करत होता ?, असा प्रश्‍न विचारतात का ? - संपादक) तसेच आज जामिनावर बाहेर असलेले हे साधक नेमके कुठे आहेत ?, असे विचारण्यात आले आहे. (कबीर कला मंचचा संस्थापक अमरनाथ चड्डालिया सध्या कुठे आहे ? नक्षलवादी कारवायांमध्ये गुंतल्याचे आरोप असलेली मंचची शीतल साठे, सचिन माळी, दीपक ढगळे, रमेश गायचोर हे सध्या चंद्रपूरच्या जंगलात फिरत आहेत कि रेड कॉरिडर परिसरात आहेत ? स्वतःचे ठेवावे झाकून आणि दुसर्‍याचे पहावे वाकून ही कम्युनिस्ट कला मंचची वृत्ती यातून दिसून येते ! मंचचे नक्षलवाद्यांशी असलेले संबंध जगजाहीर आहेत. सनातनचे साधक काय करतात, यापेक्षा मंच स्वतः काय करतो, हे त्याने जनतेला प्रथम सांगावे ! - संपादक) या लेखातील महत्त्वाचा भाग काना-मात्रेचा पालट न करता आणि त्याचा प्रतिवाद येथे देत आहे ...

पीडीपी-भाजप युती सरकारचा प्रयोग अयशस्वी ! - भाजपचे खासदार डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांची स्पष्टोक्ती

    नवी देहली - काश्मीरमध्ये करण्यात आलेला पीडीपी आणि भाजप युती सरकारचा प्रयोग अयशस्वी होणे निश्‍चित होते आणि ते तसेच झाले आहे. त्याचा अंत जवळ आला आहे. पीडीपी युतीनंतर सुधारेल असे भाजपला वाटत होते; मात्र पीडीपी आणि मेहबुबा मुफ्ती कधीही सुधारणार नाहीत. मी त्यांना आधीपासून ओळखतो, असेही डॉ. स्वामी यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी त्यागपत्र द्यावे आणि राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी त्यांनी मागणी केली.

सरकारवर टीका म्हणजे देशद्रोह नाही ! - न्यायालय

    नवी देहली - सर्वोच्च न्यायालयाने एका खटल्यावर सुनावणी करतांना म्हटले की, सरकारवर एखाद्याने टीका केली; म्हणून त्याच्या विरोधात देशद्रोह किंवा मानहानी यांचा खटला दाखल करता येत नाही. कुडणकुलम् अणूऊर्जा प्रकल्पाचे विरोधक आणि व्यंगचित्रकार असीम त्रिवेदी आदींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या विरोधात एका स्वयंसेवी संस्थेने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

भारताच्या काही भागांतून आतंकवाद्यांना लोकांचे साहाय्य मिळते ! - एन्.एस्.जी.चा अहवाल

    बहुतेक आतंकवादी कोणत्या धर्माचे आहेत हे आता लपून राहिलेले नाही. त्यामुळे त्यांना साहाय्य करणारे कोण असतील याचा अंदाज लावणे ही कठीण गोष्ट नाही. आतंकवादी घटनांना उत्तरदायी असलेल्या लोकांच्या मागे ससेमिरा लावून त्यांना उघडे पाडण्याचे सोडून पोलीस आणि इतर अन्वेषण यंत्रणा सनातनसारख्या राष्ट्रप्रेमी  संघटनेची चौकशी करण्यात वेळ आणि धन व्यय करतात. हीच शक्ती धर्मांधांविरुद्ध वापरली तर देशातील बॉम्बस्फोट न्यून होतील !
    नवी देहली - भारतात आतंकवादी कारवायांत गुंतलेले अतिरेकी आणि घुसखोर यांना भारतातील काही भागातून सक्रीय साहाय्य लाभते. जोपर्यंत असे साहाय्य थांबणार नाही, तोपर्यंत भारतात आतंकवादी कारवाया होतच रहातील, असा अहवाल भारताच्या अव्वल दर्जाच्या राष्ट्रीय सुरक्षा रक्षक (नॅशनल सेक्युरीटी गार्ड - एन्.एस.जी.) या यंत्रणेने केंद्रशासनास दिला आहे.

माझ्या अधिकोष खात्यात १५ लाख रुपये कधी जमा होणार ? - एका भारतीय नागरिकाचा माहिती अधिकाराच्या अंतर्गत प्रश्‍न

काळ्या पैशाला भारतात आणण्याच्या पंतप्रधानांच्या आश्‍वासनाचे प्रकरण
     नवी देहली - परदेशातील काळा पैसा भारतात आणू आणि प्रत्येक भारतियाच्या खात्यात १५ लाख रुपये जमा करू, असे वर्ष २०१४ च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रसाराच्या वेळी नरेंद्र मोदी यांनी जनतेला आश्‍वासन दिले होते; मात्र त्यांचे सरकार येऊन २ वर्षे उलटून गेल्यावरही हे आश्‍वासन पूर्ण न झाल्याने राजस्थानच्या झालावार येथील कन्हैया लाल यांनी माहिती अधिकाराच्या अंतर्गत अर्ज केला आहे. माझ्या अधिकोष खात्यात १५ लाख रुपये कधी जमा होणार ?, असा प्रश्‍न याद्वारे त्यांनी विचारला आहे. (शासनाने आश्‍वासनांची पूर्तता केली नाही, तर भविष्यात त्याला जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागणार, याचे उदाहरण ! - संपादक)

वर्ष २०१९ मधेही ७० टक्के भारतियांना पंतप्रधानपदी नरेंद्र मोदीच हवे !

मोदी यांच्याकडून जनतेच्या अजूनही अपेक्षा आहेत, या अपेक्षा 
ते लवकरच पूर्ण करतील, अशी आशा आहे !
इन शॉर्ट्स आणि इप्सास या आस्थापनांच्या सर्वेक्षणाचा निष्कर्ष !
     नवी देहली - वर्ष २०१९ मधेही ७० टक्के भारतियांना पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदीच हवे असल्याचे एका सर्वेक्षणातून समोर आले आहे. यात १७ टक्के नागरिकांनी मोदी यांना विरोध दर्शवला आहे, तर १३ टक्के नागरिकांनी याविषयी कोणतेही मत प्रदर्शित केलेले नाही. २५ जुलै ते ७ ऑगस्ट या कालावधीत करण्यात आलेल्या या सर्वेक्षणात ८० टक्के जणांचे वय ३५ आणि त्याहूनही अल्प होते.
१. न्यूज अ‍ॅप इन शॉर्ट्स आणि मार्केट रिसर्च करणारे आस्थापन इप्सास यांनी केलेल्या या सर्वेक्षणामध्ये ६३ सहस्र १४१ जणांनी सहभाग घेतला होता. 
२. मागील २ वर्षांमध्ये दलित आणि अल्पसंख्यांक यांच्यावर अत्याचार वाढल्याचे ३३ टक्के नागरिकांना वाटत आहे, तर ४६ टक्के नागरिकांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. 
३. सर्वेक्षणातील ५७ टक्के नागरिकांना राज्यांमध्ये दारूबंदी असावी, असे वाटते. 
४. विद्यार्थी संघटनांच्या निवडणुकांना ६१ टक्के नागरिकांनी विरोध केला आहे, तर अशा निवडणुका व्हाव्यात, असे ३२ टक्के नागरिकांना वाटत आहे.

भारत शिक्षणक्षेत्रात ५० वर्षे मागासलेला ! - युनेस्कोचा अहवाल

देश स्वतंत्र होऊन ७० झाल्यानंतरही सर्वांना शिक्षण देण्याचे मुलभूत ध्येय 
गाठता येत नाही, यास सर्वपक्षीय राजकारीच उत्तरदायी आहे !
     नवी देहली - सर्वांना शिक्षण पुरवण्याच्या ध्येयामध्ये भारत ५० वर्षे मागासलेला आहे, असे युनेस्कोच्या अहवालात म्हटले आहे. भारत प्राथमिक शिक्षणाचे ध्येय वर्ष २०५०, कनिष्ठ शिक्षणाचे ध्येय वर्ष २०६० आणि उच्च माध्यमिक शिक्षणाचे ध्येय वर्ष २०८५ मधे पूर्ण करेल, असेही या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. 
१. ग्लोबल एज्युकेशन मॉनिटरिंगच्या अहवालानुसार भारताला शाश्‍वत विकास ध्येय गाठण्यासाठी शिक्षण क्षेत्रात मुलभूत पालट करणे आवश्यक आहे.
२. अहवालात सांगितल्याप्रमाणे भारतात ६ कोटींहून अधिक मुलांना अल्प किंवा काहीच शिक्षण मिळत नाही, तर ११ लाख मुले कनिष्ठ माध्यमिक स्तरावर असतांना मध्येच शिक्षण सोडून देतात.
३. उच्च माध्यमिक स्तरावरील ४ कोटी ६८ लाख मुले शाळेतही जात नाहीत. 
४. २९ लाख मुले प्राथमिक शिक्षणापासून लांब आहेत. 
५. एकीकडे जगातील अर्ध्या शाळांमध्ये वातावरणातील पालटाविषयी शिक्षण दिले जात नसतांना भारतात ३० कोटी विद्यार्थ्यांना हवामानाविषयी शिक्षण दिले जात आहे.

काँग्रेस भाजपला भारताचा हिंदु पाकिस्तान करू देणार नाही ! - काँग्रेसचे नेते शशी थरूर

वैचारिक सुंता झालेली काँग्रेस आणि तिचे नेते !
     काँग्रेसी आणि अन्य पुरोगामी यांना वाटते की, ज्याप्रमाणे पाक इस्लामी राष्ट्र झाल्यावर तेथे जिहादी आतंकवाद आणि कट्टरतावाद निर्माण झाला, तसा भारतात हिंदु राष्ट्र स्थापन झाल्यास होऊ शकतो; मात्र ते जाणीवपूर्वक हे विसरतात किंवा लपवतात की, हिंदु धर्माची विचारसरणी अन्य धर्मियांना ठार करा, त्यांची संपत्ती लुटा, त्यांच्या बायकांवर बलात्कार करा, त्यांचे धर्मांतर करा, अशी नसून वसुधैव कुटुम्बकम् अशी आहे. त्यामुळे भारताचे हिंदु राष्ट्र झाल्यास तो कधीही पाकिस्तानसारखा कट्टरतावादी होणार नाही; मात्र भारतातील अल्पसंख्यांक मुसलमानांची लोकसंख्या वाढल्यास भारताचे इस्लामीस्तान नक्कीच होईल !
    जयपूर - पाकिस्तान ज्या प्रकारे इस्लामी देश झाला आहे, तसे भारताचे हिंदु राष्ट्र करण्याचा डाव भाजप करत आहे. काँग्रेस असा प्रयत्न सफल होऊ देणार नाही, असे उद्गार माजी केंद्रीयमंत्री शशी थरूर यांनी काढले आहेत. ते येथे इतिहासाचे पुनर्लेखन आणि राष्ट्रवादाची पुनर्व्याख्या या विषयावर आयोजित एका परिषदेत बोलत होते. (मग काय शशी थरूर यांच्या काँग्रेसला भारताला इस्लामी राष्ट्रच करायचे आहे का ? प्रत्येक इस्लामी अथवा ख्रिस्ती राष्ट्र हे त्या त्या देशातील बहुसंख्य लोकांच्या धर्मानुसार झाले आहे. भारतात जर ८० टक्के हिंदु रहातात, तर भारत हिंदु राष्ट्र का होऊ नये ? - संपादक)

काश्मीर हिंसेवर चर्चा करण्यासाठी अरुंधती रॉय यांना पाकचे निमंत्रण !

अरुंधती रॉय पाकला आपल्या वाटतात ! यावरून रॉय यांचा भारतद्वेष स्पष्ट होतो !
      इस्लामाबाद - पाकच्या पंजाब विधानसभेने वादग्रस्त लेखिका आणि मानवी हक्क कार्यकर्त्या अरुंधती रॉय यांना काश्मीरमधील हिंसेवर चर्चा करण्यासाठी आमंत्रित केले आहे. डॉन ऑनलाईननुसार परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या सल्ल्याप्रमाणे हा निर्णय घेतल्याचे पंजाब प्रांताचे श्रम आणि संसाधनमंत्री रजा अशफाक सरवर यांनी सांगितले.हिंदू संघटित नसल्यामुळे देशाची विदारक स्थिती आहे ! - चिरायू पंडित, सावरकर मंच

बडोदा (गुजरात) येथे हिंदू संघटन मेळावा संपन्न
दिपप्रज्वलन करतांना डावीकडून श्री. चिरायू पंडित,
श्री. संतोष आळशी, सौ. अंशू संत आणि सौ. प्रीती पोद्दार
      बडोदा - आज काश्मीरमध्ये गेल्यास आपल्याला हिंदु म्हणून ओळख देण्याचीही भीती वाटते. ३०० वर्षे मुसलमान आक्रमणकर्त्यांना भारतातील पराक्रमी राजांशी लढावे लागले होते. आज हिंदू संघटित नाहीत, ते धर्माचरण आणि धर्मपालन करत नाहीत, म्हणून आजची विदारक स्थिती निर्माण झाली आहे, असे प्रतिपादन सावरकर मंचाचे श्री. चिरायू पंडित यांनी केले. येथील पटेलवाडी, मांजलपूर येथे नुकताच हिंदू संघटन मेळावा पार पडला. या मेळाव्याला हिंदु जनजागृती समितीचे श्री. संतोष आळशी, रणरागिणी शाखेच्या सौ. अंशू संत उपस्थित होत्या. या मेळाव्याला धर्माभिमानी हिंदूंचा भरघोस प्रतिसाद मिळाला.
      या वेळी श्री. संतोष आळशी यांनी समाजातील दुष्प्रवृत्ती आणि त्याचा समाजावर होणारा विपरीत परिणाम याविषयी सांगतांना याचा संघटितपणे प्रतिकार केला पाहिजे, असे सांगितले, तर रणरागिणीच्या सौ. अंशू संत यांनी स्वसंरक्षण काळाची आवश्यकता विषद करतांना समाजातील असुरक्षिततेची भावना दूर करण्यासाठी स्वसंरक्षण आणि साधना याचे महत्त्व सांगितले. समितीच्या सौ. रेखा बर्वे यांनी उपस्थितांना हिंदु जनजागृती समितीचा परिचय करून दिला.

बुरख्यावर टीका करणार्‍या मुसलमान महिलेला धर्मांधांकडून बलात्कार करून जिवे मारण्याची धमकी !

आता युरोपातील धर्मांधही उद्दाम झाले आहेत, हे लक्षात घ्या !
      साराजेवो (बोस्निया) - एका महिला पत्रकाराला बुरख्यावर टीका केल्याच्या प्रकरणी बलात्कार करून जिवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. त्यामुळे ही महिला पत्रकार सध्या लपूनछपून जीवन जगत आहे. लेजला कोलक नावाच्या या पत्रकाराने त्यांच्या एका लेखामध्ये महिलांना बुरखा घेण्यास बळजोरी करणे म्हणजे त्यांच्या डोक्याला लैंगिक खेळणे बांधण्यासारखे आहे, असे लिहिले होते. बोस्नियाच्या या पत्रकाराच्या विरोधात द्वेष पसरवणारी मोहीम संकेतस्थळावरून चालू करण्यात आली आहे. त्या महिला पत्रकारावर बलात्कार करणार्‍याला किंवा त्यांना ठार मारणार्‍याला मोठी रक्कम देण्याचे घोषित करण्यात आले आहे. अत्यंत सुंदर लेजला यांच्यावर बलात्कार करणारा कोणी व्यक्ती आहे का ? मी स्वत: त्याला मोठे रोख बक्षीस देईन असे सामाजिक संकेतस्थळावरील एका धर्मांधाने म्हटले आहे. (धर्मांधांची क्रुरता जाणा ! - संपादक) लेजला कोलक यांनी त्यांच्या लेखातील काही आक्षेपार्ह शब्दांविषयी क्षमायाचना केली आहे.नास्तिक असल्याचे ट्विट केल्यामुळे मुसलमान तरुणाला १० वर्षांचा कारावास आणि २ सहस्र कोडे मारण्याची शिक्षा

भारतात हिंदु धर्म, देवी-देवता यांच्यावर अश्‍लाघ्य टीका करणारे आणि स्वत:ला 
नास्तिक समजणार्‍यांना सौदी अरेबियाच्या शिक्षेविषयी काय म्हणायचे आहे ?
      रियाद (सौदी अरेबिया) - येथील एका मुसलमान तरुणाने मी नास्तिक आहे, असे ट्विट केल्याप्रकरणी त्याला १० वर्षांचा कारावास आणि २ सहस्र कोडे मारण्याची शिक्षा देण्यात आली. एवढेच नाही, तर त्याला अनुमाने ४ लक्ष रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. 
      या तरुणाचे नाव सार्वजनिक करण्यात आलेले नाही. त्याला अटक करण्यापूर्वी त्याने ६०० ट्विट केले होते. यात त्याने, मला विचार व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य आहे, असे मत व्यक्त करतांनाच ईश्‍वराचे अस्तित्वही नाकारले होते. या देशातील कायद्यानुसार नास्तिक असलेल्यांना आतंकवादी समजण्यात येते. त्याचे ट्विट कुराणचा उपहास करत होते, असे पोलिसांना आढळून आले होते. त्याने सर्व नबींनी खोटे सांगितले आहे, धार्मिक शिक्षण द्वेष पसरवणारे आहे, अशी मतेही व्यक्त केली होती.गणेशमूर्ती विसर्जनाच्या दिवशी नदीत पाणी न सोडणार्‍या धर्मद्रोही पुणे महानगरपालिकेचा हिंदुद्वेष पहा !

हिंदूंनो, धर्मनिष्ठ हिंदु राष्ट्राच्या (सनातन धर्म राज्याच्या) स्थापनेची अपरिहार्यता जाणा ! 
     पुणे - गणेशमूर्तीची प्राणप्रतिष्ठा केल्यावर तिच्यात जिवंतपणा येतो. मंदिरातही विश्‍वस्त देवाच्या वतीने कारभार पहातात. भाविक श्री गणेशाची इतकी भावपूर्ण पूजा, आरती करतात, की श्री गणराय घरातून गेल्यावर घर 'रिकामे' वाटते. अशा मूर्तीचे विसर्जन करतांना ते शास्त्रशुद्धच करायला हवे. जसे विज्ञानात प्रयोग असतात, तसे अध्यात्मात कर्मकांडाला महत्त्व असते. मृत व्यक्तीचे अंत्यसंस्कारही आपण योग्य पद्धतीने करतो; मात्र हिंदूंना त्यांचे सण-उत्सव शास्त्रशुद्धरीत्या साजरे करताच येऊ नयेत आणि त्यांना सण-उत्सवाच्या चैतन्याचा लाभ होऊ नये, असा चंगच जणू पुणे महापालिकेने बांधला आहे, अशी खालील दृश्ये पाहिल्यावर कुणाला वाटले तर काय नवल ? 

गायीची पूजा करणार्‍या देशातील सरकारच गोमांस विकून पैसे कमवत आहे ! - शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती

     देहरादून (उत्तराखंड) - देशातील अनेक राज्यांत गोहत्येवर बंदी आहे; मात्र तरीही भारत जगात गोमांस निर्यातीत पहिल्या क्रमांकावर आहे. गायीला माता समजून तिची पूजा करणार्‍या देशातील सरकार गायीचे मांस विकून परकीय चलन कमवण्याच्या मागे लागला आहे, हे दुर्दैवी आहे, अशी टीका द्वारका आणि ज्योतिष पीठाचे शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांनी केली आहे. शंकराचार्य यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही टीका केली. ते म्हणाले की, त्यांनी गोरक्षकांना अपमानित केले आहे. ते गोरक्षकांना गुंड आणि नकली गोरक्षक म्हणत आहेत. 
कल्याण येथील आमदार श्री नरेंद्र पवार यांना आदर्श गणेशोत्सव साजरा
करण्यासंदर्भात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने निवेदन देतांना
डावीकडून विजय ठाकरे, राकेश गोडांबे आणि श्री. उपेंद्र महाजन

हिंदु राष्ट्राच्या संवर्धनासाठी यथाशक्ती निष्काम साधना करा ! - राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळे

   पुणे - लोकमान्य टिळक यांनी गीतारहस्याच्या माध्यमातून निष्काम कर्मयोगाची शिकवण दिली. ते आयुष्यभर शारीरिक, बौद्धिक, तसेच आर्थिकदृष्ट्या जनजागृती करण्यासाठी पर्यायाने स्वातंत्र्यप्राप्तीसाठी झिजले. अभिमानाने धर्माचरण करणारे टिळक यांनी सुधारणेच्या नावाखाली सनातन हिंदु धर्माला नाकारणार्‍यांचाही सडेतोड प्रतिवाद केला. आज हिंदूंचे उपासनेचे बळ न्यून पडत आहे. लोकमान्य टिळक यांचा आदर्श घेऊन हिंदूंनीही हिंदु राष्ट्रासाठी यथाशक्ती निष्काम साधना करावी, असे आवाहन राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळे यांनी केले. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच, या सिंहगर्जनेला १०० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्त अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेच्या वतीने १ आणि २ सप्टेंबर या दिवशी केसरी वाडा येथे सिंहगर्जनेची शताब्दी या विषयावर त्यांचे कीर्तन आयोजित करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते.

गोतस्करांना मारा; मात्र त्यांची हाडे मोडू नका ! - विहिंपचा गोरक्षकांना सल्ला

     मेरठ (उत्तरप्रदेश) - विश्‍व हिंदु परिषदेने 'गोतस्करांना मारा; मात्र त्यांची हाडे मोडू नका', असा सल्ला गोरक्षकांना दिला आहे. परिषदेच्या गोरक्षा विभागाच्या मध्यवर्ती समितीचे प्रभारी सदस्य श्री. खेमचंद यांनी पश्‍चिम उत्तरप्रदेश आणि उत्तराखंड राज्यातील गोरक्षकांच्या बैठकीत हा सल्ला दिल्याचे वृत्त एका इंग्रजी दैनिकाने प्रसिद्ध केले आहे. गोरक्षण करण्यासाठी विश्‍व हिंदु परिषदेव्यतिरिक्त इतर संघटनांतील कार्यकर्त्यांचे साहाय्य घ्यावे; म्हणजे गोरक्षकांचे संख्याबळ बघून गायींचा अवैध व्यवसाय करणारे घाबरून असे अवैध कृत्य करणार नाहीत, असेही श्री. खेमराज म्हणाले. 

पुण्यात गणेशोत्सवाच्या निमित्ताने 'एक भारत अभियाना'च्या प्रसारालाही वेग !

     पाकिस्तानच्या निर्मितीपासूनच पाकिस्तानने, तसेच आतापर्यंतच्या सर्वपक्षीय राज्यकर्त्यांनी काश्मीर प्रश्‍न धुमसता ठेवला आहे. भारतीय राज्यकर्त्यांच्या बोटचेप्या धोरणांमुळेच आज शांतताकाळातही काश्मीरमध्ये आतंकवाद्यांचा धुडगूस चालू असून भारतीय सैनिक हुतात्मा होत आहेत. आपल्याच देशात निर्वासित झालेल्या काश्मिरी हिंदूंची पुनर्वसनाची मागणी धुडकावली जात आहे. या पार्श्‍वभूमीवर काश्मिरी हिंदूंवरील अन्याय आणि जिहादी आतंकवाद यांच्या विरोधात भारतभरातील राष्ट्रभक्त व्यक्तींचे संघटन उभे रहावे, या उद्देशाने शनिवारवाडा येथे २३ ऑक्टोबर या दिवशी जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. गणेशोत्सव काळात यासंदर्भात जनजागृती व्हावी आणि हिंदूसंघटन व्हावे, या उद्देशाने हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते विविध गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकार्‍यांच्या भेटी घेत आहेत. या सभेच्या संदर्भात फ्लेक्स प्रदर्शन सिद्ध करण्यात आले असून गणेशोत्सव मंडळांच्या मंडपांमध्ये ते लावण्यात येत आहे. अनेक मंडळांचा त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून ज्यांना या अभियानात सहभागी व्हायचे आहे, त्यांनी ८९८३३३५५१७ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

केरळमध्ये संघाच्या कार्यकर्त्याची माकपच्या कार्यकर्त्यांकडून निर्घृण हत्या !

हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे नेते आणि कार्यकर्ते यांच्यावर 
सातत्याने होत असलेली जीवघेणी आक्रमणे देशात 'सहिष्णुता'च
वाढवत असल्याने सर्व धर्मनिरपेक्षतावादी आणि प्रसारमाध्यमे गप्प आहेत, हे लक्षात घ्या ! 
केरळमध्ये सत्ताधारी माकपच्या कार्यकर्त्यांची वाढती मोगलाई ! 
     कन्नूर (केरळ) - येथील थिल्लानकेरी येथे माकप या साम्यवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून ३ सप्टेंबरच्या रात्री एका २६ वर्षीय राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कार्यकर्त्याची निर्घृण हत्या करण्यात आली. सदर कार्यकर्त्याचे नाव बिनीश असून तो भाजपच्या कार्यातही सहभागी व्हायचा. हत्येची ही घटना २ घंट्यांआधीच झालेल्या एका बॉम्बस्फोटात साम्यवादी पक्षाचा एक कार्यकर्ता घायाळ झाल्यानंतर घडली. 

सनातन संस्थेकडून महाराष्ट्राचे गृह राज्यमंत्री श्री. दीपक केसरकर यांना निवेदन

कॉ. गोविंद पानसरे हत्येप्रकरणी सनातनचे 
डॉ. वीरेंद्रसिह तावडे यांना पोलिसांनी मारहाण केल्याचे प्रकरण 
     सावंतवाडी, ६ सप्टेंबर (वार्ता.) - सनातन संस्थेचे साधक डॉ. वीरेंद्रसिह तावडे यांच्यावर अद्याप कोणतेही दोषारोप सिद्ध झाले नसतांना त्यांना कोल्हापूर पोलिसांच्या विशेष अन्वेषण पथकाकडून करण्यात येत असलेली अमानुष मारहाण आणि हीन वागणुकीच्या विरोधात महाराष्ट्राचे गृह राज्यमंत्री श्री. दीपक केसरकर यांना ६ सप्टेंबर या दिवशी सावंतवाडी येथील त्यांच्या कार्यालयात हिंदुत्वनिष्ठांनी निवेदन दिले. 'या प्रकरणात व्यक्तीगतरित्या लक्ष घालून पोलिसांकडून निरपराध डॉ. तावडे यांचा करण्यात येत असलेला कायदाबाह्य छळ थांबवण्यात यावा', अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. 
     या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. मनोज खाडये आणि सनातनचे डॉ. पेंढारकर उपस्थित होते.

न्यायालयाच्या आदेशामुळे डॉ. तावडे यांना अधिवक्त्यांना भेटू देण्याची अनुमती !

पोलिसांनी न्यायालयाचा अवमान केल्याविषयी न्यायालयाने कारवाई करणे अपेक्षित आहे ! 
     कोल्हापूर, ६ सप्टेंबर (वार्ता.) - सनातनचे साधक डॉ. तावडे यांच्या अधिवक्त्यांनी अवमान याचिका, तसेच यांना न्यायालयात उपस्थित करावे आणि त्यांची पुन्हा वैद्यकीय तपासणी करावी, अशा आशयाचे ३ अर्ज दाखल न्यायालयात केले होते. त्यानुसार आज प्रथमवर्ग न्यायदंडाधिकार्‍यांनी ६ सप्टेंबर या दिवशी सायंकाळी ४ वाजता अर्जांची अंतिम सुनावणी केली. त्यामध्ये '७ सप्टेंबर या दिवशी सकाळी ९ वाजता भेटू देऊ', असेे न्यायालयाच्या आदेशामुळे पोलिसांनी सांगितले. 

पुण्यातील टेमघर धरणाच्या गळतीप्रकरणी १० अभियंते निलंबित

   मुंबई - पुणे जिल्ह्यातील टेमघर धरणातून मोठ्या प्रमाणात गळती होत असल्याचे उघड झाले होते. या धरणाच्या गळतीप्रकरणी जलसंपदा विभागाने एकाच वेळी १० अभियंत्यांना निलंबित केले आहे. या गळतीप्रकरणी जलसंपदा विभागाच्या प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली चौकशी करण्यात आली होती. त्यात कंत्राटदारासह २५ अभियंते दोषी असल्याचे समोर आले. त्यातील १५ अभियंते सेवानिवृत्त झाले असल्याने उरलेल्या १० जणांना तात्काळ निलंबित करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली. (निलंबन करण्यासमवेत त्यांच्यावर जलद न्यायालयीन प्रक्रिया करून कठोर शिक्षा होण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे. - संपादक) जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी स्वत: टेमघर धरणाची पाहणी केली होती आणि त्यानंतर ३४ जणांच्या विरोधात गुन्हा नोंदवला होता.

चित्रपटातील अश्‍लील शब्द आणि गाणी यांमुळे तरुण पिढी बिघडत आहे ! - चेन्नई उच्च न्यायालय

जे न्यायालयाला दिसते, ते सरकारला का दिसत नाही ? 
अश्‍लीलतेचा प्रसार करणार्‍या
 निर्माता-दिग्दर्शकांवर आतातरी कठोर कारवाई करील, ही अपेक्षा ! 
     चेन्नई - चित्रपटातील अश्‍लील शब्द आणि गाणी यांमुळे तरुण पिढीच्या मनामध्ये दुष्ट विचार येतात, असे चेन्नई उच्च न्यायालयाने सांगितले. चित्रपट क्षेत्रातील लोकांनी स्वत:चे सामाजिक दायित्व लक्षात घ्यावे, असे आवाहनही उच्च न्यायालयाने केले आहे. एका तरुणाने चित्रपटातील अश्‍लील गाणे म्हणत एका महिलेशी गैरवर्तणूक केली होती. या प्रकरणी जामीन मिळवण्यासाठी केलेल्या अर्जावरील सुनावणीच्या वेळी न्यायमूर्ती एस्. वैद्यनाथन् यांनी वरील उद्गार काढले. (न्यायालयाने केवळ हे सत्य समाजासमोर ठेवून थांबू नये, तर अश्‍लीलता पसरवणारे चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माते यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे आदेश सरकारला द्यायला हवेत ! - संपादक) 

...तर माकपचे कार्यकर्तेही शस्त्रास्त्रांचे प्रशिक्षण देण्याचे कार्य करतील !

संघ शस्त्रास्त्रांचे प्रशिक्षण देत असल्याचा सत्ताधारी माकपचा आरोप ! 
     पथानामथिट्टा (केरळ) - माकपचे केरळ राज्य सचिव कोडियरी बाळकृष्णन् यांनी ३ सप्टेंबर या दिवशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर आरोप करत म्हटले की, जर संघाने केरळमधील मंदिरांमध्ये शस्त्रास्त्र प्रशिक्षणाचे कार्य चालू ठेवले, तर माकपचे कार्यकर्तेही तेथेच प्रशिक्षणाचे कार्य चालू करतील. (केरळ राज्यात सत्ताधारी असलेल्या माकपकडून अशी धमकी देण्यात येणे, हे राज्याच्या दयनीय न्यायव्यवस्थेचेच द्योतक ! - संपादक) त्यांनी हिंदूंना आवाहन करतांना म्हटले आहे की, मंदिरे एका राजकीय पक्षाच्या अधीन होण्यापासून हिंदूंनी मंदिरांना वाचवले पाहिजे. माकप हा कोणत्याच धर्माच्या विरोधात नाही. आज असे चित्र रंगवण्यात येत आहे; पण हे सर्व आरोप निराधार आहेत. कोडियरी एका कार्यक्रमाच्या वेळी बोलत होते. (असे आहे, तर गेल्या १० वर्षांत माकपने राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या हिंदुत्वनिष्ठ संघटनेच्या शेकडो कार्यकर्त्यांची हत्या का केली ? याचे उत्तर देण्याचे धाडस कोडियरी दाखवतील का ? - संपादक)

इसिसच्या बाल आतंकवाद्याकडून कुर्दिश सैनिकाची हत्या !

लहान मुलांना क्रूरतेचे बाळकडू पाजणारा इस्लामिक स्टेट ! 

     दमिश्क (सीरिया) - इसिसच्या एका बाल आतंकवाद्याने इसिसच्या ताब्यात असलेल्या कुर्दिश सैनिकाची निर्घृण हत्या केली. सॅली जोन्स या जिहादी महिलेचा हा मुलगा आहे. सॅली जोन्स ही ४७ वर्षीय जिहादी महिला तिच्या १० वर्षीय जोजो नावाच्या मुलासह सिरीयामध्ये जाऊन इसिसमध्ये सहभागी झाली होती. तिने जोजोचे इस्लाममध्ये धर्मांतर केले, तसेच त्या जिहादी महिलेने २० वर्षीय जिहादी आतंकवादी जुनेद हुसेन याच्याशी विवाह केला. वर्ष २०१५ मध्ये अमेरिकेने केलेल्या ड्रोनच्या आक्रमणात जुनेद ठार झाला. इसिसचे ५ बाल आतंकवादी कुर्दिश सैनिकांची हत्या करतांनाची ध्वनिचित्रफीत प्रसारित झाली आहे. ब्रिटनमध्ये जन्माला आलेली ५० लहान मुले इसिसच्या नियंत्रणाखाली सिरीयामध्ये विविध भागात कार्यरत आहेत.

श्री गणेशमूर्ती विसर्जनाला विरोध करणार्‍या भोंदू सुधारकांच्या टोळीची पशूवधगृहे आणि सांडपाणी यांमुळे होणार्‍या जलप्रदूषणाकडे डोळेझाक !

Add caption
      गणेशोत्सव जवळ आला आहे. आता नेहमीप्रमाणे स्वत:ला पर्यावरणप्रेमी म्हणवणारे स्वयंघोषित सुधारक आणि त्यांच्या संघटनांचे कार्यकर्ते सक्रीय होतील. गणेशोत्सवात गणेशमूर्ती विसर्जित केल्यामुळे जलप्रदूषण होते, अशी टूम या लोकांनी काही वर्षांपूर्वी काढली होती. धर्मशिक्षणाचा अभाव आणि कथित पुढारलेपण यांमुळे अनेक जण त्यांच्या नादालाही लागले; पण आता हे स्वयंघोषित समाजसुधारक आणि समाजसेवक यांचे पितळ उघडे पडत आहे. गणपतीच्या मूर्तीला लावण्यात येणार्‍या रंगांमुळे जलप्रदूषण होते. त्यामुळे अशा मूर्ती तलाव, नद्या, खाड्या, समुद्र यांत विसर्जित न करता, कृत्रिम तलावांत विसर्जित करण्याची किंवा त्या स्वयंघोषित संघटनांना दान देण्याची फॅशन चालू झाली.

कराड येथील निवासी नायब तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे मागणी काश्मीरमधील हिंसाचार रोखण्यासाठी सरकारने कठोर पावले उचलावीत !

   कराड - आतंकवादी आणि फुटिरतावादी यांमुळे काश्मीरमधील परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. त्यामुळे केंद्रीय गृहमंत्री, भारत सरकार यांनी योग्य ती कठोर पावले उचलावीत, या आशयाचे निवेदन येथील निवासी नायब तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी श्री. अजित कुर्‍हाडे यांना हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देण्यात आले. या वेळी समितीचे कार्यकर्ते, हिंदु एकता आंदोलनचे सर्वश्री भूषण जगताप, अनुप कुंभार, संपत निकम, सनातन संस्थेचे साधक उपस्थित होते.

आदर्श गणेशोत्सव साजरा करूया !

     म्हणता म्हणता श्री गणेशाचे आगमन झाले आहे. सण म्हटले की, प्रत्येकाच्या घरात आनंद असतो. या दिवसांमध्ये ईश्‍वराचे चैतन्य कार्यरत असते. कुटुंबातील सर्वजण आनंदाने सण साजरा करण्यासाठी एकत्र येतात; मात्र सण खर्‍या अर्थाने आदर्शपणे साजरे होतात का, याचाही विचार व्हायला हवा. 

गणेशोत्सव : आत्मावलोकनाची आवश्यकता !

सध्या चालू असलेल्या गणेशोत्सवाच्या निमित्ताने...
१. राष्ट्रीय प्रवृत्तीची जोपासना करून समाजाला संघटित करण्यासाठी गणेशोत्सव हा लोकमान्य टिळकांचा उद्देश असणे : सार्वजनिक गणेशोत्सवाचा प्रारंभ पुण्यात ख्रिस्ताब्द १८९३ मध्ये लोकमान्य टिळकांनी केला. या वेळी कीर्तने, प्रवचने, संगीत मेळे इत्यादी विविध कार्यक्रम ठेवून समाजात जागृती करता येईल, असा लोकमान्यांचा उद्देश होता. विस्कळीत झालेला समाज या निमित्ताने संघटित होऊन त्याने राजकीय स्वातंत्र्याच्या चळवळीत महत्त्वाची कामगिरी करावी, असा त्यांचा मानस होता. लोकमान्यांच्या प्रोत्साहनामुळे या उत्सवाचा सर्वत्र प्रसार झाला आणि राष्ट्रीय प्रवृत्तीची जोपासना होऊ लागली. स्वातंत्र्यप्राप्तीच्या कार्यात या उत्सवाचे मोठे साहाय्य झाले, यात शंका नाही.

भुताची सहलसारखा हास्यास्पद उपक्रम राबवून जनतेची दिशाभूल करणारे नास्तिकतावादी आणि बुद्धीप्रामाण्यवादी !

वाईट शक्ती आहेत कि नाहीत, हे लक्षात येण्यासाठी साधना 
करणे अपरिहार्य आहे, हे बुद्धीप्रामाण्यवादी जाणतील का ?
     सध्या काही संस्थांच्या पुढाकाराने भुते नसतात, हे सिद्ध करण्याकरिता अमावस्येच्या रात्री स्मशानात जाऊन मांसाहार करणे, तिथे मुलांना भीती दाखवण्याचे खेळ खेळणे आदींचा समावेश असणारे उपक्रम राबवले जातात. नुकताच एका शहरातील एका संघटनेच्या वतीने नास्तिकतावाद्यांसह १०० मुलांना स्मशानात नेऊन भुताची सहल हा उपक्रम राबवण्यात आला. त्या अनुषंगाने समाजातून काही प्रश्‍न उपस्थित करण्यात आले. त्यांचे शंकानिरसन व्हावे आणि अशा हास्यास्पद मोहिमांची निरर्थकता स्पष्ट व्हावी; म्हणून पुढील सूत्रे देत आहोत.

सनातन संस्थेविषयी उलट-सुलट वार्ता प्रसिद्ध होऊनही अधिवेशनाला उपस्थित हिंदुत्वनिष्ठांच्या मनात सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्याविषयी कोणताही विकल्प न येणे

      काही दिवसांपूर्वी सनातनच्या एका साधकाला काहीही पुरावा नसतांना खुनाच्या आरोपावरून अटक झाली. त्या संदर्भात वृत्तपत्रे आणि दूरदर्शन वाहिन्यांवरून उलट-सुलट वार्ता प्रसिद्ध होत होत्या. या प्रकरणी रामनाथी आश्रमावर छापा टाकण्यात आल्याची खोटी वार्ताही प्रसिद्ध झाली. त्या काळात पंचम अखिल भारतीय हिंदू अधिवेशन चालू होते. एवढे सगळे होत असूनही अधिवेशनाला उपस्थित हिंदुत्ववाद्यांच्या मनात सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्याविषयी कोणताही विकल्प नव्हता. या वृत्ताचा या अधिवेशनावर कसलाही परिणाम झाला नसल्याचे जाणवले. - श्री. प्रकाश मालोंडकर, राऊरकेला, ओडिशा. (१२.७.२०१६)


आतंकवादी बुरहान वानीची पाठराखण अन् सैनिकांचे खच्चीकरण हे राष्ट्रघातकी राज्यकर्त्यांचे षड्यंत्र !

कु. प्रियांका जगताप
१. धर्मांध आतंकवाद्याला ठार मारल्यावर सैनिकांना क्षमा मागायला सांगणे, हे षड्यंत्र ! : धर्मांध आतंकवादी बुरहान वानीला मारल्याची वार्ता सर्वत्र पसरल्यावर भारतीय सैनिक आणि पोलीस यांच्यावर प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे ताशेरे ओढले जात आहेत. एखाद्या चकमकीत एक बहादूर सैनिक मारला गेला, तर कोठेच एवढी ओरड होत नाही. एक सलामी देऊन विषय शांत होतो; पण एक आतंकवादी चकमकीत ठार झाला, तर एवढा गाजावाजा कशासाठी ? काश्मीरच्या मुख्यमंत्र्यांना एवढा कळवळा कशासाठी वाटतो ? भारतीय सैनिक आणि पोलीस यांना त्यांनी या प्रकरणी क्षमा मागायला सांगणे, हे राजकारण्यांचे षड्यंत्र आहे. 
२. राष्ट्रद्रोही कृत्यांना पाठिंबा देऊन सैनिकांचे खच्चीकरण करणारे राजकारणी ! : राष्ट्रद्रोही कृत्यांना पाठिशी घालण्यासाठी चुकीचे निर्देश देऊन सैनिकांचा आत्मविश्‍वास न्यून करण्याचे हे राज्यकर्त्यांचे कारस्थान आहे. कोणत्याच देशात आतंकवादी मारल्यानंतर सैनिकांना त्याविषयी क्षमा मागण्यास सांगितली जात नाही. सैनिकांचे असे खच्चीकरण झाल्यास ते देशासाठी कसे लढू शकतील ?

धर्महानी रोखणे हे काळानुसार आवश्यक असे धर्मपालन !

      देवतांच्या उपासनेच्या मुळाशी श्रद्धा असते. देवतांचे कोणत्याही प्रकारचे विडंबन हे श्रद्धेवर घाला घालते. यामुळे ही धर्महानी ठरते. धर्महानी रोखणे हे काळानुसार आवश्यक असे धर्मपालन आहे, ती देवतेची समष्टी स्तराची उपासनाच आहे. ही उपासना केल्याविना देवतेची उपासना पूर्ण होऊच शकत नाही. यास्तव गणेशभक्तांनीही याविषयी जागरूक होऊन धर्महानी रोखायला हवी. सनातन संस्था यासंदर्भात वैध मार्गाने कार्य करत आहे. देवतांची विडंबनात्मक गीते लावून बालमनावर कुसंस्कार करणारे जन्महिंदू !

    श्री गणेशचतुर्थीच्या काळात अनेक घरांमध्ये मारुती नाही, सेंट्रो नाही... मूषक कंपनीची पमपम छान, उंदीरमामा.... भाग्यवान !, अशा गीतांना बालगीते म्हणून वाजवणारे पालक लहान मुलांना धार्मिकतेचे बाळकडू काय पाजणार ?

नागपूरमध्ये अज्ञातांकडून वृद्धावर गोळीबार

   नागपूर, ६ सप्टेंबर - येथील तहसील अग्रसेन चौकात ६ सप्टेंबर या दिवशी सकाळी एकनाथ निमगाडे या ७२ वर्षांच्या वृद्ध व्यक्तीवर काही अज्ञात व्यक्तींकडून गोळीबार करण्यात आल्याची घटना घडली. एकनाथ निमगाडे यांच्या हातावर ३ हून अधिक गोळ्या लागल्या आहेत. या घटनेनंतर निमगाडे यांना येथील इंदिरा गांधी रूग्णालयात प्रविष्ट केले आहे. हे आक्रमण संपत्तीच्या वादातून झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. गेल्या काही दिवसांत नागपूरमध्ये गुन्ह्यांचे प्रमाण वाढत असून त्याविषयी पोलीस प्रशासन कोणती उपाययोजना करणार आहे, अशी चर्चा नागपूरवासियांमध्ये चालू आहे. (राज्यातील कायदा सुव्यस्थेचे तीन-तेरा ! संपादक)

पूंछ सीमेवर पाककडून गोळीबार !

पाकच्या कुरापती कायमच्या रोखण्यासाठी भारत ठोस कारवाई कधी करणार ?
    जम्मू - पाककडून पूंछ सीमेवर गोळीबार करण्यात आला आहे. आठवड्याभरात दुसर्‍यांदा पाककडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले. भारतीय सैन्याने या गोळीबाराला प्रत्युत्तर दिले. पाकने भारताच्या ६ चौक्यांना लक्ष्य केले. या गोळीबारात कोणतीही जीवितहानी झाली नाही. याआधी २ सप्टेंबरला अखनूर भागात पाकने भारताच्या चौक्यांवर गोळीबार केला होता.

निरपराध व्यक्तीला कोठडीत डांबणार्‍या वाळपई पोलीस उपनिरीक्षकाला निलंबित करा !

     निरपराध व्यक्तीला विनाकारण अटक करून कोठडीत डांबल्याच्या आरोपाखाली दोषी ठरवून गोवा मानवाधिकार आयोगाने वाळपई पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक डी. सावंत यांना दंड ठोठावला. 

     हिंदु जनजागृती समिती ही अत्यंत मनापासून हिंदुसंघटनाचे काम करत आहे ! - पू. सुनील चिंचोलकर, पुणे       हिंदूंवर होणारे आघात हिंदूंनी निवडून दिलेल्या राज्यकर्त्यांमुळेच होत आहेत. त्यामुळे हिंदु धर्माच्या अधःपतनाला आपणच कारणीभूत आहोत. - ह.भ.प. शिवणीकर महाराज, पंढरपूर

देवद आश्रमातील साधकांचे आध्यात्मिक वडील असलेले सद्गुरु राजेंद्र शिंदे !

सद्गुरु राजेंद्र शिंदे
       ३ वर्षांपूर्वी मी देवद आश्रमात रहायला आल्यानंतर सद्गुरु राजेंद्रदादांशी संपर्क आला. या कालावधीत त्यांनी कधी पित्याच्या, कधी आईच्या मायेने, तर कधी मोठ्या भावाच्या रूपात एवढे प्रेम दिले की, त्यांच्याशी एवढी जवळीक कशी झाली, हे लक्षात आले नाही. स्वतःला अनेक शारीरिक त्रास असूनही सतत इतरांचा विचार करणार्‍या दादांच्या प्रेमभावाचे आणि व्यापकत्वाचे लक्षात आलेले काही पैलू त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने उलगडण्याचा एक छोटासा प्रयत्न येथे करत आहे.
सद्गुरु राजेंद्र शिंदे यांना वाढदिवसानिमित्त 
सर्व साधकांचा नमस्कार !

हिंदू तेजा जाग रे !

Jago !
    Islami Pak ki bhati Bharat ko Hindu Rashtra bananeka prayas safal nahi hoga ! - Shashi Tharoor, Congress - Dharmanirpeksh Congress ka Hindudwesh jano !
जागो !
   इस्लामी पाक की भांति भारत को हिन्दू राष्ट्र बनाने का प्रयास सफल नहीं होगा - शशी थरूर, कांग्रेस धर्मनिरपेक्ष कांग्रेस का हिन्दूद्वेष जानो !
प्रार्थना आणि भाव यांची जोड देऊन दृढ निश्‍चयाने प्रयत्न केल्यास आश्रमातून घरी गेल्यावरही साधना करणे शक्य असल्याविषयी सद्गुरु राजेंद्र शिंदे यांनी केलेले मार्गदर्शन

कु. वैदेही शिंदे
     दिवाळीला मी आश्रमातून घरी गेले होते. घरी गेल्यावर काही दिवस माझ्याकडून साधनेचे प्रयत्न झाले आणि नंतर झालेच नाहीत. त्यामुळे माझ्यावर पुष्कळ आवरण आले. माझे अनेक दोषही उफाळून येऊ लागले. त्यामुळे माझाच माझ्याशी पुष्कळ संघर्षही होऊ लागला. घरी आपण व्यष्टीचे प्रयत्न करत नाही. त्यामुळे त्रास वाढतो आणि आवरण येते. पुन्हा आश्रमात आल्यावर काही दिवस हे आवरण दूर करण्यात जातात. असे अनेक साधकांचे होत असल्याचे माझ्या लक्षात आले. तेव्हा यासाठी काय करायला पाहिजे ?, असे मी माझ्या बाबांना (पू. राजेंद्र शिंदे यांना) विचारले. तेव्हा त्यांनी पुढील सूत्रे सांगितली. साधनेच्या दृष्टीने ती अत्यंत महत्त्वाची असल्याने येथे देत आहे.

फलक प्रसिद्धीकरता

धर्मनिरपेक्ष काँग्रेसचा हिंदुद्वेष जाणा !
   पाकिस्तान ज्या प्रकारे इस्लामी देश झाला आहे, तसे स्वरूप भारताचे हिंदु राष्ट्र म्हणून करण्याचा भाजपचा डाव आहे. काँग्रेस हा प्रयत्न यशस्वी होऊ देणार नाही, असे उद्गार काँग्रेसचे नेते शशी थरूर यांनी काढले आहेत.

आम्ही चाललो साधनेच्या प्रवासी ।

श्री. शंकर नरुटे
आम्ही चाललो साधनेच्या प्रवासी ।
गुरुचरण धरूनी मोक्षाच्या मुळाशी ॥ धृ. ॥

गुरुदेवांचे चरण पाहूनी ।
सदैव गुरुचरणी मन राहूनी ॥ १ ॥

गुरुकृपेने काळी शक्ती काढूनी ।
गुरुकृपेने चैतन्य शक्ती भरूनी ॥ २ ॥

अहंकार गुरुचरणी सोडूनी ।
कृतज्ञताभावे गुरुचरणी हात जोडूनी ॥ ३ ॥

सद्गुरु राजेंद्र शिंदे यांनी व्यष्टी आढाव्यात सांगितल्याप्रमाणे प्रयत्न केल्यावर स्वतःत जाणवणारे पालट आणि आलेल्या अनुभूती

      गुरुपौर्णिमेला चार दिवस शेष असतांना आम्हा काही साधकांचा व्यष्टी साधनेचा आढावा सद्गुरु राजेंद्र शिंदे यांनी घेतला. त्या आढाव्यात त्यांनी व्यष्टी साधनेचे प्रयत्न त्या चार दिवसांत अधिक करण्यास सांगितले. त्या वेळी जाणवलेले आंतरिक पालट आणि आलेल्या अनुभूती पुढीलप्रमाणे आहेत. 
१. जाणवलेले आंतरिक पालट 
१ अ. कृतज्ञतेत वाढ होणे : आतापर्यंत प.पू. डॉक्टरांनी आपल्यासाठी काय केले आहे ?, ते आठवून त्याविषयी कृतज्ञता व्यक्त झाली. आतापर्यंत देवाने आपली किती काळजी घेतली आणि आताही घेत आहे, याची जाणीव झाली.
१ आ. तत्परता हा गुण अंगी येणे : आता आपल्याकडे वेळ अल्प आहे, या विचाराने सेवेच्या संदर्भातील सूत्र असल्यास लगेच ते पूर्ण करण्याचा भाग वाढला.

रुग्णाईत साधिकेला सर्वतोपरी साहाय्य करून तिला आधार देणारे सद्गुरु राजेंद्र शिंदे !

१. साधिकेला बरे वाटत नसल्याचे पाहून तिला साहाय्य म्हणून खोलीचे दार 
उघडून देणे आणि ती खोलीत जाईपर्यंत तिथे उभे रहाणे 
     नोव्हेंबर २०१५ मध्ये मला बरे वाटत नव्हते. तेव्हा एकदा मी नवीन वास्तूच्या पहिल्या माळ्यावरील जिन्याची दुसरी-तिसरी पायरी हळूहळू चढत होते. जिन्यावर अंधार होता. तेव्हा सद्गुरु राजेंद्रदादा मार्गिकेतून जात असतांना त्यांनी मला पाहिले आणि लगेच जवळ येऊन मला विचारले, बरे वाटत नाही का ? मी हो म्हटल्यावर त्यांनी मला मी रहात असलेल्या खोलीचा क्रमांक विचारला आणि त्या माळ्यावर जाऊन खोलीच्या दरवाजाची कडी काढून दार उघडून ठेवले. त्यानंतर कुणाला सहाय्याला पाठवू का ?, असेही विचारले. मी नको म्हटल्यावर मी खोलीत जाईपर्यंत ते जिन्याजवळ उभे होते. संत असूनही त्यांनी माझ्यासारख्या सामान्य साधिकेची सेवा केली. यासाठी मी सद्गुरु राजेंद्रदादांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करते.

गुरुशक्ती !

श्री. राम होनप
      कधी वाईट शक्तींचे आवरण, तर कधी मायेचे आवरण यांमुळे साधनेत शिथिलता येते. त्या वेळी आतून कुणीतरी सांगते, साधना कर. उठ साधना कर. थांबू नको. असे सांगून मला कुणीतरी सातत्याने पुढे ढकलत असते. मला जागृत करते. हीच ती गुरुशक्ती ! हेच ते गुरुदेव ! 
- श्री. राम होनप, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२४.६.२०१६)

तुझी भक्ती कशी करू, नाही कळत मजला गोविंदा ।

कु. दीपाली माळी
तुझ्याविना नाही श्‍वास, तुझ्याविना नाही प्राण ।
तूच एक दयावंत करी मजवरी कृपा अनंत ॥ १ ॥

तुझीया चरणांची दासी होण्या आतुर झाले माझे मन ।
कर रे कृपा मजवरी नाथा, तूच आमचा जयंत नाथ ॥ २ ॥

तुझी भक्ती कशी करू, नाही कळत मजला गोविंदा ।
तूच कृपेचा सागर मी त्यातील एक थेंब ।
या थेंबाला करशील का रे ? एकरूप तूच एक कृपावंत ॥ ३ ॥

- कु. दीपाली माळी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२६.८.२०१६)

धर्माचरण करणारी आणि श्रीकृष्णाप्रती भाव असणारी ५१ टक्के आध्यात्मिक पातळीची उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली म्हसावद, जळगाव येथील कु. गौरी घनश्याम बडगुजर (वय ११ वर्षे) !

कु. गौरी बडगुजर
भाद्रपद शुक्ल पक्ष षष्ठी (७.९.२०१६) या दिवशी म्हसावद, जळगाव येथील कु. गौरी बडगुजर हिचा तिथीनुसार वाढदिवस आहे. त्यानिमित्त तिच्या आईला तिची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये पुढे देत आहोत.
कु. गौरी बडगुजर हिला वाढदिवसाप्रीत्यर्थ
सनातन परिवाराच्या वतीने शुभाशीर्वाद !
१. गर्भारपणात श्री गणेशमूर्तीला प्रदक्षिणा घालत असतांना श्री गणेश हसत आहे, असे जाणवणे : माझी मोठी बहीण श्रीमती उषा बडगुजर हिने सांगितलेला नामजप मी गर्भारपणात करत होते. एके दिवशी दुपारी मी श्री गणेशमूर्तीला नामजप करत प्रदक्षिणा घालत होते. त्या वेळी मी श्री गणेशाच्या मूर्तीकडे बघितल्यावर श्री गणेश हसत आहे, असे मला जाणवले. मला त्रास होत असूनही मी प्रदक्षिणा घालत होते. शेवटी त्रास असह्य झाल्यावर मला रुग्णालयात भरती करण्यात आले. त्याच दिवशी सायंकाळी ६ वाजता बाळाचा जन्म झाला.

अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाला आलेल्या अधिवक्ता ईश्‍वरप्रसाद खंडेलवाल यांनी व्यक्त केलेले मनोगत आणि त्यांना जाणवलेले स्वतःतील पालट !

१. रामनाथी आश्रमात आल्यावर स्वतःत पालट जाणवू लागणे 
      मी गेल्या वर्षी अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाला आलो नव्हतो. तेव्हा मला वाटत होते, अधिवेशनात नुसती भाषणे देतील. सर्व जण ती ऐकून निघून जातील आणि नंतर काहीच होणार नाही. या वर्षी अधिवेशनासाठी आल्यावर मला रामनाथी आश्रमात निवास करण्याची संधी मिळाली आणि प्रतिदिन मला स्वतःत पालट जाणवू लागला. मी घरी प.पू. डॉक्टरांच्या छायाचित्राला उदबत्ती ओवाळतांना सूक्ष्मातून प्रतिदिन त्यांना विचारायचो, माझा क्रमांक कधी येणार ? इथे आल्यावर मला समजले. ते हेच सांगत होते.

सर्वांशी जवळीक साधणार्‍या, झोकून देऊन साहाय्य करणार्‍या आणि त्यागी वृत्तीच्या कु. सुप्रिया टोणपे !

कु. सुप्रिया टोणपे
   भाद्रपद शुक्ल पक्ष षष्ठी (७.९.२०१६) या दिवशी कु. सुप्रिया टोणपे यांचा वाढदिवस आहे. कु. सुप्रिया आणि त्यांची मोठी बहीण सौ. विजया या सनातनच्या रामनाथी आश्रमात पूर्णवेळ सेवा करत आहेत. कु. सुप्रिया यांची सौ. विजया यांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत.
कु. सुप्रिया टोणपे यांना वाढदिवसानिमित्त
सनातन परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा !
१. समजूतदारपणा
   लहानपणापासूनच सुप्रिया अतिशय समजूतदारपणे वागते. आम्ही दोघी अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असतांना दोघींची फी एकत्रित भरण्यास वडिलांना अडचण येत असे. त्या वेळी ती बाबांना म्हणायची, प्रथम ताईची फी भरा. कारण मला उशिरा फी भरलेली आवडत नव्हते. माझी फी तुम्ही उशिरा भरली, तरी चालेल. जर एकदम भरणे शक्य नसल्यास अर्धी फी आता आणि उरलेली फी नंतर, म्हणजे अर्धे वर्ष पूर्ण झाल्यानंतर भरली, तरी चालेल, असे ती सांगत असे.

पंचम अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाच्या काळात धर्माभिमान्यांकडून शिकायला मिळालेली सूत्रे

श्री. नितीन गावंड
१. विविध राज्यांतून आलेल्या धर्माभिमान्यांनी हिंदी भाषा येत नसूनही न अडखळता हिंदीत भाषण करणे, यावरून त्यांची प.पू. गुरुदेवांवरील श्रद्धा लक्षात येणे : अधिवेशनासाठी आलेले धर्माभिमानी विविध राज्यांतील होते. प्रत्येक धर्माभिमानी भाषण आरंभ करण्यापूर्वी त्याला हिंदी भाषा व्यवस्थित बोलता येत नसल्याचे सांगत होता; पण सर्व धर्माभिमान्यांची प.पू. गुरुदेवांवरील श्रद्धा आणि भाव यांमुळे अधिवेशनात बोलतांना त्यांच्यापैकी कुणीही एकदाही अडखळले नाहीत.
२. सातत्याने भावाच्या आणि शिकण्याच्या स्थितीत रहाणे : अधिवेशनासाठी आलेले धर्माभिमानी सातत्याने भावाच्या आणि शिकण्याच्या स्थितीत रहात होते. सर्वांमध्ये हिंदु राष्ट्राची (सनातन धर्म राज्याची) स्थापना आणि धर्मकार्य यांची अंतःकरणापासून तळमळ असल्याचे लक्षात आले.

श्री गणेशाची सात्त्विक मूर्ती बनवून ईश्‍वरप्राप्तीसाठी कला समर्पित करणारे सनातनचे मूर्तीकार-साधक श्री. गुरुदास खंडेपारकर यांना प.पू. डॉक्टरांनी दिलेले मूर्तीज्ञान आणि त्यांच्या चैतन्यानुभूती !


श्री. गुरुदास खंडेपारकर
परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचे अमृत महोत्सवी वर्ष
आणि गणेशोत्सव यानिमित्त गणेशभक्तांना भावभक्तीची भेट !
    सनातनचे मूर्तीकार-साधक श्री. गुरुदास खंडेपारकर यांनी अभिनव कला महाविद्यालय, पुणे येथे डी.एम्.सी., ए.टी.डी. आणि जी.डी. आर्ट (पेंटींग) चे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर वर्ष १९९६ ते २००० या कालावधीत मुंबईच्या एका प्रसिद्ध चित्रकारासमवेत ज्युनिअर आर्टिस्ट म्हणून काम केले. मूर्तीकला हा त्यांचा विषय नव्हता; पण त्यांच्या नोेकरीच्या ठिकाणी जे.जे. स्कूल ऑफ आर्ट्समधून शिल्पकलेचे शिक्षण घेतलेले दोघे जण होते. त्यांना मूर्ती बनवत असतांना श्री. गुरुदास यांनी पाहिले होते. अजंठा, खजुराहो येथील शिल्पकलाही जवळून पाहिली होती. त्यांच्या मामांकडे पारंपरिक पद्धतीने गणेशमूर्ती बनवल्या जातात. पुण्याला घरी असतांना त्यांनी सनातन संस्थेने प्रकाशित केलेल्या श्री गणेशाच्या चित्रावरून एक मूर्ती सिद्ध केली आणि प.पू. डॉक्टरांना दाखवण्यासाठी ती गोव्याला पाठवली. त्यानंतर गुरुदासदादा स्वतःच गोव्याला आले आणि ईश्‍वरप्राप्तीसाठी कला या विषयाच्या अभ्यासाला त्यांचा आरंभ झाला. संतांनी त्यांना श्री गणेशाची मूर्ती सिद्ध करण्यास सांगितली आणि येथे त्यांच्या मूर्तीकलेच्या सेवेचा श्रीगणेशा झाला.
    सात्त्विक गणेशमूर्ती कशी असावी, हे समाजाला समजावे, यासाठी सनातनने अधिकाधिक गणेशतत्त्व आकर्षित करणारी गणेशमूर्ती सिद्ध करण्यासाठी संशोधन चालू केले.

हरि ॐ तत्सत

संत भक्तराज
सनातनचे श्रद्धास्थान
हे असे आहे का ? ते तसे आहे का ? हे असेही नाही, तसेही नाही.
ते कशात नाही ? मग ते असेही आहे आणि तसेही आहे.
भावार्थ : हे असे आहे का ? मधील हे मायेविषयी आहे. ते तसे आहे का ? मधील ते ब्रह्मासंबंधी आहे. हे असेही नाही, तसेही नाही, म्हणजे म्हटले तर ही म्हणजे माया, असेही नाही म्हणजे दिसते तशी नसून ब्रह्म आहे आणि तशीही नाही म्हणजे ब्रह्म म्हटले तर ब्रह्मस्वरूपातही नाही. ते कशात नाही ? म्हणजे ब्रह्म सर्वत्र आहे, मायेतही आहे. मग ते असेही आहे आणि तसेही आहे म्हणजे माया आणि ब्रह्म दोन्ही एकच आहेत.
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण)


 
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥
या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो. - प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

सकारात्मकतेतील शक्ती !
घडणार्‍या गोष्टींकडे सकारात्मक दृष्टीकोनातून पाहिले की, आपल्या आयुष्यात घडणार्‍या प्रत्येक 
गोष्टीत आपले हितच आहे, याची जाणीव होते. नेहमी सकारात्मक बोलणारी व्यक्ती सर्वांना 
हवीहवीशी वाटते. नैराश्यपूर्ण विचारांची व्यक्ती समाजातील लोकांना नकोशी वाटते. 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले
    कुठे आई-वडिलांनाही वृद्धाश्रमात अडगळीप्रमाणे टाकून देणारी पाश्‍चात्त्य वळणाची हल्लीची पिढी, तर कुठे हे विश्‍वचि माझे घर, असे शिकवणार्‍या हिंदु धर्मातील आतापर्यंतच्या पिढ्या ! - (परात्पर गुरु) डॉ. आठवले 

आपचे पतन !

संपादकीय
      अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीच्या अर्थात आपच्या हातात देहलीकरांनी ६७ आमदारांचे दान टाकत प्रचंड विश्‍वास दाखवला; मात्र गेल्या दोन वर्षांतील त्याची वाटचाल पहाता लोकांनी त्यांच्या पायावर धोंडा मारून घेतला, असेच म्हणावे लागेल. प्रत्येक मासांत एकातरी आमदाराला आणि मंत्र्याला कोणत्या ना कोणत्या गुन्ह्यात अटक होतच आहे. नुकतेच अश्‍लील ध्वनीचित्रतबकडी प्रकरणात माजी मंत्री संदीप कुमार यांना कारागृहाची हवा खावी लागली. यातील त्यापुढील धक्कादायक बाब म्हणजे आपचे प्रवक्ता आशुतोष यांनी जे काही झाले ते सहमतीने झाले आणि यात संदीपकुमार यांचा काहीच दोष नाही, असे आमदार संदीप कुमार यांची पाठराखण करणारा लेख ब्लॉकवर प्रसारित केला आहे. त्यामुळे राष्ट्रीय महिला आयोगाने आशुतोष यांना नोटीस पाठवली आहे. या अगोदरच आशुतोष यांच्या विरोधात दोन पोलीस ठाण्यात दोन वेगवेगळ्या प्रकरणात गुन्हे प्रविष्ट झाले आहेत. असे नेते नेतागिरी करत असतील, तर ते समाजासाठी धोकादायक आहे.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn