Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

कोटी कोटी प्रणाम !

स्वामी स्वरूपानंद (रत्नागिरी) यांची आज पुण्यतिथी

कोटी कोटी प्रणाम !

संत सेना महाराज यांची आज पुण्यतिथी

पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करा ! - पंतप्रधान मोदी

सनातन गेली अनेक वर्षे सांगत असलेले शास्त्र आता 
पंतप्रधानांनी सांगणे, ही सनातनच्या प्रबोधनाची प्रचीती !
पंतप्रधानांचे आवाहन !
  • चिकणमातीच्या मूर्ती बनवा !
  • प्लास्टर ऑफ पॅरीसच्या मूर्ती बनवणे टाळा !
     नवी देहली - गणेशोत्सव येत असून त्यानिमित्त लोकमान्य टिळकांची आठवण येते. गणेशोत्सव समाजाला एका धाग्यात बांधतो. सुराज्य ही आपली प्राथमिकता असून गणेशोत्सवाच्या माध्यमातून आपण हा संदेश देऊ. गणेशोत्सवात पर्यावरणाची काळजी घेऊन आपण प्लास्टर ऑफ पॅरीसची मूर्ती बनवण्याचे टाळले पाहिजे. पर्यावरणपूरक गणेशोत्सव आणि दुर्गापूजा करण्यावर भर दिला पाहिजे. आपण आपल्या जुन्या परंपरेनुसार चिकणमातीच्या मूर्ती का बनवत नाही ? मातीच्या मूर्तींमुळे पर्यावरणाचे रक्षण होईल. पर्यावरण आणि समुद्राची काळजी घेणे हीसुद्धा एक प्रकारची पूजाच आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २८ ऑगस्टला आकाशवाणीवरून केलेल्या मन की बात या त्यांच्या कार्यक्रमात केले. पंतप्रधान मोदी यांनी ऑलिंपिक, गणेशोत्सव, गंगा शुद्धीकरण आदी विषयांवर या वेळी मते मांडली.

जर मी पंतप्रधान झालो, तर देश इस्लाममुक्त करीन ! - गर्ट विल्डस, नेदरलॅण्डचे राजकीय नेते

  अ‍ॅमस्टरडॅम - मार्च २०१७ मध्ये होणार्‍या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर नेदरलॅण्डमधील डच फ्रीडम पार्टीचे नेते गर्ट विल्डर्स यांनी ऑनलाईन घोषणापत्र प्रसिद्ध केले आहे. यात त्यांनी नेदरलॅण्डला इस्लाममुक्त करण्याची घोषणा केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, मी पंतप्रधान झालो, तर लगेचच कुराणवर बंदी घालून सर्व मशिदींना टाळे ठोकीन.
     गर्ट पुढे म्हणाले की, पंतप्रधान बनवल्यावर मदरसे, इस्लामचा प्रचार करणारी केंद्रे आदी बंद करण्यात येतील; तसेच महिलांनी बुरखा वापरण्यावरही बंदी घालण्यात येईल. गर्ट यांच्या पक्षाने सिरीयातील शरणार्थी मुसलमानांच्या संदर्भातील सध्याच्या सरकारच्या धोरणाचा विरोध केला आहे. गर्ट यांनी म्हटले आहे की, आम्ही सिरीया आणि इराकमधून येणार्‍या शरणार्थींना सहन करणार नाही. सध्याच्या सर्वेक्षणात त्यांच्या पक्षाला यश मिळणार असल्याचे समोर आले आहे. यावरून पक्षाच्या इस्लामविरोधी भूमिकेला जनतेचे समर्थन असल्याचे म्हटले जात आहे. गर्ट यांनी कुराणची तुलना हिटलरच्या माय काम्फ या आत्मचरित्राशी केली आहे.

स्वयंपाक शिकवण्याआधी मुलींना स्वरक्षणाचे धडे द्या ! - अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा

जे एका अभिनेत्रीला वाटते, ते देशभरातील लोकप्रतिनिधींना का वाटत नाही ?
     मुंबई - लग्नानंतर दुसर्‍याच्या घरी जाणार; म्हणून अगदी लहानपणापासून मुलींना स्वयंपाक, शिवणकला आणि व्यावहारिकता यांचे धडे दिले जातात. आज स्त्रियांसमवेत ज्या घटना देशभरात घडत आहेत, ते पहाता त्यांना स्वसंरक्षणाचे धडे देणे जास्त आवश्यक असल्याचे मत अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा यांनी व्यक्त केले आहे. (महिलांना सुरक्षित जीवन जगता यावे, यासाठी गृह विभाग आणि भाजप शासन कोणते प्रयत्न करणार आहे ? - संपादक)

पोलीस ठाण्यांतील न्यायालयांशी संबंधित दस्त (कागदपत्रे) टंकलिखित स्वरूपात उपलब्ध व्हावे !

स्वातंत्र्याच्या ६९ वर्षांनंतरही अशी मागणी करावी लागणे, हे शासनाला लज्जास्पद !
गचाळ हस्ताक्षराच्या सूत्रावरून हिंदु विधीज्ञ परिषदेची पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांकडे मागणी
     मुंबई - पोलीस ठाण्यांतील न्यायालयांशी संबंधित दस्त (कागदपत्रे) टंकलिखित स्वरूपात उपलब्ध होण्याविषयी हिंदु विधीज्ञ परिषदेने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि पोलीस महासंचालक यांना पत्र लिहिले आहे.
     न्यायालयात सादर केल्या जाणार्‍या आरोपपत्रांतील पंचनामे, साक्षीदारांचे किंवा आरोपींचे जबाब, तपासाचे टीपण या गोेष्टी बहुदा हस्तलिखित स्वरूपात असतात. हे जबाब किंवा टीपण लिहिणार्‍यांचे अक्षर इतके गचाळ असते की, ते ४-५ वर्षांनी तेच तपास अधिकारी आणि साक्षीदार यांनाही वाचता येत नाही.
     अनेक वेळा अधिवक्ते आणि न्यायाधीश यांनाही त्याचा अर्थ लागत नाही. परिणामी न्यायालयाचा वेळ वाया जातो. अर्थबोध नीट न झाल्याने वाक्यांचा अर्थ पालटू शकतो आणि त्याचा परिणाम म्हणून एखाद्या निरपराध्याला शिक्षा होऊ शकते किंवा खरा अपराधी सुटू शकतो. देशाच्या स्वातंत्र्याच्या ६९ वर्षांहून अधिक कालावधीनंतरही न्यायालयाशी संबंधीत दस्तऐवज गचाळ अक्षरांत असणे, ही महाराष्ट्राला लाजिरवाणी बाब आहे. त्यामुळे न्यायालयांशी संंबंधीत दस्त टंकलिखित स्वरूपात उपलब्ध करण्याची आवश्यकता असल्याचे हिंदु विधीज्ञ परिषदेने तिच्या पत्रात म्हटले आहे. त्याचप्रमाणे प्रचलित पद्धतीतील काही हस्तलिखितांचे नमुनेही या पत्रासमवेत हिंदु विधीज्ञ परिषदेने जोडले आहेत.

बाबरी वाचवण्यासाठीच कारसेवकांना ठार केले ! - (मुल्ला) मुलायमसिंह यादव यांची स्वीकृती

  • काश्मीर वाचवण्यासाठी देशद्रोही मुसलमान दंगलखोरांना ठार करा, असे (मुल्ला) मुलायमसिंह कधीच बोलत नाहीत, हे लक्षात घ्या !
  • देश वाचवण्यासाठी अटकेतील जिहादी आतंकवाद्यांना फाशी द्या, असेही मुलायमसिंह कधीही म्हणत नाहीत !
  • मनुष्यापेक्षा गाय महत्त्वाची आहे का, असे म्हणत दादरी प्रकरणावर ऊर बडवणारे आता कारसेवकांच्या प्राणापेक्षा बाबरी मशीद मोठी होती का ?, असे का म्हणत नाहीत ?
      लक्ष्मणपुरी - बाबरी वाचवण्यासाठीच कारसेवकांवर गोळ्या झाडण्याचा आदेश दिला होता. मशीद वाचवण्यासाठी काही केले नसते, तर मुसलमानांचा देशावरील विश्‍वास उडाला असता. (ज्या मुसलमानांसाठी कारसेवकांना ठार केले, त्यांनी देशावर विश्‍वास दाखवल्याचे मुलायमसिंह यादव पुरावे देऊ शकतात का ? ज्या कारसेवकांना ठार मारले, त्यांच्या कुटुंबियांवर ओढवलेल्या आपत्तीचे दायित्व मुलायमसिंहांनी घेतले आहे का ? - संपादक) त्यामुळे कितीही बळी गेले, तरी पर्वा नाही; परंतु मशीद वाचली पाहिजे, अशीच माझी भूमिका होती. या गोळीबारात १६ जण मरण पावले; पण देशाच्या एकतेसाठी ३० बळी गेले असते, तरी त्याची आपल्याला पर्वा नव्हती, अशी स्वीकृती समाजवादी पार्टीचे अध्यक्ष (मुल्ला) मुलायमसिंह यादव यांनी दिली.

काश्मीरमध्ये दगडफेक करणार्‍यांना गोळ्याच घातल्या पाहिजेत ! - डॉ. तोगाडिया

     बरेली (उत्तरप्रदेश) - कश्मीरमध्ये दगडफेक करणार्‍यांना रबरी गोळ्यांनी नाही, तर लोखंडी गोळ्यांनीच मारले पाहिजे. जे पाकचे समर्थन करतात, त्याचे झेंडे फडकवतात त्यांना पाकमध्ये पाठवून दिले पाहिजे, असे आवाहन विश्‍व हिंदु परिषदेचे नेते डॉ. प्रवीण तोगाडिया यांनी येथे केले. डॉ. तोगाडिया पुढे म्हणाले की, जर अशीच स्थिती राहिली, तर आज काश्मीरमध्ये सैनिकांवर दगड फेकणारे उद्या बरेली आणि लक्ष्मणपुरी अशा शहरांकडेही दगडफेक करतील.

पुरोगाम्यांच्या दबावापोटी सनातन संस्थेवर बंदी न घालण्याची शासनाकडे मागणी

  • राजापूर पंचायत समिती आणि विविध ग्रामपंचायती यांचे ठराव : विविध मंदिर व्यवस्थापन, संघटना आणि नगरसेवक यांची शासनाला पत्रे
  • सनातनच्या पाठीशी ठामपणे उभे रहाणार्‍या सर्व धर्मप्रेमींचे आभार !
       रत्नागिरी, २८ ऑगस्ट (वार्ता.) - समाजसाहाय्य, राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती यांविषयी प्रबोधन व्हावे, तसेच चारित्र्यसंपन्न पिढी घडवून समाजात समृद्धी नांदावी, या उदात्त हेतूंनी सनातन संस्था कार्यरत आहे.सनातनचे हे कार्य थांबवण्यासाठीच हिंदुविरोधी संघटना आणि पुरोगामी हे पुरोगाम्यांच्या हत्यांच्या प्रकरणांत सनातनला गोवून सनातनवर बंदी आणण्याची मागणी करत आहेत. हे हिंदुविरोधी षड्यंत्र हाणून पाडावे आणि सनातनवर बंदी आणू नये, अशा आशयाचे ठराव राजापूर पंचायत समिती आणि विविध ग्रामपंचायती यांनी केले आहेत, तसेच विविध मंदिरे, संघटना, नगरसेवक यांनी शासनाला तशी पत्रे पाठवली आहेत.

कमलेश तिवारी यांचे शिर उडवणार्‍यास ५१ लक्ष रुपयांचे पारितोषिक घोषित करणारे मौलाना अनवार उल् हक यांच्यावर महिलेचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप

हिंदु संतांवर कथित आरोप झाल्यानंतर त्यांच्याविरोधात आक्रमकपणे अपप्रचार करणारी 
प्रसारमाध्यमे मौलानाच्या विरोधात साधे वृत्तही दाखवायचे धाडस का दाखवत नाहीत ?
      बिजनौर (उत्तरप्रदेश) - पैंगंबर यांच्याविषयी कथित टीपणी केल्यासंबंधी हिंदु महासभेचे नेते कमलेश तिवारी यांचे शिर उडवणार्‍यास ५१ लक्ष रुपयांचे पारितोषिक घोषित करणारे जामा मशिदीचे इमाम मौलाना अनवार उल् हक यांनी एका महिलेचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी गुन्हा प्रविष्ट करण्यात आला आहे. या संदर्भात मौलानाची आक्षेपार्ह ध्वनीचित्रफीतही सार्वजनिक झाली आहे. पीडीत महिलेच्या पतीने सांगितले की, काही दिवसांपूर्वी त्याची पत्नी आजारी होती. तिचा आजार बरा झाला नाही. त्यानंतर मौलाना अनवर हक यांनी तिला भूतबाधा झाल्याचे सांगितले, तसेच उपचारासाठी किलअर शरीफ येथे चलण्यास सांगितले होते.

आतंकवादी बुरहान वानीच्या वडिलांनी घेतली श्री श्री रविशंकर यांची भेट !

     नवी देहली - ठार झालेला जिहादी आतंकवादी बुरहान वानी याचे वडील मुझफ्फर वानी यांनी बेंगळुरू येथे आर्ट ऑफ लिव्हिंगचे संस्थापक श्री श्री रविशंकर यांची भेट घेतली. काश्मीरमध्ये पुन्हा शांतता निर्माण होण्यासाठी काय करता येईल, या अनुषंगाने वानी यांनी भेट घेतली.

देशात खरोखरच अच्छे दिन आले आहेत काय ? - खासदार संजय राऊत, शिवसेना

     अमरावती - महागाई वाढत असून सर्वसामान्यांचे जगणे कठीण होऊन बसले आहे. देशात खरोखरच अच्छे दिन आले आहेत का ? काश्मीरमध्ये गेल्या ४५ दिवसांपासून संचारबंदी चालू आहे. सैनिकांवर आक्रमणेे होत आहेत. त्यावर सत्तेत असूनही आम्हीच बोलतो. हे राष्ट्रभक्तीचे धैर्य उद्योगपतींच्या पैशाने विकत घेता येत नाही, अशी टीका शिवसेनेचे खासदार श्री. संजय राऊत यांनी भाजपवर केली. अमरावती येथे शिवसेना कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात २८ ऑगस्ट या दिवशी श्री. राऊत बोलत होते.

ढाका येथील आतंकवादी आक्रमणातील ४ जिहादी आतंकवादी चकमकीत ठार !

      ढाका - जुलै महिन्यात येथील एका कॅफेवर झालेल्या जिहादी आतंकवाद्यांच्या आक्रमणातील मुख्य सूत्रधार तमीम अहमद आणि अन्य ३ आतंकवाद्यांना पोलिसांनी ठार केले. कॅफेवरील आक्रमणात २२ जण ठार झाले होते. यात एका भारतीय युवतीचाही समावेश होता. ढाका शहरातील कल्याणपूर भागात केलेल्या छापेमारीच्या वेळी पोलिसांना तमीमचे पुरावे हाती लागले होते. जमात उल मुजाहिदीन बांगलादेश संघटनेचा प्रमुख असलेल्या तमीमला शोधण्यासाठी पोलिसांनी खास पथकेही स्थापन केली होती. अखेर २७ ऑगस्टला सकाळी पोलिसांनी ही कारवाई केली. तमीम बांगलादेशी वंशाचा कॅनडाचा नागरिक होता.

केरळमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यावर आक्रमण

केरळमध्ये हिंदुत्वनिष्ठ पक्षाचे कार्यकर्ते असुरक्षित !
       कन्नूर (केरळ) - येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मंडल कार्यवाह सुजयन यांच्यावर ३० लोकांनी प्राणघातक आक्रमण केले. सुजयन यांना गंभीर घायाळ अवस्थेत कन्नूरच्या थालासरी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या आक्रमणात ५ लोक घायाळ झाले आहेत. स्थानिक वृत्तानुसार मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि संघ यांच्या कार्यकर्त्यांमध्ये २४ ऑगस्टला गोकुळाष्टमीच्या महोत्सवावरून वाद झाला होता.त्यानंतर झालेल्या हिंसाचारात ३ संघाचे कार्यकर्ते आणि कम्युनिस्ट पक्षाचे २ कार्यकर्ते घायाळ झाले होते.त्यानंतर रात्रीच कम्युनिस्टचे शाखा सचिव सुरेश यांच्यावर काही लोकांनी आक्रमण केले होते. त्याच्या दुसर्‍या दिवशीच सुजयन यांच्यावर आक्रमण करण्यात आले.

पतीला पत्नीच्या मृतदेहासह बसमधून खाली उतरवले !

कधीकाळी सुसंस्कृतपणासाठी प्रसिद्ध असलेला भारत सध्या माणुसकीही विसरला आहे. त्यामुळे 
त्याचे माणूसपण जागृत करण्यासाठी त्याला केवळ विकासाची नाही, तर धर्मशिक्षणाची आवश्यकता आहे !
मध्यप्रदेशातील माणुसकीला लाजवणारी घटना
      भोपाळ - ओडिशामध्ये रुग्णवाहिका न पुरवल्यामुळे एका पतीला त्याच्या पत्नीचे शव खांद्यावर घेऊन १२ किमी पायपीट करण्याची घटना ताजी असतांनाच मध्यप्रदेशमधील घोघरा येथे एका खाजगी बसचालकाने पतीला त्याच्या पत्नीच्या मृतदेहासह भरपावसात बसच्या खाली उतरवले.
     घोगरा येथील रामसिंह यांच्या पत्नीची तब्येत बिघडल्यामुळे ते त्यांच्या पत्नीला एका खासगी बसमधून उपचारांसाठी रुग्णालयात घेऊन जात होते; मात्र प्रवासातच त्यांच्या पत्नीचा दुर्दैवी अंत झाला. यानंतर चालकाने रामसिंह यांना साहाय्य न करता त्यांना भर पावसात बसखाली उतरवले. काही वेळानंतर त्याच मार्गावरून जाणार्‍या दोन अधिवक्त्यांनी रामसिंग यांना साहाय्य केले. त्यांनी १०० क्रमांकावर दूरध्वनी करून पोलिसांना साहाय्य मागितले; मात्र पोलिसही केवळ चौकशी करून निघून गेले. त्यानंतर अधिवक्त्यांनीच रुग्णवाहिकेची व्यवस्था करून महिलेचा मृतदेह घरापर्यंत पोचवला.

शववाहिका न मिळाल्याने मृतदेहाचे तुकडे केले !

महासत्ता होण्याचा प्रयत्न करणार्‍या भारताची लाज काढणारी घटना !
     भुवनेश्‍वर (ओडिशा) - २५ ऑगस्टला ओडिशाच्या बालासोर जिल्ह्यात मृतदेह नेण्यासाठी शववाहिका न मिळाल्याने वृद्ध महिलेच्या मृतदेहाचे तुकडे केल्यानंतर गाठोड्यात बांधून ते खांद्यावरून नेण्यात आल्याची घटना समोर आली आहे.
   ८० वर्षीय सलमानी बेहरा या महिलेचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू झाला होता. मृतदेह रुग्णालयात पोचवण्यासाठी १ सहस्र रुपये खर्च करण्याची अनुमती असते; परंतु स्थानिक या कामासाठी ३ सहस्र ५०० रुपयांची मागणी करत होते. २ कर्मचारी काम करण्यास सिद्ध झाले होते. परंतु मृतदेह कडक झाल्यामुळे घटनास्थळावरून हलवणे शक्य नव्हते. यामुळे मृतदेहाचे तुकडे करून ते बाहेर काढण्यात आले.
    स्वतःच्या आईचा अशा पद्धतीचा मृतदेह पाहून मुलगा रविंद्र यांना धक्का बसला आहे. पोलीस आणि नागरिक यांच्यामध्ये माणुसकीच उरलेली नाही. रेल्वे पोलिसांविरोधात गुन्हा प्रविष्ट करणार आहे, असे रविंद्र यांनी सांगितले.

मोकाट गोधनासाठी पंजाब सरकार उभारणार गोशाळा !

गोशाळेसह सरकारने गोरक्षणासाठीही ठोस पावले उचलावीत, अशी हिंदूंची अपेक्षा आहे !
      चंदीगड - राज्यात रस्त्यांवर मोकाट भटकणार्‍या गोधनाचे पुनर्वसन करण्यासाठी पंजाबच्या भाजप-अकाली दल युतीच्या सरकारने राज्यातील सर्व २२ जिल्ह्यांमध्ये गोशाळांची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला आहे.याकरता सरकारने ४४ कोटी रुपयांचा निधी संमत केला आहे, अशी माहिती पंजाब गोसेवा आयोगाने दिली आहे. आयोगाचे अध्यक्ष कीमती लाल भगत म्हणाले, येत्या ३ मासांत गोशाळा उभारण्यात येणार आहेत.त्यानंतर मात्र राज्यातील रस्त्यांवरील मोकाट गोधनाला प्रतिबंध करण्यात येणार आहे.

इस्रोकडून स्क्रॅमजेट इंजिनची यशस्वी चाचणी !

     श्रीहरिकोटा (आंध्रप्रदेश) - भारतीय अवकाश संशोधन संस्था म्हणजेच इस्त्रोने २८ ऑगस्टच्या पहाटे आंध्रप्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अवकाश तळावर स्क्रॅमजेट इंजिनची यशस्वी चाचणी घेतली. स्क्रॅमजेट इंजिन वातावरणातील ऑक्सिजनच्या साहाय्याने इंजिनातील इंधन प्रज्वलित करते. पूणर्र्वापरायोग्य आर्एल्व्ही यानामध्ये स्क्रॅमजेट इंजिन उपयोगात आणता येईल, असे वैज्ञानिकांनी सांगितले. स्क्रॅमजेटमुळे प्रक्षेपण खर्च आणखी अल्प होणार आहे.

बलुचिस्तानच्या विधानसभेकडून भारताचा निषेध !

     इस्लामाबाद - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ ऑगस्टला बलुचिस्तानसंदर्भात केलेल्या विधानाचा पाकच्या बलुचिस्तान प्रांतामधील विधानसभेने एका ठरावाद्वारे निषेध केला आहे. याविषयी पाक सरकारने आंतरराष्ट्रीय पातळीवर पाठपुरावा करण्याची विनंती या ठरावाद्वारे करण्यात आली आहे. नवाझ शरीफ यांच्या मुस्लिम लीग (नवाझ) पक्षाचे नेते महंमद खान लेहरी यांनी हा ठराव मांडला होता. विधानसभेमधील सर्व पक्षांनी या ठरावास अनुमोदन दिले. बलुचिस्तानमधील आतंकवादास भारताचेच उत्तेजन आहे, असे भारतीय पंतप्रधानांनी केलेल्या विधानावरून स्पष्टपणे दिसून येत आहे, असा आरोप या ठरावाच्या माध्यमातून करण्यात आला आहे. मोदी यांनी काश्मीरवरून जगाचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठीच हे विधान केले आहे, अशी टीका बलुचिस्तानचे गृहमंत्री सरफराझ बुगती यांनी केली आहे.

कृष्णा पुष्करम् पर्वात परिवहन मंडळानेे ३२ कोटी, तर रेल्वेने ४७ कोटी रुपयांचा महसूल कमावला !

पुष्करम् पर्वात सहभागी होणार्‍या भाविकांना कुठलीही सवलत न देता त्यांच्याकडून महसूल कमावणारे 
सरकार हज यात्रेकरूंना मात्र कोट्यवधी रुपयांचे अनुदान देते, हे लक्षात घ्या !
      विजयवाडा (आंध्रप्रदेश) - आंध्रप्रदेशात संपन्न झालेल्या १२ दिवसीय कृष्णा पुष्करम् पर्वाच्या कालावधीत भाविकांची वाहतूक करणार्‍या आंध्रप्रदेश परिवहन मंडळाने ३२ कोटी रुपयांचे, तर दक्षिण-मध्य रेल्वेने ४७ कोटी रुपयांचे महसुली उत्पन्न मिळवले आहे.
     कृष्णा पुष्करम् पर्वाच्या कालावधीत आंध्रप्रदेश परिवहन मंडळाने एकूण ९० लक्ष, तर दक्षिण-मध्य रेल्वेने ४२ लक्ष भाविकांची ने-आण केली. यासाठी परिवहन मंडळाने २५ सहस्र कर्मचार्‍यांची नियुक्ती केली होती.मंडळाच्या ९ सहस्र बसगाड्यांची व्यवस्था करण्यात आली होती. दक्षिण-मध्य रेल्वेने ६०० विशेष गाड्या सोडल्या होत्या. त्या विजयवाडा-विशाखापट्टणम्, विजयवाडा-भाग्यनगर आणि विजयवाडा-तिरुपती या मार्गावर चालवण्यात आल्या.

वेद आणि भारतीय तत्त्वज्ञानच जगाला शांतीचा मार्ग दाखवू शकतात ! - ग्रीस राजकन्या आयरीन

     एथेन्स (ग्रीस) - ५० वर्षांपूर्वी ग्रीस राजघराण्यातील सदस्यांनी कांची परमाचार्य प.पू. चंद्रशेखरेंद्र सरस्वती स्वामीगल यांची मचिलीपट्टणम् येथे भेट घेतली होती. हे कुटुंब ईश्‍वराच्या शोधार्थ साधक बनून येथे आले होते. त्यांचा आध्यात्मिक प्रवास उच्च कोटीचा होता. तेव्हापासून प्रतिवर्षी हे कुटुंब कांची मठामध्ये आयोजित केल्या जाणार्‍या कार्यक्रमात सहभागी होत आहे.
    लाल तपकिरी रंगाची साडी नेसलेल्या आणि कपाळावर कुंकू लावलेल्या राजकन्या आयरीन मागील आठवणींना उजाळा देतांना म्हणाल्या, ५० वर्षांपूर्वी मचिलीपट्टणम् येथे आम्ही परमाचार्यांची भेट घेतली होती. आंध्रप्रदेशला परत भेट देण्यास मला खूप आनंद होतो. भारतीय तत्त्वज्ञानी टीएम्पी महादेवन् यांच्यामुळे आम्हाला भारतीय तत्त्वज्ञानाचे श्रेष्ठत्व कळले. गेल्या ५० वर्षांपासून आमचे कुटुंब तत्त्वज्ञानावर परिषदा आणि बैठका यांचे आयोजन करत आहे. वेद आणि भारतीय तत्त्वज्ञानच जगाला शांतीचा मार्ग दाखवू शकते. वेद हे ज्ञानाचे खूप मोठे स्रोत आहेत. वेद हे प्रत्येकासाठी आहेत. वैदिक जीवनाचा अवलंब केल्यास जागतिक शांती प्रस्थापित होऊ शकते.
     पू. विजयेंद्र सरस्वती स्वामिगल यांनी सांगितले की, वेद म्हणजे प्रत्येक धर्माचे सार आहे. प्रत्येक नागरिकाने गोरक्षण केले पाहिजे.

सौदी अरेबियाकडून मूलतत्त्ववादी इस्लामचा प्रसार !

      रियाध - इस्लामचे मूलतत्त्ववादी अंग असलेला वहाबी हा सौदी अरेबियाचा अधिकृत धर्म आहे. सौदी अरेबियाकडून वहाबी पंथाचा जगभर प्रसार करण्याचा प्रयत्न असतो.
    डिसेंबर २०१५ मध्ये जर्मनीचे उपपंतप्रधान सिग्मार गाब्रियल यांनी सौदी अरेबिया युरोपमध्ये आतंकवाद्यांना पैसा पुरवत आहे, असा आरोप केला होता. वहाबी मशिदी उभारण्यासाठी सौदी अरेबिया निधी पुरवत आहे.तसेच मूलतत्त्ववादी इस्लामचा आतंकवादाशी संबंध आहे, असा आरोप त्यांनी केला होता. १८ व्या शतकाच्या मध्यास मुसलमान धर्मगुरु महंमद इब्न अल्-वहाब यांनी वहाबी पंथाची स्थापना केली. इस्लाममधील शिकवणीचे कठोरपणे पालन करणे; शरियत कायद्याची कडक अंमलबजावणी करणे, हे वहाबी पंथाचे मुख्य ध्येय आहे. नंतर त्यांनी तेथील स्थानिक राजा महंमद इब्न सौद यांच्या भागिदारीने सौदी साम्राज्याची स्थापना केली. सैनिकी आणि राजकीय सत्ता सौद यांच्याकडे गेली, तर धार्मिक क्षेत्रात अल-वहाब यांची सत्ता चालू लागली. २० व्या शतकात सौदी अरेबियाने आपल्या अमाप संपत्तीचा वापर करून जगभर वहाबी मशिदी उभारल्या. गेल्या पन्नास वर्षांत त्यांनी १ सहस्र ५०० वहाबी मशिदी उभारल्या. इसिस आणि अल्-कायदा यांसारख्या आतंकवादी संघटना वहाबी पंथ मानतात.

दूरदर्शनची देशातील १ सहस्र ७००, तर महाराष्ट्रातील १५० लघु प्रक्षेपण केंद्रे निरुपयोगी !

      मुंबई - दूरदर्शनची देशभरातील १७०० तसेच महाराष्ट्रातील १५० लघु प्रक्षेपण केंद्रांना आता कवडीचेही काम उरलेले नाही. खाजगी वाहिन्यांची वाढ, तसेच डिश टिव्ही आणि केबलचे जाळे खेडोपाडी पोचल्याने ही प्रक्षेपण केंद्रे निरुपयोगी झालेली आहेत.
   खाजगी वाहिन्यांचा झपाट्याने विस्तार झाल्याने दूरदर्शनच्या कार्यक्रमांचा प्रेक्षक या वाहिन्यांकडे वळला.दूरदर्शनचे राष्ट्र्रीय आणि सह्याद्रीसारख्या प्रादेशिक पातळीवरील वाहिन्यांवरील कार्यक्रमांना पाहणारे प्रेक्षक घटत गेले. आता सेटटॉप बॉक्स अनिवार्य करण्यात आले असून वर्षभरात प्रत्येक ग्राहकाकडे हे लागणे बंधनकारक झाल्यामुळे दूरदर्शनची प्रासंगिकता काय, असा प्रश्‍न उपस्थित होतो.
       देशभरातील १७०० प्रक्षेपण केंद्रांविषयीही तोच प्रश्‍न येतो. जिल्हा पातळीवर किमान ६-७ केंद्रे आहेत. ५०० व्हॅट क्षमतेच्या केंद्रांवर अभियंत्यासह किमान ५ कर्मचारी आहेत. त्यांचे वेतन, इमारतीचे भाडे अन् विद्युत शुल्काचा खर्च ३-४ लक्ष रुपयांच्या घरात जातो. महाराष्ट्रात या केंद्रांचा मासिक खर्च ४-५ कोटी रुपयांवर जात असल्याची अंदाजित आकडेवारी आहे. केंद्रे बंद केल्यावर अधिकारी-कर्मचारी यांचे काय, याचे उत्तर मिळालेले नाही. देशभरातील महानगरीय केंद्रात एवढ्या संख्येतील कर्मचार्‍यांचे समायोजन शक्य नाही.

फ्रान्समध्ये मुसलमान महिलांच्या बुर्किनी घालण्यावरील बंदी हटली !

फ्रान्समध्ये बुर्किनीला विरोध होताच त्याचे पडसाद जगभर उमटले; मात्र हिंदूंच्या धार्मिक 
स्वातंत्र्यावर आघात होतो, तेव्हा भारतातील हिंदू त्याचा निषेधही करत नाहीत !
      लंडन - फ्रान्सच्या वरिष्ठ न्यायालयाने मुसलमान महिलांच्या बुर्किनी (मुसलमान महिलांकडून पोहण्यासाठी वापरण्यात येणारा पोषाख) घालण्यावरील बंदी हटवली आहे. या वेळी न्यायालयाने, बुर्किनीवर बंदी घालणे, हेे व्यक्ति स्वातंत्र्य, विचार स्वातंत्र्य आणि संचार स्वातंत्र्य या अधिकारांचे उल्लंघन असून अवैध आहे, असे स्पष्ट केले. फ्रान्समधील ३० हून अधिक शहरांमध्ये बुर्किनी घालण्यावर बंदी घालण्यात आली होती.
         अलिकडे फ्रान्सच्या नीस शहरात समुद्र किनार्‍यावर एका मुसलमान महिलेची बुर्किनी उतरवण्यात आली होती.या पार्श्‍वभूमीवर बुर्किनी बंदीच्या विरोधात जगभरातून टीका करण्यात येत होती. पश्‍चिम लंडनच्या नाईट्सब्रिज भागात फ्रान्सच्या दुतावासासमोर नुकतेच एका बीच मेजवानीचे आयोजन करण्यात आले होते. या मेजवानीत महिलांनी बिकिनी आणि बुर्किनी परिधान करून नीस येथील घटनेचा निषेध नोंदवला होता.
बुर्कीनी इस्लामच्या कट्टरतेला दर्शवते ! - फ्रान्सचे माजी राष्ट्रपती सरकोजी
       फ्रान्सचे माजी राष्ट्रपती सरकोजी म्हणाले की, बुर्कीनी इस्लामच्या कट्टरतेला दर्शवत आहे. आम्ही महिलांना कपड्यांमध्ये बांधून ठेवत नाही.

हाजी अली ट्रस्टला सर्वोच्च न्यायालयात साहाय्य करणार - शबरीमलाचे पुजारी

      थिरुवनंतपुरम् - मुंबईतील हाजी अली दर्ग्यामध्ये महिलांना प्रवेश करण्यास अनुमती देणार्‍या मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यासाठी हाजी अली ट्रस्टला साहाय्य करणार आहे,असे शबरीमला मंदिराच्या पुजार्‍याने सांगितले. हाजी अली दर्ग्यामध्ये महिलांना प्रवेश करण्यास अनुमती देणारा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने नुकताच दिला होता.
      मुंबई न्यायालयाच्या या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याचा निर्णय हाजी अली ट्रस्टने घेतला आहे. हाजी अली ट्रस्टला या कामी साहाय्य केले जाईल, असे शबरीमला मंदिराचे पुजारी राहुल ईश्‍वर यांनी सांगितले. धर्मस्वातंत्र्यामध्ये हस्तक्षेप करतांना कुणीच लक्ष्मण रेषा ओलांडू नये, असे श्री. ईश्‍वर यांनी सांगितले.

दाऊद इब्राहिम याला आमच्या कह्यात द्या ! - भारताची पाककडे मागणी

पाक दाऊदला भारताच्या कह्यात देणार नाही, हे तितकेच खरे !
     नवी देहली - संयुक्त राष्ट्रसंघाने जागतिक आतंकवादी म्हणून घोषित केलेल्या दाऊद इब्राहिमला भारताच्या कह्यात देण्याच्या मागणीचा भारताने पुनरुच्चार केला आहे. संयुक्त राष्ट्रसंघाने दाऊद पाकमध्येच रहात असल्याचे घोषित केले होते. त्यावर भारताने ही मागणी केली होती. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरूप यांनी म्हटले की, दाऊद आपल्या देशात नसल्याचे किमान आता तरी पाकने सांगू नयेे.

पतंजली पूजा साहित्यात गुंतवणार ८ सहस्र कोटी रुपये !

      नवी देहली - पतंजलीने धार्मिक पूजेसाठी लागणार्‍या वस्तूंच्या उत्पादन क्षेत्रात ८ सहस्र कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. उदबत्ती, धूप, दिवे यांसारख्या घरगुती पूजेसाठी लागणार्‍या वस्तूंना मोठी मागणी असते. हे लक्षात घेऊन पतंजली आस्था या ब्रॅण्ड अंतर्गत या वस्तूंचे उत्पादन करण्यात येणार आहे. पतंजलीचे व्यवस्थापकीय संचालक आचार्य बालकृष्ण म्हणाले, उदबत्ती किंवा धूप यांमध्ये रसायनांचा वापर केला जातो. त्यामुळे नैसर्गिक पद्धतीने सिद्ध झालेल्या उत्पादनांची आवश्यकता आहे. त्याकरता आम्ही हा ब्रॅण्ड निर्माण केला आहे.

चीनच्या गुआंग्झू शहरातील आंतरराष्ट्रीय बैठकीच्या पार्श्‍वभूमीवर पाक आणि अन्य ४ देशांच्या नागरिकांना त्या शहरात राहू देण्यास बंदी !

      बीजिंग - चीनच्या गुआंग्झू शहरातील वसतीगृहांत पाकिस्तान, अफगाणिस्तान, इराक, सिरिया आणि तुर्कस्थान या देशांच्या नागरिकांना राहू देण्यास पोलिसांनी बंदी घातली आहे. ही बंदी एक महिन्यासाठी घालण्यात आली आहे. येथे एका आंतरराष्ट्रीय बैठकीचे आयोजन करण्यात आल्याच्या पार्श्‍वभूमीवर ही बंदी घालण्यात आली आहे. ४ आणि ५ सप्टेंबर या दिवशी २० देशांचे नागरिक या बैठकीत सहभागी होणार आहेत. (चीनसारखी दूरदृष्टी भारतीय नेत्यांना कधी लागेल का ? आतंकवादाच्या धोक्यामुळे ही बंदी घालण्यात आल्याचे कोणीही म्हणू शकेल ! - संपादक)

ब्रिटनमधील विश्‍वविद्यालयामध्ये शरणार्थींना शिष्यवृत्ती देण्यात येणार !

शरणार्थींवर सुविधांची उधळपट्टी करतांना ते कृतघ्न होणार नाहीत, 
याची काळजी ब्रिटन घेणार आहे का ?
    लंडन - ब्रिटनच्या ब्रिस्टल विश्‍वविद्यालयाने सिरियातून आलेल्या शरणार्थी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याची सिद्धता दर्शवली आहे. तसेच शरणार्थी विद्यार्थ्यांसाठी विश्‍वविद्यालयातील प्रवेश प्रक्रिया सुलभ करण्यात आली आहे.
    ब्रिस्टल विश्‍वविद्यालयाचे कुलगुरु प्राध्यापक ह्युज ब्रॅडी यांनी सांगितले की, शरणार्थी विद्यार्थ्यांकडे स्थलांतर प्रमाणपत्र किंवा शैक्षणिक पात्रता यांविषयीची कागदपत्रे नसली, तरी त्यांना विश्‍वविद्यालयामध्ये प्रवेश दिला जाणार आहे. निर्वासित शिक्षणापासून वंचित राहू नयेत, यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे, असे ब्रॅडी यांनी सांगितले.

एका शहरातील गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांकडून सनातनच्या साधकाची चौकशी !

सनातनच्या साधकांच्या मागे पोलिसांचा ससेमिरा चालूच !
सनातनच्या निरपराध साधकांवर पाळत ठेवून त्यांची चौकशी करणार्‍या 
पोलिसांनी अशी पाळत आतंकवाद्यांवर ठेवली असती, तर आतंकवादी 
कारवाया थांबून देश आतंकवादमुक्त व्हायला साहाय्य झाले असते !
     एक साधक एका शहरातून आपल्या गावी जाण्यासाठी रेल्वेस्थानकावर आले होते. त्या वेळी तेथे एक पोलीस अधिकारी आले आणि त्यांनी आपले ओळखपत्र दाखवून मी गुन्हे शाखेकडून आलो आहे, असे सांगितले. त्यानंतर त्या पोलीस अधिकार्‍याने साधकाला कुठे जात आहेस ?, काय काम करतोस ?, इकडे कशासाठी आला होता ? आदी प्रश्‍न विचारले. या प्रश्‍नांवर साधकाने आवश्यक ती माहिती सांगितली. पोलीस अधिकार्‍याने साधकाची बॅगही तपासून पाहिली. साधक रेल्वेत जाऊन बसल्यावरही साध्या वेशातील दोन पोलीस आले आणि साधकाकडे पाहून गेले.हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सोलापूर येथे एकदिवसीय जिल्हास्तरीय हिंदु अधिवेशन !

डावीकडून सद्गुरु (कु.) स्वाती खाडये, दीपप्रज्वलन
करतांना पू. महंत मावजीनाथ महाराज, श्री. मनोज खाडये

        सोलापूर, २८ ऑगस्ट (वार्ता.) - भारत हिंदुबहुल देश असूनही देशात गोहत्या, मंदिर सरकारीकरण, लव्ह जिहाद, धर्मांतर आदी धर्मविरोधी घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. हे आघात रोखून हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी येथील हिंदु अधिवेशनाच्या माध्यमातून धर्माभिमानी हिंदू एकवटले. याच वेळी धर्मप्रेमाची साक्ष देणार्‍या धर्माभिमान्यांनी उत्स्फूर्तपणे घोषणा दिल्या.

समाजातील परिस्थिती पालटण्यासाठी हिंदूंनी संघटित होणे, ही काळाची आवश्यकता ! - ह.भ.प. रामदास महाराज क्षीरसागर

नगर येथे हिंदूसंघटन मेळाव्यात 
राष्ट्र-धर्म रक्षणार्थ हिंदूंची एकजूट !
       नगर, २८ ऑगस्ट (वार्ता.) - सध्याच्या सरकारची भूमिका दुटप्पी आहे. एकीकडे हज यात्रेला अनुदान द्यायचे आणि दुसरीकडे पंढरपूर, आळंदी येथे वारीसाठी जाणार्‍या वारकर्‍यांना साध्या मूलभूत सुविधाही मिळत नाही. समाजाला निःस्वार्थपणे धर्मशिक्षण देणार्‍या हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांमागे पोलीस चौकशीचा ससेमिरा लावला जातो. सरकारच्या अशा भूमिकेमुळे समाजात असमतोल निर्माण होतो. ही परिस्थिती पालटण्यासाठी हिंदूंनी जातीपातीत न अडकता संकुचित वृत्ती बाजूला सोडून संघटित होणे, ही काळाची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन ह.भ.प. रामदास महाराज क्षीरसागर यांनी केले. येथील सावेडी भागातील कोहिनूर मंगल कार्यालय येथे हिंदु जनजागृती समिती आयोजित हिंदूसंघटन मेळाव्यामध्ये ते मार्गदर्शन करत होते. हा मेळावा २७ ऑगस्ट या दिवशी पार पडला. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. मिलिंद धर्माधिकारी आणि हिंदु जनजागृती समितीप्रणीत रणरागिणी शाखेच्या कु. अश्‍विनी कुलकर्णी उपस्थित होत्या.

जैन मुनी तरुण सागर यांचा अवमान करणारे आपचे कार्यकर्ते आणि गायक विशाल ददलानी यांनी राजकारण सोडले !

       नवी देहली - जैन मुनी तरुण सागर यांच्यावर अवमानजनक ट्वीट करणारे गायक आणि आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते विशाल ददलानी यांच्यावर टीका झाल्याने त्यांनी क्षमा मागून राजकारण सोडण्याचा निर्णय घेतला. आम आदमी पक्षानेही त्यांच्यावर टीका केली आहे. हरियाणा विधानसभेत तरुण सागर यांचे प्रवचन झाल्यानंतर विशालने ट्विट करत म्हटले होते की, तुम्ही अशा (भाजपसारख्या) लोकांना मतदान केले आहे. अशी मुर्खासारखी परिस्थिती निर्माण होण्याला तुम्ही उत्तरदायी आहात.
       देहलीचे मंत्री सतेंद्र जैन यांनीही विशाल याने केलेल्या अवमानावरून क्षमायाचना केली आहे. देहलीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी जैन मुनी तरुण सागर यांच्या सन्मानात ट्विट केले.
       हरियाणाच्या पावसाळी अधिवेशनाच्या प्रारंभी भाजप सरकारने विधानसभेत जैन मुनी तरुण सागर यांच्या प्रवचनाचे आयोजन केले होते. राजकारणावर धर्माचा अंकुश हवा, असे सांगत जैन मुनी तरुण सागर यांनी धर्म, राजकारण, कन्या भ्रूण हत्या, पाकिस्तान आदी विषयांवर मार्गदर्शन केले. देशातील एखाद्या विधानसभेत अशा प्रकारे धर्मगुरूंना बोलवून मार्गदर्शन करण्याचा हा पहिलाच प्रयत्न होता.

विश्‍वाला वाचवण्यासाठी आणि विश्‍वात शांती निर्माण करण्यासाठी हिंदु राष्ट्र आवश्यक ! - अधिवक्ता श्री. ईश्‍वरप्रसाद खंडेलवाल, राष्ट्रीय अध्यक्ष, लष्कर-ए-हिंद

अधिवक्ता श्री. ईश्‍वरप्रसाद खंडेलवाल
पालघर येथे हिंदू गोवंश रक्षा समिती आणि हिंदु जनजागृती 
समिती आयोजित एकदिवसीय जिल्हास्तरीय हिंदू अधिवेशन
     नालासोपारा - हिंदु बांधव जोपर्यंत एकत्रित येत नाहीत, तोपर्यंत हिंदु राष्ट्र येणार नाही. या विश्‍वाला वाचवण्यासाठी आणि विश्‍वात शांती निर्माण करण्यासाठी हिंदु राष्ट्र्र आवश्यक आहे, असे प्रतिपादन लष्कर-ए-हिंदचे राष्ट्रीय अध्यक्ष अधिवक्ता श्री. ईश्‍वरप्रसाद खंडेलवाल यांनी केले. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या ध्येयपूर्तीसाठी हिंदू गोवंश रक्षा समिती आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने २८ ऑगस्ट या दिवशी नालासोपारा (प.) येथील महाकाली मंदिराच्या सभागृहात एकदिवसीय जिल्हास्तरीय हिंदू अधिवेशन पार पडले. अधिवेशाच्या उद्घाटन सोहळ्यात प्रमुख वक्ता म्हणून ते बोलत होते. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. प्रसाद वडके आणि सनातन संस्थेच्या प्रवक्त्या सौ. नयना भगत व्यासपिठावर उपस्थित होत्या.
     अधिवेशनाच्या प्रारंभी पुरोहित विजय जोशी यांनी शंखनाद आणि वेदमंत्रपठण केले. व्यासपिठावरील मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन होऊन अधिवेशनाला आरंभ झाला. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. योगेश शिर्के यांनी सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले यांचा संदेश अधिवेशनात वाचून दाखवला. या वेळी संतांचा सन्मान आणि वक्ते अन्य मान्यवर यांचा सत्कार करण्यात आला. अधिवेशनाला सनातनच्या संत सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर यांची वंदनीय उपस्थिती लाभली.

पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांच्या मार्गदर्शनात कोणताही अपप्रकार घडलेला नसतांना वृत्तपत्रांकडून व्याख्यान उधळले, अशी खोटी वृत्ते !

        मुंबई, २८ ऑगस्ट (वार्ता.) - श्रीशिवप्रतिष्ठानचे संस्थापक पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांचे २७ ऑगस्ट या दिवशी लोअर परळ येथील ना.म. जोशी मार्गावरील म्यु. सेकंडरी हायस्कूल येथे श्रीदुर्गामाता दौड आणि शिवचरित्र या विषयावर व्याख्यान आयोजित केले होते. व्याख्यान प्रारंभ होण्यापूर्वी स्वाभिमानी संघटनेच्या पाच महिलांनी गुरुजींनी मराठा आरक्षणावर बोलावे, असा आग्रह धरला. त्या वेळी उपस्थित असणार्‍या अन्य कार्यकर्त्यांनी हे राजकीय व्यासपीठ नाही, असे सांगून पोलिसांकरवी त्यांना बाहेर काढले. हा प्रकार झाल्यावर पू. गुरुजींचे पुढील व्याख्यान व्यवस्थित पार पडले. अशी घटना प्रत्यक्ष असतांना काही वृत्तपत्रांनी मात्र व्याख्यानात स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांचा गोंधळ, महिलांनी व्याख्यान रोखले, २५० कार्यकर्त्यांचा गोंधळ, अशी अत्यंत खोटी आणि वस्तुस्थितीचा विपर्यास करणारी वृत्ते प्रसारित केली.

आपण आपल्या देशाच्या इतिहासाविषयी जागरूक नाही ! - शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची खंत

ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. पांडुरंग 
बलकवडे यांना समर्थ पुणे पुरस्कार प्रदान
        पुणे, २८ ऑगस्ट - मी लंडन येथे अभ्यासासाठी गेलो असतांना एक पत्र पाठवायचे होते. तेव्हा त्या पत्राला तिकीट चिकटवतांना ब्रिटनच्या राणीचे असणारे तिकीट गडबडीत उलटे लागले. त्या वेळी तेथील कर्मचारी महाविद्यालयीन मुलीने मला तिकीट सरळ लावण्यास सांगितले. फ्रान्समध्ये एका संग्रहालयात ७०० वर्षांपूर्वी झालेल्या विजयी लढाईची तुटकी तलवार आजही तेथे जतन केलेली आहे. विदेशी नागरिक हे त्यांच्या राष्ट्राच्या इतिहासाविषयी जागरूक आहेत. त्या तुलनेत आपण आपल्या देशाच्या इतिहासाविषयी एवढे जागरूक नाही, अशी खंत महाराष्ट्र भूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी व्यक्त केली. समर्थ पुणे परिवाराच्या वतीने पहिला समर्थ पुणे पुरस्कार ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. पांडुरंग बलकवडे यांना शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी भाजप खासदार अनिल शिरोळे, संत साहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे, समर्थ परिवाराचे सुनील शितोळे आदी उपस्थित होते. या पुरस्काराचे स्वरूप रोख रक्कम, स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र, शाल आणि श्रीफळ असे आहे.

(म्हणे) पालिका शाळांमध्ये सूर्यनमस्कार घालण्याचे बंधन नको !

काँग्रेसच्या अल्पसंख्यांक सेलची मागणी
     मुंबई - मुंबई काँग्रेसच्या अल्पसंख्यांक सेलच्या शिष्टमंडळाने २७ ऑगस्ट या दिवशी राज्यपाल विद्यासागर राव यांची भेट घेऊन मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये सूर्यनमस्कार घालणे बंधनकारक न करण्याची मागणी केली. (स्वतःच्या जीवनाचे हित भारतीय जीवनपद्धतीत आहे, हेही न समजणार्‍या धर्मांध समाजाने भारतातून निघून जाणेच श्रेयस्कर नव्हे का ? - संपादक)      मुंबई महापालिकेला अशा प्रकारची सक्ती करण्याचा कोणताही अधिकार नाही. ही सक्ती म्हणजे एका धर्मातील परंपरा दुसर्‍या धर्मावर लादण्याचा प्रकार आहे. तसे झाल्यास सामाजिक सलोखा भंग पावेल आणि दोन धर्मांमध्ये तेढ वाढेल, असे शिष्टमंडळाने राज्यपालांना सांगितले. (ही एक प्रकारची धमकीच नव्हे का ? काँग्रेसच्या तत्कालीन राज्यकर्त्यांनी अल्पसंख्यांकांचे अतीलांगूलचालन केल्याने ते अशा प्रकारची उघड धमकी देऊ धजावत आहेत ! - संपादक)
१. या संदर्भातील सूचना नुकतीच संमत झाली असली, तरी मुंबईच्या पालिका शाळांमध्ये २६ जुलैपासूनच दैनंदिन परिपाठ म्हणून हा उपक्रम चालू करण्यात आला आहे. पालिकेच्या उर्दू माध्यमातील ४०० शाळांतील एक लाख विद्यार्थ्यांनाही सूर्यनमस्कार घालणे बंधनकारक आहे.

स्वराज्य संघटनेसह धर्माभिमानी हिंदूंनी केलेल्या विरोधामुळे मुजीब शेख मित्रमंडळ आयोजित दहीहंडी स्पर्धेला पोलिसांनी अनुमती नाकारली !

हिंदूंच्या सणांमध्ये सहभागी होत असल्याचे ढोंग करून स्वतःचा राजकीय स्वार्थ 
साधणार्‍या धर्मांधांना रोखणार्‍या हिंदूंचे अभिनंदन ! सर्वत्रच्या हिंदूंनी यातून बोध घ्यावा !
     सावंतवाडी - येथील मुजीब शेख मित्रमंडळाच्या वतीने सावंतवाडी शहरात २७ ऑगस्ट या दिवशी ५१ सहस्र रुपयांचे पारितोषिक लावून आयोजित केलेल्या दहीहंडी स्पर्धेला येथील स्वराज्य संघटनेसह धर्माभिमानी हिंदूंनी केलेल्या विरोधामुळे पोलिसांनी अनुमती नाकारली.
     ही दहीहंडी हिंदु धर्मानुसार नसून स्वतःच्या राजकीय स्वार्थापोटी आयोजित केली आहे. हिंदु धर्मातील सण, उत्सव तिथीनुसार साजरे केले जातात. कोणीही स्वतःच्या मनाप्रमाणे साजरे करत नाहीत. त्याला सहस्रो वर्षांची परंपरा लाभली आहे. त्यामुळे सण, उत्सव हे त्या त्या तिथीलाच साजरे झाले पाहिजेत. तसे कोणी करत नसेल, तर लाखो हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या जातील. त्यामुळे ही दहीहंडी होता कामा नये, अशी मागणी स्वराज्य संघटनेसह धर्माभिमानी हिंदूंनी सावंतवाडी पोलिसांकडे केली होती.
     या पार्श्‍वभूमीवर मुजीब शेख मित्रमंडळाच्या पदाधिकार्‍यांना पोलिसांनी पोलीस ठाण्यात बोलावून कायदा आणि सुव्यवस्थेच्या कारणामुळे अनुमती नाकारत असल्याचे सांगितले.

सार्वजनिक बांधकाम विभागातील भ्रष्टाचार खपवून घेणार नाही ! - चंद्रकांत पाटील

     पुणे - निकृष्ट काम करून जनतेच्या जिवाशी खेळू नका. चांगले काम करता येत नसेल, तर नोकरी सोडून इतरत्र काम करा. सार्वजनिक बांधकाम विभागातील भ्रष्टाचार आणि अकार्यक्षमता ही भयानक गुन्हेगारी आहे. यापुढे ती खपवून घेतली जाणार नाही, अशी चेतावणी सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांना दिली. (केवळ चेतावणी देण्यापेक्षा पाटील यांनी संबंधितांवर कठोर कारवाई करावी ! - संपादक) महाड दुर्घटनेच्या पार्श्‍वभूमीवर राज्यातील पुलांच्या सुरक्षिततेच्या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने कार्यकारी अभियंते आणि वरिष्ठ स्तरावरील अभियंत्यांसाठी येथे २५ ऑगस्ट या दिवशी राज्यस्तरीय कार्यशाळेचे आयोजन केले होते. त्याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. ते म्हणाले, खात्यातील अधिकारी आणि कर्मचार्‍यांनी केवळ नोकरी न करता अभियान म्हणून काम करण्याची आवश्यकता आहे.

कोल्हापूर येथे मूर्तीदान केलेल्या मूर्ती परत घेण्याची मूर्तीकारांची सिद्धता !

       कोल्हापूर, २८ ऑगस्ट (वार्ता.) - पंचगंगा नदी, इराणी खण येथे पाणी अल्प झाल्याने गणेशमूर्ती विसर्जनाचे पर्याय अल्प पडू लागले आहेत. मूर्तीची इतरत्र विसर्जनाची सोय न केल्याने सामाजिक संघटनांच्या मूर्तीदानाच्या हाकेला सार्वजनिक मंडळेही प्रतिसाद देत आहेत. त्यामुळे सार्वजनिक मंडळे धर्मशास्त्राच्या विरोधात कृती करून चुकीची प्रथा पाडत आहेत. मूर्ती विसर्जनानंतर काही वेळा मूर्ती विरघळत नाही, असे काही ज्येष्ठ मूर्तीकारांचे म्हणणे आहे. त्यामुळे याला पर्याय म्हणून शहरातील गणेश मूर्तीकारांनी विसर्जन मिरवणुकीनंतर मूर्ती परत घेण्याची सिद्धता दर्शवली आहे. पूर्वी काही मंडळांनी असा उपक्रम राबवलाही आहे. (धर्मशिक्षणाचा अभाव असल्याने अशा चुका मंडळांच्या कार्यकर्त्यांकडून होत आहेत. - संपादक)

पुणे येथे अवैधरित्या पिस्तुले विक्री करण्यासाठी आलेल्या परराज्यातील महिलेला अटक

असुरक्षित पुणे !
     पुणे - येथील लष्कर भागातील हॉटेल अरोरासमोर मध्यप्रदेशमधून आलेल्या जेनीबाई ताना बारेला या महिलेकडे ३ पिस्तुले आणि २१ जिवंत काडतुसे आढळली असून गुन्हे शाखेच्या पोलिसांनी तिला अटक केली आहे. एखाद्या महिलेकडून शस्त्र तस्करी उघड होण्याची ही पहिलीच वेळ असल्याची माहिती उपायुक्त पी. आर्. पाटील यांनी दिली. (या प्रकरणाच्या मुळाशी पोहोचून पोलीस तस्करीचे जाळे उद्ध्वस्त करणार का ? - संपादक) १. जेनीबाई बारेला मूळची मध्यप्रदेशातील असून तिचा मुलगाही अवैध शस्त्र निर्मितीच्याच व्यवसायामध्ये आहे. गेल्या वर्षभरापासून तिने पुण्यात ३ हून अधिक वेळा येऊन काही जणांना अवैधरित्या शस्त्रे विकलेली आहेत. (हे पुणे पोलीस आणि पोलीस प्रशासन यांचे अपयश नव्हे का ? - संपादक) त्यांचा शोध पोलीस घेत आहेत.
२. तिने मुंबई आणि नाशिक येथेही मोठ्या प्रमाणावर अवैध शस्त्रविक्री केली आहे. (याविषयी राज्य गुन्हे शाखा अनभिज्ञ कशी ? - संपादक)
३. यापूर्वी तिला अवैध शस्त्र तस्करीप्रकरणी शिक्षा झालेली असून ती काही काळ आग्रा कारागृहात होती.

लातूर येथे अवैधपणे गुटख्याची वाहतूक करणार्‍यास अटक

राज्यात गुटखाबंदी असतांनाही त्याची अवैध वाहतूक
 होणे, हे गुटखाबंदी कायद्याचा धाक नसल्याचेच लक्षण !
     लातूर - येथे अवैधरित्या गुटख्याची वाहतूक करणार्‍या भाग्यनगर येथील राजकुमार सुराजाराम मिना याला पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी ट्रकमधून २७ लक्ष ५४ सहस्र रकमेचा गुटखा शासनाधीन केला. येथील नांदेड रस्त्यावरील एका ढाब्यावर राजकुमार मिना याचा ट्रक थांबला असतांना पहार्‍यावरील पोलिसांनी त्याची सहज चौकशी केली. त्याने उडवाउडवीची उत्तरे दिल्याने पोलिसांनी ट्रकची तपासणी केली. ट्रकमध्ये ४० पोत्यांमध्ये गुटखा आढळून आल्याने पोलिसांनी वाहनासह गुटखाही शासनाधीन केला. (लातूर जिल्ह्यातून एवढ्या मोठ्या प्रमाणात गुटख्याची अवैध वाहतूक होत असतांना पोलिसांना त्याची माहिती कशी मिळत नाही ? - संपादक)

पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावरील नियम तोडणार्‍या वाहनांवर ड्रोनच्या माध्यमातून २४ घंटे लक्ष

     मुंबई - पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर लेनची शिस्त मोडणार्‍यांसह अतिवेगाने वाहने चालवणार्‍यांवर, चुकीच्या पद्धतीने ओव्हरटेक करणार्‍यांवर लक्ष ठेवण्यासाठी २४ घंटे ड्रोन तैनात ठेवण्यात येणार आहे. रस्ते विकास महामंडळ आणि आयआर्बीच्या वतीने महामार्गावर चार ठिकाणी ड्रोनच्या माध्यमातून लक्ष दिले जाईल. या पार्श्‍वभूमीवर २७ ऑगस्ट या दिवशी प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी लेनची शिस्त मोडणार्‍या अवजड वाहनांच्या विरोधात कारवाई करण्यात आली. खंडाळा घाट (बोरघाट), खोपोली एक्झिट ते फूडमॉल, कामशेत बोगदा ते उर्से टोकनाका परिसर, खालापूर टोलनाका ते पनवेल परिसर या परिसरात ड्रोन फिरणार आहेत. एक ड्रोन चार किलोमीटर अंतरावर दृष्टी ठेवण्यास सक्षम आहे.

प्रसारमाध्यमांनी अधिवक्ता आणि न्यायाधीश यांची नावे प्रकाशित करू नयेत !

चेन्नई उच्च न्यायालयाचे मत
       चेन्नई - प्रसारमाध्यमांनी कोणत्याही खटल्याचे वार्तांकन प्रसिद्ध करतांना खटल्याशी संबंधित अधिवक्ता आणि न्यायाधीश यांची नावे प्रकाशित करू नयेत, असे मत चेन्नई उच्च न्यायालयाने व्यक्त केले आहे. ६ दलित विद्यार्थ्यांविरुद्ध रचलेल्या खोट्या आरोपपत्राविषयीच्या एका खटल्यात निर्णय देतांना न्यायालयाने हे मत व्यक्त केले.
       न्यायालयाने म्हटले की, अधिवक्त्यांची नावे प्रकाशित केल्याने त्या अधिवक्त्यांचे अप्रत्यक्ष विज्ञापनच केल्यासारखे होते आणि त्यांच्या व्यावसायिक गुणवत्तेचा वापर अधिक अशील मिळवण्यासाठी होऊ शकतो. अधिवक्त्यांना त्यांचे प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष विज्ञापन करण्यास कायद्याने बंदी आहे. त्यासाठी प्रसारमाध्यमांनी खटल्यांचे वार्तांकन करतांना खटल्याशी संबंधित अधिवक्त्याचे नावे प्रकाशित करू नयेत. तसेच खटल्याची सुनावणी करणार्‍या न्यायाधिशांची नावेही प्रसारमाध्यमांनी अत्यंत आवश्यक असल्याव्यतिरिक्त प्रकाशित करू नयेत. केवळ उच्च न्यायालयाचे नावच प्रकाशित करावे. न्यायाधीश त्यांचे कर्तव्य निर्विकारपणे आणि स्वत:ची मते किंवा तत्त्वज्ञान आड येऊ न देता बजावत असतात.

फलक प्रसिद्धीकरता

जिहादी आतंकवाद्यांना गोळ्या घाला, असे मुलायमसिंह कधी म्हणतात का ?
     बाबरी वाचवण्यासाठीच कारसेवकांवर गोळ्या झाडण्याचा आदेश दिला होता. मशीद वाचवण्यासाठी काही केले नसते, तर मुसलमानांचा देशावरील विश्‍वास उडाला असता, अशी स्वीकृती समाजवादी पार्टीचे अध्यक्ष मुलायमसिंह यादव यांनी दिली.

हिंदू तेजा जाग रे !

Jago !
Babri bachane ke liye karsevkopar goliya chalai, aisa Mulayamsingh Yadav ne kaha.
     kya Mulayamsigh Atankwadiyopar bhi goliya chalane ki bat karenge ?
जागो !
बाबरी बचाने के लिए कारसेवकों पर गोलियां चलाई, ऐसा मुलायमसिंह यादव ने कहा ।
     क्या मुलायमसिंह आतंकवादियों पर भी गोलीयां चलाने की बात करेंगे ?

पनवेल महापालिकेविषयीची अधिकृत घोषणा ३१ ऑगस्टपर्यंत होण्याची शक्यता

      मुंबई - राज्यातील २७ वी महापालिका काही दिवसांतच अस्तित्वात येणार असून पनवेल महापालिकेविषयीची अधिकृत घोषणा ३१ ऑगस्टपर्यंत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. महापालिका क्षेत्रासाठी नियोजन आराखडा यंत्रणेचे दायित्व नव्या महापालिकेकडे असेल, कि हे काम सिडकोकडे सोपवले जाईल, याकडे सर्वांचे लक्ष आहे.
१. पनवेल नगरपालिका आणि परिसरातील तळोजा, खारघर, कामोठे, कळंबोली, बोनशेत, पळस्पे, नेवाळी आदी गावांचा समावेश करून रायगड जिल्ह्यातील पहिली पनवेल महापालिका स्थापन करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
२. अधिसूचनेनंतर नागरिकांकडून हरकती आणि सूचना मागवण्यात आल्या. या संदर्भातील कोकण विभागीय आयुक्तांचा अहवाल राज्य सरकारला मिळाला आहे.
३. मुख्यमंत्र्यांना महानगरपालिकेच्या प्रस्तावाला मे मासातच मान्यता दिली होती. त्यानुसार २०११ च्या जनगणनेनुसार पनवेल महापालिकेची लोकसंख्या पाच लक्ष ४५ सहस्र असली, तरी या महापालिका हद्दीतील लोकसंख्या आठ लक्षांच्या आसपास असेल.

कौशांबी (उत्तरप्रदेश) येथे प्रथम अखिल भारतीय ज्योतिष्य संमेलन संपन्न

        गाझियाबाद (उत्तरप्रदेश) - मॉ जगदंबा महाकाली डासनावाली का परिवार आणि एस्ट्रो ज्ञानम् रिसर्च सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने २८ ऑगस्ट या दिवशी कौशांबी येथील हॉटेल क्लार्क इन येथे प्रथम अखिल भारतीय ज्योतिष्य संमेलन पार पडले. या संमेलनामध्ये भारतातील सुप्रसिद्ध ज्योतिषाचार्य सहभागी झाले होते. या संमेलनाला केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह, यति नरसिंहानंद सरस्वतीजी महाराज, हिंदु स्वाभिमानच्या अध्यक्षा सौ. चेतना शर्मा, हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक पू. डॉ. चारुदत्त पिंगळे आदी संत आणि मान्यवर उपस्थित होते.
(सविस्तर वृत्त लवकरच प्रसिद्ध करत आहोत.)

मुंबईतील रिक्शा आणि टॅक्सी संघटनांचा २८ ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून संप

३१ ऑगस्टपासून बेस्टचाही संप
       मुंबई - ओला-उबर टॅक्सी यांच्या सेवेवर कडक निर्बंध घालावेत, या मागणीसाठी मुंबईतील रिक्शा आणि टॅक्सी संघटना २८ ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून टप्प्याटप्प्याने संपावर जाणार आहेत. मुंबईतील प्रमुख संघटनांसमवेत परिवहन मंत्र्यांच्या झालेल्या बैठकीत संपाचा निर्णय घेण्यात आला. ३१ ऑगस्टपासून बेस्टचे कर्मचारीही संपावर जाणार आहेत. त्यामुळे पुढील आठवडाभर मुंबईकरांना त्रास सोसावा लागण्याची शक्यता आहे.

कर्मसाफल्यासाठी आवश्यक घटक

कु. मधुरा भोसले
    कोणतेही कर्म यशस्वी किंवा अयशस्वी होण्यामागे कारणीभूत असणारी पंचसूत्रे (पाच घटक) येथे देत आहे.
१. उद्देश
      कर्माची निष्कामता आणि उद्देशाची शुद्धता हे कर्म सफल होण्यासाठी आवश्यक असते.
२. स्वरूप
      कर्म करत असतांना ते योग्य वेळी, योग्य ठिकाणी आणि योग्य पद्धतीने केले, तर ते यशस्वी होण्याची शक्यता अधिक असते.

उत्सवात निर्बंधांचे पालन हवेच !

      दहीहंडीविषयीच्या निर्णयात सर्वोच्च न्यायालय काही पालट करेल, या आशेने दहीहंडीच्या आदल्या दिवशी पर्यंत मुंबईच्या जय जवान गोविंदा पथकाने प्रयत्न केला; पण न्यायालयाने त्या विषयीची याचिकाच फेटाळून लावत आधी दिलेल्या आदेशात पालट करण्यास नकार दिला. तरीही दहीहंडीच्या दिवशी न्यायालयाचे निर्बंध तोडून मुंबई ठाण्यात दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला. दहीहंडी विषयक घालून दिलेल्या निर्बंधांत आपल्या हिताचाच विचार करण्यात आला आहे, या दृष्टीने निर्बंधांकडे न पहाता आमची गळचेपी करण्यात आल्याची आवई उठवण्याचा केलेला आटापिटा अयोग्य आहे. न्यायालयाचे निर्बंध झुगारून आपले तेच खरे करणार्‍यांना न्यायालयाने भविष्यात आपल्या समोर का उभे करावे ? स्वतःला हवे तसे करायचे आणि तसे करून झाल्यावर न्यायालयात जाण्याचीही सिद्धता करायची. ऑक्टोबर महिन्यामध्ये दहीहंडीविषयी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. तेव्हा दहीहंडीच्या दिवशी झालेल्या निर्बंधांच्या उल्लंघनाविषयी न्यायालय अप्रसन्न झाल्यास काय होते, हे तेव्हाच समजेल.

आम्ही गोरक्षा करणार नाही आणि तुम्हालाही करू देणार नाही, या वृत्तीचे सरकार !

     दलितांवरील अत्याचाराच्या घटना अल्प करण्यासाठी आम्ही प्रयत्नरत आहोत. गुजरातमधील दलितांवरील आक्रमणाच्या प्रकरणी आम्ही ३२ आरोपींना अटक केली आहे. - केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर

इतिहासाची काळी पाने !

अफगाणिस्तानातील संपूर्ण हिंदु जनतेची हत्याकांडे झालेल्या त्या भागाला हिंदुकुश म्हणून ओळखणे
      सनातन हिंदु धर्मावरची अमित श्रद्धा, जन्म-मृत्यूचा तो संघर्ष होता. संपूर्ण नगरेच्या नगरे जाळली आणि सर्व लोकसंख्या भस्मसात केली, आक्रमणामागून आक्रमणे झाली, कोट्यवधी बळी पडले आणि तितकेच गुलाम केले गेले. नवेनवे आक्रमक हिंदूंच्या कवट्यांचे पर्वत करत. अफगाणिस्तानात इ.स. १००० वर्ष मध्ये संपूर्ण हिंदु जनतेची हत्याकांडे झाली. अजूनही त्या भागाला हिंदुकुश म्हणतात. हिंदूंची कत्तल झालेल्या कवट्यांचा पर्वत, म्हणजे हिंदुकुश ! मध्य भारतातल्या बहामणी सुलतानाने तर संकल्पच केला होता. प्रतिवर्षी किमान १ लक्ष हिंदूंचे मुडदे पाडण्याचा संकल्प !
       इ.स. १३९९ मध्ये तैमुरने एकाच दिवसात १ लक्ष हिंदूंची कत्तल केली. अन्य प्रसंगी यापेक्षाही अधिक हिंदूंना मारले.
(संदर्भ : मासिक घनगर्जित, मार्च २०१५)

हिंदु जनजागृती समितीच्या कार्याविषयीचे गौरवोद्गार

हिंदु जनजागृती समितीच्या कार्याचे 
उपकार हिंदु समाज कधीही फेडू शकणार नाही ! 
- ह.भ.प. रामदास महाराज क्षीरसागर
       हिंदु जनजागृती समितीच्या कार्यात सहभागी होणार्‍या प्रत्येक हिंदूची आईप्रमाणे काळजी घेतली जाते आणि प्रत्येक हिंदूंवर धर्मशिक्षणाचा संस्कार कसा होईल, यासाठी प्रयत्न केले जातात. निवडणुका आल्यावर फळाची अपेक्षा ठेवून अनेक जण प्रचाराचे काम करतात; पण आपल्याला ही पद्धत पालटावी लागेल. फळाची अपेक्षा न करता समितीच्या मार्गदर्शनाखाली कार्य करून हिंदु राष्ट्राची स्थापना करावी लागेल. समितीच्या या कार्याचे उपकार हिंदु समाज कधीही फेडू शकणार नाही.
क्षणचित्र - साध्या वेशातील पोलिसांनी मेळाव्याचे चित्रीकरण केले. (पोलिसांनी हीच शक्ती आतंकवाद्यांचे अड्डे शोधण्यासाठी वापरली असती, तर आतापर्यंत देश आतंकवादमुक्त झाला असता ! - संपादक)

उच्च न्यायालयाला असा आदेश द्यावा लागतो, हे गोवा सरकारला लज्जास्पद !

     उसगाव येथील गोवा मांस प्रकल्प न्यायालयाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करून ३० सप्टेंबरपूर्वी कार्यान्वित करण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपिठाने गोवा शासन आणि गोवा मांस प्रकल्पाचे प्रशासन यांना दिला आहे.

विश्‍वकल्याणासाठी भारताचे रक्षण आवश्यक !

      विश्‍वाचे कल्याण आणि लाभ यांच्यासाठी भारताचे रक्षण करणे अत्यंत आवश्यक आहे; कारण केवळ भारतच विश्‍वाला शांती आणि न्यायव्यवस्था देऊ शकतो.
- मदर, अरविंद आश्रम (हिन्दू चिंतन)
      पूर्वी धर्माचरणी आणि प्रजाहितदक्ष राजांमुळे भारतात सोन्याचा धूर निघत होता. आता भारतात सर्वत्र भ्रष्टाचार, बलात्कार, भ्रूणहत्या, प्रतिष्ठेसाठी हत्या (ऑनर किलिंग), खून, अपहरण, खंडणीखोरी, अमली पदार्थांचे सेवन, मानवी तस्करी, वेश्याव्यवसाय यांच्या धुरांचे लोट निघत आहेत.
     भारत हे जगाचे देवघर आहे; मात्र इथला हिंदु विकलांग, भ्रष्ट आणि दुर्बल झाला आहे. स्वत्व, आत्मभान आणि राष्ट्रीयत्व गमावलेल्या हिंदूंना जागे करावे लागेल. हिंदुत्व हा आपला प्राण आहे. हिंदु समाजावरील आक्रमण थांबवण्यासाठी हिंदु समाज बलवान होण्याची गरज आहे. असे झाले, तरच भारत पुन्हा जगद्गुरुपदी विराजमान होईल ! - कै. अरविंदराव हर्षे, निवृत्त प्राचार्य, पुणे
     प.पू. गुरुदेवांचे स्मरण करून आणि त्यांना कसे आवडेल ?, हा भाग जाणून सेवा करायला हवी.
- श्री. रमानंद गौडा, सनातन संस्थेचे प्रसारसेवक, कर्नाटक. (४.७.२०१६)
     हिंदूंचा देव विश्‍वात्मके असतो. दुरितांचे तिमिर जावो । विश्‍व स्वधर्म सूर्ये पाहो ॥, अशा प्रार्थना करत हिंदु लहानाचा मोठा झालेला असतो. आपल्याप्रमाणे सारे जग साधे आणि सरळ आहे, अशी समजूत तो करून घेतो आणि फसतो; कारण जग कधीच साधे आणि सरळ नसते ! - श्री. अरविंद विठ्ठल कुळकर्णी, ज्येष्ठ पत्रकार, मुंबई.

लहान-लहान गोष्टींतून सातत्याने इतरांचा विचार करणारे आणि चुकाही प्रेमाने सांगणारे ६९ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. अनंत आठवले ! (वय ८१ वर्षे)

श्री. अनंत आठवले आणि सौ. सुनीती आठवले
      सध्या मला परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे ज्येष्ठ बंधू श्री. अनंत आठवले (ती. भाऊकाका) आणि वहिनी सौ.सुनीती आठवले (सौ. सुनीतीकाकू) यांच्या घरी विविध सेवा करण्याची संधी मिळाली आहे. विविध गुणांमुळे साधकांशी लवकर जवळीक साधणारे, सनातन संस्थेने प्रकाशित केलेला गीताज्ञानदर्शन ग्रंथ लिहिणारे अभ्यासक श्री. अनंत बाळाजी आठवले (भाऊकाका) यांचा श्रावण कृष्ण पक्ष एकादशी (२८.८.२०१६) या दिवशी ८१ वा वाढदिवस झाला. त्यानिमित्ताने त्यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे येथे देत आहे.

पूर्वीच्या काळी समाजात सात्त्विकता निर्माण करणार्‍या ऋषिमुनींप्रमाणे कलियुगात राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती यांचे कार्य करणारे प.पू. डॉक्टर !

प.पू. पांडे महाराज
       सप्तर्षींनी सर्वांसाठी ॐ निसर्गदेवो भव । ॐ वेदं प्रमाणं । हरि ॐ जयमे जयम् । जय गुरुदेव ।, हा मंत्र दिला आहे. त्याद्वारे आपल्यावर निसर्गाची कृपा होणार आहे. परात्पर गुरु डॉ. आठवले हे आपल्याला गुरु म्हणून प्राप्त झाले आहेत. ते आपल्याला नेहमी चैतन्याची महती सांगतात. त्या दृष्टीने ते साधकांद्वारे चैतन्यवृद्धीसाठी प्रयत्न करून घेत आहेत. तेव्हा धर्माचरण करून त्या गुरुमंत्राद्वारे व्यष्टी आणि समष्टी साधना केल्यासच हिंदु राष्ट्राची निर्मिती होईल अन् आजची परिस्थिती पालटून रामराज्य अनुभवता येईल.महर्षींच्या सांगण्यानुसार गायत्री मंत्र हा गुरुमंत्र आहे. ते वाणीतील तेजतत्त्व आहे. त्यामुळे बुद्धी प्रकाशमय होते. गायत्री मंत्राची शक्ती काळानुसार निसर्गामध्ये आली. तो निसर्ग वेदांनी मान्य केला. त्याला गुरुमंत्राद्वारा सर्वत्र कार्यरत करायचे आहे.

ती. अनंत आठवले यांच्याविषयी साधकांनी व्यक्त केलेले मनोगत आणि त्यांना दिलेले शुभेच्छापत्र !

       २८.८.२०१६ या दिवशी ती. भाऊकाकांना वाढदिवसानिमित्त अभिष्ट चिंतण्यासाठी एक कार्यक्रम झाला. त्या वेळी रामनाथी आश्रमातील साधकांनी सांगितलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत, तसेच साधकांनी केलेले काव्य, शुभेच्छापत्रही येथे दिले आहे.
वाढदिवसाच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या साधकांमध्ये 
देव पहाणारे आणि प्रसिद्धीपराङ्मुख असलेले ती. भाऊकाका ! 
कु. निधी देशमुख यांनी 
ती. भाऊकाका यांना दिलेले शुभेच्छापत्र !
टीप १ - परित्राणाय साधूनां .., - श्रीमद्भगवद्गीता, अध्याय ४, श्‍लोक ८ म्हणजे सज्जनांच्या संरक्षणाकरिता (श्रीकृष्णाचा जन्म धर्मसंस्थापनेसाठी झाला.)
टीप २ - जन्म कर्म च मे दिव्यं.., - श्रीमद्भगवद्गीता, अध्याय २, श्‍लोक ५६ म्हणजे माझा जन्म आणि माझे कर्म दिव्य अर्थात् अलौकिक आहे. (ज्याचा जन्म आणि कर्म दिव्य आहे, हे जाणणारे त्याच्या चरणी पोचतात.)
टीप ३ - वीतरागभयक्रोधः.. - श्रीमद्भगवद्गीता, अध्याय २, श्‍लोक ५६ म्हणजे राग, भय, क्रोध हे ज्यांच्या अंतःकरणात मुळीच नाहीत. (जी व्यक्ती राग, भय, क्रोध आदींपासून अलिप्त राहून ज्ञानरूपी तपस्या करते, ती त्याला (ईश्‍वराला) प्राप्त करते.) 

प.पू. स्वामी स्वरूपानंद यांच्याशी निगडित अमूल्य ठेवा असलेले कोल्हापूर येथील स्वामी स्वरूपानंद मठ (श्री.जामसंडेकर निवास)

पावस (रत्नागिरी) येथील थोर संत प.पू. स्वामी स्वरूपानंद यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने...
प.पू. स्वामी स्वरूपानंद
      रत्नागिरी जिल्ह्यातील पावस येथील थोर संत प.पू. स्वामी स्वरूपानंद यांचे आध्यात्मिक कार्य अलौकिक आहे. या आध्यात्मिक ठेव्याचा लाभ अनेक भाविकांना आजही होत आहे. कोल्हापूर येथील श्री. जामसंडेकर निवास येथे प.पू. स्वामी स्वरूपानंद यांचा मठ आहे. त्याच्याशी निगडित छायाचित्र येथे देत आहोत.
उत्सवांत राष्ट्र आणि धर्म या विषयांवर कार्यक्रम चालू करण्याविषयी 
प.पू. स्वामींच्या जीवनातील एक प्रसंग !
     कोकणात मोठ्या प्रमाणात होणार्‍या उत्सवांत त्या काळी नाट्य, गाणी, नाच, तमाशा यांसारखे कार्यक्रम होत असत. याविषयी गावातील प्रतिष्ठित व्यक्तींचे प्रबोधन करून प. पू. स्वामींनी उत्सवांतून श्रीकृष्णमेळा करायचे ठरवले. त्यासाठी त्यांनी तरुणांना एकत्र करून श्रीकृष्णलीला नाट्य प्रबोधन स्वरूपात करण्याचे ठरवले. त्यासाठी त्यांनी स्वत: गाणी आणि संवाद लिहिले.

साधकांनी शीघ्र आध्यात्मिक उन्नती करावी अशी तळमळ असणारे ती. भाऊकाका !

१. गुणवैशिष्ट्ये
१ अ. कर्तेपणा नसणे : काही वेळा त्यांना काही विषयांचे लेख सुचतात. त्या वेळी ते त्यावर स्वतःचे नाव देण्याचे टाळतात. ते कर्तेपणा कधीच आपल्याकडे घेत नाहीत.
१ आ. परिस्थिती सहजतेने स्वीकारणे : ती. भाऊकाका मुंबईचे घर सोडून गोव्यात रहायला आले, तेव्हा आमचे दूरभाषवर बोलणे झाले. मी त्यांना म्हणाले, तुम्ही गोव्यात आल्याने आम्हाला सर्वांना पुष्कळ आनंद झाला. तेव्हा ती. भाऊकाका सहजतेने म्हणाले, आता शेवटचे दिवस आले. यायलाच हवे. त्यानंतर मी त्यांना म्हटले की, आता आपली भेट होणार. यावर ते म्हणाले, हो. ते मात्र आहे.
- कु. युवराज्ञी शिंदे
१ इ. प्रेमभाव वाढणे : सेवेच्या अनुषंगाने ती. भाऊकाकांशी भ्रमणभाषवर संपर्क होत असे. पूर्वी भाऊकाका आवश्यक तेवढेच बोलून आमचे बोलणे संपत असे. सध्या काकांच्या बोलण्यात पुष्कळ गोडवा जाणवतो, तसेच ते बोलतांना गमती-जमतीही करतात. वरचेवर माझ्यासोबत माझ्या कुटुंबियांचीही चौकशी करतात.

शारीरिक त्रास असणार्‍या साधकांनाही स्वतःच्या सहवासात आनंदावस्था अनुभवायला देणारे ती. भाऊकाका !

      काही दिवसांपासून सोनालीताई (कु. सोनाली बधाले) ती. भाऊकाकांकडे सेवेसाठी जाते. ताईला आधीपासूनच गुडघेदुखीचा त्रास आहे. ती. भाऊकाकांकडील सेवा सांगितल्यावर ती अतिशय सकारात्मक विचाराने म्हणाली, मी सेवा शिकून घेईन.
      ४ ते ५ दिवसांपूर्वी सोनालीताईने मला सांगितले, मला देव ती. भाऊकाका आणि काकूंकडून पुष्कळ शिकण्याची संधी देत आहे. त्यांच्या सेवेमध्ये मी केवळ आनंदावस्थाच अनुभवत आहे. देव आपोआपच प्रत्येक लहान लहान सूत्रातून कसे शिकायचे, ते शिकवत आहे आणि त्या शिकवण्यामुळे केवळ आनंदच अनुभवायला मिळतो. त्यामुळे शरिराचा कोणता अवयव दुखत आहे, याचे आपल्याला भानही रहात नाही.
      त्या वेळी तिला सेवेतून मिळत असलेला आनंद तिच्या तोंडवळ्यावरून ओसंडून वहात होता. तेव्हा ती. भाऊकाकांकडून शिकायला मिळालेली सूत्रे सांगत असतांना तिला किती सांगू नि किती नको, असे होत होते.
- सौ. कीर्ती जाधव, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२८.८.२०१६)

ती. भाऊकाकांनी वयाच्या ८१ व्या वर्षीही प्रत्येकाशी आदरपूर्वक बोलून चांगल्या गोष्टींचे श्रेय इतरांना देणे !

कु. एकता नखाते
     २०.७.२०१६ या दिवशी मी ती. भाऊकाका यांना भेटण्यासाठी गेले होते. त्या वेळी मला त्यांच्याशी बोलतांना त्यांची लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये आणि आलेल्या अनुभूती पुढे देत आहे.
१. गुणवैशिष्ट्ये
१ अ. आपुलकी आणि जिज्ञासापूर्वक बोलणे : ती. भाऊकाकांनी पुष्कळ प्रेमाने माझ्या घरातील सर्वांची चौकशी केली. त्यांनी जिज्ञासूवृत्तीने घरच्यांविषयी जाणून घेतले.
१ आ. सर्वच साधकांना आदरार्थी संबोधणे : ती. भाऊकाकांशी बोलतांना मला ते आदरार्थी का संबोधत होते, ते मला कळले नाही; म्हणून मी त्याविषयी त्यांच्या सेवेतील साधिकेला विचारले. तेव्हा ती साधिका मला म्हणाली, ते मलाही असेच संबोधतात आणि त्यासंबंधी विचारले असता सांगतात, मुले एवढ्या लहान वयात सर्व सोडून साधना करता. त्यामुळे तुम्ही मोठ्याच आहात.
     ते उत्तर ऐकल्यावर माझ्या मनात आले, ती. भाऊकाकांमध्ये अहं अल्प असल्याने ते सर्वांशीच आदरार्थी बोलतात.

संतपदावर आरूढ होण्यापूर्वीपासूनच मायेतून अलिप्त असणारे कै. पू. अप्पाकाका !

कै. पू. डॉ. वसंत आठवले
       सुमारे १५ ते २० वर्षांपूर्वी एकदा डॉ. वसंत आठवले (आताचे कै. पू. डॉ. वसंत आठवले, परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचे जेष्ठ बंधू) यांचे कुटुंबीय, माझे कुटुंबीय आणि परिवारातील अन्य सदस्य एक बस करून सहलीला गेलो होतो. त्या वेळी बसमध्ये गाणी गाणे, विनोद सांगणे, गप्पा, असा गदारोळ चालू होता. मध्येच मी बसमध्ये उभा राहिलो आणि पाहिले, तर डॉ. वसंत आठवले हे त्या सर्वांमध्ये असूनही पूर्ण अलिप्त होते,जणूकाही ते एकाच वेळी २ वेगळ्या विश्‍वांत होते.
- श्री. अमरेश देशपांडे (कै. पू. अप्पाकाका यांच्या धर्मपत्नी श्रीमती विजया वसंत आठवले यांचे नातेवाईक),गोवा (१५.८.२०१५)

गुरुदेव, गुरुदेव मन रटता है ।

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त...
परात्पर गुरु
डॉ. जयंत आठवले
गुरुदेव ने मुझे संभाला है ।
गुरुदेव ने मुझे पाला है ॥

गुरुदेव ही दुःखहर्ता हैं ।
गुरुदेव ही सुखकर्ता हैं ॥

गुरुदेव हमारे सर्वज्ञाता हैं ।
गुरुदेव ही हमारे विधाता हैं ॥

गुुरुदेव ही जीवन का सार हैं ।
गुरुदेव ही हमारा संसार हैं ॥

ती. भाऊकाका यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे आणि त्यांच्या सान्निध्यात आलेल्या अनुभूती

सौ. पल्लवी हंबर्डे
      स्वयंपाकघरात साधनेचे प्रयत्न अधिक होतात, असे मला वाटत होते. त्यामुळे तेथे मला सेवा मिळायला हवी,असा विचार दोन दिवस माझ्या मनात आला. त्यानंतर मी देवाला प्रार्थना केली, देवा, मला सेवेमध्ये स्वेच्छा नको. तुझ्या इच्छेने आणि तुला अपेक्षित अशी सेवा मला दे. त्यानंतर मला ती. भाऊकाकांसाठी (प.पू.डॉक्टरांचे ज्येष्ठ बंधू श्री. अनंत बाळाजी आठवले यांच्यासाठी) सकाळी अल्पाहार बनवण्याची सेवा देवाच्या कृपेने मिळाली. त्या वेळी देवाच्या चरणी कृतज्ञता व्यक्त झाली. सेवा करतांना शिकायला मिळालेली सूत्रे येथे देत आहे.

ती. भाऊकाकांची लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये

१. वेळेचे पालन करणे : ती. भाऊकाकांची दिनचर्या ठरलेली असते; म्हणजे ते प्रत्येक कृती नियोजित वेळेत करतात. त्यांच्या उठणे, चहा पिणे इत्यादींच्या वेळा निश्‍चित आहेत.
२. सेवेची तळमळ असणे : वयाच्या ८१ व्या वर्षीही ते सलग ३.३० घंटे (तास) बसून हिंदी मजकूर पडताळण्याची सेवा करतात. त्यांच्यासमवेत टंकलेखनाची सेवा करत असतांना मला त्यांच्याकडून बर्‍याच गोष्टी शिकायला मिळाल्या. ते जणू ज्ञानाचे सागरच आहेत.
३. सहजतेने आपलेसे करणे : पहिल्यांदा त्यांच्याकडे सेवेला गेल्यावर प्रथम मला त्यांची थोडी भीती वाटत होती; परंतु नंतर त्यांनी इतक्या सहजतेने मला आपलेसे केले की, माझा ताण आणि भीती नाहीशीच झाली.
४. प्रेमभाव : मध्यंतरी गाडीवरून पडल्यामुळे माझ्या पायाला लागले होते. तेव्हा काका-काकूंनी माझी पुष्कळ काळजी घेतली. त्यांच्याप्रमाणे काकूंमध्येही पुष्कळ प्रेमभाव आहे.
- कु. मयुरी आगावणे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२८.८.२०१६)

१ सप्टेंबर या दिवशीचे कंकणाकृति सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही !

     श्रावण अमावास्या म्हणजे गुरुवार, १ सप्टेंबर २०१६ या दिवशी कंकणाकृति सूर्यग्रहण आहे. हे ग्रहण भारतात दिसणार नसल्याने ग्रहणाचे वेधादि कोणतेही नियम पाळू नयेत.
ग्रहण दिसणारे प्रदेश आणि वेळ
आफ्रिका, हिंदी महासागर, अटलांटिक महासागर
ग्रहण आरंभ : ११.४३ मि.
ग्रहण मध्य : १४.३७ मि.(दु. २.३७)
ग्रहण समाप्ती : १७.३१ मि.(सायंकाळी ५.३१)
(सर्व वेळा भारतीय प्रमाण वेळेनुसार)
(संदर्भ : दाते पंचाग)
- ज्योतिष फलितविशारद (सौ.) प्राजक्ता जोशी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

साधकांसाठी सूचना आणि कृतीशील धर्माभिमान्यांना नम्र विनंती !

ब्राह्मतेज आणि क्षात्रतेज यांचा अनोखा 
संगम असलेले सनातन पंचांग घरोघरी पोचवा ! 
        राष्ट्रीय अस्मिता वृद्धिंगत करणारे आणि राष्ट्रहिताचा दृष्टिकोन देणारे विचारधन म्हणून अनेक धर्मप्रेमींनी सनातन पंचांगाचा गौरव केला आहे. हिंदूंना धर्मशिक्षण देणारे, तसेच धर्मरक्षणाविषयी प्रबोधन करणारे हे पंचांग एकमेवाद्वितीय आहे. पंचांगातील बहुमूल्य ज्ञानामुळे जिज्ञासूंमध्ये साधनेची रूची निर्माण होत आहे. चैतन्याचा स्रोत असणारे हे पंचांग ब्राह्मतेज आणि क्षात्रतेज यांचा अनोखा संगमच आहे.
        मराठीसह हिंदी, इंग्रजी, कन्नड, गुजराती, तेलुगु, ओरिया आणि तमिळ या ८ भाषांत प्रकाशित होणारे सनातन पंचांग अधिकाधिक हिंदूंंपर्यंत पोचणे आवश्यक आहे. सर्वत्रचे साधक आणि कृतीशील धर्माभिमानी यांनी पंचांग वितरणासाठी पुढील प्रयत्न करावेत.

हिंदुत्ववाद्यांसाठी आढावा बैठक !

      राष्ट्र-धर्म यांचे कार्य करण्यासाठी कृतीशील होऊ इच्छिणार्‍यांसाठी ३० ऑगस्ट या दिवशी खाकिदास बाबा मठ, नगर येथे सायंकाळी ७ वाजता आढावा बैठकीचे आयोजन केले आहे.

बोधचित्र

॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज
सनातनचे श्रद्धास्थान
गुरु-शिष्य नात्याविषयी गुरूंचा दृष्टीकोन
मी कोणाचा गुरु नाही; पण शिष्य केल्याविना सोडणार नाही.
भावार्थ १ : मी कोणाचा गुरु नाही, यातील मी प्रकृतीतील मीविषयी आहे. शिष्य केल्याविना सोडणार नाही, म्हणजे पुरुषतत्त्वाचा किंवा बाबांच्या गुरूंचा, म्हणजे प.पू. अनंतानंद साईश यांचा शिष्य केल्याविना सोडणार नाही किंवा असा नामजप चालू करून देईन की, सर्वजण नामाचे शिष्य होतील.
भावार्थ २ : गुरु म्हणजे शिव. शिवदशेत मनात विचार येत नाहीत; म्हणूनच मी गुरु आहे हा विचार मनात येऊ शकत नाही. जीवदशेत आल्यावर मी शिष्य आहे एवढाच विचार मनात येतो; म्हणूूनच माझ्या गुरूंकडे मी साधकांना घेऊन जाईन, त्यांना माझ्या गुरूंचे शिष्य करीन.
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.)

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

   
परात्पर गुरु डॉ. आठवले
  पाश्‍चात्त्य संस्कृती स्वेच्छेला प्रोत्साहन देणार्‍या व्यक्तीस्वातंत्र्याचा पुरस्कार करते आणि दुःखाला निमंत्रण देते, तर हिंदु संस्कृती स्वेच्छा नष्ट करून सत्-चित्-आनंदावस्था कशी प्राप्त करायची, हे शिकवते. - (परात्पर गुरु) डॉ. आठवले
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥
या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो.
- प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

मनाची एकाग्रता
मनाची एकाग्रता ही अशी शक्ती आहे की, जी प्रत्येक गोष्टीत यश प्राप्त करून देते.
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

सरोगसीचे स्वागतार्ह विधेयक !

संपादकीय 
       सरोगसी म्हणजे गर्भाशय भाड्याने देण्याच्या पद्धतीच्या संदर्भात काही अटी आणि नियम घालणारे विधेयक २४ ऑगस्ट या दिवशी केंद्रीय मंत्रीमंडळ बैठकीत संमत करण्यात आले. भाजप शासन ज्या काही चांगल्या कृती करू पहात आहे, त्यांतील ही एक चांगली गोष्ट आहे. सरोगसी प्रक्रियेतील बाजारीकरणाची अंगावर काटा आणणारी भयावहता ज्यांनी जाणून घेतली आहे, त्यांना हे विधेयक किती अत्यावश्यक आणि मोलाचे आहे, हे लक्षात येईल. दुर्दैवाने आजची तथाकथित वैचारिक म्हणवणारी पत्रकारिता एकीकडे सरोगसीचे दुष्परिणाम प्रसिद्ध करत असतांना दुसरीकडे शासनाच्या या विधेयकावर टीकाही करत आहे. भरकटलेल्या आणि समाजद्रोही पत्रकारितेचे यापेक्षा वेगळे दुसरे उदाहरण नसेल.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn