Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

पाकने काश्मीरमधील परिस्थिती बिघडवली ! - मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती

पाकने काश्मीरची परिस्थिती बिघडवेपर्यंत काश्मीर सरकार झोपले 
होते का ? पाक इतक्या सहजासहजी काश्मीरची स्थिती कशी काय 
बिघडवू शकतो ? आता ती सुधारण्यासाठी आणि पाकप्रेमी लोकांना कठोर
 शिक्षा करण्यासाठी मेहबुबा मुफ्ती काय करणार आहेत, हेही त्यांनी सांगायला हवे !
     नवी देहली - पाककडूनच काश्मीरमधील युवकांना आंदोलनासाठी प्रोत्साहन देण्यात येत आहे. पाकनेच काश्मीरमधील परिस्थिती बिघडवली असून त्याच्यामुळेच येथील वातावरण गढूळ झाले आहे, अशी टीका जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यावर केली. या वेळी मेहबुबा मुफ्ती यांनी त्यांचे वडील काश्मीरचे माजी मुख्यमंत्री दिवंगत मुफ्ती महंमद सईद यांच्या एका विधानाची आठवण करून दिली. नरेंद्र मोदी यांच्या पक्षाला दोन तृतीयांश इतके बहुमत मिळाले आहे. जर या काळात काश्मीरच्या परिस्थितीत फरक पडला नाही, तर तो कधीच पडणार नाही, असे मुफ्ती महंमद सईद मेहबुबा मुफ्ती यांना म्हणाले होते, असे त्या म्हणाल्या.

श्री गणेशमूर्तींच्या विसर्जनाने जलाशये प्रदूषित होत नाहीत !

गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाचा अभ्यासाअंती निष्कर्ष
आतातरी धर्मद्रोही अंनिसवाले श्री गणेशमूर्तींच्या विसर्जनामुळे प्रदूषण होत 
असल्याची खोटी ओरड थांबवून मूर्तीदानासारखी धर्मविरोधी चळवळ राबवणे बंद करतील का ?
     पणजी - श्री गणेशमूर्तींच्या विसर्जनामुळे जलाशयांतील पाण्याच्या घटकांत कोणताही पालट होत नसल्याचे गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाने वर्ष २०१५ च्या श्री गणेशचतुर्थीच्या काळातील विसर्जनाच्या वेळी केलेल्या अभ्यासातून पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. यापूर्वी वर्ष २०१४ मध्येही श्री गणेशमूर्ती विसर्जनामुळे कोणतेही प्रदूषण होत नसल्याचा असाच निष्कर्ष गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाने अभ्यासाअंती काढला होता.
     गोवा प्रदूषण नियत्रण मंडळाने श्री गणेशमूर्तींचे विसर्जन होत असलेल्या जलाशयांमधील पाण्याचा अभ्यास करण्यासाठी मोठा प्रकल्प राबवून राज्यभरातील एकूण १२ जलाशयांचा अभ्यास केला. अभ्यास केलेल्या या जलाशयांमध्ये साध्या पाण्याचे तलाव, ओढे, तसेच खार्‍या पाण्याच्या खाड्या आणि समुद्र यांचा समावेश आहे. या जलाशयांतील पाण्याचे ३ वेगवेगळे नमूने (श्री गणेशमूर्ती विसर्जन होण्यापूर्वी, विर्सजन झाल्यानंतर लगेच, तसेच विसर्जनानंतर १५ दिवसांनी) गोळा करण्यात आले आणि त्या नमून्यांचा प्रयोगशाळेत अभ्यास करण्यात आला. अभ्यासाअंती पाण्याच्या गुणधर्मांत अजिबात पालट झाला नाही. यावरून श्री गणेशमूर्तींच्या विसर्जनाने जलाशये प्रदूषित होत नसल्याचा निष्कर्ष गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाने काढला आहे.

पुलवामा येथे आतंकवाद्यांकडून पोलिसाची हत्या !

     श्रीनगर - २७ ऑगस्टला सकाळी दक्षिण काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात आतंकवाद्यांच्या गोळीबारात एका पोलीस कर्मचार्‍याचा मृत्यू झाला. खुर्शिद अहमद गनाई असे या पोलीस शिपायाचे नाव असून ते सुटीसाठी पुलवामा जिल्ह्यातील कोली या गावी गेले असतांना त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या.

जुगार आणि पत्ते खेळणे बंद करून आदर्श गणेशोत्सव साजरा करणार !

हिंदु जनजागृती समितीच्या प्रबोधनानंतर मानखुर्द येथील महाराष्ट्र
 नगर नवनाथ सेवा संघ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा अभिनंदनीय निर्णय !
     मानखुर्द - येथील महाराष्ट्र नगर नवनाथ सेवा संघ या सार्वजनिक गणेश मंडळाला यंदा २५ वर्षे पूर्ण होत आहेत. हिंदु जनजागृती समितीच्या आदर्श गणेशोत्सव मोहिमेच्या अंतर्गत समितीच्या वतीने गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकार्‍यांना भेटून आदर्श गणेशोत्सव साजरा करण्याविषयी त्यांचे प्रबोधन करण्यात आले. या आवाहनाला प्रतिसाद देत महाराष्ट्र नगर नवनाथ सेवा संघ सार्वजनिक गणेश मंडळानेे जुगार आणि पत्त्यांचा खेळ बंद करून आदर्श गणेशोत्सव साजरा करण्याचा निश्‍चय केला आहे. (धर्मशास्त्र कळल्यावर त्यानुसार उत्सव साजरा करणार्‍या महाराष्ट्र नगर नवनाथ सेवा संघ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा आदर्श अन्य मंडळांनीही घ्यावा ! - संपादक)

हिमाचल प्रदेशला भूकंपाचे ३ सौम्य धक्के !

     शिमला - हिमाचल प्रदेशातील कुलू भागाला २७ ऑगस्टच्या सकाळी भूकंपाचे ३ सौम्य धक्के बसले. या भूकंपामुळे कोठेही जीवित किंवा वित्त हानी झाल्याचे वृत्त नाही. सकाळी ६.४५ च्या सुमारास बसलेल्या या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ४.६ इतकी मोजण्यात आली आहे. त्यानंतर ७ वाजून ५ मिनिटांनीही ४.३ तीव्रतेचा धक्का बसला. सुमारे २० मिनिटांच्या अंतरात दोन धक्के जाणवले. कुलूपासून १० कि. मी. अंतरावर भूकंपाचा केंद्रबिंदू होता. उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेश हे भूकंपप्रवण क्षेत्रात येत असल्याने या ठिकाणी कायम भूकंपाचे धक्के बसत असतात.
महर्षींनी प्रलयकालाविषयी सतर्क करणे
     १९.३.२०१६ या दिवशी झालेल्या नाडीवाचन क्रमांक ६७मध्ये महर्षि म्हणतात, हे पूर्ण वर्ष प्रलयकालाचे आणि आपत्तीजनक असणारे आहे. (हिमाचल प्रदेशातील कुलु भागाला २७ ऑगस्टच्या सकाळी भूकंपाचे ३ सौम्य धक्के बसले. या घटनेवरून प्रलयकालाविषयी महर्षींनी केलेले भाष्य किती तंतोतंत आहे, हे लक्षात येते ! - संपादक)

मालेगावमध्ये शस्त्रास्त्रे विकणार्‍या धर्मांधाला अटक

     मालेगाव (नाशिक) - विषेश पोलीस पथकाने सालीक अहमद अब्दुल अजीज नामक तरुणास अटक करून त्याच्याकडून ३ गावठी कट्टे, २७ जिवंत काडतुसे आणि दोन भ्रमणध्वनी जप्त केले.

साध्वी प्राची यांना दूरभाषद्वारे ठार मारण्याची धमकी !

हिंदूंचे संत, साधक, साध्वी यांना सरकारने कडक सुरक्षाव्यवस्था पुरवली पाहिजे !
     मुजफ्फरनगर (उत्तरप्रदेश) - साध्वी प्राचीजी यांना दूरभाषद्वारे ठार मारण्याची धमकी देण्यात आली आहे. धमकी देणार्‍याने तो आयएस्आयचा हस्तक असल्याचे म्हटले आणि राममंदिरात किंवा हिंदु संमेलनांना गेलात, तर ठार केले जाईल, अशी धमकी दिली.
     २६ ऑगस्टला रात्री दीड वाजता हा दूरभाष करण्यात आला होता. साध्वी यांनी त्वरित याची माहिती पोलीस उपअधीक्षकांना दिली.

पगडी काढण्यास सांगितल्यामुळे भाजपच्या खासदारांनी अमेरिकेचा व्हिसा नाकारला !

     नवी देहली - अमेरिकेच्या दुतावासाने भाजपचे खासदार वीरेंद्र सिंह यांना सुरक्षेच्या कारणावरून पगडी काढण्यास सांगितले. ते ऐकून सिंह यांनी अमेरिकेचा व्हिसा घेण्यास नकार दिला. सिंह म्हणाले, पगडी आमच्या परंपरांच्या सन्मानाचे प्रतीक आहे, तसेच ती माझ्या देशाच्या सन्मानाचेही प्रतीक आहे. त्यामुळे ती काढू शकत नाही.

फोंडा, गोवा येथील दिवाणी आणि फौजदारी न्यायालयांत न्यायाधिशांची २ पदे रिक्त असल्याने न्यायप्रक्रियेस विलंब !

शासनाने न्यायाधिशांची त्वरित 
नियुक्ती करून नागरिकांची गैरसोय टाळावी !
        फोंडा, २७ ऑगस्ट (वार्ता.) - फोंडा येथील दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) यांना नुकतेच पदच्युत करण्यात आले आहे. सध्या फोंडा भागासाठी केवळ एक कनिष्ठ न्यायाधीश कार्यान्वित असून दोन न्यायाधिशांची पदे रिक्त आहेत. त्यामुळे दैनंदिन न्यायालयीन प्रक्रियेमध्ये अडचणी येत असून लोकांना न्याय मिळण्यास अडचण येत आहे.
        वर्ग केलेल्या दाव्यांमध्ये न्यायाधीश नसल्यामुळे तसेच केवळ तारखा पडत असल्यामुळे वादी आणि प्रतिवादी यांना न्यायालयात विनाकारण हेलपाटे घालावे लागत आहेत. फोंडा तालुक्यातील अधिवक्त्यांचा वेळसुद्धा न्यायाधीश नसल्यामुळे वाया जात असल्याचा सूर अधिवक्त्यांच्या गटाकडून ऐकण्यास मिळतो. प्रतिदिन अनुमाने ३० दाव्यांची वर्गवारी सुनावणीसाठी निश्‍चित केली असल्यामुळे दोन्ही न्यायालयांत मिळून ६० दावे किंवा खटले यांसाठीचे वादी, प्रतिवादी, पोलीस, साक्षीदार आदींना हेलपाटे होऊन त्यांचा वेळ वाया जात आहे. तरी गोवा शासनाने त्वरित न्यायाधीशांची नियुक्ती करावी, अशी मागणी केली जात आहे.

प्रस्तावित अलवाफी पशूवधगृह रहित करा !

गोवंशहत्या बंदी कायदा होऊनही मागण्यांसाठी मोर्चा काढावा लागणे हे खेदजनक !
अकोला येथील मोर्च्यात उपस्थित असलेल्या सहस्रोंच्या संख्येतील जनसमुदायाची मागणी 
मोर्च्यात सहभागी जनसमुदाय
     अकोला - जैनांची काशी, बाळादेवी संस्थान, तसेच संत गजानन महाराज यांच्या दर्शनासाठी शेगावला जाणार्‍या मार्गाच्या ठिकाणी प्रस्तावित अलवाफी पशूवधगृहाला मोर्च्याद्वारे निषेध नोंदवण्यात आला. हे पशूवधगृह रहित करा, अशी मागणीही या वेळी करण्यात आली. जैन साध्वी प.पू. प्रीतीधर्माश्रीजी अधिठाणा सात तथा प.पू. स्थानकवासी विशुद्धीजी महासती अधिठाणा चार यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला. 

बांगलादेशात आणखी एका मंदिरसेवकावर जिहाद्यांचे प्राणघातक आक्रमण !

पाकव्याप्त काश्मीर आणि बलुचिस्तान येथील परिस्थितीनंतर पंतप्रधानांनी
 पाक आणि बांगलादेश येथील हिंदूंविषयी काही बोलावे, अशी हिंदूंची अपेक्षा आहे !
     ढाका - बांगलादेशात नरसिंगदी जिल्ह्यातील रघुनाथपूर येथील देवी मां काली मंदिरातील सेवक चित्तरंजन यांच्यावर २ जिहाद्यांनी प्राणघातक आक्रमण करून त्यांना गंभीर घायाळ केले आहे. त्यांच्यावर ढाका येथील शासकीय रुग्णालयात उपचार चालू आहेत. पोलिसांनी या प्रकरणी महंमद फिरोज याला अटक केली असून पुढील तपास चालू आहे. (बांगलादेशात कोणीही निधर्मीवादी आणि पुरोगामी नसल्याने तेथील अल्पसंख्यांक हिंदूंवर होणार्‍या अत्याचारांवर कोणीही बोलत नाही. त्यामुळे किमान भारतातील तथाकथित निधर्मीवाद्यांनी तरी यावर बोलावे ! - संपादक)
     श्री. चित्तरंजन अड्ड्या (वय ५७ वर्षे) हे मंदिरातील सेवक असून त्यांचे मंदिराच्या परिसरात वह्या-पुस्तकांचे दुकान आहे. २२ ऑगस्टच्या सायंकाळी ८ च्या सुमारास २ तरुण तोंडावर कपडा बांधून दुचाकीवरून दुकानात आले आणि त्यांनी श्री. चित्तरंजन यांच्यावर तीक्ष्ण हत्यारांनी आक्रमण केले.

सनातन संस्थेची अपकीर्ती केल्याच्या प्रकरणी दैनिक टाइम्स ऑफ इंडियाचे संपादक, मालक, प्रकाशक आणि मुद्रक यांच्या विरोधात संस्थेचा मानहानी भरपाईसाठी न्यायालयात दिवाणी दावा

     फोंडा (गोवा) - सनातन संस्थेच्या वाढत्या प्रसाराची व्याप्ती आणि संस्थेचा समाजातील नावलौकिक माहिती असतांना संस्थेची अपकीर्ती करण्याच्या हेतूने दैनिक टाइम्स ऑफ इंडिया या इंग्रजी वृत्तपत्राने फॉर धिस कल्ट, क्रिटीक्स आर् डेमॉन्स या मथळ्याखाली संस्थेच्या विरोधात मानहानीकारक लेख त्यांच्या २० जून २०१६ या दिवशीच्या अंकात प्रसिद्ध करून संस्थेची मानहानी केली. त्यामुळे सनातन संस्थेची अपरिमित हानी झाली; म्हणून सनातन संस्थेचे व्यवस्थापकीय विश्‍वस्त श्री. वीरेंद्र मराठे यांनी संस्थेचे मानद कायदेविषयक सल्लागार श्री. रामदास केसरकर यांच्यामार्फत या दैनिकाचे संपादक, मालक, मुद्रक आणि प्रकाशक यांच्या विरोधात १० कोटी रुपये हानीभरपाई मागणीचा दिवाणी दावा सनातन संस्थेने फोंडा, गोवा येथील दिवाणी न्यायालयात दाखल केला आहे.
     संपादक, मालक, मुद्रक आणि प्रकाशक यांना ११.७.२०१६ या दिवशी कायदेशीर नोटीस बजावून मानहानी भरपाईपोटीची रक्कम रुपये १० कोटी रुपयांची मागणी केली होती; परंतु त्यांनी कायदेशीर नोटिसीतील संस्थेच्या मागणीची पूर्तता करण्यास नकार दिला.

समान नागरी कायदा असलेल्या गोवा राज्यात ख्रिस्ती आणि ख्रिस्तेतरांच्या लग्ननोंदणी पद्धतीत भेदभाव !

हा कसला समान नागरी कायदा ? हे 
गोव्यात ख्रिस्त्यांचेच राज्य असल्याचे सूचक !
       पणजी, २७ ऑगस्ट (वार्ता.) - गोव्यात समान नागरी कायदा लागू असला, तरी ख्रिस्ती आणि ख्रिस्तेतरांच्या कायदेशीर विवाह नोंदणीत बराच भेदभाव आहे. ख्रिस्त्यांच्या लग्ननोंदणीची स्वाक्षरी चर्चमध्ये करावी लागते, तर ख्रिस्तेतरांना दोन वेळा आवश्यक असलेल्या विवाहनोंदण्या शासकीय निबंधकांकडे त्यांच्या कार्यालयात जाऊन कराव्या लागतात.
       गोव्यात विवाह नोंदणीसाठी वधूवरांना १५ दिवसांच्या कालावधीत निबंधकाकडे जाऊन दोन वेळा स्वाक्षर्‍या कराव्या लागतात. पहिली स्वाक्षरी ही लग्नासाठी इच्छुक असल्याची सूचक आहे, तर दुसरी स्वाक्षरी ही लग्न झाल्याची सूचक आहे. हा नियम सर्व ख्रिस्तेतरांना लागू आहे; मात्र ख्रिस्त्यांना पद्धत वेगळी आहे. ख्रिस्त्यांनी चर्चमध्ये केलेली स्वाक्षरी ग्राह्य मानली जाते. चर्चमधील नोंदवहीतील प्रत निबंधकांकडे कधीही दिल्यास ते लग्न झाले होते, हे ग्राह्य मानले जाते.

(म्हणे) रोमी लिपीतील कोकणीला राजभाषेचा दर्जा द्या; पण मराठीला राजभाषा करू नका !

 • रोमी कोकणीची मागणी करणार्‍यांनी उद्या इंग्रजी किंवा पोर्तुगीज भाषेला अधिकृत मान्यता देण्याची मागणी केल्यास आश्‍चर्य नाही !
 • धर्मांध तियात्रिस्त फ्रान्सिस-द-तुयेची मागणी
        पणजी, २७ ऑगस्ट (वार्ता.) - सरकारने रोमी लिपीतील कोकणीला राजभाषेचा दर्जा द्यावा आणि अनुदान देण्यासाठी संमती द्यावी. अन्यथा आंदोलन छेडले जाईल, अशी मागणी तियात्रिस्त फ्रान्सिस-द-तुये आणि त्यांचे सहकारी यांनी पत्रकार परिषदेत केली. एक राज्य : एकच राजभाषा यानुसार मराठीला राजभाषा करू नये, अशी मागणीही फ्रान्सिस-द-तुये यांनी केली.
        फ्रान्सिस-द-तुये म्हणाले, रोमी लिपीतून शिक्षण देण्यासाठी रोमी लिपीत ख्रिस्ती धर्मगुरु आणि अन्य लेखक यांनी साहित्य निर्मिती केली आहे. याला राजाश्रय नसल्यामुळे या साहित्याला योग्य मान मिळत नाही. दाल्गाद कोकणी अकादमी रोमी लिपीतील कोकणीला मिळत असलेले अनुदान तिच्या स्वार्थासाठी वापरत आहे. त्याचा या भाषेला काही लाभ झालेला नाही. १५ दिवसांच्या आत मागण्या पूर्ण न झाल्यास गावागावांत जाऊन सभा घेणार आणि रोमी लिपीविषयी जागृती करणार आहोत. तरीही शासन ऐकत नसल्यास रस्त्यावर येऊन धरणे आंदोलन करू.

शाहिरी कलेच्या माध्यमातून समाजापुढे धार्मिक आणि राष्ट्रीय समस्येविषयी प्रबोधन करण्याची आवश्यकता ! - किरण दुसे

उपस्थितांना मार्गदर्शन करतांना श्री. किरण दुसे
     मलकापूर (जिल्हा कोल्हापूर) - आज आमच्या समोर केवळ लोणी खाणार्‍या अथवा रासलीला करणार्‍या श्रीकृष्णाचे वर्णन केले जाते; मात्र आज भगवंताच्या धर्मसंस्थापनेचे कार्य करणार्‍या अर्जुनाला युद्धासाठी प्रवृत्त करणार्‍या रूपाचे वर्णन करायची आवश्यकता आहे. देशामध्ये गोहत्या, मंदिरांचे सरकारीकरण, धर्मांतर अशा अनेक धार्मिक समस्या, तसेच देशावर वाढणारे कर्ज, महिलांवरील अत्याचार, शेतकर्‍यांच्या आत्महत्या, सैनिकांवर होणारी दगडफेक अशा राष्ट्रीय समस्या निर्माण झाल्या आहेत. यासाठी आपण शाहिरी कलेच्या माध्यमातून समाजापुढे जातांना परिस्थिती संदर्भात प्रबोधन करण्याची आज नितांत आवश्यकता आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे कोल्हापूर जिल्हा समन्वयक श्री. किरण दुसे यांनी केले.
     २४ ऑगस्ट या दिवशी येथून जवळच असलेल्या येळवण जुगाई गावातील जुगाई मंदिरामध्ये ॐ स्वरूप शिवशक्ती आध्यात्मिक शाहीर मंडळाच्या वतीने भव्य भेदीक शाहिरी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्या वेळी हिंदु धर्माची सद्यस्थिती आणि उपाय आणि हिंदु राष्ट्राची आवश्यकता या विषयावर ते बोलत होते. या स्पर्धेसाठी शाहूवाडी, सिंधुदुर्ग, करवीर या तालुक्यांमधील २६ गावांतील उपस्थित असलेल्या ४०० हून अधिक शाहिरी कार्यकर्ते आणि भेदीकप्रेमी यांनी या कार्यक्रमाचा लाभ घेतला. या कार्यक्रमात दैनिक सनातन प्रभातच्या अंकांचे वितरण करण्यात आले.

उद्योजकांसाठी जनसंपर्क म्हणजे भगवान श्रीकृष्णाने निर्माण केलेली धर्मप्रसाराची उत्तम संधी ! - श्री. मनोज खाडये, हिंदु जनजागृती समिती

सोलापूर येथे जनसंपर्कातून धर्मप्रसार करण्याचा उद्योजकांचा निर्धार !
     सोलापूर - उद्योजकांनी उद्योगाच्या माध्यमातून निर्माण केलेला जनसंपर्क म्हणजे श्रीकृष्णाने प्रभावी धर्मप्रसारासाठी त्यांना दिलेली सुवर्णसंधी आहे. श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी धर्मकार्यासाठी कटिबद्ध होण्याचा निर्धार करावा, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे पश्‍चिम महाराष्ट्र समन्वयक श्री. मनोज खाडये यांनी सोलापूर येथील महाराष्ट्र औद्यागिक विकास महामंडळ परिसरात आयोजित उद्योजकांच्या बैठकीत केले. बैठकीत औद्यागिक परिसरातील २६ उद्योजकांनी सहभाग घेतला. येथील प्रसिद्ध उद्योजक श्री. रवि ल. यन्नम यांनी पुढाकार घेऊन बैठकीचे आयोजन केले. बैठकीची प्रस्तावना समितीचे स्थानिक कार्यकर्ते श्री. दत्ता पिसे यांनी केली. या बैठकीत श्री. खाडये यांनी राष्ट्र अन् धर्म यांच्या सद्यस्थितीविषयी सविस्तर विवेचन करून त्याची कारणे आणि उपाययोजना, तसेच दैनिक सनातन प्रभातचे महत्त्व या अनुषंगाने माहिती दिली. उपस्थितांपैकी ७ जणांनी दैनिक सनातन प्रभातचे वार्षिक वर्गणीदार होण्याची सिद्धता दर्शवली आणि दुसर्‍या दिवशी वर्गणीदार करवून घेण्यासाठी संपर्क करण्यास सांगितले. उपस्थित सर्वच उद्योजकांनी जनसंपर्कातून धर्मप्रसारासाठी कृतीशील होण्याचा निर्धार केला. तसेच उद्योजक मेळावा आयोजित करण्याचे ठरवले.
व्यसनांच्या संदर्भातील वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी हिंदु राष्ट्र अपरिहार्य !
     सोलापूर - येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने हातभट्टी दारु अड्ड्यांवर धाडी टाकल्या. त्यात दारूचे ३१५ बॅरल कह्यात घेतले आहेत. दारु बनवण्यासाठी लागणारे ६२ सहस्र लिटर रसायन, ६ सहस्र २५० लिटर हातभट्टी दारु, रबरी ट्यूब आणि काही दुचाकीही कह्यात घेण्यात आल्या. या प्रकरणी उत्पादन शुल्क विभागाने १२ जणांवर गुन्हा प्रविष्ट केला आहे. एकूण १८ लक्ष रुपयांचा मुद्देमाल या कारवाईत कह्यात घेण्यात आला.

भ्रमणभाषवर खेळ खेळण्याच्या निमित्ताने धर्मांधाकडून मुलीचा विनयभंग

     धुळे - भ्रमणभाषवर खेळ खेळण्याच्या निमित्ताने घरी बोलावून धर्मांध परवेज बशिरोद्दीन शेख (वय ३५ वर्षे) याने ८ वर्षीय मुलीचा विनयभंग केला आहे. त्याविषयी कुणाला सांगितल्यावर जीवे मारण्याची धमकीही त्याने तिला दिली. याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा प्रविष्ट करण्यात आला आहे. (धर्मांधांची वासनांधता जाणा ! - संपादक)

सातारा येथील छत्रपती प्रतापसिंह उद्यानात यंदा कृत्रिम तळे निर्माण न होण्याची शक्यता !

जिल्हाधिकार्‍यांच्या धर्मद्रोही आदेशास जिल्हा परिषदेकडून केराची टोपली ! 
     सातारा, २७ ऑगस्ट (वार्ता.) - येथील पुरोगाम्यांच्या दबावामुळे ४ जुन्या तळ्यांमध्ये गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी पर्यावरणरक्षणाच्या नावाखाली मागील वर्षी कृत्रिम तलाव निर्माण करण्यात आले. त्यांपैकी शहरातील ७० टक्के मूर्तीविसर्जन ज्या श्री छत्रपती प्रतापसिंह उद्यानातील तळ्यात होते, तिथे यंदा कृत्रिम तळ्याची निर्मिती होऊ शकत नाही, असे चित्र दिसत आहे. 
१. तसे होण्याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे हे तळे असलेले उद्यान सातारा जिल्हा परिषदेच्या मालकीचे असून या उद्यानात नगरपालिकेला तळे खोदण्यासाठी बंदी केल्याचा ठराव जिल्हा परिषदेने संमत करून तसे पत्र सातारा नगरपालिकेला पाठवले आहे. 

लोकोपयोगी कार्यासाठी बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समिती आणि युवाशक्ती प्रतिष्ठान यांची युती

     मुंबई - अनेक दशके शहर आणि उपनगरांतील बारा सहस्रांहून अधिक मंडळांचे प्रतिनिधित्व करणारी बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समिती आणि प्रशिक्षित पत्रकार तसेच सक्षम तरुणाई यांना घडवण्याचे काम करणारी युवाशक्ती प्रतिष्ठान संघटना यापुढे एकत्र मिळून लोकहितासाठी काम करणार आहेत.
     गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सव या काळात काम करणारी सार्वजनिक मंडळे मोठ्या संख्येने कार्यरत आहेत. त्यांतील अनेक मंडळे ही वर्षभर सामाजिक उपक्रम राबवतात, अशी माहिती युवाशक्ती प्रतिष्ठानच्या संस्थापक अध्यक्ष, वरिष्ठ पत्रकार शीतल करदेकर यांनी दिली. तसेच लोकमान्य टिळकांच्या जाज्वल्य पत्रकारितेप्रमाणे जनजागृती करण्याचा आणि जनशक्ति संघटित करून समाजहितासाठी काम करण्याचा वसा आम्ही घेतला आहे, असेही त्यांनी या वेळी सांगितले.

पुणे महानगरपालिकेतील २० नगरसेवकांकडूनच उपस्थितीसाठी असलेल्या बायोमेट्रिक प्रणालीचा वापर

     पुणे - पुणे महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेला येणार्‍या नगरसेवकांची उपस्थिती बायोमेट्रिक पद्धतीने घेण्याचे नियोजन पालिका प्रशासनाने केले आहे. पालिकेतील १५२ पैकी ९५ नगरसेवकांची बायोमेट्रिकसाठी नोंदणी केली आहे. त्यांपैकी २० नगरसेवकांनी बायोमेट्रिकचा वापर करत उपस्थिती नोंदवली आहे. (नगरसेवकच जर शिस्त आणि नियम पाळणार नसतील, तर ते जनतेला शिस्त आणि कायद्याचे राज्य काय देणार ? - संपादक)
     बायोमेट्रिक प्रणाली गेल्या २ वर्षांपासून वापराविना असल्याचे यापूर्वी स्पष्ट झाले होते. महापौर प्रशांत जगताप यांनी पुढाकार घेऊन ३ ऑगस्टपासून बायोमेट्रिक प्रणालीचा वापर करण्याचे आवाहन नगरसेवकांना केले होते; परंतु त्यानंतर झालेल्या २ सर्वसाधारण सभांसाठी नगरसेवकांनी प्रणालीला प्रतिसाद दिला नाही. (महापौरांच्या आवाहनाला प्रतिसाद न देणारे नगरसेवक जनतेच्या सूचनांना किती मूल्य देत असतील, याचा विचारच न केलेला बरा ! - संपादक)

संभाव्य मपिसा कायद्याच्या विरोधात श्रमजिवी संघटनेचा मोर्चा

     ठाणे - आणीबाणीसारखी परिस्थिती निर्माण होऊ शकणार्‍या मपिसा (महाराष्ट्र अंतर्गत सुरक्षा व्यवस्था अधिनियम) या जाचक कायद्याच्या विरोधात श्रमजीवी संघटनेने येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर २६ ऑगस्टला मोर्चा काढला. सुमारे आठ सहस्र लोक यात सहभागी झाले होते. या कायद्याचा केवळ मसुदा तयार केला असून तो अंतिम मसुदा नाही, असे राज्याच्या गृहविभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव के.पी. बक्षी यांनी म्हटले आहे. या मसुद्यावरून सरकारची पावले आणीबाणीच्या दिशेने वळत असल्याचा आरोप होत आहे.

१०० जणांचा सहभाग असणार्‍या कार्यक्रमासाठी अनुमती घेण्याच्या संभाव्य कायद्याचा मसुदा मागे घेण्याचा मुख्यमंत्र्यांचा आदेश !

     मुंबई - पूजा, विवाह, मेजवानी आदी कौटुंबिक कार्यक्रमांसाठी १०० च्या वर पाहुण्यांना आमंत्रित करायचे असेल, तर यापुढे पोलिसांची अनुमती घेणे आवश्यक आहे, अशा प्रकारच्या तरतुदी असणारा महाराष्ट्र अंतर्गत सुरक्षा व्यवस्था अधिनियम (मपिसा) या कायद्याचा आतंकवादविरोधी पथकाने बनवलेला मसुदा शासकीय संकेतस्थळावर ठेवण्यात आला होता. त्या कायद्याला होत असलेल्या विरोधामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तो मागे घेण्याचा आदेश दिला आहे. सरकारने यासाठी सूचना आणि हरकती मागवल्या होत्या. आता हा मसुदा प्रथम मंत्रीमंडळाकडे चर्चेला गेल्यानंतर त्यावर निर्णय घेण्यात येणार आहे. 

सनातन संस्थेवर बंदीचे षड्यंत्र रचू नये !

वनवासमाची (सज्जनगड) येथील धर्माभिमान्यांची मागणी
     कराड - पुरोगाम्यांच्या हत्येप्रकरणी दोषींवर कारवाई करावी; मात्र सनातन संस्थेवर बंदी घालण्याचे षड्यंत्र रचू नये, अशा आशयाचे निवेदन वनवासमाची (सज्जनगड) येथील धर्माभिमान्यांनी मुख्यमंत्र्यांच्या नावे कराडचे नायब तहसीलदार मीनल भामरे यांना देण्यात आले. या वेळी श्री शिवप्रतिष्ठानचे सर्वश्री सचिन कुंभार, संदीप माने, अमोल कुंभार, नवजवान गणेश मंडळ, वनवासमाचीचे श्री. आनंदराव जाधव, श्री. अशोक माने, तसेच धर्माभिमानी सर्वश्री शहाजी जाधव, अक्षय सावंत, सागर खोचरे, सोमनाथ नाळे, सुशांत शिंदे, हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते आणि सनातन संस्थेचे साधक उपस्थित होते.
     या निवेदनात म्हटले आहे की, सनातन संस्था आध्यात्मिक संस्था आहे. ती धर्मशिक्षणाचे कार्य करते. धार्मिक उत्सवांमध्ये जागृती करते. संस्थेचे सर्वच कार्य सनदशीररित्या चालू असते. हिंदुत्वनिष्ठांचा छळ करण्यासाठीच सनातन संस्थेवर बंदी घालण्याचे षड्यंत्र चालू आहे. आम्ही सर्व हिंदुत्वनिष्ठ सनातन संस्थेच्या पाठीशी आहोत.

ठाणे महानगरपालिका शाळेतील दोन अल्पवयीन मुलींवर सुरक्षारक्षकाकडून अत्याचार

रक्षकच झाले भक्षक !
     ठाणे - ठाणे महानगरपालिका शाळा क्रमांक १६ मधील सुरक्षारक्षक म्हणून कार्यरत असलेल्या विलास शंकर चव्हाण याने २ अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केले आहेत. (अशा नराधमांना भर चौकात फाशीची शिक्षा दिल्यासच या घटनांना काही प्रमाणात आळा बसेल ! - संपादक) मुलींच्या पालकांनी शाळा प्रशासनाच्या साहाय्याने चव्हाण याला पोलिसांच्या कह्यात दिले असून ठाणे न्यायालयाने त्याला ३१ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
     पोलिसांनी चव्हाण याच्या भ्रमणभाषची पडताळणी केली असता त्यात अश्‍लील चित्रफीती सापडल्या. कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी शाळेच्या मुख्याध्यापिकेसह ४ शिक्षिकांना निलंबित करण्यात आले आहे, तसेच त्यांच्याविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित करण्याचे आदेशही पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिले आहेत.

उदगीर (जिल्हा लातूर) येथून हत्येसाठी ३१ बैलांना अवैधरित्या घेऊन जाणार्‍या दोघांना अटक

सर्वच ठिकाणी होणार्‍या गोवंशियांच्या हत्या रोखण्यासाठी शासनाने तत्परतेने पावले उचलावीत !
     उदगीर - येथून कर्नाटकातील पशूवधगृहाकडे अवैधरित्या ३१ बैलांना घेऊन जाणारे शिवकुमार बावकरी आणि इस्माइल कुरेशी यांना पोलिसांनी अटक केली आहे.
१. शिवकुमार बावकरी हा १६ बैलांची अवैधरित्या वाहतूक करून इस्माइल कुरेशी याच्याकडे कत्तलीसाठी घेऊन जात होता. त्याच्या जवळील १६ बैलांसह गाडी आणि ८ लक्ष रुपयांचा ऐवज कह्यात घेऊन अटक केली आहे.
२. दुसर्‍या एका आयशर वाहनावर ताडपत्री टाकून वाहनचालक महमद रजाक शरिफमियाँ १५ बैल अवैैधरित्या मेहराज खाजामैनुसाब कुरेशी यांच्याकडे नेत होता. त्याच्याविरुद्ध गुन्हा प्रविष्ट करण्यात आला आहे.

मुंबईमध्येही मूळ तलावामध्ये दगडी भिंत बांधून गणेशमूर्तींच्या विसर्जनाची व्यवस्था करू ! - आमदार प्रकाश फातर्पेकर

कृत्रिम तलावात गणेशमूर्तींचे विसर्जन आणि मूर्तीदान या अशास्त्रीय कृती थांबवण्यासाठी आमदार प्रकाश फातर्पेकर यांना निवेदन ! 
डावीकडून आमदार श्री. प्रकाश फातर्पेकर
यांना निवेदन देतांना श्री. किशोर औटी
     मुंबई, २७ ऑगस्ट (वार्ता.) - मूळ तलावांत दगडी भिंत बांधून गणेशमूर्ती विसर्जनाची व्यवस्था कशा प्रकारे करता येईल, हे नवी मुंबई प्रशासनाशी बोलून घेईन. त्याप्रमाणे मुंबईमध्येही तशी व्यवस्था करण्यात येईल, असे आश्‍वासन शिवसेनेचे चेंबूर येथील आमदार श्री. प्रकाश फातर्पेकर यांनी दिले. हिंदु जनजागृती समितीचे श्री. किशोर औटी आणि धर्माभिमानी श्री. किरण सावंत यांनी आमदार श्री. फातर्पेकर यांची भेट देऊन त्यांना गणेशोत्सवामध्ये मूर्तीदान आणि कृत्रिम तलावांमध्ये गणेशमूर्तीचे विसर्जन या धर्मशास्त्र विसंगत कृतींद्वारे होणारी धर्महानी रोखावी, यासाठी निवेदन दिले. 

फुटीरतावादी नेत्यांवर देशद्रोहाचा खटला भरा आणि त्यांना जेरबंद करा ! - काश्मिरी पंडितांची मागणी

अशी मागणी करावी लागणे, हे शासनाला लज्जास्पद आहे ! केंद्र सरकार काश्मिरी पंडितांची ही मागणी पूर्ण करणार कि फुटीरतावाद्यांना पाठीशी घालणार ? 
      मुंबई, २७ ऑगस्ट - जे फुटीरतेची बीजे पेरतात, त्यांचे इतके लाड का केले जात आहेत ? सैय्यद गिलानी, उमर फारूक आणि यासिन मलिक हे आतंकवाद्यांना बळ पुरवत असतांना केंद्र सरकार त्यांना 'झेड' सुरक्षा कशी काय देऊ शकते ? त्या सर्वांची सुरक्षा काढून अशा फुटीरतावादी नेत्यांवर देशद्रोहाचा खटला भरा आणि त्यांना जेरबंद करा, अशी मागणी जम्मूतील डोग्रा समाजाचे कृष्णा पंडित, काश्मिरी पंडितांचे नेते चांद भट, एल्.सी. रैना यांनी २६ ऑगस्ट या दिवशी येथील प्रेस क्लबमध्ये आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत केली. 

लाच स्वीकारल्याच्या प्रकरणी दोन वन कर्मचार्‍यांना पोलीस कोठडी

 • भ्रष्टाचाराने पोखरलेली शासकीय कार्यालये !
 • कणकवली वनक्षेत्रपालांवरही संशय : आज चौकशी
        कणकवली - लाकडाची वाहतूक करण्यासाठी लागणारी अनुज्ञप्ती (पास) देण्यासाठी १५ सहस्र ५०० रुपयांची लाच घेतांना कणकवली वनक्षेत्रपाल कार्यालयातील वनरक्षक श्रीकृष्ण परीट, वनमजूर मधुकर सावंत यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने २५ ऑगस्टला अटक केली होती. या दोघांना जिल्हा न्यायालयाने २९ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी बजावली आहे.
        लाकडाची वाहतूक करण्यासाठी पास मिळावा, यासाठी तिवरेचे माजी सरपंच पंढरीनाथ म्हाडेश्‍वर यांनी १६ मार्चला अर्ज दिला होता. या कामासाठी १७ सहस्र ५०० रुपये वनक्षेत्रपाल अधिकारी यांना देण्यासाठी मागण्यात आले, अशी तक्रार म्हाडेश्‍वर यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दिली होती. या प्रकरणात वनक्षेत्रपाल आर्.एस्. पाटील यांच्यावरही संशय व्यक्त केला जात असल्याने २७ ऑगस्टला त्यांची चौकशी करण्यात येणार आहे. या चौकशीत पाटील दोषी आढळल्यास त्यांच्यावरही कारवाई अटळ आहे.

फलक प्रसिद्धीकरता

पाऊस पडण्यासाठी होम-हवन करण्याचा अभिनंदनीय निर्णय !
     आंध्रप्रदेश राज्याच्या श्रीकाकुलम् जिल्ह्यात बरेच दिवस पावसाने दडी मारल्याने पाण्याचे संकट निर्माण झाले आहे. त्यामुळे आंध्रप्रदेश शासनाच्या धर्मादाय विभागाने राज्यातील शिव मंदिरांत वरूण-जप, वरुण सुक्त, पारायणे आणि रुद्र यज्ञ करण्याचा निर्णय घेतला आहे.

हिंदू तेजा जाग रे !

Jago !
     Andhra ke Shrikakulam jile me varsha hone hetu rajya sarkar jap, parayan aur rudra yagya ayojit karegi. - Adwitiya Hindu Dharmaki mahattako naman kare !
जागो !
     आंध्र के श्रीकाकुलम् जिले में वर्षा होने हेतु राज्य सरकार जप, पारायण और रुद्र यज्ञ आयोजित करेगी. - अद्वितीय हिन्दू धर्म की महत्ता को नमन करें !

मुंबई आणि पुणे येथील दहीहंडी उत्सवाच्या मंडळांवर गुन्हे प्रविष्ट

पोलिसांकडून अशी तत्परता मशिदींवर लावलेल्या अवैध भोंग्यांविषयी का दाखवली जात नाही ?
 मशिदींवरील अवैध भोंग्यांविषयी उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे पालन न करणे, हा उच्च न्यायालयाचा अवमान नव्हे का ?
      मुंबई, २७ ऑगस्ट - २० फुटांपेक्षा अधिक उंचीच्या थरांचे मनोरे उभारल्याच्या प्रकरणी मुंबईतील २१ आणि पुण्यातील ११ दहीहंडी मंडळांवर गुन्हे प्रविष्ट करण्यात आले आहेत. मुंबईत ट्रक आणि बस यांच्या टपावर बसून प्रवास करणार्‍या गोविंदांवरही यंदा पोलिसांनी कारवाई केली आहे. 

उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मशिदींवरील ध्वनीक्षेपक त्वरित काढा ! विश्‍व हिंदू परिषदेची मागणी

विहिंप आणि बजरंग दल यांच्या वतीने प्रांताधिकार्‍यांना निवेदन सादर !
प्रांताधिकारी सौ. जिरंगे यांना निवेदन देतांना कार्यकर्ते
     इचलकरंजी (जिल्हा कोल्हापूर), २७ ऑगस्ट (वार्ता.) उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ध्वनीप्रदूषण कायद्याचा भंग करणार्‍यांवर पोलिसांकडून दंडात्मक कारवाई केली जात आहे; मात्र उच्च न्यायालयाने मशिदींवरील ध्वनीक्षेपक काढावेत, असा आदेश दिला असतांना पोलीस त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत. पोलीस सोयीस्कर भूमिका का घेत नाहीत, असा प्रश्‍न उपस्थित करत विश्‍व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांनी कायदा सर्वांसाठी समान आहे, त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे, अन्यथा राज्यव्यापी आंदोलन करण्याची चेतावणी प्रांताधिकारी सौ. अश्‍विनी जिरंगे यांना नुकत्याच दिलेल्या निवेदनाद्वारे देण्यात आली. (हिंदूंच्या सणांच्या वेळी ध्वनीक्षेपकांवर बंधने घालून हिंदुत्ववाद्यांवर गुन्हे प्रविष्ट करण्यास पोलीस मागेपुढे पहात नाहीत. मग हेच पोलीस मशिदींवरील भोंगे काढण्यास पुढाकार का घेत नाहीत कि ते धर्मांधांच्या आक्रमकतेला घाबरतात का ? संपादक) 

'हिंदु राष्ट्र' स्थापनेसाठी सोलापूर येथे आज एकदिवसीय जिल्हास्तरीय हिंदु अधिवेशन !

     सोलापूर, २७ ऑगस्ट (वार्ता.) - भारत हिंदुबहुल देश असूनही देशात गोहत्या, मंदिर सरकारीकरण, लव्ह जिहाद, धर्मांतर आदी धर्मविरोधी घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. हे आघात रोखण्यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना हाच एकमेव उपाय आहे. राष्ट्रीय स्तरावरील कार्याप्रमाणे जिल्हा स्तरावरही स्थानिक हिंदुत्ववादी संघटनांच्या माध्यमातून हिंदुत्वाचे कार्य चालू आहे. गोवा येथे झालेल्या अखिल भारतीय हिंदु अधिवेशनातून प्रेरणा घेऊन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने २८ ऑगस्ट या दिवशी मुरारजी पेठ येथील राघवेंद्र स्वामी मठाच्या जवळ सुशील रसिक सभागृहात एकदिवसीय जिल्हास्तरीय हिंदु अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे. 

गोव्यात अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणारा ७० वर्षीय नझीरशहा याला ५ दिवसांची पोलीस कोठडी !

अशा विकृत अन् वासनांध 
मुसलमानांना कठोर शिक्षा व्हायला हवी !
       मडगाव, २७ ऑगस्ट (वार्ता.) - नुवे येथे एका १३ वर्षांच्या शाळकरी मुलीचा विनयभंग करण्याच्या आरोपावरून मायणा-कुडतरी पोलिसांनी अटक केलेल्या नझीरशहा उपाख्य नझीरबाबा (वय ७० वर्षे) याला पणजी येथील बाल हक्क न्यायालयाने ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
       २० ऑगस्ट या दिवशी नझीरशहा याने त्याच्याकडे भजन शिकण्यासाठी आलेल्या अल्पवयीन युवतीसोबत अश्‍लील वर्तन केले होते. या आरोपीने जामिनासाठी केलेला अर्ज न्यायालयाने अमान्य केला. मूळ पालघर (महाराष्ट्र) येथील नझीरशहा गोव्यात आल्यानंतर तो सासष्टी तालुक्यातील नुवे येथे रहात होता. हा नराधम हिंदु पद्धतीने भजनांचा कार्यक्रम आयोजित करत होता. १५ ऑगस्टला तो गोव्यात आला होता. पीडित मुलीच्या घरापासून काही अंतरावर असलेल्या एका घरात त्याने २० ऑगस्ट या दिवशी भजनांचा कार्यक्रम ठेवला होता. या कार्यक्रमात ही मुलगीही गेली होती. तेव्हा कुणी नसल्याची संधी साधून त्याने तिचा विनयभंग केला. या प्रकरणी तक्रार नोंद झाल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. भारतीय दंड संहिता कलम ३५४, गोवा बाल कायदा कलम ८ आणि बाल संरक्षण कायद्यांतर्गत पोलिसांनी त्याच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे.

हिंदूंनो, सावधान ! पवित्र गंगाजल विकले जात आहे !

गंगाजल विकणे, हे महापापच !
     धर्मशिक्षणाच्या अभावामुळे आपलीच (हिंदूंचीच) श्रद्धास्थाने विकून पैसे मिळवणारे बाजारू वृत्तीचे जन्महिंदू आणि त्यांनी निवडून दिलेले सरकार. एकेकाळी सुवर्णभूमी म्हणून लौकिक असलेल्या भारतातून राजकर्त्यांच्या अधर्माचरणामुळे आनंद, सुख आणि संपत्ती निघून गेली आहे. पैशांसाठी पापनाशिनी गंगानदीचे जल विकण्यापर्यंत आता त्यांची मजल गेली आहे. स्वामी अच्युतानंद महाराज, महामंडलेश्‍वर स्वामी प्रेमानंद महाराज, महंत विनोदगिरी महाराज इत्यादी संत या योजनेस विरोध करत आहेत. त्यानिमित्ताने हा लेखप्रपंच !

स्थूलपणा (लठ्ठपणा) न्यून करण्यासाठी आयुर्वेदीय उपचार

वैद्य मेघराज पराडकर
      स्थूलपणा (लठ्ठपणा) न्यून करण्यासाठी प्रतिदिन व्यायाम करावा, औषधांनी मर्दन (मालिश) करावे, योग्य आहार घ्यावा, तसेच औषधेही घ्यावीत. या सर्व स्तरांवर प्रयत्न केल्यास शरिरात साठलेला अनावश्यक मेद (चरबी) न्यून होतो. यांसंबंधीचे विवेचन पुढे दिले आहे.
१. व्यायाम
१ अ. अंथरुणात किंवा भूमीवर लोळणे : सकाळी अंथरुणात पडल्या पडल्या पुढीलप्रमाणे व्यायाम करावा. उताणे (पाठीवर) झोपून दोन्ही दंड कानांजवळ आणि हात सरळ वर घ्यावेत. दोन्ही हातांची बोटे एकमेकांत गुंतवावीत. या स्थितीत कुशीवर वळत अंथरुणाच्या एका कडेपासून दुसर्‍या कडेपर्यंत आणि दुसर्‍या कडेपासून पुन्हा पहिल्या कडेपर्यंत १ - २ मिनिटे लोळावे. अंथरुण लहान असल्यास भूमीवर पडून हा व्यायाम करावा. हा व्यायाम उठल्या उठल्या करणे शक्य नसल्यास अन्य व्यायाम करतांना करावा.
      सकाळी शौचाला जाऊन आल्यावर पुढीलपैकी शक्य तेवढे व्यायाम शरिराच्या अर्ध्या शक्तीने करावेत. व्यायाम करत असतांना तोंडाने श्‍वास चालू झाला, म्हणजे अर्धी शक्ती वापरली गेली, असे समजावे. आणखी व्यायाम करायचा असल्यास थोडा वेळ थांबून श्‍वास पुन्हा नाकावाटे सुरळीत चालू झाल्यावर करावा. व्यायाम ५ मिनिटांपासून आरंभ करून टप्प्याटप्याने वाढवावा. व्यायामाची सवय झाल्यावर प्रतिदिन न्यूनतम २० मिनिटे व्यायाम करावा.

धर्मांधांच्या वाढत्या संख्येमुळे काश्मीर आणि उत्तरप्रदेश येथील हिंदूंप्रमाणे पुणे येथेही एका भागातील हिंदूंचे स्थलांतर !

       वर्ष १९९० च्या दशकात काश्मीरमधून लक्षावधी काश्मिरी हिंदूंना धर्मांधांनी देशोधडीला लावले. ज्यांनी धर्मांतर करण्यास नकार दिला, संपत्तीपेक्षाही ज्यांनी आपल्या घरातील स्त्रियांच्या रक्षणाला प्रधान मानले, त्या धर्मनिष्ठ काश्मिरी हिंदूंना काश्मीर सोडावे लागले. हे काही एका रात्रीतील स्थलांतर नव्हते. या षड्यंत्राचा प्रारंभ त्याच्या कितीतरी वर्षे आधी झाला होता. वेगवेगळ्या घटनांमधून धोक्याची घंटा वाजत होती; पण त्याकडे कोणीच गांभीर्याने पाहिले नाही. जेव्हा लक्षात आले, तेव्हा हक्कांसाठी लढत बसायचे कि आधी जीव वाचवायचा, हा प्रश्‍न समोर उभा राहिला होता. अशीच स्थिती नुकतीच उत्तरप्रदेशमधील कैरानामध्येही निर्माण झाली. एकेकाळी हिंदूबहुल असणार्‍या त्या गावात हिंदू अल्पसंख्य झाले. प्रकाशझोतात आलेली काश्मीर आणि कैराना ही दोनच नावे ! भारतातील कित्येक गावे, शहरे काश्मीर आणि कैरानाच्या मार्गावर आहेत; परंतु आजही हिंदू जागे होत नाहीत, हे दुर्दैव ! त्यातच आता पुण्यासारख्या शहराची भर पडत आहे. या लेखातील धर्मांधांची उद्दामगिरी वाचून हिंदु राष्ट्राची (सनातन धर्म राज्याची) आवश्यकता प्रतिपादित होईल. त्यासाठी हिंदूंनी प्रभावी संघटन उभारणे आवश्यक आहे.

हिंदु धर्मातील यज्ञातील हवनातून निर्माण होणारा धूर आणि इतर कारणांमुळे निर्माण होणारा धूर

सौ. रंजना गडेकर
       येथे यज्ञामुळे वातावरण आणि मानव यांच्यावर कसा चांगला परिणाम होतो, याचे सविस्तर विवेचन केले आहे. यज्ञाचे लाभ समजावेत, यासाठी यज्ञाचा धूर आणि प्रदूषण करणारे हानीकारक धूर यांची तुलना केली आहे. हे विवेचन सर्वांसाठीच बोधकारक आहे. विशेषकरून पुरोगामी आणि बुद्धीप्रामाण्यवादी यांनी ते समजून घ्यावे; कारण ते नेहमी यज्ञाच्या विरोधात बोलतात. त्यांनी पुढील गोष्टींचा विचार करून हे विवेचन वाचावे.
१. बुद्धीप्रामाण्यवादी सर्व गोष्टींना एका मापात तोलतात. ते सात्त्विकता-तामसिकता लक्षात घेत नाहीत. त्यामुळे त्यांना कारखान्यांतून निघणारा धूर आणि यज्ञातून निर्माण होणारा धूर सारखाच वाटल्यास नवल नाही.
२. ते यज्ञाच्या धुरातील घटक कोणते आणि प्रदूषण करणार्‍या धुरातील घटक कोणते, याचाही विचार करत नाहीत, म्हणजेच ते बुद्धीचा उपयोग करत नाहीत.
३. ते हिंदु धर्माचे वैरी असल्याप्रमाणे वागतात. ऋषी-मुनींनी उगाचच आणि वायफळ व्यय (खर्च) कारण्यासाठी यज्ञ सांगितले आहेत का ? बुद्धीप्रामाण्यवादी यज्ञांचा सूक्ष्मातील आणि व्यापक लाभ का समजून घेत नाहीत ? यज्ञ म्हणजे काही समिधा, तूप इत्यादी अनावश्यक जाळणे नव्हे ! त्यामध्येही अध्यात्मशास्त्र आहे. कोणत्या लाभासाठी कोणती हवनीय द्रव्ये हवीत, हे ठरलेले आहे, उदा. लाह्यांची आहुती दिल्याने हवनकर्त्याला यश आणि बुद्धी मिळते, मोदकांच्या हवनाने इच्छित फळ मिळते, तिळाच्या हवनाने सर्वसाधारण लाभ होतात इत्यादी. असे विविध लाभ करवून देणारे शेकडो यज्ञ धर्मग्रंथांत सांगितले आहेत. इतके हे शास्त्रशुद्ध असतांना यज्ञांना नाहक विरोध का ?

व्हॉट्स अ‍ॅपच्या माध्यमातून धर्मशिक्षणाची आवश्यकता स्पष्ट करणारी एक पोस्ट समूहांत टाकल्यावर त्याला समाजातील जिज्ञासूंकडून मिळालेला प्रतिसाद !

श्री. आनंद जाखोटिया
      माझ्या व्हॉट्स अ‍ॅपवरील क्रमांकाला समाजातील १० समूहांतील लोकांनी जोडले होते. त्या १० समूहांतील प्रत्येकाने पाठवलेल्या माहितीची पोस्ट पहाणे किंवा त्यात काही राष्ट्र आणि धर्म यांविषयीची माहिती पोस्ट करणे, असे मला शक्य होत नव्हते. या अडचणींवर उपाय काढण्यासाठी म्हणून त्या समूहातील जिज्ञासू आणि धर्मप्रेमी शोधण्यासाठी काय करता येईल ?, असा विचार आला. नंतर मी धर्मशिक्षणाची आवश्यकता स्पष्ट करणारी एक पोस्ट सिद्ध करून ती या १० समूहांत केवळ एकदाच टाकली. या पोस्टचा झालेला परिणाम आणि त्यातून लोकांना धर्मशिक्षणाची वाटत असलेली निकड यांविषयीची सूत्रे पुढे देत आहे.
१. समाजातून 
आलेली धर्मशिक्षणाची मागणी !
      या १० समूहांत टाकलेल्या पोस्टमुळे आतापर्यंत विविध राज्यांतील ६३० लोकांनी व्हॉट्स अ‍ॅपवर धर्मशिक्षणाची मागणी केली. त्यांना नियमितपणे ते आचरणात आणू शकतील, अशा प्रकारची धर्मशिक्षणाची पोस्ट एका ब्रॉडकास्ट समूहाद्वारे (ब्रॉडकास्ट समूह : यामध्ये ज्यांनी हा समूह सिद्ध केला आहे, तेच पोस्ट पाठवू शकतात. ती पोस्ट त्या समूहात जोडलेल्या प्रत्येकाला वैयक्तिक मिळते. त्यांना आपल्याला काही प्रतिसाद द्यायचा असल्यास आपल्यालाही तो वैयक्तिकरित्या मिळतो.) पाठवली जात आहे.
     हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व आहे आणि राष्ट्रीयत्व हेच भारतीयत्व ! - श्री. विनोदकुमार सर्वोदय, गाजियाबाद, उत्तर प्रदेश.

घरातील डास न्यून करण्यास साहाय्यक मंत्र

पूर्वे ब्रह्मा मे बद्धः पश्‍चिमे विष्णुर्मे बद्धः ।
उत्तरे रुद्रो मे बद्धः दक्षिणे यमो मे बद्धः ॥
पातले वासुकिर्मे बद्धः फणिः सहस्रे बद्धः ।
हुम् अङ्गुष्ठाय नमः ॥
    हा मंत्र घराची दारे-खिडक्या उघड्या ठेवून ३ वेळा म्हणावा. प्रत्येक वेळा मंत्र म्हणून झाल्यावर ३ टाळ्या वाजवाव्यात. मंत्र म्हणून झाल्यावर ५ मिनिटांनी दारे-खिडक्या बंद कराव्यात. या मंत्रामुळे डास पळून जातात, असा अनुभव काहींनी घेतला आहे.
- डॉ. मोहन केशव फडके, पुणे यांनी दिलेली माहिती (संदर्भ : सनातनचा आगामी ग्रंथ विकार-निर्मूलनासाठी मंत्रोपचार)

गणेशमूर्तींच्या विसर्जनाने प्रदूषण होते, अशी ओरड करणार्‍यांनो, सांडपाण्याद्वारे होणार्‍या भीषण जलप्रदूषणाचा विचार करा !

अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर
     गणेशोत्सव जवळ आला आहे. आता नेहमीप्रमाणे स्वत:ला पर्यावरणप्रेमी म्हणवणारे स्वयंघोषित सुधारक आणि त्यांच्या संघटनांचे कार्यकर्ते सक्रीय होतील. गणेशोत्सवात गणेशमूर्ती विसर्जित केल्यामुळे जलप्रदूषण होते, अशी टूम या लोकांनी काही वर्षांपूर्वी काढली होती. धर्मशिक्षणाचा अभाव आणि कथित पुढारलेपण यांमुळे अनेक जण त्यांच्या नादालाही लागले; पण आता हे स्वयंघोषित समाजसुधारक आणि समाजसेवक यांचे पितळ उघडे पडत आहे. गणपतीच्या मूर्तीला लावण्यात येणार्‍या रंगांमुळे जलप्रदूषण होते. त्यामुळे अशा मूर्ती तलाव, नद्या, खाड्या, समुद्र यांत विसर्जित न करता, कृत्रिम तलावांत विसर्जित करण्याची किंवा त्या स्वयंघोषित संघटनांना दान देण्याची फॅशन चालू झाली.

प.पू. डॉक्टरांच्या अमृत महोत्सवी वर्ष विशेषांका संदर्भात आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती !

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले 
यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त... 
१. २९.५.२०१६ या दिवशी सकाळी दैनिक सनातन प्रभात घरी आल्यावर मला घरात एकदम पुष्कळ प्रकाश आला, असे वाटले.
२. श्रीगणेशमूर्ती सात्त्विक कशी बनवावी ?, याचे मार्गदर्शन करत असतांनाचे प.पू. डॉक्टरांचे छायाचित्र जिवंत वाटून त्यांच्या हातातील कुंचला हलत आहे, असे जाणवणे : मी दैनिक सनातन प्रभात वाचत असतांना त्यातील श्रीगणेशमूर्ती सात्त्विक कशी बनवावी ?, याचे मार्गदर्शन करत असतांनाचे प.पू. डॉक्टरांचे छायाचित्र जिवंत वाटत होते. मला ते चित्र पहात असतांना त्यांच्या हातातील कुंचला हलत आहे, असे अनुमाने २ मिनिटे जाणवत होते. त्यानंतर मी दैनिक सनातन प्रभात वितरणासाठी घेऊन जात असतांना माझ्यासमवेत एक प्रकाशाचा झोत येत आहे, असे मला जाणवत होते. मला आतून पुष्कळ आनंद होत होता आणि उत्साहाचे प्रमाणही वाढले आहे, असे जाणवत होते.

सनातनच्या निरपराध साधकांवरील हा अन्याय लक्षात ठेवा !

     कोणताही गुन्हा केला नसतांना श्री. समीर गायकवाड यांना मागील ११ महिने १२ दिवसांपासून, तर डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांना २ महिने १८ दिवसांंपासून कारागृहात डांबण्यात आले आहे.
     केवळ हिंदुत्वाची मानहानी करण्यासाठी सनातनच्या निरपराध साधकांना कारागृहात डांबणार्‍यांना हिंदु राष्ट्रात दामदुपटीने शिक्षा देण्यात येईल !

प.पू. डॉक्टरांचे आरोग्य सुधारावे आणि हिंदु राष्ट्राची स्थापना व्हावी, यांसाठी अविश्रांतपणे धडपडणारे अश्‍वमेधयाजी प.पू. नाना काळेगुरुजी

प.पू. नाना काळेगुरुजी
१. प.पू. नानांनी प.पू. डॉक्टरांचे आरोग्य सुधारावे, यासाठी आयुष्कामेष्टी यज्ञ करणे आणि त्याचा परिणाम म्हणून प.पू. डॉक्टरांच्या शरिराला सुटलेला कंप आणि त्यात येणारे झटके चमत्कार झाल्यासारखे बंद होणे : १०.४.२०१६ या दिवशी प.पू. नानांचा दूरध्वनी आला होता. त्या वेळी मी त्यांना म्हटले, नाना, प.पू. डॉक्टरांची तब्येत बरी नाही. त्यांच्या हाताला, पायाला कंप आहे. इतका की, त्यांचे शरिर अचानक झटके बसल्यासारखे हलू लागते. हे झटके इतके जोरात आहेत की, त्यामुळे ते बसलेली आसंदीही हलते. गेल्या आठ दिवसांपासून हे सुरू आहे. यावर प.पू. नाना म्हणाले, आम्हाला काही झाले, तरी चालेल; परंतु त्यांना काहीही होता कामा नये. आमचा देह काय कामाचा ? त्यांचा देहच टिकला पाहिजे. आम्ही गेलो, तरी कुणाला काही वाटणार नाही. प.पू. डॉक्टरांचे आरोग्य सुधारावे, यासाठी मी आयुष्कामेष्टी यज्ञ करीन.
        त्याप्रमाणे प.पू. नानांनी १२.४.२०१६ या दिवशी प.पू. डॉक्टरांचे आरोग्य सुधारावे, यासाठी आयुष्कामेष्टी यज्ञ केला आणि काय चमत्कार ! त्यानंतर २ दिवसांनी प.पू. डॉक्टरांच्या देहाला येणारे झटके बंद झाले.

सनातन धर्मानुसार सांगितलेल्या कृतींचा परिणाम किती खोलवर होतो, याचा प्रत्यक्ष अनुभव घेणारे श्री. गौरव सेठी !

श्री. गौरव सेठी
      जानेवारी २०१६ मध्ये चंडीगड येथील श्री. गौरव सेठी यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठली. त्या वेळी प.पू. डॉक्टर यांच्याशी झालेल्या भेटीच्या वेळी श्री. गौरव सेठी यांच्या पत्नी सौ. अनन्या सेठी यांनी एक प्रसंग सांगितला. तो त्यांच्याच शब्दांत देत आहे.
१. दोन्ही हातांनी पावलांना स्पर्श न करता अर्धवट वाकून वडिलांच्या गुडघ्याला स्पर्श करून नमस्कार करत असल्याची चूक मुलाने लक्षात आणून देणे : आम्ही एकत्र कुटुंबात रहातो. श्री. गौरव आणि त्यांचे वडील यांच्यातील संबंध तणावपूर्वक आहेत, तरीही श्री. गौरव प्रतिदिन सकाळी आणि रात्री अर्धवट वाकून वडिलांच्या गुडघ्याला स्पर्श करून नमस्कार करत असत. आमची मुले जेव्हा त्यांना (श्री. गौरव यांना) नमस्कार करत असत, तेव्हा ते त्यांना दोन्ही हातांनी पावलांना स्पर्श करून नमस्कार करायला सांगत. एके दिवशी मुलाने म्हटले, तुम्ही आम्हाला दोन्ही हातांनी पावलांना स्पर्श करून नमस्कार करायला शिकवता; पण स्वतः मात्र आजोबांच्या पायाला एका हाताने स्पर्श करून नमस्कार करता.

कुठे सत्तेसाठी हपापलेले बहुतांश राज्यकर्ते आणि कुठे आत्मानंदात रममाण होण्याऐवजी समाजऋण फेडण्यासाठी समाजात जाऊन अध्यात्मप्रसार करणारे साधू-संत !

श्री. अजित महांगडे
        एकदा पू. भैय्याजींनी त्यांच्या मार्गदर्शनामध्ये त्यांनी स्वतः जंगलात राहून किती खडतर साधना केली आणि त्यांच्यावर देवाची कशी कृपा झाली ?, ते सांगितले. त्या वेळी ते म्हणाले, मला माझ्या गुरुदेवांनी शेवटी समाजात जाऊन कार्य करायला सांगितले. एखादा साधू जेव्हा साधना करत असतो, तेेव्हा समाज त्याला लागणार्‍या गोष्टींची, म्हणजे कपडे, जेवण इत्यादींची काळजी घेत असतो. त्यामुळे त्या साधूवर समाजाचे ऋण असते. यासाठी त्याला समाजात यावे लागते. खरेतर साधू त्याला देवाने दिलेल्या अनुभूतींमुळे जंगलातच आनंदात असतो. त्याला बाहेरच्या समाजात येण्याची इच्छा नसते; पण हे ऋण फेडण्यासाठी तो समाजात येऊन लोकांना साधनेसाठी साहाय्य करतो. 

आम्ही ध्येयापासून विचलीत नाही होणार ।

श्री. अविनाश जाधव
श्रीमत् नारायणाने दिलेले हिंदु राष्ट्राचे ध्येय ।
आम्ही साधकजन पूर्णत्वास नेणार ॥

नारायणाने उचललेल्या या गोवर्धनाला ।
आम्ही साधक साधनारूपी काठ्या लावणार ॥ १ ॥

धर्मद्रोह्यांच्या साहाय्याने प्रसारमाध्यमांनी ।
साधकांवर स्फोट-हत्यांचे आरोप केले ॥
 
सत्ताधिशांच्या बाहुल्यांनी हिंदुद्वेषापायी ।
साधकांना कारागृहात डांबले ॥ २ ॥

रामनाथी आश्रमाला भेट दिलेल्या मान्यवरांचे अभिप्राय

       १९ ते २५.६.२०१६ या कालावधीत विद्याधिराज सभागृह, रामनाथी, गोवा येथे पंचम अखिल भारतीय हिंदू अधिवेशन झाले. या अधिवेशनात सहभागी झालेल्या हिंदुत्वनिष्ठांनी सनातनच्या रामनाथी (गोवा) येथील आश्रमाला भेट दिली आणि येथील कार्याची ओळख करून घेतली. त्यांनी दिलेले अभिप्राय येथे देत आहोत.
१. अशा आश्रमाच्या उभारणीची कल्पना हे दिवास्वप्न आणि अशक्य वाटते. असा आश्रम केवळ दैवी कृपेनेच उभारला जाऊ शकतो. 
- अधिवक्ता कमलेशचंद्र त्रिपाठी, अध्यक्ष, संस्थापक आणि विश्‍वस्त, बुद्धीमत्ता समुह के साथ भारत, वाराणसी, उत्तरप्रदेश. (२०.६.२०१६)

सनातनच्या सात्त्विक भीमसेनी कापराचे महत्त्व

वर्षभरासाठी लागणारा गहू ठेवलेल्या पिंपात 
सनातनचा सात्त्विक भीमसेनी कापूर 
घातल्यावर गव्हामध्ये एकही किडा न आढळणे
       आम्ही प्रतिवर्षी वर्षभरासाठी लागणारे धान्य एकाच वेळी खरेदी करून भरून ठेवतो. ते सुरक्षित रहाण्यासाठी त्यात खडेमीठ, लवंगा, बोरीक पावडर, एरंडेल तेल इत्यादी घालून ठेवत होतो. अशा प्रकारे सर्व काळजी घेऊनसुद्धा धान्याला कीड लागत असे. गेल्या वर्षी देवाने मला गव्हाच्या पिंपात सनातनचा सात्त्विक भीमसेनी कापूर ठेवण्याचा विचार दिला आणि त्याच्याच कृपेने लगेचच तशी कृतीही झाली. जेव्हा मी साठवणातून गहू काढले, तेव्हा मला गव्हात एकही किडा दिसला नाही. यावरून सनातनच्या सात्त्विक उत्पादनांचे महत्त्व माझ्या लक्षात आले. त्यामुळे चालू वर्षीच्या धान्यातही सनातनचा कापूर घालून ठेवला आहे.
- सौ. आसावरी म्हसकर, सनातन आश्रम, मिरज, जिल्हा सांगली. (१९.३.२०१६)

पू. दादा (बाळाजी आठवले) यांचे पत्रलेखन आणि विचार यांची सुंदर शैली दर्शवणारे पत्र !

       चि. सौ. छबू (आताच्या सनातनच्या संत पू. (श्रीमती) शालिनी नेनेआजी) हिच्या शेजारी रहाणार्‍या सौ. माणिक या बाईंनी १९७४ मध्ये रोहिणी मासिकात चि. सौ. छबू हिच्या कर्तबगारीचे वर्णन छापले होते. ते वर्णन वाचल्यावर पू. दादा यांनी चि. सौ. छबूला खालील पत्र लिहिले.
चि.सौ. छबूस सप्रेम आशीर्वाद !
       एक होती चिमुकली हिरकणी. ती फार तेजस्वी होती. आम्ही दोघे तिची किंमत ओळखत होतो; परंतु ती पडली होती एका कोपर्‍यात. तिच्यावर साचली होती धूळ. माणसाला माणूस ओळखतो, त्याचप्रमाणे एका माणिकने त्या हिरकणीवरील धूळ दूर केली. मग तिच्यावर पडला रोहिणी नक्षत्राचा किरण. हिरकणी चमकू लागली. तिचे मूळ स्वरूप, तिचे तेज जगाच्या डोळ्यांत भरले आणि आम्हा दोघांस माहीत असलेले गूढ सत्य घरांतील माणसांनाच नव्हे, तर समाजाला पटले; म्हणून आमचा आनंद द्विगुणित नव्हे, तर शतगुणित झाला. आज तू येथे असतीस, तर तुला दृष्ट लागू नये; म्हणून सौ. ताईने तुझी दृष्ट काढली असती. असेच आपले तेज उत्तरोत्तर वाढत जावो, हीच देवाजवळ प्रार्थना.
       राजाभाऊंनी (प्रसिद्ध नट राजा नेने यांनी) वर्णिलेला आपल्या पत्नीचा मोठेपणा त्यांच्या मनाचा मोठेपणा दाखवितो.
- (पू.) दादा (श्री. बाळाजी आठवले) - (पू.) ताई (सौ. नलिनी बाळाजी आठवले) (वर्ष १९७४) (प.पू. डॉक्टरांचे वडील आणि आई)

हस्तरेषा, जन्मकुंडली आणि नाडीभविष्य

प्रश्‍न : बरेच नाडीशास्त्राचे जाणकार हाताच्या रेषांवरून भविष्य सांगतात. त्यासंदर्भात पुढील मजकूर वाचून माहिती कळवावी. हस्तरेषा आणि पादरेषा, तसेच जन्मकुंडली या दोन्हीमध्ये फरक एवढाच आहे की, जन्मवेळ चुकीची असल्यास भविष्य चुकते; मात्र हाताच्या रेषा प्रत्यक्ष दिसतात. त्यामुळे त्यावरून सांगितलेले भविष्य चुकण्याची शक्यता कमी असते का ?; मात्र रेषा पालटत असल्यामुळे पुढचे भविष्य सांगता येते का ?
उत्तर
१. हस्तरेषांपेक्षा जन्मकुंडली अधिक महत्त्वाची ! : रेषांप्रमाणे जन्मकुंडलीमध्येही पालट होतो. जन्मवेळेच्या मूळ कुंडलीत (जन्मलग्नकुंडलीत) पालट होत नाही. जसे हाता-पायांवरील रेषा काही वर्षांनी पालटतात, तसेच गोचर कुंडलीत (तात्कालिक कुंडलीत) पालट होतो. हाता-पायांवरील रेषांवरून प्रत्यक्ष कोणत्या वेळेत एखादी घटना घडली ?, हे सांगण्यासाठी ते सांगणार्‍या व्यक्तीची साधना आणि तिचा हस्तशास्त्राचा भरपूर अभ्यास असणे आवश्यक असते. असे असले, तरीही घडणार्‍या घटनेची अचूक वेळ वर्तवणे कठीण होते. केवळ हातावरील रेषा पाहून घटनांचा काळ, दिवस तर नाहीच; परंतु घटनेचा मासही (महिनाही) अचूक येत नाही. ज्याप्रमाणे कुंडली घटनांच्या कालनिर्णयासहित ठळक मार्गदर्शन करू शकते, त्याप्रमाणे हाता-पायांवरील रेषा पाहून मार्गदर्शन करता येऊ शकत नाही. एखाद्या व्यक्तीचे आयुष्य ८५ वर्षे दर्शवणार्‍या आयुष्यरेषेवर एक बिंदू कित्येक वर्षांच्या घटना कोरून ठेवतो. अशा वेळी आयुष्यात संभवणार्‍या एखाद्या घटनेचा कालावधी सांगणे कठीण असते. सूक्ष्म कालनिर्णयासाठी हस्तसामुद्रिक शास्त्र अपूर्ण ठरते.

महर्षींनी नाडीवाचनात तुम्ही (सनातनचे साधक) आमच्याकडे उशिरा आलात, असे म्हणण्याचे कारण आणि त्यांनी दिलेले आश्‍वासन

पू. (सौ.) अंजली गाडगीळ
    महर्षि म्हणतात, तुम्ही माझ्याकडे जरा उशिरा आलात. आधी आला असता, तर आपण जगात बरेच काही केले असते.
१. प.पू. डॉक्टरांच्या हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) स्थापनेच्या कार्यासंदर्भात महर्षींनी नाडीशास्त्रात बरेच काही लिहून ठेवले असल्यामुळे आणि पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांचे वय झाल्यामुळे महर्षींनी नाडीवाचनात कधी कधी साधकांना प्रश्‍न विचारणे - तुम्ही माझ्याकडे इतक्या उशिरा का आलात ? : महर्षींच्या वरील प्रश्‍नावर प.पू. डॉक्टरांनी त्यांना प्रश्‍न विचारला, आमच्याकडून उशीर होण्याचे कारण काय ? आमची चूक काय झाली ? त्यावर पू.डॉ. ॐ उलगनाथन् म्हणाले, महर्षींनी प.पू. डॉक्टरांच्या सनातन धर्म राज्याच्या स्थापनेच्या कार्याविषयी इतके लिहून ठेवले आहे की, हे सर्व वाचणे आपल्याला या जन्मात तरी शक्य नाही; कारण आता माझे वय ६६ आहे. महर्षि जेवढे सांगतील, तेवढे वेचकच आपल्याला वाचावे लागेल आणि त्यानुसार कार्य करावे लागेल; म्हणूनच महर्षि मधे मधे म्हणतात, तुम्ही माझ्याकडे यायला उशीर केलात.

भृगुसंहिता आणि सप्तर्षि जीवनाडी

भृगु महर्षि

१. सप्तर्षींच्या गटात भृगु ऋषी नसणे, भृगु म्हणजे महर्षींचे महर्षी
म्हणून मीच आहे, असे श्रीकृष्णाने गीतेतील १० व्या अध्यायात सांगणे 

नाडीपट्टी

    सप्तर्षींच्या गटात भृगु येत नाहीत. ते सप्तर्षींच्याही वर आहेत. साक्षात् भगवान श्रीकृष्णाने गीतेच्या १० व्या अध्यायात म्हटले आहे, महर्षींमधले महर्षी जे आहेत, त्यात भृगु म्हणजे मीच आहे.
२. भृगुसंहितेतील विवरण संक्षिप्त असणे, तर सप्तर्षी जीवनाडीतील
विवरण हे महर्षींनी विस्ताराने केलेले असणे
    सप्तर्षींनी नाडीपट्टीत केलेले विषयाचे विवरण हे भृगुपत्रापेक्षा अधिक, म्हणजेच विस्ताराच्या रूपात असते. भृगु महर्षींचे बोल हे बहुधा संक्षिप्त रूपात असतात.

देवतांच्या विडंबनाविरुद्ध सनातन चळवळी (मोहिमा) राबवत असतांना सनातनची प्रकाशने आणि उत्पादने यांवर देवतांची चित्रे का ?

       सनातन संस्था व्यावसायिक उत्पादनांच्या, तसेच त्यांच्या विज्ञापनांच्या माध्यमातून देवतांचे विडंबन होऊ नये, यासाठी विविध चळवळी राबवते. विविध उत्पादनांवर देवतांची चित्रे छापल्यावर कालांतराने ती पायदळी तुडवली जाण्याची आणि इतस्ततः पडण्याची शक्यता असल्याने तसे न करण्याविषयी समाजप्रबोधनही करते. या पार्श्‍वभूमीवर सनातनची नियतकालिके, उत्पादने, ग्रंथ अन् प्रसारसाहित्य यांवर देवतांची चित्रे किंवा गुरुकृपायोगाचे (गुरु-शिष्याचे) बोधचिन्ह का ?, असा प्रश्‍न एखाद्याला पडू शकतो. याचे उत्तर पुढीलप्रमाणे आहे.
१. अध्यात्मात कृतीपेक्षा तिच्यामागील उद्देशाला अधिक महत्त्व आहे. कुठलीही प्रकाशने आणि उत्पादने काढण्यामागे सनातनचा व्यावसायिक हेतू नसून अध्यात्मप्रसार करून समाजाची सात्त्विकता वाढवणे, हा आहे. सनातन-निर्मित देवतांची चित्रे बाजारात मिळणार्‍या देवतांच्या चित्रांपेक्षा अधिक सात्त्विक असल्याने हा हेतू साध्य होत आहे. अध्यात्मातील जाणकार आणि साधक यांना त्यासंबंधी अनुभूतीही आल्या आहेत.
२. सनातनची प्रकाशने आणि उत्पादने यांवर देवतांची चित्रे छापतांनाच त्यांची हाताळणी कशी करावी, उत्पादनांचा उपयोग झाल्यानंतर त्यांचा विनियोग कसा करावा आदी गोष्टींसंबधी सूचना त्या-त्या उत्पादनांवर शक्यतो प्रसिद्ध केली जाते. सनातनचे वाचक, हितचिंतक आणि साधक त्या सूचनांचे पालन करून इतरांना तसे करण्यास उद्युक्तही करतात.

पंचम अखिल भारतीय हिंदू अधिवेशनात अभिभाषण करतांना एस्.एस्.आर्.एफ्.चे संत पू. सिरियाक वाले यांना आलेली अनुभूती

पू. सिरियाक वाले
अधिवेशनाला उपस्थित असलेल्या सर्व धर्माभिमान्यांप्रती जवळीक आणि प्रेमभाव जाणवणे अन् अभिभाषणाच्या शेवटी आतून शांत वाटणे : पंचम अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाच्या दुसर्‍या दिवशी, म्हणजे २०.६.२०१६ या दिवशी मला स्पिरिच्युअल सायन्स रिसर्च फाउन्डेेशन (एस्.एस्.आर्.एफ्.) आणि महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय यांसंदर्भात बोलायचे होते. एरव्ही ४०० लोकांसमोर बोलायला मला मनापासून आवडत नाही; मात्र या वेळी मी ही सेवा शांतपणे करू शकलो. अभिभाषणापूर्वी मी व्यासपिठावर बसलो असतांना अधिवेशनाला उपस्थित असलेल्या सर्व धर्माभिमान्यांंप्रती मला जवळीक आणि प्रेमभाव जाणवून त्यांच्याशी काही अंशी एकरूपता जाणवत होती. अभिभाषणाच्या शेवटी मला आतून पुष्कळ शांत वाटत होते आणि उपस्थितांप्रती अधिक जवळीक जाणवत होती.
- (पू.) श्री. सिरियाक वाले, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२०.६.२०१६)

सप्तर्षि जीवनाडी

वर्तमानकाळात वैश्‍विक कार्याच्या आवश्यकतेप्रमाणे
सप्तर्षींचा कार्य करणारा गट वेगवेगळा असणे; पण बहुतांश
वेळी वसिष्ठ आणि विश्‍वामित्र संवादात प्रधान असणे
    वैश्‍विक कार्याच्या आवश्यकतेप्रमाणे वर्तमानकाळात कार्य करणारा सप्तर्षींचा गट वेगवेगळा असतो; मात्र सर्वत्र बहुतांशी आदिगुरु म्हणून वसिष्ठच मार्गदर्शन करतात आणि जनसामान्यांचे प्रतिनिधी म्हणून महर्षि विश्‍वामित्र वसिष्ठांना प्रश्‍न विचारत असतात. २-३ मासांनी (महिन्यांनी) सप्तर्षींतील महर्षी पालटतातही. कधी यांत वसिष्ठ, विश्‍वामित्र यांच्याबरोबर नंदिकेश्‍वर आणि नारदही येतात, तर कधी अंगीरस, जमदग्नी, दुर्वास, पुलस्त्य असेही महर्षि संवादात असतात, असे दिसून येते. आताच्या नाडीपट्टीत प.पू. डॉक्टरांविषयी, तसेच सनातनच्या कार्याविषयी बोलणार्‍या गटात वसिष्ठ, विश्‍वामित्र, गौतम, पराशर, पुलस्त्य, अंगीरस आणि दुर्वास हा सप्तर्षींचा गट आहे. कधीतरी मधेच येऊन नंदिकेश्‍वर किंवा नारदही तेवढ्या काळापुरता प्रश्‍न विचारून जातात.
- (पू.) सौ. अंजली गाडगीळ (कोळ्ळिमलय पर्वतक्षेत्र, तमिळनाडू, ३०.६.२०१६, दुपारी ४.२०)
  
चि. श्रीहरि देवळालीकर
    ५३ टक्के आध्यात्मिक पातळीचा उच्च स्वर्गलोकातून जन्माला आलेला नाशिक येथील चि. श्रीहरि स्वप्नील देवळालीकर (वय ३ वर्षे) याचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्याच्या बाबांना त्याच्याविषयी जाणवलेली सूत्रे लवकरच प्रसिद्ध करत आहोत.
चि. श्रीहरि देवळालीकर यांस सनातन 
परिवाराकडून वाढदिवसानिमित्त अनेक शुभाशीर्वाद !

भावी आपत्काळात अन् नेहमीसाठीही उपयुक्त ठरणारी सनातनची ग्रंथमालिका : भावी आपत्काळातील संजीवनी !

      संत-महात्मे, ज्योतिषी आदींच्या सांगण्यानुसार आगामी काळ हा भीषण आपत्काळ असून या काळात समाजाला अनेक आपत्तींना तोंड द्यावे लागणार आहे. आपत्काळात दळणवळण तुटल्यामुळे रुग्णाला रुग्णालयात नेणे, डॉक्टर वा वैद्य यांच्याशी संपर्क साधणे आणि पेठेत (बाजारात) औषधे मिळणेही कठीण होते. आपत्काळात ओढवणार्‍या विकारांना (आजारांना) तोंड देेण्याच्या पूर्वसिद्धतेचा एक भाग म्हणून सनातन भावी आपत्काळातील संजीवनी ही ग्रंथमालिका सिद्ध (तयार) करत आहे. या मालिकेतील १३ ग्रंथ आतापर्यंत प्रकाशित झाले आहेत. या ग्रंथांचा अभ्यास आतापासूनच केला, तर प्रत्यक्ष आपत्काळात विकारांना सामोरे जाण्यासाठी लागणारा आत्मविश्‍वास निर्माण होण्यास साहाय्य होईल. यासाठी हे सर्व ग्रंथ वाचकांनी अवश्य संग्रही ठेवावेत !
अग्निहोत्र 
आपत्काळात नागरिकांच्यारक्षणाचा 
मूलमंत्र ठरणारा सनातनचा ग्रंथ !
 • अग्निहोत्र हे देव आणि निसर्ग यांच्या ऋणांतून मुक्त होण्याचा मार्ग कसा ?
 • अग्निहोत्रामुळे अणूयुद्धाद्वारे होणार्‍या प्रदूषणापासून रक्षण कसे होते ?
 • अग्निहोत्रामुळे होणारे सूक्ष्मातील परिणाम आणि वेळेचे महत्त्व
 • अग्निहोत्राची होम, हवन, यज्ञ आणि याग यांच्याशी तुलना
 • अग्निहोत्रातील प्रत्येक घटकामुळे होणारे वैद्यकीय, मानसिक आणि आध्यात्मिक लाभ कोणते ?
 • साधनेच्या दृष्टीकोनातून अग्निहोत्राचे महत्त्व काय ?
सनातनची ग्रंथसंपदा आता 
SanatanShop.com वर उपलब्ध !
संपर्क : ९३२२३१५३१७

माणुसकीहीन पोलिसांचा आलेला अनुभव !

१. रुग्णाईत साधकाला सलाईन लावलेले असतांना पोलिसांनी जबाब घेण्यासाठी त्याला उठून बसवण्यास सांगणे आणि साधकाने त्यास नकार देऊन रुग्ण साधकाजवळ जाऊन जबाब घेण्यास सांगणे : दैनिक सनातन प्रभातचे वितरण करणार्‍या एका साधकावर धर्मांधाने लोखंडी रॉडने जीवघेणे आक्रमण केले. त्या साधकाला शासकीय रुग्णालयात भरती केले होते. गुन्हा नोंद झाल्यावर रुग्णालयात सायं. ७ वाजता एक पोलीस निरीक्षक आणि दोन साहाय्यक पोलीस निरीक्षक असे तीन पोलीस अधिकारी संबंधित साधकाचा जबाब नोंदवण्यास आले. पोलिसांनी रुग्ण साधक झोपलेला असतांना त्याला उठवून बसवण्यासाठी आम्हाला सांगितले. जेथे पोलीस पटल आणि आसंदी घेऊन बसले होते, तेथे रुग्ण साधकाला आसंदीवर आणून बसवण्यास सांगितले. मी त्यांना स्पष्टपणे सांगितले, तो रुग्णाईत असतांना आणि सलाईन चालू असतांना आम्ही त्याला उठवणार नाही. तुम्हाला हवे असेल, तर तुम्ही तेथून उठून रुग्णाजवळ येऊन जबाब नोंदवा. त्यानंतर ते तिघेही आसंदी सोडून साधकाजवळ आले.
   देशभक्ती, स्वातंत्र्यभक्ती, त्यागाची निष्ठा यांच्या प्रसूतीवेदना हिंदुस्थानला जोपर्यंत जाणवणार नाहीत, तोपर्यंत आपण स्वातंत्र्यविश्‍वाच्या त्रिखंडात टिकणार नाही. आजचा सुशिक्षित समाज अशाच क्षुद्र विचारांचा झाला आहे.
- पू. संभाजीराव भिडेगुरुजी, संस्थापक, श्री शिवप्रतिष्ठान
श्री. अनंत आठवले
       विविध गुणांमुळे साधकांशी लवकर जवळीक साधणारे प.पू. डॉक्टरांचे ज्येष्ठ बंधू श्री. अनंत बाळाजी आठवले (भाऊकाका) यांचा श्रावण कृष्ण पक्ष एकादशी (२८.८.२०१६) या दिवशी ८० वा वाढदिवस आहे.
श्री. अनंत बाळाजी आठवले यांना 
सनातन परिवाराचा सप्रेम नमस्कार
       श्री. भाऊकाकांकडून साधकांना शिकायला मिळालेली सूत्रे उद्या प्रसिद्ध करत आहोत.

हिंदु धर्मावरील संकटे, हे हिंदु धर्मगुरूंनी हिंदूंना धर्मशिक्षण न दिल्याचे फलित !

        हिंदूंवर धर्माचे संस्कार करण्याचे दायित्व धर्मगुरु आणि रामानंदाचार्य यांचे असते. ते कधीही आपला मठ अन् आश्रम सोडून जनतेत आले नाहीत. त्यामुळे हिंदूंना धर्म म्हणजे काय आणि त्याची आवश्यकता काय ?, याविषयी ज्ञानच मिळाले नाही. त्यामुळे हिंदु धर्मावरील सर्व संकटांना धर्मगुरुच उत्तरदायी आहेत ! 
- जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज

गोवा सरकारची कार्यक्षमता ! एक छोटा निर्णय घ्यायला अनेक वर्षे लागणे !

    गोवा वैद्यकीय महाविद्यालय, दंत महाविद्यालय आणि अन्य वैद्यकीय शैक्षणिक संस्थांतील शिक्षक असलेल्या डॉक्टरांच्या निवृत्तीचे वय वाढवण्याविषयी मागील अनेक वर्षे विचार चालू होता. - लक्ष्मीकांत पार्सेकर, मुख्यमंत्री, गोवा

सर्वधर्मसमभावाचा स्वीकार करणे, म्हणजे निरक्षर अथवा प्राथमिक शिक्षण घेतलेले आणि पदव्युत्तर शिक्षण घेतलेले यांना समान लेखणे !

   कोणत्याही धर्माचा अथवा पंथाचा सखोल अभ्यास न करणारेच सर्वधर्मसमभाव नावाच्या हास्यास्पद शब्दाचा उपयोग करतात !

एक साधा निर्णय घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाला १ वर्ष का लागते ?

    दहीहंडी फोडतांना २० फुटांपेक्षा अधिक मोठा थर न लावण्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने गेल्या वर्षी अंतरिम स्थगिती दिली होती; पण आता सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा हा निर्णय कायम ठेवला आहे.

हिंदूंना आंदोलनासाठी परवानगी नाकारणारे पक्षपाती सातारा पोलीस !

   २० ऑगस्ट या दिवशी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या तृतीय स्मृतीदिनाचे औचित्य साधत सातारा येथील पाठक हॉल येथे सनातनचे नाव घेऊन स्वयंघोषित पुरोगाम्यांकडून यथेच्च चिखलफेक करण्यात आली. याच वेळी शहरातील समस्त हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने राजवाडा येथे आंदोलनाला पोलिसांनी अनुमती नाकारली. पोलिसांनी पक्षपाती भूमिका घेऊन स्वत:चे पुरोगामित्व सिद्ध करून अविवेकवादाचे दर्शन घडवले आहे !

विविध परकीय भाषा अवगत असल्यास भाषांतराच्या सेवेत सहभागी व्हा !

साधक, तसेच वाचक, हितचिंतक आणि धर्मप्रेमी 
यांना जागतिक स्तरावरील समष्टी सेवेची सुवर्णसंधी !
१. एस्.एस्.आर्.एफ्. या आध्यात्मिक संस्थेचे व्यापक स्तरावर चालू असलेले प्रसारकार्य ! : जगभरातील जिज्ञासूंना अध्यात्माविषयी मार्गदर्शन करून आनंदी जीवनाचा मार्ग दाखवणारी स्पिरिच्युअल सायन्स रिसर्च फाउंडेशन (एस्.एस्.आर्.एफ्.) ही एक आध्यात्मिक संस्था आहे. www.spiritualresearchfoundation.org हे तिचे संकेतस्थळ आहे.
      हिंदी, इंग्रजी यांसह फारसी, पोर्तुगीज, डच, फ्रेंच, जर्मन, रशियन, स्लोव्हेनियन, चिनी, मलेशियन, क्रोएशियन, स्पॅनिश, हंगेरियन, सर्बियन, इंडोनेशियन, मॅसिडोनियन, बल्गेरियन अशा १८ भाषांतून या संस्थेचे प्रसारकार्य चालू आहे. एस्.एस्.आर्.एफ्.ने जर्मन भाषेतील अध्यात्माविषयीची ग्रंथसंपदा प्रकाशित केली आहे. स्पॅनिश, क्रोएशियन, सर्बियन आदी भाषांतील ग्रंथ प्रकाशित करण्याची सेवा चालू आहे.

सनातनने धर्मप्रसारासाठी बनवलेल्या आकाशकंदिलात थर्माकोलचा वापर करण्यामागील उद्देश लक्षात घ्या !

       श्री गणेशोत्सवात श्री गणेशाची सात्त्विकता अधिकाधिक मिळावी, यासाठी त्याच्या मूर्तीभोवती थर्माकोलने आरास न करता नैसर्गिक वस्तूंनी, उदा. पाने, फुले इत्यादींनी आरास करावी, अशी सूचना देण्यात आली होती. यावरून सनातनने दिवाळीसाठी आकाशकंदील थर्माकोलचा कसा काय बनवला, अशी शंका काहींच्या मनात आली. त्याचे उत्तर पुढीलप्रमाणे देता येईल.
       कृतीपेक्षा त्या कृतीमागील उद्देश महत्त्वाचा असतो, या तत्त्वानुसार सनातनने आकाशकंदील शोभेसाठी बनवला नसून धर्मप्रसारासाठी बनवला आहे. त्यामुळेच त्यावरील लिखाण धर्मजागृतीपर आहे. धर्मजागृतीचा उद्देश सहजसाध्य व्हावा, यासाठी त्याच्यामध्ये थर्माकोलचा सांगाडा म्हणून वापर केला आहे आणि त्यावर धर्मप्रसाराचा उद्बोधक लिखाण चिकटवले आहे. म्हणजेच थर्माकोलचा वापर आकाशकंदील आकर्षक दिसण्यासाठी केलेला नसून धर्मप्रसारासाठीचे एक माध्यम म्हणून केला आहे. आकाशकंदिलातील थर्माकोलचा सांगाडा सात्त्विक लिखाणाने पूर्णपणे झाकला जात असल्यामुळे त्यातून सात्त्विकता प्रक्षेपित होते.
    हिंदूंनी स्वतःकडे आणि अन्य धर्मांकडे त्यांनी दिलेल्या डोळ्यांनी नव्हे, तर आपल्या स्वतःच्या डोळ्यांनी पहायला शिकायला हवे !
- कै. राम स्वरूप गर्ग

पोलिसांनी हीच शक्ती आतंकवाद्यांचे अड्डे शोधण्यासाठी वापरली असती, तर आतापर्यंत देश आतंकवादमुक्त झाला असता !

    पुरोगामी संघटनांकडून सनातन संस्थेवर बंदी घालण्याच्या केल्या जाणार्‍या अन्याय्य मागणीच्या विरोधात समस्त राष्ट्रप्रेमी आणि हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने २१ ऑगस्ट या दिवशी मुंबई येथे भव्य निषेध मोर्चा काढण्यात आला. या मोर्च्यामध्ये बंदोबस्तासाठी असलेले साध्या वेषातील पोलीस मोर्च्यात सहभागी झालेल्या हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांना बाजूला घेऊन त्यांची सखोल चौकशी करत होते.

सर्वत्रचे वाचक, हितचिंतक आणि धर्मप्रेमी यांना नम्र विनंती !

सनातनच्या रामनाथी आश्रमातील कलामंदिरात 
(स्टुडिओमध्ये) व्हिडिओ एडिटिंग आणि अ‍ॅनिमेशन 
यांसाठी पुढील संगणक अन् सॉफ्टवेअर यांची आवश्यकता !
       अखिल मानवजातीला ईश्‍वरप्राप्तीचा मार्ग दाखवणे आणि आध्यात्मिक संशोधन करणे, ही महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाची ठळक वैशिष्ट्ये ! मानवाला आध्यात्मिक विषयांचे अमूल्य ज्ञान मिळावे आणि साधनेसाठी त्या ज्ञानाचा लाभ करून घेऊन त्याने आध्यात्मिक प्रगती साध्य करावी, या व्यापक उद्देशाने विश्‍वविद्यालयाकडून व्यापक स्तरावरील संशोधन कार्य चालू आहे.
       संशोधनाच्या अंतर्गत नानाविध विषयांवरील चित्रीकरण करण्यात येते. त्या चित्रीकरणाचे दृक्श्राव्य संकलन (व्हिडिओ एडिटिंग) करण्याची सेवा सध्या चालू आहे. बुद्धीअगम्य घटनांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याने या सेवेसाठी उपलब्ध असणारी उपकरणे अपुरे पडत आहेत. तुटपुंज्या उपकरणांमुळे या संशोधन कार्याची गती खुंटू नये, यासाठी व्हिडिओ एडिटिंग आणि अ‍ॅनिमेशन करण्याच्या क्षमतेचे पुढील संगणक अन् सॉफ्टवेअर यांची तातडीने आवश्यकता आहे. 
       जे वाचक, हितचिंतक आणि अर्पणदाते वरील साहित्य विकत घेण्यासाठी धनरूपात साहाय्य करू इच्छितात, त्यांनी श्री. योगेश शिंदे यांच्याशी ०८४५१००६१३० या क्रमांकावर किंवा yogesh.sanatan@gmail.com या संगणकीय पत्त्यावर संपर्क साधावा.

धर्मरथांवर चालक-साधकांची तातडीने आवश्यकता !

सर्वत्रच्या साधकांना सेवेची सुवर्णसंधी !
       सनातनचे ग्रंथ म्हणजे समाजाला धर्मशिक्षण देणारे ज्ञानाचे अनमोल भांडारच ! मानवजातीसाठी ज्ञानामृत असलेल्या या ग्रंथांद्वारे समाजाला आचारधर्म, साधना, आदी नानाविध विषयांसंदर्भात दिशादर्शन केले जाते. या ग्रंथांना सर्वत्र मोठ्या प्रमाणावर मागणी येत आहे.
       समाजापर्यंत शीघ्रतेेने पोहोचण्यासाठी सनातन संस्थेच्या वतीने ठिकठिकाणी धर्मरथाद्वारे ग्रंथप्रदर्शने लावली जात आहेत. या सेवेसाठी धर्मरथावर चालक-साधकांची आवश्यकता आहे. सेवेसाठी इच्छुक असलेल्या साधकांकडे लहान धर्मरथासाठी लाईट मोटर व्हेहिकल (LMV), दुसर्‍या लहान धर्मरथासाठी लाईट ट्रान्स्पोर्ट व्हेहिकल आणि तीन मोठ्या धर्मरथांसाठी हेव्ही ट्रान्स्पोर्ट व्हेहिकल (HGV) असे परवाने असणे आवश्यक आहे.
       जे साधक वरील सेवांमध्ये काही कालावधीसाठी किंवा पूर्णवेळ सहभागी होऊ शकतात, त्यांनी जिल्हासेवकांच्या माध्यमातून श्री. माधव गाडगीळ यांच्याशी ०८४५१००६००८ या क्रमांकावर त्वरित संपर्क साधावा.

देवस्थानात मनोरंजन नव्हे, तर भक्तीमय वातावरण हवे !

   शिर्डी येथील श्री साई संस्थानमध्ये भाविकांचे दर्शन आनंददायी होण्याकरता भक्तीमय अन् धार्मिक वातावरणासह लेझर-शो, श्री साई गार्डन यांसारख्या मनोरंजनाच्या सुविधा निर्माण करू. - श्री. सुरेश हावरे, अध्यक्ष, श्री साई संस्थान
   मनोरंजनाच्या सुविधांमुळे वातावरण भक्तीमय कसे होईल ? देशातील अनेक धार्मिक स्थळे पर्यटनस्थळे बनल्यामुळे आज तेथील सात्त्विकता आणि चैतन्य न्यून झाले आहे. त्यामुळे धार्मिक स्थळी भक्तीभाव वृद्धींगत करणारे सत्संग, नामजप आदी कार्यक्रम झाले, तरच धार्मिक वातावरण निर्माण होईल !

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेची दिशा

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शक विचारांचा संग्रह असलेले सनातनचे ग्रंथ !
या ग्रंथात वाचा...
 • हिंदु संप्रदाय आणि हिंदुत्वनिष्ठ संघटना यांनी एकत्रित कार्य करण्याची आवश्यकता !
 • हिंदु राष्ट्र-स्थापनेसाठी हिंदुत्वनिष्ठ विचारवंत आणि अधिवक्ते यांचे योगदान आवश्यक !
 • हिंंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या दृष्टीने संतांच्या ब्राह्मतेजाचे (आध्यात्मिक बळाचे) महत्त्व !
 • हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचे प्रत्यक्ष करावयाचे कार्य आणि भावी काळातील कार्याची दिशा !

पोलिसांनी केलेल्या चौकशीची माहिती त्वरित दैनिक सनातन प्रभातला कळवा !

सनातनचे साधक आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते यांना सूचना
     डॉ. दाभोलकर आणि कॉ. पानसरे यांच्या हत्येच्या प्रकरणी सनातनच्या साधकांची आणि हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांची ठिकठिकाणी पोलिसांकडून चौकशी करण्यात येत आहे. पोलिसांनी प्रत्यक्ष बोलावून, घरी येऊन किंवा भ्रमणभाषवर संपर्क करून चौकशी केल्यास त्या चौकशीची माहिती (कोणत्या दिवशी चौकशी झाली, काय प्रश्‍न विचारले, पोलिसांचे नाव, पोलीस ठाणे, किती वेळा चौकशी केली आदी सर्व तपशील) नजीकच्या दैनिक सनातन प्रभातच्या कार्यालयात त्वरित पाठवावी. आपल्या जिल्ह्यातील साधक किंवा कार्यकर्ते यांनी झालेल्या चौकशीचा तपशील पाठवला आहे कि नाही, याचा जिल्हा समन्वयकांनी आढावा घ्यावा.
इ-मेल : panveldainik@gmail.com
संपर्क : ९४०४९५६०८७
       निधर्मी म्हणजे जडवादी, इहवादी, पुमनर्जन्म आणि परलोकादी न मानणारे ! 
- गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी (घनगर्जित, सप्टेंबर २०१०)
सर्वांना सुख देणारे हिंदु राष्ट्र हे एक दैवी राष्ट्र आहे. - आद्य सरसंघचालक डॉ. केशव बळीराम हेडगेवार

भारतात अशी कल्पना तरी करू शकतो का ?

अ. अमेरिकेतील एका प्रमुख विद्यापिठाने त्याच्या संस्थेमध्ये हिंदूंसाठी प्रथमच पूर्णवेळ संचालक म्हणून ब्रह्मचारी व्रजविहारी शरण यांची नियुक्ती केली आहे. ही नियुक्ती मिशन अ‍ॅण्ड को जॉजर्र्टाऊनचे उपाध्यक्ष रे हावर्ड ग्रे यांनी केली. या विद्यापिठात अनुमाने ४०० हिंदु विद्यार्थी आणि शिक्षक आहेत.
आ. अमेरिकेतील युनिव्हर्सिटी ऑफ टेक्सासच्या ब्लँटन म्युजियम ऑफ आर्टने विनामूल्य योगवर्ग चालू केले आहेत. विश्‍वविद्यालयाच्या या निर्णयाचे हिंदूंनी स्वागत केले आहे.
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥
या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो. - प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

बोधचित्र

॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज
सनातनचे श्रद्धास्थान
जिसने पायो उसने छिपायो । वो नर सच्चा, वोही गुरुका बच्चा ।
भावार्थ : पायो म्हणजे आत्मानुभूती झाली. छिपायो म्हणजे आत्मानुभूती झाल्याचे कोणाला सांगितले नाही. (अर्थात ती शब्दांत सांगताही येत नाही.) गुरुका बच्चा म्हणजे गुरूचा खरा शिष्य. एखाद्याकडे अनमोल हिरा असला, तर तो काही सर्वांना त्याविषयी सांगत नाही. तसेच अनमोल आत्मानुभूती आलेला त्याविषयी कोणाला काही सांगत नाही. अहंभाव नसल्यामुळेच त्याला ती अनुभूती आलेली असते व म्हणूनच तो तिच्याविषयी बोलत नाही.
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.)

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले
हिंदुत्वनिष्ठांची केविलवाणी सद्य:स्थिती !
     गायींची हत्या झाली, तर गंगा प्रदूषण रोखण्यासाठी कार्यरत असलेल्यांना त्याचे काही वाटत नाही आणि गंगा प्रदूषण रोखण्यासाठी कार्यरत असलेल्यांवर पोलिसांनी लाठीहल्ला केला, तर गोरक्षकांना त्याचे काही वाटत नाही ! प्रत्येकाला हिंदूंचे सर्व प्रश्‍न माझेच आहेत,असे वाटेल, तेव्हाच हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या दिशेने हिंदूंची वाटचाल होईल. - (परात्पर गुरु) डॉ. आठवले

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

कुळाचाराचे पालन करा !
    ईश्‍वरावर श्रद्धा ठेवा. घरातील वातावरण आधुनिक असले, तरी देवघर असावे. कुळधर्म-कुळाचार यांचे पालन करा.
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥

(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

लोकमान्यांचे स्मरण !

     गणेशोत्सव एका आठवड्यावर येऊन ठेपला आहे. महाराष्ट्र राज्यात या उत्सवाचा गवगवा आणि व्याप्ती मोठी असतेे. राज्यातील पुणे शहरात या उत्सवाची मुहूर्तमेढ झाली. लोकमान्य टिळक यांनी वर्ष १८९४ मधे सार्वजनिक गणेशोत्सव चालू केला आणि यशस्वी करून दाखवला. त्यानंतर मुंबई, नाशिक, नगर, धुळे, कोल्हापूर, सोलापूर येथे सार्वजनिक गणेशोत्सव चालू झाले. तसे पहाता गणेशचतुर्थी हा हिंदूंचा सण. त्याचे रूपांतर गणेशोत्सवात कसे आणि का झाले ? लोकमान्य टिळक हे या परिवर्तनाचे शिल्पकार आहेत. लोकमान्य टिळक यांनी अनेक हिंदू-मुसलमान दंगे तेव्हा अनुभवले. पुणे हे हिंदु संस्कृतीचे माहेरघर ! या शहरात हिंदूंचे परंपरागत सण-उत्सव साजरे होत होते; पण म्लेंच्छांनी घडवून आणलेल्या दंगलीचे गालबोट या सण-उत्सवांना लागतच होते. हिंदू, मुसलमान आणि ब्रिटीश शासन या तीन घटकांचा टिळकांनी अभ्यास केला. शासनाची निष्क्रीयताच या दंग्यांना कारणीभूत असल्याचे त्यांचे मत झाले. हिंंदूंची मिरवणूक मशिदीसमोरून जात असतांना वाद्ये वाजवायला पोलिसांची बंदी असे, तर हिंदूंच्या मंदिरांसमोरून वाद्यांसह जाणार्‍या मिरवणुकीवर असे कोणतेच बंधन नसे. म्हणजे पोलीस प्रशासन पक्षपातीपणा करते, हिंदू दुखावले जातात, मुसलमानांना सगळ्या सवलती मिळतात, असे चित्र दिसत होते. अल्पसंख्यांकांनी कितपत सवलती घ्यायच्या आणि बहुसंख्यांकांनी कितपत भोगायचे, यालाही काही मर्यादा हव्यात, असे लोकमान्य टिळक एकदा म्हणाले. टिळकांनी हिंदूंची बाजू मांडणे चालूच ठेवले. केसरीसारखे नियतकालिक त्यांच्या हाताशी असल्यामुळे या गोष्टी राज्यभर पसरत गेल्या. हिंदूंचे संघटन काळाची आवश्यकता झाली आणि सगळ्या हिंदूंना एकत्र आणण्यासाठी एखादी धार्मिक गोष्टच उपयुक्त ठरेल, असे टिळकांचे ठाम मत झाले.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn