Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

कोटी कोटी प्रणाम !

चक्रधरस्वामी जयंती

कोटी कोटी प्रणाम !

सनातनचे १० वे संत पू. डॉ. मुकुल गाडगीळ यांचा आज वाढदिवस !
अत्यल्प अहं असणारे, संशोधक वृत्ती असणारे आणि ऋषींप्रमाणे भासणारे पू. डॉ. मुकुल गाडगीळ !

(म्हणे) सर्वोच्च न्यायालय मुस्लिम पर्सनल लॉमध्ये पालट करू शकत नाही !

मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचा थयथयाट
     नवी देहली - सामाजिक सुधारणांच्या नावाखाली मुस्लिम पर्सनल लॉमध्ये पालट किंवा तो नव्याने लिहिण्यात येऊ शकत नाही. हे धर्माशी संबंधित कायदे असल्याने न्यायालय त्यात हस्तक्षेप करू शकत नाही, असे मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने २ सप्टेंबरला सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्रकाद्वारे सांगितलेे. तीन वेळा तलाक म्हणत घटस्फोट देण्याच्या विरोधात एका मुसलमान महिलेने न्यायालयात प्रविष्ट केलेल्या याचिकेवरील सुनावणीच्या वेळी बोर्डाने वरील प्रतिज्ञापत्र सादर केले. २७ ऑगस्टला न्यायालयाने मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाला नोटीस पाठवून ते सादर करण्यास सांगितले होते.
     या प्रतिज्ञापत्रात पुढे म्हटले आहे की, कुणी आव्हान द्यायला मुळातच मुस्लिम पर्सनल लॉ हा काही कायदा नाही. कुराणाच्या आधारावर त्याची निर्मिती झाली आहे. विवाह, तलाक या गोष्टी धर्मानुसार वेगवेगळ्या आहेत. त्यामुळे एखाद्या विशिष्ट धर्माच्या अधिकारांसंबधी न्यायालय निर्णय देऊ शकत नाही. कुराणानुसार तलाक अनिष्ट आहे; पण तशीच स्थिती उद्भवली तर तलाकची अनुमती त्यात देण्यात आली आहे. पती कधीही घाईघाईत निर्णय घेत नाही, त्यामुळेच तलाकचा अधिकार त्याला देण्यात आलेला आहे. तीन वेळा तलाक म्हणण्याचा प्रकार शेवटचा पर्याय म्हणून वापरला जातो.

सुभाष वेलिंगकर यांचा गुन्हा काय ? - शिवसेना

     मुंबई - गोव्यात मातृभाषेच्या रक्षणाची चळवळ सुभाष वेलिंगकर यांनी उभी केली. मातृभाषेला संरक्षण दिल्याशिवाय मातृभूमीला कवचकुंडले लाभणार नाहीत, या प्रखर राष्ट्रीय विचाराने सुभाष वेलिंगकर आणि त्यांचे सहकारी मैदानात उतरले. पाद्य्रांच्या इंग्रजी माध्यमांच्या शाळांना अनुदान न देता सरकारने मराठी, तसेच कोकणी भाषेच्या शाळांना पाठबळ द्यावे, ही भूमिका घेऊन वेलिंगकर बेडरपणे लढत राहिले. यात त्यांनी कोणते बेकायदेशीर काम केले ? सुभाष वेलिंगकरांचा गुन्हा काय ?, असा प्रश्‍न शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक सामनाच्या अग्रलेखात विचारण्यात आला आहे.
यात पुढे म्हटले आहे की,
  १. गोव्यातील सरकारात भ्रष्टाचार आणि व्यभिचाराची बजबजपुरी माजली आहे. सौदेबाजी आणि भंपकपणास प्रतिष्ठा मिळाली आहे. रशियन, नायजेरियन गुंडांमुळे महिलांचे आणि मंदिरांचे पावित्र्य धोक्यात आले आहे. पुन्हा ज्या राजकर्त्यांच्या ढिलाईमुळे गोव्यात हा अनाचार वाढला त्यांच्या केसालाही धक्का न लावता मातृभूमी आणि मातृभाषा यांच्या रक्षणासाठी लढणार्‍या सेनापतीलाच काळ्या पाण्याची शिक्षा ठोठावली गेली. प्रश्‍न फक्त वेलिंगकर यांचा नसून यामुळे गोव्यातील पाद्य्रांचा काळ सोकावेल हीच भीती वाटते.
२. गोव्यातील अनेक समुद्रकिनारे आणि गल्लीबोळ नायजेरियन अन् रशियन माफिया यांनी नशेने धूत केले आहेत. सर्व प्रकारचे ड्रग्ज येथे सहज मिळते, ते काय राज्यकर्त्यांच्या पाठिंब्याशिवाय ? भाजपचे राज्य आणा, समुद्रकिनारी चालणार्‍या कॅसिनो बोटीचा जुगार बंद करू, असे सांगणार्‍यांचे राज्य आले, तेव्हा कॅसिनो बोटी चारवरून चाळीसवर पोचल्या.

गणेशभक्तांनो, गणेशोत्सवातील अपप्रकार टाळा !

नंदुरबार येथील हिंदु जनजागृती समितीपुरस्कृत सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाचे आवाहन !
   
श्री. हर्षल सोनार, प्रेम सोनार, डॉ. नरेंद्र पाटील, श्री. शेखर मराठे, सौ. चेतना पाटील आणि कु. रागेश्री देशपांडे
  नंदुरबार - हिंदूंचे प्रभावी संघटन व्हावे, हा लोकमान्य टिळकांंचा गणेशोत्सवामागील उद्देश साध्य करण्याच्या दृष्टीनेच शहरात गणेशोत्सव मंडळांचे संघटन करून हिंदु जनजागृती समितीच्या माध्यमातून सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाची स्थापना करण्यात आली आहे. राष्ट्र आणि धर्म संकटात असतांना सार्वजनिक गणेशोत्सवातील अपप्रकार न्यून करून आदर्श गणोशोत्सव साजरा करणे, हे प्रत्येक धर्मप्रेमी आणि राष्ट्रप्रेमी यांचे कर्तव्य आहे. गणेशभक्तांनी असा आदर्श ठेवून आणि भक्तीभावपूर्ण गणेशोत्सव साजरा करून श्रीगणेशाची कृपा संपादन करावी, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे डॉ. नरेंद्र पाटील यांनी येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत केले. हिंदु जनजागृती समिती पुरस्कृत सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाच्या वतीने या पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.
     या पत्रकार परिषदेला शहरातील मानाचा गणपति असलेल्या श्री दादा गणपति मंडळाचे अध्यक्ष श्री. प्रेम सोनार, मानाचा गणपति असलेल्या श्री बाबा गणपति मंडळाचे उपाध्यक्ष श्री. हर्षल सोनार, कुणबी पाटील गणेश मंडळाच्या सौ. चेतना पाटील, जय बजरंग व्यायामशाळेचे व्यवस्थापक श्री. शेखर मराठे आणि हिंदु जनजागृती समितीच्या कु. रागेश्री देशपांडे उपस्थित होत्या.

सजीव मूर्तीचे दान घेण्याचा अधिकार पुरोगाम्यांना आहे का ? - रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ता, हिंदु जनजागृती समिती

पत्रकार परिषदेत डावीकडून श्री. किरण दुसे, श्री. संभाजी भोकरे, अधिवक्ता श्री. वीरेंद्र इचलकरंजीकर, 
श्री. रमेश शिंदे, श्री. रणजित आयरेकर आणि श्री. शिवाजीराव ससे 
श्री गणेशचतुर्थीच्या पार्श्‍वभूमीवर हिंदु जनजागृती समितीची कोल्हापूर येथे पत्रकार परिषद
     कोल्हापूर - भारतीय संस्कृती आणि कायदा पूजा केलेली मूर्ती सजीव (जिवंत) आहे, असे मानतो. त्यामुळे कोणत्याही देवस्थानातील विश्‍वस्त हे देवतेच्या वतीने कारभार करतात. अशा प्रकारे जिवंत मानल्या गेलेल्या मूर्तीचे दान घेण्याचा अधिकार पुरोगाम्यांना आहे का ? त्याचसमवेत साक्षात् जिवंत म्हणून पूजा केलेल्या आणि ज्याच्याशी हिंदूंच्या भावना निगडित आहेत, अशा श्रीगणेशमूर्तींना पर्यावरणवादी अन् इतर कचर्‍याच्या गाडीतून नेऊन टाकतात, हे हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणारे आहे. श्रीगणेशमूर्तीच्या माध्यमातून होणारे प्रदूषण हे नगण्य असून केवळ हिंदूंच्या सण-उत्सवांचा आनंद हिरावून घेण्यासाठी चालणारे श्रीगणेशमूर्तीदानासारखे प्रकार बंद झाले पाहिजेत, असे परखड मत हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ता श्री. रमेश शिंदे यांनी व्यक्त केले. ते हिंदु जनजागृती समितीच्या वतीने शाहू स्मारक येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.
     या पत्रकार परिषदेला शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख श्री. संभाजी भोकरे, युवासेनेचे जिल्हा समन्वयक श्री. रणजित आयरेकर, हिंदु एकता आंदोलनाचे श्री. शिवाजीराव ससे, हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष अधिवक्ता श्री. वीरेंद्र इचलकरंजीकर आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. किरण दुसे उपस्थित होते.

भारताच्या माध्यमातून अमेरिका आणि जपान चीनला घेरण्याचा प्रयत्न करत आहेत ! - चीन

     बीजिंग - भारत आणि रशिया यांच्या माध्यमातून अमेरिका अन् जपान चीनला घेरण्याचा प्रयत्न करत आहेत; मात्र चीनला यामुळे चिंतीत होण्याची आवश्यकता नाही. चीनला आर्थिक आणि सैन्य शक्ती वाढवण्याकडे लक्ष केंद्रीत केले पाहिजे, असे मत चीनचे सरकारी दैनिक ग्लोबल टाइम्सच्या संपादकीयमध्ये म्हटले आहे.

काश्मीरमध्ये दंगलखोर धर्मांधांकडून विस्थापित हिंदूंच्या वसाहतीवर आक्रमण !

  • सरकार अशा दंगलखोरांवर आणखी किती दिवस कठोर कारवाई करणार नाही ? 
  • पीडीपी-भाजप सरकारच्या राज्यात असुरक्षित हिंदू ! 
     श्रीनगर - संचारबंदी हटवल्यानंतर कुपवाडा येथे २ सप्टेंबरला शेकडो दंगलखोर धर्मांधांनी येथील विस्थापित हिंदूंच्या वसाहतीवर आक्रमण केले. या वसाहतीतील काश्मीर प्रशासनात कर्मचारी असणार्‍या विस्थापित हिंदूंची घरे आहेत. आक्रमणाच्या वेळी या वसाहतीत हिंदू नव्हते. त्यामुळे कोणतीही जीवित हानी झाली नाही. मात्र दंगलखोरांनी येथील अनेक वाहनांची तोडफोड केली. काश्मीरमधील काही ठिकाणी दंगलखोरांनी अल कायदा, लष्कर-ए-तोयबा, अल उमर या आतंकवादी संघटनांचे झेंडे फडकावले.

पाणीटंचाई दूर व्हावी आणि पाऊस पडावा यासाठी आंध्रप्रदेशातील कनकदुर्गा मंदिरात वरूण याग संपन्न !

      विजयवाडा (आंध्रप्रदेश) - वरूण देवाला प्रसन्न करण्यासाठी येथील इंद्रकिलाद्रीमधील कनकदुर्गा मंदिरात आरंभलेला ३ दिवसीय वरूण याग नुकताच संपन्न झाला. या वेळी वेदमंत्रांचे पठण करण्यात आले. या यज्ञाचा एक भाग म्हणून वरूण यागाच्या तिसर्‍या दिवशी पुरोहितांनी कृष्णा नदीचे पाणी आणून मल्लिकार्जुन स्वामी मंदिरात मुख्य देवतेला सहस्र घट कलशाभिषेक केला.
     मंदिराचे साहाय्यक कार्यकारी अधिकारी आणि जनसंपर्क अधिकारी एस्. अच्युत रामय्या यांनी यागामध्ये पूर्णाहुती दिली. मोसमी पावसाला झालेला विलंब आणि असह्य उष्णता यांपासून लोकांना होणारा त्रास दूर व्हावा, या उद्देशाने वरूण यागाचे आयोजन करण्यात आले होते, असे रामय्या यांनी सांगितले.

आदिवासी पोषाखातील व्हर्जिन् मेरीचा पुतळा हटवण्याची आदिवासी गटांची मागणी !

ख्रिस्त्यांचा धर्मांतरासाठी पुतळ्याचा वापर !
       रांची - झारखंडच्या सिंगपूरमध्ये चर्चच्या आवारात उभारण्यात आलेला आदिवासी पोषाखातील व्हर्जिन् मेरीचा पुतळा हटवण्यात यावा, अशी मागणी सारना आदिवासी समुदायातील विविध गटांनी एका मोर्च्याद्वारे केली आहे. व्हर्जिन् मेरीला आदिवासींच्या पारंपरिक तांबड्या आणि पांढर्‍या साडीमध्ये दाखवण्यात आले आहे. तसेच आदिवासी महिलेप्रमाणे केशरचना करण्यात आली आहे. हातामध्ये बांगड्या घालण्यात आल्या आहेत आणि पदरामध्ये बालक दाखवण्यात आले आहे. हे वर्णन सारना समुदायातील महिलेचे असून व्हर्जिन् मेरीचा पुतळा हुबेहुब तसा बनवण्यात आला आहे, असे सारना समुदायातील काही धार्मिक नेत्यांनी सांगितले. (धर्मांध ख्रिस्त्यांची हुशारी ! - संपादक) आदिवासींचा चर्चकडे निघालेला मोर्चा पोलिसांनी अडवला आणि सिंगपूर परिसरात १४४ कलम लागू केले आहे. (धर्मांध ख्रिस्त्यांच्या विरोधात सनदशीर मार्गाने कृती करणार्‍या सारना आदिवासींचे अभिनंदन ! - संपादक)

मध्यप्रदेशातील एका सरकारी कार्यालयात धर्माच्या आधारे सुट्ट्या घोषित !

     भोपाळ - मध्यप्रदेश राज्य मंडळाने तेथे काम करणार्‍या कर्मचार्‍यांना धर्माच्या आधारावर सुट्टया घोषित केल्या आहेत. यामुळे कर्मचार्‍यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. या नियमानुसार हिंदु कर्मचार्‍यांना अन्य धर्मियांच्या सणांच्या वेळी सुटी मिळणार नाही. तसेच मुसलमानांना केवळ जन्माष्टमी आणि गुरुनानक जयंती वळगता हिंदूंच्या सणांच्या वेळी सुटी मिळणार नाही. याला विरोध करणार्‍या कर्मचार्‍यांचे म्हणणे आहे की, आम्ही सर्व सण साजरे करतो. दिवाळीला मुसलमान आमच्या घरी येतात आणि आम्ही ईदच्या वेळी त्यांच्याकडे जातो; मात्र या आदेशामुळे आम्ही असे करू शकत नाही.भारताने सैन्य दलाच्या बळावर निराकरण करण्याचा पर्याय निवडला असता, तर पाकव्याप्त काश्मीर आता भारताचा असता ! - वायूदल प्रमुख अरूप राहा

पाकव्याप्त काश्मीर आणि एकूणच काश्मीरची समस्या हे पुरो(अधो)गामी नेहरू 
यांचे पाप आहे आणि त्या पापाची शिक्षा भारत गेली ७० वर्षे भोगत आहे !
     नवी देहली - भारताने तथाकथित नैतिकता जपण्याऐवजी सैन्याच्या बळावर निराकरण करण्याचा पर्याय निवडला असता, तर पाकव्याप्त काश्मीर हा आतापर्यंत भारताचा भाग बनला असता, असे विधान वायू दलप्रमुख अरूप राहा यांनी १ सप्टेंबर या दिवशी केले. १९७१ मध्ये झालेल्या भारत-पाकिस्तान युद्धापर्यंत भारत सरकारने वायू दलाचा कधीही पूर्ण वापर करून घेतला नाही, असेही ते म्हणाले. वायू दलाने आयोजित केलेल्या एका चर्चासत्रावेळी अरूप राहा यांनी अधिकार्‍यांशी संवाद साधला. 
राहा म्हणाले की, 
१. पाकव्याप्त काश्मीर हा शरीरात घुसलेला काटा आहे. 
२. भारत सरकारने आतापर्यंत संरक्षण गरजांकडे संवेदनशील आणि वास्तववादी दृष्टीकोनातून पाहिले नाही.
३. भारताने आतापर्यंत अनेक कठीण आणि संघर्षाच्या परिस्थितीतही सैनिकी, विशेषत: वायू दलाच्या शक्तीचा वापर करण्यात फारसा उत्साह दाखवला नाही.

७५ टक्के हजेरी दाखवा आणि स्मार्टफोन मिळवा, मध्यप्रदेशमधील भाजप सरकारची महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना भेट !

      इंदूर (मध्यप्रदेश) - महाविद्यालयामध्ये ७५ टक्क्यांहून अधिक हजेरी (उपस्थिती) लावणार्‍या विद्यार्थ्यांना राज्य सरकारकडून चक्क स्मार्टफोन (भ्रमणभाष संच) भेट म्हणून देण्यात आले. राज्याचे उच्चशिक्षणमंत्री जयभानसिंह पवैय्या यांनी ११ सरकारी महाविद्यालयांतील ५५ विद्यार्थ्यांना हे संच वाटले. मेहनती विद्यार्थ्यांना स्मार्टफोन भेट म्हणून देण्यात येतील, अशी घोषणा भाजप सरकारने वर्ष २०१३ मधील विधानसभा निवडणुकीच्या वेळी केली होती. त्यानुसार सरकारने एप्रिलपर्यंत या भ्रमणभाष संचाचे वाटप करण्याचा निर्णय घेतला होता. राज्य सरकारने सर्व महाविद्यालयांना पत्र पाठवून २८ जानेवारीपर्यंत पात्र विद्यार्थ्यांची सूची सादर करण्यास सांगितले होते.

नायजेरियाच्या नागरिकांना त्यांच्या आर्थिक स्थितीची माहिती मिळवल्याशिवाय सरकार भारतात येऊ का देते ?

     पर्वरी (गोवा) पोलिसांनी सावळे, पिळर्ण येथे अमली पदार्थ (गांजा) विकण्यार्‍या नायजेरियाच्या २ नागरिकांना २ लक्ष रुपये किंमतीच्या अमली पदार्थांसह अटक केली. पाकिस्तानात २ आतंकवादी आक्रमणांत ४ आतंकवादी आणि १६ नागरिक ठार !

     नवी देहली - पाकमध्ये २ सप्टेंबरला दोन ठिकाणी झालेल्या आतंकवादी आक्रमणांत ४ आतंकवादी आणि १६ नागरिक ठार झाले.
     पेशावर येथील ख्रिस्ती कॉलनीत आतंकवाद्यांनी केलेल्या आक्रमणांच्या वेळी सुरक्षा दलाशी झालेल्या चकमकीत ४ आतंकवादी ठार झाले. खैबर पख्तुनवा प्रांतातील मरदान जिल्हा न्यायालयाबाहेर झालेल्या २ बॉम्बस्फोटांत १२ जण ठार, तर ५२ जण घायाळ झाले. मृतांमध्ये अधिवक्त्यांचा समावेश आहे. घायाळांपैकी काहींची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

हिंदु स्वाभिमान संघटनेच्या वतीने गाझियाबाद (उत्तरप्रदेश) येथे आजपासून हिंदु नारी संसद !

      मेरठ (उत्तरप्रदेश) - हिंदु स्वाभिमान संघटनेच्या वतीने गाझियाबादमधील डासना मंदिरात ३ सप्टेंबरपासून हिंदु नारी संसद भरवली जाणार आहे. इसिसच्या विरोधात लढा देण्यासाठी १५ सहस्र धर्म सैनिक निर्माण करण्याची घोषणा गेल्या वर्षी हिंदु स्वाभिमानने केली होती. लव्ह जिहादच्या विपरित परिणामांविषयी हिंदु महिलांमध्ये जागृती निर्माण करण्याच्या दृष्टीने ही चळवळ हाती घेण्यात आली आहे, असे हिंदु स्वाभिमानच्या राष्ट्रीय अध्यक्षा चेतना शर्मा यांनी सांगितले. जिहाद्यांकडून हिंदु महिलांवर अत्याचार झाल्याची अनेक उदाहरणे इतिहासात सापडतात. इसीस आणि बोको हराम यांसारख्या जिहादी संघटना इतर समुदायातील मुली आणि महिला यांच्यावर बलात्कार करून त्यांची विक्री करत आहेत. हिंदु महिलांनी या आक्रमणाच्या विरोधात लढा देण्यासाठी आता सिद्ध होण्याची वेळ आली आहे, असे शर्मा यांनी सांगितले.

पाकने बलुचिस्तान सोडले नाही, तर वर्ष १९७१ पेक्षाही मोठे परिणाम भोगावे लागतील !

स्वत:च्या घरात काय जळत आहे, याकडे लक्ष न देता दुसर्‍याला त्रास देण्याचा 
प्रयत्न केल्याचा परिणाम भोगत असलेला पाकिस्तान !
बलूच नेते ब्रहमदाग खान बुगती यांची पाक सैन्याला चेतावणी
      नवी देहली - पाकिस्तानी सैन्याने बलुचिस्तान सोडले नाही, तर त्यांना वर्ष १९७१ पेक्षाही मोठे परिणाम भोगावे लागतील, अशी चेतावणी बलूच रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष ब्रहमदाग खान बुगती यांनी दिली आहे. 
   बलुचिस्तानमधील लोकांवर पाककडून केल्या जात असलेल्या अत्याचारांविषयी बोलतांना म्हणाले, इस्लामाबादमध्ये बसलेल्या पाक अधिकार्‍यांना बलूच लोकांना पूर्णपणे नष्ट करायचे आहे. त्यांना बलुचींचा प्रश्‍न शक्तीच्या बळावर दडपून टाकायचा आहे. प्रत्येक दिवशी अनेक महिला-पुरुषांच्या हत्या केल्या जात आहेत. अनेकांचे अपहरण केले जाते, अनेकांना त्यांच्या घरून ओढून नेऊन ठार केले जाते. त्यानंतर त्यांच्यावर अत्याचार करून त्यांना रस्त्यावर सोडून दिले जाते. प्रतिदिन राजरोसपणे अत्याचार होत असतांना बलुचिस्तानमधील दडपशाहीविषयी एकाही प्रसारमाध्यमाने वृत्त प्रसारित केले नाही, जे काही दाखवण्यात येते, ते तोडून मोडून दाखवण्यात येत आहे.

फ्रान्सच्या एका उपाहारगृहाच्या चालकाने सर्व मुसलमान आतंकवादी असतात, असे म्हणत २ मुसलमान महिलांना हिजाब घातल्याने सेवा नाकारली !

जिहादी आतंकवादाचा फटका बसल्यानंतर युरोपातील लोकांचा 
उद्रेक भारतातील निधर्मीवादी जाणून घेतील का ?
       लंडन - फ्रान्सची राजधानी पॅरिसजवळील थॉम्बले-ओन-फ्रान्स येथील ली सेनैको या महागड्या रेस्टॉरंटमध्ये हिजाब घालून गेलेल्या २ मुसलमान महिलांना रेस्टॉरंटच्या चालकाने सेवा देण्यास नकार देत त्यांना बाहेर काढले. सर्व मुसलमान आतंकवादी असल्याचा आरोपही केल्याने येथे संताप व्यक्त होत आहे. 
       या घटनेचा व्हिडिओ सामाजिक संकेतस्थळावर प्रसारित झाल्यानंतर तिथे निषेध करण्यासाठी गेलेल्या एका गटाची या चालकाने नंतर क्षमा मागितली. स्थानिक पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत चौकशी चालू केली आहे. 
      चालकाने सांगितले की, सध्या सर्वत्र घडणार्‍या आतंकवादी आक्रमणांमुळे आपण व्यथित झालो होतो आणि गेल्या वर्षी पॅरिसमध्ये झालेल्या आतंकवादी आक्रमणात एक जवळचा मित्र मृत्युमुखी पडल्याने चिडलो होतो. 
      गेल्या आठवड्यातच फ्रान्समधील काही शहरांच्या महापौरांनी बुर्किनी या मुसलमान महिलांसाठी बनवण्यात आलेल्या पोहण्याच्या पोषाखावर बंदी घातली होती. येथील सर्वोच्च न्यायालयाने ही बंदी उठवली असली तरी यामुळे फ्रान्समध्ये मुसलमानविरोधी वातावरण वाढत असल्याने काळजी व्यक्त होत आहे. पाकमध्ये भारतीय दूरचित्रवाहिन्यांच्या प्रक्षेपणावर निर्बंध !

पाकशी सांस्कृतिक मैत्री करणार्‍या पाकप्रेमी भारतीय यावर तोंड उघडतील का ?
      इस्लामाबाद - भारतीय दूरचित्रवाहिन्यांचे अवैधरित्या होणारे प्रक्षेपण बंद करण्यासाठी पाकमधील इलेक्ट्रॉनिक माध्यमे नियामक मंडळाने सर्व पाकिस्तानी दूरचित्रवाहिन्यांना चेतावणी दिली आहे. या वाहिन्यांना दिवसभरात केवळ ६ टक्के वेळच भारतीय वाहिन्यांचे प्रसारण करण्याची अनुमती देण्यात आली आहे. अनेक नागरिकही भारतीय आस्थापनांचे डीटीएच् साहित्य वापरून भारतीय वाहिन्याच पाहत असल्याचे लक्षात आले आहे.

जर्मनीतील सहस्रावधी शरणार्थींना येत्या ३ वर्षांत स्वदेशी पाठवणार ! - जर्मनीचे अर्थमंत्री

     बर्लीन - चान्सलर मर्केल यांच्या ओपन डोअर पॉलिसीमुळे सहस्रावधी निर्वासित जर्मनीमध्ये घुसले. येत्या ३ वर्षांत त्यांना परत स्वदेशी पाठवण्यात येणार आहे, असे जर्मनीचे अर्थमंत्री मार्कुस सोडर यांनी स्पाइजेल या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे. मार्कुस सोडर म्हणाले की, युद्धग्रस्त देशांतून येणार्‍या शरणार्थींचा ओघ विशिष्ट कालमर्यादेनंतर थांबवला पाहिजे. यादवी युद्धापासून त्यांची सुटका व्हावी, यासाठी त्यांना तात्पुरता आश्रय देण्यात आला होता. त्यांच्या देशातील स्थिती सुधारली की, त्यांनी परत आपल्या देशात जायला पाहिजे. अफगाणिस्तान आणि इराक येथून आलेल्या निर्वासितांसाठी आता तेथे सुरक्षित स्थिती निर्माण झाली आहे. या शरणार्थींची परत त्यांच्या कुटुंबियांशी भेट घालून दिली पाहिजे.
     मार्कुस सोडर म्हणाले की, गेल्या वर्षी १० लाखपेक्षा अधिक निर्वासित जर्मनीमध्ये आले. एवढ्या मोठ्या प्रमाणात वेगळ्या संस्कृतीतील लोकांना आपल्या देशात सामावून घेणे योग्य नाही. जर्मनीमध्ये वास्तव्य करू इच्छिणार्‍यांनी जर्मनीची नीतीमूल्ये आत्मसात केली पाहिजे. बुरख्यावर जर्मनीमध्ये बंदी घालण्यात आली आहे. ज्यांना हे मान्य नाही, त्यांनी त्यांच्या देशात परत जावे.
     २०१६ मधे २ लाख ५० सहस्र ते ३ लाख निर्वासित जर्मनीत आले, असे जर्मनीच्या स्थलांतराविषयीच्या कार्यालयाचे प्रमुख फ्रँक ज्युर्जन वेस यांनी सांगितले.

ओला कॅब्सकडून करण्यात येणार्‍या श्री गणेशाच्या विडंबनाचा हिंदूंकडून निषेध !

      नवी देहली - वाहतुकीसाठी मोबाईल अ‍ॅपचा वापर करणारे ओला हे भारतातील एक प्रसिद्ध आस्थापन आहे. ओलाने त्याच्या ब्लॉगवर प्रसारित केलेल्या एका पोस्टमध्ये श्री गणेशचतुर्थीला श्रीगणेशाची चांदीची मूर्ती तुमच्या घरापर्यंत पोचवू, असे विज्ञापन केले आहे. या विज्ञापनामध्ये ओला कॅब्सच्या छतावर (रूफवर) श्रीगणेशाची मूर्ती बसवली असून गणेशचतुर्थीला ओला कॅब्स वरून श्रीगणेश घरी येत असल्याचे दाखवण्यात आले आहे.
     हिंदु धर्मात श्री गणेश ही उपास्य देवता आहे. हिंदु समाजात श्री गणेशाची भक्तीभावाने पूजा-अर्चा करतात. श्री गणेशाला गाडीच्या छतावर बसवून विज्ञापनासाठी वापर करणे अयोग्य आहे. ओला कॅब्सने स्वत:च्या व्यापारी लाभासाठी हिंदु देवतेचे मानवीकरण केले आहे. श्री गणेशाची ही विटंबना आहे. त्यामुळे हिंदूंच्या धार्मिक भावनांचा अनादर झाला आहे.

माझ्यासह महापालिकेच्या अधिकार्‍यांच्या घरी शाडूमातीची श्री गणेशमूर्ती बसवण्यासाठी प्रयत्न करू ! - महापालिका आयुक्त रवींद्र खेबूडकर

निवेदन स्वीकारतांना डावीकडे महापालिका आयुक्त, तर
उजवीकडून सौ. माईणकर, सौ. तोफखाने आणि श्री. धमेंद्र कोळी

        सांगली, २ सप्टेंबर (वार्ता.) - प्रदूषण मंडळाच्या सातत्याने आम्हाला नोटिसा येत आहेत आणि त्या संदर्भात आम्हालाही कृती करणे आवश्यक आहे. सध्या मोठ्या प्रमाणात प्लास्टरच्या श्री गणेशमूर्ती नागरिक खरेदी करतात. त्यासाठी लोकांच्या प्रबोधनासमवेत तुम्हीही काही पर्याय उपलब्ध करून दिले पाहिजेत. यांसाठी प्रशासनाच्या स्तरावर माझ्यासह अधिकाधिक अधिकार्‍यांच्या घरी शाडूमातीची श्री गणेशमूर्ती बसवण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्‍वासन सांगली-मिरज-कुपवाड महापालिकेचे आयुक्त श्री. रवींद्र खेबूडकर यांनी दिले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयुक्तांना श्री गणेशविसर्जनासाठी कृत्रिम हौद करण्यात येऊ नये, तसेच अन्य मागण्यांसाठी निवेदन देण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी हिंदु जनजागृती समितीच्या सौ. स्मिता माईणकर, सौ. मधुरा तोफखाने आणि वाहतूक सेनेचे श्री. धर्मेंद्र (आबा) कोळी उपस्थित होते.

सनातन-निर्मित श्री गणेशमूर्तीप्रमाणे आदर्श आणि सात्त्विक श्री गणेशमूर्ती बनवणारे राजापूर (जिल्हा रत्नागिरी) येथील मूर्तीकार श्री. राहुल तायशेट्ये !

श्री. राहुल तायशेट्ये
     राजापूर, रत्नागिरी येथील श्री गणेशमूर्तीकार श्री. राहुल तायशेट्ये यांनी प्रथम सनातन-निर्मित सात्त्विक श्री गणेशमूर्तीप्रमाणे मूर्ती घडवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यासाठी त्यांना प्रेरणा कशा प्रकारे मिळाली, तसेच मूर्ती घडवतांना आलेल्या अनुभूती आदींविषयी त्यांच्याच शब्दांत जाणून घेऊया.
१. सनातन-निर्मित सात्त्विक श्री गणेशमूर्ती पाहिल्यापासून 
त्याप्रमाणे मूर्ती घडवण्यासाठी प्रयत्न करणे
     मी ३ वर्षांपूर्वी सनातनच्या साधकांच्या घरी सनातन-निर्मित सात्त्विक श्री गणेशमूर्ती पाहिल्यापासून त्याच प्रकारे श्री गणेशमूर्ती बनवण्याची तळमळ मला लागली होती आणि ती यावर्षी प्रत्यक्षात आली. श्री गणेशमूर्ती शास्त्रानुसार असावी ? या सनातन-निर्मित ग्रंथातील शास्त्रानुसार शाडूच्या मातीपासून मूर्ती बनवण्यास प्रारंभ केला आणि त्यानंतर स्थानिक साधकांनी वेळोवेळी सुचवलेले पालट केल्यानंतर अखेर सात्त्विक श्री गणेशमूर्ती घडवली गेली.

ज्या देशात महिलांचा आदर राखला जात नाही, तो समाज रसातळाला जातो ! - विश्‍वास नांगरे-पाटील, पोलीस महानिरीक्षक, पंढरपूर

      पंढरपूर - ज्या ठिकाणी महिलांचा आदर आणि सन्मान केला जातो तेथे देवतांचे स्थान आणि वास्तव्य असते; मात्र जेथे महिलांचा अपमान केला जातो, तिच्यावर अत्याचार होतो, त्या ठिकाणी कोणतीही क्रिया सफल होत नाही; ते रसातळाला जातात, असे प्रतिपादन कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील यांनी केलेे. सोलापूर ग्रामीण जिल्हा पोलीस दलाच्या वतीने आयोजित निर्भया पथकाच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. पंढरपुरात गणेशोत्सवात निर्भया पथक २४ घंटे कार्यरत असेल.
     या वेळी नांगरे-पाटील म्हणाले की, लहानपणी पिता रक्षण करतो, मोठे झाल्यानंतर पती आणि वृद्धपणी पुत्र रक्षण करतो, असे असतांनाही महिला असुरक्षित का, असा प्रश्‍न पडतो. गुन्हेगाराला शिक्षा होण्यापूर्वी गुन्हाच घडणार नाही, याची काळजीही हे निर्भया पथक घेणार आहे. त्यासाठी जो कोणी विनयभंग, छेडछाड करेल त्याला अगोदर पोलीस ठाणे, नंतर त्याच्या घरी आई, वडील, भाऊ, बहीण यांच्यासमोर बसवून समुपदेशन केले जाईल. त्यातून तो सावरला तर ठीक अन्यथा कठोर शिक्षा केली जाईल.

मलकापूर येथे डॉल्बीमुक्त गणेशोत्सव साजरा करण्यासाठी महिलांच्या वतीने महिला प्रभात फेरी !

प्रभात फेरीत सहभागी झालेल्या महिला
(छायाचित्रकार : श्री विक्रम फोटो, मलकापूर)

       मलकापूर (जिल्हा कोल्हापूर), २ सप्टेंबर (वार्ता.) - प्रदूषणकारी डॉल्बी वापरून गणेशोत्सव साजरा करणार्‍या मंडळांवर कारवाई व्हावी, तसेच पारंपरिक पद्धतीने भावपूर्ण गणेशोत्सव साजरा व्हावा, या मागणीसाठी येथील तनिष्का महिला गट, गणेश भक्त महिला आणि कोल्हापूर पोलीस दल शाहूवाडी पोलीस ठाणे यांच्या वतीने महिला प्रभात फेरी काढण्यात आली.

देवसंस्कृती भोगवादी झाल्यानेच विनाशाकडे वाटचाल होत आहे ! - श्री. वासुदेवराव राठोड, गायत्री परिवार

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने राजुरा येथे हिंदूसंघटन मेळावा ! 

डावीकडून सौ. भक्ती चौधरी, दीपप्रज्वलन
करतांना श्री. वासुदेवराव राठोड, श्री. श्रीकांत पिसोळकर

       राजुरा - सध्या हिंदूंसाठी कुठेही धर्मशिक्षण दिले जात नाही. मुले आई-वडिलांना मम्मी-पप्पा असे म्हणतात. खरेतर मुलांवर संस्कार करायला आई-वडीलच न्यून पडत आहेत. आपली संस्कृती ही देवसंस्कृती आहे; पण ती आता भोगवादी संस्कृती झालेली आहे. आपण विनाशाकडे जात आहोत, असे प्रतिपादन गायत्री परिवाराचे साधक श्री. वासुदेवराव राठोड यांनी केले. येथे ३० ऑगस्ट या दिवशी झालेल्या हिंदूसंघटन मेळाव्यात ते बोलत होते. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. श्रीकांत पिसोळकर आणि रणरागिणी शाखेच्या सौ. भक्ती चौधरी यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले. २१५ धर्माभिमान्यांनी मेळाव्याचा लाभ घेतला.

कोल्हापूर येथे उद्योजक परिसंवाद

उद्योजकांशी संवाद साधतांना
हिंदु जनजागृती समितीचे श्री. रमेश शिंदे

         कोल्हापूर - २६ ऑगस्ट या दिवशी येथील धर्माभिमानी उद्योजक श्री. शरद शेट्ये यांच्या आसावती शुगर मिल येथे उद्योजकाच्या परिसंवादाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी बंगाल, आसाम, ओरिसा, मिझोराम आणि उत्तरपूर्व भारतातील राज्यांतील हिंदू उद्योजकांची स्थिती, समस्या आणि धर्माध यांच्या कुरघोड्यांविषयी मार्गदर्शन केले. ज्येष्ठ उद्योजक सर्वश्री अरविंद शिंदे आणि भरत सोमैय्या यांनी व्यवसायाच्या दृष्टीने हिंदु राष्ट्राची आवश्यकता ? या विषयावर श्री. रमेश शिंदे यांच्याशी संवाद साधला.

न्याय सेवा केंद्राच्या माध्यमातून गरीब-गरजूंना विनामूल्य मार्गदर्शन - अधिवक्ता समीर पटवर्धन

     सांगली - आर्थिक परिस्थिती चांगली नसलेल्या नागरिकांमध्ये न्यायविषयक प्रश्‍न भरपूर असतात. या संदर्भात त्यांचे अज्ञानही असते. त्याचप्रकारे त्यांच्या मनात अधिवक्ता आणि न्यायाधीश यांच्या संदर्भात एक अनामिक भीतीही असते. त्यांच्यात होणार्‍या वादाचे रूपांतर योग्य न्यायिक मार्गदर्शनाअभावी मारामारीत होते. त्यासाठी गरीब-गरजू लोकांना विनामूल्य कायदेशीर मार्गदर्शन मिळावे, या उद्देशाने अधिवक्ता परिषदेच्या वतीने न्याय सेवा केंद्र हे विनामूल्य कायदेविषयक मार्गदर्शन केंद्र चालू करण्यात येत आहे, अशी माहिती अधिवक्ता परिषदेचे सांगली जिल्हाध्यक्ष अधिवक्ता श्री. समीर पटवर्धन यांनी दिली. ते पंचशीलनगर येथील श्रीमती मालूताई जोशी (काकी) यांच्या घरी चालू करण्यात आलेल्या मार्गदर्शन केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते.
     या वेळी अधिवक्ता परिषदेचे महाराष्ट्र सचिव श्री. चंद्रकांत कुलकर्णी, सांगली जिल्हा सचिव अधिवक्ता श्री. संजय धर्माधिकारी, खजिनदार अधिवक्ता श्री. श्रीपाद होमकर, सदस्य सर्वश्री विनायक देशपांडे, आनंद देशपांडे, स्मिता शिंदे, आरती देशपांडे, जिल्हा सरकारी वकील श्री. उल्हास चिप्रे यांसह अन्य मान्यवर उपस्थित होते.

नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा मृत्यू विमान अपघातातच झाला !

  • नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या मृत्यूविषयीचे गूढ सरकारनेच अधिकृतपणे जनतेसमोर उकलावे, अशी जनतेची अपेक्षा आहे !
  • जपानने सार्वजनिक केलेल्या अहवालातील माहिती
       लंडन - नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या मृत्यूच्या संदर्भातील माहिती असलेला ६० वर्षे जुना अहवाल नुकताच जपानच्या अधिकार्‍यांनी सार्वजनिक केला आहे. या अहवालानुसार नेताजींचा मृत्यू विमान अपघातातच झाला असल्याचे म्हटले आहे. विमान अपघातानंतर १८ ऑगस्ट १९४५ या दिवशी नेताजींना तैपेई येथील रुग्णालयात मृत घोषित करण्यात आले होते, असेही या अहवालात स्पष्टपणे नमूद करण्यात आलेले आहे. बोस फाईल्स इन्फो या ब्रिटनस्थित संकेतस्थळावर याविषयीची माहिती प्रकाशित करण्यात आली आहे. या संकेतस्थळाने दिलेल्या माहितीनुसार संबंधित अहवाल जानेवारी १९५६ या दिवशीच पूर्ण झाला होता. त्यानंतर टोकियो येथील भारतीय दुतावासाकडे तो सोपवण्यात आला; मात्र भारत सरकारने सुरक्षिततेच्या कारणास्तव तो आजवर प्रकाशित केला नव्हता. या अहवालात प्रारंभीची ७ पाने ही जपानी भाषेत असून पुढील १० पानांमध्ये त्याचे इंग्रजी भाषांतर केलेले आहे.

कृत्रिम तलाव आणि गणेश मूर्तीदान या धर्मशास्त्रविरोधी प्रथा रोखण्यासाठी मुलुंड येथे तहसीलदारांना निवेदन !

डावीकडून तहसीलदार श्रीमती जे. व्ही. वाघ, यांना
निवेदन देतांना रमेश घाटकर, बाजूला गणेश पाटील

        मुलुंड, २ सप्टेंबर (वार्ता.) - नैसर्गिक जलाशयापेक्षा कृत्रिम तलावांमध्ये श्री गणेशमूर्तींचे विसर्जन करणे आणि गणेशमूर्तींचे दान करणे या धर्मशास्त्रविरोधी प्रथा रोखाव्यात, यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ३१ ऑगस्ट या दिवशी मुलुंडच्या तहसीलदार श्रीमती जे. व्ही. वाघ यांना निवेदन देण्यात आले. या वेळी धर्माभिमानी श्री. विनायक साळुंखे, हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

पर्यावरणपूरक गणेशोत्सव आणि शाडूच्या मूर्तीद्वारे शास्त्रोक्त पूजा होण्यासाठी श्री गणेश कला केंद्र आणि गुरुजी फॉर ऑल यांचे योगदान ! - श्री. चैतन्य तागडे

        पुणे, २ सप्टेंबर (वार्ता.) - गेल्या १० वर्षांपासून श्री गणेश कला केंद्र पर्यावरणपूरक अशा शाडूमातीच्या गणेशमूर्ती घराघरात पूजल्या जाव्यात, यासाठी कार्यरत आहे. गणेशमूर्ती शास्त्रोक्त असावी. शाडूच्या मूर्तीचे शास्त्रोक्त पालन केले, तर पर्यावरणाचे रक्षण होणार आहे. शाडूमातीच्या मूर्तीमध्येच गणेशतत्त्व अधिकाधिक प्रमाणात आकृष्ट होते. अशा गणेशमूर्तींमुळे समाजामध्ये सात्त्विक स्पंदने निर्माण होऊन मूर्तीची शास्त्रोक्त पूजा व्हावी; म्हणून आम्ही गुरुजी फॉर ऑल यांच्याशी करार केला आहे. याची थेट संकेतस्थळावरून नोंद करून घेतली जाते. हिंदु जनजागृती समिती आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांनी केलेल्या जनजागृतीमुळे श्री गणेश कला केंद्राकडून घरगुतीसमवेत सार्वजनिक गणेश मंडळाच्या मूर्तीही शाडूच्या मातीत उपलब्ध करून दिल्या जात आहेत, अशी माहिती श्री गणेश कला केंद्राचे श्री. चैतन्य तागडे यांनी १ सप्टेंबर या दिवशी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. या वेळी गुरुजी फॉर ऑलचे सर्वश्री निकेत पुराणिक, अमित कोठावडे आणि तुषार जैन उपस्थित होते.
        श्री. चैतन्य तागडे म्हणाले, आतापर्यंत आम्ही विविध आकारांतील ६० प्रकारच्या मूर्ती सिद्ध केल्या असून सात्त्विक गणेशमूर्तींचेे महत्त्व सांगून सनातन संस्थेने भाविकांना मार्गदर्शन केले आहे. श्री गणेश कला केंद्राच्या वतीने प्लास्टर ऑफ पॅरिसच्या भावातच शाडूच्या मूर्तींची विक्री केली जाणार आहे.
     नागपूर - राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्थेचा (नीरी) सेवानिवृत्त वैज्ञानिक मकसूद अन्सारी मेहंदी हसन अन्सारी हा दत्तक घेतलेल्या ३ मुलींवर गेल्या काही वर्षांपासून बलात्कार करत असल्याची घटना समोर आली. (उच्चशिक्षित धर्मांधांची विकृत वासनांधता ! अशा धर्मांधांना शरियतनुसारच शिक्षा हवी, असे कुणाला वाटल्यास त्यात चूक ते काय ? - संपादक)      पीडित मुलीने पोलिसांना दिलेल्या तक्रारीवरून धंतोली पोलिसांनी गुन्हा प्रविष्ट करून मकसूद याला अटक केली आहे. त्याला न्यायालयाने २ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी दिली होती. मकसूद अन्सारी हा १२ वर्षांपूर्वी संस्थेतून वैज्ञानिक म्हणून निवृत्त झाला. वर्ष २००८ मध्ये त्याने एक मुलगी दत्तक घेतली. त्यानंतर त्याने काही मासांनंतर आणखी मुली दत्तक घेतल्या. त्या तीनही पीडित मुली अनुक्रमे १६, ११ आणि ५ वर्षांच्या आहेत. पहिल्या मुलीवर २००८ पासून त्याने अत्याचार करण्यास आरंभ केला. सध्या पहिली मुलगी १० वीत, २ मुलगी ६ वी आणि ३ री मुलगी पहिल्या वर्गात शिकत आहे. मोठ्या मुलीने तिची वर्गमैत्रीण आणि तिचे पालक यांना सांगितल्यानंतर त्यांनी लेखी स्वरूपात पोलिसांकडे तक्रार केली.

न्यूझीलंडमध्ये ७.१ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचे धक्के !

       वेलिंग्टन - न्यूझीलंडच्या उत्तर-पूर्व भागात भूकंपाचे धक्के बसले. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ७.१ इतकी नोंद झाली. या भूकंपाचा केंद्रबिंदू गिसबॉर्नपासून १६९ किलो मीटर अंतरावर उत्तर-पूर्व भागात ३० किलो मीटर खोल समुद्रात असल्याचे समजते. सुनामीच्या भीतीने येथील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे; मात्र हवाईस्थित पॅसिफिक सुनामी केंद्राने या भूकंपामुळे सुनामीचा धोका नसल्याचे स्पष्ट केले आहे.
महर्षींनी प्रलयकालाविषयी सतर्क करणे
       १९.३.२०१६ या दिवशी झालेल्या नाडीवाचन क्रमांक ६७मध्ये महर्षि म्हणतात, हे पूर्ण वर्ष प्रलयकालाचे आणि आपत्तीजनक असणारे आहे. (न्यूझीलंडच्या उत्तर-पूर्व भागात भूकंपाचे धक्के बसले. या घटनेवरून प्रलयकालाविषयी महर्षींनी केलेले भाष्य किती तंतोतंत आहे, हे लक्षात येते ! - संपादक)

फलक प्रसिद्धीकरता

काश्मीरची समस्या सोडवण्याचा एकमेव उपाय !
     भारताने तथाकथित नैतिकता जपण्याऐवजी सैन्याच्या बळावर समस्येचे निराकरण करण्याचा पर्याय निवडला असता, तर पाकव्याप्त काश्मीर हा आतापर्यंत भारताचा भाग बनला असता, असे प्रतिपादन वायूदलप्रमुख अरूप राहा यांनी केले आहे.

हिंदू तेजा जाग रे !

Jago !
     Bharat ne sainya bal ka upyog kiya hota, to ab tak pakvapt kashmir bharat ka hota. - vayudal pramukh Arup Raha - kya Bharat yah galati sudharega ?
जागो !
: भारत ने सैन्य बल का उपयोग किया होता, तो अब तक पाकव्याप्त कश्मीर भारत का होता ! - वायुदल प्रमुख अरूप राहा - क्या भारत यह गलती सुधारेगा ?

राज्यासह देशभरातील क्ष-किरणतज्ञांचा (रेडिओलॉजिस्ट) बेमुदत संप !

राष्ट्र्रहित साधणारे वैद्यकीय 
अधिकारी आणि कर्मचारी मिळण्यासाठी 
हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) आवश्यक !
       पुणे, २ सप्टेंबर - गर्भलिंगनिदान आणि प्रसूतीपूर्व चाचणी (पीसीपीएन्डीटी) कायद्यातील जाचक अटी आणि तरतुदी रहित व्हाव्यात, या मागणीसाठी राज्यासह देशभरातील क्ष-किरणतज्ञांनी पुकारलेल्या संपाला १ सप्टेंबर या दिवशी प्रारंभ झाला. देशभरातील २० सहस्रांहून अधिक क्ष-किरणतज्ञ या संपात सहभागी झाले आहेत. (संप पुकारून सर्वसामान्यांची हित गैरसोय हा संप समाजद्रोहीच म्हणावा लागेल ! - संपादक)
       संपाविषयी माहिती देतांना डियन रेडिओलॉजिकल अ‍ॅण्ड इमेजिंग असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. गुरुराज लच्छान यांनी सांगितले की, गर्भलिंगनिदान आणि प्रसूतीपूर्व चाचणी कायद्यामुळे डॉक्टरांना दबाव आणि भीतीखाली काम करावे लागत आहे. या कायद्यांतर्गत महाराष्ट्र्रात मागील वर्षभरात ५५२ क्ष-किरणयंत्रे बंद (सील) केली आहेत. त्यातील ५५० तक्रारी या फॉर्म एफ् भरण्यासंदर्भातील आहेत. डॉक्टरांना फॉर्म भरण्यासारख्या जाचक गोष्टींमध्ये अडकवणे चुकीचे असल्याचा आरोप संघटनेकडून करण्यात आला आहे. कायद्याची एकसारखी अंमलबजावणी व्हावी आणि त्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे ठरवली जावीत, अशी संघटनेची मुख्य मागणी असल्याचे डॉ. विनय चौधरी यांनी सांगितले. त्यामुळे येत्या काळात सरकारने या विषयात योग्य ते लक्ष घालावे. योग्य तो निर्णय न दिल्यास हे आंदोलन आणखी तीव्र करू, अशी चेतावणीही संघटनेने दिली आहे.

अमेरिकेच्या केनेडी स्पेस सेंटरमध्ये स्फोट !

       फ्लोरिडा (अमेरिका) - अमेरिकेतील फ्लोरिडा राज्यातील केनेडी स्पेस सेंटरमध्ये स्फोट झाला. या स्फोटामुळे अनेक इमारतींना हादरा बसला. रॉकेटमध्ये इंधन भरतांना चूक झाल्याने स्फोट झाला. या स्फोटात कुणीही घायाळ झाले नाही. या स्फोटात फेसबुकचा एमॉस-६ हा उपग्रह नष्ट झाला आहे. या उपग्रहाची किंमत १ सहस्र ४०० कोटी रुपये होती. हा उपग्रह सोडतांना हा स्फोट झाला. एमॉस-६ उपग्रहाच्या साहाय्याने सर्व आफ्रिकी देशांतील नागरिकांना फेसबुकच्या इंटरनेट डॉट ओआर्जीच्या माध्यमातून ब्रॉडब्रँड इंटरनेट देण्याची योजना होती.

बांगलादेशनंतर बलुचिस्तान

१. फाळणीच्या वेळी बलुचिस्तानला पाकिस्तानात समाविष्ट व्हायचे नसणे !
      मुळात फाळणी हीच भारताच्या आजपर्यंतच्या इतिहासातील सर्वांत मोठी घोडचूक आहे. म्हणजे भारताच्या इतिहासाकडे वस्तुनिष्ठरित्या पाहिल्यास इतरही अनेक घटना सर्वांत मोठी घोडचूक पदाच्या दावेदार ठरू शकतील. तथापि इतिहासातील घटनांचा अर्थ, अन्वयार्थ आणि महत्त्व हे त्यांच्या वर्तमानकाळातील संदर्भावरून ठरते. म्हणून फाळणी ही आजवरची इतिहासातील सर्वांत मोठी घोडचूक ठरते. ब्रिटीश साम्राज्यवादी व्यवस्थेचे फोडा आणि राज्य करा धोरण, धर्मांध मुसलमान फुटीरतावाद, त्याला ब्रिटिशांनी पद्धतशीरपणे पोसणे, तत्कालीन काँग्रेसने त्याविषयी पत्करलेले पडते घेण्याचे धोरण आदी घटना फाळणीला कारणीभूत आहेत. डॉ. राममनोहर लोहिया यांच्या मते तत्कालीन काँग्रेसी नेत्यांचा सत्तेच्या लोभातून फाळणीचा भयानक रक्तरंजित अध्याय आकाराला आला. त्या फाळणीच्या वेळीसुद्धा मुळातच बलुचिस्तानला पाकिस्तानात समाविष्ट व्हायचे नव्हते. त्यांना स्वतंत्र तरी व्हायचे होते किंवा भारतात समाविष्ट व्हायचे होते.

गोप्रेमींनो, हिंदु राष्ट्र स्थापन झाल्यावर सर्व समस्या सुटणार असल्याने हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी प्रयत्नरत रहा !

श्री. राम होनप
    गोप्रेमींच्या मनात गायींना वाचवण्याविषयीचे विचार असतात; पण गायींचा पालनकर्ता असलेला गोपालक भगवान श्रीकृष्ण प.पू. डॉक्टरांच्या माध्यमातून सांगत आहे, अरे, केवळ गायींचा विचार न करता सर्व शक्ती पणाला लावून हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी प्रयत्नरत रहा. हिंदु राष्ट्र स्थापन झाल्यावर सर्व समस्या आपोआपच सुटतील. गोप्रेमींनो, श्रीकृष्ण काय सांगतो ते जरा कान देऊन ऐका ! 
- श्री. राम होनप, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२२.६.२०१६)स्पिरिच्युअल सायन्स रिसर्च फाउंडेशन (एस्.एस्.आर्.एफ्.)च्या प्रसारकार्याचा जून २०१६ मधील आढावा

पू. मिलुटीन पांक्रात्स

  कालच्या लेखात आपण एस्.एस्.आर्.एफ्.च्या कार्याचा आढावा पाहिला. आज त्याच्या पुढचा भाग पाहू.
३ इ. वैशिष्ट्यपूर्ण अभिप्राय
३ इ २. विषयांची निवड आणि त्याचे स्पष्टीकरण देण्याची पद्धत उत्कृष्ट ! : प्रत्येक सूत्राचे तुम्ही केलेले विवेचन चकित करणारे आहे. माझी मनःस्थिती संभ्रमित असतांना, तसेच मला मार्गदर्शनाची आवश्यकता असतांना आवश्यक असलेल्या विषयांवरच तुमचे लेख वाचायला मिळतात आणि आश्‍चर्यकारकरित्या माझ्या शंकांचे विनासायास निरसन होते. तुमची विषयांची निवड आणि त्याचे स्पष्टीकरण देण्याची पद्धत नैसर्गिक अन् तर्कशुद्ध असल्याने ती विश्‍वसनीय आहे. - कु. स्वाती रॉय, पुणे (एस्.एस्.आर्.एफ्. गूगल प्लसवरील अभिप्राय)

वाहतूक पोलिसांचे हात कायद्याने बळकट करा !

     अल्पवयीन दुचाकीस्वाराच्या भावाने केलेल्या आक्रमणात गंभीर घायाळ झाल्याने मुंबई वाहतूक विभागातील वाहतूक हवालदार विलास शिंदेंची प्राणज्योत अखेर मालवली. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत त्या उद्दाम आक्रमणकर्त्यावर ठोस कारवाई तर हवीच; पण अशा गुन्हेगारांना कोणते कडक शासन करता येईल, हे आता तरी अभ्यासण्याची वेळ आली आहे. देशांतर्गत कुठलेही युद्ध चालू नसतांना पोलीस दल अशा पद्धतीने धारातिर्थी पडत आहे. एखाद्या ठिकाणी एका व्यक्तीला सामान्यपणे विचारणा केल्यावर आक्रमण होते आणि त्यात आम्हाला आमचे पोलीस गमवावे लागतात, ही प्रतिक्रिया ऐकायला मिळाली. पोलिसांची ही अवस्था, तर सामान्य लोक जगतांना जीव मुठीत घेऊन कशाप्रकारे जगत असतील, याचा विचार न केलेलाच बरा. या प्रकरणावरून शासन काहीतरी शिकेल काय ?
दैनिक सनातन प्रभातचा रंगीत
श्री गणेशोत्सव विशेषांक

प्रसिद्धी दिनांक : ४ सप्टेंबर २०१६
पृष्ठ संख्या : १०, मूल्य : ५ रुपये
विशेषांकाची वाढीव मागणी वितरकांनी ३ 
सप्टेंबरला दुपारी ३ पर्यंत इआर्पी प्रणालीत भरावी.
     हिंदूंनो, आपल्यासमोर गांधी, नेहरू आणि सर्वपक्षीय राजकारणी यांचा आदर्श नको, तर धर्म अन् राष्ट्र यांसाठी त्याग केलेले छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप, छत्रपती संभाजी महाराज, गुरु गोविंद सिंग, स्वातंत्र्यवीर सावरकर इत्यादी धर्माभिमान्यांचा आदर्श हवा !

प.पू. पांडे महाराज यांच्या धर्मपत्नी, तसेच प्रेमळ, निर्मळ आणि प.पू. डॉक्टरांप्रती भाव असणार्‍या ६४ टक्के आध्यात्मिक पातळी असणार्‍या कै. (सौ.) आशा पांडेआजी !

आज कै. (सौ.) पांडेआजी यांच्या देहावसनानंतरचा तेरावा दिवस आहे. त्यानिमित्ताने...
बसलेले डावीकडून सौ. आशा पांडे, प.पू. पांडे महाराज, मागे उभे असलेले सौ. देवयानी पांडे
(प.पू. पांडे महाराजांच्या स्नुषा), चि. सौरभ अमोल पांडे, कु. गौरी अमोल पांडे (प.पू. पांडे
महाराजांची नातवंडे), श्री. अमोल पांडे (प.पू. पांडे महाराजांचे चिरंजीव) (वर्ष २००७)
ती. सौ. आशा पांडेआजी यांची त्यांच्या कुटुंबियांनी सांगितलेली गुणवैशिष्ट्ये
      २२.८.२०१६ या दिवशी प.पू. पांडे महाराज यांची धर्मपत्नी सौ. आशा पांडेआजी यांचे देहावसान झाले. आज कै. (सौ.) पांडेआजी यांच्या देहावसनानंतरचा तेरावा दिवस आहे. त्यानिमित्ताने त्यांचे कुटुंबीय आणि सनातनचे साधक यांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये पाहूया.

अत्यल्प अहं असणारे, संशोधक वृत्ती असणारे आणि ऋषींप्रमाणे भासणारे पू. डॉ. मुकुल गाडगीळ !

पू. मुकुल गाडगीळ
      सनातनचे १० वे संत पू. मुकुल गाडगीळ यांचा भाद्रपद शुक्ल पक्ष द्वितीया या दिवशी वाढदिवस आहे. पू. गाडगीळ काका यांची कु. मधुरा भोसले यांनी टिपलेली गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत.
पू. डॉ. मुकुल गाडगीळ यांच्या चरणी सनातन 
परिवाराच्या वतीने भावपूर्ण नमस्कार !
१. विनम्रता
     पू. गाडगीळकाका व्यावहारिकदृष्ट्या उच्च शिक्षित (डॉक्टरेट) असून त्यांनी उच्च पद सांभाळून संशोधन केले होते; परंतु त्यांच्या वागण्या-बोलण्यातून पुष्कळ नम्रता जाणवते. ते लहान-मोठ्या सर्वच वयोगटांतील साधकांशी अतिशय सहजतेने आणि विनम्रपणे संवाद साधतात.

६४ टक्के आध्यात्मिक पातळी असणार्‍या कै. (सौ.) आशा पांडेआजी यांची सनातनचे संत आणि साधक यांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये !

सौ. आशा पांडे
       २२.८.२०१६ या दिवशी प.पू. पांडे महाराज यांच्या धर्मपत्नी सौ. आशा पांडे यांचे निधन झाले. आज त्यांची निधनशांत आहे. त्यानिमित्ताने देवद आश्रमातील साधकांना मिळालेल्या पूर्वसूचना आणि त्यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत.
१. साधकांना मिळालेल्या पूर्वसूचना
१ अ. सौ. आजींच्या निधनाच्या आधी त्यांची पुष्कळ आठवण येणे आणि रुग्णालयात गेल्यावर त्या पुन्हा येणार नाहीत, असे वाटणे : सौ. आजींच्या निधनाच्या २ दिवस आधी रात्री मला आजींना भेटावे, असे पुष्कळ वाटत होते. भोजनकक्षातून खोलीत जातांना मी त्यांना सांगितले, आजी, मला आज तुम्हाला पुष्कळ भेटावेसे वाटत आहे. यावर त्या प्रेमाने म्हणाल्या, हो का ? आणि त्यांनी मला कडकडून आलिंगन दिले. जणूकाही त्यांना ही आमची अखेरचीच भेट असल्याचे ठाऊक होते. या वेळी सौ. पांडेआजी रुग्णालयात गेल्या, त्याच वेळी माझ्या मनात विचार आला की, आजी आता परत येणार नाहीत. असे २ दिवस सतत जाणवत होते. - सौ. रेखा नटवरलाल जाखोटिया
१ आ. आजींच्या निधनाविषयी मिळालेली पूर्वसूचना : आजींच्या निधनाच्या आदल्या दिवशी त्यांना न्याहारी देतांना दूधही घेऊन जाण्याचा विचार माझ्या मनात आला. त्यांना खायला काहीच जात नसल्याचे बघून माझ्या मनात एक क्षण विचार आला की, उद्या या आपल्याला दिसणार नाहीत. - सौ. स्मिता नाणोसकर

प.पू. पांडे महाराज यांनी मृत्यू या विषयावर केलेले मार्गदर्शन

प.पू. परशराम पांडे
१. व्यक्तीच्या मृत्यूनंतर ती आहे,या सकारात्मक भावनेने 
पाहिल्यास मनात वैफल्य निर्माण होत नाही !
     एखाद्याचा मृत्यू झाल्यावर आपण म्हणतो, मृत्यू झाला, म्हणजेच आता ती व्यक्ती नाही. वास्तविक तिचे अस्तित्व तिथे नसले, तरी तिचे स्थित्यंतर होऊन ती वेगळ्या स्वरूपात असतेच. ती आहे, या भावनेने त्याकडे पाहिल्यास, म्हणजे सकारात्मक भाव ठेवल्यास ती नसल्याचा भाव निर्माण होत नाही. त्यामुळे मनात वैफल्य निर्माण होत नाही. जसे एखाद्याचा मुलगा विदेशात असतो, तेव्हा तो म्हणतो, माझा मुलगा विदेशात आहे, तसे हे आहे.

चांगली निरीक्षणक्षमता आणि प्रेमभाव असणार्‍या कै. (सौ.) पांडेआजी !

१. सौ. पांडेआजी दुपारच्या महाप्रसादानंतर प्रतिदिन माझ्या खोलीत येऊन माझी विचारपूस करायच्या. - श्रीमती सत्यवती दळवी, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२५.८.२०१६)
२. सौ. पांडेआजी प्रत्येकाची प्रेमाने चौकशी करायच्या. सौ. पांडेआजी म्हणजे प्रेमाचा अखंड वहाणारा झराच ! त्यांना रुग्णालयात भरती करावयाच्या आदल्या रात्री मी महाप्रसाद घेत होते. तेव्हा सौ. पांडेआजींनी पाठीमागून येऊन प्रेमाने माझ्या पाठीवर हात ठेवला आणि त्या मला म्हणाल्या, वासंती, आज तुला यायला का उशीर झाला ? तू जेव्हा आश्रमात सेवा करत होतीस, तेव्हा आपण समवेतच महाप्रसादाला बसायचो. आता तू संकुलात जातेस. त्यामुळे २ - २ दिवस भेट होत नाही.

सेवाभाव आणि तत्त्वनिष्ठता असणार्‍या कै. (सौ.) आशा पांडेआजी !

१. खडतर परिस्थितीत आनंदाने गृहिणीची कर्तव्ये पार पाडणे
     पूर्वी प.पू. पांडे महाराज जलसिंचन खात्यात चाकरी (नोकरी) करत होते. तेव्हा त्यांना प्रकल्पाचे काम करण्यासाठी काही वेळा वनात जावे लागायचे. त्या वेळी सौ. पांडेआजी वनातील खोलीत एकट्याच असायच्या; तरीही त्यांना कधीही जंगली प्राण्यांची भीती वाटली नाही. त्या स्थितीत त्या आनंदाने गृहिणीची कर्तव्ये आणि व्रते करत.
२. सेवाभाव 
अ. प्रारंभी सौ. पांडेआजींना मुले आणि नातवंडे यांच्यासमवेत घरी रहावे, असे वाटायचे; मात्र नंतर त्या प.पू. पांडे महाराजांना सेवेत साहाय्य व्हावे आणि त्यानिमित्त स्वतःकडूनही सेवा घडावी, यासाठी अधिकाधिक काळ त्या देवद येथील सनातन आश्रमात राहू लागल्या.
आ. सौ. पांडेआजींना वाटत असे, आपल्या हातून प्रतिदिन काहीतरी सेवा घडली पाहिजे, अन्यथा आश्रमात आपण अन्न ग्रहण करायला नको.

भगवंताला स्वीकारले, तर भगवंत त्याचे गुण (चैतन्य) तुम्हाला देईल !

      २२.८.२०१६ या दिवशी प.पू. पांडे महाराज यांची धर्मपत्नी सौ. पांडेआजी यांचे देहावसान झाले. त्याच्या दुसर्‍या दिवशी, म्हणजे २३.८.२०१६ या दिवशी पहाटे ५.३० वाजता प.पू. पांडे महाराज नेहमीप्रमाणे प्रसन्नतेने फिरायला जाण्यासाठी खोलीतून बाहेर आले. तेव्हा मी त्यांना म्हणालो, काल मला तुम्ही शिकवलेले वेदामध्ये मृत्यू हा शब्द नाही, तर केवळ परिवर्तन होते, हे सूत्र आठवले. नंतर दिवसभर माझ्याकडून प्रार्थना आणि नामजप चांगला झाला. त्या प्रसंगी प.पू. महाराजांनी मला पुढील मार्गदर्शन केले.

परात्पर गुरूंची पत्नी होण्याचे महद्भाग्य लाभलेल्या आणि स्वतःही अध्यात्मातील अधिकारी असलेल्या कै. सौ. पांडेआजी !

सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ
        सौ. पांडेआजींनी २२ ऑगस्ट २०१६ या दिवशी देहत्याग केल्याचे कळले. ज्या वेळी पू. (सौ.) सखदेवआजींनी देहत्याग केला, त्याच वेळी मला प.पू. पांडे महाराजांची आठवण आली होती. ती का आली होती, ते आता लक्षात आले. त्या विश्‍वमंडलात अशी काही घटना होणार असल्यास, याची स्पंदने त्या त्या व्यक्तीसंदर्भात आधीच निर्माण होत असल्यानेही अशा प्रकारच्या पूर्वसूचना मिळत असतात.
        बहुतांश वेळा असे असते की, पती जरी अध्यात्मातील अधिकारी असला, तरी पत्नी असतेच, असे नाही किंवा तिची त्याला अध्यात्म जगण्याला साथ असतेच, असे नाही; परंतु सौ. पांडेआजींचे असे नव्हते. त्या स्वतःही अध्यात्मातील अधिकारी होत्या. त्यांची आध्यात्मिक पातळी ६४ टक्के होती, म्हणजेच त्या जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून आधीच सुटल्या होत्या. शिवाय परात्पर गुरु पांडे महाराज यांची पत्नी होण्याचे महद्भाग्य त्यांना लाभले होते. सात जन्मांच्या पुण्याईमुळेच हे शक्य होते. तसेच तो श्रीमन् नारायण ज्यांच्या माध्यमातून राष्ट्र आणि धर्म यांचे कार्य करतो, त्या सनातन परिवारातही त्या सामावलेल्या होत्या. त्या देवद आश्रमातच वास्तव्याला होत्या. उतारवयात घर सोडून आश्रमात येऊन रहाणे कदापि शक्य नसते; कारण या वयात चित्तावरील संस्कारांचे प्रमाणही अधिक असते. ते झुगारून आश्रमात रहाणे, हे अगदीच कठीण असते, ते आजींनी शक्य करून दाखवले होते. त्या सनातन परिवाराच्याच एक ज्येष्ठ सदस्य होत्या.

सौ. पांडेआजींच्या पार्थिवाच्या दहनविधीच्या प्रसंगी आलेली अनुभूती

सौ. पांडेआजींच्या पार्थिवाच्या दहनविधीच्या वेळी पाऊस पडू लागणे; पण प.पू. पांडे महाराज यांनी प्रार्थना करताच पाऊस थांबणे आणि विधी निर्विघ्नपणे पूर्ण होऊन सर्व साधक आश्रमात परतल्यानंतर मुसळधार पाऊस पडणे : श्रावण कृष्ण पक्ष पंचमी (२२.८.२०१६) या दिवशी सौ. पांडेआजी यांच्या पार्थिवाचा अंत्यसंस्कार विधी पनवेल येथील स्मशानात करण्यात आला. पार्थिव देहाचे दहन करण्यापूर्वी अग्नीच्या शुद्धीसाठी त्याला आहुत्या दिल्या जातात. हा विधी स्मशानात प्रत्यक्ष चिता रचतात, तेथून काही अंतरावर मोकळ्या (छत नसलेल्या) ठिकाणी चालू होता. तेथे प.पू. पांडे महाराजही उपस्थित होते. त्याच वेळी आकाशात बरेच ढग जमून पावसाचे थेंब पडू लागले; पण काही क्षणातच पाऊस पडायचा थांबून हा विधी निर्विघ्नपणे पार पडला. विधी संपल्यानंतर सर्व जण आश्रमात परतले आणि मुसळधार पावसाची सर आली. या अनुभूतीविषयी मी विधीनंतर प.पू. पांडे महाराज यांच्याशी बोललो. तेव्हा ते म्हणाले, देवाची केवढी कृपा ! मला प्रार्थना करण्याविना दुसरा काही पर्यायच नव्हता. अशा प्रकारे प.पू. पांडे महाराजांचे अस्तित्व आणि त्यांनी केलेली प्रार्थना यांमुळेच सौ. पांडेआजींचा दहनविधी निर्विघ्नपणे पार पडला.
- श्री. विनायक आगवेकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (३०.८.२०१६)

दैनिक सनातन प्रभातच्या परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे अमृत महोत्सवी वर्ष विशेषांकातील प.पू. डॉक्टरांच्या छायाचित्राच्या संदर्भात आलेली अनुभूती

सौ. मानसी राजंदेकर
परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त...
१. आदल्या रात्री विशेषांक वाचल्यावर निर्गुणाची (विशेषांकाची) सगुणातून पूजा करूया, असे ठरवणे : दैनिक सनातन प्रभातच्या परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त काढलेला विशेषांक २८.५.२०१६ च्या रात्रीच घरी आला होता. मी त्या रात्रीच तो अंक पूर्ण वाचला. अंक पाहून मनात विचार आला, आज केवळ प.पू. डॉक्टरांच्या कृपेनेच निर्गुण तत्त्वाची सगुणातून अनुभूती घेण्याची संधी आली आहे. त्यानंतर मी देवाने दिलेल्या निर्गुणाची (विशेषांकाची) सगुणातून उद्या पूजा करूया, असे ठरवले.
२. पूजा केलेल्या विशेषांकातील प.पू. डॉक्टरांच्या छायाचित्रात जिवंतपणा जाणवणे आणि पूजा केलेल्या अन् पूजा न केलेल्या अन्य अंकांतील छायाचित्र यांत पुष्कळ अंतर असल्याचे ध्यानी येणे : मी दुसर्‍या दिवशी सकाळी देवपूजा केल्यावर विशेषांकाचीही पूजा केली. पूजेनंतर मी तो अंक देवघरात ठेवला. संध्याकाळी मी देवाजवळ दिवा लावतांना त्या अंकाकडे पाहिले, तर अंकातील प.पू. डॉक्टरांच्या छायाचित्रात जिवंतपणा जाणवत होता.

महर्लोकवासी (सौ.) पांडेआजी यांच्या निधनाविषयी त्यांचे पती प.पू. पांडे महाराज यांना ज्येष्ठ पत्रकार श्री. अरविंद विठ्ठल कुळकर्णी यांनी पाठवलेले पत्र !

माननीय श्री परशरामपंत पांडे महोदय,
यांना स.न.वि.वि.
      आपल्या पत्नी सौ. आशाताई यांचे २२.८.२०१६ या दिवशी निधन झाल्याचे वृत्त वाचले. दु:ख झाले. आपणासारख्या अध्यात्मात गती असलेल्या कर्तृत्ववान शासकीय सेवकाचा पती म्हणून प्रदीर्घ सहवास आपल्या पत्नीस लाभला. परिणामी आपणा उभयतांची कृपादृष्टी ज्यांच्याकडे वळली, त्या सर्वांचे आयुष्य सुखावह झाले असणार. आपण स्थितप्रज्ञ आहात. त्यामुळे पत्नीविरहाचे दुःख सोसण्याचे धैर्य आपल्यात आहेच. आपले ईशचिंतन अखंड चालू राहो, ही प्रार्थना. आपली काही सेवा करणे असल्यास निःसंकोचपणे सांगावे. कळावे.
- आपला नम्र, श्री. अरविंद विठ्ठल कुळकर्णी, मुंबई (२५.८.२०१६)

व्हॉट्स अ‍ॅपवरून श्री गणेशाचे विडंबन करणार्‍या संदेशाचे प्रसारण

हिंदूंमध्ये धर्मशिक्षणाचा 
अभाव असल्याचे दर्शवणारे उदाहरण !
        व्हॉट्स अ‍ॅपवरून श्री गणेशाचे विडंबन करणारा एक संदेश सध्या प्रसारित होत आहे. यात व्हिसा कन्फर्म झाला आहे. ५ सप्टेंबरला सकाळची फ्लाईट आहे. न्यायला या अशा संदेशासह श्री गणेशाच्या पारपत्राचा (पासपोर्ट) समावेश केला आहे. एखाद्या व्यक्तीचे छायाचित्र, वय, लिंग, नातेवाईक, तसेच पत्ता यांची माहिती ज्याप्रमाणे पारपत्रावर असते, त्याचप्रमाणे श्री गणेशाची माहिती यात लिहिण्यात आली आहे. (अशा अयोग्य कृतींमुळे श्री गणेशाची अवकृपा होऊ नये यासाठी हिंदूंना धर्मशिक्षण देणे आवश्यक आहे ! - संपादक) 
- व्हॉट्स अ‍ॅपवरून साभार

सनातनच्या साधिका सौ. सुप्रिया माथूर आणि सौ. विद्या अग्नी यांना पितृशोक

     फोंडा (गोवा) - सनातनच्या रामनाथी, गोवा येथील आश्रमात पूर्णवेळ साधना करणार्‍या साधिका सौ. सुप्रिया सुरजित माथूर, तसेच बांदोडा, गोवा येथील सनातनच्या साधिका सौ. विद्या सुचेंद्र अग्नी यांचे वडील द्वारकानाथ खातू (वय ७० वर्षे) यांचे २ सप्टेंबर २०१६ या दिवशी हृदयविकाराच्या झटक्याने गोव्यात निधन झाले. ते मूळचे नाते (महाड, जिल्हा रायगड) येथील रहिवासी होते. त्यांच्या पश्‍चात २ विवाहित मुली, एक मुलगा, सून, जावई, नात, असा परिवार आहे. त्यांचे जावई श्री. सुचेंद्र अग्नी आणि श्री. सुरजित माथूर (हे पूर्णवेळ साधना करतात.) हे सनातनच्या मार्गदर्शनाखाली साधना करतात. सनातन परिवार खातू, माथूर आणि अग्नी कुटुंबियांच्या दु:खात सहभागी आहे.

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती निर्मित धर्मसत्संगांचे केबल अथवा दूरचित्रवाणी यांवरून प्रसारण करण्याचे नियोजन करावे !

जिल्हासेवक आणि साधक यांच्यासाठी महत्त्वाची सूचना
     ५.९.२०१६ या दिवशी श्री गणेश चतुर्थी आहे. त्या निमित्ताने या संदर्भातील महत्त्व विशद करणारा हिंदी विशेष धर्मसत्संग सिद्ध करण्यात आला आहे. या धर्मसत्संगाच्या अंतर्गत धार्मिक कृतियोंका शास्त्र या विषयाचे ७ धर्मसत्संग आहेत. त्यासमवेत ऋषिपंचमी, हरतालिका आणि अनंत चतुर्दशी या विषयाचे धर्मसत्संग आहेत. अध्यात्मशास्त्र या विषयाचे ८ धर्मसत्संग असून त्याचा कालावधी २८ मिनिटे आहे.
     या धर्मसत्संगांच्या माध्यमातून अधिकाधिक धर्मप्रसार होण्यासाठी साधकांनी पुढील प्रयत्न करावेत.
१. स्थानिक केबल अथवा दूरचित्रवाहिनी यांवरून या धर्मसत्संगांचे प्रसारण करण्याचे नियोजन करावे.
२. गावोगावी चालू असणार्‍या धर्मशिक्षणवर्गात आवश्यकतेनुसार हे धर्मसत्संग दाखवावेत.
३. सध्या सर्वत्र चालू असलेल्या सभा, अधिवेशने यांमधून जोडल्या जाणार्‍या धर्माभिमान्यांना हे धर्मसत्संग आसपासच्या गावांत दाखवण्याची सेेवा द्यावी.
४. समाजातील कार्यक्रमांमध्येही हे धर्मसत्संग दाखवण्याचे नियोजन करू शकतो.

प्रसारमाध्यमे आणि निधर्मीवादी यांची धर्मनिरपेक्षता !

       धर्मांधाने केलेल्या मारहाणीमुळे रुग्णालयात मृत्यूशी झुंज दिलेल्या वरळी, मुंबई येथील पोलीस हवालदार विलास शिंदे यांचा ३१ ऑगस्टला मृत्यू झाला. या घटनेचे वृत्तांकन वृत्तपत्रे आणि वृत्तवाहिन्या यांवर ठळकपणे करण्यात आले; मात्र या घटनेला प्रसिद्धी देतांना भगव्या आतंकवादाची ओरड करणारी आणि हिंदुत्ववाद्यांवर आगपाखड करण्याची एकही संधी न सोडणारी प्रसारमाध्यमे आणि पुरोगामी यांतील कुणालाही मारहाण करणार्‍याचा धर्म दिसला नाही. मारणारा खरेतर मुसलमान होता; मात्र त्यावर काहीही भाष्य न करता निधर्मीवादाचा बुरखा पांघरून सर्वजण चिडीचूप झाले आहेत. हिंदुत्ववाद्यांवरील आरोपांचा विषय आल्यावर मात्र यांची काव-काव पुन्हा चालू होईल. ही आहे पुरोगामी आणि निधर्मवादी यांची धर्मनिरपेक्षता !

१७ सप्टेंबर ते ११ ऑक्टोबर या कालावधीत दैनिकात प्रसिद्ध होणार्‍या लेखमालेचा लाभ घ्या !

साधकांना वाचकवृद्धी करण्याची संधी 
     १७ सप्टेंबर या दिवशीपासून महालयास (पितृपक्ष) आरंभ होत आहे, तर ११ ऑक्टोबर या दिवशी विजयादशमी आहे. पितृपक्ष आणि नवरात्रोत्सव या अनुषंगाने दैनिक सनातन प्रभातमध्ये माहितीपर लेखमाला प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
     पितृपक्षात श्राद्ध करण्याचे महत्त्व, त्या कालावधीत दत्ताचा नामजप करण्याचे महत्त्व, ब्राह्मणाने जेवलेले अन्न पितरांना कसे पोचते आदी लिखाण पितृपक्षाच्या अनुषंगाने, तर देवीपूजनाचे शास्त्र, कुंकुमार्चन कसे करावे, यासंबंधीची माहिती नवरात्रोत्सवाच्या संदर्भात प्रसिद्ध केली जाईल.
     शास्त्रोक्त पूजाविधी आणि श्राद्धविधी करता येण्यासाठी या लेखमालेतील माहितीचा उपयोग होईल. ही माहिती समाजातील अधिकाधिक लोकांपर्यंत पोचावी, या उद्देशाने साधकांनी या कालावधीत वाचकसंख्या वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत !

साधकांना सूचना

पौर्णिमा आणि अमावास्या या तिथींना प्रार्थना, नामजप, तसेच साधना अधिकाधिक करा.
१ दिवसापूर्वी अमावास्या झाली.
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥ 
या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो. - प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

बोधचित्र

॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज 
सनातनचे श्रद्धास्थान
जिवात्मा आणि शिवात्मा म्हणजे काय ?
बाबा : मी कशासाठी जन्माला आलो आहे आणि मला काय करायचे आहे, याचे ज्ञान जिवाला झाले, तर त्या आत्म्याला जिवात्मा म्हणतात. कोणीतरी माझ्याकडून कार्य करवून घेत आहे, याचे ज्ञान झाले की, त्या आत्म्याला शिवात्मा म्हणतात. शिवात्मा शोधणे, म्हणजे खरे ज्ञान. शिवात्मा कार्यकारणभावापुरता जन्माला येतो, तर जीव प्रारब्धभोगामुळे जन्माला येतो.
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.)

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

  
परात्पर गुरु डॉ. आठवले
   एखाद्या जातीचे किंवा पंथाचे कार्य करणार्‍यांचे, म्हणजे जात्यंधांचे, पंथांधांचे कार्य तात्कालिक असते. धर्माचे मानवजातीसाठीचे कार्य स्थळ आणि काळ यांची मर्यादा ओलांडून पुढे जाते. - (परात्पर गुरु) डॉ. आठवले

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

न्यूनगंड बाळगू नका !
आपल्या उणिवांची जाणीव ठेवून त्यांविषयी न्यूनगंड न बाळगता त्यांवर मात 
करण्यासाठी सदैव प्रयत्नशील रहा. 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)हिंदूंचा अवमान !

संपादकीय
     आमच्या घटनेला कोणताही धर्म किंवा जात नाही. त्यामुळे सरकारी कार्यालये किंवा शाळा यांमधील कार्यक्रमांत पारंपरिक दिवे प्रज्वलित करण्याची आवश्यकता नाही, असे प्रतिपादन केरळचे सार्वजनिक बांधकाम मंत्री जी. सुधाकरन् यांनी नुकतेच केले. केरळमध्ये सध्या साम्यवाद्यांची राजवट आहे. हिंदु धर्माच्या विरुद्ध जेवढे म्हणून काय करता येईल तेवढे हे शासन करू शकते. शासकीय कार्यालये किंवा शाळा येथे होणार्‍या कार्यक्रमांत पारंपरिक दिवे प्रज्वलित करण्याची आवश्यकता नाही, ही दरिद्री सूचना साम्यवादी विचारसरणीवाचून इतर कुणाला सुचणार नाही. काहीतरी विपरित करायचे आणि लोकांचे लक्ष वेधून घ्यायचे, एवढाच हा प्रकार असतो. चांगल्या कामाचा शुभारंभ या उदात्त हेतूने हिंदू पारंपरिक दिवे लावतात. समई पेटवून कार्यक्रमाचा आरंभ होतो. हिंदु संस्कृतीमध्ये हे सर्व ओघाने येते.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn