Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

आज स्वातंत्र्यदिन (तिथीनुसार)

भारतियांनो, स्वातंत्र्यदिन तिथीनुसार साजरा करा ! 
        देश स्वतंत्र झाला तो दिवस होता श्रावण कृष्ण चतुर्दशी या तिथीचा ! इंग्रजाळलेल्या मानसिकतेमुळे हा दिवस ख्रिस्ती कालगणनेनुसार १५ ऑगस्ट असल्याचे म्हटले जाते.
       भारतियांनो, ही मानसिकता सोडा आणि भारताचा स्वातंत्र्यदिन १५ ऑगस्ट या दिवशी नव्हे, तर तिथीप्रमाणे श्रावण कृष्ण चतुर्दशीला साजरा करा !

कोटी कोटी प्रणाम !

प.पू. श्री रामकृष्ण क्षीरसागर महाराज पुण्यतिथी, नगर 

विनम्र अभिवादन !

पुण्यश्‍लोक अहिल्याबाई होळकर यांची आज पुण्यतिथी

(म्हणे) रा.स्व. संघाकडून मंदिरांचा शस्त्रसाठ्यासाठी उपयोग ! - केरळमधील कम्युनिस्ट पक्षाच्या सरकारच्या मंत्र्याचा आरोप

  • मदरसे, मशिदी येथून आतंकवादी निर्माण होतात, त्यांचा वापर शस्त्रसाठ्यासाठी आणि आतंकवादी प्रशिक्षण यांसाठी केला जातो, हे काही घटनांतून समोर येऊनही कम्युनिस्ट पक्षाने कधीही यावर तोंड उघडले नाही, हे लक्षात घ्या !
  • केरळमध्ये कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आतापर्यंत किती स्वयंसेवकांच्या हत्या केल्या तेही मंत्र्यांनी जाहीर करावे !
  • केरळमधून किती मुसलमान तरुण इसिसमध्ये सहभागी झाले आणि जिहादी संघटना पॉॅप्युलर फ्रंट ऑफ इंडियाने किती कारवाया केल्या हेही सांगावे !
  • केरळमध्ये धर्मांध मुसलमान युवकांनी ६ सहस्र हिंदू आणि ख्रिस्ती तरुणींना लव्ह जिहादमध्ये फसवले हे सुरेंद्रम् का सांगत नाहीत ?
       थिरुवनंतपुरम् - रा.स्व. संघाकडून मंदिरांचा वापर शस्त्रसाठ्यासाठी करण्यात येतो, असा आरोप केरळचे मंत्री कडकांपल्ले सुरेंद्रम् यांनी केला आहे.
       सुरेंद्रम् यांनी मल्याळम् भाषेत लिहिलेल्या फेसबुक पोस्टद्वारे हा आरोप केला आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, देवस्वम् मंडळाच्या मंदिरांमध्ये संघासह अन्य काही संघटनांकडून अवैध कृत्ये होत असल्याच्या तक्रारी माझ्याकडे आल्या आहेत. तसेच संघाकडून भाविकांना या मंदिरापासून दूर ठेवण्यात येते. मंदिरांचा शस्त्रांची कोठारे म्हणून उपयोग करण्यात येतो आणि तेथे शस्त्रप्रशिक्षण दिले जात आहे. समाजघातक कारवायांसाठी प्रार्थनास्थळांचा वापर करण्यास सरकारचा पाठिंबा असणार नाही. या प्रकरणी सरकार हस्तक्षेप करील. (सरकारकडे जर तक्रारी आल्या आहेत, तर ती गोष्ट गंभीर असतांना मंत्र्यांनी फेसबूक पोस्ट करण्यात वेळ घालण्याऐवजी त्यावर अद्याप कारवाई का केली नाही, हे सांगायला हवे ! हा केवळ राजकीय लाभ उठवण्यासाठी केलेला आरोप आहे, हेच यातून लक्षात येते ! - संपादक)

बलुचिस्तानमध्ये पाक सैन्याकडून रासायनिक शस्त्रांचा वापर !

प्रतिदिन अनेकांची होत आहे हत्या !
       नवी देहली - १५ ऑगस्टला पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या भाषणात बलुचिस्तानचे सूत्र उपस्थित केल्यानंतर बलुचिस्तानमध्ये पाक सैन्याकडून रासायनिक शस्त्रांचा वापर केला जात आहे. याद्वारे प्रतिदिन १०० लोकांना ठार केले जात आहे. एखाद्या प्राण्यालाही कधी असे मारले जात नाही, इतक्या क्रूरतेन लोकांना मारले जात आहे, असा आरोप बलुचिस्तानच्या सामाजिक कार्यकर्त्या नायला कादरी यांनी पाकच्या विरोधात केला आहे.
१. नायला कादरी पुढे म्हणाल्या की, मकरान येथील टेकड्यांवर रासायनिक शस्त्रे सापडली आहेत. तेथे बलुची लोकांचे मृतदेह सापडले आहेत. रासायनिक शस्त्रांनी ठार केल्याने त्यांची ओळखही पटू शकत नाही.
       पाकचे सैन्य लहान मुलांना ठार करून त्यांचे अवयव काढून विकत आहे. यापूर्वी येथे पाकने चीनच्या साहाय्याने अणूचाचणी केल्यामुळे गेली ६ वर्षे येथे पाऊस पडलेला नाही. पाणीही विषारी झाले आहे. अत्याचारांचे चित्रण आणि छायाचित्रेही आहेत. सध्या येथे प्रसारमाध्यमांवर बंदी असल्याने काही संकेतस्थळांवर छायाचित्रे ठेवण्यात आली आहेत.

दोन्ही देश एकमेकांच्या सैनिकी तळांचा आणि सुविधांचा वापर करू शकणार !

भारत आणि अमेरिका यांच्यात 
संरक्षणविषयक महत्त्वपूर्ण करार !
       वॉशिंग्टन / बीजिंग - अमेरिका आणि भारत यांनी २९ ऑगस्टला संरक्षणाच्या संदर्भातील महत्त्वाचा लॉजिस्टिक्स एक्स्चेंज मेमोरंडम ऑफ अ‍ॅग्रीमेंट (एल्इएम्ओए) करार केला आहे. या करारानुसार दोन्ही देश एकमेकांच्या सैनिकी तळांचा आणि सुविधांचा वापर करू शकणार आहेत. यात तिन्ही दलांचा म्हणजे नौदल, पायदळ आणि वायूदल यांचा समावेश आहे. यात इंधन भरण्याच्या सुविधेचाही लाभ मिळणार आहे. करार नसतांनाही इराक युद्धाच्या वेळी अमेरिकेच्या युद्ध विमानांना मुंबईच्या विमानतळावरून इंधन भरण्याची अनुमती देण्यात आली होती. अमेरिकेत झालेल्या या कराराच्या वेळी संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर आणि अमेरिकेचे संरक्षणमंत्री एश्टन कार्टर उपस्थित होते. या करारामुळे दोन्ही देशांचे व्यावहारिक संबंध अधिक दृढ होतील, असे या दोघांनी म्हटले.
       वर्षे १९६२ च्या चीनबरोबरील युद्धाच्या वेळी स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी अमेरिकेचे साहाय्य घेण्याची युद्धनीती मांडली होती. तीच आता चीनच्या कुरातपखोरीला आणि महत्त्वाकांक्षेला लगाम घालण्यासाठी भारताला आचरणात आणावी लागत आहे, यावरून सावरकरांच्या दूरदृष्टीचे आणखी एक उदाहरण लक्षात येते !

हिंदु संघटनांची प्रतिमा मलीन करण्याचा पुरो(अधो)गाम्यांचा डाव ! - प्रमोद मुतालिक

धारवाड (कर्नाटक) येथे सनातन 
संस्थेच्या समर्थनार्थ हिंदुत्वनिष्ठांचा मोर्चा 
       धारवाड - अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे डॉ. नरेंद्र दाभोलकर तसेच कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या सनातनच्या साधकांची सुटका करण्यात यावी आणि सनातन संस्थेच्या विरोधात होणारा अपप्रचार थांबवावा, यासाठी श्रीराम सेनेचे संस्थापक अध्यक्ष श्री. प्रमोद मुतालिक यांच्या नेतृत्वाखाली ३० ऑगस्ट या दिवशी येथे हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी मोर्चा काढून जिल्हाधिकार्‍यांना निवेदन दिले. या मोर्च्याात श्रीराम सेना, सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती आदी हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. या वेळी श्री. प्रमोद मुतालिक म्हणाले, सनातन संस्थेवर खोटे आरोप करण्यात येत असून हिंदु संघटनांची प्रतिमा मलीन करण्याचा पुरो(अधो)गाम्यांचा हा डाव आहे.

इसिसला वाटते अमेरिकेतील निवडणुकीत ट्रम्प विजयी व्हावेत !

       वॉशिंग्टन - इसिसचे, तसेच धर्मांधांचे कट्टरविरोधक असलेले अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प हे अमेरकेतील निवडणुकीत विजयी व्हावेत, अशी इसिसची इच्छा आहे. इसिसच्या म्हणण्यानुसार ट्रम्प यांनी ही निवडणूक जिंकल्यास अमेरिकेत इसिसचा आणखी विस्तार होणार असून त्यांना आतंकवादी मिळणे अधिक सोपे होणार आहे. ट्रम्प निवडून आल्यास तेच त्यांच्या विनाशास कारणीभूत ठरतील, असेही इसिसने म्हटले आहे. काही दिवसांपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांनी इसिसला नरकात पाठवण्याचे सूतोवाच केले होते. (कुठे इसिसला नष्ट करण्याची भाषा करणारे अमेरिकी राजकारणी, तर कुठे इसिसचे समुपदेशन करणारे भारतीय राजकारणी ! - संपादक) त्यास इसिसने प्रत्युत्तर दिले. एवढेच नव्हे, तर इसिसचा प्रवक्ता नसीर म्हणाला, ट्रम्प निवडून यावेत, यासाठी मी अल्लाहकडे प्रार्थना केली असून त्यांना निवडून देणे, ही जिहाद्यांचे प्राधान्य असले पाहिजे; कारण त्यामुळे इसिसचाच लाभ होणार आहे.

हिंदु राष्ट्र स्थापन होईपर्यंत स्वस्थ बसणार नाही !

  • सोलापूरमध्ये प्रांतीय हिंदू अधिवेशनात सहभागी १०० हून अधिक धर्माभिमान्यांचा संकल्प !
  • वेळ पडल्यास सनातनच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरण्यास धर्मबांधव सिद्ध !
  • धर्मप्रेमाची साक्ष देणार्‍या धर्माभिमान्यांच्या घोषणांनी सभागृह दणाणले !
डावीकडून अधिवक्ता संदीप अपसिंगेकर, श्री. मनोज खाडये, पू. महंत मावजीनाथ
महाराज, भागवताचार्य वा.ना. उत्पात, सद्गुरु (कु.) स्वाती खाडये आणि श्री. सुनील घनवट
      सोलापूर, ३० ऑगस्ट (वार्ता.) - हिंदु राष्ट्राच्या स्थापनेपर्यंत धर्मरक्षणाचे कार्य करत राहू, असा संकल्प २८ ऑगस्ट या दिवशी येथे झालेल्या एकदिवसीय प्रांतीय हिंदूअधिवेशनात सहभागी धर्माभिमानी हिंदूंनी केला. या अधिवेशनात सोलापूर, धाराशिव, बीड, लातूर, सातारा, नांदेड या जिल्ह्यांतून १०० हून अधिक धर्माभिमानी सहभागी झाले होते. या अधिवेशनात धर्मप्रेमाची साक्ष देणार्‍या धर्माभिमान्यांच्या घोषणांनी सभागृह दणाणले.

मशिदीतून भोंग्याद्वारे ध्वनीप्रदूषण होत असल्यास कायद्यानुसार कारवाई करीन !

साहाय्यक पोलीस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांचे आश्‍वासन 
     उंचगाव, (जिल्हा कोल्हापूर), ३० ऑगस्ट (वार्ता.) - मशिदीतील भोंग्याद्वारे ध्वनीप्रदूषण होत असल्याचे निदर्शनास आणून दिल्यास त्यावर ध्वनीप्रदूषण कायद्याद्वारे कारवाई करीन, असे आश्‍वासन येथील साहाय्यक पोलीस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांनी दिले. (सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर गणेशोत्सवात डॉल्बीची यंत्रणा मोजण्यासाठी पोलीस जी यंत्रणा वापरतात, तशीच यंत्रणा मशिदींवरील भोंग्यांचे प्रदूषण पडताळण्यासाठी उभी केली पाहिजे. पोलिसांना हेही का सांगावे लागते. मुळात पोलिसांना मशिदीवरील भोंग्यावर कारवाई करायचीच नाही ! केवळ हिंदूंच्या सणांमध्ये कुरघोडी करून हिंदूंवर कारवाई करायची, असेच हिंदुद्वेषी वर्तन आतापर्यंत दिसून आले आहे. - संपादक) येथील मंगेश्‍वर मंदिरात तरुण मंडळांच्या बैठकीत काढले. २६ ऑगस्ट या दिवशी ग्रामपंचायत उंचगाव आणि गांधीनगर पोलीस ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने ही आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला २०० हून अधिक कार्यकर्ते, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष सर्वश्री दिनकर पोवार, माजी सरपंच अनिल शिंदे, धर्माभिमानी मधुकर चव्हाण, महालिंग लिंगम, सचिन चौगले, सचिन वाठोड, नामदेव वाईंगडे, दत्ता यादव, दत्तू यादवमामा, बाजीराव मनाडे आदी धर्माभिमानी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

देहलीचे उपराज्यपाल नजीब जंग मुख्यमंत्री केजरीवाल यांच्याप्रमाणेच ४२० ! - डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांचा आरोप

        नवी देहली - माझ्या मते देहलीचे उपराज्यपाल नजीब जंग देहलीचा कारभार करण्यासाठी सक्षम नाहीत. ते मुख्यमंत्री केजरीवाल यांच्याप्रमाणेच ४२० आहेत, असा आरोप भाजपचे खासदार डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांनी ट्विट करून केला आहे. त्या जागेवर रा.स्व. संघाचा एखादा माणूस असला पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली आहे. जून महिन्यात डॉ. स्वामी यांनी देहलीतील कारभारावरून राष्ट्रपती यांना पत्र लिहिले होते. त्या वेळी डॉ. स्वामी म्हणाले होते की, नजीब जंग हे काँग्रेसचे नेते अहमद पटेल यांच्या जवळचे आहेत. अहमद पटेल यांना विचारूच जंग काम करत आहेत. ते काँग्रेसच्या काळापासून उपराज्यपाल आहेत. भाजपची सत्ता आल्यानंतर बहुतेक राज्यांचे राज्यपाल पालटले गेले; मात्र जंग अद्याप त्याच जागेवर आहेत.

पंजाबमध्ये अशांती निर्माण करण्यासाठी आम आदमी पक्षाला परदेशातून पैसा ! - पंजाबचे उपमुख्यमंत्री सुखबीर बादल यांचा आरोप

       चंडीगड - पंजाबमध्ये अशांती निर्माण करण्यासाठी आम आदमी पक्षाला उत्तर अमेरिका, युरोप आणि ऑस्ट्रेलिया येथील धर्मांधांकडून पैसे मिळत आहेत, याची चौकशी करण्यात यावी, असे पत्र पंजाबचे उपमुख्यमंत्री सुखबीर बादल यांनी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांना लिहिले आहे. या चौकशीतूनच आम आदमी पक्ष राज्यात धर्मग्रंथांचा अवमान आणि त्याद्वारे हिंसाचार करण्याचा प्रयत्न करत असल्याचे उघड होईल. संघाचे नेते जगदीश गगनेजा यांच्यावरील आक्रमणही याच षड्यंत्राचा भाग आहे, असेही बादल यांनी म्हटले आहे.
       आपचे आमदार जरनैल सिंह लंडन येथे धर्मांधांच्या संमेलनाला संबोधित केले आहे. ही घटना देशाच्या सुरक्षेशी संबंधित असल्याने यावर त्वरित कारवाई केली पाहिजे, असेही बादल यांनी म्हटले आहे.

मुंबईत महसूल गुप्तचर संचलनालयाकडून २ सहस्र कोटी रुपयांचा बँकिंग हवाला घोटाळा उघड

आतापर्यंत अनेकदा हवाला घोटाळा उघड 
झालेला असतांना त्याची पाळेमुळे आतापर्यंत उद्ध्वस्त 
होणे आवश्यक होते. हवालामार्गे होणारे घोटाळे थांबवणे आणि त्याची 
पाळेमुळे खोदून काढणे,  यासाठी अर्थ आणि गृह विभाग केव्हा उपाययोजना करणार? 
  • दक्षिण मुंबईतील ६ राष्ट्रीयीकृत अधिकोषांच्या शाखांच्या सहभागाचा संशय 

     मुंबई, ३० ऑगस्ट - विविध वस्तू आयात करून त्याद्वारे चालू असलेला २ सहस्र कोटी रुपयांचा 'बँकिंग हवाला घोटाळा' महसूल गुप्तचर संचलनालयाने (डीआर्आय) केलेल्या चौकशीतून उघड केला आहे. या घोटाळ्यात दक्षिण मुंबईतील ६ राष्ट्रीयीकृत अधिकोषांच्या शाखांचा सहभाग असल्याचा संशय संचलनालयाने व्यक्त केला आहे. (या प्रकरणी भारतीय रिझर्व्ह बँक स्वतः पुढाकार घेऊन संबंधित अधिकोषांची चौकशी करेल का ? अशा प्रकारचा हवाला घोटाळा होत असल्याचे कोणाच्याच कसे लक्षात आले नाही ? यावरून देशातील आर्थिक कारभार किती भोंगळपणे चालू आहे, हेच दिसून येते. - संपादक) तसेच चौकशीत पुढे आलेली माहिती केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग आणि अंमलबजावणी संचलनालय यांना कळवली जाईल, असेही महसूल गुप्तचर संचलनालयाने सांगितले. 

म्हणे 'सनातनी धर्मांधांनी बुद्धीचे भरीत भाजणे बंद करावे !'

सनातनद्वेषी एन्.डी. पाटील यांचे विधान ! 
     सातारा, ३० ऑगस्ट (वार्ता.) - खर्‍याला खरे आणि खोट्याला खोटे म्हणण्याचे धारिष्ट्य असावे लागते. ते सनातन्यांच्यात नाही. त्यामुळे सनातनी धर्मांधांनी बुद्धीचे भरीत भाजणे बंद करावे, असा फुकटचा सल्ला प्रा. डॉ. एन्.डी. पाटील यांनी दिला आहे. 

केरळमध्ये दाईश या जिहादी संघटनेकडून आतंकवादाचे प्रशिक्षण !

केरळचे मंत्री सुरेंद्रम् 
याविषयी का बोलत नाहीत ?
       थिरुवनंतपुरम् - दाईश या जिहादी आतंकवादी संघटनेने केरळमध्ये आतंकवाद्यांच्या निर्मितीसाठी प्रशिक्षण दिल्याची माहिती समोर आली आहे. या संघटनेच्या माध्यमातून प्रशिक्षण देणारी २९ वर्षीय यास्मीन अहमद हिला अटक केल्यानंतरही माहिती समोर आली आहे. यास्मीन ही काबूल येथे जाण्याच्या प्रयत्नात असतांना तिला देहली विमानतळावर अटक करण्यात आली. दाईश संघटनेचा प्रभाव इराक आणि सिरीया यांसारख्या देशांमध्ये आहे. वर्ष २०१४ पासून आतापर्यंत ४० लोकांना दाईशशी संबंधित असण्याच्या संशयावरून देशाच्या विविध भागांमध्ये अटक करण्यात आली होती. याबरोबर ८ जिहादी गटांनाही पकडण्यात आले होते.
       आतापर्यंत ४० युवक दाईश संघटनेत भरती करण्याचे काम करणार्‍या अब्दुल राशीद या आतंकवाद्याच्या प्रभावाखाली आल्याची माहितीही समोर आली आहे. यास्मीन अहमद ही मूळची बिहारची आहे. ३ वर्षांपूर्वी ती केरळमधील मल्लापूर शाळेत शिक्षिका म्हणून रुजू झाली होती. तेथेच तिची ओळख दाईशशी संबंधित अब्दुल राशीद याच्याशी झाली होती. मुंबईचा पदवीधर असलेला अशफाक अब्दुल याला दाईशमध्ये प्रवेश करण्यासाठी राशीद यानेच प्रभावित केलेे. अशफाकने २ जूनला भारत सोडला आहे.

(म्हणे) सरकारी कार्यक्रमात पारंपरिक दिवे प्रज्वलित करू नयेत ! - जी. सुधाकरन्

केरळमधील कम्युनिस्ट 
पक्षाच्या सरकारच्या मंत्र्याचा हिंदुद्वेष !
       थिरूवनंतपुरम् - आमच्या घटनेला कोणताही धर्म किंवा जात नाही. त्यामुळे सरकारी कार्यालये किंवा शाळा यांमधील कार्यक्रमांत पारंपरिक दिवे प्रज्वलित करण्याची आवश्यकता नाही. धार्मिक स्त्रोतांचे गायन करण्याऐवजी सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये देशभक्तीची गीते म्हटली जाऊ शकतात, असे मत केरळचे सार्वजनिक बांधकाम मंत्री जी. सुधाकरन् यांनी व्यक्त केले आहे. ते एका कार्यक्रमात बोलत होते. (भारतीय राज्यघटनेला केवळ ६६ वर्षे झाली आहेत, तर भारतीय संस्कृती अनादी अनंत काळापासून आहे. त्यामुळे अशा हास्यास्पद विचारांना कोणताही हिंदु भीक घालणार नाही; मात्र यातून कम्युनिस्टांचा भारतीय संस्कृतीप्रतीचा आणि हिंदूंप्रतीचा द्वेष दिसून येतो ! - संपादक)

संत सेवा संघाच्या वतीने आेंकारेश्‍वर मंदिर येथे आध्यात्मिक चित्रप्रदर्शन

     पुणे, ३० ऑगस्ट (वार्ता.) - संत सेवा संघाच्या वतीने आेंकारेश्‍वर मंदिर येथे श्रावणी सोमवारनिमित्त २९ ऑगस्ट या दिवशी साधनेविषयी मार्गदर्शन करणारे चित्रप्रदर्शन लावण्यात आले होते. सुंदररित्या रेखाटलेल्या या चित्रांच्या माध्यमातून मानवी जीवनात असलेले गुरूंचे महत्त्व, साधना करण्याचे महत्त्व, तसेच मन निर्मळ होण्याचे महत्त्व यांविषयी सांगण्यात आले होते. अनेक भाविकांनी या चित्रप्रदर्शनाचा लाभ घेतला.

मूर्तीदान नको, तर धर्मशास्त्रानुसार गणेशमूर्तींचे वहात्या पाण्यातच विसर्जन करा !

पंढरपूर येथे हिंदु जनजागृती समितीचे पत्रकार परिषदेत आवाहन ! 
डावीकडून श्री. राजन बुणगे, श्री. मनोज खाडये,
अधिवक्ता श्री. नीलेश सांगोलकर, अधिवक्ता श्री. संदीप अपसिंगेकर
     पंढरपूर, ३० ऑगस्ट (वार्ता.) - नास्तिकवाद्यांच्या भूलथापांना बळी न पडता भाविकांनी धर्मशास्त्रानुसार वहात्या पाण्यातच विसर्जन करावे, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे पश्‍चिम महाराष्ट्र समन्वयक श्री. मनोज खाडये यांनी ३० ऑगस्ट या दिवशी येथील सावरकर वाचनालयात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत केले. या पत्रकार परिषदेला सोलापूर जिल्हा समन्वयक श्री. राजन बुणगे, हिंदु विधीज्ञ परिषदेचे सदस्य अधिवक्ता श्री. नीलेश सांगोलकर आणि अधिवक्ता श्री. संदीप अपसिंगेकर उपस्थित होते. 

समीर गायकवाड यांना सकाळी आणि दुपारच्या वेळेत कारागृहाच्या परिसरात फिरण्यास अनुमती ! - न्यायाधिशांचा निर्णय

कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरण ! 
     कोल्हापूर, ३० ऑगस्ट (वार्ता.) - कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरणात न्यायालयाच्या आदेशानंतरही कोल्हापूर येथील कळंबा कारागृहात बंदीस्त असलेले सनातनचे साधक श्री. समीर गायकवाड यांना परिसरात फिरण्यास प्रतिबंध करण्यात येत आहे, असे अधिवक्ता श्री. समीर पटवर्धन यांनी २७ जुलै या दिवशी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले होते. यावर न्यायालयाने कारागृह प्रशासनास नोटीस बजावली होती. त्या संदर्भात उत्तर देण्यासाठी कारागृह अधीक्षक ३० ऑगस्ट या दिवशी न्यायालयात उपस्थित होते. यावर श्री. समीर गायकवाड यांचे म्हणणे आणि अधिवक्ता श्री. समीर पटवर्धन यांचा युक्तीवाद ऐकून न्यायाधिशांनी सकाळी ६ ते दुपारी १२ आणि दुपारी ४ ते सायंकाळी ६ या वेळेत श्री. समीर गायकवाड यांना कारागृह परिसरात फिरण्यास अनुमती देत असल्याचे सांगितले. जिल्हा न्यायाधीश एल्.डी. बिले यांच्यासमोर ही सुनावणी चालू आहे. पुढील सुनावणी १३ सप्टेंबर या दिवशी होईल, असे न्यायाधिशांनी घोषित केले. 

हिंदुत्वनिष्ठांनी साधना केल्यास त्यांना निश्‍चित यश येईल ! - पू. नंदकुमार जाधव

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने भुसावळ येथे तालुकास्तरीय अधिवेशन ! 
डावीकडून कु. रागेश्री देशपांडे, पू. नंदकुमार जाधव,
दीपप्रज्वलन करतांना ह.भ.प. सुभाष महाराज
पाटील आणि श्री. प्रशांत जुवेकर 
      जळगाव हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यात सहभागी होण्यासाठी हिंदुत्वनिष्ठांनी नियमित साधना करणे आवश्यक आहे. त्यामुळे ईश्‍वराचे आशीर्वाद प्राप्त होऊन त्यांना त्यांच्या कार्यात निश्‍चित यश येईल, असे मार्गदर्शन सनातनचे पू. नंदकुमार जाधव यांनी केले. ते भुसावळ येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय हिंदू अधिवेशनात बोलत होते. या अधिवेशनाचा आरंभ दीपप्रज्वलनाने करण्यात आला. या अधिवेशनात भुसावळ, रावेर आणि यावल या तालुक्यांतील विविध गावांतील धर्माभिमान्यांनी सहभाग घेतला. 
      अधिवेशनाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात पू. नंदकुमार जाधव यांच्यासह निंभोरा, तालुका रावेर येथील ह.भ.प. सुभाष महाराज पाटील, रणरागिणी शाखेच्या कु. रागेश्री देशपांडे आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. प्रशांत जुवेकर यांनी हिंदुत्वनिष्ठांना संबोधित केले.

(म्हणे) 'सनातनच्या पदाधिकार्‍यांची नार्को चाचणी करून त्यांच्यावर देशद्रोहाचे गुन्हे प्रविष्ट करा !'

राष्ट्र आणि धर्म यांविषयी समाजात जागृती होण्यासाठी 
अहोरात्र झटणारे सनातनचे साधक कधीतरी देशद्रोही कृत्ये करतील का ? 
 संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष अधिवक्ता मनोज आखरे यांची सनातनद्वेषी मागणी 
     कोल्हापूर, ३० ऑगस्ट - डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉम्रेड गोविंद पानसरे आणि प्रा. कलबुर्गी यांच्या हत्येतील संशयित हे सनातन संस्थेचे साधक आहेत. तीनही हत्याकांडांमध्ये सनातनच्या पदाधिकार्‍यांचा समावेश आहे. (डॉ. दाभोलकर आणि कॉ. पानसरे यांच्या हत्यांच्या प्रकरणी सनातनच्या साधकांना केवळ संशयित म्हणून अटक केली आहे. या हत्यांमध्ये सनातनच्या साधकांचा हात असल्याचे कोणतेही पुरावे नसतांना धादांत खोटे आरोप करणार्‍यांविषयी सनातन अधिवक्त्यांचा सल्ला घेत आहे ! - संपादक) हत्येतील संशयित आणि सनातन संस्थेच्या सर्व पदाधिकार्‍यांची नार्को चाचणी करून त्यांच्यावर पोलिसांनी देशद्रोहाचे गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष अधिवक्ता मनोज आखरे यांनी २८ ऑगस्ट या दिवशी येथील शासकीय विश्रामगृहात घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली. (निकाल कसा द्यायचा आणि शिक्षा कोणती द्यायची हे ठरवण्यासाठी न्याययंत्रणा सक्षम असतांना अशा प्रकारे वक्तव्य करणे कितपत योग्य आहे ? - संपादक) 

गायीला राष्ट्रीय पशू घोषित करा ! - खासदार साक्षी महाराज

     नवी देहली - गायीला राष्ट्रीय पशू घोषित करून संपूर्ण गोहत्या बंदी केली पाहिजे, अशी मागणी भाजपचे खासदार साक्षी महाराज यांनी केली आहे. तसेच त्यांनी गोमांसाची निर्यात बंद करण्यासाठी पंतप्रधान मोदी यांना पत्र लिहिले आहे. मात्र त्यांनी गोरक्षकांच्या संदर्भात मोदी यांनी मांडलेल्या सूत्राला समर्थन दिले आहे. ते म्हणाले की, जे खरे गोरक्षक आहेत, त्यांनी स्वतः गायीची सेवा केली पाहिजे. ज्या गायी रस्त्यावर बेवारस फिरतात यांना स्वतः पाळले पाहिजे.

पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू यांना एम्स् रुग्णालयात वैद्यकीय पडताळणीसाठी सर्वोच्च न्यायालयाची अनुमती !

       नवी देहली - जोधपूर कारागृहात असणारे पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू यांना देहलीतील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान (एम्स्) रुग्णालयात वैद्यकीय पडताळणीसाठी नेण्याची अनुमती सर्वोच्च न्यायालयाने दिली आहे; मात्र या कारणासाठी त्यांना अंतरिम जामीन फेटाळला आहे. पू. बापूजी यांनी पडताळणीच्या कालावधीत देहलीतील त्यांच्या आश्रमात रहाण्याची मागितलेली अनुमतीही नाकारण्यात आली आहे.

स्वत:च्या प्राणांचे बलीदान करून देशाच्या स्वातंत्र्याचे खरे शिल्पकार बनलेल्या अनेक ज्ञात-अज्ञात क्रांतीकारकांच्या शौर्याचा मागोवा !

आज तिथीनुसार स्वातंत्र्यदिन. त्या निमित्ताने...
देशाला स्वातंत्र्य प्रदान 
करणार्‍या क्रांतीकारकांची महान परंपरा !
     जीवनाच्या सर्व अंगोपांगांना क्रांती स्पर्श करत असते. राजकीय क्रांतीविना आपल्या राष्ट्रीय जीवनाशी संबंधित इतर काही क्रांतींचा, त्या घडवून आणणार्‍या क्रांतीकारकांचा आणि समुदायांचा अल्पसा परिचय येथे दिला आहे.
       हिंदुस्थानावर परकियांनी अनेक आक्रमणे केली. त्याविरुद्ध लढलेले सर्वच क्रांतीकारक हे स्वातंत्र्ययोद्धे होते. अनेक ब्रिटीश अधिकार्‍यांना मारणारे विविध क्रांतीकारक, आझाद हिंद सेनेत सहभागी झालेले सैनिक जितके महान, तितकेच सर्व क्रांतीकारकांचे खटले विनामूल्य चालवणारे विधीज्ञ आणि क्रांतीकारकांना आश्रय देणार्‍या माता-भगिनीही महान आहेत. इंग्रजांविरुद्ध लढलेला आद्य क्रांतीकारक कोण ? हे ठरवणे, थोडे अवघड आहे; परंतु उपलब्ध विवरणानुसार आद्य क्रांतीकारक पाहूया.

कांची कामकोटी पीठाधीश्‍वर जयेंद्र सरस्वती रुग्णालयात !

       नवी देहली - प्रकृती बिघडल्याने कांची कामकोटीचे ८१ वर्षीय पीठाधीश्‍वर स्वामी जयेंद्र सरस्वती यांना विजयवाडा (आंध्रप्रदेश) येथील रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. ३० ऑगस्टला येथे पूजा करत असतांना ते बेशुद्ध झाल्याने त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. त्यांना कृत्रिम श्‍वासोच्छ्वासावर ठेवण्यात आले आहे. स्वामी चातुर्मासाचे व्रत करत असल्याने ते प्रतिदिन कृष्णा नदीत स्नानासाठी जातात आणि सायंकाळी भोजन करतात. त्यामुळे त्यांच्या रक्तातील साखर आणि सोडीयम यांचे प्रमाण खाली आल्याने ते बेशुद्ध झाले. या वयात व्रत करत असल्याचा हा परिणाम असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

आपल्या वैदिक वैभवशाली इतिहासाचा विज्ञानात शोध घेण्याला हास्यास्पद ठरवणे, हे विज्ञानाच्या इतिहासासाठी मारकच !

      सातव्या-आठव्या शतकात आपल्या देशावर इस्लामी आक्रमणे चालू झाली, ती अगदी सोळाव्या शतकातील ईस्ट इंडिया कंपनीपर्यंत अव्याहतपणे चालू होती. साहजिकच हा संस्कृतींमधील संघर्ष, मूळ संस्कृतीमध्ये आलेली बेदिली (बेबनाव) यांमुळे एकंदरीतच मूळ प्रवाहामध्ये पालट होण्यापेक्षा त्याला विकृत स्वरूप येऊ लागले. परकियांशी झगडणे हे अस्तित्वाचे मूळ सूत्र ठरले, ते अगदी १९४७ च्या स्वातंत्र्यापर्यंत ! भाषा, ग्रहगणित, वैद्यक, स्थापत्य, राज्यशास्त्र, व्यापार, विधी, सर्व कला आणि साहित्य यामध्ये प्रचंड सर्जनशीलता दाखवणारा हा समाज, आक्रमकांच्या जीवनशैलीचे अनुकरण अपरिहार्यपणे करू लागला. या आधीही इजिप्त आणि युरोपमध्येही असेच घडल्याचे आपल्याला दिसते. युरोपमध्येही प्रबोधनाच्या उत्तरकाळात त्यांनी आपल्या विकासाच्या सर्व मूळ संकल्पना ग्रीक संस्कृतीत शोधणे काय किंवा पारतंत्र्यातील आणि आजच्या भारतियांनी आपल्या वैदिक किंवा वैभवशाली इतिहासामध्ये अगदी आजच्या विज्ञानाच्या मूळ संकल्पना शोधणे काय, या दोन्ही प्रतिक्रिया सारख्याच आहेत. यामध्ये जेव्हा तारतम्य सुटते, तेव्हा अशा अभ्यासातील संशोधन संपते आणि ते एक हास्यास्पद स्वरूप घेते; म्हणून असा शोध घेणे, म्हणजे ते संशोधन नाही किंवा गुन्हा आहे, असा समज करून देणेही विज्ञानाच्या इतिहासाकरता मारकच ठरते ! 
(संदर्भ : संपादकीय, त्रैमासिक सद्धर्म, एप्रिल २०१५)

कसा साजरा करावा स्वातंत्र्यदिन ?

कु. मधुरा भोसले
आजचा शुभदिन ।
असे भारताचा स्वातंत्र्यदिन ॥
भारत अजूनही असे पराधीन ।
मग कसा साजरा करावा 
स्वातंत्र्यदिन ? ॥ धृ.॥

काळे इंग्रज भारतावर राज्य करतात ।
अन् सारे मिळून जनतेला फसवतात ॥
कारकूनापासून सर्व जण लाच खातात ।
सामान्य जनतेच्या डोळ्यांत धूळ फेकतात ॥ १ ॥

पुण्यश्‍लोक अहिल्याबाई होळकर यांनी स्थापित केलेला आध्यात्मिक ठेवा !

पुण्यश्‍लोक अहिल्याबाई होळकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त...
       पंढरपूर येथील होळकर वाड्यातील पुण्यश्‍लोक अहिल्याबाई होळकर यांनी स्थापन केलेले हेच ते श्रीराम, सीता, लक्ष्मण यांचे मंदिर. या मंदिरातील शिवपिंडीभोवती ११ छोटे लिंग आहेत आणि गरुड आहेत. अहिल्याबाई होळकर यांना येथे शिवमंदिर बांधायचे होते. तथापि मंदिराचे बांधकाम चालू असतांना मारुतीची मूर्ती मिळाल्यामुळे त्यांनी या ठिकाणी श्रीराम मंदिर बांधले.

हे मुलायमसिंह नव्हे, तर क्रूरसिंह !

     उत्तरप्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री मुलायमसिंह यादव यांनी कारसेवकांवरील गोळीबाराचे पुन्हा एकदा समर्थन केले आहे. त्यांनी याचे काही मासांपूर्वीच समर्थन केले होते. तरीही आता पुन्हा तोच विषय चर्चेत आणून आगीत तेल ओतण्याचे दुष्कर्म यादव यांनी चोखपणे केले आहे. हा विषय पुन्हा उकरून काढून उत्तरप्रदेशात नव्याने दंगल घडवण्यास एकप्रकारे चिथावणीच देण्यात आली आहे. ज्या आदेशामुळे कारसेवकांना प्राण गमवावे लागले त्याचा यांना फारच गर्व असल्याचे दिसते. कारसेवकांच्या नातेवाइकांच्या जखमांवर मीठ चोळण्याचे लाळघोटे उद्योग बंद होतील असे वाटत नाही; कारण आपल्या प्रत्येक कृतीतून मुसलमानांप्रती निष्ठा झळकली नाही, तर त्यांना त्याचे काय वाटेल, याचीच चिंता मुलायमसिंहांना वाटत आली आहे.

यादवी युद्धाची चाहुल !

श्री. भाऊ तोरसेकर
१. उपलब्ध स्वातंत्र्याच्या आधारे आतंकवाद्यांकडून फ्रान्समध्ये जिहाद !
     फ्रान्स हा सेक्युलर देश आहे आणि तिथे कुणाही नागरिकाची धर्मानुसार नोंदणी होत नाही. म्हणूनच धर्मपालनाचे स्वातंत्र्य असले, तरी धर्माचे अवडंबर माजवण्याची मुभा नाही. म्हणून मग कुणाला धर्माचा मुखवटा पांघरून आतंकवाद पसरवण्याचेही स्वातंत्र्य घेता येत नाही. तरीही तिथे जिहाद थांबलेला नाही. जे उपलब्ध स्वातंत्र्य आणि मोकळीक आहे त्याचा लाभ उठवून उच्छाद मांडणे, हीच तर जिहादी रणनीती असते. म्हणून आजवर फ्रेंच वसाहतीतून आलेल्या मुसलमानांना फ्रान्सने मोठ्या प्रमाणात आश्रय आणि नागरिकत्वही दिले. तथापि म्हणून त्या आश्रितांना त्यांच्या धर्माचा आग्रह सोडणे शक्य झालेले नाही. परिणामी फ्रान्सला वारंवार जिहादी आतंकवादाचे शिकार व्हावे लागले.

हिंदूंची लोकसंख्या वाढवण्यापेक्षा क्षात्रतेज आणि ब्राह्मतेज यांनी संपन्न असलेली पिढी निर्माण करणे आवश्यक ! - सौ. सुनीता पाटील, प्रवक्ता, हिंदु जनजागृती समिती

सरसंघचालक मोहन भागवत यांच्या, 'अन्य धर्मीय अनेक मुलांना जन्म देतात, हिंदूंना कुणी रोखले आहे' या विधानाच्या पार्श्‍वभूमीवरील चर्चासत्र 
 'आयबीएन् लोकमत' या वृत्तवाहिनीवरील 'बेधडक' कार्यक्रमातील चर्चासत्र 
     '१९५१ मध्ये हिंदूंची लोकसंख्या ८५ टक्के होती आणि २०११ च्या जनगणनेनुसार ती ७९ टक्के झाली आहे. मुसलमानांची लोकसंख्या १९५१ मध्ये ९.८ टक्के होती आणि २०११ ला १४.२३ टक्के झाली आहे. यावरून स्पष्ट दिसते की, हिंदूंची लोकसंख्या न्यून होत चालली आहे. त्यामुळे हिंदू नेत्यांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढीस लागली आहे; मात्र हिंदूंनीही अधिक मुले जन्माला घालणे हा त्याच्यावरील उपाय नसून जन्मदराच्या संदर्भात सर्व धर्मियांसाठी समान कायदा असायला हवा. तसेच आहे ती पिढी राष्ट्रप्रेमी आणि सुसंस्कारित म्हणजेच क्षात्रतेज आणि ब्राह्मतेज यांनी संपन्न असायला हवी,' असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीच्या सौ. सुनीता पाटील यांनी केले.

साधकांना सूचना

पौर्णिमा आणि अमावास्या या तिथींना प्रार्थना, नामजप, तसेच साधना अधिकाधिक करा. 
प्रारंभ - श्रावण कृष्ण पक्ष चतुर्दशी (३१.८.२०१६) दुपारी २.०४ वाजता 
समाप्ती - श्रावण अमावास्या (१.९.२०१६) दुपारी २.३३ वाजता 
उद्या अमावास्या आहे.

राज्यशासनाचा धर्मद्रोही उपक्रम 'महाअवयवदान' अभियान चालू !

धर्मशिक्षणाच्या अभावी शासनाच्या वैद्यकीय विभागाकडून राबवली जाणारी धर्मशास्त्रविरोधी मोहीम ! 
     पुणे, ३० ऑगस्ट - अवयव निकामी झालेल्या रुग्णांना नवजीवन मिळावे, या उद्देशाने समाजात अवयवदानाविषयी जनजागृती होण्याकरता एकाच वेळी राज्यभरात हे 'महाअवयवदान अभियान' राबवण्यात येत आहे. ३० ऑगस्टला या अभियानाला आरंभ झाला असून ते १ 8 पर्यंत चालणार आहे. 

पुणे पोलीस कर्मचारी असलेल्या राठोड दांपत्यावर नेपाळ सरकारकडून १० वर्षांची बंदी

     पुणे, ३० ऑगस्ट - एव्हरेस्ट शिखर सर केल्याचा खोटा दावा करणार्‍या पुणे पोलीस दलातील दिनेश आणि तारकेश्‍वरी राठोड या दांपत्यावर नेपाळ सरकारने १० वर्षांची बंदी घातली आहे. (यावरूनच पोलिसांना नीतीमत्तेचे धडे आवश्यक असल्याचे दिसून येते. भारतियांवर अशा प्रकारची बंदी दुसर्‍या देशाने घालणे, हे देश आणि गृह विभाग यांना लज्जास्पद आहे. - संपादक) त्याविषयीचे पत्र नेपाळ सरकारने पुणे पोलीस आयुक्त यांना लिहिले आहे. 'एव्हरेस्ट सर' करणारे पहिले भारतीय दांपत्य असा दावा दिनेश आणि तारकेश्‍वरी यांनी केला होता; पण नेपाळ सरकारने हा दावा खोटा असल्याचे प्रसिद्ध केले आहे. नेपाळकडून त्या दोघांना १० वर्षांच्या बंदीची नोटीस पाठवली आहे. राठोड दांपत्य हे शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये कार्यरत आहे. त्यांच्या खोट्या दाव्यामुळे पोलीस प्रशासनाकडूनही त्यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे. नेपाळ सरकारने केलेल्या चौकशीत त्या दोघांचे सत्य समोर आले आहे.

गोमांसावर संपूर्ण बंदी घालू नये ! - रामदास आठवले

     नवी देहली - केंद्रीय सामाजिक न्याय आणि अधिकार राज्यमंत्री रामदास आठवले म्हणाले की, "गोमांसावर संपूर्ण बंदी घालू नये. काही राज्यांत गोहत्या आणि गोमांसावर यापूर्वीच बंदी घालण्यात आली आहे, त्यामुळे अन्य मांसावर बंदी असू नये. जर बंदी घालण्यात आली, तर त्याला आमच्या पक्षाकडून विरोध केला जाईल." आठवले यांनी शेतकर्‍याला बैल म्हतारा झाल्यास त्याला कसायला विकण्याची अनुमती असली पाहिजे, अशी मागणीही केली. (स्वतःचे वडील म्हातारे झाले असता आपण काय करतो ? त्यांचा सांभाळ करणे, हे नैतिक दायित्व नाही का ? हेच तत्त्व जनावरांच्या बाबतीत लागू करता येतेे - संपादक)

काळ्या सूचीतील कंत्राटदाराला दिले मुंबईतील मेट्रो- ३ चे कंत्राट !

भ्रष्टाचारमुक्त भारत करण्यास निघालेले याविषयी स्पष्टीकरण देतील का ? 
     मुंबई, ३० ऑगस्ट - रस्ते घोटाळ्याच्या संदर्भात मुंबई महानगरपालिकेने दोषी ठरवलेल्या 'जे. कुमार' या आस्थापनाला मेट्रो-३ मार्गिकेच्या बांधकामाचे कोट्यवधी रुपयांचे कंत्राट देण्यात आले आहे. (दोषी आस्थापनांना कंत्राट देणे, हा समाजद्रोहच आहे. ही कृती म्हणजे कायदा सुव्यस्था बासनात गुंडाळून ठेवण्यासारखेच आहे. अशा दोषी आस्थापनांची बांधकाम अनुज्ञप्तीच कायमची रहित करायला हवी. - संपादक) नुकताच मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन (एम्एम्आर्सी) आणि ५ आस्थापने यांच्यात बांधकाम करार करण्यात आला आहे. यामध्ये ५ व्या टप्प्याचे २ सहस्र ८१७ कोटी २ लक्ष रुपयांचे आणि ६ व्या टप्प्याचे २ सहस्र ११८ कोटी ४० लक्ष रुपयांचे काम जे कुमार या आस्थापनाला देण्यात आले आहे.

श्री गणेशोत्सव विशेषांक

दैनिक सनातन प्रभातचा रंगीत विशेषांक
प्रसिद्धी दिनांक : ४ सप्टेंबर २०१६ 
पृष्ठ संख्या : १०, मूल्य : ५ रुपये 
विशेषांकाची वाढीव मागणी वितरकांनी ३ सप्टेंबरला 
दुपारी ३ पर्यंत इआर्पी प्रणालीत भरावी.

किर्गिस्तानमधील चिनी दूतावासावर आत्मघातकी आक्रमण !

     बिशकेक (किर्गिस्तान) - मध्य आशियाई देश किर्गिस्तानची राजधानी बिशकेकमधील चिनी दूतावासामध्ये आतंकवाद्यांनी केलेल्या आत्मघातकी आक्रमणात अनेक जण ठार आणि घायाळ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सकाळी दूतवासाच्या प्रवेशद्वाला धडक देऊन एक चारचाकी गाडी आत घुसली आणि त्याचा स्फोट झाला. धडक देणार्‍या गाडीचा चालक ठार झाल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच दूतावासातील तीन कर्मचार्‍यांना किरकोळ दुखापत झाली.

फलक प्रसिद्धीकरता

केरळमध्ये कम्युनिस्टंानी किती हिंदुत्वनिष्ठांच्या हत्या केल्या, हेही सांगावे ! 
      रा.स्व. संघाकडून मंदिरांचा वापर शस्त्रसाठ्यासाठी करण्यात येतो आणि तेथे शस्त्र प्रशिक्षण दिले जात आहे, असा आरोप केरळच्या कम्युनिस्ट शासनातील मंत्री कडकांपल्ले सुरेंद्रम् यांनी केला आहे.

हिंदू तेजा जाग रे !

Jago ! 
RSS Mandironka upyog shastrastronke liye karta hai. - Surendram, Mantri, kerala 
Communist masjid aur madarso ke bareme chup kyo ? 
जागो ! 
रा.स्व. संघ मंदिरों का उपयोग शस्त्रास्त्रों के लिए करता है । - सुरेंद्रम्, मंत्री, केरल 
कम्युनिस्ट मस्जिद और मदरसों के बारे चुप क्यों ?

स्वतःच्या वाढदिवसाचे औचित्य साधून साधनेची वाटचाल वर्णन करतांना कु. आरती सुतार यांनी सहसाधक, संत आणि भगवंत यांच्याप्रती व्यक्त केलेली कृतज्ञता !

कु. आरती सुतार
      श्रावण कृष्ण पक्ष चतुर्दशी (३१.८.२०१६) या दिवशी सनातनच्या रामनाथी आश्रमात सेवा करणार्‍या कु. आरती सुतार यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने त्यांनी व्यक्त केलेली कृतज्ञता आणि त्यांच्या सहसाधकांना जाणवेली कु. आरती यांची गुणवैशिष्ट्ये येथे प्रसिद्ध करत आहोत.
कु. आरती सुतार यांना वाढदिवसानिमित्त 
सनातन परिवाराच्या वतीने अनेक शुभाशीर्वाद !
१. बालसंस्कार वर्गाला जाऊ लागल्यावर नामजप करणे आणि दत्तगुरु 
आवडू लागून सूक्ष्मातून त्यांच्याशी बोलू लागणे 
     मी इयत्ता ५ वीत असल्यापासून ताईसमवेत प्रसाराला आणि बालसंस्कार वर्गाला जात असे. त्यामुळे मला देवाविषयी ओढ वाटू लागली. बालसंस्कार वर्गात कुलदेवता आणि दत्त यांचा नामजप करायला सांगत. त्यामुळे मला दत्तगुरु आवडू लागले. मी हळूहळू सूक्ष्मातून त्यांच्याशी बोलू लागले आणि ते कधी माझा सखा बनले ?, ते मला समजलेच नाही. मला काही अडचण आल्यावर मी ती दत्तगुरूंना सांगायचे आणि ते ती दूर करायचे. अशा प्रकारे माझे मन कधी देवाशी जोडले गेले, ते समजलेच नाही.

प.पू. डॉक्टरांच्या निर्गुण तत्त्वाच्या अस्तित्वाची साधिकेने घेतलेली अनुभूती !

कु. गायत्री बुट्टे
१. उपायांच्या वेळी मानसरित्या प.पू. डॉक्टरांच्या चरणांजवळ बसून त्यांना भावपूर्णतेने फुले अर्पण करणे, त्या वेळी देवच सत्य असून बाकी सर्व जग मिथ्य असल्याचे वाटून केवळ शाश्‍वत देवावरच निरपेक्ष प्रीती करूया, असे वाटणे : २.६.२०१६ या दिवशी मी रामनाथी आश्रमातील एक संत पूर्वी रहात असलेल्या खोलीत बसून उपाय करत होते. त्या वेळी मी मानसरित्या प.पू. डॉक्टरांच्या चरणांजवळ दास्यभावात बसून त्यांना एकेक फूल प्रीतीपूर्वक अर्पण करू लागले. फुले अर्पण करतांना मी ईश्‍वराच्या चरणांची दासी आहे आणि त्याची भावपूर्ण, प्रीतीने, मनापासून आणि अंतःकरणापासून सेवा करत आहे. माझे सर्वस्व त्याच्या चरणी अर्पण करणे, एवढेच माझे कर्तव्य आहे. उर्वरित जगाशी मला कसलेच कर्तव्य नाही आणि कोणाकडून, म्हणजे ईश्‍वराकडूनही कसलीच अपेक्षा किंवा सुख-दुःखाचीही अपेक्षा नाही, असे मला वाटत होते.
        माझे मन एकाग्र झाले. मला चैतन्य मिळून मी भावमुग्ध झाले. त्या वेळी माझ्या मनात केवळ देवाविषयी आपुलकी, जिव्हाळा आणि प्रीती होते. केवळ देव आणि भक्त या नात्याव्यतिरिक्त दुसरे कोणतेच नाते नाही, असे मला वाटत होते. देवच सत्य आहे, बाकी सर्व जग खोटे म्हणजे माया आहे. देव सोडून अन्य कोणावर प्रेम करू नये, केवळ आणि केवळ शाश्‍वत देवावरच मनापासून प्रीती करावी, असे मला वाटत होते.
कु. आरती सुतार यांनी सिद्ध
केलेल्या कृतज्ञतापत्रावरील चित्र
कोटी कोटी कृतज्ञता ।
माता-पित्यांनी जन्म दिला, बहिणींनी सांभाळ केला ।
संतांच्या मार्गदर्शनाखाली साधनेला आरंभ झाला ॥ १ ॥ 

दैनिक सनातन प्रभातच्या माध्यमातून गुरूंनी घडवले ।
स्वभावदोष-अहंवर मात करायला शिकवले ॥ २ ॥

या देहाची काळजी घेतली आश्रमातील वैद्यांनी ।
साधनेत साहाय्य करण्या होत्या तत्पर मैत्रिणी ॥ ३ ॥

सहसाधकांसह साहाय्य केले सर्वांनी ।
म्हणूनी हा देह पोचू शकला देवाचरणी ॥ ४ ॥

कृतज्ञ आहे देवा, मज मनुष्यजन्म दिलास ।
कृतज्ञ गुरुमाऊली, मला साधना शिकवलीस ॥ ५ ॥

तव चरणी आता केवळ एकच प्रार्थना ।
सदैव तव चरणी ठेवावे या देहाला ॥ ६ ॥

अपेक्षित असे घडवूनी मोक्षाच्या वाटेवरी न्यावे ।
हिंदु राष्ट्र स्थापनेसह या जन्माचे सार्थकही व्हावे ॥ ७ ॥

- सतत देवासाठी तळमळणारी,
कु. आरती नारायण सुतार, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१५.८.२०१६) 
कु. आरती नारायण सुतार यांनी स्वतःच्या वाढदिवसानिमित्त सिद्ध केलेल्या कृतज्ञतापत्रावरील कविता !

परम पूजनीय गुरुदेवांच्या चरणी अमृत महोत्सवानिमित्त सर्व साधकांकडून कोटी कोटी शिरसाष्टांग दंडवत आणि अनंत कृतज्ञता !

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले 
यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त... 
 १. कलियुगातील कलियुगात भगवान 
श्रीकृष्णाने पुन्हा एकदा अवतार घेतला !
        परम पूजनीय, सदैव वंदनीय, सर्वांत माननीय अशा सर्वश्रेष्ठ गुरुदेवांच्या चरणी अमृत महोत्सवानिमित्त आम्हा सर्व साधकांकडून कोटी कोटी शिरसाष्टांग दंडवत !
        यदा यदा हि धर्मस्य... । असे श्रीकृष्णाने अर्जुनाला मार्गदर्शन केले आणि सज्जनांचे रक्षण करण्यासाठी प्रत्येक युगात अवतार घेतला. त्याप्रमाणे कलियुगातील कलियुगात भगवान श्रीकृष्णाने पुन्हा एकदा अवतार घेतला.
२. मानवजातीच्या र्‍हासाला कारणीभूत 
ठरणार्‍या अगणित गोष्टींना पालटण्याचे 
सामर्थ्य असणारे आणि वर्षानुवर्षे एकाच खोलीत 
राहून हे कार्य करू शकणारे, असे आमचे गुरुदेव !
        मानवजातीच्या र्‍हासाला कारणीभूत ठरणार्‍या अगणित गोष्टींना पालटण्याचे सामर्थ्य असणारे आणि वर्षानुवर्षे एकाच खोलीत राहून हे कार्य करू शकणारे, असे आमचे गुरुदेव ! गुरुदेव हिंदु समाजाला वेढलेल्या वाढलेल्या समस्यांचे मूळच उखडून टाकण्यासाठी आपण या पृथ्वीतलावर अवतार घेतला आहे. या दिवसाची, या क्षणाची सर्व देवता अत्यंत आतुरतेने वाटच पहात होते. आमच्यासारख्या सामान्यजनांच्या हे लक्षात येण्याएवढीही आमची पात्रता नाही.

कृष्णानंदात रमणारी आणि साधकांना सर्वतोपरी साहाय्य करणारी कु. आरती सुतार !

१. कु. मानसी प्रभु आणि कु. वैष्णवी माने
१ अ. उत्साही : आरतीताई नेहमी उत्साही असते. आम्हाला आजपर्यंत ती कधीच निराश झालेली दिसली नाही. 
१ आ. इतरांच्या आनंदात सहभागी होणे : आम्ही आरतीताईची बर्‍याचदा गंमत करतो. त्या वेळी ती काहीच म्हणत नाही. ती शांत राहून आमच्या आनंदात सहभागी होते.
१ इ. आईच्या मायेने सांभाळणे
१. आम्ही ताईकडे मन मोकळे केल्यावर आई जशी तिच्या बाळाला समजावते, त्याप्रमाणे ती आम्हाला समजावून सांगते. आमचे एखाद्या प्रसंगात काही चुकत असेल, तर तेही सांगते. त्यामुळे ती आमची ताई नसून आईच आहे, असे वाटते.
२. तिने आम्हाला २ वर्षे आईप्रमाणे कोणत्याही तक्रारी न करता सांभाळले. 
१ ई. दायित्व घेऊन सेवा करणे : ताई सेवेचेे दायित्वही व्यवस्थित सांभाळते, तसेच आवश्यकता असल्यास आमच्या सेवेत साहाय्यही करते.
१ उ. स्वतःला पालटण्याची तळमळ : ताई आम्हाला नेहमी तुम्हाला माझे स्वभावदोष आणि अहंचे पैलू लक्षात आले असतील, तर सांगा. मला माझ्या चुकाही सांगा. माझ्या चुका झाल्यावर त्या लगेच तुमच्या लक्षात येत नसतील, तर त्या लिहून ठेवा, असेही सांगते. 
१ ऊ. कृष्ण आणि गुरुदेव यांच्याप्रती भाव 
१. ताईकडे कितीही सेवा असल्या, तरी ती ताण न घेता कृष्णच सर्व सेवा करवून घेणार आहे, या भावाने आणि आनंदाने पूर्ण करते.
२. ती नेहमी म्हणत असते, कृष्णच माझे सर्वस्व आहे. मी त्यालाच सर्व सांगते. तोच माझा सखा आहे. 
२. श्री. अजित महांगडे
२ अ. सेवेची तळमळ : आरतीताईचा उजवा हात दुखतो. तिला संगणकीय सेवा करतांना त्या हाताने माऊसचा वापर करता यायचा नाही; पण ताईला सेवेची तळमळ असल्याने ती डाव्या हाताने माऊस वापरू लागली; पण तिने सेवेत खंड पडू दिला नाही.
२ आ. इतरांचा विचार करणे : आरतीताईने घरी जातांना ज्या साधकांना तिच्या सेवा दिलेल्या असतात. त्या साधकांना ती घरून आल्यावर त्याच दिवशी भेटते आणि सेवेत काही अडचणी आल्या का ? सेवा नियमित व्हायची ना ?, अशा सर्व गोष्टी विचारून घेते.
३. श्री. सुरजित माथूर
अ. आरतीताई कोणतीही सेवा करतांना परिपूर्ण करते. तिची कार्यक्षमता अधिक आहे. ती रात्री उशिरापर्यंत जागरण करून सेवा करते. ती झोकून देऊन सेवा करते.
आ. ताई सर्वांना एकत्र करून साधनेचा दृष्टीकोन देऊन परिपूर्ण सेवा करण्यासाठी उद्युक्त करते.
इ. ती स्वतःसह इतरांचीही कार्यक्षमता वाढवण्यासाठी प्रयत्न करते.
ई. ती इतरांच्या चुका प्रेमाने सांगते.
४. कु. वैभवी झरकर (वय ११ वर्षे)
अ. आरतीताई कुठलीही चूक प्रेमाने सांगते. त्यामुळे तिने चूक सांगितली, तरी वाईट वाटत नाही. 
आ. मी तिच्याशी बोलते. तेव्हा ती मला व्यष्टी साधनेविषयी विचारते, उदा. स्वयंसूचना सत्र झाले का ? लिखाण झाले का ?
इ. आरतीताईचा सेवा करतांना सतत नामजप चालू असतो, असे जाणवले.
५. श्री. वैभव साखरे (वय २० वर्षे)
अ. आरतीताईकडे पाहिल्यावर ती स्थिर असल्याचे जाणवते. सेवेचा कितीही व्याप असला, तरी ती स्थिर राहून परिपूर्ण सेवा करते. ती सेवा करत असतांना तेवत असलेल्या दिव्याची आठवण येते.
आ. ताईकडे मी मनमोकळेपणे बोलतो. ती मला साधना चांगली होण्यासाठी योग्य दृष्टीकोन देते. ताईला साधनेविषयी काहीही विचारल्यावर ती सहजतेने सांगते. त्यामुळे प्रयत्न करायला सुलभ होते. 
   एकदा आम्हाला सेवा करतांना कंंटाळा आला होता. आम्ही ताईला हे सांगितल्यावर तिला लगेच पुढील कविता सुचली आणि आम्हाला कविता वाचून चांगले वाटले. 
        अर्पण करावे हे मन गुरुचरणी ।
गुरुविना नसे कोणी ।
तोच आपले मना जाणी ॥ १ ॥

अर्पण करावे मन गुरुचरणी ।
सदा राहून सकारात्मक ॥ २ ॥

राहू सदैव आनंदी ।
हीच प्रार्थना गुरुचरणी ॥ ३ ॥

ताईचे गुण अनुभवतांनाही आनंद मिळून आम्हालाही तसे प्रयत्न करायला पाहिजे, असे वाटते.

रामनाथी (गोवा) येथील सनातन आश्रम वैकुंठासमान असल्याविषयी साधिकेला आलेली अनुभूती

रामनाथी, गोवा येथील सनातन आश्रम
१. एका काकांनी अल्प पैशांत देवदर्शनाला येणार का ?, असे विचारणे आणि मनात रामनाथी आश्रमच 
काशी तीर्थक्षेत्र आहे, असा भाव असल्याने काकांना अन्यत्र देवदर्शनाला येणार नाही, असे कळवणे 
      जानेवारी २०१६ मध्ये माझी मुलगी कु. सोनाली आणि मी रामनाथी (गोवा) येथील सनातन आश्रमात साधनेसाठी पूर्णवेळ आलो. नंतर मला एका काकांनी दूरभाष करून विचारले, देवदर्शनासाठी बालाजी आणि अन्य ठिकाणी मी पुष्कळ लोकांना अल्प पैशांत नेणार आहे, तर तुम्ही दोघी येता का ? तेव्हा माझ्या मनात विचार आला, रामनाथी आश्रमच काशी तीर्थक्षेत्र आहे. त्यामुळे कुठेही जाण्याची आवश्यकता नाही. लगेच मी त्यांना येणार नाही, असे सांगितले. ही गोष्ट मी नंतर पूर्णपणे विसरून गेले.

केरळ येथील सनातनचे साधक श्री. अजय पिंगळे यांना पायाच्या शस्त्रकर्माच्या प्रसंगी आलेली अनुभूती

श्री. अजय पिंगळे
१. पायाच्या शस्त्रकर्माच्या वेळी श्रीकृष्णाचे अस्तित्व जाणवणे : माझ्या उजव्या पायातील अशुद्ध रक्तवाहिन्या फुगून झालेल्या गाठींमधील नसांचे (व्हेरिकोज व्हेन्सचे) शस्त्रकर्म गुरुपौर्णिमेच्या दुसर्‍या (२०.७.२०१६ या) दिवशी करायचे ठरले होते. त्यानुसार मी संध्याकाळी ६.३० वाजता रुग्णालयात गेलो. तेव्हा मी श्रीकृष्णाचा नामजप चालू केला. मला तेथील शस्त्रकर्मगृहात गेल्यावर श्रीकृष्णच माझ्या समवेत आहे, असे वाटत होते. काही वेळाने आधुनिक वैद्यांनी शस्त्रकर्म यशस्वी झाल्याचे सांगताच मी श्रीकृष्णाला नमस्कार करून कृतज्ञता व्यक्त केली.
२. शस्त्रकर्म झाल्याच्या दुसर्‍या दिवशी प्रत्यक्ष श्रीकृष्णच धीर देत आहे, असे जाणवणे अन् पायाचे दुखणे पूर्णतः थांबल्याने कृतज्ञता व्यक्त होणे : २१.७.२०१६ या दिवशी पहाटे मी वेगळ्याच भावावस्थेत होतो. पहाटे ५ वाजल्यापासून मला माझे शरीर अतिशय हलके झाले आहे, असे वाटत होते. तसेच मला प्रत्यक्ष श्रीकृष्णच धीर देत माझ्याशी बोलत आहे, असे जाणवले. त्यामुळे माझा अधिकच भाव जागृत होत होता. मन आनंदाने भरून गेले होते. विशेष म्हणजे माझ्या पायाचे दुखणे पूर्णतः थांबले होते. अशा अवस्थेचा अनुभव मला पुष्कळ दिवसांनी आला, यासाठी मी प.पू. डॉक्टरांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करतो.
- श्री. अजय पिंगळे, केरळ (२५.७.२०१६)

काही वर्षांपासूनचा पित्त आणि डोकेदुखी यांचा त्रास शिवस्वरोदयशास्त्रानुसार सनातनचे पू. डॉ. गाडगीळकाका यांनी सांगितलेला उपाय केल्यावर दूर होणे

       मला काही वर्षे पित्त आणि डोकेदुखी यांचा पुष्कळ त्रास होत होता. मी प्रवास केला किंवा माझ्या खाण्यात पालट झाला, तरी माझ्या त्रासाची तीव्रता वाढत असे. मी रामनाथी (गोवा) येथील सनातन आश्रमात आल्यावरही मला डोकेदुखी आणि पित्त यांचा त्रास होत होता. तेव्हा मी माझी मुलगी कु. सोनालीला म्हणाले, उन्हाळ्यामुळे मला अधिक त्रास होत असून तो सहनही होत नाही. त्यामुळे आपण काही दिवस घरी जाऊया. तेव्हा माझा मुलगा अमोल याने सनातनचे पू. डॉ. मुकुल गाडगीळकाका यांना माझ्या त्रासाविषयी सांगून उपाय विचारला. तेव्हा त्यांनी माझ्यासाठी उजव्या कानात कापसाचा बोळा घाला, असा निरोप दिला. तेव्हापासून एक मास झाला, तरी मला पित्ताचा किंवा डोकेदुखीचा त्रास होत नाही. तसेच माझी अंगदुखीही न्यून झाली आणि आता मला जेवणही व्यवस्थित जाते. तेव्हा मला संतांनी सांगितलेल्या उपायामध्ये किती सामर्थ्य आहे, हे अनुभवायला मिळाले.
      (डोकेदुखी आणि पित्त यांवर शिवस्वरोदयशास्त्रानुसार संतांनी उपाय सांगितल्यावर साधिकेने ते श्रद्धापूर्वक केले. त्यामुळे तिचा शारीरिक त्रास लवकर दूर झाला. यावरून कोणतेही औषध वैद्य, संत वा देव यांच्यावर श्रद्धा ठेवून घेतल्यास लवकर रोगनिवारण होते, हे स्पष्ट होते. - संकलक)
- श्रीमती संध्या बधाले, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (८.५.२०१६)

लेखक आणि कवी यांचे लिखाण अन् साधक, संत यांनी केलेले लिखाण यातील भेद

१. लेखक आणि कवी : लिखाणासाठी प्रथम विषय शोधावा लागतो. त्यानंतर संबंधित विषयावर मनन, चिंतन करून लिखाण करावे लागते. यामध्ये बुद्धी आणि कर्तेपणा अधिक असल्याने अशा लिखाणात शुष्कता (कोरडेपणा) असते.
२. साधक आणि संत : देवच लिखाणासाठी विषय सुचवतो आणि लिखाणही तोच करवून घेतो. श्रद्धा आणि भाव यांमुळे ईश्‍वराकडून ज्ञान ग्रहण करण्याची प्रक्रिया दैवी बनते. यातून ज्ञानी जिवाला आनंद मिळतो. 
- श्री. राम होनप, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२१.६.२०१६)

आत्मचिंतन आणि प्रार्थना !

श्री. प्रतीक जाधव
भगवंता, तू कोणाचेतरी माध्यम घेऊन यावं ।
पण मी माझ्या अहंमुळे तुलाच न पहावं ।
यासारखं दुसरं दुर्भाग्य ते कोणतं ॥ १ ॥
भगवंता, तू कुठूनतरी मला सांगण्यासाठी धडपडावं ।
पण अहंमुळे मी ते ऐकूनच न घ्यावं ।
यासारखं दुसरं कुकर्म ते कोणतं ॥ २ ॥
भगवंता, तू प्रेम देण्यासाठी माझ्यापर्यंत यावं ।
पण अहंमुळे मी तुझ्याकडे दुर्लक्ष करावं ।
यासारखं दुसरं दुःख ते कोणतं ॥ ३ ॥
      शिवाजी महाराजांच्या वेळी हिंदवी स्वराज्य मिळण्याअगोदर समाजाची जशी स्थिती होती, तशी स्थिती आजही आहे. निधर्मीवादी, बुद्धीप्रामाण्यवादी आणि पुरोगामी विचारांचे लोक आपल्या देशात सर्वधर्मसमभावाचे विचार पसरवून समाजाची फारच हानी करत आहेत. याच लोकांनी या देशाचे तीन तुकडे केले, ते धर्माच्या नावावर !
- पू. संभाजीराव भिडेगुरुजी, संस्थापक, श्री शिवप्रतिष्ठान

साधकांसाठी महत्त्वाची सूचना !

उच्च आध्यात्मिक मूल्ये असलेल्या 
विविध संज्ञांचे माहात्म्य ओळखा आणि अनुचित 
ठिकाणी त्या न वापरता त्यांचा आदर राखा ! 
सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ
       भाव, तळमळ, संत, गुरु, परेच्छा, ईश्‍वरेच्छा अशा साधनेतील संज्ञांचा सर्व साधक नित्य वापर करतात. अयोग्य ठिकाणी त्यांचा वापर करण्याच्या संदर्भात काही अक्षम्य चुका लक्षात आल्या. सर्वांना चुकांतून शिकता यावे आणि असे इतरांकडून होत असल्यास त्या दुरुस्त करता याव्यात, यासाठी त्या चुका पुढे देत आहे.
१. शिष्य या अध्यात्मातील संज्ञेचा 
विवाहासारख्या मायेतील गोष्टींशी संबंध लावणे
       एका साधकाचा विवाह निश्‍चित झाल्यावर त्या संदर्भात बोलणे चालू असतांना एक कार्यकर्ता त्या साधकाच्या संबंधित अन्य एका साधकाला म्हणाला, शिष्य पुढे निघून गेला. (वयाने मोठ्या असलेल्या साधकाच्या अगोदर लहान वयाच्या साधकांनी विवाह करण्याचे ठरवले.) या गंभीर चुकीची जाणीव अन्य साधकाने त्या कार्यकर्त्याला करून दिली.
       अध्यात्मात गुरु आणि शिष्य या सर्वांत वंदनीय संज्ञा आहेत. त्या संदर्भात अशी प्रतिक्रिया व्यक्त करणे अपमानास्पद आहे.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले
       भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढणार्‍या युवा क्रांतीकारकांना संमोहित करून त्यांना कृती करण्यास भाग पाडले, असे बुद्धीप्रामाण्यवाद्यांनी उद्या म्हटले, तर आश्‍चर्य वाटणार नाही.
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले

बोधचित्र

॥ हरि ॐ तत्सत् ॥

ईश्‍वरालाच जिंकणे
 विषयांपेक्षा विषयांच्या निर्मात्यालाच का जिंकू नये ?
 संत भक्तराज
 सनातनचे श्रद्धास्थान
 भावार्थ : एकेक विषय जिंकत जायचे म्हटले तर वासना, आवडी-निवडी, स्वभावातील दोष, असे लाखो विषय जिंकायला, म्हणजे त्यांच्यावर नियंत्रण मिळवायला लाखो जन्म लागतील. त्यापेक्षा त्या सर्वांच्या निर्मात्यालाच भक्तीने या जन्मात जिंकले, तर त्या सर्वांवर या जन्मातच नियंत्रण मिळविता येईल; म्हणूनच म्हटले आहे, 'एक साधै सब साधै । सब साधै सब जाय ॥' म्हणजे एका नामाला, भगवंताला (नाम आणि भगवंत एकच आहेत.) साध्य केले म्हणजे सर्वच साध्य होते. सर्व साध्य करायला गेलो, तर काहीच साध्य होत नाही. 
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.)

॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥

॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥ 
या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो. - प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

सद्गुरूंना आपल्यापेक्षा वेगळे समजू नका !
जो सद्गुरूंना आपल्यापेक्षा वेगळा आणि दूर समजतो, तो त्यांच्यापासून पूर्ण लाभ मिळवू शकत नाही. 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

जातीचे राजकारण !

संपादकीय
      ज्याप्रमाणे देहलीत निर्भया बलात्कार प्रकरणी नागरिकांकडून ज्यात युवकांचा उत्स्फूर्त सहभाग होता, असे आंदोलन पहायला मिळाले, त्याचप्रकारे महाराष्ट्रातही कोपर्डी बलात्कार प्रकरणानंतर मराठा समाजाकडून ठिकठिकाणी भव्य आंदोलने होतांना दिसत आहे. या आंदोलनातही विशेष करून तरुणांचा मोठ्या प्रमाणात पुढाकार आहे. आजवर मराठा समाजातील मतांवर राजकारण करतच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रस या पक्षांनी सत्तेची पोळी भाजून घेतली. हा समाज आम्हाला सोडून कुठे जात नाही, अशाच भ्रमात ते होते; मात्र आज मराठा समाजाच्या मोर्च्यांना कुठल्याही राजकीय पक्षाच्या नेतृत्वाशिवाय लक्षावधींची संख्या पाहून पवार यांच्यासारख्या नेत्यांच्या पायाखालची वाळू सरकू लागली आहे. त्यामुळेच आजपर्यंत आपण मागासवर्गियांचे कैवारी आहोत, असे भासवून सातत्याने भाजप आरक्षणावर घाला घालत आहे, अशी भाषा करणारे पवार हे अचानक उपरती झाल्यासारखी अ‍ॅट्रॉसिटी कायदा तपासून घ्यायला हवा, अशी भाषा करत आहेत.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn