Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

कोटी कोटी प्रणाम !

 
श्रीकृष्ण सरस्वती महाराज पुण्यतिथी, कोल्हापूर.

हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी पालघर येथे २८ ऑगस्ट या दिवशी जिल्हास्तरीय हिंदु अधिवेशन !

धर्मांतर, आतंकवाद, लव्ह जिहाद, गोहत्या या 
धर्मावरील आघातांवर चर्चा अन् कृती कार्यक्रम ठरणार ! 

डावीकडून श्री. जितेंद्र हजारे, श्री. शिवकुमार पांडे,
श्री. नरेंद्र सुर्वे, श्री. दीप्तेश पाटील आणि सौ. नयना भग

        पालघर, २६ ऑगस्ट (वार्ता.) - भारत हिंदुबहुल देश असूनही देशात गोहत्या, मंदिर सरकारीकरण, लव्ह जिहाद, धर्मांतर आदी धर्मविरोधी घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. हे आघात रोखण्यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना हाच एकमेव उपाय आहे. राष्ट्रीय स्तरावरील कार्याप्रमाणे जिल्हास्तरावरही स्थानिक हिंदुत्ववादी संघटनांच्या माध्यमातून हिंदुत्वाचे कार्य चालू आहे. गोवा येथे झालेल्या अखिल भारतीय हिंदु अधिवेशनातून प्रेरणा घेऊन हिंदु जनजागृती समिती आणि हिंदू गोवंश रक्षा समिती यांच्या वतीने २८ ऑगस्ट या दिवशी नालासोपारा चावडीनाका येथील श्री महाकाली मंदिराच्या सभागृहात एकदिवसीय जिल्हास्तरीय हिंदु अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे.

इचलकरंजी येथे अज्ञात समाजकंटकांनी विश्‍व हिंदु परिषदेचा फलक चौथ्यांदा फाडला !

 • पोलिसांकडून कार्यकर्त्यांनाच शिवीगाळ आणि मारहाण
 • विहिंपकडून रस्ता बंद आंदोलन !
 • समाजकंटकांऐवजी ८ कार्यकर्त्यांना कह्यात घेतले !

विहिंपचा लावण्यात आलेला डिजीटल फलक
मधून असा फाडण्यात आला आहे. (वर्तुळात)

        इचलकरंजी (जिल्हा कोल्हापूर), २६ ऑगस्ट (वार्ता.) - येथील भारतमाता हौसिंग सोसायटी येथे विश्‍व हिंदु परिषदेचा छत्रपती शंभू राजांचे चित्र असलेला डिजिटल फलक अज्ञात समाजकंटकांनी २६ ऑगस्ट या दिवशी फाडला. अशा प्रकारे फलक फाडला जाण्याची ही चौथी वेळ असल्याने संतप्त झालेल्या विहिंपच्या कार्यकर्त्यांनी रस्ता बंद आंदोलन केले.

हाजीअली दर्ग्यात आता मजारपर्यंत महिलांना प्रवेश !

 • हिंदूंच्या धर्मपरंपरांच्या विरोधात तात्काळ कारवाई करणारे पोलीस आणि शासन मुंबई उच्च न्यायालयाच्या या आदेशाची कार्यवाही करणार कि अल्पसंख्यांकांचे तुष्टीकरण करणार ?
 • मुंबई उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय !
 • निकालाला ६ आठवड्यांची स्थगिती
       मुंबई, २६ ऑगस्ट - वरळी येथील हाजीअली दर्ग्यात महिलांच्या प्रवेशावरील बंदी मुंबई उच्च न्यायालयाने २६ ऑगस्ट या दिवशी हटवली आहे.
       हाजीअली दर्ग्यात प्रवेशासंबंधी याचिकेवर ऐतिहासिक निर्णय देतांना मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती विद्यासागर कानडे आणि न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे यांनी स्पष्ट केले आहे की, जेथे पुरुषांना जाण्याची अनुमती आहे, तेथे महिलांनाही जाण्याचा अधिकार आहे. त्यामुळे यापुढे हाजीअली दर्ग्यामध्ये आता स्त्री-पुरुष असा भेदाभेद न करता सर्वांना दर्ग्याच्या आतपर्यंत प्रवेश मिळणार आहे.
       हाजीअली दर्ग्याच्या विश्‍वस्तांनी या निकालाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यासाठी वेळ मागितला होता. त्यामुळे निकालाला स्थगिती द्यावी, अशी मागणी करण्यात आली होती. न्यायालयाने ती मागणी मान्य करत निकालाला ६ आठवड्यांची अंतरिम स्थगिती दिली. उच्च न्यायालयाने हा निर्णय दबावाखाली दिलेला असल्याचेही हाजीअली ट्रस्टने म्हटले आहे, तर एम्आयएम्चे हाजी राफत यांनी हा निकाल त्यांच्या विरोधात असल्याचे म्हटले आहे.

पंतप्रधानांनी गोरक्षकांविषयीचे वक्तव्य मागे घेऊन गोमातेची क्षमा मागावी !

नागपूर येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलनात हिंदुत्वनिष्ठांची मागणी 

आंदोलनात सहभागी हिंदुत्वनिष्ठ

        नागपूर - पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी गोरक्षकांच्या संदर्भात केलेल्या विधानामुळे असंतोष पसरला आहे. पंतप्रधानांनी गोहत्या करणार्‍या धर्मांधांना खडे बोल ऐकवावेत अन् त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्याचे आदेश द्यावेत, गोरक्षकांविषयी केलेले वक्तव्य मागे घ्यावे आणि गोमातेची क्षमा मागावी, या मागण्यांसाठी समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने संविधान चौक, नागपूर येथे २३ ऑगस्ट २०१६ या दिवशी राष्ट्रीय हिंदू आंदोलन करण्यात आले.

आयुक्त दालनात धूर आणि औषध यांची फवारणी

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून नगर 
महानगरपालिकेच्या आयुक्तांशी असभ्य वर्तणूक
         नगर, २६ ऑगस्ट - शहरातील नागरिकांना गढूळ पाणी, विस्कळीत पाणी पुरवठा, स्वच्छता, मोकाट कुत्रे, जनावरांचा प्रश्‍न आदींविषयी महानगरपालिका प्रशासनाकडून नोंद घेतली जात नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पालिकेचे आयुक्त दिलीप गावडे यांच्या दालनात जाऊन त्यांच्या पटलासह अन्य साहित्यांवरही धूर आणि औषध फवारणी केली. त्यानंतर त्यांना खडसवले. (हे आंदोलन जीवघेणे ठरले असते, तर त्याला उत्तरदायी कोण ? - संपादक) काही कार्यकर्त्यांनी आयुक्तांच्या आसंदीजवळ (खुर्ची) जाऊन त्यांना हाताला धरून बाहेर घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. (कायदा हातात घेणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते ! - संपादक) काही कार्यकर्ते आणि आयुक्त यांच्यात वादही झाला. शेवटी आयुक्तांनी मोर्चाला सामोरे जाण्याची सिद्धता दर्शवल्यानंतर आंदोलक आणि पोलीस यांच्या गराड्यात त्यांना बाहेर नेण्यात आले. त्यानंतर आयुक्तांनी भूमिका मांडली.
         जनतेच्या उपरोक्त समस्यांविषयी आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली २३ ऑगस्ट दिवशी पालिका कार्यालयावर वाडिया पार्क येथील गांधी पुतळ्यापासून मोर्चा काढण्यात आला होता. त्यानंतर कार्यकर्त्यांनी वरील अयोग्य कृती केली. त्या वेळी आयुक्तांच्या दालनात त्यांच्यासह सर्व वरिष्ठ अधिकारी आणि विभाग प्रमुख उपस्थित होते.

स्क्रोलड्रोल डॉट कॉम आस्थापनाने देवतांचे विडंबन करणारी चित्रे फेसबूकवरून काढली !

 • हिंदूंनी संघटितपणे आणि वैध मार्गाने विरोध केल्यामुळे मिळालेले यश !
 • हिंदूंनो, या यशासाठी ईश्‍वराच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करा !

वस्त्रहरण चालू असतांना द्रौपदीसाठी
भ्रमणभाषवरून ऑनलाईन साडीची मागणी करणारा श्रीकृष्ण

       या चित्राद्वारे कोणाच्या धार्मिक भावना दुखावण्याचा हेतू नसून केवळ विडंबन काय केले आहे, ते समजावे यासाठी चित्र प्रकाशित करत आहोत. - संपादक 
       मुंबई - श्रीकृष्णजन्माष्टमीच्या दिवशी Twitter.com/balsanskar या बालसंस्कार संकेतस्थळाच्या ट्विटर खात्यावरून श्रीकृष्णाचा होणारा अनादर रोखून त्यांची कृपा संपादन करूया #HappyJanmashtami असे प्रबोधन केले आहे. या ट्विटसह द्रौपदी वस्त्रहरणाच्या प्रसंगी श्रीकृष्ण मिंट्रा डॉट कॉम संकेतस्थळावर Extra long sarees (जास्त लांबीच्या साड्या) असे शोधत आहे, असे स्क्रोलड्रोलने काढलेले चित्र जोडण्यात आले आहे. त्यातील एक म्हणजे द्रौपदी वस्त्रहरणाच्या वेळी श्रीकृष्णाला प्रार्थना करत असून तिच्या शीलरक्षणासाठी मोठ्या लांबीची साडी खरेदी करण्यासाठी श्रीकृष्ण मिंट्रा डॉट कॉमकडे ऑनलाईन मागणी करत आहे, असे श्रीकृष्णाचे विडंबन करणारे विज्ञापन प्रसारित करण्यात आले होते. त्या वेळीही आस्थापनाला हिंदूंनी विरोध केला होता; मात्र या वेळी जन्माष्टमीच्या काळात हिंदूंनी संघटितपणे वैध मार्गाने विरोध केल्यावर हे विज्ञापन बनवणार्‍या स्क्रोलड्रोल डॉट कॉम ने ही चित्रे फेसबूकवरून काढून टाकली, तर मिंट्रा डॉट कॉमनेही या चित्राला आम्ही पाठिंबा देणार नाही, असे सांगत सारवासरव केली.

राज्यातील २ सहस्र १०० पूल वाहतुकीसाठी धोकादायक ! - सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील

इतक्या मोठ्या संख्येत धोकादायक 
झालेले पूल सार्वजनिक बांधकाम विभागाच्या 
आधीच निदर्शनास का आले नाहीत ?
       पुणे, २६ ऑगस्ट - महाड येथील सावित्री पुलाच्या दुर्घटनेनंतर राज्यातील शिवकालीन आणि ब्रिटीशकालीन पुलांची पडताळणी करण्यात आली. (हा प्रकार म्हणजे तहान लागल्यावर विहीर खोदण्यासारखा आहे ! - संपादक) त्यातील २ सहस्र १०० पूल वाहतुकीसाठी धोकादायक आहेत. त्यापैकी १०० पुलांची तातडीने दुरुस्ती करण्याची आवश्यकता आहे. (जनतेच्या जिवाशी खेळणारे प्रशासन ! अशा धोकादायक पुलांवरून होणारी वाहतूक तातडीने रोखणार का ? - संपादक) पुलांची ही स्थिती लक्षात घेऊन त्यासंदर्भात पुढील दिशा ठरवण्यासाठी स्वतंत्र विभाग स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने पुलांची पडताळणी, देखभाल-दुरुस्ती आणि संनियंत्रण या विषयावर कार्यरत वरिष्ठ अभियंत्यांसाठी २५ ऑगस्ट या दिवशी पुण्यात चर्चासत्र आयोजित केले होते. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
       ते पुढे म्हणाले की, अतिनिकडीच्या १०० पुलांच्या कामासाठी आवश्यक निधीचे अंदाजपत्र काढण्याचे काम चालू आहे. डिसेंबरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये त्या कामासाठी अधिक निधीची मागणी करण्यात येणार असून मे २०१७ पर्यंत सर्व पुलांची दुरुस्ती करण्यात येईल.

अभाविपच्या पाठपुराव्यानंतर जेएस्पीएम्च्या प्राचार्यांविरुद्ध गुन्हा प्रविष्ट !

शिक्षणक्षेत्रात आणखी एक घोटाळा !
       पुणे, २६ ऑगस्ट - अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (अभाविपच्या) पाठपुराव्यानंतर जसवंतराव चव्हाण अभियांत्रिकी महाविद्यालयाचे (जेएस्पीएम्) प्राचार्य आणि संस्थाचालक यांच्या विरोधात हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा प्रविष्ट करण्यात आला आहे.
       या संदर्भात अभाविपने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे की,
१. शासनाच्या वतीने आर्थिक मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी (EBC) शिष्यवृत्ती मिळते. जेएस्पीएम् संस्थेच्या पुण्यातील सर्व अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये वर्ष २०१४-१५ साठीची शिष्यवृत्ती ४ मास उलटूनही विद्यार्थ्यांना देण्यात आली नव्हती.
२. शिष्यवृत्ती आल्यानंतर ३-४ दिवसांत पैसे देतो, असे सांगून महाविद्यालय प्रशासनाच्या वतीने विद्यार्थ्यांकडून पैसे मिळाले आहेत, अशा आशयाच्या मजकुरावर स्वाक्षर्‍या घेण्यात आल्या.
३. पैसे मागण्यासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांना वारंवार शिवीगाळ करण्यात आली.

संभाजीनगर येथील हर्सूलच्या तलावात यंदा श्री गणेशमूर्तींचे विसर्जन न करण्याचा प्रस्ताव

संभाजीनगर महानगरपालिका आणि 
पोलीस प्रशासन यांचा धर्मद्रोही प्रस्ताव !
       संभाजीनगर, २६ ऑगस्ट - गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर मागील आठवड्यात पोलीस प्रशासन आणि महानगरपालिका यांची संयुक्त बैठक पार पडली. हर्सूल तलावातील साठा पिण्यायोग्य असून त्यातून अनेक भागांना पाणीपुरवठा होतो. त्यामुळे यंदा तलावात श्री गणेशमूर्तींचे विसर्जन करू नये, असा प्रस्ताव बैठकीत मांडण्यात आला होता. त्या प्रस्तावावर गणेश मंडळे आणि प्रशासन यांचे एकमत झाले आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली. (धर्मशिक्षणाच्या अभावीच गणेश मंडळांकडून अशा प्रकारच्या प्रस्तावावर होकार दिला जातो, हे दुर्दैव ! श्री गणेशमूर्तींच्या विसर्जनामुळे कोणत्याही प्रकारचे जलप्रदूषण होत नाही, असा प्रदूषण नियंत्रण मंडळाचा अहवाल उपलब्ध असतांना प्रशासनाकडून जलप्रदूषणाचा बागुलबुवा निर्माण करून हिंदूंना धर्माचरणापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला जात आहे. अशा निर्णयांना हिंदूंनी विरोध करून शास्त्रानुसार मूर्तींचे विसर्जन करण्यासाठी आग्रह करणे अपेक्षित आहे. - संपादक)

भावभक्तीविरहित अशास्त्रीय दहीहंडी साजरी !

दहीहंडीच्या नावाखाली तरुणाईची हुल्लडबाजी 
        पुणे, २६ ऑगस्ट (वार्ता.) - पूर्णावतार भगवान श्रीकृष्णाच्या स्मरणात साजरा करण्यात येणारा आनंददायी उत्सव म्हणजे दहीहंडी उत्सव ! दुर्दैवाने धर्मशिक्षणाच्या अभावामुळे नुकताच साजरा झालेला दहीहंडी उत्सव बहुतांश ठिकाणी विकृत पद्धतीने साजरा करण्यात आला. चौकाचौकात साजर्‍या झालेल्या उत्सवात तरुणाईची हुल्लडबाजी होती; पण श्रीकृष्णाप्रतीचा भाव नव्हता, नाच होता; पण त्यामध्ये आनंद नव्हे, तर बीभत्सपणा होता, तरुणांमध्ये उत्साह होता; मात्र भक्तीभावाचा अभाव होता. जवळपास सर्वच ठिकाणी अशी चित्रपटगीतांच्या तालावर थिरकत मानवी मनोरे रचत दहीहंडी फोडण्यात आली. (अशा प्रकारे सण साजरे करणे म्हणजे दहीहंडीच्या नावाखाली मनोरंजनाची, तसेच विकृत हौस भागवून घेणेच होय. सण धर्मशास्त्रीय दृष्टीकोनातून साजरे झाले, तरच त्यांचा आध्यात्मिक स्तरावर लाभ होतो. अशा विकृतीमुळे आध्यात्मिक लाभ तर होतच नाही; पण अयोग्य कृती करणारे आणि त्याला मूकसंमती देणारे मात्र पापाचे धनी होतात. असे होऊ नये, यासाठी समाजाला धर्मशिक्षण मिळणे आवश्यक आहे. - संपादक)

ओडिशामध्ये एका व्यक्तीवर पैशांअभावी रुग्णालयापासून घरापर्यंत पत्नीचा मृतदेह खांद्यावर वाहून नेण्याची वेळ !

जागतिक स्तरावरील श्रीमंत देशांच्या सूचीमध्ये भारताचा
७ वा क्रमांक लागतो, हे या घटनेवरून कधीतरी सत्य वाटेल का ?
      भुवनेश्‍वर - ओडिशा राज्यातील कलहंडी गावातील दाना माझी नामक एका व्यक्तीला पैशांअभावी स्वतःच्या पत्नीचा मृतदेह रुग्णालयापासून घरापर्यंत खांद्यावरून न्यावा लागला. त्याच्यासह त्याची मुलगीही होती. रुग्णालय आणि घरामधील अंतर १२ किमी आहे. २४ ऑगस्ट या दिवशी सकाळी सरकारी रुग्णालयात दाना माझी यांच्या पत्नीचा मृत्यू झाला होता. पैसे नसल्याने रुग्णवाहिकेची सोय करावी, अशी त्यांनी विनंती केली होती; मात्र रुग्णालय प्रशासनाने मागणीची पूर्तता न केल्याने दाना माझी यांना हे पाऊल उचलावे लागले.

इस्लामचा अवमान केल्याच्या आरोपावरून मलेशियाच्या प्रसिद्ध संगीतकारास अटक !

हिंदु देवतांचे वारंवार अश्‍लाघ्य विडंबन होत असतांना
गप्प रहाणारे जन्महिंदु मुसलमानांकडून धर्मप्रेम शिकतील का ?
      कुआला लंपूर (मलेशिया) - मलेशियाचे प्रसिद्ध संगीतकार व्ही मेंग ची उपाख्य नमेवी यांना इस्लामचा अवमान केल्याच्या आरोपावरून पोलिसांनी नुकतीच अटक केली. नमेवी यांनी नुकत्याच प्रकाशित केलेल्या एका ध्वनीचित्रफितीमध्ये (व्हिडिओ सीडीमध्ये) ओ माय गॉड या गाण्यात इस्लामचा अवमान केल्याची तक्रार एका स्वयंसेवी संघटनेचे प्रतिनिधी महंमद अर्शद यांनी केली होती.

जिहाद्यांकडून महिला अधिकारांच्या होणार्‍या हननाच्या विरोधात विविध संघटनांकडून इंग्लंडच्या संसदेबाहेर निदर्शने !

 • पेगिडा, शरीया वॉच आणि एक्झॅमिन इस्लाम या संघटनांनी केली निदर्शने !
 • हिंदु धर्मावर निराधार चिखलफेक करणार्‍या स्त्रीमुक्तीवादी आणि पुरोगामी संघटना एकीकडे पाश्‍चात्त्य विचारधारेचा उदोउदो करतात, तर दुसरीकडे इंग्लंडमध्ये झालेल्या सदर आंदोलनाला साधा शाब्दिक पाठिंबाही दर्शवत नाहीत ! यातूनच स्त्रीमुक्ती आणि पुरोगामित्व या गोंडस नावांखाली अशा संघटनांचा ढोंगीपणा आणि हिंदुद्वेषच सिद्ध होतो !
     लंडन - महिलांच्या अधिकारांविषयी जिहाद अत्यंत हानीकारक आहे, इस्लाम किल्स् वुमेन इत्यादी प्रकारच्या घोषणांनी लंडनचे आसमंत दणाणून निघाले. येथील ऐतिहासिक संसदेच्या बाहेर नुकतीच प्रखर निदर्शने करण्यात आली. इंग्लंडमधील पेगिडा या प्रखर राष्ट्रवादी संघटनेच्या नेत्या अ‍ॅनीमॅरी वॉटर्स यांच्या नेतृत्वाखाली ही निदर्शने आयोजित करण्यात आली होती. पेगिडा, शरिया वॉच आणि एक्झॅमिन इस्लाम डॉट ऑर्ग यांच्याकडून या निदर्शनांचे आयोजन करण्यात आले होते.

युरोपच्या प्रेग शहरात इस्लामविरोधी नेत्याकडून इस्लामी आक्रमणाचे पथनाट्य !

जिहादी आतंकवादाविषयी युरोपमध्ये भय वाढत असल्याचे द्योतक !
     प्रेग (झेक रिपब्लिक) - युरोपीय देश झेक रिपब्लिकच्या राजधानी प्रेगमध्ये २१ ऑगस्टला दुपारी मार्टिन कोनविका या इस्लामविरोधी राजकीय नेत्याने इस्लामी आक्रमणाविषयी एक पथनाट्य सादर केले. त्यामुळे प्रेगमधील ओल्ड टाऊन स्क्वेअर येथील लोकांमधे भीतीचे वातावरण निर्माण झाले.
वॉशिंग्टन पोस्टच्या वृत्त संकेतस्थळाने दिलेल्या माहितीनुसार,
१. दाढी-मिशा वाढलेल्या लष्करी वेशातील बनावट आतंकवाद्यांनी भरलेली एक जीप ओल्ड टाऊन स्क्वेअर येथे आली आणि त्यांनी अल्ला हूं अकबरच्या घोषणा देत आकाशाच्या दिशेने बेछूट गोळीबार चालू केला.

बलात्कार करणार्‍यांना कठोरात कठोर शासन द्या !

कराड येथे नायब तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे मागणी 
       कराड, २६ ऑगस्ट (वार्ता.) - कोपर्डी जिल्हा नगर, तसेच तडवळे (जिल्हा सातारा) येथे झालेली बलात्काराची घटना यांतील दोषींना कठोरात कठोर शासन द्यावे, या मागणीचे निवेदन वनवासमाची (सज्जनगड) येथील धर्माभिमान्यांनी मुख्यमंत्र्यांच्या नावे कराड नायब तहसीलदार मीनल भामरे यांना दिले. या वेळी श्री शिवप्रतिष्ठानचे सर्वश्री सचिन कुंभार, संदीप माने, श्री. अमोल कुंभार, नवजवान गणेश मंडळ, वनवासमाचीचे श्री. आनंदराव जाधव, श्री. अशोक माने, तसेच धर्माभिमानी सर्वश्री शहाजी जाधव, अक्षय सावंत, सागर खोचरे, सोमनाथ नाळे, सुशांत शिंदे, हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते आणि सनातन संस्थेचे साधक उपस्थित होते.
       वाढत्या बलात्काराच्या घटना घडत असतांना शासन काय करत आहे ? ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी रांझाच्या पाटलाचा चौरंगा केला, त्याचप्रमाणे या नराधमांना शिक्षा द्यावी. तसे झाल्यासच अशा घटनांना आळा बसेल, असेही या निवेदनात म्हटले आहे.

केंद्रसरकार अल्पसंख्यांकांसाठी ६ सहस्र ५०० कोटी रुपये खर्च करून सद्भावना मंडप उभारणार !

करदात्या हिंदूंचा पैसा मुसलमानांवर उधळणारे सर्वपक्षीय सरकार !
काँग्रेसच्या राज्यात जे चालू होते, तेच आताही चालू आहे !
     नवी देहली - संपूर्ण देशात धार्मिक सद्भाव निर्माण व्हावा, यासाठी केंद्रसरकारच्या वतीने प्रत्येक राज्यात सद्भावना मंडप निर्माण करण्यात येणार आहेत. ही विशेष योजना अल्पसंख्यांकांसाठी असून त्यासाठी अनुमाने ६ सहस्र ५०० कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. (केवळ अल्पसंख्यांकांसाठी योजना आखून त्याचे नाव सद्भावना कसे होईल ? अशाने बहुसंख्य हिंदूंमध्ये द्वेषच निर्माण होणार ! सरकारला योजनाच आखायची होती, तर सर्व धर्मियांना समानतेने साहाय्य करणारी योजना हवी, तरच सद्भावना निर्माण होईल ! - संपादक)
     या केंद्रांमध्ये अल्पसंख्यांकांना कौशल्यावर आधारित प्रशिक्षण देण्यात येईल तसेच तेथे समुपदेशन, तक्रार निवारण केंद्रही असेल. अल्पसंख्यांकांना विवाहसमारंभ आणि अन्य महत्त्वाच्या कामांसाठी या केंद्रांचे सभागृह वापरता येऊ शकते. ही योजना आधीच्या शासनानेही मांडली होती. विद्यमान शासनाने या योजनेला पंतप्रधान जनविकास योजना असे नाव दिले आहे. त्याअंतर्गत हे सद्भावना मंडप चालू करण्यात येणार आहेत. या योजनेचे कामकाज केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्रालयाच्या देखरेखीखाली चालणार आहे. या योजनेत आतापर्यंत राज्यांवर अधिक दायित्व होते; परंतु यापुढे ती केंद्राच्या निरीक्षणाखाली चालवण्यात येईल.
     दुसरीकडे काश्मीरमध्ये लेह, जम्मू आणि कारगिल येथे स्थानिक तरुणांसाठी रोजगाराभिमुख प्रशिक्षण केंद्र चालू करण्यात येणार आहेत. यामुळे काश्मीरमधील तरुणांना मोठ्या प्रमाणावर रोजगार मिळेल, असा विश्‍वास केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी व्यक्त केला. (दिवास्वप्नात रमणारे केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्री ! आजपर्यंत काश्मिरी जनतेसाठी पाण्यासारखा पैसा ओतूनही तेथील राष्ट्रद्रोह्यांवर काहीच परिणाम झालेला नाही. त्यामुळे त्यांना चुचकारण्याऐवजी त्यांच्यावर वचक बसवणे अधिक आवश्यक आहे. - संपादक)

कथित कुराण जाळल्याच्या आरोपामुळे होणार्‍या अत्याचारांपासून बचाव होण्यासाठी पाकमधील हिंदूंचे पलायन !

पाकमधील हिंदूंना कोणीही वाली नाही !
पाकमधील हिंदूंचे जीवन नरक समान 
झाले आहे; मात्र कोणताही निधर्मी, 
पुरोगामी अथवा मानवाधिकारवादी 
यावर बोलत नाही ! भारत सरकारही 
त्यांच्यासाठी काही करत नाही !
        कराची - येथील मुसलमानांकडून होणारे अत्याचार आणि हिंदु मुलींचे अपहरण करून बलपूर्वक धर्मांतर यांमुळे स्थानिक हिंदू पाकिस्तान सोडण्यासाठी बाध्य होत आहेत. त्यातच पाकसीमेवरील घोटकी शहरात हिंदूंवर कुराण जाळल्याचा आरोप करून त्यांच्यावर आक्रमण करण्याचा प्रयत्न केला जात असल्यानेही येथून मोठ्या प्रमाणात हिंदू पलायन करू लागले आहेत.
१. पाकिस्तान सीमेवरील घोटकी शहरातील अशोक कुमार म्हणाले की, माझ्या ४ मुली आहेत. मला भीती वाटते की, एकेदिवशी या मुलींचे अहपरण करून त्यांना मुसलमान बनवण्यात येईल आणि त्यांचा मुसलमानासमवेत विवाह करून दिला जाईल. म्हणून मी भारतात जात आहे.

पाऊस पडण्यासाठी आंध्रप्रदेश शासनाचा धर्मादाय विभाग शिव मंदिरांत होम-हवन करणार !

 • बार्शी, सोलापूर येथील अश्‍वमेधयाजी प.पू. काळे गुरुजी यांनी गेल्यावर्षीपासूनच यावर्षी पाऊस पडण्यासाठी ज्योतिर्लिंगाच्या ठिकाणी केलेल्या यज्ञांचा परिणाम म्हणजे देशात सध्या मोठ्या प्रमाणात पडलेला पाऊस आहे, हे विज्ञानवाद्यांनी लक्षात घ्यायला हवे !
 • मन आणि बुद्धी यांच्या पलीकडेही काही आहे, हे माहीत नसणार्‍या आणि जाणून घ्यायची इच्छाही नसणार्‍या अंनिसला याविषयी काय म्हणायचे आहे ?
 • राज्यकर्ते धर्माचरणी असतील, तर निसर्ग मानवासाठी अनुकूल असतो, त्यामुळे नागरिकांनी धर्माचरणी राज्यकर्ते निवडावेत !
        श्रीकाकुलम् (आंध्रप्रदेश) - श्रीकाकुलम् जिल्ह्यात बरेच दिवस पावसाने दडी मारल्याने पाण्याचे संकट निर्माण झाले आहे. त्यामुळे आंध्रप्रदेश शासनाच्या धर्मादाय विभागाने राज्यातील शिव मंदिरांत वरूण-जप, वरुण सुक्त, पारायणे आणि रुद्र यज्ञ करण्याचा निर्णय घेतला आहे. (आंध्रप्रदेश शासनाच्या धर्मादाय विभागाचे अभिनंदन ! असा निर्णय प्रत्येक राज्यातील धर्मादाय विभागाने घ्यायला हवा ! - संपादक) हे पूजाविधी २९ ऑगस्टपर्यंत चालणार आहे. हे विधी श्रीकाकुलम् जिल्ह्यातील उमा रुद्र कोटेश्‍वर स्वामी, रामलिंगेश्‍वर, भीमेश्‍वर आणि श्री लक्ष्वेशर स्वामी मंदिर, जुमुरू येथील श्री मुखलीन्गेश्‍वर, आणि संगम येथील संगमेश्‍वर या मंदिरांमध्ये पार पडणार आहेत. तसेच काल्लेेपल्ली येथील मणी नागेश्‍वर, रविवालासा येथील श्री एन्डला मल्लिकार्जुन स्वामी, कोताबोम्मली येथील मल्लेेश्‍वर आणि बरूवा येथील कोटी लिंगेश्‍वर मंदिरातही पूजा-अर्चा करण्यात येणार आहे. (मंदिरांचे पावित्र्य टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न केले, तसेच मंदिरांमधून समाजाला धर्मशिक्षण देण्याची सोय केली, तर केवळ पाऊसच पडणार नाही, तर समाजाची सात्त्विकता वाढून तो सुखीही होईल ! - संपादक)

कॅनडामध्ये इस्लामी शाळा आणि मशिदी यांमधून जिहादी आतंकवादाची शिकवण

जगभरात आतंकवादाचा वाढता विळखा !
      ओटावा (कॅनडा) - कॅनडातील इस्लामी शाळा आणि मशिदी यांमधून जिहादी आतंकवादाची शिकवण दिली जात आहे, असे कॅनडाच्या द स्टार या वृत्त संकेतस्थळाने प्रसारित केलेल्या वृत्तात म्हटले आहे. मशिदींची वाचनालये आणि इस्लामी शाळा यांमध्ये आतंकवादी लिखाण मोठ्या प्रमाणात असल्याचे एका अभ्यासातून स्पष्ट झाले आहे.
      कॅनडाच्या प्रायवी काउन्सिल कार्यालयाचे माजी गुप्तचर चिकित्सक थॉमस किग्वीन आणि मूळचे मिस्र येथील पत्रकार सईद शोएब या दोघांच्या नेतृत्वाखालील एका पथकाने मशिदी आणि इस्लामी शाळांच्या छुप्या अभ्यासाद्वारे हा अहवाल सिद्ध केला आहे.
      कॅनडामध्ये सामाजिक संकेतस्थळांवरूनही जिहादी लिखाणाचा प्रसार केला जात आहे. येथील राज्यकर्त्यांनी मात्र या संकटाकडे कानाडोळा केला आहे.
      देशातील अनेक मुसलमान तरुण आतंकवादाकडे वळले आहेत. काही इमाम इस्लामी आतंकवादी शिकवणीचा प्रसार करतात, असेही या अभ्यासातून समोर आले आहे.

मोरोक्कोच्या राजाने जिहादी आतंकवादाचा बिमोड करण्यासाठी संघटित होण्याचे केले आवाहन !

      रबत (मोरोक्को) - मोरोक्कोचा राजा महंमद सहावा यांनी इस्लाममधील धर्मांधतेशी युद्ध करण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी इस्लामच्या सहिष्णु रूपाचे रक्षण करण्याचे मोरोक्कोच्या नागरिकांना संबोधित करतांना म्हटले. आफ्रिका न्यूजच्या संकेतस्थळानुसार देशाला उद्देशून केलेल्या भाषणामधे ते पुढे म्हणाले, इस्लामच्या नावाखाली काही मुसलमानांनी आतंकवादी कारवाया करून इस्लामची प्रतिमा मलीन केली आहे. आतंकवाद्यांनी चुकीचा मार्ग स्वीकारला आहे. त्यांच्या नशिबात नरकातच रहाणे आहे. सर्व मुसलमान, ख्रिस्ती आणि ज्यू यांनी ही धर्मांधता निपटण्यासाठी संघटित झाले पाहिजे.

कर्वेनगर (पुणे) येथे लहान मुलांची पुस्तकहंडी !

दहीहंडीच्या ऐवजी पुस्तकहंडी फोडली जाणे 
हे धर्मशिक्षणाचा अभाव दर्शवणारे उदाहरण !
       पुणे, २६ ऑगस्ट - कर्वेनगर येथील हुतात्मा मेजर ताथवडे उद्यान येथे शिवसाम्राज्य वाद्यपथक आणि देशप्रेमी मंडळ यांच्या वतीने पुस्तकहंडीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी लहान मुलांनी अकबर-बिरबल यांच्या गोष्टी, हॅरी पॉटर, ऐतिहासिक गोष्टींची पुस्तके, विज्ञान आणि तंत्रज्ञानाशी निगडित पुस्तके, तसेच सामान्यज्ञान अन् शब्दकोष यांची पुस्तके आदींचा समावेश असलेली पुस्तकहंडी फोडली. यानंतर ही पुस्तके अभिजात एज्युकेशन सोसायटीला देण्यात आली. या प्रसंगी आतंकवादविरोधी पथकाचे साहाय्यक पोलीस आयुक्त भानुप्रताप बर्गे यांनी दहीहंडीपेक्षा पुस्तकहंडी हा अभिनव उपक्रम असून त्याद्वारे वाचनाचा ठेवा पुढच्या पिढीला मिळतो, असे सांगितले. (नाविन्यपूर्ण उपक्रम धर्मशास्त्राशी विसंगत नाहीत ना, याचीही काळजी घेतल्यास समाजाला योग्य दिशादर्शन होईल. - संपादक)

सैन्यात सुमारे ५० खोट्या (बोगस) सैनिकांची भरती झाल्याचे उघड !

 • या खोट्या सैनिकांच्या माध्यमातून आतंकवादी घुसले नसतील कशावरून ? असा अक्षम्य निष्काळजीपणा करून देशाची सुरक्षा धोक्यात आणणार्‍या सैन्यातील उत्तरदायींवर शासन कठोर कारवाई करून त्यांना कारागृहात टाकणार का ?  
 • भ्रष्टाचाराने मलीन झालेले भारतीय सैन्य !
       नाशिक - बनावट कागदपत्रांच्या आधारे एजंटच्या माध्यमातून लष्करात खोट्या सैनिकांची भरती करणार्‍यांचे पितळ उघडे पडले आहे. देहलीतून चालणार्‍या अवैध प्रकारामधून ४० ते ५० खोट्या सैनिकांनी सैन्यात प्रवेेश घेतल्याची माहिती मिळत आहे. या प्रकरणी सैन्यातील शिपाई आणि ३ उमेदवार, अशा चौघांना अटक करण्यात आली आहे. २ एजंटना नाशिक पोलिसांनी कह्यात घेतले आहे. नगर, नागपूर आणि पुणे येथील सैन्यात असे खोटे सैनिक कार्यरत असल्याची माहिती समोर येत आहे.

काश्मीरमध्ये पॅलेट गनला पर्याय म्हणून मिरचीयुक्त पीएव्हीए बॉम्बचा वापर होण्याची शक्यता !

        नवी देहली - काश्मीरमध्ये जमावाला पांगवण्यासाठी पॅलेट गनला पर्याय म्हणून मिरचीपासून निर्माण केलेला पीएव्हीए बॉम्ब वापरण्यावर विचार चालू आहे. या बॉम्बमुळे कोणतीही दुखापत होत नाही, तसेच प्राणहानीही होत नाही. हा बॉम्ब जमावाला बराच वेळ काही करण्यापासून असक्षम बनवतो.
        लक्ष्मणपुरी येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टॉक्सिकॉलॉजी रिसर्च आणि काऊन्सिल ऑफ सायन्टिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च या दोन संस्थांनी या बॉम्बची निर्मिती केलेली आहे. या बॉम्बचा स्फोट घडवला तर लक्ष्य असलेल्या व्यक्तींना काहीकाळ हालचाल करता येत नाही. तसेच अस्वस्थ वाटते. या बॉम्बच्या गेल्या काही वर्षांपासून यशस्वी चाचण्या घेण्यात येत आहेत.

संभाजीनगर येथील भारतीय स्टेट बँकेच्या शाखेत ७१ लक्षांहून अधिक रुपयांचा अपहार

जनतेच्या पैशांचा अपहार करणार्‍या 
समाजद्रोह्यांवर कठोर कारवाई होणे आवश्यक !
       संभाजीनगर, २६ ऑगस्ट - येथील भारतीय स्टेट बँकेच्या दूध डेअरी चौक शाखेतील कर्मचारी बलवंत यशवंतराव देशमुख यांनी ७१ लक्ष ५१ सहस्र रुपयांची रक्कम परस्पर खात्यात वळवून अधिकोषाची फसवणूक केली. (अपहाराच्या वाढत्या घटना हे कायद्याचे भय नसल्याचेच द्योतक ! - संपादक)
       अपहारप्रकारणी साहाय्यक महाप्रबंधक नंदकिशोर रामविलास मालू यांनी क्रांती चौक पोलीस ठाण्यात त्यांच्या विरोधात २५ ऑगस्ट या दिवशी तक्रार दिली असून गुन्हा प्रविष्ट केला आहे. (भारतीय स्टेट बँकेतील वाढती अपहाराची प्रकरणे ही चिंतेची गोष्ट आहे. त्यावर अधिकोष आणि भारतीय रिझर्व्ह बँक यांनी तातडीने उपाययोजना काढणे आवश्यक आहे. - संपादक)

खार (मुंबई) येथे वाहतूक पोलिसाला मारहाण करणार्‍या धर्मांधाला अटक

उद्दाम धर्मांध !
       मुंबई, २६ ऑगस्ट - येथील मंडईजवळील पेट्रोल पंपावर पेट्रोल भरायला येणार्‍यांची माहिती जमा करणारे वाहतूक पोलीस कर्मचारी विठोबा शिंदे यांना धर्मांध अहमद महंमद अली कुरेशी याने माहिती देण्यास नकार दिला. कुरेशीने शिंदे यांना बांबूने मारहाण केली आणि तो तेथून पसार झाला. (ही घटना म्हणजे धर्मांधांना वर्दीचा धाक नसल्याचेच उदाहरण आहे ! - संपादक) पोलिसांनी कुरेशी याला २५ ऑगस्ट या दिवशी अटक केली आहे.

न्यायालयाच्या आदेशाने देशात रामराज्य येणार का ? - सर्वोच्च न्यायालयाचा सरकारी निष्क्रीयतेविषयी संताप

 • सध्याची शासनव्यवस्था देशात कधीही रामराज्य आणू शकत नाही; म्हणून जनतेने धर्माचरणी राज्यकर्त्यांचे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) आणण्यासाठी कृतीशील व्हावे !
 • सर्वोच्च न्यायालयाचा हा संताप देशातील लोकशाही व्यवस्थेविषयीच प्रश्‍नचिन्ह निर्माण करतो !
       नवी देहली - देशभरात पदपथावर असलेली अतिक्रमणे हटवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात प्रविष्ट करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणी करतांना सरन्यायाधीश टी.एस्. ठाकूर यांनी सरकारी निष्क्रीयतेवर टीका केली. पदपथावर झालेली अतिक्रमणे हटवण्याचे आदेश आम्ही दिले, तर त्या आदेशांचे पालन होणार का ? न्यायालयाच्या आदेशाने देशात रामराज्य येऊ शकते का ? देशातील भ्रष्टाचार संपवा असे म्हटले, तर तसे होणार आहे का ? गुन्हे घडू नयेत, कोणाचीही हत्या होऊ नये, असे आदेश दिल्याने ते थांबणार आहे का ?, असे प्रश्‍न न्या. ठाकूर यांनी विचारले.

पाकसमवेत केवळ आतंकवादावरच चर्चा होईल ! - भारताचे पाकला उत्तर

       नवी देहली - पाकिस्तानने भारताला चर्चा करण्याच्या दिलेल्या निमंत्रणावर भारताने दुसरे पत्र लिहून केवळ आतंकवादावरच चर्चा करण्यात येईल. याव्यतिरिक्त कोणतेही सूत्र नसेल, असे कळवले आहे. भारताचे परराष्ट्र सचिव एस्. जयशंकर यांनी पाकिस्तानचे परराष्ट्र सचिव एजाज अहमद चौधरी यांना हे पत्र लिहिले आहे.
       पत्रात एस्. जयशंकर यांनी मागण्या करतांना म्हटले आहे की, पाकने प्रथम सीमेपलीकडच्या आतंकवादाला आळा घालावा. या कारवायांना प्रादेशिक सुरक्षिततेसाठी धोका आहे. चर्चेत पाकव्याप्त काश्मीरलाही सहभागी करून घ्यावे. तसेच सीमेवरील आतंकवादाला प्रोत्साहन देऊ नये, काश्मीरमधील आतंकवाद आणि हिंसाचार थांबवावा, आतंकवादी गटाच्या प्रमुखांवर कारवाई करावी, बहादूर अलीसारख्या आतंकवादी संघटनेचा बिमोड करण्यावर चर्चा व्हावी आणि पाकव्याप्त काश्मीर कधी सोडणार ते सांगावे. (पाक कधीही वरील मागण्या मान्य करणार नाही. त्यामुळे पाकला शस्त्रांद्वारेच उत्तर द्यावे लागणार आहे, हे भारतीय राज्यकर्त्यांनी लक्षात घ्यावे ! - संपादक)

प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अध्यक्षपदी राजकारणी नव्हे; तर तज्ञ आणि अनुभवी व्यक्तींची निवड करा !

 • असे लवादाला का सांगावे लागते ? त्या त्या क्षेत्रांतील तज्ञांचीच निवड करणे आवश्यक असल्याचे शासनाच्या का लक्षात येत नाही ?
 • राष्ट्रीय हरित लवादाचा महत्त्वपूर्ण आदेश !
        पणजी - राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचे कार्य पुष्कळ महत्त्वाचे असून या मंडळाचे अध्यक्ष आणि सदस्य सचिव या पदी राजकारणी किंवा प्रशासकीय अधिकारी यांची नियुक्ती करू नये. मंडळाचा अध्यक्ष होण्यासाठी पर्यावरणाचे ज्ञान असलेल्या आणि या क्षेत्रात अनुभव असलेल्या व्यक्तीचीच निवड करणे आवश्यक आहे, असा निवाडा राष्ट्रीय हरित लवादाने दिला आहे. याचिकाकर्ता राजेंद्र सिंह भंडारी यांनी राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्षपद आणि सदस्य सचिव यांच्या नियुक्तीला अनुसरून उत्तराखंड येथील शासन आणि केंद्रीय पर्यावरण अन् वन मंत्रालय यांच्या विरोधात याचिका दाखल केली होती. त्या सुनावणीच्या वेळी पाच सदस्यीय खंडपिठाने हा निवाडा दिला आहे.
१. लवादाचा हा निवाडा गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरला आहे.

नागपूर येथे धर्मप्रचार सभा न्यासाच्या वतीने मंदिर स्वच्छता उपक्रम !

मंदिर स्वच्छता करतांना कार्यकर्ते

       नागपूर - येथील हुडकेश्‍वर परिसरातील श्री विठ्ठल-रुक्मिणी (मारोती) मंदिरात धर्मप्रचार सभा न्यासाच्या वतीने मंदिर स्वच्छता करण्यात आली. या वेळी धर्मप्रचार सभेच्या सौ. सुनीता वैद्य, श्रीमती चित्रा खटी, सौ. जयश्री क्षीरसागर, श्रीमती उत्तरवार, श्री. अभिजीत पोलके आदी उपस्थित होते. या उपक्रमात मंदिर विश्‍वस्तांनीही सहकार्य केले.

घोषणा करूनही हुतात्मा सैनिकाच्या नातेवाइकांना नोकरी देण्यास नकार !

हिमाचल प्रदेशच्या काँग्रेस 
सरकारकडून हुतात्मा सैनिकाचा अवमान !
      शिमला - हिमाचल प्रदेशातील बिलासपूर येथील शाहतलाई येथे रहाणारे बलदेव शर्मा आसाम रायफल्समध्ये सुभेदार असतांना मणीपूरमध्ये झालेल्या आतंकवादी आक्रमणात हुतात्मा झाले होते. या वेळी हिमाचल प्रदेश सरकारचे सामाजिक न्यायमंत्री कर्नल डॉ. धनीराम शांडिल यांनी शर्मा यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबाचे सांत्वन केले होते. या वेळी त्यांनी शर्मा यांच्या परिवाराला ५ लाख रुपये आणि एकाला नोकरी देण्याचे आश्‍वासन दिले होते; मात्र आता सरकारच्या सैनिक कल्याण खात्याने नोकरीचे आश्‍वासन पूर्ण करण्यास नकार दिला आहे. तसेच आर्थिक साहाय्यताही अद्याप देण्यात आलेली नाही.

पत्रकारांच्या बोचर्‍या प्रश्‍नामुळे संतप्त मेहबूबा मुफ्ती यांनी पत्रकार परिषद गुंडाळली !

       श्रीनगर - काश्मीरच्या दौर्‍यावर असणारे गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेच्या वेळी उपस्थित असणार्‍या राज्याच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांना पत्रकारांनी बोचरा प्रश्‍न विचारल्यामुळे त्यांनी संतापाच्या भरात पत्रकार परिषद मध्येच संपवली.
       वर्ष २०१० मध्ये नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला मुख्यमंत्री असतांना फुटीरतावाद्यांना अटक करणे आणि त्यांच्याविरुद्ध बळाचा वापर करणे याला मेहबूबा मुफ्ती यांनी विरोध दर्शवला होता, याची एका वार्ताहराने या परिषदेच्या वेळी आठवण करून दिली असता मेहबूबा त्याच्यावर चिडल्या. हे लोक मला काय सांगतील ? यांच्या मुलांना मीच सुरक्षा दलांपासून वाचवले आहे, असे त्या रागाने म्हणाल्या.

निर्भया बलात्कार प्रकरणी फाशीची शिक्षा सुनावलेल्या आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्न !

         नवी देहली - तिहार येथील कारागृहात शिक्षा भोगत असलेला निर्भया प्रकरणातील आरोपी विनय शर्मा याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. २४ ऑगस्टला रात्री त्याने काही गोळ्या खाल्ल्या आणि त्यानंतर मफलरच्या साहाय्याने स्वतःला गळफास लावण्याचा प्रयत्न केला. त्याला दीनदयाळ रुग्णालयात प्रविष्ट केले असून त्याची प्रकृती गंभीर आहे.
         वर्ष २०१२ मध्ये देहलीमध्ये चालत्या बसमध्ये तरुणीवर सामूहिक बलात्कार केल्याच्या प्रकरणी न्यायालयाने विनय शर्मा याला फाशीची शिक्षा सुनावली होती. त्याला तिहारमधील ८ क्रमांकाच्या कारागृहात ठेवण्यात आले होते. शर्मा याने वर्ष २०१५ मध्ये त्याला सुरक्षा पुरवण्याची मागणी केली होती. काही कैदी आणि पोलीस यांच्याकडून शारीरिक छळ केला जात असल्याचा आरोपही त्याने केला होता. निर्भया प्रकरणातील मुख्य आरोपी राम सिंग याचा तिहार कारागृहात संशयास्पदरित्या मृत्यू झाला होता. ११ मार्च २०१३ मध्ये त्याचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळला होता. निर्भया प्रकरणी एका अल्पवयीन आरोपीला ३ वर्षांच्या कारावासानंतर सोडण्यात आले, तर चौघा दोषींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे; मात्र त्यापैकी एकाने आत्महत्या केली.

ठाणे येथे नोकरीच्या आमिषाने शेकडो तरुणांची फसवणूक

वाढती खोटी आस्थापने आणि 
त्यांच्याकडून होणारी फसवणूक हे देशातील 
आर्थिक कायद्यांची मर्यादा स्पष्ट करते !
       ठाणे, २६ ऑगस्ट - येथील एका नामांकित माहिती तंत्रज्ञान आस्थापनात नोकरी देण्याचे आमिष दाखवून देशभरातील २ सहस्र ५०० हून अधिक तरुणांची ६ ते ७ कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
       या आस्थापनाने तरुणांकडून प्रत्येकी २५ सहस्र रुपये प्रशिक्षण शुल्क घेतले होते. प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर हे शुल्क परत देणार असल्याचे आस्थापनाकडून सांगण्यात आलेे; मात्र शुल्क प्राप्त झाल्यावर एका आठवड्याची सुट्टी असल्याचे सांगून आस्थापनाचे ३ संचालक पसार झाले आहेत.
       या संदर्भात ठाण्यातील ६ तरुणांनी येथील वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली असून पोलिसांची आर्थिक गुन्हे शाखा तपास करणार आहे.

बोलिवियाच्या उपगृहमंत्र्यांचा खाण कामगारांच्या मारहाणीत मृत्यू !

       सुक्रे - दक्षिण अमेरिका खंडातील बोलिविया देशाचे उपगृहमंत्री राडोल्पो इमलनैस यांना खाण कामगारांनी मारहाण केली. यात त्यांचा मृत्यू झाला. त्यांचे अपहरण करण्यात आले होते. ते खाणींच्या संदर्भातील कायद्यांवरून चाललेल्या संपात मध्यस्थी करण्यासाठी खाण कामगारांना भेटण्यास गेले होते. बोलिवियामध्ये जवळपास एक लाख खाण कामगार आहेत.
       ते सहकारी संस्थांच्या माध्यमातून काम करतात. त्यांची मागणी आहे की, त्यांना खाजगी आस्थापनांशी जोडण्यात यावे.

कर्करोग पीडित मुलाच्या उपचारासाठी खेळाडूने रिओ ऑलिम्पिकमध्ये मिळालेले रौप्य पदक विकले !

       वॉर्सा (पोलंड) - रिओ ऑलिम्पिकमध्ये पुरुषांच्या थाळीफेकीत रौप्य पदक मिळवणार्‍या पिओत्र मालाचोव्हस्की याने कर्करोग पीडित मुलाच्या उपचारासाठी त्याला मिळालेले पदक विकले आहे. विशेष म्हणजे पिओत्र मालाचोव्हस्की या मुलाला ओळखतही नाही. फेसबूकवरून मुलाच्या आईने साहाय्य मागितल्यानंतर त्याने हा निर्णय घेतला. ओलेक नाव असलेल्या या पीडित मुलाच्या उपचारासाठी पिओत्रने पदकाचा लिलाव केला आहे. त्याने स्वत: फेसबूकवरुन ही माहिती दिली आहे. मी रिओमध्ये सुवर्णपदक जिंकण्यासाठी लढलो. आज मी प्रत्येकाला त्याहीपेक्षा मौल्यवान गोष्टीसाठी लढण्याचे आवाहन करतो. जर तुम्ही मला साहाय्य केले, तर माझे रौप्य पदक सुवर्ण पदकापेक्षाही मौल्यवान होईल, असे पिओत्र मालाचोव्हस्कीने लिहिले आहे.

बारामती (जिल्हा पुणे) येथे क्षुल्लक कारणावरून तरुणांची ३ पोलिसांना मारहाण

पोलिसांचा धाक आणि कायदा-
सुव्यवस्था मोडीत निघाल्याचे लक्षण !
       बारामती, २६ ऑगस्ट - येथील तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयाच्या आवारात वाढदिवस साजरा करतांना धिंगाणा घालणार्‍या युवकांना हटकल्याने बारामती शहर पोलीस ठाण्याच्या अर्जुन व्यवहारे, राजू गायकवाड आणि विजय वाघमोडे या ३ पोलीस कर्मचार्‍यांना तरुणांनी पुष्कळ मारहाण केली. पोलिसांनी या प्रकरणी २८ जणांवर गुन्हा प्रविष्ट केला आहे. घायाळ पोलिसांना शासकीय आणि खाजगी रुग्णालयात उपचारांसाठी पाठवण्यात आले आहे.
१. महाविद्यालयातील सुरक्षारक्षकांना काही युवकांनी मारहाण आणि शिवीगाळ करत प्रवेश केल्याविषयी महाविद्यालय प्रशासनाने शहर पोलिसांना कळवले होते.
२. सकाळी तीनही पोलीस कर्मचारी महाविद्यालयात गेले. त्या वेळी नीरावागज येथील सागर देवकाते याचा वाढदिवस प्रचंड गोंधळात चालू होता. त्यामुळे गायकवाड आणि वाघमोडे यांनी गोंधळ कशाला घालता, अशी विचारणा केली. त्यावर उपस्थित असलेल्या युवकांच्या जमावाने प्रतिप्रश्‍न करत त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करत शिवीगाळ केली.

जर्मनीचे चान्सलर अँजेला मॉर्केल यांच्यावर आक्रमणाचा प्रयत्न !

       प्राग (जर्मनी) - जर्मनीचे चान्सलर अँजेला मॉर्केल यांच्या सोबत असलेल्या गाड्यांच्या ताफ्यामध्ये काळ्या रंगाच्या मर्सिडिज गाडीने घुसण्याचा प्रयत्न केला. या वेळी मर्सिडिजला रोखण्याचा प्रयत्न करणार्‍या पोलिसांच्या वाहनाला मर्सिडिजने धडक दिली. त्यानंतर पोलिसांनी गोळ्या मारण्याची धमकी दिल्यानंतर मर्सिडिजमधील व्यक्ती बाहेर आली. या चालकाचा आक्रमण करण्याचा विचार असल्यावरून त्याला कह्यात घेण्यात आले आहे. या घटनेच्या पार्श्‍वभूमीवर युरोपमध्ये अतिदक्षतेची चेतावणी देण्यात आली आहे.

बेळगावच्या महिला संघटना बनवणार वनस्पतींमध्ये रूपांतरित होणार्‍या श्री गणेशमूर्ती !

धर्मशिक्षणाच्या अभावी चालवण्यात येणारी मोहीम !
       बेळगाव - वीमेन एन्टरप्रेनर बेळगाव या संघटनेने नैसर्गिक चिकणमातीपासून श्रीगणेशमूर्ती बनवण्यासाठी पुढाकार घेतला आहे. या श्रीगणेशमूर्तींचे विसर्जनानंतर वनस्पतींमध्ये रूपांतर होणार आहे. हा उपक्रम बेंगळुरूस्थित एका संघटनेच्या सहकार्याने राबवण्यात येणार आहे. मूर्तीचे विसर्जन केल्यानंतर प्रदूषण होण्याऐवजी मूर्तीची वनस्पतीमधे वाढ होणार आहे. या वेळी श्रीगणेशमूर्ती विसर्जनासाठी नदी किंवा तलावामध्ये नेण्याची गरज भासणार नाही. मूर्तीचे विसर्जन प्रत्येकाच्या घरीच करणे शक्य होणार आहे.

कायद्याचा अडसर नसल्याने केरळ सरकार धोकादायक कुत्र्यांना ठार करणार !

केरळ सरकार जर कायद्याच्या आधारे 
असा आदेश देऊ शकते, तर अन्य राज्ये 
जनतेच्या रक्षणासाठी आदेश का देत नाहीत ?
       थिरूवनंतपुरम् - विरोधी पक्ष आणि पशु कल्याण बोर्ड यांच्या विरोधाला भीक न घालता केरळ सरकार धोकादायक कुत्र्यांना ठार करण्याच्या निर्णयावर कायम आहे. २५ ऑगस्टला राज्यसरकारच्या मंत्रीमंडळाने म्हटले की, हिंसाचारी कुत्र्यांना ठार करतांना कोणतेही कायदेशीर बंधन नाही.
       राज्याचे मंत्री के.टी. जलील म्हणाले की, सर्व स्थानिक प्रशासनांना आदेश देण्यात आला आहे की हिंसाचारी आणि धोकादायक कुत्र्यांना ओळखून ठार केले जावे. गेल्या आठवड्यात येथे ६५ वर्षीय सिलुवम्मा या वृद्धेवर कुत्र्यांनी आक्रमण करून त्यांना घायाळ केले होते त्यात त्यांचा नंतर मृत्यू झाला होता. तसेच अन्य एका महिलेला ही कुत्र्यांनी घायाळ केले होते. सरकारने सिलुवम्माच्या नातेवाइकांना ५ लक्ष रुपयांचे साहाय्य केले आहे.
      अंकारा - तुर्कस्थानच्या सिजरे शहरातील पोलीस मुख्यालयाजवळ एका चारचाकी गाडीमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात ९ जणांचा मृत्यू झाला, तर ६४ जण घायाळ झाले आहेत. मृतांमध्ये एका पोलीस अधिकार्‍याचा समावेश आहे. कुर्दिस्तान वर्कस् पार्टी (पीकेके) या आतंकवादी संघटनेने हा स्फोट केल्याचे म्हटले जात आहे. काही दिवसांपूर्वीच पीकेकेने पोलीस आणि सैन्य दलाच्या वाहनावर बॉम्ब फेकले होते. सिजरे शहर सिरिया आणि इराक या देशांच्या सीमेवर वसले आहे. या भागात कुर्दिश लोकसंख्या मोठ्या प्रमाणात आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी भाजपचे गोव्यातील प्रचारप्रमुख

        पणजी, २६ ऑगस्ट (वार्ता.) - येत्या विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने केंद्रीय नेते आणि केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी यांची गोवा राज्यातील भाजपचे प्रचारप्रमुख म्हणून नियुक्ती केली आहे. नितीन गडकरी हे आता आगामी निवडणुकीसाठी गोव्याच्या निवडणुकीत भाजप कार्यकर्त्यांना दिशादर्शन करतील, तसेच उमेदवार निवड, युती, जनतेला द्यावयाची आश्‍वासने यासंदर्भात धोरण ठरवण्यात ते अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत. ही भाजपसाठी मोठी जमेची बाजू ठरणार आहे. गडकरी हे मगो आणि भाजपची युती व्हावी, यासाठी सकारात्मक आहेत. राज्यात मगो आणि भाजप युती सदृढ होईल, असा अंदाज आहे. मगो पक्षाने भाजपने योग्य व्यक्तीची निवड केली असल्याचे म्हटले आहे.

बेल्जियम क्रीडा संकुलाजवळ झालेल्या स्फोटात एकाचा मृत्यू

       छिमे (बेल्जियम) - २६ ऑगस्टला येथील क्रीडा संकुलाजवळ झालेल्या स्फोटात एकाचा मृत्यू झाला असून २ जण गंभीर घायाळ झाले आहेत. हा स्फोट कशाचा आहे हे समजू शकलेले नाही. हा स्फोट आतंकवादी आक्रमणाचा नाही, असे पोलिसांनी म्हटले आहे.

धाराशिव येथे कोपर्डी प्रकरणी मराठा समाजाचा विराट मोर्चा

      धाराशिव - कोपर्डी प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी, या मागणीसाठी धाराशिव येथे मराठा समाजातील विविध क्षेत्रांतील समुदायांनी २६ ऑगस्ट या दिवशी विराट मोर्चा काढला होता. यामध्ये शिक्षक, आधुनिक वैद्य, अधिवक्ते, शासकीय आणि खाजगी क्षेत्रातील कर्मचारी असे समाजातील विविध क्षेत्रांतील नागरिक सहभागी झाले होते. युवती आणि युवक यांचा यात सहभाग लक्षणीय होता. या वेळी अ‍ॅट्रॉसिटी कायद्याचा पुनर्विचार व्हावा, अशीही मागणी करण्यात आली. येथील शाळा-महाविद्यालये यांना सुटी देण्यात आली होती. यापूर्वी संभाजीनगरमध्येही अशाच भव्य मोर्च्याचे आयोजन करण्यात आले होते.

पुणे जिल्ह्यात मद्याच्या विक्रीत गतवर्षीच्या तुलनेत १३.८६ टक्क्यांनी वाढ

विद्येचे माहेरघर आणि सुसंस्कृत असलेल्या 
पुण्यात मद्यशौकिनांचे प्रमाण वाढणे चिंताजनक !
        पुणे, २६ ऑगस्ट - पुणे जिल्ह्यात बियर आणि विदेशी मद्य यांची (वाइन) विक्री वर्ष २०१५-१६ या आर्थिक वर्षात १३.८६ टक्क्यांनी वाढली आहे, तर देशी मद्याची विक्री १.७८ टक्क्यांनी वाढली आहे. गतवर्षी मद्यविक्री ९ लक्ष ६९ सहस्र लिटर होती. ती विक्री आता ११ लक्ष ३ सहस्र लिटरहून अधिक झाली आहे. वर्ष २०१५-१६ या आर्थिक वर्षात मद्य पिण्यासाठी लागणार्‍या वेगवेगळ्या अनुज्ञप्तीमधून (परवाना) पुणे जिल्हा प्रशासनाला वर्षभरात २५ लक्ष १ सहस्र ७०० रुपये उत्पन्न मिळाले असल्याचे उत्पादन शुल्क विभागाकडून मिळालेल्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.

ऑलिम्पिक पोडियम योजनेत खेळाडूंवर ७५० कोटी रुपये व्यय; परंतु भारताला केवळ दोनच पदके प्राप्त !

भारत शासनाने याचा विचार केला आहे का ?
        मुंबई, २६ ऑगस्ट - ऑलिम्पिक पदकांचे लक्ष्य डोळ्यांसमोर ठेवून सिद्ध केलेल्या क्रीडा योजनेसाठी केंद्र सरकारच्या क्रीडा खात्याने गेल्या ४ वर्षांत ७५० कोटी रुपये खेळांच्या विविध योजनांवर व्यय केले; पण रिओ ऑलिम्पिकमध्ये पदकांच्या संख्येत भर पडण्याऐवजी ती न्यून होऊन भारताला दोनच पदके प्राप्त झाली. राष्ट्रीय क्रीडा महासंघांना देण्यात येणारे अनुदान, साईसारख्या प्रशिक्षण संस्था, कोचेस आणि अन्य पायाभूत सुविधांवर हा व्यय झाला. रिओच्या सिद्धतेसाठी १०९ खेळाडूंवर सरकारने ६० कोटी व्यय केल्याची शासनाकडे नोंद आहे. खेळांसाठी लागणार्‍या प्राथमिक सुविधाही उपलब्ध करून दिल्या गेल्या नाहीत, अशी माहिती दिली जात आहे.

निसर्गाचा देशी गायीच्या रूपातील अनमोल ठेवा जपण्यासाठी संकरीकरणावर तातडीने बंदी आणा !

१. भारतीय देशी गाय आणि विदेशी जर्सी काऊ यांतील भेद
१ अ. काऊ या नावाची पार्श्‍वभूमी ! : युरोपमधे दूध देणार्‍या जर्सी, होल्स्टेन फ्रीजीयन या प्राण्यांना इंग्रज लोक काऊ म्हणत. भारतात आल्यावर त्यांना त्यांच्या काऊसारखी थोडीफार दिसणारी चार पायांची, तसेच दूध देणारी भारतीय गाय दिसली. म्हणून त्यांनी गायीलाही काऊ असेच संबोधले. तत्कालीन विद्वान भाषांतर करणार्‍याने काऊचे मराठीत गाय असे भाषांतर केले. तेथूनच वैचारिक गोंधळास प्रारंभ झाला. काऊ आणि गाय यांच्यात पुष्कळ भेद आहे. भारतामध्ये अनादी काळापासून वशिंड असणार्‍या गायीला पूजनीय मानले जाते.

पू. सखदेवआजी यांच्या अंत्यविधीपूर्वी आणि अंत्यविधीच्या वेळी कु. मधुरा भोसले यांनी केलेले स्थूल अन् सूक्ष्म-परीक्षण

कु. मधुरा भोसले
१. विविध संतांनी पू. आजींच्या पार्थिव देहाला भावपूर्ण वंदन करतांना
स्थुलातून जाणवलेली वैशिष्ट्ये आणि स्थुलातील कृतीचे सूक्ष्म स्तरावर केलेले विश्‍लेषण !
१ अ. पू. आजींना खोलीबाहेर आणल्यावर पू. सौरभदादांना हसू येणे
    पू. सखदेवआजींना खोलीतून बाहेर नेत असतांना श्री. संजय जोशीकाका (पू. सौरभदादांचे वडील) पू. सौरभदादांना घेऊन मार्गिकेत उभे होते. पू. आजींना बाहेर आणल्यावर पू. सौरभदादा हसले.
१ अ १. हास्याचे विश्‍लेषण :
अ. पू. आजींचा प्रवास आता पूर्णपणे निर्गुणाकडे चालू झाल्याने त्या मोक्षाच्या समीप गेल्याचे समजताच पू. सौरभदादांना पुष्कळ आनंद झाल्याने त्यांनी हसून अनुमोदन दिल्याचे जाणवले.
आ. पू. आजींचा सूक्ष्मातील प्रवास पुष्कळ वेगाने चालू असून त्यांची निर्गुणाकडे जाण्याची ओढ पाहून पू. सौरभदादांना त्यांचे कौतुक वाटले अन् ते सूक्ष्मातून पू. आजींपुढे हात जोडून नतमस्तक झाले, असे जाणवले.
१ आ. संतांनी भावपूर्ण वंदन करून अंतिम दर्शन घेणे
पू. आजींचे देहावसान झाल्यानंतर सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ, पू. गाडगीळकाका, पू. बाबा नाईक, तसेच आश्रमातील इतर संत यांनी पू. आजींना भावपूर्ण वंदन करून त्यांचे अंतिम दर्शन घेतले.

बसखरेदीला हवा सुव्यवस्थापनाचा आधार !

    जर घागरीच्या तळाला भगदाड पडले असेल, तर त्यात पाणी रहाणार नाही; मग ती घागर स्टीलची असो अथवा सोन्याची ! घागरीला असणारी भोके न बुजवता त्यात पाणी भरत राहिल्याने ना घागर भरेल, ना कुणाची तहान भागेल ! घागरीचे हे सूत्र पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या वतीने मोठा गाजावाजा करत झालेल्या बस खरेदीच्या घोषणेलाही लागू पडते. पुणे महानगर परिवहन महामंडळाने नुकताच १ सहस्र ५५० बस खरेदी करण्याचा बहुप्रतिक्षित निर्णय घेतला. महामंडळाकडे सध्या २ सहस्र ४५ बस असून पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसर मिळून एकूण १५०० ते १६०० बसच रस्त्यावर असतात.

अमृतमहोत्सवाच्या निमित्ताने महर्षींनी सांगितल्याप्रमाणे परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या नामाचा जयघोष करतांना आलेल्या अनुभूती

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त...
१. प.पू. डॉक्टरांच्या नामाचा जयघोष करून पाद्यपूजा करतांना
आेंजळीतील फुले प.पू. डॉक्टरांच्या चरणावर वाहत आहे, असे वाटणे
    प.पू. डॉक्टरांच्या चरणी संपूर्णपणे शरण जाऊन प्रार्थना करतांना ते माझ्या जवळच बसले आहेत, अशी जाणीव होत होती. श्रीश्रीजयंत बाळाजी आठवले जय गुरुदेव ।, हा जयघोष चालू झाल्यावर प.पू. डॉक्टरांची सूक्ष्मातून पाद्यपूजा करतांना आेंजळीतील फुले त्यांच्या चरणांवर वाहात आहे, असा भाव सातत्याने होता.
२. परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा अमृतमहोत्सवी अवर्णनीय
सोहळा सूक्ष्मातून पहातांना मी देवलोकात पहात आहे, असे वाटणे
    जयघोष चालू असतांना माझे डोळे उघडे होते, तरी मला रामनाथी आश्रमात मोठे रत्नजडीत सिंहासन असून त्यावर प.पू. डॉक्टर विराजमान झाले आहेत. त्यांच्या समोर सर्व साधक आणि देवता उभे राहून पुष्पवृष्टी करत आहेत, असे दिसत होते. आश्रमावर सर्वत्र पिवळा, केशरी प्रकाश पडला असून रूपेरी आणि सोनेरी दैवी कण पसरलेले आहेत, सर्व साधक उत्साही आहेत आणि सर्वांची भावजागृती होत आहे, असा हा अवर्णनीय सूक्ष्मातून सोहळा पहातांना मी देवलोकात आहे, याची जाणीव सातत्याने होत होती.

गुरूंप्रती अपार श्रद्धा असलेल्या ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठलेल्या शल्यविशारद सौ. रश्मी नल्लादारू यांची त्यांचे पती डॉ. झुबीन नल्लादारू यांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये !

डॉ. (सौ.) रश्मी नल्लादारू
डॉ. झुबीन नल्लादारू
१. समष्टी भाव हा लक्षणीय
गुण असणार्‍या सौ. रश्मी नल्लादारू !
    सौ. रश्मीचा लक्षणीय असा सर्वांत मोठा गुण म्हणजे तिच्यात पुष्कळ प्रमाणात असणारा समष्टी भाव ! तिचे जीवन समष्टीसाठीच आहे, असे वाटते. ती सतत समष्टीचा विचार करते आणि साधकांची प्रगती व्हावी, यासाठी धडपडत असते. तिच्या संपर्कात आलेल्या प्रत्येक नवीन व्यक्तीशी बोलतांना ती हळूहळू तिला अध्यात्माकडे वळवते आणि साधनेमुळे होणारे लाभ तिला समजावून सांगते.
२. वात्सल्यभावामुळे साधकांची आध्यात्मिक आई बनलेल्या सौ. रश्मी नल्लादारू !
    रश्मीचा स्वभाव अत्यंत प्रेमळ आहे. एशिया पॅसिफिक विभागातील साधकांची ती आध्यात्मिक आई आहे. साधकांच्या व्यावहारिक आणि आध्यात्मिक समस्या सोडवण्यासाठी ती सतत धडपडत असते. ती साधकांशी अल्प कालावधीत जवळीक साधू शकत असल्यामुळे साधकही तिच्याशी मोकळेपणाने बोलतात.

पू. (सौ.) सखदेवआजींच्या सेवेत असणार्‍या कु. श्रद्धा तारी यांना जाणवलेली सूत्रे

१. पू. आजींची सेवा करतांना एखाद्या लहान बाळाची सेवा करत आहे, असे जाणवणे
    पू. आजींना बरे नसतांना त्यांच्या सेवेत असतांना एखाद्या लहान बाळाची सेवा करत आहे, असे जाणवायचे. १७.८.२०१६ या दिवशी दुपारी त्यांच्याकडे गेले असता त्यांच्या डोक्यावरून हात फिरवूया, त्यांचे लाड करूया आणि त्यांना कुशीत घेऊया, असे विचार तीव्रतेने येत होते.
२. आजारपणातही व्यवस्थित रहाणे
    पू. आजींना कितीही बरे नसले, तरी त्या व्यवस्थित रहायच्या. केस विंचरलेले आणि कपडे व्यवस्थित असायला हवेत, याकडे त्यांचा कटाक्ष असायचा.

पू. (सौ.) सखदेवआजींच्या अंत्यसंस्कारापूर्वी त्यांचे पार्थिव ठेवलेल्या आश्रमासमोरील जागेकडे पाहून आलेल्या अनुभूती

   १७.८.२०१६ या दिवशी पू. (सौ.) आशालता सखदेवआजी यांनी देहत्याग केला. १८.८.२०१६ या दिवशी अंत्यसंस्काराला नेण्यापूर्वी त्यांचे पार्थिव आश्रमातील स्वागतकक्षाच्या बाहेरील प्रांगणात ठेवण्यात आले. त्यांचे पार्थिव अंत्यसंस्काराला नेल्यावर तेथे उपस्थित असलेल्या साधकांना पू. आजींचे पार्थिव ज्या ठिकाणी ठेवण्यात आले होते, त्याकडे पाहून काय वाटते ?, असा प्रयोग करण्यास सांगण्यात आले.
१. लादीचा स्पर्श शीतल जाणवणे : प्रयोगाच्या वेळी मी पू. सखदेवआजींचा देह ठेवलेल्या जागेपासून जरा दूर उभा राहिलो. त्या वेळी मला त्या लादीचा स्पर्श शीतल जाणवला.
२. माझे संपूर्ण शरीर थंडगार झाल्यासारखे वाटले.
३. मी आणखी दोन पावले जवळ गेलो, तेव्हा पायांखाली थंड पाण्याचे कारंजे उडत आहेत, असे जाणवले.

पू. (सौ.) सखदेवआजींनी देहत्याग केल्याचे समजल्यावर जाणवलेली सूत्रे

श्री. निमिष म्हात्रे
मी पू. (सौ.) सखदेवआजींच्या देहत्यागाच्या वेळी घरी होतो. मी घरूनच पू. आजींना मनोमन नमस्कार केला आणि त्यांचे चैतन्य ग्रहण करता यावे, यासाठी प्रार्थना केली. त्या वेळी मला जाणवलेली सूत्रे पुढे देत आहे.
१. माझ्या डोळ्यांसमोर पू. आजींचे रूप आले.
२. पू. आजी देवीस्वरूप असल्याचे मला दिसत होते.
३. काही काळासाठी घरातील वातावरण पालटले आहे, असे वाटत होते.
४. मनही निर्विचार आणि प्रसन्न झाले होते.
५. मला पू. आजींची स्थुलातून सेवा करायला मिळाल्याबद्दल कृतज्ञता वाटत होती; पण त्यांच्या देहत्यागाच्या वेळी मी तेथे स्थुलातून नसल्याबद्दल मला दुःख वाटत नव्हते. मी घरी असूनही रामनाथी आश्रमात पू. आजींजवळ आहे, असे मला वाटत होते.
- श्री. निमिष म्हात्रे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१९.८.२०१६)

पू. (सौ.) सखदेवआजींच्या देहत्यागापूर्वी आणि देहत्यागानंतर आलेल्या अनुभूती

१. पू. आजींच्या देहत्यागापूर्वी
१ अ. पू. सखदेवआजी सरस्वतीदेवीसारख्या दिसणे आणि त्यांना स्थुलातून नमस्कार केल्यावर शांत वाटणे : १७.७.२०१६ या दिवशी मी पू. सखदेवआजींच्या खोलीत सेवेनिमित्त गेले होते. त्या वेळी त्या पलंगावर बसल्या होत्या. पू. आजींनी पांढर्‍या रंगाची साडी नेसली होती. तेव्हा मला त्या सरस्वतीदेवीसारख्या दिसत होत्या. मी नेहमी मनात प्रार्थना करून बाहेर येते. या वेळी मला त्यांना स्थुलातून नमस्कार करूया, असे वाटले; म्हणून मी त्यांना नमस्कार करून बाहेर आले. त्यानंतर मला शांत वाटले.
२. पू. आजींच्या देहत्यागानंतर
२ अ. पू. आजींच्या पार्थिवाचे दर्शन घेतांना
१. त्यांचा श्‍वास चालू आहे, असे जाणवले.
२. त्यांचा तोंडवळा देवीसारखा दिसत होता.
३. त्यांच्यातून दैवी चैतन्य बाहेर पडत असून त्या निर्गुणाचा नामजप करत आहेत, असे जाणवले.
२ आ. पू. आजींच्या अंत्यविधीच्या वेळी
२ आ १. सवाष्णींनी त्यांची ओटी भरल्यावर त्यांच्यातील दैवी तत्त्व जागृत झाले आहे, असे जाणवले. त्या वेळी माझे मनही शांत झाले.
२ आ २. त्या हसत असून सर्व साधकांना आशीर्वाद देत आहेत, असे दिसले.

पू. आजींना होणारे तीव्र शारीरिक त्रास पाहून त्या लवकरच देहत्याग करतील, असा विचार मनात येणे आणि त्यानंतर ५ - ६ दिवसांनी पू. आजींनी देहत्याग केल्याचे समजणे

कु. कल्याणी गांगण
     १२.८.२०१६ या दिवशी मी एका सेवेनिमित्त पू. सखदेवआजींच्या खोलीत गेले होते. त्या वेळी त्या लाकडाच्या फळ्यांपासून बनवलेल्या पाटाला टेकून बसल्या होत्या. तेव्हा त्या काही मिनिटे बसायच्या आणि कंबर दुखायला लगल्यावर पुन्हा झोपवायला सांगायच्या. असे त्यांचे सतत चालू होते. ते पाहून मला वाटले, संत आपल्यासाठी किती त्रास सहन करत आहेत !
पू. आजींना इतका त्रास होत असूनही त्यांनी काही दुखत आहे, असे सांगितले नाही. पू. आजींची कन्या कु. राजश्री त्यांच्याजवळ असूनही पू. आजींनी तिला ओळखले नाही आणि तिलाच सांगितले, राजश्रीला बोलवून आण. मला तिला काहीतरी सांगायचे आहे. नंतर पू. आजी झोपल्या. पू. आजींची ही स्थिती पाहून त्या लवकरच देहत्याग करतील, असा विचार मनात आला. त्यानंतर १७.८.२०१६ या दिवशी पू. आजींनी देहत्याग केल्याचे समजले.
- कु. कल्याणी गांगण (१९.८.२०१६)

पू. (सौ.) सखदेवआजींच्या अग्नीसंस्काराच्या वेळी जाणवलेली सूत्रे


कु. मयुरी डगवार
१. अग्नीसंस्काराला जातांना नामजप सहज होत होता.
२. पू. आजींच्या पार्थिवाजवळ गेल्यावर पायाला जाणवणारे चटके न्यून होऊन थंड वाटणे : स्मशानभूमीत गेल्यावर ती स्मशानभूमी वाटत नव्हती. पू. आजींच्या अस्तित्वामुळे तिथे चैतन्य जाणवत होते. जिथे चितेवर पू. आजींचा देह ठेवला होता, त्या जागेपासून थंड लहरी पसरत असल्याचे जाणवत होते. आरंभी पू. आजींपासून २० ते २५ फूट अंतरावर पायाला चटके लागत होते. जसजसे पू. आजींकडे चालत गेल्यावर चटके लागणे न्यून होऊन थंड वाटत होते. साधारण अर्ध्या घंट्याने संपूर्ण वातावरण गार झाले.
३. पू. आजींकडून पुष्कळ गोलाकार पांढरी वलये येत असल्याचे आणि ती वलये बरीच लांबपर्यंत पसरत असल्याचे जाणवत होते.
४. अग्नी देण्यापूर्वी पू. आजींच्या चरणांतून आणि तोंडवळ्याच्या दिशेने धूर बाहेर पडत असल्याचे दिसणे : पू. आजींचे पार्थिव चितेवर ठेवले असतांना चरणांकडे बघितल्यावर त्यातून धूर बाहेर पडत होता. नंतर तो तोंडवळ्याच्या दिशेनेही बाहेर पडत असल्याचे जाणवले. त्या वेळी पू. आजींचा प्रवास निर्गुणाकडे होत असल्याने धूर चरणांकडून तोंडवळ्याकडे गेल्याचे जाणवले.

पू. (सौ.) आजींच्या देहत्यागापूर्वी आणि देहत्यागानंतर त्या रहात असलेल्या खोलीत झालेले पालट

१. पूर्वी कोणीही पू. आजी रहात असलेल्या खोलीत आले की, त्यांना शांत वाटत असे.
पू. आजींकडे पाहून सर्वांना आनंद वाटत असे. त्यांचा उत्साह वाढत असे. खोलीत एकदा कोणी आला की, त्याला वारंवार खोलीत यावेसे वाटत असे. खोलीत मंद सुगंध सतत येत असे.
२. पू. आजींच्या देहत्यागाच्या पूर्वी काही दिवस खोलीतील वातावरण एकदम शांत होते. खोलीत गेल्यावर एखाद्या पोकळीत गेल्यासारखे वाटत असे.
३. देहत्यागापूर्वी दोन दिवस खोलीच्या दरवाज्यात चंदनाचा तीव्र सुगंध येत होता.
४. देहत्यागापूर्वी एक दिवस खोलीतील लादी पुष्कळ चिकट झाली होती. (प.पू. डॉक्टरांच्या खोलीतील लादीही पायाला चिकट लागते.)

आश्रमात राहून सेवा करण्याची ओढ असलेली ५५ टक्के आध्यात्मिक पातळीची उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली पुणे येथील चि. रेणुका संजय चव्हाण (वय ५ वर्षे) !

चि. रेणुका चव्हाण
      (वर्ष २०१३ मध्ये चि. रेणुकाची ५३ टक्के आध्यात्मिक पातळी झाल्याचे घोषित केले. - संकलक)
१. चि. रेणुकाला एखादी नवीन गोष्ट शिकून घेऊन करायला आवडते.
२. प्रेमभाव
     घरातील सर्व कामांत आणि सेवेत ती मला साहाय्य करते. तिला इतरांची काळजी घेणे, काय हवे-नको ते बघणे, प्रेमाने विचारपूस करणे आवडते. एखाद्याच्या आजारपणात ती स्वतः मोठ्या व्यक्तीप्रमाणे लक्ष देऊन त्याची काळजी घेते.

पू. (सौ.) सखदेवआजींच्या अस्थी गोळा करण्यासाठी स्मशानात गेल्यावर जाणवलेली सूत्रे

पू. डॉ. मुकुल गाडगीळ
१. पू. आजींची रक्षा पांढरी होती.
२. त्या ठिकाणाची स्पंदने

अ. तेथे छातीत थंडावा जाणवत होता.
आ. मनाचा उत्साह पुष्कळ वाढला.
इ. पू. आजींच्या अस्थी आणि रक्षा यांतून प्राणशक्ती मिळत होती. त्या ठिकाणी श्‍वास सहजतेने घेतला जात होता.
३. स्पंदनांची कक्षा
अ. पू. आजींच्या अस्थी आणि रक्षा यांपासून साधारण ३ मीटर अंतरापर्यंत छातीत थंडावा अन् मनाला उत्साह जाणवत होता.
आ. हाताला चांगली स्पंदने ४ मीटर अंतरापर्यंत जाणवत होती.
इ. ॐची स्पंदने किती अंतरापर्यंत जाणवतात ?, हे मी मनात ॐचा जप करून ती स्पंदने अस्थी आणि रक्षा यांच्या स्पंदनांशी किती अंतरापर्यंत जुळतात ?, हे पाहिले. तेव्हा ५ मीटर अंतरापर्यंत ॐची स्पंदने प्रक्षेपित होत आहेत, असे मला जाणवले.

पू. (सौ.) आशालता सखदेवआजी यांच्या संदर्भात साधकांना आलेल्या अनुभूती

पू. (सौ.) आशालता सखदेवआजी यांच्या देहत्यागाचा
आज अकरावा दिवस आहे, त्यानिमित्ताने... 
 पू. (सौ.) सखदेवआजींच्या अस्थिकलशाचे विसर्जन करतांना आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती 
डावीकडून आसंदीवर बसलेले श्री. शशिकांत सखदेव, पू. (सौ.) आशालता शशिकांत सखदेव,
मागील रांगेत पू. आजींच्या कन्या कु. राजश्री सखदेव, पुत्र श्री. गुरुदत्त सखदेव आणि स्नुषा सौ. हेमलता सखदेव
१. कन्यागत पर्वाच्या निमित्ताने गंगा नदी कृष्णा नदीकडे आल्याने
अस्थिविसर्जनासाठी गंगातिरी जाण्याची आवश्यकता न पडणे
    २१.८.२०१६ या दिवशी पू. (सौ) सखदेवआजींच्या अस्थिसंचयन विधीनंतर त्यांच्या अस्थि आणि रक्षा यांचे विसर्जन करायचे होते. सध्या कन्यागत पर्व सुरू असल्याने पू. आजींच्या अस्थि आणि रक्षा नृसिंहवाडी येथे कृष्णेच्या पात्रात विसर्जित करण्यास आम्हाला सांगितले. खरेतर अस्थिविसर्जनासाठी लोक गंगातिरी जातात; पण प्रत्यक्ष गंगा कृष्णेला भेटण्यासाठी येते, त्याच कालावधीत प.पू. डॉक्टरांच्या कृपेमुळे पू. आजींनी देहत्याग केल्याने नृसिंहवाडी येथे अस्थिविसर्जन करणे सोपे झाले. यावरून गुरु प्रत्येक क्षणाला कशी काळजी घेतात, हे लक्षात आले.
चि. श्रीरंग कापडणीस
      ५१ टक्के आध्यात्मिक पातळीचा उच्च स्वर्गलोकातून जन्माला आलेला भाग्यनगर येथील चि. श्रीरंग भूषण कापडणीस (वय ४ वर्षे) याचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्याच्या आईला त्याच्याविषयी जाणवलेली सूत्रे लवकरच प्रसिद्ध करत आहोत.
चि. श्रीरंग भूषण कापडणीस यांस सनातन 
परिवाराकडून वाढदिवसाचे अनेक शुभाशीर्वाद !
    साधकांनो, तुम्ही राष्ट्र आणि धर्म यांसाठी सर्वस्वाचा त्याग करत आहात. त्यामुळे भगवंत तुम्हाला आपत्काळात तारून तर नेईलच; पण तो तुम्हाला आपले करून घेईल, याची खात्री बाळगा !

एबीपी माझा या वृत्तवाहिनीकडून सनातन संस्थेच्या संदर्भात खोटे वृत्त प्रसारित !

सनातनद्वेषाने पछाडलेल्या आणि चुकीचे वृत्त 
देणार्‍या अशा वृत्तवाहिन्या जनतेला काय दिशा देणार ?
       २० ऑगस्टला सकाळी पुणे येथे सनातन संस्था आणि अंनिस यांचे मोर्चे काढण्यात आले होते. एकाच रस्त्यावर दोन्ही मोर्चे एकत्र येणार असल्याने पोलिसांनी थोडा वेळ सनातन संस्थेच्या वतीने काढण्यात आलेल्या मोर्च्यातील साधकांना थांबण्यास सांगितले. सनातनची सर्व आंदोलने वैध मार्गाने केली जात असल्याने सनातनने ही विनंती मान्य केली. असे असतांना एबीपी माझा या वृत्तवाहिनीचे पत्रकार मंदार गोंजारी यांनी मात्र सनातनचा मोर्चा उशिरा चालू झाला, असे धादांत खोटे वृत्त दिले. तसेच डॉ. दाभोलकर यांच्या हत्येला ३ वर्षे पूर्ण झाली, म्हणून अंनिसने मोर्चाचे आयोजन केले होते. तेव्हा एका अर्थाने खोडसाळपणा म्हणून सनातनने अंनिसच्या मोर्च्याला उत्तर देण्यासाठी मोर्चा काढला, असेही चुकीचे वृत्त या वाहिनीने दिले.
       आज प्रत्येक आई-वडील माझा मुलगा डॉक्टर, अभियंता वगैरे व्हावा, असे म्हणतात; पण कोणीही सत्पुरुष व्हावा, असे म्हणत नाहीत !
- प.पू. झुरळे महाराज, डोंबिवली

फलक प्रसिद्धीकरता

आम आदमीच्या गोंडस 
नावाखाली जनतेच्या पैशांची उधळपट्टी !
      देहलीतील आम आदमी पार्टीच्या सरकारने सरकारी कामांची माहिती देण्यासाठी केलेल्या विज्ञापनांवर तब्बल ५२६ कोटी रुपये खर्च केले असून दूरचित्रवाहिन्यांवरील विज्ञापनांसाठी जनतेच्या पैशाचा गैरवापर केला आहे, अशी माहिती कॅगच्या अहवालाद्वारे समोर आली आहे.

हिंदू तेजा जाग रे !

Jago !
      Dehali ki Aam Admi Partyki Sarkarne vigyapano par kharch kiye 526 karod rupaye - CAG ka report
Aam Admike naam par kya yah paisoki barbadi nahi hai ?
जागो !
      देहली की आम आदमी पार्टी की सरकार ने विज्ञापनों पर खर्च किए ५२६ करोड रुपए - कैग की रिपोर्ट
आम आदमी के नाम पर क्या यह पैसों की बरबादी नहीं है ?
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥
या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो. - प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले
       पोलीस आणि सैन्य यांचीच नव्हे, तर प्रशासनातील सर्वांचीच भरती करतांना हिंदु राष्ट्रात राष्ट्र आणि धर्म यांवरील प्रेम हा सर्वांत मोठा घटक समजण्यात येईल !
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले

बोधचित्र

॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज
सनातनचे श्रद्धास्थान
कर्माचे महत्त्व
कर्माविना तुम्हाला गती नाही; कारण कर्मालाच गती आहे.
भावार्थ
: दैनंदिन जीवनव्यापार असो, सुखप्राप्तीच्या साधनांचा शोध असो, दुःख टाळण्याचे उपाय असोत... सारी जगरहाटी, सारे विश्‍वचक्र कर्मामुळेच चालते. आध्यात्मिकदृष्ट्याही मनुष्याचा जन्म ही त्याच्यासाठी कर्मभूमीच आहे; कारण मनुष्य कर्म (साधना) करूनच ईश्‍वरप्राप्ती करून घेऊ शकतो.
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.)

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

कर्तव्य
      आई-वडील आणि इतर वडीलधारी माणसे देवघरातील मूर्तीसारखी सांभाळा. कर्तव्यात कुठेच न्यूनता ठेवू नका.
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

जम्मू-काश्मीरच्या स्थितीवरील पर्याय !

     दीड मासापासून जम्मू-काश्मीर राज्यात हिंसाचार चालू आहे. बुरहान वानी हा आतंकवादी सैनिकांकडून मारला गेला आणि हा हिंसाचार चालू झाला. या हिंसाचारात सुरक्षा दलांच्या सैनिकांवर दगड फेकणे, हा हिंसाचारी जनतेचा मुख्य कार्यक्रम होता आणि आहे. राज्यातील हिंसाचार थांबत नाही, हे पाहून केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह राज्यातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी राज्याच्या दौर्‍यावर गेले आणि त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांच्यासह पत्रकार परिषद घेतली. जम्मू-काश्मीरच्या युवकांच्या हाती दगडांऐवजी पेन आणि लॅपटॉप यांची आवश्यकता आहे. काश्मीरशिवाय भारत स्वत:चे भविष्य बघूच शकत नाही, असे प्रतिपादन त्यांनी पत्रकार परिषदेत केले. पेन आणि लॅपटॉप म्हणजे सुशिक्षितपणाचे लक्षण, असे त्यांच्या प्रतिपादनातून ध्वनीत होते.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn