Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

संत ज्ञानेश्‍वर महाराज यांची आज जयंती !

कोटी कोटी प्रणाम !

आज श्रीकृष्ण जयंती ! 
 कुठे गायींचे पालन-पोषण करणारा गोपाळकृष्ण, तर कुठे सर्वत्र पशूवधगृहे (कत्तलखाने) उभारून प्रतिदिन ५० सहस्र गायींची कत्तल करणारे शासन !

या गोकुळाष्टमीपासून वासुदेवाचा आठवा अंश कृष्ण प्रकट होण्यास आरंभ होणार !

गोकुळाष्टमीनिमित्त महर्षींचा 
साधकांना संदेश आणि त्याचा भावार्थ ! 
     साधकांनो, आपल्याला या वर्षीची गोकुळाष्टमी अत्यंत लाभदायक असण्याचे कारण म्हणजे महर्षींनी नाडीवाचनातून वेळोवेळी सांगितले आहे की, या गोकुळाष्टमीपासून वासुदेवाचा आठवा अंश कृष्ण प्रकट होण्यास आरंभ होणार आहे. त्यामुळे आता साधकांच्या बाजूने धर्मक्रांतीचे पारडे झुकू लागणार आहे. आपल्याला आता छोट्या छोट्या प्रसंगातही याचा प्रत्यय येऊ लागेल. साधकांची विजयाच्या दिशेने वाटचाल आरंभ होईल. 
      म्हणूनच हिंदु राष्ट्राच्या (सनातन धर्म राज्याच्या) स्थापनेची पहाट अनुभवण्यासाठी या गोकुळाष्टमीच्या दिवशी श्रीकृष्णाच्या चरणी अत्यंत तन्मयतेने प्रार्थना करूया आणि त्याला आळवूया, 'देवा, तू आता दुर्जनांचा नाश करण्यास लवकर ये. तुझी आम्ही आतुरतेने वाट पहात आहोत'. या वर्षीची गोकुळाष्टमी आपल्या सर्वांसाठी पुष्कळच महत्त्वाची आहे; कारण या दिवसापासूनच अवतार प्रकट होण्यास आरंभ होणार आहे. 
- (सद्गुरु) सौ. अंजली गाडगीळ, चेन्नई, तमिळनाडू. (२३.८.२०१६, सकाळी ९.५४)

हिंदूंनो, अर्धी भाकरी मिळाली, तर ती घ्या आणि राहिलेल्या अर्ध्यासाठी प्रयत्न करा ! मिळेल ते पदरात घ्या आणि उरलेल्यासाठी झगडा ! - लोकमान्य टिळक


काश्मीरच्या ४ जिल्ह्यांतील ३६ पैकी तीनच पोलीस ठाणी कार्यरत !

पीडीपी-भाजपच्या राज्यातील काश्मीरची विदारक स्थिती ! 
     श्रीनगर - काश्मीर खोर्‍यात गेला दीड महिना चालू असलेला हिंसाचार अद्याप थांबलेला नाही. या हिंसाचारात आतापर्यंत ७० जण ठार झाले आहेत. दक्षिण काश्मीरच्या पुलवामा, शोपिया, कुलगाम आणि अनंतनाग अशा ४ जिल्ह्यांमध्ये पूर्णपणे अराजक माजले आहे. तेथील एकूण ३६ पोलीस ठाण्यांपैकी तीनच कार्यरत असल्याने दंगलखोरांना सूट मिळाली आहे. दंगलखोरांकडून पोलीस ठाण्यांवर आक्रमणे होत राहिल्याने ती बंद करण्यात आली आहेत. अनेक पोलीस ठाण्यांना दंगलखोरांनी आग लावली. बंद करण्यात आलेल्या पोलीस ठाण्यांची सुरक्षाही सैनिकांवर सोपवण्यात आली आहे. 

(म्हणे) सनातन संस्थेवर कायमची बंदी घाला !

पुरोगामी वकिलांना सनातनद्वेषाने पछाडले !
       पुणे, २३ ऑगस्ट - सनातन संस्थेची वाटचाल इस्लामी अतिरेकी संघटनांच्या पावलांवर होत असून लवकरच त्याला आवर घालणे आवश्यक आहे; अन्यथा भारतातही पाकिस्तानसारखी परिस्थिती उद्भवू शकते. अतिरेकी कारवाया करत असलेल्या सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती आणि त्यांच्याशी संलग्न संस्था यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, तसेच त्यांच्यावर कायमस्वरूपी बंदी घालावी, अशी मागणी अधिवक्ता विकास शिंदे आणि अन्य हिंदुत्वविरोधी अधिवक्त्यांनी केली आहे. (राष्ट्र आणि धर्म यांच्या उद्धारासाठी झटणार्‍या आणि हिंदु राष्ट्राच्या म्हणजेच आदर्श राज्य उभारणीच्या दिशेने सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांचा वारू भरधाव वेगाने निघाला आहे. हिंदु धर्माचे विरोधक असणार्‍यांना त्यामुळे धडकी भरली असून विवेकाच्या बाता मारणार्‍यांकडून विवेकबुद्धी गहाण ठेवून सनातन संस्थेवरील कोणताही आरोप सिद्ध झालेला नसतांना संस्थेवर बंदी घालण्याची असंविधानिक आणि अविवेकी मागणी केली जात आहे. पूर्वग्रहातून समाजमन कलुषित करण्याचे उद्योग करण्यापेक्षा अशा मंडळींनी सनातन धर्माची तत्त्वे जिज्ञासेने जाणून घेण्याचा विवेक दाखवल्यास त्यांचा भ्रम आपोआपच दूर होईल. - संपादक) या संदर्भात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत स्वप्नील जगताप, सोमनाथ भिसे, राहुल सकपाळ, प्रतिक जगताप आदी उपस्थित होते.

देशविरोधी मुसलमानांनी भारत सोडावा ! - हिंदु संहती

कोलकाता येथे १० सहस्र धर्माभिमान्यांच्या उपस्थितीत हिंदुवीर गोपाल मुखर्जी स्मरण दिवस साजरा !
आंदोलनातील हिंदूंना संबोधित
करतांना श्री. तपन घोष
     कोलकाता - हिंदुवीर गोपाल मुखर्जी स्मरण दिवसाच्या निमित्ताने हिंदुत्वनिष्ठ संघटना हिंदु संहतीने (हिंदु एकतेने) येथे एका सभेचे आयोजन केले होते. १९४६-१९४७ च्या धर्मांध मुसलमानांच्या आक्रमणाच्या वेळी हिंदुवीर गोपाल मुखर्जी यांनी हिंदूंच्या संरक्षणासाठी अविस्मरणीय प्रयत्न केले होते. त्यानिमित्ताने हा दिवस साजरा केला जातो. 
     सभेपूर्वी येथील सुबोध मल्लिक चौक ते श्याम बाजारपर्यंत फेरी काढण्यात आली होती. यात १० सहस्रांहून अधिक धर्माभिमानी सहभागी झाले होते. यात तरुणांचा मोठ्या प्रमाणात उत्साही सहभाग होता. या वेळी देशविरोधी मुसलमान भारत सोडा, इसिस समर्थक मुसलमान भारत सोडा !, अशा प्रकारच्या घोषणा देण्यात आल्या. या फेरीत चित्रपट दिग्दर्शक श्री. विवेक अग्निहोत्री, कवि नवज्योत सिंह, भोलानंद शक्ति पीठ मगरा येथील स्वामी अंबिकानंदजी, स्वामी अगमानंदजी, हिंदु संहतीचे संस्थापक अध्यक्ष श्री. तपन घोष, हिंदु जनजागृती समितीचे पूर्व अन् पूर्वोत्तर भारत समन्वयक श्री. चित्तरंजन सुराल आदी मान्यवर सहभागी झाले होते.

भारतात मुसलमानांवर अत्याचार होत असल्याने तेथेच राहून घातपात करा !

आतंकवाद्यांना धर्म असतो, हे पुनःपुन्हा दर्शवणारी आतंकवाद्यांची सूचना !
इसिसच्या कमांडरची भारतातील आतंकवाद्यांना सूचना 
     संभाजीनगर - महाराष्ट्र आतंकवादविरोधी पथकाने (एटीएसने) अटक केलेल्या इसिसचा आतंकवादी शाहिद खान याला न्यायालयाने न्यायालयीन कोठडी, तर इक्बाल आणि रईसोद्दीन याला पोलीस कोठडी दिली आहे. या वेळी एटीएस्ने न्यायालयास सांगितले की, इसिसकडून या तिघांना भारतातच मुसलमानांवर प्रचंड अत्याचार होत आहेत. त्यामुळे भारतात राहूनच घातपात करण्याचे लक्ष्य ठरवा. तुम्ही सिरियात आल्यास सर्वांचे लक्ष तुमच्यावर केंद्रित होईल, असा इमेल पाठवला होता, अशी माहिती दिली. (भारतातील मुसलमान इसिसकडे वळणार नाहीत, असे म्हणणारे भारताचे गृहमंत्री राजनाथ सिंह या घटनांवर बोलत का नाहीत ? - संपादक)

पाकमध्ये एम्क्यूएम् पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून वृत्तवाहिनीच्या कार्यालयावर आक्रमण : १ ठार !

     इस्लामाबाद - पाकमधील एआरवाय् या खाजगी वृत्तवाहिनीच्या कार्यालयावर मुत्ताहिदा कौमी मुव्हमेंट (एम्क्यूएम्) या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या आक्रमणात एकाचा मृत्यू झाला, तर अनेक जण घायाळ झाले. यात महिला कर्मचार्‍यांचाही समावेश आहे. वृत्त प्रसारित करतांना पक्षपातीपणा केला जात असल्याने हे आक्रमण केले गेल्याचे वृत्त स्थानिक वृत्तवाहिन्यांनी दिले आहे. 

बरेली (उत्तरप्रदेश) जिल्ह्यातील एका मंदिरावरील ध्वनीक्षेपकाला विरोध करणार्‍या धर्मांधांकडून पुन्हा हिंसाचार !

देशभरातील लक्षावधी मशिदींमधून आवश्यक नसतांना प्रतिदिन ५ वेळा सर्व नागरिकांना ऐकवल्या जाणार्‍या अजानविषयी धर्मांध गप्प का ? 
    बरेली - बरेली जिल्ह्यातील हाफिजगंजच्या उदरनपूर गोटिया गावातील ब्रह्मदेव मंदिरावरील ध्वनीक्षेपकावरून नुकताच धर्मांधांकडून हिंसाचार करण्यात आला. यात ६ जण घायाळ झाले. घटनास्थळी पोचलेल्या पोलिसांनी तात्काळ परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. 

तुर्की आतंकवाद्यांची भारतात घुसखोरी ! - तुर्कस्तानचे परराष्ट्रमंत्री मेवलूत कावूसोग्लू

कणाहीन राज्यकर्ते आणि भ्रष्ट सुरक्षादले यांमुळे भारत सर्व जिहादी 
आतंकवादी संघटनांसाठी माहेरघर बनले आहे ! 
      नवी देहली - प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत तुर्कस्थानचे परराष्ट्रमंत्री मेवलूत कावूसोग्लू यांनी दावा केला आहे की, फेतुल्लाह गुलेन टेररिस्ट ऑर्गनायझेशन (एफ्ईटीओ) या तुर्कस्तानमधील आतंकवादी संघटनेने भारतातही घुसखोरी केली आहेे. याची माहिती परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांना दिली आहे. तुर्कस्थानचे राष्ट्राध्यक्ष तय्यीप एर्दोगान यांचे सरकार उलथवून टाकण्यासाठी गेल्या महिन्यात करण्यात आलेल्या अयशस्वी बंडाला याच आतंकवादी संघटनेने चिथावणी दिली होती.
     याविषयी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरूप यांनी सांगितले की, तुर्कस्थानने दिलेली माहिती भारताने गांभीर्याने घेतली असून एफ्ईटीओशी संबंधित संस्था, संघटना यांना आळा घालण्याच्या या देशाच्या मागणीविषयी विचार केला जात आहे. (यात विचार करण्यासारखे काय आहे ? आतंकवादी संघटनांवर बंदी घालून तिच्यावर कारवाई करणार, असे का सांगता येत नाही ? - संपादक)चित्रपटातील प्रेमाचे प्रसंग पाहून १४ वर्षांच्या मुलाकडून ७ वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याने मुलीची आत्महत्या !

अश्‍लील चित्रपटांवर (पॉर्न वर) बंदी घालण्यास विरोध करणारे या घटनेचा विचार करतील का ? 
अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा पुरस्कार करण्याच्या नावाखाली अश्‍लीलतेला प्रोत्साहन देणारे आता कुठे आहेत ?
     जोधपूर - चित्रपटातील प्रेमप्रसंग पाहून १४ वर्षांच्या मुलाने ७ वर्षांच्या एका मुलीवर काही दिवस सातत्याने बलात्कार केल्यामुळे या मुलीने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. घटनेच्या ७ दिवसांनी पोलिसांनी या आत्महत्येचा छडा लावला. 
     विद्यार्थिनीने आत्महत्या करण्याच्या पाच दिवस आधीपासून तो तिच्यावर बलात्कार आणि अनैसर्गिक शारीरिक संबंध ठेवत होता. तिने कुठे वाच्यता करू नये, यासाठी तो तिला धमकावत देखील होता. तिच्या आईने पोलिसांना सांगितले की, शेजारी रहाणार्‍या अल्पवयीन मुलाने तिला ४ दिवसांपूर्वी गच्चीवरील बंद खोलीत नेले होते. त्यावरून तिने त्याला दरडावले होते. शेजारी आणि मुलीच्या बहिणींनीही अल्पवयीन मुलासमवेत मुलीला अनेकदा पाहिले असल्याचे सांगितल्यानंतर पोलिसांनी मुलाची चौकशी केल्यावर त्याचे कुकृत्य समोर आले.पू. (सौ.) सुशीला मोदी यांचा जोधपूरच्या महापौरांच्या हस्ते सन्मान !

पू. (सौ.) सुशीला मोदी यांचा सन्मान करतांना डावीकडून दुसरे महापौर श्री. घनश्याम ओझा
     जोधपूर - नुकताच जोधपूर महापालिकेचे महापौर श्री. घनश्याम ओझा यांच्या हस्ते सनातनच्या संत पू. (सौ.) सुशील मोदी यांचा सत्कार करण्यात आला. त्यांनी केलेल्या सामाजिक कार्यामुळे, तसेच राष्ट्र-धर्मविषयी समाजात जागृती आणण्याच्या कार्यामुळे पालिकेकडून हा सत्कार करण्यात आला.केरळमध्ये ख्रिस्ती धर्मातील दुजाभावाच्या वागणुकीला कंटाळून दलित ख्रिस्त्यांची घर वापसी !

ख्रिस्त्यांचे खरे स्वरूप समजल्यावर पुन्हा स्वगृही परतणार्‍या हिंदूंचे अभिनंदन ! 
त्यांचा आदर्श अन्य धर्मांतरित हिंदूंनी घ्यावा ! 
      थिरुवनंतपुरम् - केरळमध्ये काही हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी राबवलेल्या घर वापसी मोहिमेला चांगला प्रतिसाद लाभला आहे. ख्रिस्ती धर्मातील दुजाभावाच्या वागणुकीला कंटाळून बरेच दलित ख्रिस्त्यांनी घर वापसी केली असून काही त्या वाटेवर आहेत. 
१. केरळ शासनाच्या राजपत्रामधे प्रसिद्ध झालेल्या आकडेवारीनुसार वर्ष २०१५ मधे १ सहस्र ३३५ जणांनी धर्मांतर केले. यामध्ये ६६० दलित ख्रिस्ती असून त्यांनी हिंदु धर्मात प्रवेश केला आहे. 
२. गेल्या १९ महिन्यांमधे १ सहस्र ११९ जणांनी ख्रिस्ती धर्माला सोडचिठ्ठी दिली. ८४० जणांनी हिंदु धर्म सोडला, तर ८५ मुसलमानांनी इस्लाम धर्म सोडला.

अबिद पाशा याने हिंदुद्वेषातून ७ हिंदुत्वनिष्ठांच्या हत्या केल्याचे उघड !

धर्मांध मुसलमान हिंदूंना ठार करतात तेव्हा कोणीही त्यांचा विरोध किंवा निषेध करत नाहीत; मात्र 
एखाद्या पुरोगाम्याची किंवा कम्युनिस्टाची हत्या झाली, तर हिंदूंना आणि त्यांच्या संघटनांना 
उत्तरदायी ठरवण्याचा आटापिटा केला जातो !
     म्हैसूर (कर्नाटक) - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक राजू यांच्या हत्येच्या प्रकरणातील प्रमुख आरोपी अबिद पाशा याने हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या ७ कार्यकर्त्यांच्या हत्या केल्या आहेत, तर हत्या करण्याचे २ प्रयत्न फसले आहेत. या हत्येच्या प्रकरणी त्याच्या विरोधात म्हैसूर आणि मंगळुरू येथे गुन्हे प्रविष्ट आहेत. पाशा याने धर्मद्वेषातून सर्व हत्या केल्याचे राजू हत्या प्रकरणी अन्वेषणाच्या वेळी उघड झाले आहे, असे पोलीस आयुक्त बी. दयानंद यांनी पत्रकारांना सांगितले.

(म्हणे) अहिंसा परमो धर्मः ।

     'अहिंसा परमो धर्मः ।', म्हणजे 'अहिंसा परम धर्म आहे', म्हणणार्‍यांना श्रीकृष्णाचा अर्जुनाला, 'तस्मादुत्तिष्ठ कौन्तेय युद्धाय कृतनिश्‍चयः ।', म्हणजे 'हे कुंतीपुत्र अर्जुना, तू युद्धाचा निश्‍चय करून उभा रहा', हा उपदेश चुकीचा वाटल्यास आश्‍चर्य वाटणार नाही ! 'अहिंसा परमो धर्मः ।', हे व्यष्टी साधनेच्या संदर्भात, तर 'तस्मात् उत्तिष्ठ कौन्तेय युद्धाय कृतनिश्‍चयः ।' हे समष्टी साधनेच्या संदर्भात आहे. हे न कळणार्‍यांकडून झालेल्या अहिंसेच्या अतिरेकाने हिंदूंची आणि भारताची स्थिती अत्यंत दयनीय झाली आहे.

सूरतमध्ये गोमांस नेण्याच्या संशयावरून एका व्यक्तीला मारहाण !

     सूरत - येथील पंडेसारा भागात गोमांस घेऊन जाण्याच्या संशयावरून अज्ञातांनी इलियास मोहम्मद या ६३ वर्षीय व्यक्तीला मारहाण केली. (गोमांसाच्या प्रकरणी जनमत संतप्त असल्याने सरकारने गोमांसाची तस्करी करणार्‍यांवर कठोर कारवाई करावी ! - संपादक)

गोरक्षणाच्या नावाखाली हिंसाचार सहन केला जाणार नाही ! - झारखंडच्या भाजप सरकारचे मुख्यमंत्री रघुवर दास यांची चेतावणी

     रांची (झारखंड) - झारखंडमधील भाजप सरकारचे मुख्यमंत्री रघुवर दास यांनी एका मुलाखतीत म्हटले आहे की, 'गोरक्षणाच्या नावाखाली हिंसा करण्याची अनुमती दिलेली नाही. हिंसा आम्ही सहन करू शकत नाही. मी व्यक्तीगत स्तरावर समजतो की, जे गोतस्करीत सहभागी आहेत, तेच अशा प्रकारचा हिंसाचार करतात. याचा शोध घेतला पाहिजे,' असेही त्यांनी म्हटले. (मुख्यमंत्र्यांनी स्वतः याचा शोध घ्यावा आणि सत्य समाजासमोर आणावे ! - संपादक) पंतप्रधान मोदी यांनी गोरक्षकांविषयी जे काही म्हटले ते सत्य आहे.

चंद्रपूर येथे गायींची तस्करी रोखण्यास गेलेल्या हिंदु श्रीराम सेनेच्या कार्यकर्त्यांवर गोळीबार !

प्राण संकटात टाकून गोमातेला वाचवणारे हे गोरक्षक कधीतरी समाजकंटक असतील का ? आम्ही गोरक्षण करणार नाही आणि इतरांनाही करू देणार नाही, अशी शासनाची वृत्ती बनल्यामुळेच सर्वत्र गोतस्करींचे प्रमाण वाढत असून गोरक्षकांवरही आक्रमणांचे प्रमाण वाढले आहे ! ही स्थिती पालटण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे ! 
     चंद्रपूर, २३ ऑगस्ट - नागपूरहून चंद्रपूरकडे जाणार्‍या २ ट्रकमधून गायींची तस्करी होत असल्याची माहिती हिंदु श्रीराम सेनेच्या कार्यकर्त्यांना मिळाली. त्यांनी ट्रकचा पाठलाग केल्यावर भद्रकाली बसस्थानकाजवळ तस्करांनी कार्यकर्त्यांवर वाहनातून गोळीबार केला आणि ते पसार झाले; परंतु पडोली गावाजवळ पोलिसांनी त्यातील एका ट्रकला अडवून एका आरोपीला अटक केली. (गोवंश हत्याबंदी कायदा असूनही गोरक्षकांना अशा प्रकारे प्राण संकटात घालून गोरक्षण करावे लागते आणि पोलीस गोरक्षकांवरच खोटे गुन्हे प्रविष्ट करतात, तर दुसरीकडे शासन या गोरक्षकांना समाजकंटक म्हणून हिणवते, हे दुर्दैवी ! - संपादक) 

सध्या स्वातंत्र्याच्या दुसर्‍या लढाईची सर्वाधिक आवश्यकता ! - निवृत्त न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर

        पुणे, २३ ऑगस्ट - पटणारा विचार स्पष्टपणे मांडणे म्हणजेच सत्याग्रह. त्याची आज सर्वाधिक आवश्यकता आहे. हे ओळखून कुमार सप्तर्षी यांनी पुन्हा कार्यरत व्हावे आणि क्रांतीची हाक द्यावी. सध्या स्वातंत्र्याच्या दुसर्‍या लढाईची सर्वाधिक आवश्यकता आहे, असे आवाहन निवृत्त न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांनी केले. (स्वातंत्र्य नेमके कुणापासून हवे आहे ? हिंदुत्ववादी कि भारतीय संविधान ? - संपादक) युवक क्रांती दलाचे संस्थापक कुमार सप्तर्षी यांच्या अमृतमहोत्सवी सोहळ्यानिमित्त गणेश कला क्रीडा मंच येथे २१ ऑगस्ट या दिवशी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. (देशाची स्थिती एवढी बिकट असतांना साम्यवादी एवढा मोठा अमृतमहोत्सव सोहळा साजरा करतात, हा साम्यवादाशी प्रतारणा करून त्याला फासलेला हरताळच नव्हे का ? - संपादक) या वेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी विधानसभाध्यक्ष अरुण गुजराथी, संत साहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे, खासदार हुसेन दलवाई, शिवसेना पक्षप्रमुख श्री. उद्धव ठाकरे, महापौर प्रशांत जगताप आदी उपस्थित होते.
        या वेळी श्री. उद्धव ठाकरे यांनी सांगितले की, कुमार जात-पात-धर्म मानत नाहीत, आम्हीही जातपात मानत नाही; मात्र धर्म मानतो. कारण धर्म नसेल, तर अधर्माची भीती असते.

ज्योतिष हे शास्त्रच ! - किशोरकुमार शहा

१४ वे अखिल भारतीय ज्योतिष अधिवेशन 

ज्योतिष अधिवेशनाचे उद्घाटन करतांना ज्योतिषतज्ञ

      पुणे, २३ ऑगस्ट (वार्ता.) - ऋषीमुनींपासून चालत आलेली प्राचीन ज्योतिषशाखा शास्त्रच असल्याचे प्रतिपादन प्रसिद्ध उद्योजक किशोरकुमार शहा यांनी केले. पुणे येथील भालचंद्र ज्योतीर्विद्यालय आणि सातारा येथील प्रा. रमणलाल शहा ज्योतिष अकादमी यांच्या वतीने येथील उद्यानप्रसाद मंगल कार्यालयात १४ व्या अखिल भारतीय ज्योतिष अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते. या प्रसंगी ज्येष्ठ ज्योतीर्विद श्री.श्री. भट, पं. दिनेश गुरुजी, श्री. चंद्रकांत शेवाळे, प्रा. रमणलाल शहा, निवृत्त विंग कमांडर श्री. शशिकांत ओक आदी मान्यवर उपस्थित होते. २० आणि २१ ऑगस्ट या दिवशी पार पडलेल्या या अधिवेशनात भारतभरातून ज्योतिषअभ्यासक उपस्थित होते.

लडाखमध्ये १० सहस्र ५०० वर्षे पुरातन संस्कृती असल्याचे प्रमाण !

भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाला लडाखच्या शीत वाळवंटात १० सहस्र ५०० वर्षे पुरातन 
संस्कृती असल्याच्या खुणा आढळून आल्या आहेत. यामुळे तेथे संस्कृती आणि मानवी वास्तव्य 
असल्याचे समोर आले आहे.
१. अनेक वर्षांपासून भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाचे तज्ञ लडाखमधील १४ सहस्र फूट उंचीवर असलेल्या काराकोरम दर्रे के सासर ला भागात संशोधन करत होते. या विभागाचे तज्ञ आणि साहाय्यक महासंचालक डॉ. एस्.बी. ओटा यांचा चमू शोध घेत असतांना त्यांना येथील दुर्गम भागात पहाड आणि खोरे यांच्यामधून येणारा नागमोडी वळणाचा रस्ता हळूहळू सासर जलधारेकडे वर जात असल्याचा दिसून आला.
२. त्या मार्गाने २२ कि.मी. पुढे गेल्यावर एका ओसाड ठिकाणी काही खुणा आढळून आल्या. त्या ठिकाणी करण्यात आलेल्या उत्खननात तज्ञांना काही अस्थी आढळून आल्या. या अस्थींचे नमुने अमेरिकेतील फ्लोरिडा येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत.
३. रेडिओकार्बन डेट डिटर्मिनेशन या तंत्रज्ञानाचा वापर करून काढण्यात आलेल्या निकालानुसार हे नमुने आजपासून १० सहस्र ५०० वर्षे पुरातन असल्याचे निष्पन्न झाले. परिसरातील काही नमुने इ.स. पूर्व ७ सहस्र ३०० वर्षांपूर्वीचेही आढळून आले. त्यामुळे पुरातत्त्व विभागाने या ठिकाणी अधिक उत्खनन करण्याचे ठरवले आहे.
अरुणाचल प्रदेशमध्ये ब्राह्मोस क्षेपणास्त्र तैनात केल्याने चीनचा थयथयाट !

     नवी देहली - भारताने अरुणाचल प्रदेशातील वायूदलाच्या केंद्रावर ब्राह्मोस क्षेपणास्त्र तैनात केले आहे. यामुळे चीनने थयथायट चालू केला आहे. ब्राह्मोसमुळे पूर्वोत्तर सीमा भागात नकारात्मक प्रभाव पडेल, अशी प्रतिक्रिया चीनने व्यक्त केली आहे. भारताची ही कारवाई आम्हाला प्रत्युत्तर द्यायला भाग पाडू शकते, असे चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीचे अधिकृत प्रसारमाध्यम पीएल्ए डेलीने म्हटले आहे.
     ब्राह्मोस क्षेपणास्त्राच्या टापूत चीनचा तिबेट आणि यूनान प्रांत आला आहे. तिबेट आणि जिनजियांग भागामध्ये विमानतळे, रस्ते, रेल्वे सुविधा यांमुळे भारताने हे पाऊल उचलल्याचा दावाही पीएल्ए डेलीने केला आहे.

हौदातील श्रीगणेशमूर्ती विघटित करण्यासाठी पाण्यात अमोनियम बायकार्बोनेट वापरण्याचा अघोरी निर्णय !

धर्मशास्त्रानुसार मूर्तीविसर्जन हे पर्यावरणपूरकच आहे, हे लक्षात घ्या !
 पुणे महानगरपालिकेचा आणखी एक हिंदुद्रोह !
     पुणे, २३ ऑगस्ट - पुणे महानगरपालिकेने श्रीगणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी बनवण्यात येणार्‍या कृत्रिम हौदांतील पाण्यामध्ये यंदा श्री गणेशमूर्ती विरघळण्यासाठी अमोनियम बायकार्बोनेट (बेकिंग सोडा) घालायचे ठरवले आहे. (असे सोडामिश्रीत पाणी बनवणे आणि त्यात श्रीगणेशमूर्तीचे विसर्जन करणेे, ही एकप्रकारे विटंबनाच आहे ! अपवित्र पाण्यात गणेशाच्या पवित्र मूर्तीचे विसर्जन लाभदायी नाही ! - संपादक) 

जळगाव येथील प.पू. स्वामी माधवदासजी महाराज यांचा देहत्याग

प.पू. स्वामी माधवदासजी महाराज
     जळगाव - येथील सिद्धपुरुष महंत प.पू. स्वामी माधवदासजी महाराज यांनी २३ ऑगस्ट या दिवशी सकाळी ६ वाजता देहत्याग केला. ते ८५ वर्षांचे होेते. त्यांच्यावर २४ ऑगस्ट या दिवशी सकाळी ९ वाजता अग्नीसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्‍चात त्यांच्या पत्नी आहेत. सनातन परिवार स्वामी माधवदासजी यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे. 
      प.पू. स्वामी माधवदासजी यांनी जळगाव जिल्ह्यातील रिधुर येथील जागृत देवस्थान लोण्याच्या मारुति मंदिराचा (अवचित हनुमान मंदिराचा) ३५ वर्षांपूर्वी जीर्णोद्धार केला. तेव्हापासून ते हनुमंताची सेवा करत होते. 

भद्राचलम् येथील मंदिरातून अडीच लाख रुपयांच्या सोनसाखळ्यांची चोरी !

     खम्मम (तेलंगण) - भद्राचलम् येथील श्री सीतारामचंद्र मंदिरातून सीतामातेच्या गळ्यातील अडीच लाख रुपये किमतीच्या २ साखळ्या चोरांनी लंपास केल्या आहेत. देवतेचे दागिने चोरी झाल्याची ही पहिलीच घटना नसून यापूर्वीही अशा घटना घडल्याने याची गंभीर दखल तेलंगणचे धर्मादाय मंत्री ए. इंद्रकरण रेड्डी यांनी घेतली आहे आणि आरोपींविरुद्ध कडक कारवाई करण्याचे आश्‍वासन दिले आहे. या घटनेत मंदिरातील इतर पुजारी अथवा कर्मचारी गुंतले असावेत, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

भारत-म्यानमार सीमेवर भूकंपाचा धक्का

     नवी देहली - २३ ऑगस्टच्या सकाळी भारत-म्यानमार सीमेवरील गावांसह ईशान्येकडील काही राज्यांना भूकंपाचा धक्का बसला. सकाळी ७ वाजून ११ मिनिटांनी बसलेल्या या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ५.५ इतकी होती. या भूकंपामुळे कोठेही जीवित किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त सायंकाळपर्यत आले नव्हते. भूकंपाचा धक्का बसल्यानंतर नागरिकांनी घराबाहेर मोकळ्या जागेत आश्रय घेतला. म्यानमारमध्ये भूकंपाचा केंद्रबिंदू असल्याचे सांगण्यात येत आहे. चक्रीवादळामुळे जपानमधील १० सहस्र लोक विस्थापित !

     टोकीयो - माइंडल आणि लायनरॉक या चक्रीवादळांमुळे जपानमधील १० सहस्र नागरिकांना विस्थापित व्हावे लागले आहे. गेल्या २ दिवसांमध्ये ३ वेळा या चक्रीवादळाचा तडाखा बसला आहे. यात एक जण ठार झाला आहे. टोकीयोमध्ये जवळपास ११० मैल किंवा १८० किलोमीटर प्रति घंटे इतक्या वेगाने वारे वाहत असून शेकडोंच्या संख्येने विमानांची उड्डाणे रहीत करण्यात आली आहेत.
महर्षींनी प्रलयकालाविषयी सतर्क करणे
      १९.३.२०१६ या दिवशी झालेल्या नाडीवाचन क्रमांक ६७मध्ये महर्षि म्हणतात, हे पूर्ण वर्ष प्रलयकालाचे आणि आपत्तीजनक असणारे आहे. (भारत-म्यानमार सीमेवर झालेला भूकंप आणि चक्रीवादळामुळे जपानमधील १० सहस्र लोक विस्थापित होणे, या घटनेवरून प्रलयकालाविषयी महर्षींनी केलेले भाष्य किती तंतोतंत आहे, हे लक्षात येते ! - संपादक)

आतंकवादाच्या विरोधात लढा देणे हे महासत्ता होणार्‍या भारताचे दायित्व ! - सिरियाचे राष्ट्राध्यक्ष बशर अल् असद

     दमास्कस - भारत जागतिक महासत्ता म्हणून पुढे येत असून आतंकवादाविरुद्ध लढ्यात भारताचे दायित्व मोठे आहे, असे प्रतिपादन सिरियाचे राष्ट्राध्यक्ष बशर अल् असद यांनी केले. (आपल्या देशातील आतंकवाद भारत नष्ट करेल, असा सिरियाला विश्‍वास वाटतो. या विश्‍वासाला पात्र ठरण्यासाठी भारत शासनाने प्रथम भारतातील आतंकवाद नष्ट करावा ! असे केले, तर जगात भारताची पत वाढेल ! - संपादक) याआम्ही दशकभर संहारच पाहिला आहे. पुढचे दशक हे उभारणीचे दशक ठरावे. भारताने सिरियाची अर्थव्यवस्था उभी करण्यात साहाय्य करावे, अशी आपेक्षाही असद यांनी व्यक्त केली. भारताचे परराष्ट्र व्यवहार खात्याचे राज्यमंत्री एम्.जे. अकबर यांनी असद यांची भेट घेतली. त्या वेळी असद बोलत होते. १७ ऑगस्टपासून अकबर पश्‍चिम आशियाच्या दौर्‍यावर आले आहेत. 
      या वेळी दोन्ही देशांनी सुरक्षाविषयक सहकार्य करण्यावरही चर्चा झाली. गोपनीय माहितीची देवाण घेवाण आणि सिरियात जाणार्‍या भारतियांची पूर्ण पडताळणी ही सूत्रे या चर्चेत महत्त्वाची ठरली. सिरिया येथे काही प्रलंबित प्रकल्प भारत पूर्ण करणार आहे. यासाठी सिरियाने कामगारांच्या सुरक्षेची हमी द्यावी, अशी भारताची भूमिका आहे. 

पायरेटेड चित्रपट पाहिल्यास ३ वर्षे शिक्षा आणि ३ लक्ष रुपयांचा दंड !

      मुंबई - पायरेटेड चित्रपट पहाणे हा गुन्हा असून त्यासाठी ३ वर्षांची शिक्षा आणि ३ लाख रुपयांचा दंड ठोठावला जावू शकतो. या नियमानुसार आणि मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार काही संकेतस्थळांवर बंदी घालण्यात आली असली, तरीही असे चित्रपट ऑनलाईन बघणे, ते डाऊनलोड करणे किंवा इतरांना पाठवणे हे सर्व गुन्हा म्हणून सिद्ध होऊ शकतो. भारतात केवळ बंदी घातलेली संकेतस्थळे पाहिल्यावर शिक्षा होऊ शकते. न्यायालयाने शेकडो संकेतस्थळांवर बंदी घालण्याचा आदेश दिला आहे. 
बंगाली अभिनेत्रीचे अर्धनग्न छायाचित्र बांगलादेशमध्ये प्रसारित केल्याच्या प्रकरणी तक्रार

बांगलादेशात हिंदु अभिनेत्रीचा नभंग करण्याचा अश्‍लाघ्य प्रकार ! 
     कोलकाता - बंगाली अभिनेत्री मधुमिता चक्रवर्ती यांनी त्यांचे अर्धनग्न छायाचित्र बांगलादेशमधील वृत्त संकेतस्थळाने प्रसारित केल्याचा दावा करून कोलकाता पोलिसांत तक्रार केली आहे. तसेच अभिनेत्रीला गोव्यातील एका हॉटेलमध्ये वेश्यावृत्तीच्या प्रकरणी अटक केल्याचे खोटे वृत्त या वृत्त संकेतस्थळावर प्रसिद्ध केल्याचे मधुमिता आणि त्यांचे पती सौरभ चक्रवर्ती यांनी तक्रारीत म्हटले आहे. बांगलादेशमध्ये आपले बरेच चाहते आहेत. त्यामुळे अनेक संकेतस्थळांनी त्या वृत्ताचा अपलाभ घेतला आणि आपली १०० पेक्षा अधिक अर्धनग्न छायाचित्रे प्रसारित केली, असा दावा मधुमिता चक्रवर्ती यांनी केला आहे.

स्वातंत्र्यासाठी नेहरू, पटेल, बोस फासावर चढले ! - केंद्रीय शिक्षणमंत्री प्रकाश जावडेकर यांचा 'इतिहास'

     छिंदवाडा (मध्यप्रदेश) - नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांना स्वातंत्र्यलढ्यात फासावर चढावे लागले. ते देशासाठी हुतात्मा झाले, असे विधान केंद्रीय शिक्षण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केले आहे. 
     जावडेकर म्हणाले की, १८५७ मध्ये जी लढाई चालू झाली, ती ९० वर्षे चालली. ब्रिटिशांना पिटाळून लावण्यात आले आणि देश स्वतंत्र झाला. देशाला स्वातंत्र्य मिळवून देणार्‍या सर्व विरांना माझा प्रणाम. किती वीर झाले... सुभाषचंद्र बोस, सरदार पटेल, पंडित नेहरू, भगतसिंग, राजगुरू हे सर्व जण देशासाठी फासावर चढले... क्रांतीवीर सावरकर आणि आणखी अनेक स्वातंत्र्यसेनांनींनी देशासाठी प्राण त्यागले.

भारताने दिलेले दाऊद इब्राहिमचे ९ पैकी ६ पत्ते योग्य ! - संयुक्त राष्ट्र

संयुक्त राष्ट्र संघाने आता दाऊदला भारताच्या कह्यात देण्यासाठी पाकला बाध्य करावे, अशीच भारतियांची अपेक्षा आहे ! 
      संयुक्त राष्ट्र - कुख्यात आतंकवादी दाऊद इब्राहिम पाकमध्ये रहात असलेल्या ठिकाणांचे भारताने दिलेले ९ पैकी ६ पत्ते बरोबर असल्याचा दुजोरा संयुक्त राष्ट्र संघाने (युनोने) दिला आहे; मात्र पाकने नेहमीप्रमाणे दाऊदचा ठावठिकाणा माहीतच नसल्याचा कांगावा केला आहे. भारताने हे पत्ते देऊन दाऊदवर कारवाई करण्याची मागणी केली होती. भारताने दिलेल्या नऊ पत्त्यांपैकी चुकीच्या ठरवलेल्या ३ पत्त्यापैकी एक पत्ता पाकचे संयुक्त राष्ट्रसंघातील स्थायी प्रतिनिधी मलीहा लोधी यांच्या पत्त्याशी मिळताजुळता होता. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषद समितीने इसिस आणि अल-कायदासंबंधित निर्बंध सूचीतील संपत्ती जप्ती, प्रवास बंदी, शस्त्रबंदी घालावयाच्या व्यक्ती आणि संस्था यांच्या सूचीमध्ये दाऊदचे नाव घेतले आहे.

गोमूत्राचा वापर करण्यात आलेल्या उत्पादनांचा मुसलमानांनी वापर करू नये ! - दारुल उलूमचा फतवा

     सहारनपूर (उत्तरप्रदेश) - पतंजलीच्या उत्पादनांविषयी विचारण्यात आलेल्या प्रश्‍नावर उत्तर देतांना दारुल उलूमच्या मुफ्तींच्या खंडपिठाने फतवा काढला आहे. याद्वारे 'मुसलमानांनी गोमूत्राचा वापर करण्यात आलेले कोणतेही उत्पादन वापरू नये', असे म्हटले आहे. 'जर पतंजलीच्या उत्पादनांमध्ये गोमूत्राचा वापर केला जात नाही, असे सप्रमाण समोर आले, तर त्यांचा वापर केला जाऊ शकतो', असेही यात म्हटले आहे.

हिंदूंच्या श्रद्धांशी खेळणारी हिंदुद्रोही पुणे महानगरपालिका !

       जिथे श्री गणेशाची मूर्ती आहे, तेथे अध्यात्मशास्त्रानुसार त्याची शक्तीही आहे. घरात केवळ मूर्ती नसते, तर साक्षात् श्री गणेश विराजमान असतात, असाच गणेशभक्तांचा भाव असतो. त्यामुळेच विसर्जनाच्या वेळी अनेक गणेशभक्तांना अश्रू आवरत नाहीत. गणेशभक्तांनी भक्तीभावाने विसर्जित केलेल्या मूर्तीचे अशा प्रकारे विघटन हा अघोरी प्रकार आहे. त्याला समस्त गणेशभक्तांनी वैध मार्गाने विरोध करावा !

हिंदु जनजागृती समिती पुरस्कृत गणेशोत्सव महामंडळाच्या मागण्यांवर चर्चा करून जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांचा सकारात्मक प्रतिसाद !

जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देतांना गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी
     नंदुरबार - शहरातील सर्व गणेशोत्सव मंडळांना एकत्रित करून हिंदु जनजागृती समितीने स्थापन केलेल्या गणेशोत्सव महामंडळाच्या मागण्यांवर चर्चा करून येथील जिल्हाधिकारी डॉ. कलशेट्टी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र डहाळे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत त्या सोडवण्याचे आश्‍वासन दिले. २१ ऑगस्ट या दिवशी मोठा मारुति मंदिर येथे त्यांनी शहरातील सर्व गणेशोत्सव मंडळांची एकत्रित बैठक घेतली होती. शहरातील विविध मंडळांचे ९५ हून अधिक पदाधिकारी या बैठकीस उपस्थित होते. 

विनावेतन पशुकल्याण अधिकारीपदाच्या विज्ञापनाला भरघोस प्रतिसाद !

हिंदुत्वनिष्ठ राजकीय पक्षाचे कार्यकर्तेच 
गोरक्षण कार्यात सहभागी आहेत, हे शासन लक्षात घेईल का ?
     मुंबई - राज्याच्या पशुसंवर्धन विभागाने दिलेल्या विज्ञापनाला राज्यभरातून भरघोस प्रतिसाद मिळाला असून २ सहस्र ३८८ आवेदने त्यासाठी प्रविष्ट झाली आहेत. पशुसंवर्धन विभागाने 'पशुकल्याण अधिकार्‍यांच्या विनावेतन मानद' पदासाठी हे विज्ञापन दिले होते.

पुणे येथे गोकुळाष्टमीनिमित्त चित्रपट कलाकारांचे आकर्षण आणि लक्षावधी रुपयांची पारितोषिके !

संस्कृतीचे माहेरघर असलेल्या पुण्यामध्ये उत्सवाचे केले जाणारे 
विकृतीकरण निंदनीय असून यावरूनच धर्मशिक्षणाची अपरिहार्यता दिसून येते.उत्सवाचे
पावित्र्य जपून ते साजरे करण्यासाठी हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) स्थापनेविना पर्याय नाही! 
     पुणे, २३ ऑगस्ट (वार्ता.) - सध्या गोकुळाष्टमीनिमित्त आयोजित करण्यात येणार्‍या दहीहंडी उत्सवाचे स्वरूप विकृत होऊ लागले आहे. यंदा दहीहंडी फोडण्यासाठी अनेक मंडळांनी लक्षावधी रुपयांची पारितोषिके आणि चित्रपट कलाकारांना निमंत्रित करून उत्सवाचे पावित्र्य नष्ट केले आहे. (या माध्यमांतून मंडळे उत्सवांमध्ये कोणता आदर्श देणार आहेत ? उत्सवांची सोज्वळता नष्ट केल्या जाणार्‍या ठिकाणी भगवान श्रीकृष्णाचे तत्त्व कार्य करेल का ? - संपादक) 

पाकच्या समर्थनार्थ वक्तव्य करणारी कन्नड अभिनेत्री रम्या हिच्यावर देशद्रोहाचा गुन्हा प्रविष्ट

     बेंगळुरू - पाकिस्तान हे नरक नसून तेथील नागरिकही आपल्यासारखेच आहेत. त्यांनी आम्हाला चांगली वागणूक दिली, असे वक्तव्य कन्नड अभिनेत्री रम्या हिने केल्याने तिच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा प्रविष्ट करण्यात आला आहे. अधिवक्ता विठ्ठल गौडा यांनी केलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा प्रविष्ट करण्यात आला आहे. या प्रकरणाची सुनावणी २७ ऑगस्टला होणार आहे. 
     नुकतेच संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी वक्तव्य केले होते की, पाकिस्तानमध्ये जाणे नरकात जाण्यासारखे आहे. या विषयावरूनच रम्याने हे वक्तव्य केले आहे. 
     रम्या हिने २०११ मध्येही ट्विटरवर राष्ट्रविरोधी वक्तव्य केले होते. त्या वेळी तिच्यावर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली होती.

अकोला येथे हिंदूसंघटन मेळाव्याचे आयोजन


     अकोला, २३ ऑगस्ट (वार्ता.) - हिंदूंवर होणार्‍या आघातांना संघटितपणे विरोध करण्यासाठी येथील 'श्री शंकर संस्थान' येथे २० ऑगस्ट या दिवशी हिंदूसंघटन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला एकूण ३५० जणांची उपस्थिती होती. मेळाव्याच्या आरंभी श्री. योगेश जोशी यांनी शंखनाद केला. त्यानंतर हिंदु जनजागृती समितीचे वक्ते श्री. धीरज राऊत आणि रणरागिणी शाखेच्या सौ. माधुरी मोरे यांनी दीपप्रज्वलन केले. या वेळी सौ. प्रतिभा जडी यांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा संदेश वाचून दाखवला, तर श्री. धरज राऊत यांनी गुरुपौर्णिमेनिमित्त महर्षींनी दिलेल्या संदेशाचे वाचन केले. 

पनवेल येथे श्री गणेशमूर्ती बनवण्याची कार्यशाळा आणि सनातनच्या सात्त्विक गणेशमूर्तींचे प्रदर्शन !

श्री गणेश कला केंद्र आणि इरा फॉर वुमन यांचा उपक्रम 
ओरियन मॉलचे श्री. मंगेश परुळेकर (डावीकडे) यांना
श्री गणेशमूर्ती देतांना पू. रमेश गडकरी, समवेत श्री. प्रमोद बेंद्रे
     पनवेल - श्री गणेश कला केंद्र आणि इरा फॉर वुमन यांच्या संयुक्त विद्यमाने येथील ओरियन मॉलमध्ये २० आणि २१ ऑगस्ट या दिवशी श्री गणेशमूर्ती बनवण्याची कार्यशाळा, तसेच सनातन संस्थेच्या मार्गदर्शनाखाली सिद्ध करण्यात आलेल्या सात्त्विक गणेशमूर्तींचे प्रदर्शन भरवण्यात आले होते. कार्यशाळेचे उद्घाटन सनातनचे संत पू. रमेश गडकरी, तसेच ओरियन मॉलचे श्री. मंगेश परुळेकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. कार्यशाळेमध्ये सनातन संस्थेच्या वतीने सौ. वंदना आपटे यांनी 'श्री गणेशचतुर्थीचे शास्त्र' अन् 'आदर्श गणेशोत्सव कसा साजरा करावा ?' या विषयांवर मार्गदर्शन केले. मार्गदर्शनाचा लाभ ७०० जिज्ञासूंनी घेतला. या वेळी 'गणेशोत्सव वास्तव आणि आदर्श' या विषयावरील ध्वनीचित्र-चकती दाखवण्यात आली. 

देहू रस्ता (पुणे) येथे छेडछाड करणार्‍या टवाळखोरांना महिला पोलिसाकडून चोप

महिला पोलिसाची छेडछाड काढली जाणे, हे वर्दीचा धाक संपल्याचे लक्षण ! 
     पुणे, २३ ऑगस्ट - देहूरोड पोलीस ठाण्यातील एक महिला पोलीस कामकाज संपवून घरी जाण्यासाठी देहूरोड रेल्वे स्थानकावर पोचली. रेल्वे फलाटावर बसलेल्या टवाळखोरांनी महिला पोलिसाला पाहून अश्‍लील शेरेबाजी केली. त्यावर या महिला पोलिसाने प्रतिक्रियेदाखल टवाळखोर मुलांपैकी दोघांना चोप दिला आणि त्यांना पकडून पोलिसांच्या कह्यात दिले. हा प्रकार चालू असतांना फलाटावर बघ्यांची गर्दी जमली होती; पण युवतीच्या साहाय्याला कोणीही पुढे आले नाही. एकूणच देहू रस्ता परिसरात टवाळखोरांचे प्रस्थ बोकाळले असून पोलिसांनी गांभीर्याने त्यांच्यावर वचक बसवावा, अशी अपेक्षा नागरिकांकडून केली जात आहे.

गोरक्षकांविषयी केलेले विधान मागे घेण्याची पंतप्रधानांकडे मागणी !

फरीदाबाद (हरियाणा) 
येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन !
       वल्लभगड (हरियाणा) - फरीदाबादच्या वल्लभगड येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन करण्यात आले. यात पंतप्रधान मोदी यांनी गोरक्षकांच्या संदर्भात केलेले विधान त्यांनी मागे घ्यावे आणि काश्मीरमध्ये सैन्यावर आक्रमण करणार्‍यांना कठोर शिक्षा करावी, अशा मागण्या करण्यात आल्या.
       या आंदोलनात पनून कश्मीरचे श्री. दिगंबर रैना, गोमानव सेवा समितीचे श्री. बालकिशन ठाकूर, सनातन संस्थेचे श्री. अरविंद गुप्ता, राहुल किंगर, कु. पूनम किंगर; रणरागिणी शाखेच्या सौ. संदीप कौर, हिंदु जनजागृती समितीचे श्री. सुरेश मुंजाल, तृप्ती जोशी आणि श्री. गुलशन किंगर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

रामनाथी, गोवा येथे झालेल्या शिबिरात सहभागी झालेल्या साधकाच्या अनुभूती

श्री. अमोल मेहता
१. कु. वैदेही पिंगळे भावजागृतीचा प्रयोग करून घेत असतांना देवाने आपल्याला दोष आणि अहं यांच्या अंध:कारातून बाहेर काढून सर्वांमध्ये भावजागृतीची ज्योत पेटवली, असे दिसले आणि भाव जागृत होऊन पुष्कळ कृतज्ञता वाटली.
२. आश्रमात स्थापन केलेल्या कळसाखाली नामजप करतांना मन निर्विचार झाले आणि संपूर्ण शरिरात देवतांच्या चैतन्यामुळे गारवा जाणवून तेथून जाऊच नये, असे वाटत होते.
३. आश्रमांत झालेले पालट पहातांना, प.पू. डॉक्टरांशी संबंधित प्रदर्शन पहातांना आणि लादीवरचे पालट पहातांना शरीर पुष्कळ हलके होऊन मी हवेत तरंगत आहे, असे जाणवले. त्याक्षणी पुष्कळ भावजागृती झाली आणि या स्थितीतून बाहेर पडूच नये, असे वाटत होते.
हे प.पू. गुरुमाऊली, आमचे प्रयत्न काहीच होत नसतांना आमच्या प्रगतीसाठी तुम्हीच आम्हाला भरभरून देत आहात. आम्हाला यापुढेही प्रयत्न करण्यासाठी, भाव वाढवण्यासाठी तुम्हीच मार्गदर्शन करणार आहात, हाच कृतज्ञतेचा भाव आमच्यामध्ये राहू दे, अशी तुमच्या चरणी प्रार्थना आहे.
- श्री. अमोल मेहता, पुणे, महाराष्ट्र. (५.७.२०१६)

ठाणे शहरात प्रदूषण नियंत्रणासाठी बसवणार २०० प्रदूषण नियंत्रण यंत्रे !

     ठाणे - शहरात गृहसंकुले, मोठ्या प्रमाणावर बांधकामे, वाहनांची वाढलेली प्रचंड संख्या यांमुळे प्रदूषणात पुष्कळ वाढ झाली आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नॅम्प प्रकल्पान्वये ठाणे शहरात नियमित हवेचे सर्वेक्षण करण्यात येत असून त्यामध्ये शहरात हवेतील धुलीकणांच्या प्रमाणात मोठी वाढ झाल्याचे समोर आले आहे. हवेतील धुलीकण मानवी आरोग्यास बाधक ठरत असल्यामुळे अनेकांना विविध प्रकारच्या आजारांना समोरे जावे लागते. या पार्श्‍वभूमीवर शहरातील पदपथांवर दोनशे प्रदूषण नियंत्रक यंत्रे खाजगी आस्थापनांच्या वतीने बसवण्यात येणार आहेत. 

सनातन संस्थेवर बंदीची मागणी करणारे राष्ट्रप्रेमी असूच शकत नाहीत ! - सनातन प्रभातचे वाचक

परळी वैजनाथ (जिल्हा बीड) येथील वाचक मेळावा ! 
दीपप्रज्वलन करतांना डावीकडून अधिवक्ता
श्री. नीलेश सांगोलकर, सौ. सुनीता दीक्षित आणि सौ. अनिता बुणगे
     परळी वैजनाथ (जिल्हा बीड), २३ ऑगस्ट (वार्ता.) - सनातन प्रभातविना कोणत्याही वर्तमानपत्रात हिंदु राष्ट्राविषयीचे लिखाण वाचायला मिळत नाही. सनातनवर बंदीची मागणी करणारे राष्ट्रप्रेमी असूच शकत नाहीत. त्यामुळे त्यांनी प्रथम भारतातून निघून जावे, असे स्पष्ट मत सनातन प्रभातच्या वाचकांनी व्यक्त केले. येथील आर्य वैश्य समाज मंगल कार्यालयात २१ ऑगस्ट २०१६ या दिवशी सनातन प्रभातचा वाचक मेळावा उत्स्फूर्त वातावरणात पार पडला. या मेळाव्यात परळी येथील मागील १०-१२ वर्षांपासूनचे दैनिक सनातन प्रभातचे वाचक आणि हितचिंतक यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. मेळाव्यात दैनिक सनातन प्रभातच्या वतीने सौ. सुनीता दीक्षित, सनातनच्या वतीने सौ. अनिता बुणगे आणि हिंदु जनजागृती समिती आणि हिंदु विधीज्ञ परिषद यांच्या वतीने अधिवक्ता श्री. नीलेश सांगोलकर यांनी मार्गदर्शन केले. 

स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेतून अधिकोष व्यवस्थापकाकडून ७ कोटी ५० लक्षहून अधिक रुपयांचा अपहार

     पुणे, २३ ऑगस्ट - स्टेट बँक ऑफ इंडियाच्या येरवडा शाखेतून अधिकोष व्यवस्थापकानेच ७ कोटी ५० लक्षहून अधिक रुपयांचा अपहार केल्याची घटना उघडकीस आली आहे. (यावरून कोणालाच कायद्याचे भय राहिलेले नाही, हे लक्षात येते ! - संपादक) या प्रकरणी राजेंद्र विनायकराव जोशी यांना अटक करण्यात आली आहे. (इतक्या मोठ्या प्रमाणातील अपहार अधिकोष व्यवस्थापन आणि इतर कर्मचारी यांच्या लक्षात का आला नाही ? अधिकोषांचे लेखापरीक्षण होते कि नाही, याविषयी शंका आल्यास वावगे काय ? या प्रकरणी शासनाच्या अर्थ विभागाने पाळेमुळे शोधून संबंधितांवर कठोर कारवाई होण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. - संपादक) 

वडगाव मावळ (जिल्हा पुणे) येथे गोरक्षक आणि पोलीस यांच्याकडून गोवंशियांची सुटका !

गोवंश हत्याबंदी कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीची आवश्यकता दर्शवणारी घटना !
     वडगाव - येथील मुंबई-पुणे महामार्गावर चाकण येथून मुंबईतील तळोजा महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे २१ ऑगस्ट या दिवशी अवैधरित्या गोवंश नेण्यात येत होते. गोवंश वाहून नेणार्‍या गाडीस पोलिसांनी गोरक्षकांच्या साहाय्याने कह्यात घेतले आणि ६ गोवंशियांची सुटका केली. जगदगुरु संत तुकाराम महाराज गोशाळा संस्थेचे अध्यक्ष श्री. हनुमंत गराडे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वश्री रूपेश गराडे, प्रीतम मेटे, भास्कर सावळे, सागर सुरवसे आणि वडगाव मावळ पोलीस स्टेशन यांनी गोवंशियांची अवैध वाहतूक करणार्‍या गाडीस पकडण्यासाठी सापळा रचला. (गोवंशियांच्या सुटकेसाठी तत्परतेने कृती करणार्‍या गोरक्षक आणि पोलीस यांचे अभिनंदन ! - संपादक)

संभाजीनगर येथे अल्पवयीन मुलीसमवेत अश्‍लील चाळे करणारा धर्मांध शिक्षक पोलिसांच्या कह्यात !

आज छत्रपती शिवाजी महाराज असते, 
तर त्यांनी अशा वासनांधांचा चौरंगाच केला असता ! 
     संभाजीनगर - नागसेन वसाहतीतील सुप्रीम ग्लोबल स्कूलमध्ये शिक्षण घेणार्‍या ८ वर्षीय मुलीसमवेत तेथील धर्मांध शिक्षक अहमद खान अमीन खान (वय ३७ वर्षे) याने अश्‍लील चाळे केल्याचा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर मुलीच्या नातेवाइकांनी शाळेत जाऊन शिक्षकाला चोप देत पोलिसांच्या कह्यात दिले. पीडित मुलगी शाळेतून आल्यापासून पुष्कळ घाबरलेली होती. घरच्यांनी विश्‍वासात घेतल्यावर तिने घडलेला प्रसंग सांगितला. तिला शाळेत आणून शिक्षकांची ओळख परेड घेण्यात आली. या वेळी तिने धर्मांध शिक्षक अहमद याच्याकडे बोट दाखवून त्यानेच गैरकृत्य केल्याचे निदर्शनास आणून दिले.

अंधेरी येथे दमदाटीप्रकरणी ३ रिक्शाचालकांवर गुन्हा प्रविष्ट

     अंधेरी - येथे एका प्रवाशाजवळ गायीच्या चामड्याची बॅग असल्याच्या संशयावरून केलेल्या दमदाटीप्रकरणी पोलिसांनी ३ रिक्शाचालकांवर गुन्हा प्रविष्ट केला आहे. २० ऑगस्टला अंधेरी पश्‍चिम येथील एक तरुण रिक्शातून कार्यालयात जात होता. त्या वेळी रिक्शाचालकाने त्याच्याकडील बॅग गायीच्या चामड्याची असल्याविषयी विचारले. तरुणाने नकार देऊन तो पुढे गेल्यावरही आणखी ३ जणांनी रिक्शासमोर येऊन बॅगेच्या संदर्भात विचारणा केली. या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली होती.

भगवान श्रीकृष्णाचे अस्तित्व अनुभवलेल्या काही स्थानांचे छायाचित्रात्मक दिव्यदर्शन !गोपी रमल्या परमानंदी, श्रीहरीशी भावानुबंध अनुभवती क्षणोक्षणी ।
शिकवली सकळांस मधुराभक्ती, पदस्पर्शाने तयांच्या भूमी ही धन्य जाहली ॥
श्रीकृष्णासम सखा, गुरु, माय-बाप कोणी नाही, हे जो जाणतो, तो खरा भक्त ! भगवान श्रीकृष्णाला अनन्यपणे शरण जाणारा भक्त संसारसागरातून मुक्त होतो. श्रीकृष्णाप्रती उत्कट भाव वाढवण्यासाठी त्याच्या दिव्य जीवनाशी निगडित गोकुळ, वृंदावन आणि द्वारका या दैवी क्षेत्रांची छायाचित्रे येथे दिली आहेत. या छायाचित्रात्मक कृतज्ञतेच्या माध्यमातून श्रीकृष्णाचे अस्तित्व अनुभवण्याचा प्रयत्न करूया !

गायत्री मंत्र आणि आयुर्वेद !

     कित्येक दुकानांत सकाळी पूजा वगैरे झाल्यावर मांगल्यमय वातावरण निर्माण करण्याकरता काही मंत्र लावले जातात. दुर्दैवाने यात विचित्र चालीत बसवलेला गायत्री मंत्रही असतो. विचित्र चाल असे म्हणायचे कारण म्हणजे मुळात गायत्रीला स्वतःची अशी लय आहे; तिला उसनवारीची आवश्यकताच नाही. त्यातही गायत्री मंत्राचा जप करतांना जीभ आणि ओठदेखील न हलवता मनातल्या मनात करायचा आहे, असे शास्त्र सांगत असतांना बॉलिवूड गाण्याच्या धर्तीवर तो मंत्र लावून आपण काय साध्य करतो बरं ?

अंध सूरदासांच्या श्रीकृष्णाप्रती असलेल्या अनन्य भक्तीचे दर्शन !

गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी
१. पुजारी, अर्चनक (पूजा करणारा) आणि गोस्वामी यांच्या मुलांत 
एक दिवस सूरदासांच्या अद्भुत प्रतिभेविषयी चर्चा होणे
     सूरदासांनी प्रभु श्रीकृष्णाची नित्यनूतन पदांनी शब्दपूजा बांधण्याचा आपला क्रम चालू केला. पुजारी, अर्चनक (पूजा करणारा) आणि गोस्वामी यांच्या मुलांत एक दिवस सूरदासांच्या अद्भुत प्रतिभेविषयी चर्चेस प्रारंभ झाला, सूक्ष्म आणि व्यापक बुद्धीमत्ता असणार्‍या सूरदासांना अंतर्दृष्टी असलीच पाहिजे. त्याविना का ते भगवंताच्या नित्यनूतन शृंगाराचे तंतोतंत वर्णन करतात ? सूरदास आंधळे आहेत, तरी ते श्रीकृष्णप्रभूचा पोषाख, अलंकार, भूषणे, पुष्पे इत्यादींचे बारकावेसुद्धा पदातून गातात. कसे जमते त्यांना ?

ज्ञानेश्‍वरादी भावंडांचा विलक्षण छळ झाला, हे खरे आहे का ?

संत ज्ञानेश्‍वर महाराज यांची आज जयंती. त्यानिमित्ताने...
      समस्त वारकरी भक्त ज्ञानेश्‍वरांचे अलौकिक व्यक्तीमत्त्व आणि त्यांचे दिव्यातिदिव्य सारस्वत यांनी विनम्र झाले. आमच्या समस्त महाराष्ट्र्र समाजाला ज्ञानेश्‍वरादी भावंडांचा विलक्षण छळ झाला, असल्या क्षुद्र तामसी शंका कधीच स्पर्शत नाहीत. हे सगळे तामसी आंग्लाळलेल्यांनी (त्यांनाच गौरवाने अभिजन म्हणतात, म्हणजे निधर्मी, नास्तिक, आग लावणारे) वाद निर्माण केले आहेत आणि ब्राह्मणवर्गावर प्रचंड चिखलफेक करण्यात अनेकांनी हातभार लावलेला आहे.
१. छळासंबंधी पुरावे नसणे
     ब्राह्मणांनी ज्ञानेश्‍वरादी भावंडांना अन्नच नव्हे, पाणीही मिळू दिले नाही. त्यांचा भयानक छळ केला. त्याचे अगदी पुसटसे प्रतिबिंबही ज्ञानेश्‍वरी अथवा त्यांच्या अभंगादी वाङ्मयात का उमटले नाही ? संशोधकांनी जी ज्ञानेश्‍वर चरित्रे लिहिली आहेत, त्यांत ज्ञानेश्‍वरांचा विलक्षण छळ इत्यादी झाल्यासंबंधात काही पुरावे आहेत का ? ज्ञानेश्‍वर चरित्र आणि वाङ्मय यांसंदर्भातील ख्यातनाम अशा अभ्यासपूर्ण ग्रंथांत छळासंबंधी तसे पुरावे आढळत नाहीत.
   धर्माचरणाच्या अभावामुळे ऋतु, वृष्टी, वायू, औषधी नष्ट होऊन पर्यावरणाचे संतुलन बिघडते. - शिवनारायण सेन, सचिव, राष्ट्र-धर्म प्रचार सभा, बंगाल

ताप, पश्‍चाताप आणि मनस्ताप !

तुम्हाला ताप आला आहे का ? मग हा लेख नक्की वाचा. ताप आल्यावर आपण अगदी न चुकता ज्या चुका अगदी बरोबर करतो त्या चुका दाखवणारा आणि समजावून त्यावर उपाय सांगणारा हा लेख.
१. ताप आल्यावर पॅरासिटामॉल घेणे, हा तात्पुरता उपाय !
    ताप ! तुम्हा-आम्हा सर्वांना परिचयाचा असलेला आजार ! यापूर्वी प्रत्येकाने अनुभवलेला. आयुर्वेदात तापास सर्वरोगाधिपती, बलि अशा अनेकविध विशेषणांनी गौरवून इतर कोणत्याही रोगाचे नाही इतके सविस्तर वर्णन केलेले दिसते. तर असा हा परवलीचा झालेला ताप आला रे आला की, आपल्यापैकी बहुतेकांनी पॅरासिटामॉल (Pracetamol) नावाची तलवार (औषध) काढलीच समजा ! आणि मग तो ही बिचारा तिला बघून दबून बसणार किंवा तात्पुरता का होईना निघून जाणार, हेही नित्याचेच ! आपण मात्र त्यास पराभूत केल्याच्या (भ्रामक) आविर्भावात रहातो. ताप आला असता पाळायचे सर्वसाधारण नियम धाब्यावर बसवून आपल्या नेहमीची कामे करत रहातो. कधी नाईलाजस्तव, कधी जाणूनबुजून दुर्लक्ष करून, तर कधी अज्ञानामुळे. होते असे की, जर दुसर्‍या एखाद्या आजारासमवेत ताप लक्षण म्हणून आला असेल, तर कदाचित् तो निमूटपणे निघूनही जाईल; मात्र जेव्हा तो एक स्वतंत्र व्याधी म्हणून येतो तेव्हाही त्याकडे दुर्लक्ष केले अथवा बलपूर्वक पॅरासिटामॉल नावाचे अ‍ॅन्टीबायोटिक्स आदींचा मारा करून त्याला शरीराबाहेर थोपवून धरण्याचा प्रयत्न केला, तर मात्र वेळ मिळताच संधी साधून तो यथावकाश डोके वर काढतोच.

प.पू. डॉक्टर कृष्ण नसल्याचे आणखीन एक विश्‍लेषण

श्रीकृष्ण जयंतीच्या निमित्ताने....
      अनेकदा सांगूनही काही साधकांना वाटते, प.पू. डॉक्टर कृष्ण आहेत. त्यांनी हे समजून घेतले पाहिजे की, मी केवळ कृष्णाचा सूक्ष्मातील निरोप स्थुलातून देणारा आहे. राजाच्या निरोप देणार्‍याला कोणी राजा म्हणत नाही, तसेच कृष्णाचा निरोप देणार्‍याला कृष्ण समजणे अयोग्य आहे. - (परात्पर गुरु) डॉ. आठवले 
   सध्याचे पुरोगामी हे जनतेची पिळवणूक करून गरिबांना लुटून श्रीमंत झाले आहेत. आता असलेले पुरोगामी हे छत्रपती शिवाजी महाराज आणि सनातन संस्था यांच्या विरोधात बोलतात ! - अधिवक्ता श्री. संजीव पुनाळेकर, हिंदु विधीज्ञ परिषद

धर्मसिद्धांत, स्त्रिया यांविषयी असलेल्या चुकीच्या धारणांमुळे ख्रिस्ती आणि मुसलमान पंथ स्वत:च संपण्याच्या मार्गावर आहेत. युरोपमध्ये चर्च ओस पडत आहेत. - प्रा. कुसुमलता केडिया, संचालिका, धर्मपाल शोधपीठ, भोपाळ


सैराटप्रेमींचा अतिरेक कुठवर चालणार ?

    अति तिथे माती अशी आपल्याकडे एक अनुभवसिद्ध म्हण आहे. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईटच असतो. पुढील पिढीने आपल्या अनुभवातून शिकावे, या व्यापक हेतूने मागच्या पिढीने ४ हिताच्या गोष्टी सांगितल्या आहेत. दुर्दैवाने आपल्याला त्याचा विसर पडलेला दिसतो. सैराट चित्रपटाच्या संदर्भात हे तंतोतत लागू पडते. सैराट चे नाव काढताच त्या चित्रपटाच्या समर्थकांच्या भुवया कदाचित् उंचावतील. आधीच या चित्रपटावर कारण नसतांना चिखलफेक झाली आणि आता काय सांगणार ? असा अज्ञानमूलक प्रश्‍नही त्यांना पडेल. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर त्याच्यातील घटकांचे अनेक पैलूंतून समीक्षण झाले. दुष्परिणामांची चर्चाही झाली. सैराटवेड्यांनी मात्र त्यातील काहीच मनावर घेतले नाही, असे दिसते. या मानसिकतेतून बाहेर येऊन चित्रपटामुळे होणार्‍या परिणामांकडे डोळसपणे पहाण्याची आवश्यकता पुन्हा पुन्हा निर्माण होत आहे.

श्रीकृष्णाला अनन्यभावाने शरण आलेली गोपी !

केवळ नि केवळ तूच रे माझा गोविंद !

कु. कनकमहालक्ष्मी देवकर
केवळ नि केवळ तूच रे माझा गोविंद । 
तुझ्याच स्मरणात ठेव रे या
कनकदासीला ॥

नको रे कान्हा अडकवू
मोह-मायाबाजारी । 
तुझे मनोहर स्मरण टिकवू
कसे अंतरी ॥ १ ॥

देवा रे या जीवनात आहेस केवळ तूच ।
क्षणोक्षणी जाणीव ठेव रे मम अंतरी ॥
षड्रिपू नष्ट कर तू याच क्षणी ।
त्याच आनंदाने निवास करी निरंतरी ॥ २ ॥

कृष्ण, कृष्ण करता कृष्णमय मी झाले रे ।

सौ. शालिनी मराठे
मनपुष्प माझे तुझ्या चरणी अर्पियले ।
दिव्य प्रीतीच्या धारांनी मन
चिंब भिजले रे ।
तुजविण आता माझे कुणी
नाही उरले रे ॥ १ ॥

दुःख, दैन्य, चिंता, भीती सारे पळाले ।
अज्ञान, अपेक्षा, आकांक्षा सारे
सोडून गेले ।
जिकडे जावे, तिकडे कृष्णा, तूच दिसशी रे ॥ २ ॥

अनुसंधान अखंड राहो कृष्णाशी !

सौ. प्रेरणा हजारे
काव्यास्तव मिळे जी प्रेरणा,
ती आहे कृष्णाची ।
श्‍वासातही उरे केवळ तीच प्रत्येक ओळ त्याच्या स्मरणाची ।
प्रीत ती लावे वेड मजला आस लागली भक्तीची ।
अनुसंधान अखंड राहो कृष्णाशी
इच्छा एकच या जिवाची ॥
श्रीकृष्णार्पणमस्तु ।
- सौ. प्रेरणा हजारे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.(१४.७.२०१६)

चराचरांत वसलास तू ।

श्रीकृष्णा, हृदयात तू मनात तू ।
पुढे-मागे सदा असतोस तू ॥ १ ॥

भक्तीभावाचे मंथन तू ।
चराचरांत वसलास तू ॥ २ ॥

भावाचा भुकेला असतोस तू ।
मनात तू, ध्यानात तू ॥ ३ ॥

कृष्णाई !

कु. आरती सुतार
दया करणारी कृष्णाई ।
कृपाही करणारी कृष्णाई ।
तारणारीही कृष्णाई ॥ १ ॥

मुळात कृष्णाईच सर्वकाही आहे ।
मग तिला इथे-तिथे का शोधू ।
जिचा सर्वांच्याच हृदयात
श्‍वास असतो ॥ २ ॥

अशा कृष्णाईला कोण बरे
नाही म्हणणार ।
तिच्याच सहवासाने घडतो प्रत्येकाचा क्षण ।
अशा कृष्णाईची हवी आहे साथ जन्मोजन्मी ॥ ३ ॥

आहे केवळ निरपेक्ष प्रेम ।
आहे केवळ प्रेमाचाच श्‍वास ॥ ४ ॥
       कृतज्ञ, कृतज्ञ, कृतज्ञ !
- देवासाठी सतत तळमळणारी कु. आरती सुतार, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२९.८.२०१४)

लागो मला तुझा ध्यास कृष्णा ।

सौ. अनघा जोशी
श्‍वास कृष्णा, आस कृष्णा ।
लागो मला तुझा ध्यास कृष्णा ॥ १ ॥

तुझ्या प्रेमात चिंब भिजू दे, तुझ्या रंगात रंगू दे कृष्णा ॥
कर्तेपणाचे ओझे वाहूनी, दुःखी मी झाले रे कृष्णा ॥ २ ॥

वाढू दे माझा भक्तीभाव कृष्णा ।
मला आनंदाच्या डोहात डुंबू
दे कृष्णा ॥ ३ ॥

कशी शोधू तुला केशवा या मायाजाळात ?

तू या जगाचा उद्धारक आहेस ।
हे माझ्या मनास पटले आहे ।
तूच ईश्‍वर आहेस ।
हे रहस्य मला कळले आहे ॥ १ ॥

पण तुझ्यापर्यंत येण्याच्या वाटेवर ।
माझे पाय वळले नाहीत ॥
मायेतच ब्रह्म शोधायचे ।
हे मर्म मला समजावून सांगितलेही आहेस ॥ २ ॥

भक्त आणि भगवंत !

सौ. गार्गी मळेवाडकर
मी : श्रीकृष्णा किती सुंदर तुझे चरण । 
श्रीकृष्ण : ठाऊक आहे का
तुज याचे कारण ।
मी : तू करतोस धर्माचे रक्षण आणि अधर्माचे ताडण; म्हणून सुंदर तुझे चरण । 
श्रीकृष्ण : नाही, तू माझी भक्त आहेस; म्हणून सुंदर माझे चरण । 
- श्रीकृष्णाची गार्गी (सौ. गार्गी गुरुप्रसाद मळेवाडकर), बांदा, तालुका सावंतवाडी, जिल्हा सिंधुदुर्ग. (२८.२.२०१४) 
कृष्णा, तुझ्या प्राप्तीची तळमळ या जिवास लागू दे ।

        वरील कवितेचे टंकलेखन करतांना मला पुढील कविता सुचली. 
नसे ईश्‍वरप्राप्तीची तळमळ माझ्या मनात ।
हा जीव मृतवत् होऊ दे त्या क्षणात ॥ १ ॥
कृष्णा, तवचरणी श्रद्धा दृढ होऊ दे ।
तुझ्या प्राप्तीची तळमळ या जिवास लागू दे ॥ २ ॥
- सौ. भारती बागवे, अमेरिका (५.३.२०१४)

कृष्णा, ईश्‍वरप्राप्तीची तळमळ निर्माण करी या जिवात ।

सौ. शरण्या देसाई
एका माशाला जगण्यासाठी ।
जशी पाण्याची असते तीव्र आस ॥
कृष्णा, एवढी ईश्‍वरप्राप्तीची तळमळ ।
निर्माण करी या जिवात ॥ १ ॥

तुझ्याविना या जिवात । 
नाहीच राहिला प्राण ॥
अशी सतत जाणीव ।
होऊ दे या जिवास ॥ २ ॥

संस्कृत भाषेची आवड असणारा आणि प्रेमभावाने सर्वांची मने जिंकणारा ५५ टक्के आध्यात्मिक पातळीचा उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला कु. केदार कदम (वय १२ वर्षे) !

कु. केदार कदम
       श्रावण कृष्ण पक्ष सप्तमी (२४.८.२०१६) या दिवशी कु. केदार कदम याचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्याचे नातेवाइक आणि साधक यांना त्याची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये पुढे देत आहोत.
कु. केदार कदम याला वाढदिवसानिमित्त 
सनातन परिवाराच्या वतीने शुभाशीर्वाद !
१. श्री. संतोष कदम (केदारचे वडील), ठाणे
१ अ. केदार लहानपणापासूनच हसरा आहे.
१ आ. चांगली आकलनक्षमता :
त्याची ग्रहणक्षमता आणि आकलनक्षमता पुष्कळ चांगली आहे. तो प्रत्येक गोष्ट सर्वांगाने विचार करून समजून घेतो. तो पहिल्यापासूनच अभ्यासातही हुशार आहे.
१ इ. उत्तम वक्तृत्व : त्याचे वक्तृत्व चांगले आहे. कुणासमोर काही विषय मांडायचा असेल, तर तो निर्भीडपणे मांडतो. शाळेत त्याला वक्तृत्वाच्या स्पर्धेत पारितोषिकेही मिळाली आहेत. एकदा शाळेत त्याला लोकमान्य टिळकांवर भाषण करायचे होते. त्याचे स्पष्ट उच्चार आणि उत्तम वक्तृत्व यांमुळे ते पालकांना एवढे आवडले होते की, काही पालकांनी स्वतःच्या भ्रमणभाषवर त्याचे चलत्चित्र सिद्ध करून ते व्हॉट्स अ‍ॅपवरून इतरांनाही पाठवले.

सेवाभावी आणि प्रेमभावामुळे अल्प कालावधीत साधकांशी जवळीक साधणारे डॉ. उज्ज्वल कपाडिया !

डॉ. उज्ज्वल कपाडिया
      श्री. उज्ज्वल कपाडिया रामनाथी आश्रमात वैद्यकीय विभागात सेवा करतात. त्यांचा २४.८.२०१६ (श्रावण कृष्ण पक्ष सप्तमी) या दिवशी तिथीनुसार वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांची बहीण कु. भाविनी कपाडिया यांना त्यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये देत आहोत.
श्री. उज्ज्वल कपाडिया यांना वाढदिवसानिमित्त 
सनातन परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा !
१. प्रेमभाव
      उज्ज्वलमधील प्रेमभावामुळे रुग्ण साधकांना त्याचा आधार वाटतो. तो आश्रमात आल्यानंतर काही मासांतच त्याने आश्रमातील साधकांची मने जिंकली आहेत. तो आश्रमात येता-जाता रुग्ण साधकांची विचारपूस करतो. ते औषध घेत आहेत ना ?, याचा तो प्रेमाने पाठपुरावा करतो. बालसाधकही सहजतेने त्याच्याकडे येऊन बोलतात. एकदा रुग्ण साधकांविषयी बोलतांना त्याने सांगितले, प.पू. डॉक्टरांनी त्यांच्या रुग्णांचा पाठपुरावा केला; म्हणूनच त्यांना आध्यात्मिक विश्‍वाविषयी समजले. आपल्यासमोर प.पू. डॉक्टरांचा आदर्श असल्याने त्यांनी केले ते आपण केलेच पाहिजे.

आध्यात्मिक त्रास असह्य झाल्यावर कृष्ण आहे, असा भाव ठेवून त्रास सोसतांना प्रत्यक्ष कृष्णच उपाय करत आहे, असे जाणवणे आणि कृष्णस्पर्शाने मन आनंदी होऊन अनुभूती येणे

कु. गायत्री बुट्टे
१. वाईट शक्तींचे सूक्ष्मातून आक्रमण आणि त्यानंतर केलेले प्रयत्न 
१ अ. वाईट शक्तींच्या त्रासामुळे संपूर्ण शरिरात विचित्र संवेदना जाणवणे : ९.१.२०१५ या दिवशी पहाटे मला अकस्मात् मळमळू लागले आणि डोक्यात मुंग्या येऊ लागल्या. माझ्या शरिरातील रक्त आणि पाणी यांचे प्रमाण न्यून होत असल्यासारखे वाटले. संपूर्ण शरिरात काहीतरी विचित्र संवेदना जाणवून त्रास असह्य होऊ लागला. त्या वेळी हे वाईट शक्तींचे आक्रमण असावे, असे मला जाणवले.
१ आ. भाव ठेवून उपाय केल्यावरही त्रासाचे प्रमाण न्यून न होणे आणि कोणी साहाय्याला नसल्याने एकटे वाटणे : मी त्रासावर नामजप करू लागले. मनातून माझ्या दोन्ही पायांच्या बोटांच्या मुळाशी चैतन्याने बिंदूदाबन होत आहे आणि प्रत्येक केसाच्या मुळाशी चैतन्याची वलये निर्माण होत आहेत, असा भाव ठेवला. असे करूनही अत्यल्प प्रमाणात चैतन्य ग्रहण होत असल्याने देहातील काळ्या शक्तीचा त्रास दूर करायला ते अपुरे पडत होते आणि त्रासाचे प्रमाण न्यून होत नव्हते. घरातील व्यक्तींना आध्यात्मिक त्रासाविषयी काही ठाऊक नसल्यामुळे मी त्यांना आध्यात्मिक उपाय करून मला साहाय्य करा, असे सांगू शकत नव्हते. त्यामुळे मला एकटेही वाटत होते.

बुद्धीप्रामाण्यवाद्यांनो, आम्हाला सर्व कळते, हा अहंभाव सोडून अभ्यास करा !

पुनर्जन्माविषयीचे संशोधन
१. पुनर्जन्माविषयी ८० टक्के व्यक्तींची माहिती खरी आढळणे
    पुनर्जन्माविषयी दावा सांगणारे जे पुरावे उपलब्ध झाले आहेत, त्यांना वस्तुस्थितीचा भक्कम आधार आहे. जरी त्याविषयी कसे आणि काय या प्रश्‍नांची उत्तरे देता येत नसली; तरी राजस्थान अन् उत्तरप्रदेश यांत ५००हून अधिक व्यक्ती आढळल्या आहेत, ज्यांच्या उपरोक्त दाव्याविषयी गेल्या काही वर्षांमध्ये नीट अभ्यास झाला आहे. ८० टक्के व्यक्तींची पुनर्जन्माविषयी माहिती खरी निघाली आहे.
२. सामान्यतः मूल कोणत्या वर्षी पुनर्जन्माविषयी गोष्टी बोलते ?
    सामान्यतः वय २ ते ५ वर्षे या टप्प्यात मूल पुनर्जन्माविषयी गोष्टी बोलू लागते. त्यानंतर त्या विषयाची स्मृती पुष्कळ जणांत पुसट होऊ लागते.
३. आशिया खंडातील पुनर्जन्माच्या घटना
    आशिया खंडातील देशांमध्ये म्यानमारमध्ये (ब्रह्मदेशामध्ये) अशा व्यक्तींचा आकडा सर्वाधिक (३७७) आणि त्याच्या खालोखाल हिंदुस्थानात (३०६) आढळला.
(मासिक प्रज्ञालोक, जून १९८५)

भेट द्या हो चित्त-मनाने, रामनाथी मंदिरास (आश्रमास) ।

श्री. यज्ञेश सावंत
या रामनाथीच्या मंदिरी ।
कलियुगी वैकुंठ अवतरले भुवरी ॥ १ ॥
मूर्ती भगवंताची शेषशायी ।
देवता येथे ध्यानमंदिरी निवास करी ॥ २ ॥
दगडासह प्रत्येक व्यक्ती येथे चैतन्याने बहरली ।
आत्मोन्नती साधण्यासाठी तळमळ असे सारी ॥ ३ ॥
कणाकणांत साठवला भावभक्तीचा सुगंध ।
संत-सद्गुरु-महर्षींच्या अस्तित्वाचा अद्भुत गंध ॥ ४ ॥
संत भक्तराजकृपे आश्रमाचा पाया घडला ॥
महर्षिकृपेने कळस चढवला ॥ ५ ॥
अशी ही दैवदुर्लभ भूमी ।
सप्तलोकांचा मार्ग दावी ॥ ६ ॥
अनुभवण्या चैतन्य-आनंदाच्या ठेव्यास ।
भेट द्या हो चित्त-मनाने रामनाथी मंदिरास (आश्रमास) ॥ ७ ॥
- श्री. यज्ञेश सावंत, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१७.८.२०१६) 

प्रसंगाकडे कसे बघतो, यावरून त्याचा मनावर होणारा परिणाम ठरणे

श्री. राम होनप
       पाऊस येऊ लागल्यावर मोर आनंदाने थुई थुई नाचतो, तर फुले डोलू लागतात. तेव्हा काही जण निसर्गातील सृष्टीसौंदर्य अनुभवतात. भाव असलेल्या साधकाला पर्जन्यदेवतेचे आगमन झाले आहे, असे वाटते. अशांना पावसाळा हवासा वाटतो. कुणाला पावसाने कामे अडून रहातात, तसेच आता कपड्यांना आणि भिंतींना बुरशी येणार, या विचारांनी पाऊस नकोसा वाटतो. प्रसंगाकडे कोण कसे बघतो, यावरून त्याचा मनावर होणारा परिणाम ठरतो, हे लक्षात येते.
गुरु शिष्यातील अहं वाकवण्याचे 
(नष्ट करण्याचे) कठीण कार्य करत असणे
       एक वेळ लोखंडाला वाकवणे सोपे; पण मनुष्यातील अहंला वाकवणे (न्यून करणे) कठीण, हे कठीण कार्य गुरु करत असतात.
- श्री. राम होनप, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२१.७.२०१६)

सनातन धर्म राज्याच्या निर्मात्याचा जयजयकार झाला ।

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले 
यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त...
माता नलिनी (टीप १) आली ।
बाळ येण्याची चाहूल लागली ।
देव-देवतांना संतुष्टता आली ॥ १ ॥
वैशाख सप्तमी दिन उगवला ।
श्रीविष्णुच (टीप २) पृथ्वीवर अवतरला ।
पिता बाळाजी (टीप ३) धन्य ते झाले ॥ २ ॥

धडाडीचे गोरक्षक श्री. सतीश प्रधान यांच्या अटकेच्या पार्श्‍वभूमीवर पुणे येथील गोसेवकांनी दिलेल्या प्रतिक्रिया

गायीला आपली माता समजा !  
- श्री. नितीन वाटकर, गोवंश रक्षा 
समितीचे पिंपरी-चिंचवड समन्वयक
        भारत हा माझा देश आहे, असे समजणार्‍या प्रत्येकाने गायीला आपली माता समजावे. पंतप्रधान नरेंद्र मोदी याप्रमाणे वागत नाहीत. त्यांनी ८० टक्के गोरक्षक हे समाजकटंक असल्याचे केलेले विधान पूर्णतः चुकीचे आहे. भ्रष्टतेचा नियम भाजपला लावायचा झाला, तर पक्षातील ८० टक्के लोकप्रतिनिधी भ्रष्ट असल्याचे म्हणावे लागेल. 

उठा ऽऽ जाग्रत ऽऽऽ उठा ऽऽ जाग्रत ऽ ।

युद्ध आहे हे, जाग्रत ।
युद्ध नव्हे तर धर्मयुद्ध हे ऽऽ ।
लढण्यासाठी सिद्ध व्हा ऽ जाग्रत ॥ १ ॥
रणगाडे विस्फोटक नव्हे, तर क्षात्रतेज ।
बंदूक-नीती नव्हे, तर ब्राह्मतेज ।
हृदयाचे चिलखत करू जाग्रत ॥ २ ॥
शत्रू आहे बलाढ्य निद्रिस्त हिंदूंनो ।
जनजीवन शत्रू संहारक युद्ध हे ऽऽ ।
गुरुकृपेची तलवार धरू, जाग्रत ॥ ३ ॥
वाट लाविती शत्रू आमुचे, लचके तोडिती ।
तोफ नामजपाची करू, साहसाने न युद्ध ।
अध्यात्माने साधिती कार्ये ध्येय एकची जाग्रत ॥ ४ ॥

फलक प्रसिद्धीकरता

गोमांसभक्षणाचे समर्थक आता गप्प का ?
      पतंजलीच्या उत्पादनांविषयी विचारण्यात आलेल्या प्रश्‍नावर उत्तर देतांना दारुल उलूमच्या मुफ्तींच्या खंडपिठाने फतवा काढला आहे. याद्वारे मुसलमानांनी गोमूत्राचा वापर करण्यात आलेले कोणतेही उत्पादन वापरू नये, असे म्हणण्यात आले आहे.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

जसे श्रीकृष्णाचे निर्दोषत्व सिद्ध झाले, तसेच सनातनच्या साधकांचेही होईल !
परात्पर गुरु डॉ. आठवले
      'जेथे भगवान श्रीकृष्णावरही स्यमंतक मणी चोरल्याचा आळ आला, तेथे सनातनच्या साधकांवर हत्येचे आरोप आले, तर त्यात आश्‍चर्य ते काय ! पुढे जसे श्रीकृष्णाचे निर्दोषत्व सिद्ध झाले, तसेच सनातनच्या साधकांचेही होईल !'
 - (परात्पर गुरु) डॉ. आठवले

हिंदू तेजा जाग रे !

Jago !
       Darul Uloomka fatwa- Patanjali utpadome gomutra ho, to Musalman unka upyog na kare.
Khanpan ko vyaktigat vishay batanewale secularwadi is par chup kyu?
जागो !
       दारुल उलूम का फतवा - पतंजलि उत्पादों में गोमूत्र हो, तो मुसलमान उनका उपयोग न करें ।
खान-पान को व्यक्तिगत विषय बतानेवाले सेक्युलरवादी इसपर चुप क्यों ?
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥
या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो. - प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

बोधचित्र

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

सद्गुरूंचा शोध घेऊ नये !
    खराखुरा सद्गुरु लाभणे, ही सुकृतावर आधारित गोष्ट आहे. आपल्या संचितानुसार योग्य वेळी सद्गुरूंची भेट होते. वृथा शोध घेऊ नये.
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज
सनातनचे श्रद्धास्थान
अढळपद
       अशा ठिकाणी बसा की, तुम्हाला जिथून कोणी ऊठ म्हणून सांगणार नाही. असे बोला की, हे खोटे आहे असे कोणी बोलणार नाही.
भावार्थ :
ब्रह्मस्थितीला पोहोचल्यावर ऊठ असे म्हणायला दुसरा कोणी उरतच नाही आणि ती सर्वव्यापी अवस्था असल्याने तिथून उठायचा प्रश्‍नच निर्माण होत नाही. हे खोटे आहे असे कोणी बोलणार नाही, असा बोलण्याचा विषय म्हणजे ब्रह्माची किंवा परमेश्‍वराची अनुभूती. मायाच खोटी असल्याने मायेतील सत्य बोलणेही खोटेच असते.
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.)

बागुलबुवा नव्हे, तर सत्य !


   सरसंघचालकांच्या हिंदूंना लोकसंख्या वाढवण्यास कोणी रोखले आहे, या विधानावर सर्व स्तरांतून पडसाद उमटणे स्वाभाविक होते आणि तसे ते उमटलेही. दायित्व असलेल्या व्यक्तीने किती विचारपूर्वक बोलले पाहिजे, हे यातून परत अधोरेखित झालेे. सरसंघचालकांनी हिंदूंच्या अस्तित्वरक्षणासाठी सांगितलेला उपाय जरी अयोग्य असला, तरी त्याला खोडून काढणारी साम्यवादी आणि निधर्मी यांनी मांडलेली सूत्रे मात्र पूर्णतः फसवी आहेत आणि त्यासाठी त्याचा समाचार घ्यायलाच हवा. गोबेल्स नीतीप्रमाणे बुद्धीवादी हिंदूंना ती खरी वाटू नयेत, त्यासाठी हा पंक्तीप्रपंच.
  सरसंघचालकांच्या विधानाला विरोध करतांना तथाकथित बुद्धीवादी प्रामुख्याने दोन सूत्रे पुढे करत आहेत. त्यातील एक म्हणजे जिथे विकासदर अधिक आहे, तिथे लोकसंख्येचा दर घटतो, हे राज्यांच्या लोकसंख्यादरावरून सिद्ध होत असल्याने विकासदर वाढवा आणि दुसरे म्हणजे जनगणनेतील आकडेवारी जरी मुसलमानांची लोकसंख्या वाढलेली दाखवत असली, तरी ती न पहाता राज्यनिहाय हिंदूंच्या तुलनेतील वाढ आणि घट पहा. हे म्हणजे शब्द आणि आकडेवारी यांच्या खेळाच्या फिरवाफिरवीत बुद्धीवादी हिंदूंना भुलवणे आहे. ही सूत्रे फोलपणा दर्शवणारी कशी आहेत, ते पाहूया.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn