Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

देवाची ओढ असलेला आणि सहनशील वृत्तीचा ५३ टक्के आध्यात्मिक पातळीचा उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला मिरज, सांगली येथील कु. कृष्ण राघवेंद्र आचार्य (वय ८ वर्षे) !

१. गुणवैशिष्ट्ये 

१ अ. काटकसरीपणा : कु. कृष्णाजवळ एखादी वस्तू असेल, तर तो ती परत विकत घेत नाही. तो कोणत्याही वस्तूसाठी हट्ट करत नाही. कृष्णाची मुंज होती. त्याआधी त्याने आम्हाला (आई-बाबांना) सांगितले, आपत्काळ आहे. मुंज साधी करूया. अधिक व्यय करायला नको. विधींकडे जास्त लक्ष देऊया. 

१ आ. सहनशील : तो पुष्कळ आजारी असतांना त्रास सहन करतो आणि दुसर्‍यांना स्वतःमुळे त्रास होऊ नये, याची काळजी घेतो. 

१ इ. घरात आलेल्या पाहुण्यांना काय हवे-नको ?, याकडे त्याचे लक्ष असते.

१ ई. अन्यायाविरुद्ध चीड असणे : त्याला इतरांवर होणारा अन्याय सहन होत नाही. तो नेहमी जे योग्य आहे, त्याची बाजू घेतो. त्याला कुणाच्या बोलण्यातून देवतांचे विडंबन जाणवले, तर लगेच त्याची जाणीव करून देऊन त्याला थांबवतो.

१ उ. धर्माचरण करणे : कृष्णाला कपाळावर नाम लावायला त्याला आवडते. घरातून बाहेर पडतांना मोठ्यांना नमस्कार करून बाहेर पडायला आवडते. 

१ ए. देवाची ओढ असणे 

१. त्याला सोवळे नेसून पूजा करायला आवडते. 

२. तो संध्या करतांना मंत्रांचे उच्चार शास्त्राप्रमाणे होईपर्यंत पुनःपुन्हा करत असतो.

३. तो प्रतिदिन नामजप, प्रार्थना आणि कृतज्ञता व्यक्त करतो. तो गणपतिस्तोत्र, रामरक्षा, मारुतिस्तोत्र आणि हनुमानचालिसा नियमित म्हणतो.

१ ऐ. सेवेची तळमळ : केंद्रातील साप्ताहिक सनातन प्रभात वितरकांसाठी गठ्ठे करत असतांना तो चिठ्ठीत लिहिल्याप्रमाणे अंक मोजून ठेवतो. घरातील प्रत्येक कृती सेवाभावाने करतो आणि आईलाही साहाय्य करतो.

१ उ. तो चूक झाल्यावर क्षमा मागून त्याची नोंद ठेवतो.

१ ऊ. भाव : तो नामजप करतांना भावपूर्ण आणि एकाग्रतेने करतो. त्याने एकदा शाळेमध्ये गाण्याच्या स्पर्धेत प.पू. भक्तराज महाराज यांचे असा कसा मायाजालाचा हा फंदा... हे भजन म्हटले. शाळेतील शिक्षकांनी त्याचा भजन म्हणतांनाचा भाव पाहून त्याला पुन्हा भजन म्हणायला सांगितले.

२. अनुभूती 

अनेक उपाय करूनही अंगठा तोंडात घालण्याची न सुटणारी सवय आश्रम भेटीनंतर आपोआप सुटणे : लहानपणापासून त्याला तोंडात अंगठा घालायची पुष्कळ सवय होती. त्याविषयी त्याला पुष्कळ वेळा समजावून सांगितले. हात बांधून ठेवला, बोटाला तिखट लावले, कडू लावले, तरीही तो ६ ते ७ वर्षांचा होईपर्यंत तोंडात अंगठा घालायचा. अंगठा तोंडात घातल्याविना त्याला झोप येत नसे; पण वर्ष २०१५ मध्ये आम्ही सहकुटुंब रामनाथी आश्रमात आलो होतो. तेव्हापासून त्याने कधीच चुकूनही तोंडात अंगठा घातला नाही. 

३. कृष्णामध्ये जाणवणारे स्वभावदोष आणि त्यासाठी तो करत असलेले प्रयत्न 

कृष्ण अबोल आहे. त्याच्यात हट्टीपणा आणि मनमोकळेपणाचा अभाव आहे. अबोलपणावर मात करण्यासाठी तो घरी आलेल्यांशी थोड्या वेळाने ओळख वाढवण्याचा प्रयत्न करतो, तसेच हट्टीपणाच्या चुका किती केल्या ?, याच्या नोंदी ठेवतो. स्वभावदोष न्यून होण्यासाठी तो देवाला प्रार्थना करतो.

- श्री. राघवेंद्र कृष्णराव आचार्य (कृष्णाचे वडील), मिरज, सांगली. (२२.६.२०१६) 

(वर्ष २०११ मध्ये कु. कृष्ण राघवेंद्र आचार्य हा उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आल्याचे घोषित झाले होते. - संकलक) कु. कृष्ण आचार्य

कोटी कोटी प्रणाम !

आज वराह जयंती

आजचे दिनविशेष

हरितालिका तृतीया

मुंबई महापालिकेच्या अनुमतीविना बकरी ईदला प्राण्यांची हत्या करता येणार नाही !

महापालिका प्रशासन ईदला प्राण्यांच्या हत्या होणार नाहीत, याची काळजी घेईल का ?
मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश !
     मुंबई - मुंबई महानगरपालिकेच्या पूर्वानुमतीशिवाय यापुढे बकरी ईदच्या दिवशी कोणत्याही प्राण्याची हत्या (कुर्बानी) करता येणार नाही. पालिकेची अनुमती घेतल्यानंतरच कुर्बानीसाठी मुक्या प्राण्यांची हत्या करा, असे स्पष्ट आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. उच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे बकरी ईदच्या दिवशी खाजगी अथवा सार्वजनिकरित्या कोणत्याही ठिकाणी अवैधरित्या प्राण्यांची हत्या करता येणार नाही. देवनार येथील पशूवधगृहाने १६ ऑगस्ट २०१६ या दिवशी एक परिपत्रक प्रसिद्ध करून बकरी ईदच्या दिवशी मुंबईतील कोणत्याही भागात प्राण्यांच्या हत्या करण्यासाठी अनुमती दिली होती. (या प्रकरणी देवनार येथील पशूवधगृहावर कठोर कारवाई करायला हवी. - संपादक) त्याला भारतीय गोवंश रक्षण संवर्धन परिषदेने मुंबई उच्च न्यायालयात एका याचिकेद्वारे आव्हान दिले होते. (न्यायालयीन लढा देणार्‍या भारतीय गोवंश रक्षण संवर्धन परिषदेचे अभिनंदन ! - संपादक) त्यावर सुनावणी घेतांना न्यायमूर्ती एस्.सी. धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती बी.पी. कोलाबावाला यांनी हा निर्णय दिला आहे.

(म्हणे) राज्यातील प्रमुख विसर्जनस्थळी प्रशासकीय यंत्रणांवर लक्ष ठेवणार !

स्वतःची अन्वेषण यंत्रणा निर्माण करून राज्यातील 
प्रशासकीय यंत्रणेवर अविश्‍वास दाखवणारे अंनिसवाले !
     मुंबई - नैसर्गिक जलस्रोतांचे प्रदूषण टाळण्यासाठी गणेशभक्तांनी अधिकाधिक पर्यायी विसर्जनस्थळांचा वापर करावा, असे आवाहन करावे, असे सर्वोच्च न्यायालयाने पोलीस, प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि महानगरपालिका यांना सांगितले आहे. त्याचे पालन शासनाकडून होते कि नाही, हे पहाण्यासाठी मुंबईतील गिरगाव चौपाटी, दादर चौपाटी, गेट वे ऑफ इंडिया यांसह पुणे, नाशिक, कोल्हापूर आणि विविध प्रमुख जिल्ह्यांत अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते श्री गणेशमूर्ती विसर्जनस्थळांवर लक्ष ठेवणार आहेत. तसेच विसर्जनाच्या सर्व दिवशी चित्रीकरणही करणार आहेत.
     अंनिसचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी पोलीस, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमधील कर्मचारी यांना कृत्रिम हौद आणि अन्य पर्याय यांचा वापर करण्याचे आवाहन करण्यास सांगितले आहे.

बांगलादेशमध्ये धर्मांधांकडून इस्कॉन मंदिरावर आक्रमण !

     ढाका - बांगलादेशातील सिलहट जिल्ह्यातील काजोलशाह येथे शुक्रवारच्या नमाजाच्या वेळी इस्कॉन मंदिरात कीर्तन चालू असतांना टाळ-मृदंग वाजल्याने धर्मांधांनी मंदिरावर आक्रमण केले. या वेळी दोन्हींकडून दगडफेक करण्यात आली; मात्र येथे असणार्‍या पोलिसांनी लगेच त्यावर नियंत्रण मिळवल्याने आणि मंदिराचे दार बंद असल्याने मोठी हानी टळली. यात ७ जण घायाळ झाले आहेत. यातील ६ जण पोलिसांनी झाडलेल्या रबरी गोळ्यांमुळे घायाळ झाले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी १५ जणांना अटक केली आहे. (भारतात प्रतिदिन ५ वेळा अवैधपणे आणि देशातील बहुसंख्य हिंदूंना आवश्यक नसतांना मशिदीतून ध्वनीक्षेपकावरून अजान ऐकवली जाते त्यावर कोणीच काही बोलत नाही ! सर्वोच्च न्यायालयाने हे ध्वनीक्षेपक बंद करण्याचे आदेश देऊनही पोलीस त्यावर कारवाई करत नाहीत ! - संपादक)

सनातन संस्थेचे साधक डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांना कोल्हापूर येथील न्यायालयात हजर केले !

     कोल्हापूर - कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरणात विशेष तपास पथकाने (एस्आयटी) सनातन संस्थेचे साधक डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांना येरवडा येथील कारागृहातून कह्यात घेऊन ३ सप्टेंबर या दिवशी कोल्हापूर येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्यासमोर उपस्थित केले. त्यानंतर त्यांना वैद्यकीय चाचणीसाठी नेण्यात आले. सायंकाळी ६ वाजेपर्यंत न्यायालयाने कोणताही निर्णय दिला नव्हता.
(याविषयीचे सविस्तर वृत्त उद्या वाचा)

सनातन संस्थेची अपकीर्ती केल्याच्या प्रकरणी दैनिक टाइम्स ऑफ इंडियाचे संपादक, मालक, प्रकाशक आणि मुद्रक यांच्या विरोधात संस्थेचा मानहानी भरपाईसाठी न्यायालयात आणखी एक दिवाणी दावा

     रामनाथी (गोवा) - सनातन संस्थेच्या धर्मप्रसाराच्या समाजातील वाढत्या कार्याची व्याप्ती आणि संस्थेचा समाजात असलेला नावलौकिक माहिती असतांना सनातन संस्थेची अपकीर्ती करण्याच्या हेतूने दैनिक टाइम्स ऑफ इंडिया या इंग्रजी वृत्तपत्राने २१ जून २०१६ या दिवशीच्या अंकात पृष्ठ २ वर सनातन मे पॉज अ थ्रेट लाईक तालिबान, आयएस्आयएस् - दाभोलकर्स सन या मथळ्याखाली मानहानीकारक वृत्त प्रसिद्ध करून संस्थेची मानहानी केली. त्यामुळे सनातन संस्थेचे व्यवस्थापकीय विश्‍वस्त श्री. वीरेंद्र मराठे यांनी संस्थेचे मानद कायदेविषयक सल्लागार श्री. रामदास केसरकर यांच्या वतीने या दैनिकाचे संपादक, मालक, मुद्रक आणि प्रकाशक यांना ११.७.२०१६ या दिवशी कायदेशीर नोटीस बजावून मानहानी भरपाईपोटी १० कोटी रुपयांची मागणी केली होती; परंतु त्यांनी कायदेशीर नोटिसीतील संस्थेच्या मागणीची पूर्तता करण्यास नकार दिला.

हिंदू तेजा जाग रे !

Jago : Ola cabs ne 1 post me Shri Ganeshji ka apaman kiya tha. lekin Hinduonke virodh ke karan unko yah post hatani padi.
     Hinduo, sangathan me hi shakti hai !
जागो !
: ओला कैब्सने एक पोस्ट में श्री गणेशजी का अपमान किया था; लेकिन हिन्दुआें के विरोध के कारण उनको यह पोस्ट हटानी पडी.
     हिन्दुओ, संगठन में ही शक्ति है !

फलक प्रसिद्धीकरता

हिंदूंनो, संघटित शक्तीचे महत्त्व जाणा !
     वाहतुकीसाठी मोबाईल अ‍ॅपचा वापर करणार्‍या ओला या भारतातील आस्थापनाने त्याच्या ब्लॉगवरील एका पोस्टमध्ये, या गणेशचतुर्थीला ओला कॅब्सच्या छतावरून (रूफ) श्री गणेश घरी येत आहे, असे दाखवले होते. धर्माभिमान्यांच्या तीव्र विरोधानंतर ओलाने हे चित्र ब्लॉगवरून हटवले.

सर्वसाधारण गणेशमूर्तीच्या तुलनेत शास्त्रानुसार बनवलेल्या गणेशमूर्तीचे आध्यात्मिक स्तरावरील महत्त्व सिद्ध करणारी महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाने केलेली वैज्ञानिक चाचणी !

पिप छायाचित्रांमधील 
गणेशमूर्तींची मूळ छायाचित्रे 

सर्वसाधारण गणेशमूर्ती

रंगीत गणेशमूर्ती

धूम्रवर्णाची गणेशमूर्ती

श्री गणेशाच्या पूजेची सिद्धता आणि पूजाविधी

१. पूजेची सिद्धता (तयारी)
अ. पूजेची सिद्धता करतांना स्तोत्रपठण किंवा नामजप कसा करावा ? : पूजेची सिद्धता करत असतांना स्तोत्रपठण किंवा नामजप करावा. नामजपाच्या तुलनेत स्तोत्रात सगुण तत्त्व जास्त असते; म्हणून स्तोत्र मोठ्याने म्हणावे आणि नामजप मनातल्या मनात करावा. नामजप मनातल्या मनात होत नसल्यास मोठ्याने करण्यास आडकाठी (हरकत) नाही.
२. पूजास्थळाची शुद्धी आणि उपकरणांमधील 
देवत्वाची जागृती करणे
२ अ. पूजास्थळाची शुद्धी
१. पूजेच्या खोलीतील केर काढावा. शक्यतो पूजा करणार्‍या व्यक्तीनेच केर काढावा.
२. केर काढल्यावर खोलीतील भूमीचा पृष्ठभाग मातीचा असल्यास ती भूमी शेणाने सारवावी. भूमीचा पृष्ठभाग मातीचा नसल्यास ती भूमी स्वच्छ पाण्याने पुसून घ्यावी.

श्री गणेशचतुर्थीच्या काळात करावयाच्या उपासनेमागील शास्त्र

श्री गणेशचतुर्थीसाठी पुजावयाची मूर्ती घरी कशी आणावी ?
अ. श्री गणेशाची मूर्ती घरी आणण्यासाठी घरातील कर्त्या पुुरुषाने इतरांसह जावे. 
आ. मूर्ती हातात घेणार्‍याने हिंदु वेशभूषा करावी, म्हणजे अंगरखा (सदरा)-धोतर किंवा अंगरखा-पायजमा परिधान करावा.
इ. मूर्ती आणतांना तिच्यावर रेशमी, सुती किंवा खादीचे स्वच्छ वस्त्र घालावे. मूर्ती घरी आणतांना मूर्तीचे मुख आणणार्‍याकडे आणि पाठ समोरच्या दिशेस असावी. मूर्तीच्या समोरच्या भागातून सगुण तत्त्व, तर पाठच्या भागातून निर्गुण तत्त्व प्रक्षेपित होत असते. मूर्ती हातात धरणारा हा पूजक असतो. तो सगुणातील कार्याचे प्रतीक आहे. मूर्तीचे मुख त्याच्याकडे केल्यामुळे त्याला सगुण तत्त्वाचा लाभ होतो, तर इतरांना निर्गुण तत्त्वाचा लाभ होतो.
ई. श्री गणेशाचा जयघोष आणि नामजप करत मूर्ती घरी आणावी.
उ. घराच्या उंबरठ्याबाहेर उभे रहावे. घरातील सुवासिनीने मूर्ती आणणार्‍याच्या पायांवर दूध आणि नंतर पाणी घालावे. बाहेरून आलेली व्यक्ती रज-तमात्मक स्पंदनांनी भारीत होऊन आलेली असते. तिचे मालीन्य दूर करण्यासाठी तिच्या पायांवर दूध-पाणी घालण्याची पद्धत आहे. 
ऊ. घरात प्रवेश करण्यापूर्वी मूर्तीचे मुख समोरील दिशेस करावे. यानंतर मूर्तीचे औक्षण करून ती घरात आणावी. श्री गणेशचतुर्थीला पुजावयाची मूर्ती कशी असावी ?
     ऋषिमुनी आणि संत यांनी शास्त्रे लिहिली आहेत. त्यांना देवतांचा जसा साक्षात्कार झाला, तशी त्यांनी देवतांची वर्णने शास्त्रांत केली आहेत; म्हणून शास्त्रांत सांगितल्याप्रमाणे मूर्ती बनवावी. चिकणमाती किंवा शाडूची माती यांपासून मूर्ती बनवावी, असा शास्त्रविधी आहे. अन्य वस्तूंपासून मूर्ती बनवणे, हे धर्मशास्त्रविरोधी आहे ! मूर्ती आकाराने लहान (एक फूट ते दीड फूट उंच) असावी ! मूर्ती पाटावर बसलेली, डाव्या सोंडेची आणि नैसर्गिक रंगांनी रंगवलेली असावी ! मूर्ती मूर्तीशास्त्रानुसार बनवलेली असल्यास पूजकाला लाभ होतो. त्यासाठी अथर्वशिर्षात केलेल्या वर्णनानुसारच गणेशमूर्ती घ्यावी ! 
कुटुंबात कोणी करावे ? 
      श्री गणेशचतुर्थीस आचरण्यात येणारे व्रत हे सिद्धीविनायक व्रत या नावाने ओळखले जाते. वास्तविक हे व्रत सर्व कुटुंबांत होणे क्रमप्राप्त आहे. सर्व भाऊ एकत्र रहात असतील म्हणजेच त्यांचा द्रव्यकोश (खजिना) आणि पाकनिष्पत्ती (चूल) एकत्र असेल, तर सर्वांत मिळून एक मूर्ती पुजली तरी चालते; पण ज्या वेळी द्रव्यकोश आणि पाकनिष्पत्ती कोणत्याही कारणास्तव विभक्त असतील, तर त्यांनी आपापल्या घरी स्वतंत्र गणेशमूर्ती पुजावी. 
     कुलाचाराप्रमाणे किंवा पूर्वापार चालत आलेली एकच गणपति बसवण्याची दृढ परंपरा मोडायची नसेल, तर ज्या भावामध्ये गणपतीविषयी जास्त भक्तीभाव असेल, त्याच्याच घरी गणपति बसवणे योग्य आहे.
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले 
श्री गणेशाच्या उपासनेच्या अंतर्गत करावयाच्या कृती 
 • गंध कोणत्या बोटाने लावावे ? - अनामिकेने कोणत्या गंधाच्या उदबत्तीने ओवाळावे ? - चंदन, केवडा, चमेली 
 • उदबत्त्यांची संख्या किती असावी ? - दोन
 • अत्तर कोणत्या गंधाचे अर्पण करावे ? - हीना
 • श्री गणेशाला प्रदक्षिणा किती घालाव्यात ? - आठ किंवा आठच्या पटीत 
(संदर्भ : सनातनचा ग्रंथ श्री गणपति) 
श्री गणेशाला लाल फूल वाहण्याची पद्धत !
     गणेशपूजेत तांबडे वस्त्र, लाल फूल अन् रक्तचंदन वापरतात. त्यामुळे पूजेतील मूर्ती जागृत होण्यास साहाय्य होते. फूल वाहतांना फुलाचा देठ देवाकडे आणि तुरा आपल्या दिशेने येईल, अशा तर्‍हेने फूल देवाला वाहावे.
श्री गणेशाला दूर्वा वाहण्याची पद्धत !
    श्री गणेशाला २१ दूर्वा वहाव्यात. दूर्वांना ३, ५, ७ अशा विषम संख्येच्या पात्या असाव्यात. समिधा एकत्र बांधतो, तशा दूर्वा एकत्र बांधाव्यात. एकत्रित बांधल्याने त्यांचा गंध बराच काळ टिकतो. यासाठी दूर्वा अधिक वेळ टवटवीत रहाव्यात, म्हणून पाण्यात भिजवून मग वाहव्यात. दूर्वा वाहतांना पात्यांचा भाग आपल्याकडे आणि देठाचा भाग श्री गणेशाच्या मूर्तीकडे असावा.

श्री गणेशाचे महत्त्व

१. देवतांनी कठीण युद्धप्रसंगी श्री गणेशपूजन करून कार्ये सिद्धीस नेणे; पण श्री गणेशाने कोणाचे स्तवन वा उपासना केल्याचे उदाहरण नसणे, यातूनच त्याचे सर्वश्रेष्ठत्व सिद्ध होणे : सर्व श्रुति, स्मृति, पुराणे आदींचा अभ्यास केला, तर असे दिसून येते की, ब्रह्मा, विष्णु, महेश, देवी इत्यादी अनेक देवतांनी त्यांच्यावरील कठीण युद्धप्रसंगी श्री गणेशपूजन करून त्याची स्तुती करून कार्ये सिद्धीस नेली आहेत; पण श्री गणेशाने कोणाचे स्तवन वा उपासना केल्याचे उदाहरण नाही; म्हणजेच श्री गणेश हे दैवत सर्वश्रेष्ठ आहे, हे मानावे लागेल.
२. कोणत्याही देवस्वरूप वर्णनाचे दोन भाग असतात, पहिला भाग वाच्य आणि दुसरा भाग लक्ष्य. यांतील वाच्य हा भाग मर्यादित असतो आणि लक्ष्य हा भाग व्यापक, अमर्यादित आणि त्रिकालाबाधित असतो. हे जाणूनच ज्ञानीपुरुष सगुण साकार रूपात त्या त्या दैवतांची उपासना करतो.

शास्त्रोक्त विधी आणि रूढी यांचा अवधी

       भाद्रपद शुक्ल पक्ष चतुर्थीस मातीचा गणपति करतात. तो डाव्या हातावर ठेवून तेथेच त्याची सिद्धीविनायक या नावाने प्राणप्रतिष्ठा आणि पूजा करून लगेच विसर्जन करावे, असा शास्त्रविधी आहे; पण मनुष्य हा उत्सवप्रिय असल्याने एवढ्याने त्याचे समाधान होईना; म्हणून दीड, पाच, सात किंवा दहा दिवस श्री गणपति ठेवून त्याचा उत्सव करू लागला. एखाद्याच्या कुलाचारात गणपति पाच दिवस असेल आणि तो त्याला दीड किंवा सात दिवसांचा करावयाचा असला, तर तो तसे करू शकतो. यासाठी अधिकारी व्यक्तीस विचारण्याची जरूरी नाही. रूढीप्रमाणे पहिल्या, दुसर्‍या, तिसर्‍या, सहाव्या, सातव्या किंवा दहाव्या दिवशी श्री गणेशविसर्जन करावे.

उत्सवांच्या वेळी किंवा त्यांच्या मिरवणुकांमध्ये दारू पिऊन आलेल्या लोकांना उत्सवाचे पावित्र्य राखण्यासाठी धर्माभिमान राखून आधीच घालवा !

      सध्या सार्वजनिक उत्सवांच्या वेळी किंवा त्यांच्या मिरवणुकांमध्ये काही लोक मौजमजा आणि दंगामस्ती करण्यासाठी दारू पिऊन सहभागी होतात. त्यामुळे अंगविक्षेप करत नाचणे, लोकांची टिंगलटवाळी करणे, महिलांची छेडछाड करणे, असे प्रकार घडतात. असे होत असूनही सहभागी झालेली इतर चांगली माणसे त्या दारू पिऊन आलेल्या लोकांना काही बोलत नाहीत किंवा आपल्याबरोबरची माणसे दारू पिऊन आलेली आहेत, हे माहीत असूनही त्यांना आधीच तेथून बाहेर काढत नाहीत. एरव्ही प्रवास करतांना इत्यादी प्रसंगी आपल्या बाजूला कोणी दारू प्यायलेला माणूस असेल, तर आपण त्याला लगेच दूर जायला सांगतोच ना ? दारू प्यायलेल्या लोकांमुळे अनर्थ ओढवेल, तसेच उत्सवाचे पावित्र्य निघून जाईल, हे लोकांच्या लक्षात येत नाही किंबहुना त्यांच्यामध्ये धर्माभिमान नसल्यानेच ते घाबरून काही कृती करायला धजत नाहीत.श्री गणेशाच्या उपासनेमागील शास्त्र समजून घेण्यासाठी वाचा सनातनचे ग्रंथ आणि लघुग्रंथ !

श्री गणेशोत्सवाच्या निमित्ताने सर्व मूर्तीकार आणि गणेशभक्त यांना सनातनची अनमोल भेट !
श्री गणपति - भाग १
 • शुभकार्यात प्रथम श्री गणेशपूजन का करतात ?
 • श्री गणपतीला लाल फुले अन् दूर्वा का वाहतात ?
 • गणेशचतुर्थीला नवीन मूर्तीची पूजा का करतात ?
श्री गणेशमूर्ती शास्त्रानुसार असावी !
      श्री गणेशमूर्ती मातीची अन् शास्त्रानुसार असेल, तर भाविकांना गणेशतत्त्वाचा खरा लाभ होतो. सनातन-निर्मित मूर्ती ही या दृष्टीने आदर्श कशी, याविषयी मार्गदर्शक लघुग्रंथ !

विद्युत रोषणाई नको, तर तेला-तुपाचे दिवे लावा !

      आजकाल सणासमारंभाच्या दिवशी मांगलिकाचे प्रतीक म्हणून विद्युत रोषणाई केली जाते. पूर्वीच्या काळी तेला-तुपाच्या दिव्यांनी रोषणाई केली जात असे. विद्युत रोषणाई आकर्षक असली, तरी सात्त्विकतेच्या दृष्टीकोनातून पाहिले, तर तेला-तुपाच्या दिव्यांनी केलेली रोषणाईच अधिक लाभदायक आणि डोळ्यांना आनंददायी असते. कारण विद्युत् दिव्यामध्ये तेला-तुपाच्या दिव्यांपेक्षा रज-तम जास्त असते आणि ते वातावरणात पसरते. त्यामुळे धार्मिक विधींच्या ठिकाणी वातावरणात सात्त्विकता टिकून रहावी. यासाठी तेला-तुपाचे दिवेच लावावे. श्री गणेशमूर्तीदानासारखी धर्मशास्त्रविरोधी कृती न करता मूर्तीचे पारंपरिक पद्धतीने विसर्जन करून श्री गणेशाची कृपा संपादन करावी !

वाचक, हितचिंतक आणि विज्ञापनदाते यांना विनंती
      महाराष्ट्रात काही ठिकाणी धर्मद्रोही संघटनांकडून श्री गणेशमूर्तीदान मोहीम राबवण्यात येते. जलप्रदूषण, दुष्काळ, पाण्याची टंचाई अशी कारणे देत श्री गणेशमूर्तीदान करा, असे या संघटनांकडून सांगण्यात येते. देवतांचे दान देणे वा घेणे, हा देवतांचा अपमान आहे. श्री गणेशमूर्ती दान केल्यानंतर तिचे यथासांग विसर्जन होईल, याची शाश्‍वती नसते. श्री गणेशचतुर्थीस प्राणप्रतिष्ठापना केलेल्या मूर्तीचे विसर्जन करावे, असा शास्त्रोक्त विधीच आहे. त्यामुळे श्री गणेशमूर्तीदान न करता तिचे पारंपरिक पद्धतीने विसर्जन करून श्री गणेशाची कृपा संपादन करावी.

गणेशोत्सवात धर्माचरणाचा संकल्प करणे, ही श्री गणेशाची खरी उपासना ठरेल !

गणेशोत्सवात हे असावे !
 • शाडू वा चिकणमाती यांपासून बनवलेली अन् नैसर्गिक रंगांत रंगवलेली मूर्ती 
 • नैसर्गिक पाना-फुलांची सजावट, लहान मंडप आणि दिव्यांची आरास तालबद्ध आरत्या आणि भावपूर्ण नामजप, तसेच पोवाडे, व्याख्याने आदींचे आयोजन 
 • विसर्जन मिरवणुकीत श्री गणपतीचा नामजप अन् रात्री १० पूर्वी तिची सांगता 
गणेशोत्सवात हे नसावे !
 • प्लास्टर ऑफ पॅरीसपासून बनवलेली अशास्त्रीय अन् अवाढव्य मूर्ती
 • थर्मोकोलची सजावट, भव्य मंडप आणि विद्युत लखलखाट (रोषणाई)
 • फटाके, वाद्यवृंद आणि चित्रपटगीत यांमुळे होणारे ध्वनी अन् वायू प्रदूषण
 • विसर्जन मिरवणुकीत हिडीस नाच, स्त्रियांशी असभ्य वर्तन अन् मद्यपानराजस्थानमधील सवाई माधोपूर येथील त्रिनेत्र श्री गणेशाची अभिषेकपूजा करून त्याला संकटनिवारणासाठी प्रार्थना करणे आणि त्यासंदर्भातील अनुभूती

राजस्थानमधील सवाई माधोपूर येथील संकटनिवारक त्रिनेत्र गणेश
त्रिनेत्र गणेश मंदिरात श्री गणेशाने पांढर्‍या उंदराच्या रूपात
दर्शन देऊन पूजेच्या तबकातील दूर्वा प्रत्यक्ष ग्रहण करणे 

सतत वर्तमानात रहाणार्‍या आणि देवाची लीला अनुभवायला शिकवणार्‍या सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळकाकू !

जोग येथील धबधबा
१. रामनाथीहून बेंगळुरूला जातांना वाटेत जोग 
धबधबा पाहून पुढे जाण्याचे सद्गुरु 
(सौ.) गाडगीळकाकूंनी सांगणे
     ३०.७.२०१६ या दिवशी रामनाथी आश्रमातून बेंगळुरूला जाण्यासाठी आम्ही निघालो. आम्ही नेहमी ज्या मार्गाने जातो, त्या मार्गावर अडचण असल्यामुळे मंगळुरूला जाऊन तिथून दुसर्‍या दिवशी बेंगळुरूला जायचे ठरले. मंगळुरूला जातांना सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळकाकू म्हणाल्या, या मार्गाने जातांना वाटेत जोग धबधबा लागतो. (छायाचित्र क्रमांक १) तो पाहून पुढे जाऊया. जोगपासून बेंगळुरू ८ घंट्यांच्या अंतरावर असल्याचे लक्षात आल्यावर सद्गुरु गाडगीळकाकू म्हणाल्या, ८ घंट्यांचेच अंतर आहे, तर आपण मंगळुरूला न जाता धबधबा पाहून थेट बेंगळुरूला जाऊया.

दूर्वा

श्री गणपतीला दूर्वा वाहाण्याची कारणे 
पौराणिक कारण
      गणपतीने आपल्याशी विवाह करावा म्हणून एका अप्सरेने ध्यानमग्न असलेल्या गणपतीचा ध्यानभंग केला. गणपतीने विवाहास नकार दिल्यामुळे अप्सरेने गणपतीला शाप दिला. यामुळे गणपतीच्या डोक्याचा दाह होऊ लागला. हा दाह न्यून (कमी) करण्यासाठी गणपतीने मस्तकावर दूर्वा धारण केल्या; म्हणून गणपतीला दूर्वा वाहातात. 
आयुर्वेदानुसार कारण
       दुर्वांच्या रसाने शरिराचा दाह न्यून होतो.
आध्यात्मिक कारण
     आपण पूजा करत असलेल्या मूर्तीतील देवत्व वाढून त्याचा आपल्याला चैतन्याच्या स्तरावर लाभ होतो. यासाठी त्या त्या देवतेचे अधिकाधिक तत्त्व आकृष्ट करणार्‍या गोष्टी देवतेला वाहणे उपयुक्त असते. दुर्वांमध्ये गणेशतत्त्व आकृष्ट करण्याची क्षमता सर्वांत अधिक असल्याने श्री गणेशाला दूर्वा वाहातात.

गणेशतत्त्व आकृष्ट आणि प्रक्षेपित करणार्‍या रांगोळ्या

सगुण तत्त्वाची स्पंदने जाणवणारी रांगोळी
१३ ठिपके १३ ओळी
आनंदाची स्पंदने जाणवणारी रांगोळी
१४ ठिपके १४ ओळी

श्री गणपति अथर्वशीर्ष

१. श्री गणपति अथर्वशीर्ष आणि गाणपत्य संप्रदाय 
      श्री गणपति अथर्वशीर्ष हे तर गाणपत्य संप्रदायाची अंतिम चरणसीमा आणि मानवतेची असीम मान्यरेखा होय. 
२. अथर्वशीर्ष या शब्दाचा अर्थ
      शीर्ष याचा अर्थ श्रेष्ठ अथर्व यात थर्व हा जो धातू आहे, त्याचा अर्थ गती. अ म्हणजे नाही, म्हणजे ज्याची गती थांबली (ज्याला गती नाही), ते अथर्व. अथर्वणऋषींनी शब्दस्वरूप दिलेले आणि सर्व सूक्तांमध्ये श्रेष्ठतम ठरलेले म्हणजेच अथर्वशीर्ष.
३. असंप्रज्ञात समाधीद्वारे मनाच्या पलीकडे गेल्यावर मनाचे संपूर्ण उन्मनीकरण होऊन 
विशुद्ध आत्मस्फुरण्यातून हे सूक्त प्रकट झाल्याने श्री गणपति अथर्वशीर्ष अजरामर होणे
     अथर्व ही शरिराची गती नसून मनाची होय. मनाच्या पलीकडे गेले, तरच मनाची गती थांबेल. असंप्रज्ञात समाधीविना मनापलीकडे जाता येत नाही. तेव्हा मनापलीकडे जाऊन मनाचे संपूर्ण उन्मनीकरण झाल्यानंतर विशुद्ध आत्मस्फुरण्यातून प्रकट झालेले सूक्त हे परमात्म्याएवढेच व्यापक, सर्वश्रेष्ठ आणि शाश्‍वत ठरते; म्हणूनच हे सूक्त अजरामर झाले. 
- आचार्य वसंत गोडबोले (मासिक धनुर्धारी, सप्टेंबर २०१०)

गणेशोत्सवाच्या काळात करावयाची श्री गणेशाची उपासना !

     श्री गणेशोत्सवाच्या कालावधीत गणेशतत्त्व नेहमीच्या तुलनेत पृथ्वीवर १ सहस्र पटींनी कार्यरत असते. या काळात केलेल्या श्री गणेशाच्या उपासनेने गणेशतत्त्वाचा अधिक लाभ होतो.
प्रार्थना : हे बुद्धीदाता श्री गणेशा, मला सद्बुद्धी दे. हे विघ्नहर्त्या, माझ्या जीवनात येणार्‍या सर्व संकटांचे निवारण कर ! 
नामजप : गणेशोत्सवाच्या काळात ॐ गँ गणपतये नम: । हा नामजप अधिकाधिक करावा. हा नामजप एकट्याने, तसेच सामूहिकरित्याही करू शकतो. 
स्तोत्रपठण : श्री गणेशचतुर्थीच्या काळात प्रतिदिन कुटुंबातील सर्वांनी श्री गणेशमूर्तीसमोर बसून श्री गणपति अथर्वशीर्ष वा गणपति संकटनाशन स्तोत्र म्हणावे. 
(संदर्भ : सनातनचा ग्रंथ श्री गणपति)

अ‍ॅन्ड्रॉईड सनातन पंचांग २०१६ ला आतापर्यंत मिळालेला भरघोस प्रतिसाद !

- श्री. महेश ननावरे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३.९.२०१६)

शाडू मातीच्या मूर्ती बनवणे सहजशक्य आहे ! - मूर्तीकार-बांधव

        धर्मशास्त्रानुसार शाडू मातीच्या मूर्ती बनवणे आवश्यक आहे. प्रतिदिन सहस्रो टन माती खाणीतून काढली जाते. वर्षातून गणेशोत्सवापूर्वी १० किंवा १५ टन माती काढली, तर पर्यावरणाची मोठी हानी होत नाही. शासनाने सर्वतोपरी सहकार्य केल्यास केवळ शाडू मातीच्याच मूर्ती सिद्ध करण्यास मूर्तीकारांना कोणतीही अडचण नाही, असेही मूर्तीकारांनी दैनिक सनातन प्रभातच्या प्रतिनिधीशी बोलतांना स्पष्ट केले आहे.
(संदर्भ : सनातन प्रभात)

सर्व साधक, वाचक, हितचिंतक, हिंदुत्वनिष्ठ आणि 
विज्ञापनदाते यांना श्री गणेशचतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा !

॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज
सनातनचे श्रद्धास्थान
मी कोणाचा नाही. माझा कुणी नाही.
ज्याचा त्याचा तोच मी; म्हणून मी सर्वांचा आहे.
भावार्थ : मी सर्वस्व गुरुचरणांवर वाहिल्यानंतर मी दुसर्‍या कुणाचा होऊच शकत नाही. गुरूंना अर्पण झाल्यानंतर माझा कुणी असायला मी शिल्लक राहिलोच कुठे ? परंतु सर्वांचा खरा मी एकच आणि सर्वव्यापी असल्यामुळे आता मी सर्वांचा आहे.
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण)
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥
या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो.
- प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले
स्वतःला सर्व कळते, असा अहंभाव असणार्‍या 
बुद्धीप्रामाण्यवाद्यांमुळे समाजाची होणारी हानी !
     स्वतःला सर्व कळते, असा अहंभाव असणार्‍या बुद्धीप्रामाण्यवाद्यांना नवीन विषय जाणून घेण्याची जिज्ञासा नसते. त्यांना कोणी एखादा नाविन्यपूर्ण चमत्कार दाखवला, तर तुम्ही तो केला, असे ते म्हणतात. त्यामुळे त्यांना चमत्काराच्या मुळाशी जाता येत नाही; म्हणून त्यामागील अध्यात्मशास्त्र कळत नाही. ते मात्र चमत्कारच खोटा, असा डंका पिटून समाजाचा बुद्धीभ्रम करतात. - (परात्पर गुरु) डॉ. आठवले

प.पू. गुरुदेवांच्या संदर्भात आलेल्या अनुभूती

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त...
परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

दुसर्‍याच्या चांगल्या गुणाचा अंगीकार करा !
गुणग्राहकता हा सद्गुण अंगिकारून दुसर्‍याच्या चांगल्या गुणाचा अंगीकार करावा. 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

बंगालमधील आदेश !

संपादकीय
       बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी येत्या मोहरमच्या पार्श्‍वभूमीवर राज्यातील हिंदु जनतेसाठी एक आदेश काढला आहे. दुर्गादेवीच्या मूर्तीचे विसर्जन दसर्‍याच्या दिवशी दुपारी ४ वाजण्याच्या अगोदर पूर्ण करा किंवा तिसर्‍या दिवशी करा. दसरा हा हिंदूंचा सण ११ ऑक्टोबर या दिवशी आहे. त्या दिवशी दुपारी ४ वाजण्याच्या अगोदर किंवा १३ ऑक्टोबर या दिवशी दुर्गादेवीच्या मूर्तीचे विसर्जन करायचे आहे. १२ ऑक्टोबर या दिवशी हे विसर्जन करायचे नाही. या दिवशी मोहरम आहे, हे कारण अर्थात्च उघड आहे. प्रश्‍न असा उभा रहातो की, हिंदूंचा दसरा हा सण इतरांना अडचणीचा ठरतो का ? किंवा इतरांना सुविधा पुरवण्यासाठी दसरा साजरा करण्यावर निर्बंध का ? उत्सवामध्ये शांती राखण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. याचा अर्थ हिंदूंच्या सणांत गोंधळ-गडबड गृहीत धरण्यात आले आहे. हिंदूंविषयी करून घेतलेले अपसमज म्हणजे हिंदुविरोधी विचारधारा ! बंगालसारख्या राज्यात तर याची प्रचीती सर्वाधिक येते.

आमची राजधानी !

संपादकीय 
      चार दिवसांपूर्वी राजधानी देहलीत पावसाने केलेला कहर दूरचित्रवाहिन्यांवरून पाहिला. शहरात सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. दुचाकी, चारचाकी, सार्वजनिक वाहतूक करणारी वाहने इत्यादी प्रकारची सर्व वाहने कंबरभर पाण्यातून जात होती. जणूकाही त्यांच्या अंगवळणीच पडलेला हा प्रकार होता. या पूरस्थितीचा लाभ उठवला तो लुटारू गटाने. हे तरुण पाण्यात अडकलेले एखादे वाहन ढकलून नेण्यासाठी शंभर रुपये घेत होते आणि गरजवंत वाहनचालक ते देत होते. कठीण समय येता कोण कामास येतो ?, असे एका प्रसिद्ध कवीने म्हटलेले आहे.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn