Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

आज श्री गणेशचतुर्थी

वाचक, हितचिंतक, विज्ञापनदाते आणि वितरक यांच्यावर 
श्री गणेशाची अखंड कृपादृष्टी राहो, हीच त्याच्या चरणी प्रार्थना ! 
     श्री गणेशोत्सवाच्या दिवसांत गणेशतत्त्व नेहमीच्या तुलनेत पृथ्वीवर १ सहस्र पटीने कार्यरत असते. या काळात केलेल्या श्री गणेशाच्या उपासनेने गणेशतत्त्वाचा अधिक लाभ होतो. ॐ गँ गणपतये नम: । हा नामजप अधिकाधिक करावा. हा नामजप एकट्याने, तसेच सामूहिकरित्याही करू शकतो.

कोटी कोटी प्रणाम !

आज श्रीपाद श्रीवल्लभ जयंती

काश्मिरी हिंदूंसाठी वेगळा केंद्रशासित प्रदेश हवा ! - पनून कश्मीर

देशातील बहुसंख्य; मात्र काश्मीरमधील अल्पसंख्य 
असलेल्या हिंदूंची ही मागणी केंद्रातील सरकार पूर्ण करणार का ?
     जम्मू - काश्मिरी हिंदूंना काश्मीरमध्ये कायमस्वरूपी वसवण्यासाठी वेगळ्या केंद्रशासित राज्याची निर्मिती करावी, अशी मागणी पनून कश्मीरने केली आहे. या मागणीव्यतिरिक्त अन्य कोणताही पर्याय काश्मिरी हिंदू स्वीकारणार नाहीत, असेही पनून कश्मीर संघटनेनेे स्पष्ट केले आहे.
     पनून कश्मीरचे संयोजक अग्निशेखर म्हणाले, आम्हाला वाटते की, सर्वपक्षीय शिष्टमंडळाने काश्मीरमधून विस्थापित झालेल्या हिंदूंचा विचार करावा. काश्मीरमध्ये हा धर्मिक संघर्ष निरंतर चालू आहे. काश्मीर भारतविरोधींचा गड झाला आहे. त्यामुळे काश्मीरचे दोन भाग करणे आवश्यक झाले आहे.
     संघटनेने म्हटले की, काश्मीर आता असा प्रदेश झाला आहे, जेथे कोणाचेही शासन उरलेले नाही. तसेच शिष्टमंडळाने फुटीरतावाद्यांशी कोणताही करार करू नये.
     अग्निशेखर म्हणाले की, आमची मागणी आहे की, फुटीरतावाद्यांशी कठोरपणे वागले पाहिजे. सर्व नेत्यांचे दायित्व आहे की, फुटीरतावाद्यांनी काश्मीरमध्ये निर्माण केलेला धार्मिक कट्टरतावाद त्यांनी समजून घ्यावा.

सनातनचे साधक डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांची पोलिसांनी मारहाण केल्याची न्यायाधिशांसमोर तक्रार

कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरण !
८ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी !
     कोल्हापूर - कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरणात विशेष अन्वेषण पथकाने (एस्आयटी) सनातनचे साधक डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांना येरवडा येथील कारागृहातून कह्यात घेऊन ३ सप्टेंबर या दिवशी कोल्हापूर येथे सातवे सहदिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर) श्रीमती व्ही.व्ही. पाटील यांच्यासमोर उपस्थित केले. दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकून न्यायाधिशांनी डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी देत ८ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांच्या बाजूने अधिवक्ता समीर पटवर्धन आणि अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी बाजू मांडली. पोलिसांनी विविध कारणे देत १४ दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली होती. न्यायालयात उपस्थित केले असता डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांनी न्यायाधिशांसमोर पोलिसांनी त्यांची चौकशी करतांना त्यांना मारहाण केल्याची तक्रार केली.

समाजसेवेच्या बुरख्याआड धर्मांतर करणार्‍या तेरेसांना संतपद देणे, हे मानवताविरोधी ! - अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ

     पुणे - नोव्हेंबर १९९४ मधे बी.बी.सी.ने प्रसारित केलेल्या लघुपटात नरकातील परी (हेल्स एंजल) म्हणून गणना केलेल्या मदर तेरेसा यांना व्हॅटिकन सिटीने संत म्हणून घोषित केले आहे. मरणासन्न रुग्णांना धर्मांतर केल्याविना औषधोपचारही न करणार्‍या तेरेसा या समाजसेवेच्या नावाखाली हिंदूंचे धर्मांतर घडवून आणत. समाजसेवेच्या बुरख्याआड धर्मांतरासारखी क्रूर कृत्ये करणार्‍या तेरेसांना संतपद देणे, हे मानवतेच्या, तसेच धर्मनिरपेक्षतेच्या तत्त्वाच्या विरोधी आहे, असे परखड मत व्यक्त करत अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे पुणे जिल्हाध्यक्ष श्री. आनंद दवे यांनी तेरेसा यांना ख्रिस्त्यांकडून संतपद मिळण्याच्या घटनेचा निषेध केला आहे.
या संदर्भात महासंघाने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात पुढे म्हटले आहे की,
१. तेरेसा यांना मरणोत्तर संतपद बहाल करण्याच्या कार्यक्रमाला भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्यासमवेत १२ जणांचे एक पथक व्हॅटिकनला गेले. ही कृती म्हणजे धर्मांतराच्या षड्यंत्राला मान्यता देण्याचाच हा प्रकार आहे.

(म्हणे) गणेशमूर्तींचे घरी विसर्जन करण्यासाठी कपडे धुण्याचा सोडा नगरपालिकेने द्यावा !

वाई नगरपालिकेचा धर्मद्रोही उपक्रम !
गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी कपडे धुण्याचा सोडा वापरणे म्हणजे श्री गणेशाची 
हेतूपूर्वक केली जाणारी विटंबनाच होय ! अशामुळे श्री गणेशाची अवकृपाच होईल !
     सातारा - कृष्णा नदीचे प्रदूषण आणि पर्यावरणाची हानी टाळण्यासाठी भाविकांनी गणेशमूर्तींचे घरीच विसर्जन करावे. त्यासाठी कपडे धुण्याचा सोडा वाई नगरपालिकेने पुरवावा, असे धर्मशास्त्रविसंगत आवाहन वाईच्या प्रांताधिकारी अस्मिता मोरे आणि नगराध्यक्षा सौ. सीमा नायकवडी यांनी केले. गणेशोत्सव मंडळांच्या बैठकीत त्या बोलत होत्या. या वेळी विविध विभागांचे प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. घरच्या घरी गणेशमूर्ती विसर्जनासाठी लागणारा जास्त तीव्रतेचा कपडे धुण्याचा सोडा पालिकेच्या वतीने देण्याचा मनोदय मुख्याधिकारी आशा राऊत यांनी व्यक्त केला.

पुण्यातील कृत्रिम हौदातील गणेशमूर्तींचे वाघोलीजवळील खाणीत विसर्जन ?

     पुणे - पुणे महानगरपालिकेने यंदाच्या वर्षी गणेशमूर्तींचे खाणीत विसर्जित करण्याचे ठरवले असल्याचे समोर येत आहे. या संदर्भात घनकचरा विभागाचे प्रमुख सुरेश जगताप यांच्याशी संपर्क साधला असता वाघोली येथील खाणीत गणेशमूर्ती विसर्जित करण्यात येणार असल्याचे समजले. या संदर्भात महापौरांशी संपर्क साधला असता त्यांनी कृत्रिम हौदातील गणेशमूर्तींच्या विसर्जनासंदर्भात जागा निश्‍चित झाली नसल्याचे सांगितले. (धार्मिक क्षेत्रातील अधिकारी व्यक्तींचा समादेश (सल्ला) न घेता मनमानी कारभार हाकून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणार्‍या महानगरपालिकेचा निषेध करावा तेवढा थोडाच आहे. कधी खाणीत, तर कधी पुन्हा नदीतच गणेशमूर्ती विसर्जित करणार्‍या महानगरपालिकेचा यामागे हिंदूंना धर्माचरणापासून दूर ठेवण्याचाच कुटील हेतू आहे. हे जाणून भाविकांनी गणेशमूर्तींचे धर्मशास्त्रानुसार वाहत्या पाण्यातच विसर्जन करावे. - संपादक) गेल्या वर्षी कृत्रिम हौदात विसर्जित केलेल्या गणेशमूर्ती महानगरपालिकेने ट्रकमधून पुन्हा वाकड येथील पवना नदीत विसर्जित केल्याचे उघड झाले होते. गणेशमूर्तींमुळे जलप्रदूषण होत असल्याचा कांगावा करणार्‍या महापालिकेचा दुटप्पीपणा यातून उघड झाला होता, तसेच भविकांमध्येही तीव्र असंतोषाचे वातावरण निर्माण झाले होते.

कन्नूर (केरळ) येथे चेहर्‍यावर राष्ट्रध्वज रंगवणार्‍या शिक्षकाला अटक

शिक्षकच राष्ट्रध्वजाचा अनादर करू लागले, तर विद्यार्थ्यांवर राष्ट्राभिमानाचे संस्कार कोण करणार ?
     कन्नूर (केरळ) - राष्ट्रध्वजाचा अवमान केल्याच्या प्रकरणी कन्नूर येथील एका शाळेतील शिक्षकाला पोलिसांनी अटक केली. या शिक्षकाने चेहर्‍यावर राष्ट्रध्वज रंगवला होता.

वडिलांना मुलीच्या मृतदेहासह रुग्णवाहिकेतून उतरवले !

भारतात निधर्मी राजकीय व्यवस्थेमुळे जनतेनेही तिचा धर्म सोडून दिल्याने स्वार्थ 
पराकोटीला पोचला आहे. त्यामुळेच देशात माणुसकीला लाजवणार्‍या घटना पुन:पुन्हा पुढे येत आहेत ! 
ओडिशामध्ये पुन्हा माणुसकीला लाजवणारा प्रकार उघड
      मलकानगिरी (ओडीशा) - कालाहांडी येथील दाना मांझी यांनी पत्नीचा मृतदेह खांद्यावर घेऊन जाण्याच्या घटनेला १० दिवस उलटले नाही, तोच ओडिशामध्ये पुन्हा एकदा माणुसकीला लाजवणारा प्रकार समोर आला आहे. ७ वर्षांच्या मुलीला तिचे वडील रुग्णालयात घेऊन जात असतांना मार्गातच तिचा मृत्यू झाला. त्यानंतर रुग्णवाहिकेच्या कर्मचार्‍यांनी त्यांना मुलीच्या मृतदेहासह खाली उतरवले. अशा स्थितीत हा मृतदेह हातात घेऊन त्यांना ६ किलोमीटर चालत घरी परतावे लागले. याप्रकरणी मलकानगिरीचे जिल्हाधिकारी के. सुदर्शन चक्रवर्ती यांनी जिल्हा वैद्यकीय अधिकारी उदयशंकर मिश्रा यांना चौकशीचे आदेश दिले. त्यानंतर मिश्रा यांनी रुग्णवाहिकेचा चालक, एक फार्मासिस्ट आणि एक सेवक यांच्या विरोधात प्रथमदर्शनी माहिती अहवाल प्रविष्ट केला आहे.

अमोनियम बायकार्बोनेट वापरण्याचा निर्णय ऐच्छिक ! - महापौर प्रशांत जगताप

हिंदु जनजागृती समितीसह हिंदुत्वनिष्ठांनी केलेल्या आंदोलनाचा परिणाम !
धर्मविरोधी कृतींविरोधात लढत राहिल्याने ईश्‍वराचा आशीर्वाद मिळून यश मिळत 
असल्याने धर्मनिष्ठांनी धर्माच्या बाजूने सतत लढत राहिले पाहिजे, हे यावरून लक्षात येईल !
     पुणे - गणेशमूर्तींच्या विसर्जनामुळे जलप्रदूषण होते, असा कांगावा करत पुणे महानगरपालिकेने भाविकांना गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी अमोनियम बायकार्बोनेट वापरण्याचे आवाहन केले होते. त्यासाठी १० टन बायकार्बोनेटची खरेदीही केली होती; मात्र या धर्मशास्त्रविरोधी निर्णयाचा हिंदु जनजागृती समितीसह शिवसेना, तसेच अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ, लष्कर-ए-हिंद यांच्यासह अनेक हिंदुत्ववादी संघटना आणि भाविक यांनी विरोध दर्शवला होता. या प्रकरणी अमोनियम बायकार्बोनेट वापरण्याचा निर्णय पूर्णतः ऐच्छिक असून प्रत्येकाला गणेशमूर्तींचे विसर्जन करण्याचे स्वातंत्र्य आहे. या संदर्भात महानगरपालिका कुणावरही बळजोरी करणार नाही. हा निर्णय प्रत्येकाने स्वेच्छेने घ्यावा, अशी प्रतिक्रिया महापौर प्रशांत जगताप यांनी व्यक्त केली. (पण मुळात महानगरपालिकेने धर्मशास्त्रविरोधी पर्याय नागरिकांना उपलब्ध करून दिला का ? असे निर्णय घेण्याआधी महानगरपालिकेने धर्माचार्यांचे मार्गदर्शन घेणे अपेक्षित आहे. - संपादक)

नंदुरबार येथे हिंदु जनजागृतीपुरस्कृत सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाच्या अंतर्गत संघटित झालेल्या ७८ गणेशोत्सव मंडळांचा आदर्श गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय !

१. नंदूबारमधील गणेशोत्सव आणि गणेशोत्सव मंडळांची पूर्वीची स्थिती !
अ. सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळ स्थापन होण्यापूर्वी हिंदूंना दिली जाणारी सापत्न वागणूक !
     गणेशोत्सव आणि गणेशमूर्तींचे कारखाने यांसाठी महाराष्ट्रात नंदूरबार हे शहर प्रसिद्ध असून त्याला शेकडो वर्षांची परंपरा लाभली आहे. व्यायामशाळांच्या मंडळांचे ढोल-ताशांच्या तालावरचे नृत्य, मिरवणुकांमधून होणारे लाठ्या-काठ्या आणि तलवारींचे खेळ आणि मानाच्या दादा-बाबा गणपतींची हरिहर भेट हे नंदूबार येथील गणेशोत्सवातील आकर्षणबिंदू राहिले आहेत. उत्सवाच्या वेळी होणार्‍या शांतता कमिटीच्या बैठकांमध्ये ४० टक्के हिंदू आणि ६० टक्के अन्य धर्मीय उपस्थित असत. (हिंदूंवर होणारा हा घोर अन्याय आहे. हिंदूंच्याच देशात हिंदूंचे उत्सव साजरे करण्यासाठी अन्य धर्मियांनी अशा प्रकारे दबाव निर्माण करणे आणि प्रशासनाने तो मान्य करणे, हा गेली ६७ वर्षे काँग्रेस शासनाने केलेल्या त्यांच्या लांगूलचालनाचाच परिणाम होय ! - संपादक)

पालिकेचा कोणताही कर्मचारी श्री गणेशमूर्तीचे नदीत विसर्जन करण्यात अडथळा आणणार नाही ! - मुख्याधिकारी, पंढरपूर

मुख्याधिकारी श्री. बापट यांना निवेदन देतांना हिंदुत्वनिष्ठ
     पंढरपूर - मी स्वतः 'मूर्तीदान' ही संकल्पना मानत नाही. पालिकेचा कोणताही कर्मचारी श्री गणेशमूर्तीचे नदीत विसर्जन करण्यात अडथळा आणणार नाही, असे आश्‍वासन पंढरपूर येथील मुख्याधिकारी श्री. अभिजीत बापट यांनी दिले. येथे धर्मशास्त्रानुसार वहात्या पाण्यातच मूर्तीचे विसर्जन करावे, या मागणीसाठी पंढरपूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी श्री. अभिजीत बापट यांना निवेदन देण्यात आले. मागील वर्षी कृत्रिम हौदात विसर्जित केलेल्या मूर्तीनंतर पाणी नसलेल्या तलावात पुरल्याचे या वेळी निदर्शनास आणून दिले. निवेदन देतांना हिंदू महासभेचे विवेक बेणारे, माजी नगराध्यक्ष आणि विद्यमान नगरसेवक श्री. लक्ष्मण पापरकर, सामाजिक समरसता पश्‍चिम महाराष्ट्राचे प्रांत प्रमुख श्री. रवींद्र साळे, पेशवा युवा मंचचे अध्यक्ष श्री. गणेश लंके आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते. 

कृत्रिम हौदातील विसर्जन आणि गणेशमूर्ती दान रोखण्यासाठी महानगरपालिकेमध्ये विषय मांडणार ! - नगरसेवक रूपेश वायंगणकर

निवेदन स्वीकारतांना नगरसेवक रूपेश वायंगणकर (मध्यभागी)
     भांडुप - श्री गणेशमूर्तींचा अवमान रोखण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने २ सप्टेंबर या दिवशी नगरसेवक रूपेश वायंगणकर यांना निवेदन देण्यात आले. या वेळी मनसेचे नगरसेवक श्री. रूपेश वायंगणकर यांनी "कृत्रिम हौदातील विसर्जन आणि गणेशमूर्ती दान या धर्मद्रोही कृती रोखण्यासाठी पुढाकार घेऊन महानगरपालिकेमध्ये विषय मांडू", असे आश्‍वासन दिले. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते आणि धर्माभिमानी श्री. विनायक साळुंखे उपस्थित होते. 

मिरज येथे ७ ते ९ सप्टेंबर या कालावधीत राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळे यांची कीर्तने !

श्री संभा तालीम गणेशोत्सव मंडळाच्या शतकपूर्तीच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन !
     मिरज - ब्राह्मणपुरी येथील वर्ष १९१७ मध्ये स्थापन झालेल्या श्री संभा तालीम गणेशोत्सव मंडळास यंदा १०० वर्षे पूर्ण होत आहेत. त्या निमित्ताने ५ सप्टेंबरपासून विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. ५ सप्टेंबर या दिवशी श्रींचे आगमन, प्राणप्रतिष्ठा आणि मारुतीस रुद्राभिषेक होईल. ७ ते ९ सप्टेंबर या कालावधीत राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळे यांचे छत्रपती संभाजी महाराज यांचे चरित्र या विषयावर सायंकाळी ६ ते ९ कीर्तन होईल.
     १० सप्टेंबर या दिवशी सत्यनारायण पूजा आणि सहस्रावर्तन, ११ सप्टेंबर या दिवशी बेळगाव येथील श्री. दीपक मराठे यांचे सोलो पेटीवादन आणि श्री. शिवम गोखले यांचे सतारवादन होईल. याच दिवशी श्री गणेशयाग आणि महाप्रसाद होईल. १५ सप्टेंबर या दिवशी दुपारी ४ वाजता इचलकरंजी येथील केसरी ढोल-ताशा पथकाची विशेष मिरवणूक होईल. शतकपूर्तीच्या निमित्ताने १०० गरजू विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात येणार आहे. तरी या कार्यक्रमांचा भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन श्री संभा तालीम गणेशोत्सव मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

गणेशोत्सवातील अपप्रकार टाळून आदर्श गणेशोत्सव साजरा करा ! - विश्‍वजीत चव्हाण

भोर (जिल्हा पुणे) येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने गणेशोत्सवाच्या निमित्ताने व्याख्यान
     भोर (जिल्हा पुणे) - लोकमान्य टिळक यांनी ज्या उद्देशाने सार्वजनिक गणेशोत्सव चालू केला, तो उद्देशच आज विस्मृतीत गेला आहे. उत्सवाला आता गालबोट लागून चंगळवाद आणि भोगवाद असे स्वरूप प्राप्त झाले आहे. आताच्या काळात समाजामध्ये राष्ट्र आणि धर्म यांप्रती जागृती होईल, अशा कार्यक्रमांचे आयोजन केले पाहिजे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे श्री. विश्‍वजीत चव्हाण यांनी ३ सप्टेंबर या दिवशी येथील मयुरेश गृहनिर्माण संस्थेमध्ये समितीच्या वतीने आयोजित व्याख्यानामध्ये केले. या वेळी श्री. चव्हाण यांनी गणेशपूजा विधी, महत्त्व आणि शास्त्र, गणेशमूर्ती वहात्या पाण्यातच का विसर्जन करावी, मूर्तीदान अयोग्य का, आदर्श गणेशोत्सव याविषयीही मार्गदर्शन केले. या वेळी धर्मप्रेमी सर्वश्री युवराज मगर, मनोज नाझीरकर यांसह २० हून अधिक महिला उपस्थित होत्या. या वेळी उपस्थितांकडून समितीच्या वतीने धर्मशिक्षण वर्ग चालू करण्याची मागणी करण्यात आली.

मूर्तीकार आणि गणेशोत्सव मंडळे यांच्याकडून हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांना प्रबोधनासाठी निमंत्रण

हिंदु जनजागृती समितीची आदर्श गणेशोत्सव मोहीम २०१६
ठाणे जिल्ह्यात हिंदु जनजागृती समितीच्या आदर्श गणेशोत्सव मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद 
उजवीकडून उल्हासनगर महानगरपालिकेच्या पदाधिकार्‍यांना
आदर्श गणेशोत्सवाविषयी माहिती देतांना अधिवक्ता (सौ.) किशोरी कुलकर्णी
     ठाणे - हिंदु जनजागृती समितीच्या आदर्श गणेशोत्सव मोहिमेच्या अंतर्गत समितीच्या कार्यकर्त्यांनी आतापर्यंत जिल्ह्यातील ठाणे, अंबरनाथ, डोंबिवली, कल्याण, उल्हासनगर येथील ३३ मूर्तीकार आणि २८ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे यांच्या भेटी घेतल्या. या प्रबोधन मोहिमेला मूर्तीकार आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या प्रबोधनानंतर ८ मूर्तीकार आणि काही गणेशोत्सव मंडळे यांनी समितीच्या कार्यकर्त्यांना प्रबोधनासाठी निमंत्रित केले आहे. मोहिमेच्या अंतर्गत समितीच्या कार्यकर्त्यांनी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना संपर्क करून त्यांना आदर्श गणेशोत्सव कसा साजरा करावा ?, गणेशोत्सवात काय असावे आणि काय नसावे, याविषयी प्रबोधन केले. या वेळी हिंदु जनजागृती समिती प्रस्तुत 'आदर्श गणेशोत्सव कसा असावा', ही ध्वनीचित्र-चकती दाखवण्यात आली.

कृत्रिम तलावापेक्षा वहात्या पाण्यातच गणेशमूर्तींचे विसर्जन करावे ! - पंकज बागुल, हिंदु जनजागृती समिती

धुळे येथे शांतता समिती बैठक 
डावीकडून समितीचा विषय मांडतांना श्री. पंकज बागुल, अप्पर अधीक्षक
चंद्रकांत गवळी, महापौर सौ. कल्पना महाले आणि जिल्हाधिकारी श्री. दिलीप पांढरपट्टे
     धुळे - मागील २ वर्षांपूर्वी शासनाने कृत्रिम तलाव बनवला होता. त्यात बुडून एका हिंदूचा मृत्यू झाला. त्यामुळे कृत्रिम तलाव करू नयेत. हिंदु धर्मानुसार मूर्ती वहात्या पाण्यात विसर्जित केल्याने सात्त्विकता सर्वदूर पसरते आणि श्री गणेशाच्या कृपेनेच पाणीही वहात आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे श्री. पंकज बागुल यांनी गणेशोत्सव आणि बकरी ईद यांच्या पार्श्‍वभूमीवर धुळे जिल्हा शांतता समितीची बैठक २ सप्टेंबर या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात घेण्यात आली. या वेळी जिल्हाधिकारी श्री. दिलीप पांढरपट्टे, महापौर सौ. कल्पना महाले, उपमहापौर श्री. अन्सारी, जिल्हा पोलीस अधीक्षक चैतन्य एस्., अप्पर अधीक्षक चंद्रकांत गवळी, निवासी उपजिल्हाधिकारी श्री. तुकाराम हुलवळे, फादर विल्सन, मौलवी शकील, म.ना. जोशी, भाजपचे श्री. हिरामण अप्पा गवळी, श्री. संजय शर्मा, शिवसेनेचे श्री. महेशभाऊ मिस्त्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे श्री. मिलिंद मुंदडा उपस्थित होते. 

मुंबईतील वाहतूक पोलीस कर्मचारी विलास शिंदे यांच्या मारेकर्‍यांवर त्वरित कठोर कारवाई करावी !

पोलीस अधिकार्‍यांना निवेदन देतांना कार्यकर्ते
हिंदवी स्वराज्य युवा संघटनेच्या वतीने साहाय्यक पोलीस आयुक्तांकडे निवेदनाद्वारे मागणी
     पुणे - मुंबईतील वाहतूक पोलीस कर्मचारी विलास शिंदे हे त्यांचे कर्तव्य बजावत असतांना अहमद महंमद अली कुरेशी आणि त्याचा सहकारी यांनी त्यांना पुष्कळ मारहाण केली. शिंदे यांच्यावर रुग्णालयामध्ये उपचार चालू असतांना त्यांचा मृत्यू झाला. ही घटना अत्यंत गंभीर असून पोलीस खात्यावर अशी वेळ यावी, हे सर्वसामान्यांसाठी भयभीत करणारे आहे. त्यामुळे या घटनेतील आरोपी अहमद कुरेशी आणि त्याचा साथीदार यांच्यावर त्वरित कठोर कारवाई करून त्यांना फाशी होईपर्यंत पाठपुरावा करावा, या मागणीसाठी हिंदवी स्वराज्य युवा संघटनेच्या वतीने हडपसर पोलीस ठाण्यामध्ये साहाय्यक पोलीस आयुक्त रसाळ आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू शंकर पवार यांना निवेदन देण्यात आले. (समाजकर्तव्यांच्या जाणिवेपोटी कृतीशील होणार्‍या हिंदवी स्वराज्य युवा संघटनेच्या कार्यकर्त्यांचे अभिनंदन ! - संपादक) या वेळी हिंदवी स्वराज्य युवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री. अभिजीत बोराटे आणि अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

सांगली जिल्ह्यात विविध लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांना निवेदने !

खासदार श्री. राजू शेट्टी (बसलेले) यांच्याशी चर्चा करतांना हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते
     सांगली, ३ सप्टेंबर (वार्ता.) - गणेशोत्सव हा सण हिंदु धर्मशास्त्रानुसार साजरा व्हावा, तसेच श्री गणेशमूर्तींचे पारंपरिक पद्धतीनेच विसर्जन व्हावे, या मागणीसाठी सांगली जिल्ह्यात विविध ठिकाणी लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांना निवेदने सादर करण्यात आली. पलूस येथे निवासी नायब तहसीलदार श्री. प्रशांत थोरात आणि गटशिक्षणाधिकारी यांच्या कार्यालयात निवेदन देण्यात आले. सांगली येथे जिल्हाधिकारी कार्यालयात आणि मिरज येथे प्रांत कार्यालयात निवेदन देण्यात आले. 

बारामती येथे उपमुख्याधिकार्‍यांना निवेदन

उपमुख्याधिकार्‍यांना निवेदन देतांना कार्यकर्त्या
     बारामती - श्री गणेशमूर्तींचे कृत्रिम हौदात विर्सजन करायला लावू नये, तसेच मूर्तीदान मोहीम राबवू नये, या संदर्भात येथे नगरपरिषदेचे उपमुख्याधिकारी श्री. संजय चव्हाण आणि नायब तहसीलदार यांना हिंदु जनजागृती समितीच्या वतीने निवदेन देण्यात आले. 
     निवेदनासह 'सृष्टी इको रिसर्च इन्स्टिट्यूट' या संस्थेचा गणेशमूर्ती विसर्जनामुळे प्रदूषण होत नसल्याचा अहवाल देण्यात आला. या वेळी समितीच्या कार्यकर्त्या उपस्थित होत्या. 

गणेशमूर्तींचे वहात्या पाण्यात विसर्जन करावे !

कराड येथे निवासी नायब तहसीलदारांना निवेदन 
     कराड - गणेशमूर्तींचे दान करण्यापेक्षा त्यांचे वाहत्या पाण्यात विसर्जन केले जावे, तसेच या प्रक्रियेला पूर्ण संरक्षण देण्यात यावे, अशा मागणीचे निवेदन येथील निवासी नायब तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी श्री. अजित कुर्‍हाडे, तसेच कराड तालुका ग्रामीण पोलीस, कराडा शहर पोलीस, कराड नगरपालिका मुख्याधिकारी यांना हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने देण्यात आले. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते, तसेच भाजपचे आकाश ढवळे, गणेश कापसे, बी.एस्. पालेकर उपस्थित होते.

हिंदु जनजागृती समितीची 'आदर्श गणेशोत्सव मोहीम २०१६'

     हिंदु जनजागृती समिती हिंदुत्वनिष्ठांसह गेली १५ वर्षे 'आदर्श गणेशोत्सव मोहीम' राबवत आहे. या प्रबोधनामुळे समाजात धर्माचरणानुसार गणेशोत्सव साजरा करण्याच्या दृष्टीने पालट होत आहे. प्रशासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी यांच्याकडूनही या मोहिमेस चांगला प्रतिसाद मिळत आहे. 

फलक प्रसिद्धीकरता

गणेशभक्तांनो, गणेशोत्सवाचे पावित्र्य राखा !
१. हिडिस नाच आणि महिलांची छेडछाड रोखा !
२. जुगार आणि मद्यपान यांना स्थान देऊ नका !
३. चित्रपटगीतांपेक्षा संतांची भजने किंवा प्रवचने लावा !
४. दर्शनाच्या रांगेत न बोलता नामजप करा !
५. फटाके, वाद्यवृंद आणि चित्रपटगीते यांमुळे होणारे ध्वनी अन् वायू प्रदूषण टाळा !

हिंदू तेजा जाग रे !

Jago ! : Hinduo, Ganeshji ki shobhayatra me honewale anacharko rok kar Ganeshji ki krupa sampadan kijiye !
जागो ! : हिंदूओ, गणेशजी की शोभायात्रा में होनेवाले अनाचार रोककर गणेशजी की कृपा संपादन किजीये !

संभाजीनगर येथे 'कृत्रिम तलाव' आणि 'गणेशमूर्तीदान' या चुकीच्या संकल्पना थांबवण्यासाठी जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

     संभाजीनगर - 'कृत्रिम तलाव' आणि 'गणेशमूर्ती दान' या चुकीच्या संकल्पना राबवल्याने श्री गणेशाची होणारी विटंबना थांबवावी, अशा आशयाचे निवेदन येथील जिल्हाधिकार्‍यांना देण्यात आले. हे निवेदन जिल्हाधिकार्‍यांच्या वतीने नायब तहसीलदार (गृह) एस्.एस्. लटपटे यांनी स्वीकारले. या वेळी योग वेदांत सेवा समितीचे श्री. गौतम तांबोळी, सावरकरप्रेमी मित्रमंडळाचे उपाध्यक्ष श्री. सुभाष कुमावत, धर्माभिमानी श्री. निखिल महाले, हिंदु जनजागृती समितीचे श्री. विनोद रसाळ आणि अन्य धर्माभिमानी उपस्थित होते.

अकोला येथे आमदार आणि महापौर यांचा सकारात्मक प्रतिसाद !

हिंदु जनजागृती समितीची 'आदर्श गणेशोत्सव मोहीम २०१६'

महापौर सौ. उज्ज्वला देशमुख यांना निवेदन देतांना कार्यकर्ते 
     अकोला - येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने श्री गणेशमूर्तींचे विसर्जन कृत्रिम हौदाऐवजी धर्मशास्त्रानुसार वहात्या पाण्यात करावे, या संदर्भात भाजपचे आमदार श्री. गोवर्धन शर्मा आणि महापौर सौ. उज्ज्वला देशमुख यांना निवेदन देण्यात आले. निवेदन देतांना हिंदु जनजागृती समिती, रणरागिणी शाखा आणि हिंदु विधीज्ञ परिषदेचे कार्यकर्ते, तसेच अन्य हिंदुत्वनिष्ठ उपस्थित होते. 

हिंदु जनजागृती समिती आणि लष्कर-ए-हिंद यांच्या वतीने पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवड परिसरात 'श्री गणेशमूर्तीचे शास्त्रानुसार विसर्जन करा' याविषयी मोहीम !

     हिंदु जनजागृती समिती आणि लष्कर-ए-हिंद यांच्या वतीने 'श्री गणेशमूर्तीचे शास्त्रानुसार वहात्या पाण्यात विसर्जन करण्या'च्या संदर्भात पुण्यातील ओंकारेश्‍वर मंदिर, भिडे पूल आणि एस्.एम्. जोशी पूल या ठिकाणी ६, १० आणि १५ सप्टेंबर या दिवशी सकाळी ९ ते रात्री ९ या वेळेत भाविकांचे प्रबोधन करण्यात येणार आहे. अशीच मोहीम चिंचवड येथील बिर्ला हॉस्पिटलजवळ, श्री मोरया गोसावी मंदिर, श्री धनेश्‍वर मंदिर, तानाजीनगर येथील घाट, तसेच देहू, औंध, रावेत, मोशी आणि चिखली येथेही ६, १०, ११ आणि १५ सप्टेंबर या दिवशी घेण्यात येणार आहे. या मोहिमेत सहभागी होऊ इच्छिणार्‍यांनी ८९८३३३५५१७ या क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

तमिळनाडू येथील शिवाचे प्रत्यक्ष हृदयस्थान असलेल्या चिदंबरम् क्षेत्रातील प्रसिद्ध नटराज मंदिराचे स्थानमाहात्म्य !

सद्गुरु (सौ.) अंजली
गाडगीळ
१. चिदंबरम् म्हणजे आकाशतत्त्वाशी संबंधित शिवक्षेत्र !
    महर्षींनी नाडीवाचनातून सांगितल्याप्रमाणे आम्ही १०.८.२०१६ या दिवशी चिदंबरम् क्षेत्रातील नटराज मंदिरात दर्शनासाठी गेलो. हे आकाशतत्त्वाशी संबंधित शिवक्षेत्र आहे. हे मंदिर म्हणजे शिवाचे एक गूढ रहस्यच आहे. यालाच चिदंबरम् रहस्य, असे म्हणतात. हे अधिकतर शिवाच्या निर्गुण तत्त्वाशी संबंधित क्षेत्र आहे.
२. मंदिराचे स्थानमाहात्म्य 
२ अ. व्याघ्रपाद महर्षि आणि पतंजली महर्षि यांचे तपोस्थान : येथे पूर्वी जंगलच होते. याच जंगलात व्याघ्रपाद महर्षि आणि पतंजलि महर्षि तप करत असत. एकदा या दोघांनीही शिवाला प्रार्थना करून सांगितले, हे देवा, आम्हाला तुमचे तांडवनृत्य बघण्याची इच्छा आहे.

मदर तेरेसा यांचे खरे रूप जाणा !

      काही दिवसांपूर्वी सरसंघचालक मोहन भागवत यांनी मदर तेरेसा सेवेच्या नावाखाली हिंदूंचे धर्मांतर करत होत्या, असे वक्तव्य केले. तथाकथित धर्मनिरपेक्षतावाल्यांनी आयतेच कोलीत मिळाल्यासारखे नेहमीप्रमाणे मदर तेरेसा यांचा कैवार घेत भागवत यांच्यावर टीकेची झोड उठवली. केवळ ख्रिस्त्यांच्या लांगूलचालनासाठी मदर तेरेसा यांची बाजू घेणार्‍यांनाही कदाचित् मदर तेरेसा यांचे हे खरे रूप ज्ञात नसेल. सामान्यांना मदर तेरेसा नक्की कोण होत्या, हे कळण्यासाठी येथे काही संग्राह्य लिखाण पुनर्प्रसिद्ध करत आहोत.

आदर्श गणेशोत्सव साजरा करूया !

     म्हणता म्हणता श्री गणेशाचे आगमन झाले आहे. सण म्हटले की, प्रत्येकाच्या घरात आनंद असतो. या दिवसांमध्ये ईश्‍वराचे चैतन्य कार्यरत असते. कुटुंबातील सर्वजण आनंदाने सण साजरा करण्यासाठी एकत्र येतात; मात्र सण खर्‍या अर्थाने आदर्शपणे साजरे होतात का, याचाही विचार व्हायला हवा. 

लोकहो, मदर तेरेसा यांच्याविषयी हे सत्य तुम्हाला माहीत आहे का ?

     व्हॅटीकन सिटीने मदर तेरेसा यांना संत म्हणून घोषित केले आहे. त्यांना ४ सप्टेंबर या दिवशी व्हॅटीकन सिटी येथे संतपद बहाल करण्यात येणार असून त्या सोहळ्यात भारत सरकारचे काही प्रतिनिधीही सहभागी होणार आहेत. त्यांच्या सहभागाला ब्राह्मण महासंघाने एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे विरोध दर्शवला आहे. या प्रसिद्धीपत्रकातील निवडक सूत्रे आमच्या वाचकांसाठी येथे देत आहोत.
१. मदर तेरेसा या भारतातील हिंदूंना धर्मांतरित करण्यासाठी मिशनरी म्हणून आल्या होत्या. तेरेसा त्यांच्या मृत्यूसमयी म्हणाल्या, मी जे काही केले, ते लोकांना गॉडसोबत जोडून देण्यासाठी केले. या विधानातून त्यांचा कथित समाजसेवेमागील धर्मांतराचा कुटील हेतू स्पष्ट होतो.

मदर तेरेसा यांचे संतपद - काही कळीचे प्रश्‍न !

      मदर तेरेसा यांचा व्हॅटिकनमधील संतपदाचा मार्ग आता प्रशस्त झाला आहे. मदर तेरेसा यांनी जे काम उभे केले आणि जे तत्त्वज्ञान मांडले, त्याचा गंभीर आणि सखोल प्रतिवाद करणारे बरेच लेखन झाले आहे. या सार्‍या लेखनातले द मिशनरी पोझिशन ः मदर तेरेसा इन थिअरी अ‍ॅण्ड प्रॅक्टिस हे ख्रिस्तोफर हीचन्स यांचे पुस्तक सर्वांत महत्त्वाचे आणि मदर तेरेसा यांच्या गरिबांविषयीच्या कळवळ्यालाच आक्षेप घेणारे आहे. त्यांच्यावर सीआयएच्या सोयीचे वर्तन केल्याचा ठपका ठेवणारे आहे. हैतीमधील दैत्य हुकूमशहाकडून देणग्या घेतल्याचा आक्षेप ठेवणारे आहे.

सद्य:स्थितीत शिक्षकी पेशाची झालेली दुर्दशा !

आज असलेल्या शिक्षकदिनाच्या निमित्ताने...
शिक्षकदिन नव्हे, तर गुरुपौर्णिमेला गुरुपूजनदिन साजरा करा !
      डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन् यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ त्यांचा ५ सप्टेंबर हा जन्मदिवस शिक्षकदिन म्हणून भारतभर पाळला जातो. त्याऐवजी गुरुपौर्णिमेचा दिन गुरुपूजनदिन म्हणून पाळायला हवा; कारण गुरु हे तत्त्व असून त्या तत्त्वाचा या दिनी (आषाढ पौर्णिमेला) नेहमीपेक्षा १ सहस्र पटीने लाभ होतो आणि तोही आध्यात्मिक स्वरूपाचा, म्हणजे चैतन्य आणि कृपाशीर्वाद यांच्या स्तरावर होतो. व्यावहारिक शिक्षण देणार्‍या शिक्षकांपेक्षा ईश्‍वरप्राप्ती कशी करायची, याचे मार्गदर्शन करणारे गुरु हे अनेक पटींनी श्रेष्ठ आहेत. केवळ दिन पाळण्यापेक्षा त्या दिवशी गुरुपूजन करणे, हे अधिक योग्य. आयुष्यभर विद्यार्थीदशेतच राहिले पाहिजे, हे या निमित्ताने मनावर बिंबते.

संतच खरा न्याय देऊ शकणे !

श्री. राम होनप
      मनुष्य घडलेली घटना कान, डोळे आणि बुद्धी यांनी जाणून त्यातील सत्य-असत्य ठरवतो अन् त्यानुसार न्यायनिवाडा करतो. संतांना एखादी घटना घडण्यामागे संबंधित मनुष्याचा दोष किती ?, घटनेशी मागील जन्मांचा संबंध आणि आसुरी शक्तींचा हस्तक्षेप, या बुद्धीपलीकडील गोष्टींचे दिव्य ज्ञान असते. त्यामुळे संतच अशा घटनांचा अभ्यास करून विषयाला खरा न्याय देऊ शकतात. 
- श्री. राम होनप, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२४.६.२०१६)

योग्य दक्षिणा घेऊन किंवा दक्षिणा न घेता शास्त्रोक्त पद्धतीने धार्मिक विधी करण्यास इच्छुक पुरोहितांनी पौरोहित्याच्या सेवेत सहभागी व्हावे !

ब्राह्मतेज प्रदान करणार्‍या सेवेत सहभागी होण्याची सर्वत्रच्या पुरोहितांना सुवर्णसंधी !
१. यज्ञ हे एक वरदानच !
     श्रीमद् भगवद्गीतेत श्रीकृष्णाने यज्ञाला कामधेनू म्हटले आहे. पुरोहितांनी एकाग्रतेने केलेल्या शास्त्रोक्त मंत्रपठणामुळे वायूमंडलाची शुद्धी तर होतेच; पण व्यक्ती, समाज आणि राष्ट्र या सर्वांनाही त्या मंत्रशक्तीचा लाभ होतो. अवर्षणादी नैसर्गिक प्रकोपांना रोखून पर्जन्यवृष्टी करण्याचे सामर्थ्य यज्ञयागात आहे. यज्ञ हे भारतीय संस्कृतीला लाभलेेले फार मोठे वरदानच आहे.
२. सनातन साधक-पुरोहित पाठशाळेच्या स्थापनेचा व्यापक उद्देश !
     यज्ञसाधनेचे अनन्यसाधारण महत्त्व लक्षात घेऊन सनातन संस्थेने वर्ष २००९ मध्ये सनातन साधक-पुरोहित पाठशाळेची स्थापना केली. विविध विधींच्या माध्यमातून समाजाला साधनेकडे वळवणे आणि आदर्श अन् सात्त्विक पुरोहितांना घडवून त्यांची संतपदाकडे वाटचाल करून घेणे, हा या स्थापनेमागील उद्देश होता.
त्वं सच्चिदानन्दाद्वितीयोऽसि ।
त्वम् ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि ॥
- श्री गणपति अथर्वशीर्ष, श्‍लोक ४
अर्थ : तू एकमेवाद्वितीय असा सच्चिदानंदरूप आहेस. ज्ञान (ब्रह्माचे ज्ञान) आणि विज्ञान (ऐहिक जगताचे ज्ञान) तू आहेस. (तू स्थूल-सूक्ष्म अशा सर्व गोष्टींना व्यापून राहिला आहेस.)

ब्रिटनमध्येप्रतिवर्षी ५ लाख ख्रिस्ती स्वधर्माचा त्याग करत असल्याच्या घटनेतून ख्रिस्ती मिशनर्‍यांच्या आमिषांना बळी पडून धर्मांतर करणारे हिंदू काही बोध घेतील का ?

      प्रत्येक वर्षी ब्रिटनमध्ये ५ लाख ख्रिस्त्यांकडून स्वधर्माचा त्याग करण्यात येत आहे. यामुळे २०३० मध्ये ख्रिस्त्यांची संख्या अन्य धर्मियांच्या तुलनेत अल्प होईल, तसेच हिंदु आणि मुसलमान यांची लोकसंख्या अधिक होईल, असा अहवाल ब्रिटनच्या हाऊस ऑफ लायब्ररीने बनवला आहे. या अहवालात असेही म्हटले आहे की, प्रत्येक वर्षी साडेसात लाख ख्रिस्ती त्यांच्या धर्माचा त्याग करत आहेत. ते नास्तिकतेकडे वळत आहेत. गेल्या ६ वर्षांत ब्रिटनमध्ये मुसलमानांची लोकसंख्यावाढ ३७ टक्के झाली आहे, तर हिंदूंची ४३ टक्के झाली आहे, तसेच बौद्ध धर्मियांच्या संख्येत ७४ टक्के वाढ झाली आहे. ब्रिटनमध्ये ख्रिस्ताब्द २०१० मध्ये ४ कोटी १० लाख ख्रिस्ती होते. गेल्या ६ मासांत यामध्ये ७.६ टक्के घट झाली आहे. (८.३.२०१२)
श्रेयान् स्वधर्मो विगुणः परधर्मात्स्वनुष्ठितात् ।
स्वधर्मे निधनं श्रेयः परधर्मो भयावहः ॥ 
     - श्रीमद्भगवद्गीता, अध्याय ३, श्‍लोक ३५ 
अर्थ : चांगल्या प्रकारे आचरणात आणलेल्या दुसर्‍याच्या धर्माहून गुणरहित असला, तरी आपला धर्म अतिशय उत्तम आहे. आपल्या धर्मात तर मरणेही कल्याणकारक आहे; पण दुसर्‍याचा धर्म भयावह आहे.
     हिंदूंना मी आवाहन करतो की, त्यांनी आतापासून देवाकडे केवळ स्वतःसाठीच न मागता राष्ट्र अन् धर्म रक्षणासाठीही मागण्याची सवय लावावी ! 
- ह.भ.प. रामकृष्णबुवा गर्दे, डिचोली, गोवा.
ॐ नमस्ते गणपतये ।
त्वमेव प्रत्यक्षन् तत्त्वमसि ।
त्वं साक्षादात्माऽसि नित्यम् ॥
- श्री गणपति अथर्वशीर्ष, श्‍लोक १
अर्थ : (मंगलार्थ ओंकाराने आरंभ केला आहे.) हे गणपते (गणांचा स्वामी), तुला नमस्कार असो. (तत् त्वम् असि या महावाक्यातील) तत् या शब्दाने निर्देशिलेले ब्रह्म प्रत्यक्ष तूच आहेस. तूच सर्व प्राणीमात्रांमधील नित्य, अविनाशी असा आत्मा (आत्मतत्त्व) आहेस.

मायेपासून अलिप्त राहून कार्य साधून ते भगवंताला अर्पण करणे म्हणजे एकांत !

   ३१.३.२०१६ आणि १.४.२०१६ या दिवशी दैनिक सनातन प्रभातमध्ये प.पू. पांडे महाराज यांनी एकाग्रता आणि एकांत या शब्दार्थांच्या गुंफणीतून उलगडलेले साधनामय जीवनाचे रहस्य वाचले. या पूर्वी- प.पू. महाराज या विषयांवर माझ्याशीही बोलले आहेत.
   प.पू. महाराज शतपावली करत होते. त्यांनी हातातील काठीने शून्य, एक, ब्रह्म, माया हे सर्व काढून दाखवले. ते म्हणाले, मायेत राहूनही मायेपासून अलिप्त राहून कार्य साधणे आणि ते भगवंताला अर्पण करणे म्हणजे एकांत. सर्व चराचरात भगवंत आहे. तोच आपला स्वामी, कर्ता-करविता आहे. त्याच्याशी अनुसंधानात राहून त्याचे त्याला अर्पण करायचे. - सौ. उषा पुराणिक, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१.४.२०१६)

जाणूनी हे बोल, कृपा मजवर करावी ।

कु. वैष्णवी जाधव
हे गुरुराया, तव बालक मी वेडे । कसे तुजजवळ मी यावे ॥
या बाळाचे बोल हे बोबडे । इतरांस ते कसे उमजावे ॥ १ ॥
तू तर अवघ्या विश्‍वाची माऊली ।
जाणूनी हे बोल, कृपा मजवर करावी ॥
भक्ती अन् प्रीतीने ही झोळी भरावी । 
वाटे प्रभु इतुकेच की, हीच प्रार्थना तुजला आर्ततेने करावी ॥ २ ॥
- तुमचेच वेडे बाळ,
कु. वैष्णवी जाधव, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (९.५.२०१४)

देवाची ओढ असलेला आणि सहनशील वृत्तीचा ५३ टक्के आध्यात्मिक पातळीचा उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला मिरज, सांगली येथील कु. कृष्ण राघवेंद्र आचार्य (वय ८ वर्षे) !

कु. कृष्ण आचार्य
१. गुणवैशिष्ट्ये 
१ अ. काटकसरीपणा : कु. कृष्णाजवळ एखादी वस्तू असेल, तर तो ती परत विकत घेत नाही. तो कोणत्याही वस्तूसाठी हट्ट करत नाही. कृष्णाची मुंज होती. त्याआधी त्याने आम्हाला (आई-बाबांना) सांगितले, आपत्काळ आहे. मुंज साधी करूया. अधिक व्यय करायला नको. विधींकडे जास्त लक्ष देऊया. 
१ आ. सहनशील : तो पुष्कळ आजारी असतांना त्रास सहन करतो आणि दुसर्‍यांना स्वतःमुळे त्रास होऊ नये, याची काळजी घेतो. 
१ इ. घरात आलेल्या पाहुण्यांना काय हवे-नको ?, याकडे त्याचे लक्ष असते.
१ ई. अन्यायाविरुद्ध चीड असणे : त्याला इतरांवर होणारा अन्याय सहन होत नाही. तो नेहमी जे योग्य आहे, त्याची बाजू घेतो. त्याला कुणाच्या बोलण्यातून देवतांचे विडंबन जाणवले, तर लगेच त्याची जाणीव करून देऊन त्याला थांबवतो.

भावसत्संगात केलेला भावजागृतीचा प्रयोग आणि तोच प्रयोग इतरांना सांगून त्यातील आनंद अनुभवणार्‍या रामनाथी आश्रमातील सौ. आरती पुराणिक !

 सौ. आरती पुराणिक
    मला कु. स्वाती गायकवाड घेत असलेल्या भावसत्संगाला जायची संधी मिळाली. भावसत्संगात कु. स्वाती यांच्यामधील उत्कट भाव जवळून अनुभवता आला. त्या बोलू लागताच भावजागृती व्हायची. त्यांनी घेतलेल्या भावसत्संगाचा परिणाम जवळजवळ ३-४ घंट्यांपर्यंत टिकायचा.
    एका भावसत्संगात कु. स्वाती यांनी एक प्रयोग करण्यास सांगितला. श्रीकृष्णाच्या काळात गोपींनी ज्या भावाने श्रीकृष्णाचे स्मरण करून त्याचे वर्णन केले असेल, तसे प्रत्येकाने प.पू. डॉक्टरांविषयी जे वाटते, ते लिहायचे. आपल्याला थोडे उदास वाटत असेल अथवा आपल्याला एखाद्या संघर्षात्मक प्रसंगातून जावे लागते, तेव्हा हे लिखाण आठवायचेे. प्रयोग कळल्यावरच पुष्कळ छान वाटू लागले आणि उत्साह वाढला.
    थोड्या वेळाने मी विभागातील साधिका सौ. मीरा माने आणि सौ. श्रेया गांवकर यांच्यासमवेत भोजनकक्षात गेले. चहा घेतांना मी त्या दोघींना प्रयोगाविषयी सांगितले. मी परम पूज्यांविषयी एक वाक्य म्हटल्यावर सौ. मीरा उत्स्फूर्तपणे पुढचे वाक्य म्हणायची. मीराचे बोलून झाले की, सौ. श्रेयाही उत्स्फूर्तपणे पुढचे वाक्य बोलायची. यातून पुष्कळ आनंद मिळाल्याने आम्ही सतत भावावस्था अनुभवत होतो.
    या भावप्रयोगामुळे साधकांमध्ये भाव निर्माण करून त्यातील आनंद मला आणि साधकांनाही मिळाला, यासाठी कोटी कोटी कृतज्ञता !
- सौ. आरती पुराणिक, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

योग्य ते संस्कार होण्यासाठी धर्मशिक्षणाची आवश्यकता ! - आधुनिक वैद्या (सौ.) शिल्पा कोठावळे

     कोल्हापूर - भारतीय संस्कृतीत महिलेला पुष्कळ महत्त्व देण्यात आले आहे. आज आपण पृथ्वीला पृथ्वीमाता-जननीमाता-भूमाता, तर गायीला गोमाता, देशाला भारतमाता, असे म्हणतो; मात्र आजच्या आधुनिक युगात आपल्याला भारतीय संस्कृतीचा विसर पडत आहे. आज पाश्‍चात्त्य पद्धतीचे विविध डे साजरे केल्यामुळे भारतीय संस्कृतीची हानी होत आहे. त्यासाठी समाजात विशेषकरून मुलांवर योग्य संस्कार होण्यासाठी धर्मशिक्षणाची आवश्यकता आहे, असे मार्गदर्शन सनातन संस्थेच्या आधुनिक वैद्या (सौ.) शिल्पा कोठावळे यांनी केले. त्या यमगर्णी येथे धर्मस्थळ संघाच्या मेळाव्यात बोलत होत्या. हा मेळावा २८ ऑगस्ट या दिवशी पार पडला.

श्री गणेशाची सात्त्विक मूर्ती बनवून ईश्‍वरप्राप्तीसाठी स्वत:ची कला समर्पित करणारे सनातनचे मूर्तीकार-साधक श्री. गुरुदास खंडेपारकर यांना प.पू. डॉक्टरांनी दिलेले मूर्तीज्ञान आणि त्यांच्या चैतन्यानुभूती !

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचे अमृत महोत्सवी वर्ष
आणि गणेशोत्सव यानिमित्त गणेशभक्तांना भावभक्तीची भेट ! 
     सनातनचे मूर्तीकार-साधक श्री. गुरुदास खंडेपारकर यांनी अभिनव कला महाविद्यालय, पुणे येथे डी.एम्.सी., ए.टी.डी. आणि जी.डी. आर्ट (पेंटींग) चे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर वर्ष १९९६ ते २००० या कालावधीत मुंबईच्या एका प्रसिद्ध चित्रकारासमवेत ज्युनिअर आर्टिस्ट म्हणून काम केले. मूर्तीकला हा त्यांचा विषय नव्हता; पण त्यांच्या नोेकरीच्या ठिकाणी जेे.जे. स्कूल ऑफ आर्ट्समधून शिल्पकलेचे शिक्षण घेतलेले दोघे जण होते. त्यांना मूर्ती बनवत असतांना श्री. गुरुदास यांनी पाहिले होते. अजंठा, खजुराहो येथील शिल्पकलाही जवळून पाहिली होती. त्यांच्या मामांकडे पारंपरिक पद्धतीने गणेशमूर्ती बनवल्या जातात. पुण्याला घरी असतांना त्यांनी सनातन संस्थेने प्रकाशित केलेल्या श्री गणेशाच्या चित्रावरून एक मूर्ती सिद्ध केली आणि प.पू. डॉक्टरांना दाखवण्यासाठी ती गोव्याला पाठवली. त्यानंतर गुरुदासदादा स्वतःच गोव्याला आले आणि ईश्‍वरप्राप्तीसाठी कला या विषयाच्या अभ्यासाला त्यांचा आरंभ झाला. संतांनी त्यांना श्री गणेशाची मूर्ती सिद्ध करण्यास सांगितली आणि येथे त्यांच्या मूर्तीकलेच्या सेवेचा श्रीगणेशा झाला.
    सनातन संस्थेने सात्त्विक गणेशमूर्ती सिद्ध करण्याच्या संदर्भात सातत्याने प्रबोधन केले आहे. सात्त्विक गणेशमूर्ती कशी असावी, हे समाजाला समजावे, यासाठी सनातनने अधिकाधिक गणेशतत्त्व आकर्षित करणारी श्री गणेशमूर्ती सिद्ध करण्यासाठी संशोधन चालू केले. प.पू. डॉक्टरांच्या मार्गदर्शनानुसार वर्ष २००४ मध्ये विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर सनातनचे मूर्तीकार-साधक श्री. गुरुदास खंडेपारकर यांनी श्री गणेशाची सात्त्विक मूर्ती बनवण्यास आरंभ केला.
    प.पू. डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली वर्षभर केलेल्या प्रयत्नांतून ही सात्त्विक गणेशमूर्ती साकारली. प.पू. डॉक्टर प्रत्येक २ - ३ दिवसांनी मूर्ती पहाण्यासाठी येत आणि त्यात अनेक सुधारणाही सांगत. श्री. गुरुदास यांना मूर्ती पूर्ण होईपर्यंत सतत त्यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले. त्या कालावधीत त्यांना मिळालेला प.पू. डॉक्टरांचा सत्संग आणि त्यांनी शिकवलेली नवनवीन सूत्रे यांविषयी श्री. गुरुदास यांनी सांगितलेली माहिती पुढे देत आहोत. 
सात्त्विक श्री गणेशमूर्ती घडवतांना श्री. गुरुदास खंडेपारकर
श्री गणेशमूर्तीत सुधारणा सांगतांना परात्पर गुरु डॉ. आठवले (बसलेले)

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने श्री गणेशाच्या प्रत्यक्ष अस्तित्वाच्या आलेल्या अनुभूती
प.पू. डॉक्टरांनी शेल्याचे रेखाचित्र रेखाटतांना रेषांमधील स्पंदनांत
पालट करून ती अनुभवण्यास सांगितल्यावर शेल्याला स्पर्श केल्याचे जाणवणे
    वर्ष २००५ मध्ये दोन मूर्तींतील पहिली गणेशमूर्ती बनवतांना गणेशाच्या शेल्याच्या रेषांमधील एका रेषेत प.पू. डॉक्टरांनी थोडासा पालट करून तीच रेषा परत काढण्यास सांगितली आणि दोन्ही रेषांमधील स्पंदने बघण्यास सांगितली. त्या नवीन रेषेवरून पेन्सिल फिरवून स्पंदने बघतांना माझ्या अंगावर रोमांच आले. प्रत्यक्ष गणपतीच्या पिवळ्या रंगाच्या शेल्याला स्पर्श केल्याचे मला जाणवले.

धार्मिक उत्सव स्त्री-रक्षण अभियान अर्थात उत्सवांच्या कालावधीत महिलांसमवेत होणार्‍या संभाव्य अपप्रकारांविरुद्ध जागृती करणारा फलक उपलब्ध !

    
     सद्या सार्वजनिक उत्सव मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात. त्या निमित्ताने होणार्‍या गर्दीमध्ये महिलांशी असभ्य वर्तन करणे, युवतींची छेडछाड करणे आदी अपप्रकार होत असतात. या संदर्भात जागृती करणारे आणि महिलांच्या रक्षणासाठी समाजाला उद्युक्त करणारे धार्मिक उत्सव स्त्री-रक्षण अभियान हिंदु जनजागृती समितीच्या रणरागिणी शाखेच्या वतीने राबवण्यात येत आहे. या उपक्रमाचा प्रसार करणारा आणि समाजाला महिलारक्षणार्थ कृतीशील करणारा ७ फूट ४ फूट आकारातील फलक नेहमीच्या ठिकाणी उपलब्ध करण्यात आला आहे. विविध उत्सवांच्या निमित्ताने मंडळांच्या भेटी घेतांना या फलकासाठी प्रायोजक मिळवून तो मंडळे, मिरवणुकीचा मार्ग, शहरातील प्रमुख चौक आदी सार्वजनिक ठिकाणी लावता येईल. हे फलक अधिकाधिक ठिकाणी लावण्याचे नियोजन करून त्याचा सुयोग्य उपयोग करावा.

शास्त्रशुद्ध पद्धतीने पौरोहित्य करण्यासह आध्यात्मिक प्रगतीसाठी मार्गदर्शन करणार्‍या सनातन साधक-पुरोहित पाठशाळेत पूर्णवेळ प्रवेश घेण्यासाठी संपर्क करा !

पौरोहित्याचे शिक्षण घेण्यास इच्छुक साधकांना सूचना आणि वाचक, 
हितचिंतक अन् धर्मप्रेमी यांना नम्र विनंती !
१. साधना म्हणून वेदाध्ययन करण्यास शिकवणारी सनातनची वेदपाठशाळा !
     धर्माचरणी समाज घडवण्यासाठी सनातन संस्थेने आरंभलेला शुद्धीयज्ञ म्हणजे सनातन साधक-पुरोहित पाठशाळा ! बहुमूल्य सांस्कृतिक ठेवा असणारे वेदशिक्षण घेता घेता पुरोहितांची सर्वांगीण आध्यात्मिक उन्नतीही व्हावी, यासाठी या पाठशाळेत प्रामुख्याने प्रयत्न केले जातात. अर्थार्जनासाठी नव्हे, तर साधना म्हणून शास्त्रशुद्ध पद्धतीने पौरोहित्य करण्यास शिकवणारी ही एकमेव पाठशाळा आहे.

श्री गणेशमूर्तीदानासारखी धर्मशास्त्रविरोधी कृती न करता मूर्तीचे पारंपरिक पद्धतीने विसर्जन करून श्री गणेशाची कृपा संपादन करावी !

वाचक, हितचिंतक आणि विज्ञापनदाते यांना विनंती
     महाराष्ट्रात काही ठिकाणी धर्मद्रोही संघटनांकडून श्री गणेशमूर्तीदान मोहीम राबवण्यात येते. जलप्रदूषण, दुष्काळ, पाण्याची टंचाई अशी कारणे देत श्री गणेशमूर्तीदान करा, असे या संघटनांकडून सांगण्यात येते. देवतांचे दान देणे वा घेणे, हा देवतांचा अपमान आहे. श्री गणेशमूर्ती दान केल्यानंतर तिचे यथासांग विसर्जन होईल, याची शाश्‍वती नसते. श्री गणेशचतुर्थीस प्राणप्रतिष्ठापना केलेल्या मूर्तीचे विसर्जन करावे, असा शास्त्रोक्त विधीच आहे. त्यामुळे श्री गणेशमूर्तीदान न करता तिचे पारंपरिक पद्धतीने विसर्जन करून श्री गणेशाची कृपा संपादन करावी.

॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज 
सनातनचे श्रद्धास्थान
गुरूंकडे काय मागावे ?
माझ्याकडे सुख मागू नका, दुःख सहन करण्याचे बळ मागा.
भावार्थ : सुख हे प्रकृतीतील असल्याने अशाश्‍वत असते, म्हणून गुरूंकडे मागू नये. तसेच हेही लक्षात ठेवले पाहिजे की, शाश्‍वत आनंद मिळवून देणे, हेच गुरूंचे खरे कार्य असते. प्रारब्धामुळे दुःख भोगावे लागणार असल्यास, त्या दुःखदायक प्रसंगांमुळे होणारे दुःख सहन करण्याची शक्ती मात्र गुरु निश्‍चित (नक्कीच) देतात; म्हणून ती मागायला आडकाठी (हरकत) नाही
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.)
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥
या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो.
 - प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

    
परात्पर गुरु डॉ. आठवले
हिंदूंची धर्मनिष्ठा बुद्धीप्रामाण्यवाद्यांनी नष्ट केल्यामुळे धर्मनिष्ठ अल्पसंख्यांक मुसलमान, ख्रिस्ती आणि बौद्ध बहुसंख्य हिंदूंना भारी झाले आहेत. - (परात्पर गुरु) डॉ. आठवले

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

शिष्याने नेहमी सद्गुरूंशी एकनिष्ठ रहावे !
भाग्याने सद्गुरु लाभल्यास शिष्याने एकनिष्ठ रहावे, म्हणजे त्याच्याही नकळत 
त्याचा आध्यात्मिक विकास होत जाईल. 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)


हिंदुत्व जोपासा !

संपादकीय
      आज भाद्रपद शुद्ध चतुर्थी म्हणजे गणेशचतुर्थी ! श्री गणेशाचे प्रत्येक हिंदूच्या घरात आगमन होईल. या देवतेचा विघ्नहर्ता असा लौकिक असल्यामुळे हिंदूंना तिचा मोठा आधार वाटतो. वर्षभरात अनेक प्रसंग येतात जेव्हा व्यक्तीला दुःखाला सामोरे जायचे असते. छोटे-मोठे दुःखद प्रसंग येतच असतात. सुख जवापाडे दुःख पर्वताएवढे या संत तुकारामांच्या वचनाचा अनुभव प्रत्येक व्यक्तीला येतच असतो. अशा वेळी आधार कोणाचा घ्यायचा ? प्रत्येक जण स्वतःच्या विवंचनेत असल्यामुळे कठीण प्रसंगी कोणी साहाय्यासाठी धावून येणे दुरापास्त झालेले असते. विघ्नहर्त्या गणेशाचा त्यामुळेच लोकांना आधार वाटत असतो. हिंदु जनता कोणत्याही शुभ कार्याच्या आरंभी श्री गणेशाचे पूजन करते.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn