Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।


कोटी कोटी प्रणाम !

आज ऋषिपंचमी

कोटी कोटी प्रणाम !

प.पू. कलावतीआई जयंती

कोटी कोटी प्रणाम !

श्री गजानन महाराज पुण्यतिथी, शेगाव

कोटी कोटी प्रणाम !

मच्छिंद्रनाथ जयंती

विशेष अन्वेषण पथकाचा (एस्आयटीची) सनातनच्या देवद आश्रमात येऊन तपास !

     देवद (पनवेल) - कॉ. पानसरे हत्या प्रकरणाचे अन्वेषण करणार्‍या विशेष अन्वेषण पथकाने (एस्आयटी) येथील सनातनच्या आश्रमात येऊन तपास केला. या वेळी त्यांच्यासमवेत कोल्हापूर स्थानिक पोलीस आणि पनवेल स्थानिक पोलीस होते. ३ ते ४ गाड्यांतून ४० ते ५० पोलीस आले होते. या वेळी त्यांनी आश्रम फिरून सर्व विभागांची पाहणी करून चित्रीकरण केले, तसेच छायाचित्रे काढली. या वेळी ते डॉ. तावडे यांनाही घेऊन आले होते. पोलिसांनी आश्रमातील वैद्यकीय विभाग आणि वाहन विभाग यांची झडती घेतली आणि एका साधकाची चौकशी केली.
तेच तेच अन्वेषण पुन्हा करण्यात वेळ वाया घालवणार्‍या अन्वेषण यंत्रणा !
     (डॉ. तावडे यांना सीबीआयने कह्यात घेतल्यावर त्यांची तसेच त्यांच्याशी संबंधित पनवेल आश्रमातील साधकांची चौकशी केली. त्यानंतर आता एस्आयटीने त्यांना कह्यात घेतले. एस्आयटीने त्यापुढील तपास करणे आवश्यक असतांना पुन्हा डॉ. तावडे यांना पनवेल आश्रमात आणून साधकांची चौकशी करण्यात काय हशील ? - संपादक)

डॉ. तावडे यांना अधिवक्त्यांना भेटू न देण्याचा खुलासा न्यायालयाने पोलिसांकडे मागितला !

सनातनद्वेषापोटी न्यायालयाचा आदेशही न जुमानणार्‍या अन्वेषण यंत्रणा !
     कोल्हापूर - सनातनचे साधक डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांना अधिवक्त्यांना भेटू न देण्याचा खुलासा न्यायालयाने ५ सप्टेंबरला सायंकाळनंतर पोलिसांकडे मागितला. यासंदर्भात त्यांच्या अधिवक्त्यांनी न्यायालयात अवमान अर्ज दाखल केला. ६ सप्टेंबर या दिवशी त्याची सुनावणी होईल.
     ३ सप्टेंबर या दिवशी जेव्हा डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांना न्यायालयात उपस्थित करण्यात आले. त्या वेळी डॉ. तावडे यांची चौकशी होत असतांना त्यांचे अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांना तेथे उपस्थित रहाण्यास न्यायालयाने अनुमती दिली होती. असे असतांना ४ सप्टेंबर या दिवशी एकदाही डॉ. तावडे यांना अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांना भेटू दिले नाही. डॉ. तावडे यांना त्यांचे अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांना का भेटू दिले जात नाही, याचे कोणतेही संयुक्तिक कारण पोलिसांनी दिले नाही. (न्यायालयाचा आदेश असूनही अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांना भेटू न देणार्‍या पोलिसांवर वरिष्ठांनी योग्य ती कारवाई करणे अपेक्षित आहे ! - संपादक)
     या संदर्भात अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी अपर पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा यांना भ्रमणभाष केल्यावर त्यांनी तो उचलला नाही. त्याच प्रकारे अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी या संदर्भात सिद्ध केलेले आवेदनही कोल्हापूर पोलिसांनी स्वीकारण्यास नकार दिला. त्यामुळे अखेर अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांना हे निवेदन फॅक्स करावे लागले.

ऐन सणांच्या, तसेच महत्त्वाच्या दिवशी सनातनचे साधक आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते यांना त्रास देणारे हिंदुद्वेषी पोलीस !

    
      ऐन सणासुदीच्या कालावधीत काहीतरी खुसपट काढून सनातनच्या साधकाला अटक करायची, त्याचा मोठा गाजावाजा करून साधकांची सर्वत्र मानहानी करायची आणि साधकांना सणांचा आनंदच मिळू द्यायचा नाही, असा चंगच जणू पोलिसांनी बांधला आहे, हेच यातून दिसून येते.

प्रत्येक व्यक्तीने आपले कर्म योग्यच करायला हवे, अन्यथा त्याचे पाप लागते ! - प.पू. पांडे महाराज

प.पू. पांडे महाराज
पोलिसांनो, हे लक्षात घ्या !
१. कर्म करतांना सतर्क रहाणे आवश्यक; 
कारण चुकीचे कर्म करणार्‍याला महापाप लागते !
     प्रत्येक व्यक्तीने आपल्या हातून चुकीचे कर्म होऊ नये, यासाठी सतर्क राहिले पाहिजे; कारण आपण केलेल्या कर्माचे फळ आपल्याला भोगावे लागते. आपल्या हातून घडलेल्या कुकर्मांसाठी आपल्याला मृत्यूनंतरही यमयातना भोगाव्या लागतात. प्रत्येक कर्म माणुसकीला धरून असायला हवे. चांगल्या व्यक्तीला त्रास देणे, हे अत्यंत चुकीचे कर्म आहे. यामुळे त्या व्यक्तीला महापाप लागते. हा धर्मशास्त्राचा नियम लक्षात घेऊन सर्वांनी योग्य कर्म केले पाहिजे.
२. पोलिसांना त्यांच्या कुकर्मांचा परिणाम भोगावा 
लागत असणे, तसेच त्यांचे जीवनच धोक्यात आले असणे
     काही पोलिसांकडून चुकीचे कर्म होत आहे. प्रत्यक्षात पोलिसांनी एखाद्या व्यक्तीला संशयित म्हणून पकडल्यावर त्याला त्रास देण्याची कार्यपद्धत नाही, तरीही पोलिसांकडून चांगल्या व्यक्तींनाही त्रास दिला जात आहे. दुष्ट व्यक्तींना सवलती दिल्या जातात आणि चांगल्या व्यक्तींना नाहक त्रास दिला जातो. पोलिसांच्या या कर्माचा परिणाम म्हणून सध्या गुंड, नक्षलवादी आणि आतंकवादी हेच पोलिसांवर आक्रमण करत आहेत.

खरे आरोपी सोडून हिंदुत्वनिष्ठ संघटनांना लक्ष्य करणे, हे आंतरराष्ट्रीय षड्यंत्र ! - संजय राऊत, खासदार, शिवसेना

    
संजय राऊत
गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्रात आणि देशात हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे पद्धतशीरपणे खच्चीकरण करण्याचे कारस्थान चालू आहे. एकवेळ पाकिस्तानातून लष्कर-ए-तोयबा सारख्या संघटनांनी उघडपणे आक्रमण केले, तर ते समजण्यासारखे आहे; पण आमच्याच हिंदुस्थानात एखाद्या विशिष्ट समाजाला बरे वाटावे यासाठी, तसेच स्वत: निधर्मी वा धर्मनिरपेक्ष आहोत हे दाखवण्यासाठी हिंदूंना खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवणे अन् त्यांच्या कार्यकर्त्यांना आतंकवादी ठरवणे, असे प्रकार चालू आहेत. हे हिंदु धर्माच्या अन् देशाच्या मूळावर उठणारे आहे. सनातन संस्थेविषयी काही आक्षेप असतील, तर ते कायद्याच्या चौकटीत राहून त्याची चौकशी होऊ शकते. त्याच्यामध्ये खरोखर काही वेडेवाकडे करणारे लोक दुर्दैवाने आढळले असतील, तर तपासतकार्यात देखील ते सहकार्य करू शकतील किंवा गुन्हेगार म्हणून त्यांच्यावर कारवाई होऊ शकेल. तथापि काही नसतांना अशाप्रकारे संघटना संपवायची, कार्यकर्त्यांचे खच्चीकरण करायचे आणि निरपराध्यांना फासावर लटकवायचे, हे कर्नल पुरोहित, साध्वी प्रज्ञासिंह यांच्या प्रकरणातदेखील सिद्ध झाले आहे.

मंगलमय वातावरणात गणरायाचे आगमन !

पुणे, ५ सप्टेंबर - महाराष्ट्राचे आराध्यदैवत असलेल्या श्री गणरायाचे घरोघरी गणेश चतुर्थीला म्हणजे भाद्रपद शुद्ध चतुर्थीला मंगलमय वातावरणात आगमन झाले. गणेशभक्तांचे आकर्षण असलेल्या पुण्यातील मानाच्या गणपतींचीही पारंपरिक पद्धतीने काढलेल्या मिरवणुकीनंतर प्राणप्रतिष्ठा झाली. गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. गणपति बाप्पा मोरयाच्या गजरात श्री गणरायांची प्रतिष्ठापना झाली.

काश्मीरमधील ३७० वे कलम रहित करा ! - पनून काश्मीरची मागणी

हिंदुस्थान शासन आणि भारतीय सैन्य यांच्या समर्थनार्थ निदर्शने आणि रक्तदान शिबीर
पनून काश्मीरमधून ३७० कलम हटवण्यासाठी आंदोलन करतांना धर्माभिमानी
     पुणे, ५ सप्टेंबर (वार्ता.) - आतंकवादी आणि फुटीरतावादी यांच्या कारवायांमुळे आम्हाला आमच्याच देशात निर्वासित म्हणून रहाण्याची दुर्दैवी परिस्थिती ओढवली आहे. आम्हाला पूर्वीसारखाच शांत आणि भारताचे नंदनवन असलेला काश्मीर हवा आहे, अशा शब्दांत 'युथ फॉर बनून काश्मीर'चे प्रमुख राहुल कौल यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या. पुणे येथे रहाणार्‍या काश्मिरी पंडितांनी ३ सप्टेंबर या दिवशी बालगंधर्व चौकात भारत शासन आणि सैन्यदल यांच्या समर्थनार्थ निदर्शनांचे आयोजन केले होते. त्या वेळी ते बोलत होते. सर्वांनी काश्मीरमधील ३७० वे कलम रहित करण्याची एकमुखी मागणी केली. रक्तदान शिबिरामध्ये ५० हून अधिक राष्ट्राभिमान्यांनी रक्तदान करून त्यांचे राष्ट्रकर्तव्य बजावले. 

पानसरे खून प्रकरणात पोलिसांनी सनातनचे साधक डॉ. तावडे यांचा केलेला छळ आणि त्यांना गोवण्याचा केलेला अश्‍लाघ्य प्रयत्न !

श्री. अजय केळकर
१. डॉ. तावडेंना कधीही घेऊन येऊ अशा दिमाखात पुण्यात गेलेल्या 
कोल्हापूरच्या एस्आयटी पथकावर ओढवलेली नामुष्की ! 
      कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरणात कोल्हापूर येथील विशेष तपास पथक (एस्आयटी) हे १ सप्टेंबर या दिवशी सनातन संस्थेचे साधक डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांना कह्यात घेण्यासाठी पुणे येथील येरवडा कारागृहात गेलेे होते. (डॉ. तावडे यांना दाभोलकर खून प्रकरणात सीबीआयने गुंतवून ठेवले असून ते कारागृहात आहेत.) कधीही जाऊ आणि तावडेंना आणू, अशा दिमाखात गेलेल्या कोल्हापूरच्या एस्आयटी पथकाचे कायदेशीर ज्ञानाचे वाभाडे येरवडा कारागृहाच्या अधिकार्‍यांनी काढले. तुम्ही २० जूनला तावडेंना कह्यात घेण्याची अनुमती घेतली. आणि आता इतक्या दिवसांनी प्रत्यक्ष कह्यात घ्यायला येताय ? हे अयोग्य आहे. तुम्हाला पुन्हा अनुमती काढली पाहिजे, असे सांगत कारागृह अधिकार्‍यांनी दुपारी तीन गाड्यांचा ताफा घेऊन गेलेल्या कोल्हापूर पोलिसांना कारागृहाबाहेर काढले. या ताफ्यात या विशेष पथकाचे प्रमुख आणि महाराष्ट्राच्या गुन्हे अन्वेषण शाखेचे प्रमुख संजयकुमारही होते हे विशेष ! अशी नामुष्की ओढवल्यावर या पोलीस पथकाला नाईलाजाने पुन्हा दुसर्‍या दिवशी पुण्यातील न्यायालयाचे दरवाजे खटखटावे लागले. शेवटी संध्याकाळी कधीतरी न्यायालयाने अनुमती दिल्यावर त्याच घाईत त्यांनी डॉ. तावडे यांना कह्यात घेतले आणि शेवटी हा ताफा कोल्हापूरच्या दिशेने निघाला.

गणेशोत्सवात मुंबई येथे ४५ सहस्र, तर पुणे येथे ८ सहस्र पोलिसांचा खडा पहारा !

सुरक्षित आणि निर्विघ्न गणेशोत्सव पार 
पाडण्यासाठी हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) स्थापनेविना पर्याय नाही ! 
     मुंबई, ५ सप्टेंबर - मुंबई आणि पुणे शहरातील गणेशोत्सव उत्सव निर्विघ्नपणे पार पडावा, म्हणून मुंबई आणि पुणे पोलिसांकडून कडेकोट बंदोबस्त करण्यात येणार आहे. उत्सवाच्या कालावधीत मुंबईत ४५ सहस्र, तर पुण्यात ८ सहस्र पोलिसांचा खडा पहारा असणार आहे. 

शाडूच्या मातीची गणेशमूर्ती घडवणार्‍या 'गणेश कला केंद्रा'चा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार

'महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळा'चा उपक्रम 
'गणेश कला केंद्रा'ने घडवलेली मूर्ती मुख्यमंत्र्यांना भेट देतांना विद्यार्थिनी
     मुंबई - 'महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळा'च्या वतीने 'बिग ग्रीन' गणेशा या कार्यक्रमात शाडूच्या मातीच्या गणेशमूर्ती बनवणार्‍या 'गणेश कला केंद्रा'चा २ सप्टेंबर या दिवशी मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या वेळी श्री गणेश कला केंद्राचे सर्वश्री प्रमोद बेंद्रे, विनोद बेंद्रे आणि चैतन्य तागडे उपस्थित होते. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून मुख्यमंत्र्यांसह अभिनेते जॅकी श्रॉफ, अन्नू कपूर, तसेच विशेष अथिती म्हणून पर्यावरण विभागाच्या सचिव श्रीमती मालिनी शंकर, सदस्य सचिव डॉ. पी. अन्बल्गन, तसेच प्रमुख पाहुणे म्हणून पर्यावरण राज्यमंत्री श्री. प्रवीण पोटे-पाटील उपस्थित होते. प्रदूषण मंडळाचे जनसंपर्क अधिकारी श्री. संजय भुस्कुटे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. 

सरकारपक्षाच्या युक्तिवादाच्या अधिवक्ता श्री. वीरेंद्र इचलकरंजीकर यांच्याकडून चिंधड्या !

युक्तीवादाच्या वेळी अधिवक्ता श्री. वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी उपस्थित केलेली सूत्रे 
१. आज पोलीस काहीतरी खराखुरा पुरावा घेऊन आले असतील, असे वाटले होते; परंतु पोलीस पुन्हा तोच जुना साक्षीदार घेऊन आले आहेत. साडविलकरांची साक्ष दाभोलकर खून प्रकरणी सीबीआयने घेतली आहे. ते जगजाहीर आहे. कोल्हापूर पोलीस आणि सीबीआय या दोहोंनीही आम्ही परस्पर सहकार्याने अन्वेषण करत आहोत, हे माननीय उच्च न्यायालयासमोर अनेकदा मान्यही केले आहे (उच्च न्यायालयाचे आदेश वाचून दाखवले). खरेतर कोल्हापूर पोलिसांनी येथून आरंभ करायला पाहिजे होते; परंतु त्यांनी हे लपवले आहे. ज्या व्यक्तीचा जबाब आधी नोंदवला गेला आहे, दोन्ही यंत्रणांनी मिळून तपास केला आहे, त्या व्यक्तीकडून नवीन काय नोंदवले गेले आहे, हे पोलिसांनी खरे तर आज मांडायला हवे होते. ते त्यांनी मांडलेले नाही.

अधिवक्ता समीर पटवर्धन आणि अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांचा अभ्यासपूण र्युक्तीवाद !

 
अधिवक्ता समीर पटवर्धन
अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर
      अधिवक्ता समीर पटवर्धन आणि अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांचा न्यायालयातील युक्तीवाद अत्यंत अभ्यासपूर्ण, सडेतोड, सूसूत्रबद्ध आणि सत्यान्वेषी होता. याउलट शासकीय अधिवक्ता आणि पोलीस यांच्याकडे अशी कोणतीच विशेष सूत्रे नव्हती. या संदर्भात पत्रकारांमध्येही चर्चा होती.सनातनचे साधक डॉ. तावडे यांना पुरवण्यात येणार्‍या सुरक्षेविषयी विशेष तपास पथकाकडून अक्षम्य हेळसांड दर्शवणारी उदाहरणे !

दैनिक तरुण भारत : ३.९.२०१६ 
दैनिक पुढारी : ३.९.२०१६ 

'थँक गॉड बाप्पा...' या गाण्यातून केलेले श्री गणेशाचे मानवीकरण म्हणजे श्री गणेशाचे विडंबनच !

     गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर एका अभिनेत्याकडून 'थँक गॉड बाप्पा...' या गाण्याचा व्हिडिओ 'यू ट्यूब'वर ठेवण्यात आला आहे. या गाण्यात केलेले श्री गणेशाचे मानवीकरण असे - 

हिंदु जनजागृती समिती आणि लष्कर-ए-हिंद यांच्या वतीने पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवड परिसरात 'श्री गणेशमूर्तीचे शास्त्रानुसार विसर्जन करा' याविषयी मोहीम !

     हिंदु जनजागृती समिती आणि लष्कर-ए-हिंद यांच्या वतीने 'श्री गणेशमूर्तीचे शास्त्रानुसार वहात्या पाण्यात विसर्जन करण्या'च्या संदर्भात पुण्यातील ओंकारेश्‍वर मंदिर, भिडे पूल आणि एस्.एम्. जोशी पूल या ठिकाणी ६, १० आणि १५ सप्टेंबर या दिवशी सकाळी ९ ते रात्री ९ या वेळेत भाविकांचे प्रबोधन करण्यात येणार आहे. अशीच मोहीम चिंचवड येथील बिर्ला हॉस्पिटलजवळ, श्री मोरया गोसावी मंदिर, श्री धनेश्‍वर मंदिर, तानाजीनगर येथील घाट, तसेच देहू, औंध, रावेत, मोशी आणि चिखली येथेही ६, १०, ११ आणि १५ सप्टेंबर या दिवशी घेण्यात येणार आहे. या मोहिमेत सहभागी होऊ इच्छिणार्‍यांनी ८९८३३३५५१७ या क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

सोलापूर येथे गणेशमूर्तीदान या धर्मद्रोही मोहिमेच्या विरोधात प्रशासनाला निवेदन

     सोलापूर - येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने महानगरपालिका आयुक्त श्री. काळम पाटील तसेच पोलीस आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. सोलापुरातील तलावांमध्ये सांडपाणी मिसळल्याने होणार्‍या प्रदूषणाकडे महानगरपालिका दुर्लक्ष करत असून मूर्तीदानाच्या नावाखाली हिंदूंच्या भावना पायदळी तुडवल्या जात आहेत, असे या निवेदनात म्हटले आहे. 
     या वेळी माजी नगरसेवक श्री. बापू ढगे, धर्माभिमानी कु. अर्चना कडगंची, सर्वश्री गजानन दलभंजन, बाबुराव कोळी, दत्तात्रय पिसे आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

श्री गणेशमूर्तीदानासारखी धर्मशास्त्रविरोधी कृती न करता मूर्तीचे पारंपरिक पद्धतीने विसर्जन करून श्री गणेशाची कृपा संपादन करावी !

वाचक, हितचिंतक आणि विज्ञापनदाते यांना विनंती
     'महाराष्ट्रात काही ठिकाणी धर्मद्रोही संघटनांकडून श्री गणेशमूर्तीदान मोहीम राबवण्यात येते. जलप्रदूषण, दुष्काळ, पाण्याची टंचाई अशी कारणे देत 'श्री गणेशमूर्तीदान करा', असे या संघटनांकडून सांगण्यात येते. देवतांचे दान देणे वा घेणे, हा देवतांचा अपमान आहे. श्री गणेशमूर्ती दान केल्यानंतर तिचे यथासांग विसर्जन होईल, याची शाश्‍वती नसते. श्री गणेशचतुर्थीस प्राणप्रतिष्ठापना केलेल्या मूर्तीचे विसर्जन करावे, असा शास्त्रोक्त विधीच आहे. त्यामुळे श्री गणेशमूर्तीदान न करता तिचे पारंपरिक पद्धतीने विसर्जन करून श्री गणेशाची कृपा संपादन करावी.'

दगडूशेठ हलवाई गणपतीसमोर सहस्रो महिलांच्या अथर्वशीर्ष पठणाने वातावरण चैतन्यमय !

    पुणे, ६ सप्टेंबर (वार्ता.) - येथील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीकडून गेल्या २९ वर्षांपासून गणेशोत्सवात ऋषिपंचमी या दिवशी श्री गणपति अथर्वशीर्षाचे सामूहिक पठण करण्यात येते. अशाच प्रकारे यंदाच्या वर्षी ६ सप्टेंबर या दिवशीही २१ सहस्र महिलांनी पहाटे अथर्वशीर्ष पठण सामूहिकरीत्या केल्यावर वातावरणात चैतन्य पसरले. यात हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते आणि सनातन संस्थेच्या साधक सहभागी झाले होते. या वर्षी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपति मंडळाने महाबलीपुरम (चेन्नई) येथील शिवमंदिराचा देखावा सिद्ध केला आहे.

फलक प्रसिद्धीकरता

मुसलमान आरोपींच्या धार्मिक अधिकारांचे हनन करण्याचे धाडस पोलिसांत आहे का ?
     कॉ. पानसरे यांच्या हत्येप्रकरणी विशेष अन्वेषण पथकाच्या कह्यात असलेले सनातनचे साधक डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांचा अमानुष छळ चालू आहे. पोलीस कोठडीत डॉ. तावडे हे जपाची माळ घेऊन नामजप करत होते. ही माळ पोलिसांनी काढून घेतली.

हिंदू तेजा जाग रे !

Jago ! : Pansare hatya prakaranme aropi Sanatanke sadhak Dr. Tawdejiki japmala policene nikalva li.
     Kya kabhi anya Dharmiya aropiyoka aisa dharmik hanan hua hai
जागो !
: पानसरे हत्या प्रकरण में आरोपी सनातन के साधक डॉ. तावडे जी की जपमाला पुलिस ने निकलवा ली.
     क्या कभी अन्य धर्मीय आरोपियों का ऐसा धार्मिक हनन हुआ है ?

भोपाळजवळील गावामध्ये गोमांस नेत असल्याच्या संशयावरून ट्रक जाळला !

     भोपाळ - भोपाळ शहरापासून ४० किमी अंतरावर असलेल्या जोहरा येथे गोमांस नेत असल्याच्या संशयावरून गोरक्षकांनी ट्रक पेटवून दिल्याची आणि चालकाला मारहाण केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी १५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तर दोघांना अटक करण्यात आली आहे. मध्यप्रदेशातून उत्तरप्रदेशातील मानपूर येथे हा ट्रक जात होता. ट्रक खराब झाल्याने दुरुस्तीसाठी थांबल्यानंतर ट्रकमधून उग्र वास येत असल्याने ट्रक पेटवून देण्यात आला.

मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड मुसलमानांचा सर्वांत मोठा शत्रू ! - गीतकार जावेद अख्तर

     नवी देहली - मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड मुसलमानांचा सर्वांत मोठा शत्रू आहे, अशी टीका गीतकार जावेद अख्तर यांनी ट्विटद्वारे केली आहे. तीन वेळा तलाक म्हणत घटस्फोट देण्याच्या प्रथेला योग्य ठरवल्याच्या प्रकरणी त्यांनी ही टीका केली आहे.

चीनचे राष्ट्रपती आणि पंतप्रधान मोदी यांची आतंकवादावर चर्चा !

आतंकवादी पोसणार्‍या पाकशी मैत्री 
करणार्‍या चीनशी आतंकवादावर चर्चा करण्यात काय हशील ? 
     हांगझाऊ (चीन) - ४ सप्टेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांची येथे जी-२० शिखर परिषदेच्या अनुषंगाने भेट झाली. या वेळी दोघांनी चीन-पाक यांच्यातील आर्थिक मार्गिका आणि आतंकवाद यांवर चर्चा झाली. भारतासमवेत संबंध सुधारण्यास आणि सहकार्य वाढवण्यास आपण सिद्ध आहोत, असे शी जिनपिंग म्हणाले. (पंतप्रधान मोदी पाठीत खंजीर खुपसण्याची वृत्ती असलेल्या चीनच्या नेत्यांच्या आश्‍वासनांना भुलणार नाहीत, अशी आशा आहे. संबंध सुधारण्यास चीन सिद्ध असेल, तर वारंवार सीमेवर त्यांचे सैनिक करत असलेली घुसखोरी त्यांनी आधी थांबवावी. - संपादक) खूप कठीण परिस्थितीतून दोन्ही देशांमध्ये आता चांगले संबंध निर्माण झाले आहेत, अ
सेही ते म्हणाले.

श्री. मनोज खाडये यांचा पाशवी छळ करणारे खाकी वर्दीतील रक्षक नव्हे भक्षक पोलीस !

सामाजिक, धार्मिक किंवा राष्ट्रहितैषी... 
उपक्रम कोणताही असो, पोलिसी छळ ठरलेलाच !
श्री. मनोज खाडये
     नवरात्रोत्सवात होणारे अपप्रकार रोखण्यासाठी आणि हा उत्सव धर्मशास्त्रानुसार साजरा करण्यासाठी सनातन संस्था प्रतिवर्षी मोहीम राबवते. वर्ष २००० मधेही सिंधुदुर्ग जिल्ह्यात अशीच मोहीम राबवण्यात येत होती. या वेळी सनातनद्वेष्ट्या उद्योजकाच्या दबावाला बळी पडून पोलिसांनी सनातनचे कुडाळ येथील साधक श्री. मनोज खाडये यांना कारागृहात डांबून छळले. 
प्रशासनाला साहाय्य करणार्‍या साधकांनाच 
चोर ठरवण्याचा अश्‍लाघ्य प्रकार !
     नवरात्रोत्सवातील अपप्रकार रोखण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळच्या तहसीलदारांनी स्थानिक नवरात्रोत्सव मंडळांची एकत्रित बैठक आयोजित केली होती. सनातन संस्थेकडून धार्मिक पद्धतीने आणि शास्त्रानुसार नवरात्रोत्सव साजरा होण्यासाठी सातत्यपूर्ण चालू असलेल्या प्रबोधनामुळे सदर बैठकीला सनातन संस्थेच्या प्रतिनिधीला उपस्थित रहाण्याचे निमंत्रणही होतेे. कार्यालयीन कर्मचारी मर्यादित असल्याने मंडळांना निमंत्रण देण्यासाठी तहसीलदारांनी साधकांना विनंती केली. या विनंतीला अनुसरून संस्थेचे साधक श्री. मनोज खाडये आणि श्री. तात्या म्हापणकर यांनी निमंत्रण पत्रे संबंधित मंडळांना देण्यासाठीचे नियोजन करण्यात आले. पहिली निमंत्रण पत्रिका स्थानिक उद्योजक आणि एका नवरात्रोत्सव मंडळाचे सदस्य बापू नाईक यांना देण्यात आली. सदर व्यक्ती ही सनातनद्रोही असल्याने ते पत्र घेऊन ते तहसीलदारांकडे गेले आणि त्यांनी तहसीलदारांना शासकीय पत्राचे वाटप सनातन संस्थेकडे दिल्याविषयी तक्रार करणार, अशी धमकी दिली. त्यांना तुमची नोकरी घालवतो, असा दबाव आणून निमंत्रण पत्रे चोरीला गेली, अशी तक्रार पोलीस ठाण्यास देण्यास भाग पाडले.

मडगाव स्फोट प्रकरणात सनातनच्या निरपराध साधकांचा करण्यात आलेला अमानुष छळ !

     वर्ष २००९ मध्ये मडगावला एका गाडीत स्फोट झाल्यावर त्यात सनातन संस्थेचे दोन साधक मृत्यूमुखी पडले. असे असूनही सनातन संस्थेला अपकीर्त करण्याच्या उद्देशाने काँग्रेसच्या इशार्‍यावर नाचणार्‍या कठपुतळी बाहुल्यांप्रमाणे पोलिसांनी कसलीही पूर्वकल्पना न देता साधकांना केलेली अटक, उभे केलेले खोटे साक्षीदार आणि खोटे पुरावे, साधकांना दिलेले असह्य शारीरिक आणि मानसिक त्रास, इत्यादी छळांची मालिका येथे देत आहोत. (याविषयीची सविस्तर लेखमालिका दैनिक सनातन प्रभातमध्ये यापूर्वी प्रसिद्ध झाली आहे.)
     ४ वर्षे कारागृहात शारीरिक आणि मानसिक असह्य त्रास सहन केल्यानंतर न्यायालयाने या साधकांची ३१.१२.२०१३ या दिवशी निर्दोष मुक्तता केली.

वस्तूनिष्ठ वार्तांकन करणार्‍या सनातन प्रभातच्या वार्ताहरास अटक करून त्याला छळणारे रझाकार पोलीस !

दैनिक सनातन प्रभातची सत्यनिष्ठ पत्रकारिता चिरडण्यासाठी 
पोलिसांकडून चालवण्यात आलेल्या छळाची ज्वलंत उदाहरणे !
      दैनिक सनातन प्रभातचे सांगोला (जिल्हा सोलापूर) येथील वार्ताहर श्री. संतोष पाटणे यांना पोलिसांनी १४ ऑगस्ट २०११ अर्थात् राखी पौर्णिमेच्या रात्री अटक केली होती. १२ ऑगस्ट २०११ ला सांगोला येथे झालेल्या हिंदू आणि धर्मांध यांच्यामधील तणावाचे वस्तूनिष्ठ वृत्त १३ ऑगस्टच्या दैनिक सनातन प्रभातमध्ये प्रसिद्ध झाले होते. या वृत्ताने जातीय तेढ निर्माण झाली, असे कारण सांगत पोलिसांनी श्री. पाटणे यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. यामध्ये दैनिक सनातन प्रभातचे तत्कालीन समूह संपादक पू. पृथ्वीराज हजारे आणि तत्कालीन समादेशक (सल्लागार) संपादक श्री. अरविंद विठ्ठल कुळकर्णी यांचाही समावेश करण्यात आला होता. (एखाद्या घटनेचे वास्तववादी वृत्त दिले, तर त्यात चूक काय ? दैनिक सनातन प्रभात नेहमी सत्यच छापत आले आहे. त्याचा पोलिसांना राग येतो का ? पोलिसांनी अशी तक्रार दाखल करून पत्रकारितेच्या स्वातंत्र्यावर घाला घालण्याचे काम केले. अशा सांगोला पोलिसांचा निषेध करावा तितका अल्पच आहे ! - संपादक)

सनातन प्रभातचे सातारा येथील वार्ताहर श्री. राहुल कोल्हापुरे यांचा आणि त्यांच्या कुटुंबियांचा मानसिक छळ !

श्री. राहुल कोल्हापुरे 
       महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येच्या प्रकरणी सातारा येथील दैनिक सनातन प्रभातचे वार्ताहर श्री. राहुल कोल्हापुरे यांची पोलिसांनी २० ऑगस्ट ते २८ ऑगस्ट २०१३ या कालावधीत प्रतिदिन चौकशी केली. त्याचबरोबर पोलिसांनी श्री. कोल्हापुरे यांचा भाऊ, पत्नी, आई-वडील यांच्याकडेही वारंवार चौकशी करून त्यांना मानसिक त्रास दिला. 
     २० ऑगस्ट या दिवशी सकाळी ७.३० वाजता डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या झाली. त्यानंतर सकाळी ११.३० वाजता पोलीस सातारा येथे श्री. राहुल कोल्हापुरे यांच्या घरी आले. तेव्हा श्री. कोल्हापुरे घरी नव्हते. पोलिसांनी श्री. कोल्हापुरे यांच्या भावाकडून घराची कागदपत्रे आणि भावाचे वाहन अनुज्ञप्तीपत्र (ड्रायव्हिंग लायसन्स) यांची छायांकित प्रत सक्तीने घेतली. त्यानंतर श्री. कोल्हापुरे यांना भ्रमणभाषवर संपर्क केला आणि त्यांना एका जवळच्या ठिकाणी भेटण्यास बोलावले. श्री. कोल्हापुरे तेथे गेल्यावर त्यांनी त्यांच्या व्यवसायाच्या ठिकाणची माहिती, ते कुठे काम करतात ? त्यांची संपत्ती किती आहे ? सनातन प्रभातसाठी किती दिवसांपासून कार्य करत आहेत ? सनातन संस्था काय कार्य करते ? हिंदु जनजागृती समिती काय कार्य करते ? आदींविषयी माहिती विचारली.

संशयिताचे नातेवाईक असल्याबद्दल राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने केलेला दोन साधकांचा अमानुष छळ !

१. अत्याचारी मोगलांनाही लाजवणारे राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणांच्या अधिकार्‍यांचे क्रूर वर्तन !
      मडगाव स्फोटातील एका संशयिताच्या चौकशीसाठी राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने ५ फेब्रुवारी २०१२ पासून सनातनच्या ६ साधकांची सातत्याने चौकशी केली. चौकशीच्या नावाखाली सदर यंत्रणेने साधकांचा अमानुष छळ केला. चौकशीच्या नावाखाली अंगावरील पूर्ण कपडे काढून, केस ओढून लाथा-बुक्क्यांनी अमानुष मारहाण केली. आतंकवादी आणि गुंड यांना लाजेने मान खाली घालायला लावणार्‍या राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेच्या अधिकार्‍यांनी २ साधकांच्या घरी पोलिसांना पाठवून त्यांची वाहन अनुज्ञप्ती, मतदान ओळखपत्र, आधार कार्ड, विवाहाचा अल्बम, रेशन कार्ड, शाळेची प्रमाणपत्रे आदी कागदपत्रे कोणतीही पावती अथवा पोच न देता नेली.

शस्त्रास्त्रे बाळगल्याच्या खोट्या गुन्ह्याखाली सनातन प्रभातचे वितरण करणार्‍या तीन साधकांना अटक करणारे मिरज पोलीस !

      २ सप्टेंबर २००९ या दिवशी मिरज शहरात अफझलखानवधाच्या चित्रावरून दंगल झाली. धर्मांधांनी या वेळी पोलिसांदेखत श्री गणेशाच्या मूर्तींवर दगडफेक केली, मूर्तींची विटंबना केली. या घटनेची दैनिक सनातन प्रभातने गंभीर दखल घेऊन दंगलीची वस्तूस्थिती जनतेसमोर मांडली; परंतु हे पोलिसांच्या पचनी पडले नाही. 
      ५ सप्टेंबर २००९ या दिवशी सकाळी दैनिक सनातन प्रभातच्या सांगली, कोल्हापूर, सातारा, सोलापूर या आवृत्तीच्या मुद्रणाकरता सनातन प्रभातच्या कार्यालयातील सर्वश्री महेंद्र यशवंत सहस्रबुद्धे, तसेच इतर दोन वितरक चारचाकी वाहनाने नेहमीप्रमाणे मिरज येथून सांगली येथे गेले होते. त्यानंतर रात्री १२.३० वाजता मिरज शहरात संचारबंदी लागू झाल्याचे प्रशासनाने घोषित केले. या विषयीची कोणतीही पूर्वकल्पना नसल्याने नेहमीप्रमाणे मुद्रणालयातून दैनिकाचे अंक घेऊन वितरणासाठी गेलेले साधक ६ सप्टेंबर २००९ या दिवशी सकाळी ५.४५ वाजण्याच्या सुमारास सांगली येथून मिरज येथे वाहनाने येत होते. मिरज पोलिसांनी या साधकांना वाहन आणि दैनिकाचे गठ्ठे यांच्यासह कह्यात घेतले.

तत्कालीन वार्ताहर श्री. आनंद जाखोटिया यांनी अनुभवलेली दंडुकेशाही !

श्री.आनंद जाखोटिया
       २७.२.२००८ या दिवशी सांगली येथे शीवतीर्थावर सभा घेत असतांना श्री शिवप्रतिष्ठानचे संस्थापक पू. संभाजीराव भिडेगुरुजी आणि त्यांचे कार्यकर्ते यांच्यावर पोलिसांनी अमानुष लाठीहल्ला केला. यानंतर हिंदुत्वनिष्ठ आणि पोलीस यांच्यातील हातघाईत पोलिसांनी अनेक वेळा लाठीमार केला. पोलिसांच्या या दंडुकेशाहीचा अनुभव या वेळी या बातमीच्या वृत्तसंकलनासाठी गेलेले दैनिक सनातन प्रभातचे वार्ताहर श्री. आनंद जाखोटिया यांनाही आला. पोलिसांच्या काही लाठ्या श्री. जाखोटिया यांनाही खाव्या लागल्या. पोलिसांच्या लाठ्या त्यांच्या हातावर, पाठीत आणि पायावर बसल्या.
     आतापर्यंत आमच्या अनेक वार्ताहर साधकांची पोलिसांनी चौकशी केली आहे. एक वस्तूनिष्ठ लेख प्रसिद्ध केल्याच्या प्रकरणी सनातन प्रभातच्या संपादकांना आतापर्यंत ३ वेळा अटक झाली आहे. सनातन प्रभातच्या मुद्रणालयाचीही पोलिसांनी चौकशी केली आहे. सनातनची राष्ट्रनिष्ठा चिरडण्याचाच हा प्रयत्न आहे.

राष्ट्रध्वजाची विटंबना रोखण्याच्या उद्देशाने गेलेल्या हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांना अमानुष मारहाणकरून अटक करणारे पोलीस !

श्री. सुनील घनवट
   हिंदु जनजागृती समिती विविध संघटनांच्या सहकार्याने वर्ष २००३ पासू्न राष्ट्रध्वजाचा मान राखा ! ही चळवळ राबवत आहे. या चळवळीचा एक भाग म्हणून २६ जानेवारी २००९ या दिवशी समितीचे श्री. सुनील घनवट आणि अन्य तीन कार्यकर्ते राष्ट्रध्वजाची विटंबना रोखण्याच्या उद्देशाने तक्रार दाखल करण्याकरता शुक्रवार पेठ पोलीस चौकीत गेले असता पोलिसांनी उलट त्यांनाच अमानुष मारहाण करत त्यांच्याविरुद्ध खोटे गुन्हे दाखल केले आणि त्यांना अटक केली होती. या प्रकरणी या कार्यकर्त्यांची नंतर निर्दोष मुक्तता झाली.

सनातनच्या साधकांच्या पोलिसी छळाचा मान्यवरांकडून निषेध !

देशद्रोह्यांचे लाड आणि देशभक्तांचा छळ, हेे 
पोलिसांचे धोरण आहे का ?- भागवताचार्य वा.ना. उत्पात
     डॉ. वीरेंद्रसिंह तावडे हे स्वत: तज्ञ डॉक्टर आहेत. एका सुसंस्कृत माणसाला पोलिसांनी बुटांनी आणि लाथाबुक्यांनी मारहाण करणे, हे लज्जास्पद अन् निषेधार्ह आहे. तावडेंविषयी कुठलेही ठोस पुरावे पोलिसांकडे नाहीत. केवळ संशयावरून त्यांना अटक केली आहे. अमानुष मारहाण करून त्यांच्याकडून बळजोरीने कबुलीजबाब मिळवण्यासाठी चाललेला पोलिसांचा हा अवैध मार्ग आहे. याचा धिक्कार करावा तेवढा थोडाच आहे. असे अन्याय सर्वच कैद्यांच्या विषयी बंद झाले पाहिजेत. राजकीय पुढारी कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार करून कारागृहात आहेत, त्यांच्यापैकी कोणाला कधी पोलिसांनी मारहाण केल्याचे ऐकिवात नाही. बॉम्बस्फोट करणार्‍या आतंकवाद्यांना या पोलिसांनी कधी मारहाण केली नाही. उलट कसाबसारख्याला कबाब खायला दिले होते. देशद्रोह्याचे लाड आणि देशभक्तांचा छळ, हे पोलिसांचे धोरण आहे का ? हे म्हणजे पतिव्रतेच्या गळ्यात धोंडा वेश्येला मणिहार, असेच आहे. म्हणून याचा निषेध करावा तेवढा थोडाच आहे.

दंगलीशी दुरान्वयेही संबंध नसतांना हिंदु जनजागृती समितीचे डॉ. नरेंद्र पाटील यांना अटक करणार्‍या पोलिसांची मोगलाई !

उजवा हात नसतांनाही डॉ. नरेंद्र पाटील यांच्यावर विविध गंभीर गुन्ह्यांखाली ११ कलमे लावण्यात येणे
डॉ. नरेंद्र पाटील
   डॉ. नरेंद्र पाटील हे एकूण ३४ दिवस कोठडीत होते. यापैकी त्यांना ८ दिवस पोलीस कोठडी, तर २६ दिवस न्यायालयीन कोठडी ठोठावण्यात आली होती. सध्या ते जामिनावर आहेत. विशेष म्हणजे, पाटील यांना उजवा हात नसतांनाही त्यांच्यावर हत्येचा प्रयत्न करणे, दरोडा, लूट करणे इत्यादी ११ प्रकारची विविध कलमे लावण्यात आली आहेत. 
---------------------------------
नंदुरबार शहरात ४ फेब्रुवारी २०१५ या दिवशी अवैध गोवंश तस्करी आणि पशूवधगृहे यांच्या विरोधात विश्‍व हिंदु परिषद, गोरक्षा समिती, बजरंग दल या संघटनांनी पुकारलेला जिल्हा बंद यशस्वीपणे आणि शांततापूर्ण वातावरणात पार पडला होता. याचा सूड उगवण्यासाठी त्यांनी सायंकाळी शहरात दंगल घडवली. येथे नोंद करण्यासारखी विशेष गोष्ट म्हणजे हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या प्रमुखांनी शांततेचे आवाहन करत पोलिसांना साहाय्यही केले होते; मात्र हिंदुत्वनिष्ठांनी कितीही सद्वर्तन केले, तरी त्यांना छळायचे, असेच बहुदा पोलिसांचे धोरण असल्यामुळे या दंगलीच्या प्रकरणात रझाकारी पोलिसांनी ३३ हिंदुत्वनिष्ठ आणि केवळ १९ धर्मांधांना अटक केली. या अटक करण्यात आलेल्या हिंदुत्वनिष्ठांमध्ये हिंदु जनजागृती समितीचे डॉ. नरेंद्र पाटील यांचाही समावेश होता. रामदास पाटील आणि अनिल कटके या पोलीस निरीक्षकांनी सदर कारवाई केली होती.

वाचक, हितचिंतक आणि विज्ञापनदाते यांच्यासाठी...

     हा विशेषांक वेळेत मिळावा, यासाठी छपाई लवकर करावी लागल्यामुळे आम्ही वाचकांना ताज्या घडामोडींची वृत्ते देऊ शकलो नाही. जागेअभावी काही नियमित सदरे प्रसिद्ध करू शकलो नाही, याची नोंद घ्यावी. - संपादक

साधिकांचीही कायदाबाह्य पद्धतीने चौकशी करून त्यांचा मानसिक छळ करणारे पोलीस !

१. हिंदु जनजागृती समितीच्या एका कार्यकर्तीची चौकशी
करतांना पोलीस ठाण्यातच तिचे छायाचित्र काढणारे पोलीस !
    २० ऑगस्ट २०१३ या दिवशी महाराष्ट्र (अंध)श्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या झाल्यानंतर एका शहरातील पोलिसांनी २२ ऑगस्ट या दिवशी हिंदू जनजागृती समितीच्या एका कार्यकर्तीची तिला पोलीस ठाण्यात बोलावून चौकशी केली. प्रारंभी एका महिला साहाय्यक पोलीस निरीक्षकाने आम्ही गणेशोत्सव मंडळांची माहिती घेत आहोत. तशी तुमचीही माहिती घेणार आहोत, असे सांगितले. त्यानंतर आईवडिलांची आणि हिंदु जनजागृती समितीतील सहभाग, अध्यक्ष कोण ? आंदोलने कोणती करता ? आदी प्रश्‍न विचारले. त्यानंतर पोलीस ठाण्यातच त्यांचे छायाचित्र काढले. कार्यकर्तीने याला विरोध करूनही त्यांनी जुमानले नाही. त्यानंतर त्या महिला पोलीस अधिकार्‍याने समितीच्या या कार्यकर्तीला पोलीस ठाण्यातील दुसर्‍या खोलीत नेले. तेथे अगोदरच ३ वरिष्ठ पोलीस अधिकारी बसलेले होते. त्यातील महिला साहाय्यक पोलीस आयुक्तांनी पुन्हा कार्यकर्तीचे नाव, गाव, पत्ता आणि समितीच्या वतीने कोणती आंदोलने करता ?, हे विचारले. वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी काही दिवसांपूर्वी केलेल्या आंदोलनाविषयी पुन्हा तीच माहिती विचारली. (पुन्हा पुन्हा तेच तेच विचारून साधकांचा मानसिक छळ करणारे पोलीस ! - संपादक)

जात्यंधांचे तोंड बंद करणारे हत्या प्रकरणातील संशयित

     डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणी संशयित म्हणून श्री. समीर गायकवाड आणि डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांना संशयित म्हणून अटक करण्यात आली आहे. हीच नावे जर ब्राह्मणांची असती, तर एव्हाना जात्यंधांनी ब्राह्मणांविरुद्ध मोहीम उघडून त्यांना जगणे कठीण केले असते !

पोलिसांच्या नाहक छळाला बळी पडलेल्या निरपराध नागरिकांनी आपले अनुभव सनातन प्रभातला कळवावेत !

   पोलिसांनी गुन्हेगार म्हणून पकडलेले ९१ टक्के आरोपी निर्दोष सुटतात, असे गुन्हे अन्वेषण विभागाने प्रकाशित केलेल्या महाराष्ट्रातील गुन्हे २०१० या अहवालातून उघड झाले आहे. यावरून असे लक्षात येते की, भारतातील पोलिसांनी अशा लाखो निरपराध नागरिकांना गुन्हेगार ठरवून त्यांचा छळ केलेला असतो. निष्पाप असूनही पोलिसांचा छळ अनुभवणार्‍या नागरिकांनी त्यांचे अनुभव सनातन प्रभातच्या कार्यालयात (फॅक्स : ०८३२ - २३१८१०८ किंवा इ-मेल dspgoa1@gmail.com) पाठवावेत. - संपादक

वर्ष २०१० मध्ये प.पू. डॉ. आठवले यांच्यावर चॅप्टर केस दाखल करणे, हा गोवा पोलिसांसाठी लज्जास्पद प्रकार !

वर्ष २०१० मध्ये चॅप्टर केस दाखल झाली त्याच्या
पूर्वीपासून प.पू. डॉ. आठवले यांची खालावलेली प्रकृती.
प.पू. डॉ. जयंत आठवले यांच्यावर सामाजिक शांतता बिघडवल्याचा आरोप करून फोंडा पोलिसांनी वर्ष २०१० मध्ये चॅप्टर केस दाखल करण्याचा अश्‍लाघ्य प्रकार केला होता. प.पू. डॉक्टर हा गुन्हा प्रविष्ट होण्याआधी अडीच वर्षे आजारपणामुळे खोलीच्या बाहेर जाऊ शकत नव्हते. बर्‍याचदा ते अंथरुणावर असत. तरीही हिंदु धर्मजागृतीसाठी अविरत कार्य करणार्‍या एका वंदनीय महात्म्यावर केलेला हा आरोप म्हणजे सत्याचा अपलाप; किंबहुना हिंदूंच्या धर्मश्रद्धेवर घाला घालण्याचे आणि हिंदु धर्माला अपकीर्त करण्याचे व्यापक षड्यंत्रच होते. अर्थात् या चॅप्टर केसमध्ये त्यांनी सनातन संस्थेच्या २ विश्‍वस्तांना आणि सनातन प्रभात नियतकालिकांच्या समूहाच्या तत्कालीन संपादकांनाही गोवले. खोटे गुन्हे दाखल करण्याचा इतका व्यापक कट गोवा पोलिसांकडून पूर्णत्वास नेण्यात आला होता.

सनातन संस्था आणि साधक यांच्या चौकशीच्या संदर्भात त्यांचे निर्दोषत्व सिद्ध करणारे सत्य !

१. आतापर्यंत एटीएस्, एन्आयए, एस्आयटी आणि सीबीआय या अन्वेषण यंत्रणांनी सनातनच्या ८०० हून अधिक साधकांची चौकशी केली. त्यातून काहीच निष्पन्न झाले नाही.
२. गडकरी स्फोट प्रकरणी ६ साधकांपैकी ४ साधकांची निर्दोष मुक्तता झाली आणि २ साधकांना जामीन मिळाला. या न्यायदानाच्या वेळी न्यायाधिशांनी न्यायालयाच्या आदेशात, आरोपींचा कोणाचीही हत्या करण्याचा उद्देश नव्हता, असे म्हटले आहे.
३. मडगाव स्फोट प्रकरणातून सनातनच्या ६ साधकांची निर्दोष मुक्तता झाली आहे. त्या वेळी न्यायदानाच्या प्रतीत न्यायाधिशांनी, हा प्रथमदर्शी अहवालच संशयाच्या भोवर्‍यात आहे आणि सनातन संस्थेला गुंतवण्यासाठीच यात तोडमोड (मॅनिप्युलेट) करण्यात आली आहे, असे म्हटले आहे.
४. समीर गायकवाड यांना १६ सप्टेंबर २०१५ या दिवशी पानसरे हत्याप्रकरणी अटक करण्यात आली. त्यांना अटक करून ८ महिने होऊनही अद्याप कोणतेही ठोस पुरावे मिळालेले नाहीत. कॉ. पानसरे हत्या प्रकरणी खरे मारेकरी शोधायचेच नाहीत, असे वाटते, असे ताशेरे मुंबई उच्च न्यायालयानेे ८ ऑक्टोबर २०१५ ला ओढले.

सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी केलेल्या भावपूर्ण आणि परिपूर्ण सेवेमुळे श्री गणेशमूर्तीच्या डोळ्यांतून अश्रू येणे

सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ
श्री गणेशोत्सवाच्या निमित्ताने विशेष अनुभूती
१. आईने श्री गणेशचतुर्थीची घरातील सर्व कामे आणि
सेवा कुशलतेने सांभाळणे अन् नंतर गणेशमूर्तीच्या डोळ्यांखाली अश्रू येणे
     आमच्या मूळ घरी प्रत्येक वर्षी गणेशचतुर्थीला २० ते ३० नातेवाईक येतात. २०१३ या वर्षी झालेल्या गणेशचतुर्थीचे सर्व दायित्व आईकडे (सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्याकडे) होते. त्या वेळी पाहुण्यांसाठी जेवणाची व्यवस्था करणे, पूजेची सिद्धता करणे आणि इतर बर्‍याच गोष्टी पहाव्या लागतात. त्या वेळी बाबा वाराणसीला असल्याने आईला एकटीलाच सगळ्या गोष्टी पहाव्या लागत होत्या. आई संत झाल्यानंतर ती पहिलीच गणेशचतुर्थी होती. आईने ते दायित्व अगदी कुशलतेने सांभाळले. एकीकडे सेवेचे दूरभाष असायचे आणि घरातील इतर कामे परिपूर्ण करणे अन् ती करवून घेणे, हे तिने सहजतेने साध्य केले. तिने सेवेतही खंड पडू दिला नाही. संध्याकाळनंतर तिने आश्रमातील काही सेवाही केल्या. विसर्जनाच्या दिवशी संध्याकाळी ६ ते ६.१५ वाजता मूर्तीच्या दोन्ही डोळ्यांखाली पाण्याचा एकेक थेंब दिसला. ते अश्रू असावेत, असे मला वाटले. संध्याकाळी ७.३० वाजताही ते थेंब तसेच होते. तेव्हा सर्वांना हे विशेष वाटले. घरातील काही जणांनी त्याची छायाचित्रे काढली. आईने त्या थेंबाला हात लावल्यावर ते पाण्यासारखेच असल्याचे लक्षात आले. तिने ते पाणी तिच्या आणि माझ्या कपाळावर लावले.

साधकांनो, संत, महर्षि आणि ईश्‍वर आपल्या पाठीशी आहे, हे लक्षात घ्या !

     पोलिसांकडून साधकांचा अतोनात छळ होत असला, तरीही अनेक संत सनातनच्या पाठीशी आहेत. प्रसंगांना सामोरे जाण्यासाठी भगवंतच आपल्याला आत्मबळ देत आहे. साधकांचा छळ होऊ नये, यासाठी अनेक ज्ञात-अज्ञात संत अनुष्ठाने, पूजा-अर्चा करत आहेत. महर्षींनीही नुकतेच आमचे आश्रमाकडे पूर्ण लक्ष आहे. त्यांना काही करता येणार नाही. त्यांना जे काही पूर्ण करायचे आहे, ते पूर्ण करू दे. शेवटी जय आपलाच आहे, असा संदेश दिला आहे.
     या सर्व रूपांनी साक्षात ईश्‍वर आपल्या पाठीशी असतांना आणखी काय हवे आहे ?

सनातन संस्थेचे साधक आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते यांना सूचना !

पोलीस चौकशीला आल्यास डगमगून न जाता खंबीर रहा !
     अंनिसचे डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. पानसरे यांच्या हत्येच्या प्रकरणी सनातन संस्थेला आणि साधकांना नाहक गोवण्याचा प्रयत्न पोलिसांकडून केला जात आहे. पोलीस चौकशीला आल्यास साधकांनी घाबरून न जाता, पोलिसांनी विचारलेल्या प्रश्‍नांना योग्यप्रकारे शांतपणे उत्तरे द्यावीत. कारण सनातन संस्थेचे सर्व कार्य वैध मार्गाने चालते. यापूर्वीही अशा घटनांमध्ये साधकांची चौकशी करण्यात आलेली आहे; मात्र अशा चौकशांमधून काहीही निष्पन्न झालेले नाही. कर नाही, त्याला डर कशाला या उक्तीप्रमाणे आपण काहीही केलेले नसल्यामुळे साधकांनी घाबरून जाण्याची आवश्यकता नाही.
     भगवान श्रीकृष्ण पाठीशी असल्यामुळे साधकांनी अशा प्रसंगांत कोणतीही भीती न बाळगता प्रार्थना आणि नामजप करत खंबीरपणे प्रसंग हाताळावा.
पोलिसांनी केलेल्या चौकशीची माहिती त्वरित दैनिक कार्यालयात कळवा !
     कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या प्रकरणी सनातनच्या साधकांची आणि हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांची ठिकठिकाणी पोलीसांकडून चौकशी करण्यात येत आहे. पोलिसांनी प्रत्यक्ष बोलावून, घरी येऊन किंवा भ्रमणभाषवर संपर्क करून चौकशी केल्यास त्या चौकशीची माहिती (कोणत्या दिवशी चौकशी झाली, काय प्रश्‍न विचारले, पोलिसांचे नाव, पोलीस ठाणे, किती वेळा चौकशी केली आदी सर्व तपशील) नजीकच्या दैनिक सनातन प्रभातच्या कार्यालयात त्वरित पाठवावा. आपल्या जिल्ह्यातील साधक किंवा कार्यकर्ते यांनी झालेल्या चौकशीचा तपशील पाठवला आहे कि नाही, याचा जिल्हा समन्वयकांनी आढावा घ्यावा.
इ-मेल : dspgoa1@gmail.com
संपर्क : (०८३२) २३१२६६४

साधकांना सूचना आणि वाचकांना निवेदन !

     श्री गणेशाची सात्त्विक मूर्ती बनवून ईश्‍वरप्राप्तीसाठी स्वत:ची कला समर्पित करणारे सनातनचे मूर्तीकार-साधक श्री. गुरुदास खंडेपारकर यांना प.पू. डॉक्टरांनी दिलेले मूर्तीज्ञान आणि त्यांच्या चैतन्यानुभूती ! या लेखाचा क्रमश: भाग जागे अभावी प्रसिद्ध करू शकत नाही. आज जागेअभावी नियमित प्रसिद्ध होणारी सदरे प्रसिद्ध करू शकलो नाही. याची वाचकांनी नोंद घ्यावी. - संपादक

हिंदुत्वनिष्ठांनो, खोटे पुरावे निर्माण करून हिंदुत्वाला, म्हणजे सनातनला दडपणार्‍या अन्वेषण यंत्रणांपासून सावधान !

     सनातनचे साधक डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांच्या अटकेचा आणि त्यानंतरच्या चौकशीचा वृत्तांत विविध प्रसारमाध्यमांत प्रसिद्ध होत आहे. यात वरिष्ठांनी प्रोजेक्ट दाभोलकर उपक्रमावर डॉ. तावडे यांची नियुक्ती केली होती, डॉ. तावडे यांनी शस्त्रास्त्रे मिळवण्यासाठी काही जणांच्या गाठीभेटी घेतल्या होत्या, डॉ. तावडे डॉ. दाभोलकरांच्या विरोधात बोलले होते, डॉ. तावडे यांना हिंदु राष्ट्रासाठी १५००० जणांचे सैन्य उभारायचे होते आदी माहिती अन्वेषण यंत्रणांना प्राप्त झाल्याचा दावा प्रसारमाध्यमांनी केला आहे. खर्‍या गुन्हेगारांपर्यंत पोहोचता येत नसेल, तर खोटे पुरावे निर्माण करून निरपराध नागरिकांना अडकवण्यात अन्वेषण यंत्रणा वाक्बगार असतात, हे आतापर्यंत अनेक घटनांमधून सिद्ध झाले आहे. तसेच या प्रकरणातही झाल्यास आश्‍चर्य वाटायला नको. प्रसिद्ध होणार्‍या बातम्यांमधून सनातनच्या अधिकाधिक निष्पाप साधकांना अडकवण्याचा अन्वेषण यंत्रणांचा हेतू स्पष्ट होतो. त्यासाठी -
१. इ-मेलमधील मजकूर हस्ताक्षरासारखा नसतो. अन्वेषण यंत्रणांकडे असलेल्या व्यवस्थेद्वारे ते कोणाचाही इ-मेल कुठेही उघडू शकतात. त्याचा वापर करून हवे तसे पुरावे निर्माण करू शकतात, तसेच निरपराधीत्व सिद्ध करणारे इ-मेल नष्ट करू शकतात.

साधकांनो, चौकशीसाठी येणार्‍या पोलिसांपासून सतर्क रहा !

     पोलीस चौकशी करण्याच्या निमित्ताने आश्रमात किंवा घरी येतील, तेव्हा ते काही शस्त्रास्त्रेे अथवा आक्षेपार्ह वस्तू आश्रमात ठेवून मग छापा घालून ती जप्त केली, असे दाखवतील. त्यामुळे पोलिसांच्या चौकशीच्या संदर्भात सावधानता बाळगा ! १. कोल्हापूर येथील एका हॉटेल मालकाला फसवण्यासाठी पोलिसांनीच हॉटेलमध्ये अमली पदार्थ ठेवले होते.
२. आनंद संप्रदायाच्या आश्रमात पोलिसांनी प्लास्टिकच्या मानवी कवट्या ठेवून त्यांची मानहानी करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली होती. संप्रदायाच्या गुरूंचे कारागृहातच निधन झाले. ही गोष्ट ३५ वर्षांनंतर एका निवृत्त पोलीस अधिकार्‍याने उघड केली.
३. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाच्या आरोपपत्रात कर्नल प्रसाद पुरोहित यांच्या देवळाली येथील घरात महाराष्ट्र आतंकवादविरोधी पथकानेच (एटीएस्नेच)आर्डीएक्स ठेवून त्यांना चुकीच्या पद्धतीने अटक केली, असे राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने म्हटले आहे.
     या गोष्टी लक्षात घ्या आणि पोलीस तसे काही करत नाहीत ना, यावर सतर्कतेने लक्ष ठेवा !
     सनातनच्या आश्रमांत पोलीस येतील, तेव्हा त्यांच्यावर लक्ष ठेवा, असे सनातन संस्था का सांगते, हे या उदाहरणावरून लक्षात येईल.

॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज 
सनातनचे श्रद्धास्थान
आश्रमाविषयीचा दृष्टीकोन
आश्रम माझा नाही; पण मी आश्रमाचा आहे.
भावार्थ : आश्रम माझा नाही म्हणजे आश्रमावर माझे स्वामित्व (मालकी) किंवा अधिकार (हक्क) नाही; कारण तो गुरूंचा आहे. मी आश्रमाचा आहे म्हणजे मी गुरूंच्या आश्रमाचा असल्याने आश्रमाची, आश्रमात आलेल्यांची काळजी घेणार व सेवा करणार. या दृष्टीकोनामुळेच आश्रमातील कामे करूनही आश्रमाविषयी प्रेम निर्माण होत नाही, तर प्रीती निर्माण होते.
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.)

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

    
परात्पर गुरु डॉ. आठवले
जात्यंधता, सर्वधर्मसमभाव आणि बुद्धीप्रामाण्यवाद यांच्या आहारी गेलेल्या हिंदूंनी स्वातंत्र्यानंतर प्रगती केली आहे, असे एकतरी क्षेत्र आहे का ? - (परात्पर गुरु) डॉ. आठवले (२.९.२०१६)

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

मनाला साधना करण्याचे वळण लावा 
      ऋतं वच्मि । सत्यं वच्मि ।, म्हणजे मी यथोचित असेच सांगत आहे; सत्य तेच सांगत आहे.
स्पष्टीकरण : सत्य पालटू शकते, उदा. देवदत्त तरुण आहे, हे वाक्य आता सत्य असले, तरी देवदत्त वृद्ध झाल्यावर हे वाक्य असत्य ठरते; परंतु ऋत कधीही पालटत नाही, उदा. सूर्य पूर्व दिशेला उगवतो. ऋत म्हणजे न पालटणारे नैसर्गिक सत्य. म्हणजे सत्य आणि नित्य जे असेल, त्याची उपासना करण्याचे वळण मनाला लावावे, म्हणजे साधकांची उन्नती वेगाने होते.
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥
या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो.
- प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

विशेषांकास कारण की,...

     सद्रक्षणाय खलनिग्रहणाय, असे पोलिसांचे ब्रीद आहे; मात्र आतापर्यंत आम्ही घेतलेल्या अनुभवांनुसार पोलिसांचे वर्तन त्यांच्या ब्रीदवाक्याच्या परस्परविरोधी अनुभवास आले आहे. मडगाव स्फोट प्रकरण, दाभोलकर-पानसरे-कलबुर्गी हत्या प्रकरण यांसारख्या घटनांत सनातनला गोवण्याचा आटोकाट प्रयत्न झाला. कोणताही पुरावा नसतांना साप साप म्हणून भुई थोपटण्याच्या या प्रकारांमुळे साधकांना अनेक शारीरिक आणि मानसिक त्रास सोसावे लागले. पोलिसांच्या अत्यंत क्रूर वर्तणुकीमुळे अनेक प्रसंगांत सनातनच्या साधकांच्या मानवाधिकारांचेही हनन झाले आहे. काही प्रसंगांत साधकांच्या नातेवाइकांनाही पोलिसांच्या चौकशांमुळे नाहक मानसिक त्रास सोसावा लागला आहे. एरव्ही आतंकवाद्यांना मारल्यानंतरही मानवाधिकारांचे उमाळे येणार्‍या आपल्या देशात एका राष्ट्रप्रेमी संघटनेची चाललेली ही गळचेपी कोणतीही माध्यमे समाजासमोर येऊ देत नाहीत. ईश्‍वरप्राप्तीच्या ध्येयाने प्रेरित होऊन समाजाला रामराज्य देण्यासाठी अत्यंत निष्ठेने आणि तळमळीने प्रयत्न करणार्‍या साधकांच्या मागे लागलेला हा चौकशीचा ससेमिरा थांबावा, यासाठी कोणीही तथाकथित मानवाधिकारवाले पुढे येत नाहीत. धर्मनिष्ठ सनातनला संपवण्याचे षड्यंत्र अत्यंत थंड डोक्याने गेली अनेक वर्षे राबवले जात आहे. काहींना वाटेल की, स्फोट प्रकरणांत आरोप झाले म्हणून हा ससेमिरा लागला; परंतु तसे मुळीच नाही. वर्ष २००० पासून केवळ सनातनचे साधक आहेत; या एकाच कारणाने साधकांचा छळ झाला आहे.

हिंदुत्वनिष्ठ : एक सॉफ्ट टार्गेट !

संपादकीय 
      कलियुगांतर्गत ७ व्या कलियुगाची अंतिम घडी चालू असतांना हिंदूंनी राष्ट्र आणि धर्म निष्ठ असणे, हा एका मोठा अपराध होऊन बसला आहे. सहिष्णु, सत्शील, राष्ट्र आणि धर्म प्रेमी हिंदू अर्वाचीन काळापासून सर्वांचेच लक्ष्य राहिले आहेत. सध्याही हिंदुत्वनिष्ठांना लक्ष्य करणार्‍यांपैकी एक घटक म्हणजे कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी कार्यरत असणारे पोलीस नावाचे प्रशासन !
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn