Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

विनम्र अभिवादन !

क्रांतीकारक गणेश गोपाळ आठल्ये यांचा स्मृतीदिन

मोहरममुळे श्री दुर्गादेवीच्या मूर्ती विसर्जनाच्या वेळेवर निर्बंध !

निधर्मी राज्यात मुसलमानांसाठी हिंदूंच्या सणांवर नेहमीच निर्बंध घातले जातात,
हे हिंदूंना लज्जास्पद ! अशांना निवडून देणार्‍या हिंदूंना ही मिळालेली शिक्षाच होय !
ममता (बानो) बॅनर्जी यांचे मुसलमानप्रेम !
     कोलकाता - बंगालच्या मुख्यमंत्री ममता(बानो) बॅनर्जी यांनी मोहरमनिमित्त मुसलमानांच्या लांगूलचालनासाठी श्री दुर्गादेवीच्या मूर्तीचे विसर्जन दसर्‍या दिवशी दुपारी ४ च्या आत आणि दुसर्‍या दिवशी करू नये, असा फतवा काढून हिंदूंच्या धार्मिक परंपरा पायदळी तुडवण्याचे काम केले आहे. हिंदूंचा राग शमवण्यासाठी राज्यातील दुर्गा उत्सव मंडळाला अनुदान देण्याचे गाजर दाखवले आहे.
     या वर्षी बंगाल राज्यातील हिंदूंचा दुर्गापूजा हा अत्यंत महत्त्वाचा सण आणि मोहरम एकत्र येत आहेत. दसर्‍याच्या दिवशीच दुर्गामूर्ती विसर्जन आणि मोहरमचे ताजीये मिरवणुकीने नेण्यात येतील. या वेळी जातीय तणाव निर्माण होऊ नये; म्हणून मुख्यमंत्र्यांनी पोलीस आणि दुर्गा मंडळांचे प्रतिनिधी यांची एकत्रित बैठक घेऊन दुर्गा विसर्जन दसर्‍याच्या दिवशी म्हणजे ११ ऑक्टोबर या दिवशी दुपारी ४ वाजल्यानंतर करू नये, तसेच १२ ऑक्टोबर या दिवशीही करू नये. ते १३ ऑक्टोबर या दिवशी करावे असे निर्देश दिले. ममता बॅनर्जी यांनी गेल्या वर्षीही असा आदेश दिला होता. (ममता(बानो) बॅनर्जी यांनी अशीच बैठक मुसलमानांची घेऊन त्यांना मोहरमच्या वेळा पालटण्याची विनंती का केली नाही ? - संपादक)

ख्रिस्ती मिशनर्‍यांकडून होणारे धर्मांतराचे कार्य रोखल्यानेच माझ्या विरोधात षड्यंत्र ! - पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू

पू. आसारामजी बापू
     जोधपूर - कथित लैंगिक शोषणाच्या आरोपांतर्गत गेल्या ३ वर्षांपासून अटकेत असणारे पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू प्रतिदिन येथील न्यायालयात खटल्यासाठी येत आहेत. अशा वेळी एका दैनिकाच्या वार्ताहराने त्यांना विचारलेल्या प्रश्‍नावर उत्तर देतांना पू. बापू म्हणाले की, ख्रिस्ती मिशनर्‍यांकडून होणारे हिंदूंच्या धर्मांतराचे काम रोखल्यामुळेच माझ्या विरोधात षड्यंत्र रचून मला खोट्या गुन्ह्यात गोवण्यात आले, या आरोपाचा त्यांनी पुनरुच्चार केला. पू. बापूंनी पुढे म्हटले की,
१. ज्यांना माझा खरेपणा माहिती आहे, ते माझ्या बाजूने आजही उभे आहेत. माझ्यासमवेत देव आहे.
२. मी कोणत्याही साक्षीदाराला किंवा आरोप करणार्‍यांना धमकावलेले नाही. सर्वांच्या साक्षी झालेल्या आहेत, अशा वेळी धमकावून काय साध्य होणार ?
३. माझे भक्त आणि समर्थक शांततेने मला भेटण्यासाठी अन् पहाण्यासाठी येथे येतात; मात्र पोलीस त्यांना पिटाळून लावतात, त्यांच्यावर लाठीमार करतात आणि पुढे जाऊन त्यांच्यावर गोंधळ घातल्याचा आरोप करतात. (हिंदूंनो, पोलिसांचा हिंदुद्वेष जाणा ! - संपादक)

अयोध्येतील हनुमानगढी मंदिर न्यासाकडून ३०० वर्षे जुन्या मशिदीचे नूतनीकरण !

हिंदू मशिदी बांधून देतात; मात्र मुसलमान राममंदिर बांधण्यासाठी 
हिंदूंना भूमी देत नाहीत, हाच या देशातील निधर्मीवाद आहे !
     अयोध्या - अयोध्येतील हनुमानगढी मंदिराच्या अधिकार क्षेत्रातील ३०० वर्षे जुन्या आलमगिरी मशिदीचे नूतनीकरण मंदिर न्यासाकडून करण्यात आले आहे. मुसलमानांना नमाज पठण करणे सुलभ जावे, यासाठी हे नूतनीकरण करण्यात आले आहे. ही मशीद १७ व्या शतकात औरंगजेबच्या अनुमतीनंतर बांधण्यात आली होती. १७६५ मधे शासक शुजाउद्दीन याने येथे नमाज पठण चालू ठेवावे, या अटीवर मशिदीची भूमी मंदिर न्यासाला दिली होती. मशिदीची दयनीय स्थिती पहाता मुसलमानांनी न्यासाचे महंत ज्ञान दास महाराज यांना नूतनीकरणासाठी विनंती केली होती.
डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांचा कोल्हापूर येथील विशेष अन्वेषण पथकाकडे ताबा !

कॉ. पानसरे हत्याप्रकरण
     कोल्हापूर - डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येच्या प्रकरणी संशयित म्हणून येरवडा येथील कारागृहात न्यायालयीन कोठडीत असलेले सनातन संस्थेचे साधक डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांचा ताबा आता कोल्हापूर येथील विशेष अन्वेषण पथकाकडे (एस्आयटीकडे) देण्यात आला आहे. कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या प्रकरणी चौकशी करण्याच्या उद्देशाने विशेष अन्वेषण पथकाने न्यायालयात अर्ज करून यापूर्वीच डॉ. तावडे यांचा ताबा मिळण्याची विनंती केली होती.

मुसलमानांनी रामजन्मभूमीऐवजी अन्यत्र बाबरी मशीद उभारण्यास संमती द्यावी ! - शंकराचार्य

      हरिद्वार - द्वारका आणि ज्योतिष पीठाचे शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांनी रामजन्मभूमीप्रकरणी मुसलमानांसमोर एक प्रस्ताव ठेवला आहे. मुसलमान जर रामजन्मभूमीऐवजी अन्यत्र बाबरी मशीद बांधण्यासाठी अनुमती देत असतील, तर त्यात साहाय्य करीन. सर्वांना माहीत आहे की, तेथे राममंदिर तोडून बाबरी मशीद बांधण्यात आली होती, असे शंकराचार्य म्हणाले.

(म्हणे) दलित असल्यानेच मला गोवले ! - संदीप कुमार यांचा आरोप

अनैतिक शारीरिक संबंध ठेवल्याची ध्वनीचित्र चकती उघड 
झाल्यावर आपचे मंत्री संदीप कुमार यांची पक्षातून हकालपट्टी !
     नवी देहली - अनैतिक शारीरिक संबंध ठेवल्याची ध्वनीचित्र चकती उघड झाल्यानंतर देहलीतील आम आदमी पक्षाचे मंत्री संदीप कुमार यांनी त्यागपत्र दिले आहे, तसेच पक्षाने त्यांची हकालपट्टी केली आहे. संदीप कुमार यांनी दलित असल्यानेच त्यांच्या विरोधात हे षड्यंत्र रचण्यात आल्याचा आरोप केला आहे. तसेच या चकतीचे अन्वेषण करण्याची मागणी केली आहे. आम आदमी पक्षाच्या तीन मंत्र्यांना आतापर्यंत विविध गुन्ह्यांमुळे मंत्रीपदाचा त्याग करावा लागला आहे, तर अनेक आमदारांवर गुन्हे प्रविष्ट झाले आहेत. (आम आदमी नव्हे, तर गुन्हेगारांचा भरणा झालेला आम आदमी पक्ष ! - संपादक)

पोलीस गृहनिर्माण आणि कल्याण महामंडळाचे तत्कालीन महाव्यवस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक यांच्यावर कारवाई करावी ! - हिंदु विधीज्ञ परिषद

नंदुरबार येथे पोलिसांसाठी सदनिका बांधणार्‍या कंत्राटदाराकडून दंडवसुली करण्यात झालेला घोटाळा
      मुंबई - नंदुरबार येथे पोलिसांसाठी सदनिका बांधणार्‍या कंत्राटदाराकडून दंड वसुलीत भ्रष्टाचार झाल्याने हिंदु विधीज्ञ परिषदेने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली आहे. महाराष्ट्र्र राज्य पोलीस गृहनिर्माण आणि कल्याण महामंडळ मर्यादितचे तत्कालीन महाव्यवस्थापक टी.सी. भाल आणि व्यवस्थापकीय संचालक संजीव दयाळ यांनी कमी वसुली करून महामंडळाची आर्थिक हानी तर केलीच आहे; परंतु या प्रकरणी विधानमंडळाला खोटी माहिती देऊन विधान मंडळाची दिशाभूल केली आहे. या प्रकरणी हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी मुख्यमंत्री, पोलीस महासंचालक आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांना पत्र पाठवून या भ्रष्टाचाराची चौकशी करून संबंधितांवर गुन्हे नोंदवण्याची मागणी केली आहे. तसेच गृहनिर्माण विभागाच्या अधिकार्‍यांनी या गैरव्यवहारात खाल्लेला पैसा कुठे लपवला आहे, याचा शोध घेणे आवश्यक असल्याचेही हिंदु विधीज्ञ परिषदेने आपल्या पत्रात म्हटले आहे.
     परिषदेने केलेल्या तक्रारीनुसार पोलिसांना निवासासाठी महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण आणि कल्याण महामंडळ मर्यादित घरे बांधते. नंदुरबार येथे पोलिसांना रहाण्यासाठी १६८ निवासस्थाने बांधण्यात येणार होती. त्या बांधकामाचे कंत्राट मे. साईनाथ एंटरप्राइजेस या कंत्राटदाराला देण्यात आले.

मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी प्रवीण टक्कलकी यांना जामीन

     मुंबई - वर्ष २००८ मध्ये मालेगावमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटाच्या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या प्रवीण टक्कलकी यांना मुंबईतील सत्र न्यायालयाने जामीन दिला आहे. या स्फोटाचे अन्वेषण करणार्‍या राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर आणि श्री. प्रवीण टक्कलकी यांच्या विरोधात सदर गुन्ह्यामध्ये तपासाअंती आरोप करण्याइतपतसुद्धा पुरावे नसल्याचे म्हटले होते. यापूर्वी पुरवणी आरोपपत्राच्या आधारे साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचा जामीन नाकारला होता.
     प्रवीण टक्कलकी यांचे अधिवक्ता श्री. संजीव पुनाळेकर यांनी त्यांची बाजू मांडतांना साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचा जामीन ज्या कारणांमुळे नाकारण्यात आला होता, ती कारणे श्री. टक्कलकी यांना लागू होत नाहीत, हे न्यायालयात पुराव्यांच्या आधारे सांगितले.

भारतातील ४३ टक्के मुसलमान लोकसंख्या निरक्षर !

      नवी देहली - २०११ च्या जनगणनेनुसार देशातील ७ वर्ष वयोगटावरील निरक्षरांंमध्ये मुसलमानांची टक्केवारी ४२.७२ इतकी दर्शवण्यात आली आहे. तर ३६.४० टक्के हिंदू निरक्षर आहेत. देशातील ८६ टक्के जैन सुशिक्षित असल्याचे यात म्हटले आहे. ३२.४९ टक्के शीख, २८.१७ टक्के बौद्ध आणि २५.६६ टक्के ख्रिस्ती निरक्षर आहेत. २००१ च्या तुलनेत २०११ मध्ये साक्षरांची टक्केवारी वाढल्याचे दिसून आले आहे.

जपानमध्ये लायनरॉक चक्रीवादळामुळे ११ जणांचा मृत्यू !

      टोकियो - जपानमध्ये लायनरॉक नावाच्या चक्रीवादळामुळे आलेल्या पुरात ११ जणांचा मृत्यू झाला आहे. देशातील अनेक शहरेही जलमय झाली आहेत. हे वादळ नैसर्गिक आपत्तीची पूर्वसूचना देणार्‍या जपानच्या आपत्कालीन व्यवस्थापनाचे मोठे अपयश असल्याचे म्हटले जात आहे.
महर्षींनी प्रलयकालाविषयी सतर्क करणे
     १९.३.२०१६ या दिवशी झालेल्या नाडीवाचन क्रमांक ६७मध्ये महर्षि म्हणतात, हे पूर्ण वर्ष प्रलयकालाचे आणि आपत्तीजनक असणारे आहे. (जपानमध्ये लायनरॉक नावाच्या चक्रीवादळामुळे आलेल्या पुराच्या घटनेवरून प्रलयकालाविषयी महर्षींनी केलेले भाष्य किती तंतोतंत आहे, हे लक्षात येते ! - संपादक)

शरीया बँकिंगला मान्यता देणार !

अल्पसंख्यांकांना मुख्य प्रवाहात आणण्याचे प्रयत्न केव्हापर्यंत करायचे ते एकदा ठरवून टाका !
अल्पसंख्यांकांना मुख्य आर्थिक प्रवाहात आणण्याचे प्रयत्न
     मुंबई - धार्मिक कारणास्तव मुख्य आर्थिक प्रवाहातून बाजूला फेकल्या गेलेल्यांना संधी देण्याच्या उद्देशाने केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बँक व्याजमुक्त बँकिंग अर्थात इस्लामिक बँकिंगला अनुमती देण्याची शक्यता आहे. या माध्यमातून संबंधितांना त्यांचा आर्थिक विकास करण्याची संधी दिली जाणार आहे. (यासाठी केंद्रशासन आर्थिक भार सोसणार का ? - संपादक)
     भारतीय समाजातील काही घटक धार्मिक कारणांमुळे मुख्य प्रवाहात सहभागी होण्यास कचरतात. बँकिंग व्यवस्थेमध्ये व्याजदर हा महत्त्वाचा घटक असतो; परंतु धार्मिक पगडा असल्याने आणि व्याजाधारित बँकिंग असल्याने त्यांची प्रगती खुंटते.
     या प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्यासाठी संबंधित घटकांशी सल्लामसलत करून देशात व्याजमुक्त उत्पादने सादर करण्यासाठीचा प्रस्ताव सिद्ध करण्यात आला असल्याचे रिझर्व्ह बँकेने वर्ष २०१५-१६ च्या अहवाल म्हटले होते.

हवाला घोटाळ्यातील २ सहस्र कोटी रुपये आतंकवादी संघटना आणि अमली पदार्थांचे तस्कर यांच्याकडे असण्याची शक्यता

हवाला घोटाळ्याद्वारे देशद्रोह्यांना साहाय्य करणार्‍यांवर केंद्रशासनाने कठोर कारवाई करणे आवश्यक !
 • घोटाळ्याची व्याप्ती आणखी १ सहस्र ५०० कोटी रुपयांनी वाढण्याची शक्यता 
     मुंबई - बँकींग हवाला घोटाळ्यातून विदेशात पोचलेले २ सहस्र कोटी रुपये आतंकवादी संघटना आणि अमली पदार्थांची तस्करी करणार्‍या टोळ्या यांच्या हाती पडल्याचा संशय महसूल गुप्तचर यंत्रणेकडून व्यक्त होत आहे. या प्रकरणाची संपूर्ण चौकशी महसूल गुप्तचर यंत्रणेसमवेत केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग आणि अंमलबजावणी संचलनालय यांच्याकडून होणार आहे. गेल्या काही मासांत आयात मालाची किंमत देत आहोत, असे भासवून मुंबईतील ६ राष्ट्रीयीकृत अधिकोषांच्या दक्षिण शाखांमधून सुमारे २ सहस्र कोटी रुपये विदेशात पोच झाले आहेत. या घोटाळ्याचा व्याप मोठा असून आणखी १ सहस्र ५०० कोटी रुपये याच मार्गाने विदेशात पोचले आहेत. (एवढ्या मोठ्या प्रमाणात आर्थिक घोटाळा होऊन तो उशिरा लक्षात येणे, हे सर्व प्रकारच्या अन्वेषण यंत्रणांचे अपयश नव्हे का ? - संपादक) त्याविषयीची चौकशी महसूल गुप्तचर यंत्रणेने चालू केली असून त्यात ही गोष्ट समोर येत आहे.

मलेशियातील मंदिरात आतंकवादी आक्रमण करण्याचे षड्यंत्र रचणार्‍या इसिसच्या तिघा संशयितांना अटक !

इस्लामी राष्ट्रात हिंदु मंदिरे असुरक्षित !
       क्वालालंपूर (मलेशिया) - नुकत्याच पार पडलेल्या मलेशियाच्या स्वातंत्र्यदिनी येथील बातू गुफा परिसरातील हिंदूंच्या प्रसिद्ध मंदिरावर आतंकवादी आक्रमण करण्याचे षड्यंत्र रचल्याच्या प्रकरणी इसिसच्या ३ संशयितांना अटक करण्यात आली आहे. मलेशियाचा स्वातंत्र्यदिन ३० ऑगस्ट या दिवशी पार पडला, तर तेथील आतंकवादविरोधी पथकाने २७ ते २९ ऑगस्ट या कालावधीत ही कारवाई केली. या मंदिराच्या जवळच असणार्‍या भगवान मुरुगन यांच्याशी संबंधित एका तीर्थक्षेत्रीही आक्रमण करण्याची या आतंकवाद्यांची योजना होती, अशी माहिती पोलीस महानिरीक्षक खालिद अबु बकर यांनी दिली. बकर पुढे म्हणाले, यातील एक आतंकवादी २० वर्षांचा असून त्यास २७ ऑगस्ट या दिवशी अटक करण्यात आली. त्याच्याकडे ५५ ग्रेनेड, एक बंदुक आणि बंदुकीच्या गोळ्या आढळून आल्या. अन्य दोघांना २९ ऑगस्ट या दिवशी अटक करण्यात आली असून त्यांचे वय २७ वर्षे आणि २० वर्षे आहे. मंदिरावर आक्रमण केल्यानंतर सिरीयाला पळून जाण्याचा बेतही त्यांनी आखला होता. या तिघांनाही इसिसच्या महंमद वान्दी महंमद जेदी या आतंकवाद्याकडून सूचना मिळत होत्या.


हरियाणात एका ग्रामपंचायतीने ठराव करून गावात धर्मांतरावर बंदी घातली !

गाव करी ते राव न करी ही म्हण सार्थ करणारे ग्रामस्थ ! अशाच प्रकारे 
ग्रामपंचायतींनी पुढाकार घेतल्यास गावांमधून होणारे धर्मांतर थांबेल !
फरीदाबाद जिल्ह्यात २५ हिंदु कुटुंबे झाली ख्रिस्ती !
       फरीदाबाद (हरियाणा) - जिल्ह्यात ख्रिस्ती मिशनर्‍यांकडून मोठ्या प्रमाणात धर्मांतर करण्यात येत आहे. आतापर्यंत अनेक गावांमधील २५ हिंदु कुटुंबांचे धर्मांतर करण्यात आले आहे. त्यामुळे दयालपूर येथील संतप्त ग्रामस्थांनी ग्रामपंचायतचा ठराव पारित करून गावातच धर्मांतराला बंदी घातली आहे. (हिंदूंमध्ये धर्माशिक्षणाचा अभाव असल्यामुळे ते धर्मांतरित होतात. त्यामुळे धर्मांतर रोखण्यासाठी हिंदूंना धर्मशिक्षण देणे, हाच पर्याय आहे. ! - संपादक)

वाराणसी येथील मणिकर्णिका घाटावर दाह संस्काराच्या स्थळांचा लिलाव

धर्मशिक्षणाच्या अभावी हिंदूंची झालेली दुरवस्था ! पैशांच्या लोभापाई अंत्यसंस्काराच्या वेळी 
आपल्याच धर्मबांधवांची अडवणूक करणार्‍या हिंदूंमुळेच हिंदूंचा त्यांच्या धर्मावरील विश्‍वास 
डळमळीत होतो ! धर्मापासून दूर नेणार्‍या अशा व्यावसायिक हिंदूंवर कठोर कारवाई केली पाहिजे !
 • अधिवक्ता कमलेशचंद्र त्रिपाठी यांचे अंत्यसंस्काराचा व्यापार करणार्‍यांच्या विरोधात जिल्हाधिकार्‍यांकडे निवेदन
 • एका दाह संस्कारासाठी १५ ते २० सहस्र रुपये 
 • लिलावासाठी सकाळपासून रचण्यात येते चिता
      वाराणसी - पौराणिक मान्यता आणि श्रद्धा यांमुळे येथील मणिकर्णिका घाटावर जवळच्या नातेवाइकांचे अंत्यसंस्कार करण्यासाठी येणार्‍या दु:खी आणि शोकग्रस्त नातेवाइकांकडून दाह संस्कारासाठी अव्वाच्या सव्वा रक्कम उकळणारे समाजकंटक आणि लाकूड व्यापारी यांच्या विरोधात कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी येथील अधिवक्ता कमलेशचंद्र त्रिपाठी यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे एका निवेदनाद्वारे केली.

मुसलमान युवक आता गोट्या खेळत नाही, तर संगणकावर वेळ घालवतो ! - उत्तरप्रदेशचे मंत्री आझम खान

मुसलमान युवक अशिक्षित असून त्यांना सरकारी साहाय्यतेची आवश्यकता आहे, असे सांगणार्‍यांना 
चपराक ! तसेच मुसलमान युवक संगणकावर कोणत्या कारणासाठी वेळ घालवतो, हे गेल्या काही 
महिन्यांत इसिसमध्ये सहभागी होण्यासाठी जाणार्‍या आतंकवाद्यांच्या अटकेतून उघड झालेच आहे !
      नवी देहली - देशातील मुसलमानांना राजकीय नेत्यांची चलाखी लक्षात आली आहे. मुसलमान आता स्वत:च्या हक्कांसाठी जागरूक झाले आहेत. भावनिक सूत्राला हात घालून त्यांना मूर्ख बनवता येणार नाही. मुसलमान युवक हा आता गोट्या खेळण्याऐवजी संगणकावर अधिक वेळ घालवत असतो, असे विधान उत्तरप्रदेशचे संसदीय कार्यमंत्री आझम खान यांनी केले आहे. उत्तरप्रदेश विधानसभेत मुसलमानांच्या आरक्षणावर चाललेल्या चर्चेच्या वेळी त्यांनी हे विधान केले.

सामाजिक समस्या टाळण्यासाठी गोवंश जगणे आवश्यक ! - न्यायाधीश डेस्मंड डिकोस्ता

वाळपई, गोवा येथील अखिल विश्‍व जय श्रीराम गोसंवर्धन केंद्रातील 
प्रस्तावित गोमाता मंदिराच्या आराखड्याचे अनावरण ! 
       वाळपई - गोशाळा आणि त्यातून होणारे कार्य खरोखरच महत्त्वपूर्ण आहे. अनेकांना गोमातेचे महत्त्व ज्ञात झालेले नाही. गोवंश जगला नाही, तर येणार्‍या काळात आम्हाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागेल. गोवंशाच्या संरक्षणासाठी सर्वांनी सामाजिक हेतूने कार्यरत रहायला हवे, असे आवाहन दक्षिण गोवा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश डेस्मंड डिकॉस्ता यांनी केले. गोकुळष्टमीच्या दिवशी नाणूस येथील अखिल विश्‍व जय श्रीराम गोसंवर्धन केंद्रात उभारण्यात येणार असलेल्या गोव्यातील एकमेव गोमाता मंदिराच्या आराखड्याच्या अनावरण कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी सुप्रसिद्ध चित्रकार श्री. शिवानंद खेडेकर, केंद्राचे अध्यक्ष श्री. हनुमंत परब, कीर्तनकार ह.भ.प. नारायणबुवा बर्वे, गोसंवर्धन केंद्राचे व्यवस्थापक श्री. रामचंद्र जोशी, श्री. लक्ष्मण जोशी आदी उपस्थित होते.

भारत सरकार बलुचिस्तानमध्ये रेडिओ सुविधा चालू करणार !

भारताचा पाकला आणखी एक धक्का !
       नवी देहली - केंद्रसरकारच्या वतीने बलुचिस्तानमध्ये ऑल इंडिया रेडिओची सुविधा चालू करण्यात येणार आहे. बलुचिस्तानच्या सूत्रावरून भारताचा पाकला हा आणखी एक मोठा धक्का आहे. ही सुविधा बलुच भाषेतून असून यामध्ये अनेक कार्यक्रमांसह बातम्यांना प्राधान्याने स्थान देण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या सुविधेला हिरवा कंदील दाखवला आहे, अशी माहिती ऑल इंडिया रेडिओतील सूत्रांनी दिली. केंद्रसरकारच्या या भूमिकेविषयी प्रतिक्रिया व्यक्त करतांना काँग्रेसेचे एक नेते म्हणाले, आमच्या मते हे एक सरकारी धोरण आहे. ऑल इंडिया रेडिओची सुविधा अन्य भाषांत पूर्वीपासून चालूच असून त्यात आणखी एका भाषेची भर पडली आहे. त्यामुळे यात काहीही आक्षेपार्ह नाही. या रेडिओद्वारे कशाप्रकारे बातम्या प्रसारित केल्या जाणार आहेत, हे मात्र पहावे लागेल.फसवी विज्ञापने केल्यास वलयांकित लोकांना १ कोटी रुपयांपर्यंत दंड करण्याची शिफारस !

      नवी देहली - उत्पादनांची चुकीची विज्ञापने करणार्‍या वलयांकित लोकांना एक कोटी रुपयांपर्यंतचा दंड करण्याच्या शिफारसी केंद्र सरकारला केल्या गेल्या आहेत. अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्र्यांच्या बैठकीत यावर सहमती दर्शवण्यात आल्याचे म्हटले जात आहे. वलयांकित लोकांनी विज्ञापन करण्यापूर्वी संबंधित उत्पादनाची संपूर्ण माहिती करून घ्यावी, असेही मत व्यक्त केले गेले आहे.
१. काही काळापूर्वी प्रमाणाबाहेर शिसाचा वापर होत असल्याचे कारण दाखवून मॅगी नूडल्सवर बंदी आली होती. या नूडल्सचे विज्ञापन अभिनेते अमिताभ बच्चन यांनी केले होते.
२. आम्रपाली रिअल इस्टेटसमवेत क्रिकेटपटू महेंद्रसिंह धोनी याचा विज्ञापन करार होता; मात्र या आस्थापनाने ग्राहकांना वेळेत जागेचा ताबा दिला नाही. त्यामुळे लोकांनी धोनी याच्यावर टीका केल्याने त्याने करार रहित केला.

नवी देहली येथे देहव्यापाराचे जाळे उद्ध्वस्त

देशाच्या राजधानीत अनेक वर्षांपासून चालू असलेला देहव्यापार बंद करायला २५ वर्षांहून अधिक 
कालावधी का लागला ? यात सहभागी लोकांवर कठोर कारवाई करून त्यांना आजन्म कारागृहात टाका !
 • ४० खोल्यांमधून २५० मुली कह्यात
 • धर्मांध जोडपे आणि ६ जण यांना अटक
 • नेपाळ, तसेच देशातील ७ राज्यांमधील मुलींना देहव्यापारात ढकलले मुख्य आरोपीची मिळकत १०० कोटी रुपये
      नवी देहली - पोलिसांनी येथील जी.बी. मार्गावरील ६ ठिकाणांवर धाडी घालून देहव्यापाराचे मोठे जाळे उद्ध्वस्त केले आहे. या धाडीत ४० खोल्यांमधील तळघर आणि कपाटांमध्ये २५० मुलींना बंद करून ठेवल्याचे आढळून आले. या प्रकरणी आफाक हुसैन आणि त्याची पत्नी सायरा आणि इतर ६ जण यांना अटक करण्यात आली असून अनेक जण फरार आहेत. आरोपींच्या विरोधात मकोका कायद्यानुसार गुन्हा प्रविष्ट करण्यात आला आहे. या जोडप्याने ५ सहस्रांहून अधिक मुलींची तस्करी केल्याचा संशय आहे.

जैन मुनी तरुणसागर यांच्याविषयी अनुद्गार काढल्याप्रकरणी काँग्रेसचे प्रवक्ते तेहसीन पूनावाला यांच्याविरुद्ध गुन्हा प्रविष्ट

      पुणे, १ सप्टेंबर - जैन मुनी तरुणसागर यांच्याविषयी ट्विटर या सामाजिक संकेतस्थळावर काँग्रेसचे येथील प्रवक्ते तेहसीन पूनावाला यांनी अनुद्गार काढले होते. (अशा काँग्रेसींवर संभाषण बंदीची मागणी केल्यास चुकीचे काय ? - संपादक) या प्रकरणी अधिवक्ता सेहुल शैलेश शहा यांनी पूनावाला यांच्या विरोधात ३० ऑगस्ट या दिवशी बंडगार्डन पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानुसार भादंवि २९५ (अवमानकारक उद्गार) या कलमांतर्गत पूनावाला यांच्यावर गुन्हा प्रविष्ट करण्यात आला आहे. या प्रकरणी पूनावाला यांच्यावर कारवाई करण्याची मागणी भाजपचे शहराध्यक्ष योगेश गोगावले यांनी ३० ऑगस्ट या दिवशी पुणे पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली. 
      जैन धर्मियांचे पर्युषण पर्व आणि अवघ्या काही दिवसांवर गणेशोत्सव येऊन ठेपला आहे. पूनावाला यांच्या अनुद्गारांमुळे धार्मिक तेढ निर्माण होऊ शकते. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करावी. तसेच काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पूनावाला यांची पक्षातून हकालपट्टी करावी, अशी मागणी गोगावले यांनी निवेदनाद्वारे केली आहे. (सोनिया गांधी या पूनावाला यांची पक्षातून हकालपट्टी करतील कि मुसलमानांचे लांगुलचालन करतील ? - संपादक)

शासनाचे कायदे पाळणे चित्रपट परिनिरीक्षण मंडळाचे कर्तव्य ! - पहलाज निहलानी, अध्यक्ष, केंद्रीय चित्रपट परिनिरीक्षण मंडळ

     मुंबई - शासनाला संस्कृतीरक्षण करायचे असल्याने त्याने केलेले कायदे पाळणे चित्रपट परिनिरीक्षण मंडळाचे (सेन्सॉर बोर्डाचे) कर्तव्य आहे, अन्यथा बेबंदशाही माजेल. शासनाला चित्रपटांचे बरे-वाईट चांगले कळते, असे उद्गार केंद्रीय चित्रपट परिनिरीक्षण मंडळाचे प्रमुख पहलाज निहलानी यांनी एका वृत्तपत्राशी संवाद साधतांना काढले.
     या वेळी बोलतांना निहलानी म्हणाले, चित्रपटांद्वारे भारतीय मूल्ये आणि संस्कृती याची हानी होऊ नये, यासाठी चित्रपटांचे सेन्सॉर होणे आवश्यक आहे, असे माझे मत आहे. कायदे सर्वोच्च आहेत. त्यामुळे चित्रपट परिनिरीक्षण मंडळाने हे कायदे पाळणे तितकेच आवश्यक आहे, जितके लोक इतर कायदे पाळतात. माझ्या कार्यकाळात मी केलेल्या कामगिरीविषयी मी समाधानी आहे. मी जेव्हापासून चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले, तेव्हापासूनन म्हणजे वर्ष १९६७ पासून माझा चित्रपट परिनिरीक्षण मंडळाशी संबंध आहे. माझ्या कार्यकाळात मंडळाची पारदर्शकता आणि उत्तरदायित्व वाढले, तसेच भ्रष्ट्राचार न्यून झाला.उत्तरप्रदेश शासनाकडून अल्पाहारासाठी ४ वर्षांत पावणे नऊ कोटी रुपये खर्च !

देशातील अर्धेअधिक जनता अर्धपोटी जगत असतांना त्याच जनतेच्या 
पैशाची अशी उधळपट्टी करणार्‍यांकडून हा पैसा वसूल केला पाहिजे !
      लक्ष्मणपुरी - उत्तरप्रदेशच्या समाजवादी पक्षाच्या सरकारने गेल्या ४ वर्षांत पाहुण्यांना चहा, समोसा आणि गुलाबजामून देण्यासाठी ८ कोटी ७८ लाख १२ सहस्र ४७४ रुपये खर्च केले आहेत, अशी माहिती स्वतः मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी विधानसभेत दिली. मंत्री प्रतिदिन नाश्त्यासाठी २ सहस्र ५०० खर्च करू शकतात, असे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी स्पष्ट केले आहे. समाजवादी पक्षाचे प्रवक्ता राजेंद्र चौधरी म्हणाले की, हा पैसा केवळ बैठकांच्या वेळी तसेच मंत्र्यांना भेटायला येणार्‍या नागरिकांसाठी एक शिष्टाचार म्हणून मंत्री आणि त्यांचे कर्मचारी खर्च करतात. भाजपचे प्रवक्ता हरिश्‍चंद्र श्रीवास्तव म्हणाले की, हा केवळ जनतेच्या पैशाचा अपव्यय आहे. मोदी यांचा संयम ढासळू लागला आहे ! - चीनची टीका

चीनकडून सातत्याने भारतात होणारी घुसखोरी म्हणजे चीनची संयत भूमिका असते, असे आहे कि काय ?
      बीजिंग - भारत-पाक यांच्यातील संबंध सुधारण्याच्या प्रयत्नांना गेल्या २ वर्षांत आलेल्या अपयशामुळे मोदी यांच्या संयमाचा बांध तुटल्याने ते त्यांच्या मूळ कट्टरतावादी स्वभावानुसार आचरण करू लागले आहेत, अशी कठोर टीका चीनचे सरकारी दैनिक ग्लोबल टाइम्सकडून प्रथमच पंतप्रधान मोदी यांच्या बलुचिस्तानवरील विधानावर करण्यात आली आहे. 
     यात पुढे म्हटले आहे की, काश्मीरमधील तणावाच्या स्थितीवरून लक्ष वळवण्यासाठीच ते बलुचिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरचे सूत्र उपस्थित करत आहेत. जर भारत बलुचिस्तानला कशाही प्रकारची साहाय्यता करत नाही, असे म्हणतो, तर मग बलुचिस्तानचा विषय सार्वजनिक स्तरावर का मांडत आहे ? 
     पाकव्याप्त काश्मीरमधील अत्याचारग्रस्त पीडित लोकांना पंतप्रधानांकडून प्रत्येकी ५ लाख रुपये दिले जाणे म्हणजे चिथावण्याचीच कृती आहे. १५ ऑगस्टला केलेले भाषणही अशाच स्वरूपाचे होते.बुर्किनीचा इस्लामशी काहीही संबंध नाही ! - मुसलमान महिला समाजसुधारक

      न्यूयॉर्क - बुरखा आणि बुर्किनी (पोहतांना डोके तसेच संपूर्ण अंग झाकणारा पेहराव) यांचा इस्लामशी काहीएक संबंध नाही; तर या गोष्टी आतंकवाद आणि जिहाद यांच्याशी अधिक संबंधित आहेत, असे अमेरिकेतील मुसलमान महिला समाज सुधारक शिरीन कुडोसी यांनी सांगितले. बुर्किनी हा अंगाला घट्ट चिकटणारा पेहराव असून बुरख्यावरूनच बुर्किनी हे नाव पुढे आले आहे. फ्रान्सच्या सर्वोच्च न्यायालयाने बुर्किनीवरील बंदी उठवल्याने त्यांनी खेद व्यक्त केला. फ्रान्सने अभिव्यक्ती स्वातंत्र्य बहाल केले आहे आणि इस्लामची संस्कृती स्वीकारली आहे, हे या निर्णयावरून स्पष्ट झाले आहे. इस्लामवाद्यांकडून फ्रान्समध्ये जिहाद संस्कृती रुजवण्याचा प्रयत्न चालू आहे. बुर्किनीची कल्पना ही चित्रकार अहिदा झनेटी यांची आहे. बुर्किनीद्वारे इस्लामी संस्कृती लादण्याचा प्रयत्न आहे. मुसलमानेतर देशांमध्ये इस्लामी तत्त्वप्रणाली लादण्याचा हा डाव आहे, असे शिरीन कुडोसी यांनी म्हटले आहे.

पारंपरिक श्री गणेशमूर्ती विसर्जनासाठी शहरातील सार्वजनिक तळी खुली करून द्यावीत !

हिंदु जनजागृती समितीची पत्रकार परिषदेद्वारे मागणी 
पत्रकार परिषदेला संबोधित करतांना (डावीकडून) सौ. रूपा महाडिक,
 श्री. हेमंत सोनवणे, श्री. जितेंद्र वाडेकर, श्री. सुधन्वा गोंधळेकर आणि श्री. राहुल कोल्हापुरे
     सातारा, १ सप्टेंबर (वार्ता.) - शहरातील घरगुती गणेशमूर्तींचे विसर्जन पारंपरिक पद्धतीने मंगळवार तळे, मोती तळे, फुटका तलाव आदी ठिकाणी होते. हे तलाव सावर्र्जनिक असल्याने आणि शेकडो वर्षे या तलावांत गणेशमूर्ती विसर्जन होत असल्याने याला कोणीही आक्षेप घेऊ शकत नाही; परंतु काही हिंदु धर्मद्रोही संघटनांनी प्रदूषणाच्या गोंडस नावाखाली सातारा नगरपालिकेची दिशाभूल करून हिंदूंच्या गणेशोत्सवासारख्या पवित्र उत्सवात अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न मागील वर्षी केला. यामुळे या तळ्यांमध्ये सार्वजनिक गणेशमूर्तींचे विसर्जन तर झालेच नाही शिवाय घरगुती गणेशमूर्तीही गणेशभक्तांना नाईलाजाने 'दान' म्हणून द्याव्या लागल्या. तरी पोलीस आणि प्रशासनाने हिंदूंच्या धर्मभावना दुखावणारी धर्मशास्त्रविसंगत 'मूर्तीदान' मोहीम राबवणार्‍यांवर कडक कारवाई करावी. तसेच शहरातील सार्वजनिक तळी गणेशमूर्ती विसर्जनासाठी खुली करून द्यावीत, अशी एकमुखी मागणी हिंदु जनजागृती समितीच्या पुढाकाराने शहरातील समस्त हिंदुत्ववादी संघटनांनी पत्रकार परिषदेद्वारे करण्यात आली. 

हिंगोनिया गोशाळेत आणखी २५८ गायींचा मृत्यू !

भाजपशासित राज्यातील गायींची दुरवस्था !
     जयपूर - येथील हिंगोनिया गोशाळेतील गायींच्या मृत्यूच्या घटना अद्याप थांबलेल्या नाहीत. गेल्या ५ दिवसांत २५८ गायींचा मृत्यू झाला आहे. यावर सरकारकडून म्हटले जात आहे की, बेवारस म्हणून पकडून आणलेल्या गायींचा येथे येऊन मृत्यू होत आहे. या गायींनी प्लास्टिक खाल्लेले असल्याने त्यांचा मृत्यू होतो. त्यामुळे आम्ही त्याला उत्तरदायी नाही. दुसरीकडे गोपालकांचा आरोप आहे की, सरकारच्या दायित्वशून्यतेमुळेच गायींचा मृत्यू होत आहे. या प्रश्‍नावर विधानभेत आवाज उठवण्यात येईल, असे काँग्रेसने म्हटले आहे. गेल्या महिन्यात येथे १ सहस्राहून अधिक गायीचा मृत्यू झाला. राजस्थान देशातील पहिले राज्य आहे जेथे गोरक्षणासाठी कर लावला जातो. यातून सरकारने १०० कोटी रुपये गोळा केले आहेत; मात्र त्यातील एक रुपयाही खर्च केला नसल्याचे सांगितले जात आहे.

पोलिसाने भाविकाच्या पर्समधील १ सहस्र रुपये चोरले !

रक्षक नव्हे भक्षक पोलीस !
श्री महालक्ष्मी मंदिरात मद्यधुंद पोलिसाची महिला भाविकाशी उद्धट वर्तणूक
      कोल्हापूर - श्री महालक्ष्मी मंदिरात महाद्वार प्रवेशद्वारावर बंदोबस्तासाठी नियुक्त पोलीस नियंत्रण कक्षातील पोलीस अजित होडगे याने मद्यधुंद अवस्थेत एका महिला भाविकाशी अरेरावी करून उद्धट वर्तन केले. या प्रकारामुळे भाविकांत संतापाची लाट उसळली. तणाव निर्माण झाल्याने होडगे याला जुना राजवाडा पोलिसांनी रात्री कह्यात घेतले. संबंधित पोलिसाने पर्समधील एक सहस्र रुपये परस्पर काढून घेतल्याचाही आरोप महिलेने माध्यमांशी बोलतांना केला; मात्र पर्समधून रक्कम काढून घेतल्याच्या तक्रारीत तथ्य दिसून येत नाही, असे पोलीस निरीक्षक अनिल देशमुख यांनी सांगून मद्यधुंद पोलिसाची बाजू घेतली. (या प्रकरणाचे पूर्ण अन्वेषण न करताच पोलीस निरीक्षक देशमुख मद्यधुंद पोलिसाची का बाजू घेतात ? त्यामुळेच जनतेचा पोलिसांवरील विश्‍वास अल्प होत आहे. - संपादक)
     या पोलिसाने पर्स घेऊन मंदिरात जाता येणार नाही, असे बजावत हातातील पर्स आणि अन्य साहित्य काढून घेण्याचा प्रयत्न केला. अर्ध्या घंट्यानंतर पर्स परत घेतांना त्यातील पैसे चोरल्याचे लक्षात आले.

बनावट शनीयंत्र बनवून कॉपी राईटचा भंग केल्याप्रकरणी एकास अटक

     पुणे - प्रशांत बाबर याला बनावट शनीयंत्र विकत असल्याप्रकरणी कॉपी राईट कायद्याचा भंग केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. आत्मशांती, घरशांती यांसाठी, तसेच भरभराट व्हावी, यासाठी शनीयंत्र, बारा राशीचे यंत्र यांची विक्री सध्या सर्वत्र होत आहे. त्याची विज्ञापनेही सर्वत्र दिसतात. त्याची मागणी पहाता शनीयंत्राचेही बनावट उत्पादन झाल्याचे लक्षात आले. या प्रकरणी अभय रिखबचंद बाफना यांनी फिर्याद दिली होती.

मराठी भाषा सर्व निकषांवर पात्र ठरूनही तिला अभिजात भाषेचा दर्जा का नाही ?

डॉ. श्रीपाल सबनीस यांचे पंतप्रधानांना पत्र
उशिरा जागे झालेले मराठी साहित्य संमेलनाध्यक्ष डॉ. सबनीस !
     पुणे - बलुचिस्तानविषयी तुम्ही घेतलेल्या भूमिकेमुळे मी प्रभावित झालो आहे. या निमित्ताने मलाही आपल्याशी एक मन की बात करायची आहे. आमची मराठी भाषा सर्व निकषांवर पात्र ठरूनही तिला अभिजात भाषेचा दर्जा का मिळू शकला नाही ? सहृदयी असूनही तुम्हाला आमच्या सांस्कृतिक व्यथा-वेदना कशा कळत नाहीत ?, असे प्रश्‍न असलेले पत्र अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी पंतप्रधान मोदी यांना लिहिले आहे.

ठाणे महापालिकेच्या वतीने श्री गणेशमूर्ती स्वीकृती केंद्रे आणि कृत्रिम तलावांची निर्मिती !

गणेशभक्तांनो, श्री गणेशमूर्तींचे विसर्जन धर्मशास्त्रानुसार 
वहात्या पाण्यातच करून श्री गणेशाची कृपा संपादन करा ! 
१. गणेशभक्तांनो, भावभक्तींने गणेशमूर्तीचे पूजन केल्यावर तिची अशी घोर विटंबना करण्यासाठी त्या दान करणार का ? 
२. धर्मशास्त्रानुसार अशा प्रकारे देवाचे दान करणेही चुकीचे आहे ! 
३. दान हे सत्पात्रे असले पाहिजे. मूर्तीची विटंबना करणार्‍यांकडे मूर्ती दान करून काय उपयोग ? 
४. श्री गणेशमूर्ती विसर्जनाने प्रदूषण होत नाही, हे वारंवार सिद्ध होऊनही आणि प्रदूषण नियंत्रण मंडळांनी तसा अहवाल देऊनही बुद्धीवादी त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात, यातून त्यांचा हिंदुद्वेष दिसून येतो ! 

सण-उत्सवाच्या काळात सामाजिक संकेतस्थळांवरून धार्मिक तेढ वाढवणारे लिखाण फिरत असल्यास पोलिसांना संपर्क करा !

ठाणे पोलीस आयुक्तांचे आवाहन 
     कल्याण - सणासुदीच्या काळात सामाजिक संकतेस्थळांवर जाती-धर्माविषयी अनुचित घटना पसरवून समाजात विष पसरवण्याचे काम अनेक जण करत असतात. अशा अनुचित घटना पुढे न पसरवता त्वरित पोलिसांना संपर्क साधण्याचे आवाहन ठाणे पोलीस आयुक्त डॉ. परमबीर सिंग यांनी केले. कल्याणमधील आचार्य अत्रे सभागृहात 'गणेशोत्सव २०१५' पारितोषिक वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी परमबीर सिंग बोलत होते.

श्रीकृष्णजन्माष्टमीनिमित्त सनातन संस्था, ठाणे न्यासाकडून मार्गदर्शन

     ठाणे - येथील साईबाबा सत्संग केंद्र रसायनी यांच्याकडून २४ ऑगस्टला श्रीकृष्णजन्माष्टमीच्या निमित्ताने भजन आणि प्रवचन यांचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी सनातन संस्था ठाणे या न्यासाच्या वतीने सौ. पुष्पा चौगुले यांनी श्रीकृष्णजन्माष्टमीचा इतिहास आणि उत्सव कसा साजरा करावा, याचे महत्त्व सांगितले. तसेच गोपाळकाला आणि दहीहंडी यांचे महत्त्व आणि हे उत्सव साजरे करतांना कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत याविषयी सांगितले. यांसह महिलांवरील होणार्‍या वाढत्या अत्याचारांच्या पार्श्‍वभूमीवर स्वसंरक्षण प्रशिक्षणाची अनिवार्यता विशद केली. या मार्गदर्शनाचा ५० जिज्ञासूंनी लाभ घेतला. श्रीकृष्णाच्या श्‍लोकाने या कार्यक्रमाचा आरंभ करण्यात आला. सनातन संस्थेच्या सौ. जयश्री म्हैसकर यांनी श्रीकृष्णाचा पाळणा आणि आरती म्हटली. कार्यक्रमानंतर सौ. पुष्पा चौगुले आणि सौ. जयश्री म्हैसकर यांचा साईबाबा सत्संग केंद्राकडून सत्कार करण्यात आला. तसेच यापुढेही अशा कार्यक्रमाचे आयोजन करणार असल्याचे सांगितले.

मुंबईतील पर्यावरणतज्ञांकडून खाद्यपदार्थांपासून श्री गणेशमूर्ती सिद्ध

शास्त्रोक्त पद्धतीच्या गणेशमूर्तीतूनच गणेशतत्त्वाचा लाभ
 होतो, हे हिंदूंना कळण्यासाठी धर्मशिक्षण देणे अपरिहार्य !
     मुंबई - येथील पर्यावरणतज्ञ आनंद पेंढारकर यांनी पालक, मका, चणा डाळ यांसारख्या खाद्यपदार्थांच्या पिठांपासून श्री गणेशाची मूर्ती सिद्ध केली आहे. ही मूर्ती सागरी परिसंस्थेशी एकरूप होत असल्याने पर्यावरण पूरक असल्याचा दावा त्यांनी केला असून गणेशोत्सवात अशा गणेशमूर्ती बसवण्याचे आवाहनही केले आहे. ते पुढे म्हणाले, प्लॅस्टर ऑफ पॅरिस पासून बनवलेल्या मूर्तींवरील विषारी रंग समुद्रातील माशांच्या आरोग्याला घातक ठरतात. त्यामुळे अरबी समुद्राचे जैववैविध्य धोक्यात असून संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे. गेल्या वर्षीपासून आम्ही हा उपक्रम राबवत असून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा त्याला प्रतिसाद मिळत आहे. (मृत्तिकेपासून म्हणजेच शाडू मातीपासून श्री गणेशमूर्ती बनवणे हे शास्त्रसंमत आहे. अशी मूर्ती पर्यावरणपूरक तर आहेच, शिवाय त्यामुळे गणेशभक्तांना आध्यात्मिक स्तरावरही लाभ होतो. अशा मूर्ती बसवण्याचा आग्रह खर्‍या पर्यावरणप्रेमींनी केला पाहिजे ! - संपादक)
३१ ऑगस्ट या दिवशी संतश्री पू. आसारामजी बापू यांच्या अटकेला ३ वर्षे 
झाल्याच्या निषेधार्थ मुंबईत काढण्यात आलेल्या मोर्च्यात सहभागी 
सांप्रदायिक ! अशा प्रकारचा मोर्चा जळगाव येथेही काढण्यात आला.

येत्या दोन वर्षांत अपूर्ण प्रकल्प पूर्ण करणार ! - गिरीश महाजन, जलसंपदामंत्री

     नगर - जलसंपदा विभागात एकही नवीन काम काढणार नसून येत्या दोन वर्षांत अपूर्ण प्रकल्प पूर्ण करणार असल्याची माहिती जलसंपदामंत्री श्री. गिरीश महाजन यांनी दिली. 
     जलसंपदा विभागात प्रचंड अनियमितता आहे. हे सारे मागच्या सरकारचे पाप असून या खात्यामुळेच सरकार पालटले आहे. राज्यातील धरणे केव्हाही फुटू शकतील, अशी परिस्थिती नाही. टेमघर धरणाला गळती लागली असून, त्याची चौकशी चालू आहे. टेमघरसाठी शंभर कोटींची निविदा काढली आहे. पुढच्या महिन्यात दुरुस्तीला आरंभ होऊन गळती थांबेल. सरकार याविषयी गंभीर आहे. टेमघरची परिस्थिती गंभीर आहे. ज्यांनी चुका केल्या आहेत, त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे श्री. महाजन म्हणाले. 

पुण्यात एका पोलीस कर्मचार्‍याने महिलेला केली मारहाण !

अशा पोलिसांना जनतेचे रक्षक म्हणायचे का ? 
 जनतेला अशा पोलिसांचा आधार कधीतरी वाटेल काय ? 
     पुणे, १ सप्टेंबर - येथील समर्थ पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी श्रीकृष्ण उत्तमराव खोकले याने कासेवाडी परिसरातील एका ५५ वर्षांच्या महिलेला किरकोळ कारणावरून ३० ऑगस्ट या दिवशी रात्री लाकडाने पुष्कळ मारहाण केली. हे प्रकरण आपापसात मिटवल्याने गुन्हा प्रविष्ट करण्यात आला नाही. खोकले याने केलेल्या मारहाणीत ती महिला गंभीर घायाळ झाली असून तिच्यावर येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार चालू आहेत.

उपसरपंचाला २ लाखांची लाच मागितल्याच्या प्रकरणी अटक !

भ्रष्टाचारात आकंठ बुडालेला भारत ! 
     शिरजगाव (जिल्हा बुलढाणा) - खामगाव तालुक्यातील शिरजगाव देशमुख गट ग्रामपंचायतचे उपसरपंच बळीराम तोताराम वानखडे यांना २ लाखांची लाच मागितल्याच्या प्रकरणी बुलढाणा येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ३१ ऑगस्ट या दिवशी अटक केली. शहरातील विजयराज नरेंद्र देशमुख यांनी हॉटेलसमोरील जागेत वाहनतळासाठी पत्र्याचे छत उभारण्याकरिता ग्रामपंचायतकडे अनुमती मागितली असता त्यांच्याकडे ही लाच मागण्यात आली होती.

पनवेल नगरपालिका आता होणार महानगरपालिका !

     पनवेल, १ सप्टेंबर - नगरपालिका असलेल्या पनवेलला आता महानगरपालिकेचा दर्जा मिळाला असून उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार पनवेल आणि परिसरातील ३२ गावांचा समावेश करून महानगरपालिकेची स्थापना करण्यात आली आहे. येत्या १५ दिवसांत याविषयी अंतिम निर्णय होऊन अधिसूचना काढण्यात येईल, अशी माहिती नगर विकास विभागाकडून देण्यात आली. सिडकोने केलेल्या आग्रहामुळे नैना क्षेत्रातील ३६ गावांना वगळून हा निर्णय घेण्यात आला आहे.

कोपर्डी घटनेतील दोषींच्या फाशीच्या मागणीसाठी बीड येथे मराठा समाजाचा महामोर्चा

     बीड - येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर नगर जिल्ह्यात घडलेल्या कोपर्डी घटनेच्या निषेधार्थ ३० ऑगस्ट या दिवशी मराठा क्रांती मूक मोर्चा काढण्यात आला. या मोर्च्यात लक्षावधी स्त्री-पुरुष सहभागी झाले होते. (राज्य शासनाने महिलांवरील अत्याचाराच्या घटनांविरोधात कठोर पावले उचलणे आवश्यक आहे. अन्यथा अशा प्रकारच्या जनक्षोभाला सामोरे जावे लागू शकते. - संपादक) पोलिसांनी ठरवून दिलेल्या वाहनतळांवरून सकाळी ७ वाजल्यापासून नागरिक या मोर्च्यात सहभागी होऊ लागले. जिल्हा क्रीडा संकुलाच्या मैदानावर सकाळी १० वाजेपर्यंत हजारोंच्या संख्येने लोक जमा झाले. या मोर्च्यामध्ये ३ किलोमीटरपेक्षा जास्त अंतरापर्यंत नागरिक सहभागी झाले होते. मोर्च्यानंतर जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनात दोषींना फाशी देण्याची मागणी करण्यात आली आहे. महत्त्वाचे म्हणजे मराठा क्रांती मूक मोर्चाचे नेतृत्व कोण्या एका व्यक्ती अथवा संघटना यांपैकी कोणीही केलेले नव्हते.

लालबागचा राजा मंडळाची अपकीर्ती करणार्‍यांच्या विरोधात १० कोटी रुपयांचा अब्रूहानीचा दावा

     मुंबई - देश-विदेशातील कोट्यवधी भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या लालबागचा राजा मंडळाच्या विरोधात वर्तमानपत्रात अपकीर्ती करणारे वृत्त छापून मंडळाची नाहक अपकीर्ती केल्याप्रकरणी लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने मुंबई उच्च न्यायालयात महेश वेंगुर्लेकर यांच्या विरोधात १० कोटी रुपयांचा अब्रूहानीचा दावा प्रविष्ट केला आहे. मंडळाची अपकीर्ती केल्याप्रकरणी मंडळाने यापूर्वीच महेश वेंगुर्लेकर आणि यांच्या दैनिक मुंबई मित्र विरोधात शिवडी महानगर दंडाधिकार्‍यांच्या न्यायालयात फौजदारी गुन्हा प्रविष्ट केला आहे.

युवकांना इसिसमध्ये पाठवणार्‍या दोघांचा ताबा केरळ पोलिसांकडून मुंबई गुन्हे शाखेच्या पोलिसांकडे

     मुंबई - केरळमधील २१ युवकांना इसिसमध्ये सहभागी होण्यासाठी सीरियात पाठवणार्‍या इस्लामिक रिसर्च फाउंडेशनचा (आयआर्एफ) सदस्य अर्शिद कुरेशी आणि त्याचा साथीदार रिझवान खान यांचा ताबा २९ ऑगस्ट या दिवशी केरळ पोलिसांकडून मुंबई गुन्हे शाखेच्या पोलिसांनी घेतला. त्या दोघांना किल्ला न्यायालयाने १ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. त्यामुळे इस्लामिक रिसर्च फाउंडेशनची कार्यपद्धती, संस्थेला होणारा अर्थपुरवठा, तरुणांना सीरियाला पाठवण्यात फाउंडेशनचा असलेला हात आणि त्यांनी आजपर्यंत किती युवकांना चिथावणी दिली, याचा उलगडा तपासात करण्यात येणार आहे.
     केरळमधील युवकांची माथी भडकावून आणि त्यांचे धर्मांतर करून सीरियात इसिसमध्ये दाखल होण्यासाठी पाठवणार्‍या अर्शिद आणि रिझवान यांना केरळ पोलीस आणि राज्य आतंकवादविरोधी पथकाने अटक केली होती.

नगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील १५५ गावांमध्ये एक गाव एक गणपति संकल्पना राबवणार !

असा आदर्श सर्वत्रच्या गणेशोत्सव मंडळांनी घ्यायला हवा !
     अकोले - नगर जिल्ह्यातील सर्वांत मोठा तालुका म्हणून ओळखल्या जाणार्‍या अकोले तालुक्यातील १९१ गावांमधील १५५ गावांमध्ये एक गाव एक गणपति अशी संकल्पना राबवण्यात येणार आहे. पोलीस उपअधीक्षक अजय देवरे यांनी ही माहिती दिली. यांत अकोले पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणारी ७७ गावे आणि राजूर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणारी ७८ गावे यांचा समावेश आहे.

श्री तुळजाभवानी देवस्थान संरक्षक कृती समितीच्या वतीने तुळजापुरात तहसीलदारांना निवेदन !

 निवेदन देतांना देवीभक्त
 • शारदीय नवरात्रोत्सवात धार्मिक रूढी आणि परंपरांत प्रशासन यांची ढवळाढवळ नको ! 
 • देऊळ संस्थानचे अध्यक्ष यांचीही सीआयडी चौकशी करा ! 

     तुळजापूर (जिल्हा धाराशिव) १ सप्टेंबर (वार्ता.)- श्री तुळजाभवानी देवस्थान संरक्षक कृती समितीच्या वतीने शारदीय नवरात्रोत्सवाच्या काळात श्री तुळजाभवानी देऊळ संस्थानने धार्मिक विधी आणि परंपरा यांत ढवळाढवळ न करता व्यवस्था करावी आणि देऊळ संस्थानच्या अध्यक्षांना गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीआयडी) चौकशीतून न वगळता त्यांच्यासह चौकशी करावी, याविषयीचे निवेदन तहसीलदारांच्या अनुपस्थित श्री. सी.एस्. सुरवसे यांना देण्यात आले, तसेच तहसीलदार अनुपस्थित असल्याने कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी रिकाम्या खुर्चीला हार घालून हे निवेदन दिले. 

४०० स्वयंसेवकांनी बंड पुकारून स्थापन केला 'राष्ट्रीय स्वयंसेवक संघ गोवा' हा नवीन विभाग

रा.स्व. संघाने गोवा संघचालक पदावरून प्रा. वेलिंगकर यांना हटवल्याचे प्रकरण 
 • प्रा. वेलिंगकर यांना नवीन गटाचे प्रमुखपद बहाल 
 • संघाच्या कोकण प्रांताशी नाते तोडले 

     पणजी - गोव्यातील प्राथमिक शिक्षणातील माध्यमप्रश्‍नावरून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या गोवा संघचालक पदावरून प्रा. वेलींगकर यांना हटवल्याच्या प्रकरणी ४०० स्वयंसेवकांनी संघाच्या प्रमुखांच्या विरोधात बंड पुकारले आहे. या स्वयंसेवकांनी संघाच्या कोकण प्रांताशी त्यांचे नाते तोडून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ गोवा असा नवीन विभाग स्थापन केला आहे. या नवीन विभागाचे प्रमुखपद प्रा. सुभाष वेलिंगकर यांना बहाल करण्यात आले आहे, तसेच ३१ ऑगस्ट या दिवशी संघाच्या विविध पदांवरून त्यागपत्र दिलेल्यांना पुन्हा नवीन विभागाच्या पदाधिकारीपदी पुन्हा नेमण्याचा निर्णय या बंड केलेल्या स्वयंसेवकांनी घेतला आहे. नवीन विभागाचे प्रमुख प्रा. सुभाष वेलिंगकर यांनी या नवीन घटामोडीसंबंधी म्हटले की, आता नव्याने स्थापन झालेला विभाग स्वतंत्रपणे काम करणार असून तो संघाच्या कोकण प्रांताशी सलग्नित असणार नाही. ही स्थिती निदान आगामी विधानसभा निवडणुकीपर्यंत रहाणार आहे.

फलक प्रसिद्धीकरता

बहुसंख्य हिंदूंच्या देशात हिंदूंच्याच सण-उत्सवांवर निर्बंध कसे ?
     बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मोहरमच्या पार्श्‍वभूमीवर दुर्गादेवीच्या मूर्तीचे विसर्जन दसर्‍याला म्हणजे ११ ऑक्टोबर या दिवशी दुपारी ४ च्या आत करावे किंवा नंतर १३ ऑक्टोबरला करावे, असा आदेश काढला आहे.

हिंदू तेजा जाग रे !

Jago ! : Bangal me Moharam ke julus nikalne ke liye sarkarne ne lagai durgavisarjan yatra ke samaypar rok.
     Hinduoke deshme Hinduoparhi pratibandh !
जागो !
: बंगाल में मोहर्रम का जुलूस निकालने के लिए सरकार ने लगाई दुर्गाविसर्जन-यात्रा के समय पर रोक !
     हिन्दुओं के देश में हिन्दुआें पर ही प्रतिबंध !

रिलायन्स आस्थापनाकडून 'जिओ ४-जी' योजनेची घोषणा !

     मुंबई - रिलायन्स आस्थापनाने त्याच्या 'जिओ ४-जी' नेटवर्क सेवेचा १ सप्टेंबरला शुभारंंभ केला. या सेवेअंतर्गत पुढील ४ महिने डेटा आणि कॉलिंग सेवा विनामूल्य मिळणार आहे. रिलायन्स उद्योग समूहाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत समूहाचे प्रमुख मुकेश अंबानी यांनी ही घोषणा केली. हा नव्या डिजिटल युगाचा प्रारंभ आहे, असे ते म्हणाले. १८ सहस्र शहरे अन् २ लाख गाव यांंमध्ये जिओ ४-जी सेवा उपलब्ध होणार आहे. 

कामगार नेते शरद राव यांचे निधन !

     मुंबई - कामगार नेते शरद राव यांचे येथे १ सप्टेंबर या दिवशी दीर्घ आजाराने निधन झाले. शरद राव यांनी अनेक कामगार संघटनांचे नेतृत्व केले. रिक्शा आणि टॅक्सी यांच्या भाडेवाढीच्या सूत्रावर त्यांची भूमिका महत्त्वाची होती. ते जनता दलाचे कार्यकर्ते होते.

पीडीपीच्या खासदाराचे घर पेटवले !

काश्मीरमध्ये हिंसाचार चालूच ! 
     श्रीनगर - काश्मीरमध्ये दंगलखोरांनी पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात हिंसाचार घडवला. बांडीपोर येथे ९०० दंगलखोरांच्या जमावाने पोलिसांवर आक्रमण केले, तसेच येथील एक पूल तोडण्याचा प्रयत्न केला. कुलगाममध्ये सत्ताधारी पीडीपीचे राज्यसभेतील खासदार नजीर अहमद लावे यांचे घर आणि शॉपिंग कॉम्प्लेक्स यांना आग लावण्यात आली. दंगलखोरांमध्ये सहभागी आतंकवाद्यांनी गोळीबार करत येथील सुरक्षा रक्षकांची शस्त्रे लुटून नेली. काश्मीर खोर्‍यात ५० हून अधिक ठिकाणी मोर्चे काढण्यात आले, तर ७० ठिकाणी दगडफेक करण्यात आली.

स्पिरिच्युअल सायन्स रिसर्च फाउंडेशन (एस्.एस्.आर्.एफ्.)च्या प्रसारकार्याचा जून २०१६ मधील आढावा

१. संकेतस्थळाच्या संदर्भातील संख्यात्मक आढावा 
१ अ. विविध माध्यमांतून संकेतस्थळाला भेट देणार्‍यांची संख्या

अन्यायी ब्रिटीश राजवटीला हादरवून सोडणारे थोर क्रांतीकारक गणेश गोपाळ आठल्ये !

क्रांतीकारक गणेश गोपाळ आठल्ये यांच्या आज असलेल्या १०५ व्या स्मृतीदिनानिमित्त...
      गणेश गोपाळ आठल्ये उपाख्य अण्णा आठल्ये यांचा जन्म १४ नोव्हेंबर १८७९ या दिवशी शिपोशी (तालुका लांजा, जिल्हा रत्नागिरी) येथे झाला. वडिलांच्या सततच्या बदलीच्या नोकरीमुळे शिपोशी, अलिबाग आणि दापोली येथे त्यांचे शिक्षण झाले. पुढील शिक्षणासाठी ते मुंबईला गेले; पण हलाखीच्या परिस्थितीमुळे शिकणे कठीण झाले. मुंबईत बदामवाडीत रहात असतांना त्यांचा संपर्क आर्यसंघ या बंगाली क्रांतीकारकांच्या संघटनेशी झाला. त्यांच्यातील शामसुंदर चक्रवर्ती हे अण्णांचे खास मित्र.

कोट्यवधी रुपयांच्या बक्षिसांची खैरात कशासाठी ?

      रिओ ऑलिम्पिकमध्ये भारताची बडमिंटनपटू पी.व्ही. सिंधू हिने रौप्यपदक, तर कुस्तीपटू साक्षी मलिक हिने कास्यपदक मिळवले. देशासाठी पदक मिळवणार्‍यांचे अभिनंदन ! तथापि १२५ कोटींच्या देशात केवळ दोनच पदके हे चित्र पालटायला हवे. पदकविजेते भारतात पोचले आणि सरकारने पदकविजेत्यांवर बक्षिसांची खैरातच चालू केली. कर्ज काढून सण-उत्सव कसे साजरे करायचे, हे भारतीय नेत्यांकडून अवश्य शिकावे. बक्षिसाची रक्कम कोट्यवधी रुपयांमध्ये असण्याचे कारण तरी काय ? शिवाय सरकारी नोकरीही ! नोकरीवर नियुक्त केल्यावर ती व्यक्ती कामावर किती काळ असणार आणि पटांगणात किती काळ असणार ? त्या व्यक्तीच्या नोकरीवरील अनुपस्थितीतील काम अन्य कर्मचार्‍यांच्याच माथ्यावर मारले जाणार, हे न जाणायला कोणी मुर्ख नाही. रिओ ऑलिम्पिकमध्ये शेकडो बक्षिसे मिळाली असती, तर सरकारने अशीच बक्षिसे वाटली असती का ?
     साधकांनो, तुम्ही राष्ट्र आणि धर्म यांसाठी सर्वस्वाचा त्याग करत आहात. त्यामुळे भगवंत तुम्हाला आपत्काळात तारून तर नेईलच; पण तो तुम्हाला आपले करून घेईल, याची खात्री बाळगा !

भारतात कोट्यवधी दावे प्रलंबित असतांना न्यायाधिशांची पदे रिक्त ठेवणारे सरकार !

     फोंडा, गोवा येथील दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) यांना नुकतेच पदच्युत करण्यात आले आहे. सध्या फोंडा भागासाठी केवळ एक कनिष्ठ न्यायाधीश कार्यान्वित असून दोन न्यायाधिशांची पदे रिक्त आहेत.

गाढव निर्माण करणारी भारतीय शिक्षणपद्धत !

      आज शाळांमध्ये ग गणपतीचा शिकवणे हे धर्मांध ठरते; म्हणून ग गाढवाचा असे शिकवलेले चालते. असे शिक्षण विद्यार्थ्यांना मिळत असल्यास ते गाढवच बनणार ! 
- श्री. सुरेश चव्हाणके, संपादक, सुदर्शन न्यूज वृत्तवाहिनी.

समानशीले व्यसनेषु सख्यम् । (समान चारित्र्य असलेल्यांमध्ये संकटकाळी मैत्री होते.) या न्यायाने दिग्विजय सिंह यांनी पाकिस्तान स्वर्ग आहे, असे म्हटले, तरी आश्‍चर्य वाटणार नाही !

     संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी पाकिस्तानला नरक संबोधणे, हे भाजप-राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्या असहिष्णुतेचे दर्शक आहे. - दिग्विजय सिंह, राष्ट्रीय सरचिटणीस, काँग्रेस

हिंदु राष्ट्राची पहाट पहायची असेल, तर संघर्ष आणि संघर्षच करावा लागेल ! - पू. (कु.) स्वाती खाडये, सनातन संस्था


साधकांनो, मत्सरयुक्त विचारांमुळे होणारी स्वतःच्या साधनेची हानी टाळण्यासाठी योग्य दृष्टीकोन घेऊन कठोर प्रयत्न करा !

सद्गुरु (सौ.) बिंदा
सिंगबाळ
        काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर हे षड्रिपू प्रत्येकात अल्प-अधिक प्रमाणात असतात. ईश्‍वरप्राप्तीच्या प्रयत्नांत ते प्रमुख अडथळा ठरत असल्याने त्यांचे निर्मूलन करणे आवश्यक असते. मत्सर हा त्यातील सर्वांत घातक रिपू ! 
१. मत्सर निर्माण होण्याची कारणे आणि त्याची लक्षणे
       व्यक्तीचा स्वभाव एकलकोंडा असल्यास, तसेच मनमोकळेपणाने बोलण्याची सवय नसल्यास मत्सराचे विचार अधिक असतात, असे आढळते. इतरांशी तुलना झाल्यानंतर विचारांना योग्य दिशा न दिल्यास मत्सराच्या विचारांचा उगम होतो. इतरांचे चांगले झाल्यावर हेवा वाटणे, त्यांना मानसन्मान मिळाल्यावर अहं दुखावणे, ज्याच्या संदर्भात मत्सर वाटतो, त्यांचे वाईट चिंतणे ही मत्सराची लक्षणे आहेत.

वेगवेगळ्या प्रसंगांमधून प.पू. गुरुदेवांच्या तेजोमय अवतारी व्यक्तिमत्त्वाचे उलगडलेले पैलू

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले 
यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त... 
 आकाशापेक्षा विशाल, हिमालयापेक्षाही 
कितीतरी पटींनी उत्तुंग आणि माऊलीची मायाही 
ज्यांच्या वात्सल्यापुढे थिटी आहे, असे प.पू. गुरुदेव !
अ. प.पू. भक्तराज महाराजांचे शिष्य होऊन रहाण्यासाठी पुनःपुन्हा जन्म घ्यायला आवडेल, असे म्हणणारे प.पू. डॉक्टर ! : काही वर्षांपूर्वी प.पू. गुरुदेवांनी विदर्भातील जिल्ह्यांचा दौरा केला होता. त्या वेळी त्यांच्यासमवेत त्या दौर्‍यावर जाण्याची संधी मला मिळाली. आम्ही यवतमाळहून परभणी-नांदेड या जिल्ह्यांकडे निघालो होतो. प्रवासात बोलतांना प.पू. गुरुदेवांनी ते स्वतः त्यांचे गुरु प.पू. बाबा (प.पू. भक्तराज महाराज) यांच्यासमवेत दौर्‍यावर जायचे, तेव्हाचे काही प्रसंग सांगितले. प.पू. बाबांसमवेत जातांना वाहनात किती गर्दी असायची, ते सगळे कसे दाटीवाटीने बसायचे, त्यातही कसा आनंद असायचा इत्यादी सांगितले. नंतरचे काही क्षण शांततेत गेले. प.पू. गुरुदेवांनी सांगितलेले ऐकून, मी त्यांचा तो आनंद अनुभवण्याचा प्रयत्न करत होते. अचानक प.पू. गुरुदेव म्हणाले, मला तर प.पू. बाबांचे शिष्य होऊन रहाण्यासाठी पुनःपुन्हा जन्म घ्यायला आवडेल !

पाण्याचा कुलर भरतांना श्रीकृष्णाने केलेले साहाय्य

सौ. मानसी राजंदेकर
१. शारीरिक स्थिती चांगली नसतांना कुुलरमध्ये पाणी भरावे लागणे
     काही दिवसांसाठी मी नागपूरला माहेरी गेले होते. तिथे पुष्कळ उन्हाळा असल्यामुळे नेहमी कुलर लागायचो. माझ्या खोलीतील कुलरमध्ये प्रतिदिन किमान ४ - ५ मोठ्या बादल्या पाणी भरावे लागायचे. माझ्या पोटाचे शस्त्रकर्म झालेले असल्यामुळे मला जड वस्तू उचलायची नव्हती, तरी मलाच बालदीने पाणी भरावे लागत होते. मला पूर्ण भरलेली बालदी उचलता येत नव्हती; म्हणून मी अर्धी-अर्धी बालदी आणून पाणी कुलरमध्ये ओतत होते. 
२. पाणी भरतांना मी आश्रमातील सेवा करत आहे, असा भाव ठेवणे
      ३.६.२०१६ या दिवशी मी पाण्याने भरलेली पहिली बालदी उचलली आणि माझ्या मनात विचार आला, मी वजन उचलल्यावर मला काही होणार नाही ना ? त्या वेळी मी असा विचार केला, पाणी भरणे ही आश्रमातील सेवा असून त्यामुळे मला आनंद मिळून माझी साधना होणार आहे. त्यानंतर मी सहजतेने बादल्या उचलून पाणी भरू शकले.

शारीरिक कष्टाची सेवा करण्याविषयी साधिकेचे झालेले चिंतन

श्रीमती गीता प्रभु
१. पूर्वी शारीरिक कष्टाची सेवा करण्यास सांगितल्यावर प्रतिक्रिया येणे 
     १३.५.२०१६ या दिवशी मला रामनाथी आश्रमात स्वयंपाकघरात सेवा करतांना तांदुळाच्या कण्या धुण्यास सांगितले होते. पूर्वी मला अशी सेवा दिली की, माझ्या मनात प्रतिक्रिया येत असत; परंतु आता मला तशा प्रतिक्रिया येत नाहीत. 
२. सेवेविषयी प्रतिक्रिया आल्याने ती सेवा न होता कार्य होणे
      ही सेवा करत असतांना माझ्या मनात पुढील विचार आले, शारीरिक आणि कष्टाच्या सेवा करायला सांगितल्यावर काही साधक ती करायला मनापासून सिद्ध नसतात. त्यातील काही साधक शारीरिक कारणे सांगतात, तर काही साधक सेवा करतात; परंतु त्यांच्या मनात सेवा सांगणार्‍या साधकाविषयी प्रतिक्रिया येतात. प्रतिक्रिया आल्याने त्यांच्याकडून ती सेवा न होता कार्य होते आणि त्यात मनाची ऊर्जा वाया जाते. त्यामुळे साधकांची आध्यात्मिक उन्नती होत नाही.

६१ टक्के आध्यात्मिक स्तर असलेले श्री. संदीप सकपाळ यांची लेखा विभागातील साधिकांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये

श्री. संदीप सकपाळ
१. सेवेतील 
गतीमानता आणि अचूकता
       श्री. संदीप सकपाळ याची सेवेची गती पुष्कळ आहे. कोणत्याही सूत्राची आकडेवारी करून माहिती काढायची असली, तरी तो ती लगेचच अचूकपणे काढू शकतो. हे करतांना त्यामध्ये सहजता असते. सेवेतील बारकावे त्याच्या लगेचच लक्षात येतात.
२. स्वीकारण्याची वृत्ती
       मागील १५ दिवसांपासून श्री. संदीपदादामध्ये स्वीकारण्याचा भाग वाढला असल्याचे जाणवले. एखाद्या प्रसंगामध्ये आपले कुठे चुकले आहे, याचा त्याचा अभ्यास होतो.
३. सकारात्मकता
       पूर्वीच्या तुलनेत संदीपची सकारात्मकता वाढली आहे. विभागातील एक सेवा पुष्कळ दिवसांपासून प्रलंबित आहे. याबद्दल संदीपशी बोलल्यावर त्याने काही दिवस वेळ देऊन ती सेवा स्वत: करण्याचेे नियोजन केले असल्याचे सांगितले. खरे तर मार्च अखेर (वर्षअखेर) असल्याने सध्या महत्त्वाच्या आणि तातडीच्या सेवा चालू आहेत. त्यामुळे या सेवेसाठी वेळ देणे अवघड असूनही त्याने तिचे नियोजन केले.

यजमानांना रात्रीचे अल्प दिसत असल्याने काळजी वाटत असतांना ईश्‍वरच त्यांची काळजी घेत असल्याची जाणीव होणे

       माझ्या यजमानांना रात्रीचे अल्प दिसते. एके दिवशी प्रसारसेवेला ते दुचाकी घेऊन गेले होते. तेव्हा गावामध्ये रस्त्यांवर दिवे नव्हते. रात्रीचे १२ वाजून गेले होते, तरी यजमान घरी आले नव्हते. त्या वेळी त्यांचा भ्रमणभाषही लागत नव्हता; म्हणून मला भीती वाटत होती. रात्रीचे त्यांना दिसत नाही, तर एवढ्या रात्री ते कसे येणार ? तसेच त्यांचा संपर्कही होत नाही, असे विचार येऊन काळजी वाटत होती. तेव्हा मला प.पू. डॉक्टर दिसले आणि म्हणाले, कोण म्हणते त्यांना दिसत नाही ? त्यांना दिसते; म्हणूनच ते एवढे बाहेर सेवेला जातात आणि एवढी सेवा करतात. तेव्हापासून ते घरी वेळेवर आले नाही किंवा ते सेवेनिमित्त बाहेर गेले, तरी देव त्यांची काळजी घेईल, अशी श्रद्धा वाटते आणि कधीही काळजी वाटत नाही.
- सौ. जानकी वाघ, नांद्रा, जळगाव. (३.७.२०१६) रामनाथी आश्रमातील शिबिरात साधकाकडून झालेल्या चुकांवर दिलेले योग्य दृष्टीकोन ऐकून मनातील योग्य विचारांवर ठाम रहाता आल्याने आनंद मिळणे

श्री. विजय पाटील
१. शिबिरात साधकाकडून झालेल्या चुकांवर योग्य दृष्टीकोन दिले जात असतांना श्रीकृष्णच चित्तावर योग्य विचारांचे संस्कार करत आहे, असा भाव ठेवल्याने स्वतःकडून झालेल्या चुका लक्षात येणे : रामनाथी आश्रमात होत असलेल्या शिबिरातील एका सत्रात एका साधकाकडून झालेल्या चुकांवर योग्य दृष्टीकोन दिले जात होते. त्या वेळी मी देवाला भगवंता, ही सर्व सूत्रे माझ्या लक्षात राहू देत. जेव्हा मी अयोग्य विचार करीत असेन, तेव्हा हे दृष्टीकोन माझ्या लक्षात येऊ देत, अशी कळवळून प्रार्थना केली. तेव्हा देवाने वही म्हणजे चित्त आणि लेखणी म्हणजे श्रीकृष्णाचे मोरपीस आहे, असे सुचवले. श्रीकृष्णच माझ्या चित्तावर योग्य विचारांचे संस्कार करत आहे, असा भाव ठेवून प्रयत्न केल्यावर मला चांगले वाटले आणि माझ्याकडून सर्व सूत्रे वहीत लिहिली जात होती. देवा, शिबिरात साधकाकडून झालेल्या चुकांवर योग्य दृष्टीकोन देऊन त्या माध्यमातून मला माझ्या सर्व चुका लक्षात आणून दिल्यासाठी मी कृतज्ञ आहे.

अवयवदानाविषयी आध्यात्मिक दृष्टीकोन !

    अवयव निकामी झालेल्या रुग्णांना नवजीवन मिळावे, तसेच समाजात अवयवदानाविषयी जनजागृती व्हावी, यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारकडून नुकतेच महाअवयवदान अभियान राबवण्यात आले. अवयवदानाविषयी पुढील सूत्रे लक्षात घ्यावीत.
     काही जण मृत्यूनंतर शरीराचा एखादा अवयव किंवा संपूर्ण शरीर एखाद्या रुग्णालयाला दान करण्याच्या संदर्भात मृत्यूपत्रात लिहितात. काही वेळा मृताचे नातेवाईक, मित्र किंवा रुग्णालयातील कर्मचारी, तसे करण्याविषयी मृताच्या कुटुंबियांना सुचवतात. त्या वेळच्या दुःखद स्थितीत काय करावे, हे कुटुंबियांना कळत नाही. त्यामुळे कधी दडपणामुळे ते हो म्हणू शकतात. यासंदर्भात आध्यात्मिक दृष्टीकोन जाणून घेतला पाहिजे. देहदान करणे, अध्यात्मशास्त्रदृष्ट्या चुकीचे आहे. आपल्या एखाद्या नातेवाईकाला त्या अवयवाची आवश्यकता असेल, तर तसे करणे कर्तव्यकर्म म्हणून योग्य ठरेल; पण भावनेपोटी एखाद्या रुग्णालयाला देहदान केले, तर ते पुढील कारणांसाठी अयोग्य ठरते.

साधनेसाठी आसन कसे असावे ?

साधनेसाठी लाकूड वर्ज्य असण्याची कारणे 
डॉ. दीपक जोशी
          साधनेसाठी चिंच, जांभूळ आदी काही झाडांच्या लाकडांची आसने वर्ज्य म्हणून सांगितली आहेत. अशा नावांची सूची देण्यापेक्षा काही ग्रंथांमध्ये सरसकट सर्वच लाकडी आसने वर्ज्य असे, सांगितले जाते. ती ग्रंथलेखनाची एक पद्धत आहे; कारण अन्य ग्रंथांमध्ये पळस, बकुळ आदी झाडांचे लाकूड आसनासाठी चांगले आहे, असाही उल्लेख आढळतो. लाकडाचे आसन साधनेसाठी वापरू नये, असे सांगण्यामागे वृक्षांचा र्‍हास होऊ नये, हेही एक कारण आहे. 
- पू. गणेशनाथजी उपाख्य डॉ. दीपक जोशी, पुणे यांनी सांगितलेली माहिती. (१३.८.२०१६)

तत्त्वनिष्ठ आणि नेतृत्व गुण असणार्‍या ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या बांदोडा, गोवा येथील सौ. लता ढवळीकर !

सौ. लता ढवळीकर
१. सकारात्मकता : सेवांची घडी व्यवस्थित बसावी, यासाठी सनातन संस्थेने घातलेल्या कार्यपद्धतीविषयी त्या पूर्ण सकारात्मक रहातात आणि सर्व साधकांनाही सकारात्मक दृष्टीकोन देतात.
२. तत्त्वनिष्ठ : त्या सतत सर्व साधकांना साहाय्य करतात, त्यांचा विचार करतात आणि श्रेय सर्वदा गुरुदेवांना देतात. त्या आपल्यात कोणाला अडकू देत नाहीत.
३. आज्ञापालन : संतांनी सांगितलेली प्रत्येक गोष्ट १०० प्रतिशत श्रद्धा ठेवून कृती करण्याचा त्या प्रयत्न करतात.
४. साधकांना आधार देणे : साधकांना नवीन दायित्व दिल्यावर त्यांना अडचणी विचारून साहाय्य करतात. त्यांना सेवा दिल्यावर त्यांचे त्याकडे दुर्लक्ष होत नाही. उलट सेवेतून साधक शिकत आहे का ? त्याला आनंद मिळतो का ? हेही त्या पहातात. साधक दायित्व घेऊन सेवा तळमळीने करत असेल, तर त्याला कुठे साहाय्य करू शकते ? असा विचार त्या नेहमी करतात.

परिस्थिती स्वीकारणारा, हिंदूंवरील अन्यायाची चीड असणारा ४७ टक्के आध्यात्मिक पातळी असलेला आणि उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला पुणे येथील कु. प्रथमेश महेंद्र अहिरे (वय १४ वर्षे) !

कु. प्रथमेश अहिरे
       भाद्रपद शुक्ल पक्ष प्रतिपदा (२.९.२०१६) या दिवशी पुणे येथील कु. प्रथमेश महेंद्र अहिरे याचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने त्याच्या वडीलांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे प्रसिद्ध करत आहोत. 
कु. प्रथमेश अहिरे याला वाढदिवसानिमित्त सनातन 
परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा !
१. गुणवैशिष्ट्ये
१ अ. हट्ट न करणे : प्रथमेश कोणत्याही गोष्टीसाठी हट्ट करत नाही. त्याचे कपडे वापरून जुने झाले, तरी तेे फाटेपर्यंत तो वापरतो.

प्रवासात शारीरिक त्रास होत असतांना नामजप चालू केल्यावर आलेली अनुभूती

अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर
१. प्रवास करतांना थकवा आणि अंगदुखी पुष्कळ प्रमाणात जाणवणे : २.७.२०१६ या दिवशी मी नाशिक येथे एका खटल्यानिमित्त गेलो होतो. निघतांना मला थकवा आणि थोडी कणकणही वाटत होती. दिवसभर खटल्याची सुनावणी झाली. नंतर आगगाडीने मुंबईला परत येतांना मला पुन्हा थकवा आणि अंगदुखी पुष्कळ प्रमाणात जाणवू लागली. दिवसभर माझे त्याकडे लक्ष नव्हते; परंतु माझे मन सेवेतून मोकळे झाल्यावर पुन्हा दुखणे जाणवू लागले.
२. नामजप करत असतांना शरीर हलके होऊन तरंगत वर जात असल्याचे तीव्रतेने जाणवणे : मी आगगाडीत तसाच बसून नामजप करत होतो. तेव्हा अचानक मी जागेवरून उठून तरंगत वर कुठेतरी जात आहे, असे मला जाणवले. ती जाणीव इतकी तीव्र होती की, मी पटकन डोळे उघडले. त्यानंतर मी पुन्हा जप चालू केला, तरीही मी ती जाणीव पुन्हा अनुभवली.
३. एकाच वेळी दुखणे आणि शरीर तरंगत असल्याची स्थिती अनुभवणे : त्यानंतर मी बराच वेळ दुखणे आणि वरील अनुभव अशा दोन्ही स्थिती अनुभवत होतो. मी शरिराकडे लक्ष दिले की, मला शारीरिक दुखण्याची जाणीव होत होती, तर दुसर्‍या अवस्थेकडे लक्ष दिल्यावर दुखण्याचा संबंधच नसल्याचे जाणवत होते. मला शरीरच नसून मी कुठेतरी वेगळ्याच विश्‍वात-आकाशगंगेत तरंगत आहे, ही जाणीव जवळजवळ २० मिनिटे होती.
- अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर, अध्यक्ष, हिंदू विधीज्ञ परिषद. (२.७.२०१६)

कधी कधी महर्षि सांगत असलेल्या सततच्या उपायांतून सनातनवरील संभाव्य बंदीच्या संकटाच्या तीव्रतेची कल्पना येणे

सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ
       सनातनवरील संभाव्य बंदी आणि साधकांचे रक्षण यासाठी महर्षींनी आम्हाला गेले ८ दिवस अनेक देवळांचे दर्शन, तसेच देवाला अभिषेक करणे, शिवाय रामनाथी आश्रमातही बगलामुखी याग करणे, अशा अनेक गोष्टी सांगितल्या होत्या. त्यातच भर कि काय म्हणून महर्षींनी पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांनाही तिरूत्तणी या गावी एक दिवस राहून वीर राघव (श्रीमहाविष्णु) मंदिराचे दर्शन, तसेच तेथील साक्षात् उभ्या असणार्‍या आणि देवांचा सेनापती असणार्‍या कार्तिकेयाचे दर्शनही घेण्यास सांगितले होते. त्याप्रमाणे पू. डॉ. ॐ उलगनाथन् हे ११.८.२०१६ या दिवशी तेथील देवतांचे दर्शन करून तिरुपतीकडे यायला निघाले होते. याच काळात विरोधही वाढला होता. महर्षींनी पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांनाही एकीकडे सनातनवरील संकटांसाठी मंदिर दर्शनासाठी पाठवले होते. या काळात महर्षि रामनाथी आश्रमात उपाय करण्याबरोबरच आम्हालाही, तसेच पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांनाही देवदर्शनासाठी वैयक्तिकपणे पाठवत होते. एकाच वेळी असे तीन दिशांनी उपायांचे प्रयत्न करण्यास महर्षि सांगत होते, त्या अर्थी सनातनवर येणार्‍या बंदीचे संकट मोठे असल्याचे यातून लक्षात आले.
       यातूनही देव आपल्याला तारून नेणारच आहे; परंतु महर्षींच्या उपाय सांगण्याच्या पद्धतीवरूनच आपण या संकटांतील तीव्रतेची कल्पना करू शकतो आणि अधिक सतर्क राहून आपले उपाय आणि प्रार्थना वाढवू शकतो, हे लक्षात आले !
- (सद्गुरु) सौ. अंजली गाडगीळ, तिरूचानूर, आंध्रप्रदेश. (१३.८.२०१६, सायं. ५.५०)

साधकाच्या दृष्टीने कोणत्या लोकातून पृथ्वीवर जन्माला आलो यापेक्षा आता ईश्‍वराकडे जायचे आहे, हा विचार महत्त्वाचा असणे

श्री. राम होनप
       स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेल्या जिवाला वाटते, मी स्वर्गलोकातून आलो. महर्लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेल्या जिवाला वाटते, मी महर्लोकातून आलो. भूलोकातील साधकाला मी अन्य लोकातून आलेला नसून इथल्याच लोकातील आहे, असा न्यूनगंड असतो. एखादा जीव कोणत्या लोकातून जन्माला आला ?, हे केवळ अभ्यासासाठी तपासले जाते. साधकाच्या दृष्टीने कुठून आलो ?, यापेक्षा आता कुठे (ईश्‍वराकडे) जायचे आहे ?, हे महत्त्वाचे ! 
- श्री. राम होनप, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२४.६.२०१६)

पू. संदीप आळशी यांनी मंत्रजपाचे महत्त्व पटवून देणे

पू. संदीप आळशी
       २७.७.२०१६ या दिवशी पू. संदीप आळशी यांची आणि माझी भेट झाली. त्यांनी मला माझ्या त्रासाविषयी विचारले. तेव्हा आमच्यात पुढील संवाद झाला.
पू. दादा : त्रासावर उपाय म्हणून मंत्रजप करता का ?
मी : मंत्रजप म्हणायला वेळ लागतो; म्हणून मी तो म्हणत नाही.
पू. दादा : तुम्हाला मंत्रजप म्हणातांना कुठली अडचण येते ?
मी : माझ्या मनात विचार येतो, आपण ईश्‍वरप्राप्तीसाठी साधना करतो, तर स्वतःचा आजार बरा होण्यासाठी मंत्रजप करून सकाम साधना कशी करायची ? मनाला ते न पटल्यामुळे मी देवाला कधीही मला बरे कर, अशी प्रार्थना केली नाही. मी प्रार्थना करते, मला आजार सहन करण्याची शक्ती दे आणि त्रासदायक शक्तींचे माझ्या साधनेतील अडथळे दूर होऊ दे.

साधकांना सूचना

पौर्णिमा आणि अमावास्या या तिथींना प्रार्थना, नामजप, तसेच साधना अधिकाधिक करा.
काल अमावास्या झाली.
दैनिक सनातन प्रभातचा रंगीत
श्री गणेशोत्सव विशेषांक
प्रसिद्धी दिनांक : ४ सप्टेंबर २०१६
पृष्ठ संख्या : १०, मूल्य : ५ रुपये
विशेषांकाची वाढीव मागणी वितरकांनी ३ 
सप्टेंबरला दुपारी ३ पर्यंत इआर्पी प्रणालीत भरावी.
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥ 
या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो. - प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

बोधचित्र

॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज
सनातनचे श्रद्धास्थान
शिष्याचा विश्‍वास
गुरु विश्‍वासावर आहे. आपल्या विश्‍वासावर
 गुरूंची महती अवलंबून आहे. गुरु तुमच्यापण 
विश्‍वासावर आहे. तुमच्या विश्‍वासातच गुरु आहे.
भावार्थ : गुरु विश्‍वासावर आहे. आपल्या विश्‍वासावर गुरूंची महती अवलंबून आहे, यातील गुरु हा शब्द बाह्य गुरूविषयी वापरलेला आहे. गुरूवर विश्‍वास असेल, तरच गुरु गुरु म्हणून कार्य करू शकतो. गुरु तुमच्यापण विश्‍वासावर आहे. तुमच्या विश्‍वासातच गुरु आहे, यातील गुरु हा अंतर्यामी असलेला गुरु होय.
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.)

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले
     कुठे पृथ्वीवर राज्य करण्याचे ध्येय असणारे इतर धर्म, तर कुठे प्रत्येकाला ईश्‍वरप्राप्ती व्हावी, हे ध्येय असणारा हिंदु धर्म ! - (परात्पर गुरु) डॉ. आठवले


योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

मन आणि इंद्रिय यांच्या आधीन होऊ नका !
जो मन आणि इंद्रिये यांच्या आधीन नसतो, तोच खर्‍या अर्थाने स्वतंत्र होय. 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)


पुरोगामी महाराष्ट्राची प्रगती !

      राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाने २०१५ च्या सादर केलेल्या अहवालानुसार महाराष्ट्र महिलांच्या विनयभंगात प्रथम, बलात्कारात दुसरा, तर अत्याचारांमध्ये तिसरा असल्याचे समोर आले आहे. देशातील अन्य राज्यांत या गुन्ह्यांची संख्या लक्षणीय असल्याचेही यातील आकडेवारीवरून लक्षात येते. या विभागाने आकडेवारीची राज्यनिहाय विभागणी केल्याने कुठल्या राज्यात किती प्रमाण आहे, हे लक्षात आले, तरी देशात महिलांवरील अत्याचारांत प्रचंड वाढ झाल्याचे प्रतिदिन घडणार्‍या घटनांवरून देशातील जनतेच्या लक्षात आले आहे.

निरक्षर भारत !

संपादकीय 
      २०११ च्या जणगणनेतील काही आकडे आता समोर आले आहेत. यात धर्माच्या आधारे साक्षरता आणि निरक्षरता यांची देशातील माहिती देण्यात आली आहे. ७ वर्षे वयाच्या वरील निरक्षरांमध्ये मुसलमानांची टक्केवारी ४२.७२, तर हिंदूंची टक्केवारी ३६.४० इतकी असल्याचे म्हटले आहे. या देशात या दोन धर्मांची लोकसंख्या सर्वाधिक असल्याचे साधारणः ३५ कोटी लोकसंख्या निरक्षर आहे, असे म्हणता येईल. १२५ कोटी लोकसंख्येत ३५ कोटी जनता निरक्षर असणे ही भारताची स्वातंत्र्यानंतरची प्रगती दर्शवते !
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn