Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

कोटी कोटी प्रणाम !

स्वामी वरदानंद भारती पुण्यतिथी

परत परत फतवे काढून सरकारी अधिकार्‍यांकडून धर्मशास्त्राची पायमल्ली ! - समर्थभक्त पू. सुनील चिंचोलकर

अमोनियम बायकार्बोनेटद्वारे श्री गणेशमूर्ती विसर्जनाच्या
 पुणे महानगरपालिकेच्या प्रयत्नांचा हिंदुत्वनिष्ठांकडून निषेध ! 
डावीकडून पर्यावरण अभियंता श्री. विकास भिसे , पू. सुनील चिंचोलकर,
हिंदु जनजागृती समितीचे श्री. पराग गोखले, सनातनचे श्री. चंद्रशेखर तांदळे
     पुणे, २९ ऑगस्ट (वार्ता.) - धार्मिक क्षेत्राशी निगडित प्रश्‍नांसंबंधी सरकारी अधिकारी काही निर्णय घेऊन ते सर्वसामान्यांवर लादतात. सरकारी अधिकारी हे काही धर्मशास्त्राचे अभ्यासक नाहीत. परत परत फतवे काढून शासकीय आणि प्रशासकीय स्तरावर धर्मशास्त्राची पायमल्ली केली जाते. हिंदूंच्या सहिष्णुतेचा अपलाभ घेत हिंदूंच्या धार्मिक भावनांची खिल्ली उडवली जाते. धार्मिक सणांंसंबंधी निर्माण होणार्‍या प्रश्‍नांविषयी विचारविनिमय करण्यासाठी सरकारने धर्माचा अभ्यास आणि ज्ञान असलेल्या अधिकारी व्यक्तींची समिती नेमून योग्य ते निर्णय घ्यावेत. हिंदूंच्या धार्मिक श्रद्धा दुखावत राहिल्यास हिंदू ते सहन करणार नाहीत, अशी चेतावणी समर्थभक्त पू. सुनील चिंचोलकर यांनी दिली. २९ ऑगस्ट या दिवशी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथील पत्रकार भवनात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 

मंदिरात घुसणे हे काही पुरोगामी महिलांचे हिंदु धर्म नष्ट करण्याचे षड्यंत्र ! - अभय वर्तक, सनातन संस्था

      हिंदु धर्माने पुरुषांना ज्याप्रमाणे साधनेची संधी दिली आहे त्याचप्रमाणे महिलांनाही दिली आहे. मंदिरांत मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात येते. त्यातून चैतन्याचा स्रोत कार्यरत होतो. तो टिकवून ठेवण्यासाठी ६ लक्ष मंदिरांपैकी केवळ हाताच्या बोटांवर मोजण्याइतक्या मंदिरांमध्येच परंपरा म्हणून महिलांना प्रवेशबंदी आहे.असे असतांना ही महिलांची सर्वात मोठी समस्या असल्याप्रमाणे वातावरण निर्माण केले जात आहे.एअरलाइन्समध्ये महिलांना तोकडे कपडे घालणे अनिवार्य करणे, बारबालांना अनुमती मिळणे या सर्वांमध्ये स्त्रीचे खर्‍या अर्थाने हनन होत आहे; मात्र त्यासंदर्भात काही न करता मंदिर प्रवेशाचे सूत्र उपस्थित करून तृप्ती देसाईंसारख्या पुरोगामी महिला केवळ प्रसिद्धीसाठी आंदोलन करत आहेत.

बलुचिस्ताननंतर आता सिंधमध्येही वेगळ्या सिंधु देशाच्या मागणीच्या घोषणा !

     मीरपूर (पाकिस्तान) - १५ ऑगस्टला पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या भाषणात बलुचिस्तानचे सूत्र उपस्थित केल्यापासून पाकमध्ये पाकपासून स्वतंत्र होऊ इच्छिणार्‍या लोकांना बळ मिळाले आहे. पाकिस्तानमध्ये पाकपासून स्वतंत्र होऊ इच्छिणार्‍यांचा आवाज आता वाढत चालला आहे. पाकव्याप्त काश्मीरमधील गिलगिट, बाल्टीस्थान, तसेच बलुचिस्तान यानंतर आता सिंधमध्येही वेगळ्या सिंधु देशाची मागणी होऊ लागली आहे. २९ ऑगस्टला सिंधच्या मीरपूर खास या शहरातील लोकांनी निदर्शने करत वेगळ्या सिंधु देशाची मागणी केली. तसेच लंडन येथेही चिनी दूतावासासमोर 'चायना-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडोर (सीपीइसी)' चा बलुची नागरिकांनी विरोध केला. या वेळी त्यांना पाकमधील सिंधी लोकांनीही सहभागी होऊन पाठिंबा दिला. 

येमेनमधील आक्रमणात ६० जण ठार

      अदेन (येमेन) - येथील सैन्याच्या छावणीवर चारचाकी गाडीद्वारे घडवून आणलेल्या आत्मघाती स्फोटात ६० जणांचा मृत्यू झाला, तर २९ जण घायाळ झाले. या वेळी सैन्यामध्ये नव्याने भरती झालेल्यांना येथे प्रशिक्षण देण्याचे काम चालू होते. अल्-कयदा आणि इस्लामिक स्टेट यांच्या गटाने हे आक्रमण केल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अद्याप कोणत्याही आतंकवादी संघटनेने या आक्रमणाचे दायित्व स्वीकारलेले नाही.

(म्हणे) पर्रीकर यांचे पाकला नरक संबोधणे, हे भाजप-रा.स्व. संघ यांची असहिष्णुता दर्शवते !

दिग्विजय सिंह यांना पाकविषयी एवढे प्रेम का वाटते ? पाक भारतावर वारंवार आक्रमणे करत असतांना 
तेथील हिंदूंवर अनन्वित अत्याचार होत असतांना सिंह यांना पाकला पाठीशी घालावे वाटते, तर त्यांनी 
तेथेच कायमचे निघून जावे !
काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस दिग्विजय सिंह यांची मुक्ताफळे
      पणजी - संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी पाकिस्तानला नरक संबोधणे, हे भाजप-राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्या असहिष्णुतेचे दर्शक आहे, असे काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस द्विग्विजय सिंह म्हणाले.
   दिग्विजय सिंह पुढे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पाकचे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या घरगुती कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी पाकला गेले. महंमद अली जिना यांच्या मजारीवर भाजपचे तत्कालीन अध्यक्ष लालकृष्ण अडवाणी यांनी पुष्पे अर्पण केली, तसेच तत्कालीन भाजपचे पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी बसद्वारे लाहोरला गेले. त्या वेळी मनोहर पर्रीकर यांनी आक्षेप का घेतला नाही. पाकिस्तान हा नरक नाही. तेथे लोक रहातात, असे म्हणणे हा देशद्रोह नव्हे. असे म्हटल्यामुळे काँग्रेसच्या खासदार सौम्या यांच्यावर देशद्रोहाची तक्रार दाखल करणे चुकीचे आहे. अभिनेता आमीर खान यांच्या विरोधातही असेच वक्तव्य पर्रीकर यांनी केले आहे. पर्रीकर यांच्या वागणुकीवरून भाजप-राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांची असहिष्णुता दिसून येते. पर्रीकर यांनी गोव्यातील काँग्रेसवर ३५ सहस्र कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला होता. हा आरोप त्यांनी सिद्ध करून दाखवावा.

देशभरातील ४० टक्के शाळकरी मुले प्रतिदिन खातात स्नॅक्स !

विदेशी संस्कृतीचे अंधानुकरण टाळून भारतीय संस्कृतीचे खाद्यपदार्थ मुलांना 
द्या आणि राष्ट्राची भावी पिढी आरोग्यसंपन्न बनवा !
केंद्रीय महिला बालकल्याण मंत्रालयाने स्थापन केलेल्या कार्यकारी गटाचा अहवाल
      नवी देहली - भारतातील साधारण ४० टक्के शाळकरी मुले प्रतिदिन कॅन्टीनमधून स्नॅक्स (चिप्स, बर्गर इत्यादी) खातात. त्या माध्यमातून त्यांच्यामध्ये मिठाचे प्रमाण वाढत आहे, असे केंद्रीय महिला बालकल्याण मंत्रालयाने स्थापन केलेल्या कार्यकारी गटाच्या अहवालातून समोर आले आहे. हा अहवाल सरकारकडे सादर करण्यात आला आहे. या अहवालाच्या आधारावर आता फूड सेफ्टी अ‍ॅण्ड स्टॅन्डर्ड अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडिया(एफएस्एस्आय) ज्या पदार्थांमध्ये मीठ, साखर, मेद यांचे प्रमाण आधिक आहे, त्या उत्पादनांची सूची सिद्ध करत आहे. यातून हे पदार्थ खाण्यापासून शाळकरी मुलांना रोखण्याचा त्यांचा मानस आहे.

मध्यप्रदेशात रस्त्यावर फिरणारे पशू सापडल्यास मालकांना तडीपार करणार अथवा रासुका अंतर्गत कारवाई होणार !

      इंदूर - मध्यप्रदेशातील इंदूर शहरात प्रशासनाने नवीन नियम लागू केला आहे. येथील प्रशासनाने गोपालकांची सूची बनवली असून ज्या गोपालकांचे पशू रस्त्यावर फिरतांना दिसतील त्या गोपालकांना जिल्ह्यातून तडीपार करण्यात येईल किंवा राष्ट्रीय सुरक्षा कायद्याच्या अंतर्गत कारवाई करण्यात येईल. या कारवाईत प्रशासनासमवेत नगरपालिका आणि पोलीस यांचाही सहभाग असणार आहे.
       पोलीस उपमहानिरीक्षक संतोष सिंह म्हणाले की, वाहतूक व्यवस्था आणि पशूंमुळे होणारे अपघात यांमुळेे प्रशासनाने बैठक घेऊन हा निर्णय घेतला आहे. प्रशासनाच्या या निर्णयाच्या विरोधात येथील यादव समाजाने आंदोलन करण्याची सिद्धता चालू केली आहे. हा तुघलकी आदेश असून त्यानुसार बळजोरी केल्यास कठोर कृती केली जाईल, अशी चेतावणी त्यांनी दिली आहे.

ब्रसेल्समध्ये पुन्हा एकदा आतंकवादी आक्रमण !

जिहादी आतंकवादग्रस्त युरोप !
पोलिसांच्या इमारतीवर स्फोटकांनी भरलेली चारचाकी धडकवली !
     ब्रसेल्स - बेल्जियमची राजधानी ब्रसेल्सच्या उत्तरेला असलेल्या पोलीस दलाच्या एका प्रशिक्षण संस्थेच्या इमारतीतील क्रिमिनॉलॉजी इन्स्टिट्युटच्या प्रयोगशाळेला लक्ष्य करत आतंकवाद्यांनी स्फोटकांनी भरलेली चारचाकी धडकवून स्फोट घडवून आणाला. या वेळी इमारतीत कोणीही नसल्याने काहीच जीवितहानी झाली नाही. स्थानिक वेळेनुसार रात्री ३ वाजता हे आक्रमण करण्यात आले. चारचाकीमधील आतंकवादी ठार झाले कि नाही, हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही.
     यापूर्वी मार्च महिन्यात ब्रसेल्स विमानतळावर आतंकवाद्यांनी केलेल्या आक्रमणात ३५ जण ठार झाले होते, तर ३०० हून अधिक जण घायाल झाले होते.

मध्यप्रदेशातील एका सरकारी कार्यालयात धर्माच्याआधारे सुट्ट्यांची विभागणी !

       भोपाळ - मध्यप्रदेश राज्य मंडळाने तेथे काम करणार्‍या कर्मचार्‍यांना धर्माच्या आधारावर सुट्टया घोषित केल्या आहेत. यामुळे कर्मचार्‍यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. या नियमानुसार हिंदु कर्मचार्‍यांना अन्य धर्मियांच्या सणांच्या वेळी सुटी मिळणार नाही. तसेच मुसलमानांना केवळ जन्माष्टमी आणि गुरुनानक जयंती वळगता हिंदूंच्या सणांच्या वेळी सुटी मिळणार नाही. याला विरोध करणार्‍या कर्मचार्‍यांचे म्हणणे आहे की,आम्ही सर्व सण साजरे करतो. दिवाळीला मुसलमान आमच्या घरी येतात आणि आम्ही ईदच्या वेळी त्यांच्याकडे जातो; मात्र या आदेशामुळे आम्ही असे करू शकत नाही.

पाकचे २२ खासदार विविध देशांत जाऊन काश्मीरचे सूत्र मांडणार !

पाकिस्तानने आधी त्यांच्या देशात काय चालले आहे, हे पहावे आणि नंतरच काश्मीरविषयी बोलावे !
      इस्लामाबाद - काश्मीरचे सूत्र सार्‍या जगाला समजाऊन सांगण्यासाठी पाकिस्तानने २२ खासदारांची विशेष दूत म्हणून निवड केली असून हे खासदार विविध देशांमध्ये जाऊन काश्मीरचे सूत्र मांडणार आहेत, असे वृत्त रेडिओ पाकिस्तानने दिले आहे.
    याविषयी पाकचे पंतप्रधान नवाज शरीफ म्हणाले, आमचे खासदार विविध देशांच्या राजधानीला भेट देऊन तेथे त्यांची भूमिका मांडतील. काश्मिरी लोकांना स्वयंनिर्णयाचा अधिकार देण्याचे आश्‍वासन देण्यात आले होते,याची आठवण आम्ही संयुक्त राष्ट्रसंघाला करून देणार आहोत. अनेक दशकांपूर्वी काश्मीरच्या सुत्रावर भारतच राष्ट्र्रसंघात गेला होता; मात्र तो त्याचे वचन पूर्ण करीत नसल्याचेही आम्ही सर्वांना सांगणार आहोत. येत्या सप्टेंबर मासात होणार्‍या संयुक्त राष्ट्र्रसंघाच्या आमसभेतील भाषणाच्या वेळी आंतरराष्ट्रीय समुदायात दबाव निर्माण करण्यासाठी शरीफ यांचे प्रयत्न चालू असल्याचे म्हटले जाते.

(म्हणे) 'मुसलमान आरोपींना डांबून ठेवणार्‍या आतंकवादविरोधी पथकाच्या कारवाईची स्वतंत्र चौकशी करा !'

शरद पवार यांची अल्पसंख्यांकांचे तुष्टीकरण करण्यासाठीची मागणी 
  • साध्वी प्रज्ञासिंह, कर्नल पुरोहित आदी अनेक हिंदुत्वनिष्ठांना अटकेच्या आधी अनेक दिवस कारागृहात डांबून ठेवून त्यांच्यावर अत्याचार करण्यात आले. त्या वेळी स्वत:च्या पक्षाची सत्ता असतांना शरद पवार यांनी कधी अशी मागणी केली होती का ? 
  • याच आतंकवादविरोधी पथकाच्या माध्यमातून हिंदुत्वनिष्ठांना जाणीवपूर्वक मालेगाव स्फोटात अडकवण्यासाठी शरद पवार यांनी आदेश दिले होते, असा आरोप होतात, त्यावर ते का बोलत नाहीत ! 

(म्हणे) 'गोमांस खाऊन धावपटू उसेन बोल्ट याने ९ सुवर्ण पदके जिंकल्याने भारतीय खेळाडूंनीही गोमांस खावे !' - भाजपचे खासदार उदित राज यांचे संतापजनक विधान

उदित राज यांच्या विधानाला हास्यास्पद म्हणावे कि मूर्खपणा ?
अशांना हिंदू निवडून संसदेत पाठवतात, हे त्यांना लज्जास्पद होय !
भाजपने त्यांच्या लोकप्रतिनिधींना योग्य प्रशिक्षण द्यावे, अशीच हिंदूंची अपेक्षा !
      नवी देहली - जमैकाचा धावपटू उसेन बोल्ट हा गरिब होता. अशक्त होता. त्या वेळी त्याला प्रशिक्षकांनी दोन वेळा गोमांस खाण्याचा सल्ला दिला. त्याचाच परिणाम म्हणून त्याने ऑलिंपिकमध्ये ९ सुवर्णपदके मिळवली आहेत. गोमांसातून प्रोटीन मिळते. त्यात चुकीचे काय आहे ? भाजप कधीच 'काय खावे' याविषयी आग्रही नाही. भारतीय खेळाडूंनाही प्रशिक्षकांनी गोमांस खाण्याचा सल्ला दिला पाहिजे, असे संतापजनक ट्विट भाजपचे देहलीतील खासदार उदित राज यांनी केले आहे. त्यांच्यावर टीका होऊ लागल्याने त्यांनी नंतर हे ट्विट काढून टाकले आहे.

मोरोक्कोमध्ये अनैतिक वर्तनावरून मुसलमान धार्मिक नेत्यांचे निलंबन

स्वत: अनैतिक वर्तन करणारे मुसलमान धार्मिक नेते लोकांना काय मार्गदर्शन करणार ?
       रबत (मोरोक्को) - येथील इस्लामिक यूनिटी अ‍ॅण्ड रिफॉर्म मूव्हमेंटया संस्थेचे वरिष्ठ धार्मिक नेते मौले उमर बेनहमद आणि फातिमा नेजर मोहमेदिया हे दोघे येथील एका सार्वजनिक ठिकाणी आक्षेपार्ह स्थितीत आढळून आले. त्यामुळे त्यांना संस्थेतून निलंबित करण्यात आले आहे.
       न्यूयॉर्क पोस्टनुसार इस्लामिक यूनिटी अ‍ॅण्ड रिफॉर्म मूव्हमेंट ही धार्मिक संस्था असून इस्लामिक जस्टिस अ‍ॅण्ड डेवलपमेंट पार्टची शाखा आहे. या संस्थेच्या माध्यमातून बेनहमद आणि फातिमा महिलांना पावित्र्य आणि संयम यांच्याविषयी मार्गदर्शन करतात. पोलिसांच्या मते दोघेही जण मोहमेदिया येथील समुद्र किनार्‍यावर एका चारचाकी वाहनात आक्षेपार्ह स्थितीत आढळून आले. बेनहमद हे ७ मुलांचे पिता आहे, तर फातिमा विधवा असून तिला ६ मुले आहेत. मोरोक्कोमध्ये विवाहबाह्य संबंध ठेवणे कायद्याने गुन्हा आहे. हा कायदा मोडणार्‍याला तेथे एक वर्षापर्यंतची शिक्षा होऊ शकते.

कानपूर येथे मशिदीच्या ध्वनीक्षेपकावरून उपदेश केल्यामुळे देवबंदी आणि बरेलवी गटात तणाव : दगडफेक आणि हाणामारी

क्वचित प्रसंगी आपसात भांडणारे मुसलमान हिंदूंच्या विरोधात 
मात्र मतभेद विसरून एक होतात, हे लक्षात घ्या !
      कानपूर - येथील डेरापूर भागात एका मशिदीच्या ध्वनीक्षेपकावरून उपदेश केल्यामुळे मुसलमानांच्या सुन्नी संप्रदायातील दोन गटात वाद झाला. या वादाचे पर्यावसन जोरदार दगडफेक आणि हाणामारीत होऊन तणाव निर्माण झाला. याप्रकरणी पोलिसांनी ५ लोकांना अटक केली आहे. सुन्नी संप्रदायाचे देवबंदी मिशलखचे काही लोक येथील मदीना मशिदीच्या ध्वनीक्षेपकावरून उपदेश देत होते. यावर याच संपद्रायाचे बरेलवी मिशलख युवकांनी आक्षेप घेत उपदेश थांबवला. त्यामुळे वाद होऊन तणाव निर्माण झाला. या दोन्ही गटांमध्ये ४ वर्षांपूर्वी देवबंदी ध्वनीक्षेपकावर उपदेश न देण्याविषयी निर्णय झाला होता. हा नियम तोडल्यामुळे वादाला प्रारंभ झाल्याचे सांगण्यात येते.

काश्मीरमध्ये हिंसाचार करणार्‍यांना भडकवणार्‍या स्थानिक नेत्यांना अटक होणार !

      नवी देहली - केंद्रीय अन्वेषण यंत्रणांनी काश्मीरमध्ये लोकांना हिंसाचारासाठी भडकवणार्‍या ४०० स्थानिक नेत्यांची ओळख पटवली असून पोलीस लवकरच त्यांची धरपकड करणार आहेत. या सूचीत हिजबुल मुजाहिद्दीन आणि इतर आतंकवादी संघटनेचे कार्यकर्ते तसेच तेहरीक-ए-हुरियत, जमात-ए-इस्लामीच्या स्थानिक पातळीवरील पदाधिकार्‍यांचा समावेश आहे. हे स्थानिक नेतेच किशोरवयीन मुलांसह १० ते १२ वर्षांच्या मुलांना दगडफेक करण्यास चिथावतात.

इमरान खान यांच्या विवाहाचे खोटे वृत्त प्रसारित करणार्‍या पाकमधील १३ वृत्तवाहिन्यांना दंड !

      इस्लामाबाद - पाकचा माजी क्रिकेट खेळाडू आणि आता तहरीक-ए-इंसाफ नावाच्या पक्षाचा अध्यक्ष इमरान खान यांच्या तिसर्‍या विवाहाचे खोटे वृत्त प्रसारित करणार्‍या पाकच्या १३ वृत्तवाहिन्यांना प्रत्येकी ५ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. पाकिस्तान इलेक्ट्रॉनिक मीडिया नियामक प्राधिकरण (पीईएम्आर्ए) या संस्थेने खान यांच्या पक्षाकडून आलेल्या तक्रारीनंतर हा दंड ठोठावला आहे. पीईएम्आरएने म्हटले आहे की,वृत्तवाहिन्यांवर दंड ठोठावण्यामागे पत्रकारितेच्या तत्त्वांना कायम राखणे, हे आहे. या वृत्तवाहिन्यांनी १२ जुलैला लंडन येथे विवाह केल्याचे वृत्त प्रसारित केले होते.

पाकच्या सिंधमध्ये मुतहिद्दा कौमी मूव्हमेंटवर सरकारची धडक कारवाई

१९ कार्यालये तोडली, मुख्यालयासमवेत २०० शाखांना टाळे !
       कराची - सिंध सरकारने अल्ताफ हुसेन यांच्या मुतहिद्दा कौमी मूव्हमेंट पक्षाची १९ कार्यालये जमीनदोस्त केली, तर पक्षाच्या मुख्यालयासमवेत २०० केंद्रांना टाळे ठोकले आहेत. तसेच पक्षाच्या ३० मोठ्या नेत्यांना कह्यात घेण्यात आले आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार ही कार्यालये आणि केंद्रे सरकारी भूमीवर अवैधरित्या बांधण्यात आली होती. मात्र तज्ञांच्या मते हे सत्य नसून परदेशात रहाणार्‍या अल्ताफ हुसेन यांनी पाक सरकारच्या विरोधात चालवलेल्या आंदोलनामुळे आणि अमेरिकेत केलेल्या उपोषणामुळेच त्यांच्या पक्षावर कारवाई करण्यात आली आहे. हुसेन यांच्यावर पाकमध्ये देशद्रोहाचा खटलाही चालू आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ते लंडन येथे रहात आहेत. मुतहिद्दा कौमी मूव्हमेंटचा उदय १९८० च्या दशकात झाला. त्याचा प्रभाव सिंध प्रांताच्या शहरी भागात विशेषतः कराची, हैदराबाद, मीरपूर खास आणि सुकुर येथे आहे.

कृत्रिम तलावांऐवजी पारंपरिक पद्धतीने श्रीगणेशमूर्ती विसर्जनाला प्राधान्य देणार !

श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्री. आेंकार डोंगरे, हिंदु जनजागृती
समितीचे डॉ. मानसिंग शिंदे आणि विहिंपचे श्री. जितेंद्र वाडेकर
हिंदूंच्या गणेशोत्सवाच्या वेळी प्रदूषणाची बांग 
ठोकणार्‍या पुरो(अधो)गामी संघटना आणिप्रशासन यांना कारखान्यांचे 
प्रदुषित पाणी आणि सांडपाणी व्यवस्थापन करण्यासाठी भाग पाडणार !
सातारा शहरातील गणेशोत्सव मंडळांचा एकमुखी निर्धार !
पारंपरिक पद्धतीने श्रीगणेशमूर्ती विसर्जन करण्याचा 
निर्णय घेणार्‍या सातार्‍यातील गणेशोत्सव मंडळांचे अभिनंदन !
     सातारा, २९ ऑगस्ट (वार्ता.) - शहरातील हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने राबवण्यात येत असलेली श्री गणेशमूर्ती विसर्जन मोहीम योग्य असून त्याला हिंदु धर्मशास्त्राचा आधार आहे. कोणत्याही शास्त्राचा आधार नसलेल्या 'गणेशमूर्तीदान मोहीम' आणि 'कृत्रिम तलाव' या संकल्पना आम्हाला मागेही मान्य नव्हत्या आणि आताही मान्य नाहीत. भविष्यामध्ये आमच्या सहकारी मंडळांमध्ये याविषयी आम्ही पुढाकार घेऊन जागृती करणार आहोत. तसेच प्रशासनाने बनवलेल्या कृत्रिम तलावांऐवजी पारंपरिक पद्धतीने श्रीगणेशमूर्ती विसर्जनाला प्राधान्य देणार आहोत, असा एकमुखी निर्धार सातारा शहरातील गणेशोत्सव मंडळांनी केला आहे.हिंदु जनजागृती समितीच्या पुढाकाराने समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने येथील रजतसागर मंगल कार्यालयामध्ये शहरातील गणेशोत्सव आणि दुर्गोत्सव मंडळांची बैठक घेण्यात आली.

'हिंदु राष्ट्र स्थापणे', हे आपले कर्तव्य आहे आणि त्याचे पालन प्रत्येक हिंदूने केलेच पाहिजे ! - श्री. रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ता, हिंदु जनजागृती समिती

यापुढे संघटितपणे धर्मकार्य करण्याचा पालघर जिल्हास्तरीय हिंदू अधिवेशनाला उपस्थित हिंदुत्ववाद्यांचा निर्धार !
श्री. रमेश शिंदे
     नालासोपारा, २९ ऑगस्ट (वार्ता.) - धर्मक्रांतीसाठी छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज आणि बाजीराव यांची आवश्यकता आहे. त्यासाठी आपल्याला धर्माचे आचरण करून धर्मपरायण झाले पाहिजे. हिंदु पुनर्जन्म मानतात; म्हणून ते मृत्यूला घाबरत नाहीत. ७ लक्ष मुघल सैन्यांच्या विरोधात छत्रपती शिवाजी महाराजांचे केवळ सहस्रावधीच्या संख्येत असलेले सैन्य लढले; कारण ते सर्व धर्मासाठी लढले. आपणही धर्मासाठी लढलो, तर आपलाही विजय निश्‍चित आहे. हिंदु राष्ट्र स्थापन करणे, हे आपले कर्तव्य आहे आणि त्याचे पालन प्रत्येक हिंदूने केलेच पाहिजे, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ता श्री. रमेश शिंदे यांनी केले. हिंदु राष्ट्र्र स्थापनेसाठी नालासोपारा येथे झालेल्या जिल्हास्तरीय हिंदू अधिवेशनाच्या समारोपाच्या वेळी ते बोलत होते. या वेळी धर्मकार्यात स्वत:चा सहभाग आणि संघटन वाढवून संघटितपणे धर्मकार्य करण्याचा निर्धार उपस्थित हिंदुत्वनिष्ठांनी केला. 

भारतात किशोरावस्थेतील ७० टक्के मुले पोर्नोग्राफीच्या विळख्यात

पोर्न संकेतस्थळावर केंद्रशासनाने घातलेली बंदी कायम ठेवली असती तर, हे प्रमाण न्यून झाले असते ! 
पाश्‍चात्त्य संस्कृतीच्या अंधानुकरणाचा दुष्परिणाम ! 
      नागपूर, २९ ऑगस्ट - सध्याच्या काळात पती-पत्नी दोघेही चाकरीनिमित्त घराबाहेर जात असल्याने मुले एकटीच घरी असतात. ही मुले सामाजिक संकेतस्थळांच्या आहारी जातात. त्यातूनच ८ वी ते १० वीच्या १५ वर्षे वयोगटातील ७० टक्के मुलांना पॉर्नोग्राफीचे आकर्षण वाढत असल्याची माहिती डॉ. राजीव मोहता यांनी दिली. (यावरून तरी पूर्वापार चालत आलेल्या एकत्र कुटुंब पद्धतीचे महत्त्व लक्षात येईल का ? किशोरावस्थेतील मुलांना योग्य दिशा मिळणे आणि उज्ज्वल भावी पिढी निर्माण होणे यासाठी केंद्र आणि राज्य शासन कोणते प्रयत्न करणार आहे ? चारित्र्य संपन्न आणि नीतीवान पिढी निर्माण होण्यासाठी हिंदु राष्ट्र आवश्यक ! - संपादक) येथील राष्ट्रीय लैंगिक परिषदेत किशोरावस्थेतील मुलांचे भावविश्‍व आणि पालकांचे दायित्व या विषयावर डॉ. मोहता बोलत होते. 

चाफळ (जिल्हा सातारा) येथील 'गाव तंटामुक्त समिती'च्या अध्यक्षांचा गोळीबारात मृत्यू

     सातारा - पाटण तालुक्यातील चाफळ येथील बसस्थानकावर गावचे तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष विकास बबन साळुंखे (वय ४२) यांच्यावर एका व्यक्तीने बारा बोअरच्या बंदुकीने दोन गोळ्या झाडल्याने त्यांचा मृत्यू झाला. चंद्रकांत भाईगडे या व्यक्तीला बाजाराच्या रस्त्यावर गर्दी असल्याने तिकडून जीप नेऊ नको, असे सांगितले. त्यावरून दोघांत वाद झाला होता. त्यानंतर भाईगडे याने वरील कृत्य केले.

जीएस् टी विधेयकाला महाराष्ट्र विधीमंडळाचा पाठिंबा

विधेयकाला पाठिंबा देणारे महाराष्ट्र नववे राज्य 
     मुंबई - बहुचर्चित जीएस् टी विधेयकाला महाराष्ट्र विधीमंडळानेही एकमताने पाठिंबा दिला आहे. त्यामुळे या विधेयकाला पाठिंबा देणारे महाराष्ट्र नववे राज्य ठरले आहे. जीएस् टी विधेयकासाठी राज्य विधीमंडळाचे विशेष अधिवेशन भरवण्यात आले होते. त्या वेळी अर्थमंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी सरकारची भूमिका मांडली. 

बापूंना न्याय मिळेपर्यंत आम्ही आंदोलन चालूच ठेवू आणि ते आणखी तीव्र करू ! - अधिवक्ता श्री. प्रशांत यादव, धर्मजागरण समिती

पुणे येथे संतश्री आसारामजी बापू प्रेरित युवा सेवा संघाच्या वतीने आंदोलन !
 आंदोलन करतांना पूज्य बापूजींचे भक्त आणि हिंदुत्वनिष्ठ
     पुणे, २९ ऑगस्ट (वार्ता.) - पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू यांचे सामाजिक कार्य, वय आदी लक्षात न घेता कोणत्याही पुराव्याविना त्यांना अटक होते, हे देशाचे दुर्दैव आहे. ही निषेध सभा केवळ बापूंवर झालेल्या आरोपांविरुद्ध नाही, तर आज समाजात पसरलेल्या समस्त बुद्धीभेदाच्या वातावरणाविरुद्ध आहे. अन्वेषण यंत्रणाचे अपयश लपवण्यासाठी बापूंविरुद्ध रचलेले हे आंतरराष्ट्रीय षड्यंत्र असून त्याद्वारे त्यांच्या सांस्कृतिक कार्यावर चिखलफेक करण्यात आली आहे. हा अन्याय असून आपण या धर्मकार्यात थोडा वेळ काढून सहभागी झाले पाहिजे. साधूसंत हे अखिल मानवजातीचे असतात; म्हणून त्यांच्या पाठीशी आपण उभे राहिले पाहिजे. जोपर्यंत बापूंना न्याय मिळत नाही, तोपर्यंत आम्ही आंदोलन चालूच ठेवू आणि ते आणखी तीव्र करू, असे प्रतिपादन धर्मजागरण समितीचे अधिवक्ता श्री. प्रशांत यादव यांनी केले.

परदेशी महिलांनी स्कर्ट घालून फिरू नये ! - केंद्रीय पर्यटन मंत्री महेश शर्मा यांचा सल्ला

मुसलमान महिलांच्या बुरख्याविषयी तोंड न उघडणारे पुरो(अधो)गामी आणि पाश्‍चात्त्यांचे अंधानुकरण करणारे यांची या सल्ल्यावर टीका ! 
     नवी देहली - भारतात पर्यटनासाठी येणार्‍या परदेशी महिलांनी स्कर्ट घालून फिरू नये. तसेच महिलांनी रात्री बाहेर फिरू नये. पर्यटक ज्या गाडीतून फिरत आहेत, त्या गाडीच्या नंबरप्लेटचे भ्रमणभाष संचात छायाचित्र काढून मित्राला पाठवून ठेवा, असे सल्ले केंद्रीय पर्यटन मंत्री महेश शर्मा यांनी दिले आहेत. पर्यटन मंत्रालयाकडून भारतात पर्यटनासाठी येणार्‍या परदेशी महिलांसाठी माहिती पुस्तिका बनवण्यात आली आहे. परदेशी पर्यटक विमानतळावर उतरताच त्यांना ही पुस्तिका देण्यात येत आहे. या पुस्तिकेत हे सल्ले देण्यात आले आहेत. या सल्ल्यांवर पाश्‍चात्त्यांचे अंधानुकरण करणारे आणि तथाकथित पुरो(अधो)गामी यांच्याकडून टीका झाल्याने शर्मा यांनी यावर स्पष्टीकरण दिले आहे. (विरोध करणे, हेच ज्यांचे नियत कर्म आहे, त्या पुरोगाम्यांना कोण समजावणार ? परदेशी पर्यटकांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना आखायच्याच नाही का ? - संपादक)  

पश्‍चिम बंगालचे नामकरण आता बांग्ला आणि बंगाल !

     कोलकाता - पश्‍चिम बंगाल राज्याचे नाव पालटण्याचा प्रस्ताव राज्याच्या विधानसभेत संमत करण्यात आला असून आता बंगाली भाषेत 'बांग्ला' आणि इंग्रजीमध्ये 'बंगाल' असणार आहे. मुख्यमंत्री ममता बनर्जी यांनी हे नाव घोषित केले. आता नाव पालटण्याचा प्रस्ताव केंद्रसरकारकडे पाठवण्यात येणार आहे. (ब्रिटिशांनी बंगालची पूर्व आणि पश्‍चिम अशी फाळणी केली होती. स्वातंत्र्यानंतर पूर्व बंगाल पाकमध्ये गेल्यानंतर भारतातील भागाला पश्‍चिम बंगाल म्हणणे निरर्थक होते. सनातन प्रभातने हेच धोरण राबवत आरंभापासूनच या भागाचा उल्लेख बंगाल असाच केला आहे ! - संपादक)

गणेशोत्सव मंडळांना एक खिडकी योजनेद्वारे अनुमतीपत्रांची सोय !

     कल्याण - गणेशोत्सवासाठी लागणारे विविध दाखले, तसेच अनुमतीपत्र गणेशोत्सव मंडळांना एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहेत. कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या हद्दीत ९०० पेक्षा अधिक गणेशोत्सव मंडळे आहेत. त्यांच्यासाठी महानगरपालिकेच्या सार्वजनिक रस्त्यांवर मंडप घालण्यासाठी मंडपाची अनुमती, तसेच अग्नीशमन विभागाच्या ना हरकत दाखल्यासह वाहन परवाना, ध्वनीक्षेपक, मिरवणूक अनुमतीपत्र आदी एक खिडकी योजनेद्वारे स्थानिक पोलीस ठाण्यांमध्ये उपलब्ध करणे सोयीस्कर होईल, असा निर्णय पोलीस उपायुक्त आणि पालिका आयुक्त यांच्या बैठकीत घेण्यात आला आहे.

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने राजुरा (जिल्हा चंद्रपूर) येथे हिंदूसंघटन मेळाव्यानिमित्त पत्रकार परिषद !

 हिंदूसंघटन मेळाव्यामध्ये मार्गदर्शन
 करतांना श्री. नामदेव उरकुडे
     राजुरा - हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ३० ऑगस्ट या दिवशी शुभमंगल कार्यालय, पोस्ट ऑफिसजवळ, राजुरा येथे हिंदूसंघटन मेळाव्याचे आयोजन केलेले आहे. त्यानिमित्त समितीने शासकीय विश्रामगृह, राजुरा येथे पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. या वेळी रणरागिणी शाखेच्या सौ. भक्ती चौधरी आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. नामदेव उरकुडे यांनी हिंदूसंघटनांची आवश्यकता आणि मेळाव्यातील विषय याविषयी पत्रकारांना मार्गदर्शन केले. या वेळी १६ पत्रकार उपस्थित होते.

श्री गणेशचतुर्थीच्या कालावधीत समाजप्रबोधन, राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती यांसाठी कृती करून श्री गणेशाची कृपा संपादन करा !

श्री. संगम बोरकर
       प्रतिवर्षी आपण श्री गणेशचतुर्थी उत्साहात आणि आनंदात साजरी करतो. या अंतर्गत आपण श्रीगणेशाची यथासांग भावपूर्ण पूजा करतो. आप्तेष्ट, नातेवाईक, मित्र या सर्वांची भेट घडवून आणणारा आणि विघ्नहर्त्या श्री गणेशाची भक्ती करून भक्तीभाव वाढवणारा हा उत्सव आहे; मात्र आज समाजासमोर भ्रष्टाचार, अनैतिकता,गरिबी, बेरोजगारी, हिंसाचार, धर्मांतर, लव्ह जिहाद, इसिसचा आतंकवाद, अशा असंख्य समस्या उभ्या आहेत.या स्थितीत समाजसाहाय्य, राष्ट्ररक्षण, धर्मजागृती आणि हिंदूसंघटन यांची नितांत आवश्यकता आहे. त्यामुळे ही स्थिती पालटण्यासाठी धार्मिक कृती करण्यासोबत समाज, राष्ट्र आणि धर्म यांसाठीही प्रत्येकाने आपले योगदान देणे आवश्यक आहे. श्री गणेशचतुर्थीच्या शुभ कालावधीचा लाभ आपण या कृती करण्यासाठी उठवू शकतो.

स्वामी वरदानंद भारती यांचे विचारधन !

स्वामी वरदानंद भारती यांच्या पुण्यतिथीनिमित्त...
        स्वामी वरदानंद भारती यांचे पूर्वाश्रमीचे नाव अनंत दामोदर आठवले. वर्ष १९९१ मध्ये त्यांनी संन्यासाश्रम स्वीकारला आणि स्वामी वरदानंद भारती हे नाव धारण केले. राष्ट्र, धर्म, अध्यात्म आदी विषयांवर त्यांनी विपुल लेखन केले आहे.
       श्रावण कृष्ण पक्ष त्रयोदशीला असणार्‍या त्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने साप्ताहिक पंढरी प्रहारच्या स्वामी वरदानंद भारती विशेषांकातील (संपादक : भागवताचार्य श्री. वा.ना. उत्पात, एप्रिल १९९१) आणि हिंदु धर्म समजून घ्या ! या पुण्याच्या स्वस्तिश्री प्रकाशनाने प्रसिद्ध केलेल्या पुस्तकातील विविध विषयांवरील निवडक विचार येथे देत आहोत.

शिक्षक कर्मचार्‍यांना मनस्ताप देणारा शासनाचा कौशल्य विकास विभाग !

       महाराष्ट्रात कौशल्य विकास आणि उद्योजकता विकास या नावाने एक नवीनच विभाग (खाते) चालू झाले असून त्याला त्याचेे बस्तान अजूनही बसवता आलेले नाही. खरे कौशल्य काय, हेच त्या विभागाला अजूनही समजलेले नाही. त्यामुळे या विभागाच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या सहस्रोे शिक्षक कर्मचार्‍यांचे वेतन रखडले जाऊन नसता मनस्ताप देण्याचे कौशल्य मात्र विभागाला प्राप्त झाले आहे. त्यामुळे या विभागाच्या कार्याविषयी संपूर्ण महाराष्ट्रातील व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या शिक्षक कर्मचारीवर्गात संतापाची लाट उसळली आहे.

जाज्वल्य हिंदु जीवनरचनेचा अभिमान बाळगा !

       हिंदु जीवनरचनेमध्ये वर्णाश्रमधर्म, पुनर्जन्म आणि कर्मसिद्धांत या संकल्पनांची वीण अल्पाधिक प्रमाणात बळकट होती. त्यातूनच नीती-अनीती, चांगले-वाईट, पाप-पुण्य या सगळ्या संकल्पना समाजबांधणीकरता निर्माण होत होत्या. काही अभ्यासकांच्या मते रामायण, महाभारत आणि मनुस्मृति यांसारख्या ग्रंथात प्रत्येक शतकामध्ये पालटणार्‍या नवीन संदर्भांना सामावून घेण्यासाठी पालट होत गेले. आपली पुराणे ही याचे एक उत्कृष्ट उदाहरण म्हणून घेता येईल. यांची संख्या वाढली एवढेच नाही, तर त्यातील कथाही वाढत गेल्या.यामधील काही कथा वास्तवापासून इतक्या विसंगत आहेत की, श्रद्धाळू माणसालाही त्यावर विश्‍वास ठेवणे कठीण वाटू लागले, तरीही हे वाङ्मय अतिशय महत्त्वाचे आहे; कारण ते गेल्या २-३ सहस्र वर्षांच्या समाजाच्या चालीरिती, विश्‍वास आणि त्यातील पालट यांचे प्रतिबिंब आहे; म्हणूनच पुराणातील प्रत्येक गोष्ट ही खरी नसली, तरी ते सर्व वाङ्मय भाकड आहे; अशी समजूत करून घेणे, हीसुद्धा मोठी घोडचूक होईल.
(संदर्भ : संपादकीय, त्रैमासिक सद्धर्म, एप्रिल २०१५)

योग्य दक्षिणा घेऊन किंवा दक्षिणा न घेता शास्त्रोक्त पद्धतीने धार्मिक विधी करण्यास इच्छुक असलेल्या पुरोहितांनी पौरोहित्याच्या सेवेत सहभागी व्हावे !

ब्राह्मतेज प्रदान करणार्‍या सेवेत सहभागी होण्याची सर्वत्रच्या पुरोहितांना सुवर्ण संधी !
१. यज्ञ हे एक वरदानच !
      श्रीमद् भगवद्गीतेत श्रीकृष्णाने यज्ञाला कामधेनू म्हटले आहे. पुरोहितांनी एकाग्रतेने केलेल्या शास्त्रोक्त मंत्रपठणामुळे वायूमंडलाची शुद्धी तर होतेच; पण व्यक्ती, समाज आणि राष्ट्र या सर्वांनाही त्या मंत्रशक्तीचा लाभ होतो. अवर्षणादी नैसर्गिक प्रकोपांना रोखून पर्जन्यवृष्टी करण्याचे सामर्थ्य यज्ञयागात आहे. यज्ञ हे भारतीय संस्कृतीला लाभलेेले फार मोठे वरदानच आहे.
२. सनातन साधक-पुरोहित पाठशाळेच्या स्थापनेचा व्यापक उद्देश !
      यज्ञसाधनेचे अनन्यसाधारण महत्त्व लक्षात घेऊन सनातन संस्थेने वर्ष २००९ मध्ये सनातन साधक-पुरोहित पाठशाळेची स्थापना केली. विविध विधींच्या माध्यमातून समाजाला साधनेकडे वळवणे आणि आदर्श अन् सात्त्विक पुरोहितांना घडवून त्यांची संतपदाकडे वाटचाल करून घेणे, हा या स्थापनेमागील उद्देश होता.

अशी कशी ही लोकशाही ?

कु. तुषार काकड
    देवद (पनवेल) येथील सनातन आश्रमातील ध्यानमंदिरात मी नामजप करत बसलो होतो. तेव्हा अचानक माझ्या मनात लोकशाहीविषयी विचारप्रक्रिया झाली आणि देवाने पुढील कविता सुचवली.
     राजकारण्यांच्या भ्रष्टाचाराने ।
     पिळून निघाली जनता सारी ॥
     केवळ मतांसाठी हे राजकारणी ।
     झाले आहेत अत्याचारी ॥ १ ॥

धर्मनिरपेक्षता केवळ हिंदूंसाठी । इतर धर्मियांना ती लागत नाही ॥
अल्पसंख्य मुसलमानांचे लाड । बहुसंख्य हिंदूंवर मात्र दडपशाही ॥ २ ॥

पुणे येथील संत प.पू. आबा उपाध्ये, त्यांच्या धर्मपत्नी पू. (सौ.) मंगलाआजी यांच्या संत सहवासात मिळालेला अवर्णनीय आनंद, आलेल्या अनुभूती अन् शिकायला मिळालेली सूत्रे !

प.पू. आबा उपाध्ये आणि पू. (सौ.) मंगला उपाध्ये, पुणे

     मी घरी कामानिमित्त साधारण चार मास (महिने) राहिल्याने माझे साधनेचे सर्व प्रयत्न अत्यल्प झाले होते.आश्रमात आल्यानंतर पुणे येथील संत प.पू. आबा उपाध्ये यांची सेवा करण्याची संधी मला मिळाली. तेव्हा आरंभी एक दिवस मला काही सुचतच नव्हते. नंतर मात्र पुष्कळ चैतन्य आणि शक्ती मिळून सेवेतील आनंद मिळू लागला. त्या कालावधीत प.पू. आबा, त्यांच्या धर्मपत्नी पू. मंगलाआजी आणि प.पू. डॉक्टर यांच्यातील संभाषणाचा मिळालेला अवर्णनीय आनंद, आलेल्या अनुभूती अन् शिकायला मिळालेली सूत्रे पुढे देत आहे.

समष्टी साधनेचे बीज पेरून आणि ती सहजतेने करवून घेऊन आनंद देणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले 
यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त... 
१. प.पू. डॉक्टरांचे अनमोल 
मार्गदर्शन असलेले मासिक अभ्यासवर्ग
१ अ. अभ्यासवर्गाला औपचारिकता म्हणून थोडा वेळ उपस्थित रहाण्याचे ठरवूनही पूर्ण दिवसभर थांबणे आणि आनंदप्राप्ती हेच आयुष्याचे ध्येय असून मी इतके दिवस जे शोधत होते, ते हेच आहे, याची जाणीव होणे : फेब्रुवारी १९९३ मध्ये मुंबईला मासिक अभ्यासवर्ग चालू झाले. अभ्यासवर्ग संपूर्ण दिवस असून प.पू. डॉक्टर स्वतःच ते घेत असत.
        पहिल्या अभ्यासवर्गाला मी माझ्या आईच्या इच्छेसाठी आणि केवळ औपचारिकता म्हणून गेले होते. काही वेळ उपस्थित राहून नंतर माझ्या यजमानांसमवेत चित्रपट पहाण्यासाठी जाण्याचे ठरवून मी आले होते. प.पू. डॉक्टरांनी सुख, दुःख आणि आनंद हा विषय शिकवायला आरंभ केला. ते जे सांगत होते, ते माझ्या अंतर्मनापर्यंत पोचत होते. मी अगदी मंत्रमुग्ध झाल्याप्रमाणे माझ्या आसंदीला तशीच खिळून राहिले. त्या वेळी प.पू. डॉक्टर केवळ मलाच सांगत आहेत आणि प्रत्येक सूत्र मला समजले आहे ना, हे पहात आहेत, असे मला वाटत होते. प्रत्येक सूत्र मला समजेपर्यंत आणि मी ते लिहून घेईपर्यंत ते थांबत होते. पहिल्याच दिवशी आनंदप्राप्ती हेच माझ्या आयुष्याचे ध्येय असून मी इतके दिवस जे शोधत होते, ते हेच आहे, याची मला जाणीव झाली.

कृष्णावरील श्रद्धेमुळे कशाचीही भीती न वाटणारा, समंजस ५३ टक्के आध्यात्मिक पातळी असलेला आणि उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला ठाणे येथील चि. ईशान अरविंद कौसडीकर ! (वय ३ वर्षे ८ मास)

चि. ईशान कौसडीकर
    (चि. ईशान याची आध्यात्मिक पातळी सप्टेंबर २०१५ मध्ये ५१ टक्के होती. - संकलक)
१. व्यवस्थितपणा आणि नीटनेटकेपणा
      चि. ईशान त्याच्या सर्व वस्तू जागच्या जागी ठेवतो. तो शाळेत जातांना स्वतः त्याचे दप्तर भरतो. तो दप्तरात सर्व आवश्यक वस्तू घेतल्या आहेत ना, याची निश्‍चिती करतो.
२. आठवण ठेवणे
      ईशानने बाहेर खेळायला जातांना स्वतःचे एखादे खेळणे समवेत नेले असेल, तर तो ते आठवणीने परत आणतो.

चतुर्थ अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाच्या काळात मिळालेली सेवा सकारात्मक विचार करून स्वीकारतांना आलेल्या अनुभूती

श्री. अपूर्व ढगे
१. प्रथम मनाप्रमाणे सेवा न मिळाल्याने सेवेतून समाधान न मिळणे 
आणि सकारात्मक विचाराद्वारे मिळालेली सेवा स्वीकारल्यानंतर 
देवाने स्वयंपाकघरात सेवा मिळावी, ही इच्छा पूर्ण करणे
     वर्ष २०१५ मध्ये मी चतुर्थ अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाच्या सेवेसाठी रामनाथी (गोवा) येथील सनातन आश्रमात आलो होतो. त्या वेळी काही दिवस मला अन्य सेवा सांगितल्या होत्या; परंतु मला स्वयंपाकघरात सेवा करण्याची तीव्र इच्छा होती. त्यामुळे प्रथम अन्य सेवांमध्ये माझे मन लागत नव्हते. तेव्हा माझ्या मनात विचार आला, देवाला आपल्याकडून जी सेवा करवून घ्यायची आहे, तो ती करून घेत आहे. मग ती सेवा आश्रमातील कोणत्याही विभागात असू दे. त्या सेवेतून तो माझी प्रगती करवून त्याच्या चरणांशी नेणारच आहे. नंतर दुसर्‍या दिवसापासूनच मला स्वयंपाकघरात सेवेची संधी मिळाली.

प.पू. भक्तराज महाराज यांच्या भजनांची आवड असणारा, प.पू. गुरुदेवांवर श्रद्धा असलेला ५३ टक्के आध्यात्मिक पातळीचा उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला नाशिक येथील चि. श्रीहरि स्वप्नील देवळालीकर (वय ३ वर्षे) !

चि. श्रीहरि देवळालीकर
        नाशिक येथील चि. श्रीहरि देवळालीकर याचा २८.८.२०१६ (श्रावण कृष्ण पक्ष एकादशी) या दिवशी वाढदिवस झाला. त्या निमित्ताने त्याच्या बाबांना त्याची जाणवलेली गुणवैशिष्ट्यै येथे देत आहोत.
१. जन्म ते १ वर्ष
१ अ. प्रतिदिन प.पू. भक्तराज महाराज यांची भजने ऐकत झोपणे : श्रीहरि अतिशय शांत होता. जन्मानंतर आणि आताही तो प्रतिदिन प.पू. भक्तराज महाराज (प.पू. बाबा) यांची भजने ऐकतच झोपतो. रामरक्षा आणि मारुतिस्तोत्र म्हणत असतांना झोप आल्यावरही ती पूर्ण होईपर्यंत तो झोपत नाही. प.पू. बाबांचे भार्या म्हणे सुदाम्यासी &।, हे भजन त्याला सर्वात अधिक आवडायचे. भजन संपत आले की, त्याला समजायचे आणि त्याला झोपवलेल्या झोळीतून हात काढून दुसरे लाव, असे सांगून तो भजने ऐकत झोपायचा.
१ आ. प.पू. गुरुदेव आणि पू. पेठेआजी यांच्या संभाषणाची क्लिप लावल्यावर पुष्कळ आनंद होणे : आमच्याकडे प.पू. गुरुदेव आणि पू. कै. पेठेआजी यांच्यातील संभाषणाची एक लहान क्लिप आहे. त्यात केवळ चित्र दिसते. थोडे समजायला लागल्यावर तो प्रतिदिन दूरचित्रवाणीवर ती क्लिप दिवसातून ७ - ८ वेळा पहात असे आणि आताही पहातो. ती लावल्यावर त्याला पुष्कळ आनंद होतो. बाबा आणि पू. आजी, असे म्हणून तो लगेच त्यांना नमस्कार करतो.

हिंदु राष्ट्र-स्थापनेत खारीचा वाटा उचलता येण्यासाठी श्रीकृष्णालाप्रार्थना करणारा सांगवी, पुणे येथील श्री. अवधूत लोणे (वय १८ वर्षे) !

     हे श्रीकृष्णा, तुझ्या कृपाशीर्वादामुळेच मला देवद आश्रमात येण्याची संधी मिळाली. त्याबद्दल मी तुझ्या चरणी कृतज्ञ आहे. ज्या ज्या साधकांसमवेत मी सेवा केली, त्या त्या साधकांकडून मला शिकायला मिळालेली सूत्रे नेहमीसाठी माझ्या लक्षात राहू देत. माझी व्यष्टी आणि समष्टी साधना तूच करवून घेणार आहेस, याची जाणीव सतत माझ्या मनात जागृत राहू दे. माझ्याकडून प्रत्येक सेवा भावपूर्ण आणि परिपूर्ण करवून घे. हिंदु राष्ट्र येण्यासाठी माझ्याकडून खारीचा वाटा असेल, ती सेवा तूच पूर्ण करवून घे, अशी तुझ्या चरणी प्रार्थना आहे. - श्री. अवधूत लोणे (वय १८ वर्षे), सांगवी, पुणे.(जुलै २०१५)

प.पू. डॉक्टरच कर्ते-करविते आहेत, हे जाणून त्यांच्या चरणी साधकाने वाहिलेली शब्दसुमनांजली !

प.पू. डॉक्टर,
कृतज्ञतापूर्वक नमस्कार !
       प.पू. डॉक्टर, आपल्याच कृपेमुळे स्तुतीस्वरूप कृतज्ञता व्यक्त करणार्‍या २ ध्वनीचित्रचकत्या बनवता आल्या. गुरुदेवा, साधक मला हे कसे सुचले ?, काय विचार केला ?, असे विचारतात. देवा, आपल्या इच्छेविना झाडाचे पानही हलत नाही. गुरुराया, मला ध्वनीचित्रचकत्या ही माया आहे. यातील केवळ तुम्हीच अंतिम सत्य आहात, याची कल्पना आहे.
       साधकांना मी भावपूर्णरित्या या ध्वनीचित्रचकत्या बनवल्या; म्हणून त्या पहातांना त्यांची भावजागृती होते, असे वाटते. व्यवहारात एखाद्या चित्रपटाची निर्मिती झाल्यावर त्यातील नायकाला पहाण्यासाठी लोकांची गर्दी होते. त्या चित्रपटाची संहिता लिहिणारा आणि त्याचे दिग्दर्शन करणारा यांना कोणीही ओळखत नाही. प.पू. डॉक्टर, तुम्हाला किंवा संतांना या ध्वनीचित्रचकत्यांतून वगळले, तर त्यातील अन्य (शुष्क) शब्दांना काय अर्थ आहे ? त्या कोणीही पहाणार नाहीत. केवळ आपण आहात; म्हणून त्यांना अर्थ आहे.

१५ वर्षांपासून वैद्यकीय उपचार करूनही हातावरील चट्टे न जाणे आणि गोअर्क अन् कापूर एकत्रित करून हाताला लावल्यावर हातावरील चट्टे पूर्णपणे जाणे

       मी माझ्याकडे येऊन सनातनचे सात्त्विक साहित्य घेऊन जाणार्‍यांना नमस्कार करत असे; परंतु आता सात्त्विक साहित्याची उपयुक्तता अनुभवायला आल्यामुळे येणार्‍या व्यक्तीच मला नमस्कार करतात. जळगाव येथील एका गृहस्थांच्या हाताला भाजल्याप्रमाणे चट्टे पडलेले दिसले; म्हणून मी त्यांना त्याविषयी विचारले. ते म्हणाले, गेल्या १५ वर्षांपासून यावर डॉक्टरांचे उपाय चालू आहेत, तरी काहीच फरक पडला नाही. तुमच्याकडे काही औषध आहे का ? मी त्यांना म्हटले, माझ्याकडे काही औषध नाही; पण तुम्ही गोअर्क आणि कापूर एकत्रित करून हाताला लावून पहा. शक्य असल्यास गोमूत्र १ चमचा पोटातही घेऊ शकता ! नंतर त्यांनी गोअर्क आणि कापूर एकत्र करून १ मास हाताला लावले आणि आश्‍चर्य म्हणजे देवाच्या कृपेने त्यांच्या हातावरील चट्टे पूर्णपणे गेले. 
       (हा साधकाचा वैयक्तिक अनुभव आहे. तो सरसकट सर्वांना येईलच, असे नाही. - संपादक) 
- श्री. लक्ष्मण शिंदे, जळगाव (७.५.२०१६) 

६० आणि ७० टक्क्यांच्या पुढील आध्यात्मिक पातळी गाठलेल्या साधकांनी आणि त्यांच्या कुटुंबियांनी पुढील माहिती पाठवून संशोधनाला साहाय्य करावे !

१. कोणत्या वर्षी साधनेला आरंभ झाला ?
२. लहानपणापासून साधनेची आवड होती का ?
३. ते लहानपणापासून सात्त्विक होते का ?
४. त्यांनी साधनेसाठी लहानपणी काय प्रयत्न केले ?
५. घरचे वातावरण साधनेला पूरक होते का ?
६. लहानपणी किंवा आतापर्यंतच्या साधनाप्रवासामध्ये प्रत्यक्ष देवाने त्याच्या अस्तित्वाची जाणीव करून दिली आहे, अशा अनुभूती, घटना अथवा अनुभव आहेत का ? 

देवाला रिटायर करा, (सेवानिवृत्त करा) असे म्हणणारे सनातन संस्थेवर कायमची बंदी घाला, असे म्हणतात, यात आश्‍चर्य ते काय ?

       सनातन संस्थेची वाटचाल इस्लामी अतिरेकी संघटनांच्या मार्गाने होत असून लवकरच त्याला आवर घालणे आवश्यक आहे; अन्यथा भारतातही पाकिस्तानसारखी परिस्थिती उद्भवू शकते. अतिरेकी कारवाया करत असलेल्या सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती आणि त्यांच्याशी संलग्न संस्था यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, तसेच त्यांच्यावर कायमस्वरूपी बंदी घालावी, अशी मागणी अधिवक्ता विकास शिंदे आणि अन्य हिंदुत्वविरोधी अधिवक्त्यांनी नुकतीच केली आहे.
       राष्ट्र आणि धर्म यांच्या उद्धारासाठी झटणार्‍या आणि हिंदु राष्ट्राच्या म्हणजेच आदर्श राज्य उभारणीच्या दिशेने सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांचा वारू भरधाव वेगाने निघाला आहे. हिंदु धर्माचे विरोधक असणार्‍यांना त्यामुळे धडकी भरली असून विवेकाच्या गोष्टी करणार्‍यांकडून विवेकबुद्धी गहाण ठेवून सनातन संस्थेवरील कोणताही आरोप सिद्ध झालेला नसतांना संस्थेवर बंदी घालण्याची असंविधानिक आणि अविवेकी मागणी केली जात आहे. पूर्वग्रहातून समाजमन कलुषित करण्याचे उद्योग करण्यापेक्षा अशा मंडळींनी सनातन धर्माची तत्त्वे जिज्ञासेने जाणून घेण्याचा विवेक दाखवल्यास त्यांचा भ्रम आपोआपच दूर होईल !

शास्त्रशुद्ध पद्धतीने पौरोहित्य करण्यासह आध्यात्मिक प्रगतीसाठी मार्गदर्शन करणार्‍या सनातन साधक-पुरोहित पाठशाळेत पूर्णवेळ प्रवेश घेण्यासाठी संपर्क करावा !

पौरोहित्याचे शिक्षण घेण्यास इच्छुक साधकांना सूचना आणि वाचक, 
हितचिंतक अन् धर्मप्रेमी यांना नम्र विनंती !
१. साधना म्हणून वेदाध्ययन करण्यास शिकवणारी सनातनची वेदपाठशाळा !
      धर्माचरणी समाज घडवण्यासाठी सनातन संस्थेने आरंभलेला शुद्धीयज्ञ म्हणजे सनातन साधक-पुरोहित पाठशाळा ! बहुमूल्य सांस्कृतिक ठेवा असणारे वेदशिक्षण घेता घेता पुरोहितांची सर्वांगीण आध्यात्मिक उन्नतीही व्हावी, यासाठी या पाठशाळेत प्रामुख्याने प्रयत्न केले जातात. अर्थार्जनासाठी नव्हे, तर साधना म्हणून शास्त्रशुद्ध पद्धतीने पौरोहित्य करण्यास शिकवणारी ही एकमेव पाठशाळा आहे.

फलक प्रसिद्धीकरता

कारागृहातील निरपराध 
हिंदुत्वनिष्ठांंच्या संदर्भातही अशी मागणी करा !
       इसिसच्या संपर्कात असलेल्या आरोपावरून आतंकवादविरोधी पथक मोठ्या प्रमाणात मुसलमान तरुणांना अटक करत असून पथकाचे अधिकारी त्यांच्यावर अत्याचार करत आहेत, त्यामुळे सरकारने या पथकाच्या कारवाईची स्वतंत्रपणे चौकशी करावी, अशी मागणी शरद पवार यांनी केली.

हिंदू तेजा जाग रे !

Jago ! : Musalman aropiyonko karagar me dalnewale atank virodhi dalki janch karai jaye ! - Sharad Pawar 
Pawar aisi mang nirparadh hinduonke liye kue nahi karte ?
जागो ! : मुसलमान आरोपियों को कारागारमें डालनेवाले आतंकवाद विरोधी दलकी जांच कराई जाए ! - शरद पवार
पवार ऐसी मांग निरपराध हिंन्दुआें के लिए क्यों नहीं करते ?
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥
या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो. - प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

बोधचित्र

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले

     'कलियुगांतर्गत कलियुग म्हातारे झाले आहे. आता ते नष्ट होऊन कलियुगांतर्गत सत्ययुग येणार आहे, म्हणजेच हिंदु राष्ट्र स्थापन होणार आहे.' 
 - (परात्पर गुरु) डॉ. आठवले परात्पर गुरु डॉ. आठवले

॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज
सनातनचे श्रद्धास्थान
देवाकडे ऐहिक सुख मागू नये
      मुलाने विष मागितले, तरी आई आणि डॉक्टर त्याला विष देत नाहीत. तसेच देवही ऐहिक सुख देत नाही; कारण त्याला ठाऊक असते की, हे त्याला पेलवणार नाही. म्हणून देवाकडे भीक (ऐहिक सुख) मागण्यात अर्थ नाही.
भावार्थ :
देव, म्हणजे गुरु, हे देवापासून दूर नेणारे ऐहिक सुख देत नाहीत. देवापासून दूर जाणे हे साधकाच्या दृष्टीने मरणच होय; म्हणून ऐहिक सुख हे विषासमान मानले आहे.
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.)

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

प्रत्येक कृती परमेश्‍वरी कार्य म्हणून करा !
जे काम कराल, ते श्रद्धेने, सचोटीने, शुद्ध मनाने आणि परमेश्‍वरी कार्य म्हणून करा, 
म्हणजे ईश्‍वर आपल्यापासून फार दूर नाही.
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

समाजाची संवेदनशून्यता आणि त्यावरील उपाय !

संपादकीय 
      जगात अनेक संस्कृती विकसित झाल्या आणि लोपही पावल्या; मात्र या सर्वांमध्ये टिकून राहिली, ती भारतीय किंवा हिंदु संस्कृती. या संस्कृतीचा केंद्रबिंदू होता तो उच्चतम मूल्ये जोपासणारा समाज. आज मात्र भारतीय समाजाचे झपाट्याने अधःपतन होत चालले आहे. अलीकडेच मध्यप्रदेशमध्ये अत्यवस्थ असलेल्या महिलेचा खाजगी बसमध्येच दुर्दैवी अंत झाल्यावर बसचालकाने भरपावसात पतीला पत्नीच्या मृतदेहासकट खाली उतरवले. काही दिवसांपूर्वी ओडिशामध्ये पैशांअभावी रुग्णवाहिकेची सोय न झाल्यामुळे पत्नीचा मृतदेह घेऊन गरिब पतीला १० किलोमीटर पायपीट करावी लागली. याविषयीची ध्वनीचित्रफीत वृत्तवाहिन्यांवर प्रसारित झाली. या गरीब व्यक्तीबरोबर तिची कन्याही होती. त्या दोघांच्याही तोंडवळ्यावर हतबलता, वेदना आणि आक्रोश स्पष्टपणे दिसत होता.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn