Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

पुण्यातील कोंढवा खुर्द येथे हज हाऊस बांधण्यासाठी निधी देण्याचा निर्णय

 • हज हाऊसमध्ये देशद्रोही कारवाया होत असल्याचे सिद्ध झालेले असतांना नवनवीन हज हाऊसच्या निर्मितीसाठी जागा देणे म्हणजे देशातील आतंकवादी कारवायांना प्रोत्साहन देण्यासारखेच नव्हे का ?
 • वारकरी भवनाचा प्रश्‍न प्रलंबित ठेवणार्‍या पुणे महानगरपालिकेचा हा पक्षपात म्हणायचा का ?
          पुणे, २५ ऑगस्ट - शहरातील कोंढवा खुर्द भागामध्ये हज हाऊस बांधण्यासाठी १ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव काँग्रेसचे अविनाश बागवे यांनी दिला होता. त्यासाठी पदपथाच्या निधीचे वर्गीकरण करून १ कोटी रुपये उपलब्ध करून देण्याचा निर्णय काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी आगामी पालिका निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून बहुमताच्या जोरावर स्थायी समितीमध्ये २४ ऑगस्ट या दिवशी घेतला आहे. (हिंदूंनो, अल्पसंख्यांकांचे लांगूलचालन करणार्‍या अशा पक्षांना पालिकेच्या आगामी निवडणुकीत घरी बसवा ! - संपादक) हज हाऊससाठी पैसे देण्याच्या निर्णयाला शिवसेना आणि भाजप यांनी विरोध केला. तरीही हज हाऊसला संमती देण्यात आली; पण वारकरी भवनाचे काय, असा प्रश्‍नही या वेळी उपस्थित करण्यात आला.

काश्मिरी युवकांच्या हातात दगडांऐवजी पेन आणि लॅपटॉप असणे आवश्यक ! - राजनाथ सिंह

         भारतातून इसिसमध्ये सहभागी होण्यासाठी जाण्याच्या सिद्धतेत असणार्‍या बहुतांश सुशिक्षित मुसलमान युवकांच्या हातात लॅपटॉप होते आणि ते सिरियातील इसिसच्या आतंकवाद्यांशी संपर्क साधत होते, हे राजनाथ सिंह यांना माहिती नाही का ?
         श्रीनगर -
काश्मीर खोर्‍यात दीड महिन्यांहून अधिक काळ चालू असलेल्या हिंसाचारावर तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. राज्यात शांतता निर्माण करण्यासाठी सर्व पक्षियांची लवकरच बैठक बोलावणार आहे. येथील युवकांच्या हाती दगडांऐवजी पेन आणि लॅपटॉप यांची आवश्यकता आहे. काश्मीरशिवाय भारत स्वत:चे भविष्य बघूच शकत नाही, असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केले. जम्मू-काश्मीरच्या दौर्‍यावर असलेल्या राजनाथ सिंह यांनी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांच्या समवेत आयोजित पत्रकार परिषदेत वरील प्रतिपादन केले.
         दौर्‍याच्या पहिल्या दिवशी सिंह यांनी राज्यातील मुसलमान समाजातील विविध गटांच्या तसेच राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची भेट घेतली. या गंभीर परिस्थितीवर मात काढण्यासाठी सर्वांचा सल्ला घेतला. काश्मीर खोर्‍यात शांतता निर्माण करण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकार सातत्याने प्रयत्न करत असून लवकरच सर्व पक्षियांची भेट घेणार आहे, असे त्यांनी सांगितले.

(म्हणे) मंदिराचा आर्थिक व्यवहार महसूल खात्याच्या अखत्यारित असल्याने आमदार आणि नगराध्यक्ष यांचा संबंध येत नाही !

राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने अपहाराचा ठपका 
ठेवलेला असतांना काँग्रेसचे आमदार मधुकर 
चव्हाण यांच्याकडून दिशाभूल करणारे विधान !
         धाराशिव, २५ ऑगस्ट - तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या कारभारात संस्थानचा पदसिद्ध सदस्य या नात्याने मी कोणत्याही अपप्रकाराला पाठीशी घातले नाही. सिंहासन पेटीचा जाहीर लिलाव शेकडो नागरिकांच्या उपस्थितीत आणि महसूल खात्याच्या अधिकार्‍यांच्या अधिपत्याखाली चालतो. मंदिराचा आर्थिक व्यवहार पूर्णपणे महसूल खात्याच्या अखत्यारित होत असल्याने आमदार आणि नगराध्यक्ष यांचा कोणत्याही आर्थिक व्यवहारात संबंध येत नाही, असे वक्तव्य काँग्रेसचे आमदार मधुकर चव्हाण यांनी २४ ऑगस्ट या दिवशी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केले. मागील २० वर्षांत श्री तुळजाभवानी मंदिरातील मौल्यवान दागिन्यांच्या अपहारप्रकरणी काँग्रेसचे आमदार मधुकर चव्हाण यांच्यावर राज्य गुन्हे अन्वेषण यंत्रणेच्या विभागाने ठपका ठेवला आहे. त्या पार्श्‍वभूमीवर पत्रकार परिषदेत ते बोलत होते. (याचा अर्थ अन्वेषण यंत्रणा चुकीच्या आणि आपण मात्र योग्य, हे म्हणजे स्वतःच न्यायाधीश बनून निर्णय देण्यासारखेच आहे !- संपादक)

राज्य गुन्हे अन्वेषण यंत्रणेचा अहवाल न्यायालयात सादर करण्यास राज्य सरकारने वेळ मागितला !

श्री तुळजाभवानी मंदिरातील सिंहासन दानपेटी 
गैरव्यवहार प्रकरणी दोन आठवड्यांनंतर सुनावणी होणार 
        संभाजीनगर - श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या सिंहासन दानपेटी लिलावाच्या वादावर मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर येथील खंडपिठात याचिका प्रलंबित आहे. या याचिकेवर न्यायमूर्ती एस्.व्ही. गंगापूरवाला आणि के.एल्. वडणे यांच्यासमोर २४ ऑगस्ट या दिवशी सुनावणी झाली. या सुनावणीत खंडपिठाने राज्य गुन्हे अन्वेषण यंत्रणेचा चौकशी अहवाल सादर करण्याची विचारणा केली. त्यावर राज्य सरकारने अहवाल सादर करण्यास वेळ मागून घेतला असून या याचिकेची २ आठवड्यांनंतर सुनावणी होणार आहे.

देहलीतील आम आदमी पक्षाने विज्ञापनांवर केले ५२६ कोटी रुपये खर्च !

आम आदमीच्या नावाने सत्तेवर 
येणार्‍या  पक्षाकडून होणार्‍या जनतेच्या पैशांच्या 
उधळपट्टीवर केंद्रशासन काय कारवाई करणार आहे ?
        नवी देहली - देहलीतील आम आदमी पक्षाच्या सरकारने शासकीय कामांची माहिती देण्यासाठी केलेल्या विज्ञापनांवर तब्बल ५२६ कोटी रुपये खर्च केले असून यातील १०० कोटी रुपयांचा हिशेब त्यांनी दिला नसल्याचे भारताचे नियंत्रक महालेखापरीक्षकांच्या (कॅगच्या) अहवालातून समोर आले आहे. विशेष म्हणजे केजरीवाल यांनी देहलीतील कायदा सुव्यवस्था बिघडण्यास केंद्र सरकारला उत्तरदायी धरत त्याचा प्रसार करण्यासाठी ७० लाख रुपये खर्च केल्याचे उजेडात आले आहे. आपच्या सरकारने दूरचित्रवाहिनीवरील विज्ञापनांसाठी जनतेच्या पैशाचा गैरवापर केल्याचे कॅगने त्याच्या ५५ पानी अहवालात नमूद केल्याचे एका वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे. देहली सरकारला एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त मोठ्या प्रमाणात विज्ञापने देण्यात आली होती. त्यासाठी ३३ कोटी ४० लाख रुपये खर्च करण्यात आले. यातील ८५ टक्के रक्कम ही देहलीबाहेर खर्च करण्यात आली आहे.
        एका विज्ञापनात एक व्यक्ती झाडू दाखवतांना दिसते. झाडू हे आपचे निवडणूक चिन्ह आहे. हे राज्य सरकारने केलेल्या कामाचे विज्ञापन नसून पक्षाचा प्रचार असल्याचे कॅगने म्हटले आहे.

गोरक्षकांच्या विधानावरून पंतप्रधान मोदी यांच्यावर उघडपणे टीका करू नका ! - सरसंघचालकांचा संघ परिवाराला आदेश

        आग्रा - नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी गोरक्षकांवर केलेल्या कठोर टीकेनंतर त्यांच्यावर उघडपणे टीका करणे टाळा, असा आदेश सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी संघ परिवारातील संघटनांना दिला आहे. ते २४ ऑगस्टला आग्रा येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यवाहकांच्या मेळाव्यात बोलत होते. या वेळी त्यांनी विश्‍व हिंदु परिषद आणि बजरंग दल यांच्यासह संघाशी संबंधित असलेल्या इतर संघटनांना मोदींच्या वक्तव्याविरुद्ध संताप व्यक्त करून मिळणार्‍या प्रसिद्धीपासून दूर रहा, असे सांगितले. गेल्या काही दिवसांत विश्‍व हिंदु परिषदेच्या नेत्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया या भाजपला अडचणीत आणत असून त्यामुळे संघ परिवारात दुही निर्माण झाल्याचे चित्र निर्माण होत असल्याचे भागवत यांनी म्हटले आहे. या भूमिकेतून भागवत यांनी भाजप आणि हिंदू संघटना यांमध्ये मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला आहे.

देहलीतील मशिदींबाहेर रस्ता अडवून प्रत्येक शुक्रवारी केल्या जाणार्‍या नमाजाच्या विरोधात अखंड भारत मोर्चाची तक्रार !

 • प्रत्येक वेळी न्यायालयाचा आदेश असल्याचे सांगून हिंदूंच्या धार्मिक उत्सवांवर कारवाई करणारे पोलीस त्याच आदेशांचे आणि नियमांचे उल्लंघन करणार्‍या मुसलमानांच्या विरोधात शेपूट घालतात !
 • केवळ देहलीतच नव्हे, तर देशातील सहस्रावधी ठिकाणी अशा प्रकारे रस्ता अडवून नमाजपठण केले जाते; मात्र त्याविरोधात एकही निधर्मीवादी आणि पुरोगामी तोंड उघडत नाही !
        नवी देहली - शहरातील हासनपूर आगाराजवळ असलेल्या कथित दर्ग्याच्या बाहेर रस्त्यावर प्रत्येक शुक्रवारी शेकडोंच्या संख्येने मुसलमान नमजपठण करतात. अन्य ठिकाणीही मशिदींबाहेर नमाजपठण केले जाते. यामुळे नागरिकांना अडचणींना सामोरे जावे लागते. आता या कथित दर्ग्याला मशीद बनवण्याचा प्रयत्न चालू झाला आहे. यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी अखंड भारत मोर्चा संघटनेकडून पोलिसांना निवेदन देऊन करण्यात आली आहे. जर हिंदूंनी अशाच प्रकारे महाआरती किंवा महाहनुमान चालिसा यांचे पठण चालू केले, तर प्रशासनाला ते भारी पडेल, अशी चेतावणी या संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. संदीप आहुजा यांनी दिली आहे. या संघटनेकडून शहरातील पंचेश्‍वर शिव मंदिर या ठिकाणी मंदिरासमोरील रस्त्यावर हनुमान चालिसाचे पठण करण्यात आले.

स्वभाषाभिमान असलेली आणि धर्माचरण करणारी ६१ टक्के आध्यात्मिक पातळीची अन् महर्लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली असोगा, खानापूर, जि. बेळगाव येथील कु. वैष्णवी चेतन मणेरीकर (वय ६ वर्षे) !

कु. वैष्णवी मणेरीकर
१. कु. वैष्णवी स्वभावाने लाघवी आहे.
२. नवीन व्यक्तींचीही ती आस्थेने विचारपूस करते.
३. इतरांना साहाय्य करणे

    आजोबा झाडांना पाणी घालत असले किंवा बाई भांडी घासत असली की, ती स्वतः त्यांना साहाय्य करते.
४. घरकामाची आवड
     कु. वैष्णवी ३ वर्षांची असतांना स्वतः झाडू घेऊन झाडत असे आणि सूप हातात घेऊन केर भरण्याचा प्रयत्न करत असे.
५. सांगितलेले त्वरित आचरणात आणणे
अ. एकदा मी तिला चूक झाल्यावर दोन्ही कान धरून श्रीकृष्णाची क्षमा मागायची, असे सांगितले. थोड्याच वेळाने गाडीत बसल्यावर दुधाच्या कॅनला तिचा पाय लागला. तेव्हा ती पळत आली आणि म्हणाली, दुधाच्या कॅनला माझा पाय लागला. चूक झाली. मी श्रीकृष्णाची क्षमा मागते. असे सांगून तिने कान धरून श्रीकृष्णाची क्षमा मागितली.

छत्तीसगडमध्ये सडले अब्जावधी रुपयांचे धान्य !

देशातील अर्ध्याहून अधिक जनतेला पोटभर अन्न मिळत नसतांना अब्जावधी रुपयांचे धान्य सडणे, हा जनताद्रोह आहे !
 सडलेल्या धान्याची दारूच्या व्यापार्‍यांकडून अल्प दरात खरेदी !
     रायपूर (छत्तीसगड) - छत्तीसगडमध्ये वेळेत टरफलासह असलेला तांदूळ खरेदी न केल्यामुळे १ अब्ज ७३ कोटी रुपयांचे धान्य सडले आहे. हे सडलेले धान्य गुरेही खाऊ शकत नाही किंवा त्याचा कोणताही उपयोग होऊ शकत नाही. साहजिकच असे धान्य सडल्यावर त्याचा उपयोग केवळ मद्य बनवण्यासाठीच होऊ शकतो. त्यामुळे अल्प किमतीत काही मद्याच्या ठेकेदारांना या धान्याची लिलावात विक्री करण्यात येईल. शासकीय अधिकार्‍यांच्या निष्काळजीपणामुळे झालेली अब्जावधी रुपयांची ही हानी सरकारला सोसावी लागत आहे. ('दैव देते आणि कर्म नेते', अशा अर्थाची एक म्हण आहे. देवाने देशाला मुबलक प्रमाणात अन्नधान्य दिले; पण त्याचा विनियोग योग्य प्रकारे होत नसेल, तर आपण देवाकडून आणखी काय अपेक्षा करू शकतो ? - संपादक) 
     राज्यात गावोगावी तांदूळ खरेदी केंद्रे उभारण्यात आली आहेत. या माध्यमातून केंद्रसरकारच्या साहाय्याने शेतकर्‍यांकडून प्रतिवर्षी १० सहस्र कोटी किंमतीच्या तांदळाची खरेदी केल्या जाते. या तांदळाची टरफले काढून सरकारी गोदामांमध्ये ठेवण्यात येतो. त्यानंतर हे तांदूळ सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोचवले जातात. 

इराकमध्ये इसिसच्या ३६ आतंकवाद्यांना फाशी !

भारत कधीतरी अशी शिक्षा जिहादी आतंकवाद्यांना देईल का ?
     बगदाद - वर्ष २०१४ मध्ये झालेल्या नरसंहाराच्या प्रकरणी दोषी ठरवण्यात आलेल्या इसिसच्या ३६ आतंकवाद्यांना इराकने फाशी दिली आहे. या आतंकवाद्यांनी तिकरिट शहराजवळील स्पीचर येथे १ सहस्र ७०० सैनिकांना ठार केले होते.

नागरिकांनी १० दिवसांच्या अन्नपाण्याची व्यवस्था करावी ! - जर्मन सरकारचे आवाहन

जर्मनीवर मोठ्या आतंकवादी आक्रमणाची शक्यता
    बर्लिन - जर्मनीवर जिहादी आतंकवादी आक्रमणाची शक्यता असल्याच्या भीतीने जर्मन सरकारने नागरिकांना घरात कमीत कमी १० दिवस पुरेल इतका खाद्यपदार्थांचा आणि पाण्याचा साठा करायला सांगितले आहे. या संदर्भात जर्मनीच्या गृहमंत्रालयाने ६९ पानांचा प्रस्ताव बनवला आहे. तचेस नागरिक सुरक्षा कायदा १९९५ मध्ये सुधारणा केली जाणार आहे. विरोधी पक्षांतील खासदारांनी लोकांमध्ये दहशत पसरवण्यासाठी उचललेले पाऊल असल्याचा आरोप सरकारवर केला आहे.

न्यायालयाचे निर्बंध तोडून ठाणे-मुंबईत दहीहंड्या !

सणांचा खरा आनंद घेण्यासाठी हिंदु राष्ट्रच (सनातन धर्म राज्यच) हवे ! 
 • अपप्रकारांचा अतिरेक ! 
 • कायदा तोडल्याविषयी कार्यकर्त्यांची मग्रुरीची भाषा ! 

     मुंबई - २० फुटांपेक्षा अधिक थर लावून आणि अल्पवयीन युवकांचा सहभाग असलेल्या दहीहंड्या फोडून ठाणे आणि मुंबई येथे दहीहंडी उत्सव मंडळांनी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा उघडपणे भंग केला. ठाणे येथील नौपाडा भागात मनसे पुरस्कृत जय जवान पथकाने ९ थरांची हंडी फोडून ११ लाखांचे पारितोषिक जिंकले. या मंडळावर आणि मनसे आयोजकांवर गुन्हा प्रविष्ट करण्यात आला आहे. भरभक्कम राजकीय पाठिंबा असणारे मनसेचे आयोजक या संदर्भात म्हणाले, "माझ्या साहेबांवर ९३ गुन्हे प्रविष्ट असल्याने माझ्यावर १ झाला, तर मला त्याची पर्वा नाही."

(म्हणे) 'हिंदूंनी आपल्या धार्मिक भावनांकडे कानाडोळा करायला पाहिजे !'

अमरावती येथील महानगरपालिका आयुक्तांचे हिंदुद्रोही विधान ! 
हिंदूच हिंदु धर्माचे खरे वैरी आहेत ! 
     अमरावती - तुम्ही ज्या धर्माचे आहात, त्याच धर्माचा मीही आहे. तुम्ही गणेशमूर्ती विसर्जनाविषयी सूचना करण्यास आला आहात, तर तुम्ही कोणते आर्थिक योगदान देऊ शकता ? काही गोष्टींसाठी हिंदूंनी आपल्या धार्मिक भावनांकडे कानाडोळा करायला पाहिजे, असे संतापजनक विधान येथील महानगरपालिका आयुक्त श्री. हेमंत पवार यांनी केले. (अन्य धर्मियांच्या संदर्भात असे विधान करण्याचे धाडस आयुक्त महाशयांनी केले असते का ? - संपादक) गणेशमूर्तींचे शास्त्रोक्त पद्धतीने विसर्जन केले जावे आणि कृत्रिमरित्या विसर्जन टाळावे, या मागण्यांचे निवेदन घेऊन येथील हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे प्रतिनिधी महानगरपालिका आयुक्त, उपायुक्त आणि महापौर यांच्याकडे गेले होते. या वेळी आयुक्त बोलत होते. आयुक्तांच्या विधानामुळे संतप्त झालेल्या हिंदूंनी त्यांना त्यांच्या चुकीची जाणीव करून दिली. हिंदु महासभेचे श्री. नितीन व्यास यांनी विचारले, "धार्मिक भावनांकडे केवळ हिंदूंनीच कानाडोळा करावा का ?" त्यावर आयुक्त निरुत्तर झाले. महापौर सौ. रीना नंदा यांनी हिंदुत्ववाद्यांनी दिलेल्या निवेदनाला सकारात्मक प्रतिसाद दिला. या वेळी शिवसेनेचे शहरप्रमुख श्री. नरेंद्र केवले, हिंदु महासभेचे श्री. नितीन व्यास, योग वेदांत सेवा समितीचे श्री. मानव बुद्धदेव, हिंदुराज संघटनेचे श्री. महेंद्र श्रीवास्तव, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्री. अभिषेक दीक्षित, श्री. महेश लडके, समाजसेविका कु. गुंजन गोळे, वीर सावरकर युवा संघटनेचे श्री. सोपान कनेरकर आदी हिंदुत्वनिष्ठ उपस्थित होते.

एन्आयएकडून जाहिदच्या विरोधात आरोपपत्र दाखल

केंद्रात हिंदुत्वनिष्ठ विचारसरणीचे शासन असतांनाही हिंदु नेत्यांच्या हत्या होत असतील, तर धर्मांध अधिक उद्दाम झाले, असा त्याचा अर्थ घ्यायचा का ? 
दाऊदचा सहकारी जाहिदने भरूच हत्याकांडासाठी पैसे पुरवले होते ! 
गुजरातमधील भाजप नेत्यांच्या हत्येचे प्रकरण 
     नवी देहली - गुजरातमधील भाजप नेत्यांच्या हत्येप्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एन्आयएने) कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमचा सहकारी जाहिद मिया उपाख्य जाओच्या विरोधात विशेष न्यायालयात आरोपपत्र प्रविष्ट केले आहे. जाहिदवर या प्रकरणातील मारेकर्‍यांना पैसे पुरवल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. नोव्हेंबर २०१५ मधे शिरीश बंगाली आणि प्रग्नेश मिस्त्री या भाजप नेत्यांच्या भरूचमध्ये गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्या होत्या. या हत्याकांडाप्रकरणी जाहिदसह १० आरोपींवर आरोपपत्र ठेवण्यात आले आहे. जाहीद हा दाऊद इब्राहिमचा दक्षिण आफ्रिकेतील हिर्‍याचा व्यवसाय सांभाळतो. एन्आयएने दिलेल्या माहितीनुसार जाहिदकडे दक्षिण अफ्रिकेचे नागरिकत्व असून सध्या तो प्रीटोरियात रहात आहे. त्याचे भारताकडे प्रत्यार्पण करण्यासाठी एन्आयए प्रयत्न करत आहे. एन्आयएच्या मते हे हत्याकांड दाऊद टोळीच्या आंतरराष्ट्रीय षड्यंत्राचा एक भाग होता.

मेरठ (उत्तरप्रदेश) येथे गतीमंद युवतीवर बलात्कार केल्याच्या प्रकरणी इमामाला अटक !

अशा वासनांध बलात्कार्‍यांना न्यायालयाने फाशीची शिक्षा करावी !
      मेरठ (उत्तरप्रदेश) - येथे २० वर्षीय गतीमंद युवतीवर सामूहिक बलात्कार केल्याच्या प्रकरणी हुजैफा आणि अब्दुल रशीद या दोघांना अटक करण्यात आली आहे. यातील हुजैफा हा रोहता येथील एका मशिदीचा इमाम आहे. (धर्मांधांची वासनांधता ! - संपादक)

बक्सर (उत्तरप्रदेश) येथे ५०० दलितांचे धर्मांतर !

 • केंद्र सरकारने लवकरात लवकर धर्मांतरविरोधी कायदा बनवून धर्मांतराला रोखले पाहिजे !
 • घरवापसीला विरोध करणारे हिंदूंच्या धर्मांतरावर मात्र नेहमीच मौन बागळतात !
        बक्सर (उत्तरप्रदेश) - येथील चौंगाई गांवातील ५०० दलितांनी हिंदु धर्माचा त्याग करून ख्रिस्ती धर्म स्वीकारला आहे. त्यांना आमिष दाखवून धर्मांतरित करण्यात आल्याचे म्हटले जात आहे. तसेच आणखी ५०० दलितांवर धर्मांतर करण्यासाठी दबाव आणला जात आहे. या घटनेची माहिती मिळाल्यावर जिल्हाधिकारी रमण कुमार यांनी याची चौकशी करण्याचा आदेश दिला आहे.

'हिंदु धर्मगुरु दशनाम गोसावी आणि त्यांचे दुर्मिळ मंत्र' या पुस्तकाचे प्रकाशन

     
उजवीकडून कौलव मठाचे श्री. आनंदा गिरी, संपादक श्री. य.ग.गिरी,
सर्वश्री प्रमोद गिरी, अजित गिरी, उत्तम गिरी आणि महादेव गिरी
     कोल्हापूर - निंगुडगे, तालुका आजरा येथे 'हिंदु धर्मगुरु दशनाम-गोसावी आणि त्यांचे दुर्मिळ मंत्र' या पुस्तकाचे प्रकाशन अभियंता प्रमोद गिरी यांच्या शुभहस्ते पार पडले. ब्रह्मीभूत कृष्णा गणपतबुवा (निंगुडगे, आजरा) यांचे उत्तरकार्यगुरु भंडारा १२ ऑगस्ट या दिवशी होता. त्या वेळी या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. त्या प्रसंगी धर्मगुरु महादेवगिरी, दशनाम गोसावी समाजाचे अध्यक्ष श्री. उत्तम गोसावी आणि सचिव श्री. अजित गिरी, कौलव मठाचे आनंदा गिरी आदींच्या समवेत 'करवीर प्रगती'चे संपादक श्री. य.ल. गिरी, श्री. निंगुडगेकर हे उपस्थित होते. 

खोट्या शिधापत्रिका बनवणार्‍या संबंधितांवर फौजदारी गुन्हा प्रविष्ट करून तपास अहवाल सादर करा ! - न्यायालयाचे आदेश

वाहतूक सेनेचे धमेंद्र कोळी यांनी प्रविष्ट केलेल्या याचिकेवर न्यायालयाचा निर्णय 
     सांगली, २५ ऑगस्ट (वार्ता.) - शिवसेना वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष श्री. धमेंद्र (आबा) कोळी यांनी स्वस्त धान्य दुकानाच्या माध्यमातून बनावट शिधापत्रिका बनवणार्‍या दुकान मालक हसीना सत्तार मुरसल यांच्यासह आठ जणांच्या विरुद्ध येथील जिल्हा न्यायालयात या सर्वांवर कारवाई होण्यासाठी याचिका प्रविष्ट केली होती. याचिकेवर निर्णय देतांना प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी श्रीमती एस्.डी. जवळगेकर यांनी सर्व संबंधितांवर गुन्हा प्रविष्ट करण्याचे आदेश दिले आहेत. त्याचसमवेत सांगली शहर पोलिसांना या संदर्भात ३१ ऑगस्टअखेर तपास अहवाल सादर करण्याचेही आदेश दिले आहेत. 

रा.स्व. संघावर केलेल्या आरोपावर मी आजही ठाम ! - राहुल गांधी

कोलांट्या उड्या मारणारे राहुल गांधी ! 
     नवी देहली - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते गांधी यांच्या हत्येत सहभागी होते, असे विधान केल्याच्या प्रकरणी खटल्याला सामोरे जात असलेल्या राहुल गांधी यांनी दोन दिवसांपूर्वी न्यायालयात 'आपण असे बोललोच नाही', असे म्हटले होते; मात्र २५ ऑगस्टला राहुल यांनी परत विधान केले असून 'मी जे बोललो त्या प्रत्येक शब्दावर मी ठाम आहे', असे म्हटले आहे. २०१४ लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या वेळी बोलतांना राहुल यांनी हे विधान केले होते.

सरोगसीवर बंधने आणणारे विधेयक केंद्रीय मंत्रीमंडळाकडून संमत !

     नवी देहली - भारतातील सरोगेट मातांच्या (गर्भाशयात अन्य दांपत्याच्या गर्भाला वाढवणारी माता) हक्काचे विधेयक नुकतेच केंद्रीय मंत्रीमंडळाने संमत केले. कायदेशीर विवाहित भारतीय जोडप्यांनाच पालकत्वासाठी सरोगसीचा आधार घेता येईल. या विधेयकात सिंगल पॅरेंट, अविवाहित, समलिंगी जोडप्यांना सरोगसीद्वारे मूल दत्तक घेण्याला मनाई करण्यात आली आहे. या संदर्भात परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज म्हणाल्या की, देशात जी गोष्ट आवश्यकता म्हणून रुजली होती, ती छंद म्हणून जोपासली जात होती. आवश्यकता छंद झाल्यामुळेच एक किंवा दोन मुले असतांनाही वलयांकित लोक सरोगसीमध्ये रुची दाखवतांनाचे चित्र निर्माण झाले. आरोग्य मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय सरोगसी समिती स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती स्वराज यांनी दिली. 

पितृपक्षात स्पेक्ट्रमचा लिलाव करू नये !

 • दूरसंचार आस्थापने संपूर्णपणे विज्ञानवादाचे कार्य करत असतांना त्यांच्याकडून अशी मागणी होणे, ही अंधश्रद्धा कशी म्हणता येईल ?
 •  अंधश्रद्धेच्या नावाखाली श्रद्धेचे भंजन करणार्‍या अंनिससारख्या संघटना आणि पुरोगामी आता काय बोलणार आहेत ? 
दूरसंचार आस्थापनांकडून केंद्रसरकारला विनंती 
     नवी देहली - केंद्र सरकारकडून दूरसंचाराच्या संदर्भातील स्पेक्ट्रमचा लिलाव २९ सप्टेंबरला पितृपक्षात होणार आहे. हा लिलाव पितृपक्षात ठेवू नये, अशी विनंती या क्षेत्रांतील मोठमोठ्या आस्थापनांकडून सरकारला करण्यात आला. या विनंतीचा मान राखण्याचा सरकारकडूनही प्रतिसाद देण्यात येणार असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. २९ सप्टेंबरऐवजी १ ऑक्टोबरच्या आश्‍विन शुक्ल प्रतिपदा म्हणजे नवरात्रीच्या पहिल्या दिवशी दिवा ठेवण्याचा विचार सरकारकडून केला जात आहे. या संदर्भात दूरसंचार खात्याचे सचिव जे.एस्. दीपक म्हणाले की, आस्थापनांनी आम्हाला विनंती केल्याने आम्ही लिलाव नवरात्रीपर्यंत पुढे ढकलण्याचा विचार करत आहोत. जर त्यांना नवरात्रीत लिलाव करण्यासाठी योग्य वाटत असेल, तर मला वाटते तसे होऊ शकते.

हिंदूंपेक्षा मुसलमानांमध्ये अधिक प्रमाणात घटस्फोट होतात !

सर्वधर्मसमभाव मानणार्‍यांनो, हे लक्षात घ्या !
 •  ख्रिस्त्यांंमध्ये अविवाहितांचे प्रमाण सर्वाधिक
 •  जैन धर्मात घटस्फोटाचे प्रमाण अल्प 
     नवी देहली - घटस्फोट किंवा विवाहानंतर विभक्त होण्याचे प्रमाण हिंदूंपेक्षा मुसलमानांमध्ये अधिक असल्याचे जनगणनेच्या २०११ च्या अहवालातून समोर आले आहे. या अहवालानुसार भारतामध्ये ख्रिस्ती आणि बौद्ध धर्मियांमध्ये घटस्फोटाचे प्रमाण सर्वाधिक आहे, तर जैन धर्मात सर्वाधिक अल्प घटस्फोट होत असल्याचे आढळून आले आहे. १. या अहवालानुसार एकत्र न रहाणार्‍या हिंदु धर्मीय दांपत्यांसह प्रत्येकी १ सहस्र विवाहित जोडप्यांपैकी ५.५ टक्के जोडपे विभक्त होत आहेत, तर घटस्फोटाचे प्रमाण १.८ टक्के आहे. २. मुसलमान धर्मियांमधील तलाक पद्धतीमुळे घटस्फोटित महिलांचे प्रमाण प्रत्येकी १ सहस्र विवाहित महिलांमध्ये ५ टक्के आहे. ३. विदुर (पत्नी मृत झालेले) पुरुषांपेक्षा विधवा महिलांचे प्रमाण २-३ पट अधिक आहे. ४. हिंदूंच्या एकूण लोकसंख्येपैकी १६ टक्के पुरुष अविवाहित आहेत, तर १० टक्के महिला अविवाहित आहेत. ५. ख्रिस्त्यांमध्ये अविवाहितांचे प्रमाण सर्वाधिक असून पुरुषांचे प्रमाण २१ टक्के, तर महिलांचे प्रमाण १८ टक्के आहे.

प.पू. प्रमुख स्वामीजी महाराज हे ईश्‍वरीय व्यक्तीमत्व ! - अरुणभाई गुजराथी

         चोपडा - परम पूज्य ब्रह्मलीन प्रमुख स्वामीजी महाराजांनी आपल्या जीवनकालात जगभरात अनुमाने १३०० भव्य मंदिरांचे निर्माण केले. कारण मंदिरातून माणुसकी वाढते यावर त्यांचा विश्‍वास होता. जगभरात प्रवास करून विविध धर्माच्या व्यक्तींना भेटून विश्‍वशांतीचा विचार स्वामीजींनी मांडला. धर्माच्या नावाने संघर्ष नको, ही भावना असणारे प्रमुख स्वामीजी हे ईश्‍वरीय व्यक्तीमत्व होते, असे भावोद्गार महाराष्ट्र विधानसभेचे माजी अध्यक्ष प्रा. अरुण गुजराथी यांनी काढले. येथील गो.भि. जिनींगमध्ये बाबाजी परिवार, चंद्रहास गुजराथी आणि स्वामी नारायण मंडळ यांच्या वतीने आयोजित श्रद्धांजली सभेत बोलत होते. या वेळी मंचावर धुळे येथील आनंदजीवनस्वामी, योगीस्नेही स्वामी, रामेश्‍वर मंदिराचे महंत नारायण स्वामी, माजी आ. डॉ. सुरेश पाटील, पंकज समूहाचे अध्यक्ष डॉ. सुरेश बोरोले हे होते.

संभाजीनगर येथे अल्पवयीन मुलीवर ४ जणांकडून अत्याचार

अल्पवयिनांवरील वाढते अत्याचार 
हे कायदा-सुव्यवस्था संपल्याचे लक्षण ! 
     संभाजीनगर, २५ ऑगस्ट - येथील जिन्सी भागातील एका शाळेत शिकणार्‍या ८ वर्षांच्या एका मुलीवर धर्मांध अहमद खान आमिर खान याने अत्याचार केले. आजारी पडलेल्या अल्पवयीन मुलीने आणखी ३ रिक्शाचालक आणि शाळेतील संगणक शिकवणारे शिक्षक यांनीही अत्याचार केल्याची माहिती कुटुंबियांना दिली. कुटुंबियांनी जिन्सी पोलीस ठाण्यात २४ ऑगस्ट या दिवशी तक्रार दिली असून संबंधितांवर गुन्हा प्रविष्ट करण्यात आला आहे.

ठाणे महानगरपालिका आयुक्तांना वाहत्या पाण्यात गणेशमूर्तींचे विसर्जन करणे शास्त्रानुसार योग्य असल्याविषयीचे निवेदन

ठाणे आयुक्तांना निवेदन देतांना कार्यकर्ते
  ठाणे - हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथील महानगरपालिकेचे आयुक्त श्री. सुनील चव्हाण यांना गणेशमूर्तींचे विसर्जन शास्त्रानुसार वाहत्या पाण्यात करणे कसे योग्य आहे, याविषयीचे निवेदन देण्यात आले. ठाणे शहरातील सर्व तलावांत एक भिंत उभारून ठराविक भागात विसर्जन करणे हा कृत्रिम तलावाला उत्तम पर्याय आहे. त्यातून निधीचीही बचत होईल. या वेळी आयुक्तांनी तलावात भिंत उभारून विसर्जनाची व्यवस्था करण्याविषयी सूचना देणार असल्याचे आश्‍वासन दिले. निवेदन देतांना समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते. 

मुसलमान सैनिकाच्या दुसर्‍या पत्नीलाही मिळणार निवृत्तीवेतनाचा लाभ !

बहुसंख्य हिंदूंपेक्षा अधिक लाभ घेणारे देशातील अल्पसंख्यांक मुसलमान !
       नवी देहली - आर्म्ड फोर्सेस ट्रिब्यूनल (एएफ्टी)च्या मुख्य पीठाने दिलेल्या आदेशानुसार आता मुसलमान सैनिकाच्या दुसर्‍या पत्नीलाही पहिल्या पत्नीप्रमाणे आरोग्य योजना आणि निवृत्ती वेतन यांचा लाभ मिळणार आहे. पीठाने म्हटले की, जर मुसलमान सैनिक पहिल्या पत्नीसमवेतचे संबंध कायम ठेवत दुसरा विवाह करत असेल, तर तिलाही पहिल्या पत्नीला मिळणार्‍या सर्व सुविधा मिळायला हव्यात; कारण तीही पहिल्या पत्नीप्रमाणे पतीवर अवलंबून आहे. लेफ्ट. कर्नल सरदार अहमद खान (निवृत्त) यांनी प्रविष्ट केलेल्या याचिकेवर लवादाने हा निर्णय दिला.

रोहित वेमुला दलित नव्हता ! - न्यायालयीन आयोगाचा निर्वाळा

     नवी देहली - भाग्यनगरच्या केंद्रीय विद्यापिठात संशोधन करणारा पीएच्डीचा विद्यार्थी रोहित वेमुला दलित नव्हता, असा निर्वाळा केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने स्थापन केलेल्या न्यायालयीन आयोगाने दिला आहे. आत्महत्या केलेला रोहित वेमुला हा अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमातींपैकी नव्हता, असे या अहवालात म्हटलेले आहे. रोहित वेमुला दलित असण्याच्या सूत्रावर सर्व राजकीय पक्षांनी केंद्रसरकारच्या विरोधात आंदोलन केले होते, तर अनेकांनी पुरस्कार परत केले होते; मात्र या निर्वाळ्यानंतर त्यांचा ढोंगीपणा उघड झाला आहे. १७ जानेवारी २०१६ या दिवशी रोहितने आत्महत्या केली होती. रोहितचा भाऊ राजा यांनी रोहित दलित नव्हता हे आयोगाचे म्हणणे नाकारले आहे.

मदर तेरेसा यांंच्या गौरवार्थ विशेष टपाल पाकीट !

भारतात सहस्रावधी हिंदु संत असतांना त्यांच्या गौरवार्थ सरकार टपाल पाकीट का काढत नाही ? 
     कोलकाता - गरिबांची कथित सुश्रुषा करण्याच्या नावाखाली हिंदूंचे धर्मांतर करण्याचा आरोप असणार्‍या मदर तेरेसा यांना संतपद देण्याचा समारंभ व्हॅटिकन सिटी येथे होणार आहे. तत्पूर्वी भारताकडून त्यांना आदरांजली वाहण्यासाठी एक विशेष टपाल पाकीट प्रकाशित करण्यात येणार आहे. २ सप्टेंबरला या पाकिटाचे अनावरण करण्यात येईल. 
     भारतीय टपाल खात्याकडून प्रकाशित करण्यात येणारे हे पाकीट रेशमापासून बनवलेले असणार आहे. त्यावर वर्ष २०१० मध्ये मदर तेरेसा यांच्या जन्म शताब्दीनिमित्त भारत सरकारने बनवलेले ५ रुपयांचे नाणे कोरण्यात येणार आहे. अशी केवळ १ सहस्र पाकिटेच बनवण्यात येणार आहेत.

शारदा गैरव्यवहार प्रकरणी काँग्रेस नेते पी. चिदंबरम् यांच्या पत्नी नलिनी यांना समन्स !

     नवी देहली - सहस्रो कोटी रुपयांच्या शारदा चिटफंड घोटाळ्याच्या प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाकडून (ईडीकडून) माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम् यांच्या पत्नी नलिनी चिदंबरम् यांना समन्स बजावण्यात आले आहे. त्यांची या प्रकरणी चौकशी करण्यात येणार आहे. 
     केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) प्रविष्ट केलेल्या सहाव्या पुरवणी आरोपपत्रात नलिनी यांच्या नावाचा उल्लेख साक्षीदार किंवा आरोपी म्हणून नसला, तरी वादग्रस्त व्यवहारांची गुप्त माहिती असणारी व्यक्ती म्हणून त्यांच्या नावाचा आरोपपत्रात समावेश आहे.

सौदी अरेबियाच्या कारागृहात २ सहस्र भारतीय कामगार अटकेत !

कामगारांची भारत सरकारकडे सुटकेची मागणी 
     नवी देहली - भारतातून कामानिमित्त सौदी अरेबियाला गेलेल्या २ सहस्रांहून अधिक लोकांना तेथील पोलिसांनी कारागृहात डांबून ठेवले आहे. त्यामुळे त्यांनी भारत सरकारकडे सुटकेची मागणी केली आहे. 
     त्यांना त्यांच्या पूर्वीच्या आस्थापनाच्या मालकांनी अनेक मास वेतन न दिल्यामुळे त्यांनी दुसर्‍या कंपनीत कामाला प्रारंभ केला. त्यानंतर एक दिवस अचानक तेथील पोलिसांनी त्यांना कारागृहात टाकले. पोलिसांच्या नुसार या लोकांवर सरकारकडून १० सहस्र रियालचा (अनुमाने १ लक्ष ८० सहस्र रुपयांचा दंड) लावण्यात आला आहे. सौदीच्या नियमानुसार एखादा कामगार पहिल्या आस्थापनाकडून पासपोर्ट परत न घेताच दुसर्‍या आस्थापनात काम करत असेल, तर सरकार त्याला दंड ठोठावून अटक करते आणि दंड न दिल्यास त्याला त्याच्या देशात परत पाठवते. या पीडितांनी एक ध्वनीचित्रफीत सिद्ध केली. या चित्रफितीद्वारे आज तक या वृत्तवाहिनीशी संपर्क केला आणि जेद्दा येथील कारागृहातून सोडवण्याची भारत सरकारकडे साहाय्याची मागणी केली आहे.

उत्तरप्रदेशात ५ महिन्यांत बलात्काराच्या १ सहस्र घटना !

बलात्कार करणार्‍यांचे राज्य झालेले उत्तरप्रदेश ! 
उत्तरप्रदेशातील कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा होऊनही केंद्रसरकार जर काहीच कारवाई करणार नसेल, तर जनता कोणाकडे दाद मागणार ? 
     लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) - उत्तरप्रदेशात गेल्या ५ मासांत बलात्काराचे १ सहस्र १२, तर छेडछाडीचे ४ सहस्र ५२० गुन्हे प्रविष्ट झाल्याची माहिती सरकारने दिली आहे. राज्याच्या विधानसभेत भाजपचे सतीश मेहाना यांनी विचारलेल्या प्रश्‍नाला सरकारने दिलेल्या लेखी उत्तरात चालू वर्षात १५ मार्च ते १८ ऑगस्ट या कालावधीत बलात्कार आणि महिला छेडछाडीसह लूटमारीचे १ सहस्र ३८६, तर दरोड्याच्या ८६ गुन्हे प्रविष्ट झाले आहेत. अशा गुन्ह्यांच्या प्रभावी तपासणीसाठी प्रत्येक जिल्ह्यात गुन्हा शाखेची स्थापना करण्यात आली आहे.

सनातनच्या समर्थनार्थ काढलेल्या मोर्च्यातील मागण्यांचे निवासी उपजिल्हाधिकार्‍यांना निवेदन !

     पुणे, २५ ऑगस्ट (वार्ता.) - समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने २० ऑगस्ट या दिवशी सनातन संस्थेच्या समर्थनार्थ महाराणा प्रताप उद्यानापासून कसबा गणपति मंदिरापर्यंत भव्य मोर्चा काढण्यात आला होता. डॉ. दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी पुरोगाम्यांकडून कोणत्याही पुराव्यांविना पूर्वग्रहातून केल्या जाणार्‍या सनातन संस्थेच्या अपकीर्तीच्या पार्श्‍वभूमीवर मोर्च्याचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी उपस्थित हिंदुत्ववाद्यांनी 'डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणी अन्वेषण यंत्रणांनी कोणत्याही दबावाला बळी न पडता निष्पक्षपणे चौकशी करावी आणि राष्ट्रप्रेमी सनातन संस्थेचा छळ थांबवावा', अशा मागण्या करण्यात आल्या. या मागण्यांचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र मुठे यांना देण्यात आले. या प्रसंगी हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

(म्हणे) 'तानाजी मालसुरे यांचे टोपणनाव 'सिंह' होते !'

मुलांना विकृत इतिहास शिकवून त्यांच्यापासून 
सत्य लपवणारे आयसीएस्ई बोर्ड विसर्जित करा !
 'आयसीएस्ई' पाठ्यक्रम मंडळाचा जावईशोध ! 
     मुंबई - कौन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन (आयसीएस्ई) बोर्डाच्या 'होम स्कूल'च्या पुस्तकात तानाजी मालुसरे यांचे टोपणनाव सिंह होते. त्यांच्या सन्मानार्थ किल्ल्याला सिंहगड नाव पडले, असा शोध या पुस्तकात लावण्यात आला आहे. (हा नवा शोध लावणार्‍या बोर्डाला आता पुरस्कार द्यावा ! ऐतिहासिक संदर्भ न देता इतिहासाची वाट्टेल तशी मोडतोड करणार्‍या या बोर्डाच्या व्यवस्थापन मंडळावर शासनाने कारवाई करावी ! - संपादक) 

अमेरिका दिवाळीवर टपाल तिकीट काढणार !

     न्यूयॉर्क - दिवाळीवर टपाल तिकीट काढावे, अशी मागणी अमेरिकेत रहाणार्‍या भारतीय वंशाच्या नागरिकांकडून अनेक वर्षांपासून केली जात होती. त्याला अमेरिकेतील कायदेतज्ञांनी अनुमती दिल्याने यावर्षी अशा प्रकारचे टपाल तिकीट प्रकाशित होणार आहे. सोनेरी रंगातील चमचमत्या पार्श्‍वभूमीवर ज्योतीने उजळलेल्या परंपरागत दिव्याचे चित्र या तिकिटावर असणार आहे. त्यावर 'फॉरएव्हर यूएस्ए २०१६' हे शब्द असतील. ५ ऑक्टोबरला या टपाल तिकिटाचे प्रकाशन होणार आहे.

फ्रान्समध्ये बंदी असतांनाही 'बुर्कीनी' घालून पोहणार्‍या मुसलमान महिलेवर कारवाई !

     पॅरिस - फ्रान्समध्ये पोहतांना मुसलमान महिलांकडून घालण्यात येणार्‍या 'बुर्कीनी' या पेहरावावर बंदी घालण्यात आली आहे. तरीही नीस शहरातील किनार्‍यावर बुर्कीनी घालून पोहणार्‍या एका मुसलमान महिलेवर पोलिसांनी कारवाई करून तिला बुर्कीनी काढण्यास भाग पाडले. आदल्या दिवशी पोलिसांनी कान्स येथे ४ मुसलमान महिलांकडून बुर्कीनी घातल्यावरून ३ सहस्र रुपयांचा दंड वसूल केला होता. 
     कान्सचे महापौर डेव्हीड लिस्नर्ड मेयर यांनी म्हटले आहे की, आम्ही त्या गणवेशांवर बंदी घालत आहोत, जी इस्लामच्या कट्टरतेची प्रतीके आहेत. फ्रान्समध्ये २०११ पासून सार्वजनिक ठिकाणी बुरखा घालण्यावरही बंदी आहे.

पाकव्याप्त काश्मीरविषयी अमेरिकेकडून चिंता !

अमेरिकेने केवळ तोंडदेखली चिंता व्यक्त न करता पाकला कारवाई करण्यास भाग पाडावे किंवा भारताला कारवाई करण्यास साहाय्य करावे ! 
     वॉशिंग्टन - अमेरिकेच्या विदेश विभागाचे प्रवक्ते मार्क टोनर यांनी म्हटले आहे की, पाकव्याप्त काश्मीरमधील मानवाधिकारांची स्थिती पाहून अमेरिकेला चिंता वाटत आहे. आम्ही आमच्या मानवाधिकाराच्या अहवालात अनेक वर्षे याचा उल्लेख केला आहे. (जे अमेरिकेला कळते ते भारत सरकारला का कळत नाही ? - संपादक)

राज्याच्या गृहखात्याच्या विरोधात सर्वाधिक तक्रारी !

पारदर्शी आणि जनताभिमुख शासन देण्यासाठी वचनबद्ध 
असलेल्या भाजप सरकारने याकडे लक्ष देऊन कारवाई करावी !
        मुंबई, २५ ऑगस्ट - गेल्या २ वर्षांत ३१ खात्यांच्या विरोधात २ लक्ष ४४ सहस्र ११२ तक्रारी आल्या आहेत. त्यातील सर्वाधिक तक्रारी या गृह खात्याविरोधात आहेत. गृह खात्याच्या विरोधात सर्वाधिक म्हणजे, ७१ सहस्र ४७५ तक्रारी आल्याचे माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी सांगितले. (यावरून गृह विभागामध्ये किती अनागोंदी असेल, हेच दिसून येते. राज्यातील गृह विभागाची प्रतिमा सुधारण्यासाठी प्रयत्न करणार्‍या पोलीस महासंचालकांनी याची दखल घेऊन संबंधितांवर कारवाई करावी. - संपादक)
        गलगली यांनी पुढे सांगितले की, महसूल आणि वन खात्याविरोधात २४ सहस्र २९३, तर नगर विकास विरोधात १५ सहस्र ३८८, सामान्य प्रशासन आणि ग्राम विकास यांच्या विरोधात अनुक्रमे ९ सहस्र ४६१ आणि ९ सहस्र ३६८ एवढ्या तक्रारी करण्यात आल्या आहेत. (यावरून शासकीय विभागातील कर्मचारी जनतेशी कसे वागत असतील, याचा विचारच न केलेला बरा ! - संपादक)

काबूलमध्ये अमेरिकी विद्यापिठावरील आक्रमणात १२ जण ठार !

        काबूल - येथील अमेरिकन युनिव्हर्सिटी ऑफ अफगाणिस्तान या शैक्षणिक संस्थेवर आतंकवाद्यांनी केलेल्या आक्रमणात १२ ठार, तर ३० जण घायाळ झाले आहेत.

विदेशी वृक्षांचे धोके ओळखून देशी वृक्षांचीच लागवड करा !

         जागतिक हवामानाच्या पालटामुळे संपूर्ण जगासमवेत भारतालाही वृक्षारोपण अन् संवर्धन याचे महत्त्व पटून खडबडून जाग आली आहे. आधुनिकीकरणाच्या महत्त्वाकांक्षेपोटी संपूर्ण जगभरातच बेसुमार वृक्षतोड झाली. त्यास भारतही अपवाद राहिला नाही आणि सद्य:स्थिती केवळ २१.३४ प्रतिशत भूमी ही वनक्षेत्र म्हणून गणली जात आहे. विविध स्वयंसेवी संघटना, आस्थापने आणि शासकीय स्तरावर कित्येक कोटी वृक्षारोपणाचा संकल्प केला जातो. तो संकल्प काही अंशी पूर्णही केला जातो; परंतु त्या वेळी नैसर्गिक समतोल राखणे आणि संपूर्ण जीवसृष्टी यांसाठी कोणते वृक्ष उपयोगी आहेत, या सूत्रांकडे पूर्णपणे दुर्लक्ष झालेले आढळते.

मुंबई, ठाणे आणि रायगड या जिल्ह्यांतील हिंदु जनजागृती समितीच्या धर्मप्रसाराच्या कार्याचा जुलै २०१६ मधील आढावा

१. मुंबई जिल्हा 
श्री. विश्‍वनाथ कुलकर्णी
१ अ. राष्ट्रीय हिंदू आंदोलन : कोपरखैरणे येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलनाच्या वेळी पाऊस पडत असतांनाही धर्माभिमानी सक्रिय सहभागी झाले होते. या वेळी आंदोलनाचे सूत्रसंचालन हिदु राष्ट्र सेनेचे श्री. भालचंद्र गायकवाड यांनी केले. आंदोलनाच्या शेवटी उपस्थित १६० नागरिकांना सनातन प्रभातच्या हिंदु एकता विशेषांकाचे वाटप करण्यात आले.
१ आ. पत्रलेखनाच्या माध्यमांतून जागृती : या मासात (महिन्यात) एकूण ५१ (४० मराठी, ९ हिंदी आणि २ गुजराती) वृत्तपत्रांना हिंदू अधिवेशन अणि राष्ट्र अन् धर्म या विषयांवरील पत्रे पाठवली होती. यातील २२८ मराठी आणि ५२ हिंदी पत्रे विविध नियतकालिकांत प्रसिद्ध झाली.
१ इ. हिंदूसंघटन मेळाव्यांमधील धर्माभिमान्यांचा कृतीशील सहभाग
१ इ १. गोवंडी :
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने गोवंडी येथे २४ जुलै २०१६ या दिवशी हिंदूसंघटन मेळावा झाला. २०० हिंदुत्वनिष्ठ आणि धर्माभिमानी यांनी त्याचा लाभ घेतला. हिंदूसंघटन मेळाव्यात सर्वश्री विनोद जगताप, राहुल पवार, विक्रम यादव, सुभाष गायकवाड आणि राहुल भुजबळ या धर्माभिमान्यांनी प्रसार करणे, बैठका घेणे, प्रदर्शन लावणे, मेळाव्यातील विविध सेवा करणे, यांत पुढाकार घेतला. स्थानिक नगरसेवक श्री. बबलू पांचाळ यांनी गोवंडी येथील हिंदूसंघटन मेळाव्याला विनामूल्य सभागृह उपलब्ध करून दिले. देवनार म्युनिसिपल कॉलनी येथील स्वयंभू हनुमान मंदिर ट्रस्ट यांनी सलग ७ दिवस धर्मप्रसारासाठी त्यांच्या मंदिराची जागा उपलब्ध करून दिली.

इस्लामिक स्टेटची अर्थात् इसिसची पाळेमुळे भारतात रुजतील का ?

     दक्षिण आशियामध्ये मुख्यत्वे करून भारत, पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तान या ४ देशांकडे इसिसचे लक्ष आहे. या चारही देशांमध्ये मुसलमान लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर आहे आणि तेथे गरिबी अन् बेरोजगारी यांचे प्रमाणही मोठे आहे. त्यामुळे आपल्याला आवश्यक असणारे कार्यकर्ते इथून मिळू शकतील, अशी इसिसची अटकळ आहे.
१. इसिसची भारतातील पाळेमुळे !
     आजवर आपण इस्लामिक स्टेट अर्थात् इसिसने युरोपीय देशांमध्ये घडवलेल्या निर्घृण हिंसाचाराच्या बातम्या वाचत होतो. हातामध्ये बंदुका आणि रॉकेट लाँचर्स घेऊन फिरणार्‍या तरुण आतंकवाद्यांचे व्हिडिओ माध्यमांमधून दाखवले गेले; परंतु चेहरे झाकलेल्या या तरुणांमध्ये भारतातील काही तरुण असतील, याची कल्पनाही कोणी केली नव्हती. तथापि गेल्या काही मासांपासून या समजाला छेद जाण्यास आरंभ झाला आहे.

गुरुमाऊलीने मायेतून बाहेर काढून सेवेत ठेवल्यामुळे साधिकेने लिहिलेले कृतज्ञतारूपी पत्र !

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त...
परम वंदनीय प.पू. डॉक्टर,
आपल्या कोमल चरणी शि.सा. नमस्कार !
प.पू. डॉक्टर, या जिवाचा उद्धार आपणच केला आहे. आपल्या कृपेमुळेच माझे शारीरिक आणि आध्यात्मिक त्रास दूर झाले आणि आपण मला माणसात आणलेत, हे मी कधीच विसरणार नाही. एवढे महान गुरु मला लाभले आहेत, हे सर्वांना सांगावेसे वाटते; पण मी अडाणी आहे. त्यामुळे मला अनुभूती योग्य प्रकारे शब्दबद्ध करता येत नाहीत. भगवान श्रीकृष्ण जसे सुचवेल, त्याप्रमाणे मी लिहित आहे.
    प.पू. डॉक्टर, मला आपल्याला भेटावे, असे पुष्कळ वाटत आहे. तुम्ही एकदा म्हणाला होतात, या पुढे पुष्कळ सेवा करणार, त्याप्रमाणे तशी प्रचीती येत आहे. सेवेचे चिंतन मनापासून होते. माझ्या समवेत सतत श्रीकृष्ण असतो. तो मला सतत साहाय्य करतो. श्रीकृष्ण मला सेवेतील आनंद क्षणोक्षणी देत आहे.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनातून सिद्ध झालेल्या सनातन-निर्मित श्रीकृष्णाच्या चित्रामुळे पंचतत्त्वाच्या स्तरावरील, तसेच चित्रात जिवंतपणा जाणवण्याच्या संदर्भात आलेल्या कृष्णानुभूती !

  
सनातन-निर्मित श्रीकृष्णाचेे चित्र
२२.८.२०१५ या दिवशी सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी सनातन-निर्मित श्रीकृष्णाच्या चित्रातील डोळ्यांकडे सर्व कोनांमधून पाहिल्यावर तो आपल्याकडे पहात असल्याचे जाणवते का ? असा प्रयोग करण्यास सांगितले, तो प्रयोग केल्यावर साधकांना आलेल्या काही अनुभूती आपण काल २५.८.२०१६ या दिवशी पाहिल्या. आज त्यापुढील अनुभूती पाहूया.
५. तारक-मारक तत्त्वाविषयी
५ अ. चित्रात तारक-मारक रूप जाणवणे : चित्राकडे पहातांना श्रीकृष्ण काही क्षण तारक आणि काही क्षण मारक रूपात आहे, असे जाणवले. दोन्हींचे प्रमाण ५० - ५० टक्के जाणवले. - (पू.) श्री. अशोक पात्रीकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
५ आ श्रीकृष्णाच्या डोळ्यांमधून तारक-मारक तत्त्व प्रक्षेपित होत असल्याचे जाणवणे : प्रथम मी श्रीकृष्णाच्या मुखाकडे पाहिले. त्याच्या मुखातून मारक तत्त्व प्रक्षेपित होत असल्याचे मला जाणवले. श्रीकृष्णाच्या डोळ्यांमधून तारक-मारक तत्त्व प्रक्षेपित होत आहे, असे वाटलेे आणि त्याचा तोंडवळा बोलका झाल्याचे जाणवले. श्रीकृष्ण संवेदनशील वाटून कृष्णतत्त्व काळानुरूप अधिक कार्यरत होत आहे, असेही मला जाणवले. - सौ. वृंदा मराठे आणि सौ. रंजना गडेकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

पू. (सौ.) आशालता सखदेव यांच्या पार्थिव देहाचे कु. मधुरा भोसले यांनी केलेले सूक्ष्म-परीक्षण

कु. मधुरा भोसले
पू. (सौ.) आशालता सखदेवआजी यांनी १७.८.२०१६ या दिवशी सायं. ५.१० वाजता देहत्याग केला. त्यानंतर त्यांच्या पार्थिव देहाचे दर्शन घेतल्यावर सायं. ६.२५ वाजता केलेले सूक्ष्म-परीक्षण पुढीलप्रमाणे आहे.

१. मनाला वेगळ्या प्रकारची गंभीरता जाणवणे
पू. आजींनी देहत्याग केल्याचे समजल्यावर दुःख न होता मनाला वेगळ्या प्रकारची गंभीरता जाणवली.
विश्‍लेषण : संतांनी देहत्याग केल्यामुळे त्यांच्यातील चैतन्याच्या प्रक्षेपणाचा परिणाम सभोवतालच्या वातावरणावर होऊन साधिकेची वृत्ती अंतर्मुख झाल्याने तिची गंभीरता वाढली.
२. पू. आजींच्या खोलीकडे जातांना एका पोकळीत प्रवेश करत असल्याचे जाणवणे
पू. आजींच्या पार्थिव देहाचे सूक्ष्म-परीक्षण करायचे आहे, हे समजल्यावर मी त्यांच्या खोलीच्या दिशेने जात होते. तेव्हा मी एका पोकळीमध्ये हळूवारपणे प्रवेश करत असून पोकळीतील चैतन्याकडे आपोआप खेचली जात आहे, असे जाणवले.
विश्‍लेषण : पू. आजींचा सूक्ष्मातील प्रवास सगुणाकडून निर्गुणाकडे होत असल्याने त्यांच्या खोलीकडे जातांना निर्गुणतत्त्वाचे द्योतक असणार्‍या पोकळीची अनुभूती आली.

देहत्यागानंतर संतांचे अस्तित्व जाणवण्याचे प्रकार

कु. राजश्री सखदेव
१. सौ. होनपकाकू (देहत्यागावेळची ६६ टक्के आध्यात्मिक पातळी) आणि पू. पेठेआजी यांच्या देहावसानानंतर त्यांचे खोलीत अस्तित्व जाणवत होते.
२. पू. सखदेवआजींच्या देहत्यागानंतर त्यांचे अस्तित्व खोलीत न जाणवता आश्रमात जाणवते.
देहत्यागानंतर संतांचे अस्तित्व जाणवणे हे पुढील घटकांवर अवलंबून असते.
१. संतांचा आध्यात्मिक स्तर
२. संतांचे कार्य
३. संतांमधील सगुण-निर्गुण तत्त्वाचे प्रमाण आणि त्यानुसार त्यांचा साधनामार्ग
४. काळानुसार कार्याची आवश्यकता
- कु. राजश्री सखदेव, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२३.८.२०१६)

पू. (सौ.) सखदेवआजींनी देहत्याग केल्यावर आलेल्या अनुभूती

सौ. अनुपमा जोशी
१. पू. आजींनी १७.८.२०१६ या सायंकाळी देहत्याग केल्यावर आश्रमातील वातावरण शांत आणि चैतन्यमयी वाटत होते.
२. देहत्यागाच्या दिवशी त्यांना पाहिल्यावर ज्याप्रमाणे पांडुरंगाचे परमभक्त तुकाराम महाराज यांना वैकुंठी नेण्यासाठी भगवंत आला होता, त्याप्रमाणे परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या साक्षीने भगवान श्रीकृष्ण पू. सखदेवआजींचा हात धरून त्यांना वैकुंठी नेत आहे, असे मला जाणवले.
३. त्यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतांना तोंडवळ्यासह त्यांचे पूर्ण शरीर पिवळे तेजस्वी दिसत होते. त्यांचे पाय लहान बाळासारखे मऊ अन् कोमल आहेत आणि त्यांनी देहत्याग केला नसून त्या ईश्‍वराच्या चरणांजवळ ध्यानस्थ बसल्या आहेत, असे मला जाणवत होते.

चंद्रपूर येथील ६३ टक्के आध्यात्मिक पातळीच्या साधिका कै. श्रीमती उर्मिला लक्ष्मणराव बुलदेव (वय ८७ वर्षे) यांच्या आजारपणात आणि त्यांच्या मृत्यूनंतर आलेल्या अनुभूती !

कै. श्रीमती उर्मिला बुलदेव
       चंद्रपूर येथील साधिका श्रीमती उर्मिला लक्ष्मणराव बुलदेव (सनातनच्या साधिका सौ. जानकी पाध्ये यांची आजी) यांचे २८.७.२०१६ या दिवशी निधन झाले. त्या अनेक वर्षांपासून नामजप करायच्या. मागील ७ वर्षांपासून, म्हणजे वयाच्या ८० व्या वर्षांपासून त्यांनी सनातन संस्थेच्या माध्यमातून साधना करणे चालू केले. वर्ष २०१६ च्या गुरुपौर्णिमेला त्यांची आध्यात्मिक पातळी ६३ टक्के झाली होती. २६.८.२०१६ या दिवशी त्यांचे मासिक श्राद्ध आहे. त्यांचे चिरंजीव श्री. संजय बुलदेव यांनी आजींचे आजारपण, त्यांचा मृत्यू आणि मृत्यूनंतर आलेल्या अनुभूती यांविषयी दिलेली सूत्रे पुढे देत आहोत.
१. न्युमोनियाचे निदान झाल्यामुळे आईला रुग्णालयात भरती 
करावे लागणे आणि २ दिवसांच्या उपचारानंतर ठीक वाटू लागणे
       २४.७.२०१६ या दिवशी आईला बोलतांना आणि श्‍वास घेतांना त्रास होऊ लागल्याने तिला रुग्णालयात भरती केले. त्या वेळी तिला न्युमोनिया झाल्याचे निदान झाले आणि तिच्यावर अतीदक्षता विभागात उपचार चालू झाले. २ दिवस उपचार केल्यावर आईला ठीक वाटू लागले. ती ॐ निसर्गदेवो भव या नामजपासह श्री श्री जयंत बाळाजी आठवले, जय गुरुदेव, असा जपही करू लागली.

पंचम अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाशी संबंधित सेवा करतांना सहकार्‍यांची लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये

     अधिवेशनाशी संबंधित सेवा करतांना मला सहसाधकांकडून शिकायला मिळालेली सूत्रे आणि त्यांच्यातील लक्षात आलेले गुण येथे देत आहे. प.पू. गुरुदेवांच्या कृपेमुळेच मला हे सर्व शिकण्याची संधी मिळाली. त्यांनीच बुद्धी दिली आणि लिहिण्याची कृतीसुद्धा त्यांनीच करवून घेतली; म्हणून त्यांच्या चरणी प्रथम कृतज्ञता व्यक्त करतो.
१. सतत हसतमुखाने आणि तळमळीने सेवा करणारे अन् कठीण प्रसंगी
दृष्टीकोन कसे ठेवावेत ?, हे शिकवणारे गोव्याचे श्री. घनश्याम गावडे !
     यांच्यात गुरुकार्याविषयीची तळमळ आणि प्रेमभाव आहे. दिसेल ते कर्तव्य या विचाराने दादा सेवा करायचे. सेवा करतांना दादांच्या तोंडवळ्यावर कधीच ताण जाणवला नाही. ते सतत हसतमुखाने सेवा करत असत. ते पाहून आम्हाला ऊर्जा मिळत असे. दादांनी आम्हाला सकारात्मक दृष्टीकोन दिले. तसेच त्यांनी कठिणातील कठीण प्रसंगी दृष्टीकोन कसे ठेवावेत ?, तेही शिकवले. अपघातामुळे त्यांच्या पायाला दुखापत झाली असल्यामुळे पाय दुखत असूनही ते सेवा करत होते. प.पू. गुरुदेवांवरची श्रद्धा त्यांच्या प्रत्येक कृतीतून आणि बोलण्यातून जाणवत होती.

पू. (सौ.) सखदेवआजी यांची तपोलोकाच्या दिशेने वाटचाल होतांना सनातनच्या साधिका श्रीमती वसुधा देशपांडे यांना जाणवलेली वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे

श्रीमती वसुधा देशपांडे
१. पू. सखदेवआजींचा रामनाथी (गोवा) येथील
सनातन आश्रमातून उच्च लोकाकडे प्रवास चालू होणे
    १७.८.२०१६ या दिवशी दुपारी ३ ते ४ वाजण्याच्या सुमारास मी रुग्णाईत असल्याने पहुडले होते. तेव्हा अर्धवट जागेपणी मला दृश्य दिसले, पू. (सौ.) सखदेवआजी थोड्या वाकड्या स्थितीत खोलीच्या समोरून धान्य विभागाकडे गेल्या. त्या सरळ धान्य विभागासमोरील उंचवट्यावर गेल्या. नंतर त्यांनी पूर्ण सरळ उभे राहून आश्रमाकडे तोंड करून दोन्ही हात जोडून डोळे मिटले आणि क्षणमात्र थांबून त्या सावकाश वर वर जातांना दिसत होत्या. त्या बर्‍याच सावकाश जात होत्या. नंतर मला एका संतांनी सांगितले, पू. आजींनी सायंकाळी ५.१० वाजता देहत्याग केला.
२. पू. आजींनी महर्लोकातून तपोलोकाकडे प्रयाण करणे
    रात्री मी पू. आजींच्या पार्थिवाचे दर्शन घेतले. मला पूर्वीपासून पू. आजींचा आधार वाटत होता. त्यामुळे रात्री ११ ते १२ वाजण्याच्या सुमारास माझ्या मनात विचार आला, पू. आजी आता कुठे गेल्या असतील ? त्या वेळी मला सूक्ष्मातून पुढील दृश्य दिसले.

समजूतदार, उपजतच देवाची ओढ आणि सात्त्विकतेची जाण असणारा ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचा महर्लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला जळगाव येथील चि. कार्तिक लिगाडे (वय १ वर्ष) !

चि. कार्तिक लिगाडे
        जळगाव येथील चि. कार्तिक लिगाडे याचा २६.८.२०१६ (श्रावण कृष्ण पक्ष नवमी) या दिवशी पहिला वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने त्याची आजी, आई आणि मावशी यांना जाणवलेली त्याची गुणवैशिष्ट्ये पुढे देत आहोत.
प्रथम वाढदिवसानिमित्त चि. कार्तिक लिगाडे
याला सनातन परिवाराकडून अनेक शुभाशीर्वाद !
१. जन्मापूर्वी
१ अ. मुलीला प्रसववेदना चालू झाल्यावर ती सनातनचा भावजागृती हा ग्रंथ वाचू लागणे, वाचतांना तिला झोप लागणे आणि आई, मला बाहेर यायचे आहे गं !, असा आवाज तिच्या पोटातून ऐकू आल्यावर भावजागृती होणे : माझी मुलगी सौ. आरती प्रसूतीसाठी घरी आली होती. तिला ५.९.२०१५ हा प्रसूतीचा दिनांक दिला होता या दिवशी दुपारी तिच्या पोटात दुखू लागले. नंतर ती सनातनचा भावजागृती हा ग्रंथ वाचू लागली आणि वाचता वाचता पोटावर ग्रंथ ठेवून झोपी गेली. थोड्या वेळाने मला एक आवाज आला, आई, मला बाहेर यायचे आहे गं ! आवाज कुठून येत आहे, हे पहातांना आरतीच्या पोटाकडे माझे लक्ष गेले. त्या वेळी पुन्हा आवाज आला, मैय्या, मी पोटातून बोलतोय. मी उलटा झालो आहे. त्यामुळे मला त्रास होत आहे. मला लवकर बाहेर यायचे आहे. हे बोलणे ऐकून माझी भावजागृती झाली आणि आनंदही झाला. माझा हा भाव आणि आनंद दुसर्‍या दिवसापर्यंत टिकून होता.

पू. (सौ.) सखदेवआजी यांची देहत्यागानंतर जाणवलेली वैशिष्ट्ये

पू. डॉ. मुकुल गाडगीळ
१. प्राण आज्ञाचक्रातून गेल्याचे जाणवणे, आज्ञाचक्र तेजस्वी दिसणे आणि कपाळावरील कुंकवामध्ये ॐ उमटलेला दिसणे : पू. (सौ.) सखदेवआजी यांच्या खोलीत गेल्यानंतर जाणवले, त्यांचा प्राण आज्ञाचक्रातून गेला आहे. त्यांचे आज्ञाचक्र तेजस्वी दिसत होते. तसेच त्यांच्या कपाळावरील कुंकवामध्ये ॐ उमटल्याचेही आढळले.
२. पू. (सौ.) सखदेवआजींची स्पंदने हाताला जेथपर्यंत जाणवली, तेथपर्यंतच ती यु. टी. स्कॅनर मापकाने दर्शवणे आणि ती पू. आजींपासून २.८८ मीटर येथपर्यंत असणे : पू. आजींची चैतन्यमय स्पंदने त्यांच्यापासून किती अंतरापर्यंत जाणवतात ?, हे मी माझ्या हाताने पाहिले. मला ती स्पंदने जेथपर्यंत जाणवत होती, तेथपर्यंतच युनिव्हर्सल थर्मल स्कॅनर (यु. टी. स्कॅनर) मापकाने ती दर्शवली आणि ती पू. आजींपासून २.८८ मीटर एवढ्या दूरपर्यंत होती.

सनातनच्या २० व्या संत पू. (सौ.) आशालता सखदेवआजी यांनी देहत्याग केल्यानंतर पुष्कळ प्रमाणात निर्माण झालेल्या सकारात्मक ऊर्जेचा परिणाम अभ्यासण्यासाठी यू.टी.एस्. (Universal Thermo Scanner) या उपकरणाद्वारे महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाने केलेली वैज्ञानिक चाचणी !

कै. पू. (सौ.) आशालता
सखदेवआजी
पू. (सौ.) आशालता सखदेवआजी यांच्या देहत्यागाचा
आज दहावा दिवस आहे, त्यानिमित्ताने...
     सामान्यतः जो जीव जन्माला येतो, त्याचा मृत्यू निश्‍चितच असतो. हा नियम सर्वांनाच लागू आहे. जीवनात व्यक्तीने साधना केल्यास त्याचा मृत्यूनंतरचा प्रवासही चांगला होतो. जीव साधना करणारा असेल, तर जिवंतपणी आणि मृत्यूनंतरही त्याच्या साधनेचा त्याला अन् इतरांना लाभ होतो. त्याच्या माध्यमातून वातावरणात सकारात्मक ऊर्जेचे प्रक्षेपण होते. सामान्य व्यक्तीचा मृत्यू झाल्यास मृतदेहाभोवतालचे वातावरण त्रासदायक होते; मात्र संतांनी देहत्याग केल्यावर त्यांच्या देहातून चैतन्य दूरवर प्रक्षेपित होते.
कठोर साधना करत संतपद प्राप्त केलेल्या सनातनच्या २० व्या संत पू. (सौ.) आशालता सखदेवआजी यांनी १७.८.२०१६ या दिवशी देहत्याग केला. देहत्यागानंतर त्यांच्या देहातून कोणत्या ऊर्जेचे प्रक्षेपण होते ? देहाच्या ठिकाणी आणि देहातून वातावरणात किती अंतरापर्यंत हे प्रक्षेपण होते आणि त्यांचा परिणाम, याविषयी वैज्ञानिक दृष्टीकोनातून अभ्यास करण्यासाठी यू.टी.एस्. (Universal Thermo Scanner) या उपकरणाद्वारे चाचणी घेण्यात आली. या चाचणीची निरीक्षणे आणि तिचे विवरण पुढे दिले आहे. 
यूटीएस् उपकरणाद्वारे ऊर्जेचे मापन करतांना आधुनिक वैद्या (कु.) आरती तिवारी
१. वैज्ञानिक चाचणी करण्याचा उद्देश
    एखाद्या घटकात (वस्तू, वास्तू आणि व्यक्ती यांत) किती टक्के सकारात्मक स्पंदने आहेत, तो घटक सात्त्विक आहे कि नाही किंवा तो घटक आध्यात्मिकदृष्ट्या लाभदायक आहे कि नाही, हे सांगण्यासाठी सूक्ष्मातील कळणे आवश्यक असते. संत सूक्ष्मातील जाणू शकत असल्याने ते प्रत्येक घटकातील स्पंदनांचे अचूक निदान करू शकतात. भाविक, व्यक्तीला आणि साधक संतांनी सांगितलेले शब्द प्रमाण मानून त्यावर श्रद्धा ठेवतात; परंतु बुद्धीप्रामाण्यवाद्यांना मात्र शब्दप्रमाण नाही, तर प्रत्यक्ष प्रमाण हवे असते. त्यांना प्रत्येक गोष्ट वैज्ञानिक चाचणीद्वारे, म्हणजेच यंत्राने सिद्ध करून दाखवली असेल, तरच ती खरी वाटते.

मध्यप्रदेशातील नेमावर्त तीर्थ येथे असणार्‍या शिवलिंगावर पाण्याच्या ११ धारा असणार्‍या घागरीने अभिषेक केला असता शिवलिंगातून ॐकाराचा ध्वनी बाहेर पडणे आणि तो इतरांनाही स्पष्ट ऐकायला येणे

बुद्धिप्रामाण्यवाद्यांना 
चपराक आणि वैज्ञानिकांना आवाहन ! 
सद्गुरु सौ. अंजली गाडगीळ
        मध्यप्रदेशात नेमावर्त तीर्थ नावाचे पवित्र तीर्थ आहे. या ठिकाणी घडणार्‍या चमत्कारासंदर्भात हल्लीच ऐकायला मिळाले. पुणे येथील सनातनचे हितचिंतक श्री. पेंडसे यांनी तेथील चमत्काराविषयी पुढील माहिती सांगितली.
        नेमावर्त तीर्थ हे मध्यप्रदेशात आहे. तेथे एक ब्रह्मचारी आश्रम आहे. तेथे असणार्‍या श्री. गाडगीळ नावाच्या पुजार्‍यांनी सांगितले की, या शिवलिंगावर पाण्याच्या ११ धारा पडणार्‍या घागरीने अभिषेक केला की, शिवलिंगातून ॐकाराचा ध्वनी बाहेर पडलेला स्पष्ट ऐकायला येतो.
        श्री. पेंडसे म्हणाले, मला ही बातमी सनातनच्या साधकांना द्यावीशी वाटली आणि असे वाटले की, अशा घटना सनातन प्रभातमधून उघड व्हायला हव्यात आणि या सर्वच घटनांविषयी संशोधन व्हायला हवे. भारतात अनेक चमत्कार होतात. त्यांमागील शास्त्र काय आहे, हे सर्वांनाच कळायला हवे. सनातनच या सर्व गोष्टींना प्रकाशात आणू शकते, असा विश्‍वासही त्यांनी या वेळी व्यक्त केला. त्यांची हे सांगण्यामागे अध्यात्मशास्त्र जाणून घेण्याची आणि ते समाजापर्यंत पोचवण्याची तळमळ दिसून आली.
        ईश्‍वराच्या साकार आणि निराकार दोन्ही रूपांची उपासना करणारा हिंदु धर्म हा एकमेव धर्म आहे. - शिवनारायण सेन, सचिव, राष्ट्र-धर्म प्रचार सभा, बंगाल

कुणाला कशा प्रकारे नमस्कार करावा ?

१. मित्र : मित्र भेटला की, दोन्ही हात जोडून नमस्कार करावा.
२. ज्येष्ठ किंवा श्रेष्ठ व्यक्ती : श्रेष्ठांना गुडघे टेकून पायावर डोके ठेवून नमस्कार करावा.
३. देव, गुरु आणि माता-पिता : देव, गुरु आणि माता-पिता यांना साष्टांग नमस्कार करावा.
     (शास्त्रानुसार पहिल्याहून दुसरा आणि दुसर्‍याहून तिसरा प्रकार श्रेष्ठ सांगितला आहे. - संकलक)
(मासिक श्रीधर संदेश, जुलै २०११)

फलक प्रसिद्धीकरता

घरवापसीच्या विरोधात आकाश-
पाताळ एक करणारे आता गप्प का ?
        उत्तरप्रदेशच्या बक्सर येथील चौंगाई गावातील ५०० दलितांनी हिंदु धर्माचा त्याग करून ख्रिस्ती धर्म स्वीकारला आहे. त्यांना आमीष दाखवून धर्मांतरीत करण्यात आल्याचे म्हटले जात आहे. अन्य ५०० दलितांवर धर्मांतर करण्यासाठीही दबाव घातला जात आहे.

हिंदू तेजा जाग रे !

Jago !
        UP ke Baksarme 500 dalitone Isai Dharma swikara. Charcha hai ki unhe phuslakar dharmantarit kiya gaya hai. 
Gharwapasipar shor machanewale ab chup kyu ?
जागो !
        उत्तरप्रदेश के बक्सर में ५०० दलितों ने ईसाई धर्म स्वीकारा. चर्चा है कि उन्हें फुसलाकर धर्मांतरित किया गया है । 
घरवापसी पर शोर मचानेवाले अब चुप क्यों ?

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

आध्यात्मिक प्रगती होण्याचे महत्त्व 
        आध्यात्मिक प्रगती होऊ लागल्यावर माणसाचा जीवनाकडे पहाण्याचा दृष्टीकोन आपोआप पालटत जातो आणि शाश्‍वत सुखाच्या दिशेने त्याची वाटचाल चालू होते.
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥
या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो. - प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले
         अध्यात्मात निवडणुका नाहीत हे बरे, नाहीतर सर्व भक्तांचे डिपॉझिट जप्त झाले असते ! 
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले

बोधचित्र

॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज
सनातनचे श्रद्धास्थान
खरा शिष्य
रंगाच्या जशा अनेक छटा असतात, तशाच शिष्यत्वाच्याही अनेक पायर्‍या असतात.
१. मला कोणी शिव्या दिल्या, मारले, माझी कुणी हत्या (खून) केली, तरी त्याच्यावर तुम्ही दया केलीत, तर मी समजेन की, माझ्या गुरूने तुम्हाला सिद्ध (तयार) केले.
भावार्थ : शिव्या देणे, मारणे, हत्या करणे इत्यादी सर्व प्रकृतीतील आहे. हे समजून ते करणार्‍याविषयी राग न येणे, एवढेच नव्हे, तर करुणाकर भगवंताप्रमाणे त्याच्यावर दया करणे, हे शिष्याच्या खर्‍या प्रगतीचे लक्षण होय.
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.)

हिंदूंनो, उत्सवाचा उद्देश जाणा !

         सर्वोच्च न्यायालयाने २० फुटांपेक्षा अधिक स्तर लावायचे नाहीत, या निर्णयावर शिक्कामोर्तब केल्यावर विशेषतः ठाणे आणि मुंबईमध्ये हंडी फोडणार्‍या मंडळांच्या कार्यकर्त्यांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. त्यामध्ये त्यांचे मुख्य सूत्र होते की, आम्ही वर्षभर सराव केला आहे, त्याचे काय करायचे ? काहींनी असे सूत्र मांडले की, खेळातही अपघात होतात, म्हणून खेळ खेळायचे थांबतात का ?, हिंदूंच्या उत्सवातील आनंदावर विरजण का आणता ? पोलिसांनी ठिकठिकाणी नोटिसा देऊनही न्यायालयाचा निर्णय अमान्य करण्यापर्यंत काहींची मजल गेली आणि ठाण्यात मुद्दामहून ४० फुटांची हंडी उभारण्यात आली आणि त्याला ११ लाखांचे पारितोषिकही ठेवण्यात आले. दादरमध्ये एका मंडळाने काळे फडके दाखवून न्यायालयाच्या निर्णयाचा निषेध केला आणि शिडीवर चढून हंडी फोडली. एका मंडळाने झोपून ९ थर लावले इत्यादी. या सर्व पार्श्‍वभूमीवर हिंदू धर्मशिक्षणाच्या अभावी धर्माचरणापासून किती दूर गेले आहेत आणि त्यांनी त्यांच्या पवित्र उत्साहाचे बाजारीकरण करून त्याला बीभत्स रूप दिले आहे, हे प्रकर्षाने लक्षात येते.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn