Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

दिनविशेष


आज पोळा

नेहरू सरकार नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या सैन्याच्या संपत्तीचा वाटा पाकला देणार होते !

नेहरू यांचे आणखी एक पाप उघड !
       नवी देहली - १९५३ मध्ये तत्कालीन पंतप्रधान नेहरू नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या इंडियन नॅशनल आर्मी आणि इंडियन इंडिपेंडन्स लीग या सैन्य संस्थाच्या संपत्तीतील काही भाग पाकला देणार होते, अशी माहिती केंद्र सरकारने सार्वजनिक केलेल्या कागदपत्रांवरून समोर आली आहे. नेताजींच्या संपत्तीची चौकशी करावी, अशी विनंती बंगालच्या विधीमंडळाने १९५३ मध्ये केंद्र सरकारला केली होती. त्याला १८ ऑक्टोबर १९५३ या दिवशी नेहरू यांनी पत्राद्वारे उत्तर दिले होते. या पत्रामध्ये म्हटले होते की, पूर्वेकडील युद्धसमाप्तीच्या वेळी आशिया खंडातील देशांतून नेताजींच्या दोन्ही सैन्य संस्थांचे सोने आणि इतर मौल्यवान वस्तू जप्त केल्या गेल्या होत्या. ही सर्व संपत्ती सध्या सिंगापूरच्या कह्यात आहे. यासंबंधीची माहिती १९५० मध्ये सिंगापूर सरकारने दिली होती. या सर्व संपत्तीचे पुनर्मूल्यांकन शक्य नसल्याने तिचे योग्य मूल्य सांगणे अशक्य आहे. या संपत्तीवर पाकिस्ताननेही आपला अधिकार सांगितल्याने त्यांच्याशी या संबंधात वाटाघाटी चालू आहेत. या वाटाघाटीत ही संपत्ती भारत आणि पाकिस्तान २:१ प्रमाणात विभागून घेण्याचा तोडगा निघाला आहे, असे यात नेहरूंनी म्हटले होते.

धर्मशास्त्रविरोधी निर्णय घेणारे आयुक्त आणि महापौर यांचे डोके ठिकाणावर आहे का ? - आमदार योगेश टिळेकर, भाजप

आंदोलन करतांना धर्माभिमानी आणि गणेशभक्त

  • श्रीगणेशमूर्ती विसर्जनाच्या संदर्भात मनमानी निर्णय घेऊन धर्मशास्त्राची पायमल्ली करणार्‍या पुणे महानगरपालिकेच्या विरोधात हिंदुत्ववाद्यांची तीव्र निदर्शने !
  • आयुक्त आणि महापौर यांच्या त्यागपत्राची मागणी
       पुणे, ३१ ऑगस्ट (वार्ता.) - हिंदूंच्या धर्मभावनांचा विचार न करता पुणे महापालिका आयुक्त आणि महापौर हे श्रीगणेशमूर्ती विसर्जनासाठी अमोनियम बायकार्बोनेटचा वापर करण्याच्या हट्टाला पेटले आहेत. धर्मशास्त्रविरोधी निर्णय घेणारे आयुक्त आणि महापौर यांचे डोके ठिकाणावर आहे का ?, असाच प्रश्‍न विचारावासा वाटतो. आमच्या संस्कृतीवरचे असे आघात आम्ही कदापि सहन करणार नाही. महापौर आणि आयुक्त यांना मनमानी कारभार करू देणार नाही. महानगरपालिकेने काहीही निर्णय घेतला असला, तरी हिंदु रितीरिवाजाप्रमाणे श्री गणेशमूर्तींचे नदीतच विसर्जन करणार, अशी खणखणीत चेतावणी भाजपचे आमदार श्री. योगेश टिळेकर यांनी दिली. पुणे महापालिकेने श्री गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी अमोनियम बायकार्बोनेट, तसेच कृत्रिम हौद यांचा वापर करण्याचा अशास्त्रीय निर्णय घेतल्याच्या निषेधार्थ महापालिका भवनाच्या समोर ३१ ऑगस्ट या दिवशी निषेध आंदोलन करण्यात आले. त्या वेळी आमदार श्री. टिळेकर बोलत होते.

हिंदुत्वरक्षक भाजप खासदारांकडून अमेरिकेत ७ दिवसांच्या संस्कृत, संस्कृती आणि सनातन धर्माची एकता परिषदेचे आयोजन !

हिंदुत्वासाठी कार्य करणार्‍या 
भाजपच्या खासदारांचे अभिनंदन !
       नवी देहली - भाजपच्या काही हिंदुत्वरक्षक नेत्यांनी हिंदूएकतेचा जगभरात प्रचार करण्यासाठी योजना आखली आहे. यासाठी अमेरिकेत एक परिषद आयोजित करण्यात येणार आहे. या परिषदेचा आरंभ ११ सप्टेंबरपासून न्यू जर्सी येथे होणार आहे. ही परिषद ७ दिवस चालणार आहे. या योजनेवर भाजपचे खासदार डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी काम करत आहेत. त्यांच्यासमवेत खासदार हुकूम सिंह आणि भाजपचे बंगाल प्रदेश अध्यक्ष दिलीप घोष आहेत. या परिषदेचे नाव संस्कृत, संस्कृती आणि सनातन धर्माची एकता असे ठेवण्यात आले आहे.
       या परिषदेत हुकूम सिंह उत्तरप्रदेशच्या कैराना येथे हिंदूंच्या झालेल्या पलायनाविषयी बोलणार आहेत, तर घोष बंगालमध्ये हिंदूंवर होणार्‍या अत्याचारांची माहिती देणार आहेत. घोष हिंदी आणि बंगाली भाषेत बोलणार आहेत. (केंद्रात सत्ता असतांनाही सरकारी स्तरावरून हिंदूंवरील अत्याचारांच्या अशा घटना रोखण्यासाठी प्रयत्न होत नाहीत, हे हिंदूंना लज्जास्पद आहे ! - संपादक) कैरानाचा प्रश्‍न सर्वप्रथम हुकूम सिंह यांनीच उठवला होता. येथे मुसलमानांकडून होणार्‍या अत्याचारांमुळे गेल्या १० वर्षांत ३० टक्के हिंदूंनी घर विकून पलायन केले आहे. पूर्वी येथे ५० टक्के मुसलमान रहात होते.

श्री दुर्गा परमेश्‍वरी देवीविषयी मानहानीकारक लिखाण फेसबूकवर पोस्ट केल्याने दक्षिण कन्नड जिल्ह्यात तणाव !

        मंगळुरू - येथील श्री दुर्गा परमेश्‍वरी देवीविषयी मानहानीकारक मजकूर फेसबूकवर पोस्ट केल्याचे काही हिंदू संघटनांच्या आणि धर्माभिमान्यांच्या लक्षात आल्यावर दक्षिण कन्नड जिल्ह्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी या भागात अधिक पोलीस कुमक मागवून सुरक्षा वाढवली आहे.
        मानहानीकारक मजकूर फेसबूकवर पोस्ट केल्याचा हा प्रकार २ ऑगस्ट या दिवशी घडला. नंतर या पोस्टला इतरही लोकांनी खोटी नावे धारण करून समर्थन दिले. ही गोष्ट लक्षात आल्यावर हिंदु जागरण वेदिके आणि करावली संस्कृतीका वेदिके या हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी मंगळुरू पोलीस आयुक्त एम्. चंद्रशेखर यांची भेट घेऊन त्यांना वरील प्रकाराविरुद्ध तक्रारी असलेली अनेक पत्रे सादर केली.
        या घटनेमागे काही धर्मांधांचा या भागात जातीय दंगली भडकवण्याचा कट असावा, अशी शंका हिंदू संघटनांनी व्यक्त केली आहे. अल्पसंख्यांक समाजाच्या संघटनांनी या घटनेचा निषेध व्यक्त केला आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून जनतेला शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. पोलीस या फेसबूक पोस्टचा मूळ स्रोत शोधून काढण्याच्या प्रयत्नात आहेत.

नवी देहलीतील बाबरपूर येथे वयोवृद्ध पुजार्‍याची निर्दयीपणे हत्या

गुंडांना कायद्याचा धाक राहिला नसल्याचे द्योतक ! 
      नवी देहली - येथील मंदिरात वास्तव्य करणारे वयोवृद्ध पुजारी गौरीशंकर उपाख्य बाबा यांना निर्दयीपणे मारहाण करून त्यांची हत्या करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. गौरीशंकर गेल्या ४० वर्षांपासून बाबरपूरच्या मंदिरात पुजारी होते. मंदिराच्या परिसरात काही व्यसनी युवक येऊन चिलम ओढत होते. त्या दिवशीही ४ युवक आले असता त्यांच्याशी गौरीशंकर यांचा वाद झाला होता. गौरीशंकर यांनी मंदिराच्या बांधकामासाठी विटा घेतल्या होत्या. या विटांचे गौरीशंकर यांच्याकडून २५ सहस्र रुपये येणे होते. या पैशांची त्यांच्याकडे मागणी करूनही त्यांनी दिले नव्हते. त्यामुळे त्यांची हत्या केल्याचे आरोपींनी पोलिसांना सांगितले.

गुजरातमध्ये ढोलवीरा येथे हडप्पा बंदराचे अवशेष सापडले !

      पणजी - गुजरातमध्ये ढोलवीरा येथे हडप्पा बंदरातील बांधकामांचे अवशेष राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेच्या (एन्आयओच्या) शास्त्रज्ञांना सापडले आहेत. दोनापावला येथे संस्थेचे संचालक डॉ. एस्. नक्वी यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. त्सुनामीमध्ये नष्ट झालेले जगातील हे पहिलेवहिले बंदर शहर असल्याचा दावा डॉ. नक्वी यांंनी केला आहे. अधिक संशोधनासाठी ३४ लक्ष रुपये खर्चाचा प्रस्ताव केंद्राकडे ठेवण्यात आला आहे.
     गुजरातमध्ये कच्छच्या रणात ५ सहस्र वर्षांपूर्वीचे हे बंदर वसवले गेले होते. बांधकामाचे जे अवशेष सापडले आहेत त्यावर मातीचे थर ज्या पद्धतीने आढळलेत ते पाहता दीड सहस्र वर्षांपूर्वी त्सुनामी येऊनच ही बंदर वसाहत गाडली गेली असावी, असा शास्त्रज्ञांचा दावा आहे. येथे भारतीय पुरातत्व खात्याकडून आवश्यक ती अनुज्ञप्ती घेऊन उत्खनन करण्यात आले. बंदराच्या ठिकाणी बांधलेली भिंत १४ ते १८ मीटर जाडीची आढळून आली. इतक्या जाडीची भिंत ही प्राण्यांपासून किंवा सशस्त्र आक्रमणापासून वाचण्यासाठी नव्हे, तर त्सुनामीपासून बचावासाठीच त्या वेळी बांधण्यात आली असावी, असे शास्त्रज्ञांचे मत आहे.

उपचार मिळण्यापूर्वीच वडिलांच्या खांद्यावर मुलाने प्राण सोडला !

जनतेवर विद्यार्थीदशेतच धर्मशिक्षण देऊन चांगले संस्कार केले गेले असते, 
तर देशात माणुसकीला लाजवणार्‍या घटना पुन:पुन्हा घडल्या नसत्या !
उत्तरप्रदेशातील कानपूर येथे माणुसकीला लाजवणारी घटना उघड 
      कानपूर (उत्तरप्रदेश) - येथील हैलेट रुग्णालयाच्या एका विभागातून दुसर्‍या विभागात पायपीट करत असतांना वडिलाच्या खांद्यावरच १२ वर्षांच्या आजारी मुलाने प्राण सोडल्याची घटना घडली. (वैद्यकीय क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाने गरूडझेप घेतली; मात्र माणुसकीच हरवत चालली असेल, तर हा विकास काय कामाचा ? - संपादक) 

पाकव्याप्त काश्मीरमधील विस्थापितांसाठी २ सहस्र कोटी रुपयांचे पॅकेज घोषित होण्याची शक्यता !

काश्मीरमधील विस्थापित हिंदूंसाठी सरकारने किती कोटी रुपये खर्च 
केले आणि करणार आहे, हेही सांगायला हवे ! 
       नवी देहली - पाकव्याप्त काश्मीरमधून भारतात आलेल्या कुटुंबांच्या साहाय्यासाठी केंद्रसरकारने २ सहस्र कोटी रुपयांच्या पॅकेजचा प्रस्ताव बनवला आहे. पाकव्याप्त काश्मीरमधील गिलगिट, बाल्टीस्तान या भागांतील लोक कित्येक वर्षांपासून जम्मू-काश्मीरमध्ये रहात आहेत. सरकारने अशा ३६ सहस्र ३४८ कुटुंबांची ओळख पटवली आहे. त्यांना प्रत्येकी साडेपाच लक्ष रुपयांचे आर्थिक साहाय्य देण्यात येणार आहे. जम्मू, कथुआ, राजौरी अशा विविध भागांमध्ये या कुटुंबांचा निवास असून त्यांना कायमस्वरुपी नागरीकत्व मिळालेले नाही. काही कुटुंबे १९४७ मध्ये फाळणीच्या वेळी, तर काही कुटुंबे १९६५ आणि १९७१ या वर्षांमधील भारत-पाकिस्तान युद्धाच्या वेळी भारतात आली आहेत. हे विस्थापित लोकसभा निवडणुकीत मतदान करू शकतात; पण विधानसभा निवडणुकांमध्ये त्यांना मतदान करण्याचा अधिकार नाही.

झी वाहिनीने कॉमेडी शोमधील बाजीराव पेशवे यांच्या संदर्भातील विडंबनात्मक भाग पुनर्प्रक्षेपणातून वगळला !

  • हिंदूंनो, या यशासाठी कृतज्ञता व्यक्त करा !
  • राष्ट्रभक्त हिंदूंच्या संघटित शक्तीचे यश !
      पुणे, ३१ ऑगस्ट (वार्ता.) - चित्रपट, मालिका, तसेच विज्ञापने आदींच्या माध्यमातून मनोरंजनाच्या नावाखाली हिंदूंच्या देवता, राष्ट्रपुरुष यांचे विडंबन करण्याचे प्रकार घडत असतात. झी वाहिनीवरील कॉमेडी शो या कार्यक्रमातही अटकेपार झेंडे फडकवणारे बाजीराव पेशवे यांचे विडंबन करण्यात आले होते. त्यासंदर्भात ब्राह्मण जागृती सेवा संघ, तसेच अन्य राष्ट्रप्रेमी नागरिक यांनी संघटितरित्या निषेध नोंदवला. परिणामस्वरूप झी वाहिनीला सदर आक्षेपार्ह भाग कॉमेडी शोच्या पुनर्प्रक्षेपणातून वगळणे भाग पडले.
      अपराजित योद्धे बाजीराव पेशवे यांची कॉमेडी शोमध्ये अपकीर्ती झाल्याचे लक्षात येताच ब्राह्मण जागृती सेवा संघाच्या वतीने झी वाहिनीला निषेधपत्रे पाठवण्यात आली होती, तसेच सामाजिक संकेतस्थळांवरही राष्ट्रभक्त नागरिकांकडून निषेध चळवळ राबवण्यात येत होती. (राष्ट्रपुरुषांच्या अवमानाच्या विरोधात कृतीशील झालेले ब्राह्मण जागृती सेवा संघ आणि अन्य राष्ट्रप्रेमी नागरिक यांचे अभिनंदन ! अशा प्रकारे हिंदूंचे अभेद्य संघटन उभे राहिले, तर राष्ट्रभक्तांच्या श्रद्धास्थानांवर आघात करण्याची कुणाचे धैर्य होणार नाही ! - संपादक)

महाराष्ट्राचा विनयभंगात प्रथम, बलात्कारांमध्ये दुसरा, तर महिलांवरील अत्याचारांमध्ये तिसरा क्रमांक !

        समानतेच्या अधिकाराच्या नावाखाली प्रसिद्धीलोलूप आंदोलने करून मंदिरांच्या परंपरा पायदळी तुडवणार्‍या तृप्ती देसाई यांच्यासारख्या महिला आणि त्यांच्या संघटना महाराष्ट्रातील महिलांवर होणार्‍या अत्याचारांना रोखण्यासाठी कृती करत नाहीत, हे लक्षात घ्या !
        नवी देहली -
नॅशनल क्राईम रजिस्टर ब्युरो अर्थात राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाने वर्ष २०१५ च्या अहवालात दिलेल्या माहितीनुसार महिलांवर सर्वांत जास्त अत्याचार होणार्‍या राज्यांच्या पहिल्या क्रमांकावर उत्तरप्रदेश आणि दुसर्‍या क्रमांकावर बंगाल आहे, तर महाराष्ट्राचा तिसरा क्रमांक लागला आहे. महाराष्ट्राचा विनयभंगात पहिला, तर बलात्कार्‍यांच्या घटनांत तिसरा क्रमांक लागला आहे.
१. महिलांवरील अत्याचारांच्या उत्तरप्रदेशात ३५ सहस्र ५२७, बंगालमध्ये ३३ सहस्र २१८, तर महाराष्ट्रात ३१ सहस्र १२६ घटना घडल्या आहेत. उत्तरप्रदेशचा आकडा देशातील एकूण गुन्ह्यांच्या १०.९ टक्के एवढा आहे.
२. २०१५ मध्ये देशभरात विनयभंगाच्या सर्वांत जास्त घटना घडल्या आहेत. महिला विनयभंगाचा आकडा ८२ सहस्र ४२२ एवढा आहे. विनयभंगाच्या सर्वाधिक घटना म्हणजे ११ सहस्र ७१३ घटनांची नोंद महाराष्ट्रात झाली आहे. त्यापाठोपाठ मध्यप्रदेशात ८ सहस्र ४९ इतक्या घटना घडल्या आहेत.

हिंदु असल्यामुळे क्रिकेटपटू दानिश कनेरिया यांना पाकिस्तान क्रिकेट मंडळ साहाय्य करत नाही ! - पाकमधील हिंदु खासदार रमेशकुमार वंकवानी यांचा आरोप

असे भारतात मुसलमान वा ख्रिस्ती खेळाडूंच्या बाबतीत झाले असते, 
तर एव्हाना पुरोगामी, साम्यवादी, निधर्मी आदींनी जणू राष्ट्रीय समस्या उद्भवल्याप्रमाणे 
देश डोक्यावर घेतला असता ! आता मात्र हे सर्व एक शब्दही बोलणार नाहीत, हे लक्षात घ्या !
पाकमध्ये क्रिकेटपटू दानिश कनेरिया यांच्याशी धार्मिक भेदभाव 
        भारतात अल्पसंख्य समाजातील खेळाडूंवर कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी केली जाते, तर इस्लामी राष्ट्रात हिंदु खेळाडूंना साहाय्य करणे तर दूरच; पण त्यांचे जगणे अवघड केले जाते ! दानिश कनेरियावरील अन्यायाच्या विरोधात सरकार गप्प का ? संकटात सापडलेल्या जगभरातील भारतीय नागरिकांना साहाय्य करणार्‍या सरकारने पाक आणि बांगलादेश येथील हिंदूंच्याही व्यथा जाणून त्यांना साहाय्य करावे, ही अपेक्षा !
      इस्लामाबाद - आजीवन बंदीचा सामना करत असलेले पाकचे क्रिकेटपटू दानिश कनेरिया हे हिंदु असल्यामुळे पाक सरकारने त्यांना आर्थिक आणि कायदेशीर साहाय्य करण्यास नकार दिला आहे, अशी तक्रार पाकच्या सांसदीय समितीचे सदस्य तथा पाकिस्तान मुस्लीम लीग (नवाज) या पक्षाचे खासदार रमेशकुमार वंकवानी यांनी केली आहे.

उडत्या मिग-२९ विमानातून इंधन टाकी खाली पडली!

उडत्या शवपेट्या झालेली वायूदलाची विमाने !
      नवी देहली - २९ ऑगस्टला विशाखापट्टणम् येथे उडणार्‍या नौदलाच्या मिकोयान मिग-२९ के या विमानातून इंधन टाकी खाली भूमीवर पडल्याची दुर्घटना घडली. हे विमान धावपट्टीवरून हवेत झेपावतांना हा प्रकार घडला. त्यामुळे धावपट्टीवर आग लागली. ही आग किरकोळ असल्यामुळे लगेच आटोक्यात आणली गेली. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. या अपघातामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट करण्यात आलेले नाही.
सरकारी शाळांमध्ये प्रत्येक ७६ मुलांसाठी १, तर ६६ मुलींसाठी १ शौचालय !

स्वातंत्र्याच्या ६९ वर्षांतील विकास ! 
सरकारी शाळांमध्ये साधनसुविधांचा अभाव !
      नवी देहली - देशातील ९ राज्यांत ४५० सरकारी शाळांमध्ये केलेल्या सर्वेक्षणात सरासरी प्रत्येक ७६ मुलांसाठी १, तर ६६ मुलींसाठी १ शौचालय असल्याचे आढळून आले आहे. भारत शासनाच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाने शाळांमध्ये मुलांसाठी आणि मुलींसाठी वेगळे शौचालय उपलब्ध करून देण्यासाठी स्वच्छ विद्यालय अभियान हाती घेतले होते. या मोहिमेच्या अंमलबजावणीनंतर २ वर्षांनी वॉटर एड या आंतरराष्ट्रीय सेवाभावी संघटनेने हे सर्वेक्षण हाती घेतले होते. ऑगस्ट २०१५ मधे भारत शासनाने स्वच्छ विद्यालय मोहिमेच्या अंतर्गत देशभरातील २ लक्ष ६१ सहस्र शाळांमध्ये ४ लक्ष १७ सहस्र शौचालये उभारण्याची घोषणा केली होती. या योजनेतील तरतुदीनुसार प्रत्येक ४० विद्यार्थ्यांमागे एक शौचालय असायला हवे होते. 
      या सर्वेक्षणाच्या अंतर्गत ४ सहस्र ८०० विद्यार्थी आणि ८०० पेक्षा अधिक शिक्षक यांची मुलाखत घेण्यात आली होती. केवळ ७६ टक्के शाळांमध्ये मुलांसाठी आणि मुलींसाठी वेगळे शौचालय असल्याचे या वेळी आढळून आले. 
       ९ राज्यांपैकी कर्नाटक आणि ओडिशा या राज्यांमध्ये स्थिती खूप वाईट असल्याचे दिसून आले. १९.४ टक्के मुले उघड्यावर शौचाला बसत असल्याचे या सर्वेक्षणात म्हटले आहे.उज्जैन येथील श्री वृषभ देव मंदिरात महिलांच्या पाश्‍चात्त्य पोषाखावर बंदी !

मंदिरांमध्ये पाश्‍चात्त्य पोषाखांना बंदी, असे फलक लावून न थांबता मंदिरांनी हिंदूंना 
धर्मशिक्षण देण्याची सोय करावी. त्यामुळे हिंदूंमध्ये धर्माभिमानही निर्माण होईल !
      उज्जैन - येथील श्री वृषभ देव मंदिराच्या न्यासाने महिलांसाठी नवा नियम निर्माण केला आहे. या मंदिरात येतांना ८ वर्षांवरील मुलींनी किंवा विवाहित महिलांनी पाश्‍चात्त्य कपड्यांऐवजी भारतीय कपडे परिधान करून यावे, असा नियम करण्यात आला आहे. 
     या मंदिराच्या न्यासाने मंदिराच्या बाहेरच एक सूचना फलक लावला आहे. यावर महिलांनी जीन्स परिधान करून मंदिरात येऊ नये, असे लिहिले आहे. यापूर्वी दक्षिण भारतातल्या मंगलादेवी आणि केनगेरी येथील कालीकंबा मंदिरातही महिलांना जीन्स परिधान करून येण्यास निर्बंध घातले होते. त्याचबरोबर महालक्ष्मी मंदिरातही भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांना साडी परिधान करून येण्यास सांगितले होते; पण त्यांनी याचा विरोध केला होता. (अशा पुरो (अधो)गाम्यांमुळेच आज हिंदू धर्माचरणापासून लांब चालले असून त्यांच्या हातून अधिकाधिक अधर्म होत आहे. त्यामुळे समाजात नैराश्य, आत्महत्या, फसवणूक, भ्रष्टाचार आदी प्रकारांना ऊत येऊन समाज अधोगतीकडे जात आहे ! - संपादक)

उज्जैन येथील श्री वृषभ देव मंदिरात महिलांच्या पाश्‍चात्त्य पोषाखावर बंदी !

मंदिरांमध्ये पाश्‍चात्त्य पोषाखांना बंदी, असे फलक लावून न थांबता मंदिरांनी हिंदूंना 
धर्मशिक्षण देण्याची सोय करावी. त्यामुळे हिंदूंमध्ये धर्माभिमानही निर्माण होईल !
      उज्जैन - येथील श्री वृषभ देव मंदिराच्या न्यासाने महिलांसाठी नवा नियम निर्माण केला आहे. या मंदिरात येतांना ८ वर्षांवरील मुलींनी किंवा विवाहित महिलांनी पाश्‍चात्त्य कपड्यांऐवजी भारतीय कपडे परिधान करून यावे, असा नियम करण्यात आला आहे. 
     या मंदिराच्या न्यासाने मंदिराच्या बाहेरच एक सूचना फलक लावला आहे. यावर महिलांनी जीन्स परिधान करून मंदिरात येऊ नये, असे लिहिले आहे. यापूर्वी दक्षिण भारतातल्या मंगलादेवी आणि केनगेरी येथील कालीकंबा मंदिरातही महिलांना जीन्स परिधान करून येण्यास निर्बंध घातले होते. त्याचबरोबर महालक्ष्मी मंदिरातही भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांना साडी परिधान करून येण्यास सांगितले होते; पण त्यांनी याचा विरोध केला होता. (अशा पुरो (अधो)गाम्यांमुळेच आज हिंदू धर्माचरणापासून लांब चालले असून त्यांच्या हातून अधिकाधिक अधर्म होत आहे. त्यामुळे समाजात नैराश्य, आत्महत्या, फसवणूक, भ्रष्टाचार आदी प्रकारांना ऊत येऊन समाज अधोगतीकडे जात आहे ! - संपादक)

पठाणकोटमधील आक्रमणाचा कट पाकनेच रचल्याचे अमेरिकेने दिले पुरावे !

     नवी देहली - पंजाबच्या पठाणकोट येथील वायूदलाच्या तळावर झालेल्या जिहादी आतंकवादी आक्रमणाचा कट पाकमध्ये रचण्यात आला होता, याचे पुरावे अमेरिकेने दिले आहेत. (भारताने दिले काय आणि अमेरिकेने दिले काय, कोणी कितीही पुरावे दिले, तरी ते पालथ्या घड्यावर पाणीसारखेच आहेत ! पाकला पुरावे देण्यात वेळ घालवण्यापेक्षा त्याला त्याच्याच भाषेत उत्तर द्यायला हवे ! अमेरिका त्यासाठी भारताला साहाय्य करणार का, हे तिने स्पष्ट करायला हवे ! - संपादक)

सरकारचे अपयश झाकण्यासाठी सरकार पाकशी युद्ध करील ! - मायावती

भारताला प्रतिदिन डिवचणार्‍या पाकशी युद्ध करण्यास मायावती सारख्या 
राजकारण्यांनी विरोध केला, तरी आश्‍चर्य वाटणार नाही !
      आझमगढ (उत्तरप्रदेश) - स्वत:चे अपयश झाकून जनतेचे लक्ष वळवण्याठी मोदी सरकार पाकिस्तानशी आतंकवादाच्या सूत्रावर युद्ध करील, असे भाकित बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा तथा माजी मुख्यमंत्री मायावती यांनी येथे वर्तवले. त्या पुढे म्हणाल्या, एकीकडे भाजप सरकारने श्रीमंतांची १ लक्ष १४ सहस्र कोटींची कर्जे माफ केली, तर दुसरीकडे गरीब आत्महत्या करत असल्याचे विरोधाभासी चित्र आहे. राज्य, तसेच केंद्रसरकारने जनतेची फसवणूक केली आहे. भाजप दलितविरोधी आहे, तर समाजवादी पक्ष गुन्हेगारांना प्रोत्साहन देत आहे. उत्तरप्रदेशच्या निवडणुकीपूर्वी राजकीय लाभ उठवण्यासाठी भाजप आणि समाजवादी पक्ष दंगलीही घडवू शकतील. बसप सत्तेत आल्यावर राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राखली जाईल.

माध्यान्ह भोजनातून झालेल्या विषबाधेमुळे २३ विद्यार्थ्यांच्या मृत्यूप्रकरणी शिक्षिकेला १७ वर्षांची शिक्षा !

      छपरा (बिहार) - येथील गंडामन गावामधील शाळेत १६ जुलै २०१३ या दिवशी माध्यान्ह भोजन खाल्ल्याने २३ विद्यार्थ्यांना विषबाधा होऊन त्यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी न्यायालयाने मुख्य शिक्षिका मीना देवी यांना एका कलमातर्गत ७ वर्ष आणि दुसर्‍या कलमातर्गत १० वर्षांची शिक्षा सुनावली. तसेच ३ लक्ष ७५ सहस्र रुपयांचा दंडही ठोठावला आहे. कारावासाची शिक्षा एकानंतर दुसरी भोगायची आहे. भाजी बनवण्यासाठी वापरण्यात आलेले तेल हे प्रत्यक्षात किटकनाशक औषध होते. मीना देवी यांनीच ते तेल म्हणून दिले होते.

भारत म्यानमारला प्रत्येक पावलावर सहकार्य करील ! - पंतप्रधान नरेंद्र मोदी

      नवी देहली - एक सहकारी आणि दोन्ही देशांची सुरक्षा या स्तरावर भारत प्रत्येक पावलावर म्यानमारला सहकार्य करील, असे आश्‍वासन पंतप्रधान मोदी यांनी म्यानमारचे राष्ट्रपती हुतिन ज्यॉ यांना दिले. ज्यॉ सध्या भारत भेटीवर आहेत. या दोन्ही राष्ट्रांत स्वतःच्या भूमीचा वापर आतंकवाद्यांना करू न देण्याचा पुनरुच्चार केला.गणेशोत्सवासाठी कोकणात जाणार्‍यांना टोलमधून सवलत

      मुंबई - गणेशोत्सवासाठी कोकणात जाणार्‍यांना मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर टोलमधून सवलत देण्याचा निर्णय सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील राज्य रस्ते विकास महामंडळाने घेतला आहे. कोकणातील आमदारांनी केलेल्या मागणीच्या अनुषंगाने सिंधुदुर्गचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी यासंदर्भात श्री. शिंदे यांना विनंती केली होती.


जर्मनीत आणखी किमान ३ लक्ष निर्वासित येण्याची शक्यता !

      बर्लिन - जर्मनीमध्ये आणखी ३ लक्ष निर्वासित येण्याचा अंदाज येथील स्थलांतरित आणि निर्वासित यांच्यासाठी कार्यरत असलेल्या कार्यालयाचे मुख्य अधिकारी फ्रँक जुर्गेन वेईस यांनी वर्तवला आहे. जर्मनीमध्ये आणखी निर्वासित आले, तर येथील व्यवस्थेवर ताण पडेल; मात्र या वर्षी येणार्‍या निर्वासितांची संख्या ही अपेक्षेइतकीच असेल, असे वेईस यांनी सांगितले. जर्मनीमध्ये पश्‍चिम आशिया, अफगाणिस्तान आणि आफ्रिका येथून गेल्या वर्षभरात १० लाखांपेक्षाही अधिक निर्वासित आले आहेत. या निर्वासितांना जर्मन समाजामध्ये सामावून घेण्यासंदर्भातील प्रक्रियेस मोठा कालावधी लागेल आणि त्याची मोठी किंमतही मोजावी लागेल, असे सूचक विधान वेईस यांनी व्यक्त केले आहे. जर्मनीमध्ये या मासात (महिन्यात) करण्यात आलेल्या सर्वेक्षणामध्ये देशातील निम्म्याहून अधिक लोकसंख्येने तेथील चॅन्सलर अँजेला मर्केल यांच्या निर्वासितांसंदर्भातील धोरणाविषयी तीव्र अप्रसन्नता दर्शवल्याचे स्पष्ट झाले आहे. याशिवाय देशातील निर्वासितांना विरोध करणार्‍या गटांना पाठिंबा वाढत असल्याचेही निष्पन्न झाले आहे.

(म्हणे) सूर्यनमस्कार बंधनकारक करण्यापूर्वी शाळांचा दर्जा सुधारा !

गेल्या ६९ वर्षांत काँग्रेसने शाळांचा दर्जा सुधारण्याविषयी काहीही केलेले 
नसतांना काँग्रेसच्या नेत्यांना याविषयी बोलण्याचा काय अधिकार ?
हिंदु धर्मापासून तोडणारी शिक्षणपद्धती देणार्‍या काँग्रेसच्या संजय निरूपम यांचे वक्तव्य 
     मुंबई - शाळांमध्ये योग आणि सूर्यनमस्कार बंधनकारक करण्यापूर्वी विद्यार्थ्यांना पुरेसे पिण्याचे पाणी, वीज आणि स्वच्छ प्रसाधनगृह यांसह अन्य सुविधा उपलब्ध करण्याची, तसेच शिक्षणाच्या दर्जामध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता आहे, अशी टीका मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरूपम यांनी केली. 
   ते पुढे म्हणाले की, पालिकेच्या शिक्षण विभागाचा २०१६-१७ या वर्षासाठी २ सहस्र ४०० कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला असून पालिका शाळेतील एका विद्यार्थ्यावर प्रशासन अनुमाने ५० सहस्र ५३४ रुपये खर्च करत आहे; मात्र गेल्या ५ वर्षांपासून विद्यार्थ्यांची संख्या न्यून होत आहे. तसेच एकूण ६७ शाळा बंद पडल्या असून पालिकेच्या शाळांमधील शिक्षणाविषयी ४२ टक्के पालक समाधानी नसल्याचे प्रजा फाऊंडेशनच्या अहवालावरून आढळून आले आहे. (शाळांमधील शिक्षणाचा दर्जा घसरण्यास इंग्रजाळलेली शिक्षणपद्धती कारणीभूत आहे. त्यामुळे हे कारण पुढे करून सूर्यनमस्कारांना विरोध करणे हा संजय निरूपम यांचा हिंदुद्वेषच होय ! - संपादक) मुसलमान धर्मीय विद्यार्थ्यांना सूर्यनमस्कार घालण्यास भाग पाडू नये, असे साकडेच पालिका आयुक्त अजय मेहता यांना काँग्रेसच्या शिष्टमंडळाने घातले़ आहे.

बंगालमधील मदरशांत विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ !

भारतातील धर्मांध युवक आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराद्वारे इसिसच्या संपर्कात होते.
मदरशांतील हे विद्यार्थीही आधुनिक तंत्रज्ञानांचा वापर अशा प्रकारे करणार नाहीत, याची
शाश्‍वती कोण देणार ?, असा प्रश्‍न जनतेच्या मनात उत्पन्न होत असेल, तर तो चुकीचा कसा ?
इंटरनेटद्वारे माहिती कशी मिळवावी, याविषयी शिक्षण दिले जात असल्याचा परिणाम !
      सीतापूर (बंगाल) - बंगालमधील मदरशांनी तंत्रज्ञानाच्या उपयोगाच्या संदर्भात वर्ष २०१४ मधे लागू केलेले शैक्षणिक धोरण स्वीकारले. त्यानंतर विद्यार्थ्यांच्या संख्येत दुप्पट वाढ झाली आहे. पूर्वी याच मदरशांतील अनेक विद्यार्थ्यांनी मध्येच शिक्षण सोडले होते किंवा ते परत कधीही आले नाहीत; परंतु आता पुस्तकी ज्ञानाऐवजी इंटरनेटद्वारे माहिती कशी मिळवावी, याविषयी शिक्षण दिले जात असल्याने विद्यार्थ्यांचा ओढा वाढत चालला आहे. 
     विद्यार्थी इंटरनेटच्या माध्यमातून माहिती मिळवतांना दिसून येत आहेत. टाटा ट्रस्टचे अमिना चरनिया यांनी सांगितले, दीनी तालिम (धार्मिक) आणि दुनियावी तालिम (जागतिक शिक्षण) हे शिक्षण आधुनिक तंत्रज्ञानाने दिले जात असून त्यात आता विद्यार्थ्यांना रस वाटत आहे.पत्नीचा मृतदेह खांद्यावर वाहण्याच्या वृत्ताने दुःखी झालेल्या बहारीनच्या पंतप्रधानांची आर्थिक साहाय्याची घोषणा !

भारतातील एका गरीबाची दुःस्थिती वाचून एका इस्लामी देशातील पंतप्रधान त्याला आर्थिक साहाय्य 
करतो; मात्र त्याला साहाय्य करण्यासाठी भारतातील एकही राज्यकर्ता पुढे येत नाही. असे 
संवेदनशून्य लोकप्रतिनिधी जनहित काय साधणार ? 
      नवी देहली - काही दिवसांपूर्वी ओडिशामध्ये दाना माझी यांनी पैशाअभावी स्वतःच्या पत्नीचा मृतदेह खांद्यावरून १२ किलोमीटरपर्यंत घेऊन जाण्याची घटना समोर आली होती. या घटनेचे वृत्त वाचून भारतातून कोणीही साहाय्य केले नसले, तरी बहारीनचे पंतप्रधान प्रिन्स खलीफा बिन सलमान अल खलीफा यांनी माझी यांच्या कुटुंबाला आर्थिक साहाय्य करण्याची घोषणा केली आहे. दैनिकात प्रसिद्ध झालेले वृत्त वाचून दुःख झाल्याने सलमान यांनी हे साहाय्य घोषित केले. ही रक्कम किती आणि कधी देण्यात येईल याविषयी मात्र अजून खुलासा करण्यात आलेला नाही.

जर्मनीमध्ये बलुची नागरिकांकडून भारतीय राष्ट्रध्वज घेऊन पाकच्या विरोधात निदर्शने !

     बर्लिन - जर्मनीच्या लिपजिग शहरात २७ ऑगस्टला निर्वासित बलुची नागरिकांनी पाकच्या विरोधात निदर्शने केली. या वेळी त्यांनी भारताचा राष्ट्रध्वज घेतला होता आणि पंतप्रधान मोदी यांचे कौतुक करणार्‍या घोषणाही दिल्या. 
      निदर्शनात सहभागी झालेल्या एका बलुची नागरिकाने सांगितले की, आम्ही पंतप्रधान मोदी यांचे आभारी आहोत. पाक आमच्यावर अमानुष अत्याचार करत आहे. 
     अन्य एक व्यक्ती म्हणाला की, आम्ही आमच्या देशासाठी लढा देत आहोत. आम्ही मानवतेवर विश्‍वास ठेवणारे आहोत. आमचे निदर्शन बलुचिस्तानमधील लोकांसाठी आणि पाकमध्ये होणार्‍या मानवाधिकाराच्या उल्लंघनाच्या विरोधात आहे.इस्लामी कट्टरतेला सौदी अरेबिया उत्तरदायी असण्यावर हिलरी क्लिंटन आणि डोनाल्ड ट्रम्प यांचे एकमत !

      वॉशिंगटन - अमेरिकेच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार हिलरी क्लिंटन आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात अनेक विषयांवर मतभेद असले, तरी एका विचारांवर दोघांचे एकमत आहे. दोघेही इस्लामच्या कट्टरतेच्या मागे सौदी अरेबिया असल्यावर ठाम आहेत.
     हिलरी क्लिंटन म्हणाल्या की, सौदी अरेबिया त्या शाळांना आणि मशिदींना समर्थन करतो ज्या मुसलमान युवकांना धर्मांधतेकडे आणि जिहादच्या मार्गावर नेतात. ट्रम्प म्हणाले की, सौदी अरेबिया आतंकवाद्यांचा सर्वांत मोठा अर्थपुरवठादार आहे.
    मुसलमान देशांत राजदूत राहिलेले फराह पंडित यांचे म्हणणे आहे की, जर सौदीने आताच स्वतःला यापासून रोखले नाही, तर भविष्यात याचे सांस्कृतिक आणि आर्थिक दुष्परिणाम भोगावे लागतील. 
    अमेरिकेतील वॉशिंग्टन पोस्ट दैनिकात फरीद जकारिया यांच्या लेखात सौदी अरेबियाने इस्लामच्या जगात एका राक्षसाची निर्मिती केली आहे, असे म्हटले आहे.

पाकिस्तानमध्ये मंदिरांची देखरेख करणार्‍या मंडळाकडे केवळ ८ पुजारी !

भारत सरकार याकडे लक्ष देणार का ?
      इस्लामाबाद - पाकमधील हिंदू त्यांच्यावरील अत्याचारांमुळे पाकमधून पलायन करत असल्याने तेथील हिंदूंच्या मंदिरांना पुजारी मिळणे दुर्मिळ झाले आहे. या पार्श्‍वभूमीवर पाक सरकारच्या एक्यू ट्रस्ट प्रॉपर्टी बोर्डाने पुजार्‍यांचे वेतन वाढवले आहे. आता त्यांचे वेतन ८ सहस्रावरून १० सहस्र होणार आहे. अल्पसंख्यांकांच्या धार्मिक संपत्तीची देखरेख करणार्‍या या बोर्डाचे अध्यक्ष फारुक उल सिद्धीक यांनी सांगितले की, पाकमधील मंदिरांत पूजा करण्यासाठी बोर्डाकडे केवळ ८ पुजारी आहेत. 
     फाळणीच्या वेळी पाकमध्ये लहान मोठी सहस्रो मंदिरे होती; मात्र जिहाद्यांनी त्यांवर आक्रमण करून ती नष्ट केली. आता संपूर्ण पाकमध्ये केवळ ९० प्रमुख मंदिरे आहेत. त्यात आदित्य सूर्य मंदिर, मुल्तान; जगन्नाथ मंदिर, सियालकोट; कटास राज मंदिर, चकवाल; कृष्णा मंदिर, रावी रोड, लाहोर; वाल्मीकि मंदिर, लाहोर; लावा मंदिर लाहोर किल्ला; टीला जोगियां मंदिर, सियालकोट; हिंगलाज मंदिर, पेशावर; स्वामी नारायण मंदिर, कराची; वरुण देव मंदिर, कराची आदी मंदिरांचा समावेश आहे.

इसिसचे आतंकवादी बांगलादेशातील आतंकवादी संघटनांच्या संपर्कात ! - जॉन कॅरी, परराष्ट्र मंत्री, अमेरिका

      ढाका - इसिसचे आतंकवादी बांगलादेशातील आतंकवादी संघटनांच्या संपर्कात आहेत, असे विधान अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री जॉन कॅरी यांनी केले आहे. ते सध्या दक्षिण आशियाच्या भेटीवर आहेत. बांगलादेशातील वाढत्या आतंकवादी धोक्याला पहाता गोपनीय माहिती आणि सूचना देण्यासाठी सहकार्य करण्यासंदर्भात पंतप्रधान शेख हसीना अन्य नेत्यांशी चर्चा करण्यास सिद्ध आहेत.

डेन्मार्कमध्ये प्रथमच मुसलमान महिलेने मशिदीत जाऊन दिली अजान !

      कोपेनहेगन - डेन्मार्क मध्ये २५ ऑगस्टच्या शुक्रवारी प्रथमच एका महिलेने कोपनहेग येथील सिटी सेंटर स्ट्रीटवरील मशिदीत जाऊन अजान देण्याची घटना घडली. स्कॅन्डीनेव्हीया वंशाच्या शेरिन खानकन आणि सलीहा मेरी या फेतह मशिदीच्या इमाम आहेत. यावर्षी फेब्रुवारी महिन्यात या मशिदीचा प्रारंभ झाला होता; मात्र आता पहिल्यांदा महिलेने अजान दिली. या वेळी आलेल्या ६० महिलांपैकी काही महिला अन्य धर्मीय होत्या. त्यांना उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी आमंत्रण देण्यात आले होते. ही मशीद महिला आणि पुरुष यांच्यासाठी असली, तरी शुक्रवारच्या नमाजाच्या वेळी केवळ महिलांनाच प्रवेश असणार आहे. यापूर्वी गेल्या वर्षी अमेरिकेच्या लॉस एंजलिस येथे महिलांसाठी मशीद उघडण्यात आली होती.

'दलित' हा शब्द घटनाबाह्य असल्याने त्याचा वापर करू नये !

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठाची शासनाला नोटीस 
     नागपूर, ३१ ऑगस्ट - 'दलित' हा शब्द वापरणे घटनाबाह्य असून मुद्रित, दृकश्राव्य आणि सामाजिक संकेतस्थळ यांवर हा शब्द वापरण्यात येऊ नये, अशी नोटीस नागपूर खंडपिठाने केंद्र आणि राज्य शासनाला दिली आहे. हा शब्द घटनाबाह्य आणि आक्षेपार्ह असून भावना दुखावल्या जात असल्याने याच्या वापरावर बंदी घालण्यात यावी, अशी विनंती करणारी याचिका अमरावती येथील 'भीम मुंबई उच्च न्यायालया'च्या नागपूर खंडपिठात प्रविष्ट करण्यात आली होती.

काश्मीरमधील संचारबंदी हटवल्यानंतर पुन्हा झालेल्या हिंसाचारात एक दंगलखोर ठार !

       श्रीनगर - काश्मीरमध्ये ५० हून अधिक दिवस चालू असलेली संचारबंदी उठवण्यात आली आहे; मात्र येथे १४४ कलम लागू करून जमावबंदी करण्यास मनाई करण्यात आली आहे. संचारबंदी उठवण्यात आली असली, तरी काही ठिकाणी दगडफेकीच्या घटना घडल्या आहेत. बारामुल्ला येथील लडुरामध्ये सुरक्षादल आणि दंगलखोर यांच्यात झालेल्या चकमकीत एक दंगलखोर ठार, तर ५ जण घायाळ झाले. श्रीनगरच्या नौहाटा आणि अन्य ठिकाणही संचारबंदी नसतांना चकमकी घडल्या. यानंतर येथे मोठ्या संख्येने सुरक्षा दलांना तैनात करण्यात आले. याव्यतिरिक्त सोपोर आणि तेंगपुरा येथेही चकमक झाली.

एअर होस्टेसवर टॅक्सीचालक इमरान याचा बलात्काराचा प्रयत्न !

अशा वासनांधांना शरीयत कायद्यानुसार शिक्षा 
करण्याची कोणी मागणी केल्यास त्यात चुकीचे काय ?
       भाग्यनगर - येथे ३० ऑगस्टला रात्री २ वाजता औषधे आणण्यासाठी घराबाहेर पडलेल्या २४ वर्षीय एअर होस्टेसवर इमरान नावाच्या एका टॅक्सीचालकाने बलात्काराचा प्रयत्न केला. इमरानने तिचा विनयभंग करून तिच्या जवळची रोख रक्कम लुटली. त्यानंतर पीडित तरुणीला निर्जनस्थळी सोडून तिथून पसार झाला. पोलिसांनी इमरानवर बलात्कार आणि दरोडा यांचा गुन्हा दाखल केला आहे. घराजवळचे औषधाचे दुकान बंद असल्याने दूरच्या दुकानात जाण्यासाठी ती जवळ उभ्या असलेल्या टॅक्सीत बसली, तेव्हा इमरान तिला आऊटर रिंग रोडवर निर्जन स्थळी घेऊन गेला. तिथे त्याने तरुणीवर बळजोरी करण्याचा प्रयत्न केला.

ध्वनीक्षेपक आचारसंहितेचे काटेकोर पालन करा !

सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे आवाहन ! 
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या याचिकेत सात्त्विक गाणी लावण्याचे आवाहन !
     मुंबई - गणेशोत्सवात नियम धाब्यावर बसवून कर्णकर्कश्य आवाजात ध्वनीक्षेपकाचा वापर करणार्‍या, तसेच रात्री उशिरापर्यंत कार्यक्रमांमध्ये रंगणार्‍या गणेशोत्सव मंडळांसाठी बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीने आचारसंहिता सिद्ध केली आहे. या आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन समन्वय समितीने सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना केले आहे. 

बलात्कार प्रकरणातील दोषींना संचित रजा (पॅरोल) न देण्याचा राज्य सरकारचा निर्णय

उशिरा सुचलेले शहाणपण ! 
     मुंबई, ३१ ऑगस्ट - बलात्कार, खून आणि मानवी तस्करी या प्रकरणांतील दोषींना संचित रजा (पॅरोल) न देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. पल्लवी पूरकायस्थ बलात्कार आणि हत्या प्रकरणातील दोषी सज्जाद मुघल हा संचित रजा मिळाल्यावर पसार झाल्याने राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे. वडाळा येथील अधिवक्ता पल्लवी पूरकायस्थ या तरुणीवर इमारतीचा सुरक्षारक्षक सज्जाद अहमद मुघलने बळजोरी केली होती; मात्र तिने प्रतिकार केल्यानंतर तिची हत्या केली होती. सज्जादला जन्मठेपेची शिक्षा होऊन नाशिकमधील कारागृहात होता. मार्च २०१६ मध्ये सज्जादने आईच्या आजारपणाचे कारण देत संचित रजा मिळवली होती; पण ती रजा संपल्यावरही सज्जाद पुन्हा कारागृहात परतलाच नाही. त्याला रजा दिल्याप्रकरणी तुरुंगातील वरिष्ठ अधिकार्‍यांवर निलंबनाची कारवाईही केली होती. आतापर्यंत महाराष्ट्रातून २०० जण आणि भारतातून ८ सहस्रहून अधिक कैदी फरार झाले आहेत.

अंत्यविधीसाठी लागणार्‍या रॉकेलला अवाजवी पैशांची मागणी !

मयताच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा प्रकार ! 
     ठाणे - मीरा-भाईंदर महापालिकेच्या मीरा रोड पूर्व येथील स्टेशन रोड परिसरातील स्मशानभूमीत सोमवारी एका अंत्यविधीसाठी आलेल्या लोकांकडे येथील कर्मचार्‍याने एका लिटर रॉकेलसाठी चक्क ३०० रुपयांची मागणी केली. या प्रकाराने नातेवाइकांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटली असून या प्रकाराची चौकशी करण्याची मागणी केली आहे. 

पुणे महापालिकेच्या हद्दीत मृत झालेल्यांच्या अंत्यविधीचा व्यय आता पालिका करणार !

निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून घेतलेला निर्णय, असे वाटल्यास चुकीचे काय ? 
सर्वसाधारण सभेच्या मान्यतेनंतर अंमलबजावणी 
     पुणे, ३१ ऑगस्ट - पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत मृत झालेल्या व्यक्तीच्या अंत्यविधीचा संपूर्ण व्यय पालिकेच्या वतीने करण्याचा निर्णय स्थायी समितीने घेतला आहे. सर्वसाधारण सभेच्या मान्यतेनंतर या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. (देश आर्थिक संकटाच्या खाईत असतांना असा निर्णय घेणे कितपत योग्य आहे ? - संपादक) पालिका हद्दीत मृत झालेल्या व्यक्तींच्या अंत्यविधीचा संपूर्ण व्यय पालिकेने करावा, यासाठी राष्ट्रवादीचे आमदार अनिल भोसले यांनी २ आठवड्यांपूर्वी पालिकेसमोर लाक्षणिक उपोषण केले होते. त्या वेळी महापौर प्रशांत जगताप यांच्यासह स्थायी समितीचे अध्यक्ष बाळासाहेब बोडके यांनी याविषयी सकारात्मक निर्णय घेतला होता. त्या पार्श्‍वभूमीवर स्थायी समितीच्या बैठकीत त्याविषयीचा ठराव मांडून त्याला मान्यता घेण्यात आल्याचे बोडके यांनी सांगितले. 

झाकीर नाईक यांच्यावर गुन्हा प्रविष्ट करा ! - केंद्रीय महाधिवक्ता

      नवी देहली - सर्व मुसलमानांना आतंकवादी बनण्याचा सल्ला देणारे इस्लामी धर्मप्रसारक राष्ट्रद्रोही झाकीर नाईक यांच्यावर गुन्हा प्रविष्ट करण्यात यावा, अशी सूचना देशाचे महाधिवक्ता (सॉलिसिटर जनरल) रणजित कुमार यांनी गृहमंत्रालयाला दिली आहे. नाईक यांच्या भाषणांची तपासणी करून गृहमंत्रालयाला हा अहवाल त्यांनी दिला. डॉ. झाकीर नाईक यांच्या भाषणांच्या ध्वनीचित्रफिती तपासणीसाठी सॉलिसिटर जनरल यांच्याकडे देण्यात आल्या होत्या. त्यामध्ये ते आतंकवादाला प्रोत्साहन देत असल्याचे आढळून आले.

वाहतूक हवालदार विलास शिंदे यांचा अखेर मृत्यू !

धर्मांधांची खुनशी वृत्ती जाणा ! 
धर्मांध अल्पसंख्यांक गुन्हगारीत मात्र अग्र्रेसर ! 
     मुंबई - आठ दिवसांपासून मृत्यूशी झुंज देत असलेले वाहतूक पोलीस विलास शिंदे यांचा अखेर ३१ ऑगस्टला मृत्यू झाला. २३ ऑगस्टला कर्तव्य बजावत असतांना शिंदे यांना दोन धर्मांध मुलांनी लोखंडी सळईने बेदम मारहाण केली होती. शहीद जवानांच्या कुटुंबियांना ज्या सवलती मिळतात, त्या त्यांच्या कुटुंबियांना मिळणार आहेत. २५ लाखांचे साहाय्य त्यांच्या कुटुंबियांना करण्यात येणार आहे. शिंदे यांनी विनाहेल्मेट दुचाकी चालवणार्‍याला थांबवले आणि वाहनपरावान्याची मागणी केली होती. आरोपी अहमद महमद अली कुरेशीसह त्याच्या अल्पवयीन भावाला अटक करण्यात आली आहे.

पुण्यात पोलिसांना धक्काबुक्की केल्याप्रकरणी ३ धर्मांधांना अटक

धर्मांधांची वाढती गुन्हेगारी ! 
     पुणे, ३१ ऑगस्ट - वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यामुळे पोलिसांनी शेरअली सिकंदर शेख, आरिफ शेख आणि सिकंदर दुल्हेमिया शेख या तिघांना अडवल्यामुळे त्यांनी २ पोलिसांना धक्काबुक्की केली. (पोलिसी वर्दीचा धाक संपला कि काय ? - संपादक) त्या तिघांना सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी खडक पोलिसांनी अटक केली आहे. समर्थ वाहतूक विभागातील पोलीस शिपाई मल्लिकार्जुन गायकवाड आणि त्यांचे सहकारी गस्तीवर असतांना त्यांनी शेख आणि त्याचे मित्र विरुद्ध दिशेने येत असल्याचे पाहिले. वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांना अडवून दंड भरण्यास सांगितले; परंतु आरोपींनी पावती पुस्तक फेकून देत पोलिसांना धक्काबुक्की केली. (उद्दामखोर धर्मांध ! - संपादक)

हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणारा अघोरी निर्णय घेणार्‍यांनी त्यागपत्र द्यावे ! - सुनील घनवट

महापौरांना निवेदन देतांना हिंदुत्वनिष्ठ
     महानगरपालिकेने हिंदूंच्या धार्मिक भावनांना पायदळी तुडवत अमोनियम बायकार्बोनेट वापरून गणेशमूर्ती विसर्जन करण्यासाठी प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतला आहे. गणेशमूर्ती विसर्जनासाठी निर्बंध घालणारे पालिका प्रशासन ताबूत विसर्जनांच्या संदर्भात निर्बंध घालण्याचे धैर्य दाखवील का ? हिंदूंच्या सणांच्या संदर्भात कुणाही धर्माचार्यांचे मत विचारात न घेता असे धर्मद्रोही निर्णय घेणार्‍यांना पदावर रहाण्याचा नैतिक अधिकार नाही. हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणारा अघोरी निर्णय घेणारे महापौर आणि आयुक्त यांनी त्वरित त्यागपत्र द्यावे, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र राज्यसंघटक श्री. सुनील घनवट यांनी केले. ३१ ऑगस्ट या दिवशी महानगरपालिका भवनासमोर आयोजित करण्यात आलेल्या निषेध आंदोलनात ते बोलत होते. या प्रसंगी विविध संघटनांच्या प्रतिनिधींसह १४० हून अधिक धर्माभिमानी उपस्थित होते. 

राजगुरुनगर येथे गोवंशियांची वाहतूक करणार्‍या २ धर्मांधांना अटक

शासनाने गोवंश हत्याबंदी कायद्याची अंमलबजावणी कडक करावी !     
     राजगुरुनगर, ३१ ऑगस्ट - येथील बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी गोवंशियांना मुंबई येथील पशूवधगृहात घेऊन चाललेल्या एका टेम्पोला अडवले. या वेळी नदीम अब्दुल करीब कुरेशी आणि फरजाना अब्दुल करीब कुरेशी या दोघांना पकडून पोलिसांच्या कह्यात दिले. 
     खेड तालुक्यातील किवळे येथील बजरंग दलाचे स्वप्नील बाळासाहेब साळुंके आणि मयूर रोहिदास साळुंके यांना २९ ऑगस्ट या दिवशी रात्री मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी कोहिंडे फाट्यावर टेम्पो अडवला. त्यात १ गाय, १ बैल आणि २ वासरे आढळली. (गोवंश रक्षणासाठी प्रयत्न करणार्‍या बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांचे अभिनंदन ! - संपादक) हे गोवंशीय बुट्टेवाडी येथील धर्मवीर संभाजीराजे गोशाळेत सोडण्यात आले आहेत.

पू. भिडेगुरुजी यांच्या सभेविषयी चुकीचे वृत्त छापणार्‍या दैनिक लोकमतचा खुलासा त्रोटक ! - नितीन चौगुले, श्रीशिवप्रतिष्ठान

दैनिक लोकमतच्या कार्यालयाबाहेर
घोषणा देतांना संतप्त धारकरी !
    सांगली, ३१ ऑगस्ट (वार्ता.) - पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांच्या सभेविषयी चुकीचे वृत्त छापणार्‍या दैनिक लोकमतने चुकीचा खुलासा अत्यंत त्रोटक शब्दांत छापला असून या संदर्भात कायदेशीर मार्ग अवलंबणार असल्याची माहिती श्रीशिवप्रतिष्ठानचे सांगली शहर कार्यवाहक नितीन चौगुले यांनी दिली. या संदर्भात  श्रीशिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी दैनिक लोकमतच्या येथील कार्यालयाबाहेर घोषणा दिल्या.
श्री. चौगुले पुढे म्हणाले की,
१. श्रीशिवप्रतिष्ठानचे संस्थापक पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांच्या मुंबई येथील सभेसाठी दोन सहस्र धारकर्‍यांची उपस्थिती होती आणि सभाही सुरळीत पार पडली होती. सभा उधळणे, घेराव घालणे यांसारखे कोणतेही अपप्रकार येथे घडले नसतांना दैनिक लोकमतने खोटे वार्तांकन केले.

उंच गणेशमूर्ती नेतांना विजेचा धक्का लागून दोघांचा मृत्यू

हिंदूंनो, धर्मशास्त्रानुसार छोटी गणेशमूर्ती बसवा !
      उल्हासनगर (जिल्हा ठाणे) - येथे १४ फुटी गणेशमूर्ती नेत असतांना इलेक्ट्रिक वायरचा स्पर्श झाल्याने २ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. उंचावरील उच्च दाबाच्या वाहिनीचा मूर्तीला स्पर्श झाल्याने पाण्यामुळे हा विजेचा धक्का लागला. (शास्त्रानुसार गणेशमूर्ती ही छोटीच असली पाहिजे. गणेशोत्सवात शिरलेल्या अपप्रकारांमुळे हल्ली सर्वत्र सार्वजनिक उत्सवांत उंच मूर्तींसाठी स्पर्धा लागते. त्याचेच हे दुष्परिणाम आहेत. - संपादक)अंबरनाथमध्ये अवैधपणे चालणार्‍या पशूवधगृहावर पोलिसांच्या धाडीत ४ धर्मांधांना अटक

राज्यातील अवैध पशूवधगृहांना आळा घालण्यासाठी
पोलीस प्रशासन गोवंशहत्या बंदी कायद्याची अंमलबजावणी करणार का ?
     अंबरनाथ, ३१ ऑगस्ट - येथील उलनचाळ वस्तीत अवैधपणे चालणार्‍या पशूवधगृहावर पोलिसांनी धाड टाकून शफी इब्राहिम कुरेशी, रियाज मोहमद शेख, अजाद निजामुद्दीन कुरेशी आणि सज्जाद निजामुद्दीन कुरेशी या ४ धर्मांधांना अटक केली आहे. त्यांच्यासह मनसेचे शहर उपाध्यक्ष युसुफ काशीद शेख यांच्यावर आणि आणखी एकावर गुन्हा प्रविष्ट केला आहे. गोवंशियांतील चोरलेल्या प्राण्यांची हत्या करणे आणि गोमांस विक्री करणे आदी प्रकार पोलिसांनी उघड केले आहेत.

नगर जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेतील ४७ लक्ष रुपयांचा घोटाळा दडपल्याचे उघड

दिवसेंदिवस अधिकोषातील घोटाळे उघड
होणे, हे आर्थिक क्षेत्रातील अराजकतेचे लक्षण !
    नगर, ३१ ऑगस्ट - येथील जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेच्या कोपरगाव शाखेत ३ ऑक्टोबर २०१५ या दिवशी ४७ लक्ष ८ सहस्र ४८९ रुपयांचा अपहार झाला. हा घोटाळा तत्कालीन अधिकारी आणि पदाधिकारी यांनी दडपला असून बँकेच्या सभासदांना याविषयी माहिती दिली नाही. तसेच बँक प्रशासनाने घोटाळ्याची पोलिसांकडे तक्रारही केलेली नाही. (यावरून बँकेचा कारभार कसा चालत असेल, याचा विचारच न केलेला बरा ! बँकेच्या चुकीच्या कार्यपद्धतीविषयी भारतीय रिझर्व्ह बँक अधिकोष व्यवस्थापनाकडे चौकशी करून कारवाई करेल का ? तसेच या प्रकरणाची पोलिसांची आर्थिक गुन्हे शाखा स्वतःहून नोंद घेऊन कारवाई करेल का ? - संपादक)

ह.भ.प. नारायणबुवा काणे यांनी गीत समर्थायनच्या माध्यमातून उलगडले समर्थ रामदासस्वामी यांचे चरित्र !

     सांगली, ३१ ऑगस्ट (वार्ता.) - जय जय रघुवीर समर्थ या गर्जनेने समर्थ रामदासस्वामींनी महाराष्ट्राला जागृती दिली. कृष्णामाईच्या खोर्‍यात श्री समर्थ आणि छत्रपती शिवराय यांनी हिंदु राष्ट्राची मुहूर्तमेढ रोवली. अशा समर्थ रामदासस्वामींचेे चरित्र कीर्तनकलाशेखर ह.भ.प. नारायणबुवा काणे यांनी गीत समर्थायनच्या माध्यमातून सादर केले. २८ आणि २९ ऑगस्ट असे दोन दिवस सिटी हायस्कूल येथे पार पडलेल्या या कार्यक्रमात ह.भ.प. नारायणबुवा काणे यांनी मंत्रमुग्ध करणार्‍या गीतांच्या साहाय्याने समर्थांचा संपूर्ण जीवनपट उलगडून दाखवला. श्रीशिवप्रतिष्ठानच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

मानवी प्रदूषणामुळे गोव्यातील नद्यांमध्ये जंतूंची मोठ्या प्रमाणात वाढ ! - एस्. नक्वी, संचालक राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्था

     केवळ हिंदु धर्माला अपकीर्त करण्यासाठी श्री गणेशमूर्ती, निर्माल्य नदीत विसर्जित करू नये, अशी ओरड करणारे अंनिसवाले, तसेच पुरो(अधो)गामी याविषयी का बोलत नाहीत ?
    पणजी, ३१ ऑगस्ट (वार्ता.) - मानवी मल, तसेच सांडपाणी कुठलीही प्रक्रिया न करता थेट नदीमध्ये सोडण्याचे प्रमाण जसे भारतातील इतर भागांत आहे, तसेच गोव्यातही आहे. अशा मलामुळे गोव्यातील मांडवी, जुवारी आदी नद्यांतील हानीकारक बॅक्टेरिया (ई-कोलाय) वाढत आहे, असे राष्ट्रीय समूद्रविज्ञान संस्थेचे संचालक एस्. नक्वी यांनी सांगितले.

मानवी प्रदूषणामुळे गोव्यातील नद्यांमध्ये जंतूंची मोठ्या प्रमाणात वाढ ! - एस्. नक्वी, संचालक राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्था

     केवळ हिंदु धर्माला अपकीर्त करण्यासाठी श्री गणेशमूर्ती, निर्माल्य नदीत विसर्जित करू नये, अशी ओरड करणारे अंनिसवाले, तसेच पुरो(अधो)गामी याविषयी का बोलत नाहीत ?
    पणजी, ३१ ऑगस्ट (वार्ता.) - मानवी मल, तसेच सांडपाणी कुठलीही प्रक्रिया न करता थेट नदीमध्ये सोडण्याचे प्रमाण जसे भारतातील इतर भागांत आहे, तसेच गोव्यातही आहे. अशा मलामुळे गोव्यातील मांडवी, जुवारी आदी नद्यांतील हानीकारक बॅक्टेरिया (ई-कोलाय) वाढत आहे, असे राष्ट्रीय समूद्रविज्ञान संस्थेचे संचालक एस्. नक्वी यांनी सांगितले.

गणेशोत्सव डॉल्बीमुक्त होण्यासाठी गणेशोत्सव मंडळांना नोटिसा !

हिंदु धर्मियांसमवेत अन्य धर्मियांचे सणही
प्रदूषणमुक्तहोण्यासाठी पोलीस प्रशासन पुढाकार घेणार काय ?
    सांगली, ३१ ऑगस्ट (वार्ता.) - यंदाचा गणेशोत्सव डॉल्बीमुक्त करण्यासाठी गणेशोत्सव मंडळांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. त्यासाठी पोलीस ठाण्यातील प्रभारी अधिकार्‍यांना अधिकार दिले आहेत. ध्वनीप्रदूषण केल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, अशी चेतावणी अप्पर पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय यांनी दिली.

नागपूर येथे हिंदुत्वनिष्ठांकडून उपजिल्हाधिकार्‍यांना निवेदन


     नागपूर -शास्त्रानुसार श्री गणेशमूर्ती वहात्या पाण्यात विसर्जित करू द्यावी आणि कृत्रिम तलावात श्री गणेशमूर्ती विसर्जित करायला नको, या संदर्भात नागपूर येथील उपजिल्हाधिकारी श्री. राव यांना हिंदु जनजागृती समितीच्या वतीने निवेदन देण्यात आले. या वेळी गणेश हस्त शिल्प मंडळाचे अध्यक्ष श्री. सुरेश पाठक, भाजपच्या अभियान सेविका सौ. अनिता काशीकर, हिंदु जनजागृती समितीचे श्री. अभिजित पोलके आणि श्री. अतुल आर्वेन्ला, तसेच अन्य हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्ते उपस्थित होते.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील नगरसेवकांचे मानधन ५० सहस्र रुपये करण्याचा प्रस्ताव मागे

नागरिकांनी असेच जागरूक राहून लोकप्रतिनिधींवर अंकुश ठेवायला हवा !
वाढत्या जनक्षोभाचा परिणाम !
     पिंपरी (पुणे), ३१ ऑगस्ट - खासदार आणि आमदार यांच्या मानधनात मोठी वाढ झाल्यानंतर पिंपरी पालिकेच्या नगरसेवकांनी स्वत:चे मानधन ७ सहस्र ५०० रुपयांवरून थेट ५० सहस्र करावे, असा ठराव विधी समितीने संमत करून महानगरपालिका सभेकडे संमतीसाठी पाठवला होता. त्या प्रस्तावावर सर्वच स्तरावरून नगरसेवकांवर टीकास्त्र सोडले गेल्याने त्याचा परिणाम म्हणून २९ ऑगस्ट या दिवशी झालेल्या महापौर शकुंतला धराडे यांच्या अध्यक्षतेखालील सर्वसाधारण सभेत मानधनवाढीचा प्रस्ताव मागे घेण्यात आला. (देशातील अधिकांश जनता अर्धपोटी जगत असतांना वेतनवाढीची मागणी करणे ही स्वार्थांधतेची परिसीमा ! - संपादक)

कादंबरीची नक्कल केल्याप्रकरणी सैराट चित्रपटाच्या निर्मात्यांना पनवेल न्यायालयाकडून चौकशीचे आदेश

     मुंबई, ३१ ऑगस्ट - सैराट या चित्रपटाच्या कथेचा शिल्पकार मी असून माझ्या बोभाटा या कादंबरीवरून या चित्रपटाच्या कथानकाची नक्कल केल्याचा दावा लेखक नवनाथ माने यांनी पनवेल न्यायालयात जून २०१६ मध्ये केला होता. त्यानुसार पनवेल न्यायालयाचे न्यायदंडाधिकारी एस्.बी. पाटील यांनी ३० सप्टेंबरपर्यंत चित्रपट निर्मात्यांची चौकशी करून अहवाल देण्याचे आदेश कामोठे पोलिसांना दिले आहेत. माने यांनी केलेल्या दाव्यात फसवणूक आणि नक्कल कायद्याचे (कॉपीराईट) उल्लंघन केल्याने चित्रपटनिर्माते आणि इतर ७ जण यांच्याविरोधात गुन्हा प्रविष्ट करण्याची मागणी केली होती. नवनाथ माने यांना या कादंबरीवर चित्रपट काढायचा होता. त्यांनी सैराटशी संबंधित काही लोकांशी भेट घेतल्याचा दावाही न्यायालयात केला होता.

रिक्शाचालकांच्या आंदोलनाला पुण्यात हिंसक वळण, ३ टॅक्सींची तोडफोड

राष्ट्रहित साधणारे रिक्शाचालक मिळण्यासाठी
हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) आवश्यक !
    पुणे, ३१ ऑगस्ट - खाजगी, अनधिकृत टॅक्सी आणि ओला-उबेर टॅक्सी सेवेच्या विरोधात पुणे-मुंबईतील रिक्शाचालकांच्या काही संघटनांनी ३१ ऑगस्ट या दिवशी संप पुकारला होता. मुंबईत १ लक्षांहून अधिक रिक्शाचालक यात सहभागी झाले होते. (देशाची आर्थिक स्थिती कमकुवत असतांना असा संप पुकारणे, हे कितपत योग्य ? - संपादक) त्यामुळे या संपात सहभागी झालेल्या रिक्शाचालकांनी त्यांची सेवा बंद ठेवली होती. या आंदोलनाला पुण्यात हिंसक वळण लागले असून येथील संगमवाडी येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयासमोर आलेल्या ओला-उबेर या आस्थापनांच्या ३ टॅक्सींवर आंदोलकांपैकी काहींनी आक्रमण करत गाड्यांच्या काचा फोडल्या. (यावरून कायदा सुव्यवस्थेचा धाक राहिलेला नाही, असे म्हणावे लागेल. - संपादक) या वेळी पोलिसांनी लगेचच हस्तक्षेप करत आंदोलकांना रोखले. या घटनेच्या पार्श्‍वभूमीवर प्रादेशिक परिवहन कार्यालय परिसरातील पोलीस सुरक्षा वाढवण्यात आली आहे. या प्रकरणी पोलीस तपास करत असून गुन्हा प्रविष्ट करण्यात येणार आहे.

दैनिक सनातन प्रभातचा रंगीत श्री गणेशोत्सव विशेषांक

प्रसिद्धी दिनांक : ४ सप्टेंबर २०१६
पृष्ठ संख्या : १०, मूल्य : ५ रुपये
विशेषांकाची वाढीव मागणी वितरकांनी
३ सप्टेंबरला दुपारी ३ पर्यंत इआर्पी प्रणालीत भरावी.

गणेशोत्सवात होणारे धर्मशास्त्रविरोधी उपक्रम थांबवण्यासाठी पुणे महानगरपालिका आयुक्तांना निवेदन

निवासी उपजिल्हाधिकारी श्री. राजेंद्र मुठे (उजवीकडे)
 यांना निवेदन देतांना हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते
     पुणे, ३१ ऑगस्ट (वार्ता.) - गणेशमूर्तींचे अशास्त्रीय पद्धतीने कृत्रिम हौदांमध्ये अथवा घरीच बादलीमध्ये अमोनियम बायकार्बोनेटच्या साहाय्याने विसर्जन करण्याविषयी महानगरपालिका, तसेच कथित पर्यावरणवादी यांच्याकडून प्रचार करण्यात येत आहे. वास्तविक या दोन्ही पद्धती, तसेच मूर्तीदानासारखे उपक्रम धर्मशास्त्रसंमत नाहीत. या पार्श्‍वभूमीवर गणेशोत्सव धर्मशास्त्राला अनुसरून साजरा केला जावा आणि उत्सवात शिरलेले अपपक्रार, तसेच धर्मशास्त्रविरोधी उपक्रम थांबवण्यात यावेत, या मागणीचे निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने महानगरपालिका आयुक्त कुणाल कुमार यांना देण्यात आले. 

यवतमाळ येथे उपजिल्हाधिकार्‍यांना निवेदन !


     यवतमाळ, ३१ ऑगस्ट - येथील हिंदु जनजागृती समितीने उपजिल्हाधिकारी श्री. राजेश खवले यांना पंतप्रधानांनी गोरक्षकांचा अवमान करणारे विधान मागे घ्यावे आणि काश्मीरमधील दगडफेक्यांवर कठोर कारवाई करून सुरक्षा रक्षकांचे मनोबल वाढवण्याविषयी शासनाने कृती करावी, या संदर्भातील निवेदन उपजिल्हाधिकार्‍यांना दिले. तेव्हा उपजिल्हाधिकार्‍यांनी त्यांच्या भावना पुढे कळवू, असे आश्‍वासन दिले. या वेळी समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

फलक प्रसिद्धीकरता

कम्युनिस्टांचा भारतीय संस्कृती आणि हिंदुद्वेष जाणा !
    आमच्या घटनेला कोणताही धर्म नाही. त्यामुळे सरकारी कार्यालये किंवा शाळा यांमधील कार्यक्रमांत पारंपरिक दिवे प्रज्वलित करण्याची, तसेच धार्मिक स्त्रोतांचे गायन करण्याची आवश्यकता नाही, असे केरळचे सार्वजनिक बांधकाम मंत्री जी. सुधाकरन् यांनी म्हटले आहे.

हिंदू तेजा जाग रे !

Jago !
    Sarakari karyalyome paramparagat diye jalane ki avashyakta nahi.
- G. Sudhakaran, mantri, Kerala - kya Bhartiya paramparase
66 varshaka samvidhan bada hai ?
जागो !
     सरकारी कार्यालयों में परंपरागत दीए जलाने की आवश्यकता नहीं ।
- जी. सुधाकरन्, मंत्री, केरल - क्या भारतीय परंपरा से ६६ वर्ष का संविधान बडा है ?

गणेशमूर्ती दान करण्यास सांगणार्‍या तथाकथित सुधारकांना घनकचरा, सांडपाणी, उद्योग, ई-कचरा यांमुळे होणार्‍या प्रदूषणाविषयी खडसवा !

अधिवक्ता वीरेंद्र
इचलकरंजीकर
       गणेशोत्सव जवळ आला आहे. आता नेहमीप्रमाणे स्वत:ला पर्यावरणप्रेमी म्हणवणारे स्वयंघोषित सुधारक आणि त्यांच्या संघटनांचे कार्यकर्ते सक्रीय होतील. गणेशोत्सवात गणेशमूर्ती विसर्जित केल्यामुळे जलप्रदूषण होते, अशी टूम या लोकांनी काही वर्षांपूर्वी काढली होती. धर्मशिक्षणाचा अभाव आणि कथित पुढारलेपण यांमुळे अनेक जण त्यांच्या नादालाही लागले; पण आता या स्वयंघोषित समाजसुधारक आणि समाजसेवक यांचे पितळ उघडे पडत आहे. गणपतीच्या मूर्तीला लावण्यात येणार्‍या रंगांमुळे जलप्रदूषण होते. त्यामुळे अशा मूर्ती तलाव, नद्या, खाड्या, समुद्र यांत विसर्जित न करता, कृत्रिम तलावांत विसर्जित करण्याची किंवा त्या स्वयंघोषित संघटनांना दान देण्याची फॅशन चालू झाली. असे असतांना धर्मद्रोही प्रदूषणाचे खापर आज केवळ गणेशमूर्ती विसर्जनावर का फोडत आहेत ? आणि प्रत्यक्षात होणार्‍या अतीभयानक प्रदूषणाविषयी गांधीजींच्या तीन माकडांसारखे ते का गप्प बसले आहेत ? असे प्रश्‍न आपण त्यांना विचारायला नकोत का ?

आंदोलन कसले ? हा तर केवळ हिंदूंवर आघात !

      स्त्रीस्वातंत्र्यासाठी, स्त्रीहक्कांसाठी, स्त्रीमुक्तीसाठी अशा घोषणा देऊन चळवळी उभारणार्‍यांच्या संख्येत आजकाल वाढ होत आहे. चार दिवसांपूर्वीच मुंबई उच्च न्यायालयाने हाजी अली दर्ग्याच्या संदर्भातील महिलांच्या प्रवेशाच्या संदर्भात दिलेल्या निर्णयानंतर या घोषणा पुन्हा ऐकण्यास मिळाल्या. ५-६ मासांपूर्वीही (महिन्यांपूर्वीही) मंदिर प्रवेशाच्या संदर्भात असाच काहीसा गदारोळ काही पुरोगामी महिला संघटनांनी केला होता. तेव्हाचे आवेशाचे आणि आतातायीपणाचे चित्र अन् हाजी अली दर्ग्याच्या निर्णयानंतरचे सामोपचाराचे चित्र यांमध्ये भेद होता. यावरून वर उल्लेखलेले सर्व शब्द वापरून काही पुरो(अधो)गामी महिला सोयीस्करपणे प्रसिद्धीसाठी हिंदु धर्मावर आघात करत आहेत, हे स्पष्ट झालेे.

सामाजिक संकेतस्थळावर श्रीगणेशाची आरती, तसेच अन्य श्‍लोक यांचे जाणीवपूर्वक विडंबन !

       श्रीगणेशाची आरती, तसेच श्‍लोक यांचे विडंबन करणारे हिंदुद्वेष्टेच होत ! असे विडंबन अन्य पंथियांच्या बाबतीत झाले असते, तर आतापर्यंत सरकार, पोलीस आणि प्रशासन यांच्याकडून त्याची त्वरित दखल घेऊन ते सामाजिक संकेतस्थळावरून काढून टाकण्यात आले असते. तथापि बहुतांश हिंदू निद्रिस्त आणि धर्माभिमानशून्य असल्याने त्यांच्या श्रद्धास्थानांचे होणारे विडंबन आवडीने वाचतात ! यावरून हिंदूंना धर्मशिक्षणाची किती आवश्यकता आहे, हे लक्षात येते !

ध्वज भगवा

उंच उंच फडकवूया हा ध्वज भगवा ।
घेऊन हाती हा हे सारे हिंदू जागवा ॥ धृ. ॥
अनादि अनंत काळापासून फडकतो हा भगवा ।
सांगतो कहाणी आपली नित हा ध्वज भगवा ।
रणी रणांगणी फडकतो सदा हा ध्वज भगवा ।
विजयरथावर डौलाने फडकतो हा भगवा ॥ १ ॥ 

हिंदुत्वाची असे ओळख हा भगवा ।
या हिंदूंचे असे काळीज हा भगवा ।
सार्‍या हिंदूंचा असे सन्मान हा भगवा ।
हिंदूतून रुधीर पेटवतो हा भगवा ॥ २ ॥

हे भारत सरकारला कधीच सुचणार नाही !

    जर्मनीवर जिहादी आतंकवादी आक्रमणाची शक्यता असल्याच्या भीतीने जर्मन सरकारने नागरिकांना घरात कमीत कमी १० दिवस पुरेल इतका खाद्यपदार्थांचा आणि पाण्याचा साठा करायला सांगितले आहे.

अशा प्रसंगी सर्वधर्मसमभाववाले विरोध करत नाहीत, हे लक्षात घ्या ! म्हणजे त्यांना हिंदु धर्माचे महत्त्व मान्य आहे तर !

    आंध्रप्रदेश राज्यातील श्रीकाकुलम् जिल्ह्यात बरेच दिवस पावसाने दडी मारल्याने पाण्याचे संकट निर्माण झाले आहे. त्यामुळे आंध्रप्रदेश शासनाच्या धर्मादाय विभागाने राज्यातील शिव मंदिरांत वरूण-जप, वरुण सुक्त, पारायणे आणि रुद्र यज्ञ करण्याचा निर्णय घेतला आहे.

सहजभावात राहून साधकांना घडवणार्‍या आणि सतत आध्यात्मिक स्तरावर रहाण्यास शिकवणार्‍या सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ !

१. उपाहारगृहातील एक वेटर जिज्ञासेने बराच वेळ जवळ उभा असूनही त्याच्याशी संवाद न साधणे 
आणि या प्रसंगात योग्य काय असायला हवे, हे पू. (सौ.) गाडगीळकाकूंनी सांगणे 
सद्गुरु (सौ.) अंजली
गाडगीळ
     एकदा आम्ही पू. (सौ.) गाडगीळ काकूंसमवेत एका उपाहारगृहात (हॉटेलमध्ये) गेलो होतो. त्या वेळी तेथे एक वेटर पुष्कळ वेळ आमच्याजवळ उभा होता. त्याला पाहून आमच्या मनात तो इतका वेळ का उभा आहे ? किंवा आपण त्याच्याशी काही बोलूया का ?, असा विचार आला नाही.
       पू. (सौ.) गाडगीळ काकूंना मात्र त्याच्याविषयी आतून प्रेम वाटत होते; म्हणून त्यांनी आम्हाला त्याच्याशी संवाद साधण्यास सांगितला. त्याला सनातन संस्था आणि साधना यांविषयी माहिती सांगण्यास सांगितली. त्याप्रमाणे आम्ही त्याच्याशी संवाद साधल्यावर त्याला ही माहिती पुष्कळ आवडली आणि त्याने सर्वांचे छायाचित्र काढून घेतले.

चैतन्यच प्रभावी प्रसारकार्य कसे करते, याचा आदर्श असलेल्या सनातनच्या चैतन्यमयी संत सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ !

१. साड्यांच्या एका प्रसिद्ध दुकानाच्या मालकांनी दिलेला अपूर्व प्रतिसाद !
१ अ. पूर्वनियोजित वेळ ठरवूनही साधकांना न भेटणारे दुकानाचे मालक पू. (सौ.) गाडगीळकाकू दुकानात खरेदीस गेल्यावर सहजपणे भेटणे : १८.६.२०१६ या दिवशी नाडीपट्टी वाचनापूर्वी आम्हाला थोडा वेळ होता. तेव्हा पू. (सौ.) गाडगीळकाकूंनी आम्हाला दक्षिणी शैलीतील साड्या पहाण्यासाठी दुकानात नेले. त्या वेळी त्या म्हणाल्या, तुम्हालाही येथील साड्यांचे प्रकार आणि रंग कसे असतात, ते शिकायला मिळाले. सर्व खरेदी झाल्यानंतर आम्ही निघत होतो, इतक्यात त्या दुकानाचे मालक तिथे आले. या दुकानाचे मालक पू. (सौ.) काकूंना भेटणे, ही एक अनुभूतीच होती; कारण प्रतिवर्षी त्यांची पूर्वनियोजित भेट ठरवूनही चेन्नई येथील प्रसारातील साधक त्यांना भेटायला गेल्यानंतरही ते भेटत नसत. आज मात्र कुठलेही नियोजन नसतांनाही पू. (सौ.) काकूंना ते सहजच भेटले. त्यामुळे हे देवाचेच नियोजन असल्यासारखे आम्हाला वाटले.

श्रीगुरूंवर नितांत श्रद्धा ठेवून रुग्णाईच्या स्थितीतच कुंभपर्वाच्या ठिकाणी सेवेला गेलेेले श्री. घनःशाम गावडे यांना आलेल्या अनुभूती

श्री. घनःशाम गावडे
१. प्रकृती ठीक नसल्याने उज्जैन येथील कुंभपर्वाला जाता न येणे आणि साधकाने तिकडे येण्यासाठी दिलेल्या प्रोत्साहनामुळे देवच बोलवत आहे, असे वाटून जाता येणे : माझे उज्जैन कुंभपर्वात जाण्याचे पूर्वनियोजन होते; पण पायाला दुखापत झाल्यामुळे, तसेच काविळ झाल्यामुळे आधुनिक वैद्यांनी मला विश्रांती घ्यायला सांगितली होती. कुंभपर्वाच्या ठिकाणाहून श्री. निरंजनदादा (श्री. निरंजन चोडणकर) माझ्या प्रकृतीची विचारपूस करायचे आणि लवकर ये. बसून करण्यासारख्या सेवा तुझ्यासाठी ठेवल्या आहेत, असे मला सांगायचे. तेव्हा मला वाटायचे दादाच्या माध्यमातून देवच मला तिकडे यायला सांगत आहे आणि मला जायलाच हवे. उत्तरदायी साधकानेही जाण्याची अनुमती दिली. त्यामुळे मला पुष्कळ आनंद झाला आणि उज्जैन येथे कुंभपर्वाच्या ठिकाणी जाता आले.

एप्रिल २०१६ या मासात झालेल्या मुंज आणि विवाह सोहळ्यांच्या नियोजनाची सेवा करणार्‍या सौ. अनुश्री साळुंखे यांनी सेवेतून अनुभवलेला आनंद अन् त्यांना शिकायला मिळालेली सूत्रे

सौ. अनुश्री साळुंखे
१. समन्वय साधणे : प्रत्येक सूत्र पूर्ण करतांना चित्रीकरण सेवा, पुरोहित आणि विधी असलेले अशा सर्वांशी समन्वय करावा लागायचा. प्रत्येक वेळी त्या त्या साधकाकडून सेवेतील बारकावे शिकता आले. संबंधित सर्वच साधक आपली सेवा परिपूर्ण व्हावी, यासाठी प्रयत्नशील असल्याने अल्प अडचणी जाणवायच्या.
२. सेवा करायला जमेल का ? असा विचार आल्यावर यजमानांनी आधार देणे आणि देव करवून घेईल, या विचाराने सेवा करता येणे : एका विवाहाच्या वेळी अनुभवी सहसाधिका घरी जाणार होती. तेव्हा ही सेवा करावी कि नको ? मला ही सेवा जमेल का ?, असे विचार मनात आले; पण यजमानांनी (श्री. रोहित साळुखे यांनी) मला आधार दिला आणि ही सेवा देवच तुझ्याकडून करून घेईल, असे सांगितले. तेव्हा मी प्रार्थना केली आणि मी ही सेवा करू शकते, असे व्यवस्थापनाला सांगितले. त्या वेळी देव करवून घेईल, हा एकच विचार मनात होता. त्यानंतर अन्य एका साधिकेचे सहकार्य लाभले आणि सेवा होऊ लागली.

सद्गुरु (सौ.) गाडगीळकाकूंसह दैवी प्रवासात चित्रीकरणाची सेवा करतांना त्यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे

१. दैवी प्रवासाला जातांना प्रत्येक वेळी एका नवीन साधकाला घेऊन जाणे
      साधकांना नवनवीन शिकता यावे, तसेच त्यांना सेवेतून आनंद मिळावा, यासाठी काकू दैवी प्रवासाला जातांना प्रत्येक वेळी एका नवीन साधकाला घेऊन जायला हवे, असे सांगतात आणि तसे करण्यास आता आरंभही केला आहे. त्यामुळे साधकाला आश्रमात सेवा करण्यासह समाजातही सेवा करण्याचा आणि त्यातून शिकण्याचा अनुभव घेता येतो.
२. प्रत्येक साधकाला त्याच्या त्याच्या प्रकृतीनुसार साधनेत पुढे नेणे
       एका आईप्रमाणे त्यांना साधकांची आवड-निवड, गुण-दोष या सर्वांची माहिती असते. व्यक्ती तितक्या प्रकृती, तितके साधनामार्ग या नियमानुसार प्रत्येक साधकाला त्याच्या त्याच्या प्रकृतीनुसार साधनेत पुढे कसे जाता येईल, हे सांगतात, उदा. भाव वाढवणे, कृतीच्या स्तरावर प्रयत्न, मनोलयासाठी प्रयत्न, शरणागती वाढवणे इत्यादी.

साहित्य भिजू नये; म्हणून शेडची डागडुजी करण्यासाठी पत्र्यांची आवश्यकता असतांना देवाने पत्रे कसे उपलब्ध करून दिले, या संदर्भात आलेली अनुभूती

         कुंभपर्वात सनातन-निर्मित ग्रंथांचे आणि सात्त्विक उत्पादनांचे प्रदर्शन लावले होते. यासाठी लागणारे ग्रंथ आणि इतर साहित्य एका शेडमध्ये ठेवण्यात आले होते. अधून-मधून पाऊस पडत असल्यामुळे साहित्य भिजू नये, यासाठी शेडची डागडुजी करायची होती. त्यासाठी आवश्यक असणारे काही साहित्य खरेदी करण्यासाठी मी आणि श्री. सागर म्हात्रे गाडी घेऊन बाजारात निघालो होतो. तेवढ्यात पाऊस आणि वारा यांमुळे सनातन संस्थेच्या प्रदर्शनासमोर लावलेल्या प.पू. प्रेमप्रकाश यांच्या प्रदर्शनस्थळाचे कुंपण (कंपाऊंड) तुटून त्याचे पत्रे विखरून पडले. त्यांच्याकडे माझे लक्ष गेले आणि देवानेच मनात विचार घातला की, ते पत्रे आपल्याला मिळतील का ? पहावे. मी याविषयी पू. स्वातीताईंना (सनातनच्या सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांना) विचारले. त्या म्हणाल्या, माझ्याही मनात हाच विचार आला होता. नंतर आम्ही प.पू. प्रेमप्रकाश यांच्या शिष्याशी पत्र्यांविषयी चर्चा केली. ते म्हणाले, तुम्ही त्यांचा चांगला वापर करणार आहात, तर घेऊन जा. आम्ही ते पत्रे घेतले. त्यामुळे साहित्याचे पावसाच्या पाण्यापासून रक्षण होण्यासाठी चांगली शेड बनवता आली. पत्रे मिळाल्यामुळे ते खरेदी करण्यासाठी लागणारे पैसेही (२५०० रुपये) वाचले. या प्रसंगातून देवाने दिलेल्या विचारावर लगेच कृती केल्यामुळे देव लगेच साहाय्य करतो, हे शिकायला मिळाले.
- श्री. घनःशाम गावडे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२५.६.२०१६)

समितीच्या कार्यकर्त्यांमध्ये ज्येष्ठांच्या संदर्भात आदरभाव नसल्याचे दर्शवणार्‍या गंभीर चुका

        वयाने मोठ्या असलेल्या व्यक्तींशी नम्रतेने वागावे, अशी शिकवण बालपणीच मुलांना दिली जाते. लहान मुलेही तिचे पालन करतात; परंतु कार्यकर्त्यांकडून ज्येष्ठांशी उद्धटपणे बोलणे, त्यांच्या संदर्भात बहिर्मुखतेने मत व्यक्त करणे, चेष्टा करणे, अशा चुका वारंवार होत आहेत.
१. एका ज्येष्ठ साधकाने विचारलेल्या 
प्रश्‍नाचे अत्यंत अयोग्य उत्तर देणे
        एका साधकाने एका कार्यकर्त्याला विचारले, एक साधक कुठे गेले आहेत ? तेव्हा त्या कार्यकर्त्याने ते पाकिस्तानला गेले आहेत, असे अत्यंत अयोग्य उत्तर दिले. प्रश्‍न विचारणारे, तसेच ज्यांच्या संदर्भात चूक झाली, ते दोघेही ज्येष्ठ असूनही असे बोलणे कार्यकर्त्यातील उद्धटपणा दर्शवते.
२. वृद्ध व्यक्तींची चेष्टा करणे
        एका हिंदु धर्मजागृती सभेला दोन वृद्ध व्यक्ती उपस्थित होत्या. या दोन व्यक्ती सभास्थळावरील एका कक्षावर ठेवलेल्या संगणकाजवळ आल्या आणि त्या संगणकाला सी.सी.टी.व्ही. कॅमेरा समजून त्या संदर्भात एकमेकांशी बोलू लागल्या. एका कार्यकर्त्याने हा प्रसंग त्या वृद्धांची चेष्टा करण्याच्या हेतूने इतर साधकांना सांगितला.

सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांची मार्गदर्शनपर वाक्ये

अ. दोन चांगल्या गोष्टींमधील अधिक चांगली गोष्ट कोणती ? हे पाहून निर्णय घ्यावा.
आ. ज्ञान रुक्ष असते. भक्तीची भाषा रडवते (भाव निर्माण करते); म्हणून चांगली असते.
इ. स्वार्थ संपला की, परमार्थ चालू होतो.
ई. आनंद घेणे ही साधना.
उ. तळमळीने प्रार्थना करून पहिल्याच प्रयत्नात ध्येय साध्य करावे. पुनःपुन्हा प्रार्थना आणि प्रयत्न करायला लागू नयेत.
ऊ. यांत्रिकपणा काढून टाकायला पाहिजे, आनंदानेच सर्व होते.

सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांची वैशिष्ट्ये

अ. पू. काकू संतांप्रमाणे न वागता एखाद्या आध्यात्मिक मित्राप्रमाणे वागतात.
आ. त्यांच्या हसण्यातून त्यांचा बालकभाव लक्षात येतो.
इ. त्या सतत वर्तमानकाळात असतात आणि प.पू. डॉक्टरांना काय अपेक्षित आहे, याचे चिंतन करून त्याप्रमाणे कृती करतात.
ई. तीव्र शारीरिक त्रास असूनही या वयातही त्या एका तरुणाप्रमाणे घंटोन्घंटे प्रवास करतात आणि आनंदीही असतात.
उ. त्यांची निर्णयक्षमता अद्वितीय आहे.
ऊ. ज्ञानयोगी आणि भक्तीयोगी (भाव) यांचा अद्वितीय संगम म्हणजे पू. काकू !
साधकांचे पुष्कळ लाड करणे
      पू. काकू आम्हा सर्वांचे पुष्कळ लाड करतात. एखाद्या साधकाला विशिष्ट खाऊ आवडत असल्यास त्याच्यासाठी स्वतः तो आवर्जून घेतात. त्या वेळी त्या म्हणतात, जीवनात भरपूर आनंद घ्या आणि भरपूर साधनाही करा.


महर्षींनी साधकांना दिलेला संदेश !

महर्षींची शिकवण आणि कार्य ! 
साधकांनो, प्रतिदिन अन्न ग्रहण 
करतांना प.पू. गुरुदेवांचे स्मरण करा !
       सध्या साधकांना शारीरिक आणि आध्यात्मिक त्रास होण्याचे प्रमाण वाढले आहे. बर्‍याच साधकांच्या पोटात दुखत आहे. यावर उपाय म्हणून महर्षींनी ३०.८.२०१६ या दिवशी पुढीलप्रमाणे संदेश दिला आहे.
       साधकांसाठी प.पू. गुरुदेवच सर्वकाही आहेत. साधकांनी जेवणापूर्वी एक मिनिटभरतरी प.पू. गुरुदेवांचे स्मरण करून मगच जेवायला हवे. प.पू. गुरुदेवांच्या कृपेने साधकांनी ग्रहण केलेले अन्नच साधकांचे सर्व व्याधींपासून आणि आध्यात्मिक त्रासांपासून रक्षण करणार आहे. या अन्नात वाईट शक्ती त्रासदायक शक्ती घालू शकणार नाहीत. लाकडावर उभे राहून विजेच्या तारेला हात लावला, तर आपल्याला विजेचा धक्का बसत नाही, तसेच हे आहे. 

महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या कार्यशाळेच्या वेळी श्री. गणपति व्ही.पी. यांना आलेल्या अनुभूती

१. आश्रमात प्रवेश करताच भावजागृती होणे आणि देवानेच त्याच्याशी स्वतःला जोडलेले असून आश्रमात आणले असल्याचे जाणवणे : वर्ष २०१५ मध्ये महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या वतीने घेण्यात आलेल्या ५ दिवसीय कार्यशाळेसाठी मी सनातनच्या रामनाथी आश्रमात येण्यासाठी निघालो. त्या वेळी माझ्याकडून अनेक वेळा श्रीकृृष्णाप्रती कृतज्ञता व्यक्त होत होती. संपूर्ण प्रवासातही माझा नामजप चालू होता. आश्रमात प्रवेश करताच माझी भावजागृती झाली. देवानेच माझी गाठ त्याच्याशी बांधली असून (देवानेच मला त्याच्याशी जोडले असून) त्यानेच मला आश्रमात आणले आहे, असे मला जाणवू लागले.
२. कार्यशाळेच्या 
उद्घाटनाच्या वेळी आलेल्या अनुभूती
अ. कार्यशाळेच्या उद्घाटनाच्या वेळी मला पुष्कळ चैतन्य जाणवले.
आ. सौ. श्‍वेताताईच्या (एस्.एस्.आर्.एफ्.च्या साधिका सौ. श्‍वेता क्लार्क यांच्या) मागे सूक्ष्मातून मला श्रीकृष्णाचे अस्तित्व जाणवले.
- श्री. गणपति व्ही.पी., भाग्यनगर, आंध्रप्रदेश. (२३.५.२०१५)

श्रीश्रीजयंत अवतारकार्याचा, झाला आता आरंभ ।

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले 
यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त... 
श्रीश्रीजयंत अवतारकार्याचा झाला आता आरंभ ।
दैवी कार्याचा देवा करशील तू आरंभ ॥ १ ॥
युगानुयुगे तुलाच करावा लागतो धर्म-अधर्माचा लढा ।
अनिष्ट कार्याच्या विरोधात आता देवच देतील लढा ॥ २ ॥
शिवरात्रीपासून कार्याचा या, आरंभ झाला खरा ।
पहा देवा, पहा, सहस्रो पुष्पे वाहून पूजा करते धरा ॥ ३ ॥
तुझे स्वागत करण्या, फळा-फुलांनी बहरलले तरु ।
प्रसाद रक्षा आधीच पाठवलीस, कार्य झाले चालू ॥ ४ ॥
भारतभूमीत चार गोष्टीच आहेत श्रेष्ठ ।
देवदर्शन, गुरुचरण, तीर्थ आणि प्रसाद यांपेक्षा न काही वरिष्ठ ॥ ५ ॥

साधकांना सूचना

     पौर्णिमा आणि अमावास्या या तिथींना प्रार्थना, नामजप, तसेच साधना अधिकाधिक करा.
प्रारंभ - श्रावण कृष्ण पक्ष चतुर्दशी (३१.८.२०१६) दुपारी २.०४ वाजता
समाप्ती - श्रावण अमावास्या (१.९.२०१६) दुपारी २.३३ वाजता
आज अमावास्या आहे.
        राष्ट्ररूपी मठ निर्माण व्हावा, हा आमचा संकल्प आहे. प्रत्येक घरच जर मठ झाला, तर प्रत्येक व्यक्ती सद्गुणी वृत्तीने कार्य करून आध्यात्मिक आणि सामाजिक विकास करील. 
(धर्मादित्य टाइम्स, ऑगस्ट २०१०)
       पापापासून बुद्धी आणि विवेक फार फार दूर आहेत. दोघांचे आग-पाण्यासारखे नाते आहे. पापाला सहानुभूती हा कर्करोग आधुनिक समाजाला झाला आहे !
- गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥ 
या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो. - प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले
       शिक्षक, प्राध्यापक, अभियंता, वैद्य इत्यादी केवळ व्यवसाय करतात, तर मनापासून पौरोहित्य केल्यास व्यष्टी आणि समष्टी साधना होते.
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले

बोधचित्र

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

खरे दान 
खरे दान सत्पात्री असावे आणि त्याची वाच्यता दुसर्‍याजवळ होऊ नये. त्याची आठवणही क्षणार्धात विसरण्याचा प्रयत्न करावा. 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज
सनातनचे श्रद्धास्थान
वाटाड्या
     देव वाटाड्या आहे. मार्गात ठेच लागते; कारण मार्गात खाचखळगे असतात. आपण वाटाड्यावर संतापतो, तरी तो सांगतो, पुढे मार्ग चांगला आहे.
भावार्थ : येथे वाटाड्या म्हणजे मोक्षाचा मार्ग दाखविणारे गुरु. ठेच लागते म्हणजे त्रास होतो, आध्यात्मिक प्रगती खुंटते. मार्गात खाचखळगे असतात म्हणजे साधनेत अडचणी असतात. पुढे मार्ग चांगला आहे म्हणजे आध्यात्मिक प्रगती चांगली होणार आहे.
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.)

पाकचा नाझीवाद !

संपादकीय
        पाककडून होणार्‍या नरसंहाराचा धक्कादायक खुलासा झाला आहे. बलुचिस्तानमध्ये पाकचे सैनिक प्रतिदिन १०० लोकांना ठार करत असल्याची माहिती तेथील सामाजिक कार्यकर्त्या नायला कादरी यांनी दिली. हिटलरच्या नरसंहारालाही लाजवेल, असे कृत्य पाक राजरोसपणे करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकव्याप्त काश्मीरला भारताचा भाग म्हटल्यावर कालपर्यंत पाकच्या अत्याचारांना कंटाळलेल्या येथील नागरिकांना पंतप्रधानांच्या पाठिंब्याने धीर आला आणि बलुचिस्तानातील नागरिकांना थोडे अवसान मिळाले. त्याआधारे तेथील नागरिकांनी पाकच्या विरोधात संघर्ष आरंभिला असून भारतात येण्याची इच्छा व्यक्त केली. याच कारणामुळे पाकच्या सैनिकांनी प्रतिदिन येथे नरसंहार आरंभिला आहे. १५ ऑगस्ट या दिवशी लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करतांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काश्मीरच्या विषयाचा विशेष उल्लेख न करता बलुचिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरचा उल्लेख केला.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn